चैतन्य लहरी सप्टेंबर-ऑक्टोबर २००८ त आ मराठी ं २० हि स प सा S०o र क २ * प्रकाशक निर्मल ट्राँसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८ फोन : ०२० २५२८६५३७, २५२८६०३२ मे ।ॐ॥ र) ৩ अनुक्रमणिका १. श्री महागणेश पूजा - ४ ६ नवरात्र पूजा संदेश २. ८ ३. कुंडलिनी आणि श्री गणेश पूजा रार श्री महागणेश पूजा गणपतीपुळे, १ जानेवारी १९८६ ां ा ग ०] रंघ आम. आजआम्ही गणपतीपुळ्याला आलो याचे फार माहात्म्य आहे. अष्टविनायकात हे महागणेशाचं स्थान आहे. महागणेश हा पीठाधीश आहे. आणि या पीठावर बसूनच तो सर्व गणेशांचं रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरुतत्त्व मिळालेले आहे. वातावरणातसुद्धा आपण पाहिलं की, समुद्रसुद्धा इतका सुंदर आणि स्वच्छ या गणपतीचे पाय धुतो आहे कारण समुद्र हा गुरु तत्त्व आहे आणि त्या गुरु तत्त्वाने तो श्रीगणेशाचे पाय धुतो. तसेच सर्व सहजयोग्यांचे झाले पाहिजे. गणेश स्तुती झाली, गणेश स्थापना झाली, त्यानंतर महालक्ष्मी तत्त्वाने तुम्ही महागणेश झालेला आहात. ही स्थिती आहे ती लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्क, स्त्री सर्वांना सुलभ मिळू शकते, जर त्यांच्यामध्ये सरळ स्वभाव असला तर. ज्याला आपण सारल्य म्हणतो मराठी भाषेत, ज्याला अबोधिता म्हणतात. innocence ज्याला म्हणतात. ते जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे बाणले जाते, तेव्हा आपल्याला गुरुपद येऊ शकते. कोणताही गुरू ज्याच्यामध्ये ही सरलता, ते भोळेपण नाही तो कधीही गुरू होऊ शकत नाही. तो अगुरू आहे. ज्याचं लक्ष फक्त परमेश्वरी शक्तीकडे आहे तोच होऊ शकतो. गुरू सर्वसाधारण माणसाचं लक्ष हे दूषित आहे. ते स्वच्छ नाही. त्याबद्दल ख्रिस्तांनी सांगितलंय की, तुमच्या डोळ्यामध्ये कोणताही दूषितपणा नसला पाहिजे. त्याचा अर्थ असा की, आमच्या डोळ्यांनी आम्ही कोणत्याही वस्तूकडे पाहिलं की विचारांच काहर माजून जातं आणि भलते सलते विचार येऊन ही वस्तु आपण मिळवावी किंवा ही आपल्याला का मिळाली नाही? त्याने हेवेदावे असे सुरू होतात. कोणत्याही वस्तूकडे बघून विचार आला तर तुम्ही आज्ञा चक्रावर अजून मात केलेली नाही. कोणत्याही वस्तूकडे बघून निर्विचारिता आली पाहिजे. विशेषकरून जेवढ्या परमेश्वरी संपत्तीत समृद्ध अशा देवी-देवता आहेत त्यांच्याकडे पाहन तरी निर्विचारिता आली पाहिजे. निर्विचारिता आली तर दूषितपणा येणार नाही कारण मनाला दूषित करणारे विचारच येणार नाहीत, मग दूषितपणा कसा येईल. म्हणजे जे ख़रिस्ताने सांगितलं की तुमच्या डोळ्यामध्ये कोणताही दूषितपणा आला नाही पाहिजे इतके स्वच्छ असले पाहिजे. जसे सूर्याचे किरण हे जेव्हा कोणत्याही झाडावर पडतात त्यातली घाण घेत नाही पण त्याला प्रफुल्लित करतात, पल्लवित करतात. इतकंच नव्हे तर त्याच्यामध्ये शक्ती देतात. तसेच एका सहजयोग्याच्या डोळ्यामध्ये तेज असायला पाहिजे की जे या सर्व जगामध्ये अत्यंत शुद्ध वातावरण नि्माण करतील. शुद्ध वातावरणाची आज आपल्याला सगळीकडे गरज आहे. याच्यामध्ये शांती, आनंद आणि परमेश्वराची शक्ति नांदू शकते. नुसतं श्रीगणेशाला भजून होत नाही. आपल्यामध्ये श्री गणेश जागृत झाले पाहिजेत. त्याचा महागणेश झाला पाहिजे. महागणेश झाल्यानंतरच आपल्या देशाचं व आपल्या देशाच्या कारणाने इतर देशांचे भले होणार आहे. आपणच दुसऱ्या देशांचे पुढारीपण करणार आहोत अशी दशा आहे. पण जर आपण हातामध्ये ही जबाबदारी घेतली नाही तर ह्या सबंध विश्वाचे काय होईल ते मला सांगता येत नाही. तरी सर्वांना विनंती आहे की, आपल्या डोळ्यातला दूषितपणा काढून टाकला पाहिजे. त्यासाठी आपल्या सहजयोगामध्ये मंत्र निर्विचाराचा आहे. विचारच येऊ द्यायचा नाही. कोणत्याही गोष्टीकडे बघून जर विचार आला तर 'यं नेति नेति म वचने हे नाही, हे नाही म्हणत जायचे किंवा क्षमा केली, क्षमा केली असं म्हणत गेलं की तो विचार नष्ट होतो. एकदा निर्विचारिता आली म्हणजे दूषितपणा येण्याचा मार्गच खुंटतो. सर्वांनी पूर्णपणे प्रयत्न करावा. डोळे दूषित नसावे. 'ह्या डोळ्याने दूषितपणा येत असेल तर हे डोळे नको असं श्री संत तुकारामांनी म्हटलेले आहे. त्यापेक्षा आंधळाच बरा. तेव्हा एक तऱ्हेने असं म्हटलं पाहिजे की या दृषित गोष्टींपेक्षा जगाचं आंधळेपणच बरं आणि परमेश्वराचं डोळसपण. या दोन्ही गोष्टींची सांगड जेव्हा बरोबर बसेल तेव्हा असं म्हणता येईल की, सहजयोगी आता गुरुपदाला गेलेले आहेत. माझा तुम्हा सर्वांना पूर्ण आशीर्वाद आहे की आज ह्या पुळ्याला जे महागणपतीचे स्थान आहे त्याच्या विशेष कृपेने तुम्हा सर्वांना लवकरच गुरुपद मिळावे. १ ुम] ১৯৭ ९ रथ ल पू. जा कशाप्रकारे करावी? पूजेचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की तुम्ही देवीमुळे मोहून गेला आहात आणि तुम्ही तिची स्तुती करीत आहात. हा बुद्धीचा व्यायाम नाही. तुम्ही खूप करण्यासाठी या सर्व गोष्टी सांगता. जसे तुम्ही कोणावर प्रेम करीत असाल तर त्या व्यक्तीला फक्त खूष करण्यासाठी तुम्ही बोलता त्याप्रकारे तुम्ही देवीशी बोलत आहात. या गोष्टी स्वत:ला व्यक्त करण्यासाठी संतांनी लिहिल्या होत्या की, 'आपण देवी आहात. अशा आहात. तशा आहात. मला मिळणारी काही पत्रेसुद्धा अशी असतात. त्यांच्या भावना पूर्णपणे व्यक्त करणारी, पण हा काही भाषणाचा कोर्स वर्गैरे नाही. ही दृष्टिकोनाची जाणीव आहे. तर पूर्ण भक्तीमध्ये हे सर्व केले पाहिजे. र पूर्ण विनम्रतेने तुमच्या हृदयात ही जाणीव ठेवा. हे प्रार्थनेसारखे व्यक्त स्वरूप आहे. ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना असली पाहिजे. ही काही बुद्धिवाद्यांची चर्चा नाही. ही देवीची प्रार्थना आहे. हा दृष्टिकोन तुम्ही तयार केल्याशिवाय तुम्ही जास्त दूर जाऊ शकणार नाही. हृदयापासून पूर्णपणे ओतले पाहिजे. तुमचे हृदय उघडा. तुमच्या प्रार्थनेमध्ये पूर्णपणे ओता. विश्लेषण करण्यासारखे तिथे काही नाही. हृदयापासून ते आले नाही तर तुम्ही जे बोलता ते फक्त तोंडदेखले आहे. तुमचे हृदय प्रकाशित करण्यासाठी देवीची स्तुती केली पाहिजे. अशा प्रकारे व्यक्त करा की, तुम्हाला या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी सांगत असताना तुम्हाला श्री माताजींचा नवरात्र पूजा संदेश १९८८, प्रतिष्ठान म ६ २2 त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे. तुम्ही जेव्हा फोटोसमोर ध्यान र करता त्यावेळी फोटो तुमच्या हृदयात ्री ठेवण्याचा प्रयत्न करा, 'आई, मी तुमच्यावर प्रेम करतो. कृपा करून माझ्या हृदयात ये! असे म्हणा. या हृदयामध्ये सर्व बुद्धी आहे. सर्व कर्तृत्व आहे. हृदयातून सर्व काही जन्माला येते, पण तुम्ही हृदय बंद केले तर मेंदू विचलित होतो व तुम्ही हृदयाच्या म बाहेर जाता. हृदय जे आत्म्याचे सिंहासन आहे ते सर्वांना काबूत ठेवते. स्वयंचलित मज्जासंस्था, सिंपथेटिक, पॅरासिंपथेटिक उत्क्रांती ज्ञान, सर्व काही त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तुमचे हृदय तयार करा. कुंडलिनी आणि श्री गणेश पूजा २२ सप्टेंबर १९७९, दादर, मुंबई आम् जाजच्या हाया नवरात्री, प्रथमदिन शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता पण तो किती महत्त्वपूर्ण आहे! विशेषतः या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या या पुण्यभूमीत, जेथे अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे तेंव्हा श्री गणेशाचे माहात्म्य काय आहे, या श्री अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नाहीत याचे मला आश्चर्य वाटते. कदाचित जे सर्व काही समजत होते किंवा ज्यांना सगळे काही माहीत होते असे जे मोठेमोठे साधुसंत ह्या आपल्या संतभूमीत झालेले आहेत, त्यांना कोणी बोलायची मुभा दिली नसणार किंवा त्यांचे कोणी ऐकून घेतले नसेल पण याबद्दल सांगावे तितके थोडे आहे आणि एकाच्या ऐवजी सात भाषणे जरी ठेवली असली तरीसुद्धा श्री गणेशाबद्दल बोलतांना मला ती पुरणार नाहीत. आजचा सुमुहूर्त म्हणजे घटपूजनाचा. घटस्थापना ही अनादी आहे म्हणजे ज्यावेळेला या सृष्टीची रचना झाली, अनेकवेळा. सृष्टीची रचना एकाच वेळी झालेली नाही तर ती अनेकदा झालेली आहे, तेव्हा आधी घटस्थापना करावी लागली. आता घट म्हणजे काय? हे अत्यंत सूक्ष्मात समजले पाहिजे. पहिल्यांदा ब्रह्मतत्त्व म्हणून जी एक स्थिती असते, तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. त्याला आपण इंग्लिशमध्ये entrophy म्हणू. ह्या स्थितीत काहीही हालचाल नसते परंतु ह्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर परमेश्वराला येते तेव्हा त्याच्यामध्ये ही इच्छा सामावते. ती इच्छा अशी की, आता काहीतरी संसारामध्ये सृजन केले १ ै म न (८ १४ ि हि ु न ব पाहिजे. त्यांना ही इच्छा का होते. ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते हे समजणे माणसाच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. अशा पुष्कळशा गोष्टी मानवाच्या सर्वसाधारण बुद्धीच्या आकलनाबाहेरच्या आहेत पण जशा आपण त्या सर्व मानून घेतो तसेच हे मानले पाहिजे की, परमेश्वराची इच्छा हा त्यांचा आपला स्वत:चा शौक आहे. त्यांची इच्छा, त्यांना जे काही करायचे आहे ते करत असतात. ही इच्छा त्यांच्यामध्ये विलीन होते आणि ती परत जागृत होते. जसा एखादा मनुष्य झोपावा आणि परत जागृत व्हावा. झोपल्यावर त्यांच्या इच्छा जरी त्यांच्याबरोबर झोपल्या असल्या तरी त्या तिथेच असतात आणि जागृत झाल्या की कार्यान्वित होतात, तसेच परमेश्वराचे आहे. जेव्हा त्यांना इच्छा झाली की, आता एका सृष्टीची रचना करायची, तेव्हा या सर्व सृष्टीच्या रचनेची जी इच्छा, जी आपण म्हणू तरंग आहेत किंवा त्याच्या ज्या लहरी आहेत त्या एकत्र होतात आणि त्या एकत्र झाल्यावर त्या घटात भरल्या जातात. तो मर हा घट म्हणजे परमेश्वर व परमेश्वरांनी इच्छाशक्ति जर वेगळी केली व आपण तसे समजू शकलो तर ते कळेल. आपलेही तसेच असते, पण थोड़ा फरक असतो. आपण आणि आपली इच्छाशक्ति यात फरक आहे. ती प्रथम जन्माला येते. जोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची इच्छा होत नाही तोपर्यंत ती गोष्ट व त्याचे रूपांतर होत नाही. म्हणजे आता हे जे एक आपले मोठे सुंदर जग बनवलेले आहे हे सुद्धा कोणाच्या तरी इच्छेचेच फळ आहे. प्रत्येक गोष्ट इच्छा झाल्यावरच कार्यान्वित होते आणि परमेश्वराची इच्छा ही कार्यान्वित होण्यासाठी त्याच्यापासून वेगळी करावी लागते. तिला आपण 'आदिशक्ती' असे म्हणतो. ही प्रथम स्थिती जेव्हा आली तेव्हा घटस्थापना झाली. ही अनादिकालापासून अनेक वेळा झाली आहे आणि आजही आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा त्या अनादी अनंत क्रियेला आठवतो. म्हणजे आपण ह्या वेळेला (नवरात्र प्रथमदिनी) ती घटस्थापना करतो. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही! लक्षात ठेवा. त्या बैळेला परमेश्वराने जी इच्छा केली, ती कार्यान्वित करण्याच्या अगोदर ती एकत्रित केली. ती एका घटात घातली, तीच इच्छा आज आपण पूजीत आहोत. त्याचे आज आपण पूजन केले. ती इच्छा परमेश्वराला झाली. त्यांनी आज आपल्याला मनुष्यत्वाला आणले. एवढ्या मोठ्या स्थितीला पोहचवले तेव्हा आपले परम कर्तव्य आहे की, त्याच्या ह्याइच्छेला आधी वंदन केले पाहिजे. त्या इच्छेला, आमच्या सहजयोगाच्या भाषेत श्री महाकालीची इच्छा म्हणतो किंवा महाकालीची शक्ती म्हणतो. ही महाकालीची शक्ती आहे आणि हे जे नवरात्राचे नऊ दिवसाचे (महाराष्ट्रात विशेष करून) समारंभ होतात. ते ह्या महाकालीची जी काही अनेक अवतरणे झाली त्यांच्याबद्दल आहेत. आता महाकाली शक्तीच्या म्हणजे इच्छाशक्तीच्या पूर्वी काहीही होऊ शकत नाही. म्हणून इच्छाशक्ती आदी आहे आणि अंतही तिच्यातच होतो. पहिल्यांदा इच्छेतून सगळे निघते आणि शेवटी ते इच्छेतच विलीन होऊन जाते तर ही श्री सदाशिवाची शक्ति किंवा आदिशक्ती आहे व महाकाली शक्ती म्हणून आपल्यामध्ये ती वावरत असतें. याठिकाणी जर हे परमेश्वर आहे असं समजलं, हे विराटाचे सूत्र असे समजले तर त्याच्यामध्ये डावीकडे जी शक्ती आहे ती आपल्या इडा नाडीतून प्रवाहित असते व त्या शक्तीला महाकालीची शक्ती म्हणतात. हिचा माणसामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव झालेला आहे. प्राणीमात्रामध्ये तितका नाही. आपल्यामध्ये ती आपल्या उजव्या बाजूने डोक्यातून येते. नंतर डावीकडून जाऊन त्रिकोणाकार अस्थीच्या खाली श्री गणेशाचे जे स्थान आहे तिथे जाऊन संपते. म्हणजे महाकालीच्या शक्तीने फक्त सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेशाला जन्म दिला. तेव्हा श्री गणेशाची स्थापना झाली. गणेश हे सर्वात पहिल्यांदा स्थापन केलेले दैवत आहे आणि त्याचप्रमाणे जसे महाकालीचे आहे, तसेच श्री गणेशाचे आहे. हे बीज आहे आणि बीजातूनच सर्व विश्व निघाल्यावर परत बीजातच सामाविले जाते. तसंच सगळं गणेश तत्त्वातून निघून गणेश तत्त्वातच सामावले जाते. गणेश हा सर्व जे काही आहे त्याचे बीज आहे. जे आपल्याला समोर दिसते, कृतीत दिसते, इच्छेत दिसते त्याचे हे बीज आहे. म्हणून श्री गणेश हा सगळ्यात मुख्य देव मानला जातो. इतकेच नाही तर श्री गणेशाचे पूजन केल्याशिवाय, आपण कोणतेही कार्य करू शकत नाही. मग ते शैव असोत, वैष्णव असोत, मग ते ब्रह्मदेवाला मानणारे असोत किंवा आणखी कोणी असोत. सगळे आधी श्री गणेशाचे पूजन करतात. त्याला कारण असे आहे की, श्री गणेश तत्त्व परमेश्वराने सर्वात पहिल्यांदा या सृष्टीत बसविले. श्री गणेश तत्त्व म्हणजे ज्याला आपण 'अबोधिता' म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये innocence म्हणतो. आता हे त्त्व अगदी सूक्ष्म आहे. ते आपल्याला समजत नाही. बाल्यकालात जे लहान मुलांमध्ये वास्तव्य करते, ज्याचा सगळीकडे आपण आविर्भाव पाहतो व त्याचा सुगंध पसरलेला असतो. त्यामुळेच लहान मुले इतकी प्रिय वाटतात असे हे अबोधिताचे त्व आहे. ते ह्या श्री गणेशामध्ये सामावलेले आहे. आता मानवाला हे समजणे जरा कठीण जाते की, असे कसे एका देवतेमध्ये हे सगळे सामाविलेले आहे? पण जर आपण सूर्याला बघितले तर सूर्यामध्ये जशी प्रकाश देण्याची शक्ति आहे, तशीच श्री गणेशामध्ये ही 'अबोधिता' शक्ति आहे. ही जी अबोधितेची शक्ति परमेश्वरांनी आपल्यामध्ये भरलेली आहे, ह्या अबोधितेच्या शक्तिला आपण पूजतो. म्हणजे आम्हीसुद्धा असे अबोध झाले पाहिजे. अबोधितेचा अर्थ पुष्कळांना असा वाटतो की, आपण अज्ञानी झाले पाहिजे. अबोध शब्दामध्ये अर्थ असा आहे की, जो एक भोळेपणा एखाद्या लहान मुलात असतो किंवा निरागसता असते, तो भोळेपणा किंवा निरागसता आपल्यामध्ये आली पाहिजे. हे किती मोठे त्त्व आहे ते आपल्या लक्षात येत नाही. एक लहान मुलगा समजा खेळायला लागला. आजकालची मुले म्हणजे त्यांचा भोळेपणा विशेष राहिलेला नाही. त्याला कारण आपणच आहोत. आपण दुसऱ्यांना तरी सांगून काय सांगायचे? आम्हीच आमचे धर्म कसे पाळतो आहोत? आम्हीच आमच्या धर्मात कितपत आहोत? त्याच्यावर हे सर्व अवलंबून आहे आणि ते त्याचेच फळ असे समजले पाहिजे. आता हे जे माणसांमध्ये अबोधितेचे लक्षण आहे, ते एखाद्या लहान मुलाला बघून तुम्ही ओळखू शकता. ज्या माणसात 'अ्बोधिता असते, तो कितीही मोठा झाला तरी ती त्याच्यात असते. जसे एखादा लहान मुलगा खेळत असला तर खेळात तो अगदी शिवाजी बनेल, किल्ला बनवेल, सगळे काही करेल, मग ते सगळे सोडून तो निघून जाईल. म्हणजे सगळे करून सोडून द्यायचे. सगळे केले ते सोडून त्याच्याबद्दल तटस्थता ठेवायची. त्याच्यामध्ये काही आपले मन गुंतवायचे नाही. Involvement ठेवायची नाही. हे एक मुलांचे साधारण वागणे असते. तुम्ही कोणत्याही मुलाला काहीतरी दिले, तर ते तो जपून ठेवेल. फार वेळ ते जपून ठेवेल. आणखी नंतर मग थोड्या वेळानी त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. जर तुम्ही त्याला भुलवून ते काढून घेतले, तर त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. पण त्यातल्या त्यात काही काही गोष्टी लहान मुलगा मुळीच सोडत नाही की जे त्याला फारच महत्त्वाचे असते. पैकी एक त्याची आई. त्याची आई तो सोडत नाही. बाकी सगळे काही तुम्ही काढून घेतले तरी चालेल. त्याला ऐश्वर्य समजत नाही, त्याला पैसे समजत नाहीत, त्याला शिक्षण समजत नाही, काही समजत नाही त्याला, फक्त समजते त्याची आई. ही माझी आई आहे. ही माझी जन्मदात्री आहे. तिने मला जन्म दिलेला आहे. हीच माझे सगळे काही आहे. तो आईपेक्षा कोणत्याही गोष्टीला महत्त्व देत नाही. रवींद्रनाथ टागोरांनी एक फार सुंदर गोष्ट लिहिली आहे. एक लहानसा मुलगा बाजारातून कुठे तरी हरवला आणि त्याला लोकांनी पकडलं आणि त्याला विचारलं की 'तुला काय हवं?' तो सारखा रडत होता. त्यांनी त्याला सांगितलं की 'आम्ही तुला हे देतो, ते देतो, घोडा देतो, हत्ती देतो.' तो म्हणे,'काही नाही. मला माझी आई पाहिजे. खायला दिलं तरी खाल्लं नाही. सारा दिवस रडत राहिला. त्याची आई जेव्हा मिळाली तेव्हा मग तो चूप झाला. ' आणि सारखा तो आईसाठी रडत होता. शेवटपर्यंत काही म्हणजे आपल्या सर्वांमध्ये लहानपणापासूनच हे बीजतत्त्व आहे. म्हणून आपण आपल्या आईला सोडत नाही. ती आई आपली जन्मदात्री आई आहे. आपल्याला माहिती असते तिने आपल्याला जन्म दिला आहे. पण त्याशिवाय एक दुसरी आई परमेश्वराने आपल्यामध्ये आपल्याला दिली आहे आणि तीच आई म्हणजे स्वत:मधील ही 'कुंडलिनी' आहे. कुंडलिनी माता, जी आपल्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये वेटोळे घालून परमेश्वराने बसवली आहे. ती आपली आई आहे आणि आपण तिला सारखे शोधत असतो. ०४ ाु २ ान र शा प्ण की ट्र आपल्या सर्व शोधामध्ये मग ते राजकीय असोत, सामाजिक असोत वा शैक्षणिक असोत. कोणत्याही गोष्टीचे तुम्हाला वेड असो, त्या सर्व वेडांच्या मागे तुम्ही ह्या कुंडलिनी आईला शोधत असता. ही कुंडलिनी आई तुम्हाला त्या परमपदाला पोहचविते की, जिथे सर्व तन्हेचे समाधान तुम्हाला मिळते. ह्या आईचा शोध, आईप्रति ओढ, जी आपल्यामध्ये अद्ृश्यामध्ये असते, जी आपल्याला खेचते ती गणेश तत्त्वामुळे जागृत राहते. ज्या माणसाचे श्री गणेश तत्त्व अगदी नष्ट पावलेले आहे, ज्याच्यामध्ये अबोधिता नाही. अबोधितामध्ये अनेक गुण माणसामध्ये दिसून येतात जसे आई, बहीण-भाऊ कितीही मोठे झाले तरी त्यांची पवित्रता ठेवणे, व्यवहारात राहतांना, समाजात राहतांना, संसारात राहतांना, परमेश्वरांनी एक आपली पत्नी आणि बाकी सर्व जगाचे लोक जे कोणी आहेत. त्यांचे आपले पवित्र नाते आहे असे परमेश्वरांनी सांगितले आहे. जर असे तुमच्या व्यवहारात दिसायला लागले तर मात्र मानले पाहिजे की, ह्या मनुष्यामध्ये खरी अबोधिता आहे. ते त्याचे खरे लक्षण आहे. अबोधितेचे लक्षण हे आहे की, माणसाला सगळ्यांच्यामध्ये पावित्र्य दिसते. कारण स्वतःमध्ये पाकित्र्य आल्यामुळे, तो अपवित्र नजरेनी कोणाकडे बघत नाही. आता आपल्याकडे पवित्रता समजावून सांगायला नको. आपल्याकडें माणसाला पवित्रता काय आहे हे माहीत आहे. इंग्लंडमध्ये, अमेरिकेत समजवायला पाहिजे कारण त्यांची डोकी फिरलेली आहेत. पण तुम्ही अजून सुज्ञ आहात. विशेषत: ह्या भारतात तरी देवकृपेने, अष्टविनायक कृपेने म्हणा किंवा आपल्या पूर्वपुण्याईने म्हणा, आपल्या गुरु -संतांनी केलेल्या सेवेमुळे म्हणा या पृथ्वीवर महाराष्ट्र ही एक अशी भूमी आहे की, इथून ही पवित्रता मात्र अजून हललेली नाही. ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्या पवित्रतेचे तुम्ही आज पूजन काढलेले आहे. म्हणजे पूजन करतांना तुमच्यामध्ये ती पवित्रता आहे किंवा नाही इकडे लक्ष दिले पाहिजे. आता आमच्या सहजयोगात ज्यांच्यामध्ये गणेश तत्त्व नाही, त्यांच्यामध्ये पावित्र्य नाही. तो मुळी कामाचा नाही. त्यात आम्ही हात घालत नाही. कारण हा जो गणपती बसवलेला आहे, तिथे तो म्हणजे श्री गौरीचा पुत्र आहे आणि श्री गौरी म्हणजेच आपल्यामध्ये प्रादुर्भाव करणारी जी कुंडलिनी शक्ती आहे ती ही गौरीशक्ती आहे. आज श्री गौरीपूजन आहे आणि आज श्री गणेश पूजन आहे म्हणजे केवढा मोठा दिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्यामध्ये जे श्री गणेश तत्त्व आहे ते श्री गौरीला सांगते की, हा मनुष्य ठीक आहे किंवा नाही म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्था किती सुंदर केलेली आहे ती बघा. वरून ज्या दोन नाड्या येत आहेत इडा आणि पिंगला, ह्या दोन नाड्या आपल्यामध्ये आहेत. पैकी एक महाकाली आणि एक महासरस्वती. ह्या दोन नाड्या आहेत. ह्या महाकालीतूनच महासरस्वती निघालेली आहे. म्हणजे ती क्रियाशक्ती आहे. पहिली ११ उु पা OIEBANHANGE रा स] श्ी र ी इच्छाशक्ती आहे आणि दुसरी क्रियाशक्ती आहे. या दोन्ही शक्तीतून जे काही आपण ह्या जन्मात केलेले आहे, पूर्व जन्मात केलेले आहे, जे काय आपले सुकृत आहे आणि जे आपले दुष्कृत आहे, या सगळ्यांचा पाढा तिकडे बसून लहानसे एक हे जे श्री गणेश देव आहेत ते घेत असतात. ते बघत असतात ह्या माणसांनी किती पुण्य केलेले आहे. आता पुण्य कशाशी खातात हे आजकालच्या मॉडर्न लोकांना माहीत नाही आणि त्याबद्दल त्यांचा विचारही नाही. लोकांना असे वाटते की, ह्याला काय अर्थ आहे? पुण्य किती आहे? काय आहे? जर ती पापपुण्याची भावनाच नाही, तर पाप आणि त्याचे क्षालन वरगैरे ह्या गोष्टी कळण्यात काही अर्थच राहत नाही. मानवाला पाप आणि पुण्य हा असा भाव आलेला असतो. जनावराला तो नसतो. जनावराला अनेक भाव नसतात. आता समजा एखाद्या जनावराला तुम्ही शेणातून घेऊन गेलात किंवा घाणीतून घेऊन गेलात तर त्याला वास येत नाही. त्याला सौंदर्य कशाशी खातात ते माहीत नाही. तुम्ही मानव झाल्याबरोबर तुम्हाला पाप -पुण्याचा विचार येतो. तुम्हाला समजते की हे चुकलेले आहे. हे पाप आहे हे करू नये. हे पुण्य आहे, हे केले पाहिजे. पाप-पुण्याचा निवाडा आपण करण्यापेक्षा, पाप पुण्याचा सबंध रोखठोक हिशेब श्री गणेश आपल्यात बसून करत असतात. प्रत्येक मानवामध्ये श्री गणेशाचे स्थान आहे आणि ते प्रोस्टेट ग्लँड च्या जवळ असून त्याला आम्ही 'मूलाधार चक्र' असे म्हणतो. त्रिकोणाकार अस्थीला 'मूलाधार' असे म्हटले आहे. तिथे कुंडलिनी आई बसलेली आहे. त्या त्रिकोणाकार अस्थीच्या खाली श्री गणेश आरामात जाऊन तिथे तिची रक्षा म्हणण्यापेक्षा, तिच्या लज्जेचे रक्षण करीत असतात. आता आपल्याला असे माहीतच आहे की, श्री गणेशाची स्थापना श्री गौरींनी कशी केली तिचे लग्न झाले होते, पण अजून पतीशी भेट झालेली नव्हती. त्यावेळी ती आंघोळीला गेली होती आणि आपल्या अंगातला मळ काढून तिने श्री गणेशाला बनविले. आता बघा हातामध्ये सबंध जर व्हायब्रेशन्स म्हणजे चैतन्य लहरी आहेत, तर त्या सगळ्या शरीरालासुद्धा चैतन्य लहरी आल्या असतील आणि हे चैतन्य जर वाहत असेल आणि ते जर श्री गौरी मातेने मळात घेतले, तर त्या मळालाही ते चैतन्य येते. त्या मळाचा तिने गणपती केला आणि तो आपल्या नहाणीच्या बाहेरच्या बाजूला ठेवला. समोरच्या बाजूला ठेवला नाही कारण नहाणीतून सगळी घाण वाहत असते. आपल्याकडे पुष्कळांना माहीत असेल की, नहाणीतले पाणी जेव्हा वाहते तेव्हा त्याच्यावर पुष्कळदा अळूची पाने किंवा कमळाची फुलेसुद्धा लोक लावतात आणि तिथे ती चांगली लागतात. आश्चर्याची गोष्ट आहे की, जिथे फार डबकं असेल तिथेच कमळाची फुले लागतात. त्याचेच उदाहरण श्री गणेशाचे आहे. म्हणजे घरातला सर्वात घाणीचा जो प्रदेश आहे, त्या घाणीवरती हे कमळ लागलेले आहे आणि तो आपल्या सुगंधाने त्या सर्व घाणीला सुगंधित करत असतो. ही जी त्याची शक्ति आहे, ती शक्ती आपल्या आयुष्यातसुद्धा फार मदत करते. आपल्यामध्ये १२ आसपास जी काय बाण दिसते ती ह्या गणेशतत्त्वामुळे सुरक्षितपणे दूर होते. आता ह्या श्री गणेश तत्त्चाने कुंडलिनीचे म्हणजे श्री गौरीचे आधी पूजन करावे लागते. म्हणजे तुमच्या श्री गणेश तत्त्वाने आधी तुम्हाला स्वतःमधील कुंडलिनीचे पूजन करावे लागते. म्हणजे आपल्यामध्ये अबोधिता असायला हवी. आपल्याला आश्चर्य वाटेल की, ज्यावेळी आपले कुंडलिनीचे जागरण होते ्यावेळेला श्री गणेश तत्त्वाचा सुगंध सबंध शरीरात पसरतो. पुष्कळांना विशेषतः सहजयोग्यांना ज्या वेळेला कुंडलिनीचे जागरण होते, तेव्हा सुगंध येतो. कारण श्री गणेश तत्त्व हे पृथ्वी तत्त्वाचे बनविले आहे. ह्या श्री महागणेशातून पृथ्वी बनवलेली आहे. तर आपल्यामध्ये जे श्री गणेश आहेत, ते सुद्धा पृथ्वी तत्त्वातून बनविले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की, सगळे सुगंध पृथ्वीतून येतात. सगळ्या फुलांचे सुगंध पृथ्वीतून येतात. त्यामुळे कुंडलिनी जागरण होतांना पुष्कळांना अनेक तन्हेचे सुगंध येतात. इतकेच नाही तर सहजयोगी मला सांगतात की, श्री माताजी तुमची आठवण आली की, अत्यंत सुगंध येतात व तुमच्या शरीरातून पण असे सुगंध येत असतात. पुष्कळांची कधी कधी गैरसमजूत होते की, श्री माताजी काही तरी सेंट लावतात, पण तसे नाही. जर तुमच्यामध्ये श्री गणेश तत्त्व जागृत असेल तर सुगंध येत असतो. तऱ्हेंतऱ्हेचे सुगंध माणसाच्या अंगातून येत असतात. पण काही आपल्याला माहीत असतील की, असेही जगामध्ये लोक आहेत व जे स्वत:ला साधुसंत म्हणवतात आणि त्यांना सुगंध चालत नाही. स्वतःला परमेश्वर म्हणवतात व त्यांना सुगंध चालत नाही. आपल्याकडे व्यवस्थित लिहिले आहे. कोणतेही देवाचे बर्णन वाचलेत. विशेषतः श्री गणेशाचे, तर तो सुगंधप्रिय आहे. इतकेच नाही तर तो कुसमप्रिय आहे व तो कमलप्रिय आहे तसेच श्री विष्णूंच्या वर्णनात लिहिलेले आहे, श्री देवीच्या वर्णनात लिहिलेले आहे. त्याचा अर्थ असा आहे की, ज्या लोकांना सुगंध प्रिय नाही व ज्यांना सुगंध चालत नाही त्यांच्यात काहीतरी भयानक दोष आहे व ते परमेश्वराच्या विरोधात आहेत. त्यांच्यात परमेश्वरी शक्ती नाही हे अगदी हमखास! ज्या माणसाला सुगंध मुळीच चालत नाही, त्यांच्यात काहीतरी परमेश्वराच्या विरोधातील तत्त्वे बसलेली आहेत हे नक्की. कारण सुगंध पृथ्वी तत्त्वातले महान तत्त्व आहे. योगभाषेमध्ये त्याला अनेक नावं आहेत. पण सांगायचे म्हणजे असे की, जी काही पंचमहातत्त्व आहेत आणि त्यांच्या आधी त्याची जी काय प्राणत्त्वे आहेत, त्या प्राणतत्त्वातला आद्य म्हणजे सुगंध. त्या त्त्वानीच आपली पृथ्वीही झालेली आहे. त्या प्राणत्त्वानेच घडवलेला हा श्री गणेश आहे. तेव्हा श्री गणेशाचे पूजन करतांना पहिल्यांदा आपण स्वत:ला सुगंधित केले पाहिजे, म्हणजे काय की आपापले जीवन हे अती सूक्ष्मातून सुगंधित झाले पाहिजे. बाह्यत: नाही. वरून जितका मनुष्य दुष्ट असेल, वाईट असेल तितकाच तो दुर्गंधी असतो. आमच्या सहजयोगाच्या दृष्टीने असा मनुष्य दुर्गंधी होय. वरून जरी त्याने सुगंध लावला असला तरी तो मनुष्य काही सुगंधी नाही. सुगंध असा असला पाहिजे की, मनुष्याला आकर्षण वाटले पाहिजे. एखाद्या माणसाजवळ जाऊन आपण उभे राहिलो आणि जर आपल्याला त्या माणसाबद्दल सुप्रसन्न वाटले आणि पावित्र्य वाटले तर तो मनुष्य खरा सुगंधित आहे नाहीतर दुसरा असा मनुष्य असेल की, ज्याच्यातून संपूर्ण लालसा आणि घाणेरड्या प्रवृत्त्या बाहेर वाहत आहेत, अशा माणसाजवळ जाऊन जर आपण उभे राहिलो तर बरे वाटणार नाही. परंतु अशा माणसाला बघून काही काही लोकांना बरेही वाटत असेल, तर हे त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीवर अवलंबून आहे. पण ते लोक काही श्री गणेश तत्त्वातले नाहीत. श्री गणेश तत्त्वाचा मनुष्य हा अत्यंत सात्त्विक असतो, पण तरीसुद्धा त्या माणसामध्ये एक तऱ्हेचे विशेष आकर्षण असते. त्या आकर्षणात एवढे पावित्र्य असते की ते पवित्र आकर्षणच माणसाला सुखी ठेवते. आता आकर्षणाच्या कल्पनासुद्धा फार विक्षिप्त झाल्या आहेत. त्या गणेश त्त्वाच्या विरोधात आहेत. त्याला कारण असे की, माणसांमध्ये श्री गणेश तत्त्व राहिले नाही. जर माणसात श्री गणेश तत्त्व असले तर, आकर्षणसुद्धा आपल्या श्री गणेश तत्त्वावर असते. सहजच आहे. जिथे आपले आकर्षण आहे ते तत्त्व आपल्यात असल्याशिवाय तिथे आपले आकर्षण कसे होणार? एक फार प्रसिद्ध मोनालिसाचे चित्र आहे. आपण ऐकलच असेल 'लिओनार्द-द-विन्सी' ने ते काढलेले फार सुंदर चित्र आहे आणि ते पॅरिस म्युझियम मध्ये ठेवलेले आहे. आता त्या चित्राला पाहिलं, त्या बाईला पाहिलं तर ती आजकालच्या मॉडर्न बायकांच्या दृष्टीने आणि ब्युटीच्या ज्या मॉडर्न आयडियाज आहेत त्या दृष्टीने तिला कधीही ब्युटीक्वीन म्हणणार नाहीत आणि तिच्या तोंडावर एक तऱ्हेचे स्मित आहे, ज्याला 'मोबाईल स्माईल ऑफ मोनालिसा' म्हणतात आणि त्या स्माईलवरच लोकांनी हजारो वर्ष मेहनत करूनसुद्धा त्यांना अशा तऱ्हेचे चित्र काढता आले नाही. हे जर प्रसिद्ध चित्र आहे, त्यामध्ये मुख्य कारय असेल तर ते म्हणजे पावित्र्य त्या चित्रात इतके पावित्र्य आहे की ते आकर्षक आहे. पण आजकालच्या आधुनिक काळात. विक्षिप्त आणि विकृत भावनेच्या मागेसुद्धा, मला आश्चर्य वाटते हजारोनी लोक तिथं ते चित्र बघण्यासाठी येतात. जर ते चित्र त्यादिवशी नसेल तर कोणीही आतमध्ये येत नाही. इतकं मोठं म्युझियम आहे पण कोणीही आतमध्ये यायला तयार नाही. जर तुम्ही पावित्र्याच्या गोष्टी केल्या, तर आपले जे मोठमोठाले बुद्धिजीवी लोक आहेत त्यांना मुळीच पटत नाही. त्यांना वाटते ह्या काहीतरी जुन्या कल्पना आहेत आणि ह्या जुन्या कल्पनांवरून हे नका करू, ते नका करू, असे नाही केले पाहिजे, तसे नाही केले पाहिजे अशा रीतीने तुम्ही लोकांना कंडिशनिंग करता आणि तसे करून मग मनुष्य वाईट मार्गाला लागतो. आता सांगायचे म्हणजे असे की, माणसामध्ये पावित्र्य हे पवित्र आईवडिलांच्या १३ रत এ भ सा] संमतीने येते. पहिल्या प्रथम ती आईच जर पवित्र नसली, तर मुलाचे पवित्र असणे फार कठीण आहे. पण एखादा जीव असतोसुद्धा की, अत्यंत वाईट मार्गाला लागलेल्या बाईच्या पोरटीसुद्धा तो जन्माला येतो आणि तो एवढ्यासाठीच येतो की, त्या बाईचा उद्धार करावा आणि स्वत: तो फार मोठा जीव असतो. मोठा पिंड असतो आणि विशेष पुण्यवान आत्मा त्या ठिकाणी जन्माला येतो. म्हणजे असेच की, जसे घाणीत कमळ फुलावे तसा तो तिथे जन्माला येतो असे मी पाहिलेले आहे. लंडनला विशेषकरून मला फार आश्चर्य वाटलं अशी काही लहान मुलं आहेत की ज्यांच्या आयांना आपण दारातसुद्धा उभं करणार नाही. असे जरी असले तरी ही म्हणजे एखादी अपवादात्मक गोष्ट आहे. स्वभावत: जर आई पवित्र असली तर मुलगा किंवा मुलगी हे पवित्रपणाला फार सोप्या रीतीने पोहोचतात किंवा फार सहजपणे त्यांना पवित्रपणा लाभतो. आपल्याकडे म्हणून आईविरूद्ध गेलेले चालत नाही. एक अक्षरसुद्धा आईविरूद्ध बोललेले चालत नाही. पण अशा किती आया आजकाल आहेत की ज्यांच्यामध्ये हे पावित्र्य आहे. पावित्र्यामध्ये आईचे जे मुख्य असते, ते म्हणजे तिला आपल्या पतीसाठी पहिली निष्ठा असायला पाहिजे. जर श्री पार्वतीला श्री शंकराची निष्ठा नसती तर तिला काही अर्थ आहे का? जरी ती शंकराच्या वर शक्तीशालिनी असली. श्री पार्वतीला श्री शंकराशिवाय काहीच अर्थ नाही. ती श्री शंकराहन जरी शक्तीशालिनी वाटली तरी ती शक्ति शंकराची आहे. श्री सदाशिवाची ती शक्ती जरी असली, तरीसुद्धा ती पहिल्यांदा शंकराला शरण गेली आणि तेव्हाच ती शक्तीशालिनी मानली गेलेली आहे. पण ती त्याची शक्ती आहे. परमेश्वराचे किंवा देवतांचे वेगळे असते आणि माणसांचे अगदी वेगळे असते. त्यांना हे समजायचे नाही. त्यांना हे समजतच नाही की, नवर्याचे आणि बायकोचे इतके पटले की, त्यांच्यात दोन भागच नाही. जसा काही चंद्र आणि चंद्रिका किंवा सूर्य आणि सूर्यांचे किरण. असो तसा एकपणा माणसाला समजतच नाही. माणसाला असे वाटते की, बायको आणि नवरा यांच्यात भांडणे ही झालीच पाहिजेत. जर भांडणे नाही झाली तर काहीतरी अनैसर्गिक गोष्ट आहे. अशा रीतीचे एक अत्यंत पवित्र बंधन नव-्यात आणि बायकोत किंवा आपण म्हणू श्री सदाशिवात आणि श्री पार्वतीत होते व त्यांचा पुत्र हा श्री गणेश. श्री पार्वतीने नुसत्या आपल्या पावित्र्याने जन्माला घातला म्हणजे त्यांच्यात तिने बापाचाही भाग बेतलेला नाही. म्हणजे नुसत्या आपल्या पावित्र्याने व आपल्या संकल्पाने तिने श्री गणेशाला जन्म दिलेला आहे. केवढी मोठी गोष्ट आहे तिच्या पावित्र्यात ते संकल्पाने तिने हे सिद्ध करून दिलेले आहे. सहजयोगातसुद्धा फक्त आमचे जे काही पुण्य असेल, ते आम्ही पणाला लावलेले आहे. त्या पुण्यांनी ज्या लोकांना व जितक्या लोकांना जन्म देता येईल तितक्यांना द्यायचा असा आमचा, आपल्या जीवनाचा आम्ही हाच एक अर्थ काढलेला आहे. आता इथे १४ ि माझ्या आधी इतके वतक्ते माझ्याबद्दल सांगून गेले. तुम्ही त्याचा काही विचार घेऊ नका. जोपर्यंत तुम्हाला माझ्याबद्दल काही मिळत नाही, अनुभव मिळत नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टीत अडकू नका. या गोष्टीनी लोकांच्या डोक्यांना आठ्या पडतात. पण तरीसुद्धा कुणी श्री माताजी देवी आहेत वगैरे वरगैरे म्हणणे म्हणजे झाले. तसे म्हणायचे नाही. तसे का म्हणायचे? ते कशाला हवे? असे म्हटलेले लोकांना अगदी आवडत नाही. तुम्ही जर म्हणालात तर त्याचा त्यांना रागच येतो आणि आपल्यापेक्षा कुणी उच्च आहे असे म्हटले की राग येणे अगदी माणसाच्या मनाला नैसर्गिक असते. देवी म्हटले की लोकांना राग येणारच. पण मूर्ख लोकांनी आपण स्वतःला देवता किंवा भगवान म्हटले तरी मात्र लोक त्यांच्यापुढे अगदी डोके टेकतात. त्यांना मग हे अगदी भगवान वाटतात कारण त्यांना भुलवायचे कसे? ती प्रेतविद्या, भूतविद्या व स्मशानविद्या अशा सर्व संमोहनविद्या ते वापरतात. तेव्हा माणसांचे डोके चालत नाही. ते कामातून जाते. त्यांना अगदी नागवे करून जरी नाचवले किंवा त्यांना अगदीच पैशांनी वर्गैरे जरी नागवे केले तरी चालेल. पण त्यांना भगवान म्हणतील. पण जे खरे आहे ते मिळवावे लागते आणि जर ते आपल्याला मिळाले, तर समजेल की, त्याला काय अर्थ आहे आणि का असे म्हणावे लागते? व का असे मानावे लागते? ते मी आज सांगणार आहे. म्हणजे श्री गणेशाला जर तुम्ही देवच नाही मानले तर तुमचे काहीही चालू शकत नाही आणि चालत नाही. पण ते प्रत्यक्षात दिसत नाही म्हणून लोकांना कळत नाही. म्हणजे एक डॉक्टरसुद्धा घरी श्री गणेशाचा फोटो ठेवेल. त्याला कुंकू लावेल अथवा त्याला टिळा लावेल. आणखीन जर त्याला मी सांगितले की श्री गणेश तत्त्व हे तुमच्या शरीरामध्ये स्थित असते. तुम्हाला त्याने शारीरिक फायदा होतो, तर कधीही तो मानायला तयार होणार नाही. जर त्याला मी सांगितले की, तुम्ही श्री गणेशाचे फोटो काढून ठेवा तर ते ही मानायला तयार होणार नाहीत. जर मी म्हटले श्री गणेश तत्त्वाशिवाय तुम्ही चालू हलू शकत नाही तर ते ही गोष्ट मानायला तयार नाहीत. आता देवत्व आपण मानत नाही, पण श्री गणेशाचे सहजयोगात हमखास मानावे लागते. त्याला कारण असे आहे की, जो काही त्रास तुम्हाला जर ह्या श्री गणेश तत्त्वामुळे झालेला असेल तर मात्र तुम्हाला श्री गणेशालाच आळवावे लागते. म्हणजे असे आहे की, तुमच्यामधले श्री गणेश रुसले की, तुमच्यातले श्री गणेश तत्त्व बिघडते व तुम्हाला प्रोस्टेट ग्लॅडचा त्रास व युट्सचा कॅन्सर वर्गरे होतो. आता अनुभवाची गोष्ट सांगते. आमचे शिष्य आहेत अग्निहोत्री म्हणून. त्यांचे नाव राजवाडे पण त्यांनी अग्रीचे मोठे मोठे यज्ञ केले म्हणून अग्निहोत्री. पट्टीचे सहजयोगी आहेत २-३ वर्षांपूर्वी एक दिवस माझ्याकडे आले व म्हणाले, मला काही त्रास नाही, फक्त प्रोस्टेटचा त्रास आहे.' मला मोठे आश्चर्य वाटलं. हा एवढा मोठा गणेश भक्त व सहजयोगी, त्यांना प्रोस्टेट चा त्रास कसा होणार? कारण प्रोस्टेटचा त्रास गणेश तत्त्वाने किंवा त्याच्या ऋ्रासाने होतो. यांच्यावर गणेश रुसण्याचे कारण नाही. कारण हे पट्टीचे सहजयोगी आहेत आणि माझ्यावर त्यांची श्रद्धा आहे व अत्यंत भोळा मनुष्य. मग है गणेश तत्त्व त्याच्या हातात कसे उलटे चालू लागले हे लक्षात नाही आले. मी त्यांना म्हटले, "घ्या की थोड़ा प्रसाद. ' प्रसाद म्हणून चणे असतात. ते दिल्यावर त्यांच्या बरोबरचे म्हणाले, "आज