20 डिसेंबर 1990 Conference Circuit house, Kolhapur (India) Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED Press Conference, Kolhapur, India, 20-12-1990 काळापासून आपल्या देशामध्ये कुंडलिनी शक्ती आहे . असे वर्णन केले आहे. आता किती अनादी पुस्तकात आहे ते मी तुम्हाला सांगते. चाप्टर लिहून घ्या. कारण जे काय असते. संस्कृत वाचलेले नाही. त्याच्यामुळे माहिती नाही. पान 427 आता हे पुस्तक घ्या. पुष्कळ आहे. हंस उपदेश आता योग तुरा मनी, हे आधी शंकराचार्य यांनी लिहले ते बघू या. योग तुरा मणी, लिहिल्यानंतर त्याच्यात त्यांनी सात्विक चर्चा केली, वैचारिक चर्चा आहे. त्यात एक शर्मा म्हणून धर्ममार्तंड आहेत. त्यांनी त्यांचं डोकं खाल्लं, त्यांचं सोडा. मग त्यानंतर सौंदर्य लहरी म्हणून पुस्तक लिहिलं. ऋषी याग, ध्यान विद्या, योग सुख उपदेश, योग कुंडलिनी, उपनिषद म्हणजे कुंडलिनी जागरण. कई उपनिषद, देवीभागवत, योग पुराण, लिंग पुराण, अग्नि पुराण, नंतर शंकराचार्यांची सौंदर्य लहरी .त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रात मार्कंडेय. मार्कंडेय कुठ झाले माहित आहे का .आता आपल्याला माहितीच नाही. आपल्यात काय असते ते. ते झालं महाराष्ट्रात साडेतीन पीठ आहेत. आता हे हिंदी मध्ये लिहिलेलं कल्याण आहे. यांचा अभ्यास फार चांगला आहे. आपण सगळं जाणतो असं नाही. आपण मराठीत सगळं जाणतो पण या लोकांनी हिंदीत पुष्कळ कार्य केले आहे .मराठी तेवढं कार्य झालेला नाही. आता यांनी लिहिले ओमकार स्वरूप साडेतीन सगुण शक्ती पीठ महाराष्ट्रात आहेत. कोण कोणचं एक मातार गड म्हणजे ज्याला आपण माहूरगड म्हणतो. एक गाणं आहे माहुर गडावरी तुझा वास, दुसरं कोल्हापूर मध्ये, तीन तुळजापूर. मातापुर ची महासरस्वती,तुळजापूरची महाकाली, कोल्हापूरची महालक्ष्मी, . त्यांचं सर्व काही यांनी दिलेल आहे काय काय ते. महाराष्ट्रात समर्थ रामदास यांनी देवीला रामवरदायनी असं म्हटलं आहे. कारण शिवाजी महाराज तुळजापूर भवानी ला जात असत. तेथे त्यांना वरदान मिळाले ह्यांनी एवढे मोठे काम केले आहे. मराठीत एवढे काम झालेले नाही. आपण थोडे लक्ष आपल्याकडे घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रात फार मोठी कामगिरी केलेली आपण म्हणू ती ज्ञानेश्वरांनी कामगिरी केली. फार मोठी कामगिरी केली. कारण ये नाथपंती होते. त्यात तीन पंत होते. एकीकडे वेद राइट साईडला,लेफ्ट साईडला भक्ति आणि मधोमध हा नाथपंथ होता. म्हणजे जे जनक राजा होते ते नाथपंथी होते. एका गुरूने एकाच शिष्याला जागृती द्यायची, कुंडलिनी चे ज्ञान द्यायचे, असं त्याचं विधान होतं. म्हणजे तशी परंपराच होती.ते दुसऱ्याला द्यायचे नाही. हे ज्ञान गुप्त आहे .बहुमोल आहे. ते जर सांगितलं तर लोक फार त्रास देत असत. म्हणून ते कोणाला सांगायचे नाहीत. त्यांनी तेव्हा आपल्या भावाला निवृत्तीनाथ त्यांचे गुरु होते. विनंती केली की तुम्ही मला हे ज्ञान तुम्ही मला हे ज्ञान सगळ्या जगाला सांग द्या. कारण सगळे काही संस्कृत वाचत नाहीत म्हणून मराठी भाषेत मी ज्ञानेश्वरी लिहितोय जर तुम्ही मला हे ज्ञान सांगून दिलं नाही तर महाराष्ट्रात हे ज्ञान कसे जाईल. हे सामान्य माणसाला बहुजन समाजाला ते कसे कळणार. या सहाव्या अध्यायात स्वतंत्र कुंडलिनी चे वर्णन केले आहे. ते या परवानगीने आणि निवृत्तीनाथांनी त्यांना परवानगी दिली तुम्हाला माहिती हे तुम्हाला असेल. ते कारण तुम्हाला माहिती असेल ते त्यांच्या आई-वडिलांना आत्महत्या करावी लागली.आणि त्या आत्महत्या मध्ये आईने मोठ्या मुलाला बोलवले. कारण संन्याशी ची पोर म्हणून धर्ममार्तंडांनी त्यांना त्रास दिला . तर आम्ही आत्महत्या करणार. तर तू फक्त आम्हाला वचन दे, ज्ञानोबा ने काही मागितलं तर तेवढ वचन दे, ते त्याला दे. त्यांनी आयुष्यात एवढ च मागितलं. मग त्याच्या ह्या दहाव्या अध्यायात त्यांनी कुंडलिनीचे वर्णन केले,पण त्यांनी वर्णन केले त्याला कारण असे त्यांना परवानगी मिळाली म्हणून. तसंही तुकारामांनी हे केलेला आहे. रामदास स्वामींनी हे केलेला आहे. पण हे उघड करून कोणी सांगत नसत. कारण हे अंतर्ज्ञान होतं. ते दुरुपयोग करतील,काहीही करतील. उल ड्रॉपने त्याच्यावर काम केले आहे, पण उल ड्रॉप ने हे सगळे तांत्रिक आहे. मेकॅनिझम हे एक तंत्र आहे. तंत्र काय तर कुंडलिनी तंत्र. तांत्रिक काय तर अर्ध तांत्रिक लोक काय करतात. समजा देवळात जायचा आणि काहीतरी व्यभिचार करायचा म्हणजे देवीचे चित्त हटलं . तिथून मग तसे काहीतरी प्रकार करायचे काळी विद्या, व्यसनांचे भयंकर घाणेरडे प्रकार आणि त्या तांत्रिकाला पैशाचा लोभ असतो. तुम्ही याला त्याला संमोहन करायचे आणि त्याच्याकडून पैसे काढायचे. म्हणजे अगदी लोवेस्ट म्हणा. तुम्ही अगदी निम्न स्तरावरील लोक आहेत, ते तांत्रिक. त्यात तांत्रिक होऊच शकत नाहीत . त्यांचं नाव तांत्रिक ठेवल आहे आणि शंकराचार्याच्या नंतर सहाव्या शताब्दीत ते फार बोकाळलेली. आपल्या दृष्टीने आणि तहात कलकत्ता पासून तर इकडे गुजरात पर्यंत सबंध यांचे साम्राज्य पसरले होते. कलेमध्ये सुद्धा त्यांनी हात घातला आणि कलेमध्ये तर सगळा राजे लोक तुम्हाला माहित होतं कीकसे होते ते, सगळा स्वैराचार. त्या स्वैराचाराला धरून त्यांचे जे मंत्री लोक होते. त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला देऊळ बांधून द्या. पण मग आम्ही म्हणजे बाहेर जे जगात चालते.ते उघड करून सांगू, ते म्हणाले बर. त्यांना ऍडजेस्ट करावे लागले. कारण कसतरी त्या राजाला खुश करायचं, त्त्यांनी सांगितलं ते सगळे बाहेर काढायचं त्याला त्यांनी प्रॉटडक्टिविटी कंठ असं नाव दिलं. म्हणजे प्रजाजन, म्हणजे प्रजा कशी अशा रितीने त्यांनी काढली ती टूम . ती टूम जी चालली तर होणारच. आपल्याला माहिती आहे. नंतर मग खजुराहो अशा प्रत्येक ठिकाणी या तांत्रिक यांचा प्रवेश झाला. येथे ते राजा ना खूष करण्यासाठी त्या सगळं लैंगिकतेचे मांडायचे. त्याने राजा खुश होत असे. राज यांनी सांगितले की ते मंदिरात आत करा. जे बाहेर नाही केलं तरी चालेल पण मागून दिसायचे. इथपर्यंत काठमांडू ही जागा त्या ठिकाणी त्यांच्यावर पुष्कळ पुस्तके लिहिली. ही जर आपण वाचली तर हिंदुस्थानात खूप काम केला आहे. काठमांडू सारख्या ठिकाणी जी देवळे बांधली येथे त्यांनी सांगितलं देवी आहे त्यातली एक देवी कुमारी आहे. आणि तिच्या मुळे विष्णुमाया आहे. त्यामुळे कमी पडू शकते. तर आम्ही काय म्हणतो, काष्टच लाकडाचं बनवतोय, काष्टा च बनवतोय त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण अशा काय तरी मुर्त्या केल्या पाहिजेत, तेथे भूत येणार नाही असं त्यांना समजावून सांगितलं. कोणाला काय आणि कुणाला काय असे त्यांना सांगितले. काठमांडूला पाठवले, वर पाहिले तर आहे खाली काही नाही. त्यांनी काय तुमच्या नजरेला येणार नाही. तर तेथे सगळे जर्मन आणि जपानी पोचले तेथे. चुंग लॅच हे जे घाणेरडे प्रकार आहेत. त्यांची तुम्ही पुस्तकं जर पाहिली जापानीज भाषेतली तर आश्चर्य वाटेल तुम्हाला .