चैतन्य लहरी नौहंब-डिब २०७९ ७ जक पाम मराठी ४. १० ा सला के v० ० ० ० ० ० बडी । ्। ा ०० ० ० ० ० C० १ ६GC ए०ड चरणांचा फोटो अहंकार आणि प्रति अहुँकारानै पिडीत लोकांसाठी खूप चांगला आह. १७/७/१९७० छ या अंकात सहजयोग सर्वांना समग्र करतो - १ डायरी - १५ पाऊंड केक - १९ अन्य विषय माताजीचा आई-वडिलांसाठी संदेश- १७ सहजयोग सर्वाना समग् करतो मुंबई, २९ मे १९७६ १ सर्व मंडळींनी माझ्याकडे असे हात करायचे बसल्यावर. सहजयोगाने पार झालेली आपण मंडळी आहात. आणि काही मंडळी पार व्हायला बसली आहेत. पैकी पुष्कळांना आता कुंडलिनी म्हणजे काय, कुंडलिनी योग म्हणजे काय, नानाविध चक्रे जी आपल्यामध्ये कार्यान्वित आहेत त्यांची नावे, त्यावर बसलेल्या अनेक देवता-देवी त्यांच्याबद्दल मी बरीच माहिती सगळ्यांना दिलेली आहे. इतकेच नव्हे पण तुम्ही सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तेव्हा नवीन मंडळींनी आमच्या जुन्या मंडळींकडून त्याच्याबद्दल माहिती घेतली , विचार केला तर उत्तम. आता प्रश्न असा की, सहजयोगामध्ये पार झाल्यावर आम्ही आता करायचे काय? वारंवार लोक मला विचारतात काय करायचं? हा असाच प्रश्न आहे, 'ही आम्ही एवढी कमाई केली माताजी आता करायचं काय ?' कमाई केल्यावर तुम्ही खर्च करा. तुम्ही जेव्हा पैसे कमावता आणि पैसे एकत्र करता किंवा एक ठेवा म्हणून बँकेमध्ये पैसे जमा करता, मेहनत करता, तो ठेवा नंतर आपल्याला वापरला पाहिजे. आता वापरायचा कसा ते मी तुम्हाला सांगू शकते आणि काही मंडळी तो ठेवा फार उत्तम प्रकाराने वापरू शकतात. परत तो जर वापरला नाही तर काय होईल असेही पुष्कळ लोक आज म्हणतात, तेव्हा तो वापरला नाही तर बुवा काय होणार? देवाने आपल्याला प्रेमाने निवडलेले आहे. फार मोठं कार्य आहे जगाचं आणि या फार महान कार्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला हे व्हायब्रेशन्स दिलेले आहेत ते काहीतरी कारणानी दिलेले आहेत आणि ते कारण आपल्याला माहिती आहे की या व्हायब्रेशन्समुळे आपण दुसऱ्याला सुद्धा परमेश्वराच्या साम्राज्यात नेऊ शकतो आणि त्यांनासुद्धा या शांतीचा आनंद मिळू शकतो. इतकेच नव्हे पण सर्वव्यापी परमेश्वराच्या प्रेम शक्तीशी आपण तदुरूप होऊ शकतो. आता प्रश्न असा असतो की ही शक्ती आमच्या हातून वाहत आहे ती जर वापरली नाही, तर संपली नाही पाहिजे असा लोकांचा अट्टाहास आहे, पण आपण जर का म्हटलं की हे झालं नाही पाहिजे, हे झालं पाहिजे वगैरे गोष्टी देवाच्या साम्राज्यात नाहीत. देवाचं साम्राज्य हे सर्वात उच्च आहे. त्यांना आपण ऑर्डर देऊ शकत नाही की 'बाबा, तू असं कर आणि तसं करू नकोस.' तो सगळ्यांच्यावर सर्व जितकी साम्राज्ये संसारात झाली त्या सगळ्यांच्या वर त्याचे साम्राज्य आहे आणि त्याचे कार्य इतके प्रेमळ आहे, अती सूक्ष्म आहे तितकेच ते अत्यंत दक्ष पण आहे. त्यामुळे आपण जर व्हायब्रेशन्स घेऊन आरामात बसलो, 'आम्हाला आनंद झाला. माताजींनी काय अनुभव दिला! आता आम्ही आरामात आहोत,' असं करत बसलो तर तीन-चार महिन्यांनी मी परत आल्यावर 'माताजी, आमचे व्हायब्रेशन्स गेले किंवा आता आम्हाला हातांना आग वगैरे येतेय तेव्हा काही तरी गडबड झाली. व्हायब्रेशन्स तुम्ही घेतलेत आमचे परत,' अशा रीतीने बरेच लोक बोलू लागतात. तर सांगायचं असं आहे की परमेश्वराची दक्षता इतकी सजग आहे तुमच्याबद्दल. विशेष करून, कारण परमेश्वराने तुम्हाला निवडून ठेवलेले आहे. तेव्हा जर तुम्ही हे व्हायब्रेशन्स वापरलेच नाहीत, त्याचा उपयोग जर जनसाधारण लोकांसाठी केला नाही, तर तो परत घेणार. ता तेव्हा हे व्हायब्रेशन्स मिळाल्यावर ते वापरावे लागतात. त्याचा अर्थ असा नाही की लोकांना असे वाटते की माताजींचे म्हणणे असे आहे की आम्ही सगळे सहजयोगाला तुम्ही काही देऊ शकत नाही. काय देणार , देऊन देऊन देणार काय ? तुमच्या जवळ ैकै ३ य] काय आहे ? दगड, धोंडे, माती! सहजयोगाला द्यायचे सांगायचे म्हणजे सहजयोगाला तुम्ही काही देऊ शकत नाही. काय देणार, काहीच नाही. उलट दिल्यावर तो वाढतो आणि 'तुम्ही' इथे जर तुमच्या आतून प्रचंड शक्ती वाहत राहते. ती शक्ती एकदा वाहायला सुरुवात झाली म्हणजे तुम्हाला स्वत:ची कल्पना येते की तुम्ही किती मोठे आहात. तुमच्यामध्ये केवढे मोठे सामर्थ्य परमेश्वराने दिलंय. पण त्याबद्दल मुळीच अहंकार नाही. डोक्यामध्ये आपल्याकडे अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांनी हजारो लोकांना बरे केले असेल, पण त्यांच्या डोक्यातही येत नाही की आम्ही यांना बरे केले की काय केले. बरे केले अहंकाराच्या तर केले, नाही केले तर नाही केले. त्याचे काही त्यांना हे नाही. झाले तर झाले. होत नाही किंवा माताजी, होत नाही. हे हातातनं जातंय, येतंय. काही कोणी असे म्हणत नाही की मी करतोय प्रति की माझ्या हातून होतय की मी असं केलंय, कोणी असं म्हणत नाही. असं जो म्हणायला लागला तो गेला. ज्याला असं वाटतंय की माझ्या हातून हे होतंय तो कामातून गेला. मग अहंकाराच्या रूपाने लोक असं म्हणतात की, 'माताजी, आमची व्हायब्रेशन्स का हो गेली ? आम्ही इतक्या असं वाटू लागलं की लोकांना बरं केलं. अमुक केलं.' तर त्याला कारण असे की तुम्हाला तुम्ही कर्ता. मग तुम्ही आला. तुम्ही इथं आहात म्हणून तर घोटाळा आहे सगळा. 'तुम्ही इथे जर डोक्यामध्ये अहंकाराच्या किंवा प्रतिअहंकाराच्या रूपाने नसता तर प्रश्नच नव्हता. नसता तोच तर आम्ही बाजूला केलाय. तुमचा 'तुम्ही' पणा. आणि तो दूर केला म्हणूनच त्या परमेश्वराशी एकाकार झालात. तिथे 'तुम्ही' आलात, झालं. तर प्रश्नच नव्हता. आता तुम्ही म्हणजे किती गोष्टी आहेत, तुम्ही म्हणजे ' तुम्ही' जे आहात ती गोष्ट नाही. तुम्ही जे नाहीत ते सुरुवातीपासून तुम्हाला वाटतं तुम्ही आहात. म्हणजे कसं काय ? तोच तर तुम्ही जन्माला आलात. एका घराण्यात जन्मला. झालं. हे अगदी आई-वडील इथून आम्ही सुरुवात. आमचं हे नाव तिथून दुसरी गोष्ट. मग हा आमचा देश, मग हे आमचं घर, ही आमची वसती, ही आमची जात, अमकं तमकं, ज्याला मिसआयडेंटिफिकेशन्स म्हणतात. बाजूला केलाय. तऱ्हेत-्हेच्या गोष्टी. जे तुम्ही नाही ते. तुम्ही काय आहात ? तुम्ही परमेश्वराची ती परमशक्ती आहात ही गोष्ट खरी आहे. तुम्ही तेच आहात, पण जोपर्यंत तुम्ही बाहेर आहात आणि सारखं मी अमका आहे, मी तमका आहे या गोष्टी जोपर्यंत आहेत तोपर्यंत ती शक्ती पूर्णपणे प्रकाशित होत नाही. म्हणून मी 'हे' काही नाही आणि मी 'तेच' आहे असं जर तुम्ही मनानं का ४ धरलं, म्हणजे रिअलायझेशन नंतर. आधी जर तुम्ही मनानं धरलं तर त्याला काही अर्थच नाही. कारण तुम्ही ते नाहीच आहात. तेव्हा म्हणण्यात काय अर्थ आहे. तुम्ही बाहेरच आहात. मग तुम्ही जेव्हा आतमध्ये ते प्राप्त कराल आणि जेव्हा ते व्हाल तेव्हा जर म्हणाल मी तेच मात्र आहे आणि बाकी काहीच नाही. तेव्हा ते होऊ शकेल आणि जो असं म्हणेल त्याला मनुष्य परमेश्वराचा साक्षात दूत, त्याच्या आतमध्ये ती शक्ती वाहतच आणि इतकंच नाही तर प्रचंड वेगाने वाहते आणि त्यात अनेक तऱ्हेच्या धारा वाहून तुमच्या सगळ्या प्रश्नांना, सर्व गोष्टींना उत्तरे मिळतात. आता पुष्कळांचे असे म्हणणे आहे की माताजी, आम्ही बघा एवढे तुमच्याकडे आलो पण आमची गरिबी नाही गेली. असे आहेत पुष्कळ. आता हे बघा तुम्ही माझ्याकडे आलात तो उपकार माझ्यावर किंवा देवावर नाही. आपली दृष्टी जराशी बदलायला पाहिजे. आम्ही मुद्दामून वेळ काढून इथे आलो, हे कोणी माझ्यावर उपकार केलेले नाही. हे तुम्ही स्वत:वरती उपकार करत आहात. तुम्ही इथे आलात, तुम्हाला हा अलभ्य लाभ झाला, ही एवढी मोठी गोष्ट मिळाली ही आनंदाची पर्वणी तुमच्यात उतरलेली आहे. हे तुम्हाला जे मिळालेलं आहे, लाभलेलं आहे ते केवढं मोठं आहे! त्याच्यामध्ये तुम्ही देवावरती काही उपकार केलेले नाहीत. पण त्याचे अनेक उपकार आहेत, अनंत त्याचे उपकार तुमच्यावर आहेत की त्याने एवढा मोठा प्रेमाचा साठा तुम्हाला दिला. असं कधीही पूर्वीच्या जन्मात झालेलं नाही, कोणाच्याही. कारण आज ती मंडळी इथे माझ्यासमोर बसलेली आहेत. ती सुद्धा साधु-संतच मंडळी आहेत. साधु-संत मंडळी जी बाहेर भटकत होती ती संसारात रमूनसुद्धा परमेश्वराच्या ठायी लीन झालेली आहेत म्हणून ही गोष्ट घटीत होत आहे. आता दिसायला सहजयोग म्हणजे लोकांना, 'असं कसं होऊ शकते, अहो, त्याला जन्मजन्मांतराच्या सगळ्या कठीण समस्येनंतर होतं हे माताजी, असं काय? कारण आहे त्याला, आम्ही आहोत नं म्हणून. 