हय येशु ख्रिस्त नि पूर्वजस्नी नावस्नी यादी शे. तो राजा दाविद ना वंश ना शे आणि जो अब्राहाम ना वंश शे. अब्राहाम ना पोऱ्या इसहाक, इसहाक ना पोऱ्या याकोब, आणि याकोब ना पोऱ्या यहूदा, आणि तेना भाऊ हुयनात. यहूदा ना पोऱ्या पेरेस आणि जेरह हुयनात, तामार एस्नी माय होती, आणि पेरेस ना पोऱ्या हेस्रोन, आणि हेस्रोन ना पोऱ्या अराम हुयना. आणि अराम ना पोऱ्या अम्मीनादाब, आणि अम्मीनादाब ना पोऱ्या नहशोन, आणि नहशोन ना पोऱ्या सल्मोन हुयना. सल्मोन ना पोऱ्या बवाज हुयना तेनी माय राहेब होती. आणि बवाज ना पोऱ्या ओबेद हुयना, आणि तेनी माय रूथ होती. राहेब आणि रूथ यहुदी नई होत्यात. आणि ओबेद ना पोऱ्या इशाय हुईना. आणि इशाय ना पोऱ्या दाविद राजा, आणि दाविद ना पोऱ्या शलमोन, त्या स्त्री पासून उत्पन्न हुयना जी पयले उरीयानी बायको होती. शलमोन ना पोऱ्या रहबाम, आणि रहबाम ना पोऱ्या अबिया, आणि अबिया ना पोऱ्या आसा हुयना. आणि आसा ना पोऱ्या यहोशाफात, आणि यहोशाफात ना पोऱ्या योराम, आणि योराम ना पोऱ्या उज्जीया हुयना. आणि उज्जीया ना पोऱ्या योताम, आणि योताम ना पोऱ्या आहाज, आणि आहाज ना पोऱ्या हिज्कीया हुयना. आणि हिज्कीया ना पोऱ्या मनश्शे, आणि मनश्शे ना पोऱ्या आमोण, आणि आमोण ना पोऱ्या योशीया हुयना. योशीया, यखन्या आणि तेना भावूस्ना आजोबा होता. जो इस्त्राएल देश ना लोकस्ले बाबेल मा बंदी बनाईसन लीजावा ना पयले उत्पन्न हुयेल होतात. बंदी बनाईसन तेस्ले लीजावा ना टाईम पासून येशु ना जन्म लोंग, तेना पूर्वज या शेतस, यखन्या ना पोऱ्या शल्तीएल, आणि शल्तीएल ना पोऱ्या जरुब्बाबेल हुयना. आणि जरुब्बाबेल ना पोऱ्या अबिहूद, आणि अबिहूद ना पोऱ्या एल्याकीम, आणि एल्याकीम ना पोऱ्या अज्जुर हुयना. आणि अज्जुर ना पोऱ्या सदोक, आणि सदोक ना पोऱ्या याखीम, आणि याखीम ना पोऱ्या एलीहूद हुयना. आणि एलीहूद ना पोऱ्या एलाजार, आणि एलाजार ना पोऱ्या मत्तान, आणि मत्तान ना पोऱ्या याकोब हुयना. आणि याकोब ना पोऱ्या योसेफ हुयना, जो मरिया ना नवरा होता, आणि मरिया येशु नि माय होती, जो (येशु ले) ख्रिस्त सांगावस. अब्राहाम पासून दाविद लगून सर्वा चौदा पीडी हुयनात. राजा दाविद ना टाईम पासून त्या टाईम लोंग जव इस्त्राएल देश ना लोकस्ले बंदी बनाईसन बाबेल लीग्यात, तठलोंग चौदा पिढ्या हुयनात. आणि बंदी हुईसन बाबेल ले पोहचाळा ना टाईम पासून ख्रिस्त लोंग चौदा पिढ्या हुयनात. येशु ख्रिस्त ना जन्म होवाना पयले ह्या प्रकारे हुयन, कि जव तेनी माय मरिया नि मांगणी योसेफ संगे हुईगी त तेस्ना लग्न होवाना पयले, जव ती कुवारी होती, तव ती पवित्र आत्मा ना सामर्थ्य ना द्वारे गर्भवती हुयनी. योसेफ, तीना नवरा एक धर्मी माणुस होता आणि तिले सार्वजनिक रूप शी बदनाम करानी ईच्छा नई होती, एनासाठे तेनी चुपचाप आपली मांगणी तोळाना निर्णय (कारण ती लग्न ना पयलेच गर्भवती दिखनी जे नियम ना विरुद्ध मा शे) करना. जव तेना ध्यान ह्या गोष्टीस्ना विचार माच होतात परमेश्वर ना दूत तेले स्वप्न मा दिखीसन सांगू लागणा योसेफ, राजा दाविद ना वंश तू मरिया ले आपली बायको बनावाले भ्यावू नको कारण कि तीना गर्भ मा शे तो पवित्र आत्मा ना सामर्थ्य कण शे. ती धाकला पोऱ्या ले जन्म दिन आणि तू तेना नाव येशु ठेवजो, कारण कि तो आपला लोकस्ले तेस्ना पापस पासून वाचाळीन. हय सगळ एनासाठे हुयन कारण ते सर्व पूर्ण होवो जे परमेश्वर नि यशया भविष्यवक्तास्ना व्दारे येशु ना जन्मा ना विषय मा सांगेल होत. यशया नि ह्या प्रकारे लिख. देखा एक कुवारी गर्भवती हुईन आणि एक धाकला पोऱ्या ले जन्म दिन आणि तेना नाव “इम्मानुल” ठेवाईन जेना अर्थ शे “परमेश्वर आमना संगे.” आणि तव योसेफ निंद मधून जागीसन परमेश्वर ना दूत ना आज्ञा प्रमाणे तेनी मरिया ना संगे लग्न करी लीधा आणि तिले आपला घर लई उना. आणि जठ लगून ती धाकला पोऱ्या ले जन्म नई दिनी तठ लगून तेस्नी काही शारीरिक संबंध नई ठेव. जव तेस्ना पोऱ्या ना जन्म हुईना तव योसेफ नि आपला पयला पोऱ्या ना नाव येशु ठेवा. जव राजा हेरोद यहूदीया प्रांत वर राज्य करत होता, त येशु ना जन्म त्या प्रांत ना बेथलेहेम नगर मा हुयना, तव पूर्व कळून बुद्धीमान लोक ज्या तारास्ना अभ्यास करतस, यरूशलेम शहर मा ईसन विचारनात. तो पोऱ्या कोठे शे जो यहुदी लोकस्ना राजा बनाना साठे जन्म लीयेल शे? कारण कि आमी पूर्व कळे तेना जन्म ना बारामा दाखाळनारा तारा देखनुत, आणि तेले नमन कराले एयेल शेतस. यहुदी लोकस्ना राजा ना जन्म ना बारामा आयकीसन, राजा हेरोद घाबरी ग्या, आणि तेना संगे यरूशलेम शहर ना गैरा सावटा लोक घाबरी ग्यात. एनासाठे तेनी सर्वा मुख्य यहुदी पुजारी लोकस्ले आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ले एकत्र करीसन तेस्ले विचार कि “ख्रिस्त ना जन्म ना बारामा शास्त्र काय सांगस?” तेस्नी तेले सांग, ख्रिस्त ना जन्म या यहूदीया प्रांत ना बेथलेहेम नगर मा हुईन, कारण कि भविष्यवक्तास्ना व्दारे अस लिखेल शे. “यहूदा प्रांत ना बेथलेहेम नगर ना लोक, तू कोणताही प्रकारे यहूदीया अधिकारीस्मा सर्वास्तून धाकला नई, कारण कि तुना मधून एक माणुस ईन जो शासक बनीन जो मना लोक इस्त्राएल देश ना राखोया बनीन.” हेरोद राजा नि त्या जन्म लीयेल पोऱ्या नि वय माहित कराले बुद्धीमान लोकस्ले चोरी कण बलायसन तेस्ले विचार कि तारा ठीक कोणता टाईम वर दिखेल होता. आणि तेनी हय सांगीसन बुद्धीमान लोकस्ले बेथलेहेम नगर मा धाळ, कि जाईसन त्या पोऱ्या ना बारामा खर-खर माहिती करा, आणि जव तो भेटी जाईन, त मना जोळे परत या आणि मंग जे काही तुमनी देखेल शेतस, ते मले सांगा, एनासाठे कि मी बी ईसन तेले वाकीसन नमन करू. तेस्नी घर मा जाईसन त्या बाळ ले तेनी माय मरिया ना संगे देखा, आणि गुळघा टेकीसन तेले नमन कर, आणि आपला आपला थैल्या उघाळीसन तेले सोना आणि त्या प्रकार ना लोबान जेना गोळ सुगंध ऱ्हास आणि हय महाग ऱ्हास आणि गंधरस भेट चळाव. आणि परमेश्वर नि तेस्ले स्वप्न मा हय चेतावणी दिधी, कि हेरोद राजा कळे परत नका जायज्यात आणि तेस्नी राजा ले बिगर सांगाणा दुसरा रस्ता कण आपला देश ले चालना ग्यात. तेस्ना जावा नंतर परमेश्वर ना दूत नि स्वप्न मा योसेफ ले दिखीसन सांग उठ; तो पोऱ्या आणि तेनी माय ले लिसन मिसर देश ले पयजा; आणि जठ लगून तठेच रायजो जठलोंग मी तुले नई सांगाव, कारण कि पोऱ्या ले मारी टाकासाठे हेरोद राजा तेले झामलनार शे. तो रात ले उठीसन पोऱ्या ले आणि तेनी माय ले लिसन मिसर देश ले चाली दिना. आणि राजा हेरोद ना मरा लगून त्या मिसर देश माच ऱ्हायना; एनासाठे कि तो वचन जो प्रभु नि होशे भविष्यवक्ता द्वारे गैरा पयले सांगेल होता पुरा होवो, कि मनी आपला पोऱ्या ले मिसर मधून बलावना. राजा हेरोद रागे भरी ग्या जव तो समजी ग्या कि बुद्धीमान लोकस्नी तेले धोका दियेल शे. तेनी शिपाईस्ले धाळ कि त्या बेथलेहेम नगर आणि तेना आंगे पांगे ना सर्वा पोरस्ले मारी देवोत ज्या दोन वरीस ना आणि तेना तून धाकला होतात. हय बुद्धीमान लोकस्ना द्वारे तारा ना सर्वास्ना पयले दिखामा येवाना बातमी ना आधार वर होत. तव वचन यिर्मया भविष्यवक्ता ना व्दारे संगायेल होत. हय एनासाठे हुईन कारण परमेश्वर नि पुस्तक मा भविष्यवक्ता यिर्मया ना द्वारे प्रभु नि जे सांगेल होता, ते खर हुई जावो. “रामा नगर मा कोनातरी रळाना आवाज लोकस्नी आयक, शोक, रळान आणि मोठा विलाप, राहेल आपला पोरस साठे रळी ऱ्हायंती आणि शांत होवाना नई देखी ऱ्हायंती कारण कि त्या मरी जायेल होतात.” योसेफ, मरिया आणि धाकला पोऱ्या येशु आते लोंग मिसर देश माच होतात. हेरोद ना मरा नंतर परमेश्वर ना दूत नि मिसर देश मा योसेफ ले स्वप्न मा प्रगट हुईसन सांग. उठ बाळ आणि तेनी माय ले लिसन इस्त्राएल देश मा चालना जा, कारण कि राजा हेरोद आणि तेना लोक मरी जायेल शे ज्या बाळ ना जीव लेवाले देखी ऱ्हायनात. योसेफ उठना आणि बाळ आणि तेनी माय ले संगे लिसन मिसर ले सोळी दिधा आणि इस्त्राएल देश मा चालना ग्यात. पण योसेफ नि हय आयक कि अर्खेलाव आपला बाप हेरोद नि जागा यहूदीया प्रांत वर राज्य करी ऱ्हायनात तो तठे जावाले भ्यायना; नंतर स्वप्न मा परमेश्वर कळून चेतावणी लिसन गालील जिल्हा ना प्रांत मा चालना ग्या. आणि नासरेथ नगर जाई बसणा; एनासाठे कि तो वचन पुरा होवो जो भविष्यवक्ता व्दारे येशु ना बारामा सांगेल होत कि तो नासरेथ नगर मधून येणारा सांगाईन. त्या दिन मा योहान बाप्तिस्मा देणार ईसन यहूदीया प्रांत ना उजाळ जागा मा हवू प्रचार कराले सुरुवात करना. आपला पापस पासून मन फिरावा, कारण स्वर्ग ना राज्य जोळे ईजायेल शे. हवू तोच शे, जेना बारामा यशया भविष्यवक्ता नि सांगेल होता. “उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना कि प्रभु ना रस्ता तयार करा, त्या सळकस्ले सीधा करा जेनावर तो चालीन.” योहान ना कपळा उट ना केसस्ना बनायेल होता आणि आपला कमर वर कातळी ना पट्टा बांधेल होता; तेना जेवण नाकतोडा आणि रानमध हय होत. तव यरूशलेम शहर व सर्वा यहूदीया प्रांत ना आणि यार्देन नदी ना आस-पास ना सर्वा जागा वरून लोक तेना कळे इग्यात. तेस्नी आपला पापस्ले कबूल कर, आणि यार्देन नदी मा तेना हात कण बाप्तिस्मा लीधा. पण तेनी गैरा परूशी आणि सदूकी ज्या दोन प्रकार ना यहुदी समाज ना धार्मिक समूह होतात, तेना कळे बाप्तिस्मा लेवाले येतांना देख, तो तेस्ले सांगणा, तुमी विषारी सापस्ना पिल्ला सारखा शेतस, तुमले कोणी जताळी टाक कि तुमना वर येणारा परमेश्वर ना राग पासून पया? तुमना कार्य ले सिद्ध करा, जे दाखाळीन कि तुमी तुमना पाप पासून फिरी जायेल शेतस. आणि आपला-आपला मन मा हय नका विचार करा कि आमी अब्राहाम ना संतान शे, कारण कि मी तुमले सांगस कि परमेश्वर ह्या दघळस पासून अब्राहाम साठे संतती उत्पन्न करू सकस. आते परमेश्वर ना न्याय ना कुराळ झाळ ना मुयास्ले कापाले तयार शे, तो प्रत्येक त्या झाळ ले जो चांगल फय नई लयत तेस्ले काटीसन विस्तोमा फेकी दिन. मी तुमले आपला पापस पासून मन फिराव ना पाणी कण बप्तीसमा देस, पण तो मनातून बी शक्तिशाली शे, मी तेना जोळा ना बंद खोलाना बी योग्य नई, तो तुमले पवित्र आत्मा आणि आग कण बाप्तिस्मा दिन. तेना सूप, तेनाच हात मा शे, तो आपला खया चांगल्या प्रकारे साप करीन, आणि आपला गहू ले वावर मा एकत्र करीन, पण भूसिले ले त्या आग मा चेटाळी दिन जे मलायाव नई. त्या टाईम ले येशु नि गालील जिल्हा ना नासरेथ गाव तून यार्देन नदी मा योहान कळून बाप्तिस्मा लेवाले उना. पण योहान बाप्तिस्मा देणारा हय संगीसन तेले रोकु लागणा, आणि तेले विचार, “मले तुना हात कण बाप्तिस्मा लेवानी गरज शे, आणि तू मना कळे काब ईऱ्हायना?” येशु नि तेले हवू उत्तर दिधा, आते असच होवू दे, कारण आपले हय रितीवर सर्वा धर्म पूर कराना योग्य शे, तव योहान नि येशु नि गोष्ट मानी लिधी. येशु नि योहान बाप्तिस्मा देणारा कडून बाप्तिस्मा लीधा आणि जसाच तो पाणी तून बाहेर निघणा, आणि देखा तेना साठे आकाश उघडी ग्या, आणि तो परमेश्वर नि आत्मा ले कबुतर ना रूप मा उतरतांना व आपला वरे येतांना देख. मंग आकाश मधून परमेश्वर ना आवाज उना आणि येशु ले सांगणा, “हवू मना प्रिय पोऱ्या शे, मी तुनाशी गैरा खुश शे.” तव पवित्र आत्मा येशु ले उजाळ जागा मा लीग्या कि सैतान तेनी परीक्षा करोत. येशु चाळीस दिन, आणि चाळीस रात बिगर काही खावाना ऱ्हायना, तव तेले भूक लागणी. तव सैतान तेना जोळे उना आणि तेले सांग, जर तू परमेश्वर ना पोऱ्या शे त ह्या दघळस्ले आज्ञा दिसन साबित कर कि त्या भाकरी बनी जावोत, एनासाठे कि तू तेस्ले खाई सको. येशु नि तेले उत्तर दिधा “परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, माणुस फक्त भाकरीस्वर नई, पण तो परमेश्वर ना सांगेल प्रत्येक वचनस्ले मानीसन जित्ता राहीन.” तव सैतान तेले पवित्र शहर यरूशलेम मा लिसन ग्या, आणि परमेश्वर ना मंदिर ना सर्वास्तून उच्चा टोक वर उभा करना. आणि सैतान नि सांग, कदी तू परमेश्वर ना पोऱ्या शे, त स्वता ले खाले पाळीसन साबित कर, कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा हय लिखेल शे, “तो तुना बारामा आपला दूतस्ले आदन्या दिन, आणि त्या तुले हातो-हात समाई लेतीन, कदी अस नई होवो कि तुना पाय ले दघळ कण ठेस लागो.” येशु नि तेले सांग, “परमेश्वर नि पुस्तक मा हय बी सांगस,” “तू प्रभु आपला परमेश्वर नि परीक्षा नको लेवू.” मंग सैतान तेले उच्चा डोंगर वर लिसन ग्या. आणि सर्वा जग ना राज्य व तेना वैभव दाखाळीसन. तेले सांग, कदी तू पडीसन मले नमन करत मनी उपासना करशीन, त मी हय सगळ काही तुले दि दिसू. तव येशु नि तेले सांग, “हे सैतान दूर चालना जाय, कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तू प्रभु आपला परमेश्वर ले पडीसन नमन कर, आणि फक्त तेनीच उपासना कर.” तव सैतान तेना पासून चालना ग्या, आणि परमेश्वर ना दूत ईसन येशु नि सेवा करणात. जव येशु हय आयकना, कि योहान ले बंदीगृह मा टाकी दियेल शे, तव येशु यहूदा जिल्हा ले सोळीसन, परत गालील जिल्हा ले चालना ग्या. आणि नासरेथ नगर ले सोळीसन कफर्णहूम नगर मा जो गालील जिल्हा ना समुद्र ना किनारा वर स्थित होता, जठे जबुलून आणि नफताली ना गोत्र राहत होतात, तठे येशु जाईसन राहाले लागणा. हय एनासाठे हुईन कि जे यशया भविष्यवक्ता कळून सांगामा एयेल होत, ते पूर्ण होवो. “तुमी लोक ज्या जबुलून गोत्र ना अधिकार वाला क्षेत्र मा आणि नफताली गोत्र ना अधिकार वाली जमीन वर राहतस, जे त्या रस्ता वर शे, जे गालील ना समुद्र ना जोळे आणि यार्देन नदी ना पूर्व किनारा वर शे, गालील जिल्हा ना क्षेत्र जठे कईक दुसरा जाती लोक राहत होतात. तुमी लोक ज्या परमेश्वर ले बिगर वयखतस अंधकार मा राहीरायनात, तुमले एक महान मोठा उज्वल उजाया ले देखतीन. आणि हवू उजाया त्या लोकस्ले मुक्ती ना रस्ता दाखाळीन, जो परमेश्वर ले नई वयखतस आणि कायम ना मोत ना रास्ता वर शेत.” त्या टाईम पासून येशु नि प्रचार करान आणि हय सांगाले सुरुवात करना, “पापस पासून मन फिरावा कारण कि परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे.” येशु नि गालील ना समुद्र ना किनारा वर चालतांना दोन भाऊ म्हणजे शिमोन ले जेले पेत्र म्हणतस आणि तेना धाकला भाऊ अंद्रियाले समुद्र मा जाय टाकतांना देख कारण कि त्या मासा धरणारा होतात. येशु नि तेस्ले सांग, मना मांगे इपळा, मी तुमले शिकाळसू कि लोकस्ले मना शिष्य कसा बनावाना शे. तेस्नी त्याच टाईम ले आपला मासा धराना काम सोळीसन आणि तेना शिष्य बनी ग्यात. तठून पुळे जायसन येशु नि आखो दोन भावूस्ले म्हणजे जब्दी ना पोऱ्या याकोब आणि तेना भाऊ योहान ले देख त्या आपला बाप जब्दी ना संगे नाव वर आपला जायास्ले सुधारत होतात आणि तेस्ले बी बलाव. त्या लगेच नाव ले व आपला बाप ले सोळीसन तेना मांगे चालना ग्यात. येशु पूर्ण गालील जिल्हा मा फिरत आणि तेस्ना प्रार्थना घरस्मा शिक्षण देत, आणि परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता ना प्रचार करत आणि लोकस्नी सर्वा प्रकार ना आजार आणि कमजोरीस्ले बरा करत ऱ्हायना. आणि सर्वा सिरीया प्रांत, ज्या गालील ना उत्तर दिशा मा स्थित होता, तेनी बातमी पसरी गई, आणि लोक सर्वा आजारिले, ज्या आल्लग-आल्लग प्रकारणा आजारस्मा आणि दुख मा पिडीत होतात. आणि जेस्ना मा दुष्ट आत्मा होतात आणि येळा आणि लखवा ना आजारीस्ले तेना जोळे लयनात आणि तेनी तेस्ले बर करा. आणि गालील जिल्हा, दकापलीस जिल्हा, यरूशलेम शहर, यहूदीया प्रांत, यार्देन नदी ना त्या पारून मोठी गर्दी तेना मांगे चालू लागणी. येशु ह्या लोक समुदाय ले देखीसन डोंगर ना किनारा वर थोळा वरला कळे ग्या, आणि जव बठी ग्या, त येशु ना शिष्य तेना जोळे उनात. आणि येशु नि तेस्ले शिकाळाले चालू कर. “धन्य शेतस ज्या वाटस कि तेस्ले परमेश्वर नि गरज शे, कारण कि स्वर्ग ना राज्य तेस्ना शे. धन्य शे त्या, ज्या दुख करतस, कारण कि परमेश्वर तेस्ले सांत्वना दिन. धन्य शे त्या, ज्या नम्र शेत, कारण कि परमेश्वर तेस्ले ती पृथ्वी दिन जी तो परत बनाईन. धन्य शे त्या, ज्या धार्मिकता ना जीवन जगानी खरी ईछ्या ठेवतस, कारण कि परमेश्वर तेस्ले तृप्त करीन. धन्य शे त्या, जे दयाळू शेत, कारण कि परमेश्वर तेस्ना वर दयावान हुईन. धन्य शे त्या, जेस्ना मन युध्द शे, कारण कि त्या परमेश्वर ले देखतीन. धन्य शे त्या, ज्या मेल करावणारा शे, कारण कि त्या परमेश्वर ना संतान सांगावतीन. धन्य शे त्या, जेस्ना धार्मिक जीवन जगा मुळे छळ होस, कारण स्वर्ग ना राज्य तेस्ना शे. धन्य शे तुमी, जव तुमले मना शिष्य होवाना मुळे लोक तुमनी निंदा करो आणि त्रास देवोत आणि खोट बोलीसन तुमना विरुद्ध मा सर्वा प्रकार ना वाईट गोष्ट सांगतीन.” आनंद आणि गैरी खुशी करज्यात, कारण कि तुमना साठे स्वर्ग मा मोठा ईनाम शे. जस कि तेस्नी त्या भविष्यवक्तास्ले ज्या गैरा पहिले होतात, ह्याच प्रमाणे छळ करेल होता. तुमी ह्या जग ना लोकस साठे मीठ सारखा शेतस, पण कदी मीठ ना स्वाद खराब हुई जास, त परत कसा कणच तेले चवदार बनावू नई सकतस. मंग तो कोणताच काम ना नई, फक्त एना कि बाहेर फेकामा आणि माणसस्ना पाय खाले चेन्दामा येवो. तुमी पुरा जग ना साठे उजाया सारखा शेतस. जो नगर डोंगर वर बसेल शे ते दपू सकत नई. आणि लोक दिवाले पेटाळीसन तेले एक कटोरा ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवतस, तव तेना कण घर मधला सर्वा लोकस्ले उजाय भिळस. त्या प्रकारे तुमना उजाया लोकस्ना मा समोर चमको कि त्या तुमना चांगला कामस्ले देखीसन तुमना बाप नि जो स्वर्ग मा शे तेना गौरव करो. हय नका समजा कि मी मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्ना पुस्तक ज्या तेस्नी लिखेल होतात, रद्द कराले नयी पण पुरा कराले एयेल शे. मी तुमले खरज-खरज सांगस कि, एक दिन, आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जाईन. पण जठलोंग त्या शेतस, त परमेश्वर ना पुस्तक बी राहीन, येणा मधून धाकली तून धाकली गोष्ट टई नई सकाव, परमेश्वर ना पुस्तक तठलोंग राहीन, जठलोंग तेना मधून सर्व काही पूर नई हुई जात. एनासाठे जो कोणी हय धाकल्या-धाकल्या आज्ञा मधून कोणीही एक आज्ञा ले नई माणस, आणि तसच लोकस्ले शिकाळस तो स्वर्ग ना राज्य मा सर्वास्तून धाकला सांगामा ईन पण जो कोणी या आज्ञा ना पालन करीन आणि तेले शिकाळीन तोच स्वर्ग ना राज्य मा महान सांगामा ईन. मी तुमले खरज-खरज सांगस, कि जर तुमनी धार्मिकता, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक नि धार्मिकता तून वाढविसन नई शे, त तुमी स्वर्ग ना राज्य मा प्रवेश नई करिसकाव. तुमी आयकी लीयेल शे, कि परमेश्वर नि आमना पूर्वजस्ले सांगामा एयेल होत, कि खून नका करज्यात, जो कोणी खून करीन तो त न्यायसभा मा दंड ना योग्य ठरीन. पण मी तुमले हय सांगस कि जो कोणी आपला भावू वर रागे भरीन, तेले न्यायसभा मा दंड दिन, आणि जो कोणी आपला भाऊ ले रिकामा सांगीन, तो महासभा मा दंड ना पात्र ठरीन, आणि जो कोणी सांगीन अरे मूर्ख तो नरक ना आग मा दंड ना पात्र बनीन. एनासाठे कदी तू वेदी वर परमेश्वर ले आपली भेट चळावनार शे, आणि तठे तुले आठवण एस कि तुना भावू ना मन मा तुना विरुद्ध काही शे. त आपली भेट वेदी ना समोर सोळी दे, आणि जायसन पयले आपला भाऊ संगे समजोता करी ले, मंग ईसन आपली भेट परमेश्वर ले चळाव. जठलोंग तू आपला विरोधी बराबर रस्ता वर शे तेनाशी फटकामा सहमती कर अस नई होवाव कि विरोधी तुले न्यायाधीश ना हात मा सोपीन, आणि न्यायधीश तुले शिपाईस्ले सोपीन आणि तुले बंदीगृह मा टाकामा येवो. मी तुले खर सांगस. कि जठलोंग तुमी तेना सर्व परत नई दि देतस, जे तुमना वर बाकी शे, तठलोंग तुमी बंदीगृह मधून कदीच नई निंघावत. तुमले आदन्या माहिती शे जी सांगस, कि व्यभिचार नका करज्यात. पण मी तुमले सांगस कि, कोणी पराई बाई वर वाईट दुष्टी कण देखस तो आपला मन मा तेना संगे व्यभिचारी करी लीयेल शे. जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस त तेले काळीसन फेकी टाक. कारण तुना साठे हयच चांगल शे कि तुना आंग मधून एक नाश हुई जावो आणि तुना पूर्ण शरीर नरक मा जावा पेक्षा वाची जावो. जर तुमी पाप करासाठे आपला हात ले उपयोग कराना विचार मा शेतस, त येले कापी टाक. एक हात ना बिगर स्वर्ग मा प्रवेश करान कठीण लागू सकस, पण दोनी हात ले ठीसन आणि नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे. तुमले आदन्या माहिती शे जी सांगतस, कि “जो कोणी आपली बाई ले फारकती देस मंग तिले सुट पत्र दे.” तुमले माहिती शे, कि जो कोणी आपली बायको ले व्यभिचार शिवाय कोणताही कारण वर फारकती देस तो तिले व्यभिचार करावस, आणि जो कोणी ती सोळेल बाई बराबर लग्न करस, तो व्यभिचार करस. तुमले माहिती शे, कि परमेश्वर नि आमना पूर्वजस्ले सांगणा, कि खोटी शेप्पत घालू नका पण प्रभु साठे आपली शेप्पत ले पुरी करा. पण मी तुमले हय सांगस कि कव बी शेप्पत नका घालज्यात, नईत स्वर्ग नि, कारण ते परमेश्वर ना सिंहासन शे. नईत धरती नि, कारण कि तो तठे पाय ठेवस, नईत यरूशलेम शहर नि, कारण ते महाराजा ना नगर शे. आपला डोका नि बी शेप्पत घालू नको, कारण तू एक केस ले बी धव्या, आणि नईत काया करू सकस. पण तुमनी गोष्ट हा त हा, व नईत नई ऱ्हास, कारण कि जे काही एनातून जास्त होस ते सैतान पासून होस. तुमले माहिती शे, कि “मोशे ना नियम मा लिखेल शे, डोया ना बदला मा डोया, आणि दात ना बदला मा दात.” पण मी तुमले हय सांगस, कि जो तुमना संगे वाईट करस, तेना पासून बदला नको लेयज्यात, पण जो कोणी तुना उजवा गाल वर थाप मारस तेना कळे दुसरा बी फिराई द्या. आणि कदी कोणी तुनावर दोष लाईसन तून वरला कपळा लेवान देखस, तेले लांबझगा बी ली लेवू दे. कदी एक शिपाई तुले आपला सामान एक किलोमीटर भर लीजावाले जबरजस्ती करस, त तेले दोन किलोमीटर ली चालना जावा. जो कोणी तुना कळून मांगस, तेले दे, आणि जो तुना कळून उधार मांगस, तेना कळून तोंड नको फिरावू. तुमी लोकस्ले सांगतांना आयकी लीयेल शेतस, कि मोशे ना नियम मा लिखेल शे, कि आपला शेजारीस्वर प्रेम ठेवा, आणि आपला शत्रू वर व्देष कर. पण मी तुमले हय सांगस, कि आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा आणि आपले त्रास देणारा साठे बी प्रार्थना करा. जेनाशी तुमी आपला स्वर्गीय बाप ना पोर ठरशान, कारण कि तो आपला सूर्य चांगला आणि वाईट लोकस्वर उगाळस, आणि धर्मी आणि अधर्मी लोकस्वर वर्षा करस. कारण कि जर तुमी आपला वर प्रेम ठेवणारास्वरच प्रेम ठेवश्यात, त परमेश्वर तुमले फय नई देवाव, काय कर लेणारा बी असा करतस? जर तुमी फक्त आपला भावूस्ले नमस्कार करतस, त तुमी कोणता मोठा काम करतस? आठ लोंग कि ज्या परमेश्वर वर विश्वास नई करतस त्या बी असाच करतस. एनासाठे अस पायजे कि असा काम करा कि ते आठे दाखाळोत कि तू सर्वास्वर प्रेम करस, कि तुमी सिद्ध बना जसा तुमना स्वर्गीय बाप सिद्ध शे. सावधान राहा. तुमी माणसस्ले दाखाडा साठे चांगला काम नका करा, नईत तुमना बाप जो स्वर्ग मा ऱ्हास तुमले काही बी फय नई देवाव. एनासाठे जव तू दान करस, दुसरा लोकस्ना ध्यान आकर्षित नका करा, जसा कपटी प्रार्थना घरस्मा व गल्ल्यास मा करतस, एनासाठे कि लोक तेस्ना बडाई करोत मी तुमले खर सांगस, जेना कण तेस्ले लोकस्ना द्वारा बडाई भेटी जायेल शे, पण परमेश्वर तेस्ले कोणताच प्रतीफय नई देवाव. पण जव तू दान करस, त जो तुना उजवा हात करस, तेले दुसरा लोकस्ले माहित नई पाळाले पायजे. एनासाठे कि तुना दान गुप्त राहो, आणि तव तुना बाप जो गुप्त मा देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन. जव तू प्रार्थना करस तो कपटी सारखा नको होवू, कारण कि लोक तेस्ले देखोत आणि तेस्नी बडाई करोत, प्रार्थना घरस्मा आणि रस्तास्ना चौक वर उभा ऱ्हायसन प्रार्थना कराले तेस्ले चांगल वाटस. मी तुमले खर सांगस, कि तेस्ले आपला प्रतीफय भेटी जायेल शे. जी लोकस्ना द्वारा बडाई भेटी जायेल शे. पण जव तू प्रार्थना करशी, त आपली खोली मा जाय, आणि दरवाजा बंद करीसन, आपला स्वर्ग मधला बाप संगे जेले कोणी नई देखू सकत, तेना संगे प्रार्थना कर, आणि तव तुना स्वर्ग मधला बाप जो गुप्त मा देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन. प्रार्थना करतांना अन्यजाती सारखा शब्द परत सांगाणा द्वारे बळबळ नका करा. कारण कि त्या समजतस तेस्ना शब्दस्ले परत सांगाणा द्वारे आणि बळबळ करावर तेस्नी आयकामा ईन. एनासाठे तुमी तेस्ना सारखा नका बना, कारण कि तुमना स्वर्ग मधला बाप ले तुमना मांगाना पयलेच माहित शे, कि तुमले कसा कसा नि गरज शे. तुमले ह्या प्रमाणे प्रार्थना कराले पाहिजे, ए आमना बाप, तुजो स्वर्ग मा शे, तुना पवित्र नाव ना आदर करामा येवो. तुना राज्य येवो, तुनी ईच्छा जशी स्वर्ग मा पुरी होस, तशी पुर्थ्वी वर बी होवो. आम्हनी दिन भर नि भाकर आज आमले दे. आणि जसा आमी आपला अपराधीस्ले माफ करेल शेत, तसाच तू बी आमना अपराधस्ले माफ कर. आणि आमले परीक्षा मा नको लयजो, पण सैतान पासून आमले वाचाळ. कारण कि राज्य सामर्थ आणि गौरव कायम तुनीच शे, आमेन. एनासाठे कदी तुमी माणसस्ना अपराधस्ले माफ करशात, त परमेश्वर तुमना बाप जो स्वर्ग मा ऱ्हास, तुमले माफ करीन. कदी तुमी माणसस्ना अपराधस्ले माफ नई कराव, त तुमना स्वर्ग मधला बाप बी तुमले माफ नई कराव. जव तुमी उपवास करशात, तव कपटी सारखा तुमना तोंड वर उदासी नका दिखाले पाहिजे, कारण कि त्या आपला तोंड दुखी दाखाळतस, एनासाठे कि लोकस्ले समजो कि त्या उपवाशी शेतस. मी तुमले खर सांगस, कि तेस्ले आपला प्रतीफय भेटी जायेल शे, जे कि लोकस्ना द्वारा बडाई शे. पण जव तू उपवास करशी त आपला डोका वर तेल लाव आणि तोंड धोय. एनासाठे कि लोक नई पण तुमना स्वर्ग मधला बाप जो तुले गुप्त मा देखस, तुले उपवाशी समजो. याच दशा मा तुमना स्वर्ग मधला बाप जो तुले देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन. आपला साठे पृथ्वी वर धन एकत्र नका करा, जठे उदी आणि जंग खराब करस आणि चोर मधमा घुशिसन चोरी लीजातस. पण चांगल करीसन स्वर्ग मा आपला साठे प्रतीफय एकत्र करा, जठे उदी आणि जंग नाश नई करस, आणि जठे चोर नईत मधमा घुशिसन चोरी करतस. कारण कि तुना मन कायम तठेच लागेल राहीन जठे तुना धन शे. डोया शरीर साठे एक दिवा ना सारखा शेतस, एनासाठे कदी तुना डोया चांगला शेतस, तव तुना सर्वा शरीर उजळ हुईन. एनासाठे कदी तू विचार करस कि, तुना मन प्रकाशमान शे, पण खरज प्रकाशमान नई अंधार शे, तव तुना मधमा जो अंधार शे, तो गैरा जास्त अंधार वाला हुईन. कोणताही माणुस एकच टाईम वर दोन मालकस्नी सेवा नई करू सकत, कारण तो एक ना संगे तिरस्कार आणि दुसरा संगे प्रेम ठेवीन, नईत एक ना संगे समर्पित राहीन व दुसराले तुच्छ समजीन. तुमी परमेश्वर आणि धन या दोनीस्नी सेवा नई करू सकतस. एनासाठे मी तुमले सांगस, कि दररोज ना शारीरिक जीवन साठे हय चिंता नका करज्यात, कि आमी काय खासुत आणि काय पीसुत, आणि नईत आपला शरीर साठे कि काय घालसुत, निश्चित रूप मा तुमना जीवन तुमना खावा पिवा तून जास्त किमती शे. आणि तुमना शरीर तुमना द्वारे घालायनारा कपळास्नि तुलना मा जास्त किमती शे. आकाश ना पक्षीस्ले देखा, त्या नईत पेरतस, नईत कापतस, आणि नईत कठोरास्मा एकत्र करतस, तरी बी तुमना स्वर्गीय बाप तेस्ले खावाळस. आणि तुमी निश्चित रूप मा पक्षीस्ना तुलना तून गैरा जास्त किंमत शेतस. तुमना मधून असा कोण शे, जो चिंता करीसन थोळा जास्त टाईम लगून जित्ता राहू सकस? आणि कपळा साठे काबर चिंता करतस? जंगल मधला फुलस्वर ध्यान द्या, कि त्या कसा वाढतस, त्या नईत कष्ट करतस, नईत कपळा बनावतस. पण मी तुमले सांगस, कि राजा शलमोन बी, आपला सर्वा वैभव मा त्या फुलस मधून कोणा सारखा कपळा घालेल नई होता. एनासाठे जव परमेश्वर मैदान ना गवत ले, जो आज शे, आणि कालदिन आग मा फेकामा ईन, अशी सुंदरता देस, त तो निश्चित रूप मा तुमनी बी देखभाल करीन, तुमना विश्वास इतला कमजोर काब शे? एनासाठे तुमी चिंता करीसन हय नका सांगज्यात, कि आमी काय खासुत, कि काय पीसुत, आणि काय घालसुत? कारण कि दुसऱ्या जाती ह्या सगळ्या गोष्टीस्ना शोध मा ऱ्हास, आणि तुमना स्वर्गीय बाप ले माहित शे, कि तुमले या सर्वा वस्तू पाहिजे, एनासाठे चिंता नका करा. एनासाठे सर्वास्तून पहिले हय करा, कि परमेश्वर ना राज्य आणि तेना धार्मिकता ना शोध करा, त या सर्वा वस्तू तुमले भेटी जातीन. एनासाठे कालदिन ना बारामा चिंता नका करा, कारण कि कालदिन आपलीच चिंतास्ले लईन. आज ना साठे आज ना दु:ख गैरा शे. दोष नका लावा, त तुमना वर बी दोष लावामा नई येवाव. कारण ज्या प्रकारे तुमी दोष लावतस, त्याच प्रकारे परमेश्वर तुमना न्याय करीन, आणि ज्या प्रकारे, तुमी दुसरास्ना न्याय करस त, तुमना बी न्याय करामा ईन. तू आपला मित्र ना धाकली चुकी मुळे न्याय काब करस, जो कि डोया मा फपुटाना सारखा शे, जव कि तुना जीवन मा मोठ्या चुक्या शेतस, ज्या कि तुना डोया मा बांडूक ना सारखा शेतस. जर तुना स्वता ना मधमा गैरा मोठ्या चुका शेतस, त तुले स्वता तून धाकला चुक्या वाला कोणी व्यक्ती नि मदत कराना प्रयत्न नई कराले पाहिजे. ओ कपटी, पहिले आपला स्वता ना मोठा चुकीस्ले सुधारी ले, मंग तू स्पष्टपणे आपला मित्र ना डोया मा देखीसन फपुटाले काळी सकस. त्या लोकस्ले परमेश्वर ना संदेश नका आयकाळा ज्या येले आयकाना नई देखतस. कदी तुमी असा करतस, त हय अस हुईन जस कोणी पवित्र वस्तू ले कुत्रास्ना समोर फेकी देवान, व जसा डुक्करस्ना समोर मोती फेकाना, जो फक्त तेस्ले चेंदी टाकतीन आणि मंग तुमना वर हमला करतीन. तुमले जे पाहिजे ते परमेश्वर पासून मांगा आणि तो तुमले दिन. झामला, त तुमले सापडीन, ठोका, त तुमना साठे उघाळामा ईन. कारण कि जो कोणी मांगस, तेले भेटस, आणि जो झामलस, तेले सापडस, आणि जो ठोकस, तेना साठे उघाळामा ईन. तुमना मधून कोणी बी बाप आपला पोऱ्या ले दघळ नई देवाव जर तो तुमना पासून भाकार मांगस त. ह्याच प्रमाणे, कोणी बी माणुस आपला पोऱ्या ले मासा मांगावर विषारी साप नई देवाव. एनासाठे जव तुमी वाईट हुईसन, आपला पोरस्ले चांगल्या वस्तू देवाना देखतस, त तुमना स्वर्ग मधला बाप आपला मांगनारस्ले चांगली वस्तू निश्चित रूप मा दिन. ह्या मुळे प्रत्येक टाईम ले, दुसरास्ले आपला साठे जसा कराना देखतस, तुमी बी तेस्ना साठे तसाच व्यवहार करा, कारण कि मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्ना लिखाना अर्थ हईच शे. तुमी फक्त अरुंद दरवाजा कणच परमेश्वर ना राज्य मा जावू सकतस. कारण कि नरक ले जानार दरवाजा चवळा शे, आणि तठे जानारा रस्ता सरळ शे, आणि तेना मधून जानारा लोक गैरा शेतस. कारण अरुंद शे तो दरवाजा आणि कठीण शे तो रस्ता जो कायम ना जीवन ले भिळावस, आणि थोडासाच लोक शेतस जो तेस्ले भेटीन. खोटा भविष्यवक्तास पासून सावधान राहा, कारण कि त्या लांडगास सारखा शेतस जेस्नी स्वता ले मेंढ्यास्नी खाल कण झाकेल शेतस, लोकस्ले हय विश्वास देवाळा साठे कि त्या मेंढ्या शेतस, पण त्या खरज मा त्या लांडगा शेतस ज्या लोकस वर हमला करतस. ज्या प्रकारे त्या जीवन जगतस, तुमी तेस्ले ओयखी लेशान. काय लोक झाळस कण अंगूर, व रिंगणीना झाळ कण अंजिर तोडतस? ह्याच प्रकारे प्रत्येक चांगला झाळ चांगला फय लयस, आणि वायबार झाळ खराब फय लयस. चांगला झाळ खराब फय नई लयु सकस, आणि नईत वायबार झाळ चांगल फय लयु सकस. जो-जो झाळ चांगल फय नई लयस, तो कापामा आणि आग मा टाकामा येस, खोटा भविष्यवक्तास्ले बी ह्याच प्रमाणे दंड देवामा ईन. तुमी तेस्ले तेस्ना कामस्ले देखीसन, तेस्ले ओयखी लेशान. जो कोणी मले, हे प्रभु, हे प्रभु सांगस, तेस्ना मधून प्रत्येक स्वर्ग ना राज्य मा प्रवेश नई कराव, पण तोच मना स्वर्गीय बाप नि ईच्छावर चालस, तो स्वर्ग ना राज्य मा प्रवेश करीन. न्याय ना दिन गैरा लोक मले सांगतीन, “हे प्रभु, हे प्रभु, आमी तुना नाव कण भविष्यवाणी करेल शे, आणि तुना नाव कण दुष्ट आत्मास्ले बी काळेल शे, आणि तुना नाव कण गैरा सामर्थ्य ना काम बी करेल शे.” तव मी तेस्ले मोक्या सांगी देसू, मी तुमले कदीच नई वयखत, हे वाईट काम करणार होण, मना पासून चालना जावा. एनासाठे जो कोणी मना या गोष्टी आयकीसन तेस्ले माणस तो त्या बुद्धीमान माणुस सारखा ठरीन, जेनी आपला घर ना पाया खडक वर बनाव. आणि पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, पण ते नई पडण, कारण कि तेना पाया खडकावर उभा करेल होता. पण जो कोणी मना ह्या गोष्टीस्ले आयकस आणि तेनावर नई चालस, तो त्या मूर्ख माणुस सारखा ठरीन, जेनी आपल घर रेती वर बनाव. पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, आणि ते घर पडीसन नाश हुय ग्या. जव येशु ह्या गोष्ट सांगी दिना, त अस हुईन कि गर्दी तेना शिक्षण कण चकित हुईनी. कारण कि तो तेस्ना मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक सारखा नई, पण तो तेस्ले एक असा शिक्षक सारखा शिकाळत होता, जेना जोळे मोठा अधिकार होता. जव येशु त्या डोंगर वरून उतरणा, त एक मोठी गर्दी तेना मागे चालू लागणी. आणि एक माणुस कोळी ना आजार कण पिळीत होता, येशु जोळे ईसन प्रणाम कर, आणि तेले सांग, “हे प्रभु जर तुनी ईच्छा शे, त तू मले बरा करू सकस.” येशु नि हात पुळे करीसन तेले हात लाव, आणि सांग, “मनी ईच्छा शे, तू बरा हुई जा” आणि तो लगेच कोळ पासून बरा हुईग्या. येशु नि तेले सांग, “देख, कोले बी नको सांगजो, पण जाईसन स्वता ले यहुदी पुजारी कळे दाव आणि जो चढवा मोशे नि ठरायेल शे तेले चळाव, एनासाठे कि तेस्ना साठे साक्षी होवो.” आणि जव येशु कफर्णहूम नगर मा उना, त शंभर सैनिकस्ना रोमी अधिकारी येशु जोळे ईसन, तेस्ले विनंती करी. “हे प्रभु, मना दास घर मा लखवा ना आजार मा पडेल शे जो हालू नई सकस.” येशु नि तेले सांग, “मी ईसन तेले बरा करसू.” तो अधिकारी जो यहुदी नई होता, येशु ले उत्तर दिधा, “हे प्रभु, मी एना योग्य नई, कि तू मना घर मा येवो, पण फक्त तोंड कण सांगी दे त मना दास बरा हुई जाईन. मले माहिती शे, कारण कि मनावर बी आदन्या देणारा अधिकारी लोक शेत, आणि शिपाई मना हात मा शे, आणि जव एक ले सांगस, जा, त तो जास, आणि दुसराले कि ये, त तो येस, आणि आपला दास ले सांगस, कि हय कर, त तो करस.” हय आयकीसन येशु ले आश्चर्य वाटण, आणि ज्या तेना मांगे ईऱ्हायंतात तेस्ले सांग, “मी तुमले खरज सांगस, कि मले पुरा इस्त्राएल देश मा एक बी असा माणुस नई भेटणा, जो ह्या दुसरा जाती ना माणुस सारखा मनावर विश्वास करस. आणि मी तुमले सांगस, कि गैरा सावटा अन्यजाती लोक पूर्व आणि पश्चिम दिशा तून ईसन अब्राहाम आणि इसहाक आणि याकोब ना संगे परमेश्वर ना राज्य मा संगती करतीन. पण यहुदी लोकस्ले ज्या परमेश्वर ना राज्य मा राहाले पाहिजे तेस्ले बाहेर अंधकार मा फेकामा ईन, तठे रळना आणि दुख मुळे दातखाने हुईन.” आणि येशु नि अधिकारी ले सांग, “घर जा, जसा तुना विश्वास शे, तसाच तुना साठे होवो.” आणि तेना दास त्याच टाईम ले बरा हुईग्या. येशु नि पेत्र ना घर मा ईसन तेनी सासूले कळक ताप मा पळेल देखना. तेनी तीना हात ले स्पर्श करा आणि तीना ताप उतरी ग्या, आणि ती उठीसन तेनी सेवा कराले लागणी. जव संज्याकाय होयनी तव त्या तेना कळे गैरा लोकस्ले लयनात जेस्ना मा दुष्ट आत्मा होती आणि तेनी त्या आत्मास्ले फक्त आपला शब्द कण आज्ञा दिसन काळी टाक, आणि सर्वा आजारीस्ले बरा करा. कारण कि जे वचन यशया भविष्यवक्ता ना व्दारा सांगामा एयेल होत ते पूर होवो. “तेनी स्वता आमनी कमजोरीले ली लीधा आणि आमना आजारस्ले उचली लीधा.” येशु नि आपला चारीस कळे एक मोठी गर्दी देखी आणि तेनी तेना शिष्यस्ले सांग “या आमी समुद्र ना त्या पार जावूत.” जसा त्या जावाले तयार हुई ऱ्हायंतात आणि एक यहुदी लोकस्ना मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि जोळे ईसन तेले सांग, हे गुरु, मी तुना शिष्य बनासाठे तुना मांगेच चालसू. येशु नि तेले सांग, “कोल्हास्ना गुफा आणि आकाश ना पक्षीस्ना खोपा ऱ्हातस, पण मले, माणुस ना पोऱ्या साठे मना जोळे एक घर बी नई शे जठे मी जपी सकू.” एक आखो शिष्य नि तेले सांग, हे प्रभु, मले पयले घर परत जाऊ दे. मना बाप ले मरा नंतर, मी बाप ले गाळसु आणि तव मी ईसन तुना मांगे चालसू. येशु नि तेले सांग, “तू मना शिष्य बनासाठे मना मांगे ये, आणि ज्या लोक आत्मिक रूप कण मरेल शेतस, तेस्ले आपला मुर्दास्ले गाळू दे.” जव तो नाव वर चळना, त तेना शिष्य तेना मागे चालू लागनात. आणि, समुद्रा मा एक अशी जोरदार वारा वांधी चालू हुईनी आणि नाव लाठास कण झाकावू लागणी, आणि येशु जपी ऱ्हायंता तव तेस्नी जोळे ईसन तेले जागाळ, आणि सांग, “हे प्रभु, आमले वाचाळ, आमी सर्वा डुबी ऱ्हायनूत.” तेनी तेस्ले सांग, “ओ बिगर विश्वासीहोण, तुमी काबर घाबरतस?” तव तो उठीसन वारा वांधी आणि पाणी ले धमकाव, आणि समुद्र बिलकुल शांत हुईग्या. आणि लोक आश्चर्य करीसन सांगाले लागनात, हवू कसा माणुस शे? कि वारा वांधी आणि पाणी बी तेनी आदन्या मानतस. जव तो त्या पार गरसेकर ना प्रांत मा पोहचना, त दोन माणस ज्या दुष्ट आत्मा कण ग्रसित होतात मसानखाई मधून निघीसन तेले भेटनात, ज्या इतला हिंसक होतात, कि कोणी त्या रस्ता वरून जावू सकत नई होतात. आणि, तेस्नी आराया मारीसन सांग, “हे परमेश्वर ना पोऱ्या, आमन तुनाशी काय काम? काय तू टाईम ना पहिले आमले दुख देवाले आठे एयेल शे?” तेस्ना तून हाकी दूर गैराच डुक्करस्ना गवारा चरत होता. दुष्ट आत्मास्नी येशु ले हय सांगीसन विनंती करी, “कदी तू आमले काळस, त डुक्करस्ना गवारा मा धाळी दे.” तेनी तेस्ले सांग, “जावा!” आणि त्या निघीसन डुक्करस्मा घुशी ग्यात आणि सर्वा गवारा किनारा ना उतार नि जगावरुन पयत तलाव मा पळी गया आणि डुबी मरणा. आणि चारणारा पईनात, आणि नगर मा आणि गावस्मा जाईसन ह्या सगळ्या गोष्टी आणि जेनामा दुष्ट आत्मा होत्यात, तेना पुरा हाल सांगी आयकाळ. आणि सर्वा नगर ना लोक येशु ले भेटाले निघी उनात आणि तेले देखीसन विनंती करी, कि आमना प्रांत मधून बाहेर निघी जा. मंग येशु नाव वर चळीसन समुद्र ना पार ग्या, आणि आपला नगर मा उना. आणि कईक लोक एक लखवा ना आजारी ले खाट वर ठीसन, कारण कि तो चालू नई सकत होता तेना जोळे लयनात. येशु नि तेस्ना विश्वास देखीसन, त्या लखवा ना आजारी ले सांग, ओ पोऱ्या धीर ठेव तुना पाप माफ हुई ग्यात. आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक नि विचार करा, हवू त परमेश्वर नि निंदा करस. येशु नि तेस्ना मन ना गोष्टी समजीसन सांग, “तुमी लोक आपला-आपला मन मा वाईट विचार काबर करी ऱ्हायनात? सोप काय शे हय सांगण, तुना पाप माफ हुईनात, कि हय सांगण, उठ आणि चाल फिर?” पण एनासाठे कि तुमी समजी ल्या कि मले, माणुस ना पोऱ्या ले पृथ्वी वर लोकस्ना पाप माफ कराना बी अधिकार शे. तेनी लखवा ना आजारी ले सांगणा, उठ, आपली खाट उचल, आणि आपला घर चालना जाय. त तो उठीसन आपला घर चालना ग्या. लोक हय देखीसन चकित हुई ग्यात आणि परमेश्वर नि महिमा कराले लागनात जेनी माणसस्ले असा अधिकार दियेल शे. तेना नंतर, जव येशु जात होता, तव तेनी लेवी नाव ना एक कर लेणारले देख, जेना दुसरा नाव मत्तय होता. जो हलपाई (बाप) ना पोऱ्या होता. तो आपला कर लेवाना जागा वर बसेल देखना, आणि तेले सांग, “मना मांगे ये,” तो उठीसन तेना मांगे चालाले लागणा. आणि जव येशु आणि तेना शिष्य, मत्तय ना घर मा जेवण कराले बठना, त गैरा सावटा कर लेणारा लोक आणि दुसरा लोक जेस्ले पापी मनतस, ईसन येशु ना आणि तेना शिष्य संगे खावाले बठनात. हय देखीसन मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या परूशी समूह ना होतात, येशु ना शिष्यस्ले विचाराले लागनात, कि तुमना गुरु कर लेणारा लोक आणि पापी लोकस संगे जेवण काबर करस? हय आयकीसन येशु नि तेस्ले सांग, डाक्टर नि गरज चांगलास साठे नई पण आजारी ना साठे शे. एनासाठे तुमी जाईसन एना अर्थ सीखील्या, कि मी माणसस कण बलिदान नि ईच्छा नई ठेवस पण ईच्छा करस कि त्या दुसरास्वर दया करोत, कारण कि मी धर्मीस्ले नई पण पापिस्ले बलावाले एयेल शे कि त्या आपला पापस पासून मन फिरावा. तव योहान ना शिष्य लोक येशु कळे ईसन सांगणात, “काय कारण शे, कि आमी आणि परूशी लोक बिगर जेवण ना उपवास करतस, पण तुना शिष्य उपवास काब नई करतस?” येशु नि तेस्ले सांग, काय वराती जठलोंग नवरदेव तेस्ना संगे शे दुख करू सकतस? पण त्या दिन येतीन कि नवरदेव ले तेस्ना पासून आल्लग करामा ईन त्या टाईम वर त्या बिगर जेवण ना उपवास करतीन. कोणी आपला नवीन कपळा ना तुकळा ले जुना कपळा वर जोळत नई, नईत धुवा नंतर नवीन कपळा सुकळी जाईन, आणि जुना कपळा ले आजून फाळी दिन, तव जुना कपळा ना छिद्र गैरा मोठा हुई जाईन. जर मनी शिक्षा ले जुनी रिती-रिवाज ना संगे एक करामा ईन, त मनी शिक्षा या कपळा ना सारखी काम नई येवाव. आणि लोक नवीन द्राक्षरस जुना चामळी शी बनेल थैली मा नई ठेवतस. कारण अस करावर द्राक्षरस आणि थैली दोनी नाश हुई जातीन. येशु तेस्ले ह्या गोष्टी सांगत होता कि एक अधिकारी ईसन तेले प्रणाम करना आणि सांग, मनी पोर आते मरी जायेल शे, पण तू ईसन आपला हात तीनावर ठेव तव ती जीत्ती हुई जाईन. येशु उठीसन आपला शिष्यस्ना संगे तेना मांगे चालना ग्या. आणि जव त्या आपला रस्ता वरच होतात, त देखा, एक बाई नि जिले बारा वरीस पासून रक्तस्राव ना आजार होता, मागून ईसन तेना कपळा ना कोपरा ले स्पर्श करनी. कारण ती आपला मन मा सांगत होती कि, जर मी तेना लांबझगा ना कोपरा ले बी हात लावसू तरी परमेश्वर मले बरी करी दिन. येशु फिरीसन तिले देखना आणि सांगणा, पोर धीर धर, तुना विश्वास नि तुले बर करले शे. आणि ती बाई त्याच टाईम ले चांगली हुई गयी. जव येशु त्या अधिकारी ना घर मा पोहचना आणि बासरी वाजणारा आणि गर्दी ले रळतांना देख. तव येशु नि सांग, बाजू वा, पोर मरणी नई, पण जपी ऱ्हायनी शे. हय आयकीसन, गर्दी येशु वर हासू लागणी. पण जव ती गर्दी ले काळामा उना, त तेनी पोर जोळे जाईसन तीना हात धरा, आणि ती जीत्ती हुई गई. आणि या गोष्टीनी चर्चा त्या पुरा देश मा पसरी गई. जव येशु तठून पुढे ग्या, त दोन अंधा तेना मांगे हय सांगत चालनात, ओ राजा दाविद ना पोऱ्या आमना वर दया कर. जव तो घर मा पोहचना, त त्या अंधा तेना जोळे उनात, आणि येशु नि तेस्ले सांग, काय तुमले विश्वास शे, कि मी तुमले बरा करी सकसू? तेस्नी तेले सांग हा प्रभु, आमले विश्वास शे कि तू आमले बरा करी सकस. येशु नि तेस्ना डोयास्ले हात लाईसन सांग, कारण तुमी विश्वास करतस कि मी बरा करू सकस. एनासाठे तुमी बरा हुईजा. आणि तेस्ना डोया चांगला हुई ग्यात आणि येशु नि तेस्ले चेतावणी दिधी आणि सांग, सावध राहा कि तुमी कोले नका सांगज्यात कि मनी तुमना साठे काय करेल शे. पण तेस्नी निघीसन सर्वा प्रांत मा तेना यश पसारी टाक. जव येशु आणि तेना शिष्य जात होतात, तव लोक एक माणुस ले जो दुष्ट आत्मा शी पिळीत होता, आणि बोलू नई सकत होता, येशु ना जोळे लयनात. आणि जव येशु नि दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून भायेर काळी टाक, त तो बोलाले सुरु करी दिना. आणि गर्दी नि आश्चर्य करत सांग इस्त्राएल देश मा अस कदी नई देखामा उना. पण परूशी लोकस्नी हय सांग, “तो दुष्ट आत्मास्ना ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.” तव येशु आणि तेना शिष्य गालील जिल्हा ना कईक शहर आणि धाकला गावस मधून ग्यात, आणि त्या जागा ना प्रार्थना घरस्मा शिकाळत, आणि परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता शिकाळत फिरणा, आणि लोकस्ना हर प्रकार ना आजारस्ले आणि कमजोरीस्ले दूर करत ऱ्हायना. जव तो त्या मोठ्ठी गर्दिले देखना, त तेले लोकस वर दया उणी, कारण कि तेस्ना कळे कोणी नई होता जो चांगला प्रकारे तेस्नी नेतृत्व करू सकस, आणि तेस्नी देखभाल करू सकस, ठीक तसाच जसा बिगर मेंडपाळ ना मेंढ्या. व्याकुळ आणि भटकेल सारखा होतात. तव तेनी आपला शिष्यस्ले सांग, ज्या प्रकारे वावरस्मा गैरा पिक ऱ्हास, असा गैरा लोक शेतस ज्या परमेश्वर ना वचन ले आयकाना साठे तयार शे. पण परमेश्वर ना राज्य ना बारामा सांगाणा साठे लोक कमी शेतस. एनासाठे पिक ना मालक ले विनंती करा, कि तो आखो मजुर धाळो, कि त्या लोकस्ले राज्य ना बारामा सांगोत. तव येशु नि बारा शिष्यस्ले आपला जोळे बलाव आणि तेस्ले दुष्ट आत्मास्वर अधिकार दिना. कि तेस्ले काळोत आणि सर्व प्रकरणा आजार आणि सर्व प्रकरणी कमजोरीले बरा करोत. त्या बरा प्रेषितस्ना नाव हय शेतस, पयले शिमोन जेले पेत्र सांगामा येस, आणि तेना भाऊ अंद्रिया, जब्दी ना पोऱ्या याकोब आणि तेना भाऊ योहान. फिलिप्प आणि बर्थलमय, थोमा आणि कर लेणारा मत्तय, हलपाई ना पोऱ्या याकोब आणि तद्दय. शिमोन कनानी आणि यहूदा इस्कर्योत जेनी येशु ले धराई टाक. त्या बारा शिष्यस्ले येशु नि हय निर्देश दिसन धाळना, बिगर यहुदीस कळे नका जायजात, आणि शोमरोनी लोकस्ना कोणताही नगर मा प्रवेश नका करज्यात. पण इस्त्राएल देश ना घराणामाच जायज्यात, कारण कि त्या दवळेल मेंढ्यास्ना गवारा ना सारखा शेत. जसा तुमी निघतस, त तुमी हय सांगत प्रचार करा कि “स्वर्ग ना राज्य जोळे शे.” आजारीस्ले बरा करा, मरेल ले जित्ता करा, कोळीस्ले बरा करा, दुष्ट आत्मास्ले काळा, जो तुमले फुकट मा भेटेल शे, ते तुमी दुसरास्ले फुकट द्या. आपला बटवा मा पैसा, नईत सोन, आणि नईत चांदी, आणि नईत तांब ना शिक्का ठेवज्यात. रस्ता ना साठे नईत झोयना ठेवज्यात, नईत दोन जोळी कपळा, नईत जुत्ता आणि नईत काठी ल्या कारण कि मजुर ले आपली मजुरी भेटाले पाहिजे. ज्या कोणा नगर मा व गाव मा जाशान त असा व्यक्ती ले देखज्यात जो योग्य शे, आणि तुमले आपला पाव्हनास्ना रूप मा स्वीकार करो, आणि जठ लगून तुमी त्या नगर मधून नई निघतस, तेनाच घर मा ऱ्हायज्यात. आणि घर मा जातांना तेस्ले आशीर्वाद देयज्यात. जर त्या घर ना लोक योग्य अशीन, त तुमनी शांती तेस्ना वर पोहचीन, पण जर त्या योग्य नई होणार त तुमनी शांती तुमना कळे परत इजाईन. आणि जो कोणी तुमले स्वीकार नई कराव, आणि तुमना गोष्ट नई आयकाव, त्या घर व त्या नगर मधून निघतांना आपला पायनी माती झटकी ल्या. मी तुमले खर सांगस, कि न्याय ना दिन परमेश्वर तेस्ले सदोम व गमोरा तून बी जास्त दंड दिन. देखा मी तुमले मेंढ्यास्ना सारखा लांडगास्ना मधमा धाळस, एनासाठे साप ना सारखा बुद्धीमान आणि कबुतर सारखा भोळा व्हा. पण लोकस पासून स्वता सावधान राहा, कारण कि तुमना शत्रू तुमले महासभास्मा लीजातिन, आणि आपला प्रार्थना घरस्मा तुमले फटका मारतीन. तुमी मनासाठे, राज्यपाल आणि राजास समोर तेस्ना साठे, आणि बिगर यहुदी साठे सुवार्ता सांगा साठे लयामा येशान. जव त्या तुमले धरावतीन, त हय चिंता नका करज्यात, कि तुमी कसा सांगसुत आणि काय बोलशात, कारण कि जे काही तुमले सांगान राहीन, योग्य टाईम वर, तुमले सांगामा ईन. कारण कि तुमी तेच शब्द बोलशान जे स्वर्ग मधला बाप नि आत्मा तुमले दिन. शब्द तुमना कळून नई येवाव. भाऊ आपला भाऊ ले, आणि बाप आपला पोऱ्या ले, मारा साठे सोपतीन, कारण कि त्या मना मांगे येतस. आणि पोर माय-बाप ना विरोध मा उठीसन तेस्ले माराइ टाकतीन. सर्वा लोक तुमना व्देष करतीन, कारण कि तुमी मनावर विश्वास करतस. पण ज्या लोक मना संगे विश्वास योग्य ऱ्हातीन, आणि दुख खतम होता लोंग मनावर विश्वास करत ऱ्हातीन, आणि हार नई मानावत, त्या परमेश्वर ना द्वारे वाचाळामा येतीन. जव त्या तुमले एक नगर मा त्रास देतीन त दुसरा नगर मा पई जावाना, मी तुमले खर सांगस, कि मले, माणुस ना पोऱ्या ना येवाना पयले तुमी इस्त्राएल देश ना सर्वा नगरस्मा आपला काम पूर्ण नई करी सकावत. शिष्य आपला गुरु तून मोठा नई, आणि दास नईत आपला स्वामी तून मोठा शे. शिष्य गुरु ना, आणि दास स्वामी ना बराबर होवानाच गैरा शे, जव तेस्नी घर ना स्वामीले सैतान सांग, त निश्चित रूप मा त्या तुमना परिवार वालास्ले बी सांगतीन. एनासाठे तेस्नाशी नका घाबरू, जे काही आते दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्त्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन. जे मी तुमले आते अंधारामधून सांगस, तेले तुमी उजाया मा सांगा, आणि जे मी तुमना कान मा सांगेल शे, त्या गोष्टी घर ना छत वरून प्रचार करा, कि सर्वा आयकोत. ज्या शरीर ले मारू सकतस, पण आत्मा ले मारू नई सकतस तेस्ले नका घाबरा, पण परमेश्वर ले घाबरा जो आत्मा आणि शरीर दोनीस्ले नरक मा नष्ट करी सकस. दोन चिमण्या एक दमडी (एक दिनार ना 1-16 भाग शे) मा नई इकावत? तरी बी बिगर तुमना बाप नि ईच्छा ना तेस्ना मधून एक बी जमीन वर नई पडू सकतस. तेले हय बी माहित शे, कि तुमना डोका वर कितला बाल शेतस. एनासाठे, घाबरू नका, तुमी ह्या चीमण्यास्तून जास्त किंमत शेतस. जो कोणी लोकस्ना समोर सांगस कि त्या मना शिष्य शेतस, त मी आपला बाप ले जो स्वर्ग मा शे, सांगी देसू कि त्या मना शिष्य शेतस. पण कदी त्या लोकस्ना समोर हय सांगाले भ्यातस कि त्या मना शिष्य शेतस, त मी आपला बाप ले जो स्वर्ग मा शे, सांगी देसू कि त्या मना शिष्य नई शेतस. हय नका समजा कि मी पृथ्वी वर लोकस्ना मधमा शांती लयाले एयेल शे, मी लोकस्ना मधमा शांती नई पण फुट पाळाले एयेल शे. मी त एयेल शे, कि माणुस ले तेना बाप शी, आणि पोर ले तेनी माय पासून, आणि वारिले तिनी सासू पासून आल्लग करी देवू. आणि माणुसस्ना वैरी तेना परिवार नाच लोक राहतीन. जो माय व बाप ले मनातून जास्त प्रिय जानस, तो मना योग्य नई आणि ज्या बेटा व बेटी ले मनातून जास्त प्रिय जानस, तो मना शिष्य बनाना योग्य नई शे. आणि जो मना शिष्य होवा मुळे दुख उचलान आणि मरा साठे बी तयार नई होवाव, तो मना शिष्य बनाना योग्य नई शे. जो आपला जीव वाचावस, तो तेले गमाळस, आणि जो मना कारण आपला प्राण देस, त तेले तो जीवन भेटीन. जो तुमना स्वीकार करस, तो मना स्वीकार करस, आणि जे मना स्वीकार करतस, त्या मले धाळनारले स्वीकार करतस. जो भविष्यवक्ता ले भविष्यवक्ता समजीसन स्वीकार करस, जो प्रतीफय भविष्यवक्तास्ले भेटीन, तसाच प्रतीफय तेले भेटीन, आणि जो धर्मिले धर्मी सामजीसन स्वीकार करीन, तेले चांगला व्यक्ती ना सारखा प्रतीफय भेटीन. जो कोणी ह्या धाकला मधून एक ले ख्रिस्त ना शिष्य समजीसन फक्त एक ग्लास पाणी पाजस, मी तुमले खरज सांगस, तेले निश्चित रूप मा पुरस्कारीत करामा ईन. जव येशु आपला शिष्यस्ले आदन्या दि दिना, त तो नगरस्मा शिक्षण आणि प्रचार कराले तठून चालना ग्या. योहान नि बंदीगृह मा ख्रिस्ताना काम नि बातमी आयकीसन आपला शिष्यस मधून दोन ले तेना कळे हय विचाराले धाळ. आणि तेले सांग काय तुमीच त्या ख्रिस्त शेतस, जेले धाळाना करार परमेश्वर नि करेल होता, कि आमी कोणी दुसरा ना रस्ता देखुत? येशु नि उत्तर दिधा जे काही तुमी आयकतस आणि देखतस, ते सगळ जाईसन योहान ले सांगी द्या. कि अंधा देखतस आणि लंगडा चालतस-फिरतस कोळी शुद्ध करामा येतस आणि बहिरा आयकतस मरेल जित्ता हुई जातस आणि गरीबस्ले सुवार्ता आयकाळा मा येस. आणि धन्य शे ज्या मनावर आपला विश्वास नई सोळतस. जव योहान ना शिष्य तठून चालना ग्यात तव येशु योहान ना बारामा लोकस्ले सांगाले लागणा, तुमी उजाळ जागा मा काय देखाले जायेल होतात? काय हवा कण हालस ती वेत ले? मंग तुमी काय देखाले जायेल होतात? काय माहागा कपळा घालेल लोकस्ले देखाले ज्या राजभवन मा ऱ्हातस. त मंग काय देखाले जायेल होतात? काय कोणता भविष्यवक्ता ले देखाले? हा, मी तुमले सांगस, पण भविष्यवक्ता तून बी मोठा ले. योहान तो माणुस शे, पवित्र शास्त्र मा परमेश्वर तेना बारामा सांगस, देख, मी आपला संदेश लयनारा ले तुना पुळे धाळस, जो तुना पुढे तुना रस्ता तयार करीन. मी तुमले खर सांगस, कि जो बाईस कळून जन्म लीयेल शे, तेस्ना मधून योहान बाप्तिस्मा देणारातून कोणीच मोठा नई हुयना, पण जो स्वर्ग ना राज्य मा सर्वा धाकलास्तून धाकला शे, तो तेना पेक्षा बी मोठा शे. आणि जव पासून योहान बाप्तिस्मा देणार नि प्रचार कराले सुरुवात करी, त्या टाईम तून आते लोंग स्वर्ग ना राज्य जबरजस्ती पुळे वाळी ऱ्हायना शे, आणि हिंसक लोक येले नाश कराना प्रयत्न करी ऱ्हायनात. भविष्यवक्ता ना सर्वा पुस्तके आणि मोशे ना नियम मा योहान बाप्तिस्मा देणार ना येता लोंग राज्य ना बारामा भविष्यवाणी करामा उणी. आणि ईच्छा अशीन त विश्वास करा, एलीया, जेना बारामा येवानी भविष्यवक्तास्नी सांग कि तो ईन, तो हवूच शे. “ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा.” “मी ह्या टाईम ना लोकस्ले उदाहरण कसा कण देवू? त्या, त्या पोरस सारखा शेतस, ज्या बजारस्मा बठीसन एक दुसराले आवाज देतस. कि आमी तुमना साठे खुशी ना गीत म्हणनुत, पण तुमी नई नाचनात, दुख ना गाना म्हणनुत, पण तुमी दुखी नई हुईनात. कारण कि योहान बाप्तिस्मा देणार उपवास करत होता, आणि दारू नई पेत होता, आणि त्या सांगत होतात, कि तो एक दुष्ट आत्मा शी पिळीत शे. माणुस ना पोऱ्या खात-पीत एयेल शे, आणि तुमी सांगतस, देखा, खादाळ व दारूबाज माणुस, कर लेणारस्ना आणि पापिस्ना मित्र. पण ज्ञान आपला सर्वा काम ना द्वारे खर ठरावामा येस.” तव तो त्या लोकस्ले धमकाव ज्या त्या शहरस मा राहत होतात, जेस्ना मा तेनी गैरा सावटा सामर्थ्य ना काम करेल शे, कारण तेस्नी आपला मन नई फिरायेल होतात. हाय, खोराजिन, हाय, बेथसैदा नगर जे सामर्थ्य ना काम तुमना मा करेल शे, जर ते सोर आणि सिदोन शहर मा करामा येत, त तठला लोक गैरा पयलेच तठ आंगावर ली लेतत आणि आपला वर राक छिळकि लेतात, हय दाखाळा साठे कि त्या आपला पापस पासून मन फिराई लीयेल शेतस. पण मी तुमले सांगस, कि न्याय ना रोज तुमनी दशा कण ती शिक्षा जी परमेश्वर सोर आणि सिदोन शहर ले दिन, ती त्या शिक्षा तून गैरी कमी राहीन जो ती तुमले दिन. ओ कफर्णहूम नगर ना लोक, काय तू स्वर्ग लोंग उंच करामा येशीन? त तुमले अधोलोक लोंग खाले पाळामा ईन, जे सामर्थ्य ना काम तुना मा करेल शे, जर सदोम शहर मा करामा येत, त त्या आते लोंग बनेल ऱ्हातस. पण मी तुमले सांगस, कि न्याय ना रोज तुमनी दशा कण ती शिक्षा जी परमेश्वर सोर आणि सदोम ले दिन, ती त्या शिक्षा तून गैरी कमी राहीन जो ती तुमले दिन. त्याच क्षण येशु नि सांग, ओ बाप स्वर्ग आणि पृथ्वी ना प्रभु मी तुना धन्यवाद करस, कि तुनी ह्या गोष्टीस्ले समजदार आणि ज्ञानी लोकस पासून दपाळी ठेव आणि ज्या लोक साधारण लोकस सारखा शे, तेस्ले प्रगट करेल शे. हा, ओ बाप, कारण कि तुले हय चांगल लागण. मना बाप नि मले सर्व काही सोपी दियेल शे, फक्त तोच शे जो पोऱ्या ले ओयखस, एकच जो खरज बाप ले ओयखस तो पोऱ्या शे, आणि एना शिवाय, पोऱ्या कोणी खास लोकस्ले बाप ना बारामा सांगाणा निर्णय करस. हे कष्ट करणारा आणि भार ना खाले दाबायेल लोक मना जोळे या मी तुमले विश्राम दिसू. मना दुस्सेर तू आपला वर उचली ले, आणि मना कण शिका कारण मी नम्र आणि मन मा लीन शे, आणि तुमले आपला मन मा आराम भेटीन. कारण कि मना दुस्सेर सहज आणि मना भार हलका शे. त्याच टाईम ले येशु पुळला आराम ना दिन वावरस मधून जात होता, आणि तेना शिष्य लोकस्ले भूक लागणी म्हणून उंब्या मधला दाणाले तोळाले लागनात आणि खाऊ लागनात. परूशी लोकस्नी हय देखीसन तेले सांगणात, देख, तुना शिष्य लोक जे काम आराम ना दिन करी ऱ्हायनात, ते मोशे ना नियम ना विरुद्ध मा शे, तुले तेस्ले सांगाले पायजे अस कराले नको पायजे. तेनी तेस्ले सांग, काय तुमी कदी नई वाच? कि दाविद नि, आणि तेना जोळीदार गैरा भुक्या हुयनात तव तेनी काय करेल होत? तो कसा परमेश्वर ना तंबू मा गया आणि भेटणा भाकरी खादात, जेस्ले खावाना नईत तेले आणि तेना साथिले, फक्त यहुदी पुजारीस्ले योग्य शे. काय तुमनी मोशे ना नियम मा वाचेल नईत कि यहुदी पुजारी आराम ना दिन परमेश्वर ना मंदिर मा आराम ना दिन नि विधी ले तोळावर बी निर्दोष ठरतस? पण मी तुमले सांगस, कि आठे तो शे, जो परमेश्वर ना मंदिर पेक्षा महान शे. तुमले माहित शे कि परमेश्वर ना पुस्तक मा या शब्द ना अर्थ काय शे, मनासाठे बलिदान करा पेक्षा, मनी ईच्छा शे कि तुमी दुसरास्ना संगे दयाळू बना. कदी तुमी समजतात कि येणा काय अर्थ शे, त तुमी मना या निर्दोष शिष्यस्नी निंदा नई करतात. माणुस ना पोऱ्या त आराम ना दिन ना बी प्रभु शे. तठून चालीसन तो तेस्ना प्रार्थना घर मा उना. तठे एक माणुस होता, जेना हात सुकेल होता, आणि परूशी लोकस्नी येशु वर दोष लावा साठे तेले विचार, काय आराम ना दिन बर करान योग्य शे? तेनी तेस्ले सांग, मानी ल्या कि तुमना मधून कोणी तरी एक मेंढी शे. कदी ती आराम ना दिन एक खड्डा मा पळी जास, त तुमी निश्चित रूप मा तिले वाचाळी लीशात. माणुस ना महत्व मेंढी पेक्षा कितला वाढीसन शे, कारण आराम ना दिन चांगल कार्य करान, आणि वाईट नई करान निश्चित रूप मा चांगल शे. तव येशु नि त्या माणुस ले सांग, आपला हात पुळे कर. तेनी पुळे करा, आणि तो परत दुसरा हात ना सारखा चांगला हुईग्या. तव परूशी लोक बाहेर जाईसन तेना हात कसा काय बरा करा मनिसन तेना विरोध मा योजना कराले लागनात कि तेले मारी टाकुत? हय समजीसन येशु तठून चालना ग्या. आणि गैरा लोक तेना मांगे चालू लागनात, आणि तेनी सर्वास्ले बर कर. पण येशु नि दुष्ट आत्मास्ले जोरमा धमकाव आणि सांगणा, “लोकस्ले नका सांगज्यात कि मी परमेश्वर ना पोऱ्या शे.” तेनी अस एनासाठे सांगेल होत, कारण कि जे यशया भविष्यवक्ता द्वारा परमेश्वर नि सांगेल होत ते पूर्ण हो. “देखा, हवू मना सेवक शे, जेले मनी निवाळेल शे, मना प्रेमळ, जेना कण मना मन खुश शे. मी आपला आत्मा तेनावर टाकसु, आणि तो सर्वा जाती ना लोकस्ले न्याय नि प्रचार दिन.” तो कोणता बी कमजोर ले नुकसान नई पोहोचाळाव आणि जो झगडा कराव नईत ओरडाव, आणि नईत बजारस्मा वरळीसन गर्व वाल्या गोष्टी कराव. तो कोणता बी कमजोर ले नुकसान नई पोहचाळाव जो एक नाजूक वेत ना सारखा कमजोर राहो. आणि धुक्कय देणारी बत्तीले नई मलावाव, पण तो सुनिश्चित करीन कि न्याय करामा येवो. आणि सर्वा जाती ना लोक तेना नाव वर आशा धरतीन. तव लोक एक आंधळा मुक्काले जो दुष्ट आत्मा शी पिळीत होता, तेना जोळे लयनात, आणि जव येशु नि दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून भायेर काळी टाक, त तो मुक्का बोलाले आणि देखाले लागणा. एनावर सर्वा लोक चकित हुईसन सांगाले लागनात, हवू काय राजा दाविद ना पोऱ्या शे. पण परूशी लोकस्नी हय आयकीसन सांग, “तेनामा सैतान शे, तो दुष्ट आत्मा ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.” तेनी तेस्ना मन ना गोष्टीस्ले समजीसन तेस्ले सांग, जर एक राज्य ना लोक आपस मा भांडतस त्या नाश हुई जातीन. आणि कोणता नगर व परिवार ना लोक एक दुसरा ना विरुद्ध मा वाटायेल शे, त तो परिवार एकत्र नई राहू सकाव. आणि कदी सैतानच दुष्ट आत्मा ले काळीन, त तो आपलाच विरोधी हुई जायेल शे, त तेना राज्य कसा बनेल राहीन. आणि, कदी मी सैतान नि मदत कण दुष्ट आत्मास्ले काळस, त तुमना वंश कोणी मदत कण काळतस? एनासाठे तुमनाच वंश तुमना न्याय करतीन. पण कदी मी परमेश्वर नि आत्मा नि मदत कण दुष्ट आत्मास्ले काळस, त परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईपळेल शे. कि कसा कोणी माणुस एक ताखतवर माणुस ना घर घुशिसन तेनी संपत्ती ले लुट सकस जठलोंग कि पयले त्या ताखतवर ले नई बांधीलेस? आणि तव तो तेना घर लुटी लीन. जो मना संगे नई, तो मना विरोध मा शे, आणि जो मना संगे नई गोया करस, तो पसरावस. एनासाठे मी तुमले सांगस, कि माणुस ना सर्व प्रकार ना पाप आणि निंदा परमेश्वर त्या लोकस्ना पापस्ले माफ करी दिन. पण परमेश्वर नि आत्मा ना बारामा निंदा करीन, माफ नई करामा येवाव. जो कोणी माणुस ना पोऱ्या ना विरोध मा काही गोष्ट सांगस, परमेश्वर त्या लोकस्ना पापस्ले माफ करी दिन. पण जो कोणी पवित्र आत्मा ना बारामा निंदा करीन, तेना अपराध नईत ह्या लोक मा आणि नईत येणार मा माफ करामा ईन. जर एक झाळ चांगला शे, त तेना फय बी चांगला राहीन. कदी एक झाळ खराब शे, त तेना फय बी खराब राहीन. कारण कि झाळ फयच कण ओयखामा येस. तुमी विषारी सापस्ना पिल्लास्ना सारखा शेतस, तुमी वाईट हुईसन कसा चांगला गोष्टी सांगू सकतस? कारण कि जे मन मा भरेल शे, तेच तोंड वर येस. एक चांगला माणुस एक चांगला मन ना खजाना मधून चांगली वस्तू उत्पन करस, आणि एक वाईट माणुस एक वाईट मन ना खजाना मधून वाईट वस्तू उत्पन करस. आणि मी तुमले सांगस, कि ज्या-ज्या रिकाम्या गोष्टी लोक संगतीन, न्याय ना दिन प्रत्येक गोष्ट नि लेखा देतीन. कारण परमेश्वर न्याय करीन आणि एक व्यक्ती ले तेना द्वारे सांगेल शब्दस मुळे निर्दोष घोषित करीन, तो न्याय करीन आणि एक व्यक्ती ले तेना द्वारे सांगेल शब्दस मुळे दोषी घोषित करीन. एनावर काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोकस्नी जो यहुदी ना मधला धार्मिक पुढारीस्ना समूह मधून एक होता. तेले सांगा हे गुरु तुनावर एक चिन्ह देखाना विचार शे. तेनी तेले उत्तर दिधा, ह्या युग ना वाईट आणि व्यभिचार लोक चमत्कारी चिन्ह झामलतस, पण योना भविष्यवक्ता ना संगे जे हुयन त्या चिन्हले सोळीसन आजून दुसरा कोणताच चमत्कारी चिन्ह तुमले नई भेटाव. योना तीन रात दिन महा मासा ना पोट मा ऱ्हायंना, तसाच मी माणुस ना पोऱ्या तीन रात दिन पृथ्वी ना मधमा राहीन. निनवे ना लोक न्याय ना दिन ह्या युग ना लोकस्ना संगे उठीसन तेस्ले दोषी ठरावतीन, कारण कि तेस्नी योना ना प्रचार आयकीसन, मन फिरावा आणि आठे तो शे जो योना तून बी मोठा शे. पण तुमी पश्चाताप कराले नकारतस. दक्षिण दिशा नि राणी न्याय ना दिन ह्या युग ना लोकस संगे उठीसन तेस्ले दोषी ठराईन, कारण कि ती शलमोन ना ज्ञान आयकाले गैरा दूर तून उणी, आणि दूर तून शे, जो शलमोन तून बी मोठा शे. पण तुमी पश्चाताप कराले नकारतस. जव दुष्ट आत्मा माणुस मधून निघी जास, त सुखी जागा मा आराम झामलाले फिरस, आणि सापळत नई. ती स्वता ले सांगस, कि ज्या व्यक्ती मधून मी एयेल शे, मी जठून निघेल होती, परती जासू, आणि ईसन तेले सूना देखीसन, त्या व्यक्ती ना जीवन ले घर ना सारखी देखस जेले स्वच्छ करामा एयेल शे. दुष्ट आत्मा जाईसन आपला तून जास्त वाईट सात दुष्ट आत्मास्ले आपला संगे लई येस, आणि त्या व्यक्ती मा घुशिसन तठे ऱ्हास, आणि त्या माणुस्नी मांगली स्थिती पयले तून बी जास्त खराब हुई जास. या टाईम ना वाईट लोकस्ना संगे असाच हुईन. जव तो गर्दी संगे बोलीच ऱ्हायंता, त तेनी माय आणि तेना लहान भाऊ उनात आणि बाहेर उभा होतात, आणि तेना संगे बोलान देखी ऱ्हायंतात. कोणी तेले सांग, देख तुनी माय आणि तुना भाऊ बाहेर उभा शेतस, आणि तुना संगे बोलान देखी ऱ्हायंतात. हय आयकीसन तेनी सांगनारस्ले हवू उत्तर दिधा, कोण शे मनी माय? आणि कोण शे मना भाऊ? आणि आपला शिष्यस कळे हात पुढे करीसन सांग, मनी माय आणि मना भाऊ ह्या शेतस. कारण कि त्या हय करतस जी परमेश्वर नि ईच्छा शे, मनी माय आणि मना भाऊ ह्या शेतस. कारण कि त्या हय करतस जी स्वर्ग मधला परमेश्वर नि ईच्छा शे, त्याच मना धाकला भाऊ आणि बहिणी आणि माय शेतस. त्या दिन येशु घरून निघीसन समुद्र ना तठ वर जाई बठना. आणि तेना जोळे एक अशी मोठी गर्दी एकत्र हुईनी कि तो नाव वर चळी ग्या, आणि सगळी गर्दी समुद्र ना तठ वर उभी ऱ्हायनी. आणि तेनी आपला दाखलास्मा कईक गोष्टी सांगणा, देखा एक माणुस आपला वावर मा काही बीज पेरासाठे निघना. पेरतांना काही बीज रस्ता ना तठ वर पळणा आणि पक्षी ईसन तेले खाई ग्यात. काही बीज दगडसवाली जमीन वर पळणा, जठे तेस्ले जास्त माती नई भेटणी, आणि नरम माती नई भेटा मुळे त्या लवकर उगी उनात. पण सूर्य निघा वर त्या बई ग्यात, आणि मुया नई धरा मुळे सुखी ग्यात. काही बीज काटावाला झाळीस्मा पळणा, आणि झाळ वाळीसन तेस्ले दाबी टाकनात. पण काही सुपीक जमीन वर पळणा, आणि वाळीसन तो गैरा पिक लयना, आणि कोणी तीस पट, कोणी साठ पट, आणि कोणी शंभर पट पिक लयना. ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा. शिष्यस्नी तेना जोळे ईसन तेले सांग, तू तेस्ना संगे दाखलास्मा काब बोलस? तेनी उत्तर दिधा, तुमले त परमेश्वर ना राज्यांनी समज खरेपणा मा दियेल शे, पण तेस्ले नई. कारण कि जेले समजा नि ईच्छा शे (जे मी शिकाळी ऱ्हायनु), परमेश्वर तेले आखो जास्त समज दिन. पण जो कोणी हय समजा नि ईच्छा नई ठेवत कि मी काय सिकस, आठ लगून कि जी समज तेनापा शे, परमेश्वर तिले तेना पासून लीलीन. मी तेस्ना संगे दाखलास्मा एनासाठे गोष्टी करस, कारण कि त्या देखीसन नई देखतस, आणि आयकीसन नई आयकतस आणि नई समजतस. “आणि तेस्ना विषय मा यशया भविष्यवक्ता नि हयी भविष्यवाणी पुरी होस, तुमी कानस कण आयकशात, पण समजाव नईत, आणि डोयास कण त देखशात, पण तुमले नई सुजाव. कारण ह्या लोकस्ना मन कठोर हुई जायेल शेत. आणि त्या कानस कण जोरमा आयकतस, आणि तेस्नी आपला डोया झाकी लीयेल शे. कदी अस नई हुई जावो कि त्या डोयास कण देखोत, आणि कानस कण आयकोत, आणि मन कण समजोत आणि पयोत मंग मी तेस्ले बरा करतू.” पण धन्य शे तुमना डोया, कि त्या देखतस, आणि तुमना कान, कि त्या आयकतस. कारण कि मी तुमले खरज सांगस, कि गैरा भविष्यवक्तास्नी आणि धर्मीस्नी विचार कि ज्या गोष्टी तुमी देखतस, देख पण नई देखतस, आणि ज्या गोष्टी तुमी आयकतस, आयकनात, पण नई आयक. आते तुमी पेरणार ना दाखला ना अर्थ आयका. जो कोणी राज्य ना वचन आयकीसन नई समजत, तेना मन मा जे काही पेरायेल होत, तेले तो द्रुष्ट ईसन हिसकाय लीजास, हवू तोच शे, जो रस्ता ना किनारा वर पेरायेल होत. आणि जो दघळस वाली जमीन वर पेरेल होत, हवू तो शे, जो वचन आयकीसन लगेच खुशी ना संगे मानी लेतस. पण आपला मा मुया नई ऱ्हावाना मुळे तो थोडाच दिन लोंग राहू सकस, आणि जव वचन मुळे क्लेश व संकट होस, त लगेच ठोकर खास. जो काटेरी झाळीस्मा पेरेल शे, हवू तो शे, जो परमेश्वर ना वचन ले आयकस, पण संसारनी चिंता आणि धन ना धोका परमेश्वर ना वचन ले दाबस, आणि ते फय नई लयस. जे चांगली जमीन मा पेरायेल होत, हवू तो शे, जो परमेश्वर ना वचन ले आयकीसन समजस, आणि तेस्ना जीवन मा काही चांगला परिणाम येतस, जसा कि कोणी शंभर पट कोणी साठ पट, आणि कोणी तीसपट. येशु नि तेस्ले एक आखो दाखला दिधा, स्वर्ग ना राज्य ह्या प्रकारे शे, कि एक शेतकरी आपला वावर मा चांगल बीज पेरा. पण जव लोक जपी ऱ्हायंतात, त तेना शत्रू ईसन जंगली बीज पेरीसन चालना ग्या. जव रोप उगी जास आणि पिकाले लागो, त शेतकरी ना दास नि जंगली दाना ना रोप देख. एनावर घर वाला ना दासस्नि ईसन तेले सांग, हे स्वामी काय तुनी आपला वावर मा चांगल बीज नई पेरेल होत? मंग जंगली दाना ना रोप तेनामा कोठून कस उनात? शेतकरी नि तेस्ले सांग, हय कोणा शत्रू ना काम शे, दासस्नि तेले सांग, काय तुनी ईच्छा शे, कि आमी जायसन जंगली दाना कापी लेवूत? शेतकरी नि सांग, नई, अस नका करा. अस नई हुई जावो कि जंगली दाना ना रोपले कापतांना तुमी तेस्ना संगे गहू बी उपाळी लेवोत. कापणी लोंग दोनीस्ले एकत्र वाडू द्या, आणि कापणी ना टाईम ले कापनारस्ले सांगसू, पयले जंगली दाना ना रोप गोया करीसन चेटाळा साठे तेस्ना गठ्ठा बांधी ल्या, आणि गहू ले मना कोठारामा एकत्र कर. तेनी तेस्ले एक दाखला सांग, परमेश्वर ना राज्य राई ना दाना सारखा शे, कोणी व्यक्ती नि आपला वावर मा पेरी टाक. पृथ्वी ना सर्वा बिजस मधून सर्वास तून धाकला बीज सारखा शे, पण जव तो वाळस तव असा झाळ होस कि आकाश ना पक्षी तेना फांद्यास्वर ऱ्हातस. तेनी एक आजून दाखला तेस्ले आयकाळ, थोळासा खमीर जास्त पीठ मा पसरी जास आणि तेले चांगला प्रकारे प्रभाव करस. त्याच प्रकारे, कईक लोकस्ना मधमा परमेश्वर ना शासन ना प्रभाव सगळी दुनिया मा पसरी जास. या सगळ्या गोष्टी येशु नि दाखलास्मा लोकस्ले सांगी, आणि तो गर्दी ले फक्त दाखला द्वाराच शिक्षा देत होता. कि जे वचन भविष्यवक्तास द्वारे सांगेल शे, पूर्ण होवो कि “मी दाखला सांगाले बोलसु कि मी त्या गोष्टीस्ले जग नि उत्पती पासून दपेल शे प्रगट करसू.” जव तो गर्दिले सोळीसन घर मा उना आणि तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगणात शेतना जंगली दाना ना दाखला आमले समजाडी दे. येशु नि तेस्ले दाखला ना अर्थ ह्या प्रकारे सांग, चांगल बीज पेरणार शेतकरी मी, माणुस ना पोऱ्या शे. वावर संसार ना लोक शे, चांगल बीज परमेश्वर ना राज्य ना लोक शे, आणि जंगली बीज सैतान ना राज्य ना लोक शे. जो शत्रूनी तेले पेरेल शे, तो सैतान शे, कापणी जगत ना अंत शे, आणि कापणारा परमेश्वर ना दूत शे. जस जंगली दाना ना रोप गोया करतस, आणि बायामा येतस तसाच जगत ना अंतमा हुईन. मी माणुस ना पोऱ्या आपला परमेश्वर ना दूतस्ले धाळसू, आणि तेना राज्य मा सर्वा ठोकर ना कारण ले आणि वाईट काम करणारस्ले उपाळी देतीन. आणि स्वर्गदूत तेस्ले अग्नी कुंडा मा टाकतीन जडे रळाना आणि दुख कण दातखाने चालीन. त्याच टाईम ले धर्मी आपला बाप ना राज्य मा सूर्य सारखा चमकतीन, ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा. स्वर्ग ना राज्य, एक खजाना सारख शे, जेले एक व्यक्ती नि एक वावर मा दपाळेल होत ते सापळन, आणि खुशिमा तो आपला घर जाईसन आपल सर्व विकी टाक आणि त्या वार ले विकत लीधा. मंग स्वर्ग ना राज्य एक व्यापारी सारखा शे जो चांगला मोतीस्ना शोधा मा होता. जव तेले एक जास्त किंमत मोतीस्ना भेटीन त तो जाईसन आपल सर्व काही विकी टाक आणि त्याले विकत लीनात. स्वर्ग ना राज्य ह्या प्रमाणे शे, कि जव जाईस्ले समुद्र मा फेकामा एस, आणि सर्वा प्रकरणा मासा ले धरामा एस, आणि बठीसन चांगल्या-चांगल्या मासा चांगली-चांगली भांडमा टाकनात आणि वाईट फेकी दिधा. आणि जव जाय भरी गई त मासोया लोक तिले तठ वर वळी लयनात आणि तेस्नी चांगल्यास्ले टोमास्मा एकत्र कर पण खराब मासास्ले फेकी टाकनात. जग ना अंतमा आसज हुईन परमेश्वर ना दूत येतीन दुष्ट लोकस्ले धर्मी लोकस पासून आल्लग करतीन. आणि दुष्ट लोकस्ले अग्नीकुंड मा टाकतीन, आणि तठे रळन आणि दुख कण दात खाना हुईन. येशु नि तेस्ले सांग, “काय तुमी ह्या सर्वा गोष्टी समजी ग्यात?” शिष्यस्नी तेले उत्तर दिधा, “हा प्रभु.” येशु नि तेस्ले सांग, प्रत्येक मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक जो स्वर्ग ना राज्य ले बी समजस, त्या माणुस ना सारखा शे, जेना घर मा कोठरी शे. तो तठून जुनी आणि नवीन दोनी प्रकार नि किमती वस्तू बाहेर काळस. जव येशु ह्या सर्वा दाखला सांगी दियेल होता त तो कफर्णहूम शहर मधून चालना ग्या. आणि आपला नासरेथ नगर मा ईसन, तेस्ना प्रार्थना घर मा तेस्ले असा शिक्षण देऊ लागणा कि त्या चकित हुईसन सांगू लागनात, कि येले हवू ज्ञान आणि सामर्थ्य कोठून भेटनात? काय हवू सुतार ना पोऱ्या नई शे? आणि तेनी मायन नाव मरिया नई आणि तेना भावूस्ना नाव याकोब योहान शिमोन आणि यहूदा नई. आणि काय तेना पाच बहिणी बी आठेच आमना मधमा नई राहतस मंग तेले हय कथाईन भेटन. ह्या प्रकारे तेस्नी तेना कारण ठोकर खायतस पण येशु नि तेले सांग कि भविष्यवक्ता ले आपला देश मा आदर नई भेटस. आणि तेनी तठे तेस्ना अविश्वास मुळे गैरा सामर्थ्य ना काम नई करात. त्या टाईम ले चौथा भाग ना राजा हेरोद नि त्या कामस्ना बारामा आईक ज्या येशु करत होता. आणि आपला सेवकस्ले सांग हवू योहान बाप्तिस्मा देणारा शे, तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे, हवूच कारण शे कि तेना कळे या सामर्थ्य ना कामस्ले करासाठे परमेश्वर नि शक्ती शे. कारण हेरोद आपला भाऊ फिलिप्प नि बायको हेरोदियास मुळे योहान ले धरीसन बांध, आणि बंदीगृह मा टाक. कारण कि योहान नि तेले सांग होत, कि तुले आपला भाऊ नि बायको ले ठेवण तुना साठे चांगल नई. एनासाठे तो तेले मारी टाकाना देखत होता, पण लोकस्ले घाबरत होता, कारण कि त्या तेले भविष्यवक्ता मानत होतात. पण हेरोद ना जन्म दिन उना हेरोदियास नि पोर उत्सव मा नाचीसन हेरोद राजा ले खुश करनी. एनावर राजा हेरोद नि वचन दिधा, जे काही तू मांगशी, मी तुले दिसू. ती आपली माय ना आयकीसन बोलणी योहान बाप्तिस्मा देणार ना डोक ताट मा मांगाळी द्या. राजा गैरा उदास हुईग्या, पण आपली शेप्पत आणि तठे संगे पावनास मुळे आज्ञा दिना कि देवामा येवो. आणि तेनी बंदीगृह मा लोकस्ले धाळीसन योहान ना डोक कापाळी टाक. आणि तेन डोक एक ताट मा ठेयीसन लयामा उन, आणि पोर ले देवामा उन, आणि ती पोर तेले आपली माय जोळे लीगई. जव योहान ना शिष्य उनात आणि तेना धळ ले उचलीसन कबर मा ठेवा. आणि जाईसन येशु ले सांग. जव येशु नि हय आयक, तो नाव वर चळीसन कोणती सुनसान जागा वर एकांत मा चालना ग्या, लोक हई आयकीसन नगर-नगर मधून पायी तेना मांगे चालाले लागनात. तेनी निघीसन एक मोठी गर्दी देखी, आणि तेस्ना वर दया करी, आणि तेस्ना आजारस्ले बरा करना. जव दुफार ना गैरा उशीर नंतर, तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगाले लागनात, हय सुनसान जागा शे आणि संज्याकाय हुई जायेल शे, लोकस्ले धाळी दे, कि त्या वस्तीस्मा जाईसन आपला साठे खावाले विकत लेवोत. पण येशु नि तेस्ले सांग तेस्न जान आवश्यक नई, तुमी तेस्ले खावाले द्या. तेस्नी तेले सांग, आठे आमना जोळे पाच भाकरी आणि दोन मासास्ले सोळीसन आखो काहीच नई शे. तेनी सांग तेस्ले आठे मना आडेच लया. तव तेनी लोकस्ले गवत वर बसाले सांग, आणि पाच भाकरी आणि दोन मासा ले लीधा, आणि स्वर्ग कळे देखीसन धन्यवाद करना आणि भाकरी तोडीसन शिष्यस्ले दिधा, आणि शिष्यस्नी लोकस्ले. जव बठ्ठा खाईसन तृप्त हुई ग्यात त शिष्यस्नी उरेल भाकरीस्ना तुकळा बारा टोपल्या भरीसन उचलनात. आणि खाणारा बाया आणि पोरस्ले सोळीसन लोक पाच हजार ना आस-पास होतात. तव तेनी शिष्यस्ले लवकर नाव वर चडाले विवश कर कि त्या तेना तून पयले त्या पार जावोत, जठलोंग तो लोकस्ले धाळस. आणि लोकस्ले धाळा नंतर, तो पहाळ वर प्रार्थना कराले आल्लग चळी ग्या. आणि जव संज्याकायले तो तठे एखटा जमीन वर होता. त्या टाईम ले नाव समुद्र ना किनारा पासून गैरी दूर होती, आणि लाठास कण ईकळे तिकळे झोला मारत होती, कारण कि हवा समोरून येत होती. आणि येशु रात ना चौथा पहरले समुद्र वर चालत तेस्ना कळे उना. शिष्य तेले समुद्र वर चालतांना देखीसन घाबरी ग्यात, आणि सांगाले लागनात, “हवू सैतान शे,” आणि घाबरीसन ओरडाले लगनात. तव येशु नि लगेच तेस्ना संगे बोलना, आणि सांग, धीर धरा, मी शे, घाबरू नका. पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हे प्रभु, जर तू येशुच शे, त मले आपला जोळे पाणी वर चालीसन येवानी आज्ञा दे.” तेनी सांग, ये तव पेत्र नाव वरून उतरीसन येशु जोळे जावाले पाणी वर चालाले लागणा. पण हवाले देखीसन घाबरी ग्या आणि बुळू लागणा तेनी वरळीसन सांगणा, हे प्रभु, मले वाचाळ. येशु नि आपला हात पुळे करीसन पेत्र ले पकळी लीधा आणि तेले बाहेर निघाले मदत करी, आणि तेले सांग, हे अविश्वासी, तुनी काब संशय धरा? जव त्या नाव वर चळी ग्यात, त हवा थांबी गई. एनावर ज्या नाव वर होतात, तेस्नी येशु ना जोळे ईसन तेले नमन करीसन सांगणात, खरज तू परमेश्वर ना पोऱ्या शे. त त्या गनेसरत मा उनात. आणि तडला लोकस्नी तेले वयखीसन पुरा जिल्हा मा सांगाले धाळ, आणि सर्वा आजारीस्ले तेना जोळे लयनात. आणि तेनाशी विनंती कराले लागनात कि तो तेस्ले आपला वस्त्र ना गोंड्याले फक्त हात लाऊ दे, आणि जीतलास्नी तेले हात लावत होतात सर्वा बरा हुई ग्यात. एक दिन काही परूशी लोक आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या यरूशलेम शहर मधून एयेल होतात, येशु कळे ईसन सांगू लागनात. तुना शिष्य आमना रीतीरिवाज नुसार काब नई करतस? त्या गंधा हात वर जेवण काब करतस? तेनी तेस्ले उत्तर दिसन सांग, तुमी परमेश्वर ना नियमले अस्वीकार करी देतस, कारण तुमी कामस्ले आपली रीतीरिवाज वर करी साकोत. कारण कि परमेश्वर नि सांगेल शे, “कि आपला बाप आणि आपली माय ना आदर कर,” आणि “कोणी आपला बाप व माय ले वाईट सांगस तो निश्चित मारी टाकाय जाईन.” पण तुमी सांगतस कि कोणी आपला बाप व माय ले सांगस, मी तुमनी मदत नई करू सकत कारण जे मी तुमले देतु ते मनी परमेश्वर ले देवानी शेप्पत खायेल शे. एनासाठे हई भेट फक्त परमेश्वर साठे शे. आणि मंग तव पासून, तुमी त्या माणुस ले तेनी माय व बाप नि मदत करानी परवानगी नई देतस. या प्रकारे, तुमी परमेश्वर ना पुस्तक ना पालन नई करतस, जी तेनी तुमले दियेल शे, पण त्या रीतीरिवाज ना पालन करतस ज्या तुमना आजोबास्ना द्वारे सोपेल शे. ओ कपटी, यशया नि परमेश्वर ना पुस्तक मा जी भविष्यवाणी करी, “ती तुमना सारखा ढोंगीस्ना बारामा खरी शे. तुमी लोक मना बारामा गैरा चांगला बोलतस, पण तुमी खरोखर मना शी प्रेम नई करतस. आणि त्या व्यर्थ मनी उपासना करतस कारण कि लोकस्ना विधी ले निरर्थक करीसन शिकाळस.” परत येशु लोकस्ले आपला जोळे बलाईसन तेस्ले सांग, ध्यान द्या आणि समजाना प्रयत्न करा कि मी काय सांगस. जे तोंड मा जास ते माणुस्ले अशुद्ध नई करस पण जे तोंड मधून निघस ते माणुस्ले अशुद्ध करस. तव शिष्यस्नी ईसन तेले सांगणात, “काय तुले माहित शे कि हय आयकीसनच परूशी लोक नारज हुई जायेल होतात?” तेनी उत्तर दिधा रोज रोप जो मना स्वर्गीय बाप नि नई लाव उखाडामा येवो. तेस्ले जावूद्या त्या आंधळा मार्गदर्शक शे आणि जर आंधळा-आंधळा ले रस्ता दाखाडीन त त्या दोनी खड्डा मा पळतीन. हई आयकीसन पेत्र नि सांग हवू दाखला आमले समजाळी दे. काय तुमी बी असा अग्यानी शेतस का? काय तुमले माहित नई कि जे काही तोंड मा जास ते पोट मा पडस आणि संडास मधून निघी जास. पण जे काही लोक विचार करतस, सांगतस आणि करतस, तेच तेस्ले परमेश्वर ना समोर अशुद्ध करस. कारण वाईट विचार, शारीरिक गंधा संबंध, चोरी, हत्या, व्यभिचार, खोटी साक्षी देणे आणि निंदा मन मधूनच निघस. हई जे तुमले परमेश्वर पुळे अस्वीकार्य बनावस पण हात नई धुविसन जेवण कराना माणुस्ले अशुद्ध नई करत. येशु तठून निघीसन सोर आणि सिदोन नाव ना शहर कळे चालना ग्या. त्या प्रदेश मधून एक कनानी बाई उणी आणि बोमलीसन सांगू लागणी हे प्रभु दाविद नि संतान मनावर दया कर मनी पोर ले एक दुष्ट आत्मा गैरा त्रास दि ऱ्हायना शे. पण तेनी तिले काही उत्तर नई दिध तव शिष्य ईसन तेले विनंती करत ती आमना मांगे इरायनी. येशु नि उत्तर दिधा, इस्त्राएल देश ना घराणा ना दवळेल मेंढ्या ले सोळीसन मी कोणाच कळे धाळेल नई शे. पण ती उणी आणि येशु ले प्रणाम करीसन सांगू लागणी, हे प्रभु मनी मदत कर. तेनी उत्तर दिध, पोरस समोरून भाकर लिसन कुत्रास समोर फेकान हई चांगल नई शे. तेनी सांग खर शे प्रभु पण कुत्रा बी त मेज खाले पोरस्ना भाकर ना तुकळा-ताकळा खाई लेतस. एनावर येशु नि तेले उत्तर दिधा हे बाई तुना विश्वास मोठा शे तुनी ईच्छा शे तुना साठे तसच होवो आणि तेनी पोरगी त्याच क्षण चांगली हुयनी. येशु तठून गालील ना समुद्र ना जोडे उना आणि डोंगरावर चळीसन बठी ग्या. तव गर्दी वर गर्दी तेन कळे उणी, त्या आपला संगे लंगडा आंधळा गुंगा दुन्डा आणि गैरास्ले तेना जोडे लयनात, आणि तेस्नी येशु ना पाय मा बसाळ. जव लोकस्नी देख कि गुंगा बोलतस आणि टुंडा चांगला होतस लंगडा चालतस आणि आंधळा देखतस चकित हुईसन इस्त्राएल देश परमेश्वर नि महिमा कराले लागनात. येशु नि तेना शिष्यस्ले जोळे बलायसन तेस्ले सांग, या मुळे मले तेस्ना साठे गैरा दुख हुई ऱ्हायना शे, कारण कि त्या ह्या लोक पयलेच तीन दिन पासून मना संगे शेतस. आणि आते तेस्ना जोळे खावाले काय बी नई होत. जर मी एस्ले जेवण खावाळा बिगर भुक्या घर धाळी दिसू, त त्या रस्ता मा थकीसन पळी जातीन. शिष्यस्नी तेले उत्तर दिधा, “कोणी बी या सर्वा लोकस्ले तृप्त करासाठे या सुनसान जागा वर पोट भर जेवण नई झामलू सकस.” येशु नि तेस्ले विचार, “तुमना जोळे कितल्या भाकरी शेतस?” तेस्नी सांग, “सात भाकरी.” आणि थोळा धाकला मासा शे. मंग येशु नि लोकस्ले जमीन वर बसानी आदन्या दिधी. आणि नंतर त्या सात भाकऱ्या लीधा, आणि परमेश्वर ले धन्यवाद दिधा भाकर ले मोळना, आणि तेनी आपला शिष्यस्ले दिधा आणि तेस्नी लोकस्ले. लोक खायीसन तृप्त हुई ग्यात, आणि शिष्यस्नी सात मोठ्या टोपल्या भरीसन उरेल तुकळास्ले एकत्र करणात. खाणारा बाया आणि पोरस्ले सोळीसन चार हजार माणस होतात. तव येशु गर्दी ले धाळीसन नाव वर चळी ग्या, आणि मगदन क्षेत्र मा उना. परूशी लोक, आणि सदूकी लोक येशु ना जोळे ईसन पारखा साठे तेले सांग आमले स्वर्ग मधून एक चमत्कारी चिन्ह दाखाळ. तेनी तेस्ले उत्तर दिधा, संज्याकायले सांगतस वातावरण चांगला राहीन, कारण आकाश लाल शे. आणि सकायले सांगतस, आज वारा वांधी ईन कारण आज ढग लाल आणि तांबूस एयेल शे, तुमी आकाश ना लक्षण देखीसन तेना भेद सांगू सकतस, पण टाईम ना चिन्हस्ना भेद काब नई दाखाळू सकतस? ह्या पीडी ना वाईट आणि व्यभिचार लोक चमत्कारी चिन्ह झामलतस पण योना भविष्यवक्ता ना चिन्हले सोळीसन आजून दुसरा कोणताही चमत्कारी चिन्ह नई देवामा येवाव, आणि तो तेस्ले सोळीसन चालना ग्या. शिष्य समुद्र ना त्या बाजू भिडनात पण आपला संगे भाकरी लेवाले विसरी जायेल होतात, एनासाठे एक भाकर ना शिवाय तेस्ना कळे नाव मा आजून बिलकुल बी भाकर नई होतात. येशु नि तेस्ले सांग, परूशी लोकस्ना आणि सदूकीस्ना खमीर पासून सावधान ऱ्हायज्यात. त्या आपस मा विचार करीसन सांगाले लागनात, एनासाठे तो असा सांगी ऱ्हायना कारण कि “आमी भाकरी नई लयनुत.” हय वयखीसन येशु नि तेस्ले विचार, हे अल्पविश्वासी तुमी आपल मन मा काबर विचार करतस कि आमना जोळे भाकर नई? काय तुमी आजून नई समजनात काय तुमले त्या पाच हजार लोक आणि पाच भाकरी स्मरण नई आणि हई नई कि तुमी कितल्या टोपल्या उचलेल होतात. आणि नई त्या चार हजार लोक आणि सात भाकरी आणि हई कि तुकळास्ना कितल्या टोपल्या भरीसन उचलनात. तुमी काबर नई समजतस कि मी तुमले भाकरीना बारामा नई सांग पण हई कि परूशी लोक आणि सदूकी लोक ना खमीर पासून सावध राहा. तव तेस्ना समज मा उन कि तेनी भाकरीना खमिरले नई पण परूशी लोक आणि सदूकी लोक ना शिक्षा पासून सावध राहाले सांगेल होता. येशु कैसरीया ना फिलीप्पि नगर मा उना आणि आपला शिष्यस्ले विचारू लागणा, कि लोक माणुस ना पोऱ्या ले काय सांगतस? तेस्नी सांग, “कोणी त योहान बाप्तिस्मा देणारा सांगतस आणि कोणी एलीया भविष्यवक्ता, आणि कोणी यिर्मया या संदेष्ट्यास मधून एक शे.” येशु नि तेस्ले विचार, “पण तुमी काय सांगतस कि मी कोण शे?” शिमोन पेत्र नि उत्तर दिधा, तू “जीवीत परमेश्वर ना पोऱ्या ख्रिस्त शे.” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “हे शिमोन पेत्र, योना ना पोऱ्या, तू धन्य शे, कारण कोणी माणुस नि तुनावर हय खरी गोष्ट प्रगट नई करी, पण मना बाप जो स्वर्ग मा शे, हय गोष्टी तुनावर प्रगट करीन. आणि मी बी तुले सांगस, कि तू पेत्र शे, आणि मी या दगड वर आपली मंडळी बनावसू, आणि अधोलोक ना दरवाजा तीन वर प्रगट नई होवाव. मी तुले स्वर्ग ना राज्यांनी चाव्या देसू आणि जे काही पृथ्वी वर बांधशी ते स्वर्ग मा बांधशी आणि जर काही तू पृथ्वी वर उघाळशी ते स्वर्ग मा उघाळीन.” तव येशु नि शिष्यस्ले जताड कि कोले बी नका सांगज्यात कि मी ख्रिस्त शे. त्या टाईम ले येशु नि आपला शिष्यस्ले सांगू लागणा, निश्चित शे कि मी यरूशलेम शहर ले जाऊ, कि मले गैरा दु:ख मधून जान पळीन, आणि पूर्वज लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस, मले तुच्छ समजीसन मारी टाकतीन आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू. एनावर पेत्र तेले आलग लीजाईसन धमकावणा, हे प्रभु परमेश्वर नई करो, तुना संगे अस कदीच नई होवाव. तो फिरीसन पेत्र ले सांगणा हे सैतान मना पासून दूर हुई जा, तू मनासाठे ठोकर ना कारण शे, कारण कि तू परमेश्वर ना सारखा विचार नई करस, पण लोकस सारखा विचार करस. तव येशु नि आपला शिष्यस्ले सांग, “जर तुमी मना शिष्य बनाले इच्छितस त, तेले आपली योजनास्ले आणि ईच्छास्ले सोळन पळीन. तो मनासाठे मराले बी तयार पाहिजे (व, तेले मनासाठे दुख उचलाले आणि मरा साठे बी तयार राहाले पाहिजे) तव आखरी वर, तेले मना शिष्य ना रूप मा मना मांगे चालाले पाहिजे.” कारण जो कोणी आपला जीव वाचाळाना करस, तो तेले दवाळीन, आणि जो कोणा मना मागे आपला जीव देव, तो तेले भेटीन. जर कोणी जग ना सर्वास तून श्रीमंत व्यक्ती बनीन, पण परमेश्वर ना संगे ना कायम ना जीवन ले दवाळी टाकस, त तेले काय फायदा होस? काय हई शक्य शे कि कोणी कायम ना जीवन लेवा साठे परमेश्वर ले काही देवू सकस? नई. मी माणुस ना पोऱ्या शे, आपला परमेश्वर ना दूत ना संगे, आपला बाप ना महिमा मा एसू, आणि त्या टाईम ले मी प्रत्येक ले तेस्ना काम ना नुसार प्रतीफय देसू. मी तुमले खरज सांगस, कि तुमना मधून काही लोक ज्या आठे उभा शेतस, कि जठलोंग माणुस ना पोऱ्या ले तेना राज्य मा येतांना नई देखाव तठलोंग मृत्यु ना अनुभव कदीच नई करू सकाव. साहा दिन नंतर येशु नि पेत्र आणि याकोब आणि योहान ले संगे लीना आणि तेस्ले एकांत मा उच्चा डोंगर वर लिसन ग्या. तठे तेस्ना समोर तेना रूपांतर हुयना आणि तेना चेहरा सूर्य सारखा चमकणा आणि तेना कपळा उजाय सारखा हुई ग्यात. आणि मोशे आणि एलीया तेना संगे बोलतांना दिखनात. येनावर पेत्र नि येशु ले सांग, हे प्रभु, आमन आठे राहाण चांगल शे, जर तुनी ईच्छा अशीन त आमी आठे तीन तंबू बनावसू, एक तुना साठे एक मोशे साठे आणि एक एलीया साठे. तो बोली ऱ्हायंता आणि एक उज्वल ढग नि सावली नि तेस्ले झाकी लीध, आणि त्या ढग मा हई शब्द निघन, “हवू मना प्रिय पोऱ्या शे जेनावर मी आनंदित शे, सर्वा एनी आयक.” शिष्य हई आयकीसन तोंड खाले करीसन जमीन वर पालथा पळीग्यात, कारण कि त्या गैरा भ्याय ग्यात. येशु जोळे ईसन तेस्ले स्पर्श करना आणि सांगणा भ्यावू नका. जव तेस्नी आपला डोया उघाळा तव येशु ले सोळीसन कोलेच नई देख. जव त्या डोंगर वरून उतरत होतात तव येशु नि तेस्ले आदन्या दिधी, “कोले बी हई नका सांगज्यात कि तुमनी काय देखेल शे, जठलोंग कि मी, माणुस ना पोऱ्या, मोत मधून जीवन मा परत नई इजाऊ.” एनावर तेना शिष्यस्नी तेले विचार, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक, हई सांगाले योग्य शे काय, कि हई गरज शे कि ख्रिस्त ना येवाना पयले एलीया येवो? येशु नि उत्तर दिधा, कि एलीया खरज पयले ईन आणि तो सर्व काही चांगल करी दिन. पण एलीया पयलेच ईजायेल शे, आणि लोकस्नी तेले नई ओयख, पण जसा करानी तेस्नी ईच्छा होती, तसच तेना संगे कर. ह्याच प्रमाणे माणुस ना पोऱ्या बी तेस्ना हात कण दुख उचलीन. तव शिष्य समजनात कि तेनी आमना योहान बाप्तिस्मा देणारा ना विषय मा सांग. जव येशु आणि तेना तीन शिष्य दुसरा शिष्यस्ना जोळे पोहोचनात, त एक माणुस तेना जोळे उना, आणि गुळघा टेकीसन सांगाले लागणा. हे प्रभु मना पोऱ्या वर दया कर कारण कि तेले मिर्घी येस, आणि तेले गैरा दुख होस, आणि घडी-घडी आग मा आणि घडी-घडी पाणी मा पळी जास. मनी तुना शिष्यस जोळे लयेल होतु, पण त्या तेले चांगला नई करू सकनात. येशु नि उत्तर दिधा, ओ विश्वासहीन आणि कुटील लोक मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? त्या पोऱ्या ले आठे मना कळे लया. तव येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, आणि ती तेना मधून निघी गई, आणि पोऱ्या त्याच टाईम ले चांगला हुईग्या. तव शिष्य एकांत मा येशु कळे जाईसन सांगणात, आमी दुष्ट आत्मा ले कसकाय नई काळी सकनुत? येशु नि तेस्ले सांग, तुमना विश्वास नि कमी मुळे, कारण कि मी तुमले खरज सांगस, जर तुमना विश्वास राई ना दाना एवळा बी ऱ्हायना त ह्या डोंगर ले सांगू सकशान, कि आठून निघीसन तठे चालना जाय त तो चालना जाईन आणि कोणतीही गोष्ट तुमना साठे अशक्य नई राहाव. पण हवू भूत बिगर उपवास आणि प्रार्थना ना नई निघस. जव शिष्य गालील जिल्हा मा येशु ना संगे थांबेल होतात, तव येशु नि तेस्ले सांग कि, “लवकर कोणी, मले, माणुस ना पोऱ्या ले, मना शत्रू अधिकारी ले, सोपी दिन, आणि त्या लोक मले मारी टाकतीन, पण तिसरा दिन जव मना मरा नंतर, मी परत जित्ता हुई जासू.” एनावर त्या गैरा दुखी हुयनात. जव त्या कफर्णहूम नगर मा ग्यात, त यरूशलेम शहर ना मंदिर ना कर लेनारास्नि पेत्र ना जोळे ईसन विचार, “काय तुमना गुरु यरूशलेम शहर ना मंदिर ना कर नई देत?” तेनी सांग, हा देस. जव तो घर मा उना त येशु नि पेत्र ले विचाराना पयले तेले सांग, “हे शिमोन तू काय विचार करस कि पृथ्वी ना राजा वसुली आणि कर कोणा कळून लेतस, आपला पोऱ्यास कळून कि पराया कळून शे.” पेत्र नि तेले सांग, “पराया कळून.” येशु नि तेले सांग त पोऱ्या कर देवा पासून वाची ग्या. पण आमी तेस्ना साठे ठोकर खावाळनार नई बनावत. तू समुद्र ना तठ वर जाईसन जाय टाक आणि जो मासा पयले निघीन तेले तेना तोंड उघाळा वर तुले एक शिक्का (चार दिन नि मजुरी ना बरोबर चांदी ना एक शिक्का) भेटीन तेले लिसन मना आणि तुना बदला मा दि टाकजो. त्या टाईम ले शिष्य येशु कळे ईसन विचारू लागणत स्वर्ग ना राज्य मा मोठा कोण शे? एनावर तेनी एक पोऱ्या ले तेना कळे बलाईसन तेस्ना मधमा उभा कर. आणि सांग, “मी तुमले खरज सांगस, कदी तुमी मन नई फिरावतस आणि पोरस सारखा नई बनतस, तठलोंग तुमी स्वर्ग ना राज्य मा प्रवेश नई करू सकावत.” पण कदी तुमी या पोऱ्या सारखा नम्र शे, त तुमी स्वर्ग ना राज्य मा सर्वास्तून महान शे. आणि जो कोणी मना नाव कण एक असा पोऱ्या ले स्वीकार करस तो मले स्वीकार करस. कदी कोणी त्या व्यक्ती ले जो मनावर विश्वास करस, तेना मनावर विश्वास करान बंद कराना कारण बनस, भले तो ह्या पोऱ्या सारखा का नई हो, त हय तेना साठे चांगल हुईन कि तेना गयामा एक मोठा दघळ बांधा मा येवो, आणि तेले बुळा साठे समुद्र मा फेकामा येवो. ठोकर ना कारण संसार वर तुमना साठे कितला भयानक हुईन ठोकर खावाना निश्चित शे पण तुमना साठे कितला भयानक हुईन त्या माणुस वर जेना व्दारे ठोकर लागस. जर तुमी पाप करासाठे आपला हात ले उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले कापी टाक. एक हात ना बिगर स्वर्ग मा प्रवेश करान कठीण लागू सकस, पण दोनी हात ले ठीसन नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे. जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले काळीसन फेकी टाक. एक डोया ना बिगर परमेश्वर ना राज्य मा प्रवेश कराले कठीण लागू सकस, पण दोन डोया ठीसन, नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे. देखा तुमी या धाकला मधून कोलेच तुच्छ नका समजा, कारण कि मी तुमले सांगस, स्वर्ग मा तेस्ना परमेश्वर ना दूत मना बाप ना उपस्थिती मा कायम ऱ्हातस. कारण कि मी, माणुस ना पोऱ्या दवळेल ले वाचाळा साठे एयेल शे. तुमी काय विचार करतस, कोणी एक माणुस ना शंभर मेंढ्या शे, आणि तेस्ना मधून एक भटकी जास, त काय नव्यानव ले सोळीसन, आणि पहाळस्वर जाईसन, ती भटकेल ले नई झामलाव. आणि असच होयन कि तेले सापडो मी तुमले खर सांगस कि तो त्या नव्यानव मेंढ्या साठे जे भटकेल नई शे इतला आनंद नई कराव कि जीतला तीतला मेंढ्या साठे करीन. असाच आमना बाप जो स्वर्ग मा शे, हई ईच्छा नई कि या धाकला मधून एक नष्ट हुईन. जर तुना भाऊ तुना विरोध मा अपराध करीन, तू जा आणि एखटा मा बोलीसन तेले समजाविले, जर तून तो आयकीन आणि मन फिरावस, त तू आपला साथी विश्वासीले परत जिती लीयेल शे. जर तो नई आयकस एक व दोन झन ले संगे लीजाय, “कारण कि मोशे ना नियम ना नुसार, प्रत्येक आरोप ले दोन व तेना तून जास्त साक्षी द्वारे खर साबित करामा येवाले पायजे.” जर तो तेस्ना बी नई माणस, त मंडळी ले सांगी दे, जर तो मंडळी ना बी नई माणस, त जसा तुमी एक अन्यजाती आणि कर लेणारस संगे करशात, तसाच तेले मंडळी मधून बाहेर करी द्या. मी तुमले खर सांगस, जे काही पृथ्वी वर बांधशी ते स्वर्ग मा बांधशी आणि जे काही तू पृथ्वी वर उघाळशी ते स्वर्ग मा उघाळीन. मी परत तुमले सांगस, कदी तुमना मधून कोणी दोन झन पृथ्वी वर एक मन हुईसन कोणतीही वस्तू मांगशान त मना बाप जो स्वर्ग मा शे तुमले दिन. कारण कि जठे दोन व तीन मना नाव कण एकत्र होतस तठे मी तेस्ना मधमा उपस्थित राहस. तव पेत्र तेना जोळे ईसन तेले सांगणा, “हे प्रभु जर मना साथी विश्वासी अपराध करत ऱ्हास, त मी तेले कितला सावा माफ करू, काय सात सावा लोंग?” येशु नि तेस्ले सांग, “मी तुले हई नई सांगस, कि सात सावा लोंग, पण सात सावाना सत्तर पट लोंग, तुले तेले माफ करी देवाले पायजे.” स्वर्ग ना राज्य ह्या दाखला सारखा शे, एक स्वामी आपला दासस कळून लेखी लेवाना विचार करा. जव तो लेखी लेवू लागनात एक झन तेना समोर लेखामा उना जो पाच करोड चांदी ना शिक्का (इतला पैसा कि एक दास कदीच नई फेळू सकत होता) कर्जदार होता. तेना कळे कर्ज फेडाले काई नई होत, एनासाठे राजा नि सांग, येले आणि तेनी नवरी आणि पोर आणि जे काही तेन शे सगळ विका मा येव आणि ते कर्ज फेडा मा येव. एनावर तेना दास नि पडीसन तेले प्रणाम करना आणि सांग हे राजा धाळस बांध मी सर्व काही भरी देसू. तव त्या दास ना राजा नि दया करीसन सोळी टाक आणि तेना कर्ज बी माफ करना. पण तो दास बाहेर निघनात तेस्ना संगतीना एक दास भेटणा जो तेना शंभर चांदी ना शिक्का (शंभर दिन नि मजुरी) कर्जदार होता तेनी तेले धरीसन तेना गया दाबणा आणि सांग जे काय तुनावर कर्ज शे ते दि टाक. एनावर तेना संगती दास तेना पाय वर पडीसन तेले विनंती करू लागणा धाळस बांध मी सर्व दि टाकस. पण तेनी नई आयक आणि जायसन तेले बंदीगृह मा टाकी दिधा कि जठलोंग कर्ज नई देवाव तड लोंग तठेच ऱ्हावो. तेना संगती दास हई देखीसन गैरा नाराज हुयना आणि जाईसन आपला राजा ले पूर्ण गोष्टी सांगी दिना. तव त्या दास ले जेले राजा ना मोठा कर्ज फेळ करान होत, राजा नि तेले बलाईसन सांग, हे दुष्ट दास मनी तुना सांगेल वर तुना सर्वा कर्ज माफ करी टाक. एनासाठे जसा मनी तुनावर दया करी, तसाच काय तुले बी तेना कर्ज माफ नई करी देवाले पायजे, जसा मनी तुनावर दया दाखाळी आणि तुना कर्जाले माफ करी दिना? आणि राजा गैरा रागे भरणा आणि तेनी त्या दास ले जठलोंग तो पुरा कर्ज नई फेडत तठलोंग तेले दंड देनारास्ना हात मा सोपी टाक. एना प्रकारे जो तुमना मधून रोज एक आपला भाऊ ले मन कण माफ नई कराव, त मना बाप जो स्वर्ग मा शे तुमना वर बी तसाच करीन. जव येशु या गोष्टी सांगी दियेल होता, त गालील जिल्हा मधून चालना गया आणि यार्देन नदी ना त्या पार यहूदीया प्रांत मा उना. तव मोठी गर्दी तेना मांगे येवू लागणी आणि तेनी तठे तेस्ले बरा करना. तव परूशी लोक नि तेनी परीक्षा लेवा साठे जोळे ईसन सांगू लागनात, काय प्रत्येक कारण वर आपली बायको ले सोडान योग्य शे. येशु नि उत्तर दिध, “काय तुमी वाचेल नई. कि जेनी तेस्ले बनाव, तेनी सुरुवात पासून नर आणि नारी बनाईसन सांगणा.” “या कारण वर माणुस आपला माय-बाप पासून आल्लग हुईसन आपली बायको ना संगे राहीन आणि त्या दोनी एक तन होतीन.” एनासाठे त्या आते पासून दोन लोकस सारखा नई, पण त्या एक एकदेह हुई जायेल शे. एनासाठे ज्या लोकस्ले परमेश्वर नि एकत्र जोळेल शे, तेले कोणी बी व्यक्ती आल्लग नका करा. तेस्नी तेले सांग, “मंग मोशे नि काबर ठहराव कि सूटपत्र दिसन तेले सोडी द्या.” येशु नि तेस्ले सांग, “मोशे नि तुमना मन नि कठोर ताना कारण तुमले आपली आपली बायको सोडानी आदन्या दिधी, पण सुरुवात पासून नई होती. मी तुमले सांगस, कि जो कोणी व्यभिचार ले सोळीसन, दुसरा कोणताही कारण वर कोणी आपली बायको ले सोळीसन दुसरी संगे लग्न करीन, त तो व्यभिचार करस, आणि जो ती सोडेल बाई संगे लग्न करस तो बी व्याभिचार करस.” तेना शिष्यस्नी तेले सांग, जर बाई ना पुरुषना संगे असा संबंध शे त लग्न कराले चांगल नई. येशु तेस्ले सांग, “फक्त त्या लोकस्ले जेस्ले परमेश्वर नि एखटा राहाणा वरदान दियेल शे, त्या ह्या शिक्षास्ले स्वीकारू सकतस. कारण काही नपुसंक असा शेत, ज्या जन्मा पासून असाच जन्मले एयेल शे, आणि काही नपुसंक असा शेत, जेस्ले माणस नपुसंक बनावात, आणि काही नपुसंक असा शेत, जेस्नी स्वर्ग ना राज्य साठे स्वता ले नपुसंक बनायेल शे, त्या ज्या समजी सकतस, समजी जा.” तव लोक पोरस्ले येशु कळे लयाले लागनात, कि तो तेस्ना वर हात ठेवो आणि प्रार्थना करो आणि आशीर्वाद देवोत. पण शिष्यस्नी लोकस्ले धमकाव. येशु नि सांग “पोरस्ले मना कळे ईवू द्या आणि तेस्ले मना नका करा, कारण त्याच लोक ज्या या पोरस सारखा विश्वास लायक आणि नम्र शेतस स्वर्ग ना राज्य मा राहतीन.” आणि तेस्ना वर हात ठीसन तेस्ले आशीर्वाद दिना, आणि तठून चालना ग्या. एक माणुस येशु कळे उना आणि तेले सांगणा हे उत्तम गुरुजी मी कोणता चांगल काम करू कि कायम ना जीवन प्राप्त करू. तेनी तेले सांग तू मले उत्तम काबर सांगस? उत्तम त एकच शे पण जर जीवन मा प्रवेश कराना विचार करस त आदन्या माना कर. तेनी तेस्ले सांग, “कोणती आज्ञा?” येशु नि सांग ह्या “कि घात करज्यात नका. आपला बाप व आपली माय ना आदर करज्यात आणि आपल शेजारी वर आपला सारखा प्रेम करज्यात.” त्या जवान नि तेले सांग, “ह्या सर्वा आदन्या मी लहानपणा पासून पायत एयेल शे.” आते मले कोणती वस्तू नि कमी शे. येशु नि तेले सांग जर तुले सिद्ध होण शे, त जा जे काही तुना कळे शे तेले विकीसन पैसा गरीब लोकस्ले द्या जर तुमी असा करतस, त तुमना जोळे स्वर्ग मा धन राहीन. आणि ईसन मना मांगे चालू लाग. पण तो जवान हई गोष्ट आयकीसन नाराज हुईसन चालना ग्या कारण तो गैरा मालदार होता. तव येशु नि आपला शिष्यले सांगणा कि मी तुमले खर सांगस “मालदार लोकस साठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करान गैरा कठीण शे.” परत तुमले सांगस, कि एक उट ना साठे सुई ना छिद्र मधून जावान सोप शे, पण एक मालदार ले परमेश्वर ना राज्य मा जावाले गैरा कठीण शे. हई आयकीसन शिष्यस्नी गैरा चकित हुईसन सांग, मंग कोनासाठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करासाठे वाचाले कस शक्य शे? येशु तेस्ना कळे देखीसन सांगणा, “हई लोकस साठे अशक्य शे पण परमेश्वर ना साठे नई, परमेश्वर ना साठे सर्व काही शक्य शे.” एनावर पेत्र नि तेले सांग, “आमन काय हुईन? आमी तुना शिष्य बनासाठे सर्व काही सोळी दियेल शे.” येशु नि तेस्ले सांग, मी तुमले खर सांगस, जव नवीन सृष्टीमा माणुस ना पोऱ्या आपली महिमा ना सिंहासन वर बठीन, तुमी बी ज्या मना मांगे एयेल शेत, बारा सिंहासन वर बठीसन इस्त्राएल देश ना बारा गोत्र वर न्याय करशात. आणि तुमना मधून हरेक झन घर, भाऊ-बहिण, माय-बाप, बायको, पोरस्ले, व वावरस्ले मना शिष्य होवा साठे आणि सुवार्ता जाहीर करासाठे सोळी दियेल शे, तेले शंभर पट भेटीन आणि तो कायम ना जीवन ना अधिकारी हुईन. ज्या आते पहिला शेतस, त्या टाईम ले आखरी होतीन, आणि काही ज्या आखरी शेतस, त्या टाईम ले पहिला होतीन. जस कि येशु नि सिखाळान चालू ठेव, तेनी सांग, स्वर्ग ना राज्य ह्या दाखला ना सारख शे. एक जमीनदार जो सक्कायमा लवकर त्या जागा वर जास, जठे लोक काम झामलाले एकत्र होतस. तेस्ना मधून कईक मजुरस्ले आपला द्राक्षमया मा काम करासाठे लीग्या. जव तो तेस्ले एक दिन ना काम नि मजुरी ना रूप मा चांदी ना एक शिक्का देवाले तयार हुईग्या, त तेनी तेस्ले आपला द्राक्षमया मा काम करासाठे धाळी दिधा. त्या सक्कायमा नऊ वाजाना आस-पास, तो जमीनदार नि काही आखो मजुरस्ले बाजार मा उभा ऱ्हायेल देखना, ज्या काहीच नई करी ऱ्हायंतात. तेस्ले सांग, तुमी बी द्राक्षमया मा जावा, आणि मी तुमले मजुरी नि योग्य रक्कम देसू, नंतर त्या बी काम कराले ग्यात. दुफारले बारा वाजता आणि आखो तीन वाजता तो परत बाजार मा ग्या, आणि दुसरा मजुरस्ले देख, जेस्ले तेनी योग्य रक्कम देवाना करार करेल होता. नंतर जवळपास संज्याकाय ना पाच वाजता तो बजार मा ग्या, दुसरास्ले उभा देखना, आणि तेस्ले सांग तुमी दिन भर रिकामा काब उभा शे? तेस्नी तेले सांग, कोणी आमले काम ले नई लावत. तेनी तेस्ले सांग, तुमी बी मना द्राक्षमया मा जावा आणि काम करा आणि मी तुमले मजुरी नि योग्य रक्कम देसू. संज्याकायले द्राक्षमया ना मालक नि आपला ठेकादार ले सांग, मजुरस्ले बलाईसन ज्या सर्वास्ना शेवट काम कराले एयेल होतात, तेस्ना पासून ते पयला लोंग तेस्ले मजुरी दि टाक. जव मजुर उनात, त ज्या लोक संज्याकायले पाच वाजता काम ले लायेल होतात, तेस्ले पुरा दिन नि मजुरी देवामा उणी. मजुर ज्या सकाय मा पयले एयेल होता, तेस्ले वाटण आपले जास्त भेटीन पण तेस्ले बी एक रोज नि मजुरी भेटणी. जव भेटणा, त त्या द्राक्षमया ना जमीनदार वर कुरकूडीसन बोलू लागनात. या मांगलास्नी एकच घंटा काम करणात, आणि तुनी तेस्ले बी तितलीच मजुरी दियेल शे जीतली आमले दियेल शे. जेस्नी दिन भर काम करेल शे आठ लोंग कि आमना बी. जमीनदार नि तेस्ना मधून एक ले उत्तर दिधा, “मित्र, मनी तुमना संगे अन्याय नई कर. मनी तुमले तीच मजुरी दिधी, जेनावर आमी ठरेल होतुत.” आपली मजुरी ले आणि चालना जाय, मनी ईच्छा हई शे कि जीतल तुले, तीतलाच ह्या मांगला ले बी देवू. निश्चित रूप मा मले हई अधिकार शे, कि मी आपला पैसा आपली ईच्छा प्रमाणे खर्च करू, तुले बयन पणा नई होवाले पायजे कारण मी दुसरास्वर दयाळू शे. ह्या रितीवर ज्या मांगला शेतस त्या टाईम ले पहिला होतीन, आणि ज्या आते पहिला शेतस, त्या टाईम ले मांगला होतीन. बलायेल त गैरा शेतस पण निवाळेल कमी शे. येशु यरूशलेम शहर ले जातांना बारा शिष्यस्ले एक बाजुमा लीग्या आणि रस्ता वर तेस्ले सांगू लागणा. देखा आमी यरूशलेम शहर कळे जाईरायनुत आणि मी, माणुस ना पोऱ्या मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना स्वाधीन करामा ऐईन आणि त्या मले मरणदंड ठरावतीन. आणि मले दुसरा जातीस्ना हात मा स्वाधीन करतीन. कि त्या मनी थट्टा करतीन, आणि मनावर थुकतीन, आणि मले फटका मारतीन, आणि क्रूस वर चळावतीन आणि तिसरा दिन मा मी परत जित्ता होसू. तव जब्दी ना पोरनी माय नि आपला पोऱ्या संगे येशु ना जोळे ईसन तेले प्रणाम करनी आणि तेना कळून काही मांगू लागणी. तेनी तेस्ले सांग तुनी काय ईच्छा शे? ती सांगणी मले हई वचन दे कि मना ह्या दोन पोर तुना राज्य मा एक तुना उजवा हात कळे आणि दुसरा डाखोऱ्या हात कळे बठतीन. येशु नि उत्तर दिधा, तुमले नई माहित कि काय मांगी ऱ्हायनात? काय तुमनी ईच्छा शे कि ज्या त्रास मी भोगसु त्या तुमी भोगश्यात आणि मरश्यात का जसा मी मरसू? तेस्नी सांग, भोगी सकसुत. येशु नि तेस्ले सांग, तुमी त्रास ले भोगश्यात ज्या मी भोगसु, आणि मरश्यात जसा मी मरसू. पण मले हई ठरावाना अधिकार नई शे, कि मना बाजुमा मा उजवा बाजू आणि डाखोऱ्या बाजू, कोण तो सन्मान ना जागा ले प्राप्त करीन. परमेश्वर नि त्या (सन्मान ना) जागास्ले तयार करेल शे, जेस्ले तेनी निवाळेल शे तेस्ना साठे. हई आयकीसन त्या दहा शिष्य त्या दोन भावू वर गैरा रागावनात. येशु नि आपला शिष्यस्ले जोळे बलाईसन सांग, तुमले माहित शे कि ह्या संसार ना अधिपती दुसरा जातीस्वर राज्य करतस आणि तेस्ना उच्च अधिकारी तेस्ना वर अधिकार जताळतस. पण तुमना मधून असा नई होवाव, पण जो कोणी तुमना मा मोठा होवाना देखस, तो तुमना दास बनाले पाहिजे. आणि जो कोणी तुमना मा पहिला होवानी ईच्छा ठेवस त तो सर्वास्ना दास बनो. जसा कि माणुस ना पोऱ्या, दुसरास्नी चाकरी करासाठे या दुनिया मा उना. मी एनासाठे नई उना कि दुसरा मनी चाकरी करो आणि मी किईक लोकस्ले तेस्ना पाप शी सोळावा साठे मराले एयेल होता. जव त्या यरीहो तून निघी ऱ्हायंतात, तव एक मोठी गर्दी तेना मांगे येवू लागणी. आणि दोन अंधा ज्या सळक ना बाजुले बसेल होता, हई आयकीसन कि येशु जाई ऱ्हायना. तव त्या जोरमा आराया मारीसन सांग, “हे प्रभु, राजा दाविद ना वंश आमना वर दया कर.” गैरास्नी तेस्ले धमकाव कि शांत राहा म्हणून पण त्या जास्त आराया माराले लागीग्या, “हे प्रभु, दाविद ना वंश मनावर दया कर.” तव येशु थामी ग्या आणि आजू-बाजू ना लोकस्ले तेस्ले लयानासाठे सांगणा, आणि सांग तुमनी काय ईछ्या शे कि मी तुमना साठे करू? अंधाळास्नि येशु ले सांग, “हे प्रभु, हई कि आमना डोया उघळी जावो.” येशु नि दया करीसन तेस्ना डोयास्ले हात लाव आणि त्या त्याच टाईम ले देखाले लागनात आणि त्या लोकस्ना संगे जुळी ग्यात ज्या येशु ना मांगे चालत होतात. जव येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर ना जोळे पोहचना आणि त्या बेथफगे आणि बेथानी ना बाहेर ना गाव मा पोहचनात, हई गाव जैतून डोंगर ना जोळे होता त येशु नि आपला शिष्यस मधून दोन शिष्यस्ले हय सांगीसन धाळ. समोर ना गाव मा जा तठे पोहचताच एक गाढव बांधेल अशीन आणि तेना संगे धाकला शिंगरू भेटीन तेले सोळीसन मना कळे लया. कदी कोणी तुमले विचारीन कि हय काब करतस? त सांगज्यात, कि येशु, आमना प्रभु ले येले उपयोग करानी गरज शे, तव त्या तेले फटकामा धाळतीन. हय एनासाठे हुईन कि जे वचन भविष्यवक्ता व्दारे सांगेल होत ते पूर होवो. सियोन शहर नि पोर ले सांगा, देखा तुना राजा तुना कळे येस तो नम्र शे, आणि गाढव वर बठेल शे, तो गाढव ना धाकला शिंगरू वर शे. शिष्य नि जायसन जस येशु नि सांगेल होत तसच करणात. आणि शिंगरू ले येशु जोळे लयसन, तेस्नी येशु ले बसाना ना साठे धाकला शिंगरू ना पाठ वर आपला पांघराना कपळा टाकनात. आणि तो शिंगरू वर बठी ग्या. तव गैरा लोकस्नी येशु ना समोर रस्ता वर आपला कपळा पसारनात, आणि दुसरा लोक झाळ वरून फांद्या तोळीसन रस्ता वर टाकनात. जी गर्दी पुळे पुळे जास आणि मांगे मांगे चालीसन येस हाका मारी-मारीसन सांगत होती दाविद नि संतान होसन्ना धन्य शे जो प्रभु ना नाव वर येस आकाश मा होसन्ना. जव तो यरूशलेम शहर मा उना त पुरा नगर मा गोंधय उळना आणि लोक सांगू लागनात हवू कोण शे. लोकस्नी सांग, हवू गालील जिल्हा ना नासरेथ नगर ना भविष्यवक्ता येशु शे. येशु नि परमेश्वर ना मंदिर मा जाईसन त्या सर्वास्ना ज्या मंदिर मा लेन देन करत होतात काळी टाक आणि पैसा बदल नारस्नी टेबल आणि कबुतर ईकनारस्नि बैठकी उलट्या करात. आणि तेस्ले सांग, परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, कि लोक मना परमेश्वर ना मंदिर ले अशी जागा बोलतीन जठे सर्वा जाती ना लोक प्रार्थना कराले येतीन. पण तुमी तेले लुटनारस्नि भरेल गुफा ना सारखा बनावतस. तव अंधा आणि लंगळा परमेश्वर ना मंदिर मा तेना कळे उनात, आणि तेनी तेस्ले बरा कर. पण जव मुख्य यहुदी पुजारी आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ह्या महान कार्य ले जे तेनी करेल आणि पोरस्ले परमेश्वर ना मंदिर मा दाविद नि संतान नि होसन्ना सांगतांना देख तव त्या रागे भरणात. आणि तेले सांगू लागनात, “काय तू आयकस कि ह्या काय सांगी ऱ्हायनात,” येशु नि तेस्ले सांग, हय काय तुमले नई माहिती कि परमेश्वर नि पुस्तक सांगतस, “बाळ आणि दुध पेणार बाळ स्तुती करतीन?” तव तो तेस्ले सोळीसन नगर ना बाहेर बेथानी नगर ले चालना ग्या, आणि तठे रात ऱ्हायना. सकायले जव नगर मा परत येत होता तव येशु ले भूक लागणी. रस्ता ना तठ वर अंजिर ना एक हिरवागार पानसकण भरेल झाळ देखीसन जोळे ग्या, पण पानस्ले सोळीसन तेले काहीच भेटन नई, तव येशु नि झाळ ले सांग, आते पासून तुले कदीच फय नई लागाव आणि अंजिर ना झाळ त्या टाईम वर सुखी ग्या. हय देखीसन शिष्य चकित हुई ग्यात, आणि तेस्नी सांग, हवू अंजिर ना झाळ इतला मा कसा काय सुकी ग्या? येशु नि तेस्ले उत्तर दिधा, मी तुमले खरज सांगस, “कदी तुमी विश्वास ठेवो आणि शक नई कराव, त नईत फक्त हई कराव जे ह्या अंजिर ना झाळ संगे करेल शे पण कदी ह्या डोंगर ले बी सांगीन, उपळी जा समुद्र मा जाईपळ, त हई हुई जाईन.” आणि जे काही तुमी प्रार्थना मा विश्वास कण मांगशात ते सर्व तुमले भेटीन. तो परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा लोकस्ले जाईसन शिक्षण देत होता त मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि आणि पूर्वज लोक तेना कळे ईसन विचाराले लागनात, “तू ह्या काम कोण अधिकार कण करस आणि हवू अधिकार तुले कोणी दियेल शे?” तव येशु नि तेस्ले उत्तर दिधा मी बी तुमले एक गोष्ट ईचारस जर तुमी सांगश्यात, तव मी तुमले सांगसू कि ह्या काम मी कोणा अधिकार कण करस. योहान ना बाप्तिस्मा कोणा कळून होता स्वर्ग कळून कि लोकस कळून तव त्या आपस मा विचार करू लागनात जर आमी सांगसुत स्वर्ग कळून त तो आमले सांगीन, त मंग तुमनी तेनावर विश्वास काब नई ठेवा? पण जर आमी सांगसुत, माणसस कळून शे, त त्या गर्दी ले भ्यात होतात, ज्या हई मानतस कि योहान परमेश्वर कळून एक खरा भविष्यवक्ता होता. नंतर तेस्नी येशु ले उत्तर दिधा, कि आमले नई मालूम, मंग येशु नि बी सांग त मी बी तुमले हई नई सांगाव कि मले या प्रकार ना काम कराना काय अधिकार शे. तुमी ह्या दाखला शी काय समजतस? कोणी माणुस ना दोन पोऱ्या होतात, तो पयला कळे जाईसन सांगणा, ओ पोऱ्या, आज द्राक्षमया मा काम कर. तेनी उत्तर दिधा, मी नई जावाव, पण नंतर तेले आपला बोलेल वर गैरा दुखी हुईग्या आणि तो चालना ग्या, आणि वावर मा काम करना. तव बाप नि दुसरा पोऱ्या ले सांग, तू जा, तेनी सांग, हा, मी जास. पण तो नई ग्या. या दोनीस्मा कोणी बाप नि ईच्छा ले पूर्ण करी? तेस्नी सांग, पयला नी. येशु नि तेस्ले सांग, मी तुमले खराज सांगस, कि जकातदार व व्यभिचार तुमना तून पयले परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करतीन. मी असा एनासाठे सांगस, कारण कि जव योहान बाप्तिस्मा देणार नि तुमले सांग कि कस धार्मिकता शी जीवाण शे, तर तुमी तेनावर विश्वास नई करणात. आणि कर लेणारा आणि व्यभिचारीस्नि तेस्ना पापस्ले सोळी दिधात. आणि तुमी हई देखीसन नंतर बी पापस पासून मन नई फिराव कि तेनावर विश्वास करी लेतात. एक आजून दाखला आयका गृहस्वामी होता जेनी आपला मया मा द्राक्ष लावना, आणि तेना मया ना चारीकळे दघळस्नि भिंत बनावी, तेनामा रसना कुंडा खोद आणि मया बनावना. आणि शेतकरीले ठेका दिसन परदेश मा चालना ग्या. पण शेतकरी नि तेन शिष्यले पकळी सन कोले मार आणि कोले मारी टाक आणि कोणावर दगड टाक करणात. मंग तेनी पहिल्या पेक्षा जास्त शिक्षसले धाळ आणि तेस्नी तेस्ना संगे बी तसाच करणात. शेवट मा, तेनी आपला पोरस्ले तेस्ना जोळे हय विचार करीसन धाळ कि त्या मना पोऱ्या ना मान ठेवतीन. पण त्या शेतकरीस्नी तेना पोऱ्या ले येतांना देखीसन तेस्नी आपस मा सांग, हवू तोच शे जो द्राक्ष ना मया ना वारीस हुईन, या आह्मी तेलेच मारी टाकुत तव वारसी आपण लिलेवूत. नंतर तेस्नी तेले धर आणि द्राक्षमया ना बाहेर काळीसन मारी टाकनात. एनासाठे तव द्राक्षमया ना स्वामी ईन त त्या शेतकरी बराबर काय करीन. तेनी तेस्ले सांग तो त्या दुष्ट लोकस्ले दुष्ट रिती कण नष्ट करीन आणि द्राक्षमया ना ठेका दुसरा शेतकरीले दिन ज्या टाईम वर तेले फय देत राहीन. येशु नि तेले सांग, “काय तुमी परमेश्वर ना पुस्तक मा हई नई वाचनात, ज्या दगड ले राजमिस्त्रीनी रिकामा ठहरायेल होतात. तोच कोनाशील दगड हुईग्या. हई प्रभु कळून हुयना आणि आमना नजर मा अदभूत शे. एनासाठे मी तुमले सांगस, कि परमेश्वर ना राज्य तुमना कळून लेवामा ईन. आणि अशी जातीले दिन ज्या चांगला फय उत्पन करतीन.” जो कोणी या दगड वर पडीन तो चुराडा हुईन आणि जेनावर तो पळीन तेले तो दई टाकीन. मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि तेना दाखला ले आयकीसन समजी ग्यात कि येशु नि तेस्ना विरुद्ध हवू दाखला सांगी ऱ्हायना. आणि एनासाठे त्या तेले पकळानी ईच्छा ठेवत होतात, पण तेस्नी तेले नई पकळा कारण कि त्या लोकस्ले भ्यात होतात, कारण कि त्या भविष्यवक्ता मानत होतात. येशु आखो तेस्ले दाखला मा सांगाले लागणा. स्वर्ग ना राज्य ह्या दाखला सारखा शे, एक राजा जेनी आपला पोऱ्या ना लग्न करना. आणि तेनी आपला दासस्ले धाळ कि आमंत्रित लोकस्ले लग्ना ना जेवण साठे बलाव पण तेस्नी येवाना नई सांग. मंग तो आजून शिष्यस्ले हई सांगीसन धाळ आमंत्रित लोकस्ले सांग देखा मी स्वादिष्ट जेवण ऱ्हान्धामा एयेल शे, आणि पसंद ना जेवण, आणि सर्व काही तयार शे लग्न मा जेवाले या. आणि त्या दुर्लक्ष करीसन चालना ग्यात, कोणी आपला वावर मा कोणी आपला व्यापारले. दुसरा लोक ज्या वाचेल होता तेना दास ले धरीसन तेस्नी थट्टा करी आणि मारी टाक. जव राजा नि हई आयक, तव राजा ले राग उना आणि तेनी आपली सेना धाळीसन त्या हत्यारास्ले नाश कर, आणि तेस्ना नगर ले चेटाळी टाक. तव आपला दासस्ले सांग, लग्न ना जेवण त तयार शे, पण लोक निमंत्रण देवाना योग्य नई ठरणात. एनासाठे, तुमी प्रत्येक जागा वर जाईसन जीतला तुमले दिखतीन तितलास्ले लग्न ना जेवण साठे बलावा. नंतर त्या दासस्नि प्रत्येक जागा वर जाईसन, बरा वाईट जीतला भेटनात, सर्वास्ले एकत्र कर, आणि लग्न ना घर पावनास कण भरी ग्या. जव राजा पावनास्ले देखाले मधमा उना, त तेनी देख कि तेस्ना मधून एक नि लग्न साठे चांगला कपळा नई घालेल होतात. राजा नि विचार, “मित्र, तुनी लग्न साठे चांगला कपळा काब नई घालात?” पण त्या व्यक्ती जोळे कोणताच शब्द नई होत. तव राजा नि दासस्ले सांग एना हात-पाय बांधीसन येले बाहेर अंधकार मा टाकी द्या तळे रळान आणि दात खाना अशीन. येशु नि आपली शिक्षा ले समाप्त करतांना सांग, “बलायेल तर गैरा शेतस, पण निवळेल कमी शेतस.” जव परूशी लोक जाईसन आपसमात विचार करणात कि तेले कोणता प्रकारे गोष्ट मा फसाळूत? नंतर तो आपला शिष्यस ले हेरोद राजा ना दल ना संगे तेना कळे हई सांगाले धाळ, ओ गुरुजी, आमले माहिती शे, कि तू नेहमी खरा बोलस, आणि पण परमेश्वर ना मार्ग खरोखर शिकाळस, आणि तू ह्या गोष्ट पासून नई घाबरस कि दुसरा लोक तुना बारामा काय विचार करतस. तू सर्वास्ना संगे सारखा व्यवहार करस. एनासाठे तू आमले सांग कि तू काय समजस? सम्राट कैसर ले कर देन चांगल शे कि नई. येशु नि तेस्ना कपट वयखीसन तेस्ले सांग, “ओ कपटीसहोण, तुमी मले काबर पारखतस? एक चांदी ना शिक्का जो एक दिन नि मजुरी ना बराबर होता, मना कळे लया कि मी देखू. तेनी तेस्ले विचार, मले सांगा कि चांदी ना शिक्का वर कोणा चित्र आणि कोण नाव शे?” तेस्नी सांग “सम्राट ना.” येशु नि तेस्ले सांग, “जे सम्राट ना शे, ते सम्राट ले द्या, जे परमेश्वर न शे ते परमेश्वर ले द्या.” हई आयकीसन त्या चकित हुयग्यात आणि तेले सोळीसन चालना ग्या. त्या दिन सदूकी, यहुदी लोकस्ना एक समूह ज्या सांगतस, कि मरेलस्ना परत जित्ता होण शेच नई, त्या येशु जोळे उनात आणि तेले विचारनात. हे गुरु “मोशे नि सांग होत जर कोणी बिगर संतान ना मरी जास त तेन भाऊ नि नवरी संगे लग्न करीसन आपला भाऊ साठे वंश पैदा करस.” आणि आमना सात भाऊ होतात, सर्वास तून मोठा भाऊ नि लग्न करी लीधा पण बिगर पोरस्ना मरी ग्या. आणि आपली बायको ले आपला भावूस साठे सोडी ग्या. या प्रकारे दुसरा भाऊ नि बी तसच कर, आणि सर्वा सात भावूस संगे असच हुयन, सर्वास्ना नंतर ती बाई बी मरी गयी. ज्या टाईम ले मरेल लोक परत जित्ता होतीन, त ती त्या सात मधून कोणी बायको हुईन? आमी हय विचारतस कारण कि तिनी त्या सर्वा सातीझनस संगे लग्न करेल शे. येशु नि तेस्ले सांग, तुमी परमेश्वर ना पुस्तक ले आणि परमेश्वर ना सामर्थ्य ले नई समजतस एनामुळे तुमी चुकी मा पळेल शेतस. कारण कि त्या मरेल मधून परत जित्ता होवावर, नईत माणुस नईत बाया लग्न करावत. त्या स्वर्ग मा ऱ्हायनारा ना परमेश्वर ना दूतस सारखा ऱ्हातीन. पण आते, काय मरेल मधून परत जित्ता होतीन, काय तुमी येणा विषय मा परमेश्वर नि पुस्तक मा नई वाचनात? अब्राहाम, इसहाक आणि याकोब ना मराणा गैरा टाईम नंतर, परमेश्वर नि सांग. “मी अब्राहाम ना परमेश्वर आणि इसहाक ना परमेश्वर आणि याकोब ना परमेश्वर शे. तो मरेल ना नई पण जिवंत ना परमेश्वर शे.” हई आयकीसन लोक तेना शिक्षण वर चकित होय ग्यात. पण जव परूशी नि आयक कि येशु नि आपला उत्तर द्वारे सदूकी ना तोंड बंद करी टाकनात परूशी लोक एकत्र हुयना आणि येशु ना जोळे उनात. तेस्ना मा एक मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक मधून एक ईसन, त तेनी येशु नि परीक्षा करासाठे विचार. हे गुरु मोशे ना नियम मा कोणती मोठी आज्ञा होती. येशु नि तेस्ले सांग, तू आपला प्रभु परमेश्वर संगे आपला पूर्ण मन, आपला पूर्ण प्राण, आणि आपली पूर्ण बुद्धी ना संगे प्रेम कर. हई पयली आणि महत्वपूर्ण आज्ञा शे. आणि तेना सारखी हई दुसरी बी शे आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम ठेव. सर्वा मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्नी सर्वा पुस्तक मा लिखेल वचन या आज्ञास्वर आधारित शे. जव परूशी लोक एकत्र होतात तव येशु नि तेस्ले विचार. ख्रिस्त ना विषय मा तुमी काय विचार करतस तो कोणा वंश शे? तेस्नी तेले सांग राजा दाविद ना. तेनी तेस्ले विचारत, राजा दाविद आत्मा मा हुईसन तेले प्रभु काबर सांगस? राजा दाविद सांगस कि प्रभु नि मना प्रभु ले सांग, मना उजवा बाजुले बठ जठलोंग मी तुना वैरी ले तुना समोर हाराई नई देत. चांगल जर राजा दाविद नि बी ख्रिस्त ले प्रभु सांगीसन संभोदित करना, त तो बी दाविद ना वंश कसा होवू सकस? तेना उत्तर वर कोणी बी गोष्ट हि सांगू सकनात नई त्या रोज पासून कोले बी परत तेनाशी काही विचारानी हिम्मत नई हुईनी. तव येशु नि गर्दी ले व आपला शिष्यले सांगणा. मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक ज्या मोशे ना नियमले शिकाळा मा परिपूर्ण शे. एनासाठे त्या तुमले जे काही सांगतीन, ते करज्यात, आणि मानज्यात, पण ज्या काम त्या करतस ते नई करा, कारण कि त्या प्रचार करतस, पण पालन करतस नई. त्या सर्वा प्रकार ना नियमस्ले बनावतस जेना पालन कराले लोकस साठे कठीण होस, पण त्या स्वता तेले आपली बोट वर बी सरकावना नई देखतस. त्या आपला सर्वा काम लोकस्ले दाखाडाले करतस, त्या आपला मंत्र पत्र चवडा करतस तेनावर त्या पवित्र वचन लिखीसन आपला शरीर वर बांधतस आणि आपला वस्त्रस्ना झालरस्ले व्हाळातस. आणि मेजवानी मा सन्मान नि जागा बी देखतस. आणि प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर बसान पसंद करतस. तेस्ले हई आवळस कि बाजारस्मा लोक तेस्ले आदरताशी नमस्कार करोत. पण तुमी स्वता ले लोकस कळून गुरु नका सांगाले लावज्यात, कारण कि तुमना एकच गुरु शे, आणि तुमी सर्वा एकसारखा शेतस. आपला बाप ले सोळीसन कोले बी पृथ्वी वर बाप ना पद ना आदर नको देयजो कारण कि परमेश्वर तुमना एकच बाप शे जो स्वर्ग मा शे. आणि स्वता ले स्वामी बी नका सांगाळज्यात, कारण तुमना एकच स्वामी शे म्हणजे ख्रिस्त. जर तुमी मोठा होवाना देखतस तर तो शिष्य बना. जो कोणी स्वता ले मोठा बनाईन तेले धाकला बनावामा ईन आणि जो कोणी स्वता ले धाकला बनाईन तेले मोठा बनावामा ईन. ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी लोकस्ले स्वर्ग ना राज्य मा जावानी परवानगी नई देतस, तुमी तेनामा नई जातस आणि नईत जानारस्ले जावू देतस. ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण तुमी धोका कण विधवास्नी संपती देवाले विवश करतस, आठ लोंग कि तेस्ना घर, आणि दाखाळा साठे तुमी लोकस्नी गर्दी मा मोठी प्रार्थना करतस, एनामुळे तुमले जास्त दंड भेटीन. ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन कारण तुमी एक माणुस ले आपला मत मा आणा साठे दूर-दूर जल आणि स्थळ नि यात्रा करतस. तेले तुमना मत मा जुळा वर तुमी तेले नरक नि आग ना दुप्पट दंड भेटाना योग्य बनाई देतस. ओ अंधा पुढारी, तुमना साठे कितला भयानक हुईन, ज्या सांगतस कि जर कोणा परमेश्वर ना मंदिर नि शेप्पत खातस तर काई नई पण जर कोणी परमेश्वर ना मंदिर ना सोनानी शेप्पत खास त तो तेनी शेप्पत कण बांधाई जाईन. ओ मूर्ख आणि अंधा, कोण मोठ शे सोन कि तो परमेश्वर ना मंदिर जेनावर ते सोन पवित्र होस? मंग सांगतस कि कदी कोणी वेदी नि शेप्पत खास तर काही नई पण जी भेट तेनावर शे, जर कोणी तेनी शेप्पत खाईन त तो तेनी शेप्पत कण बांधाई जाईन. काय तुमी मूर्ख आणि अंधा शेतस? कोण मोठा शे भेट कि विधी, जेना कण भेट पवित्र होस. एनासाठे ज्या वेदी नि शेप्पत खास ते तेनावर जे काही ठीयेल शे तेनी बी शेप्पत खास. जो परमेश्वर ना मंदिर नि शेप्पत खास, तो तेनी आणि तेनामा ऱ्हायनारा परमेश्वर नि शेप्पत खास. जो स्वर्ग नि शेप्पत खास तो परमेश्वर ना सिंहासन ना आणि तेनावर बठनारानी शेप्पत खास. ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक व परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण पुदिना, आणि शौप, आणि जीरा एस्ना दहावा भाग तुमी देतस. पण तुमी नियम ना महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे न्याय, दया, आणि विश्वास योग्य होवाले पायजे. तुमले दहावा भाग देवाले पायजे, पण या दुसरा महत्वपूर्ण गोष्टीस्ले दुर्लक्ष नका करज्यात. ओ अंधा अगुवा, तुमी धाकला नियमस्ना पालन कराना बारामा गैरा सावध शे जसा कि तुमी जे पीतस तेनाशी माशास्ले दूर ठेवण, पण नंतर तुमी परमेश्वर नि महत्वपूर्ण आदन्यास्ना पालन नई करतस. ते उट ले गियाना सारख शे. ओ कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी असा भांडा शे, ज्या बाहेरून स्वच्छ शेतस, पण आत मधून आते बी गंधा शेतस. म्हणजे, तुमी स्वता ले चांगला लोकस सारखा दाखाळतस. पण तुमना मनस्मा तुमी लालच आणि स्वार्थ कण भरेल शेतस. हे अंधा परूशी लोक पयले तुमले लालच आणि स्वार्थी होवाले बंद करी देवाले पायजे, तव तुमी तेच करू सकशान जे बरोबर शे, हई एक अशी ताटली नि सारखी अशीन जी बाहेर आणि आत मधून स्वच्छ अशीन. हे कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक, तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी चुना लायेल कबर ना सारखा शे, ज्या वरून तर सुंदर दिखस, पण मधमा मरेल ना हाळ आणि सर्वा प्रकार नि मळीनता कण भरेल शे. हई रीतीतून तुमी बी लोकस्ले वरून धर्मी दाखाळतस पण मधून कपटी आणि अधर्म पणा भरेल शेत. ओ कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन तुमी तुमना पूर्वजस नि ज्या भविष्यवक्तास्ले मारी टाकेल होतात, तेस्ना कबर बांधतस आणि धर्मी लोकस्ना ना कबर ले संमानीत करतस. आणि सांगतस कि जर आमी आपला बापस्ना दिन सभा राहत त भविष्यवक्ता ना हत्या मा सहभागी नई होतात. एना कण त तुमी साबित करतस, कि तुमी खरज त्या लोकस्ना वंश शेतस जेस्नी भविष्यवक्तास्ले मारी टाकेल होतात. (मले मालूम शे कि) तुमी आपला पूर्वजस्ना पाप ना घळा भरी देशान. तुमी विषारी सापस्ना बच्चास्ना सारखा शेतस, तुमी नरक ना दंड पासून नई वाचावत. एनासाठे देखा, मी तुमना जोडे भविष्यवक्तास्ले आणि बुद्धिमानस्ले आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ले धाळस, आणि तुमी तेस्ना मधून कईक ले मारी टाकशात, आणि तुमी कईक ले क्रूस वर चळावशात. आणि कितला ले आपला प्रार्थना घर मा फटका मारशात, आणि एक नगर तून दुसरा नगर मा खदळत काळशात. जेनाशी धर्मी हाबेल येणा रक्त पासून बरख्याना पोऱ्या जखऱ्या लोंग, जेस्ले तुमनी परमेश्वर ना मंदिर आणि वेदी ना मधमा मारी टाकेल होतात, सर्वा धर्मी लोकस्ना रक्त पृथ्वी वर व्हावाळा मा एयेल शे, ते सर्व तुमना डोका वर पळीन. मी तुमले खर सांगस या सर्वा हत्यास्नि दंड या सगळी पीडी ना लोकस वर ईपळीन. ओ यरूशलेम शहर ना लोक, ओ यरूशलेम ना लोक, तुनी त्या भविष्यवक्तास्ले मारी टाक ज्या गैरा पहिले होतात, आणि त्या लोकस्वर दघळ फेक कर जेस्ले तुना जोळे धाळामा एयेल होतात. कितला सावा मी विचार करनू कि कोंबळी आपला पिल्लूस्ले आपला पंख खाले सांभाळ करस, तसाच मी बी तुना पोरस्नि राखोई करू, पण तुले मान्य नई होत. देखा तुमना घर तुमना साठे उजाळ सोळामा एस. कारण मी तुमले सांगस, कि आते पासून तुमी नई सांगावत, कि धन्य शे तो जो प्रभु ना अधिकार ना संगे येस, तठलोंग तुमी मले परत कदीच नई देखावत. जव येशु परमेश्वर ना मंदिर मधून निघी ऱ्हायनता, जो यरूशलेम मा होता, तेना शिष्य त्या मंदिर नि रचना दाखाळा साठे तेना कळे उनात. तेनी तेस्ले सांग, काय तुमी हय सगळ नई देखतस? मी तुले खरज सांगस, शत्रू एक बी दघळ या जागा वर नई सोळाव. त्या सर्वास्ले नाश करामा ईन. आणि जव तो जैतून ना पहाळ वर परमेश्वर ना मंदिर ना समोर दरी ना त्या पार उतार वर जाईसन बठेल होता, शिष्यस्नी तेले आल्लग ईसन विचार आमले सांग कि ह्या गोष्टी कव होतीन? आणि तुना येवाना व या जग अंत ना चिन्ह काय शे? येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “सावधान राहा कि कोणी तुमले धोका नई देवो.” कारण गैरा लोक मना नाव ना उपयोग करीसन येतीन. आणि सांगतीन कि मी ख्रिस्त शे आणि त्या गैरा लोकस्ले तेस्ना वर विश्वास करासाठे धोका देतीन. तुमी युध्द आणि युध्दस्ना धमकी ना बारामा आयकतस, त घाबरज्यात नका: कारण कि ह्या गोष्टीस्ले पहिले होण शे, पण दुनिया ना अंत लगेच नई होवाव. कारण कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन, जठे तठे भूकंप होतीन, आणि दुष्काळ व महामारी पळतीन. हवू त्रास पोऱ्या ना जन्मा ना पयले त्रास ना सारखा शे. तव त्या लोक ज्या तुमना विरोध करतस दुख देवाळा साठे तुमले धरावतीन, आणि मारी टाकतीन, कारण कि तुमी मनावर विश्वास करतस म्हणून सर्वा जातीस्ना लोक तुमना व्देष करतीन. तव गैरा सावटा मनावर विश्वास कराले सोळी देतीन, आणि एक दुसराले पकडावतीन आणि एक दुसरानं वैरी बनावतीन आणि गैरा खोटा भविष्यवक्ता येतीन आणि गैरा लोकस्ले फसाळतीन. आणि अधर्म ले वाढावर, त्या एक दुसराले प्रेम नई कराव. पण ज्या लोक मना संगे विश्वास योग्य राहतस आणि दुख खतम होता लोंग मनावर विश्वास करत राहतस आणि हार नई मानतस, त्या परमेश्वर ना द्वारे वाचाळामा येतीन. आणि परमेश्वर ना राज्य ना बारामा सुवार्ता सर्वा जग मा प्रचार करामा ईन, एनासाठे कि सर्वा देशस्ले येले स्वीकार कराना साठे संधी भेटो. तव, जग ना शेवट इजाईन. जव तुमी ती उजाडणारी श्रापित वस्तू नि जेनी चर्चा दानीयेल भविष्यवक्ता कळून होयेल हिती पवित्रस्थान वर उभी देखशान जो वाचीन तो समजीन. तव ज्या लोक यहूदीया प्रांत मा शे, तेस्नी रक्षा ना साठे पहाळ कळे पयानि गरज शे. जर तुमी आपला घर ना छत वर शे, त आपली संपत्ती लेवाले घर ना मधमा नका जायज्यात, तुमी पई जावाले पायजे. आणि जो वावरस मा शे, तो आपला कपळा लेवा साठे परत आपला घर नका जायज्यात. हई त्या बायास्ना साठे एक भयानक टाईम राहीन जी गर्भवती शे आणि त्या बायास साठे ज्या पोरस्ले दूत पाजी ऱ्हायनात, तेस्ना साठे पयाना गैरा कठीण राहीन. आणि एनासाठे प्रार्थना करा, कि हवू दुख कण भरेल टाईम हिवाया मा नई होवो, आणि आराम ना दिन पासून नई पळो. कि त्या टाईम ले असा क्लेश पडीन जसा त्या टाईम पासून जव परमेश्वर नि पयला सावा जग बनायेल होता आते लोंग. आणि लोकस्ले परत त्या प्रकार नि पिळा नई होवाव. आणि त्या दिन कमी नई कराव त कोनाबी जित्ता नई ऱ्हावावत. पण तेनी आपला लोकस्ना मुळे, जेस्ले तेनी निवाळेल शे, तो टाईम कमी करी दिन. त्या टाईम वर कदी कोणी तुमले सांगीन; देखा, ख्रिस्त आठे शे, व देखा, तठे शे, त विश्वास नका करज्यात. कारण कि खोटा ख्रिस्त आणि खोटा भविष्यवक्ता येतीन, आणि परमेश्वर नि निवाळेल लोकस्ले फसाळासाठे मोठा चिन्ह आणि चमत्कार करतीन. देखा मी ह्या घटना घळाना पयले ज्या घळनार शे तेना विषय मा सगळ सांगी दियेल शे. कदी तुले सांगामा येवो कि ख्रिस्त सुनसान जागा मा बाहेर शे, त तठे नका जायज्यात, आणि आखो तुमले सांगामा येवो कि तो कोणता गुप्त जागा वर शे, त विश्वास नका करज्यात. कारण कि जशी वीज पूर्व कळून निघीसन पश्चिम लोंग चमकीसन जास तसाच माणुस ना पोऱ्या ना बी येन राहीन. जठे प्रेत राहीन, तठेच गिधळ एकत्र होतीन. त्या दिनस्मा, भयानक दुख ना टाईम सराना नंतर सूर्य आणि चांद दोनी चमकाना बंद करी देतीन. आणि आकाश मधून तारा पळाले लागतीन: आणि आकाश मधल्या शक्तीस्ले हालावामा ईन. तव माणुस ना पोऱ्या ना चिन्ह आकाश मा दिखीन, आणि तव पुर्थ्वी ना सर्व जाती ना लोक छाती ठोकतीन, आणि मी, माणुसस्ना पोऱ्या मोठा सामर्थ्य मा आणि मोठी महिमा मा येतांना देखतीन. आणि तव तुतारी ना मोठा शब्द ना संगे आपला दूतस्ले जग मा धाळसू कारण कि त्या मना निवाळेल लोकस्ले मना जोळे लय येतीन त्या तेस्ले सर्वा देशस मधून आणि पृथ्वी ना गैरा दूर जागा वरून त आकाश ना त्या सीमा लोंग तेना निवाळेल लोकस्ले एकत्र करतीन. अंजिर ना झाळतून हवू धळा शिका, जसा तेना डायास्मा फांद्या आणि तेना पान फुटाले लागी जातस त तुमी वयखी लेतस, पाउसाया जोळे शे. ह्याच प्रकारे, जव तुमी ह्या सर्व गोष्टी ले होतांना देखतस त तुमी समजी लेवाले पायजे कि या दुनिया ना शेवट नजीक ईजायेल शे. मी तुमले खरज सांगस, आते ऱ्हायनारा गैरा लोक निश्चित रूप मा त्या सर्वा गोष्टी पुरा नई होवाना पयले नई मराव. आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जातीन, पण मना शब्द कायम लोंग राहीन. त्या दिन आणि कोणता तास ले हुईन हई कोले बी नई माहित, स्वर्ग मधला परमेश्वर ना दूत ले आणि पोऱ्या, येशु ले बी नई पण फक्त बाप ले दिन आणि तास माहित शे. जसा नोहा ना दिन होतात, तसाच माणुस ना पोऱ्या न येन बी हुईन. कारण कि जसा जल-प्रलय ना पयला दिनस्मा, ज्या दिन लगून कि नोहा जहाज मा नई चळना, त्या दिन लोंग लोक खात-पीत होतात, आणि तेस्ना मा लग्न-लुग्न होत होतात. आणि जठलोंग जल-प्रलय ईसन त्या सर्वास्ले वाव्हाळीसन नई लीगया तड लोंग तेस्ले काही माहित नई पडत तसाच माणुस ना पोऱ्या येन बी राहीन. त्या टाईम ले दोन झन वावर मा ऱ्हातीन, एक ले ली लेवामा ईन, आणि दुसराले सोळामा ईन. दोन बाया दयन करत ऱ्हातीन, एक ले ली लेवामा ईन, आणि दुसरी सोळामा ईन. येनासाठे येशु नि आपला शिष्यस्ले सांग कि, तुमले नई मालूम कि तुमना प्रभु कोणता टाईम ले ईन. पण हई समजी ल्या कि घर ना मालक ले माहिती शे कि चोर कोणत्या टाईम ले ईन, त तो जागत ऱ्हाता, आणि आपला घर मा चोरी नई होवू देता. एनासाठे तुमी बी तयार राहा, कारण कि ज्या टाईम ना बारामा तुमी विचार बी नई करतस, त्याच टाईम ले माणुस ना पोऱ्या इजाईन. एक विश्वास योग्य, आणि बुद्धीमान दास तो ऱ्हास, जेले घर ना स्वामी दुसरा दास वर लक्ष देवाना साठे नियुक्त करस. जो तेस्ले निश्चित टाईम वर जेवण देवाना साठे सांगस. नंतर तो लांब प्रवास ले निघी जास. धन्य शे, जो दास, जेले तेना मालक ईसन असाच करतांना देखात. मी तुमले खरज सांगस, तो तेले आपली सर्वी संपती वर अधिकारी ठराईन. पण तो दुष्ट दास विचार करले लागो, कि मना मालक ले येवाले उशीर शे. आणि आपला साथी दासस्ले माराले लागो, आणि बेवळास्ना संगे खावो-प्येवो. त त्या दास ना मालक असा दिन ईन, जव तो तेना रस्ता नई देखत ऱ्हावाव, आणि अशी घळी वर जी तेले माहित नई ऱ्हावाव, ईजायीन. तो तेले कठोर दंड दिसन, तेना भाग कपटीस्ना संगे ठराईन, तठे रळान व दात खान राहीन. येशु नि आपला शिष्यस्ले सांग, जव मी, माणुस ना पोऱ्या परत एसू, तव स्वर्ग ना राज्य असा ऱ्हाईन. दहा कुवारी आपला दिवा लिसन नवरदेव ले भेटाले ग्यात. तेस्ना मा पाच एळा होत्यात आणि पाच समजदार होत्यात. एळास्नी आपला दिवा त लीनत पण आपला संगे पुरेसा तेल नई लीधात. पण समजदारी न आपला दिवा ना संगे आपली कुप्पीमा तेल बी लिलीध. जव नवरदेव ना येवामा उशिरा होयनात मंग त्या सर्व झोपाले लागनात. आर्धी रात्री ले कोणी तरी वरळना, कि देखा, नवरदेव ईऱ्हायना तेले भेटाले चला. तव त्या सर्व कुवारी उठीसन आपला दिवा सुधारू लागनात. आणि एळास्नी समजदारस्ले सांग आपला तेल मधून काही आमले बी द्या कारण आमना दिवा मलावामा शेतस. पण समजदारास्नि उत्तर दिनात कि कदाचित आमना व तुमना साठे पुराव नई चांगल हई शे कि तुमी विकनारासकळे जाईसन तुमना साठे विकत लिल्या. जव त्या विकत लेवा साठे जात होत्यात तव नवरदेव ईग्या, आणि त्या ज्या बुद्धीमान कुवारी तयार होत्यात, त्या तेना संगे लग्न घर मा चालना ग्यात आणि दरवाजा बंद करामा उना. एना नंतर त्या दुसऱ्या कुवारी बी परत ईसन नवरदेव ले आवाज दिधा, हे स्वामी आमना साठे द्वार उघाळी दे. तेनी उत्तर दिधा कि मी तुमले खर सांगस मी तुमले ओयखत नई. एनासाठे जागा राहा कारण कि तुमी नई जानतस कि माणुस ना पोऱ्या कोणता टाईम ले ईन. आणि नईत त्या दिन ले. जव मी परत एसू, तव स्वर्ग ना राज्य ह्या प्रकारे ऱ्हायीन, एक माणुस लांब प्रवास वर जात होता. त्या टाईम ले आपला दासस्ले बलाईसन आपली संपती मधून कईक तेस्ले दि टाक, आणि सांगणा कि जव तो चालना जाईन, त त्या तेले काम मा लयोत आणि जास्त पैसा लयोत. तेनी एक ले पाच हजार सोना ना शिक्का, दुसराले दोन हजार सोना ना शिक्का, व तिसराले एक हजार सोना ना शिक्का, म्हणजे प्रत्येक ले तेस्नी क्षमता प्रमाणे दिधात, आणि तव परदेश ग्या. तव जेले पाच हजार रुपये भेटेल होतात तेनी लगेच जायसन तेनावर लेन-देन करना आणि पाच हजार कमाई लीधा. हई रिती कण जेले दोन हजार भेटेल होतात, तेनी बी दोन हजार आखो कमाई लीधा. पण जेले एक हजार भेटेल होत, तो जाईसन माती खोदी आणि आपला स्वामी ना एक हजार दपाडी दिधा. गैरा दिन नंतर त्या दासस्ना मालक ईसन हई मालूम करासाठे तेनी एकत्र कर कि तेस्नी तेना पैसा ना संगे काय करेल शे. जेले पाच हजार भेटेल होतात, तेनी पाच हजार आजून लईसन सांग, मालक, तुनी मले पाच हजार दियेल होतात, देख मी आजून पाच हजार कमायेल शे. तेना मालक नि तेले सांग, शाब्बास, चांगला आणि विश्वासू दास, तू थोडा धन राशी ले सांभाळा मा विश्वास योग्य ऱ्हायना, मी तुले गैरा वस्तूस्ना अधिकारी बनावसू. आपला मालक नि खुशी मा सहभागी हो. आणि जेले दोन हजार भेटेल होतात, तेनी ईसन सांग, मालक, तुनी मले दोन हजार सोपेल होतात, देख, मी आजून दोन हजार कमावनु. तेना मालक नि तेले सांग, शाब्बास, चांगला आणि विश्वासू दास तू थोडा धन राशी ले सांभाळा मा विश्वास योग्य ऱ्हायना, मी तुले गैरा वस्तूस्ना अधिकारी बनावसू, आपला मालक नि खुशी मा सहभागी हो. तव जेले एक हजार दियेल होतात, तेनी ईसन सांग, मालक, मी तुले ओयखत होतु, कि तू कठोर माणुस शे, तू एक असा माणुस ना सारखा शे, जो एक असा वावर मधून पिक एकत्र करानी ईच्छा करस, जेले कोणी दुसरास्नी लायेल शे. म्हणून मी घाबरी ग्या, कि जर मी तुना पैसा दवाळी टाकस त तू मले दंड देशीन, आणि जाईसन तुना पैसा माती मा दपाळी टाक, देख, जो तुना शे, ते हई शे. तेना मालक नि उत्तर दिधा, ओ दुष्ट आणि आळशी दास, जव तुले हई माहित होत, कि मी एक असा माणुस ना सारखा शे, जो एक असा वावर मधून पिक एकत्र करानी ईच्छा करस जेले कोणी दुसरास्नी लायेल शे. तो तुले पाहिजे होता, कि मना पैसा ले सावकार ले दिदेता, त मी ईसन आपला पैसा व्याज सम्मध ली लेतू. तव मालक नि दुसरा दासस्ले सांग, त्या पैसा तेना कळून लिल्या, आणि जेना कळे दहा हजार शेतस, तेले दिटाका. कारण कि जेना कळे शे, तेले आजून देवामा ईन, आणि तेना कळे जास्त हुई जाईन, पण जेना कळे नई शे, तेना कळून ते बी जे काही तेना कळे शे, लेवामा ईन. या आळशी दास ले बाहेर, अंधकार मा टाकी द्या जठे रळान आणि दात खान शे. जव मी, माणुस ना पोऱ्या परत एसू, तर मी आपली महिमा मा एसू आणि सर्वा परमेश्वर ना दूतस्ले आपला संगे लयसू. तव मी सर्वा लोकस्ना न्याय कराना साठे आपला महिमामय सिंहासन वर बठसू. आणि सर्वा जाती मना समोर एक करामा ईन आणि जसा मेंडपाळ मेंढ्यास्ले बकरी पासून आल्लग करी देस तसच मी तेस्ले एक दुसरा पासून आल्लग करीन. आणि मी मेंढ्यास्ले ज्या कि धर्मी लोक शेतस, आपला उजवा बाजू मा करसू आणि बकऱ्यास्ले ज्या कि अधर्मी लोक शेतस, डावखोऱ्या बाजुमा करसू. तव मी, राजा आपला उजवा बाजुवालास्ले सांगीन हे मना बाप ना धन्य लोक या आणि त्या राज्य ना अधिकारी हुईजावा जे जग ले बनावाना पयले तुमना साठे तयार करी ठेयेल शे. जव मी भुक्या होता, तर तुमनी मले जेवण दिनात, जव मी तहानेल होतु, तव तुमनी मले पाणी पाज, जव मी परदेशी होता, तर तुमनी मले आपला घर मा ठेवनात. जव मी नागा होता, तव तुमनी मले घालाना साठे कपळा दिधात, जव मी आजारी होता, तव तुमनी मनी देखभाल करणात, जव मी बंदीगृह मा होता, तव तुमी मले भेटणा साठे उनात. तव धर्मी तेले उत्तर देतीन कि हे प्रभु आमी तुले कवय भूक देख आणि कवय खाऊ घाल कि तहानेल देख आणि पेवाड. आमी तुले नईत परदेशी देख कि आमना घर मा ठेवनुत कि नाग देख आणि कपळा घालनात. आमी तुले कवय आजारी व बंदीगृह मा देख आणि तुले भेटाले उनात. तव राजा तेस्ले उत्तर दिन, मी तुमले खर सांगस कि तुमी ज्या मना धाकलास्तून धाकला शिष्य मधून कोणा एक संगे करणात ते मना संगे करणात. तव डावखोऱ्या कळलास्ले सांगीन हे स्त्रापित लोक मना समोरून त्या नरक मा चालना जावो जे सैतान आणि तेना दूतस साठे परमेश्वर नि बनायेल शे. कारण जव मी भुक्या होता, तर तुमनी मले जेवण नई दिनात, जव मी तहानेल होतु, तव तुमनी मले पाणी नई पाज. मी परदेशी होतु तुमी मले आपला घर मा नई राहू दिधा, मी नागा होतु, त तुमनी मले कपळा नई घालावनात, मी आजारी व बंदीगृह मा होता आणि तू मले देखाले नई उना. तव त्या उत्तर देतीन कि हे प्रभु आमी तुले कवय भुक्या देखनुत कि तहानेल कि परदेशी कि आजारी कि बंदिगृहामा देखनात आणि तुनी सेवा करणात नई. तव मी तेस्ले उत्तर दिसू, तुमले खर सांगस कि तुमी या विश्वासी भावूस मधून कोणी एक ना संगे नई करणात ते मना संगे बी नई करणात. आणि त्या ज्या डाखोऱ्या बाजुमा शे, कायम ना दंड भोगतीन, पण धर्मी लोक कायम ना जीवन मा प्रवेश करतीन. जव येशु ह्या सर्वा गोष्टी सांगी दियेल होता, त तो आपला शिष्यस्ले सांगू लागणा. तुमले माहित शे, कि दोन दिन नंतर यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन शे, आणि माणुस ना पोऱ्या क्रूस वर चळावा साठे धरवामा ईन. आणि मुख्य यहुदी पुजारी, पूर्वज लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ह्या केफा नाव ना महा यहुदी पुजारी ना घर ना आंगण मा गोया हुईनात. आणि या गोष्ट नि तपासमा होतात, कि येशु ले कसकाय कपट मा धरीसन मारी टाकुत. पण सांगत होतात, कि “आमले सन ना टाईम ले तेले बंदी कराले आणि माराले नोको पायजे, कदी अस नई हुई जावो कि लोकस्मा दंगा होवो.” जव येशु बेथानी नगर मा शिमोन ना घर होता, जेले कोळ होता. त एक बाई संगमरमर ना कुपी मा गैरा महाग सुगंध तेल लिसन तेना कळे उणी आणि तो जेवण कराले बठेल होता तेना डोका वर टाकी दिधा. हई देखीसन तेना शिष्य रागे भारीनसन सांगानात हई नाश काबर करणीत. हई त चांगली किंमत मा ईकीसन गरीबस्ले देता येत. हई समजीसन येशु नि तेस्ले सांग, बाई ले काब त्रास देतस? तिनी मना संगे चांगल करेल शे. गरीब तुमना संगे कायम राहतीन पण मी तुमना संगे कायम नई राहाव. तेनी मना शरीरावर जे हई सुगंधी तेले ओतेल शे तेना मना उत्तर कार्य साठे करेल शे. मी तुमले खरज सांगस, सर्वा जग मा जठे कोडे बी सुवार्ता ना प्रचार करतीन, त्या हई बी सांगतीन कि बाई नि काय करेल शे, आणि लोक तिले आठवण करतीन. तव यहूदा इस्कर्योत जो बारा शिष्यस मधला एक होता मुख्य यहुदी पुजारी जोळे जायसन सांगणा, जर मी तेले तुमना हात मा देवू त मले काय देशान तेस्नी तेले तीस चांदी ना शिक्का तो लिसन दिनात. आणि तो त्याच टाईम पासून तेले धरानी संधी झामलत होता. बिगर खमीर ना भाकर ना सन ना पहिला दिन, येशु ना शिष्यस्नी तेले विचार, आपला साठे वल्हांडण सन ना जेवण तयारी कोठे करावी म्हणून तुनी ईच्छा शे. तेनी सांग यरूशलेम शहर मा अमुक माणुस कळे जायसन सांगा कि गुरु सांगस कि मना टाईम जोळे शे मी आपला शिष्य संगे तुना आठे वल्हांडण ना सन ना जेवण करसू. मंग शिष्यस्नी येशु नि आज्ञा मानी, आणि वल्हांडण सन ना जेवण तयार करणात. जव संज्याकाय होयनी त तो बारा शिष्यस्ना संगे जेवण कराले बठना. जव त्या जेवण करत होतात, त येशु नि सांग, मी तुमले खर सांगस, तुमना मधून एक झन मले धरावीन. एनावर त्या गैरा नाराज हुयनात, आणि तेले विचारू लागनात, काय तो मी शे? तेनी उत्तर दिधा कि जेनी मना संगे ताट मा हात टाकेल शे मले धराईन. मी, माणुस ना पोऱ्या मरी जासू कारण कि हई शास्त्रस मा लिखेल शे. पण त्या माणुस साठे कितला भयानक शिक्षा हुईन, कि जेना व्दारा माणुस ना पोऱ्या धरावामा येस, हय त्या माणुस साठे चांगल ऱ्हात कि तो पैदाच नई होता. तव तेना धरावनारा यहूदा नि सांग, गुरुजी, काय तो मी शे? तेनी तेले सांग, तू सांगी दिना. जव त्या खात होतात, तव येशु नि भाकर लीधी, आणि आभार मानीसन मोळना, आणि शिष्यस्ले दिसन सांग, ल्या खावा हई मनी देह शे. मंग तो कटोरा लिसन आभार मानीसन आणि तेस्ले दिसन सांगणा, तुमी सर्वा एना मधून प्या. कारण हई नवा करार मना रक्त शे, जे गैरास साठे पाप नि माफी साठे व्हावाळा मा येस. मी तुमले खरज सांगस, कि येणा नंतर मी त्या दिन लोंग परत कदीच द्राक्षरस नई पीवाव, जठलोंग कि तुमना संगे आपला बाप ना राज्य मा नवीन नई पिलेस. मंग येशु आणि तेना शिष्यस्नी परमेश्वर ना भजन करणात, यरूशलेम शहर मधून बाहेर चालना ग्यात, आणि जैतून ना पहाळ वर चालना ग्यात. तव येशु नि तेस्ले सांग, तुमी सर्व आजच मना विषय मा ठोकर खाशान कारण कि लिखेल शे, कि “मी मेंडपाळले मारसू आणि गवारा ना मेंढ्या तित्तर-बित्तर हुई जातीन.” मोत मधून जित्ता होवा नंतर मी तुमना तून पयले गालील जिल्हा मा जासू आणि तठे तुमले भेटसू. एनावर पेत्र नि तेले सांग जर सर्वातूना विषय मा अडखड तीन तरी मी कदी अडखडाव नई. येशु नि तेले सांग मी तुले खर सांगस कि आजच रात ले कोंबळा बांग देवाना पयले तू तीन सावा मना नकार करशीन. पेत्र नि तेले सांग, जर मले तुना संगे मरण बी पळीन, तरी बी, मी तुले मी कदीच नई सांगाव कि मी तुले नई ओयखस, आणि असाच सर्व शिष्यस्नी बी सांग. तव येशु नि आपला शिष्यस संगे एक गेथशेमाने नाव ना एक जागा वर उनात आणि आपला शिष्यस्ले सांगू लागनात कि “आठेच बसा जव मी जाईसन परमेश्वर कळे प्रार्थना करस.” आणि तो पेत्र व जब्दी ना दोनी पोरस्ले बगीचा मा थोळा पुढे आपला संगे लीग्या, आणि तो गैरा दुखी आणि व्याकुल होवाले लागणा. तव तेनी तेस्ले सांग, “मना मन गैरा दुखी शे, आणि मले अस वाटी ऱ्हायन कि मी मरा वर शे. तुमी आठेच थांबा आणि मना संगे जागे राहा.” तव तो थोडा पुढे जायसन तोंड खाले करीसन जमीन वर पालथा पळणा, आणि हई प्रार्थना करू लागणा कि हे मना बाप जर हुईन त हवू दुख ना कोठारा मना पासून दूर करी दे तरी तुनी ईच्छा सारखा होवो. तव येशु परत उना आणि तीन शिष्यस्ले जपेल देखीसन शिमोन पेत्र ले सांग, काय तू एक तास बी नई जागी सकना? जागत आणि प्रार्थना करत राहा कि तुमी पाप कळे आकर्षित नई होवोत, आत्मा तयार शे, पण शरीर कमजोर शे. मंग तो दुसरी सावा जायसन हई प्रार्थना करी कि जर हई मना पिवाना बिगर नई बाजू व्हाव त तुमनी ईच्छा प्रमाणे होवू दे. तव परत ईसन तेस्ले जपेल देखा कारण कि त्या गैरा थकेल होतात, आणि तेस्ले सोळीसन आजून चालना ग्या आणि तीच गोष्ट आजून सांगीसन तिसरा सावा प्रार्थना करना. आणि तेनी शिष्य कळे ईसन तेस्ले सांग, “आते जपत राहा, आणि आराम करा, गैरा हुईग्या, आयका, टाईम ईजायेल शे, आणि माणुस ना पोऱ्या पापी लोकस्ना हात मा धरावामा ईन. उठा जावूत, देखा जो मले बंदी बनावाले मदत करस, जोळे ईऱ्हायना शे.” तो हई सांगतच होता, कि तव यहूदा ईस्कोरीयोत जो बारामा एक होता, उना आणि तेना संगे मुख्य यहुदी पुजारी आणि लोकस्ना पूर्वज तेस्ना कळून मोठी गर्दी तेनावर तलवार लिसन उना. तेना येशु ले बंदी बनावाले मदत करणारा, यहूदा नि या गर्दी ले हई पयलेच सांगी दियेल होता, कि जेले मी सन्मानपूर्वक छाती ले लावसू तोच शे, तेले धरी लयज्यात. आणि लगेच येशु ना जोळे जाईसन सांग; “गुरुजी!” सलाम आणि तेना गैरा चुम्मन लीधा. येशु नि तेले सांग, ओ मित्र, ज्या काम साठे तू एयेल शे, तेले करीले. तव त्या जोळे ईसन येशु वर हात टाकीसन तेले बंदी करी लीधा. आणि तव येशु ना साथीमधून एक झन हात वाढविसन आपली तलवार काडीसन महा यहुदी पुजारी ना दास वर चलाईसन तेना कान कापी टाकना. तव येशु नि तेले सांग आपली तलवार त्याच जागा वर ठेव कारण ज्या तलवार चालवतस त्या सर्व तलवार वर नाश होतीन. काय तू नई समजत कि मी आपला बाप ले विनंती करसू आणि तो परमेश्वर ना दूत नि बारा तुकडी तून जास्त मना कळे आते उपस्थित करी दिन. पण जर कदी मनी कर, त परमेश्वर ना पुस्तक ना त्या गोष्टी कसा पुरा होतीन, ज्या सांगतस कि आते काय होवाले पाहिजे. येशु नि त्या गर्दी ले जी तेले धराले एयेल होती सांग, काय तुमी डाखू समजीसन मले बंदी करासाठे तलवारी आणि सोठा लिसन निघेल शेतस? पण हई सर्व एनासाठे होयेल शे कि परमेश्वर ना पुस्तक नि गोष्टी पुरी होवोत. तव सर्वा शिष्य तेले सोळीसन पईग्यात. आणि येशु ले पकडणारा तेले केफा नाव ना महा यहुदी पुजारी कळे लीग्या जठे मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक व पूर्वज लोक एकत्र होयेल होतात. पेत्र दूर दूर तून तेना मांगे मांगे महा यहुदी पुजारी ना घर ना आंगण लगून ग्या, आणि मधमा जाईसन शेवट काय होस ते देखा साठे कामगारस्मा जाईसन बठी ग्या. मुख्य यहुदी पुजारी लोक आणि सर्वा यहुदी महासभा ना अन्य सदस्य येशु ले मारी टाकासाठे तेना विरुद्ध मा साक्षी झामलत होतात. पण नई भेटणा कारण कि गैराच तेना विरुद्ध मा खोटी साक्ष दिऱ्हायंतात पण दुसरा साक्षीदारस्नि काय सांग त्या तेस्ना कण सहमत नई होतात. शेवटी दोन झन ईसन सांगणात, कि आमी येले हय सांगतांना आयकेल शे, कि मी ह्या परमेश्वर ना मंदिर ले पाळी टाकासू आणि तीन दिन मा दुसरा मंदिर बनावसू. तव महा यहुदी पुजारी सभा ना समोर उभा ऱ्हायसन येशु ले विचार, कि “तू स्वता ले वाचाळा साठे काय बी काब सांगत नई? ह्या लोक तुना विरुद्ध मा काय साक्षी देतस?” पण येशु चूप ऱ्हायना. तव महा यहुदी पुजारी नि तेले सांग, मी तुले जिवंत देवणी शेप्पत देस, जर तू परमेश्वर ना पोऱ्या ख्रिस्त शे त आमले सांग? येशु नि तेस्ले सांग, तुनी स्वता हा सांगी दिधा पण मी तुले हई बी सांगस कि आते पासून तुमी मी, माणुस ना पोऱ्या ले सर्व सामर्थ्य ना परमेश्वर ना बाजू बठेल आणि आकाश ना ढगस्वर येतांना देखशात. तव महा यहुदी पुजारी नि आपला कपळा फाळीसन सांगणा, तेनी परमेश्वर नि निंदा करेल शे, आते आमले साक्षीदार नि काय गरज शे. देखा तुमी आते हई निंदा आयकेल शे. तुमी काय समजतस तेस्नी उत्तर दिधा कि तो मरणदंड ना योग्य शे. तव तेस्नी तेन तोंड वर थुक आणि तेले बुक्का मारनात दुसरानी झापट मारीसन सांग. हे ख्रिस्त आमले भविष्यवाणी करीसन सांग कि कोणी तुले मार. आणि पेत्र बाहेर आंगण मा बठेल होता कि एक कामगार तेना कळे ईसन सांग कि तुमी येशु गालील जिल्हा ना आणि काही लोकस्ना बराबर होता. तेनी सर्वा समोर हई सांगीसन नकार दिन आणि सांगणा मले माहित नई कि तू काय सांगस. मंग तो बाहेर देवडीवर चालना गया त दुसरी दासी पोर नि तेले देखीसन तेले जो तठे होता सांग, हवू बी तो येशु नासरेथ ना संगे होता. तेनी शेप्पत खाईसन आखो नकार कि मी त्या माणुस ले नई वयखत. थोडा टाईम नंतर जे तठे थांबेल होतात त्या पेत्र कळे ईसन सांगणात खरज तू तेस्ना मधून एक शे कारण तुनी बोली वरून तू ओयखाय जास कि तू गालील जिल्हा ना शे. तव तो शेप्पत खाऊ लागणा कि मी त्या माणुस्ले नई जानत आणि तीतलामा कोंबळानी आवाज दिधा. तव पेत्र ले ती गोष्ट जी येशु नि तेले सांगेल होती आठवण उणी कि “कोंबळा ना दोन सावा बांग देवाना पहिले तू तीन सावा मना नकार करशीन,” आणि तो बाहेर ईसन जोरमा दुखी हुईसन रळाले लागणा. जव गैरी सकाय होयनी, तव मुख्य यहुदी पुजारी लोक, पूर्वज लोक, येशु ले माराना निर्णय करणात. आणि तेस्नी तेले बांध, आणि लीजायन यहूदा क्षेत्र ना रोमी राज्यपाल, पिलात ना हात मा सोप. जव तेले पकडणारा यहूदा ईस्कोरीयोत ले मालूम हुईन, कि येशु ले माराले निश्चय करेल शे, तेनी जे करेल होता तेनाशी तेनी पश्चाताप करा, आणि त्या तीस चांदी ना शिक्का मुख्य यहुदी पुजारी लोक आणि पूर्वज लोक जोळे परत लयना. आणि सांगणा मी निर्दोष माणुस ले मारावाना साठे धराईसन पाप करेल शे तेस्नी सांग एनाशी आमन कायी लेन देन नई हई तेनीच समस्या शे. तव तो त्या शिक्कास्ले परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा फेकीसन चालना ग्या, आणि बाहेर जायसन तेनी स्वता ले फाशी लाई लिधी. मुख्य यहुदी पुजारी लोकस्नी त्या शिक्कास्ले लिसन सांगणा, आमना नियम आमले ह्या धन ले मंदिर ना खजाना मा ठेवानी परवानगी नई देस, कारण या कोले तरी मारा साठे दियेल पैसा होता. मंग तेस्नी एकत्र हुईसन त्या शिक्कास्ले परदेशीस्ले गाडा साठे माती ना भांडा बनावनार कोणता व्यक्ती ना वावर विकत लीधा. या रितिने तो वावर आज लोक रक्त ना वावर सांगतस. तव जे यिर्मया भविष्यवक्ता नि जे वचन सांगेल होत ते पूर्ण हुयना, कि “तेस्नी त्या तीस शिक्का म्हणजे त्या ठरायेल किंमत ले जेले इस्त्राएल देश नि संतान मधून कईक नि ठहरायेल होत लीलीधा. ” आणि जसा प्रभु नि मले आज्ञा दियेल होता तसाच तेस्नी येणा वापर कुंभार ना वावर ईकत लेवाले करणात. जव येशु राज्यपाल ना समोर उभा होता त राज्यपाल नि तेले विचार कि काय तू यहुदीस्ना राजा शे येशु नि तेले सांग तू स्वता सांगी ऱ्हायना. जव मुख्य यहुदी पुजारी लोक व पूर्वज लोक तेनावर आरोप लाई ऱ्हायंतात, त तेनी काही उत्तर नई दिधा. एनावर पिलात नि तेले सांग काय तू आयकत नई या तुना विरोध मा कितली साक्ष दि ऱ्हायनात. पण तेनी तेस्ले एक बी गोष्ट ना उत्तर नई दिधा आडलोंग कि राज्यपाल ले आश्चर्य वाटणा. आणि राज्यपाल नि हई रिती होती कि त्या सन मा लोकस साठे कोणी एक बंदिदार जेले त्या सांगतस तेले सोळतस. त्या टाईम ले बरब्बा नाव ना एक माणुस होता, जो अन्य क्रांतीकारीस ना संगे जेल मा होता. जव त्या एकत्र होयनात पिलात नि तेस्ले सांग तुमले कोण आवडस कि मी तुमना साठे सोडी देवू बरब्बा ले कि येशु ले ख्रिस्त मनतस तेले. कारण तेले माहित होत कि तेस्नी येशु ले हेवा कण धरेल शे. जव तो न्याय सिंहासन वर बठेल होता कि तेनी नवरी नि तेले सांगी धाळ कि तू त्या धार्मिक माणुस ना काम मा हात टाकू नको, कारण कि मी मांगली रात ले स्वप्ना मा तेना मुळे मना मन मा गैरा त्रास हुईना. मुख्य यहुदी पुजारी व पूर्वज लोकस्नी लोकस्ले भडकाव कि बरब्बा ले मागील्या आणि येशु ले नाश करावा. राज्यपाल नि तेस्ले विचार कि या दोनी मधून कोण आवडस कि तुमना साठे सोडी देवू तेस्नी सांग बरब्बाले. पिलात नि तेस्ले विचार मंग येशु ले जो ख्रिस्त म्हणावस तेना काय करू सर्वास्नी तेले सांग कि तेले क्रूस वर चळावामा येवो. राजा नि सांग काब तेनी काय वाईट करेल शे पण त्या आजून बी जास्त ओरडी-ओरडीसन सांगू लगनात तेले क्रूस वर चळावामा येवो. जव पिलात नि देख कि काही होवू सकत नई पण या उलट पयलेच गडबड हुई ऱ्हायनी त तेनी पाणी लिसन पूर्ण गर्दी समोर आपला हात धोवात आणि सांगणा मी या धार्मिक ना रक्त मा निर्दोष शे तुमीच जाणा. सर्वा लोकस्नी उत्तर दिधा कि येणा रक्त आमना वर व आमना पोरस व राहीन. एनासाठे तेनी बरब्बा ले तेस्ना साठे सोडी दिधा आणि येशु ले फटका मारीसन तेस्ना स्वाधीन करना कि क्रूस वर चळावामा येवो. तव पिलात ना शिपाई येशु ले राज्यपाल ना महल ना आंगण मा ली ग्यात. आणि सर्वा शिपाईदल ले बलाई लयनात. आणि तेना कपळा काळीसन तेले किरमिजी झगा घालनात. आणि काटासना मुकुट बनाईसन तेना डोका वर ठेव आणि तेना जेवणा हात मा वेत दिना आणि रतेना समोर गुडघा टेकीसन मजाक उडवू लगनात कि हे यहुदी लोकस्ना राजा प्रणाम. आणि तेनावर थुकू आणि तोच वेत लिसन तेन डोकामा मारू लगनात. जव त्या तेनी निंदा करी लीनात त तेना वरून जांभा झगा काळीसन तेनाच कपळा घालात; आणि तव तेले क्रूस वर चळावा साठे शहर ना बाहेर ली ग्यात. बाहेर जातांना तेस्ले शिमोन नाव ना एक माणुस कुरेने शहर ना होता भेटणा तेस्नी तेले धर कि तो तेना क्रूस उचलीसन चालो. आणि त्या जागा वर जे गुलगुथा नाव नि जागा म्हणजे कवटी नि जागा सांगतस. तव शिपाईस्नी येशु ले गंधरस नाव नि एक कडू औषध टाकेल द्राक्षरस पेवाले दिधात, पण तेनी चाखीसन तेले पिवान नई सांग. तव तेस्नी तेले क्रूस वर चळाव आणि चिठ्या टाकीसन तेना कपळा वाटी लीधात. आणि तठे बठीसन तेनी राखोई करू लगनात. आणि तेना दोष पत्र तेना डोका वर लावनात कि हवू यहुदीस्ना राजा येशु शे. तव तेना संगे दोन डाखू एक उजवा बाजू ले आणि एक डावखोऱ्या बाजू क्रूस वर चळावनात. आणि येनावर जानारा आपला डोका हालावात आणि आरोया मारत सांगाले लागनात. हा! त तू तोच शे जेनी दावा करेल होता, कि तू मन्दिर पाळी सकस आणि तीन दिन मा परत बांधी सकशी. कदी तू परमेश्वर ना पोऱ्या शे, त स्वता ले वाचाळीले आणि क्रूस वरून खाले उतरी ये. हई रिती कण मुख्य यहुदी पुजारी आणि पूर्वज लोक बी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना संगे, आपस मा थट्टाकण सांगत होतात; कि एनी दुसरास्ले वाचाळ आणि स्वता ले नई वाचाळी सकत. हवू त इस्त्राएल देश ना राजा शे आते क्रूस वरून उतरी ईन त आमी विश्वास करसुत. तेनी परमेश्वर वर विश्वास ठीयेल शे जर तो येले आवडस त तो तेले सोळाविलीन कारण एनी सांगेल होता कि मी परमेश्वर ना पोऱ्या शे. या प्रकारे लुटारू ज्या तेना संगे क्रूस वर चढायेल होतात तेनी निंदा करत होतात. आणि दुफार ना टाईम ले सर्वा देश मा तीन तास साठे आंधारा पळेल ऱ्हायना. तिसरा पहर ना टाईम ले येशु नि जोरमा आवाज दिसन सांग, “एलोई, एलोई, लमा सबकथनी?” म्हणजे “हे मना परमेश्वर, हे मना परमेश्वर, तुनी मले काब सोळ?” ज्या तठे उभा होतात, तेस्ना मधून कितलाक नि हई आयकीसन सांग, “आयका, तो भविष्यवक्ता एलीया (स्वर्ग मधून) ले आपली मदत साठे बलावी ऱ्हायना.” तेस्ना मधून एक फटकामा पयना आणि स्पंज लिसन सिरका मा बुळाव आणि वेतवर ठीसन तेले पेवाड. दुसरानी सांग राय जावा देखुत एले एलीया वाचाळाले येत का नई. तव येशु नि मोठा शब्द मा आवाज दिसन तो मरी गया आणि आपली आत्मा परमेश्वर ले दि टाकी. आणि तो जाळा परदा जो परमेश्वर ना मंदिर मा होता, जो सर्वास्ले परमेश्वर नि संगतीमा जावाले रोकत होता, वरून त खाले लगून दोन तुकळा मा फाटी ग्या. आणि धरती हाली गई खडक फुटनात. कब्रा उघळी ग्यात आणि मरेल गैरा पवित्र लोकस्ना मृत्यूदेह जित्ता हुई ग्यात आणि येशु ना परत जित्ता होवा नंतर तो कबर मधून निघीसन पवित्र नगर यरूशलेम मा गया आणि गैरास्ले दिखना. तव शंभर सैनिकस्ना रोमी अधिकारी आणि जे तेना संगे येशु नि राखोई करणारा भूकंप आणि जे काही होयेल होत देखीसन घाबरी ग्यात आणि सांगणात खरोखर हवू परमेश्वर ना पोऱ्या होता तठे गैरा बाया ज्या गालील जिल्हा तून येशु ना सेवा करत जाईसन तेना संगे एयेल होती दूर तून हई देखत होती. तेस्ना मा मरिया मग्दालीया आणि याकोब आणि योसेफ नि माय मरिया आणि जब्दी ना पोऱ्या नि माय होती. जव संज्याकाय होयनी त योसेफ नाव ना अरिमथाई ना एक मालदार माणुस जो स्व:ताह येशु ना शिष्य होता उना आणि तेनी पिलात कळे जायसन येशु ना शरीर मागना. एनावर पिलात नि देवणी आज्ञा दिधी. योसेफ नि शरीर लिसन तेले श्वेत चादर मा गुंडाळ आणि तेनी आपली नवीन कबर मा ठेव जेनी खडकासमा खोदेल होती आणि कबर ना दरवाजा वर मोठा दगड लोटीसन चालना ग्या. आणि मरिया जी मग्दालीया नाव ना नगर नि होती, याकोब आणि योसेस नि माय मरिया तठे कबर ना समोर बठेल होती. दुसरा दिन, आराम ना दिन मुख्य यहुदी पुजारी लोक आणि कईक परूशी लोक पिलात ले भेटाले ग्यात आणि सांगणात. हे स्वामी आमले आठवण शे, कि त्या खोटा नि जित्ता राईसन सांग होत, कि मना मराणा तीन दिन नंतर मी परत जित्ता हुई जासू. एनासाठे, कृपया आमले परवानगी द्या, कि तीन दिन साठे पहारेकर कबर नि राखोई करोत. कदी तुमी अस नई करावत, त तेना शिष्य ईसन तेना मृत्यूदेह चोरी लीजातिन, आणि लोकस्ले सांगाले लागतीन, कि तो मरेल मधून परत जित्ता हुईजाएल शे, त मांगला धोका पयला तून बी वाईट हुईन. पिलात नि तेस्ले सांग, तुमना कळे पहारेदार शेत, त मांगला धोका (म्हणजे येशु ख्रिस्त ना ख्रिस्त होवाना दावा करान) पयला तून बी वाईट हुईन, जावा तुमले शक्य हुईन तीतला कबर ले सुरक्षित करा. एनासाठे तेस्नी जाईसन कबर ना दघळ वर निशान कण प्रवेश दरवाजा ले सील दिनात, कारण कोणी येशु ना शरीर ले दुसरा जागा वर नई लीजावू सकस. तव तेस्नी शिपाईस्ले कबर नि राखोई साठे सोळी दिधा. आराम ना दिन नंतर आठवडाना पयलाच दिन उजायामाच मरिया मग्दालीया आणि दुसरी मरिया कब्रले देखाले उणी. आणि एक मोठा भूकंप हुयना, कारण कि परमेश्वर ना दूत स्वर्ग तून उतरणा आणि जोडे ईसन तेनी दगड लोटी दिधा, आणि तेनावर बठी ग्या. तेन रूप विजे सारखा होता आणि तेन कपळा बर्फ सारखा धव्या होतात. तेना भीती शी पहारेकरी थरथर कापनात आणि मरेल सारखा हुई ग्यात. परमेश्वर ना दूत नि बायास्ले सांग, कि तुमी घाबरू नका माहित शे कि तुमी ज्या येशु ले क्रूस वर चळावामा एयेल होता तेले झामलतस. तो आठे नई शे पण आपला वचन ना नुसार जित्ता हुई जायेल शे या हय तीच जागा शे जठे तेस्नी प्रभु ले ठीयेल होत. आणि फटकामा जाईसन तेना शिष्यस्ले सांगा, कि तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे, आणि देखा, तो तुमना तून पहिले गालील जिल्हा मा जाईन, आणि तुमी तठेच तेले देखश्यात, जस तेनी तुमले पयले सांगेल होता. बाया घाबरेल होत्यात आणि तरी बी गैऱ्या खुशी होत्यात, कारण कि त्या कबर मधून फटकामा निघनात आणि आपला शिष्यले सांगा साठे पयनात. अचानक येशु तेस्ले भेटणा आणि सांग, “शांती तुमना संगे ऱ्हावो,” त्या तेना जोळे ग्यात, तेना पाय धरात, आणि तेले नमन कर. तव येशु नि तेस्ले सांग, “घाबरू नका, मना शिष्यस्ले जाईसन सांगा, कि गालील जिल्हा मा चालना जावा तठे मले देखशात.” जव त्या बाया बातमी सांगाणा साठे जातच होतात, कि पहारेकर ज्या कबर नि राखोयी करत होतात, नगर मा जाईसन मुख्य यहुदी पुजारी ले जाईसन पूर्ण गोष्टी सांगणात. मुख्य यहुदी पुजारी आणि पूर्वजस्नी एकत्र हुईसन आपली योजना बनावनात. तेस्नी पहारेकरिस्ले लाच ना रूप मा एक मोठी धन राशी देवाले निर्णय लीनात, हई सांगाणा साठे कि कबर खाली होती. हई सर्वास्ले सांगज्यात कि रात ले आमी जपेल होतात तर येशु ना शिष्य ईसन येशु ना शरीर चोरी ली ग्यात. आणि हई बातमी कि तुमी राखोयी ना टाईम ले जपी जायेल होतात, राज्यपाल ना कान लोंग पोहचनीत आणि तेले आमी समाई लीसुत आणि तुमले कोणतीच गोष्ट नि चिंता करानी गरज नई शे. एनासाठे तेस्नी पैसा लिसन जसा शिकाळा मा एयेल होतात, तसाच करणात, आणि हई गोष्ट आज लोंग यहुदीस्मा प्रसिद्ध शे. आणि अकरा शिष्य गालील जिल्हा मा त्या डोंगर वर ग्यात, जठे येशु नि तेस्ले भेटाले सांगेल होत. आणि शिष्यस्नी येशु ना दर्शन लिसन तेले नमन करणात, पण कोणा-कोणाले शक हुयना, कि तो जित्ता हुई जायेल शे. येशु नि तेस्ना कळे ईसन सांग, कि स्वर्ग आणि पृथ्वी ना सर्वा अधिकार मले दियेल शे. एनासाठे तुमी जाईसन सर्वा जाती ना लोकस्ले मना शिष्य बनावा आणि तेस्ले बाप, आणि पोऱ्या, आणि पवित्र आत्मा ना नाव वर बाप्तिस्मा द्या. आणि तेस्ले सर्व आज्ञा जे मी तुमले दियेल शे, मानाले शिकाळा आणि देखा, मी जग ना शेवट लोंग तुमना संगे शे. परमेश्वर ना पोऱ्या येशु ख्रिस्त ना बारामा सुवार्ता ह्या प्रकारे सुरुवात होस. जस यशया भविष्यवक्ता ना पुस्तक मा लिखेल शे, परमेश्वर नि आपला पोर्‍या ले सांग, “मी आपला संदेश लयनारा ले तुना पुळे धाळस, जो तुना साठे रस्ता सुधारीन. उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना, कि प्रभु ना रस्ता तयार करा, त्या सळकस्ले सीधा करा जेनावर तो चालीन.” हवू दूत योहान बाप्तिस्मा देणार होता, जो यार्देन नदी ना जोळे यहूदीया ना उजाळ जागा मा ऱ्हात होता, आणि हवू प्रचार करत होता, कि लोकस्ले बाप्तिस्मा लेवानी गरज शे, हई दाखाळा साठे कि त्या आपला पापस पासून मन फिरायसन परमेश्वर कळे फिरणात कि तेस्ले पापस्नी माफी भेटो. यहूदीया प्रांत ना राहणारा, आणि यरूशलेम शहर ना राहणार गैरा लोक निघीसन उजाळ जागा वर योहान ना संदेश आयकाले ग्यात, आणि तेस्नी आपला पापस्ले कबूल कर, त्या टाईम ले योहान नि तेस्ले यार्देन नदी मा बाप्तिस्मा दिधा. एक भविष्यद्वक्ता ना सारखा योहान ना कपळा उट ना केसस्ना बनायेल होता, आणि आपला कमर वर कातळी ना पट्टा बांधी ऱ्हाये, आणि नाकतोडा आणि रानमध खाया करत होता. आणि योहान हय संदेश देत होता. तेनी लोकस्ले सांग, कि “एक व्यक्ती शे, जो मनातून जास्त सामर्थी शे, जो लवकर येणार शे, मी ह्या योग्य नई कि तेना दास ना रूप मा वाकीसन तेना जोळास्ना बंद सोळू. मी त तुमले पाणी कण बाप्तिस्मा दियेल शे, पण तो तुमले पवित्र आत्मा कण बाप्तिस्मा दिन.” त्या दिनस्मा येशु नि गालील जिल्हा ना नासरेथ नगर तून ईसन, यार्देन नदी मा योहान कळून बाप्तिस्मा लीधा. आणि जव तो पाणी मधून निघीसन वरे उना, तव चालू तेनी आकाश ले उघळत, आणि परमेश्वर नि आत्मा ले कबुतर ना सारखा आपला वर उतरतांना देखा. मंग स्वर्ग मधून परमेश्वर ना आवाज उना, आणि येशु ले सांगणा, “तू मना प्रिय पोऱ्या शे, मी तुनाशी गैरा खुश शे.” तव पवित्र आत्मा नि चालू तेले उजाळ जागा कळे धाळा. आणि उजाळ जागा मा चाळीस दिन व चाळीस रात लगून ऱ्हायना, आणि तठे सैतान नि तेनी परीक्षा करी. आणि तठे वनपशु बी होतात, तरी परमेश्वर ना दूत ईसन येशु नि सेवा करत ऱ्हायनात. काही दिन नंतर, जव हेरोद राजा नि योहान ले बंदीगृह मा टाकी दियेल होत, तव येशु यहूदा जिल्हा ले सोळीसन परत गालील जिल्हा मा उना, आणि लोकस्ना मधमा परमेश्वर ना राज्य ना बारामा, सुवार्ता ना प्रचार करू लागणा. येशु नि सांग, “परमेश्वर नि जो टाईम नियुक्त करेल शे, तो ईजायेल शे, आणि परमेश्वर ना राज्य जोळे ईजायेल शे, त्यामुळे पापस पासून मन फिरावा आणि सुवार्ता वर विश्वास करा.” एक दिन जव येशु गालील ना समुद्र ना किनारा वर जातांना, तेनी शिमोन आणि तेना धाकला भाऊ अंद्रियाले समुद्र मा जाय टाकतांना देख, कारण कि त्या मासा धरणारा होतात. येशु नि तेस्ले सांग, “मना मांगे इपळा, आते लोंग तुमी मासा धरणारा होतात. मी तुमले शिकाळसू कि लोकस्ले मना शिष्य कसा बनावाना शे.” तेस्नी त्याच टाईम ले आपला मासा धराना काम सोळीसन, आणि तेना शिष्य बनी ग्यात. जव येशु काही पुळे जायसन, तेनी आजून दोन भावूस्ले देख, जेस्ना नाव याकोब आणि योहान होता, त्या जब्दी ना पोर होतात, त्या दोनी एक नाव मा बठीसन आपला जायास्ले सुधारत होतात. येशु नि तेस्ले सांग “मना संगे या आणि मना शिष्य बना.” आणि त्या आपला बाप जब्दी ले मजूरस्ना संगे नाव वर सोळीसन, त्या येशु ना शिष्य बनाना साठे तेना मांगे चालना ग्यात. येशु आणि तेना शिष्य कफर्णहूम नगर मा उनात, जव दुसरा आराम ना दिन उना, येशु प्रार्थना घर मा जाईसन प्रचार करू लागणा. आणि लोक तेना प्रचार कण चकित हुईनात, कारण कि तो तेस्ले मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक सारखा नई, पण तो तेस्ले एक असा शिक्षक सारखा शिकाळत होता, जेना जोळे मोठा अधिकार होता. जव येशु प्रार्थना घर मा प्रचार करत होता, कि त्याच टाईम ले, एक माणुस होता, जो एक दुष्ट आत्मा ना नियंत्रण मा होता. तेनी जोरमा सांग, “ओ येशु नासरेथ ना, आमले तुनाशी काय काम? मी तुले वयखस तू कोण शे. तू परमेश्वर ना पवित्र पोऱ्या शे.” येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, “चूप ऱ्हाय, आणि तेना मधून निघी जा.” तव दुष्ट आत्मा तेले जोरमा मुर्घळीसन, आणि मोठा शब्द मा आरोया मारीसन, तेना मधून निघी गई. एनावर प्रार्थना घर मा उपस्थित सर्वा लोक गैरा आश्चर्य करत, आपस मा बोलू लागनात कि, “हय त कोणत सामार्थी शिक्षण शे, आमी कदी बी कोले इतला अधिकार ना संगे प्रचार करतांना नई आयक! दुष्ट आत्मास्ले बी तो धमकावस, आणि त्या तेनी मानतस.” येशु नि जे करेल होत तेना विषय मा लोक दुसरास्ले सांगी ऱ्हायनात आणि लगेच गालील जिल्हा ना सर्वा लोकस्नी येशु ना करेल कामस्ना बारामा आयकी लीधात. त्या नंतर येशु आणि तेना शिष्य प्रार्थना घर मधून निघीसन, याकोब आणि योहान ना संगे शिमोन आणि अंद्रिया ना घर उनात. त्या टाईम ले शिमोन नि सासू ताप मा पळेल होती, आणि खाट मा पळेल होती. जव येशु घर मा उना, तव कोणी तरी येशु ले सांग, कि शिमोन नि सासू आजारी शे. तव येशु जोळे जायसन, तीना हात धरीसन तिले उठाळना, आणि तीना ताप तीना वरून उतरी ग्या, आणि ती तेस्ले जेवण दिसन पाहुनचारी करनी. जव संज्याकाय होयनी त्या टाईम वर जव आराम ना दिन बदली गया, त्या नगर ना लोकस्नी गैरा आजारी लोकस्ले आणि तेस्ले जेस्ना मा दुष्ट आत्मा होतात, येशु ना जोळे लयनात. आणि लोकस्नी मोठी गर्दी, कफर्णहूम ना सर्वा जागा वरून, शिमोन आणि अंद्रिया ना घर ना समोर एकत्र हुयनात. आणि तेनी गैरास्ले ज्या आलग-आलग प्रकारणा आजार पासून दुखी होतात, बरा करात, आणि गैरा दुष्ट आत्मास्ले काळा, आणि दुष्ट आत्मास्ले बोलू नई दिधा, कारण कि दुष्ट आत्मा तेले वयखत होतात, कि तो परमेश्वर ना पोऱ्या शे. सक्कायमा दिन निघाना पैले, येशु उठीसन निघणा, आणि एक सुनसान जागा वर ग्या, कि तठे एखटा राहू सको, आणि प्रार्थना करू सको. तव शिमोन आणि तेना जोळीदारस्ले, अस माहित पडण कि येशु चालना ग्या, त त्या तेले झामलू लागनात. जव तो भेटणा, तव तेस्नी सांग, कि “गैरा लोक तुले झामली ऱ्हायनात.” येशु नि तेस्ले सांग, “या, आमी त्या आंगे-पांगे ना गाव मा जावूत, कि मी तेस्ना मधमा बी परमेश्वर ना संदेश ना प्रचार करी सकसू, कारण कि संसार मा येवाना मना हवूच उद्देश शे.” तव तो गालील जिल्हा ना गैरा नगर मा ग्या, तेस्ना प्रार्थना घरस्मा जाय जायसन शिक्षण देत, आणि दुष्ट आत्मास्ले काळत ऱ्हायना. एक दिन एक माणुस येशु जोळे उना, तो माणुस कोळी ना आजार कण पिळीत होता, ईसन तेनाशी विनंती करी, आणि तेना समोर गुळघा टेकीसन तेले सांग, “मले माहित शे, कि तुना कळे सामर्थ शे, कि तू मले बरा करू सकस, हे प्रभु जर तुनी ईच्छा शे, त तू मले बरा करू सकस.” (या आजार पासून) येशु नि तेनावर दया करीसन हात पुळे करा, आणि तेले हात लायिसन सांग, “मनी ईच्छा शे कि तुले बरा करू, बरा हो.” आणि लगेच तेना कोळ ना आजार चांगला हुईग्या, आणि तो बरा हुईग्या. तव येशु नि त्या माणुस ले जताळीसन सांग. “देख, कोले बी नको सांगजो, कि मनी तुले युध्द करेल शे. पण जायसन स्वता ले यहुदी पुजारीस्ना समोर दाखाळ, कि तू युध्द हुई जायेल शे. आणि परमेश्वर ना साठे जे काय मोशे नि येणा विषय मा लिखेल शे, भेट अर्पण कर, कारण कि तुले रिवाज ना नुसार युध्द ठरावामा येवो, तव सर्वा लोक मानी लेतीन कि तू युध्द हुई जायेल शे.” पण तो त्या जागा वरून चालना ग्या, आणि जाईसन गैरा लोकस्ले सांगाले लागणा, कि येशु नि तेले युध्द कर. आणि अठलगून पसाराले लागणा कि या कारण मुळे, येशु परत मोक्या नगर मा नई जायसकना. पण नगर ना बाहेर सुनसान जागा मा ऱ्हायना, जठे कोणताच लोक नई ऱ्हात होतात, तरी बी चारी बाजूतून लोक तेना कळे ईज ऱ्हायंतात. गैरा दिन ना नंतर येशु परत कफर्णहूम नगर मा आपला घर उना. आणि लोकस्ले आयकामा उना कि तो घर मा एयेल शे. नंतर इतला लोक एकत्र हुईनात, कि या मुळे पूर्ण घर भरी ग्या, आणि दरवाजा ना बाहेर बी आंगण भरी ग्या, आणि येशु तेस्ले परमेश्वर ना वचन ना प्रचार करत होता. आणि कईक लोक एक लखवा ना आजारी ले तेना जोळे लय उनात. जेले त्या चार माणसस कण उचलीसन येशु जोळे लय उनात. पण त्या गर्दी मुळे येशु जोळे नई पोहचू सकनात, त तेस्नी त्या छत ले जेना खाले येशु होता, उघाळी टाका, आणि जव तेले उघाळी टाकनात, त त्या खाट ले जेनावर लखवा वाला पळेल होता, खाले आराम कण उतारी दिनात. आणि येशु ले माहित हुयन, कि तेस्ना विश्वास देखीसन, येशु नि त्या लखवा ना आजारी ले सांग, “ओ पोऱ्या, तुना पाप माफ हुई ग्यात.” तव काही लोक, ज्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक घर मा बसेल होतात, जे काही येशु नि सांग, त्या आपला आपला मन मा विचार कराले लागनात. कि हवू असा कसा सांगू सकस? हवू त परमेश्वर नि निंदा करस, फक्त परमेश्वर कळे पापस्नी माफी कराना अधिकार शे. येशु नि लगेच जानी लीधा, कि त्या आपला आपला मन मा काय विचार करी ऱ्हायनात. येशु नि तेस्ले सांग, “तुमी आपला मन मा वाईट विचार काबर करतस? काय लखवा ना आजारी ले तुना पापस्नी माफी हुई जायेल शे, अस सांगण मले सोप शे? कि उठ आणि आपली खाट उचलीसन चाल फिर, अस सांगण मले सोप शे? पण जेनातून तुमी जानी लेवोत कि, मी माणुस ना पोऱ्या ले धरती वर पाप माफ कराना बी अधिकार शे,” म्हणून तेनी त्या लखवा वाला ले सांग. “उठ, आपली खाट उचलीसन आपला घर चालना जा.” लगेच तो उठना, आणि आपली खाट उचलीसन चालना ग्या, आणि सर्वा लोक तेले देखत ऱ्हायनात. येनावर सर्वा लोक चकित हुयनात, आणि परमेश्वर नि वाह-वाह करीसन सांगाले लागनात, कि “आमी अस कदीच नई देख.” एक सावा परत येशु निघीसन गालील ना समुद्र ना किनारा वर ग्या, आणि गैरा सावटा लोक तेना कळे ईसन एकत्र हुयनात, आणि तो तेस्ले परमेश्वर ना वचन ले शिकाळू लागणा. तेना नंतर, जव तो जात होता, तव तेनी लेवी नाव ना एक कर लेणारले देख, जेना दुसरा नाव मत्तय होता. जो हलपाई (बाप) ना पोऱ्या होता. तो आपला कर लेवाना जागा वर बसेल देखना, आणि तेले सांग, “मना मांगे ये,” आणि लेवी उठीसन, आपला काम ले सोळ, आणि येशु ना शिष्य बनी ग्या. नंतर येशु आणि तेना शिष्य लेवी ना घर मा रात ना जेवण करत होतात. आणि गैरा सावटा कर लेणारा लोक आणि दुसरा लोक जेस्ले पापी मनतस, तठे होतात. ज्या येशु ना मांगे चालत होतात, आणि त्या बी तेस्ना संगे जेवण करत होतात. आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या परूशी लोकस्ना समूह ना होतात, त्या देखनात, कि तो त पापी आणि कर लेणारस संगे जेवण करी ऱ्हायंता. तव तेस्नी येशु ना शिष्यस्ले सांगू लागनात, कि “तो त पापी आणि कर लेणारस संगे खास पेस.” येशु नि हय आयकीसन तेस्ले सांग, “ज्या लोक बरा शे, तेस्ना साठे डाक्टर नि गरज नई, पण आजारी लोकस्ले डाक्टर नि गरज शे, पण मी तेस्ले नई ज्या स्वता ले धर्मी मानतस, पण पापिस्ले बलावाले एयेल शे.” योहान ना शिष्य लोक, आणि परूशी लोक, बिगर जेवण ना उपवास करत होतात. एक दिन काही लोक येशु ना जोळे उनात, आणि विचारू लागणत, “योहान ना शिष्य लोक आणि परूशी लोक काब बिगर जेवण ना उपवास ठेवतस, पण तुना शिष्य लोक बिगर जेवण ना उपवास काब नई करतस?” येशु नि तेस्ले सांग, “जव मी आपला शिष्यस्ना संगे शे, त्या कसा बिगर जेवण ना उपवास ठेवी सकतस? त्या बिगर जेवण ना उपवास नई ठेवी सकतस, कारण कि त्या खुश शे, तसाच एक नवरदेव ना मित्र तेना संगे तेना लग्न नि खुशी बनावतस.” पण त्या दिन येतीन कि नवरदेव तेस्ना पासून आल्लग करामा ईन, त्या टाईम वर त्या बिगर जेवण ना उपवास करतीन. “कोणी आपला नवीन कपळा ना तुकळा ले जुना कपळा वर जोळत नई, नईत धुवा नंतर नवीन कपळा सुकळी जाईन, आणि जुना कपळा ले आजून फाळी दिन, तव जुना कपळा ना छिद्र गैरा मोठा हुई जाईन. जर मनी शिक्षा ले जुनी रिती-रिवाज ना संगे एक करामा ईन, त मनी शिक्षा या कपळा ना सारखी काम नई येवाव. नवीन द्राक्षरस ले कोणी जुनी चामळी शी बनेल थैली मा नई ठेवस, नईत द्राक्षरस थैली ले फाळी टाकीन, आणि द्राक्षरस आणि थैली दोनी नाश हुई जातीन, पण नवा द्राक्षरस नवीन थैली मा भराले पाहिजे.” एक आराम ना दिन, येशु आणि तेना शिष्य लोक वावरस मधून जाई ऱ्हायंतात, आणि तेना शिष्य लोक चालतांना उंब्या मधला दाणाले तोळाले लागनात, आणि खाऊ लागनात. तव काही परूशी लोकस्नी तेले सांग, “देख, तुना शिष्य लोक जे काम आराम ना दिन करी ऱ्हायनात, ते मोशे ना नियम ना विरुद्ध मा शे, तुले तेस्ले सांगाले पायजे, अस कराले नको पायजे.” येशु नि तेस्ले सांग, “काय तुमी कदी नई वाच? कि गैरा टाईम पयले जव आमना पूर्वज दाविद आणि तेना जोळीदार गैरा भुक्या हुयनात, तव तेनी काय करेल होत? तेनी काब, अबियातार महा यहुदी पुजारी ना टाईम वर परमेश्वर ना तंबू मा जायसन भेटणा भाकरी खादात, आणि आपला जोळीदारस्ले बी दिधा, जे मोशे ना नियम ना नुसार जेवण यहुदी पुजारीस्ले सोळीसन आखो कोले बी खावान योग्य नई?” आणि येशु नि तेस्ले सांग, “शब्बाथ ना दिन परमेश्वर नि माणसस साठे बनायेल शे, तेनी आराम ना दिन ले माणसस ना वरे भार बनावा साठे नई बनाव. येणा साठे मी माणुस ना पोऱ्या आराम ना दिन ना बी प्रभु शे.” आणि येशु परत प्रार्थना घर मा ग्या, आणि तठे एक माणुस होता, जेना हात सुकेल होता. आणि काही परूशी लोक येशु वर दोष लावा साठे, तेले ध्यान लाईसन देखत होतात, कि आराम ना दिन तो तेले बरा करस कि नई. येशु नि त्या सुकेल हात वाला माणुस ले सांग, “सर्वा लोकस्ना मधमा उभा ऱ्हाईजा, कारण कि त्या तुले देखी सकोत.” आणि तेनी सांग, मोशे ना नियम ना प्रमाणे “आराम ना दिन चांगल कार्य करान, आणि वाईट नई करान निश्चित रूप मा चांगल शे, आणि कोणा जीव ले वाचाळाना, आणि कोले नई मारान, हई बी निश्चित रूप मा चांगल शे,” पण त्या चूप ऱ्हायनात. जव येशु चारी बाजू तेस्ना कळे देखना, आणि तो रागे भरणा, तो गैरा दुखी होता कारण कि तेस्नी येशु संगे सहमती कराले नकार दिधा, आणि त्या सुकेल हात वाला माणुस ले सांग, “आपला हात पुळे कर.” तेनी पुळे करा, आणि तेना हात चांगला हुईग्या. तव परूशी लोक बाहेर जाईसन, लगेच हेरोद राजा ना दल ना काही लोकस्ना संगे, तेना विरोध मा योजना कराले लागनात, कि तेले मारी टाकुत. येशु लोकस पासून दूर, आपला शिष्यस संगे, गालील समुद्र कळे चालना ग्या. आणि गालील जिल्हा मधून एक मोठी गर्दी तेना मांगे चालू लागणी. आणि यरूशलेम शहर आणि यहूदा जिल्हा ना दुसरा नगरस मधून, आणि ईदुमि जिल्हा आणि यार्देन नदी ना पार, आणि सोर आणि सिदोन शहर ना आंगे पांगे तून लोकस्नी एक मोठी गर्दी एयेल होती. या सर्वा लोक येणा साठे उनात, कि तेस्नी सर्वा चमत्कार ना काम ज्या तेनी करेल होता. आणि जे काही तेनी करेल होत, आयकेल होतात. येशु नि आपला शिष्यस्ले सांग, “गर्दी मुळे एक धाकली नाव मनासाठे तयार ठेवजात, एनासाठे कि त्या मले दाबी नई देवोत.” त्या दिन तेनी गैरा लोकस्ले बरा करेल होता, येणा साठे जीतला लोक रोगी होतात, तेले स्पर्श करासाठे तेना आजू-बाजू गैरा ढकलत होतात. आणि जव बी दुष्ट आत्मा मा पिळीत लोक येशु ले देखत होतात, त आदरताशी तेना पुळे पळी जात होतात, आणि जोर सांगत होतात, कि तू परमेश्वर ना पोऱ्या शे. पण येशु नि दुष्ट आत्मास्ले जोरमा धमकाव, आणि सांगणा, “लोकस्ले नका सांगज्यात कि मी परमेश्वर ना पोऱ्या शे.” तेना नंतर, येशु जोळे ना पहाळ वर चळी ग्या. तेनी लोकस्ले तेना कळे बलाव, जेस्ले तेनी आपला शिष्य होवा साठे निवाळेल होता, आणि त्या गर्दी मधून येशु कळे ईपळनात. तव तेनी तेस्ना मधून बारा लोकस्ले निवाळ, आणि तेस्ले आपला प्रेषित सांगीसन आवाज दिधा. तेनी ईच्छा होती, कि त्या तेना संगे संगे राहोत, आणि तो तेस्ले धाळोत, कि त्या सुवार्ता सांगोत. आणि येशु नि शिष्यस्ले दुष्ट आत्मास्ले काळाना अधिकार दिना. त्या बरा प्रेषितस्ना नाव हई शेतस, जेस्ले येशु नि निवाळेल शे: शिमोन जेना नाव येशु नि पेत्र ठेवा. आणि जब्दी ना पोऱ्या याकोब, आणि याकोब ना भाऊ योहान, जेना नाव तेनी बेनेरेगेश म्हणजे “गर्जन ना सारखा माणुस” ठेवणा. अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, हलपाई ना पोऱ्या याकोब, तद्दय, शिमोन कनानी होता. आणि यहूदा इस्कर्योत, असा तेना नाव होत, जेनी येशु ले शत्रू ना हात मा धराई टाकेल होता. जव येशु आपला शिष्यस्ना संगे आपला घर मा उना, तव परत इतला सावटा लोक जमनात कि तेले भाकर खावाले बी टाईम भेटत नई होता. जव येशु ना परिवार वाला तेना काम ना बारामा आयकनात, तव त्या, येशु ले घर धरीसन लीजावा साठे ग्यात, कारण कि लोक सांगत होतात, कि तो शुद्धी वर नई शे. आणि ह्या लोक ज्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक शे, यरूशलेम शहर मधून एयेल होतात, आणि त्या सांगत होतात, कि “तेनामा सैतान शे, तो दुष्ट आत्मा ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.” एनासाठे येशु लोकस्ले जोळे बलायसन तेस्ना संगे दाखलास्मा सांगाले लागणा, निश्चित, सैतान आपली दुष्ट आत्मास्ले लोकस मधून बाहेर निघाले जबरजस्ती नई करान देखाव. जर एक राज्य ना लोक आपस मा भांडतस, त त्या नाश हुई जातीन. जर एक परिवार ना लोक एक दुसरा ना विरुद्ध मा वाटायेल शे, त तो परिवार एकत्र नई राहू सकाव. जर सैतान स्वतानाच दुष्ट आत्मा ना विरोध मा भांडण करीन, तो स्वतानाच नाश करीलीन, तेनी त समाप्ती हुई जास. कोणी बी सैतान ना सारखा ताखतवर मनुष्य ना घर मा जबरजस्ती घुसू नई सकाव, जठलोंग कि तो त्या ताखतवर मनुष्य ले हारावाले आणि बांधासाठे ताखतवर नई शे. तव तो तेना घर मधून सगळ काही चोरू सकस. “मी तुमले खरज सांगस, कि लोक परमेश्वर ना किंवा आखो कोणी दुसरा ना विरुद्ध मा सर्वा पाप आणि निंदा ज्या त्या करतस, परमेश्वर लोकस्ना पापस्ले माफ करी दिन. पण जो कोणी पवित्र आत्मा ना बारामा निंदा करीन, त तेस्ले परमेश्वर तेना साठे कदी बी माफ नई कराव, पण परमेश्वर त्या व्यक्ती ले त्या पाप ना साठे कायम ना गुन्हागार ठराईन.” कारण कि त्या हय सांगत होतात, कि तो एक दुष्ट आत्मा कण पछाळेल शे. तव येशु नि माय आणि तेना लहान भाऊ उनात, आणि बाहेर उभा ऱ्हायसन, तेले बलावा साठे कोले तरी धाळ. आणि गर्दी तेना आंगे पांगे बसेल होती, आणि तेस्नी येशु ले सांग, “देख तुनी माय आणि तुना भाऊ बाहेर शे, त्या तुले झामली ऱ्हायनात.” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, कि “मनी माय आणि मना भाऊ कोण शेतस?” आणि लोकस वर ज्या तेना आंगे पांगे बसेल होतात नजर टाकीसन सांग, “देखा, मनी माय आणि मना भाऊ ह्या शेतस. कारण कि त्या हई करतस, जी परमेश्वर नि ईच्छा शे, त्याच मना धाकला भाऊ आणि बहिणी आणि माय शेतस.” कईक दिन नंतर, येशु परत गालील ना समुद्र किनारा वर प्रचार कराले सुरुवात करना, आणि अशी मोठी गर्दी तेना जोळे एकत्र हुईगी, कि तो समुद्र मा एक नाव वर चळीसन बठी ग्या, आणि सगळी गर्दी समुद्र ना किनारा वर उभी ऱ्हायनी. आणि तो तेस्ले दाखलास्मा कईक गोष्टी शिकाळाले लागणा, आणि आपला उपदेश मा तेस्ले सांग. “आयका, देखा एक माणुस आपला वावर मा काही बीज पेरासाठे निघना. आणि पेरतांना काही बीज रस्ता ना किनारा वर पळणा, आणि पक्षी ईसन तेले खाई ग्यात. आणि काही बीज, दगडसवाली जमीन वर पळणा, जठे तेले जास्त माती नई भेटणी. आणि ते बीज जल्दी उगी उना, कारण कि माती खोल नई होती. आणि जव सूर्य वरे उना, त त्या रोप सुखी ग्यात, आणि बई ग्यात, कारण कि तेस्ना मुय खोल नई होतात. आणि काही बीज, काटावाला झाळीस्मा पळणा, आणि झाळ वाळीसन तेले दाबी लीधात, आणि तो पिक नई लयना. पण काही बीज चांगली जमीन वर पळणा, आणि ते बीज उगणा, आणि वाळीसन तो गैरा पिक लयना, आणि कोणी तीस पट, कोणी साठ पट, आणि कोणी शंभर पट पिक लयना.” आणि तेनी सांग, “ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या येले समजाना प्रयत्न करा.” जव येशु एखटा रायग्या, तव बारा शिष्य आणि दुसरा त्या लोक ज्या तठे एकत्र हुयेल होतात, तेनाशी ह्या दाखलास ना अर्थ विचार. तेनी तेस्ले सांग, तुमले त परमेश्वर ना राज्यांनी समज खरेपणा मा दियेल शे, पण त्या ज्या मनावर विश्वास नई करतस, तेस्ना साठे सगळ्या गोष्टी दाखलास्मा सांगामा येस. जस कि परमेश्वर नि पुस्तक न ते वचन पूर होवो, जे सांगेल शे, “कि त्या देखतांना देखोत, आणि तेस्ले समज मा नई येवो, आणि आयकतांना आयकोत बी, आणि नई समजोत, असा नई होवो, कि त्या परत फिरोत, आणि माफ कराय जावोत.” तव येशु नि तेस्ले सांग, “जर तुमी हवू दाखला ले नई समजस, त तुमी दुसरा दाखलास्ले बी नई समजावत.” ह्या दाखला ना अर्थ हई शे, बीज पेरणार तेना सारखा शे, जसा कोणी परमेश्वर ना वचन प्रचार करस. काही लोक त्या रस्ता मा पळेल बीज ना सारखा शेतस, त्या हई वचन त आयकतस, पण सैतान लगेच ईसन वचन ले जो तेस्ना मा पेरायेल होत, काळी लीजास. आणि काही लोक, ज्या दघळस वाली जमीन सारखा शेतस, जेनावर बीज पळस, ह्या त्या शेतस, कि ज्या वचन ले आयकीसन लगेच खुशी मा मानी लेतस. पण वचन तेस्ना मधमा खोल मुया नई धरेल होतात, म्हणून त्या थोळाच दिन साठे ऱ्हातस, येणा नंतर, जव वचन मुळे तेस्ना वर संकट नईत छळ होस, त त्या लगेच ठोकर खातस. आणि काही लोक त्या बीज सारखा शेतस, ज्या काटेरी झाळीस्मा पळणा, त्या ह्या शेतस, जेस्नी परमेश्वर ना वचन आयका. पण या जीवन ना विषय मा चिंता, आणि संपत्ती ना साठे प्रेम आणि दुसरी वस्तू ना लोभ तेस्ना जीवन मा ईजास, आणि परमेश्वर ना वचन मा अर्थळा टाकस, आणि त्या बिगर फय ना जीवन जीतस. आणि ज्या चांगली जमीन मा पेरायेल होतात, त्या ह्या शेतस, ज्या परमेश्वर ना वचन ले आयकीसन मानी लेतस, तेस्ना जीवन मा काही चांगला परिणाम येतस, जसा कि कोणी तीस पट, कोणी साठ पट, आणि कोणी शंभर पट पिक लयतस. येशु नि तेस्ले सांग, “कोणी बी एक दिवाले पेटाळीसन तेले एक कटोरा ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवामा एस, कारण कि तेना उजाया ले सर्वाझन देखी सकोत.” या मुळे, जे काही दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्त्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन. “ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस, जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा.” तव तेनी तेस्ले सांग, “सावध राहा कि काय आयकतस, जीतला प्रयत्न तुमी मनी शिक्षास्ले आयकाले करतस, तेनाच नुसार परमेश्वर तुमले बुद्धी दिन. कारण कि जेले समजा नि ईच्छा शे (जे मी शिकाळी ऱ्हायनु), परमेश्वर तेले आखो जास्त समज दिन. पण जो कोणी हय समजा नि ईच्छा नई ठेवत, कि मी काय सिकस, आठ लगून कि जी समज तेनापा शे, परमेश्वर तिले तेना पासून लीलीन.” नंतर येशु नि सांग; आठे एक आखो दाखला शे, कि “परमेश्वर ना राज्य कसा शे. एक शेतकरी एक वावर मा बीज पेरस. आणि रात दर रात तो माणुस जपत ऱ्हास, आणि दिन बे दिन तो काम करस, आणि बीज मधून कोंब फुटत ऱ्हास, आणि वाळत ऱ्हास, पण तेले नई माहित कि अस कस होस. भूमी आपला आप पिक लयस, पहिले अंकुर, मंग कणीस, आणि नंतर कणीस मा तयार दाना. आणि शेवट मा जव पिक पूर्णपणे तयार हुई जास, तव शेतकरी लगेच मजुरस्ले कापाले धाळस, कारण कि या पिक ना कापाना टाईम ईजायेल शे.” तव येशु नि सांग, “आमी परमेश्वर ना राज्य नि तुलना कसा कण करूत? आठे एक दाखला शे जेना वापर आमी एना वर्णन करासाठे करू सकतस.” परमेश्वर ना राज्य पृथ्वी ना सर्वा बिजस मधून सर्वास तून धाकला बीज सारखा शे, कि जव जमीन मा पेराय जास, त जमीन मा सर्वास तून धाकला राहस. पण जव पेराय जास आणि उगीसन सर्वा झाळस्मा मोठा हुई जास, आणि तेना मोठ्या फांद्या निघतस, कि आकाश ना पक्षी तेनी सावली मा तेस्ना खोपा बनावू सकतस. आणि तो तेस्ले ह्या प्रकार ना गैरा दाखला दि दिसन तेस्नी समजना सारखा वचन आयकाळत होता. तो गर्दी ले फक्त दाखला द्वाराच शिक्षा देत होता, पण एकांत मा तो आपला शिष्यस्ले सर्वा गोष्टीस्ना अर्थ सांगत होता. त्याच दिन जव संजाकाय हुयनी, येशु नि तेस्ले सांग, चला आमी गालील ना समुद्र ना त्या पार जावूत. म्हणून शिष्य गर्दी ले सोळीसन नाव मा चालना ग्यात, जेनामा येशु बठेल होता, आणि तेस्ना मांगे आखो नाव होतात. जव त्या समुद्र ले पार करत होतात, एक जोरदार वारा वांधी चालू हुईनी, आणि लाठा नाव ले ठोकावू लागणत, आणि नाव पाणी कण भरी चालनी होती, आणि ती डुबनार होती. आणि येशु नाव ना मांगला बाजुले उशी वर डोक ठीसन जपी ऱ्हायंतात, तव तेस्नी तेले जागाळीसन सांग, गुरुजी आमी सर्वा डुबनार शे, आणि तुले कसाणी चिंताच नई. तव येशु उठीसन वारा वांधी ले धमकाव, आणि लाठास्ले सांग, शांत राहय थामिजा, आणि वारा वांधी थामी गई, आणि समुद्र बिलकुल शांत हुईग्या. तव येशु नि शिष्यस्ले विचार, तुमी काब घाबरतस? काय तुमले आते बी विश्वास नई शे? आणि त्या गैरा भ्याय ग्यात, आणि आपस मा बोलनात, हवू कसा माणुस शे? आठ लोंग, कि हवा आणि लाठा बी एनी आदन्या मानतस. येशु आणि तेना शिष्य समुद्र ना पार गरसेकर प्रांत, आणि तेना आंगे-पांगे ना प्रांत मा पोहचनात. आणि जव येशु नाव वरून उतरणात, लगेच एक माणुस जो दुष्ट आत्मा कण ग्रसित होता, मसानखाई मधून निघीसन तेले भेटणा. तो मसानखाई मा राहत होता. लोक तेले बांधीसन बी नई ठेवू सकत होतात, आठ लोंग कि लोखंड ना मजबूत साकय कण बी नई. कारण कि तो घळी-घळी बेळ्या आणि साकयास कण बांधायेल होता, पण तेनी साकयास्ले तोळी टाका, आणि बेळ्यास्ना तुकळा तुकळा करी टाकेल होता, आणि कोणी तेले काबू मा नई करू सकत होता. तो दिन आणि रात कायम मसानखाई आणि पहाड मा कोकावत होता, आणि स्वता ले दघळस कण जखमी करत होता. तो येशु ले दूर तून देखीसन पयत उना, आणि तेले आदर देवाले आदरताशी तेना पुळे पळी जास. आणि तो माणुस जोरमा वरळना, येशु सर्वशक्तिमान परमेश्वर ना पोऱ्या, आपल एक दुसरा शी काय काम शे? परमेश्वर ना समोर एक शेप्पत ले कि तू मले दुख नई देवाव. तेनी अस सांग, कारण कि येशु नि तेले पयलेच आदन्या दि दियेल होता, “दुष्ट आत्मा ह्या माणुस मधून निघी जा.” येशु नि तेले विचार, “तुना नाव काय शे?” तेनी येशु ले सांग, “मना नाव सैन्य शे कारण कि आमी गैरा (ह्या माणुस ना मधमा) शेतस.” आणि तेनी येशु ले गैरी विनंती करी, आमले ह्या क्षेत्र मधून बाहेर नको धाळू. तेस्ना तून हाकी दूर गैराच डुक्करस्ना गवारा चरत होता. आणि दुष्ट आत्मास्नी येशु ले विनंती करीसन सांग, “कि आमले त्या डुक्करस्मा धाळी दे कि आमी तेस्ना मा जावूत.” त येशु नि गैरा दुष्ट आत्मास्ले आदन्या दिधी, आणि त्या माणुस मधून निघीसन डुक्करस्मा घुशी ग्यात, आणि गवारा जो काई दोन हजार ना होता, किनारा ना उतार नि जागा वरून पयत तलाव मा पळी गया, आणि डुबी ग्यात. आणि तेस्ना चारणारास्नि, पईसन नगर मा आणि गावस्मा हई खबर आयकाळ, कि काय हुएल होत. आणि जे हुयेल होत, लोक तेले देखाले उनात. आणि येशु जोळे ईसन, त्या तेले जेनामा गैरा सावटा दुष्ट आत्मा घुसेल होतात, कपळा घालेल, आणि शुद्धी मा देखीसन भ्याय ग्यात. आणि देखणारस्नि तेना जेनामा दुष्ट आत्मा होती, आणि डुक्करस्ना पुरा हाल लोकस्ले सांगी टाक. आणि ज्या लोक तेले देखाले एयेल होतात, तेनाशी विनंती करीसन सांगाले लागनात, कि आमना प्रांत मधून चालना जा. जव येशु नाव वर जावा साठे चळाले लागणा, तव तो जेनामा दुष्ट आत्मा होती, तेनाशी विनंती कराले लागणा, कि मले बी तुमना संगे येवू दे. पण येशु तेले तेस्ना संगे नई येवू दिधा, पण तेना बदला मा तो हय सांगणा, “आपला घर जायीसन आपला लोकस्ले ह्या गोष्टी सांग, कि तुनावर दया करीसन प्रभु नि तुना साठे कसा मोठा काम करेल शे.” त तो माणुस आपला घर कळे जायीसन. तव तो बठ्ठा दकापलीस (व तो दहा शहरस ना जिल्हा जोळे ना क्षेत्र मा गया, जेले दकापलीस सांगामा येस) मा ह्या गोष्टी नि सुवार्ता सांगाले लागणा, कि येशु नि मनासाठे कसा मोठा काम करा, आणि तेले आयकनारा सर्वा लोक आशर्य करत होतात. एक सावा परत येशु नाव कण गालील ना समुद्र ना त्या पार ग्या, त एक मोठी गर्दी तेना जोळे एकत्र हुईगी, जव तो समुद्र ना किनारा वर उभा होता. आणि याईर नाव ना प्रार्थना घर ना अधिकारीस मधून एक उना, आणि तेले देखीसन आदरताशी तेना पाय वर पळणा. आणि तेनी हय सांगीसन गैरी विनंती करी, “कि मनी धाकली पोर मरा वर शे, तू मना घर ये, कि ती बरी हुई जावो, आणि जीत्ती ऱ्हावो एनासाठे तू तीनावर हात ठेव. कारण कि ती मरा पासून वाची जावो.” तव येशु तेना संगे ग्या, आणि मोठी गर्दी तेना मांगे चालू लागणी, आठ लगून कि लोक तेना आजू-बाजू गैरा ढकलत होतात. गर्दी मा एक बाई होती, जिले बारा वरीस पासून रक्तस्राव ना आजार होता. आणि तिनी गैरा डाक्टर ना हातून, गैरा दुख सोसिसन तीनापा जे काही होत, ते सगळ खर्ची टाकेल होती, तरी ती बरी नई हुयनी, पण तिनी तबेत आजून जास्त खराब हुईगी. ती बाई नि येशु लोकस्ले बरा करस ह्या विषय मा आयकनी, आणि तिनी विचार कर, “जर मी तेना कपळा ले स्पर्श करी लेसू, त मी चांगली हुई जासू.” एनासाठे, ती गर्दी मधून तेना मांगे उणी, आणि तेना लांबझगा ले हात लावनी. आणि लगेच तीना रक्तस्राव बंद हुई गया, आणि तिनी आपला शरीर मा अनुभव करा, कि ती त्या आजार तून बरी हुईगी. येशु गर्दी मा मांगे फिरणा, आणि विचारना, “मना झगा ले कोण हात लावना?” तेनी अस एनासाठे कर कारण कि तेले माहित पडी जायेल होत, कि मना मधून बरा करानी सामर्थ्य निघेल शे. तेना शिष्यस्नी तेले सांग, “तू देखीराय्ना कि गर्दी तुले गैरी ढकली ऱ्हायनी, आणि तू विचारस, कि कोणी मले हात लावा?” तव येशु त्या व्यक्ती ले झामला साठे अथा-तथा देखत ऱ्हायना, जेनी तेले स्पर्श करेल होत. ती बाई हय समजी गई, कि बरी हुई जायेल शे, एनासाठे ती ईसन येशु ना पायस्मा प्रणाम करनी. तिनी तेले सांग, कि तिनी तेले स्पर्श करेल होत, तिनी विचार कर कि तो तीनावर रागे भरीन एनासाठे ती गैरी भ्याई जायेल होती, आणि थरथर करी ऱ्हायंती. येशु नि तिले सांग, “पोरी तू बरी हुईगी, कारण कि तू विश्वास करनी, कि मी तुले बर करू सकस, शांती कण जा, आणि तुना पिळा पासून पूर्णपणे मुक्त हुई जायेल शे.” जव येशु हय सांगीच ऱ्हायंता, कि प्रार्थना घर ना अधिकारी, याईर ना घर मधून कईक लोक ईसन याईर ले सांगणात, कि “आते गुरुजी ले काब त्रास देस, तुनी पोर त मरी गई.” ज्या गोष्टी त्या सांगी ऱ्हायंतात, तेस्ले येशु नि ध्यान नई देता प्रार्थना घर ना अधिकारी, याईर ले सांगणा, “भ्यावू नको, तेना बदला मा फक्त विश्वास ठेव.” येशु नि फक्त पेत्र, याकोब, आणि याकोब ना भाऊ योहान आणि याईर ले आपला संगे येवानी परवानगी दिधी, तेनी गर्दी मधून कोले बी आपला बरोबर येवू दिना नई. आणि प्रार्थना घर ना अधिकारी ना घर मा भिळीसन, येशु नि लोकस्ले गैरा रळतांना आणि कोकायतांना देख. तव येशु मधमा जायीसन तेस्ले सांगणा, “तुमले या प्रकारे गळबळ करानी आणि रळानी कायी गरज नई शे, पोर मरणी नई, पण जपी ऱ्हायनी.” हई आयकीसन, गर्दी येशु वर हासू लागणी, एनासाठे तेनी त्या सर्वास्ले भायेर काळी दिधा, पोर ना माई-बाप आणि तेना तीन शिष्यस्ले लिसन मधमा जठे पोर जपेल होती ग्या. तव येशु नि लहान पोर ना हात धरा. तेनी तिले सांग “तलीथा कूम,” जेना अर्थ हय शे, कि “धाकली पोर मी तुले उभी ऱ्हावा साठे सांगस.” आणि पोर लगेच ईकळे-तिकळे चाला फिराले लागी गयी, ती बारा वरीस नि होती. आणि लोकस्नी हई देखताच, गैरा आश्चर्य चकित हुई ग्यात. नंतर येशु नि माय-बाप ले जताळीसन सांग, कि त्या, “हय गोष्ट नका पसारज्यात, कि तेनी पोर ले मरेल मधून जीत्ती करेल होता, तव तेनी तीना माय-बाप ले सांग, कि तिले काही तरी खावाले द्या.” तव येशु कफर्णहूम शहर मधून चालना ग्या, आणि आपला नासरेथ नगर मा ग्या. आणि तेना शिष्य तेना संगे ग्यात. पुळला आराम ना दिन तो प्रार्थना घर मा परमेश्वर ना वचन शिकाळू लागणा, आणि गैरा लोक आयकीसन आश्चर्य चकित हुईनात, आणि सांगाले लागनात, “हवू माणुस ह्या गोष्टी कोठून सिकना?” येले हई सर्व ज्ञान आणि या प्रकार ना सामर्थ्य ना काम करानी शक्ती कोठून भेटणी? हवू फक्त एक सुतार शे, मरिया ना पोऱ्या आणि याकोब, योसेस, यहूदा आणि शिमोन ना भाऊ शे. आणि तेना बहिणी बी आठेच आमना संगे शे, आणि त्या तेले स्वीकार नई करणात. येशु नि तेस्ले सांग, “एक भविष्यवक्ता जसा मी शे, जठे बी जास तेना सन्मान करामा येस, पण तेना गाव मा, तेना घर मा, आणि तेना आपला नातेवाईकस ना मधमाच तेना सन्मान नई होस.” आणि तेस्ना अविश्वास मुळे, तो तेस्ना वर हात ठीसन, काही आजारी लोकस्ले बरा कराना, या शिवाय आजून जास्त मोठा सामर्थ्य ना काम नई करू सकना. आणि येशु तेस्ना अविश्वास वर आश्चर्य करना, येणा नंतर, येशु एक गाव मधून दुसरा गाव मा लोकस्ले परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता शिकाळत फिरणा. तव येशु नि बारा शिष्यस्ले आपला जोळे बलाव, आणि तेस्ले दुष्ट आत्मास्ले काळाना अधिकार दिधा. तव येशु नि तेस्ले दोन-दोन झन ले सूचना दिसन, आलग-आलग गाव मा धाळाले लागणा. आणि येशु नि तेस्ले सांग, कि “आपला प्रवास ना साठे फक्त एक धरीसन चालानी काठी ली ल्या. पण आपला खावा साठे काही नका ल्या, नईत, कोणता झोयना, आणि नईत, बटवा मा पैसा ल्या. जोळा घालील्या पण जास्त कपळा लेवू नका.” आणि येशु नि तेस्ले सांग, “जर कोणी तुमले आपला घर मा राहा साठे निमंत्रित करीन, त जठलोंग तुमी त्या नगर मा राहशान, तठलोंग तेना पाहुनचारी बनी राहज्यात.” ज्या ठिकाण ना लोक तुमना स्वीकार नईत करावत, आणि तुमनी नई आयकावत, तठून जातांना आपला तयपायस्नि धुई तठेच झाळी टाका, हई त्या नगर ना लोकस्ले दाखाळीन, कि परमेश्वर तेस्ना न्याय करीन. तव शिष्यस्नी जाईसन प्रचार कर, “कि पापस पासून मन फिरावा, आणि परमेश्वर कळे फिरा.” आणि गैरा दुष्ट आत्मास्ले काळा, आणि गैरा आजारीस वर जैतून ना तेल लाव, आणि तेस्ले बरा करा. तव हेरोद राजा नि त्या कामस्ना बारामा आईक, ज्या येशु करत होता, कारण कि गैरा सावटा लोक येशु ना बारामा जानत होतात, आणि तेना विषय मा चर्चा करत होतात. म्हणून तेना नाव पसरी जायेल होता, आणि कईक लोक सांगत होतात, हवू योहान बाप्तिस्मा देणारा होवाले पायजे, तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे, हवूच कारण शे, कि तेना कळे या सामर्थ्य ना कामस्ले करासाठे परमेश्वर नि शक्ती शे. आणि दुसरास्नी सांग, “हवू एलीया भविष्यवक्ता शे,” पण दुसरास्नी सांग, “तो एक भविष्यवक्ता शे, त्या भविष्यवक्तास्ना सारखा ज्या गैरा टाईम पयले ऱ्हात होतात.” हेरोद नि हय आयकीसन सांग, हवू योहान बाप्तिस्मा देणारा शे, मी स्वता तेना डोक कापाले लायेल होता, पण तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे! हेरोद राजा नि काही दिन पयले, आपला भाऊ फिलिप्प नि बायको हेरोदियास संगे लग्न करी लीयेल होता. पण योहान नि तेले सांग, “हई बर नई शे, (मोशे ना नियम ना नुसार) कि तुले आपला भाऊ नि बायको ले ली लेवोत,” (जव कि तो आते जित्ता शे) एनासाठे, हेरोदियास ले खुश करासाठे, हेरोद राजा नि योहान ले बंदी कराले लावना, आणि तेले बंदीगृह मा टाकी दिधा. येनासाठे हेरोदियास तेनाशी व्देशभाव ठेवत होती, आणि हय देखत होती, कि तेले माराइ टाकू, पण असा नई हुईसकना. कारण कि हेरोद राजा योहान ले धर्मी आणि पवित्र माणुस समजीसन तेले भ्यात होता, आणि तेले बंदीगृह मा सुरक्षित ठेवणा, प्रत्येक टाईम ले जव हेरोद राजा योहान ले बोलतांना आयकस, तो गैरा घाबरी जास, पण तरी बी, ते तेले आयकाले आवळत होत. काही दिन नंतर, हेरोद राजा नि आपला जन्म दिन बनावना. तेनी आपला उच्च अधिकारीस्ले, सेना ना सर्वा मा महत्वपूर्ण अगुवास्ले, गालील जिल्हा ना अगुवास्ले उत्सव मा शामिल होवा साठे आमंत्रित करना. जव उत्सव चालू होता, हेरोदियास ले योहान ले मारावानि संधी भेटणी. आणि तीच हेरोदियास नि पोर मधमा उणी, आणि नाचीसन हेरोद राजा ले आणि तेना पावनास्ले खुश करनी, तव राजा नि पोर ले सांग, “तुले जे पाहिजे ते मांग मी तुले दिसू.” राजा हेरोद नि वचन दिधा, आणि पोर ले सांग, “मी आपला आधा राज्य लगून जे काही तू मना पासून मंगाशी मी तुले दिसू.” ती बाहेर जाईसन, आपली माय ले विचार नि, कि “मी काय मांगू?” तिनी माय सांगणी, राजा ले सांग, कि तो तुले योहान बाप्तिस्मा देणार ना डोक दे. ती लगेच राजा जोळे मधमा उणी, आणि तेनाशी विनंती करीनि, कि तू मले योहान बाप्तिस्मा देणार ना डोक कापी दे, आणि एक ताट मा दि दे. तव राजा गैरा उदास हुईग्या, तो आपली शेप्पत आणि पावनास मुळे ती पोर नि विनंती ले अस्वीकार नई करू सकत होता. आणि राजा नि लगेच एक शिपाहिले आदन्या दिसन बंदीगृह मा धाळा, कि योहान ना डोक कापी टाको, आणि तेना जोळे लिसन येवो. तेनी बंदीगृह मा जायीसन तेना डोक काप, आणि एक ताट मा ठीयीसन लयना, आणि पोर ले दिधा, आणि पोर नि आपली माय ले दिधा. जव योहान ना शिष्यस्ले माहित पळण, कि तेले मारी देयेल शे, आणि तेना धळ ले उचलीसन कबर मा ठेवा. जव त्या बारा प्रेषित जेस्ले येशु नि धाळेल होता, परत उनात, आणि ईसन, तेना चारीकळे एकत्र हुई ग्यात, आणि सांगणात, “जे काही तेस्नी कर आणि शिकाळेल होत, सगळ तेले सांगी टाक.” गैरा सावटा लोक येत-जात होतात, आणि या मुळे येशु आणि तेना शिष्यस्ले खावाले बी टाईम नई भेटत होता. तव येशु नि तेस्ले सांग, “या एक असा सुनसान जागा वर जावूत जठे आमी एखटा राही सकोत, आणि काही टाईम आराम करी सकुत.” एनासाठे त्या नाव वर चळीसन सुनसान जागा वर आलग चालना ग्यात. पण गैरा लोकस्नी तेस्ले जातांना देख, आणि समजी ग्यात, कि त्या कथा जाई ऱ्हायनात. एनासाठे लोक जवळपास ना सर्वा नगरस मधून त्या जागा कळे पयनात, येशु आणि तेना शिष्यस्ले पोहचाना पयले तठे पोहची ग्यात. जव येशु नाव मधून उतरणा, तेनी मोठी गर्दी देखी. आणि तेस्ना वर दया उणी, कारण कि तेस्ना कळे कोणी नई होता, जो चांगला प्रकारे तेस्नी नेतृत्व करू सकस, आणि तेस्नी देखभाल करू सकस, ठीक तसाच, जसा बिगर मेंडपाळ ना मेंढ्या. तो तेस्ले परमेश्वर ना राज्य ना बारामा गैरा सावटा गोष्टी शिकाळाले लागणा. जव संज्याकाय हुयनी, तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगाले लागनात, “हय सुनसान जागा शे, आणि संज्याकाय हुई जायेल शे. तेस्ले धाळी दे, कि त्या चारीस कल्ला गावस्मा आणि वस्तीस्मा जाईसन, आपला साठे काही खावाले विकत लेवोत.” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, कि तुमीच तेस्ले खावाले द्या, तेस्नी तेले सांग, “इतला भाकरी ईकत लेवा साठे एक माणुस नि दोन शे दिन नि मजुरी लागीन, काय आमी जाईसन इतला पैसा भाकरीस साठे खर्च करूत, आणि तेस्ले खावाले देवूत?” येशु नि तेस्ले सांग, “जायीसन देखा तुमनापा कितल्या भाकरी शेतस?” तेस्नी मालूम करीसन सांग, “पाच भाकरी आणि दोन मासा.” तव येशु नि शिष्यस्ले आदन्या दिधी, कि सर्वा लोकस्ले हिरवा गवत वर पंक्तीपंक्ती कण बसाळी द्या. त्या शंभर-शंभर आणि पन्नास-पन्नास करीसन पंक्तीपंक्ती मा बठी ग्यात. येशु नि त्या पाच भाकरी आणि दोन मासास्ले लीधा, आणि स्वर्ग कळे देखीसन परमेश्वर ना धन्यवाद करना, आणि भाकरी मोळना, आणि शिष्यस्ले देत ग्या, कि त्या लोकस्ले वाळोत, आणि तेस्नी दोन मासास्ले बी लोकस्ले वाटी टाकात. आणि सर्वा खायीसन तृप्त हुई ग्यात. येणा नंतर, तेस्नी वाचेल भाकरीस ना तुकळा, आणि मासास्ना बारा टोपल्या भरी लीनात. जेवण करणारा पाच हजार माणसस्ना व्यतिरिक्त, तठे बाया आणि पोर बी होतात, जेस्नी बी खाद. तव येशु नि लगेच आपला शिष्यस्ले सांग, “कि त्या आपला नाव वर चळी जावोत, आणि तेना पयले समुद्र ना त्या पार बेथसैदा नगर कळे चालना जावोत, जठ लगून कि तो मांगे थामीसन गर्दी ना लोकस्ले वाट लावस.” आणि लोकस्ले धाळा नंतर, तो पहाळ वर प्रार्थना कराले ग्या. आणि जव संज्याकाय ना नंतर, शिष्य नाव मा होतात, आणि नाव गालील ना समुद्र किनारा पासून गैरी दूर होती, आणि येशु एखटा जमीन वर होता. आणि जव तेनी देख, कि त्या कष्ट करत वाल्ही मारत होतात, कारण कि वारा तेस्ना समोरून येत होता, नंतर सकाय होवाना काही टाईम पयले, येशु समुद्र वर चालत तेस्ना कळे उना, आणि तेस्ना तून पुळे निघी जावाना करत होता. पण जव तेस्नी येशु ले समुद्र वर चालतांना देख, त त्या ओरडाले लागनात, कारण कि त्या समजनात, कि तो एक भूत शे. आणि त्या हई देखीसन घाबरी ग्यात, पण येशु लगेच तेस्ना संगे बोलाले लागणा, आणि सांग, “धाळस बांधा: मी येशु शे, भिऊ नका.” तव तो तेस्ना संगे नाव वर चळी गया, आणि वारा येवाना थामी ग्या, आणि त्या गैरा आश्चर्य कराले लागनात. पण तेस्नी देखेल होतात, कि पयला दिन तेनी भाकर ना संगे काय करेल होत, पण त्या आते बी स्पष्ट रूप मा समजेल नई होतात, कि येशु खरोखर कोण होता. तेस्ना मन आते बी विश्वास कराले बिचकी ऱ्हायंता. नंतर येशु आणि तेना शिष्य एक नाव मा गालील ना समुद्र मा आजून पुढे ग्यात, त त्या गनेसरत ना किनारा वर पोहचनात. तव तेस्नी नाव तठे बांधी दिधी. आणि जव त्या नाव वरून उतरणात, त लोक लगेच तेले वयखी लीधा. लोक पुरा जिल्हा मा लवकर ग्यात, आणि आजारीस्ले खाट वर टाकीसन, आणि त्या तेस्ले उचलीसन त्या जागा वरली ग्यात. जठे तेस्नी लोकस्ले बोलतांना आयक, कि येशु तठे जायेल होता. जव बी तो गावस, शहरस, व वावरस्मा जास, लोक आजारीस्ले बजारस्मा ठियसन तेनाशी विनंती करत होतात. कि तो तेस्ले आपला वस्त्र ना गोंड्याले फक्त हात लाऊ दे, आणि जीतला तेले हात लावत होतात, सर्वा बरा हुई जात होतात. एक दिन काही परूशी लोक, आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक, ज्या यरूशलेम शहर मधून एयेल होतात, येशु जोळे एकत्र हुईनात. तेस्नी देख, कि येशु ना कईक शिष्य बिगर हात धुवाना जेवण करतस. कारण कि, परूशी लोक आणि सर्वा यहुदी लोक जेवण कराना पयले, नेहमी आपला आजोबास्ना रीतीरिवाज ना नुसार आपला हात धुतस. जव त्या बजार मधून घर येतस, तव त्या तठ लगून नई खातस, जठ लगून कि त्या स्वता ले रिवाज ना नुसार धुईसन युध्द नई करीलेतस. तेस्ना आजोबास्ना आजून बी कईक रिवाज शेतस, जेस्ले त्या मानतस, जस कि प्याला ले धुवान, घागरी, पितयना भांडा, तेस्ले घासान. एनासाठे त्या परूशी लोक, जो यहुदी ना मधमा धार्मिक नेतास्ना समूह मधून एक होता. आणि लोकस्नी ज्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक होता, तेले विचार, कि “तुना शिष्य आमना रीतीरिवाज नुसार काब नई करतस? त्या बिगर हात धुवाना जेवण काब करतस?” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, कि “यशया नि परमेश्वर ना पुस्तक मा जी भविष्यवाणी करी, ती तुमना सारखा कपटीस्ना बारामा खरी शे. तुमी लोक मना बारामा गैरा चांगला बोलतस, पण तुमी खरोखर मना शी प्रेम नई करतस. एस्ना व्दारे मनी उपासना करतस, ती व्यर्थ शे, कारण कि ह्या लोकस्ले माणसस्ना द्वारे बनायेल आदन्यास्ना पालन कराले शिकाळतस. (जशी कि ती मनी आदन्या शे) कारण कि तुह्मी परमेश्वर ना आदन्या ना पालन करान सोळी दियेल शे, आणि आजोबास्ना रीतीरिवाज ले पालन करतस.” आणि तेनी तेस्ले सांग, “तुमी परमेश्वर ना नियमले अस्वीकार करी देतस, कारण कि तुमी कामस्ले आपली रीतीरिवाज वर करी साकोत.” मोशे नि सांगेल शे, कि आपला बाप आणि आपली माय ना आदर कर, आणि “कोणी आपला बाप व माय ले वाईट सांगस, तो निश्चित मारी टाकाय जाईन.” पण तुमी सांगतस, कि कोणी आपला बाप व माय ले सांगस, “मी तुमनी मदत नई करू सकत, कारण कि जे मी तुमले देतु, ते मनी परमेश्वर ले देवानी शेप्पत खायेल शे. एनासाठे हई भेट फक्त परमेश्वर साठे शे.” आणि मंग तव पासून, तुमी त्या माणुस ले तेनी माय व बाप नि मदत करानी परवानगी नई देतस. या प्रकारे, तुमी परमेश्वर नि आदन्यास्ले पालन नई करतस, जी तेनी तुमले दियेल शे, पण त्या रीतीरिवाज ना पालन करतस, ज्या तुमना आजोबास्ना द्वारे सोपेल शे. आणि तुमी ह्या प्रकार ना वाईट काम करतस. परत येशु लोकस्ले आपला जोळे बलाईसन तेस्ले सांग, “ध्यान द्या आणि समजाना प्रयत्न करा कि मी काय सांगस. अस काय बी नई शे, जे बाहेरून कोणता माणुस ना मधमा जास, जे तेले रिवाज ना नुसार अशुद्ध बनाई सकस. पण, ते जे त्या माणुस मधून बाहेर येस, तेच तेले अशुद्ध करस. ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकस जे मी सांगस, त्या येले समजाना प्रयत्न करा.” जव येशु आणि तेना शिष्य गर्दी पासून घर मा ग्यात, त तेना शिष्यस्नी तेनी जो दाखला सांगेल होता तेना अर्थ तेले विचार. येशु नि तेस्ले सांग, काय तुमी बी असा अग्यानी शेतस का? काय तुमी हई नई समजतस कि आमी बाहेरून जे जेवण करतस ते आमले परमेश्वर ना समोर अशुद्ध नई ठरावस? कारण कि ते तेना मन मा नईत पण पोट मा जास आणि संडास मा निघी जास. हई सांगीसन, येशु ना अर्थ हई होता कि, “सर्वा प्रकार ना जेवण खावाना साठे स्वीकार्य शे.” (परमेश्वर ना साठे) नंतर येशु नि सांग, “लोक जे विचार करतस, सांगतस आणि करतस, तेच तेस्ले परमेश्वर ना समोर अशुद्ध करस. कारण कि माणुस ना मन सर्वा प्रकार ना वाईट ना झरा शे. म्हणजे तेना मधून गंधा-गंधा विचार, शारीरिक गंधा संबंध, चोरी, व्यभिचार, हत्या. लोभ, दुष्टपना, छळ, लबाळ पणा, दुसरास्वर बयान, निंदा, गर्व, आणि मूर्खपणा निघतस. ह्या सगळ्या गंधा गोष्टी मन मधूनच निघतस आणि त्या माणुस ले परमेश्वर पुळे अस्वीकार्य बनावस.” त्या नंतर येशु आणि तेना शिष्य गालील मधून चालना ग्यात, आणि सोर नाव ना शहर ना आंगे-पांगे ना क्षेत्र मा ग्यात. तो एक घर मा चालना ग्या, आणि कोले माहित नई पळाले पाहिजे तो तठे थामेल शे. पण लोकस्ले लगेच माहित पळी ग्या कि तो तठे शे. आणि लगेच एक बाई जेनी धाकली पोर एक दुष्ट आत्मा शी पिळीत होती, तेना बारामा आयकीसन उणी, आणि येशु ले आदर देवाले तेना पाय वर पळणी. ती बाई यहुदी नई होती पण ग्रीक होती. ती सिरीया प्रांत ना सुरफुनीकी क्षेत्र मा पैदा हुयेल होती. तिनी येशु ले विनंती करी कि तिनी पोर मधून दुष्ट आत्मा काळी टाक. येशु नि तिले सांग, “पयले मले आपला लोकस्ले, यहुदीयास्ले, जे तेस्ले पायजे, देवू दे. नईत ते, पोरस्नि भाकर लिसन कुत्रास समोर फेकाना सारख शे.” ती बाई समजी गयी कि येशु ज्या यहुदी नई शेतस तेस्ले कुत्रा, आणि यहुदीस्ले लोक मनिसन दर्शावस, एनासाठे तिनी तेले उत्तर दिधा. “प्रभु, कुत्रा बी त मेज खाले पोरस्ना भाकर ना तुकळा-ताकळा खाई लेतस.” तव येशु नि तिले उत्तर दिध, “कारण तुनी विश्वास शी उत्तर दियेल शे, एनासाठे मनी दुष्ट आत्मा ले तुनी पोर मधून भायेर करी दियेल शे, एनासाठे तू आते घर चालनी जाय.” आणि तेनी आपला घर ईसन देख कि पोर खाट वर जपेल शे, आणि दुष्ट आत्मा तीना मधून निघी जायेल शेतस. नंतर येशु आणि तेना शिष्य सोर शहर ना आस-पास ना क्षेत्र ले सोळीसन सिदोन शहर मधून ग्यात. नंतर त्या दहा नगरस्ना जिल्हा जेले दकापलीस म्हणत होतात मधून ग्यात, आणि नंतर गालील ना समुद्र ना जोळे ना नगरस्मा गयात. आणि लोकस्नी एक माणुस जो बहिरा आणि तोतऱ्या बी होता, येशु ना जोळे लयसन तेले बरा कराना साठे तेनाशी विनंती करणात. तव येशु तेले गर्दी पासून आल्लग लीग्या, आणि आपला बोट तेना कानस्मा टाका, आणि तेनी आपली एक बोट वर थुकना आणि त्या माणुस ना जीप ले स्पर्श करना. आणि स्वर्ग कळे देखीसन तेनी गोहाटा टाका (प्रार्थना मा) तव येशु नि त्या माणुस ले सांगणा, “इफ्फाता” जेना इब्री भाषा मा अर्थ शे, “उघळी जाय.” लगेच तो माणुस स्पष्ट आयकाले लागणा आणि बिगर कोणतीच आळचन ना बोलू लागणा. येशु नि लोकस्ले सांग, “कि हई कोले बी नई सांगान, कि तेनी काय करेल शे. पण जीतला जास्त तेनी तेस्ले जताळ कि दुसरास्ले नका सांगज्यात, तीतला त्या जास्त जोश मा त्या दुसरास ना मधमा खबर ले पसरावू लागणत.” आणि त्या गैराच आश्चर्य मा हुईसन सांगाले लागनात, “तेनी सर्व काही गैरा चांगल करेल शे. आठ लोंग कि तो बहिरास्ले आयकाले आणि मुक्कास्ले बोलाना योग्य बनावस.” काही दिन नंतर, जव येशु दहा नगरस्ना क्षेत्र जेले दकापलीस म्हणावस मा होता. गैरा सावटा लोक येशु ना जोळे उनात आणि चारी बाजू एकत्र हुयी ग्यात. आणि तेस्नी काही खावाले संगे नई लयेल होतात, तव तेनी तेना शिष्यस्ले जोळे बलायसन तेस्ले सांग. ह्या लोक पयलेच तीन दिन पासून मना संगे शेतस. आणि आते तेस्ना जोळे खावाले काय बी नई होत. आणि या मुळे मले तेस्ना साठे गैरा दुख हुई ऱ्हायना शे. एस्ना मधून कईक लोक गैरा दूर जागा वरून एयेल शेतस. जर मी एस्ले जेवण खावाळा बिगर भुक्या घर धाळी दिसू, त त्या रस्ता मा थकीसन पळी जातीन. तेना शिष्यस्नी तेले उत्तर दिधा, “कोणी बी या सर्वा लोकस्ले तृप्त करासाठे या सुनसान जागा वर पोट भर जेवण नई झामलू सकस.” येशु नि तेस्ले विचार, “तुमना जोळे कितल्या भाकरी शेतस?” तेस्नी सांग, “सात भाकरी.” मंग येशु नि लोकस्ले जमीन वर बसानी आदन्या दिधी, आणि त्या बठी ग्यात, येणा नंतर त्या सात भाकऱ्या लीधा, आणि परमेश्वर ले धन्यवाद दिधा भाकर ले मोळना, आणि तेनी आपला शिष्यस्ले तुकळा देत ग्या कि त्या तेस्ले लोकस्ना मधमा व्हाळी सकोत. तेस्ना जोळे थोळ्याश्या धाकल्या मासा बी होतात, आणि तेनी परमेश्वर ले धन्यवाद कर आणि शिष्यस्ले सांग कि तेस्ले बी वाटी देवोत. लोक खायीसन तृप्त हुई ग्यात, येणा नंतर शिष्यस्नी सात मोठ्या टोपल्या भरीसन उरेल तुकळास्ले एकत्र करणात. आणि लोक चार हजार ना जवळ-पास होतात. नंतर येशु नि लोकस्ले धाळी दिध. तव येशु आपला शिष्यस संगे नाव वर चळी ग्या, आणि दल्मुथा क्षेत्र मा चालना ग्या. नंतर परूशी लोक, जो यहुदी ना मधला धार्मिक पुढारीस्ना समूह मधून एक होता. येशु ना जोळे ईसन विवाद कराले लागनात. तेस्नी मांग कि, तो तेस्ले स्वर्ग मधून एक चमत्कारी चिन्ह दाखाळो. त्या तेले फसाळासाठे हई मांगत होतात. येशु तेस्ना अविश्वास मुळे उदास हुईसन गोहाटा टाका, तुमी या पीडी ना लोक काब चमत्कारी चिन्ह मांगतस? मी तुमले खरज सांगस, कि या पीडी ना लोकस्ले कोणताच चमत्कारी चिन्ह नई देवायणार. नंतर तो परूशी लोकस्ले सोळीसन, आपला शिष्यस संगे परत नाव वर चळना आणि त्या गालील ना समुद्र ना चारीस कळून जात पुढे ग्यात. येशु ना शिष्य आपला संगे भाकरी लेवाले विसरी जायेल होतात, एनासाठे एक भाकर ना शिवाय तेस्ना कळे नाव मा आजून बिलकुल बी भाकर नई होतात. येशु नि तेस्ले जताळ, “परूशी लोकस्ना आणि हेरोद ना खमीर (तेस्ना उपदेश) पासून सावधान राहा.” त्या आपस मा विचार करीसन सांगाले लागनात, “तो असा एनासाठे सांगी ऱ्हायना कारण कि आमी भाकरी नई लयनुत.” हय वयखीसन येशु नि तेस्ले विचार; तुमी काब आपस मा हय विचार करी ऱ्हायनात कि आमना जोळे भाकर नई? काय तुमी आपला मनस्ले इतला कठोर बनाई लीयेल शेतस कि तुमी आते बी समजी नई ऱ्हायनात? तुमना डोया आणि कान शेतस, पण तुमी देखू आणि आयकू नई सकतस. आणि तुमले आठवण नई. तुमनी वाचेल तुकळास्ना कितल्या टोपल्या उचलेल होतात, जव मनी त्या पाच हजार लोकस्ले फक्त पाच धाकली भाकरीस शी खावाळ? तेस्नी तेले सांग, “बारा टोपल्या.” येशु नि तेस्ले विचार आणि जव चार हजार लोकस साठे सात भाकरी होतात, त तुमनी तुकळास्ना कितल्या टोपल्या भरीसन उचलेल होतात? तेस्नी तेले सांग, “सात टोपल्या.” येशु नि तेस्ले सांग, “आणि तरी बी तुमी नई समजतस कि मी कोण शे?” तव येशु आणि तेना शिष्य बेथसैदा नगर मा उनात, आणि लोक एक अंधा माणुस ले तेना कळे लयी उनात आणि तेनाशी विनंती करणात, कि तेले बरा करी दे. येशु त्या अंधा माणुस ना हात धरीसन तेले नगर ना बाहेर लीग्या, तव येशु त्या माणुस ना डोया वर थुकना आणि तेनावर हात ठेवाना, आणि तेले विचारना, “तुले काही दिखस का?” तो माणुस वरे देखीसन सांगणा, “मी लोकस्ले देखू सकस, पण मी तेस्ले स्पष्ट रूप मा नई देखू सकस. त्या झाळस सारखा ईकळे-तिकळे चालतांना दिखी ऱ्हायनात.” तव येशु दुसरा सावा तेना डोया वर आपला हात ठेवणा, जस त्या माणुस नि ध्यान लाईसन देख, तेना डोया बरा हुई ग्यात, आणि तो सगळ काही स्पष्ट रूप मा देखत होता. येणा नंतर येशु नि तेले हय आदन्या दिसन सांगणा, कि “आपला घर जा, आठे काय होयेल होत गाव वालास्ले सांगाणा साठे, गाव मा प्रवेश नको करजो.” येशु आणि तेना शिष्यस बेथसैदा नगर ले सोळीसन, कैसरीया फिलीप्पि नगर ना जोळे ना गावस्मा चालना ग्यात. आणि रस्ता मा तेनी आपला शिष्यस्ले विचार, कि “लोक मना बारामा काय सांगतस?” शिष्यस्नी उत्तर दिधा, “काही लोक सांगतस कि तुमी योहान बाप्तिस्मा देणारा शे, दुसरास्न सांगण शे कि तुमी एलीया भविष्यवक्ता शे.” आणि दुसरा लोक सांगतस कि तुमी अन्य संदेष्ट्यास मधून एक शे. तव येशु नि तेस्ले विचार, “पण तुमी काय विचार करतस कि मी कोण शे?” पेत्र नि तेले उत्तर दिधा, “तू परमेश्वर कळून धाळेल, ख्रिस्त शे.” तव येशु नि तेस्ले जताळीसन सांग, कि तुमी मना बारामा कोले बी नका सांगज्यात. आणि येशु नि आपला शिष्यस्ले शिकाळाले चालू करना, मी माणुस ना पोऱ्या ना साठे निश्चित शे, कि मले गैरा दु:ख मधून जान पळीन, आणि पूर्वज लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक, मले तुच्छ समजीसन मारी टाकतीन आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू. तेनी हय गोष्ट तेस्ले स्पष्ट रूप मा सांगी टाकी, एनावर पेत्र तेले आलग लीजाईसन धमकावणा. पण येशु मांगे फिरणा आणि शिष्यस कळे देखना आणि परत पेत्र ले धमकाईसन सांग, “सैतान मना पासून दूर हुई जा, तू परमेश्वर ना सारखा विचार नई करस, पण लोकस सारखा विचार करस.” येशु नि गर्दी ले आपला शिष्यस संगे जोळे बलाईसन तेस्ले सांग, “जर तुमी मना शिष्य बनाले इच्छितस त, तुमले आपली योजनास्ले आणि ईच्छास्ले सोळन पळीन. तुमले मनासाठे मराले बी तयार पाहिजे (व, तुमले मनासाठे दुख उचलाले आणि मरा साठे बी तयार राहाले पाहिजे) तव आखरी वर, तुमले मना शिष्य ना रूप मा मना मांगे चालाले पाहिजे.” कदी कोणी माणुस अस नई करत कारण कि तो आपला शारीरिक जीवन ले वाचाळाना देखस, त तो परमेश्वर संगे ना कायम ना जीवन ले दवाळी दिन. पण एक माणुस जो मरी जास कारण कि तो मनावर आणि मना बारामा सुवार्ता वर विश्वास करस तेले परमेश्वर ना संगे कायम ना जीवन भेटीन. जर कोणी जग ना सर्वास तून श्रीमंत व्यक्ती बनीन, पण परमेश्वर ना संगे ना कायम ना जीवन ले दवाळी टाकस, त तेले काय फायदा होस? काय हई शक्य शे कि कोणी कायम ना जीवन लेवा साठे परमेश्वर ले काही देवू सकस? नई. जो कोणी ह्या टाईम ना पापी लोकस्ना मधमा, तुमी मनावर विश्वास ठेवतस, म्हणून तुमना मजाक करतीन, म्हणून भ्यातस, आणि मले आपला परमेश्वर ना रूप मा स्वीकार कराले आणि मना शिक्षास्ले मानाले नकारतस, जव मी आपला पवित्र स्वर्गदूतस संगे पृथ्वी वर परत येसू. तव प्रत्येक झन मनी महिमा ले देखीन जो मना बाप ना सारखा शे, आणि तव मी बी, माणुस ना पोऱ्या, नकार देसू कि तुमी मना शिष्य नई शेतस. परत येशु नि गर्दी आणि तेना शिष्यस्ले सांगणा, “मी तुमले खरज सांगस, कि तुमना मधून काही लोक ज्या आठे उभा शेतस, त्या देखतीन कि तेस्ना मराणा पयले परमेश्वर ना राज्य एक नवीन आणि सामर्थ्य कण ईजायेल शे.” साहा दिन नंतर येशु नि पेत्र आणि याकोब आणि योहान ले संगे लीना, आणि एकांत मा उच्चा डोंगर वर चळी ग्यात, जव तेस्नी तेना कळे देखात, त येशु ना रूप बदली ग्या. आणि तेना कपळा चमकदार धव्या हुई ग्यात. धरती वर कोणी बी तेले धुईसन इतला धव्या नई करू सकस. तव या तीन शिष्यस नि मोशे आणि एलीया भविष्यवक्तास्ले येशु ना संगे बोलताणां देख. येनावर पेत्र नि येशु ले सांग, “गुरुजी आमन आठे राहाण चांगल शे, एनासाठे आमी तीन तंबू बनावुत, एक तुना साठे एक मोशे साठे आणि एक एलीया साठे.” तेनी असा सांगा, कारण होत कि तो आणि दुसरा दोन शिष्य घाबरी जायेल होतात, आणि तेले माहित नई होत, कि काय सांगान शे व काय करान शे. तव एक ढग उना आणि तेस्ले झाकी दिधा, आणि परमेश्वर नि ढग मधून बोलना कि हवू मना प्रिय पोऱ्या शे, तेनी आयका. मोशे आणि एलीया चालना जायेल होतात, आणि तेस्नी फक्त येशु ले तेस्ना संगे देख. जव येशु आणि तेना तीन शिष्य डोंगर वरून उतरतांना तेनी तेस्ले आदन्या दिधी, “कोले बी हई नका सांगज्यात कि तुमनी काय देखेल शे, जठलोंग कि मी, माणुस ना पोऱ्या, मोत मधून जीवन मा परत नई इजाऊ.” तेस्नी (पहाळ ना वरे) जे हुयना तेना बारामा कोले बी नई सांग, पण येणा बारामा चर्चा करणात कि “जीवन मा परत येवाना” येनाशी येशु ना काय अर्थ होता. तव शिष्यस्नी तेले विचार, “मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक, हई सांगाले योग्य शे काय, कि हई गरज शे, कि ख्रिस्त ना येवाना पयले एलीया येवो?” जव येशु आणि तेना तीन शिष्य दुसरा शिष्यस्ना जोळे परत उनात, देखना कि तेस्ना चारीस कळे गैरी गर्दी जमा शे, आणि शास्त्री ज्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक होतात, शिष्यस संगे संवाद करी ऱ्हायनात. जसा सर्वा लोकस्नी येशु ले देखनात, गैरा चकित हुईनात आणि तेना कळे पयत जायसन तेले नमस्कार करणात. येशु नि शिष्यस्ले विचार, “तुमी एस्ना संगे काय विवाद करी ऱ्हायनात?” गर्दी मधून एक माणुस नि तेले उत्तर दिधा, “कि गुरुजी मी आपला पोऱ्या ले, तेनामा एक दुष्ट आत्मा शे जी तेले बोलाले रोकस. तुना कळे लयेल होता.” जव बी हई दुष्ट आत्मा तेनावर हमला करस, त तो हिंसक रूप मा हालावाले, खाले पाळाना कारण बनस. तेना तोंड मधून फेस निघस, आणि तो दात चावस आणि ताट हुई जास आणि हालत नई. मनी तुना शिष्यस्ले दुष्ट आत्मा ले बाहेर काळाना साठे सांग, “पण त्या असा करामा कमजोर होतात.” हय आयकीसन येशु नि तेस्ले उत्तर दिसन सांग, “ओ विश्वासहीन लोक, मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? त्या पोऱ्या ले मना कळे लया.” एनासाठे त्या पोऱ्या ले येशु ना जोळे लई उनात, आणि जव दुष्ट आत्मा नि येशु ले देख, त ती दुष्ट आत्मा नि लगेच तेले हिंसक रूप मा हालावाले, जमीन वर पाळाना कारण बनस. तेना तोंड मधून फेस लयीसन लोयाले लागणा. येशु नि पोऱ्या ना बाप ले विचार, “हायी कवय पासून हुई ऱ्हायन?” बाप नि सांग, “हई याच प्रकारे होत ऱ्हास जव पासून तो गैरा धाकला होता.” कईक सावा दुष्ट आत्मा नि तेले आग आणि पाणी मा फेकीसन माराना प्रयत्न करेल शे. पण तू कदी काही करी सकस, त आमना वर दया करीसन आमले मदत कर. येशु नि तेले सांग, “तुमले शक नयी होवाले पायजे कि मी असा करू सकस! जर कोणी व्यक्ती मनावर विश्वास करस त काय बी शक्य शे.” पोऱ्या ना बाप नि लगेच आवाज दिसन सांगणा, “ओ गुरुजी, मी विश्वास करस, पण मी विनंती करस कि मले शक नई करासाठे मदत कर.” जव येशु नि देख, “आजून बी जास्त गर्दी तेस्ले देखाले एकत्र होत होती, तेनी दुष्ट आत्मा ले हय सांगीसन धमकावा,” कि “ओ दुष्ट आत्मा, ज्या ह्या पोऱ्या ले बयरा बनायी ऱ्हायनी आणि बोलाले असमर्थ करी ऱ्हायनी! मी तुले आदन्या देस, तेना पासून दूर चालनी जाय, आणि तेनामा परत कदीच घुसजो नको.” तव तो आराया मारत, आणि तेले गैरा पियीसन गंधी फिट मा फेकीसन बाहेर निघी गई, पोऱ्या नई हालना, तो मरेल सारखा दिखना. आठ लगून कि गैरा लोक सांगाले लागनात कि तो मरी ग्या. पण येशु नि तेना हात धरीसन तेले उठाळ आणि तो उभा हुईग्या. नंतर, जव येशु आपला शिष्यस संगे घर मा एखलाच होतात, तव तेस्नी तेले विचार, आमी दुष्ट आत्मा कसकाय नई काळी सकनुत? नंतर येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “या प्रकार नि दुष्ट आत्मा प्रार्थना (आणि उपवास) ना बिगर लोकस मधून बाहेर नई येत.” नंतर, येशु आणि तेना शिष्यस्नी त्या जागा ले सोळी दिधात आणि गालील जिल्हा मधून ग्यात. येशु नि ईच्छा नई होती कि कोले माहित पळो कि तो कोठे शे. कारण कि तेनी आपला शिष्यस्ना संगे जास्त टाईम राव्हानि आणि तेस्ले शिकाळानि ईच्छा होती, कि “लवकर कोणी, मले, माणुस ना पोऱ्या ले, मना शत्रू अधिकारी ले, सोपी दिन, त्या लोक मले मारी टाकतीन पण तिसरा दिन जव मना मारा नंतर, मी परत जित्ता हुई जासू.” पण हय गोष्ट तेस्ना समज मा नई उणी आणि त्या तेले विचाराले घाबरत होतात. नंतर येशु आणि तेना शिष्य कफर्णहूम नगर मा येशु ना घर उनात, जव त्या घर ना मधमा होतात, येशु नि तेस्ले विचार, रस्ता वर तुमी कोणती गोष्ट वर आपस मा बोली ऱ्हायंतात? त्या शांत ऱ्हायनात, कारण कि रस्ता मा तेस्नी वाद-विवाद करेल होता, कि आमना मधून मोठा कोण शे? येशु बठी ग्या आणि बारा शिष्यस्ले आपला जोळे एकत्र होवाले बलावना. आणि तेस्ले सांग, “जर कोणी सर्वास तून मोठा बणानी ईच्छा ठेवस, त स्वता ले सर्वास तून धाकला बनावाले पायजे, आणि सर्वास्ना दास बनाले पाहिजे.” आणि येशु नि एक पोऱ्या ले सांग मना समोर उभा राय, आणि तेले छाती ले लाव आणि शिष्यस्ले सांग. जव कोणी व्यक्ती असा पोरस मधून कोणा एक ना बी स्वीकार करस आणि मदत करस, कारण कि तो व्यक्ती मले प्रेम करस तो मले स्वीकार करस; आणि मले नई पण मना धाळनारले स्वीकारस. तव योहान नि तेले सांग, “गुरुजी, आमी एक माणुस ले तुना नाव ना अधिकार ना उपयोग करीसन, दुष्ट आत्मा ले काळतांना देख आणि आमी तेले मना कराले लागनुत, कारण कि तो आपला शिष्यस मधला एक नई होता.” येशु नि सांग, “जो आमना विरुद्ध मा नई तो आमना कळे शे. एनासाठे कोणी बी जो मना नाव ना अधिकार तून चमत्कार ना काम करो आणि लवकर मले वाईट सांगो. एनासाठे तेले मना नका करा.” जो कोणी तुमले एक ग्लास पाणी एनासाठे पेवाले देईन कि तुमी ख्रिस्त ना शिष्य सांगावतस, परमेश्वर निश्चित रूप मा त्या माणुस ले तेना साठे तेन चांगल करीन. कदी कोणी त्या व्यक्ती ले जो मनावर विश्वास करस, तेना मनावर विश्वास करान बंद कराना कारण बनस, भले तो ह्या पोऱ्या सारखा का नई हो, त हय तेना साठे चांगल हुईन कि तेना गयामा एक मोठा दघळ बांधा मा येवो, आणि तेले बुळा साठे समुद्र मा फेकामा येवो. जर तुमी पाप करासाठे आपला हात ले उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले कापी टाक. एक हात ना बिगर स्वर्ग मा प्रवेश करान कठीण लागू सकस, पण दोनी हात ले ठीसन, नरक मा प्रवेश करान गैर वाईट शे. नरक मा, सर्वास्ना शरीर ले खाणारा किळा कदी नई मरत आणि आग नई मलावत. जर तुमी पाप करासाठे आपला पाय ले उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले कापी टाक. एक पाय ना बिगर स्वर्ग मा प्रवेश कराले कठीण लागू सकस, पण दोन पाय ठीसन नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे. नरक मा, सर्वास्ना शरीर ले खाणारा किळा कदी नई मरत आणि आग नई मलावत. या प्रकारे, जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले काळीसन फेकी टाक. एक डोया ना बिगर परमेश्वर ना राज्य मा प्रवेश कराले कठीण लागू सकस, पण दोन डोया ठीसन आणि नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे. नरक मा, सर्वास्ना शरीर ले खाणारा किळा कदी नई मरत आणि आग नई मलावत. सर्वास्ले आग कण शुद्ध करामा ईन जस कि मीठ कण एक बलिदान युध्द होस. मीठ एक आवश्यक वस्तू शे, पण कदी मीठ ना स्वाद चालना ग्यात तेले कसा पासून तुमी चवदार बनावशात? आपला मा मीठ ना गुण होवाले पायजे आणि एकमेकना बरोबर शांती मा राहाले पायजे. येशु नि आपला शिष्यस्ना संगे कपरनहूम शहर सोळीसन, आणि त्या यहूदीया प्रांत मधून ग्यात, आणि यार्देन नदी ना त्या पार चालना ग्यात, परत एक सावा गर्दी तेना जोळे एकत्र हुईगी, आणि तो आपली चाल प्रमाणे तेस्ले प्रचार करू लागणा. तव परूशी लोकस्नी तेना जोळे ईसन तेनी परीक्षा कराले तेले विचार, काय मोशे ना नियम मा एक माणुस ले आपली बायको ले फारकती देवानी परवानगी शे? येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “मोशे ना नियम एना बारामा काय सांगस?” तेस्नी सांग, “मोशे नि एक माणुस ले आपली बायको ले फारकती ना सूटपत्र लीखाले आणि तिले धाळी दे हायी आदन्या दियेल शे.” येशु नि तेस्ले सांग, “कारण कि तुमी नेहमी परमेश्वर ले मानाले नकार देतस, एनासाठे तेनी तुमना साठे हई आदन्या लिखी.” पण सुरुवात मा जव परमेश्वर नि सगळ कायी बनाव, “तेस्ले नर आणि नारी करीसन बनावना.” एनासाठे “माणुस आपला माय-बाप तून आलग हुईसन, आपली बायको संगे लग्न करीलीन कारण कि दोनी एक होतीन आणि त्या एक व्यक्ती ना सारखा शेतस. आणि त्या दोनी एकदेह होतीन, एनासाठे त्या आते पासून दोन लोकस सारखा नई, पण त्या एकदेह हुई जायेल शे.” एनासाठे ज्या लोकस्ले परमेश्वर नि एकत्र जोळेल शे, तेले कोणी बी व्यक्ती आल्लग नका करा. नंतर, जव तो शिष्यस्ना संगे त्या घर मा एखटा होता, तेस्नी तेले येणा बारामा विचार. येशु नि तेस्ले सांग, “जो कोणी आपली बायको ले सोळीसन दुसरी संगे लग्न करीन त तो पहिली ना विरुद्ध मा व्यभिचार करस. आणि कदी बायको आपला नवराले सोळीसन दुसरा संगे लग्न करस त ती व्यभिचार करस.” नंतर लोक पोरस्ले येशु कळे लयाले लागनात, कि तो तेस्ना वर हात ठेवो आणि आशीर्वाद देवोत. पण शिष्यस्नी लोकस्ले धमकाव. जव येशु हय देखीसन रागे भरणा आणि तेस्ले सांग, “पोरस्ले मना कळे ईवू द्या आणि तेस्ले मना नका करा, कारण कि त्याच लोक ज्या या पोरस सारखा विश्वास लायक आणि नम्र शेतस परमेश्वर ना राज्य मा राहतीन.” मी तुमले खरज सांगस, “परमेश्वर आपला राज्य मा फक्त त्या लोकस्ले स्वीकार करीन ज्या तेना नियमले पोरस सारखा स्वीकार करतीन.” आणि तेस्ले छाती ले लाव आणि तेस्ना वर हात ठियसन तेस्ले आशीर्वाद दिना. जसा येशु आपला शिष्यस संगे परत प्रवास कराले सुरु करत होता, त एक माणुस तेना जोळे पयत उना, आणि तेना पुळे आदरताशी गुळघा टेकीसन तेले विचारना, “उत्तम गुरुजी, मी काय काम करू कि परमेश्वर मले कायम ना जीवन दिन.” येशु नि तेले उत्तर दिधा, “जव तू सांगस कि मी चांगला शे त तुना अर्थ काय शे? परमेश्वरच फक्त एक शे जो खरोखर चांगला शे.” तुले परमेश्वर ना आदन्या माहिती शेतस, मनुष्य हत्या करजो नको, व्यभिचार करजो नको, चोरी करजो नको, खोटी साक्ष देईजो नको, कोले बी धोका नको देयजो, आपला माय-बाप ना मान ठेवजो. तेनी येशु ले सांग, गुरुजी, “ह्या सर्वा आदन्या मी लहानपणा पासून पायत एयेल शे.” येशु नि त्या माणुस ना साठे खरा प्रेम अनुभव कर, जस तेनी तेले देख, आणि तेले सांग, “एक आजून गोष्ट शे, जी तुले करानी गरज शे, जा जे काही तुना कळे शे तेले विकीसन पैसा गरीब लोकस्ले दे जर तू असा करस, त तुना जोळे स्वर्ग मा धन राहीन. आणि ईसन मना मांगे चालू लाग.” जव माणुस नि येशु ले हई सांगतांना आयक, त तेना चेहरा उतरी ग्या, आणि तो दुखी हुईसन चालना ग्या, कारण कि तो गैरा मालदार होता. येशु नि चारीस कळे देखीसन आपला शिष्यले सांग, “मालदार लोकस साठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करान गैरा कठीण शे.” शिष्य तेनी गोष्ट वरून चकित हुई ग्यात. एनावर येशु नि परत तेस्ले सांग, “मना भाऊसहोण, मालदार लोकस साठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करान गैरा कठीण शे.” एक उट ना साठे सुई ना छिद्र मधून जावान सोप शे, पण एक मालदार ले परमेश्वर ना राज्य मा जावाले गैरा कठीण शे. जव शिष्यस्नी हय आयक, त त्या आजून चकित हुयनात, आणि एकमेकना बरोबर सांगणात, मंग कोनासाठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करासाठे वाचाले कस शक्य शे? येशु तेस्ना कळे देखीसन सांगणा, “हई लोकस साठे अशक्य शे पण परमेश्वर ना साठे नई, परमेश्वर ना साठे सर्व काही शक्य शे.” पेत्र तेले सांगाले लागणा, “आमन काय हुईन? आमी तुना शिष्य बनासाठे सर्व काही सोळी दियेल शे.” येशु नि शिष्यस्ले सांग. “मी तुमले खरज सांगस, तुमना मधून हरेक झन घर, भाऊ-बहिण, माय-बाप, बायको, पोरस्ले, व वावरस्ले मना शिष्य होवा साठे आणि सुवार्ता प्रचार करासाठे सोळी दियेल शे. निश्चित प्रकारे जे काय तेनी सोळेल शे, तेना ह्या वय मा गैरा पद तेले भेटीन, तेना संगे-संगे त्रास बी भेटीन, आणि येणारा युगमा तुमले कायम ना जीवन भेटीन.” पण गैरा ज्या आते पहिला शेतस, त्या टाईम ले आखरी होतीन, आणि काही ज्या आखरी शेतस, त्या टाईम ले पहिले होतीन. येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर ले जातांना रस्ता मा होतात, आणि येशु तेस्ना पुळे पुळे जाईरायन्ता. शिष्य गैरा आश्चर्य चकित हुईनात कि त्या तठे जात होतात जठे गैरा लोकस्नी तेस्ना विरोध करेल होता, आणि दुसरा लोक ज्या तेस्ना संगे होतात, त्या ह्या गोष्ट ले भ्यात होतात, कि यरूशलेम शहर मा तेना काय हुईन. एक सावा परत येशु बारा शिष्यस्ले एक बाजुमा लीग्या आणि त्या गोष्ट ना बारामा बोलना जी तेना संगे होणार होती. “देखा आमी यरूशलेम शहर कळे जाईरायनुत आणि मी, माणुस ना पोऱ्या मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना स्वाधीन करामा ऐईन, आणि त्या मले मरणदंड ठरावतीन, आणि दुसरा जातीस्ना स्वाधीन करतीन. आणि त्या मनी थट्टा करतीन, आणि मनावर थुकतीन आणि मले फटका मारतीन, आणि मले मारी टाकतीन, आणि तिसरा दिन मा मी परत जित्ता होसू.” याकोब आणि योहान, त्या जब्दी ना पोर होतात, येशु ना जोळे ईसन सांगणात, “गुरुजी आम्हनी हय ईच्छा शे कि जे काय आमी तुना पासून मांगसुत तेना प्रमाणे तू आमना साठे करो.” तेनी तेस्ले विचार, “तुमनी काय ईच्छा शे कि मी तुमना साठे करू?” तेस्नी तेले सांग, “तुना महिमामय राज्य मा, आमी तुना बाजुमा सन्मान नि जागा वर बठानी ईच्छा करतस. आमना मधून एक तुना उजवा हात कळे आणि दुसरा डाखोऱ्या हात कळे बसू सकतस.” येशु नि तेस्ले सांग, “तुमले नई माहित कि काय मांगी ऱ्हायनात? काय तुमनी ईच्छा शे कि ज्या त्रास मी भोगसु त्या तुमी भोगश्यात का, आणि मरश्यात का जसा मी मरसू?” तेस्नी तेले सांग, “आमना कण बी हुई सकीन: येशु नि तेस्ले सांग, तुमी त्रास ले भोगश्यात ज्या मी भोगसु, आणि मरश्यात जसा मी मरसू.” पण मले हई सिद्ध कराना अधिकार नई शे, कि मना बाजुमा मा उजवा बाजू आणि डाखोऱ्या बाजू, कोण तो सन्मान ना जागा ले प्राप्त करीन. परमेश्वर नि त्या (सन्मान ना) जागास्ले तयार करेल शे, जेस्ले तेनी निवाळेल शे तेस्ना साठे. हय आयकीसन दहा शिष्य याकोब आणि योहान वर रागे भरू लागनात तव येशु नि तेस्ले जोळे बलाईसन तेस्ले सांग, “तुमले माहित शे, कि ज्या लोक या दुनिया मा राज्य करणारा मानावतस, त्या आपला अधिकार ना प्रयोग आपला ताबा मधला लोकस्ना वर अधिकार जताळासाठे करतस. तेस्ना पुढारी लोक तेस्ले माना साठे तेस्ना अधिकार ना उपयोग करतस.” पण तुमना मधून असा नई होवाले पायजे, पण जो कोणी तुमना मा मोठा होवाना देखस, तो तुमना सेवक बनो. जो दुसरास्नी नेतृत्व करानी ईच्छा ठेवस, तेले दास ना सारखा सर्वास्नी सेवा कराले पायजे. आणि जो कोणी तुमना मा पहिला होवानी ईच्छा ठेवस त तो सर्वास्ना दास बनो. मी असा एनासाठे सांगस कि मी, माणुस ना पोऱ्या, दुसरास्नी चाकरी करासाठे या दुनिया मा उना. मी एनासाठे नई उना कि दुसरा मनी चाकरी करोत. मी किईक लोकस्ले तेस्ना पाप शी सोळावा साठे मराले एयेल होता. यरूशलेम जावाना रस्ता मा, येशु आणि शिष्य यरीहो शहर मा उनात, जस कि येशु आणि तेना शिष्य आणि दुसारा लोकस्नी एक मोठी गर्दी शहर मधून निघी ऱ्हायंती, एक बार्तीमय नाव ना अंधा भिकारी सळक ना बाजुले बसेल होता, तो तीमाई ना पोऱ्या होता. जव तेनी लोकस कळून हय आयक कि येशु नासरेथ नगर ना शे, तो त्या रस्ता वरून जात होता, तो जोरमा आराया मारना, ओ येशु, राजा दाविद ना पोऱ्या मनावर दया कर. गैरास्नी तेले धमकाव कि शांत राहय म्हणून पण तो जास्त आराया माराले लागीग्या, ओ येशु, राजा दाविद ना पोऱ्या मनावर दया कर. जव येशु नि तेले आयक, त तो थामी ग्या आणि आजू-बाजू ना लोकस्ले तेले लयानासाठे सांगणा, आणि लोकस्नी त्या अंधा ले बलायसन त्या अंधा ले सांग घाबरू नको उठ तो तुले बलाई ऱ्हायना. तव अंधा माणुस आपला पांघरेल कपळा फेकीसन लगेच उठना आणि येशु जोळे उना. एनावर येशु नि तेले सांग, “तुनी काय ईछ्या शे कि मी तुना साठे करू?” अंधा नि येशु ले सांग, “गुरुजी, कि मी देखाले लागी जावू.” येशु नि तेले सांग, मी तुले बरा करस कारण कि तुनी मनावर विश्वास करेल शे, एनासाठे तू घर जावू सकस. आणि तो लगेच देखाले लागणा आणि तो त्या लोकस्ना संगे जुळी ग्या ज्या येशु ना मांगे चालत होतात. जव येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर ना जोळे उनात, त त्या बेथफगे आणि बेथानी नगर ना बाहेर ना गाव मा पोहचनात, हई गाव जैतून डोंगर ना जोळे होता. तेनी आपला शिष्यस मधून दोन शिष्यस्ले हय सांगीसन धाळ. कि आपला समोरला गाव मा जा आणि तेमा भिळताच जेनी पयले कोणताच माणुस ले वरे नई बसाळ, असा धाकला शिंगरू तुमले बांधेल भेटीन तेले सोळी लया. कदी कोणी तुमले विचारीन कि हय काब करतस? त सांगज्यात, कि येशु, आमना प्रभु ले येले उपयोग करानी गरज शे, तो येले लगेच आठे परत धाळी दिन. शिष्य गाव मा ग्यात, आणि धाकला शिंगरू ले एक घर ना दरवाजा ना जोळे खांबाले बांधेल भेटणा, जो सळक वर होता, आणि सोळाले लागनात. आणि तेस्ना मधून ज्या तठे उभा होतात कईक लोक सांगाले लागनात कि हय काय करी ऱ्हायनात धाकला शिंगरू ले काब सोळी ऱ्हायनात? जस येशु नि सांगेल होत तसच तेस्नी तेस्ले सांगी टाक, तव लोकस्नी तेस्ले धाकला शिंगरू ले लीजावू दिधात. आणि तेस्नी शिंगरू ले येशु जोळे लयसन, येशु ले बसाना ना साठे धाकला शिंगरू ना पाठ वर आपला पांघराना कपळा टाकनात. आणि तो शिंगरू वर बठी ग्या आणि यरूशलेम शहर कळे जावू लागणा. आणि गैरा लोकस्नी येशु ना समोर रस्ता वर आपला कपळा पसारनात, आणि दुसरा लोकस्नी तेना आदर सत्कार कण तेना स्वागत करासाठे रस्ता वर खजूर ना हिरवागार डंघास्ले पसारी टाका, जेस्ले त्या लोक वावरस मधून कापीसन लयेल होतात. कईक लोक येशु ना पुळे पुळे चालनात आणि कईक मांगे, त्या सर्वा खुशिमा ओरडत होतात “होसन्ना” (परमेश्वर नि महिमा होवो) तो जो प्रभु ना नाव वर येस, तेनावर परमेश्वर नि दया शे. आमना पूर्वज दाविद ना सारखा एक राजा परमेश्वर ना आशीर्वाद कण राज्य करासाठे ईऱ्हायना शे. “होसन्ना” परमेश्वर नि महिमा करा जो स्वर्ग मा राहस. जव येशु यरूशलेम शहर मा उना, तेना नंतर, तो परमेश्वर ना मंदिर मा ग्या. तेना चारी बाजू प्रत्येक वस्तुले ध्यान लाईसन देखना आणि परत तो शहर मधून चालना ग्या कारण कि संज्याकाय होयेल होती. मंग तो आपला बारा शिष्यस्ना संगे बेथानी नगर कळे निघनात. दुसरा दिन जव त्या बेथानी नगर मधून निघनात त येशु ले भूक लागणी. आणि तो दुरून अंजिर ना एक हिरवागार पानसकण भरेल झाळ देखीसन जोळे ग्या, कि तेना वरून काही फय भेटीन, पण पानस्ले सोळीसन काहीच भेटन नई, कारण कि अंजिर ना फय ना हंगाम एयेल नई होता. तव येशु नि झाळ ले सांग, “तुनावर कदीच फय नई लागाव आणि तेना शिष्य आयकत होतात.” तेना नंतर, येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर मा उनात. आणि परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा ग्यात. तो त्या लोकस्ले त्या जागा वरून बाहेर काळाले चालू करना, जे बलिदान ना साठे उपयोग मा येणारा पशुस्ले आणि अन्य वस्तूस्ले लेवाना आणि विकाना काम करत होतात, तेनी पैसा बदल नारस्नी टेबल ले ढकली टाक आणि बलिदान ना साठे कबुतरस्ले विकनारास्ना टेबलस्ले पलटाई टाक. आणि तेनी लोकस्ले आदन्या दिधी कि परमेश्वर ना मंदिर ना आंगण ना जवळपास ना जागा वरून वस्तूस्ले लीजावा ना बंद करा. आणि शिकाळतांना तेस्ले सांग, “काय परमेश्वर ना पुस्तक हय नई सांगस, लोक मना घर ले अशी जागा बोलतीन जठे सर्वा जाती ना लोक प्रार्थना कराले येतस. पण तुमी तेले लुटनारस्नि भरेल गुफा ना सारखा बनाई टाकेल शे.” जव मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक लोकस्नी आयक, कि येशु काय सांगणा आणि करना, त त्या तेना घात करू अशी संधी देखी ऱ्हायनात, कारण कि जे काही तेनी शिकाळ गर्दी नि तेले पूर्णपणे स्वीकार कर, या मुळे त्या तेनी वाळत लोक प्रीयता शी भ्यायेल होतात. जव संज्याकाय हुईनी त येशु आणि तेना शिष्य शहर ले सोळीसन बेथानी गाव मा ती रात राहाले चालना ग्यात. दुसरा दिन गैरा सक्कायमा, जव येशु आणि तेना शिष्य परत यरूशलेम शहर कळे चालत होतात, तेस्नी अंजिर ना झाळ ले परत देखना. तो पूर्णपणे मरी जायेल होता आणि मुयास लोंग सुकी जायेल होता. पेत्र ले ती गोष्ट याद इगई, आणि तेनी येशु ले सांग, “गुरुजी, देख हवू अंजिर ना झाळ जेले तुनी श्राप दियेल होता सुकी जायेल शे.” येशु नि तेले उत्तर दिधा, “विश्वास करा कि जे तुमनी मांगेल शेतस परमेश्वर करीन.” मी तुमले खरज सांगस, कि जो कोणी हवू डोंगर ले सांगीन, “उठ आणि स्वता ले समुद्र मा फेकी दे, आणि तेना मना मा शक नई शे, पण विश्वास शे कि परमेश्वर तेच करीन जो तो विचार करस, तव परमेश्वर तेना साठे तेच करीन.” एनासाठे मी तुमले सांगस कि जे काही तुमी प्रार्थना करीसन मांगशात, त विश्वास करा कि परमेश्वर नि पयलेच तुमनी विनंती ले स्वीकार करी लीयेल शे, परमेश्वर तुमना साठे हई करीन. येणा सारखा जव कदी तुमी उभा ऱ्हायसन प्रार्थना करतस, कदी कोणा मन मा तुमना विरोध मा काही वाईट अशीन त माफ करा: एनासाठे कि परमेश्वर तुमना बाप जो स्वर्ग मा ऱ्हास, तुमना अपराधस्ले माफ करो. आणि कदी तुमी माफ नई कराव त तुमना बाप बी जो स्वर्ग मा शे तुमना अपराधस्ले माफ नई कराव. त्या परत यरूशलेम शहर मा उनात आणि जव तो परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा चालीरायन्ता त मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि आणि पूर्वज लोक तेना कळे ईसन विचाराले लागनात तेस्नी विचार, “जे काम तुनी करेल शे तेस्ले करासाठे तुना जोळे काय अधिकार शे? हई सर्व सांगाले आणि कराना अधिकार तुले कोणी दियेल शे?” येशु नि तेस्ले सांग, “मी बी तुमले एक गोष्ट विचारस, जर तुमी मले उत्तर देश्यात. तव मी तुमले सांगसू कि ह्या काम मी कोणा अधिकार कण करस.” जव योहान नि लोकस्ले बाप्तिस्मा दिधा, त काय तेना अधिकार स्वर्ग ना परमेश्वर कळून उना कि लोकस कळून? मले उत्तर द्या. तव त्या आपस मा चर्चा कराले लागनात, कि कदी आमी सांगसुत, स्वर्ग ना परमेश्वर कळून, त तो आमले विचारीन, त मंग तुमनी तेनावर विश्वास काब नई ठेवा? पण जर आमी सांगसुत, माणसस कळून शे, त काय हुईन? त्या या प्रकार ना उत्तर नई देवू सकत, कारण कि त्या लोकस्ले भ्यात होतात, ज्या हई मानतस कि योहान परमेश्वर कळून एक खरा भविष्यवक्ता होता. त तेस्नी येशु ले उत्तर दिधा, कि आमले नई मालूम, कि योहान ले लोकस्ले बाप्तिस्मा देवाले कोणी धाळ, येशु नि तेस्ले सांग, “त मी बी तुमले हई नई सांगाव कि मले या प्रकार ना काम कराना काय अधिकार शे.” येणा नंतर, येशु नि काही दाखलास ना द्वारे यहुदी अगुवास्ना संगे गोष्टी कराले लागणा. तेनी सांग “एक माणुस नि आपला मया मा द्राक्ष लावना, तेना मया ना चारीकळे दघळस्नि भिंत बनावी, आणि एक रसना कुंडा बनाव तेनी चोरस आणि ढोरस पासून मया नि रक्षा करासाठे माळ बनावना. नंतर तेनी त्या मया ले काही शेतकरीस्ले ठेका दिधा आणि परदेश लांब प्रवास वर चालना ग्या.” जव द्राक्ष तायार हुईग्या, त तेनी आपला दासस मधून एक ले ठेका लीयेल शेतकरी कळे धाळ कारण कि तेले तेना कळून द्राक्ष ना मया मधून काही फय भेटू सकोत. पण शेतकरीस्नी तेले धरीसन मारा, आणि बिगर काही देवाना तेले परत धाळी दिनात. नंतर मया ना मालिक नि आखो एक दास ले ठेका लीयेल शेतकरीस कळे धाळ, आणि तेस्नी तेन डोक फोळी टाक आणि तेना अपमान करणात. नंतर मया ना मालिक आखो एक ले धाळना आणि तेस्नी तेले मारी टाक: तव तो आखो गैरास्ले धाळना: तेस्ना मधून तेस्नी कितलास्ले मार आणि कितलास्ले मारी टाक. शेवट मा, मालिक जोळे धाळा साठे फक्त एक माणुस होता हवू तेना पोऱ्या होता, आणि मालिक तेले गैरा प्रेम करत होता, आखरी वर तेनी तेले बी तेस्ना जोळे हय विचार करीसन धाळ कि त्या मना पोऱ्या ना मान ठेवतीन. पण त्या शेतकरीस्नी तेना पोऱ्या ले येतांना देख, तेस्नी आपस मा सांग, हवू तोच शे जो द्राक्ष ना मया ना वारीस हुईन, या आह्मी तेलेच मारी टाकुत तव वारसी आपली हुई जाईन. आणि तेस्नी तेले धरीसन मारी टाक आणि तेना मृत शरीर ले द्राक्षमया ना बाहेर फेकी दिनात. तुमले काय वाटस कि द्राक्षमया ना मालक काय करीलीन? तो ईसन त्या ठेका लीयेल शेतकरीस्ले मारी टाकीन आणि द्राक्षमया ले दुसरास्ले दि दिन. काय तुमनी परमेश्वर ना पुस्तक मा हय भाग नई वाच जो ख्रिस्त नि तुलना एक महत्वपूर्ण दघळ शी करस? तो सांगस, ज्या दघळ ले मिस्त्रीस नि फेकी दिधा, तोच दघळ शे जो पूर्ण घर मा सर्वास्तून महत्वपूर्ण दघळ बनी ग्या. हय प्रभु परमेश्वर, नि करेल शे, आणि आमना साठे गैरा आश्चर्यकारक शे. यहुदी अगुवा समजी ग्यात कि येशु नि तेस्ना विरुद्ध हवू दाखला सांगेल होता, एनासाठे त्या तेले पकळानी ईच्छा ठेवत होतात. पण तेस्नी तेले नई पकळा कारण कि त्या लोकस्ले भ्यात होतात, एनासाठे त्या तेले एखटा सोळीसन चालना ग्यात. नंतर, यहुदी पुढारीस्नी येशु ना जोळे काही परूशी लोकस्ले आणि हेरोद राजा ना दल ना काही सदस्यस्ले धाळस, कि त्या काही चूकीन सांगाणा द्वारे येशु ले फसाळोत आणि जेनाशी तेले पकळू सकोत. आणि तेस्नी ईसन तेले सांग; गुरुजी, आमले माहिती शे, कि तू नेहमी खरा बोलस, तू ह्या गोष्ट पासून नई घाबरस कि दुसरा लोक तुना बारामा काय विचार करतस. तू सर्वास्ना संगे सारखा व्यवहार करस. पण परमेश्वर ना मार्ग खरोखर शिकाळस, आते आमले सांग, “काय रोमी सम्राट ले कर देवाना, नियम ना विरुद्ध मा शे? काय आमी कर देवूत कि आमी कर नई देवूत?” तेनी तेस्ना कपट वयखीसन तेस्ले सांग, “तुमी मले काबर पारखतस? एक चांदी ना शिक्का जो एक दिन नि मजुरी ना बराबर होता मना कळे लया कि मी देखू.” त्या लई उनात आणि तेनी तेस्ले सांग, “मले सांगा कि चांदी ना शिक्का वर कोणा चित्र आणि कोण नाव शे?” तेस्नी सांग “सम्राट ना.” येशु नि तेस्ले सांग, “जे सम्राट ना शे, ते सम्राट ले द्या, जे परमेश्वर न शे ते परमेश्वर ले द्या.” तव त्या तेनावर गैरा आश्चर्य कराले लागनात. नंतर सदूकी नाव ना यहुदी जात ना एक आखो समूह ना काही सदस्य येशु ना जोळे उनात. सदूकी समूह हई नई मानतस कि मरणारा लोक परत जित्ता होवू सकतस, त्या येशु ना जोळे उनात आणि विचारू लागनात. “हे गुरुजी, मोशे ना शास्त्र मा आमना साठे एक नियम लिखेल होता कि जर कोणी लग्न वाला माणुस नि मोत हुई जास, आणि तो बिगर पोऱ्यास्ना नवरीले सोळीसन मरी जास, त त्या माणुसस्ना भाऊ ले विधवा शी लग्न करी लेवाले पायजे आणि एक पोरग पैदा कराले पायजे जो तेना भाऊ ना वारीस हो. एक परिवार मा सात भाऊ होतात, सर्वास तून मोठा भाऊ नि लग्न करी लीधा पण बिगर पोरस्ना मरी ग्या. तव दुसरा भाऊ नि आपला मरेल भाऊ नि, विधवा संगे लग्न करी लीधा, पण तो बी बिगर पोरस्ना मरी ग्या, हईच गोष्ट तिसरा भाऊ ना संगे हुयनी. आणि सर्वा सात भावूस संगे असच हुयन, त्या बाई नि तेस्ना मधून कोणा बी साठे एक पोरस्ले बी जन्म नई दिधी. शेवट मा, ती बाई बी मरी गयी. आते, आमले सांग, ज्या टाईम ले मरेल लोक परत जित्ता होतीन, ती कोणी बायको हुईन? आमी हय विचारतस कारण कि तिनी त्या सर्वा सातीझनस संगे लग्न करेल शे.” येशु नि तेस्ले सांग, “तुमी चुकीना शेतस कि तुमले माहित नई कि परमेश्वर ना पुस्तक काय सांगस, आणि तुमी परमेश्वर ना सामर्थ्य ना बारामा नई जानतस. कारण कि जव त्या मरेल मधून परत जित्ता हुई जातीन, नईत माणुस, नईत बाया लग्न करावत. त्या परमेश्वर ना दूतस सारखा ऱ्हातीन. मरेल ना जित्ता होवाना बारामा काय तुमनी मोशे नि पुस्तक मा नई वाच? ज्या भाग मा परमेश्वर चेटणारी झाळी मधून मोशे न संगे बोलस, तठे परमेश्वर सांगस कि मी आजून बी ‘अब्राहाम ना परमेश्वर, इसहाक ना परमेश्वर, याकोब ना परमेश्वर शे.’ एनासाठे, तो मरेल लोकस्ना परमेश्वर नई शे. तो त्या लोकस्ना परमेश्वर शे जो जिवंत शे. तुमी गैरा चुकीना शेतस.” मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस मधून एक ईसन, येशु आणि सदूकी आपस मा काय चर्चा करत होतात, आणि हय जानीसन कि तेनी तेस्ले चांगल्या प्रकारे उत्तर दिधा; येशु ले विचार, परमेश्वर नि जीतली बी आदन्या दियेल शे, तेस्ना मधून “महत्वपूर्ण आदन्या कोणती शे?” येशु नि तेले उत्तर दिध, “सर्वा आदन्यास मधून हई महत्वपूर्ण शे, ‘हे इस्त्राएल देश ना लोक आयका, प्रभु आमना परमेश्वरच फक्त प्रभु शे. आणि तू प्रभु आपला परमेश्वर ले आपला पुरा मन आणि आपला पुरा जीव कण, आणि आपली पुरी बुद्धी कण, आणि आपली पुरी शक्ती कण प्रेम कर.’ आणि दुसरी सर्वा मा महत्वपूर्ण आदन्या हय शे, ‘दुसरास वर बी तीतलाच प्रेम करा जीतला तुमी स्वतः वर प्रेम करतस.’ परमेश्वर नि ह्या दोन आदन्या तून मोठी कोणतीच आदन्या नई दियेल शे.” मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक नि तेले सांग; “गुरुजी, गैर चांगल! तुनी खरज सांग, परमेश्वरच एकमात्र परमेश्वर शे आणि कोणताच दुसरा परमेश्वर नई. आणि तू प्रभु आपला परमेश्वर ले आपला पुरा मन आणि आपला पुरा जीव कण, आणि आपली पुरी बुद्धी कण, आणि आपली पुरी शक्ती कण प्रेम कर, आणि दुसरास वर बी तीतलाच प्रेम करा जीतला तुमी स्वतः वर प्रेम करस, या सर्वा पशु आणि बलिदान जे आमी परमेश्वर ले चाळावतस एस्नातून मोठ शे.” जव येशु नि देख कि तेनी समजीसन उत्तर दिधा, त तेले सांग, “तू परमेश्वर ना राज्य मा प्रवेश कराना जोळे शे,” आणि कोले बी परत तेनाशी काही विचारानी हिम्मत नई हुईनी. नंतर येशु नि परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा शिकाळतांना हय सांग, “मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक न सांगण शे कि ख्रिस्त राजा दाविद ना वंश शे, तव त्या असा सांगतस त तेना अर्थ काय शे?” कारण कि (गैरा पहिले) जव राजा दाविद पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण बोलना, प्रभु परमेश्वर (परमेश्वर) नि मना प्रभु ले सांग, “मना उजवी कळे बठ, जठ लगून कि मी तुना शत्रूस्ले हाराई नई देत.” कारण कि त्या भाग मा बी आठ लोंग कि राजा दाविद नि बी ख्रिस्त राजा दाविद ना पोऱ्या ले प्रभु सांगीसन संभोदित करना, त तो बी दाविद ना वंश कसा होवू सकस? आणि गर्दी ना लोक तेनी आनंद मा आयकत होतात. येशु नि आपला प्रचार मा तेस्ले सांग, “मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस पासून सावधान राहा. तेस्ले हई गोष्ट गैरी आवळस कि सार्वजनिक जागा वर लोक तेस्ले लंबा, आणि महाग कपळा घालतांना देखोत आणि तेस्ले हई आवळस कि बजारस्मा लोक तेस्ले आदरताशी नमस्कार करोत. त्या प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर बसान पसंद करतस, आणि मेजवानी मा सन्मान नि जागा बी देखतस. त्या धोका कण विधवास्नी संपती ले ली लेतस, त्या सार्वजनिक जागा वर गैरा टाईम लगून प्रार्थना करतस, कारण कि लोक विचार करतीन कि त्या लोक चांगला शेतस, परमेश्वर निश्चित रूप मा एस्ले जास्त दंड दिन.” येशु मंदिर ना भंडार समोर बठीसन देखी ऱ्हायंता, कि लोक मंदिर ना भंडार मा कोणता प्रकारे पैसा टाकतस आणि कईक मालदार लोकस्नी गैरा सावटा पैसा टाकात. इतला मा एक गरीब विधवा ईसन दोन तांबा ना शिक्का टाकणी, जेस्नी किंमत गैरी कमी होती. तव येशु आपला शिष्यस्ले जोळे बलाईसन तेस्ले सांग; “मी तुमले खरज सांगस, कि मंदिर ना भंडार मा टाकनारस मधून हय गरीब विधवा नि सर्वास तून जास्त टाकेल शे. त्या मालदार शे आणि तेस्नी फक्त तेना मधून काही दियेल शे जेस्नी तेस्ले गरज नई होती, पण हई विधवा गरीब शे आणि येणी ते सर्व काही दिधा जे तेना जोळे होत, येणी तो सर्वा पैसा टाकी दिधा जे ती आपला गरज ना साठे वापरू सकत होती.” जव येशु परमेश्वर ना मंदिर मधून निघी ऱ्हायनता, जो यरूशलेम मा होता, तेना शिष्यस मधून एक नि तेले सांग; गुरुजी, देख, काय भव्य या मंदिर ना ईमारती शेतस, त्या कोणता मोठा दघळ कण बनेल शे. येशु नि तेले सांग, “या मोठी ईमारतीस साठे जे आते तू देखी ऱ्हायना, पण, मी तुले सांगस, शत्रू एक बी दघळ या जागा वर नई सोळाव. त्या सर्वास्ले नाश करामा ईन.” तेना नंतर, तो जैतून ना पहाळ वर गया, आणि परमेश्वर ना मंदिर ना समोर दरी ना त्या पार उतार वर जाईसन बठी ग्या. जव पेत्र, याकोब, योहान, आणि अंद्रिया तेना संगे एकत्र होतात, त तेस्नी तेले विचार. कि आमले सांग कि ह्या गोष्टी कव होतीन? आणि जव ह्या सर्वा गोष्टी होतीन त त्या टाईम ना काय चिन्ह हुईन? येशु तेस्ले सांगाले लागणा, “सावधान राहा कि कोणी तुमले धोका नई देवो.” गैरा लोक मना नाव ना उपयोग करीसन येतीन. त्या सांगतीन, मी ख्रिस्त शे आणि त्या गैरा लोकस्ले तेस्ना वर विश्वास करासाठे धोका देतीन. आणि जव तुमी युध्द आणि युध्दस्ना बारामा खोट्या धमक्या आयकशान, त घाबरज्यात नका: ह्या गोष्टीस्ले पहिले होण शे, पण दुनिया ना अंत लगेच नई होवाव. कारण कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन, जठे तठे भूकंप होतीन, आणि दुष्काळ पळतीन, हवू त्रास पोऱ्या ना जन्मा ना पयले त्रास ना सारखा शे. तुमी स्वता सावधान राहा, कारण कि तुमना शत्रू तुमले स्थानिक महासभास्मा लीजातिन आणि प्रार्थना घरस्मा तुमले फटका मारतीन. कारण कि तुमी मना मांगे चालतस, तुमी राज्यपाल आणि राजास समोर परीक्षण ना साठे उभा करामा येशात. तव तुमी तेस्ना समोर मनी साक्ष देशान. येले सोळीसन संसार ना शेवट ना पयले मना बारामा सुवार्ता सर्वा जाती ना लोकस्ले आयकाळा मा येवाले पायजे. जव त्या तुमले धरावतीन, त पहिले पासून चिंता नका करज्यात, कि आमी काय सांगसुत, योग्य टाईम वर, बस तेच सांगा जे परमेश्वर तुमना दिमाग मा टाकस. कारण कि तुमी तेच शब्द बोलशान जे पवित्र आत्मा तुमले दिन. शब्द तुमना कळून नई येवाव. लोक आपला भावूस आणि बहिणी संगे विश्वासघात करतीन, कारण कि त्या मना मांगे येतस. माय-बाप आपला पोरस संगे असाच करतीन. पोर आपला माय आणि बाप ना विरोध करतीन, आणि तेस्ना माराना कारण बनतीन. कारण कि तुमी मनावर विश्वास करतस, म्हणून सर्वा लोक तुमना व्देष करतीन, पण ज्या लोक मना संगे विश्वास योग्य ऱ्हातीन आणि दुख सरता होता लोंग मनावर विश्वास करत ऱ्हातीन आणि हार नई मानावत, त्या परमेश्वर ना द्वारे वाचाळामा येतीन. एक दिन तुमी श्रापित माणुस ले देखशान, जेना मुळे मंदिर ले सोळामा ईन, हवू त्या जागा वर उभा राहीन जठे तेले उभा ऱ्हावाना काई अधिकार नई शे. सर्वाझन ज्या येले वाचतस, त समजाना प्रयत्न कराले पायजे! जव तो टाईम ईन, ज्या लोक यहूदीया प्रांत मा शे, तेस्नी रक्षा ना साठे, पहाळ कळे पयानि गरज शे. जर तुमी आपला घर ना छत वर शे, त आपली संपत्ती लेवाले घर ना मधमा नका जायज्यात, तुमी पई जावाले पायजे. आणि जो वावरस मा शे, तो आपला कपळा लेवा साठे परत आपला घर नका जायज्यात. हई त्या बायास्ना साठे एक भयानक टाईम राहीन जी गर्भवती शे आणि त्या बायास साठे ज्या पोरस्ले दूत पाजी ऱ्हायनात, तेस्ना साठे पयाना गैरा कठीण राहीन. परमेश्वर नि त्या भयानक टाईम ले धाकला कराना निर्णय लीयेल शे. नईत कोणी बी जित्ता नई ऱ्हावाव. पण तेनी आपला लोकस्ना मुळे, जेस्ले तेनी निवाळेल शे, तो टाईम कमी करी दिन. त्या टाईम वर कदी कोणी तुमले सांगीन; देखा, ख्रिस्त आठे शे, व देखा, तठे शे, त विश्वास नका करज्यात. कारण कि खोटा ख्रिस्त आणि खोटा भविष्यवक्ता येतीन, आणि परमेश्वर नि निवाळेल लोकस्ले फसाळासाठे मोठा चिन्ह आणि चमत्कार करतीन. मी ह्या घटना घळाना पयले ज्या घळनार शे तेना विषय मा सर्वा सांगेल होता, एनासाठे तुमले हुशार ऱ्हावानी गरज शे. त्या दिनस्मा, भयानक दुख ना टाईम सराना नंतर सूर्य आणि चांद दोनी चमकाना बंद करी देतीन. आणि आकाश मधून तारा पळाले लागतीन: आणि आकाश मधल्या शक्तीस्ले हालावामा ईन. त्या टाईम ले लोक मले देखतीन, माणुस ना पोऱ्या पृथ्वी कळे ढगस मा इऱ्हायना. त्या मनी मोठी सामर्थ्य आणि महिमा देखतीन. मी आदन्या दिसन मना दूतस्ले जग मा धाळसू कारण कि त्या मना निवाळेल लोकस्ले मना जोळे लय येतीन त्या तेस्ले सर्वा देशस मधून आणि पृथ्वी ना गैरा दूर जागा वरून त आकाश ना त्या सीमा लोंग तेना निवाळेल लोकस्ले एकत्र करतीन. अंजिर ना झाळतून हवू धळा शिका, जसा तेना डायास्मा फांद्या आणि तेना पान फुटाले लागी जातस त तुमी वयखी लेतस, पाउसाया जोळे शे. ह्याच प्रकारे, जव तुमी ह्या गोष्टी ले होतांना देखतस त तुमी समजी लेवाले पायजे कि या दुनिया ना शेवट नजीक ईजायेल शे. मी तुमले खरज सांगस, आते ऱ्हायनारा गैरा लोक निश्चित रूप मा त्या सर्वा गोष्टी होवाना पयले नई मराव. आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जातीन, पण मनी जे सांगेल शे ते कायम लोंग राहीन. ह्या गोष्टी कोणता दिन आणि कोणता तास ले हुईन हई कोले बी नई माहित, स्वर्ग मधला परमेश्वर ना दूत ले आणि माणुस ना पोऱ्या ले बी नई पण फक्त बाप ले दिन आणि तास माहित शे. देखा, जागेल ऱ्हावा आणि प्रार्थना करत ऱ्हावा, कारण कि जव या गोष्टी होतीन मी परत येसू. एक माणुस लांब प्रवास वर जावाना साठे आपल घर सोळी देस. जावाना पयले, तो आपला दासस्ले ते काम सांगस जे तेस्ले कराले पायजे, आणि तो राखोया ले सांगस, तेले परत येवाना साठे तयार राहा. येनासाठे येशु नि आपला शिष्यस्ले सांग कि, तुमले नई मालूम कि घर ना मालक कवय परत ईन. येणा साठे तुमले देखत ऱ्हायन पळीन. घर ना मालिक संज्याकायले व आधी रात ले व गैरा सक्कायमा व सूर्य निघाना टाईम ले परत येवू सकस. जर तो बिगर जताळान अचानक ईजास, त तेले हई माईत नोको होवाले पायजे कि तुमी जपी ऱ्हायनात. आणि जे मी तुमले सांगस, तेच सर्वास्ले सांगस, मना येवाना साठे तयार राहा. आते यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन, आणि बिगर खमीर नि भाकर ना सन दोन दिन नंतर सुरु होणार होता, आणि मुख्य यहुदी पुजारी, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ह्या गोष्ट नि तपासमा होतात, कि येशु ले कसकाय कपट मा धरीसन मारी टाकुत. पण सांगत होतात कि “आमले सन ना टाईम ले तेले बंदी कराले आणि माराले नोको पायजे कदी अस नई हुई जावो कि लोकस्मा दंगा होवो.” त्या टाईम ले येशु बेथानी नगर मा, शिमोन ना घर मा, जेले कुष्टरोग होता जेवण कराले बठेल होता. एक बाई अलाबास्र दघळ ना बनेल एक कुप्पी लिसन उणी, जेनामा तेल भरेल होता. तेल गैरा माहागा होता, कारण कि हई शुद्ध होत. तिनी त्या कुप्पी ना वरला भाग ले तोळी टाक, कारण कि ती तेले मान देवा साठे येशु ना डोका वर सर्वा तेल टाकी सकोत. पण कईक लोक आपला मन मा रागे भरीसन सांगाले लागनात तिनी या प्रकारे “माहागा तेल ले नाश काब करनी? कारण कि हय सुगंधीत तेल त एक साल नि मजुरी नि किंमत मा ईकी जात आणि पैसा गरीबस्ले वाटाई जाता,” मंग तेस्नी बाई ले धमकाईसन आपला राग दाखाळा. येशु नि सांग, “तिले धमकाळान बंद करी द्या, तुमी तिले त्रास नका द्या. तिनी मनासाठे जे कार्य करेल शे, ते गैरा चांगला शे. गरीब तुमना संगे कायम ऱ्हातस: आणि तुमनी जव ईछ्या हुईन तव तेस्ना संगे चांगल काम करू सकतस; पण मी तुमना संगे कायम नई ऱ्हावाव. ती बाई नि मना मराणा पयले मना डोका वर तेल टाकेल शे, कारण कि मना शरीर ले गाळासाठे तयार करामा येवो. बस हईच ती मनासाठे करू सकस होती. मी तुमले खरज सांगस, सर्वा जग मा जठे बी सुवार्ता ना प्रचार करतीन, त्या हई बी सांगतीन कि बाई नि काय करेल शे, आणि लोक तिले आठवण करतीन.” तव यहूदा इस्कर्योत जो बारा शिष्यस मधला एक होता मुख्य यहुदी पुजारी जोळे ग्या, आणि सांगणा, कि तो तेस्ले येशु ले धराले मदत करीन. त्या हय आयकीसन आनंदित हुईनात आणि तेले पैसा देवाले स्वीकार करा, आणि चांगली संधी झामलाले लागणा कि येशु ले यहुदी अगुवास्ना हात मा धराई देवू सकस. दोन दिन नंतर, बिगर खमीर ना भाकर ना सन ना पहिला दिन, जव तेस्नी सन ना साठे मेंढ्या ले बलिदान करी टाक, येशु ना शिष्यस्नी तेले विचार, “तू आमले कोठे जावानी ईच्छा करस, कि आमी वल्हांडण सन ना जेवण नि तयार करूत कि आपण तेले खाई सकोत?” येशु नि आपला शिष्यस मधून दोन ले हय सांगीसन धाळ कि “यरूशलेम शहर मा जावा आणि एक माणुस पाणी नि माठ उचलेल तुमले भेटीन तेना मांगे चालू लागज्यात. आणि तो ज्या घर मा जाईन त्या घर ना मालक ले सांगज्यात, ‘गुरुजी सांगस कि मनासाठे तयार खोली कोठे शे, जेनामा मी आपला शिष्यस संगे वल्हांडण सन ना जेवण खावू?’ मंग तो तुमले वरनी एक मोठी सजाळेल तयार खोली दाखाळीन, तीच आमना साठे तयार करा.” तव दोन शिष्य निघीसन नगर मा उनात आणि जस तेनी तेस्ले सांगेल होत तसच देख, तेस्नी तठे वल्हांडण सन ना जेवण तयार करणात. जव संज्याकाय हुईनी येशु आपला बारा शिष्यस्ना संगे त्या घर मा उना. आणि जव त्या बठीसन जेवण करी ऱ्हायंतात तव येशु नि सांग; “मी तुमले खरज सांगस कि तुमना मधून एक जो मना संगे जेवण करी ऱ्हायना, मले धराना साठे मना शत्रू ले मदत करीन.” जव तेस्नी हई शब्द आयक, तेस्ले गैरा दुख लागणा, तेस्नी तेले एक नंतर एक प्रश्न विचारू लागनात, “काय तो मी शे?” तेनी तेस्ले सांग “तो बारा शिष्यस मधला एक शे जो मना संगे ताट मा हात टाकस. मी, माणुस ना पोऱ्या मरी जासू कारण कि हई शास्त्रस मा लिखेल शे. पण त्या माणुस ना साठे भयानक शिक्षा राहीन जो मले धराना साठे मदत करीन, हय त्या माणुस साठे चांगल ऱ्हात कि तो पैदाच नई होता.” आणि जव त्या खाईच ऱ्हायंतात त येशु नि भाकर ना तुकळा ली लीधा आणि तेना साठे परमेश्वर ना धन्यवाद करीसन मोळी, आणि आपला शिष्यस्ले दिधा, आणि सांग “ल्या खावा हय मना शरीर शे.” नंतर तेनी द्राक्षरस ना प्याला लिसन परमेश्वर ले धन्यवाद दिधा, आणि आपला शिष्यस्ले दिधा, आणि त्या सर्वास्नी तेना मधून पीनात. आणि तेनी तेस्ले सांग, “या रक्त शी, परमेश्वर लोकस्ना संगे एक नवा करार करस. गैरा लोकस्ना फायदना साठे मना बलिदान करामा ईन तव हई ओतामा ईन.” मी तुमले खरज सांगस, कि “येणा नंतर मी त्या दिन लोंग परत कदीच द्राक्षरस नई पीवाव, जठलोंग कि मी परमेश्वर ना राज्य मा नवीन द्राक्षरस नई पिलेस.” तव येशु आणि तेना शिष्यस्नी परमेश्वर ना भजन करणात, आणि यरूशलेम शहर मधून बाहेर चालना ग्यात, आणि जैतून ना पहाळ वर चालना ग्यात जो जोळेच होता. जव त्या पहाळ कळे जात होतात, येशु नि तेस्ले सांग, ज्या प्रकारे मना बारामा परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, “मी तेले मारी देसू जो मना लोकस्नी मेंडपाळ ना सारखा देखभाल करस, आणि त्या मेंढ्या सारखा दानाफान हुई जातीन. आणि तुमी सर्वा मले सोळीसन पयी जाशान,” मोत मधून जित्ता होवा नंतर मी तुमना तून पयले गालील जिल्हा मा जासू आणि तठे तुमले भेटसू. पेत्र नि येशु ले सांग, “तुले सर्वा सोळीसन पयी जातीन पण मी तुले सोळीसन नई पयाव.” येशु नि तेले सांग; “मी तुले खरज सांगस कि आजच ह्याच रात ले कोंबळा ना दोन सावा बांग देवाना पहिले तू तीन सावा सांगशीन कि तू मले नई ओयखस.” पण तेनी आखो बी जोर लाईसन सांग “कदी मले तुना संगे मरण बी पळीन, तरी बी, मी तुले कदीच नई सांगाव कि मी तुले नई ओयखस,” ह्या प्रकारे आणि सर्वास्नी बी सांग. जव येशु आणि तेना शिष्य गेथशेमाने नाव ना बगीचा मा पोहचनात, त तेनी आपला शिष्यस्ले सांगणा, “आठेच बसा जठलोंग मी जाईसन परमेश्वर कळे प्रार्थना करस.” आणि येशु नि पेत्र आणि याकोब आणि योहान ले बगीचा मा थोळा पुढे आपला संगे लीग्या, आणि तो गैरा दुखी आणि व्याकुल होवाले लागणा. आणि तेस्ले सांग, “मना मन गैरा दुखी शे, आणि मले अस वाटी ऱ्हायन कि मी मरा वर शे. तुमी आठेच थांबा आणि जागेल ऱ्हावा.” आणि येशु थोळाच पुळे वसरना. आणि तेनी गुळघा टेका आणि आपला तोंड जमीन कळे वाकीसन परमेश्वर कळे प्रार्थना कराले लागणा, मना बाप, जर तुनी ईच्छा मा हई होवू सकस कि तू त्या दुख ले जो मनावर येणार शे तेले रोकी ले. आणि सांग, “हे अब्बा हे बाप तुनाशी सगळ काही हुई सकस; मले ह्या पिळा पासून वाचळ, पण जस मले पाहिजे तस नई पण जशी तुनी ईच्छा शे तेच होवो.” तव येशु परत उना आणि तीन शिष्यस्ले जपेल देखीसन शिमोन पेत्र ले सांग, “शिमोन, तू जपी ऱ्हायना? काय तू एक तास बी नई जागी सकना? जागत आणि प्रार्थना करत राहा कि तुमी पाप कळे आकर्षित नई होवोत, आत्मा तयार शे, पण शरीर कमजोर शे.” आणि येशु परत चालना ग्या, आणि ती गोष्ट सांगीसन प्रार्थना करी. आणि परत ईसन तेस्ले जपेल देखा कारण कि त्या जप नि धुंद मा होतात, आणि नई जानत होतात कि तेले काय उत्तर दिवूत जव तेनी तेस्ले उठाळा. नंतर तिसरा सावा ईसन तेस्ले सांग, “आते जपत राहा आणि आराम करा, गैरा हुईग्या, आयका, टाईम ईजायेल शे, जव कोणी मले, माणुस ना पोऱ्या ले पापी लोकस्ना हात मा बंदी बनाईसन सोपी दिन. उठा जावूत, देखा जो मले बंदी बनावाले मदत करस, जोळे ईऱ्हायना शे.” जव येशु हय सांगीच ऱ्हायनता कि यहूदा जो बारा शिष्यस मधला एक होता, तठे उना. तो एक मोठी गर्दी ना संगे एयेल होता जो तलवार आणि सोठा आपला संगे लिसन एयेल होतात. या लोकस्ले मुख्य यहुदी पुजारी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि पूर्वज लोकस द्वारे धाळायेल होता. आणि येशु ले बंदी बनावाले मदत करणारा, यहूदा नि या गर्दी ले हई पयलेच सांगी दियेल होता, कि जेले मी सन्मानपूर्वक छाती ले लावसू तोच शे, तेले धरीसन सांबाळीसन ली जायज्यात. यहूदा उना आणि लगेच येशु ना जोळे जाईसन सांग; “गुरुजी!” आणि तेना गैरा चुम्मन लीधा. तव तेस्नी तेनावर हात टाकीसन तेले बंदी करी लीधा. तेस्ना मधून ज्या जोळे उभा होतात एक नि तलवार काळीसन महा यहुदी पुजारी ना दास वर चालाई आणि तेना कान कापी टाका. येशु नि त्या गर्दी ले जी तेले धराले एयेल होती सांग, काय तुमी डाखू समजीसन मले बंदी करासाठे तलवारी आणि सोठा लिसन निघेल शेतस? मी दररोज परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा तुमना मधमा ऱ्हाईसन प्रचार करत होता आणि तव तुमनी मले बंदी नई करणात पण हय एनासाठे हुयेल शे कि परमेश्वर ना पुस्तक नि गोष्टी पुरी होवोत. तव सर्वा शिष्य तेले सोळीसन पईग्यात. आणि एक जवान आपली निरवस्त्र शरीर वर चादर पांघरीसन तेना मांगे चालू लागणा; आणि लोकस्नी तेले धरा. पण तो चादर सोळीसन नागा पई ग्या. नंतर त्या येशु ले महा यहुदी पुजारी ना घर कळे लीग्यात; आणि सर्वा मुख्य यहुदी पुजारी लोक आणि पूर्वज लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक तेना कळे एकत्र हुई ग्यात. पेत्र दूर दूर तून तेना मांगे मांगे महा यहुदी पुजारी ना घर ना आंगण ना मधमा लगून ग्या, आणि पहारेकरी बरोबर बठीसन आंग सेकाले लागणा. मुख्य यहुदी पुजारी लोक आणि सर्वा यहुदी महासभा ना अन्य सदस्य येशु ले मारी टाकासाठे तेना विरुद्ध मा साक्षी झामलत होतात पण नई भेटणा. कारण कि गैराच तेना विरुद्ध मा खोटी साक्ष दिऱ्हायंतात पण दुसरा साक्षीदारस्नि काय सांग त्या तेस्ना कण सहमत नई होतात. तव काही लोक उठीसन तेनावर हय खोटी साक्ष दिधी. कि “आमी येले हय सांगतांना आयकेल शे, कि मी मंदिर ले पाळी टाकासू, ज्या लोकस्नी बनायेल शे, आणि तीन दिन मा दुसरा मंदिर बनावसू.” एनावर बी त्या दुसरा साक्षीदार कण सहमत नई होतात. तव महा यहुदी पुजारी सभा ना समोर उभा ऱ्हायसन येशु ले विचार, कि “तू स्वता ले वाचाळा साठे काय बी काब सांगत नई? ह्या लोक तुना विरुद्ध मा काय साक्षी देतस?” पण येशु शांत ऱ्हायना, आणि काही उत्तर नई दिना: महा यहुदी पुजारी नि तेले परत विचार, “काय तू परमधन्य परमेश्वर ना पोऱ्या ख्रिस्त शे, जेनी आमी उपासना करतस?” येशु नि सांग; “हा मी शे: आणि तुमी मले देखशात, माणुस ना पोऱ्या ले सर्व सामर्थ्य ना जागा वर परमेश्वर ना उजवी कळे बठेल आणि आकाश मा ढगस्ना मजारमा येतांना देखशात.” तव महा यहुदी पुजारी नि येशु नि जी गोष्ट सांगी ती आयकना, त तेनी आपला कपळा फाळा कारण कि तो गैरा रागे भरेल होता, आणि तेनी सांग, “आते आमले साक्षीस्नी आखो काय गरज शे. तुमनी तेले परमेश्वर नि निंदा करतांना आयकेल शे. तुमना काय निर्णय शे?” तठे जीतला सभा ना लोक होतात, त्या या गोष्ट शी सहमत होतात, कि येशु दोषी शे, आणि तो मरणदंड ना योग्य शे. तव कोणी तेनावर थुकाले, आणि कोणी तेना तोंड झाकाले आणि तेले बुक्का माराले लागनात, आणि तेनी थट्टा करीसन सांगाले लागनात कि तू भविष्यवक्ता अशीन त “भविष्यवाणी कर,” आणि आमले सांग कि तुले कोणी मार, आणि पहारेकरस्नि तेले धरीसन थापा मारणात. जव पेत्र आंगण मा शेकोटी ना समोर होता, त महा यहुदी पुजारी नि दासीस मधून एक तठे उणी. आणि पेत्र ले आंग सेकता देखीसन तेनावर टपिसन देखनी, आणि सांगाले लागणी “तू बी त्या नासरेथकर येशु ना संगे होता.” तो नकारी गया, आणि सांग कि “मी त नई वयखत आणि नई समजत कि तू काय सांगीरायनी,” तव तो तठून आंगण ना दरवाजा कळे चालना ग्या; आणि कोंबळा नि बांग दिधी. ती दासी तेले देखीसन तेस्ले ज्या जोळे उभा होतात परत सांगाले लागणी, “हवू माणुस येशु ना शिष्यस मधून एक शे.” पण तो परत एक सावा नकारी ग्या आणि सांग, मी नई शे, आणि थोळा टाईम मा तेस्नी ज्या जोळे उभा होतात परत पेत्र ले सांग; “तू ज्या प्रकारे बोलस तेनावर समजस कि तू गालील जिल्हा ना शे, त्यामुळे निश्चित तू येशु ना शिष्यस मधून एक शे.” तव पेत्र नि सांग मी शेप्पत खास कि मी खरज सांगी ऱ्हायनु. “कि मी त्या माणुस ले जेण्या तुमी गोष्टी करतस नई वयखत. कदी मी खरज नई सांगत होवाव त परमेश्वर मले दंड देवो” तव लगेच दुसऱ्यांदा कोंबळा नि बांग दिधा, पेत्र ले ती गोष्ट जी येशु नि तेले सांगेल होती आठवण उणी कि “कोंबळा ना दोन सावा बांग देवाना पहिले तू तीन सावा मना नकार करशीन.” ह्या गोष्टी वर पेत्र आपला दुख ले काबू नई करू सकना आणि गैरा रळाले लागणा. सकाय मा गैरा लवकर लगेच मुख्य यहुदी पुजारी लोक, पूर्वज लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि, आखो सर्वा महासभा ना सदस्यनि निर्णय करीसन येशु ले बांधाळ, आणि न्याय करासाठे यहूदा क्षेत्र ना रोमी राज्यपाल, पिलात ना घर मा ली ग्यात. आणि रोमी राज्यपाल नि येशु ले विचार काय तू यहुदी लोकस्ना राजा शे? तेनी तेले उत्तर दिधा, तू सांगस तोच मी शे. आणि मुख्य यहुदी पुजारी लोक तेना विरोध मा गैरा गोष्टीस्ना आरोप लाई ऱ्हायंतात. पिलात रोमी राज्यपाल नि तेले परत विचार काय तू काही उत्तर नई देत, देख ह्या तुनावर कितल्या गोष्टीस्ना आरोप लावतस? येशु शांत ऱ्हायना, आठ लगून कि पिलात ले गैरा आश्चर्य हुयना. दर साल वल्हांडण ना सन ना टाईम ले, पिलात नेहमी कोणी एक कैदी ले सोळत होता, जो लोकस्ले पायजे कि तो तेले सोळी देवो. आणि त्या टाईम ले बरब्बा नाव ना एक माणुस होता, जो अन्य क्रांतीकारीस्ना संगे जेल मा होता, जेस्नी रोमी सरकार ना विरुद्ध मा अपराध मा काही लोकस्ले मारी टाकेल होता. आणि गर्दी पिलात ना जोळे उणी आणि तेले एक कैदी ले सोळाना साठे सांगू लागनात जसा तो नेहमी करत होता. पिलात नि तेस्ले हय उत्तर दिधा, काय तुमनी ईछ्या शे कि मी तुमना साठे यहुदी लोकस्ना राजा ले सोळी दिवू? कारण कि तेले माहित होत कि मुख्य यहुदी पुजारी लोकस्नी येशु ले हेवा कण धरेल होतात. पण मुख्य यहुदी पुजारीस्नी गर्दी प्रभावित करणात कि येशु ना बदला मा बरब्बा ले सोळाना साठे पिलात ले विनंती करोत. हाय आयकीसन पिलात नि तेस्नाशी परत विचार; त जेले तुमी यहुदी लोकस्ना राजा सांगतस तेले मी काय करू? गर्दी परत आराया मारणी, तेले क्रूस वर मारी टाका. पिलात नि तेस्ले सांग, काबर तेनी काय वाईट करेल शे? पण गर्दी आखो आराया मारनात, तेले क्रूस वर मारी टाका. पिलात नि गर्दी ले खुश करानी ईच्छा होती, म्हणून तेनी बरब्बा ले सोळी दिधा, नंतर तेनी आपला शिपाईस्ले येशु ले फटका मारानी आणि क्रूस वर चळावानी आदन्या दिधी. जव पिलात ना शिपाई येशु ले राज्यपाल ना महल ना आंगण मा ली ग्यात. आणि मोठा शिपाईदल ले बलाई लयनात. तेस्नी तेले जांभा झगा घालनात जसा तो एक राजा शे असा दाखाळा साठे आणि तेना मजाक उळावू लागनात, तेस्नी काटेरी काळ्या ना एक मुकुट बी बनावनात आणि तेले राजा बनाना मजाक करासाठे हवू मुकुट ले तेना डोका वर ठेवनात. आणि हय सांगीसन तेले नमस्कार कराले लागनात कि ओ यहुदी लोकस्ना राजा नमस्कार. त्या घळी-घळी तेना डोका वर वेतक नि काठी कण मारत होतात, तेस्नी तेना अपमान करासाठे गैरा सावा तेनावर थुकात, आणि त्या तेले सन्मान देवाना साठे मजाक करतांना तेना समोर वाकू लागनात. आणि जव त्या तेनी निंदा करी लीनात त तेना वरून जांभा झगा काळीसन तेनाच कपळा घालात; आणि तव तेले क्रूस वर चळावा साठे शहर ना बाहेर ली ग्यात. जव त्या शहर ना बाहेर जात होतात, तव शिमोन नाव ना एक माणुस ग्रामीण भाग मधून यरूशलेम शहर मा येत होता. तो कुरेने शहर ना होता, आणि तो सिकंदर आणि रुफ ना बाप होता, शिपाईस्नी तेले आदन्या दिधा कि तो क्रूस ले उचलीसन त्या जागा लोंग लीजावो जठे त्या येशु ले क्रूस वर चळावतीन. शिपाई येशु ले गुलगुथा नाव ना जागा वर जेना अरामी भाषा मा अर्थ “खोपडी नि जागा” शे लयनात. तव शिपाईस्नी येशु ले गंधरस नाव नि एक कडू औषध टाकेल द्राक्षरस पेवाले दिधात कारण कि ते तेना त्रास ले अनुभव नको करामा मदत करोत. पण तेनी पेवाले नकारना. तेस्नी तेले क्रूस वर चळाव, कोण कोणता कपळा लेवो एनासाठे तेस्नी चिठ्या टाकनात आणि तेना कपळा वाटी लीधात. सकाय ना नऊ वाजेल होता, जव तेस्नी येशु ले क्रूस वर चळाव. शिपाईस्नी येशु ना डोका ना वरे एक फळी लायी टाकी. तेनामा तेले क्रूस वर चाळावना कारण दियेल होत आणि तेनामा हई शब्द लिखेल होत, “यहुदी लोकस्ना राजा.” तेस्नी तेना संगे दोन लुटारुस्ले बी क्रूस वर चळाव एक तेना उजवी कळे आणि एक तेना डाखोऱ्या कळे. ह्या प्रकारे पवित्र शास्त्र खरा हुईग्या जे ख्रिस्त ना बारामा सांगस, “तेले एक दोषी सारखा मानामा ईन.” लोक ज्या रस्ता मा जाई ऱ्हायंतात येशु ना बारामा भयानक गोष्टी करी ऱ्हायंतात, तेस्नी आपला डोका हालावात आणि आराया मारनात, हा! त तू तोच शे जेनी दावा करेल होता, कि तू मंदिर पाळी सकस आणि तीन दिन मा परत बांधी सकशी. स्वता ले वाचाळीले आणि क्रूस वरून खाले उतरी ये. याच प्रकारे मुख्य यहुदी पुजारी बी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना संगे, आपस मा थट्टाकण सांगत होतात; कि एनी दुसरास्ले वाचाळ आणि स्वता ले नई वाचाळी सकत. हवू माणुस जो इस्त्राएल देश ना ख्रिस्त आणि राजा बनाना दावा करस, आते क्रूस वरून उतरी ये, कि आमी देखुत आणि विश्वास करी सकोत कि तो आमना राजा शे, आणि त्या दोन गुन्हेगारस्नि बी येशु ले कठोर गोष्टी सांगी. आणि दुफार ना टाईम ले सर्वा देश मा तीन तास साठे आंधारा पळी ग्या. तीन वाजाना जवळपास येशु नि मोठा शब्द मा आराया मारीसन एलोई-एलोई लमा सबकथनी? जेना अर्थ शे; मना परमेश्वर मना परमेश्वर तुनी मले काब सोळी टाका? त्या लोकस मधून कईक नि त्या तेना जोळे उभा होतात, तेले आयक पण तेस्नी तेले समज आणि एक दुसराले सांग, “आयका, तो भविष्यवक्ता एलीया (स्वर्ग मधून) ले आपली मदत साठे बलावी ऱ्हायना.” त्या लोकस मधून एक माणुस पयीसन ग्या, एक स्पंज लीना, आणि येले थोळासा आंबट द्राक्षरस मा वल्ला करना. तेनी तेले एक काठी वर बांध आणि तेले येशु ना तोंड जोळे भिळाव कारण कि तो तेना मधून काही द्राक्षरस पी लेवोत, तेनी सांग, “थांबा आणि कायी नका करा. आमी देखुत कि काय एलीया भविष्यवक्ता ईन आणि तेले क्रूस वरून मुक्त करीन कि नई.” तव येशु नि मोठा शब्द मा वरळीसन मरी ग्या. आणि तो जाळा परदा जो परमेश्वर ना मंदिर मा होता, जो सर्वास्ले परमेश्वर नि संगतीमा जावाले रोकत होता, वरून त खाले लगून दोन तुकळा मा फाटी ग्या. जो सेनापती येशु समोर उभा होता जव तेना वरदान आयक आणि देख कि तो कसा मरी ग्या, तेनी सांग, “एनामा काही शक नई शे कि हवू माणुस परमेश्वर ना पोऱ्या होता.” कईक बाया बी दुरून देखी ऱ्हायंतात बायास्ना झुंड मा मरिया बी होती जी मग्दालीया नाव ना शहर नि होती, आणि सलोमी आणि मरिया जो धाकला याकोब आणि योसेस नि माय होती. जव येशु गालील जिल्हा मा चारी बाजू प्रवास करेल होता, त ह्या तिनी बायास्नी तेना शिष्यस्ना रूप मा तेना मांगे चालू लागनात आणि तेले जी बी गरज होती, तेले पूर्ण करत होती. कईक दुसऱ्या बाया बी गलील मा तेना संगे-संगे होत्या आणि तेना संगे यरूशलेम शहर एयेल होत्या. त्या बी तेले दुरून देखत होत्या. जव पिलात नि आयक कि येशु पयलेच मरी जायेल शे, त तेले विश्वास नई हुयना, आणि तेनी सेनापती ले बलाईसन विचार, कि काय येशु ले मराले गैरा टाईम हुईग्या? जव सेनापती कळून हाल माहित करी लीधा, तेनी योसेफ ले येशु ना प्रेत लेवानी परवानगी दि टाकी. तव तेनी एक माहाग धोतर ईकत लीधी, तेनी येशु नि प्रेत ले क्रूस वरून खाले उतारीसन, आणि तेले महाग धोतर मा गुंडाळी लीधा आणि तेले एक गाळानी गुफा मा ठीई दिधा, मंग तेनी एक मोठा गोलदघळ ढकला आणि तेले गाळानी गुफा ना उघाळाना जागा ना समोर तेले बंद कराना साठे ढकली सन ठीई दिधा. आणि मरिया जी मग्दालीया नाव ना नगर नि होती, याकोब आणि योसेस नि माय मरिया देखीरायन्ति कि तेले कोणती कबर मा ठीयेल शे. दुसरी संज्याकाय जव आराम ना दिन चालना ग्यात मरिया मग्दालीया नगर नि होती आणि याकोब नि माय मरिया आणि सलोमी नि सुगंधीत तेल विकत लीधा कि ईसन येशु ना शरीर वर लावोत. (यहुदीस्ना रिती नुसार) परत रविवार ना गैरा सक्कायमा त्या बाया गाळानी गुफा कळे ग्यात आणि तठे सूर्य निघाना नंतर पोहचनात. आणि एराएर ले सांगत होत्या कि आमना साठे कबर ना दरवाजा वरून दघळ कोण लोटीन? पण जव तेस्नी कबर कळे देखनात, तेस्नी ध्यान दिनात कि मोठा दघळ ले जो कबर ना मधमा जावाना जागा वर होता लोटेल शे. जव त्या बाया कबर वर पोहचनात आणि मधमा ग्यात तेस्नी एक जवान ले चमकणारा धव्या कपळा घालेल उजवा कळे बठेल देखनात आणि त्या गैरा चकित हुईनात. जवान माणुस नि बायास्ले सांग, “घाबरू नका तुमी येशु नासरेथकर ले जो क्रूस वर चळावामा एयेल होता झामली ऱ्हायनात. तो जित्ता शे, आठे नई शे, देखा, हय तीच जागा शे जठे तेस्नी तेले ठीयेल होत.” आते तुमी जावा, आणि तेना शिष्यस्ले आणि पेत्र ले बी सांगा, जो तेना शिष्यस मधला एक शे, कि येशु तुमना तून पहिले गालील जिल्हा मा जाईन, आणि तुमी तठेच तेले देखश्यात, जस तेनी तुमले पयले सांगेल होता. जव तेस्नी हई आयक त्या गाळानी गुफा मधून बाहेर निघीसन पईग्यात, कारण कि त्या थरकाप आणि धाक तेस्ना मा घुशी जायेल होती. रस्ता मा तेस्नी कोलेच काही नई सांग ज्या गोष्टी त्या जवान माणुस नि सांगेल होता कारण कि त्या घाबरत होत्या. रविवार ना दिन सक्कायमा येशु मरेल मधून परत जित्ता हुयना, पहिली व्यक्ती जीना समोर जो प्रगट हुयना ती मग्दालीया नि रायणारी मरिया होती. पयले जेना मधून येशु नि सात दुष्ट आत्मा काळेल होता. मरिया जायसन हई बातमी येशु ना शिष्यस्ले सांगणी. तव तेनी तेस्ले देख, येशु ना मोत मुळे त्या दुखी होतात आणि रळी ऱ्हायंतात. पण जव तेस्नी तीना पासून आयक, येशु परत जित्ता शे आणि तिनी तेले देखेल शे, त त्या तीनावर विश्वास कराले नकारी दिनात. त्या दिन ना आखरी ले येशु दोन शिष्यस्ले दिखना जव त्या यरूशलेम मधून आपला गाव कळे जाई ऱ्हायंतात. पण तेस्नी तेले जल्दी नई ओयख कारण कि तो गैरा आलग दिखत होता. जव तेस्नी तेले ओयखी लीधा, त्या दोन शिष्य परत यरूशलेम मा ग्यात. तेस्नी तेना दुसरा शिष्यस्ले सांगणात कि काय होयेल होत, पण तेस्नी विश्वास नई करा. तेना नंतर येशु अकरा शिष्यस्ले जव त्या जेवण कराले बठेल होतात दिखना. आणि तेस्ना अविश्वास आणि मन नि कठोरता वर धमकावणा, कारण कि ज्या लोक तेना जित्ता हुईजावा नंतर तेले देखेल होतात, एस्नी सांगणारा लोकस वर विश्वास नई कर होत. तव येशु नि तेस्ले सांग, “तुमी जग ना सर्वा जागा मा जाईसन सर्वा लोकस्ले सुवार्ता ना प्रचार करा.” जो मनावर विश्वास करीन, आणि बाप्तिस्मा लीन हई दाखाळा साठे कि तो मनावर विश्वास करस, तेले परमेश्वर पाप ना दंड पासून वाचळीन, पण ज्या सर्वा लोक मना विश्वास नई करावत, तेस्ना पाप ना साठे परमेश्वर तेस्ले दंड दिन. ज्या लोक मनावर विश्वास करतस, त्या लोक चिन्ह चमत्कार करू सकतीन, कि त्या मना नाव तून दुष्ट आत्मास्ले काळतीन, आणि मी तेस्ले नवी-नवी भाषा बोलाले लावीन. मी तेस्ले समायसू, जर त्या विषारी सापस्ले उचली लेतीन, आणि कदी त्या जहर बी पिलेवोत तरी बी, मी त्या पासून तेस्ना काही नुकसान नई होवू देवाव. त्या आजारीस वर हात ठेवतीन, आणि मना नाव मुळे, आजारी लोक बरा हुई जातीन. प्रभु येशु शिष्यस्ना संगे या गोष्टी सांगाणा नंतर, परमेश्वर तेले स्वर्गवर उचली लीधा, आणि तो परमेश्वर ना बाजुमा बठी ग्या. नंतर शिष्यस्नी लोकस्ले सुवार्ता ना प्रचार करासाठे सर्वा जागा वर निघनात. प्रभु येशु तेस्ले सामर्थ्य दिना, आणि त्या जे चिन्ह चमत्कार ना काम ना द्वारे तेस्नी सुवार्ता खरी शे, अस सिद्ध करणात. असच होवुदे. प्रिय थियफिला ना साठे, गैरा लोकस्नी त्या गोष्टीस्ले ज्या आमना मधमा हुयेल शे, एक वृतांत लिखाना प्रयत्न करेल शे. तेस्नी तेच लिख जे लोकस्नी आमले सांगेल होतात. जेस्नी तेले (आपला डोया कण) येशु नि सेवकाई ले सुरुवात पासून देखेल होतात, आणि ज्या नंतर परमेश्वर ना वचन ना सेवक बनी ग्यात. एनासाठे मले बी हय चांगल माहिती पळण, कि त्या सर्वा घटनास्ना पुरा हाल पहिले पासून ठीक-ठीक तपास करेल शे, तेस्ले तुना साठे एक कळून क्रमणुसार लिखू. मी हय एनासाठे करी ऱ्हायनु, कारण कि तुले प्रत्येक त्या गोष्ट नि निश्चितता माहित पळो, जी लोकस्ना द्वारे तुले सांगामा एयेल शे. जव हेरोद राजा यहूदीया प्रांत वर राज्य करी ऱ्हायंता, अबिया पुजारी ना गट मा जखऱ्या नाव ना एक यहुदी पुजारी होता, आणि तेनी बायको इस्राएल देश ना पहिला यहुदी पुजारी अहरोन ना वंश मधली होती, तेना नाव अलीशिबा होत. परमेश्वर ना समोर त्या दोनी धर्मी होतात, कारण कि त्या पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीस्ले मानेल होतात, जेस्नी आदन्या परमेश्वर नि दियेल होती. पण तेस्ना पोर-सोर नई होतात, कारण कि अलीशिबा वांझ होती, आणि त्या दोनी धल्ला होतात. एक दिन जव जखऱ्या ना पुजारीस्ना गट यरूशलेम शहर ना मंदिर मा आपला काम करत होता, आणि जखऱ्या परमेश्वर नि उपस्थिती मा यहुदी पुजारी ना रूप मा सेवा करत होता. यहुदी पुजारीस्ना रिती प्रमाणे, तेले वेदी वर धूप चेटाळा साठे चिठ्ठी टाकाना द्वारे निवाळेल होत. एनासाठे तो प्रभु ना मंदिर मा ग्या. आणि धूप पेटाळा ना टाईम लोकस्नी सगळी मंडळी मंदिर ना आंगण मा प्रार्थना करी ऱ्हायंती. अचानक एक परमेश्वर ना दूत धूप नि वेदी ना उजवी कळे उभा ऱ्हायेल दिखना. आणि जखऱ्या देखीसन बिचकी ग्या, आणि तो गैरा भ्याई ग्या. पण परमेश्वर ना दूत नि तेले सांग जखऱ्या भिवू नको कारण कि परमेश्वर नि तुनी प्रार्थना आयकी लीयेल शे, आणि तुनी बायको अलीशिबा तुना साठे एक पोऱ्या ले जन्म दिन, आणि तू तेना नाव योहान ठेवजो. तुले आनंद आणि उल्लास हुईन. गैरा लोक तेना जन्म ना मुळे खुश होतीन. कारण कि तो प्रभु ना समोर महान हुईन, तो नईत द्राक्षरस पिन आणि नईत कदी मद्य पिवाव. तो आपली माय ना गर्भ मधूनच पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुई जाईन. आणि तो इस्त्राएल देश ना गैरा लोकस्ले तेस्ना प्रभु परमेश्वर ना जोळे परत लईन. तो एलीया भविष्यवक्ता ना सारखा आत्मा आणि सामर्थ्य कण परिपूर्ण हुईसन, प्रभु ना रस्ता तयार करीन, कि बापस्ना मन पोरस कळे फिराई देवो, आणि तो आदन्या नई मानणार लोकस्ले परमेश्वर ना ज्ञान ले स्वीकार कराले लावीन, आणि प्रभु साठे एक योग्य प्रजा तयार करो. जखऱ्या नि परमेश्वर ना दूत ले विचार, हय मी कस मानी लेवू कि आमना संगे अस हुईन? कारण कि मी त धल्ला शे, आणि मनी बायको बी धल्ली हुई जायेल शे. परमेश्वर ना दूत नि तेले उत्तर दिधा, कि मी गब्रीएल शे, आणि मी परमेश्वर ना समोर उभा ऱ्हास, आणि मले तुना संगे गोष्ट कराले आणि तुले हय सुवार्ता आयकाळा साठे धाळायेल शे. कारण कि तुनी मना गोष्टीस्वर विश्वास नई कर, ज्या आपला टाईम वर पुरा होतीन, आणि जठ लगून बाळ पैदा नई होवाव तठ लगून तू पूर्णपणे बोली नई सकाव. आणि परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा लोक जखऱ्या नि वाट देखी ऱ्हायंतात, आणि आच्चर्य कराले लागनात, कि तेले परमेश्वर ना मंदिर मा इतला टाईम काब लागी ऱ्हायना? जव तो बाहेर उना त तेस्नाशी बोलू नई सकना, त त्या समजी ग्यात कि तेले परमेश्वर ना मंदिर मा काही दर्शन भेटेल शे, आणि तो तेस्ले इशारा देत ऱ्हायना आणि मुका ऱ्हाय ग्या. जव परमेश्वर ना मंदिर मा एक यहुदी पुजारी ना रूप मा तेनी सेवा ना दिन पुरा हुईनात, त तो यरूशलेम शहर मधून आपला घर चालना ग्या. काही दिन नंतर तेनी बायको अलीशिबा गर्भवती हुईनी, आणि पाच महिना लगून ती स्वता ले लोकस्नी नजर कण दपाळी ठेव कारण कि ती गर्भवती होती. आणि तिनी हय गोष्ट स्वता ले सांग, “माणसस्मा मना अपमान दूर करासाठे, प्रभु नि मनावर दया करेल शे.” जव अलीशिबा साहा महिना नि गर्भवती हुईगी, त परमेश्वर कळून गब्रीएल नाव ना परमेश्वर ना दूत गालील जिल्हा ना नासरेथ नगर मा एक कुवारी कळे धाळामा उना. जेनी मांगणी योसेफ नाव ना राजा दाविद ना वंश मधला एक पुरुष संगे हुयेल होती, त्या कुवारी ना नाव मरिया होत. आणि दूत नि तीना जोळे मधमा ईसन सांग, “आनंद आणि विजय तुनी हो, परमेश्वर नि तुले गैरा आशीर्वाद दियेल शे, प्रभु तुना संगे शे. तू सर्वा बायास्मा धन्य शे.” जव मरिया तेले देख ती गैरी घाबरी गई, आणि विचार कराले लागणी कि ह्या अभिनंदन ना अर्थ काय शे? परमेश्वर ना दूत नि तिले सांग मरिया, घाबरू नको कारण कि परमेश्वर नि कृपा तुनावर हुयेल शे. आणि आयक, तू गर्भवती होशीन, आणि तू एक पोऱ्या ले जन्म देशीन, तू तेना नाव “येशु” ठेवजो. तो महान हुईन, आणि परात्पर परमेश्वर ना पोऱ्या सांगाईन, आणि परमेश्वर तेले तेना पूर्वज राजा दाविद सारखा राजा बनावीन. आणि तो याकोब ना वंश वर युगानयुग राज्य करीन, आणि तो कायम ना साठे राजा ना रूप मा राज्य करीन. मरिया नि परमेश्वर ना दूत ले सांग, “हय कसकाय हुईन? मी एक कुवारी शे.” परमेश्वर ना दूत नि तेले उत्तर दिधा, कि “पवित्र आत्मा तुनावर उतरीन आणि परात्पर परमेश्वर नि सामर्थ्य तुनावर सावली करीन एनासाठे तो बाळ जेले तू जन्म देणार शे, तो पवित्र झन परमेश्वर ना पोऱ्या सांगाईन. आणि आयक, तुनी नातेवाईक अलीशिबा बी माथारापना मा गर्भवती शे, जो वांझ सांगावत होती. हवू तीना साहावा महिना शे. कारण कि परमेश्वर ना साठे काहीच अशक्य नई शे.” मरिया नि सांग, आयक, मी परमेश्वर नि दासी शे, जस तुनी सांगेल शे, तसच मना संगे होवो, तव परमेश्वर ना दूत तीना जोळून चालना ग्या. जस अलीशिबा नि मरिया ले नमस्कार आयक, तसाच बाळ अलीशिबा ना पोट मा उळी मरना, आणि अलीशिबा पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईगी. आणि अलीशिबा नि गैरा जोरमा सांग, तू सर्वा स्त्रीयास्मा धन्य शे, आणि ते बाळ जेले तू जन्म देशीन धन्य शे. तुले आठे देखीसन, स्वता ले सन्मानित वाटी ऱ्हायन, कि मना प्रभु नि माय मले भेटाले एयेल शे. आणि आयक, जशी मी तुना नमस्कार आयकनु, तसाच बाळ मना पोट मा आनंद कण उळी मारना. तू धन्य शे, कारण कि तुनी विश्वास कर कि प्रभु नि ज्या गोष्टी तुले सांगेल शे, तो तेस्ले पुरा करीन. तव मरिया नि सांग, मी परमेश्वर नि स्तुती करस. आणि मी, मना तारण करणार परमेश्वर कण आनंदित शे. कारण कि मी तेनी दासी, दैन्य अवस्था वर नजर टाकेल शे, एनासाठे देखा, आते पासून सर्वा युग युग ना लोक मले धन्य सांगतीन. कारण कि त्या सर्वशक्तिमान परमेश्वर नि मनासाठे मोठा मोठा काम करेल शे, आणि तेना नाव पवित्र शे. आणि तेनी दया तेले भ्याणारा लोकस्वर, पिळीन-पिळी लगून बनेल ऱ्हास. तेनी आपली शक्ती कण महान कार्य करेल शेतस, आणि तेनी सर्वा घमंडीस्ले हाराई टाकेल शे. तेनी शाषकस्ले सिंहासन वरून काळी टाकेल शे, आणि नम्र लोकस्ना सन्मान करेल शे. परमेश्वर नि भूख्यास्ले चांगला वस्तूसकण तृप्त कर, आणि मालदारस्ले खाली हात काळी टाक. तेनी आमना पूर्वजस संगे करेल आपला करार ले आठवण कर, आणि आपला इस्त्राएल देश ना लोकस्नी मदत कराले एयेल शे. तेनी अब्राहाम ले आणि तेना सर्वा वंशज वर कायम ना साठे दया दाखाळाले आठवण करेल शे. मरिया जवळ-पास तीन महिना अलीशिबा संगे ऱ्हायसन आपला घर परत चालनी गई. तव अलीशिबा ना प्रसव ना टाईम पुरा हुईना, आणि तिनी एक बाळ ले जन्म दिधी. तीना शेजारी आणि कुटुंबिस्नि हय आयकीसन कि प्रभु नि तीनावर मोठी दया करेल शे, तीना संगे आनंदित हुईनात. आणि अस हुईन कि पैदा होवाना आठवा दिन ले त्या पोऱ्या ना सुंता कराले उनात, आणि तेना नाव तेना बाप ना नाव वर जखऱ्या ठेवाले देखत होतात. पण तेनी माय अलीशिबा नि उत्तर दिधा कि नई, पण तेना नाव योहान ठेवामा येवो. पण तेस्नी तिले सांग, “तुना कुटुंब मा कोणाच हवू नाव नई शे.” तव तेस्नी धाकला पोऱ्या ना बाप जखऱ्या ले इशारा मा विचार, कि तुले तेना नाव काय ठेवण शे? आणि तेनी लीहानी पाटी मांगाळी सन लिखीटाक कि “तेना नाव योहान शे,” आणि सर्वास्नी नवल करा. तव जखऱ्या परत बोलू लागणा, आणि परमेश्वर नि स्तुती कराले लागणा. आणि त्या सर्वा भयभीत हुई ग्यात, आणि त्या सगळ्या गोष्टीस्नी चर्चा यहूदीया प्रांत ना सर्वा डोंगराळ क्षेत्र मा पसरी गई. आणि सर्वा आयकनारस्नी आप आपला मन मा विचार करीसन सांगणात, “हवू पोऱ्या कसा ऱ्हाईन?” कारण कि प्रभु ना सामर्थ तेनावर होता. आणि तेना बाप जखऱ्या पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईग्या, आणि भविष्यवाणी करीसन सांगाले लागणा. कि धन्य शे प्रभु, इस्त्राएल देश ना परमेश्वर! तेनी आपला लोकस वर ध्यान दिधा, आणि तेस्ले मुक्ती दिधी, तेनी आपला दास दाविद ना वंश मधून एक शक्तिशाली तारणार ले आमना साठे धाळेल शे. तेनी सांग कि तो आमना पूर्वजस्नी दया करीसन आपला पवित्र करार ले आठवण करीन. आणि तू, ओ पोऱ्या, परात्पर परमेश्वर ना भविष्यवक्ता म्हणाईन, कारण कि तू प्रभु ना रस्ता तयार करासाठे तेना पुळे पुळे चालीन. तो आपला लोकस्ना पापस्ले माफ कराना द्वारे तेस्ले तारण ना बारामा ज्ञान दिन. आणि तो बाळ योहान वाळत आणि आत्मिकता मा बलवान होत ग्या, आणि तो इस्त्राएल देश ना लोकस्ना मधमा उपदेश देवाना दिन लगून उजाळ जागास्मा ऱ्हायना. त्या दिनस्मा रोमी साम्राज्य ना सम्राट आगुस्त नि अशी आदन्या काळी, कि आपला सर्वा रोमी साम्राज्य ना लोकस्ना नाव नि नोंद करामा येवो. हय पहिला सावा त्या टाईम ले नाव नोंदणी हुईनी, जव क्वीरीनिय सिरीया प्रांत ना राज्यपाल होता. आणि सर्वा लोक नाव नोंदणी साठे आपला आपला नगर मा ग्यात, जठून तेस्ना पूर्वज होतात. त योसेफ बी एनासाठे कि तो दाविद ना परिवार आणि वंश ना होता, गालील जिल्हा ना नासरेथ नगर मधून यहूदीया प्रांत मा दाविद ना नगर बेथलेहेम नगर ले ग्या, जीना संगे योसेफ नि मांगणी हुयेल होती, त्या गर्भवती मरिया संगे नाव नि नोंद करासाठे ग्या. ती लवकरच बाळ ले जन्म देणार होती. जव त्या बेथलेहेम मा होतात, त तेस्ना साठे त्या जागा वर राहा साठे कोणताच विश्रामगृह मा जागा नई होती, जठे प्रवासी राहात होतात. एनासाठे त्या गोशाळा मा थांबनात, जव मरिया ना प्रसव ना टाईम उना, त तिनी तठे आपला पहिला पुत्र ले जन्म दिधा, तिनी तेले फळका मा गुंढाव आणि तेले गव्हाणी मा ठेव, जठे लोक ढोरस साठे चारा टाकतस. आणि त्या प्रदेश मा कईक मेंडपाळ होतात, ज्या रात ले आंगनमा ऱ्हायसन आपला गवारास्नि ऱ्हाखोई करत होतात. आणि देखा, एक परमेश्वर ना दूत तेस्ना मा ईसन उभा ऱ्हायना, आणि परमेश्वर ना प्रकाश तेस्ना चारीस कळे चमकणा आणि त्या गैरा भ्याई ग्यात. तव परमेश्वर ना दूत नि तेस्ले सांग, भ्यावू नका, कारण कि देखा मी तुमले मोठी आनंद नि सुवार्ता आयकाळस, जी सर्वा लोकस साठे मोठी आनंद नि गोष्ट ठरीन, ते हय शे कि आज बेथलेहेम नगर मा, जो कि राजा दाविद ना नगर शे, तुमना साठे एक तारणार जन्मेल शे, आणि तोच ख्रिस्त प्रभु शे. आणि ह्या चिन्ह कण तुमले माहिती पळी जाईन कि ते बाळ कोण शे, तुमी त्या बाळ ले कपळा मा गुंडायेल आणि गव्हाणी मा जपेल देखशात. तव अचानक कईक दुसरा परमेश्वर ना दूत स्वर्ग मधून खाले उनात, आणि त्या परमेश्वर ना दूत ना संगे मियसन परमेश्वर नि स्तुती कराले लागनात आणि सांग, “स्वर्ग मा परमेश्वर नि महिमा आणि पृथ्वी वर त्या माणसस्मा जेस्ना वर तो आनंदित शे शांती होवो.” जव परमेश्वर ना दूत तेस्ना जोळून स्वर्ग मा चालना ग्यात, त मेंडपाळस्नी आपस मा सांग, या आमी बेथलेहेम नगर मा जाईसन हय गोष्ट जी हुयेल शे, आणि जेले परमेश्वर नि आमले सांगेल शे, देखुत. आणि त्या लगेच जाईसन मरिया आणि योसेफ ले आणि गव्हाणी मा त्या बाळ ले जपेल देखनात. तेस्नी त्या धाकला बाळ ना माय बाप ले सांग, कि परमेश्वर ना दूत नि त्या धाकला बाळ ना बारामा काय सांगेल होता. आणि त्या सर्वा आयकनारस्नी त्या गोष्टीस पासून ज्या मेंडपाळस्नी तेस्ले सांगी, आश्चर्य करा. पण मरिया ह्या सगळ्या गोष्टी आपला मन मा ठियसन विचार करत होती. आणि मेंडपाळस्ले जस परमेश्वर ना दूतस्नि तेस्ले सांगेल होत, तसच सगळ आयकीसन आणि देखीसन परमेश्वर नि महिमा आणि स्तुती करत परती ग्यात. जव बाळ येशु ना जन्म नंतर आठ दिन पुरा हुईनात आणि तेना सुंता ना टाईम उना, त तेना नाव येशु ठेवामा उना, हय नाव परमेश्वर ना दूत द्वारे, तेना पोट मा येवाना पहिले ठेवामा एयेल होत. त्या टाईम ले यरूशलेम शहर मा शिमोन नाव ना एक माणुस होता, आणि तो माणुस धर्मी आणि परमेश्वर ले भ्याणार होता, आणि तो ख्रिस्त नि येवानी गैरी वाट देखी ऱ्हायंता, (जेले धाळाना करार परमेश्वर नि करेल होता) कि तो येवो आणि इस्त्राएल देश ना लोकस्ले शांती देवो. आणि पवित्र आत्मा तेना संगे होता. आणि पवित्र आत्मा नि तेले सांग, कि मराणा पहिले, तो प्रभु ना ख्रिस्त ले देखीन. आणि त्या दिन, परमेश्वर नि आत्मा ना व्दारे तेनी पुढाकारी करामा उणी, आणि तो परमेश्वर ना मंदिर मा उना, त्याच टाईम ले मरिया आणि योसेफ नि मोशे ना नियम ना द्वारे नेमेल रितीस्ले पुरा कराना उद्देश कण बाळ येशु ले लिसन तठे ग्यात. त तेनी बाळ येशु ले आपला हात मा लीधा आणि परमेश्वर ना धन्यवाद करीसन सांग. “ओ प्रभु, आते तू मले, तुना दास ले आपला करार प्रमाणे शांती कण मरू दे, जे तुनी तुना लोकस्ले वाचाळा साठे करेल शे, ते मनी आपला डोयास्वर देखी लीयेल शे, जेले तुनी सर्वा लोकस्ले वाचाळा साठे धाळेल शे. कि तो बिगर यहुदीस्वर परमेश्वर ले प्रगट करणारा दिवा शे, आणि तुना खास लोक इस्त्राएल देश नि महिमा होवो.” योसेफ आणि बाळ नि माय ह्या गोष्टी कण ज्या शिमोन नि तेना बारामा सांगी, आश्चर्य करत होतात. तव शिमोन नि तेस्ले आशीर्वाद दिसन तेनी माय मरिया ले सांग, देख तो त इस्त्राएल देश ना कईक लोकस्ना नाश करासाठे आणि कईक लोकस्ना तारण करासाठे धाळामा एयेल शे, तेले परमेश्वर कडून एक चिन्ह ना रूप मा धाळेल शे, पण काही लोक तेना विरोध करतीन. आणि एनासाठे कि तेस्ना गुप्त विचारस्ले समोर लयो, (आणि भयंकार दुख, एक धार दार तलवार सारखा तुना स्वता ना हृदय मा भोसकाय जाईन.) आशेर ना वंश मधून हन्ना नाव फनूएल नि पोर एक भविष्यवक्तीन होती, ती गैरी धल्ली होती, आणि लगन होवा नंतर सात वर्ष आपला नवरा संगे ऱ्हाई सकेल होती. तेना नंतर ती चौऱ्याऐंशी वर्ष नि वय लगून विधवा बनीसन ऱ्हायनी, आणि कायम परमेश्वर ना मंदिर मा राहात होती, पण उपास आणि प्रार्थना करी करीसन रात-दिन उपासना करत होती. आणि ती त्या घळी तठे ईसन, प्रभु ना धन्यवाद कराले लागणी, आणि त्या सर्वास्ले जो यरूशलेम शहर ना लोकस्ले सोळावा साठे ख्रिस्त ले धाळा साठे परमेश्वर नि वाट देखत होतात, तेना बारामा मा गोष्टी कराले लागणी. जव योसेफ आणि मरिया मोशे ना नियम ना प्रमाणे सगळ काही निपटी दिनात, त गालील जिल्हा मा आपला नगर नासरेथ नगर ले परत चालना ग्यात. आणि बाळ व्हाळत, आणि आत्मा मा बलवान होत आणि बुद्धी कण परिपूर्ण होत ग्या, आणि परमेश्वर नि कृपा तेनावर होती. योसेफ आणि बाळ नि माय दर वरीस वल्हांडण ना सन मा यरूशलेम शहर ले जात होतात. जव येशु बारा वरीस ना हुईना, त तो आणि तेना माय-बाप वल्हांडण ना सन नि रिती ना प्रमाणे यरूशलेम शहर ले ग्यात. जव सन सरी ग्या, त योसेफ आणि बाळ नि माय घर परताले लागनात, पण पोऱ्या येशु यरूशलेम शहर मा ऱ्हाय ग्या, आणि हय योसेफ आणि बाळ नि माय ले मालूम नई होत. त्या हय समजीसन, कि तो दुसरा प्रवासीस संगे हुईन, एनासाठे तेस्नी पुरा दिन ना प्रवास करा मंग आपला नाते-वाईक आणि मित्रस्ना मधमा तेले झामलाले लागनात. पण जव नई भेटणा, त शोधत-शोधत यरूशलेम शहर परत चालना ग्यात. तीन दिन नंतर तेस्नी तेले परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा यहुदी शिक्षकस्ना मधमा बठेल, तेस्नी आयकतांना आणि तेस्नाशी प्रश्न करतांना देख. आणि जीतला तेनी आयकी ऱ्हायंतात, त्या सर्वा तेनी समज आणि तेना उत्तरस कण चकित होतात. तव योसेफ आणि बाळ नि माय तेले देखीसन चकित हुईनात आणि तेनी माय नि तेले सांग, “ओ पुत्र, तुनी आमना संगे काब असा व्यवहार करा? देख, तुना बाप आणि मी कष्टी हुईसन तुले शोधत होतु. तेनी तेस्ले सांग, तुमी मले काब झामलत होतात? मी तेच कराले पायजे जी मना बाप नि ईच्छा शे कि मी करू, तुमले हय माहित पायजे.” पण त्या गोष्टीस्ना अर्थ ज्या तेनी तेस्ले सांग, तेस्ले तेस्नी नई समज. तव तो तेस्ना संगे ग्या, आणि नासरेथ नगर मा उना, आणि तेस्ना वंश मा ऱ्हायना, आणि तेनी माय नि ह्या सगळ्या गोष्टी आपला मन मा ठेवी. आणि येशु ज्ञान आणि शरीर मा आणि परमेश्वर आणि माणसस्नी कृपा मा वाळत ग्या. हय सम्राट तिबिर्य ना शासन ना पंधरावा वर्ष होता, पंतय पिलात यहूदीया प्रांत ना राज्यपाल होता, हेरोद राजा गालील जिल्हा ना शासक होता. तेना भाऊ फिलिप्प, इतुरीया आणि त्राखोनिती प्रदेशस्ना शासक होता. लुस्निय अबिलेने प्रदेश ना शासक होता. त्या टाईम ले जव हन्ना आणि केफा मुख्य यहुदी पुजारी होतात, तव जखऱ्या ना पोऱ्या योहान उजाळ जागा मा होता. त्या टाईम ले परमेश्वर तेनाशी बोलना. तो यार्देन नदी ना आंगे पांगे ना सर्वा क्षेत्र मा जाईसन हवू संदेश देत होता, कि आपला पापस पासून मन फिरावा आणि बाप्तिस्मा ल्या तव परमेश्वर तुमले तुमना सर्वा पापस्नी माफी दिन. जस यशया भविष्यवक्ता ना सांगायेल वचनस्ना पुस्तक मा लिखेल शे, कि उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना, प्रभु ना रस्ता तयार करा, त्या सळकस्ले सीधा करा जेनावर तो चालीन. प्रत्येक दरी भराय जाईन आणि प्रत्येक डोंगर आणि टेकळी सपाट करामा ईन, आणि जो वाकळा शे सीधा करामा ईन, आणि जो खाले वरे शे तो चौकोण रस्ता बनीन. आणि प्रत्येक लोक परमेश्वर ना तारण ले देखीन. जी मोठी गर्दी तेना पासून बाप्तिस्मा लेवा साठे निघीसन येत होती, तेस्ले तो सांगत होता, तुमी लोक विष्यारी सापस्ना सारखा दुष्ट शेतस, तुमन हय विचार करान चूकीन शे, कि फक्त बाप्तिस्मा लेवा कण तुमी आपला पापस साठे परमेश्वर ना द्वारे दंड भेटा पासून वाचू सकतस! येणा साठे दंड पासून वाचा साठे असा काम करा ज्या दाखाळतस कि तुमी खरज मन फिरायेल शेतस. आणि आपला आपला मन मा हय नका विचार करा, कि परमेश्वर आमले दंड नई देवाव कारण कि अब्राहाम आमना बाप शे, कारण कि मी तुमले सांगस, कि परमेश्वर ह्या दघळस पासून अब्राहाम ना साठे वंश ना निर्माण करी सकस. आणि आतेच परमेश्वर प्रत्येक ले दंड देवाले तयार शे, ज्या मन नई फिरावतस, त्याच प्रमाणे जसा कुराळ वाला कोणी माणुस त्या झाळस्ले कापाले तयार शे, ज्या चांगला फय नई लयतस. आणि प्रत्येक व्यक्ती जो त्या झाळ सारखा शे, जो चांगला फय नई लयत, तेले परमेश्वर ना व्दारे दोषी ठरावामा ईन आणि आग मा फेकामा ईन. दुसरा लोकस्नी तेले विचार, त परमेश्वर ना दंड पासून वाचा साठे “आमी काय करूत?” तेनी तेस्ले उत्तर दिधा, कि जेना कळे दोन कुळच्या (शर्ट) शेतस, तो तेना संगे जेना कळे नई शे वाटी लेवो आणि जेना कळे जेवण हुईन, त तो बी असाच करो. आणि कर लेणारा बी बाप्तिस्मा लेवाले उनात, आणि तेले विचार, “गुरुजी, आमी काय करूत?” तेनी तेस्ले सांग, जे तुमना साठे अधिकारीस कळून ठरायेल शे, तेना तून जास्त कर नका लेयज्यात. काही शिपाईस्नी बी तेले हय विचार, “आमी काय करूत?” येशु नि तेस्ले सांग, कि “कोणा कळून जबरजस्ती पैसा नका ल्या, नईत कोणावर खोटा आरोप लावज्यात आणि आपली मजुरी कण समाधान ऱ्हावा.” जव लोक ख्रिस्त नि लवकर येवानी आस धरेल होतात, आणि सर्वा आपला आपला मन मा योहान ना बारामा विचार करी ऱ्हायंतात, कि काय हवू ख्रिस्तच त नई शे? त योहान नि त्या सर्वास्ले उत्तर मा सांग, कि मी त तुमले पाणी कण बाप्तिस्मा देस, पण तो येणार शे, जो मनातून सामार्थी शे, मी त ह्या योग्य बी नई, कि तेना जोळास्ना बंद सोळी सकू, तो तुमले पवित्र आत्मा आणि अग्नी कण बाप्तिस्मा दिन. तेना सूप, तेनाच हात मा शे, आणि तो आपला खया चांगल्या प्रकारे साप करीन, आणि गहू ले आपला वावर मा एकत्र करीन, पण भूसिले त्या आग मा चेटाळी दिन जी मलायाव नई. तव योहान गैराच शिक्षण दि-दिसन लोकस्ले सुवार्ता आयकाळत ऱ्हायना. पण तेनी एक चौथाई देश ना राजा हेरोद ले तेना भाऊ फिलिप्प नि बायको हेरोदियास ना बारामा, आणि सर्वा कुकर्मना बारामा ज्या तेनी करेल होतात, दोष लावा. एनासाठे हेरोद राजा नि त्या सर्वास्तून मोठा हवू कुकर्म बी करा, कि योहान ले बंदीगृह मा टाकी दिधा. जव सर्वा लोकस्नी बाप्तिस्मा लीधा, आणि येशु बी बाप्तिस्मा लिसन प्रार्थना करी ऱ्हायंता, त आकाश उघळी ग्या. पवित्र आत्मा शरीरिक रूप मा कबुतर सारखा तेनावर उतरणा, आणि हय आकाश तून अशी वाणी हुईनी कि तू मना प्रिय पुत्र शे, मी तुनाशी गैरा खुश शे. जव येशु नि लोकस्ले प्रवचन देवाले चालू करना, त जवळ-पास तीस वरीस ना होता, आणि लोक अस समजत होतात, कि येशु योसेफ ना पोऱ्या होता, आणि योसेफ एलि ना पोऱ्या होता. आणि एलि मत्ताथ ना पोऱ्या होता, आणि मत्ताथ लेवी ना पोऱ्या होता, आणि लेवी मल्खी ना पोऱ्या होता, आणि मल्खी यन्रया ना पोऱ्या होता, आणि यन्रया योसेफ ना पोऱ्या होता. आणि योसेफ मत्तिथ्य ना पोऱ्या होता, आणि मत्तिथ्य अमोस ना पोऱ्या होता, आणि अमोस नहूम ना पोऱ्या होता, आणि नहूम हेस्ली ना पोऱ्या होता, आणि हेस्ली नग्गया ना पोऱ्या होता. आणि नग्गया महथा ना पोऱ्या होता, आणि महथा मत्तीथ्या ना पोऱ्या होता, आणि मत्तीथ्या शिमयी ना पोऱ्या होता, आणि शिमयी योसेख ना पोऱ्या होता, आणि योसेख योदा ना पोऱ्या होता. आणि योदा योहान ना पोऱ्या होता, आणि योहान रेशा ना पोऱ्या होता, आणि रेशा जरुब्बाबेल ना पोऱ्या होता, आणि जरुब्बाबेल शल्तीएल ना पोऱ्या होता, आणि शल्तीएल नेरी ना पोऱ्या होता. आणि नेरी मल्खी ना पोऱ्या होता, आणि मल्खी अद्दी ना पोऱ्या होता, आणि अद्दी कोसोम ना पोऱ्या होता, आणि कोसोम एल्मदाम ना पोऱ्या होता, आणि एल्मदाम एरा ना पोऱ्या होता. आणि एरा येशु ना पोऱ्या होता, आणि येशु अलीयेजर ना पोऱ्या होता, आणि अलीयेजर योरीम ना पोऱ्या होता, आणि योरीम मत्ताथा ना पोऱ्या होता, आणि मत्ताथा लेवी ना पोऱ्या होता. आणि लेवी शिमोन ना पोऱ्या होता, आणि शिमोन यहूदा ना पोऱ्या होता, आणि यहूदा योसेफ ना पोऱ्या होता, आणि योसेफ योनाम ना पोऱ्या होता, आणि योनाम एल्याकीम ना पोऱ्या होता. आणि एल्याकीम मल्ल्या ना पोऱ्या होता आणि तो मित्र ना पोऱ्या होता, आणि मित्र मत्ताथ ना पोऱ्या होता, आणि मत्ताथ नाथान ना पोऱ्या होता, आणि नाथान दाविद ना पोऱ्या होता. आणि दाविद इशाय ना पोऱ्या होता, आणि इशाय ओबेद ना पोऱ्या होता, आणि ओबेद बवाज ना पोऱ्या होता, आणि बवाज सल्मोन ना पोऱ्या होता, आणि सल्मोन नहशोन ना पोऱ्या होता. आणि नहशोन अम्मीनादाब ना पोऱ्या होता, आणि अम्मीनादाब अर्णय ना पोऱ्या होता, आणि अर्णय हेस्रोन ना पोऱ्या होता, आणि हेस्रोन पेरेस ना पोऱ्या होता, आणि पेरेस यहूदा ना पोऱ्या होता. आणि यहूदा याकोब ना पोऱ्या होता, आणि याकोब इसहाक ना पोऱ्या होता, आणि इसहाक अब्राहाम ना पोऱ्या होता, आणि अब्राहाम तेरह ना पोऱ्या होता, आणि तेरह नाहोर ना पोऱ्या होता. आणि नाहोर सरुग ना आणि सरुग रऊ ना पोऱ्या होता, आणि रऊ पेलेग ना पोऱ्या होता, आणि पेलेग एबर ना पोऱ्या होता, आणि एबर शेलह ना पोऱ्या होता. आणि शेलह केनान ना पोऱ्या होता, आणि केनान अर्पक्षद ना पोऱ्या होता, आणि अर्पक्षद शेम ना पोऱ्या होता, आणि शेम नोहा ना पोऱ्या होता, आणि नोहा लामेख ना पोऱ्या होता. आणि लामेख मथुशलह ना पोऱ्या होता, मथुशलह हनोख ना पोऱ्या होता, हनोख यारेद ना पोऱ्या होता, आणि यारेद महललेल ना पोऱ्या होता, आणि महललेल केनान ना पोऱ्या होता. आणि केनान अनोश ना पोऱ्या होता, आणि अनोश शेथ ना पोऱ्या होता, आणि शेथ आदाम ना पोऱ्या होता, आणि आदाम परमेश्वर ना पोऱ्या होता. नंतर येशु पवित्र आत्मा मा भरेल यार्देन नदी मधून परतना, आणि चाळीस दिन व चाळीस रात लगून आत्मा ना शिकाळा वर उजाळ जागा मा फिरत ऱ्हायना. आणि सैतान तेनी परीक्षा करत ऱ्हायना. त्या दिनस्मा तेनी काहीच नई खाद, आणि जव त्या दिन पुरा हुई ग्यात, त तेले भूक लागणी. आणि सैतान नि तेले सांग, “कदी तू परमेश्वर ना पोऱ्या शे, त ह्या दघळस्ले आज्ञा दिसन साबित कर, कि त्या भाकरी बनी जावोत, एनासाठे कि तू तेस्ले खाई सको.” येशु नि तेले उत्तर दिधा, “परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, माणुस फक्त भाकर कण नई, पण तो परमेश्वर ना प्रत्येक वाचन ना द्वारे जित्ता राहीन.” तव सैतान तेले उच्चा पहाळ वर लीग्या, आणि तेले क्षण भर मा जग ना सर्वा राज्य दाखाळा. आणि तेले सांग, “मी हवू सर्वा अधिकार, आणि एस्ना वैभव तुले दिसू, कारण कि ते मले सोपायेल शे, आणि जेले आवळस, तेले देवू सकस. एनासाठे, कदी तू पडीसन मले नमन करशीन, त हय सगळ तून हुई जाईन.” येशु नि तेले उत्तर दिधा, “ओ सैतान दूर चालना जा,” कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, कि “तू प्रभु आपला परमेश्वर ले पळीसन नमन कर आणि फक्त तेनीच उपासना कर.” तव सैतान तेले पवित्र नगर यरूशलेम शहर मा लीजायसन परमेश्वर ना मंदिर ना सर्वास्तून उच्चा टोक वर उभा करा, आणि सैतान नि सांग, “कदी तू परमेश्वर ना पोऱ्या शे. त स्वता ले खाले पाळीसन साबित कर. कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा हई लिखेल शे, तो तुना बारामा आपला स्वर्गदूतस्ले आदन्या दिन, कि त्या तुनी रक्षा करोत. आणि त्या तुले हातो-हात समाई लेतीन, कदी अस नई होवो कि तुना पाय ले दघळ कण ठेस लागो.” येशु नि तेले उत्तर दिधा, “परमेश्वर नि पुस्तक मा हय बी सांगामा एयेल शे, कि तू प्रभु आपला परमेश्वर नि परीक्षा नको लिवू.” जव सैतान सगळ्या परीक्षा लीलीना, तव काही टाईम साठे तेना पासून दूर चालना ग्या. नंतर येशु आत्मा ना सामर्थ्य मा भरेल, यहूदा जिल्हा ले सोळीसन परत गालील जिल्हा मा परतना, आणि तेनी गोष्ट आंगे पांगे ना सर्वा देश मा पसरी गी. आणि तो तेस्ना प्रार्थना घरस्मा प्रवचन सांगत ऱ्हायना, आणि सर्वा तेनीच व्हा-व्हा करत होतात. आणि तो नासरेथ नगर मा परत उना, जठे तेना पायन-पोषण हुयेल होत, आणि आपली रिती प्रमाणे आराम ना दिन प्रार्थना घर मा परमेश्वर ना पुस्तक मधून वाचाले उभा ऱ्हायना. यशया भविष्यवक्ता नि पुस्तक तेले देवामा उणी. तेनी पुस्तक उघाळीसन, त्या भाग मधून वाच जठे हय लिखेल होत, “प्रभु ना आत्मा मनावर शे, एनासाठे कि तेनी गरीबस्ले सुवार्ता आयकाळा साठे मना अभिषेक करेल शे, आणि मले एनासाठे धाळेल शे. कि ज्या सैतान ना बंधन मा बांधायेल शेत, तेस्नी सुटका करू, आणि अंधास्ले दुष्टी देवू, आणि प्रत्येक जो चेन्दायेल शे सोळावू. आणि हय सांगा साठे कि परमेश्वर नि कृपा दाखाळा ना टाईम ईजायेल शे. आणि प्रभु ना आनंद ऱ्हावाना वर्ष ना प्रचार करू. तव तेनी पुस्तक बंद करीसन सेवक ना हात मा दि टाकी, आणि बठी ग्या, आणि प्रार्थना घर ना सर्वा लोक तेले ध्यान दिसन देखत होतात.” तव तो तेस्ले सांगाले लागणा, “आजच हय लेख परमेश्वर ना पुस्तक मधून जव तुमी मना गोष्टीस्ले आयकी ऱ्हायनात पूर्ण हुयेल शे.” आणि सर्वास्नी तेनी कवतुक करी, आणि ज्या कृपा ना गोष्टी तेना तोंड मधून निघत होतात, तेस्ना कण आचर्य चकित हुईनात, आणि सांगाले लागनात, “काय हवू योसेफ ना पोऱ्या नई?” तेस्ले तेनी सांग, “तुमी मनावर हय म्हण खरज सांगशात, कि ओ वैद्य, स्वता ले बरा कर! जे काही आमी आयकेल शेतस कि कफर्णहूम नगर मा तुनी करेल शे, तेले आठे आपला देश मा बी कर.” आणि तेनी सांग, “मी तुमले खरज सांगस, कोणता बी भविष्यवक्ता ले आपला देश मा मान भेटत नई. ह्या बारामा विचार करा, हय खरज शे कि एलीया भविष्यद्वक्ता ना दिनस्मा जव साळे तीन साल लगून पावूस नई पळणा, आठ लगून कि पुरा इस्त्राएल देश मा मोठा काय पळी ग्या, त इस्त्राएल देश मा गैऱ्या विधवा होत्यात. पण एलीया ले इस्त्राएल देश मा कोणतीच विधवा कळे नई धाळामा उना, फक्त सिदोन शहर ना जोळे सारफथ ना क्षेत्र मा एक दुसरा जाती विधवा जोळे धाळ. आणि अलीशा भविष्यवक्ता ना टाईम ले इस्त्राएल देश मा गैरा लोक कुष्टरोग कण आजारी होतात, पण नामान, जो सूरीया देश ना एक दुसरा जाती माणुस होता, तेले सोळीसन तेस्ना मधून कोणीच युध्द नई करामा उना.” ह्या गोष्टी आयकताच जीतला प्रार्थना घर मा होतात, सर्वा रागे भरी ग्यात. आणि उठीसन तेले नगर मधून बाहेर काळणात, आणि ज्या डोंगर वर तेस्ना नगर होता, तेनी शेंडी वर लीचालनात, कि तेले तठून खाले पाळीसन मारी टाकोत. पण तो तेस्ना मधून निघीसन चालना ग्या. नंतर तो गालील जिल्हा ना कफर्णहूम नगर मा ग्या, आणि आराम ना दिन लोकस्ले प्रवचन सांगत होता. त्या तेना प्रवचन कण चकित हुई ग्यात कारण कि तेन प्रवचन अधिकार संगे होत. प्रार्थना घर मा एक माणुस होता, जो एक दुष्ट आत्मा ना नियंत्रण मा होता. तो मोठा शब्द मा वरळना, “येशु नासरेथ ना, आमले तुनाशी काय काम? काय तू आमले नाश कराले एयेल शे? मी तुले वयखस कि तू कोण शे, तू परमेश्वर ना पवित्र पोऱ्या शे.” येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, “चूप ऱ्हाय, आणि तेना मधून निघी जा.” तव दुष्ट आत्मा तेले मधमा उपटीसन बिगर नुकसान कराना तेना मधून निघी गई. एनावर सर्वास्ले आचर्य हुईना, आणि त्या आपस मा गोष्टी करीसन बोलू लागनात, कि “हय कोणता प्रकार ना शब्द शे?” कि तो अधिकार आणि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले आदन्या देस, आणि त्या निघी जातस. त चारीस कळे प्रत्येक जागा वर तेनीच चर्चा होवाले लागणी. तो प्रार्थना घर मधून उठीसन शिमोन ना घर मा ग्या आणि शिमोन नि सासू जी कळक ताप मा पळेल होती, आणि तेस्नी तीना साठे तेले विनंती करी. येशु तीना जोळे उभा ऱ्हायसन ताप ले दाट आणि ताप तीना वारून उतरी ग्या, आणि ती लगेच उठीसन तेस्ले जेवण दिसन पाहुनचारी करनी. जव संज्याकाय होयनी तव जेस्ना-जेस्ना कळे लोक नाना प्रकार ना आजार मा पळेल होतात, त्या सर्वा तेस्ले तेना जोळे लई उनात, आणि तेनी एक-एक वर हात ठियसन तेस्ले बरा करना. आणि दुष्ट आत्मा आराया मारत आणि हय सांगत, “तू परमेश्वर ना पोऱ्या, ख्रिस्त शे.” गैरास मधून निघीगी पण तो तेस्ले धमकावत होता आणि दुष्ट आत्मास्ले बोलू नई देत होता, कारण कि त्या वयखत होतात, कि हवू ख्रिस्त शे. जव दिन उगणा, त तो निघीसन एक सुनसान जागा वर ग्या, आणि मोठी गर्दी तेले झामलत तेना जोळे उणी, आणि तेले थांबाळाले लागणी, कि आमना जोळून नको जावू. पण तेनी तेस्ले सांग, मले आखो नगरस्मा बी परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता आयकाळन अवश्य शे, कारण संसार मा येवाना मना हवूच उद्देश शे. आणि तो गालील जिल्हा ना प्रार्थना घरस्मा प्रवचन सांगत ऱ्हायना. एक दिन येशु गनेसरत ना समुद्र ना तठ वर उभा होता. तठे एक मोठी गर्दी एकत्र हुईगी आणि परमेश्वर ना वचन आयका साठे तेनावर पळी जाई ऱ्हायंती. तेनी समुद्र ना तठ वर दोन नाव लागेल देख आणि तेनी देख कि काही मासोया नाव वरून उतरीसन मासा धरानी जाय धुई ऱ्हायंतात. त्या नावस मधून एक वर, जी शिमोन नि होती, चळीसन, तेनी तेनाशी विनंती करी, कि तठ वरून थोळासा दूर ली चाल, तव तो बठीसन लोकस्ले नाव वरून प्रवचन सांगाले लागणा. जव तो लोकस संगे गोष्टी करी लीना, त शिमोन ले सांग, खोल पाणी कळे ली चाल, आणि मासा धराले आपला जाया टाका. शिमोन नि तेले उत्तर दिधा, कि गुरुजी, आमी पुरी रात कष्ट करनुत आणि काहीच नई धरनूत, तरी बी कदी तू असा सांगस, त मी जाय टाकसु. जव पेत्र आणि तेना जोळीदारस्नी जाया टाकनात, त गैरा मासा घेरी लयनात, आणि तेसन्या जाया फाटावर होतात. एनावर, तेस्नी आपला साथिस्ले ज्या दुसरी नाव वर होतात, इशारा करा, कि ईसन आमनी मदत करा. तव त्या ईसन तेस्नी मदत करू लागनात आणि दोनी नाव आठ लगून भरी लीनात कि त्या बुळावर होत्यात. हय देखीसन शिमोन पेत्र येशु ना पाय वर पळणा, आणि सांग, “गुरुजी, मना जोळून चालना जा, कारण कि मी पापी माणुस शे.” कारण कि इतल्या मासा धराई जावावर तेले आणि तेना जोळीदारस्ले गैर आश्चर्य हुईन. आणि शिमोन जोळीदार, याकोब आणि योहान ज्या जब्दी ना पोऱ्या ना होतात, त्या बी आश्चर्य चकित हुई ग्यात, तव येशु नि शिमोन ले सांग, भ्यावू नको, आते पासून मी तुले शिकाळसू कि लोकस्ले मना शिष्य कसा बनावाना शे. आणि त्या नावस्ले तठ वर लई उनात, आणि सगळ काही सोळीसन तेना शिष्य बनी ग्यात. जव तो एक नगर मा होता, त तठे एक माणुस कोळी ना आजार कण पिळीत होता, आणि तो येशु ले देखीसन तेनी गुळघा टेकीसन आपला तोंड ले जमीन वर टेक, आणि विनंती करी, कि “हे प्रभु जर तुनी ईच्छा शे, त तू मले बरा करू सकस.” तेनी हात पुळे करीसन तेले हात लायिसन सांग, “मनी ईच्छा शे, कि तू बरा हुईजा.” आणि तेना कोळ लगेच बरा हुईग्या. तव येशु नि त्या माणुस ले जताळीसन सांग, कि “कोले बी हई नको सांगजो, पण जाईसन स्वता ले यहुदी पुजारी ले दाव, आणि आपला शुद्ध होवाना बारामा जे काही मोशे नि बलिदान ठरायेल शे, तेले चळाव, कि तेस्ना वर साक्षी होवो.” पण येशु ना बारामा बातमी आखो जास्त पसरी ग्या, आणि मोठी गर्दी तेनी आयका साठे आणि आपला आजार पासून बरा होवा साठे एकत्र हुईनी. पण तो सुनसान जागा मा आलग जाईसन प्रार्थना करत होता. आणि एक दिन अस हुईन कि तो प्रवचन सांगी ऱ्हायंता, आणि परूशी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक तठे बठेल होतात, ज्या गालील जिल्हा आणि यहूदीया प्रांत तून आणि यरूशलेम शहर मधून एयेल होतात, आणि बरा करासाठे प्रभु नि सामर्थ्य तेना संगे होती. आणि देखा कईक लोक एक लखवा ना आजारी ले खाट वर लयनात, आणि त्या तेले मधमा लीजावा ना आणि येशु समोर ठेवाना उपाय झामली ऱ्हायंतात. आणि जव गर्दी मुळे तेले मधमा नई लीजावू सकनात त तेस्नी त्या छत ले जेना खाले येशु होता, उघाळी टाका, आणि तेले खाट संगे मधमा येशु ना समोर उतारी टाक. तेनी तेस्ना विश्वास देखीसन, त्या लखवा ना आजारी ले सांग, “ओ पोऱ्या, तुना पाप माफ हुई ग्यात.” तव मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक विवाद करू लागनात, कि “हवू कोण शे, जो परमेश्वर नि निंदा करस? परमेश्वर ले सोळीसन कोण पापस्नी माफी करू सकस?” येशु नि तेस्ना मन ना गोष्टी समजीसन, येशु नि तेस्ले सांग, कि तुमी आपला मन मा काय विचार करी ऱ्हायनात? सोप काय शे? काय हई सांगण, कि तुना पाप माफ हुईनात, कि हई सांगण, कि उठ आणि चाल फिर? पण एनासाठे कि तुमी समजोत कि माणुस ना पोऱ्या ले पृथ्वी वर लोकस्ना पापस्ले माफ कराना बी अधिकार शे. तेनी त्या पक्षघाती ले सांग “मी तुले सांगस, उठ आणि आपली खाट उचलीसन आपला घर चालना जा.” तो लगेच तेस्ना समोर उठाना, आणि जेनावर तो पळेल होता, तेले उचलीसन परमेश्वर नि स्तुती करत आपला घर चालना ग्या. तव सर्वा चकित हुईनात आणि परमेश्वर नि महिमा कराले लागनात, आणि गैरा भ्याय-भ्यायसन सांगाले लागनात, कि आमनी चमत्कारी काम देखेल शेतस. तेना नंतर, जव तो जात होता, तव तेनी लेवी नाव ना एक कर लेणारले देख, जेना दुसरा नाव मत्तय होता. जो हलपाई (बाप) ना पोऱ्या होता. तो आपला कर लेवाना जागा वर बसेल देखना, आणि तेले सांग, “मना मांगे ये,” तव तो सगळ काही सोळीसन उठना, आणि तेना मांगे चालू लागणा. आणि लेवी नि आपला घर मा तेना साठे मोठी मेजवानी करी, आणि गैरा सावटा कर लेणारस्नी आणि दुसरा लोकस्नी ज्या तेना संगे जेवण कराले बठेल होतात, एक मोठी गर्दी होती. आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या परूशी लोकस्ना समूह ना होतात, येशु ना शिष्यस्ले हय सांगीसन कुरूकुरू कराले लागनात, कि “तुमी कर लेणारस संगे आणि पापीस संगे काब खातस पीतस?” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, कि “डाक्टर चांगलास साठे नई, पण आजारीस साठे शे. मी धर्मीस्ले नई पण पापिस्ले बलावाले एयेल शे कि त्या आपला पापस पासून मन फिरावा.” आणि तेस्नी तेले विचार, “योहान ना शिष्य लोक त बिगर जेवण ना उपवास ठेवतस, आणि प्रार्थना कऱ्या करतस, आणि तसाच परूशी लोकस्ना बी, पण तुना शिष्य काब खातस पीतस?” त येशु नि तेस्ले सांग, “काय तुमी वरातीस्ले जठ लगून नवरदेव तेस्ना संगे ऱ्हास, बिगर जेवण ना उपवास कराले लावशात?” पण त्या दिन येतीन, जेस्ना मा नवरदेव तेस्ना पासून आल्लग करामा ईन, तव त्या, त्या टाईम वर बिगर जेवण ना उपवास करतीन. तेनी एक आखो दाखला बी तेस्ले सांगणा, कि “कोणी माणुस आपला नवीन कपळा ना तुकळा ले जुना कपळा वर जोळत नई, नईत धुवा नंतर नवीन कपळा सुकळी जाईन, आणि जुना कपळा ले आजून फाळी दिन, तव जुना कपळा ना छिद्र गैरा मोठा हुई जाईन. जर मनी शिक्षा ले जुनी रिती-रिवाज ना संगे एक करामा ईन, त मनी शिक्षा या कपळा ना सारखी काम नई येवाव. आणि कोणी नवीन द्राक्षरस जुना चामळी शी बनेल थैली मा नई ठेवस, नईत नवा द्राक्षरस थैली ले फाळीसन व्हाई जाईन, आणि द्राक्षरस आणि थैली दोनी नाश हुई जातीन. पण नवा द्राक्षरस नवी थैली मा भराले पाहिजे. कोणी माणुस जुना द्राक्षरस पिसन नवाले नई झामलत कारण कि तो सांगस, कि जुनाच चांगला शे.” नंतर पुळला आराम ना दिन तो वावरस मधून जाइरायंता, आणि तेना शिष्य लोक उंब्या तोळी तोळीसन आणि हातस कण चोई-चोईसन खात जात होतात. तव परूशी लोकस मधून कोणी एक सांगाले लागणा, “देख, तुना शिष्य लोक जे काम आराम ना दिन करी ऱ्हायनात, ते मोशे ना नियम ना विरुद्ध मा शे, तुले तेस्ले सांगाले पायजे अस कराले नको पायजे.” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “काय तुमी कदी नई वाच? कि राजा दाविद आणि तेना जोळीदार गैरा भुक्या हुयनात तव तेनी काय करेल होत? तो कसा परमेश्वर ना तंबू मा गया, आणि भेटणा भाकरी खादात, जो जेवण यहुदी पुजारीस्ले सोळीसन आखो कोले बी खावान बर नई, आणि आपला जोळीदारस्ले बी दिधा?” आणि तेनी तेस्ले सांग, “माणुस ना पोऱ्या आराम ना दिन ना बी प्रभु शे.” आणि अस हुईन कि दुसरा आखो एक आराम ना दिन तो प्रार्थना घर मा जाईसन प्रवचन सांगाले लागणा, आणि तठे एक माणुस होता, जेना उजवा ना हात वाकळा होता. काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक येशु वर दोष लावानी संधी भेटासाठे तेना शोध मा होतात, कि आराम ना दिन तो तेले बरा करस कि नई. पण तो तेस्ना विचार समजत होता, एनासाठे तेनी त्या सुकेल हात वाला माणुस ले सांग, “उठ, मधमा उभा ऱ्हाईजा.” तो उठीसन उभा ऱ्हायना. येशु नि तेले सांग, “मी तुमले हय विचारस, कि आराम ना दिन चांगल कार्य करान, आणि वाईट नई करान निश्चित रूप मा चांगल शे, आणि कोणा जीव ले वाचाळाना, आणि कोले नई मारान, हई बी निश्चित रूप मा चांगल शे.” आणि तो चारी बाजू तेस्ना कळे तेस्ले देखीसन त्या माणुस ले सांगणा, “आपला हात पुळे कर,” तेनी तसच कर, आणि तो परत दुसरा हात ना सारखा चांगला हुईग्या. पण त्या परूशी लोक बाहेर जाईसन आपस मा चर्चा कराले लागनात, कि आमी येशु ना संगे काय करूत? आणि त्या दिनस्मा तो डोंगर वर प्रार्थना कराले निघणा, आणि परमेश्वर संगे प्रार्थना करामा पुरी रात काळी. जव दिन उगणा, त तेनी आपला शिष्यस्ले बलाईसन तेस्ना मधून बारा निवाळी लीना, आणि तेस्ले प्रेषित सांग. त्या बरा प्रेषितस्ना नाव हई शेतस, शिमोन जेना नाव तेनी पेत्र बी ठेव, आणि तेना भाऊ अंद्रिया, आणि याकोब, आणि योहान, आणि फिलिप्प, आणि बर्थलमय, आणि मत्तय, आणि थोमा, आणि हलपाई ना पोऱ्या याकोब, आणि शिमोन जो जेलोतेस सांगावस. आणि याकोब ना पोऱ्या यहूदा, आणि यहूदा इस्कर्योत जो तेले धरावनार बनना. तव तो तेस्ना संगे उतरीसन चौकोण जागा मा उभा हुईना, आणि तेना शिष्यस्नी मोठी गर्दी, आणि सर्वा यहूदीया प्रांत आणि यरूशलेम शहर आणि सोर आणि सिदोन शहर ना समुद्र वरून गैरा लोक, ज्या तेनी आयकाले, आणि आपला आजारस पासून बरा होवा साठे तेना जोळे एयेल होतात, तठे होतात. आणि दुष्ट आत्मा कण त्रासेल लोक बी बरा करत होतात. आणि सर्वा तेले हात लावानी ईच्छा करी ऱ्हायंतात, कारण कि तेना मधून सामर्थ्य निघीसन सर्वा लोकस्ले चांगला करत होती. तव तेनी आपला शिष्यस कळे देखीसन सांग, “धन्य शेतस ज्या वाटस कि तेस्ले परमेश्वर नि गरज शे, कारण कि स्वर्ग ना राज्य तुमना शे. धन्य शे त्या, जेस्नी धार्मिकता ना जीवन जगानी खरी ईछ्या शे, कारण कि परमेश्वर तेस्ले तृप्त करीन. धन्य शेतस तुमी, ज्या आते रळतस, कारण कि हसष्यात. धन्य शेतस तुमी, ज्या माणुस ना पोऱ्या ना शिष्य शेतस, त्यामुळे लोक तुमनी निंदा करतीन आणि लोक तुमना संगे वाईट वागतीन, आणि तुमना नाव वाईट समजीसन कापी टाकतीन.” त्या दिन गैरी खुशी करज्यात, कारण कि देखा तुमना साठे स्वर्ग मा मोठा फय शे, एनासाठे कि तेस्नी त्या भविष्यवक्तास्ले ज्या गैरा पहिले होतात, ह्याच प्रमाणे छळ करेल होता. पण तुमना साठे कितला भयानक हुईन, ज्या मालदार शेतस, कारण कि तुमी (पहिले पासून) आपली खुशी भेटी जायेल शे. तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण कि तुमना जोळे सर्व काही शे, जी तुमनी ईछ्या शे, तरी बी भुक्या होश्यात. तुमना साठे कितला भयानक हुईन, ज्या आते हासतस, कारण कि तुमी दुख करश्यात आणि रळश्यात. तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण कि तुमना पूर्वजस्नी बी खोटा भविष्यवक्तास्ना बारामा चांगल्या गोष्टी सांगेल होतात. “पण मी तुमी आयकनारस्ले सांगस, कि आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा, जो तुमना शी वाईट वागस, तेस्न चांगल करा. जो तुमले श्राप देस, तेस्ले आशीर्वाद द्या, जो तुमना अपमान करस, तेस्ना साठे प्रार्थना करा. जो कोणी तुना उजवा गाल वर थाप मारस, तेना कळे दुसरा बी फिराई द्या, आणि कदी कोणी तुनावर आरोप करीसन तून वरला कपळा लेवान देखस, तेले लांबझगा बी ली लेवू दे. जो कोणी तुना कळून मांगस, तेले दे, आणि जो तुनी वस्तू हिसकाय लेस, तेना पासून नको मांगू. आणि जस तुमी देखतस कि लोक तुमना संगे करोत, तुमी बी तेस्ना संगे तसाच करा.” जर तुमी आपला वर प्रेम ठेवणारस्वरच वर प्रेम ठेवश्यात, त परमेश्वर तुमले फय नई देवाव, कारण कि पापी बी आपला वर प्रीती ठेवणार वर प्रीती ठेवतस. कारण कि कदी तुमी आपला चांगला करणारच संगे चांगल करतस, त तुमना काय महत्व? कारण कि पापी बी असाच करतस. ज्या परमेश्वर ना नियम ना पालन नई करतस, अशीच गोष्ट करतस. आणि कदी तुमी तेले उसना देवोत, जेस्ना कळून परत लेवणी आशा ठेवतस, त तुमना काय महत्व? आठ लोंग कि पापी पापिस्ले उसना देतस, कारण कि तेस्ले अस वाटस कि ते तेस्ले परत भेटी जाईन. पण आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा, आणि चांगल करा, आणि परत भेटानी आशा नई ठीसन उसना द्या, आणि तुमना साठे मोठा फय हुईन, आणि तुमी परात्पर परमेश्वर ना पोर ठरशात, कारण कि तो तेस्ना वर ज्या धन्यवाद नई करतस आणि वाईट वर बी कृपाळू शे. जसा तुमना बाप दयाळू शे, तसाच तुमी बी दयाळू बना. दोष नका लावा, त तुमना वर बी दोष लावामा नई येवाव, दोषी नका ठरावा, त तुमी बी दोषी नई ठरावामा येवावत, माफ करा, त तुमनी बी माफी करामा ईन. देत जा, त तुमले बी देवामा ईन, लोक पुरा माफ दाबी दाबिसन आणि हालाई हालाईसन आणि खाले पाळत तुमना खोयामा टाकतीन, कारण कि ज्या प्रकारे तुमी दुसरास्ना न्याय करस त, तुमना बी न्याय करामा ईन. नंतर तेनी तेस्ले एक दाखला सांग, काय अंधा, अंधा ले रस्ता दाखाळू सकस का? आणि जर अंधा-अंधा ले रस्ता दाखाळीन त त्या दोनी खड्डा मा पळतीन. शिष्य आपला गुरु तून मोठा नई, पण जव तो आपला प्रशिक्षण पुरा करीलीन, तव तो आपला गुरु सारखा हुईन. तू आपला मित्र ना धाकली चुकी मुळे न्याय काब करस, जो कि डोया मा फपुटाना सारखा शे, जव कि तुना जीवन मा मोठ्या चुक्या शेतस, ज्या कि तुना डोया मा बांडूक सारखा शेतस. जव तुना स्वता ना मधमा गैरा मोठ्या चुका शेतस, त तुले स्वता तून धाकला चुक्या वाला कोणी व्यक्ती नि मदत कराना प्रयत्न नई कराले पाहिजे. ओ कपटी, पहिले आपला स्वता ना मोठा चुकीस्ले सुधारी ले, मंग तू स्पष्टपणे आपला मित्र ना डोया मा देखीसन फपुटाले काळी सकस, आणि दुसरास्ले तेस्ना धाकला चुकीस्ले सुधाराले मदत करू सकस. कोणताच चांगला झाळ नई जो वायबार फय लयस आणि नईत कोणी वायबार झाळ शे जो चांगला फय लयो. हर एक झाळ आपला फय वरून वयखावस, कारण कि लोक झुळपास मधून अंजिर नई तोळतस, आणि नई बोर वरून अंगूर. चांगला माणुस आपला मन ना चांगला खजाना मधून चांगल्या गोष्टी काळस, आणि वाईट माणुस आपला मन ना वाईट भांडार मधून वाईट गोष्टी काळस, कारण कि जे मन मा भरेल शे तेच तेना तोंड मधून निघस. जव तुमी मन सांगान नई आयकतस, त काब मले, हे प्रभु, हे प्रभु सांगतस? जो कोणी मना जोळे एस, आणि मना गोष्टी आयकीसन तेस्ले माणस, मी तुमले सांगस कि तो कोणा सारखा शे? तो त्या माणुस सारखा शे, जेनी आपला घर खडक वर पाया बनाव. पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, पण ते नई पडण, कारण कि तेना पाया खडकावर उभा करेल होता. पण जो कोणी मना ह्या गोष्टीस्ले आयकस आणि तेनावर नई चालस, तो त्या मूर्ख माणुस सारखा ठरीन, जेनी आपल घर रेती वर बनाव. पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, आणि ते घर पडीसन नाश हुय ग्या. येशु आपला सगळ्या गोष्टीस्ले तठे उपस्थित लोकस्ले आयकाळा नंतर कफर्णहूम नगर मा उना. आणि शंभर सैनिकस्ना रोमी अधिकारी ना एक दास जो तेना प्रिय होता, आजार कण मरा वर होता. तेनी येशु नि चर्चा आयकीसन यहुदीस्ना कईक पूर्वजस्ले तेले हय विनंती कराले तेना कळे धाळना, कि ईसन मना दास ले बरा करो. त्या येशु जोळे ईसन तेले गैरी विनंती करीसन सांगाले लागनात, कि “तो इतला योग्य शे, कि तेना साठे हय करो. कारण कि तो आमना जातीस्ले प्रेम करस, आणि तेनीच आमना प्रार्थना घर ले बनायेल शे.” येशु तेस्ना संगे संगे चालना, पण जव तो घर पासून दूर नई होता, त तो अधिकारी जो यहुदी नई होता, तेना कळे गैरा मित्रस व्दारे सांगीसन धाळ, कि प्रभु दुख नको उचलू, कारण कि मी ह्या योग्य नई, कि तू मना घर मा येवो. एनासाठे मी स्वता ले ह्या योग्य बी नई समजना, कि तुना जोळे येवू, पण फक्त तोंड कण सांगी दे त मना दास बरा हुई जाईन. मी बी अधिकारी माणुस शे, आणि शिपाई मना हात मा शे, आणि जव एक ले सांगस, जा, त तो जास, आणि दुसराले सांगस, कि ये, त येस, आणि आपला दुसरा दास ले कि हई कर, त तो तेले करस. हई आयकीसन येशु ले आश्चर्य वाटण, आणि तेनी तोंड फिराईसन त्या गर्दी ले जी तेना मांगे ईऱ्हायंती सांग, “मी तुमले खरज सांगस, कि मले पुरा इस्त्राएल देश मा एक बी असा माणुस नई भेटणा, जो ह्या दुसरा जाती ना माणुस सारखा मनावर विश्वास करस.” तव धाळेल लोक जव घर परत उनात त देखनात कि तो दास बरा हुई जायेल शे. दुसरा दिन तो नाईन नाव ना एक नगर मा जात होतात, आणि तेना शिष्य आणि मोठी गर्दी तेना संगे जाई ऱ्हायंती. जव तो नगर ना दरवाजा जोळे पोहोचना, त देखा, लोक एक मुर्दा ले बाहेर लीजाई ऱ्हायंतात, जो आपली माय ना एखटा पोऱ्या होता. आणि ती विधवा होती, आणि नगर ना गैरा लोक तेना संगे होतात. तिले देखीसन प्रभु ले दया कण भारी गया, आणि तेनी त्या बाई ले सांग, “रळू नको.” तव तो जोळे ईसन मृत शरीर ले हात लावना, आणि उचलणार थांबी ग्यात, तव तेनी सांग, “ओ जवान, मी तुले सांगस उभा हुईजा.” तव तो मरेल उठी बठना, आणि बोलाले लागणा, आणि येशु नि तेले तेनी माय ले सोपी दिना. एनावरून सर्वा लोक भीती कण भारी ग्यात, आणि त्या परमेश्वर नि महिमा करत सांगाले लागनात, कि आमना मधमा एक मोठा भविष्यवक्ता एयेल शे, परमेश्वर आपला लोकस्ले वाचाळाले एयेल शे. आणि तेना बारामा हय गोष्ट पुरा यहूदीया प्रांत आणि आंगे-पांगे ना सर्वा देशस्मा पसरी गी. योहान ले तेना शिष्यस्नी ह्या सगळ्या गोष्टीस्ना संदेश दिनात. तव योहान नि आपला शिष्यस मधून दोन ले बलाईसन येशु ना जोळे हय विचाराले धाळना, कि “काय येणार तूच शे, कि आमी कोणी दुसरा नि वाट देखुत?” तेस्नी तेना कळे ईसन सांग, “योहान बाप्तिस्मा देणार नि आमले तुना जोळे हय विचाराले धाळेल शे, काय येणार तूच शे, कि आमी दुसरा नि वाट देखुत?” त्याच घळी तेनी गैरास्ले आजारस आणि पीळास आणि दुष्ट आत्मास पासून सोळाव, आणि गैरा अंधास्ले दुष्टी दिधी. येशु नि उत्तर दिधा, “जे काही तुमी आयकतस आणि देखतस, ते सगळ जाईसन योहान ले सांगी द्या, कि अंधा देखतस, आणि लंगडा चालतस-फिरतस, कोळी शुद्ध करामा येतस, आणि बहिरा आयकतस, मरेल जित्ता हुई जातस, आणि गरीबस्ले सुवार्ता आयकाळा मा येस. आणि धन्य शेतस, ज्या मनावर शक नई करतस.” जव योहान ना संदेश लयनारा लोक चाली दिनात, त येशु योहान ना बारामा लोकस्ले सांगाले लागणा, “तुमी उजाळ जागा मा काय देखाले जायेल होतात? काय हवा कण हालस ती वेत ले?” त मंग तुमी काय देखाले जायेल होतात? काय माहागा कपळा घालेल माणुस ले? देखा, ज्या रंग वाला कपळा घालतस, आणि सुख विलास मा ऱ्हातस, त्या राजभवन मा ऱ्हातस. त मंग काय देखाले जायेल होतात? काय कोणता भविष्यवक्ता ले देखाले? हा, मी तुमले सांगस, पण भविष्यवक्ता तून बी मोठा ले. हवू तोच शे, जेना बारामा परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, कि देख, मी आपला संदेश लयनारा ले तुना पुळे पुळे धाळस, ज्या तुना साठे पुळे रस्ता तयार करीन. आणि येशु नि सांग, “कि जो बाईस कळून जन्म लीयेल शे, तेस्ना मधून योहान बाप्तिस्मा देणारातून कोणीच मोठा नई, पण जो परमेश्वर ना राज्य मा सर्वा धाकलास्तून धाकला शे, तो तेना पेक्षा बी मोठा शे.” जव तेस्नी येशु ना सांगेल गोष्टीस्ले आयक, त सर्वा लोकस्नी, आठ लगून कि कर लेणारस्नी बी ज्या योहान कळून बाप्तिस्मा लीयेल होतात, घोषणा करणात, कि परमेश्वर धर्मी शे. पण परूशी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि योहान कळून बाप्तिस्मा लेवा साठे नकार दिधा, आणि परमेश्वर नि ईच्छा ले आपला बारामा टाइ दिनात. आणि येशु नि सांग, मी ह्या युग ना लोकस्ना उदाहर कोणा कण देवू कि त्या कोणा सारखा शेतस? त्या, त्या पोरस सारखा शेतस, ज्या बजार मा बठीसन एक दुसराले आवाज देतस आणि सांगतस, कि आमी तुमना साठे खुशी ना गीत म्हणनु पण तुमी नई नाचनात, दुख ना गाना म्हणनु पण तुमी दुखी नई हुईनात. कारण कि योहान बाप्तिस्मा देणार घळी-घळी उपवास करत होता, आणि दारू नई पेत होत, आणि तुमी सांगतस, तेनामा दुष्ट आत्मा शे. माणुस ना पोऱ्या खात-पीत एयेल शे, आणि तुमी सांगतस, देखा, खादाळ व दारूबाज माणुस कर लेणारस्ना आणि पापिस्ना मित्र. पण ज्ञान आपला सर्वा काम ना द्वारे खर ठरावामा येस. नंतर परूशी लोकस मधून कोणी एक नि तेले विनंती करी, कि मना संगे जेवण कर, आणि तो त्या परूशी माणुस ना घर मा जायसन जेवण कराले बठना. त्या नगर नि एक वाईट जीवन जगनारी बाई हय आयकीसन कि येशु परूशी माणुस ना घर मा जेवण कराले बठेल शे, तिनी संगमरमर ना पात्र मा गैर महाग सुगंधीत तेल लईनि, आणि येशु ना पाय जोळे, मांगे उभी ऱ्हायसन, रळत, तेना पायस्ले आसास कण भिगाळाले आणि आपला डोका ना बालस कण पोसाले लागणी, आणि तेना पाय ले घळी-घळी मुक्का लिसन तेस्ना वर सुगंधीत तेल लावत होती. हय देखीसन, तो परूशी माणुस जेनी येशु ले बलायेल होता, आपला मन मा विचार कराले लागणा, कदी हवू भविष्यवक्ता ऱ्हाता त वयखी लेता, कि ती जो तेले हात लाई ऱ्हायनी, ती कोण आणि कशी बाई शे? कारण कि ती वाईट जीवन जगनारी बाई शे. येशु नि तेना विचारस्ले समजीसन त्या परूशी माणुस ले जेना नाव शिमोन होता उत्तर मा सांग, “ओ शिमोन, मले तुले काही बोलन शे,” तेनी सांग, “गुरुजी सांग.” तव येशु नि हवू दाखला दिधा, “कोणी एक मालदार ना दोन लेनदार होतात, एक वर पाच शे दिनार (पाच शे दिन नि मजुरी) आणि दुसरा वर पन्नास दिनार उधार होतात. आणि तेस्ना जोळे परत देवाले काहीच नई ऱ्हायन, त तेनी दोनीस्ना कर्ज माफ करी टाक. त्या दोन माणसस मधून कोणत्या मालदार माणुस शी जास्त प्रेम ठेवीन?” शिमोन नि उत्तर दिधा, मना समज कण त, जेना जास्त कर्ज माफ करी दिना. येशु नि तेले सांग, “तुनी खरज सांगेल शे.” आणि त्या बाई कळे फिरीसन तेनी शिमोन ले सांग, काय तुनी देख कि ह्या बाई नि काय कर? मी तुना घर मा उनू पण आमनी रिती प्रमाणे तुनी मले पाय धुवा साठे पाणी नई दिना, पण इनी मना पाय आसास कण भीगाळा, आणि आपला केसस कण पूस. तुनी मले मुक्का नई दिना, पण जव पासून मी एयेल शे, तव पासून येणी मना पायस्ले मुक्का देवाले नई सोळणी. तुनी मना डोका वर तेल नई लाव, पण येणी मना पाय वर सुगंधीत तेल लायेल शे. “एनासाठे मी तुले सांगस, कि गैरा सावटा पाप ज्या येणी करेल शेत, माफ हुईनात, कारण येणी गैरा प्रेम कर, पण जेना थोळा माफ हुयेल शे, तो थोळा प्रेम करस.” आणि तेनी बाई ले सांग, “तुना पाप माफ हुईनात.” तव ज्या लोक तेना संगे जेवण कराले बठेल होतात, त्या आपला आपला मन मा विचार कराले लागनात, हवू कोण शे जो पापस्ले बी माफ करस जे फक्त परमेश्वर करू सकस? पण तेनी बाई ले सांग, परमेश्वर नि तुले वाचाळी लीयेल शे, कारण कि तुनी मनावर विश्वास करेल शे, शांती मा चालनी जा. एना नंतर तो नगर-नगर आणि गाव-गाव प्रवचन सांगत, आणि परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता आयकाळत फिराले लागणा. आणि त्या बारा शिष्य तेना संगे होतात. काही बाया बी ज्या दुष्ट आत्मास कण आणि आजारस कण सोळावा मा एयेल होत्या. तेस्ना मधून एक मरिया जी मग्दालीया गाव तून होती, जेना मधून सात दुष्ट आत्मा निघेल होत्या. राजा हेरोद ना भंडारी खोजा नि बायको योहान्ना आणि सूसान्ना आणि गैऱ्या आखो बाया, आपली संपत्ती कण येशु आणि तेना शिष्यस्नी सेवा करत होती. जव मोठ्ठी गर्दी एकत्र हुईनी, आणि नगर-नगर ना लोक तेना कळे येत होतात, त तेनी दाखला मा सांग. “देखा एक माणुस आपला वावर मा काही बीज पेरासाठे निघना. पेरतांना काही बीज रस्ता ना किनारा वर पळणा, आणि चेनदाई ग्या, आणि आकाश ना पक्षी तेले खाई ग्यात. आणि काही दगडसवाली जमीन वर पळणा, आणि उगणा, पण माती नई भेटा मुळे सुखी ग्यात. काही काटावाला झाळीस्मा पळणा, आणि झाळ वाळीसन तेले दाबी लीनात.” “आणि काही बीज सुपीक जमीन वर पळणा, आणि उगीसन शंभर पट पिक लयना,” हय सांगीसन तेनी जोरमा सांग, “ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या येले समजाना प्रयत्न करा.” तेना शिष्यस्नी तेले विचार कि “ह्या दाखला ना अर्थ काय शे?” तेनी सांग, “तुमले परमेश्वर ना राज्यांनी समज दियेल शे, पण दुसरास्ले दाखलास्मा आयकाळा मा येस, एनासाठे कि त्या देखीसन बी नई देखोत, आणि आयकतांना आयकोत बी आणि नई समजोत.” दाखला ना अर्थ हई शे, बी त परमेश्वर ना वचन शे. रस्ता ना किनारा वरला त्या शेतस, जेस्नी आयक, त सैतान लगेच ईसन, वचन ले जो तेस्ना मा पेरायेल होत, काळी लीजास, कि कदी असा नई हुई जावो कि त्या विश्वास करीसन तारण ली लेवोत. दघळस वाली जमीन वरला त्या शेतस, कि जव आयकतस, त खुशी मा वचन ले मानी लेतस, पण मुया नई धरा मुळे त्या थोळा टाईम लगून विश्वास ठेवतस, आणि परीक्षा ना टाईम वर, विश्वास कराले बंद करी देतस. ज्या काटेरी झाळीस्मा पळणा, त्या ह्या शेतस, ज्या आयकतस पण पुळे चालीसन चिंता, आणि धन, आणि जीवन ना सुख विलास मा फशी जातस, आणि तेस्ना फय नई पिकत. पण चांगली जमीन वरला त्या ह्या शेतस, ज्या परमेश्वर ना वचन ले आयकीसन चांगल्या आणि उत्तम मन मा समाईसन ठेवतस, आणि धीर धरीसन फय लयतस. कोणी बी एक दिवाले पेटाळीसन तेले एक कटोरा व खाट ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवामा एस कि मधमा येनारस्ले उजाया भेटो. जे काही दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्त्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन. एनासाठे सावधान राहा, कि तुमी कोणत्या प्रकारे आयकतस? कारण कि जेना कळे शे, तेले देवामा ईन, आणि जेना कळे नई शे, तेना पासून ते बी लेवाय जाईन जेले तो आपला समजस. येशु नि माय आणि तेना लहान भाऊ तेना जोळे उनात, पण गर्दी मुळे तेले भेटू नई सकनात. आणि तेले सांगामा उन, कि “तुनी माय आणि तुना भाऊ बाहेर उभा ऱ्हायसन तुले भेटाना देखी ऱ्हायनात.” तेनी तेना उत्तर मा तेस्ले सांग, कि “मना माय आणि मना भाऊ ह्याच शेतस, ज्या परमेश्वर ना वचन आयकतस आणि मानतस.” नंतर तो आणि तेना शिष्य नाव वर चळनात, आणि तेनी तेस्ले सांग, कि “या समुद्र ना त्या पार जावूत,” त तेस्नी नाव सोळी टाकी. पण जव नाव चालीऱ्हायंती, त तो जपी ग्या, आणि समुद्र वर वारा वांधी उणी, आणि नाव पाणी कण भराले लागणी आणि त्या धोका मा होतात. तव तेस्नी तेले जागाळीसन सांग, “गुरुजी! गुरुजी! आमी नाश हुई चालनुत,” तव तेनी उठीसन वारा वांधी ले आणि पाणी ना लाठास्ले धमकाव, आणि त्या थांबी ग्यात, आणि शांती हुईगी. आणि तेनी तेस्ले सांग, “तुमना विश्वास कोठे होता?” पण त्या भ्याय ग्यात, आणि चकित हुईसन आपस मा सांगाले लागनात, “हवू कोण शे? जो वारा वांधी आणि पाणी ले बी आदन्या देस, आणि त्या तेनी आयकतस.” येशु आणि तेना शिष्य समुद्र ना पार गरसेकर प्रांत मा पोचनात, जो त्या पार गालील जिल्हा ना सोमोर शे. जव तो तठ वर उतरणा, त त्या नगर ना एक माणुस तेले भेटणा, जो दुष्ट आत्मा कण ग्रसित होता, आणि गैरा दिनस पासून कापळा नई घालेल होता, आणि नईत घर मा राहत होता, पण मसानखाई मा राहात होता. तो येशु ले देखीसन वोरळना, आणि तेना समोर पळीसन जोरमा सांग, “ओ सर्वशक्तिमान परमेश्वर ना पोऱ्या येशु! तुना मना शी काय काम शे. मी तुले विनंती करस, कि मले दुख नको देवू.” कारण कि तो त्या दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून निघानी आज्ञा दि ऱ्हायंता, एनासाठे कि ती तेनावर घळी-घळी हाबी होत होती, कदी लोक तेले साकयस आणि बेळीस कण जरी बांधत होतात, तरी बी तो त्या बंधनस्ले तोळी टाकत होता, आणि दुष्ट आत्मा तेले उजाळ जागास्मा पयाळत फिरत होती. येशु नि तेले विचार, “तुना नाव काय शे?” तेनी सांग, “सैन्य,” कारण कि गैरा दुष्ट आत्मा तेनामा घुसेल होत्यात. आणि तेस्नी तेले विनंती करी, कि “आमले अग्नीकुंड मा जावानी आज्ञा नको देवू.” तेस्ना तून काही दूर गैराच डुक्करस्ना गवारा चरत होता, त दुष्ट आत्मास्नी येशु ले विनंती करीसन सांग, कि आमले तेस्ना मा घुसू दे, त तेनी तेस्ले जावू दिधा. तव दुष्ट आत्मा तेना मधून निघीसन डुक्करस्मा ग्यात, आणि तो गवारा किनारा ना उतार नि जगावरुन पयत तलाव मा पळी गया, आणि डुबी मरणात. चारणारास्नि हय जे हुयेल होत देखीसन पयनात, आणि नगर मा, आणि गावस्मा जाईसन तेस्नी हई बातमी आयकाळी. आणि लोक हय जे हुयेल होत, तेले देखाले निघनात, आणि येशु जोळे ईसन ज्या माणुस मधून गैरा सावटा दुष्ट आत्मा निघेल होतात, तेले येशु ना समोर जमीन वर कपळा घालेल, आणि शुद्धी मा देखीसन भ्याय ग्यात. आणि देखणारस्नि तेस्ले सांग, कि तो दुष्ट आत्मा कण त्रासेल माणुस कसा बरा हुईना. तव गरसेकर प्रांत ना आंगे-पांगे ना सर्वा लोकस्नी येशु ले विनंती करी कि आमना आठून चालना जा, कारण कि तेस्ना मा बी ती घुशी जायेल होती, त तो नाव वर चळीसन परती ग्या. ज्या माणुस मधून दुष्ट आत्मा निघेल होती, तो तेले विनंती कराले लागणा, कि मले आपला संगे राहू दे, पण येशु नि तेले सांगीसन धाळ. कि “आपला घर जायीसन आपला लोकस्ले ह्या गोष्टी सांग, कि परमेश्वर नि तुना साठे कसा मोठा काम करेल शे.” तो जाईसन पुरा नगर मा सुवार्ता सांगाले लागणा, कि येशु नि मनासाठे कसा मोठा-मोठा काम करात. एक सावा परत येशु परती ऱ्हायंता, त लोक तेले खुशी मा भेटनात, कारण कि त्या सर्वा येशु नि वाट देखी ऱ्हायंतात. आणि देखा, याईर नाव ना एक माणुस जो प्रार्थना घर ना अधिकारी होता, उना, आणि येशु ना पायस्वर पळीसन तेले विनंती कराले लागणा, कि “मना घर चाल.” कारण कि तेनी बारा साल नि एकच पोर होती, आणि ती मरा वर होती. जव तो जाई ऱ्हायंता, तव आठ लगून कि लोक तेना आजू-बाजू गैरा ढकलत होतात. आणि एक बाई होती, जिले बारा वरीस पासून रक्तस्राव ना आजार होता, आणि तिनी गैरा डाक्टर ना हातून गैरा दुख सोसिसन तीनापा जे काही होत ते सगळ खर्ची टाकेल होती, आणि तरी बी कोणा हात कण बरी नई हुई सकेल होती. एनासाठे ती गर्दी मधून तेना मांगे उणी, आणि तेना कपळा ना कोणाले स्पर्श करनी. आणि लगेच तीना रक्तस्राव बंद हुईग्या. येशु गर्दी मा मांगे फिरणा, आणि विचारना, “मना झगा ले कोण हात लावना?” जव सर्वा नकाराले लागनात त पेत्र आणि ज्या लोक तेना संगे होतात तेस्नी तेले सांग, “गुरुजी तू देखी ऱ्हायना कि गर्दी तुले गैरी ढकली ऱ्हायनी शे, आणि तू सांगस कि कोण मले हात लायेल शे.” पण येशु नि सांग, “कोणी तरी मले हात लायेल शे, कारण कि मनी वयखी लीयेल शे, कि मना मधून बरा करानी सामर्थ्य निघेल शे.” जव बाई नि देख, कि मी लपू नई सकत, तव थरथर करत उणी, आणि पायस्मा प्रणाम करनी, आणि सर्वा लोकस समोर सांग, कि मनी कसा मुळे तुले स्पर्श कर, आणि कशी लगेच बरी हुईनी. तेनी तिले सांग, “पोरी हिंमत धर तुना विश्वास नि तुले बर करेल शे, शांती कण जा.” तो हय सांगीच ऱ्हायंता, कि कोणी प्रार्थना घर ना अधिकारी कळून ईसन सांग, “तुनी पोर त मरी गई, गुरुजी ले दुख नको देवू.” येशु नि आयकीसन उत्तर दिधा, “भ्यावू नको, फक्त विश्वास ठेव, त ती वाची जाईन.” घर मा ईसन तेनी पेत्र, आणि योहान, आणि याकोब, आणि धाकली पोर ना माय-बाप ले सोळीसन आखो कोले बी आपला संगे मधमा येवू नई दिना. आणि सर्वा तीना साठे रळी ऱ्हायंतात पण तेनी सांग, “रळा नका, पोर मरणी नई पण जपी ऱ्हायनी.” त्या हय समजीसन कि मरी जायेल शे, तेनी मजाक कराले लागनात. पण तेनी तीना हात धरा आणि सांग, “ओ पोर उठ.” तव तीना जीव परत उना आणि ती लगेच उठनी. नंतर येशु नि माय-बाप ले जताळीसन सांग, कि त्या, “हय गोष्ट नका पसारज्यात कि तेनी पोर ले मरेल मधून जीत्ती करेल होता, तव तेनी तीना माय-बाप ले सांग, कि तिले काही तरी खावाले द्या.” नंतर येशु नि आपला बारा शिष्यस्ले आपला जोळे बलाव, आणि तेस्ले दुष्ट आत्मा आणि आजारस्ले बरा कराना सामर्थ्य आणि अधिकार दिधा. आणि तेस्ले परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता ना बारामा सांगाले, आणि आजारस्ले बरा करासाठे धाळ. आणि येशु नि तेस्ले सांग, “रस्ता साठे काहीच नका लेयज्यात, नईत काठी, नईत झोयना, नईत भाकर, नईत पैसा, आणि नईत दोन शर्ट. आणि ज्या कोणता घर मा तुमी उतरष्यात तठेच राहा, आणि तठूनच परता. जो कोणी तुमले स्वीकार नई करावत, त्या नगर मधून निघतांना आपला पायस्ना फपुटा झटकी टाका, कि तेस्ना विरुद्ध साक्षी होवो. त त्या निघीसन गाव-गाव सुवार्ता आयकाळत आणि सर्वा लोकस्ले बरा करत फिरत ऱ्हायनात. आणि देश ना चौथा भाग ना राजा हेरोद, त्या कामस्ना बारामा आयकीसन घाबरी ग्या, कारण कि कईक लोक सांगत होतात, कि योहान बाप्तिस्मा देणार मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे. आणि कितलाक नि हय, कि एलीया भविष्यवक्ता दिखना शे, आणि दुसरास्नी हय, कि जुना भविष्यवक्तास्ना मधून कोणी जित्ता हुई जायेल शे. पण हेरोद राजा नि सांग, योहान ना त मी स्वता नि डोक कापाले लायेल होता, आते हवू कोण शे, जेना बारामा अशा गोष्टी आयकस?” आणि तेनी तेले देखानी ईछ्या करी. नंतर त्या बारा प्रेषित जेस्ले येशु नि धाळेल होता, परती सन जे काही तेस्नी करेल होत, तेले सांगी टाक, आणि तो तेस्ले आल्लग करीसन बेथसैदा नाव ना एक नगर मा लीग्या. हय समजीसन गर्दी तेना मांगे चालू लागणी, आणि येशु खुशी मा तेस्ले भेटणा, आणि तेस्ना संगे परमेश्वर ना राज्य नि गोष्टी कराले लागणा, आणि ज्या बरा होवाले देखी ऱ्हायंतात, तेस्ले बर कर. जव दुफार ना गैरा उशीर नंतर, तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगाले लागनात, गर्दी ले परत धाळी दे, कि त्या चारीस कल्ला गावस्मा आणि वस्तीस्मा जाईसन, आणि खावाना सन्स करोत, कारण कि आमी आठे सुनसान जागा मा शेतस. येशु नि तेस्ले सांग, “तुमीच तेस्ले खावाले द्या,” तेस्नी सांग, “आमना कळे पाच भाकरी आणि दोन मासा शिवाय आजून काहीच नई, पण हा, जर आमी ह्या सर्वा लोकस्ले खावाळा ना देखतस त आमले जेवण विकत लेवाले जान पळीन,” गर्दी मधून पाच हजार त माणस होतात. येशु नि आपला शिष्यस्ले सांग, “तेस्ले पन्नास-पन्नास करीसन पंगत मा बसाळी द्या.” तेस्नी असच कर, आणि सर्वास्ले बसाळी टाक. तव तेनी त्या पाच भाकरी आणि दोन मासा लीधात, आणि स्वर्ग कळे देखीसन धन्यवाद कर, आणि मोळी-मोळीसन शिष्यस्ले देत ग्या कि लोकस्ले वाळो. सर्वा खाईसन तृप्त हुईनात, आणि वाचेल तुकाळास कण बारा डालक्या भरीसन उचलनात. जव तो एकांत मा प्रार्थना करी ऱ्हायंता, आणि शिष्य तेना संगे होतात, त तेनी तेस्ले विचार, कि “लोक मले काय सांगतस?” तेस्नी उत्तर दिधा, “काही लोक सांगतस, कि तू योहान बाप्तिस्मा देणारा शे, दुसरास्न सांगण शे, कि तू एलीया भविष्यद्वक्ता शे, आणि कोणी हय कि जुना भविष्यवक्ता मधून कोणी जिंदा हुई जायेल शे.” तव येशु नि तेस्ले विचार, “पण तुमी मले काय सांगतस?” पेत्र नि उत्तर दिधा, “तू परमेश्वर ना कळून धाळायेल ख्रिस्त शे.” तव येशु नि तेस्ले जताळीसन सांग, कि “हय कोलेच नका सांगज्यात.” आणि येशु आपला शिष्यस्ले शिकाळाले चालू करना, मी माणुस ना पोऱ्या ना साठे निश्चित शे, कि मले गैरा दुख मधून जान पळीन, आणि पूर्वज लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस, मले तुच्छ समजीसन मारी टाकतीन, आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू. तेनी सर्वास्ले सांग, “जर तुमी मना शिष्य बनाले इच्छितस त, तेले आपली योजनास्ले आणि ईच्छास्ले सोळन पळीन. तो मनासाठे मराले बी तयार पाहिजे (व, तेले मनासाठे दुख उचलाले आणि मरा साठे बी तयार राहाले पाहिजे) तव आखरी वर, तेले मना शिष्य ना रूप मा मना मांगे चालाले पाहिजे.” कारण कि जो कोणी आपला जीव ले वाचाळाना देखस, तो आपला जीव ले दवाळीन, पण जो कोणी मना शिष्य बना मुळे आपला जीव ले दवाळीन, तोच आपला जीव ले वाचाळीन. जर कोणी जग ना सर्वास्तून श्रीमंत व्यक्ती बनीन, पण परमेश्वर ना संगे ना कायम ना जीवन ले दवाळी टाकस, त तेले काय फायदा होस? जर तुमना मधून कोणी बी मले आपला प्रभु ना रूप मा स्वीकार कराले, आणि मनी शिक्षास्ना पालन नई करस, मंग मी माणुस ना पोऱ्या, मी नकारी देसू कि तुमी मना शिष्य शेतस, जव मी पवित्र स्वर्गदूतस ना संगे परत धरती वर येसू. तव सर्वाझन चमकनारी महिमा ले देखतीन जी मना बाप ना सारखी शे. “मी तुमले खरज सांगस, कि तुमना मधून काही लोक ज्या आठे उभा शेतस, कोणी-कोणी असा शेतस, कि जठलोंग परमेश्वर ना राज्य नई देखी लेतस तठ लगून नई मरावत.” ह्या गोष्टीस्ना आठ दिन नंतर तो पेत्र, आणि योहान, आणि याकोब ले संगे लिसन प्रार्थना कराले पहाळ वर ग्या. जव तो प्रार्थना करीच ऱ्हायंता, त तेना चेहरा ना रूप बदली ग्या, आणि तेना कपळा धव्या हुईसन चमकाले लागणा. आणि देखा, मोशे आणि एलीया ह्या दोन पुरुष तेना संगे गोष्टी करी ऱ्हायंतात. त्या महिमा संगे दिखनात, आणि तेनी मरानी गोष्टी करी ऱ्हायंतात जी यरूशलेम शहर मा होणार होती. पेत्र आणि तेना साथी निंद मा भरेल होतात, आणि जव चांगल्या प्रमाणे जागनात, त येशु ना प्रकाश, आणि त्या माणसस्ले ज्या तेना संगे उभा होतात देख. जव त्या तेना कळून जावाले लागनात, त पेत्र नि येशु ले सांग, “गुरुजी, आमन आठे राहाण चांगल शे, त आमी तीन तंबू बनासुत, एक तुना साठे, एक मोशे साठे, आणि एक एलीया साठे.” तेले माहित नई होत, कि काय सांगी ऱ्हायना. तो हय सांगीच ऱ्हायंता, कि एक ढग नि ईसन तेस्ले घेरी लीना, आणि जव त्या, त्या ढग मा घेराले लागनात, त भ्याई ग्यात. आणि त्या ढग मधून हय शब्द निघणा, कि “हवू मना प्रिय पोऱ्या शे आणि एनी आयका.” हय शब्द होताच येशु एखटाच दिखना, आणि त्या शांत ऱ्हायनात, आणि जे काही देखेल हातात, तेनी कोणतीच गोष्ट त्या दिनस्मा कोलेच नई सांग. आणि दुसरा दिन जव त्या पहाळ वरून उतरणात, त एक मोठी गर्दी तेले इभेटणी. आणि देखा, गर्दी मधून एक माणुस नि जोरमा सांग, गुरुजी, मी तुले विनंती करस, कि मना पोऱ्या वर दया कर, कारण कि तो मना एकच शे. आणि देख, एक दुष्ट आत्मा तेले धरस, आणि तो अचानक आराया मारस, आणि ती तेले असा मुरघळी टाकस, कि तो तोंड मधून फेस भरी लयस, आणि तेले चेन्दिसन गैरी कठीणता कण सोळस. आणि मनी तुना शिष्यस्ले बी विनंती करी, कि ती वाईट आत्मा ले काळोत, पण त्या काळी नई सकनात. येशु नि उत्तर दिधा, “ओ विश्वासहीन आणि कुटील लोक मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? आपला पोऱ्या ले आठे लई ये.” तो ईच ऱ्हायंता कि दुष्ट आत्मा नि तेले उपटीसन मुरघळ, पण येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, आणि पोऱ्या ले बरा करीसन तेना बाप ले सोपी टाक. तव सर्वा लोक परमेश्वर ना महान सामर्थ कण चकित हुईनात. पण जव सर्वा लोक त्या सर्वा काम कण ज्या तो करत होता, चकित होत होतात, त तेनी आपला शिष्यस्ले सांग, “ह्या गोष्टी नका विसरज्यात कारण कि लवकर कोणी, मले, माणुस ना पोऱ्या ले, मना शत्रू अधिकारी ले, सोपी दिन.” पण त्या ह्या गोष्टीस्ले नई समजत होतात, आणि हय तेस्ना पासून दपेल ऱ्हायनी, कि त्या तेले समजा ले नको पाहिजे, आणि त्या ह्या गोष्ट ना बारामा तेले विचाराले भ्यात होतात. नंतर तेस्ना मा हवू विवाद होवाले लागणा, कि आमना मधून मोठा कोण शे? पण येशु नि तेस्ना मन ना विचार वयखी लीधा, आणि एक पोऱ्या ले लिसन आपला जोळे उभा कर. आणि तेस्ले सांग, “जो कोणी मना नाव तून ह्या बाळ ले स्वीकार करस, तो मले स्वीकार करस, आणि जो कोणी मले स्वीकार करस, तो मना धाळनारले स्वीकार करस, कारण कि जो तुमना मा सर्वास्तून धाकला शे, तोच मोठा शे.” तव योहान नि सांग, “गुरुजी, आमी एक माणुस ले तुना नाव ना अधिकार ना उपयोग करीसन, दुष्ट आत्मास्ले काळतांना देख, आणि आमी तेले मना करनुत, कारण कि तो आमना संगे हुईसन तुना मांगे नई चालत.” येशु नि तेले सांग, “तेले मना नका करा, कारण कि जो आमना विरुद्ध मा नई, तो आमना कळे शे.” जव तेना वरे उचलाई जावाना दिन येवावर होतात, त तेनी यरूशलेम शहर जावाना विचार पक्का करा. आणि तेनी आपला पुळे बातमी देणारा संदेश लयनारा धाळात, त्या शोमरोनी लोकस्ना एक गाव मा ग्यात, कि तेना साठे जागा तयार करोत. पण त्या लोकस्नी तेले घुसू नई दिनात, कारण कि तो यरूशलेम शहर ले जाई ऱ्हायंता. हय देखीसन तेना शिष्य याकोब आणि योहान नि सांग, “प्रभु, तुनी काय ईच्छा शे, कि आमी आदन्या देवूत, कि आकाश मधून आग पळीसन तेस्ले राक करी टाको, जसा एलीया नि करेल होता?” पण तेनी फिरीसन तेस्ले धमकाव, आणि सांग, “तुमले नई मालूम कि तुमी कोणती आत्मा ना शेतस. कारण कि माणुस ना पोऱ्या लोकस्ना जीव नाश कराले नई पण वाचाळा साठे एयेल शे.” आणि त्या कोणता तरी दुसरा गाव मा चालना ग्यात. जसा त्या जावाले तयार हुई ऱ्हायंतात, त कोणी तेले सांग, “हे गुरु, मी तुना शिष्य बनासाठे तुना मांगेच चालसू.” येशु नि तेले सांग, “कोल्हास्ना गुफा आणि आकाश ना पक्षीस्ना खोपा ऱ्हातस, पण मले, माणुस ना पोऱ्या साठे मना जोळे एक घर बी नई शे जठे मी जपी सकू.” तेनी दुसराले सांग, “मना मांगे चालू लाग,” तेनी सांग, “प्रभु मले पयले घर परत जाऊ दे. कि मना बाप ले मरा नंतर, तेले गाळसु आणि तव मी ईसन तुना शिष्य बनसू.” येशु नि तेले सांग, “ज्या लोक आत्मिक रूप कण मरेल शेतस, तेस्ले आपला मुर्दास्ले गाळू दे, पण तू जाईसन परमेश्वर ना राज्य नि प्रचार कर.” आखो एक नि बी सांग, “प्रभु मी तुना मांगे चालसू, पण मले पहिले जावू दे कि आपला घर ना लोकस्ना आखरी सावा निरोप लेवू.” येशु नि तेले सांग, जो कोणी आपला वावर मा नागरस आणि मांगे देखस, तो परमेश्वर ना राज्य ना योग्य नई. एना नंतर प्रभु येशु नि दुसरा आखो सत्तर शिष्यस्ले नेम आणि ज्या-ज्या नगर आणि जागा ले जठे तेनी जावानी योजना बनायेल होती, तठे आपला पुळे दोन-दोन करीसन धाळना. आणि तेनी आपला शिष्यस्ले सांग, “ज्या प्रकारे वावरस्मा गैरा पिक ऱ्हास, असा गैरा लोक शेतस, ज्या परमेश्वर ना वचन ले आयकाना साठे तयार शे. पण परमेश्वर ना राज्य ना बारामा सांगाणा साठे लोक कमी शेतस. एनासाठे वावर ना मालक ले विनंती करा कि तो वावर मधला पिक कापा साठे मजुर धाळो.” जा, देखा, मी तुमले मेंढ्यास्ना सारखा लांडगास्ना मधमा धाळस. एनासाठे नईत बटवा, नईत झोयना लेयज्यात, आणि नईत रस्ता मा कोले नमस्कार करज्यात. ज्या कोणता घर मा जावोत पहिले सांगा, कि ह्या घर मा शांती येवो. जर एक शांतीप्रिय माणुस अशीन, त तुमनी शांती तेस्ना वर पोहचीन, पण जर त्या योग्य नई होणार, त तुमनी शांती तुमना कळे परत इजाईन. त्याच घर मा राहा, आणि जे काही तेस्ना कळून भेटस, तेच खा-प्या, कारण कि मजुर ले आपली मजुरी भेटाले पाहिजे, घर-घर नका फिरज्यात. आणि ज्या नगर मा जाश्यात, कदी तठला लोक तुमले स्वीकार करतीन, त जे काही तुमना समोर ठेवामा येवो तेच खावा. तठला आजारीस्ले बरा करा, आणि तेस्ले सांगा, कि परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे. पण ज्या नगर मा जावो, आणि तठला लोक तुमले स्वीकार नई करावत, तव तेस्ना बजारस्मा जाईसन सांगा. कि तुमना नगर ना फपुटा बी, जी आमना पाय वर लागेल शे, आमी तुमना समोर झटकी देतस, तरी बी हय जानील्या, कि परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे. मी तुमले सांगस, कि त्या दिन त्या नगर नि दशा सदोम नि दशा तून सहन करा योग्य हुईन. हाय, खोराजिन, हाय, बेथसैदा नगर जे सामर्थ्य ना काम तुमना मा करेल शे, जर ते सोर आणि सिदोन शहर मा करामा येत, त तठला लोक गैरा पयलेच गोणताट आंगवर ली लेतात आणि आपला वर राक छिळकि लेतात, हई दाखाळा साठे कि त्या आपला पापस पासून मन फिराई लीयेल शेतस. पण न्याय ना दिन तुमनी दशा तून सोर आणि सिदोन शहर नि दशा सहन करा योग्य हुईन. ओ कफर्णहूम नगर ना लोक, काय तू स्वर्ग लोंग उंच करामा येशीन? त तुमले अधोलोक लोंग खाले पाळामा ईन, “जो तुमनी आयकस, तो मनी आयकस, आणि जो तुमले तुच्छ समजस, तो मले तुच्छ समजस, आणि जो मले तुच्छ समजस तो मना धाळनारले तुच्छ समजस.” त्या सत्तर शिष्य खुशिमा परत ईसन सांगाले लागनात, “प्रभु, दुष्ट आत्मास्नी बी आमना गोष्टीस्ले मान जव आमी तुना नाव कण आदन्या दिधी.” येशु नि तेस्ले सांग, “जव दुष्ट आत्मास्नी तुमनी आदन्या ले मान, त मनी सैतान ले अचानक आकाश मधून वीज पळा सारखा पळत देखनु.” देखा, मनी तुमले सापस्ले आणि विंचूस्ले चेन्दाना अधिकार दियेल शे, आणि शत्रू (सैतान) नि पुरी सामर्थ्य वर अधिकार दियेल शे, आणि कोणत्याच वस्तू कण तुमले हानी नई होवाव. पण खुश नका व्हा, कारण कि दुष्ट आत्मा तुमना आदन्या ले मानतस, पण एना पासून खुशी व्हा, कि तुमना नाव स्वर्ग मा लिखेल शे. त्याच क्षण येशु पवित्र आत्मा मा भरीसन खुशी मा भरी ग्या, आणि सांग, “ओ बाप, स्वर्ग आणि पृथ्वी ना प्रभु, मी तुना धन्यवाद करस, कि तुनी ह्या गोष्टीस्ले समजदार आणि ज्ञानी लोकस पासून दपाळी ठेव, आणि ज्या लोक साधारण लोकस सारखा शेतस. तेस्ले प्रगट कर, हा, ओ बाप, कारण कि तुले हई चांगल वाटण. मना बाप नि मले सर्व काही सोपी दियेल शे, आणि फक्त तोच शे जो पोऱ्या ले ओयखस, एकच जो खरज बाप ले ओयखस तो पोऱ्या शे, आणि एना शिवाय, पोऱ्या कोणी खास लोकस्ले बाप ना बारामा सांगाणा निर्णय करस.” आणि शिष्यस कळे फिरीसन एखटा मा सांग, “धन्य शे तुमना डोया, ज्या ह्या गोष्टी ज्या तुमी देखतस, आणि तुमना कान, कि त्या आयकतस. कारण कि मी तुमले खरज सांगस, कि गैरा भविष्यवक्तास्नी आणि धर्मीस्नी विचार कि ज्या गोष्टी तुमी देखतस, देख, पण नई देखतस, आणि ज्या गोष्टी तुमी आयकतस, आयकनात, पण नई आयक.” एक दिन जव येशु लोकस्ले शिकाळी ऱ्हायंता, देखा, एक मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक उठाना, आणि हय सांगीसन तेनी परीक्षा कराले लागणा, कि “उत्तम गुरुजी, कायम ना जीवन ना वारीस होवा साठे, मी काय करू?” येशु नि तेले सांग, कि “मोशे ना नियम मा काय लिखेल शे? तू तेस्ले कसा समजस?” तेनी उत्तर दिधा, कि “तू प्रभु आपला परमेश्वर ले आपला पुरा मन, जीव, शक्ती आणि बुद्धी कण प्रेम ठेव, आणि आपला शेजारी संगे आपला सारखा प्रेम ठेव.” तेनी तेले सांग, तुनी बरोबर उत्तर दिधा, हईच कर त तुले कायम ना जीवन भेटीन. पण तेनी आपला कार्यस्ले खरज ठरावासाठे, (म्हणजे दुसरा जातीस संगे प्रेम नई ठेवण) येशु ले विचार, “त मना शेजारी कोण शे?” येशु नि एक गोष्ट द्वारे उत्तर दिधा, कि “एक माणुस यरूशलेम शहर मधून यरीहो शहर ले जाई ऱ्हायंता, कि डाखूस्नी तेनावर हल्ला करा आणि तेना कपळा आणि सर्व काही जे तेना जोळे होत हिसकाय लीनात, आणि मारी कुटीसन तेले आधमरता सोळीसन चालना ग्यात. आणि अस हुईन कि त्याच रस्ता वरून एक यहुदी पुजारी जाई ऱ्हायंता, पण तेले देखीसन बिगर तेनी मदत कराना चालना ग्या. ह्याच प्रमाणे एक लेवी माणुस जो मंदिर ना काम करत होता, त्या जागा वर उना तो बी तेले देखीसन बिगर तेनी मदत कराना चालना ग्या. पण एक शोमरोन प्रांत ना एक माणुस तठे ईनिघणा, आणि तेले देखीसन दया करना. आणि तेना जोळे ईसन आणि तेनी तेना घाव वर जैतून ना तेल आणि द्राक्षरस टाक आणि नंतर तेना घाव वर पट्टी बांधी आणि आपली सवारी वर टाकीसन उतारशाळा मा लीग्या आणि तेनी सेवा करी. दुसरा दिन जव तो निंघनार होता, त तेनी दोन दिनार (दोन दिन नि मजुरी) काडीसन उतारशाळा ना मालक ले दिना आणि सांग, एनी सेवा चालूच ठेवजो, आणि जे काही तून आखो लागीन, ते मी तुले परत एवावर दिसू. तव येशु नि तेले विचार, तुनी समज मा जेनावर डाखूस द्वारे हल्ला हुयेल होता, त्या तीनस मधून ज्या त्या रस्ता वरून जाई ऱ्हायंतात त तेना शेजारी कोण ठरणा?” तेनी सांग, “तोच जो तेनावर दया करना,” येशु नि तेले सांग, “जा, तू बी तसाच कर.” नंतर येशु आणि तेना शिष्य एकत्र प्रवास करी ऱ्हायंतात, आणि त्या एक गाव मा पोहोचनात. जव त्या पोहोचनात, त मार्था नाव नि एक बाई नि तेना घर मा स्वागत कर. आणि मरिया नाव नि तेनी एक बहिण होती, ती प्रभु ना पाय मा बठीसन तेनी शिक्षा ले आयकत होती. पण मार्था जेवण ऱ्हांदत-ऱ्हांदत उबगी गई, आणि तेना जोळे ईसन सांगाले लागणी, “ओ गुरुजी, काय तुले काहीच विचार नई कि मनी बहिण नि मले सर्वा काम कराले एखटीच सोळी दियेल शे? त तिले सांगी दे, कि मनी मदत करो.” येशु नि तिले उत्तर दिधा, “मार्था, ओ मार्था, तू गैरा गोष्टीस साठे चिंता करस आणि घाबरस. पण एक गोष्ट नि गरज शे आणि त्या उत्तम भाग ले मरिया नि निवाळी लीयेल शे, जो तीना पासून हिस्कावायनार नई.” एक दिन येशु कोणत्या तरी जागा वर प्रार्थना करी ऱ्हायंता, आणि जव तो करी लीयेल होता, त तेना शिष्यस मधून एक नि तेले सांग, “गुरुजी, जस योहान बाप्तिस्मा देणार नि आपला शिष्यस्ले प्रार्थना कराले शिकाळ, तसाच आमले तू बी शिकाळी दे.” आणि तेनी तेस्ले सांग, “जव तुमी प्रार्थना करश्यात, त ह्या प्रकारे करा, ओ आमना स्वर्ग मधला बाप, तुना पवित्र नाव ना आदर करामा येवो. तुना राज्य येवो. आम्हनी दिन भर नि भाकर आज आमले देत जा. आणि आमना पापस्ले माफ कर, कारण कि आमी बी आपला सर्वा अपराधीस्ले माफ करतस, आणि आमले परीक्षा मा नको लयजो. पण सैतान पासून आमले वाचाळ.” येशु नि तेस्ले सांग, समजी ल्या कि तुमना मा कोणी आधी रात ले आपला कोणी मित्र जोळे जाईसन सांगो, मित्र, मले तीन भाकरी उसनवार दे, कारण कि मना एक मित्र प्रवास करीसन मना जोळे पोहोचेल शे, आणि तेले खावाळा साठे मना जोळे काहीच नई शे. आणि तुना मित्र मधून उत्तर देवो, कि मले त्रास नको देवू, आते त मनी आपला दार बंद करी लीयेल शे, आणि मना पोर मना संगे बिछाना वर शेतस, एनासाठे मी उठीसन तुले देवू नई सकत. मी तुमले सांगस, कदी तुना मित्र हुईसन बी तुले उठीसन नई देत, तरी बी तुले लाज नई शे मांगा मुळे तुले जीतली गरज शे, तितल उठीसन दिन. पण मी तुमले सांगस, कि “मांगा त तुमले देवामा ईन, झामला त तुमले भेटीन, वाजाळा त तुमना साठे उघाळामा ईन. कारण कि जो कोणी मांगस, तेले भेटस, आणि जो झामलस, तेले सापडस, आणि जो ठोकस, तेना साठे उघडामा ईन. तुमना मधून कोणी बी बाप, आपला पोऱ्या ले दघळ नई देवाव जर तो तुमना पासून भाकार मांगस त. ह्याच प्रमाणे, कोणी बी माणुस आपला पोऱ्या ले मासा मांगावर विषारी साप नई देवाव. कदी अंडा मागस त तेले विन्चू देस? त तुमी वाईट हुईसन, आपला पोरस्ले चांगल्या वस्तू देवाना देखतस, त तुमना स्वर्ग मधला बाप आपला मांगनारस्ले पवित्र आत्मा काब नई देवाव?” नंतर तेनी एक मुक्की दुष्ट आत्मा ले काळ, आणि जव येशु नि दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून भायेर काळी टाक, त तो मुक्का बोलाले लागणा, आणि लोकस्नी आश्चर्य कर. पण तेस्ना मधून कितलाक नि सांग, “हवू त दुष्ट आत्मास्ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.” दुसरास्नी तेनी परीक्षा लेवा साठे तेना कळून स्वर्ग मधून एक चमत्कारी चिन्ह मांगा. पण तेनी, तेस्ना मन ना गोष्टीस्ले समजीसन, तेस्ले सांग, जर एक राज्य ना लोक आपस मा भांडतस त्या नाश हुई जातीन. आणि ज्या परिवार ना लोक एक दुसरा ना विरुद्ध मा वाटायेल शेतस, त तो परिवार एकत्र नई राहू सकाव. आणि कदी सैतान आपलाच विरोधी हुई जास, त तेना राज्य कसा बनेल ऱ्हाईन? कारण कि तुमी मना बारामा त सांगतस, कि हवू त सैतान ना मदत कण दुष्ट आत्मा काळस. चांगल, कदी मी सैतान नि मदत कण दुष्ट आत्मास्ले काळस, त तुमना वंश कोणी मदत कण काळतस? एनासाठे तुमनाच वंश तुमना न्याय करतीन. पण कदी मी परमेश्वर ना सामर्थ कण दुष्ट आत्मास्ले काळस त परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे. जव ताखतवर माणुस हत्यार लिसन आपला घर नि राखोई करस, त तेनी संपत्ती वाचेल ऱ्हास. पण तेना तून जास्त कोणी आखो ताखतवर माणुस हल्ला करीसन तेले जिकी लेस, त तेना त्या हत्यार जेस्ना वर तेना विश्वास होता, हिसकाई लेस आणि तेनी संपत्ती लुटीसन वाटी देस. जो मना संगे नई, तो मना विरोध मा शे, आणि जो मना संगे नई गोया करस, तो पसरावस. “जव दुष्ट आत्मा माणुस ना शरीर मधून निघी जास त सुक्की जागा मा आराम झामलाले फिरस, आणि सापळत नई. त ती स्वता ले सांगस, कि ज्या व्यक्ती मधून मी एयेल शे, जठून मी निघेल होती, परती जासू, आणि जाईसन सूना देखीसन, त्या व्यक्ती ना जीवन ले घर ना सारखी देखस, जेले स्वच्छ करामा एयेल शे. तव ती दुष्ट आत्मा जाईसन आपला तून जास्त वाईट सात दुष्ट आत्मास्ले आपला संगे लई येस, आणि त्या व्यक्ती मा घुशिसन तठे ऱ्हास, आणि त्या माणुस्नी मांगली स्थिती पयले तून बी जास्त खराब हुई जास.” जव येशु ह्या गोष्टी सांगीच ऱ्हायंता, त गर्दी मधून कोणी बाई नि जोरमा सांग, धन्य शे ती बाई जेनी तुले जन्म दिधा आणि तुले दुध पाजा. तेनी सांग, हा, हय खराज शे, पण धन्य त्या शेतस, ज्या परमेश्वर ना वचन आयकतस आणि पालन करतस. जव मोठी गर्दी एकत्र होत जात होती, त तो सांगाले लागणा, कि ह्या पीडी ना वाईट आणि व्यभिचार लोक, चमत्कारी चिन्ह झामलतस पण योना भविष्यवक्ता ना चिन्हले सोळीसन आजून दुसरा कोणताही चमत्कारी चिन्ह तुमले नई भेटाव. जसा योना, निनवे ना लोकस साठे चिन्ह ठरणा, तसाच मी माणुस ना पोऱ्या बी ह्या युग ना लोकस साठे ठरसू. दक्षिण दिशा नि राणी न्याय ना दिन ह्या युग ना लोकस संगे उठीसन, तेस्ले दोषी ठराईन, कारण कि ती शलमोन ना ज्ञान आयकाले गैरा दूर तून उणी, आणि देखा आठे तो शे, जो शलमोन तून बी मोठा शे. निनवे ना लोक न्याय ना दिन ह्या युग ना लोकस्ना संगे उठीसन, तेस्ले दोषी ठरावतीन, कारण कि तेस्नी योना ना प्रचार आयकीसन मन फिरावा, आणि आठे तो शे, जो योना तून बी मोठा शे. “कोणी बी एक दिवाले पेटाळीसन कटोरा ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवामा एस कि मधमा येनारस्ले उजाया भेटो. तुना डोया शरीर साठे एक दिवा ना सारखा शेतस, एनासाठे कदी तुना डोया चांगला शेतस, तव तुना सर्वा शरीर उजळ हुईन. पण जव त्या वाईट शेतस, त तुना शरीर बी अंधकारमय शे. एनासाठे सावधान ऱ्हायज्यात, कि जो उजाया तुमना मा शे, तो अंधकारमय नई जावो. एनासाठे कदी तुना पुरा शरीर उजाया शे, आणि तेना कोणता बी भाग आंधारा मा नई शे, तव पुरण-पुरा शरीर अस उजाय हुईन, जसा एक दिवा आपली चमक कण तुले उजाया देस.” जव तो गोष्टी करी ऱ्हायंतात, त कोणी परूशी माणुस नि तेले विनंती करी कि मना कळे जेवण कराले बस, आणि तो मधमा जाईसन जेवण कराले बठना. एक दिन काही परूशी लोक आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या यरूशलेम शहर मधून एयेल होतात, येशु कळे ईसन सांगू लागनात. तुना शिष्य आमना रीतीरिवाज नुसार काब नई करतस? त्या गंधा हात वर जेवण काब करतस? प्रभु येशु नि तेले सांग, “परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी असा भांडा शे, ज्या बाहेरून स्वच्छ शेतस, पण आत मधून आते बी गंधा शेतस. म्हणजे, तुमी स्वता ले चांगला लोकस सारखा दाखाळतस. पण तुमना मनस्मा तुमी लालच, आणि स्वार्थ कण भरेल शेतस. ओ बुद्धीहीन लोकसहोण, जेनी बाहेर ना भाग बनाव, काय तेनी आतमधला भाग नई बनाव? पण हा, मधली वस्तूस्ले दान करी द्या, त देखा सर्व काही तुमना साठे शुद्ध हुई जाईन.” पण ओ परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी पुदिना आणि सुदाब (जीरा) ना आणि सर्वा प्रकार ना जळी-बुटी ना दहावा भाग देतस, पण न्याय ले आणि परमेश्वर ना प्रेम ले टाइ देतस, पाहिजे त होता कि एस्ले बी करत ऱ्हातात, आणि तेस्ले बी नई सोळतस. ओ परूशी लोकसहोण, तुमना वर हाय. तुमी प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर बसान पसंद करतस, आणि बजारस्मा लोक तुमले आदरताशी नमस्कार कराले पाहिजे असा देखतस. हे कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी, तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण कि तुमी चुना लायेल कबर ना सारखा शेतस, ज्या वरून तर सुंदर दिखतस, पण मधमा मरेल ना हाळ आणि सर्वा प्रकार नि मळीनता कण भरेल शेतस. तव एक मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक नि तेले उत्तर दिधा, कि “गुरुजी, ह्या गोष्टी सांगीसन तू आमनी निंदा करस.” तेनी सांग, “ओ मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक तुमना वर बी हाय. तुमी मोठा वझा जेस्ले उचलान कठीण शे माणसस वर टाकतस पण तुमी स्वता त्या वजन ले आपली एक बोट बी नई लावतस. हाय तुमना वर. तुमी त्या भविष्यवक्तास्ना कबर बनावतस जेस्ले तुमनाच पूर्वजस्नी मारी टाकेल होता. त तुमी साक्षी शेतस, आणि आपला पूर्वजस्ना कामस्मा भागी शेतस, कारण कि तेस्नी त तेस्ले मारी टाक, आणि तुमी तेस्नी कबर बनावतस. एनासाठे परमेश्वर नि आपला ज्ञान ना द्वारे सांगेल शे, कि मी तेस्ना जोळे भविष्यवक्तास्ले आणि संदेश लयनारस्ले धाळसू, आणि त्या तेस्ना मधून कईक ले मारी टाकतीन, आणि कितलाकस्ले त्रास देतीन. एनासाठे कि जीतला भविष्यवक्तास्ना रक्त जग नि निर्मिती पासून व्हावाळा मा एयेल शे, सर्वास्ना लेख ह्या युग ना लोकस पासून लेवामा येवो. हाबेल नि हत्या पासून त जखऱ्या नि हत्या लगून जो वेदी आणि परमेश्वर ना मंदिर ना मधमा घात करामा उना, मी तुमले खरज सांगस, तेस्ना लेख ह्याच टाईम ना लोकस पासून लेवामा ईन. हाय, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्वर. कि तुमनी न्यान नि किल्ली त ली लीधी, पण स्वता प्रवेश नई करणात, आणि प्रवेश करणास्ले बी रोकी लीध.” आणि जव तेनी ह्या गोष्टी तेस्ले सांग त तो तठून निघणा, त मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तेना गैरा मांगे लागी ग्यात आणि वाद-विवाद कराले लागनात, कि तो गैऱ्या गोष्टीस्ना बारामा चर्चा करो. आणि त्या ह्या मोका ले देखत होतात कि येशु ना तोंड मधून निघेल कोणती गोष्ट धरुत आणि तेले दोष लाईसन फसाळी देवूत. इतला मा जव हजारस्नी गर्दी एकत्र हुई गई, आठ लगून कि एक दुसरा ना पाय वर पाय ठिय ऱ्हायंतात, त तो सर्वास्तून पहिले आपला शिष्यस्ले सांगाले लागणा, कि “परूशी लोकस्ना खमीर पासून सावधान ऱ्हायज्यात. जे काही दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन. एनासाठे जे काही तुमनी अंधार मा सांगेल शे, ते उजाया मा आयकामा ईन, आणि जे तुमनी मधली खोली मा कानस्मा सांगेल शे, ते छतस्वर सांगामा ईन.” पण मी तुमले ज्या मना मित्र शेतस सांगस, कि “ज्या शरीर ले मारू सकतस, पण आत्मा ले मारू नई सकतस तेस्ले नका घाबरा. मी तुमले जताळस, कि तुमले कोले घाबराले पायजे, तेलेच घाबरा जेना कळे नरक मा टाकाना अधिकार शे. पण मी तुमले सांगस तेलेच घाबरा.” काय दोन पैसा ना पाच चीळ्या नई विकावतस? तरी बी परमेश्वर तेस्ना मधून एक ले बी नई विसरत. पण तुमना पुरा डोका वरना बाल बी मोजायेल शेतस, घाबरू नका, तुमी गैरा चीमण्यास्तून जास्त मूल्यवान शेतस. मी तुमले सांगस, “जो कोणी लोकस्ना समोर मले स्वीकार करीलीन, तेले माणुस ना पोऱ्या बी परमेश्वर ना दूतस समोर स्वीकार करी लीन. पण ज्या लोकस्ना समोर हई सांगाले भ्यातस कि त्या मना शिष्य शेतस, त मी परमेश्वर ना दूतस समोर सांगी देसू कि त्या मना शिष्य नई शेतस.” “जो कोणी माणुस ना पोऱ्या ना विरोध मा काही गोष्ट सांगस, परमेश्वर त्या लोकस्ना पापस्ले माफ करी दिन. पण जो कोणी पवित्र आत्मा ना बारामा निंदा करीन, तेन अपराध माफ नई करावनार.” “जव लोक तुमले प्रार्थना घर आणि सुभेदारस समोर आणि अधिकारीस्ना समोर लीजावोत, त चिंता नका करज्यात कि आमी कोणत्या प्रकारे आणि काय उत्तर देसुत, कि काय सांगसुत. कारण कि पवित्र आत्मा त्याच घळी तुमले शिकाळी दिन, कि काय सांगाले पाहिजे. कारण कि तुमी तेच शब्द बोलशान जे परमेश्वर नि आत्मा तुमले दिन. शब्द तुमना कळून नई येवाव.” नंतर गर्दी मधून एक माणुस नि येशु ले सांग, “गुरुजी, मना भाऊ ले सांग, कि बाप नि सामप्ती मले वाटी देवो.” येशु नि तेले सांग, “हे मित्र, तुमनी संपती वाटनार व न्याय करणार म्हणून कोणी मले ठरायेल शे?” परत तेनी तेस्ले सांग, “सावधान राहा, आणि सर्वा प्रकार ना लोभ पासून स्वता ले वाचाळी सन ठेवा, कारण कि कोणा जोळे कितली बी संपत्ती का नई ऱ्हावो, तेना त्या संपत्ती मा जीवन नई शे.” तेनी तेस्ले एक दाखला सांग, कि कोणी एक मालदार नि जमीन मा मोठ पिक उन. त तो आपला मन मा विचार कराले लागणा, मले माहित नई कि मी काय करू कारण कि मना आठे पर्याप्त जागा नई शे कि जठे आपला पिक ठेवू. नंतर तेनी सांग, “मले माहिती शे कि मले काय करन शे, मी आपला धान्य ना काही कोठारा मोळीसन तेस्ना तून मोठ्या बनावसू, आणि तठे आपला सर्व पिक आणि संपती ठेवसू. एना नंतर मी आपला स्वता ले सांगसू, कि मना जीव, तुना साठे गैरावर्षस साठे गैरी संपत्ती ठीयेल शे, आराम कर, खा, पी, सुख मा ऱ्हाय. पण परमेश्वर नि तेले सांग, ओ एळा, ह्याच रात ले तू मरी जाशी, तव त्या वस्तूस्ले कोण लीन जेस्ले तुनी आपला साठे एकत्र करेल शे? असच त्या व्यक्ती संगे हुईन जो सर्व काही आपला साठे एकत्र करस पण तो परमेश्वर नि नजर मा मालदार नई.” नंतर तेनी आपला शिष्यस्ले सांग, एनासाठे मी तुमले सांगस, आपला शारीरिक जीवन साठे चिंता नका करा, कि आमी काय खासुत, नईत आपला शरीर साठे कि काय घालसुत. कारण कि जेवण तून जीव आणि कपळा पासून शरीर मोलवान शे. आकाश ना पक्षीस्ले देखा, त्या नईत पेरतस, नईत कापतस, आणि नईत कठोरास्मा एकत्र करतस, तरी बी स्वर्गीय परमेश्वर तेस्ले खावाळस. आणि तुमी निश्चित रूप मा पक्षीस्ना तुलना तून गैरा जास्त किंमत ना शेतस. तुमना मधून असा कोण शे, जो चिंता करीसन थोळा जास्त टाईम लगून जित्ता राहू सकस? एनासाठे कदी तुमी सर्वास्तून धाकला काम बी नई करी सकतस, त मंग दुसरा विषयस्ना बारामा चिंता करा कण काय फायदा? सोसण ना फुलस्वर ध्यान द्या, कि त्या कसा वाढतस, त्या नईत कष्ट करतस. पण मी तुमले सांगस, कि राजा शलमोन बी, आपला सर्वा वैभव मा, त्या फुलस मधून कोणा सारखा कपळा घालेल नई होता. एनासाठे जव परमेश्वर मैदान ना गवत ले जो आज शे, आणि कालदिन आग मा फेकामा ईन, अशी सुंदरता देस, तो निश्चित रूप मा तुमनी बी देखभाल करीन, तुमना विश्वास इतला कमजोर काब शे? आणि तुमी ह्या गोष्ट नि शोध मा नका राहा, कि काय खासुत, आणि काय पीसुत, आणि संशय नका करा. कारण कि संसार नि जात ह्या सगळ्या गोष्टीस्ना शोध मा ऱ्हास, आणि तुमना बाप ले माहित शे, कि तुमले ह्या गोष्टीनी गरज शे. पण परमेश्वर ना राज्य आणि एक धार्मिक जीवन जीवाना प्रयत्न करा, त या सर्वा वस्तू तुमले भेटी जातीन. तुमी मेंढ्यास्ना गवारा सारखा शेतस, एनासाठे कोणतीच गोष्ट कण भ्यावू नका, कारण कि तुमना बाप परमेश्वर ले हय आवळन शे, कि तुमले राज्य देवो. आपली संपत्ती विकीसन दान करी द्या, आणि आपला साठे असा बटवा बनावा, ज्या जुना नई होतस, म्हणजे स्वर्ग मा असा प्रतीफय एकत्र करा जो कमी नई होत, आणि जेना जोळे चोर नई जात आणि किळा नाश नई करत. कारण कि जठे तुमना धन शे, तठेच तुमना मन बी लागेल राहीन. मी परत एसू एनासाठे आपली कमर बांधीसन आणि दिवा पेटाळीसन तयार राहा. आणि तुमी त्या माणसस सारखा बना, जो आपला मालक ना रस्ता देखी ऱ्हायंतात, कि तो लगन मधून परतो आणि जव तो ईसन दार वाजाळो त लगेच तेना साठे उघाळी देवो. धन्य शेत त्या दास, जेस्ना मालक जव त्या परतस आणि तेस्ले जागेल देखतस, मी तुमले खरज सांगस कि तो कमर बांधीसन तेस्ले जेवण कराले बसाळीन, आणि जोळे ईसन तेस्नी सेवा करीन. धन्य शेतस त्या दास, जेस्ले मालक आर्धी रात ले नईत सक्कायमा दिन उगाणा पहिले बी ईसन जागेल देखो. पण तुमी हय समजी ल्या, कि कदी घर ना मालक ले माहिती ऱ्हात, कि चोर कोणता टाईम ले ईन, त जागत ऱ्हाता, आणि आपला घर ले लुट नई देता. तुमी बी तयार राहा, कारण कि मी, माणुस ना पोऱ्या असा टाईम वर स्वर्ग मधून एसू जव तुमी मना येवाना विचार नई करत होवाव. तव पेत्र नि विचार, “प्रभु, काय तू हवू दाखला आमना साठे सांगी ऱ्हायना कि सर्वा साठे.” प्रभु येशु नि सांग, विश्वास योग्य आणि बुद्धीमान दास तो ऱ्हास, जेले घर ना स्वामी दुसरा दास वर लक्ष देवाना साठे नियुक्त करस. जो तेस्ले निश्चित टाईम वर जेवण देवाना साठे सांगस. धन्य शे, जो दास, जेले तेना मालक ईसन असाच करतांना देखात. मी तुमले खरज सांगस, तो तेले आपली सर्वी संपती वर अधिकारी ठराईन. पण तो दास विचार करले लागो, कि मना मालक ले येवाले उशीर शे. आणि आपला साथी दासस्ले माराले लागो, आणि बेवळास्ना संगे खावो-प्येवो. त त्या दास ना मालक असा दिन, जव तो तेना परत येवाना रस्ता नई देखत ऱ्हावाव, आणि अशी घळी वर जेले ती माहित नई ऱ्हावाव, ईजायीन आणि तेले कठोर दंड दिसन तेना वाटा विश्वासघाती ना संगे ठराईन. आणि जो शिष्य जेनी आपला मालक नि ईच्छा काय शे हय समजीसन बी, तयारी नई करी आणि तेनी ईच्छा प्रमाणे नई चालत होवाव त मंग तो गैर मार खाईन. पण जो नई समजीसन मार खावान योग्य काम करस, तो कमी मार खाईन, एनासाठे जेले सावट दियेल शे, तेना कळून जास्त मांगामा ईन, आणि जेले जास्त सोपेल शे, तेना कळून गैर लेवामा ईन. मी पृथ्वी वर आग लावाले एयेल शे, आणि जर ती पयलेच सिल्गेल अशीन त मले आखो काय पाहिजे? मना पुळे भयानक पिळा ना एक बाप्तिस्मा शे, आणि जठ लगून ती पिळा नई हुई जास तठ लगून मी गैरा व्याकुळ शे. काय तुमी समजतस कि मी पृथ्वी वर भेट करावाले एयेल शे? मी तुमले सांगस, नई, पण मी लोकस्ना मधमा शांती नई पण फुट पाळाले एयेल शे. कारण कि आते पासून कदी एक घर मा पाच लोक शेतस, त त्या आपस मा वाटायेल होतीन, तीन लोक ज्या तुनावर विश्वास नई ठेवतस, त्या, त्या दोन लोकस्ना विरोध करतीन ज्या तुनावर विश्वास करतस. बाप पोऱ्या ना विरुद्ध, पोऱ्या बाप ना विरुद्ध, माय पोर ना विरुद्ध, आणि पोर माय ना विरुद्ध, सासू सून ना विरुद्ध, आणि सून सासू संगे विरोध ठेवीन. आणि तेनी गर्दी ले बी सांग, “जव ढग ले पश्चिम कळून उठतांना देखतस, त लगेच सांगतस, कि पाणी पळीन, आणि तसच होस. आणि जव दक्षिण कळे उठतांना देखतस, आणि सांगतस, कि उन पळीन आणि असच होस, ओ कपटी, तुमी आकाश आणि पृथ्वी ना रूप मा फरक करू सकतस, पण या वर्तमान टाईम मा परमेश्वर काय करी ऱ्हायना, एन अर्थ सांगान माहित नई शे का?” आणि “तुमले स्वता निर्णय लेवाले पाहिजे कि तुमना साठे काय करान चांगल शे. जठलोंग तू आपला विरोधी बराबर रस्ता वर शे, तेनाशी फटकामा सहमती कर, अस नई होवाव, कि विरोधी तुले न्यायाधीश ना हात मा सोपीन, आणि न्यायधीश तुले शिपाईस्ले सोपीन, आणि तुले बंदीगृह मा टाकामा येवो. मी तुले खर सांगस. कि जठलोंग तुमी तेना सर्व परत नई दि देतस, जे तुमना वर बाकी शे, तठलोंग तुमी बंदीगृह मधून कदीच नई निंघावत.” त्या टाईम ले काही लोक ईपोहोचनात, आणि येशु ना संगे, त्या गालील जिल्हा ना राहनारस्ना बारामा चर्चा कराले लागनात, जेस्नी त्या पिलात नि हत्या करी टाकेल होती, जव त्या यरूशलेम ना मंदिर मा बलिदान करी ऱ्हायंतात. हय आयकीसन येशु नि तेस्ले उत्तर मा हय सांग, “काय तुमी समजतस, कि ह्या गालील जिल्हा ना लोक बाकी गालील जिल्हा ना लोकस्तून जास्त पापी होतात, एनासाठे तेस्ना वर अशी विपत्ती पळणी?” मी तुमले सांगस, “कि बिलकुल नई, पण जर तुमी आपला पापस पासून मन नई फिरावाव त तुमी बी याच प्रकारे नाश होशान. कि काय तुमी समजतस, कि त्या अठरा लोकस्ना बारामा काय सांगश्यात, ज्या तव मरी ग्यात, जव शिलोह ना गुंमट तेस्ना वर पळी जायेल होता, यरूशलेम शहर ना राहणारस्तून जास्त अपराधी होतात? बिलकुल नई, मी तुमले सांगस, कदी तुमी आपला पापस पासून मन नई फिरावाव त तुमी बी सगळ ह्याच प्रमाणे नाश होशात.” नंतर तेनी हवू दाखला बी सांगा, कि कोणी द्राक्षमया मा एक अंजिर ना झाळ लायेल होता, दर वरीस तो तेनामा फय झामलाले उना, पण नई भेटणा. तव तेनी द्राक्षमया ना राखोया ले सांग, देख तीन वरीस पासून मी ह्या अंजिर ना झाळ ना फय देखाले एस, पण नई दिखत, एले कापी टाक कारण कि हवू चांगली जमीन ले नाश करी ऱ्हायना. तेनी तेले उत्तर दिधा, कि ओ गुरुजी, एले एक आखो वरीस लोंग राहू दे, कि मी एना चारीस कळे कोरीसन खत टाकू. कदी हवू झाळ फय नई देत त तेले कापी टाकजो. आराम ना दिन येशु एक प्रार्थना घर मा शिक्षण देत होता. आणि देखा, तठे एक बाई होती, जिले अठरा वरीस पासून एक विकलांग करणार दुष्ट आत्मा लागेल होती, आणि ती कुबळी हुई जायेल होती, आणि कोणत्याच प्रकारे सीधी नई होवू सकत होती. येशु नि तिले देखीसन बलाव, आणि सांग, “ओ बाई, तू आपली कमजोरी पासून मुक्त हुई गई.” तव येशु नि तीनावर हात ठेव, आणि ती लगेच सीधी हुईगी, आणि परमेश्वर नि स्तुती कराले लागणी. एनासाठे कि येशु नि आराम ना दिन तिले बर करेल होता, प्रार्थना घर ना अधिकारी रागे भारीसन लोकस्ले सांगाले लागणा, “एक हप्ता मा साहा दिन शेतस, जेस्ना मा आमले काम करानी परवानगी देतस, त त्या दिनस्मा ईसन बरा होवोत, पण आराम ना दिन ले नई.” हय आयकीसन प्रभु येशु नि उत्तर दिसन सांग, ओ कपटीसहोण, काय आराम ना दिन तुमना मधून काही लोक आपला बईल आणि गाढव ले खुटा कण सोळीसन पाणी पाजाले नई लीजातस? आणि काय चांगल नई होत, कि हय बाई जी अब्राहाम नि वंश मधली शे, जिले सैतान नि अठरा वर्ष पासून बांधी ठीयेल होता, आराम ना दिन ह्या बंधन पासून मुक्त होवो? जव तेनी ह्या गोष्टी सांगी, त तेना सर्वा विरोधी लज्जित हुई ग्यात, आणि सगळी गर्दी त्या अदभूत ना कामस्तून ज्या तो करत होता, खुश हुईनी. नंतर तेनी सांग, “परमेश्वर ना राज्य कोणा सारखा शे? आणि मी तेनी वर्णन कस करू? तो एक ऱ्हायना दाना सारखा शे, जेले कोणी माणुस लिसन आपला वावर पेरना, आणि तो व्हाळीसन मोठा झाळ बनी ग्या, आणि आकाश ना पक्षी तेना फांद्यास्वर ऱ्हायनात.” तेनी एक आजून दाखला तेस्ले आयकाळ, “मी परमेश्वर ना राज्य नि उपमा कसा देवू? तो खमीर ना सारखा शे, जेले कोणी बाई नि लिसन तीन पाउशेर पीठ मा टाक, आणि होत-होत पुरा पीठ खमीर हुईग्या.” तो आपला शिष्यस संगे नगर-नगर आणि गाव-गाव जाईसन शिक्षण देत, यरूशलेम शहर कळे जाई ऱ्हायंता. आणि कोणी तेले विचार, “हे गुरुजी, काय कईक लोकच कायम ना दंड पासून वाचतीन?” तेनी तेस्ले सांग, परमेश्वर ना राज्य मा अरुंद दरवाजा कण जान कठीण शे, कारण कि मी तुमले सांगस, कि गैरा लोक जावाना देखतीन, पण जावू नई सकावत. जव परमेश्वर, जो घर ना मालक उठीसन दार बंद करी लीयेल हुईन, आणि तुमी बाहेर उभा ऱ्हायसन दरवाजा वाजाळीसन आणि विनंती करीसन सांगाले लागोत, ओ प्रभु, आमना साठे उघाळी दे, आणि तो उत्तर देवो कि मी तुमले नई वायखत, तुमी कोठला शेतस? तव तुमी सांगाले लागश्यात, कि आमी त तुना समोर खायेल पियेल शेतस, आणि तुमी आमना चौकस्मा प्रवचन सांग. पण तो सांगीन, मी तुमले सांगस, मी नई वयखस तुमी कोठून शेतस, हे वाईट काम करणार होण, तुमी सर्वा मना पासून दूर व्हा. तठे रळन आणि दात खान राहीन, जव तुमी अब्राहाम आणि इसहाक आणि याकोब आणि सर्वा भविष्यवक्तास्ले परमेश्वर ना राज्य मा बठेल, आणि स्वता ले बाहेर काळेल देखश्यात. तव पुरा संसार मधून लोक ईसन परमेश्वर ना राज्य मा तेना निवता मा जेवण कराले बठतीन. हय आयक, त्या टाईम ले जेस्ना कायीच महत्व नई शे तेस्ले जास्त महत्वपूर्ण करामा ईन, आणि त्या टाईम ले ज्या जास्त महत्वपूर्ण शे तेस्ना कायीच महत्व नई राव्हाव. त्याच दिन ले कईक परूशी लोकस्नी ईसन येशु ले सांग, “आठून निघीसन चालना जा, कारण कि हेरोद राजा तुले मारी टाकाना देखस.” तव येशु नि तेस्ले सांग, जाईसन त्या व्यक्ती ले जो एक कोल्हा सारखा चालाक शे तेले सांगा, कि देख मी आज आणि काल दुष्ट आत्मास्ले काळत आणि आजारीस्ले बरा करस, आणि मी तिसरा दिन आपला कार्य पुरा करी लीसू. तरी बी मले आज आणि काल आणि परोनदिन मना प्रवास निश्चित शे, कारण कि यरूशलेम शहर ले सोळीसन कोठे बी कोणता भविष्यवक्ता ले मारी टाकामा येवो चांगल नई शे. “ओ यरूशलेम शहर ना लोक, ओ यरूशलेम शहर ना लोक, तुनी त्या भविष्यवक्तास्ले मारी टाक ज्या गैरा पहिले होतात, आणि त्या लोकस्वर दघळ फेक कर जेस्ले तुना जोळे धाळामा एयेल होतात. कितला सावा मी विचार करनू कि कोंबळी आपला पिल्लूस्ले आपला पंख खाले सांभाळ करस, तसाच मी बी तुना पोरस्नि राखोई करू, पण तुले मान्य नई होत. आणि मी तुमले निश्चित रूप मा सांगस, तुमना घर तुमना साठे उजाळ सोळामा एस. कारण मी तुमले सांगस, जठ लगून तुमी नई सांगावत, कि धन्य शे तो, जो प्रभु ना अधिकार ना संगे येस, तठलोंग तुमी मले परत कदीच नई देखावत.” येशु आराम ना दिन परूशी लोकस्ना सरदारस मधून कोणा एक ना घर मा जेवण कराले ग्या, आणि त्या तेले बारकाई कण देखत होतात, एनासाठे कि तो काही अस करो जेना कण सर्वा लोक तेनावर दोष लावू सकोत. तठे एक माणुस होता, जेना हात आणि पाय सुजी जायेल होतात. एनावर येशु नि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ले आणि परूशी लोकस्ले सांग, “काय आराम ना दिन लोकस्ले चांगला करान आमना नियम मा परवानगी शे?” तव तेनी आपला हात तेनावर ठेवा, आणि बरा करीसन जावू दिना. आणि तेस्ले सांग, “कदी तुमना गाढव, पोऱ्या व बईल एक हेर मा पळी जास, आणि तुमी आराम ना दिन तेले लगेच बाहेर नई काळी लेवोत?” त्या ह्या गोष्टी ना काही उत्तर नई दि सकनात. जव तेनी देख, कि निवतायेल लोक, कसा जठे सन्मानित लोक बठतस ती जागा निवाळी लेतस, त एक दाखला दिसन तेस्ले सांग. जव कोणी तुले लग्न नि मेजवानी साठे आमंत्रित करीन, त सन्मानित लोक बठतस ती जागा वर नका बठज्यात, कदी अस नई हुई जावो, कि तेनी तुना तून बी कोणी मोठा ले आमंत्रित करेल राहो. आणि जेनी तुले आणि तेले निवता दियेल शे, ईसन तुले सांगो, कि एले जागा दे, आणि तव तुले लाजीसन सर्वास्तून कमी महत्व वाली जागा वर बठन पळो. पण जव तू बालावा मा येवो, त सर्वास्तून कमी महत्व वाली जागा वर जाई बठ, कि जव तो, जेनी तुले आमंत्रित दियेल शे एवो, त तुले सांगो कि ओ मित्र, सन्मान ना जागा वर ईबठ, तव तुना संगे बठनारस समोर तुना वाह-वाह हुईन. कारण कि जो कोणी स्वता ले मोठा बनाविन, तो धाकला करामा ईन, आणि जो कोणी स्वता ले धाकला करीन, तो महान करामा ईन. तव तेनी आपला निवता देणार परूशी ले बी सांग, “जव तू दिन ना व रात ना जेवण देस, त आपला मित्र भाऊ आखो घर मधला व मालदार शेजारीस्ले नको बलावू, कदी अस नई हुई जावो, कि त्या बी तुले निवता देवोत, आणि तुनी फेळ हुई जावो. पण जव तू जेवण देस, त गरीब, डूंडा, लंगळास्ले आणि अन्धास्ले बलाव. तव तू धन्य होशीन, कारण कि तेस्ना जोळे तुनी फेळ कराले काहीच नई, पण जव धर्मी लोक मरेल मधून परत जित्ता हुई जातीन, त परमेश्वर तुले फय दिन.” तेना संगे जेवण करणारस मधून एक नि ह्या गोष्टी आयकीसन तेले सांग, “धन्य शे तो, जो परमेश्वर ना राज्य मा जेवण करीन.” तेनी तेले सांग, “कोणी माणुस नि मोठी पोहोनचारी दिधी आणि गैरास्ले बलाव. जव जेवण तयार हुईग्या, त तेनी आपला दास ना हात आमंत्रित लोकस्ले सांगाले धाळ, कि या, आते जेवण तयार शे. पण त्या सर्वा क्षमा मांगाले लागनात, पहिला नि तेले सांग, मनी वावर विकत लीयेल शे, आणि अवश्य शे कि तेले देखू, मी तुले विनंती करस, कि मले माफ करी दे. दुसरा नि सांग, मनी पाच जोळी बईल विकत लीयेल शे, आणि तेस्ले परखाले जाईऱ्हायनु, मी तुले विनंती करस, कि मले माफ करी दे. आखो एक नि सांग, मनी लगन करेल शे, एनासाठे मी नई येवू सकत. त्या दास नि आपला मालक ले ह्या गोष्टी ईसन आयकाळात, तव घर ना मालक नि रागे भरीसन आपला दास ले सांग, नगर ना बजार आणि गलीस्मा लगेच जाईसन गरीब, डूंडा, लंगळास्ले, आणि अन्धास्ले, आठे लई या. दास नि परत सांग, ओ स्वामी, जस तुनी सांगेल होत, तसच करामा एयेल शे, आणि तरी बी जागा उरेल शे. मालक नि दास ले सांग, सळकस्वर आणि वाळास कळे जाईसन लोकस्ले रावन्या करीसन लईच ये, एनासाठे कि मना घर भरी जावो. कारण कि मी तुमले सांगस, जेस्ले पयले मनी निवता दियेल होत, तेस्ना मधून एक बी माणुस मना जेवण मधून काही बी नई चाखाव.” आणि जव मोठी गर्दी तेना मांगे जाईऱ्हायंती, त तो मांगे फिरीसन तेस्ले सांगणा. ज्या लोक मना जोळे येतस, त्या तठलोंग मना शिष्य नई बनी सकतस, जठलोंग कि त्या आपला बाप आणि माय आणि बायको आणि पोर आणि भाऊ बहिणस्तून आणि आपला जीव तून, जास्त मना संगे प्रेम नई करतस. आणि जो कोणी मना शिष्य होवा मुळे दुख उचलान आणि मरा साठे बी तयार नई होवाव, तो मना शिष्य नई होवू सकत. कदी तुमना मधून कोणी मोठी ईमारत बनावान विचार करस, त तो सर्वास्तून पहले बठीसन ह्या गोष्टी ना हिसाब करीन, कि एले बनावाले कितला खर्चा नई, आणि देखीन कि तेना जोळे एले पुरा करासाठे, पुरेसा पैसा शे कि ईन. कदी तेनी अस नई कर, त जव पाया टाकीसन तयार नई करू सकत, त सर्वा देखणार हय सांगीसन तेनी मजाक करतीन, कि हवू मनुष्य बनाऊ त लागणा, पण बनावू नई सकना. नंतर, कदी एक राजा दहा हजार माणसस संगे, दुसरा राजा संगे, युध्द कराले निघस, जो वीस हजार माणसस संगे तेना विरुद्ध मा एयेल शे, त सर्वास्तून पहिले तो बठीसन, ह्या गोष्ट ना निर्णय लीन, कि काय तो त्या दुसरा राजा ना मुकाबला करासाठे, पुरा रूप मा ताखातवान शे कि नई. नईत तेना दूर राहताच, मध्यस्ता करानी शर्तस्ना बारामा चर्चा करासाठे दूत धाळीन. ह्याच रिती कण तुमना मधून जो कोणी आपल सर्व काही सोडाव नई, त तो मना शिष्य नई होवू सकस. मीठ त चांगल शे, पण जर मीठ ना स्वाद खराब हुई जास, त तेले कसा कण तुमी चवदार बनावशात? ते नईत जमीन ना व नईत खतना काम मा येस, फक्त एना कि बाहेर फेकामा आणि माणसस्ना पाय खाले चेन्दामा येवो. ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या येले समजाना प्रयत्न करा. एक दिन कर लेणार गैरा लोक आणि पापी तेना जोळे ईऱ्हायंतात, एनासाठे कि तेनी आयकोत. परूशी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक कुर-कुर करीसन सांगाले लागनात, कि “हवू त पापीस संगे भेटस आणि तेस्ना संगे जेवण बी करस.” तव तेनी तेस्ले हवू दाखला सांगा. कदी तुमना मधून कोणा जोळे शंभर मेंढ्या राहोत, आणि कदी तेस्ना मधून एक दवळी जावो, त तुमी निश्चित पणे नव्यानव मेंढ्यास्ले उजाळ जागा मा सोळी देशात, आणि तठलोंग ती एक दवळेल मेंढी नि शोध मा ऱ्हाशात, जठलोंग तेले झामली नई लेतस. आणि जव भेटी जास, तव तुमी मोठी खुशी मा तेले आपला खांदा वर उचली लेतस. आणि आपला घर ईसन मित्र आणि शेजारी ले एकत्र करीसन सांगस, मना संगे आनंद करा, कारण कि मनी दवळेल मेंढी सापळी जायेल शे. मी तुमले खर सांगस, कि ह्याच प्रमाणे एक पश्चताप करणार पापिना बारमा बी स्वर्ग मा ईतलीच खुशी हुईन, जीतली कि नव्याण्णव असा लोक ज्या विचार करतस कि त्या धर्मी शेतस, पण तेस्ना बारामा नई होस, जेस्ले पापस पासून मन फिरावा नि गरज नई. येशु नि आखो एक दाखला सांगा, कदी कोणी बाई जोळे दहा चांदी ना शिक्का ऱ्हावोत, आणि तीना एक शिक्का दवळी जावो, त ती दिवा पेटाळीन, आणि घर मा झाळीन, आणि तठ लगून ध्यान लाईसन झामलीन, जठ लगून तेले झामली नई लेत. आणि जव सापळी जास, तव ती आपला मैत्रिणी आणि शेजारनिस्ले एकत्र करीसन सांगस, कि मना संगे खुशी करा, कारण कि मना दवळेल शिक्का सापळी जायेल शे. मी तुमले सांगस, कि ह्याच प्रकारे एक व्यक्ती आपला पापस पासून मन फिरावस आणि त्या पापी ना विषय मा परमेश्वर ना दूत बी आनंद करतस. नंतर तेनी एक आखो दाखला सांगा, कि एक माणुस ना दोन पोर होतात. तेस्ना मधून धाकला पोऱ्या नि बाप ले सांग, कि बाप, संपत्ती मधून जो भाग मना शे, तो आते मले दि टाक. तव बाप नि दोनी पोरस्ना मधमा आपली संपत्ती वाटी टाकी. आणि काही दिनस नंतर, धाकला पोऱ्या आपली संपत्ती ना काही भाग विकीसन आणि पैसा लिसन घर सोळीसन एक दूर देश मा चालना ग्या, तठे तेनी आपला पैसा मोज मजा मा उळाई टाकी. जव तो सगळ काही खर्च करी टाकना, त त्या देश मा मोठा काय पाळणा, आणि तो भूक कण मराले लागणा. आणि तो एक माणुस ना आठे काम कराले ग्या, जो त्या देश ना नागरिक होता, तेनी तेले आपला वावर मा डुक्कर चाराले धाळ. आणि तो इतला भुक्या होता, कि तो त्या जेवण ले खाईसन पोट भराना देखत होता, जेस्ले डुक्कर खात होतात, कारण कि तेले कोणीच काही नई देत होता. जव तो शुद्धी वर उना आणि हय विचार कराले लागणा, तव सांगाले लागणा, कि मना बाप ना जोळे कितलाक मजुरस्ले जेवण तून जास्त भाकर भेटस, आणि मी आठे भुक्या मरी ऱ्हायनु. आते मी उठीसन आपला बाप जोळे जासू आणि सांगसू, कि बाप, मी स्वर्ग ना परमेश्वर ना विरुद्ध मा आणि तुनी नजर मा पाप करेल शे. आते ह्या योग्य नई ऱ्हायनु कि तुना पोऱ्या म्हणावू, पण मले आपला एक मजुर सारखा ठीईले. तव तो उठीसन, त्या देश ले सोळी दिन आणि आपला बाप जोळे जावा साठे परत चाली दिना, आते तो दूरच होता, कि तेना बाप नि तेले देखीसन दया करी, आणि पोऱ्या कळे पयना आणि तेले आपली छाती ले लावना, आणि गैरा मुक्कू लीना. पोऱ्या नि तेले सांग, बाबा, मी स्वर्ग ना परमेश्वर ना विरुद्ध मा आणि तुनी नजर मा पाप करेल शे, आणि आते ह्या योग्य नई ऱ्हायनु कि तुना पोऱ्या म्हणावू, मले आपला दासस मधून कोणा एक दास ना सारख ठीईले. पण बाप नि आपला दासस्ले सांग, फटकामा चांगला तून चांगला कपळा काळीसन तेले घाला, आणि तेना हात मा अंगठी, आणि पायस्मा जोळा घाला. आणि स्वादिष्ट जेवण तयार करा, एनासाठे कि आमी खावूत आणि खुशी करूत. कारण कि हय असा होता जसा मना पोऱ्या मरेल सारखा होता, जो परत जित्ता हुई जायेल शे, दवळी जायेल सारखा होता. आते भेटी जायेल शे, आणि त्या आनंद कराले लागनात. जव हय हुई ऱ्हायंत, तेना मोठा पोऱ्या वावर मा काम करी ऱ्हायंता, आणि जव तो येतान्ना घर जोळे भिळणा, त तेनी गाना म्हणाना, वाजाळा ना आणि नाचाना आवाज आयकना. आणि तेनी एक दास ले बलाईसन विचार, हय काय हुई ऱ्हायन? तेनी तेले सांग, तुना भाऊ घर परत एयेल शे, आणि तुना बाप नि स्वादिष्ट जेवण तयार करायेल शे, कारण कि तो सुरक्षित आणि चांगला घर एयेल शे. हय आयकीसन तो रागे भारी ग्या, आणि घर ना मधमा नई जाई ऱ्हायंता, आणि एनासाठे तेना बाप बाहेर उना आणि तेले घर मा येवा साठे रावन्या कराले लागणा. तेनी बाप ले उत्तर दिधा, कि देख मी इतला साल पासून तुनी सेवा करी ऱ्हायनु, आणि कदी बी तुनी आज्ञा टायेई नई, तरी बी तुनी मले कदी काही चांगली वस्तू नई दिधी, कि मी आपला मित्रस संगे आनंद करतू. पण जव तुना हवू पोऱ्या, जेनी तुनी संपत्ती वेश्यास्ना उळाई टाकेल शे, आणि घर परती उना, त तेना साठे तुनी स्वादिष्ट जेवण तयार कराले लाव. तेनी तेले सांग, मना पोऱ्या, तू कायम मना संगे शे, आणि जे काही मन शे ते सगळ तूनच शे. पण आते आनंद कराले आणि मग्न होवाले पाहिजे, कारण कि हय अस होता, जसा तुना भाऊ मरेल सारखा होता, जो परत जित्ता हुई जायेल शे, दवळी जायेल सारखा होता, आते भेटी जायेल शे. नंतर तेनी शिष्यस्ले बी हवू दाखला दिसन सांग, “कोणी मालदार ना एक कारभारी होता, आणि लोकस्नी तेना समोर तेनावर हवू दोष लावा कि हवू तुनी सगळी संपत्ती उळाई ऱ्हायना. त मालदार माणुस नि कारभारी ले बलाईसन सांग, हय काय शे जे मी तुना बारामा आयकी ऱ्हायनु? तुनी मना पैसास्ना काय करेल शे, तेना हिसाब दे, कारण कि तू पुळे कारभारी नई राहू सकत. तव कारभारी विचार कराले लागणा, कि मी आते काय करू? कारण कि मना मालक आते कारभारी ना काम मना पासून हिसकाई ऱ्हायना, जमीन खोदाना काम करानी ताखत मना मा नई शे, आणि भिक मांगाले मले लाज वाटस. आते मी समजी ग्यू, कि काय करसू, कि जव मी कारभारी ना काम वरून सोळाई जावूत लोक मनी मदत करतीन. आणि तेनी आपला मालक ना कर्जदारी मधून एक-एक ले बलाईसन पहिला ले विचार, कि तुनावर मना मालक ना कितला कर्ज शे? कारभारी नि तेले सांग, शेम्बर मन जैतून ना तेल, (तीन हजार सात शे लिटर तेल) तव कारभारी तेले सांग, कि आपली खाता वही लिसन दुसरा नवा खाता मा बदलीसन पंनास मन जैतून ना तेल (अठरा शे पंनास लिटर) लिखी दे. नंतर दुसराले विचार, कि तुनावर कितला कर्ज शे? तेनी सांग, शंभर मन गहू, (गहू ना एक हजार टगारी) तव तेनी तेले सांग, आपली खाता वही लिसन दुसरा नवा खाता मा बदलीसन अस्सी मन गहू (गहू ना आठशे टगाऱ्या) लिखी दे. मालक नि त्या अधर्मी कारभारी ले शाब्बाशी दिधी, कि तेनी हुशारी कण काम करेल शे, कारण कि ह्या पीडी ना पोर आपली लोकस संगे आपस मधला लेन देन मा उजाय ना पोरस्तून जास्त चतुर शेतस. आणि मी तुमले सांगस, कि संसार ना धन कण आपला साठे मित्र बनाईल्या, एनासाठे कि तुमना धन सरा नंतर त्या तुमले कायम ना घर मा स्वागत करोत. जो धाकल्या-धाकल्या गोष्टीस्मा प्रामाणिक शे, तो मोठी गोष्ट मा बी प्रामाणिक शे, आणि जो धाकल्या-धाकल्या गोष्टीस्मा लबाळ शे, मोठी गोष्ट मा बी लबाळ शे. एनासाठे जव तुमी सांसारिक ना धन मा प्रामाणिक नई ठरावत, त स्वर्ग मधला धन तुमले कोण दिन. आणि कदी तुमी परका धन मा प्रामाणिक नई ठरोत, त कोण तुमले स्वता पासून प्रबंध (संचालन) करासाठे काही दिन? कोणताही माणुस एकच टाईम वर दोन मालकस्नी सेवा नई करू सकत, कारण तो एक ना संगे तिरस्कार आणि दुसरा संगे प्रेम ठेवीन, नईत एक ना संगे समर्पित राहीन व दुसराले तुच्छ समजीन. ह्याच प्रमाणे, तुमी एकच टाईम वर परमेश्वर नि सेवा आणि आपला साठे धन या एकत्र नई करू सकतस.” परूशी लोक ज्या लालची होतात, ह्या सगळ्या गोष्टी आयकीसन तेनी मजाक उळावाले लागनात. तव येशु नि तेस्ले सांग, तुमी त स्वता ले लोकस समोर धर्मी ठरावतस, पण परमेश्वर तुमना मन ले वयखस, कारण कि जी वस्तू माणसस्नी नजर मा महत्त्वपूर्ण शे, ती परमेश्वर ना जोळे घृणित शे. जठलोंग योहान बाप्तिस्मा देणार उना, तठ लगून मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्ना संदेश तुमना मार्गदर्शक होतात, पण जव परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता आयकाळा मा एस, आणि प्रत्येक झन तेनामा जावा साठे उत्सुक शेत. आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जाईन, पण परमेश्वर ना पुस्तक मधून एक मात्रा आणि बिंदू बी नई टयाव. उदाहर साठे, जो कोणी आपली बाइको ले सोळीसन दुसरी संगे लग्न करस, तो व्यभिचार करस, आणि जो कोणी अशी सोळायेल बाई संगे लग्न करस, तो बी व्यभिचार करस. एक मालदार माणुस होता, जो गैरा महाग कपळा घालत होता, आणि दररोज तो उत्तम जेवण करत होता, आणि सुख-विलास आणि धूम-धाम मा राहात होता. आणि अस हुईन कि तो गरीब मरी ग्या, आणि परमेश्वर ना दूत तेले लिसन अब्राहाम ना जोळे सन्मान नि जागा वर पोचाळ, आणि तो मालदार बी मरणा, आणि गाळामा उना. आणि अधोलोक मा तेनी पिळा मा पळीसन वरे देख, आणि दुरून अब्राहाम ना जोळे सन्मान नि जागा वर लाजर ले देख. आणि तेनी जोरमा सांग, ओ बाबा अब्राहाम, मनावर दया करीसन लाजर ले धाळी दे, एनासाठे कि तो तेनी एक बोट पाणी मा भिगाळीसन मनी जीप ले थंडी करो, कारण कि मी ह्या ज्वाला मा भयानक पिळा मा मरी ऱ्हायनु. पण अब्राहाम नि सांग, बेटा आठवण कर, जव कि तू पृथ्वी वर जित्ता होता तुनी आपला जीवन मा चांगल्या वस्तू ली लीयेल शे, आणि तसाच लाजर ले सर्वा वाईट वस्तू भेटनात, पण आते तो आठे शांती ली ऱ्हायना शे, आणि तू भयानक पिळा मा मरी ऱ्हायना शे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ले सोळीसन आमना आणि तुमना मधमा एक मोठ्ठा खड्डा ठरायेल शे, कि जो आठून त त्या पार तुमना कळे जावाना देखस, त्या नई जावू सकोत, आणि नईत कोणी तठून ह्या पार आमना जोळे ईसकस. तेनी सांग, त ओ बाबा अब्राहाम, मी तुले विनंती करस, कि तू लाजर ले मना बाप ना घर धाळ. कारण कि मना पाच भाऊ शेत, आणि मनी ईच्छा शे कि तो जावो आणि मना भावूस्ले जताळो, अस नई होवो कि त्या बी ह्या पिळा नि जागा मा येवो. अब्राहाम नि तेले सांग, तेस्ना जोळे जताळासाठे मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्ना पुस्तक शेतस, तेस्ले तेस्नी आयकाले पाहिजे, आणि तेना प्रमाणे चालाले पाहिजे. मालदार माणुस नि सांग, नई, ओ बाबा अब्राहाम, पण कदी कोणी मरेल मधून तेस्ना जोळे जावो, आणि तेस्ले जताळो, त त्या आपला पापस साठे पश्चताप करतीन. अब्राहाम नि तेले सांग, जव त्या मोशे आणि भविष्यवक्तास्नी आदन्यास्ले नई मानतस, त कदी मरेल मधून कोणी जित्ता बी हुई जावो तरी बी तेनावर विश्वास नई करावत. नंतर तेनी आपला शिष्यस्ले सांग, हय निश्चित शे कि त्या गोष्टी ज्या पाप ना कारण शेत, येतीन, पण तेना साठे कितला भयानक हुईन, त्या माणुस वर जेना व्दारे ठोकर लागस. कदी कोणी त्या व्यक्ती ले जो मनावर विश्वास करस, तेना मनावर विश्वास करान बंद कराना कारण बनस, भले तो ह्या पोऱ्या सारखा का नई हो, त हय तेना साठे चांगल हुईन, कि तेना गयामा एक मोठा दघळ बांधा मा येवो, आणि तेले बुळा साठे समुद्र मा फेकामा येवो. सावधान राहा कि तुमी काय करतस, कदी तुना भाऊ अपराध करस त तेले धमकाव, आणि कदी पचतावस त तेले माफ कर. कदी दिन भर मा तो सात सावा तुना गुन्हा करस, आणि साती सावा तुना जोळे परत ईसन सांगो, कि मी पचतावस, त तेले माफ कर. तव प्रेषितस्नी प्रभु येशु ले सांग, आमना विश्वास ले आखो पक्का कर. प्रभु येशु नि सांग, कि जर तुमना विश्वास राई ना दाना एवळा बी ऱ्हाता, त तुम्ही या तू तेना झाळ ले सांगतात कि मुय सगट उपळीसन समुद्र मा लागी जा, त तो तुम्हनी मानी लेता. कदी तुम्हना दास वावर मा नागरीसन व मेंढ्यास्ले चारीसन घर येस, त काय तुमी सांगश्यात, लगेच ये आणि जेवण कराले बठ? नई, पण तो सांगीन, कि मना जेवण तयार कर, आणि जठ लगून मी खावू-पिवू तठ लगून मनी सेवा करासाठे तयार हुई जा, एना नंतर तू बी खाई-पी लेयजो. तुमी आपला दास ले त्या काम ले करासाठे धन्यवाद नई म्हणावत, कि जे तुमी तेले कराले सांगेल होतात. ह्याच प्रमाणे, तुमी ते सगळ काही लीयेल राहोत, जे तुमले करासाठे सांगेल होत, त तुमले हय कराले पाहिजे, आमी साधारण दास शेतस, कि जे आमले करन होत तेच करेल शे. जव येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर कळे जानारा रस्ता वर चालीऱ्हायंतात, तो शोमरोन प्रांत आणि गालील जिल्हास्ना मधून जाई ऱ्हायंता. आणि कोणता गाव मा धुसाना टाईम वर तेले दहा कोळी भेटनात. आणि तेस्नी दूर उभा ऱ्हायसन, जोरमा सांग, ओ येशु, ओ गुरुजी, आमना वर दया कर. तेनी तेस्ले देखीसन सांग, “जा, आणि आपला यहुदी पुजारीस्ले दाखाळा,” आणि जातांना त्या शुद्ध हुई ग्यात. तव तेस्ना मधून एक हय देखीसन कि मी चांगला हुई जायेल शे, जोरमा परमेश्वर नि स्तुती करत तो येशु जोळे परत उना. आणि येशु ना पाय वर पालथा पळीसन, तेले धन्यवाद देवाले लागणा. तो शोमरोन प्रांत ना एक माणुस होता. एनावर येशु नि विचार, काय दाहा न दाहा माणस बरा नई हुईनात, त मंग त्या नवू कोठे शेतस? काय हवू माणुस दुसरा देश ना ले सोळीसन कोणी आखो नई निघणा, जो परमेश्वर नि स्तुती करता? तव येशु नि तेले सांग, “उठीसन चालना जा, तुना विश्वास नि तुले बरा करेल शे.” जव परूशी लोकस्नी येशु ले विचार, कि परमेश्वर ना राज्य कव ईन? त तेनी तेस्ले उत्तर दिधा, कि परमेश्वर ना राज्य ह्या प्रकारे इरायना शे, कि तुमी तेले आपला डोयास कण नई देखू सकाव. लोक हई नई सांगाव, कि देखा, आठे व तठे शे. कारण कि, परमेश्वर ना राज्य तुमना मधमा शे. आणि तेनी शिष्यस्ले सांग, तो टाईम इरायना, जव तुमी त्या दिन ले देखानी ईच्छा करशात, जव मी, माणुस ना पोऱ्या परत येसू. पण तुमी लोक त्या दिन ले नई देखी सकाव. लोक तुमले सांगतीन, देखा, तठे शे व आठे शे, पण तुमी चालना नका जायज्यात आणि नईत तेस्ना मागे चालू लागज्यात. कारण कि जशी वीज आकाश ना एक कळून आवाज करीसन आकाश ना दुसरी कळे लोंग चमकस, तसाच माणुस ना पोऱ्या ना दिन बी हुईन. पण पहिले निश्चित शे, कि तो गैरा जास्त दुख झेलो, आणि ह्या पिळी ना लोक तेले तुछ्य समजो. जस आमना पूर्वज नोहा ना दिनस्मा हुयेल होत, तसच माणुस ना पोऱ्या ना दिनस्मा बी हुईन. ज्या दिन लगून नोहा जहाज मा नई चळना, त्या दिन लोंग लोक खात-पीत होतात, आणि तेस्ना मा लग्न-लुग्न होत होतात, तव जलप्रलय नि ईसन त्या सर्वास्ले नष्ट कर. आणि त्याच प्रमाणे आमना पूर्वज लोट, जो सदोम शहर मा राहत होता, तेना दिनस्मा हुयेल होत, कि लोक खात-पीत लेन-देन करत, झाळ लावत आणि घर बांधत होतात. पण ज्या दिन लोट सदोम मधून निघणा, त्या दिन आग आणि गंधक आकाश मधून पाळणा आणि सर्वा लोकस्ले ज्या शहर मा होतात नष्ट करी टाकना. माणुस ना पोऱ्या ना प्रगट होवाना दिनस्मा बी असच हुईन. त्या दिन जर तुमी आपला घर ना छत वर शे, त आपली संपत्ती लेवाले घर ना मधमा नका जायज्यात, आणि तसच जो वावरस्मा शे, तो आपला कपळा लेवा साठे परत आपला घर नका जायज्यात. आठवण करा कि लोट नि बायको ना संगे काय हुयेल होत. जो कोणी आपला जीव वाचाळाना देखीन तो तेले दवाळीन, आणि जो कोणी आपला जीव दवाळीन तो तेले जित्ता ठेवीन. मी तुमले सांगस, त्या रात ले दोन माणुस एक खाट वर होतीन, एक ले ली लेवामा ईन, आणि दुसराले सोळामा ईन. दोन बाया एकत्र दयत होतीन, एक ले ली लेवामा ईन, आणि दुसरी सोळामा ईन. दोन झन वावर मा होतीन, एक ले उचलावामा ईन, आणि दुसरा सोळामा ईन. हय आयकीसन तेस्नी तेले विचार, “ओ प्रभु, हय कोठे हुईन?” तेनी तेस्ले सांग, “जठे प्रेत शे, तठे गिधळ एकत्र होतीन.” येशु नि आपला शिष्यस्ले कायम प्रार्थना कराले आणि धीर नई सोळाना बारामा एक दाखला ना द्वारे समजावना. कोणी नगर मा एक न्यायाधीश राहत होता, जो नईत परमेश्वर ले भ्यात होता, आणि कोणताच माणुस ना आदर नई करत होता. आणि त्याच नगर मा एक विधवा बी राहात होती, जी तेना कळे ईसन घळी-घळी सांगत होती, कि मना न्याय करीसन मले शत्रू पासून वाचाळ. तेनी गैरा दिनस लगून त नई मान पण आखरी वर मन मा विचार करीसन सांग, जर मी परमेश्वर ले नई घाबरत, आणि नईत माणसस्नी परवा करस. तरी बी हय विधवा मले त्रास देत ऱ्हास, एनासाठे मी तीना न्याय करसू, कदी अस नई हुई जावो कि घळी-घळी ईसन आखरी वर मलेच थकाळी देवो. प्रभु येशु नि सांग, आयका, ह्या अन्यायकारक न्यायाधीश नि जे सांग, तेना बारामा चांगला विचार करा. परमेश्वर आपला निवाळेल लोकस साठे ज्या रात दिन तेना समोर रळतस न्याय करीन, तो तेस्नी मदत करामा उशीर नई कराव. मी तुमले सांगस, तो फटकामा तेस्ना न्याय करीन, तरी बी, जव मी, माणुस ना पोऱ्या पृथ्वी वर परत येसू, तव मले आश्चर्य हुईन कि पृथ्वी वर कितलाक लोक भेटतीन ज्या मनावर विश्वास करत हो. आणि तेनी त्या लोकस्ले ज्या आपला बारामा विश्वास करत होतात, कि त्या धर्मी शेतस, आणि दुसरास्ले तुच्छ समजत होतात, तेस्ले हवू दाखला सांगा. कि दोन माणस यरूशलेम ना परमेश्वर ना मंदिर मा प्रार्थना कराले ग्यात, एक परूशी माणुस होता, आणि दुसरा कर लेणार (जकातदार) होता. परूशी माणुस उभा ऱ्हायसन आपला मन मा अशी प्रार्थना कराले लागणा, कि परमेश्वर, मी तुना धन्यवाद करस, कि मी दुसरा माणसस सारखा वाईट करणार, अन्यायी आणि व्यभिचारी नई, आणि नईत ह्या कर लेणार सारखा शे. मी हाप्ता मा दोन सावा उपास ठेवस, मी आपली कमाई ना दहावा भाग बी तुले देस. पण कर लेणार (जकातदार) दूर उभा ऱ्हायसन, स्वर्ग कळे देखान बी नई देख, पण दुख कण आपली छाती ले मारी-मारीसन सांग, परमेश्वर, मी एक पापी शे, मनावर दया कर आणि मले माफ कर. मी तुमले सांगस, कि हवू कर लेणार (जकातदार) होता, परूशी नई जो परमेश्वर ना समोर धर्मी ठरावामा उना, आणि आपला घर ग्या, कारण कि जो कोणी स्वता ले महान बनाईन, तो धाकला करामा ईन, आणि जो कोणी स्वता ले धाकला बनाईन, तो महान करामा ईन. नंतर लोक पोरस्ले येशु कळे लयाले लागनात, कि तो तेस्ना वर हात ठेवो आणि आशीर्वाद देवोत, पण शिष्यस्नी लोकस्ले धमकाव. येशु नि पोरस्ले जोळे बलाईसन सांग, “पोरस्ले मना कळे ईवू द्या, आणि तेस्ले मना नका करा, कारण त्याच लोक ज्या या पोरस सारखा विश्वास योग्य आणि नम्र शेतस परमेश्वर ना राज्य मा राहतीन.” मी तुमले खरज सांगस, कि जो कोणी पोऱ्या ना सारखा बनीसन परमेश्वर ना राज्य ले स्वीकार नई करस, तो तेनामा कदीच जावू नई सकाव. कोणी अधिकारी नि तेले विचार, “उत्तम गुरुजी, कायम ना जीवन ना अधिकारी होवा साठे मी काय करू?” येशु नि तेले उत्तर दिधा, “जव तू सांगस कि मी चांगला शे, त तुना अर्थ काय शे? परमेश्वरच फक्त एक शे जो खरोखर चांगला शे.” तुले परमेश्वर ना आदन्या माहिती शेतस, मनुष्य हत्या करजो नको, व्यभिचार करजो नको, चोरी करजो नको, खोटी साक्ष देईजो नको, कोले बी धोका नको देयजो, आपला माय-बाप ना मान ठेवजो. तेनी सांग, मी त “ह्या सर्वा आदन्या लहानपणा पासून पायत एयेल शे.” हय आयकीसन, येशु नि तेले सांग, “तुना मा आते बी एक गोष्ट नि कमी शे, जा जे काही तुना जोळे शे, तेले विकीसन पैसा गरीब लोकस्ले दे, जर तू असा करस, त तुना जोळे स्वर्ग मा धन राहीन. आणि ईसन मना मांगे चालू लाग.” तो हय आयकीसन गैरा उदास हुईना, कारण कि तो गैरा मालदार होता. येशु नि तेले ध्यान दिसन देख कि तो कितला दुखी शे, आणि तेले सांग मालदार लोकस साठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करन कितल कठीण शे? एक उट ना साठे सुई ना छिद्र मधून जावान सोप शे, पण एक मालदार ले परमेश्वर ना राज्य मा जावाले गैरा कठीण शे. आणि आयकनारस्नी सांग, “त मंग कोनासाठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करासाठे वाचाले कस शक्य शे?” तेनी सांग, “हई लोकस साठे अशक्य शे, पण परमेश्वर ना साठे नई, परमेश्वर ना साठे सर्व काही शक्य शे.” पेत्र नि सांग, “देख, आमी तुना शिष्य बनासाठे सर्व काही सोळी दियेल शेतस.” येशु नि शिष्यस्ले सांग, मी तुमले खरज सांगस, कि असा कोणीच नई जेनी परमेश्वर ना राज्य साठे घर नईत बायको नईत भाऊ नईत माय बाप नईत पोर पारस्ले सोळी टाकेल शे. आणि ह्या टाईम कईक पट जास्त नई भेटाव, आणि येणारा युगमा तुमले कायम ना जीवन भेटीन. एक सावा परत येशु बारा शिष्यस्ले एक बाजुमा लीग्या आणि तेस्ले सांग, देखा आमी यरूशलेम शहर कळे जाईऱ्हायनुत, आणि जीतल्या गोष्टी माणुस ना पोऱ्या साठे भविष्यवक्तास्ना व्दारे लिखामा एयेल शेतस, त्या सगळ्या पुऱ्या होतीन. कारण कि मले दुसरा जातीस्ना हात मा सोपामा ईन, आणि त्या मनी थट्टा करतीन, आणि मना अपमान करतीन, आणि मनावर थुकतीन. आणि मले फटका मारतीन, आणि मले मारी टाकतीन, आणि तिसरा दिन मा मी परत जित्ता होसू. आणि तेस्नी ह्या गोष्टीस मधून कोणतीच गोष्ट नई समजी, आणि हय गोष्ट तेस्ना मा दपेल ऱ्हायनी, आणि जे सांगामा एयेल होत, ते तेस्नी समज मा नई उन. जव तो यरीहो जोळे पोहोचना, त एक अंधा सळक ना बाजुले बठीसन भिक मांगी ऱ्हायंतात. आणि तो गर्दी नि चालानी आवाज आयकीसन विचाराले लागणा, “हय काय हुई ऱ्हायन?” तेस्नी तेले सांग, कि “येशु नासरेथ नगर ना शे, तो जाई ऱ्हायना.” तव तेनी जोरमा आराया मारीसन सांग, “ओ येशु, राजा दाविद ना पोऱ्या मनावर दया कर.” ज्या पुळे जात होतात, गैरास्नी तेले धमकाव कि शांत ऱ्हाय म्हणून, पण तो जास्त आराया माराले लागीग्या, कि “राजा दाविद ना पोऱ्या, मनावर दया कर.” तव येशु थामी ग्या, आणि आजू-बाजू ना लोकस्ले आदन्या दिधी कि तेले मना जोळे लया, आणि जव तो जोळे उना, त येशु नि तेले हय विचार. कि “तुनी काय ईछ्या शे कि मी तुना साठे करू?” अंधा नि येशु ले सांग, “प्रभु हय कि मी देखाले लागी जावू.” येशु नि तेले सांग, “मी तुले बरा करस कारण कि तू मनावर विश्वास करेल शे, एनासाठे कि तू घर जावू सकस.” आणि तो लगेच देखाले लागीग्या, आणि परमेश्वर नि स्तुती करत तेना मांगे चालू लागणा, आणि सर्वा लोकस्नी देखीसन परमेश्वर नि स्तुती करी. येशु यरीहो शहर मा प्रवेश करीसन जाई ऱ्हायंता. आणि देखा, जक्कय नाव ना एक माणुस होता जो जकातदारस्ना अधिकारी होता, आणि मालदार होता. येशु ले देखानी तेनी ईच्छा होती, कि तो कोणता शे? पण गर्दी मुळे देखू नई सकत होता, कारण कि तो ठेंगणा होता. तव तेले देखा साठे तो पुळे पयीसन एक उंबर ना झाळ वर चळी ग्या, कारण कि तो त्याच रस्ता वरून जानार होता. जव येशु त्या झाळ जोळे पोहोचना, तो वरे देखीसन तेले सांगणा, “ओ जक्कय फटकामा उतरी ये, कारण कि मले तुना घर मा राहाण अवश्य शे.” तो लवकर झाळ वरून खाले उतरणा आणि येशु ले आपला घर लीग्या, आणि खुशी मा तेना स्वागत करना. हय देखीसन सर्वा लोक कुरूकुरू करीसन सांगाले लागनात, “तो त एक पापी माणुस ना घर जायेल शे.” जक्कय नि खावाना टाईम ले उभा ऱ्हायसन प्रभु येशु ले सांगणा, “प्रभु, देख मी मनी आधी संपत्ती गरीबस्ले देस, आणि कदी मी लोकस्ले तेस्ना करामा लबाळेल अशीन, त मी तेस्ले चार गुणा परत दि टाकसु.” तव येशु नि तेले सांग, “आज ह्या घर मा तारण एयेल शे, एनासाठे कि हवू बी अब्राहाम ना खरा पोऱ्या शे. कारण कि मी, माणुस ना पोऱ्या कायम ना दंड पासून वाचाळाले आणि तेस्ना तारण कराले एयेल शे.” जव लोक हय आयकी ऱ्हायंतात, तव येशु नि आपली गोष्ट चालू ठेवी आणि तेस्ले एक दाखला सांगा, कारण कि तो यरूशलेम शहर जोळे होता, आणि लोकस्ले वाटण कि परमेश्वर ना राज्य बस चालू होणारच होत. त तेनी सांग, एक मालदार माणुस लांब प्रवास ले चालना एनासाठे कि राजपद लिसन परत येवो. आणि तेनी आपला दासस मधून दहास्ले बलाईसन दहा मोहर (दहा मूल्यवान शिक्का) दिधात, आणि तेस्ले सांग, मले परत एवा लगून लेन देन करज्यात. पण तेना नगर ना राहाणार लोक तेना कण द्वेष करत होतात, आणि हय सांगा साठे कईक संदेषवाहक ले धाळ, कि आमनी ईच्छा नई शे, कि हवू आमना वर राज्य करो. जव तो राजपद लिसन परती उना, त अस हुईन कि तेनी आपला दासस्ले जेस्ले रोकडा दियेल होता, आपला जोळे बलाव एनासाठे कि मालूम करो कि तेस्नी लेन देन कण काय कमाव. तव पहिला नि ईसन सांग, मालक, तुनी मोहर (एक मूल्यवान शिक्का) पासून दहा आखो मोहर कमायेल शेतस. तेनी तेले सांग, शाब्बास, चांगला दास, तू गैरा थोळासा मा विश्वासी निघणा आते दहा नगरस्ना अधिकार ठेव. दुसरा नि ईसन सांग, स्वामी तुनी मोहर (एक मूल्यवान शिक्का) पासून आखो पाच मोहर कमाएल शे. तेनी तेले सांग, कि तू बी पाच नगरस्वर अधिकार ठेव. तिसरा नि ईसन सांग, स्वामी देख, तुनी मोहर (एक मूल्यवान शिक्का) हय शे, जेले मी कपळा मा बांधी ठीयेल शे. कारण कि मी तुले भ्यात होता, एनासाठे कि तू कठोर माणुस शे, जे तुनी नई ठेयेल तेले तू उचली लेस, आणि जे तुनी नई पेरेल, तेले कापस. तेनी तेले सांग, ओ दुष्ट दास, मी तुनाच तोंड कण तुले दोषी ठरावस. तू मले वयखत होता कि कठोर माणुस शे, जे मी नई ठेव तेले उचली लेस, आणि जे मी नई पेर, तेले कापस. त तुनी मना पैसा सावकार ले काब नई दि दिधा, कि मी ईसन व्याज सम्मध ली लेतू? आणि ज्या लोक नजीक उभा होतात, तेनी तेस्ले सांग, ती मोहर (एक मूल्यवान शिक्का) तेना कळून लिल्या, आणि जेना कळे दहा मोहर शेतस, तेले दिटाका. तेस्नी तेले सांग, स्वामी, तेना जोळे दहा मोहर त शेतस. मी तुमले सांगस, कि जेना कळे शे, तेले आखो देवामा ईन, आणि जेना कळे नई, तेना कळून ते बी जे तेना कळे शे लेवामा ईन. पण मना त्या दुश्मनस्ले जेस्नी ईच्छा नई होती, कि मी तेस्ना राजा बनू, तेस्ले आठे लईसन मना समोर मारी टाका. ह्या गोष्टी सांगीसन, येशु यरूशलेम शहर कळे आपला शिष्यस संगे पुळे पुळे चालत ग्या. जव तो बेथफगे आणि बेथानी नगर ना बाहेर ना गाव मा पोहचनात हई गाव जैतून डोंगर ना जोळे होता, त तेनी आपला शिष्यस मधून दोन ले हय सांगीसन धाळ. कि आपला समोरला गाव मा जा, आणि तेमा भिळताच जेनी पयले कोणताच माणुस ले वरे नई बसाळ, असा धाकला शिंगरू तुमले बांधेल भेटीन तेले सोळी लया. जर कोणी तुमले विचारीन कि काब सोळी ऱ्हायनात, हय सांगज्यात, कि येशु प्रभु ले एनी गरज शे. ज्या धाळायेल होतात, त्या जाईसन जस सांगेल होत, तसच तेस्नी देख. जव त्या धाकला शिंगरू ले सोळीऱ्हायंतात, त तेना मालक नि तेस्ले सांग, “ह्या धाकला शिंगरू ले काब सोळतस?” तेस्नी सांग, “प्रभु ले एनी गरज शे.” तेस्नी त्या शिंगरू ले येशु जोळे लयसन, येशु ले बसाना साठे धाकला शिंगरू ना पाठ वर आपला पांघराना कपळा टाकनात. आणि तो शिंगरू वर बठी ग्या. जव तो जात होता, त त्या येशु ना समोर रस्ता वर आपला कपळा पसारत जात होतात. जव येशु यरूशलेम शहर ना जोळे त्या जागा वर उना जठे सळक खाले जैतून डोंगर कळे जात होती. तव शिष्यस्नी नि पुरी मंडळी त्या बठ्ठा सामर्थ्य ना काम मुळे ज्या तेस्नी देखेल होतात, खुश हुईसन मोठा आवाज मा परमेश्वर नि स्तुती कराले लागणी. “धन्य शे तो राजा, जो प्रभु ना नाव कण एस, स्वर्ग मा शांती आणि आकाश मा महिमा हो.” तव गर्दी मधून काही परूशी लोक तेले सांगाले लागनात, गुरुजी, तुना शिष्यस्ले धमकाव, कि त्या शांत राहोत. तव तेनी तेस्ले उत्तर दिधा, “मी तुमले खर सांगस, कि कदी ह्या लोक शांत हुई ग्यात, त दघळ मनी महिमा करासाठे वरळाले चालू करी देतीन.” जव येशु जोळे उना, तो यरूशलेम शहर ले देखीसन रळना आणि सांगणा, गैर चांगल होत कि आज तुले शांती ना रस्ता भेटी जाता. पण आते गैरा टाईम हुई जायेल शे, आणि शांती तुना पासून दपी जायेल शे. कारण त्या दिन तुनावर येतीन, कि तुना शत्रू तुना चारीस कळे मोर्चा उभा करतीन, आणि तुले घेरतिन आणि चारीस कळून शहर वर हल्ला करतीन. तुना शत्रू तुले पूर्णपणे नष्ट करी टाकतीन, (म्हणजे यरूशलेम ले) आणि तुना सर्वा लोकस्ले मारी टाकतीन, आणि तुना दुश्मन पूर्णपणे नगर ले नष्ट करी देतीन, जो दघळ ना बनेल शे. नई सोळावत, कारण कि तुनी ती संधी जव परमेश्वर तुले वाचाळा साठे उना नई वयखना. तव तो परमेश्वर ना मंदिर मा जाईसन ईकनास्ले बाहेर काळाले लागणा. आणि तेस्ले सांग, “परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, कि लोक मना घर ले प्रार्थना ना घर बोलामा ईन. पण तुमी तेले लुटनारस्नि भरेल गुफा ना सारखा बनाई टाकेल शेतस.” आणि तो दररोज परमेश्वर ना मंदिर मा प्रवचन सांगत होता, आणि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक लोकस्ना मुख्य, तेले नाश करानी संधी देखी ऱ्हायंतात. पण कोणता उपाय नई काळी सकनात, कि हय कोणत्या प्रकारे करूत, कारण कि सर्वा लोक मोठी ईच्छा कण तेनी आयकत होतात. एक दिन अस हुईन कि जव तो परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा लोकस्ले जाईसन शिकाळस होतात, त मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि, आणि पूर्वज लोक तेना पुळे ईसन थांबीग्यात. आणि सांगाले लागनात, “कि आमले सांग, तू ह्या कामस्ले कोणा अधिकार कण करस, आणि तो कोण शे, जेनी तुले हवू अधिकार दियेल शे?” तेनी तेस्ले उत्तर दिधा, कि “मी तुमले एक गोष्ट विचारस, मले सांगा. योहान ना बाप्तिस्मा स्वर्ग कळून होता कि माणुस कळून होता?” तव त्या आपस मा सांगाले लागनात, कि कदी आमी सांगसुत स्वर्ग कळून, त तो सांगीन, त मंग तुमनी तेनावर विश्वास काब नई ठेवा? आणि कदी आमी सांगसुत, माणसस कळून शे, त सर्वा लोक आमले दघळ मारतीन, कारण कि तेस्ले खरज माहिती शे, कि योहान परमेश्वर कळून एक खरा भविष्यवक्ता होता. त तेस्नी उत्तर दिधा, “कि आमले नई मालूम, कि तो कोणा कळून होता.” येशु नि तेस्ले सांग, “त मी बी तुमले नई सांगाव, कि मले या प्रकार ना काम कराना काय अधिकार शे.” तव येशु लोकस्ले हवू दाखला सांगाले लागणा, कि कोणी माणुस नि आपला मया मा द्राक्ष लावना, आणि नंतर तेनी त्या मया ले काही शेतकरीस्ले तेना ठेका दिधा, आणि परदेश लांब प्रवास वर चालना ग्या. हंगाम ना टाईम वर तेनी आपला दासस मधून एक ले ठेका लीयेल शेतकरी कळे धाळ, कारण कि तेले तेना कळून द्राक्ष ना मया मधून काही फय भेटू सकोत. पण शेतकरीस्नी तेले धरीसन मारा, आणि बिगर काही देवाना तेले परत धाळी दिनात. नंतर मया ना मालिक नि आखो एक दास ले ठेका लीयेल शेतकरीस कळे धाळ, आणि तेस्नी तेले बी मारीसन आणि तेना अपमान करीसन खाली हात परताई टाक. नंतर तेनी तिसरा धाळा, आणि तेस्नी तेले बी जखमी करीसन काळी टाक. तव द्राक्ष वाळी ना मालक नि सांग, मी काय करू? मी आपला प्रिय पोऱ्या ले धाळसू, कदाचित त्या मना पोऱ्या ना मान ठेवतीन. जव शेतकरीस्नी तेना पोऱ्या ले येतांना देखीसन तेस्नी आपस मा सांग, कि हवू तोच शे, जो द्राक्ष ना मया ना वारीस हुईन, या आमी तेलेच मारी टाकुत, तव वारसी आपली हुई जाईन. आणि तेस्नी तेले द्राक्षमया मधून बाहेर काळीसन मारी टाकनात, एनासाठे द्राक्षमया ना मालक तेस्ना संगे काय करीन? तो ईसन त्या ठेका लीयेल शेतकरीस्ले मारी टाकीन, आणि द्राक्षमया ले दुसरास्ले दि दिन. हय आयकीसन तेस्नी सांग, परमेश्वर अस नको करो. येशु नि तेस्ना कळे देखीसन सांग, “तव परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल त्या भाग ना अर्थ काय शे, जठे हय सांगस, कि ज्या दघळ ले राजमिस्त्रीस्नी बिगर काम ना म्हणून नकारेल होता, तोच कोपरा ना मुख्य दगड हुईग्या.” जो कोणी या दगड वर पडीन तो चुराडा हुईन, आणि जेनावर तो पळीन तेले तो दई टाकीन. त्याच घळी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि आणि मुख्य यहुदी पुजारी लोकस्नी तेले धरान देख, कारण कि समजी ग्यात, कि तेनी आमना वर हवू दाखला सांगा, पण त्या लोकस्ले भ्यायनात. आणि त्या तेनी ताक मा ऱ्हायनात आणि भेदीस्ले धाळात, कि धर्म ना नाव लिसन तेनी कोणती न कोणती गोष्ट धरोत, कि तेले राज्यपाल ना हात आणि अधिकार मा सोपी देवूत. तेस्नी तेले हय विचार, कि गुरुजी, आमले माहिती शे, कि तू नेहमी खरा बोलस, आणि तू ह्या गोष्ट पासून नई घाबरस कि दुसरा लोक तुना बारामा काय विचार करतस. तू सर्वास्ना संगे सारखा व्यवहार करस. पण परमेश्वर ना रस्ता खरोखर दाखाळस. काय आमले सम्राट ले कर देन बर शे, कि नई. तेनी तेस्नी चालाकीले समजीसन तेस्ले सांग. “तुमी मले काबर पारखतस?” एक चांदी ना शिक्का जो एक दिन नि मजुरी ना बराबर होता मना कळे लया, कि मी देखू. एनावर कोणा चित्र आणि कोण नाव शे? तेस्नी सांग “सम्राट ना.” येशु नि तेस्ले सांग, “जे सम्राट ना शे, ते सम्राट ले द्या, जे परमेश्वर न शे ते परमेश्वर ले द्या.” त्या लोकस समोर त्या गोष्ट ले धरू नई सकनात, पण तेना उत्तर कण चकित हुईसन चूप राहीग्यात. सदूकी लोक हय विश्वास नई करत होतात कि लोक मरा नंतर परत जित्ता होतीन. तेना मधून कईक सदूकीस्नि येशु ना जोळे ईसन ईचार. कि गुरुजी, “मोशे नि आमना साठे हय लिखेल शे, कि कदी कोणा भाऊ आपली बायको ना राहतांना बी बिगर पोरस्ना मरी जावो, त तेना भाऊ तेनी बायको संगे लग्न करी लेवो, आणि आपला भाऊ साठे वंश पैदा करो. एक परिवार मा सात भाऊ होतात, सर्वास तून मोठा भाऊ नि लग्न करी लीधा, पण बिगर पोरस्ना मरी ग्या.” नंतर दुसरा आणि तिसरा भाऊ नि बी आपला मरेल भाऊ नि, विधवा ले आपली नवरी बनाई लीधा, आणि तो बी बिगर पोरस्ना मरी ग्या. आणि सर्वा सात भावूस संगे असच हुयन. सर्वास्ना नंतर ती बाई बी मरी गयी. त परत जित्ता होवावर ती तेस्ना मधून कोणी बायको हुईन? आमी हय विचारतस, कारण कि तिनी त्या सर्वा सातीझनस संगे लग्न करेल शे. येशु नि तेस्ले सांग, कि ह्या संसार ना लोक लग्न लुग्न करतस. पण ज्या लोक ह्या योग्य ठरतीन, कि त्या युगले आणि मरेल मधून परत जित्ता होवान ली लेवोत, तेस्ना मा लग्न बिग्न नई होवावत. त्या परत मराव बी नई, त्या स्वर्ग मा ऱ्हायनारा परमेश्वर ना दूतस सारखा ऱ्हातीन. आणि परत जित्ता होवाना पोर होवा कण परमेश्वर ना पोर होतीन. पण मरेल मधून जित्ता होवाना विषय मा मोशे नि पेटनरा झुडूप ना भाग मा लिखेल शे, “कि मोशे प्रभु ले अब्राहाम ना परमेश्वर, आणि इसहाक ना परमेश्वर, आणि याकोब ना परमेश्वर सांगस.” परमेश्वर त मरेल ना नई, पण जिंदास्ना परमेश्वर शे, कारण कि तेना समोर ह्या सर्वा जित्ता शेतस. तव हय आयकीसन मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस मधून कितलाकस्नि सांग, कि “गुरुजी, तुनी बर सांग.” आणि तेस्ले परत तेनाशी आखो काही विचारानी हिम्मत नई हुईनी. मंग तेनी तेस्ले विचार, ख्रिस्त ले राजा दाविद ना वंश काब सांगतस? राजा दाविद स्वता स्तोत्रसंहिता नि पुस्तक मा सांगस, कि प्रभु नि मना प्रभु ले सांग. मना उजवा बाजुले बठ, जठलोंग मी तुना वैरी ले तुना समोर हाराई नई देत. राजा दाविद नि बी ख्रिस्त ले प्रभु सांगीसन संभोदित करेल शे, त तो बी दाविद ना वंश कसा होवू सकस? जव सर्वा लोक आयकी ऱ्हायंतात. त तेनी आपला शिष्यस्ले सांग. “मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस पासून सावधान राहा, जेस्ले लंबा, आणि महाग कपळा घालीसन फिरान बर शे. आणि तेस्ले बजारस्मा लोक आदरताशी नमस्कार कराले पाहिजे, आणि प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर आणि मेजवानी मा सन्मान नि जागा प्रिय वाटतस.” त्या धोका कण विधवास्नी संपती ले ली लेतस, आणि दाखाळा साठे गैरा टाईम लगून प्रार्थना करत राहातस, एस्ले जास्त दंड भेटीन. नंतर तेनी वरे देखीसन मालदारस्ले आपला आपला दान ले भांडार मा टाकतांना देख. आणि तेनी एक गरीब विधवा ले बी तेनामा दोन तांबा ना शिक्का टाकतांना देख, जेस्नी किंमत गैरी कमी होती. तव येशु नि सांग, मी तुमले खरज सांगस, कि “हय गरीब विधवा नि सर्वास तून जास्त टाकेल शे.” कारण कि सर्वास्नी फक्त तेना मधून काही दियेल शे, जेस्नी तेस्ले गरज नई होती, पण हई विधवा गरीब शे, आणि येणी ते सर्व काही दिधा जे तेना जोळे होत, येणी तो सर्वा पैसा टाकी दिधा जे ती आपला गरज ना साठे वापरू सकत होती. जव कितला लोक परमेश्वर ना मंदिर ना बारामा बोली ऱ्हायंतात, कि तो कसा सुंदर दघळस्ना आणि भेट नि वस्तूसकण सुशोभित करेल शे, त तेनी सांग. त्या दिन येतीन, जेस्ना मा हय सगळ तुमी देखतस, शत्रू एक बी दघळ या जागा वर नई सोळाव. जो लोटाई नई जावाव. तेस्नी तेले विचार. “कि आमले सांग, कि ह्या गोष्टी कव होतीन? आणि ह्या गोष्टी जव पुऱ्या होवावर येतीन, त त्या टाईम ना काय चिन्ह हुईन?” तेनी सांग, सावधान राहा, फसज्यात नका, कारण कि गैरा लोक मना नाव ना उपयोग करीसन येतीन, आणि ईसन सांगतीन, कि मी तोच शे, आणि हय बी कि टाईम जोळे ईलागेल शे, तुमी तेस्ना मांगे नका चालना जायज्यात. आणि जव तुमी युध्द आणि युध्दस्ना धमकी ना बारामा आयकतस, त घाबरज्यात नका, ह्या गोष्टीस्ले पहिले होण निश्चित शे, पण दुनिया ना अंत लगेच नई होवाव. तव तेनी तेस्ले सांग, कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन. आणि मोठा मोठा भूकंप होतीन, आणि जागा-जागा वर दुष्काळ नि महामारी पळीन, आणि आकाश मा भयंकार गोष्टी आणि मोठ मोठ्या चिन्ह प्रगट होतीन. पण सगळ्या गोष्टी तून पहिले त्या मना नाव मुळे तुमले धरतीन, आणि छळ करतीन आणि प्रार्थना घरस्ना अधिकारीस्ना हात मा सोपतीन, आणि जेल मा टाकतीन, आणि राजास आणि राज्यपाल आणि राजास समोर परीक्षण ना साठे उभा करामा येशात. तव तुमी तेस्ना समोर मनी साक्ष देशान. एनासाठे आपला आपला मन मा निश्चय ठेवा कि तुमी पहिले पासून उत्तर देवानी चिंता नका करज्यात, कि आमी काय सांगसुत. कारण कि योग्य टाईम वर मी तुमले अशी बुद्धी दिसू, कि तुमना सर्वा विरोधी सामना आणि खंडन नई करी सकावत. आणि तुमना माय-बाप आणि भाऊ आणि कुटुंबि, आणि मित्र बी तुमले धरावतीन, आठ लगून कि तुमना मधून कितलाकस्ले माराइ टाकतीन. आणि मनावर विश्वास करतस म्हणून, सर्वा लोक तुमना व्देष करतीन. पण तुमना काही बी नुकसान नई होवाव. आपला धीर कण तुमी आपला जीव वाचाळी ठेवशात. जव तुमी यरूशलेम शहर ले सैनिकस कण घेरेल देखशात, त समजी लेयज्यात कि तेन नष्ट होण नजीकच शे. तव ज्या ज्या लोक यहूदीया प्रांत क्षेत्र मा शे, तेस्नी रक्षा ना साठे पहाळ कळे पयानि गरज शे. आणि ज्या यरूशलेम शहर मा शेतस त्या बाहेर निघी जावोत, आणि ज्या गावस्मा शेतस, त्या तेनामा नई जावात. हवू तो टाईम शे जव परमेश्वर आठला सर्वा लोकस्ले दंड दिन, तव परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल सर्वा गोष्टी पुऱ्या हुई जातीन. हई त्या बायास्ना साठे एक भयानक टाईम राहीन, जी गर्भवती शे, आणि त्या बायास साठे ज्या पोरस्ले दूत पाजी ऱ्हायनात, तेस्ना साठे पयाना गैरा कठीण राहीन. कारण कि देश मा मोठा क्लेश आणि ह्या लोकस्वर मोठी आपत्ती हुईन. त्या तलवार ना धार कण मरामा येतीन, आणि काही लोकस्ले दुसरा देश ना लोकस्मा बंदी हुईसन पोचाळा मा येतीन, यरूशलेम शहर दुसऱ्या जातीस्ना द्वारा त्या टाईम लगून ठेचामा ईन जठ लगून दुसऱ्या जाती ना टाईम पुरा नई हुई जात. आणि सूर्य आणि चांद आणि तारास्मा चिन्ह दिखतीन, आणि पृथ्वी वर, देश देश ना लोकस्ले संकट हुईन, कारण कि त्या समुद्र ना गर्जना आणि लाठास्ना कोलाहल कण घाबरी जातीन. आणि भीती मुळे आणि संसार वर येणारी घटनास्नि वाट देखत-देखत लोकस्ना जीव मा जीव नई राहाव, कारण कि आकाश मधल्या शक्तीस्ले हालावामा ईन. तव मी, माणुस ना पोऱ्या ले सामर्थ्य आणि मोठी महिमा संगे ढग वर येतांना देखतीन. जव ह्या गोष्टी होवाले लागतीन, त सरळ हुईसन आपला डोक वरे करज्यात, तव परमेश्वर तुमले गैरा जल्दी वाचाळी लीन. तेनी तेस्ले एक दाखला बी सांगा, कि अंजिर ना झाळ आणि सर्वा झाळस्ले देखा. जसा तेना डायास्मा फांद्या आणि तेना पान फुटाले लागी जातस, त तुमी वयखी लेतस पाउसाया जोळे शे. याच प्रकारे, जव तुमी ह्या गोष्टी ले होतांना देखतस, तव समजी लेयज्यात कि परमेश्वर ना राज्य जोळेच शे. मी तुमले खरज सांगस, आते ऱ्हायनारा गैरा लोक निश्चित रूप मा ह्या सर्वा गोष्टी नई हुई जावावत, नई मराव. आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जातीन, पण मनी जे सांगेल शे ते कायम लोंग राहीन. “एनासाठे सावधान राहा, अस नई हुई जावो कि तुमना मन मग्न आणि गुंगीवाला, आणि ह्या जीवन नि चिंतास कण सुस्त हुई जावोत, आणि कदी तुमी असा करतस, त तो दिन तुमना वर फासा सारखा अचानक ईपळो. कारण कि एक फासा ना सारखा, हवू पृथ्वी वर राहाणारा सर्वा लोकस वर ईन. एनासाठे जागत राहा, आणि प्रत्येक टाईम ले प्रार्थना करत राहा कि तुमी ह्या सर्वा येणारी घटना पासून वाचाले, आणि माणुस ना पोऱ्या समोर उभा राहाणा योग्य बना.” आणि तो दिन ले परमेश्वर ना मंदिर मा प्रवचन सांगत होता, आणि रात ले नगर ना बाहेर जाईसन जैतून नाव ना पहाळ वर राहत होता. आणि सक्कायमा यरूशलेम शहर मधून गैरा लोक तेनी शिक्षा आयकाना साठे परमेश्वर ना मंदिर मा तेना जोळे येत होतात. यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन, आणि बिगर खमीर नि भाकर ना सन, दोन दिन नंतर सुरु होणार होता. आणि मुख्य यहुदी पुजारी, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ह्या गोष्ट नि शोध मा होतात, कि तेले कसकाय मारी टाकुत, पण त्या लोकस्ले भ्यात होतात. आणि सैतान यहूदा मा घुसणा, जो इस्कर्योत म्हणावत होता, आणि बारा शिष्यस्मा मोजावत होता. तो जाईसन मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी अधिकारीस्ना संगे गोष्ट करी, कि तेले कोणत्या प्रकारे तेस्ना हात मा धरावू. त्या खुश हुईनात, आणि तेले पैसा देवाना वचन दिनात. तेनी मानी लीध, आणि संधी झामलाले लागणा, कि बिगर विवाद ना तेले तेस्ना हात मा धराई दिसू. तव बिगर खमीर ना भाकर ना सन ना दिन उना, जव वल्हांडण सन ना मेंढ्या बलिदान करन अवश्य होत. आणि येशु नि पेत्र आणि योहान ले हय सांगीसन धाळ, कि जाईसन आमना खावा साठे वल्हांडण ना खुशी साठे जेवण तयार करा. तेस्नी तेले विचार, “तुनी कोठे ईच्छा शे, कि आमी तयार करूत?” तेनी तेस्ले सांग, देखा यरूशलेम शहर मा जावा, आणि एक माणुस पाणी नि माठ उचलेल तुमले भेटीन, तेना मांगे चालू लागज्यात. आणि तो ज्या घर मा जाईन त्या घर ना मालक ले सांगज्यात, कि गुरुजी तुले सांगस, कि ती पाव्हनास्नी खोली कोठे शे, जेनामा मी आपला शिष्यस संगे वल्हांडण सन ना जेवण खावू? तो तुमले एक सजाळेल मोठी खोली दाखाळीन, तठे तयारी करज्यात. तेस्नी जायसन, जस तेनी तेस्ले सांगेल होत, तसच देख, आणि तेस्नी तठे वल्हांडण सन ना जेवण तयार करणात. जव टाईम उना, त तो निवाळेल बारा प्रेषितस संगे जेवण कराले बठना. आणि तेनी तेस्ले सांग, मनी गैरी ईच्छा होती, कि दुख भोगाना आणि मराणा पहिले हवू वल्हांडण सन ना जेवण तुमना संगे खावू. कारण कि मी तुमले सांगस, जठलोंग परमेश्वर ना राज्य मा येणा अर्थ पूर्ण नई दि देवो, तठलोंग मी येले नई खावाव. तव तेनी अंगूर ना रस नि वाटी लिसन परमेश्वर ना धन्यवाद करना, आणि सांग, एले ल्या आणि आपस मा वाटीसन पील्या. कारण कि मी तुमले खरज सांगस, कि जठ लगून परमेश्वर ना राज्य नई येवाव, तठ लगून मी द्राक्षरस आते पासून कदीच नई पिवाव. नंतर तेनी भाकर लीधी, आणि परमेश्वर ले धन्यवाद दिसन मोळी, आणि तेस्ले हय सांगत दिधी, कि हवू मना शरीर शे, जो तुमना साठे देवामा येस, येले खावा आणि मना स्मरण साठे हय कऱ्या करा. ह्याच प्रमाणे तेनी भाकर नंतर वाटी बी हय सांगत लीना, कि हय वाटी मना त्या रक्त मा जो तुमना साठे व्हावाळा मा एस नवा करार शे. पण देखा, मले धरावनार ना हात, मना संगे बागळा वर शे. कारण कि माणुस ना पोऱ्या तो जस तेना साठे ठरावामा एयेल शे, जासच, पण त्या माणुस ना साठे भयानक शिक्षा राहीन, जो मले धराना साठे मदत करीन, तव त्या एक दुसराले विचाराले लागनात, कि आमना मधून कोण शे, जो हय काम करीन? तेस्ना मा हवू वाद विवाद बी हुईना, कि आमना मधून कोण मोठा समजामा एस? तेनी तेस्ले सांग, कि ज्या लोक या दुनिया मा राज्य करणारा म्हणावतस, त्या आपला अधिकार ना प्रयोग आपला ताबा मधला लोकस्ना वर अधिकार जताळासाठे करतस, आणि जो तेस्ना वर अधिकार ठेवतस, त्या उपकारक म्हणावतस. पण तुमी असा नका हुईज्यात, पण जो तुमना मा मोठा शे, तो धाकला सारखा आणि जो प्रधान शे, तो सेवक सारखा बनो. कारण कि मोठा कोण शे, तो जो जेवण कराले बठेल शे, कि जो सेवा करस तो? निश्चित, तो जो जेवण कराले खाले बठेल शे. पण मी तुमना मधमा सेवक सारखा शे. पण तुमी त्या शेतस, ज्या मनी परीक्षा मा कायम मना संगे राहोत. आणि जस मना बाप नि मनासाठे एक राज्य ठरायेल शे, तसाच मी बी तुमना साठे ठरावस. एनासाठे कि तुमी बी मना राज्य मा मना बागळा वर खावोत पिवोत, आणि तुमी बी ज्या मना मांगे एयेल शेतस, बारा सिंहासन वर बठीसन इस्त्राएल देश ना बारा गोत्र ना न्याय करोत. आणि प्रभु नि तेले सांग, “शिमोन, ओ शिमोन, देख, सैतान नि तुमनी परीक्षा लेवा साठे परमेश्वर कळून परवानगी मांगेल शे, कि चांगला ले वाईट पासून दूर करो, जसा कि शेतकरी भुशी मधून गहू ले निवाळस. पण मनी तुना साठे विनंती करी, कि तू मनावर विश्वास कराले बंद नई करो, आणि जव तू पश्चाताप करस, त आपला भावूस्ले सीधा करजो.” तव पेत्र नि तेले सांग, ओ प्रभु, मी तुना संगे बंदीगृह मा जावाले, आणि मराले बी तयार शे. तेनी सांग, “पेत्र मी तुले सांगस, कि आज कोंबळा बांग दिन तठ लगून तू तीन सावा मना नकार करी लेशीन, कि मी तेले नई वयखत.” येशु नि तेस्ले सांग, कि “जव मी तुमले बटवा, आणि झोयना, आणि बिगर जोळा ना बाहेर धाळेल होतु, त काय तुमले कोणती वस्तू नि कमी पळेल होती?” तेस्नी सांग, “कोणतीच वस्तू नि नई.” तव येशु नि तेस्ले सांग, पण आते लोक आमना विरोध मा शेतस, जेना कळे बटवा शे, तो तेले ली लेवो, आणि तसाच झोयना बी, आणि जेना कळे तलवार नई शे तो आपला वरला कपळा विकीसन एक ईकत लीलेवो. कारण कि मी तुमले सांगस, कि हय जे परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, कि “तो अपराधीस संगे मोजामा एयेल शे, तेन मना मा होण निश्चित शे, कारण कि मना बारा मधल्या गोष्टी पुरा होवावर शे.” तेस्नी सांग, “प्रभु, देख, आठे दोन तलवार शेतस,” येशु नि तेस्ले सांग, “गैऱ्या शेतस.” तव तो बाहेर निघीसन आपला रिती प्रमाणे जैतून ना पहाळ वर ग्या, आणि शिष्य तेना मांगे चालू लागनात. त्या जागा वर पोचीसन तेनी तेस्ले सांग, प्रार्थना करत राहा कि तुमी पाप कळे आकर्षित नई होवोत, आणि तो तेस्ना तून थोळासा दूर ग्या, आणि गुळघा टेकीसन प्रार्थना कराले लागणा. “ओ बाप कदी तुनी ईच्छा शे त हय दुख नि वाटी ले मना पासून दूर करी ले, तरी बी मनी नई पण तुनी ईच्छा पुरी होवो.” तव स्वर्ग मधून एक परमेश्वर ना दूत तेले दिखना जो तेले सामर्थ देत होता. आणि तो जास्त संकट मा व्याकुल हुईसन आखो बी हृदय वेदना कण प्रार्थना कराले लागणा, आणि तेना घाम समजा रक्त ना मोठा मोठा थेंबस सारखा जमीन वर पळी ऱ्हायंतात. तव तो प्रार्थना करीसन उठाना आणि आपला शिष्यस जोळे ईसन तेस्ले उदास हुईसन जपेल देखना, आणि तेस्ले सांग, काब जपतस? उठा प्रार्थना करा, कि तुमी पाप कळे आकर्षित नई होवोत. तो हय सांगीच ऱ्हायंता, कि देखा एक गर्दी उणी, आणि त्या बारास मधून जेना नाव यहूदा इस्कर्योत होता, तेस्ना पुळे पुळे ईऱ्हायंता, तो येशु जोळे उना, कि तेले मुक्का लेवो. येशु नि तेले सांग, “यहूदा, काय तू मुक्का लिसन माणुस ना पोऱ्या ले धराई ऱ्हायना?” तेना जोळीदारस्नी जव देख कि काय होणार शे, त सांग, “प्रभु, काय आमी तलवार चालावूत?” आणि येशु ना शिष्यस मधून एक नि महा यहुदी पुजारी ना दास वर तलवार चालाईसन, तेना उजवा कान उळाई टाक. एनावर येशु नि सांग, “आते बस करा,” आणि तेना कान ले हात लाईसन तेले बर कर. तव येशु नि मुख्य यहुदी पुजारीस्ले, आणि परमेश्वर ना मंदिर मधला पहारेकरीस्ना अधिकारीस्ले आणि पूर्वजस्ले, ज्या तेनावर चळी एयेल होतात, सांग, “काय तुमी डाखू समजीसन मले बंदी करासाठे तलवारी आणि सोठा लिसन निघेल शेतस? मी दररोज परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा तुमना मधमा ऱ्हाईसन प्रचार करत होता, आणि तव तुमनी मले बंदी नई करणात, पण तुमनी हय घळी शे, आणि आंधारा ना अधिकार शे.” नंतर त्या तेले धरीसन लीचालनात, आणि महा यहुदी पुजारी ना घर ना आंगण मा लयनात, आणि पेत्र दुरू दूरूनच तेना मांगे मांगे चालत होता. आणि जव त्या आंगण मा विस्तो सिलगाईसन बसनात, त पेत्र बी तेस्ना मधमा बठी ग्या. आणि एक दासी तेले विस्तो ना उजाया मा बठेल देखीसन, आणि तेना कळे देखीसन सांगाले लागणी, हवू बी त तेना संगे होता. पण तेनी हय सांगीसन नकार करा, कि “ओ पोर, मी तेले नई वयखत.” थोळा टाईम नंतर कोणी आखो नि तेले देखीसन सांग, “तू बी त तेस्नाच मधून शे,” पेत्र नि सांग, “ओ भाऊ, मी नई शे.” घन्टाक भर नंतर एक आखो माणुस पक्का सांगाले लागणा, “निश्चय हवू बी त तेस्ना संगे होता; कारण कि हवू गालील जिल्हा ना शे.” पेत्र नि सांग, “ओ भाऊ, जे तुनी सांग, ते पूर खोट शे?” तो सांगीच ऱ्हायंता कि लगेच कोंबळा नि बांग दिधी. तव प्रभु नि फिरीसन पेत्र कळे देख, आणि पेत्र ले येशु नि सांगेल गोष्ट आठवण उणी, जी तेनी सांगेल होती, कि कोंबळा ना बांग देवाना पहिले तू तीन सावा मना नकार करशीन. ह्या गोष्टी वर पेत्र आपला दुख ले काबू नई करू सकना, आणि गैरा रळाले लागणा. ज्या माणस येशु ले धरी ठीयेल होतात, त्या तेनी मजाक उळाईसन माराले लागनात. आणि तेना डोया झाकीसन आणि तेले मारीसन विचारनात, कि “भविष्यवाणी करीसन सांग कि तुले कोणी मार.” आणि तेस्नी आखो गैऱ्या निंदा ना गोष्टी तेना बारामा सांग्यात. जव दिन उगणा, त लोकस्ना मुख्य यहुदी पुजारी लोक, पूर्वज लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक एकत्र हुईनात, आणि तेले आपली महासभा मा लईसन ईचार. “कदी तू ख्रिस्त शे, त आमले सांगी दे.” तेनी तेस्ले सांग, “कदी मी तुमले सांगू, त विश्वास नई करावत. आणि कदी मी प्रश्न वीचारसु, त तुमी मले कदीच उत्तर नई देवाव. पण आते पासून माणुस ना पोऱ्या, जो मी शे, सर्व सामर्थ्य परमेश्वर ना उजवी कळे बठेल ऱ्हाईन.” एनावर सर्वास्नी सांग, “त काय तू परमेश्वर ना पोऱ्या शे?” तेनी तेस्ले सांग, “तुमी स्वता सांगतस, कारण कि मी शे.” तव तेस्नी सांग, “आते आमले साक्षीस्नी आखो काय गरज शे. कारण कि आमी स्वता तेना तोंड कण आयकी लीयेल शे.” तव पुरी सभा उठीसन येशु ले यहूदा क्षेत्र ना रोमी राज्यपाल, पिलात कळे लीगई. आणि त्या हय सांगीसन तेनावर आरोप लावाले लागनात, कि “आमी येले आमना देश ना लोकस्ले उकसाळतांना आणि सम्राट ले कर देवाले मना करतांना, आणि स्वता ले ख्रिस्त आणि राजा सांगतांना आयकेल शे.” पिलात नि तेले विचार, “काय तू यहुदीस्ना राजा शे?” तेनी तेले उत्तर दिधा, कि “तू स्वताच सांगी ऱ्हायना.” तव पिलात नि मुख्य यहुदी पुजारीस्ले आणि लोकस्ले सांग, “मी ह्या माणुस मा काहीच दोष नई देखत.” पण त्या आखो बी दृढता कण सांगाले लागनात, “तो यहूदीया प्रांत ना सर्वा लोकस्ना मधमा आपली शिक्षा मुळे दंगास्ना कारण बनी ऱ्हायना शे, गालील जिल्हा मा सुरु कर आणि आते आठे ईजायेल शे.” जव पिलात नि येशु ना विषय मा हय आयक त तेनी विचार, “काय हवू माणुस गालील जिल्हा ना शे?” आणि हय समजीसन कि येशु राजा हेरोद द्वारा राज्य करणारा प्रांत मा शे, तेले हेरोद राजा कळे धाळी दिना, कारण कि त्या टाईम ले तो बी यरूशलेम शहर मा होता. हेरोद राजा येशु ले देखीसन गैराच खुश हुईना, कारण कि तो गैराच दिनस पासून तेले देखानी ईच्छा करत होता. एनासाठे कि तेना बारामा गैर आयकेल होत. आणि तो येशु ले काही चिन्ह करत देखानी आशा करी ऱ्हायांता. तो तेले गैऱ्या गोष्टी ईचारत ऱ्हायना, पण तेनी तेले काही बी उत्तर नई दिधा. आणि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक उभा ऱ्हायनात, तन मन कण तेनावर आरोप लावत ऱ्हायनात. तव हेरोद राजा आपला शिपाईस संगे तेना अपमान करीसन तेनी मजाक उळावना, आणि रंगीत कपळा घालीसन तेले पिलात कळे परत धाळी दिना. त्या टाईम लोंग पिलात आणि हेरोद राजा एक दुसरा ना दुश्मन होतात, पण त्याच दिन त्या मित्र बनी ग्यात. पिलात नि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि अधिकारीस्ले आणि लोकस्ले बलाईसन तेस्ले सांग. तुमी ह्या माणुस्ले मना जोळे लयनत आणि सांगणात कि हवू दंगा करासाठे लोकस्ले भळकावत होता, आणि देखा, मनी तुमना समोर तेनी चौकशी करी, पण ज्या गोष्टी ना तुमी तेनावर आरोप लावतस, त्या गोष्टीस्ना बारामा मनी तेनामा काही बी दोष नई देखेल शे. राजा हेरोद नि भी तेले आरोपी नई समज, कारण कि तेनी तेले मना जोळे परत धाळी दिधा, आणि देखा, ह्या माणुस नि मृत्युदंड ना योग्य काही बी चुकी नई करेल शे. एनासाठे मी तेले चाबूक कण मारीसन सोळी टाकस. आते पिलात प्रत्येक वल्हांडण ना सन ना टाईम ले यहुदी लोकस साठे एक कैदी ले सोळत होता. तव सर्वा मियसन वरळी उठनात, “कि एना काम खतम कर, आणि आमना साठे बरब्बा ले सोळी दे.” तो कोणता तरी विवाद ना मुळे जो नगर मा हुयेल होता, आणि हत्या मुळे बंदीगृह मा टाकामा एयेल होता. पण पिलात नि येशु ले सोळीदेवानी ईच्छा कण लोकस्ले परत समजाळ. पण तेस्नी जोरमा सांग, “कि तेले क्रूस वर चळावा, क्रूस वर.” तेनी तिसरा सावा तेस्ले सांग, “काब, तेनी कोणत वाईट करेल शे? मी तेनामा कोणतीच मृत्युदंड नि योग्य गोष्ट नई देखनु, एनासाठे मी तेले फटका माराईसन सोळी देस.” पण मुख्य यहुदी पुजारी लोक आणि अधिकारी वरळी-वरळीसन मांगे लागी ग्यात, कि तेले क्रूस वर चळावामा येवो, आणि तेस्न वरळन प्रबळ हुयना. तव पिलात नि आदन्या दिधी, कि तेस्नी विनंती प्रमाणे करामा येवो. पिलात त्या माणुस ले जो दंगा करावाना आणि हत्या मुळे बंदीगृह मा टाकामा एयेल होता, आणि जेले त्या मांगत होतात सोळी टाक, आणि येशु ले तेस्ना ईच्छा प्रमाणे सोपी टाक. जव त्या तेले लिसन जात होतात, तेस्नी शिमोन नाव ना एक माणुस ग्रामीण भाग मधून यरूशलेम शहर मा येत होता. शिमोन कुरेने शहर ना होता, धरीसन तेनावर क्रूस ले ठीई दिधा कि तेले येशु ना मांगे-मांगे ली जावोत. आणि लोकस्नी मोठी गर्दी तेना मांगे मांगे चालू लागणी, आणि गैरा बाया बी होतात, ज्या तेना साठे छाती ले मारत आणि तेना साठे दुख करत होत्यात. येशु नि तेस्ना कळे फिरीसन सांग, “ओ यरूशलेम शहर न्या पोरीसहोण, मनासाठे नका रळा, पण स्वता साठे आणि आपला पोरस साठे रळा. कारण कि देखा, पिळा ना दिन येतीन, जेस्ना मा लोक सांगतीन, धन्य शेतस त्या बाया जेस्ना कदी पोर नई होतात, जेस्नी कोणी पोरस्ले जन्म नई दिध, आणि जेस्नी कदीच तेस्ले दुध नई पाजनात. त्या टाईम ले लोक पहाळस्ले सांगतीन, कि आमना वर पळा, आणि टेकळ्यास्ले कि आमले झाकी ल्या. कारण कि त्या हिरवा झाळस म्हणजे मना संगे असा करतस, त सुकेल म्हणजे तुमना संगे काय-काय नई करावामा येवाव?” त्या आखो दोन माणसस्ले बी ज्या कुकर्मी होतात, येशु ना संगे मराणा साठे शिपाई ना द्वारे लीजावा मा उनात. जव त्या जागा वर पोहचनात, जिले खोपळी ना स्थान सांगतस, त तेस्नी येशु ले तठे आणि त्या अपराधीस मधून एक ले उजवी आणि दुसराले डाखोऱ्या कळे क्रूस वर चळाव. तव येशु नि सांग, “ओ बाप, एस्ले माफ कर, कारण कि एस्ले नई माहिती कि काय करी ऱ्हायनात?” आणि तेस्नी चिठ्या टाकीसन तेना कपळा वाटी लीधात. लोक उभा-उभा देखी ऱ्हायंतात, आणि अधिकारी बी निंदा करी-करीसन सांगत होतात, कि “एनी दुसरास्ले वाचाळ, कदी हवू परमेश्वर ना ख्रिस्त शे, आणि तेना निवाळेल शे, त स्वता ले वाचाळी ले.” शिपाई बी जोळे ईसन आणि सिरका दिसन तेनी निंदा करीसन सांगत होतात. “कदी तू यहुदीस्ना राजा शे, त स्वता ले वाचाळ.” आणि तेना वरे एक दोष पत्र बी लायेल होता, कि “हवू यहुदी लोकस्ना राजा शे.” ज्या कुकर्मी लटकायेल होतात, तेस्ना मधून एक नि तेनी निंदा करीसन सांग, “जर तू ख्रिस्त शे त मंग स्वता ले आणि आमले वाचाळ.” एनावर दुसरा अपराधी नि तेले धामकाई सन सांग, “काय तू परमेश्वर ले बी नई घाबरत? तू बी त तोच दंड भोगी ऱ्हायना शे. आणि आमी त न्याय प्रमाणे दंड भोगी ऱ्हायनूत, कारण कि आमी आपला कामस्ना बराबर फय भोगी ऱ्हायनूत, पण एनी कोणताच वाईट काम नई कर.” तव तेनी येशु ले सांग, “हे प्रभु, जव तू राजा ना सारखा आपला राज्य ना संगे येशीन, त मले आठवण ठेवजो.” येशु नि तेले सांग, “मी तुले खरज सांगस, कि आजच तू मना संगे स्वर्गलोक मा होशी.” आणि जवळ-पास दोन पहर पासून तिसरा पहर लगून सर्वा देश मा आंधारा पळेल ऱ्हायना. आणि सूर्य ना उजाया जात ऱ्हायंना, आणि तो जाळा परदा जो परमेश्वर ना मंदिर मा होता, जो सर्वास्ले परमेश्वर नि संगतीमा जावाले रोकत होता, वरून त खाले लगून दोन तुकळा मा फाटी ग्या. आणि येशु नि जोरमा सांग, “ओ बाप, मी आपली आत्मा तुना हात मा सोपस,” आणि हय सांगीसन जीव सोळी दिना. सेनापती नि, जे काही हुयेल होत देखीसन परमेश्वर नि स्तुती करी, आणि सांग, “खरज हवू माणुस धर्मी होता.” आणि गर्दी जो हय देखाले एकत्र हुयेल होती, ह्या घटना ले देखीसन त्या छातीस्ले मारत-मारत आपला घरस्ले परती ग्यात. येशु ना सर्वा मित्र, आणि ज्या बाया गालील जिल्हा मधून एयेल होत्यात, दूर उभ्या राईसन जे काही हुयन देखी ऱ्हायंतात. तेनी पिलात कळे जाईसन येशु ना मृत शरीर ले मांगी लीध. तेले उतारीसन मखमली चादर मा गुंढाव, आणि एक कबर मा ठेव, जी दघळस्मा खोदेल होती तेना कदीच वापर नई करेल होता. तो दिन आराम ना दिन ना साठे तयारी ना दिन होता, जो शुक्रवार होता. आणि त्या बायास्नी ज्या तेना संगे गालील जिल्हा मधून एयेल होत्यात, मांगे मांगे जाईसन त्या कबर ले देखनात, आणि हय बी कि तेना प्रेत कोणत्या प्रकारे ठीयेल शे. आणि तेस्नी आपला घर परती सन सुगंधीत वस्तू आणि ईत्र येशु ना शरीर ले लावा साठे तयार करणात, आणि आराम ना दिन त तेस्नी मोशे ना नियम प्रमाणे आराम कर. रविवार ना दिन सक्कायमा बायास्नी त्या सुगंधीत वस्तूस्ले लिसन ज्या तेस्नी बनायेल होत्यात, आखो कईक बायास्ना संगे कबर वर लिसन उन्यात. तेस्नी त्या मोठा गोलकार दघळ ले कबर वरून कंडलेल देख, आणि तेना कपळा ले आलग पळेल देखनात. आणि मधमा जाईसन प्रभु येशु नि प्रेत नई दिखणी. जव त्या ह्या गोष्ट कण चकित हुई ग्यात त देखा, दोन माणस धव्या कपळा घालेल तेस्ना जोळे ईउभा ऱ्हायनात. जव त्या भ्याई ग्यात, आणि जमीन कळे तोंड वाकाळेल ऱ्हायन्यात, त तेस्नी तेस्ले सांग, “तुमी जित्ता ले मरेल मा काब शोधतस? तो आठे नई पण जित्ता हुई जायेल शे, आठवण करा कि तो गालील जिल्हा मा ऱ्हायसन तुमले सांगेल होता. मी, माणुस ना पोऱ्या ना साठे निश्चित शे, कि मी गैरा जास्त दुख झेलु, आणि वरिष्ठ लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस, मले तुच्छ समजीसन क्रूस वर मारी टाकतीन, आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू.” तव तेन्या गोष्टी तेस्ले याद उन्यात. आणि त्या कबर मधून परती सन त्या अकरा शिष्यस्ले, आणि दुसरा लोकस्ले, ह्या गोष्टी सांगी आयकाळात. जेस्नी प्रेषितस्ले ह्या गोष्ट सांग्यात, त्या मरिया मग्दालीया आणि योहान्ना आणि याकोब नि माय मरिया आणि तेस्ना संगे न्या आखो बाया बी होत्यात. पण तेस्नी गोष्ट प्रेषितस्ले गोष्ट सारखी वाटनी, आणि तेस्नी तीस्नावर विश्वास नई कर. तव पेत्र उठीसन कबर वर पयत ग्या, आणि वाकीसन फक्त कपळा आल्लग पळेल देखाना, आणि जे हुयेल होत, तेना कण चकित हुईसन, आपला घर चालना ग्या. त्याच दिन येशु ना दोन शिष्य उम्माउस नाव ना गाव ले जात होतात, जो यरूशलेम शहर पासून काही सात मिल (अकरा किलोमीटर ना आस-पास) ना दूर वर होता. आणि त्या ह्या सगळ्या हुयेल घटनास्ना बारामा, आपस मा गोष्टी करत जाई ऱ्हायंतात. आणि जव त्या आपस मा बोलत आणि सोच-विचार करतच होतात, त येशु स्वता जोळे ईसन तेस्ना संगे चालाले लागणा. पण परमेश्वर नि तेस्ले तेले वयखा पासून रोकी ठेव, एनासाठे कि त्या तेले वयखी नई सकनात. येशु नि तेस्ले विचार, “ह्या काय गोष्टी शेतस, ज्या चालता-चालता तुमी आपस मा बोली ऱ्हायनात?” त्या थांबी ग्यात आणि तेस्ना चेहरा गैरा नाराज वाटी ऱ्हायंतात. हय आयकीसन, तेस्ना मधून क्लीयुपास नाव ना एक माणुस नि सांग, “कदाचित यरूशलेम शहर मा तू एखटाच माणुस शे, जेले ह्या घटना ना बारामा माहित नई, कि मांगला काही दिनस्मा काय हुयन.” येशु नि तेस्ले विचार, “कोणत्या गोष्टी?” तेस्नी तेले सांग, येशु नासरेथकर ना बारामा जो परमेश्वर आणि सर्वा लोकस्ना नजर मा, काम आणि वचन मा सामर्थ भविष्यवक्ता होता. मुख्य यहुदी पुजारीस्नी आणि आमना पुढारीस्नी तेले धराईटाक, कि तेनावर मृत्युदंड नि आदन्या देवामा येवो, आणि तेले क्रूस वर चळावाले लाव. पण आमले आशा होती, कि हवूच इस्त्राएल देश ले रोमीस साम्राज्य पासून सुटका दिन, आणि ह्या गोष्टी शिवाय ह्या घटना ले हुयेल तिसरा दिन शे. आणि आते आमना समूह मधून कईक बायास्नी बी आमले आचर्य मा टाकी दियेल शे, ज्या आज सक्कायमा कबर वर जायेल होत्यात. आणि जव येशु ना मृत शरीर नई दिखना, त हय सांगत उन्यात, कि आमनी परमेश्वर ना दूत ना दर्शन देख, जेस्नी सांग कि येशु जिंदा शे. तव आमना जोळीदारस मधून कितलाक झन कबर वर ग्यात, आणि जस बायास्नी सांगेल होत, तसच देख, पण तेले नई देखनात. तव तेनी दोनी शिष्यस्ले सांग; ओ बिगर बुद्धी लोकसहोण, जे काही भविष्यवक्तास्नी परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तुमी लोकस्ले तेनावर विश्वास करान गैर कठीण वाटस. हय आवश्यक होत कि ख्रिस्त ह्या सर्वा दुख उचलो आणि मंग आपली महिमा मा प्रवेश करो. तव येशु नि परमेश्वर ना पुस्तक मधून, मोशे पासून सुरुवात करीसन सर्वा भविष्यवक्तास्ना द्वारे आपला बारा मधल्या गोष्टीस्ना अर्थ, तेस्ले समजाळी टाक. इतला मा त्या गाव ना नजीक पोचनात, जठे त्या जाई ऱ्हायंतात, आणि तेना गोष्टी कण अस माहिती हुईन कि तेस्ले पुळे जावानी ईच्छा शे. पण तेस्नी तेले हय सांगीसन रोक, कि “आमना संगे ऱ्हाय, कारण कि संज्याकाय हुईचालनी आणि दिन आते गैरा ढइजायेल शे.” तव तो तेस्ना संगे ऱ्हावाले मधमा ग्या. जव तो तेस्ना संगे जेवण कराले बठना, त तेनी भाकर लिसन परमेश्वर ले धन्यवाद कर, आणि तिले मोळीसन तेस्ले देवाले लागणा. तव तेस्ना डोया उघळी ग्यात, आणि तेस्नी तेले वयखी लीध, आणि तो तेस्ना डोया ना समोरून गायब हुईग्या. तेस्नी आपस मा सांग, “जव तो रस्ता मा आमना संगे गोष्टी करत होता, आणि परमेश्वर ना पुस्तक ना अर्थ समजाळत होता, तव आमना मन मा उत्तेजना उत्पन्न हुयेल होती.” त्या लगेच उठीसन यरूशलेम शहर ले परती ग्यात, आणि त्या अकरा शिष्यस्ले आणि तेस्ना जोळीदारस्ले एकत्र देख. त्या तेस्ले सांगू लागनात, “प्रभु खरज जित्ता हुई जायेल शे, आणि शिमोन पेत्र ले दिखेल शे.” तव तेस्नी रस्ता मा घळेल गोष्टी तेस्ले सांगी टाकी आणि हय बी तेस्ले सांग कि जव तो भाकर मोळीऱ्हायंता त तेस्नी तेले वयख लीध. त्या ह्या गोष्टी सांगीच ऱ्हायंतात, कि येशु स्वता तेस्ना मधमा प्रगट हुईना आणि तेस्ले सांग, “तुमले शांती भेटो.” पण त्या घाबरी ग्यात, आणि भ्याय ग्यात, आणि समजनात, कि त्या कोणी भूत ले देखी ऱ्हायनात. येशु नि तेस्ले सांग, “काब घाबरतस? आणि तुमी मन मा शक काब करतस? मना हात आणि पाय ले देखा, कि मी तोच शे, मले हात लाईसन देखा, कारण कि प्रेत-आत्मा ना शरीर नई ऱ्हास जसा मना मा देखतस.” हय सांगीसन तेनी तेस्ले आपला हात पाय दाखाळात. जव खुशी ना मारे तेस्ले विश्वास नई हुईऱ्हायंता कि येशु जित्ता होता, आणि आश्चर्य करत होतात, त येशु नि तेस्ले विचार, “काय आठे तुमना जोळे काही जेवण शे?” तेस्नी तेले भुंजेल मासा ना तुकळा आणि मध दिधा. तेनी लिसन जव कि त्या तेले देखी ऱ्हायंतात तेस्ना समोर खादा. मंग तेनी तेस्ले सांग, “ह्याच मना त्या गोष्टी शेतस, ज्या मी तुमना संगे ऱ्हातांना, तुमले सांगेल होती, कि अवश्य शे, कि जीतल्या गोष्टी मोशे ना नियम आणि भविष्यवक्ता आणि स्तोत्रसंहिता ना पुस्तक मा लिखेल शे, सर्वा खरा साबित होवो.” तव तेनी तेस्ले परमेश्वर ना पुस्तक ना गोष्टी समजा साठे मदत करी. आणि तेनी सांग, “परमेश्वर ना पुस्तकस्मा हय लिखेल शे, हई निश्चित होत कि ख्रिस्त दुख उचलीन, आणि तिसरा दिन मरेल मधून परत जित्ता हुई जाईन. आणि यरूशलेम शहर पासून सर्वा जातीस्मा आपला पापस पासून परत फिराणा आणि पापस्नी माफी ना प्रचार, तेनाच नाव कण करामा ईन. तुमी ह्या सगळ्या गोष्टीस्ना साक्षी शेतस. आणि आयका, मी स्वता तुमना वर परमेश्वर नि आत्मा ले धाळसू जी शेप्पत मना बाप नि करेल शे, पण तुमले तठ लगून यरूशलेम शहर मा वाट देखनी पळीन, जठ लगून तुमले स्वर्ग मधून सामर्थ्य नई देवामा येत.” तव येशु तेस्ले शहर तून बाहेर बेथानी नगर जोळे लीग्या, आणि आपला हात वरे करीसन आशीर्वाद दिधा. आणि तेस्ले आशीर्वाद देतांना तो तेस्ना तून आल्लग हुईग्या, आणि स्वर्ग मा उचलाई ग्या. आणि त्या तेनी स्तुती करीसन खुशी मा यरूशलेम शहर ले परती ग्यात. आणि त्या कायम परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा जाईसन परमेश्वर नि स्तुती करत धन्य सांगत होतात. असच होवुदे. ह्या सर्वा जग बनाना पयले वचन होता, आणि वचन परमेश्वर ना संगे होता, आणि वचन परमेश्वर होता. तो सुरुवात पासूनच परमेश्वर ना संगे होता. परमेश्वर नि वचन ना द्वारे सगळ काही बनाव आणि जे काही ह्या दुनिया मा बनायेल होत, सगळ काही वचन ना द्वारे बनायेल शे. तेच वचन सर्वा जीवन ना झरा शे आणि तो सर्वा लोकस्ले उजाया देस. उजाय आंधारा मा चमकस आणि अंधकार तेले मलाई नई सकना. परमेश्वर नि योहान नाव ना एक माणुस ले धाळ, जो लोकस्ले उजाया ना बारामा साक्ष देवाले एयेल होता, एनासाठे कि सर्वा त्या साक्ष ना द्वारे विश्वास करोत. योहान स्वता तर ते उजाया नई होता, पण तो त्या उजाया नि साक्षी देवाना साठे एयेल होता. ती जी खरा उजाया शे जे प्रत्येक माणुस्ले प्रकाशित करस जग मा येणार होती. वचन जग मा होता आणि जग तेना द्वारा उत्पन्न हुयना पण जग ना लोकस्नी तेले नयी ओयख. तो आपला देश मा उना आणि तेना आपला लोकस्नी तेले स्वीकार नई करनत. पण जीतलास्नी तेले स्वीकार करणात, आणि तेनावर विश्वास करणात, त्या सर्वास्ले तेनी परमेश्वर ना संतान बानाना अधिकार दिधा. त्या नईत रक्त तून, नईत शरीर नि ईच्छा तून, नईत माणुस नि ईच्छा तून, पण परमेश्वर नि स्वता तेस्ले आपला पोर ठरायेल शे. तो वचन माणुस बनना. तो कृपा आणि खरापण तून पूर्णपणे होयनस आमना मधमा ठिया करना. आमी तेनी अशी महिमा देखी जशी परमेश्वर बाप ना कळून एयेल एकुलता पोऱ्या नि महिमा. योहान नि तेना विषयी मा साक्ष दिना आणि आवाज दिसन सांगणा, “हवू तोच शे, जेना मी वर्णन करनू, कि जो मना नंतर इरायना, तो मनातून श्रेष्ठ शे कारण तो मनातून पयले पासून होता.” तेनी परिपूर्णता तून आमी सर्वास्ले कृपा वर कृपा भेटेल शे. एनासाठे कि मोशे ना नियम त मोशे ना द्वारा दियेल शे, पण परमेश्वर नि येशु ख्रिस्त ना द्वारे कृपा आणि खरेपणा दाखाळ. परमेश्वर ले कोणी कदी नई देख फक्त एकुलता पोऱ्या नि जो बाप परमेश्वर ना जोळे शे, तेनी परमेश्वर ले आमना वर प्रकट करना. योहान नि साक्ष हई शे, कि जव यहुदी पुढारीस्नी यरूशलेम शहर तून यहुदी पुजारी आणि मंदिर मा मदत करणारा लेवी लोकस्ले हई विचारा साठे धाळना, “तू कोण शे?” त योहान नि हई मानी लीधा, आणि तेनी तेस्ले स्पष्ट रूप मा सांग, “मी ख्रिस्त नई शे.” तव तेस्नी तेले विचार, “त मंग कोण शे? काय तू एलीया भविष्यवक्ता शे?” तेनी सांग, “मी नई शे.” “तर काय तू तो भविष्यवक्ता शे?” तेनी उत्तर दिधा, “नई.” तव तेस्नी तेले विचार, “मंग तू कोण शे? कारण कि आमी आमले धाळणारस्ले काय उत्तर देवूत. तू आपला विषय मा काय सांगस?” योहान बाप्तिस्मा देणारा नि सांग, “जसा यशया भविष्यवक्ता नि सांगेल शे, उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना, कि प्रभु ना रस्ता तयार करा.” ह्या प्रश्न ले विचारनारा लोक परूशी लोकस कळून धाळायेल होतात. तेस्नी तेले हई प्रश्न विचार, “जर तू ख्रिस्त नई शे, आणि नईत एलीया, आणि नईत भविष्यवक्ता शे, त मंग बाप्तिस्मा काबर देस?” योहान बाप्तिस्मा देणारा नि तेस्ले उत्तर दिधा, “मी त पाणी कण बाप्तिस्मा देस, पण तुमना मधमा एक व्यक्ती उभा शे, जेले तुमी नई जानतस. म्हणजे मना नंतर जो येणार शे, जेना जोळास्ना बंद खोलना बी मी योग्य नई शे.” या गोष्टी यार्देन नदी ना पार बेथानिया नगर मा हुईनी, जठे योहान बाप्तिस्मा देणारा लोकस्ले बाप्तिस्मा देत होता. दुसरा दिन योहान नि येशु ले आपले कळे येतांना देखीसन सांग, “देखा, हावू परमेश्वर ना मेमना, जो जग ना लोकस्ना पापस्ले ली लेस.” हवू तोच शे, जेना विषय मा मी सांगेल होता, कि एक व्यक्ती मना नंतर येस, जो मनातून श्रेष्ठ शे, कारण तो मनातून पयले पासून होता. मनी स्वता पयले तेले नई वयख, कि तो ख्रिस्त शे. पण मी एनासाठे पाणी कण बाप्तिस्मा देत उनू कि इस्त्राएल देश ना लोकस्वर हई प्रगट करी सकू कि तो कोण शे. आणि योहान नि हई साक्ष दिधी, “मनी आत्मा ले स्वर्ग मधून कबुतर ना रूप मा उतरतांना देख, आणि तो तेनावर थांबीग्या. आणि मी त तेले ओयखत बी नई होत, कि तो ख्रिस्त शे, पण जेनी मले पाणी कण बाप्तिस्मा देवाले धाळ, तेनीच मले सांग, जेनावर तू आत्मा ले उतरतांना आणि थांबताना देखशीन तोच पवित्र आत्मा कण बाप्तिस्मा देणारा शे. मनी तेले देख आणि मी तुमले ह्या गोष्ट नि साक्ष देस कि हावुच परमेश्वर ना पोऱ्या शे.” दुसरा दिन योहान बाप्तिस्मा देणारा आणि तेना शिष्य मधून दोन झन परत त्याच जागा वर उभा होतात. येशु तठून जात होता त तेनी नजर टाकीसन सांग, “देख, हवू परमेश्वर ना मेमना शे.” तव त्या दोनी शिष्य तेन आईकसन येशु ना मांगे चालना ग्यात. येशु नि तेस्ले आपला मांगे येतांना देखीसन तेस्ले विचार, “तुमी कोणी शोधा मा शे?” तेस्नी येशु ले सांग, “हे गुरु, तू कोठे ऱ्हास?” येशु नि तेस्ले सांग, “चाला, त देखी लेशान.” दुफार ना जवळपास चार वाजी जायेल होतात, जव त्या तेना संगे ग्यात आणि देखनात कि तो कोठे ऱ्हास. एनासाठे त्या बाकी उरेल दिन ना साठे तठेच थांबनात. त्या दोनी मधून, जो योहान नि गोष्ट आयकीसन येशु ना मांगे चालू लागणा, एक त शिमोन पेत्र ना भाऊ अंद्रिया होता. अंद्रिया पयले आपला सख्खा भाऊ शिमोन ले भेटीसन तेले सांग, “आमले ख्रिस्त म्हणजे परमेश्वर ना अभिषिक्त भेटी जायेल शे.” अंद्रिया नि शिमोन ले येशु जोळे लयना, येशु नि तेनावर नजर ठीसन सांगणा, “तू योहान ना पोऱ्या शिमोन शे, तू केफा म्हणजे पेत्र सांगामा ईन.” दुसरा दिन येशु गालील जिल्हा मा जावाना निर्णय करना आणि फिलिप्प ले भेटीसन सांगणा, “मना मांगे चालू लाग.” फिलिप्प त अंद्रिया आणि पेत्र ना बेथसैदा नगर ना रहिवासी होता. फिलिप्प नि नतनयल ले भेटीसन तेले सांगणा, “आमले तो माणुस भेटी जायेल शे, जेना बारामा मा मोशे ना नियम मा आणि भविष्यवक्तास्नी लिखेल शे. तो नासरेथ नगर ना योसेफ ना पोऱ्या येशु शे.” नतनयल नि तेले विचार, “काय कोणती चांगली वस्तू बी नासरेथ नगर मधून निघू सकस?” फिलिप्प नि तेले सांग, “चालीसन देखीले.” येशु नि नतनयल ले आपला कळे येतांना देखीसन तेना विषय मा सांग, “देखा, हवू इस्त्राएल देश ना ईमानदार माणुस शे, एनामा कोणताच कपट नई शे.” नतनयल नि तेले विचार, “तू मले कसा ओयखस?” येशु नि तेले उत्तर दिधा, “एनातून पयले कि फिलिप्प नि तुले बलाव, जव तू अंजिर ना झाळ खाले होता, तव मी तुले देखेल होता.” नतनयल नि तेले उत्तर दिधा, “हे गुरु, तू परमेश्वर ना पोऱ्या शे, तू इस्त्राएल देश ना राजा शे.” येशु नि तेले उत्तर दिधा, “मनी जे तुले सांग, कि मी तुले अंजिर ना झाळ खाले देखेल होतु, काय तू एनासाठे विश्वास करस. तू एनातून मोठा मोठा काम देखशिन.” मंग तेले सांगणा, “मी तुमले खरोखर सांगस कि तुमी स्वर्ग ले उघळेल, आणि परमेश्वर ना दूतस्ले वरे जातांना आणि मी माणुस ना पोऱ्या ना वरे उतरतांना देखशात.” दोन दिन नंतर गालील जिल्हा ना काना नगर मा कोनतरी लग्न होत, आणि येशु नि माय बी तठे होती. येशु आणि तेना शिष्य बी त्या लग्न मा आमंत्रित होतात. जव पाउनास्नी सर्वा द्राक्षरस पी लीनात, त येशु नि माय नि तेले सांग, “तेस्ना कळे द्राक्षरस नई ऱ्हायना.” येशु नि तेले सांग, “ओ बाई तुमी मले काब सांगी ऱ्हायनी कि मले काय करन शे? आते मना टाईम एयेल नई शे.” पण तेनी माय नि शिष्यस्ले सांग, “जे काही तो तुमले सांगीन तेच तुमी करज्यात.” तठे यहुदी लोकस्ना धार्मिक नियमस्ना नुसार हात धोवाना साठे सहा मटका ठीयेल होतात, प्रत्येक मटकास्मा जवळपास शंभर लिटर म्हावत होत. येशु नि त्या दासस्ले सांग, “मटकास मा पाणी भरी द्या.” त तेस्नी तेस्ले तोंडा तोंड भरी टाक. तव येशु नि तेस्ले सांग, “आते पाणी काळीसन जेवण ना आयोजक कळे लीजावा.” दासस्नि तसाच करणात जसा तेनी तेस्ले कराले सांगणा. जव जेवण ना आयोजकनी ते पाणी चाख, जे द्राक्षरस बनी जायेल होत आणि नई माहित होत कि ते कोठून उना, पण ज्या सेवक नि पाणी काळेल होत तेस्ले माहित होत, त जेवण ना आयोजक नि नवरदेव ले बलाईसन तेले विचार. “आमंत्रण देणारा प्रत्येक माणुस पयले गैरा चांगला द्राक्षरस देस, आणि जव सर्वा लोक मन भरीसन पी लेतस, तर साधारण द्राक्षरस देस, पण तुनी गैरा चांगला द्राक्षरस आजून पर्यंत ठीयेल शे.” येशु नि गालील जिल्हा ना काना नगर मा आपला हवू पयला चिन्ह दाखाडीसन आपली महिमा प्रकट करना, आणि तेना शिष्यस्नी तेनावर विश्वास करणात. एना नंतर तो आणि तेनी माय, आणि तेना भाऊ, आणि तेना शिष्य, कफर्णहूम नगर मा ग्यात आणि तठे कईक दिन ऱ्हायनात. जव यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन ना टाईम जोळे होता, त येशु आपला शिष्यस्ना संगे यरूशलेम शहर मा ग्या. आणि तेनी परमेश्वर ना मंदिर मा बईल, आणि मेंढ्या आणि कबुतरस्ले विकणारास्ले, आणि पैसा बदल नारा व्यापारीस्ले बठेल देखना. तव तेनी आवत्या ना कोडा बनाईसन, सर्वा मेंढ्या व बैलस्ले परमेश्वर ना मंदिर मधून काळी टाका, आणि सराफास्ना पैसा फेकी टाक, आणि चौरंग पल्टी दिना, तेनी कबुतर विकणारास्ले सांग, “एस्ले आठून लीजावा. मना बाप ना घर ले व्यापारी ना घर नका बनावा.” तव तेना शिष्यले आठवण उन, कि दाविद नि ह्या वचनस्ले परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल होता, “तुना घर नि भक्ती मना मधमा आग ना सारखी बयस.” ह्या घटना वर यहुदी पुढारीस्नी तेले विचार, “तू आमले कोणता आश्चर्यपूर्ण चिन्ह दाखाळू सकस, जेना कण आमी हय जानी सकुत कि तुले असा कराना अधिकार शे?” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “या मंदिर ले नाश करी द्या, मी तेले तीन दिन मा परत बनावी टाकसु.” यहुदी पुढारीस्नी सांग, “या परमेश्वर ना मंदिर ले बनावा साठे सेहचाळिस वर्ष लागेल शे, तू काय तले तीन दिन मा बनावी टाकशी?” पण येशु ज्या मंदिर ना विषय मा तेस्नाशी बोलत होता, ते तेना शरीर होता. जव तो परत मरेल मधून जित्ता हुयना, त तेना शिष्यस्ले आठवण उना कि तेनी हई सांगेल होत, त तेस्नी परमेश्वर ना पुस्तक जो येशु ख्रिस्त ना परत जित्ता होवाना बारामा सांगस, विश्वास करणात. जव तो वल्हांडण ना सन ना टाईम ले यरूशलेम शहर मा होता, त गैरास्नी त्या चिन्हस्ले जे तो करत होता देखीसन तेनावर विश्वास करणात. पण येशु ले तेस्ना वर विश्वास नई होता कारण कि तो माणुस ना स्वभाव ले ओयखत होता. आणि तेले गरज नई होती कि माणुस ना विषय मा तेले कोणी सांगोत कारण कि तेले स्वता ले माहित होत कि माणुस ना मन मा काय शे. परूशी लोकस मधून निकुदेमूस नाव ना एक माणुस होता, जो यहुदी लोकस्ना धार्मिक पुढारी होता. एक रात तेनी येशु जोळे ईसन तेले सांगणा, “ओ गुरु, आमले माहित शे, कि परमेश्वर नि तुले आमले शिकाळा साठे धाळेल शे, कारण कि कोणी चिन्हस्ले व चमत्कारस्ले जे तू दाखाळस, जर परमेश्वर तेना संगे नई ऱ्हावो तर नई दाखाळू सकस.” येशु नि तेले उत्तर दिध, “मी तुले खरोखर सांगस, जर कोणी नवीन जन्म नई लेणार त परमेश्वर ना राज्य नई देखाव.” निकुदेमूस नि तेले विचार, “एक माथारा माणुस कसा परत जन्म लेवू सकस? निश्चित रूप मा दुसरा सावा जन्म लेवाना साठे आपली माय ना गर्भ मा परत नई जावू सकत.” येशु नि उत्तर दिधा, “मी तुले खरोखर सांगस, जठलोंग कोणी माणुस पाणी व आत्मा तून जन्म नई लेत तर तो परमेश्वर ना राज्य मा प्रवेश नई करू सकस. एक मनुष्य शारीरिक रूप मा माय-बाप कळून जन्म लेस पण आत्मिक रूप शी तो आत्मा कण जन्म लेस. आश्चर्य नको करू, कि मनी तुले सांग, कि तुले नवीन जन्म लेन अवश्य शे. हवाले जथी आवडस तथी चालस, तू तेना शब्द आयकस पण तुले माहित नई कि ती कथाईन येस आणि आखो कथी जास. जो कोणी पवित्र आत्मा तून जन्म लीएल शे, तो असाच शे.” निकुदेमूस नि तेले विचार, “या गोष्टी कसकाय होवू सकतस?” हायी आयकीसन येशु नि तेले उत्तर दिधा, “तू इस्त्राएल देश मा एक महान गुरु शे. तुले खरज ह्या गोष्टीस्ले समजा ले पायजे.” मी तुले खरोखर सांगस, कि आमले माहित शे, ते सांगतस, कारण कि आमी स्वता तेले देखेल शे आणि तेनी साक्ष बी देतस, पण आमी जे सांगतस तुमी तेनावर विश्वास नई करतस. जव मनी तुमले पृथ्वी वर हुईणारी गोष्टी सांगणा, तव तुमी मना विश्वास नई करणात. जर कदी मी तुमले स्वर्ग मा हुईणारी गोष्टी सांगसू, त मंग कसकाय विश्वास करश्यात? कोणी स्वर्ग मा नई ग्या, फक्त माणुस ना पोऱ्या, जो स्वर्ग मधून खाले पृथ्वी वर एयेल शे. आणि ज्या प्रमाणे मोशे नि उजाळ जागा मा पित्तय ना सापले उंचावर चडावना, त्याच प्रमाणे अवश्य शे कि, माणुस ना पोऱ्या ले बी उंचावर चळावामा येवो, कारण कि जो कोणी मनावर विश्वास करीन, तेना नाश नई होवाव पण तेले कायम ना जीवन भेटीन. कारण परमेश्वर नि जग ना लोकस्वर एवळा प्रेम करना कि तेनी आपला एकुलता पोऱ्या दि टाकना, कि जो कोणी तेनावर विश्वास करीन, तेना नाश नई होवाव, पण कायम ना जीवन भेटीन. कारण परमेश्वर नि आपला पोऱ्या ले जग मा एनासाठे नई धाळना, कि जग ना लोकस्वर दंडणी आज्ञा दिन, पण एनासाठे कि जग ना लोक तेना द्वारे वाची जावोत. जो परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास करस, तेनावर दंड नि आज्ञा नई होस, पण जो तेनावर विश्वास नई करस, तो दोषी ठहरायेल शे, कारण कि तेनी परमेश्वर ना एकुलता पोऱ्या ना नाव वर विश्वास नई ठेव. आणि दंडणी आज्ञा ना कारण हई शे कि उजाया जग मा एयेल शे, आणि लोकस्नी अंधकार ले उजाया पेक्षा जास्त प्रिय समजनत कारण तेस्ना काम वाईट होतात कारण जो कोणी वाईट करस, तो उजायशी द्वेष ठेवस, आणि उजाया ना जोळे नई येत कारण कि त्या नई इच्छितस कि तेस्ना वाईट कामस्ले दाखाळा मा येवो. पण जो खरापण मा चालस, तो उजाया ना जोळे येस, कारण तेना काम प्रकट हो कि तो परमेश्वर नि आज्ञा ना पालन करस. एना नंतर येशु आणि तेना शिष्य यहूदीया प्रांत मा उनात, तो तठे तेस्ना संगे ऱ्हायसन बाप्तिस्मा देत ऱ्हायना. तठे योहान ना शिष्यस्ना कोणी यहुदी माणुस ना संगे हात धोवाना रिती-रिवाज ना विषय मा वाद विवाद हुयना. योहान बाप्तिस्मा देणारा ना शिष्य योहान ना जोळे ईसन तेले सांगणात, “हे गुरु, जो व्यक्ती यार्देन नदी ना पूर्व बाजुमा तुना संगे होता, आणि जेना बारामा तुनी आमले सांग कि तो कोण होता, देख तो बाप्तिस्मा दीरायना, आणि सर्वा लोक तेना कळे ईऱ्हायनात.” योहान नि उत्तर दिधा, “जठलोंग माणुस ले स्वर्ग कळून नई भेटस, तठलोंग तो काही लेवू नई सकस.” तुमी स्वता मले सांगतांना आयक, कि मनी सांग, मी ख्रिस्त नई, पण तेना पयले धाळेल शे. नवरा नवरी संगे लगन करी लेस, पण नवरा ना मित्र उभा हुईसन तेले आयकस, आणि तो नवरदेव ना शब्द शी गैरा खुश होस, त्याच प्रकारे मना मन आनंद शी भरी जायेल शे. अवश्य शे कि तेनी वृर्द्धी होवो आणि मी कमी होवू. पण जेस्नी तेनी साक्ष स्वीकार करीलीधी, तेनी या गोष्टी वर छाप दि टाक कि परमेश्वर खरा शे. कारण कि जेले परमेश्वर नि धाळेल शे तो परमेश्वर नि गोष्टी सांगस. कारण कि तो पवित्र आत्मा पूर्णपणे देस. परमेश्वर बाप ना पोऱ्या वर प्रेम ठेवस. तेनी सर्वा वस्तू तेना हात मा सोपेल शे. जो परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास करस, कायम ना जीवन तेना शे. पण जो पोऱ्या ना नई आयकत, तो कायम ना जीवन ना अनुभव नई कराव. पण परमेश्वर ना दंड तेनावर ऱ्हायीन.” मंग जव येशु ले माहित होयन कि परूशी लोकस्नी आयकेल शे कि येशु योहान बाप्तिस्मा देणारा पेक्षा जास्त शिष्य बनावस आणि तेस्ले बाप्तिस्मा देस. तरी येशु स्वता नयी पण तेना शिष्य बाप्तिस्मा देत होता, तव येशु यहूदीया प्रांत ले सोळीसन आपला शिष्यस संगे गालील जिल्हा मा परत चालना गया, तेले शोमरोन प्रांत कळून जावाना अवश्य होत. तो शोमरोन प्रांत मा स्थित सुखार शहर मा उना, जे त्या जमीन ना जोळे शे जेले याकोब नि आपला पोऱ्या योसेफ ले दियेल होता. याकोब नि जी हेर खोदेल होता ती हेर आते बी तठेच होती. हवू दुफार ना टाईम होता आणि येशु चालता-चालता थकि जायेल होता एनासाठे तो ती हेर जोळे बठी ग्या. इतला मा शोमरोन प्रांत नि एक बाई पाणी भराले उणी. येशु नि तिले सांग, “मले पाणी पाज.” त्या टाईम ले येशु ना शिष्य नगर मा जेवण विकत लेवा साठे जायेल होतात. ती शोमरोनी बाई नि तेले सांग, “तू यहुदी शे, आणि मी एक शोमरोनी बाई शे. तुमी मना कळून पाणी काब मांगी ऱ्हायनत?” येशु नि उत्तर दिधा, “तुले माहित नई कि परमेश्वर तुले काय देवानी ईच्छा करस आणि नईत हई माहित शे कि जो तुना कळून पाणी मांगस तो कोण शे, जर तुले माहित ऱ्हात, तर तू मना कळून मांगती आणि मी तुले ते पाणी देतु जे जीवन देस.” तिनी येशु ले सांग, “हे गुरुजी, तुना कळे पाणी भरा साठे तर काही बी नई शे आणि हेर गैरा खोल शे. त मंग ते जीवन ना पाणी तुना कडे कथाईन उना. काय तो आमना पूर्वज याकोब तून मोठा शे, जेनी हय हेर आमले दियेल शे तो आणि तेनी पोर आणि तेना ढोर संगे तेना मधून पिनत?” येशु नि तिले उत्तर दिधा, “जो कोणी हय पाणी पिन तेले परत तहान लागीन, पण जो कोणी त्या पाणी मधून पिन जे मी तेले देसू मंग तेले कायम लोंग तहान लागाव नई. पण जे पाणी जेले मी दिसू तो तेनामा एक झरा बनी जाईन जो तेस्ले जीवन देणारा पाणी दिन आणि तेस्ले कायम ना जीवन दिन.” बाई नि तेले सांग, “हे प्रभु, ते पाणी मले दे कि मी तहानेल नई होवू आणि नईत इतला दूर पाणी भराले येवू,” येशु नि तिले सांग, “जा, आपला नावराले बलायी लय.” बाईंनी उत्तर दिधा, “मी बिगर नवरानी शे.” येशु नि तले सांग, “तू खर सांगस, कि मी बिगर नवरानी शे. कारण कि तू पयलेच पाच नवरास संगे ऱ्हायी लीयेल शे, आणि तो माणुस जेना संगे तू आते शे तो बी तुना नवरा नई, हई तू खर सांगेल शे.” बाई नि तेले सांग, “हे प्रभु, मले वाटस कि तू भविष्यवक्ता शे. आमना शोमरोन पूर्वज याच डोंगर वर परमेश्वर नि उपासना करणात, आणि तुमी यहुदी लोक सांगतस कि ती जागा जठे उपासना कराले पायजे ती यरूशलेम शहर मा शे.” येशु नि तेस्ले सांग, “हे बाई, मना गोष्ट नि विश्वास कर कि तो टाईम येस कि तुमी नईत या डोंगर वर परमेश्वर बाप नि उपासना करशात, नईत यरूशलेम शहर मा. तुमी शोमरोन लोक जेले नई ओळखत तेनी उपासना करतस आणि आमी जेले नई ओयखतस, तेनी उपासना करतस, आणि आमी यहुदी लोक जेले ओयखतस, तेनी उपासना करतस, कारण तारण यहुदी लोकस्ना मधून शे. पण तो टाईम येस, आणि आते बी शे, जेनामा खरा भक्त परमेश्वर बाप नि उपासना आत्मा आणि खरेपण कण करीन, कारण बाप आपला असाच उपासना करणारस्ले झामलस. परमेश्वर आत्मा शे, एनासाठे अवश्य शे कि तेनी उपासना करणारा आत्मा आणि खरेपणातून उपासना करा.” बाई नि तेले सांग, “मले माहित शे कि मसिह जेले ख्रिस्त म्हणतस, येणारा शे, जव तो ईन, तव सर्वा गोष्टी आमले सांगी दिन.” येशु नि तिले सांग, “मी जे तुले सांगस, तोच शे.” इतला मा तेना शिष्य इग्यात, आणि आश्चर्य करू लागणत कि तो बाई शी बोली ऱ्हायंना, तरी बी कोणी नई विचारन, “कि तुनी काय ईच्छा” व “कसा साठे तीना बरोबर बोलस?” तव बाई आपला घडा सोळीसन नगर मा चालनी गई, आणि लोकस्ले सांगू लागणी, “या, एक माणुस ले देखा, जेनी गैर काही जे मी करेल होती सांगी दिधा. कदाचित हवू त ख्रिस्त नई शे.” तव नगर मधून गैरा लोक निघीसन येशु ले देखाले येवू लागणत. इतला मा तेना शिष्य येशु ले हई विनंती करू लागणत, “हे गुरु, काही खाईल्या.” पण तेनी तेस्ले सांग, “मना कळे खावाले असा जेवण शे जे तुमले माहित नई शे.” तव शिष्यस्नी आपस मा सांगनत, “काय कोणी आखो तेना साठे खावाले आनेल शे.?” येशु नि तेस्ले सांग, “मना जेवण त्या परमेश्वर नि ईच्छा नि पायन करन शे जेनी मले धाळेल शे. आणि त्या काम ले पूर्ण करान शे जे मले सोपेल शे. काय तुमी नई सांगतस कि, कापणी करासाठे आजून चार मयना पळेल शे? मी तुमले सांगस, आपला डोया उघाडीसन येणारा लोकस्ले देखा, कि त्या एक वावर सारखा शे ज्या कापणी साठे तयार शे. कापणारा मजुरी ली ऱ्हायनात. आणि कायम ना जीवन साठे फय एकत्र करी ऱ्हायना. कि पेरणारा आणि कापणारा दोनी एकत्र हुईसन आनंद करोत. कारण कि येनावर हई गोष्ट चांगली बठस, पेरणारा कोणी दुसरा शे आणि कापणारा कोणी दुसरा. मनी तुमले ते वावर कापाले धाळनु जेनावर तुमी काम नई करणत दुसरास्नी काम कर आणि तुमी त्या पिक ले एकत्र करशात जेस्ना साठे तेस्नी काम करेल शे.” त्या नगर मधना गैरा शोमरोनी लोक त्या बाई ना सांगा वरून येशु वर विश्वास करणात, जेनी हई सांगेल शे, कि तेनी सगळ काही जे मनी करेल शे, मले सांगी टाक. तव शोमरोनी लोक तेना जोळे उनात, त तेले विनंती करू लागनात कि आमना आठे ऱ्हाय. एनासाठे तो तठे दोन दिन लोंग ऱ्हायना. येशु ना संदेश ले आयकीसन आजून बी गैरास्नी तेनावर विश्वास करणात. तेस्नी त्या बाई ले सांगणात, “आते आमी तुमना सांगावर विश्वास नई करतस. कारण कि आमी स्वताच आयकेल शे, आणि समजी ग्यात कि हवूच खरोखर जग ना लोकस्ले वाचाळनारा शे, ख्रिस्त शे.” मंग तो त्या दोन दिन नंतर तो तठून निघीसन गालील जिल्हा मा ग्या. कारण येशु नि स्वता साक्ष दियेल होता, कि भविष्यवक्ता ले आपला देश मा आदर नई भेटस. जव तो गालील जिल्हा मा उना, त गालील जिल्हा ना लोक आनंद मा तले भेटनत. कारण जीतला काम तेनी यरूशलेम शहर मा वाल्हांडण ना सन ना टाईम ले करेल होता तेस्नी ते सगळ देखेल होत, कारण त्या बी सन मा जायेल होता. तव आखो तो गालील जिल्हा ना काना नगर मा उना, जठे तेनी पाणी ले द्राक्षरस बनायेल होता. तठे राजा ना एक कर्मचारी होता जेना पोऱ्या कफर्णहूम नगर मा आजारी होता. तो हई आयकीसन कि येशु यहूदीया प्रांत मधून गालील जिल्हा मा इजाएल शे, तेना कळे गया, आणि तेले विनंती करू लागणा कि चालीसन मना पोऱ्या ले बरा करी दे, कारण तो मरणार होता. येशु नि तेले सांग, “जठलोंग तुमी चिन्ह आणि चमत्कार नई देखतस तठलोंग कदीच मनावर ख्रिस्त ना रूप मा विश्वास नई कराव.” राजा ना कर्मचारीनी तेले सांग, “हे प्रभु, मना पोऱ्या ले मराणा पयले चाल.” येशु नि तेले सांग, “जा, तुना पोऱ्या जित्ता शे.” त्या माणुस नि येशु नि सांगेल गोष्टी वर विश्वास करना आणि चालना ग्या. तो रस्ता वर चालत होता, कि तेना दास ईसन भेटनात आणि सांगू लागणत, “तुना पोऱ्या जित्ता शे.” तेनी तेस्ले विचार, “कोणता टाईम ले तो चांगला होवू लागणा?” तेस्नी तेस्ले सांग, “कालदिन दुफार ना एक वाजता तेना ज्वर उतरी ग्या.” तव बाप ले माहित पडण कि हई त्याच टाईम ले होयन ज्या टाईम ले येशु नि तेले सांग, “तुना पोऱ्या जित्ता शे.” आणि तो आणि तेना पूर्ण घरणानी येशु वर विश्वास करणात. हई दुसरा चमत्कारी चिन्ह होत जे येशु नि यहूदीया प्रांत तून गालील जिल्हा मा परत ईसन दाखाळणा. या गोष्टी नंतर येशु यहुदी लोकस्ना सन ना टाईम ले यरूशलेम शहर मा ग्या. यरूशलेम शहर मा, मेंढ्या दरवाजा जोळे एक कुंडा होता, जेले इब्री भाषा मा बेथसैदा सांगामा येस, आणि हई पाच छत वाला ओसारा शी घेरायेल होता. एनामा गैरा आजारी, आंधळा, लंगडा आणि लखवा ना आजारी पाणी हलावामा येवो या आशा मा पडेल ऱ्हात होतात. कारण नेमेल टाईम वर प्रभु ना दूत कुंडा मा उतरीसन पाणी ले हालावत होतात. पाणी हलावा नंतर जो कोणी बी कुंडा मा पयले उतरस, तो चांगला हुई जात होता. जरी तेना कोणता का आजार ना राहो. तठे एक माणुस होता, जो अडोतीस साल पासून आजार मा पडेल होता. येशु नि तेले पडेल देखीसन आणि समजीसन कि तो गैरा दिन पासून ह्या दशा पडेल शे, तेले विचार, “काय तुले बर होयन शे?” त्या आजारी नि तेले उत्तर दिधा, “हे प्रभु, मना कळे कोणी माणुस नई, कि जव पाणी हलवामा येस, त मले कुंडा मा उतारा साठे मदत करोत, मी कुंडा मा प्रवेश कराना प्रयत्न करस, पण कोणी दुसरा नेहमी पयलेच प्रवेश करी लेस.” येशु नि तेले सांग, “उठ, आणि आपली खाट उचल आणि चाल फिर.” तो व्यक्ती फटकामा चांगला हुईग्या, आणि आपली खाट उचलीसन चालाले व फिराले लागणा. ज्या दिन हई हुईन तो वल्हांडणा दिन होता. एनासाठे यहुदी पुढारी तेले जो बरा हुयेल होता, सांगू लागनात, “मोशे ना नियम ना नुसार आज आराम ना दिन तुले आपली खाट उचलान योग्य नई शे.” तेनी तेस्ले उत्तर दिधा, “जेनी मले चांगला करना, तेनीच मले सांग आपली खाट उचलीसन चाल फिर.” तेस्नी तेले विचार, “तो कोण माणुस शे, जेनी तुले सांग, खाट उचल आणि चाल फिर?” पण तो चांगला हुई जायेल होता, तेले माहित नई होत कि तो कोण शे, कारण त्या ठिकाणी गैरी गर्दी होवा मुळे येशु तठून बाजू मा हुई जायेल होता. या गोष्टी नंतर तो येशु ले परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा भेटणा, तव तेनी तेले सांग, “देख, तू त चांगला हुईग्या, परत पाप नको करजो, अस नको होवाले पायजे कि येनातून कोणतीही मोठी विप्पती तुनावर इजाईन.” या माणुस नि जायसन यहुदी पुढारीस्ले सांगी टाक, कि जेनी मले बर कर, तो येशु शे. या कारण यहुदी पुढारी येशु ले त्रास देवू लागनात, कारण कि तो असा असा काम आराम ना दिन करत होता. पण येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “परमेश्वर मना बाप कायम काम करस आणि मले बी काम कराले पायजे.” कारण कि येशु हई शब्द सांग, या मुळे यहुदी पुढारी आजून बी जास्त तेले घात करना प्रयत्न करू लागनात, कि तो नई फक्त आराम ना दिन विधी मोळस पण परमेश्वर ले आपला बाप सांगीसन आपला स्वता ले परमेश्वर ना बराबरी ले ठरावस. एनावर येशु नि तेस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, मी स्वता कळून काही करू सकत नई, फक्त तो जो परमेश्वर बाप ले करतांना देखस, कारण ज्या ज्या काम ले तो करस, तेस्ले मी बी त्याच रितीवर करस.” कारण कि परमेश्वर बाप मनावर प्रेम करस, आणि जे काम तो स्वता करस, ते सगळ मले दाखाडस, आणि तो एनातून बी मोठा काम मले दाखाडीन, कारण तुमी आश्चर्य करशात. कारण जसा परमेश्वर बाप मरेल लोकस्ले परत जित्ता करस, तसाच मी बी जेले पटीन तेले जित्ता करस. मी तुमले खरोखर सांगस, जो मना वचन आयकीसन मले धाळणारावर विश्वास करस, कायम ना जीवन तेनाच शे, आणि तेले दंड नई देवायनार, पण त्या कायम मृत्यु तून वाची जायेल शे, आणि पयले पासून नवीन जीवन मा प्रवेश करी लीयेल शे. मी तुमले खरोखर सांगस, “तो टाईम येस, आणि आते शे, जेनामा मृतक परमेश्वर ना पोऱ्या म्हणजे मना शब्द आयकतीन, आणि ज्या आयकतीन त्या कायम ना साठे जित्ता ऱ्हातीन.” कारण ज्या रीतीतून परमेश्वर बाप स्वता ले जीवन ठेवस, त्याच रितीकन तेनी मले बी हई अधिकार दियेल शे, कि स्वता मा जीवन ठेवोत. आणि कारण मी माणुस ना पोऱ्या शे, परमेश्वर बाप नि मले सर्वा लोकस्ना न्याय कराना अधिकार दियेल शे. एनावर आश्चर्य नका करा, कारण तो टाईम येस, कि त्या सर्वा लोक ज्या मरेल शेतस, मना शब्द आयकीसन जित्ता हुईसन उभा ऱ्हातीन. जितलास पान चांगला जीवन होत, त्या कायम ना जीवन लेवा साठे परत जित्ता होतीन, आणि त्या वाईट मा जीवन जगतस, त्या दोषी ठरावासाठे जित्ता होतीन. मी स्वता कळून काही नई करू सकत, मी लोकस्ना न्याय असाच करस, जसा बाप मले तेस्ना न्याय कराले सांगस, आणि मना न्याय खरा शे, कारण मी मनी ईच्छा कण नई, पण मले धाळनार नि ईच्छा प्रमाणे कराना देखस. जर मी स्वता मनी साक्षी देवू, त मनी साक्ष स्वीकार योग्य नई शे. एक आजून शे जो मना बाप शे, तो बी मना विषय मा साक्ष देस, आणि मले माहित शे कि मनी साक्ष जो देस, तो खरा शे. तुमी योहान बाप्तिस्मा देणारा कळे संदेश लिजायनारा ले धाळ, आणि तेनी खरापणा मा साक्ष दिना. पण मी आपला विषय मा माणुस नि साक्ष नई पायजे, तरी बी मी तुमले त्या साक्ष ना बारामा सांगेल शे, जी योहान नि दियेल होती, कारण तुमी वाची जावोत. योहान एक चेटणारा आणि चमकणारा दिवा ना सारखा होता, आणि तुमले कईक टाईम लोंग तेना उजाया मा, मग्न होवाना चांगल लागण. पण मना कळे योहान बाप्तिस्मा देणारा नि मी साक्ष पेक्षा उत्तम साक्ष शे. जे काम ज्या बाप नि मले पूर्ण कराले दियेल शे, तोच मना बारामा साक्ष देस. जे काम मी करस, ते साक्षी देस कि बाप नि मले धाळेल शे. आणि बाप जेनी मले धाळेल शे, तेनीच मनी साक्षी दियेल शे, तुमी नईत तेना आवाज आयकेल शेतस, आणि नईत तेले आमने-सामने देखेल शेतस. आणि तेनी शिक्षा ले मन मा स्थिर नई ठेवतस, कारण तुमी मनावर विश्वास नई करतस, जेले धाळामा एयेल शे. तुमी परमेश्वर ना पुस्तक ना अभ्यास करतस, कारण समजतस कि तेनामा तुमले कायम ना जीवन भेटस, आणि ते हई शे, जे मनी साक्ष देस. तरी बी तुमी कायम ना जीवन लेवा साठे मना कळे येवान नई देखतस. मले लोकस कळून प्रशंश्या नई पायजे. पण मी तुमले ओयखस, कि तुमी आपला मन शी परमेश्वर ले प्रेम नई करतस. मी आपला बाप ना अधिकार ना संगे एयेल शे, आणि तुमी मले स्वीकार नई करतस, जर कोणी दुसरा आपलाच अधिकार शी ईन, त तेले स्वीकार करी लीशान. तुमी मनावर विश्वास नई करू सकतस, कारण तुमी एक दुसरा कळून प्रशंश्या देखतस, आणि तुमी एकमात्र परमेश्वर कळून प्रशंश्या लेवाना प्रयत्न नई करतस. हई नका समजा कि मी बाप ना समोर तुमना वर दोष लावसू. मोशे जेनावर तुमी आपली आशा ठीयेल शेतस तुम्हना वर आरोप लावीन. जर तुमी मोशे वर विश्वास करतस, त मनावर बी विश्वास करतस, कारण कि तेनी मना विषय मा लिखेल शे. पण तुमी तेना लिखेल नियम वरच विश्वास नई करतस, त जे मी सांगस, तुमी निश्चित रूप मा एनावर विश्वास नई कराव. या गोष्टी नंतर येशु गालील ना समुद्र पार ग्या, जेले तिबिर्या समुद्र या नाव कण बी ओयखतस. आणि एक मोठी गर्दी तेना मांगे येवू लागणी, कारण ज्या सामर्थ्य ना काम तो आजारीस वर करत होता, त्या तेस्ले देखत होतात. तव येशु डोंगर वर चळीसन आपला शिष्यस्ना संगे तठे बठना. आणि यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन जोळे होता. तव येशु नि आपली नजर उचलीसन एक मोठी गर्दी आपला कळे येतांना देख, आणि फिलिप्पस्ले सांग, “कि आमी एस्ना जेवण ना साठे कळून भाकरी विकत लयूत.” पण हई गोष्टी तेनी तेले पारखा साठे सांग, कारण स्वताला ले माहित होत कि तो काय करीन. फिलिप्प नि तेले उत्तर दिधा, “दोन शे दिनस्नी मजुरी न किंमत (दोन शे चांदी ना शिक्का) नि भाकर बी तेस्ले पुराव नई तेस्ना मधून प्रतेक ले थोडी-थोडी भेटी जाईन.” तेना शिष्य मधून शिमोन पेत्र ना भाऊ अंद्रिया नि सांग, “आठे एक पोऱ्या शे, जेना कळे पाच भाकरी आणि दोन मासा शे, पण इतला लोकस साठे ते काय शे.” येशु नि सांग, “लोकस्ले बठाळी द्या.” त्या जागा वर गैरा गवत होता तव लोक जेस्ना मा लोकस्नी गीनती जवळपास पाच हजार नि होती, बठी ग्यात. तव येशु नि भाकरी लीधा, आणि धन्यवाद करीसन तोळना आणि शिष्यस्ले दिधा आणि शिष्यस्नी बठनारा लोकस्ले वाटी दिधी, तसाच मासा वाटी टाक. जव त्या खाईसन तृप्त हुई ग्यात, तव तेनी आपला शिष्यस्ले सांग, “वाचेल तुकळा आवरी ल्या, कि काही फेकामा नई येवो.” एनासाठे तेस्नी आवर आणि पाच भाकरीना टुकटा जे खाणारा तून वाचेल होतात, तेस्ना बारा डालका भरी ग्यात. जे सामर्थ्य ना काम येशु नि करी दाखाड, तेले त्या लोक देखीसन सांगू लागनात, कि “तो भविष्यवक्ता जो जग मा येणार होता तो निश्चित हवू शे.” येशु हई समजीसन कि त्या तेले राजा बनावा साठे ईसन धराना विचार करतस, मंग डोंगर वर एखटा चालना ग्या. मंग संज्याकाय होयनी, त तेना शिष्य समुद्र ना किनारा वर ग्यात, आणि नाव वर चळीसन समुद्र ना पार कफर्णहूम नगर मा जावू लागणत. त्या टाईम ले अंधार हुई जायेल होता, आणि येशु आठ लोंग तेस्ना जोळे नई एयेल होता. आणि आंधी मुळे समुद्र मा लाठा उठू लागनात. जव त्या धीरे बागे पाच-सहा किलोमीटर ना जवळपास निघीग्यात, त तेस्नी येशु ले समुद्र वर चालता आणि नाव ना जोळे येतांना देख, आणि भ्याय ग्यात. पण तेनी तेस्ले सांग, “मी येशु शे, घाबरू नका.” तव त्या तेले नाव वर चढावले तयार होयनात, आणि फटकामा ती नाव त्या जागा वर जाय भिळनी जठे त्या जात होतात. दुसरा दिन त्या गर्दी नि जी समुद्र ना दुसरा तठ वर ऱ्हाय जायेल होती, हई देखनत, कि आठे एक नाव ले सोळीसन आजून धाकली नाव नई होती, तेस्ले हय मालूम होत कि येशु आपला शिष्यस ना संगे त्या नाव वर नई चळना, पण फक्त तेना शिष्य चालना जायेल होतात. तरी बी धाकला नाव तीबीरियास समुद्र तून त्या जागा ना जोळे उनात, जठे तेस्नी प्रभु ना धन्यवाद करा नंतर जेवण करेल होतात. जव गर्दिनी देखा, कि आठे येशु नई शे, आणि नई तेना शिष्य, त त्या बी धाकला-धाकला नाव वर चठीसन येशु ले झामलत कफर्णहूम नगर मा ग्यात. आणि समुद्र ना पार तेले भेटीसन सांगनत, “हे गुरु, तू आठे कव उना?” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “मी तुमले खरोखर सांगस, तुमी मले एनासाठे नई झामलतस कि तुमी सामर्थ्य ना काम देखाले, पण एनासाठे कि तुमी भाकरी खायसन तृप्त हुईनत. नाश होणारा जेवण साठे मेहनत नका करा, पण त्या जेवण साठे जे कायम ना जीवन लोंग ऱ्हास, जे माणुस ना पोऱ्या तुमले दिन, कारण कि परमेश्वर बाप नि मले असा कराना अधिकार दियेल शे.” तेस्नी तेले सांग, “परमेश्वर आमना कळून काय ईच्छा करस कि आमी तेले करूत?” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “परमेश्वर नि हई ईच्छा शे कि तुमी तेनावर विश्वास करा जेले तेनी धाळेल शे.” तव तेस्नी तेले सांग, “मंग तू कोणता चिन्ह दाखाळसीन कि आमी तेले देखीसन तुनावर विश्वास करूत? तू काय करणारा शे? आमना पूर्वजस्नी उजाळ जागा मा मन्ना खायनात, जस परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, परमेश्वर नि तेस्ले खावाले स्वर्ग मधून भाकर दिधी.” येशु नि तेले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, कि मोशे नि तुमले ती भाकर स्वर्ग मधून नई दिधी, पण परमेश्वर मना बाप तुमले खरी भाकर स्वर्ग मधून देस.” कारण कि खरी भाकर जी परमेश्वर देस तीच शे, जी स्वर्ग तून उतरीसन जग ले जीवन देस. तव तेस्नी तेले सांग, “हे प्रभु, हई भाकर आमले कायम देत जाय.” येशु नि तेस्ले सांग, “ती भाकर जी कायम ना जीवन देस मीच शे, जो मना कळे ईन तो कदीच भुक्या नई होवाव आणि जो कोणी मनावर विश्वास करीन, तेले कदीच तहान नई लागाव. पण मी तुमले पयलेच सांगेल होता, कि तुमनी देखी बी लीयेल शे, तरी बी विश्वास नई करतस. जे काही बाप मले देस ते सगळ मना कळे ईन, आणि जो कोणी मना कळे ईन मी कदी बी तेना तिरस्कार नई कराव. कारण मी आपली ईच्छा नई, पण मले धाळनारा नि ईच्छा पूर्ण कराले स्वर्ग तून उतरेल शे. आणि मले धाळनार नि ईच्छा हई शे कि जे काय तेनी मले दियेल शे, तेना मधून एक ले बी नाश नई होवू देवाव पण तेले आखरी दिन मोत मधून परत जित्ता करस.” कारण मना बाप नि ईच्छा हई शे, कि “जो कोणी पोऱ्या ले देखीन, आणि तेनावर विश्वास करीन, तेले कायम ना जीवन भेटीन, आणि मी तेले आखरी दिन मोत मधून परत जित्ता करसू.” तव यहुदी पुढारी तेनावर कुरुकुडू लागणत, एनासाठे कि तेनी सांगेल होता, “जी भाकर स्वर्ग मधून उतरनी, ती मी शे.” आणि तेस्नी सांग, “काय हवू योसेफ ना पोऱ्या येशु नई, जेना माय-बाप ले आमी ओयखतस? तर तो कसकाय सांगस कि मी स्वर्ग मधून उतरेल शे?” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “आपस मा कुरुकुडू नका. कोणी मना कळे नई येवू सकस, जठलोंग परमेश्वर बाप, जेनी मले धाळेल शे, तेले हिसकाय नई लेवो, आणि मी तेले आखरी दिन मरेल मधून परत जित्ता करसू. भविष्यवक्तास्नी आपला पुस्तक मा हय लिखेल शे, त्या सर्वा परमेश्वर कळून सिखाडेल होतीन. जो कोणी बाप कळून आयकेल आणि शिकेल शे, तो मना कळे येस. कोणी बी परमेश्वर बाप ले नई देख. मी एखटा शे, जो परमेश्वर कळून एयेल शे, जेनी तेले देखेल शे. मी तुमले खरोखर सांगस, कि जो कोणी मनावर विश्वास करस, कायम ना जीवन तेनाच शे. मी तीच भाकर शे जी जीवन देस. तुमना पूर्वजस्नी उजाळ जागा मा मन्ना खायनात आणि नंतर मरी बी ग्यात. हई ती भाकर शे जी स्वर्ग मधून उतरस, कारण माणुस तेना मधून खाईन आणि नई मराव. जीवन देणारी भाकर जी स्वर्ग मधून उतरनी मी शे. जर कोणी या भाकर मधून खाईन, तो कायम जित्ता राहीन, आणि ती मना शरीर शे जो मी जग ना लोकस्ना जीवन ना साठे दि टाकसु.” एनावर यहुदी पुढारी हई सांगीसन आपस मा वाद-विवाद करू लागनात, “हवू माणुस कसकाय आमले आपला शरीर खावाले देवू सकस?” येशु नि तेस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, जठलोंग तुमी, मी माणुस ना पोऱ्या ले म्हणजे मना शरीर नई खावाव, आणि तेना रक्त नई पेवाव, तुमना मा जीवन नई. जो मना शरीर खास, आणि मना रक्त पेस, कायम ना जीवन तेनाच शे, आणि मी तेले आखरी दिन मोत मधून परत जित्ता करसू. कारण कि मना शरीर खरज जेवण शे आणि मना रक्त खरज पेय शे. जो मना शरीर खास आणि रक्त पेस, तो मना मा स्थिर बनीसन ऱ्हास आणि मी तेनामा बनीसन ऱ्हास. परमेश्वर जित्ता बाप नि शक्ती कण मी जित्ता शे जेनी मले धाळ, त्याच प्रकारे, ज्या लोक मना शरीर ले खातस, त्या मना मुळे जित्ता ऱ्हायतीन. हयच ती भाकर शे जी स्वर्ग मधून उतरेल शे. हय त्या भाकर ना सारखी नई शे, जी पूर्वजस्नी खायेल होतात. त्या त मरी ग्यात, पण जो हई भाकर खाईन, तो कायम जित्ता राहीन.” या गोष्टी तेनी कफर्णहूम नगर मा एक प्रार्थना घर मा उपदेश देवाना टाईम ले सांग. एनावर तेना शिष्य मधून गैरास्नी हई आयकीसन सांगनत, “हई तर कठीण शिक्षा शे, इले कोण माणू सकस. येशु नि आपला मन मा समजीसन कि मना शिष्य आपस मा या गोष्टी वर कुळकुळतस, तेस्ले विचार, काय हय तुमले मनावर विश्वास करावर रोकस? आणि जर तुमी माणुस ना पोऱ्या ले जठे जो पयले होता, तठे वरे जातांना देखशान, तव काय हुईन? हई ती आत्मा शे जी तुमले जीवन देस. माणुस नि सामर्थ्य मुळे अस नई होवू सकत. मनी तुमना शी ज्या शब्द बोलेल शे त्या आत्मा कळून येस. त्या तुमले जीवन देस. पण तुमना मधून कितलाक असा शे, ज्या विश्वास नई करतस.” येशु नि हई एनासाठे सांगणा, कारण कि तेले पयले पासून माहित होत कि ज्या विश्वास नई करतस, त्या कोण शे, आणि कोण तेले धरावीन. आणि येशु नि सांग, “एनासाठे मनी तुमले सांगेल होता कि जठलोंग कोले बाप कळून हवू दान नई भेटस तठलोंग तो मना जोळे नई येवू सकस.” एनावर तेना शिष्य मधून गैरा मांगे सरकी ग्यात आणि तेना नंतर तेना संगे नई चालनात. तव येशु नि त्या बारा शिष्यस्ले सांगणा, “काय तुमी बी जावाना देखतस?” शिमोन पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हे प्रभु, आमी कोणा कळे जावूत? कायम ना जीवन ना गोष्टी त तुना कळे शेत. आणि आमी विश्वास करनुत, आणि समजी ग्यात कि तू परमेश्वर ना पवित्र पोऱ्या ख्रिस्त शे.” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “काय मनी तुमले बारा जनास्ले निवाडेल नई होता? तरी तुम्हना मधून एक माणुस सैतान ना ताबा मा शे.” हई तेनी शिमोन ना पोऱ्या यहूदा इस्कर्योत ना विषय मा सांगणा, कारण तो बारा शिष्यस मधून एक होता, तो येशु ना संगे विश्वासघात करणार होता. या गोष्टी नंतर येशु गालील जिल्हा मा फिरत ऱ्हायंना तो यहूदीया प्रांत मा जावाना विचार नई करत होता कारण कि यहुदी पुढारी तेले मारणी योजना बनावत होतात. आणि यहुदी लोकस्ना झोपडी ना सन ना टाईम जोळे होता. एनासाठे येशु ना भाऊस्नि तेले सांग, “आठून यहूदीया प्रांत मा चालना जाय, कि जे काम तू करस, तेले तुना शिष्य बी देखोत. कारण कि कोणी, बी जो प्रसिद्ध होवाना देखस, तो दपिसन काम नई करत. जर तू हई काम कराना देखस, त स्वता ले जग वर प्रगट कर.” कारण कि तेना भावूस्ना बी तेनावर विश्वास नई होता. तव येशु नि तेस्ले सांग, “मना टाईम आजून नई एयेल शे, पण तुमी लोकस साठे चांगला टाईम शे. जग ना लोक तुमना संगे द्वेष नई करू सकत, पण तो मना संगे द्वेष करस, कारण कि मी तेना विरुद्ध मा हय साक्ष देस, कि तेना काम वाईट शेतस. तुमी सन मा जावा, आणि मी आते नई जावाव, कारण आजून पर्यंत मना टाईम पुरा नई हुईना.” तो तेस्ले ह्या गोष्टी सांगीसन गालील जिल्हा मा ऱ्हाई ग्या. पण तव तेना भाऊ सन मा चालना ग्यात, त तो स्वता मन मोक्या नई, पण समजा गुप्त पणे ग्या. कईक यहुदी पुढारी तेले सन मा हई सांगीसन झामलू लागणत कि “तो कोठे शे?” आणि लोकस्मा तेना विषय मा दपी-दपिसन गैरा गोष्टी हुईनात. कितलाक सांगत होतात, “तो चांगला माणुस शे.” आणि कितलाक सांगत होतात, “नई, तो लोकस्ले भळकावस.” त लोक यहुदी पुढारीस्ले घाबरा मुळे कोणीही व्यक्ती तेना विषय मा मोक्या बोलत नई होत. आणि जव सन ना अर्धा दिन चालना ग्यात, त येशु परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा जाईसन उपदेश देवू लागणा. तव यहुदी पुढारी चकित हुईसन सांगाले लागनात, “एनी कदी बी परमेश्वर ना पुस्तक ना शिक्षण नई लीधा त एले ज्ञान कोठून भेटणा?” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, कि “मना शिक्षा मना पासून नई, पण जेनी मले धाळनारा परमेश्वर कळून शे. जर कोणी तेनी ईच्छावर चालानी ईच्छा ठेवस, त तेले माहिती पळी जाईन कि मनी शिक्षा परमेश्वर कळून येस, कि मी आपला कळून सांगस. जो आपला कळून काही सांगस, तो आपलीच स्तुती देखस, पण जो आपला धाळनारनी स्तुती देखस तो खरा शे, आणि तेनामा लबाळी नई शे. काय मोशे नि तुमले नियम नई दिधा? तरी बी तुमना मधून कोणी मोशे ना नियम ना नुसार नई चालत. तुमी काब मले मारान देखतस?” लोकस्नी गर्दी नि उत्तर दिधा, “तुना मा दुष्ट आत्मा शे, कोण तुले माराना देखस?” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “मनी एक काम कर, आणि तुमी सर्वा चकित होतस. मोशे नि तुमले सुंता नि आज्ञा दियेल शे, हई नई कि ती मोशे कळून शे पण पूर्वजस पासून चालत एयेल शे, आणि तुमी आराम ना दिन माणुस ना सुंता करतस. जव आराम ना दिन माणुस ना सुंता करामा येस, कारण कि मोशे ना नियम नि आज्ञा टयाले नको पाहिजे, त तुमी मनावर काब एनासाठे रागे भरतस, कि मनी आराम ना दिन एक माणुस ले पूर्णपणे बरा करनू. तुम्हना न्याय बाहेर ना रूप वर नई, पण खरेपणा वर निर्भर शे.” तव यरूशलेम शहर ना कईक लोक सांगू लागणत, “हवू तो शे जेले यहुदी पुढारी लोक मारना प्रयत्न करी ऱ्हायनात पण देखा, तो त मोक्या चोकया बोलस आणि कोणी तेले काही सांगत नई, काय शक्य शे कि त्या लोकस्नी खर जानी लीयेल शे, कि हवूच खरोखर ख्रिस्त शे? येले त आमी ओयखतस, कि हवू कोठला शे, पण ख्रिस्त जव ईन, त कोणीच नई ओयखाव कि तो कोठला शे.” तव येशु परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा उपदेश देतांना जोरमा सांग, “तुमी मले ओयखतस आणि हई बी माहित शे कि मी कोठला शे. मी त स्वता नई एयेल पण मले धाळनारा खरा शे, तेले तुमी नई ओयखतस. पण मी तले ओयखस, कारण कि मी तेना कळून शे, आणि तेनीच मले धाळेल शे.” एनावर पुढारी लोकस्नी तेले धराना विचार करत तरी बी कोणी तेले अटक नई करणात, कारण कि तेना मराणा निश्चित टाईम आते नई एयेल होता. आणि गर्दी मधून गैरास्नी तेनावर विश्वास कर, आणि सांगू लागनात, “ख्रिस्त जव ईन, त काय एनातून बी मोठा सामर्थ्य ना काम दाखाळीन जे एनी दाखाळ?” परूशीस्नि तेना विषय मा लोकस्ले या गोष्टी दपी दपिसन करतांना आयकनात, आणि मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी लोकस्नी तेले धराले आपला मंदिर ना राखोयास्ले धाळनात. एनावर येशु नि तेस्ले सांग, “मी थोळा टाईम लगून आजून तुमना संगे शे, तव मी आपला धाळनार कळे परती जासुत. तुमी मले झामलशात, पण मले नई झामली सकाव, आणि जठे मी शे, तठे तुमी नई येवू सकतस.” यहुदी पुढारी लोकस्नी आपस मा सांग, “हवू कोडे जाईन कि आपले नई सापडाव? काय तो त्या यहुदी लोकस जोळे जाईन ज्या ग्रीक शहरस्मा गले-पते हुईसन राहतस, आणि ग्रीक लोकस्ले बी उपदेश दिन? तो काय सांगाणा, देखस कि तुमी मले झामलशात, पण मले नई झामली सकाव आणि जठे मी शे, तठे तुमी नई येवू सकावत?” मंग सन ना शेवट ना दिन, जो मुख्य दिन शे, येशु उभा ऱ्हायना आणि जोरमा सांग, “जर कोणी तिश्या अशीन त जोळे येवो आणि पिवो. जो मनावर विश्वास करीन, जसा परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तेना हृदय मधून पाणी ना नद्या वाहतीन ज्या जीवन देतस.” तो पवित्र आत्मा ना बारामा सांगी ऱ्हायंता, जी तेनावर विश्वास करणारस्ले भेटाव होती, कारण कि पवित्र आत्मा आते लगून उतरेल नई होता, आणि परमेश्वर नि आते लगून येशु नि महिमा ले प्रगट नई करेल होता. तव गर्दी मधून कोणी-कोणी ह्या गोष्टी आयकीसन सांग, “खरज हवूच तो भविष्यवक्ता शे, जेनी आमी येवानी वाट देखी ऱ्हायंतू.” दुसरास्नी सांगा, “हवू ख्रिस्त शे,” पण कोणी सांग, “ख्रिस्त ना येन गालील जिल्हा तून त नई होवाव. परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, कि ख्रिस्त दाविद ना वंश पासून आणि बेथलेहेम नगर कळून ऐईन, जठे दाविद राहत होता.” ह्या प्रकारे येशु मुळे लोकस्मा फुट पडनी. तेस्ना मधून कितलाकस्नि तेले धराना विचार करेल होतात, पण तेले कोणीच धरू नई सकनात, कारण कि तेना मराणा टाईम नई एयेल होता. तव मंदिर ना राखोया मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी लोकस्ना ना जोळे उनात, आणि तेस्नी राखोयास्ले विचार, “तुमी तेले काब नई लयनत?” मंदिर ना राखोयास्नी उत्तर दिधा, “कोणताही माणुस्नी कदी अशी गोष्ट नई करी.” परूशी लोकस्नी तेस्ले उत्तर दिधा, “काय तेनी तुमले बी भटकावामा ली लीयेल शे?” काय आमी अधिकारी आणि परूशी लोकस मधून कोणी तेनावर विश्वास करेल शेतस? पण या लोक जेस्ले मोशे ना नियम माहित नई शे, परमेश्वर ना द्वारे श्रापित शे, निकुदेमूस जो एक रात मा येशु जोळे एयेल होता आणि तेस्ना मधून एक होता तेस्ले सांगणा, “काय आमना मोशे ना नियम मा कोणी माणुस ले आयकाना बिगर आणि तेना काम ओयखाना बिगर तेले दोषी ठरायेल शे?” तेस्नी तेल उत्तर दिधा, “काय तू बी गालील जिल्हा ना शे? परमेश्वर ना पुस्तक मा झामल त तुले भेटीन, कि गालील जिल्हा मधून कोणताच भविष्यवक्ता प्रकट नई होणार.” तव सर्वा कोणी आपला-आपला घर चालना ग्यात. येशु जैतून डोंगर वर ग्या. परत दुसरा दिन साकायले परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा उना, आणि गैरा लोक तेना जोळे उनात, आणि तो बठी ग्या आणि तेस्ले उपदेश देवू लागणा. जव तो बोलतच होता, त मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोकस्नी एक बाई ले लिसन जी व्याभिचार करतांना सापडेल होती, आणि तेस्नी तिले गर्दी ना समोर उभी करीसन येशु ले सांगनत, “हे गुरु, हई बाई व्याभिचार करतांना पकडा एयेल शे. मोशे ना नियम मा मोशे नि आमले आज्ञा दियेल शे कि अशा बाईस्ले दगडमार करीसन मारी टाकोत, त तू काय सांगस कि आमले हई बाई ना संगे काय कराले पायजे?” तेस्नी येशु ले पारखा साठे हई गोष्ट सांगेल कारण तेनावर दोष लावा साठे काही गोष्ट भेटीन, पण येशु वाकीसन आणि आपली बोटकन जमीन वर लिखू लागणा. जव ते तेले विचारत ऱ्हायनात, त तो सीधा होयसन तेस्ले सांग, “तुमना मधून जेनी कदी बी पाप नई करेल शे, तोच तिले पयले दगड मारोत.” आणि आखो वाकीसन जमीन वर बोटकन लिखू लागणा. पण त्या हई आयकीसन मोठा पासून त धाकला लोंग एक-एक करीसन हई समजीसन कि त्या सर्वा पापी शे निघीग्यात, आणि येशु त्या बाई ना संगे जी आते बी तठेच उभी होती, एखटा ऱ्हाय ग्या, येशु सीधा हुईसन तिले सांगणा, “हे नारी, त्या कोठे ग्यात? काय कोणी तुनावर दंड नि आज्ञा नई दिधी?” तेनी सांग, “हे प्रभु, कोणीच नई.” येशु नि सांग, “मी बी तुनावर दंडणी आज्ञा नई देत, आते घर चालनी जाय, आणि पुढे पाप मा जीवन नको जगजो.” तव येशु नि आखो लोकस्ले सांग, “जग ना उजाया मीच शे, जो मनी आदन्या माणस तो अंधार मा नई चालाव, पण त्या उजाया ले लीन जी कायम ना जीवन देस.” परूशी लोकस्नी तेले सांग, “तू आपली साक्ष स्वता देस, तुनी साक्ष खरी नई शे.” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “जर मी आपली साक्षी स्वता देस, तरी मनी साक्ष खरी शे, कारण मले माहित शे, कि मी कोठून येस आणि कोठे जास. पण तुमले माहित नई कि मी कोठून येस आणि कोठे जास. तुमी माणसस्ना विचार कण न्याय करतस, मी कोणाच न्याय नई करत. आणि जर मी न्याय करू बी, त मना न्याय खरा शे, कारण मी एखटा नई, पण मना बाप जेनी मले धाळेल शे मना संगे शे. आणि मोशे ना नियम मा बी लिखेल शे, कि दोन झनस्नी साक्ष खरी ऱ्हास. एक त मी आपली साक्ष देस, आणि दुसरा बाप मनी साक्ष देस जेनी मले धाळेल शे.” तेस्नी तेले सांग, “तुना बाप कोठे शे?” येशु नि उत्तर दिधा, “नईत तुमी मले ओयखतस, नईत मना बाप ले, जर मले ओयखतात, त मना बाप ले बी ओयखिलेतात.” या गोष्टी तेनी परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा उपदेश देतांना भांडार घर मा सांगणा, आणि कोणी बी तेले नई पकडनत, कारण तेना दुख उचलाना टाईम आजून एयेल नई होता. येशु नि आखो तेस्ले सांग, “मी जास, आणि तुमी मले झामलश्यान आणि तुमी आपला पाप माफ होवाना पयलेच मरी जाशान, जठे मी जास, तठे तुमी नई येवू सकत.” एनावर यहुदी पुढारीस्नी सांग, “काय तो स्वता ले मारी टाकीन, जो सांगस, जठे मी जास तठे तुमी नई येवू सकत?” तेनी तेस्ले सांग, “तुमी आठे ह्या संसार मा जन्म लीयेल होतात, पण मी स्वर्ग मधून एयेल शे, तुमी संसार ना शेतस, मी संसार ना नई.” एनासाठे मनी तुमले सांग, कि तुमी आपला पाप माफ होवाना पयलेच मरी जाशान. जर तुमी मनावर विश्वास नई करतस कि मी तोच शे, त तुमी मरी जाशान, आणि तुमना पाप माफ नई होवाव. यहुदी पुढारीस्नी तेले विचार, “तू कोण शे?” येशु नि तेस्ले सांग, “जवय पासून मनी उपदेश देवाना सुरु करेल शे, मी तुमले सांगत एयेल शे कि मी कोण शे. तुमना विषय मा मले गैरा सांगण आणि तुमना दोषी ठरावाना साठे गैर काही सांगान शे, पण मले धाळनारा खरा शे, आणि जे मनी तेना पासून आयकेल, शे तेच जग ना लोकस्ले सांगस.” त्या नई समजनत कि आमले बाप ना विषय मा सांगस. तव येशु नि तेस्ले सांग, “जव तुमी मले, माणुस ना पोऱ्या ले क्रूस वर चडावशान, त समझशान कि मी तोच शे, आणि मी स्वता कळून काही नई करत, पण जसा बाप मना परमेश्वर नि मले शिकाळेल शे, तसाच या गोष्टी सांगस. आणि माना धाळनारा माना संगे शे, तेनी मले एखटा नई सोड, कारण मी कायम तेच काम करस, जेनावर तो खुश होस.” गैरा लोकस्नी जेस्नी येशु ले ह्या गोष्टी सांगतांना आयक, तेनावर विश्वास करणात. तव येशु नि त्या यहुदीस्ले जेस्नी तेनावर विश्वास करेल होतात, सांगणा, “जर तुमी मना वचन ले मानतस त खरोखर मना शिष्य बनशान. आणि तुमी सत्य ले जानशान आणि सत्य तुमले स्वतंत्र करीन.” तेस्नी तेले उत्तर दिधा, “आमी त अब्राहाम ना वंशज शे, आणि कदी कोणा दास नई बनतूत, मंग तू कसकाय सांगस, कि तुमी स्वतंत्र हुई जाशान?” येशु नि तेले उत्तर दिधा, “मी तुमले खरोखर सांगस, कि जो कोणी पाप करस, तो पाप ना आधीन शे.” आणि दास कायम घर मा नई ऱ्हास, पोऱ्या कायम ऱ्हास. जर परमेश्वर ना पोऱ्या तुमले स्वतंत्र करीन, त खरोखर तुमी स्वतंत्र हुई जाशान. मले माहित शे कि तुमी अब्राहाम ना वंशज शे, तरी बी तुमी मना उपदेश ना पालन नई करतस, एनासाठे तुमी मले माराना विचार करतस. “मी त्या गोष्टीस्ले दाखाळी ऱ्हायनु जेस्ले मनी देखेल शे जव मी आपला बाप ना संगे होतु, आणि तुमी तेच करतच राहतस जे तुमी आपला बाप कळून आयकेल शेतस.” तेस्नी तेस्ले उत्तर दिधा, “आमना पूर्वज त अब्राहाम होता.” येशु नि तेस्ले सांग, “जर तुमी अब्राहाम ना वंशज ऱ्हायतात, तर तुमी तसाच काम करतात जसा अब्राहाम करत होता.” पण आते तुमी मले मारी टाकाना देखतस, जेनी तुमले खर वचन सांग जो परमेश्वर कळून आयक, असा तर अब्राहाम नि नई कर. तुमी आपला बाप सारखा काम करतस, तेस्नी तेले सांग, “आमी व्याभिचार कळून नई जन्मेल, आमना फक्त एकच बाप शे आणि तो परमेश्वर.” येशु नि तेस्ले सांग, “जर परमेश्वर तुमना बाप राहता, त तुमी मनावर प्रेम करतात, कारण मी परमेश्वर कळून एयेल शे, मी स्वता नई एयेल पण तेनीच मले धाळ. जे मी सांगस ते तुमी नई समजतस. कारण कि मना वचन आयकाले नकार देतस. तुमी आपला बाप सैतान कळून शेतस, आणि आपला बाप नि लालसास्ले पूर्ण कराना देखतस. तो त सुरुवात पासून हत्यारा शे, आणि तेना सत्य काई लेन देन नई शे, कारण सत्य तेनामा नई शे, जव तो खोट बोलस, त आपला स्वभाव वरून बोलस, कारण तो लबाळ शे पण लबाड ना बाप शे. मी खर बोलस, एनासाठे तुमी मना विश्वास नई करतस. तुमना मधून कोण मले पाप कराना दोष लावस? आणि जर मी खर सांगस त तुमी मनावर विश्वास काब नई करतस? जो कोणी परमेश्वर संगे संबंध ठेवस, तो परमेश्वर नि गोष्ट आयकस, आणि तुमी एनासाठे नई आयकतस, कारण कि तुमी परमेश्वर ना नई शेतस.” हई आयकीसन यहुदी पुढारीस्नी तेले सांग, “आमी हई सांगामा बरोबर होतु कि तू शोमरोन प्रांत ना एक माणुस शे, आणि तुमना मा दुष्ट आत्मा शे.” येशु नि उत्तर दिधा, “मानामा दुष्ट आत्मा नई, पण मी आपला बाप ना आदर करस, आणि तुमी मना अपमान करतस. पण मी मनासाठे सन्मान नई देखस. पण एक शे जेले पायजे, कि मले सन्मानित करामा येवो, आणि तो तोच शे जो न्याय बी करस. मी तुमले खरोखर सांगस, जर कोणी माणुस मना वचन ना पालन करस, तो कायम लोंग कदीच नई मराव.” यहुदी लोकस्नी तेस्ले सांग, “आते आमी जानी लीध कि तुना मा दुष्ट आत्मा शे, अब्राहाम मरी गया, आणि भविष्यवक्ता बी मरी ग्यात, आणि तू सांगस, कदी जर कोणी मना वचन ना पालन करस, तो कायम लोंग कदीच नई मराव.” “आमना बाप अब्राहाम त मरी गया, आणि भविष्यवक्ता बी मरी गया, आणि तू आपला स्वता ले काय समजस?” येशु नि उत्तर दिधा, “जर मी स्वतानी प्रशंश्या करस, त मना प्रशंश्या काई नई, पण मना प्रशंश्या करणारा मना बाप शे, जेले तुमी सांगतस, कि तो तुमना परमेश्वर शे. आणि तुमी त तेले नई ओयखतस, पण मी तले ओयखस, आणि हय सांगू कि मी तेले नई ओयखस, त मी तुमना सारखा लबाड ठरसू, पण मी तेले ओयखस, आणि तेनी आज्ञा मानस. तुमना पूर्वज अब्राहाम मले देखानी अशा तून गैरा खुश होता, आणि तेनी देख आणि आनंद करना.” यहुदी लोकस्नी तेले सांग, “आते लोंग त तू पन्नास वर्षाना नई, तरी बी तू सांगस कि अब्राहाम नि तुले देखेल शे?” येशु नि तेस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, कि अब्राहाम ना जन्म ना पयले मी शे.” एनावर लोकस्नी येशु ले मारा साठे दगड उचलनात, पण येशु दपिसन परमेश्वर ना मंदिर तून बाहेर निघी ग्या. एक दिन जसा येशु आपला शिष्यस संगे जाई ऱ्हायंता, त तेनी एक माणुस ले देख जो जन्म पासून अंधा होता. आणि तेना शिष्यस्नी तले विचार, “गुरुजी, कोणी पाप करेल होत कि हवू अंधा जन्मले उना, ह्या माणुस नि कि एना माय-बाप नि पाप करेल शे?” येशु नि उत्तर दिधा, “नईत एनी पाप करेल शे, नईत एना माय-बाप नि पण हवू एनासाठे अंधा जन्मले उना कि परमेश्वर ना सामर्थ तेनामा प्रकट होवो. जेनी मले धाळेल शे, मले लवकर तेना काम ले पुरा करान जरुरी शे, ती रात येणार शे जेनामा कोणी काम नई करू सकस. जठलोंग मी जग मा शे, तठलोंग जग ना उजाया शे.” हय सांगीसन तेनी जमीन वर थुक आणि त्या थुक मधून माती सानी, आणि ती माती त्या अंधा ना डोया वर लायसन, तले सांग, “जा, आणि आपला तोंड शिलोह ना कुंडा मा धुईले” (शिलोह ना अर्थ धाळेल शे) त तेनी जायसन धुव, आणि देखू लागणा परती उना. तव तेना शेजारी आणि दुसरा लोकस्नी जेस्नी तेले भिक मांगतांना देखेल होतात, एक दुसराले सांगू लागणत, “काय हवू तो नई, जो अंधा होता आणि भिक मांगत होता?” काही लोकस्नी सांग, “हवू तोच शे,” दुसरास्नी सांग, “नई, पण तेना सारखा शे” तेनी सांग, “मी तोच शे.” तव त्या तेले विचारू लागणत, “तुले कसकाय दिखाले लागण?” तेनी उत्तर दिधा, “येशु नाव ना एक माणुस्नी माती सानी, आणि मना डोया वर लाईसन मले सांग, जा, आणि आपला तोंड शिलोह ना कुंडा मा जाईसन धुईले, त मी शिलोह ना कुंडा वर ग्यू, आणि तोंड धुईसन देखाले लागनु.” तेस्नी तेले विचार, “तो माणुस कोठे शे?” तेनी सांग, “मले नई माहित.” मंग परूशी लोकस्नी बी तेले विचार, तू कसा काय देखाले लागणा? तेनी तेस्ले सांग, “तेनी मना डोया वर माती लावी, मंग मनी धुयलीधा, आणि आते देखू लागनु.” एनावर कईक परूशी लोक सांगू लागनात, “तो माणुस जेनी अस कर परमेश्वर कळून नई, कारण कि तो आराम ना दिन ले नई मानत.” दुसरास्नी सांग, “एना सारखा पापी माणुस ह्या प्रकार ना सामर्थ्य ना काम कसा करू सकस?” त तेस्ना मा फुट पळीगी. तेस्नी त्या अंधा ले परत सांग, “तेनी जो तुले देखाना साठे सामर्थ्य दियेल शे, तू तेना बारामा मा काय सांगस?” तेनी सांग, “तो एक भविष्यवक्ता शे.” तेना माय-बाप नि उत्तर दिधा, “आमले त माहित शे कि हवू आमना पोऱ्या शे, आणि अंधा जन्मले एयेल होता. पण आमले हई नई माहित शे कि आते कसकाय देखस, आणि हई बी नई माहित, कि कोणी येले डोयास्ले देखाना ना साठे सामर्थ्य दियेल शे, तो स्वता साठे उत्तर देवाले चांगला मोठा शे, तेलेच विचारी ल्या, तो आपला विषय मा स्वताच सांगी दिन.” या गोष्टी तेना माय-बाप नि एनासाठे सांगी कारण कि त्या यहुदी पुढारी लोकस्ले घाबरत होतात, ज्या एकी करी लीयेल होतात, कि कदी कोणी विश्वास करस कि येशुच ख्रिस्त शे त तेले प्रार्थना घर मधून काळामा ईन. एनामुळे तेना माय-बाप सांग, कि “तो प्रश्न ना उत्तर देवा साठे चांगला समजदार शे, तेलेच विचारी ल्या.” तव यहुदी पुढारीस्नी त्या अंधा माणुस ले दुसरी सावा बलाईसन तेले सांग, “खर सांगीसन परमेश्वर नि स्तुती कर कारण कि आमले त माहित शे कि तो माणुस पापी शे.” तेनी उत्तर दिधा, “मले नई माहित शे कि तो पापी शे कि नई मले एक गोष्ट माहिती शे कि मी अंधा होतु पण आते देखाले लागनु.” तेस्नी तेले परत विचार, “तेनी तुना संगे काय कर? आणि तेनी तुना डोयास्ले कसकाय बरा करात?” तेनी तेस्ले सांग, “मनी त तुमले सांगी दिएल शे, आणि तुमनी नई आयक, आते दुसरा सावा काब आयकान देखतस? काय तुमी बी तेना शिष्य बनाना देखतस?” तव त्या तेले बर-वाईट म्हणीसन सांगणात, “तूच तेना शिष्य शे, आमी त मोशे ना शिष्य शेतस.” आमले माहित शे कि परमेश्वर नि मोशे संगे बोलेल शे, पण ह्या माणुस ले नई ओयखतस कि तो कोठून एयेल शे. तेनी तेस्ले उत्तर दिधा, “हई त नवल नि गोष्ट शे कि तुमले माहित नई शे कि तो कोठून एयेल शे पण तेनी मना डोया बरा करी टाकात. आमले माहित शे कि परमेश्वर पापीस्नि नई आयकस पण जर कोणी परमेश्वर ना भक्त शे, आणि तेनी ईच्छा प्रमाणे चालस, त तो तेनी आयक. जव पासून संसार नि निर्मिती करामा एयेल होती हय कदीच आयकामा नई उन, कि कोणी बी जन्म पासून अंधा ले दुष्टी दियेल होवो. जर हवू माणुस परमेश्वर कळून नई राहता, त काय बी नई करू सकत.” तेस्नी तेले उत्तर दिधा, “तू त बिलकुल पाप मा जन्म लीयेल शे, तू आमले काय शिकाळस?” आणि तव तेस्नी त्या माणुस ले महासभा मधून बाहेर काळी टाक. जव येशु नि आयक, कि तेस्नी तेले बाहेर काळी टाकेल शे, आणि जव तेनाशी भेट हुयनी त सांग, “काय तू माणुस ना पोऱ्या वर विश्वास करस?” तेनी उत्तर दिधा, “महोदय, मले सांग कि हवू परमेश्वर ना पोऱ्या कोण शे, एनासाठे कि मी तेनावर विश्वास करी सकू?” येशु नि तेले सांग, “मी परमेश्वर ना पोऱ्या शे, तुनी पहिलेच मले देखी लीयेल शे मी तोच शे जो आते तुना संगे बोली ऱ्हायनु.” आणि तेनी सांग, “प्रभु, मी तुनावर विश्वास करस.” आणि तेले नमन करना. आणि येशु नि सांग, “मी या जग मा न्याय कराले एयेल शे, एनासाठे कि ज्या नयी देखतस त्या देखोत, आणि ज्या देखतस त्या अंधा हुई जावोत.” ज्या परूशी लोक तेना संगे होतात, तेस्नी या गोष्टी आयकीसन तेले विचार, “काय तू सांगी ऱ्हायना कि आमी बी अंधा शेतस?” येशु नि तेस्ले सांग, “जर तुमी अंधा ऱ्हातात त पापी नई ठरतात पण आते सांगतस, कि आमले दिखस, एनासाठे तुमले क्षमा नई करामा येवाव.” “मी तुमले खरोखर सांगस, कि जो कोणी दरवाजा मधून मेंढ्यास्ना वाडा मा प्रवेश नई करस, पण कोणत्या दुसरा कळून चढीजास, तो चोर आणि डाखू शे. पण मेंढ्या ना मेंडपाळ दरवाजा कळून प्रवेश करस. तेना साठे द्वारपाल दरवाजा उघाळी देस, आणि मेंढ्या तेना आवाज ओयखतस, आणि तो आपला मेंढ्या ले नाव लिसन आवज देस, आणि तेस्ले बाहेर लीजास. आणि जव तो आपला सर्वा मेंढ्यास्ले बाहेर काळी देस, त तेस्ना पुढे-पुढे चालस, आणि मेंढ्या तेना मांगे चालतस आणि त्या तेना आवाज ओयखतस. पण त्या दुसरा ना मांगे नई जावाव, पण तेना कळून पयीन, कारण त्या दुसरा ना आवाज ओयखत नई.” येशु नि तेस्ले हवू दाखला सांगणा, पण त्या नई समजी सकनात कि तेना सांगाणा अर्थ काय होता. तव येशु तेस्ले आजून सांगस, “मी तुमले खरोखर सांगस, कि मेंढ्यास्ना साठे दरवाजा मी शे.” जीतला उनात, त्या सर्वा चोर आणि डाखू शे, पण मना मेंढ्या तेस्न नई आयकतस. मना द्वारे मधमा येनारस्ना परमेश्वर तारण करीन, आणि मधमा बाहेर येन जान करत राहीन आणि खावाले जेवण भेटीन. चोर फक्त मेंढ्यास्ले चोरी कराले, माराले आणि नष्ट कराले येस. मी एनासाठे एयेल शे, कारण त्या खरज जित्ता ऱ्हावो. चांगला मेंडपाळ मी शे, चांगला मेंडपाळ मेंढ्या साठे आपली ईच्छा कण जीव देस. मजुरी वर लायेल मेंडपाळ जव लांडगा येतांना देखीन त तो पयी जाईन. तो मेंढ्यास्ले सोळी दिन कारण तो तेस्ना मेंडपाळ नई शे, आणि मेंढ्या तेना नई शे. एनासाठे लांडगा तेस्ना वर हमला करस आणि गवारा ले गले पते करी देस. तो एनासाठे पई जास कारण तो मजुर शे, आणि तेले मेंढ्यास्नी चिंता नई. ज्या प्रकारे बाप मले ओयखस आणि मी बाप ले ओयखस, त्याच प्रकारे, मी मना मेंढ्यास्ले ओयखस आणि मना मेंडरू मले ओयखतस. या प्रकारे बाप मले ओयखस, आणि मी बाप ले ओयखस. मी मेंढ्यास साठे मराले तयार शे. आणि मना आजून बी मेंढ्या शे, ज्या ह्या गोशाळा ना नई, मले तेस्ले बी लयान अवश्य शे, त्या मना आवाज ओयखतीन, तव एकच गवारा आणि एकच मेंडपाळ ऱ्हाईन. बाप मनावर एनासाठे प्रेम करस कारण मी आपली ईच्छा कण जीव देस, कारण मी परत जित्ता हुई जावू. कोणी मना जीव मना पासून हिसकावत नई, पण मी आपली ईच्छा कण तेले स्वता देस. मले तेले देवाना अधिकार शे, आणि परत तेले लेवाना अधिकार बी शे. कारण कि हई तीच आज्ञा शे जी मले मना बाप कळून भेटेल शे. या गोष्टी मुळे यहुदी लोकस्मा परत फुट पडनी. तेस्ना मधून गैरा सावटा सांगू लागणत, “तेनामा दुष्ट आत्मा शे, आणि तो पागल शे, तेनी नका आयकज्यात.” दुसरास्नी सांग, “या गोष्टी असा माणुस ना नई जेनामा दुष्ट आत्मा शे. एक दुष्ट आत्मा कदी बी एक अंधा माणुस ले दुष्टी नई देवू सकस.” यरूशलेम शहर मा समर्पण ना सन हुयना, आणि हिवाया ना टाईम होता. आणि येशु परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा शलमोन ना ओसारा मा फिरत होता, जो परमेश्वर ना मंदिर ना आंगण ना मधमा होता. तव यहुदी पुढारीस्नी तेले ईसन घेर आणि विचारनात, “तुनी आमले गैरा टाईम पासून नासमज मा ठीयेल शे. आते आमले स्पष्ट रूप मा सांगी दे. काय तू ख्रिस्त शे.” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “मनी तुमले सांगी दिधा, आणि तुमी विश्वास नई करतस, जे काम मी आपला बाप ना अधिकार शी करस त्याच मना साक्षी शे.” पण तुमी एनासाठे विश्वास नई करतस, कारण कि तुमी मना मेंढ्यास मधून नई शे, जसा कि मनी तुमले सांग. मना मेंढ्या मना आवाज ले ओयखतस, मी तेस्ले ओयखस आणि त्या मना मांगे-मांगे चालतस. आणि मी तेस्ले कायम ना जीवन देस, आणि त्या कदी नाश नई होवाव, आणि कोणी बी तेस्ले मना कळून हिसकावू नई सकस. मना बाप नि, जेनी तेस्ले मले दियेल शे, तो सर्वास्मा महान शे, आणि कोणी तेस्ले बाप ना हात मधून नई हिसकावू सकत. मी आणि मना बाप एक शे. एक सावा आखो यहुदीयास्नी तेनावर दगडफेक कराले दगड उचलनात. एनावर येशु नि तेस्ले सांग, “मनी तुमले बाप कळून गैरा चांगला काम दाखाळेल शे, तेस्ना मधून कोणता काम साठे तुमी मनावर दगडफेक करतस?” यहुदी पुढारीस्नी तेले उत्तर दिधा, “चांगला काम साठे आमी तुनावर दगडफेक नई करतस, पण परमेश्वर नि निंदा मुळे आणि एनासाठे कि तू माणुस हुयसन बी परमेश्वर होवाना दावा करस.” येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “काय हई परमेश्वर ना पुस्तक मा आणि मोशे ना नियम मा नई लिखेल शे, कि परमेश्वर नि आपला लोकस्ना पुढारीस्ले सांग, कि त्या ईश्वर शेतस?” आणि तुमले माहित शे कि परमेश्वर ना पुस्तक ले बदलू नई सकतस. एनासाठे तेना लोकस्ना पुढारीस्ले ईश्वर सांग जेस्ले हवू संदेश दियेल शे. जव मी हई सांगस, “मी परमेश्वर ना पोऱ्या शे.” तर तुमी मले काब सांगतस, “तू परमेश्वर नि निंदा करस.” मी तोच शे जेले परमेश्वर, मना बाप नि आलग कर आणि मले जग मा धाळ. जर मी परमेश्वर, आपला बाप ना काम नई करस, त मना विश्वास नका करा. “पण जर मी करस, तर मना विश्वास बी नका करा, पण त्या कामस्वर विश्वास करा, तव तुमले माहित पळीन आणि समजष्यात कि परमेश्वर, मना बाप मना मा ऱ्हास, आणि मी मना बाप मा ऱ्हास.” तव तेस्नी तेले पकडाना परत प्रयत्न करणात पण तो तेस्ना तून दूर चालना ग्या. मंग येशु यार्देन नदी ना पार त्या जागा वर चालना गया, जठे योहान बाप्तिस्मा देणारा पयले बाप्तिस्मा देत होता, आणि येशु तठेच ऱ्हायना. गैरा सावटा तेना कळे ईसन सांगत होतात, “योहान बप्तिस्मा देणारा नि त कोणताच चिन्ह चमत्कार नई दाखाळ, पण जे काही योहान बप्तिस्मा देणारा नि येणा विषय मा सांगेल होता ते सगळ खर होत.” तठे गैरा लोकस्नी तेनावर विश्वास करा. लाजर नाव ना एक माणुस आजारी होता. तो बेथानी नगर मा आपली बहिण मरिया आणि मार्था ना संगे राहत होता. हई तीच मरिया होती जेनी नंतर प्रभु येशु ना पाय वर महाग आणि शुद्ध सुगंधी ईत्र टाकीसन तेना पाय ले आपला केसवरी पुसेल होती, ईनाच भाऊ लाजर आजारी होता. तव तेनी बहीनीस्नि येशु ले संदेश धाळ, “हे प्रभु, देख जेनावर तू प्रेम करस, तो आजारी शे.” येशु नि हई आयकीसन सांग, “हवू आजार लाजर नि मोत कण नई सराव, पण परमेश्वर नि महिमा साठे शे, कि तेना द्वारे परमेश्वर ना पोऱ्या नि महिमा होवो.” येशु, मार्था आणि तेनी बहिण आणि लाजर वर प्रेम करत होता. पण जव येशु नि आयक, कि तो आजारी शे, त ज्या जागा वर तो होता, तठे दोन दिन आखो थांबीग्या. दोन दिन नंतर तेनी शिष्यस्ले सांग, “या, आमी परत यहूदीया प्रांत मा जाऊत.” शिष्यस्नी तेले विचार, “गुरुजी, आते त यहुदी पुढारी तुले दगडफेक करना देखत होतात, आणि काय तू तरी बी तठे जावाना देखस?” येशु नि उत्तर दिधा, “काय दिन ना बारा तास नई होतस? जर कोणी दिन मा चालस, त ठोकर नई खास, कारण तो ह्या जग ना उजाया ले देखस. पण जर कोणी रात ले चालस, त ठोकर खास, कारण तेना जोळे कोणताच उजाया नई.” तेनी ह्या गोष्टी सांगाणा, आणि येणा नंतर तेनी तेस्ले सांगू लागणा, “आमना मित्र लाजर जपी जायेल शे, पण मी जागाळाले जाई ऱ्हायनु.” तव शिष्यस्नी तेले सांग, “गुरुजी, जर तो जपेल शे, त बरा हुई जाईन.” येशु नि त तेना मृत्यु ना विषय मा सांगेल होत, पण त्या समजनात कि तो निंद मा जपाना बारामा सांगस. तव येशु तेस्ले स्पष्ट सांगी दिधा, “लाजर मरी जायेल शे. मी तुम्हना साठे खुश शे कि मी तठे नई होतु जेना कण तुमी विश्वास करोत. पण आते या, आमी तेना जोळे जावूत.” तव थोमा जो दिदुम सांगामा येस, आपला साथी शिष्यस्ले सांग, “या, आमी बी तेना संगे मराले जाऊत.” जव येशु बेथानी गाव मा उन्हा त तेले हई मालूम हुयना, कि लाजर मरी जायेल शे आणि तेले कबर मा गाळेल चार दिन हुई जायेल शे. बेथानी नगर यरूशलेम शहर ना तीन किलोमीटर ना आंगे पांगे दूर वर होता. कईक यहुदी लोक मार्था आणि मरिया ना जोळे तेस्ना भाऊ ना विषय मा शांती देवा साठे एयेल होतात. मार्था येशु ना येवाना समाचार आयकीसन तेले भेटाले गई, पण मरिया घरमाच बठेल होती. मार्था नि येशु ले सांग, “गुरुजी, तुले आठे ऱ्हावाले पायजे होता, त मना भाऊ नि मोत नई होती. आणि आते बी मी समजस, कि जे काही तू परमेश्वर कळून मांगशी, परमेश्वर तुले दिन.” येशु नि तिले सांग, “तुना भाऊ परत जित्ता हुई जाईन.” मार्था नि तले सांग, “मले माहित शे, न्याय ना दिन मा जव प्रत्येक झन जित्ता होतीन त तो परत जित्ता हुई जाईन.” येशु नि तिले सांग, “मी तो शे जो मरेल लोकस्ले परत जित्ता करस, जो कोणी मनावर विश्वास करस जर तो मरी बी जाईन, तरी बी जित्ता हुईन. आणि जो कोणी मना मा विश्वास करा मुळे जित्ता शे त्या कदीच नई मराव. काय तू ह्या गोष्टी वर विश्वास करस?” तिनी तेले सांग, “हा, गुरुजी, मी विश्वास करस कि तू परमेश्वर ना पोऱ्या जो ख्रिस्त शे जो जग मा येणार होता.” हई सांगीसन ती चालनी गई, आणि आपली बहिण मरिया ले बागेचकन बलाईसन सांगणी, “गुरु आठेच शे, तो तुले बलाई ऱ्हायना.” ती आयकताच लगेच उठीसन तेना जोळे उणी. (येशु आते लोंग गाव मा नई एयेल होता, पण त्याच जागा वर होता जठे मार्था नि तेले भेटेल होती.) तव ज्या यहुदी लोक तेना संगे घर मा होतात, आणि तेले सांत्वना देत होतात, हई देखीसन कि मरिया लगेच उठीसन बाहेर गई, एनासाठे लोक हई सांगीसन कि ती कबर वर रळाले जास, तेना मांगे चालू लागनात. जव मरिया तठे पोहचनी जठे येशु होता, त तेले देखताच तेना पाय वर पळीसन सांगणी, “गुरुजी, जर तू आठे ऱ्हाता त मना भाऊ नई मरता.” जव येशु नि तिले आणि त्या यहुदी लोकस्ले ज्या तेना संगे एयेल होता रळतांना देख, त तो गैरा जास्त उदास आणि दुखी हुयना, आणि विचार, “तुमनी तेले कोठे गाळेल शेतस?” तेस्नी तेले उत्तर दिधा, “गुरुजी, चालीसन देखीले.” येशु रळना. तव यहुदी लोक सांगू लागनात, “देखा, तो तेनाशी कसा प्रेम करत होता.” पण तेस्ना मधून कितलाक नि सांग, “काय हवू जेनी अंधा ले बरा करेल, तो लाजर ले मरा पासून वाचाळी सकत होता.” येशु मन मा आजून जास्त उदास हुईसन कबर वर उना, ती एक गुफा होती आणि एक दगड तेना तोंड वर ठीयेल होता. येशु नि सांग, “दगड ले उचला.” त्या मरेल नि बहिण मार्था नि तेले सांगू लागणी, “गुरुजी, तेना मधून आते त वास येस, कारण तेले मरेल चार दिन हुई ग्यात.” येशु नि तिले सांग, “काय मनी तुले नई सांगेल होत जर तू विश्वास करशीन, त परमेश्वर नि महिमा ले देखीशीन.” तव तेस्नी दगड ले त्या कबर वरून सरकाव, जठे मृत शरीर ले ठीयेल होता, मंग येशु नि वरे देखीसन सांगणा, “हे बाप, मी तुना धन्यवाद करस कि तुनी मनी आयकी लीयेल शे. आणि मले माहित होत, तू कायम मनी आयकस, पण जी गर्दी आजू-बाजू उभी शे, तेस्ना मुळे जोरमा मनी हई सांग, जेनावर कि त्या विश्वासी करोत, कि तुनी मले धाळेल शे.” हई सांगीसन तेनी जोरमा आवाज दिधा, “हे लाजर भायेर ये.” तो, जो मरी जायेल होता, जित्ता हुईसन बाहेर ईग्या तेना सर्वा शरीर आणि तेना तोंड कपळा नि पट्टीस कण गुंडायेल होता. येशु नि तेस्ले सांग, “तेना कफन ना कपळा ना पट्ट्या खोलीसन तेले जावू द्या.” तव ज्या यहुदी लोक मरिया ले भेटाले एयेल होतात, येशु ना हई काम देखेल होतात, तेस्ना मधून गैरास्नी तेनावर विश्वास करणात. पण तेस्ना मधून कईक नि परूशी लोकस कळे जाईसन येशु ना कामस्नी बातमी दिधा. एनावर मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी लोकस्नी महासभा ना लोकस्ले एकत्र करीसन विचार, “आमी काय करसुत? हवू माणुस त गैरा चिन्ह चमत्कार दाखाळस.” जर आमी तेले असाच करत ऱ्हावानी परवानगी देवूत, त प्रत्येक तेले ख्रिस्त ना रूप मा स्वीकार करू लागतीन आणि रोमी ईसन आमना मंदिर आणि लोकस्वर अधिकार करी लेतीन. त तेस्ना मधून केफा नाव ना सभा ना सदस्य मधून एक माणुस नि जो त्या साल ना महा यहुदी पुजारी होता, तेस्ले सांगणा, “तुमले काही बी माहित नई शे. आणि नई हई समजतस, कि तुमना साठे हई चांगला शे, कि लोकस साठे एक माणुस मरो. जेनाशी आमना जाती ना सर्वा लोक नाश नई होवो.” हई गोष्ट तेनी आपला स्वता कळून नई सांग, पण त्या साल ना महा यहुदी पुजारी ना रूप मा, तेनी हई भविष्यवाणी करना, कि येशु इस्त्राएल लोकस साठे मरीन. पण फक्त तेस्ना साठे नई. तो परमेश्वर ना दुसरा संतानस साठे बी मरीन ज्या ह्या धरती वर पसरेल शेतस, कारण तेस्ले एकत्र करी सकोत. त त्याच दिन पासून यहुदी पुढारी येशु ले मारानी योजना बनावू लागनात. एनासाठे ह्या षडयंत्र मुळे येशु त्या टाईम पासून यहुदीस्मा मोक्या हुईसन नई फिरणा, पण तो तठून सुनसान जागा ना जोळे प्रदेश मा ईफ्राईम नाव ना एक नगर मा चालना गया, आणि आपला शिष्यस संगे तठेच राहू लागणा. आणि यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन जोळे होता, आणि गैरा सावटा लोक सन ना पयले गाव तून यरूशलेम शहर मा ग्यात, कि रीत ना नुसार स्वतास्ले शुद्ध करोत. त्या येशु ले झामलाले आणि परमेश्वर ना मंदिर मा उभा ऱ्हायसन आपस मा सांगू लागणत, “तुमी काय समजतस? काय तो सन मा नई येवाव?” मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी लोकस्नी बी आज्ञा दियेल होतात, कि जर कोले माहित पडीन कि येशु कोठे शे त सांगा, कि तेले बंदी बनाई सकुत. मंग येशु वल्हांडण ना सन ना सहा दिन पयले येशु बेथानी नगर मा उना, जठे तेनी लाजर ले मरेल मधून जित्ता करेल होता. तठे तेस्नी तेना साठे जेवण तयार करणात आणि येशु न सन्मान करासाठे मार्था सेवा करत होती, आणि लाजर तेस्ना मधून एक होता जो येशु ना संगे जेवण कराले बठेल होतात. तव मरिया नि शुद्ध जटामासी ना अर्धा लिटर नि एक कुप्पी महागामोल ईत्र लिसन येशु ना पाय वर ओतनी, आणि आपला केसस वर तेना पाय पुसणी, आणि ईत्र नि सुगंध कण घर सुगंधीत हुईग्या. पण तेना शिष्यस मधून यहूदा इस्कर्योत नाव ना एक शिष्य जो तेले धरावनार होता, सांगू लागणा, “ह्या ईत्र ले तीन शे दिनार (तीन शे दिन नि मजुरी) मा ईकीसन गरीबस्ले काब नई दि टाकत?” तेनी हई गोष्ट एनासाठे नई सांग, कि तेले गरीबस्नि चिंता होती, पण एनासाठे कि तो चोर होता आणि तेना कळे तेस्नी पैसास्नि थैली ऱ्हात होती, आणि तेनामा जे काही टाकामा येत होत, तो काळी लेत होता. पण येशु नि सांग, “तिले एखटी सोळी द्या. कारण ती टाईम ना पयलेच मना गाळानी तयारी साठे हय करी ऱ्हायनी. कारण कि गरीब लोक त तुमना संगे कायम ऱ्हातीन, पण मी तुमना संगे कायम नई ऱ्हावाव.” जव लोकस्नी आयक कि येशु तठे होता त यहुदी लोकस्नी एक मोठी गर्दी तठे उणी. त्या फक्त येशु लेच नई, पण लाजर ले बी देखाले एयेल होतात, जेले तेनी मरेल मधून जित्ता करेल होता. पण मुख्य यहुदी पुजारीस्नी लाजर ले बी मारानी योजना बनावी. कारण कि तेना मुळे गैरा लोक यहुदी पुढारीस्ले अस्वीकार करत होतात, आणि येशु वर विश्वास करत होतात. येशु यरूशलेम शहर मा ईऱ्हायना, हय आयकीसन दुसरा गैरा लोक दुसरा दिन सन मा एयेल होतात, तेस्नी खजूर ना फांद्या लीधात, आणि तेले भेटाले निघनत, आणि ओरडीसन सांगू लागनात, “होसन्ना, धन्य इस्त्राएल देश ना राजा, जो प्रभु ना नाव वर येस.” जव येशु ले धाकला शिंगरू भेटणा, त तो जसा यरूशलेम शहर मा उना, तो तेनावर बठी गया, जसा परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तसाच हुईना, “ओ सियोन शहर ना लोक, घाबरू नका, देखा, तुमना राजा धाकला शिंगरू वर बठीसन इऱ्हायना.” येशु ना शिष्य, ह्या गोष्टी पयले नई समजनत, पण जव परमेश्वर नि येशु नि महिमा प्रकट करना, त तेस्ले आठवण उणी, कि जे काही बी येशु ना हुयन, ते ठीक तसच होत, जस कि परमेश्वर नि पुस्तक मा सांगेल होत. त गर्दी ना लोकस्नी ज्या त्या टाईम ले तेना संगे होतात, हय साक्ष देवाले लागनात कि तेनी लाजर ले मरेल मधून परत जित्ता करी दियेल होता. गैरा लोक येशु ले भेटाले उनात, कारण कि तेस्नी ह्या सामर्थ्य ना काम ना बारामा आयकेल होतात. त परूशी लोकस्नी आपस मा सांग, “विचार करा, आमी काहीच नई करू सकतस. कारण कि पुरा संसार तेना मांगे चालू लागणा शे.” तठे कईक ग्रीक लोक होतात, ज्या वल्हांडण ना सन ना मुळे उपासना करान साठे यरूशलेम शहर मा एयेल होतात. त्या गालील जिल्हा ना बेथसैदा नगर ना ऱ्हायनारा शिष्य फिलिप्प ना जोळे ईसन तेले विनंती करू लागनात, “महोदय, आमनी येशु ले भेटानी ईच्छा शे.” फिलिप्प नि ईसन अंद्रियाले सांग, तव अंद्रिया आणि फिलिप्प नि येशु ले सांग. एनावर येशु नि तेस्ले सांग, “कि तो टाईम इजाएल शे, कि मी माणुस ना पोऱ्या नि महिमा होवो.” मी तुमले खरोखर सांगस, कि जठलोंग गहू ना दान जमीन वर पडीसन मरत नई, तो एखटा ऱ्हास पण जव मरी जास, त गैरा फय लयस, मना संगे बी हईच हुईन. जे आपला जीव ले प्रिय समजस, तो तेले दवाळी देस, आणि जो या जग मा आपला जीव ले अप्रिय जानस, तो कायम ना जीवन साठे तेनी राखोयी करीन. जर कोणी मनी सेवा करीन, तर त्या मना शिष्य बना, त जठे मी शे तठे मना शिष्य बी ऱ्हायीन, जर कोणी मनी सेवा करीन, त परमेश्वर बाप तेना सन्मान करीन. “आते मी गैरा दुखी शे. एनासाठे आते मी काय सांगू? ओ बाप, मले ह्या पीळाना टाईम वाचाळ? पण मी संसार मा एनासाठे एयेल शे, कारण कि दुख उचलू. हे बाप, प्रगट कर कि तू कितला महिमामय शे.” त आकाश तून हय वाणी हुयनी, “मी प्रगट करेल शे, कि मी कितला महिमामय शे आणि येले परत प्रगट करसू.” तव लोक उभा होतात त्या आयकत होतात, तेस्नी सांग, कि हय ढग नि आवाज होता, दुसरास्नी सांग, “कोणी परमेश्वर ना दूत नि तेना संगे बोलना.” एनावर येशु नि सांग, “हय आवाज तुमना फायदा साठे होता, नई मनासाठे नई. आते ह्या संसार मा लोकस्ना न्याय करासाठे परमेश्वर ना टाईम शे, आते ह्या जग ना शासक सैतान ना शक्ती ले नष्ट कराना टाईम शे. आणि जर मले पृथ्वी पासून वरे चळावामा ईन, त सर्वास्ले आपला जोळे लयसू.” अस सांगीसन तेनी हय प्रगट करी दिधा, कि तो कसा मरणार होता. एनावर लोकस्नी तेले सांग, “आमी परमेश्वर ना पुस्तक मा हय गोष्ट आयकेल शे, कि ख्रिस्त कायम जित्ता राहीन, मंग तू कसकाय सांगस, माणुस ना पोऱ्या ले उंचावर चढावान निश्चित शे? हवू माणुस ना पोऱ्या कोण शे?” येशु नि तेस्ले सांग, “उजाय (येशु) आते थोडाच टाईम लोंग तुमना मधमा शे, जठलोंग उजाया तुमना संगे शे तठलोंग चालत राहा, असा नई कि अंधार ईसन तुमले ईसन घेरी लेवोत, जो अंधकार मा चालतस तेले माहित नई कि तेले कथा जास. जठलोंग उजाया तुमना संगे शे, उजाया वर विश्वास करा कि तुमी उजाया ना पोर बाना.” ह्या गोष्टी सांगीसन येशु चालना गया आणि स्वता ले तेस्ना पासून दपाळी ठेव. आणि तेनी तेस्ना सोमर इतला चिन्ह चमत्कार दाखाडा, तरी बी तेस्नी तेनावर विश्वास नई करणात, हय एनासाठे हुयन कि यशया भविष्यवक्ता नि जे सांगेल होत ते खर हुई जावो कि, “गुरुजी, आमना संदेश वर कोणीच विश्वास नई करेल शे आणि कोणी हई बी नई समजतस कि हई तुनी ताखत शे.” या मुळे त्या विश्वास नई करू सकनात, कारण यशया नि हय बी सांग, तेनी तेस्ना डोया आंधळा करी दिना कारण त्या देखी नई सकोत, आणि तेस्ना मन बंद करी दिना कारण समजी नई सकोत. नई तर मना कळे फिरी जातात आणि मी तेस्ले बरा करी देता. यशया नि या गोष्टी एनासाठे सांगी, कि जव तेनी येशु नि महिमा देखना, आणि तेनी येशु ना विषय मा गोष्टी करना. तरी बी पुढारीस मधून गैरास्नी तेनावर विश्वास करणत, पण परूशी लोकस मुळे प्रकट मा नई मानत होतात, हय भीती मा कि तेस्ले प्रार्थना घर ना भायेर काळामा ईन. कारण माणसस्नी प्रशंश्या तेस्ले परमेश्वर नि प्रशंश्या पेक्षा जास्त प्रिय वाटत होती. येशु नि गर्दी ले आवाज दिसन सांग, “जो मनावर विश्वास करस, तो मनावर नई, पण मना धाळनारा परमेश्वर वर विश्वास करस.” आणि जो मले देखस, तो मले धाळनारा परमेश्वर देखस. मी जग मा उजाया बनीसन एयेल शे, कारण जो कोणी मनावर विश्वास करीन, तो आंधारा मा नई ऱ्हावोत. जर कोणी मना संदेश आयकीसन तेना विश्वास नई करस, त मी तेले दोषी नई ठरावस, कारण मी जग ना लोकस्ले दोषी ठरवाले नई, पण जग ना लोकस्ले वाचाळाले एयेल शे. जो मले तुच्छ समजस आणि जो कोणी मना संदेश स्वीकार नई करस, तेस्ना न्याय करणारा त एक शे, म्हणजे जो संदेश मनी सांगेल शे, ते तेले शेवट ना दिन मा दोषी ठरावीन. कारण कि मनी स्वता आपला अधिकार कण संदेश नई दिधा, पण जेनी मले धाळेल शे तेनीच मले आज्ञा दियेल शे, कि काय काय सांगू आणि काय काय बोलू. आणि मले माहित शे कि तेनी आज्ञा ना पालन करान कायम ना जीवन कळे लीजास, एनासाठे, मी तुमले तेच सांगस जे तो मले सांगस. वल्हांडण ना सन ना पयले जव येशु समजी गया, कि मना तो टाईम इजाएल शे कि जग ले सोळीसन बाप कळे परती जासुत. त तो आपला लोकस्ले ज्या जग मा होतात जसा प्रेम करत होता शेवट लोग तसाच प्रेम करत ऱ्हायना. येशु आणि तेना शिष्य रात ना जेवण करत होतात सैतान नि पयले पासून येशु ले धोका देवाना साठे, शिमोन ना पोऱ्या यहूदा इस्कर्योत ना मन मा टाकी दिधा कि तेले धारावोत. येशु ले हई माहित होत, कि परमेश्वर बाप नि तेले प्रत्येक वस्तू वर अधिकार दियेल शे, आणि मी परमेश्वर कळून एयेल शे, आणि परमेश्वर कळे परती ऱ्हायनु. जेवण वरून उठीसन आपला वरला कपळा उतारी टाक, आणि रुमाल लिसन आपली कमर वर गुंडाव. मंग भांडा मा पाणी भरीसन शिष्यस्ना पाय धुवाले आणि ज्या रुमाल ले जेनी आपला कंबर मा गुंडाळेल होता, तेनाशीच पुसू लागणा. जव तो शिमोन पेत्र ना जोळे उना, तव शिमोन पेत्र नि तेले विचार, “गुरुजी, काय तू मना पाय धुवस?” येशु नि तेले उत्तर दिधा, “जे मी करस, तू येणा अर्थ आते नई समजस, पण येणा नंतर समजशीन.” पेत्र नि तेले सांग, “तू मना पाय कदीच नई धुवाव,” हय आयकीसन येशु नि तेले सांग, “जर मी तुना पाय नई धुवाव, त तू मना शिष्य नई होवू सकस.” शिमोन पेत्र नि तेले सांग, “गुरुजी, त मना पायच नई, पण मना हात आणि डोक बी धुयी दे.” येशु नि तेले सांग, “जेनी आंग धुईलीयेल शे, तेले आपला पाय ले सोळीसन आजून काही धुवानी गरज नई शे, तेना पूर्ण शरीर साफ शे. फक्त एक ले सोळीसन तुमी सर्वा शुद्ध शे.” तो त आपला धरावनारा ले ओयखत होता, एनासाठे तेनी सांग, “तुमी सर्वान सर्वा साफ नई. फक्त एक ले सोळीसन तुमी सर्वा शुद्ध शे.” जव येशु तेस्ना पाय धुई दिना आणि आपला वरला कपळा घालीसन बठी ग्यात तेस्ले सांगू लागणा, “काय तुमी समजनात कि मनी तुमना संगे काय करना?” तुमी मले गुरुजी, आणि प्रभु, संगातस, आणि तुमी संगातस ते बरोबर शे, कारण मी तुमना गुरुजी आणि प्रभु शे. जर मी प्रभु आणि गुरुजी हुईसन तुमना पाय धुईना, त तुमी बी एक दुसरा ना पाय धुईसन मना सारख कराले पायजे. कारण मी तुमले नमुना दाखाडेल शे, कि जसा मनी तुमना संगे करेल शे, तुमी बी तसाच करत राहा. मी तुमले खरोखर सांगस, “दास आपला स्वामी पेक्षा मोठा नई शे, आणि नईत धाळेल आपला धाळनारा तून मोठा शे. आते जव कि तुमले त या गोष्टी माहित शे, त तेस्ले करा कारण तुमी धन्य हुई जावोत. मी तुमना सर्वास्ना विषय नई सांगस, जेस्ले मी निवाळेल शे, तेस्ले मी ओयखस, पण हई एनासाठे हुई ऱ्हायन कि परमेश्वर ना पुस्तक मा जे लिखेल शे पूर्ण होवो, जो मना संगे भाकर खायेल शे तेनी मले धोका दियेल शे. आते मी असा होवणा पयले जतळी देस, कि जव हुई जासू त तुमी विश्वास करा कि मी तोच शे.” मी तुमले खरोखर सांगस, “कि जो मना धाळेल ले स्वीकार करस, तो मले स्वीकार करस, आणि जो मले स्वीकार करस, तो मना धाळनारले स्वीकार करस.” या गोष्टी सांगाणा नंतर येशु आत्मा मा गैरा दुखी हुईना आणि आपला शिष्यस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, कि तुमना मधून एक मले धरावीन.” शिष्य हई शक करत, कि तो कोणा विषय मा सांगस, एक दुसरा कळे देखू लागणत. तेना शिष्य मधून एक जेनावर येशु प्रेम करस, येशु ना बाजुमा बठेल शे. तव शिमोन पेत्र नि तेना कळे इशारा करीसन विचार, “सांग त, तो कोणा विषय मा सांगस?” तव तेनी येशु कळे वाकीसन विचार, “हे प्रभु, तो कोण शे?” येशु नि उत्तर दिधा, “जेले कटोरा मा हई भाकर ना तुकळा डुबाईसन देसू, तोच शे” आणि येशु नि तो तुकळा कटोरा मा डुबाईसन शिमोन ना पोऱ्या यहूदा इस्कर्योत ले दिधा. आणि जसा यहूदा नि भाकर ना तुकळा खायना, तव येशु नि तेले सांग, “जे तू करणार शे ते जल्दी कर.” त्याच टाईम ले सैतान तेनामा घुशी ग्या. पण बठणारास मधून दुसरा शिष्य कोणी बी नई जान कि तेनी हई गोष्ट तेले कसा साठे सांगी. यहूदा इस्कर्योत कळे थैली ऱ्हाहत होती, एनासाठे कोणी-कोणी समज, कि येशु तेल सांगस, कि जे काही आमले सन ना साठे पायजे ते विकत लीले, व हई कि गरीबस्ले काही दि देवूत. भाकर ना तुकळा खावाना नंतर यहूदा इस्कर्योत लगेच भायेर चालना गया, आणि रात्र ना टाईम होता. जव तो भायेर चालना गया, त येशु नि सांग, “आते माणुस ना पोऱ्या नि महिमा हुयेल शे, आणि परमेश्वर नि महिमा तेना द्वारे हुयनी.” जर परमेश्वर नि महिमा तेना द्वारे हुयनी, त परमेश्वर बी तेले आपला मा महिमावंत करीन आणि तो लगेच करीन. हे पोर, मी आजून थोडा टाईम तुमना जोळे शे, मंग तुमी मले झामलश्यान, आणि जसा मनी यहुदीयास्ले सांग, “जठे मी जास, तठे तुमी नई येवू सकत, तसाच मी आते तुमले बी सांगस. मी तुमले एक नवीन आज्ञा देस, कि एक दुसरा वर प्रेम करा, त्याच प्रकारे जसा मी तुमना शी प्रेम करस, तसाच तुमी बी एक दुसरा शी प्रेम करा. जर तुमी एक दुसरा शी प्रेम करशात, त सर्वा जानी लेतीन, कि तुमी मना शिष्य शेतस.” शिमोन पेत्र नि तेले विचार, “गुरुजी, तू कोठे जास?” येशु नि उत्तर दिधा, “जठे मी जास, तठे तू आते मना मांगे नई येवू सकस, पण येणा नंतर मन मांगे येशीन.” पेत्र नि तेले सांग, “गुरुजी, आते मी तुना मांगे काब नई येवू सकस? मी त तूनासाठे मराणा साठे भी तयार शे.” येशु नि उत्तर दिधा, “काय तू मनासाठे मरशीन? मी तुले खरोखर सांगस, कोंबळा ना बांग देवाना पयले तू तीन सावा सांगशीन कि तू मले नई ओयखस.” “तुमना मन दुखी नई होवो, तुमी परमेश्वर वर विश्वास ठेवतस मनावर बी विश्वास ठेवा. मना बाप ना घर मा गैरी राहाले जागा शे, जर नई राहाती, त मी तुमले सांगी देता. कारण कि मी तुमना साठे जागा तयार कराले जाई ऱ्हायनु. मना जावाना आणि तुमना साठे जागा तयार कराना नंतर मी परत ईसन तुमले मना संगे ऱ्हावाले लिजासु, कारण कि जठे मी ऱ्हास तठे तुमी बी राहा. तुमले माहित शे जठे मी जास, तुमले तठला रस्ता माहित शे.” थोमा नि तेस्ले सांग, “गुरुजी, आमले नई माहित कि तू कोठे जास, त रस्ता कसकाय जानसुत?” येशु नि तेस्ले सांग, “मार्ग आणि खरेपणा आणि तो जो जीवन देस मीच शे, बिगर मना द्वारे कोणीच परमेश्वर बाप ना जोळे नई पोहचू सकत. जर तुमी मले ओयखतात, त मना बाप ले बी ओयखशात. आणि आते पासून तेले ओयखतस, आणि तेले देखेल बी शेतस.” फिलिप्प तेले सांग, “गुरुजी, बाप ले आमले दाखाळ, त आमी संतृष्ट हुई जासुत.” येशु नि तेले सांग, “हे फिलिप्प, मी इतला दिन पासून तुमना संगे शे, काय तू मले नई ओयखस?” जेनी मले देखेल शे तेनी बाप ले देखेल शे, तू काब सांगस कि परमेश्वर बाप ले आमले दाखाळ? परमेश्वर बाप मना मा ऱ्हास, आणि मी परमेश्वर मा ऱ्हास, काय तू हय गोष्ट वर विश्वास नई करस, ह्या गोष्टी ज्या तुमले सांगस, मी स्वता कळून काही नई करू सकत, पण परमेश्वर बाप मना मा ऱ्हायसन तेच करस जी तेनी ईच्छा शे. मना विश्वास करा, कि मी बाप मा शे, आणि बाप मना मा शे, नईत ज्या चमत्कार मनी करेल शे, त्याच मुळे मना विश्वास करा. मी तुमले खरोखर सांगस, “कि जो मनावर विश्वास करस, हय काम जे मी करस तो बी करीन, पण एनातून बी मोठा काम करीन, कारण मी बाप ना जोळे जास.” आणि जे काही तुमी मना नाव वर मांगशान, तेच मी करसू कि पोऱ्या ना द्वारे बाप नि महिमा हो. जर तुमी मना नाव कण काही मांगशान, त मी तेले करसू. “जर तुमी मना शी प्रेम करतस, त मनी आज्ञास्ना पालन करशान.” मी बाप ले विनंती करसू, आणि तो तुमले एक आजून मदत करणारा दिन, कि तो कायम तुमना संगे राहीन. पण तो पवित्र आत्मा शे, जो परमेश्वर ना बारामा सत्य ले सांगस. हय पवित्र आत्मा शे जेले संसार ना लोक स्वीकार नई करतस, कारण त्या तेले देखू नई सकस, आणि नई तेले जानस तुमी तेले जानतस, कारण तो तुमना संगे ऱ्हास, आणि तो तुमना मधमा ऱ्हास. “मी तुमले अनाथ नई सोडाव, मी तुमना जोळे परत येसू. आणि थोडाच टाईम ऱ्हाईजायेल शे, कि संसार ना लोक मले नई देखाव, पण तुमी मले देखशान, कारण मी परत जित्ता हुई जासू, आणि एनासाठे तुमी बी जीवीत राहशान. जव मी परत जित्ता हुई जासू, त तुमी जानशान, कि परमेश्वर मना मा ऱ्हास, आणि मी परमेश्वर मा ऱ्हास, आणि तुमी मना मा ऱ्हातस आणि मी तुमनामा. ज्या मनी आज्ञास्ले ओयखस, आणि तो तेस्ना पालन करस, तोच मना शी प्रेम करस, आणि जो मना शी प्रेम करस, तेनावर मना बाप प्रेम करीन, आणि मी तेनाशी प्रेम करसू, आणि मी स्वता ले तेनावर प्रगट करसू.” शिष्यस मधून एक शिष्य जेना नाव यहूदा होता पण तो यहूदा जो इस्कर्योत नई होता, त्या यहूदा नि येशु ले विचार, “गुरुजी, तू स्वता ले आमना वर काबर प्रगट करस आणि संसार ना लोकस वर नई?” येशु नि तेले उत्तर दिधा, “मी स्वता ले असा लोकस वर प्रगट कराना देखस ज्या मना शी प्रेम करतस, आणि ज्या मनी शिक्षा ना पालन करतस, आणि मना बाप तेनावर प्रेम करीन, आणि आमी तेना जोळे येसुत, आणि तेना संगे ऱ्हासुत.” जो मना शी प्रेम नई करस, तो मनी शिक्षा ना पालन नई करस, आणि जी शिक्षा तुमी आयकतस, ते मना नई पण मना बाप ना शे, जेनी मले धाळेल शे. “ह्या गोष्टी मी तुमना संगे ऱ्हायसन तुमले सांगेल शे. पण मदत करणारा म्हणजे पवित्र आत्मा जेले बाप मना अधिकार ना संगे धाळीन, तो मदत करणारा तुमले सर्वा गोष्टी सिखाडीन, आणि जे काही मी तुमले सांगेल शे, ते सगळ तुमले आठवण देवाळीन.” मी तुमले शांती देस म्हणजे ती शांती जी मना जोळे शे. हय ती शांती नई जी संसार देस, तुमना मन दुखी नई हो आणि घाबरू नका. तुमी आयकात, कि मनी तुमले सांग, मी जास आणि तुमना जोळे परत येसू, जर तुमी मनावर प्रेम करतस, त या गोष्टी वर बी खुश होतात, कि मी बाप ना जोळे जास. कारण कि बाप मनातून महान शे. आणि आते मी ह्या सर्वा गोष्टी होवाना पयले तुमले सांगी दिएल शे, कि जव ते हुईजान, त तुमी मनावर विश्वास करा. मना कळे तुमना संगे बोलाले जास्त टाईम नई वाचेल शे, कारण कि सैतान या संसार ना सरदार इरायना, आणि मनावर तेना काहीच अधिकार नई. पण हई एनासाठे होस कि संसार ना लोकस्ले माहित पडो कि मी बाप शी प्रेम करस, आणि ज्या प्रकारे बाप नि मले आज्ञा दिधी, मी तसाच करस. उठा, आठून चाल. “खरी दाखलता मीच शे, आणि मना बाप शेतकरी शे.” प्रत्येक डंग जी मना शी जोळायेल शे, आणि फय नई देत, तो तेले कापी टाकस, आणि जी डंग फय लयस तेले तो छाटस कारण कि जास्त फय दिन. तुमी त्या शिक्षा मुळे जे मनी तुमले सांगाले शे, छाटाइ जायेल शेतस. तुमी मना मा ऱ्हातस, आणि मी तुमना मा शे. जशी डंग दाखलता मा नई ऱ्हास, त स्वता फय देवू सकत नई, त्याच प्रकारे, तुमी काही बी चांगल नई करू सकतस, जर तुमी मना मा बनीसन नई ऱ्हातस. मी दाखलता शे, तुमी फांद्या शेतस, जे मना मा ऱ्हातस, आणि मी तेनामा, त तो गैरा फळ लयस, कारण कि मनातून आल्लग हुईसन तुमी काही बी नई करू सकतस. जर कोणी मना मा नई ऱ्हास, त तेले कापीसन फेकामा येस, जव त्या फांद्या सुकी जातस, त तेस्ले गोया करीसन चेटाळी टाकतस. जर तुमी मन मा बनीसन राहश्यान, आणि मनी शिक्षा तुमना मा बनीसन राहीन, त जे काही तुमी बाप कळून मांगशान त बाप तुमना साठे करीन. मना बाप नि महिमा एना कणच होस, कि तुमी गैरा फय लयोत, तरच तुमी मना शिष्य ठरश्यान. जसा बाप नि मना शी प्रेम ठेव, तसाच मनी तुमना शी प्रेम ठेव, मना प्रेम मा बनीसन राहा. जर तुमी मनी आज्ञा ना पालन करतस, त मना प्रेम मा बनीसन राहशान, जसा कि मनी आपला बाप नि आज्ञा ना पालन करेल शे आणि तेना प्रेम मा बनीसन ऱ्हास. मी ह्या गोष्टी तुमले एनासाठे सांगेल होता, कि मना आनंद तुमना मा ऱ्हावो, आणि तुमना आनंद परिपूर्ण हुई जावो. “मनी आज्ञा हई शे, कि जसा मी तुमना शी प्रेम करस, त्याच प्रमाणे तुमी बी एक दुसरा वर प्रेम करा, एक माणुस ना साठे आपला मित्र ले हय दाखाळाले कि तो तेस्ना संगे प्रेम ठेवस, सर्वास्तून चांगला रस्ता हवू शे कि तो तेस्ना साठे मरी जावो.” जे काही आज्ञा मी तुमले देस, जर तेले करा, त तुमी मना मित्र शेतस. आते पासून मी तुमले दास नई सांगाव, कारण कि दास ले माहित नई, कि तेना स्वामी काय करस, पण मी तुमले मित्र सांगेल शे, कारण कि मी ज्या गोष्टी आपला बाप कण आयकी, त्या सर्वा तुमले सांगी टाक. तुमी मले नई निवाळ पण मनी तुमले निवाळेल शे, आणि तुमले ठराव कारण कि तुमी जायसन फय लयोत, आणि तुमना फय बनीसन राहोत, कारण कि तुमी मना शी संबंध ठेवतस. या गोष्ट नि आज्ञा मी तुमले एनासाठे देस, कि तुमी एक दुसरा वर प्रेम करा. जर संसार ना लोक तुमना शी द्वेष ठेवतस, त तुमले माहित शे, कि तेस्नी तुमना तून पयले मना शी द्वेष ठेवनत. जर तुमी ह्या संसार ना लोकस सारखा ऱ्हातात, त संसार ना लोक तुमना वर प्रेम करतात, पण या मुळे कि तुमी संसार ना लोक नई, तुमले संसार ना लोकस मधून निवाडी लीएल शे, कारण कि संसार ना लोक तुमना शी द्वेष करस. हई ध्यान मा ठेवा कि जे मनी तुमले सांगेल शे, दास आपला स्वामी प्रेक्षा मोठा नई होस. तेले ध्यान मा ठेवजा, जर तेस्नी मले त्रास दिधा, त तुमले बी त्रास देतीन, जर तेस्नी मनी शिक्षा ना पालन करणात त तुमनी बी पालन करतीन. पण त्या हई सगळ काही तुमना संगे करतीन कारण कि तुमी मना शिष्य शेतस आणि त्या मना धाळनारा ले बी नई ओयखतस. कदी मी नई येतू, आणि तेस्नाशी नई बोलतू, त त्या पापी नई ठरतात पण आते तेस्ले तेस्ना पाप ना साठे काही बहाणा नई. जो मना शी द्वेष ठेवस, तो मना बाप संगे द्वेष ठेवस. जर मी तेस्ना मा त्या चमत्कार नई करता, जे आजून कोणीच नई करत त्या पापी नई ठरतात, आते त तेस्नी ज्या मनी चमत्कार ना काम करेल शे देखनात, तरी बी तेस्नी मना आणि मना बाप ना द्वेष करणात. हय त्या वचन ले पूर्ण करस जे परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, तेस्नी बिगर कारण ना मना शी घृणा करणात. मी बाप कळून तुमना जोळे मदत करणारा धाळसू. ती आत्मा जी बाप कळून ईन, आणि जे सत्य शे तेले प्रगट करीन. जव तो ईन, त तो तुमले मना बारामा सांगीन. आणि तुमी संसार ना लोकस्ले मना बारामा सांगश्यान, कारण कि तुमी सुरुवात पासून मना संगे शेतस. “ह्या गोष्टी मनी तुमले एनासाठे सांगेल शे कि तुम्हना विश्वास कमजोर नई होवो. त्या तुमले प्रार्थना घर मधून भायेर करतीन, कारण कि तो टाईम ईऱ्हायना, कि जो कोणी तुमले मारी टाकीन हय समजीन, कि असा करावर तो परमेश्वर नि सेवा करस.” आणि त्या हय तुमना संगे एनासाठे करतीन कि नईत तेस्नी बाप ले ओयख आणि नईत मले ओयखतस. पण ह्या गोष्टी मनी एनासाठे तुमले सांगेल होता, कि जव त्या गोष्टीस्ना पुरा होवाना टाईम ईन त तुमले आठवण येवो, कि मनी तुमले पयलेच सांगी दियेल होता, जव तुमी सुरुवात मा मना शिष्य बननात त ह्या गोष्टी मनी तुमले एनासाठे नई सांगी कारण कि मी तुमना संगे होता. आते मी आपला धाळनारा जोळे जाईऱ्हायनु, आणि तुमना मधून कोणी मले नई विचारतस, कि मी कोठे जास? पण मनी ज्या गोष्टी तुमले सांगणा, एनासाठे तुमना मन उदास हुई जायेल शे. तरी बी मी तुमले खर सांगस, कि मन जावान तुमाना साठे चांगल शे, कारण कि जर मी नई जानार, त तो मदत करणारा तुमना नई येवाव, पण जर मी जासू, त तेले तुमना जोळे धाळसू. तो ईसन संसार ना लोकस्ले पाप, धार्मिकता आणि परमेश्वर ना न्याय ना बारामा साबित करीन कि त्या चूकीन शे. तो हई साबित करीन कि त्या पाप ना बारामा चूकीन शेत कारण कि त्या मनावर विश्वास कराले नकार करतस, तो हई साबित करीन कि त्या धार्मिकता ना बारामा चुकीना शे, कारण कि मी बाप जोळे जास, आणि तुमी मले परत नई देखावत. तो हई साबित करीन कि त्या न्याय ना बारामा चुकीना शे, कारण कि सैतान जो संसार ना सरदार शे दोषी ठरायेल शे. “मी तुमले आजून बी गैरा गोष्टी सांगानी ईच्छा ठेवस, पण आते तुमी नई समजी सकाव.” पण जव पवित्र आत्मा ईन जो सर्वा सत्य मा तुमले रस्ता दाखाळीन, कारण कि तो आपला अधिकार वर नई, पण तो परमेश्वर कळून जे आयकीन तेच सांगीन, आणि घडणारी गोष्टी तुमले सांगीन. तो मनी महिमा करीन, कारण कि जे तेले मना कळून भेटेल शे, तो तुमले तेच दाखाडीन परमेश्वर नि सर्व वस्तू मना हात मा सोपेल शे, एनासाठे मनी सांग, कि पवित्र आत्मा जे काही मना कळून लेस तो तुमना वर प्रगट करीन. “थोडाच टाईम मा तुमी मले नई देखाव, आणि मंग थोडाच टाईम मा तुमी मले देखशान” तव तेना कईक शिष्यस्नी आपस मा सांगणात, “हय काय शे, जे तो आमले सांगस, थोडा टाईम नंतर तुमी मले नई देखाव, आणि मंग थोडा टाईम नंतर तुमी मले देखशयान?” आणि तेना सांगाणा अर्थ काय शे कि मी बाप ना जोळे जास? तव तेस्नी सांग, “हय, थोडाच टाईम सांगस, तेना काय अर्थ शे? आमले नई माहित कि काय सांगस.” येशु नि हय जानीसन, कि त्या मले ह्या गोष्ट ना अर्थ विचाराना देखतस, तेस्ले विचार, “काय आपस मा मनी ह्या गोष्ट ना बारामा विचार पूस करतस, थोडाच टाईम मा मले नई देखाव, आणि मंग थोडाच टाईम मा तुमी मले देखशयान?” मी तुमले खरोखर सांगस, कि तुमी मोत ना नंतर रळशान, पण संसार ना लोक आनंद करतीन, तुमले दुख हुईन, पण जव तुमी मले परत जित्ता देखशात तुमना दुख आनंद मा बदली जाईन. जव बाई ना प्रसव ना टाईम येस, त ती गैरा पीडा मा ऱ्हास, पण ती बाळ ले जन्म दि देस, त ती हई विचार करीसन आनंद करस कि जग मा एक बाळ उत्पन्न हुयना, त्या संकट ले परत आठवण नई करत. याच प्रमाणे तुमले भी आते त दुख शे, पण मी तुमले परत भेटसू, आणि तुमना मन आनंदित हुई जातीन, आणि तुमना आनंद तुमना कळून कोणीच नई हिसकवाव. त्या टाईम ले तुमी मले काही नई विचाराव, मी तुमले खरोखर सांगस, जव तुमी मना नाव कण बाप कळून काही मांगशान, त तो तुमले दिन. आते लोंग तुमनी मना अधिकार कण बाप कळे काही नई मांगनात, मांगशात तर भेटीन, कारण कि तुमाना आनंद पूर्ण हुई जावो. “मनी ह्या गोष्टी तुमले दाखलास्मा सांगेल शे, पण तो टाईम येस, कि मी तुमले दाखलास्मा परत नई सांगाव पण उघाडीसन तुमले बाप ना बारामा सांगसु. त्या टाईम ले तुमी मना नाव कण मांगशात, आणि मले मना बाप ले सांगानी गरज नई पडाव कि तो ते जे तुमी मांगतस तुमले देवो. कारण कि मना बाप त स्वताच तुमना शी प्रेम करस, कारण कि तुमी मनावर प्रेम करतस, आणि हय बी विश्वास करणात, कि मी बाप कळून एयेल शे. मी बाप कळून जग मा एयेल शे, परत जग ले सोडीसन बापा जोळे जासू.” तेना शिष्यस्नी सांग, “देख, आते त तू स्पष्ट सांगस, आणि कोणता दाखला नई सांगस. आते आमी जानी लीयेल शे, कि तुले सगळ काही माहित शे, आणि कोले तुनाशी प्रश्न विचारानी गरज नई, एनाशी आमी विश्वास करतस, कि तू परमेश्वर कळून एयेल शे.” येशु नि तेस्ले सांग, “आखरी मा काय तुमी आते विश्वास करस?” देखा तो टाईम येस, पण ईजायेल शे, कि तुमी सर्वा गले-पते हुईसन आपला-आपला रस्ता वर चालना जाशान, आणि मले एखटा सोडी देशान, पण मले धाळनारा मना संगे शे, तेनी मले एखटा नई सोडणा. मनी ह्या गोष्टी तुमले एनासाठे सांग, कि तुमले मना शिष्य होवा मुळे शांती भेटो, संसार मा तुमले त्रास सहन करना पडीन, पण धीर धरा, मनी सैतान ले हराई दियेल शे. येशु नि आपला शिष्यस्ले ह्या गोष्टी सांगा नंतर वरे स्वर्ग कळे देखीसन सांग, “हे बाप, तो टाईम ईजायेल शे, आपला पोऱ्या नि महिमा करो, कि मी, पुत्र बी तुनी महिमा करो.” आणि तुनी तेले सर्वा लोकस्वर अधिकार दिधा, कि ज्या लोकस्ले तुनी मले दियेल शे, त्या सर्वा लोकस्ले मी कायम ना जीवन देवू. कायम ना जीवन हवू शे, कि त्या लोक तू एकमात्र खरा परमेश्वर ले आणि मले वयाखा कि मी येशु ख्रिस्त शे, जेले तुनी धाळेल शे. जे काम तुनी मले कराले दियेल होता, तेले पुरा करीसन मी पृथ्वी वर तुनी महिमा करेल शे. आणि आते, हे बाप, तू आपली उपस्थिती मा मनी महिमा कर, ती महिमा जी संसार ना उत्पत्ती ना पयले पासून तुना संगे राहातांना मना जोळे होती. मनी तुना नाव त्या लोकस्ले सांगेल शे, कि तू कोण शे, जेस्ले तुनी जग मधून मले दिधात. त्या तुना होतात आणि तुनी तेस्ले मले दिधा आणि तेस्नी तुना वचन ना पालन कर. आते त्या समजी जायेल शे कि जे काही शिक्षण तुनी मले दियेल शे, सर्वा तुना कळून शे. कारण कि ज्या गोष्टी तुनी मले पोहचाळी दिधी, मनी तेस्ले पोहचाळी दिधा आणि तेस्नी त्या संदेश ले स्वीकार कर, आणि खर-खर समजी जायेल शेतस, कि मी तुना कळून एयेल शे, आणि हय विश्वास करेल शे तुनीच धाळ. मी ह्या जग ना लोकस साठे विनंती नई करस, पण मी तेस्नाच साठे विनंती करस, जेस्ले तुनी मले दियेल शे, कारण कि त्या तुना शेतस. आणि जे काही तुनी मले दियेल शे ते सगळ तून शे, आणि जे तून शे ते मन शे, आणि तेस्ना कण मनी महिमा प्रगट हुयेल शे. आते मी संसार मा नई ऱ्हावाव, पण मना शिष्य ह्या संसार मा ऱ्हातीन, मी तुना जोळे ईऱ्हायनु, हे पवित्र बाप आपला नाव ना द्वारे तेस्नी रक्षा कर जेस्ले तुनी मले दियेल शे, कि जसा आमी एक शेतस, तसाच त्या बी एक हुई जावोत. जव मी तेस्ना संगे होतु त मनी तुना त्या नाव कण जे तुनी मले दियेल शे, तेस्नी रक्षा करी मनी तेस्नी देखरेख करी आणि त्या जेस्नी विनाश ना रस्ता ले निवाळ तेस्ले सोळीसन आखो कोणीच नाश नई हुईनात, एनासाठे कि परमेश्वर ना पुस्तक मा जे लिखेल शे ते पूर हो. पण मी तुना जोळे एस, आणि ह्या गोष्टी संसार मा राहातांना सांगस, कि त्या मना आनंद कण पूर्णपणे भरी जातीन. मनी तुना संदेश तेस्ले दियेल शे, आणि संसार ना लोकस्नी तेना संगे घृणा कर, कारण कि जसा मन संसार संगे नात नई, तसाच तेस्ना बी ह्या संसार संगे नात नई. मी हय विनंती नई करत, कि तू तेस्ले संसार मधून उचली ले, पण हय कि तू तेस्ले त्या सैतान पासून सुरक्षित ठेव. जसा मना ह्या संसार संगे नात नई, तसाच तेस्ना बी ह्या सांसार संगे नात नई. तुना वचन सत्य शे, एनासाठे तेस्ले सत्य ना द्वारे पवित्र बनाव. जस तुनी मले संसार मा धाळ, तसाच मनी बी तेस्ले संसार मा धाळ. आणि जसा तेस्ना फायदा साठे मी स्वता ले पवित्र करस, एनासाठे कि त्या बी सत्य ना द्वारा पवित्र करामा येवोत. “मी फक्त आपला शिष्यस साठे विनंती नई करत, पण सर्वास साठे बी ज्या लोक मना शिष्यस्ना संदेश ले आयकीसन मनावर विश्वास करतीन, कि त्या सर्वा एक होवोत. बाप जसा तू मना मा शे, आणि मी तुना मा शे, तसाच त्या बी आमना मा एकत्र होवोत, एनासाठे ह्या संसार ना लोक विश्वास करोत कि तुनीच मले धालेळ शे. ती महिमा जी तुनी मले दियेल शे, मनी तेस्ले दियेल शे कि त्या एकत्र होवोत, जसा आमी एक शेतस. मी तेस्ना मा आणि तू मना मा, एनासाठे कि त्या सिद्ध हुईसन एक हुई जावोत, आणि संसार समजो कि तुनीच मले धाळेल शे, आणि जसा तुनी मना संगे प्रेम ठेव, तसाच तेस्ना संगे बी प्रेम ठेव. हे बाप, मनी ईच्छा शे कि जेस्ले तुनी मले दियेल शे, जठे मी शे, तठे त्या बी मना संगे राहोत कि त्या मनी त्या महिमा ले देखोत जी तुनी मले दियेल शे, कारण कि तुनी संसार नि उत्पत्ती ना पयले मना संगे प्रेम ठेव. हे धार्मिक बाप, संसार ना लोकस्नी मले नई वयख पण मनी तुले वयखेल शे, आणि ह्या शिष्यस्नी बी वयख कि तुनीच मले धाळ. मनी तेस्ना वर प्रगट करेल शे कि तू कोण शे, आणि प्रगट करत ऱ्हासु कि जे प्रेम तुले मना शी होता, तेच प्रेम तेस्ना मा बी राहो, आणि मी तेस्ना मा बनीसन राहू.” येशु प्रार्थना खतम करीसन आपला शिष्यस्ना संगे किद्रोन नाला ना टेकळी ना पार ग्या, त्या जागा वर एक बगीचा होता, जेनामा तो आणि तेना शिष्य ग्यात. आणि तेना धरावनारा यहूदा इस्कर्योत ले बी ती जागा माहित होती, कारण कि येशु आपला शिष्य ना संगे तठे जात होता. तव यहूदा सैनिक नि तुकळी आणि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि परूशी लोकस कळून मंदिर ना पहारे करीस्ले लिसन दिवास्ले आणि मशालस्ले आणि हत्यार लिसन तठे उना. तव येशु नि त्या सर्वा गोष्टस्ले जी तेना संगे होणार होती, समजीसन निघणा आणि तेस्ले सांगू लागणा, “तुमी कोले झामलतस?” तेस्नी तेले उत्तर दिध, “नासरेथ नगर ना येशु ले.” येशु नि तेस्ले सांग, “मी शे.” आणि तेले धरवणारा यहूदा इस्कर्योत बी तेस्ना संगे उभा होता. येशु न हय सांगताच, “मी शे,” त्या मांगे वसरीसन जमीन वर पळीग्यात तव तेनी परत तेस्ले विचार, “तुमी कोले झामलतस?” त्या सांगणात, “नासरेथ ना येशु ले.” येशु नि उत्तर दिध, “मनी त तुमले सांगी दियेल शे, कि मी शे, जर तुमी मले झामलतस त दुसरा माणसस्ले जावू द्या.” अस एनासाठे हुयन कि येशु नि जे पयले सांगेल होत, ते खर हुई जावो, “जेस्ले तुनी मले दिधा, तेस्ना मधून मनी एक ले बी नई दवाळ.” शिमोन पेत्र नि तलवार, जी तेना कळे होती, तानी आणि महा यहुदी पुजारी ना दास वर चालाईसन, तेना उजवा कान कापी टाक, त्या दास ना नाव मल्खी होत. तव येशु नि पेत्र ले सांग, “आपली तलवार ले दूर कर. जो कटोरा बाप नि दिएल शे, मले तेले पिवाना जरुरी शे.” तव शिपाई आणि तेस्ना सुभेदार आणि यहुदी लोकनस्ना मंदिर ना पहारेकरीस्नि येशु ले धरीसन बांधी लीधा, आणि पयले तले हन्ना जोळे लीग्यात कारण कि तो त्या वर्ष ना महा यहुदी पुजारी केफा ना सासरा होता. हवू तो केफा होता, जेनी यहुदीस्ले सल्ला दियेल होता, कि आमना लोकस साठे एक माणुस ना मराण चांगला शे. शिमोन पेत्र आणि एक आखो शिष्य बी येशु ना मांगे चालू लागणत, हवू शिष्य महा यहुदी पुजारी ना ओयखना होता, आणि येशु ना संगे महा यहुदी पुजारी ना आंगण मा ग्या. पण पेत्र बाहेर दरवाजा वर उभा ऱ्हायंना, तव तो दुसरा शिष्य जो महा यहुदी पुजारी ना ओयखना होता, बाहेर निघणा, आणि एक दासी ले सांगीसन जी दरवाजा वर उभी होती, पेत्र ले मधमा लई उना. त्या दासी नि जी दरवाजा वर उभी होती, पेत्र ले सांग, “काय तू बी ह्या माणुस ना शिष्य मधून शे?” तेनी सांग, “मी नई शे.” दास आणि मंदिर ना पहारेकरी हिवाया मुळे कोयसा तपाळी सन उभा हुईसन विस्तोले तापत होतात, आणि पेत्र बी तेस्ना संगे उभा राहीसन तापत होता. तव महा यहुदी पुजारी नि येशु ले तेना शिष्य ना विषय मा आणि तेना उपदेश ना विषय मा विचार. येशु नि तेले उत्तर दिधा, “मी सर्वास्ना संगे मोक्या बोलनु, मी प्रार्थना घरस्मा आणि परमेश्वर ना मंदिर मा जठे यहुदी लोक एकत्र होत ऱ्हातस कायम प्रवचन सांग आणि गुप्त मा काहीच नई सांग.” तू मले हवू प्रश्न काब विचारस? आयकनारास्ले विचार, कि मनी तेस्ले काय सांग, देख तेस्ले माहित शे, कि मनी काय काय सांग. जव तेनी हई सांग, त मंदिर ना राखोयास्ना मधून एक नि जो जोळे उभा होता, येशु ले एक थापड मारीसन सांग, “काय तू महा यहुदी पुजारी ले या प्रकारे उत्तर देस?” येशु नि तेले विचार, “जर मनी वाईट सांग, त मले सांग कि हय काय होत, पण जर कदी चांगल सांग, त मले काबर मारस?” तव हन्नानी तेले बांधेलच केफा महा यहुदी पुजारी कळे धाडी टाक. शिमोन पेत्र उभा हुईसन विस्तोले तापत होता. तव तेस्नी तेले विचार, “काय तू बी तेना शिष्यस मधून शे?” तेनी नकार दिसन सांग, “मी नई शे.” महा यहुदी पुजारी ना दास मधून एक जो तेना कुटुंब ना होता, जेना कान पेत्र नि कापेल होता, सांगणा, “काय मनी तुले येशु ना संगे बारीमा नई देख?” पेत्र नि परत नकार आणि लगेच कोंबळानी बांग दिधी. आणि त्या येशु ले केफा कळून रोमी राज्यपाल ना पिलात ना महल ना आंगण मा लीग्यात आणि तो सक्काय ना टाईम होता, पण त्या स्वता महल ना मधमा नई ग्यात. येणा कारण हई शे कि जर त्या मधमा जातात, त अशुद्ध हुई जातात आणि वल्हांडण सन ना जेवण मा भागी नई होवू सकत. तव पिलात तेस्ना कळे बाहेर निघी उना आणि सांगणा, “तुमी ह्या माणुस वर कोणती गोष्ट ना आरोप लावतस?” तेस्नी तेले उत्तर दिधा, “जर तो कुकर्मी नई ऱ्हाता त आमी तेले तुना जोळे नई लयतूत.” पिलात नि तेस्ले सांग, “तुमीच एले लीजायसन आपला मोशे ना नियम ना प्रमाणे तेना न्याय करा.” यहुदी पुढारीस्नी तेले सांग, “आमले कोले मृत्युदंड देवानी परवानगी नई शे.” हई एनासाठे हुयन, कि येशु नि ती गोष्ट पूर्ण हो जी तेनी हई दाखाळतांना सांगेल होती, कि कोणता प्रकारे तेन मरण राहीन. तव पिलात परत महल ना मधमा ग्या, आणि येशु ले मधमा बलाईसन विचार, “काय तू यहुदी लोकस्ना राजा शे?” येशु नि उत्तर दिधा, “काय तू हई गोष्ट आपला कळून सांगस कि दुसरास्नी मना विषय मा तुले सांग?” पिलात उत्तर दिधा, “तुले माहिती शे कि मी यहुदी नई शे. तुनीच जाती आणि मुख्य यहुदी पुजारीस्नी तुले मना हात मा सोप. तुनी काय करेल शे?” येशु नि उत्तर दिधा, “मना राज्य ह्या जग ना नई, जर मना राज्य ह्या जग ना राहता, त मना मांगे चालणारा लोक लळाई करतात, कि मी यहुदी पुढारीस्ना द्वारे अटक नई करावामा येता, पण मना राज्य आठला नई.” पिलात नि तेले सांग, “त काय तू राजा शे?” येशु नि उत्तर दिधा, “तू सांगस, कारण मी राजा शे, मना जन्म लेवाना आणि संसार मा येवाना कारण हय शे, कि मी सत्य ना बारामा शिकाळी सकू. सत्य ना पालन करणारा सर्वा मना गोष्टी मानतस.” पिलात नि तेले सांग, “सत्य काय शे?” आणि हई सांगीसन तो परत यहुदी पुढारीस कळे निघी ग्या, आणि तेस्ले सांग, “मी त तेनामा काही दोष नई देखस. पण तुमनी हई रिती शे कि मी वल्हांडण ना सन मा तुमना साठे एक कैदी ले सोडी देवू. त काय तुमनी ईच्छा शे, कि मी तुमना साठे यहुदी लोकस्ना ना राजा ले सोळी देवू?” तव तेस्नी परत आवज दिसन सांग, “येले नई पण आमना साठे बरब्बा ले सोळी दे.” आणि बरब्बा डाखू होता. एनावर पिलात नि शिपाईस्ले आज्ञा दिधा, कि येशु ले लीजावा आणि तेले कोडा मारा. आणि शिपाई नि काटाणा मुकुट गुंथीसन तेना डोका वर ठेवा आणि तेले रंगीत लांबझगा घाला. तेना जोळे ईसन तेना मजाक उळाईसन सांगू लागणत, “ओ यहुदी लोकस्ना राजा, नमस्कार.” आणि तेले थापड मारात. तव पिलात आजून बाहेर निघीसन लोकस्ले सांगणा, “देखा, मी तेले तुमना कळे आजून बाहेर आनस, कारण तुमी जाना मी काही बी दोष नई देखस.” तव येशु ले काटा ना मुकुट आणि रंगीत लांबझगा घालीसन बाहेर लयामा उना, आणि पिलात तेस्ले सांग, “ह्या माणुस ले देखा.” जव मुख्य यहुदी पुजारी आणि मंदिर ना पहारेकरी तेले देखनत, त जोरमा सांग, “तेले क्रूस वर चढाव, क्रूस वर.” पिलात नि तेस्ले सांग, “तुमीच तेले लिसन क्रूस वर चळावा, कारण कि मले तेनामा दोष नई दिखस.” यहुदी पुढारीस्नी तेले उत्तर दिधा, “आमना जोळे मोशे ना नियम शे, आणि त्या नियम ना नुसार तो मारी टाकाना योग्य शे, कारण तेनी स्वता ले परमेश्वर ना पोऱ्या सांग.” जव पिलात नि हई गोष्ट आयकी त आजून बी गैरा जास्त घाबरी ग्या. आणि मंग महल ना मधमा गया आणि येशु ले विचार, “तू कोठला शे?” पण येशु नि तेले काही बी उत्तर नई दिधा. पिलात नि तेले सांग, “मना शी काब नई बोलस? काय तुले नई माहित कि तुले सोडाना अधिकार मले शे, आणि तुले क्रूस वर चळावाना अधिकार बी मले शे.” येशु नि उत्तर दिधा, “जर तुले परमेश्वर कळून नई देवमा येत, त तुना मनावर काही अधिकार नई राहता, एनासाठे जेनी मले तुना हात मा धरायेल शे तेना पाप जास्त शे.” ह्या मुळे पिलात नि तेले सोडावा ना देख, पण यहुदी पुढारीस्नी गर्दी ओरडी-ओरडीसन सांग, “जर तू येले सोडी देशीन त तू रोमी सम्राट ना मित्र नई, जो कोणी स्वता ले राजा बनावस, तो सम्राट ना विरोध करस.” ह्या गोष्टी आयकीसन पिलात येशु ले बाहेर आनना आणि तो न्याय सिंहासन वर बठना, जो कि दगड ना फरसबंदी नाव ना जागा वर होता, येले इब्री भाषा मा गब्बाथा सांगामा येस. हवू वल्हांडण ना सन ना हाप्ता ना तयारी ना दिन होता, आणि जवळपास दुफार ना टाईम होता, तव तेनी यहुदी लोकस्ले सांगणा, “देखा, हवूच तुमना राजा शे.” पण त्या ओरडीसन सांगू लागनात, “तेले मारी टाक, तेले मारी टाक, तेले क्रूस वर चढाव.” पिलात नि तेस्ले सांग, “काय मी तुमना राजले क्रूस वर चढावू?” मुख्य यहुदी पुजारीस्नी उत्तर दिधा, “सम्राट ले सोळीसन आमना कोणताच राजा नई.” तव पिलात नि येशु ले क्रूस वर चळावा साठे तेस्ना हात मा सोपी टाक, त्या तेले तठून ली ग्यात. तव शिपाहीस्नि येशु ले ताबा मा लीधात. तेस्नी तेले आपला क्रूस स्वता ले उचलाले लाव आणि तेले यरूशलेम शहर ना बाहेर “खोपडी नि जागा” नाव ना जागा वर लीग्यात, जिले इब्री भाषा मा “गुलगुथा” सांगतस. तठे तेस्नी तले आणि तेना संगे आखो दोन माणसस्ले क्रूस वर चढाव, एक ले अथा आणि दुसराले तथा आणि मधमा येशु ले. आणि पिलात नि एक दोष पत्र लिखीसन येशु ना डोका ना वरे क्रूस वर लावाळी टाक, आणि तेनामा हय लिखेल होत, “हवू यहुदी लोकस्ना राजा नासरेथ ना येशु शे.” हय दोष पत्र ले गैरा यहुदी लोकस्नी वाचा कारण कि ती जगा जठे येशु ले क्रूस वर चढायेल होता, यरूशलेम शहर ना जोळे होता, आणि हई इब्री भाषा, रोमी आणि ग्रीक मा लिखेल होत. तव यहुदी लोकस्ना मुख्य यहुदी पुजारीस्नी पिलात ले सांग, “यहुदीस्ना राजा नको लिखू पण कि हई तेनी सांग, मी यहुदीस्ना राजा शे.” पिलात नि उत्तर दिधा, “मनी जे लिखी दिधा ते लिखी दिध, हय बदलावा मा नई येवाव.” शिपाहीस्नि जव येशु ले क्रूस वर चढाई टाकेल होतात, त तेना कपळा लिसन चार भाग करणात, आणि चारी शिपाहीस्नि एक-एक वाटा लीधा, आणि लांबझगा बी ली लीनात, पण तो लांबझगा शियेल नई होता पण वरून त खाले लोंग बनेल कपळा ना एकच तुकळा ना होता. एनासाठे शिपाहीस्नि एक दुसराले सांग, “आमी येले नई फाडूत, पण एनावर चिठ्ठी टाकुत कि तो कोणा हुईन.” हय एनासाठे हुयन, कि परमेश्वर ना पुस्तक नि गोष्ट पूर्ण हो, “तेस्नी मना कपळा आपस मा वाटी लीधा आणि मना कपळास वर चिठ्ठी टाकी.” आणि शिपाहीस्नि असाच कर. पण येशु ना क्रूस ना जोळे तेनी माय आणि तेनी माय नि बहिण मरिया, क्लोपास नि बायको आणि मग्दालीया शहर नि मरिया उभी होती. येशु नि आपली माय आणि त्या शिष्यले जेनावर तो प्रेम करस जोळे उभा देखीसन आपली माय ले सांग, “हे माय, देख, हवू तुना पोऱ्या शे.” तव त्या शिष्यले सांगणा, “देखा, हय तुनी माय शे.” आणि त्याच टाईम तून तो शिष्य तिले आपला परिवार ना सदस्य बनाईसन लीग्या. एना नंतर येशु नि हई जानीसन कि आते सर्व काही पूर्ण होयग्या, एनासाठे कि परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल गोष्ट पुरी होवा साठे सांगणा, “मले तहान लागेल शे.” तठे एक सिरका कण भरीसन एक भांड ठीयेल होता, एनासाठे कोणी तरी सिरका मा भीगाळेल स्पंज ले उंचवटा झाळ ना डंग वर ठीसन तेना तोंड ले लाव. जव येशु नि ते सिरका चाखणा, त सांग, “पूर्ण हुयना,” आणि तेनी मान खाले करीसन जीव सोडी दिधा. आते हवू तयारी ना दिन होता, दुसरा दिन आराम ना दिन व वल्हांडण ना सन दोनी होतात. हवू यहुदी लोकस साठे विशेष दिन होता, आणि तेस्नी ईच्छा नई होती कि या दिन मा शव क्रूस वर राहो. एनासाठे तेस्नी पिलात ले सांगनत कि त्या लोकस्ना पाय तोळाले लाव, कि त्या जल्दी मरी जावोत आणि शवस्ले खाले लई सकोत. एनासाठे शिपाहीस्नि ईसन पयला ना पाय तोळनात तव दुसरा ना बी, ज्या येशु ना संगे क्रूसस वर चळावामा एयेल होतात. पण जव त्या येशु ना जोळे ईसन देखनत कि तो मरी जायेल शे, त तेना पाय नई तोळनात. पण शिपाहीस मधून एक नि भाला कण तेना कुशी मा भोकस्ना, आणि तेना मधून लगेच रक्त आणि पाणी निघना. ज्या माणुस नि हई सगळ देख, तेनी साक्ष दियेल शे, आणि तेनी साक्ष खरी शे, आणि तेले माहित शे, कि खर सांगस. कि तुमी बी येशु वर विश्वास करत ऱ्हावो. या गोष्टी एनासाठे होयनी कि परमेश्वर ना पुस्तक मा जे लिखेल शे ते खर हुई जावो, “तेना कोणताच हाड तोडामा नई येयाव.” मंग परमेश्वर ना पुस्तक मा एक आजून जागा वर लिखेल शे, “जेले कि तेस्नी भोकसेल होत, तेनावर दुष्टी करतीन.” या गोष्टी नंतर अरिमथाई गाव ना योसेफ नि, जो येशु ना शिष्य होता, (पण यहुदी पुढारीस्ले घाबरीसन या गोष्टी ले दपाळी ठेवत होता,) पिलात ले विनंती करना, कि मी येशु ना शव ले लीजावू, आणि पिलात नि तेनी विनंती आयक, आणि तो ईसन तेना शव लीग्या. निकुदेमूस बी जो पयले येशु ना जोळे रात मा जायेल होता. तो जवळ-पास पन्नास सेर (वजन मा कमीत-कमी तेहेतीस किलोग्रॅम) गंधरस आणि एलोवा ना बनायेल मिश्रण लयी उना. तव तेस्नी येशु ना शव ले लीधा आणि यहुदी लोकस्ना गाडा ना रिती नुसार तेले सुगंध द्रव्य ना संगे मलमल ना कपळा ना लांब चादर मा गुंडाय. त्या जागा ना जोळे जठे येशु ले क्रूस वर चळावामा एयेल होता, एक बाग होता, आणि त्या बाग मा एक नवीन कबर होती, जेले पयले कदीच नई वापरेल होत. एनासाठे तेस्नी येशु ना शव ले तीच कबर नि गुफा मा ठीई दिनात कारण ती जोळे होती, आणि तो यहुदी लोकस्ना शब्बाथ ना तयारी ना बी दिन होता. रविवार ना दिन सक्कायमा मरिया जी मग्दालीया नगर नि होती, सक्कायमा अंधार राहतानाच कईक दुसऱ्या बायास संगे कबर वर उणी, आणि दगड ले कबर ना प्रवेश दरवाजा वरून बाजुमा होयल देखनी. तव ती पयनी आणि शिमोन पेत्र आणि दुसरा शिष्य ना जोळे जेनाशी येशु प्रेम करत होता ईसन सांगाले लागणी, “कोणी प्रभु ना शव ले कबर मधून काळी लीजायेल शे, आणि आमले नई माहित, कि ते तेले कोठे ठीएल शे.” तव पेत्र आणि दुसरा शिष्य निघीसन कबर कळे गयात. आणि दोनी संगे-संगे पयत होतात, पण दुसरा शिष्य पेत्र तून जोरमा पयीसन कबर वर पयले पोहोचना. आणि वाकीसन मलमल ना कपळा ना लांब चादर पडेल देखनात, तरी बी तो मधमा नई ग्या. तव शिमोन पेत्र तेना मांगे मांगे पोहचना आणि कबर ना मधमा ग्या आणि जेनाशी तेना शरीर ले झाकेल होतात त्या लांब कपळा ले पडेल देखना. तोंड गुंडाळेल रुमाल जो तेना डोका वर बांघेल होता, कपळा ना संगे पडेल नई पण आल्लग एक जागा वर गुंडाळेल देखात. तव दुसरा शिष्य बी जो कबर वर पयले पोहचेल होता, मधमा गया आणि देखीसन कि येशु मरेल जित्ता हुई जायेल शे, विश्वास करना. परमेश्वर ना पुस्तक मा येशु ना बारामा हय निश्चित रूप कण लिखेल होत, कि तो आपली मोत मधून परत जित्ता हुईन, पण त्या आते लोंग येले समजू नई सकनात. तव ह्या शिष्य आपला घर परत ग्या. पण मरिया रळत कबर ना बाहेर उभी ऱ्हायनी, आणि रळत-रळत कबर कळे वाकीसन, दोन परमेश्वर ना दूत ले धव्या कपळा घालेल एक ले डोका जोळे आणि एक ले पाय जोळे बठेल देखनी, जठे येशु ना मृत शरीर ठीयेल होता. तेस्नी तेले सांग, “ओ बहिण, तू काब रळस?” तेनी तेस्ले सांग, “त्या मना प्रभु ना शव ले उचली लीग्यात आणि मले नई माहित तेले कोठे ठीयेल शे.” हई सांगा नंतर ती मांगे फीरणी आणि येशु ले उभा देखनी आणि नई ओयखनी, कि हवू येशु शे. येशु नि तिले सांग, “ओ बहिण, तू काब रळस? कोले झामलस?” तेनी माळी समजीसन तेले सांग, “ओ महाराज, जर तुनी तेना शव ले उचलेल शे, त मले सांग कि तेले कोठे ठीयेल शे, आणि मी तेले लीजासु.” येशु नि तिले सांग, “मरिया.” तेनी मांगे फिरीसन तेनाशी इब्री भाषा मा सांग, “रब्बुनी.” म्हणजे ओ गुरुजी. येशु नि तिले सांग, “मना पायस्ले नका धरा, कारण कि मी आते लोंग बाप ना जोळे वरे नई गया, पण मना शिष्यस जोळे जाईसन सांगी दे, कि मी मना बाप जो तुमना बी बाप शे आणि मना परमेश्वर, जो तुमना बी परमेश्वर शे. तेना जोळे वरे जाई ऱ्हायनु.” मरिया जी मग्दाली गाव नि होती जायसन शिष्यस्ले सांग, “तेनी प्रभु ले देख आणि प्रभु नि तीना संगे गोष्टी करना.” त्याच रविवार ना संज्याकायले सर्वा शिष्य एक संगे एकत्र हुईनात, तेस्नी दरवाजा बंद करी लीनात कारण त्या यहुदी पुढारीस्ले घाबरेल होतात, तव येशु उना आणि मधमा उभा हुईसन तेस्ले सांग, “तुमले शांती भेटो.” आणि हई सांगीसन तेनी तेस्ले आपला हात आणि आपला क्रूस ना घाव दाखाडा, तव शिष्य येशु ले देखीसन आनंदित हुयनात. येशु नि आजून तेस्ले सांग, “तुमले शांती भेटो, ज्या प्रकारे मना बाप नि मले संसार ना लोकस जोळे धाळ, तसाच मी बी तुमले संसार मा धाळस.” हई सांगीसन तेनी तेस्ना वर फुक आणि तेस्ले सांग, “पवित्र आत्मा ल्या. जेस्ना पाप तुमी माफ करशात त्या तेस्ना साठे माफ करामा येतीन, जेस्ले तुमी ठेवशान, त्या आपला पापस्मा बांधायेल राहतीन.” जव येशु आपला शिष्यस्ना जोळे उनात बारा शिष्यस मधून एक व्यक्ती म्हणजे थोमा जो दिदुम सांगामा येस तेस्ना संगे नई होता. जव थोमा उनात दुसरा शिष्य तले सांगू लागणत, “आमनी प्रभु ले देखेल शे.” तव तेनी तेस्ले सांग, “जठलोंग मी तेना हात ना खिया ना घाव नई देखाव आणि खिया ना घाव मा आपली बोट नई टाकाव आणि तेनी कुशी मा आपला हात टाकीसन नई देखाव तठलोंग मी विश्वास नई कराव, कि तो मरेल मधून जित्ता हुई जायेल शे.” एक हाप्ता नंतर तेना शिष्य परत घर ना मधमा होतात, आणि थोमा तेस्ना संगे होता, आणि दरवाजा बंद होता, तव येशु ईसन आणि मधमा उभा हुईसन सांगणा, “तुमले शांती भेटो.” तव तेनी थोमा ले सांग, “आपली बोट आठे लईसन मना हातस्ले देख, आणि आपला हात लईसन मना कुशी मा टाक आणि शक कराना बंद कर, पण विश्वास कर.” हई आयकीसन थोमा नि उत्तर दिधा, “ओ मना प्रभु, ओ मना परमेश्वर.” येशु नि तेले सांग, “थोमा तुनी त मले देखीसन विश्वास करेल शे. पण धन्य शे त्या ज्या बिगर देखाना मनावर विश्वास करतस.” येशु नि आजून बी गैरा चिन्ह शिष्यस्ना समोर दाखाडा, ज्या ह्या पुस्तक मा लिखेल नई शेतस. पण हई एनासाठे लिखेल शे, कि तुमी विश्वास करत ऱ्हावा, कि येशुच परमेश्वर ना पोऱ्या, ख्रिस्त शे, आणि तेनावर विश्वास करीसन तेना नाव कण कायम ना जीवन भेटो. ह्या गोष्टीस्ना नंतर येशु नि स्वता ले तिबिर्या समुद्र जेले गलील ना समुद्र बी सांगतस तेना तठ वर शिष्यस्ना समोर प्रगट कर, आणि हय या प्रमाणे प्रकट कर. शिमोन पेत्र, थोमा जो दिदुम म्हणावस, गालील जिल्हा ना काना नगर ना नतनयल, जब्दी ना पोऱ्या आणि येशु ना दोन दुसरा शिष्य एकत्र होतात. शिमोन पेत्र नि तेस्ले सांग, “मी मासा धराले जाई ऱ्हायनु.” तेस्नी तेले सांग, “आमी बी तुना संगे येतस.” आणि त्या लगेच निघीसन नाव वर चडनात पण त्या रात ले काहीच नई धरणात. पुलळा दिन सकाय होताच येशु किनारा वर उभा हुयना तरी बी शिष्यस्नी नई ओयखा कि हवू येशु शे. तव येशु नि तेस्ले विचार, “ओ मना मित्रसहोण, काय तुमना जोळे काही खावाले शे?” तेस्नी उत्तर दिध, “नई.” तेनी तेस्ले सांग, “नाव ना उजव्या बाजुमा जाई टाका, त तुमले भेटीन.” तव तेस्नी जाई टाक, आणि आते मासास्नी जास्त मुळे तेले तानू नई सकनात. ह्या साठे त्या शिष्य नि जेनावर येशु प्रेम करत होता पेत्र ले सांग, “हवू त प्रभु शे.” शिमोन पेत्र नि हय आयकीसन कि प्रभु शे, त तेनी आपला त्या कपळा घाली लीधात ज्या तेनी काम कराना टाईम ले काळी दियेल होतात, आणि पाणी मा कुदी ग्या. पण दुसरा शिष्य धाकली नाव वर मासास कण भरेल जाई तानत उनात, कारण कि त्या किनारा पासून जास्त दूर नई, पण शेम्बर मीटर ना आंगे-पांगे होतात. जव त्या किनारा वर उतरणात, त तेस्नी कोयसानी आग, आणि तेनावर मासा ठीयेल, आणि भाकर देखनात. येशु नि तेस्ले सांग, “जो मासा तुमनी आते धरेल शेतस, तेस्ना मधून काही लया.” शिमोन पेत्र नि धाकला नाव वर चळीसन एक शे त्रेपन मोठा मासास कण भरेल जाई ले किनारा वर ताण, आणि इतला मासा होवावर बी जाई नई फाटनी. येशु नि तेस्ले सांग, “या, जेवण करा.” आणि शिष्यस मधून कोले हिंमत नई हुई, कि तेले वीचारो, “तू कोण शे?” कारण कि तेस्ले माहित होत, कि हवू प्रभु शे. येशु उना, आणि भाकर लिसन तेस्ले दिधी, तसाच मासा बी दिधा. हई तिसरा सावा शे, कि येशु नि मरेल मधून जित्ता होवा नंतर शिष्यस्ले दर्शन दिना. जेवण करा नंतर येशु नि शिमोन पेत्र ले विचार, “हे योहान ना पोऱ्या शिमोन. काय तू खरज ह्या दुसरास्तून जास्त मनावर प्रेम करस?” पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हा प्रभु, तुले माहित शे, मी तुनाशी प्रेम करस.” येशु नि तेले सांग, “मना मांगे चालणारस्नि अशी चाकरी कर जसा कि त्या मेंढ्या शेतस.” येशु नि आजून दुसरा सावा तेले विचार, “हे योहान ना पोऱ्या शिमोन. काय तू मनावर प्रेम करस?” पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हा, प्रभु तुले माहित शे, कि मी तुनावर प्रेम करस.” येशु नि तेले सांग, “मना मेंढ्यास्नी राखोई कर.” येशु नि तिसरा सावा तेले विचार, “हे योहान ना पोऱ्या शिमोन. काय तू मना शी प्रेम करस?” पेत्र दुखी हुयना, कि तेनी तिसरा सावा असा सांग, “काय तू मना शी प्रेम करस?” पेत्र नि सांग, “हे प्रभु, तुले त सर्व माहित शे, तुले हय बी माहिती शे कि मी तुनावर प्रेम करस.” येशु नि तेले सांग, “मना मेंढ्यास्ना ध्यान ठेव.” मी तुमले खरोखर सांगस, जव तू जवान होता, तव आपली कमर बांधीसन जठे जावानी ईच्छा करत होता, तठे फिरत होता, पण जव धल्ला होशी, त तू आपला हातस्ले पसारशी, आणि कोणी दुसरा तुले बांधी लीन आणि तुले तठे लीजाईन जठे तू जावाना नई देखत. येशु नि अस हय सांगा साठे सांग, कि पेत्र कसा मरीन आणि परमेश्वर नि महिमा करीन, आणि हय सांगीसन, तेले सांग, “मना मांगे चालू लागा.” पेत्र नि फिरीसन त्या शिष्यले येतांना देख, जेनाशी येशु प्रेम करत होता, आणि म्हणजे तो जो जेवण ना टाईम ले येशु ना बाजुमा बठेल होता आणि तेनी वाकीसन विचार, “हे प्रभु, तुले धरावनारा कोण शे?” तेले देखीसन पेत्र नि येशु ले सांग, “हे प्रभु, एना संगे काय हुईन?” येशु नि तेले सांग, “जर मी देखू कि तो मना परत येवा लोंग जित्ता राहो त तुले काय? तू मना मांगे चालू लाग.” एनासाठे भावूस्मा हई गोष्ट पसरी गई, कि तो दुसरा शिष्य नई मराव, तरी बी येशु नि तेले हई नई सांग, “कि हवू नई मराव, पण हय कि जर मी देखू कि तो मना परत येवा लोंग जित्ता राहो त तुले एना कण काय?” ज्या शिष्य नि हई सगळ देख, तेनी साक्ष दिएल शे, कि तुमी बी येशु वर विश्वास करी सकोत. आमले माहित शे कि तेनी साक्ष खरी शे. येशु नि आजून बी गैरा काम करेल शे. जर आमी एक-एक करीसन तेस्ना वर्णन करतात, त मी समजस कि ज्या पुस्तक लिखामा येतात, त्या संसार भर मा बी नई समायतात. प्रिय थियुफिलुस, मनी पयली पुस्तक मा मनी तुले त्या सर्वा गोष्टीस्ना बारामा सांग ज्या येशु नि सुरुवात मा करा आणि शिकाळाना सुरु करना. तेनी त्या प्रेषितस्ले जेस्ले तेनी निवाळेल होत, पवित्र आत्मा ना द्वारे आदन्या दिसन परमेश्वर ना द्वारे स्वर्ग मा वरे उचलायग्या. आणि तेनी दुख भोगाना आणि मोत नंतर गैरा पक्का पुरावाना स्वता ले जित्ता दाखाळ, आणि चाळीस दिन लगून तो प्रेषितस्ले दिखत ऱ्हायना, आणि परमेश्वर ना राज्य ना गोष्टी करत ऱ्हायना. एक टाईम जव येशु तेस्ना संगे होता, त तेनी शिष्यस्ले आदन्या दिधी, “यरूशलेम शहर ले नका सोडज्यात, पण त्या दान नि वाट देखत राहा जो मना बाप नि तुमले देवाना करार करेल होता, जेना बारामा तुमी मले बोलतांना आयकेल शेतस. कारण कि योहान नि त पाणी कण बाप्तिस्मा दियेल शे पण थोडा दिन नंतर तुमले पवित्र आत्मा ना बाप्तिस्मा भेटीन.” नंतर जव प्रेषित परत येशु ले भेटनात, त तेस्नी तेले विचार, “हे प्रभु, काय इस्त्राएल देश ले सोळाले आणि आमना राज्य ले परत बनावाना साठे तुना टाईम ईजायेल शे?” तेनी तेस्ले सांग, “तो टाईम कव ईन आणि त्या गोष्टी कव होतीन हय जानान, फक्त मना बाप कळेच ठरावाना अधिकार शे, ह्या गोष्टीस्ले तुमले जानानी गरज नई. पण जव पवित्र आत्मा तुमना वर ईन तव तुमले सामर्थ्य भेटीन, आणि तुमी यरूशलेम शहर मा आणि सर्वा यहूदीया प्रांत मा आणि शोमरोन प्रांत मा, आणि संसार मा प्रत्येक जागा वर लोकस्ले मना बारामा सांगश्यात.” हय सांगस तो तेस्ना देखता-देखता परमेश्वर ना द्वारे वरे स्वर्ग मा उचलाई ग्या, आणि एक ढग मुळे त्या तेले नई देखी सकनात. आणि तेना जावाना टाईम ले जव त्या आकाश कडे देखी ऱ्हायनातात तव अचानक दोन माणस धव्या कपळा घालेल तेस्ना जोळे ईसन उभा ऱ्हायनात. आणि सांगाले लागनात, “ओ गालील जिल्हा ना लोक, तुमी काब उभा ऱ्हायसन ढग कळे देखी ऱ्हायनात? हवूच येशु, जेले परमेश्वर नि तुमना जोळून स्वर्ग मा उचली लीएल शे, ज्या प्रकारे तुमी देखनात कि तेले स्वर्ग मा उचली लीयेल शे, त्याच प्रकारे तेले परत येतांना देखशात.” जव स्वर्गदूत चालना ग्यात, तव शिष्य जैतून नाव ना डोंगर वरून जो यरूशलेम शहर ना आंगे पांगे एक किलोमीटर ना दूर होता, यरूशलेम शहर ले परतनात. आणि जव त्या शहर मा पोहचनात त त्या वरली खोली मा गयात. ज्या त्या खोली मा उपस्थित होतात त्या ह्या शेतस, पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, हलपाई ना पोऱ्या याकोब, शिमोन जिलोत आणि याकोब ना पोऱ्या यहूदा. ह्या सर्वा प्रेषित आणि कईक स्त्रिया जेस्नी येशु नि मदत करेल होतात, आणि येशु नि माय मरियम आणि येशु ना भावू नेहमी एकत्र हुईसन, मन मा एकच उद्देश ना संगे एक चित हुईसन प्रार्थना करत होतात. आणि त्या दिनस्ना टाईम ले जव एक शे वीस विश्वासी भावू एकत्र होतात, तव पेत्र तेस्ना मधमा उभा हुईसन सांगू लागणा. “ओ भावूसहोण, पवित्र आत्मा नि गैरा दिन पयले राजा दाविद ना द्वारे यहूदा ना बारामा भविष्यवाणी करेल होता, जो येशु ले बंदी बनावनारा लोकस्ना पुढारी बनी ग्या. हई अवश्य होत कि यहूदा ना बारामा परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल पूर्ण होवो.” कारण कि तो आमना मधून एक होता, आणि ह्या सेवकाई मा बी सहभागी हुयना. जव यहूदा नि स्वता ले फाशी लायी लीधी, त तेना शव जमीन वर पळी ग्या, तेना पोट फाटी ग्या आणि तेना सर्वा आतळ्या बाहेर इग्यात. एनासाठे यहुदी पुढारीस्नी त्या पैसासकण एक वावर विकत लीधा. आणि यरूशलेम शहर ना लोकस्ले ह्या बारामा माहित होयन, आणि एनासाठे त्या लोक त्या जागा ले आपली भाषा मा “हकलदमा” म्हणजे रक्त ना वावर सांगू लागणत. कारण कि राजा दाविद स्तोत्रसंहिता ना पुस्तक मा लिखस, “तेना घर उजळी जावो, आणि तेनामा कोणी नई ऱ्हावो.” आणि हय बी लिखेल शे, “कोणी दुसरा तेनी नेतृत्व पदवी लीलेवो.” एनासाठे हय महत्वान शे कि एक असा माणुस ले निवाळा मा येवो, जो प्रभु येशु आमना संगे ऱ्हातांना सर्वा काय मा आमना संगे ऱ्हायेल शे. प्रभु येशु ले योहान ना द्वारे बाप्तिस्मा देवामा येवा मुळे तेले परमेश्वर ना द्वारे स्वर्ग मा उचली लेवा लोंग, निश्चित शे कि हवू माणुस आमना संगे प्रभु येशु ना परत जित्ता होवाना साक्षी बनो. तव तेस्नी दोन लोकस्ले नामांकीत कर, एक योसेफ ले जो बर्सबा सांगावत होता, जेना दुसरा नाव युसतुस शे, दुसरा मत्थिया ना. आणि हय सांगीसन प्रार्थना करी, “ओ प्रभु, तू जो सर्वास्ना मन वयखीलेस, हय प्रगट कर कि ह्या दोनीस मधून तुनी कोले निवाळिल शे, कि तो ह्या सेवकाई आणि प्रेषित ना पद लेवो, जेले यहूदा सोळीसन मरी ग्या आणि तसा जागा वर चालना ग्या जठे तेले होवाले पाहिजे.” तव तेस्नी तेस्ना बारामा चिठ्ठ्या टाकात, आणि चिठ्ठी मत्थिया ना नाव नि निघणी, आखरी मा तो त्या अकरा प्रेषित संगे मोजाई ग्या. यहुदीस्ना पिन्तेकुस्त ना सन ना दिन त्या सर्वा एक जागा वर एकत्र होतात. अचानक आकाश मधून मोठी आंधी सारखा आवाज हुईना, आणि तेना कण पुरा घर जठे त्या बठेल होतात, आवाज कण भरी ग्या. आणि तेस्ले एक प्रकार नि आग दिखनी, जी जीप मा आलग हुईसन तेस्ना मधून हर एक वर ईसन थांबी गयी. आणि त्या सर्वा पवित्र आत्मा कण भरीग्यात, आणि जो वरदान पवित्र आत्मा नि तेस्ले दिधा, तेना नुसार त्या नवी-नवी भाषास्मा बोलाले लागनात. त्या टाईम ले, परमेश्वर ना आदर करणारा कईक यहुदी होतात आकाश ना खाल्ला हरेक देश मधून सन साजरा करासाठे यरूशलेम शहर मा ईसन थांबेल होतात. जव हवू आवाज आंधी सारखा आयकू उना, त गर्दी हुईगी आणि लोक घाबरी ग्यात, कारण कि हरेक आपली-आपली भाषा मा शिष्यस्ले बोलतांना आयकत होतात. आणि त्या सर्वा चकित आणि भेमकाईसन सांगाले लागनात, “देखा, ह्या ज्या बोली ऱ्हायनात काय गालील जिल्हा ना राहणारा नई शे? तर हय काय हुई ऱ्हायन, जो आमना मधून प्रत्येकस्ले आपली-आपली मुळ भाषा मा बोलतांना आयकस? आमना मधून कईक लोक पारथी क्षेत्र ना शे. कईक लोक मेदी, एलामी, मेसोपटेम्या देश, यहूदीया प्रांत, कप्पदूकीया, पंत आणि आशिया प्रांत, आणि फ्रुगिया आणि पंफुलिया प्रांत आणि मिसर देश आणि कुरेने शहर ना जोळे लिबुआ देश ना कईक भाग. ह्या सर्वा देशस्ना ऱ्हायनारा आणि रोम शहर तून यरूशलेम शहर ले येणारा प्रवासी, म्हणजे काय यहुदी, आणि काय गैर-यहुदी जेस्नी यहुदी धर्म स्वीकार करी लीयेल होतात. क्रेत बेट ना लोक आणि अरब देश तून बी शे, पण आपली-आपली भाषा मा तेस्नाशी परमेश्वर ना मोठ-मोठा काम ना चर्चा आयकतस.” आणि त्या सर्वा चकित हुयनात, आणि घाबरीसन एक-दुसराले सांगाले लागनात, “हय काय हुई ऱ्हायन?” पण दुसरास्नी निन्दा करीसन सांगणात, “त्या त नवा द्राक्षरस ना धुंदी मा शेतस.” पेत्र त्या अकरा प्रेषितस संगे उभा ऱ्हायंना, आणि उंच शब्द मा सांगाले लागणा, “ओ यहूदीया प्रांत ना राहणारा लोकसहोण, आणि ओ यरूशलेम शहर ना ऱ्हायनारसहोण, हय समजी ल्या आणि कान लाईसन मना गोष्टी आयका.” जस तुमी समजी ऱ्हायनात, ह्या नशा मा नई शेतस, कारण कि आते त सकाय ना नऊच वाजेल शेतस. पण जे आमना संगे हुयेल शे हय त्या गोष्ट जी सत्यता शे जी योएल भविष्यवक्ता ना द्वारे परमेश्वर ना पुस्तक मा परमेश्वर नि सांग. परमेश्वर सांगस, कि आखरी ना दिनस्मा अस हुईन, कि मी आपली आत्मा सर्वा लोकस्वर ओती देसू आणि तुमना पोर आणि तुमना पोरी भविष्यवाणी करतीन, आणि तुमना जवान दर्शन देखतीन, आणि तुमना वरिष्ठ लोक स्वप्न देखतीन. त्या दिनस्मा मी आपला दासस, आणि दासीस्ले आपली आत्मा देसू, आणि त्या भविष्यवाणी करतीन. आणि मी वरे आकाश मा अदभूत काम, आणि खाले पृथ्वी वर चिन्ह, म्हणजे रक्त, आणि आग आणि धुक्कय ना ढग दाखाळसु. प्रभु ना दिन येवाना पहिले सूर्य अंधार हुई जाईन, आणि चांद रक्ताळ हुई जाईन. तो दिन महान आणि तेजस्वी दिन हुईन. आणि जो कोणी प्रभु ना नाव लीन, तेनच तारण हुईन ओ इस्त्राएल देश ना लोकसहोण आयका, नासरेथ ना येशु एक असा माणुस होता जेले परमेश्वर ना द्वारे तुमना समोर साबित करामा एयेल होता, त्या चमत्कार आणि अदभूत काम आणि चिन्हस्ना द्वारे ज्या परमेश्वर नि तेना द्वारे करना. तुमी स्वता जानतस कि हय खर शे. परमेश्वर ना द्वारे ठरायेल योजना आणि पूर्वज्ञान ना नुसार, तो तुमना हात मा सोपाय ग्या. तुमनी तेले दुष्ट लोकस्ना मदत कण खिया ठोकीसन क्रूस वर चळाईसन मारी टाका. तरी बी, परमेश्वर नि तेनी मोत ना नंतर तेले परत जित्ता करी दिधा, कारण कि तेना साठे मरेल राहाण शक्य नई होत. कारण कि राजा दाविद येशु ना बारामा सांगस, मी प्रभु ले कायम आपला समोर देखत ऱ्हायनु, कारण कि तो मना उजवी कळे शे. एनासाठे मना हृदय खुश हुईना आणि मनी जीप स्तुती करस, मना शरीर बी आशा मा बनेल राहीन. कारण कि तू नईत मनी आत्मा ले अधोलोक सोळाव, आणि नईत आपला पवित्र झन ना शव ले कबर मा सळु देवाव. तुनी मले जीवन ना रस्ता दाखाळेल शे, तू मले आपली उपस्थिती मा खुशी कण भरी देशीन. “ओ भावूसहोण, मी ह्या कुलपति राजा दाविद ना बारामा तुमले साहस कण सांगी सकस कि तो तर मरी ग्या आणि गाळाई बी ग्या आणि तेनी कबर आज लोंग आमना आठे वर्तमान शे.” तो भविष्यवक्ता होता, आणि तेले माहित होत कि परमेश्वर नि शेप्पत खाईसन तेना संगे शेप्पत करेल शे, “मी तुना वंश मधून एक व्यक्ती ले तुना राजासन वर बठाळसू. हय जानीसन कि भविष्य मा परमेश्वर काय कराले जात होता, परमेश्वर नि दाविद ना संगे येशु ख्रिस्त ना परत जित्ता होवाना बारामा गोष्ट करी, आणि दाविद नि सांग तू नईत मनी आत्मा ले अधोलोक सोळाव, आणि नईत आपला पवित्र झन ना शव ले कबर मा सळु देवाव. ह्याच येशु ले परमेश्वर नि जित्ता कर, जेना आमी सर्वा साक्षी शेतस. आते तो स्वर्ग मा परमेश्वर ना उजवा हात कळे सर्वो‍च्च सन्मान ना जागा वर बठेल शे. आणि बाप नि, जसा तेनी करार करेल होत, तेले पवित्र आत्मा दिधा आणि तेनी पवित्र आत्मा आमले दियेल शे, जस कि तुमी आज देखतस आणि आयकतस. कारण कि दाविद त स्वर्ग मा नई चळना, पण तो स्वता सांगस, प्रभु परमेश्वर नि मना प्रभु ले सांग, मना उजवी कळे बठ, जठ लगून कि मी तुना विरोधीस्ले नम्र करीसन, तेस्ले तुना पायस ना खालली (चौकी) ना सारखा नई बनाई टाकू. एनासाठे, इस्त्राएल देश ना सर्वा लोक ह्या गोष्ट ना विषय मा निश्चित हुईजावा, कि परमेश्वर नि ह्याच येशु ले, जेले तुमनी क्रूस वर चळाव, प्रभु आणि ख्रिस्त दोनी ठराव.” जव लोकस्नी हई आयक त गैरा दुखी हुई ग्यात, आणि त्या पेत्र आणि बाकी प्रेषितस्ले विचाराले लागनात, “ओ भावू, आमी काय करूत?” पेत्र नि तेस्ले सांग, “मन फिरावा, आणि तुमना मधून प्रत्येक आपला-आपला पापस्नी माफी साठे येशु ख्रिस्त ना नाव कण बाप्तिस्मा ल्या, त तुमले पवित्र आत्मा ना दान भेटीन. कारण कि हई शेप्पत तुमी, आणि तुमना वंश, आणि त्या सर्वा दूर-दूर ना लोकस साठे बी शे जेस्ले प्रभु आमना परमेश्वर आपला जोळे बलाईन.” पेत्र नि गैर्‍या आजून गोष्टीस्मा बी साक्षी दि-दिसन तेस्ले विनंती करना, कि स्वता ले ह्या कुटील पीडी पासून वाचाळा. जे काही पेत्र नि सांग, जेस्नी तेनावर विश्वास कर तेस्नी बाप्तिस्मा लीधा, आणि त्या दिन (विश्वासीस्ना) त्या समूह मा जवळ-पास तीन हजार लोक जुळी ग्यात. आणि त्या प्रेषितस पासून शिक्षण लेवाले, संगती ठेवामा आणि त्या प्रभु भोज मा सहभागी होत होतात, त्या विश्वासी एकत्र आपला जेवण खात होतात, आणि प्रार्थना करामा लीन ऱ्हात होतात. आणि यरूशलेम मा सर्वा लोकस्ना मन परमेश्वर ना विषय मा आदर आणि भीती कण भरीग्यात, आणि गैरा अदभूत काम आणि चिन्ह प्रेषितस द्वारे प्रगट होत होतात. आणि सर्वा विश्वास करणार एकत्र ऱ्हात होतात, आणि तेस्ना सर्वा वस्तू जे काही तेस्ना जोळे होत ते सगळ आपस मा वाटी लेत होतात. आणि त्या आपली-आपली संपती आणि सामान विकी-विकीसन जशी जेनी गरज होती वाटी टाकत होतात. आणि दररोज एक मन हुईसन परमेश्वर ना मंदिर मा एकत्र होत होतात, आणि घर-घर मा प्रभु भोज ना साठे एकत्र हुईसन खुशी आणि सरळ मन कण जेवण कर्‍या करत होतात. आणि परमेश्वर नि स्तुती करत होतात, आणि सर्वा लोक तेस्ना कण प्रसन्न होतात, आणि जेले तारण भेटीजात होत, तेस्ले प्रभु दररोज तेस्ना मा संमिलीत करत होता. पेत्र आणि योहान दुफार ना तीन वाजता प्रार्थना ना टाईम ले परमेश्वर ना मंदिर मा जाई ऱ्हायंतात. तठे एक माणुस होता जो जन्मा पासून लंगळा होता, लोक तेले दररोज परमेश्वर ना मंदिर ना त्या दरवाजा वर जो सुंदर दरवाजा सांगामा येस, बठाळी देतस, कि तो मंदिर मा जाणारास पासून भिक मांगो. जव तेनी पेत्र आणि योहान ले परमेश्वर ना मंदिर मा जातांना देख, त तेनी तेस्ना पासून भिक मांग. पेत्र नि योहान ना संगे सरळ तेना कळे देखीसन सांग, “आमना कळे देख.” तो तेस्ना कळून काही भेटानी आशा कण तेस्ना कळे देखाले लागणा. तव पेत्र नि सांग, “चांदी आणि सोन त मना जोळे नई शे, पण जे मना जोळे शे, ते तुले देस, येशु ख्रिस्त नासरेथकर ना नाव मा उठ आणि चालू लाग.” मंग पेत्र नि तेना उजवा हात धरीसन तेले उठाळ, तव लगेच तेना पाय आणि गुळघास्मा शक्ती ईगयी. तो उडीमारीसन उभा रायग्या, आणि चालू फिरू लागणा, तव तो उड्यामारत-कुदत आणि परमेश्वर नि स्तुती करतांना तेस्ना संगे परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा ग्या. सर्वा लोकस्नी तेले चालता-फिरतांना आणि परमेश्वर नि स्तुती करतांना देखीसन, तेले ओयखी लीध कि हवू तोच लंगळा भिकारी शे, जो परमेश्वर ना मंदिर ना सुंदर दरवाजा जोळे बठीसन भिक मांगत ऱ्हात होता, आणि त्या घटना कण जी तेना संगे होयेल होती, त्या गैरा आश्चर्य आणि चकित हुई ग्यात. जव तो पेत्र आणि योहान ले घट्ट धरेल होता, त सर्वा लोक गैरा आश्चर्य करतांना त्या जागा वर जो शलमोन ना ओसारा सांगामा येस, तेस्ना कळे पयीसन उनात. हय देखीसन पेत्र नि लोकस्ले सांग, “हे इस्त्राएल देश ना लोकसहोण, तुमी या माणुस वर काबर आश्चर्य करतस, आणि तुमी आमना कळे काबर घुरतस, जसा कि आमी आपली सामर्थ्य व भक्ती कण तेले चालाना-फिराणा योग्य बनाई दिधा?” अब्राहाम, इसहाक, आणि याकोब ना परमेश्वर, आमना पूर्वज लोक ना परमेश्वर नि आपला दास येशु नि महिमा करी, पण तुमी तेले मारावा साठे यहुदी पुढारीस्ना हात मा सोपी दिधा, पण जव पिलात नि तेले सोळाना विचार कर, तव तुमी तेना समोर येशु ले नकार दिधा. तुमी येशु ले अस्वीकार करणात, जो पवित्र आणि धर्मी होता, आणि लोकस साठे पिलात ले सांगीसन एक हत्याराले सोळाव. तुमी तेले जो लोकस्ले कायम ना जीवन देस मारी टाक, जेले परमेश्वर नि मरेल मधून परत जित्ता कर, ह्या गोष्ट ना आमी साक्षी शेतस. ख्रिस्त येशु ना नाव वर विश्वास करा मुळे ह्या माणुस ले जेले तुमी ओयखतस आणि ह्या टाईम ले देखतस, परमेश्वर कळून सामर्थ्य भेटेल शे. हवू माणुस येशु ख्रिस्त ना नाव मा विश्वास ना द्वारे बरा चांगला हुयेल शे, जसा कि तुमी स्वता देखी सकतस. “आते हे भावूसहोण, मले माहित शे कि तुमी आणि तुमना पुढारीस्नी येशु ले अज्ञानता कण मारी टाकनात, कारण तुमले माहित नई होत कि तो ख्रिस्त शे.” पण ज्या गोष्टीस्ले परमेश्वर नि सर्वा भविष्यवक्ता ना द्वारे पयलेच सांगेल होत, कि तेना (परमेश्वर) कळून धाळेल ख्रिस्त दुख उचलीन आणि मारी टाकामा ईन, तेनी तेस्ले खर करी दाखाळ. एनासाठे, मन फिरावा आणि परमेश्वर कळे परत या कि तुमना पाप माफ करामा येवोत, तव परमेश्वर कळून आत्मिक सामर्थ्य ना टाईम ईन. आणि तो येशु ले धाळीन, जो तो ख्रिस्त शे जेले तेनी तुमना साठे पयलेच निवाळेल शे. येशु ले स्वर्ग मा त्या टाईम लोंग राहाले अवश्य शे जव परमेश्वर त्या सर्वा वस्तूस्ले नवीन बनाई दिन ज्या तेनी बनायेल शे, गैरा टाईम पयले परमेश्वर नि लोकस्ले सांगा साठे पवित्र भविष्यवक्तास्ना द्वारे असा कराना करार करना. जसा कि मोशे नि सांग, “प्रभु परमेश्वर तुमना भावूस मधून तुमना साठे मनासारखा एक भविष्यवक्ता धाडीन, जे काही तो तुमले सांगीन तेना आयकज्यात.” पण प्रत्येक माणुस जो त्या भविष्यवक्ता ना नई आयकाव, लोकस मधून नाश करामा ईन. शमुवेल पासून तेना नंतर लोंग जीतला भविष्यवक्तास्नी गोष्ट सांगणात त्या सर्वास्नी ह्या दिनस्नी प्रचार करेल शे. तुमी सर्वा भविष्यवक्तास्ना वारीस आणि त्या करार ना भागी शे, जो परमेश्वर नि तुमना पूर्वज लोक बरोबर बांधेल होता, जव तेनी अब्राहाम ले सांग, “तुना वंश ना द्वारा पृथ्वी ना सर्वा घरानास्ले आशीर्वाद भेटीन.” परमेश्वर नि आपला दास ले मरेल मधून उठाडीसन बठ्ठास्ना पयले तुमना जोळे धाळ, कि आमना मधून प्रत्येक ले आपला जीवन ना पापमय रिती कण परमेश्वर कळे फिराले मदत करो. जव पेत्र आणि योहान लोकस्ले हय सांगीच ऱ्हायंतात, त यहुदी पुजारी आणि परमेश्वर ना मंदिर ना सरदार आणि सदूकी तेस्ना वर चळी उनात. त्या गैरा रागे भरनात कि पेत्र आणि योहान येशु ना बारामा शिकाळत होतात कि ज्या लोक मरी जायेल शे परमेश्वर तेस्ले परत जित्ता करी दिन, जसा तेनी येशु ले मरेल मधून परत जित्ता करी दिधा. तेस्नी तेस्ले अटक करीसन दुसरा दिन लगून बंदीगृह मा ठेव कारण कि संज्याकाय हुई जालेल होती. पण संदेश ना आयकनारास मधून गैरास्नी येशु वर विश्वास कर, आणि तेस्नी गणती पाच हजार माणसस्ना आंगे पांगे हुईगी ज्या येशु वर विश्वास करणारा बनी ग्यात. दुसरा दिन तेस्ना पुढारी, पूर्वज लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक यरूशलेम शहर मा एक जागा वर एकत्र हुईनात. ज्या लोक त्या सभा मा उपस्थित होतात, तेस्ना मा, हन्ना, केफा, योहान, सिकंदर आणि सर्वा महा यहुदी पुजारी परिवार मधला होतात. आणि पेत्र आणि योहान ले मधमा उभा करीसन विचारू लागनात, “ह्या माणुस ले बरा करासाठे कोणी तुमले सामर्थ्य आणि अधिकार दिधा?” तव पेत्र नि पवित्र आत्मा कण भरीसन तेस्ले सांग, “ओ लोकस्ना सरदारसहोण आणि पूर्वज लोकसहोण, आमी एक दुर्बल माणुस न चांगल करेल शे आणि आज आमनी चौकशी करी ऱ्हायनात कि तो कसा बरा हुईना. त तुमी सर्वा आणि सर्वा इस्त्राएल देश ना लोक समजी ल्या कि हय नासरेथकर येशु ख्रिस्त ना नाव कण करेल शे. त्याच येशु ले तुमी लोकस्नी क्रूस वर चळाई टाकेल होतात, पण परमेश्वर नि तेले मरेल मधून परत जित्ता कर. आज तेनाच नाव ना द्वारे हवू माणुस तुमना समोर चांगला उभा शे. ख्रिस्त येशु तोच दगड शे, जेले तुमी राजमिस्त्रीस्नी तुच्छ समज आणि तोच कोपरा ना मुख्य दगड हुईग्या. येशु ले सोळीसन कोणी दुसरा ना द्वारे तारण नई, कारण कि आकाश ना खाले माणसस्मा आखो कोणताच दुसरा नाव नई देवामा एयेल शे, जेना द्वारे आमी तारण प्राप्त करी सकुत.” जव त्या पेत्र आणि योहान नि हिम्मत देखनात, आणि हय समजी ग्यात कि बिगर शिकेल आणि साधारण माणस शेतस, त आश्चर्य करणात, नंतर तेस्ले ओयख, कि ह्या येशु ना संगे ऱ्हायेल होतात. पण त्या माणुस ले जो बरा हुयेल होता, पेत्र आणि योहान ना संगे उभा देखीसन, पुढारी, पूर्वज लोक आणि यहुदी नियम ना शिक्षक (शास्त्री) तेस्ना विरुद्ध मा काहीच नई करू सकनात. पण तेस्ले महासभा ना बाहेर जवानी आज्ञा दिसन, त्या आपस मा विचार कराले लागनात, “आमी ह्या माणसस संगे काय करूत? कारण कि यरूशलेम शहर ना सर्वा राहणारास वर प्रगट शे, कि एस्ना द्वारे एक प्रसिद्ध चिन्ह दाखाळेल शे, आणि आमी तेना नकार नई करू सकतस. पण लोकस्मा हय बातमी आजून जास्त पसराले नको, आमी तेस्ले धमकावूत, कि त्या ह्या नाव कण परत कोणी माणुस संगे गोष्टी नई करोत.” तव पेत्र आणि योहान ले परत बलाईसन आणि जताळीसन हय सांगामा उन, “येशु ना नाव कण काय बी नका सांगज्यात आणि नईत शिकाळज्यात.” पण पेत्र आणि योहान नि तेस्ले उत्तर दिधा, “तुमीच न्याय करा, कि काय हय परमेश्वर ना जोळे चांगला शे, कि आमी परमेश्वर नि गोष्ट ले सोळीसन तुमनी गोष्ट मानी लेवूत? कारण कि आमी शांत नई राहू सकतस, आमनी जे देखेल आणि आयकेल शे, तेना बारामा आमी बोलत ऱ्हासुत.” तव तेस्नी तेस्ले आखो धमकाईसन सोळी टाक, कारण कि लोकस मुळे तेस्ले दंड देवाना कोणताच कारण नई भेटणा, एनासाठे कि जी घटना हुयेल होती तेना मुळे सर्वा लोक परमेश्वर नि स्तुती करत होतात. कारण कि जो माणुस चमत्कारी रूप मा बरा हुयेल होता, चाळीस वर्ष तून जास्त वय ना होता. पेत्र आणि योहान सुटीसन आपला साथीस जोळे उनात, आणि जे काय मुख्य यहुदी पुजारीस्नी आणि पूर्वज लोकस्नी तेस्ले सांगाले होत, तेस्ले आयकाळी दिध. हय आयकीसन, तेस्नी एक चित्त हुईसन उंच शब्द मा परमेश्वर ले सांग, “ओ प्रभु, तू तोच शे जेनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि जे काही तेस्ना मा शे बनाव.” तुनी पवित्र आत्मा ना द्वारे आपला सेवक आमना पूर्वज दाविद ना तोंड कण सांग, “दुसरा जातीस्ना लोक गोंधय करतस? आणि देश-देश ना लोक व्यर्थ गोष्टीस्ना काब विचार करतस? प्रभु आणि तेना ख्रिस्त ना विरुद्ध मा पृथ्वी ना राजा उभा ऱ्हायनात, आणि हाकीम एकत्र हुई ग्यात. कारण कि खरज तुना पवित्र सेवक येशु ना विरुद्ध मा, जेले तुनी अभिषेक कर, हेरोद राजा आणि पंतय पिलात बी बिगर यहुदी आणि इस्त्राएल देश ना लोकस संगे ह्या नगर मा एकत्र हुईनात, तेस्नी तेच कर जी तुनी सामर्थ्य आणि ईच्छा नि पयलेच ठरायेल होत कि तेच होवो. आते हे प्रभु, तेस्ना धमक्यास्ले आयक, आणि आपला दासस्ले हवू वरदान दे कि तुना वचन मोठी हिम्मत कण आयकाळोत. बरा करासाठे तू आपला हात वाळाव, कि चमत्कारी चिन्ह आणि अदभूत काम तुना पवित्र सेवक येशु ना नाव कण करामा येवो.” जव त्या प्रार्थना करी लीनात, त ती जागा जठे त्या एकत्र होतात हाली गई, आणि त्या सर्वा पवित्र आत्मा कण भरीग्यात, आणि परमेश्वर ना वचन हिम्मत कण आयकाळत ऱ्हायनात. विश्वास करणारास्नी मंडळी एक चित्त आणि एक मन नि होती, आठ लोंग कि कोणी बी आपली संपती आपली नई सांगत होता, पण सगळ काही आपस मा वाटी लेत होतात. प्रेषित मोठी सामर्थ्य कण प्रभु येशु ना परत जित्ता हुई जावाना साक्ष देत ऱ्हायनात आणि त्या सर्वास्वर मोठी कृपा होती. तेस्ना मा कोणी बी गरीब नई होता, कारण कि जेस्ना कळे जमीन व घर होतात, त्या तेस्ले ईकी-ईकीसन, ईकायेल वस्तुना दाम लयत होतात, आणि प्रेषितस्ले दि टाकत होतात. आणि जशी जेले गरज होती, त्या प्रमाणे प्रत्येक ले वाटी टाकत होतात. योसेफ नाव ना एक माणुस होता, तो लेवी गोत्र मधून होता आणि कुप्र बेट ना होता. प्रेषितस्नी तेले बर्णबा सांगनत, जेना अर्थ शे, एक असा माणुस जो दुसरास्ले उत्साहित करस. तेनी काही जमीन होती, जिले तेनी ईक, आणि दाम ना पैसा लईसन प्रेषितस्ले दि टाक एनासाठे कि त्या लोकस्ले वाटी सकोत. हनन्या नाव ना एक माणुस, आणि तेनी बायको सप्पीरा नि काही संपती विकी जी तेनी होती. तेना दाम मधून काही आपला साठे ठीई लीना, आणि हय गोष्टी तेनी बायको ले बी माहिती होती, आणि तेना एक भाग लईसन प्रेषितस्ले दि टाक. पण पेत्र नि सांग, “ओ हनन्या, जो सैतान नि तुना मन मा पवित्र आत्मा ले खोट बोलाना विचार टाकेल शे, आणि तुनी आपली विकेल जमीन ना दाम ना एक भाग आपला साठे ठीई लीध. काय विकता लोंग ती जमीन तुनी नई होती? आणि जव विकाई गई त तेना दाम तुना वश मा नई होता? तुना मन मा ह्या वाईट काम ना विचार कसा उना? तू माणसस्ले नई, पण परमेश्वर ले खोट बोलेल शे.” ह्या गोष्टी आयकताच हनन्या जमीन वर पळी ग्या, आणि तेनी मोत हुई गयी आणि सर्वा आयकनारस्मा मोठी भीती घुशी गी. नंतर जवानस्नी ईसन तेनी किळी तयार करी आणि बाहेर लीजाईसन गाळी टाक. जवळ-पास तीन घंटा ना नंतर तेनी बायको, जे काही हुयेल होत नई जानीसन, मधमा उणी. तव पेत्र नि तिले सांग, “काय तुमी दोनीस्नी ती जमीन ले इतलाच मा विकेल होती?” तिनी सांग, “हा, इतलाच मा.” पेत्र नि तिले सांग, “हय काय गोष्ट शे, कि तुमी दोनी प्रभु ना आत्मा नि परीक्षा साठे एकी करी? देख, तुना नवराले गाळनार दरवाजा वरच उभा शेतस, आणि तुले बी बाहेर लिजातीन.” तव ती लगेच तेना पाय जोळे जमीन वर पळी गयी, आणि तिनी मोत हुई गयी, आणि जवानस्नी मधमा ईसन तिले मरेल देखनात, आणि बाहेर लीजाईसन तीना नवरा जोळे गाळी टाक. तव यरूशलेम शहर नि सगळी मंडळी वर आणि ह्या गोष्टी ना सर्वा आयकनारास वर मोठी भीती घुशी गयी. प्रेषितस्ना द्वारे गैरा चिन्ह आणि अदभूत काम लोकस्ना मधमा दाखाळा मा येत होतात, आणि ख्रिस्त ना विश्वासी सर्वा एक चित हुईसन शलमोन ना ओसारे मा एकत्र होत होतात. पण जेस्नी आते लोंग प्रभु वर विश्वास नई करेल होता तेस्ना मधून कोले हय हिम्मत नई होत होती कि, तेस्ना समूह मा जाईसन मियजावूत, तरी बी लोक तेस्नी वाह-वाह करत होतात. जास्तीत-जास्त विश्वासी प्रभु मा ईसन जुळी ग्यात. आणि बाया-माणसस्ना मोठा समुदाय बनी ग्या. जे काही प्रेषित करत होतात तेना मुळे लोक आजारीस्ले रस्ता वर लई लईसन, खाटस्वर जपाळी देत होतात, कि जव पेत्र ईन, त तेनी सावलीच तेस्ना मधून कोणावर पळी जावो. यरूशलेम शहर ना आंगे-पांगे ना नगरस मधून बी गैरा लोक आजारीस्ले आणि दुष्ट आत्मास कण त्रासेल ले लई-लईसन, प्रेषितस्ना जोळे एकत्र होत होतात, आणि त्या सर्वा बरा हुई जात होतात. तव महा यहुदी पुजारी आणि तेना सर्वा जोळीदार ज्या सदूकीस्ना पंथ ना होतात, त्या प्रेषितस्ना विरुद्ध मा डाव कण भरी उनात. आणि प्रेषितस्ले धरीसन बंदीगृह मा बंद करी टाक. पण रात ले परमेश्वर ना दूत नि बंदीगृह ना दरवाजा उघाडीसन तेस्ले बाहेर लईसन सांग, “जा, परमेश्वर ना मंदिर मा उभा ऱ्हायसन लोकस्ले ह्या कायम ना जीवन ना बारामा आयकाळ.” प्रेषित हय आयकीसन झापटमाच परमेश्वर ना मंदिर मा जाईसन प्रवचन देवू लागनात, पण महा यहुदी पुजारी आणि तेना जोळीदारस्नी ईसन महासभा ले आणि इस्त्राएल देश ना सर्वा पूर्वज लोकस्ले एकत्र करणात, आणि बंदीगृह मा सांगी धाळ कि तेस्ले लया. पण पहारेकरीस्नि तठे पोहचीसन तेस्ले बंदीगृह मा नई देख, आणि परती सन सांगणात, “आमी बंदीगृह ले चांगली चौकशी कण बंद करेल, आणि पहारे करीस्ले बाहेर दरवाजा वर उभा ऱ्हायेल देखनुत, पण जव उघाळनुत, त मधमा कोणीच नई भेटन.” जव परमेश्वर ना मंदिर ना राखोयास्ना सुभेदार आणि मुख्य यहुदी पुजारी नि हय बातमी आयकी, त तेस्ना बारामा मोठी चिंतामा पळीग्यात कि ह्या परिस्थिती ना काय परिणाम हुईन. इतला मा कोणी ईसन तेस्ले सांग, “देखा, जेस्ले तुमनी बंदीगृह मा बंद करेल होतात, त्या लोक परमेश्वर ना मंदिर मा उभा ऱ्हायसन लोकस्ले प्रवचन दि ऱ्हायनात.” जव तेस्नी हय आयक, मंदिर ना राखोया ना सुभेदार राखोयास संगे मंदिर मा ग्या, तठे जाईसन प्रेषितस्ले महासभा ना समोर लई उना, पण शक्ती कण नई, कारण कि त्या लोकस्ले भ्यात होतात कि लोक दगड मारी-मारीसन तेस्ले मारी टाकतीन. महासभा मा महा यहुदी पुजारीस्नी तेस्ना संगे विचार-पूस कराले सुरु करणात, “काय आमनी तुमले जताळीसन आज्ञा नई दियेल होतात, कि तुमी ह्या नाव कण प्रवचन नका सांगज्यात? तरी बी तुमनी सर्वा यरूशलेम शहर ले आपला प्रवचन कण भरी टाकेल शे, आणि तुमी त्या व्यक्ती ना हत्या ना दोष जबरजस्ती आमना वर लावाना देखतस.” तव पेत्र आणि दुसरा प्रेषितस्नी उत्तर दिधा, “माणसस्नी आज्ञा कण वाढीसन परमेश्वर नि आज्ञा ना पालन करानाच आमना कर्तव्य शे. आमना पूर्वजस्ना परमेश्वर नि येशु ले मरेल मधून जित्ता करी दिधा, जेले तुमनी क्रूस वर टांगीसन मारी टाकेल होतात. तेलेच परमेश्वर नि प्रभु आणि तारणारा ठराईसन, आपला उजवा हात कण सर्वो‍च्च करी टाका, कारण कि इस्त्राएल देश ना लोक आपला वाईट विचारस आणि रस्तास पासून परत परमेश्वर कळे फिरोत आणि तेना द्वारे आपला पापस साठे माफी लेवोत. आमी ह्या गोष्टीस्ना साक्षी शेतस, आणि पवित्र आत्मा बी, जिले परमेश्वर नि तेस्ले दियेल शे, ज्या तेनी आज्ञा मानतस.” जव सभा ना सदस्यस्नि हय आयक त त्या गैरा रागे भरनात, आणि प्रेषितस्ले मारी टाकाना देख. पण गमलीएल नाव ना एक परूशी माणुस नि जो मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ना ज्ञानी आणि सर्वा लोकस्मा आदरणीय होता, महासभा मा उभा ऱ्हायसन प्रेषितस्ले थोडा टाईम साठे बाहेर करानी आज्ञा दिधी. तव तेनी महासभा ना सदस्यस्ले सांग, “ओ इस्त्राएल देश ना लोकसहोण, जे काही ह्या माणसस संगे कराना देखी ऱ्हायनात, समजी उमजी सन करज्यात. कारण कि ह्या दिनस्तुन पहिले थियुदास हय दावा करत होता कि मी बी काही शे आणि जवळ-पास चार शे लोक तेना मांगे चालू लागनात, तो मरी ग्या, तेना मांगे चालणारा सर्वा लोक तित्तर-बित्तर हुई ग्यात आणि नाश हुई ग्यात. तेना नंतर नाव लिखाना टाईम ना दिनस्मा गालील जिल्हा ना राहणारा यहूदा उना, तेनी कईक लोकस्ले आपला कळे करी लीधा, तो बी मरी ग्या, आणि तेना मांगे चालणारा सर्वा लोक बी तित्तर-बित्तर हुई ग्यात. एनासाठे आते मी तुमले सांगस, ह्या माणसस पासून दूरच राहा आणि तेस्ले एखटाच राहू द्या. कारण कि हय योजना व काम माणसस कळून शे, त समाप्त हुई जाईन. पण जर परमेश्वर कळून शे, त तुमी तेस्ले कदीच समाप्त नई करू सकावत, कदी अस नई हुई जावो, कि तुमी परमेश्वर ना संगे बी झगळनार हुई जावोत.” तव तेस्नी तेनी गोष्ट मानी लीधी आणि प्रेषितस्ले बलाईसन माराले लावना, आणि तेस्ले हय आज्ञा दिधी कि त्या आते पासून येशु नाव कण काही नई सांगाव, मंग तेस्ले सोळी दिधा. त्या ह्या गोष्ट पासून आनंदित हुईसन महासभा ना समोरून चालना ग्यात, कि आमी येशु ना साठे अपमानित होवाना योग्य ठरणात. एना नंतर दररोज, परमेश्वर ना मंदिर मा आणि घर-घर मा, प्रेषित नेहमी शिकाळस आणि सांगत होतात कि येशुच ख्रिस्त शे. त्या दिनस्मा जव शिष्यस्नी संख्या गैरी वाळाले लागणी, तव ग्रीक भाषा बोलणारा यहुदी विश्वासी आणि इब्री भाषा बोलणारा यहुदी विश्वासीस्ना विरुद्ध मा कुळकुळाले लागनात, कि दररोज धन व जेवण नि सेवकाई मा आमन्या विधवास्नी हालचाल नई लेवामा येत. तव त्या बारा प्रेषितस्नी यरूशलेम शहर ना दुसरा विश्वासीस्ले आपला जोळे बलाईसन सांग, “आमी प्रेषितस्ले आपला टाईम परमेश्वर ना वचन सिखाळामा देवाले पायजे, नई कि खावाळा-पिवाळा नि सेवा करामा. एनासाठे ओ भावूसहोण, आपला मधून सात प्रतिष्ठीत माणसस्ले ज्या पवित्र आत्मा आणि बुद्धी कण परिपूर्ण राहोत, निवाळी ल्या, कि आमी तेस्ले ह्या कामस्वर ठराई देवूत. पण आमी त प्रार्थना मा आणि वचन प्रचार व शिक्षण देवानी सेवामा लागेल ऱ्हासुत.” हय गोष्ट पुरी मंडळी ले चांगली वाटनी, आणि तेस्नी स्तेफन नाव ना एक माणुस ले जो विश्वास आणि पवित्र आत्मा कण परिपूर्ण होता, आणि फिलिप्प, प्रखर, नीकानोर, तीमोन, पार्मिना आणि अंतीयुकस वासी निकलाव ले जो यहुदी मत मा ईजायेल होता, निवाळी लीधा. एस्ले प्रेषितस समोर लयनात आणि तेस्नी प्रार्थना करीसन त्या काम ले कराना साठे तेस्ले निवाळी लीधा. परमेश्वर ना वचन पसरत ग्या आणि यरूशलेम शहर मा शिष्यस्नी संख्या गैरी वाळत गी, यहुदी पुजारीस्ना एक मोठा समूह येशु ख्रिस्त मा विश्वास ना ह्या संदेश ले स्वीकार करना. स्तेफन कृपा आणि सामर्थ्य कण भरीसन लोकस्मा मोठा-मोठा अदभूत काम आणि चिन्ह दाखाळत होता. पण कईक लोकस्नी स्तेफन ना विरोध करणात. त्या प्रार्थना घर ना सदस्य होतात, जेले दासत्व-मुक्त सांगामा येस, त्या लोक कुरेने शहर, सिकंदरिया शहर मधून, किलकिया प्रांत आणि आशिया प्रांत मधून बी होतात. ह्या लोक स्तेफन संगे विवाद कराले लागनात. पण तेनी जे काही सांग त्या तेस्ना काही उत्तर नई देवू सकनात, कारण कि पवित्र आत्मा नि तेले मोठी बुद्धीमानी कण बोलामा मदत कर. एनावर तेस्नी दासत्व-मुक्त लोकस्ले स्तेफन ना विषय मा खोट बोलाले उकसाव ज्या सांगू लागनात, “आमी येले मोशे ना नियम आणि परमेश्वर ना विरुद्ध मा निंदा नि गोष्टी सांगतांना आयकेल शे.” तेस्नी स्तेफन ना विरुद्ध मा लोकस्ले, पूर्वज लोकस्ले आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ले उकसाव आणि त्या ईसन स्तेफन ले धरीसन महासभा ना समोर ली ग्यात. तठे त्या खोटा साक्षीस्ले लईसन उभा करणात जेस्नी स्तेफन वर हवू आरोप लाव कि, “हवू माणुस ह्या पवित्र जागा आणि मोशे ना नियम ना विरुद्ध मा निंदा करान नई सोळत. कारण कि आमी तेले हय सांगतांना आयक, कि हवूच नासरेथ ना येशु ह्या मंदिर ले पाळी दिन आणि त्या रितीस्ले बदलाई टाकीन ज्या मोशे नि आमले सोपेल शे.” तव सर्वा लोकस्नी ज्या महासभा मा बठेल होतात, तेस्नी तेना कळे देख कि तेना चेहरा परमेश्वर ना दूत ना चेहरा ना सारखा चमकत होता. तव महा यहुदी पुजारी नि विचार, “काय हवू आरोप खरा शे?” स्तेफन नि उत्तर दिध, “ओ भावूसहोण, आणि पूर्वज लोक आयका, आमना पूर्वज अब्राहाम ले तेना हारान नगर ना गाव मा ईसन राहाणा पहिले, जव तो मेसोपटेम्या देश मा होता, त महिमामय परमेश्वर नि तेले दर्शन दिधा.” आणि तेले सांग, “तू आपला देश आणि आपला नातलगस्ले सोळीसन निघीसन त्या देश मा चालना जा, जेले मी तुले दाखाळसु.” तव तो कसदिया ना देश मधून निघीसन हारान नगर मा जाईसन राहू लागणा. मंग तेना बाप नि मृत्यु नंतर परमेश्वर नि तेले त्या नगर तून काळीसन ह्या देश मा लईसन ठेव जेनामा आते आमी ऱ्हातस. पण परमेश्वर नि तेले आठे काही बी वतन नई दिध म्हणजे पाय ठेवा पुरती बी जागा नई दिधी, जव त्या टाईम ले तेले काही पोर बी नई होता. तरी बी परमेश्वर नि करार कर कि, “मी हवू देश, तुना आणि तुना नंतर तुना वंश ना हात मा करी देसू.” आणि परमेश्वर नि हय बी सांग, “तुनी संततीस्ना लोक परका देश मा परदेशी होतीन, आणि त्या लोक तेस्ले गुलाम बनावतीन, आणि चार शे वर्ष लगून तेस्ना संगे वाईट व्यवहार करतीन.” नंतर परमेश्वर नि सांग, “ज्या जाती ना त्या गुलाम होतीन, तेस्ले मी दंड देस, एना नंतर त्या देश मधून निघीसन, ह्याच देश मा ईसन ह्याच जागा वर मनी उपासना करतीन.” परमेश्वर नि अब्राहाम ना संगे एक करार कर आणि तेले सांग कि, तो आपला घर ना सर्वा पुरुषस्ना करार ना चिन्ह ना स्वरूप मा सुंता करो. नंतर जव इसहाक ना जन्म हुयना त अब्राहाम ना करार ले याद करत आठवा दिन तेना सुंता करना. आणि ह्या रिती ले चालू ठेवत इसहाक नि आपला पोऱ्या याकोब ना सुंता कर आणि याकोब आपला बारा पोरस्ना सुंता करना. “तुमले माहित शे कि याकोब ना मोठा पोरसस्नि आपला भावू योसेफ ना डाव करीसन तेले मिसर देश ले जानारा व्यापारीस्ले एक गुलाम ना रूप मा विकी टाक, पण परमेश्वर तेना संगे होता.” परमेश्वर नि योसेफ ले तेना सर्वा दुख पासून सोळाईसन मिसर देश ना राजा फारो ना सोमर कृपा आणि बुद्धी दिधी, फिरोन राजा नि योसेफ ले मिसर देश वर आणि आपला पुरा घर वर राज्यपाल ठराव. जव योसेफ राज्यपाल होता तव सर्वा मिसर देश आणि कनान देश मा काय पडणा, जेना कण मोठा क्लेश हुयना, आणि आमना पूर्वजस्ले जेवण नई भेटत होता. पण याकोब नि हय आयकीसन, कि मिसर देश मा धान्य शे, त तेनी आमना पूर्वजस्ले तठे धाळ कि त्या काही धान्य विकत लेवो, त्या मिसर देश मा ग्यात, तठे योसेफ ले भेटनात आणि धान्य बी विकत लीध पण तेस्नी तेले नई वयख. दुसरा सावा जव त्या परत धान्य लेवाले मिसर देश मा ग्यात, तव योसेफ नि स्वता आपली वयख आपला भावूस्ले सांगी, आणि योसेफ कोणता गोत्र ना शे हय गोष्ट फारो ले मालूम हुई गयी. तव योसेफ नि आपला बाप याकोब ले आणि आपला सर्वा परिवार संगे, ज्या पंच्यात्तर व्यक्ती होतात, मिसर देश मा येवाना साठे संदेश धाळ. तव याकोब मिसर देश मा ग्या, आणि काही साल नंतर याकोब आणि आमना पूर्वज त्या देश मा मरी ग्यात. तेस्नी याकोब आणि तेना पोरस्ना शवस्ले आमना देश कनान मा लई उनात आणि याकोब ना शव ले त्या कबर मा गाळनात. जेले अब्राहाम नि एक निश्चित दाम दिसन विकत लीयेल होता, मंग तेस्नी याकोब ना पोरस्ले शखेम शहर ना त्या जमीन मा गाळनात, जिले याकोब नि हामोर ना पोऱ्या पासून विकत लीयेल होती. “पण जव त्या करार ना पुरा होवाना टाईम जोळे उना, जो परमेश्वर नि अब्राहाम संगे करेल होता, त मिसर देश मा त्या लोक वाळी ग्यात आणि गैरा हुई ग्यात.” तव मिसर देश मा दुसरा राजा हुयना जो योसेफ ले नई वयखत होता. त्या राजा नि आमनी जाती संगे लबाळी करीसन आमना आजोबास संगे आठ लगून वाईट व्यवहार करना, कि माय बापस्ले आपला बालकस्ले फेकी देन पळण, कि त्या मरी जावोत. त्या टाईम ले मोशे ना जन्म हुयना, तो परमेश्वर ना नजर मा गैरा सुंदर होता, आणि तो तीन महिना लगून तेना माय बाप ना द्वारे गुप्त रूप मा पोसायना. पण जव त्या तेले नई दपाळी सकनात, त तेस्नी तेले घर ना बाहेर लीजाईसन नील नदी ना तठ वर झुडूप ना मधमा सोळी दिध, तठे फारो नि पोर नि तेले उचली लीध आणि तेले आपला पोर्‍या मानीसन तेना पालन पोषण करनी. आणि मोशे ले मिसरीस्ना सर्वा ज्ञान शिकाळा मा उना, तो बोलाले आणि कामस्ले कराले सामर्थ्यी होता. “जव मोशे चाळीस वरीस ना हुयना, त तेना मन मा विचार उना कि आपला इस्त्राएली जाती ना भावूस्ले भेटु.” तठे तेनी एक मिसरी माणुस ना द्वारे एक इस्त्राएली माणुस ना संगे वाईट व्यवहार होतांना देखीसन तेले वाचाळ आणि मिसरवासी ले मारीसन त्रासेल ना बदला लीधा. तेनी विचार करा कि, तेना भावू समजतीन कि परमेश्वर तेना द्वारे तेस्ले गुलामी तून वाचाळीन, पण त्या नई समजी सकनात. दुसरा दिन जव दोन इस्त्राएली लोक आपस मा झगळा करी ऱ्हायंतात, त तो तठे जाई पोहोचना आणि हय सांगत तेस्ले समजोता कराले समजाऊ लागणा, “ओ लोकसहोण, तुमी त भावू-भावू शेतस, मंग एक दुसरा वर काब अन्याय करतस?” पण जो माणुस आपला शेजारी वर अन्याय करी ऱ्हायंता, तेनी मोशे ले हय सांगीसन ढकली टाक, “तुले कोणी आमना वर राजा आणि न्यायाधीश ठरायेल शे? काय ज्या प्रकारे तुनी कालदिन मिसरवासी ले मारी टाक, त्याच प्रकारे मले बी मारी टाकाना देखी ऱ्हायना?” हय गोष्ट आयकीसन मोशे घाबरी ग्या आणि एनासाठे तो मिसर देश ले सोळीसन पई ग्या आणि मिद्यान देश मा परदेशी हुईसन राहाले लागणा, तठे तेनी लगन कर आणि तेना दोन पोरस्ना जन्म हुईना. “मोशे ना मिद्यान देश मा चाळीस वरीस लोंग ऱ्हावाना नंतर परमेश्वर ना दूत ना रूप मा मोशे ले सियोन पहाळ ना उजाळ जागा मा चेटणारी झुडूप ना आग मा दर्शन दिधा.” जव मोशे नि चेटणारी झुडूप ले देख जी भस्म नई होत होती, त तो आश्चर्य चकित हुयना आणि जव देखा साठे नजीक ग्या, त प्रभु ना हवू शब्द आयकू उना. “मी तुना पूर्वज अब्राहाम, इसहाक आणि याकोब ना परमेश्वर शे,” तव मोशे घाबरीसन कापी उठना, आठ लगून कि तेले देखानी हिम्मत नई ऱ्हायनी. तव प्रभु नि तेले सांग, “मना प्रती सन्मान दाखाळा साठे आपला पाय मधून जोळा काळी टाक, कारण कि ज्या जागा वर तू उभा शे, ती पवित्र जागा शे.” मनी खरज आपला लोकस्नी दुर्दशा ले देखेल शे ज्या मिसर देश मा ऱ्हातस, आणि तेस्ना आवाज आणि तेस्ना रळान आयकी लीयेल शे, एनासाठे मी तेस्ले सोळावा ना साठे उतरेल शे, आते तयार हुई जा मी तुले मिसर देश मा धाळसू. “हवू तोच मोशे शे जेले इस्त्राएलीस्नि अस्वीकार करी दियेल होत, आणि जेस्नी सांग होत, तुले कोणी आमना वर राजा आणि न्यायाधीश ठरायेल शे? तेलेच परमेश्वर नि राजा आणि सोळावनार ठराईसन त्या परमेश्वर ना दूत ना द्वारे जेनी तेले झुडूपस्मा दर्शन दियेल होत, धाळ.” हवू व्यक्ती मिसर देश आणि लाल समुद्र आणि उजाळ जागा मा चाळीस वरीस लगून अदभूत काम आणि चिन्ह दाखाळी दाखाळीसन तेस्ले काळी लयना. हवू तोच मोशे शे, जेनी इस्त्राएल देश ना लोकस्ले सांग, परमेश्वर तुमना भावूस मधून तुमना साठे मनासारखा एक भविष्यवक्ता उभा करीन. हवूच मोशे एक भविष्यवक्ता ना रूप मा आमना पूर्वजस संगे होता, जव त्या उजाळ जागा मा एकत्र होतात. तठे सियोन पहाळ वर मोशे ले जीवीत वचन भेटणा आणि तेनी तेले आमना लोंग पोहचाळी दिधा. पण आमना पूर्वजस्नी तेनी आयकान नई देखनात, पण तेले धिक्कारीसन आपला मन मा विचार करत होतात कि मिसर देश मा परत जावाले पायीजे. तेस्नी मोशे ना भावू अहरोन ले सांग, “आमना साठे असा देवतास्ले बनाव, जो मिसर देश मा परत जावाना साठे आमना पुळे-पुळे चालो, कारण कि हवू मोशे जो आमले मिसर देश मधून काळी लयना, आमले माहिती नई तेले काय हुयन?” त्या दिनस्मा तेस्नी एक गोरा नि मूर्ती बनाईसन त्या मूर्ती समोर बलिदान चळावनात आणि आपला हातस्ना काम मा मग्न होवाले लागनात. या मुळे परमेश्वर तेस्ना पासून तोंड फिराईसन तेस्ले आकाश मा सूर्य, चांद आणि तारास्ले पूजा ना साठे सोळी दिधा, जसा भविष्यवक्ता ना पुस्तक मा लिखेल शे, ओ इस्त्राएल देश ना लोक, काय तुमी उजाळ जागा मा चाळीस वरीस लगून पशु बली आणि अन्नबली मनासाठे लयनात? नई तुमनी दुसरा देवतास्ले बलिदान चळावनात. तुमी त्या तंबू ले लिसन फिरत होतात जेनामा तुम्हना देवता मोलोक नि आणि देवता रेफान ना तारा मूर्ती होती. एनासाठे मी तुमले बाबेल देश ना त्या पार बंदी मा धाळसू. “साक्षी ना तंबू उजाळ जागा मा आमना पूर्वजस्ना संगे होता,” जसा परमेश्वर नि तेले ठराव, तेनी मोशे ले सांग, “जो आकार तुनी देखेल शे, त्याच प्रकारे येले बनाव.” गैरा वरीस नंतर आमना पूर्वज, यहोशू ना अगुवाई मा साक्षी ना तंबू ले ह्या जमीन वर लई उनात. ज्या टाईम ले तेस्नी आठे राहणारा बिगर यहुदीस्ना देश वर अधिकार लीधा, जेस्ले परमेश्वर नि आमना पूर्वजस्ना समोरून काळी टाका, तो साक्षी ना तंबू राजा दाविद ना टाईम लोंग ऱ्हायना. राजा दाविद वर परमेश्वर नि कृपा करी, एनासाठे राजा दाविद याकोब ना परमेश्वर ना साठे राहाणी जागा बनावाले विनंती करी. पण त्या मंदिर ना निर्माण दाविद ना पोऱ्या राजा शलमोन नि कर. खर तर हय शे कि परात्पर परमेश्वर लोकस्ना हात ना बनायेल मंदिर मा नई ऱ्हात. जसा कि यशया भविष्यवक्ता नि पुस्तक मा लिखेल शे, परमेश्वर सांगस, “स्वर्ग मना सिंहासन आणि पृथ्वी मना पाय नि चौकी शे. मनासाठे तुमी कसा प्रकार ना मंदिर बनावशयात? व मले राहाले कोणती जागा राहीन?” काय मी स्वता हय सगळ काही नई बनाव? “ओ कुटील लोकसहोण, तुमी तेनी गोष्ट मानाले व आयकाले नकार देतस, तुमी कायम पवित्र आत्मा ना विरोध करतस. जसा तुमना पूर्वजस्नी करेल होत, तसाच तुमी बी करतस. तुमना पूर्वजस्नी भविष्यवक्तास्ले त्रास दिधा, आणि जेस्नी धर्मी ख्रिस्त नि येवानी भविष्यवाणी करेल होती तेस्ले मारी टाक, आणि जव ख्रिस्त उना, त तुमनी तेले धोका दिधा आणि तेले मारी टाक. तुमी त त्या लोक शेतस जेस्ले परमेश्वर ना दूतस्ना द्वारे मोशे ना नियम सोपामा उणी, तरी बी तुम्हनी तेना पालन नई करणात.” स्तेफन ना ह्या गोष्टी आयकीसन यहुदी पुढारी गैरा रागे भरनात आणि तेनावर दात पिसू लागनात. पण स्तेफन पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईसन स्वर्ग कळे देखाना आणि परमेश्वर नि महिमा ले आणि येशु ले परमेश्वर ना उजवी कळे उभा देखीसन, तठे उपस्थित लोकस्ले सांग, “देखा, मले स्वर्ग उघळेल व माणुस ना पोऱ्या परमेश्वर ना उजवी कळे उभा ऱ्हायेल दिखी ऱ्हायना.” हय आयकताच तठे उपस्थित लोकस्नी मोठा आवाज मा आराया मारीसन आपला कानस्वर हात ठीई लीधात, आणि एकत्र तेनावर झपटनात. तेस्नी स्तेफन ले घसळीसन यरूशलेम शहर ना बाहेर काळ आणि दगडफेक करीसन तेले मारी टाक, स्तेफन वर आरोप लावणारा लोकस्नी आपला वरला कपळा काळीसन शौल नाव ना एक तरुण ना जोळे जमीन वर ठीई दिनात कि तो त्या कपळास्नि राखोयी करो. जव त्या स्तेफन वर दगडफेक करत होतात, त तो हय सांगीसन प्रार्थना करत ऱ्हायना, “ओ प्रभु येशु, मनी आत्मा ले स्वीकार कर.” मंग तेनी गुळघा टेकीसन उंच शब्द मा आवाज दिधा, “ओ प्रभु, ह्या पाप ना साठे एस्ले दोषी नको ठरावजो.” आणि हय सांगीसन तो मरी ग्या. स्तेफन नि हत्या मा शौल पूर्णपणे सहमत होता. त्याच दिन पासून यरूशलेम शहर नि मंडळी वर मोठा सताव होवू लागणा आणि प्रेषितस्ले सोळीसन सर्वान सर्वा यरूशलेम शहर तून निघीसन यहूदीया प्रांत आणि शोमरोन प्रांतस्मा गले-पते हुई ग्यात. काही भक्त लोकस्नी ज्या परमेश्वर ना आदर करत होतात स्तेफन ले कबर मा ठेव आणि तेना साठे मोठा दुख कर. शौल मंडळीस्ले त्रास देत होता आणि घर-घर मा घुशिसन विश्वासी माणसस्ले आणि बायास्ले घसळी-घसळीसन बंदीगृह मा टाकत होता. पण त्या विश्वासी ज्या यरूशलेम शहर ले सोळी दियेल होतात, त्या दुसरा जागा वर सुवार्ता आयकाळत फिरत होतात. त्या विश्वासीस मधून एक माणुस जेना नाव फिलिप्प होता, तो शोमरोन प्रांत ना एक नगर मा जाईसन लोकस्ले ख्रिस्त येशु ना प्रचार आयकाळाले लागणा. तेना प्रचार ले आयकीसन आणि जे चिन्ह चमत्कार तो करत होता तेले देखीसन लोकस्नी एक चित हुईसन तेना कळे मन लाव. फिलीप ना आदेश ले आयकीसन गैरा दुष्ट आत्मा गैरास मधून मोठा आवाज मा आराया मारत बाहेर निघीग्यात, गैरा लखवास ना रोगी आणि लंगळास्ले बी बरा करामा उन. आणि त्या शहर ना गैरा सावटा लोक आनंद करू लागनात. त्याच नगर मा शिमोन नाव ना एक माणुस होता, जो जादू टोना करीसन शोमरोन प्रांत ना लोकस्ले चकित करत आणि स्वता ले एक मोठा माणुस सांगत होता. त्या प्रदेश मा सर्वा धाकला पासून मोठा लोकस लोंग तेना सन्मान करीसन सांगत होतात, “हवू माणुस जोळे परमेश्वर नि ती सामर्थ्य शे जी महान सांगावस.” तेनी गैरा दिनस पासून तेस्ले आपला जादू ना कामस कण चकित करी ठीयेल होता, एनासाठे त्या तेनी आयकत आणि जे काही तो सांगत होता त्या तेन पालन करत होतात. जव लोकस्नी परमेश्वर ना राज्य आणि येशु ख्रिस्त ना नाव नि सुवार्ता मा फिलिप्प ना संदेश आयकीसन विश्वास करणात, तव सर्वा बाया आणि लोकस्नी बाप्तिस्मा लीधा. तव शिमोन नि स्वता बी फिलिप्प ना संदेश वर विश्वास कर आणि बाप्तिस्मा लिसन फिलीप ना संगे राहाले लागणा आणि चिन्ह चमत्कार आणि मोठा-मोठा सामर्थ्य ना काम देखीसन चकित होत होता. जव प्रेषितस्नी ज्या यरूशलेम शहर मा होतात आयक कि शोमरोन प्रांत ना लोकस्नी परमेश्वर ना वचन मानी लीयेल शे त पेत्र आणि योहान ले तेस्ना जोळे धाळ. तेस्नी तठे पोहचीसन तेस्ना साठे प्रार्थना करी कि तेस्ले पवित्र आत्मा भेटो. कारण कि आते लोंग तेस्ना मधून कोणाच जोळे बी पवित्र आत्मा नई धाळामा एयेल होता, तेस्नी त फक्त प्रभु येशु ना नाव मा बाप्तिस्मा लीयेल होता. तव पेत्र आणि योहान नि तेस्ना वर हात ठेव आणि तेस्ले पवित्र आत्मा भेटणा. जव शिमोन जादूगर नि देखा कि प्रेषितस्ना हात ठेवावर पवित्र आत्मा तेस्ना मा येस, त तेस्ना जोळे पैसा लईसन सांग, “हय सामर्थ्य मले बी द्या, कि मी ज्या कोणावर हात ठेवू, तेले पवित्र आत्मा भेटो.” पेत्र नि तेले सांग, “तू आणि तुना पैसा नाश हुई जावोत, कारण कि तुनी परमेश्वर ना दान पैसासकण विकत लेवाना विचार करा. ह्या सेवामा नईत तुना हिस्सा शे नईत भाग शे, कारण कि तुना मन परमेश्वर ना समोर खरा नई शे.” एनासाठे आपला ह्या वाईट पणा पासून मन फिराईसन प्रभु ले प्रार्थना कर, कदाचित परमेश्वर तुना मन ना वाईट विचार माफ करी दिन. मन फिराव कारण कि मी देखस कि तू द्वेष ना सारखी कळूता कण भरेल शे आणि पूर्णपणे पाप ना बंधन मा पळेल शे. शिमोन जादूगर नि उत्तर दिध, “तू स्वता मनासाठे प्रभु ले प्रार्थना कर कि ज्या गोष्टी तुनी सांगी, तेस्ना मधून काई बी मनावर असर नई करोत.” येणा नंतर पेत्र आणि योहान साक्षी दिसन आणि प्रभु येशु ना वचन आयकाळीसन, यरूशलेम शहर कळे परत जातांना शोमरोन प्रांत ना कईक गावस्मा सुवार्ता आयकाळत ग्यात. प्रभु ना एक परमेश्वर ना दूत नि फिलिप्प ले सांग, “उठीसन दक्षिण कळे त्या रस्ता वर जा, जो यरूशलेम शहर पासून गाजा शहर कळे जास.” हवू उजाळ जागा ना रस्ता शे. फिलीप हय आज्ञा ना नुसार उठीसन चाली पळणा, तव रस्ता मा तेनी भेट इथिओपिया देश ना एक माणुस संगे हुयनी जो खोजा होता. तो इथिओपिया नि राणी कांदके ना मंत्री आणि पुरा खजाना नि देखभाल करणारा होता. तो उपासना कराना साठे यरूशलेम शहर एयेल होता. तो आपला देश ले परत जावाना टाईम ले आपला रथ मा बठीसन यशया भविष्यवक्ता ना पुस्तक वाचत होता. तव पवित्र आत्मा नि फिलिप्प ले सांग, “पुळे जाईसन ह्या रथ ना संगे-संगे चालू लाग.” फिलिप्प पयीसन रथ जोळे पोहोचना आणि त्या माणुस ले यशया भविष्यवक्ता नि पुस्तक वाचतांना आयक, तव तेनी तेले विचार, “तू जे वाची ऱ्हायंना काय तेले समजस बी?” खोजा नि उत्तर दिधा, “जर कोणी मले समजाळनारा नई शे त, मी येले नई समजसु सकस.” मंग तेनी फिलिप्प ले रथ वर चळीसन बठानी विनंती करी. परमेश्वर ना पुस्तक मधून जो भाग तो वाची ऱ्हायंता, तो हवू होता, “तो ठरायेल मेंढी ना सारखा वध होवाले पोचाळायेल शे, जसा मेंडरू आपला केस कापनारस्ना समोर शांत ऱ्हास, तसाच जव लोकस्नी तेले दुख दिधा त तेनी आपला तोंड नई ऊघाळ.” तेले अपमानित करामा उन आणि तेले न्याय नई भेटणा, तेना वंशज ना बारामा कोणी नई सांगू सकस, कारण कि येणा पयले पृथ्वी वर तेन कोणी वंशज ऱ्हात, लोकस्नी तेले मारी टाक. एनावर खोजा नि फिलिप्प ले विचार, “मी तुले विनंती करस, कृपा करीसन मले सांग कि भविष्यवक्ता हवू कोणा बारामा वर्णन करस, आपला बारामा कि कोणा दुसरा ना बारामा?” तव फिलिप्प नि परमेश्वर ना पुस्तक ना त्याच भाग मधून सुरुवात करीसन तेले येशु ख्रिस्त ना बारामा सुवार्ता आयकाळी. जव त्या रस्तामाच होतात, त तेस्नी रस्ता ना बाजुमा एक तलाव देख. त खोजा नि सांग, “देख आठे तलाव शे, आते मले बाप्तिस्मा लेवाले काय हरकत शे?” फिलीप नि उत्तर दिधा, “जर तू आपला पुरा मन कण ख्रिस्त येशु वर विश्वास करस, त तू बाप्तिस्मा लेवू सकस.” खोजा नि सांग, “हा मी विश्वास करस कि ख्रिस्त येशुच परमेश्वर ना पोऱ्या शे.” तव खोजा नि रथ चालक ले रथ उभा करानी आज्ञा दिधी, मंग फिलिप्प आणि खोजा दोनी तलाव मा उतरी पळणात, आणि फिलिप्प खोजा ले बाप्तिस्मा दिधा. जव त्या पाणी मधून निघीसन बाहेर उनात, त परमेश्वर नि आत्मा फिलिप्प ले उचली ली गई, मंग खोजा नि तेले परत नई देख, आणि तो ह्या गोष्ट ना आनंद करत कि परमेश्वर नि तेले वाचाळी लीयेल शे आपला देश परती ग्या. पण फिलिप्प परमेश्वर नि आत्मा ना द्वारे अजोत नगर मा लिजावामा उना. आणि कैसरीया शहर मा पोहोचा लगून तो प्रत्येक गाव मा खुशी नि सुवार्ता आयकाळत एक जागा वरून दुसरी जागा वर आपला प्रवास चालू ठेवणा. ह्याच टाईम ले शौल वर प्रभु येशु ना शिष्यस्ले धमकावानी आणि तेस्नी हत्या करानी धुंदी चळेल होती. तो महा यहुदी पुजारी कळे ग्या. आणि तेस्ना पासून दमिश्क नगर ना प्रार्थना घरस्ना नाव वर ह्या उद्देश कण अधिकार पत्र मांगना, कि जर कोणी माणुस व बाई ज्या येशु ना मत ले मानणारा राहो तेस्ले तो बांधीसन यरूशलेम शहर मा लई येवो. पण जव शौल आणि तेना साथी चालता-चालता दमिश्क नगर ना जोळे भिळनात, त अचानक चारीस कळून अदभूत आकाश ना उजाया मा तो घेराई ग्या. तो जमीन वर पळी ग्या, आणि परमेश्वर ना हवू शब्द आयकना, “ओ शौल, ओ शौल, तू मले काब त्रास दि ऱ्हायना?” शौल नि विचार, “ओ प्रभु, तू कोण शे?” प्रभु नि उत्तर दिध, “मी येशु शे जेले तू त्रास दि ऱ्हायना.” पण आते तू उठीसन नगर मा जा, तठे कोणी तुले सांगी दिन कि तुले काय करन शे. शौल ना संगे ज्या लोक होतात, त्या आश्चर्य ना संगे शांतपणे उभा ऱ्हायनात. कारण कि त्या शब्द त आयकत होतात, पण कोणी दिखत नई होता. तव शौल जमीन वरून उठना, पण जव डोया उघाळना त तेले काहीच नई दिखन, आणि तेना साथीस्नि तेना हात धरीसन तेले दमिश्क नगर मा ली ग्यात. शौल तीन दिन लगून अंधाच ऱ्हायना आणि काही नई देखी सकना, नईत तेनी काही खाद, आणि नईत काही पिद. दमिश्क नगर मा हनन्या नाव ना एक शिष्य होता, तेले प्रभु येशु नि दर्शन मा सांग, “ओ हनन्या,” तेनी सांग, “हा प्रभु.” तव प्रभु येशु नि तेले सांग, “उठीसन सरळ नाव नि गली मा जा, आणि यहूदा ना घर मा शौल नाव ना एक तार्सस नगर ना राहणारा ना बारामा विचारी ले, कारण कि तो प्रार्थना करी ऱ्हायना शे,” तेनी दर्शन मा देख कि हनन्या नाव ना एक माणुस नि ईसन तेनावर हात ठेव कि तो परत देखाले लागी जावो. हनन्या नि उत्तर दिध, “ओ प्रभु, मनी ह्या माणुस ना बारामा गैरास पासून आयकेल शे कि एनी यरूशलेम शहर मा तुना पवित्र लोकस संगे मोठ-मोठा वाईट काम करेल शे. आणि आठे बी तो मुख्य यहुदी पुजारीस कळून अधिकार पत्र लिसन एयेल शे, कारण कि ज्या लोक तुनावर विश्वास करतस, त्या सर्वास्ले बांधीसन यरूशलेम शहर लीजावो.” पण प्रभु येशु नि हनन्या ले सांग, “तू चालना जा, कारण कि तो त मना निवाळेल झन शे, जो बिगर यहुदीस, राजास, आणि इस्त्राएल देश ना लोकस्ना समोर मना नाव ना प्रचार करीन. मी तेले सांगसू कि लोकस्मा मना नाव ना प्रचार करा मुळे तेले कितला दुख उचलना पळीन.” तव हनन्या उठीसन त्या घर ईग्या, जठे शौल थांबेल होता. तेनी शौल वर आपला हात ठियसन सांग, “हे भावू शौल, प्रभु येशु नि, जेनी तुले आठे येतांना रास्ता मा दर्शन दिध, तेनीच मले तुना जोळे धाळेल शे. कारण कि तू परत देखाले लागो आणि पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुई जावो.” तव लगेच शौल ना डोया मधून पापळी सारख छील्की पळणी आणि तो देखाले लागणा, तव तो उठीसन बाप्तिस्मा लीना. मंग शौल ना जेवण करा नंतर तेना शरीर मा शक्ती उणी. तो कईक दिनस लोंग दमिश्क नगर ना शिष्यस्ना संगे ऱ्हायना. तेना नंतर शौल नि टाईम नई लावता दमिश्क नगर ना यहुदी प्रार्थना घरस्मा येशु ख्रिस्त ना बारामा प्रचार कराले लागणा कि, “ख्रिस्त येशुच परमेश्वर ना पोऱ्या शे.” जीतलास्नी तेले हय सांगतांना आयक त्या सर्वा चकित हुईसन सांगाले लागनात, “काय हवू तोच माणुस नई शे जो यरूशलेम शहर मा ख्रिस्त येशु ना नाव लेनारास्ले नाश करत होतात आणि आते आठे बी एनासाठे एयेल होता कि, तेस्ले बंदी बनाईसन मुख्य यहुदी पुजारीस कळे लीजावो?” पण शौल नि आखो बी शक्तिशाली रूप कण प्रचार कराले सुरु करी टाक. तो ह्या गोष्ट नि प्रमाण दि-दिसन कि येशुच ख्रिस्त शे, दमिश्क नगर ना राहणारा यहुदी लोकस्ना तोंड बंद करत होता. जव शौल ले दमिश्क नगर मा राहतांना गैरा टाईम चालना ग्यात, त यहुदी लोकस्नी मियसन तेले मारी टाकना युक्ती काळी. पण तेस्नी युक्ती शौल ले माहित पळी गी, त्या त तेले मारी टाकना साठे रात दिन नगर ना दरवाजास्वर टपिसन बठेल राहत होतात. एक रात तेना शिष्य तेले दगड नि एक मोठी भिंत वर लीग्यात जी नगर ले घेरत होती. मंग तेस्नी भिंत ना एक उघळेल भाग तून दोरीस्ना वापर करीसन एक मोठ टोमा मा तेले बठाळीसन खाले उतारी टाक. ह्या प्रकारे तो दमिश्क नगर तून वाचीसन चालना ग्या. यरूशलेम शहर मा भिळीसन शौल नि येशु ख्रिस्त ना शिष्यस्ना संगे मिय जावन प्रयत्न करना, पण सर्वा विश्वासी तेले भ्यात होतात. कारण कि तेस्ले विश्वास नई होता कि तो बी येशु ख्रिस्त ना शिष्य शे. पण बर्णबा नि तेले आपला संगे प्रेषितस्ना जोळे लीजाईसन तेस्ले सांग, कि एनी कसा काय दमिश्क नगर जावाना रस्ता मा प्रभु येशु ले देख. आणि प्रभु नि तेना संगे गोष्टी करी, नंतर कसा काय एनी दमिश्क नगर मा मोठी हिम्मत कण येशु ना नाव ना प्रचार कर. प्रेषितस्नी बर्णबा ना गोष्टीस्वर विश्वास कर आणि येणा साठे शौल तेस्ना संगे यरूशलेम शहर मा प्रत्येक जागा वर ग्या. शौल बिगर भ्यावाना प्रभु येशु ना नाव ना प्रचार करत होता, तो ग्रीक भाषा बोलणार यहुदी लोकस संगे गोष्टी आणि वाद-विवाद करत होता. पण त्या तेले मारी टाकना यत्न कराले लागनात. हय समजीसन विश्वासी भावू तेले कैसरीया शहर मा लई उनात. मंग तेस्नी तेना साठे शहर मधून तार्सस नगर जो तेना गृहनगर शे जावाना साठे एक नाव नि सोय करणात. ह्या प्रकारे सर्वा यहूदीया प्रांत, गालील जिल्हा आणि शोमरोन प्रांत मा मंडळी ले आराम भेटणा आणि तेस्नी प्रगती होत गयी. मंडळी प्रभु ना भीती आणि पवित्र आत्मा नि प्रोत्साहन ना द्वारे शांती मा चालत आणि गणती मा वाळत गयी. नंतर अस हुयन कि पेत्र त्या सर्वा क्षेत्र मा फिरत त्या पवित्र लोकस जोळे बी भेट कराले पोहोचना, ज्या लोद नगर मा ऱ्हात होतात. तठे तेले ऐनेयास नाव ना लखवा ना रोगी माणुस भेटणा, जो आठ वरीस पासून खाट वर पळेल होता. पेत्र नि तेले सांग, “ओ ऐनेयास, येशु ख्रिस्त तुले बरा करस. उठ, आपला अथरुण उचल.” तव तो लगेच उठीसन उभा ऱ्हायना. लोद नगर आणि शारोन नगर ना ऱ्हायनारस्नी तेले देखीसन प्रभु येशु वर विश्वास करणात. यापो नगर मा तबिथा नाव नि एक शिष्य बाई होती. (ग्रीक भाषा मा तीना नाव दोरकास शे, जेना अर्थ शे एक हरीण.) ती गैरा चांगला-चांगला काम आणि गरीबस्नि मदत करत ऱ्हात होती. त्या टाईम ले पेत्र लोद मा होता, ती आजारी हुईसन मरी गई. तीना साथीस्नि तिले आंघोळ घालीसन वरली खोली मा ठिय टाक. लोद नगर यापो नगर ना जोळे शे, शिष्यस्नी हय आयकीसन कि पेत्र तठे शे दोन माणसस्ले धाळीसन तेले विनंती करी, “आमना जोळे येवाले उशीर नको करू.” तव पेत्र उठीसन तेस्ना संगे चालू लागणा, आणि जव तो भिळणा, त त्या तेले वरली खोली मा लिग्यात. सगळ्या विधवा रळत तीना जोळे ईसन उभ्या ऱ्हायन्यात, ज्या कपळा दोरकास नि तीना संगे राहतांना बनायेल होतात, तेले दाखाळाले लागण्यात. तव पेत्र नि सर्वास्ले बाहेर करी दिध आणि गुळघा टेकीसन प्रार्थना करना. तव धड कळे देखीसन सांग, “ओ तबिथा, उठ.” मंग तिनी आपला डोया उघाळी लीधात आणि पेत्र ले देखीसन उठी बठनी. पेत्र नि हात पुळे करीसन तिले उठाळा, आणि पवित्र लोकसस्ले आणि विधवास्ले बलाईसन तिले जीवीत आणि जागृत दाखाळी. हय गोष्ट पुरा यापो नगर मा पसरी गयी, आणि गैरास्नी प्रभु येशु वर विश्वास करा. आणि पेत्र यापो नगर मा शिमोन नाव ना कोणी कातळीस्ना धंदा (व्यापार) करणार ना आठे गैरा दिनस लगून ऱ्हायना. कैसरीया शहर मा कुरनेलियुस नाव ना एक माणुस होता, जो इटलीक नाव ना सैन्य दल ना सरदार होता. तो परमेश्वर ना भक्त होता आणि आपला पुरा घराणा (परिवार) संगे परमेश्वर ले घाबरत आणि तेनी स्तुती करत होता. तो गरीब यहुदी लोकस्ले गैरी वर्गणी देत होता, आणि कायम परमेश्वर ले प्रार्थना करत होता. एक दिन दुफार ना जवळ-पास तीन वाजता तेनी दर्शन देख, कि परमेश्वर ना एक परमेश्वर ना दूत नि तेना जोळे मधमा ईसन सांग, “ओ कुरनेलियुस.” कुरनेलियुस नि स्वर्गदूत ले ध्यान कण देख आणि भ्यायसन विचार, “ओ प्रभु, काय आज्ञा शे?” स्वर्गदूत नि तेले उत्तर दिध, “तुन्या प्रार्थना आणि तुनी वर्गणी परमेश्वर ना समोर स्मरण करामा एयेल शे. एनासाठे आपला दासस्ले यापो नगर मा धाळीसन शिमोन ले जो पेत्र सांगावस, बलाई ले. तो शिमोन नाव ना चामळी ना धंदा (व्यापार) करणारा ना घर पाव्हना शे, जेना घर समुद्र ना तठ वर शे.” जव तो परमेश्वर ना दूत जो तेनाशी गोष्टी करी ऱ्हायंता चालना ग्या, त कुरनेलियुस नि आपला दोन दासस्ले बलाईसन ज्या तेनी सेवा कराले कायम हजर ऱ्हात होतात, तेस्ना मधून एक शिपाई ले जो परमेश्वर ना भक्त होता बलाव. तेस्नी तेस्ले सगळ्या गोष्टी संगीसन यापो नगर मा पेत्र ले लया साठे धाळ. कुरनेलियुस ना द्वारे धाळायेल दास दुसरा दिन दुफार ना जवळ-पास चालत-चालत यापो नगर मा पोचनात. त्याच टाईम ले पेत्र गच्चीवर वर प्रार्थना करले ग्या. तठे तेले भूक लागणी आणि काही खावानी ईच्छा करत होता, पण जव त्या जेवण तयार करी ऱ्हायंतात त तो बेसुध हुईग्या. तव तेनी दर्शन मा देख कि आकाश उघळी ग्या आणि एक मोठी चादर सारखी वस्तू चारी कोपरास कण लटकायेल पृथ्वी कळे उतरी ऱ्हायंती. तेनामा पृथ्वी ना सर्वा प्रकारणा चारपाई आणि घसळनारा जंतू आणि आकाश ना पक्षी होतात त तेले एक असा शब्द आयकू उना, “ओ पेत्र उठ, मार आणि खा.” पेत्र नि सांग, “नई प्रभु, कदीच नई, कारण कि मी कदी कोणती अपवित्र आणि अशुद्ध वस्तू नई खायेल शे.” परत दुसरा सावा तेले शब्द आयकू उना, “जे काही परमेश्वर नि शुद्ध ठरायेल शे, तेले तू अशुद्ध नको सांगु.” तीन सावा असच हुयन, तव लगेच ती चादर आकाश मा उचला मा उणी. जव पेत्र आपला मन मा ह्या दर्शन ना बारामा विचार करत होता, कि जे मी देखेल शे तेना अर्थ काय शे. तव त्या दास जेस्ले कुरनेलियुस नि धाळेल होत, शिमोन जो चामळी ना धंदा (व्यापार) करत होता तेना घर ना तपास लाईसन दरवाजा वर ईसन उभा ऱ्हायनात. तेस्नी आवाज दिसन विचार, “काय शिमोन जो पेत्र सांगावस आठेच थांबेल शे?” जव पेत्र त्या दर्शन ना बारामा विचारच करी ऱ्हायंता, तव पवित्र आत्मा नि तेले सांग, “देख, तीन लोक तुले झामली ऱ्हायनात. एनासाठे उठीसन खाले जा, जरी बी त्या दुसरा जाती ना शेतस तरी बी बिगर चिंता ना तेस्ना संगे चालना जा, कारण कि मीच तेस्ले धाळेल शे.” तव पेत्र नि खाले उतरीसन त्या लोकस्ले विचार, “देखा, जेले तुमी झामली ऱ्हायनात, तो मीच शे. तुमना येवाना कारण काय शे?” तेस्नी उत्तर दिधा, “कुरनेलियुस सरदार जो धर्मी आणि परमेश्वर ले भ्यायनारा आणि सर्वा यहुदी लोकस्ना मधमा सन्मानित माणुस शे. तेनी एक पवित्र स्वर्गदूत पासून हवू आदेश लीयेल शे, कि तुले आपला घर बलाईसन तुना पासून वचन आयको.” तव पेत्र नि तेस्ले घर ना मधमा बलाईसन राहाले जागा दिधी. दुसरा दिन तो तेस्ना संगे ग्या, आणि यापो नगर ना भावूस मधून काही तेना संगे चालना ग्यात. तिसरा दिन त्या कैसरीया शहर पोचनात, तठे कुरनेलियुस आपला परिवार आणि प्रिय मित्रस संगे एकत्र हुईसन तेना रस्ता देखी ऱ्हायंतात. जव पेत्र घर ना मधमा उना त कुरनेलियुस नि तेना स्वागत कर आणि तेना पायस्वर पळीसन तेले नमन करना. पण पेत्र नि तेले उठाळीसन सांग, “उभा हो, मले नमन नको करू कारण कि मी बी त माणुस शे.” आणि तेना संगे गोष्टी करत मधमा ग्या, तठे गैरा लोकस्ले एकत्र देखीसन, तेस्ले सांग, “तुमले माहित शे कि बिगर यहुदी संगे सहभागीता करान व तेस्ना घर मा जावान आणि यहुदी लोकस्ना नियम ना विरुद्ध मा शे. पण परमेश्वर नि मले सांगेल शे कि कोणी माणुस ले अपवित्र व अशुद्ध नई सांगु. एनासाठे जव मले बलावामा उन त मी बिगर काही सांगाणा आठे ईलागनु. आते मी विचारस कि मले कोणता काम साठे बलावामा एयेल शे?” कुरनेलियुस नि उत्तर दिध, “चार दिन पयले, ह्याच टाईम ले जव मी आपला घर मा दुफार ना तीन वाजता प्रार्थना करत होतु त एक माणुस चमकदार कपळा घालेल, मना समोर ईसन उभा ऱ्हायना.” तेनी मले सांग, “ओ कुरनेलियुस, तुनी प्रार्थना आयकाय जायेल शे आणि तुनी वर्गणी परमेश्वर ना समोर स्मरण करामा एयेल शे. एनासाठे आते कोले यापो नगर मा धाळीसन शिमोन ले जो पेत्र सांगावस, बलाई ले. तो समुद्र ना तठ वर शिमोन जो चामळी ना धंदा (व्यापार) करणारा शे तेना घर मा पाव्हना शे. तव मनी लगेच आपला दासस्ले तुना कळे धाळ, आणि तुनी चांगल कर कि आठे इगया. आते आमी सर्वा आठे परमेश्वर ना समोर शेतस, कारण कि जे काही परमेश्वर नि तुले सांगेल शे तेले आयकोत.” तव पेत्र नि सांग, आते मी चांगला प्रकारे समजी ग्या, कि परमेश्वर कोणाच पक्षपात नई करस, पण सर्वा जातीस्मा ज्या परमेश्वर ले भ्यातस आणि धार्मिक ना काम करतस, तो तेस्ले स्वीकार करस. तुमले त्या संदेश ना बारामा त माहितीच शे जो परमेश्वर नि इस्त्राएल देश ना लोकस साठे धाळेल शे. तेनी शांती ना बाराम सुवार्ता आयकाळी जी लोकस्ले येशु ख्रिस्त वर जो सर्वा लोकस्ना प्रभु शे, विश्वास कराना द्वारे भेटू सकस. तो वचन तुमले माहिती शे, जो योहान बाप्तिस्मा देणारा ना द्वारे बाप्तिस्मा ना प्रचार करा नंतर गालील जिल्हा तून सुरुवात हुईसन सर्वा यहूदीया प्रांत मा पसरी ग्या. परमेश्वर नि कोणत्या प्रकारे पवित्र आत्मा आणि सामर्थ्य कण नासरेथ नगर ना येशु ले अभिषेक कर. तो चांगल करत आणि सर्वा ज्या सैतान कण त्रासेल होतात बरा करत फिरणा. कारण कि परमेश्वर तेना संगे होता. आमी त्या सर्वा कामस्ना साक्षी शेतस, जे तेनी यहुदीस्ना पुरा देश मा आणि यरूशलेम शहर मा बी कर. यरूशलेम शहर मा यहुदी पुढारीस्नी तेले क्रूस वर टांगीसन मारी टाक. पण परमेश्वर नि तेले तिसरा दिन मरेल मधून जित्ता कर, आणि तेले समोर बी लयना. सर्वा लोकस्नी तेले नई देख, पण त्या साक्षीस्ले जेस्ले तेनी पहिले पासून निवाळी लीयेल होत, म्हणजे आमी प्रेषित जेस्ना संगे तेनी जित्ता होवाना नंतर खाद-पिद आणि संगती करणात. तेनी आमले आज्ञा दिधी कि लोकस्मा प्रचार करा, आणि साक्षी द्या, कि येशु तोच शे जेले परमेश्वर नि जित्तास्वर आणि मरेलस्वर न्याय कराले ठरायेल शे. तेनी सर्वा भविष्यवक्ता साक्षी देतस, कि जो कोणी तेनावर विश्वास करीन, तेस्ले तेना नाव ना द्वारे पापस्नी माफी भेटीन. पेत्र ह्या गोष्टी सांगीच ऱ्हायंता कि वचन ना सर्वा आयकणारस वर पवित्र आत्मा उतरी उना. पेत्र ना संगे जीतला सुंता करेल यहुदी विश्वासी एयेल होतात, त्या सर्वा चकित हुयनात कि बिगर यहुदी लोकस्ले बी पवित्र आत्मा ना वरदान दियेल शे. कारण कि त्या तेस्ले आल्लग-आल्लग भाषा बोलत आणि परमेश्वर नि स्तुती करत आयकत होतात. एनावर पेत्र नि सांग, “काय आते कोणी एस्ले पाणी ना बाप्तिस्मा पासून रोकी सकस? कारण कि एस्ले बी आमना सारखा परमेश्वर कळून पवित्र आत्मा भेटेल शे.” तव पेत्र नि तेस्ले ज्या कुरनेलियुस ना घर मा एकत्र होतात आज्ञा दिधी, कि त्या येशु ख्रिस्त ना नाव मा बाप्तिस्मा लेवोत. बाप्तिस्मा लेवाना नंतर कुरनेलियुस नि तेले विनंती करी कि काही दिन आखो आमना संगे ऱ्हाय. एनासाठे तो काही दिन लोंग थांबीग्या. सर्वा यहूदीया प्रांत मा प्रेषितस्नी आणि विश्वासी भावूस्नी हवू संदेश आयक कि बिगर यहुदीस्नी बी परमेश्वर ना वचन मानी लीयेल शे. जव पेत्र यरूशलेम शहर मा उना, त सुंता करेल विश्वासी लोक तेना संगे वाद-विवाद कराले लगनात, तू बिगर-सुन्ताना दुसरा जाती ना लोकस्ना घर ग्या आणि तेस्ना संगे जेवण करना. तव पेत्र नि तेस्ले सुरुवात पासून क्रम ना नुसार ज्या गोष्टी कुरनेलियुस ना घर मा हुयेल होत्यात सांगी आयकाळ, “जव मी यापो नगर मा प्रार्थना करी ऱ्हायंतू, आणि बेसुध हुईसन एक दर्शन देखनु. कि एक मोठी चादर सारखी वस्तू चारी कोपरास पासून लटकेल आकाश मधून उतरीसन मना जोळे उणी.” जव मनी तेनावर ध्यान दिधा, त तेनावर पृथ्वी ना चारपाई, वनपशु, घसरणार जंतू आणि आकाश ना पक्षीस्ले देख. त्याच टाईम ले मले हवू शब्द बी आयकू उना, “ओ पेत्र उठ, मार आणि खा.” मनी सांग, “नई प्रभु, नई, कारण कि काही अपवित्र व अशुद्ध वस्तू मनी कदीच नई खाद.” एना उत्तर मा आकाश मधून दुसरा सावा आवाज उना, “जे काही परमेश्वर नि शुद्ध ठरायेल शे, तेले तू अशुद्ध नको सांगु.” तीन सावा असच हुयन, तव सगळ काही परत आकाश मा उचलाई ग्या. बरोबर त्याच टाईम ले तीन लोक ज्या कैसरीया शहर मधून कुरनेलियुस ना द्वारे मना जोळे धाळायेल होतात, त्या घर मा जेनामा आमी होतुत, ईसन उभा ऱ्हायनात. तव पवित्र आत्मा नि मले तेस्ना संगे बिगर संशय धराना जावाले सांग, मना संगे ह्या सहा भावू बी चालू लागनात, आणि आमी कुरनेलियुस ना घर मा ग्युत. तठे कुरनेलियुस नि आमले सांग, कि तेनी आपला घर मा एक परमेश्वर ना दूत ले उभा ऱ्हायेल देख, जेनी तेले सांग, यापो नगर मा माणुस धाळीसन शिमोन ले जो पेत्र सांगावस, बलाई ले. त्या परमेश्वर ना दूत नि सांग, पेत्र तुले अशा गोष्टी सांगीन, जेना द्वारे परमेश्वर तुले आणि तुना सर्वा परिवार ना लोकस्ले वाचाळीन. जव मनी प्रवचन देवाले चालू कर, त पवित्र आत्मा तेस्ना वर त्याच प्रमाणे उतरणा, जसा सुरुवात मा आमना वर उतरेल होता. तव मले प्रभु ना तो शब्द याद उना, जो तेनी सांगेल होत, “योहान बाप्तिस्मा देणारा नि त पाणी कण बाप्तिस्मा दिधा, पण तुमी पवित्र आत्मा कण बाप्तिस्मा लीशात.” एनासाठे हई स्पष्ट शे कि परमेश्वर नि तेस्ले बी तोच दान दिधा, “जो आमले प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास करा मुळे भेटणा, त मी कोण होतु जो परमेश्वर ले रोकी सकत होतु?” हाय आयकीसन त्या यहुदी विश्वासी चूप ऱ्हायनात आणि परमेश्वर नि वाह-वाह करीसन सांगू लागनात, “तव त परमेश्वर नि बिगर यहुदीस्ले बी कायम ना जीवन ना साठे आपला पापस पासून मन फिरावा ना आणि येशु ख्रिस्त वर विश्वास कराना दान दियेल शे.” स्तेफन नि मृत्यु नंतर यरूशलेम शहर मा छळ हुयेल होता, ह्या छळ मुळे ज्या विश्वासी लोक अथा-तथा हुईनात, त्या फिरत-फिरत फेनिके प्रांत, कुप्र बेट आणि सिरीया प्रांत ना अंत्युखिया शहर मा पोहोचनात. पण यहुदी लोकस्ले सोळीसन कोणी आखो कोले येशु ना बारामा संदेश नई आयकाळत होतात. पण तेस्ना मधून काही विश्वासी कुप्र बेट ना राहणारा आणि कुरेने शहर ना राहणारा होतात, ज्या अंत्युखिया शहर मा ईसन ग्रीक लोकस्ले बी प्रभु येशु ना सुवार्ता ना गोष्टी आयकाळाले लगनात. प्रभु ना सामर्थ्य तेस्ना वर होता आणि गैरा दुसरा जाती ना लोक तेस्ना संदेश ना द्वारे प्रभु येशु वर विश्वास करू लागनात. तव तेस्ना गोष्टी यरूशलेम शहर नि मंडळीस्मा बी पोहोचनात. एनासाठे तेस्नी बर्णबा ले अंत्युखिया शहर मा धाळ. बर्णबा तठे पोहचीसन आणि त्या विश्वासीस्ना साठे परमेश्वर नि कृपा देखीन खुश हुईना. तेनी सर्वास्ले प्रवचन सांग कि तन मन लाईसन प्रभु ना प्रती विश्वास योग्य बनेल राहोत. बर्णबा एक चांगला माणुस होता, तो विश्वास आणि पवित्र आत्मा कण परिपूर्ण होता. बर्णबा नि सेवाकार्य द्वारे गैरा लोक प्रभु येशु वर विश्वास करणात. तव बर्णबा अंत्युखिया शहर ले सोळीसन शौल ले झामला साठे तार्सस नगर ले चालना ग्या. जव तेनी शौल ले झामली लीध, त तो तेले अंत्युखिया शहर मा लिसन ग्या. शौल आणि बर्णबा एक वरीस लोंग मंडळी ना विश्वासी संगे ऱ्हायसन आणि गैरा लोकस्ले प्रभु येशु ना बारमा शिक्षण देत ऱ्हायनात. अंत्युखिया शहर माच सर्वास्तून पयले ख्रिस्त येशु ना शिष्य, ख्रिस्ती सांगायनात. त्याच दिनस्मा काही विश्वासी ज्या भविष्यवक्ता होतात यरूशलेम शहर मधून अंत्युखिया शहर मा उनात. तेस्ना मधून अगब नाव ना एक भविष्यवक्ता नि उभा ऱ्हायसन पवित्र आत्मा नि प्रेरणा कण हय सांग कि, सर्वा जग मा मोठा काय पळीन. आणि तो काय सम्राट क्लौदिया ना टाईम मा पळणा. तव शिष्यस्नी निर्णय कर कि प्रत्येक आपली-आपली पुंजी प्रमाणे यहूदीया प्रांत मा राहणारा विश्वासी भावूस्नी आपली-आपली सामर्थ्य ना नुसार मदत करूत. तेस्नी असच कर व बर्णबा आणि शौल ना हात कण वरिष्ठस कळे काही पैसा धाळनात. त्या टाईम हेरोद राजा मंडळी ना काही विश्वासी लोकस्ले त्रास देवा साठे बंदी बनाई लीधा. तेनी प्रेषित योहान ना भावू याकोब ले तलवार कण माराइ टाक. जव तेनी देख, कि यहुदी लोक एना कण खुश होतस, त तेनी पेत्र ले बी धराना निश्चय कर. हय बिगर खमीर ना भाकर ना सन ना दिन हुईन. हेरोद राजा नि पेत्र ले धरीसन बंदीगृह मा टाक आणि राखोई साठे, चार-चार शिपाईस्ना चार तुकळी ले पहारा देवाले ठेव. ह्या विचार कण कि वल्हांडण ना सन नंतर तेले सर्वा लोकस्ना समोर तेनी परीक्षा लेवूत. बंदीगृह मा पेत्र नि गैरा दिनस पासून राखोयी होत होती. पण मंडळी ना विश्वासी लोक तेना साठे एक मन हुईसन परमेश्वर ले प्रार्थना करी ऱ्हायंतात. जव हेरोद राजा पेत्र वर दोष लावा साठे तेले लोकस समोर लयावर होता, तेना तून एक रात पयले पेत्र दोन साकयस कण बांधायेल होता, दोन शिपाईस्ना मधमा जपी ऱ्हायंता आणि पहारेकरी दरवाजा वर बंदीगृह नि राखोई करी ऱ्हायंतात. अचानक परमेश्वर ना एक दूत पेत्र ना समोर ईसन उभा ऱ्हायना आणि ती खोली (कोठरी) उजाया कण भरी गयी. परमेश्वर ना दूत नि पेत्र नि पासोई वर हात लाईसन तेले जागाळ आणि सांग, “लवकर उठ.” तव पेत्र ना हात कण साकय उघळीसन पळीग्यात. तव परमेश्वर ना दूत नि तेले सांग, “कमर बांध, आणि आपला जोळा घालीले.” पेत्र नि तसच कर, नंतर परमेश्वर ना दूत नि तेले सांग. “आपला वरला कपळा घालीसन मना मांगे चालू लाग.” तो निघीसन तेना मांगे चालू लागणा. पण हय नई माहित होत कि जे काही परमेश्वर ना दूत करी ऱ्हायना ते खर शे, पण हय समजना कि मी दर्शन देखी ऱ्हायनु. तव त्या पहिला आणि दुसरा पहारे पासून निघीसन त्या लोखंड ना दरवाजा वर पोहोचनात, जो शहर कळे लीजास. तो दरवाजा तेस्ना साठे आपो-आप उघळी ग्या, आणि त्या निघीसन एक गली मधून ग्यात. इतला मा परमेश्वर ना दूत तेले सोळीसन चालना ग्या. तव पेत्र नि शुद्धी मा ईसन सांग, “आते मी खर समजी जायेल शे कि प्रभु नि आपला परमेश्वर ना दूत धाळीसन मले हेरोद राजा ना अधिकार मधून सोळाई लीध. आणि यहुदी पुढारीस्नी आशा तोळी टाकी.” हय समजीसन कि परमेश्वर नि तेले वाचाळी लीयेल होत, पेत्र त्या योहान नि माय मरियम ना घर उना, जो मार्क म्हणावस. तठे गैरा विश्वासी लोक एकत्र हुईसन प्रार्थना करी ऱ्हायंतात. जव पेत्र नि दरवाजा नि कळी वाजाळी त रुदा नाव नि एक दासी दरवाजा वर उणी. तिनी पेत्र ना शब्द वयखीसन खुशी ना मारे दरवाजा नई उघाळा, पण पयीसन मधमा जाईसन सांग कि पेत्र दरवाजा वर उभा शे. मधमा उपस्थित विश्वासीस्नी तिले सांग, “तू पागल शे.” पण ती आपली गोष्ट वर आळेल ऱ्हायनी कि हवू पेत्रच शे. तव तेस्नी सांग, “तेना परमेश्वर ना दूत हुईन.” पण पेत्र दरवाजा वर वाजाळतच ऱ्हायना, नंतर तेस्नी दरवाजा उघाळा, आणि तेले देखीसन चकित ऱ्हाईग्यात. तव तेनी तेस्ले हात कण इशारा कर कि चूप राहा. पेत्र नि तेस्ले सांग कि प्रभु कोणत्या प्रकारे मले बंदीगृह मधून काळी लय. मंग तेनी सांग, “याकोब आणि विश्वासी भावूस्ले हय गोष्ट सांगी देयज्यात.” तव तो निघीसन दुसरा जागा वर चालना ग्या. दुसरा दिन सक्कायमा बंदीगृह ना शिपाई गैर हताश हुई ग्यात, कि पेत्र कोठे ग्या. जव हेरोद राजा नि तेले झामलाना आदेश दिधा आणि तेले कोठेच नई झामली सकनात, त तेनी राखोयास्ले प्रश्न विचार आणि जव त्या तेले उत्तर नई देवू सकनात त तेनी त्या राखोयास्ले मारी टाकानी आज्ञा दिधी, आणि स्वता यहूदीया प्रांत ले सोळीसन कैसरीया शहर मा जाईसन राहाले लागणा. हेरोद राजा सूर आणि सैदा ना लोकस्वर गैरा रागे भरेल होता. एनासाठे त्या शहरस ना लोक हेरोद राजा ले भेटाले एक मन हुईसन उनात. सर्वास्तून पयले ब्लस्त पासून मदत मांगनात जो कि राजा ना एक कर्मचारी होता. तव तेस्नी हेरोद राजा ले शांती स्थापना ना साठे सांग, कारण कि त्या आपला जेवण ना पुरती साठे राजा ना देश वर आधारित होतात. ज्या दिन हेरोद राजा नि त्या शहरस्ना लोकस्ले भेटानी योजना करी त्या दिन हेरोद राजा राजवस्त्र घालीसन न्याय सिंहासन वर बठना, आणि तेस्ले भाषण देवाले लागणा. तव लोक वरळी उनात, “हवू त माणुस ना नई परमेश्वर ना शब्द शे.” त्याच क्षण परमेश्वर ना एक परमेश्वर ना दूत नि लगेच हेरोद राजा वर वार कर, कारण कि तेनी परमेश्वर ले महिमा नई दिधी. आणि तेना शरीर मा किळा पळीग्यात आणि तो मरी ग्या. परमेश्वर ना वचन पसरत ग्या आणि विश्वासीस्नी गणती वाळत गयी. यहुदी क्षेत्र मा यहुदी विश्वासीस्नी मदत करासाठे पैसा देवा नंतर बर्णबा आणि शौल यरूशलेम शहर मधून अंत्युखिया शहर ले परती ग्यात. योहान जो मार्क म्हणावस, तो बी तेस्ना संगे होता. अंत्युखिया शहर नि मंडळी मा काही भविष्यवक्ता आणि उपदेशक होतात, म्हणजे बर्णबा आणि शिमोन जो निग्र म्हणावस, आणि लुकीयुस, कुरेने शहर, आणि चौथाई देश ना राजा हेरोद ना दुध-भावू मनाएम आणि शौल. जव त्या उपवास धरीसन प्रभु नि उपासना करत होतात, त पवित्र आत्मा नि सांग, “मनासाठे बर्णबा आणि शौल ले मनी सेवा करासाठे आलग करा जेना साठे मी तेस्ले बलायेल शे.” एनासाठे जव त्या उपवास आणि प्रार्थना करी लीयेल होतात, त शौल आणि बर्णबा वर हात ठियसन तेस्ले परमेश्वर ना काम करासाठे धाळ. शौल आणि बर्णबा पवित्र आत्मा ना द्वारे अंत्युखिया शहर तून सलुकीया लोंग धाळामा उनात. तठून जहाज मा चळीसन कुप्र बेट वर सलमी बेट ले चालना ग्यात. सलमी बेट ना नगर मा भिळीसन, तेस्नी परमेश्वर ना वचन यहुदी लोकस्ना प्रार्थना घरस्मा आयकाळ. योहान मार्क तेस्नी मदत करासाठे तेस्ना संगे होता. येणा नंतर तेस्नी सर्वा बेट मा एक नगर तून दुसरा नगर ना प्रवास कर आणि शेवट मा त्या पफे नगर मा भिळनात. तठे तेस्ले बार-येशु नाव ना एक यहुदी माणुस भेटणा, जो जादूगर आणि खोटा भविष्यवक्ता होता. तो राज्यपाल सिर्ग्य पौल ना संगे होता, जो बुद्धीमान माणुस होता. राज्यपाल सिर्ग्य पौल नि बर्णबा आणि शौल ले आपला जोळे बलाईसन परमेश्वर ना वचन आयकानी ईच्छा करी. पण अलीम जादूगर नि जेना नाव नाच अर्थ जादूगर शे बर्णबा आणि शौल ना विरोध करीसन राज्यपाल सिर्ग्य पौल ले येशु ख्रिस्त वर विश्वास करा पासून रोकान देख. तव शौल जो पौल बी म्हणावस, पवित्र आत्मा कण भरीसन अलीम कळे टकटकी लाईसन देखीसन सांग, “ओ पुरा कपट आणि पुरा चालाकी कण भरेल सैतान ना पोऱ्या, चांगला कामस्ना शत्रू, काय तू प्रभु ना सरळ रस्ता ले वाकळा कराले नई सोळाव? आते देख, प्रभु तुना विरुद्ध मा शे आणि तू काही टाईम लगून अंधा ऱ्हाशी आणि सूर्य ना उजाया ले नई देखाव.” तव लगेच धुंदाया आणि अंधार तेनावर पळी ग्या, तो ईकळे-तिकळे झामलाले लागीग्या कि कोणी तेना हात धरीसन तेनी मदत करो. तव राज्यपाल सिर्ग्य पौल नि जे काही हुयेल होत देखीसन आणि प्रभु ना शिक्षा कण चकित हुईसन प्रभु येशु वर विश्वास कर. पौल आणि तेना जोळीदारस्नी पफे नगर मधून समुद्री प्रवास चालू कर आणि त्या पंफुलिया प्रांत ना पिर्गा नगर मा जाई पोहोचनात. आणि योहान मार्क तेस्ले सोळीसन यरूशलेम शहर ले परती ग्या. पिर्गा नगर ना पुळे चालीसन गलातीया प्रांत ना पिसिदिया जिल्हा ना जोळे अंत्युखिया शहर मा पोहोचनात. आणि आराम ना दिन प्रार्थना घर मा जाईसन बसी ग्यात. मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्नी पुस्तक वाचा नंतर प्रार्थना घर ना अधिकारीस्नी तेस्ना कळे सांगी धाळ, “ओ भावूसहोण, कदी लोकस्ले शिकाळा साठे तुमना मन मा कोणती गोष्ट शे त सांगा.” तव पौल उभा ऱ्हायसन आणि तेस्ले शांत करासाठे हात कण कृती करीसन सांग, “ओ इस्त्राएल देश ना लोकसहोण आणि परमेश्वर ले भ्याणारा दुसरा जातीस्ना लोकसहोण आयक. ह्या इस्त्राएल देश लोकस्ना परमेश्वर नि आमना पूर्वजस्ले निवाळी लीध, आणि जव या मिसर देश मा परदेशी हुईसन राहत होतात, त तेस्नी उन्नती करी, आणि पराक्रमी सामर्थ्य कण काळी लयना. एना नंतर उजाळ जागा मा जवळ-पास चाळीस वरीस लगून तो तेस्ले सहन करत ऱ्हायना, जव कि तेस्नी घळी-घळी तेनी आज्ञा ले मोळ.” आणि तेनी कनान देश ना सात जातीस्ना नाश करीसन तेस्नी जमीन ले आपला लोकस्ले मिरास मा दि टाक. हय सगळी प्रक्रिया मा कमीत कमी चार शे पन्नास वरीस लागनात एना नंतर त्या कनान देश वर अधिकार करणात. परमेश्वर नि भविष्यवक्ता शमुवेल लोंग इस्त्राएल ना लोकस्वर राज्य करासाठे पुढारी निवाळना. जव शमुवेल आते लोंग तेस्ना पुढारी होता, तव इस्त्राएल ना लोकस्नी आपला साठे राजा नि मागणी करी. एनासाठे परमेश्वर नि तेस्ले बन्यामीन ना वंश मधून किश ना पोऱ्या शौल ले राजा होवा साठे दिधा. तेनी चाळीस वरीस लोंग इस्त्राएल ना लोकस्वर राज्य कर. नंतर परमेश्वर नि शौल ले पद वरून काळीसन तेना जागा वर दाविद ले राजा बनाव. जेना बारमा तेनी साक्ष दिधी, “मले एक माणुस, इशाय ना पोऱ्या दाविद, मना मन सारखा भेटी जायेल शे. तोच मनी ईच्छा पुरी करीन.” तेनाच वंश मधून परमेश्वर नि आपला शेप्पत प्रमाणे इस्त्राएल देश ना जोळे एक तारणारा, म्हणजे येशु ख्रिस्त ले धाळ. तेना येवाना पयले योहान बाप्तिस्मा देणार सर्वा इस्त्राएल देश ना लोकस्ले मन फिराव ना बाप्तिस्मा नि सुवार्ता करी. जव योहान बाप्तिस्मा देणार आपली सेवा पुरी करावर होता, त तेनी सांग, “तुमी मले काय समजतस? मी ख्रिस्त नई शे. पण देखा, मना नंतर एक येणार शे, तो मनातून जास्त महान शे, मी या योग्य बी नई शे कि तेना पाय ना जोळा ना बंध सोळी सकू.” “ओ भावूसहोण, तुमी ज्या अब्राहाम ना संतान शेतस, आणि तुमी ज्या परमेश्वर ले भ्यातस, परमेश्वर नि तुमना जोळे येशु ना बारामा हवू संदेश धाळेल शे जो लोकस्ले वाचाळस.” कारण कि यरूशलेम शहर ना लोकस्नी आणि तेस्ना