पण लोकांना तर असं वाटतं की आपल्याकडे तर हे सगळे प्रकार आज प्रकार आहे. देव-धर्म म्हणजे सगळा लैंगिक प्रकार आहे. हे तांत्रिकांचे काम. तांत्रिक लोक राजकीय लोकांच्या मागे आणि राजकीय लोक त्यांच्यामागे. पण हे खरंच तंत्र आहे की सहज योग हा तंत्र नाही. म्हणजे कसा, तुमच्यामध्ये यंत्र आहे ते यंत्र कसं दाखवायचं. योगाला दोन अर्थ आहेत. योग म्हणजे यात सर्व काही शक्तीशी एका कारिता आणि दुसरा अर्थ युक्ती . त्याची जी युक्ती आहे . जसं हे एक मेकॅनिझम आहे हे जाणणे म्हणजे त्याला आपण सगळे तंत्र म्हणतो. म्हणजे यंत्राचे तंत्र मराठी भाषेत आपल्याला समजतं . यंत्राचे तंत्र. आता ज्ञानेश्वरांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. कारण त्यांनी निदान लिहिल्यामुळे एक तर दाखवायला झालं, कारण आपण महाराष्ट्रात वाचतच नाही, संस्कृत फार आज-काल. पूर्वी आमच्या काळी संस्कृत कंपल्सरी होता. आज-काल वाचत च नाही, त्यामुळे संस्कृताच्या पुराणातील वांगी पुराणात राहिलेली आहेत. बर आता यांची सिद्धता कशी करायची हा प्रश्न तर मी लहानपणापासून माहित होतं की ,मला हे कार्य करायच आहे. सामूहिक चेतना जागृत झाली पाहिजे म्हणजे एका व्यक्तीची नाही कारण याने सामूहिक कार्य. त्या कार्याचा साक्षात्कार दिला पाहिजे. म्हणून मी लहानपणापासून मानवामध्ये आतून काय दोष आहेत. एक शक्ती आहे माझ्याकडे ती शक्ती मी सूक्ष्म तेत जाणली. कोण कसा आहे कोण कसा आहे. आता माझी पूर्वपिठीका अशी आहे की, माझे वडील जे साळवे साहेब आहेत ते माझे मोठे भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे, मी त्यांच्या पाठी ची. एनकेपी साळवे, माझा आणि राजकारणाचा इतका काही संबंध नाही. त्यांच्याशी माझा फक्त भाऊ-बहिणीचा संबंध. बाकी काही संबंध नाही. तर माझे वडील हे काँग्रेसमध्ये आले त्यावेळी मी फार लहान होते. नागपूरचे, हो नागपूरचे त्यांच्या नावाचे रस्ते आहेत तेथे, त्यांचं नाव घेतले तरी लोकांच् हृदय असं भरून येतं, फार मोठी माणसं आणि त्यांच्यामुळे आम्ही पुष्कळ मोठी माणसं पाहिली, आणखी आई माझी फर्ग्युसन कॉलेजची ओनर्स मॅथेमॅटिक्स. सुशिक्षित फॅमिली, आणि आम्ही शालिवाहनाची वंशज. नंतर खरं नाव साळवी नाही सालवे, त्यांनी मग आम्हाला 96 कुळी केलं. म्हणजे आम्ही राजपूत आणि अत्यंत बाळबोध वातावरण घरांमध्ये. मी ज्या शाळेत शिकले. ती शाळा अत्यंत बाळबोध वळणाची फार चांगली शाळा होती. त्यात आमच्या मुली डॉक्टर झाल्या आहेत. मग त्याच्यानंतर मी सात वर्षाचे असताना आमचे हे गांधीजींकडे गेले होते. ते वर्ध्याला आले होते. गांधीजी म्हणाले “ ये सब हमारी तयार की है” माझ्या वडिलांना 14 भाषेत पारंगत होते. त्यांना 28 भाषा येत असत त्यापैकी 14 भाषेत ते पारंगत होते. गांधीजी माझ्या वडिलांना म्हणाले. “ हमको ये बच्चा आम्ही दे दो” वडील म्हणाले,” चलो दे दिया” आणि त्यांनी मला उचलून घेतले. मी परकर निशी गेले होते. त्यांच्यानंतर गांधीजींच्या बरोबर राहिले. शाळेत जाणे हे पुष्कळ वर्षे चालू होते. जाऊन येऊन असे. गांधीजी आत्मसाक्षात्कारी होते. म्हणजे नेमके काय? चालेल मी सांगते, एक शक्ती आहे जी तुमच्या अंगात असते. असे चैतन्य वाहत असते. चैतन्य आणखी मला वाटते तेच चैतन्य दुसऱ्या गोष्टीवर वापरले तर,आणखी ते चैतन्य तुम्हाला हातात जाणवते. आपण जन्माला आलो तर आपणाला माहीत असतं आपण माणूस आहोत,काही जानवर नाही. तसंच एका संताला माहित असतं की मी संत आहे. या चैतन्याच्या अनुभूती ने.आणि त्याचं वागणं वगैरे असत. ते कधी अशुद्ध काम करू शकत नाहीत. त्याला म्हटले दारू प्या ते काम त्यांना जमत नाही. तो तसं चुकीचं काम किंवा पैसे खा करायचा नाही. म्हणजेच तो संत कसा असतो. त्याला आपोआप आतूनच समजते. आतूनच बाहेरून नाही आतूनच संन्यस्त असतो.आणि ते लोकांना ही कळतं. गांधीजी सुद्धा आत्मसाक्षात्कारी होते. मी लहान असताना मलाही उपासना सांगितली मी तेव्हा तेथे असताना मला विचारलं. एकेक चक्रावर सांग, त्यांचं म्हणणं असं का? तर सगळ्यांना सांगायचं कारण त्यांनी मला ओळखलं होतं.शास्त्रीजी ते मला फार ओळखत होते .एवढे मोठे प्राईम मिनिस्टर होते. एकदा मी गेले भेटायला सर दारातच उभे राहिले. मला लाजल्यासारखे व्हायचे. इव्हन संजीव रेड्डी फार मोठे, मी गेले त्यांच्याकडे तर ते जमिनीवर बसायचे. गोरबाचेव हे देखील मानतात मला. ते सर्वच म्हणतात मला. पण आपल्या देशामध्ये नवीनच वावटळ निघाले आहे. संताला ओळखतच नाहीत. त्यांची ओळख काय? त्यांचे चरित्र, त्यांचं वागणं,, त्यांचे राहणीमान, त्यांची प्रेम, त्यांनी ओळखलं. बरं झालं. त्यांनी ओळखलं. तशी माझी त ओळख होती. तस मलाही ओळखलं पाहिजे होतं. त्यांच्यानंतर वडिलांचे देशावर नितांत प्रेम होते. माझ्या आईचे सुद्धा, ते रायबागी होते, हे सोडून काँग्रेसमध्ये आले. माझे आई सुद्धा पाच वर्ष निवडून आली होती. मी लहान होते. आठ नऊ वर्षाची माझं हे असं चालू होतं माझे भावंड त्यांना सांभाळणं. नंतर 42 सालामध्ये परत कॉलेज मध्ये असताना त्या 42 सालची चळवळ सुरू झाली. तेव्हा आमचे प्रिन्सिपल साहेब आहेत अजून पुण्याला त्यांना अजूनही विचारा ते सांगतील. तेव्हा मी एकटी,तेव्हा माझे वय नव्हते. मी तेव्हा सतरा अठरा वर्षाची असेल. माझा तेवीस सालाचा जन्म आहे .तेव्हा मी एकटी मी त्या गेट वर उभे होते. तेव्हा एकटी गेटवर उभी असताना लोकांनी हे बंदूक वगैरे पकडून उभे होते.तर एकटीने मी हे केलं मला भितीच वाटली नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला बर्फावर घातलं, मला मारलं वगैरे, मी लहानशीच होते. पण आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. साळवे साहेबांना विचारा ते सांगतील. त्यांना माहित आहे. आणि तो माझ्यावर चिडायचा तू कशाला हे करते. बेचाळीस सालच्या आम्ही हे कार्य केलं.त्या स्टुडिअस मध्ये त्यांच्यासाठी पुष्कळ त्रास दिला. इलेक्ट्रिक शॉक दिला, ते जाऊदे. तर गांधीजींचा असं म्हणणं होतं. जोपर्यंत तुम्हाला फ्रीडम मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही अध्यात्माच्या गोष्टी करायच्या नाहीत.हे त्यांचं म्हणणं. मग फ्रीडम मिळालं त्याच्यानंतर माझं लग्न झालं. नशिबाने माझे यजमान चांगले आहेत. त्यांच्यासमोर हिऱ्याचे ताठ ठेवले तर झटकून टाकतील, असे आदर्श मनुष्य होते, अत्यंत आदर्श. आणि माझ्या वडिलांनी पण केला होता. आमची लग्न समाजाबाहेर करायची, तर साळवे साहेबांचं लग्न सिंधी बाईशी झालं. हे आम्हाला माहीत होते. आणि माझं झालं ते हे यूपीचे श्रीवास्तव. अगदी लाखात एक मनुष्य आहे. त्यांना माहिती होतं हे हे मला नेहमी अवलिया म्हणायचे. अवलिया म्हणजे अवधूत. तुम्ही अवलिया म्हणजे तुमच्या सारखा कोणी नाही .मी तर खादीच वापरत असे तर यांनी हट्ट करून पार्टी ला जाण्यासाठी म्हणून खादी शिवले. त्यानंतर हे आय. एफ.एस.झाले इंडियन फॉरेन सर्विस मध्ये काय करणार, तुम्ही दारु पित नाही आपण काय करणार. मी म्हटलं रीझाईन करा. आणि तुम्ही आय.ए.एस .जॉईन करा. तर म्हणे त्याच्यात सहाशे रुपये पगार कमी होतो. तेव्हा सहाशे पुष्कळ होते.पैशाचे तुम्ही सहाशे रुपये चा नका विचार करू. तुम्ही आय .ए . एस. जॉईन करा. मग आम्ही आय.ए. एस. मध्ये आलो. हे कलेक्टर झाले साहेब. मेरट ला कलेक्टर झाले. त्यांची इतक्या लवकर प्रमोशन झाली की,तर कधी आम्ही ह्या ला पोहोचलो, मुंबईला. मुंबईला ते शिपिंग कार्पोरेशन चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर झाले. फार लांब राहिले ते, पण अत्यंत इमानदार मनुष्य मला त्यांचं हे वाटायचं, कधी आमचं लग्न झालं या दिवशी सुद्धा हे कामाला गेले होते. या दिवशी संध्याकाळी येऊन आमचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी कामाला गेले. मला ते बरं वाटलं अशी पण माणसं आहेत की जी आपल्या देशासाठी कार्य करतील. मग त्यांनी आय .एफ. एस सोडलं आणि आय.ए.एस झाले. त्याचा त्रास झाला म्हणा. त्यांनी पुष्कळ कार्य केले त्यांच्या त ही माझा हातभार आहे. त्यांना पद्मभूषण ही पदवी मिळाली. त्यांच्या नंतर मग 134 देशांनी त्यांचं सिलेक्शन केले. आणि आम्ही लंडनला गेलो. त्यांच्यासाठी लंडनला कायदा केला. आणि आम्हाला एन. आर. इ. केले. अहो, आता तर आम्ही इंग्लंडला आलो. आता आम्ही एन. आर. इ. नाही होणार तर काय होणार? काय पण झालं काहीच्या बाही कुणाला काही कोणाला काही करतात. त्याला काय अर्थ आहे. त्याचा अर्थ आहे काय? लंडनला त्यांना त्या लोकांनी चारदा एन. आर. इ. वस्तीत घेऊन गेले. चारदा , त्यावेळी आम्ही सोळाशे रुपयात राहिले. अजून ते तिथे चान्सलर आहेत.