'ते कसं काय' ते या लोकांना तुम्ही विचारा. त्याबद्दल मला आता सांगायचं नाही पण होतं मात्र खरं आणि झालं आहे. परमेश्वर सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला तयारच बसलेला आहे. खरोखर एका दृष्टीने उपकारच आहेत त्याच्यावर कारण शहाणपण धरून तुम्ही आलात. ते दार उघडे करून बसलात आणि या, या म्हणले, तरीसुद्धा येत नाही हो माणसं ! तेव्हा त्याच्यासाठी काहीही कमी नाही. वाटेल ते तुम्हाला देईल, जे म्हणाल ते तुम्हाला द्यायला तयार आहे. पण तुम्हाला झोळी पाहिजे तेवढी. त्या झोळीमध्ये सामावलं पाहिजे, एवढं आहे त्याच्याकडे द्यायला, पण तुमचे विचार आहेत देण्याच्या बाबतीत त्यामध्ये थोडा फरक पडतो कारण आपल्याला असं वाटतं की आपण देवाकडे गेलो की तर काय सोन्याच्या राशी मिळायला हव्या. देवाला सोन्याचं काय माहात्म्य असणार! तो काय तुम्हाला सोनं म्हणजे जे दगड, धोंडे ते देणार आहे का? काही तरी अमृत देणार आहे. परमेश्वर हा अमृताचा साठा आहे. तो आपल्या मुलांना अमृतच देणार. तो काय दगड, धोंडे देणार आहे का? ज्या दगड, धोंड्यांनी कुणाला, कधीही आनंद प्राप्त झाला नाही ती दगड-धोंड्यांची रास तुम्हाला देऊन करायचं काय? याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गरिबीत ढकलले वगैरे. तसं नाही. पण जे तुमच्याजवळ आहे ते तुम्ही उपभोगीतच नाही. त्याची उपभोग बुद्धी जी आहे ती तुमच्यात नाही. आता बघा, जो श्रीमंत मनुष्य आहे तोही तेच रडतोय, गरीब आहे तो ही तेच रडतोय. आपल्याजवळ जे एक लहानसं वस्त्र आहे ते उपभोगायची, आनंदाची ती शक्ती आहे का ? नाहीये. आपण जर बघतो एखाद्या वस्तूला तर आपल्याला असं वाटतं बघा, यांच्याजवळ एवढी चांगली वस्तू आहे आणि कमावली माझ्याजवळ नाही. बरं स्वत:जवळ आहे ती दिसत नाही. त्याच्याजवळ आहे ती दिसतेय. म्हणजे तुम्ही कशाला? जर तुम्हाला ही उपभोगताच येत नाही तर ही कशाला कमावली? आता ती कमवायच्या मागे. ती मिळाली तर तिसरी कमवायच्या मागे. ती मिळाली तर चौथीच्या मागे. म्हणजे काय की आनंदाची तुमची जी कल्पना आहे ती परमेश्वराची नाही. तो तुम्हाला अशी वस्तू देतो की त्याच्या पलीकडे मग तुम्ही काही मागतच नाही. तुमचं मागणं संपतं तिथे. जिथे सगळा क्षितिजाचाच भाग संपून जातो, त्याच्या पलीकडे काही दिसतचं नाही, अशा मध्यबिंदूत तो तुम्हाला आणून सोडतो. स्वत:च्या का ६ मध्यबिंदूवर उभे राहिल्यावर, तुम्हाला असं दिसतच नाही की बाहेर काय आहे. पण असं दिसतं की आम्ही खोलात स्वत:तच रुतत चाललो आहोत. आनंदाच्या सागरात बुड़त चाललो. सगळं आनंदासाठीच आहे नां, पण मिळतोय का आनंद कुठे! तेव्हा ज्या गोष्टींनी आनंदाचा सागर तुमच्यात येऊन जाईल अशीच वस्तू मिळाल्यावर तुम्ही दुसर्या गोष्टी कशाला मागणार! आपण आनंदच मागतो. जे काही आपण मागतो त्याच्या मागे आनंदाचाच विचार आहे. सुक्ष्म आहे. दिसत नाही पण आहे तो. तेव्हा तोच आनंद जर तुम्हाला मिळाला तर दुसर्या गोष्टी कशाला पाहिजेत ! आता केवढी मोठी गोष्ट आहे सहजयोगाची! परवा मी याच्याबद्दल म्हटलं होतं की सहजयोग ही शक्ती इतकी जबरदस्त आहे, परमेश्वराच्या या शक्तीला प्राप्त झाल्यावर तुम्ही एका नवीन राज्यात येता. एक नवीन साम्राज्य आहे आणि त्या साम्राज्याचा राजा परमेश्वर स्वत: आहे. नंतर तुम्हाला हे सांगायला नको की तुम्ही मराठी भाषा बोलू नका, तुम्ही हिंदी भाषा बोलू नका. तुम्ही एकच भाषा बोला, दहा भाषेत बोलू नका किंवा तुमचं एकच साम्राज्य असलं पाहिजे, सबंध देशाचं एकीकरण करा, त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स घाला. एकच असलं पाहिजे. ते होतच मुळी. कारण तुम्ही एकच आहात. तुम्ही आतून एकच आहात. म्हणजे जी जोडण्याची शक्ती आहे ती आहे, आतमध्ये आहे. तुम्ही जोडलेलं म्हटलं तरी बरोबर नाही कारण तुम्ही अनंतात एकच आहात. तुम्ही जे एकच आहात ते दर्शविणारी जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये जागृत होते. म्हणजे काय आहे? सहजयोग युनिफायर आहे, हा सगळ्यांना एकत्र करतो. इतकंच नाही तर समग्र करतो, म्हणजे ज्याला इन्टिग्रेट म्हणतात. तुमच्यामध्ये इन्टिग्रेशन येतं आपापसात. प्रत्येकाचं जेवढं चांगलं आहे ते दिसायला लागतं. या संस्कृतीत हे चांगलं आहे, त्या संस्कृतीत ते चांगलं आहे. हा त्यांच्यापासून चांगलं घेतो, तो त्यांच्यापासून चांगलं घेतो, अशा रीतीने जेवढं काही चांगलं आहे ते एकीकरण होऊन तुमच्यामध्ये येऊ शकतं म्हणजे सबंध राष्ट्राचे आज जे प्रश्न आहेत भांडणांचे अमुक तमुक हे सगळे निघून जाते. आणि मनुष्य त्या स्थितीमध्ये येऊन उभा राहतो, जिथे तो बघतो की मी आणि दुसरा आहे कोण? अरे, आम्ही सगळे एकच आहोत म्हणजे आहोतच. माझं काय म्हणणं आहे ह्याला असं म्हणा तुम्ही की सेल्फ अॅक्च्युअलायझेशन म्हणजे तो एक अनुभव असतो म्हणजे ती काही लेक्चरबाजी नाही की बघा तुम्ही सगळे बंधू आहात, भगिनी आहात. 'अहो, कसं काय, असं कसं काय म्हणता माताजी तुम्ही? असं कसं काय?' हे बरोबर आहे माझं की तुम्ही बंधु-भगिनी आहात. असं वरून आमचं आरोपण करणं आर्टिफिशयली याला काही अर्थ नाही. त्याला काहीही अर्थ नाही. जबरदस्तीने तुम्हाला म्हटलं की 'नाही, तुम्ही बंधू आणि भगिनी आहात .' तुम्ही म्हणाल, 'माताजी, कसं शक्य आहे हो हे?' पण हे झाल्याबरोबर तुम्ही आहातच. बंधु-भगिनी , सगळं काही म्हणाल ते. म्हणजे ते नातंच वेगळं होऊन जातं. कारण तुम्ही वेगळे राहत नाही. ती शक्ती जेव्हा हातातून वाहू लागते तेव्हा तुम्हाला दुसरा सहजच जाणवतो हा कुठे आहे ? ही कुठे आहे? त्या कुठे आहेत? कुठे त्याचं अडकलंय? आणि सगळे लक्ष कुंडलिनीवर येतं. बाहेरचं लक्ष जातं की कोणती साडी नेसली आहे, कोणते कपडे घातले आहेत, त्यांची कुंडलिनी कुठे अडकली आहे ते पटकन लोक सांगतात मग लहानसं मूल असो की मोठा माणूस असो! कुणी पार मनुष्य असेल व्यवस्थित, तर त्याला आधी कुंडलिनी दिसणार. त्याला हे सगळे काही दिसणार. पण त्यातही आता दोन आणखी पद्धती आहेत त्यांच्याकडे लक्ष असलं पाहिजे. म्हणजे एकीकडे तुम्हाला तुमच्या डावीकडे एक दूसर्या त्हेची व्यवस्था आहे आणि उजवीकडे दुसरी व्यवस्था आहे. डावीकडे जी व्यवस्था आहे त्याला आपण कलेक्टिव्ह सबकॉन्शस म्हणू, म्हणजे सामूहिक सुप्त चेतना आणि उजवीकडे जी व्यवस्था आहे त्याला आपण सुप्राकॉन्शस म्हणू किंवा अतिचेतना म्हणा. त्याला मराठीमध्ये काय शब्द आहे माहिती नाही. म्हणजे इकडे मेलेली अति चेतना आहे आणि तिकडे मेलेली सुप्त चेतना आहे. अशा रीतीने आपल्यामध्ये आणखी दोन व्यवस्था आहेत. त्याला कारण असं आहे की जी मंडळी मरतात, संसारामध्ये त्यांना सुद्धा जागा पाहिजे. पैकी जी मंडळी अशी मेलेली आहेत, जी आळशी, काही कामाची नाहीत ती या बाजूला जातात. त्या बाजूला अशी मंडळी जातात ज्यांनी अतिकर्मीपणा केलेला आहे जगामध्ये. ैकै ७ य] अमुक-तमुक महत्त्वाकांक्षी लोक वगैरे ह्या बाजूला जातात. त्यातली बहुतेक मंडळी परलोकात जाऊन हळूहळू लहान होत जातात आणि त्या दिवसाची वाट बघत असतात, जेव्हा त्यांना जन्म घ्यायचा असतो. त्यातली काही थोर मंडळी असतात ती डिसीजन घेतात, स्वत:च निर्णय करतात की केव्हा जन्म घेऊ, कुठे जन्म घेऊ, कोण माझे आई-वडील? वगैरे त्याबद्दल मी आता जास्त बोलणार नाही आज, पण आहेत. असेही लोक असतात. पण जी मंडळी फार अतृप्त असतात, आजकाल तर कलीयुगात फारच असे लोक आहेत, त्यांची जी एक रांग लागलेली आहे ती सुद्धा मंडळी तुमच्याभोवती आहेत आणि ती अगदी तुमच्या जवळपास असतात. तेव्हा जो मनुष्य त्या किंवा ह्या बाजूला एका मर्यादिच्या बाहेर गेला, करू शकतात हे लोक आजकाल. हे लोक जे करत आहेत ते हेच धंदे करतायत. इकडे तरी ढकलतात किंवा तिकडे तरी ढकलतात. ह्या किंवा त्या गुरु बाजूला. जर तो अतिमध्ये जरासा गेला की तो तिकडे तरी ढकलला जातो किंवा इकडे तरी ढकलला जातो. तेव्हा त्यातली एखादी व्यक्ती तुमच्यात येते. आता महेश योगी आहेत ते हे करतात. ते उजव्या बाजूला ढकलतात. उजव्या बाजूला तुम्ही गेल्याबरोबर काय होतं ? अति महत्त्वाकांक्षी मेलेले लोक जे अतृप्त अथवा आत्मिक ते तुमच्यात उतरतात. म्हणजे त्यांनी त्यांची नावे देवाची ठेवलेली आहेत, म्हणजे बघा हुशारी! आता तुम्हाला सांगितलं 'तुम्हाला कोणाचे, शिवाचे आहे ना , मग शिवाचे नाव घ्या. तुम्हाला कुणाचे रामाचे आहे ना मग रामाचं नाव घ्या.' आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही देवाचंच नाव घेतो पण असा विचार केला पाहिजे की तुमच्या हाक मारून यायला देव काही तुमचा नोकर नाही. तुम्हाला काय अधिकार आहे त्याला बोलावण्याचा? तेव्हा कोणीतरी नोकरपद्धतीचा मनुष्य येणार किंवा जो तुमच्या खाली येऊ इच्छितो किंवा तुमच्या वरती येऊ इच्छितो. तर हे जे लोक आहेत सुप्राकॉन्शसचे त्यामध्ये ही मंडळी आली. आल्याबरोबर सगळं काही बदललं, तुमचा ब्लड काऊंट बदलणार, तुमच्या पद्धती बदलणार कारण त्यांनी तुमचा चार्ज घेतलेला आहे. तुमच्या शरीरातच फरक होऊ लागतो. उलट तुम्ही अत्यंत डायनॅमिक होता. तुमच्यामध्ये असे विचार येऊ लागतील की तुम्हाला आश्चर्य वाटेल. कुठून विचार येतात. समजा एखादा मनुष्य असेल त्याला काही अक्षर माहिती नसेल संस्कृतचं, त्याच्यामध्ये संस्कृतचा मनुष्य आणून बसवला तो संस्कृतमध्ये श्लोक म्हणू लागेल. आमच्या कार्यक्रमातच एक बाई आल्या होत्या. त्या साधारण भांडी घासणार्या बाई होत्या. घाटीण बाई आणि त्या संस्कृतमध्ये बोलू लागल्या. पुष्कळांनी ऐकलं आहे. तेव्हा असं घटित होऊ शकतं आणि त्याच्यात माणसांना अस वाटतं 'वा ! वा! आम्ही केवढे मोठे झालो! आमच्यामध्ये हे आलं ते आलं.' चार-पाच वर्षानंतर त्या लोकांची स्थिती अशी होते, की त्यांचे हातपाय लटलट कापतात. फार तर चार-पाच वर्षे त्या लोकांचं आयुष्य असतं आणि त्याच्यानंतर जिवंत राहणंसुद्धा त्या लोकांना कठीण असतं. सारखे हालत असतात कारण सगळीकडे परमेश्वराचे साम्राज्य आहे. त्याच्यासमोर ते फेस करू शकत नाहीत. ती भुते एकदा अंगातून गेली की सगळं संपते. अंगात असली तरी संपते कारण त्यांच्याही शक्त्या संपतात व यांच्याही शक्त्या संपतात. अशी स्थिती येते. मग या लोकांना काही पर्वा नाही कारण त्यांनी आपले पैसे बघावेत. आता दुसर्या साईडला बघा. अशी माणसं महा आळशी, घाणेरडी, घाणेरडी कामं करणारी अशी तशी असतात. ती तुमच्यात राहतात. ती तुम्हाला घाणेरडी कामं शिकवितात. म्हणजे स्मगलींग करा, अमकं करा. तुम्हाला वाटतं काय पैसे मिळतात. वा! वा! सगळीकडे देव आमचं काम करतोय ह ! तिथे मी गेलो, एवढं स्मगलींग केलं, पैसे मिळाले. तिकडे मी आपल्याला एवढं हे केलं, तिकडे खून झाला. गळे कापले तरी कळत नाही. कुणाला मारायचं असलं तरी मारतात ही हे लोक. वाटेल ती घाणेरडी कामे करतील हे लोक ! बरं हे गुरू लोकांचं काय आहे, तुम्हाला कधी रागवणार नाहीत, 'वा! वा! वा! ही सगळी अगदी संत, चांगली मंडळी आहेत. स्मगलींग केलं तरी काही हरकत नाही. मला त्याच्यातलं घबाड आणून द्या, म्हणजे रा झालं!' एखादी बाई घाणेरडी वेश्या असली तरी काही हरकत नाही, 'तू देवीच आहेस.' फक्त एवढंच आहे की तू जे कमविले आहेस त्याच्यातलं फक्त काहीतरी माझ्या चरणावर जशी श्रद्धा असेल तसे घाल. तू घाल.' हे घातलं म्हणजे मग ते गुरू महाराज ैकै ९ य] खुष. 