दादा काही खात नाहीत." म्हटलं "का? आज का नाही खात तुम्ही?" म्हणे, "सगळ्यांनी सांगितलयं की संकष्टीला चणे नाही खायचे. म्हटलं हेच चुकलंय. संकष्टी म्हणजे गणेशाचा वाढदिवस. तुम्ही सगळे शिकलेले. कोणी काही सांगितलं तरी बुद्धी वापरली पाहिजे. सतर्कतेने घेतले पाहिजे. संकष्टीला आम्ही उपवास करतो. संकष्टी किंवा गणेश चतुर्थी हे त्याचे जन्मदिवस आहेत. त्याच्या जन्मदिवशी तुम्ही उपवास करता म्हणजे काय सुतक पाळायचे आहे का? एक साधी गोष्ट आहे, मनुष्याचे जे expression असते किंवा मनुष्य दाखवतो दुःख झाले किंवा सुख मिळाले. जर घरात कोणी मनुष्य मेला तर आपण जेवत नाही. आता जर तुमच्या घरी मुलगा झाला किंवा नातू झाला तर तुम्ही पेढे वाटाल, मेजवान्या द्याल, समारंभ कराल. मग श्री गणेश जन्माला आले तर तुम्ही उपाशी बसाल, तर मग होणारच प्रोस्टेट चा त्रास, मग युट्सचा कॅन्सर. तो सुद्धा याच्यामुळे होतो. श्री गणेश तत्त्वाला जर तुम्ही नीट वागवले नाही तर म्हणजे तुमच्या मुलाला नीट वागवले नाही तर, जर तुमच्यामध्ये मातृत्व नसले तर, ह्या सर्व गोष्टीमुळे युट्सचा त्रास होतो. श्री गणेश तत्त्वाचे काही काही फार अगदी पवित्र नियम आहेत. ते जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला युट्रसचा त्रास होतात. पण हा त्रास एक डॉक्टर श्री गणेश तत्त्वाशी लावू शकत नाही. परंतु त्याचा संबंध श्री गणेशाशीच आहे. ते तो लावू शकत नाही. तो इथपर्यंत येतो की, प्रोस्टेट ग्लॅन्ड खराब झाली आहे किंवा फार तर पेल्व्हिक प्लेक्सिस खराब झाले आहे. पण ह्याच्या मागचे जे परमेश्वराचे कार्य आहे किंवा ह्याच्या अंतजर्ज्ञानाचे किंवा परोक्षज्ञानाने जे जाणले जातात किंवा ज्याला म्हटले पाहिजे की बाह्यज्ञानापासून अलग आहे, जे तुम्हाला दिसत नाही, त्यासाठी तुमच्याजवळ अजून डोळे नाहीत, त्यासाठी अजून संवेदना आलेली नाही, अजून तुमची परिपूर्ती झालेली नाही. तेव्हा तुम्ही कसे लक्षात घेणार की, हा त्रास श्री गणेश तत्त्व बिघडल्यामुळे झाला आणि श्री गणेश आमच्यात रागावलेला आहे. तेव्हा त्या दैवताला प्रसन्न केल्याशिवाय आम्ही सहजयोग करू शकत नाही. असे म्हटल्याबरोबर ते डॉक्टर एकदम घसरले. श्री गणेशाचे नाव घेतल्याबरोबर डॉक्टर एकदम घसरतात की आम्ही श्री गणेशाला मानायला तयार नाही. आम्ही फक्त सायन्स मानतो. मग बसा, तुमचा कॅन्सर वगैरे त्रास श्री गणेश तत्त्वाला मानल्याशिवाय ठीक होणार नाही. श्री गणेश तत्त्व बिघडल्यामुळे कॅन्सर होतो. श्री गणेश तत्त्व जर आपल्यामध्ये बिघडले कारण ते श्री गणेश तत्त्व हर एक ठिकाणी प्रत्येक अणू-रेणूत सगळीकडे संतुलन बघत असते. आता आम्ही कॅन्सर ठीक करतो, केला आहे आणि करणार, पण आमचा काही हा धंदा नाही. तेव्हा श्री गणेश त्त्व किती महत्त्वाचे आहे, त्याला किती माहात्म्य द्यावे तेवढे थोडे आहे. जे बितका १५ जर ा हे अत्यंत सुंदर असे चार पाकळ्यांचे श्री गणेश तत्त्व आपल्यामध्ये असते आणि ह्या चार पाकळ्यांच्या श्री गणेश तत्त्वामध्ये मधोमध श्री गणेश जे आहेत ते आपल्यामध्ये बसलेले असतात. म्हणजे आपल्या शरीरात त्याच्यातले एक एक अंग आहे. त्याला अनेक अंगे आहेत. त्यापैकी पहिले अंग म्हणजे मानसिक अंग. मानसिक अंगाचे जे बीज आहे ते श्री गणेश तत्त्वाचे. इच्छाशक्ति म्हणजे जी डावीकडची शक्ति आहे व जी आपल्याला सगळ्या भावना देते. त्या भावनेच्या मुळातच श्री गणेश बसले आहेत म्हणजे ज्या माणसाला वेड लागले असेल, त्याचे श्री गणेश तत्त्वच खराब असले पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की, तो मनुष्य अपवित्र आहे. पण त्याच्या पवित्रतेला धक्का लागला असावा. पवित्रतेला कुणी ठेच मारली, तरच त्याला तसे होऊ शकते. एखाद्या माणसाला जर दुसर्या माणसाने खूप छळले, तरी त्यांचे श्री गणेशत्त्व बिघडू शकते कारण त्याला असे वाटते की परमेश्वर आहे. जर श्री गणेश आहेत तर मग ह्या माणसाचा ते वध का नाही करत? असे प्रश्न त्या माणसाला उभे झाले की, हळूहळू त्याची डावी बाजू खराब होत जाते आणि ती खराब झाली म्हणजे मग त्याला वेड लागायची पाळी येते. आता बघा की श्री गणेश तत्त्वाचे किती संतुलन असते. जर तुम्ही कितीही परिश्रम केले आणि कितीही त्रास घेतला आणि जर बुद्धीने पुष्कळ मेहनत केली आणि पुढचा विचार केला, प्लॅनिंग केले, आजकालच्या लोकांना हा एक आजार लागलेला आहे जरा बुद्धीने विचार करण्याचा. म्हणजे फार विचार सुरू झाला आणि त्या विचारामध्ये जर संतुलन राहिले नाही तर तुमची डावी बाजू एकदम कामातून जाते म्हणजे थिजून जाते आणि उजवी बाजू जास्त वाढ़, लागते. त्यामुळे डाव्या बाजूचे जेवढे रोग आहेत ते श्री गणेश तत्त्व बिघडल्यामुळे होतात. पैकी मधुमेह हा रोग श्री गणेश तत्त्व बिघडले म्हणजे होतो. श्री गणेशाची जी संतुलन व्यवस्था आहे तो रोग ठीक करण्यासाठी आपले लक्ष मधुमेहाकडे श्री गणेश घालतात. असा मनुष्य लगेच काम करु लागतो. त्याचप्रमाणे हृदयविकारसुद्धा. जर तुम्ही अत्यंत डोक्याचे काम केले तर हृदयविकार होतो. कारण श्री गणेशाचे स्वस्तिक आपल्या शरीरात बनविलेले असते, ते म्हणजे दोन वातीसारख्या दिसणाऱ्या शक्ती ह्या एकात एक अशा मिळतात. पैकी डावीकडून जी अशी शक्ती येते, ही म्हणजे महाकालीची शक्ती. उजवीकडून येते ती महासरस्वतीची. मधोमध जिथे त्यांची मिलनबिंदू आहे, तो मिलनबिंदू मात्र महालक्ष्मी शक्तीच्या मधल्या उभ्या रेषेत आहे. डावीकडची सिंपथेटीक नव्व्हस सिस्टीम जी आहे ती महाकालीच्या शक्तीने चालते म्हणजे इच्छाशक्तीने चालते. आता एखाद्या माणसाच्या इच्छाशक्ती विरुद्ध फार कार्य झाले आणि त्याला फार त्रास झाला, त्याच्या कोणत्याही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, तर त्याला वेड लागते. त्याला हार्ट अॅटॅक नाही येणार. हार्ट अॅटॅक त्या माणसाला येईल, ज्याला पुष्कळ पाहिजे. त्याला हे पाहिजे, ते पाहिजे, पुष्कळ प्लॅनिंग पाहिजे. ते करायला पाहिजे, १६ देशकार्याला निघाले. राष्ट्रकार्याला निघाले. काही काही उगीचच. डोक्याचे नुसते भ्रम आहे. काही कुणी कार्य केलेले नाही. केलेले असते तर दिसले असते. नुसती भांडणं लावून ठेवली आपापसात. नाहीतर त्याला हृदयविकाराचा झटका येतो. म्हणजे वर सांगितलेले सगळे रोग माणसाच्या अतिविचारामुळे होतात आणि त्यांचे संतुलन श्री गणेश आणून देतात. हे श्री गणेशाचे कार्य आहे. म्हणून तुम्ही पाहिले असेल की लोक जरी घाईत असले तरी श्री गणेशाचे देऊळ दिसले तर नमस्कार करून घेतात तेवढ्यातल्या तेवढ्यात. सिद्धिविनायकालासुद्धा किती रांग लागते. पण त्याला काही अर्थ आहे काय? ते करून तेव्हाच फायदा होईल, जेव्हा तुमच्यामध्ये आत्मसाक्षात्कार आलेला आहे. जर तुमच्यात आत्मसाक्षात्कार आला नाही तर तुमचे परमेश्वराशी कनेक्शन जुळणार नाही. कोणता खोटा गुरू आहे, कोणता खरा गुरू आहे हे ही तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणजे हे बीज तुमच्यामध्ये जे श्री गणेशाचे आहे ते कुंडलिनी उठल्यावर, कुंडलिनीला सगळ्यात प्रथम श्री गणेश समजून सांगतात व ही कुंडलिनी दाखवते की या गृहस्थाला कसले त्रास आहेत? एखाद्याला समजा लिव्हरचा त्रास आहे, तर ती तिथे जाऊन धकधक करेल. तुमच्या डोळ्यांनी दिसते. जर नाभिचक्र धरलेले असेल किंवा नाभिचक्रावरती पकड असली तर नाभिचक्राच्या जवळ कुंडलिनी जेव्हा उठेल, तेव्हा तुमच्या डोळ्यांनी तुम्ही तिचे स्पंदन अथवा धकधक बघू शकाल. ती त्या ठिकाणी एखाद्या माणसाला जर समजा भूतबाधा असेल, तर सबंध पाठीवरती ती अशी धकधक करेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आम्ही त्याच्यावरती फिल्म घेतलेली आहे. तुम्हाला ती धडपड तिथे स्पष्ट दिसू शकते. कुंडलिनी आमच्यामुळे जागृत होते ह्याच्याबद्दल काही शंका नाही. कुंडलिनी उठते, पण जर श्री गणेश तत्त्व खराब असेल तर श्री गणेश परत तिला खाली ओढून घेतात. ती वरपर्यंत आली तर परत धपकन खाली जाणार म्हणजे प्रथम श्री गणेश तत्त्व तुम्हाला सुधारले पाहिजे. त्यांचे वैशिष्ट्य हे की, कुंडलिनी बर आणून जरी बांधली तरी परत खाली येते आणि त्यांनी काय गणेश तत्त्वाला हानी केली ते मला ठाऊक नाही. त्यांनी तिथे काय हात घातला की काय केलं ते माहिती नाही, पण त्यांचे जे आम्ही पाहिलेले आहे की कुंडलिनी हमखास खाली पडते. पाच वेळा जरी कुंडलिनी उचलली तरी खाली पडते तेव्हा ते काय करत होते म्हणून मी बऱ्याच वेळेला गुरुघंटालाकडे जाऊनसुद्धा आले, बघण्यासाठी, पाहण्यासाठी. करतात तरी काय? तेव्हा मी हे पाहिलेले आहे पुष्कळशा लोकांना की अत्यंत घाणेरडे आणि अनुचित प्रकार घडतात. प्रथम ते गणेश तत्त्व खराब करतात काही ना काही बहाण्याने. ते म्हणतात 'कुंडलिनीला उचलायला आम्हाला खाली हात घालायला पाहिजे.' म्हणजे बघा गणेश तत्त्व लहान बालकासारखे तिथे बसलेले आहे, आपल्या आईच्या लज्जा रक्षणार्थ आणि गणेश तत्त्वाने आपल्या सेक्सला चालना मिळते. तेव्हा जे लोक असे म्हणतात की सेक्सने आम्ही कुंडलिनी जागरण करू म्हणजे ते असं म्हणू लागले की गणेशाचा वाईट संबंध त्याच्या कुंडलिनीशी म्हणजे त्याच्या आईशी लावतो. त्या तिथे बसलेला आहे. त्या मार्गाने कोणी गेले तर तडाखा मारतो. आमच्याकडे पुष्कळ मंडळी आली आहेत सांगायला की 'माताजी, आमची कुंडलिनी जागृत झाली'. म्हटलं 'असं का? म्हटलं काय होतय?" कुंडलिनी जागृत झाली म्हणजे हातात थंड बारा यायला पाहिजे. पण त्यांच्या गळ्याला सबंध मोठमोठाले फोड आले आणि त्यातून सारखं पाणी निघतं. काही लोकांच्या अंगात कमालीची गरमी असते. दिल्लीला एका माणसाने मला तीनदा तार केली की 'माताजी, माझी कुंडलिनी जागृत झाली मी काय करू?' तेव्हा मी मुंबईला होते. म्हटलं त्याला तार करा आणि बोलवून घ्या. पण मी तिथून दिल्लीतून निघाले आणि तो तिथे पोहोचला. तर माझ्या वहिनी सांगत होत्या तो सारखा इथून तिथून धावत असायचा. जसे काही त्याला हजार मुंग्या किंवा विचू चावले आहेत. इथून तिथून धावत असायचे. दिल्लीला एक गृहस्थ आहेत डॉ.बत्रा म्हणून. ते असेच एका प्रोग्रॅमला आले होते. ते म्हणाले, 'श्री माताजी, महिन्यापासून मी असा छळला गेलोय. मला विंचू चावून राहिले आहेत. माझी कुंडलिनी जागृत झाली आहे.' तेव्हा मी म्हटले बसा दोन मिनिटं, तरी त्यांना अगदी धीर धरवेना. तेव्हा मी त्यांच्याजवळ गेले व पाच मिनिटांत त्यांना शांत केले. कारण ही पृथ्वी. ते जमिनीवर उभे होते. तुम्ही आज जमिनीवर बसलात. मला फार आनंद झाला. आज अगदी बरोबर सबंध योग जुळलेला आहे. त्या पृथ्वी मातेने त्यांची सबंध उष्णता ओढून घेतली. आता तुम्ही कसे पृथ्वी मातेला सांगणार की, हे पृथ्वी माते, तूमाझी सबंध गरमी ओढून घे. ओढूनच नाही घेणार ती, पण सहजयोग्यातील ती ओढून घेते. त्याला कारण असे आहे की, एकदा ते श्री गणेश तत्त्व तुमच्यात जागृत झाले तर तेच तत्त्व या पृथ्वीत असल्यामुळे, त्याच तत्त्वावर ही पृथ्वी चालत असल्यामुळे ती अगदी ओढून घेते व म्हणूनच आपल्यामध्ये ते तत्त्व जागृत ठेवले पाहिजे व ते पावित्र्य ठेवले पाहिजे माणसाने. इतकेच नाही तर सहजयोगामध्ये मग तो सहजयोगी जो पावित्र्याचा पुतळा व त्याला चालवणारा जो राजा श्री गणेश आहे. त्या देशामध्ये (शरीरामध्ये) जो राज्यकर्ता आहे. अशा श्री गणेशाला 'त्रिवार' नमस्कार करून आणि त्याच श्री गणेशासारखे आपल्यामध्ये पावित्र्य आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता ज्या गोष्टी सांगू नयेत आणि जे लोक सांगत आहेत, ज्याबद्दल पुष्कळ वाच्यता झाली आहे आणि अशा रीतीने पुष्कळ तांत्रिकांनीसुद्धा आपल्या देशामध्ये आक्रमण केले आहे. त्यांचे आक्रमण राजकीय नसले तरी इतके अनैतिक आणि इतके घातक आहे १७ की, त्यांचे आपण आज भोग उचलतो आहोत या तांत्रिकांनी सगळा अतिशय घाणेरडेपणा सहाव्या शतकांत केला. त्याला कारण असे की, त्या वेळचे राजे म्हणजे फार खुशालचेंडू अशा लोकांच्या पैशावरती तांत्रिकांनी चैन केली. जास्त पैसा झाला म्हणजे मात्र हेच होते. आधी पहिले श्री गणेशतत्त्व खराब करा. पैसा जर अती झाला म्हणजे तो श्री गणेश तत्त्वाच्या मागे लागतो. तरुण मुलींच्या मागें लागणे लहान अबोध मुलींच्या मागे लागणे ते त्यांच्यात श्री गणेश तत्त्व झोपल्याचे द्योतक आहे. हे तांत्रिक लोकसुद्धा काय करतात. त्यांच्यातील तेच आहे की कोणतीही अबोधिता दिसली की त्याला हाणायचे. कुणीही अबोध मनुष्य दिसला की त्याला मारायचे. आपलीच अबोधिता खतम करुन घ्यायची. यावरून असे दिसते की, हे विलासी लोक परमेश्वरापासून दूर राहिले. तसेच अनेक कर्मठ लोक ज्यांनी परमेश्वराकडे जाण्याचा आटोकाट प्रयत्न करून परमेश्वर मिळविलेला नाही. आपल्यामध्ये विलासी प्रमाणेच कर्मठ लोक फार आहेत. कर्मठता आपल्यामध्ये कमी नाही. महाराष्ट्रात तर फारच कर्मठता आहे. म्हणजे सकाळी त्रेसष्ट वेळा हात धुतले पाहिजे. कुणी सांगितले माहीत नाही. त्या बाईंनी जर बासष्ट वेळा हात धुतले आणि त्रेसष्ट वेळा हात धुतले नाही तर रात्रभर तिला झोप येणार नाही. काहीतरी अमूक इतक्या वाती वळल्याच पाहिजे. अमुक लाख जप केलाच पाहिजे, पण जे करायला पाहिजे ते मात्र होत नाही, म्हणजे वाती वळायच्या आणि त्या वेळेला आपल्या सुनेच्या किंवा मुलीच्या काहीतरी वाईट गोष्टी सांगत बसायचे असे आपल्याकडे प्रकार आहेत. त्यापैकी सांगायचे म्हणजे असे की, सहजयोग हा अशा लोकांत रुजणार नाही. येऱ्यागबाळ्याचे काम नाही. श्री रामदासांनी सगळी आमच्या कार्याची पूर्वपीठिका सांगितली आहे. जर तुम्ही दासबोध वाचला तर आम्हाला मुळीच तुम्हाला काही सांगायला नको. त्यांनी हे सगळे सांगून ठेवलेले आहे आणि तेच खरे आहे. ज्या माणसामध्ये ती कुवत असते आणि जो खरोखर त्या पट्टीचा असेल, त्याच माणसाला खरोखर सहजयोग साधेल. सगळ्यांना साधत नाही. म्हणजे व्हायब्रेशन्स येतील. पार व्हाल. पण परत गेले कामातून. अशा आम्ही हजारो लोकांना व्हायब्रेशन्स दिली. या मुंबई शहरातच निदान दहा हजार लोकांना तरी व्हायब्रेशन्स दिली आहेत. पण किती लोक त्यातले खरोखरच पुढे आले? कारण लोकांची दृष्टीच मुळी उलटीकडे जाते. एक आमचे गुरू आहेत ते आम्हाला मानतात सुद्धा, ते आम्हाला म्हणत होते गाढवांना गाढवांचेच काम दिले पाहिजे. तुम्ही कशाला रियलायझेशन देत बसता? तुम्हाला इतकी काय गरज पडली आहे? म्हटलं गरज नाही पडली, वेळ आली आहे तशी. जर आता सहजयोग झाला नाही तर हा परमेश्वराच्या घरचा निवाडा आहे. हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आता चालायचे नाही असे. आताच तुम्ही पार होऊन घेतले पाहिजे. पुढे जे काही होणार आहे तिथे पुन्हा संधी मिळणार नाही. पुढे काय होणार आहे? त्यावेळी १८. 'एकादशरुद्र' येणार आहेत. एकादशरुद्र म्हणजे अकरा रुद्र. एकच रुद्र ह्या सबंध विश्वाला संपविण्यासाठी समर्थ आहेत. पण जेव्हा अकरा रुद्र येतील तेव्हा तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाहीत. ते अगदी सबंध संपवून टाकतील. त्याच्या आधी ज्या लोकांचा निवाडा व्हायचा आहे, तो निवाडा आताच सहजयोगाने झाला पाहिजे आणि लोकांनी घेतला पाहिजे. पण बहुतेक लोकांचे असे असते की लहान लहानशा गोष्टीत लोक बिथरतात आणि लहान लहानशा गोष्टीवरून निघून जातात. पैकी जर आम्ही एखादे पैसेबिसे घेत असतो आणि एखादी भोंदुगिरी वरगैरे केली, तर लोकांना जास्त आवडेल. म्हणजे मनुष्याच्या अहंकाराला पुष्टी दिली तर मनुष्य यायला तयार असतो. पण सहजयोगामध्ये हे सांगायचे झाले तर हे सगळे काही परमेश्वराचे कार्य आहे. हे सहज घडते त्याला पैसा लागत नाही. एका फूलातून जसे फळ निघते तसेच तुमचे सुद्धा होणार आहे आणि जसे तुम्हाला नाक, डोळे, तोंड आणि ही मानवस्थिती आलेली आहे, तसेच अतिमानव स्थिती परमेश्वरच तुम्हाला ही एक स्थिती म्हणून देत आहे. हे दान आहे परमेश्वराचे. परमेश्वर तुम्हाला देणार आहे. तुम्ही या बाबतीत काही बोलू शकत नाही. ही भूमिका मानायला मनुष्य मुळी तयार होऊ शकत नाही. त्याला एवढा अहंकार झालेला आहे. त्याला वाटते डोक्यावर जोपर्यंत मी दहा दिवस उभा राहू शकत नाही, तोपर्यंत मला काही मिळणारच नाही. आधी हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्या परमेश्वरांनी अशा अनंत गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्या आपण काहीही करू शकत नाही. कोणतेही जिवंत कार्य आपण करू शकत नाही. जिथे आपण करू शकत नाही, तिथे आपण अतिमानव तरी कसे होऊ? तोच करणार. पण एवढेच होते की, पार झाल्यावर फक्त मनुष्य योनीतच मनुष्याला समजते की, आपण पार झालो, ही पहिली गोष्ट. दुसरी त्याच्यात जी शक्ती येते की, ज्यामुळे तो दुसऱ्यांना पार करू शकतो. त्याच्यातून ती शक्ती वाहते. तो एक-एक असा अनेक होऊ शकतो. म्हणजे त्याला देवत्व प्राप्त होते. तो स्वत: देवत्वात येतो. आता असे पुष्कळसे लोक आहेत. ज्यांनी चांगले चांगले गुरू वरगैरे केलेले आहेत. गुरू मोठमोठाले आहेत, पण त्यांच्या शिष्यांमध्ये देवत्व आलेले मी पाहिलेले नाही. त्यांच्यात परिवर्तन झालेले नाही. ते जिथे आहेत तिथेच आहेत. जरी झाले तरी, शिष्य भयामुळे किंवा श्रद्धांनी पूर्ण अजून ते घटीत झालेले नाहीत. ती घटना घडलेली नाही. ते परिवर्तन आतून झालेले नाही. म्हणजे यांचा जर गाभाच ठीक करायचा असला किंवा फुलाचे फळ करायचे म्हटले म्हणजे सबंधच बदलते. अशी स्थिती मात्र कोणाला आलेली नाही, तेव्हा सांगायचे असे आहे की, त्यासाठी आपले श्री गणेश तत्त्व जागृत व्हायला पाहिजे. त्याला आपण आधी सांभाळले पाहिजे. आजकालच्या काळामध्ये नाना तऱ्हेच्या जाहिराती पाहतो व वाचतो आणि काही जाहिराती म्हणजे सबंध अश्लीलपणा आणि सबंध अपवित्रपणा त्यात भरलेला व हे जे आता शहरामध्ये झाले आहे. ते खेड्यात पण गेले आहे. आता त्या अपवित्रतेने त्यांचा सर्वनाश झालेला आहे. त्यामुळे काही इतक्या दुःखात पडले की, आता रात्रंदिवस ह्याच योजना करत बसलेत की, आता आम्ही आत्महत्या कोणत्या प्रकारची करावी. ही त्यांची स्थिती आलेली आहे. तुम्ही त्या मार्गाला जातांना आपणच विचार करून बघितला पाहिजे. तसेच