त्या तिथे अमेरिकन युनिव्हर्सिटीचे, सुट्टी काय मिळत नाही. दोन वर्ष झाली ,पण त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मला सुट्टी मिळेल तेव्हा येईन. बस हे सगळं करत असताना सहजयोग हा मी 1970 मध्ये सुरू केला. त्याला कारणीभूत श्री रजनीश आहेत. त्या रजनीशांनी मला ओळखलं, हे मी मान्य करते भूत लोक हे लवकर ओळखतात मला . त्यांनी सांगितले ही आदिशक्ती आहे. मी त्याच्या वाटेला जायची नाही. ते माझ्या मागे लागले. त्यांना वाटले की,आता यांच्या नवऱ्याला सांगून ठेवलं म्हणजे झालं. वारंवार माझं कार्य बघा कारण मी पुष्कळ सोशल कार्य केले ते बघा. फ्रेंडस लाईफ हे ते पुष्कळ, यात कुष्ठरोग यावर पुष्कळ कार्य केले आहे. मला लोक पैसे देतात. इमानदार लोक असले की त्यांना पैसे मिळतात. ते म्हण ह्यांना तुम्ही घ्या. माझ्या मागे लागले ते. आमच्याकडे इंपाला गाडी आहे. मला म्हणे इंपाला गाडी मला पाहिजे. ती गाडी शिपिंग कार्पोरेशन ची गाडी आहे. आम्ही तशी विकू शकत नाही. हावरट पणाची कमाल आहे , त्या माणसाची.पण साहेबांना कसं सांगायचं याच्या विषयी, तरी मग ते त्यांच्या मागे लागले. मी नारगोल ला फार मोठे कार्य केले आहे. तुम्ही यांना पाठवा. असं तर ते फार मोठे स्पिरिच्युअल आहे. असं, साहेब म्हणजे जाऊन ये ना. मी पण दिल्लीला जातो. एकदाजाऊन ये ना बघूया तरी काय आहे ते. मग मी नारगोल ला गे गेले. नारगोल ला साहेबांनी त्यांचा एक मित्र पारशी होता. त्याच्या च घरी राहिले. त्याचा सूट वगैरे अतिशय चांगला आहे. तेथे तुम्हाला एक झाड आहे तेथे ते तेथे बसून मी बघत होते. हा सगळ्यांना संमोहन करत होता आणि सगळे असे रस्त्यावर लोळत होते, कपडे फाडायला लागले. संमोहन करून माझं डोकं म्हटलं हा करतोय काय, काय मनुष्य आहे, बायका सगळे कपडे काढून नागव्या होत होत्या. संमोहनात मी तुम्हाला काय सांगितले ते तुम्ही करू शकता. लोक लहान मुला सारखे दुसऱ्याला पाठीवर घेतात. माहिती का तुम्हाला संमोहनात. मनमौनी ,मी हे सगळं पाहून ठेवले. मी हे सगळे बघते. मी सगळ्यांना भेटते ,त्याला भेटते . मी सगळ्यांना पाहिलं मुक्तानंद . सगळ्यांची माहिती घेतली.अमुक ठिकाणचं काय? यांच्याकडे जाऊन आले पण त्यांचं मला इतकं हे झालं. उपरती झाली. आता काही तरी करून हे शेवटच्या चक्र उघडलं पाहिजे. त्याच्याशिवाय कार्य होणार नाही. आणि मी रात्रभर तिथे एकटी झोपले समुद्रावर आणि सकाळी पाच वाजता मी सहस्त्रार उघडले. त्या ठिकाणी सात चक्र असतात. काहो दिले का तुम्ही यांना चित्र दिलय, कुंडलिनी चे, सहस्त्रार उघडल्याबरोबर मी काय पाहिले, कुंडलिनी ही अशी खट खट खट वर गेली . जसा तुमचा टेलिस्कोप उघडला जातो आणि जसं हे तुमचं कुंकू आहे ते जवळून चमकते.तसं सोन्याला तप्त केलं की चमकते , अगदी शांत, आणि सगळ्या दिसतात, त्या अगदी जशा काय दिव्याच्या वाती. अनेक प्रकारच्या सशक्त. पण कुणाला काय सांगायची सोय होती का? तुम्ही सांगा कोणी ऐकलं असतं का माझं. कबीर म्हणतो” कैसे समजाऊ सब जग मै” मग म्हटलं आपण सहज योगात आपण सुरू करू. तर एका पै पासून सुरू केलं. एक बाई यांच्या अंगात यायचं त्या म्हणून माझ्याकडे आल्या. त्यांना बंधन दिले. पहिल्यांदा आणि त्यानंतर एक प्रोग्राम घेतला , बोधीला घेतला. एकंदर तेरा लोक आले म्हणजे 14 माणसे झाली. त्यानंतर हळूहळू हे कार्य सुरू झाले. मग मी साहेबांच्या बरोबर होते. ही 1970 सालची गोष्ट आहे. हे 72 साल सुरू आहे. त्यानंतर इराण ला जाऊन आले. पुष्कळ कार्य झाले आहे. इराणमध्ये आमचे शिष्य आहेत. मग त्याच्यानंतर लंडनला आले. लंडन नंतर आम्ही सगळ्या देशात फिरलो. अनेक देशात हे कार्य सुरू झाले. आणि सगळ्यात शेवटी आश्चर्याची गोष्ट आहे की, गारबाचेव, आल्या बरोबर मी साहेबांना सांगितले हा आत्मसाक्षात्कारी आहे. लेनिन सुद्धा आत्मसाक्षात्कारी आहे. त्याला साऱ्यांनी प्रेशर आणून त्याच्या पार्टीवर प्रेशर आणून हेच सगळं सुरू केलं. जर तुम्ही त्यांची पुस्तके कधी वाचली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तो सांगतो की, स्टेट लेस स्टेज यायला पाहिजे . अशी स्थिती माणसाची आली पाहिजे की, गरज राहिली नाही पाहिजे. स्टेट लेस स्टेज गरज राहिली नाही नाही पाहिजे. पण त्याला असे वाटते की, भौतिकता जर माणसांमध्ये परिपूर्ण झाली तर तो ह्याला येईल. आपणाकडे म्हटलेला आहे की, लक्ष्मी तत्व पूर्ण झाले तर माणसात महालक्ष्मी तत्व जागृत होते. म्हणून त्यांनी त्याची घडी तशी बसवली .पण एक फायदा झाला त्याचा इतके त्यातले स्टॅन्ड आहेत. त्यामुळे त्याच्यावर प्रेशर आहे. इतकी दडपशाही की त्यामुळे लोकांचे सगळं लक्ष देवांकडे, देव नाही पण त्यांना देव माहीत नाही. गणपती माहीत नाही काहीही माहित नाही. ह्यांच्यात सुद्धा लेख आहे. त्या माणसाचा त्यांना मी भेटले मला आश्चर्य वाटलं त्यांनी चक्रावर केवढं काम केलं. . तो स्वतः येऊन भेटला.तो फार मोठा सायंटिस्ट आहे. श्री चक्रावर काम केले आणि खूप वाचन केलं. आश्चर्याची गोष्ट आहे. त्या देशांमध्ये सोळा हजार लोक माझ्याकडे येत . आम्हाला स्टेबबिग करा आणि मिनिस्टर होते. ते कॅस ट्रोल ग्राफ मिनिस्टर आहेत. आपलं सगळं इंटरनॅशनल मिनिस्टर ते सुद्धा सद्गुरू होते. मागच्या वेळेला त्यातले हे लोक त्यांना तेथे दगड मारला, तुमच्या देशाची नालस्ती झाली. सुरुवातीला माझ्याशी काय वाद केला नाही त्यांनी. भाषण झाल्यावर सुरुवातीला इज्जत करत होते. हे लोक बस मध्ये बसत असताना हॉकी स्टिक घेऊन आले. सगळे लोक दारू पिऊन आले होते. सगळे दारुडे झाले. त्यांची नावे सुद्धा घेऊ शकते, त्या मुलांची. तेव्हा जरा लहान होते. आता अगदी गाव गुंड, त्यांचा हात माग इचलकरंजीला बंद पडला. तेव्हा हॉकी स्टिक घेऊन बायका होत्या. सगळ्यांनी असं केलं. सगळ्या बसेस होत्या त्या बसच्या कडेने 8 ते दहा मुले उभी राहिली, ते जेव्हा वर चढत होते, वर चढताना त्यांच्या पायाची शीर म्हणतात ना,तेथे दना दन . इतका त्यांना मार बसला त्यांनी मला एका अक्षराने या लोकांनी सांगितले नाही. त्यांना इतका मार बसला मग कनायाला, बिनायला लागले. म्हटलं होतं काय? मग सांगितले, आम्हाला तेथे मारले. मग म्हटलं तिथे च का नाही सांगितलं? तेव्हाच सांगितलं असतं तर पोलिसात जाऊन वर्दी दिली असती . मग मी पोलिसाकडे गेले.” शिंदे साहेब हे बघा,” त्यांच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. काय हे बायकांना सुद्धा झोडपले आहे. शिंदे साहेब म्हणाले काही नाही मी बंदोबस्त करतो. आम्हाला नशिबाने त्यांची नावे मिळाली. त्याची लिस्ट मिळाली. आता सगळे हे दारुडे वाट लागली त्यांची. अंधश्रद्धेचे पहिले दर्शन आणि दुसरे दर्शन कुठे घडले. ते म्हणजे मुंबईला जवळजवळ बारा हजार माणसे असतील, डिसिल्वा यांच्यावर. हे मिस्टर मानव , एक ग्रहस्थ बाबा होऊन समोर बसले व माझा फोटो घेऊ लागले. आमचे आमचे लोक म्हणाले माताजींचा फोटो बोलताना घेऊ नका. शांत बसा, तर म्हणे मी हो घेणारच. माताजी ना मध्ये मध्ये बोलताना डिस्टर्ब होतं,पण इतका हट्टी माणूस, शेवटी म्हटलं बसता का शांत. त्यांच्याबरोबर काहीतरी 10 ते 12 पोरे आली होती. आम्हाला काही माहीत नाही. दहा ते बारा हजार माणसांमध्ये ते असतील. ते म्हणे आमचा एक संशय आहे. त्यांचे नाव मला लक्षात नाही, बरे अमृते. हे ग्रहस्थ मागे फक्त सहजयोग यांना पुस्तक देण्यासाठी ते बसले होते, ते विकत नव्हते. या लोकांनी जाऊन त्यांना तुडवलं. सगळी पुस्तके हिसकावून घेतली आणि ते ग्रहस्थ आठ दिवसांनी वारले. मी आता अशी फिरतीवर कुणाला कुठे काय सांगणार, आमच्याकडे पुरावा काय? कोणी मारले? आम्हाला काय माहिती की, ते हेच लोक आहेत. आणि मानव पुढे आले आणि आमच्याशी आमचे शिकापुर एक गृहस्थ आहेत. त्यांनी सांगितले हे एक सुद्धा संमोहनाचे चे काम करतात. म्हटलं फार चांगली गोष्ट आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारे फार चांगली गोष्ट आहे. ते म्हणे तुम्हाला वेळ असेल तर भेटायचे आहे. आता मी स्पष्ट सांगते त्यांची परीक्षा घ्या. त्यांना सायन्स माहित नाही, त्यांना अध्यात्म माहित नाही. शिक्षण किती झाले तर बीए फेल झालेला मनुष्य त्याच्यापेक्षा बरा. काही वाचन नाही, काही व्यासंग नाही. हे पुढारी, पुढारी ला काहीतरी पाहिजे की नाही.