'मग तुमच्या गळ्यात आम्ही हार घालतो. बाकी काही नाही. आमचा तुमचा संबंध एक आहे. आम्ही गुरू तुम्ही संत. फक्त संबंध एवढाच, की तुम्ही जेवढी कमाई केली त्यातला जो इन्कमटॅक्स आम्हाला आणून घाला. तिकडे गव्हर्नमेंट कशाला? उगीच सरकारला कशाला तुमची द्यायचा! आता असं केल्यावर, थोड्या दिवसांनी पाहिलं, की तो मनुष्य पकडला गेला. मग खुशामत करतो माझ्याकडे आला, 'माताजी, आम्हाला सोडा.' म्हटलं 'तुम्ही केलं कशाला असं. गुरू आहेत नं तुमचे ! कशाला तुम्ही? काय कामासाठी ठेवलेला आहे? जो तुमची खुशामत करतो तो गुरू कसा होऊ शकतो? त्याने सांगितलं नाही का, की हे धंदे करू नकोस? जो तुम्हाला कधीही सांगत गुरू आहेत तुमचे म्हणजे काय? मग हे ठेवलंय कशाला! हा गुरू ठेवला तो नाही तो गुरू तुम्ही ठेवायचा कशाला?' 'नाही, आम्ही म्हटलं जर सगळ्यांनी ठेवलं तर गुरू आम्ही ठेवून घेतलं. तसं काही नाही. आम्ही काही केलं नाही. आम्ही फक्त त्याच्या पायावर गेलो होतो.' कसा आता हे मस्तक देवाने तुमचं केलेलं आहे माणसाचं. केवढे मोठे हे मस्तक! माहिती होऊ शकतो? आहे का आपल्याला! हे मस्तक आपण जनावराच्या स्थितीतून आज मनुष्याच्या स्थितीला आणलंय ते कसं आणलंय? ते कसं इव्हॉल्युशनरी स्टेजेस मध्ये आणलंय ते सांगायला नको. ते मस्तक असं आपण वर केलेलं आहे ते अशा घाणेरड्या माणसाच्या पायावरती तुम्ही टेकल्यावर मात्र परमेश्वर तुम्हाला कधीही क्षमा करू शकत नाही. अशा घाणेरड्या गुरूच्या मागे जर धावलेले असाल आणि हे मस्तक जर तुम्ही टेकलेले असेल तर परमेश्वर तुम्हाला क्षमा करू शकत नाही. बाकी सहजयोगात तुमची सगळी पापं क्षमा करतो तो. हे मी पाहिलेले आहे. मी जर बसले असेल समोर तर हजारो माणसं पार होतात. अशी, अशी माणसं त्याला लोक म्हणतात तो असा मनुष्य आहे, तो तसा मनुष्य आहे. काही हरकत नाही. क्षमा केली. सगळं क्षमा. केवढा मोठा आहे तो ! पण हे मात्र तो क्षमा करीत नाही. म्हणून कुणी गुरूचा मनुष्य आला की मी म्हणते 'हे बघ, तू त्या गुरूकडे जा बाबा. मला तू क्षमा कर.' कारण इथे तीन- तीन, चार-चार वर्षे आम्ही डोके फोडायला तयार नाही. त्याला विचारलं, 'तुला दिलं काय गुरूंनी?' 'काही नाही, म्हणजे तसं काही नाही. म्हणजे आता असं आहे, की आम्ही गुरूचा फोटोबिटो ठेवला आहे.' 'अरे, पण तुम्ही फोटो ठेवलेला आहे त्याने तुमच्यात काही फरक आला कां?' आता खरे गुरू म्हणजे लाखात एक असतात. आपल्या महाराष्ट्रात पुष्कळ उत्तम गुरू झालेले आहेत. म्हणजे आपण खरोखरच काही तरी विशेष आहोत असं म्हटलं पाहिजे ! महाराष्ट्र भूमीमध्ये काही तरी आहे किंवा असही म्हणता येईल की चिखल होता म्हणूनच इथे कमळं आलेली आहेत. काहीही म्हटलं तरी एक आहे, गरू मात्र फार मोठे मोठे झाले आहेत आपल्याकडे. आता थोड्या वर्षापूर्वीच आपण म्हणू, की आपल्याकडे साईनाथांसारखे मोठे गुरू होऊन गेले, त्याबद्दल शंकाच नाही. ते साक्षात दत्तात्रयांचे अवतार नुसता का 10 होते याबद्दल शंकाच नाही. साक्षात त्यांनी अवतरण घेतलं होतं यात तर शंकाच नाही. ते मुसलमान असोत की कोणीही असो. ते कोण होते ते तुम्ही ओळखलंत हे विशेष; पण त्याच्यानंतर तुम्ही देवळे, ती उभी केली. बघा तिथे ते असे मोठ्या पोटाचे पुजारी लावले कोणत्याही आणि ते कसे तिथे पूजा करणार? त्यांना काय अधिकार आहे ? कोण आहेत ते पुजारी? मग धर्माची त्यांच्यासमोर जाऊन पैशाच्या राशी तुम्ही ओतल्या म्हणजे हे काय! त्यांनी काय सांगितलेलं आहे ! त्यातलं काही जरी केलं नाही नुसतं जाऊन त्या देवळात बसले, 'हो, साईबाबांनी निंदा आमची कामं केली.' अहो, ते करतातच! ते आहेतच मुळी दयाळू! त्यांच्या चरणी गेलं म्हणजे करतात. तुमची कामं करतात. एवढंच. पण तुम्ही काय करता त्यांच्यासाठी? उलट नावे घेऊन घेऊन ते रागावले आहेत तुमच्यावर. मी पुष्कळ साईनाथांचे शिष्य पाहिले आहेत. करणे त्यांना मला उलट म्हणावं लागतं 'यांना क्षमा करा हो. यांना माहिती नव्हते.' त्यांचं नावसुद्धा घेण्याची आपली पात्रता नाही, खरे सांगायचे तर! केवढी मोठी माणसं आहेत ती ! माझं काम दुसरं आहे. मी आईच आहे. माझंे नांव कितीही वेळा घेतलं तरी हरकत नाही. मी काही महापाप रागवत नाही लवकर. पण त्यांचं नाव घ्यायचं, त्यांच्याकडे डोळासुद्धा वर करून बघायचं ही केवढी मोठी गोष्ट आहे. आहे. अशी मोठी मोठी मंडळी आपल्या इथे झालेली आहेत. पण ते जेव्हा जिवंत राहिले होते तेव्हा त्यांना छळ-छळ आपण छळलेलं आहे हे मान्य केलं पाहिजे. बरं ते झालं. जे झालं ते झालं. ते ही लोक नाहीत. पण आतासुद्धा आपण कसे वागतो आहोत? त्यांच्या तत्त्वाला धरून वागतो आहोत का ? या महाराष्ट्रात किती अशी साधु-संत मंडळी झालेली आहेत, पण अमके उभे, तमके उभे म्हणजे असल्या तऱ्हेच्या घाणेरडेपणाच्या गोष्टी आपण करायला सुरुवात केली आहे. म्हणजे काय ? माझं म्हणणं असं आहे की याच्यात पॉलिटिकल अशी काही गोष्ट नाही. पण कुणाचा हेवा-दावा करणं, कुणाविषयी वाईट विचार करणं किंवा कोणालाही आपल्यापेक्षा कमी लेखणं किंवा उच्च लेखणं वगैरे वरगैरे गोष्टी साईभक्तांकडून केल्या जाऊ नयेत. बाकीच्यांना करू देत, पण तुम्ही साईबाबांचा घरात फोटो ठेवून हिंदू-मुसलमान वेगळे आहेत असा प्रचार करू शकत नाही. कबूल मुसलमान वाईट. त्यांनी असा त्रास दिला. कबूल हिंदू वाईट, त्यांनी असा त्रास दिला. पण त्यांचा जेव्हा फोटो घरात लावता तेव्हा तुम्ही कोठे आहात ? तुम्ही कुणी काही केलं तरी चालेल पण साईनाथांचे जर तुम्ही शिष्य आहात, तुम्ही त्यांच्या चरणाशी आहात तर तुम्ही सगळे नीट रहा मग तुम्हाला असला दुजाभाव नसला पाहिजे. ही अगदी साधी गोष्ट आहे. त्यांनी स्वत: सांगितलं आहे, कोणत्याही धर्माची निंदा करणं महापाप आहे. अशी किती मंडळी आहेत ! बरं तुम्ही कोण मोठे धर्माचे आले! तुम्हाला धर्मातलं काय कळतंय अजून ! अहो, तुम्ही गणपतीचं देऊळ बांधलं म्हणून मोठे धार्मिक झाला आहात का? तो गणपती नाही तिथे ते तरी कळतंय का तुम्हाला ? तेव्हा आधी धर्म म्हणजे काय? हे सुद्धा सहजयोगाने लक्षात येते. धर्म म्हणजे काय? धर्मामध्ये मनुष्याला काय प्राप्त होते? धर्माने कसं जाणायचं? कुठे आहे ते ? साईनाथ मोठे ैकै ११ य] होते. मी असे म्हणेन हे आताचे सारे शंकराचार्य मी बघितले. एकसुद्धा पार नाही, एकसुद्धा शंकराचार्य! आदिशंकराचार्यांची गोष्ट वेगळी. ते आणि साईनाथ एक आहेत. पण बाकी आजकालचे तर नाहीत. तुमचे ते पोप आहेत ते मुळीच पार नाहीत. नाही म्हणजे नाहीत. आता आम्ही तरी त्याला काय करणार. आता तुम्ही त्यांना पोप करा नाहीतर आणखी काहीतरी नाव द्या, पण नाही म्हणजे नाही, त्याला काही इलाज नाही. कारण आम्ही बघून सांगतो आणि जे तिथे आहेत ते सगळे एकच आहेत. त्यांच्यात काही फरक नाही. ख्रिस्तांनी सांगितले आहे की, 'दोज ह आर नॉट अगेन्स्ट मी आर वुईथ मी.' म्हणजे केवढं मोठं त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. पण या ख्रिस्ती लोकांना समजेल का ? त्यांना जर मी सांगितलं तर ते म्हणतील की नाही म्हणजे त्यांचा अर्थ असा की ते खिश्चन आहेत. म्हणजे हे कोण खिश्चन करणारे. त्यांना काय अधिकार आहे ख्रिस्तांनी दिलेला. उलट ख्रिस्त जेवढा त्यांच्यावर रागावलेला आहे तेवढा तुमच्यावर नाही रागावलेला. हे असे गोंधळ आहेत धर्माचे. या धर्माच्या नावावरसुद्धा इतका गोंधळ झालेला आहे. लोकांचा धर्मावरून विश्वास उडालेला आहे. सगळं कबूल आहे. पण आज सहज धर्म जर तुमच्यात आला तर तुमच्या लक्षात येईल की धर्म हा शाश्वत, सनातन प्रत्येकामध्ये वास करतो. प्रत्येकामध्ये तो आहे. इतकेच नाही तर साऱ्या संसारावर त्याचे राज्य चालले आहे. पण त्यासाठी धर्माच्या पलीकडे उतरावं लागतं. धर्मातीत व्हावं लागतं आणि ती दशा फार सहज अगदी सहज, त्याच्यात तुम्हाला काही करणं नाही. त्याच्यात तुम्हाला काही बोलणं नको. ते आपोआप परमेश्वर साक्षात तुमच्या हातात देणार आहे. आणि केवढी ती गोष्ट आहे आणि आंतरराष्ट्रीय वरगैरे वगैरे ज्या गोष्टी आपण करतो. ते ' अंतर', अंत:करण जर झालं, तर एकदमच फरक होऊन जाईल. आता तुमच्यासारखी लंडनला पण माझी पुष्कळ मुलं आहेत. अमेरिकेला पुष्कळ मुलं आहेत. ते येतील आता. भेटाल तुम्ही सगळ्यांना. सगळ्यांच्या भाषा व्हायब्रेशन्सच्या, दूसरी भाषा कशाला एस्टॅब्लिश करायची ? व्हायब्रेशन्सची भाषा आल्यावर दुसरी भाषा कशाला? आमचा मोरेश्वर आहे त्याला येते ती भाषा. तिकडे इंग्लंडचा तो इंग्लिश मुलगा आहे. त्यालाही येते ती भाषा. तिकडे अमेरीकेतला असला तरी त्यालाही ती भाषा येते. पटकन सांगेल 'ही बोट आहेत बघा माताजी' आणि बरोबर तिथे, तिथे धरलेलं आहे. इतकं त्याचं सायन्स आहे. पण सायन्सच्या लोकांना जर तुम्ही म्हटलं की 'प्रेम काय आहे ?' तर ते त्यांना समजायचं नाही. तेव्हा त्यांना नुसते दगड, धोंडे समजतात. माणसं समजून सांगायचे फार कठीण काम आहे. पण जेव्हा कॅन्सरसारखा रोग डोक्यावर येऊन बसला आहे आणि मी परत सांगते सहजयोगाशिवाय कॅन्सर ठीक होणार नाही. शक्य नाही. म्हणून हा कॅन्सर काढला देवाने की तू जा. त्याच्याशिवाय समजत नाही हो लोकांना, करता काय! आता काय काय सहजयोगाचे लाभ आहेत त्याचा तुम्हीच आढावा घ्या आणि मी परत तुम्हाला सगळे समजावून सांगितले आहे. थोडसं ध्यानात जाऊ या. नवीन मंडळी आली आहेत यांना पार करून टाका, मग बघा. पण सहजयोगामध्ये असं नाही की आज झाले ना मग जाऊ या कधीतरी. सहजयोगाची मजा उचलायची असली तर त्याच्या साम्राज्यात यायला पाहिजे आणि मधेमधे इथला बाजार केला पाहिजे. हे असं आहे की, मुंबईत येऊन तुम्ही जेव्हा इथे राहणार नाही तर मुंबईची मजा काय माहिती तुम्हाला. तसंच आहे. त्याच्यामध्ये स्थावर झालं पाहिजे. आमच्याकडे मंडळींनी बरीच प्रगती केलेली आहे. साधारण लोकांनीसुद्धा केलेली आहे. आता काही आज अशा गोष्टी निघाल्या तेव्हा मंडळी अशी म्हणाली की 'अहो, सर्वसाधारण लोकांमध्ये ही तुमच्या मोठी मंडळी कशी येणार?' म्हटलं 