पुढारीस्नी, येशु ख्रिस्त ले नई वयख आणि तेस्नी भविष्यवक्तास्ना त्या वचनस्ले नई समज जेस्ले त्या प्रत्येक आराम ना दिन वाचत होतात. एनासाठे तेस्नी तेले दोषी ठराव आणि ह्या प्रकारे भविष्यवक्ता ना वचनस्ले पुरा कर. तेस्नी मारी टाकाना योग्य कोणताच दोष तेनामा नई देख, तरी बी राज्यपाल पिलात ले विनंती करी कि तेले मारी टाकामा येवो. आणि जव तेस्नी ते सगळ कर जे परमेश्वर ना पुस्तक तेना बारामा सांगस सर्वा गोष्टीस्ले पुरा करात, तेस्नी तेले क्रूस वर खिया ठोकीसन मारी टाक मंग क्रूस वरून उतारीसन कबर मा ठेव. पण परमेश्वर नि तेले मरेल मधून परत जित्ता करना. तो तेस्ले जो तेस्ना संगे गालील जिल्हा मधून यरूशलेम शहर मा एयेल होतात, गैरा दिनस लगून आपला शिष्यस्ले दिखत ऱ्हायना. लोकस समोर जेस्नी तेले देख आते त्याच तेना साक्षी शेतस. आमी तुमले त्या करार ना बारामा जी परमेश्वर द्वारे पूर्वजस्ले करामा एयेल होती हय सुवार्ता आयकाळतस, कि परमेश्वर नि येशु ले मोत मधून परत जित्ता करीसन, तोच करार आमना संतान ना साठे पुरा करना. जस स्तोत्रसंहिता मा बी लिखेल शे, परमेश्वर नि ख्रिस्त ना बारामा सांग कि “तू मना पुत्र शे, आजच मी तुना बाप बनी जायेल शे.” आणि तेना मोत मधून जित्ता होवाना बारामा परमेश्वर हय सांगस, मी तुमले पवित्र आणि नई टयनारा आशीर्वाद देसू जेले देवाना करार मनी दाविद ले करेल होता. दाविद ह्या गोष्टी दुसऱ्या स्तोत्रसंहिता मा बी सांगस, “तू आपला पवित्र झन ले सळु नई देवाव.” दाविद त आपला जीवन काय मा परमेश्वर नि ईच्छा प्रमाणे आपला टाईम मा सेवा करीसन मरी ग्या आणि आपला पूर्वजस्मा जाई भेटणा आणि सळी बी ग्या. एना कण आमले समजस कि दाविद आपला बारामा नई सांगस. पण तो त येशु ना बारामा बोलत होता. जेले परमेश्वर नि मोत मधून परत जित्ता कर आणि जेना शरीर सळु नई सकना. एनासाठे भावूसहोण, मनी ईच्छा शे कि तुमी समजी ल्या कि येशु ख्रिस्त ना द्वारे तुमले पापस्नी माफी ना संदेश देवामा येस. ज्या गोष्टीस कण तुमी मोशे ना नियम ना द्वारे निर्दोष नई ठरू सकत, त्याच गोष्टीस कण प्रत्येक विश्वास करणारा येशु ख्रिस्त ना द्वारे निर्दोष ठरस. एनासाठे सावधान राहा, अस नई होवो कि जो भविष्यवक्तास्नी पुस्तक मा लिखेल शे, ते तुमना वर बी ईपळे, “ओ निंदा करणारसहोण देखा, आणि आश्चर्य करा, आणि नष्ट हुईजा. कारण कि मी तुमना समोर एक असा काम करणार शे, कि कदी कोणी तुमना संगे तेनी चर्चा बी करीन, त तुमी कदीच विश्वास नई करावत.” जव पौल आणि बर्णबा प्रार्थना घर मधून निघी ऱ्हायंतात त लोक तेस्ले विनंती कराले लागनात कि पुळला आराम ना दिन बी आमले ह्या गोष्टी परत आयकाळा मा येवोत. जव प्रार्थना घर नि सभा सरीगई त यहुदी लोक आणि यहुदी मत मा एयेल भक्त लोकस मधून गैराच पौल आणि बर्णबा ना मांगे चालू लागनात. पौल आणि बर्णबा नि तेस्ना संगे बोलीसन समजाळ कि, परमेश्वर नि कृपा मा कायम ऱ्हावा. पुळला आराम ना दिन जवळ-पास सर्वा लोक तेस्ना पासून परमेश्वर ना वचन आयका साठे नगर मा एकत्र हुईनात. त्या गर्दी ले देखीसन यहुदी पुढारी रागे भरीग्यात, आणि पौल ना गोष्टीस्ना विरोध कराले लागनात. पण पौल आणि बर्णबा नि बिगर भ्यात सांग, “जरुरी होत कि परमेश्वर ना वचन पयले तुमले आयकाळा मा येत. पण जव तुमी तेले नकारी दियेल शे, आणि कायम ना जीवन ना साठे स्वता ले अयोग्य ठरायेल शे, त आते आमी बिगर यहुदीस कळे जासुत.” कारण कि परमेश्वर नि आमले हय आज्ञा दियेल शे कि, “मनी तुले दुसरा जातीस साठे उजाया ठरायेल शे आणि तुमले संसार मा प्रत्येक जागा वर तारण करणारा ना बारामा सांगाले पायजे.” हय आयकीसन बिगर यहुदी लोक खुश हुयसन परमेश्वर ना वचन नि वाह-वाह कराले लागनात. आणि जीतला कायम ना जीवन साठे ठरायेल होतात, तेस्नी प्रभु येशु वर विश्वास कर. प्रभु येशु ना वचन त्या पुरा देश मा पसराले लागणा. पण यहुदी पुढारीस्नी भक्त आणि कुलीन स्त्रियास्ले आणि नगर ना मुख्य लोकस्ले उसकाळ आणि पौल आणि बर्णबा ना विरुद्ध भळकाईसन तेस्ले आपली सीमा मधून बाहेर काळी टाक. पौल आणि बर्णबा तेस्ना समोर आपला पायस्ना फपुटा झटकनात कारण कि तेस्ले दाखाळी सकोत कि परमेश्वर नि तेस्ले अस्वीकार करी दियेल शे आणि तेस्ले दंड दिन. मंग तठून इकुन्या शहर ले चालना ग्यात. अंत्युखिया शहर मा शिष्य खुशी कण आणि पवित्र आत्मा कण भरत ग्यात. इकुन्या शहर मा पौल आणि बर्णबा यहुदी लोकस्ना प्रार्थना घर मा एकत्र ग्यात. तठे तेस्नी असा मोठा प्रभाव कण वचन आयकाळ कि मोठी संख्या मा यहुदी आणि ग्रीक लोकस्नी विश्वास कर. पण विश्वास नई करणारा यहुदी लोकस्नी बिगर यहुदीस्ना मन मा विश्वासी भावूस्ना विरोध मा भळकाव आणि तेस्ना मा भाग पाळी टाक. पौल आणि बर्णबा गैरा दिन लगून तठे ऱ्हायनात. तठे तेस्नी परमेश्वर वर विश्वास करीसन हिम्मत कण परमेश्वर ना वचन ले सांग. परमेश्वर नि तेस्ले चिन्ह आणि चमत्कार करनी सामर्थ्य दिधी. परमेश्वर तेस्ना द्वारे आपला कृपा ना संदेश ले खर साबित करत ऱ्हायना. त्या नगर ना लोकस्मा फुट पळी जायेल होती, काही त्या यहुदी लोकस कळे ज्या येशु वर विश्वास नई करतस आणि काही पौल आणि बर्णबा नि गोष्ट मा सहमत होतात. जव दुसरा जाती आणि बिगर यहुदीस्नी तेस्ना अपमान आणि तेस्ना वर दगडफेक करासाठे आपला अधिकारीस संगे तेस्ना वर पयनात. तव पौल आणि बर्णबा ह्या गोष्ट ले समजी ग्यात, लुकवनिया क्षेत्र ना लुस्र नगर आणि दर्बे नगरस्मा, आणि आंगे-पांगे ना प्रदेशस्मा पईग्यात. आणि तठे परमेश्वर नि सुवार्ता आयकाळाले लागनात. लुस्र नगर मा एक माणुस होता जो जन्म पासून पायस कण लंगडा होता आणि कदीच चाली फिरू नई सकना. तो पौल ना प्रवचन आयकत होता. पौल नि तेना कळे ध्यान कण देख कि तेले बरा हुई जावाना विश्वास शे. पौल नि उच्चा शब्द मा सांग, “आपला पायस्वर सरळ उभा हो.” तव तो माणुस उदलीसन चाला-फिराले लागणा. लोकस्नी पौल ना हय काम देखीसन लुकवनिया नि भाषा मा उचा शब्द मा सांग, “देव माणुस ना रूप मा हुईसन आमना जोळे उतरी एयेल शे.” तेस्नी बर्णबा ले ग्रीक लोकस्ना ज्युस नाव दिधा, आणि पौल ले मर्क्युरी ना नाव दिधा कारण कि तो मुख्य संदेश सांगणारा होता. नगर ना बाहेर ज्युस ना मंदिर होता. ज्युस देवता ना पुजारी बईल व फूलस्ना हार लिसन शहर ना दरवाजा वर ईग्या कारण कि तो लोकस्ना संगे बलिदान कराना देखी ऱ्हायंता. प्रेषित पौल आणि बर्णबा ले जव हय माहित हुयन, त त्या गैरा चिंतामा पळीग्यात आणि तेस्नी आपला कपळा फाळात आणि गर्दी मा वाकी ग्यात आणि जोरमा सांगाले लागनात, “ओ लोकसहोण, तुमी काय करतस? आमी बी त तुमना सारखा दुख-सुख भोगणार लोक शेतस आणि तुमले सुवार्ता आयकाळतस कि तुमी या व्यर्थ वस्तुस्कन आल्लग हुईसन जित्ता परमेश्वर कळे या, जेनी आकाश पृथ्वी आणि समुद्र आणि जे काही तेस्ना मा शे बनायेल शे.” तेनी पयला टाईम मा सर्वा जातीस्ले आपला मन ना नुसार देवतास्नी उपासना करू दिधा. तरी बी तो कायम आपला अस्तित्व ना प्रमाण त्या चांगला कामस्ना द्वारे देस. आकाश तून पाणी आणि चांगला पिक दिसन तुमना साठे जेवण आणि तुमना मन ले खुशी कण भरत ऱ्हायना. तेस्नी इतल सांगीसन बी लोकस्ले तेस्ना साठे बलिदान करावर मोठा कष्ट कण रोकी सकनात. पण काही यहुदी लोकस्नी अंत्युखिया शहर आणि इकुन्या शहर मधून ईसन लोकस्ले आपला कळे करी लीधा, व पौल वर दगडफेक कर, आणि तेले मरेल समजीसन नगर ना बाहेर घसळीसन ली ग्यात. पण जव तेना शिष्य चारीस कळे ईसन उभा ऱ्हायनात, त तो उठीसन शहर मा परत ग्या आणि दुसरा दिन बर्णबा संगे दर्बे नगर ले चालना ग्या. प्रेषित पौल आणि बर्णबा त्या नगर ना लोकस्ले सुवार्ता आयकाळीसन, गैरा शिष्य बनाईसन तठून लुस्र नगर मा ग्यात, मंग तठून इकुन्या शहर मा ग्यात, मंग तठून त्या पिसिदिया प्रांत ना अंत्युखिया शहर ले ग्यात. त्या प्रत्येक नगर मा शिष्यस्ले स्थिर करत आणि प्रोत्साहित करत हय शिक्षा देत ऱ्हायनात कि विश्वास मा बनीसन राहा. त्या तेस्ले हय याद देवाळीसन सांगत होतात कि, “आमले मोठा दुख उचलीसन परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करन पळीन.” पौल आणि बर्णबा नि प्रत्येक मंडळी मा तेस्ना साठे वरिष्ठ ठराव, आणि उपवास धरीसन प्रार्थना करीसन तेस्ले प्रभु येशु ले सोप जेनावर तेस्नी विश्वास करेल होत. येणा नंतर पौल आणि बर्णबा पिसिदिया प्रांत मधून जात पंफुलिया प्रांत मा पोचनात. पिसिदिया प्रांत मा तेस्नी पिर्गा नगर मा परमेश्वर ना वचन आयकाळीसन आणि मंग अत्तलिया शहर मा ग्यात. तठून त्या जहाज ना द्वारे अंत्युखिया शहर ले परती ग्यात, जठून तेस्ले परमेश्वर नि कृपा मा सोपीसन त्या काम साठे धाळामा उना जेले त्या आते पुरा करीसन परती एयेल होतात. तठे पोहोचीसन तेस्नी मंडळी ना लोकस्ले एकत्रीत कर आणि सांग कि परमेश्वर नि आमना संगे हुईसन कसा मोठा-मोठा काम करना. कसा परमेश्वर नि बिगर यहुदीस्ले येशु ख्रिस्त वर विश्वास कराना साठे दरवाजा उघाळी टाकात. पौल आणि बर्णबा शिष्य संगे गैरा दिनस लगून ऱ्हायनात. काही लोक यहूदीया प्रांत मधून अंत्युखिया शहर मा ईसन प्रभु ना शिष्यस्ले हय शिक्षा देवाले लागनात, “मोशे ना नियम प्रमाणे कदी तुमना सुंता नई हुयेल शे त तुमना तारण असंभव शे.” ह्या बारामा पौल आणि बर्णबा ना तेस्ना संगे गैरा झगळा हुयना आणि त्या वाद-विवाद करू लागनात. तव एक मत हुईसन हय ठरावामा उन कि पौल आणि बर्णबा काही दुसरा शिष्यस्ना संगे ह्या बारामा बोला साठे प्रेषित आणि वरिष्ठस जोळे यरूशलेम शहर ले जावोत. मंडळी नि तेस्ले धाळी दिध आणि त्या फेनिके आणि शोमरोन प्रांत मधून जात बिगर यहुदी लोक कोणत्या प्रकारे सुवार्ता आयकीसन ख्रिस्त येशु मा विश्वासी बनी ऱ्हायनात ह्या गोष्ट ना सविस्तर वर्तमान आयकाळत ग्यात. हय आयकीसन विश्वासी भावूस्ले गैरी खुशी हुईनी. जव त्या यरूशलेम शहर मा पोहोचनात, त मंडळी, प्रेषित आणि वरिष्ठ तेस्ले खुशी मा भेटनात. पौल आणि बर्णबा नि तेस्ले सांग कि परमेश्वर नि तेस्ना द्वारे कसा-कसा काम करात. पण परूशी पंथ ना विश्वासी मधून कितलाक उठीसन सांगाले लागनात, “दुसरा जाती ना लोकस्ले सुंता कराले आणि मोशे ना नियमले मानानी आज्ञा देवाले पायजे.” तव प्रेषित आणि वरिष्ठ ह्या गोष्ट ना बारामा विचार करासाठे एकत्र हुयनात. तव पेत्र नि गैरा वाद-विवाद हुईजावा नंतर उभा ऱ्हायसन तेस्ले सांग, “ओ भावूसहोण, तुमले माहिती शे कि गैरा दिन हुयनात कि परमेश्वर नि तुमना मधून मले निवाळी लीयेल शे, कि मना द्वारे बिगर यहुदी लोक सुवार्ता ना वचन आयकीसन विश्वास करोत.” परमेश्वर, जेले सर्वास्ना मन नि गोष्ट माहिती शे, तेनी तेस्ले बी आमना सारखा पवित्र आत्मा दिसन हय दाखाळ कि तेनी तेस्ले आपला लोकस्ना रूप मा स्वीकार करी लीयेल शे. तेनी तेस्ना मन विश्वास ना द्वारे शुद्ध करीसन आमना मा आणि तेस्ना मा काही फरक नई ठेव. एनासाठे आते तुमी लोक आमना यहुदी नियम आणि रिती-रिवाज ना पालन करासाठे दुसरा जाती ना लोकस्वर भारी वजा टाकीसन परमेश्वर नि परीक्षा काब करतस? ह्या वजा ले त आमी आणि आमना पूर्वज बी नई उचलू सकतस. अस करान चांगल नई शे. आमना विश्वास त हवू शे कि जसा प्रभु येशु नि कृपा ना द्वारे आमले तारण भेटणा त्याच प्रमाणे तेस्ले बी भेटीन. तव सगळी सभा चूप हुईसन बर्णबा आणि पौल नि गोष्टी आयकाले लागनात, कि परमेश्वर नि तेस्ना द्वारे बिगर यहुदी लोकस्मा कसा मोठ-मोठा चिन्ह, आणि अदभूत काम दाखाळात. जव तेस्नी बोलाना बंद कर, त याकोब उठीसन सांगाले लागणा, “ओ भावूसहोण, मनी आयक. शिमोन पेत्र नि समजाळ कि परमेश्वर नि सुरुवात मा बिगर यहुदी लोकस्वर कशी कृपादृष्टी करी आणि तेस्ना मधून काही लोकस्ले आपला लोक होवा साठे नीवाळ.” दुसरा जाती ना लोकस्ना ह्या बदलाव ना बारामा भविष्यवक्तास्ना लेख ना समर्थन बी भेटस, जस कि लिखेल शे, “एना नंतर मी परत ईसन दाविद ना राज्य जो तेना शत्रूस्ना द्वारे नाश करी दियेल शे तेले परत बनावसू. आणि तेना तंबूस्ले परत बनाईसन उभा करसू. जेना कण सर्वा जाती ना लोक जेस्ले मनी आपला लोक होवा साठे बलायेल शे, त्या मले झामली सकोत. हवू तोच प्रभु ना आवाज शे जेनी जग नि निर्मिती पासून ह्या गोष्टीस्ना संदेश दिधा.” एनासाठे मना निर्णय हवू शे कि दुसरा जाती ना लोकस मधून ज्या लोक परमेश्वर ना जोळे येतस. तेस्ले दाबिसन आमी सर्वा यहुदी नियम आणि रिवाज ना पालन करासाठे दुख नई देवोत. पण तेस्ले आमी एक पत्र लिख हय सांगा साठे, “आमी हय निर्णय करासाठे लिखी धाळेल शे कि त्या मूर्तीस्ना समोर अर्पण करेल मांस पासून, आणि रक्त पासून, आणि गयाले दाबिसन मारेल जनावरस्ना मांस पासून, आणि व्यभिचार पासून वाचेल राहा.” कारण कि जुना टाईम पासून नगर-नगर मा ह्या मोशे ना नियम ना प्रचार करणार येत ऱ्हायनात आणि दर आराम ना दिन प्रार्थना घर मा वाचामा येस. तव यरूशलेम शहर मा सगळी मंडळी संगे प्रेषित आणि वरिष्ठस्ले चांगल वाटण कि आपला मधून कईक लोकस्ले निवाळी लेवो म्हणजे यहूदा जो बर्शब्बा सांगावस आणि सीला ले जो विश्वासीस्ना मधमा आदरणीय होता. तेस्ले पौल आणि बर्णबा ना संगे अंत्युखिया शहर ले धाळ. आणि तेस्नी ह्या पत्र ले तेस्ना संगे धाळ, “अंत्युखिया शहर, सिरीया प्रांत आणि किलकिया प्रांत ना ऱ्हायनारा भावूस्ले ज्या बिगर यहुदीस मधून शेतस प्रेषित आणि वरिष्ठ भावूस्ना नमस्कार. आमी आयकेल शे, कि आमना मधून कीतलास्नी तठे जाईसन, तुम्हले आपली गोष्टीस कण घाबराई टाक, आणि तुमना मन उलटाई दियेल शे पण आमी तेस्ले आज्ञा नई दियेल होती. एनासाठे आमी एक चित हुईसन बर समजनूत, कि आमना द्वारे निवाळेल कईक लोकस्ले आपला प्रिय बर्णबा आणि पौल ना संगे तुमना जोळे धाळोत. ह्या त असा लोक शेतस, जेस्नी आपला प्रभु येशु ख्रिस्त ना साठे आपला जीव जोखीम मा टाकेल शे. एनासाठे आमनी यहूदा आणि सीला ले तुम्हना जोळे धाळी ऱ्हायनूत, कि त्या व्यक्तिगत रूप मा ह्या बारामा गोष्टी आयकाळोत ज्या आमी तुमले लिखीरायनुत. कारण कि पवित्र आत्मा ले आणि आमले हई चांगल वाटण कि ह्या आवश्यक गोष्टीस्ले सोळीसन तुमना वर आखो कोणती गोष्टी ना भार नई टाकोत. तुमी त्या मूर्तीस्नी अशुद्धता कण आणि व्यभिचार कण आणि गया दाबिसन मारेल जनावरस्ना मांस कण आणि जनावरस्ना रक्त खावा पासून दूर राहोत. असाच करा तर तुमना चांगल हुईन. क्षेमकुशल राहा.” मंग त्या तठून निघीसन अंत्युखिया शहर मा पोचनात, तठे तेस्नी मंडळी ले एकत्र करीसन पत्र दि टाक. त्या पत्र ना संदेश ले वाचीसन गैरा उत्साहित आणि आनंदित हुयनात. यहूदा आणि सीला नि ज्या स्वता भविष्यवक्ता होतात, गैरा गोष्टीस कण विश्वासी भावूस्ले प्रोत्साहित आणि दृढ करणात. तेस्ना कईक दिन लोंग तठे रावा नंतर तेस्नी विश्वासी भावूस कण शांती कण परत ग्यात, कि आपला धाळनारस कळे परत जावोत. पण सीला नि अंत्युखिया शहर मा राहाणा निर्णय लीधा एनासाठे यहूदा एखटाच यरूशलेम शहर ले परत चालना ग्या. पौल आणि बर्णबा नि कईक टाईम लोंग अंत्युखिया शहर मा राई ग्यात आणि दुसरा गैरा लोकस संगे प्रभु येशु ना वचन ना उपदेश करत आणि सुवार्ता आयकाळत ऱ्हायनात. काही दिन नंतर पौल नि बर्णबा ले सांग, “चाला त्या नगरस्मा जाईसन जठे आमनी प्रभु येशु ना वचन आयकळेल होता, आपला विश्वासी भावूस्ले देखुत कि त्या कसा शेतस.” बर्णबा नि ईच्छा होती कि योहान ले जो मार्क बी सांगावस, आपला संगे ले. पण पौल ले हय चांगल नई वाटण कि तेले संगे लेवूत कारण कि तो पंफुलिया प्रांत मा काम पुरा होता लोंग नई थाबंना पण काम अर्धा सोळीसन चालना ग्या. ह्या गोष्ट ले लिसन पौल आणि बर्णबा मा गैरा वाद-विवाद हुईना आणि त्या एक दुसरा कण आल्लग हुई ग्यात. बर्णबा मार्क ले लिसन जहाज कण कुप्र बेट ले चालना ग्या. पण पौल नि सीला ले निवाळी लीध. आणि विश्वासी भावूस्नी तेस्ले परमेश्वर नि कृपा मा सोपीसन अंत्युखिया शहर तून धाळी दिध. मंग त्या सर्वा सिरीया प्रांत आणि किलकिया प्रांत मधून मंडळीस्ना विश्वासीस्ले मजबूत करत ग्यात. मंग पौल दर्बे नगर आणि लुस्र नगर ह्या शहरस्मा मा बी ग्या, आणि तठे तीमुथियुस नाव ना एक शिष्य होता, तेनी माय यहुदी विश्वासी होती, पण तेना बाप ग्रीक देश ना राहणार होता. तो लुस्र नगर आणि इकुन्या शहर ना शिष्यस्मा नावाजीत होता. पौल नि ईच्छा होती कि तीमुथियुस तेना संगे जावो, आणि ज्या यहुदी लोक त्या जागा मा होतात तेस्ना मुळे तेले लिसन तेना सुंता करा, कारण कि तेस्ले सर्व माहित होत कि तेना बाप ग्रीक देश ना राहणार होता. पौल आणि तेना जोळीदार नगर-नगर जात त्या विधीस्ले माना साठे विश्वासीस्ले सांगत जात होतात, ज्या यरूशलेम शहर ना प्रेषित आणि वरिष्ठस्नी ठरायेल होती. ह्या प्रकारे मंडळी विश्वास मा स्थिर होत गी आणि दररोज नवीन विश्वासी तेस्ना संगे जुळत ग्यात. आणि त्या फ्रुगिया आणि गलतिया प्रांत मधून हुईसन ग्यात, आणि पवित्र आत्मा नि तेस्ले आशिया प्रांत मा वचन आयकाळा कण मना कर. आणि तेस्नी मुसिया प्रांत ना जोळे पोचीसन, बेथानी प्रांत मा जावाना देखा, पण येशु नि आत्मा नि तेस्ले जावू नई दिधा. त त्या मुसिया प्रांत मधून त्रोवस शहर मा उनात. तठे पौल नि रात ले एक दर्शन देख कि मासेदोनिया क्षेत्र मा एक माणुस उभा ऱ्हायेल, तेले विनंती करत सांगस, “समुद्र ना पार उतरीसन मासेदोनिया प्रांत मा ये, आणि आमनी मदत कर.” तेना हवू दर्शन देखताच आमी लगेच मासेदोनिया प्रांत जावाना देखनुत, हय समजीसन कि परमेश्वर नि आमले तेस्ले सुवार्ता आयकाळा साठे बलायेल शे. एनासाठे त्रोवस शहर मधून जहाज सोळीसन आमी सरळ सुमात्राके बेट आणि दुसरा दिन नियापुलीस शहर मा उनुत. तठून आमी फिलिप्पै शहर मा पोहोचनुत, जो मासेदोनिया प्रांत ना मुख्य नगर, आणि रोमी लोकस्नी वस्ती शे, आणि आमी त्या नगर मा काही दिन लगून ऱ्हायनूत. आराम ना दिन आमी नगर ना दरवाजा ना बाहेर नदी ना तठ वर हय समजीसन ग्युत कि तठे यहुदी लोकस्ना प्रार्थना करानी जागा हुईन. पण बठीसन त्या बायस्ना संगे ज्या एकत्र हुयेल होत्यात, गोष्टी कराले लागनुत. त्या बाईस मधून एक बाई जीना नाव लुदिया होता, ती थुवतीरा नगर नि राहणारी होती आणि माहाग बैजनी कपळा विकाना व्यवसाय करत होती. ती बाई परमेश्वर नि भक्तिनी होती, आणि ती आमना गोष्टी ले आयकत होती. प्रभु नि तीना मन ले उघाळ कि ती पौल ना गोष्टी उत्सुकता कण आयको. आणि जव तिनी आपला घराणा संगे बाप्तिस्मा लीधा, त तिनी विनंती करी, “कदी तुमी मले प्रभु नि विश्वासनी समजतस, त चाला मना घर मा राहा,” आणि ती आमले समजाळीसन लीगई. जव आमी यहुदी लोकस्ना प्रार्थना घर मा जाई ऱ्हायंतुत, त आमले एक दासी भेटणी, जीनामा एक द्रुष्ट आत्मा होती, जेनी मदत कण ती भविष्य प्रगट करी देत होती, आणि ती भविष्य दाखाळी-दाखाळीसन आपला मालकस साठे गैर काही कमाइसन लयत होती. ती पौल आणि आमना मांगे ईसन बोमलू लागणी, “ह्या लोक परमप्रधान परमेश्वर ना दास शेतस, ज्या तुमना वर तारण ना रस्ता प्रगट करी ऱ्हायनात.” ती गैरा दिन लगून अशीच करत ऱ्हायनी, पण पौल दुखी हुयना, आणि तोंड फिरायसन ती दुष्ट आत्मा ले सांग, “मी तुले येशु ख्रिस्त ना नाव मा आज्ञा देस, कि तीना मधून निघीजाय आणि ती त्याच घळी तीना मधून निघीगी.” जव तीना मालकस्नी देख, कि आमनी कमाई नि आशा जात ऱ्हायनी, त पौल आणि सीला ले धरीसन चौक मा प्रधान ना जवळ तानीसन ली ग्यात. आणि तेस्ले अधिकारी ना राज्यपाल जोळे लीजायसन सांग, “या लोक ज्या यहुदी शेतस, आमना नगर मा गैरा अशांती पसारी ऱ्हायनात. आणि अश्या रितीस्ले दाखाडी ऱ्हायनात, जेस्ले स्वीकार करान व मानान आमी रोम ना नागरिकस साठे चांगल नई.” तव गर्दी ना लोक पौल आणि सीला ना विरोध मा एकत्र हुईसन चळी उनात, आणि अधिकारीस्नी तेस्ना कपळा फाडीसन उतारी टाकात, आणि तेस्ले छळ्या मारानी आज्ञा दिधी. आणि गैरा छळ्या मारीसन तेस्नी तेस्ले बंदीगृह मा टाकी दिध आणि राखणारा ले आज्ञा दिधी कि तेस्ना वर ध्यान द्या. तेले असा हुकुम भेटावर तेनी तेस्ले मधली कोठडी मा ठेव आणि तेस्ना पायस्ले लाकूळ नि बेळीस्मा आळकाई टाक. आर्धी रात ना आसपास पौल आणि सीला प्रार्थना करत परमेश्वर ना भजन गात होतात, आणि कैदी लोक आयकत होतात. कि इतला मा एक मोठा भूकंप हुयना, आठ लगून कि बंदगृह ना पाया बी हाली ग्यात, आणि लगेच सर्वा दरवाजा उघळी ग्यात, आणि सर्वा कैदीस्ना बंधन उघळी ग्यात. आणि बन्दिगृह ना राखोया उठीग्या, आणि बन्दिगृह ना द्वार उघडा देखीसन समजना कि कैदी पयीग्यात, त तेनी तलवार तानीसन स्वता ले मारान देख. पण पौल जोरमा आवाज दिसन सांगणा, स्वता ले काही नुकसान नको करू, कारण आमी सर्वा आडेच शेतस. त तो दिवा मांगाळी सन मधमा पयत ग्या, आणि कापत पौल आणि सीला ना समोर पडी ग्या. आणि तेस्ले बाहेर लयीसन सांग, “सायब, तारण भेटासाठे मी काय करू?” तेस्नी सांग, “प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास कर, त तू आणि तुना घराणा ना तारण हुईन.” आणि तेस्नी तेले आणि तेना सर्वा घरणा ना लोकस्ले प्रभु ना वचन आयकाळ. आणि रात ले त्याच घळी तेनी तेस्ले लीजायसन तेस्ना घाव धोयना, आणि तेनी आपला सर्वा घराणा ना लोकस्ना समेत लगेच बाप्तिस्मा लीधा. आणि तेनी तेस्ले आपला घर मा लीजायसन, तेस्ना समोर जेवण ठेवणा आणि सर्वा घराणा समेत परमेश्वर वर विश्वास करीसन त्या सर्वा गैरा खुश होतात. पुड्ल्ली सक्कायले अधिकारीस्नी शिष्यले सांगी धाळ कि त्या लोकस्ले सोळी द्या. राखोया नि या गोष्टी पौल ले सांगी आयकाळ, “अधिकारी नि तुमले सोडानी आज्ञा धाडेल शे, त आते निघीसन शांती कण जावा.” पण पौल नि तेले सांग, “तेस्नी आमले ज्या रोमी देश ना राहणार शेतस, बिगर दोषी ठरावाना लोकस्ना समोर मार आणि बंदीगृह मा टाक, आणि आते काय चुपचाप काळी देतस? अस नई, पण त्या स्वता ईसन आमले बाहेर लीजावो.” शिपाईस्नी ह्या गोष्टी अधिकारीस्ले सांगी दिधी, आणि त्या हय आयकीसन कि रोम देश ना नागरिक शे, घाबरी ग्यात. आणि ईसन तेस्नाशी माफी मांगी, आणि बाहेर लीजायसन विनंती करणात कि नगर मधून चालना जावा. त्या बंदीगृह तून निघीसन लुदिया ना आठे ग्यात, आणि विश्वासीस्ले भेटीसन तेस्ले प्रोत्साहित करणात कि त्या कायम प्रभु येशु वर विश्वास करत राहो. मंग पौल आणि सीला तठून चालना ग्यात. परत पौल आणि सीला अंफिपुली नगर आणि अपुल्लोनिया नगर मधून निघनात त थेस्सलनीक शहर पोचनात, जठे यहुदी लोकस्ना एक प्रार्थना घर होता. आणि पौल आपली रिती प्रमाणे तेस्ना जोळे ग्या, आणि तीन शब्बाथ ना दिन लगून परमेश्वर ना पुस्तक मधून तेस्ना संगे वाद विवाद करत ऱ्हायना. आणि तेस्ना अर्थ उघाळी-उघाळीसन समजाळत होता कि ख्रिस्त ले दुख उचलन, आणि मोत मधून जित्त होण, अवश्य होत, “हवूच येशु जेना बारामा मी प्रचार करस, ख्रिस्त शे.” तेस्ना मधून कितलाक यहुदीस्नी, आणि परमेश्वर ले भ्याणारा ग्रीक लोकस मधून गैरास्नी आणि गैरा सावटा प्रमुख बायास्नी विश्वास करी लीध, आणि पौल व सीला ना संगे मिई ग्यात. पण यहुदीस्नी ईर्ष्या कण भरीसन बजार ना लोकस मधून काही द्रुष्ट लोकस्ले आपला संगे लीधा, आणि गर्दी लाईसन नगर मा दंगा कराले लागनात, आणि तेस्नी यासोन ना घर वर हल्ला करीसन पौल आणि सीला ले लोकस्ना समोर लयाना देखनात. आणि त्या नई सापळनात त त्या हय आराया मारत यासोन आणि काही आखो विश्वासीस्ले नगर ना अधिकारीस समोर वळी लयनात आणि सांगाले लागनात, “ह्या लोक जेस्नी प्रत्येक जागा वर समस्या पसारी टाकेल शे, आठे बी एयेल शेतस. आणि यासोन नि तेस्ले आपला घर ऱ्हावानी परवानगी दियेल शे, आणि ह्या सर्वान सर्वा हय सांगतस कि येशु म्हणीसन दुसराच कोणी राजा शे, आणि रोमी सम्राट नि आज्ञास्ना विरोध करतस.” जव गर्दी आणि नगर ना अधिकारीस्नी ह्या गोष्टीस्ले आयक, त त्या समस्या मा पळीग्यात. आणि तेस्नी यासोन आणि दुसरा लोकस्ले जामीन वर सोळी टाक. विश्वासीस्नी लगेच रात लेन रात ले पौल व सीला ले बिरुया नगर मा धाळी टाक, आणि त्या तठे पोहोचीसन यहुदी लोकस्ना प्रार्थना घर मा ग्यात. ह्या लोक त थेस्सलनीका शहर ना यहुदी लोकस तून चांगला होतात आणि तेस्नी गैरी लालूस कण वचन ले स्वीकार कर, आणि दररोज परमेश्वर ना पुस्तक मा शोधत ऱ्हायनात कि ह्या गोष्टी असाच शेतस कि नई. एनासाठे तेस्ना मधून गैरास्नी, आणि ग्रीक प्रमुख बायास मधून आणि माणसस मधून गैरास्नी विश्वास कर. पण जव थेस्सलनीका शहर ना यहुदी लोकस्ले मालूम हुयन कि पौल बिरुया नगर मा बी परमेश्वर ना वचन आयकाळस, त तठे बी ईसन लोकस्ले भळकावाले आणि अशांती पसरावू लागनात. तव विश्वासीस्नी लगेच पौल ले धाळ कि समुद्र तठ वर चालना जावो, पण सीला व तीमुथियुस बिरुया नगर माच राहीग्यात. त्या लोक ज्या पौल ले लीजाई ऱ्हायंतात, तेना संगे अथेनै शहर लोंग ग्यात, आणि पौल नि हय आदन्या संगे त्या बिरिया नगर ले परती ग्यात कि सीला आणि तीमुथियुस ले लवकरच तेना जोळे धाळामा येवो. जव पौल अथेनै शहर मा तेस्नी वाट देखत होता, त नगर ले मूर्तीस कण भरेल देखीसन तेना मन गैरा उदास हुईना. एनासाठे पौल प्रार्थना घर मा यहुदी लोक आणि परमेश्वर ले भ्याणारा बिगर यहुदी लोकस संगे आणि बजार मा ज्या लोकस्ले भेटत होता, तेस्ना संगे प्रत्येक दिन वाद-विवाद करत होतात. त्या शिक्षक ज्या एपिकूरपंथी आणि स्तोयिकपंथी शिक्षास्ले मानणार म्हणून वयखामा येत होतात तेना विरोध कराले लागनात, आणि काही लोकस्नी सांग, “हवू बडबड्या काय सांगान देखी ऱ्हायंना?” पण दुसरास्नी सांग, “तो दुसरा देवस्ना प्रचारक मालूम पडस,” कारण कि तो येशु ना आणि पुनरुत्थान नि सुवार्ता आयकाळत होता. तव त्या पौल ले आपला संगे अरियपग नाव ना सभास्थान मा लीग्यात आणि विचार, “काय आमी जाणू सकतस का, कि हवू नवा संदेश जो तू आयकाळस, काय शे? कारण कि तू अपरिचित गोष्टी आमले आयकाळस, एनासाठे आमले समजी लेन शे कि ह्या गोष्टस्ना अर्थ काय शे?” (एनासाठे कि सर्वा अथेनै शहर ना रहिवासी आणि परदेशी ज्या तठे राहात होतात नव्या-नव्या गोष्टी सांगाले आणि आयका पासून आखो कोणताच कामस्मा टाईम नई जावाळतस.) तव पौल नि अरियपग नाव ना सभास्थान ना मधमा उभा ऱ्हायसन सांग, “ओ अथेनै शहर ना लोक, मी देखस कि तुमी सर्वा गोष्टीस्मा देवस्ना गैरा मानणार शेतस. कारण कि मी फिरत तुमनी पूजाणी वस्तुले देखी ऱ्हायंतू, त एक अशी वेदी बी देखनु, जेनावर लिखेल होत, बिगर वयख ना परमेश्वर साठे. एनासाठे जेनी तुमी बिगर वयख ना उपासना करतस, मी तुमले तेना संदेश आयकाळस.” ज्या परमेश्वर नि जग आणि तेन्या सर्वा गोष्टीस्ले बनाव, तो आकाश आणि पृथ्वी ना प्रभु शे म्हणून तो हात कण बनायेल मंदिर मा नई ऱ्हास. आणि नईत कोणती वस्तू नि गरज साठे तेले माणुस नि मदत नि गरज शे, कारण कि तो स्वता सर्वास्ले जीवन श्वास आणि सगळ काही देस. तेनी एकच माणुस कण माणसस्ना सर्वा जातीस्ले पृथ्वी वर राहा साठे बानायेल शे, आणि तेस्ना ठरायेल टाईम आणि राहाणी सीमाले बांधेल शे, परमेश्वर नि अस एनासाठे कर कि लोक तेले झामलोत, आणि कदाचित त्या तेना जोळे पोहोची सकोत, तरी बी, तो आमना मधून कोणा पासून दूर नई शे. कारण कि तो आमना संगे शे एनासाठे कि आमी जित्ता राहोत आणि चालोत-फिरोत आणि आमना अस्तित्व कायम राहो, बरोबर तसाच जसा तुमना कविस्नी बी सांगेल शे, “आमी त तेनाच वंश बी शेतस.” एनासाठे परमेश्वर ना वंशज हुईसन आमले हय समजन चांगल नई कि परमेश्वर ना स्वभाव, सोन व चांदी व दघळ सारखा शे, जो माणुस नि कारागिरी आणि कल्पना कण बनायेल शेतस. एनासाठे परमेश्वर नि लोकस्नी अज्ञानता ना टाईम वर ध्यान नई दिधा, पण आते प्रतेक जागा वर सर्वा माणसस्ले आपला पापस पासून मन फिरावानी आज्ञा देस. कारण कि तेनी एक दिन निश्चित करेल शे, जेनामा तो त्या माणुस ना द्वारे धार्मिकता कण जग ना लोकस्ना न्याय करीन, जेले तेनी ठरायेल शे आणि तेले मरेल मधून जित्ता करीसन, ह्या गोष्ट ना पुरावा सर्वा लोकस्ले दि दियेल शे. मरेल मधून परत जित्ता होवाना विषय मा गोष्टी आयकीसन कितलाक लोक त मजाक उळावाले लागनात, आणि कितलाक लोकस्नी सांग, “हय गोष्ट आमी तुना कण परत नंतर आयकसुत.” एनासाठे पौल तेस्ना मधून चालना ग्यात. पण काही लोक तेना संगे मिई ग्यात, आणि प्रभु वर विश्वास करणात, जेस्ना मा दिओनुस्य जो अरिय-पगकर ना सदस्य होता, आणि दामारी नाव नि एक बाई होती, आणि तेस्ना संगे आखो बी काही लोक होतात. ह्या नंतर पौल अथेनै शहर ले सोळीसन करिंथ शहर मा उना. आणि तठे अक्विल्ला नाव ना एक यहुदी भेटणा, जेना जल्म पंत प्रांत मा हुयेल होत, आणि आपली बायको प्रिस्कील्ला ना संगे इटली प्रांत मधून आतेच एयेल होता, कारण कि सम्राट क्लौदिया सर्वा यहुदीस्ले रोम मधून निघी जावानी आज्ञा दियेल होती, त्या आदेश मुळे त्या करिंथ शहर मा उनात. आणि पौल तेस्ले भेटाले ग्या, पौल आणि अक्विल्ला ना एकच व्यवसाय होता. एनासाठे तो तेस्ना संगे ऱ्हायना आणि तेस्ना संगे तंबू बनावाना काम कराले लागणा. आणि पौल प्रतेक आराम ना दिन प्रार्थना घर मा तर्क-वितर्क करीसन यहुदी आणि ग्रीक लोकस्ले येशु ख्रिस्त वर विश्वास कराले समजाळत होता. जव सीला आणि तीमुथियुस या मासेदोनिया प्रांत तून उनात, त पौल वचन आयकाळानी धून मा लागीसन यहुदी लोकस्ले साक्षी देत होता कि येशुच ख्रिस्त शे. पण जव यहुदी लोक पौल ना विरोध मा विरोध आणि निंदा कराले लागनात, त तेनी आपला कपळा झटकी सन तेस्ले सांग, “परमेश्वर ना संदेश ले अस्वीकार करा मुळे तुमी स्वताच त्या दंड साठे जिम्मेदार शेतस, जो तुमले परमेश्वर कळून भेटीन, मी निर्दोष शे. आते पासून मी बिगर यहुदी लोकस कळे जासू आणि तेस्ना मधमा परमेश्वर ना संदेश ना प्रचार करसू.” आणि प्रार्थना घर मधून चालीसन तो तीत युस्त नाव ना परमेश्वर ना भक्त ना घर बिगर यहुदी लोकस्ले शिकाळाले उना, जेना घर प्रार्थना घर ले लागीसन होता. तव प्रार्थना घर ना अधिकारी क्रिस्प नि आपला पुरा कुटुंब संगे प्रभु वर विश्वास कर, आणि गैराच करिंथ शहर ना रहिवासीस्नी पौल ना गोष्टीस्ले आयकीसन विश्वास कर आणि बाप्तिस्मा लीधात. आणि प्रभु नि रात ले दर्शन ना द्वारे पौल ले सांग, “भ्यावू नको, पण सांगत जा आणि चूप नको राहू, कारण कि मी तुना संगे शे, आणि कोणी तुनावर चळीसन तुना नुकसान नई कराव, कारण कि ह्या नगर मा मना गैरा लोक शेतस ज्या मनावर विश्वास करतीन.” एनासाठे पौल तेस्ना मधमा परमेश्वर ना वचन शिकाळत दीड वरीस लगून ऱ्हायना. जव गल्लियो अखया प्रांत ना राज्यपाल होता त यहुदी लोक एकी करीसन पौल वर चळी उनात, आणि तेले न्याय सिंहासन ना समोर लईसन सांगाले लागनात, “हवू माणुस लोकस्ले समजाळस, कि परमेश्वर नि उपासना ह्या प्रमाणे करा, जी मोशे ना नियम ना विरुद्ध मा शे.” जव पौल बोलावर होता, त गल्लियो नि यहुदी लोकस्ले सांग, “यहुदी लोकसहोण, कदी हय काही अन्याय व वाईट गोष्ट ऱ्हाती त बर ऱ्हात कि मी तुमनी आयकतू. पण कदी हवू तर्क-वितर्क शब्द, आणि नाव, आणि तुमना आठला मोशे ना नियम ना बारामा शे, त तुमीच जाना, कारण कि मी ह्या गोष्टीस्ना न्यायाधीश बनाना नई देखत.” आणि गल्लियो नि तेस्ले आदन्या दिधी कि त्या तेस्ले न्याय सिंहासन समोरून काळी देवोत. तव सर्वा लोकस्नी प्रार्थना घर ना अधिकारी सोस्थीनेस ले धरीसन न्याय सिंहासन ना समोर मार. पण गल्लियो नि ह्या गोष्टीस्नी काही बी चिंता नई करी. तव पौल गैरा दिन लगून करिंथ शहर मा ऱ्हायना, मंग विश्वासीस पासून निघीसन पाणी ना रस्ता कण सिरीया प्रांत चालना ग्या, तेना संगे प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला बी होतात. सिरीया जावाना पहिले किंख्रिया नगर मा पौल नि आपला डोकान मुंडण कराई लीध कारण कि तेनी एक नवस करेल होता. आणि त्या इफिस शहर मा पोहचीसन पौल नि प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला ले तठे सोळी दिध, आणि स्वताच प्रार्थना घर मा जाईसन यहुदी लोकस संगे तर्क-वितर्क कराले लागणा. जव लोकस्नी तेले विनंती करी कि, “आमना संगे काही दिन आखो ऱ्हाय.” त तेनी मना करी टाक. पण जातांना तेस्ले हय सांगीसन ग्या, “जर परमेश्वर नि ईच्छा अशीन त मी तुमना जोळे परत एसू.” तव इफिस शहर तून जहाज सोळीसन चाली पाळणा, आणि कैसरीया शहर मा उतरीसन (यारुशलेम ले) ग्या आणि मंडळी ले भेटीसन अंत्युखिया शहर मा उना. मंग काही दिन अंत्युखिया नगर मा राहीसन तठून चालना ग्या, आणि एक कळून गलतिया प्रांत व फ्रुगिया प्रांत मा सर्वा शिष्यस्ले विश्वास मा बळकट करत फिरणा. अपुल्लो नाव ना एक यहुदी जेना जल्म सिकंदरिया शहर मा हुएल होत, जो विध्वान माणुस होता आणि परमेश्वर ना पुस्तक मा निपुण होता, इफिस मा उना. तेनी प्रभु ना रस्ता नि शिक्षा लीयेल होती, आणि आत्मा मा उत्साहित हुईसन येशु ना बारामा खर-खर आयकाळत आणि शिकाळत होता, पण तेले फक्त योहान ना बाप्तिस्मा ना बारामाच माहित होता. तो प्रार्थना घर मा बिगर भ्यावाना बोलाले लागणा, पण प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला तेन्या गोष्टी आयकीसन, तेले आपला घर लई उनात आणि परमेश्वर ना रस्ता तेले आखो बी स्पष्टपणे दाखाळ. आणि जव तेनी निश्चय कर कि पार उतरीसन अखया प्रांत ले जावूत विश्वासीस्नी तेले जावा साठे प्रोत्साहित करीसन शिष्यस्ले लिख कि त्या तेना चांगल्या प्रकारे स्वागत करोत. एनासाठे जव अपुल्लो तठे पोहोचना, तेनी त्या शिष्यस्ना गैरा प्रोत्साहन कर. जेस्नी कृपा ना द्वारे विश्वास करेल होता. अपुल्लो नि आपली शक्ती आणि कौशल्य कण यहुदी लोकस्ले सार्वजनिक रूप कण हाराव, परमेश्वर ना पुस्तक मधून पुरावा दि दिसन कि येशुच ख्रिस्त शे. जव अपुल्लो करिंथ शहर मा होता, त पौल वरना सर्वा प्रांतस मधून इफिस शहर मा उना, आणि तठे काही शिष्यस्ले भेटणा. तेनी तेस्ले सांग, “काय तुमले विश्वास करतांना पवित्र आत्मा भेटणा?” तेस्नी तेले सांग, “आमी त पवित्र आत्मा नि चर्चा बी नई आयकनुत.” पौल नि तेस्ले सांग, “त मंग तुमी कोणता प्रकार ना बाप्तिस्मा लीधा?” तेस्नी सांग, “आमनी तो बाप्तिस्मा लीधा जो योहान देत होता.” पौल नि सांग, “योहान नि हय सांगीसन लोकस्ले बाप्तिस्मा दिधा जेस्नी आपला पापस पासून मन फिरायसन परमेश्वर कळे फिरणात, पण तेनी इस्त्राएल ना लोकस्ले सांग कि त्या येशु वर विश्वास करोत जो तेना नंतर ईन, जो कि येशु ख्रिस्त शे.” हय आयकीसन तेस्नी प्रभु येशु ना नाव ना बाप्तिस्मा लीधा. आणि जव पौल नि तेस्ना वर आपला हात ठेवात, त तेस्ना वर पवित्र आत्मा उतरणा, आणि त्या आल्लग-आल्लग भाषा बोलणे आणि भविष्यवाणी कराले लागनात. ह्या सर्वा जवळ-पास बारा माणस होतात. तव पौल प्रार्थना घर मा जाईसन तीन महिना लगून बिगर भ्यावाना बोलत ऱ्हायना, आणि परमेश्वर ना राज्य ना बारामा तर्क-वितर्क करत आणि समजाळत ऱ्हायना. पण जव काही लोकस्नी कठोर हुईसन विश्वास कराले नकार करी दिधा आणि आखो लोकस समोर येशु ना मत ना बारामा वाईट सांगाले लागनात, त तेनी तेस्ले सोळीसन शिष्यस्ले आल्लग करी लीध, आणि तुरन्नानी शाळा मा दररोज चर्चा करत होता. दोन साल लगून अस होत ऱ्हायन, आठ लगून कि आशिया प्रांत ना राहणारा काय यहुदी, काय ग्रीक सर्वास्नी प्रभु ना वचन आयकी लीध. आणि परमेश्वर पौल ना द्वारे अदभूत सामर्थ्य ना काम दाखाळत होता. आठ लगून कि रुमाल आणि शाल तेना शरीर ले स्पर्श कराईसन आजारीस्वर टाकत होतात, आणि त्या आजारस्तून बरा हुई जात होतात, आणि दुष्ट आत्मा तेस्ना मधून निघी जाया करत होती. पण काही यहुदी माणस सर्वा कळे फिरत होतात आणि लोकस मधून दुष्ट आत्मास्ले काळत होतात, आणि त्या तेस्ले प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण काळाले लागनात, आणि त्या हय सांगाले लगनात कि “ज्या येशु ना प्रचार पौल करस, आमी तुमले बाहेर येवानी आदन्या देस.” आणि स्कीवा नाव ना एक मुख्य यहुदी पुजारी ना सात पोर होतात, ज्या असाच करत होतात. पण दुष्ट आत्मा नि तेस्ले उत्तर दिधा, “येशु ले मी वयखस, आणि पौल ले बी वयखस, पण तुमी कोण शेतस?” आणि त्या माणुस नि जेनामा दुष्ट आत्मा होती, तेस्ना वर उळीमारीसन, आणि तेस्ले काबू मा लईसन, तेस्ना वर असा झपटना, कि त्या नागा आणि जखमी हुईसन त्या घर मधून निघी पयनात. आणि हय गोष्ट इफिस शहर ना राहणारा यहुदी आणि ग्रीक ले बी सर्वास्ले माहिती पळीग्य, आणि त्या सर्वास्मा भीती घुसग्यी, आणि प्रभु येशु नि नाव नि स्तुती करी. जेस्नी विश्वास करेल होत, तेस्ना मधून गैरा लोकस्नी ईसन आपला आपला वाईट कामस्ले सर्वास्ना समोर मानी लीनात. आणि झाळू फुक करणारास मधून गैरास्नी आपल्या-आपल्या झोयना एकत्र करीसन सर्वास समोर पेटाळी टाक, आणि जव तेस्ना मोळ काळामा उना, त आसपास पन्नास हजार चांदी ना शिक्कास्ना बराबर निघना. ह्या प्रकारे प्रभु ना वचन सामर्थ कण पसरत ग्या आणि प्रबळ होत ग्या. जव ह्या गोष्टी हुई ग्यात त पौल नि मासेदोनिया प्रांत व अखया प्रांतस मधला विश्वासीस संगे भेटा नंतर यरूशलेम शहर जावाना निर्णय लीधा. आणि सांग, “तठे जावा नंतर मले रोम शहर ले बी देखान अवश्य शे.” एनासाठे आपली सेवा करणारस मधून तीमुथियुस आणि एरास्त ले मासेदोनिया प्रांत मा आपला पुळे धाळीसन स्वता काही दिन आशिया प्रांत मा राही ग्या. त्या टाईम ले प्रभु ना मत ना बारामा मोठा गोंधय हुयना. कारण कि देमेत्रिय नाव ना एक सोनार होता जो अर्तमी ग्रीक देवी ना चांदी ना मंदिर ना नमुना बनाईसन, कारागीरस्ले तेस्ले बनावा साठे गैरा पैसा देत होता. देमेत्रियस्नि आपला कारागीरस्ले बलाव आणि अशी वस्तूस्ना कारागीरस्ले एकत्र करीसन सांग, “भावूसहोण, तुमले माहिती शे कि ह्या काम कण आपले कितला पैसा भेटस. आणि तुमी देखतस आणि आयकतस कि फक्त इफिस शहर माच नई, पण आशिया प्रांत ना सर्वा गावस्मा हय सांगी सांगीसन ह्या पौल नि गैराच लोकस्ले समजाळेल आणि फुसलायेल बी शे, कि जी हात नि कारागिरी शे, त्या परमेश्वर नईत. आणि आते फक्त ह्याच गोष्ट नि भीती नई कि आमना ह्या धंदा नि प्रतिष्ठा चालनी जाईन, पण हय कि महान देवी अर्तमी ना मंदिर तुच्छ समजामा ईन आणि जिले पुरा आशिया प्रांत मा आणि जग भर मा तेना महत्व बी चालना जाईन.” सर्वी गर्दी हय आयकीसन रागे भरी गई आणि आराया मारी-मारीसन सांगाले लागणी, “इफिसस्नि देवी अर्तमी महान शे.” आणि शहर ना दुसरा कईक लोकस्नी आराया मारानी आवाज आयक आणि जाईसन गर्दी मा मिई ग्यात आणि शहर मा गोंधय उठी गी आणि लोकस्नी गायस आणि अरिस्तार्ख, मासेदोनिया प्रांत ना राहानारस्ले ज्या पौल ना संगी प्रवासी होतात, धरी लीनात, आणि एकत्र हुईसन रंग शाळा मा पईग्यात. जव पौल बी रंग शाळा ना मधमा जाईसन लोक संगे बोलाले देखत होता त शिष्यस्नी तेले जावू नई दिध. आशिया ना अधिकारीस मधून बी तेना काही मित्रस्नी तेना जोळे सांगी धाळ आणि विनंती करी, कि रंग शाळा मा जाईसन आपला जीव ले धोका मा नको टाकजो. रंग शाळा ना मधमा, सर्वा लोक आराया मारत होतात, कोणी एक काही आणि आखो कोणी काही, सर्व काही गोंधय होत. आणि गैरा जास्त लोकस्ले त हय मालूम बी नई होत कि त्या कसा साठे एकत्र हुएल शेतस. तव गर्दी मधून काही यहुदी लोकस्नी आलेक्सांद्र नाव ना एक माणुस्ले गर्दी मधून पुळे कर, आणि आलेक्सांद्र हात ना इशारा कण शांत राहा साठे लोकस्ले समजाळाना प्रयत्न करू लागणा. पण जव त्या समजी ग्यात कि तो यहुदी माणुस शे, त सर्वान सर्वा एक सूर मा जवळ-पास दोन घंटा लगून वरळत ऱ्हायनात, कि “इफिसस्नि देवी अर्तमी महान शे.” तव नगर ना मंत्री नि लोकस्ले शांत करीसन सांग, “ओ इफिस शहर ना रहिवासीसहोण, सर्वास्ले माहित शे कि महान अर्तमी देवी ना मंदिर आणि तेनी मूर्ती जी आकाश मधून पळेल होती, तेनी राखोई इफिस शहर ना लोक करी ऱ्हायनात. एनासाठे जव कि ह्या गोष्टीस्ना खंडनच नई होवू सकस, त बर शे, कि तुमी शांत राहा, आणि बिगर विचार-पूस ना काही नका करा. कारण कि तुमी ह्या माणसस्ले लयेल शेतस, ज्या नईत मंदिर ले लुटणार शेतस, आणि नईत आमनी देवी ना निंदा करणारा शेतस. एनासाठे कदी देमेत्रिय आणि तेना जोळीदार कारागीरस्ना कोणा संगे विवाद हुईन त त्या न्यायालय मा जावू सकतस, आणि तेस्ना प्रकरण ना न्याय करासाठे लोक बी शेतस, तठे लोक एक दुसरा वर आरोप लावू सकतस. पण कदी तुमी कोणती दुसरी गोष्ट ना बारामा काही विचाराना देखतस, त नियमित सभा मा न्याय करामा ईन. कारण कि मले भीती शे कि राज्यपाल ह्या सर्वा गोंधय ना बारामा आयकीन आणि सांगीन कि आमी रोम सरकार ना विरुद्ध विरोध कराना प्रयत्न्य करी ऱ्हायंतुत, कारण कि एन काहीच कारण नई, आखो आमी ह्या गर्दी ना एकत्र होवान कोणताच उत्तर नई देवू सकस.” आणि हय सांगीसन तेनी सभा ले जावान सांग. जव गोंधय थांबी ग्यात पौल नि शिष्यस्ले बलाईसन उत्साहित करना, आणि तेस्ना पासून निघीसन मासेदोनिया प्रांत कळे चाली दिना. त्या पुरा प्रदेश मधून हुईसन आखो दुसरा शिष्यस्ले गैरा उत्साहित करत तो ग्रीक प्रांत मा उना. जव तीन महिना राहीसन तो तठून जहाज कण सिरीया प्रांत कळे जावावर होता, पण तेनी आयक कि काही यहुदी पुढारी तेले जहाज मा माराना षड्‍यंत्र रची ऱ्हायनात, आणि त्यामुळे तेनी मासेदोनिया प्रांत मधून होत सिरीया प्रांत जावाना निर्णय कर. आणि तेना संगे काही लोक होतात त्या असा होतात. बिरुया ना राहणारा पुर्राना ना पोऱ्या सोपत्र आणि थेस्सलनीका शहर ना रहिवासी अरिस्तार्ख व सकुंद, आणि दर्बे ना गायस आणि तीमुथियुस, तुखिक व त्रफिम आशिया प्रांत ना होतात. पण या जोळीदार प्रवासी आमना पुळे चालना ग्यात आणि त्रोवस शहर मा पोहोचीसन आमनी वाट देखत ऱ्हायनात. आणि आमी दोनीस्नी बिगर खमीर भाकर ना सन ना दिनस नंतर फिलिप्पै शहर ना समुद्र ना मार्ग कण पाच दिनस्मा त्रोवस शहर मा तेस्ना जोळे पोहोचनुत, आणि सात दिन लगून तठेच ऱ्हायनूत. हप्ताना पहिला दिन जव आमी भाकर मोडाना साठे एकत्र हुयनूत, त पौल जो दुसरा दिन जानार होता, तेस्ना संगे गोष्टी करना, आणि आधी रात लगून उपदेश देत ऱ्हायना. ज्या खोली मा आमी एकत्र हुएल होतुत, तीनामा गैरा दिवा पेटी ऱ्हायंतात. आणि युतुख नाव ना एक जवान माणुस खिळकी वर बठीसन दाट निंद मुळे डोलक्या ली ऱ्हायंता, आणि जव पौल उशीर लगून बोली ऱ्हायंता त तो निंद ना डोलकी मुळे तीन तालनी वरली खोली वरून पळी ग्या, आणि तव काही लोक खाले पयनात आणि जाईसन तेले उचनात, त तो मरी जायेल होता. पण पौल खाले ग्या, आणि तेना जोळे जाईसन तेले आपली आंगळी मा लीना, आणि मिठी मा लिसन सांग, “घाबरू नका, कारण कि तो आते बी जित्ता शे.” आणि तेनी दुसऱ्यांदा वरे जाईसन भाकर मोळी (परत प्रभु भोज लीधा) आणि खाईसन दिन निघा लगून गोष्ट करत ऱ्हायनात, नंतर तो चालना ग्या. आणि त्या जवान ले जित्ता लई उनात, आणि गैरा खुश हुईनात. आमी जहाज कण अस्सा नगर कळे पुळे निघनुत, जठून आमले पौल ले लिसन पुळे जान होत. पौल तठे जमीन ना रस्ता कण पोहोचना कारण कि हय तेनीच पहिले पासून ठरायेल योजना होती. जव तो अस्सा नगर मा आमले भेटणा त आमी तेले जहाज वर चळाई लीनुत आणि मितुलेने नगर मा उनुत. दुसरा दिन तठून प्रवास करत आमी खियास नगर ना जोळून सामा नगर मा पोहोचनुत आणि तेना पुडल्ला दिन मिलेता शहर मा उनात. कारण कि पौल नि इफिस शहर मा नई थांबाना निर्णय लीधा कारण कि तेले आशिया प्रांत मा आखो जास्त टाईम थांबन नई होत, कारण कि तो जल्दी मा होता, कि कदी होवू सकस त तो पिन्तेकुस्त ना सन ना दिन यरूशलेम शहर मा राहो. आणि जव मिलेता शहर मा उतरनूत, तव पौल नि इफिस शहर नि मंडळी ना वरिष्ठ लोकस्ले संदेश धाळ. जव त्या तेना जोळे उनात, त तेस्ले सांग, “तुमले माहिती शे, कि पहिलाच दिन पासून जव मी आशिया प्रांत मा पोहोचनु, मी प्रत्येक टाईम ले तुमना संगे आते लगून कसा ऱ्हायनु. म्हणजे गैरी नम्रता कण, आणि असा वाव्हाळी-वाव्हाळीसन, आणि त्या परीक्षास्मा ज्या यहुदी लोकस्ना वाईट योजना मुळे जी मनावर ईपळणी, मी प्रभु नि सेवा करतच ऱ्हायनु. ज्या-ज्या गोष्टी तुमना फायदा ना होत्यात, तेस्ले सांगाले आणि लोकस समोर आणि घर-घर शिकाळाले कदी नई झिझकनु. पण यहुदी आणि ग्रीक लोकस्ले जताळत ऱ्हायनु कि आपला पापास पासून मन फिराईसन परमेश्वर कळे फिरा, आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास करोत.” आणि आते, मी पवित्र आत्मा नि आदन्या कण यरूशलेम शहर ले जास, आणि मले नई माहित कि तठे मनावर काय-काय बितीन, फक्त हय कि पवित्र आत्मा प्रतेक नगर मा साक्ष दि-दिसन मले सांगस कि बंधन आणि क्लेश तुना साठे तयार शेत. पण मी आपला जीव ले काही नई समजस कि तेले प्रिय समजू, पण हय कि मी आपल पयन, आणि ती सेवा ले पुरी करू, जी मनी परमेश्वर नि कृपा नि सुवार्ता वर साक्ष देवा साठे प्रभु येशु पासून भेटेल शे. आणि आते मले माहिती शे, कि तुमी सर्वा जेस्ना मा मी परमेश्वर ना राज्य ना प्रचार करत एयेल शे, तुमी मले परत नई देखावत. एनासाठे मी आज ना दिन तुमले साक्ष दिसन सांगस, कदी तुमना मधून कोणी बी बिगर विश्वास कराना मरी जास, त हय मनी जपापदारी नई शे. कारण कि मनी तुमले सर्व काही सांगेल शे जी परमेश्वर नि ईच्छा शे कि तुमले माहिती पळो. एनासाठे आपली आणि सर्वा लोकस्नी देख-रेख करा, जेस्ना मा पवित्र आत्मा नि तुमले अध्यक्ष ठरायेल शे कि तुमी परमेश्वर नि मंडळी नि राखोई करोत, ज्या मंडळी ले तेनी आपला रक्त कण विकत लीयेल शे. मले माहिती शे, कि मले जावा नंतर तुमना मधमा खोटा शिक्षक येतीन आणि विश्वासीस्ले गैरा नुकसान पोहोचाळतीन, त्या त्या फाळणारा लांडगा सारखा राहतीन ज्या मेंढ्यास्ले मारी टाकतस. आठ लगून कि तुमना आपला विश्वासीस मधून सुद्धा असा लोक येतीन, ज्या शिष्यस्ले आपला मांगे व्हळी लेवाले वाकळ्या-तिकळ्या गोष्टी सांगतीन. एनासाठे जागता राहा, आणि आठवण करा कि मनी तीन साल लगून रात दिन असा वाव्हाळी-वाव्हाळीसन, प्रत्येक ले जताळान नई सोळ. आणि आते मी तुमले परमेश्वर ले, आणि तेना कृपा ना वचन ले सोपी देस, जो तुमले विश्वास मा वाळावू सकस, आणि परमेश्वर तुमले ते वतन दिन जेले देवाना करार तेनी त्या सर्वा लोकस संगे करेल शे ज्या तेना द्वारे पवित्र करामा एयेल शेत. मनी कोण सोना-चांदी व कपळा ना लोभ नई करेल शे. तुमले माहिती शे कि ह्याच हातस्नी मना आणि मना जोळीदारस्नी गरजस्ले पुरी करेल शे. मनी तुमले सगळ काही करीसन दाव, कि ह्या प्रमाणे मेहनत करत कमजोरस्ले समायन, आणि प्रभु येशु ना वचन ले याद ठेवण अवश्य शे, कि तेनी स्वताच सांगेल शे, “लेवा पासून देवान धन्य शे.” हय सांगीसन तेनी गुळघा टेकात आणि सर्वास संगे प्रार्थना करी. तव त्या सर्वा गैरा रळनात आणि पौल ना गयाले बिलगीसन तेले मुक्का देवाले लागनात. त्या खास करीसन ह्या गोष्ट ना दुख करत होतात, जी तेनी सांगेल होती, कि तुमी मले परत नई देखावत. आणि तेस्नी तेले जहाज लगून पोहोचाळ. जव आमी तेस्ना पासून निघीसन समुद्रमार्गे निघनुत, आणि सरळ प्रवास करत कोस बेट मा उनुत, आणि दुसरा दिन रूड बेट मा, आणि तठून आमी पातरा बेट मा पोहोचीग्युत. आणि एक जहाज फेनिके प्रांत ले जातांना भेटणा, आणि आमी तेनावर चळीसन, प्रवास चालू करनुत. जव आमले डाखोऱ्या कळे कुप्र बेट दिखना, आमी तेले सोळीसन सिरीया प्रांत कळे चालतग्यू आणि सोर नगर ले जाई पोहोचनुत कारण कि तठे जहाज मधून सामान ले उतारन होत. आणि काही शिष्य तठे आमले भेटनात त आमी तेस्ना संगे सात दिन लगून ऱ्हायनूत, त्या पवित्र आत्मा नि सूचना मुळे पौल ले यरूशलेम शहर मा नई जावानी विनंती करत ऱ्हायनात. सात दिनस नंतर जव तठून आमना जावाना टाईम उना, त आमी तठून चालीपळनूत, आणि सर्वा बाया आणि पोरस संगे आमले नगर ना बाहेर लगून पोचाळनात आणि आमी समुद्र ना तठ वर गुळघा टेकीसन प्रार्थना करनुत. मंग एक दुसरा ना निरोप लिसन आमी जहाज मा चळणुत, आणि त्या आपला आपला घर परती ग्यात. जव आमी सोर नगर तून चालू करेल प्रवास पुरा करीसन आमी पोलेमा नगर ले पोहोचनुत, आणि विश्वासीस्ले भेटीसन तेस्ना संगे एक दिन ऱ्हायनूत. दुसरा दिन आमी तठून चालीसन कैसरीया शहर मा उनुत, आणि फिलिप्प सुवार्ता ना प्रचारक ना घर मा जो त्या सात माणसस मधून एक होता जेस्ले यरूशलेम मा प्रेषितस्नी विधवास्नी रेख-देख साठे निवाळेल होत, जाईसन तेना आठे थांबनात. तेन्या चार कुवार्‍या पोरी होत्यात, ज्या भविष्यवाणी करत होत्यात. जव आमी तठे गैरा दिन ऱ्हाय लीनुत, त अगब नाव ना एक भविष्यद्वक्ता यहूदीया प्रांत मधून उना. तो आमना जोळे ईसन पौल ना पट्टा मांगी लीना, आणि आपला हात पाय बांधीसन सांग, “पवित्र आत्मा हय सांगस, कि ज्या माणुस ना हवू कमर ना पट्टा शे, तेले यरूशलेम शहर मा यहुदी लोक ह्याच प्रकारे बांधतीन, आणि दुसरा जाती ना हात मा सोपतीन.” जव आमी ह्या गोष्टी आयकनूत, त आमी आणि तठला लोकस्नी पौल ले विनंती करी, कि यरूशलेम शहर ले नई जावो. पण पौल नि उत्तर दिधा, “तुमी काय करी ऱ्हायनात, कि रळी-रळीसन मना मन दूखाळी ऱ्हायनात? मी त प्रभु येशु ना नाव ना साठे नईत फक्त यरूशलेम शहर मा बांधाई जावा साठेच नई पण मरा साठे बी तयार शे.” जव तेनी नई मान त आमी हय सांगीसन चूप हुईग्यूत, “प्रभु नि ईच्छा पुरी होवो.” काही दिनस नंतर आमनी तयारी करी, आणि यरूशलेम शहर कळे निघनुत. कैसरीया शहर ना बी काही शिष्य आमना बरोबर चालू लागनात, आणि आमले म्नासोन नाव ना कुप्र बेट ना रहिवासी ना घर लीजावा मा उन कि आमी तेना आठे राहोत. तो सर्वास्तून पहिलेस्ना शिष्यस मधून एक होत. जव आमी यरूशलेम शहर मा पोहोचनुत, तव विश्वासीस्नी मोठा आनंद कण आमना स्वागत करणात. दुसरा दिन पौल आमले लिसन याकोब कळे ग्या, जठे सर्वा वरिष्ठ लोक हजर होतात. तव तेनी तेस्ले नमस्कार करीसन, ज्या-ज्या काम परमेश्वर नि तेनी सेवकाई ना द्वारे बिगर यहुदी लोकस्मा करेल होतात, एक-एक करीसन सर्वा सांगात. तेस्नी हय आयकीसन परमेश्वर नि स्तुती करी, आणि तेस्नी तेले सांग, “ओ भावू, तुले माहित शे, कि यहुदी लोकस मधून हजारो लोकस्नी विश्वास करेल शे, आणि त्या सर्वा मोशे ना नियमले गैरा उत्साह कण पायतस. आणि त्या यहुदी विश्वासी लोकस्ले तुना बारामा मा (दुसरास्ना द्वारे) सांगामा एयेल शे, कि तू बिगर यहुदीस्मा ऱ्हायनारा यहुदी लोकस्ले मोशे ना नियमले सोळाले शिकाळस, आणि सांगस, कि नका त आपला बाळ ना सुंता करज्यात आणि नका त यहुदी लोकस्नी रीतीरिवाज प्रमाणे चालज्यात. त मंग काय करामा येवो? लोक नक्खी आयकतीन कि तू आठे एयेल शे. एनासाठे जे आमी तुले सांगतस, ते कर. आमना आठे चार माणस शेतस, तेस्ले त्या नवस ले पुरा करन शे जी तेस्नी परमेश्वर समोर मानेल शे. तेस्ले लिसन तेस्ना संगे स्वता ले शुद्ध करानी विधी ले पुरी कर, आणि तेस्ना साठे खर्चा दे, कि त्या आपला डोकान मुंडण करोत. त सर्वास्ले माहिती पळी जाईन कि ज्या गोष्टी तुना बारामा आयकामा उणी, त्या काय खरा नईत पण तू स्वता बी मोशे ना नियमले मानीसन त्या प्रमाणे चालस. पण त्या बिगर यहुदी ना बारामा जेस्नी विश्वास करेल शे, आमनी हय निर्णय करीसन लिखी धाळेल शे कि त्या मूर्तीस पुळे अर्पण करेल मांस पासून, आणि व्यभिचार पासून, आणि गया दाबेल ना मांस पासून, आणि जनावरस्ना रक्त खावा पासून दूर राहा.” असाच करा त तुमन चांगल हुईन. दुसरा दिन पौल नि त्या माणसस संगे जाईसन स्वता ले शुद्ध कर, तव तो परमेश्वर ना मंदिर मा ग्या, आणि तठे हय सांग, कि शुद्धीकरण ना दिन कव समाप्त होतीन, आणि तेस्ना मधून प्रत्येक साठे भेट चळावामा ईन. जव त्या सात दिन पुरा होवामा उनात, त आशिया प्रांत ना यहुदी लोकस्नी पौल ले परमेश्वर ना मंदिर मा देखीसन सर्वा लोकस्ले भळकाई टाक, आणि पौल ले धरी लीनात आणि वरळाले लागनात. “ओ इस्त्राएल देश ना लोकसहोण, मदत करा, हवू तोच माणुस शे, जो लोकस्ना आणि मोशे ना नियम ना आणि ह्या जागा ना विरोध मा प्रत्येक जागा वर सर्वा लोकस्ले शिकाळस. आठ लगून कि ग्रीक लोकस्ले बी परमेश्वर ना मंदिर मा लईसन तेनी ह्या पवित्र जागा ले अपवित्र करेल शे.” तेस्नी अस सांग कारण कि एनातून पहिले इफिस शहर राहणार त्रफिम ले पौल संगे नगर मा देखेल होतात, आणि हय समजेल होतात कि पौल तेले परमेश्वर ना मंदिर मा लई एयेल शे. तव पुरा नगर मा गोंधय उठीग्या, आणि लोक पयत एकत्र हुईनात, आणि पौल ले धरीसन परमेश्वर ना मंदिर ना बाहेर घसळीसन लयनात, आणि लगेच दरवाजा बंद करामा उनात. जव त्या तेले मारी टाकान देखत होतात, त सैनिक दल ना सरदार ले संदेश भेटणा कि यरूशलेम शहर मा गैरा सावटा लोक गोंधय करी ऱ्हायंतात. तव तो लगेच सैनिकस्ले आणि शताधिपतीस्ले लिसन तेस्ना जोळे पयत उना, आणि लोकस्नी गर्दी नि सैनिक दल ना सरदार आणि सैनिक ले देखीसन पौल ले मार-हान करन थाम्बाळी टाक. तव सैनिक दल ना सरदार नि पौल ना जोळे ईसन तेले धरी लीध, आणि दोन साकयस कण बांधाणी आदन्या दिसन विचाराले लागणा, “हवू कोण शे, आणि एनी काय करेल शे?” पण गर्दी मधून कोणी काही आणि आखो कोणी काही, वरळत ऱ्हायनात आणि जव गोंधय मुळे खरज गोष्ट नई समजू सकना, त तेले गळ मा ली जावानी आज्ञा दिधी. जव तो पायऱ्यास्वर पोहोचना, त अस हुयन कि गर्दी ना दबाव मुळे सैनिकस्ले तेले उचलीसन लीजान पळण. कारण कि लोकस्नी गर्दी हय वरळत तेना मांगे लागणी, “तेले मारी टाका.” जव त्या पौल ले गळ मा लिजावावर होतात, त तेनी सैनिक दल ना सरदार ले सांग, “काय मले आदन्या शे कि मी तुले काही सांगू?” तेनी सांग, “काय तुले ग्रीक भाषा बोलता येस का? काय तू त्या मिसर देश ना नई, जो ह्या दिनस तून पहिले सरकार ना विरुद्ध विरोध करीसन चार हजार कटारबंद लोकस्ले उजाळ जागा मा लीजायेल होता?” पौल नि सांग, “नई, मी एक यहुदी माणुस शे, किलकिया प्रांत ना तार्सस नगर ना राहणारा शे, आणि मी तुले विनंती करस, कि मले लोक संगे बोलू दे.” जव तेनी आदन्या दिधी, त पौल पायऱ्यास्वर उभा ऱ्हायसन लोकस्ले हात कण शांत राहाले सांग, जव त्या शांत हुई ग्यात, त तो इब्री भाषा मा बोलू लागणा. “ओ भावूसहोण आणि बापसहोण, मना प्रतीउत्तर आयका, जो मी आते तुमना समोर सांगस.” त्या हय आयकीसन कि तो तेस्ना संगे इब्री भाषा मा बोली ऱ्हायना, त्या शांत ऱ्हायनात. तव तेनी सांग, “मी यहुदी शे, मना जल्म किलकिया प्रांत ना तार्सस नगर मा हुईना. पण ह्या नगर मा गमलीएल ना पायस जोळे बठीसन शिकणु, आणि वरिष्ठ लोकस्ना मोशे ना नियम बी चांगल्या प्रकारे शिकाळा मा उना, आणि परमेश्वर साठे असा उत्साह कण भरेल होतु, जस कि तुमी सर्वा आज लगून शेतस. मी माणस आणि बाया दोनीस्ले बांधीसन बंदीगृह मा टाकीसन, येशु ना मत वर चालनारस्ले आठ लगून त्रास दिनू, कि तेस्ले माराइ बी टाक. स्वता महा यहुदी पुजारी आणि महासभा ना सर्वा पूर्वज साक्षी शेतस, कि तेस्ना मधून मी दमिश्क नगर मा यहुदी भावूस्ना साठे पत्र लिसन जाई ऱ्हायंतू, कि ज्या तठे राहोत तेस्ले दंड देवाळा साठे बांधीसन यरूशलेम शहर मा लयू. आणि जव मी प्रवास करत दमिश्क नगर ना जोळे पोहोचनु, त अस हुईन कि दुफार ना आंगे-पांगे अचानक एक मोठा प्रकाश आकाश मधून मले घेरी लीना. आणि मी जमीन वर पडी ग्यू, आणि हय वाणी आयकनु, शौल, ओ शौल, तू मले काब त्रास देस? मी उत्तर दिनू, ओ प्रभु तू कोण शे? तेनी मले सांग, मी येशु नासरेथकर शे, जेले तू त्रास देस. ज्या मना संगे होतात तेस्नी प्रकाश अवश्य देख, पण जो मना संगे बोली ऱ्हायंता तेनी वाणी नई समजू सकनात. तव मी सांगणु, ओ प्रभु, मी काय करू? प्रभु नि मले सांग, उठीसन दमिश्क नगर ले जा, आणि जे काही तुले करासाठे ठरावामा एयेल शे तठे तुले सर्व सांगामा ईन. जव त्या प्रकाश मुळे मले काहीच दिखन नई, त मी आपला जोळीदारस्ना हात धरीसन दमिश्क नगर मा उनू. तव हनन्या नाव ना मोशे ना नियम प्रमाणे परमेश्वर ले भ्यायनारा एक माणुस, जो तठला राहणारा सर्वा यहुदी लोकस्मा प्रतिष्ठीत होता, मना जोळे उना आणि उभा ऱ्हायसन मले सांग, ओ भावू शौल, परत देखाले लाग. त्याच क्षणी मना डोया उघळी ग्यात आणि मनी तेले देख. तव तेनी सांग, आमना पूर्वजस्ना परमेश्वर नि तुले एनासाठे ठरायेल शे कि तू तेनी ईच्छा ले समजो, आणि त्या धर्मी म्हणजे ख्रिस्त ले देखो, आणि तेनी आवाज आयको. कारण कि तू तेना कळून सर्वा माणसस समोर त्या गोष्टीस्ना साक्षी होशीन, ज्या तुनी देखेल आणि आयकेल शे. आते काब उशीर करस? उठ, आणि तेना नाव लिसन आपला पापस्नी माफी साठे बाप्तिस्मा ले. जव मी परत यरूशलेम शहर मा ईसन परमेश्वर ना मंदिर मा प्रार्थना करी ऱ्हायंतू, त दर्शन देखनु. आणि तेले देखनु कि मले सांगस, जल्दी करीसन यरूशलेम शहर मधून फटकामा निघी जा, कारण कि त्या लोक ज्या आठे शेतस मना विषय मा तुनी साक्ष नई मानावत. एनासाठे मनी सांग, मले नई समजन कि यरूशलेम शहर मा यहुदी लोक मनावर विश्वास काब नई करावत, तेस्ले त माहिती शे, कि मी तुनावर विश्वास करणारस्ले बंदीगृह मा टाकत आणि जागा-जागा वर प्रार्थना घरस्मा मार खावाळत होतु. आणि जव तुना साक्षी स्तेफन ना रक्त व्हावाळा मा येत होत तव बी मी तठेच उभा होतु, आणि ह्या गोष्ट मा सहमत होतु, आणि तेना हत्या करणारस्ना कपळास्नि राखोई करत होतु. आणि प्रभु नि मले सांग, चालना जा, कारण कि मी तुले सर्वा जाती ना लोकस्ना जोळे दूर-दूर धाळसू.” लोक ह्या गोष्ट लोंग तेनी आयकत ऱ्हायनात, नंतर उचा आवाज मा वरळनात, “तेले मारी टाका, तेन जित्त ऱ्हाण बर नई.” जव त्या वरळत आणि वरला कपळा फेकत आणि आपला राग दाखाळा साठे आकाश मा फपुटा उळावत होतात, त सैनिक दल ना सरदार नि सांग, “एले गळ मा लीजावा, आणि चाबूक मारीसन चौकशी करा, कि मले माहिती पळो कि लोक कसा मुळे तेना विरोध मा असा वरळी ऱ्हायनात.” जव तेस्नी तेले कातडी ना बंधस कण बांध त पौल नि त्या सुभेदार ले जो तेना जोळे उभा होता, सांग, “काय हय चांगल शे, कि तुमी एक रोम ना माणुस्ले बी बिगर दोषी ठरावाना चाबूक मारश्यात?” सैनिक ना सरदार नि हय आयकीसन सैनिक दल अधिकारी ना जोळे जाईसन सांग, “तू हय काय करी ऱ्हायना? हवू त रोम ना माणुस शे.” तव सैनिक दल ना सरदार नि तेना जोळे ईसन सांग, “मले सांग, काय तू रोमन शे?” तेनी सांग, “हा.” हय आयकीसन सैनिक दल ना सरदार नि सांग, “मी रोम ना नागरिक होवाना पद गैरा पैसा दिसन प्राप्त करेल शे.” पौल नि सांग, “मी जल्म पासून रोमन शे.” तव ज्या लोक तेनी चौकशी करावर होतात, त्या लगेच तेना जोळून दूर हुई ग्यात, आणि सैनिक दल ना सरदार बी हय समजीसन कि हवू रोमन शे, आणि तेनी तेले बांधेल शे, भ्याई ग्या. दुसरा दिन तो खर-खर समजानी ईच्छा कण कि यहुदी लोक तेनावर काब दोष लाई ऱ्हायनात, एनासाठे तेना बंधन सोळी टाकात, आणि मुख्य यहुदी पुजारी आणि पुरी महासभा ले एकत्र होवानी आदन्या दिधा, आणि पौल ले लईसन तेस्ना समोर उभा करी टाक. पौल नि महासभा कळे एक टक लाईसन देख, आणि सांग, “ओ भावूसहोण, मनी आज लोंग परमेश्वर ना साठे पुरा सदभाव कण वागेल शे.” तव हनन्या महा यहुदी पुजारी नि, तेस्ले ज्या तेना जोळे उभा होतात, तेना तोंड वर थाप मारानी आदन्या दिधी. जव पौल ले कोणी थाप मारी, तेना नंतर पौल नि तेले सांग, “ओ चुना लायेल भीत (ढोंगी), परमेश्वर तुले मारीन. तू मोशे ना नियम प्रमाणे मना न्याय करासाठे बठेल शे, आणि परत काय मोशे ना नियम ना विरुद्ध मले मारानी आदन्या देस?” ज्या जोळे उभा होतात, तेस्नी सांग, “काय तू परमेश्वर ना महा यहुदी पुजारी ना अपमान करस?” पौल नि सांग, “ओ भावूसहोण, मले नई मालूम होत, कि हवू महा यहुदी पुजारी शे, कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, आपला लोकस्ना अधिकारीस्ले वाईट नको सांगु.” तव पौल नि हय समजीसन, कि काही सदूकी लोक आणि काही परूशी लोक शेतस, महासभा मा जोरमा सांगा, “ओ भावूसहोण, मी परूशी आणि परूशीस्ना पुत्र शे, मना न्याय एनासाठे हुई ऱ्हायना, कारण कि मनी आशा शे कि परमेश्वर मरेल लोकस्ले परत जित्ता करीन.” जव तेनी हय गोष्ट सांगी, त परूशी लोकस्मा आणि सदूकी लोकस्मा विवाद होवाले लागीग्या, आणि सभा मा फुट पळीगी. कारण कि सदूकी लोकस्ना हवू विश्वास शे, कि लोक मरेल मधून परत जित्ता नई होवावत, आणि नईत परमेश्वर ना दूत आणि नईत दुष्ट आत्मा शेतस, पण परूशी लोक ह्या सर्वास्मा विश्वास करतस. तव मोठा गोंधय हुईना आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या परूशी लोक होतात, उभा ऱ्हायग्यात आणि हय सांगीसन जोरदार विरोध कराले लागनात, “आमी ह्या माणुस मा काहीच वाईट नई देखतस, होवू सकस कि एक आत्मा व परमेश्वर ना दूत नि तेना संगे बोलेल शे, मंग काय?” जव गैरा झगळा हुईना, त सैनिक दल ना सरदार नि हय भीती कण कि त्या पौल ना तुकळा-तुकळा नई करी टाकोत, म्हणून सैनिक दल ले आदन्या दिधी कि उतरीसन पौल ले सभा ना सदस्यस्ना मधून जबरजस्ती काळोत, आणि गळ मा लई येवोत. त्याच रात ले प्रभु येशु नि पौल ना जोळे उभा ऱ्हायसन सांग, “ओ पौल, हिंमत ठेव, कारण कि जशी तुनी यरूशलेम शहर मा मनी साक्ष दिधी, तशीच तुले रोम शहर मा बी साक्ष देणी पळीन.” जव दिन उगणा, त यहुदी लोकस्नी एकजूट करी, आणि शेप्पत खादी कि जठ लगून आमी पौल ले मारी नई टाकतस, कदी आमी खासुत व पीसुत त आमना वर धिक्कार शे. जेस्नी हय शेप्पत खायेल होती, त्या चाळीस झन तून जास्त होतात. तेस्नी मुख्य यहुदी पुजारी आणि पूर्वजस जोळे ईसन सांग, “आमनी शेप्पत खायेल शे कि जठ लगून आमी पौल ले मारी नई टाकावत, तठ लगून कदी काय बी खासुत, त आमना वर धिक्कार शे. एनासाठे आते महासभा ना संगे सैनिक दल ना सरदार ले समजाळा, कि पौल ले परत सभा मा लयो हय दाखाळा साठे कि तेस्ले तेना पासून आखो जास्त माहिती नि गरज शे, आणि आमी तेले पोहोचाना पहिलेच मारी टाकासाठे तयार ऱ्हासुत.” पण पौल ना भासा नि आयक कि यहुदी लोक पौल ले मारानी योजना बनाई ऱ्हायंतात, त गळ मा जाईसन पौल ले सांगी टाक. पौल नि सैनिक दल ना सरदारस मधून एक ले आपला जोळे बलाईसन सांग, “ह्या जवान ले सैनिक दल ना सरदार जोळे लीजाई, हवू तेले काय तरी सांगान देखस.” एनासाठे शताधीपती पौल ना भासा ले सैनिक दल ना सरदार ना जोळे लीग्या आणि सांग, “बंदी पौल नि मले बलाईसन विनंती करी, कि हवू जवान सैनिक दल ना सरदार ले काय तरी सांगान देखस, एले तेना जोळे लीजावा.” सैनिक दल ना सरदार नि तेना हात धरीसन, आणि तेले आल्लग लीजाईसन विचार, “तुले मले काय सांगण शे?” तेनी सांग, “यहुदी पुढारीस्नी एकी करेल शे, कि तुले विनंती करोत कि कालदिन पौल ले महासभा मा लयो, हय दाखाळा साठे कि तेस्ले तेना पासून आखो जास्त माहिती नि गरज शे. पण कृपा करीसन तेस्नी हय विनंती कळे ध्यान नको देयजो. कारण कि तेस्ना मधून चाळीस तून जास्त माणस पौल ले माराना घात मा शेतस, जेस्नी हय शेप्पत खायेल शे कि जठ लगून त्या पौल ले मारी नई टाकावत, तठ लगून नईत खावावत आणि नईत पिवावत, आणि आते त्या तयार शेतस आणि तुनी आदन्या नि वाट देखी ऱ्हायनात.” तव सैनिक दल ना सरदार नि जवान ले हय निर्देश दिसन जावू दिधा, “कोलेच नको सांगजो कि तुनी मले ह्या गोष्टी सांगेल शे.” तव तेनी दोन शताधिपतीस्ले बलाईसन सांग, “दोन शे शिपाई, सत्तर स्वार, आणि दोन शे भाले करी ले कैसरीया शहर जावा साठे तयार करी ठेवा, तू रात ना तिसरा पहर (नऊ वाजता) ले निघजो. आणि पौल ना प्रवास साठे घोडास्ले तयार ठेवा कि तेले फेलिक्स राज्यपाल ना जोळे ले सुरक्षित पोहोचाळी देवो.” आणि सैनिक दल ना सरदार नि ह्या प्रकारे राज्यपाल ले पत्र लिख. “महामहीम राज्यपाल फेलिक्स ले क्लोदियूस लुसिया कळून नमस्कार, ह्या माणुस्ले यहुदी लोकस्नी धरीसन मारी टाकान देख, पण जव मले माहित पळण कि तो रोमन शे, त सैनिक दल लिसन सोळाई लयनु. आणि मले मालूम करन होत, कि त्या तेनावर काब दोष लाई ऱ्हायनात, एनासाठे तेले तेस्नी महासभा मा लीग्यू. तव मले माहिती पळण, कि त्या आपली यहुदी नियम ना विवाद ना विषय मा तेनावर दोष लावतस, पण मृत्युदंड व बंदी बनावाना योग्य तेनामा कोणताच दोष नई. आणि जव मले सांगामा उन, कि त्या ह्या माणुस ना घात मा शेतस त मनी लगेच तेले तुना जोळे धाळी दिध, आणि त्या यहुदी लोकस्ले जेस्नी तेनावर आरोप लायेल शे आदन्या दिधी कि तुना समोर तेनावर आरोप लावोत.” त्याच रात ले सैनिकस्नी तेस्ले दियेल आदन्या ले पुरी करी, त्या पौल ले यरूशलेम शहर मधून लीग्यात आणि तेले अंतिपत्रिस शहर मा लई उनात. दिन त्या सर्वास्ले पौल ना संगे कैसरीया नगर जावा साठे सोळीसन शिपाई गळ ले यरूशलेम शहर परती उनात. तेस्नी कैसरीया शहर मा पोहोचीसन राज्यपाल ले पत्र दिध, आणि पौल ले बी तेना समोर उभ कर. राज्यपाल नि पत्र वाच आणि विचार, “हवू कोणता प्रदेश ना शे?” आणि जव माहिती पळण कि किलकिया प्रदेश ना शे, त तेनी सांग, “जव तुनावर दोष लावणार बी इजातीन, त मी तुना न्याय करसू.” आणि तेनी पौल ले हेरोद ना किला मा, सुरक्षा मा ठेवानी आदन्या दिधी. पाच दिन नंतर हनन्या महा यहुदी पुजारी काही पूर्वज आणि तिर्तुल्ल नावणा एक वकील ले संगे लिसन कैसरीया नगर मा उना, तेस्नी राज्यपाल ना समोर पौल वर दोष लाव. जव पौल ले बलावामा उन त तिर्तुल्ल तेनावर आरोप लाईसन सांगाले लागणा, “ओ महाराज फेलिक्स, तुना द्वारे आमले मोठी शांती शे, आणि तुनी व्यवस्था मुळे ह्या जाती ना साठे गैरा वाईट काम सुधरी जायेल शेतस. एले आमी प्रत्येक जागा वर आणि प्रत्येक प्रकारे धन्यवाद कण स्वीकार करतस. पण एनासाठे मनी ईच्छा नई कि तुना जास्त टाईम लेवू, मी तुले विनंती करस, कि कृपा करीसन आमन्या दोनेएक गोष्टीस्ले आयकी लेवो. कारण कि हवू माणुस ले आमी उपद्रव करणार शे आणि जग भर ना सर्वा यहुदी लोकस्मा आंदोलन करत फिरस आणि येशु नासरेथकर ना नाव ना मत वाला पंथ ना पुढारी शे. आणि तेनी परमेश्वर ना मंदिर ले बी अशुद्ध करान देख, म्हणून आमी तेले धरी लीनुत. (आमी आमना नियम प्रमाणे तेले दंड देतुत,) पण सैनिक दल ना सरदार लुसिया नि ईसन तेले शक्ती पुर्वक आमना हातस कण हिसकाई लीधा, आणि एनावर दोष लावनारस्ले तुना समोर एवानी आदन्या दिधी. ह्या सगळ्या गोष्टीस्ना बारामा आमी तेनावर दोष लावतस, तू स्वता तेनी चौकशी करीसन काय खर शे ते समजी जाशी.” यहुदी लोकस्नी बी तेना सात दिसन सांग, ह्या गोष्टी ह्याच प्रकार ना शेतस. जव राज्यपाल नि पौल ले बोलाना इशारा करा, त तेनी उत्तर दिध, “मले माहित शे कि तू गैरा सालस पासून ह्या देश ना लोकस्ना न्यायाधीश शे, आणि एनासाठे मी खुशी मा आपला प्रतीउत्तर देस. तू स्वता मालुमात करी सकशीन, कि जव पासून मी यरूशलेम शहर ना मंदिर मा उपासना कराले उनू, मले बारा दिन तून वरे नई हुईनात. तेस्नी मले नईत परमेश्वर ना मंदिर मा, नईत प्रार्थना घर मा, आणि नईत नगर मा कोठे कोणा संगे वाद-विवाद करतांना व गर्दी जमा करतांना देख, आणि नईत ह्या त्या गोष्टीस्ले, जेस्ना बारामा त्या आते मनावर दोष लावतस, तुना समोर खरज प्रमाणित करिसकतस. पण मी तुना समोर कबूल करी लेस, कि मी ख्रिस्त ना मत प्रमाणे चालीसन आपला पूर्वजस्ना परमेश्वर नि उपासना करस, आणि ज्या गोष्टी मोशे ना नियम मा आणि भविष्यवक्तास्ना पुस्तक मा लिखेल शे, त्या सर्वास्वर विश्वास करस. जेले यहुदी लोक कुपंथ सांगतस. आणि परमेश्वर कळून आशा ठेवस जशी स्वता ह्या लोक बी ठेवतस, कि धर्मी आणि अधर्मी दोनीस्ले परमेश्वर मरेल मधून परत जित्ता करीन. म्हणून मी बी परमेश्वर आणि माणसस्ना संगे मना विवेक ले निर्दोष बनावाना साठे सदा प्रयत्न करस. गैरा सालस नंतर मी आपला गरीब लोकस साठे भेटवस्तू देवाले, आणि परमेश्वर ले चळावा-चळावा साठे यरूशलेम शहर मा एयेल होतु. त्याच टाईम ले जव मी हय करी ऱ्हायंतू (चळावा चळाई ऱ्हायंतू) कि तेस्नी मले परमेश्वर ना मंदिर मा देख, जव मी शुद्धीकरण नि रिती ले पुरी करी ऱ्हायंतू. तठे मना संगे नईत कोणती गर्दी होती आणि नईत कोणता दंगा करणार होतात, पण तठे काही आशिया प्रांत ना लोक होतात जेस्नी दंगा कर. आणि तेस्ले उचित होत. कदी मी काही वाईट करेल होतु, त तेस्ले मनावर आरोप लावा साठे आठे तुना समोर ऱ्हावाले पाहिजे होत. नईत ह्या लोक स्वताच सांगो, कि जव मी महासभा ना समोर उभा होतु, त तेस्नी मना मा कोणता अपराध दिखना? फक्त एक आरोप जो त्या मना विरुद्ध लावू सकतस, तो हवू शे जव मनी मंदिर ना आंगण मा जोरमा सांगेल होत, कि आज मना तुना द्वारे न्याय करामा ईऱ्हायना कारण कि मी विश्वास करस कि परमेश्वर त्या लोकस्ले ज्या मरी जायेल शेतस परत जित्ता करीन.” पण फेलिक्स ले ह्या मत ना गोष्टी चांगल्या माहिती होत्यात, तेस्ले हय सांगीसन टाइ दिध, “जव सैनिक दल ना सरदार लुसिया ईन, तव तुमना मुकदमा ना निर्णय देसू.” आणि शताधिपतीले आदन्या दिधी, कि पौल ले सुरक्षा मा ठेवामा येवो, पण तेना मित्रस मधून कोले बी तेनी सेवा करा पासून नका रोकज्यात. काही दिनस नंतर फेलिक्स राज्यपाल आपली यहुदी बायको द्रुसिल्ला ना संगे उना आणि तेनी पौल ले बलाईसन त्या विश्वास ना बारामा जो ख्रिस्त येशु वर शे, तेना पासून आयक. जव तो धार्मिकता, संयम आणि एणारा न्याय नि चर्चा करी ऱ्हायनात, त फेलिक्स नि भयभीत हुईसन उत्तर दिध, “आते त तू जा, जव मना जोळे टाईम राहीन, मी स्वता बलाई लेसू.” फेलिक्स घळी-घळी तेले बलावत होता आणि तेना संगे बोलत होता, कारण कि तो विचार करत होता कि पौल बंदीगृह मधून निघा साठे तेले काही पैसा दिन. पण जव दोन साल बी ती ग्यात, त फेलिक्स ना जागा वर पुर्क्य फेस्त राज्यपाल बनी ग्या, आणि फेलिक्स यहुदी लोकस्ले ले खुश करानी ईच्छा कण पौल ले कैदमाच सोळी ग्या. मंग फेस्त राज्यपाल ना रूप मा यहुदी प्रांत मा उना, तीन दिन नंतर तो कैसरीया शहर मधून यरूशलेम शहर ले ग्या. तव मुख्य यहुदी पुजारीस्नी, आणि यहुदी पुढारी लोकस्नी, तेना समोर पौल वर दोष लाव, आणि तेले विनंती करीसन तेना पासून विरोध मा हय मागणी करी कि कृपा करीसन पौल ले यरूशलेम शहर ले बलाई ले, एनासाठे कि त्या तेले रस्तामाच मारी देवाना घात मा होतात. फेस्त नि उत्तर दिधा, “पौल कैसरीया शहर मा कैद शे, आणि लवकरच मी स्वता तठे जासू.” नंतर सांग, “तुमना मधून ज्या मुख्य माणस शेतस, त्या मना संगे चालज्यात, आणि कदी ह्या माणुस नि काही वाईट काम करेल हुईन, त तेनावर दोष लावज्यात.” फेस्त यरूशलेम शहर मा आठ दाहा दिन ऱ्हायसन कैसरीया शहर ले ग्या, आणि दुसरा दिन न्याय सिंहासन वर बठीसन पौल ले लयानी आदन्या दिधी. जव तो उना, त ज्या यहुदी पुढारी लोक यरूशलेम शहर मधून एयेल होतात, तेस्नी तेना आंगे-पांगे उभा राहीसन तेनावर गंभीर आरोप लावनात, जेस्ना पुरावा त्या नई देवू सकत होतात. पण पौल नि उत्तर दिध, “मनी नईत यहुदी लोकस्ना नियम ना आणि नईत परमेश्वर ना मंदिर ना, आणि नईत सम्राट ना विरुद्ध मा काही अपराध करेल शे.” पण फेस्त नि यहुदी पुढारीस्ले खुश करानी ईच्छा कण तेनी पौल ले विचार, “यरूशलेम शहर मा जायसन तठे मना समोर तुना ह्या आरोपस्ना न्याय करू अशी तुनी ईच्छा शे का?” पौल नि सांग, “मी सम्राट ना न्याय सिंहासन ना समोर उभा शे, बरोबर तठेच जठे एक रोमन रहिवासी ना रूप मा मना न्याय होवाले पाहिजे जस तुले चांगल्या प्रकारे माहित शे, यहुदी लोकस्ना मनी काहीच अपराध नई कर. कदी मी अपराधी शे आणि मृत्युदंड भेटाना योग्य काही काम करेल शे, त मराले तयार शे, पण ज्या गोष्टीस्ना ह्या मनावर आरोप लावतस, कदी तेस्ना मधून कोणती गोष्ट खरी नई ठराव, त कोलेच अधिकार नई शे कि तो मले ह्या यहुदी पुढारीस्ना हात मा सोपो. मनी विनंती शे कि मना न्याय स्वता सम्राट ना द्वारे करामा येवाले पाहिजे.” त फेस्त नि मंत्रीस्नि सभा ना संगे विचार करीसन उत्तर दिध, “तुनी सम्राट ना द्वारे न्याय करानी मांग करेल शे, त तू सम्राट ना समोरच जाशी.” काही दिन बिता नंतर राजा अग्रिपा आणि तेनी धाकली बहिण बर्णीका ह्या दोनी कैसरीया शहर मा ईसन फेस्त ले भेटनात. तेस्ना गैरा दिन तठेच ऱ्हावा नंतर फेस्त नि पौल ना बारामा राजा ले सांग, “एक माणुस शे, जेले फेलिक्स कैदी सोळी जायेल शे. जव मी यरूशलेम शहर मा होतु, त मुख्य यहुदी पुजारी आणि यहुदी लोकस्ना पूर्वजस्नी तेनावर आरोप लाव आणि विनंती करी कि तेले दंड नि आदन्या भेटो. पण मनी तेस्ले उत्तर दिध, कि रोमीस्नी हय प्रथा नई शे, कि कोणी माणुस ले दंड साठे सोपी देवो, जठ लगून आरोपी ले आपला वर आरोप लावणारस्ना समोर उभा ऱ्हायसन आरोप ना उत्तर देवानी संद्धी नई भेटो. एनासाठे जव यहुदी पुढारी लोक मना संगे आठे कैसरीया नगर मा उनात, त मनी काही उशीर नई कर, कि लगेच दुसरा दिन न्याय सिंहासन वर बठीसन, मनी आदन्या दिधी कि पौल ले न्याय सिंहासन समोर लयामा येवो. जव तेनावर आरोप लावणार उभा हुयनात, त तेस्नी असा वाईट गोष्टीस्ना आरोप नई लाव, जस मी विचार करत होतु. तेस्ना फक्त आपला धर्म ना संबंध मा काही गोष्टीस्मा तेना संगे मतभेद होता, आणि येशु नाव ना एक माणुस ना बारामा मा बी जो मरी जायेल शे, पण पौल ना दावा शे, कि तो जित्ता शे. मले माहित नई होत कि ह्या गोष्टीस्नी चौकशी कस करान शे, एनासाठे मनी पौल ले विचार, काय तू यरूशलेम शहर ले जाशी, कि तठे ह्या मुकदमा ना न्याय होवो? पण जव पौल नि विनंती करी, कि मना मुकदमा ना न्याय सम्राट पा होवो, त मनी आदन्या दिधी, कि जठ लगून तेले सम्राट ना जोळे नई धाळू, तेनी राखोई करामा येवो.” तव अग्रिपा नि फेस्त ले सांग, “मले बी त्या माणुस न आयकन शे.” तेनी सांग, “तू कालदिन आयकी लेशी.” आणि दुसरा दिन, जव अग्रिपा आणि बर्णीका मोठी धूम-धाम कण ईसन सैनिक दल ना सरदारस्ले आणि नगर ना पुढारी लोकस्ना संगे दरबार मा पोहोचनात, तव फेस्त नि आदन्या दिधी, कि त्या पौल ले लई येवोत. फेस्त नि सांग, “ओ राजा अग्रिपा, आणि आमना बरोबर आठे उपस्थित सर्वाझन, तुमी ह्या माणुस ले देखा, जेना बारामा सर्वा यहुदी लोकस्नी आणि यरूशलेम शहर मा आणि आठे बी वरळी-वरळीसन मले विनंती करी कि येले जित्त ऱ्हाण उचित नई. पण मले माहिती पळीग्य कि तेनी अस काहीच नई कर कि तेले मारी टाकामा येवो, आणि जव कि तेनी स्वतानी विनंती करेल शे कि मना न्याय सम्राट करो, त मनी तेले रोम शहर मा धाळाना निर्णय करा. पण मले तेना बारामा कोणतीच चांगली गोष्ट नई दिखनी कि मी सम्राट ले लिखू, एनासाठे मी तेले तुमना समोर आणि खास करीसन राजा अग्रिपा तुना समोर लयेल शे, कि चौकशी करीसन मले काही लीखाले भेटो. कारण कि कैदी ले धाळन आणि ज्या आरोप तेनावर लावामा उनात तेस्ले नई सांगण, मले चांगल नई वाटण.” अग्रिपा नि पौल ले सांग, “तुले आपला बारामा मा बोलानी परवानगी शे,” एनावर पौल हात ना इशारा करीसन आपला बचावमा सांगाले लागणा. “ओ राजा अग्रिपा, जीतल्या गोष्टीस्ना यहुदी पुढारी मनावर आरोप लावतस, आज तुना समोर तेस्ना उत्तर देवाले मी स्वता ले धन्य समजस, विशेष करीसन एनासाठे कि यहुदी लोकस्ना सर्वा प्रथा आणि विवाद तुले माहित शे, एनासाठे मी विनंती करस, कि धीर धरीसन मनी आयकीले.” “जस कि मन वागण जव मी पोऱ्याच होतु, आपला लोकस्ना मधमा आणि यरूशलेम शहर मा जसा होतु, हय सगळ यहुदी लोकस्ले माहिती शे. त्या कदी हय साक्ष देवाना देखी ऱ्हायनात, जव मी पोऱ्याच होतु मले वयखतस, कि मी एक परूशी लोकस्ना सारखा ऱ्हायनु, जो कि आमना धर्म ना सर्वास्तून कट्टर पंथ शे. आज मी परमेश्वर ना द्वारे आमना पूर्वजस्ले देयेल आशा (वचन) मुळे आठे आरोपी ना रूप मा उभा शे. तीच प्रतिज्ञा (वचन) ले पुरी होवानी आशा लाईसन, आमना बारा गोत्र आपला पुरा मन कण रात-दिन परमेश्वर नि सेवा करतस एयेल शेतस. ओ राज, ह्याच आशा ना बारामा यहुदी लोक मनावर आरोप लावतस. तव पौल नि गर्दी मधला सर्वा यहुदी लोकस्ले सांग, परमेश्वर मरेल ले परत जित्ता करस, त मंग तुमी लोक विश्वास कराले काब नकारतस कि तेनी येशु ले मरेल मधून परत जित्ता कर?” “मले बी वाटत होत कि नासरेथकर येशु ना नाव ना विरोध मा मले गैर काही कराले पाहिजे. आणि मनी यरूशलेम शहर मा असच कर, आणि मुख्य यहुदी पुजारीस पासून अधिकार लिसन गैरा पवित्र लोकस्ले बंदीगृह मा टाक, आणि जव त्या मारी टाकावत होतात, त मी बी तेस्ना विरोध मा आपली सम्मती देत होतु. आणि प्रत्येक प्रार्थना घर मा मी तेस्ले ताडना देवाळी-देवाळीसन येशु नि निंदा करावत होतु, आठ लगून कि राग मुळे असा येळा हुईग्या कि दुसरा शहरस्मा बी जाईसन तेस्ले त्रास दिनू.” ह्याच धून मा जव मी मुख्य यहुदी पुजारीस्नी परवानगी आणि आदन्या-पत्र लिसन दमिश्क नगर ले जाई ऱ्हायंतू, त ओ राजा, रस्ता वर दुफार ना टाईम ले मी आकाश मधून सूर्य ना तेज तून बी जास्त एक प्रकाश, मना आणि मना संगे चालनारस्ना चारीस कळे चमकत देखनु. आणि जव आमी सर्वा जमीन वर पळी ग्युत, त मनी इब्री भाषा मा, मले सांगतांना हय वाणी आयकनु, शौल, ओ शौल, तू मले काब त्रास देस? तू मले त्रास देवाना प्रयत्न करीसन स्वता ले त्रास दि ऱ्हायना, जसा कि एक बईल आपला मालक ना पुरान्ढा ना विरुद्ध मा लात मारत हो. मनी सांग, प्रभु, तू कोण शे? प्रभु नि सांग, मी येशु शे, जेले तू त्रास देस. पण तू उठ, आपला पायस्वर उभा ऱ्हाय, कारण कि मनी तुले एनासाठे दर्शन दियेल शे कि तुले त्या गोष्टीस्ना बी सेवक आणि साक्ष ठरावु, जी तुनी देखेल शे, आणि तेस्ना बी जेस्ना साठे मी तुले दर्शन देसू. आणि मी तुले तुना लोकस पासून आणि बिगर यहुदी लोकस पासून वाचाळत ऱ्हासु, जेस्ना जोळे मी तुले आते धाळस. कि तू तेस्ना डोया उघाळो, एनासाठे कि त्या अंधार मधून उजाया कळे, आणि सैतान ना अधिकार मधून परमेश्वर कळे फिरोत, तव परमेश्वर तेस्ना पापस्ले माफ करीन, आणि त्या लोकस्ना संगे वतन भेटो ज्या पवित्र हुयेल शेतस कारण कि त्या मनावर विश्वास करतस. एनासाठे, ओ राजा अग्रिपा, मी ह्या स्वर्गीय दर्शन ना पालन करनू. पण पहिले दमिश्क नगर ना, नंतर यरूशलेम शहर ना राहानारस्ले, आणि नंतर पुरा यहूदीया प्रांत मा आणि बिगर यहुदीस्ले मनी प्रचार कर, कि आपला पापस पासून मन फिरावा आणि परमेश्वर कळे फिरीसन आपला कार्य ले सिद्ध करा. ह्या गोष्टीस मुळे यहुदी मले परमेश्वर ना मंदिर मा धरीसन मारी टाकाना प्रयत्न करत होतात. पण परमेश्वर नि मदत कण मी आज लगून जित्ता शे आणि लहान-मोठा सर्वास समोर साक्ष देस, आणि मी त्या गोष्टीस्ले सोळीसन काहीच नई सांगत, ज्या भविष्यवक्तास्नी आणि मोशे नि बी सांग कि होणार शेतस. कि ख्रिस्त ले दुख भोगण पळीन, आणि तोच सर्वास्तून पहिले मोत मधून जित्ता हुईसन, आमना लोकस्मा आणि बिगर यहुदीस्मा हय घोषणा करीन कि त्या चावू सकतस, ज्या कि प्रकाश ना सारखा शेतस. जव पौल आपला बचावमा ह्या प्रकारे सांगी ऱ्हायंता, त फेस्त नि जोरमा सांग, “ओ पौल, तू एळा शे. जास्त बुद्धी नि तुले एळा करी दियेल शे.” पण पौल नि सांग, “ओ महाराज फेस्त, मी एळा नई शे, पण खरज (सत्य) आणि बुद्धी ना गोष्टी सांगी ऱ्हायनु. ह्या गोष्टी राजा ले बी माहिती शे, जेना समोर मी बिगर भ्यावाना बोली ऱ्हायनु, आणि मले विश्वास शे, कि ह्या गोष्टीस मधून कोणतीच तेना पासून दपेल नई, कारण कि ती घटना त गुप्त मा नई हुईनी. ओ राजा अग्रिपा, काय तू भविष्यवक्तास्वर विश्वास ठेवस? हा, मले माहिती शे, कि तू विश्वास करस.” एनावर अग्रिपा नि पौल ले सांग, “काय तू थोळसच समजाळीसन मले ख्रिस्ती बनावाले देखस?” पौल नि सांग, “परमेश्वर ले मनी हय प्रार्थना शे कि काय थोळासा मा, आणि काय जास्त मा, फक्त तूच नई, पण जीतला लोक मन आयकी ऱ्हायनात, मना या साखयबंद ले सोळीसन त्या बी मनासारखा हुई जावोत.” तव राजा, राज्यपाल आणि बर्णीका आणि तेस्ना संगे बठणार उठी उभा ऱ्हायनात आणि चालना ग्यात. जव त्या बाहेर जाई ऱ्हायतात, त्या एक दुसराले सांगाले लागनात, “ह्या माणुस नि मृत्युदंड व बंदीगृह मा टाकना योग्य कोणताच अपराध नई करेल शे.” अग्रिपा नि फेस्त ले सांग, “कदी हवू माणुस नि हय विनंती नई करी होती कि सम्राट तेना न्याय करो, त सुटी सकत होता.” जव फेस्त राज्यपाल ना द्वारे हय निश्चित हुईग्य कि आमी जहाज ना द्वारे इटली प्रांत (मा रोम शहर ले) जावूत, त तेस्नी पौल आणि काही अन्य बंदिस्ले बी सम्राट अगस्तस ना सैनिक दल ना सुभेदार जेना नाव युल्य होत तेना हात मा सोपी दिध. आणि अद्रमुत्तिय शहर ना एक जहाज जो आशिया प्रांत ना तठ ना जागा वर जावावर होता, आणि चळीसन आमी समुद्रीमार्ग कण प्रवास चालू कर, आणि अरिस्तार्ख नाव ना एक झन बी आमना संगे होता, जो मासेदोनिया प्रांत ना थेस्सलनीका शहर ना राहणार होता. दुसरा दिन आमी सिदोन शहर ले पोहोचीग्युत आणि युल्य नि पौल वर कृपा करीसन तेना मित्रस कळे जावू दिधा कि तेस्ना पासून गरज ना वस्तूस्ले लई येवो. तठून आमनी परत प्रवास चालू करा, हवा विरुद्ध होवाना मुळे आमी कुप्र बेट ना आळ कळून ग्युत, आणि किलकिया प्रांत आणि पंफुलिया प्रांत ना तठ ना जोळे ना समुद्री मधून निघीसन मुर्या शहर, जो लुक्या प्रांत मा शे पोहोचनुत. तठे सुभेदार ले आलेक्सांद्री शहर ना जहाज इटली प्रांत ले जातांना भेटणा, आणि तेनी आमले त्या जहाज वर चळाई टाक. जव आमी गैरा दिनस लगून धीरे-धीरे प्रवास करत मुसकील कण कनिदा नगर ना समोर पोहोचनुत, त एनासाठे कि हवा आमले पुळे जावू नई देत होती, आमी सल्मोन शहर ना समोरून हुईसन क्रेत बेट ना आळ मा चालना ग्युत. आणि तेना तठ-तठ वर जेमतेम करीसन शुभलंगरबारी नाव नि एक जागा वर पोहोचनुत, जठून लसया नगर जोळेच होता. जव गैरा दिन बीती ग्यात, आणि जल प्रवास मा बी धोका एनासाठे होत होता कि उपासना दिन आते बीती जायेल होतात. आणि पौल नि त्या सर्वास्ले हय सांगीसन चेतावणी दिधी, “ओ भावूसहोण, मले अस वाटस कि ह्या समुद्र प्रवास मा विपत्ती आणि धोका, नईत फक्त जहाज मधला माल ले आणि जहाज ले शे पण आमना जीव ना बी शे.” पण सुभेदार नि जहाज ना कप्तान आणि मालक ना गोष्टीस्वर पौल ना गोष्टीस्तून जास्त विश्वास कर. शुभलंगरबारी नाव ना एक बंदर हिवाया मा मुक्काम कराले चांगला नई होता, एनासाठे गैरास्ना विचार हुईना कि तठून पुळे चालना जावूत कदी कोणत्या प्रकारे होवू सकस फेनिके बंदर मा पोहोचीसन हिवाया काळूत. हवू त क्रेत बेट ना तठ ना एक बंदर शे, जेना दरवाजा दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम दिशा कळे उघळस. जव दक्षिण कळून हालकी-हालकी हवा येवाले लागणी, त तेस्नी विचार कर कि त्या तेस्नी योजना प्रमाणे फेनिके बंदर मा पोहोची जासुत, एनासाठे नांगर उचलनात आणि क्रेत बेट ना तठ-तठ कण, समुद्र तठ ना कळे चालू लागनात. पण थोळाच टाईम मा जमीन कळून एक मोठी आंधी उणी, जी उत्तर-पश्चिम म्हणावत होती. जव आंधी जहाज वर लागणी, तव आमी जहाज ले हवा ना ताण मा सोळी दिध, आणि ह्याच प्रमाणे वाहत चालना ग्युत. तव कौदा नाव ना बेट नि आळ मा वाहत-वाहत आमी जेमतेम करीसन जीवनरक्षक नाव ले काबू मा करी सकनुत. मंग जहाज ना कर्मी दल नि जीवनरक्षक नाव ले उचलीसन तेले सुधार आणि जहाज ले खाले तून वरे लोंग आवत्यास्कन वातळ बांधी दिध, आणि सूर्ती नि उथळ ना रेत वर फशी जावानी भीती कण तेस्नी शीड ले थोळासा खाले उतारीसन जहाज ले हवा ना ताण कण धीरे-धीरे जावा साठे दिध. आणि जव आमी आंधी कण गैरा हिचकोया आमी धक्का खाय ऱ्हायनूत, त दुसरा दिन त्या जहाज ना माल फेकाले लागनात, आणि तिसरा दिन तेस्नी आपलाच हात कण जहाज ना सामान बी फेकी दिनात. आणि जव गैरा दिनस लगून नईत सूर्य व नईत तारा दिखनात, आणि मोठी आंधी चालीऱ्हायंती, त धीरे-धीरे आमनी वाचाणी पुरी आशा समाप्त हुईगी. जव त्या गैरा दिन लगून भुक्या ऱ्हाय लीनात, त पौल नि तेस्ना मधमा उभा ऱ्हायसन सांग, ओ भावूसहोण, तुमी मनी गोष्ट ले मानीसन क्रेत बेट तून पुळे येवालेच नको पाहिजे होत, त नईत हय विपत्ती येती आणि नईत हवू नुकसान होता. पण आते मी समजाळस कि हिम्मत ठेवा, कारण कि तुमना मधून कोणाच जीव ना नुकसान नई होवाव, पण फक्त जहाज नी. कारण कि परमेश्वर जेना मी सेवक शे, आणि जेनी सेवा करस, तेना एक परमेश्वर ना दूत नि काल रात ले मना जोळे ईसन सांग, “ओ पौल, भ्यावू नको, तुले सम्राट पुळे उभ ऱ्हाण अवश्य शे, आणि अवश्य शे कि परमेश्वर सर्वास्ले ज्या तुना संगे प्रवास करी ऱ्हायनात जित्ता ठेवीन. एनासाठे, ओ भावूसहोण, हिम्मत ठेवा, कारण कि मी परमेश्वर वर विश्वास करस, कि जस मले सांगामा एयेल शे, तसच हुईन. पण आमले कोणता तरी बेट वर जाईसन थांबन पळीन.” जव चौदावी रात हुईनी, आणि आमी अंद्रिया समुद्र मा भटकी ऱ्हायंतुत, त आधी रात ना आंगे-पांगे जहाज ना कर्मी दल नि अंदाज कण समज कि आमी कोणता तरी देश ना जोळे पोहोची ऱ्हायनूत. तेस्नी पाणी नि खोलाई माफी आणि ती सदोतीस मीटर खोल भरणी आणि थोडा पुळे चालीसन परत पाणी नि खोलाई माफी त सत्तावीस मीटर खोल भरणी. तव दघळ वाली जागास्वर पळा नि भीती मुळे तेस्नी जहाज ना मांगे चार नांगर टाकात, आणि उजाया होवानी प्रार्थना करत ऱ्हायनात. पण जव जहाज ना कर्मी दल जहाज वरून पयाना देखत होतात, आणि तेस्नी जहाज ना समोरून नांगर टाकना बहाणा कण जीवनरक्षक होड्या ले समुद्र मा उतारी टाक, त पौल नि सुभेदार आणि सैनिकस्ले सांग, “कदी ह्या लोक जहाज वर नई ऱ्हावावत, त तुमी बी नई वाचू सकावत.” तव सैनिकस्नी आवत्यास्ले कापीसन जीवनरक्षक होड्या ले पाळी टाक. जव उजाया होवावर होता, त पौल नि हय सांगीसन, सर्वास्ले जेवण करासाठे उत्साहित कर, “आज चौदा दिन हुई ग्यात कि तुमी चिंता करत-करत भुक्या ऱ्हायनात, आणि काहीच नई खाद. एनासाठे तुमले समजाळस कि काही खाई ल्या, जेना कण कि तुमी वाचोत, कारण कि तुमना मधून कोणाच डोका ना एक बाल बी नई पळाव.” आणि हय सांगीसन तेनी भाकर लिसन सर्वास समोर परमेश्वर ना धन्यवाद करा आणि मोळीसन खावाले लागणा. एना कण सर्वास्ले प्रोत्साहन भेटणा आणि त्या बी जेवण कराले लागनात. आमी सर्वा मियसन जहाज वर दोन शे शहात्तर झन होतुत. जव त्या जेवण करीसन तृप्त हुई ग्यात, त गहू ले समुद्र मा फेकीसन जहाज ले हलका कराले लागनात. जव दिन निघणा, त तेस्नी त्या देश ले नई वयख, पण एक भूभाग ले देख जेना चौकोण किनारा होता, आणि विचार कर कि कदी होवू सकस त एनाच वर जहाज ले टेकुत. तव तेस्नी नांगर ले सोळीसन समुद्र मा सोळी दिध आणि त्याच टाईम ले पाल ना दोऱ्यास्ले ढिल्ला करी दिनात, आणि हवा ना समोर पुळला फट चळाईसन किनारा कळे चालनात. पण दोन समुद्र नि संगम नि रेत नि जागा वर तेस्नी जहाज ले टेक, आणि तेना पुळला भाग त सरळ हुईग्या, आणि फाकू नई सकनी, पण जहाज ना मांगना भाग लाठास्ना तळाखा मुळे मुळाले लागणा. तव सैनिकस्ना हवू विचार हुईना कि कैदिस्ले मारी टाकुत, अस नई हुई जावो कि तेस्ना मधून कोणी झेपिसन निघी पयो. पण सुभेदार नि पौल ले वाचाळानी ईच्छा कण तेस्ले असा करा पासून रोक, आणि हय सांग, कि ज्या झेपी सकतस त्या पहिले कुदिसन किनारा वर निघी जावोत. आणि बाकी लोक फळ्यास्वर, आणि कोणी जहाज ना दुसरा वस्तूस्ना सहारा कण निघी जावोत, ह्याच प्रमाणे सर्वा लोक जमीन वर सुखरूप पोचनात. जव आमी सर्वा सुरक्षित रूप मा किनारा वर पोहोचीग्युत, तव आमले माहिती पळण कि ह्या बेट ना नाव माल्टा शे. आणि तठला रहिवासीस्नी आमना वर गैरी दया करी, पावूस आणि थंडी मुळे तेस्नी विस्तो पेटाळीसन आमना स्वागत करणात. जव पौल नि लाकडस्ना गोया एकत्र करीसन विस्तो वर ठेवा, त उष्णता कण एक साप निघाना आणि तेना हात ले गुंडाई ग्या. जव त्या रहिवासीस्नी सापले तेना हात ले गुंडायेल देखनात, त एक दुसराले सांगाले लागनात, “निश्चय हवू माणुस खुनी शे, कि जरी तो समुद्र पासून वाची ग्या, तरी बी आमनी देवी ना न्याय नि तेले जित्ता नई राहू दिध.” तव तेनी सापले विस्तोमा झटकी टाक, आणि तेले कोणताच नुकसान नई हुयना. त्या लोक वाट देखत होतात कि तो सुजी जाईन, पण जव त्या गैरा टाईम लगून देखत ऱ्हायनात आणि देख कि तेले काही बी नई हुईन, त आखो दुसराच विचार करीसन सांग, “हवू त कोणी देवता शे.” त्या जागा ना आंगे-पांगे बेट ना अधिकारी नि जमीन होती जेन नाव पुब्ल्य होत, तेनी आमले आपला घर लीजाईसन तीन दिन लगून मित्रभाव कण पाहुणचार कर. पुब्ल्य ना बाप कळक ताप कण आणि पोट खराब मुळे आजारी पळेल होता, त पौल नि तेनी खोली मा जाईसन प्रार्थना करी, आणि तेनावर हात ठियसन तेले बर कर. जव अस हुयन, त त्या बेट ना बाकी आजारी लोक बी पौल जोळे उनात, आणि बरा करामा उनात. तेस्नी आमना गैरा आदर करा, आणि तीन महिना नंतर जव आमी जावा साठे तयार होतुत, त जे काही आमना साठे गरज नि सर्वी वस्तू होती, जहाज वर ठिय दिध. तीन महिना नंतर आमी आलेक्सांद्र शहर ले जानारा जहाज वर प्रवास चालू करनुत, हवू जहाज थंडी मुळे ह्या बेट वर थांबेल होता, ह्या जहाज ना पुळला भाग वर जुळवा देवतास्ना एक चिन्ह होत. नंतर सुराकूस शहर मा नांगर टाकीसन आमी तीन दिन लगून थांबी ऱ्हायनूत. तठून पुळे चालीसन आमी रेगियोन नगर ले पोहोचनुत, आणि एक दिन नंतर दक्षिण वारा चालू हुईना, तव दुसरा दिन आमी पुत्युलास शहर मा उनुत. तठे आमले काही विश्वासी भेटनात, आणि तेस्ना सांगा मुळे आमी तठे सात दिन लगून ऱ्हायनूत, तेना नंतर आमी समुद्रीमार्ग कण रोम शहर कळे चाली पळनूत. रोम मधून काही विश्वासीस्नी आयक कि आमी तठे ईऱ्हायनूत आणि त्या आमले भेटाले आणि आमले रोम मा लीजावा साठे अप्पिया नगर ना बजार आणि तीन धर्मशाळा लगून उनात, जेस्ले देखीसन पौल नि परमेश्वर ना धन्यवाद कर, आणि गैरा उत्साहित हुईना. जव आमी रोम शहर मा पोहोचनुत, त पौल ले एक सैनिक ना संगे जो तेनी राखोई करत होता, एखटा राहाणी आदन्या देवामा उणी. तीन दिनस नंतर तेनी यहुदी ना पुढारी लोकस्ले बलाव, आणि जव त्या एकत्र हुयनात त तेस्ले सांग, “ओ भावूसहोण, मी आपला लोकस्ना आणि पूर्वजस्नी प्रथास्ना विरुद्ध मा काहीच नई करेल शे, तरी बी कैदी बनाईसन यरूशलेम शहर मधून रोम सरकार ना हात मा सोपामा एयेल शे. तेस्नी मनी चौकशी करीसन सोळी देवान देख, कारण कि मना मा मृत्यु-दंड ना योग्य कोणताच दोष नई होता. पण जव यहुदी पुढारी तेना विरोध मा बोलाले लागनात, त मले सम्राट ना समोर आठे रोम मा मना न्याय होवो अशी विनंती कारणी पळणी, हय नई कि मले आपला लोकस्वर कोणता दोष लावण होत. एनासाठे मनी तुमले बलायेल शे, कि तुमले भेटू आणि गोष्टी करू, कारण कि इस्त्राएल देश नि आशा ना साठे ज्या कि ख्रिस्ती शेतस मी ह्या साकयस कण बांधायेल शे.” तेस्नी सांग, “नईत आमले तुना विषय मा यहूदीया प्रांत पासून पत्र भेटणा, आणि नईत विश्वासीस मधून कोणी ईसन तुना बारामा काही सांग, आणि नईत कोणी वाईट गोष्ट सांगी. पण तुना विचार काय शे? तेच आमी तुना पासून आयकान देखी ऱ्हायनूत, कारण कि आमले माहिती शे, कि प्रत्येक जागा वर ह्या मत (पंथ) ना विरोध लोक गोष्टी करतस.” तव तेना साठे एक दिन निश्चित करीसन त्या मोठी संख्या मा तेना राहाणा जागा वर उनात तेनी परमेश्वर ना राज्य ना बारामा साक्ष दिसन तेस्ले समजाळ आणि सकाय पासून संज्याकाय लोंग मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्नी पुस्तक मधून येशु ना संबंध मा तेस्ले समजाळाना प्रयत्न करत ऱ्हायना. तव काही लोकस्नी जे पौल ना संगे होतात त्या गोष्टीस कण सहमत हुईनात, आणि काहीस्नी विश्वास नई कर. जव त्या एक दुसरा कण सहमत नई हुईनात, त पौल ना ह्या एक गोष्ट ले सांगा मुळे चालना ग्यात. “पवित्र आत्मा नि यशया भविष्यवक्ता ना द्वारे पूर्वजस्ले चांगलच सांग. एनासाठे तुमी समझील्या, कि परमेश्वर ना ह्या तारण नि गोष्ट बिगर यहुदी लोकस जोळे धाळामा एयेल शे, आणि त्या स्वीकार कतीन.” आणि जव तेनी सांगी, त यहुदी लोक आपस मा गैरा विवाद करत तठून चालना ग्यात. मी पौल, येशु ख्रिस्त ना दास शे, आणि परमेश्वर ना कळून प्रेषित होवा साठे बलावामा एयेल शे आणि तेनी सुवार्ता ना प्रचार करासाठे निवाळा मा एयेल शे. परमेश्वर नि ह्या सुवार्ता नि प्रतिज्ञा गैरा पहिलेच आपला भविष्यवक्तास्ना व्दारे परमेश्वर ना पुस्तक मा करेल होती. हय सुवार्ता तेना पोऱ्या, आमना प्रभु येशु ख्रिस्त ना विषय मा शे. तो दाविद ना वंश मा माणुस बनीसन जल्म ले उना आणि पवित्र आत्मा ना भाव कण मरेल मधून परत जित्ता होवा मुळे सामर्थ्य कण परमेश्वर ना पोऱ्या येशु ख्रिस्त ठरेल शे. येशु ख्रिस्त ना द्वारे परमेश्वर नि मले ख्रिस्त ना प्रेषित ना पद आणि अधिकार दिधा कारण कि तेना नाव ना साठे सर्वा जातीस्ना लोक तेनावर विश्वास करोत आणि तेले स्वीकार करोत. जेस्ना मा तुमी बी ज्या रोम शहर मा राहातस मिई जावा आणि येशु ख्रिस्त ना होवा साठे बलावामा एयेल शेतस. मी तुमी सर्वा लोकस्ले ज्या रोम शहर मा परमेश्वर ना प्रिय शेतस आणि तेना पवित्र लोक होवा साठे बलावामा एयेल शेतस, हय पत्र लिखस. आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो. पहिले मी तुमी सर्वास साठे येशु ख्रिस्त ना व्दारे आपला परमेश्वर ना धन्यवाद करस, कारण कि येशु ख्रिस्त वर तुमना विश्वास नि चर्चा प्रत्येक जागा वर लोकस्ना मधमा हुई ऱ्हायनात. परमेश्वर जेनी सेवा मी आपला पुरा हृदय कण तेना पोऱ्या नि सुवार्ता ना विषय मा करस, तोच मना साक्ष शे कि मी तुमले आपली प्रार्थना मा कायम आठवण करत ऱ्हास. आणि कायम आपली प्रार्थनास्मा विनंती करत ऱ्हास कि परमेश्वर नि ईच्छा कण कोणत्यान-कोणत्या प्रकारे कण मले आखरी वर तुमी लोकस जोळे एवानी संधी भेटो. कारण कि मी तुमले भेटानी लालसा करस एनासाठे कि मी तुमले कोणती तरी आत्मिक कृपादान देवू जेना कण तुमी विश्वास मा पक्का हुई जावोत. मन सांगान अर्थ हय शे कि जव मी तुमना मधमा ऱ्हासु, त आमी तेनावर विश्वास ना द्वारे जो मना मा आणि तुमना मा शे, एक दुसरा कण प्रोत्साहन भेटो. ओ मना विश्वासी भावूसहोण, मले तुमले सांगानी ईच्छा शे कि मनी घडीघडी तुमना जोळे येवानी योजना करी, एनासाठे कि मी तठला लोकस्ले ख्रिस्त ना मांगे चालणारा बनाई सकू जस मनी सर्वा जातीस्ना लोकस्मा करेल शे. पण आते लगून रोका मा उनू. एना कण काही फरक नई पडत कि लोक सभ्य आणि शिक्षित शे, व जर त्या असभ्य आणि अशिक्षित शे. मी सर्वास्ले सुवार्ता आयकाळाना साठे कर्जदार शे. म्हणून मी तुमले बी ज्या रोम शहर मा राहातस, सुवार्ता आयकाळाले पुरा तयार शे. कारण कि मले सुवार्ता आयकाळाना साठे स्वता वर गर्व शे, कारण कि ती प्रत्येक विश्वास करणार ना तारण साठे पहिले त यहुदीस साठे मंग बिगर यहुदीस साठे परमेश्वर नि सामर्थ्य शे. कारण कि सुवार्ता हय प्रगट करस कि परमेश्वर कोणता प्रकारे लोकस्ले धर्मी ठरावस, हय सुरुवात पासून त आखरी लगून विश्वास ना द्वारे होस. जस शास्त्र मा लिखेल शे, “विश्वास कण धर्मी झन जित्ता राहीन.” परमेश्वर ना राग त सर्वा अभक्ति आणि अधर्म ना काम करणारा लोकस्वर स्वर्ग मधून प्रगट होस, जो अधर्म ना कामस्ले कराना द्वारे परमेश्वर ना सत्य ले लोकस्वर प्रगट होवा पासून रोकतस. कारण कि सगळी मानव जाती ना साठे स्पष्ट शे कि परमेश्वर कसा शे, कारण कि परमेश्वर नि स्वता तेस्ले स्पष्ट रूप कण प्रगट करेल शे. जव पासून परमेश्वर नि जग नि उत्पती करेल शे तव पासून तेना बिगर देखेल गुण, म्हणजे तेना कायम ना सामर्थ्य आणि स्वभाव ले तेना कार्यस्मा देखामा येस, एनासाठे तेस्ना बचावमा कोणताच बाहान नई शे कि त्या परमेश्वर ले नई ओयखतस. त्या परमेश्वर ले वयखतस, तरी बी त्या तेना आदर नई करतस जेना योग्य तो शे आणि नईत तेना धन्यवाद करतस. पण तेस्ना विचार पुरा निरर्थक हुई जायेल शेतस आणि तेस्ना निर्बुद्धी मन अंधार कण भरी जायेल शे. त्या सांगतस कि त्या बुद्धीमान शेतस पण त्या मूर्ख शेतस. अविनाशी परमेश्वर नि महिमा कराना एवजी त्या नाशवंत माणुसस्ना, आणि पक्षीस्ना, आणि सरपटणार जंतुस्नि मूर्तीस्ना गौरव करतस. एनासाठे परमेश्वर नि तेस्ले तेस्ना मन नि वाईट ईच्छा नुसार अशुद्धता साठे सोळी टाक कि त्या आपस मा वाईट कामस्मा आपला शरीर ना अपवित्र करोत. तेस्नी परमेश्वर नि सत्यता वर विश्वास नई ठेव पण जे खोट शे तेनावर विश्वास ठेव, आणि सृष्टी नि उपासना करी, नई कि त्या निर्माणकर्ता नि जो कायम धन्य शे. आमेन. तेस्न अस करा मुळे, परमेश्वर नि तेस्ले वाईट वासनास्ना वश मा सोळी दिधा. आठ लगून कि बायास्नी माणसस संगे नई करता बायास संगे शारीरिक संबंध ठेवू लागनात. त्याच प्रकारे तेस्ना माणसस्नी बी बायस्ना संगे स्वभाविक संबंध ठेवाना सोळीसन माणसस्ना संगे आपस मा कामातुर हुईसन बयाले लागनात. माणुस-माणुस ना संगेच कुकर्म करू लागनात आणि ह्या प्रकारे त्या आपला वाईट वागणूक ना योग्य दंड स्वतास्ले भेटस. जव तेस्नी परमेश्वर ना खरा ज्ञान ले प्राप्त कराले योग्य नई समजत त परमेश्वर नि बी तेस्ले ते सगळ करासाठे, जे अयोग्य होत, तेस्ना वायबार मन ना वश मा सोळी दिध. एनासाठे त्या सर्वा प्रकार ना अधर्म, दृष्टता, लोभ, मत्सर आणि द्वेष कण भरीग्यात, हत्या, झगळा, कपट, ईर्ष्या कण भरपूर हुई ग्यात, चुगली खोर. निंदा करणारा, परमेश्वर ना संगे घृणा करणारा, हिंसक, गर्विष्ठ, बळाईखी मारणारा, वाईट-वाईट गोष्टीस्ले बनावणारा. निर्बुद्ध, विश्वासघाती, दयाहीन आणि निर्दय हुई जायेल शेतस. तेस्ले त परमेश्वर नि विधी माहिती शे कि असा काम करणारा मृत्यु ना दंड ना योग्य शेतस, तरी बी नईत फक्त स्वताच असा काम करतस पण करणारस कण खुश बी होतस. एनासाठे, ओ दोष लावणार, तू कोणी का नई राहो, तू निरुत्तर शे. कारण कि ज्या गोष्ट मा तू दुसरास्वर दोष लावस त्याच गोष्ट मा स्वता ले बी दोषी ठरावस, एनासाठे कि तू जो दोष लावस स्वताच ते काम करस. आमले माहित शे कि परमेश्वर न्याय करणारा शे आणि असा काम करणारस्ले तो दंड दिन. पण, तू जो असा काम करणारस्वर दोष लावस आणि स्वता त्याच काम करस, काय हय समजस कि तू परमेश्वर ना दंड पासून वाची जाशी? काय तू परमेश्वर नि कृपा, आणि सहनशीलता, आणि धिरजरूपी धन ले तुच्छ समजस? काय हय नई समजस कि परमेश्वर नि कृपा तुले मन फिरावाले शिकाळस? पण एनासाठे कि तू कठोर शे आणि मन फिरावाले नकार करस, तू तेना राग ना दिन साठे, जेनामा परमेश्वर ना खरा न्याय हुईन, आपला साठे राग कमाई ऱ्हायना शे. कारण कि परमेश्वर प्रत्येक माणुस्ले तेस्ना कामस्ना प्रमाणे ज्या तेनी करेल शे फय दिन. ज्या लोक चांगला काम करत गौरव, आदर आणि अमरत्व ना शोध मा शे, परमेश्वर तेस्ले कायम ना जीवन दिन. पण ज्या तठ पाळणारा शेतस आणि सत्य ले नई मानीसन अधर्म वर चालतस, असास्वर परमेश्वर आपला राग आणि कोप ले ओतीन. क्लेश आणि संकट प्रत्येक माणसस्ना जीव वर ज्या वाईट करतस ईन, पहिले यहुदीस्वर मंग बिगर यहुदीस्वर. पण परमेश्वर प्रत्येक ले ज्या चांगल करतस गौरव, आदर आणि शांती दिन. पहिले यहुदीस्ले मंग बिगर यहुदीस्ले. कारण कि परमेश्वर प्रत्येक झनस्ना न्याय बिगर पक्षपात ना करीन. ज्या मोशे ना नियम ना आधीन नई होतात, कदी त्या नियमले बिगर वयखाना पाप करेल शेतस, त त्या नियमले बिगर वयखाना नाश बी होतीन. पण जेस्ले नियम माहिती हुईसन पाप करेल शेतस, तेस्ना न्याय बी नियम प्रमाणेच हुईन. कारण कि मोशे ना नियम ना गोष्टीस्ले आयकनारा परमेश्वर नि नजर मा धर्मी नई शेतस, पण मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन करणारस्ले धर्मी ठरावामा ईन. बिगर यहुदीस जोळे मोशे ना नियम नई शेतस, पण जव कदी त्या स्वभाविक्ता कणच नियम ना गोष्टीस्ना प्रमाणे जीवन जगतस, त नियम तेस्ना जोळे नई राहातांना बी त्या स्वतास्ना साठे स्वताच नियम शेतस. तेस्नी वागणूक वरून हय प्रगट होस कि मोशे ना नियम तेस्ना हृदयस्वर लिखेल शे. तेस्ना विवेक बी हईच साक्ष देस कि हय सत्य शे, जव कि तेस्ना विचार तेस्ले कदी दोषी, त कदी निर्दोष ठरावतस. हय सगळ त्या दिन प्रगट करामा ईन, जव परमेश्वर, मनी सुवार्ता प्रमाणे, येशु ख्रिस्त ना द्वारे माणसस्ना गुप्त विचारस्ना न्याय करीन. पण तू, जो यहुदी म्हणावस, आणि मोशे ना नियम वर विश्वास ठेवस, आणि गर्व करस कि तू परमेश्वर ना निवाळेल लोकस मधला शे. तुले जेले तेनी ईच्छा माहिती शे आणि माहिती शे कि काय करान चांगल शे. कारण कि तुले एस्ना बारामा मोशे ना नियम मधून सिखाळामा एयेल शे. आणि स्वता ले अंधास्ना पुढारी आणि अंधकार मा पळेलस्ना उजाया समजस. निर्बुद्धीस्ले शिकाळनारा, आणि पोरस्ना उपदेशक समजस, आणि तुले खात्री शे कि ज्ञान, आणि सत्य ना नमुना जो मोशे ना नियम ना प्रमाणे शे, तुले भेटेल शे. म्हणून तू जो दुसरास्ले शिकाळस, स्वताःले काब नई शिकाळत? तू प्रचार करस “चोरी नका करज्यात.” आणि स्वताच चोरी करस. तू जे सांगस, “व्यभिचार नका करज्यात,” काय स्वताच व्यभिचार करस? तू जो मूर्तीस्नी घृणा करस, काय स्वताच मंदिरस्ले लूटस? तू जो गर्व करस कि परमेश्वर ना नियम तुना पा शे, त मंग मोशे ना नियम ना गोष्टी ना पालन नई करीसन काय तू परमेश्वर ना अनादर नई करत? जस कि शास्त्र मा लिखेल शे, “तुमी यहुदीस मुळे, बिगर यहुदीस्मा परमेश्वर ना नाव नि निंदा करामा एस.” कदी तू मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन करशी, त तुना सुंता नि दशा कण तुले फायदा शे, पण कदी तू मोशे ना नियम ना गोष्टीस्ना उल्लंघन करस, त तुना सुंता बिगर सुंता नि दशा ठरणा. कदी कोणी बिगर यहुदी, जेना सुंता नई हुयेल राहो, जर तो मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन करस, त परमेश्वर असा माणुस ले त्याच माणुस ना रूप मा देखस जेना सुंता हुयेल शे. त तो व्यक्ती जो शारीरिक दशा कण बिगर सुंता ना शे पण मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन करस, तुनावर जो यहुदी शे दोष लाईन. कारण कि तुले मोशे ना लिखेल नियम भेटणा आणि तुना सुंता बी हुईना तरी बी तू मोशे ना नियम ना उल्लंघन करस. खरा यहुदी तो नई, जेना फक्त बाहेर ना स्वरूप यहुदीस सारखा शे आणि नईत खरा सुंता तो शे, जो बाहेर ना रूप कण फक्त शरीर माच करामा एयेल शे. पण खरा यहुदी तो शे, जो आपला मन मा यहुदी शे व खरा सुंता तो शे, जो पवित्र आत्मा ना द्वारे हृदय ना करामा एस, नई कि तो, जो फक्त नियम ना प्रमाणे करामा एस. ह्या प्रकार ना माणुस नि स्तुती माणसस्ना द्वारे नई, पण परमेश्वर ना द्वारे करामा एस. जर कदी परमेश्वर यहुदीस्ले सुंता नि दशा मा स्वीकार नई करत त मंग यहुदी होवा मुळे काय बडाई व सुंता कण काय फायदा? हा एना फायदा शे, सर्वास्तून खास हय कि परमेश्वर ना वचन तेस्ले सोपामा उनात. जरी तेस्ना मधून काही विश्वासघाती निघनात बी त काय हुईन? काय तेस्ले विश्वासघाती होवा मुळे परमेश्वर नि विश्वास योग्यता समाप्त हुई जाईन? कदीच नई. परमेश्वर खरा आणि प्रत्येक माणुस खोटा ठरो, जस कि शास्त्र मा लिखेल शे, “जेना कण तू आपली गोष्टीस्मा धर्मी ठरो आणि न्याय कराना टाईम ले तू विजय होवो.” एनासाठे कदी आमना अधर्म ना काम परमेश्वर नि धार्मिकता ले दाखाळतस, त आमी काय सांगुत? काय परमेश्वर न रागे भरण आणि आमले दंड देन चूकीन शे? (मी असा माणुस ना दृष्टीकोन कण सांगी ऱ्हायनु.) कदीच नई. कदी परमेश्वर आमी यहुदीस्ना न्यायच धर्म कण नई कराव त तो जग ना लोकस्ना न्याय कसा करीन? कदी कोणी सांगो कि, “मनी खोटी गोष्ट मुळे परमेश्वर नि सत्यता प्रगट हुयेल शे आणि तेना कण परमेश्वर ले जास्त गौरव भेटेल शे, त परमेश्वर कसा मले पापी ठराईसन दंड देवू सकस?” जर अशी गोष्ट शे, त मंग आमले वाईट करू द्या, एनासाठे कि चांगल हुई सको, काही लोकस्नी मनी निंदा करतांना मनावर दोष लावा कि मी असाच शिकाळस, ज्या मना बारामा असा सांगतस न्याय प्रमाणे तेस्ले दंडीत घोषित करन बरोबर शे. त, काय आमी यहुदी दुसरास्नी तुलना मा जास्त चांगली स्थिती मा शेतस? कदीच नई, कारण कि आमी हवू आरोप लाई दियेल शेतस कि सर्वा, भले त्या यहुदी राहोत कि बिगर यहुदी, पाप ना आधीन शेतस, जस कि लिखेल शे, “कोणीच धर्मी नई शे, एक बी नई, कोणीच समजदार नई, कोणीच परमेश्वर ले वयखणारा नई. सर्वा परमेश्वर पासून दूर हुई ग्यात, सर्वान-सर्वा वायबार हुई जायेल शेतस, कोणीच चांगल करणार नई, एक बी नई. तेस्ना गोष्टी उधळेल कबर नि वास ना सारखा गंध्या शेतस. तेस्ना जीप खोटी गोष्टीस कण भरेल शेतस, तेस्ना शब्द विषारी साप ना विष ना सारखा शेतस जेना कण नुकसान होस. तेस्ना तोंड कण कायम कळू आणि श्राप नाच गोष्टी निघतस. त्या नुकसान पोहोचाळा मा आणि हत्या करासाठे उतावळा शेतस. त्या जठे कोठे बी जातस सर्व काही खराब करी टाकतस आणि विपत्ती लयतस. तेस्ले शांती कण जीवन व्यतीत करन नई माहिती. आणि नईत त्या परमेश्वर ले भ्यावाले शिकेल शेतस.” आमले माहित शे कि मोशे ना नियम जे काही सांगस, ते त्या लोकस्ले सांगस, ज्या नियम ना आधीन शेतस, एनासाठे कि सर्वा माणसस्ले ढोंग करा पासून रोका मा येवो आणि परमेश्वर समोर पुरा जग दंड ना योग्य मानामा येवो. कारण कि मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन करा मुळे कोणी बी माणुस परमेश्वर समोर धर्मी नई ठराव, एनासाठे कि मोशे ना नियम ना द्वारे हय साबित हुई जास कि आमनी पाप करेल शे. पण आते बिगर नियम ना गोष्टीस्ना पालन करत परमेश्वर नि आमले धर्मी ठरायेल शे, आणि हय गैरा टाईम पहिले मोशे ना नियम मा आणि भविष्यवक्तास्नी पुस्तकस्मा लिखामा एयेल शे. परमेश्वर नि लोकस्ले येशु ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे धर्मी ठरायेल शे. परमेश्वर त्या सर्वा लोकस साठे असा करस ज्या ख्रिस्त वर विश्वास करतस, कारण कि आते कोणताच भेद-भाव नई ऱ्हायना. कारण कि सर्वास्नी पाप करेल शे, आणि सर्वा परमेश्वर नि महिमा पासून दूर हुई जायेल शेतस. पण परमेश्वर नि कृपा ना द्वारे जी ख्रिस्त येशु मा शे, तेनी आमले आमना पापस्ना दंड पासून सोळाईसन धर्मी ठरायेल शे. तेले परमेश्वर नि ख्रिस्त ना रक्त मुळे असा प्रायश्चित्त ठरावना, जो विश्वास करा कण कार्यकारी होस, कि ज्या पाप पहिले करामा उनात आणि जेस्ना वर परमेश्वर नि आपली सहनशीलता मुळे ध्यान नई दिधा. तेस्ना विषय मा तो आपली धार्मिकता प्रगट करो. पण चालू टाईम मा तो तेस्ना पापस्ले निपटस एनासाठे कि तो आपली धार्मिकता ले प्रगट करी सको. अस करीसन परमेश्वर हय दाखाळस कि तो स्वता धर्मी शे आणि त्या सर्वास्ले धर्मी ठरावस ज्या येशु वर विश्वास करतस. त मंग, आमना गर्व न काय हुईन? तेना बहिष्कार करामा ईजायेल शे. अस कोणता सिद्धांत ना द्वारे हुयन, काय हय एनासाठे हुयन कि आमनी नियम ना गोष्टीस्ना पालन कर? नई. पण हय येशु वर विश्वास करा मुळे हुयन. कारण कि आमी असा मानतस कि माणुस मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन कराना द्वारे नई पण विश्वास ना द्वारे धर्मी ठरस. काय परमेश्वर फक्त यहुदीस्ना परमेश्वर शे? काय तो बिगर यहुदीस्ना बी परमेश्वर नई? निश्चित तो बिगर यहुदीस्ना बी परमेश्वर शे. कारण कि फक्त एकच परमेश्वर शे, जो सुंता करावणारा यहुदीस्ले तेस्ना विश्वास ना आधार कण धर्मी ठराईन आणि त्याच विश्वास ना द्वारे बिगर यहुदी बी जो बिगर सुंता ना शे धर्मी ठरावामा ईन. त, काय आमी ह्या विश्वास ना द्वारे मोशे ना नियमले रद्द करतस? कदीच नई. पण आमी मोशे ना नियमले स्थिर करतस. एनासाठे आमी यहुदी, आपला पूर्वज अब्राहाम ना बारामा काय सांगुत? तेले धर्मी ठरावाना मांगे काय कारण होत? कारण कि कदी अब्राहाम आपला चांगला कामस कण धर्मी ठरावामा येता, त तो स्वता वर गर्व करू सकत होता, पण परमेश्वर ना समोर तो असा नई करू सकत होता. परमेश्वर ना पुस्तक सांगस कि, “परमेश्वर ना करार वर अब्राहाम नि विश्वास कर आणि तेना विश्वास मुळे परमेश्वर नि तेले धर्मी ठराव.” जो काम करस, तेले मजुरी दान ना रूप मा नई, पण अधिकार ना रूप मा भेटस. पण जो काम नई करत, पण परमेश्वर वर विश्वास ठेवस, जो अधर्मी ले धर्मी बनावस, तेना हवू विश्वास तेना साठे धार्मिकता ठरस. ह्या प्रमाणे दाविद बी त्या माणुस्ले धन्य सांगस जेले परमेश्वर बिगर कामस्ना धर्मी ठरावस. “धन्य शेतस त्या जेस्ना अधर्म माफ हुईनात, आणि जेस्ना पाप झाकामा उनात. धन्य शेतस त्या माणस जेस्ना पापस्ना हिसाब परमेश्वर नई ठेवत.” त काय ह्या धन्य वचन ज्या दाविद नि सांगेल शेत, सुंता वाला यहुदीस साठेच शेतस? कदीच नई. हय त्या बिगर यहुदीस साठे बी शे जेस्ना सुंता नई हुईना. कारण कि जे पवित्र शास्त्र मा लिखेल शे आमी सांगी दियेल शेतस, “परमेश्वर ना करार वर अब्राहाम नि विश्वास कर आणि तेना विश्वास मुळे परमेश्वर नि तेले धर्मी ठराव.” त हय कव हुयन? काय अब्राहाम ना सुंता होवाना पहिले हुयन कि नंतर? हय तेना सुंता ना पहिले हुयन, नंतर नई. तेना सुंता नंतर हुयना. आणि तेना सुंता ह्या गोष्ट ना चिन्ह होता कि परमेश्वर नि अब्राहाम ले जव तो बिगर सुंता नि दशा मा होता विश्वास ना द्वारे धर्मी ठरावना. जेना कण तो त्या सर्वास्ना बाप ठरो ज्या बिगर सुंता नि दशा मा परमेश्वर वर विश्वास करतस, कि त्या बी धर्मी ठरावामा येवोत. अब्राहाम त्या सुंता करेलस्ना बी बाप शे, आणि ज्या नईत फक्त सुंता करेल शेतस, पण आमना बाप अब्राहाम ना त्या विश्वास नि लेख वर बी चालतस जो तेनी बिगर सुंता नि दशा मा करेल होता. जव परमेश्वर नि अब्राहाम आणि तेना वंशज संगे हवू करार करा कि त्या जग ना वारीस होतीन, आणि तेनी तेना करार ले पुरा बी करा. एनासाठे नई कि अब्राहाम नि मोशे ना नियम ना पालन कर, पण एनासाठे कि तेनी विश्वास कर आणि परमेश्वर ना द्वारे धर्मी ठरावामा उना. कारण कि, कदी परमेश्वर नि जो करार करेल शे ती फक्त मोशे ना नियम ना पालन करणारस्लेच भेटस, त मंग विश्वास निरर्थक शे, आणि परमेश्वर नि प्रतिज्ञा रद्द हुई जास. जो पुरी रिती कण मोशे ना नियम ना पालन नई करत तेनावर परमेश्वर ना दंड शे, पण जठे मोशे ना नियम नई, तठे मोशे ना नियम ना उल्लंघन बी नई. एनासाठे लोक या विश्वास ना द्वारे परमेश्वर ना करार ले प्राप्त करतस. अस एनासाठे होस कि करार कृपा ना रितीवर होवो. तवच अब्राहाम ना सर्वा वंशज त्या करार ले प्राप्त करू सकतस. हय फक्त तेस्ना साठे नई ज्या मोशे ना नियम ना आधीन शेतस, पण त्या सर्वास साठे शे ज्या अब्राहाम ना सारखा जो आमना पूर्वज शे, विश्वास कण जगतस. जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “मनी तुले सर्वा जातीस्ना बाप ठरायेल शे.” परमेश्वर नि नजर मा अब्राहाम आमना बाप शे, त्या परमेश्वर वर अब्राहाम नि विश्वास कर, जो मरेल ले जित्ता करस. आणि ज्या गोष्टी शेतसच नईत, तेस्ना नाव असा लेस, समजा कि त्या शेतस. तेनी अविश्वासी बनीसन परमेश्वर ना करार वर संशय धर, पण विश्वास मा दृढ हुईसन परमेश्वर नि महिमा करी. तेले पुरा निश्चय होता कि ज्या परमेश्वर नि करार करेल शे, तो तेले पुरा करामा बी समर्थी शे. एनासाठे हवू विश्वास तेना साठे धार्मिकता मोजामा उना. आणि हवू वचन, “विश्वास तेना साठे धार्मिकता मोजामा उना,” नईत फक्त तेनाच साठे लिखामा उना, पण आमना साठे बी लिखामा एयेल शे जेस्ले परमेश्वर धर्मी ठराईन, म्हणजे आमना साठे ज्या तेनावर विश्वास करतस जेनी आमना प्रभु येशु ले मरेल मधून परत जित्ता कर. आमना पापस मुळे तो मृत्युदंड ना साठे धरावामा उना, आणि आमले धर्मी ठरावा मुळे तेले जित्ता बी करामा उन. एनासाठे जव आमी विश्वास कण धर्मी ठरनुत, त आपला प्रभु येशु ख्रिस्त ना त्या कामस्ना द्वारे ज्या तेनी आमना साठे करेल शेतस परमेश्वर ना संगे सामंजस्य ठेवो. आमना विश्वास मुळे, ख्रिस्त नि आमले ह्या कृपा मा पोहोचाळेल शे जेनामा आते आमी उभा शेतस, आते आमी परमेश्वर नि महिमा नि आशा मा खुशी करतस. फक्त हईच नई, पण आमी आमना क्लेशस्मा बी खुशी करतस, कारण कि आमले माहिती शे कि क्लेश पासून धीर, धीर पासून खरी नम्रता, व खरी नम्रता पासून आशा उत्पन्न होस. आणि हय आशा आमले लज्जित नई होवू देत, कारण कि परमेश्वर जी पवित्र आत्मा आमले दियेल शे, ती आमना हृदयस्ले परमेश्वर ना प्रेम कण भरी देस. कारण कि जव आमी असहायच होतुत त परमेश्वर ना निवाळेल टाईम वर ख्रिस्त भक्तीहीनस साठे मरणा. एखाद्या धर्मी झन साठे कोणी मरस, हय त कठीण शे, पण तरी होवू सकस एखाद्या चांगला माणुस साठे कोणी मरानी बी धाळस करीन. पण परमेश्वर नि आमले दाखाळ कि तो आमना वर कितला प्रेम करस, कि जव आमी पापीच होतुत तवच ख्रिस्त आमना साठे मरणा. म्हणून, जव कि आमी आते तेना रक्त मुळे धर्मी ठरनुत, त ख्रिस्त आमले निश्चितच परमेश्वर ना राग पासून बी वाचाळीन. आमी परमेश्वर ना शत्रू होतुत, पण परमेश्वर ना संगे आमनी सामंजस्य तेना पोऱ्या नि मृत्यु ना द्वारे हुईग्या. आते जव आमी परमेश्वर ना मित्र शेतस, त ख्रिस्त ना जीवन मुळे आमले तारण काब नई भेटाव? फक्त हईच नई, पण आमी आपला प्रभु येशु ख्रिस्त ना व्दारे, जेना व्दारे आमनी सामंजस्य हुयेल शे, परमेश्वर मा खुश होतस. पहिला माणुस आदाम ना द्वारे जेले परमेश्वर नि बनायेल होत पाप जग मा उना, आणि तेना पाप ना द्वारे मृत्यु उणी. तेना परिणाम स्वरूप मृत्यु सर्वा लोकस्मा पसरी गई, कारण कि सर्वास्नी पाप कर. मोशे ले नियम देवामा येवाना पहिले पाप जग मा होता, पण त्या पापस्ना हिसाब ठेवामा नई उना, कारण कि त्या टाईम ले कोणताच मोशे ना नियम नई होता जेना उल्लंघन करामा येत. तरी बी आदाम पासून त मोशे लगून मृत्यु पुरी माणुस जातीवर राज्य करत ऱ्हायनी, आठ लगून कि त्या लोकस्वर बी जेस्नी आदाम ना सारखी कोणती आदन्या ना उल्लंघन करा मुळे पाप नई करेल होतात, आदाम त्या व्यक्ती ना प्रतिक होता, जो येणार होता. पण आदाम ना पाप त्या वरदान ना सारखा नई शे जो परमेश्वर आमले कृपा कण देस. कारण कि एक माणुस ना अपराध कण गैरा माणस मरणात. पण परमेश्वर नि कृपा आणि धार्मिकता ना वरदान जो आमले त्या माणुस म्हणजे येशु ख्रिस्त ना द्वारे सर्वा माणसस साठे भेटेल शे जास्त शे. एक माणुस ना अपराध मा व परमेश्वर ना वरदान मा कोणतीच तुलना नई शे. कारण कि एक नाच अपराध ना परिणाम स्वरूप दंड नि आदन्या ना निर्णय हुईना, पण गैरा अपराधस मुळे परमेश्वर नि आमले असा कृपादान दिधा जो आमले तेनी नजर मा धर्मी बनाई टाकस. हय खर शे कि एक माणुस ना अपराध मुळे मृत्यु नि त्या एकच ना द्वारे राज्य कर. त ज्या लोकस्ले कृपा आणि धर्म रुपी वरदान विपुलता कण भेटस त्या एक माणुसस्ना, म्हणजे येशु ख्रिस्त ना व्दारे तेस्ले कायम ना जीवन भेटीन आणि तेना संगे त्या राज्य करतीन, कारण कि तेस्नी तेनावर विश्वास कर. एनासाठे जसा एक अपराध सर्वा माणसस साठे दंड नि आदन्या ना कारण बनना, तसाच एकच माणुस ना धार्मिकता ना काम कण सर्वा माणसस साठे पापस पासून माफी आणि कायम ना जीवन भेटणा. कारण कि जसा एक माणुस ना आदन्या ले नई माना मुळे गैरा लोक पापी ठरणात, तसाच एक माणुस ना आदन्या माना कण गैरा लोक धर्मी ठरतीन. मोशे ना नियम सर्वा माणसस्ले देवामा उना एनासाठे कि तेस्ले माहिती पळो कि त्या कितला पापी शेतस. पण जठे पाप गैरा हुईना तठे परमेश्वर नि कृपा तेना तून बी जास्त हुईनी. एनासाठे जस पाप नि मृत्यु पसारत राज्य कर, तसाच आमना प्रभु येशु ख्रिस्त ना द्वारे कृपा बी कायम ना जीवन साठे धर्मी ठरावत राज्य करो. त आमी काय सांगुत? काय आमी पाप करत राहूत कि परमेश्वर नि कृपा वाळत राहो? कदीच नई. आमी पाप साठे मरी जायेल शेतस आणि एनासाठे आमी परत पाप करत नई राहाले पाहिजे. आमले माहिती शे कि जव आमी ख्रिस्त येशु ना बाप्तिस्मा लीधा, त आमी सर्वा तेनी मृत्यु ना बाप्तिस्मा लीधा. त आमना त्या बाप्तिस्मा द्वारे आमी तेना संगे गाळाई ग्युत आणि तेनी मृत्यु मा सहभागी हुयनूत, एनासाठे कि जसा ख्रिस्त बाप नि महिमा ना द्वारे मरेल मधून परत जित्ता करामा उना, तसाच आमी बी नवा जीवन ले जगुत. कारण कि कदी आमी बाप्तिस्मा ना द्वारे ख्रिस्त ना सारखा मरीसन तेना संगे एक हुई जायेल शेतस, त निश्चितच आमी तेना सारखा पुनरुत्थान मा बी तेना संगे जोळामा येसुत. आमले माहिती शे कि आमना जुना पापमय स्वभाव ख्रिस्त येशु ना संगे क्रूस वर चळावामा उना एनासाठे कि आमना शरीर मा पापमय स्वभाव नष्ट हुई जावो, आणि आमी पुळे पाप ना गुलामी मा नई राहोत. कारण कि जव आमी ख्रिस्त ना संगे मरी जायेल शेतस त पाप ना गुलामी मधून मुक्त हुई जायेल शेतस. एनासाठे कदी आमी ख्रिस्त ना संगे मरी ग्यात, त आमना विश्वास हवू शे कि तेना संगे जगसुत बी. कारण कि आमले माहिती शे कि ख्रिस्त मरेल मधून परत जित्ता होवा नंतर परत कदीच नई मराव. आते मृत्यु ना तेनावर कोणताच अधिकार नई. आणि एनासाठे, कारण कि तो मरी ग्या, त मृत्यु ना तेनावर कोणताच अधिकार नई. आणि आते तो जित्ता हुईसन परमेश्वर ना साठेच जगस. असाच तुमी बी स्वता ले पाप ना साठे मरेल समजा, पण परमेश्वर नि सेवा साठे ख्रिस्त येशु मा जित्ता समजा. एनासाठे पापमय वासना तुमना नाशवान शरीर मा राज्य नई कराले पाहिजे, कि तुमी तेनी लालुस्ना आधीन राहोत. आणि आपला शरीर ना आंगस्ले वाईट ना उद्देश्य ले पुरा करासाठे पापस्ले नका सोपा, पण स्वता ले मरेल मधून परत जित्ता हुयेल समजीसन धार्मिकता ना उद्देश्य ले पुरा करासाठे परमेश्वर ले सोपी द्या. तव तुमना वर पाप ना अधिकार नई राहाव, कारण कि तुमी मोशे ना नियम ना आधीन नई पण कृपा ना आधीन शेतस. त काय, आमी एनासाठे पाप करूत कारण कि आमी मोशे ना नियम ना आधीन नई पण परमेश्वर नि कृपा ना आधीन मा शेतस? कदीच नई. निश्चित तुमले माहिती शे कि जव तुमी स्वता ले कोणी आदन्या माना साठे दास सारखा सोपी देतस, तव तो व्यक्ती तुमना मालक बनी जास जेनी तुमी आदन्या मानतस. तुमी पाप ना दास बनी सकतस जेना परिणाम मृत्यु शे, व तुमी परमेश्वर नि आदन्या ले मानानी निवळ करू सकतस जेना परिणाम धार्मिकता शे. पहिले तुमी पाप ना दास होतात, पण आते तुमनी त्या शिक्षा ना पालन करेल शेतस जी तुमले भेटेल शे. आणि मी एनासाठे परमेश्वर ना धन्यवाद करस. परमेश्वर नि तुमले पाप नि सामर्थ्य कण सोळाव आणि आते तुमी धार्मिकता ना दास हुई जायेल शेतस. मी तुमनी शारीरिक दुर्बलता मुळे माणसस्नी रिती प्रमाणे सांगस. जसा पहिले तुमनी आपला शरीर ले अशुद्धता आणि अधर्म ना आधीन करेल होतात, जेना कण ते खराब हुई जायेल होत, तसाच आते आपला शारीरिक आंगस्ले पवित्रता ना साठे धार्मिकता दास म्हणीसन सोपी द्या. जव तुमी पाप ना दास होतात, तव तुमी धार्मिकता ना कामस्ले नई करू सकत होतात. तुमना त्या जुना जीवन कण जेना कण तुमी आते लज्जित होतस काय फायदा हुईना? कारण कि त्या कामस्ना फय त मृत्यु शे. पण आते तुमी पाप पासून मुक्त हुई जायेल शेतस आणि परमेश्वर ना दास बनी जायेल शेतस. आते तुमी त्या काम करतस जेस्ना कण पवित्रता भेटस, आणि तेना फय कायम ना जीवन शे. कारण कि पाप ना फय त मृत्यु शे, पण परमेश्वर ना कृपादान त कायम ना जीवन शे जो प्रभु येशु ख्रिस्त मा आमले भेटस. ओ विश्वासी भावूसहोण, तुमले माहित शे कि मी तेस्ले सांगस जेस्ले मोशे ना नियम माहिती शे. जठ लगून माणुस जित्ता ऱ्हास तेले नियम ना गोष्टीस्ना पालन करन पळस. उदाहरणार्थ, एक विवाहित बाई आपला नवरा संगे विवाहिक नियम ना प्रमाणे त्या संबंध मा तठ लगून बांधायेल ऱ्हास जठ लगून तीना नवरा जित्ता शे, पण जर तीना नवरा मरी जास त ती त्या विवाहिक नियम पासून सुटी जास जीनामा ती आपला नवरा संगे बांधायेल होती. एनासाठे, कदी ती आपला नवराले जित्ता राहतांना बी कोणी दुसरा माणुस ना संगे ऱ्हास, त ती व्यभिचारिणी म्हणाईन. पण जर तीना नवरा मरी जास, त ती विवाहिक नियम पासून मुक्त हुई जास आणि कोणी दुसरा माणुस संगे लग्न करावर व्यभिचारिणी नई म्हणावनार. तसाच, ओ विश्वासी भावूसहोण, जव तुमी ख्रिस्त ना संगे मरी ग्यात, त तुमी मोशे ना नियम ना साठे बी मरी ग्यात. आते तुमी तेना शेतस जो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे एनासाठे कि तुमी परमेश्वर ना साठे फलदायी जीवन जगू सकोत. कारण कि जव आमी शरीर ना स्वभाव प्रमाणे जीवन जगतस, त मोशे ना नियम कण शक्तिशाली हुईसन पापस्ना वासना आमना आंगस्मा काम करत होती जेस्नी समाप्ती मृत्यु होत होती. पण आते आमी मोशे ना नियम पासून मुक्त हुई जायेल शेतस, कारण कि आमी त्या गोष्टीस साठे मरी जायेल शेतस, जी आमले कैदीस सारखी बंधन मा जखडी ठेवत होती. आते आमी लिखेल नियम ना गोष्टीस्ना पालन करीसन जुनी रितीवर नई पण पवित्र आत्मा नि आदन्या ना पालन करीसन नवी रिती कण परमेश्वर नि सेवा करू सकतस. त आमी काय सांगुत? काय नियम पाप शे? कदीच नई. पण मोशे ना नियम ना द्वारेच मले माहिती पळण कि पाप काय शे. मोशे ना नियम ना द्वारेच मले माहिती पळण कि लोभ करान पाप शे, कारण कि मोशे ना नियम मा हय आदन्या लिखेल शे कि “लोभ नका करज्यात.” पण ह्या आदन्या ना द्वारे पाप नि संधी देखीसन मना मा सर्वा प्रकार ना लोभ उत्पन्न कर, कारण कि बिगर मोशे ना नियम ना पाप सामर्थ्य हीन आणि मरेल सारखा शे. एक टाईम होता जव मी नियमले नई वयखतांना जित्ता होतु, पण जव मले मोशे ना नियम ना द्वारे पाप माहिती पळणा त मना मा पाप करानी तीव्र ईच्छा जागी उठनी आणि मी परमेश्वर पासून दूर हुई ग्यू. पण जी आदन्या ले मानाना द्वारे मले जीवन भेटाले पाहिजे होत तीच आदन्या द्वारे मी परमेश्वर पासून दूर हुई ग्यू. कारण कि पाप नि संधी देखीसन आदन्या ना व्दारे मले फसाळ, आणि तेनाच व्दारे मले परमेश्वर पासून दूर बी करी टाक. ह्या प्रकारे आमी देखतस कि मोशे ना नियम पवित्र शे आणि आदन्या पवित्र, उचित व कल्याणकारी शे. त काय एना अर्थ हय शे कि मोशे ना नियम, जो चांगला शे, परमेश्वर पासून मले दूर होवाना कारण ठरणा? कदीच नई. पण हय पाप ना द्वारे हुईन. पण पाप नि त्या चांगला मोशे ना नियम ना द्वारे मले परमेश्वर पासून आल्लग करी टाक, एनासाठे कि पाप ना खरा रूप प्रगट होवो आणि आदन्या ना द्वारे हय प्रगट हुईन कि पाप पूर्णपणे वाईट शे. आमले माहित शे कि मोशे ना नियम त आत्मिक शे, पण मी शारीरिक शे आणि पाप ना गुलाम शे. जे मी करस तेनी मले समज नई, कारण कि जे मी कराले देखस ते मी नई करत, पण जेना कण मले घृणा येस तेच करस. एनासाठे, जे वाईट मी नई कराले देखस कदी तेच करस, त मी मानी लेस कि मोशे ना नियम बरोबर शे. त अशी दशा मा त्या वाईट ले करणारा मी नई, पण पाप शे जो मना मा बठेल शे. कारण कि मले माहित शे कि मना मा म्हणजे मना पापमय शारीरिक स्वभाव मा काहीच चांगल वास नई करत. जरी चांगला काम करानी ईच्छा मना मा शे पण ते मी नई करू सकत. कारण कि ज्या चांगला काम करानी ईच्छा मी ठेवस ते त नई करत, पण ज्या वाईट ना कामस्ले मी नई करान देखस तेच करत ऱ्हास. म्हणून कदी मी तेच करस जेनी ईच्छा नई करत, त तेना करणार मी नई पण पाप शे जो मना मा बसेल शे. ह्या प्रकारे, मना अनुभव हय शे कि जव मी चांगल करानी ईच्छा करस, त वाईटच करू सकत. मना मधला मनुष्यत्व परमेश्वर ना नियम वर गैरा खुश ऱ्हास. पण मले आपल शरीर ना आंगस्मा दुसरा प्रकार ना नियम दिखी पळस, जो मनी बुद्धी ना नियम संगे झगळा करस आणि मले त्या पाप ना गुलाम बनाई टाकस जो मना मा काम करस. मी कितला कष्टी माणुस शे. मले ह्या वासनाना शरीर पासून कोण सोळाईन जी मले मृत्यु ना कळे धकलस? मी परमेश्वर ना धन्यवाद करस जो मले प्रभु येशु ख्रिस्त व्दारे वाचाळस. एनासाठे मी स्वता आपला कण त परमेश्वर ना नियम ना पालन करस पण शरीर कण पाप ना नियम ना पालन करस. ह्या मुळे, आते जो ख्रिस्त येशु मा शे, तेस्ना वर दंड नि आदन्या नई. (कारण कि त्या शरीर प्रमाणे नई पण आत्मा ना प्रमाणे चालतस.) कारण कि जीवन देणारी आत्मा नि सामर्थ्य नि मले पाप नि सामर्थ्य पासून जी मृत्यु कळे लीजास मुक्त करी टाकेल शे. कारण कि जो काम मोशे ना नियम आमना कमजोर पापमय स्वभाव मुळे नई करू सकना, तेले परमेश्वर नि कर. तेनी पाप ना प्रायश्चित साठे आपला पोऱ्या ले धाळ, जेनी पापी माणुस सारखा शरीर ले धारण कर. ह्या प्रकारे परमेश्वर नि मानव शरीर मा पाप ले दंडीत कर. परमेश्वर नि हय एनासाठे कर कि मोशे ना नियम नि मांग आमी लोकस्मा ज्या शारीरिक स्वभाव प्रमाणे नई पण आत्मा ना प्रमाणे जीवन जगतस, पुरी करामा येवो. ज्या व्यक्ती ना जीवन पापी स्वभाव ना द्वारे चालावामा एस तेना विचार पापमयच ऱ्हातस. पण ज्या व्यक्ती ना जीवन पवित्र ना द्वारे चालावामा एस तो त्या गोष्टीस कळेच मन लावस जेना कण आत्मा खुश होस. पापमय स्वभाव ना प्रमाणे जीवन जगन त मृत्यु शे, पण पवित्र आत्मा ना प्रमाणे जीवन जगन शांती शे. आणि जव माणुस पापमय स्वभाव प्रमाणे जीवन जगस त परमेश्वर ना शत्रू बनी जास, कारण कि तो परमेश्वर ना नियम ना पालन नई करत आणि नईत करू सकतस. ज्या आपला पापमय स्वभाव नि आदन्या ना पालन करतस, त्या परमेश्वर ले खुश नई करू सकतस. पण जव परमेश्वर नि आत्मा तुमना मा वस्ती करस त तुमी पापमय स्वभाव ना प्रमाणे जीवन नका जगा, पण पवित्र आत्मा ना प्रमाणे जीवन जगा. ज्या माणुस ना जोळे पवित्र आत्मा नई तो ख्रिस्त ना नई. पण जर ख्रिस्त तुमना मा वास करस त पाप मुळे शरीर ले मरा वर बी धार्मिकता मुळे तुमनी आत्मा जीत्ती शे. कदी परमेश्वर नि आत्मा जेनी येशु ख्रिस्त ले मरेल मधून परत जित्ता कर, तुमना मा वास करस, त तोच तुमना नाशवान शरीरस्ले बी आपली आत्मा ना द्वारे जो तुमना मा बठेल शे, जित्ता करीन. एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, आमी कर्जदार त शेतस, पण पापमय स्वभाव ना नईत कि तेना प्रमाणे जीवन जगुत. कारण कि कदी तुमी पापमय स्वभाव प्रमाणे जीवन जगतस त तुमी परमेश्वर पासून दूर हुई जाश्यात. पण कदी आत्मा ना द्वारे पापमय कामस्ले मारश्यात, त तुमी जगश्यात. एनासाठे जीतला लोक परमेश्वर नि आत्मा ना प्रमाणे जीवन जगतस, त्याच परमेश्वर ना पोर शेतस. कारण कि परमेश्वर नि जी आत्मा तुमले दियेल शे ती तुमले गुलाम नई बनावत कि परत भयभीत हुई जावोत, पण ती आत्मा तुमले परमेश्वर ना पोर बनावस, त्या आत्मा कण प्रेरित हुईसन आमी जोरमा सांगतस, “अब्बा, ओ बाप.” परमेश्वर नि आत्मा स्वता आमनी आत्मा ना संगे जुळाईसन हय घोषणा करस कि आमी परमेश्वर ना पोर शेतस. जर आमी परमेश्वर ना पोर शेतस, त आमी त्या आशीर्वादस्मा बी ज्या तेनी तेना लोकस साठे ठीयेल शे वारीसदार शेतस, आणि कदी आमी ख्रिस्त ना सारखा दुख बी उचलसुत त तेना संगे महिमा बी भेटीन. मी समजस कि आमना वर जी महिमा प्रगट होणार शे, तेनी तुलना मा ह्या टाईम ना दुख आणि क्लेश काहीच नई शे. कारण कि पुरी सृष्टी मोठी आशा भरेल नजर कण परमेश्वर ना पोरस्ले प्रगट होवानी वाट देखी ऱ्हायनी. कारण कि जी सृष्टी परमेश्वर नि बनायेल होती तिनी आपला किंमत दवाळी टाक, अस एनासाठे नई हुईन कारण कि स्वता सृष्टी नि ईच्छा होती कि अस होवो, पण सृष्टीकरता परमेश्वर नि अस कर. पण हय आशा बी बनेल ऱ्हायनी. कि सृष्टी बी स्वताच विनाश ना दास्य मधून सुटीसन, परमेश्वर ना पोरस्नि महिमा नि स्वातंत्रता मा सहभागीता प्राप्त करीन. आमले माहिती शे कि पुरी सृष्टी आदाम ना पाप कराना टाईम पासून त आज लगून, जशी बाई जल्म देवानी पीडा ना टाईम ले कण्हस तशीच कण्ही ऱ्हायनी. आणि सृष्टीच नई, पण आमी बी मधमा-न-मधमा कण्ही ऱ्हायनूत. आमले पवित्र आत्मा भेटी जायेल शे, जो परमेश्वर नि महिमा ना पहिला फय शे. पण आमी आपला शरीर नि सुटका नि वाट देखी ऱ्हायनूत, जव आमी परमेश्वर ना दत्तक पोर होसुत. ह्या आशा मा आमना तारण हुईना. कदी कोणी ती गोष्ट देखस, जेनी तो आशा करस, त हय आशा नई म्हणावत. कारण कि माणुस ज्या वस्तू ले देखी ऱ्हायना शे, तेनी आशा काब करीन? पण ज्या वस्तू ले आमी नई देखतस, आणि तेनी आशा ठेवतस, त धीर धरीसन तेनी वाट बी देखतस. ह्याच प्रकारे पवित्र आत्मा बी आमनी दुर्बलता नि परिस्थिती मा आमनी मदत साठे आमना संगे जुळाई जास कारण कि आमले नई माहिती कि प्रार्थना कोणत्या प्रकारे कराले पाहिजे. पण पवित्र आत्मा स्वता आमना साठे मध्यस्थी हुईसन असा रळी-रळीसन, जी वर्णन ना बाहेर शे प्रार्थना करस. आणि परमेश्वर जो मनस्ले तपासणार शे, माहित शे कि आत्मा नि ईच्छा काय शे? कारण कि पवित्र आत्मा लोकस्ना साठे परमेश्वर नि ईच्छा प्रमाणे विनंती करस. आमले माहिती शे कि ज्या लोक परमेश्वर वर प्रेम ठेवतस, तेस्ना साठे सर्वा गोष्टी मियसन चांगलच उत्पन्न करतस, म्हणजे तेस्नाच साठे जेस्ले तेनी आपली ईच्छा ना प्रमाणे निवाळी लीयेल शे. कारण कि जेस्ले तेनी पहिले पासून निवाळी लीयेल शे तेस्ले पहिले पासून ठरायेल बी शे कि तेना पोऱ्या येशु ना स्वरूप मा होवोत, एनासाठे कि ख्रिस्त येशु गैरा भावूस्मा ज्येष्ठ शे. मंग जेस्ले परमेश्वर नि पहिले पासून निवाळीसन आल्लग कर, तेस्ले बलाव बी, आणि जेस्ले बलाव, तेस्ले धर्मी बी ठरायेल शे, आणि जेस्ले धर्मी ठराव, तेस्ले महिमा बी दियेल शे. मंग ह्या गोष्टीस्ना विषय मा आमी काय सांगुत? जर परमेश्वर आमना बाजुले शे, त आमना विरोधी कोण होवू सकस? तेनी आपला स्वता ना पोऱ्या ले बी नई वाचाळ, पण तेनी आमी सर्वास्ना साठे तेले अर्पण करी दिध. त इतल देवा नंतर, काय तो आमले आपला पोऱ्या ना संगे सर्व काही नई देवाव? परमेश्वर ना निवाळेलस्वर दोष कोण लाईन? कोणीच नई. कारण कि परमेश्वरच शे जो तेस्ले धर्मी ठरावणार शे. एनासाठे कोणी आमना वर दंड नि आदन्या नई देवू सकत, कारण कि येशु ख्रिस्तच शे जो आमना साठे मरणा आणि मरेल मधून परत जित्ता हुईग्या, आणि परमेश्वर ना उजवी कळे बठीसन आमना साठे विनंती करस. त मंग कोण आमले ख्रिस्त ना प्रेम पासून आल्लग करीन? काय क्लेश, संकट, उपद्रव, दुष्काळ, नग्नता, आपत्ती, कि तलवार असा करी सकतस? जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तुना साठे आमी दिन भर मारा मा येतस, आमी वध कराना मेंढी सारखा मोजामा एयेल शेतस.” पण या सर्वा गोष्टस्मा आमी तेना व्दारे जेनी आमना वर प्रेम करेल शे, विजयी तून बी जास्त वाळीसन शे. कारण कि मले निश्चित माहिती शे. कि नईत मृत्यु, नईत जीवन, नईत स्वर्गदूत, नईत सत्ता, नईत वर्तमान, नईत भविष्य, नईत सामर्थ्य, नईत उंची. नईत खोलाई, आणि नईत कोणी आणि सृष्टी आमले परमेश्वर ना प्रेम पासून जो आमना प्रभु ख्रिस्त येशु मा शे, आल्लग करू सकाव. मी ख्रिस्त मा खरज सांगस आणि मना विवेक बी पवित्र आत्मा मा ह्या गोष्ट नि साक्षी शे कि मी खोट नई बोलत. मना मन मना लोकस साठे कायम दुखत ऱ्हास. मनी त आठ लगून ईच्छा शे कि मी आपला यहुदी भावूस्ना चांगला साठे, ज्या शरीर ना नाता कण मना वंश मधून शेत, स्वता शापित हुई जावू आणि ख्रिस्त पासून आल्लग हुई जावू. त्या इस्त्राएल देश ना लोक शेतस. परमेश्वर नि तेस्ले आपला दत्तक पोर होवाना अधिकार दियेल शे. परमेश्वर नि तेस्ले महिमा दिधी. परमेश्वर नि तेस्ना संगे करार कर आणि तेस्ले मोशे ना नियम दियेल शे. तेस्ले परमेश्वर नि खरी उपासना करन माहिती शे आणि परमेश्वर नि प्रतिज्ञा बी तेस्ले भेटेल शे. महान ग्रीक पूर्वज तेस्नाच शेतस आणि शरीर ना भाव कण ख्रिस्त तेस्नाच मधून शे. परात्पर परमेश्वर नि स्तुती युगानयुग होवो. आमेन. मी अस नई सांगी ऱ्हायनु कि परमेश्वर आपला करार ना पालन कराले चुकी ग्या, कारण कि ज्या सर्वा इस्राएल ना वंश ना शेत त्या सर्वा परमेश्वर ना लोक नईत. आणि नईत सर्वा अब्राहाम ना वंश ना होवा मुळे परमेश्वर ना पोर ठरणात. परमेश्वर नि अब्राहाम ले सांगेल होत, “ज्या इसहाक ना वंश मधून जल्म लेतस, त्याच तुना वंशज मानामा येतीन.” एना अर्थ हय शे कि ज्या निसर्ग प्रमाणे जल्म लेतस, त्या परमेश्वर ना पोर नई शेतस, पण जेस्ना जल्म करार प्रमाणे हुईना, त्याच वंशज समजामा येतस. कारण कि परमेश्वर ना करार ना ह्याच शब्द होतात, “मी निर्धारित टाईम वर परत येसू आणि तव सारा ले एक पुत्र उत्पन्न हुईन.” एवळच नई, रिबेका ना गर्भ मा एकच माणुस, म्हणजे आमना पूर्वज इसहाक पासून दोन पोर हुईनात. जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “मनी याकोब वर प्रेम कर, पण एसाव ले अप्रिय समज.” त आमी काय सांगुत? काय परमेश्वर अन्यायी शे? कदीच नई. कारण कि तेनी मोशे ले सांगेल होत, “मनी जेनावर दया करानी ईच्छा शे, तेनाच वर दया करसू आणि जेनावर कृपा करानी ईच्छा शे, तेनाच वर कृपा करसू.” एनासाठे परमेश्वर एनी निवळ करीन कि तो कोणावर दया करो, तेनी निवळ माणुस नि ईच्छा आणि प्रयत्न्यस्वर नई शे. कारण कि परमेश्वर ना पुस्तक मा मिसर ना राजा फारो ले सांगामा एयेल होत, “मनी तुले एनासाठे राजा बनायेल शे कि तुना द्वारे मी आपली सामर्थ्य दाखाळू, आणि मना नाव ना प्रचार पुरी पृथ्वी वर होवो.” एनासाठे परमेश्वर नि जेनावर ईच्छा शे तेनावर दया करस, आणि जेले कठोर करानी ईच्छा शे तेले कठोर करी देस. तव काही लोक मले सांगतीन, “जर अस शे, त परमेश्वर आमना वर दोष कसा लावू सकस? कारण कि कोणी बी तेले जी तेनी करानी ईच्छा शे करा पासून रोकी नई सकत.” पण ओ माणुस, तू कोण शे जो परमेश्वर संगे विवाद करू सकस? कारण कि गाळायेल वस्तू गाळनार ले नई विचारू सकत कि, “तुनी मले अस काब बनाव?” काय कुंभार ले हय अधिकार नई कि तो माती ना एकच गोया कण एक भांड खास काम ना साठे बनावो आणि दुसर भांड साधारण काम ना साठे बनावो? परमेश्वर ना जोळे आपली सामर्थ्य आणि न्याय ना प्रदर्शन कराना पुरा अधिकार शे, पण तेले हय बी अधिकार शे कि तो राग ना भांडास्नि, ज्या विनाश ना साठे तयार करामा एयेल शे, तेस्ना वर सहनशील दाखाळो. तेले हवू बी अधिकार शे कि आपला महिमा ना धन ले त्या दया ना भांडास्वर प्रगट करो जेस्ले तेनी महिमा ना साठे पहिले पासून तयार करेल शे. कारण कि आमी तेना निवाळेल लोक शेतस, जेस्ले तेनी नईत फक्त यहुदीस मधून, पण बिगर यहुदीस मधून बलायेल शे. जसा तो होशे ना पुस्तक मा बी सांगस, “जी मनी प्रजा नई होती, तेस्ले मी आपली प्रजा सांगसू, आणि जी प्रिय नई होती, तिले प्रिय सांगसु.” आणि ज्या जागा वर तेनी तेस्ले सांगेल होत, “तुमी मनी प्रजा नई शेतस, तठेच त्या जित्ता परमेश्वर ना पोर म्हणावतीन.” आणि यशया इस्त्राएल देश ना विषय मा आराया मारीसन सांगस, “इस्राइलिस्नि संख्या समुद्र रेती सारखी का नई हो, तरी बी तेस्ना मा थोळासाच वाचाळामा येतीन. कारण कि प्रभु लवकरच पूर्णपणे जग ना लोकस्ना न्याय करीन.” जसा यशया नि पहिले पासून सांगेल शे, “जर सैन्यांस्ना प्रभु आमना साठे काही वंश नई सोळत, त आमी सदोम ना सारखा हुई जातात, आणि गमोरा ना सारखा नाश हुई जातात.” त आमी काय सांगुत? त्या बिगर यहुदी, ज्या धार्मिकता नि शोध बी नई करी ऱ्हायंतात, तेस्नी त्या धार्मिकता ले प्राप्त करी लीध जी विश्वास कण शे. जव कि इस्त्राएल देश ना लोक ज्या मोशे ना नियम ना पालन करीसन धार्मिकता नि शोध करत होतात, त्या बी धर्मी बना पासून ऱ्हाईग्यात. अस काब हुईन? कारण कि इस्त्राएली विश्वास वर नई, पण समजा कामस कण तेनी शोध करत होतात. परिणाम स्वरूप त्या ठेस ना दघळ कण तेस्ले ठेस लागणी. जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “देखा, मी सियोन शहर मा एक दघळ ठेवस, जो लोकस्ना ठेस खावाना आणि अडखळ ना कारण राहीन. पण जो तेनावर विश्वास करीन तो कदी लज्जित नई होवाव.” ओ विश्वासी भावूसहोण, मना मन नि ईच्छा आणि मना यहुदी भावूस साठे परमेश्वर ले मनी प्रार्थना शे कि तेस्ले तारण भेटो. मी तुमले तेस्ना विषय मा हय साक्ष देस कि तेस्ना मा परमेश्वर ना प्रती उत्साह शे, पण हवू उत्साह विवेकपूर्ण नई शे. तेस्ले ती धार्मिकता नई माहिती, जी परमेश्वर नि ईच्छा शे, आणि आपली धार्मिकता स्थापित करामा लागेल ऱ्हातस. एनासाठे तेस्नी परमेश्वर ना द्वारे निर्धारित धार्मिकता ना आधीन राहाले स्वीकार नई कर. कारण कि ख्रिस्त नि पहिलेच मोशे ना नियम ना उद्देश ले पुरा करी टाकेल शे, एनासाठे कि जो कोणी ख्रिस्त वर विश्वास करो तो धर्मी ठरावामा येवो. मोशे ना नियम ना आधार वर धार्मिकता ना विषय मा लिखस, “जो माणुस मोशे ना नियम ना ह्या गोष्टीस्ना पालन करीन, तेले तेस्ना द्वारे जीवन भेटीन.” पण पवित्र शास्त्र विश्वास वर आधारित धार्मिकता ना विषय मा जे लिखस तो हय शे, “तू आपला मन मा हय नको ईचारजो स्वर्ग मा कोण चळीन?” (म्हणजे ख्रिस्त ले उतारी लया साठे.) आणि नका त हय ईचारज्यात “अधोलोक मा कोण उतरीन?” (म्हणजे ख्रिस्त ले मरेल मधून जित्ता करीसन वरे लया साठे.) पण ती हय सांगस कि, “वचन तुमना जोळे शे, ते तुमना तोंड मा आणि तुमना हृदय मा शे.” हय विश्वास ना वचन शे, जेना आमी प्रचार करतस. कि जर तू आपला तोंड कण येशु ले प्रभु मानीसन कबूल करी लेस, आणि आपला मन मा विश्वास करस कि परमेश्वर नि तेले मरेल मधून परत जित्ता कर, त तुले निश्चित तारण भेटीन. कारण कि आमी विश्वास ना द्वारे धर्मी ठरावामा येतस आणि तोंड कण कबूल कराना द्वारे वाचाळामा येतस. परमेश्वर ना पुस्तक हय सांगस, “जो कोणी तेनावर विश्वास करीन तो लज्जित नई होवाव.” एनासाठे यहुदी आणि ग्रीक मा काहीच फरक नई शे, सर्वास्ना प्रभु एकच शे. तो त्या सर्वास्ना प्रती संपन्न शे, ज्या तेले हाक मारतस. जस पवित्र शास्त्र सांगस, “जो कोणी प्रभु ना नाव लीन, तेले तारण भेटीन.” पण कदी लोकस्ले तेनावर विश्वास नई, त त्या तेले कसा हाक मारू सकतस? आणि तेस्नी तेना विषय मा कदी आयकच नई, त तेनावर विश्वास कसा करू सकतस? आणि कदी कोणी प्रचारक नई राहो, त त्या तेना विषय मा कसा आयकू सकतस? आणि कदी तेले धाळामा नई येवो, त कोणी प्रचारक कसा बनू सकीन? जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तेस्ना पाय कितला सुंदर शेतस, ज्या चांगली गोष्टीस्नी सुवार्ता आयकाळतस.” पण सर्वास्नी त्या सुवार्ता वर विश्वास नई कर, यशया स्वता सांगस, “ओ प्रभु, कोणी आमना सुवार्ता वर विश्वास करेल शे?” पण विश्वास आयका कण आणि आयकन ख्रिस्त ना वचन कण होस. पण मी विचारस, “काय हय खर शे कि तेस्नी ख्रिस्त ना बारामा मा सुवार्ता नई आयकी?” नख्खीच तेस्नी आयकेल शे, कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तेस्ना आवाज पुरा पृथ्वी मा पसरी जायेल शे आणि तेस्ना शब्द जग ना कोपरा लगून पोहोची जायेल शे.” मी परत विचारस, “काय इस्त्राएल देश ना लोकस्ले हय सुवार्ता नई समजनी का?” पहिले त मोशे स्वता सांगस, “मी एक असा देश ना प्रती, जो देश नई शे, तुमना मा ईर्ष्या उत्पन्न करसू आणि एक विवेकहीन देश ना प्रती तुमना मा राग उत्पन्न करसू.” मंग यशया आखो बी मोठी हिंमत कण सांगस, “ज्या मले नई शोधतस, तेस्ले मी भेटणु आणि ज्या मना विषय मा नई ईचारतस, तेस्ना वर मी स्वता ले प्रगट करनू.” पण इस्त्राएल देश ना लोकस्ना विषय मा परमेश्वर यशया ना द्वारे हय सांगस, “मी आदन्या नई मानणार आणि विरोध करणारी प्रजा कळे दिन भर हात पसारेल ऱ्हायनु.” त मी हय प्रश्न ईचारस, काय परमेश्वर नि आपली प्रजा ले सोळी दियेल शे? कदीच नई. मी बी त इस्त्राएल देश ना शे, अब्राहाम ना वंश आणि बन्यामीन ना गोत्र मधून शे. परमेश्वर नि आपला लोकस्ले तेस्ले तेनी पहिले पासून निवाळेल शे, नई सोळ. तुमले माहिती शे कि परमेश्वर ना पुस्तक एलीया ना विषय मा काय सांगस, कि तो इस्त्राएल देश ना विरोध मा परमेश्वर ले विनंती करस? तेनी सांग, “ओ प्रभु, तेस्नी तुना भविष्यवक्तास्ना घात करेल शे, आणि तुन्या वेदीस्ले पाळी टाकेल शे, आणि मीच एखटा वाचेल शे, आणि त्या मना जीव ना बी शोध मा शेतस.” एनावर परमेश्वर नि तेले काय उत्तर दिध? “मनी आपला साठे सात हजार माणसस्ले राखी ठीयेल शे, जेस्नी बाल देवता नि मूर्ती समोर गुळघा नई टेकेल शेतस.” ह्याच प्रमाणे परमेश्वर नि आपला कृपा कण काही यहुदी लोकस्ले तेनी खरी प्रजा होवा साठे निवाळेल शे. तेनी निवळ तेनी कृपा वर आधारित शे, नईत कि तेस्ना कामस्वर ज्या तेस्नी करेल शेतस. कारण कि जर परमेश्वर नि निवळ लोकस्ना कामस प्रमाणे ऱ्हाती, त ती कृपा खरी कृपा नई ऱ्हाती. त एना परिणाम काय निघणा? इस्त्राएल देश ना लोक ज्या गोष्ट ना शोध मा होतात, ती तेस्ले नई भेटणी. पण निवाळेल लोकस्ले ती भेटी गई आणि बाकी लोकस्ना मन कठोर हुई ग्यात कि परमेश्वर नि नई आयकोत. जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “परमेश्वर नि तेस्नी बुद्धी ले मंद बनाई टाकेल शे. तेनी तेस्ले असा डोया दिधा, ज्या देखतस नईत आणि असा कान, ज्या आयकतस नईत आणि तेस्नी हय दशा आज लगून तशीच शे.” आणि दाविद सांगस, “त्या आपली मेज मा अचानक धरामा येवोत, जशी चिळी जाय मा धराई जास आणि जनावर खड्डा मा पळस तसाच तेस्ले बी दंड भेटो. तेस्ना डोया अंधा हुई जावोत कि त्या देखी नई सकोत आणि तू तेस्नी कमर ले कायम साठे वाकाळी दे.” मी ईचारस, काय यहुदी लोक ठेस लागा मुळे कायम ना साठे खाले पळेल ऱ्हातीन? कदीच नई. एनासाठे कि तेस्नी विश्वास नई कर, येणा मुळे तारण बिगर यहुदीस साठे उपलब्ध शे कि इस्त्राएल देश ना लोक बयोत. यहुदीस्ना अपराध आणि तेस्नी कमी बिगर यहुदीस साठे संपत्ती ना कारण ठरणा, त तेस्नी परिपूर्णता कण कितला फायदा हुईन? आते मी तुमी बिगर यहुदीस्ले ह्या गोष्टी सांगस, जव कि मले बिगर यहुदीस्ले प्रचार करासाठे धाळामा एयेल शे, त मी आपली हय सेवा ना विषय मा गर्व बी करत. एनासाठे कि काही करीसन मी आपला यहुदी लोकस्मा ईर्ष्या उत्पन्न कराईसन तेस्ना मधून काही लोकस्ना तारण कराई सकू. कारण कि जव त्या सोळामा उनात, त तेस्ले सोळी देन जग ना लोकस साठे परमेश्वर मा सामंजस्य ना कारण ठरणा. त जव त्या ख्रिस्त येशु ले स्वीकार करतीन त तेना परिणाम काय हुईन? एना परिणाम मरेलस्ना साठे जीवन ना सारखा हुईन. जव परमेश्वर ले चळायेल भेट नि पहिली भाकर पवित्र ठरणी त पुरा गुंथायेल पीठ बी पवित्र शे. आणि जव मुय पवित्र ठरणा त फांद्या बी पवित्र ठरेल शेतस. कदी काही फांद्या कापीसन आल्लग करामा एयेल शेतस म्हणजे तुमी, ज्या बिगर यहुदी शेतस. तुमी जंगली जैतून शेतस, तुमी त्या फांद्यास्ना जागा वर शेतस ज्या कापामा एयेल शेतीस, तेस्ना जागा वर कलम ना सारखा लावामा एयेल शेतस आणि जैतून ना मुया व तेना रस-भांडार ना भागीदार बननात, त तुमी स्वता ले फांद्यास्तुन वाळीसन नका समजज्यात. कदी तुमले गर्व करन शे, त ध्यान मा ठेवा कि तुमी मुयास्ले नई समायतस पण मुया तुमले समायतस. तुमी सांगश्यात, “फांद्या एनासाठे कापीसन आल्लग करामा उनात कि मले कलम ना सारखा लावामा येवो.” हय खर शे, त्या एनासाठे कापामा उनात कारण कि तेस्नी विश्वास नई कर, जव कि तू विश्वास कण त्या जागा वर टिकेल ऱ्हास. पण ह्या गोष्ट वर गर्व नको करू पण सावधान ऱ्हाय. जव परमेश्वर नि यहुदीस्वर दया नई करी ज्या स्वभाविक फांद्या सारखा शेतस, त तो तुमना वर बी दया नई कराव. परमेश्वर नि दया आणि कठोरता वर विचार कर. ज्या पळी जायेल शेतस तेस्ना वर तो कठोरता करस, पण कदी तू तेनामा बनेल ऱ्हाशी त तुनावर कृपा होत राहीन, नईत तुले बी कापामा ईन. कदी यहुदी आपला अविश्वास ले सोळी देस, त तेस्ले बी कलम ना सारखा लावामा ईन. कारण कि परमेश्वर तेस्ले परत कलम लावामा समर्थ शे. कदी तुमी स्वभाव कण जंगली जैतून ना फांद्या शेतस आणि तेना पासून कापाईसन आपला स्वभाव ना विरुद्ध असली जैतून मा कलम लावामा एयेल शेतस, त त्या जास्त सरळता कण आपला स्वभाव ना प्रमाणे आपलाच जैतून मा कलम लावामा एश्यात. ओ विश्वासी भावूसहोण, कदी अस नई हुई जावो कि तुमी स्वता ले हुशार समजी लेवोत. एनासाठे मनी ईच्छा नई शे कि तुमी ह्या रहस्य ना विषयी मा अज्ञानी राहोत कि जठ लगून बिगर यहुदी पुरी रिती कण प्रवेश नई करी लेत. तठ लगून इस्त्राएल देश ना एक भाग असाच कठोर राहीन. आणि ह्या प्रकारे पुरा इस्त्राएल देश ना लोकस्ले तारण प्राप्त हुईन, जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तारणार न येन सियोन पासून हुईन आणि तो याकोब ना वंश पासून अधर्म ले दूर करीन. आणि तेस्ना संगे मना हवू नवा करार राहीन, जव कि मी तेस्ना पापस्ले माफ करी दिसू.” तेस्नी सुवार्ता वर विश्वास नई कर एनासाठे त्या तुमना मुळे परमेश्वर ना शत्रू शेतस. पण निवाळी लेवाना भाव कण त्या पूर्वजस मुळे प्रिय शेतस. कारण कि जेस्ले परमेश्वर नि निवाळ आणि आशीर्वादित करेल शे तेस्ना प्रती तो आपला मन कदीच नई बदलत. कारण कि जसा तुमी बिगर यहुदीस्नी पहिले परमेश्वर ना आदन्यास्ले नई मान, पण आते यहुदीस्नी आदन्या नई माना मुळे तुमना वर दया करामा एयेल शे. ह्याच प्रकारे, त्या दया मुळे जी तुमना वर हुयेल शे, आते यहुदी आदन्या नई मानतस एनासाठे त्या बी परमेश्वर नि दया ले प्राप्त करी सकोत. कारण कि परमेश्वर नि सर्वा लोकस्ले आदन्या उल्लंघन ना कैदी बनाई ठेयेल शे, एनासाठे कि तो सर्वास्वर दया करो. परमेश्वर नि दया कितली महान शे. तेनी बुद्धी आणि ज्ञान कितला महान शे, तेना निर्णयस्ले कोण समजाळू सकस? तेना रस्तास्ना विषय मा कोण समजी सकस? जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “प्रभु ना मन ले कोण समजू सकस? कोण तेले सल्ला देवू सकस? काय कोणी परमेश्वर ले कदी काही दियेल शे, जो तो बदला मा काही भेटाना दावा करी सको?” सर्व काही परमेश्वर पासून, परमेश्वर ना द्वारे व परमेश्वर साठे शे. तेनी महिमा युगानयुग होत राहो. आमेन. एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले परमेश्वर नि दया आठवण देवाळीसन विनंती करस कि, आपला जीवन ले जित्ता, आणि पवित्र, आणि परमेश्वर ले आवळीन असा बलिदान चळावा. हईच तुमनी आत्मिक सेवा शे. ह्या जग ना लोकस सारखा नका बना, पण परमेश्वर ले संधी द्या कि तो तुमले मधून बदलीसन तुमना विचारस्ले नवीन करी देवो. त तुमी परमेश्वर नि चांगली, आणि तेले खुश करणारी, आणि तेनी सिद्ध ईच्छा समजाना योग्य बनश्यात. कारण कि त्या कृपा मुळे जी मले भेटेल शे. तुमना मधून प्रत्येक ले सांगस कि जस समजा ले पाहिजे तेना तून जास्त कोणी बी स्वता ले नई समजा ले पाहिजे. पण जसा परमेश्वर नि प्रत्येक ले विश्वास परिणाम ना नुसार वाटी दियेल शे. तसाच सुबुद्धी प्रमाणे स्वता ले समजो. ज्या प्रकारे आमना एक शरीर मा गैरा आंग राहातस आणि सर्वा आंगस्ना एकसारखा काम नई राहातस, त्या प्रकारे आमी, ज्या गैरा शेतस, ख्रिस्त मा एक शरीर व व्यक्तिगत रूप कण सर्वा एक दुसरा ना आंग शेतस. एनासाठे आमी त्या आल्लग-आल्लग वरदानस्ना जो परमेश्वर नि आमले कृपा कण दियेल शे वापर कराले पाहिजे. त जेले भविष्यवाणी ना दान भेटेल शे, तो विश्वास ना परिणाम ना नुसार जे काही परमेश्वर नि तेले सांगेल शे बोलाले पाहिजे. कदी दुसरास्नी सेवा कराना दान भेटेल शे, त सेवामा लागी राहाले पाहिजे, कदी कोणी शिकाळनारा होवो, त सिखाळामा लागेल राहो. जो प्रचारक शे, तो प्रचार करामा लागेल राहाले पाहिजे, दान देणारा मोक्या मन कण गरजाळूस्ले दान देवाले पाहिजे, जो पुढाकारी करस, तेले उत्साह कण कराले पाहिजे, जो दया करस, तेले खुशी कण कराले पाहिजे. प्रेम दिखावटी नको पाहिजे, वाईट कण घृणा करा आणि चांगला ले बिलगी राहा. परिवार ना सदस्य सारखा ख्रिस्ती भावू-बहिण एक दुसरास्वर प्रेम करा, आणि एक-दुसरा ना आदर करासाठे उत्सुक राहा. कठीण परिश्रम करा आणि आळशी नका बना. पुरा मन कण प्रभु नि सेवा करा. आपली आशा प्रमाणे खुश राहा, क्लेश मा स्थिर राहा, प्रार्थना मा कायम लागेल राहा. ख्रिस्ती विश्वासीस्ले जी वस्तू नि बी गरज शे, तेस्नी मदत करा, आणि पाव्हनास्नी सेवा करा. आपले त्रास देणारस्ले आशीर्वाद दया, हा तेस्ले आशीर्वाद द्या श्राप नका द्या. ज्या खुश शेतस, तेस्ना संगे खुशी करा व ज्या दुखी शेतस, तेस्ना संगे दुखी व्हा. एक दुसरास्नी सुधी लेत जावा. गर्विष्ठ नका बना, पण नम्र लोकस्नी संगतीमा राहत जावा. स्वता ले बुद्धीमान नका समजा. कदी कोणी तुमना संगे वाईट करस त तेना बदला मा तेना संगे वाईट नका करा. ज्या गोष्टी सर्वा लोकस्ना नजर मा चांगल्या शेतस त्याच कऱ्या करा. जठ लगून होवू सकस, आपला कळून सर्वास्ना संगे शांतीपूर्वक संबंध ठेवा. ओ मित्रसहोण, बदला नका लेवा, पण परमेश्वर ले संधी दया कि तो बदला लेवो. जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “बदला लेवाना मना काम शे, प्रभु सांगस मीच बदला देसू.” पण “कदी तुना वैरी भुक्या शे त तेले खावाले दे, कदी तिश्या शे त तेले पाणी पाज, कारण कि असा करा मुळे तू तेले लाजे घालशीन.” वाईट कण नका हारा, पण चांगला कण वाईट ले जिकी ल्या. प्रत्येक माणुस सरकारी अधिकारीस्ना आधीन मा राहाले पाहिजे, कारण कि सर्वा अधिकार परमेश्वर ना कळून शेतस, आणि ज्या अधिकार शेतस, त्या परमेश्वरनाच ठरायेल शेतस. एनासाठे जो कोणी अधिकार ना विरोध करस, तो परमेश्वर ना आदन्या ना विरोध करस. आणि जो कोणी असा करस तेले दंड भेटीन. ज्या चांगला काम करतस तेस्ले राज्यकर्तास पासून भ्यावानी गरज नई पण ज्या वाईट काम करतस तेस्ले राज्यकर्तास्ले भ्यावाले पाहिजे. एनासाठे कदी तू राज्यकर्तास पासून बिगर भ्यावाना राहाणा देखस, त चांगला काम कर, आणि तेस्ना कळून तुनी प्रशंसा हुईन. कारण कि त्या परमेश्वर ना सेवक शेतस ज्या तुमना चांगला साठे काम करतस. पण कदी तू वाईट करस, त तेस्ले भ्याय, कारण कि तेस्ना जोळे अधिकार शे कि त्या दंड देवो. त्या परमेश्वर ना सेवक शेतस आणि ज्या वाईट करतस तेस्ले त्या दंडीत करतस. एनासाठे तू अधिकारीस्ना आधीन ऱ्हाय, नईत फक्त परमेश्वर ना दंड नि भीती कण पण एनासाठे बी कि तुना विवेक बी तुले हईच करासाठे सांगत राहो. एनासाठे कर बी द्या कारण कि राज्यकर्ता परमेश्वर ना सेवक शेतस आणि कायम त्याच काम मा लागेल ऱ्हातस. एनासाठे प्रत्येक ना प्रती आपला कर्तव्य पुरा करत राहा, जेले कर पाहिजे तेले कर द्या, जेले जकात पाहिजे तेले जकात द्या, जेले घाबराले पाहिजे तेले घाबरा, जेना आदर कराले पाहिजे तेना आदर करा. आपस मा प्रेम ले सोळीसन आखो कोणतीच गोष्ट मा कोणाच कर्जदार नका बनज्यात, कारण कि जो दुसरा वर प्रेम ठेवस, तेनीच मोशे ना नियम ना पालन करेल शे. मोशे ना नियम मा जे लिखेल शे तेना नुसार, “व्यभिचार करजो नको, मनुष्य हत्या करजो नको, चोरी करजो नको, लालच करजो नको,” ह्या गोष्टीस्ले सोळीसन आखो कोणती बी आदन्या राहो त सर्वास्ना सारांश ह्या गोष्ट मा भेटस, “आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम ठेव.” कदी तुमी कोणावर प्रेम ठेवतस, त तुमी तेस्न वाईट नई करावतस, एनासाठे प्रेम करान पुरा मोशे ना नियम ना पालन करन शे. तुमी असच कऱ्या करा, कारण कि तुमले माहिती शे कि तुमना साठे निंद मधून जागी उठानी घळी ईजायेल शे, ज्या टाईम ले आमी विश्वास करेल होतुत, त्या टाईम ना तुलना मा आते आमना तारण जोळे शे. गैरी रात बीती जायेल शे, आणि दिन निघा वर शे, एनासाठे आणि अन्धकार ना कामस्ले सोळीसन उजाया ना हत्यार बांधील्या. जशी दिन ले शोभो, तशीच आमनी वागणूक बी पाहिजे, नईत कि कामातुरपणा आणि बेवळापणा मा, नईत व्यभिचार आणि अश्लीलता मा, आणि नईत झगळा आणि ईर्ष्या मा. पण प्रभु येशु ख्रिस्त ले कवच ना सारखा आंग मा घालील्या, आणि आपला शरीर ना पापमय स्वभाव नि वासनास्ले पुरा करा कळे ध्यान नका द्या. कदी कोणी विश्वास मा दुर्बळ शे, त तुमी तेना शंकास्वर बिगर विवाद कराना तेनी आपली संगतीमा स्वागत करा. काही लोकस्ना विश्वास शे कि सर्व काही खान उचित शे, पण जो व्यक्ती विश्वास मा दुर्बळ शे तो फक्त भाजीपालाच खास. जो व्यक्ती मांसाहारी शे तो शाकाहारी ले तुच्छ नको समजा ले पाहिजे, आणि जो शाकाहारी शे तो मांसाहारी वर दोष नको लावाले पाहिजे. कारण कि तेले परमेश्वर नि स्वीकारेल शे. तू कोण शे जो दुसरा ना दासस्वर दोष लावस? फक्त तेस्ना मालकच निर्णय करीन कि त्या सेवामा पास शेतस कि नापास. कारण कि प्रभु तेले पास करू सकस. काही लोक एक दिन ले दुसरा तून व्हाळीसन मानतस, जव कि काही मानतस कि सर्वा दिन एकसारखा शेतस. प्रत्येक झन आपला आपला धारणा माच पुरा निश्चित राहा. जो कोणी कोणता दिन ले शुभ माणस, तो तेले प्रभु ना नाव वर शुभ माणस, आणि जो खास, तो प्रभु ना नाव कण खास, कारण कि तो परमेश्वर ले धन्यवाद देस. जो खात नई तो प्रभु ना नाव वर खात नई, आणि तो बी परमेश्वर ले धन्यवाद देस. कारण कि, आमना मधून कोणी नईत स्वता साठे जगस आणि नईत स्वता आपला साठे मरस. जर आमी जित्ता राहातस, त प्रभु ना साठे जित्ता राहातस आणि जर मरतस, त प्रभु ना साठे मरतस. ह्या प्रकारे भले आमी जित्ता राहूत कि मरी जावूत, आमी प्रभु नाच शेतस. कारण कि ख्रिस्त एनासाठे मरणा आणि परत जित्ता बी हुईग्या कि तो मरेल आणि जित्ता दोनीस्ना प्रभु होवो. तव तू जो शाकाहारी शे. तू काब आपला विश्वासी भावू वर दोष लावस? आणि तू जो मांसाहारी शे, तू काब दुसरा विश्वासीले तुच्छ समजस? आमी सर्वा परमेश्वर ना न्याय सिंहासन ना समोर उभा राहासुत. कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “प्रभु सांगस, मना जीवन नि शेप्पत शे कि प्रत्येक गुळघा मना समोर टीकीन, आणि प्रत्येक जीप स्वीकार करीन कि मीच परमेश्वर शे.” तव आमना मधून प्रत्येक ले परमेश्वर ना समोर आपला-आपला लेख देन पळीन. एनासाठे आते पासून आमी एक दुसरा वर दोष लावान सोळी देवाले पाहिजे, पण आमी हय निश्चित करी लेवाले पाहिजे कि आमी कोणताच असा काम नई करावत कि जेना कण आमना विश्वासी भावू ठोकर खावो आणि पाप मा पळी जावो. मले माहित शे आणि प्रभु येशु ना शिष्य होवाना नाता कण मना विश्वास शे कि कोणतीच गोष्ट स्वता मा अशुद्ध नई शे. पण जो तेले अशुद्ध समजस तेना साठे अशुध शे. कदी तू आपला जेवण मुळे भावू ले दुख देस, त तू प्रेम नि रिती प्रमाणे नई चालत. एनासाठे आमले सावधान हुई जावाले पाहिजे आणि जेवण मुळे आपला विश्वासी भावू ना विश्वास नष्ट नई कराले पाहिजे, जेना साठे ख्रिस्त मरणा. एनासाठे जे तुमनी नजर मा तुमना साठे चांगल आणि उचित शे, तेना विषय मा दुसरास्ले निंदा करानी संधी नका द्या. कारण कि परमेश्वर ना राज्य खावा-पेवाना नई, पण तो धार्मिकता, शांती, आणि खुशी ना शे, जो पवित्र आत्मा कण भेटस. आणि जो कोणी ह्या प्रमाणे ख्रिस्त नि सेवा करस, तो परमेश्वर ले खुश करस आणि माणसस्मा ग्रहणयोग्य ठरस. आमी कायम एक दुसरा ना संगे सामंजस्य कण राहाणा प्रयत्न कराले पाहिजे आणि कायम एक दुसराले आत्मिकता मा पक्का करत राहोत. जे काही बी तुमी खातस तेना मुळे परमेश्वर ना कामस्ले नका बीगाळा. सगळ काही त खावामा येवू सकस पण असा जेवण जेले खावा कण कोले ठोकर लागस त ते चांगल नई शे. चांगल त हय शे कि तू नईत मांस खावो आणि नईत द्राक्षरस पीवो, आणि नईत काही असा करो जेना कण तुना विश्वासी भावू ठोकर खावो. तुना जो विश्वास शे, तेले परमेश्वर ना समोर आपला मनमाच ठेव. धन्य शे तो जो त्या गोष्ट मा, जेले तो चांगली समजस, स्वता ले दोषी नई ठरावत. पण जो खावाना विषय मा संक्या करस आणि तरी बी खास, परमेश्वर तेले दोषी ठरावस, कारण कि तेन हय कार्य विश्वास ना प्रमाणे नई शे, आणि जे कार्य विश्वास ना प्रमाणे नई शे, ते पाप शे. म्हणून आमी ज्या विश्वास मा पक्का शेतस, आमले फक्त आपलीच सुख-सुविधा नि नई पण दुर्बळस्नि कमजोरीस्ना बी ध्यान देवाले पाहिजे. आमना मधून प्रत्येक आपला विश्वासी भावू संगे चांगल करीसन तेले खुश करो एनासाठे कि तेना कण तेनी आत्मिक उन्नती होवो. कारण कि ख्रिस्त नि स्वता ले खुश करासाठे काहीच नई कर, पण जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तुनी निंदा करणारस्नि मनी निंदा करी.” परमेश्वर ना पुस्तक मा जे काही लिखामा एयेल शे ते आमनी शिक्षा साठे लिखामा एयेल शे, एनासाठे कि आमले धीर आणि प्रोत्साहन भेटत राहो आणि ह्या प्रकारे आमी आपली आशा सदा ठेवी सकुत. मी प्रार्थना करस कि परमेश्वर तुमले धीर आणि प्रोत्साहन देत राहो एनासाठे कि तुमी ख्रिस्त येशु नि शिक्षा प्रमाणे एक दुसरा ना संगे सामंजस्य कण राहू सकोत. एनासाठे कि तुमी एक मन आणि सूर मा मियसन परमेश्वर, आमना प्रभु येशु ख्रिस्त ना बाप नि स्तुती करी सकोत. एनासाठे जसा ख्रिस्त नि तुमले स्वीकार कर तसाच तुमी बी एक दुसराले स्वीकार करा एनासाठे कि लोक परमेश्वर नि महिमा करो. मले हय सांगण शे कि ख्रिस्त येशु ले सेवक एनासाठे बनन पळण कि तो, पूर्वजस्ले देवामा एयेल करारस्ले पुरा करीसन, परमेश्वर नि सत्यता ना प्रमाण देवू सको. आणि एनासाठे बी कि बिगर यहुदी, परमेश्वर नि दया प्राप्त करीसन, तेनी स्तुती करो. जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “ह्या मुळे मी बिगर यहुदीस्ना मधमा तुनी स्तुती करसू आणि तुना नाव नि महिमा ना गाना म्हणसू.” मंग तो सांगस, “ओ दुसरी जाती ना सर्वा लोकसहोण, तेनी प्रजा संगे खुशी करा.” परत पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “ओ दुसरी जाती ना सर्वा लोकसहोण, प्रभु नि स्तुती करा, आणि ओ राज्य-राज्य ना सर्वा लोकसहोण, तेनी प्रशंसा करा.” आणि मंग यशया सांगस, “इशाया नि एक मुय प्रकट हुईन, आणि बिगर यहुदीस्ना अधिकारी होवा साठे एक उठीन, तेनावर बिगर यहुदी जाती आशा ठेवतीन.” मी प्रार्थना करस कि परमेश्वर जो आशा ना झरा शे तुमले विश्वास करामा सर्वा प्रकार नि खुशी आणि शांती कण परिपूर्ण करो, कि पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण तुमनी आशा व्हाळत जावो. ओ मना विश्वासी भावूसहोण, मले स्वता तुमना विषय मा निश्चय माहिती शे कि तुमी बी स्वताच चांगुलपणा कण भरेल आणि सर्वा प्रकार ना ज्ञान कण भरेल शेतस, आणि एक दुसरास्ले शिकाळू सकतस. पण ह्या पत्र मा काही गोष्टी आठवण देवाळा साठे मनी तुमले हिम्मत कण लिखेल शे, आणि हय हिम्मत मले परमेश्वर नि कृपा कण भेटेल शे. कि मी बिगर यहुदीस साठे ख्रिस्त येशु ना सेवक बनीसन परमेश्वर नि सुवार्ता नि सेवा यहुदी पुजारी ना सारखा करू, एनासाठे कि बिगर यहुदी, पवित्र आत्मा ना द्वारे पवित्र करामा येवा नंतर, परमेश्वर ले समर्पित आणि स्वीकारा योग्य हुई जावोत. एनासाठे मी येशु ख्रिस्त ना मुळेच परमेश्वर नि सेवा वर गर्व करू सकस. मी फक्त त्या गोष्टीस्नी चर्चा करानी हिम्मत करसू, जेस्ले ख्रिस्त नि बिगर यहुदीस्ले विश्वास नि आधीनता स्वीकार करासाठे मना द्वारे वचन आणि कामस कण, आणि चिन्ह आणि अदभूत कामस्नी सामर्थ्य कण, आणि पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण करेल शे. आठ लगून कि मनी यरूशलेम शहर पासून त चारीस कळे इल्लूरिकम प्रांत लगून ख्रिस्त नि सुवार्ता ना प्रचार पुरा-पुरा करेल शे. मनी पहिले पासून हय ईच्छा शे कि मी ख्रिस्त येशु नि सुवार्ता असा जागास्वर आयकाळू जठे तेनी सुवार्ता प्रचार नई करामा एयेल होवो. कारण कि मी दुसरास्ना द्वारे टाकेल पाया वर बांधांना नई देखत. जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जेस्ले कदी तेना संदेश नई भेटेल होता, त्या तेना दर्शन करतीन आणि जेस्नी कदी तेना विषय मा नई आयक, त्या समजतीन.” आणि हईच कारण शे कि मी तुमना जोळे घळी-घळी येवा कण थांबेल ऱ्हायनु. पण आते मनी ह्या प्रदेशस्मा ख्रिस्त नि सुवार्ता सर्वा लोकस्ले आयकाळी दियेल शे आणि आते मना कामस साठे आखो जागा नई ऱ्हायनी, आणि गैरा वरीस पासून मले तुमना जोळे येवानी ईच्छा शे. एनासाठे जव मी स्पेन देश ले जासू त तुमना जोळे होत जासू, कारण कि मले आशा शे कि त्या प्रवास मा मनी तुमना संगे भेट हुईन, आणि जव तुमना संगे संगती करीसन मले खुशी वाटीन त तुमी मले थोळा पुळे पोहोचाळी देयज्यात. पण ह्या टाईम ले त मी परमेश्वर ना लोकस्नी मदत करासाठे यरूशलेम शहर कळे जाई ऱ्हायनु. कारण कि मासेदोनिया प्रांत आणि अखया प्रांत ना मंडळीस्नी स्वतास्ना ईच्छा कण हय निर्णय करेल शे कि त्या भेटणा रूप कण यरूशलेम शहर ना परमेश्वर ना लोकस्मा गरीब लोकस साठे काही मदत धाळोत. तेस्ना हवू निर्णय चांगल शे, पण खरज त्या यरूशलेम शहर ना परमेश्वर ना लोकस्ना कर्जदार बी शेतस. कारण कि कदी बिगर यहुदी लोक यहुदी लोकस्नी आत्मिक संपत्ती ना भागीदार होतीन. त बिगर यहुदीस्ले आपली भौतिक संपत्ती कण तेस्नी सार्वजनिक सेवा कराले पाहिजे. एनासाठे मी पहिले यरूशलेम शहर ले जाईसन जमा करेल भेट तेस्ले सोपी देसू, नंतर मी तुमना जोळे रोम शहर ले होत स्पेन देश ले जासू. मले विश्वास शे कि जव मी तुमना जोळे एसू, त ख्रिस्त ना पुरा आशीर्वाद ना संगे एसू. ओ विश्वासी भावूसहोण, आमना प्रभु येशु ख्रिस्त ना आणि पवित्र आत्मा ना प्रेम नि आठवण देवाळीसन मी तुमले विनंती करस, कि मना संघर्ष मा मनासाठे परमेश्वर ले प्रार्थना करामा मना संगे मियसन लीन राहा. आणि हय प्रार्थना करज्यात कि मी यहूदा प्रदेश ना अविश्वासीस पासून वाची राहू आणि ज्या सेवा-कार्य साठे मी यरूशलेम शहर ले जाईऱ्हायनु, तठे तठला परमेश्वर ना लोकस्ले आवळो. आणि मी खुशी कण तुमी लोकस्ना आठे पोहोचीसन परमेश्वर नि ईच्छा प्रमाणे तुमी लोकस्नी संगतीमा आराम करी सकू. परमेश्वर, जो शांती ना झरा शे, तुमना संगे राहो. आमेन. मी तुमले फिबी ना साठे जी आमनी विश्वासी बहिण आणि किंख्रिया नगर नि मंडळी नि सेविका शे, विनंती करस. प्रभु मा तीना परमेश्वर ना लोकस सारखा स्वागत करा. आणि जी गोष्ट मा तिले तुमनी गरज पळो, तीना मदत करा, कारण कि तिनी गैरास्नी आणि मनी बी गैरी मदत करेल शे. येशु ख्रिस्त मा आपल्या दोनी जोळीदार-काम करी प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला ले नमस्कार. तेस्नी मना जीव साठे आपलाच जीव धोका मा टाकी दियेल होतात, आणि फक्त मीच नई, पण बिगर यहुदीस्ना सर्वा मंडळ्या बी तेस्ना धन्यवाद करतस. तेना घर मा एकत्र होणार मंडळी ले नमस्कार. मना प्रिय अपैनत ले, जो ख्रिस्त ना साठे आशिया प्रांत ना पहिला फय शे, नमस्कार. मरियम ले, जिनी तुमना साठे गैरा परिश्रम कर, नमस्कार. मना संबंधी आणि बंदीगृह मा मना जोळीदारसहोण, अंद्रोनिकस आणि बहिण युनिया ले नमस्कार. ह्या प्रेषितस्मा प्रतिष्ठीत शेतस आणि मनातून पहिले ख्रिस्त ना शिष्य बनेल होतात. प्रभु मा मना प्रिय अंप्लियात ले नमस्कार. ख्रिस्त मा आमना सहकर्मी उर्बान आणि मना प्रिय स्ताखू ले नमस्कार. ख्रिस्त मा खरा सेवक अपिल्लेस ले आणि अरिस्तबूल ना घर मधलास्ले नमस्कार. मना संबंधी हेरोदियोन ले आणि नार्कीस ना घर मधलास्ले नमस्कार, जो प्रभु मा शे. प्रभु नि सेवामा परिश्रम करणारी त्रुफैना आणि त्रुफोसा ले नमस्कार. प्रिय पर्सिस ले नमस्कार, जिनी प्रभु नि सेवामा गैरा परिश्रम करेल शे. प्रभु ना कृपापात्र रुफस आणि तेनी माय ले, जी मनी बी माय शे, नमस्कार. असुंक्रित, फ्लगोन, हरमेस, पत्रबास आणि हरमास आणि तेस्ना संगे ऱ्हायनारा भावूस्ले नमस्कार. फिललोगस, युलिया, निरीयस आणि तेनी बहिण, आणि ओलुंपास आणि तेस्ना संगे सर्वा परमेश्वर ना लोकस्ले नमस्कार. पवित्र चुंबन कण एकमेकस्ले सलाम करा. तुमले ख्रिस्त ना सर्वा मंडळीस कळून नमस्कार. आते ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले विनंती करस, कि तुमी त्या लोकस पासून सावधान राहा, ज्या फुट पाळतस आणि दुसरास साठे पाप ना कारण बनतस. असा व्यवहार ती खरी शिक्षा ना विरुद्ध शे जी तुमले भेटेल शे. तुमी असा लोकस पासून दूर राहा. कारण कि असा लोक आमना प्रभु ख्रिस्त नि नई, पण आपला पोट नि सेवा करतस, आणि गोळ-गोळ बोलीसन सीधा-साधा मन ना लोकस्ले बहकाई देतस. प्रत्येक ले माहित शे कि तुमी परमेश्वर ना आज्ञाकारी शेतस, एनासाठे मी तुमना विषय मा खुशी करस. पण मनी हय ईच्छा शे कि तुमी चांगला साठे ज्ञानी आणि वाईट साठे भोया बनी राहा. शांती ना परमेश्वर लवकरच सैतान ना नाश करीन आणि तेले तुमना आधीन करी टाकीन. आमना प्रभु येशु नि कृपा तुमना संगे राहो. मना सहकर्मी तीमुथियुस आणि मना संबंधी लुकियस, यासोन आणि सोसिपेतर तुमले नमस्कार सांगतस. मी, तर्तियस, जेनी हय पत्र लिखेल शे. प्रभु मा तुमी लोकस्ले नमस्कार सांगस. गायस, जेना आठे मी पाव्हना शे, आणि सर्वा मंडळ्या जेना घर मा उपासना ना साठे एकत्र होतस, तेना कळून तुमले नमस्कार. एरास्त जो नगर ना भंडारी शे, आणि भावू कुर्तस्ना तुमले नमस्कार. पण आते परात्पर परमेश्वर नि आदन्या कण भविष्यद्वक्तास्ना पुस्तकस्ना द्वारे प्रगट हुई जायेल शे आणि सर्वा जाती ना लोक आयकी लीयेल शे कि त्या विश्वास करीसन आदन्या मानणारा बनी जावोत. त्याच एकमात्र बुद्धीमान परमेश्वर नि येशु ख्रिस्त ना द्वारे महिमा युगानयुग होत राहो. आमेन. मी पौल, जो परमेश्वर नि ईच्छा कण ख्रिस्त येशु ना प्रेषित होवा साठे बलावामा एयेल शे, भावू सोस्थनेस ना संगे मियसन हय पत्र, करिंथ शहर मा राहाणारा परमेश्वर नि मंडळी ना विश्वासीस्ले लिखस. म्हणजे तेस्ले ज्या ख्रिस्त येशु मा पवित्र करामा एयेल शेतस, आणि परमेश्वर ना पवित्र झन होवा साठे बलावामा एयेल शेतस. आणि तेस्ना साठे बी लिखस ज्या प्रत्येक जागा वर आमना आणि आपला प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण प्रार्थना करतस. मी प्रार्थना करस कि आमना बाप परमेश्वर आणि येशु ख्रिस्त ना कडून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो. मी तुमना साठे आपला परमेश्वर ना कायम धन्यवाद करत ऱ्हास, त्या कृपा साठे जी तेनी प्रभु येशु ख्रिस्त मा तुमले दियेल शे. कारण कि तुमी ख्रिस्त येशु मा सर्वा प्रकारे संतृष्ट करामा एयेल शेतस, म्हणजे तेनी तुमले वचन ले समजा ले आणि तेना प्रचार करानी योग्यता दियेल शे. ह्या प्रकारे परमेश्वर नि तुमना मा हय साबित करी टाक कि ख्रिस्त येशु ना विषय मा जो संदेश आमनी तुमले आयकाळ तो सत्य शे. एनासाठे, जव कि तुमी उत्सुकता कण आमना प्रभु येशु ख्रिस्त ले प्रगट होवानी वाट देखी ऱ्हायनात, त तुमना मा पवित्र आत्मा ना द्वारे देवायेल कोणती बी आत्मिक योग्यता नि कमी नई शे. तोच ख्रिस्त येशु तुमले शेवट लगून विश्वास मा पक्का बी करीन एनासाठे कि तुमी आमना प्रभु येशु ख्रिस्त ना दिन लगून निर्दोष ठरोत. परमेश्वर विश्वास योग्य शे, तेनीच तुमी लोकस्ले आपला पुत्र आमना प्रभु येशु ख्रिस्त नि संगतीमा बलायेल शे. ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले आमना प्रभु येशु ख्रिस्त ना अधिकार ना द्वारे विनंती करस कि, तुमी सर्वा आपस मा संमती कण राहा एनासाठे कि तुमना मधमा भाग नई पळो. तुमी एक-दुसरा संगे सामंजस्य करा आणि हृदय व मन कण पुरा एक हुई जावा. कारण कि ओ मना भावूसहोण, ख्लोवे ना घराणा ना लोकस्नी मले तुमना विषय मा सांगेल शे कि तुमना मा झगळा हुई ऱ्हायनात. मन सांगान अर्थ हय शे, तुमना मधून कोणी तरी हय सांगस कि, “मी पौल ना शिष्य शे,” कोणी सांगस “मी अपुल्लो ना शिष्य शे” कोणी सांगस कि “मी केफा ना शिष्य शे” कोणी सांगस कि “मी ख्रिस्त ना शिष्य शे.” तुमी ज्या असा करी ऱ्हायनात हय चांगल नई शे, काय ख्रिस्त ना हिस्सा करामा एयेल शे? काय मी पौल ले तुमना साठे क्रूस वर चळावामा उन? काय तुमले मी पौल ना नाव कण बाप्तिस्मा भेटेल शे? मी परमेश्वर ना धन्यवाद करस कि मनी ह्या दोनी भावू क्रिस्प आणि गायस ले सोळीसन तुमना मधून कोलेच बाप्तिस्मा नई दिधा. कोणी अस नई सांगू सकत कि तुमले मना शिष्य होवा मुळे बाप्तिस्मा भेटेल शे. आणि हा, मनी स्तेफन ना घरानाले बी बाप्तिस्मा दिधा, एस्ले सोळीसन मले नई माहित कि मनी आजून कोले बाप्तिस्मा दिधा. कारण कि ख्रिस्त नि मले बाप्तिस्मा देवा साठे नई, पण सुवार्ता आयकाळाले धाळेल शे. जव मी सुवार्ता आयकाळस त आपलाच शब्दस्ना ज्ञान ना वापर नई करत. कदी अस नई होवो कि लोक शब्दस्ना ज्ञान मुळे विश्वास करोत आणि ख्रिस्त नि क्रूस नि मृत्यु नि सामर्थ्य ले नई समजी सकोत. कारण कि ज्या लोक दंडीत होवा साठे परमेश्वर पासून आल्लग करामा येतीन, त्या क्रूस वर चळायेल ख्रिस्त नि मृत्यु नि शिक्षा ले वायबार समजतस. पण आमी ज्या वाचाळामा एयेल शेतस, आमले माहिती शे कि हय परमेश्वर नि सामर्थ्य ना प्रमाण शे. कारण कि पवित्र शास्त्र मा परमेश्वर सांगस, “मी ज्ञानवानस्ना ज्ञान ले नष्ट करसू, आणि समजदारस्नि समज ले तुच्छ करी देसू.” त मंग, आमी बुद्धीमानस्ना बारामा काय सांगुत? व आमी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना बारामा मा काय सांगुत? व आमी ह्या जग ना त्या लोकस्ना बारामा काय सांगुत ज्या बोलामा चतुर शेतस? परमेश्वर नि त्या सर्वास्ले येळा आणि तेस्ना ज्ञान ले व्यर्थ ठरायेल शे. मी अस एनासाठे सांगी ऱ्हायनु, कारण कि परमेश्वर नि बुद्धीमानी कण हवू निर्णय लीधा कि ह्या जग ना लोक आपला ज्ञान ना द्वारे परमेश्वर ले वयखाले असमर्थ शेतस. एनासाठे परमेश्वर ले हय चांगल वाटण कि माणसस्ना नुसार मूर्खता ना ह्या संदेश ना प्रचार ना उपयोग त्या सर्वास्ना तारण साठे करो, ज्या विश्वास करतस. यहुदीस साठे हय मूर्खता एनासाठे शे कारण कि त्या एले खर साबित करासाठे स्वर्ग मधून चिन्ह मांगतस आणि बिगर यहुदीस साठे एनासाठे कि त्या जग ना ज्ञान नि शोध करतस. पण आमी प्रचार करतस कि ख्रिस्त आमले आमना पापस पासून सोळावा साठे क्रूस वर मरणा, जो यहुदीस्ना साठे ठोकर ना कारण आणि बिगर यहुदीस साठे मूर्खता शे. पण परमेश्वर नि जेस्ले आपली प्रजा होवा साठे बलायेल होता, भले त्या यहुदी राहोत व बिगर यहुदी तेस्ना साठे हईच ख्रिस्त परमेश्वर नि सामर्थ्य व परमेश्वर ना ज्ञान शे. कारण कि जी परमेश्वर नि मूर्खता वाटस ती माणुस नि बुद्धितून जास्त बुद्धीमान शे, आणि जी परमेश्वर नि दुर्बळता वाटस ती माणुस नि शक्ती कण गैरी शक्तिशाली शे. ओ विश्वासी भावूसहोण, एना बारामा मा विचार करा कि जव तुमले परमेश्वर नि बलाव त तुमी कसा होतात. जव तुमले बलावामा उन त मानवी दृष्टीकोन कण तुमना मधून गैराच ज्ञानवान, शक्तिशाली, आणि उच्चा कुय ना नई होतात. परमेश्वर नि तेस्ले निवाळ ज्या जग नि नजर मा मूर्ख शेतस एनासाठे कि त्या ज्ञानवानस्ले लज्जित करी सकोत, आणि तेनी तेस्ले निवाळ ज्या जग ना नजर मा दुर्बळ होतात एनासाठे कि त्या शक्तीशालीस्ले लज्जित करी सकोत. परमेश्वर नि तेस्ले निवाळ ज्या जग ना नजर मा खाल्ला शे, तुच्छ शे आणि जो शेच नई एनासाठे कि त्या तेस्ले ज्या काही तरी खास समजतस, व्यर्थ ठरावो. परमेश्वर नि अस एनासाठे कर कि कोणताच माणुस तेना समोर गर्व नई करू सको. पण परमेश्वर नि तुमले ख्रिस्त येशु मा एक कर आणि ख्रिस्त ना द्वारे तेनी आमले आपला ज्ञान दिधा. परमेश्वर नि आमले आपली नजर मा धर्मी ठराव. ख्रिस्त ना द्वारे आमी पवित्र करामा उनुत आणि तेनी आमले पापस पासून सोळाव. एनासाठे, जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जर कोणी गर्व करान देखस त तो प्रभु ना करेल काम वर गर्व करो.” ओ विश्वासी भावूसहोण, जव मी परमेश्वर ना गुप्त सत्यता ले आयकाळत तुमना जोळे उनू, त मोठ्या-मोठ्या गोष्टी आणि ज्ञान ना गोष्टीस्ना प्रचार नई करनू. कारण कि जव मी तुमना संगे होतु, त मनी पक्क करी लीयेल होत कि मी येशु ख्रिस्त आणि तेनी क्रूस नि मृत्यु ले सोळीसन आखो कोणतीच गोष्ट नई समजू. एनासाठे जव मी तुमना जोळे उनू, त मी दुर्बळता आणि भीती ना संगे, आणि गैरा थरथर कापत तुमना संगे ऱ्हायना. आणि मना विरुद्ध मा प्रचार करामा माणसस्ना ज्ञान ले पटाळणाऱ्या गोष्टी नई होत्यात, पण पवित्र आत्मा नि प्रमाणित कर कि मना संदेश मा सत्यता होती. एनासाठे तुमना विश्वास, माणसस्ना ज्ञान वर नई, पण परमेश्वर ना सामर्थ्य वर निर्भर होवो. तरी बी मी, ज्ञान ना संदेश त्या लोकस्ले आयकाळस ज्या आत्मिक रूप कण पक्का शेतस. पण हय ज्ञान नईत ह्या जग ना शे आणि नईत ह्या जग वर अधिकार करणारा त्या शासकस्ना ज्या नाश होणार शेतस. ज्या ज्ञान ना बारामा आमी सांगतस, तो ज्ञान परमेश्वर ना गुप्त ज्ञान होता. आते लगून एले कोणी समजू नई सकना. पृथ्वी ना निर्मिती ना पहिलेच, परमेश्वर नि हय निर्णय लीयेल होता कि तेनी बुद्धी ना द्वारे आमनी महिमा होवो. परमेश्वर नि हय योजना ले ह्या जग ना शासक नई समजू सकनात, कारण कि कदी समजतात, त तेजमय प्रभु ले क्रूस वर नई चळावतात. तरी बी जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जो कदी डोयास कण देखामा नई उना, जो कदी कानस कण आयकामा नई उना, आणि जो माणसस्ना हृदय मा नई उतरणा, ते सर्व परमेश्वर नि तेस्ना साठे तयार ठीयेल शे ज्या तेनावर प्रेम करतस.” पण परमेश्वर नि हय रहस्य आपली पवित्र आत्मा ना द्वारे प्रेषितस्वर प्रगट कर, कारण कि आत्मा ले सर्वा गोष्टी माहिती शेतस, व परमेश्वर ना रहस्यक योजनास्नी खोलाई ले बी तपासस. माणसस मधून कोलेच कोणता माणुस ना गोष्टी नई माहित कि तो काय विचार करस, पण फक्त त्याच माणुस नि आत्मा ले सर्व काही माहिती शे जे तेना मधमा शे. ह्याच प्रकारे, फक्त परमेश्वर नि आत्मा ले परमेश्वर ना गोष्टी माहिती शे. आमले जग नि आत्मा नई भेटणी, पण आमले ती आत्मा भेटेल शे, जी परमेश्वर कळून शे, एनासाठे कि आमी त्या गोष्टीस्ले समजोत, जी परमेश्वर नि आमले उदारपणा दियेल शे. एनासाठे, आमी माणुस ना ज्ञान ना द्वारे शिकाळेल गोष्टी नईत, पण परमेश्वर नि आत्मा ना शिकाळेल गोष्टीस्ले त्या लोकस्ले समजाळतस, ज्या आत्मिक शेतस. जेना जोळे परमेश्वर ना आत्मा नई शे तो परमेश्वर नि आत्मा नि शिक्षा ग्रहण नई करू सकत, कारण कि त्या तेनी नजर मा मूर्खता ना गोष्टी शेतस, आणि नईत त्या तेस्ले समजू सकतस कारण कि ती शिक्षा नि तपासणी आत्मिक रिती कण होस. त्या लोक जेस्ले पवित्र आत्मा भेटेल शे, त्या पवित्र आत्मा ना सर्वा शिक्षास्ले समजतस. पण ज्या माणुस जोळे आत्मा नई शे तो आत्मिक माणुस नि गोष्टीस्ले नई समजू सकत. जसा पवित्र शास्त्र सांगस, कि “कारण कि प्रभु ना मन कोण जानस, कि तेले सीखाळो?” पण आमना मा ख्रिस्त ना मन शे. ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमी लोकस्ले त्या रिती कण गोष्टी नई करी सकनु जसा मी त्या लोकस संगे करस जेस्ना मा परमेश्वर ना आत्मा ऱ्हास. पण मी तुमना संगे त्या लोकस सारखा गोष्टी करनू ज्या ह्या जग ना शेतस आणि तेस्ना सारखा ज्या ख्रिस्त मा धाकला पोर शेतस. मनी तुमले परमेश्वर ना वचन कण फक्त मुल शिक्षा दिधी, आणि खोलाई ना गोष्टी नई सांगी कारण कि त्या टाईम ले ती शिक्षा ले समजा ले आणि स्वीकार करासाठे इतला पक्का नई होतात. आणि ह्या टाईम लगून बी पक्का नई शेतस. कारण कि तुमी आते लगून ह्या जग ना लोकस सारखा जीवन जगतस. एनासाठे कि जव तुमना मा मत्सर शे आणि तुमी एक दुसरास संगे झगळा करतस, त काय एना कण साबित नई होत कि तुमी ह्या जग ना शेतस, आणि तेस्ना नियम ना नुसार जगतस? एनासाठे कि जव तुमना मधून एक सांगस, कि “मी पौल ना शिष्य शे,” आणि दुसरा सांगस, “मी अपुल्लोस ना शिष्य शे,” त काय तुमी ह्या जग ना लोकस सारखा नई वागी ऱ्हायनात? अपुल्लोस कोण शे? आणि पौल कोण शे? आमी फक्त परमेश्वर ना सेवक शेतस, जेस्ना द्वारे तुमी ख्रिस्त येशु वर विश्वास कर, आमना मधून प्रत्येक झन परमेश्वर ना दियेल कामस्ले करतस. तुमी लोकस्ले परमेश्वर ना संदेश सांगणार पहिला व्यक्ती मी शे, त मी बीज पेरणार ना सारखा ठरणु. एना नंतर अपुल्लोस नि विश्वास मा पक्का होवा साठे तुमनी मदत करी, जसा कि कोणी वाळता झाड ले पाणी टाकस. पण परमेश्वर नि तुमले नवा जीवन दिधा आणि तुमले आत्मिक्ता मा वाळाई ऱ्हायना, तसाच जसा परमेश्वर झाड ले वाढावस. एनासाठे जेनी लाव आणि जेनी पाणी टाकीसन वाळाव तेना काही महत्व नई शे. पण परमेश्वर महत्वाना शे कारण कि तोच शे जो त्या झाड ले वाढावस. मनी तुमले सुवार्ता प्रचार करी आणि परमेश्वर ना वचन ले शिकाळ आणि अपुल्लोस कायम तुमले शिकाळत ऱ्हायना आणि विश्वास मा पक्का करत ऱ्हायना, पण आमी दोनीस्ना उद्देश एकच होता. पण परमेश्वर प्रत्येक व्यक्ती ले तेना परिश्रम ना नुसारच प्रतीफय दिन. कारण कि आमी परमेश्वर ना सहकर्मी शेतस आणि तुमी परमेश्वर नि शेती शेतस आणि परमेश्वर ना ईमारत शेतस. परमेश्वर नि ती कृपा नुसार जी मले देवामा एयेल शे, मी बुद्धीमान राजमिस्त्री ना सारखा त्या घर ना पाया टाका. आणि दुसरा पाया वर बांधी ऱ्हायनात, पण प्रत्येक व्यक्ती ले चौकस राहाले पाहिजे कि तो कसा बांधी ऱ्हायना. तो पाया जो पहिलेच टाकामा एयेल शे तो ख्रिस्त येशु ख्रिस्त शे, आणि कोणी दुसरा पाया नई टाकू सकस. कदी ख्रिस्ती सेवक खरी शिक्षा ले जी तेस्ले परमेश्वर पासून भेटेल शे, शिकाळतस, त त्या मिस्त्री सारखा शेतस जेनी त्या पाया वर चांगला प्रकार नि सामग्री कण बांधकाम करेल शे, जस कि सोन, चांदी आणि मोलवान दघळ ना बांधकाम. पण जर त्या खोटी शिक्षा देतस, त त्या त्या मिस्त्री सारखा शेतस खराब प्रकार नि सामग्री कण बांधकाम करेल शे, जस कि लाकळ, गवत व पेंढ्या कण बांधकाम. पण न्याय ना दिन जव ख्रिस्त परत ईन, त ती आग प्रत्येक व्यक्तीस्ना कामस्ले प्रगट करीन. ती आग प्रत्येक कामस्ले परखीन कि कसा शे. त्या पाया वर जे काही बनावामा उन जर ते आग कण वाची जास, त त्या मिस्त्री ले प्रतीफय भेटीन. पण कदी कोणा काम पेटी जाईन त तो नुकसान उचलीन. पण तो असा वाचीन, जसा कोणी आग ले पार करीसन वाची जास. निश्चित तुमले माहिती शे कि तुमी परमेश्वर ना मंदिर शेतस आणि परमेश्वर नि आत्मा तुमना मा ऱ्हास. आणि जो कोणी परमेश्वर ना लोकस्नी एकता ले नाश करीन, परमेश्वर तेले नाश करीन. कोणी स्वता ले धोका नई देवो. कदी तुमना मधून कोणी ह्या जग ना लोकस्नी नजर मा सजदार शेतस, त तो जग ना लोकस्नी नजर मा मूर्ख बनो एनासाठे कि तो परमेश्वर नि नजर मा ज्ञानी बनी जावो. कारण कि ह्या जग ना लोक जेले ज्ञान समजतस खर तर तो परमेश्वर नि नजर मा मूर्खता शे. जस कि पवित्र शास्त्र सांगस, “तो ज्ञानीस्ले चतुराई मा फसाळी देस.” पवित्र शास्त्र परत सांगस, “प्रभु ले माहिती शे कि ज्ञानीस्ना विचार, व्यर्थ शेतस.” एनासाठे, कि माणुस नि प्रेरणा ना अनुसरण करावर गर्व नई कराले पाहिजे, कारण कि सर्व काही तुमनच शे. जस कि, पौल, अपुल्लोस, केफा (पेत्र), ह्या जग मा जे काय शे, जीवन, मरण, वर्तमान व भविष्य, हय सर्व काय तुमन शे, आणि तुमी ख्रिस्त ना अधिकार मा शेतस आणि ख्रिस्त परमेश्वर ना अधिकार मा शे. लोक आमले ख्रिस्त ना सेवक आणि परमेश्वर ना कारभारी म्हणजे सुवार्ता ना रहस्यमय सत्यता ले समजाळनारा समजोत. मंग कारभारी मा हय गोष्ट देखामा एस, कि तो तेना मालक ना द्वारे देवायेल कामस्ना प्रती विश्वास योग्य राहो. पण मी चिंता नई करत कि तुमी व दुसरा लोक मले विश्वास योग्य सांगतस कि नई. पण मी बी नई सांगत कि मी विश्वास योग्य शे कि नई. कारण मना विवेक मले कोणत्याच गोष्ट मा दोषी नई ठरावस, पण एना कण मी निर्दोष नई ठरत, कारण कि मले पारखनार प्रभु शे. एनासाठे जठ लगून प्रभु नई येत तठ लगून कोणी कोले नई परखो, तोच सर्वा माणसस्ले उघाळामा सांगीन जे कोलेच नई माहिती. तो तेस्ना हृदय ना उद्देशस्ले प्रगट करीन, तव परमेश्वर ना कळून प्रत्येक नि प्रशंसा हुईन. ओ विश्वासी भावूसहोण, मी जे सांगी ऱ्हायनु तेले समजाळा साठे मनी आपली कळे अपुल्लोस नि चर्चा दाखला नि रितीवर करेल शे. तुमी उदाहरण सिखाले पाहिजे कि पवित्र शास्त्र मा लिखेल गोष्टीस पासून पुळे नई जावाले पाहिजे. तव तुमी गर्व कण आमना मधून एक ले दुसरा ना विरोध मा नई ठेवावत. कारण कि कोणी तुमले कोणा कण खास नई बनाव. सर्व काही जे तुमना जोळे शे ते परमेश्वर ना द्वारे तुमले देवामा एयेल शे. जव कि सर्व काही जे तुमना जोळे शे तुमले परमेश्वर पासून भेटेल शे, त तुमले गर्व कराना कोणताच अधिकार नई. तुमी विचार करतस कि सर्व काही तुमनापा शे जे तुमनी आत्मिकता ना साठे गरज न शे. तुमी विचार करतस कि तुमना जोळे पहिले पासून त्या सर्वा खास गुण शेतस ज्या पवित्र आत्मा लोकस्ले देस. तुमी विचार करतस कि तुमी पहिले पासून आमना बिगर राजा ना सारखा राज्य कराले लागेल शेतस, मले गैरी खुशी होती एनासाठे कि आमी बी तुमना संगे राज्य करतुत. मनी समज मा परमेश्वर नि आमी प्रेषितस्ले त्या लोकस सारखा सर्वास्ना शेवटला जागा वर ठीयेल शे, जेस्नी उघळपणे मृत्यु नि आज्ञा हुई जायेल होवो. कारण कि आमी सर्वा स्वर्गदूत आणि माणसस्ना जग साठे तमाशा ठरेल शेतस. ख्रिस्त ना प्रचार करा मुळे लोक आमले मूर्ख समजतस, पण तुमी चुकी कण समजतस कि तुमी बुद्धीमान शेतस. कईक लोक असा विचार करतस कि आमले काही अधिकार नई शे, पण तुमी गर्व कण सांगतस कि तुमना मा परमेश्वर नि सामर्थ्य शे. लोक आमना आदर नई करतस पण त्या तुमना आदर करतस. आमी ह्या घळी लगून भुक्या-तिश्या शेतस आणि आमना कपळा बी फाटी जायेल शेतस, आमी मार खातस आणि आमना जोळे घर बी नई शे. आणि आपलाच हातस्ना काम करीसन परिश्रम करत ऱ्हातस. लोक आमले वाईट सांगतस आणि आमी तेस्ले आशीर्वाद देतस, त्या आमले त्रास देतस आणि आमी सहन करतस. जव त्या आमले बदनाम करतस, आमी तेस्ले नम्रता कण उत्तर देतस. आठ लगून कि लोक आते आमना आदर नई करतस, त्या सांगतस कि आमना काही महत्त्व नई. मी तुमले लज्जित करासाठे ह्या गोष्टी नई लिखत, पण मी तुमले सुधारा ना उद्देश कण मना प्रिय पोरस समजीसन सावधान करस. कारण कि जरी जर ख्रिस्त मा तुमना सिखाडणारा दहा हजार बी ऱ्हातात, तरी बी मी तुमना बाप सारखा शे, कारण कि तुमना लगून सुवार्ता लयणार पहिला व्यक्ती मीच शे, जेना परिणाम स्वरूप तुमनी ख्रिस्त येशु वर विश्वास कर. एनासाठे मी तुमले सांगस कि मनी वागणूक ना अनुकरण करा. एनासाठे मनी तीमुथियुस ले जो मना प्रिय आणि विश्वास योग्य पोऱ्या शे, तुमना जोळे धाळेल शे आणि तो तुमले सांगीन कि मी येशु ख्रिस्त ना समर्थक होवा मुळे काय करस आणि कसा जीवन जगस, जेना हिसाब कण मी सर्वा जागास्वर प्रत्येक मंडळी मा शिक्षा देस. तुमना मधमा काही लोक शेतस ज्या असा विचार करतस कि मी तुमले भेटाले नई येवाव, आणि एनासाठे त्या गर्विष्ठ बनी जायेल शेतस. पण जर प्रभु नि ईच्छा अशीन त मी तुमना जोळे लवकरच येसू, तव नईत फक्त त्या गर्विष्टस्नि शिक्षा पण तेस्नी सामर्थ्य ले बी समजी जासू. कारण कि परमेश्वर ना राज्य लोकस्ना जीवन मा तेस्ना कार्य ना द्वारे दिखस, नई कि तेस्ना गोष्टीस्ना द्वारे. जव मी येवू त तुमनी काय ईच्छा शे कि मी करू? कदी तुमनी तुमना वाईट रस्तास्ले नई सोळेल शे, त मी तुमले दंड देसू, आणि कदी तुमनी तुमना वाईट रस्तास्ले सोळी टाकेल शे, त मी तुमना संगे प्रेम व नम्रता कण वागसू. मनी लोकस्ले तुमना बारामा गोष्टी सांगतांना आयकेल शे, कि तुमनी मंडळी मा काही लोक व्यभिचार मा पळी जायेल शेतस, असा व्यभिचार जो अविश्वासीस्मा बी नई राहत, कि एक माणुस आपली सावत्र माय संगे संबंध ठेवस. ह्या गोष्टीस्ना विषय मा तुमले उदास आणि शोकित होवाले पाहिजेल होत आणि ज्या माणुस नि असा काम करेल शे तेले मंडळी मधून काळी देवाले पाहिजेल होत, पण तुमी असा करान सोळीसन गर्व व्यक्त करतस. जरी मी तुमना संगे तठे नई होतु, पण मना मन मा समजा मी तठे उपस्थित ऱ्हायसन असा काम करणार माणुस ना विषय मा न्याय करी टाकेल शे. तुमले बी असच करानी गरज शे, कि तुमी, आणि मना मन एकत्र हुईसन, आमना प्रभु येशु नि सामर्थ्य ले वयखीसन, असा माणुस्ले आमना प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण, तेना पापमय स्वभाव ना विनाश साठे सैतान ना हातस्मा सोपी देवूत, एनासाठे कि तो पश्चाताप करो. आणि कदी तो पश्चाताप करस त तो त्या दिन वाचाळामा ईन जव प्रभु न्याय करीन. गर्व करान बंद करा, तुमले माहिती शे, कि थोळासा खमीर, पुरा गुंथेल पीठले खमीर करी देस. एनासाठे तुमी जुना पाप ना खमीर ले काळी द्या, एनासाठे कि तुमी पुरा युध्द हुई जावोत. तव तुमी बिगर खमीर ना नवा गुंथेल पीठ ना सारखा बनी जाश्यात, जसा कि मले निश्चित पणे माहिती शे कि तुमी शेतस. कारण कि ख्रिस्त आमले पापस पासून सोळावा साठे मरी ग्या आणि तो त्या अर्पण होणारा मेंडरू सारखा शे जेले यहुदी लोक वल्हांडण सन ना जेवण साठे अर्पण करतस. एनासाठे या आमी वल्हांडण ना सन ले साजरा करूत. वल्हांडण ना टाईम ले यहुदी लोक आपला घरस मधून खमीर ले काळीसन बाहेर फेकतस. त्याच प्रकारे आमी विश्वासी बनाना पहिले जसा व्यवहार कऱ्या करत होतुत तसा आते कराले बंद करी द्या. वल्हांडण ना टाईम ले यहुदी लोक बिगर खमीर नि भाकर खात होतात, त्याच प्रकारे आमी परमेश्वर ना लोकस सारखा व्यवहार करोत, आमना जीवन मा कोणतीच वाईट वागणूक नई राहाले पाहिजे. म्हणजे आमी इमानदारी कण ख्रिस्त ना अनुकरण करणारा बनी जावोत, आणि कपट कण कोणतीच वाईट गोष्ट आमना मन मा दपेल नई राहो. मनी तुमले, मना पहिला पत्र मा तुमले लिखेल शे, कि व्यभिचारीस्नि संगती नका करज्यात. मन सांगान अर्थ हय नई कि तुमी बिलकुल ह्या जग ना व्यभिचारीस, व लोभी, व धोका देनारस, व मूर्ती-पूजकस्नि संगती नका करा, कारण कि ह्या दशा मा त तुमले जग मधून निघी जावान पळत. पण मन सांगान अर्थ हय शे, कि तेस्ना संगे संगती नका करा ज्या स्वता ले विश्वासी सांगतस पण तरी बी व्यभिचार करतस, लोभी शेतस, मूर्ती-पूजक शेतस, गाया देणार शेतस, बेवळा शेतस, आणि धोका देणारा शेतस, असा लोकस संगे जेवण कराले बी नका बसा. कारण कि बाहेर ना अविश्वासीस्ना न्याय करानी जबाबदारी मनी नई शे. पण तुमी निश्चितच आपली मंडळी ना समूह ना लोकस्ले दाटा आणि तेस्ले शिस्तीत करा. पण बाहेर ना अविश्वासीस्ना न्याय परमेश्वर करस. एनासाठे जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे “आपला मधून कुकर्मी व्यक्ती ले काळी द्या.” कदी तुमना मधून कोणी विश्वासी ना दुसरा विश्वासी संगे मुकदमा राहो, त तुमी निर्णय साठे अधर्मी न्यायीस कळे नका जायज्यात. तुमी आपली मंडळी ना विश्वासीस्ले न्याय करासाठे सांगा, कि तुमना मधून कोण बरोबर शे. निश्चित तुमले माहिती शे कि भविष्य मा परमेश्वर ना लोक ह्या जग ना लोकस्ना न्याय करतीन. एनासाठे निश्चित रूप कण तुमी आपला मधला धाकला तून धाकला झगळास्ना न्याय करासाठे योग्य बनी जावा. तुमले माहिती शे कि भविष्य मा आमी स्वर्गदूतस्ना न्याय करसुत, त निश्चितच आमी आपला जीवन ना साध्या गोष्टीस्ना बी न्याय करू सकतस. कदी असा संसारिक गोष्टी तुमना जोळे येतस, त तुमी येणा न्याय करासाठे त्या लोक जोळे नका जायज्यात, जेस्ना मंडळी ना लोकस्मा काहीच आदर नई. तुमले लाज वाटाले पाहिजे, निश्चित तुमना मधमा कोणी एक समजदार व्यक्ती शे जो आपला संगी विश्वासी भावूस्ना न्याय करू सकस. पण अस करान सोळीसन, एक विश्वासी भावू दुसरा विश्वासी भावू ना विरुद्ध न्यायालय मा जातस आणि अविश्वासीस्ले आपला न्याय करू देतस. पण खर हय शे, कि तुमी आपस मा मुकदमा करतस आणि एना कण हय सिद्ध होस कि तुमी ख्रिस्ती जीवन ले जगा मा पुरा हारी जायेल शेतस. काय तुमना साठे हय चांगल नई होवाव कि तुमी अन्याय ले सहन करी लेवोत? काय तुमना साठे हय चांगल नई होवाव कि तुमी नुकसान उचली लेवोत? एले सोळीसन तुमी दुसरास संगे अन्याय करतस आणि नुकसान पोहोचाळतस, आणि अस तुमी आपलाच विश्वासी भावूस संगे करतस. तुमले हय माहिती शे कि अन्यायी लोक परमेश्वर ना राज्य ना वारीस नई होवावत. कोणी तुमले धोका नई देवू सको, त्या लोक ज्या वेश्यागामी करतस, मूर्ती-पूजक शेतस, व्यभिचार शेतस, लबाळ शेतस, पुरुषगामी शेतस, चोर शेतस, लोभी शेतस, बेवळा शेतस, गाया देणारा शेतस, धोका देणारा शेतस, असा लोक परमेश्वर ना राज्य ना वारीस नई होवावत. तुमना मधून कितलाक त पहिले असाच होतात, पण प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण आणि आमना परमेश्वर नि आत्मा कण तुमना पाप धोयामा एयेल शेतस, तुमी पवित्र करामा एयेल शेतस आणि धर्मी ठरावामा एयेल शेतस. तुमना मधून कोणी सांगस, कि मले सर्व काही करानी परवानगी शे. हा शे, पण सर्व काही तुमना साठे फायदान नई. मी सांगू सकस कि मले सर्व काही करानी परवानगी शे, पण मी कोणतीच गोष्ट ना गुलाम नई बनाव. कोणी सांगस, जेवण आपला शरीर ना साठे, आणि शरीर जेवण ना साठे. हा हय खर शे, पण परमेश्वर शरीर आणि जेवण दोनीस्ना नाश करीन. शरीर व्यभिचार ना साठे नई शे, पण प्रभु नि सेवा साठे शे, आणि प्रभु शरीर ना गरजस्ले उरावस. आमना शरीर महत्वपूर्ण शे, कारण कि जस परमेश्वर नि आपली सामर्थ्य कण प्रभु येशु ख्रिस्त ले मरेल मधून परत जित्ता कर, तसाच तो आमले बी जित्ता करीन. निश्चित तुमले माहिती शे, कि तुमना शरीर ख्रिस्त ना शरीर शे. त काय मी ख्रिस्त ना आंग ले लिसन तेस्ले वेश्यास्ना आंग बनावू? कदीच नई. तुमले निश्चितच माहिती शे, कि जो कोणी वेश्या नि संगती करस, तो तीना संगे एक तन हुई जास, कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “त्या दोनी एक तन होतीन.” पण जो प्रभु ना संगे संगती करस, तो तेना संगे एक आत्मा हुई जास. व्यभिचार नका करा. कोणी बी असा पाप जो माणुस करस तेना प्रभाव तेना शरीर वर नई पळत, पण व्यभिचार करणारा व्यक्ती आपलाच शरीर ना विरुद्ध मा पाप करस. निश्चितच तुमले माहिती शे, कि तुमना शरीर पवित्र आत्मा ना मंदिर शे, जो तुमना मा बसेल शे आणि तुमले परमेश्वर कळून भेटेल शे, आणि तुमी आपला नई शेतस पण परमेश्वर ना शेतस. कारण कि परमेश्वर नि तुमले दाम दिसन विकत ली लीयेल शे, एनासाठे परमेश्वर नि महिमा साठे आपला शरीर ना उपयोग करा. आते त्या प्रश्नस्ना विषय मा ज्या तुमनी आपला पत्रस्मा विचारेल शेतस, काय आमना साठे हय चांगल शे कि आमी लग्न नई करोत? पण व्यभिचार पासून वाचा साठे, मी सल्ला देस कि प्रत्येक माणुस लग्न करो आणि आपली नवरी संगे विश्वास योग्य राहो, आणि प्रत्येक बाई आपला नवरा संगे विश्वास योग्य राहो. नवरा होवा मुळे माणुस आपला कर्तव्यस्ले पुरा करो, तशीच बाई बी नवरी ना रूप मा आपला कर्तव्यस्ले पुरा करो. नवरीले आपला शरीर वर अधिकार नई पण तीना नवरा ना अधिकार शे, तसच नवराले बी आपला शरीर वर अधिकार नई, पण नवरीले शे. तुमी एक दुसरा पासून आल्लग नका राहा, पण काही टाईम साठे कि आपली सम्मती कण प्रार्थना ले संद्धी भेटो, आणि परत नवरा-नवरी ना सारखा एकत्र राहा, अस नई हुई जावो कि, तुमना संयम मुळे सैतान तुमले परखो. पण मी जो हय सांगी ऱ्हायनु ती आज्ञा नई पण सल्ला शे. मनी ईच्छा शे, कि जसा मी अविवाहित शे, तसाच सर्व माणस राहोत, पण प्रत्येक ले परमेश्वर ना कळून खास वरदान भेटेल शेतस, कोले परमेश्वर ना कळून विवाहित होवाना आणि कोले अविवाहित राहाणा वरदान भेटेल शे. पण मी अविवाहित आणि विधवास्ले हय सल्ला देस, कि तेस्ना साठे ना विषय मा सांगस कि एस्ना साठे अविवाहित राहाणच चांगल शे, जसा मी शे. पण कदी त्या आपल्या ईच्छास्वर नियंत्रण नई ठेवू सकतस त, तेस्ले लग्न करी लेवाले पाहिजे, कारण कि लग्न करान कामतर राहा पेक्षा चांगल शे. जेन लग्न हुईजाएल शे, तेस्ले मी नई, पण प्रभु येशु आदन्या देस, कि नवरी आपला नवराले फारकती नई देवो. आणि जर ती फारकती देस, त बिगर दुसरा लग्न नि राहो, किंवा आपला नवरा संगे समजोता करी लेवो, आणि नईत नवरा आपली नवरीले फारकती देवो. दुसरास्ले प्रभु नई, पण मीच सांगस, कदी कोणी विश्वासी भावू नि नवरी प्रभु येशु वर विश्वास नई करत आणि तेना संगे राहाले खुश शे, त तो विश्वासी भावू तिले फारकती नई देवो. आणि जी विश्वासी बाई ना नवरा प्रभु येशु वर विश्वास नई करत, आणि तीना संगे राहाले खुश हो, त ती विश्वासी बाई तेले फारकती नई देवो. कारण कि परमेश्वर अविश्वासी नवरा ना संगे आपला लोकस्ना सारखाच वागस, कारण कि तेनी नवरी ख्रिस्ती शे. तसाच परमेश्वर अविश्वासी नवरी ना संगे आपला लोकस सारखाच वागस, कारण कि तीना नवरा ख्रिस्ती शे. कदी अस नई होत त तुमना पोर-सोर अशुद्ध होतात, पण आते त पवित्र शेतस. पण जो माणुस विश्वास नई करत, कदी तो फारकती देस त तेले दिवू ह्या, अशी स्थिती मा कोणी बी विश्वासी नवरा व नवरी लग्न ना बंधन पासून मुक्त शेतस, कारण कि परमेश्वर नि त आमले शांती कण जीवन जगाले बलायेल शे. ओ नवरीसहोण, आठवण ठेवा कि तुमना मुळे तुमना नवरा ना तारण होवू सकस. तसाच नवरासहोण, आठवण ठेवा कि तुमना मुळे तुमनी नवरीस्ना तारण होवू सकस. जे मी सांगी ऱ्हायनु तेना सार हवू शे, कि प्रत्येक व्यक्ती ले त्या स्थिती मा राहाले पाहिजे जेनामा प्रभु नि तेले ठीयेल शे, हय तीच स्थिती शे, जेना कण तुमी परमेश्वर ना लोक होवा साठे बलावामा एयेल शेतस. आणि मी प्रत्येक ख्रिस्ती मंडळी ले असच कराले सांगस. कदी कोणी सुंता करेल माणुस प्रभु येशु वर विश्वास करस, त तेले आपला सुंता नि निशाणी ले लपाळानी गरज नई शे. तसाच कदी कोणी बिगर सुंता ना माणुस प्रभु येशु वर विश्वास करस, त तेले सुंता करानी गरज नई. कारण कि भले माणुस सुंता करेल राहो कि बिगर सुंता ना राहो तेना कण काहीच फरक नई पळत, परमेश्वर नि आदन्यास्नाच पालन करान महत्वान शे. प्रत्येक झन त्याच दशा मा राहो, ज्या दशा मा तेले बलावामा एयेल शे. जर तू ख्रिस्त येशु वर विश्वास करतांना दास नि दशा मा होता, त निराश नको हुईजो, पण कदी तुले स्वतंत्र होवानी संद्धी भेटस, त त्या संद्धी ना फायदा उचल जो. कारण कि जेले दास नि दशा मा बलावामा एयेल होत, तेले प्रभु येशु ना द्वारे स्वतंत्र करामा एयेल शे आणि तसाच जेले स्वतंत्र नि दशा मा बलावामा एयेल शे, तो ख्रिस्त ना दास शे. परमेश्वर नि तुमले मोठा दाम दिसन विकत लीयेल शे, एनासाठे माणसस्ना दास नका बना, पण परमेश्वर ना दास बना. ओ विश्वासी भावूसहोण, जी दशा मा तुमनी परमेश्वर ले स्वीकार कर, तीच दशा मा तेना संगे संगतीमा सदा राहा. कुवारीस्ना विषय मा प्रभु नि काही आदन्या मले नई भेटणी, पण विश्वास योग्य होवा साठे जशी दया प्रभु नि मनावर करेल शे, तेनाच नुसार मी तुमले सल्ला देस. कारण कि ह्या दिनस्मा विश्वासीस्ना प्रत्येक जागास्वर छळ हुई ऱ्हायना, एनासाठे मना सल्ला शे कि बिगर लग्न ना लोक बिगर लग्न नाच राहोत. जर तू विवाहित शे, त विवाह मा बनेल ऱ्हाय. आणि कदी तू बिगर लग्न ना शे, त लग्न नको करू. पण तू लग्न करस, त तुमी कोणता पाप नई कर, आणि कदी कोणती कुवारी पोर लग्न करस त तिनी कोणता पाप नई कर. पण लग्न करेल लोक ह्या जग मा दुख सहन करतीन, आणि मनी ईच्छा शे कि तुमी असा संकटस पासून वाचोत. ओ विश्वासी भावूसहोण, मनी हय सांगानी ईच्छा शे कि ख्रिस्त ले परत येवामा आते जास्त टाईम ऱ्हायेल नई शे. ह्या मुळे, कदी तुमना जोळे बायको राहो कि नई राहो एनी जास्त चिंता नका करा, पण परमेश्वर नि सेवा करासाठे विचार करत राहा. ज्या रळनारा, खुशी साजरा करणारा आणि विकत लेणारा शेतस, तेस्ले ह्या सर्वा गोष्टीस्ना बारामा जास्त चिंता नको कराले पाहिजे. आणि जे काही ह्या जग मा आमना जोळे शे, आणि तेस्ले गैरा जास्त महत्वान नई समजा ले पाहिजे. कारण कि जे काही ह्या जगन शे ते चालन जाईन. मनी ईच्छा हय शे कि तुमी संसारिक जीवन ना वासनास पासून मुक्त राहोत बिगर लग्न ना माणुस ह्या गोष्ट नि चिंतामा ऱ्हास कि प्रभु नि सेवा कशी करू आणि कसा तेले खुश ठेवू. पण लग्न करेल माणुस जग ना गोष्टीस्नी चिंतामा ऱ्हास, कि आपली बायको ले कोणत्या प्रकारे खुश ठेवू. एनासाठे दोन गोष्टी शेतस जेना बारामा तो विचार करस, कि तो कसा परमेश्वर ले खुश ठेवू आणि कसा आपली बायको ले खुश ठेवू. लग्न करेल आणि लग्न नई करेल मा बी फरक शे. बिगर लग्न नि आणि कुवारी बाई प्रभु नि सेवा नि चिंतामा ऱ्हास, एनासाठे कि ती शरीर आणि आत्मा मा पवित्र राहो, पण लग्न करेल बाई संसार नि जबाबदारीस्नि चिंतास्मा ऱ्हास, कि आपला नवराले खुश ठेवो. मी हय गोष्ट तुमनाच चांगला साठे सांगस, नई कि मी तुमना वर कोणता जबरजस्ती कराना देखस. पण मनी ईच्छा शे कि तुमी ते करा जे बरोबर आणि चांगल शे, आणि एक चित्त हुईसन पूर्णपणे परमेश्वर नि सेवामा लागेल राहा. कदी कोले हय वाटस कि तो आपली पोर ना लग्न ना साठे उशीर कराना द्वारे तीना संगे अन्याय करी ऱ्हायना, कारण कि तिनी वय चालनी जाई ऱ्हायनी, त तो तेच करो, जे तो चांगल समजस तो तिले लग्न करू देवो. हय कोणता पाप नई शे. पण कदी कोणी मन मा निर्णय लेस, कि तेनी पोर ना लग्न नई करान चांगल शे आणि महत्वान नई शे, आणि तो आपला ईच्छास्ले नियंत्रण मा लयु सकस, त तो तेना लग्न नई कराईसन चांगल करस. त जो आपली कुवारी पोर न लग्न करी देस, तो चांगल करस, आणि जो आपली कुवारी पोर ना लग्न नई करी देत तो बी चांगल करस. जठ लगून कोणती बाई ना नवरा जित्ता ऱ्हास, तठ लगून ती तेना संगे विवाहिक संबंध मा बांधायेल शे, पण जव तीना नवरा मरी जास, त जेना कण तिनी ईच्छा शे लग्न करू सकस, पण तेनाच संगे जी ख्रिस्ती विश्वासी शे. पण जर ती बिगर लग्न नि राहो, त मना विचार कण ती आखो बी सुखी राहीन. आणि मी समजस, कि जे मी सांगी ऱ्हायनु ते परमेश्वर नि आत्मा नि प्रेरणा ना द्वारे सांगी ऱ्हायनु. तुमी आपला पत्र मा मूर्तीस्ले बलिदान करेल जेवण ना बारामा मले विचार, आमी सर्वास्ले ह्या विषय ना बारामा ज्ञान शे. पण ज्ञान आमना मा गर्व उत्पन्न करस, जव कि प्रेम आमले दुसरास्नी मदत कराले शिकाळस. कदी कोणी समजा कि तेले काही माहिती शे, त तेले जस माहिती पाहिजे तस आते लगून नई माहिती. पण कदी कोणी परमेश्वर वर प्रेम ठेवस, त परमेश्वर तेले वयखस. एनासाठे, मी मूर्ती ना समोर बलिदान करेल जेवण ले खावाना विषय मा विचारेल प्रश्न ना उत्तर देसू. आमले माहिती शे कि मूर्ती खरज कोणताच देव नई शे, आणि फक्त एकच जित्ता परमेश्वर शे. जरी आकाश आणि पृथ्वी वर गैरा शेतस जेस्ले लोक ईश्वर आणि प्रभु सांगतस. तरी बी आमना साठे त एकच परमेश्वर शे. म्हणजे परमेश्वर जो सर्वा वस्तूस्ले बनावनार शे आणि आमी तेनाच साठे जगतस, आणि फक्त एकच प्रभु शे, म्हणजे प्रभु येशु ख्रिस्त, जेना द्वारे सर्वा वस्तू बनावामा उनात, आणि आमी तेनाच द्वारे जित्ता शेतस. पण आमना काही विश्वासी भावूस्ले हय नई माहिती कि मूर्तीस्मा काहीच सामर्थ्य नई शे. कारण कि पहिले त्या त्या मूर्तीस्नी स्तुती कऱ्या करत होतात, पण जव आते त्या मूर्तीस्ले बलिदान करेल जेवण ले खातस, त त्या चुकी कण असा विचार करतस कि त्या आते त्या मूर्तीस्नी स्तुती करी ऱ्हायनात. बरोबर आणि चुकीना ले समजाना तेस्ना विवेक कमजोर हुई जायेल शे, आणि एनासाठे त्या विचार करतस कि त्या जेवण ले खाईसन अशुद्ध हुई जायेल शेतस. जेवण आमले परमेश्वर ना नजीक नई पोहोचाळत, कदी आमी नई खावावत त आमना काही नुकसान नई, आणि कदी खासुत बी तरी काही फायदा नई. पण सावधान राहा, अस नई होवो, कि तुमनी हय स्वतंत्रता काही दुर्बळ लोकस्ना साठे ठोकर ना कारण बनी जावो. कारण कि कदी कोणी माणुस जेना ह्या बारामा विवेक कमजोर शे, तुमी ज्ञानीस्ले मूर्ती ना मंदिर मा जेवण करतांना देखोत, त काय तेना विवेक मा मूर्ती ना समोर अर्पण करेल वस्तूस्ले खावानी हिम्मत नई होवाव? आणि एनासाठे तो विश्वासी भावू जेना विवेक कमजोर शे, जेना साठे ख्रिस्त मरणा, तुना ह्या ज्ञान मुळे तो नाश हुई जाईन. आणि ह्या प्रमाणे तुमी त्या विश्वासी भावूस्ना विरुद्ध अपराध करीसन तेस्ना दुर्बल विवेक ले दुखाळतस, आणि अस करीसन तुमी ख्रिस्त ना विरुद्ध पाप करतस. एनासाठे, कदी मूर्तीस्ले चळावामा एयेल जेवण खावा कण कोणी विश्वासी भावू ना विश्वास ले ठेच पोहोचस, त मी त्या प्रकार ना जेवण कदीच नई खावाव, एनासाठे कि मी कोणी विश्वासी भावू ना विश्वास ले ठोकर खावाळा ना कारण नई बनू. मनी जे काही करान ईच्छा शे ते करासाठे मी स्वतंत्र शे, मी प्रेषित शे, मनी आपला प्रभु येशु ले देखेल शे, तुमी मना काम ना प्रतीफय शेतस जो मनी प्रभु ना साठे करेल शे. कदी दुसरा लोक नई मानतस कि मी प्रभु येशु ना प्रेषित शे, पण तुमी लोक म्हणाले पाहिजे. कारण कि मीच शे जो तुमना लगून सुवार्ता ले लिसन उनू, प्रभु येशु ख्रिस्त वर तुमना विश्वास कण हय स्पष्ट हुई जास कि मी ख्रिस्त ना प्रेषित शे. ज्या लोक मनी प्रेषिताई ना अधिकार वर प्रश्न उचलतस, तेस्ना साठे मना हवूच उत्तर शे. बर्णबा आणि मले खावा-पिवाना अधिकार शे. आमले हवू अधिकार शे, कि आमी कोणी तरी ख्रिस्ती विश्वासीनी संगे लग्न करीसन तिले संगे लिसन फिरोत, जसा दुसरा प्रेषित आणि प्रभु ना भावू आणि केफा (पेत्र) करतस. काय मले आणि बर्णबा लेच जीवन जगाले काम कराले पाहिजे? एक सैनिक ले कदी बी आपला खर्च स्वता ले नई देन पळत. कोणी बी माणुस असा नई शे जो द्राक्षमया लावस आणि तीना मधला फय नई खावो, कोणी बी माणुस असा नई शे जो मेंढ्यास्नी राखोई करस आणि तेना दुध नई पिवाव. मी ह्या गोष्टी माणसस्ना रितीस्वर नई बोलत. मोशे ना नियम बी असाच सांगस, मोशे ना नियम मा लिखेल शे, “धान्य नि मळणी करतांना बईल ना तोंड वर मुकसा घालज्यात नका.” काय तुमी असा विचार करतस कि परमेश्वर फक्त बईलस्निच चिंता करस? नई. तो खास करीसन आमना साठे सांगस. हा, आमना साठेच लिखामा एयेल शे, कारण कि उचित शे, कि शेतकरी आशा कण वावर करस आणि जो नागरस तेले नागर कणच उत्पन्न ना भाग भेटानी आशा कराले पाहिजे. आमनी तुमना मधमा आत्मिक बीज पेर, एनासाठे हय कोणतीच मोठी गोष्ट नई शे, कि आमी तुमना पासून शारीरिक वस्तूस्ना पिक कापानि आशा ठेवूत. जव कि दुसरा लोक ज्या तुमना मधमा प्रचार करतस तेस्ले हवू अधिकार शे, त निश्चितच मले आणि बर्णबा ले बी हवू अधिकार शे. तरी बी आमनी कदीच तुमना वर जबरजस्ती नई करी तुमी आमले काही देवोत, पण सर्व काही सहन करतस, कि आमना द्वारे ख्रिस्त नि सुवार्ता नि काही रोक नई होवो. काय तुमले नई माहिती ज्या लोक मंदिर मा काम करतस तेस्ले आपली भाकर मंदिर मधून भेटस? हा, ज्या वेदी वर अर्पण करतस तेस्ले त्या अर्पण मधून हिस्सा भेटस. ह्याच प्रमाणे प्रभु नि बी ठराव, कि ज्या लोक सुवार्ता आयकाळतस, तेस्नी जीविका सुवार्ता आयकाळनारस कळून होवो. पण मनी एस्ना मधून एक बी अधिकार ना वापर नई करनू. मी हय एनासाठे नई लिखी ऱ्हायनु कि तुमी मनासाठे काही करोत, कदीच नई. एनातून त चांगल मनासाठे मरी जान शे. कारण कि कोणी बी ह्या गोष्ट वर गर्व करा पासून कोणी रोकु नई सकत कि मनी आपला ध्यान स्वता नि ठीयेल शे. कदी मी सुवार्ता आयकाळू, त एना कण मले गर्व करानी कोणतीच गोष्ट नई, कारण कि हय त मले सोपामा एयेल जबाबदारी शे. आणि कदी मी सुवार्ता ना प्रचार नई करत, त मनावर धिक्कार शे. कारण कि कदी आपली ईच्छा कण मी हय काम करस, त मजुरी मले भेटीन. आणि कदी हय काम मी आपली ईच्छा कण नई करत, तरी बी हय जबाबदारी मले परमेश्वर ना कळून सोपामा एयेल शे. त मंग मनी कोणती मजुरी शे? मनी कोणती मजुरी हय शे कि मी ख्रिस्त नि सुवार्ता फुकट मा प्रचार करू, जरी मले अधिकार शे कि तेना पासून मले उपजीविका भेटो. एना अर्थ हय शे, जरी लोक मले काही देतस तरी बी मी तेस्नी आदन्या मानाना साठे बांधायेल नई शे, तरी बी मी सर्वास्ना सेवक बनणु एनासाठे कि मी तेस्ले ख्रिस्त मा लई सकू. म्हणजे जव मी यहुदीस संगे होतु, त मी यहुदीस सारखा ऱ्हायनु, एनासाठे कि यहुदीस्ले ख्रिस्त मा लई सकू. जव मी मोशे ना नियमले मानणारस्ना संगे होतु, त मी बी मोशे ना नियम ना आधीन ऱ्हायनु, जरी मले मोशे ना नियमले मानानी गरज नई होती तरी बी मनी अस कर एनासाठे कि मी नियमले मानणारस्ले ख्रिस्त मा लई सकू. तसाच जव मी दुसरा जाती ना लोक संगे होतु, त मी दुसरा जाती ना लोकस सारखा ऱ्हायनु ज्या यहुदी मोशे ना नियम ना पालन नई करतस, एनासाठे कि तेस्ले ख्रिस्त मा लई सकू. एना अर्थ हय नई शे कि मी परमेश्वर ना आदन्यास्ना पालन नई करत, कारण कि मी प्रत्येक टाईम ख्रिस्त ना आदन्यास्ना पालन करस. जव तेस्ना संगे ज्या विश्वास मा कमजोर शेतस, त मी तेस्ना सारखा वागत होतु, एनासाठे कि मी ख्रिस्त ना अनुकरण करामा तेस्नी मदत करी सकू. मी सर्वा माणसस साठे सर्व काही बनेल शे, एनासाठे कि कोणत्यान-कोणत्या रिती कण काही लोकस्ना तारण कराई सकू. आणि मी सर्व काही ख्रिस्त नि सुवार्ता ना प्रचार साठे करस, एनासाठे कि मी दुसरास्ना संगे सुवार्ता ना आशीर्वादस्ना भागी हुई जाऊ. निश्चित तुमले माहिती शे कि गैरा स्पर्धक पयाले भाग लेतस, पण तेस्ना मधून एकलेच बक्षिश भेटस. तुमी बी असाच पया, कि बक्षिश प्राप्त करी सकोत. सर्वा स्पर्धक प्रत्येक गोष्टीस्मा संयम ठेवतस त्या नाशवान मुकुट ले प्राप्त करासाठे असा करतस, पण आमी असा मुकुट ले प्राप्त करासाठे हय करतस जो कदी नाश नई होवाव. एनासाठे मी एक निश्चित लक्ष समोर ठियसन पयस. मी एक असा मुष्ठयोद्धा शे जो हवा मा बुक्का नई मारत. मी आपली ईच्छास्ले वश मा ठेवस, एनासाठे कि अस नई हुई जावो कि मी जो दुसरास्ले सुवार्ता ना प्रचार करस, स्वताच त्या बक्षिश ले प्राप्त करा पासून अयोग्य ठरू. ओ विश्वासी भावूसहोण, मनी ईच्छा शे कि तुमी आठवण ठेवा, कि आमना पूर्वजस्नी मोशे ना अनुकरण कर, तेस्ना संगे जंगल मा काय हुईन. परमेश्वर नि ढग ले धाळीसन तेस्नी पुढाकारी करी, आणि तो तेस्ले लाल समुद्र मधून सुरक्षित काळीसन कोल्ली जमीन वर लई उना. मोशे ना अनुयायी म्हणीसन, त्या सर्वा लोकस्नी वादळ आणि लाल समुद्र मा बाप्तिस्मा लीधा. आणि सर्वा लोकस्नी ती भाकर खादी जी परमेश्वर नि स्वर्ग मधून तेस्ले दिधी. त्या सर्वा लोकस्नी त्या पाणी ले पिद जे परमेश्वर नि तेस्ले दिधा, तेस्नी एक खडक मधून पाणी पिद, तो खडक तेस्ना संगे-संगे चालत होती, आणि ती खडक ख्रिस्त होता. पण परमेश्वर तेस्ना मधून गैरास कण खुश नई होता. एनासाठे त्या उजाळ जागा मा मरी ग्यात. या सगळ्या गोष्टी आमना साठे उदाहर ठरणात, कि आमी वाईट गोष्टस्नि लालूस नई करोत, जस तेस्नी करेल होत. तुमी मूर्तीस्ना पूजणारा नका बना, जसा कि तेस्ना मधून कितलाक बनी जायेल होतात, जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “लोक खावा-पिवाले बठनात, आणि अनैतिक रिती कण नाच-कुदाले उठनात.” आणि नईत आमी व्यभिचार कराले पाहिजे, जस कि तेस्ना मधून कितलाक नि कर, आणि तेस्ना मधून तेवीस हजार लोक एक दिन मा मरी ग्यात. आणि नईत आमी प्रभु ले परखाले पाहिजे, जस कि तेस्ना मधून कितलाक नि कर, आणि सापस्ना द्वारे मारा मा उनात. आणि नईत तुमले कुरूकुरू कराले पाहिजे, ज्या रिती कण तेस्ना मधून कितलाक कुरूकुरू करणात, आणि ज्या दूत ले परमेश्वर नि धाळ, तेस्नी तेस्ले मारी टाक. पण ह्या सर्वा गोष्टी ज्या तेस्ना संगे घळनात, ते दुसरास्ना साठे उदाहरण शे. आणि त्या चेतावणी ना रितीवर आमना साठे ज्या जग ना आखरी टाईम मा जगी ऱ्हायनात लिखामा एयेल शे. एनासाठे कदी कोणी माणुस हय सांगस कि तो परमेश्वर वर पक्का विश्वास ठेवस, तेले सावधान राहाले पाहिजे, अस नई हुई जावो कि प्रलोभन मा पळीसन पाप करी बठो. तुमना वर तशीच परीक्षा एयेल शे जशी सर्वा लोकस्वर येस. पण परमेश्वर विश्वास योग्य शे, कारण कि तो तुमले अशी परीक्षा मा नई पळू देवाव जेना सामना तुमी नई करू सकावत, पण तो तुमले परीक्षा ना सामना करासाठे शक्ती बी दिन कि तुमी पाप पासून वाची सकोत. ह्या मुळे, ओ मना मित्रसहोण, मूर्ती नि उपासना पासून दूर राहा. मी तुमले समजदार समजीसन हय सांगस, कि जे मी सांगी ऱ्हायनु तेना विषय मा विचार करा कि मी बरोबर सांगी ऱ्हायनु कि नई. जव आमी प्रभु भोज कटोरा मधून पीतस, जेनावर आमी धन्यवाद करतस, त आमी खरज ख्रिस्त ना रक्त मा सहभागी होतस. आणि जव आमी भाकर मोळतस, त आमी खरज ख्रिस्त ना शरीर मा सहभागी होतस. जव कि एकच भाकर शे आणि तो ख्रिस्त शे, आणि आमी बी ज्या जास्त शेतस, ख्रिस्त मा एक शरीर शेतस कारण कि आमी सर्वा एकच भाकर मधून खातस. इस्त्राएल देश ना लोकस्ना बारामा मा विचार करा, जव सर्वा लोक परमेश्वर ले बलिदान करेल जेवण मधून खातस, त त्या परमेश्वर नि उपासना मा भाग लेतस. त्याच प्रमाणे ज्या लोक मूर्तीस्ले बलिदान करेल जेवण ले खातस, त त्या बी त्या मूर्तीस्नी उपासना मा सहभागी होतस. त मंग मी काय सांगाणा प्रयत्न्य करी ऱ्हायनु? काय मी हय सांगी ऱ्हायनु कि मूर्त्या खरज देव शेतस, जेस्ना साठे बलिदान करामा येस आणि काय ह्या बलिदानस्नी काही किंमत शे? नई, बस हय, कि त्या जे काही मूर्तीस्ले बलिदान करतस, ते परमेश्वर ना साठे नई, पण दुष्ट आत्मास्ना साठे बलिदान करतस, आणि मनी ईच्छा नई शे कि, दुष्ट आत्मास्ना सहभागी बनोत. तुमी प्रभु ना कटोरा, आणि दुष्ट आत्मा ना कटोरा ह्या दोनीस मधून नई पिसू सकतस. तुमी प्रभु नि मेज आणि दुष्ट आत्मा नि मेज ह्या दोनीस्मा सहभागी नई होवू सकतस. जर तुमी असा करतस, त निश्चितच प्रभु ले राग देवाळतस. आठवण ठेवा कि तुमी तेना तून शक्तिमान नई शेतस. त्या लोक सांगतस, आमले सर्व काही करानी परवानगी शे, खर शे, पण सर्व काही आमना साठे फायदान नई. आमले सर्व काही करानी परवानगी शे, पण सर्वा वस्तूसकण आत्मिक उन्नती नई. कोणी बी आपलाच चांगला ना शोध मा नई राहो पण दुसरास्ना चांगला ना बारामा मा विचार करा. जे काही कस्साईस्ना आठे विकावस, तुमी तेले स्वातंत्रता कण खावा, आणि आपला विवेक ले शुद्ध ठियसन आणि बिगर प्रश्न विचाराना कि हय मांस कथाईन उन. कारण कि पवित्र शास्त्र सांगस, “पृथ्वी आणि तेनी भरपुरी प्रभु नि शे.” कदी अविश्वासीस मधून कोणी तुमले आमंत्रण देस, आणि तुमी जावाना निर्णय करतस, त जे काही तुमना समोर ठेवामा येवो तेच खावा, तरी बी तुमले हय नई विचाराले पाहिजे कि हय अर्पण करेल शे, एनासाठे कि तुमले खातांना दोषी वाटाले नको पाहिजे. पण कदी कोणी तुमले सांगस, कि “हय जेवण मूर्ती ले बलिदान करामा एयेल शे,” त तुमी तेले विवेक मुळे खावू नका. मना अर्थ तुमना विवेक मुळे नई, पण जेनी तुमले सांग तेना विवेक मुळे खावू नका. कारण कि मनी स्वातंत्रता कोणी दुसरा ना विवेक कण नई परखा मा येवाले पाहिजे. कदी मी आपला जेवण धन्यवाद करीसन खास, त जेना मुळे मी धन्यवाद करस, तेना मुळे मनी निंदा काब होस? म्हणून, मनी तुमले हय सांगानी ईच्छा शे, कि भले तुमी खावोत, व काही बी करोत, सर्व काही परमेश्वर नि महिमा ना साठे करा. तुमी मना अनुकरण करा, जसा मी ख्रिस्त ना अनुकरण करस. मी तुमनी प्रशंसा करत ऱ्हास, कारण कि तुमी मले प्रत्येक टाईम ले आठवण करत ऱ्हातस, आणि जी शिक्षा मनी तुमले दियेल शे, तेस्नी सावधानी कण पालन करी ऱ्हायनात. पण मनी ईच्छा शे कि तुमी एक गोष्ट समजी लेवोत, कि प्रत्येक माणुस ना डोक ख्रिस्त शे, प्रत्येक बाई ना डोक माणुस शे, आणि ख्रिस्त ना डोक परमेश्वर शे. एनासाठे जो माणुस, लोकस्ना मधमा डोक झाकीसन प्रार्थना करस व परमेश्वर ना संदेश सांगस तो ख्रिस्त ना अपमान करस. आणि जी बाई बिगर डोक झाकानी लोकस्ना मधमा प्रार्थना करस व परमेश्वर ना संदेश सांगस ती आपला नवरा ना अपमान करस. अशी बाई मा आणि डोक मुंडायेल बाई मा कोणताच फरक नई. कदी बाई पदर डोका वर नई लेस, त ती केस बी कापी लेवो, कदी बाई ना साठे केस कापण व डोक मुंडण करान लाज नि गोष्ट शे, त डोका वर पदर ठेवा. हा माणुस ले आपल डोक झाकान उचित नई शे, कारण कि माणुस परमेश्वर नि महिमा शे, आणि परमेश्वर नि आपलीच प्रतिमा मा बनावामा एयेल शे. पण बाई माणुस नि महिमा ले दर्शावस. कारण कि पहिला माणुस (आदाम) बाई पासून नई हुईना, पण पहिली बाई (हव्वा) माणुस पासून हुईनी. आणि परमेश्वर नि माणुस ले बाई नि मदत करासाठे नई निर्माण कर, पण तेनी बाई ले माणुस नि मदत साठे निर्माण कर. हय दाखाळा साठे बायास्ले आपला डोका वर पदर लेवाले पाहिजे कि ती आपला नवरा ना अधिकार ना आधीन मा शे, आणि एनासाठे बी कि स्वर्गदूत तीस्नावर नजर ठीयेल शेतस. तरी बी प्रभु ना विश्वासीस्मा बिगर बाई ना माणुस काहीच नई शे आणि नईत बिगर माणुस नि बाई काही शे. कारण कि ज्या प्रकारे बाई नि उत्पत्ती माणुस पासून हुयेल शे त्याच प्रकारे आते माणुस ना जल्म बाई पासून होस व पुरी सृष्टी नि उत्पत्ती परमेश्वर पासून शे. मनी ईच्छा शे कि तुमी स्वता ठरावोत, कि काय बाई ले लोकस समोर बिगर डोका वर पदर लिसन परमेश्वर ले प्रार्थना करान चांगले शे? काय स्वभाविक रिती कण बी तुमले नई माहिती, कि कदी माणुस लंबा केस ठेवस, त तेना साठे अपमान शे. पण कदी बाई लंबा केस ठेवस त तीना साठे शोभा शे, कारण केस तिले ओढणी साठे देवामा एयेल शे. पण कदी कोणी संगे सहमत नई शे, त हय समजो कि नईत आमना जोळे आणि नईत परमेश्वर नि मंडळीस्ना जोळे एले सोळीसन दुसरा कोणता रिवाज शे. त्या विषयस्ना बारामा जे मी सांगाले जाईऱ्हायनु, मी तुमनी प्रशंसा नई करत, एनासाठे कि तुमन एकत्र होवा कण चांगल नई, पण नुकसान होस. कारण कि पहिले त मी हय आयकस, कि जव तुमी स्तुती करासाठे मंडळी मा एकत्र होतस, त तुमना मा फुट होस आणि मी विश्वास करस कि तेस्ना सांगेल काही गोष्टी बरोबर शेतस. पण, निश्चित पणे, तुमना मधमा पक्षभेद राहाले पाहिजे एनासाठे कि तुमी लोकस्मा जेस्ना जोळे परमेश्वर नि मंजुरी शे, तेले वयखामा येवो. जव तुमी प्रभु येशु ख्रिस्त नि मृत्यु ले आठवण करासाठे एक जागा वर एकत्र होतस, त हय प्रभु-भोज लेवा साठे नई. कारण कि मले सांगामा एयेल शे कि तुमना मधून काही आपला जेवण दुसरास्ना संगे बिगर समिति ना लवकर खाई लेतस, ह्या मुळे, कोणी त भुक्या चालना जातस आणि काही पिसन झिंगणार हुई जास. तुमी आपला घरस्मा खावू आणि पिवू सकतस. तुमले वाटस कि परमेश्वर नि मंडळी महत्वानी नई शे, आणि तुमी त्या लोकस्ले लाजे घालतस ज्या गरीब शेतस. मी तुमले काय सांगू? काय मले तुमनी प्रशंसा कराले पाहिजे? मी अस करासाठे तुमनी प्रशंसा नई करत. जी शिक्षा मनी तुमले दियेल शे, हय तीच शिक्षा शे जी मले प्रभु पासून भेटेल होती, कि प्रभु येशु नि ज्या रात ले तेले धरावामा उन भाकर लीधी, आणि धन्यवाद करीसन मोळी, आणि सांग, “हय मना शरीर शे, जो तुमना साठे शे, मनी आठवण साठे हईच करत राहा.” त्या नंतर तेनी प्याला बी लीधा, आणि सांग, “हवू प्याला मना रक्त मा नवा करार शे, जव बी पिशात त मनी आठवण साठे हईच करत राहा.” कारण कि जव बी तुमी ह्या भाकर ले खातस, आणि ह्या प्याला मधून द्राक्षरस पीतस, त प्रभु नि मृत्यु ले जठ लगून तो नई ईजात, प्रचार करत राहा. एनासाठे जो कोणी अयोग्य रिती कण प्रभु नि भाकर खास, व तेना प्याला मधून द्राक्षरस पेस, त तो प्रभु ना शरीर ना आणि रक्त ना अपराधी ठरीन. एनासाठे माणुस पहिले आपला व्यवहार नि तपासणी करो आणि ह्याच प्रमाणे ह्या भाकर मधून खावो, आणि ह्या प्याला मधून द्राक्षरस पेवो. कदी कोणी प्रभु ना शरीर ना संगे आपला नाता ले बिगर वयखाना प्याला मधून पेस आणि भाकर खास, त तो ह्या खावा आणि पिवा कण स्वता वर दंड लयस. या मुळे पहिले पासूनच तुमना मधमा गैरा दुर्बळ आणि रोगी शेतस, आणि गैरा मरी बी ग्यात. एनासाठे कदी पहिले आमी स्वता नि तपासणी करतूत, त परमेश्वर पासून दंड नई भेटता. पण प्रभु आमना न्याय करस आणि आमले शिस्त लावस एनासाठे कि आखरी मा परमेश्वर ले जग ना बरोबर आमले दोषी ठरावन नई पळो. एनासाठे, ओ मना विश्वासी भावूसहोण, जव तुमी प्रभु-भोज खावा साठे एकत्र होतस, तर एक-दुसरा साठे थांबत जा एनासाठे कि सर्वास्ना संगे मियसन खाई सकोत. कदी कोणी भुक्या शे, त आपला घर मा खाई लेवो, एनासाठे कि जव तुमी एकत्र होतस, तव तुमी चांगल्या प्रकारे व्यवहार करश्यात आणि परमेश्वर तुमना न्याय नई कराव. बाकी गोष्टीस्ले जव मी एसू तव समजाळसू. ओ विश्वासी भावूसहोण, ज्या आत्मिक वरदानस्ना बारामा मा तुमनी मले प्रश्न विचारेल होत, मनी ईच्छा शे कि तुमी तेना बारामा स्पष्टता कण समजोत. तुमले माहित शे कि जव तुमी विश्वासी नई होतात, तव तुमी गुंगी मूर्तीस्ना मांगे चाला साठे भटकाळामा एयेल होतात. एनासाठे मनी ईच्छा शे कि तुमले माहिती पळो, कि जो कोणी परमेश्वर नि आत्मा नि प्रेरणा कण बोलस, तो नई सांगत कि येशु श्रापित शे, आणि पवित्र आत्माच शे जी कोले बी हय सांगा साठे सक्षम करस कि येशुच प्रभु शे. वरदान त गैरा प्रकार ना शेतस, पण आत्मा एकच शे जी सर्वास्ले वरदान देस. आणि सेवा बी गैरा प्रकार नि शे, पण प्रभु एकच शे जेनी आमी सेवा करतस. आणि प्रभावशाली कार्य बी गैरा प्रकार ना शेतस, पण परमेश्वर एकच शे, जो सर्वा माणसस्मा तेना प्रभाव उत्पन्न करस. पण परमेश्वर सर्वा विश्वासीस्नी मदत करासाठे प्रत्येक माणुस ले आत्मा नि उपस्थिती ना काही प्रमाण देस. कारण कि एक ले आत्मा ना द्वारे बुद्धी कण भरेल संदेश ले बोलानी क्षमता देवामा येस, आणि दुसराले त्याच आत्मा ना नुसार ज्ञान कण भरेल संदेश ले बोलानी क्षमता देवामा येस. आणि कोले त्याच आत्मा कण प्रभु येशु वर विश्वास करानी क्षमता देवामा येस, आणि कोले तीच एक आत्मा बरा कराना वरदान देस. तोच आत्मा परत कोले सामर्थ्य ना काम करानी शक्ती देस, आणि कोले भविष्यवाणी करानी क्षमता देस, आणि कोले आत्मास्ले परखा नि क्षमता देस, आणि कोले आल्लग-आल्लग भाषा बोलानी क्षमता देस, आणि कोले त्या भाषास्ना अर्थ सांगानी क्षमता देस. पण हय सर्व प्रभावशाली कार्य परमेश्वर ना आत्माच करावस, आणि तीच आत्मा जेले जशी तेनी ईच्छा शे तशी वाटी देस. कारण कि ज्या प्रकारे शरीर त एक शे आणि तेना अवयव गैरा शेतस, आणि त्या एक शरीर ना सर्वा अवयव गैरा होवावर बी सर्वा मियसन एकच शरीर शे, त्याच प्रकारे ख्रिस्त आणि ख्रिस्त वर विश्वास करणारा बी शेतस. कि आमी सर्वास्नी काय यहुदी हो, काय बिगर यहुदी, काय दास, काय स्वतंत्र, एकच आत्मा ना द्वारे एक शरीर होवा साठे बाप्तिस्मा लीधा, आणि आमी सर्वास्ले एकच आत्मा भेटेल शे. आमना शरीर मा एकच अवयव नई, पण गैरा शेतस. समजी ल्या, कदी पाय सांगो कि मी हात नई, एनासाठे शरीर ना अवयव नई, त काय तेन अस सांगा मुळे तो शरीर ना अवयव नई ऱ्हात? आणि कदी कान सांगस, मी डोया नई, एनासाठे शरीर ना अवयव नई, त काय तेन अस सांगा मुळे तो शरीर ना अवयव नई ऱ्हात? कदी पुरा शरीर डोयाच ऱ्हाता त आयकन कोडे ऱ्हात? कदी पुरा शरीर कानच ऱ्हाता त सुंगान कोडे ऱ्हात? पण परमेश्वर नि आमना शरीर सर्वा अवयव आपली ईच्छा ना नुसार एक-एक करीसन व्यक्तिगत पणे बरोबर जागा वर ठीयेल शे. कदी त्या सर्वा एकच अवयव ऱ्हातात, त शरीर ऱ्हाताच नई. एनासाठे, जरी शरीर ना गैरा अवयव शेतस, तरी बी शरीर एकच शे. डोया हात ले नई सांगू सकस, कि “मले तुनी गरज नई शे,” आणि नईत डोक पाय ले सांगू सकस, कि “मले तुनी गरज नई.” पण शरीर ना त्या अवयव ज्या दुसरास्तून कमजोर दिखतस त्या गैराच आवश्यक शेतस. आणि शरीर ना ज्या अवयवस्ले आमी कमी आदर ना योग्य समजतस, त्याच अवयवस्ले गैरा ध्यान दिसन कपळा घालतस. आणि ज्या अवयव आमी दुसरास्ले दाखाळत नईत त्याच अवयव नि सुरक्षा गैरा ध्यान कण करतस. ज्या अवयवस्ले आमी दाखाळतस, तेस्ले सुरक्षा नि गरज नई. पण परमेश्वर, जेनी आमना शरीर ना सर्वा अवयवस्ले एकत्र जोळेल शे, तेनी आमले अस करी टाक कि आमी ज्या अवयवस्ले कमी महत्व देतस तेस्नीच जास्त देखरेख करतस. परमेश्वर नि अस एनासाठे कर कि शरीर मा फुट नई पळो, आणि शरीर ना सर्वा अवयव एक-दुसरास्नी बरोबर देखरेख करोत. एनासाठे कदी शरीर ना कोणता अवयव ले दुखापत होस त तेना संगे शरीर ना सर्वा अवयव दुखी होतस. कदी कोणता एक अवयव नि बडाई होस त सर्वा अवयव खुशी करतस. ह्याच प्रकारे तुमी सर्वा मियसन ख्रिस्त ना शरीर शेतस, आणि तुमना मधून प्रत्येक तेना आणि तेना शरीर ना अवयव सारखा शेतस. आणि परमेश्वर नि मंडळी मा आल्लग-आल्लग व्यक्तीस्ले नेमेल शे, पहिले त्या लोक ज्या तेना प्रेषित शेतस, दुसरा भविष्यवक्ता, तिसरा शिक्षक. मंग सामर्थ्य ना काम करणारा, मंग बरा करणारा, आणि उपकार करणारा, आणि प्रधान, आणि पवित्र आत्मा ना द्वारे देवामा एयेल आल्लग-आल्लग भाषा बोलणारा. प्रत्येक झन प्रेषित नई शेतस, प्रत्येक झन भविष्यवाणी नई करू सकत, प्रत्येक झन शिकाळनारा नई शेतस, आणि नईत प्रत्येक झन सामर्थ्य ना काम करू सकतस. प्रत्येक झन आजारीस्ले बरा नई करू सकत, प्रत्येक झन आल्लग-आल्लग भाषा नई बोलू सकत. प्रत्येक झन भाषास्ना अनुवाद नई करू सकत. तुमी गैरा प्रयत्न कण पवित्र आत्मा पासून मोठा-मोठा वरदानस्नि मांग करतस. पण मी तुमले एनातून बी चांगला रस्ता दाखाळस. कदी मी, माणसस्नी आणि स्वर्गदूतस्नी भाषा बोलू, आणि दुसरास्वर प्रेम नई ठेवू, त मी ठण-ठण करणारा पित्तय आणि झणझणणारी झांज शे. आणि कदी मले परमेश्वर ना संदेश ले सांगाणा वरदान भेटेल राहो, आणि मले सर्वा गोष्टीस्ना ज्ञान शे आणि सर्वा रहस्य नि समज शे, आणि मले परमेश्वर वर विश्वास शे आठ लगून कि मी डोंगर ले दूर करी देवू, पण दुसरास्वर प्रेम नई करत, त मी काय बी नई शे. आणि कदी मी आपली सर्वी संपत्ती गरीबस्ले दि टाकू, आठ लगून कि मी आपला शरीर ले तेस्ले बायाले दि टाकू, आणि दुसरास्वर प्रेम नई ठेवू, त मले काहीच फायदा नई. ज्या लोक प्रेम करतस, धीर धरणारा ऱ्हातस, आणि त्या कृपाळू ऱ्हातस, प्रेम करणारा लोक दुसरास्वर बयतस नई, त्या आपली बळाईखी नई करतस, आणि गर्व नई करतस. प्रेम करणारा लोक दुसरास्ना संगे वाईट व्यवहार नई करतस, त्या स्वतास्न चांगल नई देखतस, त्या लवकर रागे नई भरतस, आणि त्या दुसरास्ना करेल वाईट कामस्ले आठवण नई ठेवतस. प्रेम करणारा लोक वाईट कामस कण खुश नई होतस, पण सत्य ना गोष्टीस कण खुश होतस. प्रेम करणारा सर्व काही सहन करी लेतस, त्या कोणती बी परिस्थिती मा करान नई सोळतस, त्या सर्वा गोष्टीस्मा परमेश्वर वर आशा धरी ठेवतस, आणि त्या प्रत्येक कठीण परिस्थिती मा धीर धरी ऱ्हातस. संदेशस्नी गरज नई राहाव, भाषा निशब्द हुई जातीन, आणि ज्ञान सरी जाईन पण प्रेम कायम ना साठे बनेल राहीन. कारण कि आमना ज्ञान अपुरा शे, आणि परमेश्वर ना संदेश ले देवानी आमनी क्षमता बी अपुरी शे. पण जव सर्वसिध्द ईन, त सर्व्या अपुऱ्या गोष्टी नष्ट हुई जातीन. हय सगळ एक व्यक्ती ना विकास ना सारख शे. जव मी एक पोऱ्या होतु, मी एक पोऱ्या ना सारखा गोष्टी करत होतु, विचार करत होतु आणि तर्क करत होतु. पण जव मी मोठा हुयणु तव मनी आपला धाकलपणी ना गोष्टीस्ले सोळी टाक. आते त आमले आरसा मा अंधुक दिखस, पण जव सर्वसिध्द ईन आमी समोरा-समोर देखसूत. आते त मना ज्ञान अपुरा शे, पण तव मी त्याच प्रमाणे पूर्णपणे समजी जासू, ज्या प्रमाणे परमेश्वर मले समजी जायेल शे. एनासाठे आते आमले तीन गोष्टी करत राहाले पाहिजे, आमले परमेश्वर वर विश्वास ठेवाले पाहिजे, आमले तेना करार वर आशा ठेवाले पाहिजे, आणि दुसरास्वर प्रेम ठेवत राहाले पाहिजे, पण ह्या तिन्ही गोष्टीस्मा सर्वास्तून श्रेष्ठ प्रेम शे. दुसरास्वर प्रेम कराना प्रत्येक प्रकार ना प्रयत्न करा, आणि आत्मिक वरदानस्नि उत्सुकता कण ईच्छा ठेवा, खास करीसन परमेश्वर ना संदेश ले सांगानी ईच्छा ठेवा. कारण कि जो आल्लग-आल्लग भाषास्मा गोष्टी करस, तो माणसस संगे नई, पण परमेश्वर संगे बोलस, एनासाठे कि तेसन्या गोष्टी कोणीच नई समजत, कारण कि तो पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण गुप्त गोष्टीस्ले सांगस. पण जो परमेश्वर ना संदेश ना प्रचार करस, तो माणसस्ले उन्नती, प्रोत्साहन आणि शांती ना प्रचार करस. जो आल्लग-आल्लग भाषा मा गोष्टी करस, तो फक्त आपलाच विश्वास ले पक्का करस. पण जो परमेश्वर ना संदेश ना प्रचार करस तो मंडळी नि उन्नती करस. मनी ईच्छा शे कि तुमी सर्वा अन्य भाषा मा बोलोत, पण जास्त त हय ईच्छा शे कि परमेश्वर ना संदेश सांगा. कारण कि तो, जो परमेश्वर ना संदेश ना प्रचार करस, तो त्या आल्लग-आल्लग भाषा बोलणार पासून, जो बिगर अनुवाद कराना आल्लग-आल्लग भाषा मा गोष्टी करस, चांगला शे कारण कि अनुवाद करा नंतरच मंडळी ना उन्नती संभव होवू सकस. एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, कदी मी तुमना जोळे ईसन आल्लग-आल्लग भाषा मा बोलू, त तेना कण तुमले काय फायदा हुईन? काहीच नई. पण कदी मी परमेश्वर ना प्रकटीकरण ना गोष्टी, ज्ञान ना गोष्टी, परमेश्वर ना संदेश ना गोष्टी, आणि उपदेश ना गोष्टी तुमले सांगू, त त्या तुमना साठे उपयोगी होतीन. ह्या प्रमाणे जव तुमी बासरी आणि वीणा सारखा वाद्यस्ले वाजाळतस, आणि कदी तुमी ध्वनी चांगल्या प्रकारे नई वाजाळतस व आवाज मा काही फरक नई शे त मंग दुसरा कसा वयखतीन कि ती बासरी शे कि वीणा? व कोणता बी राग ले नई वयखू सकावत व कोलेच माहिती नई पळाव कि तो कोणती ध्वनी वाजाळी ऱ्हायना. युध्द मा, कदी तुरही नि ध्वनी स्पष्टपणे आयकू नई देत, त सैनिक लळाई करासाठे तयार नई होवू सकतस. त्याच प्रकारे, कदी तुमी आल्लग-आल्लग भाषा मा संदेश देतस आणि कोणी तेना अर्थ ले नई समजू सकोत त ते वारा मा गोष्टी करान ठरीन, आणि तेना काहीच फायदा नई. ह्या जग मा गैरा सावटा आल्लग-आल्लग प्रकार ना भाषा शेतस आणि प्रत्येक भाषास्ना अर्थ शे. पण कदी आमी त्या भाषास्ले नई समजतस ज्या दुसरा बोली ऱ्हायनात, त हय अस हुईन समजा कि त्या आमना साठे बाहेर देश ना शेतस, आणि आमी तेस्ना साठे बाहेर देश ना. एनासाठे जव तुमी पवित्र आत्मा ना द्वारे देवामा येणारा वरदानस्नि धून मा शेतस, त तुमी असा वरदानस्नि ईच्छा ठेवा जेना कण मंडळी नि उन्नती हुई सको. ह्या मुळे जो आल्लग-आल्लग भाषा मा बोलस, तो प्रार्थना करो, कि तो तेना अर्थ बी स्वता समजी सको. एनासाठे कदी मी आल्लग-आल्लग भाषा मा प्रार्थना करू, त मनी आत्मा प्रार्थना करस, पण मनी बुद्धी ना एनामा काहीच काम नई. त मी तुमले सांगस कि काय कराले पाहिजे. मी आत्मा कण बी प्रार्थना करसू आणि बुद्धी कण बी प्रार्थना करसू कि दुसरा लोक समजू सकोत. मी आत्मा कण गान म्हणसू., आणि बुद्धी कण बी गान म्हणसू. कि आयकनारा समजी सकोत. नईत तू कदी आत्मा कणच परमेश्वर ना धन्यवाद करशी, त जो साधारण माणुस तुनी प्रार्थना मा सहभागी शे कदी ते तेले नई समजू सकाव त आमेन कसा सांगीन? तू त चांगला प्रकारे परमेश्वर ना धन्यवाद करस, पण तेना कण दुसरा व्यक्ती ना विश्वास पक्का नई होवाव. मी आपला परमेश्वर ना धन्यवाद करस, कि मी तुमी सर्वास्तून जास्त आल्लग-आल्लग भाषा मा बोलस. पण मंडळी मा आल्लग-आल्लग भाषा मा दहा हजार गोष्टी सांगा पासून हय मले आजून भी चांगल वाटस, कि दुसरास्ले शिकाळा साठे बुद्धी कण पाचच गोष्टी सांगू ज्या सर्वास्ले समज मा येवो. ओ विश्वासी भावूसहोण, ह्या बारामा मा तुमनी समज मा पोरस सारखी नई राहो, वाईट मा त पोर राहा, पण समजाना गोष्टीस्मा शाहाणा बना. परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, कि प्रभु सांगस, “मी अन्य भाषा बोलणारास्ना द्वारे, आणि पराया मुख ना द्वारे ह्या लोकस्ना संगे गोष्टी करसू, तरी बी त्या मनी नई आयकाव.” एनासाठे आल्लग-आल्लग भाषा विश्वासीस साठे नई, पण अविश्वासीस साठे चिन्ह शेतस, आणि परमेश्वर ना संदेश अविश्वासीस साठे नई, पण विश्वासी साठे चिन्ह शे. त कदी मंडळी एक जागा वर एकत्र होवो, आणि सर्वान-सर्वा आल्लग-आल्लग भाषा बोलोत आणि बाहेर ना साधारण व अविश्वासी माणुस मधमा ईजावो त त्या काय विचार करतीन कि तुमी येळा शेतस. पण कदी सर्वा परमेश्वर ना संदेश सांगाले लागोत, आणि कोणी बाहेर ना साधारण व अविश्वासी माणुस मधमा ईजावो, त तेस्ले वाटीन कि त्या पापी शेतस, आणि तुमी जे सांगी ऱ्हायनात तेले आयकीसन त्या आपला विवेक बदला ले देखतीन. परमेश्वर ना संदेश मुळे तेले आपली वाईट, गुप्त विचारना बारामा काही वाटीन, तव तो पश्चाताप करीन व पालथा पळीसन परमेश्वर नि उपासना करीन, आणि मानी लीन, कि खरोखर परमेश्वर तुमना मधमा शे. एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले सांगस कि तुमले काय कराले पाहिजे. जव तुमी उपासना ना साठे एकत्र होतस, कि तुमना मधून कोणा हृदय मा भजन ऱ्हातस, आणि कोणा जोळे लोकस्ले शिकाळा साठे उपदेश ऱ्हातस. कोणा जोळे परमेश्वर ना द्वारे देवामा एयेल प्रकटीकरण ऱ्हास. कोणी त आल्लग-आल्लग भाषा मा जी तेस्नी शिकेल नई शे संदेश देतस, आणि काही त त्या संदेशस्ना अर्थ सांगतस. ध्यान ठेवा कि जे काही तुमी करतस तेना कण लोकस्नी आत्मिक उन्नती होवाले पाहिजे. जर कदी आल्लग-आल्लग भाषा मा बोलन राहो, तर जास्तीत जास्त दोन व तीन व्यक्ती एक नंतर एक बोलो, आणि तठे एक व्यक्ती अनुवाद करणारा राहाले पाहिजे. पण कदी अनुवाद करणारा नई राहो, त अन्य भाषा बोलणारा मंडळी मा शांत राहो, आणि आपला मन कण, आणि परमेश्वर ना संगे बोलो. परमेश्वर ना भविष्यवक्ता देनारस मधून दोन व तीन व्यक्तीच बोलोत, आणि बाकी लोक तेस्ना संदेश ले आयकीसन तेस्ले परखोत. पण जर सभा मा बठेल कोणी दुसरा व्यक्ती ले परमेश्वर पासून कोणता संदेश भेटस त जो बोली ऱ्हायना तेले थांबाले पाहिजे आणि दुसरा व्यक्ती ले बोलू देवाले पाहिजे. तुमी सर्वा परमेश्वर ना संदेश ना प्रचार करू सकतस, पण एक नंतर एक, एनासाठे कि प्रत्येक झन सिखोत आणि उत्तेजित होवोत. आणि परमेश्वर ना संदेश ले प्रचार कराना वरदान, प्रचारक ना नियंत्रण ना शे. कारण कि परमेश्वर बेशिस्तपणा ना नई, पण शांती ना निर्माण करता शे. ह्या नियम ना पालन परमेश्वर ना लोक मंडळीस्मा करामा एस. बाया मंडळी नि सभास्मा चूप राहोत, कारण कि तीस्ले बोलानी परवानगी नई, पण आधीन मा राहाणी आदन्या शे, जस परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल बी शे. आणि कदी त्या काही सिखानी ईच्छा करतस, त घर मा आपला-आपला नवराले विचारोत, कारण कि बाई ना मंडळी मा गोष्टी करान लज्जा ना गोष्ट शेतस. काय तुमी विचार करतीस कि परमेश्वर ना वचन पहिले तुमना जोळे पोहोचना? कि हय फक्त तुमलेच देवामा एयेल शे? कदी कोणी माणुस स्वता ले परमेश्वर ना वचन ना प्रचारक व आत्मिक झन समजस, त हय समजी लेवो, कि ज्या गोष्टी मी तुमले लिखी ऱ्हायनु, त्या प्रभु ना आज्ञा शेतस. कदी कोणी मना ह्या गोष्टीस्वर ध्यान नई देवाव, त तुमी बी तेनावर ध्यान देवू नका. ओ विश्वासी भावूसहोण, परमेश्वर ना वचन ले प्रचार करानी धून मा राहा, आणि आल्लग-आल्लग भाषा बोलाले मना नका करा. पण जे काही बी तुमी उपासना ना टाईम वर करतस, सभ्यता कण आणि क्रमणुसार करा. ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले तीच सुवार्ता आठवण देवाळस जी पहिले आयकाळी टाकेल शे, ज्या सुवार्ता वर तुमनी विश्वास करेल होत आणि जेनामा तुमना विश्वास स्थिर बी शे. जी सुवार्ता मनी तुमले आयकाळेल शे कदी तुमी तीनावर दृढता कण विश्वास करतस, त परमेश्वर तुमले वाचाळीन. आणि कदी तुमी कायम विश्वास नई करावत, त तुमना विश्वास करान वायबार ठरण. ह्या मुळे, मनी तुमले सर्वास्तून महत्वाना संदेश सांगणु जो मले प्रभु येशु पासून भेटेल होता, आणि तो हवू शे, कि परमेश्वर ना पुस्तक ना वचन ना नुसार, येशु ख्रिस्त आमना पापस साठे मरी ग्या. आणि गाळामा उना, आणि पवित्र शास्त्र ना नुसार तिसरा दिन मरेल मधून परत जित्ता हुईग्या. व तो केफा (पेत्र) ले दिखना, आणि नंतर बारा शिष्यस्ले. मंग पाच शे तून जास्त शिष्यस्ले एकत्र दिखना, जेस्ना मधून गैरा सावटा आज लगून जित्ता शेतस आणि काही मरी जायेल शेतस. मंग याकोब ले दिखना आणि नंतर सर्वा प्रेषितस्ले दिखना. आणि सर्वास्ना नंतर मले दिखना, पण मी त असामान्य रिती कण प्रेषित बनेल शे. कारण कि मी प्रेषितस्मा सर्वास्तून कमी महत्वाना शे, आणि प्रेषित म्हणाना योग्य बी नई शे, कारण कि मनी परमेश्वर नि मंडळीस्ना लोकस्ले त्रास दियेल होतु. पण परमेश्वर नि कृपा कण आते मी प्रेषित शे. आणि तेनी कृपा मना जीवन वर प्रभावशाली होती. एनासाठे मनी दुसरा प्रेषितस्तून जास्त कष्ट बी कर, तरी बी हय मना कळून नई हुईन पण परमेश्वर नि कृपा काम करी ऱ्हायंता. भले मी शे व दुसरा प्रेषित राहोत, आणि सर्वास्नी ख्रिस्त येशु ना बारामा एकच संदेश ना प्रचार कर, आणि एनाच वर तुमनी विश्वास बी कर. आते मी तुमले हय विचारस, कि जव ख्रिस्त ना प्रचार करामा एस, कि तो मरेल मधून परत जित्ता हुईग्या, त तुमना मधून कितलाक काब सांगतस, कि मरेल मधून परत जित्ता नई होवावत? कदी मरेल मधून परत जित्ता नई होवावत, त ख्रिस्त बी जित्ता नई हुयना. आणि कदी ख्रिस्त मरेल मधून परत जित्ता नई हुईना, त आमना प्रचार करान बी व्यर्थ शे आणि तुमना ख्रिस्त वर विश्वास करान बी व्यर्थ शे. कदी मरेल ले जित्ता नई करामा एस, त आमनी हय सांगीसन परमेश्वर ना बारामा तुमले खोटा बोलेल शे कि तेनी ख्रिस्त ले जित्ता करेल होत, जव कि खरज तेनी अस नई कर. आणि जर हय खर शे, कि मरेल जित्ता नई होतस, त ख्रिस्त बी जित्ता नई हुईना. आणि कदी ख्रिस्त जित्ता नई हुईना, त तुमना ख्रिस्त वर विश्वास करान बी व्यर्थ शे, आणि तुमी आते लगून पापस्मा जीवन जगी ऱ्हायनात. आणि कदी ख्रिस्त मरेल मधून परत जित्ता नई हुईना, त ज्या ख्रिस्त मा विश्वासी मरी जायेल शेतस, त्या बी वाचाळामा नई उनात, पण दवळी जायेल शेतस. जर ख्रिस्त मा आमनी आशा फक्त ह्याच जीवन ना साठे शे, त आमना वर ह्या जग मा सर्वास्तून जास्त दया होवाले पाहिजे. पण खर हय शे, कि पहिले ख्रिस्त ले जित्ता करामा ईन, आणि तो निश्चितच ख्रिस्ती विश्वासीस्ले ज्या मरी जायेल शेतस जित्ता करीन. कारण कि जसा एक माणुस, म्हणजे आदाम ना द्वारे मृत्यु उणी, त्याच प्रकारे एक माणुस, म्हणजे येशु ख्रिस्त ना द्वारे परमेश्वर ख्रिस्ती विश्वासीस्ले बी परत जित्ता करीन. आणि जसा आदाम मा सर्वा मरतस, तसाच ख्रिस्त मा सर्वा जित्ता करामा येतीन. पण प्रत्येक व्यक्ती योग्य क्रम मा जित्ता करामा ईन, परमेश्वर सर्वास्तून पहिले ख्रिस्त येशु ले जित्ता करामा ईन, आणि जव ख्रिस्त परत ईन, तव परमेश्वर त्या लोकस्ले ज्या ख्रिस्त ना शेतस जित्ता करामा येतीन. नंतर जव ख्रिस्त सर्वा सामर्थ्य आणि प्रधानतास्ना नाश करी टाकीन, तव जग नि समाप्ती इजाईन, आणि ख्रिस्त राज्य ले आपला बाप परमेश्वर ना हात मा सोपी दिन. कारण कि जठ लगून परमेश्वर आपला शत्रूस्ले हाराईसन आपला पाय खाले नई लई येत, तठ लगून ख्रिस्त ना राज्य करान अवश्य शे. सर्वास्तून आखरी शत्रू जो कायम ना साठे नष्ट करामा ईन तो मृत्यु शे. कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे. “परमेश्वर नि सर्व काही तेना पायस्ना खाले करी टाकेल शे.” पण जव तो सांगस कि सर्व काही तेना आधीन करामा एयेल शे, त एनामा परमेश्वर समाविष्ट नई शे कारण कि हवू परमेश्वरच होता जेनी सर्व काही ख्रिस्त नि सामर्थ्य ना आधीन मा करेल होत. जव सर्व काही पुत्र ना आधीन मा करामा ईन, तव पुत्र स्वता त्या परमेश्वर ना आधीन हुई जाईन, जेनी सर्व काही तेना आधीन करी टाक आणि ह्या प्रकारे परमेश्वर सर्वास्वर शासन करीन. कदी मरेल जित्ता नई होवावत, त मंग ज्या तेस्ना साठे बाप्तिस्मा ली ऱ्हायनात त्या काय करतीन? कदी मरेल जित्ताच नई होतस त मंग काब लोक तेस्ना साठे बाप्तिस्मा लेतस? आणि कदी मरेल जित्ताच नई होतात त आमन स्वता ले घळी-घळी संकट मा टाकण मूर्खपणा शे. ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले सांगस कि मी प्रत्येक दिन ले मृत्यु ना सामना करस. मी जो हय सांगी ऱ्हायनु हय खरज सत्य शे, तसाच जसा कि हय बी खर शे कि मी तुमना साठे खुश शे कारण कि तुमी आमना प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास करतस. आठे इफिस मा, मना शत्रू निर्दयी जनावरस्ना सारखा शेतस ज्या मले नुकसान पोहोचाळाना देखी ऱ्हायनात. कदी मना प्रतीफय ह्या जग माच शे, त मी आते बी हय सगळ काब सहन करी ऱ्हायनु? कदी हय खर ऱ्हात कि मले आखरी दिनस्मा परत जित्ता नई करामा येवाव, त चांगल होत कि मी मजा मारतु, जशी कि हय म्हण शे, “या आमी खावूत-पिवूत कारण कि कदाचित कालदिन आमी मरी नई जावूत आणि ती आमनी शेवट राहीन.” ज्या लोक ह्या प्रकार ना गोष्टी करतस तेस्ना कण धोका नका खाइज्यात, “वाईट संगती चांगला चरित्र्यले बिगाळी देस.” शुद्धी मा या आणि पाप कराले सोळी द्या. कारण कि तुमना मधून कितलाक लोक असा शेतस ज्या परमेश्वर ले नई वयखतस. मी तुमले लज्जित करासाठे हय सांगस. आते कोण हय प्रश्न विचारीन, कि “मरेल कसा काय जित्ता होवू सकस? आणि तेस्ना शरीर कोणत्या प्रकार ना राहीन?” जो कोणी असा प्रश्न विचारस तो निर्बुद्धी शे, तुमले हय माहिती शे कि जमीन मा जो बीज पेरामा एस, तेना कोंब निघाना पहिले तेना रूप पूर्णपणे बदली जास. तू जे पेरस, तो त्या भावी शरीर नई शे जो नंतर उत्पन्न हुईन, पण तू उघळा दाना पेरस, भले तो गहू ना राहो कि दुसरा प्रकार ना. पण परमेश्वर आपली ईच्छा ना नुसार त्या बीज ले रूप देस. तो प्रत्येक बीज ले तेना खास शरीर देस. आणि जग मा सर्वा आल्लग-आल्लग प्रकार ना जित्ता प्राणीस्ना शरीर एकसारखा नई शेतस. माणसस्ना मांस जनावरस्ना मांस सारखा नई शे. पक्षीस्ना मांस बी मासास्ना मांस कण आल्लग ऱ्हास. आणि ज्या प्रकारे पृथ्वी वर आल्लग-आल्लग प्रकार ना शरीर शेतस, असाच आकाश मा बी शे जसा सूर्य, चांद आणि तारा. पण आकाश ना वस्तूस्नी सुंदरता आल्लग शे आणि पृथ्वी वरना वस्तूस्नी सुंदरता आल्लग शे. सूर्य नि सुंदरता आल्लग शे, आणि चांद नि सुंदरता आल्लग शे, आणि तारा स्नी सुंदरता आल्लग शे, कारण कि एक तारा पासून दुसरा तारा नि सुंदरता मा अंतर शे. त असच मरेल लोकस्ना परत जित्ता होवावर बी हुईन. ज्या शरीर ले त्या गाळतस तो असा शरीर शे जो सळी जास, पण जव हय परत उठाळा मा ईन त हवू एक असा शरीर राहीन जो सळी नई सकत. जव आमना शरीर ले गाळामा एस, तव तो गंधापटक आणि कमजोर ऱ्हास. पण जव तो जीवन मा परत एस, त तो सुंदर आणि सामर्थ्यवान ऱ्हास. जव शरीर ले गाळामा एस तव तो स्वाभाविक शरीर ऱ्हास, पण जव तो जित्ता होस तव तो आत्मिक शरीर ऱ्हास. ज्या प्रमाणे स्वाभाविक शरीर शे, तर आत्मिक शरीर बी शे. पवित्र शास्त्र मा बी हय लिखेल शे, कि “पहिला माणुस, म्हणजे आदाम, जित्ता प्राणी बनना” आणि शेवट ना आदाम जो कि ख्रिस्त शे, कायम ना जीवन देणार आत्मा बनना. पण जो पहिले उना तो आत्मिक शरीर नई, पण स्वभाविक शरीर होता. आत्मिक शरीर एना नंतर उना. पहिला आदाम जमीन पासून म्हणजे माती कण बनेल होता. दुसरा आदाम जो कि ख्रिस्त शे तो स्वर्ग मधून उना. पृथ्वी वर सर्वा माणसस जोळे तसाच शरीर शे जसा शरीर पृथ्वी ना पहिला माणुस ना जोळे होता. आणि स्वर्ग मा सर्वास जोळे तसाच शरीर राहीन जसा शरीर ख्रिस्त ना जोळे शे, जो स्वर्ग मधून उतरी एयेल होता. जसा आमी त्या माणुस ना रूप ले धारण कर जो माती ना होता, तसाच आमी त्या माणुस ना रूप बी धारण करसुत जो स्वर्गीय होता. ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले सांगस, कि ह्या पृथ्वी वर आमना शरीर मांस आणि रक्त कण बनेल शे, आमी स्वर्ग मा परमेश्वर ना राज्य मा आपला ह्या शरीर ना संगे वास नई करू सकावत. आमी स्वर्ग मा आपला असा शरीर ना संगे नई राहू सकतस जो मरू सकस, कारण कि तठे मृत्यु नई शे. कारण कि आमना हवू शरीर जो सहज मरी जास आणि सळी जास, तेले एक असा शरीर मा बदली जावाले पाहिजे जो नईत कदी मरस आणि नईत कदी सळस. आणि जव अस हुईन, तव ते पूर हुई जाईन जो परमेश्वर नि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, जो सांगस, “जय नि मृत्यु ले गीई लीध.” “ओ मृत्यु तुनी विजय कोठे शे? ओ मृत्यु तुना नांगी कोठे शे?” मृत्यु ले सामर्थ्य पाप पासून भेटस, आणि पाप ले सामर्थ्य मोशे ना नियम पासून भेटस. पण परमेश्वर ना धन्यवाद होवो, जो आमना प्रभु येशु ख्रिस्त ना द्वारे आमले विजय करस. एनासाठे ओ मना प्रिय विश्वासी भावूसहोण, आपला विश्वास मा दृढ आणि ठाम राहा, आणि प्रभु ना काम मा कायम वाळत जावा, कारण कि हय तुमले माहिती शे, कि तुमना परिश्रम प्रभु मा व्यर्थ नई शे. आते मी त्या प्रश्न ना उत्तर देस जो तुमनी मले करेल होता, तुमनी मले त्या वर्गणी ना बारामा विचारेल होत जी यरूशलेम मा राहणारा परमेश्वर ना लोकस्ना साठे करामा एस. जशी आदन्या मनी गलतिया प्रांत नि मंडळीस्ना लोकस्ले दिधी, तसाच तुमी बी करा. प्रत्येक रविवार ना दिन तुमना मधून प्रत्येक आपली कमाई ना नुसार काही आपला कळे ठेवा, एनासाठे कि जव मी येवू तुमले वर्गणी करानी गरज नई पळो. नंतर जव मी तठे ऱ्हासु, त मी त्या लोकस्ले धाळसू जेस्ले तुमी विश्वास योग्य व्यक्तीस्ना रूप कण निवाळशात एनासाठे कि त्या देणगी ले लिसन यरूशलेम शहर मा जावोत. मी तेस्ना संगे एक पत्र बी धाळी दिसू कि तठला विश्वासीस्ना संगे तेस्नी वयख कराळी सकू. आणि कदी मन जान चांगल शे, त मी तेस्ना संगे जासू. आणि मी, मासेदोनिया प्रांत मा जावा नंतर, तुमले भेटाले एसू. कारण कि मले मासेदोनिया प्रांत मधून हुईसन जानच शे. पण होवू सकस कि मी तुमना संगे जास्त टाईम साठे राहू, आणि कदाचित पुरा हिवाया तुमना संगे राहू. एना नंतर जथ मले जान हो, तथा पोहोचाले तुमी मनी मदत करज्यात. मी फक्त थोडा टाईम साठे तुमले भेटीसन आपला प्रवास ले जावाना नई देखस, पण मले आशा शे, कि जर प्रभु नि ईच्छा अशीन त काही जास्त टाईम लगून तुमना संगे ऱ्हासु. पण मी पिन्त्तेकुस्त ना सन ना दिन लगून इफिस शहर मा ऱ्हासु, कारण कि आते बी आठे गैरा लोक शेतस जेस्नी परमेश्वर ना वचन आयकानी ईच्छा शे, आणि मन आठे राहाण गैर उपयोगी शे. जरी आठे विरोध करणारा गैरा शेतस. कदी तीमुथियुस तुमना जोळे करिंथ शहर मा ईजास, त तुमी तेना तुमना मधमा स्वागत करज्यात, कारण कि तो मनासारखा प्रभु ना कार्य करस. एनासाठे कोणी तेले तुच्छ नई समजो, पण जव तो तठून मना जोळे येवा साठे निघस, त तेना प्रवास साठे जी काही गरज शे तुमी तेले देयज्यात. कारण कि तेनी आठे येवानी वाट देखी ऱ्हायनु, कि तो बाकी विश्वासी भावूस संगे येवो. भावू अपुल्लो ना बारामा मले हय सांगण शे कि मनी तेले गैरी विनंती करी कि तो भावूस संगे तुमना जोळे जावो, पण आते तेनी येवानी ईच्छा नई होती. पण परिस्थिती बरी होवावर तो तुमना जोळे ईन. सावधान राहा, विश्वास मा स्थिर राहा, धैर्यशील बना, परमेश्वर ना संगे नाता मा पक्का बनी राहा. तुमी जे काही करतस ते प्रेम मा करा. ओ विश्वासी भावूसहोण, तुमी स्तेफन ले आणि तेना परिवार ले वयखतस, कि त्या अखया प्रांत ना पहिला ख्रिस्ती विश्वासी शेतस, आणि परमेश्वर ना लोकस्नी सेवा करासाठे ऱ्हातस. एनासाठे मी तुमले विनंती करस, कि असा लोकस्नी पुढाकारी ना अनुसरण करा, व प्रत्येक ना जो कठीण परिश्रम करतस आणि ह्या प्रमाणे खरी भक्ती ना संगे सेवा करतस. आणि मी स्तेफन, फर्तूनात आणि अखायिक ना येवा कण खुश शे, कारण कि तेस्ना मुळे तुमना कळून जी मदत नि कमी होती, ती पुरी हुईगी. तेस्नी मले शांती दिधी आणि उत्साहित बी कर. मी आशा करस कि जव तो तुमना जोळे ईन त तुमना साठे बी असाच करतीन. एनासाठे तुमी असास्ना आदर करा. आशिया प्रांत नि मंडळी ना विश्वासीस कळून तुमले नमस्कार, अक्विल्ला आणि तेनी बायको प्रिस्कील्ला ना त्या मंडळी ना विश्वासीस्ना ज्या तेस्ना घर मा एकत्र होतस तेस्ना बी कळून तुमले प्रभु मा गैरा-गैरा नमस्कार. सर्वा विश्वासी भावूस्ना तुमले नमस्कार, ख्रिस्ती प्रेम कण एक दुसराले नमस्कार करत राहा. मी प्रार्थना करस, कि आमना प्रभु येशु नि कृपा तुमना वर होत राहो. तुमी ज्या ख्रिस्त येशु ना संगे एकजूट शेतस, मना प्रेम तुमी सर्वास्ना संगे राहो, आमेन. मी पौल, जो परमेश्वर नि ईच्छा कण ख्रिस्त येशु ना प्रेषित शे, आणि ख्रिस्त मा आमना भावू तीमुथियुस ना कळून परमेश्वर नि ती मंडळी ना लोकस्ले ज्या करिंथ शहर मा शेतस, आणि अखया प्रांत ना परमेश्वर ना सर्वा लोकस्ले मी हय पत्र लिखस. मी प्रार्थना करस, कि आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो. आमना प्रभु येशु ख्रिस्त ना बाप आणि परमेश्वर नि स्तुती हो, जो दयाळू बाप शे, आणि सर्वा प्रकार नि सांत्वना ना झरा शे. तो आमना सर्वा क्लेशस्मा सांत्वना देस, एनासाठे कि आमी त्याच सांत्वना मुळे जी आमले परमेश्वर पासून भेटस, दुसरास्ले बी सांत्वना देवू सकुत, ज्या कोणता हि प्रकार ना क्लेश मा होवोत. कारण कि ज्या प्रकारे आपण पीडा सहन करतस, तसाच ख्रिस्त नि बी पीडास्ले सहन कर, तशीच आपला सांत्वना मा ख्रिस्त ना द्वारे आखो सहभागी हुई ऱ्हायनी. जर आमी क्लेश भोगतस, त तुमी लोकस्ना सांत्वना आणि तारण ना साठे, आणि जर आमले सांत्वना भेटस, त एनासाठे आमी तुमी लोकस्ले सांत्वना देवू सकतस, जेले तुमी धीर कण त्या दुखस्ले सहन करामा समर्थ राहो, जेस्ले आमी बी भोगतस. एनासाठे, आमनी आशा तुमना विषय मा दृढ शे, कारण कि आमले माहित शे, कि जसा तुमी आमना दुखस्मा सहभागी होतस, तसाच आमनी सांत्वना मा बी सहभागी होवोत. ओ विश्वासी भावूसहोण, आमनी तुमले त्या क्लेशस्ना बारामा आठवण देवाळा नि ईच्छा शे, जो आशिया प्रांत मा आमले सहन करना पळणा, तो कष्ट गैरा वजन दार आणि आमनी सहनशक्ती ना बाहेर होता, आठ लगून कि आमनी राहाणी आशा बी सोळी दियेल होती. पण आमी आपला मन मा अस मानी लीयेल होत, कि आमना वर मृत्युदंड नि आज्ञा हुई जायेल शे. पण अस एनासाठे हुयन, कि आमी स्वता वर नई पण परमेश्वर वर विश्वास ठेवू सकोत जो मरेल ले परत जित्ता करस. तेनीच आमले मृत्यु ना असा मोठा संकट पासून वाचाळ, आणि वाचाळीन, आणि तेना पासून आमले हय आशा शे, कि तो पुळे चालीसन बी वाचाळत राहो. तो आमले वाचाळीन कारण कि तुमी प्रार्थना कराना द्वारे आमनी मदत करी ऱ्हायनात जेना मुळे आमले आशीर्वाद भेटीन. परिणाम स्वरूप, गैरा लोक परमेश्वर ना धन्यवाद करतीन कारण कि आमनी सुरक्षा साठे करामा एयेल गैरा लोकस्नी प्रार्थना आयकी लेवामा एयेल शे. आमी मोठा साहस कण आणि शुद्ध विवेक कण हय सांगी सकतस, कि आमी आपला सर्वा कामस्मा ईमानदार ऱ्हायेल शेतस. आणि ह्याच प्रमाणे पवित्रता आणि सत्यता कण सर्वास्ना संगे व्यवहार बी कर, खास करीसन तुमना संगे आणि हय परमेश्वर नि कृपा वर निर्भर होत, नई कि आमनी संसारिक बुद्धी वर. मले विश्वास होता कि तुमी मले समजी सकश्यात, आणि एनासाठे मनी ईच्छा होती कि मी तुमना जोळे परत येवू कि तुमले दुप्पट आशीर्वाद दि सकू. कारण कि मनी योजना होती कि तुमना जोळून हुईसन मकीदुनिया प्रांत ले जावू आणि परत मासेदोनिया प्रांत मधून तुमना जोळे येवू, आणि मले आशा होती कि तुमी यहूदीया प्रांत मा मना प्रवास साठे गरजास्ले पुरा करश्यात. एनासाठे मनी जी ईच्छा करेल होती त काय मनी चंचलपणा दाखाळी? व जे करानी ईच्छा शे शरीर ना नुसार कराना देखस, ज्या पहिले हा, हा सांगतस आणि नंतर नई-नई सांगतस? जसा परमेश्वर विश्वास योग्य शे, त्याच प्रमाणे आमनी तुमले जे सांग ते कायम सत्यच सांग. कारण कि परमेश्वर ना पोऱ्या येशु ख्रिस्त जेना प्रचार आमना द्वारे म्हणजे मना आणि सिल्वान आणि तीमुथियुस ना द्वारे तुमना मधमा हुईना, तो प्रचार कदी बी “हा” व कदी “नई” नई पण परमेश्वर मा कायम “हा” च ऱ्हाएल शे. कारण कि परमेश्वर ना सर्वा करार ख्रिस्त मा “हा” ना संगे पुरा होतस, आणि एनासाठे आमी परमेश्वर नि महिमा साठे ख्रिस्त येशु ना द्वारे “आमेन” सांगतस. परमेश्वर मनी हय सत्यता ना साक्षी शे कि मी दुसऱ्यान्दा करिंथ शहर मा एनासाठे नई उनू कि मनी तुमले कष्ट देवानी ईच्छा नई होती. एन अर्थ हय नई कि आमी तुमना विश्वास वर आपला अधिकार जताळाना देखतस, कारण कि तुमी आपला विश्वास मा स्थिर उभा राहोत. आमी त तुमनीच खुशी साठे तुमना सहकर्मी शेतस. एनासाठे मनी आपला मन मा निश्चय करी लीयेल होत कि तुमले दुख देवा साठे परत तुमना जोळे नई येवू. कारण कि जर मी तुमले दुखी करू, त मले समाधान देणार कोणी नई राहाव. फक्त तोच व्यक्ती जेले मनी दुख दिधा. एनासाठे मनी ह्या गोष्टी तुमले लिख, एनासाठे अस नई हुई जावो कि मना येवावर जेस्ना कण मले खुशी भेटाले पायजे, मी तेस्ना कण उदास होवू. कारण कि मले तुमी सर्वास्वर ह्या गोष्ट ना विश्वास शे, कि जव मी खुश शे त तुमी सर्वा बी खुश शेतस. मोठा क्लेश आणि मन ना कष्ट कण, मी आसा व्हावाळी-व्हावाळीसन तुमले तो पत्र लिखेल होतु, एनासाठे नई कि तुमले दुखी करू, पण एनासाठे कि तुमी त्या मोठा प्रेम ले वयखी लेवोत, जो मले तुमना वर शे. आते जर कोणी दुखी करेल शे, त मलेच नई पण तुमले बी दुखी करेल शे. मी अस एनासाठे सांगी ऱ्हायनु, कारण कि मी तेस्ना संगे गैरा कठीण नई कराना देखत. असा व्यक्ती ले जो दंड तुमना मधून गैरा विश्वासीस्नी दियेल शे, ते पुरेपूर शे. एनासाठे अस करा पेक्षा हय चांगल शे, कि तुमी तेना अपराध माफ करा, आणि तेले प्रोत्साहित करोत, जर तुमी तेले माफ नई करतस त कदाचित तो इतला दुखी हुई जावो कि निराशा मा हार मानीसन ख्रिस्त वर विश्वास कराले सोळी देवो आणि तो जास्त दुख मा डुबी जावो. ह्या मुळे मी तुमले विनंती करस, कि तुमी तेले आश्वासीत करत हय देखाळा कि तुमी आते बी तेना संगे प्रेम करतस. मनी तुमले ते पत्र एनासाठे लिखेल होत, कारण कि मनी तुमले परखा नि ईच्छा होती, कि तुमी मना निर्देशस्ना पालन करासाठे तयार शेतस, कि नईत. ज्या माणुस ले तुमी माफ करतस तेले मी बी माफ करस, कारण कि मी तुमना चांगला साठे ख्रिस्त ना अधिकार कण जे काही बी माफ करानी गरज होती ते माफ करेल शे, एनासाठे कि सैतान ना डाव आमना वर नई चालो, कारण कि आमले तेना वाईट उद्देश माहिती शेतस. जव मी ख्रिस्त नि सुवार्ता आयकाळा साठे त्रोवस शहर मा उनू, त प्रभु नि मले प्रचार साठे महान संध्या दिधात. पण मी गैरा व्याकुळ होतु, कारण कि मले आपला भावू तीत नई भेटणा, एनासाठे मी त्रोवास शहर ना विश्वासीस पासून निघीसन, तीत ले झामला साठे मासेदोनिया प्रांत ले चालना ग्यू. पण परमेश्वर ना धन्यवाद होवो, कारण कि ख्रिस्त ना संगे आमना संबंध ना मुळे तो कायम आमनी पुढाकारी करस आणि आमले जीकाळस, आणि आमना द्वारे प्रत्येक जागा वर ख्रिस्त ले ओयखाना सुगंध पसरावस. कारण कि आमना जीवन परमेश्वर ना जोळे तारण लेणारा आणि नाश होणारा, दोनीस साठे ख्रिस्त ना सुगंध शेतस. नाश होणारस साठे हवू वास घातक हुईसन मोत कळे लीजास, पण मुक्ती लेनारास साठे हवू जीवन दायी हुईसन जीवन कळे लीजास. निश्चित रूप मा कोणी बी ह्या कार्य ले करामा सक्षम नई शे. कारण कि आमी त्या गैरास्ना सारखा नईत, ज्या धन ना साठे परमेश्वर ना वचन ना प्रचार करतस. पण आमी मन नि सत्यता कण, परमेश्वर पासून प्रेरित हुईसन आणि परमेश्वर ले उपस्थित समजीसन, ख्रिस्त ना सेवक ना सारखा बोलतस. काय आमी परत आपला विषय मा गर्व कराले लागी जायेल शेतस? काय दुसरा लोकस सारख हय आमना साठे आवश्यक शे कि आमी तुमले शिफारीशपत्र दाखाळूत कि तुमी लोकस पासून मांगुत. तुमी स्वता एक पत्र ना सारखा शेतस जो आमना साठे वशिला देस. आणि हरेक झन एले वाचू सकस आणि तुमना मधमा आमना करेल कामस्ले वयखू सकस. हय प्रकट शे, कि तुमी ख्रिस्त ना पत्र ना सारखा शेतस, हय पत्र आमनी सेवकाई ना परिणाम शे. जेले शाई कण नई आणि दघळ ना पाट्यास्वर नई पण जीत्ती परमेश्वर नि आत्मा कण माणसस्ना हृदय ना पाट्यास्वर लिखामा एयेल शे. आमी ख्रिस्त ना द्वारे परमेश्वर वर असाच विश्वास ठेवतस. आमी हय नई सांगतस कि आमना मा स्वता कण काही करानी योग्यता शे, पण परमेश्वर आमले हय योग्यता देस. जेनी आमले नवा करार ना सेवक होवाना योग्यता दियेल शे, आमी मोशे द्वारे लिखामा एयेल नियम ना सेवक नई पण पवित्र आत्मा ना सेवक शे. कारण कि मोशे द्वारे लिखेल नियम ना पायन नई कराना परिणाम त मृत्यु शे, पण पवित्र आत्मा जीवन देस. जव परमेश्वर नि मोशे ले दघळ ना पाट्यास्वर लिखेल नियम दिधात, त परमेश्वर नि तेजमय महिमा प्रगट हुईनी. आठ लगून कि इस्त्राएल देश ना लोक मोशे ना तोंड ले त्या प्रकाश मुळे जो क्षण भर ना होता नई देखू सकनात. एनासाठे जर मृत्यु उत्पन्न करणार मोशे ना नियम ना सेवाकार्य इतला तेजमय होता, त पवित्र आत्मा ना मार्गदर्शन मा नवीन करार ना आधीन सेवा ना कार्य आखो बी तेजमय कण भरेल ऱ्हायीन. कारण कि जव दोषी ठरणार करार तेजमय होता, त मंग धर्मी ठरणार करार आखो बी जास्त तेजमय राहीन. खर तर, जुना करार ना तेज नवा करार ना तुलना मा जास्त तेजमय नई ऱ्हायना. एनासाठे, जव जुना करार, जो आते दूर करामा एयेल शे, इतला तेजमय होता, त नवा करार जो कायम ना साठे स्थिर ऱ्हास, तेना तून बी जास्त तेजमय राहीन. एनासाठे अशी आशा ठियसन आमी हिंमत कण बोलतस. आमी मोशे ना सारखा नई शेतस, जेनी आपला तोंड वर परदा टाकेल होता, एनासाठे कि इस्त्राएल देश ना लोक त्या तेज ले नई देखी सकोत जो घटा वर होता. पण त्या मति-मंद हुई ग्यात, कारण कि आज लगून जुना करार ना नियमले वाचता टाईम ले तेस्ना हृदयस्वर तोच परदा पडेल ऱ्हास, पण तो परदा ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे दूर हुई जास. आणि आज लगून जव कदी मोशे ना नियम वाचामा एस, त तेना हृदय वर परदा पडेल ऱ्हास, आणि एनासाठे त्या तेले पूर्णपणे समजू नई सकतस. पण जव कदी त्या प्रभु येशु वर विश्वास करतीन, त तेस्ना हृदय वरना परदा उठी जाईन. प्रभु त आत्मा शे, आणि जठे-कोडे प्रभु ना आत्मा शे, तठे करार कण स्वतंत्रता शे. जठलोंग आमी सर्वास्ना प्रश्न शे, आमना मुख वर परदा नई शे आणि आमी सर्वा आरसा ना सारखा प्रभु नि महिमा ले देखतस. ह्या प्रकारे आमी धीरे-धीरे प्रभु ना तेजोमय प्रतिरूप मा रुपांतरीत हुई जातस आणि तो रूपांतरण प्रभु म्हणजे आत्मा ना कार्य शे. एनासाठे, जव आमना वर अशी दया हुयनी, कि आमले परमेश्वर ना संदेश ना प्रचार करानी सेवा भेटणी, त आमी हिंमत नई सोळतस. पण आमी लज्जा ना गुप्त कामस्ले सोळी टाकेल शे. नईत आमी हुशारपणा कण चालतस आणि नईत परमेश्वर ना वचन मा मिश्रण करतस, पण परमेश्वर ना समोर आमी फक्त खर बोलतस, आणि दुसरास्ले ले विश्वास शे कि आमी विश्वास योग्य शेतस. कारण कि जी सुवार्ता आमी प्रचार करतस जर दपेल शे, त ती नाश होणारस साठेच दपेल शे. ह्या जग ना शासक सैतान नि त्या अविश्वासीस्नी बुद्धी ले अंधा करी टाकेल शे, कारण कि ख्रिस्त जो परमेश्वर ना प्रतिरूप शे, तेना तेजमय सुवार्ता ना प्रकाश तेस्ना वर नई चमको. कारण कि आमी स्वता ले नई पण ख्रिस्त येशु ले प्रचार करतस, कि येशु ख्रिस्त प्रभु शे. आमी स्वता ले ख्रिस्त येशु मुळे तुमना सेवक समजतस. एनासाठे, कि परमेश्वर नि सांगेल शे, “अंधकार मधून उजाय चमको,” आणि तेनीच आमना हृदयस्मा आपला उजाया चमकाळा एनासाठे कि आमी परमेश्वर नि महिमा ले देखी सकोत जी येशु ख्रिस्त ना द्वारे प्रगट होस. आणि त्या माती ना भांडा ना सारखा शेतस जेनामा हय धन भरेल शे, हय दाखाळा साठे, कि हय अपार सामर्थ्य आमना कळून नई, पण परमेश्वर कळूनच शे. आमी कईक प्रकार ना कष्टस्ले भोगतस, पण संकट मा नई पडतस, चिंतीत त शेतस, पण निराश नई होतस. आमले कईक सावा त्रास त देवामा उना पण परमेश्वर आमले एखटा नई सोळत. कईक सावा आमले गैर मारा मा त येस पण परमेश्वर आमले नाश नई होवू देत. आमी प्रत्येक टाईम ले आपला शरीर मा येशु ना दुख व मृत्यु ना अनुभव करतस, एनासाठे कि लोक आमना कामस्ना द्वारे देखी सकोत कि ख्रिस्त आमना मा जित्ता शे. आमी जित्ता ऱ्हातांना येशु मुळे कायम मृत्यु ना सामना करतस, एनासाठे कि येशु ना जीवन आमना शारीरिक देह मा प्रकट होवो. एन अर्थ हय शे कि आमी कायम मृत्यु ना सामना करतस, पण एना परिणाम हय शे कि तुमले कायम ना जीवन भेटो. पण आमी प्रचार करत ऱ्हातस कारण कि आमना मा तीच विश्वास नि आत्मा शे जी भजनस्ना लिखणार मा होती, जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “मनी परमेश्वर वर विश्वास कर, एनासाठे मी सांगस.” कारण कि आमले माहित शे, जस परमेश्वर नि प्रभु येशु ले मरेल मधून परत जित्ता करा, तसाच तो आमले बी येशु ना संगे परत जित्ता करीन, आणि तुमना संगे आमले बी आपली उपस्थिती मा ली जाईन. कारण कि सर्व काही तुमना चांगला साठे शे, कि ज्या प्रकारे परमेश्वर नि कृपा जास्ती जास्त लोकस्मा पसरत जाई ऱ्हायनी, त्याच प्रकारे परमेश्वर नि महिमा ना साठे धन्यवाद नि प्रार्थना बी वाढत जावो. एनासाठे आमी हिंमत नई सोळतस, जरी आमना बाहेर ना मनुष्यत्व नाश हुई जास, तरी बी आमना आत्मिक मनुष्यत्व दिवसानुदिवस नवा होत जास. हवू थोळा टाईम ना हलकासा क्लेश आमना साठे गैरा महत्वपूर्ण आणि कायम नि महिमा उत्पन्न करस, जेना आमी विचार बी नई करू सकतस. एनासाठे आमना डोया दिखणारी वस्तूस्ले नई पण नई दिखणारी वस्तूस्वर टिकेल शे. कारण कि ज्या वस्तू आमी देखतस, त्या थोळासाच दिन ना शेतस. पण नई दिखणारी वस्तू कायम लोंग बनेल ऱ्हास. आमले माहित शे कि आमना शरीर ह्या पृथ्वी वर एक तंबू ना सारखा शे जेनामा आमी ऱ्हातस, जव हय नाश हुई जाईन त आमले राहा साठे परमेश्वर ना कळून स्वर्गवर एक असा भवन भेटीन, जेले तेनी स्वता नि बनायेल शे आणि ते कायम ना साठे राहीन. एनासाठे आमी ह्या शरीर मा कण्हतस आणि येनातून बी जास्त आपला स्वर्गीय शरीर धारण करानी तीव्र लालूस करतस. जव आमी त्या स्वर्गीय शरीर ले घाली लीसुत त आमी नागा नई सापळावत. आणि आमी ह्या शारीरिक तंबू मा ऱ्हातांना भार कण कण्हतस, कारण कि आमी ह्या जुना शरीर ले काळाले नई देखतस पण तेनावर नवा स्वर्गीय शरीर घालाना देखतस, एनासाठे कि तो मरणहार शरीर कायम ना जीवन मा बदली जावो. परमेश्वर नि आमले ह्या बदलाव साठे तयार करेल शे, आणि तेनीच आमले बेना मा आपला पवित्र आत्मा बी दियेल शे. एनासाठे आमी कायम हिंमत बनाई ऱ्हातस आणि हय समजतस, कि जठ लगून आमी शरीर मा ऱ्हातस, तठ लगून आमी प्रभु पासून दूर शे, जो स्वर्ग मा शे. कारण कि जठ लगून आमी ह्या पृथ्वी वर जित्ता शे, तठ लगून आमी तेले बिगर देखाना विश्वास कण तेना मांगे चालतस. एनासाठे आमी धीर ठेवत, आणि शरीर मा आल्लग हुईसन प्रभु ना संगे राहाले आखो बी चांगल समजतस. एनामुळे भले आमी तेना संगे स्वर्ग मा राहोत, कि आमी पृथ्वी वर राहोत, आमनी एकच अभिलाषा हय शे कि आमी प्रभु ले आवळतस. कारण कि अवश्य शे कि आमी सर्वा ख्रिस्त ना न्याय सिंहासन ना समोर उपस्थित होवोत, कि तो आमना न्याय करो. प्रत्येक व्यक्ती नि शरीर मा ऱ्हातांना जे काही करेल शे, भले ते चांगल राहो कि वाईट, तेले तेना फय भेटीन. एनासाठे प्रभु ना भय मानीसन आमी लोकस्ले विनंती करतस कि त्या सत्य वर विश्वास करोत. परमेश्वर ले आमना बारामा सर्व काही माहिती शे आणि मी आशा करस कि तुमी बी आपला हृदयस्मा आमले चांगल्या प्रकारे वयखतस. आमी तरी बी आपली बळाई तुमना समोर नई करतस, पण आमना आपला बारामा तुमले गर्व करानी संधी भेटो, आणि तुमी तेस्ले उत्तर देवू सकोत, ज्या मन वर नई, पण दाखाळा ना कामस्वर गर्व करतस. जर आमी येळा शेतस, त परमेश्वर ना साठे शेतस, आणि जर समजदार शेतस त तुमना साठे शेतस. ख्रिस्त ना प्रेम आमले विवश करी टाकस, कारण कि आमी निश्चित शे, कि जव एक व्यक्ती सर्वा लोकस साठे मरी ग्या त सर्वा लोक मरी ग्यात. आणि ख्रिस्त ह्या मुळे सर्वास्ना साठे मरी ग्या कि ज्या जित्ता शेतस, त्या पुळे चालीसन स्वता ले खुश करासाठे नई जगोत पण त्या तेना साठे जगोत जो तेस्ना साठे मरणा आणि जेले परमेश्वर नि परत जित्ता करा. एनासाठे आमी आते पासून कोले बी सांसारिक नजर कण नई देखतस, आणि जर आमी ख्रिस्त ले बी पयले सांसारिक नजर कण देखेल होतुत, पण आते पासून असा नई करावत. एनासाठे, जर कोणी ख्रिस्त वर विश्वास करस, त तेले नवा मनुष्यत्व भेटेल शे. जुना मनुष्यत्व बीती ग्या, देखा, त्या सर्वा नवा हुई जायेल शेतस. आणि सर्वा गोष्टी परमेश्वर ना कळून शे, जेनी ख्रिस्त ना द्वारे आपला संगे आमनी सामंजस्य करी लीधा, आणि सामंजस्य नि सेवा आमले सोपी टाकेल शे. म्हणजे परमेश्वर नि ख्रिस्त ना द्वारे आपला संगे जग नि सामंजस्य करी लीधा, आणि लोकस्ना पापस्ले लोकस्वर नई लाव आणि परमेश्वर नि सामंजस्य ना संदेश ना प्रचार आमले सोपी टाकेल शे. एनासाठे आमी ख्रिस्त ना राजदूत शेतस, आणि परमेश्वर आमना द्वारे तुमी लोकस्ले बी विनंती करस. आमी ख्रिस्त ना कळून विनंती करतस, कि परमेश्वर ना संगे सामंजस्य करील्या. ख्रिस्त पाप पासून अज्ञात होता, पण तेलेच परमेश्वर नि आमना साठे पाप ठराव, कि आमी परमेश्वर नि नजर मा धर्मी बनी जाउत कारण कि ख्रिस्त नि आमना पापस्ना दंड आपला वर लीलीधा. आमी ज्या परमेश्वर ना सहकर्मी शेतस आमी तुमले हय बी विनंती करतस, कि परमेश्वर नि जी कृपा तुमना वर हुईनी व्यर्थ नका राहू द्या. कारण कि पवित्र शास्त्र मा परमेश्वर अस सांगस, “योग्य टाईम वर मनी तुमनी प्रार्थना आयकी, आणि तारण ना दिन मनी तुमनी मदत करी.” आयका, आते योग्य टाईम शे, आते तारण ना दिन शे. आमी परमेश्वर ना सहकर्मी होवाना नाते कोणाच रस्ता मा अळखळन नई टाकतस, एनासाठे कि कोणी आमना सेवाकार्य वर डाग नई लावो. पण आमी प्रत्येक परिस्थिती मा स्वता ले परमेश्वर ना योग्य सेवक प्रमाणित करतस, आमी कष्ट, विपत्ती आणि संकट ले मोठी धीर कण सहन करतस. आमले चाबूक कण मारा मा उन, बंदिवास मा टाकामा उन, आमना वर गर्दी नि उत्पात कर. आमनी गैर कष्ट कर, आमी रात-रात भर जागनुत आणि भुक्या ऱ्हायनूत. आमी आपला निर्दोष स्वभाव, ज्ञान, सहनशीलता, दयाळूपणा, पवित्र आत्मा ना काम, निष्कपट प्रेम ना द्वारे परमेश्वर ना निवाळेल दास साबित करतस, आमनी सत्य ना प्रचार म्हणजे परमेश्वर ना सामर्थ्य कण स्वता ले परमेश्वर ना योग्य सेवक प्रमाणित करेल शे. आमना जोळे धार्मिकता रुपी हत्यार हमला कराले आणि स्वता ना बचाव करासाठे शे. जव लोक आमनी प्रशंसा करतस व जव त्या आमना शी घृणा करतस, तव त्या दुसरास्ले सांगतस, कि आमी वाईट व चांगला लोक शेतस, आणि आमले भटकावणारा समजतस, जव कि आमी सत्य बोलतस. आमी अनजानस्ना सारखा शेतस, तरी बी सर्वा लोक आमले वयखतस. आमी मरेल समजामा येतस, पण जसा कि तुमी देखतस आमी जित्ता शेतस. जरी आमी मार खातस, पण मरतस नई. आमी दुखी शेतस, तरी बी प्रत्येक टाईम ले खुश शेतस. आमी स्वता गरीब दिखतस, पण गैरास्ले आत्मिक रिती कण धनवान बनाई देतस. तरी बी सर्व काही आमन शे. ओ करिंथ शहर ना विश्वासीसहोण, आमी तुमना संगे मोक्या गोष्टी करेल शेतस, आमी तुमना वर पुरा हृदय कण प्रेम करतस. आमना मन मा तुमना साठे प्रेम कमी नई हुईना, पण तुमना प्रेम आमना साठे कमी हुयेल शे. पण आपला पोर समजीसन तुमले सांगस, कि तुमी बी तेना बदला मा पुरा हृदय कण प्रेम करा. अविश्वासीस्ना संगे सहभागीता नका ठेवा, कारण कि धार्मिकता आणि अधर्म ना मेय नई होवू सकत. उजाय आणि अंधार नि संगती नई होवू सकत. ख्रिस्त नि सैतान ना संगे मित्रता नई होवू सकत. विश्वासी ना संगे अविश्वासी ना कोणताच नात नई होवू सकत. मूर्तीस्ना साठे परमेश्वर ना मंदिर मा काहीच जागा नई. कारण कि आमी त जित्ता परमेश्वर ना मंदिर शेतस, जसा परमेश्वर नि पवित्र शास्त्र मा सांगेल शे, “मी त्या लोकस्ना मधमा ऱ्हासु आणि तेस्ना संगे चाल-फिर करसू. मी तेस्ना परमेश्वर होसू आणि त्या लोक मनी प्रजा होतीन.” एनासाठे परमेश्वर पवित्र शास्त्र मा आमले सांगस, “त्या लोकस्ना मधून निघी या, आणि तेस्ना पासून आल्लग राहा. आणि अशुद्ध वस्तूस्ले स्पर्श नका करा, त मी तुमले स्वीकार करसू. आणि तुमना बाप होसू आणि तुमी मना पोर आणि पोरी होशात, हय सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर ना वचन शे.” ओ प्रिय विश्वासीहोण, जव कि या सर्वा प्रतिज्ञा आमले परमेश्वर कळून भेटेल शेतस, एनासाठे या आमी सर्वा आपला शरीर आणि मन ना सर्वा प्रकार नि भ्रष्टता ना कार्य ले कराना बंद करूत, आणि परमेश्वर ना आदर करत पवित्र जीवन जगाना प्रयत्न करूत. तुमी आमना वर पुरा हृदय कण प्रेम ठेवा, आमी नईत कोणा संगे अन्याय करनुत, आणि नईत कोले बिगाळेल शे, आणि नईत कोले ठगनुत. मी तुमले दोषी ठरावासाठे हय नई सांगत कारण कि मनी पहिलेच सांगी दियेल शे, कि आमी तुमना वर पुरा हृदय कण प्रेम करतस, आणि भले आमी जगोत कि मरोत, आमी तुमना पासून कदीच आल्लग नई होवावत. मी तुमना संगे गैरा हिम्मत कण बोली ऱ्हायनु, मले तुमना वर गैरा गर्व शे, मी गैरा प्रोत्साहित शे, आपला सर्वा क्लेशस्मा मी खुशी कण भरेल ऱ्हास. कारण कि जव मी त्रोआस शहर मधून निघीसन मासेदोनिया प्रांत मा उनू, तरी बी आमना शरीर ले कोणताच आराम नई भेटणा, पण आमी प्रत्येक प्रकार ना कष्टस कण घेरायेल ऱ्हातस. बाहेर सर्वी कळे झगळा होत होतात, आमना हृदयस्मा भयानक भीती होती. तरी बी दुखी लोकस्ले सांत्वना देणार परमेश्वर नि तीत ना येवा कण आमले सांत्वना दिधा. आणि नईत फक्त तीत ना येवा कण पण तेनी ती सांत्वना कण बी, जी तीत ले तुमना कळून भेटेल होती. आणि तुमनी मले भेटानी ईच्छा, तुमी लोकस्ना पश्चाताप आणि मनासाठे तुमी लोकस्ना चिंता ना विषय मा आमले सांगणात येणा कण मना आनंद आजून बी जास्त हुईग्या. मनी जे पत्र तुमले लिख तेना कण मले काहीच पचतावा नई होत, जरी तुमी तेना कण दुखी हुयेल शेतस. पहिले मले पचतावा होत होता जव मनी देख कि तुमी एना कण दुखी हुयेल शेतस, पण तो दुख थोडासा टाईम साठे होता. आते मी खुश शे पण एनासाठे नई कि तुमले दुख हुईना पण एनासाठे कि तुमी त्या दुख मुळे पाप करान सोळीसन परमेश्वर कळे मन लाव. कारण कि तुमना दुख परमेश्वर नि ईच्छा ना नुसार होता, आणि आमना कळून तुमले कोणतीच गोष्ट ना नुकसान नई हुयना. कारण कि परमेश्वर आमले पाप पासून दूर करासाठे आमना जीवन मा दुख टाकस एनासाठे कि आमी तारण ना शोध करूत. आणि असा दुख कण आमले पचतावन नई पळत, पण सांसारिक दुख ना परिणाम मृत्यु शे. एनासाठे ध्यान द्या कि परमेश्वर कळून एयेल दुख नि तुमना मा काय-काय बदलाव करेल शे. अशी उत्सुकता भरेल तत्परता, आपला पक्ष स्पष्ट करानी अशी मोठी ईच्छा, अन्याय ना साठे असा मोठा राग, संकट ना साठे अशी सावधानी. मना संगे भेट करानी अशी तेज ईच्छा, सेवा ना साठे असा उत्साह व दुराचारी ले दंड देवाना साठे अशी जल्दी ना द्वारे तुमनी हय साबित करी दिधा कि सगळ काही चांगल करामा तुमनी काही बी कमी नई सोळेल शे. खरज मनी ते पत्र एनासाठे नई लिखेल होत कि मले अन्याय करणारा म्हणजे अन्याय सहन करणारा व्यक्ती नि जास्त चिंता होती, पण मनी एनासाठे लिख, कि परमेश्वर तुमले दाखाळो कि तुमी लोक आमनी कितली चिंता करतस. एनासाठे आमले शांत्वन भेटणी. आणि ह्या शांत्वन तून जास्त आमी तीत नि खुशी देखीसन आखो बी खुश हुई उठनुत, कारण कि तेना मन तुमना मुळे आखो बी जास्त खुश हुई जायेल शे. कारण कि जर मनी तेना समोर तुमना विषय मा काही गर्व नि गोष्ट दाखाळ, त मले लाजे नई भरण पळण, पण जसा आमनी तुमले सर्वा गोष्टी खरा-खरा सांगी टाकेल होतुत, तसाच आमन गर्व करान तीत ना समोर बी खरा निघना. जव तेले आठवण येस कि तुमी सर्वास्नी तेना गोष्टीस्ले मान आणि कापत-कापत तेना स्वागत करणात, त तुमना प्रती तेना प्रेम आखो बी व्हाळी जास. आते मी गैरा खुश शे, कारण कि मले तुमना वर प्रत्येक गोष्ट मा विश्वास शे. आते ओ विश्वासी भावूसहोण, आमी तुमले परमेश्वर ना त्या कृपा ना समाचार देतस, जो मासेदोनिया प्रांत ना विश्वासीस्नी मंडळीस्वर हुईना. जव त्या गैरा क्लेशस्ना द्वारे परखा मा उनात, तव बी तेस्नी मोठी खुशी व्यक्त करी आणि जरी त्या गैरा गरीब होतात तरी बी तेस्नी दुसरा विश्वासीस्नी मदत साठे उदारपणा कण आर्थिक रूप मा मदत करणात. तेस्ना विषय मा मनी हय साक्ष शे, कि तेस्नी जीतल शक्य होत तितल दिध आणि तेस्ना क्षमता पेक्षा जास्त मन कण दिध. तेस्नी स्वताच मोठी आस्था कण मले विनंती करी कि तेस्ले बी यरूशलेम शहर मा राहणारा संतस्नि मदत साठे सेवा-कार्य मा भाग लेवाना सोभाग्य भेटो. आमले आशा नई होती कि त्या इतला उदारपणा कण देतीन, पण तेस्नी सर्वास्तून पहिले स्वता ले प्रभु नि सेवा साठे समर्पित करी टाक, नंतर परमेश्वर नि ईच्छा कण स्वता ले आमना अनुकरण करासाठे समर्पित करी टाक. एनासाठे आमनी तीत ले समजाळ, कि जस तेनी या काम ले सुरु कर होत, तसाच प्रेम नि हय विशेष सेवा ले चालू ठेवो आणि पुरा करामा तुमनी मदत करो. पण जसा तुमी प्रत्येक गोष्ट मा म्हणजे विश्वास मा, ज्ञान आणि सर्वा प्रकार ना मेहनत मा, आणि त्या प्रेम मा जो आमना वर ठेवतस, व्हाळत जातस, तसाच गरीब विश्वासीस्ले दान देवाना कामस्मा बी व्हाळत जावा. मी दान देवाना संबंध मा तुमले कोणतीच आज्ञा नई दि ऱ्हायनु, पण दुसरा विश्वासीस्ना उदाहरण दिसन तुमले हय दाखाळान देखस कि त्या दुसरास्नी मदत कराना साठे कितला उत्सुक शेतस, मनी ईच्छा शे कि तुमी बी असाच इमानदारी कण दुसरास्ले प्रेम करा. तुमले आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा माहिती शे, कि तो धनी हुईसन बी तुमना साठे गरीब बनी ग्या एनासाठे कि तेले गरीब हुईजावा मुळे तुमी धनी हुई जावोत. ह्या गोष्ट मा मना मत हवूच शे, कि जो काम तुमी लोकस्नी मांगला वरीस ले चालू करेल होता आणि जी योजना ले तुमनी स्वता बनायेल होती, आते तेले पुरा करा माच तुमन चांगल शे. एनासाठे आते हय काम पुरा करा, तुमी जी तत्परता कण एनी योजना करेल होती, त्याच तत्परता कण तेले पुरा करा, तसाच आपला-आपला सामर्थ्य ना नुसार दान द्या. जर तुमना मन मा दान देवानी उत्सुकता शे, त सामर्थ्य ना नुसार जे काही देतस, ते परमेश्वर मान्य करस. पण तो कोणा कळून हय ईच्छा नई ठेवस कि कोणी आपली सामर्थ्य तून जास्त दान देवो, पण तेनी हय ईच्छा शे कि जे काही तेना जोळे शे तीतलाच दान देवो. जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जेनी गैर आवर तेन काहीच जास्त नई निघन, आणि जेनी थोडस आवर तेन काही कमी नई निघन.” परमेश्वर ना धन्यवाद होवो, जेनी तुमना साठे जसा उत्साह मना मा तुमना साठे होता तोच उत्साह तीत ना मन मा बी टाकी दियेल शे. जव आमी तेले तुमना जोळे जावाले सांग त तेनी आमनी गोष्ट ना आदर कर, पण तो गैरा उत्साहित कण तुमले परत भेटाले तयार शे. तेना संगे आमी दुसरा विश्वासी भावू धाळेल शे, जेना नाव सुवार्ता पसाराना बारामा सर्वा मंडळीस्ना विश्वासीस्मा पसरेल शे. आणि ईतलच नई, पण तो मंडळी ना लोकस्ना द्वारे ठरावामा बी एयेल शे कि ह्या दान ना काम साठे आमना संगे जावो. आणि आमी हय सेवा एनासाठे करतस, कि प्रभु नि महिमा आणि यरूशलेम शहर मा राहणारा विश्वासीस्ना प्रती हय प्रगट होवो कि आमी तेस्ले मदत कराना साठे गैरा उत्सुक शे. तीत ना संगे त्या विश्वासी भावू ले धाळीसन आमी ह्या गोष्ट मा चौकस ऱ्हातस, कि ह्या उदारता ना काम ना बारामा जेनी सेवा आमी करतस, कोणी आमना वर दोष नई लाई सको. कारण कि आमी नईत फक्त प्रभु ना नजर मा पण माणसस्ना नजर मा बी चांगली वागणूक कराना ध्यान ठेवतस. एनासाठे आमी त्या दोन झनस संगे एक आजून विश्वासी भावू ले धाळी ऱ्हायनूत, जेले आमी घळी-घळी पारखीसन गैरा गोष्टीस्मा उत्साहित देखेल शेतस. पण आते तुमना वर तेले मोठा विश्वास शे, ह्या मुळे तो आखो बी जास्त उत्साहित शे. जर कोणी तीत ना बारामा मा विचारस, त तो मना जोळीदार आणि तुमना साठे मना सहकर्मी शे. आणि कदी आमना विश्वासी भावूस्ना बारामा विचारस, त त्या मंडळी ना साठे धाळामा एयेल ख्रिस्त ले महिमा देणारा लोक शे. एनासाठे, आपला प्रेम तेस्ना वर प्रगट करा, आणि पुरी मंडळी ना विश्वासीस्ना समोर हय प्रमाण द्या, कि तुमना बारामा आमना गर्व करान बरोबर शे. यरूशलेम शहर मा राहणारा विश्वासीस्नी मदत ना साठे आर्थिक मदत धाळीसन करामा येणार सेवा ना बारमा, मले तुमले लिखाणी गरज नई. कारण कि मले माहिती शे कि तुमनी मदत करानी ईच्छा शे, जेना मुळे मी तुमना बारामा मासेदोनिया प्रांत ना विश्वासीस्ना समोर गर्व करस, कि अखया प्रांत ना लोक मदत करासाठे एक वरीस पासून तयार शेतस. खरज हवू तुमना उत्साह होता जेनी तेस्ना मधून कईक लोकस्ले मदत कराना साठे उभारेल शे. पण मनी ह्या तीन विश्वासी भावूस्ले तुमना जोळे एनासाठे धाळेल शे, कि आमनी जो गर्व तुमना बारामा दाखाळा, तो ह्या गोष्ट मा व्यर्थ नई ठरो. पण जस मनी सांग, तसाच तुमी यरूशलेम शहर ना विश्वासीस्ले मदत करासाठे तयार राहोत. अस नई होवो, कि कदी कोणी मासेदोनिया प्रांत ना एक विश्वासी मना संगे येवो, आणि तुमले आर्थिक मदत ना संगे तयार नई देखो, त आमले तुमना वर आमना विश्वास मुळे लाजे भरण पळो, पण तुमी आमना तून जास्त लाजे भरश्यात. एनासाठे मनी, ह्या विश्वासी भावूस्ले हय विनंती करान चांगल समज कि त्या पहिले पासूनच तुमना जोळे जावोत. आणि तुमनी उदारता ना मुळे जेना बारामा पहिले पासून प्रतिज्ञा करामा एयेल होत, तयार करी ठेवो, कि हय दबाव कण नई पण उदारता कण मदत ना सारखा तयार हो. पण गोष्ट त हय शे, कि जो कमी पेरस तो थोडच कापीन बी, आणि जो जास्त पेरस तो जास्त कापीन. प्रत्येक झन जसा मन मा निच्चय करस तसाच दान करो, नईत कुड-कुड करीसन आणि नईत दबाव कण, कारण कि परमेश्वर खुशी कण देणार वर प्रेम करस. परमेश्वर तुमना गरजास्तून जास्त प्रत्येक प्रकार ना आशीर्वाद देवू सकस. जेना कण प्रत्येक गोष्टी मा आणि प्रत्येक टाईम वर, सर्व काही, जे तुमले आवश्यक हो, तुमना जोळे राहो, एनासाठे कि प्रत्येक चांगला काम साठे तुमना जोळे गैर काही राहो. जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “परमेश्वर नि गरजाळूस्ले उदारता कण दिध, तेनी धार्मिकता कायम बनेल राहीन.” परमेश्वरच शे, जो शेतकरीले पेरासाठे बीज आणि जेवा साठे भाकर देस. त्याच प्रकारे, तो तुमले संसाधन दिन आणि तेले व्हाळाईन आणि तव तो तुमना मा उदारता ना पिक ले उत्पन्न करीन. तो तुमले आखो जास्त मालदार बनावो कि तुमी आखो जास्त उदारता कण दि सको, आणि जव आमी तुमनी दियेल मदत ले त्या लोकस लगून पोहोचाळसुत जेस्ले एनी गरज शे, त त्या परमेश्वर ना धन्यवाद करतीन. कारण कि ह्या सेवा पुरी करा कण नईत फक्त परमेश्वर ना लोकस्ना गरजा पुरा होतस, पण लोकस्ना कळून परमेश्वर ना गैरा धन्यवाद होस. तुमनी हय सेवा प्रमाण वर मानीसन लोक परमेश्वर नि महिमा करतीन, कारण कि तुमी ख्रिस्त नि सुवार्ता ले मानीसन तेनावर विश्वास करतस आणि सहभागीता नि भावना कण तेस्नी व सर्वास्नी उदारपणा कण मदत करतस. त्या तुमना साठे परमेश्वर ले प्रार्थना करतीन. त्या तुमना वर प्रेम करतस, कारण कि तेस्ले माहिती शे कि परमेश्वर नि तुमी लोकस्वर मोठी कृपा करेल शे. परमेश्वर ले तेना पुत्र ना रूप मा त्या दान ना साठे जो वर्णन ना बाहेर शे, धन्यवाद हो. हय खर शे कि आमी जग मा ऱ्हातस, पण आमी जगिक लोकस्ना सारखा झगळा नई करतस. आमना लळाई ना हत्यार जगिक नई, पण परमेश्वर ना सामर्थ्य ना हत्यार शेतस, जेस्ना वापर आमी सैतान ना गढस्ले पाळी टाकासाठे करतस. आमी विचारस्ना आणि प्रत्येक उंच गोष्ट ना खंडन करतस, ज्या लोकस्ले परमेश्वर ले वयखा पासून रोकाना प्रयत्न करस. आणि ह्या हत्यार ना द्वारे प्रत्येक भावना ले काबू मा करीसन ख्रिस्त ना आज्ञाकारी बनाई देतस. आणि तयार ऱ्हातस कि जव तुमी पूर्णपणे ख्रिस्त ना आज्ञाकारी बनी जाश्यात, त आमी प्रत्येक प्रकार ना आज्ञा नई मानणारस्ले दंड देवो. तुमी फक्त बाहेर ना रूप ले जो डोयास्ना समोर स्पष्ट शे, देखतस. जर कोणा आपला वर हवू विश्वास राहो, कि तो ख्रिस्त ना शे, त तो हय बी समजी लेवो, कि जसा तो ख्रिस्त ना शे, तसाच आमी बी ख्रिस्त ना शेतस. कारण कि जर मी त्या अधिकार ना बारामा आखो बी गर्व दाखाळू, जो प्रभु नि मले तुमना विश्वास ले नाश करासाठे नई, पण तुमना विश्वास ले व्हाळावा साठे आमले दियेल शे, त लज्जित नई होवाव. हय मी एनासाठे सांगस, कि पत्रस्ना द्वारे तुमले घाबरावणारा नई ठरू. कारण कि तुमना मधून काही लोक सांगतस, “तेना पत्र त गंभीर आणि प्रभावशाली शेतस, पण जव तो आमना संगे ऱ्हास, त तो कमजोर आणि तेना गोष्टी हलका माहित पळतस.” एनासाठे ज्या लोक असा सांगतस, त्या एनावर विचार करो कि आमी दूर ऱ्हायसन पत्रस्मा ज्या गोष्टी लिखतस, तसाच तुमना समोर आमना काम बी ऱ्हातीन. कारण कि ज्या लोक स्वतानीच स्तुती करतस, आमी तेस्ना बरोबर होवानी व तेस्ना संगे आपली तुलना करानी हिम्मत नई करतस. त्या स्वतानाच मापदंड कण आपली मोजणी करतस आणि आपला स्वतानी प्रशंसा करतस. ह्या प्रकारे त्या आपली मूर्खता ना परिचय देतस. जे काम परमेश्वर नि आमले दियेल शे आमी त त्या काम वर मर्यादा ना भायेर कदी बी गर्व नई करावत. पण आमना साठे कार्य-क्षेत्र नि जी सीमा निर्धारित करी आणि जेनामा तुमी लोक बी सहभागी शेतस, आमी तेना मधमा ऱ्हासुत. आमी आपला कार्य-क्षेत्र ना उल्लंघन नई करतस, जरी तुमी लोक आमना क्षेत्र ना मधमा शेतस, कारण कि आमी सर्वास्ना पहिले तुमना आठे ख्रिस्त नि सुवार्ता ना प्रचार कर. आमी परमेश्वर ना द्वारे दियेल कार्य-क्षेत्र ना सीमा ना उल्लंघन करत दुसरास्ना कष्ट वर गर्व नई करतस, पण आमी आशा करतस कि जसा-जसा तुमी लोकस्ना विश्वास व्हाळत जाईन, त तुमी लोकस्ना द्वारे आमी आखो बी जास्त लोकस लगून पोहोची सकसुत. आणि आमी दुसरा दूर-दूर ना क्षेत्रस्मा सुवार्ता आयकाळसुत. ह्या प्रकारे दुसरास्ना क्षेत्र मा जो काम हुई जायेल शे, आमले तेनावर गर्व करानी गरज नई पळाव. पण पवित्र शास्त्र सांगस, “जो कोणी गर्व करस, तो प्रभु वर गर्व करो.” एनासाठे जो आपली प्रशंसा करस तो नई, पण जेनी प्रशंसा प्रभु करस, तोच स्वीकारा योग्य शे. मनी ईच्छा शे कि तुमी मले सहन करील्या जर मी एक मूर्ख सारखा शे, मनी सहन करी लेत जावा. कारण कि मी तुमना बारामा मा चिंता तसाच करस, जसा परमेश्वर करस, एनासाठे कि मनी करार करेल शे, मी एकमात्र नवरदेव ख्रिस्त ना संगे तुमनी मांगणी संपन्न करनू, जेना कण मी तुमले पवित्र कुवारी ना सारखा तेना समोर आणि सकू. पण मी घाबरस कि जसा सैतान नि साप ना रूप मा आपली चतुराई कण, हव्वा ले फसाळ, तसाच तुमना मन त्या सीधापणा आणि पवित्रता कण जी ख्रिस्त नि प्रती भक्ती मा होवाले पाहिजे कदी भ्रष्ट नई करामा ईजावोत. कारण कि कदी कोणी तुमना जोळे ईसन, कोणी दुसरा येशु ना प्रचार करो. जेना प्रचार आमनी नई कर, व कोणता दुसरा आत्मा ले स्वीकारा साठे सांगनुत जो पहिले तुमले नई भेटणा, व कोणती दुसरी सुवार्ता ले स्वीकारा साठे सांगनुत जी तुमी पहिले स्वीकार नई करणात. त तुमी लोक असा व्यक्ती ना पहिले स्वागत करतस. त मी समजस, कि मी कोणतीच गोष्ट मा त्या लोकस तून कमी नई शे, ज्या स्वता ले मोठा तून मोठा प्रेषित समजतस. जरी मी बोलामा अशिक्षित शे, पण मना मा ज्ञान नि कमी नई शे, आणि मनी तुमना प्रत्येक टाईम ले आणि प्रत्येक परिस्थिती मा शिक्षा देवा कण ह्या गोष्ट ले साबित कर. मनी तुमले परमेश्वर नि सुवार्ता फुकट मा आयकाळेल शे, आणि स्वता ले खाले कर, कि तुमी उचा हुई जावोत, त काय मनी एनामा काही पाप कर? तुमी लोकस्नी सेवा करासाठे मनी दुसरा मंडळीस पासूनच आपली उपजीविका ना साठे दान स्वीकार कर. आणि जव मी तुमना संगे होता, आणि मले पैसास्नि कमी पळणी, त मनी कोणावर भार नई टाका, कारण कि विश्वासी भावूस्नी, मासेदोनिया प्रांत मधून ईसन मनी कमी ले पुरी कर. आणि मनी प्रत्येक गोष्ट मा स्वता ले तुमी लोकस्वर भार बना पासून रोक आणि येणारा दिनस्मा बी भार बना पासून रोकी ठेवसू. जस कि निश्चित रूप कण ख्रिस्त ना सत्यता मना मा शे, तर अखया प्रांत मा कोणी मले ह्या गोष्ट वर गर्व करा पासून नई रोकाव. काय मनी तुमन पैसा नई लीधा? काय मनी हय अस एनासाठे कर कि मी तुमना वर प्रेम नई करत? परमेश्वर ले माहिती शे कि मी तुमना वर प्रेम करस. पण जे मी करस, तेच करत ऱ्हासु, एनासाठे कि त्या प्रेषितस्ले ह्या गोष्ट वर गर्व करानी संधी नई भेटो कि त्या प्रचार ना काम मा आमना सारखा शेतस. कारण कि असा लोक खोटा प्रेषित, आणि छळ कण काम करणारा, आणि ख्रिस्त ना प्रेरित होवाना खोटा दावा करणारा शेतस. हय काही आश्चर्य नि गोष्ट नई कारण कि सैतान स्वता बी ज्योतिर्मय स्वर्गदूत ना रूप धारण करीसन बहिकावस. एनासाठे कदी तेना सेवक बी धार्मिकता ना सेवकस सारखा रूप धारण करीसन बहिकाळोत, त काही मोठी गोष्ट नई, पण तेस्ना शेवट तेस्ना कामस्ना नुसार हुईन. मी परत सांगस, कोणीच मले मूर्ख नका समजा; नईत मूर्खच समजीसन मनी सहन करील्या, एनासाठे कि थोडासा मी बी गर्व करी सकू. ह्या संबंध मा बिगर भ्यावाना मी जे काही सांगस, त प्रभु ना कळून नई, पण समजा मूर्खता कणच सांगस. जव कि गैरा लोक ह्या जग ना लोकस सारखा गर्व करतस, त मी बी गर्व करसू. तुमी त समजदार हुईसन खुशी कण मूर्खस्ना गोष्टीस्ले सहन करीलेतस. कारण कि जव कोणी तुमले दास बनाईलेस, व तुमनी धन-संपत्ती खाई लेस, व शोषण करस, व स्वता ले तुमना तून हुशार समजस, व तुमना तोंड वर थाप मारस, त तुमी सहन करीलेतस. मी लाज ना संगे स्वीकार करस कि तुमी लोकस्ना संगे ह्या प्रकार ना व्यवहार कराना मले साहास नई हुईना. तुमी एले मनी नादानी समजोत, पण ज्या गोष्टीस्ना बारामा त्या गर्व कराना साहास करतस, मी बी त्या गोष्टीस्ना बारामा गर्व करी सकस. काय त्याच इब्री लोक शेतस? मी बी शे. काय त्याच इस्त्राएल देश ना लोक शेतस? मी बी शे. काय त्याच अब्राहाम ना वंश ना शेतस? मी बी शे. काय त्या ख्रिस्त ना सेवक शेतस? मी एळास्ना सारखा सांगस, कि मी तेस्ना तून चांगला सेवक शे. मनी तेस्ना तून गैरा जास्त परिश्रम करेल शे, तेस्ना तून गैरा जास्त बंदी बनावामा एयेल शे, असंख्य सावा मार खायेल शे, घळी-घळी मना जीव संकट मा पळेल शे. पाच सावा मनी यहुदी पुढारीस्ना हातस कण चाबकास्ना फटका खायेल शेतस. तीन सावा मले काठी कण मार, एक सावा मनावर दगडफेक करामा उन, तीन सावा असा हुयना कि ज्या जहाज मा मी प्रवास करत होता ते तुटी ग्या, आणि एक सावा मी पुरी रात आणि दिन समुद्र मा अथा-तथा वाहत काळ. मी घळी-घळी प्रवासस्मा, बाड ना धोकास्मा, डाखूस्ना धोकास्मा, आपला जातीवालास्ना धोकास्मा, बिगर यहुदीस्ना धोकास्मा, नगरस्ना धोकास्मा, जंगलस्ना धोकास्मा, समुद्रस्ना धोकास्मा, खोटा विश्वासीस्ना मधमा धोकास्मा ऱ्हायनु. मनी कठीण परिश्रम कर आणि गैरा रात जागत बिताळनु. मले गैरा सावा जेवण नई भेटन, भूक-तहान, थंडी मा नेहमी बिगर कपळास्ना ऱ्हायसन सहन करत ऱ्हायनु. ह्या सर्व्या बाहेर ना संकटस्ले सोळीसन दररोज मनावर सर्वा मंडळीस्ना चांगला ना चिंता ना भार बनेल ऱ्हास. जव कोणी कमजोर ऱ्हास, त मले बी कमजोर वाटस. जव कोणी पाप मा पळस, त मी दुख कण भरी जास. जर गर्व करान अवश्य शे, त मी आपली कमजोरिणी गोष्टस्वर गर्व करसू. परमेश्वर, जो आमना प्रभु येशु ना बाप शे. युगानयुग धन्य शे. तेले माहिती शे कि मी खोट नई बोलत. जव मी दमिश्क नगर मा होता, त राजा अरीतास ना राज्यपाल नि मले धरा साठे नगर वर पहरा बठाळी ठीयेल होता. पण मले टोमा मा बठाळीसन गावकुसार नि खिडकी मधून खाले सोळामा उन, आणि मी त्या राज्यपाल ना हात कण वाची निघनु. जरी गर्व करान त मनासाठे चांगल नई, तरी बी करन पडस, पण मी प्रभु ना दिएल दर्शनस्नि आणि प्रकटीकरणस्नी चर्चा करसू. मी ख्रिस्तीस्मा असा एक माणुस ले ओयखस, जो चौदा वरीस पहिले उंच स्वर्ग लगून वरे उचला मा उना, मले हय माहिती नई कि तो शरीर ना संगे होता कि बिगर शरीर ना होता, पण फक्त परमेश्वरलेच माहिती शे. एनासाठे, असा माणुस वर त मी गर्व करसू, पण आपली कमजोरीले सोळीसन, मी आपला बारामा मा कोणतीच गोष्ट वर गर्व नई कराव. कारण कि जर मी गर्व करानी ईच्छा करू तरी बी मूर्ख नई होवाव, कारण कि खर सांगसू, पण स्वता ले ह्या प्रकार ना गर्व पासून दूर ठेवस, एनासाठे कि अस नई हुई जावो, असा कोणी मले देखस, व मना पासून आयकस, मले तेना तून जास्त व्हाळीसन समजो. पण मी परमेश्वर ना द्वारे दाखाळेल प्रकटीकरणस्नी विपुलता मुळे गर्व नई कराले पायजे, मना शरीर मा एक मोठी पीडा ना साठे कोणी काटा ना सारखा दियेल शे आणि सैतान ना एक दूत मले त्रास देत ऱ्हास, कारण कि मी गर्व नई करी सकू. एना बारामा मनी तीन सावा प्रभु ले विनंती करी, कि मना पासून हय दूर हुई जावो. पण तेनी मले सांग, “मनी कृपा तुना साठे पुरे-पूर शे. कारण कि मनी सामर्थ्य कमजोरी मा प्रगट होस.” एनासाठे मी मोठी खुशी कण आपली कमजोरी वर गर्व करसू, कि ख्रिस्त नि सामर्थ्य मनावर ऱ्हास. ह्या मुळे मी ख्रिस्त ना साठे कमजोरीस्मा, आणि निंदास्मा, दरिद्रतास्मा, उपद्रवस्मा, आणि संकटस्मा खुश शे, कारण कि जव मी कमजोर होस, तरच मी ख्रिस्त नि सामर्थ्य मा शक्तिशाली होस. मी एळा त बनणु, पण तुमनीच मले असा बनाना साठे विवश कर. तुमले त मनी शिफारस कराले पाहिजे होती, कारण कि जरी मी काही बी नई, तरी बी त्या प्रेषितस तून ज्या स्वता ले मोठा म्हणावतस, कोणतीच गोष्ट मा कमी नई शे. जव मी तुमना संगे होतु, तव मी तुमना समोर ह्या गोष्ट ले साबित कर कि मी ख्रिस्त येशु ना खरा प्रेषित शे. कारण कि मी धीर कण तुमना मधमा चिन्ह, अदभूत काम, आणि सामर्थ्य ना कामस्ले करनू. एक काम जे मनी तुमना संगे नई कर, जे कि मनी दुसरा मंडळीस्ना संगे कर, ते हय शे कि मी कदी बी तुमना वर आर्थिक भार नई बनणु, तुमी मले ह्या अन्याय ना साठे माफ करा. आते मी तिसरा सावा तुमना जोळे येवाले तयार शे, आणि मी ह्या टाईम ले बी तुमना पासून कोणतीच आर्थिक मदत नई लेवाव. कारण कि मले तुमनी संपत्ती नई, पण तुमीच मले पाहिजेत. कारण कि पोरस्ले माय-बापस्ना साठे धन एकत्र नई कराले पाहिजे, पण माय-बापस्ले पोरस साठे धन एकत्र कराले पाहिजे. मी तुमना साठे गैरी खुशी कण आपल सर्व काही खर्च करसू आणि स्वता ले बी समर्पित करसू, मी तुमना वर गैरा प्रेम करस, पण अस वाटस कि तुमी मनावर थोडासाच प्रेम करतस. तुमी सर्वास्ले माहित शे कि मी आपली गरज पूर्ण करासाठे तुमना वर भार नई बनणु. तरी बी तेस्ना मधून काही लोक मनावर हय सांगीसन दोष लावतस, कि “मी धूर्त शे, आणि मनी तुमले फसाळीसन पैसा लीधा.” जव मनी तीत व कोणी दुसरास्ले तुमना जोळे धाळ, काय मनी तेस्ना मधून कोणा द्वारे तुमना पासून फायदा उचलनु? मनी तीत ले समजाळीसन तेना संगे दुसरा विश्वासी भावू ले धाळनु, त काय तीत नि युक्ती करीसन तुमना पासून काही लीध? काय आमी एकच उद्देश ना नुसार नई चालनुत? काय आमी एक सारखाच नई वागनुत? मना प्रिय विश्वासीहोण तुमी आते लगून समजी ऱ्हायना होतीन कि आमी तुमना समोर प्रत्युत्तर दि ऱ्हायनूत पण अशी गोष्ट नई शे. पण आमी त परमेश्वर ले उपस्थित समजीसन ख्रिस्त ना कळून भेटेल अधिकार कण बोलतस. कि जे काही बी आमी सांगतस ते तुमनाच विश्वास ले पक्का करासाठे करतस. कारण कि मले भीती शे, कदी अस नई हुई जावो, कि जव मी तुमना जोळे येवू, जशी मनी ईच्छा शे, तसा तुमले नई देखू, आणि जशी तुमनी ईच्छा नई शे तसाच मले देखतस. मले भीती शे, तुमना मा झगळा, डाह, राग, स्वार्थ, ईर्ष्या, चुगली, अभिमान, आणि गोंधय देखू. आणि कदी अस नई होवो कि जव मी तुमना जोळे पोहोचू, जशी मनी ईच्छा शे, तसा तुमले नई देखू. त मना परमेश्वर मले परत तुमना समोर लीन करो आणि मले त्या असंख्य लोकस साठे शोक करन पळो. जेस्नी पहिले पाप कर आणि आपली अशुद्धता, व्यभिचार आणि लबाळी ना साठे मन नई फिरायेल शे. पवित्र शास्त्र मा हय लिखेल शे, कि “दोन व तीन साक्षीदारस्नि साक्ष ना द्वारे सर्व काही प्रमाणित करामा ईन.” जव मी दुसरा सावा तुमना संगे होतु, तरी मनी तेस्ले जताळेल होत ज्या पाप करी ऱ्हायंतात. आणि आते मी ह्या पत्र मा परत तेस्ले आणि सर्वा लोकस्ले जताळस, जस कि मनी पहिले बी जताळेल होत. आते मी तिसरा सावा एवावर शे, जर तेस्नी आते बी पाप करान नई सोळ, त कोणी बी दंड पासून नई वाचू सकाव. कारण कि मना द्वारे ख्रिस्त बोलस एना प्रमाण तुमले पाहिजे, जव परमेश्वर तुमना चुकीस्ले सुधारस त तो दुर्बळ नई शे, पण तो आपली सामर्थ्य ले तुमना मधमा प्रगट करस. हय खर शे तेले दुर्बळता मुळे क्रूस वर चळावामा त उन, तरी बी परमेश्वर नि सामर्थ्य कण जित्ता शे. त्याच प्रकारे आमी बी तर ख्रिस्त ना सारखा शरीरिक पणा मा दुर्बळ त शेतस. पण तुमी देखश्यात कि आमी परमेश्वर नि सामर्थ्य ना द्वारे तेना संगे जित्ता ऱ्हासुत. स्वता ले परखा आणि तपासा, कि ख्रिस्त येशु मा तुमना विश्वास खरा शे कि नई, जर तुमले हय नई माहिती कि येशु ख्रिस्त तुमना मा शे, त एना अर्थ हय शे कि तुमना विश्वास खरा नई शे. पण मनी आशा शे, कि तुमी वयखी लीश्यात. कि आमी वायबार नई शेतस. आमी आपला परमेश्वर ले प्रार्थना करतस, कि तुमी काहीच वाईट नई करोत, हय दाखाळा ना साठे नई कि आमना सेवाकार्य तुमी लोकस्ना मधमा यशस्वी शे, पण एनासाठे कि तुमी चांगल करोत, भले आमी स्वता वायबार होवो. कारण कि आमी सत्य ना विरोध मा काहीच नई करू सकतस, पण सत्य ना साठेच करू सकतस. जव आमी दुर्बळ शेतस, आणि तुमी विश्वास मा शक्तिशाली शेतस, त आमी खुश होतस, आणि हय प्रार्थना बी करतस कि तुमी विश्वास मा सिद्ध हुई जावोत. ह्या मुळे, तुमना जोळे येवाना पहिले हय गोष्ट मी तुमले लिखस. एनासाठे कि जव मी तुमना जोळे येवू त मले मना अधिकार ले दाखाळानी गरज नई पडो, जो प्रभु नि मले तुमले दंड देवाना साठे दियेल शे. कारण कि मी आपला अधिकार ना उपयोग तुमना विश्वास ले पक्का कराना देखस, नाश कराना साठे नई. आणि आते, ओ विश्वासी भावूसहोण, खुश राहा, सिद्ध बनत जावा, एक दुसरास्ले प्रोत्साहित करा, एकच मन ठेवा, एक-दुसरा ना संगे सामंजस्य कण राहा, आणि प्रेम आणि शांती ना परमेश्वर तुमना संगे राहीन. ख्रिस्ती प्रेम कण एक दुसरा ना अभिवादन करा. सर्वा पवित्र लोक तुमले नमस्कार सांगतस. प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा आणि परमेश्वर ना प्रेम आणि पवित्र आत्मा नि सहभागीता तुमी सर्वास्ना संगे होत राहो. मी प्रार्थना करस कि, परमेश्वर बाप आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो. ख्रिस्त येशु नि आमना पाप साठे आपला जीवन ले बलिदान करी टाक, एनासाठे कि आमना परमेश्वर आणि बाप नि ईच्छा नुसार आमले ह्या वर्तमान वाईट जग पासून सोळाईन. मी प्रार्थना करस कि तेनी स्तुती आणि बळाई युगानयुग होत राहो. आमेन. मी आश्चर्य चकित शे कि ज्या परमेश्वर नि तुमले ख्रिस्त नि कृपा ना द्वारे बलाव तेना कण तुमी इतला जल्दी फिरीसन एक आल्लग प्रकार नि शिक्षा ना अनुसरण कराले लागेल शेतस. फक्त एकच खरी सुवार्ता शे, पण काही लोक तुमना दिमाक ले भ्रम मा टाकीसन ख्रिस्त ना संदेश ले बीगाळाले देखतस. पण कदी आमना मधून कोणी एक व स्वर्ग मधून खाले उतरेल कोणता स्वर्गदूत बी तुमले त्या सुवार्ता ले सोळीसन जी आमनी तुमले आयकाळेल शे. कोणती दुसरीच प्रकार नि शिक्षा तुमले देस आणि त्या शिक्षा ना बारामा हवू दावा करस कि हईच सुवार्ता शे, त परमेश्वर तेले श्राप देवो. जस आमी पहिले सांगी दियेल शेतस, तसच मी आते परत सांगस, कि ती सुवार्ता ले सोळीसन जिले तुमी स्वीकार करेल शेतस. कदी कोणी दुसराच प्रकार नि शिक्षा तुमले देस आणि त्या शिक्षा ना बारामा हय दावा करस कि हईच सुवार्ता शे, त परमेश्वर तेले श्राप देवो. स्पष्ट रूप कण मनी माणसस्ले नई पण परमेश्वर ले खुश करानी ईच्छा शे. कारण कि जर मी आते लोंग लोकस्ले खुश करत ऱ्हातु, त मी ख्रिस्त ना दास बनेल नई ऱ्हातु. ओ विश्वासी भावूसहोण, मनी तुमले सांगानी ईच्छा शे, कि जी सुवार्ता मनी आयकाळेल शे, ती माणसस्ना विचारस्वर आधारित नई शे. कारण कि ती मले आजोबास पासून नई भेटणी आणि नईत कोणी धार्मिक शिक्षक नि मले शिकाळेल शे, पण येशु ख्रिस्त नि ती चांगली बातमी ले मनावर प्रगट करेल शे. तुमी आयकी लीयेल शेतस कि मी कोणत्या प्रकारे यहुदी ना नियम ना पालन कऱ्या करत होतु, आणि मी परमेश्वर नि मंडळीस्ना विश्वासीस्ले गैरा त्रास देत होतु आणि नाश कराना प्रयत्न करत होतु. आणि मी यहुदी धर्म मा आपला वय ना यहुदी जोळीदारस्तून जास्त आपला आजोबास्नि शिक्षास्ना अभ्यास कराले आणि तेस्नी आदन्यास्ले माना साठे गैरा उत्सुक राहात होतु. पण परमेश्वर नि आपली कृपा कण, मना जल्म होवाना पहिलेच मले निवाळी लीध आणि तेनी सेवा साठे मले बलाव. आणि जव तेनी निर्णय लीधा, कि आपला पोऱ्या ले मनावर प्रगट करो, एनासाठे कि मी बिगर यहुदीस्मा तेनी सुवार्ता ना प्रचार करू. त मी ह्या बारामा सल्ला लेवाले कोणा जोळे नई ग्यू. ज्या मले प्रेषित बनाना पहिले प्रेषित होतात, तेस्ले भेटासाठे मी यरूशलेम शहर ले नई ग्यू. पण मी लगेच अरब देश ले चालना ग्यू आणि नंतर दमिश्क नगर ले परती उनू. मंग तीन साल नंतर मी केफा (पेत्र) ले भेट करासाठे यरूशलेम शहर ले ग्यू, आणि तेना जोळे पंधरा दिन लगून ऱ्हायनु. पण तेना नंतर कदी मी कोणता प्रेषित ले भेटेल शे त फक्त प्रभु ना भावू याकोब संगे. परमेश्वर ले माहिती शे कि ज्या गोष्टी मी तुमले लिखी ऱ्हायनु त्या खऱ्या शेतस, खोट्या नईत. एना नंतर मी सिरीया प्रांत आणि किलकिया ना प्रांतस्मा उनू. पण यहूदीया प्रांत मा राहाणाऱ्या मंडळीस्ना लोकस्नी ज्या आते ख्रिस्त मा शेतस मले व्यक्तिगत रूप कण नई देखेल होतात. पण त्या मना बारामा हईच आयकत होतात, कि एक टाईम ले जो आमले त्रास देणार होता, एनातून पहिले तो लोकस्ले ख्रिस्त वर विश्वास कराले रोकाना प्रयत्न करत होता, आते तोच त्या विश्वास ना प्रचार करी ऱ्हायना. एनासाठे त्या मना बारमा परमेश्वर नि महिमा कऱ्या करत होतात कारण कि तेनी मले त्रास देणार पासून ख्रिस्त ना अनुसरण करणार ना रूप मा बदली दियेल होता. चौदा साल नंतर मी बर्णबा ना संगे यरूशलेम शहर ले ग्यू आणि तीत ले बी संगे लीग्यू. मी तठे ग्यू कारण कि परमेश्वर नि मले दाखाळेल होत, कि मले तठे जावाले पाहिजे. जव मी तठे होतु त मी पुढारीस संगे व्यक्तिगत रूप कण भेटणु आणि तेस्ले त्या सुवार्ता ना बारामा सांग जी मी बिगर यहुदीस्मा प्रचार करी ऱ्हायंतू. एनासाठे कि अस नई हुई जावो, कि जे मी करी ऱ्हायंतू आणि वर्तमान मा करी ऱ्हायनु तेना परिणाम काहीच नई निघो. मना जोळीदार तीत जो ग्रीक शे, तेना सुंता कदीच करामा नई एयेल होता. तरी बी, यरूशलेम शहर नि मंडळीस्ना पुढारीस्नी तेले स्वीकार कर. तेस्नी सुंता करावाना साठे तेनावर कोणतीच जबरजस्ती नई करी. आणि हय त्या खोटा विश्वासी भावूस्ना मुळे हुईन, ज्या आमना समाज मा चोरी कण इग्यात आणि त्या स्वातंत्रता ले नाश कराना प्रयत्न करी ऱ्हायंतात जी आमना तारणार येशु मा आमले भेटेल शे. एनासाठे कि त्या परत आमले यहुदी नियम ना गुलाम बनाई सकोत. तेस्ना संगे सहमत होवा साठे आमी एक घळी भर बी स्वीकार नई कर, एनासाठे कि तुमी सुवार्ता नि सत्यता मा कायम बनेल राही सकोत. नंतर त्या यरूशलेम शहर ना मंडळी ना पुढारीस्नी जो संदेश मी शिकाळी ऱ्हायंतू तेले बदला साठे मले जबरजस्ती नई कर. मले ह्या गोष्ट कण कोणताच फरक नई पळत कि त्या पुढारी कोण शेतस, कारण कि परमेश्वर वरला रूप देखीसन न्याय नई करत. पण तेस्नी देख, कि जसा परमेश्वर नि सुंता करेल यहुदी लोकस साठे सुवार्ता प्रचार कराना काम पेत्र ले सोप तसाच बिगर सुंता बिगर यहुदी लोकस्ले सुवार्ता आयकाळाना काम मले सोपामा एयेल शे. कारण कि ज्या परमेश्वर नि पेत्र ले सुंता करेल यहुदीस्ना प्रेषित बनाईसन तेना द्वारे सेवा-कार्य करना, तेनीच मले बी बिगर यहुदीस्ना प्रेषित बनाईसन मना द्वारे सेवा-कार्य करना. नेम. ज्या लोक मंडळी ना खांबा समजामा येत होतात, म्हणजे याकोब, केफा आणि योहान तेस्नी कृपा ना त्या वरदान ले वयख जो मले भेटेल शे. तेस्नी मले आणि बर्णबा ले आपला सहकर्मी समजीसन आमले सहभागीता ना उजवा हात दिधा, आणि त्या गोष्ट साठे सहमत हुईनात कि आमी बिगर यहुदीस जोळे जावोत आणि त्या सुंता करेल यहुदीस जोळे. तेस्नी आमले फक्त हय विनंती करी, कि यरूशलेम ना गरीब विश्वासीस्नी मदत करोत, आणि हय तेच काम होत जेले मनी करानी ईच्छा होती. एक दिन जव केफा (पेत्र) अंत्युखिया शहर मा उना, त मनी तेना विरोध कर आणि मले दुसरा विश्वासीस्ना समोर तेले फटका मारन पळण, कारण कि तो जे करी ऱ्हायंता ते चूकीन होत. एनासाठे कि जठ लगून यरूशलेम शहर मधून याकोब कळे धाळामा एयेल काही विश्वासी माणस अंत्युखिया शहर मा नई उनात, तठ लगून पेत्र बिगर यहुदी लोकस संगे जेवण करत होता. पण जव याकोब ना आठून कईक लोक उनात, त तेनी तेस्ना संगे राहाण आणि जेवण करन बंद करी टाक, कारण कि तो त्या सुंता करेल यहुदीस कण भ्यात होता. आणि तेना संगे बाकीना यहुदीस्नी बी कपट कर आठ लगून कि बर्णबा बी तेस्ले भ्यात होता आणि तेनी बी बिगर यहुदीस्ना संगे प्रीती-भोज ठेवण बंद करी टाकेल होत. पण जव मनी देख, कि त्या खरज सुवार्ता नि सत्यता ना पालन नई करी ऱ्हायनात. त मनी सर्वा विश्वासीस्ना समोर केफा (पेत्र) ले सांग. “जव तू यहुदी हुईसन बिगर यहुदीस्नी रिती-रिवाजस्ना पालन करस आणि यहुदीस्नी रिती-रिवाजस्ना पालन नई करत त तू बिगर यहुदीस्ले यहुदीस्नी रिती-रिवाजस्ना पालन करासाठे जबरजस्ती काब करस?” आमी ज्या जन्म पासून यहुदी शेतस, आणि त्या दुसरा जाती ना शेतस, जेस्ले बिगर यहुदी पापी सांगतस. तरी बी आमी यहुदी विश्वासीस्ले हय माहिती शे कि मोशे ना नियम ना पालन करीसन कोणी बी माणुस परमेश्वर नि नजर मा धर्मी नई ठरू सकत. एनासाठे आमी स्वता नि बी ख्रिस्त वर विश्वास कर, कि आमी मोशे ना नियम ना पालन करीसन नई पण येशु ख्रिस्त वर विश्वास करा कण धर्मी ठरोत. कारण कि नियम ना पालन करीसन कोणी बी माणुस धर्मी नई ठरू सकत. आमी ज्या धर्मी ठराना देखतस आणि कदी स्वताच पापी निघतस, त काय एना अर्थ हय शे कि ख्रिस्त नि आमले पाप कराव? कदीच नई. पण कदी मी त्या वस्तुले परत स्वीकार करस जी मनी पहिले सोळी दियेल होती, म्हणजे नियम ना पालन कराना, त मी खरज पापी ठरसू. मी समजस कि मोशे ना नियम ना पालन कराना द्वारे मले धर्मी घोषित नई करामा येवू सकत. एनासाठे मी अस समजस कि नियम ना बारामा मरी ग्यू एनासाठे कि मी परमेश्वर ना साठे जित्ता राही सकू. हय अस शे जसा जव ख्रिस्त क्रूस वर मरणा, त मी बी तेना संगे मरी ग्या आते मी जित्ता नई शे पण ख्रिस्त मना मा जित्ता शे. आणि जसा आते मी जगी ऱ्हायनु त फक्त परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास ठियसन जित्ता शे. जो मना संगे इतला प्रेम करस कि तेनी मनासाठे आपला जीव दिटाका. मी ह्या गोष्ट ले नकारू नई सकत कि परमेश्वर नि आमना प्रती आपली कृपा ना मुळे आमले वाचाळेल शे, कारण कि कदी लोक मोशे ना नियम ना पालन करीसन धार्मिकता ले प्राप्त करी सकत होतात, त ख्रिस्त न मरण व्यर्थ हुई जात. ओ बिगर बुद्धीस्ना गलती शहर ना राहाणारा विश्वासीसहोण, कोणी तुमना डोया वर परदा टाकी दिधा? मनी तुमले स्पष्ट रूप कण येशु ख्रिस्त ना क्रूस वर मराणा कारण ले सांग. मले तुमना पासून फक्त हईच समजी लेन शे, कि तुमले जो पवित्र आत्मा भेटणा तो काय मोशे ना नियम ना पालन करा मुळे भेटणा, कि सुवार्ता ले आयका मुळे आणि तेनावर विश्वास करा मुळे भेटणा? काय तुमी असा बिगर बुद्धी ना शेतस, कि आत्मा नि रीत वर सुरुवात करीसन आते शरीर ना रीत वर समाप्ती करशात? काय तुमी जो इतला दुख उचलनात तो व्यर्थ शे? मी आशा करस कि ते व्यर्थ नई होत. परमेश्वर नि तुमले पवित्र आत्मा विपुलता कण दिधा आणि तुमना मधमा चिन्ह-चमत्कार करात. पण काय तेनी हय सर्व एनासाठे कर कारण कि तुमी मोशे ना नियम ना पालन करतस? व एनासाठे कि तुमनी ख्रिस्त ना बारामा आयक आणि तेनावर विश्वास कर? आते अब्राहाम नाच उदाहरण ले लिल्या, “अब्राहाम नि त परमेश्वर वर विश्वास कर आणि हय तेना साठे धार्मिकता मोजामा उणी.” त तुमी हय समजी ल्या, कि ज्या लोक अब्राहाम ना सारखा परमेश्वर वर विश्वास करतस, त्या अब्राहाम ना पोर शेतस. आणि परमेश्वर ना पुस्तक मा गैरा टाईम पहिले हय लिखामा एयेल होत कि परमेश्वर बिगर यहुदीस्ले विश्वास कण धर्मी ठराईन, आणि पवित्र शास्त्र ना द्वारे अब्राहाम ले पहिलेच हय सुवार्ता देवामा उणी, कि “तुना मा सर्वा जातीस्ले आशीर्वाद भेटीन.” त ज्या अब्राहाम ना सारखा परमेश्वर वर विश्वास करतस, त्या विश्वासीस्ले अब्राहाम ना संगे आशीर्वाद भेटस. एनासाठे जीतला लोक मोशे ना नियम ना कामस्वर विश्वास ठेवतस, त्या सर्वा परमेश्वर ना श्राप ना आधीन मा शेतस, कारण कि लिखेल शे, “जो कोणी मोशे ना नियम नि पुस्तक मा लिखेल सर्व्या गोष्टीस्ले करामा स्थिर नई राहत, तो श्रापित शे.” पण हय स्पष्ट शे, कि मोशे ना नियम ना व्दारे परमेश्वर समोर कोणी धर्मी नई ठरत कारण कि धर्मी झन विश्वास कण जित्ता राहीन. पण मोशे ना नियम ना विश्वास संगे काहीच संबंध नई, पण “जो तेस्ले मानीन, तो तेस्ना मुळे जित्ता राहीन.” पण ख्रिस्त नि आमले मोशे ना नियम ना श्रापस पासून सोळाई लीयेल शे. जव ख्रिस्त क्रूस वर मरणा, त तेनी आमना पापस्ना श्रापस्ले आपला वर लीलीधा. कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जो कोणी झाळ वर लटकावा मा येस तो श्रापित शे.” ख्रिस्त नि हय एनासाठे कर, कि अब्राहाम ना आशीर्वाद ख्रिस्त येशु मा बिगर यहुदी लगून भीळो, आणि आमी विश्वास ना व्दारे त्या आत्मा ले प्राप्त करोत, जेना करार हुयेल शे. ओ विश्वासी भावूसहोण, मी साधारण जीवन ना उदाहरण ले दि ऱ्हायनु, कि माणसस्ना करार बी जो पक्का हुई जास, त नईत कोणी तेले टाइ सकस आणि नईत तेनामा काही वाळावस. ह्याच प्रमाणे, करार अब्राहाम ले, आणि तेना वंश ले देवामा उणी, पवित्र शास्त्र मा हय नई लिख, कि “तुना वंशज ले,” जस गैरास्ना बारामा सांगेल शे, पण जस एक ना बारामा कि “तुना वंश ले,” आणि तो ख्रिस्त शे. पण जे मी सांगी ऱ्हायनु तेना अर्थ हय शे, कि जो करार परमेश्वर नि पहिले पासून पक्का करेल होता, तेले मोशे ना नियम चार शे तीस साल नंतर ईसन नई टाइ सकत, जेना कण कि प्रतिज्ञा व्यर्थ ठरो. जर मिरास ना आधार मोशे ना नियम शे त मिरास करार ना आधार वर होवूच नई सकत. पण परमेश्वर नि अब्राहाम ले हय मिरास फुकट मा दि टाक जो परमेश्वर नि तेले देवानी प्रतिज्ञा करेल होता. त मंग मोशे ना नियम ना उद्देश काय ऱ्हायना? मोशे ना नियम त एनासाठे देवामा उना कि लोकस्ले माहिती पळो कि त्या कितला पापी शेतस. पण नियम त त्या वंश ले येवा लगूनच प्रभावशाली ऱ्हायनी, जेले करार देवामा एयेल होता, आणि परमेश्वर नि आपला नियम स्वर्गदूतस्ना द्वारे मोशे ले दिधा जो परमेश्वर आणि लोकस्ना मधमा मध्यस्थ होता. मध्यस्थ नि गरज तव पळस जव एक व दोन तून जास्त लोकस्ना मधमा करार करामा येस. परमेश्वर जो एकच शे, तेनी अब्राहाम ना संगे करार करतांना कोलेच मध्यस्थ नई ठेव. त काय मोशे ना नियम परमेश्वर ना करार ना विरुद्ध मा शे? कदीच नई. कारण कि कदी मोशे ना नियम आमले कायम ना जीवन देवू सकत होता, त आमी मोशे ना नियम ना पालन करीसन धर्मी ठरतस. पण पवित्र शास्त्र सांगस कि सर्वा जग ना लोक पाप ना आधीन शेतस, आणि एनासाठे तो नवा करार जेना आधार येशु ख्रिस्त वर विश्वास करान शे, परमेश्वर नि विश्वास करणारस्ले दियेल शे. ख्रिस्त ना येवाना पयले, आमी यहुदीस्ले कैद मा ठेवामा एयेल होत आणि मोशे ना नियम आमनी रक्षा करत होता आणि त्या विश्वास ले येता लोंग जो प्रगट होणार होता, आमी तेनाच बंधन मा ऱ्हायनूत. एनासाठे मोशे ना नियम ख्रिस्त ना येवा लगून आमना मार्गदर्शन करासाठे आणि आमनी देखरेख करासाठे देवामा एयेल होता, एनासाठे कि आमी ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे परमेश्वर ना समोर धर्मी ठरी सकुत. आते जव कि आमनी ख्रिस्त वर विश्वास करेल शेतस त आते आमले मदत साठे आणि मार्गदर्शन साठे मोशे ना नियम नि गरज नई शे. एनासाठे तुमी सर्वा येशु ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे परमेश्वर ना पोर शेतस. कारण कि तुमना मधून जीतलास्नी ख्रिस्त मा बाप्तिस्मा लीयेल शेतस, तेस्नी ख्रिस्त येशु ना स्वभाव ले नवा कपळा ना सारखा घाली लीयेल शे. एनासाठे आते नईत यहुदीस्मा आणि नईत बिगर यहुदीस्मा भेद ऱ्हायना, नईत गुलाम मा आणि स्वातंत्र मा भेद ऱ्हायना, नईत नर मा आणि नईत नारी मा भेद ऱ्हायना, कारण कि तुमी सर्वा ख्रिस्त येशु मा एक शेतस. आणि कदी तुमी ख्रिस्त संगे एकत्र शेतस, त तुमी अब्राहाम ना परिवार ना हिस्सा शेतस, आणि त्या आशीर्वाद तुमले भेटतीन जेस्ले देवाना करार परमेश्वर नि करेल शे. मी तुमले ह्या उदाहरण ना द्वारे समजाळस, पोऱ्या आपला बाप नि संपत्ती ना वारीस शे, पण जठ लगून तो बाळच शे, तठ लगून तो दास सारखा शे आणि तेले संपती वर अधिकार नई. जठ लगून तो बाळच शे, आणि बाप ना ठरायेल ना नुसार संपत्ती ना मालक होवाना अवस्था लगून नई पोहोची जास, तठ लगून तो रक्षक आणि कारभारीस्ना आधीन मा ऱ्हास. तसाच आमी बी, जव त्या बाळ सारखा होतुत, त ह्या जग ना रिती-रिवाज आणि नियमस्ना गुलाम होतुत. पण जव परमेश्वर ना ठरायेल टाईम पुरा हुईना, त परमेश्वर नि आपला पुत्र ले ह्या जग मा धाळ आणि तो बाई ना द्वारे उत्पन्न हुईना, आणि मोशे ना नियम ना पालन करत जीवन जगणा. एनासाठे कि ज्या मोशे ना नियम ना आधीन होतात तेस्ले तो खंडणी भरीसन सोळावो, आणि आपले पोऱ्या ना हक्क भेटो. आणि जव कि आमी तेना पोर शेतस, त परमेश्वर नि आपला पुत्र नि आत्मा ले आमना हृदय मा धाळेल शे, जो आत्मा परमेश्वर ले “ओ अब्बा, ओ बाप” म्हणीसन हाकामारस. एनासाठे, आते तुमी दास नई ऱ्हायनात, पण पुत्र शेतस, आणि जव पुत्र हुईनात त जे काही परमेश्वर नि आपला पोरस्ले देवानी प्रतिज्ञा करेल शे ते तुमले भेटीन. जव तुमी परमेश्वर ले नई वयखत होतात, त्या टाईम ले तुमी तेस्ना दास होतात ज्या खरज मा देव शेतसच नईत. पण आते तुमी परमेश्वर ले वयखतस, नईत हय सांगाले पाहिजे कि परमेश्वर नि तुमले वयखी लीयेल शे, त तुमी काब दुर्बळ, वायबार इत्यादी शिक्षास्ना गोष्टीस कळे फिरी ऱ्हायनात? तुमी काब दुसरा सावा तेस्ना दास बनाना देखतस? मनी आयकेल शे कि तुमी बिगर यहुदी विश्वासी यहुदीस्ना दिन, महिना, आणि ऋतू आणि सालस्ले मानतस. मी तुमना बारामा चिंतामा शे, काय मना श्रम जो मनी तुमना साठे करेल शे व्यर्थ ठरेल शे? ओ विश्वासी भावूसहोण, स्वता ले नियमस पासून मुक्त करा जसा मनी करेल शे, मनी स्वता ले नियम पासून मुक्त कर जसा, तुमी बिगर यहुदी शेतस. त्या टाईम ले तुमनी मनी चांगली देखरेख करी. तुमले आठवण हुईन, कि पहिला सावा जव मी तुमना जोळे उनू त शरीर नि कमजोरी मुळे तुमले सुवार्ता आयकाळनु. जरी मनी शारीरिक दशा तुमना साठे समस्या ना कारण होती तरी बी तुमनी मले तुच्छ नई समज आणि नईत मना संगे घृणा करी, पण तुमनी मले परमेश्वर ना दूत सारखा व ख्रिस्त येशु ना सारखा मले स्वीकार करणात. त्या टाईम ले तुमी गैरा खुश होतात. पण आते तुमनी ती खुशी कथी गयी? मी स्वता निश्चित पणे हय सांगू सकस, कि तुमी मनासाठे काही बी त्याग करू सकत होतात, आठ लगून कि आपला डोया बी काळीसन मले दि देतात. त काय मी तुमले खर सांगीसन तुमना शत्रू बनी जायेल शे? त्या खोटा शिक्षक तुमले आपला पक्ष मा करासाठे उत्सुक शेतस, पण तेस्नी नेती चांगली नई शे. तेस्नी नेती त तुमले मना पासून आल्लग करानी शे, एनासाठे कि तुमी तेस्ना शिष्य बनी जावोत. कदी उद्देश चांगला शे त उत्साहित होण चांगल शे, पण फक्त त्या टाईम लगून नई जव मी तुमना संगे शे. ओ मना प्रिय पोरसहोण, जठ लगून तुमना मा ख्रिस्त ना स्वभाव पूर्णपणे नई ईजात, तठ लगून मी तुमना साठे गरोदर बाई ना सारखा पिळा सहन करस. मनी गैरी ईच्छा शे कि आते मी तुमना जोळे ईसन तुमना संगे नम्रपणे बोलू, कारण कि मी तुमना बारामा गैरा चिंतामा शे. तुमी ज्या मोशे ना नियम ना पालन करतस, मी तुमले प्रश्न विचारस, कि काय तुमी खरज नियम मा लिखेल गोष्टीस्ले समजतस का? पवित्र शास्त्र मा हय लिखेल शे, कि अब्राहाम ना दोन पोर होतात, एक पोऱ्या हागार पासून उत्पन्न हुईना जी दासी होती, आणि दुसरा पोऱ्या सारा पासून उत्पन्न हुईना जी स्वातंत्र बाई होती. जो दासी पासून हुईना, तो शारीरिक रिती कण सामान्य पणे जल्म ना, पण जो स्वातंत्र बाई पासून जल्म ना, तो परमेश्वर ना करार ना नुसार जल्मना. ह्या गोष्टीस्मा दाखला शे, ह्या दोनी बाया दोन करार ना सारखा शेतस जो परमेश्वर आणि माणसस्ना मधमा शे. एक करार नियम शे जो परमेश्वर नि सियोन पहाळ वर करेल होता, आणि ज्या लोक ह्या करार ना आधीन मा शेतस त्या दासस्ना सारखा शेतस. हागार सियोन पहाळ ले दर्शावस जो अरब देश मा शे, तो आज ना यरूशलेम शहर ना सारखा शे जेनामा राहाणार लोक मोशे ना नियम ना गुलामी मा शेतस. पण स्वर्ग ना यरूशलेम अब्राहाम नि बायको सारा ना सारखा शे, आणि तेना पोर गुलाम नई शे. आणि हय यरूशलेम आमी विश्वासीस साठे आमनी माय ना सारखा शे. कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “ओ वांझ, तू जिले पोर नई होत खुशी कर, तू जिले पिळा नई उठतस, गया उघाळीसन जय जयकार कर, कारण कि सोळेल ना पोर सुहागिन ना पोरस्तून बी जास्त शेतस.” ओ विश्वासी भावूसहोण, तुमी अब्राहाम ना पोऱ्या इसहाक ना सारखा शेतस, कारण कि जसा इसहाक परमेश्वर ना करार ना नुसार जल्म ना, तसाच आमी बी परमेश्वर नि प्रतिज्ञा ना नुसार परमेश्वर ना पोर ठरोत. जस त्या टाईम ले शरीर ना नुसार जल्मेल इस्माईल, आत्मा ना सामर्थ्य कण जल्मेल इसहाक ले त्रास देत होता, तसाच तुमले त्या लोकस्ना द्वारे त्रास देवामा येस जेस्नी ईच्छा शे कि तुमी नियम ना पालन करोत. पण ह्या बारामा परमेश्वर ना पुस्तक काय सांगस? दासी आणि तीना पोऱ्या ले काळी द्या, कारण कि दासी ना पोऱ्या स्वातंत्र बाई ना पोऱ्या ना संगे उत्तराधिकारी नई होवाव. एनासाठे ओ भावूसहोण जे मी सांगी ऱ्हायनु तेना निष्कर्ष हय शे, कि आमी दासी ना नईत पण स्वातंत्र बाई ना पोर शेतस. ख्रिस्त नि आमले मोशे मा नियम पासून स्वातंत्र करेल शे. एनासाठे तुमी आपली स्वातंत्र्यता ले धरी ठेवा, आणि नियम ना पालन करासाठे तुमी स्वता ले परत गुलाम नका बनावा. आयका, मी पौल, तुमले सांगस, कि कदी तुमी परमेश्वर समोर धर्मी ठरा साठे सुंता करावश्यात, त ख्रिस्त नि जे काही कर तेना कण तुमले काहीच फायदा नई होवाव. मी परत एक सावा तुमले जताळस, कि जो कोणी सुंता कराना देखस, तेले पुरा मोशे ना नियम ना पालन करन पळीन. तुमी ज्या मोशे ना नियमस्ले पालन करीसन धर्मी ठराना देखतस, त तुमी स्वता ले ख्रिस्त पासून आल्लग करी ऱ्हायनात आणि परमेश्वर नि कृपा पासून तोंड फिराई ऱ्हायनात. पण आमी परमेश्वर नि आत्मा ना सामर्थ्य कण त्या धार्मिकता नि आशा ले प्राप्त करानी वाट देखी ऱ्हायनूत जेले देवाना करार परमेश्वर नि कर. कारण कि आमी तेनावर विश्वास करतस. कारण कि जव आमी ख्रिस्त येशु वर विश्वास करतस, त मंग आमी भले सुंता करेल राहोत कि बिगर सुंता ना एना कण काही फरक नई पळत, पण खास गोष्ट हय शे, कि आमी ख्रिस्त वर विश्वास करतस आणि परमेश्वर वर आणि दुसरास्वर प्रेम करतस. तुमी त ख्रिस्त ना संगे संबंध मा चांगल्या प्रकारे वाळी ऱ्हायंतात, त सत्य ना पालन पासून तुमले कोणी रोक? अशी शिक्षा परमेश्वर कळून नई शे, जेनी तुमले आपला पोर होवा साठे बलायेल शे. सावधान राहा, कारण कि लोक जे सांगतस ते खर शे, कि थोळासा खमीर पुरा गुंधेल पीठले खमीर करी टाकस. पण मले तुमना बारामा परमेश्वर वर विश्वास शे, कि तुमी दुसरास्नी गोष्टीस्ले नई मानीसन मना गोष्टीस्ना अनुसरण करश्यात. पण त्या ज्या तुमले भ्रम मा टाकतस, त्या कोणी का नई असोत परमेश्वर ना द्वारे तेस्ले दंड भेटीन. ओ विश्वासी भावूसहोण, कदी मी प्रचार करस कि लोकस्ले सुंता कराले पाहिजे, त मंग आते लगून मले त्रास काब देवामा येस? कदी मी ख्रिस्त ना क्रूस ले सोळीसन सुंता ना प्रचार करत होतु त यहुदीस्ले कोणतीच समस्या नई ऱ्हाती. चांगल होत कि ज्या तुमले खोटा सिद्धांत शिकाळतस, त्या आपला आंगलेच कापी टाकोत. ओ विश्वासी भावूसहोण, तुमी परमेश्वर ना द्वारे स्वातंत्र होवा साठे बलावामा एयेल शेतस, तुमी आपली स्वातंत्रता ले आपला शारीरिक ईच्छास्नि पुरती ना साठे संधी नका बनावा, पण प्रेम कण एक दुसरा नि सेवा करा. कारण कि पुरा मोशे ना नियम ना निष्कर्ष फक्त एकच वाक्य मा दपेल शे, “तू आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम कर.” पण कदी तुमी कायम झगळाच करत एक दुसरास्ले जनावरस्ना सारखा दातस कण चावतस आणि फाळी खातस, त सावधान राहा, कि एक दुसरा ना नाश नई करी देवोत. मी तुमले सांगस कि तुमी पावित्र आत्मा नि प्रेरणा नुसार जीवन जगा, त तुमी त्या वाईट कामस्ले नई करावत ज्या तुमना पापी स्वभाव तुमना कण करावाना देखस. कारण कि आमना पापमय स्वभाव आमले पवित्र आत्मा ना विरुद्ध मा कार्य करावाना देखस आणि पवित्र आत्मा आमना पापमय स्वभाव ना विरुद्ध मा आमना कण कार्य करावाना देखस. कारण कि ह्या दोनी शक्ती कायम एक-दुसरा ना संगे लळाई करत ऱ्हातस, एनासाठे कि तुमी जे कराना देखतस ते नई करू सकोत. आणि कदी तुमी पवित्र आत्मा ना प्रेरणा ना नुसार जीवन जगतस, त तुमी मोशे ना नियम ना पालन करासाठे बांधायेल नई शेतस. तुमी सर्वास्ले माहिती शे, ज्या लोक आपला ईच्छास्ले पुरा कराना देखतस त्या काय करतस. म्हणजे त्या व्यभिचार करतस, गंधा काम करतस, कामातुरपणा करतस. मूर्ती पूजा करतस, जादू टोना करतस, त्या जोळीदारस संगे घृणा करतस. एक-दुसरा ना संगे झगळा करतस, त्या दुसरास्नी वस्तुनी लालूस करतस. त्या लवकर रागे भारी जातस, ज्या तेस्नी गोष्टीस्मा सहमत नई होतस त्या तेस्ना विरोध करतस आणि ज्या तेस्ना गोष्टीस कण सहमत होतस तेस्ना संगे मिई जातस. त्या एक-दुसरास्वर बयत ऱ्हातस, दारूबाज शेतस, रंगेलपणा करतस, आणि त्या असा प्रकार ना आखो बी काम करतस. मी तुमले जताळी ऱ्हायनु जसा पहिले बी दियेल होतु, कि असा-असा काम करणारा परमेश्वर ना राज्य ना वारीस नई होवावत. पण परमेश्वर नि आत्मा जो स्वभाव आमना मधमा उत्पन्न करस तेना फय प्रेम, आनंद, शांती, धीर, कृपा, चांगुलपणा, विश्वास योग्यता, नम्रता, आणि सहनशीलता शे. असा-असा कामस्वर रोक लावा साठे नियम नई शे. आणि ज्या ख्रिस्त येशु ना शेतस, तेस्नी आपला पापमय स्वभाव ले तेनी ईच्छा आणि अभिलाषा ना संगे क्रूस वर चळाई टाकेल शे. जव कि पवित्र आत्मा नि आमले नवा जीवन दियेल शे, त आमी सर्वा गोष्टीस्मा पवित्र आत्मा नि प्रेरणा नुसार जीवन जगोत. आमी गर्वशाली नको बनाले पाहिजे, नईत एक-दुसरास्ले राग देवाळाले पाहिजे, आणि नईत एक-दुसरास्वर बयाले पाहिजे. ओ विश्वासी भावूसहोण, कदी कोणी माणुस कोणता अपराध मा धराईजावो, त तुमी ज्या पवित्र आत्मा नि प्रेरणा कण जीवन जगतस, नम्रता कण असा व्यक्ती ले धर्म ना रस्ता वर परत लयामा मदत करा, आणि सावधान राहा कि कदी स्वताच त्या पाप मा नई पळी जावोत. तुमना मधून कदी कोणी समस्या मा शे त एक दुसरास्नी मदत करा, आणि ह्या प्रकारे तुमी ख्रिस्त ना नियम ना पालन करा. कदी कोणी समजस कि तो एक खास व्यक्ती शे, जव कि तो खरज काहीच नई शे, त स्वता ले धोका देस. तुमना मधून प्रत्येक आपलाच काम ले पारखी लेवोत कि चांगला शेतस कि नई, जर त्या चांगला शेतस त तुमले दुसरास्ना कामस्नी बिगर मोजणी कराना आपलाच कामस्ना बारामा गर्व करानी संधी भेटीन. कारण कि आमना मधून प्रत्येक आपलाच कामस साठे जबाबदार शेतस. जेस्ले परमेश्वर ना वचन नि शिक्षा भेटस, त्या आपला सिकाळणारस्ले सर्वा चांगल्या गोष्टीस्मा भागी करोत. तुमी धोका नका खा, परमेश्वर ले कोणी मूर्ख नई बनावू सकत, कारण कि माणुस जे काही पेरीन, तेच कापीन. कदी कोणी माणुस तेच करस जो तेना पापमय स्वभाव तेना कण करावाना देखस, त तो आपला साठे मृत्युलेच उगाळीन. पण जो परमेश्वर नि आत्मा ना नुसार करीन, त तेले आपला साठे कायम ना जीवन भेटीन. एनासाठे आमले चांगला काम करा पासून हिम्मत नई सोळाले पाहिजे, कारण कि कदी आमी हिम्मत नई सोळावत, त आमले परमेश्वर ना टाईम वर प्रतीफय भेटीन. एनासाठे जठ लगून संधी भेटो आमले सर्वा लोकस संगे चांगल कराले पाहिजे, खास करीसन ख्रिस्ती विश्वासी भावूस संगे. देखा, मी कसा मोठा मोठा अक्षर मा तुमले आपला हात कण लिखेल शे. ज्या लोक तुमना वर सुंता करावा साठे दबाव टाकतस, ह्या त्या लोक शेतस ज्या दिखावा करतस आणि शरीर नि दशा वर गर्व करतस. त्या लोक असा एनासाठे करतस, कि लोकस्ले फक्त ख्रिस्त ना क्रूस ना प्रचार करीसन यहुदीस्ले त्रास देवामा नई येवो. आठ लगून कि सुंता करेल यहुदी विश्वासी बी मोशे ना नियम ना पालन नई करतस, पण त्या तुमना सुंता एनासाठे करावाना देखतस, कि त्या दुसरा यहुदी लोकस समोर तुमनी सुंता नि दशा वर गर्व करी सकोत. पण मी प्रभु येशु ख्रिस्त ना क्रूस ले सोळीसन आखो कोणतीच गोष्ट वर गर्व नई करत. कारण कि तेनी मृत्यु ना द्वारे, मी जग ना अभिलाषास्ना आधीन मा नई ऱ्हायनु आणि नईत एनी सामर्थ्य मनावर विजय कराव. कारण कि नईत सुंता नि दशा, आणि नईत सुंतारहित महत्वान शे, पण महत्वान हय शे कि परमेश्वर नि पवित्र आत्मा ना कार्य ना द्वारे तुमले नवा व्यक्ती बनायेल शे. आणि जीतला ह्या नियम वर चालतीन, परमेश्वर त्या सर्वा लोकस्वर दया करीन व तेस्ले शांती दिन, कारण कि त्या परमेश्वर ना निवाळेल लोक शेतस. पुळे मले कोणी दुख नई देवो, कारण कि मना शरीर वर ज्या डाग शेतस त्या हय दर्शावतस कि मी येशु ना शे. ओ विश्वासी भावूसहोण, मी प्रार्थना करस कि, आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा तुमना संगे राहो. आमेन. मी पौल, परमेश्वर नि ईच्छा कण ख्रिस्त येशु ना प्रेषित शे, इफिस शहर ना येशु ख्रिस्त मा विश्वासी आणि परमेश्वर ना लोकस्ले हय पत्र लिखस. मी प्रार्थना करस कि आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो. परमेश्वर ना धन्यवाद होवो, जो आमना प्रभु येशु ख्रिस्त ना बाप शे, तेनी आमले ख्रिस्त येशु ना संगे आमन नात होवा मुळे तेनी आमले स्वर्ग ना प्रत्येक प्रकार ना आत्मिक आशीर्वाद दियेल शे. परमेश्वर नि जग नि निर्मिती ना पहिले ख्रिस्त मा आमन नात बनावामा येवाना द्वारे आमले निवाळी लीयेल शे, एनासाठे कि आमी तेना समोर पवित्र आणि निर्दोष ठरोत. परमेश्वर नि आपला प्रेम मुळे पहिलेच निर्णय करी लीयेल होत कि येशु ख्रिस्त ना व्दारे आमी तेना दत्तक पोर ठरोत. हय परमेश्वर नि चांगली ईच्छा कण हुयेल शे. एनासाठे कि आमी परमेश्वर नि महिमामय कृपा नि स्तुती करोत, हय कृपा तेनी आमले आपला प्रिय पुत्र ना द्वारे दियेल शे. कारण कि आमले ख्रिस्त ना रक्त ना व्दारे सुटका म्हणजे पापस्नी माफी भेटेल शे. हय परमेश्वर नि मोठी कृपा ना परिणाम शे, आणि हय कृपा तेनी आमले आपला पुरा ज्ञान आणि समज सहित विपुलता कण दियेल शे. परमेश्वर नि आपली ईच्छा ना भेद आमना वर आपला चांगला उद्देश ना नुसार प्रगट कर, जे तेनी ख्रिस्त ना द्वारे त्या कामस्ले पुरा कराना साठे निर्धारित करेल होता. एनासाठे कि जव ह्या योजना ना पुरा होवाना टाईम येवो त परमेश्वर आकाश आणि पृथ्वी ना सर्वा वस्तूस्ले ख्रिस्त ना अधिकार ना आधीन मा एकत्र करो, कि ख्रिस्त ह्या गोष्टीस्वर मालक बनो. परमेश्वर नि आमी यहुदीस्ले बी ख्रिस्त मा आपला लोक होवा साठे निवाळी लीध कारण कि आमी परमेश्वर कळून मिरास ली लेवूत, कारण कि हय सुरुवात पासूनच तेनी योजना होती. तेनी आपली योजना आणि ईच्छा ना प्रमाणे खरज तसच कर. आमी यहुदी, पहिला लोक शेतस जेस्नी ख्रिस्त वर आशा ठीयेल होती, आणि आमी एनासाठे निवाळा मा एयेल होतुत कि आमी परमेश्वर नि महिमा नि स्तुती मुळे होवोत. आणि जव तुमनी सत्य ना वचन ले जो तारण नि सुवार्ता शे आयकीसन विश्वास कर, त तुमी बी परमेश्वर ना लोक बनी ग्यात. तुमनी ख्रिस्त वर विश्वास कर आणि परमेश्वर नि आपली प्रतिज्ञा प्रमाणे तुमले पवित्र आत्मा दिसन तुमना वर छाप लाई टाकी. आमना साठे पवित्र आत्मा बेना सारखा शे कि आमी त्या वारसा ले प्राप्त करूत जेले देवानी प्रतिज्ञा परमेश्वर नि आपला लोकस्ले करेल शे, आणि हय ह्या गोष्ट ना निश्चय शे कि परमेश्वर आपला लोकस्ले सुटका दिन. जेना कण परमेश्वर नि महिमा आणि स्तुती होवो. मी प्रार्थना करस, कि परमेश्वर जो आमना प्रभु येशु ख्रिस्त ना महिमामय ना बाप शे, तुमले आत्मिक ज्ञान आणि समज देवो कारण कि तुमी परमेश्वर ले वयखी सकोत. मी हय बी प्रार्थना करस कि सत्य ले समजा साठे तो तुमना मनस्ना डोयास्ले प्रकाशित करो, कि तुमले समजी सको कि तुमले बलावामा येवानी आशा काय शे, आणि परमेश्वर ना लोकस साठे तेनी प्रतिज्ञा करेल आशीर्वाद कितला महान आणि महिमामय शे. त्या जागा वर परमेश्वर नि ख्रिस्त ले सर्वा प्रकार ना प्रधानता वर, अधिकार वर, सामर्थ्य वर, प्रभुता वर, आणि प्रत्येक नाव ना वरे, जो नईत फक्त ह्या लोक मा पण येणारा लोक मा बी प्रत्येक नाव ना वरे प्रधान ठराएल शे. परमेश्वर नि सर्व काही ख्रिस्त ना आधीन मा करी टाक व मंडळी ना चांगला साठे तेले सर्वा गोष्टीस्वर प्रधान ठराई टाक. मंडळी ख्रिस्त ना शरीर शे, आणि ख्रिस्त नि परिपूर्णता शे. जो आपली उपस्थिती कण सर्वास्मा सर्व काही पुरा करस. पहिले तुमी आपला अपराध आणि पापस मुळे आत्मिक रूप कण मरेल ना सारखा होतात. त्या टाईम ले तुमी ह्या जग ना लोकस्ना रिती प्रमाणे जीवन जगत होतात ज्या परमेश्वर ले ओयखत नई होतात. तुमी सैतान ना नुसार जीवन जगत होतात जो आकाश मा ऱ्हायनारा दुष्ट आत्मास्ना प्रधान शे, तो आते बी तेस्ना हृदय मा काम करस ज्या परमेश्वर नि आदन्यास्ना उल्लंघन करतस. ह्या सर्वास्ना जसा आमी बी सर्वान सर्वा पहिले आपला शरीर ना पापमय स्वभाव ना नुसार जीवन जगत होतुत, आमी तेच कऱ्या करत होतुत ज्या आमना वाईट ईच्छा आणि विचार आमले करासाठे जबरजस्ती करत होतात. आमी दुसरास्ना सारखा आपला स्वभाव मुळे परमेश्वर ना राग ना आधीन होतुत. पण परमेश्वर नि दया इतली जास्त शे आणि तेना प्रेम इतला महान शे कि, जव आमी आपला अपराधस मुळे मरेल ना सारखा होतुत, त परमेश्वर नि आमले ख्रिस्त ना संगे जीवन दिधा. परमेश्वर नि कृपा ना द्वारे तुमना तारण हुयेल शे. परमेश्वर नि येशु ख्रिस्त ना संगे आमी लोकस्ले परत जित्ता करेल शे आणि तेनाच संगे आमले स्वर्गीय जागा मा बसाळ. परमेश्वर नि ख्रिस्त येशु ना संगे नात जुळा मुळे आमी सर्वास्वर हय कृपा दाखाळेल शे. तेनी हय एनासाठे कर कि तो येणारा टाईम वर जग ना लोकस्ले दाखाळी सको कि तेनी कृपा कितली महान शे. एनासाठे परमेश्वर नि आमनी निर्मिती करी. तेनी येशु ख्रिस्त ना द्वारे आमनी सृष्टी करी, जेस्ले करासाठे परमेश्वर नि पयले पासून आमले तयार करेल शे जेना कण आमी त्या चांगला कामस्ले पुरा करत राहोत. आठवण करा, तुमी ज्या जल्म पासूनच बिगर यहुदी शेतस, यहुदी लोक तुमले बिगर सुंता ना म्हणीसन चीळावतस, आणि शारीरिक रूप कण करेल सुंता कण सुंता वाला म्हणावतस. जरी त्या लोक ज्या आपली सुंता नि दशा वर गर्व करीसन विचार करतस कि त्या परमेश्वर ना लोक शेतस. त्या टाईम ले तुमी ख्रिस्त ले ओयखत नई होतात. आणि परमेश्वर नि निवाळेल प्रजा इस्त्राएल देश ना लोकस मधून नई होतात. आणि परमेश्वर ना कळून करेल त्या करार ना वचन ना भागी बी नई होतात. आणि एक आशा पासून वंचित ना सारखा ह्या जग मा परमेश्वर ना बिगर जीवन जगत होतात. पण ज्या पहिले परमेश्वर पासून दूर होतात, आते येशु ख्रिस्त ना रक्त ना द्वारे जोळे लयामा एयेल शेतस. कारण कि ख्रिस्त नि स्वता यहुदी आणि बिगर यहुदीस्ले एक करीसन तेस्नी सामंजस्य कराई टाक. तेनी ती शत्रुता नि भीत ले पाळी टाकेल शे जी तेस्ले आल्लग करत होती. ख्रिस्त येशु नि आपली मृत्यु ना द्वारे, मोशे ना नियम ना सर्वा विधीस्ले आणि नियमस्ले रद्द करी टाक, एनासाठे कि तो यहुदी लोक आणि बिगर यहुदी लोकस्ना मधमा शांती लय सको आणि दोनी दलस पासून आपला साठे एक नवीन दल बनाई सको. ख्रिस्त नि आपली क्रूस वर मृत्यु ना द्वारे दोनीस्ना एकच शरीर मा परमेश्वर ना संगे सामंजस्य कराव आणि ह्या प्रकारे शत्रुता ले नष्ट करी टाक. ख्रिस्त नि ईसन दोनीस्ले, बिगर यहुदीस्ले ज्या तेना पासून दूर होतात आणि यहुदीस्ले ज्या तेना जोळे होतात, शांती नि सुवार्ता आयकाळी. कारण कि ख्रिस्त ना द्वारे आमी दोनी एकच पवित्र आत्मा कण उत्तेजित हुईसन बाप ना जोळे पोहोची सकतस. एनासाठे आते तुमी दुसरा देश ना नईत म्हणजे परका नई ऱ्हायनात, पण परमेश्वर ना लोकस्ना संगे मिईसन स्वदेशी नागरिक आणि परमेश्वर ना परिवार ना सदस्य बनी जायेल शेतस. तुमी सर्वा मिईसन परमेश्वर ना त्या ईमारत ना सारखा शेतस जेना पाया प्रेषित आणि भविष्यवक्तास्ना पाया बनेल शे आणि जेना कोपरा ना दघळ स्वता येशु ख्रिस्त शे. ख्रिस्त ना द्वारे पुरी ईमारत नि निर्मिती एकत्र मियसन प्रभु ना साठे पवित्र मंदिर ना रूप धारण करी ऱ्हायना. तेनाच द्वारे तुमी लोक बी ह्या ईमारत मा जोळामा येतस, जेना कण तुमी पवित्र आत्मा ना द्वारे परमेश्वर ना साठे राहाणी जागा बनेल शेतस. एनामुळे मी पौल, जो तुमी बिगर यहुदीस्ले ख्रिस्त येशु नि सुवार्ता आयकाळा मुळे जेल मा कैद शे, आणि मी तुमना साठे परमेश्वर ले प्रार्थना करस. खरज तुमी लोकस्नी हय आयकेल अशीन कि परमेश्वर नि आपली कृपा कण मले तुमना चांगला साठे हय काम सोपेल शे. परमेश्वर नि स्वता हवू भेद मनावर प्रगट कर, जेना विषय मा काही गोष्टी मी पहिलेच सार मा लिखेल शे, आणि जे मी लिखेल शे कदी तुमी तेले वाचशात, त समजी जाश्यात कि मी ख्रिस्त ना तो भेद कोठ लगून समजस. मांगला पिढीस्मा हवू भेद माणसस्ले सांगामा नई एयेल होता, पण आते परमेश्वर नि आपली आत्मा व्दारे हवू भेद तेना पवित्र प्रेषित आणि भविष्यद्वक्तास्वर प्रगट करेल शे. आणि तो भेद हवू शे, कि ख्रिस्त येशु नि सुवार्ता ना व्दारे बिगर यहुदी लोक यहुदीस संगे मियसन परमेश्वर नि मिरास मा सहभागी होवोत. त्या एकच शरीर ना आंग शेतस आणि ख्रिस्त येशु ना द्वारे त्या सर्वा वस्तूस्मा सहभागी शे जेले देवाना करार परमेश्वर नि यहुदी लोकस्ले करेल होता. परमेश्वर नि कृपा आणि तेना सामर्थ्य ना काम ना नुसार मले सुवार्ता ना प्रचार ना द्वारे तेनी सेवा कराना सोभाग्य भेटेल शे. जर मी परमेश्वर ना सर्वा लोकस्मा कम योग्य माणुस शे, तरी बी मनावर हय कृपा हुईनी कि मी बिगर यहुदीस्ले ख्रिस्त ना अगम्य धन नि सुवार्ता आयकाळू. आणि सर्वा लोकस्वर हय प्रगट करू कि परमेश्वर कोणत्या प्रकारे आपला गुप्त योजनास्ले पुरा करस. जो सगळी सृष्टी ले बनावना, आणि ह्या भेद ले युगानयुग पासून गुप्त ठेव. आते परमेश्वर ना लक्ष हवू शे कि मंडळी ना व्दारे परमेश्वर ना असीम ज्ञान बिगर देखेल जग ना आत्मास्ना प्रधानस्वर आणि अधिकारीस्वर प्रगट करामा येवो. परमेश्वर नि आपला मन मा कायम पासून जो उद्देश ठीयेल होता आमना प्रभु येशु ख्रिस्त ना द्वारे पुरा करना. कारण कि आमले ख्रिस्त ना द्वारे आणि तेनावर विश्वास करा मुळे हय हिम्मत होस कि आमी बिगर भ्यावाना परमेश्वर जोळे जावू सकतस. एनासाठे मी तुमले विनंती करस, कि तुमी लोकस्ना साठे मी जे कष्ट करी ऱ्हायनु, तेना मुळे तुमी हिम्मत नका सोळा, कारण कि एनामाच तुमी लोकस्ना फायदा शे. ह्या मुळे मी परमेश्वर बाप ना समोर गुळघा टेकीसन विनंती करस, जो स्वर्ग आणि पृथ्वी वर, प्रत्येक परिवार ना मुल आधार शे. मी विनंती करस कि तो आपली महिमा ना धन ना नुसार तुमले हवू दान देवो कि तुमी तेनी आत्मा कण आपला मधमा मनुष्यत्व मा सामर्थ्य प्राप्त करीसन शक्तिशाली होत जावा. कारण कि जसा तुमी ख्रिस्त वर विश्वास करत ऱ्हायनात, तो तुमना हृदय मा राहो. मी विनंती करस कि परमेश्वर ना आणि एक दुसरा ना प्रती तुमना प्रेम तुमले पक्का करो आणि तुमले पळा पासून वाचाळो. एनासाठे कि तुमले, परमेश्वर ना सर्वा लोकस संगे चांगल्या प्रकारे समजानी शक्ती भेटो, कि ख्रिस्त तुमले कितला जास्त प्रेम करस. मी विनंती करस, कि तुमी ख्रिस्त ना त्या प्रेम ले समजोत, जरी तेले पुरा-पुरा नई समजू सकतस, आणि ह्या प्रकारे तुमी परमेश्वर ना स्वभाव कण परिपूर्ण भरी जावा. परमेश्वर आपली त्या सामर्थ्य कण जी आमना मधमा काम करस, आमना मांगा पासून जास्त आणि आमना विचारस्तून जास्त कार्य करानी क्षमता ठेवस. मंडळी मा आणि ख्रिस्त येशु मा त्या परमेश्वर नि महिमा पिढ्यानपिढ्या लगून युगानयुग होत राहो. आमेन. एनासाठे मी, प्रभु नि सेवा करा मुळे जेल मा कैद शे, तुमले विनंती करस कि ज्या बलावा कण तुमी तेना लोक होवा साठे बलावामा एयेल शेतस तेनाच नुसार तुमी जीवन जगा. म्हणजे पुरी सौम्यता आणि नम्रता कण, आणि धीर धरीसन प्रेम कण एक दुसरास्नी सहन करील्या. एक दुसरा ना संगे कायम एकता मा राहाणा प्रयत्न करा, कारण कि परमेश्वर नि आत्मा ना द्वारे तुमी एक करामा एयेल शेतस. आमी सर्वा विश्वासी लोक एकच शरीर ना आंगस सारखा शे, आणि आमी सर्वास्ले एकच आत्मा भेटेल शे, जसा कि तुमी लोकस्ले तीच आशा देवामा एयेल होती जव तुमले परमेश्वर ना लोक होवाना साठे बलावामा एयेल होत. आमी सर्वास जोळे एकच प्रभु शे, आणि आमी फक्त प्रभु येशु ख्रिस्त वरच विश्वास करतस, आणि आमी सर्वास्नी एकसारखा बाप्तिस्मा लीयेल शे. एकच परमेश्वर शे जो सर्वास्ना बाप शे, तो सर्वास्वर राज्य करस, तो आमी सर्वास्ना द्वारे काम करस आणि तो आमना मधमा ऱ्हास. ख्रिस्त नि उदारता कण आमना मधून प्रत्येक ले आत्मिक दान दियेल शे, जसा तेनी तेस्ले देवाना करार