बर येऊन बसले माझ्यासमोर, आम्ही तुम्हाला आव्हान देतो. आमची कुंडलिनी जागृत करून दाखवा.” आव्हान” असं काहीतरी वाघासारखे, अहो म्हटलं आव्हान देऊन काय होणार आहे का? आवाहन केले तर कुंडलिनी जागृत होईल, तुम्हाला काय माहिती आहे का? तुम्ही कोण मी म्हटलं का हो तुम्हाला डॉक्टरी येत नाही, मेडिसिन येत नाही. आता कसं बोलायचं तुमच्याशी? बरं म्हटलं बसा. एक दुसरा माणूस घेऊन आले , म्हणे हा माधव गडकरी. बरं म्हटलं बसा. तरूण मनुष्य असा कि मी आपलं वेड पांघरून बसा म्हटलं, आणि हे स्वतः संमोहन विद्या, मी म्हटलं तुम्ही स्वतः संमोहन विद्या करता तुमची कुंडलिनी जागृत होणार नाही. ही काळी विद्या आहे तर त्यांनी उलट लिहून पाठवले. आणि त्यांनी उलट लिहून पाठवलेले हे पेपरवाले कसे काय छापतात. अहो आम्हाला विचारायला पाहिजे आम्ही माणसंच आहोत. मला काय विचारलं नाही. छ|पून दिला जे काय खोटं असेल ते. म्हटलं तुमची कुंडलिनी जागृत करणे मोठे कठीण काम आहे. तरी आम्ही प्रयत्न करतो. मग त्यांना टेप मिळवून दिला. त्यांना टेप रेकॉर्डर मागून त्याच्यात टेप करून दिलं, आणि म्हटलं घरी जाऊन वाचा . तर लोक म्हणतात तसं ,तर म्हणे माझ्या डोक्यावरून गेलं, तुमचं शिक्षण नाही, मेडिकल्स च . मी प्यारा सिंथेटिक म्हटल्यावर कळलं काय ते. कळलं का. आज हे लक्षात घेतले पाहिजे. आम्ही मेडिकल शिकलो ते 47 साला च त्यामानाने आज मेडिसिन कुठे गेले. तुमचा व्यासंग नसला मेडिसिन मध्ये तर कुठल्या कुठे पोचले मेडिसिन .मेडिसिन तुम्हाला काय माहीत असणार. बरं कुंडलिनीचा हे तर आहे. सबंध आपला आयुर्वेद कुंडलिनी वर आधारलेला आहे. तुम्ही बर वारणेच्या जवळ एक स्कूल आहे. आपल्याला माहिती आहे आयुर्वेद कॉलेज आहे. आयुर्वेद शाळा आहे. वारणेच्या जवळ आपण जाऊन विचारू शकता. त्यांच्या पुस्तकात सुद्धा कुंडलिनी, मन आत्मा हे सगळं काही आहे. म्हणजे आपला आयुर्वेद सगळा चुकीचा आहे का हो. मेडिकल ला नाही. त्याला मी काय करणार ? फॉरेनला कुठे माहित असणार आयुर्वेद. पण आता आला इंटरनॅशनल मेडिकल जनरल मध्ये माझं नाव आलेल आहे. कुंडलिनी च नाव आलेला आहे. सहज योगा चं नाव आलय. आत्ता हे डॉक्टर चू ग नशिबाने आले आहेत. यांना एमडी ही पदवी मिळाली आहे, सहज योगात. आता परवा ते दुसरे डॉक्टर आहेत. हे तर असे आहेत की यांनी एकाचा ब्लड कॅन्सर ठीक केला.’ क्या बताये आपने क्या बताना है| एक माधुरी है बॉम्बे मे उनको ब्लड कॅन्सर था| हे डॉक्टर इरान ला असतात. “ हि वाज डिक्लेअर टू बि डेथ आफ्टर वन मंथ . ही कम्प्लीट ली क्यूअर.”कितने साल से था कॅन्सर. तीन साल पहले था ,कॅन्सर बिल्कुल ठीक है| कोई दिक्कत नहीं बिल्कुल सारे टेस्ट सारे निगेटिव्ह आए हैं.|बीमारी जड़ से ठीक हो गई. आता हे स्वतः डॉक्टर आहेत एमबीबीएस आणि इरा न ला डॉक्टर आहेत. तेथून हे माझ्या जवळ शिकायला आले आहेत. आता त्यांच्याशी बोलायला सोपं आहे. कारण यांना प्यारा सिंथेटिक नर्वस समजेल. बर आता त्यांच्याबद्दल थोडा सांगू का. एकदम थोडं कठीण आहे. अध्यात्म वादातून सामाजिक ज्ञान, आपल्या आत्म्याचे ज्ञान, आत्म्याचे ज्ञान काय आहे? आत्मा तर त्याला आपण सच्चिदानंद म्हणतो. की जेव्हा आत्माच ज्ञान होतो माणसाला, केवळ सत्य, त्याला आपण कैवल्य म्हणतो. केवळ सत्य आता समजा लहान मुलं आहेत. आत्मसाक्षात्कार यांचे डोळे बांधले आणि त्या मुलांना विचारले काय त्रास आहे. त्या माणसाला विचारले काय त्रास आहे. एकच बोट दाखवतात किंवा दोन बोट दाखवतात. त्यांच्या बोटा वरती सेंसितिविटी आली ना. संवेदना आली. दोन बोट दाखवतात. हे दोन बोटं काय दाखवतात. याचा अर्थ काय? त्याला मेंदूचा त्रास असला पाहिजे. किंवा विशुद्धी चा त्रास आपला पाहिजे. लहान मुलं सुद्धा सांगतील. म्हणजे कसं झालं. आपल्यामध्ये आपलं कॉम्प्युटर सुरु झालं. आपला सॉफ्टवेअर मेन शी जोडला जाईल. आत्म चेतना ,आत्म चेतना आली ती येते. आत्म चेतना देणारी जी शक्ती आहे. तिचं नाव कुंडलिनी. आता तुम्हीच बघा. हे मेन्स ला लागले. तशी च कुंडलिनी आहे. ती मेन्स ला मग आपलं कॉम्प्युटर सुरू, तेव्हा केवळ ज्ञान मिळतं. यात सगळ्या च एकमत आहे. आता आमच्याकडे 56 देश आहेत. यात 56 देशातील लोक आहेत. कधी भांडण नाही. तंटा नाही. सगळ्यांच एकमत.आता आपल्याकडे वैचारिक पातळी उच्च असली तरी लोकांमध्ये वेगवेगळे विचार असतात. असतातच, पण एकदा जर तुम्हाला साक्षात्कार मिळाला मग मनुष्य समजतो. तुम्ही दुसरा प्रश्न विचारला. फार चांगला आहे. समाजामध्ये कशी होते. आता समाजामध्ये जे दोष आले आहेत. ते मानवामुळे आले आहेत. या मानवाला देवाने काही दिले नाही. या मानवाला दोष का आले , तर त्यांची नीतिमूल्ये बदली हे तर मानलं पाहिजे. नीतिमूल्ये बदलली , निती मूल्य बदलल्यामुळे आपल्या मुलांना वडिलांचा मान करणे येत नाही. गुरुचा मान काय नाही.आता नीतिमूल्ये बदलल्यामुळे काय झाले, कसं वागायचं, स्वैराचार, इगो आला. आणि हे सगळे इगो चे प्रकार अहंकाराचे आहेत. पण जेव्हा तुम्ही अध्यात्मातून प्रगती केली, अध्यात्मातून तुमच्यात संतुलन येईल. बरोबर कळते संतुलन आतून आता आमच्यात लग्न होतात. पण हुंडा नाही काहीच नाही. मी काय कुणाला सांगत नाही पण घेतच नाहीत. हा घाणेरडा प्रकार वाटतो. व्यवस्थित लग्न होतात. मुलं सुंदर असायची बघण्यासारखे असायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही इतकी लग्न केली . घेतली नाही.यांच्यात कधी कोणी मला हे पाहिजे असं म्हटलं नाही. यांचे यांच्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना सांगून सहावा अध्याय लिहिला. याचा फायदा समाजाला कितपत झाला? आज मला झाला समाजाला आज झाला. माझ्यामुळे आज झाला. कसे असते. वृक्ष वाढत असतो वृक्ष वाढला. तुम्ही म्हणाल , मुळ यांचा काय फायदा? मग तुम्ही म्हणाल त्याचा बुंध्याचा काय फायदा, मग पानाचा काय फायदा, शेवटी फळ मिळालं म्हणजे झालं. तर व्हॅल्युएशन झाड वाढले. जस जसे तुमचं विश्व इतकं वाढलंय ,एवढे तुम्ही ही प्रगती करून घेतली. हे समजा झाडासारखा आहे.( ) ज्ञानेश्वर ची जी कल्पना होती. मुळात हे ज्ञान मी समाजासाठी द्यावे. अर्थात ते महाराष्ट्रातील समाजासाठी आहे. आणि त्यांनी लिहिलं सुद्धा ते मराठीत लिहिलं. म्हणून म्हटलं त्यांचा मराठीत असतानाही त्याचा प्रपोगंडा किंवा त्याचा फायदा का झाला नाही. बरोबर काढला. त्याला कारण असं, धर्ममार्तंड परत त्यांनी सांगितलं हे निषिद्ध आहे. त्यांनी सगळे यांना सांगितलं ते निषिद्ध आहे. वाचायचं नाही. हे धर्ममार्तंड इकडे तिकडे आहेत ना. त्यात त्यांचा स्वार्थ आहे,कोणता? हो स्वार्थ आहे. तुम्हाला ते माहिती आहे, हे वेगळ सांगायला नको. सगळं काही कमर्शियल. कळलं का? म्हणजे त्यांनी व्यक्तिगत स्वार्थापोटी या सहाव्या अध्यायात . कारण लोकांनी प्रश्न विचारला असता कुण्डलिनी कशी आहे. जागरण कसं काय होणार. कुंडलिनी हा शब्द आम्ही आत्ताच ऐकतोय. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ते समजणे आणखी कठीण आहे. आज सूक्ष्म विषय आहे. हे मी मानते. पण एकदा का जागृती झाली मग आपण सूक्ष्मात जातो. ह्या लोकांनी गणपती नाव कधी ऐकलं का तर सगळं काही माहिती हे कुठून उत्तर आणलं. कुंडलिनी च . हे इटालियन आहेत, हे डॉक्टर आहेत फ्रेंच चे. यांनी कुंडलिनी च नाव ऐकलं का जन्मात तरी . त्यातल्या त्यात हे रशियन, यांनी देवाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. ते कसे उत्तरले एकदम त्यांची शक्तीत प्रचंड होऊन जाते. इकडे सूक्ष्म ते मुळे , ही सूक्ष्म शक्ती आहे आत्मसाक्षात्कार ची शक्तीही स्पष्ट कळत नसल्यामुळे कारणाने पुष्कळसे लोक. स्पष्ट सांगायचे तर ओशो किंवा भोंदू लोक किंवा अन्य कोणी भोंदू . मला ति प्रेरणाच आली. माझ्या अंगी शक्ती आली असं समजून समाजाला फसवतात आणि आंधळा समाज त्यांच्या मागे धावतो. अहो हे आहे ते ओळखता येते. किंवा दोन म्हणा, त्यासाठी तो पैसे घेतो का? त्याचे लक्ष कुठे आहे. त्या माणसाचे ओशो, अशा माणसाच्या पायाच्या धूळ बरोबर असते. कळलं म्हणून दुसर त्या माणसाचा चारित्र्य. मुळात आम्ही श्रीमंत घराण्यातले, आमचं लग्न झालं ते पण अतिश्रीमंत. तुम्ही म्हणाल आम्ही ब्रह्मपुरीस चक्राचे शिबिर घेतले. ते पाहिल्याबरोबर पुष्कळांनी डोक्याला असा हात लावला. तुम्हाला काय तुम्ही दगड धोंडा काय तरी करून पुजून टाकतात. त्याचं चरित्र कसा आहे तो कसा वागतो. हे दोन पाहिले पाहिजे. आता या माणसाने एवढा घाणेरडा पणा शिकवल्या पासून त्याचे तुम्ही शिष्य होता. म्हणजे तुम्ही च घाणेरडे आहात. पण राजकीय नेते अशा व्यक्तींना प्रोत्साहन देतात. त्याचं काय? मला राजकारणी व राजकारण समजला तर ना. आपण राजकारणी घराशी संबंधित आहात म्हणून हा प्रश्न विचारला. अहो, माझे वडील त्यागी मनुष्य, माझी आई अत्यंत ज्ञानी तिचे म्हणजे आपल्या हाताने सुत काढायचे व त्या साड्या नेसायच्या. आणखी नांदगाव चे राहणारी जाधव. तर तिचं वृत्त होते की, कधीही द्राक्षे खाणार नाही, कारण माझ्या गावच्या लोकांना द्राक्षे मिळत नाहीत. काय म्हणताय मी नांदगाव ला गेले तर माझे डोळे भरून आले. मला बोलता येईना. माझा कंठ दाटून आला. यावेळी म्हटलं काय हे गरिबी, अजूनही तशीच गरिबी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल मुळा- मुठा त्यावेळी तिचे पात्र फुटलं . आणि सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्याच्या त द्राक्ष गेली. असे असले लोक होते, आमचे आई- वडील कळलं का? आमच्या आई-वडिलांचा राजकारण वेगळं होतं. एवढ्यासाठीच म्हटलं सगळीकडे राजकारणी नेते वेगवेगळे अशा काय गरज होती. माझे वडील असेंबली चे मेंबर, कॉन्स्टिट्यूशन समितीचे मेंबर, पार्लमेंट चे मेंबर होते. काय त्यागी पुरुष होते.काय त्यागी भाषा होती. माझा चेहरा अगदी त्यांच्यासारखा. आणखी आता काय झालं. ते लोक आता कुठे गेले समजत नाही. अल्लादी वगैरे मोठी माणसं, आंबेडकर फार मोठा मनुष्य, त्यांच्याबद्दल काय बोलतात मी मानत नाही. अत्यंत विद्वान व्यासंगी आणि अत्यंत कळकळीचा मनुष्य, त्याला समाजाची कळकळ होती. यावेळी खरंच त्रास होता समाजाच्या दृष्टीने ते बोलले पण रामाला वगैरे शिव्या देणे मुळीच नाही. कधीच शक्य नाही. मी विश्वास ठेवू शकत नाही. ते नेहमी मी आमच्या घरी येत असत. आणि वडील नेहमी त्यांची थट्टा करीत असत. एक तर ऑनेस्ट मनुष्य,” एकदा म्हणे असे करा तुम्ही या खुर्चीवर बसला आहेत. त्याचे पैसे द्या. ते म्हणे साळवे साहेब ही खुर्ची तुमची नाही. गव्हर्मेंट ने दिली आहे. मग गव्हर्मेंट ला द्याल हे पैसे , “असे थट्टा करायचे, भयंकर थट्टेखोर मनुष्य. भीमसेनेचे बरोबर नाही. कशासाठी म्हणाले माहित नाही.त्या अशा गोष्टी शक्य नाही.थोडासा वेगळा प्रश्न धर्म तत्व वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या ठरलेल्या आहेत. राम जन्मभूमी बद्दल मग काय ? त्याबद्दल बोलायचं का असा मी विचार करते. कारण मी म्हणे तरी तुम्ही का विश्वास ठेवायचा. आता इकडे राम जन्मभूमी आणि इकडे इतक्या लोकांच्या हत्या होतात. एखाद्या आईला काय वाटेल. याबाबत काय करायचं सांगा. किती लोकांची ची हत्या झाली. वाईट असेल मशिदीवर चढले, वाईट असेल, त्याबद्दल काय ? मशिदीवर चढले यात काही वाईट नाही. त्यांनी काही बॉम्ब वगैरे टाकला नाही. त्याने बदनामी मात्र झाली सगळीकडे ते असते तर त्यांना( फॅमिली टरम) अमुक-तमुक नाव दिली, तेथे जाऊन काय राम जप करत बसले. एकूण काय भाजपचे त्याकाळात याबाबत आंदोलन योग्य होते, असे आपल्याला वाटते. असलं तरी त्याबाबत इतकी ही घाई करण्याची ची गरज नाही. त्याबद्दल मी त्या लोकांना एकदम मारून टाकलं ते बरोबर नाही. मला कोणाची उचापती करायची नाही. राम जन्मले तर जन्मले, त्यांची शक्ती आहे ती आहे. त्यात कोणाला मारलं ते मला पटत नाही. ते कुणाचं च मला पटत नाही. म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि भाजप यांचा आत्ताचा इशू योग्य आहे ? एका अर्थाने त्यांचे योग्य आहे, आणि एका अर्थाने माझे योग्य आहे. मी दुसऱ्या दृष्टीने विचार करते. आज आपल्या समोर तीनशे माणसे मारली गेली तर काय होणार नाही.आतुन का तुम्हाला त्या संबंधात ते निषेधार्थ आहे.ते आम्हाला मान्य आहे. त्यासंबंधीची हिंसा निषेधार्य आहे. यांनी काय त्यामध्ये संशोधन करायला पाहिजे. यांच्यात संशोधन असा आहे हे एक फॉरेनर आहेत. त्याने संशोधन करून असे सांगितले त्यांचा एक पॉइंट चांगला आहे की, हा मनुष्य बाहेरून आला बाबर. तर तुम्ही सगळी इथून तिथून फॉरेनर ची नावे बदललेली आहेत. फॉरेन इन्वेस्ट गेटर ची नावे बदली त्यांचे पुतळे काढले आहेत. हा तर फॉरेनर होता. त्याने जर काही वास्तू बदलली तर बदलायला काही हरकत नव्हती. असा एक पॉईंट त्यांनी चांगला सांगितला. इंग्लिश मन होता. त्याने दुसऱ् एक जे सांगितले की तो अर्कॉलॉजीस्ट आहे. त्यांनी असं सांगितलं त्या मशिदीमध्ये डुकराचे चित्र आहे. दिस इज रॉंग . असं झालं असेल कोणी नंतरही काढला असेल. असे आपण म्हणू. पण प्रत्येक ह्याला वाद प्रतिवाद आहे. त्यानं सांगितलं( लिगा रेट) काय असायला पाहिजे. मशिदीला, दुसरं म्हणजे तिथे नदीचं पाणी असतं. असं त्यांनी मला सांगितले. त्याचं म्हणणं असा आहे. ही मशिद च नको आहे तेथे. मी म्हटलं तो काय करतोय व्यवस्थित रिसर्च करून सांग, मशीद आहे किंवा नाही. काय असेल ते असेल. पण आता तुम्ही माझं म्हणणं असा आहे, हिंसा न करता हा वाद मी मिटवू शकते. इतकंच आपलं म्हणणं आहे कोणा चि हिंसा होऊ नये. हा सत्याग्रह ठीक आहे पण सत्याग्रही च होते विवेकानंद. म्हण| बिचारे हे काय हताश होऊन गेले का ? कळलं का ? असा साक्षात्कार राजकीय लोकांना का होत नाही ? तुम्ही बरोबर विचारलं कसा आहे. कुंडलिनी हीसुद्धा इच्छा आहे, आणि आणि ती मागितल्याशिवाय प्राप्त होत नाही. नम्रते शिवाय नाही. आता हे सगळे लोक जातात मांत्रिकाकडे माझ्याकडे कोणी येत नाही.खाजगीवाले आले ते पार झाले. त्याचा रोग ही बरा झाला. मला त्यांनी बोलावले आपल्या स्टेट हाऊस मध्ये आणि जमिनीवर बसले होते. वर बसले नाहीत. त्यात प्रेस नोट दिली. विज्ञान युगात आपली शक्ती कितपत लोकापर्यंत जाऊन पोहोचले ? हे पोहोचवणे तुमच्या हातात आहे. हे सर्व तुमच्या हातात आहे. हे वृत्तपत्राचे काम आहे,असं म्हणत नाही.