'मुळीच येऊ नका!' जे आपल्याला एवढे मोठे समजतात त्यांच्यासाठी आमचा सहजयोग नाही. यात यायचं असेल तर इथे येऊन बसा. इथे एक जर कोळी असला किंवा एक जर राजा असला किंवा एक जर मेहतर असला किंवा एक जर मोठा भारी ऑफिसर असला, सगळ्यांनी देवाच्या समोर जर एक व्हायचं असेल तर सहजयोग मिळणार. का त्याला फुकटात द्यायला आम्ही बसलेलो नाही. तुम्हाला स्वत:विषयी फार घमेंड असेल तर तुमच्या बंगल्यात येऊन आम्ही १२ द्यायला तयार नाही. असेल तर बसा. तेव्हा ते म्हणाले ती मंडळी येणार नाहीत. म्हटलं नको येऊ दे. असली मंडळी घेऊन मला करायचंय काय? ज्या लोकांच्या डोक्यामध्ये असे क्षुद्र क्षुदर विचार आहेत, ते क्षुद्र आहेत की हे क्षुद्र आहेत ? क्षूद्र ती मंडळी आहेत. क्षुद्र हे नाहीत, ज्यांनी मिळविलेलं आहे. आज लोक त्यांच्या पायावर येणार नाहीत, येणार आहेत. क्षू्र क्षुदर शहाणपणा तुमच्या हा आणि त्यांना बरंच स्पष्ट शब्दात सांगितलंय. अशा लोकांना आमच्या सहजयोगाचा काही लाभ होणार नाही. बसा म्हणावं. तुमच्या मोटार, गाड्या सांभाळा! फार म्हणजे मी काही श्रीमंतांच्या विरोधात आहे अशी गोष्ट नाही. पुष्कळसे श्रीमंत आहेत. मुष्किलीने येतो, येऊन बसतात आणि म्हणतात, 'माताजी, आम्हाला द्या.' पण हे आहे की आम्ही मोठे आहोत. बसा! असल्या विचित्र कल्पना घेऊनसुद्धा पुष्कळ लोक इथे येतात. तेव्हा तुम्ही शहाणपणा धरा. शहाणपणा धरला पाहिजे. शहाणपणा हा फार मुष्किलीने येतो, मूर्खपणा फार लवकर येतो. तेव्हा आपल्यामध्ये शहाणपणा धरा. मी आई आहे. मी तुमचा मूर्खपणा किंवा जो वाईटपणा आहे त्याला मी सांगणार . तुम्ही करू नका. ते मूर्खपणा तुमचा तुमच्या भल्यासाठी आहे. मी काही गुरुबिरू नाही. मला तुमच्याकडून काही नको. फक्त हे एवढंच. तुमचं भलं आणि कल्याण झाले पाहिजे. तुमच्या हितासाठी जे चांगलं आहे ते मी सांगणार. फार लवकर त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. येतो. आता नवीन मंडळी आलेली आहेत, त्यांना मी सांगते. कोणी वाईट वाटून घेतलं, तर ते गेले कामातून. व्हायब्रेशन्स जाणार.. मी काढत नाही हं ! जो आवाज आला किनई असाच आवाज आपल्या 'ओम' चा जो आवाज तुम्हाला म्हणतात, तो असतो. कळलं का! म्हणजे ही एनर्जी वाहत आहे नं, आणि जेव्हा ती वाहते आहे पण ती पूर्णपणे चैनलाइज्ड झालेली नाही, त्यावेळेला तसला आवाज येतो. ती चैनलाईज व्हायला सुरुवात झाली म्हणजे असा आवाज येतो म्हणून आपल्यामध्ये 'ओम' चा आवाज कधी कानामध्ये येणार, कधी डोक्यामध्ये येतो तेव्हा असं समजायचं की तो एनर्जी पूर्णपणे अॅडजस्ट आणि चैनलाईज्ड नाही म्हणून तसा आवाज येतो. म्हणून आवाज जर आला तर असं समजलं पाहिजे की ती एनर्जी अजून बरोबर व्यवस्थित आपली बसलेली नाही. तिला बरोबर फिक्स करावी लागते. आणि त्याला फिक्स करण्याचे प्रकार म्हणजे या स्क्रू चे नाही. पण मनाचे स्क्रू फिरवावे लागतात. तर हे जर मनाचे फिरवता स्क्रू आले तुम्हाला, कारण आमचं मशीन वेगळं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही जर विचार करून आपल्या मनाचे थोडे जर स्तक्रू फिरवायला सुरुवात केली तर हा जो वेस्टेज आहे एनर्जीचा जो आज तुम्हाला कानात, डोक्यात ऐकायला येतो तो जाऊन निव्वळ त्याच्यातून स्वर असा निघेल की तो मौन होऊन जाईल. स्वर मौन होऊन जाईल. आता काही एनर्जीचा स्वर आला नाही की आपण म्हणतो अगदी बेस्ट पोझिशनला आला. त्या एनर्जीला एकदम मौन स्थितीला ती आली म्हणजे समजायचं की आपण त्या स्थितीत आहोत. आपण त्याचा उपयोग करतो. कळलं का आता! 'ओम'चा जो अर्थ आहे, लोक म्हणतात आतून ओमचा आवाज येतो. सात तऱ्हेचे ैकै १३ य] आवाज येतात. ते म्हणजे बरोबर नाही. आला नाही पाहिजे आवाज. याच्यातून पुष्कळसे आवाज येतात. हे आवाज येत असताना हे मशीन बिघडलेलं आहे. म्हणजे बिघडलेलं नाही पण या मशीनमधून येणारी जी शक्ती आहे ती बरोबर अॅडजस्टेड नाही तसंच आहे. ओम जो आवाज येतो, तो आम्ही मोठे दुर्ग मिळविले म्हणून जे लोक म्हणतात, त्यांना जरा अर्धवट नॉलेज आहे. त्याच्यामुळे त्यांना समजत नाही की ते चुकलेलं आहे. आवाज बिवाज काही यायला नको खरं म्हणजे आवाज सुरुवातीला यायला हरकत नाही. म्हणजे काय, तुम्ही ऐकता आवाज. पण काही हरकत नाही. कारण आता एनर्जी येऊ लागली आहे. अॅडजस्ट करून घ्यायचं. काय गोष्ट आहे. असा आवाज का आला आपण अॅडजस्ट करून घ्यायचं. अॅडजस्ट करून घेतल्यावर समजलं पाहिजे की हं आता बरोबर आलं आहे. आता ही एनर्जी वापरली पाहिजे, घेण्यासाठी किंवा देण्यासाठी. दोन्ही गोष्टींसाठी. आता हा आहे माईक. जर याच्यामध्ये आवाज येत असला तर माझा आवाज यातून कसा येईल? तेव्हा जर काहीही जरासं अॅडजेस्टमेंटला फरक असला तर परमेश्वराचा आवाज आपल्यातून कसा जाईल, त्याची शक्ती आपल्यातून कशी जाईल, तेव्हा या मशिनला पूर्णपणे मौन झालं पाहिजे. तसंच तुमच्या या शक्तीला सुद्धा आतून मौन झालं पाहिजे. मौन होणं म्हणजे बेस्ट अचीव्ह केलं. अॅक्टिव्हिटीचं जे तंतोतंत डेलिकेट जी ोॅडजस्टमेंट आहे ते जेव्हा मौन झालं म्हणजे बेस्ट झालं. म्हणजे मग ते वरून येणारे आहे ते मुखीर होत नाही. म्हणून ते ही आता एक सांगते मी. कारण परवा ते वाचत होते पुस्तक, हठयोगावरती म्हटलं बघावं. हे एवढं तर पुस्तक लिहून ठेवलंय म्हणा. त्याच्यात त्यांनी सांगितलंय आवाज येतात. म्हणजे काय ? म्हणजे मशीन बिघडलेले आहे. मशीन आम्ही बनवलेले आहे नं म्हणून आम्हाला माहिती. मशीन खराब आहे तर ते ऐकत बसू नका. ते काही चांगलं नाही. आवाज येतो म्हणजे ते मशीन खराब आहे म्हणजे अॅडजस्टेड नाही म्हणून आवाज येतो. आता हा तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला आजार होऊ दे, तुम्हाला काही त्रास असला म्हणजे आवाज येणार डोक्यात. डोकं भणभण करणार, काहीतरी असा त्रास असला म्हणजेच आवाज येणार, तुम्ही जर पूर्णपणे अगदी स्वस्थ असाल नं तर मौन आहे. मौन शांत, शांती आणि मौन, या दोन गोष्टी स्थापित झाल्या. आता सांगायचे म्हणजे आज वेळ कमी आहे, पायावर येणं सुरू झालं म्हणजे धडाधड, माझे पाय, परवा तुम्ही सगळ्यांनी मिळून मोडून टाकले. तेव्हा हे पाय जरा थोडे दिवस आणखी चालू द्यावे ही विनंती आहे. कारण मी काही इन्शुअर केले नाहीत माझे पाय तर तुम्ही जर माझे पाय मोडले तर माझं काही ठीक होणार नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे की माझे पाय एवढ्या जोरात धरून वरगैरे ओढू नका. आणखीन जरी पायातून पुष्कळ शक्ती वाहते पण तरी जरा नाजूकच आहेत ते. तेव्हा हळूच हात-पाय खाली ठेवून डोकं जर ठेवलं तर बरं. पण इतक्या जोरामध्ये पाय दाबून असं धरायचं नाही. कृपा करून विशेषत: आपली मराठेशाही माझ्यावर गाजवू नका. गरीब माणूस आहे. परवा कारण तुम्ही लोकांनी माझे पाय एवढे ओढले की माझी मुलगी म्हणाली पायावर कोणी मारलं की चाबकाचे फटके असे वाटतंय पायावर वळ आल्यासारखे अर्थात त्याला काही हरकत नाही म्हणा. तुम्ही तुझ्या प्रेमाने करता पण प्रेमात अगदी लचकाच घेतला पाहिजे असं काही जरुरी नाही. जोपर्यंत अर्धाशेर मांस नाही काढलं तोपर्यंत आपण प्रेम प्रदर्शन केलं नाही असं नसतं. उलट नाजूकपणाने व्यवस्थितपणे, श्रद्धेनी कोणतेही कार्य केले म्हणजे सुबक दिसतं आणि बरे असते. तेव्हा थोडीशी माझी काळजी घ्यावी त्याबाबतीत अशी माझी विनंती आहे. कितीही असलं तरी आई म्हणजे आईच असते नां! तिला मुलं जायला लागली म्हणजे देवी असो की कुणी असे ना, तिला वाटते की मी मुलांना सोडून आता कुठे निघाले असं वाटणारंच. आता जी मंडळी पार नाही झालेली त्यांनी हात असा करा आणि जी मंडळी ध्यानात बसलेली आहेत त्यांनी जरा असे बघायचे. बघुया. येतंय थंड? .....तुम्हाला? हातामध्ये थंड वाहतंय...उत्तम....! का १४ रि मै डायरी १७/५/१९८० १५ मी आपल्याला सांगत आले आहे की सर्व सहजयोग्यांनी डायरी लिहायला सुरू केले पाहिजे. प्रत्येक दिवशी घडणाऱ्या घटनांचा उल्लेख तुम्हाला डायरी लिहितांना करायचा आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जागरूक रहाल आणि दुसरे म्हणजे भूतकाळ किंवा भविष्यकाळाविषयी तुम्हाला जर काही खास गोष्टी आठवल्या, काही खास योजनांचा विचार केला असेल तर त्याची नोंद डायरीमध्ये करू शकता. अशाप्रकारे तुम्हाला दोन डायऱ्या बनवायला पाहिजेत. तुमचे चित्त एकाग्र होण्यासाठी ते आपल्या खास तथ्यांवर ठेवले पाहिजे. पहिले म्हणजे जसे मी तुम्हाला सांगितले, की जर तुम्ही डायरी बनवू लागाल तर तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत हे लक्षात ठेवावे लागेल. यामुळे तुमचे चित्त जागरूक राहील आणि तुम्ही अशा गोष्टींकडे लक्ष द्याल की काय झाले आणि कुठे झाले? तुम्हाला आश्चर्य वाटेल, की जेव्हा तुमचे चित्त जागरूक असेल तेव्हा तुम्हाला समजेल की कोणत्या नवीन गोष्टी तुमच्याजवळ आल्या आहेत. जसे खूप उत्तम योजना, जीवनात घडणारे चमत्कार, परमेश्वराच्या सौंदर्याचे चमत्कार आणि त्याचे मांगल्य, परमेश्वराचा मोठेपणा, त्याची उदारता, त्यांचे आशीर्वाद- कशाप्रकारे कार्य करतात. जेव्हा तुम्ही डायरी लिहिणे सुरू करता तेव्हा त्याच्याविषयी (परमेश्वर) दोन ओळी का होईना लिहा. यामुळे तुमचे मन त्याच्याबरोबर जोडलेले राहील. तुम्ही डायरीमध्ये हे पण लिहू शकता की काय, काय घडले आहे. तुम्ही ध्यान केले आहे का किवा करू शकलात का? तुम्हाला ध्यान करण्यासाठी वेळ मिळाला की नाही. स्वत:ला थोडे फार असे तयार करा म की जणू काही तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करीत आहात. त्याचप्रकारे तुम्ही टीप ही बनवा. मी सकाळी उठलो का? उठलात का? तुम्हाला तुमच्या मार्गाकडेही लक्ष ठेवले पाहिजे की तुम्ही मध्यमार्गात आहात की डाव्या किवा उजव्या बाजूकडे आहात. डायरी तयार करणे ही एक खूप चांगली सवय आहे. त्याबरोबरच तुम्हाला हे पण दिसेल की कशाप्रकारे हळूहळू आपल्या योजनांमध्ये बदल येऊ लागतो, कशाप्रकारे नव्या प्राथमिक गरजा निर्माण होऊ लागतात. कशाप्रकारे तुम्ही वास्तवातील गोष्टींना अधिक महत्त्व देऊ लागता आणि अनावश्यक गोष्टींना कमी महत्त्व देऊ लागता. मला वाटते डायरी बाळगणे ही मानवासाठी एक खूप उपयुक्त गोष्ट आहे. काही काळानंतर काही डायऱ्या प्रदर्शनीय वस्तू बनतील आणि लोकांना वाटेल तुम्ही काय लिहिले हे बघावे. यात नसावी किंवा यात काही लपवू नये. अगदी खरे आणि समजेल असे असावे.... भोंदूगिरी १६ माताजींचा "आई- भा ज जे काही सांगितले आहे, की आपण आपल्या मुलांवर जी जबरदस्ती, जुलूम करतो ते आपल्याला जुलूम वाटत नाहीत. परंतु ही मुले म्हणजे साधु-संतच तुमच्या घरी आलेले आहेत. तुम्हाला त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांना सांभाळले पाहिजे. त्यांना प्रेम द्यायला पाहिजे, ज्यामुळे ती फुलतील, वाढतील. त्यांना स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. ती कधी चुकीची कामे करू शकत नाहीत कारण ती संत -साधू आहेत. परंतु तुमच्या बघण्यात फरक आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमचा जोर लावता, हिटलरशाही, मनगटशाही गाजवता. अशा विचारांबाबत मला वाटते माझ्या वरचढ कोणी नसेल. मुलांना काहीही बोलणे, रागावणे मला बिलकूल आवडत नाही. जर एखादी चुकीची गोष्ट त्यांनी केली तर त्यांना समजवा, पण या मुलांना वाढायला पाहिजे. हीच मुलं आपल्या देशाचे उद्याचे नागरिक आहेत आणि हीच मुलं तुम्हाला करामत करून दाखवतील. या लोकांना, मुलांना अशाप्रकारे स्वातंत्र्य दिल्याने ते किती चांगले झाले आहेत हे मी बघते आहे. बरेच जण बिघडले ही आहेत. आता तुमच्याजवळ तुमची संस्कृती आहे. त्या आधारावरच तुम्ही मुलांचा सांभाळ करा. त्यांना समजवून सांगा, की आपली संस्कृती काय आहे , ज्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सहज, सरळ होतील. आपल्या देशाविषयी, इथे होऊन गेलेल्या महान लोकांविषयी कोणाला काही माहीतच नाही. कोणालाच काही माहिती नाही की किती कष्टाने, त्याग करून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. हे या मुलांना सांगितले पाहिजे. जे मोठ-मोठे नेते होऊन गेले त्यांचे फोटो घरात लावले पाहिजेत. कशा, कशा लढाया झाल्या हे त्यांना समजावले पाहिजे. शाळेत हे समजावून सांगितले पाहिजे, अशाप्रकारचे तिथे वातावरण असावे. आम्ही बघतो की मुलांना सिनेमातील हिरो-हिरोईन माहिती आहेत. परंतु ज्या लोकांनी इतका त्याग केला, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्याविषयी तर त्यांना काहीच माहिती नाही. हा खूप मोठा विरोधाभास आपल्या इथे आहे. मुलांना निरर्थक गोष्टी सांगण्यापेक्षा त्यांना सांगा की तुम्ही ज्या देशात जन्मले आहात त्या देशाची तुम्ही संपत्ती आहात. तुमच्यासाठी काय, काय केले गेले आहे, किती त्याग केला आहे. हा त्याग कशाप्रकारे केला आहे हे त्यांना सांगा. तेव्हाच त्यांच्यामध्ये देशभक्ती जागृत होईल आणि उद्याचे हे नागरिक चांगले देशभक्त होतील. ते सहजयोगी ही आहेत. त्यांच्यासाठी देशभक्ती करणे खूप सोपे आहे. तुम्हा सर्वांना माझे अनंत आशीर्वाद! १७ चुडिलांसाली संदेश ३१ डिसेंबर १९९८ ु र० २० ्थ र ४७ केक पाऊंड ० दिवाल र एए५ हां सहस साहित्य :- सर्व साहित्य साधारण तापमानावर २५० ग्रॅम मैदा, १/४ छोटा चमचा बेकिंग पावडर २५० ग्रॅम बिन मीठाचे लोणी, २५० ग्रॅम साखर, २५० ग्रॅम अंडी, १/४ छोटा चमचा व्हॅनीला इसेन्स, साधारण १२५मि.ली.दूध कृती १) केकपात्राला थोडे तूप लावून मैदा भुरभुरा. (२२ सें.मी.केकपात्र). ओव्हन १८० डिग्री सें. (३५० डिग्री फॅ. ) वर 'प्री-हीट' करा. २) मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. ३) एका भांड्यात लोणी क्रीमसारखे फेट्ून घ्या. साखर टाकून विरघळेपर्यंत फेटा. ४) एक, एक अंडे फोडून टाकत फेटत रहा. जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळणार नाही तोपर्यंत फेटत रहा. मिश्रण चांगले फुलून यायला हवे. ५) व्हॅनीला इसेन्स टाका. मैदा व बेकिंग पावडर घाला. आता दूध टाकून हळूहळू मिश्रण एकत्र करा. (दूध मैद्यानुसार कमी-जास्त करता येते) ६) हे मिश्रण केकपात्रात टाकून ४० मिनीट बेक करा. ७) एखादी पातळ काडी मधोमध टाकून केक शिजल्याची खात्री करून घ्या. जर काडीला केक चिकटला नाही तर त्याचा अर्थ आहे केक तयार झाला आहे. केक थंड होऊ द्या. एका जाळीवर केकपात्र उलट करून केक काढून घ्या जेणेकरून पूर्ण थंड होईल, नंतर वाढा. :- सूचना : तुम्हाला पाहिजे असल्यास ५० ग्रॅम किसमिस, बारीक केलेले खजूर, कुटलेला सुकामेवा, रवाळ फळ टाकू शकता. हे सर्व साहित्य एक मोठा चमचा मैद्याबरोबर प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकून चांगले हलवा आणि केकच्या मिश्रणात टाका. १९ सो FOR में मे। ठ * प्रकशक जिमल ड्रासोर्मेशन प्रा० लि. प्लाढ न.८, चंद्रगुप्त होसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरूड, पुणे - ४११०३८. फौन 8 ०२०० २५२८६५३७, २५२८६०३२ B-mail : sale@nitl.eo.in ৪ ॐ० क २ क २ ५ रा] तूम्ही कथी कमळ उपलतांना पाहिते हे! ते हजूहन् उमलते. बंतर त्यातून सुगंध पसस्तो, सपच वेगळ्याप्रकार . अरो है पुष्प आदिशरी्या चरण कमलांवर चढवले जाऊ शक्ते. २३/९/१९८४ ---------------------- 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-0.txt चैतन्य लहरी नौहंब-डिब २०७९ ७ जक पाम मराठी ४. १० ा सला के 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-1.txt v० ० ० ० ० ० बडी । ्। ा ०० ० ० ० ० C० १ ६GC ए०ड चरणांचा फोटो अहंकार आणि प्रति अहुँकारानै पिडीत लोकांसाठी खूप चांगला आह. १७/७/१९७० छ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-2.txt या अंकात सहजयोग सर्वांना समग्र करतो - १ डायरी - १५ पाऊंड केक - १९ अन्य विषय माताजीचा आई-वडिलांसाठी संदेश- १७ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-3.txt सहजयोग सर्वाना समग् करतो मुंबई, २९ मे १९७६ १ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-5.txt सर्व मंडळींनी माझ्याकडे असे हात करायचे बसल्यावर. सहजयोगाने पार झालेली आपण मंडळी आहात. आणि काही मंडळी पार व्हायला बसली आहेत. पैकी पुष्कळांना आता कुंडलिनी म्हणजे काय, कुंडलिनी योग म्हणजे काय, नानाविध चक्रे जी आपल्यामध्ये कार्यान्वित आहेत त्यांची नावे, त्यावर बसलेल्या अनेक देवता-देवी त्यांच्याबद्दल मी बरीच माहिती सगळ्यांना दिलेली आहे. इतकेच नव्हे पण तुम्ही सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तेव्हा नवीन मंडळींनी आमच्या जुन्या मंडळींकडून त्याच्याबद्दल माहिती घेतली , विचार केला तर उत्तम. आता प्रश्न असा की, सहजयोगामध्ये पार झाल्यावर आम्ही आता करायचे काय? वारंवार लोक मला विचारतात काय करायचं? हा असाच प्रश्न आहे, 'ही आम्ही एवढी कमाई केली माताजी आता करायचं काय ?' कमाई केल्यावर तुम्ही खर्च करा. तुम्ही जेव्हा पैसे कमावता आणि पैसे एकत्र करता किंवा एक ठेवा म्हणून बँकेमध्ये पैसे जमा करता, मेहनत करता, तो ठेवा नंतर आपल्याला वापरला पाहिजे. आता वापरायचा कसा ते मी तुम्हाला सांगू शकते आणि काही मंडळी तो ठेवा फार उत्तम प्रकाराने वापरू शकतात. परत तो जर वापरला नाही तर काय होईल असेही पुष्कळ लोक आज म्हणतात, तेव्हा तो वापरला नाही तर बुवा काय होणार? देवाने आपल्याला प्रेमाने निवडलेले आहे. फार मोठं कार्य आहे जगाचं आणि या फार महान कार्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला हे व्हायब्रेशन्स दिलेले आहेत ते काहीतरी कारणानी दिलेले आहेत आणि ते कारण आपल्याला माहिती आहे की या व्हायब्रेशन्समुळे आपण दुसऱ्याला सुद्धा परमेश्वराच्या साम्राज्यात नेऊ शकतो आणि त्यांनासुद्धा या शांतीचा आनंद मिळू शकतो. इतकेच नव्हे पण सर्वव्यापी परमेश्वराच्या प्रेम शक्तीशी आपण तदुरूप होऊ शकतो. आता प्रश्न असा असतो की ही शक्ती आमच्या हातून वाहत आहे ती जर वापरली नाही, तर संपली नाही पाहिजे असा लोकांचा अट्टाहास आहे, पण आपण जर का म्हटलं की हे झालं नाही पाहिजे, हे झालं पाहिजे वगैरे गोष्टी देवाच्या साम्राज्यात नाहीत. देवाचं साम्राज्य हे सर्वात उच्च आहे. त्यांना आपण ऑर्डर देऊ शकत नाही की 'बाबा, तू असं कर आणि तसं करू नकोस.' तो सगळ्यांच्यावर सर्व जितकी साम्राज्ये संसारात झाली त्या सगळ्यांच्या वर त्याचे साम्राज्य आहे आणि त्याचे कार्य इतके प्रेमळ आहे, अती सूक्ष्म आहे तितकेच ते अत्यंत दक्ष पण आहे. त्यामुळे आपण जर व्हायब्रेशन्स घेऊन आरामात बसलो, 'आम्हाला आनंद झाला. माताजींनी काय अनुभव दिला! आता आम्ही आरामात आहोत,' असं करत बसलो तर तीन-चार महिन्यांनी मी परत आल्यावर 'माताजी, आमचे व्हायब्रेशन्स गेले किंवा आता आम्हाला हातांना आग वगैरे येतेय तेव्हा काही तरी गडबड झाली. व्हायब्रेशन्स तुम्ही घेतलेत आमचे परत,' अशा रीतीने बरेच लोक बोलू लागतात. तर सांगायचं असं आहे की परमेश्वराची दक्षता इतकी सजग आहे तुमच्याबद्दल. विशेष करून, कारण परमेश्वराने तुम्हाला निवडून ठेवलेले आहे. तेव्हा जर तुम्ही हे व्हायब्रेशन्स वापरलेच नाहीत, त्याचा उपयोग जर जनसाधारण लोकांसाठी केला नाही, तर तो परत घेणार. ता तेव्हा हे व्हायब्रेशन्स मिळाल्यावर ते वापरावे लागतात. त्याचा अर्थ असा नाही की लोकांना असे वाटते की माताजींचे म्हणणे असे आहे की आम्ही सगळे सहजयोगाला तुम्ही काही देऊ शकत नाही. काय देणार , देऊन देऊन देणार काय ? तुमच्या जवळ ैकै ३ य] 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-6.txt काय आहे ? दगड, धोंडे, माती! सहजयोगाला द्यायचे सांगायचे म्हणजे सहजयोगाला तुम्ही काही देऊ शकत नाही. काय देणार, काहीच नाही. उलट दिल्यावर तो वाढतो आणि 'तुम्ही' इथे जर तुमच्या आतून प्रचंड शक्ती वाहत राहते. ती शक्ती एकदा वाहायला सुरुवात झाली म्हणजे तुम्हाला स्वत:ची कल्पना येते की तुम्ही किती मोठे आहात. तुमच्यामध्ये केवढे मोठे सामर्थ्य परमेश्वराने दिलंय. पण त्याबद्दल मुळीच अहंकार नाही. डोक्यामध्ये आपल्याकडे अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांनी हजारो लोकांना बरे केले असेल, पण त्यांच्या डोक्यातही येत नाही की आम्ही यांना बरे केले की काय केले. बरे केले अहंकाराच्या तर केले, नाही केले तर नाही केले. त्याचे काही त्यांना हे नाही. झाले तर झाले. होत नाही किंवा माताजी, होत नाही. हे हातातनं जातंय, येतंय. काही कोणी असे म्हणत नाही की मी करतोय प्रति की माझ्या हातून होतय की मी असं केलंय, कोणी असं म्हणत नाही. असं जो म्हणायला लागला तो गेला. ज्याला असं वाटतंय की माझ्या हातून हे होतंय तो कामातून गेला. मग अहंकाराच्या रूपाने लोक असं म्हणतात की, 'माताजी, आमची व्हायब्रेशन्स का हो गेली ? आम्ही इतक्या असं वाटू लागलं की लोकांना बरं केलं. अमुक केलं.' तर त्याला कारण असे की तुम्हाला तुम्ही कर्ता. मग तुम्ही आला. तुम्ही इथं आहात म्हणून तर घोटाळा आहे सगळा. 