रुढिप्रिय लोक. प्रत्येक गोष्ट आपण का हे सगळे करत आहोत. आपण मानवस्थितीला आलो आहोत, तर याचा अर्थ लावला पाहिजे. आयुष्यभर तेच तेच करण्यात काही अर्थ नाही. जसजशी मंडळी परमेश्वराला तत्त्वत: सोडून निघाली तसतशी ही मंडळी परमेश्वराच्या नावाला नुसती चिकटून आहेत. सकाळपासून देवाला दिवा दाखवला, घंटी मारली की चालले. त्या रितीने वागणारे किंवा जे मी काहीच्या कर्मठपणाबद्दल सांगितले, अशा तऱ्हेची जी कर्मठ मंडळी आहेत. त्यांनी समजून घेतले पाहिजे की, अशा तऱ्हेच्या फुकाच्या गोष्टींनी परमेश्वर कदापि मिळणार नाही. परमेश्वर आपल्यामध्ये आहे. तो जागृत केला पाहिजे हा सहजयोगाचा संदेश आहे. जर कुंडलिनी ही आई आणि श्री गणेश ही त्यांची कृती आहे आणि श्री गणेश हे तिचे मुल आहे. आपल्यामध्ये असलेली कुंडलिनी श्री गणेशाच्या नुसत्या हातावर फिरत असते. श्री गणेशाच्या हातात काय असते ते तुम्ही पाहिले असेल. तसेच त्यांच्या पोटावर सर्प बांधलेला असतो किंवा पुष्कळवेळा त्यांच्या एका हातामध्ये सर्प असतो. म्हणजे गणेशाला तसे म्हटले तर चारच हात आहेत पण खरे म्हणजे त्यांना अनंत हात आहेत. जो हातामध्ये सर्प दाखवतात, तीच ही कुंडलिनी, तसेच आमच्या सहजयोग्यांचे. आश्चर्याची गोष्ट की, सहजयोगी हे जे पार होत आहेत, त्यांच्या नुसत्या हातावर कुंडलिनी चढते. ह्यांनी हात असा वर केला म्हणजे दुसरयांची कुंडलिनी वर जाते. म्हणजे आता लहानसा सहजयोगी मुलगासुद्धा कुंडलिनी वर उचलतो. दोन दोन वर्षाची मुले, पाच-सहा महिन्यांची मुलेसुद्धा तुम्हाला सांगतील, तुमची कुंडलिनी सध्या कुठे अडली आहे ते. तिची काय स्थिती आहे. माझी नात सात-आठ महिन्याची होती. तेव्हा हे श्री मोदी माझ्याकडे आले होते आणि त्यांचे आज्ञाचक्र धरलेले होते. तर बोलता बोलता तिला काही समजेना. ती अशी रांगत होती तरी तेवढ्यात ती हातामध्ये माझा कुंकवाचा करंडा घेऊन आली आणि त्यांच्या कपाळाला कुंकू लावले आणि त्यांचे आज्ञाचक्र तिने सोडवून टाकले. सारखी तिला हीच आवड असते. तेच मी माझ्या इतर सहजयोग्यांच्या लहान-लहान मुलांमध्ये पण पाहिलेले आहे. कित्येक जन्मजात पार आहेत. जन्मजात, म्हणजे केवढी मोठी ही गोष्ट. म्हणजे साक्षात जन्मजात पार मंडळी आज संसारामध्ये जन्माला येत आहेत. त्यांच्यासाठी संन्यास घ्यायला नको. संन्यास वरगैरे घ्यायची ज्याला गरज वाटते त्याला मात्र अजून पार होता आले नाही. पार झाल्यावरती तुम्ही आतून आपोआप सुटत जाता. असे सुटत गेल्यामुळे बाहेरचा संन्यास काही घ्यायला नको. संन्यास घेतला म्हणजे आतून घेतला असला, तर त्याचे प्रदर्शन व जाहिराती १९ न हि क।।। बा लावायची काय गरज आहे? जर तुम्ही पुरुष असला, तर चेहऱ्यावर बघूनच लोक सांगतील हा पुरुष आहे की बाई. त्याच्या काय जाहिराती लावून फिरता की काय आम्ही पुरुष आहोत. आम्ही बायका आहोत. तशातलाच हा प्रकार आहे की संन्याशी तुम्ही मनाने झालात खूप काहीतरी असले तरी आतून ह्या देहात ऐहिक, पारमार्थिक सुख, समाधान वरगैरे सहजयोगामध्ये सहज गाठता येते. त्याला संन्यास वरगैरे घेण्याची काहीही गरज नाही. श्री शंकराची जी स्थिती आहे किंवा श्री शंकरांनी जी स्थिती प्राप्त करून घेतली आहे त्याला जसे श्री गणेश निर्माण करावे लागले तसे तुम्हाला सुद्धा ते श्री गणेश निर्माण करायला पाहिजे. आता आपल्यामध्ये लोकसंख्या सुद्धा हिंदुस्थानात जास्त आहे असे म्हणतात. मी म्हणते इतर कुठे वाढावी लोकसंख्या. इंग्लंडला कमी होते, जर्मनीला कमी होते, अमेरिकेला कमी होते कारण तिथे कोणी शहाणा जन्माला येणारच नाही. सगळे आपल्या इथेच येणार कारण तिथे जर मुलांना प्रत्येक आठ दिवसामध्ये इंग्लंडला आई-वडील दोन मुलांना मारत असतात. हे तिथले स्टॅटिस्टिक्स आहे तर कोण शहाणा तिथे जन्माला येईल. या सगळ्यांचा मूर्खपणा आपण सहन करतो आहे आणि आपल्याला दूषण लागते आहे. ही मुलं दुसरीकडे जन्माला येणारच नाही कारण इतकी वाईट स्थिती आहे मुलांची. आजच एक लहान मुलगा माझ्याकडे आला व म्हणाला, दुडूदुडू धावण्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे?' म्हटलं त्यांच्याजवळ कुठून असणार! लहान मुलांना बघतात तरी का ते धावतांना. आपल्याकडे दुड़दुडू धावणे हा वात्सल्य रस. आपल्याकडे श्रीकृष्णाचे वर्णन वाचावं अथवा श्रीरामाचे लहानपणाचे वर्णन वाचतांना अगदी कौतुक वाटते. कुठेही तुम्हाला श्री येशू ख़िस्ताचे लहानपणाचे वर्णन मिळणार नाही. फक्त आपले रेव्हरंड टिळक होते त्यांनी मात्र 'हीच अंगुली मुखी घालूनी, मधू गोष्टी वदसी' वगैरे वर्गैरे असं लहान मुलांचे वर्णन केलेले आहे कारण त्यांच्या हृदयामध्ये भारतीयता असल्यामुळे त्यांनी ख़रिस्ताचेसुद्धा लहानपण कसं आहे त्याचं वर्णन केलं आहे. पण तुम्हाला कुठेही 'दुडूदुडू धावणे' ह्याला इंग्लिश भाषेमध्ये शब्द मिळणार नाही. मलासुद्धा समजेना की याला कसं समजून सांगावं कारण लहान मुलांचे जे अंगभाव आहेत, अंगविक्षेप आहेत, जसं बाळसं धरणं आपण म्हणतो, त्याला काय इंग्लिश भाषेत काही अर्थ नाही. उलट ते म्हणतात की, मुलांनी फॅट नसावं, थीन असायला पाहिजे कारण आत्तापासून सिनेमा नट त्यांचे आदर्श, अशा रीतीच्या नवीन नवीन कल्पना काढून त्यांच्यामधील अबोधिता आहे ती काढून घेतली आहे. आणि ते आपण करू नये आणि त्यांच्यापासून आपल्याला घेण्यासारखे काही नाही. लहान मुलांना जन्मल्याबरोबर आपल्याला आश्चर्य वाटेल, मला असंच वाटत होतं तुमच्यासारखे, लहान मूल जन्माला आल्यावर, त्याला दुसर्या खोलीत टाकून देतात आणि कुत्रे आणि मांजरी मात्र आपल्या बेडरुममध्ये ठेवतात. ३ जेव्हा माझ्या मुली येणार होत्या, त्यांची मुलं येणार होती तर आमच्या साहेबांच्या सेक्रेटरी, त्या बऱ्याच म्हाताऱ्या बाई आहेत. त्यांना मुलंबाळे काहीच नाही, त्या मला म्हणाल्या,'तुम्ही अपसेट असाल?' म्हटलं 'अपसेट कशाला? मला तर खूप आनंद झाला आहे मुलं येणार आहेत म्हणून.' 'नाही' म्हणे 'तुमचं घरंबिरं घाणेरडं होईल.' म्हटलं 'होऊ दे बाण.' आमच्याकडे असे विचार सुद्धा डोक्यात येणार नाहीत. म्हणजे तुम्ही गणेश तत्त्वाकडे लक्ष दिले नाही तर 'इगोईझम' येतो. त्याला भयंकर अहंकार येतो. मोठे राजकीय जे नेते असतात त्यांचे चारित्र्य आपण पाहिले तर झिरो, त्याला कारण है. कारण इगो मनुष्याला आला की तो उजव्या बाजूने वाढत जातो आणि उजव्या बाजूने वाढल्यामुळे मनुष्याला इगो येतो आणि इगो आल्यामुळे श्री गणेश तरी काय किंवा श्री गणेश तत्त्व तरी काय? पवित्रता म्हणजे काय? मीच म्हणजे सर्व काही आहे असे तो समजतो व त्यांच्यातले हे श्री गणेश तत्त्व नष्ट पावते, पण त्यातले एक सुंदर उदाहरण म्हणजे संन्यास घ्यायचा आणि लग्न करायचे नाही. घराच्या बाहेर राहायचे, आणखी कुणाशी संबंध ठेवायचा नाही. ते सुद्धा हे दुसरें लोक आहेत. श्री गणेश त्त्व जर आपल्यात जागृत असले तर संसारात राहुनच परमेश्वर मिळवता येतो आणि जर देवत्व मिळवायचे असेल तर संसारात राहिले पाहिजे. ब्रह्मर्षि पद मिळू शकेल, जर तुम्ही अगदी फारच कडक अगदी तीव्र वैराग्य आचरले तर. पण मला असे आता वाटायला लागले आहे की, ब्रह्मर्षीसुद्धा एवढे मोठे पोहोचलेले आहेत, मी यांना ओळखते, पुष्कळसे लोक आहेत पण ते आता काही करायला तयार नाहीत. त्यांना एवढी आंतरिकता नाही आणि ते इतकी मेहनत करायला तयार नाहीत. मला कधी कधी वाईट वाटते आणि त्यांचे असे मत आहे की, जे हे त्यांचे भक्त आहेत, त्या भक्तांची अजून तयारी नाही. जर मेहनत केली तर आपण तयारी करू शकतो आणि त्याला पुढे आणू शकतो. पुष्कळदा मला असे वाटते की, हे सगळेजण जर आता माझ्या मदतीला आले तर बरे होईल. मला फार मानतात असे एक गृहस्थ आहेत कलकत्त्याजवळ. त्यांचे नाव श्री ब्रह्मचारी म्हणून आहे. आणखी ते फार पोहोचलेले आहेत आणि त्यांनी माझ्याबद्दल एका अमेरिकन माणसाला सांगितले को, श्री माताजी साक्षात् आल्यावर आम्ही आता बघत बसलो आहोत त्यांचे काम. आम्हाला हेच कार्य करायचे आहे व बाकीचे काही राक्षसाचा नाश वगैरे आम्ही मनन शक्तिने करतो आहोत असे सांगत, पण ते गृहस्थ इथे आल्यावर मी त्यांना म्हटले की, 'तुम्ही त्यांना अमेरिकेला घेऊन का नाही जात?' ते अमेरिकेला गेले. परंतु तेथून पाच दिवसातच पळाले आणि मला म्हणाले, मला अशा लोकांना भेटायचे नाही. ते अगदी घाणेरडे लोक आहेत. म्हणजे ह्या ब्रह्मचारीसारखे लोक स्वत: माणसात न राहिल्यामुळे अगदी माणूसधाणे झाले आहेत असे म्हटले तरीसुद्धा तुम्ही फार तर फार त्यांच्या चरणावर जाल. त्यांच्यावर श्रद्धा ठेवाल, त्यामुळे संत साधू आले तर तुमची स्थिती सुधारेल यात शंका नाही. पण मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार कसा होणार? कारण त्यासाठी घाणीतच हात घालावा लागतो मुळी. मुलाला ठीक करायचे, मुलाला सांभाळायचे आहे तर आईला घाणीतच हात घालावा लागतो. जर ती घाण-घाण करत असेल, तर मुलाला स्वच्छ कोण करणार आहे? आणि म्हणूनच हे आईचे कार्य सहजयोगासाठी आम्ही करतो आहोत. आपण सर्वांनी त्यामध्ये न्हाऊन घ्यावे, त्याच्यामधील आनंद उचलावा हीच एक आईची इच्छा आहे. आईची एकच इच्छा असते की, आपल्यात असलेली शक्ती मुलात यायला पाहिजे. जोपर्यंत जनसाधारणांना ज्याचा फायदा होत नाही, जोपर्यंत जनसाधारण मानव त्यांच्यातून काही मिळवू शकत नाही, जोपर्यंत त्यांच्या मुलाला त्यांच्या शक्त्या मिळत नाहीत अशा आईचा उपयोग कारय? अशा आया असल्यापेक्षा नसलेल्या बऱ्या. तेव्हा ज्या व्यक्तीला आई किंवा गुरु मानतात, आपल्यापेक्षा मोठे मानतात, त्यांनी जर स्वत:चा अर्थ लावलेला नाही तर त्यांच्या जीवनाचा तुम्हाला तरी काय आदर्श मिळणार आहे? सहजयोगामध्ये 'स्व' चा अर्थ लागतो. 'स्व' चा अर्थ म्हणजे तुमच्या आत्म्याचा अर्थ लागतो. मूलाधार चक्रावर श्री गणेशाचे स्थान कसे आहे? त्याच्यात कुंडलिनीचे आवाज कसे होतात आणि कुंडलिनी कशी फिरते ? नंतर प्रत्येक पाकळ्यामध्ये कसे तऱ्हेतऱ्हेचे रंग आहेत आणि ते कशा रीतीने पाकळ्यामध्ये राहतात आणि ते कसे शोषण करुन घेतात वगैरे बरेच आहे. त्याच्यामध्ये आणि ते ज्ञान सगळे तुम्हाला मिळाले पाहिजे आणि ते मिळणार आणि काहीही आम्ही त्याच्यातले लपवून ठेवणार नाही. प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगायला तयार आहोत. पण तुम्हालासुद्धा पार होऊन पुरुषार्थ करायला पाहिजे. जर तुम्ही पुरुषार्थ केला नाही, तर तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. आता पूजेमध्ये काय करावे हा प्रश्न लोकांना असतो. श्री माताजी, श्री गणेशाच्या पूजेला काय करावे?' कारण आम्ही परोक्ष विद्या जाणतो. जे तुम्हाला दिसत नाही, त्याला नानकांनी 'अलख" म्हटले आहे. त्या डोळ्यांनी आम्ही बघतो. तेव्हा आम्हाला सांगायचे आहे, पहिल्यांदा पावित्र्य तुमच्यात आहे का ते बघा. आंघोळ वरगैरे करणे हे तर झालेच. त्याचे काही नाही. ते नाही केले तरी चालेल पण एक मुसलमान सुद्धा श्री गणेश पूजा फार छान करतो. आपल्याला आश्चर्य वाटेल अल्जेरियाचे जवळजवळ मुसलमान सहजयोगी आहेत. तरुण मुले-मुली पार झालेली आहेत. पण त्यातला जो मुख्य आहे, त्याचे नाव आहे श्री जमाल आणि तो श्री गणेश पूजा इतकी सुंदर करतो ते अगदी बघण्यासारखे आहे आणि श्री गणेशाला ठेवून स्वतः त्यांची छान पूजा करतो. म्हणजे सहजयोगामध्ये हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सगळेच येतात आणि त्यापेक्षा त्यांच्या अनेक देवता कशा सहजयोगात आहेत ते दाखवले आहे. पाचशे आता है श्री गणेश तत्त्व आहे. ते आज्ञा चक्रावर आल्यावर श्री ख्रिस्त या स्वरूपात या संसारात आलेले आहेत. देवी माहात्म्य म्हणजेच देवी भागवत जे श्री मार्कडेयांनी लिहिले आहे ते तुम्ही वाचा. त्यातील श्री महाविष्णुवरील वर्णन वाचा. त्यांनी सांगितले आहे २१ ि की, राधेने स्वतःचा पूत्र तयार केला होता म्हणजे जसा पार्वतीने केला होता पण श्री गणेशतत्त्वावर आधारित त्यांनी जो पुत्र तयार केला होता, तो ह्या संसारात श्री ख्रिस्त म्हणून आला. आता ख्रिस्त! कारण राधेने तयार केला म्हणून कृष्णाच्या नावाने तो श्री ख्रिस्त आहे आणि यशोदा आहे तिथे म्हणून येशू आणि अशा रितीने त्यांनी हे जे श्री गणेश तत्त्व आहे त्यांचे जे पूर्णपणे उद्घाटन केले ते ख्रिस्त स्वरूपात केलेले आहे. म्हणून हे लोक जे आपल्याला ख्रिश्चन म्हणवतात त्यांना हे आधी माहीत नाही की हे श्री येशू खिस्त आधी श्री गणेशच होते आणि श्री गणेशतत्त्वाचा हा प्रादुर्भाव आहे आणि तोच आता श्री अकरा रुद्रांमध्ये कसा येणार आहे. पण सांगायचे असे आहे की, 'आज्ञा चक्रावर' श्री गणेश गेल्यावर, जे परशू हातात ठेवून जे मूलाधार चक्रावर श्री गणेश सगळ्यांना थाडथाड मारत होते, ते ह्या ठिकाणी क्षमेचे एक साधन झालेले आहेत. क्षमा करणे हे मानवाचे सगळ्यात मोठे साधन आहे. क्षमा करणे हे साधन असल्यामुळे त्याला हातात तलवार नको. काही नको. नुसती जर त्यांनी लोकांना क्षमा केली, तर त्यांना काहीही त्रास होणार नाही आणि म्हणूनच आजच्या ह्या काळामध्ये, आम्ही सहजयोगामध्ये आपले जे आज्ञाचक्र धरते, तेव्हा सांगतो की, सगळ्यांना क्षमा करा आणि त्यांनी किती फायदा होतो ते अनेक लोकांना माहीत आहे आणि सहजयोगातल्या लोकांनी ते मान्य केलेले आहे आणि त्यांनी पाहिले आहे कारण सगळे काही सहजयोगात प्रत्यक्षात आहे जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुमचे आज्ञाचक्र सुटणार नाही. तुमची डोकेदुखी जाणार नाही व तुमचा ट्युमर खाली येणार नाही. म्हणून क्षमा ही केलीच पाहिजे. कारण जोपर्यंत नाक धरले नाही, तोपर्यंत मनुष्य गोष्टीला तयार होत नाही. म्हणूनच हे सगळे आजार आलेले आहेत असे मला वाटायला लागले आहे. कारण जोपर्यंत माणसाला अगदी कितीही समजावून सांगितले तरी तो एकावर एक आपली शक्कल काढत असतो याला काहीतरी दुसरा अर्थ आहे. तर तुमचा अर्थ अजून लागलेला नाही. तुमचे अजून नेमके तारायंत्रण लागलेले नाही, तेव्हा ते लावून घ्या. 'आधी आत्मसाक्षात्कार करून घ्या' हेच आमचे सांगणे आहे. त्यात काहीतरी शक्कल काढू नका. जे काही विचारांनी, निदानांनी किंवा पुस्तक वाचून होत नाही, ते आतून आले पाहिजे. ते झाले पाहिजे. ही घटना झाली पाहिजे. काही वेळेस इतके महामूर्ख लोक असतात विशेषतः शहरात, खेडेगावात नाही. ते म्हणतात, अहो, आमचे कुंडलिनी जागरण झालेच नाही. बघा, आम्ही कसे?' म्हणजे फारच उत्तम तुम्ही अगदी! काय विचारता? अहो, तुमचे कुंडलिनी जागरण झाले नाही, म्हणजे काहीतरी मोठा दोष आहे तुमच्यात. शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, तो काढून घ्या. ते काही चांगले नाही. स्वच्छ झाले पाहिजे. स्वच्छ झाल्यावरच आनंद येणार आहे, असे मनामध्ये समजून घेतले पाहिजे. म्हणजे सगळे ठीक होईल. आता यापैकी जो अहंकाराचा भाग आहे, तो मात्र श्री गणेशाच्या चरणी आज अर्पण करावा. श्री गणेशाला प्रार्थना करावी की, 'आमचा अहंकार घे.' असे तुम्ही जर त्यांना आज म्हटलेत तर माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट होईल. कारण श्री गणेशासारखा पुत्र सर्वांना असावा असे आम्ही सांगतो आणि त्याच्या नुसत्या नावाने आमचे सबंध शरीर अगदी चैतन्य लहरींनी वाह लागते. अशा सुंदर गणेशाला नमन करून आजचे भाषण संपवते. २२ नव-आगमन CODE. NOS. Lang. Type Speech Title Place Date DVD/HH VCD/HH ACD/HH ACS/HH Mahashivratri Puja Pu Pune 6-Mar-08 218* Shiv Puja Part 1 & 2 Pu 219* Pune 8-9th Mar- 08 Birthday Puja Cele. 2008, Part 1& 2 Easter Puja Pu 20-23rd Mar-08 Chhindwara 221* Pu 222 Nagpur 23-Mar-08 Ramnavami Puja Pu 223* Pune 13-Apr-08 Shri Mahakali Puja - Part I & II H. Sp/Pu 224* 1-Apr-86 Kolkata Maha devi Puja - Part I & I Christmas Puja- Part I & II H/E Sp/Pu 225 Alibag 21-Dec-86 M/E Sp/Pu Pavana Dam 226* 25-Dec-86 Guru Puja Sp/Pu 227* 195* 195 Cabella 1-Aug-99 367 सार्निक कार्यक्रम PP Brahmapuri 31-Dec-89 H/E Shri Rajlakshmi Puja 028 Sp/Pu 149* Delhi 149 7-Dec-96 Navratri Puja Sp/Pu 150 164 164* Cabella 5-0ct-97 Diwali Puja E Sp/Pu 183 183 229* Italy 25-0ct-98 Easter Puja Sp/Pu 199* Istambul 230* 199 25-Apr-99 Shri Ganesh Puja Sp/Pu Cabella 200 231* 200 25-Sep-99 Shri Krishna Puja Sp/Pu 232 211 Cabella 211* 20-Aug-00 Sahastrar Puja Sp/Pu 021* 221* 221 Cabella 6-May-01 Guru Puja Sp/Pu 240 Cabella 240 042* 042 21-Jul-02 Guru Puja Sp/Pu 008 Cabella 124* 4-Jul-04 BHAJAN / MUSIC Title Artist ACD ACS 136 Mahri Nirmal Maa Padharo Mhare Dess Rajasthan Coll. MANHI MAAY (Ahirani Language) Kirti Vispute 137* DEVOTION ( Instrumental) Ajit Kakde 138* E. रा स्वस्तिक खूप संवेदनशील यंत्र आहे. हे स्वस्तिक बाकी काही नाही तर संतुलन दर्शवते. जेव्हा हे उजवीकडून फिरते तेव्हा रचनात्मक कार्य घडू लागतात आणि हे जे तो सर्व काही करतो ते जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा हे उलट दिशेने फिरू लागते तेव्हा हे विनाशाचे कार्य करते. (१७/०६/१९८९) Jai Shri Mataj ---------------------- 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-0.txt चैतन्य लहरी सप्टेंबर-ऑक्टोबर २००८ त आ मराठी ं २० 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-1.txt हि स प सा S०o र क २ * प्रकाशक निर्मल ट्राँसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८ फोन : ०२० २५२८६५३७, २५२८६०३२ मे ।ॐ॥ र) 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-2.txt ৩ अनुक्रमणिका १. श्री महागणेश पूजा - ४ ६ नवरात्र पूजा संदेश २. ८ ३. कुंडलिनी आणि श्री गणेश पूजा रार 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-3.txt श्री महागणेश पूजा गणपतीपुळे, १ जानेवारी १९८६ ां ा ग ०] रंघ आम. आजआम्ही गणपतीपुळ्याला आलो याचे फार माहात्म्य आहे. अष्टविनायकात हे महागणेशाचं स्थान आहे. महागणेश हा पीठाधीश आहे. आणि या पीठावर बसूनच तो सर्व गणेशांचं रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरुतत्त्व मिळालेले आहे. वातावरणातसुद्धा आपण पाहिलं की, समुद्रसुद्धा इतका सुंदर आणि स्वच्छ या गणपतीचे पाय धुतो आहे कारण समुद्र हा गुरु तत्त्व आहे आणि त्या गुरु तत्त्वाने तो श्रीगणेशाचे पाय धुतो. तसेच सर्व सहजयोग्यांचे झाले पाहिजे. गणेश स्तुती झाली, गणेश स्थापना झाली, त्यानंतर महालक्ष्मी तत्त्वाने तुम्ही महागणेश झालेला आहात. ही स्थिती आहे ती लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्क, स्त्री सर्वांना सुलभ मिळू शकते, जर त्यांच्यामध्ये सरळ स्वभाव असला तर. ज्याला आपण सारल्य म्हणतो मराठी भाषेत, ज्याला अबोधिता म्हणतात. innocence ज्याला म्हणतात. ते जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे बाणले जाते, तेव्हा आपल्याला गुरुपद येऊ शकते. कोणताही गुरू ज्याच्यामध्ये ही सरलता, ते भोळेपण नाही तो कधीही गुरू होऊ शकत नाही. तो अगुरू आहे. ज्याचं लक्ष फक्त परमेश्वरी शक्तीकडे आहे तोच होऊ शकतो. गुरू सर्वसाधारण माणसाचं लक्ष हे दूषित आहे. ते स्वच्छ नाही. त्याबद्दल ख्रिस्तांनी सांगितलंय की, तुमच्या डोळ्यामध्ये कोणताही दूषितपणा नसला पाहिजे. त्याचा अर्थ असा की, आमच्या डोळ्यांनी आम्ही कोणत्याही वस्तूकडे पाहिलं की विचारांच काहर माजून जातं आणि भलते सलते विचार येऊन ही वस्तु आपण मिळवावी किंवा ही आपल्याला का मिळाली नाही? त्याने हेवेदावे असे सुरू होतात. कोणत्याही वस्तूकडे बघून विचार आला तर तुम्ही आज्ञा चक्रावर अजून मात केलेली नाही. कोणत्याही वस्तूकडे बघून 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-4.txt निर्विचारिता आली पाहिजे. विशेषकरून जेवढ्या परमेश्वरी संपत्तीत समृद्ध अशा देवी-देवता आहेत त्यांच्याकडे पाहन तरी निर्विचारिता आली पाहिजे. निर्विचारिता आली तर दूषितपणा येणार नाही कारण मनाला दूषित करणारे विचारच येणार नाहीत, मग दूषितपणा कसा येईल. म्हणजे जे ख़रिस्ताने सांगितलं की तुमच्या डोळ्यामध्ये कोणताही दूषितपणा आला नाही पाहिजे इतके स्वच्छ असले पाहिजे. जसे सूर्याचे किरण हे जेव्हा कोणत्याही झाडावर पडतात त्यातली घाण घेत नाही पण त्याला प्रफुल्लित करतात, पल्लवित करतात. इतकंच नव्हे तर त्याच्यामध्ये शक्ती देतात. तसेच एका सहजयोग्याच्या डोळ्यामध्ये तेज असायला पाहिजे की जे या सर्व जगामध्ये अत्यंत शुद्ध वातावरण नि्माण करतील. शुद्ध वातावरणाची आज आपल्याला सगळीकडे गरज आहे. याच्यामध्ये शांती, आनंद आणि परमेश्वराची शक्ति नांदू शकते. नुसतं श्रीगणेशाला भजून होत नाही. आपल्यामध्ये श्री गणेश जागृत झाले पाहिजेत. त्याचा महागणेश झाला पाहिजे. महागणेश झाल्यानंतरच आपल्या देशाचं व आपल्या देशाच्या कारणाने इतर देशांचे भले होणार आहे. आपणच दुसऱ्या देशांचे पुढारीपण करणार आहोत अशी दशा आहे. पण जर आपण हातामध्ये ही जबाबदारी घेतली नाही तर ह्या सबंध विश्वाचे काय होईल ते मला सांगता येत नाही. तरी सर्वांना विनंती आहे की, आपल्या डोळ्यातला दूषितपणा काढून टाकला पाहिजे. त्यासाठी आपल्या सहजयोगामध्ये मंत्र निर्विचाराचा आहे. विचारच येऊ द्यायचा नाही. कोणत्याही गोष्टीकडे बघून जर विचार आला तर 'यं नेति नेति म वचने हे नाही, हे नाही म्हणत जायचे किंवा क्षमा केली, क्षमा केली असं म्हणत गेलं की तो विचार नष्ट होतो. एकदा निर्विचारिता आली म्हणजे दूषितपणा येण्याचा मार्गच खुंटतो. सर्वांनी पूर्णपणे प्रयत्न करावा. डोळे दूषित नसावे. 'ह्या डोळ्याने दूषितपणा येत असेल तर हे डोळे नको असं श्री संत तुकारामांनी म्हटलेले आहे. त्यापेक्षा आंधळाच बरा. तेव्हा एक तऱ्हेने असं म्हटलं पाहिजे की या दृषित गोष्टींपेक्षा जगाचं आंधळेपणच बरं आणि परमेश्वराचं डोळसपण. या दोन्ही गोष्टींची सांगड जेव्हा बरोबर बसेल तेव्हा असं म्हणता येईल की, सहजयोगी आता गुरुपदाला गेलेले आहेत. माझा तुम्हा सर्वांना पूर्ण आशीर्वाद आहे की आज ह्या पुळ्याला जे महागणपतीचे स्थान आहे त्याच्या विशेष कृपेने तुम्हा सर्वांना लवकरच गुरुपद मिळावे. १ ुम] ১৯৭ ९ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-5.txt रथ ल पू. जा कशाप्रकारे करावी? पूजेचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की तुम्ही देवीमुळे मोहून गेला आहात आणि तुम्ही तिची स्तुती करीत आहात. हा बुद्धीचा व्यायाम नाही. तुम्ही खूप करण्यासाठी या सर्व गोष्टी सांगता. जसे तुम्ही कोणावर प्रेम करीत असाल तर त्या व्यक्तीला फक्त खूष करण्यासाठी तुम्ही बोलता त्याप्रकारे तुम्ही देवीशी बोलत आहात. या गोष्टी स्वत:ला व्यक्त करण्यासाठी संतांनी लिहिल्या होत्या की, 'आपण देवी आहात. अशा आहात. तशा आहात. मला मिळणारी काही पत्रेसुद्धा अशी असतात. त्यांच्या भावना पूर्णपणे व्यक्त करणारी, पण हा काही भाषणाचा कोर्स वर्गैरे नाही. ही दृष्टिकोनाची जाणीव आहे. तर पूर्ण भक्तीमध्ये हे सर्व केले पाहिजे. र पूर्ण विनम्रतेने तुमच्या हृदयात ही जाणीव ठेवा. हे प्रार्थनेसारखे व्यक्त स्वरूप आहे. ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना असली पाहिजे. ही काही बुद्धिवाद्यांची चर्चा नाही. ही देवीची प्रार्थना आहे. हा दृष्टिकोन तुम्ही तयार केल्याशिवाय तुम्ही जास्त दूर जाऊ शकणार नाही. हृदयापासून पूर्णपणे ओतले पाहिजे. तुमचे हृदय उघडा. तुमच्या प्रार्थनेमध्ये पूर्णपणे ओता. विश्लेषण करण्यासारखे तिथे काही नाही. हृदयापासून ते आले नाही तर तुम्ही जे बोलता ते फक्त तोंडदेखले आहे. तुमचे हृदय प्रकाशित करण्यासाठी देवीची स्तुती केली पाहिजे. अशा प्रकारे व्यक्त करा की, तुम्हाला या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी सांगत असताना तुम्हाला 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-6.txt श्री माताजींचा नवरात्र पूजा संदेश १९८८, प्रतिष्ठान म ६ २2 त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे. तुम्ही जेव्हा फोटोसमोर ध्यान र करता त्यावेळी फोटो तुमच्या हृदयात ्री ठेवण्याचा प्रयत्न करा, 'आई, मी तुमच्यावर प्रेम करतो. कृपा करून माझ्या हृदयात ये! असे म्हणा. या हृदयामध्ये सर्व बुद्धी आहे. सर्व कर्तृत्व आहे. हृदयातून सर्व काही जन्माला येते, पण तुम्ही हृदय बंद केले तर मेंदू विचलित होतो व तुम्ही हृदयाच्या म बाहेर जाता. हृदय जे आत्म्याचे सिंहासन आहे ते सर्वांना काबूत ठेवते. स्वयंचलित मज्जासंस्था, सिंपथेटिक, पॅरासिंपथेटिक उत्क्रांती ज्ञान, सर्व काही त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तुमचे हृदय तयार करा. 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-7.txt कुंडलिनी आणि श्री गणेश पूजा २२ सप्टेंबर १९७९, दादर, मुंबई आम् जाजच्या हाया नवरात्री, प्रथमदिन शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता पण तो किती महत्त्वपूर्ण आहे! विशेषतः या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या या पुण्यभूमीत, जेथे अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे तेंव्हा श्री गणेशाचे माहात्म्य काय आहे, या श्री अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नाहीत याचे मला आश्चर्य वाटते. कदाचित जे सर्व काही समजत होते किंवा ज्यांना सगळे काही माहीत होते असे जे मोठेमोठे साधुसंत ह्या आपल्या संतभूमीत झालेले आहेत, त्यांना कोणी बोलायची मुभा दिली नसणार किंवा त्यांचे कोणी ऐकून घेतले नसेल पण याबद्दल सांगावे तितके थोडे आहे आणि एकाच्या ऐवजी सात भाषणे जरी ठेवली असली तरीसुद्धा श्री गणेशाबद्दल बोलतांना मला ती पुरणार नाहीत. आजचा सुमुहूर्त म्हणजे घटपूजनाचा. घटस्थापना ही अनादी आहे म्हणजे ज्यावेळेला या सृष्टीची रचना झाली, अनेकवेळा. सृष्टीची रचना एकाच वेळी झालेली नाही तर ती अनेकदा झालेली आहे, तेव्हा आधी घटस्थापना करावी लागली. आता घट म्हणजे काय? हे अत्यंत सूक्ष्मात समजले पाहिजे. पहिल्यांदा ब्रह्मतत्त्व म्हणून जी एक स्थिती असते, तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. त्याला आपण इंग्लिशमध्ये entrophy म्हणू. ह्या स्थितीत काहीही हालचाल नसते परंतु ह्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर परमेश्वराला येते तेव्हा त्याच्यामध्ये ही इच्छा सामावते. ती इच्छा अशी की, आता काहीतरी संसारामध्ये सृजन केले १ ै म न 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-8.txt (८ १४ ि हि ु न ব पाहिजे. त्यांना ही इच्छा का होते. ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते हे समजणे माणसाच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. अशा पुष्कळशा गोष्टी मानवाच्या सर्वसाधारण बुद्धीच्या आकलनाबाहेरच्या आहेत पण जशा आपण त्या सर्व मानून घेतो तसेच हे मानले पाहिजे की, परमेश्वराची इच्छा हा त्यांचा आपला स्वत:चा शौक आहे. त्यांची इच्छा, त्यांना जे काही करायचे आहे ते करत असतात. ही इच्छा त्यांच्यामध्ये विलीन होते आणि ती परत जागृत होते. जसा एखादा मनुष्य झोपावा आणि परत जागृत व्हावा. झोपल्यावर त्यांच्या इच्छा जरी त्यांच्याबरोबर झोपल्या असल्या तरी त्या तिथेच असतात आणि जागृत झाल्या की कार्यान्वित होतात, तसेच परमेश्वराचे आहे. जेव्हा त्यांना इच्छा झाली की, आता एका सृष्टीची रचना करायची, तेव्हा या सर्व सृष्टीच्या रचनेची जी इच्छा, जी आपण म्हणू तरंग आहेत किंवा त्याच्या ज्या लहरी आहेत त्या एकत्र होतात आणि त्या एकत्र झाल्यावर त्या घटात भरल्या जातात. तो मर हा घट म्हणजे परमेश्वर व परमेश्वरांनी इच्छाशक्ति जर वेगळी केली व आपण तसे समजू शकलो तर ते कळेल. आपलेही तसेच असते, पण थोड़ा फरक असतो. आपण आणि आपली इच्छाशक्ति यात फरक आहे. ती प्रथम जन्माला येते. जोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची इच्छा होत नाही तोपर्यंत ती गोष्ट व त्याचे रूपांतर होत नाही. म्हणजे आता हे जे एक आपले मोठे सुंदर जग बनवलेले आहे हे सुद्धा कोणाच्या तरी इच्छेचेच फळ आहे. प्रत्येक गोष्ट इच्छा झाल्यावरच कार्यान्वित होते आणि परमेश्वराची इच्छा ही कार्यान्वित होण्यासाठी त्याच्यापासून वेगळी करावी लागते. तिला आपण 'आदिशक्ती' असे म्हणतो. ही प्रथम स्थिती जेव्हा आली तेव्हा घटस्थापना झाली. ही अनादिकालापासून अनेक वेळा झाली आहे आणि आजही आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा त्या अनादी अनंत क्रियेला आठवतो. म्हणजे आपण ह्या वेळेला (नवरात्र प्रथमदिनी) ती घटस्थापना करतो. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही! लक्षात ठेवा. त्या बैळेला परमेश्वराने जी इच्छा केली, ती कार्यान्वित करण्याच्या अगोदर ती एकत्रित केली. ती एका घटात घातली, तीच इच्छा आज आपण पूजीत आहोत. त्याचे आज आपण पूजन केले. ती इच्छा परमेश्वराला झाली. त्यांनी आज आपल्याला मनुष्यत्वाला आणले. एवढ्या मोठ्या स्थितीला पोहचवले तेव्हा आपले परम कर्तव्य आहे की, त्याच्या ह्याइच्छेला आधी वंदन केले पाहिजे. त्या इच्छेला, आमच्या सहजयोगाच्या भाषेत श्री महाकालीची इच्छा म्हणतो किंवा महाकालीची शक्ती म्हणतो. ही महाकालीची 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-9.txt शक्ती आहे आणि हे जे नवरात्राचे नऊ दिवसाचे (महाराष्ट्रात विशेष करून) समारंभ होतात. ते ह्या महाकालीची जी काही अनेक अवतरणे झाली त्यांच्याबद्दल आहेत. आता महाकाली शक्तीच्या म्हणजे इच्छाशक्तीच्या पूर्वी काहीही होऊ शकत नाही. म्हणून इच्छाशक्ती आदी आहे आणि अंतही तिच्यातच होतो. पहिल्यांदा इच्छेतून सगळे निघते आणि शेवटी ते इच्छेतच विलीन होऊन जाते तर ही श्री सदाशिवाची शक्ति किंवा आदिशक्ती आहे व महाकाली शक्ती म्हणून आपल्यामध्ये ती वावरत असतें. याठिकाणी जर हे परमेश्वर आहे असं समजलं, हे विराटाचे सूत्र असे समजले तर त्याच्यामध्ये डावीकडे जी शक्ती आहे ती आपल्या इडा नाडीतून प्रवाहित असते व त्या शक्तीला महाकालीची शक्ती म्हणतात. हिचा माणसामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव झालेला आहे. प्राणीमात्रामध्ये तितका नाही. आपल्यामध्ये ती आपल्या उजव्या बाजूने डोक्यातून येते. नंतर डावीकडून जाऊन त्रिकोणाकार अस्थीच्या खाली श्री गणेशाचे जे स्थान आहे तिथे जाऊन संपते. म्हणजे महाकालीच्या शक्तीने फक्त सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेशाला जन्म दिला. तेव्हा श्री गणेशाची स्थापना झाली. गणेश हे सर्वात पहिल्यांदा स्थापन केलेले दैवत आहे आणि त्याचप्रमाणे जसे महाकालीचे आहे, तसेच श्री गणेशाचे आहे. हे बीज आहे आणि बीजातूनच सर्व विश्व निघाल्यावर परत बीजातच सामाविले जाते. तसंच सगळं गणेश तत्त्वातून निघून गणेश तत्त्वातच सामावले जाते. गणेश हा सर्व जे काही आहे त्याचे बीज आहे. जे आपल्याला समोर दिसते, कृतीत दिसते, इच्छेत दिसते त्याचे हे बीज आहे. म्हणून श्री गणेश हा सगळ्यात मुख्य देव मानला जातो. इतकेच नाही तर श्री गणेशाचे पूजन केल्याशिवाय, आपण कोणतेही कार्य करू शकत नाही. मग ते शैव असोत, वैष्णव असोत, मग ते ब्रह्मदेवाला मानणारे असोत किंवा आणखी कोणी असोत. सगळे आधी श्री गणेशाचे पूजन करतात. त्याला कारण असे आहे की, श्री गणेश तत्त्व परमेश्वराने सर्वात पहिल्यांदा या सृष्टीत बसविले. श्री गणेश तत्त्व म्हणजे ज्याला आपण 'अबोधिता' म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये innocence म्हणतो. आता हे त्त्व अगदी सूक्ष्म आहे. ते आपल्याला समजत नाही. बाल्यकालात जे लहान मुलांमध्ये वास्तव्य करते, ज्याचा सगळीकडे आपण आविर्भाव पाहतो व त्याचा सुगंध पसरलेला असतो. त्यामुळेच लहान मुले इतकी प्रिय वाटतात असे हे अबोधिताचे त्व आहे. ते ह्या श्री गणेशामध्ये सामावलेले आहे. आता मानवाला हे समजणे जरा कठीण जाते की, असे कसे एका देवतेमध्ये हे सगळे सामाविलेले आहे? पण जर आपण सूर्याला बघितले तर सूर्यामध्ये जशी प्रकाश देण्याची शक्ति आहे, तशीच श्री गणेशामध्ये ही 'अबोधिता' शक्ति आहे. ही जी अबोधितेची शक्ति परमेश्वरांनी आपल्यामध्ये भरलेली आहे, ह्या अबोधितेच्या शक्तिला आपण पूजतो. म्हणजे आम्हीसुद्धा असे अबोध झाले पाहिजे. अबोधितेचा अर्थ पुष्कळांना असा वाटतो की, आपण अज्ञानी झाले पाहिजे. अबोध शब्दामध्ये अर्थ असा आहे की, जो एक भोळेपणा एखाद्या लहान मुलात असतो किंवा निरागसता असते, तो भोळेपणा किंवा निरागसता आपल्यामध्ये आली पाहिजे. हे किती मोठे त्त्व आहे ते आपल्या लक्षात येत नाही. एक लहान मुलगा समजा खेळायला लागला. आजकालची मुले म्हणजे त्यांचा भोळेपणा विशेष राहिलेला नाही. त्याला कारण आपणच आहोत. आपण दुसऱ्यांना तरी सांगून काय सांगायचे? आम्हीच आमचे धर्म कसे पाळतो आहोत? आम्हीच आमच्या धर्मात कितपत आहोत? त्याच्यावर हे सर्व अवलंबून आहे आणि ते त्याचेच फळ असे समजले पाहिजे. आता हे जे माणसांमध्ये अबोधितेचे लक्षण आहे, ते एखाद्या लहान मुलाला बघून तुम्ही ओळखू शकता. ज्या माणसात 'अ्बोधिता असते, तो कितीही मोठा झाला तरी ती त्याच्यात असते. जसे एखादा लहान मुलगा खेळत असला तर खेळात तो अगदी शिवाजी बनेल, किल्ला बनवेल, सगळे काही करेल, मग ते सगळे सोडून तो निघून जाईल. म्हणजे सगळे करून सोडून द्यायचे. सगळे केले ते सोडून त्याच्याबद्दल तटस्थता ठेवायची. त्याच्यामध्ये काही आपले मन गुंतवायचे नाही. Involvement ठेवायची नाही. हे एक मुलांचे साधारण वागणे असते. तुम्ही कोणत्याही मुलाला काहीतरी दिले, तर ते तो जपून ठेवेल. फार वेळ ते जपून ठेवेल. आणखी नंतर मग थोड्या वेळानी त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. जर तुम्ही त्याला भुलवून ते काढून घेतले, तर त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. पण त्यातल्या त्यात काही काही गोष्टी लहान मुलगा मुळीच सोडत नाही की जे त्याला फारच महत्त्वाचे असते. पैकी एक त्याची आई. त्याची आई तो सोडत नाही. बाकी सगळे काही तुम्ही काढून घेतले तरी चालेल. त्याला ऐश्वर्य समजत नाही, त्याला पैसे समजत नाहीत, त्याला शिक्षण समजत नाही, काही समजत नाही त्याला, फक्त समजते त्याची आई. ही माझी आई आहे. ही माझी जन्मदात्री आहे. तिने मला जन्म दिलेला आहे. हीच माझे सगळे काही आहे. तो आईपेक्षा कोणत्याही गोष्टीला महत्त्व देत नाही. रवींद्रनाथ टागोरांनी एक फार सुंदर गोष्ट लिहिली आहे. एक लहानसा मुलगा बाजारातून कुठे तरी हरवला आणि त्याला लोकांनी पकडलं आणि त्याला विचारलं की 'तुला काय हवं?' तो सारखा रडत होता. त्यांनी त्याला सांगितलं की 'आम्ही तुला हे देतो, ते देतो, घोडा देतो, हत्ती देतो.' तो म्हणे,'काही नाही. मला माझी आई पाहिजे. खायला दिलं तरी खाल्लं नाही. सारा दिवस रडत राहिला. त्याची आई जेव्हा मिळाली तेव्हा मग तो चूप झाला. ' आणि सारखा तो आईसाठी रडत होता. शेवटपर्यंत काही म्हणजे आपल्या सर्वांमध्ये लहानपणापासूनच हे बीजतत्त्व आहे. म्हणून आपण आपल्या आईला सोडत नाही. ती आई आपली जन्मदात्री आई आहे. आपल्याला माहिती असते तिने आपल्याला जन्म दिला आहे. पण त्याशिवाय एक दुसरी आई परमेश्वराने आपल्यामध्ये आपल्याला दिली आहे आणि तीच आई म्हणजे स्वत:मधील ही 'कुंडलिनी' आहे. कुंडलिनी माता, जी आपल्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये वेटोळे घालून परमेश्वराने बसवली आहे. ती आपली आई आहे आणि आपण तिला सारखे शोधत असतो. ०४ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-10.txt ाु २ ान र शा प्ण की ट्र आपल्या सर्व शोधामध्ये मग ते राजकीय असोत, सामाजिक असोत वा शैक्षणिक असोत. कोणत्याही गोष्टीचे तुम्हाला वेड असो, त्या सर्व वेडांच्या मागे तुम्ही ह्या कुंडलिनी आईला शोधत असता. ही कुंडलिनी आई तुम्हाला त्या परमपदाला पोहचविते की, जिथे सर्व तन्हेचे समाधान तुम्हाला मिळते. ह्या आईचा शोध, आईप्रति ओढ, जी आपल्यामध्ये अद्ृश्यामध्ये असते, जी आपल्याला खेचते ती गणेश तत्त्वामुळे जागृत राहते. ज्या माणसाचे श्री गणेश तत्त्व अगदी नष्ट पावलेले आहे, ज्याच्यामध्ये अबोधिता नाही. अबोधितामध्ये अनेक गुण माणसामध्ये दिसून येतात जसे आई, बहीण-भाऊ कितीही मोठे झाले तरी त्यांची पवित्रता ठेवणे, व्यवहारात राहतांना, समाजात राहतांना, संसारात राहतांना, परमेश्वरांनी एक आपली पत्नी आणि बाकी सर्व जगाचे लोक जे कोणी आहेत. त्यांचे आपले पवित्र नाते आहे असे परमेश्वरांनी सांगितले आहे. जर असे तुमच्या व्यवहारात दिसायला लागले तर मात्र मानले पाहिजे की, ह्या मनुष्यामध्ये खरी अबोधिता आहे. ते त्याचे खरे लक्षण आहे. अबोधितेचे लक्षण हे आहे की, माणसाला सगळ्यांच्यामध्ये पावित्र्य दिसते. कारण स्वतःमध्ये पाकित्र्य आल्यामुळे, तो अपवित्र नजरेनी कोणाकडे बघत नाही. आता आपल्याकडे पवित्रता समजावून सांगायला नको. आपल्याकडें माणसाला पवित्रता काय आहे हे माहीत आहे. इंग्लंडमध्ये, अमेरिकेत समजवायला पाहिजे कारण त्यांची डोकी फिरलेली आहेत. पण तुम्ही अजून सुज्ञ आहात. विशेषत: ह्या भारतात तरी देवकृपेने, अष्टविनायक कृपेने म्हणा किंवा आपल्या पूर्वपुण्याईने म्हणा, आपल्या गुरु -संतांनी केलेल्या सेवेमुळे म्हणा या पृथ्वीवर महाराष्ट्र ही एक अशी भूमी आहे की, इथून ही पवित्रता मात्र अजून हललेली नाही. ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्या पवित्रतेचे तुम्ही आज पूजन काढलेले आहे. म्हणजे पूजन करतांना तुमच्यामध्ये ती पवित्रता आहे किंवा नाही इकडे लक्ष दिले पाहिजे. आता आमच्या सहजयोगात ज्यांच्यामध्ये गणेश तत्त्व नाही, त्यांच्यामध्ये पावित्र्य नाही. तो मुळी कामाचा नाही. त्यात आम्ही हात घालत नाही. कारण हा जो गणपती बसवलेला आहे, तिथे तो म्हणजे श्री गौरीचा पुत्र आहे आणि श्री गौरी म्हणजेच आपल्यामध्ये प्रादुर्भाव करणारी जी कुंडलिनी शक्ती आहे ती ही गौरीशक्ती आहे. आज श्री गौरीपूजन आहे आणि आज श्री गणेश पूजन आहे म्हणजे केवढा मोठा दिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्यामध्ये जे श्री गणेश तत्त्व आहे ते श्री गौरीला सांगते की, हा मनुष्य ठीक आहे किंवा नाही म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्था किती सुंदर केलेली आहे ती बघा. वरून ज्या दोन नाड्या येत आहेत इडा आणि पिंगला, ह्या दोन नाड्या आपल्यामध्ये आहेत. पैकी एक महाकाली आणि एक महासरस्वती. ह्या दोन नाड्या आहेत. ह्या महाकालीतूनच महासरस्वती निघालेली आहे. म्हणजे ती क्रियाशक्ती आहे. पहिली ११ उु 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-11.txt पা OIEBANHANGE रा स] श्ी र ी इच्छाशक्ती आहे आणि दुसरी क्रियाशक्ती आहे. या दोन्ही शक्तीतून जे काही आपण ह्या जन्मात केलेले आहे, पूर्व जन्मात केलेले आहे, जे काय आपले सुकृत आहे आणि जे आपले दुष्कृत आहे, या सगळ्यांचा पाढा तिकडे बसून लहानसे एक हे जे श्री गणेश देव आहेत ते घेत असतात. ते बघत असतात ह्या माणसांनी किती पुण्य केलेले आहे. आता पुण्य कशाशी खातात हे आजकालच्या मॉडर्न लोकांना माहीत नाही आणि त्याबद्दल त्यांचा विचारही नाही. लोकांना असे वाटते की, ह्याला काय अर्थ आहे? पुण्य किती आहे? काय आहे? जर ती पापपुण्याची भावनाच नाही, तर पाप आणि त्याचे क्षालन वरगैरे ह्या गोष्टी कळण्यात काही अर्थच राहत नाही. मानवाला पाप आणि पुण्य हा असा भाव आलेला असतो. जनावराला तो नसतो. जनावराला अनेक भाव नसतात. आता समजा एखाद्या जनावराला तुम्ही शेणातून घेऊन गेलात किंवा घाणीतून घेऊन गेलात तर त्याला वास येत नाही. त्याला सौंदर्य कशाशी खातात ते माहीत नाही. तुम्ही मानव झाल्याबरोबर तुम्हाला पाप -पुण्याचा विचार येतो. तुम्हाला समजते की हे चुकलेले आहे. हे पाप आहे हे करू नये. हे पुण्य आहे, हे केले पाहिजे. पाप-पुण्याचा निवाडा आपण करण्यापेक्षा, पाप पुण्याचा सबंध रोखठोक हिशेब श्री गणेश आपल्यात बसून करत असतात. प्रत्येक मानवामध्ये श्री गणेशाचे स्थान आहे आणि ते प्रोस्टेट ग्लँड च्या जवळ असून त्याला आम्ही 'मूलाधार चक्र' असे म्हणतो. त्रिकोणाकार अस्थीला 'मूलाधार' असे म्हटले आहे. तिथे कुंडलिनी आई बसलेली आहे. त्या त्रिकोणाकार अस्थीच्या खाली श्री गणेश आरामात जाऊन तिथे तिची रक्षा म्हणण्यापेक्षा, तिच्या लज्जेचे रक्षण करीत असतात. आता आपल्याला असे माहीतच आहे की, श्री गणेशाची स्थापना श्री गौरींनी कशी केली तिचे लग्न झाले होते, पण अजून पतीशी भेट झालेली नव्हती. त्यावेळी ती आंघोळीला गेली होती आणि आपल्या अंगातला मळ काढून तिने श्री गणेशाला बनविले. आता बघा हातामध्ये सबंध जर व्हायब्रेशन्स म्हणजे चैतन्य लहरी आहेत, तर त्या सगळ्या शरीरालासुद्धा चैतन्य लहरी आल्या असतील आणि हे चैतन्य जर वाहत असेल आणि ते जर श्री गौरी मातेने मळात घेतले, तर त्या मळालाही ते चैतन्य येते. त्या मळाचा तिने गणपती केला आणि तो आपल्या नहाणीच्या बाहेरच्या बाजूला ठेवला. समोरच्या बाजूला ठेवला नाही कारण नहाणीतून सगळी घाण वाहत असते. आपल्याकडे पुष्कळांना माहीत असेल की, नहाणीतले पाणी जेव्हा वाहते तेव्हा त्याच्यावर पुष्कळदा अळूची पाने किंवा कमळाची फुलेसुद्धा लोक लावतात आणि तिथे ती चांगली लागतात. आश्चर्याची गोष्ट आहे की, जिथे फार डबकं असेल तिथेच कमळाची फुले लागतात. त्याचेच उदाहरण श्री गणेशाचे आहे. म्हणजे घरातला सर्वात घाणीचा जो प्रदेश आहे, त्या घाणीवरती हे कमळ लागलेले आहे आणि तो आपल्या सुगंधाने त्या सर्व घाणीला सुगंधित करत असतो. ही जी त्याची शक्ति आहे, ती शक्ती आपल्या आयुष्यातसुद्धा फार मदत करते. आपल्यामध्ये १२ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-12.txt आसपास जी काय बाण दिसते ती ह्या गणेशतत्त्वामुळे सुरक्षितपणे दूर होते. आता ह्या श्री गणेश तत्त्चाने कुंडलिनीचे म्हणजे श्री गौरीचे आधी पूजन करावे लागते. म्हणजे तुमच्या श्री गणेश तत्त्वाने आधी तुम्हाला स्वतःमधील कुंडलिनीचे पूजन करावे लागते. म्हणजे आपल्यामध्ये अबोधिता असायला हवी. आपल्याला आश्चर्य वाटेल की, ज्यावेळी आपले कुंडलिनीचे जागरण होते ्यावेळेला श्री गणेश तत्त्वाचा सुगंध सबंध शरीरात पसरतो. पुष्कळांना विशेषतः सहजयोग्यांना ज्या वेळेला कुंडलिनीचे जागरण होते, तेव्हा सुगंध येतो. कारण श्री गणेश तत्त्व हे पृथ्वी तत्त्वाचे बनविले आहे. ह्या श्री महागणेशातून पृथ्वी बनवलेली आहे. तर आपल्यामध्ये जे श्री गणेश आहेत, ते सुद्धा पृथ्वी तत्त्वातून बनविले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की, सगळे सुगंध पृथ्वीतून येतात. सगळ्या फुलांचे सुगंध पृथ्वीतून येतात. त्यामुळे कुंडलिनी जागरण होतांना पुष्कळांना अनेक तन्हेचे सुगंध येतात. इतकेच नाही तर सहजयोगी मला सांगतात की, श्री माताजी तुमची आठवण आली की, अत्यंत सुगंध येतात व तुमच्या शरीरातून पण असे सुगंध येत असतात. पुष्कळांची कधी कधी गैरसमजूत होते की, श्री माताजी काही तरी सेंट लावतात, पण तसे नाही. जर तुमच्यामध्ये श्री गणेश तत्त्व जागृत असेल तर सुगंध येत असतो. तऱ्हेंतऱ्हेचे सुगंध माणसाच्या अंगातून येत असतात. पण काही आपल्याला माहीत असतील की, असेही जगामध्ये लोक आहेत व जे स्वत:ला साधुसंत म्हणवतात आणि त्यांना सुगंध चालत नाही. स्वतःला परमेश्वर म्हणवतात व त्यांना सुगंध चालत नाही. आपल्याकडे व्यवस्थित लिहिले आहे. कोणतेही देवाचे बर्णन वाचलेत. विशेषतः श्री गणेशाचे, तर तो सुगंधप्रिय आहे. इतकेच नाही तर तो कुसमप्रिय आहे व तो कमलप्रिय आहे तसेच श्री विष्णूंच्या वर्णनात लिहिलेले आहे, श्री देवीच्या वर्णनात लिहिलेले आहे. त्याचा अर्थ असा आहे की, ज्या लोकांना सुगंध प्रिय नाही व ज्यांना सुगंध चालत नाही त्यांच्यात काहीतरी भयानक दोष आहे व ते परमेश्वराच्या विरोधात आहेत. त्यांच्यात परमेश्वरी शक्ती नाही हे अगदी हमखास! ज्या माणसाला सुगंध मुळीच चालत नाही, त्यांच्यात काहीतरी परमेश्वराच्या विरोधातील तत्त्वे बसलेली आहेत हे नक्की. कारण सुगंध पृथ्वी तत्त्वातले महान तत्त्व आहे. योगभाषेमध्ये त्याला अनेक नावं आहेत. पण सांगायचे म्हणजे असे की, जी काही पंचमहातत्त्व आहेत आणि त्यांच्या आधी त्याची जी काय प्राणत्त्वे आहेत, त्या प्राणतत्त्वातला आद्य म्हणजे सुगंध. त्या त्त्वानीच आपली पृथ्वीही झालेली आहे. त्या प्राणत्त्वानेच घडवलेला हा श्री गणेश आहे. तेव्हा श्री गणेशाचे पूजन करतांना पहिल्यांदा आपण स्वत:ला सुगंधित केले पाहिजे, म्हणजे काय की आपापले जीवन हे अती सूक्ष्मातून सुगंधित झाले पाहिजे. बाह्यत: नाही. वरून जितका मनुष्य दुष्ट असेल, वाईट असेल तितकाच तो दुर्गंधी असतो. आमच्या सहजयोगाच्या दृष्टीने असा मनुष्य दुर्गंधी होय. वरून जरी त्याने सुगंध लावला असला तरी तो मनुष्य काही सुगंधी नाही. सुगंध असा असला पाहिजे की, मनुष्याला आकर्षण वाटले पाहिजे. एखाद्या माणसाजवळ जाऊन आपण उभे राहिलो आणि जर आपल्याला त्या माणसाबद्दल सुप्रसन्न वाटले आणि पावित्र्य वाटले तर तो मनुष्य खरा सुगंधित आहे नाहीतर दुसरा असा मनुष्य असेल की, ज्याच्यातून संपूर्ण लालसा आणि घाणेरड्या प्रवृत्त्या बाहेर वाहत आहेत, अशा माणसाजवळ जाऊन जर आपण उभे राहिलो तर बरे वाटणार नाही. परंतु अशा माणसाला बघून काही काही लोकांना बरेही वाटत असेल, तर हे त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीवर अवलंबून आहे. पण ते लोक काही श्री गणेश तत्त्वातले नाहीत. श्री गणेश तत्त्वाचा मनुष्य हा अत्यंत सात्त्विक असतो, पण तरीसुद्धा त्या माणसामध्ये एक तऱ्हेचे विशेष आकर्षण असते. त्या आकर्षणात एवढे पावित्र्य असते की ते पवित्र आकर्षणच माणसाला सुखी ठेवते. आता आकर्षणाच्या कल्पनासुद्धा फार विक्षिप्त झाल्या आहेत. त्या गणेश त्त्वाच्या विरोधात आहेत. त्याला कारण असे की, माणसांमध्ये श्री गणेश तत्त्व राहिले नाही. जर माणसात श्री गणेश तत्त्व असले तर, आकर्षणसुद्धा आपल्या श्री गणेश तत्त्वावर असते. सहजच आहे. जिथे आपले आकर्षण आहे ते तत्त्व आपल्यात असल्याशिवाय तिथे आपले आकर्षण कसे होणार? एक फार प्रसिद्ध मोनालिसाचे चित्र आहे. आपण ऐकलच असेल 'लिओनार्द-द-विन्सी' ने ते काढलेले फार सुंदर चित्र आहे आणि ते पॅरिस म्युझियम मध्ये ठेवलेले आहे. आता त्या चित्राला पाहिलं, त्या बाईला पाहिलं तर ती आजकालच्या मॉडर्न बायकांच्या दृष्टीने आणि ब्युटीच्या ज्या मॉडर्न आयडियाज आहेत त्या दृष्टीने तिला कधीही ब्युटीक्वीन म्हणणार नाहीत आणि तिच्या तोंडावर एक तऱ्हेचे स्मित आहे, ज्याला 'मोबाईल स्माईल ऑफ मोनालिसा' म्हणतात आणि त्या स्माईलवरच लोकांनी हजारो वर्ष मेहनत करूनसुद्धा त्यांना अशा तऱ्हेचे चित्र काढता आले नाही. हे जर प्रसिद्ध चित्र आहे, त्यामध्ये मुख्य कारय असेल तर ते म्हणजे पावित्र्य त्या चित्रात इतके पावित्र्य आहे की ते आकर्षक आहे. पण आजकालच्या आधुनिक काळात. विक्षिप्त आणि विकृत भावनेच्या मागेसुद्धा, मला आश्चर्य वाटते हजारोनी लोक तिथं ते चित्र बघण्यासाठी येतात. जर ते चित्र त्यादिवशी नसेल तर कोणीही आतमध्ये येत नाही. इतकं मोठं म्युझियम आहे पण कोणीही आतमध्ये यायला तयार नाही. जर तुम्ही पावित्र्याच्या गोष्टी केल्या, तर आपले जे मोठमोठाले बुद्धिजीवी लोक आहेत त्यांना मुळीच पटत नाही. त्यांना वाटते ह्या काहीतरी जुन्या कल्पना आहेत आणि ह्या जुन्या कल्पनांवरून हे नका करू, ते नका करू, असे नाही केले पाहिजे, तसे नाही केले पाहिजे अशा रीतीने तुम्ही लोकांना कंडिशनिंग करता आणि तसे करून मग मनुष्य वाईट मार्गाला लागतो. आता सांगायचे म्हणजे असे की, माणसामध्ये पावित्र्य हे पवित्र आईवडिलांच्या १३ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-13.txt रत এ भ सा] संमतीने येते. पहिल्या प्रथम ती आईच जर पवित्र नसली, तर मुलाचे पवित्र असणे फार कठीण आहे. पण एखादा जीव असतोसुद्धा की, अत्यंत वाईट मार्गाला लागलेल्या बाईच्या पोरटीसुद्धा तो जन्माला येतो आणि तो एवढ्यासाठीच येतो की, त्या बाईचा उद्धार करावा आणि स्वत: तो फार मोठा जीव असतो. मोठा पिंड असतो आणि विशेष पुण्यवान आत्मा त्या ठिकाणी जन्माला येतो. म्हणजे असेच की, जसे घाणीत कमळ फुलावे तसा तो तिथे जन्माला येतो असे मी पाहिलेले आहे. लंडनला विशेषकरून मला फार आश्चर्य वाटलं अशी काही लहान मुलं आहेत की ज्यांच्या आयांना आपण दारातसुद्धा उभं करणार नाही. असे जरी असले तरी ही म्हणजे एखादी अपवादात्मक गोष्ट आहे. स्वभावत: जर आई पवित्र असली तर मुलगा किंवा मुलगी हे पवित्रपणाला फार सोप्या रीतीने पोहोचतात किंवा फार सहजपणे त्यांना पवित्रपणा लाभतो. आपल्याकडे म्हणून आईविरूद्ध गेलेले चालत नाही. एक अक्षरसुद्धा आईविरूद्ध बोललेले चालत नाही. पण अशा किती आया आजकाल आहेत की ज्यांच्यामध्ये हे पावित्र्य आहे. पावित्र्यामध्ये आईचे जे मुख्य असते, ते म्हणजे तिला आपल्या पतीसाठी पहिली निष्ठा असायला पाहिजे. जर श्री पार्वतीला श्री शंकराची निष्ठा नसती तर तिला काही अर्थ आहे का? जरी ती शंकराच्या वर शक्तीशालिनी असली. श्री पार्वतीला श्री शंकराशिवाय काहीच अर्थ नाही. ती श्री शंकराहन जरी शक्तीशालिनी वाटली तरी ती शक्ति शंकराची आहे. श्री सदाशिवाची ती शक्ती जरी असली, तरीसुद्धा ती पहिल्यांदा शंकराला शरण गेली आणि तेव्हाच ती शक्तीशालिनी मानली गेलेली आहे. पण ती त्याची शक्ती आहे. परमेश्वराचे किंवा देवतांचे वेगळे असते आणि माणसांचे अगदी वेगळे असते. त्यांना हे समजायचे नाही. त्यांना हे समजतच नाही की, नवर्याचे आणि बायकोचे इतके पटले की, त्यांच्यात दोन भागच नाही. जसा काही चंद्र आणि चंद्रिका किंवा सूर्य आणि सूर्यांचे किरण. असो तसा एकपणा माणसाला समजतच नाही. माणसाला असे वाटते की, बायको आणि नवरा यांच्यात भांडणे ही झालीच पाहिजेत. जर भांडणे नाही झाली तर काहीतरी अनैसर्गिक गोष्ट आहे. अशा रीतीचे एक अत्यंत पवित्र बंधन नव-्यात आणि बायकोत किंवा आपण म्हणू श्री सदाशिवात आणि श्री पार्वतीत होते व त्यांचा पुत्र हा श्री गणेश. श्री पार्वतीने नुसत्या आपल्या पावित्र्याने जन्माला घातला म्हणजे त्यांच्यात तिने बापाचाही भाग बेतलेला नाही. म्हणजे नुसत्या आपल्या पावित्र्याने व आपल्या संकल्पाने तिने श्री गणेशाला जन्म दिलेला आहे. केवढी मोठी गोष्ट आहे तिच्या पावित्र्यात ते संकल्पाने तिने हे सिद्ध करून दिलेले आहे. सहजयोगातसुद्धा फक्त आमचे जे काही पुण्य असेल, ते आम्ही पणाला लावलेले आहे. त्या पुण्यांनी ज्या लोकांना व जितक्या लोकांना जन्म देता येईल तितक्यांना द्यायचा असा आमचा, आपल्या जीवनाचा आम्ही हाच एक अर्थ काढलेला आहे. आता इथे १४ ि 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-14.txt माझ्या आधी इतके वतक्ते माझ्याबद्दल सांगून गेले. तुम्ही त्याचा काही विचार घेऊ नका. जोपर्यंत तुम्हाला माझ्याबद्दल काही मिळत नाही, अनुभव मिळत नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टीत अडकू नका. या गोष्टीनी लोकांच्या डोक्यांना आठ्या पडतात. पण तरीसुद्धा कुणी श्री माताजी देवी आहेत वगैरे वरगैरे म्हणणे म्हणजे झाले. तसे म्हणायचे नाही. तसे का म्हणायचे? ते कशाला हवे? असे म्हटलेले लोकांना अगदी आवडत नाही. तुम्ही जर म्हणालात तर त्याचा त्यांना रागच येतो आणि आपल्यापेक्षा कुणी उच्च आहे असे म्हटले की राग येणे अगदी माणसाच्या मनाला नैसर्गिक असते. देवी म्हटले की लोकांना राग येणारच. पण मूर्ख लोकांनी आपण स्वतःला देवता किंवा भगवान म्हटले तरी मात्र लोक त्यांच्यापुढे अगदी डोके टेकतात. त्यांना मग हे अगदी भगवान वाटतात कारण त्यांना भुलवायचे कसे? ती प्रेतविद्या, भूतविद्या व स्मशानविद्या अशा सर्व संमोहनविद्या ते वापरतात. तेव्हा माणसांचे डोके चालत नाही. ते कामातून जाते. त्यांना अगदी नागवे करून जरी नाचवले किंवा त्यांना अगदीच पैशांनी वर्गैरे जरी नागवे केले तरी चालेल. पण त्यांना भगवान म्हणतील. पण जे खरे आहे ते मिळवावे लागते आणि जर ते आपल्याला मिळाले, तर समजेल की, त्याला काय अर्थ आहे आणि का असे म्हणावे लागते? व का असे मानावे लागते? ते मी आज सांगणार आहे. म्हणजे श्री गणेशाला जर तुम्ही देवच नाही मानले तर तुमचे काहीही चालू शकत नाही आणि चालत नाही. पण ते प्रत्यक्षात दिसत नाही म्हणून लोकांना कळत नाही. म्हणजे एक डॉक्टरसुद्धा घरी श्री गणेशाचा फोटो ठेवेल. त्याला कुंकू लावेल अथवा त्याला टिळा लावेल. आणखीन जर त्याला मी सांगितले की श्री गणेश तत्त्व हे तुमच्या शरीरामध्ये स्थित असते. तुम्हाला त्याने शारीरिक फायदा होतो, तर कधीही तो मानायला तयार होणार नाही. जर त्याला मी सांगितले की, तुम्ही श्री गणेशाचे फोटो काढून ठेवा तर ते ही मानायला तयार होणार नाहीत. जर मी म्हटले श्री गणेश तत्त्वाशिवाय तुम्ही चालू हलू शकत नाही तर ते ही गोष्ट मानायला तयार नाहीत. आता देवत्व आपण मानत नाही, पण श्री गणेशाचे सहजयोगात हमखास मानावे लागते. त्याला कारण असे आहे की, जो काही त्रास तुम्हाला जर ह्या श्री गणेश तत्त्वामुळे झालेला असेल तर मात्र तुम्हाला श्री गणेशालाच आळवावे लागते. म्हणजे असे आहे की, तुमच्यामधले श्री गणेश रुसले की, तुमच्यातले श्री गणेश तत्त्व बिघडते व तुम्हाला प्रोस्टेट ग्लॅडचा त्रास व युट्सचा कॅन्सर वर्गरे होतो. आता अनुभवाची गोष्ट सांगते. आमचे शिष्य आहेत अग्निहोत्री म्हणून. त्यांचे नाव राजवाडे पण त्यांनी अग्रीचे मोठे मोठे यज्ञ केले म्हणून अग्निहोत्री. पट्टीचे सहजयोगी आहेत २-३ वर्षांपूर्वी एक दिवस माझ्याकडे आले व म्हणाले, मला काही त्रास नाही, फक्त प्रोस्टेटचा त्रास आहे.' मला मोठे आश्चर्य वाटलं. हा एवढा मोठा गणेश भक्त व सहजयोगी, त्यांना प्रोस्टेट चा त्रास कसा होणार? कारण प्रोस्टेटचा त्रास गणेश तत्त्वाने किंवा त्याच्या ऋ्रासाने होतो. यांच्यावर गणेश रुसण्याचे कारण नाही. कारण हे पट्टीचे सहजयोगी आहेत आणि माझ्यावर त्यांची श्रद्धा आहे व