तुमच्याही बऱ्यापैकी प्रयत्नावर आहे की नाही. त्याचंही एक उदाहरण सांगते, मी रशियाला गेले तेथे रशियाचे व वृत्तपत्रकार माझ्याबरोबर होते. झाडून ते इमानदार होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इथून तुम्ही गेला मास्को ला,तुम्हाला प्लॅन मध्ये मिळते ते. त्यात संबंध सहज योग दिला होता. माझा फोटो अमुक-तमुक सगळं दिलं होतं. मी तुम्हाला म्हणते एखाद्या रुग्णाला तुमची आवश्यकता आहे. आणि तुम्ही कोल्हापूरला आहात. तर त्यावेळी आमचे रुग्णाचे कार्य नाही. आमचं कार्य कुंडलिनी जागृती करण हे आहे. कुंडलिनी जागृती ते आहे ना. पण कसं नागपूरला मी गेले तर अंधश्रद्धा वाले मला मुर्दाबाद वगैरे. अमुक-तमुक नागपूरच्या सगळ्या घाणेरड्या शिव्या घातल्या. ज्यां मी जन्मात ऐकल्या नव्हत्या ,कानाने त्या ऐकल्या. तुम्ही म्हणताना हे अध्यात्म आहे. हो हे खरे आहे. हे इन्फॉर्मेशन नागपूर ची. मी नागपूरची चा आहे. कोपऱ्या वर चे घर का नाही, धंतोलीत आहे. आमचं घर माहूर रोड येथे हे आमच्या वडिलांचा पुतळा आहे ना. तिथे आहे. हे सगळ्यांनी मुर्दाबाद, अहो इतक्या घाणेरड्या शिव्या घातल्या मला, तुम्ही अध्यात्मिक आहेत म्हणून. सगळ्यांचे रोग बरे करतो म्हणून. मी कशाला करू, मला काय मिळणार आहे ते सांगा. दावा करता. मी कधीही दावा केलेला नाही. मी रोग बरा करते म्हणून.ह्या माणसाला एमडी मिळाल्यानंतर ह्या तीन जणांना डॉक्टर पदवी मिळाल्याबरोबर सगळीकडे पसरली .मी कधीही दावा केला नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल. परवा 400 ते 500 डॉक्टर होते. कितने वहां लोग थे ? वहां 500 लोग थे | तर पहिली सभा झाली त्यात मी गेले होते, युनिव्हर्सिटीत . युनिव्हर्सिटीच्या लोकांनी इतकं काढलं तर तुम्ही इतकं कसं करू शकता. जर दिल्ली युनिव्हर्सिटीत होऊ शकत. तर आम्ही का करू शकत नाही. युनिव्हर्सिटीत ढवळाढवळ. बर मग त्याचं एक दुसरे सेशन झालं. तिथं मला मेहरोत्रा नि बोलवलं होतं. त्याच मी हार्ट ठीक केलं. तिथं सर्वांना सांगत सुटला, माझं हार्टपाच मिनिटात ठीक केलं. म्हटलं सांगू नका. मला लोकांना ठीक करायचं नाही मला जागृती द्यायचे आहे.एज ए बाय प्रॉडक्ट जागृतीचा तर फायदा काय ? जागृतीचा फायदा बाय प्रॉडक्ट तुम्ही बरं होता. हा फायदा. पहिल्यांदा तुम्ही जागृती मागितली नाही तर तुम्हाला ठीक करून आमचा काय फायदा ............... ..........समजा एखादा दिवा कधी लाईटच देणार नसेल तर त्याला ठीक करून काय फायदा. तुम्ही स्वार्थी आहात असं म्हटलं पाहिजे ? अर्थातच, स्व चा अर्थ आम्ही जाणले ला आहे. म्हणून आम्ही स्वार्थी आहोत. शिवाजी महाराजांनी सांगितले स्वधर्म ओळखावा. तो आम्ही स्वधर्म जागविला. त्यात स्वार्थ परमेश्वराचा आहे. अशा लोकांना जागृती द्या जे परमेश्वराचे कार्य करतील. हे ग्रहस्थ सारखी माझी पब्लिसिटी करत होते पुष्कळ, त्यांच्या राहुल बजाज यांना ठीक केलं. पुष्कळ लोक होते. ते कमिशनर होते दारू पिऊन आले मग मी त्यांच्यावर सटकली. तू सगळ्यांना कशाला सांगत सुटला स. मी गोरगरिबांना फुकट ठीक करते पण श्रीमंत लोकांना नको. म्हटलं त्यांना जाऊदे डॉक्टरांकडे. फक्त गोरगरीब च कळलं का, आणखी दुसरी अशी गोष्ट आहे हे जे आजार ठीक करायचे आहेत त्याला डॉक्टर आहेत, फक्त ज्या लोकांना जागृती आली त्यांचा रोग आम्ही ठीक करणार प्रांजळपणे सांगते. ज्यांना जागृती नको असेल त्यांचा आमचा काही संबंध नाही. मी तुम्हाला एक सांगतो माझा खांदा दुखत होता ठीक होईल का ? अहो तुमच्या साळवी साहेबांचा खांदा फ्रोजन होता. त्यांना विचारा मी त्याचा खांदा ठीक केला. हात खांदा दुखत आहे. काही बंधन वगैरे आहे का. हो मी ठीक करून देईन. असलं काही बंधन नाही. प्रेमाचं बंधन आहे तुमच्यावर. मिठी करून देईन तुम्ही ही फार लिहित असाल म्हणून दुखतोय, लेखक. ते ठीक करून देईल त्यात काय कठीण नाही. तुमचा तुम्ही ही करू शकतात. नंतर आता हेच लोक ठीक करतात. मी कुठे काय, आता मला वेळ कुठे आहे. पण आपण हे म्हणाला ते सामूहिकतेत कसं ठीक होईल. तो प्रश्न तुमचा ठीक आहे. आता आपल्याला ह्या ला एक उदाहरण देते. रशियात एक मनुष्य, रशियाला दोनशे साईट चालू केल्या होत्या. त्यात डॉक्टर होते हे सायंटिस्ट मला म्हणाले. माताजी मला विद्यापीठात सांगून कामाला लागले पाहिजे. आत्मसाक्षात्कार दिला पाहिजे. मी त्यांना विचारले तुम्हाला एवढी घाई का ? आत्मसाक्षात्काराची कमाल ही आहे. तुमच्या भाषणाला 16000 ते 14 हजार लोक होते. त्यात आमचे काही मित्र होते. हे सर्व बरे झाले. तुमच्या भाषणातच. काय म्हणता आश्चर्य आहे. भाषणातच ठीक झाले. ब्लड कॅन्सर सारखे रोग असाध्य रोग आहे. त्याच्यावर काही उपचार होईल का ? त्याचा रोग कसा ठीक झाला मी तुम्हाला काय डॉक्टरांनाही समजावून सांगू शकत नाही. त्याला कारण सायंटिफिक आहे. सायंटिफिक, काय काय गोष्टी अजून मेडिकल सायन्स मध्ये नाहीत. त्या जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्ही ब्लड कॅन्सर ठीक करू शकता सहज्योगा द्वारे, ते कसे सांगते, आपल्या शरीरामध्ये स्वाधिष्ठान चक्र आहे. एक तुम्ही समजू शकता हे स्वाधिष्ठान चक्र आहे, हे नाभि चक्र आहे. मेडिकलमध्ये याला हायपो स्टिक किंवा याला आमच्या वेळी हायपोस्टिक म्हणत असत. पण या याला ओप्पो लेक्सिस, हे फ्लेक्स सिक्स याला मदत करत. याला काय कार्य आहे हे ते आपल्या मेडिकल सायन्सला माहित नाही.याचं आणखी एक कार्य आहे. आपण आपली बुद्धी फारच वापरत आलो होतो तेव्हा हे सेल्स वापरतो. त्याच्यासाठी त्याला शक्ती द्यायला पाहिजे. तेव्हा या सेल्स च रिप्लेसमेंट झालं पाहिजे. तर हे एक चक्र आहे. ते ह्या सेल्स च रिप्लेसमेंट करते. त्यांचं हे फार मोठे महान कार्य आहे. त्याशिवाय आपले यकृत आहे म्हणजे लिव्हर. त्याशिवाय रीस स फुल त्याशिवाय पॅनक्रिया, आणि किडनी आणि सम लोअर पोर्शन ऑफ युवर इंटेस्टाइन त्यांचं कार्य आहे .त्यांना शक्ती द्यायचे कार्य आहे. त्यांना समसमान आहे. आता हे डॉक्टरांना माहिती आहे. बर मग काय हे, माहित नाही की, ब्रेन चा सेल्स ला कोण मदत करते ते. हा येथे बेसिक पॉईंट आहे. जो मनुष्य जास्त विचार करतो, प्लॅनिंग करतो त्याला आम्ही राइट साई डेड मनुष्य म्हणतो. तो हे चक्र फारच वापरतो. त्याचं लिव्हर चक्र खराब होते. त्याचं लक्ष नाही लिव्हर कडे, त्यांना गर्मी पित्त होऊ शकते. सेव इज पार्क होऊ शकते. त्यांना लिव्हर चा कॅन्सर होऊ शकतो. दुसऱ् तुमच्यासाठी बराय सांगायला कारण तुम्ही सगळे वैचारिक पातळीवर असतात. सेकंड पॉईंट कुठे आहे तुम्ही जर पेंक्रियाज. पेंक्रियाज काम करत असते की तुम्ही तुमची शुगर डिजॉल्व करते. निगेटिव्ह झाला तर डायबिटीस होणारच. आपल्या बघा खेड्यात तुम्ही जाल तर साखर इतकी टाकली पाहिजे की की अशी धार लागली पाहिजे. काय विचार करत नाहीत. पृथ्वीला त्रास होत नाही. काय विचार करत नाहीत. जे खुर्चीवर बसून प्लॅनिंग करतात. त्यांना डायबेटिस होतो. तिसरे म्हणजे हा ब्लड कॅन्सर होतो. प्लीहा याचं काय काम तर स्पीडोमीटर. आता समजा तुम्ही जेवण केलं आणि बाहेर धावत गेला तर पोटात दुखेल, ही स्पीप्लीहा तिचे हे काम कोणाची ही इमर्जन्सी आली. त्यावेळी ब्लड कास्पोसिस् , रक्तपेशी त्या तुमच्या त्या रिलीज करते. आता आपल्या आसपास काय आहे, जीवन आहे. सकाळी न्यूज पेपर वाचला की झालं. सकाळी च एक शॉक बसतो.अरे बापरे किती लोक मेले, असं झालं, तसं झालं. मग काहीतरी, कसंतरी. जर तयार लम्बो घ्यायला काय तरी, मग मोघम तुम्ही कुठेतरी वाहनात काय तरी खाडाखोड चालायचं काहीतरी. तर तुमच्या स्पीप्लीहा ला समजत नाही. हा वेडा मनुष्य आहे. त्याचं कसं चालायचं ही स्वतः वेडी होतात. प्लीहा ही वेडी होते.