करना. जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तो उच्चा वर चळना आणि बंदिस्ले बांधी लीग्या आणि तेनी माणसस्ले दान दिधात.” जव पवित्र शास्त्र सांगस, “तो उच्चा वर चळना” त एना काय अर्थ शे? एना अर्थ हय शे कि तो पहिले पृथ्वी नि सर्वास्तून खाल्ली जागास्मा उतरना. एनासाठे जो खाले उतरणा तो तोच शे जो आकाश तून बी वरे चळी ग्या कि आपली उपस्थिती कण पुरी सृष्टी ले भरी देवो. हवू तोच शे जेनी वरदान दियेल शेतस, तेनी काही लोकस्ले प्रेषित होवाना, आणि काहीस्ले भविष्यवक्ता होवाना, आणि काहीस्ले सुवार्तिक होवाना, आणि काही लोकस्ले पाळक ना आणि शिक्षक होवाना वरदान दिधा. तेनी अस एनासाठे कर कि परमेश्वर ना लोक ख्रिस्त नि सेवा करासाठे तयार होवोत, एनासाठे कि ख्रिस्त ना शरीर पुरी रिती कण पक्का बनो आणि परिपक्व हुई जावो. हय तठ लगून होत राहीन जठ लगून कि आमी सर्वा विश्वास कराना द्वारे एक नई बनी जाउत आणि परमेश्वर ना पोऱ्या ना संगे नात होवा मुळे पक्का विश्वासी बनी जाउत आणि पूर्णपणे ख्रिस्त येशु जो बिलकुल सिद्ध शे. एनासाठे आते पुळे चालीसन आमी पोरच सारखा वागाले नको पाहिजे, जी माणसस्नी फसवणूक आणि चालाकी कण, तेस्ना भ्रम नि चालना आणि उपदेश ना द्वारे एक धाकली नाव ना सारखा उदलावामा आणि ईकळे तिकळे फिरावामा येतस. पण आमी प्रेम कण सत्य ना अनुसरण करोत, आणि ख्रिस्त मा सर्वा गोष्टीस्मा पक्का हुई जावोत, जो मंडळी ना डोक शे. तेना नियंत्रण कण पुरा शरीर, प्रत्येक जोळ नि मदत कण एकत्र मियसन आणि एकत्र जुळाईसन, त्या प्रभाव ना प्रमाणे जो प्रत्येक आंग ना चांगल्या प्रकारे कार्य कराना द्वारे तेनामा होस, स्वता ले वाळावस कि तुमी सर्वा प्रेम मा उन्नती करत जावो. एनासाठे मी तुमले प्रभु ना अधिकार कण जताळी देस कि, अविश्वासीस सारखा जसा त्या आपला मन नि बिगर अर्थ नि रितीस्वर चालतस, तुमी आते पासून परत असा जीवन नका जगज्यात. त्या काही बी समजू नई सकतस, कारण कि त्या पूर्णपणे अज्ञानी आणि जिद्दी शे, ह्या मुळे त्या परमेश्वर ना जीवन पासून आल्लग करामा एयेल शे. आणि त्या आपला वाईट कामस मुळे बिगर लाज ना हुई जायेल शेतस. तेस्नी स्वतास्ले वाईट ना हातस्मा दि दियेल शे कि त्या सर्वा प्रकार ना गंधा कामस्ले बिगर आळचन ना करी सको. पण तुमी लोकस्ले ख्रिस्त पासून अशी शिक्षा नई भेटणी. पण तुमनी जे ख्रिस्त येशु ना विषय मा आयकेल शे आणि तेना विषय मा सिखाळणारस्नि तुमले जे शिकाळेल शे तो निश्चितच खरा वचन हुईन. एनासाठे तुमी लोकस्ले आपला पयली वागणूक आणि जुना स्वभाव सोळी देवाले पाहिजे, कारण कि ती फुसलावणारी वाईट ईच्छास्ना मुळे बिगळत जाई ऱ्हायना. आते परमेश्वर नि आत्मा ले संधी द्या कि तो तुमना मन ना विचारस्ले पुरी रिती कण नवीन करी देवो, आणि नवा स्वभाव ले घालील्या जो स्वता परमेश्वर ना स्वभाव ना सारखा शे. एनासाठे ह्या नवा स्वभाव प्रमाणे वागा जेनामा खरी धार्मिकता आणि पवित्रता शे. एनामुळे खोट बोलन सोळीसन, प्रत्येक विश्वासी एक दुसरा ना संगे खर बोला कारण कि आमी आपस मा ख्रिस्त ना शरीर ना आंग शेतस. कदी तुमी रागे भरतस, तरी बी पाप नका करज्यात, आणि पुरा दिन रागे नका भरेल राहा पण सूर्य डुबा लगून तुमना राग शांत हुई जावो. सैतान ले कोणतीच संधी नका द्या. जो चोरी करत होता, तेले आते पासून चोरी नको कराले पाहिजे, पण परिश्रम करो कि तो आपला हातस कण करामा एयेल उपयोगी कामस्ना द्वारे दुसरा लोकस्नी बी मदत करी सको, जेस्ले कोणत्या प्रकार नि गरज शे. कोणती वाईट गोष्ट तुमना तोंड मधून नई निघो, पण गरज ना नुसार तेच निघो जे दुसरास्ले उन्नती साठे चांगल होवो, एनासाठे कि आयकणारस्न चांगल होवो. पवित्र आत्मा ले दुखी नका करा, कारण कि पवित्र आत्मा सुटका ना दिन साठे तुमी लोकस्वर परमेश्वर ना देवायेल शिक्का शे. सगळ्या प्रकार ना कळूपणा, कोप, राग, झगळा, निंदा, दृष्टपणा व द्वेष ले आपला जीवन पासून दूर करा. आणि एक दुसरास्ना प्रती दयाळू आणि कनवाळू व्हा, आणि एक दुसरास्ले त्याच प्रकारे माफ करा ज्या प्रकारे परमेश्वर नि ख्रिस्त मा तुमले माफ करेल शे. तुमी परमेश्वर ना प्रिय पोर शेतस, एनासाठे तुमनी वागणूक तेना स्वभाव ना नुसार होवो. तुमना जीवन दुसरा ना प्रती प्रेम कण भरेल होवो, ज्या प्रमाणे ख्रिस्त नि तुमी लोकस संगे प्रेम कर आणि तुमले पापस पासून सोळावा साठे परमेश्वर ना समोर स्वता ले सुखदायक सुगंध ना सारखा भेट म्हणीसन अर्पण करी टाक. तुमी परमेश्वर ना लोक शेतस, एनासाठे तुमी लोकस्ना मधमा कोणत्याच प्रकार ना व्यभिचार आणि अशुद्धता व लोभ नि चर्चा बी नई होवो. आणि नईत लाज, मूर्खपणा व वाईट गोष्टीस्न बोलन, कारण कि ह्या गोष्टी शोभतस नईत, पण तुमी परमेश्वर ना धन्यवाद करत राहा. कारण कि तुमले माहिती शे कि जो माणुस व्यभिचारी, व अशुद्ध, व लोभी शे म्हणजे जो मूर्तीपुजक एवळा शे. असा माणुस्ले ख्रिस्त आणि परमेश्वर ना राज्य मा मिरास नई शे. कोणी तुमले फालतू गोष्टीस कण धोका नई देवू सको, कारण कि असाच गोष्टीस कण परमेश्वर ना राग तेनी आदन्या नई पायणारस्वर भळकस. एनासाठे असा लोकस संगे कोणताच संबंध नका ठेवज्यात. पहिले तुमी स्वता बी अंधकार मा जीवन जगत होतात, पण जव पासून तुमी परमेश्वर ना लोक बनी जायेल शेतस, तव पासून उजाया मा शेतस. एनासाठे तुमी असा लोकस सारखा जीवन जगा ज्या उजाया ना शेतस. कारण कि जठे उजाया शे, तठे सर्वा प्रकार ना चांगुलपण, धार्मिकता, व सत्यता उत्पन्न होस. त्या गोष्टीस्नी शोध मा लागेल राहा जेना कण परमेश्वर खुश होस. ज्या व्यर्थ ना काम लोक अंधकार मा करतस, तेस्ना संगे सहभागीता नका ठेवा, पण तेस्ले सांगा कि तेस्ना काम वाईट शेतस आणि तेस्ले उजाया मा लई या. कारण कि असा अधर्मी लोकस्ना गुप्त कामस्नी चर्चा करान बी लाज नि गोष्ट शे. उजाया ह्या सर्व्या गोष्टीस्ना वाईटस्ले प्रगट करस आणि एस्ना वास्तविक रूप स्पष्ट करी देस. कारण कि उजायाच शे, जो सर्व काही प्रगट करस. एनासाठे हय सांगामा एयेल शे, “ओ जपणार, जाग आणि मरेल मधून जित्ता हुई जा, त ख्रिस्त ना उजाया तुनावर चमकीन. एनासाठे ध्यान ठेवा कि कसा जीवन जगतस. मूर्खस सारखा नई पण बुद्धीमान सारखा जीवन जगा.” संधी ले बहुमुल्य समजीसन तेना फायदा उचला, कारण कि दिन वाईट शेतस. एनासाठे मूर्ख नका बना पण बुद्धीमानी कण समजा कि प्रभु नि काय ईच्छा शे. द्राक्षरस पिसन झिंगनारस सारखा नका बना, कारण कि एना कण तुमना जीवन नाश हुई जाईन. पण पवित्र आत्मा कण भरी जावा. आणि आपस मा मियसन भजन आणि स्तुती ना गाना आणि आत्मिक गाना गात राहा, आणि आपला पुरा मन कण प्रभु ना आदर मा गात आणि कीर्तन करत राहा. आमना प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण कायम सगळ्या गोष्टीस साठे परमेश्वर ना धन्यवाद करत राहा. ख्रिस्त ना प्रती आदर मुळे एक दुसरा ना आधीन राहा. ओ बायकाहोण, आपला नवरा ना असा आधीन राहा, जसा तुमी ख्रिस्त ना आधीन ऱ्हातस. कारण कि नवराले बायको वर अधिकार शे तसाच जसा कि ख्रिस्त ले मंडळी वर अधिकार शे, आणि ख्रिस्त स्वता शरीर ना म्हणजे मंडळी ना तारणार शे. ज्या प्रकारे मंडळी ख्रिस्त ना आधीन शे तशीच बायको बी सगळ्या गोष्टीस्मा आपला नवरा ना आधीन राहो. ओ नवरासहोण, आपली बायको वर त्याच प्रमाणे प्रेम ठेवा, ज्या प्रकारे ख्रिस्त नि मंडळी वर प्रेम कर आणि तीना साठे आपला जीवन दि टाक. जेना कण तो तिले वचन व पाणी ना आंघोळ ना व्दारे शुद्ध करीसन पवित्र बनाई सको, आणि तिले एक अशी तेजस्वी मंडळी बनाईसन आपला जोळे उभी करो, जीनामा नईत डाग, नईत सूरकुती, नईत कोणती अशी वस्तू होवो पण पवित्र आणि निर्दोष होवो. ह्याच प्रकारे उचित शे कि नवरा आपली बायको वर प्रेम ठेवो, जसा तो आपला शरीर वर प्रेम ठेवस. कारण कि जो आपली बायको वर प्रेम करस, तो स्वता वर प्रेम करस. कारण कि कोणी बी आपला शरीर संगे घृणा नई करत, पण तो तेना पायन-पोषण करस आणि तेनी देख-रेख करत ऱ्हास. जसा ख्रिस्त बी मंडळी ना संगे करत ऱ्हास. कारण कि आमी तेना शरीर ना आंग शेतस. जस कि परमेश्वर नि पुस्तक सांगस, “ह्या मुळे माणुस आपला माय-बाप ले सोळीसन आपली बायको संगे राहीन, आणि त्या दोनी एक आंग होतीन.” हवू एक खोल भेद शे आणि मी एना वापर ख्रिस्त आणि मंडळी ना संदर्भ मा करी ऱ्हायनु. पण हवू तुमना वर बी लागू होस कि, तुमना मधून प्रत्येक आपली बायको वर आपला सारखा प्रेम ठेवा, आणि बायको बी आपला नवरा नि भीती ठेवो. ओ पोरसहोण, तुमी आपली माय आणि बाप ना आदन्यास्ना पालन कऱ्या करा, कारण कि अस करान चांगल शे. “आपली माय आणि आपला बाप ना आदर कर.” हय पहिली अशी आदन्या शे जीना संगे एक प्रतिज्ञा बी जोळायेल शे. जी ह्या प्रकारे शे, “जेना कण तून बर हुईन आणि तू गैर दिनस लगून पृथ्वी वर जित्ता ऱ्हाशी.” ओ पोरसवालाहोण, आपला पोरस्ना संगे असा नका वागा जेना कण त्या रागे भरोत, पण प्रभु नि शिक्षा चेतावणी देत तेस्ना पायन-पोषण करा. ओ दाससहोण, ज्या लोक ह्या पृथ्वी वर तुमना मालक शेतस, तुमी भ्यात आणि कापत निष्कपट हृदय कण तेस्नी आदन्या ना पालन करत राहा. समजा जसा तुमी ख्रिस्त नि सेवा करी ऱ्हायनात. हय सगळ तुमी तेस्ले खुश कराना उद्देश कण फक्त दाखाळा साठे नका करा, पण ख्रिस्त ना दासस सारखा पुरा हृदय कण परमेश्वर नि ईच्छावर चाला. आणि दासस्ना सारखा आपला काम खुशी कण करत राहा, समजा तुमी माणुस नि नई पण प्रभु नि सेवा करी ऱ्हायनात. आठवण ठेवा कि जो कोणी चांगला काम करीन, भले तो दास राहो कि स्वातंत्र, प्रभु तेले तसच फय दिन. ओ मालकसहोण, तुमी आपला दासस्ले धमक्या देवाना सोळीसन तेस्ना संगे चांगला व्यवहार करत राहा. आठवण ठेवा कि तेस्ना आणि तुमना स्वर्ग मा एकच मालक शे, आणि तो सर्वास्ना न्याय बिगर पक्षपात ना करस. म्हणून, तुमी प्रभु मा आणि तेनी शक्ती ना प्रभाव मा शक्तिशाली होत जावा. त्या सर्वा शस्त्रसामग्रीस्ले आंग मा घालील्या ज्या परमेश्वर देस, एनासाठे कि तुमी सैतान नि युक्तीस पुळे उभा राही सकोत. कारण कि आमनी लळाई माणसस संगे नई, पण प्रधानस संगे, अधिकारी संगे आणि ह्या जग ना अंधकार ना अधिपतीस संगे आणि दृष्टता नि आत्मिक सेनास संगे शे जी आकाश मा शे. एनासाठे परमेश्वर ना सर्वा शस्त्रसामग्रीस्ले आंग मा घालील्या, एनासाठे कि जव वाईट दिन येवोत त तुमी शत्रू ना सामना करी सकोत, आणि आखरी लगून लळाई करीसन स्थिर राही सकोत. एनासाठे परमेश्वर ना सत्य कण आपली कमर बांधीसन, आणि धार्मीक्ता नि झीलम घालीसन. आणि पायस्मा सामंजस्य ना सुवार्ता नि तयारी ना जुता घालीसन. आणि ह्या सर्वास संगे विश्वास नि ढाल लिसन स्थिर राहा जेना कण तुमी त्या द्रुष्ट ना सर्वा पेटता बानस्ले मलावू सकोत. आणि तारणरुपी शीरस्त्राण, आणि आत्मा नि तलवार, जो परमेश्वर ना वचन शे, ली ल्या. प्रत्येक टाईम ले आणि हरेक प्रकार कण आत्मा ना मार्गदर्शन ना नुसार प्रार्थना, आणि विनंती करत राहा, आणि एनासाठे जागत राहा कि सर्वा पवित्र लोकस्ना साठे कायम प्रार्थना करत राहोत. मनासाठे बी प्रार्थना करत राहा, एनासाठे कि जव मी बोलू त परमेश्वर मले बरोबर शब्द देवो कि मी हिम्मत कण सुवार्ता ना भेद सांगी सकू. एनाच साठे मी बेड्यास्मा बांधायेल राजदूत ना सारखा सेवा करी ऱ्हायनु. प्रार्थना करा कि मी, ज्या प्रकारे मले बोलाले पाहिजे, त्याच प्रकारे हिम्मत कण सुवार्ता ना प्रचार करी सकू. तुखिक, प्रभु मा मना प्रिय भावू आणि एक विश्वास योग्य सेवक शे, तुमी लोकस्ले हय सगळ सांगी दिन, एनासाठे कि तुमले बी माहिती पळो कि मी कसा शे आणि काय करी ऱ्हायनु. मी तेले तुमना जोळे एनासाठे धाळी ऱ्हायनु कि तुमले मना बारामा पुरी बातमी माहित पळी जावो आणि एनासाठे बी कि तो तुमले प्रोत्साहित करो. परमेश्वर बाप आणि प्रभु येशु ख्रिस्त ना कळून सर्वा विश्वासी भावूस्ले शांती आणि विश्वास ना संगे प्रेम बी भेटो. परमेश्वर नि कृपा त्या सर्वास्वर सदा राहो, ज्या आमना प्रभु येशु ख्रिस्त वर खरा प्रेम करतस. मी पौल, ख्रिस्त येशु ना दास होवा मुळे, आणि तीमुथियुस ना संगे फिलिप्पै शहर मा राहणारा परमेश्वर ना पवित्र लोकस्ले, अध्यक्ष आणि सेवकस्ले हई चिठ्ठी लिखस. आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त मा तुमले कृपा आणि शांती भेटत राहो. जव कदी मी तुमनी आठवण करस, त मी तुमना साठे परमेश्वर ना धन्यवाद करस. आणि जव कदी मी तुमी सर्वास्ना साठे प्रार्थना करस, त मी खुशी कण प्रार्थना करस. कारण कि तुमी पहिला दिन पासून त आज लोंग सुवार्ता पसाराना काम मा मनी मदत करेल शे. आणि मले पुरा विश्वास शे कि ज्या परमेश्वर नि हय चांगल काम तुमी लोकस्मा सुरु कर, तोच तेले येशु ख्रिस्त ना येवाना दिन लोंग पुरा करीन. मनासाठे हय बर शे कि मी तुमी सर्वास साठे असाच विचार करू, आणि तुमी सर्वा मना मन मा बठी जायेल शेतस. कारण कि आते जव मी कैद मा शे आणि जव मी सुवार्ता नि राखोई साठे उत्तर आणि साक्ष देवाले आणि तेले दृढता कण स्थापित करासाठे मोक्या रूप मा कार्य करत होतु, त्या टाईम ले बी तुमी सर्वा मना संगे त्या कृपा मा सहभागी हुईनात जी परमेश्वर नि मनावर करेल शे. मी हय खर करी ऱ्हायनु कि तुमी सर्वास्ना साठे मना हृदय मा हय भावना स्वता ख्रिस्त येशु ना कळून एस, ह्या गोष्ट मा परमेश्वर मना साक्ष शे. मी हय प्रार्थना करस कि तुमना प्रेम खरा ज्ञान आणि विवेक मा आखो बी जास्त वाळत जावो. एनासाठे कि तुमी चांगल्या तून चांगल्या वस्तूस्ना बरोबर निवळ करामा योग्य बनोत. जव ख्रिस्त ईन, तव तुमी त्या दिन सगळी अशुद्धता आणि दोष कण स्वतंत्र होश्यान. तुमना जीवन धार्मिकता ना चांगला गुणस कण भरी जावो जो फक्त येशु ख्रिस्तच तुमना मधमा उत्पन्न करू सकस, जेना द्वारे परमेश्वर नि महिमा आणि स्तुती होस. ओ भावूसहोण, मनी ईच्छा शे कि तुमी हय समजी ल्या कि जे काही मना संगे हुयेल शे, तेना कण सुवार्ता प्रचार ना काम आखो जास्त व्हाळेल शे. आणि तेना परिणाम सम्राट नि राज्यभवन नि पुरी सेना आणि आखो गैरा लोकस्ले ह्या गोष्टी माहिती शेतस कि मी ख्रिस्त ना सेवक होवा मुळे जेल मा कैदी शे. मले जेल मा कैद होवा मुळे गैरा विश्वासी भावूस्ले ताखत भेटेल शे त्या प्रभु वर विश्वास ठीसन पयला पेक्षा जास्त हिंमत कण परमेश्वर ना वचन आयकाळतस. तेस्ना मधून काही द्वेष आणि झगळा मुळे ख्रिस्त ना प्रचार करतस पण काही चांगला मन कण बी ख्रिस्त ना प्रचार करतस. त्या लोक ज्या चांगला मन कण प्रचार करतस, कारण कि तेस्ले माहिती शे कि परमेश्वर नि मले सुवार्ता ना प्रतीउत्तर ना आणि तेले साबित कराना काम सोपेल शे. पण त्या लोक ज्या द्वेष कण ख्रिस्त ना प्रचार करतस स्वतास्ना स्वार्थ साठे असा करतस. कारण कि अस कराना द्वारे त्या विचार करतस कि त्या मनासाठे जेल मा आखो क्लेश उत्पन्न करतीन. एना कण मले काही फरक नई पळत. भले वाईट उद्देश कण राहो कि चांगला उद्देश कण, ज्या बी प्रकार कण हो ख्रिस्त ना प्रचार हुई त ऱ्हायना. मी एनाच मा खुश शे आणि खुशी करत ऱ्हासु. कारण कि मले माहिती शे कि तुमनी विनंती ना द्वारे, आणि प्रभु येशु ख्रिस्त नि आत्मा ना मदत कण मी मुक्त हुई जासू. मनी हय हार्दिक ईच्छा आणि आशा शे कि मले कोणतीच गोष्ट मा लज्जित नई होण पळो, पण मी पुरा बिगर भ्यावाना ख्रिस्त ना बारामा बोलू जसा कि आते लगून बोलत ईऱ्हायनु जेना कण मना शरीर ना व्दारे भले जीत्ती अवस्था मा व मरेल अवस्था मा ख्रिस्त नि स्तुती होत राहो. म्हणून मनासाठे जित्ता ऱ्हाण ख्रिस्त शे, आणि मरी जान फायदा शे. पण जर कदी जित्ता ऱ्हासुत आखो बी सामर्थ्य ना काम करी सकस, पण मले नई माहिती कि मी काय निवाळू. मी दोनीस कळून पेचमा शे, मले ह्या जीवन ले सोळीसन ख्रिस्त जोळे जावानी ईच्छा शे, जे कि मनासाठे जास्त चांगल शे. पण तुमना साठे मले जित्ता राहाण जास्त आवश्यक शे. मले हय खात्री शे आणि मले हय माहिती शे कि मी जित्ता ऱ्हासु आणि तुमना संगे राहीसन तुमनी मदत करसू, जेना कण कि तुमी विश्वास मा व्हाळत जावोत आणि खुश राहोत. जव मी तुमना जोळे परत एसू, त ख्रिस्त येशु जो मना द्वारे करी ऱ्हायना तेना मुळे तुमी येशु ख्रिस्त वर आखो जास्त गर्व कराले लागश्यात. फक्त ईतलच करा कि तुमना आचारण ख्रिस्त ना सुवार्ता ना योग्य होवो. भले मी ईसन तुमले देखू, आणि नई बी देखू. तरी बी तुमना बारामा हय आयकू कि तुमी एकच उद्देश्य कण आणि एक चित्त हुईसन सुवार्ता ना विश्वास साठे कष्ट करत ऱ्हातस. आणि आपला विरोधीस संगे ज्या तुमले त्रास देतस तेस्ले नका भ्या. कायम साहास ठेवा, आणि एना कण स्पष्ट हुई जाईन कि त्या हारतीन आणि तुमी जिती जाश्यात, कारण कि परमेश्वर तुमले जीत देस. कारण कि तुमी लोकस्ले नईत फक्त ख्रिस्त येशु मा विश्वास कराना, पण तेना मुळे दुख भोगाना बी वरदान भेटेल शे. आते तुमी मना संगे ह्या संघर्ष मा हिस्सा लेवू सकतस. हवू तोच संघर्ष शे जेले तुमनी मले फिलीप्पि शहर मा झगळतांना देख, आणि जसा कि तुमी आयकतस त्याच संघर्ष मा मी आज बी झगळस. जव तुमले माहिती शे कि ख्रिस्त मा तुमना जीवन तुमले धाळस बनावस, आणि तेना प्रेम तुमले शांती देस, तुमनी सहभागीता पवित्र आत्मा ना संगे शे आणि तुमना मा एक दुसरा साठे करुणा आणि दया शे. त मी तुमले विनंती करस कि एक मन राहा, आणि एक दुसरा ना संगे एकच प्रेम मा बनी राहा, आणि आपसा मा एकच चित्त आणि एकच विचार ठेवा. ह्या प्रकारे मनी खुशी पुरी करा. स्वता ना स्वार्थ व खोटी बळायखी साठे काहीच नका करा, पण एक दुसरा ना प्रती नम्र बना, आणि कायम दुसरास्ले आपला तून चांगला समजा. तुमना मधून प्रत्येक आपलीच हित नि नई, पण सर्वास्नी हित नि बी चिंता करा. जसा ख्रिस्त येशु ना स्वभाव होता तसाच तुमना बी स्वभाव होवो. जेनी परमेश्वर ना स्वरूप मा हुईसन बी परमेश्वर ना बराबर होवाले आपला अधिकार मा ठेवानी वस्तू नई समज. पण तेनी सर्व काही सोळीसन, दास ना स्वरूप धारण कर, आणि माणुस सारखा हुईग्या. आणि माणुस ना रूप मा प्रगट हुईसन स्वता ले लीन कर, आणि परमेश्वर ना आदन्याकारी बनीसन, क्रूस नि मोत बी सहन करी लिधी. ह्या मुळे परमेश्वर नि तेले अति महान कर, आणि तेले तो नाव दिधा जो सर्वा नावस्मा श्रेष्ठ शे. जो स्वर्ग मा आणि पृथ्वी वर आणि पृथ्वी ना खाले शे, त्या सर्वा येशु ना नाव वर गुळघा टेकोत. आणि परमेश्वर बाप नि महिमा ना साठे प्रत्येक लोक मानी लेवो कि येशु ख्रिस्तच प्रभु शे. एनासाठे ओ मना प्रिय भावूसहोण, तुमी कायम मना आदन्या मानत एयेल शेतस, जव मी तुमना संगे होतु तवच नई पण खास करीसन आते, म्हणजे मी दूर ऱ्हातांना बी. भ्यात आणि कापत त्या कार्यस्ले पुरा करत राहा जेस्ना द्वारा परमेश्वर तुमी लोकस्ना तारण करीन. कारण कि परमेश्वर तुमना मधमा काम करस, आणि तुमले ईच्छा आणि सामर्थ्य देस कि तुमी त्या कामस्ले करी सकोत जेना कण तो खुश होस. तुमी सर्वा कामस्ले बिगर तक्रार आणि बिगर विवाद कण कऱ्या करा. एनासाठे कि तुमी परमेश्वर ना निष्कलंक पोरस्ना सारखा निर्दोष आणि भोया हुईसकोत. ज्या जग ना पापी आणि भ्रष्ट लोकस्ना मधमा ऱ्हातस. तुमी तेस्ना मधमा आकाश मा चमकणारा तारास्ना सारखा चमका. जस तुमनी तेस्ले जीवन नि सुवार्ता दियेल शे. कदी तसाच करतस, त मले ख्रिस्त ना येवाना दिन तुमना वर गर्व ना कारण हुईन, कि नईत मन पयन आणि नईत मना कष्ट करन व्यर्थ हुईन. परमेश्वर वर तुमना विश्वास आणि तुमनी सेवा परमेश्वर ले चळायेल चळावा ना सारखा शे. कदी मले तुमना विश्वास ना साठे आपला जीवन बी देणा पळो, तरी बी मी खुश शे आणि तुमी सर्वास्ना साठे आनंद करस. तसाच तुमी बी खुश व्हा, आणि मना संगे खुशी करा. कदी हय प्रभु येशु नि ईच्छा शे, त मले आशा शे कि मी तीमुथियुस ले तुमना जोळे लगेच धाळसू, एनासाठे कि तुमनी बातमी आयकीसन उत्साहित हुई जावू. कारण कि मना जोळे असा स्वभाव ना आखो कोणीच नई, जो शुद्ध मन कण तुमनी कायजी करो. दुसरा सर्वा आपलाच स्वार्थ नि चिंता करतस, आणि येशु ख्रिस्त ना कामस्नी चिंता कोणीच नई करत. पण तुमनी तीमुथियुस ले परखी आणि समजी बी लीयेल शेतस कि तो कितला विश्वास योग्य शे. जसा पोऱ्या बाप संगे करस, तसच तेनी सुवार्ता पसरावा मा मना संगे कष्ट करेल शे. मले आशा शे कि जस मले माहिती पळीन कि मनी दशा काय हुईन, मी तेले लगेच तुमना जोळे धाळसू. आणि मले प्रभु वर विश्वास शे कि मी बी लवकरच तुमना जोळे एसू. मनी हय आवश्यक समज कि आमना भावू एपफ्रदीत ले तुमना जोळे धाळू, तो मना सहकर्मी, संगी योद्धा आणि तुमना संदेश लयनारा आणि आवश्यक गोष्टीस्मा मनी सेवा करणार व्यक्ती शे. तो तुमी सर्वास्ले देखा साठे गैरा उत्सुक होता, पण तो चिंतामा राहत होता कारण कि तुमनी तेना आजार ना बारामा आयकेल होतात. तो खरज गैरा आजारी होता आणि मरानी स्थिती वर होता. पण परमेश्वर नि दया करी आणि तेले बर कर, फक्त तेनाच वर नई पण मनावर बी दया करी, कि मले एक आखो दुख सहन नई करन पळो. एनासाठे मी तेले तुमना जोळे धाळा साठे आखो जास्त उत्सुक शे, एनासाठे कि तुमी तेले देखीसन खुश हुई जावोत, जेना कण मनी बी कमी हुई जावो. एनासाठे तुमी प्रभु मा तेना स्वागत खुशी कण करा. आणि असा व्यक्तीस्ना ह्याच प्रकारे आदर करत ऱ्हायज्यात. कारण कि तेनी ख्रिस्त ना काम साठे आपला जीव ले धोका मा टाक, तुमी दूर राहा मुळे मनी मदत नई करू सकनात, पण तेनी मनी सेवा करी. एनासाठे ओ मना विश्वासी भावूसहोण, प्रभु मा सदा खुश राहा. मले ह्या गोष्टीस्ले परत लीखाले काहीच कष्ट नई शे, कारण कि मन अस करा मुळे तुमी भटका पासून वाचश्यात. ज्या वाईट काम करतस त्या लोकस पासून सावधान राहा. ज्या कुत्रास सारखा शेतस आणि ज्या सांगतस कि तारण प्राप्त करासाठे शारीरिक सुंता करन निश्चित शे. तेस्ना नई, पण तुमना खरा सुंता हुयेल शे, कारण कि आमी तेनी परमेश्वर नि आत्मा कण प्रेरित हुईसन तेनी उपासना करतस आणि येशु ख्रिस्त मा राहीसन आपला जीवन मा गर्व करतस आणि माणुसस्ना काम वर विश्वास नई ठेवतस. जरी मनापा कितलाक चांगला कारण शेतस कि मी माणुसस्ना काम वर विश्वास ठेवू, तरी बी कदी कोणी माणुसस्ना काम वर विश्वास ठेवाना विचार करस, त मी तेस्ना तून जास्त असा करी सकस. मना जल्म होवाना आठवा दिन ले मना सुंता हुयना जसा कि परमेश्वर नि आदन्या दियेल शे. मी जल्म पासूनच इस्त्राएली शे आणि बन्यामीन ना वंश ना शे, आणि मी एक पक्का इब्री माणुस शे. आणि मोशे ना नियमले पायाना द्वारे मी परूशी माणुस होतु. मना यहुदी धर्म ना प्रती उत्साह इतला होता कि मी मंडळीस्ले त्रास देत होतु. आठ लगून कि मी एक मोशे ना नियम ना पालन करणारा धर्मी व्यक्ती होतु, कारण कि मनी त्या सर्वा गोष्टीस्ना पालन करेल होत. पण त्या सगळ्या गोष्टी ज्या मनासाठे फायदा ना होवू सकत होत्यात, आते मी तेस्ले ख्रिस्त मुळे नुकसान ना समजी लीयेल शे. कारण कि मी मना प्रभु येशु ले वयखान देखस, जो सर्वा वस्तुस्तून जास्त मूल्यवान शे. एनासाठे मी सर्व्या वस्तूस्ले नुकसान समजस, आणि तेना मुळे मी सर्व्या गोष्टीस्ना नुकसान उचलनु, आणि तेस्ले कचरा समजस, एनासाठे कि ख्रिस्त ना आदन्याकारी बनी सकू. आणि तेना संगे पुरा रूप कण एक हुई जावू, मना जोळे मोशे ना नियमले मानीसन भेटणारी धार्मिकता नई शे. आते मना जोळे ती धार्मिकता शे जी ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे भेटस, ती धार्मिकता परमेश्वर कळून विश्वास करा मुळे भेटस. एनासाठे कि ख्रिस्त ले आणि तेना परत जित्ता होवानी नि सामर्थ्य ले समजी सकू, आणि तेना संगे दुखस्मा सहभागी हुईसन तेनी मृत्यु नि समानता ले प्राप्त करू. एनासाठे कि मी कसा बी करीसन मोत मधून परत जित्ता करावामा येवू. मी हय नई सांगत कि मी पहिले पासूनच यशस्वी हुई जायेल शे व सिद्ध बनी जायेल शे. पण मले तो ईलाम भेटो म्हणून मी प्रयत्न्य करी ऱ्हायनु जेना साठे ख्रिस्त येशु नि मले आपला अधिकार मा ली लीयेल शे. ओ मना विश्वासी भावूसहोण, मी असा विचार नई करत कि तो मले भेटी जायेल शे. पण मी हय करस कि ज्या गोष्टी मांगे ऱ्हाईजायेल शेतस तेस्ले ईसरी सन, पुळल्या गोष्टी कळे वाळत जास. एनासाठे स्वर्ग ना त्या ईलाम प्राप्त करासाठे मी निशाना कळे पयत जास, जेना साठे परमेश्वर नि मले ख्रिस्त येशु ना द्वारे बलायेल शे. एनासाठे, आमी सर्वा ज्या सिद्ध शेतस, हवूच विचार ठेवा. पण कदी तुमना मधून काहीस्ना काही आल्लग विचार हुईन त परमेश्वर तेले बी तुमना वर प्रगट करी दिन. तरी जठ लगून आमी पोहोची जायेल शेतस, त्याच प्रमाणे पुळे चालोत. ओ विश्वासी भावूसहोण, तुमी सर्वा मियसन मना अनुकरण करा. आणि त्या लोकस्वर ध्यान द्या ज्या ह्याच रिती ना अनुकरण करतस जो आमनी तुमना समोर ठेयेल शे. मी पहिलेच तुमले गैरा सावा हय सांगी टाकेल शे, आणि आते परत रळी-रळीसन सांगस, गैरा असा शेतस ज्या आपला जीवन ले जगाना द्वारे ख्रिस्त नि क्रूस वरनी मृत्यु नि बातमी ना विरोध करतस. तेस्न शेवट नाश शे, कारण कि त्या आपला शरीर ना ईच्छास्ले भागाळालेच जगतस. ज्या गोष्टीस्वर तेस्ले लज्जित होवाले पाहिजे जेस्ना त्या गर्व करतस, आणि फक्त जग ना गोष्टीवरच मन लावतस. आमना स्वदेश स्वर्ग मा शे, आणि आमी उत्सुकता कण तारणार प्रभु येशु ख्रिस्त ना स्वर्ग मधून येवानी वाट देखी ऱ्हायनूत. तो आपली ती शक्ती ना प्रभाव प्रमाणे जेना व्दारे तो सगळ्या वस्तूस्ले आपला आधीन मा करी सकस, तेनाच द्वारे तो आमनी कमजोर आणि शारीरिक देह ना रूपांतर करीन आणि आपला गौरव ना शरीर ना सारखा बनाई दिन. एनासाठे ओ मना विश्वासी भावूसहोण, तुमी मना कितला प्रिय शेतस आणि मनी तुमले भेटणी ईच्छा शे. तुमी मनी खुशी शेतस आणि मले तुमना वर गर्व शे. ह्याच प्रकारे विश्वास मा मजबूत बनी राहा. मी युवदीये आणि सुंतुखे, ह्या दोनी बहिनिस्ले विनंती करस कि तुमी आपस मा वाद नई करता प्रभु मा एक मन कण राहा. ओ मना विश्वास योग्य सहकर्मी, मनी ईच्छा शे कि तू त्या बहिनस्नी मदत करो कारण कि तीस्नी मना संगे सुवार्ता आयकाळा मा, क्लेमेंत आणि मना दुसरा जोळीदारस संगे कष्ट करेल शे, जेस्ना नाव जीवन नि पुस्तक मा लीखायेल शेतस. तुमी प्रभु मा कायम खुश राहा, मी परत सांगस, खुश राहा. प्रत्येक झनस संगे सौम्यता कण वागा, प्रभु लवकरच येणार शे. कोणतीच गोष्ट नि चिंता नका करा, पण प्रार्थना आणि विनंती करीसन धन्यवाद कण आपला सर्वा गरजा परमेश्वर ना समोर ठेवा. आणि परमेश्वर नि शांती जी माणसस्नी समज तून बाहेर शे, तुमना हृदय आणि विचारस्ले ख्रिस्त येशु मा सुरक्षित ठिईन. एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, ज्या गोष्टी खऱ्या आणि आदरणीय शेतस, आणि ज्या ज्या गोष्टी धार्मिकता, ज्या ज्या गोष्टी प्रशंसनीय, आणि आनंददायक शेतस, आणि ज्या ज्या गोष्टी सदगुण आणि स्तुती ना शेतस, तेस्ना वर ध्यान लावत जा. जी शिक्षा तुमनी मना कळून शिकेल शे आणि जो उपदेश तुमनी मना पासून स्वीकारेल शे. आणि जो उदाहरण मनी आपला शब्द आणि कामस्ना द्वारे तुमले दाखाळेल शे तेस्ना पालन करा. तव परमेश्वर जो शांतीदाता शे तुमना संगे राहीन. मी प्रभु मा गैरा खुश शे कि आते इतला दिनस नंतर तुमना परत एक सावा मना बारामा चिंता दायेल शे. मना सांगाणा अर्थ हय नई शे कि तुमनी मनी चिंता कराले सोळी दियेल होत, पण हय कि तुमले संधी नई भेटणी. मी हय एनासाठे नई करी ऱ्हायनु कि मले कोणती गोष्ट नि कमी शे, कारण कि मनी प्रत्येक परिस्थिती मा तृप्त राहाण शिकी लीयेल शे. मले कमितरता मा बी राहाण माहिती शे आणि संपन्नाता मा बी राहाण माहिती शे. हरेक गोष्ट मा आणि सर्व्या स्थितीस्मा तृप्त होण, भुक्या राहाण, आणि जीवन ना उतार चळाव मा राहाण शिकेल शे. ख्रिस्त ना सामर्थ्य ना द्वारे मी सर्व्या परिस्थितीस्ना सामना करी सकस. पण तुमनी मनी दुख मा मनी मदत करीसन चांगलच कर. ओ मना प्रिय फिलीप्पि शहर ना मित्रसहोण, तुमले माहिती शे कि सुवार्ता प्रचार नि सुरुवात मा, जव मी मासेदोनिया प्रांत मधून निघणु तव फक्त तुमनीच मंडळी ना लोकस्नी मना लेन-देन ना बारामा मनी मदत करेल होती. ह्याच प्रकारे जव मी थेस्सलनीका प्रांत मा होतु तव तुमनी एक सावा नई पण कईक सावा मना गरजा पुरा करासाठे मले मदत धाळेल होती. अस नई शे कि मले दान पाहिजे, पण मनी ईच्छा शे कि हय तुमना साठे हुयेल चांगला कामस्नी यादी मा जोळाई जावो, जेना साठे परमेश्वर तुमले प्रतीफय दिन. जे काही तुमनी मले दिध ते सगळ काही मना जोळे शे, पण जास्त तून बी जास्त शे. ज्या वस्तू तुमनी एपफ्रदीत ना हात कण लीधाळेल होती तेस्ले लिसन मी तृप्त हुई जायेल शे, तो त परमेश्वर ना समोर सुखद सुगंध, स्वीकार करा योग्य अर्पण ना सारख शे, जो तेले आवळस. मना परमेश्वर बी आपला त्या धन ना प्रमाणे जो महिमा मा ख्रिस्त येशु मा शे, तुमनी प्रत्येक गरजस्ले पुरा करीन. आमना परमेश्वर बाप नि महिमा युगानयुग होत राहो. आमेन. येशु ख्रिस्त मा प्रत्येक पवित्र लोकस्ले नमस्कार सांगा. जो विश्वासी भावू मना संगे शे, तेस्ना कळून तुमले नमस्कार. सर्वा पवित्र लोकस कळून, खास करीसन ज्या रोमी सम्राट कैसर ना कर्मचारी तुमले नमस्कार सांगतस. आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा तुमना संगे राहो. मी पौल, जो परमेश्वर नि ईच्छा कण ख्रिस्त येशु ना निवाळेल प्रेषित शे, आणि आमना भावू तीमुथियुस ना कळून, कलस्सै शहर मा राहाणारा ख्रिस्त मा त्या पवित्र आणि विश्वासी भावूस्ले हय पत्र लिखस. आणि मी प्रार्थना करस कि आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त मा तुमले कृपा आणि शांती भेटत राहो. जव आमी तुमना साठे प्रार्थना करतस, तव आमी आपला प्रभु येशु ख्रिस्त ना बाप म्हणजे परमेश्वर ना धन्यवाद करतस. कारण कि आमी तुमना विश्वास ना बारामा जो प्रभु येशु ख्रिस्त वर शे आणि त्या प्रेम ना बारामा जो तुमी परमेश्वर ना लोकस संगे ठेवतस आयकेल शे, तुमना विश्वास आणि प्रेम त्या आशा वर निर्भर शे जो तुमना साठे स्वर्ग मा सुरक्षित ठेवामा एयेल शे. जेना बारामा तुमी पहिलेच आयकी लीयेल शेतस, जव काही लोक सर्वास्तून पहिले तुमना जोळे उनात आणि ख्रिस्त येशु नि सुवार्ता ले तुमले सांग, जो परमेश्वर ना सत्य वचन शे. जी सुवार्ता तुमना जोळे पोहोचनी, तिले आयकीसन गैरा लोक विश्वास करी ऱ्हायनात आणि सुवार्ता पुरा जग मा पसरी ऱ्हायनी, आणि ह्या गोष्ट कण तुमी पुरा समजी जायेल होतात कि परमेश्वर कितला कृपालु शे. आणि हय तेच शे जे तुमना मा बी असच करस. तुमनी परमेश्वर ना कृपा नि शिक्षा आमना सहकर्मी एपफ्रा ना कळून लीधी, जो आमना कळून ख्रिस्त ना विश्वास योग्य सेवक शे. तेनीच आमले तुमना त्या प्रेम ना बारामा सांगेल शे जो तुमले आत्मा ना द्वारे भेटेल शे. जव पासून आमी तुमना बारामा आयकेल शेतस तव पासून आमी तुमना साठे प्रार्थना आणि विनंती करी ऱ्हायनूत कि परमेश्वर तुमले पुरा आत्मिक ज्ञान आणि बुद्धी देवो, जेना कण तुमी तेनी ईच्छा ले पूर्णपणे समजी सको. एनासाठे कि तुमी प्रभु नि ईच्छा प्रमाणे जीवन जगाना योग्य बनोत आणि कायम जे तेले आवळस तेच करज्यात. तुमी सर्वा प्रकार ना चांगला कार्यस्ले करज्यात आणि परमेश्वर ले आखो बी चांगल्या प्रकारे समजा आणि तेनामा वाळत जावा. तेनी महिमा नि शक्ती ना नुसार सर्वा प्रकार नि सामर्थ्य कण बलवंत होत जावा, एनासाठे कि तुमी धीर व खुशी देणारी सहनशीलता कण आपला कष्टस्ले सहन करी सकोत. आणि परमेश्वर बाप ना धन्यवाद करत राहा, जेनी आमले ह्या योग्य बनाव कि उजाया ना राज्य मा पवित्र लोकस्ना संगे मिरास मा सहभागी होवो. कारण कि तेनी आमले अंधकार नि सामर्थ्य कण सोळाव आणि आपला प्रिय पुत्र ना राज्य मा प्रवेश करायेल शे. जेना बलिदान ना द्वारे परमेश्वर नि आमले सुटका म्हणजे पाप नि माफी दियेल शे. ख्रिस्त त नई दिखणारा परमेश्वर ना दिखणारा प्रतिरूप शे. तो त पुरी सृष्टी ना निर्मिती ना पहिले अस्तित्व मा होता आणि तो पुरा निर्माण करेल वस्तूस्मा जेष्ठ शे. तेनाच द्वारे परमेश्वर नि आकाश मा आणि पृथ्वी वर सर्व काही बनाव, दिखणारी आणि नई दिखणारी वस्तू, अधिकार आणि प्रधानता, आध्यात्मिक शक्ती, प्रभूता. परमेश्वर नि पुरा ब्रह्मांड नि रचना तेनाच द्वारे करी आणि तेनाच साठे बनावी. ख्रिस्त पुरी सृष्टी ना पहिले अस्तित्व मा होता, आणि तेनाच द्वारे पुरी सृष्टी एक क्रम मा आपला योग्य जागा वर स्थिर ऱ्हास. तोच आपला शरीर म्हणजे मंडळी ना डोक शे, तोच पहिले पासून जीवन ना स्त्रोत शे. तो मरेल मधून परत जित्ता होणारस मधून पहिला शे, कि सर्वा गोष्टीस्मा तोच सर्वश्रेष्ठ ठरो. कारण कि हय बाप परमेश्वरनाच निर्णय ना द्वारे शे कि तेना पुत्र म्हणजे ख्रिस्त मा परमेश्वर ना पुरा स्वभाव निवास करो. म्हणून तेनी क्रूस वर आपला रक्त ले व्हावाळीसन आपला जीव दिधा. परमेश्वर नि हय एनासाठे कर कि तेना द्वारे तो सर्वा वस्तूस्ना सामंजस्य आपला संगे कराई लेवो. ह्या प्रकारे तेनी आपला संगे पुरी पृथ्वी आणि आकाश नि गोष्टीस संगे शांती स्थापित करी. एक टाईम ले तुमी परमेश्वर पासून गैरा दूर होतात आणि आपला वाईट कामस्ना द्वारे आणि मन ना वाईट विचारस्ना द्वारे तेना शत्रू बनी जायेल होतात. पण आते, आपला पुत्र नि शारीरिक मोत ना द्वारे परमेश्वर नि तुमना संगे सामंजस्य करी लीयेल शे एनासाठे कि तुमले पवित्र आणि निष्कलंक, आणि निर्दोष बनाईसन आपली उपस्थिती मा लयो. पण तुमी ख्रिस्त मा विश्वास ना पाया वर दृढ बनी ऱ्हातस, आणि त्या सुवार्ता नि आशा ले जेले तुमनी आयकेल शे नका सोळा, जेना प्रचार आकाश ना खाले पुरी सृष्टी ना लोकस्ले करामा उना, आणि जेना मी, पौल, सेवक बनणु. आते मी त्या दुख मुळे आनंद करस जो मी तुमना साठे उचलस, मी ख्रिस्त ना क्लेश नि कमी जी राही जायेल शे, तेना शरीर म्हणजे मंडळी ना साठे, आपला शरीर मा पुरी करस. आणि मी परमेश्वर ना द्वारे त्या व्यवस्था नुसार मंडळी ना सेवक बनणु, जेनी मले मंडळी ना चांगला साठे हय काम सोप एनासाठे कि मी परमेश्वर ना वचन ले पुरा-पुरा प्रचार करू. म्हणजे त्या भेद ज्या युगानयुग आणि पिढीनपिढी लगून गुप्त ऱ्हायनात, पण आते तेना पवित्र लोकस्वर प्रकट हुयेल शे. हय परमेश्वर नि योजना शे कि तेना लोक तेना भेदना महिमा ना मुल्य ले समजो जो सर्वा जाती ना लोकस साठे शे आणि हवू भेद स्वता ख्रिस्त शे जो तुमना मा ऱ्हास. जी परमेश्वर नि महिमा नि आशा शे. एनासाठे आमी ख्रिस्त ना प्रचार सर्वा लोकस्मा करतस आणि पुरा ज्ञान कण प्रत्येक माणसस्ले शिकाळतस आणि जताळतस कि आमी प्रत्येक व्यक्ती ले ख्रिस्त मा सिद्ध करीसन परमेश्वर ना समोर उपस्थित करो. एनाच साठे मी तेनी ती शक्ती ना नुसार जी मना मा सामर्थ्य कण प्रभाव टाकस, तन मन लाईसन मेहनत बी करस. मनी तुमले सांगानी ईच्छा शे कि मी तुमना साठे आणि लावदीकिया शहर ना लोकस्ना साठे आणि तेस्ना साठे ज्या मले व्यक्तिगत रूप कण नई वयखतस, कितला कष्ट करस. मी हय एनासाठे सांगस कि त्या उत्साह कण भरी जावोत आणि त्या ज्ञान ना सर्वा धन प्राप्त करी लेवोत आणि तेस्ले परमेश्वर बाप नि गुप्त योजना ना बारामा पुरी समज राहो, जो स्वता ख्रिस्त शे. कारण कि तेनाच द्वारे परमेश्वर ना ज्ञान आणि बुद्धी प्रगट होस जी एक दपेल खजाना सारखी शे. हय मी एनासाठे सांगस, कि कोणी बी माणुस तुमले तेस्नी खोटी शिक्षा माना साठे उकसाई नई सको. जरी मी शरीर ना भाव कण तुमना पासून दूर शे तरी बी मी आत्मा मा तुमना संगे शे, आणि मी खुश होस कि तुमी त्याच प्रकारे जीवन जगी ऱ्हायनात ज्या प्रकारे तुमले जगन उचित शे आणि तुमना ख्रिस्त मा विश्वास पक्का शे. जसा तुमी ख्रिस्त येशु ले प्रभु समजीसन स्वीकार करी लीयेल शे, तसाच तेना अनुसरण करत व्यवहार करा. तेनाच मा तुमना विश्वास आणि आध्यात्मिक जीवन उन्नती करो, आणि तुमी जी विश्वास नि शिक्षा ले प्राप्त करेल शे, तेनाच मा दृढ बनेल राहा, आणि परमेश्वर ना कायम धन्यवाद करत राहा. चौकस राहा कि कोणी तुमले माणुस ना व्यर्थ ज्ञान द्वारे धोका नई देवो, जो माणसस्ना परंपरा ना प्रमाणे आणि जग नि पहिली शिक्षा ना प्रमाणे त शे, पण ख्रिस्त ना कळून नई शे. कारण कि ख्रिस्त नि शरीर मा परमेश्वर ना पुरा स्वभाव वास करस. तुमी ख्रिस्त मा पुरा हुई जायेल शेतस, आणि ख्रिस्त येशु सर्वा प्रधान आणि सर्वा अधिकारस्वर प्रमुख शे. जव तुमनी ख्रिस्त वर विश्वास कर, तव तुमना सुंता माणसस्ना द्वारे हात कण नई पण ख्रिस्त ना द्वारे हुयना म्हणजे आत्मिक रिती कण जेना द्वारे पापमय स्वभाव ना शरीर ले काळामा येस. कारण कि जव तुमना बाप्तिस्मा हुयना, तुमी ख्रिस्त संगे गाळाई ग्यात. आणि त्याच बाप्तिस्मा मा परमेश्वर नि सामर्थ्य वर विश्वास करीसन जेले तेनी मरेल मधून जित्त कर, तुमी बी ख्रिस्त संगे जित्ता हुई ग्यात. पहिले तुमी बी आपला पापस मुळे आणि बिगर सुंता ना ऱ्हावा मुळे आत्मिक रूप कण मरेल होतात. पण आते परमेश्वर नि तुमले ख्रिस्त संगे जित्ता करेल शे आणि आमना सर्वा पापस्ले माफ करी दियेल शे. तेनी आमले अपराधी ठरावनारा लेख ले रद्द करी टाकेल शे, जी विधी आणि नियम मुळे आमना विरोध मा होता आणि आपला क्रूस वर ठोकीसन पूर्णपणे दूर करी टाकेल शे. ख्रिस्त नि त्या क्रूस द्वारे प्रत्येक शक्ती आणि अधिकारस्ले हाराई दियेल शे आणि तेस्ले जग नि नजर मा धाकला दाखाळ. आणि क्रूस नि विजय प्रवास मा तेस्ना सर्वास समोर तमाशा करना. एनासाठे खावान-पेवान व सन व नवीन चांद, व आराम ना दिनस्ना बारामा कोणी तुमले दोषी नई ठराई सको. कारण या सर्वा नियम येणाऱ्या गोष्टस्नि सावली शे, वास्तविकता त ख्रिस्त शेतस. कोणता बी व्यक्ती तुमना ईलाम पासून तुमले दूर नई करी सको. असा व्यक्ती स्वता ले खोटी दीनता ना दाखावा करत, आणि परमेश्वर ना दूत नि उपासना करतस, आणि तथा-कथित आध्यात्मिक दुष्टी ना हक्क जताळा मुळे स्वता ले श्रेष्ठ समजस, आणि आपली जग नि बुद्धी मुळे गर्व कण फुगी जास, आणि ख्रिस्त मा खरा संदेश मानाले आणि शिकाळाले बंद करी देस. ज्या प्रमाणे एक डोक शरीर ले निर्देशित करस, त्याच प्रमाणे ख्रिस्त बी आपला सर्वा लोकस्ले निर्देशित करस, एनासाठे कि त्या एकत्र राहोत, आणि वाळत जावोत. जशी कि परमेश्वर नि ईच्छा शे वाळत जावोत. जसा कि तुमी ख्रिस्त ना संगे मरी ग्यात आणि ह्या जग ना परमपरा नि पहिली शिक्षास पासून मुक्त हुई ग्यात, त मंग तुमी असा जीवन काब जगतस जसा कि तुमी ह्या जग ना शेतस? तुमी असा विधीस्ना पालन काब करतस, कि “येले स्पर्श नका कराज्यात,” “तेले नका खायज्यात,” आणि “दुसरास्ले स्पर्श नका करज्यात?” ह्या सर्वा माणसस्ना नियम शेतस, माणसस्ना शिद्धांतस्वर आधारित शे आणि अश्या वस्तूस संगे संबंध ठेवतस, ज्या उपयोग मा येवाना पहिलेच नष्ट हुई जातस. खरज हवू नियम गाळेल भक्ती आणि कठीण आत्म-नियंत्रण ना द्वारे ज्ञान ना खोटा दिखावा त करस पण शारीरिक वासनास्ले रोका मा एस्ना कण काही बी फायदा नई होत. तुमी ख्रिस्त ना संगे जित्ता करामा एयेल शेतस, त स्वर्गीय विषयस कळे मन लावा, जठे ख्रिस्त परमेश्वर बाप ना उच्चा आदर ना जागा वर बठेल शे. पृथ्वी वरना विषयस्वर नई पण स्वर्गीय विषयस्वर मन लावा. कारण तुमी आपला पाप ना स्वभाव मा मरी जायेल शेतस आणि तुमन जीवन ख्रिस्त ना संगे परमेश्वर मा दपेल शे. तुमना खरा जीवन ख्रिस्त शे, आणि जव तो प्रकट हुईन, तव तुमी भी तेनी महिमा सहित तेना संगे प्रकट करामा जाश्यात. एनासाठे तुमी तुमना मधमा काम करणारा वाईट कामस्ले कराले सोळी द्या, म्हणजे व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना, वाईट लालसा आणि लोभ जी कि मूर्ती पूजा एवळी शे. कारण कि ह्या वाईट कामस्ना मुळे ज्या लोक तेना आदन्यास्ना पालन नई करतस, निश्चित रूप कण परमेश्वर तेस्ले कळक शिक्षा दिन. एक टाईम ले तुमी बी अशीच ईच्छा प्रमाणे जीवन जगत होतात आणि एस्नाच प्रमाणे चालत होतात. पण आते तुमी ह्या सर्वा कामस्ले सोळी द्या, म्हणजे क्रोध, रोष आणि गैरभाव, कोणता बी अपमान आणि निंदा तुमना तोंड मधून नई निघो. एक दुसरा कण खोट नका बोला, कारण कि तुमनी जुना पापमय स्वभाव ले तेना कामस बरोबर उतारी दियेल शे, आणि नवीन स्वभाव ले वयखी लीयेल शे. हवू तो नवा स्वभाव शे जो जास्त तून जास्त आपला निर्माणकर्ता ना सारखा नवीन बनत जास कि तो तेले चांगल्या प्रकारे समजी सको. म्हणून आते, नईत ग्रीक आणि यहुदी मा, नईत सुंता करेल आणि बिगर सुंता मा भेद-भाव शे, नईत जंगली आणि स्कुती (असंस्कृत) मा, नईत दास आणि स्वतंत्र मा भेद-भाव शे, पण ख्रिस्तच सर्व काही शे आणि ख्रिस्त सर्वास्मा शे. तुमी परमेश्वर ना लोक शेतस, तेनी तुमले आपला पवित्र लोक होवाले निवाळी लीना आणि तुमना संगे प्रेम करना. एनासाठे तुमी दया, चांगुलपण, सौम्यता, नम्रता आणि सहनशीलता धारण करील्या. कदी कोले कोणावर दोष लावाना कोणता कारण राहो, त एक दुसरा नि सहन करील्या, आणि एक दुसरास्ना अपराधस्ले माफ करा. जसा प्रभु नि तुमना अपराधस्ले माफ कर, तसाच तुमी बी एक दुसरा ना अपराध माफ करा. सर्वास्तून महत्वानी गोष्ट तुमले कराले पाहिजे ती हय शे कि एक दुसरा वर प्रेम करा. अस करावर तुमी पूर्णपणे एकजूट हुई जाश्यात. ख्रिस्त नि शांती तुमना मनस्वर राज्य करो कारण कि तुमी सर्वा एकच शरीर ना आंग शेतस आणि एनासाठे तुमले एक दुसरास्ना संगे शांती कण राहा साठे बलावामा एयेल शे. आणि धन्यवादीत बनी राहा. ख्रिस्त ना वचन ले संद्धी द्या कि तो तुमना विचारस्वर जास्तीत जास्त प्रभाव टाकी सको. पुरा ज्ञान सहित एक दुसराले शिकाळा आणि जताळा, आणि आपला मन मा धन्यवाद ना संगे परमेश्वर ना साठे भजन आणि स्तुतिगान आणि आत्मिक गीत म्हणा. जे काही तुमी सांगश्यात आणि करश्यात, सर्व काही प्रभु येशु ना नाव कण करा, आणि तेना द्वारे परमेश्वर बाप ना धन्यवाद करा. ओ बायकासहोण, आपला आपला नवरा ना आधीन राहा. कारण कि तुमी ख्रिस्ती होवा मुळे असच कराले पाहिजे. ओ नवरासहोण, आपली आपली बायकोस्वर प्रेम करा, आणि तेस्ना संगे कठोर व्यवहार नका करा. ओ पोरसहोण, तुमी ख्रिस्ती होवा मुळे कायम आपला आपला माय-बाप नि आज्ञा ना पालन करा, कारण कि एना कण परमेश्वर खुश होस. ओ बापसहोण, आपला पोरस्ले चीळावा नका. कदी अस नई होवो कि त्या नराज हुई जावो. ओ सेवकसहोण, ज्या शरीर ना प्रमाणे तुमना मालक शे, तेस्ना सर्वा आदन्यास्ना पालन करा. माणसस्ना पासून मान भेटासाठे दिखावटी ना काम नका करा पण मन ना खरापणा कण आणि परमेश्वर नि भीती कण हय करा. जे काही तुमी करश्यात तन मन कण करा, हय समजीसन कि माणसस साठे नई पण प्रभु साठे करी ऱ्हायनात. आठवण ठेवा कि परमेश्वर तुमले ईलाम ना रूप मा मिरास दिन जी तेनी आपला लोकस साठे तयार करी ठीयेल शे. कारण कि ख्रिस्त खरा मालक शे जेनी तुमी सेवा करतस. आणि वाईट करणारस्ले आपला वाईट ना फय भेटीन, कारण कि परमेश्वर प्रत्येक ना न्याय बिगर पक्षपात ना करीन. ओ मालकसहोण, आपला आपला दासस्ना बरोबर न्याय आणि चांगला व्यवहार करा, हय समजीसन कि स्वर्ग मा तुमना बी एक मालक शे. प्रार्थना करत राहा, आणि परमेश्वर ले कायम धन्यवाद देत जागृत राहा. तसाच आमना साठे बी प्रार्थना करत राहा, कि परमेश्वर आमले वचन आयकाळानी अशी संद्धी देवो कि आमी ख्रिस्त ना त्या भेदना वर्णन करी सकोत जेना मुळे मी कैद मा शे. प्रार्थना करा कि मी ख्रिस्त ना भेद ले मोक्या आणि स्पष्टपणे प्रचार करी सकू जस मले कराले पाहिजे. टाईम ले बहुमुल्य समजीसन अविश्वासीस संगे बुद्धीमान कण वागणूक करा. तुमन बोलन-चालन कायम कृपा सहित आणि मन ले आवळा जुकती होवो, आणि तुमले प्रत्येक झन ले चांगला प्रकारे उत्तर देता येवाले पाहिजे. मना प्रिय भावू तुखिक, जो प्रभु ना कार्य मा आमना सहकर्मी आणि विश्वास योग्य सेवक शे, मना बारामा सर्वा गोष्टी तुमले सांगीन. एनासाठे मी तेले तुमना जोळे धाळस, कि तुमले आमनी दशा माहित हुई जावो आणि तो तुमना हृदय ले समाधान देवो. मी तेना संगे अनेसिम ले धाळी ऱ्हायनु, तो प्रिय विश्वास योग्य भावू जो तुमनाच नगर मधून शे. त्या तुमले आठल्या सर्व्या गोष्टी सांगी टाकतीन. अरिस्तार्ख, जो मना संगे कैदी मा शे, आणि मार्क जो बर्णबा ना भावू लागस तेस्ना तुमले नमस्कार. तुमले तेना बारामा पहिलेच आज्ञा भेटेल होती कि जव मार्क तुमना जोळे येवो त तुमी तेना स्वागत करज्यात. आणि येशु, जो युस्त म्हणावस तुमले नमस्कार सांगतस. यहुदी विश्वासीस मधून फक्त ह्या तीनच परमेश्वर ना राज्य ना साठे मना सहकर्मी आणि मनी प्रोत्साहन ना कारण राहेल शेतस. एपफ्रास कळून, जो तुमनाच नगर मधून शे, आणि ख्रिस्त येशु ना दास शे तुमले नमस्कार सांगस. तो कायम तुमना साठे प्रार्थना करत ऱ्हास, एनासाठे कि तुमी सिद्ध हुईसन पुरा विश्वास कण परमेश्वर नि ईच्छावर स्थिर राहोत. मी स्वता तेना कठीण परिश्रम ना बारामा साक्ष दिवू सकस, जो तो तुमना साठे आणि लावदीकिया शहर आणि हेरापली शहर ना लोकस साठे करत ऱ्हास. प्रिय डाक्टर लूक आणि देमास तुमले नमस्कार करतस. लावदीकिया शहर ना विश्वासी भावूस्ले आणि नुंफा ले आणि तीना घर मा एकत्र होणारी मंडळी ले आमना नमस्कार सांगज्यात. जव हय पत्र तुमना आठे वाचाई जास, त अस कराज्यात कि लावदीकिया शहर नि मंडळी मा बी वाचामा येवो, आणि तो पत्र जे लावदीकिया नि मंडळी मा बी हय पत्र वाचज्यात आणि तो पत्र जो लावदीकिया तून ईन त तेले तुमी भी वाचज्यात. आणि अर्खीप्प ले सांगज्यात जी सेवा प्रभु मा तेले सोपामा एयेल शे, तिले सावधानी कण पुरी करजो. मी पौल, आपला हात कण हय पत्र लिखस आणि तुमले नमस्कार करस. हय ध्यान मा ठेवज्यात कि मी कैद मा शे. परमेश्वर नि कृपा तुमना वर होत राहो. आमेन. मी पौल, सिल्वान आणि तीमुथियुस संगे मियसन थेस्सलनीका शहर नि मंडळी ना लोकस्ले ज्या परमेश्वर बाप आणि प्रभु येशु मा शेतस, हई पत्र लिखस. मी प्रार्थना करस कि तुमले कृपा व शांती भेटत राहो. परमेश्वर तुमना वर कृपा करो व शांती देवो. आमी कायम तुमी सर्वास साठे परमेश्वर ना धन्यवाद करतस आणि कायम तुमले आपली प्रार्थनास्मा आठवण करतस. जव आमी आपला परमेश्वर बाप ले प्रार्थना करतस, तव आमी तुमना त्या कामस्ले ज्या तुमी ख्रिस्त वर विश्वास करा मुळे करतस आणि त्या कठीण परिश्रम ले जो तुमी प्रेम मुळे दुसरा ख्रिस्ती विश्वासीस्नी मदत करासाठे करतस आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त मा आशा नि धीर ले कायम आठवण करतस. ओ आमना विश्वासी भावूसहोण, आमले माहिती शे कि परमेश्वर तुमना संगे प्रेम करस आणि तुमले निवाळेल शे कि तुमी तेना लोक बनोत. कारण कि आमनी ख्रिस्त ना बारामा सुवार्ता फक्त शब्दच मा नई पण पवित्र आत्मा सामर्थ्य कण तेनी पुरी खात्री करीसन तुमना लगून पोहोचाळेल शे. तुमले माहिती शे कि जव आमी तुमना संगे होतुत त आमना व्यवहार कसा होता, ते तुमना चांगला साठे होत. तुमनी मोठा क्लेश ले सहन करीसन बी पवित्र आत्मा नि खुशी कण त्या संदेश ले स्वीकार करीसन आमना उदाहरण आणि प्रभु ना उदाहरण ना अनुकरण कर. आठ लगून कि मासेदोनिया प्रांत आणि अखया प्रांतस्ना विश्वासीस साठे तुमी आदर्श बना. कारण कि तुमना आठून प्रभु ना वचन फक्त मासेदोनिया प्रांत आणि अखया प्रांतस्मा नई पण सर्वा युनानी प्रांतस्मा पसरी ग्या, आणि तुमना विश्वास नि चर्चा जी परमेश्वर वर शे, आमले प्रत्येक जागा वर आयकाले भेटणी कि आमले तुमना बारामा आखो काही सांगानी गरज नई पळणी. कारण कि त्या लोक स्वताच सांगतस कि कोणत्या प्रकारे तुमनी आमना स्वागत करेल होतात जव आमी तुमना जोळे एयेल होतुत, आणि कोणत्या प्रकारे तुमी मूर्तीस पासून दूर हुईसन परमेश्वर कळे फिरणात एनासाठे कि जिंदा आणि खरा परमेश्वर नि सेवा करी सकोत. आणि तेना पुत्र नि स्वर्ग मधून परत येवानी वाट देखी सकोत, म्हणजे येशु नि जेले परमेश्वर नि मरेल मधून जित्ता कर आणि जो आमले एणारा राग पासून वाचाळस. ओ विश्वासी भावूसहोण, तुमले माहिती शे कि आमन तुमना जोळे एन कितल फायदान होत. तुमले माहिती शे कि आमी तुमना जोळे थेस्सलनीका शहर मा येवाना पहिले फिलिप्पै शहर मा कितला दुख आणि अपमान सहन करनुत, आणि तठे इतला भारी विरोध ऱ्हातांना बी परमेश्वर नि आमले अशी हिम्मत दिधी कि आमी परमेश्वर नि सुवार्ता तुमले आयकाळनूत. कारण कि आमना उपदेश नईत भ्राती कण शे आणि नईत अशुद्धता ना उद्देश कण आणि नईत कपट कण शे. पण, आमी कायम जशी परमेश्वर नि ईच्छा शे तसाच प्रचार करतस, कारण कि परमेश्वर नि आमले योग्य ठराईसन सुवार्ता सोपेल शे, एनासाठे आमी माणसस्ले नई पण परमेश्वर ले खुश करतस जो आमना मनस्ले तपासस. तुमले चांगल्या प्रकारे माहिती शे आणि परमेश्वर बी ह्या गोष्ट ना साक्षी शे कि आमनी नईत कदी खुशामत ना गोष्टी सांगनुत आणि नईत आमनी कदी धन ना लोभ कण प्रेरित हुईसन काही करनुत. आमी माणसस कळून आदर नई देखत होतुत, नईत तुमना पासून आणि नईत कोणा कळून. जरी ख्रिस्त ना प्रेषित होवा मुळे तुमना कळून मदत लेवाना आमना अधिकार होता. तरी बी ज्या प्रमाणे माय आपला पोरस्ना पायन-पोषण करस, तसाच आमी बी तुमना मधमा राहीसन सौम्यता कण व्यवहार कर. एनासाठे तुमना कळे आमना प्रेम मुळे आमी नईत फक्त परमेश्वर नि सुवार्ता ले तुमना संगे वाटाणा देखत होतुत पण तुमना साठे आपला जीव बी देवाले तयार होतुत, एनासाठे कि तुमी आमना प्रेमय हुई जायेल होतात. कारण कि ओ विश्वासी भावूसहोण, निश्चित तुमी हय आठवण ठेवतस, कि आमनी कोणत्या प्रकारे कठीण परिश्रम करेल शे. आमनी रात दिन काम धंदा करीसन तुमना मधमा परमेश्वर नि सुवार्ता प्रचार करी कि तुमना मधून कोणावर वजन नई होवो. तुमी आमना साक्षी शेतस आणि परमेश्वर बी साक्षी शे कि तुमी विश्वासीस्ना संगे आमना व्यवहार कसा पवित्र आणि धार्मिक आणि निर्दोष ऱ्हायना. एनासाठे आमी कायम परमेश्वर ना धन्यवाद करतस कि जव आमना व्दारे परमेश्वर ना वचन तुमना जोळे पोहोचना, त तुमनी तेले माणसस्ना नई पण परमेश्वर ना वचन समजीसन स्वीकार कर, जो खरज शे बी. हय परमेश्वर नि सुवार्ता तुमना मा ज्या ख्रिस्त वर विश्वास करतस आते बी कार्य करी ऱ्हायना शे. ओ विश्वासी भावूसहोण, तुमना संगे बी तसच हुईन जस यहूदीया प्रांत मा परमेश्वर ना मंडळीस्ना लोकस संगे जो ख्रिस्त येशु मा हुईन. तुमनी आपला लोकस पासून तसाच दुख भेटणा जसा तेस्ले यहुदीस पासून भेटेल होता, जेस्नी प्रभु येशु ले आणि भविष्यवक्तास्ले बी मारी टाक आणि आमले गैरा त्रास दिनात. परमेश्वर तेस्ना कण खुश नई आणि त्या सर्वा माणसस्ना विरोध करतस, आठ लगून कि तेस्नी बिगर यहुदीस्ना मधमा आमले त्या संदेश ना प्रचार करा पासून रोकनात जेना कण तेस्ना तारण हुईन. ह्या प्रमाणे त्या स्वता आपलाच पापस्ना घळा भरी ऱ्हायनात. आणि आते तेस्ना वर परमेश्वर ना भयानक राग ईपळेल शे. ओ विश्वासी भावूसहोण, जव थोळा टाईम साठे आमी शारीरिक रूप कण तुमना संगे नई होतुत, पण आमी कायम तुमना बारामा विचार करत होतुत. आमनी मोठा आशा कण तुमले परत भेटासाठे आखो जास्त प्रयत्न करनुत. आमी तुमना जोळे परत येवाना देखत होतुत. खास करीसन मी एक सावा नई पण गैरा सावा तुमना जोळे येवाना देखनु, पण सैतान आमले रोकी ठेवणा. आखरी मा ह्या तुमीच शेतस, तुमीच आमना प्रभु येशु ख्रिस्त ना समोर तेना येवाना टाईम वर आमनी आशा व खुशी व आमनी जीत मा बळाई ना कारण होवोत. निश्चितच आमनी बळाई आणि खुशी तुमीच शेतस. आखरी वर आमी तुमना पासून दूर नई राही सकनुत, एनासाठे आमनी निर्णय कर कि अथेनै शहर मा एखलाच ऱ्हाय जावूत. जव आमी तीमुथियुस ले जो ख्रिस्त नि सुवार्ता मा आमना भावू आणि परमेश्वर ना सेवक शे, तुमना जोळे एनासाठे धाळ कि तो तुमना धाळस वाळावो आणि ख्रिस्त वर पक्का विश्वास ठेवाना बारामा तुमनी मदत करो आणि तुमले उत्साहित करो कि तुमी कायम तेनावर विश्वास करत राहा. एनासाठे कि तुमना मधून कोणी बी ह्या क्लेशस्ना मुळे ख्रिस्त वर विश्वास करान नई सोळी देवो. कारण कि तुमले त माहिती शे कि ह्या प्रकार ना क्लेश परमेश्वर नि ईच्छा प्रमाणे आमना भाग शे. कारण कि जव आमी तुमना संगे होतुत, त आमी पहिलेच पासून तुमले सांगेल होतुत कि आमले क्लेश उचना पळतीन, आणि जस कि तुमाले माहिती बी शे कि असच हुयेल शे. ह्या मुळे मले आखो नई ऱ्हावायन, एनासाठे मनी तीमुथियुस ले तुमना विश्वास ना हाल देखा साठे धाळनु, कि कदी अस नई होवो कि सैतान तुमनी परीक्षा लीधी हो, आणि आमना पुरा कष्ट व्यर्थ हुईग्या हो. आते तीमुथियुस आमना जोळे परत ईजायेल शे, आणि तेनी आमले तुमना विश्वास आणि प्रेम ना बारामा सुवार्ता आयकाळेल शे. तेनी आमले सांगेल शे कि तुमी कायम प्रेम कण आमले आठवण करतस, आणि तुमी आमले परत देखानी अशा करतस, जसा आमी बी तुमले देखानी करतस. एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, आमी आपला पुरा दुख आणि क्लेश मा तुमना पक्का विश्वास ना विषय मा आयकीसन उत्साहित होतस. कारण कि आते कदी तुमी प्रभु मा पक्का ऱ्हाश्यात त हय आमना साठे नवा जीवन सारखा शे. आते आमी तुमना साठे आपला परमेश्वर ना उपस्थिती मा धन्यवाद करतस. तुमना मुळे आमले जो आनंद शे तेना साठे आमी परमेश्वर ले धन्यवाद देतस. परमेश्वर ना समोर आमी कायम प्रार्थना करत राहातस, कि आमी तुमना संगे भेटूत आणि ख्रिस्त येशु मा तुमना विश्वास वाळावामा तुमनी मदत करूत. आमी प्रार्थना करतस कि आमना परमेश्वर आणि बाप स्वताच आणि आमना प्रभु येशु, तुमना आठे येवा साठे आमनी पुढाकारी करो. आणि प्रभु असा करो कि जसा आमी तुमना वर प्रेम करतस, तसाच तुमना प्रेम बी आपस मा आणि सर्वा लोकस संगे वाळो, आणि प्रगती करत जावो. ह्या प्रमाणे प्रभु येशु त्या दिन लोंग, जव तो आपला सर्वा पवित्र लोकस संगे ईन, तव तुमना सर्वास्ना हृदय ले आमना बाप परमेश्वर ना समोर पवित्र आणि निर्दोष बनाईसन ठेवा. आमेन. ओ विश्वासी भावूसहोण, तुमनी आमना पासून शिकेल शे कि कोणत्या प्रकारे व्यवहार कराले पायजे आणि परमेश्वर ले खुश कराले पाहिजे. आणि त्या प्रमाणे तुमी जगी बी ऱ्हायनात. आणि आते प्रभु येशु ना नाव कण तुमले विनंती आणि आग्रह करतस कि ह्या विषय मा तुमी सर्वा आजून बी वाळत जावा. कारण कि त्या निर्देश तुमले माहिती शेतस ज्या प्रभु येशु ना अधिकार कण आमनी तुमले दियेल शे. परमेश्वर नि ईच्छा शे कि तुमी पवित्र बना, आणि व्यभिचार पासून वाचेल राहा. प्रत्येक माणुस ले आपली बायको संगे पवित्रता आणि आदरभाव कण ऱ्हावाले माहिती पाहिजे, नईत आपली कामुक ईच्छा ना गुलाम बनीसन, आणि नईत त्या लोकस सारखा ज्या परमेश्वर ले नई वयखतस. ह्या गोष्ट मा, कोणी व्यक्ती आपला विश्वासी भावू ले फसाळाले नको पाहिजे, आणि नईत तेना फायदा उचलाले पाहिजे. आमनी तुमले पहिलेच हय जताळी दियेल होतुत आणि दृढता कण समजाळेल बी होतुत कि प्रभु असा करणारस्ले दंड दिन. परमेश्वर नि आमले अशुद्धता मा जगा साठे नई पण पवित्र मा जगा साठे बलायेल शे. एनासाठे, जो कोणी ह्या शिक्षास्ले तुच्छ समजस तो माणुस ले नई पण परमेश्वर ले तुच्छ समजस, जो तुमले आपला पवित्र आत्मा देस. आपला विश्वासी भावूस्वर प्रेम ठेवाना बारामा मले गरज नई कि तुमले काही लिखू. कारण कि आपस मा प्रेम ठेवण तुमनी स्वताच परमेश्वर पासून शिकेल शेतस. तुमनी पहिलेच आपला प्रेम आपला विश्वासी भावूस्वर दाखाळेल शे जो पुरा मासेदोनिया प्रांत मा शे. एनासाठे ओ भावूसहोण, आमी तुमले विनंती करतस कि तुमी प्रेम करामा आखो बी वाळत जावा. जस कि आमनी तुमले पहिले पासून समजाळेल होत, दुसरास्ना संगे मत-भेद नई ठेवत शांत जीवन जगाले आपला लक्ष बनाईल्या, आपला-आपला काम काज कळे ध्यान लावा, आणि आपला-आपला हातस कण कमावाना प्रयत्न करा. ह्या प्रकारे तुमी तेस्ना कळून आदर प्राप्त करा ज्या विश्वासी नई शेतस, आणि तुमले आपला गरजस साठे कोणा आसरा लेवानी गरज नई पळाव. ओ विश्वासी भावूसहोण, आमनी ईच्छा शे कि मरेल ना बारामा तुमले निश्चित माहिती राहो. कदी अस नई होवो कि तुमी त्या लोकस सारखा दुख बनावतस, जेस्ले कोणती आशा नई शे, कि मरा नंतर त्या परत जित्ता होतीन. आमी विश्वास करतस कि येशु मरणा आणि परत मोत मधून जित्ता बी हुईग्या, आणि एनासाठे आमले हवू विश्वास शे कि परमेश्वर तेस्ले बी ज्या येशु वर विश्वास करत मरी जायेल शेतस, येशु ना द्वारे तेनाच संगे लई ईन. आते आमले प्रभु कळून जी शिक्षा भेटेल शे, तेनाच आधार वर आमी तुमले हई सांगतस. आमी ज्या जित्ता शेतस आणि ज्या प्रभु ना येवा लगून वाचेल राहातीन, ख्रिस्त मा मरेल लोकस्तून पयले महिमा मा प्रवेश नई कराव. त्या टाईम ले गर्जन कण आदन्या आणि मुख्य स्वर्गदूत ना शब्द आणि परमेश्वर नि तुतारी ना आवाज आयकू ईन, प्रभु येशु ख्रिस्त स्वता स्वर्ग मधून खाले उतरतीन. आणि ज्या ख्रिस्त वर विश्वास करतांना मरेल शेतस, त्या पहिले जित्ता होतीन, तव आमी ज्या टाईम ले जित्ता आणि वाचेल राहासुत, तेस्ना संगे ढगस्मा उचला मा येसुत कि आकाश मा प्रभु येशु संगे भेटोत. आणि ह्याच प्रमाणे आमी कायम ना प्रभु ना संगे राहासुत. एनासाठे ह्या गोष्टीस कण एक दुसरास्ले सांत्वना देत राहा. पण ओ विश्वासी भावूसहोण, ह्या गोष्टी कवय होतीन तेना टाईम आणि कायस्ना बारामा तुमना जोळे काही लिखामा येवो एनी गरज नई शे. कारण कि तुमले चांगलच माहिती शे कि परमेश्वर ना दिन असा ईन जसा चोर रात ले येस. जव लोक सांगतीन, “सगळ काही शांत आणि सुरक्षित शे,” तव अचानक विनाश तेस्ना वर ईपळीन. ज्या प्रकारे बायतीन बाई वर पीडा येस तसाच हय अचानक हुईन, आणि लोक नई वाचाव. पण ओ विश्वासी भावूसहोण, तुमी अंधकार मा नई शेतस, कि प्रभु ना परत येवाना दिन तुमना वर चोर सारखा ईपळो. कारण कि तुमी सर्वा उजाया ना लोक शेतस आणि दिन ना लोक शेतस. आमी रात व अंधकार ना संतान नई शेतस. एनासाठे, आमी दुसरास्ना सारखा जपत नई ऱ्हावाले पाहिजे, पण जागत आणि सावधान राहाले पाहिजे. कारण कि ज्या लोक जपतस त्या रातलेच जपतस, आणि ज्या नशावाला राहतस, त्या रातलेच नशावान ऱ्हातस. पण आमी त दिन ना लोक शेतस, एनासाठे आमले स्वता वर काबू ठेवाले पायजे. आमी विश्वास आणि प्रेम नि झीलम घालीसन आणि तारण नि आशा ना टोप घालीसन सावधान राहा. परमेश्वर नि आमले तेना राग ना द्वारे दंडीत होवा साठे नई निवाळ, पण एनासाठे निवाळेल शे कि आमी आपला प्रभु येशु ख्रिस्त व्दारे तारण प्राप्त करूत. जो आमना साठे ह्या मुळे मरणा कि जव तो येवो त भले आमी जित्ता राहोत कि ख्रिस्त मा मरेल राहो, सर्वा मियसन तेनाच संगे कायम ना साठे जगसुत. एनामुळे एक दुसरास्ना प्रोत्साहन करा आणि एक दुसरा नि मदत करा, जसा कि तुमी आते बी करी ऱ्हायनात. ओ विश्वासी भावूसहोण, आमी तुमले विनंती करतस, कि ज्या तुमना मा परिश्रम करतस, प्रभु मा तुमना पुढारी शेतस, आणि ख्रिस्ती जीवन मा तुमले निर्देश देतस, तेस्ना आदर करा. आणि तुमना साठे तेस्ना काम ना मुळे प्रेम मा तेस्ले गैरा आदर करत राहा. आणि आपस मा मित्रभाव कण राहा. ओ विश्वासी भावूसहोण, आमी तुमले विनंती करतस कि ज्या चांगला नई वागतस तेस्ले जताळा, भित्रास्ले धाळस द्या, शक्तिहीनस्नि मदत करा, सर्वास संगे सहनशीलता दाखाळा. ध्यान द्या कि कोणी कोणा संगे वाईट ना बदला मा वाईट नई करो, पण कायम एक-दुसरा ना संगे आणि सर्वा लोकस संगे चांगल कराले आपला लक्ष बनाई ल्या. तुमी कायम खुश राहा. कायम प्रार्थना करत राहा. प्रत्येक गोष्टीस्मा परमेश्वर ना धन्यवाद करत राहा, कारण कि तुमना साठे ख्रिस्त येशु मा परमेश्वर नि हईच ईच्छा शे. पवित्र आत्मा ना कामस्ले मर्यादित नका करा. भविष्यद्वाणीस्ना तिरस्कार नका करा. सगळ्या गोष्टीस्ले परखा, आणि ज्या गोष्टी चांगल्या शे तेस्ले स्वीकार करा. आणि सगळ्या प्रकार ना वाईटस पासून वाचीसन राहा. शांती देणार परमेश्वर तुमले पुरा पवित्र करो, आणि तुमनी आत्मा, जीव आणि शरीर आमना प्रभु येशु ख्रिस्त ना येवा लगून पूर्णपणे निर्दोष आणि सुरक्षित राहो. तुमना बलावणार परमेश्वर विश्वास योग्य शे, आणि तो असाच करीन. ओ विश्वासी भावूसहोण, आमना साठे बी प्रार्थना करा. सर्वा विश्वासी भावूस्ले पवित्र प्रेम कण नमस्कार करा. मी तुमले प्रभु ना अधिकार कण आज्ञा देस कि हय पत्र सर्वा विश्वासीस्ले वाचीसन आयकाळा मा येवो. आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा तुमना वर होत राहो. मी, पौल, तीमुथियुस आणि सिल्वान ना संगे भेटीसन, थेस्सलनीका शहर नि मंडळी ले हय पत्र लिखस जो आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त ना शे. आमी प्रार्थना करतस कि बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त कळून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो. ओ विश्वासी भावूसहोण, तुमना बारामा आमले प्रत्येक टाईम ले परमेश्वर ना धन्यवाद कराले पाहिजे, आमना साठे अस करन चांगल बी शे, कारण कि ख्रिस्त मा तुमना विश्वास गैरा वाळत जाई ऱ्हायना, आणि तुमी सर्वास्ना प्रेम आपस मा गैराच वाळत जाई ऱ्हायना. एनासाठे आमी स्वताच परमेश्वर नि मंडळीस्मा तुमना बारामा गर्व करतस. कारण कि जीतला त्रास आणि छळ तुमी सहन करतस, त्या सर्वा मा तुमना धीर आणि विश्वास प्रगट होस. ह्या सर्वास्तून हय प्रमाणित होस कि परमेश्वर ना न्याय खरा शे आणि जेना मुळे तुमी परमेश्वर ना राज्य ना योग्य ठरोत, जेना साठे तुमी दुख बी उचलतस. परमेश्वर ना नजर मा हय बरोबर शे कि तो त्या लोकस्ले येणा बदला मा क्लेश देवो ज्या तुमले क्लेश देतस. आणि तो तुमले ज्या क्लेश झेलतस आमना दिन, तसाच आमले बी. तो असा तव करीन जव प्रभु येशु आपला सामर्थ्यी दूतस संगे, अग्नी ज्वालाविष्टीत स्वर्ग मधून प्रगट हुईन, आणि ज्या परमेश्वर ले नई ओयखतस, आणि आमना प्रभु येशु नि सुवार्ता ले नई मानतस तेस्ले दंड दिन. त्या प्रभु ना समोरून आणि तेनी महिमामय शक्ती पासून दूर हुईसन कायम ना दंड भोगतीन. हय त्या दिन हुईन, जव तो आपला पवित्र लोकस पासून महिमा भेटो म्हणून आणि सर्वा विश्वासीस साठे आश्चर्य ना कारण बनाले ईन. तुमी बी तेनामा ऱ्हाश्यात, कारण कि तुमनी आमना संदेश वर विश्वास करेल शे. एनाच साठे आमी तुमना साठे कायम प्रार्थना करतस, आमना परमेश्वर तुमले त्या जीवन ले जगाना योग्य समजो जेना साठे तेनी तुमले बलायेल शे. आणि तो तुमना मा चांगुलपणा नि प्रत्येक ईच्छा आणि विश्वास ना प्रत्येक कामस्ले सामर्थ्य कण पुरा करो. एनासाठे कि आमना परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा ना प्रमाणे आमना प्रभु येशु ख्रिस्त ना नाव ले तुमना मा गौरव भेटो आणि तुमले बी तेनामा आदर भेटो. ओ विश्वासी भावूसहोण, आते आमी आपला प्रभु येशु ख्रिस्त ना येवाना आणि तेना समोर आमन एकत्र होवाना बारामा तुमले विनंती करतस. कि तुमी कोणती आत्मिक प्रकाशन, आणि वचन, व पत्र व्दारे, जे कि समजा आमना कळून राहो. हय समजीसन कि प्रभु ना दिन ईजायेल शे, तुमना मन अचानक अस्थिर नई होवो आणि नका त तुमी घाबरा. कोणी तुमले कोणत्याच प्रकारे धोका नई दि सको. कारण कि तो दिन तठ लगून नई येवाव जठ लगून धर्म ना त्याग नई हुई जावाव आणि तो अधर्म ना माणुस म्हणजे विनाश ना पोऱ्या प्रगट नई होवाव, जो नरक ना भागी शे. तो त्या सर्वास्ना ज्या देव म्हणावतस आणि पूज्य म्हणावतस विरोध करीन आणि स्वता ले मोठा ठराईन. आठ लगून कि तो परमेश्वर ना मंदिर मा जाईसन बठीन स्वता ले परमेश्वर ठराईन. तुमी लोकस्ले हय नक्खी आठवण अशीन, जव मी तुमना संगे होतु तव ह्या गोष्टी मी तुमले सांगत होतु. आते तो दुष्ट व्यक्ती आते लोंग प्रकट नई हुयना, कारण काही अस शे जे तेले रोकस. निश्चित रूप मा तुमले आठवण शे कि तो काय शे जे तेले रोकस. एनासाठे तो दुष्ट व्यक्ती आपला ठरायेल टाईम वर प्रकट हुईन. कारण कि अधर्म ना रहस्य आते बी कार्य करी ऱ्हायनी शे, पण ते तठलोंग गुप्त राहीन, जठलोंग रोकणारा बाजुले नई हुई जावो. तो अधर्मी प्रगट हुईन, जेले प्रभु येशु आपला तोंडनी फुक कण मारी टाकीन, आणि आपला येवाना तेज कण राक करी टाकीन. तो द्रुष्ट सैतान नि सामर्थ्य संगे ईन सर्वा प्रकार ना खोटा सामर्थ्य, चिन्ह आणि चमत्कार कामस्ले दाखाळीन. आणि सर्वा प्रकार ना अधर्म ना काम करीसन, ज्या परमेश्वर ना द्वारे नाश होणार त्या लोकस्ले फसाळीन. त्या एनासाठे नाश होतीन कारण कि तेस्नी सत्य वर प्रेम नई कर जेना कण तेस्ना तारण होवू सकस. एनासाठे परमेश्वर तेस्ना मा एक भ्राती नि सामर्थ्य ले धाळेल शे कि त्या असत्य वर विश्वास ठेवोत. एना परिणाम हय शे कि जीतलास्नी सत्य वर विश्वास नई कर, पण अधर्म ना कामस्वर प्रेम ठेव, त्या दोषी ठरतीन. ओ विश्वासी भावूसहोण, आणि प्रभु ना प्रिय लोकसहोण, आमले प्रभु परमेश्वर ले तुमना बारामा कायम धन्यवाद देवाले पायजे. कारण कि परमेश्वर नि पयला फय ना रूप मा तुमले निवाळी लीध कि जेना कण तुमी पवित्र करणारी आत्मा ना व्दारे आणि सत्य ले ओयखीसन आपला विश्वास ना द्वारे तारण प्राप्त करोत. त्याच उद्देश साठे तेनी तुमले आमनी सुवार्ता ना व्दारे बलाव कि तुमी आमना प्रभु येशु ख्रिस्त नि महिमा ना भागी हुई जावोत. एनासाठे, ओ विश्वासी भावूसहोण, ज्या ज्या गोष्टी तुमनी काय वचन व पत्र ना व्दारे आमना पासून शिकेल शेतस तेनामा स्थिर राहा आणि तेस्ना पालन करा. आमना प्रभु येशु ख्रिस्त स्वताच आणि आमना बाप परमेश्वर, जेनी आमना वर प्रेम कर आणि कृपा कण कायम नि शांती आणि चांगली आशा दियेल शे. तुमले प्रोत्साहित करो आणि तुमले प्रत्येक चांगला काम आणि वचन मा दृढ करो. आखरी वर ओ विश्वासी भावूसहोण, आमना साठे प्रार्थना करत राहा, कि प्रभु ना वचन नेहमी जल्दी पसरत राहो, आणि आदर कण स्वीकार मा येवो, जस तुमना मधमा हुईन. आणि हय बी प्रार्थना करा कि परमेश्वर आमले द्रुष्ट आणि वाईट लोकस पासून वाचाळो, कारण कि प्रत्येक झन संदेश वर विश्वास नई करत. पण परमेश्वर विश्वास योग्य शे, आणि तो तुमले सामर्थ्य दिन आणि त्या सैतान पासून सुरक्षित ठेवीन. आमले, प्रभु मा तुमना वर पुरा विश्वास शे, आणि आमले खात्री शे कि आमनी ज्या गोष्टी तुमले सांगेल शेतस तेस्ले तुमी करी ऱ्हायनात आणि पुळे बी करत ऱ्हाश्यात. प्रभु तुमना मन ले परमेश्वर ना प्रेम मा आणि ख्रिस्त ना धीर कळे पुढाकारी करो. ओ विश्वासी भावूसहोण, आमी तुमले आपला प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण आदन्या देतस, कि त्या सर्वा विश्वासीस पासून दूर राहा, ज्या आळशी जीवन ले जगी ऱ्हायनात आणि जी शिक्षा तेस्नी आमना पासून लीयेल शे तेना प्रमाणे जीवन नई जगतस. तुमले चांगल्या प्रकारे माहिती शे, कि कोणत्या प्रकारे आमना सारखा वागाले पाहिजे. कारण कि आमी तुमना संगे आळशी बनीसन नई ऱ्हायनूत. आणि नईत कोणी भाकर फुकट मा खादी. पण परिश्रम आणि कष्ट कण रात दिन काम करत होतुत, कि आमले आपली गरजस साठे तुमना मधून कोणा आसरा वर नई ऱ्हाण पळो. हा आमनी अस कर, पण एनासाठे नई कि आमले अधिकार नई शे कि तुमना पासून काही मदत मांगुत, पण आमी अस एनासाठे करनुत कि तुमना साठे आदर्श ठरुत कि तुमी आमना सारखा वागोत. जव आमी तुमना संगे होतुत त तुमले सांग्या करत होतुत, “जो कोणी काम कराले नकारस तो खावाले बी नको पाहिजे.” आमी अस एनासाठे करी ऱ्हायनूत कारण कि आमनी आयकेल शे कि तुमना मधमा काही लोक असा शेतस ज्या आळशी जीवन ले जगी ऱ्हायनात. काही काम नई करतस, पण दुसरास्ना कामस्मा हात टाक्या करतस. प्रभु येशु ख्रिस्त ना अधिकार कण आमी असा लोकस्ले आदन्या देतस आणि समजाळतस कि चांगला जीवन ले जगोत आणि काम करीसन आपलीच भाकर खात राहा. पण तुमी, ओ विश्वासी भावूसहोण, चांगल करामा हिम्मत नका सोळा. जर कोणी आमना ह्या पत्र ना गोष्टीस्ले नई मानाव त तेनावर नजर ठेवा, आणि तेनी संगती नका करा, जेना कण तेले लाज वाटो. तरी बी तेना संगे शत्रू सारखा नका वागा, पण विश्वासी भावू समजीसन जताळा. आते प्रभु स्वताच जो शांती ना प्रभु शे, तुमले प्रत्येक टाईम ले आणि हरेक प्रकार कण शांती देवो. प्रभु तुमी सर्वास्ना संगे राहो. मी, पौल, आपला हात कण नमस्कार लिखस. प्रत्येक पत्र मा मनी हईच ओयख शे, मी ह्याच प्रकारे लिखस. आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा तुमी सर्वास्वर होत राहो. मी, पौल आमना तारणार परमेश्वर आणि आमनी आशा ना आधार ख्रिस्त येशु नि आज्ञा कण ख्रिस्त येशु ना प्रेषित शे. मी हय पत्र तीमुथियुस ले लिखस जो विश्वास मा मना खरा पोऱ्या शे. मी प्रार्थना करस कि परमेश्वर बाप आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुले कृपा आणि दया आणि शांती भेटत राहो. जस मनी मासेदोनिया प्रांत ले जातांना तुले विनंती करेल होती कि इफिस नगर मा ऱ्हाइसन. तठे काही लोक खोटी शिक्षा देणारस्ले सांग कि आपली खोटी शिक्षा देवाले बंद करा. तेस्ले सांग कि त्या मनघळत गोष्टीस्वर आणि वंश्यावळीस्नि लांब यादीस्वर मन नई लावोत. जेस्ना कण विवाद होस, आणि परमेश्वर ना ज्ञान नई भेटत जो विश्वास वर आधारित शे. मना ह्या आदन्या ना उद्देश हवू शे कि शुद्ध मन आणि चांगला विवेक आणि कपटरहित विश्वास कण प्रेम उत्पन्न होवो. काही लोक ह्या शिक्षा पासून मांगे फिरी जायेल शेतस आणि बेकार ना वाद-विवाद मा भटकी जायेल शेतस. त्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक त बनाना देखतस, पण त्या स्वतास्नि बोलेल गोष्टीस्ले आणि ज्या विषयस्ना बारामा त्या दृढता कण बोलतस तीस्ले समजतस बी नई. आमले माहित शे कि जर कोणी मोशे ना नियमले चांगल्या प्रमाणे काम मा लयस त ते चांगला शे. हय तुमी जानतस कि मोशे ना नियम धर्मी लोकस साठे नई पण अधर्मी आणि निरंकुश मानससहोण, भक्तिहीन आणि पापी मानससहोण, अपवित्र आणि अशुद्ध मानससहोण, माय-बाप ना घात करणारसहोण, हत्यारा. व्यभिचारीसहोण, पुरुषगमानी आणि मनुसस्ले विकणारा, खोट बोलणारा आणि खोटी शेप्पत खाणारा, आणि एस्ले सोडीसन खरा उपदेश ना सर्वा विरोधीस साठे ठरावामा एयेल शे. आणि हई शिक्षा सुवार्ता वर आधारित त्या महिमा ना बारामा शे जो परमधन्य परमेश्वर नि शे. परमेश्वर नि मले हई सुवार्ता दुसरास्ले आयकाळा साठे सोपेल शे. मी, ख्रिस्त येशु आमना प्रभु ना धन्यवाद करस, जेनी मले मना कामस साठे सामर्थ्य दिएल शे. मी तेना धन्यवाद करस कि तेनी मले विश्वास योग्य समज आणि आपली सेवा साठे ठरायेल शे. जरी, ख्रिस्त वर विश्वास कराना पहिले मी ख्रिस्त नि निंदा करत होतु, तेनावर विश्वास करणारस्ले त्रास देत होतु आणि हिंसक होतु. तरी बी परमेश्वर नि मनावर दया करी कारण कि मनी अविश्वास नि दशा मा बिगर समजा-उमजाणा या काम करेल होतु. आणि आमना प्रभु नि आपली गैरी कृपा मनावर ओतणा आणि मले तो विश्वास आणि प्रेम दिना जो आमले ख्रिस्त येशु ना द्वारे भेटस. हय गोष्ट विश्वास करा योग्य शे आणि सर्वा प्रकारे माना आणि विश्वास करा योग्य शे कि ख्रिस्त येशु पापिस्ले वाचाळा साठे जग मा उना. आणि तेस्ना मधून सर्वास्तून मोठा पापी मी शे. पण परमेश्वर नि दया मनावर हुईनी कि तो सर्वास्तून पहिले मना मा आपली सहनशीलता दाखाळो आणि त्या लोकस्ले एक उदाहरण देवो, जे कायम ना जीवन लेवाना साठे येशु ख्रिस्त वर विश्वास करतीन. आते सनातन राजा, अमर, नदेखेल आणि एकच परमेश्वर ना आदर आणि गौरव युगानयुग होत राहो. आमेन. ओ मना पोऱ्या तीमुथियुस, हय मनी आदन्या शे, जी मी तुले दि ऱ्हायनु. त्या भविष्यद्वाणीस्ना प्रमाणे ज्या पहिले तुना बारामा करामा एयेल होती, मी हई जबाबदारी तुले सोपस. तू तेस्ना कळून ताखत ले आणि विश्वास आणि शुद्ध मन कण तयार हुईसन चांगली लळाई लळत ऱ्हाय, तू ख्रिस्त वर विश्वास करत ऱ्हाय आणि चांगला विवेक ठेव. काही लोकस्नी आपला चांगला विवेक ले सोळी दिधा आणि जेना मुळे तेस्नी ख्रिस्त वर विश्वास कराले सोळी दिधात. तेनाच मधून हूमनाय आणि आलेक्सांद्र शे, जेस्ले मनी सैतान ना हात मा सोपीसन दंड दियेल शे, जेना कण त्या हई शिक्षा लेवो कि परमेश्वर नि निंदा कराले नई पाहिजे. सर्वास्तून पयले, आते मी विनंती करस कि परमेश्वर समोर विनंती, प्रार्थना, निवेदन, आणि आभार सर्व लोकस साठे करामा येवो. राजा आणि सर्वा उच्चा पदवालास साठे प्रार्थना करत ऱ्हावा एनासाठे कि त्या आमले शांती मा आणि सुरक्षा ना संगे जीवन जगाले मदत करो, जेना मुळे आमी परमेश्वर ना आदर करी सकुत आणि कायम दुसरास्ना संगे चांगला व्यवहार करी सकुत. अस करान चांगल शे आणि आमना तारणार परमेश्वर ले आवळस बी, जेनी ईच्छा बी शे कि सर्वा लोकस्ना तारण होवो आणि त्या सत्य ले चांगल्या प्रकारे जानोत. कारण कि फक्त एकच परमेश्वर शे, आणि फक्त एकच मध्यस्थ शे, जो परमेश्वर आणि लोकस्ना मधमा सामंजस्य करावस, आणि तो येशु ख्रिस्त शे, जो माणुस बनना. तेनी सर्वा लोकस्ले पाप आणि मोत नि शक्ती शी मुक्त करासाठे स्वता ले बलिदान करी दिधा. तेनी मोत ना द्वारे, परमेश्वर नि हई साबित कर कि तेनी ईच्छा शे कि सर्वा लोक वाचाळामा येवो. मी खर सांगस, खोट नई बोलत कि, परमेश्वर नि मले सुवार्ता ना प्रचारक आणि प्रेषित करीसन निवाळ आणि मले धाळ कि मी बिगर यहुदीस्ले विश्वास ना खारा संदेश ना बारामा सिखाळू. मनी ईच्छा शे कि प्रत्येक जागा वर सभास्मा माणुस परमेश्वर ले समर्पण हातस्ले वरे उचलीसन प्रार्थना करत राहोत आणि बिगर राग व वाद-विवाद ना प्रार्थना करा. मनी हय बी ईच्छा शे कि बाया केस गुथाना आणि सोन आणि माती आणि महाग कपळास कण नई, पण चांगला प्रकार ना कपळा घालीसन मर्यादा आणि सभ्यता ना ध्यान ठेवोत. आणि तेस्ले दुसरा लोकस साठे चांगला करीसन स्वता ले सुंदर बनावाले पाहिजे, कारण कि त्या बायास साठे ज्या स्वता ले परमेश्वर नि भक्ती करणाऱ्या समजतस तीस्ना साठे हईच चांगल शे. जव माणुस उपदेश देत ऱ्हास त बाया चुपचाप ऱ्हायसन गैरा सन्मानपूर्ण आणि आधीनता कण तेस्नी आयकोत. मनी परवानगी नई शे कि बाया सिखाळोत व लोकस वर अधिकार जताळोत. पण त्या शांत राहोत. मन अस सांगा मांगे उद्देश हय शे कारण कि परमेश्वर नि पहिले आदाम ले बनाव नंतर तेनी हव्वा ले बनाव. आणि आदाम फसणा नई पण बाई फसिगई आणि परमेश्वर ना विरोध मा पाप करणात. तरी बी जरी बाया ख्रिस्त वर विश्वास ठेवतस, दुसरास्वर प्रेम करा आणि चांगला व्यवहार करा, त परमेश्वर बायास्ले पोर जल्म देवाना द्वारे तारण करीन. हय गोष्ट विश्वास करा योग्य शे कि कदी कोणी अध्यक्ष बनाना देखस, तो चांगला काम नि ईच्छा करस. एनासाठे हय अवश्य शे कि मंडळी ना अध्यक्ष निर्दोष, आणि एकच नवरी ना नवरा, संयमी, सुशील, सभ्य, आदर करणारा, आणि सिखाळामा निपुण पाहिजे. तो दारू पेणारा व मारामारी करणारा माणुस नको पाहिजे, पण सौम्य आणि शांतताप्रिय पाहिजे, आणि पैसास्ना लोभी नको पाहिजे. तेनामा आपला घर नि चांगली व्यवस्था करानी क्षमता पाहिजे, आणि आपला पोरस्ले प्रत्येक गोष्ट मा आदरता कण तेनी आदन्या मानाले शिकाळनारा पाहिजे. जो माणुस ले आपलाच घर नि व्यवस्था नई करू सकस, त तो परमेश्वर नि मंडळी नि राखोई नई करू सकस. तो कोणी असा व्यक्ती नको पायजे जो चालू-चालू विश्वासी बनेल होवो, कदी अस नई हुई जावो कि गर्व कण भरीसन सैतान सारखा तेले बी दंड भेटो. मंडळी ना बाहेरला लोकस्मा तेन नाव चांगल पाहिजे, कदी अस नई हुई जावो कि तेनी बदनामी होवो आणि तो सैतान ना फंदा मा फसाले जावो. तसाच मंडळी ना सेवकस्ना वागणूक चांगला राहोत आणि त्या ईमानदार पाहिजेत. दुतोंडी, दारू पेणारा आणि दुसरास्ले धोका दिसन कमायेल पैसास्ना लोभी नई होवाले पाहिजे. पण त्या खरा संदेश वर स्पष्ट मन कण विश्वास करणारा ऱ्हावो जो परमेश्वर नि प्रकट करेल शे. सेवक ना रूप मा निवाळाई जावाना पहिले तेस्ले परखा मा येवो, आणि नंतर कदी त्या निर्दोष निघतस त सेवक ना काम करोत. ह्या प्रकारे तेस्नी बायकोस्नी वागणूक बी चांगली राहाले पाहिजे आणि त्या दोष लावणाऱ्या नई राहोत, सभ्य आणि सर्वा गोष्टीस्मा विश्वास योग्य राहो. मंडळी ना सेवक ले फक्त एकच बायको पाहिजे आणि तेस्ले आपला पोर-सोरस्नि आणि आपला घर नि चांगली व्यवस्था करान माहित राहो. कारण कि ज्या सेवक ना काम चांगल्या प्रकारे करू सकतस, तेस्ले आपला साठे सन्मान भेटू सकस आणि त्या विश्वास ना बारामा जो येशु ख्रिस्त वर शे धाळस कण बोलू सकतस. एनामा काही संक्या नई कि आमनी भक्ती ना भेद गंभीर शे, ख्रिस्त मनुष्य ना रूप मा प्रकट हुयना, तो पवित्र आत्मा ना द्वारे परमेश्वर ना पोऱ्या साबित हुईना, परमेश्वर ना दूतस्नि तेले देख. महिमा मा स्वर्ग मा उचलाय गया, सर्वा जातीस्मा तेना प्रचार हुयना, आणि जग ना लोकस्नी तेनावर विश्वास कर. पवित्र आत्मा स्पष्ट सांगस कि येणारा टाईम मा लोक ख्रिस्त नि शिक्षास्वर विश्वास कराले बंद करी टाकतीन, कारण कि त्या बहिकाळनाऱ्या आत्मास्वर आणि दुष्ट आत्मास पासून भेटेल शिक्षास्वर ध्यान देतीन. अशी शिक्षा त्या खोटा कपटी शिक्षकस्ना द्वारे फैलावामा ईन, जेस्ना विवेक समजा पेटत लोखंड कण दागामा एयेल शे. असा लोक शिकाळतस कि लग्न करन आणि काही जेवण वस्तूस्ले खान चूकीन शे. पण ते जेवण वस्तू परमेश्वर नि बनायेल शे कि सत्य ले वयखणारा विश्वासी तेस्ले प्रार्थना मा धन्यवाद कण खावोत. प्रत्येक वस्तू जी परमेश्वर नि बनायेल शे ती चांगली शे, आणि स्वीकार करा योग्य शे, पण हय कि धन्यवाद कण प्रार्थना करीसन खावामा येवो. कारण कि परमेश्वर ना वचन आणि प्रार्थना द्वारे ती वस्तू शुद्ध हुई जास. जर तू ह्या आदन्या ज्या मनी तुले दियेल शे विश्वासीस्ले दिशी, त तू ख्रिस्त येशु ना चांगला सेवक ठरशीन, आणि विश्वास ना सिद्धानस पासून आणि त्या प्रामाणिक शिक्षास कण शक्ती प्राप्त करत ऱ्हाशी, जेना तू इमानदारी कण पालन-पोषण होत राहीन. जग आणि अभक्ति नि काल्पनिक गोष्टीस पासून दूर ऱ्हाय ज्या परमेश्वर ना सन्मान नई करतस. आणि स्वता ले परमेश्वर ना भक्तीमय जीवन साठे प्रशिक्षित कर. शरीर ना कसरत कण कमी फायदा होस, पण आत्मिक कसरत सर्वा गोष्टीस साठे फायदा नि शे. कारण कि हय ह्या धरती वर जित्ता ऱ्हातांना आणि मरा नंतर बी एक ईलाम ना करार करतस. हय गोष्ट विश्वास करा योग्य शे आणि सर्वा प्रकारे माना योग्य शे. आमले येणारा जीवन भेटो म्हणून परिश्रम आणि खटपट एनासाठे करतस कारण कि आमी आपली आशा जित्ता परमेश्वर वर ठीयेल शे, जो सर्वा माणसस्ना आणि खास करीसन तेस्ना ज्या तेनावर विश्वास करतस तारणार शे. तेस्ले हय आदन्या दे आणि शिकाळत ऱ्हाय. तू जवान शे म्हणून कोणी तुले तुच्छ नई समजो. पण तू आपल्या गोष्टीस्मा, आणि वागणूक मा, दुसरा ना प्रती प्रेम मा, ख्रिस्त वर विश्वास मा, आणि निर्दोष जीवन जगा मा विश्वासीस साठे आदर्श बनी जा. तठलोंग मी तठे नई ईजात, तठलोंग आपला टाईम वाचाळी सन मंडळी मा परमेश्वर ना पुस्तक ले वाचाले आणि उपदेश देवाले आणि शिकाळाले लवलीन ऱ्हाय. आठवण ठेव कि जव वरिष्ठस्नी तुनावर हात ठीयेल होता त परमेश्वर नि तेस्ले भविष्यवाणी ना द्वारा तुले तुना वरदानस्ना विषय मा सांगाणा संदेश दियेल होता. त्या वरदानस्ले तू दुर्लक्ष नको करू. सावधानी कण त्या वरदानस्ना अभ्यास कर आणि एस्नाच मा आपला ध्यान लाई ठेव, एनासाठे कि तुनी उन्नती सर्वा लोक देखी सकोत. आपला जीवन कळे आणि आपला उपदेश कळे ध्यान दे. असाच कामस्ले करत ऱ्हाय, कदी तू असा करस त तू स्वतानी आणि आपला आयकनारस्ना तारण ना कारण बनशी. धल्ला माणुस ले जो तुना तून वय मा मोठा शे तेले धमकाऊ नको, पण तेले आपला बाप समजीसन विनंती कर. ज्या माणस तुना तून वय मा धाकला शेतस तेस्ले आपला धाकला भावू समजीसन व्यवहार कर, धल्ल्या बायास संगे तसाच व्यवहार कर जसा तू आपली माय ना संगे व्यवहार करस, आणि शुद्ध मन कण जवान बायास्ना संगे तसाच व्यवहार कर जसा तू आपली बहिण ना संगे करस. त्या विधवास्ना साठे सन्मान दाखाळ, जेस्ले सांभाळा ना साठे आणि तेस्नी देख-रेख कराले कोणीच नई शे. पण जर कोणती विधवा ना पोर व नातवंड होतीन, त त्या पहिले आपलाच घराणा ना लोकस्ना प्रती आपल्या जपापदाऱ्यास्ले पुरा कराले सिखोत, आणि आपला माय बाप नि देख-रेख कराना द्वारे तेस्ना उपकार फेळा कारण कि हय परमेश्वर ले आवळस. जी विधवा खरज एखटी शे, जीना रेख-देख करणार कोणीच नई, ती परमेश्वर वर आशा ठेवस, आणि परमेश्वर ले मदत ना साठे रात दिन प्रार्थना मा लीन राहस. पण ती विधवा जी आपला पुरा टाईम भोग विलास मा जावाळस, ती जीत्ती ऱ्हातांना मरी जायेल शे. तेस्ले ह्या गोष्टीस्नी बी सूचना देत जा एनासाठे कि त्या निर्दोष राहोत. पण कदी कोणी आपला नातेवाईकस्नि रेख-देख नई करत, खास करीसन स्वता ना घराणा नि, त तेनी विश्वास ले नकारी दियेल शे आणि अविश्वासीस तून बी जास्त वाईट बनी जायेल शे. विधवास्नी यादी मा तीनाच नाव लिखामा येवो जी साठ वरीस तून जास्त वय नि राहो, आणि ती एकच नवरा नि बायको राहेल हो. आणि ती आपला चांगला कामस साठे वयखावत हो, जस कि पोरस्ना पालन-पोषण करान, पाव्हनास्नी सेवा करान, प्रभु ना लोकस्नी सेवा करान, आळचन मा लोकस्नी मदत करान, आणि प्रत्येक चांगला काम ना साठे स्वता ले समर्पित करेल राहो. पण जवान विधवास्ना नाव यादी मा नका लिखज्यात, कारण कि जव त्या सुख-विलास कण आकर्षित हुईसन लगन करान देखतीस त ख्रिस्त नि सेवा कराना वचन पासून परती जाईन, आणि अस कराना द्वारे तेनी दियेल पहिला लगन ना वचन ले मोळीसन ती दोषी ठरस. एना संगेच त्या घर-घर फिरीसन आळशी ऱ्हावाले शिकी जास, फक्त ईतलच नई पण दुसरास्ना बारामा बकबक करत ऱ्हातस आणि दुसरास्ना कामस्मा हात टाकत ऱ्हातस, आणि बिगर शोभा ना गोष्टीस्नी चर्चा करस. एनासाठे मनी ईच्छा शे कि जवान विधवा लगन करो, पोरस्ले जल्म देवो आणि आपला घरस्ले समायो आणि आमना कोणता बी शत्रू ले आमना बारामा वाईट करानी संधी नई देवो. मी असा एनासाठे सांगस कारण कि काही विधवा बाया परमेश्वर ले मानान सोळीसन ते काम करी ऱ्हायनात जे सैतान तेस्ना कळून कराले लावस. पण कदी कोणती विश्वासनी बाई ना घर मा विधवा राहो, त ती तेनी देख-रेख करो आणि मंडळी वर भार नई टाको, एनासाठे कि मंडळी तेस्नी मदत करू सको ज्या खरज विधवा शेत आणि जीस्ना कोणीच नई शे. मंडळी ना वरिष्ठ लोक ज्या चांगली पुढाकारी करी ऱ्हायनात, खास करीसन त्या ज्या वचन आयकाळा मा आणि सिखाळामा कष्ट करतस, त्या दोन पट ना आदर ना योग्य समजामा येतीन. कारण कि परमेश्वर ना पुस्तक सांगस, “धान्य नि मळणी करतांना बईल ना तोंड ले मुस्का नका बांधा.” आणि “मजुर आपली मजुरी ना हकदार शे.” कदी कोणी दोष मंडळी ना वरिष्ठ वर लावामा एस त बिगर दोन व तीन साक्ष ना तेना विरुद्ध मा कोणता आरोप स्वीकार नका करज्यात. पाप करणारस्ले सर्वा विश्वासी समोर समजाळा, जेना कण कि सर्वा विश्वासी बी घाबरोत. परमेश्वर, आणि ख्रिस्त येशु आणि पवित्र परमेश्वर ना दूतस्ले उपस्थित समजीसन मी तुले चेतावणी देस कि तू कोणा बी संगे बिगर पक्षपात कराना, ह्या आदन्यास्ना पालन कर. कोणी वरिष्ठ वर प्रभु नि सेवा समर्पण साठे लवकर हात नको ठेवजो. जर तू असा करस त तेना पाप ना साठे दोषी ठरशीन. स्वता ले अनैतिक वाईट पासून दूर ठेव. फक्त पाणीच नका प्या, पण आपला पोट ना साठे आणि आपले घळी-घळी आजारी होवा मुळे थोळा-थोळा द्राक्षरस बी पीत ऱ्हावा. (मी तुले सांगस कि काब कोणा माणुस नि वागणूक बिगर जाणाना तेले घाई-घाई मा पुढारी नई ठरावाले पाहिजे.) कारण कोणी लोकस्ना पाप गुप्त ऱ्हास आणि हय तठलोंग मालूम नई होत जठलोंग कोणी तेस्नी तपासणी नई करोत. पण कईक लोक मोक्या पाप करतस कारण कि तपासणी कराना पयलेच लोकस्ले माहित पळो कि तेस्नी काय करेल शे. त्याच प्रकारे, जव लोक चांगला काम करतस त त्या काम दुसरा विश्वासीस समोर प्रगट होतस, आणि ज्या असा नई होतस, त्या बी दपी नई सकतस. ज्या विश्वासी लोक लोकस्ना दास शेतस, त्या आपला मालक नि प्रत्येक गोष्ट मा आदर करो, कारण कि कोणी दुसरा विश्वासी माणुस परमेश्वर आणि आमनी शिकाळेल शिक्षा नि निंदा कराले नको पाहिजे. ज्या विश्वासी दासस्ना मालक विश्वासी शेतस त्या आपला मालक ना चांगला सन्मान करोत, कारण त्या बी ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे तेस्ना विश्वासी भावू शेतस. पण त्या तेस्नी आखो बी चांगल्या प्रकारे सेवा करोत, कारण कि तेस्ना सेवा ना फायदा उचलनारा बी विश्वासी शेतस आणि प्रेम ना योग्य शेतस. ह्या गोष्टीस्ना उपदेश करत ऱ्हाय आणि तेस्ले प्रोत्साहित करत ऱ्हाय. जर कोणी खोटी शिक्षा देस आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त नि खरा उपदेश ले आणि परमेश्वर नि भक्ती नि शिक्षा ले नई मानत, त तो घमंडी हुई जायेल शे आणि तेले काहीच नई समजस. असा माणुस ले व्यर्थ ना विषय वर विवाद करन आणि शब्द वर तर्क कराले चांगल वाटस, आणि ह्या गोष्टी डाह, आणि झगडा, आणि निंदा ना गोष्टी, आणि वाईट-वाईट विचार, आणि त्या माणसस्मा झगडा-रगडा उत्त्पन्न करतस जेस्ना मन भ्रष्ट हुई जायेल शे, आणि तेस्ना मा सत्य नि समज नई ऱ्हाएल शे. त्या समजतस कि भक्ती कमाई ना रस्ता शे. पण शांती कण भरेल परमेश्वर नि भक्ती स्वता मा एक अदभूत धन शे. आमी ह्या जग मा जल्म ले उनुत त काय लिसन उनुत? काहीच नई. आणि मरी जासुत त जग मधून काय लिसन जासुत? काहीच नई. एनासाठे कदी आमना जोळे खावा साठे अन्न आणि घाला साठे कपळा शेतस, त आमले एस्नाच वर संतृष्टी कराले पाहिजे. पण त्या ज्या मालदार होवाना देखतस त्या अशी परीक्षा मा आणि पापस्ना फंदा मा पळतस आणि गैरा व्यर्थ पणा कण भरेल त्या नुकसान दायक अभिलाषास्ना फशी जातस. कारण कि पैसा ना लोभ सर्वा प्रकार ना वाईटस्ना जळ शे, काही लोकस्नी एले प्राप्त कराना प्रयत्न करतांना ख्रिस्त नि शिक्षा वर विश्वास करान सोळीसन स्वता ले नाना प्रकार ना दुख कण चीथळा करी लीयेल शेतस. पण ओ तीमोथी, परमेश्वर ना झन, तू ह्या गोष्टीस पासून दूर ऱ्हाय, आणि प्रत्येक प्रकार ना धार्मिकता कामस्ले कराना साठे परमेश्वर ले आदर देणारा जीवन जगाना प्रयत्न कर. ख्रिस्त वर विश्वास कर, दुसरास्वर प्रेम कर, हिम्मत नको हारू, आणि दुसरा लोकस्ना संगे वीनम्रता ना सारखा वागाना प्रयत्न कर. जसा एक योद्धा युध्द मा लळाई कराले नई सोळत तसाच तू बी परमेश्वर वर विश्वास करान आणि तेनी आदन्या पालन करान नको सोळू, आणि आपला साठे कायम ना जीवन ले धरी ठेव, जेना साठे तू बलावामा एयेल शे आणि जेना बारामा लोकस समोर तुनी हय स्वीकार कर कि तू ख्रिस्त वर विश्वास करस. परमेश्वर, जो परमधन्य आणि फक्त एकच अधिपती शे, जो स्तुती ना योग्य, राजास्ना राजा, आणि प्रभूस्ना प्रभु शे, तोच ख्रिस्त ले चांगला टाईम वर प्रगट करीन. तोच फक्त एक शे जो कायम लगून जित्ता राहीन, तो त्या अगम्य उजाया मा ऱ्हास जेना जोळे कोणीच नई जावू सकत. कोणताच माणुस नि तेले कदीच नई देख आणि नईत कदी देखू सकस. तेना गौरव आणि सामर्थ्य युगानयुग राहो. आमेन. या जग ना मालदारस्ले हय आदन्या दे कि गर्व नका करा, आणि नका त जग ना नाशवान धन वर आशा ठेवज्यात, पण परमेश्वर वर आशा ठेवज्यात, जो आमना गरज ना सर्वा वस्तूस्ले लागो तितल्या देस. तेस्ले चांगल करानी आदन्या दे, चांगला कामस्मा मालदार व्हा, आणि दान करणारा आणि दुसरास्नी मदत करामा तत्पर राहा. ह्या प्रकारे त्या आपला साठे एक अशी संपत्ती ले एकत्र करतीन जी भविष्य साठे चांगला आधार हुईन. जेना द्वारे तेस्ले खरा जीवन भेटीन. ओ तीमुथियुस, ध्यान मा ठेव, कि तू तेच काम करो जो काम तुले परमेश्वर नि कराले सोपेल शे. अशुद्ध वट-वटी पासून आणि मूर्खपणा ना विवादस पासून जेस्ले लोक चुकी कण ज्ञान सांगतस, दूर ऱ्हाय. कितलाक लोकस्नी हय खोटी ज्ञान ना स्वीकार मुळे ख्रिस्त येशु वर विश्वास कराले सोळी दियेल शे. मी प्रार्थना करस कि परमेश्वर नि कृपा तुमी सर्वास्वर होत राहो. मी पौल, परमेश्वर नि ईच्छा ना नुसार ख्रिस्त येशु ना प्रेषित शे. मले त्या कायम ना जीवन ना प्रचार कराले धाळामा एयेल शे जो येशु ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे परमेश्वर देवाना करार करस. मी हवू पत्र तीमुथियुस तुले लिखस, जो मना प्रिय पोऱ्या ना सारखा शे. मी प्रार्थना करस कि परमेश्वर बाप आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुले कृपा आणि दया आणि शांती भेटत राहो. मी कायम तुले आपल्या प्रार्थनास्मा आठवण करत परमेश्वर ना धन्यवाद करस, जेनी सेवा मी आपला वळिल लोकस सारखी शुद्ध विवेक कण करस. मले आठवण शे कि तुनी आसू व्हावाळेल शेतस जव आमी आल्लग हुयेल होतुत, आणि मले तुले भेटानी गैरी ईच्छा शे, एनासाठे कि मना हृदय खुशी कण भरी जावो. मले तुना त्या निष्कपट विश्वास नि आठवण शे, ह्या प्रकार ना विश्वास तुनी आजी लोईस मा आणि तुनी माय युनीके मा बी होता. मले खात्री शे कि हवू विश्वास तुना मा बी शे. ह्या मुळे मी तुले आठवण देस कि त्या वरदान ना पूर्णपणे वापर करजो मना हात ठेवाना द्वारे परमेश्वर नि तुले दियेल शे. कारण कि परमेश्वर नि आमले जी आत्मा देयेल शे ती आमले भित्रा नई बनावत, पण सामर्थ्य ना आत्मा दियेल शे, जो आपले दुसरास्वर प्रेम कराले, आणि स्वता वर संयम ठेवाले मदत करस. ह्या मुळे प्रभु येशु नि साक्ष लोकस्ले सांगाले लाजजो नको, आणि नईत मना मुळे लाजजो जो ख्रिस्त येशु नि सेवा मुळे कैद मा शे. पण त्या सामर्थ्य ना वापर करीसन जो परमेश्वर नि तुले दियेल शे, सुवार्ता साठे मना संगे दुख उचल. परमेश्वर नि आमना तारण कर आणि पवित्र जीवन जगा साठे बलाव, आणि अस तेनी आमना पुण्य ना कामस मुळे नई पण आपला उद्देश आणि कृपा मुळे कर. सुरुवात पासून हय परमेश्वर नि ईच्छा होती (कि आमले प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा भेटो,) पण आते येशु ख्रिस्त जो आमना तारणार शे ह्या दुनिया मा उना आणि आमना वर आपली कृपा प्रकट करना. तेनी मृत्यु नि सामर्थ्य ना नाश कर आणि सुवार्ता ना द्वारे आमले कायम ना जीवन ना रस्ता दावा. ह्या सुवार्ता साठे परमेश्वर नि मले प्रेषित, प्रचारक आणि उपदेशक बी ठराव. ह्या मुळे मी जेल मा दुखस्ले बी उचलस. पण मी तेना कण लाजत नई, कारण कि मले माहिती शे कि मना विश्वास कोणावर शे, आणि मले खात्री शे कि ख्रिस्त जेनी मले हय वारसा सोपेल शे आपला परत येवाना दिन लगून राखोई करू सकस. ज्या खरी शिक्षा मनी तुले शिकाळेल शे तीस्ले धरी ठेव, आणि ख्रिस्त येशु ना संगतीना विश्वास व प्रेम मा दृढ बनी ऱ्हाय. आमना मा येणारी पवित्र आत्मा ना सामर्थ्य ना द्वारे ह्या सत्य नि राखोई कर जी तुले सोपामा एयेल शे. तुले माहित शे कि आशिया प्रांत मा कईक विश्वासी लोकस्नी मले सोळी दिधा जेस्ना मा फुगल आणि हर्मगनेस बी शे. अनेसिफर ना घराणा वर प्रभु दया करो, कारण कि तेनी गैरा सावा मले भेटीसन मनी हिम्मत व्हाळायेल शे. तो मले जेल मा होवा मुळे लाज ना नई. पण जव तो रोम शहर मा उना, त गैरा यत्न कण मले झामलीसन मना संगे भेट करी. प्रभु अनेसिफर वर न्याय ना दिन मोठी दया दाखाळो. तुमी स्वता ले माहिती शे जव मी इफिस शहर मा होतु तव तेनी मनी कितली मदत करेल होती. एनासाठे ओ मना पुत्र तीमुथियुस, हय जानीसन बलवान हुई जा कि परमेश्वर नि तुनावर कृपा करेल शे जे फक्त ख्रिस्त येशु ना संगे नात बनावावर भेटस. त्या शिक्षास्ले ज्या तुनी गैरा साक्षस्ना उपस्थिती मा मना कळून शिकेल शे, मनी ईच्छा शे कि तू तीच शिक्षा दुसरा विश्वासीस्ले बी शिकाळ जेस्ना वर तू विश्वास करस, कि त्या बी दुसरास्ले शिकाळी सकोत. ख्रिस्त येशु ना चांगला योद्धा ना सारखा मना संगे दुख उचल. एक योद्धा जो सेना मा आपली सेवा दि ऱ्हायना हो तो कोणता बी प्रकार ना संसार ना कामस्मा नई फसत कारण कि तो आपला अधिकारी ले खुश कराना प्रयत्न करस. एक खेळाळू जो स्पर्धा मा भाग लेस, तो तठ लगून ईलाम नई जिकू सकत जठ लगून तो त्या खेळ ना नियमस्ना पालन नई करत. वावर मा काम करणार शेतकरीले, सर्वास्तून पहिले पिक ना हिस्सा भेटाले पाहिजे. ज्या उधारणस्ले मी तुले दि ऱ्हायनु तेस्ना बारामा विचार कर, कारण कि परमेश्वर एस्ले समजामा तुनी मदत करो. येशु ख्रिस्त कोण शे ह्या गोष्ट नि आठवण करत ऱ्हाय, तो जो राजा दाविद ना वंश शे, जेले परमेश्वर नि मरेल मधून परत जित्ता करा, आणि हईच सुवार्ता शे जो मी लोकस्मा प्रचार करस. मी गुन्हेगार सारखा जेल मा कैद शे आणि दुख उचली ऱ्हायनु कारण कि मनी सुवार्ता ना प्रचार करा. पण त्या लोकस्ले परमेश्वर नि सुवार्ता ना प्रचार करा कण नई रोकी सकावत. पण मी परमेश्वर ना निवाळेलस्ना फायदा साठे सर्व काही सहन करी ऱ्हायनु, एनासाठे कि त्या बी विश्वास करीसन त्या तारण ले प्राप्त करोत जो येशु ख्रिस्त मा शे, आणि कायम ना गौरव बी प्राप्त करोत. हय गोष्ट विश्वास करा योग्य शे, जर आमी तेना संगे मरी जायेल शेतस, त तेना संगे जित्ता बी होसुत. जर आमी तेना संगे दुख सहन करत ऱ्हासुत, त तेना संगे राज बी करसुत. जर आमी तेले वयखाले नकारसुत, त तो बी सांगीन कि आमी तेना नई शेतस. जर आमी विश्वास योग्य नई बी शेतस, तरी बी तो विश्वास योग्य सदा ऱ्हास कारण कि तो आपला स्वभाव ना विरुद्ध नई जावू सकत. लोकस्ले ह्या गोष्टीस्नी ज्या मनी तुले सांगेल शे आठवण देवाळीसन आणि परमेश्वर ना साक्षी बनीसन चेतावणी दे कि शब्दस्ना अर्थ वर वाद-विवाद नका करा. असा वाद-विवादस कण कोलेच फायदा नई होत पण आयकनारा बिगळी जातस. तू परमेश्वर ना वचनस्ले चांगल्या प्रकारे शिकाळत ऱ्हाय, आणि ज्या काम करस, तेस्ना मा लज्जित होवाना सारखा काही कारण नई राहो असा, आणि परमेश्वर ले स्वीकार योग्य असा सेवक बनाना पुरा प्रयत्न कर. अशुद्ध मूर्खपणा ना गोष्टीस पासून दूर ऱ्हाय, कारण कि ज्या लोक असा गोष्टीस्मा लागेल ऱ्हातस त्या आखो बी अशुद्ध मा वाळत जातस आणि परमेश्वर पासून दूर होत जातस. जसा सळेल घाव शरीर ले नुकसान पोहोचाळस तसाच तेस्ना गोष्टीस्ना प्रभाव बी शे जी आयकनारस्ना विश्वास ले नाश करस. हूमनाय आणि फिलेत बी तेस्नाच मधला शे. तेस्नी सत्य वर विश्वास कराले सोळीसन दवळी जायेल शे. त्या असा सांगतस कि ज्या ख्रिस्त मा मरी जायेल शेतस परमेश्वर नि पहिलेच कायम ना जीवन दि टाकेल शे, त्या असा सांगीसन काही विश्वासीस्ले उल्टा-फुल्टा करी टाकतस. पण परमेश्वर ना लोक त्या पक्का पाया सारखा शेतस जो कदी हालू नई सकत, आणि ह्या पाया वर हय लिखेल शे. “प्रभु ले माहिती शे कि तेना लोक कोण शेतस” आणि “जो कोणी प्रभु ना नाव लेस तो वाईट काम कराले सोळी देवो.” मोठा घर मा सर्वा प्रकार ना भांडा राहतस, तेस्ना मधून काही सोन आणि चांदी ना बनेल ऱ्हातस आणि काही माती आणि लाकूळ ना. काहीस्ना खास टाईम वर वापर होस आणि काहीस्ना साधारण टाईम वर. एनासाठे जर कोणी विश्वासी व्यक्ती स्वता ले सर्वा प्रकार ना वाईट पासून आल्लग करी लेस त तो त्या खास भांडा सारखा हुईन जेना वापर खास टाईम वर करामा एस. कारण कि त्या समर्पित शेतस आणि आपला मालक साठे उपयोगी शेतस आणि प्रत्येक चांगला कामस साठे तयार शेतस. पाप नि वासनास पासून पय जी जवानस्ले आकर्षित करस, आणि ज्या शुद्ध मन कण परमेश्वर ले मदत साठे हाक मारतस तेस्ना संगे धार्मिकता, विश्वास, प्रेम, आणि शांती ना पाठलाग कर. आणि मूर्खपणा आणि अज्ञान ना विवादस पासून दूर ऱ्हाय, कारण कि तुले माहित शे कि एस्ना कण झगळा निर्माण होतस. प्रभु ना दास झगळा करणार नको पायजे, पण सर्वास्ना संगे सौम्य आणि सहनशील राहाले पाहिजे आणि परमेश्वर ना वचन ले चांगल्या प्रकारे सिखाळणार पाहिजे. तो ह्या आशा कण आपला विरोधीस्ले नम्रता कण समजाळो, काय माहित कि परमेश्वर तेस्ले मन फिराव ना मन दि देवो कि त्या बी ख्रिस्त ना सत्य ले वयखोत. ह्या प्रकारे त्या शुद्धी मा ईसन सैतान ना फंदा मधून सुटी जातीन, जेनी तेस्ले आपली ईच्छा पुरी करासाठे आपला जाय मा फसाळी लीयेल शे. आते जे मी सांगी ऱ्हायनु तेले ध्यान मा ठेव कि ख्रिस्त ना येवाना पहिले शेवट ना दिनस्मा कठीण टाईम येतीन. माणुस स्वार्थी, लोभी, बळाईखोर, गर्व करणार, आणि दुसरास्ना निंदा करणारा अहंकारी, बनी जातीन. त्या आपला माय-बाप ना आज्ञास्ले नई मानणार, अनुपकारी, आणि अपवित्र हुई जातीन. त्या निर्दयी दुसरास्ले माफ नई करणारा, दुसरास्वर दोष लावणारा, असंयमित हिंसा करणारा, कठोर, चांगला कामस्ना शत्रू हुई जातीन. त्या विश्वासघाती, निष्काळजी, घमंडी, आणि परमेश्वर ना नई पण सुख विलास ले पसंद करणारा होतीन. त्या परमेश्वर नि भक्ती ना दिखावा त करतीन, पण परमेश्वर नि ती सामर्थ्य ना तिरस्कार करतीन जी खरज तेस्ना वाईट जीवन ले बदलू सकस, असा लोकस पासून दूर ऱ्हाय. तेस्ना मधून काही लोक, ज्या घरस्मा घुशी जातस आणि मूर्ख बायास्वर पुरा नियंत्रण करी लेतस जीस्ना मन तीस्ना पापस्ना मुळे दाबाई सन सर्वा प्रकार ना ईच्छास कण संचालित होतस, अश्या बाया कायम शिकाना प्रयत्न्य त करतीस पण कदी बी सत्य ले नई वयखू सकतस. जसा यान्नेस आणि यांब्रेस नि मोशे ना विरोध करेल होता, त्याच प्रमाणे ह्या खोटा शिक्षक बी सत्य ना वचन ना प्रकार ना विरोध करतस. ह्या असा माणस शेतस जेस्नी बुद्धी भ्रष्ट हुईजाएल शे आणि खरज त्या ख्रिस्त वर विश्वास नई करतस. पण तेस्न यश फक्त काहीच टाईम साठे शे, कारण कि मोशे ना विरोधीस सारखा एस्नी मूर्खता बी सर्वास्वर प्रकट हुई जाईन. पण तुनी मनी शिक्षा, वागणूक, आणि जीवन ना उद्देश ना अनुसरण करेल शे. तुनी मना विश्वास, सहनशीलता, प्रेम, आणि धीर नि अनुसरण करना. तू त्रास आणि दुख मा मना संगे ऱ्हायना. तुले माहिती शे कि अंत्युखिया शहर आणि इकुन्या आणि लुस्र नगर मा मनी कितला त्रास सहन करना, पण प्रभु नि मले त्या सर्वा दुखस पासून सोळाव. प्रत्येक झन जो ख्रिस्त येशु वर विश्वास करस आणि परमेश्वर ले खुश करणार जीवन जगान देखस, त त्या सर्वास्ले त्रास सहन करन पळीन. पण ज्या दुष्ट शेतस आणि बहिकावतस त्या आखो बी वाईट कामस्ले करतीन, त्या लोकस्ले धोका देतीन आणि स्वता दुसरास पासून धोका खातीन. पण तू, त्या सत्य नि गोष्टीस्वर ज्या आमनी तुले शिकाळेल शे आणि दृढ विश्वास करेल शे, स्थिर बनेल ऱ्हाय, कारण कि तुले माहिती शे कि ह्या गोष्टी तुले कोणी शिकाळेल शे. आणि आठवण ठेव कि जव तू पोऱ्याच होता, तव पासून तुले परमेश्वर ना पुस्तक ना गोष्टी माहिती शेतस, जी तुले ती तारण ना ज्ञान देवू सकस, जी ख्रिस्त येशु वर विश्वास करा कण प्राप्त होस. पुरा परमेश्वर ना पुस्तक परमेश्वर नि प्रेरणा कण लिखामा एयेल शे, आणि उपदेश देवाले, चुकीना धरणास्ना खंडन करासाठे, जीवन मा सुधार साठे, आणि धार्मिकता नि शिक्षा देवा साठे उपयोगी शे. एनासाठे कि तो व्यक्ती जो परमेश्वर नि सेवा करस पुरा सिद्ध बनो आणि प्रत्येक चांगला काम कराना साठे तप्तर हुई जावो. जव ख्रिस्त येशु एक राजा ना सारखा राज्य कराले ईन, तो त्या लोकस्ना ज्या जित्ता शे आणि मरी बी जायेल शेतस न्याय करीन. एनासाठे मी परमेश्वर आणि ख्रिस्त ले साक्ष मानीसन तुले आदेश देस, कि तू परमेश्वर ना वचन ना प्रचार करासाठे प्रत्येक टाईम ले तयार ऱ्हाय, भले लोक आयकोत कि नई आयकोत. तू मोठी हिंमत कण लोकस्ले सांग कि तेस्नी चूकीन करेल शे आणि तेस्ना पापस साठे तेस्ले दाट, पण जव तू तेस्ले पुरी सहनशीलता कण शिकाळस त तेस्ले प्रोत्साहित बी कर. कारण कि असा टाईम ईन जव लोक खरी शिक्षा ले नई आयकावत, पण त्या आपलीच ईच्छा प्रमाणे आपला साठे गैरा सावटा उपदेशक जमा करी लेतीन, ज्या तेस्ले त्याच गोष्टीस्ना प्रचार करतीन ज्या त्या आयकान देखतस. त्या खऱ्या गोष्टीस्ले आयकाले सोळीसन काल्पनिक गोष्टीस्ले आयका साठे मन लावतीन. पण तू सर्वी परिस्थिती मा सावधान ऱ्हायजो, दुख उचल, सुवार्ता प्रचार ना काम कर, आणि परमेश्वर ना सेवक ना रूप मा आपली सेवा ले पुरी कर. कारण कि परमेश्वर ना साठे मना जीवन आणि काम समाप्त होवावर शे, मले माहिती शे कि मना ह्या संसार मधून जावाना टाईम ईजायेल शे. मनी हय दौड मा आपल सर्वोत्तम दियेल शे, मनी आपली दौड ले पुरी करेल शे, आणि मी शेवट लगून विश्वास योग्य ऱ्हायनु. आते परमेश्वर नि मनासाठे स्वर्ग मा एक ईनाम ठीयेल शे कारण कि मनी धार्मिक जीवन जगेल शे जेना कण परमेश्वर खुश शे, प्रभु जो धार्मिकता ना संगे न्याय करस, जव तो दुनिया ना न्याय कराले ईन, तव तो मले तो मुकुट देईन. पण तो ते ईनाम फक्त मलेच नई देवाव पण प्रत्येक त्या मनुष्य ले दिन जो तेनी येवानी गैरी वाट देखी ऱ्हायना शे. मना जोळे लवकर येवाना प्रयत्न कर. कारण कि देमास नि ह्या जग ना वस्तूस्ले प्रिय समजीसन मले सोळी टाकेल शे, आणि थेस्सलनीका शहर ले चालना जायेल शे. क्रेसकेंस गलतिया प्रांत ले आणि तीत दालमतीया जिल्हा ले चालना जायेल शे. फक्त लूक मना संगे शे, जव तू येशी त मार्क ले आपला संगे लई एयजो, कारण कि मले सेवा-कार्य मा मले तेना कण गैरी मदत भेटीन. तुखिक ले मनी इफिस प्रांत मा धाडेल शे. जव तू येशी, तर मना वरला झगा जो मनी कार्प ना आठे, त्रोवस शहर मा सोळेल होता तेले लय एयजो, आणि पुस्तक बी, खास करीसन चर्मपत्रस्ले लय एयजो. आलेक्सांद्र तांबटानी मना संगे गैरा अन्याय करेल शे, प्रभु तेले तेना वाईट कामस्ना प्रमाणे बदला दिन. तू बी तेना पासून सावधान ऱ्हाय, कारण कि तेनी आपला शिक्षा ना गैरा विरोध करेल शे. जव मले पहिला सावा न्यायालय मा आपली सफाई देणी पळणी, मना पक्ष ना समर्थन मा, त कोणीच मना साथ नई दिना, सर्वास्नी मले सोळी दिध, आशा करस कि तेस्ले एना लेख देन नई पळाव मी प्रार्थना करस कि परमेश्वर तेस्ले माफ करो. पण प्रभु नि मनी मदत करी मले सामर्थ्य दिधी, एनासाठे कि मी ख्रिस्त येशु नि सुवार्ता पूर्णपणे आयकाळी सकू, आणि सर्वा दुसरी जाती ना लोक तेले आयकोत. आणि तेनी मना जीव ले मृत्यु पासून वाचाळ. प्रभु मले प्रत्येक वाईट कामस पासून सोळाईन आणि आपला स्वर्गीय राज्य मा सुरक्षित पोहोचाळीन. तेनीच महिमा युगानयुग होत राहो. आमेन. प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला आणि अनेसिफर ना घराणा ले मना नमस्कार सांगजो. एरास्त करिंथ शहर मा ऱ्हाईग्या, आणि त्रफिम ले मी मिलेता शहर मा सोळेल शे, कारण कि तो तठे आजारी हुई जायेल होता. तू हिवाया तून पहिले येवाना प्रयत्न कर, युबुल, आणि पुदेस, आणि लीन व क्लौदिया, आणि सर्वा विश्वासी भावूस कळून तुले नमस्कार. प्रभु तुमनी आत्मा संगे राहो, परमेश्वर नि कृपा तुमी सर्वास्वर होत राहो. मी, पौल परमेश्वर ना दास आणि येशु ख्रिस्त ना प्रेषित तीत ले हवू पत्र लिखस, जो विश्वास ना मुळे मना खरा पोऱ्या ना सारखा शे. मी एनासाठे निवाळा मा एयेल शे कि परमेश्वर ना निवाळेल लोकस्ना विश्वास दृढ करू, आणि त्या सत्य ना ज्ञान ले समजाळू, जो सत्य ना ज्ञान ले स्थापित करासाठे भक्ती ना संगे सहमत शे. एना परिणाम स्वरूप त्या लोक कायम ना जीवन जगानी आशा ठेवतीन, कारण कि परमेश्वर नि जग नि निर्मिती ना पहिले हय प्रतिज्ञा करेल होती, आणि तो खोट नई बोलत. आणि आते, योग्य टाईम वर, तेनी आपला उद्देश त्या सुवार्ता ना द्वारे करी दिधा, जेना प्रचार आमना तारणहार परमेश्वर नि आदन्या ना प्रमाणे मले सोपामा एयेल शे. मी प्रार्थना करस कि परमेश्वर बाप आणि आमना तारणार ख्रिस्त येशु ना कळून तुले कृपा आणि शांती भेटत राहो. मनी तुले क्रेत बेट मा एनासाठे सोळ, कि तू तठ्ठ्ली स्थानिक मंगळीस्नि अळचणीस्ले सुधारो आणि तठ्ठ्ली प्रत्येक मंडळीस्मा वरिष्ठस्ले नेमो. ह्या गोष्टीस्ना बारामा मना आदन्यास्ले आठवण ठेव, ज्या पुढारीस्ले तू मंडळीस्मा नेमशी त्या निर्दोष ऱ्हावाले पाहिजे, एकच बायको ना नवरा ऱ्हावाले पाहिजे, तेस्ना पोर विश्वासी ऱ्हावाले पाहिजे, आणि तेस्ना मा कोणत्याच प्रकार ना वाईट काम आणि बेशिस्त नको ऱ्हावाले पाहिजेत. कारण कि अध्यक्ष ले परमेश्वर ना कारभारी होवा मुळे निर्दोष ऱ्हावाले पाहिजे. तो नईत स्वच्छंदी, नईत रागीट, नईत दारू पेणारा, नईत मारका, आणि नईत नीच कमाई ना लोभी ऱ्हावाले पाहिजे. तो पोहोनचारी करणार ऱ्हावाले पाहिजे, आणि दुसरास संगे चांगल करणारा ऱ्हावाले पाहिजे. तो संयमी ऱ्हावाले पाहिजे, नीतिमान, पवित्र आणि शिस्त प्रिय ऱ्हावाले पाहिजे. तो येशु ख्रिस्त ना विश्वास योग्य संदेश वर विश्वास करत ऱ्हावो, जे तेले धर्म उपदेश ना नुसार सिखाळामा एयेल शे. एना कण तो दुसरास्ले खरी शिक्षा ना पायन कराना साठे प्रोत्साहित करू सकीन आणि ज्या ह्या ख्रिस्ती शिक्षा ना विरोध करतस तेस्ले निरुत्तर करू सकीन. मी अस एनासाठे करस, कारण कि गैरा लोक शेतस ज्या खरी शिक्षा ना विरोध मा बोलतस, खास करीसन त्या ज्या यहुदी मत मधून ख्रिस्त मा विश्वासी बनेल शेतस. त्या आपला अधिकारीस्नी गोष्टीस्ना तिरस्कार करतस आणि गैरास्ले बहिकावत धोका मा ठेवतस. असा लोकस्ले शिक्षा देवा पासून रोक, कारण कि अयोग्य गोष्टी शिकाळतस आणि कईक परिवारस्ना विश्वास ले चौपट करी देतस. आणि त्या असा नीच कमाई साठे करतस. क्रेते बेट ना रहिवासीस मधूनच, एक व्यक्ती नि जेले त्या लोक भविष्यद्वक्ता समजतस, तेस्ना बारामा सांग कि, “क्रेत बेट ना रहिवासी कायम खोट बोलतस, तेस्नी वागणूक खतरनाक पशु सारखी शे, त्या खादाळ आणि आळशी शेतस.” क्रेते बेट ना रहिवासी ना बारामा हय साक्ष खरी शे, एनासाठे तेस्ले कळक चेतावणी दे कि जेना कण त्या ख्रिस्त वर विश्वास करामा पक्का हुई जावो, आणि यहुदीस्नी गोष्टी-कहाण्यास्वर मन नका लावा आणि ज्या सत्य पासून दूर हुई जातस त्या माणसस्नी आदन्यास्वर मन नका लावज्यात. ज्या लोकस्ना मन शुद्ध शेतस, तेस्ना साठे सर्वा गोष्टी शुद्ध शेतस, आणि ज्या लोकस्ना मन शुद्ध नईत, तेस्ना साठे काहीच शुद्ध नई. ज्या वाईट काम करतस, आणि येशु वर विश्वास नई करतस, तेस्ना मा पापमय विचार शेतस. त्या सांगतस कि आमी परमेश्वर ले वयखतस, पण तेस्ना कामस कण हय प्रगट होस कि त्या परमेश्वर ले नई वयखतस. त्या घृणास्पद आणि आज्ञा नई मानारा शेतस, आणि कोणताच चांगला काम ना योग्य नईत. पण ओ तीत तू विश्वासीस्ले त्या गोष्टी शिकाळत जा ज्या खरी शिक्षा ना नुसार शेतस. धल्ला माणसस्ले समजाळजो कि त्या संयमशील, समजदार, गंभीर, विश्वास मा पक्का, प्रेम आणि सहनशीलता मा कदीच नई फाकणार बनोत. त्याच प्रमाणे मंडळी ना धल्ल्या बायास्ले बी समजाळ कि परमेश्वर ना आदर करत पवित्र जीवन जगोत. त्या कोणी निंदा करणारी आणि नईत दारू पिणारी राहोत, पण ती चांगल्या गोष्टी सिखाळनारी पाहिजे. जेना कण कि ती स्वता ले जवान बायास्ना समोर उदाहरण ना रूप मा ठराई सको, आणि तीस्ले शिकाळी सको कि त्या आपला नवरास्वर आणि पोरस्वर प्रेम करोत. आणि सामंजस्य, आपला नवरा ना प्रती प्रामाणिक म्हणजे शुध्दाचरणी, आणि घर ना कारभार ले समायणारी, चांगली आणि आपला नवरा ना आधीन राहणारी होवो, एनासाठे कि कोणी परमेश्वर ना वचन नि निंदा नई करी सको. तसाच जवान माणसस्ले बी समजाळ्या कर कि सामंजस्य बनोत. ह्या सर्व्या गोष्टीस्मा स्वता ले चांगला कामस्ना उदाहरण बनावा. जव तू विश्वासीस्ले शिकाळस, त तुना उपदेश मा कायम साफ गंभीरता ना संगे होवो. तुना उपदेश मा कायम सत्य राहो, जेना कण कि तुना विरोधीस्ले आमना बारामा निंदा करानी कोणतीच गोष्ट नई भेटो आणि त्या लज्जित हुई जावोत. दासस्ले समजाळ कि त्या प्रत्येक स्थिती मा आपला मालक ना आधीन राहोत, आणि सर्वा गोष्टीस्मा तेस्ले खुश ठेवो आणि परत फिरीसन उत्तर नई देवो, पण तेस्नी आदन्यास्ले मानोत. तेस्ना पासून काही चोरी चाकारी नका करा पण स्वता ले विश्वास योग्य साबित करो, अस करावर त्या आपला तारणहार परमेश्वर नि शिक्षा नि शोभा वाळावतीन. कारण कि परमेश्वर नि आपली कृपा सर्वा माणसस्ना तारण साठे प्रगट करेल शे. परमेश्वर नि कृपा आमले जताळस कि आमी अभक्ति आणि जग ना ईच्छास्ले सोळी देवोत, आणि संयमी, धर्मी, आणि भक्ती कण ह्या जग मा जीवन जगा. आणि आमी त्या धन्य दिन नि वाट देखतस जव आशा पुरी हुई जाईन आणि आमना महान परमेश्वर आणि तारणार येशु ख्रिस्त नि महिमा प्रगट हुईन. ह्या ख्रिस्त येशु नि स्वता ले आपला साठे दि टाक कि आमले प्रत्येक प्रकार ना अधर्म पासून सोळाई लेवो, आणि शुद्ध करीसन आपली प्रजा बनाई लेवो ज्या चांगला कामस्ले करासाठे तयार राहीन. तू ह्या गोष्टीस्ले पुरा अधिकार कण आपला आयकनारस्ले शिकाळ, तेस्ले उत्साहित कर आणि समजाळ. कोणी तुले तुच्छ नको समजा ले पाहिजे. आपला विश्वासी लोकस्ले आठवण देवाळ कि त्या आपला राज्यकर्ते आणि अधिकारीस्ना आधीन राहोत, तेस्नी आदन्यास्ना पालन करोत आणि दुसरास साठे चांगला काम करासाठे तयार राहोत. तेस्ले सांग कि त्या कोणी नई निंदा करोत, झगळा करणार नई पण सहनशील बनोत, आणि सर्वास संगे नम्रपणे वागोत. कारण कि आमी बी पहिले बिगर बुद्धी ना, आदन्या नई मानणारा, आणि चुकीना होतुत. आमी सर्वा प्रकार ना वासनस्ना आणि सुख विलास ना गुलाम होतुत. आमी द्वेष आणि मत्सर मा जीवन जगी ऱ्हायंतुत, दुसरा लोक आमना वर व्देष करत होतात आणि आमी तेस्ना वर घृणा करत होतुत. पण जव आमना तारणहार परमेश्वर नि कृपा आणि तेना प्रेम प्रगट हुईना, त तेनी आमले पाप ना दंड पासून वाचाळणा. हय आमना आपला धर्म ना कामस मुळे नई हुईना ज्या आमी करेल शेतस, पण तेनी आपली दया कण आमले आपला पवित्र आत्मा दिसन वाचाळ जेनी आमले आमना पाप कण धुईसन नवा जल्म आणि नवा स्वभाव दिधा. आमना तारणार प्रभु येशु ख्रिस्त ना द्वारे परमेश्वर नि आमले फुकट मा आणि विपुलते कण पवित्र आत्मा दियेल शे. आणि एनासाठे, जव कि आमी तेनी कृपा ना द्वारे धर्मी ठरावामा एयेल शेतस, त आमी कायम ना जीवन नि पक्की आशा ना कण तेना वारीस बनी जायेल शेतस. हय गोष्ट विश्वास करा योग्य शे आणि मनी ईच्छा शे कि तुमी ह्या विषयस्वर जास्त जोर देवोत, एनासाठे कि जेस्नी परमेश्वर वर विश्वास करेल शे, त्या चांगला कामस्ले करामा लागी राहोत. कारण कि ह्या गोष्टी चांगल्या आणि लोकस साठे फायदा ना शेतस. पण बिगर अर्थ ना वाद कण आणि वंशावळी नि चर्चास कण, आपस मा झगळा आणि मोशे ना पुस्तक ना बारामा झगळास पासून वाचीसन ऱ्हाय, कारण कि हई सगळ व्यर्थ शे, आणि नुकसान करणार शे. फुट पाळणार ले एक दोन दार समजाळी द्या, आणि नंतर तेस्ना संगे कोणताच संबंध नको ठेवू. तुले माहिती शे कि असा लोक सत्य पासून भटकी जायेल शेतस, त्या पापी शेतस आणि आपलाच कामस्ना द्वारे दोषी ठरतस. जव मी तुना जोळे अंर्तमा ले नईत तुखिक ले धाळू त तू मना जोळे निकापलीस शहर मा येवाना प्रयत्न्य करजो, कारण कि मनी तठेच हिवाया ना टाईम जावाळाना ठरायेल शे. जव वकील जेना आणि अपुल्लो आपला प्रवास साठे जात ऱ्हात हो त लवकर करीसन तेस्ले पुळे पोहोचाळी देयजो, आणि ध्यान ठेवजो कि तेस्ले प्रवास मा कोणती वस्तू नि कमी नई पळो. आमना लोक बी गरजस्ले पुरा करासाठे चांगला कामस्मा लागेल राहाले सिखोत, ह्या प्रकारे त्या स्वता ना गरज ना साठे दुसरास्वर अवलंबून नका राहा, आणि त्या एक उद्देश ना संगे जीवन जगतीन. मना सर्वा जोळीदारस्ना तुले नमस्कार. ज्या विश्वास मुळे आमना संगे प्रेम ठेवतस तेस्ले आमना नमस्कार. परमेश्वर नि कृपा तुमी सर्वास्वर होत राहो. आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त मा तुमले कृपा आणि शांती भेटत राहो. मना भावू फिलेमोन, मी प्रत्येक टाईम ले प्रार्थना मा तुले आठवण करस, आणि आपला परमेश्वर ना धन्यवाद करस. कारण कि मी प्रभु येशु ख्रिस्त वर तुना विश्वास आणि परमेश्वर ना लोकस्ना प्रती तुना प्रेम ना बारामा आयकेल शे. मनी हय प्रार्थना शे कि विश्वास मा तुनी सहभागीता कार्यकारी हो जेना कण कि तुमी पूर्णपणे त्या सर्वा चांगला वस्तूस्ले समजी सकोत जी परमेश्वर नि आमले दियेल शे, आणि ह्या मुळे लोक ख्रिस्त नि महिमा करतीन. प्रिय भावू, तुना प्रेम कण मले गैरी खुशी आणि प्रोत्साहन भेटेल शे, कारण कि तुना व्दारे परमेश्वर ना लोकस्ना मन उत्साहित हुई जायेल शेतस. मी तुमले काही अस करासाठे सांगू सकस जे तुमले कराले पाहिजे. त्या अधिकार ना उपयोग करी सकस जो ख्रिस्त नि मले दियेल शे पण मनी अस नई कर. मी तुमले आदन्या देवाना एवजी हय कराले सांगी ऱ्हायनु कारण कि आमना मधमा भावूमित्र ना प्रेम शे, मी पौल एक धल्ला व्यक्ती होवा कण विचारी ऱ्हायनु, ख्रिस्त येशु नि सेवा करा मुळे मले जेल मा टाकामा एयेल शे. मी अनेसिम ना साठे विनंती करस, जो मनासाठे पोऱ्या ना सारखा शे. जेले मी कैद मा राहातांना आध्यात्मिक जल्म दियेल होतु. तो पहिले त तुना काही काम ना नई होता, पण आते तो तुना आणि मना गैरा काम ना शे. मी आपला काळीज ना ह्या तुकळा ले तुना जोळे धाळी ऱ्हायनु. जव कि मी जो सुवार्ता मुळे कैद मा शे, तेले आपलाच जोळे ठेवणार होतु कि तो तुमना जागा वर सुवार्ता नि सेवा करो. तरी बी मनी ईच्छा नई कि तुनावर मनी मदत करासाठे जबरजस्ती करू पण हय ईच्छा शे कि तू स्वतानी ईच्छा कण हय करो. एनासाठे तुनी सहमती ना बिगर मी काहीच नई कराव. होवू सकस कि कदाचित कसा मुळे उनेसिमुस तुना पासून काही दिनस लगून दूर ऱ्हायना पण तो कायम तुना संगे राहो. पण आते तो दास नई पण दास तून बी उत्तम शे, म्हणजे ख्रिस्त मा भावू सारखा शे, तो मना त खास प्रिय शेच, पण आते शरीर मा आणि प्रभु मा तुना बी विशेष प्रिय होवो. एनासाठे, कदी तू समजस कि मी तुना सहभागी शे, त तेना संगे तसाच व्यवहार करज्यात जसा मना संगे करेल होतात. कदी तेनी तून काही नुकसान करेल शे, व तेनावर तुना काही कर्जा शे, त मना नाव वर लिखी दे. मी पौल आपला हात कण लिखस कि मी स्वता भरी दिसू, आणि मले हय सांगानी काही गरज नई, कि मना कर्ज जो तुनावर शे तो तूच शे. ओ मित्र, हवू आनंद मले ख्रिस्त मा तुना कळून भेटो, एनासाठे विश्वासी भावू होवा मुळे असा कराना द्वारे मले खुश कर. जव मी हय लिखस, मले हवू विश्वास शे कि जे मनी तुले कराले सांगेल शे तू तेले करशीन, पण आणि तेना तून काही जास्त बी करशीन. एक आजून गोष्ट, मले थांबा साठे जागा तयार ठेव, कारण कि मले आशा शे कि परमेश्वर तुमनी प्रार्थनास्ना उत्तर दिन, आणि मी ईसन तुले भेटसू. एपफ्रास ना कळून, जो मना संगे ख्रिस्त येशु ना प्रचार करा मुळे कैद मा शे, तुले नमस्कार करस. ह्याच प्रकारे, मार्क, अरिस्तार्ख, आणि देमास आणि लूक ज्या मना सहकारी शेतस एस्ना कळून तुले नमस्कार. आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा तुमना संगे राहो. आमेन. आमना पूर्वजस्ना काय मा परमेश्वर नि पूर्वज लोकस संगे गैरा सावा आणि आल्लग-आल्लग प्रकारे भविष्यवक्तास्ना द्वारे गोष्टी करना, पण ह्या आखरी दिनस्मा तेनी आमना संगे आपला पुत्र ना द्वारे गोष्टी करना. हय तेच शे जेना द्वारे परमेश्वर नि पुरा जग नि निर्मिती करी, आणि जेले परमेश्वर नि सर्वा वस्तूस्ना वारीस ठराव. पुत्रच परमेश्वर नि महिमा ना उजाया ले प्रगट करस आणि तो प्रत्येक प्रकारे परमेश्वर ना सारखा शे, आणि सर्व वस्तूस्ले आपला वचन ना सामर्थ्य कण समायस. तो माणसस्ना पापस्ले माफ करीसन स्वर्ग मा परमधन्य परमेश्वर ना उजवा बाजू मा जाई बठना. एनासाठे तेना पद परमेश्वर ना दूतस तून उच्चा ठरणा, कारण कि जो नाव तेले परमेश्वर पासून वारसा मा भेटेल शे, ते त्या परमेश्वर ना दूतस्ना नावस्तून गैरा श्रेष्ठ शे. परमेश्वर नि आपला कोणता बी स्वर्गदूत ले अस नई सांग, कि “तू मना पुत्र शे, आज मी तुले आपला पुत्र ना रूप मा प्रगट करस.” नंतर तेनी अस बी कोणताच स्वर्गदूत ले नई सांग, कि “मी तेना बाप बनसू आणि तो मना पुत्र बनी जाईन.” पण जव परमेश्वर आपला एकुलता एक पुत्र ले जग मा धाळावर होता, त तेनी सांग, “परमेश्वर ना सर्वा स्वर्गदूत तेले नमन करोत.” पण परमेश्वर आपला स्वर्गदूतस्ना विषय मा अस सांगस, “परमेश्वर आपला स्वर्गदूतस्ले वारा ना सारखा बनावस, आणि आपला सेवकस्ले धधकनारी आग ना सारखा बनावस.” पण परमेश्वर आपला पुत्र ना विषय मा हय सांगस, “ओ परमेश्वर, तुना राज्य युगानयुग बनेल राहीन, तू आपला राज्य ना लोकस्वर धार्मिकता कण राज्य करस. तू चांगल काम करा कण प्रेम ठेवस, पण तू वाईट काम करा कण घृणा करस. ह्या मुळे मनी, तुना परमेश्वर नि, तुले निवाळेल शे, आणि तुले तुना सर्वा जोळीदारस्तून व्हाळीसन खुशी आणि आदर दियेल शे.” तो हय बी सांगस, “ओ प्रभु, सुरुवात मा तुनी पृथ्वी नि निर्मिती करी, आणि तुनी ते सर्व काही बनाव जे आकाश मा शे. त्या त नाश हुई जातीन, पण तू कायम बनेल राहीन, आणि त्या सर्वा कपळा ना सारखा जुना हुई जातीन. आणि तू तेस्ले चादर ना सारख गुंडाळशी, आणि त्या कपळा ना सारखा बदली जातीन, पण तू कायम एक सारखाच ऱ्हाशी आणि तुना जीवन कदीच सराव नई.” परमेश्वर नि आपला स्वर्गदूतस्ले कदीच अस नई सांग, कि “तू मना उजवा बाजू सन्मान ना जागा वर बठ, जठ लगून कि मी तुना शत्रूस्ले हाराईसन तुना आधीन नई करी देत.” त मंग, स्वर्गदूतस्ना होवाना काय उद्देश शे, त्या सर्वा परमेश्वर नि सेवा कायम करणारा आत्मा शेतस, आणि जेस्ले तारण भेटाव शे तेस्नी सेवा साठे परमेश्वर ना द्वारे धाळामा एयेल शे. एनासाठे आमले जो संदेश भेटेल शे, तेनावर चांगल्या प्रकारे ध्यान देवाले पाहिजे. कदी अस नई हुई जावो कि आमी सत्यता पासून भटकी जावूत. कारण कि जो वचन परमेश्वर नि स्वर्गदूतस्ना द्वारे दियेल होता तो कायम खरा साबित हुईना, आणि त्या सर्वा लोकस्नी जेस्नी एना पालन नई कर व अनुकरण नई कर एना ठीक-ठीक दंड तेस्ले भेटेल शे. आमी लोक असा महान तारण ना तिरस्कार करीसन कसा वाचू सकतस? ह्या महान तारण नि घोषणा सर्वास्तून पहिले प्रभु येशु नि करेल होती, आणि ज्या लोकस्नी प्रभु ले आयक, तेस्नी तेना संदेश ले आमना साठे बरोबर ठराव. परमेश्वर नि बी चिन्ह, चमत्कार, आल्लग-आल्लग प्रकार ना सामर्थ्य ना काम आणि आपली ईच्छा ना नुसार पवित्र आत्मा ना वरदानस्ले वाटाणा द्वारे आपला संदेश ले खरा ठरावना. परमेश्वर नि तेले येणारा जग ले जेना बारामा आमी चर्चा करी ऱ्हायनूत, परमेश्वर ना दूतस्ना आधीन नई कर पण पुत्र ना आधीन मा कर. पण पवित्र शास्त्र मा कोणी कोठेतरी हय लिखेल शे, “ओ परमेश्वर, माणुस काय शे, कि तू तेनी चिंता करस व तेनी कायजी करस? तुनी तेले परमेश्वर ना दूतस्तून कम महत्वपूर्ण बनायेल शे, तुनी तेले राजा ना सारखा महिमा आणि सन्मान दिधा, आणि आपला हातस्ना कामस्वर तेले अधिकार दिधा. आठे अस वाटस कि परमेश्वर नि सगळ काही लोकस्ना नियंत्रण मा करी दियेल शे. म्हणजे, काही बी वाचेल नई, जे तेना नियंत्रण मा नई. पण आमी देखी सकतस कि आज बी सगळी वस्तू लोकस्ना नियंत्रण मा नई शे.” पण आमी येशु ले देखतस जो काही टाईम साठे परमेश्वर ना दूतस्तून थोळासाच कमी महत्वपूर्ण करामा एयेल होता, एनासाठे कि परमेश्वर नि कृपा कण तो प्रत्येक माणुस साठे मरी जावो. एनासाठे कि तो दुख उचला आणि मरी ग्या, परमेश्वर नि तेले महिमा आणि आदर दिधा. परमेश्वर नि ह्या सर्वा वस्तूस्ले बनाव आणि आपला साठे समाई ठीयेल शे, एनासाठे, कि गैरा लोकस्ले आपली महिमा मा सहभागी करो, परमेश्वर नि हवू निर्णय लीधा, कि प्रभु येशु दुख सहन करीसन सिद्ध बनी जावो, कारण कि येशुच शे जो तेस्ले तारण कडे लीजास. येशुच सर्वा लोकस्ले तेस्ना पापस पासून युध्द करस, एनासाठे जो पवित्र करस आणि ज्या पवित्र करामा येतस, त्या सर्वास्ना एकच बाप शे. ह्या मुळे येशु तेस्ले आपला भावू सांगाले नई लाजत. तो परमेश्वर ले सांगस, “जे काही तुनी करेल शे, ते मी आपला भावूस्ले सांगसु. मी तेस्नी सभा मा तुना भजन म्हणसू.” तो हय बी सांगस, “मी तेनावर विश्वास ठेवसू.” आणि परत सांगस, “मी आठे त्या लोकस्ना संगे शे जेस्ले परमेश्वर नि मले दियेल शे, ज्या पोरस सारखा शेतस.” कारण कि परमेश्वर ना पोर माणस शेतस, म्हणजे मांस आणि रक्त कण बनेल, त पुत्र बी एक माणुस बनी ग्या. कारण कि फक्त एक माणुस बनी सनच तो मरी सकत होता, आणि मराणा द्वारेच तो सैतान नि शक्ती ले तोळी सकत होता, जेना जोळे मृत्यु नि शक्ती होती. ह्या प्रमाणे येशु नि त्या लोकस्ना तारण कर ज्या मृत्यु नि भीती मा आपला पुरा जीवन दासस्ना सारखा जगी ऱ्हायंतात. कारण कि प्रभु येशु परमेश्वर ना दूतस्नि नई पण अब्राहाम ना वंश नि मदत करस. ह्या मुळे तेले पाहिजे होत कि तो सर्वा गोष्टीस्मा आमी सर्वा माणसस्ना सारखा बनो, एनासाठे कि तो आमना दयाळू आणि विश्वास योग्य उच्चा महा यहुदी पुजारी ना रूप मा परमेश्वर नि सेवा करी सको आणि आमना पापस्नी माफी साठे स्वता ले अर्पण करी सको. कारण कि जव तेनी कठीणता आणि परीक्षा ना अनुभव करा, त तो तेस्नी बी मदत करू सकस ज्या परीक्षा आणि कठीणता ना सामना करतस. एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, परमेश्वर नि तुमले तेना संगे सहभागी होवा साठे बलायेल शे. येशु ना बारामा मा विचार करा, जो आमना साठे परमेश्वर ना कळून प्रेषित आणि महा यहुदी पुजारी शे. तो परमेश्वर ना साठे जेनी तेले हय काम करासाठे निवाळेल होत विश्वास योग्य होता, जसा मोशे बी परमेश्वर ना घराणा मा आपला सर्वा कामस्मा विश्वास योग्य होता. घर ले बनावनार व्यक्ती घर तून जास्त आदर ना योग्य समजामा येस, ह्याच प्रकारे येशु मोशे तून गैरा जास्त आदर ना योग्य शे. प्रत्येक घर ना कोणीन कोणी बनावनारा ऱ्हास, पण जेनी सर्व काही बनाव तो परमेश्वर शे. मोशे त परमेश्वर ना घराणा मा सर्वा लोकस साठे एक सेवक ना सारखा विश्वास योग्य ऱ्हायना, जे काही मोशे नि कर ते तेना कडे इशारा करत होत जे परमेश्वर नंतर सांगणार होता. पण ख्रिस्त पुत्र ना सारखा परमेश्वर ना घर ना विश्वास योग्य अधिकारी शे, आणि तेना घर आमी शेतस, कदी आमी साहस वर आणि आपली आशा ना अभिमान वर आखरी लगून दृढता कण स्थिर ऱ्हातस.. एनासाठे, जसा पवित्र आत्मा पवित्र शास्त्र मा सांगस, “कदी आज तुमी परमेश्वर नि आवाज आयकोत, त तेनी आज्ञा माना पासून नकार नका करा, जसा कि तुमना पूर्वजस्नी उजाळ जागा मा परीक्षा ना टाईम ले परमेश्वर ना विरुद्ध करेल होत. तठे तुमना पूर्वजस्नी चाळीस वरीस लगून, मना महान कामस्ले देखा नंतर बी मले आव्हान दिधी आणि मले परख.” ह्या मुळे मी त्या टाईम ना लोकस्वर रागे भरेल ऱ्हायना आणि सांगणा, “एस्ना मन कायम भटकत ऱ्हातस आणि मनी आदन्या ना पालन करा पासून नकार करत ऱ्हायेल शेतस.” तव मनी रागे भरीसन शेप्पत खादी आणि सांग, “त्या त्या जागा वर कदीच प्रवेश नई करी सकावत जठे मी तेस्ले आराम देणार होतु.” ओ विश्वासी भावूसहोण, सावधान राहा कि तुमना मा असा वाईट आणि अविश्वासी मन नई हो, जो जित्ता परमेश्वर ना अनुकरण कराले नकार करत हो. पण जठ लगून पवित्र शास्त्र कण “आज” शब्द आमना वर लागू होस, तठ लगून एक-दुसरास्ले प्रोत्साहित करत राहा, कदी अस नई हुई जावो, कि तुमना मधून कोणी पाप मा फसीसन कठीण हुई जावो. कदी आमी आखरी लगून दृढता कण आपला सुरुवात ना विश्वास ले धरी ठेवतस त आमी ख्रिस्त ना भागीदार बनी जातस. जसा कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “कदी आज तुमी परमेश्वर नि आवाज आयकोत, त तेनी आज्ञा माना पासून नकार नका करा, जसा कि तुमना पूर्वजस्नी वाळवंट मा परीक्षा ना टाईम ले परमेश्वर ना विरुद्ध करेल होत.” त्या कोण लोक होतात जेस्नी परमेश्वर ना आवाज आयकीसन बी, तेना विरोध कर? निश्चितच ह्या त्या लोक होतात, ज्या मोशे ना नेतृत्व मा मिसर देश मधून निघी एयेल होतात. आणि त्या कोण लोक होतात, जेस्ना वर परमेश्वर चाळीस वरीस लगून रागे भरेल ऱ्हायना? निश्चित ह्या त्या लोक होतात, जेस्नी पाप कर आणि जेस्ना प्रेत उजाळ जागा मा पळेल ऱ्हायनात. कोणता लोकस्ना बारामा तेनी शेप्पत खाईसन सांग कि “ह्या मना आराम ना जागा वर प्रवेश नई करावत?” निश्चितच तेस्ना बारामा, जेस्नी तेनी आज्ञा ना पालन करावर नकार करेल होतात. ह्या प्रकारे आमी देखतस कि, त्या आपला अविश्वास मुळे परमेश्वर नि आराम नि जागा मा प्रवेश नई करू सकनात. एनासाठे जव कि परमेश्वर नि आमना संगे करार करेल शे कि आमी तेना आराम नि जागा मा जासुत, त आमी सावधान राहाले पाहिजे, कदी अस नई हुई जावो कि तुमना मधून कोणी झन त्या करार ना जागा मा प्रवेश करा पासून चुकी जावो. कारण कि आमले त्याच इस्त्राएलीस्ना सारखा शुभ-सुवार्ता आयकाळा मा एयेल शे, पण तेस्ले एना कण काही फायदा नई हुईना कारण कि जव तेस्नी ह्या सुवार्ता ले आयक त विश्वास कण एले स्वीकार नई कर. आणि आमी जेस्नी विश्वास कर, त्या आराम नि जागा मा प्रवेश करतस जेना करार परमेश्वर नि करा. जस कि परमेश्वर नि दुसरास्ना विषय मा सांग, “त्या त्या जागा मा कदीच प्रवेश नई करू सकावत जठे मी तेस्ले आराम देणार होतु. जरी परमेश्वर ना काम त जग नि निर्मिती ना टाईम लेच समाप्त हुई जायेल शे.” कारण कि सातवा दिन ना बारामा तेनी पवित्र शास्त्र मा अस सांगेल शे, “परमेश्वर नि सातवा दिन आपला सर्वा कामस्ले समाप्त करीसन आराम करना.” आणि पवित्र शास्त्र मा परत हई लिखेल शे कि, “त्या त्या जागा मा कदीच प्रवेश नई करू सकावत जठे मी तेस्ले आराम देणार होतु.” पण कईक लोकस जोळे त्या आराम ना जागा वर जावा साठे मोका आते बी शे, जेस्नी पयले शुभ-सुवार्ता आयक तेस्नी तेनावर विश्वास नई करा मुळे त्या आराम ना जागा ले नई लेवू सकनात. एनासाठे परमेश्वर नि आपला आराम ना जागा मा प्रवेश करावा साठे एक आखो टाईम ले नेम, आणि तो टाईम “आज” शे. आणि तेनी गैरा वरीस नंतर दाविद ना तोंड कण ह्या वचनस्नि घोषणा करावी, ज्या पहिले पासूनच सांगामा एयेल होतात, “कदी आज तुमी परमेश्वर नि आवाज आयकोत, त तेले आयका पासून नकार नका करा.” आमले हय बी माहिती शे परमेश्वर नि ज्या आराम ना जागा ना करार करेल शे, तो कनान देश नई शे, जेनामा जावा साठे यहोशू नि आमना पूर्वजस्नी पुढाकारी करी. कारण कि कदी हय कनान देश ऱ्हात त परमेश्वर नंतर हय नई सांगता कि एनासाठे एक दुसरा टाईम होता. एनासाठे, जसा परमेश्वर नि सर्व काही बनावा नंतर सातवा दिन ले आराम कर, तसाच परमेश्वर ना लोकस साठे कायम ना आराम ना टाईम बनेल शे. कारण कि परमेश्वर नि आपला काम समाप्त करा नंतर आराम करना, आणि हई त्या सगळा साठे सारख शे ज्या परमेश्वर ना जोळे आराम कराले जातस, त्या आपला काम समाप्त करा नंतर आराम करतीन. एनासाठे आमी त्या आराम नि जागा मा प्रवेश कराना प्रयत्न करोत, अस नई हुई जावो कि कोणी झन तेस्ना सारखा आज्ञा नई मानीसन पळी जावो. कारण कि परमेश्वर ना वचन जित्ता, आणि प्रबळ, आणि प्रत्येक दोनधारी तलवार तून बी जास्त धार दार शे, जीव आणि आत्मा ले, आणि गाठ-गाठ, आणि मज्जा-मज्जा ले आल्लग करीसन आर पार भेदस आणि मन ना भावना आणि विचारस्ले पारखस. परमेश्वर पासून जग नि कोणतीच वस्तू दपेल नई शे. तेना समोर सर्व काही उघळ आणि प्रगट शे. तेलेच आमले हिसाब देणा शे. येशु जो स्वर्ग ले जायेल शे, तो परमेश्वर ना पोऱ्या शे. तो आमी सर्वास्ना उच्चा महा यहुदी पुजारी शे. एनासाठे या आमी त्या विश्वास ले बिगर सोळाना दृढता कण बनेल राहोत जेले आमनी सर्वास समोर स्वीकार करेल होतुत. हवू महा यहुदी पुजारी, जो येशु ख्रिस्त शे, आमनी प्रत्येक कमजोरीले समजस. येले सोळीसन, जसा सैतान नि आमनी परीक्षा लीयेल होता तसाच तेनी येशु नि बी प्रत्येक गोष्ट मा परीक्षा लीधी, तरी बी तो निशपाप निघना. एनासाठे, या आमी साहस कण परमेश्वर ना सिंहासन ना जोळे येवोत, जो कृपा कण भरेल शे, तव परमेश्वर आमना वर दया आणि कृपा दिन, आणि आमनी गरजस्मा तो आमनी मदत करीन. परमेश्वर प्रत्येक महा यहुदी पुजारी ले इस्त्राएल ना लोकस मधून निवाळस, आणि माणसस्ना चांगला साठे परमेश्वर नि सेवा करासाठे नेमा मा एस. एनासाठे कि तो अर्पण आणि लोकस्ना पापस्नी प्रायश्चित्त नि बलिदान चळावो. एनासाठे तो अज्ञानी आणि भटकेल ना संगे सोम्यपणा कण व्यवहार करू सकस, कारण कि तो स्वता बी दुर्बळता ना आधीन मा शे. तेना साठे हई आवश्यक शे कि तो फक्त लोकस्ना पापस्ना प्रायश्चित कराना साठे बलिदान नई चळावो, पण आपला पापस्ले दूर कराना साठे बी बलिदान चळावो. कोणी बी माणुस स्वता महा पुजारी होवाना पद नई लेवू सकत. ज्या प्रमाणे परमेश्वर नि अहरोन ले पयले महा पुजारी ना रूप मा बलाव आणि निवाळ, त्याच प्रमाणे तो दुसरा महा पुजारी ले बी परमेश्वर द्वारे बलावामा येस. त्याच प्रमाणे, ख्रिस्त नि बी स्वता ले महा यहुदी पुजारी बनासाठे नेमी सन स्वता नि आपला सन्मान नई कर, पण परमेश्वर नि तेले हवू सन्मान दिधा आणि सांग, “तू मना पुत्र शे, मी हय घोषणा करस कि आज मी तुना बाप बनेल शे.” ह्याच प्रकारे पवित्र शास्त्र मा दुसरा जागा वर बी सांगस, “जसा मलकीसदेक एक पुजारी होता, त्याच प्रमाणे तू कायम ना साठे पुजारी शे.” येशु नि ह्या जमीन वरना आपला जीवन मा परमेश्वर ले, जो तेले मृत्यु पासून वाचाळू सकत होता, जोरमा आराया मारत आणि रळत, प्रार्थना व विनंत्या करेल होत्यात, एनासाठे तेना नम्रता आणि समर्पण मुळे परमेश्वर नि तेनी आयक. जव कि तो परमेश्वर ना पोऱ्या होता, तरी बी तेनी दुख उचली-उचलीसन आज्ञा मानाले सिखना. जस तेले सिद्ध करामा उना, त तो आपला सर्वा आदन्या मानणारस्ना साठे कायम ना तारण ना कारण हुईग्या. आणि तेले परमेश्वर ना कळून मलकीसदेक ना सारखा महा यहुदी पुजारी ना पद भेटणा. एना बारामा सांगा साठे गैर काही शे पण तेस्ना बारामा विस्तार कण सांगण कठीण शे. कारण कि तुमी परमेश्वर ना वचन ना बारामा सिखामा आळशी हुई जायेल शेतस. तुमी इतला लांब टाईम पासून विश्वास करत एयेल शेतस कि आते तुमी दुसरास्ले शिकाळाले पाहिजे. पण तुमलेच कोणी गरज शे जो तुमले परमेश्वर ना वचन प्राथमिक गोष्टी परत सिखाळो. तुमी त्या पोरस सारखा शेतस जेस्ले दुध नि गरज शे आणि त्या जळ जेवण नई करू सकतस. कारण कि दुध पीणारा पोरस्ले त धार्मिकता नि शिक्षा नि समज नई ऱ्हात, कारण कि तो बाळच शे. जळ जेवण तेस्ना साठे ज्या विश्वास मा पक्का शेतस, ज्या अनुभव ना द्वारे बरोबर आणि चुकीनी वयख करामा सक्षम शे. एनासाठे या ख्रिस्त ना बारामा जी शिक्षा आमले सुरुवात पासून सिखाळामा एयेल होती तेस्ले परत-परत नई करत आमी पक्की शिक्षा कळे वाळत चालोत. आणि मरेल कामस पासून मन फिरावा साठे, आणि परमेश्वर वर विश्वास करासाठे. बाप्तिस्मा संबधी शिक्षा, विश्वासी लोकस्वर हात ठीसन आशीर्वाद देवानी शिक्षा, मरेल ना परत जित्ता होवाना आणि कायम ना दंड सारखी शिक्षास्ना पाया परत नई टाका, पण तेस्ना तून वरे उठो. आणि जर परमेश्वर नि ईच्छा अशीन त, आमी असाच करसुत. कारण कि जेस्नी आपला ले सोळी टाकेल शे, तेस्ले परत विश्वास मा नई लयामा येवू सकत. तेस्नी एक सावा परमेश्वर नि सत्यता ले वयख होत, आणि स्वर्गीय वरदानस्ले प्राप्त करेल होतात आणि पवित्र आत्मा ना भागीदार बनी जायेल होतात. तेस्नी परमेश्वर ना उत्तम वचन ना आणि येणारा युग नि सामर्थ्य ना अनुभव करेल होतात. त आते तेस्ले परत प्रायश्चित कराईसन परत लयन कठीण शे. कारण कि त्या परमेश्वर ना पोऱ्या ले आपला साठे परत क्रूस वर चळावतस आणि लोकस समोर तेनावर कलंक लावतस. ज्या लोकस्ले चांगली शिक्षा भेटस त्या तीच जमीन ना सारखा शेतस जीना वर पाऊस ना पाणी घळी-घळी पडस. जर जमीन चांगली शे, त हय ज्या लोकस साठे जोता-पेरामा एस तेस्ना साठे काम ना साग-पात उगाळस, आणि तिले परमेश्वर पासून आशीर्वाद भेटस. पण जर ती काटा आणि उंटकटारा उगाळस, आणि निरुपयोगी शे. ती परमेश्वर ना द्वारा श्रापित होवावर शे, आणि आग कण बायामा ईन. प्रिय मित्रसहोण, जर आमी ह्या प्रकारे बोली ऱ्हायनूत, तरी बी आमले निश्चित शे कि तुमी लोकस्नी दशा एनातून काही पट चांगली शे आणि तुमी तारण ना रस्ता वर चालतस. कारण कि परमेश्वर अन्यायी नई शे, कि तुमना काम, आणि त्या प्रेम ले ईसरी जावो, जो तुमनी, तेना नाव नि महिमा ना उद्देश कण, ह्या प्रमाणे दाखाड कि तुमनी संतस्नि सेवा करी आणि आते बी करी ऱ्हायनात. आणि परमेश्वर नि अब्राहाम संगे करार करता टाईम ले आपला नाव नि शेप्पत खादी, कारण कि तेना तून मोठा कोणीच नई होता, जेना नाव लिसन तो शेप्पत खावो. आणि शेप्पत खाईसन सांग, “मी खरज तुले आशीर्वाद देसू आणि तुनी वंशज ले वाळावत जासू.” आणि ह्याच प्रमाणे अब्राहाम ले गैरा धीर ठेवा नंतर करार ना फय भेटणा. जव लोक शेप्पत खातस त आपला तून कोणी मोठा ना नाव लिसन शेप्पत खातस, आणि शेप्पत कणच तेस्ना सर्वा विवादस्नी समाप्ती हुई जास. एनासाठे परमेश्वर नि शेप्पत खादी, कारण कि तो त्या लोकस्ले जेस्ले प्रतिज्ञा भेटेल होती स्पष्टपणे हय दाखाळा ना देखत होता कि तो आपला करार ले पुरा करीन. त मंग आठे दोन गोष्टी शेतस, तेनी प्रतिज्ञा आणि तेनी शेप्पत ज्या कदीच नई बदलू सकतस आणि जेस्ना बारामा परमेश्वर कदीच खोट नई सांगू सकत. एनासाठे आमी ज्या परमेश्वर ना जोळे सुरक्षा प्राप्त करासाठे एयेल शेतस आणि तेना हवू करार आमले तेना कळून दियेल आशा ले धरी ठेवाना साठे आमले प्रोत्साहित करस. आमनी हय आशा येशु ख्रिस्त मा आमनी आत्मा ले स्थिर आणि पक्का करस. ती आमले परमेश्वर पासून दूर नई होवू देत, पण हय आमले मंदिर ना अतिपवित्र जागा मा परमेश्वर ना जोळे पोहोचाळस. जठे येशु नि आमना तून पहिले आणि आमना साठे प्रवेश कर. कारण कि तो मलकीसदेक नि परमपरा मा कायम ना साठे महा यहुदी पुजारी बनी ग्या. हवू मलकीसदेक शालेम शहर ना राजा आणि परात्पर परमेश्वर ना पुजारी होता. जव अब्राहाम युध्द मधून परती ऱ्हायंता जेनामा तेनी चार राजास्ले हारायेल होत, तव ह्याच मलकीसदेक नि ईसन तेना संगे भेट करी आणि अब्राहम ले आशीर्वाद देवाना साठे परमेश्वर ले विनंती करी, आणि अब्राहाम नि एले सर्वा वस्तूस्ना दहावा भाग बी दिधा. मलकीसदेक नाव ना अर्थ शे, “धार्मिकता ना राजा” आणि कारण कि तो शालेम ना राजा होता, त तेना नाव ना हय बी अर्थ शे, “शांती ना राजा.” मलकीसदेक ना माय आणि बाप ना व तेना वंश ना कोणा बी व्यक्ती ना काही बी उल्लेख नई शे आणि तेना जन्म व मृत्यु ना बी काही उल्लेख नई शे. तो परमेश्वर ना पोऱ्या ना सारखा शे आणि तो कायम पुजारी बनेल ऱ्हास. आते एनावर ध्यान द्या कि हवू मलकीसदेक कितला महान होता, जेले आमना वंश ना मुख्य अब्राहाम नि युध्द मा प्राप्त करेल वस्तूस्ना सर्वास्तून चांगला दहावा भाग भेट कर. लेवी ना वंश मधून जेस्ले यहुदी पुजारी ना पद भेटस, तेस्ले मोशे ना नियम ना द्वारे हय आज्ञा भेटेल शे, कि तेस्ले इस्राएल ना दुसरा, म्हणजे तेस्ना आपला लोकस पासून, जे काही तेस्ना जोळे शे, तेना मधून दहावा भाग लेवाले पाहिजे. त्या यहुदी पुजारी आणि दुसरा लोक भावूस सारखा शेतस, कारण कि त्या सर्वा अब्राहाम ना वंशज शेतस. पण ह्या माणुस नि, मलकीसदेक नि जो लेविस्ना वंश ना बी नई होता अब्राहाम पासून दहावा भाग लीना, आणि जेले परमेश्वर पासून करार भेटेल होता तेले मलकीसदेक नि आशीर्वाद दिधा. आणि तेनामा काहीच संशय नई कि धाकला ले मोठा पासून आशीर्वाद भेटस. एले सोळीसन दहावा भाग लेणारा लेवी-वंश मरनशील लोक शेतस, जव कि मलकीसदेक ना बारामा पवित्र शास्त्र सांगस कि तो आते बी जित्ता शे. हय बी सांगू सकतस कि दहावा भाग लेणारा लेवी नि अब्राहाम ना माध्यम कण दहावा भाग दिधा. कारण कि जव अब्राहाम संगे मलकीसदेक नि भेट हुईनी, त लेवी ना जन्म नई हुयेल होता पण एक प्रकार कण आपला पूर्वज अब्राहाम ना शरीर मा विद्यमान होता. इस्राएली लोकस्ले यहुदी पुजारीस्नी रिती ना आधार वर मोशे ना नियम देवामा एयेल होता, ज्या अहरोन ना लेवी वंश ना होतात, पण त्या रिती ना द्वारे सिद्ध नई करामा उनात. एनासाठे एक आजून पुजारी नि येवानी गरज होती, एक असा पुजारी जो हारोन ना सारखा नई पण मलकीसदेक ना सारखा शे. कारण कि जव यहुदी पुजारी ना पद बदला मा एस त नियम ना बी बदलाना अवश्य शे. आमी ख्रिस्त ना बारामा ह्या गोष्टी सांगी ऱ्हायनूत, जो दुसरा गोत्र ना शे. त्या गोत्र मधून कोणी बी पुजारी ना रूप मा वेदी नि सेवा नई करेल होती. मंग त हय प्रकट शे कि आमना प्रभु येशु यहूदा ना गोत्र मधून शे आणि यहुदी पुजारीस्ना बारामा मोशे नि ह्या गोत्र ना बारामा काहीच नई सांग. हय सगळ आखो बी स्पष्ट हुई जास जर आमी एनावर विचार करतस कि एक दुसरा पुजारी प्रगट हुईना, जो मलकीसदेक ना सारखा शे, येशु माणसस्ना नियम आणि कायदा ना नुसार नई, पण कदीच नई खतम होणारा जीवन नि सामर्थ्य कण पुजारी नियुक्त करामा उना. कारण कि तेना विषय मा पवित्र शास्त्र मा हय साक्ष देवामा एयेल शे, “तू मलकीसदेक ना रितीवर कायम ना साठे पुजारी शे.” ह्या प्रकारे, पहिली आदन्या दुर्बळ आणि निरुपयोगी होवा मुळे रद्द करामा उणी. कारण कि मोशे ना नियम काही बी सिद्धता लगून नई पोहोचाळी सकनी. आणि आते तेना जागा वर एक अशी उत्तम आशा ठेवामा एयेल शे, जेना द्वारे आमी परमेश्वर ना जोळे जावू सकतस. आणि एना संगे परमेश्वर नि एक नवा करार जव तो येशु ले एक पुजारी ना रूप मा नियुक्त कर. कारण कि लेवी ना वंशज त बिगर शेप्पत ना यहुदी पुजारी ठरावामा उनात, पण येशु नि नियुक्ती ना टाईम वर परमेश्वर नि शेप्पत खायेल होती आणि तेना बारामा सांगेल होता, “प्रभु नि हई प्रतिज्ञा करी कि, तू कायम ना साठे पुजारी शे, आणि तो कदीच नई पचतावना.” ह्या मुळे येशु, परमेश्वर आणि आमना मधमा उत्तम करार ना जामीन शे. त्या तर गैरा यहुदी पुजारी बनत उनात, येणा कारण हवू होता, कि मृत्यु तेस्ले रावूदेत नई होती. पण येशु कायम ना साठे जित्ता शे, ह्या मुळे तेना यहुदी पुजारी पद कायम ना साठे स्थायी ऱ्हास. एनासाठे ज्या तेना द्वारे परमेश्वर ना जोळे येतस, तो तेस्ना पुरा-पुरा तारण करू सकस, कारण कि तो तेस्ना साठे विनंती करासाठे कायम जित्ता शे. असाच महा यहुदी पुजारी आमना गरजास्ले पुरा करू सकस, जो पवित्र हो, निर्दोष हो, युध्द हो, पापीस्ना प्रभाव कण दूर राहोत हो, स्वर्ग तून बी जेले उच्चा उचला मा एयेल राहो. त्या महा यहुदी पुजारी ना सारखा येशु आवश्यक नई कि प्रत्येक दिन पहिले आपला पाप आणि मंग लोकस्ना पापस साठे बलिदान चळावो, कारण कि तेनी स्वता ले बलिदान अर्पण करीसन तेले एकच सावा मा पुरा करी टाका. कारण कि मोशे ना नियम त दुर्बळ माणसस्ले महा यहुदी पुजारी म्हणून नियुक्त करस, पण त्या शेप्पत ना वचन जो मोशे ना नियम ना नंतर उना, त्या पुत्र ले नियुक्त करस जो कायम ना साठे सिद्ध करामा एयेल शे. आते ज्या गोष्टी आमी करी ऱ्हायनूत, तेस्ना मधून सर्वास्तून मोठी गोष्ट हय शे, कि आमना असा महा यहुदी पुजारी शे, जो स्वर्ग मा परमधन्य परमेश्वर ना सिंहासन ना उजवा बाजू जाई बठना. आमना महा पुजारी स्वर्गीय खरा तंबू ना महापवित्र जागा मा सेवा करस, जेले कोणी माणुस नि नई पण परमेश्वर नि बनायेल शे. कारण कि प्रत्येक महा यहुदी पुजारी भेट, आणि पापस्नी माफी साठे बलिदान चळावाना साठे ठरावामा एस. ह्या मुळे, अवश्य शे कि आमना महा पुजारी ना जोळे बी काही चळावा साठे राहो. आणि कदी ख्रिस्त जग मा ऱ्हाता त कदीच यहुदी पुजारी नई ऱ्हाता, कारण कि जग मा मोशे ना नियम ना नुसार भेट चळावनारा यहुदी पुजारी पहिलेच पासून शेतस. ह्या त्या पुजारी शेतस, ज्या स्वर्गीय वस्तूस्ना प्रतिरूप व प्रतिबिम्बस्निच फक्त स्तुती करतस, कारण कि मोशे जव तंबू ना निर्माण करावर होता, त परमेश्वर ना द्वारे हय चेतावणी देवामा एयेल होती. “हय ध्यान मा ठेवज्यात कि तू तंबू ना निर्माण तसाच करजो, जसा तुले पहाड वर दाखाळा मा एयेल होता.” पण येशु ख्रिस्त ले जी सेवा भेटेल होती ती त्या पुजारीस्नी सेवा तून बी उत्तम होती. कारण कि तो ज्या करार ना मध्यस्थ शे तो जुना करार तून उत्तम शे आणि उत्तम वस्तूस्नी प्रतिज्ञास्वर आधारित शे. कारण कि कदी तो पहिला करार निर्दोष ऱ्हाता, त दुसरा करार नि गरजच नई पळती. पण परमेश्वर लोकस्वर दोष लाईसन सांगस, “प्रभु सांगस, देखा त्या दिन येतस, कि मी इस्त्राएल देश ना लोकस संगे, आणि यहूदा ना लोकस संगे नवीन करार करसू. हय त्या करार ना सारख नई राहाव, जो मनी तेस्ना पूर्वजस संगे त्या टाईम ले बांधेल होती. जव मी तेस्ना हात धरीसन तेस्ले मिसर देश मधून काळी लयनु. कारण कि त्या मना करार ना साठे विश्वास योग्य नई राहोत, आणि एनाच साठे मनी तेस्नी सुधी नई लीधी, अस प्रभु सांगस.” परत प्रभु सांगस कि, जो नवा करार मी येणारा दिनस्मा इस्त्राएल देश ना लोकस संगे बांधसू, तो हवू शे, कि “मी आपला नियमले तेस्ना मनस्मा टाकसु, आणि तेले तेस्ना हृदयस्वर लीखसू. मी तेस्ना परमेश्वर ठरसू, आणि त्या मना लोक ठरतीन. आणि कोलेच हय गरज नई पळाव कि तो आपला देश वालास्ले व आपला भावूस्ले हय शिक्षा देवो, कि प्रभु ले वयख, कारण कि धाकला पासून त मोठा लगून सर्वा मले वयखी लेतीन कि मी तेस्ना परमेश्वर शे. मी तेस्ना अधर्म ना कामस्ना बदला मा तेस्ना वर दया करसू, आणि तेस्ना पापस्ले परत आठवण नई कराव.” परमेश्वर ह्या करार ले “नवा करार” सांगस, एनासाठे तेनी पहिला करार ले जुना ठरावना, आणि ज्या वस्तू जुना आणि जीर्ण हुई जातस तेस्नी समाप्ती हुईजान आवश्यक शे. पहिला करार मा, परमेश्वर नि इस्त्राएल ना लोकस्ले उपासना ना बारामा आणि ह्या पृथ्वी वर बनावामा येणारा तंबू ना बारामा नियम दियेल होतात. एक तंबू बनावनात, जेनामा दोन खोल्या होतात. तंबू ना पयली खोली मा दिवट, मेज, आणि ती मेज वर परमेश्वर ले चळायेल भाकरी होती, आणि ती खोली पवित्रस्थान म्हणावस. दुसरा परदा ना पुळे जो तंबू होता, तिले परम पवित्र जागा सांगामा येत होत. ह्या खोली मा, सोनानी वेदी होती जेना वापर धूप पेटाळा साठे करामा येत होत. तठे एक सन्दुक होता जो मधून आणि बाहेरून सोना कण मळेल होता, तेले करार ना सन्दुक म्हणामा येत होत. ह्या सन्दुक मा तीन वस्तू होतात, सर्वास्तून पहिले सोना न भांड होत जेनामा खास जेवण होत जेले “मन्ना” म्हणामा येत होत, आणि एनामा अहरोन नि काठी बी होती जेनामा लिखेल कळ्या ईजायेल होतात. आणि दघळ ना पट्ट्या होतात जेनावर परमेश्वर ना दहा आदन्या लिखेल होतात, ज्या तेनी मोशे ले दियेल होतात. सोना ना सन्दुक ना वरे महिमामय करुब नाव ना दोन पखसवाली आकृत्या होत्यात, जी ह्या गोष्ट ना संकेत देस कि परमेश्वर नि उपस्थिती तठे शे. तेस्ना उघळेल पंख सन्दुक ना वरला हिस्सा ले झाकत होतात जेले प्रायश्चित नि जागा सांगत होतात. एनासाठे कि लोकस्ना पापस्ले माफ करामा येवू सको. ह्या सर्वास्ना सविस्तर विवरण नई करामा येवू सकस. ह्या प्रकारे सर्व काही तयार करा नंतर, तव यहुदी पुजारीगण प्रत्येक रोज तंबू ना समोर नि खोली मा येत होतात आणि आपला प्रत्येक रोज ना विधीस्ना नुसार आपला कार्य ले करत होतात. पण दुसरी खोली जी परम पवित्र जागा शे, तठे महा यहुदी पुजारी वर्ष भर मा एकच सावा जास. तो आपला संगे पशु ना रक्त लिसन जात होता, जेले तो आपला साठे आणि लोकस्ना पापस साठे ज्या तेस्नी बिगर समजाना करेल होतात प्रायश्चित्त ना रूप मा चळावत होता. ह्या विधीस्ना द्वारे पवित्र आत्मा आमले हय समजाळस कि जठ लगून ह्या पृथ्वी वर सामंजस्य वाला तंबू आणि एना विधीस्ना पालन करामा एस, तठ लगून स्वर्ग मा परमेश्वर ना परम पवित्र जागा मा जावाना रस्ता नई उघळेल शे. हवू पहिला तंबू वर्तमान टाईम साठे एक निशाणी शे. ज्या लोक तठे भेट आणि बलिदान चळावत होतात, त्या वस्तुकण लोकस्ना मन सिद्ध नई होवू सकत होतात. कारण कि तो जुना नियम फक्त ह्या विषयस्वर आधारित शे, म्हणजे हय कि एक व्यक्ती ले काय खावा-पेवाले पाहिजे आणि बाकीना शुद्धीकरण ना विधी. ह्या सर्वा बाहेर ना विधी शेतस. ह्या नियमस्ले तठ लगून अभ्यास मा ठेवामा उन जठ लगून परमेश्वर एक चांगला नियम स्थापित नई करी देत. पण ख्रिस्त पयले पासूनच आठे ऱ्हायेल चांगली वस्तूस्ना महा यहुदी पुजारी ना रूप मा ईजायेल शे. त तो त्या चांगली-चांगली वस्तूस्ले बी लिसन उना ज्या उपलब्ध शेतस. ज्या तंबू मा तो सेवा करस तो मोठा आणि सिद्ध तंबू शे, हवू तंबू माणसस्ना हातस्ना द्वारे बनायेल तंबू नई शे, आणि नईत तो तंबू ह्या जग मधला शे. ख्रिस्त नि परम पवित्र जागा मा फक्त एक सावा आणि कायम ना साठे प्रवेश कर. तो तठे आपला संगे बकरीस्ना आणि वासरूस्ना रक्त लिसन नई जायेल होता. पण तेना बलिदान तेना स्वता ना रक्त होता, आणि एना द्वारे तेनी आमले पापस पासून कायम ना साठे सोळाई लीध. जुना नियम ना नुसार, पुजारी अशुद्ध लोकस्ले विधी नुसार शुद्ध करासाठे बकरीस्ना आणि बईलस्ना रक्त आणि वासरू नि राक तेस्ना वर छिळकीसन तेस्ले युध्द करत होतात. एनासाठे ख्रिस्त ना रक्त बी, जेनी स्वता ले सनातन आत्मा ना द्वारे निर्दोष बलिदान ना रूप मा परमेश्वर ले अर्पण कर, आमना अन्त:करण ले मरेल कार्य कण शुद्ध करीन आणि आमले जित्ता परमेश्वर नि सेवा कराना योग्य बनाईन. एनासाठे ख्रिस्त एक नवा करार ना मध्यस्थ शे. एनासाठे कि बलायेल लोक प्रतिज्ञा ना नुसार कायम ना मिरास ले प्राप्त करी सकोत. कारण कि ख्रिस्त येशु नि पहिला करार ना नुसार करेल अपराधस पासून सुटका ना साठे आपला जीव दिधा. करार एक वारसा ना सारखा शे. एक वारसा ना शासन ले लागू करासाठे ह्या गोष्ट ले साबित करान जरुरी ऱ्हास कि जेनी ह्या वारसा ले बनायेल शे, तेनी मोत हुई जायेल शे आणि आते ह्या शासन ले लागू करू सकतस. कारण कि वारसा ना महत्व तठ लगून नई शे जठ लगून एना बनावनार जित्ता शे, एना महत्व फक्त तेना मरा नंतरच शे. एनासाठे पहिला करार बी पशु ना रक्त ले व्हावाळा ना द्वारे प्रभावी हुईनी. सर्वास्तून पहिले, मोशे नि सर्वा लोकस्ले परमेश्वर नि दियेल नियम ना प्रत्येक आदन्यास्ना विषय मा आयकाळ. एना नंतर तेनी वासरूस्ना रक्त लीधा आणि तेले पाणी मा एकत्र कर. नंतर तेनी एले नियम ना पुस्तक आणि सर्वा लोकस्वर छिळका साठे लाल उन जुफा नाव ना झाळी ना फांद्यास्ना वापर कर. नंतर तेनी लोकस्ले सांग, “हय रक्त परमेश्वर ना त्या करार नि पुष्टी करस जेना अनुकरण करानी आदन्या तो तुमले देस.” ह्या प्रमाणे मोशे नि तंबू आणि उपासना ना साठे वापर करामा येणारा सामान वर रक्त छिळक. खरज, मोशे ना नियम ना नुसार सर्वा वस्तू रक्त ना द्वारे शुद्ध करामा येतस, आणि पापस्नी माफी बी फक्त रक्त व्हावाळा मा येवानाच द्वारे होस. ह्या मुळे संसारिक तंबू ले आणि तेना स्थायी प्रत्येक वस्तूस्ले पशु ना रक्त कण शुद्ध करन पळत होत. हय सगळ त्या वस्तुस्न अनुकरण शे ज्या स्वर्ग मा शेतस, पण स्वर्ग मधल्या स्थायी वस्तूस्ले पशु ना रक्त पासून गैरा जास्त उत्तम बलिदान ना द्वारे करामा येन अवश्य होत. कारण कि ख्रिस्त त्या पवित्र जागा मा नई ग्या जेले लोकस्नी बनायेल शे, जो कि खरा पवित्र जागा ना फक्त एक प्रतिमाच शे. पण तो आमना मुळे परमेश्वर ना समोर सीधा स्वर्ग मा ग्या. जुना करार ना नुसार महा यहुदी पुजारी दर वरीस ले जानवर ना रक्त लिसन परम पवित्र जागा मा प्रवेश करस. पण ख्रिस्त ले स्वता ले घळी-घळी चळावानी गरज नई शे. जर अस होत त जग नि सुरुवात पासून तेले घळी-घळी दुख भोगण पळत, पण आते युग ना शेवट ना टाईम मा तो एकच सावा प्रकट हुईना, एनासाठे कि आपलाच बलिदान ना द्वारे आमना पापस्ले समाप्त करी टाको. ज्या प्रकारे माणसस्ना साठे एकच सावा मराण आणि तेना नंतर तेस्ना न्याय होवान निश्चित शे, त्याच प्रमाणे, ख्रिस्त नि एकच सावा स्वता ले बलिदान ना रूप मा चळाई टाक एनासाठे कि गैरा लोकस्ना पापस्ले दूर करी सको. पण तो दुसरी सावा त्या लोकस्ना तारण करासाठे जाईन ज्या तेनी वाट देखी ऱ्हायनात. मोशे ले देवामा एयेल नियम भविष्य मा येणारी ईच्छास्ना अस्पष्ट प्रतिरूप शे, पण तेस्ना असली स्वरूप नई शे. एनासाठे नियम ना आधीन लोक दर वरीस्ले एकच प्रकार ना बलिदान अर्पण करतस, पण ह्या बलिदान उपासना साठे परमेश्वर ना जोळे जानारस्ले कदीच सिद्ध नई करू सकतस. जर नियम तेस्ले शुद्ध करू सकता, त बलिदानस्न चळावान पहिले पासूनच थांबी जात. भक्त खरज आपला पापस कण शुद्ध हुई जातात आणि परत तेस्ना विवेक कदी बी तेस्ले पाप ना विषय मा दोषी नई ठरावस. पण बलिदान करेल पशुस्ना रक्त पापस्ले दूर नई करू सकत. पण हय दर वरीस्ले तेस्ले तेस्ना पापस्नी आठवण करावस. कारण कि हय शक्य नई, कि बईल आणि बकऱ्यास्ना रक्त पापस्ले दूर करो. ह्या मुळे ख्रिस्त जग मा ईसन हई सांग, “तुनी नईत यज्ञ करानी ईच्छा शे आणि नईत बलिदान, पण तुनी मनासाठे एक शरीर तयार करेल शे. होम-बली आणि पाप-बली कण तू खुश नई हुयना. तव ख्रिस्त नि परमेश्वर ले सांग, ओ परमेश्वर देख, मी ईजायेल शे, तुनी ईच्छा पुरी करासाठे जी पवित्र शास्त्र मा मना विषय मा लिखामा एयेल शे.” जसा ख्रिस्त नि पयले सांगेल शे, कि “तुनी ईच्छा नई माणस तुना साठे बलिदान चळावोत व तुले भेट देवोत, आणि होम-बली आणि पाप-बली कण तू खुश नई हुईना.” जरी ह्या सर्वा बलिदान त नियम ना नुसार चळावामा येतस. प्रत्येक यहुदी पुजारी वेदी समोर उभा ऱ्हायसन दररोज सेवा करस, आणि एकच प्रकार ना बलिदानस्ले घळी-घळी चळावस, पण ह्या सर्वा बलिदान कदी बी पापस्ले दूर नई करू सकतस. पण ख्रिस्त त पापस्नी माफी साठे स्वता ले एकच सावा बलिदान चडावीसन कायम ना साठे परमेश्वर ना सिंहासन ना उजवा बाजू जाईबसना. एना बारामा पवित्र आत्मा नि साक्ष बी आमना जोळे शे. कारण कि पवित्र शास्त्र मा प्रभु नि पहिले पासूनच सांगेल होत. “टाईम एवावर मी तेस्ना साठे ह्या करारस्ले निश्चित करसू,” प्रभु सांगस, “मी आपला नियम तेस्ना हृदयस्मा ठेवसू, मी तेस्ले तेस्ना मन वर चिन्हांकित करसू,” परत परमेश्वर हय सांगस, “आणि मी तेस्ना पापस्ले आणि अधर्मस्ले आठवण बी नई कराव.” आणि जव परमेश्वर नि आमना पापस्ले माफ करी टाकेल शे, त मंग आखो बलिदानस्ले अर्पण करानी गरज नई ऱ्हायनी एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, आमना साठे येशु ख्रिस्त ना रक्त मुळे आमले हय साहस शे कि आमी स्वर्गीय महापवित्र जागा मा प्रवेश करू सकतस. बलिदान ना रूप मा मरीसन, ख्रिस्त नि स्वर्गीय पवित्र तंबू ना त्या परदा कण प्रवेश हुईसन आमना साठे नवा रस्ता ले उघाळी टाक जेना कण आमले जीवन भेटस. आणि जव कि आमना असा महान पुजारी शे, जो परमेश्वर ना घर ना अधिकारी शे. त या, आमी खरा मन, आणि ख्रिस्त मा पुरा विश्वास कण, आणि विवेक ले दोषमुक्त करासाठे आपला हृदय वर ख्रिस्त ना रक्त ना छीडकाव करीसन, आणि आपला शरीर ले शुद्ध पाणी कण धुईसन परमेश्वर ना जोळे जावूत. आणि बिगर लळखळत आपली आशा ना अंगीकार ले दृढता कण धरी ठेवूत, कारण कि परमेश्वर आपला करारस्ले पुरा करामा विश्वास योग्य शे. आमले त हय गोष्ट ना ध्यान ठेवाले पाहिजे कि आमी एक-दुसरा नि मदत करासाठे, प्रेम दाखाळा साठे आणि चांगला काम करासाठे एक-दुसरास्ले उत्साहित करोत. आणि परमेश्वर नि उपासना करासाठे एक-दुसरा ना संगे संगती कराले नई सोळाले पाहिजे, जसा कि गैरा लोक संगती कराले सोळी ऱ्हायनात. पण आमले एक-दुसरास्ले प्रोत्साहित करत राहाले पाहिजे, खास करीसन ह्या टाईम ले जव प्रभु ना परत येवाना दिन जोळे शेतस. जो माणुस मोशे ना नियम ना उल्लंघन करस. कदी तेले दोन व तीन झनस्नी साक्ष वर बिगर दया कण मृत्युदंड देवामा येस, त विचार करील्या कि तो कितला आजून बी भारी दंड ना योग्य ठरीन. जेस्नी परमेश्वर ना पोऱ्या ना आदर नई करत तेले पायस कण ठेच. तेनी ख्रिस्त ना त्या रक्त ले पवित्र नई समज जेना द्वारे परमेश्वर नि तेले पवित्र बनावा साठे नवा करार नि सुरुवात करेल होती. आणि तेनी पवित्र आत्मा ना अपमान कर जेना द्वारे तेनी कृपा प्राप्त करेल होता. असा करणारस्ले भयानक दंड भेटीन, कारण कि परमेश्वरच शे जेनी अस सांगेल शे, कि “बदला लेवाना मना काम शे, मीच बदला लीसू.” आणि परत तो हय सांगस, कि “प्रभु आपला लोकस्ना न्याय करीन.” जित्ता परमेश्वर कण दंड भेटन हय गैरी भयानक गोष्ट शे. त्या सुरुवात ना दिनस्ना बारामा विचार करा जव तुमनी पहिला सावा ख्रिस्त ना बारामा आयकेल होत. आठवण करा कि कोणत्या प्रकारे तुमी भयानक कष्ट ले सहन करीसन बी विश्वास योग्य बनेल ऱ्हायनात. तुमना मधून काही लोकस्ले सर्वास्ना देखता अपमान आणि छळ सहन करन पडण, आणि काही लोक त स्वतानी ईच्छा कण त्या लोकस्मा मिई ग्यात जेस्ना अपमान करामा येत होता आणि जेस्ना संगे वाईट वागामा येत होत. कारण कि तुमी नईत फक्त कैदीस्ना संगे तेस्ना दुखस्मा दुखी हुईनात पण जव तुमी लोकस्नी धन-संपत्ती जप्त करामा उणी. त तुमनी हय नुकसान खुशी कण स्वीकार कर, कारण कि तुमले माहिती शे कि तुमना जोळे आते बी त्या सर्वा वस्तू शेतस जेना करार परमेश्वर नि करेल होता. ज्या कि गैरा चांगला शेतस आणि ज्या सदा ऱ्हातस. म्हणून आपला विश्वास ले नका सोळा एनासाठे कि तुमले परमेश्वर ना कळून एक मोठा प्रतीफय भेटो. तुमले विश्वास मा धीर धरी ठेवण अवश्य शे. तव तुमी परमेश्वर नि ईच्छा ले पुरा करी सकश्यात आणि ते सगळ प्राप्त करू सकश्यात जेनी प्रतिज्ञा परमेश्वर नि तुमना संगे करेल शे. कारण कि पवित्र शास्त्र सांगस, कि “आते गैरा कमी टाईम ऱ्हाईजायेल शे, जव कि येणारा ईन आणि उशीर नई कराव.” आणि मना धर्मी झन विश्वास कण जित्ता राहीन, आणि कदी तेस्ना मधून काही मले सोळी देतस, त मना मन तेस्ना कण खुश नई होवाव. पण आमी त्या लोकस मधून नईत ज्या परमेश्वर ले सोळी देवूत आणि नाश हुई जावूत. पण आमी तेस्ना मधून शेतस ज्या परमेश्वर वर विश्वास करतस एनासाठे कि वाचाळामा येवोत. विश्वास त्या गोष्टीस्ना पक्का निश्चय शे, जेस्नी आमी आशा करतस आणि त्या वस्तूस्ना अस्तित्व ना प्रमाण शे, जेस्ले आमी नई देखतस. आमना पूर्वजस्ना विश्वास ह्या प्रकार ना होता, ह्या मुळे परमेश्वर तेस्ना कण खुश होता. परमेश्वर मुळेच आमी समजी जातस, कि पुरा जग नि निर्मिती परमेश्वर ना वचन ना द्वारे हुयेल शे. एनासाठे आमी ते सगळ जे देखतस, तेनी उत्पत्ती देखेल वस्तूसकण नई हुईनी. विश्वास कणच आदाम ना पुत्र हाबेल नि आपला भावू काइन तून उत्तम बलिदान परमेश्वर ना साठे चळाव, आणि त्याच बलिदान ना द्वारे परमेश्वर नि हय साक्ष दिधी कि हाबेल एक धर्मी व्यक्ती शे. कारण कि परमेश्वर तेना बलिदान कण खुश होता, आणि तरी हाबेल मरा नंतर बी आपला विश्वास मुळे आमना शी बोलस. विश्वास कणच हनोख नाव ना व्यक्ती स्वर्ग मा जित्ता उचला मा उना, एनासाठे कि तो मृत्यु ना अनुभव नई करू सको, आणि ह्या मुळे कोणी तेना पत्ता नई लावू सकना. स्वर्ग मा उचला मा येवाना पहिले पवित्र शास्त्र मा परमेश्वर नि हनोख ना बारामा साक्ष दियेल होती, कि तेनी परमेश्वर ले खुश करेल शे. फक्त विश्वासनाच द्वारे परमेश्वर ले खुश करान संभव शे. कारण कि परमेश्वर ना जोळे येनारस्ले विश्वास कराले पाहिजे कि परमेश्वर शे, आणि त्या ज्या तेले खरापणा कण झामलतस, तो तेस्ले तेना प्रतीफय देस. नोहा नाव ना व्यक्ती नि परमेश्वर पासून बाळ ना बारामा जी तेनी कदी देखेल नई होती चेतावणी लिसन, विश्वास कणच परमेश्वर ना आदर करीसन आदन्या मानीसन आपला परिवार ले वाचाळा साठे जहाज बनाव. परिणाम स्वरूप जग ना लोक विश्वास नई करा मुळे दोषी ठरावामा उनात, आणि नोहा ले परमेश्वर पासून ती धार्मिकता भेटणी जी विश्वास द्वारे प्राप्त होस. विश्वास कणच अब्राहाम ले परमेश्वर ना द्वारे बलावामा उन, त तो आदन्या मानीसन त्या जागा ले निघी ग्या जिले परमेश्वर वारसा ना रूप मा तेले देणार होता. तेले माहिती नई हुईसन कि कोठे जान शे आपला देश ले सोळीसन निघी ग्या. त्या जागा वर जेना करार परमेश्वर नि करेल होता, त्या जागा वर अब्राहाम परदेशी बनीसन आपला पुत्र इसहाक आणि नातू याकोब ना संगे ज्या परमेश्वर ना एकच प्रतिज्ञा ना उत्तरधिकारी होतात. आणि त्या तंबूस्मा राहाले लागनात. कारण कि अब्राहाम त्या स्थिर पाया वाला स्वर्गीय नगर नि वाट देखत होता, जेना निर्माण करता आणि बनावनारा परमेश्वर शे. विश्वास मुळेच वय निघी जावावर बी अब्राहाम ले प्रजनन नि शक्ती भेटणी पण सारा बी वांझ होती, तरी बी तेस्ना विचार हय होता कि तेनी करार करेल शे, तो खरा शे. पण तीना नवरा अब्राहम मरेल सारखा होता, तरी बी तो गैरा लोकस्ना पूर्वज बनी गया, जो आकाश ना तारा सारखा असंख्य शे आणि समुद्र तठ नि रेती ना सारखा असंख्य शे. ह्या सर्वा लोक प्रतिज्ञा ना फय बिगर लेवाना फक्त विश्वास करत मरी ग्यात, पण तेस्ले दूर कण देखीसन खुश हुईनात आणि मानी लीधात कि आमी पृथ्वी वर परदेशी आणि बाहेर ना शेतस. ज्या ह्या प्रकार ना गोष्टी सांगतस, त्या हय स्पष्ट करी देतस कि त्या आपला देश ना शोध मा लागेल शेतस. जर त्या त्या देश ना गोष्टीस्ना विचार करतात ज्या त्या मांगे सोळी एयेल होतात त तेस्ले तठे परता नि संद्धी बी होती. पण त्या त एक उत्तम देश म्हणजे स्वर्ग ना शोध मा लागेल होतात, एनासाठे परमेश्वर ले त्या लोकस्वर गर्व होत आणि तेले तेस्ना परमेश्वर म्हणा मुळे लाज नई वाटत होती. कारण कि तेनी त तेस्ना साठे एक नगर नि निर्मिती करेल शे. जव परमेश्वर नि अब्राहाम नि परीक्षा लीधी, त विश्वास मुळे अब्राहम नि आपला पुत्र इसहाक ले बलिदान चळावा ना साठे तयार होता, तोच अब्राहाम जेले परमेश्वर पासून करार भेटेल होता, तरी बी तो आपला एकुलता पुत्र नि बली देवा साठे तयार होता. परमेश्वर तेले सांगेल होत, “इसहाक कणच तुना वंश वाळीन जेनी प्रतिज्ञा मनी करेल होती.” कारण कि अब्राहाम नि मानी लीयेल होत, कि परमेश्वर सामर्थ्यी शे कि इसहाक ले मरेल मधून जित्ता करो. आणि ह्या प्रकारे प्रतिक रूप कण तेनी आपला पुत्र ले परत प्राप्त कर. विश्वास कणच इसहाक नि आपला दोनी पोरस्ले याकोब आणि एसाव ले प्रतिज्ञा करेल गोष्टीस्ना विषय मा आशीर्वाद दिधा. विश्वास कणच याकोब नि मरता टाईम ले योसेफ ना दोनी पोरस मधून एक-एक ले आशीर्वाद दिधा, आणि आपली काळी ना टोक ना सहारा लिसन परमेश्वर नि उपासना करी. विश्वास कणच योसेफ नि जव तो मरा वर होता, सांगेल होत, कि इस्त्राएल देश ना लोक मित्र देश ले सोळीसन निघी जातीन. आणि आठ लगून कि तेनी तेस्ले आदन्या दियेल होती कि जव त्या तठून निघतीन त तेस्ना अस्थीस्ले बी संगे ली जावोत. विश्वास कणच मोशे ना माय-बापस्नि तेले जन्म होवाना नंतर तीन महिना लगून दपाळी ठेवनात. कारण कि तेस्नी देख कि ते बाळ सुंदर शे, आणि त्या राजा नि आदन्या ना उलंघन कराले नई घाबरनात. मिसर देश ना राजा नि पोर नि मोशे न पालन-पोषण कर, आणि जव मोशे मोठा हुईग्या त विश्वासच कण तेनी देख कि लोक तेले फारो नि पोर ना पोऱ्या नई सांगोत. तेनी पाप मा थोळा दिन खुशी लेवा पेक्षा परमेश्वर ना लोक संगे दुख भोगान चांगल समज. तेनी मिसर देश नि धन-संपत्ती पेक्षा ख्रिस्त ना मुळे निंदित होवाले जास्त मूल्यवान समज. कारण कि तेनी नजर भविष्य मा प्राप्त होणारा ईनाम वर लागेल होती. विश्वास मुळेच तेनी मिसर देश ले सोळी टाक. तो राजा फारो ना राग कण भ्यायेल नई होता, पण दृढ बनी ऱ्हायना, समजा जसा तो अदृश्य परमेश्वर ले देखी ऱ्हायंता. विश्वास कणच मोशे नि वल्हांडण ना सन नि विधीस्ना पालन कर, आणि इस्त्राएलीस्ले दरवाजास्ना चौखटस्वर कोकरू ना रक्त ना छीडकाव करानी आदन्या दिधी, एनासाठे कि मृत्यु ना दूत इस्त्राएलीस्ना पहिला जल्मेल पोरस्ना ना जीव नई लेवो. विश्वासनाच मुळे इस्त्राएली लोकस्नी लाल समुद्र ले पार कर, समजा जशी ती सुखी जमीन होती, आणि जव मिसरीस्नी तसच करान प्रयत्न कर, कारण कि समुद्र ना पाणी परत उना आणि त्या बुळी मरणात. जव इस्त्राएली लोकस्नी परमेश्वर वर विश्वास कर आणि यरीहो तठ ना आजुबाजू ले सात दिन लगून चक्कर लाव, त ती भीत पळी गयी. विश्वास कणच राहाव वेश्या बी परमेश्वर नि आदन्या नई मानणारस संगे नाश नई हुईनी, कारण कि तिनी त्या इस्राएली हेरस्ले ज्या यरीहो शहर नि हेरगिरी कराले एयेल होतात तेस्नी शांती कण स्वागत करेल होत. आते मले आखो काही सांगानी गरज नई शे. कारण कि टाईम नई ऱ्हायना, कि गिदोन ना, आणि बाराक आणि शमशोम ना, आणि इफ्ताह ना, आणि दाविद ना आणि शमुवेल ना, आणि भविष्यवक्तास्ना वर्णन करू. एस्नी विश्वासनाच द्वारे राज्यस्ले आपला आधीन करी लीधा. धार्मिकता ना काम करात, प्रतिज्ञा करेल फय ले प्राप्त कर, सिंहस्ना तोंड बंद कर. आग तेस्ले चेटाळू नई सकनी, तलवार तेस्ले मारू नई सकनी, अशक्तपणा मा त्या सशक्त हुईनात. युध्द मा त्या पराक्रमी निघनात आणि विदेश नि फौज ले मारी पयाळ. विश्वासच कण काही बायास्नी आपला मरेलस्ले परत जित्ता देखनात, कितलाक त मार खात-खात मरी ग्यात, पण स्वातंत्र होवाना नई देखनात, एनासाठे कि मरीसन जित्ता होवा नंतर एक चांगला जीवन ना भागी हुई सकुत. काही लोकस्ले चेष्टास्ना आणि फटकास्ना सामना करना पडणा जव कि काही लोकस्ले बेड्यास्कन बांधीसन बंदीगृह मा टाकामा उन. काही लोकस्वर दगळफेक करीसन मारा मा उन. तेस्ले करवतीस्कन कापीसन दोन भाग करामा उन, तेस्ले तलवार कण मारी टाकामा उन. तेस्ले गरीबी ना सामना करन पळेल होतात, तेस्ले दुख देवामा उन आणि तेस्ना संगे वाईट व्यवहार करामा उन. त्या मेंढी-बकरीस्नी कातळीस्ले पांघरीसन ईकळे-तिकळे भटकत ऱ्हायनात तेस्ना साठे जग योग्य साबित नई हुईना. त्या जंगल मा, डोंगरस्वर, गुफास्मा व जमीन ना खड्डास्मा भटकत-दपत ऱ्हायनात. त्या सर्वा आपला विश्वास मुळे परमेश्वर ले खुश करणारा समजामा उनात. तरी बी तेस्ले प्रतिज्ञा ना फय प्राप्त नई हुईना. कारण कि परमेश्वर नि आमना साठे पहिले पासून आखो बी उत्तम योजना बनायेल होती, तेना उद्देश्य हवू होता कि त्या आमना संगेच सिद्धता मा पोहोचोत. एनासाठे विश्वास ना साक्षी अशी मोठी संख्या मा आमना चारी बाजू ले उपस्थित शेतस. त आमी प्रत्येक प्रकार ना अळखळन ले दूर करीसन, आणि त्या पापस्ले सोळीसन जो लक्ष पासून आराम कण आमना ध्यान दूर करी टाकस. धीर कण त्या पया मा पुळे निघत जावो, जीनामा आमले पयन शे. त या आमी येशु वर आपली नजर लायी ठेवूत, जेनावर आमना विश्वास सुरु पासून शेवट लोंग निर्भर करस. तेनी क्रूस मुळे हार नई मानी, पण त्या आनंद ना मुळे जो तेनी वाट देखत होता, तेनी विचार कर कि तो क्रूस वर मराणा अपमान नि फिकर नई करत, आणि तो आते परमेश्वर ना सिंहासन ना उजवा बाजू बठेल शे. एनासाठे त्या येशु ना बारामा विचार करा, जेनी पापीस्ना इतला मोठा विरोध सहन कर, एनासाठे तुमी लोक निराश नका व्हा आणि नईत हार माना. आते लगून तुमले पाप ना विरुद्ध मा झगळा करतांना आपला रक्त नई व्हावाळ पळणा. तुमी त्या उत्साहित करणारा वचनस्ले विसरी जायेल शेतस ज्या परमेश्वर नि तुमले आपला पोरस सारखा सांगेल होता. “ओ मना पुत्र, प्रभु जव तुमले शिस्त लावस त तेनी अनादर नका करज्यात आणि जव तो तुले फटका मारस त हिम्मत नका हारज्यात. कारण कि प्रभु, जेनावर प्रेम करस तेले शिस्त बी लावस, आणि जेले तो आपला पुत्र बनाईलेस, तेले सुधारा साठे दंड बी देस.” तुमी दुख ले परमेश्वर बाप ना अनुशासन समजीसन सहन करील्या, परमेश्वर तुमले पुत्र समजीसन तुमना संगे वागस. प्रत्येक बाप आपला पुत्र ले सुधारा साठे तेले अनुशासित करस. अनुशासित त सर्वा करामा येतस, पण जर तुमी अनुशासित नई करामा एयेल शेतस, त तुमी परमेश्वर ना आपला संतान नई पण अवैध संतान शेतस. मंग जव कि आमना शारीरिक बाप बी आमले दंड देत होतात आणि आमी तेस्ना आदर कर, त मंग आमले आखो बी जास्त आपला आत्मिक बाप ना आधीन मा राहाले पाहिजे कि आमले जीवन भेटो. आमना शारीरिक बाप त आपली समजाना नुसार थोडासा दिनस साठे आमले दंड देत होतात, पण परमेश्वर त हय आमना चांगला साठे करस, कि आमी तेना पवित्रता ना भागी हुई जावूत. ज्या टाईम ले दंड देवामा येस, त्या टाईम ले दंड चांगला नई वाटत, पण तो दुखी लागस. तरी बी ज्या असा दंड ले सहन करत-करत शिस्तीत हुई जायेल शेतस, नंतर तेस्ले आराम कण धार्मिकता ना प्रतीफय प्राप्त होस. एनासाठे आपला ढिल्ला हातस्ले उचला आणि दुर्बळ गुळघास्ले बळकट करा. सरळ रस्तास्वर चालत राहा. तव ज्या आत्मिक रूप कण कमजोर आणि लंगळा तुमना अनुकरण करी ऱ्हायनात, त्या डोलाव नईत आणि नईत पाळावत, पण बळकट हुई जातीन. सर्वास्ना संगे शांती प्रस्थापित करी ठेवा, आणि पवित्र होवा साठे प्रत्येक प्रकार ना प्रयत्न करत राहा, कारण कि बिगर पवित्रता ना कोणी बी प्रभु ले कदीच नई देखाव. सावधान राहा, कदी अस नई होवो कि कोणी परमेश्वर नि कृपा कण दूर ऱ्हाय जावो, कोले बी कळू जळ ना सारखा नका बनू द्या, ज्या तेना जहर ना संगे कईक त्रास ना कारण बनस आणि समस्त समुदाय ले नष्ट करी देवो. अस नई होवो कि कोणी झन, व्यभिचारी, व अब्राहम ना नातू एसाव ना सारखा अधर्मी राहो, जेनी एकच सावाना जेवण ना साठे आपला पयला होवाना पद विकी टाक. तुमले माहित तर शे, कि नंतर जव तेनी आपला बाप पासून आशीर्वाद लेवान देख त अयोग्य समजामा उना, आणि आसा व्हावाळी-व्हावाळीसन आशीर्वाद मांगावर बी जे तेनी करेल होत तेले तो बदलू नई सकना. इस्त्राएल ना लोक असा जागा वर होतात जठे परमेश्वर नि तेस्ले नियम दियेल होता. तुमी सियोन डोंगर ना सारखा जागा वर नई पोहोचनात, जेले देखू सकतस आणि तेले हात लावू सकत होतात. आठे नईत धदकती आग शे आणि नईत काया ढग, नईत दाट अंधार शे आणि नईत आंधी. आणि नईत तुरही ना ध्वनी शे आणि नईत बोलणारा नि वाणी, जेले आयकीसन इस्त्राएली हय विनंती करत होतात कि तो परत आमले काहीच नई सांगो. तेस्नी अस एनासाठे सांग, कारण कि त्या ह्या आदन्या ले घाबरी जायेल होतात जी परमेश्वर नि तेस्ले सांगेल होती, “कदी कोणी वनपशु बी ह्या डोंगर स्पर्श करीन, त तेले दगडफेक करीसन मारी टाकामा ईन.” तो दर्शन असा घाबरावणारा होता, आठ लगून कि मोशे नि बी सांग, “मी गैरा घाबरी आणि कापी ऱ्हायनु.” पण तुमी त्या सियोन डोंगर ना जोळे एयेल शेतस, जठे स्वर्गीय यरूशलेम शे, आणि जो जित्ता परमेश्वर ना नगर शे, जठे असंख्य परमेश्वर ना दूत मियसन खुशी साजरा करतस. तुमी परमेश्वर ना जेष्ठस्नी सभा मा एयेल शेतस, जेस्ना नाव स्वर्ग मा लिखामा एयेल शेतस. तुमी त्या परमेश्वर ना जोळे एयेल शेतस जो सर्वास्ना न्यायाधीश शे, आणि त्या धर्मीस्नी आत्मास्ना जोळे ज्या सिद्ध करामा एयेल शेतस. तुमी येशु ना जोळे एयेल शेतस, जो परमेश्वर आणि आमना मधमा नवा करार ना मध्यस्थ शे. तुमी छीडकाव ना रक्त ना जोळे एयेल शेतस जो हाबेल ना रक्त पेक्षा कईक जास्त चांगल्या गोष्टी सांगस, जो बदला ले सोळीसन दया पुर्वक क्षमा करस. सावधान राहा. आणि ध्यान ठेवा कि जो परमेश्वर गोष्टी करस तुमी कायम तेनी आयका, कारण कि ज्या इस्त्राएली लोकस्नी पृथ्वी वर चेतावणी देणारस्नि वाणी ले आयकीसन तोंड फिराई लीयेल होतात. जव त्या परमेश्वर ना दंड पासून नई वाचू सकनात, त आमी स्वर्ग मधून चेतावणी देणार परमेश्वर ना गोष्टीस पासून तोंड फिराईसन कसा वाचसुत? त्या टाईम ले जव परमेश्वर नि सियोन डोंगर वरून गोष्टी सांगी त तेना शब्दस्नि पृथ्वी ले हालाई टाक. पण आते तेनी हय प्रतिज्ञा करेल शे, कि “एक सावा परत मी फक्त पृथ्वी ले नई, पण आकाश ले बी हालाई टाकसु.” आणि हय वाक्य, “एक सावा आखो” ह्या गोष्टी ले दर्शावस, कि बानायेल वस्तूस्ले हालावामा ईन आणि दूर करामा ईन, एनासाठे कि ज्या वस्तू हालावामा नई येतस, त्या पक्का ऱ्हातस. आमले जो राज्य भेटेल शे, तेले नई हालावामा येवू सकस, एनासाठे आमी परमेश्वर ले धन्यवाद देत राहाले पाहिजे आणि तेनी ईच्छा ना नुसार भक्ती आणि श्रद्धा ना संगे तेनी उपासना करत राहो. कारण कि आमना परमेश्वर आग ना सारखा शे जी आमले भस्म करू सकस. ख्रिस्ती भावू आणि बहिणीस्ना सारखा एक-दुसरास्ना संगे प्रेम करत राहा. बिगर वयख ना लोकस्नी पहोनचारी कराले नका विसरज्यात. कारण कि एना द्वारे कितलाक नि नकळत परमेश्वर ना दूतस्नि पहोनचारी करेल शे. कैदीस्नि अशी सुधी ल्या, कि समजा तेस्ना संगे-संगे तुमी बी कैदी शेतस, आणि जेस्ना वर छळ करामा येस, तेस्नी बी सुधी हय समजीसन लेत जा कि तुमी तेस्ना दुख ले आपला शरीर मा अनुभव करतस. लग्न सर्वा लोकस्मा आदर नि गोष्ट समजामा येवो, आणि विवाहिक जीवन मा एक दुसरा ना संगे विश्वास योग्य बनेल राहा. कारण कि परमेश्वर व्यभिचारीस्ना आणि जारकर्मीस्ना न्याय करीन. तुमना स्वभाव मा धन ना लोभ नई राहाले पाहिजे, आणि जे तुमना जोळे शे तेनाच मा समाधान राहा. कारण कि परमेश्वर स्वता नि सांगेल शे, “मी तुले कदी बी नई सोळाव, आणि नईत कदी बी त्यागाव.” एनासाठे आमी बिगर भ्यावाना सांगतस, “प्रभु मना सहाय्यक शे, मी नई भ्यावाव, माणुस मन काय करू सकस?” ज्या तुमना पुढारी होतात, आणि जेस्नी तुमले परमेश्वर ना वचन आयकाळेल शे, तेस्नी आठवण ठेवा, आणि ध्यान कण देखा कि त्या कसा जगनात आणि कसा मरणात, आणि जसा तेस्नी परमेश्वर वर विश्वास ठेव तसाच तुमी बी विश्वास ठेवा. येशु ख्रिस्त काल आणि आज आणि युगानयुग सारखाच शे, तो कदीच नई बदलत. नाना प्रकार ना विचित्र उपदेशस्ना बहकावामा नका एयज्यात, तुमना मनस साठे हय चांगल शे कि त्या परमेश्वर नि कृपा ना द्वारे दृढ बनोत, नई कि खावाना संबंध ना त्या विधीस्ना पालन करज्यात जेस्ना कण कोलेच काही फायदा नई हुईना. पण आमना जोळे एक वेदी शे जठे उपासना करणारा याजकस्ले बी जेवण कराना काई अधिकार नई शे. पहिला करार ना नुसार महा यहुदी पुजारी प्रत्येक वरीस ले ज्या पशु ना रक्त पाप-बली ना साठे परम पवित्र जागा मा लीजास, त्या पशुस्ना शरीर छावणी ना बाहेरच चेटाळामा एस. ह्या मुळे, येशु नि बी लोकस्ले आपलाच रक्त ना द्वारे पवित्र करासाठे यरूशलेम शहर ना बाहेर दुख उचलना आणि मरी ग्या. एनासाठे, या आमी यहुदी रितीस्ले सोळीसन, येशु ख्रिस्त वर विश्वास करीसन तेस्ना संगे निंदा सहन करूत. कारण कि ह्या जग मा आमना स्थायिक नगर नई, पण आमी एक येणारा नगर नि शोध मा लागेल शेतस. एनासाठे आमी येशु ना द्वारे परमेश्वर ले बलिदान चळावाले नको सोळाले पाहिजे. आणि ते बलिदान आमना ओठस कण निघणारी स्तुती शे, जी तेना नाव ना स्वीकृति करस. पण तुमी लोक चांगल करान, आणि गरजाळूस्नि मदत कराले नका विसरज्यात, कारण कि परमेश्वर असा अर्पणस कण खुश होस. आपला पुढारीस्नी आदन्या माना आणि तेस्ना निर्देशस्ना पालन करा. कारण कि त्या तुमना आत्मा ना चांगला साठे रात-दिन चिंता करतस, आणि तेस्ले आपला कामस्ना लेख परमेश्वर ले देणा पळीन. जर तुमी तेस्नी आयकश्यात त आपला काम खुशी कण करू सकतीन. आणि कदी तुमी नई आयकावत त त्या ह्या काम ले नाराजी कण करतीन आणि एना कण तुमले काही बी फायदा नई होवाव. आमना साठे प्रार्थना करत राहा, आमले विश्वास शे, कि आमना विवेक शुद्ध शे, आणि आमी प्रत्येक परिस्थिती मा जे काही करतस तेना द्वारे आमनी परमेश्वर ना आदर कराना देखतस. प्रार्थना करासाठे मी तुमले आखो बी उत्साहित करस, एनासाठे कि मी तुमना जोळे परत येवू सकू. ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले विनंती करस कि, ह्या प्रोत्साहित करणारा संदेश ले धीर धरीसन आयकी ल्या, कारण कि मी तुमले गैरा संपेक्ष मा लिखेल शे. तुमी हय समजी ल्या कि तीमुथियुस आमना भावू ले सोळामा एयेल शे आणि कदी तो लवकर ईग्या, त मी तेना संगे तुमना संगे भेट करसू. आपला सर्वा पुढारीस्ले आणि सर्वा पवित्र लोकस्ले नमस्कार सांगा. इटली प्रांत ना विश्वासी तुमले नमस्कार सांगतस. तुमी सर्वास्वर परमेश्वर नि कृपा बनेल राहो. आमेन. मी याकोब जो परमेश्वर ना आणि प्रभु येशु ख्रिस्त ना दास शे, त्या यहुदी ख्रिस्ती लोकस्ना बारा जातीस्ले पत्र लिखस ज्या अथा तथा ऱ्हातस आणि नमस्कार करस. ओ मना भावूसहोण, जव तुमी नाना प्रकार नि परीक्षा मा पळतस, त तुमी तिले खुशी नि गोष्ट समजा. कारण कि तुमले माहितच शे, कि तुमना विश्वास ले पारखा वर तुमना धीर वाढत जास. आणि धीर ले आपल पूर काम करू द्या, एनासाठे कि तुमी विश्वास कण सिद्ध हुई जावोत आणि तुमना चांगला स्वभाव मा कोणतीच गोष्ट नि कमी नई राहो. पण कदी तुमना मधून कोले बुद्धी नि कमी शे, त परमेश्वर पासून मांगा, जो बिगर दोष लावाना सर्वास्ले कृपा कण देस, आणि तेले देवामा ईन. आणि बिगर शंका ना विश्वास कण मांगा, कारण कि शंका करस तो समुद्र नि त्या लाठ सारखा शे जी वारा कण वाहत आणि उदलत ऱ्हास. असा विश्वासी ज्या गरीब शे आनंद कराले पायजे कि परमेश्वर नि तेस्ले उच्चा जागा वर बठाळेल शे. जो विश्वासी मालदार शे तेस्ले खुश होवाले पाहिजे कि परमेश्वर नि तेस्ले नम्र करेल शे. कारण कि त्या जंगल ना गवत ना फुल ना सारखा शेतस ज्या नाहीसा हुई जातीन. सूर्य उगताच तेना उन जंगल ना गवत ले सुकाळी देस, आणि तेना फुल झळी जास, आणि तेनी शोभा नष्ट हुई जास, तसाच विश्वासी मालदार बी आपला कामस्ले करतांना समाप्त हुई जाईन. धन्य शे तो माणुस जो आपली विश्वास नि परीक्षा मा स्थिर ऱ्हास, कारण कि जव तो अशी परीक्षा मा खरा निधी जाईन त तेले कायम ना जीवन ना मुकुट भेटीन जो परमेश्वर नि आपला प्रेम करणारस्ले देवाना करार करेल शे. जव कोणी परीक्षा होस, त तो हय नई सांगाले पाहिजे कि हय परीक्षा परमेश्वर कळून शे, कारण कि नईत वाईट गोष्ट कण परमेश्वर कळून परीक्षा होवू सकस आणि नईत तो स्वता कोणी परीक्षा लेस. लोक आपलाच चुकीना ईच्छास मुळे वाईट काम करतस, आणि स्वता परीक्षा मा पळी जातस. मंग ज्या वाईट काम करानी ईच्छा करतस तेना मुळे त्या पाप करी बठतस आणि ज्या माणस पाप करतस, तेस्ना निकाल तेस्ना साठे कायम नि मोत ऱ्हास. ओ मना प्रिय विश्वासी भावूसहोण, धोका नका खायज्यात. कारण कि प्रतेक चांगली भेट आणि उत्तम वरदान स्वर्ग मधून उजायास्ले बनावनारा परमेश्वर बाप कळून भेटतस, परमेश्वर कायम एक सारखाच शे आणि तो सावली सारखा नई बदलत. तेनी आपलीच ईच्छा कण आमले सत्य ना वचन ना द्वारे नवीन जीवन दियेल शे, एनासाठे कि आमी तेनी निर्मिती करेल प्राणीस्ना मधमा पहिला फय ना सारखा महत्वपूर्ण बनो. ओ मना प्रिय विश्वासी भावूसहोण, हय गोष्ट ध्यान मा ठेवज्यात, कि प्रत्येक माणुस आयका साठे तत्पर, आणि बोलामा बागे आणि रागमा मंद पाहिजे. कारण कि जव कोणी माणुस रागे भरस, त तो कोणत्याच प्रकार ना चांगल काम नई करू सकत जेना कण परमेश्वर खुश होवू सकस. एनासाठे तुमी पुऱ्या वाईट सवयस पासून आणि सर्वा दुष्ट व्यवहारस पासून दूर राहा, आणि स्वता ले परमेश्वर ले समर्पित करीसन तेना वचन ले स्वीकार करील्या जो तेनी तुमना मन मा पेरेल शे आणि जो तुमले तारण देवा साठे सामर्थी शे. फक्त परमेश्वर ना वचन ले आयकणाराच नका बना ज्या स्वता ले धोका देतस, पण तेना पालन करणारा बना. कारण कि जो फक्त परमेश्वर ना वचन ले आयकनार शे, आणि तेना पालन करणार नई शे, त तो त्या माणुस सारखा शे जो आपला स्वतानाच तोंड आरसा मा देखस. तो स्वता ले तेनामा बाहेरून देखस, पण हई ईसरी जास कि तो कसा होता. पण तो माणुस जो परमेश्वर ना त्या सिद्ध नियम ना जो लोकस्ले पापस पासून मुक्त करस, सावधानी कण अध्ययन करस, ते जे तेनी आयकेल शे तेले नई ईसरत पण तेनी शिक्षा ना पालन करस, आणि अस करा मुळे परमेश्वर तेले आशीर्वाद दिन. कदी कोणी स्वता ले परमेश्वर ना भक्त समजस आणि आपली जीप वर ताबा नई ठेवस, त तो स्वता ले धोका देस आणि तेनी भक्ती व्यर्थ शे. परमेश्वर बाप ना सोमोर शुद्ध आणि खरी भक्ती हय शे, कि अनाथ आणि विधास्ना दुख मा तेस्नी सुधी लेवो, आणि स्वता ले जग ना वाईट वागणूकस पासून दूर ठेवो. ओ मना विश्वासी भावूसहोण, तुमी आमना महिमामय प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास करणारा लोक शेतस, एनासाठे तुमी पक्षपात पासून दूर राहा. समजा, एक माणुस सोनानी अंगठी आणि चांगला कपळा घालेल तुमनी मंडळी मा एवो आणि एक गरीब बी मळीन आणि चीवळायेल कपळा घालीसन मंडळी मा एवो. आणि तुमी त्या चांगला कपळा वाला ले जास्त मान ना संगे सांगो, “तू आठे चांगली जागा वर बठ,” आणि त्या गरीब ले सांगो, “तू तठे उभा राय,” व मना पायस ना जोळे खाले बठ. काय तुमनी आठे भेतभाव नई कर? काय तुमी वाईट विचार कण न्याय करणार नई बननात? ओ मना प्रिय विश्वासी भावूसहोण ध्यान कण आयका, परमेश्वर नि ह्या जग मा गरीब लोकस्ले निवाळी लीयेल शे, कि त्या विश्वास मा मालदार हुई जावोत आणि तेना राज्य ना भागी हुई जावोत, जेले देवाना करार तेनी आपला प्रेम करणारस्ले करेल शे. पण तुमनी त्या गरीब ना अपमान करेल शे. तुमले माहिती शे कि ज्या मालदार लोक शेतस त्याच तुमना वर अत्त्याचार करतस, आणि त्याच शेतस ज्या तुमले न्यायसाभमा जावाना ना साठे मजबूर करतस. त्या त्याच शे ज्या येशु ख्रिस्त ना चांगला नाव नि निंदा करतस जेना तुमी म्हणावतस. परमेश्वर ना पुस्तक ना वचन प्रमाणे राज्य ना नियम हय शे कि “तू आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम ठेव,” तरी जर खरज त्या नियमले पुरा करतस, त चांगलच करतस. पण कदी तुमी जात-भेद करतस, त पाप करतस, आणि मोशे ना नियम तुमले आरोपी ठरावस. कारण कि जो कोणी मोशे ना नियम ना पालन करस, पण तेस्ना मधून कोणती बी पवित्र शास्त्र नि आदन्या ले माना पासून चुकी जास त तो सर्वा गोष्टीस्मा दोषी ठरस. कारण कि जेनी हय सांग, “तू व्यभिचार नको करजो,” तेनीच हय बी सांग, “तू हत्या नको करजो,” एनासाठे कदी तुनी व्यभिचार त नई कर, पण हत्या करशी तरी बी तुले मोशे ना नियम तुमले आरोपी ठरावस. तुमनी बोलन आणि तुमना व्यवहार त्या लोकस सारखा पाहिजे, जेस्ना न्याय मुक्त करणारा परमेश्वर ना पुस्तक ना प्रमाणे करामा ईन. कारण कि, जेनी दया नई करी, तेना न्याय बिगर दया ना हुईन. दया न्याय वर विजय होस. ओ मना विश्वासी भावूसहोण, कदी कोणी सांगो कि मले प्रभु येशु मा विश्वास शे पण तेना प्रमाणे व्यवहार नई करत, त तेना काय फायदा? काय असा विश्वास कदी तेना तारण करी सकीन? कदी कोणी विश्वासी भावू नईत बहिण ले कपळास्नि गरज शे, आणि तेस्ले दररोज जेवण नि कमी शे. आणि तुमना मधून कोणी तेस्ले सांगो, “परमेश्वर तुमले शांती कण जाव, आणि गरम-गरम कपळा घाला आणि पोट भरीसन खावा,” पण तो तेस्ले शरीर ना साठे गरज वस्तू नई देत, त काय फायदा? कदी कोणा विश्वास कार्य ना द्वारे प्रगट नई होत, त तेना विश्वास मा जीवन नई शे. कोणी सांगस, “तुले विश्वास शे, आणि मी कर्म करस.” पण मी हय सांगस तू आपला विश्वास मले बिगर काम ना त दाखाळ, आणि मी आपला विश्वास आपला कामस्ना द्वारे तुले दाखाळसु. कदी तू विश्वास करस कि एकच परमेश्वर शे, त बर आणि चांगल करस, कारण कि दुष्ट आत्मा बी विश्वास करतस, आणि भीती कण कापतस. पण ओ मूर्ख माणुस काय तुले हय बी नई मालूम, कि बिगर कार्य ना विश्वास व्यर्थ शे? निश्चितच आमना पूर्वज अब्राहाम नि आपला पोऱ्या इसहाक ले वेदी वर चळाव, त तो आपला कामस्कन धर्मी ठरेल होता. तुमी देखतस कि तेना विश्वास तेना कार्य ना संगे सक्रिय होता आणि तेना कार्यस्ना द्वारेच तेना विश्वास सिद्ध हुईना. आणि परमेश्वर ना पुस्तक ना हवू वचन सत्य ठरणा कि, “अब्राहाम नि परमेश्वर वर विश्वास कर, आणि तेना विश्वास मुळे परमेश्वर नि तेले एक धर्मी माणुस ना रूप मा स्वीकार कर,” आणि तो परमेश्वर ना मित्र म्हणायना. त तुमनी देखी लीध कि माणुस फक्त विश्वास कणच नई, पण तो आपला कर्मस्ना द्वारे धर्मी ठरस. तशीच राहाव वेशा बी जव तेनी जासुस्ले आपला घर मा उतार, आणि दुसरा रस्ता कण धाळ, त तिले बी आपला कार्य ना द्वारे धर्मी ठरावामा उणी. जसा शरीर बिगर आत्मा ना मरेल शे, तसाच विश्वास बी बिगर कार्य ना मरेल शे. ओ मना विश्वासी भावूसहोण, तुमी लोकस मधून गैरा शिक्षक नका बना, कारण कि तुमले माहित शे, कि आमी शिक्षकस्ना दुसरास्नी बरोबरी मा जास्त शिस्त कण न्याय करामा ईन. आमी सर्वा गैरा सावा चुकी करी लेतस, पण जर कोणी व्यक्ती आपला सांगेल ना प्रमाणे करस, त कदी चूकीन नई करस, तोच त सिद्ध माणुस शे, आणि तो आपला पुरा शरीर वर बी नियंत्रण करामा सक्षम शे. जव आमी घोळा ना तोंड मा तेले वश मा कराना साठे लगाम लावतस, त आमी तेना पुरा शरीर वर नियंत्रण करी सकतस. मोठा जहाज ना विषय मा विचार करा कदाचित तो इतला मोठा ऱ्हास आणि गैरी हवा कण चालावामा एस, तरी बी एक लहान शी सुकाण ना व्दारे फिरावामा एस आणि सुकानदार ना ईच्छा प्रमाणे जास. तशीच जीप बी एक लहान आंग शे आणि मोठ्या-मोठ्या गोष्टी करस. कसा, थोळीच विस्तो कण कितला मोठा जंगल मा आग लागी जास. जीप बी एक आग ना सारखी शे, हय शरीर ना तो भाग शे जीनामा दृष्टता भरेल शे जी आपला पुरा शरीर आणि पुरा जीवन ले नाश करू सकस, हय ती आग शे जी नरक मधूनच एस. प्रत्येक प्रकार ना वनपशु, पक्षी, आणि जमीन वर सरपट नारा जंतू आणि पाणी मा राहणारा जलचर ले बी वश मा करू सकतस आणि माणुस जाती नि तेले वश मा करी बी लीयेल शे. पण जीप ले माणुस मधून कोणीच वश मा नई करी सकस, ती एक अशी अनावर शे जी कदीच थांबतच नई, आणि प्राणघातक विष कण भरेल शे. जीभ कणच आमी प्रभु आणि परमेश्वर बाप नि स्तुती करतस आणि एनाच कण आमी माणसस्ले श्राप बी देतस, ज्या परमेश्वर ना स्वरूप मा बनायेल शेतस. एकच तोंड कण स्तुती आणि श्राप दोनी निघतस. ओ मना विश्वासी भावूसहोण, अस नई होवाले पायजे. झरा मधून एकच टाईम ले गोळ आणि खारा पाणी नई निघतस. ओ मना विश्वासी भावूसहोण, अंजिर ना झाळ मधून जैतून, आणि द्राक्ष नि फांदी ले अंजिर नई लागू सकस, तसाच खारा पाणी नि झरा मधून गोळ पाणी नई निघू सकस. तुमना मा ज्ञानी आणि समजदार कोण शे? जर तुमी शेतस, त तुमी एले चांगला जीवन जगाना द्वारे आणि त्या नम्रता संगे चांगला कामस्ना द्वारे जी ज्ञान कण उत्पन्न होस, प्रगट करा. पण कदी तुमी आपला मन मा मोठी ईर्ष्या आणि स्वार्थ ठेवतस, त मोठी-मोठी गोष्टी नका करज्यात आणि नईत सत्य ना विरोध मा खोट बोलज्यात. हवू ज्ञान तो नई, जो परमेश्वर कळून उतरस पण हवू त संसारिक, शारीरिक आणि द्रुष्ट आत्मास कळून शे. एनासाठे कि जठे ईर्ष्या आणि स्वार्थ ऱ्हास, तठे अव्यवस्था आणि प्रत्येक प्रकार ना कुकर्म बी ऱ्हास. पण जो ज्ञान परमेश्वर कळून एस तो पहिले त पवित्र ऱ्हास आणि सामंजस्य, सौम्य आणि समजूत आणि दया, आणि चांगला कामस कण भरेल ऱ्हास आणि पक्षपात आणि कपट तेनामा नई ऱ्हास. ज्या भेट कराव नारा शे त्या शांती ना बीज ले पेरतस आणि धार्मिकता ना फय कापतस. तुमना मा झगळा आणि भांडण तुमना वाईट आणि स्वार्थ स्वभाव कण एस ज्या तुमना मधमा भांडण करतस. तुमी आपली लालूस पुरी नई करू सकतस आणि एनाच साठे हत्या करतस. तुमी ज्या वस्तू साठे हेवा करतस. ती तुमले नई भेटत एनासाठे झगळा आणि भांडण करतस. तुमी प्रार्थना नई करतस, एनासाठे तुमी लोकस जोळे काहीच नई राहात. तुमी मांगतस तरी बी तुमले भेटत नई, कारण कि वाईट ईच्छा कण मांगतस, आणि तुमी फक्त आपली वाईट ईच्छा पुरी करासाठे वापर कराना देखतस. ओ व्यभिचारणीस्ना सारखा व्यवहार करणारा लोकोसहोण, काय तुमले नई माहिती, कि संसार कण मित्रता करान म्हणजे परमेश्वर संगे बैर करन शे? एनासाठे जो कोणी संसार ना मित्र होवाना देखस, तो स्वता ले परमेश्वर मा वैरी बनावस. काय तुमी पवित्र शास्त्र वर संशय करतस जेनामा लिखेल शे कि, “ज्या आत्मा ले परमेश्वर नि आमना मधमा ठीयेल शे, ती अशी लालूस करस, जेना फय ईर्षा शे?” पण तो आमले ह्या प्रकार ना वाईट ईच्छा ना विरुद्ध उभा होवाना साठे आखो कृपा देस, एनामुळे पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “परमेश्वर गर्व वालास्ना संगे विरोध करस, पण दीनस्वर कृपा करस.” एनासाठे परमेश्वर ना आधीन हुईजावा, आणि जे सैतान तुमले करावान देखस तेले मना करा, त तो तुमना जोळून पईजाईन. परमेश्वर जोळे या, त तो बी तुमना जोळे ईन. ओ पापीसहोण, तुमना जीवन मधून पाप ले दूर करी द्या, आणि ओ दोन मन ना लोकसहोण, हृदयस्ले पवित्र करा. पापस्ना साठे दुखी व्हा, रळा, आणि शोक करा. तुमन हसन दुख मा आणि तुमनी खुशी उदासी मा बदली जावो. प्रभु ना समोर नम्र बना, त तो तुमले उच्चा करीन. ओ विश्वासी भावूसहोण, एक दुसरा नि निंदा नका करा, जो आपला भावू ना बारामा वाईट बोलस, व भावू वर दोष लावस, तो मोशे ना नियम नि निंदा करस आणि मोशे ना नियम ना न्याय करस. कदी तू मोशे ना नियम ना न्याय करस, त तू मोशे ना नियम ना पालन करणार नई, पण न्याय करणार बनी बठस. नियम देणार आणि न्यायाधीश त एकच तो परमेश्वर शे, जेना कण वाचाळानी आणि नाश करानी सामर्थ्य शे, पण तू आपला शेजारी नि निंदा आणि न्याय काब करस? तुमी जे हय सांगतस, “आज व कालदिन आमी कोणी दुसरा नगर मा जाईसन तठे एक साल काळी टाकसुत, आणि व्यापार करीसन फायदा उचलसुत.” पण हय नई समजतस कालदिन काय हुईन आयकी त ल्या, तुमना जीवन शेच काय? तुमी त समजा वाफ सारखा शेतस, जी थोळा टाईम दिखस, नंतर गायब हुई जास. एनातून तुमले दुसर हय सांगाले पाहिजे, “कदी प्रभु नि ईच्छा शे त आमी जिंदा राहासुत, आणि हय काय ते काम बी करसुत.” पण आते तुमी आपली अहंकारी योजनास्वर गर्व करतस, असा प्रकार ना सर्वा गर्व वाईट ऱ्हास. एनासाठे जो कोणी चांगल देखस आणि नई करस, तेना साठे हय पाप शे. ओ मालदासहोण आयका, तुमी लोकस्ले रळाले आणि दुखी होवाले पाहिजे, कारण कि क्लेश तुमना वर ईपळनार शेतस. तुमना धन नाश हुई जायेल शे आणि तुमना कपळास्ले किळा लागी जायेल शेतस. तुमना सोना चांदी मा जंग लागी जायेल शे, आणि ज्या दिन परमेश्वर तुमना न्याय करीन त्या दिन तो जंग तुमना विरोध मा साक्षी दिन, आणि नरक ना आग ना सारखी तुमना नाश करीन. तुमी आखरी दिनस्मा धन एकत्र करी लीयेल शेतस. आयका, ज्या मजुरस्नि तुमना वावर कापेल शेतस, तेस्नी मजुरी जी तुमनी तेस्ले नई दिधी, त्या मजुर परमेश्वर ना जोळे आराया मारी ऱ्हायनात, आणि त्या मजूरस्ना रळाना आवाज सैन्यस्ना परमेश्वर नि आयकी लीयेल शे. तुमी लोकस्नी पृथ्वी वर सुख आणि विलास ना जीवन जगेल शेतस, आणि ह्या प्रकारे तुमी स्वता साठे परमेश्वर ले न्याय कराना साठे तयार करेल शेतस. तुमना काहीच विरोध नई करना तरी बी धर्मी ले तुमी दोषी ठराईसन मारी टाकेल शेतस. एनासाठे विश्वासी भावूसहोण, प्रभु ना एवा लगून धीर धर, जसा शेतकरी जमीन ना मोलवान पिकस्नी वाट देखतांना पहिला आणि शेवटला पाऊस होता लगून धीर धरस. त्याच प्रकारे तुमी बी धीर धरा, आणि हिम्मत ठेवा, कारण कि प्रभु लवकरच येणार शे. ओ विश्वासी भावूसहोण, एक दुसरा वर दोष नका लावा कारण कि तुमी बी दोषी नई ठरोत, देखा, न्यायाधीश येवावर शे. ओ विश्वासी भावूसहोण, ज्या भविष्यवक्तास्नी प्रभु ना नाव कण गोष्टी करी, तेस्ले दुख उचलाले आणि धीर धराना एक आदर्श समजा. देखा, आमी धीरज धरणारस्ले धन्य सांगतस. तुमी ईयोब ना धीर ना बारामा त आयकेलच शेतस, आणि प्रभु कळून जो तेना फय भेटणा ते बी माहिती शे, जेना कण प्रभु नि अत्यंत कृपा आणि दया प्रगट होस. पण ओ विश्वासी भावूसहोण, सर्वास्तून खास गोष्ट हय शे, कि शेप्पत नका खायज्यात, नईत स्वर्ग नि नईत पृथ्वी नि, नईत कोणती वस्तू नि, पण तुमन बोलन हा त हाच, आणि नईत नईच पाहिजे, कारण कि तुमी परमेश्वर ना दंड ना योग्य नई ठरोत. कदी तुमना मधून कोणी संकट मा शे, त तो प्रार्थना करो, कदी खुश हुईन, त तो स्तुती ना गान म्हणो. कदी तुमना मा कोणी रोगी शे, त मंडळी ना वरिष्ठ ले बलावा, आणि त्या प्रभु ना नाव कण तेनावर तेल लाईसन तेना साठे प्रार्थना करोत. आणि विश्वास नि प्रार्थना ना व्दारे रोगी वाची जाईन आणि परमेश्वर तेले चांगला करीन, कदी तेनी पाप बी करेल हुईन, त परमेश्वर तेले माफ करीन. एनासाठे तुमी आपस मा एक दुसरा ना समोर आपला आपला पापस्ले कबूल करील्या, आणि एक दुसरा साठे प्रार्थना करा, जेना कण बरा हुई जावोत, धर्मीजन नि प्रार्थना कण गैर काही होवू सकस. एलीया भविष्यवक्ता बी त आमना सारखा दुख-सुख भोगणार माणुस होता, आणि तेनी आपला पुरा मन कण प्रार्थना करना, कि पाऊस नई पळो, आणि साळे तीन वरीस लगून जमीन वर पाऊस नई पळणा. नंतर तेनी प्रार्थना करी, त आकाश मधून पाऊस पळणा, आणि जमीन पिकदार हुईनी. ओ मना विश्वासी भावूसहोण, कदी तुमना मा कोणी सत्य ना रस्ता ले सोळी देस, आणि जर कोणी तेले पश्चाताप कराले मदत करस, त तुमले हय समजी लेवाले पायजे, कि जो कोणी पापी ले चुकीना रस्ता वरून परत लयस, तो तेनी आत्मा ले मोत पासून वाचाळस, अस कराना द्वारे तेना गैरा पाप झाकामा येतस. मी पेत्र, येशु ख्रिस्त ना प्रेषित, हय पत्र त्या परदेशीस्ना नाव वर लिखस, ज्या पंत, गलतिया प्रांत, कप्पदूकीया, आशिया प्रांत आणि बेथानी प्रांत मा अथा तथा हुईसन ऱ्हातस. परमेश्वर बाप नि आपली ईच्छा ना नुसार तुमले आणि पवित्र आत्मा ना कामस्ना कार्यस्ना द्वारे तुमले पवित्र बनावा साठे गैरा पहिले निवाळी लीयेल होत. हय तेनी एनासाठे कर कि तुमी येशु ख्रिस्त नि आदन्या ले मानोत आणि तेना रक्त ना द्वारे शुद्ध करामा येवोत. मी प्रार्थना करस कि परमेश्वर नि कृपा आणि शांती तुमले विपुलता कण भेटत राहो. आमना प्रभु येशु ख्रिस्त ना बाप आणि परमेश्वर ना धन्यवाद होवो, कारण कि तेनी आपली महान दया कण येशु ख्रिस्त ले मरेल मधून परत जित्ता करीसन, आमले विश्वास कण नवा जीवन नि आशा दियेल शे. आणि एनासाठे आमी त्या महान मिरास ले प्राप्त करानी वाट देखतस जी परमेश्वर आपला लोकस साठे ठीयेल शे. तो तुमना साठे तेस्ले स्वर्ग मा ठेवस, जठे नईत ती सळु सकस, नईत खराब होवू सकस आणि नईत समाप्त होवू सकस. कारण कि तुमी येशु वर विश्वास करतस, एनासाठे परमेश्वर तुमले आपली मोठी सामर्थ्य ना द्वारे सुरक्षित ठेवस, आणि तो तुमले ख्रिस्त ना दुसरा सावा येवाना दिन लगून वाचाळी सन ठेवीन. तुमले ह्या सर्वा गोष्टी मुळे खुश होवाले पाहिजे, जरी काही टाईम ना साठे तुमी नाना-प्रकार ना परीक्षास्ना मुळे दुख मा शेतस, ह्या अडचणीस्ना उद्देश्य हय शे कि तुमना परमेश्वर वर विश्वास परीक्षा ना द्वारे खरा निघो. येशु ख्रिस्त मा तुमना विश्वास सोना तून गैरा मूल्यवान शे. जसा कि नाश होणारा सोना आग मा तपाळी सन परखा मा व युध्द करामा येस, तसाच जर तुमना विश्वास नाना-प्रकार ना परीक्षास्ना द्वारे परखा मा ईसन पक्का निघो, त हय तुमना साठे ख्रिस्त येशु ना दुसरा सावा येवाना दिनस्मा प्रशंसा, महिमा आणि आदर ना कारण ठरीन. तुमनी येशु ले कदीच नई देख, पण तरी बी तुमी तेनावर प्रेम ठेवतस. तुमी तेले आते नई देखतस, पण तुमी तेनावर विश्वास ठेवतस. एनासाठे, तुमी असा खुश आणि मग्न होतस, जो वर्णन तून बाहेर आणि महिमा कण भरेल शे. तुमी खुश शेतस, कारण कि तुमनी आत्मा कायम ना साठे पाप ना दंड पासून वाचाळामा येस. ख्रिस्त येशु मा हवू तुमना प्रतीफय शे. ह्या तारण ना बारामा भविष्यवक्तास्नी गैर काही समजान देख. तेस्नी तुमी परमेश्वर कळून भेटणारी कृपास्ना बारामा भविष्यद्वाणी करेल होती. ख्रिस्त नि आत्मा त्या भविष्यवक्तास्मा वास करत होता आणि पहिले पासूनच तो ख्रिस्त ना दुख भोगाना व एना नंतर येणारी महिमा ना बारामा तेस्ले सांगत होता. भविष्यवक्ता हय समजाना देखत होतात कि आत्मा कोणता टाईम ले आणि कोणत्या परिस्थितीस्ना कळे संकेत करी ऱ्हायना शे. पण परमेश्वर नि त्या भविष्यवक्तास्ले सांग कि हवू संदेश फक्त स्वताच साठे नई पण तुमना साठे शे. तो संदेश ख्रिस्त येशु ना विषय मा सुवार्ता शे जिले तुमी आते आयकतस. परमेश्वर नि पवित्र आत्मा ले स्वर्ग मधून धाळ कि सुवार्ता आयकाळा मा लोकस्नी मदत करो, हय सगळ काही इतला अदभूत शे कि ह्या गोष्टीस्ले स्वर्गदूत बी ध्यान कण देखानी ईच्छा ठेवतस. एनासाठे, आपला मन ले तयार करा, जसा लोक काम करासाठे आपली कंबर ले कशीसन तयार करतस. तुमी संयमी बनेल राहा आणि ती कृपा नि पुरी आशा करा, जी येशु ख्रिस्त ना प्रगट होवावर तुमले भेटीन. परमेश्वर नि आज्ञा ना पालन करा कारण कि तुमी तेना पोर शेतस, त्या वाईट कामस्ले करणारा नका बना जेस्ले तुमी तव कराना देखत होतात, जव तुमी परमेश्वर ना सत्य ले नई वयखत होतात. पण जसा तुमना बलावणार परमेश्वर पवित्र शे, तसाच तुमी बी आपला पुरा वागणूक मा पवित्र बना. कारण कि शास्त्र मा लिखेल शे, “पवित्र बना, कारण कि मी पवित्र शे.” जव तुमी प्रार्थना करतस, परमेश्वर ले ओ बाप, सांगीसन हाक मारतस. पण आठवण ठेवा कि तो बिगर भेतभाव ना प्रत्येक माणुस ना न्याय तेना कामस्ना नुसार करस. एनासाठे जव तुमी परदेशीस्ना सारखा ह्या पृथ्वी वर ऱ्हातस, त तुमी तेना मोठा आदर करत जीवन जगा. परमेश्वर नि जग नि निर्मिती ना पहिले, येशु ख्रिस्त ले मुक्तिदाता ठराव. आणि ह्या आखरी युगमा तुमनी मदत साठे प्रगट हुईना. ख्रिस्त नि जे काही कर, तेना व्दारे तुमी परमेश्वर वर विश्वास करतस. कारण कि तेनी ख्रिस्त ले मरेल मधून परत जित्ता कर आणि तेले महिमा दिधी एनासाठे तुमी परमेश्वर वर विश्वास आणि आपली आशा ठेवतस. कारण कि तुमी सत्य ना पालन कराना द्वारे शुद्ध करामा एयेल शेतस, त आते तुमले आपला विश्वासी भावूस्ना संगे निष्कपट प्रेम कराले पाहिजे. त तन-मन लाईसन एक दुसरा वर पुरा मन कण प्रेम ठेवा. कारण कि तुमले परमेश्वर पासून नवा जीवन भेटेल शे. तुमले हय जीवन कोणत्या नाश होणारा वस्तू कण नई पण कायम लगून राहाणारा तत्व पासून भेटेल शे, आणि तो तत्व परमेश्वर ना जीवन आणि कायम लगून ऱ्हायनारा वचन शे. कारण कि शास्त्र मा लिखेल शे, “प्रत्येक प्राणी गवत ना सारखा शे, आणि तेनी सर्वी शोभा गवत ना फुल ना सारखा शे. गवत सुखी जास आणि फुल गई जातस. पण प्रभु ना वचन युगानयुग स्थिर ऱ्हास.” आणि हईच ख्रिस्त ना विषय मा सुवार्ता ना वचन शे जो तुमले आयकाळा मा एयेल होता. एनासाठे सर्वा प्रकार ना वाईट व्यवहार सोळी द्या. दुसरास्ले धोका नका द्या, कपटी नका बना, दुसरास्ना संगे हेवा नका ठेवा, कोणा विरुद्ध मा वाईट गोष्ट नका करा. जसा नवा जल्मेल पोऱ्या आपली माय ना युध्द दुध नि ईच्छा ठेवस, तसाच तुमी परमेश्वर ना वचन ले आयकानी ईच्छा ठेवा, जेना कण तुमी परिपक्व हुई जावोत. तव परमेश्वर तुमले या जग ना वाईटस पासून वाचाळीन. कारण कि शास्त्र अस सांगस, “कारण कि तुमनी प्रभु ना चांगुलपणा ना स्वाद चाखी लीयेल शे.” हय असच शे जस परमेश्वर नि आपला पुस्तक मा सांगेल शे, “देखा, मी कोणी असा ले जो कोनशील दघळ ना सारखा शे सियोन शहर मा ऱ्हास. जो पाया उभा करासाठे निवाळा मा एयेल शे. जो कोणी तेनावर विश्वास करीन, तो कोणत्याच प्रकारे लज्जित नई होवाव.” हवू दघळ तुमी लोकस साठे मूल्यवान शे ज्या प्रभु येशु ख्रिस्त वर विश्वास करतस. पण ज्या तेनावर विश्वास नई करतस तेस्ना साठे पवित्र शास्त्र हय सांगस, “ज्या दघळ ना वापर करा कण राजमिस्त्रीस्नी नकार करी टाक, तोच दघळ पाया उभा कराले सर्वास्तून महत्वपूर्ण ठरणा.” आणि पवित्र शास्त्र परत सांगस, “तो असा दघळ शे जेना कण लोकस्ले ठेस लागस, असा खळक शे जेना कण त्या ठोकर खातस.” तेस्नी वचन वर विश्वास करानी ईच्छा नई, एनासाठे त्या ठोकर खाईसन पळी जातस. परमेश्वर नि तेस्ले एनासाठे ठराव कि तेस्ना संगे असच होवो. पण तुमी असा नई शेतस, तुमी परमेश्वर नि निवाळेल प्रजा शेतस, तुमी राजकीय यहुदी पुजारी-वर्ग शेतस. तुमी परमेश्वर ले समर्पित करेल लोक शेतस, आणि परमेश्वर नि निजी प्रजा शेतस. तेनी तुमले आंधारा मधून आपला अदभूत उजाया मा बलायेल शे, एनासाठे कि तुमी परमेश्वर ना अदभूत कामस्ले प्रगट करी सकोत. पहिले तुमी परमेश्वर ना लोक नई होतात, पण आते परमेश्वर ना लोक शेतस. पहिले तुमी परमेश्वर नि कृपा ले नई वयखत होतात, पण आते तुमी तेले वयखतस कारण कि तेनी पहिले पासूनच आपली दया तुमना वर प्रगट करेल शे. ओ विश्वासीसहोण, मी तुमले विनंती करस कि तुमी स्वता ले बाहेर देश ना आणि प्रवासी समजीसन त्या जगिक वासनास पासून वाचीसन राहा ज्या आत्मा ना संगे युध्द करतस. दुसऱ्या जातीस्ना मधमा तुमी लोकस्ना वागणूक चांगल राहो. एनासाठे कि ज्या-ज्या गोष्टीस्मा त्या तुमले कुकर्मी सांगीसन तुमनी निंदा करतस, त्या तुमना चांगला कामस्ले देखीसन ख्रिस्त ना दुसरा सावा येवाना दिन परमेश्वर नि महिमा करतीन. प्रभु ना आदर मुळे, तुमी ह्या संसार ना ठरायेल शासकस्ना आधीन मा राहा, म्हणजे राजा ना जो सर्वास्तून उच्चा अधिकारी शे. आणि राज्यपालस्ना आधीन राहा. कारण कि त्या कुकर्मीस्ले दंड देवा साठे आणि चांगला कामस्ले करणारस्नि प्रशंसा करासाठे राजा ना कळून धाळामा एयेल शेतस. कारण कि हय परमेश्वर नि ईच्छा शे, कि आमना चांगला कामस्ना द्वारे, त्या लोक ज्या परमेश्वर ले नई वयखतस त्या आमना वर खोटा आरोप लावानी हिम्मत नई करावत. आते तुमी पाप ना दासत्व मा नईत, कारण कि आमना प्रभु येशु ख्रिस्त नि तुमले पहिलेच स्वतंत्र करी टाकेल शे. पण ह्या स्वातंत्रता ले वाईट ना साठे आळ नका बनावज्यात, पण आपला कामस्ना द्वारे हय प्रगट करा कि तुमी परमेश्वर ना खरा दास शेतस. सर्वास्ना आदर करा, सर्वा विश्वासी भावूस्वर प्रेम ठेवा, परमेश्वर ले भ्या, राजा ना सन्मान करा. ओ विश्वासी सेवकसहोण, तुमी ज्या घरस्मा काम करतस, तुमी आपला मालकस्नी आदन्यास्ना पालन करा आणि तेस्ना आदर करा. असा सर्वा मालकस्ना संगे करा, भले तो चांगला राहो, नम्र राहो कि कठोर राहो. कारण कि जर आमी परमेश्वर ना विचार करीसन अन्याय कण दुख उचलत क्लेश सहन करतस, त हय परमेश्वर ले आवळस. कारण कि आमले माहित शे कि परमेश्वर नि ईच्छा हईच शे, आणि परमेश्वर आमना शी खुश होस. पण कदी तुमी चूकीन करा मुळे दुख सहन करतस, त एनामा कोणतीच चांगली गोष्ट नई. पण जर चांगला काम ना साठे दुख भोगतस आणि धीर धरतस, त हय परमेश्वर ले आवळस. परमेश्वर ना द्वारे बलावामा येवाना एक आखो उद्देश हय बी शे, कि तुमी तेना साठे दुख भोगोत. कारण कि ख्रिस्त नि बी तुमी लोकस्ना साठे दुख भोगीसन तुमले एक उदाहरण दिधा कि तुमी बी तेना पद चिंन्हस्वर चाली सकोत. पवित्र शास्त्र सांगस, “नईत तेनी पाप कर आणि नईत तेना तोंड कण कपट नि कोणती गोष्टी निघनी.” जव लोक येशु ना अपमान करणात, त तो बदला मा तेस्ना अपमान नई करना. जव लोक तेले दुख दिनात त बदला मा तेनी तेस्ले धमकी नई दिधी. पण परमेश्वर वर विश्वास ठेव, कारण कि तेले माहिती होत कि परमेश्वर सत्यता कण सर्वास्ना न्याय करस. जव ख्रिस्त मरणा, त तो आमना पापस्नी शिक्षा आपला शरीर मा लिसन क्रूस वर चळी ग्या. तेनी अस एनासाठे कर कि आमी पाप करान सोळीसन धार्मिकता ना साठे जीवन जगोत. आणि तेनाच मार खावा कण तुमी बरा हुईनात. तुमी पहिले दवळेल मेंढ्यास्ना सारखा होतात, पण आते आपला जीव ना मेंडपाळ आणि अध्यक्ष म्हणजे ख्रिस्त ना जोळे परती एयेल शेतस. प्राचीन काय मा बाया बी, ज्या परमेश्वर वर आशा ठेवत होत्यात, आपला-आपला नवरा ना आदन्या ना पालन करीसन स्वता ले सुंदर बनावत होत्यात. जशी सारा अब्राहाम नि आदन्या मानत होती आणि तेले स्वामी सांगत होती. असाच जर तुमी दुसरास्ना संगे चांगल करश्यात आणि कोणत्या प्रकार नि भीती कण भयभीत नई होवावत, त तुमी सारा ना पोरी ठरशात. तसाच ओ नवरासहोण, तुमी बी समजदारी कण आपल्या बायकास संगे जीवन जगा, आणि तेस्नी मदत कराना विषय मा विचार करा. तुमी हय गोष्ट ध्यान मा ठेवा कि ती तुमना तून कमजोर शे, एनासाठे तुमी तेस्ना सन्मान करा. कारण कि तुमी दोनी परमेश्वर ना द्वारे देवामा एयेल कृपा ना वारीस शेतस, अस करश्यात, त परमेश्वर तुमनी प्रार्थना आयकिन. म्हणून मनी तुमले हय सांगानी ईच्छा शे, कि तुमी सर्वान सर्वा एक मन आणि एक-दुसरा ना साठे सहानुभूती ठेवा. एक-दुसरा ना संगे भावू-बहिण ना सारखा प्रेम ठेवा. एक-दुसरा ना प्रती कनवाळू आणि नम्र बना. वाईट ना बदला मा वाईट नका करा, आणि नईत गाई ना बदला मा गाई द्या, पण एना बदला मा आशीर्वादच द्या, अस करा साठेच तुमी बलावामा एयेल शेतस एनासाठे कि तुमले परमेश्वर पासून आशीर्वाद भेटी सको. कारण कि पवित्र शास्त्र सांगस, “जो व्यक्ती आपला जीवन सुख लेवाना देखस आणि चांगला दिन देखाना देखस, तो सावधान राहो कि तोंड कण काही वाईट गोष्ट नई निघो, आणि तो कोणा संगे कपट नई करो. तो वाईट कराना सोळो, आणि तेना बदला मा चांगलच करो. तो दुसरास संगे सामंजस्य कण राहाणा प्रयत्न्य करो. कारण कि ज्या चांगला काम करतस तेस्ना कळे परमेश्वर ना डोया लागेल ऱ्हातस आणि तेस्ना प्रार्थनास कळे कायम तेना कान लागेल ऱ्हातस. पण परमेश्वर वाईट काम करणारस पासून तोंड फिराय लेस.” जर तुमी कायम चांगल काम कराना प्रयत्न्य करत राहाश्यात, त कोणीच तुमले नुकसान पोहोचाळू नई सकत. पण कदी तुमी धार्मिकता ना कार्य मुळे दुख बी उचलश्यात, त तुमी खरज धन्य शेतस. एनासाठे कदी कोणी तुमले धमकावस, त तेस्ले नका भ्यावा आणि नईत तेस्ले घाबरा. पण ख्रिस्त ना साठे आपला हृदय मा श्रद्धा ठेवा आणि तेले प्रभु समजीसन तेना आदर करा, आणि कदी कोणी तुमले तुमनी आशा ना बारामा काही विचारस, तेस्ले सौम्यता आणि आदर कण उत्तर देवा साठे कायम तयार राहा. आपला विवेक शुद्ध ठेवा, एनासाठे कि ज्या तुमी लोकस्ले बदनाम करतस आणि तुमना चांगला ख्रिस्ती वागणूक ना निंदा करतस, तेस्ले लज्जित होण पळीन. जर परमेश्वर नि हईच ईच्छा शे, त वाईट करा मुळे दंड भोगा पेक्षा, चांगल करा मुळे दुख भोगान गैर चांगल शे. मी अस एनासाठे सांगस, कारण कि ख्रिस्त नि बी एकच सावा सर्वा लोकस्ना पाप प्रायश्चित साठे दुख सहन कर, तो एक सावा मारा मा उना. तो धर्मी व्यक्ती होता जो अधर्मीस साठे मरणा एनासाठे कि तो आमले परमेश्वर ना जोळे पोहोचाळो. तो शरीर ना भाव कण मारा मा उना पण पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण परत जित्ता करामा उना. तव तेनी आत्मा नि त्या जागा वर जठे मरेलस्नि आत्मा परमेश्वर ना द्वारे कैद करामा एयेल शे, जाईसन त्या आत्मास्ले प्रचार कर. हय त्या लोकस्नी आत्मा शे जेस्नी पयला टाईम मा परमेश्वर नि आदन्या नई मानी. जव नोहा जहाज बनाई ऱ्हायंता, तव परमेश्वर नि धीर धरीसन ह्या लोकस्नी वाट देखत होता कि ह्या लोक पश्चताप करतीन. पण फक्त आठ लोकच भयानक सुनामी मा बुळा पासून वाचनात. हय बाप्तिस्मा ना प्रतिक शे, जो आते तुमना तारणार शे. बाप्तिस्मा ना अर्थ शरीर ना मय धोन नई, पण शुद्ध हृदय कण स्वता ले परमेश्वर ना प्रती समर्पित करान शे. हवू बाप्तिस्मा येशु ख्रिस्त ना पुनरुत्थान ना द्वारे आमना तारण करस. आणि तो स्वर्ग मा उचलाई ग्या. तठे तो परमेश्वर नि उजवी कळे बठेल शे, आणि सर्वा स्वर्गदूतस्वर, अधिकारीस्वर, आणि शक्तीस्वर अधिकारी शे. एनासाठे, जव कि ख्रिस्त नि शरीर मा ऱ्हायसन दुख उचल, त तुमी बी तीच भावना कण तेना सारखा दुख उचला साठे तयार राहा, कारण कि कदी तुमी ख्रिस ना साठे दुख उचलानी ईच्छा ठेवतस, त तुमनी पाप ले सोळी दियेल शे. परिणाम स्वरूप, तुमी ह्या जग मा आपला बाकी शारीरिक जीवन आपला पापमय स्वभाव ना वासनास्ले पुरा करामा नई व्यतीत कराव, पण तुमी परमेश्वर नि ईच्छा पुरी करा. कारण कि पहिला काय मा तुमी लोकस्नी दुसरा जातीस्ना ईच्छा ना नुसार काम करा मुळे जीवन व्यर्थ करणात. तुमनी आपला जीवन कामातुरपणा आणि वासनास्मा, दारूबाजी, रंगेलपण, बेवडापणा, आणि तेस्नी मूर्तीस्ले पूजा करामा तेना संगे परमेश्वर घृणा करस, बिताळ. एनासाठे तुमना जुना मित्र, जव तुमी तेस्ना वाईट कामस्मा साथ नई देतस त चकित होतस, एनासाठे त्या तुमले बर-वाईट सांगतस. पण एक दिन त्या निश्चितच परमेश्वर ना समोर प्रत्येक ले तेस्ना पृथ्वी वर करामा एयेल कामस्ना बारामा हिसाब-किताब देणा पळीन. आणि तो जित्ता आणि मरेलस्ना न्याय करीन. हईच कारण शे कि मरेलस्ले बी ख्रिस्त नि सुवार्ता आयकाळा मा उना. तेस्नी शरीर मा त माणुस ना सारखा दंड ना अनुभव कर आणि मरी ग्यात, पण आते परमेश्वर ना संगे कायम ना साठे आत्मा मा जित्ता शे. सर्वा गोष्टीस्नी समाप्ती लगेच होणार शे, एनासाठे तुमी हुशार आणि शांत बना कि तुमी प्रार्थना करी सकोत. सर्वास्तून चांगली गोष्ट हय शे, कि तुमी एक दुसरा वर जास्त प्रेम ठेवोत, कारण कि प्रेम गैरा पापस्ले झाकी लेस. बिगर कुरूकुरू करत आपला घरस्मा पाहुनास्ना स्वागत करा आणि तेस्ना सत्कार करा. प्रत्येक व्यक्ती ले परमेश्वर ना कळून कृपादान भेटेल शे, त्या त्या कृपादान ले परमेश्वर चांगला कारभारी ना सारखा दुसरास्नी सेवा करासाठे वापरमा लयो. जर कदी कोले प्रचार कराना वरदान भेटेल शे, त तो परमेश्वर ना संदेश ले प्रचार करो. कदी दुसरास्नी मदत कराना वरदान भेटेल शे, त ती शक्ती कण करो जी परमेश्वर देस. त जे काही तुमी करश्यात तेना कण येशु ख्रिस्त ना व्दारे परमेश्वर ले महिमा भेटीन. सर्वी महिमा आणि सामर्थ्य युगानयुग तेनीच शे. आमेन. ओ प्रिय विश्वासी मित्रसहोण, त्या पिळा दायक त्रासस कण जो तुमी ख्रिस्त ना साठे सहन करतस, आश्चर्य नका करा. पण ह्या गोष्टी एनासाठे हुई ऱ्हायनात, कि प्रगट हुई जावो कि तुमी परमेश्वर वर विश्वास ठेवतस कि नई. एनासाठे हय नका विचार करा कि तुमना संगे काही आल्लग हुई ऱ्हायन. पण जव तुमी ख्रिस्त ना दुख मा सहभागी होतस, त खुशी करा, कारण कि जव ख्रिस्त आपली महिमा ले सर्वा लोकस्वर प्रगट करासाठे परत ईन, तव तुमी आखो बी जास्त खुश हुई उठश्यात. ख्रिस्त ना मांगे चालणारा म्हणून कदी तुमना अपमान करामा एस, त तुमी धन्य शेतस. कारण कि परमेश्वर नि महिमामय आत्मा तुमना मधमा वास करस. जर तुमी दुख सहन करतस, त सावधान राहा कि हत्यारा, चोर व कुकर्मी होवा मुळे नईत दुसरास्ना कामस्मा हात टाका मुळे तुमी लोकस मधून कोणीच व्यक्ती दुख नई भोगो. पण कदी ख्रिस्त वर विश्वास करा मुळे दुख उचलतस, त लाज नका वाटू देयज्यात. पण ख्रिस्त ना नाव मुळे दुख उचलतस ह्या गोष्ट साठे परमेश्वर नि स्तुती करा. कारण कि न्याय ना टाईम ईजायेल शे, आणि सर्वास्तून पहिले परमेश्वर ना लोकस्ना न्याय करीन, आणि जव कि तो आमी विश्वासीस्ना न्याय पहिले करीन, त त्या लोकस्ना आखरी ना बारामा विचार करा ज्या परमेश्वर नि सुवार्ता ले नई मानतस. जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जरी कदी धर्मी माणुसलेच कठीणता कण तारण भेटस, त अधर्मी आणि पापी ना निश्चितच नाश हुई जाईन.” एनासाठे ज्या परमेश्वर नि ईच्छा प्रमाणे दुख उचलतस, त्या चांगल करत राहो आणि सृष्टी बनावनारा परमेश्वर ले विश्वास करत आपली आत्मा ले सोपी द्या. तुमना मधून ज्या मंडळी वरिष्ठ शेतस, तेस्ले मनी काही सांगानी ईच्छा शे, कारण कि मी बी तुमना सारखा एक प्राचीनच शे. मनी स्वता ख्रिस्त ना दुखस्ले देखेल शे ज्या तेनी सहन करेल होतात, आणि जव तो दुसरा सावा परत ईन त मी बी तेनी महिमा मा सहभागी होसू. आते मी तुमले विनंती करस, कि परमेश्वर ना विश्वासीस्ना समूह नि राखोई करा, जेस्नी राखोई नि जबाबदारी तुमले देवामा एयेल शे. खुशी कण तेस्नी राखोई करा नई कि दबाव कण, कारण कि हईच परमेश्वर नि ईच्छा शे. त्या विश्वासीस्नी राखोई नीच कमाई साठे नई पण सेवाभाव कण करा. ज्या लोकस्नी जबाबदारी तुमले सोपामा एयेल शे, त्या लोकस्वर पुढारीस सारखा अधिकार नका जताळा. पण त्या लोकस साठे एक चांगला उदाहरण बना. आणि जव येशु ख्रिस्त जो आमना मुख्य चारणारा शे परत प्रगट हुईन, त तुमले महिमा ना मुकुट देवामा ईन, जेनी महिमा ना प्रकाश कदीच कमी नई होवाव. ह्याच प्रकारे ओ जवानसहोण, तुमी बी माथारा लोकस्ना आदन्यास्ना पालन करा, तुमी सर्वा एक-दुसरा नि नम्रता कण सेवा करा. कारण कि पवित्र शास्त्र सांगस, “परमेश्वर गर्व करणारस्ना विरोध करस, पण दीनस्वर कृपा करस.” ह्या साठे स्वता ले परमेश्वर ना समोर नम्र बनावा जो राखोई करामा बलवान शे, एनासाठे कि तो तुमले योग्य टाईम वरे उचलो. आपली सर्वी चिंता ना भार परमेश्वर वर टाकी द्या, कारण कि तो तुमनी ध्यान ठेवस. सावधान राहा, आणि जागत राहा, कारण कि तुमना विरोधी सैतान गर्जणार सिंह सारखा ह्या शोध मा फिरत ऱ्हास कि कोले फाळी खावू. तुमी आपला दृढ विश्वास कण तेना विरोध करा. आठवण ठेवा, कि तुमना विश्वासी भावू-बहिणी ज्या पुरा संसार मा ऱ्हातस, तुमनाच सारखा दुख भोगी ऱ्हायनात. परमेश्वर नि, जो सर्वी कृपा ना झरा शे, तुमी लोकस्ले येशु ख्रिस्त ना संगे आपली कायम नि महिमा ना भागीदारी होवा साठे बलायेल शे. तो तुमना थोळाच टाईम लगून दुख भोगा नंतर तुमले परिपूर्ण बनाईन एनासाठे कि तुमना मा कोणताच दोष नई राहो, तो तुमना हृदय ले दृढ करीन एनासाठे कि तुमना विश्वास तेनावर स्थिर हुई जावो. तो युगानयुग सामर्थ्यशाली रूप मा राज्य करीन, आमेन. मनी सारांश मा तुमले हय पत्र लिखेल शे आणि सिल्वान नि मदत कण, जेले मी ख्रिस्त मा विश्वास योग्य भावू समजस, हय पत्र तुमले धाळेल शे. मना लिखाना उद्देश हवूच शे कि तुमले प्रोत्साहित करू आणि विश्वास देवाळू कि जे तुमी अनुभव करी ऱ्हायनात ती खरज तुमना साठे परमेश्वर नि कृपा ना भाग शे, ह्या कृपा मा स्थिर राहा. बाबेल शहर ना विश्वासी लोक ज्या तुमना सारखाच परमेश्वर ना द्वारे निवाळेल शेतस, तुमले नमस्कार सांगतस. मार्क, जो मना पोऱ्या सारखा शे तुमले नमस्कार सांगतस. खरा प्रेम कण एक-दुसराले नमस्कार करा. परमेश्वर तुमी सर्वास्ले ज्या ख्रिस्त मा शेतस शांती देवो. मी, शिमोन पेत्र, ख्रिस्त येशु ना दास आणि प्रेषित हय पत्र मी त्या सर्वास्ले लिखस जेस्नी आमना परमेश्वर आणि तारणार येशु ख्रिस्त नि धार्मिकता ना द्वारे आमना सारखा मूल्यवान विश्वास प्राप्त करेल शे. मी प्रार्थना करस कि जसा-जसा तुमी परमेश्वर आणि आमना प्रभु येशु ना ज्ञान मा वाढतस, परमेश्वर तुमले जास्तीत जास्त कृपा व शांती देवो. परमेश्वर नि दिव्य सामर्थ्य नि आमले ते सर्व दिध, जो भक्तीमय जीवन जगा साठे आवश्यक शे आणि आमले तेनाच ज्ञान प्राप्त कराना योग्य बनायेल शे, जेनी आमले आपली महिमा आणि चांगला ना भागीदार होवा साठे बलायेल शे. त्याच दिव्य सामर्थ्य ना द्वारे, तेनी आमले मूल्यवान आणि गैरा मोठा करार दियेल शे एनासाठे कि एस्ना व्दारे आमी संसार ना वाईट वासनास पासून जी लोकस्ना नाश करस, सुटी सकुत आणि ईश्वरीय स्वभाव ना सहभागी हुई सकुत. तुमी ईश्वरीय स्वभाव ना सहभागी शेतस एनासाठे, तुमना विश्वास वाळावा ना साठे दुसरास्ना चांगला करासाठे सर्वा प्रकार ना प्रयत्न बी करा, आणि तेना संगे संगे त्या लोकस सारखा बना ज्या हुश्यारी कण व्यवहार करतस. तुमी हुश्यारी कण व्यवहार करणारस सारखा बनाना संगे सहनशील बी बना, सहनशील बनाना संगे संकट मा धीर धरणारा बी बना, आणि तेना संगे संगे तुमी असा जीवन जगा जेना कण परमेश्वर ले आदर भेटो. आणि तुमी परमेश्वर ले आदर देणारा जीवन जगा संगे संगे तुमी आपला विश्वासी भावूस संगे प्रेम बी ठेवा, आणि दुसरास संगे बी प्रेम ठेवा. जर ह्या गुण तुमना मा शेतस आणि वाळत जातस, त ह्या तुमले आमना प्रभु येशु ख्रिस्त ना ज्ञान ले प्राप्त करामा सक्रिय आणि यशस्वी बनाईन. पण जर कोणता व्यक्ती मा ह्या गोष्टी नईत, त तो त्या व्यक्ती ना सारखा शे जो अंधा शे. तेले हय आठवण पळी जायेल शे कि परमेश्वर नि तेले शुद्ध करेल शे, ज्या पाप तेनी येशु ख्रिस्त वर विश्वास कराना पहिले करेल होतात. ह्या मुळे ओ विश्वासी भावूसहोण, तुमी हय साबित कराना प्रयत्न करा कि परमेश्वर नि खरज तुमले आपली प्रजा होवाना साठे निवाळेल शे आणि बलायेल शे. जर तुमी अस करतस, त तुमी निश्चित पणे परमेश्वर पासून कदीच आल्लग नई होवावत. आणि ह्या प्रकारे तुमी आमना प्रभु आणि तारणार येशु ख्रिस्त ना महान राज्य मा मोठा आदर ना संगे प्रवेश करशान. जर तुमले ह्या गोष्टी माहिती शेतस, आणि ख्रिस्त ना बारमा खरी शिक्षा ले जी तुमले शिकाळा मा एयेल होती, दृढता कण धरी ठेवतस, तरी बी मी तुमले तेस्ना बारामा मा कायम आठवण देवाळत ऱ्हासु. मी समजस कि जठ लगून मी जित्ता शे, तठ लगून मनासाठे हय चांगल राहीन कि तुमले त्या गोष्टीस्ना बारामा आठवण देवाळीसन सावधान करत राहू, कारण कि मले माहिती शे कि मी लवकरच मरणार शे. कारण कि आमना प्रभु येशु ख्रिस्त नि मनावर हय स्पष्टपणे प्रगट करेल शे. एनासाठे मी तुमले ह्या गोष्टीस्ले सांगा साठे प्रयत्न करी ऱ्हायनु, एनासाठे कि मना मरा नंतर बी तुमी ह्या गोष्टीस्ले आठवण ठीई सकोत. कारण कि जव आमी प्रेषितस्नी तुमी लोकस्ले आपला प्रभु येशु ख्रिस्त नि सामर्थ्य व तेना दुसरा सावा येवाना बारामा सांग, त आमी हुश्यारी कण गाळायेल काल्पनिक गोष्टीस्ना सहारा नई लीधा, पण आपलाच डोया कण तेना प्रताप ले त्या टाईम ले देखनुत. ह्या घटना ना द्वारे भविष्यवक्तास्नी वाणी आमना साठे आखो बी विश्वास करा सारखी साबित हुईनी. तुमी हय चांगल करतस जे हय समजीसन तेनावर ध्यान देतस कि तो एक दिवा शे, कारण कि जठ लगून उजाया नई होत आणि तुमना हृदय मा प्रभाततारा उगी नई जात, तठ लगून भविष्यवक्तास्नी वाणी आंधारा मा चमकणारा दिवा ना सारखा शे. पण सर्वास्तून पहिले हय समजी ल्या कि पवित्र शास्त्र नि कोणती बी भविष्यवाणी कोणी माणुस ना आपला विचार नई शे. कारण कि कोणती बी भविष्यवाणी माणुस नि ईच्छा नि आदन्या कण नई निघत, भविष्यवक्ता पवित्र आत्मा कण उत्तेजित करामा ईसन परमेश्वर ना कळून घोषणा कऱ्या करत होतात. ज्या प्रकारे गैरा टाईम पहिले इस्राएलस्मा खोटा भविष्यवक्ता दिखी पळेल होतात, त्याच प्रकारे तुमना मधमा खोटा शिक्षक दिखी पळतीन. त्या खोटी शिक्षा ना प्रचार करतीन जेना कण लोक ख्रिस्त वर विश्वास कराना सोळी देतीन. आठ लगून कि त्या खोटा शिक्षक ख्रिस्त ले तेस्ना स्वामी मानाले नकार करतीन, जेनी तेस्ले विकत लीध आणि पाप ना सामर्थ्य पासून सोळाव. आणि ह्या प्रकारे त्या लवकरच आपला विनाश ना कारण बनतीन. गैरा लोक ज्या स्वता ले विश्वासी सांगतस, त्या त्या खोटा शिक्षकस्ना वाईट कामस्ना अनुकरण करतीन. आणि दुसरा लोक ज्या विश्वासी नई शेतस, त्या तेस्ना मुळे सत्य नि निंदा करतीन. असा शिक्षक लालची ऱ्हातीन, आणि त्या तुमना पासून पैसा प्राप्त करासाठे बनायेल गोष्टी आयकाळीसन तुमले बहिकाळतीन. परमेश्वर नि पहिले पासून निर्णय करी ठीयेल शे कि तो तेस्ले दंड दिन आणि तो अस करासाठे तयार शे. तो तेस्ले निश्चित नाश करी टाकीन. तुमले माहिती शे, कि जव परमेश्वर नि त्या स्वर्गदूतस्ले बी माफ नई कर, जेस्नी पाप करेल होत, पण तेस्ले नरक मा टाकीसन आंधारा कुंडा मा बांधी टाक जठे त्या न्याय ना दिन लगून बंदी शेतस कि तेस्ले दंड देवामा येवो. तुमले हय बी माहिती शे, कि प्राचीन युग ना संसार ना लोक जव परमेश्वर ना भय नई माननात, त तेनी तेस्ना वाईट कामस्ले ज्या त्या करी ऱ्हायंतात, दुर्लक्ष नई कर. पण तेनी पुरी पृथ्वी वर महा जलप्रलय धाळ एनासाठे कि त्या बुळीसन नाश हुई जावोत. पण तेनी धार्मिकता ना प्रचार करणारा नोहा ना समेत आठ व्यक्तीस्ले वाचाळी लीध. परमेश्वर नि सदोम आणि गमोरा शहरस्ले नाश कर, जेना कण त्या चेटीसन राक हुई ग्यात. तेनी तेस्ले चेतावणी दिधी कि ज्या लोक तेनी नई मानावत तेस्न काय हुईन. पण एनातून पहिले कि तो सदोम ना नाश करता, तेनी लुट ले जो धर्मी माणुस होता त्या शहर मधून काळीसन तेले वाचाळ. लोट सदोम ना लोकस कण गैरा दुखी होता, कारण कि तठला लोक कोणताच नियमले नई मानत होतात आणि वाईट काम करत होतात. तो त्या वाईट लोकस्ना मधमा राहात होता, आणि प्रत्येक दिन तो तेस्ना वाईट कामस्ले ज्या त्या लोक कऱ्या करत होतात, देखत होता आणि त्या वाईट गोष्टीस्ले ज्या त्या करत होतात आयकत होता. ह्या सर्व्या गोष्टी कण गैरा दुखी होता, कारण कि तो धर्मी व्यक्ती होता. त्या आमले हय दाखाळतस, कि ज्या लोक आत्मिक जीवन जगतस, जव त्या समस्या मा ऱ्हातस त परमेश्वर निश्चित पणे तेस्ले सुरक्षित ठेवीन, आणि आमी हय बी निश्चित करू सकतस कि तो द्रुष्ट लोकस्ले न्याय ना दिन लगून कायम दंड दिन. खास करीसन तो त्या खोटा शिक्षकस्ले दंड दिन ज्या अमंगळपणा ना वासनास्मा लीन ऱ्हातस व परमेश्वर ना अधिकार ले तुच्छ समजतस. त्या हट्टी आणि गर्विष्ठ शेतस, आणि स्वर्गीय महिमामय उच्चा पद वालास्ले बी बर-वाईट सांगाले नई घाबरतस. तरी बी स्वर्गदूत ज्या शक्ती आणि सामर्थ्य मा ह्या खोटा शिक्षकस्तून गैरा जास्त मोठा शेतस, तरी बी प्रभु ना समोर तेस्ले बर-वाईट सांगीसन दोष नई लावतस. पण ह्या खोटा शिक्षक विवेकहीन पशुस्ना सारखा शेतस, ज्या शिकार होवा साठे आणि माराइ जावा साठेच उत्पन्न होयेल शेतस. ह्या लोक तेच करतस जे तेस्ना मन मा येस, आणि ज्या गोष्टीस्ना विषय मा माहितीच नई, तेस्ना बारामा दुसरास्ले बर-वाईट सांगतस. त्या लोक निश्चितच नाश होतीन. तेस्ना नाशच तेस्ना करेल वाईट कामस्ना प्रतीफय शे. तेस्ले दिन-दुफार विलास मा बिताळान पसंद येस. त्या तुमना मधमा कलंक आणि डाग ना सारखा शेतस. तेस्ले तुमी लोकस्ना संगे खाता-पेता टाईम ले कपटपूर्ण गोष्टी कराले खुशी वाटस. त्या ज्या बी बाई ले देखतस तेस्ना संगे त्या व्यभिचार कराना देखतस. त्या पाप करानी कोणती बी संधी नई सोळतस. त्या त्या लोकस्ले बहिकाळतस ज्या ख्रिस्त वर दृढ विश्वास नई करतस. त्या तेस्ले पाप कळे धकलतस, कारण कि तेस्ना मन मा लालच भरेल शे. त्या परमेश्वर ना द्वारे देवामा येणारा अभिशाप ना भागीदार शेतस. त्या सत्य ना रस्ता ले सोळी दियेल शे आणि भटकी जायेल शेतस, आणि तेस्नी बौरा ना पुत्र, बलाम ना सारखा वाईट काम कराले चालू करी टाकेल शे, जेनी अधर्म कण कमायेल धन ना लालच करेल होता. पण परमेश्वर नि बलाम नि गाढवी ना द्वारे तेले तेना वाईट कामस साठे फटकार लावी. जरी जनावर बोलत नई, पण ती गाढवी जव बलाम ले राजा जोळे लीजाई ऱ्हायंती, त ती बलाम ना संगे माणुस सारखी बोलणी, आणि तिनी त्या भविष्यद्वक्ता बलाम ले तेना एळापणा पासून रोक. ह्या खोटा शिक्षक बिगर पाणी ना झरा सारखा आणि आंधी ना द्वारे उळावामा एयेल ढगस सारखा शे. परमेश्वर नि त्या लोकस साठे गैरी काळोख अंधकार नि जागा तयार करी ठीयेल शे. जव त्या लोकस्ले शिकाळतस, तव त्या व्यर्थ गर्व न्या गोष्टी करतस. त्या लोकस्ले सांगतस कि त्या आपला शरीर ना नुसार शरीर ना वासनास्ना लज्जापूर्ण काम करू सकतस आणि त्या त्या लोकस्ले ज्या आते-आते वाईट जीवन मधून बाहेर निघीसन एयेल होतात, परत तेस्ले पाप करासाठे बहिकाळतस. खोटा शिक्षक लोकस्ले सांगतस कि त्या काही बी करासाठे स्वातंत्र शेतस. जरी त्या स्वता गुलाम ना सारखा शेतस, कारण कि तेस्ना पापमय स्वभाव तेस्ले कुकर्म करासाठे विवश करस. कारण कि जो जेना वश मा शे, तो तेनाच गुलाम शे. जव त्या लोकस्नी येशु ख्रिस्त ले आपला प्रभु आणि तारणार म्हणून वयख, तव त्या संसार ना नाना-प्रकार ना अशुद्धता पासून वाची निघेल होतात. पण आते परत त्या वाईट गोष्टीस्मा फशी जायेल शेतस आणि आते त्या वाईट गोष्टीस्नी तेस्ले वश मा करी लीयेल शे, त आते तेस्नी मांगली दशा पहिली दशा तून बी वाईट हुई जायेल शे. मन सांगान अर्थ हय शे, कि परमेश्वर तेस्ले जास्त दंड दिन जेस्नी ख्रिस्त ले वयखीसन बी सोळी टाक. तेस्ना साठे हय चांगल ऱ्हात कि त्या जीवन ले धर्मी पणा कण जगाना अर्थच नई समजतात. आते त्या समजी जायेल शेतस कि खर काय शे पण तरी बी तेस्नी परमेश्वर नि आदन्या ना नकार करेल शे जो आमी प्रेषितस्नी तेस्ले शिकाळेल होती. तेस्ना स्वभाव ह्या म्हण ले खर साबित करस, “कुत्रा आपलाच ओकेल कळे परतस,” व “धुयेल डूक्करणी किचळ मा लोया साठे परत चालनी जास.” ओ प्रिय विश्वासीसहोण, आते मी तुमले दुसरा सावा पत्र लिखस, मी दोनी पत्रस्मा तुमले त्या गोष्टीस्ले आठवण देवाळीसन चांगल्या प्रकारे विचार करासाठे प्रोत्साहित कराना प्रयत्न करी ऱ्हायनु, जे तुमी पहिलेच शिकी जायेल शेतस. मी अस एनासाठे करी ऱ्हायनु कारण कि मनी ईच्छा शे कि ज्या गोष्टी परमेश्वर ना भविष्यवक्तास्नी पहिले पासून सांगेल शेतस, आणि प्रेषितस्नी ईसन आमना तारणार प्रभु येशु ख्रिस्त नि शिक्षा ना बारामा शिकाळेल शे, तुमी त्या गोष्टीस्ले आठवण ठेवी सकोत. सर्वास्तून महत्वा नि गोष्ट तुमी समजी ल्या, कि आखरी दिनस्मा ख्रिस्त ना येवाना पहिले, असा लोक येतीन ज्या आपलीच वाईट वासनास्ना नुसार जीवन जगतीन, आणि तुमना ह्या विश्वास मुळे कि ख्रिस्त परत येणार शे, त्या लोक तुमनी मजाक उडावतीन. आणि त्या सांगतीन, तेनी परत येवानी प्रतिज्ञा खरी नई शे, तो नई येणार. कारण कि ज्या आमना पहिले पुढारी होतात त्या सर्वा मरी जायेल शेतस, तरी बी आते लगून काहीच नई बदलन. जव पासून परमेश्वर नि सृष्टी नि निर्मिती करी तव पासून सर्वा गोष्टी तसाच चालत ईऱ्हायनात. त्या त जानी बुजीसन हय सत्य ले ईसरी जायेल शेतस कि सृष्टी नि सुरुवात मा परमेश्वर नि शब्द सांग आणि आकाश नि निर्मिती हुईनी. तेनाच शब्द ना द्वारे पृथ्वी पाणी मधून बाहेर निघीसन पाणीमाच स्थिर शे. आणि त्या टाईम ना संसार बी पाणी मा नष्ट हुईग्या, कारण कि परमेश्वर नि मोठा पावूस धाळा आणि प्रलय नि पृथ्वी ले आणि तेनावर ना सर्वा जित्ता प्राणीस्ले नाश करी टाक. परमेश्वर नि त्याच आदेश ना द्वारे वर्तमान आकाश आणि पृथ्वी ले आग ना व्दारे नाश करासाठे ठीई राखेल शे. तेनी तेस्ले एनासाठे राखी ठीयेल शे कि ज्या तेनी आदन्यास्ना पालन नई करतस, तेस्ले तो न्याय ना दिन नाश करीन. ओ प्रिय विश्वासीसहोण, आते जी गोष्ट मी तुमले सांगाले जाईऱ्हायनु तेना कळे दुर्लक्ष नका करा. परमेश्वर ना साठे एक दिन एक हजार साल ना सारखा शे, आणि एक हजार साल एक दिन ना सारखा शे. तेना साठे एक दिन आणि एक हजार साल सर्वा एकसारखा शेतस. काही लोक असा विचार करतस कि प्रभु आपला परत येवाना करार ना विषय मा उशीर करी ऱ्हायना. तव प्रभु त्या प्रमाणे उशीर नई करी ऱ्हायना, पण तो तुमना विषय मा धीर धरस, कारण कि तेनी ईच्छा नई कि कोणी बी नाश होवो. पण तेनी ईच्छा शे कि सर्वा आपला मन ले परिवर्तीत करोत, वाईट कामस्ले कराना सोळोत आणि तेना जोळे येवोत. पण ख्रिस्त निश्चितच परत ईन. तो चोर ना सारखा अचानक ईपळीन. त्या टाईम ले आकाश मोठा नाद करत नष्ट हुई जाईन. आणि जे काही आकाश मा शे, सूर्य, चांद आणि तारा सर्व काही आग ना द्वारे नष्ट करामा ईन. त्या दिन परमेश्वर सर्वा लोकस्ना पृथ्वी वर करेल कामस्ले प्रगट करीन आणि सर्वास्ना न्याय करीन. त जव कि परमेश्वर ह्या सर्व्या वस्तूस्ना नाश करणारच शे, त निश्चितच तुमनी वागणूक पवित्र व भक्ती परमेश्वर ले खुश करणारी पाहिजे. जव तुमी त्या दिन नि वाट देखतस, कि परमेश्वर संसार ना लोकस्ना न्याय करासाठे ईन. त प्रयत्न करा कि तो दिन जल्दी ईपळो. त्या दिन आकाश आग कण नाश करामा ईन, आणि त्या आग नि गर्मी कण आकाश ना सर्वा तत्व पिघई जातीन. पण आमी विश्वासी परमेश्वर ना करार करेल नवा आकाश आणि नवी पृथ्वी नि वाट देखतस, जठे फक्त धर्मी लोकच ऱ्हातीन. एनासाठे ओ प्रिय विश्वासीसहोण, जसा कि तुमी त्या परमेश्वर ना न्याय ना दिन नि वाट देखी ऱ्हायनात, त प्रयत्न करत राहा कि तुमी प्रभु नि नजर मा निर्दोष आणि निष्कलंक ठरोत, आणि तेना संगे तुमले शांती भेटो. आमना प्रभु ना धीर ना विषय मा विचार करा, जसा तो तुमले संधी देस कि तुमी येणारा न्याय पासून वाची सकोत. जसा कि आमना प्रिय विश्वासी भावू पौल त्या ज्ञान ना नुसार जो तेले परमेश्वर पासून भेटणा, तुमले पत्र मा लिखेल शे. तेनी आपला सर्वा पत्रस्मा ज्या तेनी विश्वासीस्ले लिखात, तसाच गोष्टी लिखेल शेतस ज्या तेनी तुमले लिखेल शे. पण तेस्ना मधून काही गोष्टी ज्या तेनी आपला पत्रस्मा लिखेल शे समजा साठे कठीण शे. आणि त्या लोक ज्या अज्ञानी शेतस आणि जेस्ले आपला विश्वास ना बारामा माहिती नई, ह्या कठीण गोष्टस्ना अर्थ चुकीना सांगतस, तसाच जसा कि त्या परमेश्वर ना पुस्तक ना गोष्टीस्ना अर्थ चुकीना सांगतस. अस करीसन त्या स्वताच आपला नाश ना कारण बनतस. ओ प्रिय विश्वासीसहोण, तुमले पहिले पासून माहिती शे कि ह्या सर्वा गोष्टी होणार शेतस. एनासाठे, सावधान राहा, कि त्या लोक ज्या नियमस्ना पालन नई करतस, त्या तुमले आपल्या खोट्या गोष्टीस्कन बहिकाळीसन विश्वास पासून भटकाळी नई देवो. पण येणा सारखा जीवन जगा, कि तुमी आमना तारणारा येशु ख्रिस्त तुमना साठे आजून जास्तीत जास्त कृपा कण कार्य करो, आणि हय कि तुमी तेले आजून जास्त चांगला प्रकारे ओयखी सकोत. तेनी महिमा आते आणि युगानयुग होत राहो. आमेन. आमी एक व्यक्ती ना बारामा लिखतस जो जीवन ना वचन शे, जो सुरुवात पासून शे. आमी जेले आयकेल शे, आणि जेले आपला डोया कण देख, हा आमी तेले ध्यान लाईसन देखनुत आणि आपला हात कण स्पर्श कर. त्या जीवन नि स्वता ले पृथ्वी वर प्रगट कर, आमी तेले देखनुत. आमी तेनी साक्ष देतस, आणि तुमले कायम ना जीवन नि सुवार्ता आयकाळत, जो बाप ना संगे होता आणि आमना वर प्रगट हुईना. जे काही आमी देखेल आणि आयकेल शेतस तेनी सुवार्ता आमी तुमले बी देतस, एनासाठे कि तुमी बी आमना संगे त्या सहभागीता मा भागीदार हुई जावोत, जी सहभागीता आमनी परमेश्वर बाप ना संगे, आणि तेना पुत्र येशु ख्रिस्त संगे शे. आमी हय एनासाठे लिखतस कि आमनी खुशी पुरी हुई जावो. आणि जी सुवार्ता आमी तेना पुत्र येशु पासून आयकेल शे, आणि तुमले आयकाळतस, तो हवू शे, कि परमेश्वर उजाया ना सारखा शे, आणि तेनामा काहीच अंधकार नई. कदी आमी सांगसुत कि आमनी सहभागीता परमेश्वर संगे शे, आणि पापमय जीवन जगतस, त आमी खोट बोलतस आणि सत्य ना नुसार नई चालतस. पण कदी जसा परमेश्वर उजाया मा शे, तसाच आमी बी उजाया ना नुसार जीवन जगतस त आमी एक दुसरा संगे सहभागीता ठेवतस. आणि तेना पुत्र येशु ना रक्त आमले सर्वा पाप पासून शुद्ध करस. कदी आमी सांगतस कि आमना मा काही बी पाप नई शे, त आमी स्वता ले धोका देतस, आणि आमना मा सत्य नई. पण कदी आमी आपला पापस्ले परमेश्वर समोर मानी लेतस, त तो आमना पापस्ले माफ करीन आणि आमना सर्वा अधर्म पासून आमले शुद्ध करीन, कारण कि तो विश्वास योग्य व धर्मी शे. कदी आमी सांगसुत कि आमी पाप नई करनुत, त आमी परमेश्वर ले खोटा ठरावतस, आणि आमी तेना वचन ले नई मानतस. मना पोरसहोण, मी तुमले एनासाठे लिखस, कि तुमी पाप नई करोत. पण कदी कोणी पाप करस, त परमेश्वर बाप ना जोळे आमना साठे एक मदत करणार शे, म्हणजे धर्मी येशु ख्रिस्त. आणि ख्रिस्त स्वताच आमना पापस्ना प्रायश्चित्त साठे बलिदान बनना आणि फक्त आमनाच नई, पण जग ना सर्वा लोकस साठे बी. कदी आमी परमेश्वर नि आदन्यास्ले मानसुत, त एना कण आमले हय समजी जास कि आमी तेले वयखतस. जो कोणी हय सांगतस, कि त्या तेले वयखतस पण तेनी आदन्यास्ले नई मानत. त्या खोटा शेतस, आणि परमेश्वर ना सत्य ना नुसार नई जीतस. जो कोणी तेना वचन ले माणस, तेस्ना मा परमेश्वर ना प्रेम खरज सिद्ध हुयेल शे. एना कण आमले माहिती पळस कि आमी तेनामा शेतस. जो कोणी हय सांगस, कि मी परमेश्वर मा बनेल ऱ्हास, तेस्ले असा जीवन जगाले पाहिजे जसा येशु ख्रिस्त नि जग. मना प्रिय मित्रसहोण, मी तुमले कोणती नवी आदन्या नई लिखत, हय तीच जुनी आदन्या शे जी सुरुवात पासून तुमले भेटेल शे. हय जुनी आदन्या तो वचन शे, जेले तुमी पहिलेच पासून आयकी लीयेल शेतस. तरी बी, जी आदन्या मी तुमले लिखी ऱ्हायनु ती नवी शे, एना खरापण ख्रिस्त मा आणि तुमना मा दिखेल शे. कारण कि अंधकार जात ऱ्हास आणि खरा उजाया चामकाले लागेल शे. जो कोणी हय सांगस, कि त्या उजाया मा ऱ्हातस आणि आपला विश्वासी भावूस संगे बैर ठेवस, त्या आते लगून अंधकार माच ऱ्हाय ऱ्हायनात. जो कोणी आपला विश्वासी भावूस संगे प्रेम ठेवतस, त्या उजाया मा ऱ्हातस. ह्या मुळे तेस्ना मा अस काहीच नई शे जे दुसरास्ले पाप मा पाळाना कारण बनो. पण जो कोणी आपला विश्वासी भावूस संगे बैर ठेवतस, त्या अंधकार मा शेतस. त्या त्या मा चालतस आणि नई मालूम कि कोठे जास, कारण कि अंधकार नि तेस्ले अंधा करी टाकेल शे. ओ पोरसहोण, मी तुमले एनासाठे लिखस, कारण कि तुमना पाप येशु ख्रिस्त ना नाव कण माफ करामा एयेल शे. ओ बापसहोण, मी तुमले एनासाठे लिखस, कारण कि तुमी तेले वयखतस जो सुरुवात पासून शे. ओ जवानसहोण, मी तुमले एनासाठे लिखस, कि तुमी त्या द्रुष्ट ले हराई टाकेल शे. ओ पोरसहोण, मी तुमले एनासाठे लिखस, कारण कि तुमी परमेश्वर बाप ले वयखतस. ओ बापसहोण, मी तुमले एनासाठे लिखेल शे, कारण कि तुमी तेले वयखतस जो सुरुवात पासून मा शे. ओ जवानसहोण, मी तुमले एनासाठे लिखेल शे, कारण कि तुमी शक्तिशाली शेतस, आणि परमेश्वर ना वचन तुमना मा ऱ्हास, आणि तुमी दुष्ट सैतान ले हाराई टाकेल शे. तुमी नईत जग संगे आणि नईत जग नि वस्तूस संगे प्रेम ठेवज्यात, कदी कोणी जग संगे प्रेम ठेवस, त तेनामा परमेश्वर ना प्रेम नई शे. कारण कि जे काही जग ना शे, म्हणजे-पापमय शरीर ना वासना, आणि डोयास्नि वासना आणि धन संपत्ती ना गर्व, हय सगळ परमेश्वर बाप कळून नई शे, पण जग कळून शे. जग आणि जग ना सर्वा अभिलाषा सराव शे, पण जो कोणी परमेश्वर नि ईच्छा ले पुरी करस, तो कायम जित्ता राहीन. ओ पोरसहोण, शेवट जोळे शे, तुमले सांगामा एयेल होत कि ख्रिस्त ना विरोधी एणार शे, आणि आते ख्रिस्त ना गैरा विरोधी उठी उभा ऱ्हायेल शेतस, एना कण आमले माहिती पळस कि शेवट जोळे शे. त्या ख्रिस्त विरोधी लोक आमना मधून नई शेतस एनासाठे त्या आमले सोळीसन चालना ग्यात, कदी त्या आमना मधला ऱ्हातात त त्या आमना संगे थांबनात, पण त्या निघीग्यात एनासाठे कि हय प्रगट होवो कि त्या आमना मधला नई शेतस. पण तुमी सर्वास्ना ख्रिस्त ना द्वारे पवित्र आत्मा कण अभिषेक हुएल शे. आणि सगळ सत्य तुमले माहिती शे. मी तुमले एनासाठे नई लिखत, कि तुमी सत्य ले नई वयखतस, पण एनासाठे, कि तुमी वयखतस, आणि तुमले हय बी माहती शे कि कोणतीच लबाळी, सत्य कळून नई. त मंग लबाळ कोण शे? त्या ह्या शेतस ज्या सांगतस कि येशु ख्रिस्त नई शे. असा लोक ख्रिस्त ना विरोधी शेतस, त्या परमेश्वर बाप आणि पुत्र दोनी ना नकार करस. जो कोणी पुत्र ना नकार करस तो परमेश्वर बाप ना बी नकार करस, आणि जो कोणी पुत्र ले स्वीकार करस, तो परमेश्वर बाप ले बी स्वीकार करस. सत्य ना संदेश तुमना मा सदा बनेल राहो जो तुमी सुरुवात पासून आयकेल होत. कदी ते वचन तुमना मा सदा ऱ्हास, त तुमी बी पुत्र मा आणि बाप मा सदा राहाश्यात. परमेश्वर नि करार दियेल शे कि तो आमले कायम ना जीवन दिन. मी तुमले ह्या गोष्टी त्या लोकस पासून सावधान राहणा विषय मा लिखेल शे, ज्या तुमले बहकावतस. पण तुमना साठे, पवित्र आत्मा, जो तुमले ख्रिस्त पासून भेटेल शे, तुमना मा सदा ऱ्हास. आणि पवित्र आत्मा मुळे तुमले गरज नई कि कोणी तुमले सिखाळो. कारणी कि तेनी आत्मा तुमले सर्व्या गरजस्ना गोष्टीस्ले शिकाळस आणि जे काही तो शिकाळस ते खर शे खोट नई. पवित्र आत्मा नि शिक्षा ले मानत ख्रिस्त मा सदा राहा. म्हणून आते, ओ पोरसहोण, ख्रिस्त मा सदा बनेल राहा. जेना कण जव तो प्रगट होवो त आमले पुरा विश्वास हुई जावो आणि तेना एवावर तेना समोर आमले लज्जित नई होण पळो. जर तुमले माहिती शे कि ख्रिस्त धर्मी शे, त तुमी हय बी समजी ल्या कि ज्या कोणी धर्म ना काम करतस, त्या परमेश्वर ना पोर शेतस. विचार करा परमेश्वर बाप नि आमना शी कितला प्रेम कर, तेना प्रेम इतला महान शे कि आमी परमेश्वर ना पोर म्हणावतस, आणि खरज शेत बी. एनामुळे जग ना लोक आमले वयखत नई, कारण कि तेनी परमेश्वर ले बी नई वयख. मना प्रिय मित्रसहोण, आते आमी परमेश्वर ना पोर शेतस, पण आते लगून स्पष्ट नई हुयन, कि आखो आमी काय बनसुत. पण आमले हय माहिती शे जव ख्रिस्त प्रगट हुईन आमी तेना सारखा होसुत, कारण कि आमी तेले तसाच देखसुत जसा तो खरज शे. प्रत्येक झन जो कोणी ख्रिस्त वर हय आशा ठेवतस तो स्वता ले पवित्र ठेवो, जसा ख्रिस्त पवित्र शे. जो कोणी पाप करस, तो परमेश्वर ना नियमले मानाले नकार देस, कारण कि पाप ना अर्थ परमेश्वर ना नियमले मानाले नकार करान शे. पण तुमले माहिती शे, कि ख्रिस्त एनासाठे प्रगट हुईना, कि तो आमले आमना पापस पासून मुक्त करी देवो, आणि तेनामा कोणताच पाप नई. एनासाठे प्रत्येक जो ख्रिस्त मा बनेल ऱ्हास, तो कायम पाप करत नई राहात, पण जो पाप करत ऱ्हास तेनी नईत ख्रिस्त ले देखेल शे आणि नईत ख्रिस्त ले वयखेल शे. ओ पोरसहोण, सावधान राहा कि कोणी तुमले बहकाई नई देवो, जो कोणी धार्मिकता ना काम करस तो धर्मी शे. तसाच जसा ख्रिस्त धर्मी शे. जो कोणी पाप करस तो सैतान कळून शे, कारण कि सैतान सुरुवात पासून पाप करत एयेल शे. परमेश्वर ना पोऱ्या एनाच मुळे प्रगट हुईना, कि सैतान ना कामस्ले नाश करो. जो कोणी परमेश्वर ना पोर शे त्या पाप नई करत, कारण कि परमेश्वर ना स्वभाव तेस्ना मा शे. एनासाठे तो पाप नई करू सकस कारण कि तो त परमेश्वर ना पोऱ्या शे. हवू स्पष्ट फरक शे परमेश्वर ना पोरस्मा आणि सैतान ना पोरस्मा. जो कोणी धार्मिकता ना काम नई करत आणि जो आपला भावूस संगे प्रेम नई ठेवस त्या परमेश्वर ना पोर नई शेतस. जो संदेश तुमनी सुरुवात पासून आयकेल शे तो हवू शे कि एक दुसरास्वर प्रेम करा. आदाम ना पोऱ्या काइन ना सारखा नका बना, जो त्या दुष्ट सैतान पासून होता, आणि तेनी आपला भावू ना हत्या करी टाकेल होती. काइन नि तेनी हत्या काब करी? कारण कि तेना स्वता ना काम वाईट होतात, पण ज्या काम तेना भावू हाबेल नि करेल होतात त्या धार्मिकता काम होतात. एनासाठे ओ भावूसहोण, कदी ह्या जग ना लोक तुमना वर बैर करतीन त आश्चर्य नका करज्यात. आमले माहिती शे कि आमी मोत नि सामर्थ्य कण सुटीसन जीवन मा पोहोची जायेल शेतस. कारण कि आमी आपला विश्वासी भावूस संगे प्रेम ठेवतस. जो कोणी प्रेम नई ठेवत, तो आते बी मोत नि सामर्थ्य ना अधिकार मा शे. जो कोणी आपला विश्वासी भावू संगे बैर ठेवस, त तो हत्यारा शे, आणि तुमले माहिती शे, कि कोणताच हत्यारा मा कायम ना जीवन नई ऱ्हास. येशु ख्रिस्त नि आमना साठे आपला जीव दिधा. ह्या मुळे प्रेम ना बारामा आमले माहिती पळण. म्हणून आमी बी आपला विश्वासी भावूस साठे जीव देवाले पाहिजे. ज्या लोकस जोळे जग नि संपत्ती शे आणि त्या आपला विश्वासी भावूस्ना गरजस्ले समजीसन तेस्नी मदत करासाठे आपला हृदय ले कठोर करीन दया नई कराव त तेस्ना मा परमेश्वर ना प्रेम नई. ओ पोरसहोण, आमी फक्त शब्दस कण हय नई सांगाले पाहिजे कि आमी एक दुसरास्वर प्रेम करतस, पण कामस्ले कराना द्वारे आणि खरापणा कण प्रेम कराले पाहिजे. आणि एनासाठे, ओ मना प्रिय मित्रसहोण, कदी आमना मन आमले दोष नई देत, त आमले परमेश्वर नि उपस्थिती मा साहास ऱ्हास. आणि जे काही आमी मांगतस ते आमले भेटस, कारण कि आमी तेनी आदन्यास्ले मानतस आणि तेच करतस जेना कण तो खुश होस. तेनी आदन्या हय शे कि आमी तेना पुत्र येशु ख्रिस्त ना नाव वर विश्वास करोत, आणि जसा ख्रिस्त नि आमले आदन्या दियेल शे त्याच प्रमाणे एक दुसरास्वर प्रेम ठेवोत. जो कोणी परमेश्वर नि आदन्यास्ले माणस, तो परमेश्वर मा आणि परमेश्वर तेनामा ऱ्हास. आणि एनामुळे त्या आत्मा ना द्वारे जो आमले परमेश्वर पासून भेटेल शे आमले माहिती शे कि परमेश्वर आमना मा ऱ्हास. ओ प्रिय मित्रसहोण, प्रत्येकस वर विश्वास नका करज्यात ज्या हक्क कण सांगतस कि तेस्ना मा परमेश्वर ना आत्मा शे, असास्ले वयखा कि जो आत्मा तेस्ना मा शे तो परमेश्वर ना शे कि नई, कारण कि गैराच खोटा भविष्यद्वक्ता जग मा निघी उभा हुई जायेल शेतस. परमेश्वर नि आत्मा तुमी ह्या प्रमाणे वयखी सकतस, जो कोणी हय मानी लेस कि येशु ख्रिस्त शरीर ना रूप धारण करीसन एयेल होता, त तेनामा तो आत्मा शे जो परमेश्वर कळून शे. आणि जो कोणी येशु ना बारामा हय नई मानी लेत कि येशु ख्रिस्त शरीर ना रूप धारण करीसन एयेल होता, त तेनामा परमेश्वर ना आत्मा नई शे. जो आत्मा तेनामा शे तो ख्रिस्त ना विरोधी शे. तुमनी आयकेल शे कि तो एणार शे आणि आते बी जग मा शे. ओ मना पोरसहोण, तुमी परमेश्वर ना शेतस, आणि तुमी खोटा भविष्यद्वक्तास्ले हारायेल शेतस, कारण कि जो आत्मा तुमना मा शे, तो त्या आत्मा तून मोठा शे जो संसार मा शे. त्या खोटा भविष्यद्वक्ता जग ना बारामा गोष्टी करतस, आणि ह्या जग ना लोक तेस्नी आयकतस कारण कि त्या जग ना शेतस. पण आमी परमेश्वर ना शेतस, जो कोणी परमेश्वर ले वयखस तो आमनी आयकस, जो परमेश्वर ले नई वयखत तो आमनी नई आयकत. ह्या प्रकारे आमी सत्य नि आत्मा आणि भ्रम नि आत्मा ले वयखी लेतस. ओ मना प्रिय मित्रसहोण, आमी आपस मा प्रेम ठेवाले पाहिजे, कारण कि प्रेम परमेश्वर पासून शे. जो कोणी प्रेम करस तो परमेश्वर ना पोऱ्या शे आणि परमेश्वर ले वयखस. जो कोणी प्रेम नई करत, तो परमेश्वर ले नई वयखत, कारण कि परमेश्वर प्रेम शे. आणि परमेश्वर ना प्रेम एना कण प्रगट होस कि तेनी आपला एकुलता पुत्र ले आमना साठे जग मा धाळ कि आमले तेना द्वारे कायम ना जीवन भेटो. खरा प्रेम हवू शे कि, आमी परमेश्वर संगे नई पण परमेश्वर नि आमना वर प्रेम कर. आणि परमेश्वर नि आमना पापस्ना प्रायश्चित्त साठे आपला पुत्र ले धाळ. ओ मना प्रिय मित्रसहोण, कदी परमेश्वर नि आमना वर असा प्रेम करेल शे, त आमले बी एक दुसरास्वर प्रेम कराले पाहिजे. कोणीच परमेश्वर ले नई देख, पण कदी आमी एक दुसरास्वर प्रेम करतस, त परमेश्वर आमना मा सदा ऱ्हास, आणि तेना प्रेम आमना मा सिद्ध हुई जायेल शे. आमले माहिती शे कि आमी परमेश्वर मा राहातस आणि तो आमना मा, कारण कि तेनी आमले आपला आत्मा दियेल शे. आमी पुत्र ले देखी बी लीयेल शेतस आणि साक्ष देतस, कि परमेश्वर बाप नि पुत्र ले जग ना लोकस्ना तारणार होवा साठे धाळेल शे. जो कोणी मानी लेस कि येशु परमेश्वर ना पोऱ्या शे, तो परमेश्वर मा ऱ्हास, आणि परमेश्वर तेनामा सदा ऱ्हास. आणि आमले चांगल्या प्रकारे माहिती शे आणि विश्वास बी करतस कि परमेश्वर आमना संगे प्रेम करस, परमेश्वर प्रेम शे, आणि ज्या प्रेम मा बनेल राहातस, त्या परमेश्वर मा बनेल राहातस, आणि परमेश्वर तेस्ना मा बनेल ऱ्हास. आमना मा प्रेम या प्रकारे सिद्ध हुयेल शे, कि आमी न्याय ना दिन पुरा भरोसा ठेवी सकोत, कारण कि जसा ख्रिस्त शे तसाच ह्या जग मा आमी बी शेतस. प्रेम मा भीती नई राहात, पण सिद्ध प्रेम सर्वा प्रकार नि भीती ले दूर करी देस, एनासाठे जो भ्यास तेनामा प्रेम सिद्ध नई हुयना, कारण कि भीती संबंध दंड संगे शे. आमी परमेश्वर वर आणि दुसरास वर प्रेम करतस कारण कि पहिले परमेश्वर नि आमना वर प्रेम करेल शे. कदी आमी सांगतस कि आमी परमेश्वर संगे प्रेम ठेवतस, पण आपला विश्वासी भावू संगे बैर ठेवस, त आमी खोटा शेत. कारण कि डोया समोर ना आपला भावू वर जो प्रेम नई करत, त तो नई देखेल परमेश्वर वर प्रेम करू सकत नई. ख्रिस्त नि जी आदन्या आमले दियेल शे ती हय शे, जो कोणी त्या परमेश्वर वर प्रेम ठेवस, तो आपला विश्वासी भावू वर बी प्रेम ठेवो. जो कोणी हवू विश्वास करस कि येशुच ख्रिस्त शे, तो परमेश्वर ना पोऱ्या शे, आणि जो कोणी परमेश्वर बाप वर प्रेम करस, तो तेना पोरस वर बी प्रेम करस. जव आमी परमेश्वर वर प्रेम करतस, आणि तेनी आदन्यास्ले मानतस, त एनाच कण आमले समजस कि आमी परमेश्वर ना पोरस्वर प्रेम करतस. परमेश्वर वर प्रेम करन म्हणजे तेन्या आदन्यास्ले मानन शे, आणि तेन्या आदन्या मानन आमना साठे कठीण नई शेतस. ज्या परमेश्वर ना पोर शेतस त्या जग वर विजय प्राप्त करस. आणि तो विजय जेना कण आमी जग ले हारावतस तो आमना विश्वास शे. जग वर कोण विजय होवू सकस? फक्त तोच व्यक्ती जो हवू विश्वास करस कि येशुच परमेश्वर ना पोऱ्या शे. तो येशु ख्रिस्तच शे जो पाणी आणि रक्त व्दारे एयेल होता, तो फक्त पाणीच कण नई पण पाणी आणि रक्त दोनीस्ना व्दारे एयेल होता. आणि पवित्र आत्मा स्वता ह्या गोष्ट नि साक्ष देस हय सत्य शे. कारण कि पवित्र आत्मा सत्य शे. आमी माणसस्नी साक्षस्वर विश्वास करतस, पण परमेश्वर नि साक्ष त सर्वास्तून मोठी शे, आणि परमेश्वर नि साक्ष हय शे कि तेनी आपला पुत्र ना बारामा साक्ष दियेल शे. त जो कोणी परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास करस, तो स्वताच ह्या साक्ष ले आपला मन मा ठेवस. पण जो कोणी विश्वास नई करत तेले परमेश्वर नि खोटा ठरायेल शे. कारण कि तेस्नी परमेश्वर नि साक्ष वर विश्वास नई कर जी तेनी आपला पोऱ्या ना बारामा दियेल शे. साक्ष हय शे, कि परमेश्वर नि आमले कायम ना जीवन दियेल शे, आणि हवू जीवन तेना पुत्र येशु मा शे. जेना जोळे परमेश्वर ना पोऱ्या शे, तेना जोळे कायम ना जीवन शे, आणि जेना जोळे परमेश्वर ना पोऱ्या नई, तेना जोळे कायम ना जीवन बी नई शे. मी तुमले हवू पत्र लिखस, एनासाठे कि परमेश्वर ना पोऱ्या ना नाव वर विश्वास ठेवतस, कि तुमी समजी साकोत कि तुमना जोळे कायम ना जीवन शे. परमेश्वर ना समोर आमले धीर शे कि, कदी आमी तेना ईच्छा प्रमाणे काही मांगतस, त तो आमनी आयकस. आणि आमी तेना पासून जे काही मांगतस ते तो आयकस, हय आपले माहिती शे, म्हणून जे काही आमी तेना पासून मांगेल शेतस त्या आपले भेटी जायेल शेतस हय बी आपले माहिती शे. कदी तू आपला विश्वासी भावू व बहिण ले असा पाप करतांना देखो, जेना दंड मृत्यु नई शे, त तो तेना साठे प्रार्थना करो आणि परमेश्वर तेना जीवन ले सुरक्षित ठेवीन. हय त्या लोकस्ना साठे लागू होस जेस्ना पाप प्राणघातक नई शे, कारण कि एक पाप असा बी ऱ्हास जो प्राणघातक शे तेना बारामा मी नई सांगस कि प्रार्थना कराले पायजे. सर्वा प्रकार ना अधर्म त पाप शे, पण असा पाप बी शेतस, जेना परिणाम मृत्यु नई शे. आमले माहिती शे कि परमेश्वर ना पोर कायम पाप नई करत राहत, कारण कि परमेश्वर ना पोऱ्या सुरक्षित ठेवस, आणि सैतान तेस्ले हात नई लावू सकत. आमले माहिती शे कि आमी परमेश्वर ना शेतस, आणि पुरा जग त्या सैतान ना आधीन मा शे. आमले माहिती शे कि परमेश्वर ना पोऱ्या ईजायेल शे आणि तेनी आमले समज दियेल शे, एनासाठे कि आमी खरा परमेश्वर ले वयखी सकोत. आमी खरा परमेश्वर मा वास करतस, कारण कि आमी तेना पुत्र येशु ख्रिस्त मा वास करस. खरा परमेश्वर आणि कायम ना जीवन हवूच शे. ओ मना पोरसहोण, स्वता ले त्या सर्वा गोष्टी पासून वाचाळी ठेवा, (जो तुमना हृदय मा परमेश्वर नि जागा लेस.) मी, मंडळी ना वरिष्ठ होवा मुळे ती निवाळेल प्रिय स्त्री आणि तीना पोरस्ना नाव वर जेस्ना वर मी खरा-खरा प्रेम ठेवस. आणि फक्त मीच नई, पण त्या सर्वा जेस्ले सत्य माहिती शे, तुना संगे प्रेम ठेवतस, कारण कि तो सत्य आमना मा सदा वास करस आणि कायम आमना संगे राहीन. परमेश्वर बाप, आणि तेना पुत्र येशु ख्रिस्त नि कृपा, दया आणि शांती, आमना संगे प्रेम आणि सत्य मा बनेल ऱ्हावो. मी हय जानीसन गैरा खुश हुयणु, कि तुना काही पोर त्या आदन्या प्रमाणे सत्य वर चालतस, जी परमेश्वर आमना बाप कळून आमले भेटेल होती. आते ओ प्रिय स्त्री, मी तुले कोणती नवी आदन्या नई देस, पण हय तीच आदन्या जी आमना कळे सुरुवात पासून होती, कि आमी सर्वा एक दुसरा वर प्रेम करूत. आणि प्रेम हवू शे कि आमी परमेश्वर नि आदन्या ले मानीसन जीवन जगुत. हय तीच आदन्या शे, जी तुमनी सुरुवात पासून आयकेल शे कि तुमी सर्वा प्रेम कण राहोत. मी तुमले ह्या सर्वा गोष्टी एनासाठे आठवण करावस कारण कि कितलाक असा भ्रम मा टाकणार प्रत्येक जागा वर पसरी जायेल शेतस, ज्या हय नई मानतस, कि येशु ख्रिस्त देह रूप मा उना. असा माणुस भ्रम मा टाकणार आणि ख्रिस्त ना विरोधी शे. आपला विषय मा सावधान राहा, तव तुमी तेले नई दवाळाव जेना साठे आमनी कष्ट करेल शे, पण तुमले तेना पूर्ण प्रतीफय भेटीन. जो कोणी ख्रिस्त नि शिक्षा मा बनेल नई ऱ्हास, पण तेना तून बाहेर निघत जास, तेन नात परमेश्वर ना संगे नई शे. पण जो कोणी तेनी शिक्षा मा बनेल ऱ्हास, तेन नात बाप आणि पुत्र दोनीस संगे शे. कदी कोणी तुमना जोळे एस, आणि ख्रिस्त नि शिक्षा नई पण काही दुसर शिकाळस, तेले नईत घर मा येवू द्या, आणि नई तेना स्वागत करा. कारण कि जो कोणी असा झन ना स्वागत करस, तो तेना वाईट कामस्मा तेना भागी शे. मले तुमले गैर काही सांगण शे, पण मनी हय ईच्छा नई शे कि तेस्ले ह्या प्रमाणे पत्र मा लिखू, मनी आशा शे कि मी तुमना जोळे एसू, आणि समोरा समोर गोष्टी करसू, कि आमी पुरा खुश हुई जावोत. तुनी प्रिय बहिण ना पोर जिले परमेश्वर नि निवाळेल शे, तेस्ना कळून तुमले नमस्कार. मी वरिष्ठ हय पत्र प्रिय गायस ना नाव वर लिखस जेस्ना शी मी खरा प्रेम ठेवस. ओ मना प्रिय मित्र, मी हय प्रार्थना करस कि जसा तू आत्मिक उन्नती करी ऱ्हायना, तसाच तू सर्व्या गोष्टीस्मा उन्नती करो, आणि बरा चांगला राहो. मी गैरा खुश हुयणु जव काही विश्वासी भावूस्नी तुना त्या सत्य नि साक्ष दिधी, जेनावर तू खरज चालस. मले एनातून जास्त कोणतीच खुशी नई कि मी आयकू, कि मना पोर सत्य प्रमाणे चालत राहा. ओ प्रिय मित्र, तू त्या कामस्मा गैरा विश्वास योग्य शे जे तू आपला विश्वासी भावूस साठे करस जेस्ले तू वयखत बी नई. तेस्नी आठे मंडळी ना समोर तुना चांगला व्यवहार ना बारामा साक्ष दियेल शे, कृपा करीसन तेस्ना प्रवास ना साठे असा नियोजन कर मदत कर जेना कण परमेश्वर खुश होवो. कारण कि त्या ख्रिस्त ना त्या नाव ना प्रचार ना साठे निघेल शेतस, आणि दुसऱ्या जात वाला कळून काही मदत नई लेतस. तव आमी ख्रिस्ती विश्वासीस्नी ह्या लोकस्नी मदत कराले पाहिजे, एनासाठे कि आमी बी सत्य ना पक्ष मा तेस्ना सहकारी बनोत. मी मंडळी ले एक पत्र लिखेल होतु, पण दियत्रीफेस जो तेस्ना पुढारी होवाना देखत होता, आमले स्वीकार नई करत. एनासाठे जव मी एसू, त मी तेना कामस्नी ज्या तो करी ऱ्हायना पुरी मंडळी ना लोकस समोर आठवण देवाळसु. कि तो आमना बारामा वाईट-वाईट आणि खोट्या गोष्टी सांगस, तो नईत फक्त आमनी बदनामी करस. पण तो स्वता भावू-बहिण ना सत्कार करान नई देखस आणि ज्या लोक असा करान देखतस, तो तेस्ले रोकस आणि मंडळी मधून काळी टाकस. ओ प्रिय मित्र, वाईट ना अनुसरण नको करू, पण चांगला ना अनुसरण कर. जो कोणी चांगल करस, तो परमेश्वर कळून शे, पण जो कोणी वाईट करस, तेनी परमेश्वर ले नई जान. देमेत्रिया ना बारमा सर्वा लोक ख्रिस्त मी मंडळी मा चांगली साक्ष देतस, कि तो सत्य ना नुसार जीवन जगस, आणि आमी बी तेना बारामा हईच साक्ष देतस, आणि तुले माहिती शे कि आमनी साक्ष खरी शे. मले तुमले गैर काही सांगण शे, पण मनी हय ईच्छा नई शे कि तेस्ले ह्या प्रमाणे पत्र मा लिखू. पण मले आशा शे, कि मी तुमना जोळे एसू, आणि आमी समोरा समोर गोष्टी करसू. तुमले शांती भेटो. तुमना सर्वा मित्र तुमले नमस्कार सांगतस. आमना सर्वा मित्रस्ले व्यक्तिगत नमस्कार करज्यात. मी यहूदा, येशु ख्रिस्त ना दास आणि याकोब ना धाकला भावू, त्या लोकस्ले हय पत्र लिखस. ज्या परमेश्वर ना द्वारे बलावामा एयेल शेतस आणि ज्या आमना परमेश्वर बाप ना प्रिय शेतस आणि येशु ख्रिस्त मा सुरक्षित शेतस. मी प्रार्थना करस, कि परमेश्वर ना कळून दया, शांती आणि प्रेम तुमले विपुलता कण भेटत राहो. ओ प्रिय विश्वासीसहोण, मी तुमले त्या सुटका ना विषय मा जेनामा आमी सहभागी शेतस, तेले लिखामा जास्तच श्रम कण प्रयत्न करी ऱ्हायंतू. आणि जो परमेश्वर ना कळून येशु ख्रिस्त मा आमले भेटस, पण आते मी ह्या पत्र ना द्वारे हय समजाळान खास समज, कि तुमी त्या विश्वास नि राखोई साठे संघर्ष करा, जो एकच सावा कायम ना साठे परमेश्वर नि आपला लोकस्ले सोपेल शे, आणि हय बदली नई सकस. मी तुमले एनासाठे लिखस कारण कि, काही भक्तिहीन लोक ज्या खोटी शिक्षा ले शिकाळतस बागेच कण आमना मा ईसन मिई जायेल शेतस. ह्या त्या लोक शेतस जेस्ना संगे परमेश्वर जुना टाईम मा पहिले पासूनच पवित्र शास्त्र मा सांगेल शे कि तो तेस्ले दंड दिन. त्या आमना संदेश ले बिगाळतस, जो परमेश्वर नि कृपा ना बारामा शे, एनासाठे कि त्या आपला शारीरिक कुकर्मस्मा पळेल राहोत. त्या आमना एकच स्वामी आणि प्रभु येशु ख्रिस्त ना नकार बी करतस. जरी तुमी लोकस्ले हय सगळ माहिती शे, तरी बी मनी ईच्छा शे कि तुमले आठवण देवाळू, कि प्रभु नि इस्त्राएली लोकस्ले निर्वासित मधून सोळाईसन मिसर देश मधून बाहेर लिसन उना, पण नंतर त्या सर्वास्ले जेस्नी तेनावर विश्वास नई कर उजाळ जागामाच मारी टाक. आठवण करा कि कसा परमेश्वर नि त्या स्वर्गदूतस्ले कायम ना दंड दिधा जेस्नी आपला पद ले स्थिर नई ठेव, व तेस्नी आपला स्वता ना वस्तीस्थान ले सोळी दिध. प्रभु नि त्या स्वर्गदूतस्ले भीषण न्याय ना दिन ना साठे अंधकारमय स्थान मा असा साखयस्कन बांधीसन ठीयेल शे जेले कोणीच तोडू नई सकत. त्याच प्रकारे आठवण करा कि त्या लोकस्ना संगे काय हुयेल होत ज्या सदोम आणि गमोरा आणि तेस्ना आंगे-पांगे ना नगरस्मा ऱ्हात होतात. लोक व्यभिचारी हुई ग्यात आणि प्रत्येक प्रकार ना जारकर्म ना अनुकरण कराले लागेल होतात. एनासाठे परमेश्वर नि अग्नी कण तेस्ना नाश कर. तेस्ना संगे जे काही बी हुईन ते चेतावणी ना रूप मा होत, कि त्या खोटा शिक्षकस्ले बी नरक ना दंड भेटीन. त्याच प्रमाणे ह्या भक्तिहीन लोक बी हवू दावा करतस, कि परमेश्वर नि तेस्ले दर्शन मा हय प्रगट करेल शे कि त्या अनैतिक जीवन जगाना द्वारे आपला शरीरस्ले अशुद्ध करू सकतस. त्या आपला वर कोलेच अधिकार जताळानी परवानगी नई देतस आणि त्या महिमामय स्वर्गदूतस्ले बर-वाईट सांगतस. पण मुख्य स्वर्गदूत मिखाएल बी ह्या भक्तिहीन लोकस्ना सारखा नई करत. जव सैतान मिखाएल ना संगे वाद-विवाद करना कि भविष्यद्वक्ता मोशे ना शरीर ले गाळाना अधिकार कोले शे. तव बी मिखाएल नि जो ह्या भक्तिहीन लोकस्तून जास्त अधिकार ठेवस, तेनी सैतान ले बर-वाईट सांगीसन दोष लावानी हिम्मत नई करी. पण तेनी फक्त हय सांग, कि “प्रभूच तुले धमकावो.” ह्या लोक ज्या गोष्टीस्ना बारामा समज नई ठेवतस, त्या गोष्टीस्ना बारामा बर-वाईट सांगतस. आणि ज्या गोष्टी ह्या विवेकहीन पशुस्ना सारखा चालू समजतस, एस्ना मुळे त्या नष्ट हुई जातस. तेस्ना साठे कितल भयानक हुईन, त्या काइन ना सारखा जेनी आपला भावू ले मारी टाक, वाईट जीवन जगतस. त्या बलाम ना सारखा शेतस जेनी पैसास्ना साठे परमेश्वर ना लोकस्ले पाप करासाठे उकसावा ना प्रयत्न कर. त्या लोक कोरह ना सारखा नाश होतीन जेनी मोशे ना विरुद्ध विद्रोह करेल होत. ह्या लोक भ्रष्ट मन ना शेतस, आणि त्या आपला लाजाळू आणि स्वार्थी कामस्ना द्वारे तुमना दररोज ना जेवण ले बिगाळतस. त्या हवा ना द्वारे उळणार ढग ना सारखा शेतस, ज्या कदी बी पडत नई. त्या बिगर पानस्ना झाळ ना सारखा शेतस, ज्या मरेल आणि उपळेल शेतस, ज्या कदी फय नई लयतस. ह्या लोक समुद्र ना विक्राळ लाठास्ना सारखा शेतस, ज्या आपली लाज ना कामस्ले फेस ना रूप मा उदलावतस. ह्या लोक भटकेल तारास्ना सारखा शेतस ज्या आपला निर्धारित रस्तास्वर नई चालतस. प्रभु नि तेस्ना साठे कायम लगून गैरा अंधकार ना जागा ले ठीयेल शे. ह्या लोक कायम दुसरास्ना विरुद्ध मा कुरूकुरू करतस आणि दुसरा लोकस्मा वाईट शोधतस. त्या कायम त्या वाईट कामस्ले करत राहतस, त्या स्वता ना प्रती गर्व ना गोष्टी करतस आणि आपला फायदा ना साठे दुसरास्नी खुशामत करतस. पण ओ प्रिय विश्वासीसहोण, तुमी त्या गोष्टीस्ले आठवण ठेवा ज्या प्रभु येशु ख्रिस्त ना प्रेषित गैरा पहिले सांगेल शेतस जेस्न होण पक्क शे. त्या तुमले सांग्या करत होतात, “आखरी ना दिनस्मा असा लोक ऱ्हातीन ज्या प्रभु नि थट्टा करतीन. ह्या त्या लोक ऱ्हातीन जेस्ना जीवन अभक्ति ना वासनास्ना नियंत्रण मा शे.” ह्या त्या लोक शेतस ज्या फुट पाळतस, ह्या तेच करतस जो एस्ना मन करस, एस्ना मा परमेश्वर ना आत्मा नई शे. पण ओ प्रिय विश्वासीसहोण, तुमी स्वता ले आपला अतिपवित्र विश्वास मा वाळावत जावा. तुमी पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण मार्गदर्शन लिसन प्रार्थना करत राहा, परमेश्वर ना प्रेम ना अनुभव करत राहा, आणि कायम ना जीवन साठे आमना प्रभु येशु ख्रिस्त नि दया नि मोठी आशा कण वाट देखत राहा. त्या लोकस्वर दया करा जेस्ले माहित नई कि कोणती शिक्षा वर विश्वास करोत, आणि जेस्ना विश्वास लळखळी ऱ्हायना शे. गैरास्ले न्याय ना आग मधून झपटीसन काळा, पण काही लोकस्वर दया करतांना तुमी सावधान राहा. आठ लगून कि शरीर ना द्वारे कलंकित कपळास्कन बी घृणा करा. परमेश्वर तुमनी रक्षा करामा सक्षम शे, एनासाठे कि तुमी पापमय जीवन ना द्वारे बहकावामा नई येवोत. तो तुमले आपली महिमामय उपस्थिती मा खुशी मा निर्दोष उभा करामा समर्थ शे. जो आमले आमना प्रभु येशु ख्रिस्त ना द्वारे तारण देस, त्या एकच परमेश्वर ले गैरा युगस्ना पहिले पासून, आते आखो युगानयुग लगून महिमा, पराक्रम, सामर्थ्य आणि अधिकार भेटो. आमेन. परमेश्वर त्या गुप्त गोष्टीस्ले जी गैरा जल्दी होणार होती येशु ख्रिस्त वर प्रकट कर, कारण कि तो त्या गोष्टीस्ले आपला दासस वर प्रकट करी सको. येशु नि आपला स्वर्गदूतस्ले त्या संदेश ना संगे मना जोळे म्हणजे आपला दास योहान ना जोळे धाळ. एनासाठे, मी, योहान नि ते सगळ काही लिख जे मनी देख. मनी या लेख मा परमेश्वर ना संदेश आणि ते खर विषय सांगेल शे, जेनी माहिती येशु ख्रिस्त नि मले दियेल होती. धन्य शे तो माणुस जो मंडळी ना समोर परमेश्वर ना ह्या वचनस्ले वाचस, आणि तो प्रत्येक त्या व्यक्ती ले आशीर्वाद दिन ज्या आयकतस आणि जे काही येनामा लिखेल शे तेन पालन करस, कारण कि तो टाईम जवळ शे जव परमेश्वर ह्या सर्वा गोष्टीस्ले करीन. मी, योहान, हय पत्र तुमी सात मंडळीस्ना विश्वासीस साठे लिखी ऱ्हायनु, ज्या आशिया प्रांत मा शेतस, मी प्रार्थना करस कि परमेश्वर कळून तुमले कृपा आणि शांती भेटो. तो परमेश्वर, जो कायम शे, जो कायम होता आणि येणार शे. आणि त्या सात आत्मास्ना नाव ज्या परमेश्वर ना सिंहासन ना समोर शेतस. ध्यान दिसन आयका, तो ढगस्ना संगे येणार शे, आणि प्रत्येक झन तेले देखीन, आठ लोंग कि जेस्नी तेले भोकसेल होत, त्या बी तेले येतांना देखतीन. आणि सगळी पृथ्वी ना लोक, जव तेले देखतीन त जोर-जोर कण रळतीन. हा, असच हुईन. आमेन. प्रभु परमेश्वर हई सांगस, “मीच अल्फा आणि ओमेगा शे. म्हणजे, सुरुवात आणि शेवट. मीच सर्वशक्तिमान शे, जो कायम शे, जो कायम होता आणि येणार शे.” मी, योहान, तुमना विश्वासी भावू शे, आणि येशु ना संगे आपला नाता मुळे मी तुमना संगे परमेश्वर ना राज्य मा, कष्ट मा, आणि तेस्ले सहन करानी शक्ती मा साथी शे, मी परमेश्वर ना संदेश आणि येशु ख्रिस्त ना बारामा प्रचार करा मुळे पात्म नाव ना बेट मा बंदी होतु. रविवार ना दिन जो कि प्रभु ना दिन शे, परमेश्वर ना आत्मा मनावर उतरणा, आणि मनी आपला मांगे तुरही ना आवाज सारखा एक उंच आवाज आयक. तेनी मले सांग, “जे काही तू देखस, तेले चामळी ना पत्र मा लिखीसन ह्या सात मंडळीस कडे धाळी दे, जो इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा नगर, सार्दीस, फीलेदिलफिया आणि लावदीकिया ह्या शहरस्मा शेतस.” जो मना संगे बोलत होता, मी तेले देखा साठे मांगे फिरणु, आणि मनी सोना ना सात दिवट देख. आणि त्या दिवटस्ना मधमा एक माणुस ले देख, जो पुरुषना सारखा दिखत होता, तो असा कपडास्ले घालेल होता, तेनी लांबी तेना पाय लोंग होती, आणि तो छातीवर सोना ना फटुका बांधेल होता. तेना केस उन आणि बर्फ सारखा धव्या होतात, आणि तेना डोया आग नि ज्वाला ना सारखा चमकत होतात. आणि तेना पाय भट्टी मा तपाळेल पितयना सारखा चमकत होतात, आणि जव तो बोलत होता त तेनी आवाज मोठा लाठास्ना गर्जन सारखी होती. तो आपला उजवा हात मा सात तारा लीयेल होता, आणि तेना तोंड मधून तेज दोनधारी तलवार निघत होती, आणि तेना चेहरा दोन पहर मा चमकणारा सूर्य ना सारखा होता. जव मनी तेले देख, त लगेच मी तेना पाय वर मरेल सारखा पडी गया, पण तेनी मनावर आपला डावा हात ठीसन हय सांग, “घाबरू नको, सुरुवात आणि आखरी मीच शे.” जीवन ना झरा मीच शे, जरी मी मरी जायेल होता पण देखा, आते मी कायम ना साठे जित्ता ऱ्हासु. मले मृत्यु आणि अधोलोक वर जी मरेल लोकस्नी जागा शे, अधिकार शे. एनासाठे, ह्या सर्वा गोष्टीस्ले जेस्ले तू आते देखी ऱ्हायना, आणि ज्या गोष्टी येणा नंतर होणार शे, पुस्तक मा लिखी ले. ह्या सात तारास्ना अर्थ, जेस्ले तू मना उजवा हात मा देखी ऱ्हायना व त्या सात सोना ना दिवटस्ना खोल अर्थ हय शे, त्या सात तारा सात मंडळीस्नी राखोई करणारा स्वर्गदूत शे, आणि सात दिवट सात मंडळीस्ले दर्शावस. तेनी मले हय बी सांग, “इफिस शहर नि मंडळी ना स्वर्गदूत ले हय संदेश लिख. मी तोच शे, ज्या सात तारास्ले आपला उजवा हात मा लीयेल शे, आणि जो सोना ना सात दिवट ना मधमा चालस, मी तुले हय सांगस, आयका. मी तुना करेल कामस्ले, कठीण कष्ट ले आणि कदी बी हार नई मानणार धीरज ले जानस, आणि हय बी कि तू वाईट लोकस्नी खोटी शिक्षास्ले सहन नई करत, आणि ज्या स्वता ले प्रेषित सांगतस, पण त्या खरज नई शेतस. तेस्ले तुनी पारख आणि खोटा देखना. तू धीर धरीसन त्रास सहन कर कारण कि तुनी मनावर विश्वास करेल शे आणि आते बी तुना विश्वास मनावर पक्का शे. पण तुना विरुद्ध मन हय सांगण शे, कि आते तू मना शी प्रेम नई करस, जसा पयले करत होता. तू जसा पहिले जीवन जगत होता, आते नई जगत. तेना बारामा विचार कर. आते तू पाप करान सोळीसन, ते करान चालू कर जे तू पहिले करत होता. जर कदी तू मन फिरावाव नई त मी तुना जोळे ईसन तुना दिवट ले तीना जागा वरून जठे ती उभी शे दूर करीसन तुले दंड दिसू. पण हा, मी तुनाशी खुश शे, कि तू निकलाइस्ना काम कण घृणा करस, जसा मी तेस्ना कामस्ले घृणा करस. जो मना संदेश ले समजान देखस तो तेले ध्यान दिसन आयकी लेवो जी आत्मा मंडळी ले सांगस, जो वाईट वर विजयी होस, मी तेले जीवन ना झाड मधून फय खावाना अधिकार देसू जो परमेश्वर ना बगीचा मा शे.” तेनी मले हय बी सांग, कि स्मुर्णा शहर नि मंडळी ना स्वर्गदूत ले हय लिख, “मीच सुरुवात आणि शेवट शे. मी मरी जायेल होतु, पण आते जित्ता शे, आणि कायम जित्ता ऱ्हासु. मी तुले हय सांगस, आयका, मले माहित शे कि तुले त्रास दियेल शे आणि हय कि तू गरीब शे, पण आत्मिक गोष्टी मा तू धनी शे. मले यहुदी लोकस्ना बारामा माहित शे ज्या स्वता ले परमेश्वर ना निवाळेल लोक सांगतस, पण नई शेतस. त्या तुना बाराम वाईट गोष्टी सांगतस, पण त्या खरज सैतान ना सभा ना सदस्य शेतस. ज्या दुख तुले सहन करना पळतीन, तेस्ले घाबरू नको. कारण कि सैतान तुमना मधून कईक लोकस्ले बंदीगृह मा टाकावर शे कारण कि त्या तुमले पारखी सको. दहा दिन लोंग तुमले गैरा दुख उचलन पडीन. पण जर तुमले मरण बी पडीन तरी मनावर विश्वास कराले नका सोळज्यात, कारण कि मी तुमले तुमनी जीत ना प्रतीफय ना स्वरूप मा कायम ना जीवन देसू. जो मना संदेश ले समजान देखस तो तेले ध्यान दिसन आयकी लेवो जी आत्मा मंडळी ले सांगस, ज्या वाईट वर विजयी होतस, त्या दुसरी मृत्यु ना दंड ना भागीदार नई होवावत.” तेनी मले हय बी सांग, कि पर्गम शहर नि मंडळी ना स्वर्गदूत ले हय लिख, “मी तो शे जेना जोळे तेज दुधारी तलवार शे. आणि मी तुले हय सांगस, पण तरी बी तुमी मनावर पक्का विश्वास ठेयेल शे आणि मनावर तव बी विश्वास कराले बंद नई कर, जव गैरा पहिले अन्तिपास मारा मा एयेल होता. तो मना वाचन ना प्रचार करामा विश्वास योग्य होता, एनासाठे तो तुना त्या प्रांत मा जो सैतान ना आधीन मा शे मारा मा उना. पण तुना विरुद्ध मले काही सांगण शे, कारण कि तू त्या लोकस्ना विरोध नई करस ज्या मंडळी मा खोटी शिक्षा देतस, जसा भूतकाळ मा बिलाम भविष्यवाणी करत होता. बलाम नि राजा बालक ले शिकाळेल होता कि इस्त्राएल देश ना लोकस्ले पाप मा पडा साठे काय कराले पायजे. तेनी त्या मूर्तीस्ना समोर भेट करेल वस्तू खावाना साठे आणि व्यभिचारी जीवन जगाना बारामा सिखाळ. त्याच प्रकारे तुना आठे कईक लोक असा बी शेतस, ज्या निकलाइस्ना आचारण नि शिक्षा ले मानतस. एनासाठे मन फिराव, आणि तू अस कराले नई रोकस, तर मी लवकर ईसन त्या लोकस कळून त्या तलवार कण जी मना तोंड मधून निघस, लळाई करसू. जो मना संदेश ले समजान देखस तो तेले ध्यान दिसन आयकी लेवो जी आत्मा मंडळी ले सांगस, जो वाईट वर विजयी होस, तेले मी त्या दपाळेल मन्ना मधून काही देसू. मी तेस्ना मधून प्रत्येक ले एक धव्या दगड बी दिसू, जेनावर एक नवीन नाव लिखामा ईन. जेले तेले सोळीसन जेनी तेले प्राप्त करेल शे, दुसरा कोलेच नई माहित.” तेनी मले हय बी सांग, कि थुवतीरा नगर नि मंडळी ना स्वर्गदूत ले हय लिख, “हवू संदेश परमेश्वर ना पोऱ्या कळून शे, जेना डोया आग ना ज्वाला ना सारखा, आणि जेना पाय भट्टी मा तपणारा पितयना सारखा शे, तो तुले हय सांगस. मले माहिती शे कि तुमी एक दुसरा वर प्रेम करतस, आणि हय बी कि तुमी मनावर पक्का विश्वास करतस. तुमी ज्या प्रकारे एक दुसरा नि मदत कर आणि तुमना धीर बी मले माहिती शे. मले हय बी माहिती शे कि जव तुमी पहिला सावा मनावर विश्वास कर, तेना तून बी जास्त चांगला काम तुमी आते करतस. पण मले तुना विरुद्ध हय सांगण शे, तुमी त्या बाई इजेबेल ले खोटी शिक्षा पसरावू देतस. ती सांगस कि ती एक भविष्यवक्तीन शे, पण आपली शिक्षा कण ती मना दासस्ले व्यभिचार कराले आणि मूर्तीस्ले बलिदान करेल जेवण ले खावाळा ले भरमावस. मनी तिले तीना पाप पासून मन फिरावाले मोका दिधा, पण ती त्या वाईट कामस्ले बंद कराले नई देखस. एनासाठे, मी तिले आजारी पाळसु, आणि ज्या तीना संगे व्यभिचार करतस, जर त्या त्या वाईट काम कण मन नई फिरावतस, त मी तेस्ले बी भयानक क्लेश मा टाकसु. मी तीना शिक्षास्ना पालन करणारस्ले बी मारी टाकसु. आणि मंडळी ना सर्वा विश्वासी जानी लीन कि मी मनस्ले परखस, आणि लोकस्नी ईच्छास्ले जाणस. मी तुमना मधून प्रत्येक ले तुमना करेल पाप ना नुसार दंड देसू. जो वाईट वर विजयी हुयीन, आणि शेवट लोंग मना कार्यस्ले पुरा करत राहीन, मी तेले सर्वा जाती-जाती ना लोकस्वर अधिकार दिसू. मी तेस्ले राज्य कराना तोच अधिकार देसू, जो मले मना बाप नि दियेल शे. तेस्ना राज्य लोखंड ना सारखा मजबूत राहीन जो तुटत नई, आणि तेस्ना शत्रू माती ना चुराडा होणारा भांडा ना सारखा राहतीन. मी तेस्ले सकाय ना तारा देसू, जो तेस्ले तेस्नी विजय दर्शावीन. जो मना संदेश ले समजान देखस तो तेले ध्यान दिसन आयकी लेवो जी आत्मा मंडळी ले सांगस.” तेनी मले हय बी सांग, कि सार्दीस शहर नि मंडळी ना स्वर्गदूत ले लिख, “हवू संदेश तेना कळून शे, जेना हात मा सात तारा शेतस आणि जो परमेश्वर ना सात आत्मास्ले धाळस. मी तुले सांगस कि मले तुना करेल काम माहिती शेतस. तू आत्मिक पणे जित्ता त दिखस, पण खरज मा तू आते मना अनुकरण नई करत. एनासाठे, जागी जावा, आणि मनावर जो थोळासा विश्वास तुमना मधमा बाकी शे, त्या विश्वास ले पक्का करा, एनासाठे कि तो पूर्णपणे सरी नई जावो. मले माहिती शे कि तुना मा गैरी कमी शे कारण कि जे तू करस परमेश्वर तेना कण खुश नई होत. ती शिक्षा ले आठवण कर जी तुनी आयकेल आणि स्वीकार करेल होती. जे तुले शिकाळा मा एयेल शे तेना अनुकरण कर, आणि आपला वाईट कामस पासून मन फिराईसन पश्चताप कर. जर तू कायम वाईट ले करत ऱ्हाशी, त मी चोर सारखा अचानक ईजासू, आणि तुले माहिती बी नई पळाव कि मी कव तुले दंड देवा साठे ईजासू. पण हा, सार्दीस शहर मा तुना आठे काही असा लोक शेतस, जेस्नी पाप कण स्वता ले अशुद्ध नई करेल शे. त्या धव्या कपळा घालीसन मना संगे चालतीन, कारण कि त्या ह्या योग्य शेतस. जो वाईट वर विजय होस, त्या तेस्ना सारखा धव्या कपळा घालतीन. आणि मी तेस्ना नाव त्या जीवन नि पुस्तक मधून नई खोळाव, जेनामा परमेश्वर नि कायम ना जीवन ले प्राप्त करणारस्ना नाव लिखी ठीयेल शे. मी आपला बाप ना समोर आणि तेना स्वर्गदूतस्ना समोर हय घोषणा करसू कि त्या मना लोक शेतस. प्रत्येक झन जो मना संदेश ले समजान देखस, तेस्ले त्या गोष्ट ले ध्यान कण आयकाले पाहिजे, जी पवित्र आत्मा ख्रिस्ती मंडळीस्ले सांगस.” तेनी मले हय बी सांग, कि फीलेदिलफिया शहर नि मंडळी ना स्वर्गदूत ले हय लिख. “मी तो शे जो पवित्र आणि सत्य शे, आणि जेना जोळे दाविद नि चाबी शे. जव मी चाबी लिसन दरवाजा उघाळसू त कोणीच तेले बंद नई करू सकत, आणि बंद करू, त कोणीच तेले उघाळू नई सकत. मले तुना करेल काम माहित शेतस, मले माहिती शे कि तुमनी शक्ती सीमित शे. पण तरी बी तुनी मना सांगेल गोष्टीस्ना पालन कर आणि तुनी मनावर विश्वास कराले कदीच नकार नई कराव एनासाठे, मनी तुना साठे एक दरवाजा उघाळी ठीयेल शे, जेले कोणीच बंद नई करू सकस. आयक, ज्या लोक सैतान ना समूह ना सदस्य शेतस, ज्या यहुदी लोक होवाना दावा करतस पण त्या खरज मा यहुदी नई शेतस आणि खोट बोलतस, तेस्ले मी तुना वश मा करी टाकसु. मी अस करसू, कि त्या तुना समोर ईसन तुले नमन करतीन, आणि समजी जातात कि मनी तुनावर प्रेम करेल शे. तुनी मना संदेश ले धरी ठेव कि क्लेश मा धीर धरीसन स्थिर राही सको. एनासाठे, मी त्या भारी विपत्ती ना टाईम पासून तुनी रक्षा करसू, जी पृथ्वी ना सर्वा रहिवासीस्वर तेस्ले परखा साठे येणार शे. मी लवकरच येणार शे, एनासाठे, आपला विश्वास मा दृढ बनी ऱ्हाय कारण कि कोणी बी तुले तुना विजय ना पुरस्कार लेवा कण रोकी नई सको जो मुकुट ना सारखा शे. जो वाईट वर विजय हुईन, त्या परमेश्वर ना घर मा खंबा ना सारखा होतीन, जेनी मी सेवा करस आणि तो तेले कदी बी नई सोळाव, आणि तो परत कदी तेना मधून बाहेर नई निघाव. मी तेनावर आपला परमेश्वर ना नाव आणि परमेश्वर ना नगर ना नाव जो नवा यरूशलेम म्हणावस लीखसू, हवू तो नगर शे जो मना परमेश्वर ना कळून स्वर्ग मधून खाले उतरीन. मी तेनावर आपला नवा नाव बी लीखसू. प्रत्येक झन जो मना संदेश ले समजान देखस, तेस्ले त्या गोष्ट ले ध्यान कण आयकाले पायजे, जी पवित्र आत्मा ख्रिस्ती मंडळीस्ले सांगस.” तेनी मले हय बी सांग, कि “लावदीकिया शहर ना मंडळी ना स्वर्गदूत हय लिख. मी तोच शे जेले आमेन सांगामा येस, कारण कि मी विश्वास योग्य शे आणि मी परमेश्वर ना बारामा जे बी प्रमाणित करस ते सत्य शे. जे काही बी तेनी बनायेल शे मी त्या सगळा ना मुल स्त्रोत बी शे, मी तुले हय सांगस. मले तुना करेल काम माहिती शेतस, तू नईत मनावर विश्वास करतस आणि नईत मनावर प्रेम करस. तू त्या पाणी ना सारखा शे जे नईत थंडा शे आणि नईत गरम शे. चांगल राहीन कि तू त गरम राहो व थंडा. एनासाठे कि तू कोमट शे, मी तुले सोळावर शे. तू सांगस, कि मी मालदार शे, मी समृद्ध हुई जायेल शे व मले कोणतीच कमी नई शे, पण तुले नई माहिती कि खरज मा तू तुच्छ, दुर्दैवी, गरीब, अंधा व नागा शे. एनासाठे मी तुले सल्ला देस, कि तू मना पासून युध्द सोन विकत लीले कि तू खरज मालदार हुई जावो. तू मनातून जास्त धव्या कपळा बी विकत लीले, जेले घालाना द्वारे तुना शरीर झाकाई जावो आणि तले लज्जित नई होण पळो. आणि आपला डोया साठे मना पासून औषध विकत ले कि तू देखी सको. जेस्ना वर मी प्रेम करस, तेस्ले मी शिकाळस आणि दंड बी देस. एनासाठे चांगला कामस्ले करामा लागेल राहा आणि वाईट कामस्ले कराले बंद करा. आयक, मी दरवाजा ना बाहेर उभा ऱ्हायसन दरवाजा वाजाळस. जर कोणी मनी आवाज आयकीसन दरवाजा ले उघाळस, त मी तेस्ना घर मा ईसन तेस्ना संगे जेवण करसू आणि त्या मना संगे जेवण करतीन. जो वाईट वर विजय हुईन, तेले मी त्याच प्रमाणे आपला बाजुमा सिंहासन वर बसाना अधिकार देसू, ज्या प्रमाणे मी विजय हुईसन आपला बाप ना संगे तेना सिंहासन वर बसेल शे. प्रत्येक झन जो मना संदेश ले समजान देखस, तेस्ले त्या गोष्ट ले ध्यान कण आयकाले पायजे, जी पवित्र आत्मा ख्रिस्ती मंडळीस्ले सांगस.” ह्या सर्वा गोष्टीस्ले देखा नंतर, मनी देख कि स्वर्ग मा एक दरवाजा उघळेल शे, परत मनी तीच आवाज दुसऱ्यांदा आयकी. जेना आवाज तुरही ना आवाज ना सारखा होता. तेनी मले सांग, “मना जोळे आठे वरे ईपळ, आणि मी त्या गोष्टी तुले दाखाळसु, जेस्न ह्या गोष्टीस नंतर होण अवश्य शे.” लगेच परमेश्वर ना आत्मा मनावर ईग्या. मनी देख कि स्वर्ग मा एक सिंहासन ठेवामा एयेल शे आणि तेनावर कोणी बठेल शे. जो माणुस त्या सिंहासन वर बठेल होता तो मूल्यवान दघळ यास्फे, सार्दी व रत्न सारखा दिखत होता. व त्या सिंहासन ना चारी बाजू मेघधनुष ना सारखा पाचू नि चमक होती. त्या सिंहासन ना चारी बाजू ले गोलाई मा चौवीस सिंहासन होतात. त्या सिंहासनस्वर धव्या कपळास्मा, सोना ना मुकुट घालेल चौवीस प्राचीन बठेल होतात. त्या सिंहासन पासून विजास्नि चमक, वाणी व मेघ-गर्जन नि आवाज निघी ऱ्हायंती. सिंहासन ना समोर सात दिवा पेटी ऱ्हायंतात, ज्या परमेश्वर ना सात आत्मा शेतस. सिंहासन ना समोर काच सारखा समुद्र होता. त्या सर्वास्ना मधमा एक मोठा सिंहासन होता, आणि तेना चारी बाजुले मनी चार प्राणीस्ले देख. जेस्ना शरीर पुळून व मांगून डोयास्कन झाकायेल होता. त्या प्राणीस मधून पहिला प्राणी सिंह सारखा दिखत होता, दुसरा प्राणी वासरू ना सारखा, तिसरा प्राणी ना तोंड माणुस ना सारखा होता, आणि चौथा प्राणी उळता गरुड सारखा दिखत होता. ह्या चारी प्राणीस्ले सहा-सहा पंख होतात. तेस्ना चारी बाजूस्ले डोयाच डोया होतात आठ लगून कि तेस्ना पंखस्ना मधमा बी डोया होतात, आणि त्या रात-दिन बिगर आराम करना हय सांगत ऱ्हातस, “पवित्र, पवित्र, पवित्र प्रभु परमेश्वर, सर्वशक्तिमान, जो कायम शे, जो कायम होता आणि येणार शे.” “ओ प्रभु आमना परमेश्वर, तुनीच सर्वा वस्तूस्नी रचना करी, तुनीच ईच्छा ना नुसार त्या बनावामा उनात आणि अस्तित्व मा शे. एनासाठे तू महिमा, आदर सामर्थ्य ना योग्य शे.” जो सिंहासन वर बठेल होता, मनी तेना हात मा एक चामळी ना पत्र देख, जीना वर दोनी बाजूस्ले लिखेल होत, आणि तिले सात शिक्का मारीसन बंद करेल होती. तव मनी एक सामर्थ्यशाली स्वर्गदूत ले देख, जो जोरमा हय घोषणा करी ऱ्हायंता, “कोण ह्या चामळी ना पत्र ना शिक्कास्ले तोळाना आणि इले उघाळाना योग्य शे?” पण नईत स्वर्ग मा, नईत पृथ्वी वर, नईत पृथ्वी ना खाले कोणी त्या चामळी ना पत्र ले उघाळाना व वाचा ना योग्य होता. तव मी गैरा रळू लागनु, कारण कि त्या चामळी ना पत्र ले उघाळाना व तिले वाचा ना योग्य कोणीच नई भेटणा. ह्या वर त्या प्राचीनस मधून एक नि मले सांग, “रळू नको, देख, जेले यहूदा ना गोत्र ना सिंह म्हणामा एस, जो राजा दाविद ना वंश ना शे, तो सैतान वर विजय हुयेल शे, एनासाठे तो त्या चामळी ना पत्र ना साती शिक्कास्ले तोळाना आणि तिले उघाळा योग्य शे.” तव मनी चार प्राणीस्ना आणि चौवीस प्राचीनस्ना मधमा एक कोकरा ले सिंहासन ना जोळे उभा देख. तो समजा वध करेल कोकरा सारखा होता. तेले सात-सात सिंग आणि सात डोया होतात, ह्या परमेश्वर ना सात आत्मा शेतस, जीस्ले परमेश्वर नि सर्वी पृथ्वी वर धाळेल शे. तव कोकरा जोले ईसन सिंहासन वर बठणार ना उजवा हात मधून चामळी ना पत्र ले ली लीध. जव तेनी ती पुस्तक ले ली लीध, त त्या चारी प्राणी आणि चौवीस प्राचीन त्या कोकरा ले नमन कराले लागनात. प्रत्येक प्राचीन हात मा वाणी आणि धूप कण भरेल सोना ना वाट्या लीयेल होतात. धूप कण भरेल वाट्या त परमेश्वर ना पवित्र लोकस्ना प्रार्थनास्ले दर्शावस. त्या हय सांगत एक नवा गाना म्हणाले लागणत, “तू ह्या चामळी ना पत्र ना शिक्कास्ले तोळाना आणि इले उघाळाना योग्य शे, कारण कि तू वध करामा एयेल होता. आणि तुनी आपला रक्त व्हावाळीसन परमेश्वर ना साठे प्रत्येक वंश, भाषा, जाती, आणि देशस मधून लोकस्ले विकत ली लीयेल शे. तुनी तेस्ले असा करेल शे जेस्ना वर आमना परमेश्वर ना राज्य शे, आणि त्या पुजारी बनू सकतस ज्या तेनी सेवा करतस, आणि त्या पृथ्वी वर राज्य करतीन.” जव मी परत देखनु, त अचानक मनी लाखो आणि करोळो स्वर्गदूतस्नी आवाज ले आयक ज्या मोजणी मा असंख्य होतात. ह्या स्वर्गदूत सिंहासन, चारी प्राणी व प्राचीनस्ना चारी बाजू ले उभा होतात. तो कोकरा जेना वध करामा एयेल होता, तो महिमा ना योग्य शे, तेना अधिकार महान शे, तेना ज्ञान खोल शे, तो गैरा शक्तिशाली शे आणि तो गैरा मालदार शे, या आमी तेना आदर करूत, या आमी तेनी स्तुती करूत. मंग मनी स्वर्ग मा आणि पृथ्वी वर आणि पृथ्वी ना खाले आणि समुद्र ना सर्वा रचेल जीवस्ले, आणि सर्व काहीस्ले जे तेस्ना मा शे. हय गान म्हणतांना आयक, “या आमी तेनी स्तुती करूत जो सिंहासन वर बठेल शे, या आमी कोकरा नि स्तुती करूत, या आमी कायम ना साठे तेना आदर करूत आणि तेले सन्मान देवूत, कारण कि तो सर्वास्तून जास्त शक्तिशाली शे, तेना राज्य युगानयुग राहो.” आणि चारी प्राणीस्नि आमेन सांग, आणि प्राचीनस्नी पडीसन उपासना करी. मंग मनी देख, कि कोकरा नि त्या सात मोहर मधून एक ले खोल, आणि मी त्या चारी प्राणी मधून एक ले मेघ-गर्जन सारखा आवाज मा हय सांगतांना आयक, “या.” तव मले तठे एक धव्या रंग ना घोळा दिखना, तेनावर जो बसेल होता तेना हात मा धनुष्य होता, आणि तेले एक मुकुट देवामा उना. तो स्वर्ग तून पृथ्वी कळे एक विजय ना सारखा जय प्राप्त कराना साठे निघेल शे. जव कोकरा नि दुसरी मोहर खोली, तर मनी, दुसरा प्राणी ले हय सांगतांना आयक, “या.” लगेच एक लाल रंग ना घोळा निघना. तेनावर बठेल ले एक तलवार दियेल होती आणि तेले हवू अधिकार देवामा उना कि तो पृथ्वी वरून शांती ले नष्ट करी दे, कारण कि लोक एक दुसरा ना वध करोत. जव त्या कोकरा नि तिसरी मोहर खोली, त मनी तिसरा प्राणी ले हई सांगतांना आयक, “या.” आणि तव मनी एक काया रंग ना घोळा ले बाहेर येतांना देख, आणि तेनावर बठेल ना हात मा एक तराजू होता. मनी त्या चारी प्राणीस्ना मधून एक माणुस ना सारखा आवाज आयकनु, जो सांगत होता, भविष्य मा पृथ्वी वर काय पडीन, एनासाठे एक दिन नि मजुरी ना साठे सेर भर गहू, आणि तीन सेर जव गैरा शे. पण तेल आणि द्राक्षरस न नुकसान नका करज्यात. जव त्या कोकरा नि चौथी मोहर खोली, त मनी चौथा प्राणी ले हई सांगतांना आयक, “या.” तव मनी एक मांगला घोळा ले बाहेर येतांना देख, आणि तेनावर जो बठेल होता तेना नाव मृत्यु होता, आणि अधोलोक तेना मांगे मांगे चालत येत होत. तेले पृथ्वी ना चौथा भाग ले तलवार, काय, महामारी व जंगली वनपशु ना द्वारे नाश कराना अधिकार देवामा उना. जव त्या कोकरा नि पाचवी मोहर खोली, त मनी वेदी ना खाले त्या लोकस्ना प्राणस्ले देख, ज्या एनासाठे मारा मा एयेल होतात कारण कि तेस्नी परमेश्वर ना वचन ना प्रचार करेल होत आणि आपली साक्ष मा विश्वास योग्य ठरेल होतात. तेस्नी मोठा शब्द मा आवाज दिसन सांग, “हे सर्वशक्तिमान, पवित्र, आणि सत्य प्रभु, तू कव लगून पृथ्वी वर ऱ्हायनारा त्या वाईट लोकस्ले, आमले मारी टाकानी शिक्षा देवा साठे उशीर करत ऱ्हाशी?” तव तेस्ना मधून हरेक ले श्वेत कपळा देवामा उना, आणि तेस्ले थोळा टाईम आराम कराले सांगामा उन, तठलोंग कि त्या संगी दास आणि भावूस्नी नेमेल संख्या पूर्ण नई होत, जेस्ना वध तेस्ना सारखा होणार शे. जव त्या कोकरा नि साहवी मोहर खोली, त मनी देख कि एक मोठा भूकंप हुयना, सूर्य असा काया पडणा, जसा केसस कण बनायेल चादर आणि पूर्ण चांद रक्त ना रंग सारखा लाल हुईग्या. आणि आकाश ना तारा पृथ्वी वर असा पडी उनात जसा आंधी येवावर अंजिर ना झाळ वरून कच्चा फय जमीन वर ईपळतस. आकाश फाटीसन असा हुईग्या जसा चामळी ना पत्र गुंडयी जास. आणि हरेक डोंगर आणि टापू आपला जागा वरून बाजू मा करामा उनात. तव सगळी पृथ्वी ना लोक, आमना वर इपळा राजा, महापुरुष, सेना सरदार, मालदार आणि सामर्थ्यी लोक, सर्वा दास व स्वतंत्र व्यक्ती, खायीस्मा व डोंगरस्ना खडकस्मा जाई दपणात. त्या डोंगर व दगडस्ले सांगू लागणत, “आमना वर पडीजा आणि आमले कोकरा ना दंड कण आणि तेनी उपस्थिती कण जो सिंहासन वर बठेल शे, दपाळी ले. कारण कि तो भयानक दिन ईजायेल शे, आणि कोणी बी त्या दंड पासून नई वाचाव.” “जठलोंग आमी आपला परमेश्वर ना दासस्ना कपाय वर मोहर नई लावतस तठलोंग पृथ्वी आणि समुद्र आणि झाळस्ले नुकसान नका करज्यात.” जव स्वर्गदूतस्नी शिक्का लाई दिधा, त कोणी मले सांग कि ज्या लोकस्ना कपाळ वर स्वर्गदूतस्ना द्वारे परमेश्वर ना शिक्का लावामा एयेल शे तेस्नी संख्या मधून एक शे चौरेचाळीस हजार होती. ह्या लोक इस्त्राएल देश ना बारा गोत्र मधून होतात. स्वर्गदूतस्नी यहूदा ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात, रउबेन ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात, गाद ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात. आशेर ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात, नफताली ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात, मनश्शे ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात. शिमोन ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात, लेवी ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात, इस्साखार ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात. जबुलून ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात, योसेफ ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात, बन्यामीन ना गोत्र मधून बारा हजार लोकस्वर शिक्का लावात. एना नंतर मनी तठे लोकस्नी एक मोठी गर्दी देखी, जिले कोणी मोजू नई सकत होता. त्या संसार ना प्रत्येक जाती, देश, आणि भाषा मधून एयेल होतात. त्या धव्या कपळा घालेल आणि हात मा खजूर ना फांद्या लिसन, सिंहासन ना समोर आणि कोकरा ना समोर उभा होतात. आमना परमेश्वर नि जो सिंहासन वर बठेल शे आणि कोकरा नि जय-जयकार होवो. फक्त तूच तारणार शे. तव सर्वा स्वर्गदूत ज्या त्या सिंहासन, चौवीस प्राचीन आणि चारी प्राणीस्ना चारी बाजू ले उभा होतात. त्या सर्वान-सर्वा सिंहासन ना समोर नमन करणात आणि तेस्नी हय सांगीसन परमेश्वर नि स्तुती करी कि, “आमेन आमी घोषणा करतस कि आमना परमेश्वर महान, सामर्थी, शक्तिशाली आणि ज्ञानी शे. या आमी तेनी स्तुती आणि धन्यवाद युगानयुग करत राहोत. आमेन.” एनावर प्राचीनस मधून एक नि मले सांग, “काय तुले माहिती शे ह्या लोक ज्या धव्या कपळा घालेल शेतस कोण शेतस? काय तुले माहिती शे कि त्या कोडून एयेल शेतस?” मनी तेले सांग, “ओ स्वामी, मले त नई माहिती पण तुलेच माहित शे,” तेनी मले सांग, “ह्या लोक जेस्नी धव्या कपळा घालेल शे, ह्या त्या लोक शेतस ज्या महा क्लेश ना टाईम ले माराइ ग्यात. ह्या त्या लोक शेतस जेस्नी आपला कपळा कोकरा ना रक्त कण धुईसन ना रक्त मा धुयीसन धव्या करेल शेतस. ह्या मुळे त्या परमेश्वर ना सिंहासन ना समोर शेतस, आणि त्या परमेश्वर ना घर मा रात-दिन तेनी सेवा करतस, आणि तो जो सिंहासन वर बठेल शे तो तेस्ना संगे राहीन आणि तेस्नी राखोई करीन. त्या परत भुक्या आणि तिश्या नई होवावत, आणि नईत कळक उन, व कोणती उष्णता तेस्ले चेटाळाव. कारण कि मधला सिंहासन वर बठेल कोकरा, तेस्नी राखोई करीन, जसा मेंडपाळ आपल्या मेंढ्यास्नी राखोई करस. तो तेस्ले जीवन ना पाणी जोळे लीजाईन, आणि परमेश्वर तेस्ना डोयास मधला सर्वा आसूस्ले पुसी टाकीन.” जव त्या कोकरा नि सातवा शिक्का ले उघाळ, त ज्या कोणी स्वर्ग मा होतात त्या सर्वा आधा तास साठे शांत हुई ग्यात. एना नंतर मनी देख कि त्या सात स्वर्गदूतस्ले, ज्या परमेश्वर ना समोर उभा ऱ्हातस, सात तुरह्या देवामा उनात. तठून एक स्वर्गदूत सोना ना धूप लिसन वेदी ना जोळे ईसन उभा ऱ्हाय ग्या. तेले गैरी धूप देवामा उणी कि तो तेले सर्वा पवित्र लोकस्नी प्रार्थनास्ना संगे त्या सोनानी वेदी वर अर्पण करो, जी परमेश्वर ना सिंहासन ना समोर शे. आणि स्वर्गदूत ना हात कण धूप ना धुक्कय, पवित्र लोकस्नी प्रार्थनास्ना संगे, वरे उठना आणि परमेश्वर ना समोर पोहचना. तव स्वर्गदूत धूपदान लिसन तेले वेदी वरनी आग कण भर आणि पृथ्वी वर फेकी टाक, जेना कण वीज नि चमक, गडगडाट व मेघ-गर्जन नि आवाज आणि भूकंप ईग्या. तव त्या सात स्वर्गदूत, जेस्ना जोळे तुरह्या होत्यात, तीस्ले फुका साठे तयार हुयनात. पहिला स्वर्गदूत नि तुरही फुकी, त आग आणि रक्तमिश्रित गारा उत्पन्न हुयनात, तेस्ले पृथ्वी वर टाकामा उन. ह्या मुळे, पृथ्वी ना एक तिसरा भाग हुईग्या, एक ना तिसरा भाग झाळ बईसन राक हुई ग्यात, आणि सर्वा हिरव गवत बी बईसन राक हुईग्या. तव दुसरा स्वर्गदूत नि तुरही फुकी, त मोठा डोंगर सारखी कोणती चेटणारी वस्तू समुद्र मा फेकामा उणी जेना कण एक ना तिसरा भाग समुद्र रक्त मा बदली ग्या. एना कण समुद्र मा राहणारा एक ना तिसरा भाग जहाज बी नाश हुई ग्यात. तिसरा स्वर्गदूत नि तुरही फुकी, आणि मशाल ना सारखा पेटत एक मोठा तारा आकाश मधून तुटणा आणि तो एक ना तीसारा भाग नदी व झरास्वर जाई पडणा. त्या तारा ना नाव कडूदवणा आणि एक ना तिसरा भाग पाणी कडू हुईग्या, आणि गैरा लोक पाणी पेवा मुळे मरी ग्यात, कारण कि तो पाणी कडू हुई जायेल होता. जव चौथा स्वर्गदूत नि तुरही फुकी, त सूर्य ना एक ना तिसरा भाग, चांद ना एक ना तिसरा भाग आणि तारास्ना एक ना तिसरा भाग वर असा प्रहार हुईना कि तेस्ना एक ना तिसरा भाग अंधकारमय हुईग्या. ह्या मुळे दिन ना एक ना तिसरा भाग टाईम सूर्य नई चमकणा, आणि चांद आणि तारा रात ना एक ना तिसरा भाग टाईम लगून नई चमकनात. जव मी हय आकाश देखीच ऱ्हायंतू, मनी बरोबर आपला वर उडती एक गरुड ले जोरमा हय सांगतांना आयक, “धिक्कार, धिक्कार, धिक्कार, त्या दुष्ट लोकस्वर विपत्ती येतीन, ज्या पृथ्वी ऱ्हातस. त्या तुरही ना शब्द मुळे, जो बाकी तीन स्वर्गदूतस्ना द्वारे करामा ईन, पृथ्वी वर राहणारा दुष्ट लोकस्वर विपत्ती ईन.” जव पांचवा स्वर्गदूत नि तुरही फुकी, तर मनी आकाश तून पृथ्वी वर एक तारा पडतांणा देख, त्या तारा ले च्यावी देवामा उणी जेना कण कि तो अग्नीकुंड ले उघाळी सको, जेना शेवट ना अंत नई शे. तेनी अग्नीकुंड ले उघाड आणि कुंडा मधून एक मोठी भट्टी ना सारखा धुक्कय निघणा, आणि त्या कुंडा ना धुक्कय कण सूर्य आणि वायू आधयारी हुई ग्यात. त्या धुक्कय मधून किरकोळा निघीसन पृथ्वी वर पसरी ग्यात, आणि तेस्ले पृथ्वी ना विंचू ना सारखी लोकस्ले डंक मारानी शक्ती देवामा उणी. ह्या पाच महिना मा लोक मराणा साधन झामलतीन, पण त्या नई मराव. त्या मरानी लालसा करतीन, पण मराणा साधन नई भेटाव. ह्या किरकोळा लळाई ना घोळा ना सारखा दिखत होतात, ज्या युध्द मा जावाना साठे तयार होतात. तेस्ना डोका वर सोना ना मुकुट ना सारखा काही होता, तेस्ना चेहरा मनुष्य ना चेहरा सारखा होता. तेस्ना केस बाई ना केस सारखा लांब होतात, आणि तेस्ना दात सिंह ना सारखा मजबूत होतात. तेस्ना शरीर लोखंड ना कवच कण झाकेल होता. जव त्या उडत होतात त तेस्ना पंखना आवाज असा होत होता जसा लळाई मा पयनारा रथ व गैरा घोळास्ना ऱ्हास. तेस्नी शेपूट विंचू नि डंक सारखी होती, आणि तेस्नी शेपूट माच लोकस्ले पाच महिना लोंग दुख पीडा देवानी सामर्थ्य होती. अग्नीकुंड ना दूत तेस्ना राजा शे, जो तेस्ना वर नियंत्रण करस. तेना नाव इब्री भाषा मा अबद्दोन, आणि ग्रीक मा अपुल्लयोन शे, तेना नाव ना अर्थ नाश करणारा शे. पहिली विपत्ती समाप्त हुई गई, पण येणा नंतर दोन विपत्ती आजून येणार शेतस. येणा नंतर, जव सहावा स्वर्गदूत नि तुरही फुकी तो, त मनी परमेश्वर ना समोर स्थापित सोना ना वेदी ना चारी कोपरा तून एक आवाज आयकणु. आणि तो आवाज सहावा स्वर्गदूत जेना कळे तुरही होती हय सांगत होती, “मोठी नदी फरात मा ज्या चार स्वर्गदूत बांधेल शे, तेस्ले सोळी द्या.” एनासाठे त्या चारी स्वर्गदूत, ज्या ह्याच टाईम, दिन, महिना, आणि वर्ष ना साठे तयार ठीयेल होतात, एक तिसरा भाग नाश कराना साठे खोलामा उनात. तेस्नी घोळस्वार नि एक मोठी सेना एकत्र करीलीधी, मनी तेस्नी गीनती नि घोषणा आयकी, कि त्या वीस करोड शेतस. ज्या घोळास्ले आणि तेस्ना वर बठेलस्ले मनी दर्शन मा देखेल होता त्या असा दिखनात, तेस्ना कवच उग्र लाल रंग, दाट निया, आणि पिव्या गंधक ना सारखा होतात. घोळास्ना डोक सिंहास्ना डोका सारखा दिखत होतात, आणि तेस्ना तोंड मधून आग, धुक्कय आणि गंधक निघत होती. या तिनी विपत्ती द्वारे, म्हणजे आग, धुक्कय, आणि गंधक द्वारे, जी घोळास्ना तोंड मधून निघत होती, सर्वा माणसस मधून एक तिसरा भाग ले मारी टाक. त्या घोळास्नि सामर्थ्य तेस्ना तोंड व तेस्नी शेपूट मा होती कारण कि तेस्नी शेपूट साप ना सारखी होती, जेस्ना द्वारे त्या पीडा देत होतात. नंतर मनी एक आखो बलवान स्वर्गदूत ले ढगस कण घेरायेल स्वर्ग मधून उतरतांना देख, आणि तेना डोका ना चारी बाजूस्ले मेघधनुष्य होता, तेना तोंड सूर्य ना सारखा प्रकाशित आणि तेना पाय पेटता खंबा ना सारखा होतात. तेनी आपला उजवा पाय समुद्र वर आणि डाखोऱ्या पाय पृथ्वी वर ठेव, आणि तेना हात मा एक धाकलुशि उघाळेल चामळी ना पत्र होत. त्या दूत नि जोर बोल आणि तेनी आवाज सिंहगर्जन ना सारखी होती. जव तेनी हाक मारी, त सात मोठा शब्दस्नि तेले उत्तर दिध, ज्या मेघ-गर्जन सारखा होतात. जव सात मेघ-गर्जन बोली दिनात, त मी लिखा साठे तयार होतु, पण स्वर्ग मधून मनी हय आवाज आयकी, “जे काही सात मेघ-गर्जनस्नी सांगेल शे, तेस्ले लिखू नको, पण आपला माच गुप्त ठेव.” तव ज्या स्वर्गदूत ले मनी समुद्र आणि पृथ्वी वर उभा देखेल होत, तेनी आपला उजवा हात स्वर्ग कळे उचलात. आणि परमेश्वर नि शेप्पत खाईसन, जो युगानयुग जित्ता ऱ्हास, आणि जेनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि जे काही तेनामा शे बनायेल शे, तेनीच शेप्पत खाईसन सांग. कि “आते आखो कोणतीच गोष्ट ना उशिरा नई होवाव.” ज्या दिन सातवा स्वर्गदूत नि तुरही आयकू ईन, त्या दिन परमेश्वर ना गुप्त मनोरथ पुरा हुई जाईन जो तेनी आपला सेवा करणारा भविष्यवक्तास्ले सांगेल होत. तव मनी परत त्या आवाज ले आयक जो स्वर्ग मधून मना संगे बोलत होत, त्या आवाज नि मले सांग, “जा, त्या स्वर्गदूत ना हात मधून, जो समुद्र व पृथ्वी वर उभा शे, त्या उघळेल चामळी ना पत्र ले लीले.” त मले हय सांगामा उन, कि “मले परत गैरा लोक, आणि देश, आणि भाषा, आणि राजास्ले परमेश्वर नि योजना ना बारामा घोषणा करनी पळीन.” त मले एक काठी देवामा उणी, जी मापाना सामान (बोरू) सारखी होती, आणि परमेश्वर नि मले सांग, “उठ, परमेश्वर ना घर व वेदी ना माफ ले आणि तठे उपस्थित उपासना करणारस्नि गणती कर.” पण मंदिर ना बाहेर ना आंगण ना माफ नको लेयजो, कारण ते त्या लोकस्ले दियेल शे, जेस्नी मनावर विश्वास नई करणात, आणि त्या यरूशलेम शहर ले बेचाळीस महिना लोंग पाय खाले तुडवतील. त्या टाईम ले, मी आपला दोन साक्षीस्ले हवू अधिकार देसू कि त्या केसस कण बनेल चादर ले व्हळीसन, एक हजार दोन शे साठ दिन लोंग मना संदेश नि घोषणा करतीन. ह्या दोन साक्षीस्नी तुलना दोन जैतून ना झाड आणि दोन दिवट कण करेल शे जो पुरा संसार ना प्रभु परमेश्वर ना समोर उभा ऱ्हातस. जर कोणी एस्ले नुकसान पोहचावा ना देखस, त एस्ना तोंड मधून आग निघस आणि ती एस्ना शत्रूस्ले नष्ट करी देस. जो एस्ले नुकसान पोहचावा ना देखस, तेले ह्याच प्रकारे मरण पळीन. तेस्ले आकाश ले बंद कराना अधिकार शे, एनासाठे जव त्या परमेश्वर संदेश ना प्रचार करतीन, त त्या टाईम ले पाणी नई पळो. तेस्ले सर्वा पाणी वर बी अधिकार शे, कि त्या तेले रक्त मा बदली देवो. तेस्ले पृथ्वी वर हरेक प्रकार नि महामारी धाळाना बी अधिकार शे. जव त्या दोन साक्षी परमेश्वर ना संदेश ले प्रचार करी देतीन, तव तो भयानक पशु ना सारखा दुष्ट जो अग्नीकुंड मधून निघीन, तो त्या दोन साक्षीस संगे भांडण करीन, तेस्ले हाराईन आणि तेस्ले मारी टाकीन. त्या दोन साक्षीस्ले मारी देवा नंतर, तेस्ना धळ त्या मोठा नगर (यरूशलेम) ना रस्ता वरच पळेल ऱ्हातीन, जठे तेस्ना प्रभु ले क्रूस वर चळावामा एयेल होता. त्या नगर नि तुलना सदोम शहर आणि मिसर देश कण करामा येस. प्रत्येक जाती, राष्ट्र, आणि भाषा मधून लोक त्या दोन साक्षी ना धळ ले साडे तीन दिन लगून देखत राहतीन आणि तेस्ना धळ ले कबर मा ठेवानी परवानगी कोलेच नई देवाव. पृथ्वी ना राहणारा तेस्ना मरा वर आनंदित हुईसन खुशी ना सन साजरा करतीन, आठ लोंग कि त्या एक दुसराले भेट बी देतीन कारण कि ह्या दोन साक्षीस्नी पृथ्वी ना राहणारास ले गैरा त्रास देयेल होता. पण साडे तीन दिन नंतर, जीवन ना आत्मा परमेश्वर कळून ईसन तेस्ना मा घुशी ग्या, आणि त्या उठीसन उभा हुई ग्यात, आणि जीतलास्नी तेस्ले जित्ता देख त्या गैरा भ्याय ग्यात. येणा नंतर, त्या दोन लोकस्नी स्वर्ग मधून एक मोठा शब्द आयक, तेनी तेस्ले सांग, “आठे वरे या.” आणि त्या तेस्ना शत्रू ले देखता-देखता मा ढग वरून स्वर्ग मा उचलाय ग्यात. मंग त्याच टाईम ले, नगर (यरूशलेम) मा एक मोठा भूकंप हुयना, आणि त्या नगर ना ईमारती ना दहावा भाग पडी ग्या, आणि त्या भूकंप कण सात हजार लोक मरी ग्या. राहेल जित्ता लोकस्मा भीती घुशी गयी आणि त्या स्वर्ग ना परमेश्वर ना धन्यवाद-महिमा कराले लागनात. हय दुसरी विपत्ती ना शेवट होता, एक आखो विपत्ती लवकरच येणार होती. जव सातवा स्वर्गदूत नि तुरही फुकी, त मनी स्वर्ग मा मोठा मोठा आवाज ले आयकनु, “जग ना राज्य आते आमना प्रभु व तेना निवाळेल तारणारा ख्रिस्त ना राज्य हुई जायेल शे, आणि परमेश्वर युगानयुग राज्य करीन.” मंग चौवीस प्राचीन ज्या परमेश्वर ना समोर आपला-आपला सिंहासन वर बठेल होतात, पालथा पळीसन हय सांगत परमेश्वर नि उपासना करू लागनात. “हे सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, जो तू शे आणि होता, आमी तुना धन्यवाद करतस, कारण कि तुनी आपला महान सामर्थ्य ली लीयेल शे आणि राज्य कराले चालू करी दियेल शे. ज्या तुनावर विश्वास नई करतस त्या लोक गैरा रागे भरेल शेतस, कारण कि टाईम ईजायेल शे कि तुना राग तेस्ना वर पडो, आते टाईम ईजायेल शे कि तू मरेल ना न्याय करो. टाईम ईजायेल शे कि तुना सेवक, आणि तुना भविष्यवक्ता, पवित्र लोकस्ले आणि परमेश्वर ना आदर करणारा सर्वा दासस्ले पुरस्कार देवामा येवो, भले त्या धाकला राहो कि मोठा. तो टाईम ईजायेल शे कि त्या लोकस्ना नाश करामा येवो ज्या पृथ्वी ना नाश करतस.” तव परमेश्वर ना घर, जो स्वर्ग मा शे, उघाळामा उना आणि त्या मंदिर मा तेना करार ना सन्दुक दिखना. त्याच टाईम ले विज्या चमकनात, गडगडाट व मेघ-गर्जन हुईना, एक मोठा भूकंप उना आणि मोठा-मोठा गार पळनात. जव ते सरी ग्या, तव आकाश मा एक महान आणि अदभूत चिन्ह दिखना. मनी देख कि एक बाई सूर्य ना सारखा दिखणारा कपळा ले व्हळीसन चांद वर उभी होती. तीना डोका वर बारा तारास्ना मुकुट होता. ती बाई गर्भवती होती आणि तीना बायतीन ना टाईम एयेल होता, आणि ती पिळा कण आरोया मारत होती. तव एक आजून चिन्ह आकाश मा दिखना, एक मोठा लाल अजगर होता, जेना सात डोका आणि दहा सिंग होता, आणि तेना डोका वर सात मुकुट होतात. तेनी आकाश ना एक तिसरा भाग तारास्ले आपली शेपूट वर तानीसन पृथ्वी वर फेकी दिधा, आणि तो अजगर ती बाई ना समोर जी बायतीन होवावर होती उभा ऱ्हायंना, कि बाळ ले जन्म लेताच तो तेले खाई जावो. तव ती बाई नि एक पोऱ्या ले जन्म दिधा, पण तो अजगर त्या पोऱ्या ले खाई नई सकना, कारण कि तो पोऱ्या लगेच हिसकावा मा उना आणि परमेश्वर ना सिंहासन ना जोळे पोहचावा मा उना. तव ती बाई त्या उजाळ जागा कळे पयी, जठे परमेश्वर नि तीना साठे जागा तयार करायेल होता, कि तठे तीना एक हजार दोन शे साठ दिन लोंग कायजी लेवामा येवो. मंग स्वर्ग मा लळाई होयनी, मिखाएल जो परमेश्वर ना मुख्य दूतस मधून एक होता, तेना पुढाकार मा दुसरा स्वर्गदूत मियसन, अजगर ना विरोध मा लळाई करणात. आणि अजगर ना मदत करणारा दूत मिखाएल ना विरोध मा भांडणात. अजगर लळाई हारी ग्या, तो आणि तेना समर्थन करणारा बाकीना दूतस्ले स्वर्ग मधून बाहेर काळी टाकामा उन. एनासाठे, तो आणि तेना दूतस्ले पृथ्वी वर फेकामा उनात. हवू मोठा अजगर तोच जो गैरा पयले साप ना रूप मा प्रगट हुयना, जेना नाव सैतान आणि भटकाव नारा शे. हवू तोच शे जो संसार ना लोकस्ले भळकाई ऱ्हायना शे. मंग मनी स्वर्ग मा कोले उंच स्वर मा हय सांगतांना आयक, “आते आमना परमेश्वर आपला लोकस्ले वाचाळीन, आते तो राजा ना रूप मा आपली सामर्थ्य आणि राज्य ना उपयोग करीन, आते तेना ख्रिस्त ह्या संसार वर आपला अधिकार ले दृढ करीन. कारण कि आमना भावूस वर रात-दिन दोष लावणारा सैतान आते आमना परमेश्वर ना उपस्थिती मा परत उभा नई राहू सकाव. तेले स्वर्ग मधून काळामा एयेल शे. आमना विश्वासी कोकरा ना रक्त ना द्वारे आणि आपली साक्ष ना वचन द्वारे सैतान वर विजय हुईनात. तेस्नी तेले हाराव कारण कि त्या कोकरा ले कायम आपला प्रभु मानीसन स्वीकार करत होतात. जर तेस्ले त्रास देवामा उना आणि मारा मा उना, तरी बी त्या आपला अंगीकार शी मांगे नई सरकणात. या कारण, हे स्वर्ग मा राहणारा तुमी खुश हुयी जावा. पण तुमी ज्या पृथ्वी वर आणि समुद्र वर शेतस तुमी अधर्मी लोकस्वर भयानक कष्ट ईन, कारण कि सैतान तुमना जोळे उतरी एयेल शे. तो गैरा रागे भरेल शे कारण कि तेले माहित शे कि तेना शेवट गैरा नजीक शे.” अजगर ले समज उन कि, तेले पृथ्वी वर पाडामा एयेल शे, त तेनी ती बाई ना पाठलाग कर जेनी पोऱ्या ले जन्म दियेल होत. पण ती बाई ले मोठा गरुड ना दोन पंख देवामा उनात, कि साप ना समोरून उळीसन उजाळ जागा वर पोहोची जावो, जठे परमेश्वर नि तीना साठे जागा तयार करायेल होता, तठे तिनी साडे तीन वरीस लोंग कायजी लेवामा येवो. तव त्या साप नि आपला तोंड वर नदी ना सारख पाणी ह्या प्रकारे वाहड कि ती बाई ले वाहाळी देवू. पण ती बाई ना मदत साठे जमीन नि आपला तोंड उघाडीसन अजगर ना द्वारे वाहाळेल पाणी ले आपला मा लीलीधा. परिणाम स्वरूप, अजगर बाई वर गैरा रागे भरणा, एनासाठे तेनी बाई ना संतान ना विरोध मा युध्द नि घोषणा करी टाकी. हवू त्या शे ज्या परमेश्वर नि आज्ञा ले मानतस, आणि प्रभु येशु नि खरी शिक्षास वर स्थिर शे. तव तो अजगर समुद्र नि रेत वर जाईसन उभा ऱ्हायना. मनी एक भयानक पशु ले समुद्र मधून निघतांना देख, जेना दहा सिंग आणि सात डोका होतात. तेना प्रत्येक सिंग वर एक-एक राज मुकुट, आणि तेना प्रत्येक डोका वर परमेश्वर नि निंदा ना शब्द लिखेल होतात. जो पशु मनी देख तो चिता सारखा होता आणि तेना पाय लीसळा ना सारखा, आणि तोंड सिंह ना सारखा होता. अजगर नि आपली सामर्थ्य, राजासन आणि आपला मोठा अधिकार, त्या पशु ले दि टाक. त्या पशु ना डोका वर असा भारी घाव होता, जेनाशी तो मरी सकत होता. पण तो चांगला हुईग्या. एनासाठे पृथ्वी ना सर्वा लोक चकित हुई ग्यात आणि तेना मांगे चालू लागनात. सर्वा लोकस्नी अजगर नि पूजा करणात कारण कि तेनी आपला सर्वा अधिकार पशु ले दि दियेल होता. त्या हय सांगीसन त्या पशु नि पूजा कराले लागनात, “या पशु ना सारखा कोणी नई शे. तेना संगे कोणी लळाई नई करू सकत.” त्या पशु ले बळायखी मारानी आणि परमेश्वर नि निंदा करानी परवानगी देवामा उणी. तेले बेचाळीस महिना लोंग काम कराना अधिकार देवामा उना. एनावर तो परमेश्वर नि निंदा कराले आणि तेना नाव, तेना निवास-स्थान आणि त्या लोकस्नी निंदा करू लागणा, ज्या स्वर्ग मा निवास करतस. परमेश्वर नि तेले हय परवानगी दिधी कि तो परमेश्वर ना लोकस संगे भांडण करी सको, आणि तेस्ले ऱ्हावो. तेले हरेक प्रजाती, गोत्र, देश, आणि भाषास्ना लोकस्वर अधिकार देवामा उना. पृथ्वी वर राहणारा सर्वा रहिवासी त्या पशु नि उपासना करतीन, त्या सर्वा जेस्ना नाव जग ना सुरुवात पासूनच त्या कोकरा नि जीवन नि पुस्तक मा, जेले बली करामा एयेल होता, लिखेल नई शे. जो मना संदेश ले समजान देखस तो तेले ध्यान दिसन आयकी लेवो. ज्या लोकस्ले कैद करामा येन निश्चित शे, त्या निश्चित रूप कण कैद करामा येतीन. ज्या लोकस्ना तलवार कण मरण निश्चित शे, त्या निश्चित तलवार कण मारा मा येतीन. एनासाठे परमेश्वर ना लोक धीर धरा आणि परमेश्वर वर विश्वास करत राहा. मंग मनी आजून एक भयानक पशु ले पृथ्वी मधून निघतांना देख, या पशु ले कोकरा ना सारखा दोन सिंग होतात. पण जव तो बोलस, त अजगर ना सारखा बोलत होता. हवू त्या पशु ना दियेल अधिकार ना उपयोग करस, जेना प्राणघातक घाव चांगला हुईजाएल होता. हवू पृथ्वी वर राहणारा सर्वा लोकस्ले, त्या पयला पशु नि उपासना कराना साठे विवश करत होता. तो दुसरा पशु, मोठ-मोठा चमत्कारी चिन्ह दाखाळत होता, आठ लोंग कि तो मनुष्य ना समोर स्वर्ग तून पृथ्वी वर आग पाळी देत होता. गैरा लोक, त्या दुसरा पशु ना चमत्कारी चिन्हस्ना द्वारे चकित होत होतात आणि भटकावामा येत होतात, जे तो त्या पहिला पशु ना सामर्थ्य ना द्वारे दाखाळत होता. तेनी पृथ्वी वर राहणारा लोकस्ले त्या पशु नि मूर्ती बनावाले सांग, जो तलवार ना घातक वार ना नंतर बी जित्ता ऱ्हायना. त्या दुसरा पशु ले, पयला पशु नि मूर्ती मा जीव टाकानी परवानगी देवामा एयेल होता, कारण कि ती मूर्ती बोलू लागो, आणि ज्या तेनी उपासना नई कराव तेस्ना नाश करी सको. दुसरा पशु नि सर्वा धाकला-मोठा, मालदार आणि गरीब, स्वतंत्र आणि दास, तेस्ना उजवा हात वर व तेस्ना कपाय वर पयला पशु ना नाव ना चिन्ह लावाले विवश करना. जेनावर तो छाप पशु ना नाव व तेना नाव नि संख्या नई लागेल शे, तो काही विकत लेवू व विकू नई सकत होता. आठे समज नि गरज शे. जो बुद्धीमान शे, तो पशु ना नाव नि संख्या ना जोड करील्या, कारण कि तो कोणी माणुस ना नाव नि संख्या शे आणि तेनी संख्या सहाशे सहासष्ट शे. एना नंतर, मनी आजून काही देख, मनी देखा कि कोकरा सियोन डोंगर ना शिखर वर उभा शे. तेना संगे तेना एक लाख चौरेचाळीस हजार लोक होतात, तेस्ना कपाय वर कोकरू आणि तेना बाप ना नाव लिखेल होता. आणि मनी जोर कण वाहत नदी ना लाठास ना सारखा व मेघ-गर्जन ना सारखा स्वर्ग तून कोणा आवाज आयकू उना. आणि जो आवाज मनी आयक होता तो असा होता, समजा वीणा वाजाळणार वाणी वाजाळत हो. एक लाख चौरेचाळीस हजार लोक सिंहासन ना समोर, चारी प्राणी आणि प्राचीन ना समोर उभा होतात. त्या एक नवीन गीत गात होतात, जेले फक्त त्याच शिकू सकत होतात. फक्त ह्याच त्या लोक शेतस जेस्ले परमेश्वर नि पृथ्वी वर राहणारा लोकस मधून सोळायेल होता. तेस्ना जीवन त्या माणसस्ना सारखा पवित्र शेतस, जेस्नी कदी व्यभिचार नई कर, उपासना तेस्नी फक्त कोकरा नीच उपासना करी. कोकरा जठे कठे ग्या त्या तेना मांगे मांगे चालनात. ह्या एक लाख चौरेचाळीस हजार त्या लोक शेतस जेस्ले परमेश्वर व कोकरा ना साठे पिक ना पयला फय ना सारखा संसार ना लोक मधून सोळामा एयेल शे. तेस्नी कदी खोट नई बोल, त्या निर्दोष लोक शे. मंग मनी आजून एक स्वर्गदूत ले आकाश मा उंच वर उडतांना देख, जेना कडे कदी बी नई बदलणारी सुवार्ता होती, जेले तेनी प्रत्येक गोत्र, जाती, देश, आणि भाषा ना लोकस्ले आयकाळ. तो मोठा शब्द मा ओरडणा, “परमेश्वर ना आदर करा आणि तेनी महिमा करा, कारण कि आते हवू तेना टाईम शे कि लोकस्ना न्याय करो. तेनी उपासना करा कारण कि तेनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाणी ना झरा बनावना.” पहिला स्वर्गदूत नंतर एक आखो स्वर्गदूत हय सांगत उना, सत्यानाश हुईग्य, मोठा बाबेल ना सत्यानाश हुई ग्य. बाबेल ना अनैतिक कामस्नी पृथ्वी वरना सर्वा राष्ट्रस्ले भ्रष्ट करी टाकेल शे. तिनी पृथ्वी ना सर्वा लोकस्ले फुसलाव आणि आपली व्यभिचार ना द्राक्षरस मधून तेस्ले पाज. तेस्ले पीडा देणारा धुक्कय युगानयुग वरे उडत राहीन. रात दिन तेस्ले पीडा कण चैन नई भेटाव, कारणी कि तेस्नी त्या पशु आणि तेनी मुरत नि पूजा करणात, आणि तेस्नी त्या पशु ना नाव नि छाप लीयेल होतात. एनासाठे कि ह्या गोष्टी होवावर शे, परमेश्वर ना लोक धीर धरा, ह्या त्या लोक शेतस जेस्नी परमेश्वर नि आज्ञा ना पायन करणात आणि विश्वास योग्यता कण येशु ना मांगे चालनात. मी परत स्वर्ग तून कोले तरी सांगतांना आयक, आणि तेनी मले हय सांग, “ह्या गोष्टीस्ले लिखी ले, आते पासून धन्य शे त्या लोक ज्या प्रभु वर विश्वास करत मरी जातस.” पवित्र आत्मा पृष्टी करनी आणि सांग, “हय खर शे, त्या धन्य शे कारण कि त्या तेस्ना कठीण मेहनत वर आराम करतीन, आणि तेस्ना चांगला कामस साठे तेस्ले प्रतीफय भेटीन.” तव मनी एक धव्य वादळ देखा, आणि मनी माणुस ना सारख कोले तेनावर बठेल देखनु. तेना डोका वर सोना ना मुकुट व हात मा शुद्ध ह्सुआ होता. एक दुसरा स्वर्गदूत मंदिर तून भायेर निघणा आणि तेनाशी, जो ढग वर बठेल होता, मोठा शब्द मा सांगू लागणा. “पृथ्वी वरला पिक तयार शेतस, कापणी ना टाईम इजाएल शे, त आते आपला ह्सुआ चालाईसन पिक काप.” एनासाठे, तो माणुस जो ढग वर बठेल होता, आपला ह्सुआ पृथ्वी वर फिरावणा त पृथ्वी नि पिक नि कापणी पुरी हुईगी. त एक आजून स्वर्गदूत त्या परमेश्वर ना घर तून, जो स्वर्ग मा शे, भायेर निघना. तेना हात मा बी शुद्ध ह्सुआ होता. तव एक दुसरा स्वर्गदूत वेदी मधून निघणा, जो वेदी वर आग कण धूप ले चेटाळानी जपापदारी पुरी करत होता, निघणा आणि जेना हात मा शुद्ध ह्सुआ होता. तेले उंच शब्द मा सांगू लागणा, “आपला ईया चालाईसन पृथ्वी नि पुरी द्राक्षमया मा द्राक्ष ना गुच्छा एकत्र कर कारण कि द्राक्ष पिकी जायेल शे.” येणा नंतर, मनी स्वर्ग मा एक आजून चिन्ह देख, जो गैरा अदभूत आणि भयानक होता. सात स्वर्गदूत सात विपत्तीस्ले लीयेल होतात. त्या विपत्ती शेवट ना विपत्ती होतात, कारण कि जव ह्या सरी जातीन त परमेश्वर ना राग बी सरी जाईन. त मले समुद्र सारख काही दिखन जेनी चमक काच ना सारखी होती आणि तेनामा आग बी मियेल होती. मनी त्या लोकस्ले बी देख ज्या त्या भयानक पशु वर विजय हुयेल होतात. तेस्नी त्या पशु नि मूर्ती नि उपासना नई करेल होतात, आणि तेस्नी त्या पशु ना नाव ना छाप बी नई लायेल होतात. त्या त्या समुद्र ना तठ वर उभा होतात आणि तेस्ना हात मा परमेश्वर कळून दियेल वीणा होती. त्या परमेश्वर ना दास मोशे ना तो गाना म्हणी ऱ्हायंतात जो कोकरा ना बारामा शे, “ओ सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, तुना करेल कार्य महान शेतस. सर्वा राज्य ना लोक तुना जोळे येतस, आणि त्या तुनी स्तुती करतस, कारण कि तुना धर्ममय काम प्रगट हुई जायेल शेतस.” हे प्रभु, तू सर्वा लोकस्मा आदर ना योग्य शे, त्या सर्वा तुना नाव ना सन्मान करतस, कारण कि फक्त तूच पवित्र परमेश्वर शे, सर्वा राष्ट्र ना लोक तुना जोळे येतस, आणि त्या तुनी उपासना करतस, कारण कि तुना न्याय ना काम प्रगट हुई जायेल शेतस. त्या लोकस्ना गीत सरा नंतर, मनी देख कि परमेश्वर ना घर ना दार उघाळामा उना. जो साक्षी ना तंबू ना सारखा शे. परमेश्वर नि महिमा आणि तेना सामर्थ्य ना कारण मंदिर धुक्कय कण भरी ग्या आणि कोणी तठलोंग मंदिर मा प्रवेश नई करू सकत होता, जठलोंग सात स्वर्गदूत ना सातही विपत्ती पुरी नई हुई जावो. येणा नंतर मी मंदिर तून कोले जोरमा त्या साती स्वर्गदूतस्ले हय सांगतांना आयक, “जावा, आणि पृथ्वी ना लोकस्वर परमेश्वर ना प्रकोप कण भरेल सात कटोरा ओती द्या.” एनासाठे पहिला स्वर्गदूत नि जायसन आपला कटोरा मा जे होत तेले पृथ्वी वर ओती टाक, आणि त्या लोकस्वर जेस्ना वर त्या पशु नि आपला नाव नि छाप लायेल होता आणि ज्या तेनी उपासना करत होतात, एक प्रकार ना भयानक आणि पीडा देणारा फोळा निघना. दुसरा स्वर्गदूत नि जायसन आपला कटोरा मा जे होत तेले समुद्र वर ओती टाक, आणि लगेच समुद्र मरेल माणुस ना रक्त ना सारखा बनी ग्या. या मुळे, समुद्र ना हरेक जीवधारी प्राणी मरी ग्या. तिसरा स्वर्गदूत नि आपला कटोरा जे होत तेले नदीस्मा आणि पाणी ना झरास्वर ओती टाकी, आणि त्या रक्त बनी ग्यात. आणि मी त्या स्वर्गदूत ले जेले सर्वा पाणी वर अधिकार होता, परमेश्वर ले हय सांगतांना आयक, “ओ, पवित्र परमेश्वर, तू जो शे आणि कायम होता, तुनी जो संसार वर दंड धाळेल शे तो चांगला शे. कारण कि तेस्नी तुना लोकस्ले आणि भविष्यवक्तास्ले मारी टाकेल शे, आणि तेस्ना रक्त वाव्हाळेल एनासाठे आते तू तेस्ले पेवाले रक्त दियेल शे. त्या ह्याच योग्य शेतस.” नंतर मी कोले तरी वेदी मधून हय सांगतांना आयक, “हा ओ, सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, लोकस्वर तुना दंड खरोखर खरा शे.” चौथा स्वर्गदूत नि जायसन आपला कटोरा मा जे होत तेले सूर्य वर ओती टाकी, आणि सूर्यले आजून जास्त गरम होवाले परवानगी देवामा उणी, कारण कि लोक तेना जास्त गरम मा करपी जावो. लोक तेना जास्त गरम मा करपी ग्यात आणि त्या परमेश्वर नि निंदा कराले लागनात, कारण कि तेले त्या पिळास्वर अधिकार होता, तरी बी त्या आपला पापस कण मन नई फिरावणात आणि परमेश्वर नि महिमा कराले नकार दिधात. पाचवा स्वर्गदूत नि जायसन आपला कटोरा मा जे होत तेले त्या पशु ना आसन वर ओती टाक, परिणाम स्वरूप, तेना सर्वा राज्य अंधार हुईग्या. आणि लोक पिळा मुळे आपली जीप चावाले लागनात. पिळा आणि फुनष्यास मुळे त्या स्वर्ग ना परमेश्वर नि निंदा कराले लागनात, पण त्या आपला वाईट कामस्ले ज्या त्या करत होतात, सोळाले नकार दिधात. साहावा स्वर्गदूत नि जायसन आपला कटोरा मा जे होत तेले मोठी नदी फरात वर ओती टाक, परिणाम स्वरूप, त्या मोठी नदी ना पाणी सुखी ग्या, ह्या मुळे, पूर्व दिशा ना राजा, जो आपली सेना ना साठे उभा होता, त्या मोठी नदी ले पार करी सको. येणा नंतर मी तीन दुष्ट आत्मास्ले देखनु ज्या बेडूक सारखा दिखत होतात. एक दुष्ट आत्मा त्या अजगर ना तोंड मधून, दुसरी दुष्ट आत्मा त्या पयला पशु ना तोंड मधून आणि तिसरी दुष्ट आत्मा त्या दुसरा पशु ना तोंड मधून जो खोटा संदेश देत होता, निघतांना देख. ह्या तिनी दुष्ट आत्मा मा चमत्कार दाखाळानी योग्यता होती, आणि त्या तिनी आत्मा जायसन संसार वर राज करणारा सर्वा राजास्ले एकत्र करणात, कारण कि त्या जायसन सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर ना विरुद्ध, तेना मोठा दिन मा लळाई करी सको. जव सातवा स्वर्गदूत जायसन आपला कटोरा मा जे होत तेले वारा वर ओती टाकी, त स्वर्गीय मंदिर ना सिंहासन तून मी कोले हय सांगतांना आयक, “सगळ काही पूर हुईग्या.” नंतर विजा चमकनात, गडगडाट व मेघ-गर्जन हुईना, आणि एक मोठा भूकंप उना. हवू भूकंप इतला शक्तिशाली होता कि पृथ्वी वर असा भयानक भूकंप लोकस्नी उत्पती पासून त आते लोंग नई उना. एना कण बाबेल जो मोठा नगर शे, फाटीसन तीन भाग मा वाटाई ग्या, आणि राष्ट्र ना चारी बाजू ना नगर नाश हुई ग्यात. कारण कि परमेश्वर नि बाबेल ना लोकस्ले दंड देवाना विषय मा प्रतिज्ञा लीयेल होती ती पुरी करना, हय अस हुईन जसा त्या स्वता परमेश्वर ना द्वारे तेना राग ना कटोरा मा टाकेल ना द्राक्षरस ले पितीन. त्याच टाईम ले बेटे आपली जागा वरून गायब हुई ग्यात, आणि सर्वा डोंगर डुबी ग्यात. आकाश मधून लोकस्वर मोठा आकार ना गारा पळू लागनात आणि एक एक गारा जवळ-पास पंचेचाळीस किलो ना होता. गाराना ह्या विपत्ती मुळे लोक परमेश्वर नि निंदा कराले लागनात कारण कि हय विपत्ती गैरा असहनीय होती. तव त्या सात स्वर्गदूतस मधून जेस्ना जोळे सात कटोरा होतात, एक नि ईसन मले हय सांग, “अथा ये, मी तुले दाखाळस कि परमेश्वर ती मोठी वेश्या ले कसा दंड दिन जी गैरा नदीस्वर बठेल शे. जीना संगे पृथ्वी ना राजास्नी व्यभिचार करा, आणि तिनी सर्वा माणसस्ले आपला व्यभिचार ना द्राक्षरस मधून पाज.” तव तो दूत मले आत्मा ना मदत कण उजाळ जागा मा लीग्या, तठे मी एक बाई ले लाल रंग ना पशु वर बठेल देखनु. त्या पशु ना सात डोका आणि दाहा सिंग होतात, तेना शरीर परमेश्वर नि निंदा ना नावस्कन भरेल होता. ती बाई जाम्बी आणि लाल रंग ना कपळा घालेल होती. तेनी आपला शरीर ले सोना आणि बहुमुल्य मनी आणि मोतीस्कन सिंगरेल होती. तीना उजवा हात मा सोना ना प्याला होता, जो अशुद्ध व स्वता ना व्यभिचार कण भरेल होता. तीना कपाय वर एक नाव लिखेल होत जेना भेद गुप्त शे, तो सांगस, “मोठा नगर बाबेल शे, मी सर्वा पृथ्वी वरना वेश्या आणि, घृणित नि माय शे.” आणि मी देखनु कि ती बाई परमेश्वर ना लोकस्ना रक्त ना नशा मा होती, आणि ज्या विश्वास योग्यता कण येशु ना अनुकरण करत होतात त्या लोकस्ले मारी टाकाना नशा मा होती. तिले देखीसन मी गैरा चकित हुई ग्यू. त्या स्वर्गदूत नि मले सांग, “चकित नको होवू, मी तुले या बाई व या पशु ना रहस्य सांगसू, जेना सात डोका आणि दाहा सिंग शेतस, जेनावर हायी बाई बठेल शे. तो पशु जेले तुनी आते देख, तो पयले त जित्ता होता, पण आते जित्ता नई शे. तो अग्नीकुंड मधून वरे येवावर शे, आणि परमेश्वर तेले पूर्णपणे नाश करीन. पृथ्वी वर राहणारा लोक जेस्ना नाव परमेश्वर नि संसार ना सुरुवात पासून जीवन नि पुस्तक मा नई लिख, त्या पशु ले देखीसन चकित हुई जातीन. कारण कि पयले जित्ता होता आणि आते जित्ता नई शे, पण तो परत येणार शे. ज्या बुद्धी कण विचार करतस, त्याच येले समजू सकतस. त्या पशु ना सात डोका सात डोंगर ले दर्शावस, जेस्ना वर ती बाई राज्य करस. त्या सात डोंगर सात राजास्ले बी दर्शावस. एस्ना मधून पाच त पयलेच मरी जायेल शेतस, आणि तेस्ना मधून एक आते राजा शे आणि आखरी राजा आते लोंग एयेल नई शे, पण जव तो ईन, त तो थोळाच टाईम लोंग राज्य करीन. जो पशु पहिले जित्ता होता आणि आते जित्ता नई शे, तो आठवा राजा शे. पण तो त्या साती राजास मधूनच एक शे, आणि शेवट मा त्या आठवा राजा ना कायम ना साठे नाश हुई जाईन. ज्या दाहा सिंग तुनी पयले देखेल होता त्या दहा राजास्ले दर्शावस ज्या आते लोंग शासन कराले सुरुवात नई करेल शेतस. त्या दहा राजास्ले त्या या पशु संगे शासन करानी परवानगी भेटेल शे, पण तेस्ना शासन फक्त एक तास ना साठे राहीन. ह्या सर्वा दहा राजास्ना एकच उद्देश राहीन, आणि त्या आपली सामर्थ्य आणि अधिकार त्या पशु ले देतीन. पशु आणि ह्या दहा राजा, कोकरा संगे लळाई करतीन, पण कोकरा आणि तेना अनुयायी तेस्ले हाराई टाकतीन. कारण कि तो प्रभूस्ना प्रभु आणि राजास्ना राजा शे. तेना अनुयायी त्या शेतस जेस्ले परमेश्वर नि बलायेल शे आणि निवाळेल शे, आणि त्या तेना संगे विश्वास योग्य शेतस.” मंग स्वर्गदूत नि मले हय बी सांग, “ज्या प्राणी ले तुनी पयले देख, जेनावर वेश्या बठेल शे, त्या लोक शेतस, जाती, देश, आणि भाषा शेतस. टाईम ईन कि जव तो पशु त्या दहा राजास्ना संगे मियसन त्या वेश्या संगे घृणा करीन जी तेनावर बठेल शे. त्या तीनावर हमला करतीन, तिले नागी करी टाकतीन, त्या तीना शरीर ना मांस खातीन आणि उरेल भाग चेटाळी टाकतीन. एना नंतर मी एक आखो स्वर्गदूत ले स्वर्ग मधून खाले उतरतांना देख, जेना जोळे मोठा अधिकार होता, आणि तेना मोठा तेज कण पृथ्वी प्रकाशित हुईगी. मंग मी स्वर्ग मधून एक आजून आवाज आयक, “ओ मना लोक, त्या नगर मधून बाहेर निघी या, त्या लोकस्ना पापस्ना मांगे नका चाला, कारण कि जी पीडा तेनावर येणार शे ती तुमना वर नई येवो. तेना पाप गैरा शेतस, आणि ती ढेर ना सारखी स्वर्ग लगून ईपोहोची जायेल शे, आणि ज्या अधर्म ना कामस्ले तेनी करेल शे, परमेश्वर तेले ईसरेल नई शे. तुमी तेना संगे तसाच वाईट करा जसा तेनी दुसरास्ना संगे करेल शे. पण तुमी तेना काम नुसार तेना संगे दोन पट जास्त वाईट करा. त्या शहर साठे दोन पट शक्तिशाली त्रास नि तयारी कर जसा त्रास कण तेनी दुसरा लोकस्ना संगे शोषण करेल होत. तेनी जीतली आपली गौरव करी आणि तेनी जीतला सुख-विलास कर, तुमी तीतलाच तिले पिळा आणि दुख द्या कारण कि ती आपला मन मा सांगस, मी त राणी सारखी सर्वा लोकस वर राज्य करसू, मी विधवा नई शे, आणि मी कदीच दुख नई कराव. तीना ह्या गर्व मुळे, अचानक तीनावर विपत्ती ईपळीन. अचानक एखठ्ठा तीनावर आजार, दुख, आणि काय ईपळीन. आणि ती विस्तोमा राक करामा ईन कारण कि प्रभु परमेश्वर शक्तिमान शे आणि तो तीना न्याय करीन.” पृथ्वी ना ज्या राजास्नी तीना घृणित काम आणि सुख-विलास मा साथ दियेल होतात, त्या त्या नगर ले आग कण बयतांणा देखीसन रळतीन आणि तेना साठे शोक करतीन. आणि त्या घाबरतीन, कि कदी त्या बी तेना दंड मा सहभागी नई हुई जावो, आणि सांगतीन, “ओ मोठा नगर, बाबेल. ओ द्रुड नगर, भयानक, तूनासाठे कितला भयानक, घळी भरमाच तुले दंड भेटी जायेल शे.” पृथ्वी ना व्यापारी तीना साठे रळतीन आणि शोक करतीन, कारण कि आते तेस्ना वस्तू कोणी विकत नई लेवाव. व्यापारी तेले सांगतीन, “त्या सर्वा वस्तू जेस्नी तू ईच्छा करत होती आते नई शे, त्या सर्वा चांगल्या सुगंधीत वस्तू ज्या तुले आवळत होतात, त्या सर्वा वस्तू ज्या तू आपला शरीर ले सुंदर बनावा साठे वापर करत होती, त्या सर्वा दवळी जायेल शेतस, त्या आते तुले कदीच नई भेटाव. ह्या वस्तूस्ना व्यापारी ज्या तीना व्दारे मालदार हुई जायेल होतात, तिनी पिळा नि भीती मुळे दूर उभा राहतीन, त्या रळतीन आणि शोक करत सांगतीन. भयानक, कितला भयानक, हवू मोठा नगर, जो मलमल, आणि जाम्बी, आणि किरमिजी कलर ना कपळा घालेल होता, आणि सोन, रत्न आणि मोती कण सिंगरेल होता. घळी भर मा तेना सर्वा धन नाश हुईग्या.” प्रत्येक नाव चालावणारा आणि प्रवासी आणि नाविक, आणि जीतला समुद्र वर कमावतस, सर्वा दूर उभा ऱ्हायनात. जव त्या आग मा बयत नगर ना धुक्कय ले देखतीन, त्या आराया मारीसन सांगतीन, “या मोठा नगर सारखा कोणताच नगर नई शे.” त्या आपला दुख ले दाखाळा साठे आपला आपला डोका वर राक टाकतीन, आणि रळत आणि शोक करत ओरडी-ओरडीसन सांगतीन, “भयानक, कितला भयानक, हवू मोठा नगर, जेनी संपत्ती व्दारे सर्वा जहाज ना मालिक मालदार हुई ग्यात, आणि आते थोडासाच टाईम मा, तेना पुरा धन चालना ग्या. ओ स्वर्ग राहणारा, ओ परमेश्वर ना लोकसहोण, प्रेषित, आणि भविष्यवक्तासहोण खुश व्हा. कारण कि परमेश्वर नि तुमना संगे करेल दुर्व्यवहार ना साठे बाबेल ले दंडीत करेल शे.” नंतर एक शक्तिशाली स्वर्गदूत नि मोठी चक्की ना पाठ सारखा एक दघळ उचला, आणि हय सांगीसन समुद्र मा टाकी दिधा, “जसा हवू दघळ समुद्र मा फेकामा उना, तसाच हवू मोठा नगर बाबेल मोठी शक्ती नाश करामा ईन, जेना कोणताच अवशेष बी नई सापळाव. आते पासून तुना मा गवई, वीणा, बासरी व तुरही ना शब्द कदी आयकू नई येवाव. आते पासून कोणता बी कारागीर ना काम तुना मा नई दिखाव. आते पासून तुना मा चक्की ना आवाज आयकू नई येवाव. आते पासून तुना मा एक बी दिवा नई चमकाव, आते पासून तुना मा नवरा नवरी ना उल्लास ना शब्द बी आयकामा नई येवाव, तुना व्यापारी पृथ्वी ना मोठा लोक होतात. तुना जादू नि सर्वा देशस्ले भरमाई टाकेल शे. परमेश्वर नि बाबेल ले दंड दिध, कारण कि तो भविष्यवक्तास्ले, आणि परमेश्वर ना लोकस्ले आणि संसार ना लोकस्ले मारी टाका मुळे दोषी शे.” जव तो शक्तिशाली स्वर्गदूत बोली दियेल होता, तेना नंतर, मी स्वर्ग मा मोठी गर्दी ना आवाज असा आयक समजा त्या जोरमा गान मनी ऱ्हायनात, “परमेश्वर नि स्तुती करा. तारण, महिमा, आणि सामर्थ्य आमना परमेश्वरनाच शे. कारण कि तेना सर्वा न्याय खरा आणि चांगला शे, तेनी ती मोठी वेश्या ना न्याय कर कारण कि ती वेश्या नि संसार ना लोकस्ले पाप ना द्वारे भ्रष्ट कर, तेस्ना दासस्ले मारी टाका मुळे परमेश्वर नि तीना पासून बदला लीधा.” मंग दुसरी सावा तेस्नी ओरळ, “परमेश्वर नि स्तुती करा. ज्या आग नि बाबेल ना नाश कर तेना धुक्कय कायम उळत राहीन.” आणि चौवीस प्राचीन आणि चारी प्राणीस्नि नि पळीसन परमेश्वर ले नमस्कार घाला, जो सिंहासन वर बठेल होता, आणि सांग, “आमेन. परमेश्वर नि उपासना करी.” तव मनी परमेश्वर ना सिंहासन कळून कोणी तरी आवाज आयकी, तेनी सांग, “ओ आमना परमेश्वर ना आदर करणारा सर्वा दाससहोण, तुमी भले धाकला राहोत कि मोठा राहोत, तुमी सर्वा परमेश्वर नि स्तुती करा.” तव मनी आयक कि मोठी संख्या मा लोकस्नी आराया मारात. हय एक मोठा धब-धबा ना आवाज सारखा आणि मेघ-गर्जन ना आवाज सारखा मोठा होता. तेस्नी सांग, “परमेश्वर नि स्तुती करा, या आमी परमेश्वर नि स्तुती करूत, कारण कि आमना सर्वशक्तिमान परमेश्वर राजा शे. या, आमी खुश हुईसन मग्न हुईजावूत आणि परमेश्वर स्तुती करूत. कारण कि कोकरा ना लग्न ना टाईम ईजायेल शे. आणि तेनी नवरी नि स्वता ले तयार करी लीयेल शे. परमेश्वर नि तेले शुद्ध, तेजस्वी असा तागाना तलम वस्त्र घालाना साठे दियेल शे.” कारण कि त्या तागाना तलम ना अर्थ पवित्र लोकस्ना धार्मिक काम शे. तव त्या स्वर्गदूत नि मले सांग, “हय लिख, कि धन्य शे त्या, ज्या कोकरा ना लगन ना उत्साह ले साजरा करासाठे बलावामा एयेल शेतस.” मंग तेनी मले सांग, “परमेश्वर ना द्वारे धाळेल हवू संदेश सत्य शे.” एनासाठे मी त्या स्वर्गदूत ले नमस्कार करासाठे तेना पाय वर पळी ग्या पण तेनी मले सांग, “मले नमस्कार नको करू, मत त तुना सारखा तुना भावूस सारखा ज्या येशु नि खरी शिक्षा वर विश्वास करतस आणि मानतस, परमेश्वर ना दास शे. तू फक्त परमेश्वर नीच उपासना कर, कारण कि तीच आत्मा शे, जी परमेश्वर ना लोकस्ले येशु द्वारे प्रगट करेल सत्य ले घोषित कराना योग्य बनावस.” मंग मी स्वर्ग ले उघळेल देख, तठे मना समोर एक धव्या घोळा होता, आणि तेनावर एक बठेल शे, जो विश्वास योग्य शे आणि खोट नई बोलस. तो धार्मिक पणा कण आपला शत्रू ना न्याय करस आणि तेस्ना विरोध मा लळाई करस. तेना डोया अग्नी ना ज्वाला सारखा शे, आणि तेनी आपला डोका वर गैरा राज मुकुट घालेल शे, आणि तेना शरीर वर एक नाव लिखेल शे, पण फक्त तेलेच त्या नाव ना अर्थ माहित शे. तो रक्त मा बुळायेल कपळा घालेल शे, आणि तेना शीर्षक “परमेश्वर ना वचन शे.” स्वर्ग नि सेना उत्तम मलमल ना धव्या व स्वच्छ कपळास्ले घालेल, धव्या घोळा वर बठीसन तेना मांगे-मांगे चालत होता. तेना तोंड मधून एक तीक्ष्ण तलवार निघणी, जेना कण तो देश ले हाराई टाकीन. जो कोणी तेना अधिकार ले स्वीकार नई कराव, तेले तो दंडीत करीन. तो सर्वशक्तिमान परमेश्वर ना भयानक प्रकोप ले तसाच सोळी दिन, जसा एक रसकुंड मधून द्राक्ष ना रस वाहास. तेना कपळा आणि उजवी मांडी वर जे नाव लिखेल शे, ते हय शे, “राजास्ना राजा आणि प्रभूस्ना प्रभु.” नंतर मी एक स्वर्गदूत ले सूर्य वर उभा देखनु, आणि तेनी जोरमा आकाश मा उंच उळनारा सर्वा पक्षीस्ले सांग, “या, ती मोठी मेजवानी मा सहभागी हुईजावा जी परमेश्वर नि तुमना साठे तयार करेल शे. या आणि तुमी राजास्ना, सरदारस्ना, शक्तिशाली माणसस्ना, घोळास्ना, आणि तेना वरला स्वारस्ना व सर्वा लोकस्ना, स्वातंत्र व दास, धाकला व मोठा, सर्वास्ना मांस खावा.” नंतर मनी त्या हिंसक पशु ले देख जो समुद्र मधून बाहेर एयेल होता, आणि पृथ्वी ना राजास्ले आणि तेस्नी सेना ले देख, त्या घोळा वर बठनारा आणि तेनी सेना ना विरुद्ध लळाई करासाठे एकत्र उनात. तव त्या भयानक पशु ले धरामा उन. तेना संगे त्या खोटा भविष्यवक्ता ले बी, जो त्या पशु ना नाव मा चिन्ह-चमत्कार दाखाळीसन तेस्ले भरमावत होता, जेस्ना वर त्या भयानक पशु ना चिन्ह नि छाप होती, व ज्या तेनी मूर्ती नि पूजा करत होतात. ह्या दोनीस्ले जित्ता गंधक ना धदकती झील मा टाकामा उन. तव धव्या घोळा ना स्वार नि त्या पशु ना बाकी सैनिकस्ले मारी टाकना, तेनी तेस्ले आपला तोंड मधून निंघणारी तलवार कण कापी टाका, आणि सर्वा पक्षी तेस्ना मांस खाईसन तृप्त हुई ग्यात. मंग मी एक स्वर्गदूत ले स्वर्ग तून उतरतांना देख, जेना हात मा अग्नीकुंड नि चाबी आणि एक मोठी साकय होती. मंग मी कईक सिंहासन ले देख, आणि तेस्ना वर त्या लोकस्ले बठेल देखनु जेस्ना डोका परमेश्वर ना वचन आणि येशु ना संदेश नि घोषणा करा मुळे कापामा एयेल होतात. या लोकस्नी त्या पशु आणि तेनी मूर्ती नि उपासना नई करेल होतात, आणि नई त्या पशु ना छाप ले आपला कपाय वर व हात वर लीयेल होतात. त्या जित्ता हुईसन सिंहासन वर बठेल आणि परमेश्वर नि तेस्ले राज्य कराना अधिकार दिधा आणि त्या ख्रिस्त ना संगे हजार वर्ष लगून राज्य करत ऱ्हायनात. आणि त्या पृथ्वी वर सगळी कळे पसरी जातीन आणि तो तेना लोकस्ले ज्या त्या शहर मा राहतस जेनावर परमेश्वर प्रेम करस, घेरी लेतीन. पण आग स्वर्ग मधून परमेश्वर ना द्वारे आग उतरीसन त्या सर्वा लोकस्ले बाईसन भस्म करी दिन. तव त्या सैतान ले, जेनी त्या लोकस्ले भरमाव, पकळी सन आग आणि गंधक नि झील मा फेकी दिधा, जठे त्या भयानक पशु आणि खोटा भविष्यवक्ता ले पयलेच टाकामा एयेल शे. तठे त्या आग मा तेस्ले युगानयुग ना साठे रात दिन पीडा देत राहतीन. तव मी एक धव्या सिंहासन देख, जेनावर परमेश्वर बठेल होता. पृथ्वी आणि आकाश तेना समोरून पयीग्यात मंग तेस्ले कदी कोणी नई देख. मंग मनी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी देखनु, कारण कि पयला आकाश आणि पयली पृथ्वी ना अस्तित्व नई ऱ्हायंना आणि समुद्र बी अस्तित्व नई ऱ्हायना. मंग मी पवित्र नगर ले बी, जो नवीन यरूशलेम शे, परमेश्वर कडून स्वर्ग तून खाले उतरतांना देख. जशी नवरी आपला नवरा संगे लगन साठे चांगल्या प्रकारे सजाळामा येस, तसाच तो नगर तयार करामा एयेल होता. मंग मी कोले परमेश्वर ना सिंहासन तून उंच आवाज मा हई सांगतांना आयक, “देख, आते पासून परमेश्वर नि वस्ती माणसस्ना मधमा राहीन, तो मनुष्य जाती संगे राहीन. आणि त्या तेना लोक होतीन. परमेश्वर स्वता तेस्ना संगे राहीन, आणि तो तेस्ना परमेश्वर राहीन. आणि परमेश्वर तेस्ना डोया ना सर्वा आसा पुसी टाकीन, तठे नईत कोणी मराव, नईत कोणी शोक कराव, नईत कोणी रळाव, आणि नईत कोले पीडा होवाव. कारण कि पयल्या गोष्टी अस्तित्व मा नई राहाव.” तव जो सिंहासन वर बठेल होता, तेनी सांग, “आते मी सगळ काही नवीन करी देस,” तेनी मले हय बी सांग, “येले लिखी ले, जे काही मनी सांगेल शे तू तेनावर विश्वास करू सकस, त्या निश्चित पुरा होतीन.” आणि तेनी सांग, “सगळ पूर हुईग्या, मी अल्फा आणि ओमेगा शे, म्हणजे सुरुवात आणि शेवट शे. जो कोणी प्यासा शे, तेले मी जीवन ना पाणी ना झरा मधून फुकट पेवाले दिसू. जो सर्वा वाईट वर विजयी हुईन, तो मना कळून त्या सर्वा आशीर्वाद ले ली लीन, आणि मी तेना परमेश्वर होयसू, आणि तो मना पोऱ्या होईन. पण ज्या कोणी मनावर विश्वास नई ठेवाव, त्या बी त्या झरा मधून जो आग आणि गंधक शी बयत ऱ्हास, टाकामा ईन, हय दुसरी मोत शे. आणि ज्या लोकस समोर मना नकार करतीन, ज्या वाईट काम, आणि हत्या, व्यभिचार, टोना, मूर्तिपूजा, आणि सर्वा खोट बोलणारास्ना बी हवूच परिणाम होईन.” तव त्या सात स्वर्गदूत मधून, जेना जोळे सात शेवट ना विपत्ती कण भरेल सात कटोरा होता, तेस्ना मधून एक मना जोळे ईसन सांगणा, “अथा ये, मी तुले ती नवरी दाखाळस, जी गैरा जल्दी कोकरा संगे लगन करणार शे.” आणि तो मले पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण, एक मोठा उंच डोंगर वर लीग्या, आणि पवित्र नगर यरूशलेम ले परमेश्वर कळून स्वर्ग तून खाले उतरतांना दाखाळ. तो नगर परमेश्वर नि महिमा कण विभूषित होता आणि यशब नाव ना बहुमुल्य दघळ ना सारखा चमकत होता, आणि काच ना सारखा साफ होता. त्या नगर ना चारी बाजू उंच भिंत होती. त्या भिंत मा बारा दरवाजा होता, आणि बारा दरवाजा वर बारा स्वर्गदूत ठरायेल होतात. आणि त्या दरवाजा वर इस्त्राएल देश ना बारा गोत्र ना नाव लिखेल होतात. तीन दरवाजा पूर्व दिशा कडे, तीन उत्तर ना कडे, तीन पश्चिम कडे व तीन दक्षिण कडे होतात. नगर नि भिंत, पाया बारा दघळ वर बनेल होता. हरेक दघळ वर कोकरा ना बारा प्रेषित ना नाव लिखेल होतात. जो स्वर्गदूत मना संगे बोलत होता, तेना जोळे नगर आणि तेना दरवाजा आणि तेना उंच भिंत ले मापाना साठे सोना ना एक मापक-दंड होता. त्या नगर नि रचना चौफेर होती, तेनी लांबी चौडाई ना बराबर होती. तेनी नगर ले या सोना ना यंत्र कण माफ, त तो नगर दोन हजार चार शे किलोमीटर लांबा, तीतलाच चौडा आणि तीतलाच उंच होता. येणा नंतर स्वर्गदूत नि भिंत नि उंची ले माफ, तेनी तेले तसाच माफ जसा लोक मापतस. ती भिंत सहासष्ट मीटर उंच होती. तो नगर शुद्ध सोना ना बनेल होता, जेनी चमक काच ना सारखी साफ होती. आणि तेनी उंच भिंत सुर्यकांत नि बनेल होती. उंच भिंत ना पाया हर एक प्रकार ना किमती ना दगड कण सजाळेल होतात, पयला दघळ सुर्यकांत, दुसरा नीलमणी, तिसरा लालडी, चौथा मरकत, पांचवा गोमेदक, सहावा माणिक्य, सातवा स्वर्णमनी, आठवा पेरिज, नववा पुखराज, दहावा लहसनिया, अकरावा धुम्रकांत, बारावा नीलम. नगर ना बाहेर दरवाजा बी मोती ना बनेल होतात, हर एक दरवाजा एक मोती ना बनेल होता, आणि नगर ना रस्ता बी शुद्ध सोना ना बनेल होतात, जेस्नी चमक काच ना सारखी साफ होती. मनी त्या नगर मा कोणताच मंदिर नई देख, कारण कि सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर आणि कोकरा त्या नगर मा शे, एनासाठे तठे कोणताच मंदिर नि गरज नई शे. नगर ले उजाया देवाना साठे नईत सूर्य नि गरज शे नईत चांद नि कारण कि परमेश्वर ना तेज तेले प्रकाश देस व स्वता कोकरा येणा दिवा शे. राष्ट्र ना लोक तेना उजाया मा चालतीन आणि पृथ्वी ना राजा तेनामा आपला वैभव लय येतीन. दिन सरा वर नगर ना दरवाजा बंद नई करामा येवाव, कारण कि आठे रात होवावच नई. राष्ट्र ना सर्वा लोक आपला वैभव आणि आदर ह्या नगर मा लयतीन. तेनामा नईत अशुद्ध वस्तू प्रवेश कराव आणि नईत कोणी असा माणुस जो घृणित काम करस व खोट बोलस, फक्त त्याच लोक या नगर मा प्रवेश करतीन, जेस्ना नाव कोकरा ना जीवन नि पुस्तक मा लिखेल शे. मंग स्वर्गदूत नि मले जीवन ना पाणी नि नदी दाखाळी, आणि ती नदी काच ना सारखी चमकत होती, आणि ती नदी परमेश्वर आणि कोकरा ना सिंहासन पासून वाहत होती. हय नदी त्या नगर ना सडक ना मधमाइन वाहत होती, आणि नदी ना दोनी बाजू जीवन ना झाड होता, जेनामा बारा प्रकार ना फय शे आणि दर महिना ले आलग प्रकार ना फय उत्पन्न होतस. या झाड ना पानस्मा देश ना लोकस्ले बरा करानी योग्यता शे. त्या नगर मा कोणी बी परमेश्वर ना श्राप ना आधीन नई होवाव. परमेश्वर आणि कोकरा ना सिंहासन त्या नगर मा राहीन, आणि परमेश्वर ना सेवक तेनी सेवा करतीन. त्या परमेश्वर ले समोरा-समोर देखतीन, आणि परमेश्वर ना नाव तेस्ना कपाय वर लिखेल राहीन. तठे परत कदी रात नई होवाव, नईत तेस्ले दिवा ना उजाया नि गरज होवाव आणि नईत सूर्य ना उजाया नि कारण कि स्वता प्रभु परमेश्वर तेस्ना उजाया हुईन, आणि त्या राजास्ना सारखा कायम ना साठे राज्य करतीन. येणा नंतर त्या स्वर्गदूत नि मले सांग, “या सर्वा गोष्टी सत्य शे आणि निश्चित पुरा होतीन. प्रभु परमेश्वर, जेनी भविष्यवक्तास्ले आपली आत्मा दियेल होता, तेनी आपला दूत ले आदेश दिसन धाळेल शे कि आपला दासस्ले त्या गोष्टी दाखाळो जेस्न लवकर होण जरुरी शे.” येशु सांगस, “आयका, मी लवकर येणार शे, धन्य शे तो, जो या पुस्तक नि भविष्यवाणी नि गोष्टी ना पायन करस.” मी तोच योहान शे, जो या सर्वा गोष्टी देखा आणि आयकेल शे, आणि जव मनी आयक आणि देख, त जो स्वर्गदूत मले या गोष्टी दाखाळत होता, मी तेना पाय वर तेनी उपासना कराना साठे पडी ग्या. पण तेनी मले सांग, “देख, अस नको करू, कारण कि मी तुना आणि तुना भावू भविष्यवक्ता आणि या पुस्तक ना गोष्टी ना पायन करणारस्ना संगी दास शे. परमेश्वर नीच उपासना कर.” मंग तेनी मले सांग, “या पुस्तक नि भविष्यवाणी ना गोष्टी ले गुप्त नको ठेवू, कारण कि या गोष्टी ना पुरा होवाना टाईम जोळे शे. जो वाईट काम करस, तो वाईटच काम करत राहो, जो अपवित्र शे, तो अपवित्र बनेल राहो. जो चांगला काम करस, तो चांगला काम करत राहो, आणि जो पवित्र शे, तो पवित्र बनेल राहो.” येशु सांगस, “आयक, मी लवकर येणार शे. हरेक माणुस ले तेना काम ना नुसार जो प्रतीफय देवामा ईन, ते मी मना संगे लयी ऱ्हायनु. मी अल्फा आणि ओमेगा, पयला आणि शेवट, सुरुवात आणि समाप्त शे.” धन्य शे त्या, ज्या आपला कपळा ले कोकरा ना रक्त कण धुई लेतस, कारण कि तेस्ले त्या नगर ना दार मधून मधमा येवाना अधिकार भेटीन, आणि तेस्ले झाड ना फय खावाना अधिकार बी भेटीन. पण जेस्ना काम लाज ना शेतस, आणि हत्या, व्यभिचार, टोना, मूर्तिपूजा, आणि सर्वा खोटा बोलणारा, बाहेर राही जातीन. “मी, येशु, मीच मंडळी ना विषय मा या गोष्टी प्रगट कराना साठे आपला स्वर्गदूत ले तुमना जोळे धाळेल शे. मी दाविद ना मुळ वंशज व संतान शे, सक्काय ना चमकणारा तारा शे.” परमेश्वर नि आत्मा आणि कोकरा नि नवरी सांगस, “ये.” आणि जो कोणी येले आयकस तो बी सांगो, “ये.” आणि जो प्यासा शे तो येवो, आणि जेनी कोणी येले पिवानी ईच्छा शे, त्या या जीवन ना पाणी ले फुकट मा प्या. मी हरेक ले, जो या पुस्तक नि भविष्यवाणी नि ले आयकस, सावध करस, जर कोणी एनामा काही बी जोडस, त परमेश्वर तेनी विपत्ती ले, जेना वर्णन या पुस्तक मा लिखेल शे, वाढावी दिन. आणि जर कोणी या भविष्यवाणी नि पुस्तक मधून काही बी काळस त परमेश्वर जीवन ना झाड व पवित्र नगर मधून, जेना वणर्न या पुस्तक लिखेल शे, तेना भाग तून तेले दूर करी दिन. येशु, जो या गोष्टी नि साक्षी देस, तो हय सांगस, “हा, मी लवकरच येणार शे.” मी, योहान, उत्तर मा सांगस, आमेन. हे प्रभु येशु ये. प्रभु येशु नि कृपा परमेश्वर ना लोकस्ना संगे राहो. आमेन.