अत्यंत भोळा मनुष्य. मग है गणेश तत्त्व त्याच्या हातात कसे उलटे चालू लागले हे लक्षात नाही आले. मी त्यांना म्हटले, "घ्या की थोड़ा प्रसाद. ' प्रसाद म्हणून चणे असतात. ते दिल्यावर त्यांच्या बरोबरचे म्हणाले, "आज दादा काही खात नाहीत." म्हटलं "का? आज का नाही खात तुम्ही?" म्हणे, "सगळ्यांनी सांगितलयं की संकष्टीला चणे नाही खायचे. म्हटलं हेच चुकलंय. संकष्टी म्हणजे गणेशाचा वाढदिवस. तुम्ही सगळे शिकलेले. कोणी काही सांगितलं तरी बुद्धी वापरली पाहिजे. सतर्कतेने घेतले पाहिजे. संकष्टीला आम्ही उपवास करतो. संकष्टी किंवा गणेश चतुर्थी हे त्याचे जन्मदिवस आहेत. त्याच्या जन्मदिवशी तुम्ही उपवास करता म्हणजे काय सुतक पाळायचे आहे का? एक साधी गोष्ट आहे, मनुष्याचे जे expression असते किंवा मनुष्य दाखवतो दुःख झाले किंवा सुख मिळाले. जर घरात कोणी मनुष्य मेला तर आपण जेवत नाही. आता जर तुमच्या घरी मुलगा झाला किंवा नातू झाला तर तुम्ही पेढे वाटाल, मेजवान्या द्याल, समारंभ कराल. मग श्री गणेश जन्माला आले तर तुम्ही उपाशी बसाल, तर मग होणारच प्रोस्टेट चा त्रास, मग युट्सचा कॅन्सर. तो सुद्धा याच्यामुळे होतो. श्री गणेश तत्त्वाला जर तुम्ही नीट वागवले नाही तर म्हणजे तुमच्या मुलाला नीट वागवले नाही तर, जर तुमच्यामध्ये मातृत्व नसले तर, ह्या सर्व गोष्टीमुळे युट्सचा त्रास होतो. श्री गणेश तत्त्वाचे काही काही फार अगदी पवित्र नियम आहेत. ते जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला युट्रसचा त्रास होतात. पण हा त्रास एक डॉक्टर श्री गणेश तत्त्वाशी लावू शकत नाही. परंतु त्याचा संबंध श्री गणेशाशीच आहे. ते तो लावू शकत नाही. तो इथपर्यंत येतो की, प्रोस्टेट ग्लॅन्ड खराब झाली आहे किंवा फार तर पेल्व्हिक प्लेक्सिस खराब झाले आहे. पण ह्याच्या मागचे जे परमेश्वराचे कार्य आहे किंवा ह्याच्या अंतजर्ज्ञानाचे किंवा परोक्षज्ञानाने जे जाणले जातात किंवा ज्याला म्हटले पाहिजे की बाह्यज्ञानापासून अलग आहे, जे तुम्हाला दिसत नाही, त्यासाठी तुमच्याजवळ अजून डोळे नाहीत, त्यासाठी अजून संवेदना आलेली नाही, अजून तुमची परिपूर्ती झालेली नाही. तेव्हा तुम्ही कसे लक्षात घेणार की, हा त्रास श्री गणेश तत्त्व बिघडल्यामुळे झाला आणि श्री गणेश आमच्यात रागावलेला आहे. तेव्हा त्या दैवताला प्रसन्न केल्याशिवाय आम्ही सहजयोग करू शकत नाही. असे म्हटल्याबरोबर ते डॉक्टर एकदम घसरले. श्री गणेशाचे नाव घेतल्याबरोबर डॉक्टर एकदम घसरतात की आम्ही श्री गणेशाला मानायला तयार नाही. आम्ही फक्त सायन्स मानतो. मग बसा, तुमचा कॅन्सर वगैरे त्रास श्री गणेश तत्त्वाला मानल्याशिवाय ठीक होणार नाही. श्री गणेश तत्त्व बिघडल्यामुळे कॅन्सर होतो. श्री गणेश तत्त्व जर आपल्यामध्ये बिघडले कारण ते श्री गणेश तत्त्व हर एक ठिकाणी प्रत्येक अणू-रेणूत सगळीकडे संतुलन बघत असते. आता आम्ही कॅन्सर ठीक करतो, केला आहे आणि करणार, पण आमचा काही हा धंदा नाही. तेव्हा श्री गणेश त्त्व किती महत्त्वाचे आहे, त्याला किती माहात्म्य द्यावे तेवढे थोडे आहे. जे बितका १५ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-15.txt जर ा हे अत्यंत सुंदर असे चार पाकळ्यांचे श्री गणेश तत्त्व आपल्यामध्ये असते आणि ह्या चार पाकळ्यांच्या श्री गणेश तत्त्वामध्ये मधोमध श्री गणेश जे आहेत ते आपल्यामध्ये बसलेले असतात. म्हणजे आपल्या शरीरात त्याच्यातले एक एक अंग आहे. त्याला अनेक अंगे आहेत. त्यापैकी पहिले अंग म्हणजे मानसिक अंग. मानसिक अंगाचे जे बीज आहे ते श्री गणेश तत्त्वाचे. इच्छाशक्ति म्हणजे जी डावीकडची शक्ति आहे व जी आपल्याला सगळ्या भावना देते. त्या भावनेच्या मुळातच श्री गणेश बसले आहेत म्हणजे ज्या माणसाला वेड लागले असेल, त्याचे श्री गणेश तत्त्वच खराब असले पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की, तो मनुष्य अपवित्र आहे. पण त्याच्या पवित्रतेला धक्का लागला असावा. पवित्रतेला कुणी ठेच मारली, तरच त्याला तसे होऊ शकते. एखाद्या माणसाला जर दुसर्या माणसाने खूप छळले, तरी त्यांचे श्री गणेशत्त्व बिघडू शकते कारण त्याला असे वाटते की परमेश्वर आहे. जर श्री गणेश आहेत तर मग ह्या माणसाचा ते वध का नाही करत? असे प्रश्न त्या माणसाला उभे झाले की, हळूहळू त्याची डावी बाजू खराब होत जाते आणि ती खराब झाली म्हणजे मग त्याला वेड लागायची पाळी येते. आता बघा की श्री गणेश तत्त्वाचे किती संतुलन असते. जर तुम्ही कितीही परिश्रम केले आणि कितीही त्रास घेतला आणि जर बुद्धीने पुष्कळ मेहनत केली आणि पुढचा विचार केला, प्लॅनिंग केले, आजकालच्या लोकांना हा एक आजार लागलेला आहे जरा बुद्धीने विचार करण्याचा. म्हणजे फार विचार सुरू झाला आणि त्या विचारामध्ये जर संतुलन राहिले नाही तर तुमची डावी बाजू एकदम कामातून जाते म्हणजे थिजून जाते आणि उजवी बाजू जास्त वाढ़, लागते. त्यामुळे डाव्या बाजूचे जेवढे रोग आहेत ते श्री गणेश तत्त्व बिघडल्यामुळे होतात. पैकी मधुमेह हा रोग श्री गणेश तत्त्व बिघडले म्हणजे होतो. श्री गणेशाची जी संतुलन व्यवस्था आहे तो रोग ठीक करण्यासाठी आपले लक्ष मधुमेहाकडे श्री गणेश घालतात. असा मनुष्य लगेच काम करु लागतो. त्याचप्रमाणे हृदयविकारसुद्धा. जर तुम्ही अत्यंत डोक्याचे काम केले तर हृदयविकार होतो. कारण श्री गणेशाचे स्वस्तिक आपल्या शरीरात बनविलेले असते, ते म्हणजे दोन वातीसारख्या दिसणाऱ्या शक्ती ह्या एकात एक अशा मिळतात. पैकी डावीकडून जी अशी शक्ती येते, ही म्हणजे महाकालीची शक्ती. उजवीकडून येते ती महासरस्वतीची. मधोमध जिथे त्यांची मिलनबिंदू आहे, तो मिलनबिंदू मात्र महालक्ष्मी शक्तीच्या मधल्या उभ्या रेषेत आहे. डावीकडची सिंपथेटीक नव्व्हस सिस्टीम जी आहे ती महाकालीच्या शक्तीने चालते म्हणजे इच्छाशक्तीने चालते. आता एखाद्या माणसाच्या इच्छाशक्ती विरुद्ध फार कार्य झाले आणि त्याला फार त्रास झाला, त्याच्या कोणत्याही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, तर त्याला वेड लागते. त्याला हार्ट अॅटॅक नाही येणार. हार्ट अॅटॅक त्या माणसाला येईल, ज्याला पुष्कळ पाहिजे. त्याला हे पाहिजे, ते पाहिजे, पुष्कळ प्लॅनिंग पाहिजे. ते करायला पाहिजे, १६ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-16.txt देशकार्याला निघाले. राष्ट्रकार्याला निघाले. काही काही उगीचच. डोक्याचे नुसते भ्रम आहे. काही कुणी कार्य केलेले नाही. केलेले असते तर दिसले असते. नुसती भांडणं लावून ठेवली आपापसात. नाहीतर त्याला हृदयविकाराचा झटका येतो. म्हणजे वर सांगितलेले सगळे रोग माणसाच्या अतिविचारामुळे होतात आणि त्यांचे संतुलन श्री गणेश आणून देतात. हे श्री गणेशाचे कार्य आहे. म्हणून तुम्ही पाहिले असेल की लोक जरी घाईत असले तरी श्री गणेशाचे देऊळ दिसले तर नमस्कार करून घेतात तेवढ्यातल्या तेवढ्यात. सिद्धिविनायकालासुद्धा किती रांग लागते. पण त्याला काही अर्थ आहे काय? ते करून तेव्हाच फायदा होईल, जेव्हा तुमच्यामध्ये आत्मसाक्षात्कार आलेला आहे. जर तुमच्यात आत्मसाक्षात्कार आला नाही तर तुमचे परमेश्वराशी कनेक्शन जुळणार नाही. कोणता खोटा गुरू आहे, कोणता खरा गुरू आहे हे ही तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणजे हे बीज तुमच्यामध्ये जे श्री गणेशाचे आहे ते कुंडलिनी उठल्यावर, कुंडलिनीला सगळ्यात प्रथम श्री गणेश समजून सांगतात व ही कुंडलिनी दाखवते की या गृहस्थाला कसले त्रास आहेत? एखाद्याला समजा लिव्हरचा त्रास आहे, तर ती तिथे जाऊन धकधक करेल. तुमच्या डोळ्यांनी दिसते. जर नाभिचक्र धरलेले असेल किंवा नाभिचक्रावरती पकड असली तर नाभिचक्राच्या जवळ कुंडलिनी जेव्हा उठेल, तेव्हा तुमच्या डोळ्यांनी तुम्ही तिचे स्पंदन अथवा धकधक बघू शकाल. ती त्या ठिकाणी एखाद्या माणसाला जर समजा भूतबाधा असेल, तर सबंध पाठीवरती ती अशी धकधक करेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आम्ही त्याच्यावरती फिल्म घेतलेली आहे. तुम्हाला ती धडपड तिथे स्पष्ट दिसू शकते. कुंडलिनी आमच्यामुळे जागृत होते ह्याच्याबद्दल काही शंका नाही. कुंडलिनी उठते, पण जर श्री गणेश तत्त्व खराब असेल तर श्री गणेश परत तिला खाली ओढून घेतात. ती वरपर्यंत आली तर परत धपकन खाली जाणार म्हणजे प्रथम श्री गणेश तत्त्व तुम्हाला सुधारले पाहिजे. त्यांचे वैशिष्ट्य हे की, कुंडलिनी बर आणून जरी बांधली तरी परत खाली येते आणि त्यांनी काय गणेश तत्त्वाला हानी केली ते मला ठाऊक नाही. त्यांनी तिथे काय हात घातला की काय केलं ते माहिती नाही, पण त्यांचे जे आम्ही पाहिलेले आहे की कुंडलिनी हमखास खाली पडते. पाच वेळा जरी कुंडलिनी उचलली तरी खाली पडते तेव्हा ते काय करत होते म्हणून मी बऱ्याच वेळेला गुरुघंटालाकडे जाऊनसुद्धा आले, बघण्यासाठी, पाहण्यासाठी. करतात तरी काय? तेव्हा मी हे पाहिलेले आहे पुष्कळशा लोकांना की अत्यंत घाणेरडे आणि अनुचित प्रकार घडतात. प्रथम ते गणेश तत्त्व खराब करतात काही ना काही बहाण्याने. ते म्हणतात 'कुंडलिनीला उचलायला आम्हाला खाली हात घालायला पाहिजे.' म्हणजे बघा गणेश तत्त्व लहान बालकासारखे तिथे बसलेले आहे, आपल्या आईच्या लज्जा रक्षणार्थ आणि गणेश तत्त्वाने आपल्या सेक्सला चालना मिळते. तेव्हा जे लोक असे म्हणतात की सेक्सने आम्ही कुंडलिनी जागरण करू म्हणजे ते असं म्हणू लागले की गणेशाचा वाईट संबंध त्याच्या कुंडलिनीशी म्हणजे त्याच्या आईशी लावतो. त्या तिथे बसलेला आहे. त्या मार्गाने कोणी गेले तर तडाखा मारतो. आमच्याकडे पुष्कळ मंडळी आली आहेत सांगायला की 'माताजी, आमची कुंडलिनी जागृत झाली'. म्हटलं 'असं का? म्हटलं काय होतय?" कुंडलिनी जागृत झाली म्हणजे हातात थंड बारा यायला पाहिजे. पण त्यांच्या गळ्याला सबंध मोठमोठाले फोड आले आणि त्यातून सारखं पाणी निघतं. काही लोकांच्या अंगात कमालीची गरमी असते. दिल्लीला एका माणसाने मला तीनदा तार केली की 'माताजी, माझी कुंडलिनी जागृत झाली मी काय करू?' तेव्हा मी मुंबईला होते. म्हटलं त्याला तार करा आणि बोलवून घ्या. पण मी तिथून दिल्लीतून निघाले आणि तो तिथे पोहोचला. तर माझ्या वहिनी सांगत होत्या तो सारखा इथून तिथून धावत असायचा. जसे काही त्याला हजार मुंग्या किंवा विचू चावले आहेत. इथून तिथून धावत असायचे. दिल्लीला एक गृहस्थ आहेत डॉ.बत्रा म्हणून. ते असेच एका प्रोग्रॅमला आले होते. ते म्हणाले, 'श्री माताजी, महिन्यापासून मी असा छळला गेलोय. मला विंचू चावून राहिले आहेत. माझी कुंडलिनी जागृत झाली आहे.' तेव्हा मी म्हटले बसा दोन मिनिटं, तरी त्यांना अगदी धीर धरवेना. तेव्हा मी त्यांच्याजवळ गेले व पाच मिनिटांत त्यांना शांत केले. कारण ही पृथ्वी. ते जमिनीवर उभे होते. तुम्ही आज जमिनीवर बसलात. मला फार आनंद झाला. आज अगदी बरोबर सबंध योग जुळलेला आहे. त्या पृथ्वी मातेने त्यांची सबंध उष्णता ओढून घेतली. आता तुम्ही कसे पृथ्वी मातेला सांगणार की, हे पृथ्वी माते, तूमाझी सबंध गरमी ओढून घे. ओढूनच नाही घेणार ती, पण सहजयोग्यातील ती ओढून घेते. त्याला कारण असे आहे की, एकदा ते श्री गणेश तत्त्व तुमच्यात जागृत झाले तर तेच तत्त्व या पृथ्वीत असल्यामुळे, त्याच तत्त्वावर ही पृथ्वी चालत असल्यामुळे ती अगदी ओढून घेते व म्हणूनच आपल्यामध्ये ते तत्त्व जागृत ठेवले पाहिजे व ते पावित्र्य ठेवले पाहिजे माणसाने. इतकेच नाही तर सहजयोगामध्ये मग तो सहजयोगी जो पावित्र्याचा पुतळा व त्याला चालवणारा जो राजा श्री गणेश आहे. त्या देशामध्ये (शरीरामध्ये) जो राज्यकर्ता आहे. अशा श्री गणेशाला 'त्रिवार' नमस्कार करून आणि त्याच श्री गणेशासारखे आपल्यामध्ये पावित्र्य आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता ज्या गोष्टी सांगू नयेत आणि जे लोक सांगत आहेत, ज्याबद्दल पुष्कळ वाच्यता झाली आहे आणि अशा रीतीने पुष्कळ तांत्रिकांनीसुद्धा आपल्या देशामध्ये आक्रमण केले आहे. त्यांचे आक्रमण राजकीय नसले तरी इतके अनैतिक आणि इतके घातक आहे १७ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-17.txt की, त्यांचे आपण आज भोग उचलतो आहोत या तांत्रिकांनी सगळा अतिशय घाणेरडेपणा सहाव्या शतकांत केला. त्याला कारण असे की, त्या वेळचे राजे म्हणजे फार खुशालचेंडू अशा लोकांच्या पैशावरती तांत्रिकांनी चैन केली. जास्त पैसा झाला म्हणजे मात्र हेच होते. आधी पहिले श्री गणेशतत्त्व खराब करा. पैसा जर अती झाला म्हणजे तो श्री गणेश तत्त्वाच्या मागे लागतो. तरुण मुलींच्या मागें लागणे लहान अबोध मुलींच्या मागे लागणे ते त्यांच्यात श्री गणेश तत्त्व झोपल्याचे द्योतक आहे. हे तांत्रिक लोकसुद्धा काय करतात. त्यांच्यातील तेच आहे की कोणतीही अबोधिता दिसली की त्याला हाणायचे. कुणीही अबोध मनुष्य दिसला की त्याला मारायचे. आपलीच अबोधिता खतम करुन घ्यायची. यावरून असे दिसते की, हे विलासी लोक परमेश्वरापासून दूर राहिले. तसेच अनेक कर्मठ लोक ज्यांनी परमेश्वराकडे जाण्याचा आटोकाट प्रयत्न करून परमेश्वर मिळविलेला नाही. आपल्यामध्ये विलासी प्रमाणेच कर्मठ लोक फार आहेत. कर्मठता आपल्यामध्ये कमी नाही. महाराष्ट्रात तर फारच कर्मठता आहे. म्हणजे सकाळी त्रेसष्ट वेळा हात धुतले पाहिजे. कुणी सांगितले माहीत नाही. त्या बाईंनी जर बासष्ट वेळा हात धुतले आणि त्रेसष्ट वेळा हात धुतले नाही तर रात्रभर तिला झोप येणार नाही. काहीतरी अमूक इतक्या वाती वळल्याच पाहिजे. अमुक लाख जप केलाच पाहिजे, पण जे करायला पाहिजे ते मात्र होत नाही, म्हणजे वाती वळायच्या आणि त्या वेळेला आपल्या सुनेच्या किंवा मुलीच्या काहीतरी वाईट गोष्टी सांगत बसायचे असे आपल्याकडे प्रकार आहेत. त्यापैकी सांगायचे म्हणजे असे की, सहजयोग हा अशा लोकांत रुजणार नाही. येऱ्यागबाळ्याचे काम नाही. श्री रामदासांनी सगळी आमच्या कार्याची पूर्वपीठिका सांगितली आहे. जर तुम्ही दासबोध वाचला तर आम्हाला मुळीच तुम्हाला काही सांगायला नको. त्यांनी हे सगळे सांगून ठेवलेले आहे आणि तेच खरे आहे. ज्या माणसामध्ये ती कुवत असते आणि जो खरोखर त्या पट्टीचा असेल, त्याच माणसाला खरोखर सहजयोग साधेल. सगळ्यांना साधत नाही. म्हणजे व्हायब्रेशन्स येतील. पार व्हाल. पण परत गेले कामातून. अशा आम्ही हजारो लोकांना व्हायब्रेशन्स दिली. या मुंबई शहरातच निदान दहा हजार लोकांना तरी व्हायब्रेशन्स दिली आहेत. पण किती लोक त्यातले खरोखरच पुढे आले? कारण लोकांची दृष्टीच मुळी उलटीकडे जाते. एक आमचे गुरू आहेत ते आम्हाला मानतात सुद्धा, ते आम्हाला म्हणत होते गाढवांना गाढवांचेच काम दिले पाहिजे. तुम्ही कशाला रियलायझेशन देत बसता? तुम्हाला इतकी काय गरज पडली आहे? म्हटलं गरज नाही पडली, वेळ आली आहे तशी. जर आता सहजयोग झाला नाही तर हा परमेश्वराच्या घरचा निवाडा आहे. हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आता चालायचे नाही असे. आताच तुम्ही पार होऊन घेतले पाहिजे. पुढे जे काही होणार आहे तिथे पुन्हा संधी मिळणार नाही. पुढे काय होणार आहे? त्यावेळी १८. 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-18.txt 'एकादशरुद्र' येणार आहेत. एकादशरुद्र म्हणजे अकरा रुद्र. एकच रुद्र ह्या सबंध विश्वाला संपविण्यासाठी समर्थ आहेत. पण जेव्हा अकरा रुद्र येतील तेव्हा तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाहीत. ते अगदी सबंध संपवून टाकतील. त्याच्या आधी ज्या लोकांचा निवाडा व्हायचा आहे, तो निवाडा आताच सहजयोगाने झाला पाहिजे आणि लोकांनी घेतला पाहिजे. पण बहुतेक लोकांचे असे असते की लहान लहानशा गोष्टीत लोक बिथरतात आणि लहान लहानशा गोष्टीवरून निघून जातात. पैकी जर आम्ही एखादे पैसेबिसे घेत असतो आणि एखादी भोंदुगिरी वरगैरे केली, तर लोकांना जास्त आवडेल. म्हणजे मनुष्याच्या अहंकाराला पुष्टी दिली तर मनुष्य यायला तयार असतो. पण सहजयोगामध्ये हे सांगायचे झाले तर हे सगळे काही परमेश्वराचे कार्य आहे. हे सहज घडते त्याला पैसा लागत नाही. एका फूलातून जसे फळ निघते तसेच तुमचे सुद्धा होणार आहे आणि जसे तुम्हाला नाक, डोळे, तोंड आणि ही मानवस्थिती आलेली आहे, तसेच अतिमानव स्थिती परमेश्वरच तुम्हाला ही एक स्थिती म्हणून देत आहे. हे दान आहे परमेश्वराचे. परमेश्वर तुम्हाला देणार आहे. तुम्ही या बाबतीत काही बोलू शकत नाही. ही भूमिका मानायला मनुष्य मुळी तयार होऊ शकत नाही. त्याला एवढा अहंकार झालेला आहे. त्याला वाटते डोक्यावर जोपर्यंत मी दहा दिवस उभा राहू शकत नाही, तोपर्यंत मला काही मिळणारच नाही. आधी हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्या परमेश्वरांनी अशा अनंत गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्या आपण काहीही करू शकत नाही. कोणतेही जिवंत कार्य आपण करू शकत नाही. जिथे आपण करू शकत नाही, तिथे आपण अतिमानव तरी कसे होऊ? तोच करणार. पण एवढेच होते की, पार झाल्यावर फक्त मनुष्य योनीतच मनुष्याला समजते की, आपण पार झालो, ही पहिली गोष्ट. दुसरी त्याच्यात जी शक्ती येते की, ज्यामुळे तो दुसऱ्यांना पार करू शकतो. त्याच्यातून ती शक्ती वाहते. तो एक-एक असा अनेक होऊ शकतो. म्हणजे त्याला देवत्व प्राप्त होते. तो स्वत: देवत्वात येतो. आता असे पुष्कळसे लोक आहेत. ज्यांनी चांगले चांगले गुरू वरगैरे केलेले आहेत. गुरू मोठमोठाले आहेत, पण त्यांच्या शिष्यांमध्ये देवत्व आलेले मी पाहिलेले नाही. त्यांच्यात परिवर्तन झालेले नाही. ते जिथे आहेत तिथेच आहेत. जरी झाले तरी, शिष्य भयामुळे किंवा श्रद्धांनी पूर्ण अजून ते घटीत झालेले नाहीत. ती घटना घडलेली नाही. ते परिवर्तन आतून झालेले नाही. म्हणजे यांचा जर गाभाच ठीक करायचा असला किंवा फुलाचे फळ करायचे म्हटले म्हणजे सबंधच बदलते. अशी स्थिती मात्र कोणाला आलेली नाही, तेव्हा सांगायचे असे आहे की, त्यासाठी आपले श्री गणेश तत्त्व जागृत व्हायला पाहिजे. त्याला आपण आधी सांभाळले पाहिजे. आजकालच्या