'तुम्ही इथे जर डोक्यामध्ये अहंकाराच्या किंवा प्रतिअहंकाराच्या रूपाने नसता तर प्रश्नच नव्हता. नसता तोच तर आम्ही बाजूला केलाय. तुमचा 'तुम्ही' पणा. आणि तो दूर केला म्हणूनच त्या परमेश्वराशी एकाकार झालात. तिथे 'तुम्ही' आलात, झालं. तर प्रश्नच नव्हता. आता तुम्ही म्हणजे किती गोष्टी आहेत, तुम्ही म्हणजे ' तुम्ही' जे आहात ती गोष्ट नाही. तुम्ही जे नाहीत ते सुरुवातीपासून तुम्हाला वाटतं तुम्ही आहात. म्हणजे कसं काय ? तोच तर तुम्ही जन्माला आलात. एका घराण्यात जन्मला. झालं. हे अगदी आई-वडील इथून आम्ही सुरुवात. आमचं हे नाव तिथून दुसरी गोष्ट. मग हा आमचा देश, मग हे आमचं घर, ही आमची वसती, ही आमची जात, अमकं तमकं, ज्याला मिसआयडेंटिफिकेशन्स म्हणतात. बाजूला केलाय. तऱ्हेत-्हेच्या गोष्टी. जे तुम्ही नाही ते. तुम्ही काय आहात ? तुम्ही परमेश्वराची ती परमशक्ती आहात ही गोष्ट खरी आहे. तुम्ही तेच आहात, पण जोपर्यंत तुम्ही बाहेर आहात आणि सारखं मी अमका आहे, मी तमका आहे या गोष्टी जोपर्यंत आहेत तोपर्यंत ती शक्ती पूर्णपणे प्रकाशित होत नाही. म्हणून मी 'हे' काही नाही आणि मी 'तेच' आहे असं जर तुम्ही मनानं का ४ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-8.txt धरलं, म्हणजे रिअलायझेशन नंतर. आधी जर तुम्ही मनानं धरलं तर त्याला काही अर्थच नाही. कारण तुम्ही ते नाहीच आहात. तेव्हा म्हणण्यात काय अर्थ आहे. तुम्ही बाहेरच आहात. मग तुम्ही जेव्हा आतमध्ये ते प्राप्त कराल आणि जेव्हा ते व्हाल तेव्हा जर म्हणाल मी तेच मात्र आहे आणि बाकी काहीच नाही. तेव्हा ते होऊ शकेल आणि जो असं म्हणेल त्याला मनुष्य परमेश्वराचा साक्षात दूत, त्याच्या आतमध्ये ती शक्ती वाहतच आणि इतकंच नाही तर प्रचंड वेगाने वाहते आणि त्यात अनेक तऱ्हेच्या धारा वाहून तुमच्या सगळ्या प्रश्नांना, सर्व गोष्टींना उत्तरे मिळतात. आता पुष्कळांचे असे म्हणणे आहे की माताजी, आम्ही बघा एवढे तुमच्याकडे आलो पण आमची गरिबी नाही गेली. असे आहेत पुष्कळ. आता हे बघा तुम्ही माझ्याकडे आलात तो उपकार माझ्यावर किंवा देवावर नाही. आपली दृष्टी जराशी बदलायला पाहिजे. आम्ही मुद्दामून वेळ काढून इथे आलो, हे कोणी माझ्यावर उपकार केलेले नाही. हे तुम्ही स्वत:वरती उपकार करत आहात. तुम्ही इथे आलात, तुम्हाला हा अलभ्य लाभ झाला, ही एवढी मोठी गोष्ट मिळाली ही आनंदाची पर्वणी तुमच्यात उतरलेली आहे. हे तुम्हाला जे मिळालेलं आहे, लाभलेलं आहे ते केवढं मोठं आहे! त्याच्यामध्ये तुम्ही देवावरती काही उपकार केलेले नाहीत. पण त्याचे अनेक उपकार आहेत, अनंत त्याचे उपकार तुमच्यावर आहेत की त्याने एवढा मोठा प्रेमाचा साठा तुम्हाला दिला. असं कधीही पूर्वीच्या जन्मात झालेलं नाही, कोणाच्याही. कारण आज ती मंडळी इथे माझ्यासमोर बसलेली आहेत. ती सुद्धा साधु-संतच मंडळी आहेत. साधु-संत मंडळी जी बाहेर भटकत होती ती संसारात रमूनसुद्धा परमेश्वराच्या ठायी लीन झालेली आहेत म्हणून ही गोष्ट घटीत होत आहे. आता दिसायला सहजयोग म्हणजे लोकांना, 'असं कसं होऊ शकते, अहो, त्याला जन्मजन्मांतराच्या सगळ्या कठीण समस्येनंतर होतं हे माताजी, असं काय? कारण आहे त्याला, आम्ही आहोत नं म्हणून. 'ते कसं काय' ते या लोकांना तुम्ही विचारा. त्याबद्दल मला आता सांगायचं नाही पण होतं मात्र खरं आणि झालं आहे. परमेश्वर सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला तयारच बसलेला आहे. खरोखर एका दृष्टीने उपकारच आहेत त्याच्यावर कारण शहाणपण धरून तुम्ही आलात. ते दार उघडे करून बसलात आणि या, या म्हणले, तरीसुद्धा येत नाही हो माणसं ! तेव्हा त्याच्यासाठी काहीही कमी नाही. वाटेल ते तुम्हाला देईल, जे म्हणाल ते तुम्हाला द्यायला तयार आहे. पण तुम्हाला झोळी पाहिजे तेवढी. त्या झोळीमध्ये सामावलं पाहिजे, एवढं आहे त्याच्याकडे द्यायला, पण तुमचे विचार आहेत देण्याच्या बाबतीत त्यामध्ये थोडा फरक पडतो कारण आपल्याला असं वाटतं की आपण देवाकडे गेलो की तर काय सोन्याच्या राशी मिळायला हव्या. देवाला सोन्याचं काय माहात्म्य असणार! तो काय तुम्हाला सोनं म्हणजे जे दगड, धोंडे ते देणार आहे का? काही तरी अमृत देणार आहे. परमेश्वर हा अमृताचा साठा आहे. तो आपल्या मुलांना अमृतच देणार. तो काय दगड, धोंडे देणार आहे का? ज्या दगड, धोंड्यांनी कुणाला, कधीही आनंद प्राप्त झाला नाही ती दगड-धोंड्यांची रास तुम्हाला देऊन करायचं काय? याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गरिबीत ढकलले वगैरे. तसं नाही. पण जे तुमच्याजवळ आहे ते तुम्ही उपभोगीतच नाही. त्याची उपभोग बुद्धी जी आहे ती तुमच्यात नाही. आता बघा, जो श्रीमंत मनुष्य आहे तोही तेच रडतोय, गरीब आहे तो ही तेच रडतोय. आपल्याजवळ जे एक लहानसं वस्त्र आहे ते उपभोगायची, आनंदाची ती शक्ती आहे का ? नाहीये. आपण जर बघतो एखाद्या वस्तूला तर आपल्याला असं वाटतं बघा, यांच्याजवळ एवढी चांगली वस्तू आहे आणि कमावली माझ्याजवळ नाही. बरं स्वत:जवळ आहे ती दिसत नाही. त्याच्याजवळ आहे ती दिसतेय. म्हणजे तुम्ही कशाला? जर तुम्हाला ही उपभोगताच येत नाही तर ही कशाला कमावली? आता ती कमवायच्या मागे. ती मिळाली तर तिसरी कमवायच्या मागे. ती मिळाली तर चौथीच्या मागे. म्हणजे काय की आनंदाची तुमची जी कल्पना आहे ती परमेश्वराची नाही. तो तुम्हाला अशी वस्तू देतो की त्याच्या पलीकडे मग तुम्ही काही मागतच नाही. तुमचं मागणं संपतं तिथे. जिथे सगळा क्षितिजाचाच भाग संपून जातो, त्याच्या पलीकडे काही दिसतचं नाही, अशा मध्यबिंदूत तो तुम्हाला आणून सोडतो. स्वत:च्या का ६ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-9.txt मध्यबिंदूवर उभे राहिल्यावर, तुम्हाला असं दिसतच नाही की बाहेर काय आहे. पण असं दिसतं की आम्ही खोलात स्वत:तच रुतत चाललो आहोत. आनंदाच्या सागरात बुड़त चाललो. सगळं आनंदासाठीच आहे नां, पण मिळतोय का आनंद कुठे! तेव्हा ज्या गोष्टींनी आनंदाचा सागर तुमच्यात येऊन जाईल अशीच वस्तू मिळाल्यावर तुम्ही दुसर्या गोष्टी कशाला मागणार! आपण आनंदच मागतो. जे काही आपण मागतो त्याच्या मागे आनंदाचाच विचार आहे. सुक्ष्म आहे. दिसत नाही पण आहे तो. तेव्हा तोच आनंद जर तुम्हाला मिळाला तर दुसर्या गोष्टी कशाला पाहिजेत ! आता केवढी मोठी गोष्ट आहे सहजयोगाची! परवा मी याच्याबद्दल म्हटलं होतं की सहजयोग ही शक्ती इतकी जबरदस्त आहे, परमेश्वराच्या या शक्तीला प्राप्त झाल्यावर तुम्ही एका नवीन राज्यात येता. एक नवीन साम्राज्य आहे आणि त्या साम्राज्याचा राजा परमेश्वर स्वत: आहे. नंतर तुम्हाला हे सांगायला नको की तुम्ही मराठी भाषा बोलू नका, तुम्ही हिंदी भाषा बोलू नका. तुम्ही एकच भाषा बोला, दहा भाषेत बोलू नका किंवा तुमचं एकच साम्राज्य असलं पाहिजे, सबंध देशाचं एकीकरण करा, त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स घाला. एकच असलं पाहिजे. ते होतच मुळी. कारण तुम्ही एकच आहात. तुम्ही आतून एकच आहात. म्हणजे जी जोडण्याची शक्ती आहे ती आहे, आतमध्ये आहे. तुम्ही जोडलेलं म्हटलं तरी बरोबर नाही कारण तुम्ही अनंतात एकच आहात. तुम्ही जे एकच आहात ते दर्शविणारी जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये जागृत होते. म्हणजे काय आहे? सहजयोग युनिफायर आहे, हा सगळ्यांना एकत्र करतो. इतकंच नाही तर समग्र करतो, म्हणजे ज्याला इन्टिग्रेट म्हणतात. तुमच्यामध्ये इन्टिग्रेशन येतं आपापसात. प्रत्येकाचं जेवढं चांगलं आहे ते दिसायला लागतं. या संस्कृतीत हे चांगलं आहे, त्या संस्कृतीत ते चांगलं आहे. हा त्यांच्यापासून चांगलं घेतो, तो त्यांच्यापासून चांगलं घेतो, अशा रीतीने जेवढं काही चांगलं आहे ते एकीकरण होऊन तुमच्यामध्ये येऊ शकतं म्हणजे सबंध राष्ट्राचे आज जे प्रश्न आहेत भांडणांचे अमुक तमुक हे सगळे निघून जाते. आणि मनुष्य त्या स्थितीमध्ये येऊन उभा राहतो, जिथे तो बघतो की मी आणि दुसरा आहे कोण? अरे, आम्ही सगळे एकच आहोत म्हणजे आहोतच. माझं काय म्हणणं आहे ह्याला असं म्हणा तुम्ही की सेल्फ अॅक्च्युअलायझेशन म्हणजे तो एक अनुभव असतो म्हणजे ती काही लेक्चरबाजी नाही की बघा तुम्ही सगळे बंधू आहात, भगिनी आहात. 