असा घालू तसा घालवू मग संध्याकाळी या धकाधकीच्या जीवनात ति स्पीप्लीहा वेडी होऊन जाते. वेडी झाली म्हणजे आपण म्हणतो, व्हेनरेबल टू टच, मग लेफ्ट साईड. ही लेफ्ट साईड तिला आम्ही इडा नाडी म्हणतो. हीच ती बघा खालच्या चक्रापासून मूलाधार आणि हि जी वरच्या चक्रापासून स्वाधिष्ठान चक्र पासून येते. आता हे जे आहे ते आपलं शुद्ध चित्त आहे. त्याला आपण सबकॉन्शस माईंड म्हणतो. तुमच्या या सबकॉन्शस मध्ये जे जे झालं, ते तेथे प्रेजेंट मध्ये असतो. सकाळी जे झालेलं असतं. पूर्वीच्या तुमच्या आयुष्यात जे झालं ते असतं. त्याच्या पलीकडे कलेक्टिव सबकॉन्शस असते. त्याच्यावर युन ने खूप काम केले. यून खूप मोठा माणूस, आणि स्वाईद चा शिष्य होता. त्याने ते सोडून दिलं. तर युन नी सांगितलं की, आपल्यामध्येच कलेॲक्टिव सबकॉन्शस आहे. जे सामूहिक सुप्त चिन्ह. त्या कलेक्टिव्ह सबकॉन्शस मध्ये भूत, त्यात वेग वेगळ्या गोष्टी असतात. पण जे झालं ते गेलं. भूतकाळात गेलं. तिथुन हे डॉक्टरांच्या थोडं जवळ जात. त्यात हे दट एरिया, दट बिल्डस सिमस सम क्रिएशन. म्हणजे काय झालं.आल की नाही बरोबर. मंजे समीकरण काय आहे. एरिया बिल्डस सिमस सम क्रिएशन , आलं लक्षात. तेथून प्रोटीन 52, प्रोटीन 53, प्रोटीन 58 यांचा अभ्यास होतो. फोटो सुद्धा काढता येतात. तो आला म्हणजे त्याचं कॅन्सल झाल. आता कॅन्सल कशा साठी ते मी सांगते. आता समजलं ना आतापर्यंत काय काय झालं ते. ते मी स्पेशल काय केलं नाही . आता हे बघा हे दोन लेफ्ट आणि राइट साइड आहेत. त्याच्या मधोमध एक चक्र आहे. दिसतंय का आपल्या सगळ्यांना, आता काय होते, जेव्हा तुम्हें या चक्रातील शक्ती वापरता. बहुतेक अशी कमी होत जाते. आता तुम्ही असे वापरली अशी वापरली म्हणजे बहुतेक कशी कमी च होते. तर व्हनरेबल असला म्हणजे लेफ्ट वर अटॅक. आल्याबरोबर तुमचा उठल्याबरोबर तुमचा कणा असतो तो तुटतो. मग होतं काय ? यू रॉंग मूव्ही ला लर्निंग होतं. लेप लेस, नाक वाढायला लागत.कानात वाढायला लागतो डोळे च वाढायला लागतील आता कुंडलिनीच्या जागरणाने काय होते. ते बघा हे जस झालेला आहे कुंडलिनी ह्याच्यातून याच्यातून वर येते बुद्धी कशी गुंफतो मग ती ओवत ओवत वर येते तिथे तिला शक्ती मिळते या शक्तीमुळे सगळे सुटले एवढे सोपे काम आहे .आता एवढं सगळं झालेलं आहे यात काय प्रश्न नाही आता एवढं झाल्यावर यायला याच्या एवढंच आहे एवढंच मी त्यांच्या पाया पडायला जाणार नाही .आता सांगते नागपूरच उदाहरण सांगते त्यांनी मारण्यापलीकडे सर्व काही केले माझ्याशी, नाही तर काय नागपूर माझे घर होते मग भाऊ चिडले, तर मग चिडू नको तर काय लोकच तसे आहेत न चिडून तर काय करणार आता बहिणच, बहिणीबद्दल वाटतंय त्यांना, आता त्यांना ही माहिती आहे की ती शक्तिशाली आहे, ते हे जाणतात तर काय ते म्हणत राजकारणी लोकांना तू जागृती देऊ नको. नागपूर इथल्या गावातल्या लोकाना असे का वाटावे नागपूर ही तुमची कर्तव्य भूमी आहे.हो जिथे पिकतं तिथेच विकत नाही. ख्रिस्ताला मारले कोणी ? जुहु निच मघाशी तुम्ही कॅन्सर संबंधात सांगितले मगाशी यांनी प्रश्न विचारला तिथे अंधश्रद्धा निर्मूलनाचे लोक तिथे आले आणि ते सर्व सोडून पळाले कोणीही नाही तेथे. आता ओरडायला दहा लोक पुष्कळ आहेत. काल एक पत्रक काढलं दाभोळकरांनी, ते रोजच काढत असतात,काही वाचत नाहीत. त्याचं काय आता एवढी मोठी मीटिंग झाली. आमची कॉन्फरन्स मध्ये सांगोपांग त्यांनी संबंध दाखवलं कसं आम्ही रिसर्च केलं ते तेथे डॉक्टर दोन डॉक्टर होते. हे फक्त एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांच्याबद्दल माझ्याजवळ जी पत्रे आली, ती तुम्ही वाचून बघितली तर, तुम्हाला कळेल की, हे काय लायकीचे आहेत ते. इथून च पत्र आले . त्त्यांची बायको, तिने इतके पैसे लोकांचे लुटले आहेत. आणि हे रिकामटेकडे त्यांची प्रॅक्टिस चालत नाही. त्यांनी मेडिकल मध्ये कोणता प्रावीण्य मिळवले. ते सांगा. एवढं तुम्ही त्यांना डोक्यावर बसवले, डॉक्टर दाभोळकर ते डॉक्टर झालेत. हे येथे डॉक्टर आहेत. हे एक डॉक्टर आहेत. हे एमडी आहेत. त्यांना एमडी ची पदवी मिळाली, यांना ज्यांनी एमडी ची पदवी दिली ते किती उच्च पदाची असतील. तुमच्यासाठी मला असे वाटते आपण कुठे चाललो आहोत. डॉक्टर दाभोळकर नुसते एमबीबीएस झाले म्हणून काय झाले. त्यात यांचं काय डॉक्टर मानव. आता मला यांच्यात डोकं फोड करायची नाही. अहो, एमबीबीएस म्हणजे काहीच ज्ञान नाही. त्याला अगदी मिनिमम असते. परत यांनी कधी प्रॅक्टीस केली नाही. यात त्यांचे टीचर वगैरे ते सांगतात ते किती त्यांच्याबद्दल काय शिकले आणि किती वर्षात एमबीबीएस झाले. हा प्रश्न विचारून बघा तुम्ही ? आम्हाला कुणाच्या कशाला चिटकवा चिटकवा करायची नाही.म्हणून आम्ही हे टाळत होतो. तुम्ही सकाळच्या आहात का? महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स फार छान लिहिते हे आपण वाचलं असेल फार छान लिहिलंय त्यांनी. आता दिल्लीजवळ जवळजवळ चाळीस डॉक्टर आले होते. आमच्या डॉक्टर जुग यांचं म्हणनेआहे की , फार लहान जागा आहे, महाराष्ट्र.माताजी म्हणून लोक असा विचार करतात. म्हटलं दिल्लीच काय दिल्लीला 40 डॉक्टर आले होते. आत्तासुद्धा इंडियन एक्सप्रेस आता त्यांना मानलं पाहिजे. इंडियन एक्सप्रेस हे लिहून देते. बाईचं आता बातमीदार कोण आहेत ते. आता आम्हाला दगडफेक केली.इतकं मारलं. आणि उलट लिहिले. त्या पागे ला दगड मारला. पागे टॉर्च घेऊन उभे होते. पागे नीच टॉर्च मारला तर दगड घेऊन दोघे उभे होते. पहिला दगड आला तेव्हा टॉर्च मारला बघतात तर हे डॉक्टर. काय म्हणतात ते दगड घेऊन उभे होते. मी काय पाहिले नाही. मी पाठीमागे होते. ते परांजपे दूरदर्शनचे ते तर स्टेजवर पोहोचले. आता मला जागृती द्या मी म्हटलं तुम्ही मघाशी येणार होते. आता कसे आले. मी आता भाषणाला उभे राहिले आहे. आता कसे आले . म्हणे तुम्ही सहज योगाचा दुरुपयोग केला आहे. अशा माणसाला जागृती कशी मिळेल का ? आणि म्हणे आमची काय जागृती झालीच नाही. म्हटलं तुम्ही शहाणे आहात म्हणून झाली नाही. तर आम्ही टाळलं बर का ? अज्ञानाला काय बोलायचं ते. ते तर कसं होतं त्यांना विचारा. तुम्हाला काय ज्ञान आहे अंधश्रद्धेचं. आम्ही विचारलं अंधश्रद्धा निर्मूलनाचे तुम्हाला काय ज्ञान आहे? तर जागृतीमुळे तुम्हाला वाटतं समाजाचे प्रश्न सुटतील? असे आपणास वाटते ? हो सगळे सुटतील , तर सबंध मानवाच्याच उद्धाराचेच मार्ग आहे. कारण उत्क्रांतीत तुम्ही मानव असता आता चेतनेत आलाय यांच्या पलिकडची एक पायरी टाकायचि सबंध आमचे तर साहेब हे आहेत आपणाला तर माहिती असेल त्यांना ही मिळालंय तर ते म्हणतात तू एंजल्स कसे बनवले. आधी मानत नव्हते तू आहेस तरी पण बाकी होतील असं नाही. आता संबंध पैशांनी सर्व गोष्टी होतील फार महत्त्वाचे आता येणार आहे ते जरा कामात अडकलेत त्यांना तेथील लोक सोडत नाहीत म्हणून पण साहेबांच म्हणन अगदी एंजल आहेत लोक तू कसे बनवलस. पण याच्यातून ब्लड कॅन्सर बरा होतो असं म्हणतात मी नाही केला कुंडलिनी ने केला .एक बाई मरत होती .समजा ऑपरेशन न करता तुमच्याकडे आली असती तर ती बरी झाली असती का अहो पुष्कळ बरे झालेत तसे त्यांचं काय चॅलेंजिंग काय सांगता येत नाही, तुम्ही डॉक्टरांकडे गेले तर 99% बरे होतात. आता राहुल बजाज राहुल बजार हा तुमचा काय म्हणायचा मनी मेहरोत्रा त्याला ॲजायनाचा डबल होता तर ओपीडी मध्ये दिल्लीला प्रोग्राम झाला तेथे आला हा शेवटला तिथे शेवटला तिथे आला ह्यूस्टन ला जाणार होता त्याला वाटलं आता मी काही जगत नाही. तिथे माझे मेडिकल मध्ये लेक्चर झाले. तो म्हणाला माताजी तुमच्या लेक्चर ने मी फार प्रभावी झालो ,पण मला सांगा हे कुठे मिळेल? मला सांगा तुम्ही कुठे चालले ,तर मी म्हटलं पुण्याला चालले .