काळामध्ये नाना तऱ्हेच्या जाहिराती पाहतो व वाचतो आणि काही जाहिराती म्हणजे सबंध अश्लीलपणा आणि सबंध अपवित्रपणा त्यात भरलेला व हे जे आता शहरामध्ये झाले आहे. ते खेड्यात पण गेले आहे. आता त्या अपवित्रतेने त्यांचा सर्वनाश झालेला आहे. त्यामुळे काही इतक्या दुःखात पडले की, आता रात्रंदिवस ह्याच योजना करत बसलेत की, आता आम्ही आत्महत्या कोणत्या प्रकारची करावी. ही त्यांची स्थिती आलेली आहे. तुम्ही त्या मार्गाला जातांना आपणच विचार करून बघितला पाहिजे. तसेच रुढिप्रिय लोक. प्रत्येक गोष्ट आपण का हे सगळे करत आहोत. आपण मानवस्थितीला आलो आहोत, तर याचा अर्थ लावला पाहिजे. आयुष्यभर तेच तेच करण्यात काही अर्थ नाही. जसजशी मंडळी परमेश्वराला तत्त्वत: सोडून निघाली तसतशी ही मंडळी परमेश्वराच्या नावाला नुसती चिकटून आहेत. सकाळपासून देवाला दिवा दाखवला, घंटी मारली की चालले. त्या रितीने वागणारे किंवा जे मी काहीच्या कर्मठपणाबद्दल सांगितले, अशा तऱ्हेची जी कर्मठ मंडळी आहेत. त्यांनी समजून घेतले पाहिजे की, अशा तऱ्हेच्या फुकाच्या गोष्टींनी परमेश्वर कदापि मिळणार नाही. परमेश्वर आपल्यामध्ये आहे. तो जागृत केला पाहिजे हा सहजयोगाचा संदेश आहे. जर कुंडलिनी ही आई आणि श्री गणेश ही त्यांची कृती आहे आणि श्री गणेश हे तिचे मुल आहे. आपल्यामध्ये असलेली कुंडलिनी श्री गणेशाच्या नुसत्या हातावर फिरत असते. श्री गणेशाच्या हातात काय असते ते तुम्ही पाहिले असेल. तसेच त्यांच्या पोटावर सर्प बांधलेला असतो किंवा पुष्कळवेळा त्यांच्या एका हातामध्ये सर्प असतो. म्हणजे गणेशाला तसे म्हटले तर चारच हात आहेत पण खरे म्हणजे त्यांना अनंत हात आहेत. जो हातामध्ये सर्प दाखवतात, तीच ही कुंडलिनी, तसेच आमच्या सहजयोग्यांचे. आश्चर्याची गोष्ट की, सहजयोगी हे जे पार होत आहेत, त्यांच्या नुसत्या हातावर कुंडलिनी चढते. ह्यांनी हात असा वर केला म्हणजे दुसरयांची कुंडलिनी वर जाते. म्हणजे आता लहानसा सहजयोगी मुलगासुद्धा कुंडलिनी वर उचलतो. दोन दोन वर्षाची मुले, पाच-सहा महिन्यांची मुलेसुद्धा तुम्हाला सांगतील, तुमची कुंडलिनी सध्या कुठे अडली आहे ते. तिची काय स्थिती आहे. माझी नात सात-आठ महिन्याची होती. तेव्हा हे श्री मोदी माझ्याकडे आले होते आणि त्यांचे आज्ञाचक्र धरलेले होते. तर बोलता बोलता तिला काही समजेना. ती अशी रांगत होती तरी तेवढ्यात ती हातामध्ये माझा कुंकवाचा करंडा घेऊन आली आणि त्यांच्या कपाळाला कुंकू लावले आणि त्यांचे आज्ञाचक्र तिने सोडवून टाकले. सारखी तिला हीच आवड असते. तेच मी माझ्या इतर सहजयोग्यांच्या लहान-लहान मुलांमध्ये पण पाहिलेले आहे. कित्येक जन्मजात पार आहेत. जन्मजात, म्हणजे केवढी मोठी ही गोष्ट. म्हणजे साक्षात जन्मजात पार मंडळी आज संसारामध्ये जन्माला येत आहेत. त्यांच्यासाठी संन्यास घ्यायला नको. संन्यास वरगैरे घ्यायची ज्याला गरज वाटते त्याला मात्र अजून पार होता आले नाही. पार झाल्यावरती तुम्ही आतून आपोआप सुटत जाता. असे सुटत गेल्यामुळे बाहेरचा संन्यास काही घ्यायला नको. संन्यास घेतला म्हणजे आतून घेतला असला, तर त्याचे प्रदर्शन व जाहिराती १९ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-19.txt न हि क।।। बा लावायची काय गरज आहे? जर तुम्ही पुरुष असला, तर चेहऱ्यावर बघूनच लोक सांगतील हा पुरुष आहे की बाई. त्याच्या काय जाहिराती लावून फिरता की काय आम्ही पुरुष आहोत. आम्ही बायका आहोत. तशातलाच हा प्रकार आहे की संन्याशी तुम्ही मनाने झालात खूप काहीतरी असले तरी आतून ह्या देहात ऐहिक, पारमार्थिक सुख, समाधान वरगैरे सहजयोगामध्ये सहज गाठता येते. त्याला संन्यास वरगैरे घेण्याची काहीही गरज नाही. श्री शंकराची जी स्थिती आहे किंवा श्री शंकरांनी जी स्थिती प्राप्त करून घेतली आहे त्याला जसे श्री गणेश निर्माण करावे लागले तसे तुम्हाला सुद्धा ते श्री गणेश निर्माण करायला पाहिजे. आता आपल्यामध्ये लोकसंख्या सुद्धा हिंदुस्थानात जास्त आहे असे म्हणतात. मी म्हणते इतर कुठे वाढावी लोकसंख्या. इंग्लंडला कमी होते, जर्मनीला कमी होते, अमेरिकेला कमी होते कारण तिथे कोणी शहाणा जन्माला येणारच नाही. सगळे आपल्या इथेच येणार कारण तिथे जर मुलांना प्रत्येक आठ दिवसामध्ये इंग्लंडला आई-वडील दोन मुलांना मारत असतात. हे तिथले स्टॅटिस्टिक्स आहे तर कोण शहाणा तिथे जन्माला येईल. या सगळ्यांचा मूर्खपणा आपण सहन करतो आहे आणि आपल्याला दूषण लागते आहे. ही मुलं दुसरीकडे जन्माला येणारच नाही कारण इतकी वाईट स्थिती आहे मुलांची. आजच एक लहान मुलगा माझ्याकडे आला व म्हणाला, दुडूदुडू धावण्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे?' म्हटलं त्यांच्याजवळ कुठून असणार! लहान मुलांना बघतात तरी का ते धावतांना. आपल्याकडे दुड़दुडू धावणे हा वात्सल्य रस. आपल्याकडे श्रीकृष्णाचे वर्णन वाचावं अथवा श्रीरामाचे लहानपणाचे वर्णन वाचतांना अगदी कौतुक वाटते. कुठेही तुम्हाला श्री येशू ख़िस्ताचे लहानपणाचे वर्णन मिळणार नाही. फक्त आपले रेव्हरंड टिळक होते त्यांनी मात्र 'हीच अंगुली मुखी घालूनी, मधू गोष्टी वदसी' वगैरे वर्गैरे असं लहान मुलांचे वर्णन केलेले आहे कारण त्यांच्या हृदयामध्ये भारतीयता असल्यामुळे त्यांनी ख़रिस्ताचेसुद्धा लहानपण कसं आहे त्याचं वर्णन केलं आहे. पण तुम्हाला कुठेही 'दुडूदुडू धावणे' ह्याला इंग्लिश भाषेमध्ये शब्द मिळणार नाही. मलासुद्धा समजेना की याला कसं समजून सांगावं कारण लहान मुलांचे जे अंगभाव आहेत, अंगविक्षेप आहेत, जसं बाळसं धरणं आपण म्हणतो, त्याला काय इंग्लिश भाषेत काही अर्थ नाही. उलट ते म्हणतात की, मुलांनी फॅट नसावं, थीन असायला पाहिजे कारण आत्तापासून सिनेमा नट त्यांचे आदर्श, अशा रीतीच्या नवीन नवीन कल्पना काढून त्यांच्यामधील अबोधिता आहे ती काढून घेतली आहे. आणि ते आपण करू नये आणि त्यांच्यापासून आपल्याला घेण्यासारखे काही नाही. लहान मुलांना जन्मल्याबरोबर आपल्याला आश्चर्य वाटेल, मला असंच वाटत होतं तुमच्यासारखे, लहान मूल जन्माला आल्यावर, त्याला दुसर्या खोलीत टाकून देतात आणि कुत्रे आणि मांजरी मात्र आपल्या बेडरुममध्ये ठेवतात. ३ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-20.txt जेव्हा माझ्या मुली येणार होत्या, त्यांची मुलं येणार होती तर आमच्या साहेबांच्या सेक्रेटरी, त्या बऱ्याच म्हाताऱ्या बाई आहेत. त्यांना मुलंबाळे काहीच नाही, त्या मला म्हणाल्या,'तुम्ही अपसेट असाल?' म्हटलं 'अपसेट कशाला? मला तर खूप आनंद झाला आहे मुलं येणार आहेत म्हणून.' 'नाही' म्हणे 'तुमचं घरंबिरं घाणेरडं होईल.' म्हटलं 'होऊ दे बाण.' आमच्याकडे असे विचार सुद्धा डोक्यात येणार नाहीत. म्हणजे तुम्ही गणेश तत्त्वाकडे लक्ष दिले नाही तर 'इगोईझम' येतो. त्याला भयंकर अहंकार येतो. मोठे राजकीय जे नेते असतात त्यांचे चारित्र्य आपण पाहिले तर झिरो, त्याला कारण है. कारण इगो मनुष्याला आला की तो उजव्या बाजूने वाढत जातो आणि उजव्या बाजूने वाढल्यामुळे मनुष्याला इगो येतो आणि इगो आल्यामुळे श्री गणेश तरी काय किंवा श्री गणेश तत्त्व तरी काय? पवित्रता म्हणजे काय? मीच म्हणजे सर्व काही आहे असे तो समजतो व त्यांच्यातले हे श्री गणेश तत्त्व नष्ट पावते, पण त्यातले एक सुंदर उदाहरण म्हणजे संन्यास घ्यायचा आणि लग्न करायचे नाही. घराच्या बाहेर राहायचे, आणखी कुणाशी संबंध ठेवायचा नाही. ते सुद्धा हे दुसरें लोक आहेत. श्री गणेश त्त्व जर आपल्यात जागृत असले तर संसारात राहुनच परमेश्वर मिळवता येतो आणि जर देवत्व मिळवायचे असेल तर संसारात राहिले पाहिजे. ब्रह्मर्षि पद मिळू शकेल, जर तुम्ही अगदी फारच कडक अगदी तीव्र वैराग्य आचरले तर. पण मला असे आता वाटायला लागले आहे की, ब्रह्मर्षीसुद्धा एवढे मोठे पोहोचलेले आहेत, मी यांना ओळखते, पुष्कळसे लोक आहेत पण ते आता काही करायला तयार नाहीत. त्यांना एवढी आंतरिकता नाही आणि ते इतकी मेहनत करायला तयार नाहीत. मला कधी कधी वाईट वाटते आणि त्यांचे असे मत आहे की, जे हे त्यांचे भक्त आहेत, त्या भक्तांची अजून तयारी नाही. जर मेहनत केली तर आपण तयारी करू शकतो आणि त्याला पुढे आणू शकतो. पुष्कळदा मला असे वाटते की, हे सगळेजण जर आता माझ्या मदतीला आले तर बरे होईल. मला फार मानतात असे एक गृहस्थ आहेत कलकत्त्याजवळ. त्यांचे नाव श्री ब्रह्मचारी म्हणून आहे. आणखी ते फार पोहोचलेले आहेत आणि त्यांनी माझ्याबद्दल एका अमेरिकन माणसाला सांगितले को, श्री माताजी साक्षात् आल्यावर आम्ही आता बघत बसलो आहोत त्यांचे काम. आम्हाला हेच कार्य करायचे आहे व बाकीचे काही राक्षसाचा नाश वगैरे आम्ही मनन शक्तिने करतो आहोत असे सांगत, पण ते गृहस्थ इथे आल्यावर मी त्यांना म्हटले की, 'तुम्ही त्यांना अमेरिकेला घेऊन का नाही जात?' ते अमेरिकेला गेले. परंतु तेथून पाच दिवसातच पळाले आणि मला म्हणाले, मला अशा लोकांना भेटायचे नाही. ते अगदी घाणेरडे लोक आहेत. म्हणजे ह्या ब्रह्मचारीसारखे लोक स्वत: माणसात न राहिल्यामुळे अगदी माणूसधाणे झाले आहेत असे म्हटले तरीसुद्धा तुम्ही फार तर फार त्यांच्या चरणावर जाल. त्यांच्यावर श्रद्धा ठेवाल, त्यामुळे संत साधू आले तर तुमची स्थिती सुधारेल यात शंका नाही. पण मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार कसा होणार? कारण त्यासाठी घाणीतच हात घालावा लागतो मुळी. मुलाला ठीक करायचे, मुलाला सांभाळायचे आहे तर आईला घाणीतच हात घालावा लागतो. जर ती घाण-घाण करत असेल, तर मुलाला स्वच्छ कोण करणार आहे? आणि म्हणूनच हे आईचे कार्य सहजयोगासाठी आम्ही करतो आहोत. आपण सर्वांनी त्यामध्ये न्हाऊन घ्यावे, त्याच्यामधील आनंद उचलावा हीच एक आईची इच्छा आहे. आईची एकच इच्छा असते की, आपल्यात असलेली शक्ती मुलात यायला पाहिजे. जोपर्यंत जनसाधारणांना ज्याचा फायदा होत नाही, जोपर्यंत जनसाधारण मानव त्यांच्यातून काही मिळवू शकत नाही, जोपर्यंत त्यांच्या मुलाला त्यांच्या शक्त्या मिळत नाहीत अशा आईचा उपयोग कारय? अशा आया असल्यापेक्षा नसलेल्या बऱ्या. तेव्हा ज्या व्यक्तीला आई किंवा गुरु मानतात, आपल्यापेक्षा मोठे मानतात, त्यांनी जर स्वत:चा अर्थ लावलेला नाही तर त्यांच्या जीवनाचा तुम्हाला तरी काय आदर्श मिळणार आहे? सहजयोगामध्ये 'स्व' चा अर्थ लागतो. 'स्व' चा अर्थ म्हणजे तुमच्या आत्म्याचा अर्थ लागतो. मूलाधार चक्रावर श्री गणेशाचे स्थान कसे आहे? त्याच्यात कुंडलिनीचे आवाज कसे होतात आणि कुंडलिनी कशी फिरते ? नंतर प्रत्येक पाकळ्यामध्ये कसे तऱ्हेतऱ्हेचे रंग आहेत आणि ते कशा रीतीने पाकळ्यामध्ये राहतात आणि ते कसे शोषण करुन घेतात वगैरे बरेच आहे. त्याच्यामध्ये आणि ते ज्ञान सगळे तुम्हाला मिळाले पाहिजे आणि ते मिळणार आणि काहीही आम्ही त्याच्यातले लपवून ठेवणार नाही. प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगायला तयार आहोत. पण तुम्हालासुद्धा पार होऊन पुरुषार्थ करायला पाहिजे. जर तुम्ही पुरुषार्थ केला नाही, तर तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. आता पूजेमध्ये काय करावे हा प्रश्न लोकांना असतो. श्री माताजी, श्री गणेशाच्या पूजेला काय करावे?' कारण आम्ही परोक्ष विद्या जाणतो. जे तुम्हाला दिसत नाही, त्याला नानकांनी 'अलख" म्हटले आहे. त्या डोळ्यांनी आम्ही बघतो. तेव्हा आम्हाला सांगायचे आहे, पहिल्यांदा पावित्र्य तुमच्यात आहे का ते बघा. आंघोळ वरगैरे करणे हे तर झालेच. त्याचे काही नाही. ते नाही केले तरी चालेल पण एक मुसलमान सुद्धा श्री गणेश पूजा फार छान करतो. आपल्याला आश्चर्य वाटेल अल्जेरियाचे जवळजवळ मुसलमान सहजयोगी आहेत. तरुण मुले-मुली पार झालेली आहेत. पण त्यातला जो मुख्य आहे, त्याचे नाव आहे श्री जमाल आणि तो श्री गणेश पूजा इतकी सुंदर करतो ते अगदी बघण्यासारखे आहे आणि श्री गणेशाला ठेवून स्वतः त्यांची छान पूजा करतो. म्हणजे सहजयोगामध्ये हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सगळेच येतात आणि त्यापेक्षा त्यांच्या अनेक देवता कशा सहजयोगात आहेत ते दाखवले आहे. पाचशे आता है श्री गणेश तत्त्व आहे. ते आज्ञा चक्रावर आल्यावर श्री ख्रिस्त या स्वरूपात या संसारात आलेले आहेत. देवी माहात्म्य म्हणजेच देवी भागवत जे श्री मार्कडेयांनी लिहिले आहे ते तुम्ही वाचा. त्यातील श्री महाविष्णुवरील वर्णन वाचा. त्यांनी सांगितले आहे २१ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-21.txt ि की, राधेने स्वतःचा पूत्र तयार केला होता म्हणजे जसा पार्वतीने केला होता पण श्री गणेशतत्त्वावर आधारित त्यांनी जो पुत्र तयार केला होता, तो ह्या संसारात श्री ख्रिस्त म्हणून आला. आता ख्रिस्त! कारण राधेने तयार केला म्हणून कृष्णाच्या नावाने तो श्री ख्रिस्त आहे आणि यशोदा आहे तिथे म्हणून येशू आणि अशा रितीने त्यांनी हे जे श्री गणेश तत्त्व आहे त्यांचे जे पूर्णपणे उद्घाटन केले ते ख्रिस्त स्वरूपात केलेले आहे. म्हणून हे लोक जे आपल्याला ख्रिश्चन म्हणवतात त्यांना हे आधी माहीत नाही की हे श्री येशू खिस्त आधी श्री गणेशच होते आणि श्री गणेशतत्त्वाचा हा प्रादुर्भाव आहे आणि तोच आता श्री अकरा रुद्रांमध्ये कसा येणार आहे. पण सांगायचे असे आहे की, 'आज्ञा चक्रावर' श्री गणेश गेल्यावर, जे परशू हातात ठेवून जे मूलाधार चक्रावर श्री गणेश सगळ्यांना थाडथाड मारत होते, ते ह्या ठिकाणी क्षमेचे एक साधन झालेले आहेत. क्षमा करणे हे मानवाचे सगळ्यात मोठे साधन आहे. क्षमा करणे हे साधन असल्यामुळे त्याला हातात तलवार नको. काही नको. नुसती जर त्यांनी लोकांना क्षमा केली, तर त्यांना काहीही त्रास होणार नाही आणि म्हणूनच आजच्या ह्या काळामध्ये, आम्ही सहजयोगामध्ये आपले जे आज्ञाचक्र धरते, तेव्हा सांगतो की, सगळ्यांना क्षमा करा आणि त्यांनी किती फायदा होतो ते अनेक लोकांना माहीत आहे आणि सहजयोगातल्या लोकांनी ते मान्य केलेले आहे आणि त्यांनी पाहिले आहे कारण सगळे काही सहजयोगात प्रत्यक्षात आहे जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुमचे आज्ञाचक्र सुटणार नाही. तुमची डोकेदुखी जाणार नाही व तुमचा ट्युमर खाली येणार नाही. म्हणून क्षमा ही केलीच पाहिजे. कारण जोपर्यंत नाक धरले नाही, तोपर्यंत मनुष्य गोष्टीला तयार होत नाही. म्हणूनच हे सगळे आजार आलेले आहेत असे मला वाटायला लागले आहे. कारण जोपर्यंत माणसाला अगदी कितीही समजावून सांगितले तरी तो एकावर एक आपली शक्कल काढत असतो याला काहीतरी दुसरा अर्थ आहे. तर तुमचा अर्थ अजून लागलेला नाही. तुमचे अजून नेमके तारायंत्रण लागलेले नाही, तेव्हा ते लावून घ्या. 'आधी आत्मसाक्षात्कार करून घ्या' हेच आमचे सांगणे आहे. त्यात काहीतरी शक्कल काढू नका. जे काही विचारांनी, निदानांनी किंवा पुस्तक वाचून होत नाही, ते आतून आले पाहिजे. ते झाले पाहिजे. ही घटना झाली पाहिजे. काही वेळेस इतके महामूर्ख लोक असतात विशेषतः शहरात, खेडेगावात नाही. ते म्हणतात, अहो, आमचे कुंडलिनी जागरण झालेच नाही. बघा, आम्ही कसे?' म्हणजे फारच उत्तम तुम्ही अगदी! काय विचारता? अहो, तुमचे कुंडलिनी जागरण झाले नाही, म्हणजे काहीतरी मोठा दोष आहे तुमच्यात. शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, तो काढून घ्या. ते काही चांगले नाही. स्वच्छ झाले पाहिजे. स्वच्छ झाल्यावरच आनंद येणार आहे, असे मनामध्ये समजून घेतले पाहिजे. म्हणजे सगळे ठीक होईल. आता यापैकी जो अहंकाराचा भाग आहे, तो मात्र श्री गणेशाच्या चरणी आज अर्पण करावा. श्री गणेशाला प्रार्थना करावी की, 'आमचा अहंकार घे.' असे तुम्ही जर त्यांना आज म्हटलेत तर माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट होईल. कारण श्री गणेशासारखा पुत्र सर्वांना असावा असे आम्ही सांगतो आणि त्याच्या नुसत्या नावाने आमचे सबंध शरीर अगदी चैतन्य लहरींनी वाह लागते. अशा सुंदर गणेशाला नमन करून आजचे भाषण संपवते. २२ 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-22.txt नव-आगमन CODE. NOS. Lang. Type Speech Title Place Date DVD/HH VCD/HH ACD/HH ACS/HH Mahashivratri Puja Pu Pune 6-Mar-08 218* Shiv Puja Part 1 & 2 Pu 219* Pune 8-9th Mar- 08 Birthday Puja Cele. 2008, Part 1& 2 Easter Puja Pu 20-23rd Mar-08 Chhindwara 221* Pu 222 Nagpur 23-Mar-08 Ramnavami Puja Pu 223* Pune 13-Apr-08 Shri Mahakali Puja - Part I & II H. Sp/Pu 224* 1-Apr-86 Kolkata Maha devi Puja - Part I & I Christmas Puja- Part I & II H/E Sp/Pu 225 Alibag 21-Dec-86 M/E Sp/Pu Pavana Dam 226* 25-Dec-86 Guru Puja Sp/Pu 227* 195* 195 Cabella 1-Aug-99 367 सार्निक कार्यक्रम PP Brahmapuri 31-Dec-89 H/E Shri Rajlakshmi Puja 028 Sp/Pu 149* Delhi 149 7-Dec-96 Navratri Puja Sp/Pu 150 164 164* Cabella 5-0ct-97 Diwali Puja E Sp/Pu 183 183 229* Italy 25-0ct-98 Easter Puja Sp/Pu 199* Istambul 230* 199 25-Apr-99 Shri Ganesh Puja Sp/Pu Cabella 200 231* 200 25-Sep-99 Shri Krishna Puja Sp/Pu 232 211 Cabella 211* 20-Aug-00 Sahastrar Puja Sp/Pu 021* 221* 221 Cabella 6-May-01 Guru Puja Sp/Pu 240 Cabella 240 042* 042 21-Jul-02 Guru Puja Sp/Pu 008 Cabella 124* 4-Jul-04 BHAJAN / MUSIC Title Artist ACD ACS 136 Mahri Nirmal Maa Padharo Mhare Dess Rajasthan Coll. MANHI MAAY (Ahirani Language) Kirti Vispute 137* DEVOTION ( Instrumental) Ajit Kakde 138* E. 2008_Chaitanya_Lehari_M_(Scan)_V.pdf-page-23.txt रा स्वस्तिक खूप संवेदनशील यंत्र आहे. हे स्वस्तिक बाकी काही नाही तर संतुलन दर्शवते. जेव्हा हे उजवीकडून फिरते तेव्हा रचनात्मक कार्य घडू लागतात आणि हे जे तो सर्व काही करतो ते जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा हे उलट दिशेने फिरू लागते तेव्हा हे विनाशाचे कार्य करते. (१७/०६/१९८९) Jai Shri Mataj