'अहो, कसं काय, असं कसं काय म्हणता माताजी तुम्ही? असं कसं काय?' हे बरोबर आहे माझं की तुम्ही बंधु-भगिनी आहात. असं वरून आमचं आरोपण करणं आर्टिफिशयली याला काही अर्थ नाही. त्याला काहीही अर्थ नाही. जबरदस्तीने तुम्हाला म्हटलं की 'नाही, तुम्ही बंधू आणि भगिनी आहात .' तुम्ही म्हणाल, 'माताजी, कसं शक्य आहे हो हे?' पण हे झाल्याबरोबर तुम्ही आहातच. बंधु-भगिनी , सगळं काही म्हणाल ते. म्हणजे ते नातंच वेगळं होऊन जातं. कारण तुम्ही वेगळे राहत नाही. ती शक्ती जेव्हा हातातून वाहू लागते तेव्हा तुम्हाला दुसरा सहजच जाणवतो हा कुठे आहे ? ही कुठे आहे? त्या कुठे आहेत? कुठे त्याचं अडकलंय? आणि सगळे लक्ष कुंडलिनीवर येतं. बाहेरचं लक्ष जातं की कोणती साडी नेसली आहे, कोणते कपडे घातले आहेत, त्यांची कुंडलिनी कुठे अडकली आहे ते पटकन लोक सांगतात मग लहानसं मूल असो की मोठा माणूस असो! कुणी पार मनुष्य असेल व्यवस्थित, तर त्याला आधी कुंडलिनी दिसणार. त्याला हे सगळे काही दिसणार. पण त्यातही आता दोन आणखी पद्धती आहेत त्यांच्याकडे लक्ष असलं पाहिजे. म्हणजे एकीकडे तुम्हाला तुमच्या डावीकडे एक दूसर्या त्हेची व्यवस्था आहे आणि उजवीकडे दुसरी व्यवस्था आहे. डावीकडे जी व्यवस्था आहे त्याला आपण कलेक्टिव्ह सबकॉन्शस म्हणू, म्हणजे सामूहिक सुप्त चेतना आणि उजवीकडे जी व्यवस्था आहे त्याला आपण सुप्राकॉन्शस म्हणू किंवा अतिचेतना म्हणा. त्याला मराठीमध्ये काय शब्द आहे माहिती नाही. म्हणजे इकडे मेलेली अति चेतना आहे आणि तिकडे मेलेली सुप्त चेतना आहे. अशा रीतीने आपल्यामध्ये आणखी दोन व्यवस्था आहेत. त्याला कारण असं आहे की जी मंडळी मरतात, संसारामध्ये त्यांना सुद्धा जागा पाहिजे. पैकी जी मंडळी अशी मेलेली आहेत, जी आळशी, काही कामाची नाहीत ती या बाजूला जातात. त्या बाजूला अशी मंडळी जातात ज्यांनी अतिकर्मीपणा केलेला आहे जगामध्ये. ैकै ७ य] 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-11.txt अमुक-तमुक महत्त्वाकांक्षी लोक वगैरे ह्या बाजूला जातात. त्यातली बहुतेक मंडळी परलोकात जाऊन हळूहळू लहान होत जातात आणि त्या दिवसाची वाट बघत असतात, जेव्हा त्यांना जन्म घ्यायचा असतो. त्यातली काही थोर मंडळी असतात ती डिसीजन घेतात, स्वत:च निर्णय करतात की केव्हा जन्म घेऊ, कुठे जन्म घेऊ, कोण माझे आई-वडील? वगैरे त्याबद्दल मी आता जास्त बोलणार नाही आज, पण आहेत. असेही लोक असतात. पण जी मंडळी फार अतृप्त असतात, आजकाल तर कलीयुगात फारच असे लोक आहेत, त्यांची जी एक रांग लागलेली आहे ती सुद्धा मंडळी तुमच्याभोवती आहेत आणि ती अगदी तुमच्या जवळपास असतात. तेव्हा जो मनुष्य त्या किंवा ह्या बाजूला एका मर्यादिच्या बाहेर गेला, करू शकतात हे लोक आजकाल. हे लोक जे करत आहेत ते हेच धंदे करतायत. इकडे तरी ढकलतात किंवा तिकडे तरी ढकलतात. ह्या किंवा त्या गुरु बाजूला. जर तो अतिमध्ये जरासा गेला की तो तिकडे तरी ढकलला जातो किंवा इकडे तरी ढकलला जातो. तेव्हा त्यातली एखादी व्यक्ती तुमच्यात येते. आता महेश योगी आहेत ते हे करतात. ते उजव्या बाजूला ढकलतात. उजव्या बाजूला तुम्ही गेल्याबरोबर काय होतं ? अति महत्त्वाकांक्षी मेलेले लोक जे अतृप्त अथवा आत्मिक ते तुमच्यात उतरतात. म्हणजे त्यांनी त्यांची नावे देवाची ठेवलेली आहेत, म्हणजे बघा हुशारी! आता तुम्हाला सांगितलं 'तुम्हाला कोणाचे, शिवाचे आहे ना , मग शिवाचे नाव घ्या. तुम्हाला कुणाचे रामाचे आहे ना मग रामाचं नाव घ्या.' आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही देवाचंच नाव घेतो पण असा विचार केला पाहिजे की तुमच्या हाक मारून यायला देव काही तुमचा नोकर नाही. तुम्हाला काय अधिकार आहे त्याला बोलावण्याचा? तेव्हा कोणीतरी नोकरपद्धतीचा मनुष्य येणार किंवा जो तुमच्या खाली येऊ इच्छितो किंवा तुमच्या वरती येऊ इच्छितो. तर हे जे लोक आहेत सुप्राकॉन्शसचे त्यामध्ये ही मंडळी आली. आल्याबरोबर सगळं काही बदललं, तुमचा ब्लड काऊंट बदलणार, तुमच्या पद्धती बदलणार कारण त्यांनी तुमचा चार्ज घेतलेला आहे. तुमच्या शरीरातच फरक होऊ लागतो. उलट तुम्ही अत्यंत डायनॅमिक होता. तुमच्यामध्ये असे विचार येऊ लागतील की तुम्हाला आश्चर्य वाटेल. कुठून विचार येतात. समजा एखादा मनुष्य असेल त्याला काही अक्षर माहिती नसेल संस्कृतचं, त्याच्यामध्ये संस्कृतचा मनुष्य आणून बसवला तो संस्कृतमध्ये श्लोक म्हणू लागेल. आमच्या कार्यक्रमातच एक बाई आल्या होत्या. त्या साधारण भांडी घासणार्या बाई होत्या. घाटीण बाई आणि त्या संस्कृतमध्ये बोलू लागल्या. पुष्कळांनी ऐकलं आहे. तेव्हा असं घटित होऊ शकतं आणि त्याच्यात माणसांना अस वाटतं 'वा ! वा! आम्ही केवढे मोठे झालो! आमच्यामध्ये हे आलं ते आलं.' चार-पाच वर्षानंतर त्या लोकांची स्थिती अशी होते, की त्यांचे हातपाय लटलट कापतात. फार तर चार-पाच वर्षे त्या लोकांचं आयुष्य असतं आणि त्याच्यानंतर जिवंत राहणंसुद्धा त्या लोकांना कठीण असतं. सारखे हालत असतात कारण सगळीकडे परमेश्वराचे साम्राज्य आहे. त्याच्यासमोर ते फेस करू शकत नाहीत. ती भुते एकदा अंगातून गेली की सगळं संपते. अंगात असली तरी संपते कारण त्यांच्याही शक्त्या संपतात व यांच्याही शक्त्या संपतात. अशी स्थिती येते. मग या लोकांना काही पर्वा नाही कारण त्यांनी आपले पैसे बघावेत. आता दुसर्या साईडला बघा. अशी माणसं महा आळशी, घाणेरडी, घाणेरडी कामं करणारी अशी तशी असतात. ती तुमच्यात राहतात. ती तुम्हाला घाणेरडी कामं शिकवितात. म्हणजे स्मगलींग करा, अमकं करा. तुम्हाला वाटतं काय पैसे मिळतात. वा! वा! सगळीकडे देव आमचं काम करतोय ह ! तिथे मी गेलो, एवढं स्मगलींग केलं, पैसे मिळाले. तिकडे मी आपल्याला एवढं हे केलं, तिकडे खून झाला. गळे कापले तरी कळत नाही. कुणाला मारायचं असलं तरी मारतात ही हे लोक. वाटेल ती घाणेरडी कामे करतील हे लोक ! बरं हे गुरू लोकांचं काय आहे, तुम्हाला कधी रागवणार नाहीत, 'वा! वा! वा! ही सगळी अगदी संत, चांगली मंडळी आहेत. स्मगलींग केलं तरी काही हरकत नाही. मला त्याच्यातलं घबाड आणून द्या, म्हणजे रा झालं!' एखादी बाई घाणेरडी वेश्या असली तरी काही हरकत नाही, 'तू देवीच आहेस.' फक्त एवढंच आहे की तू जे कमविले आहेस त्याच्यातलं फक्त काहीतरी माझ्या चरणावर जशी श्रद्धा असेल तसे घाल. तू घाल.' हे घातलं म्हणजे मग ते गुरू महाराज ैकै ९ य] 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-12.txt खुष. 'मग तुमच्या गळ्यात आम्ही हार घालतो. बाकी काही नाही. आमचा तुमचा संबंध एक आहे. आम्ही गुरू तुम्ही संत. फक्त संबंध एवढाच, की तुम्ही जेवढी कमाई केली त्यातला जो इन्कमटॅक्स आम्हाला आणून घाला. तिकडे गव्हर्नमेंट कशाला? उगीच सरकारला कशाला तुमची द्यायचा! आता असं केल्यावर, थोड्या दिवसांनी पाहिलं, की तो मनुष्य पकडला गेला. मग खुशामत करतो माझ्याकडे आला, 'माताजी, आम्हाला सोडा.' म्हटलं 'तुम्ही केलं कशाला असं. गुरू आहेत नं तुमचे ! कशाला तुम्ही? काय कामासाठी ठेवलेला आहे? जो तुमची खुशामत करतो तो गुरू कसा होऊ शकतो? त्याने सांगितलं नाही का, की हे धंदे करू नकोस? जो तुम्हाला कधीही सांगत गुरू आहेत तुमचे म्हणजे काय? मग हे ठेवलंय कशाला! हा गुरू ठेवला तो नाही तो गुरू तुम्ही ठेवायचा कशाला?' 'नाही, आम्ही म्हटलं जर सगळ्यांनी ठेवलं तर गुरू आम्ही ठेवून घेतलं. तसं काही नाही. आम्ही काही केलं नाही. आम्ही फक्त त्याच्या पायावर गेलो होतो.' कसा आता हे मस्तक देवाने तुमचं केलेलं आहे माणसाचं. केवढे मोठे हे मस्तक! माहिती होऊ शकतो? आहे का आपल्याला! हे मस्तक आपण जनावराच्या स्थितीतून आज मनुष्याच्या स्थितीला आणलंय ते कसं आणलंय? ते कसं इव्हॉल्युशनरी स्टेजेस मध्ये आणलंय ते सांगायला नको. ते मस्तक असं आपण वर केलेलं आहे ते अशा घाणेरड्या माणसाच्या पायावरती तुम्ही टेकल्यावर मात्र परमेश्वर तुम्हाला कधीही क्षमा करू शकत नाही. अशा घाणेरड्या गुरूच्या मागे जर धावलेले असाल आणि हे मस्तक जर तुम्ही टेकलेले असेल तर परमेश्वर तुम्हाला क्षमा करू शकत नाही. बाकी सहजयोगात तुमची सगळी पापं क्षमा करतो तो. हे मी पाहिलेले आहे. मी जर बसले असेल समोर तर हजारो माणसं पार होतात. अशी, अशी माणसं त्याला लोक म्हणतात तो असा मनुष्य आहे, तो तसा मनुष्य आहे. काही हरकत नाही. क्षमा केली. सगळं क्षमा. केवढा मोठा आहे तो ! पण हे मात्र तो क्षमा करीत नाही. म्हणून कुणी गुरूचा मनुष्य आला की मी म्हणते 'हे बघ, तू त्या गुरूकडे जा बाबा. मला तू क्षमा कर.' कारण इथे तीन- तीन, चार-चार वर्षे आम्ही डोके फोडायला तयार नाही. त्याला विचारलं, 'तुला दिलं काय गुरूंनी?' 'काही नाही, म्हणजे तसं काही नाही. म्हणजे आता असं आहे, की आम्ही गुरूचा फोटोबिटो ठेवला आहे.' 'अरे, पण तुम्ही फोटो ठेवलेला आहे त्याने तुमच्यात काही फरक आला कां?' आता खरे गुरू म्हणजे लाखात एक असतात. आपल्या महाराष्ट्रात पुष्कळ उत्तम गुरू झालेले आहेत. म्हणजे आपण खरोखरच काही तरी विशेष आहोत असं म्हटलं पाहिजे ! महाराष्ट्र भूमीमध्ये काही तरी आहे किंवा असही म्हणता येईल की चिखल होता म्हणूनच इथे कमळं आलेली आहेत. काहीही म्हटलं तरी एक आहे, गरू मात्र फार मोठे मोठे झाले आहेत आपल्याकडे. आता थोड्या वर्षापूर्वीच आपण म्हणू, की आपल्याकडे साईनाथांसारखे मोठे गुरू होऊन गेले, त्याबद्दल शंकाच नाही. ते साक्षात दत्तात्रयांचे अवतार नुसता का 10 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-13.txt होते याबद्दल शंकाच नाही. साक्षात त्यांनी अवतरण घेतलं होतं यात तर शंकाच नाही. ते मुसलमान असोत की कोणीही असो. ते कोण होते ते तुम्ही ओळखलंत हे विशेष; पण त्याच्यानंतर तुम्ही देवळे, ती उभी केली. बघा तिथे ते असे मोठ्या पोटाचे पुजारी लावले कोणत्याही आणि ते कसे तिथे पूजा करणार? त्यांना काय अधिकार आहे ? कोण आहेत ते पुजारी? मग धर्माची त्यांच्यासमोर जाऊन पैशाच्या राशी तुम्ही ओतल्या म्हणजे हे काय! त्यांनी काय सांगितलेलं आहे ! त्यातलं काही जरी केलं नाही नुसतं जाऊन त्या देवळात बसले, 'हो, साईबाबांनी निंदा आमची कामं केली.' अहो, ते करतातच! ते आहेतच मुळी दयाळू! त्यांच्या चरणी गेलं म्हणजे करतात. तुमची कामं करतात. एवढंच. पण तुम्ही काय करता त्यांच्यासाठी? उलट नावे घेऊन घेऊन ते रागावले