तर म्हणे मी पुण्याला राहतो. ते शोधत शोधत पोहोचले राजवाडे कार्यालयात. तर म्हटलं आता मी निघाले. तुला बरं व्हायचं असेल तर मी दोन दिवसांनी परत येते. तू दोन दिवसांनी परत ये, मी सध्या कामात आहे. बर ते आले आणि आणखी पाच मिनिटात दुखणे थांबले आणि थोडं दुखलं बरं मी म्हटलं तुझ्यासाठी म्हणून आले मला जायचे कारण हे लोणावळ्याचे लोक आहेत तिथे एवढंसं तोंड करून बसला म्हणे जेव्हा पेशंट मरायचं असला की डॉक्टर सोडून जातात .अरे बाबा तू कोणाला दाखवले का? यू आर कम्प्लीट ली क्युअर हे त्यांनी सांगितले . त्याच त्याने टेप करून ठेवला आहे. तो डॉक्टर कडे गेला, तर डॉक्टर म्हणे की तुझा अंजायना कुठे दिसत नाही. दूसर्‍या डॉक्टरकडे दाखवले तर ते तुम्हाला अंजायना आहे, हे सांगितले कोणी? हे म्हणे तुमचे नाहीच आहेत ते . त्यांचा विश्वासच बसला नाही मी म्हटलं तुला जायचं असेल तर जा तुझ्याकडे पैसे पुष्कळ आहेत. पण राहुल ला मी बरे केले. राहुल त्याला दुसरा त्रास तर कमल नयन नाशिकचे ते मला ताई म्हणायचं. कमलनयन म्हणजे मोठा माणूस. राहुल त्यांचा मुलगा राहुलला बरोबर घेऊन आले वगैरे.राहुल तुला मी ठीक करायला तयार आहे. तर तू आत बस बसला. त्याचा मला वाटतं अर्धा तास लागला एकदम ठीक हार्ट च असेल तर तुम्ही जोपर्यंत काय करणार नाही कार्डियो ग्राम वगैरे ते तुझं तू बघ तो गेला तर डॉक्टरने सांगितले हार्ट च तर ठीक आहे नथिंग इज देअर त्यांना विश्वासच बसेना तो परत आला ह्याला लंडनला. क्लस्टर चार्ज . त्याला म्हटलं तर तो बरा झाला. तुला जायचं असेल तर जा क्लस्टर , तर तो म्हणाला डॉक्टर माझ्याकडे रागाने बघायला लागले, एवढा तू माझा फालतू वेळ कशाला घालवतोस. तुला काहीच नाही, तुझं हार्ट स्ट्रॉंग आहे. बघ मग मला काय सांगायला लागला. रामकृष्ण बजाज त्याचे काका नशीब लागते. माताजी तुमच्याकडे यायला. मी म्हटलं असं का ? माझ्या काकांनी इतका प्रयत्न केला तुम्हाला भेटण्याचा, लंडनला गेले तर तुमची आणि त्यांची चुकामूक होत राहिली. मी त्यांना आणलं नाही. त्यांचा आजार तसाच राहिला. तिथे त्यांने एक पॉईंट सांगितला. आता मी सांगू शकत नाही. आमचे एक ओळखीचे ते आमच्या नवऱ्याच्या ओळखीचे माहेरच्या ओळखीतले तरी ते रामकृष्ण ला आम्ही काही करू शकलो नाही. तुम्ही मोठ- मोठ्या व्यक्तींची नावे घेता गरीब लोकांचा काय ?अहो, हजारो आहेत, मी मोठ्यांची नावे का घेते. अहो लोकांच्या डोक्यात मोठे बसतात आणि मोठ्यांना मी सांगितलं येऊ नका म्हणून. मोठमोठे लोक तुम्हाला दिसतात. मी गरिबांची नावे सांगितली. हजारो आहेत. आता येथे गरीब बाई होत्या. काय हो त्यांचे नाव माने, त्यांना 14 वर्ष मूल नव्हतं, तुमच्या कोल्हापूरच्या. त्यांना मुलगा झाला. कितीतरी . त्याचा प्रभाव आत्तापर्यंत का वाढला नाही ? याचा प्रभाव आत्मसाक्षात्कार याचा प्रभाव का वाढला नाही ? अहो, ज्ञानेश्वर जिवंत असताना काय छळले त्यांना ,ज्ञानेश्वरीची लोकांना नुसती पारायण करण्यासाठी घेतली, ओरडून-ओरडून पारायण करतात. पडत मूर्ख आहेत. आता नानक साहेबांनी सांगितले आहे. आपल्यामध्ये शोध घ्या. तर काय म्हणतात. तेथे त्यांनी त्यात एक ग्रंथ काढला. त्यात नानक साहेब नामदेवाचे, जनाबाईचे हे आहेत. असे बसतात अडीच तास अखंड वाचन करतात, आणि अडीच दिवसाचे . असं एक बोट ठेवायचं आणि दुसऱ्याने तेथून बोट ठेवून वाचायचं. काय काय कळणार त्या माणसाला. त्यांच्यासाठी कबीर आणि म्हटले “ पडी पडी पढत पंडित पढत मूर्ख होवे |” तुम्हाला समजा प्रिस्क्रिप्शन दिले, समजा तुमचं डोकं दुखतंय. ते वाचत फिरला आम्हाला अनसिंन पाहिजे, हे वाचून आणखी डोकं वाढेल. ते औषध कोण घेणार ? तसे ज्ञानेश्वरांचे झालं. अहो, तुमचा अनुभव आत्ताचा आहे. एक त्यातला डॉक्टर काय नाव त्याचं दाभोळकर, त्या दाभोळकर ना म्हणावं अशा दोन ओळी लिहून दाखवा. अहो, तुम्ही त्यात अमृतानुभव वाचा. एक त्याच्यातल्या दोन ओळी सुद्धा त्यांना या डॉक्टरला काय नाव त्याचं ? दाभोळकर, त्या दाभोळकर ना अशा दोन ओळी लिहून दाखवा. आता त्यांची समाधी करायला निघाले होते. काय हे वेडे आहेत सगळे. एक तर आयुष्यभर त्यांना छळलं. आता ते गेल्यावर शहाणे निघाले. त्यांनी कोणता शोध लावला मेडिकलमध्ये, विज्ञानाच्या गोष्टी करायला. आणि विज्ञानाला जर अध्यात्माची साथ नसेल तर. फॉरेनला जाऊन बघा.काय झालं त्यांचं. लोकांचे कुठे पोचले. ड्रग, एड्स, 65 पर्सेंट लोकांना असले घाणेरडे घाणेरडे रोग झाले, अमेरिकेत. आणि हिंसाचार इतका की बांगड्या तर सोडा, गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा घालून जाऊ शकत नाही. तेव्हा त्यांच्या मागे इतके धावायला नको. तेव्हा शिकले पाहिजे. ते ज्या खड्ड्यात पडले त्याच्या त पडायचे का ? म्हणून आधी अध्यात्माचा पाया भक्कम केला पाहिजे. पण अध्यात्मच, तुम्हाला आश्चर्य वाटेल . अध्यात्मात तीन लोकांना इंग्लंडमध्ये पीएचडीच्या पदव्या मिळाले त विज्ञानात. मी त्यांना सांगितले कसे करायचे ते नुसतं मार्गदर्शन करायचं. मी तुम्हाला कसं सांगू. विज्ञाना त एक होते. त्यांनी ॲबसूलूट झीरो काढायचा, ॲबसूलूट झिरो चे आणखी प्रिन्सिपल तुम्हाला माहीत असेल की, कितीही तुम्ही ही नीट काढले तरी थोडेसे रॉग जाणार. पाच पर्सेंट तरी. माताजी ते कसं करायचं ते ते तुम्ही विचारू शकता. इट इज ॲबसुलूटलि, कॅनॉट थिंक द पॉईंट,. तर म्हणे व्हायब्रेशन द्यायचे. व्हायब्रेशन दिल्याबरोबर पुष्कळ तरे तरे चे प्रकार येथे झाले आहेत. तेव्हा मी आपल्याला समजावून सांगितले आहे. आता असच आपल्यावर अवलंबून आहे. पण मी म्हणते की, आपण फेअर प्ले असायला पाहिजे.पण मी एक प्रश्न विचारू का ? हा विचारा सहज ध्यान कसे करायचे ? आणि तुम्ही आधी जागृती करून घ्यायची मग आम्ही सांगतो. ध्यान कसं करायचं ते. इथे आमचे सेंटर आहे. तिथे जागृती करून घ्यायची. सहज योग म्हणजे काही नाही एकदा जागृती झाली की स्पॉन्टॅनिअस असतं. जशी आपली मदर अर्थ आहे. तिला आम्ही मातृभूमी मानतो. इथे तुम्ही बी लावले तर सहज उगवते. ही लिविंग प्रोसेस आहे. आपण मनुष्य कसे झालो. तसंही आता वरची फेरी आहे. स्पॉन्टॅनिअस ,आपण इच्छा व्यक्त केली नागपूरला जायची तर नागपूरला जायला पाहिजे. तसे नागपुर लोक फार आहेत . सहज योग पुष्कळ आहे. ही आठ दहा मंडळी, आठ-दहा डोकी म्हणता आहेत. अशी कोणी होणार आहेत, पुष्कळ झाले पण ते लाऊडस्पीकर घेऊन आलेत. माताजी, मै टाइम्स ऑफ इंडिया का रिपोर्टर , मुझे मराठी समज मे नही आती| तो आप पहिले बोलते तो हिंदी मे बात करते| माताजी, मे आपकी आर्टिकल लिखी है| हमारा इंटरनॅशनल सेमिनार है| आप तो टाइम्स वाले बहोत समजदार है| आप पहले जागृती लेकर आईये, बिना जागृती के हमारे लोग आने नही देंगे | तो जरूर तशरीफ ला ये| बहुत खुशी होगी आपसे मिले| जय श्री माताजी. बहुत समजदार बहोत है, टाईम्स वाले लोग दुसरे ये जो लोग है आपके इंडियन एक्सप्रेस वाले | बडे सत्यवादी लोग है| जागृती याने की बहुत समय सेमिनार मे आना चाहते है | जागृती लीजिये | ए लोग दे देंगे | मै निखिल गुप्ता को जानता हु | इतने जल्दी मे मेरा ऍडमिशन हो गया है | जागृति बिना यह लोग अंदर नहीं आने देंगे | आप जागृति लेंगे तो चैतन्य आएगा | आपको समझ में आएगा| नहीं तो वह कहेंगे यह हमारा प्राइवेट सेमिनार है| डॉक्टर यांना जागृती द्या. मेरा प्रश्न गरीब लोगों का काम किया अमिर लोगोन का काम नही किया| डॉक्टर रॉय हे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. त्यांनी इतक समजावून सांगितले तरीसुद्धा काही लोक तेथे समाधान झाले नाही. येथे परिमाणा शिवाय काही नाही परी लोक इतकं खोटं बोलतात. अहो, कुणाला मेडिकलच्या परिमाण शिवाय मी म्हणेन काहीही खोटं लिहायचं. फक्त न्यूजपेपर वाल्यांनी एवढं केलं पाहिजे खोटं लिहायचं नाही. मग आमचं सत्य आहे. धन्यवाद. माताजी.