आहेत तुमच्यावर. मी पुष्कळ साईनाथांचे शिष्य पाहिले आहेत. करणे त्यांना मला उलट म्हणावं लागतं 'यांना क्षमा करा हो. यांना माहिती नव्हते.' त्यांचं नावसुद्धा घेण्याची आपली पात्रता नाही, खरे सांगायचे तर! केवढी मोठी माणसं आहेत ती ! माझं काम दुसरं आहे. मी आईच आहे. माझंे नांव कितीही वेळा घेतलं तरी हरकत नाही. मी काही महापाप रागवत नाही लवकर. पण त्यांचं नाव घ्यायचं, त्यांच्याकडे डोळासुद्धा वर करून बघायचं ही केवढी मोठी गोष्ट आहे. आहे. अशी मोठी मोठी मंडळी आपल्या इथे झालेली आहेत. पण ते जेव्हा जिवंत राहिले होते तेव्हा त्यांना छळ-छळ आपण छळलेलं आहे हे मान्य केलं पाहिजे. बरं ते झालं. जे झालं ते झालं. ते ही लोक नाहीत. पण आतासुद्धा आपण कसे वागतो आहोत? त्यांच्या तत्त्वाला धरून वागतो आहोत का ? या महाराष्ट्रात किती अशी साधु-संत मंडळी झालेली आहेत, पण अमके उभे, तमके उभे म्हणजे असल्या तऱ्हेच्या घाणेरडेपणाच्या गोष्टी आपण करायला सुरुवात केली आहे. म्हणजे काय ? माझं म्हणणं असं आहे की याच्यात पॉलिटिकल अशी काही गोष्ट नाही. पण कुणाचा हेवा-दावा करणं, कुणाविषयी वाईट विचार करणं किंवा कोणालाही आपल्यापेक्षा कमी लेखणं किंवा उच्च लेखणं वगैरे वरगैरे गोष्टी साईभक्तांकडून केल्या जाऊ नयेत. बाकीच्यांना करू देत, पण तुम्ही साईबाबांचा घरात फोटो ठेवून हिंदू-मुसलमान वेगळे आहेत असा प्रचार करू शकत नाही. कबूल मुसलमान वाईट. त्यांनी असा त्रास दिला. कबूल हिंदू वाईट, त्यांनी असा त्रास दिला. पण त्यांचा जेव्हा फोटो घरात लावता तेव्हा तुम्ही कोठे आहात ? तुम्ही कुणी काही केलं तरी चालेल पण साईनाथांचे जर तुम्ही शिष्य आहात, तुम्ही त्यांच्या चरणाशी आहात तर तुम्ही सगळे नीट रहा मग तुम्हाला असला दुजाभाव नसला पाहिजे. ही अगदी साधी गोष्ट आहे. त्यांनी स्वत: सांगितलं आहे, कोणत्याही धर्माची निंदा करणं महापाप आहे. अशी किती मंडळी आहेत ! बरं तुम्ही कोण मोठे धर्माचे आले! तुम्हाला धर्मातलं काय कळतंय अजून ! अहो, तुम्ही गणपतीचं देऊळ बांधलं म्हणून मोठे धार्मिक झाला आहात का? तो गणपती नाही तिथे ते तरी कळतंय का तुम्हाला ? तेव्हा आधी धर्म म्हणजे काय? हे सुद्धा सहजयोगाने लक्षात येते. धर्म म्हणजे काय? धर्मामध्ये मनुष्याला काय प्राप्त होते? धर्माने कसं जाणायचं? कुठे आहे ते ? साईनाथ मोठे ैकै ११ य] 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-14.txt होते. मी असे म्हणेन हे आताचे सारे शंकराचार्य मी बघितले. एकसुद्धा पार नाही, एकसुद्धा शंकराचार्य! आदिशंकराचार्यांची गोष्ट वेगळी. ते आणि साईनाथ एक आहेत. पण बाकी आजकालचे तर नाहीत. तुमचे ते पोप आहेत ते मुळीच पार नाहीत. नाही म्हणजे नाहीत. आता आम्ही तरी त्याला काय करणार. आता तुम्ही त्यांना पोप करा नाहीतर आणखी काहीतरी नाव द्या, पण नाही म्हणजे नाही, त्याला काही इलाज नाही. कारण आम्ही बघून सांगतो आणि जे तिथे आहेत ते सगळे एकच आहेत. त्यांच्यात काही फरक नाही. ख्रिस्तांनी सांगितले आहे की, 'दोज ह आर नॉट अगेन्स्ट मी आर वुईथ मी.' म्हणजे केवढं मोठं त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. पण या ख्रिस्ती लोकांना समजेल का ? त्यांना जर मी सांगितलं तर ते म्हणतील की नाही म्हणजे त्यांचा अर्थ असा की ते खिश्चन आहेत. म्हणजे हे कोण खिश्चन करणारे. त्यांना काय अधिकार आहे ख्रिस्तांनी दिलेला. उलट ख्रिस्त जेवढा त्यांच्यावर रागावलेला आहे तेवढा तुमच्यावर नाही रागावलेला. हे असे गोंधळ आहेत धर्माचे. या धर्माच्या नावावरसुद्धा इतका गोंधळ झालेला आहे. लोकांचा धर्मावरून विश्वास उडालेला आहे. सगळं कबूल आहे. पण आज सहज धर्म जर तुमच्यात आला तर तुमच्या लक्षात येईल की धर्म हा शाश्वत, सनातन प्रत्येकामध्ये वास करतो. प्रत्येकामध्ये तो आहे. इतकेच नाही तर साऱ्या संसारावर त्याचे राज्य चालले आहे. पण त्यासाठी धर्माच्या पलीकडे उतरावं लागतं. धर्मातीत व्हावं लागतं आणि ती दशा फार सहज अगदी सहज, त्याच्यात तुम्हाला काही करणं नाही. त्याच्यात तुम्हाला काही बोलणं नको. ते आपोआप परमेश्वर साक्षात तुमच्या हातात देणार आहे. आणि केवढी ती गोष्ट आहे आणि आंतरराष्ट्रीय वरगैरे वगैरे ज्या गोष्टी आपण करतो. ते ' अंतर', अंत:करण जर झालं, तर एकदमच फरक होऊन जाईल. आता तुमच्यासारखी लंडनला पण माझी पुष्कळ मुलं आहेत. अमेरिकेला पुष्कळ मुलं आहेत. ते येतील आता. भेटाल तुम्ही सगळ्यांना. सगळ्यांच्या भाषा व्हायब्रेशन्सच्या, दूसरी भाषा कशाला एस्टॅब्लिश करायची ? व्हायब्रेशन्सची भाषा आल्यावर दुसरी भाषा कशाला? आमचा मोरेश्वर आहे त्याला येते ती भाषा. तिकडे इंग्लंडचा तो इंग्लिश मुलगा आहे. त्यालाही येते ती भाषा. तिकडे अमेरीकेतला असला तरी त्यालाही ती भाषा येते. पटकन सांगेल 'ही बोट आहेत बघा माताजी' आणि बरोबर तिथे, तिथे धरलेलं आहे. इतकं त्याचं सायन्स आहे. पण सायन्सच्या लोकांना जर तुम्ही म्हटलं की 'प्रेम काय आहे ?' तर ते त्यांना समजायचं नाही. तेव्हा त्यांना नुसते दगड, धोंडे समजतात. माणसं समजून सांगायचे फार कठीण काम आहे. पण जेव्हा कॅन्सरसारखा रोग डोक्यावर येऊन बसला आहे आणि मी परत सांगते सहजयोगाशिवाय कॅन्सर ठीक होणार नाही. शक्य नाही. म्हणून हा कॅन्सर काढला देवाने की तू जा. त्याच्याशिवाय समजत नाही हो लोकांना, करता काय! आता काय काय सहजयोगाचे लाभ आहेत त्याचा तुम्हीच आढावा घ्या आणि मी परत तुम्हाला सगळे समजावून सांगितले आहे. थोडसं ध्यानात जाऊ या. नवीन मंडळी आली आहेत यांना पार करून टाका, मग बघा. पण सहजयोगामध्ये असं नाही की आज झाले ना मग जाऊ या कधीतरी. सहजयोगाची मजा उचलायची असली तर त्याच्या साम्राज्यात यायला पाहिजे आणि मधेमधे इथला बाजार केला पाहिजे. हे असं आहे की, मुंबईत येऊन तुम्ही जेव्हा इथे राहणार नाही तर मुंबईची मजा काय माहिती तुम्हाला. तसंच आहे. त्याच्यामध्ये स्थावर झालं पाहिजे. आमच्याकडे मंडळींनी बरीच प्रगती केलेली आहे. साधारण लोकांनीसुद्धा केलेली आहे. आता काही आज अशा गोष्टी निघाल्या तेव्हा मंडळी अशी म्हणाली की 'अहो, सर्वसाधारण लोकांमध्ये ही तुमच्या मोठी मंडळी कशी येणार?' म्हटलं 'मुळीच येऊ नका!' जे आपल्याला एवढे मोठे समजतात त्यांच्यासाठी आमचा सहजयोग नाही. यात यायचं असेल तर इथे येऊन बसा. इथे एक जर कोळी असला किंवा एक जर राजा असला किंवा एक जर मेहतर असला किंवा एक जर मोठा भारी ऑफिसर असला, सगळ्यांनी देवाच्या समोर जर एक व्हायचं असेल तर सहजयोग मिळणार. का त्याला फुकटात द्यायला आम्ही बसलेलो नाही. तुम्हाला स्वत:विषयी फार घमेंड असेल तर तुमच्या बंगल्यात येऊन आम्ही १२ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-15.txt द्यायला तयार नाही. असेल तर बसा. तेव्हा ते म्हणाले ती मंडळी येणार नाहीत. म्हटलं नको येऊ दे. असली मंडळी घेऊन मला करायचंय काय? ज्या लोकांच्या डोक्यामध्ये असे क्षुद्र क्षुदर विचार आहेत, ते क्षुद्र आहेत की हे क्षुद्र आहेत ? क्षूद्र ती मंडळी आहेत. क्षुद्र हे नाहीत, ज्यांनी मिळविलेलं आहे. आज लोक त्यांच्या पायावर येणार नाहीत, येणार आहेत. क्षू्र क्षुदर शहाणपणा तुमच्या हा आणि त्यांना बरंच स्पष्ट शब्दात सांगितलंय. अशा लोकांना आमच्या सहजयोगाचा काही लाभ होणार नाही. बसा म्हणावं. तुमच्या मोटार, गाड्या सांभाळा! फार म्हणजे मी काही श्रीमंतांच्या विरोधात आहे अशी गोष्ट नाही. पुष्कळसे श्रीमंत आहेत. मुष्किलीने येतो, येऊन बसतात आणि म्हणतात, 'माताजी, आम्हाला द्या.' पण हे आहे की आम्ही मोठे आहोत. बसा! असल्या विचित्र कल्पना घेऊनसुद्धा पुष्कळ लोक इथे येतात. तेव्हा तुम्ही शहाणपणा धरा. शहाणपणा धरला पाहिजे. शहाणपणा हा फार मुष्किलीने येतो, मूर्खपणा फार लवकर येतो. तेव्हा आपल्यामध्ये शहाणपणा धरा. मी आई आहे. मी तुमचा मूर्खपणा किंवा जो वाईटपणा आहे त्याला मी सांगणार . तुम्ही करू नका. ते मूर्खपणा तुमचा तुमच्या भल्यासाठी आहे. मी काही गुरुबिरू नाही. मला तुमच्याकडून काही नको. फक्त हे एवढंच. तुमचं भलं आणि कल्याण झाले पाहिजे. तुमच्या हितासाठी जे चांगलं आहे ते मी सांगणार. फार लवकर त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. येतो. आता नवीन मंडळी आलेली आहेत, त्यांना मी सांगते. कोणी वाईट वाटून घेतलं, तर ते गेले कामातून. व्हायब्रेशन्स जाणार.. मी काढत नाही हं ! जो आवाज आला किनई असाच आवाज आपल्या 'ओम' चा जो आवाज तुम्हाला म्हणतात, तो असतो. कळलं का! म्हणजे ही एनर्जी वाहत आहे नं, आणि जेव्हा ती वाहते आहे पण ती पूर्णपणे चैनलाइज्ड झालेली नाही, त्यावेळेला तसला आवाज येतो. ती चैनलाईज व्हायला सुरुवात झाली म्हणजे असा आवाज येतो म्हणून आपल्यामध्ये 'ओम' चा आवाज कधी कानामध्ये येणार, कधी डोक्यामध्ये येतो तेव्हा असं समजायचं की तो एनर्जी पूर्णपणे अॅडजस्ट आणि चैनलाईज्ड नाही म्हणून तसा आवाज येतो. म्हणून आवाज जर आला तर असं समजलं पाहिजे की ती एनर्जी अजून बरोबर व्यवस्थित आपली बसलेली नाही. तिला बरोबर फिक्स करावी लागते. आणि त्याला फिक्स करण्याचे प्रकार म्हणजे या स्क्रू चे नाही. पण मनाचे स्क्रू फिरवावे लागतात. तर हे जर मनाचे फिरवता स्क्रू आले तुम्हाला, कारण आमचं मशीन वेगळं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही जर विचार करून आपल्या मनाचे थोडे जर स्तक्रू फिरवायला सुरुवात केली तर हा जो वेस्टेज आहे एनर्जीचा जो आज तुम्हाला कानात, डोक्यात ऐकायला येतो तो जाऊन निव्वळ त्याच्यातून स्वर असा निघेल की तो मौन होऊन जाईल. स्वर मौन होऊन जाईल. आता काही एनर्जीचा स्वर आला नाही की आपण म्हणतो अगदी बेस्ट पोझिशनला आला. त्या एनर्जीला एकदम मौन स्थितीला ती आली म्हणजे समजायचं की आपण त्या स्थितीत आहोत. आपण त्याचा उपयोग करतो. कळलं का आता! 'ओम'चा जो अर्थ आहे, लोक म्हणतात आतून ओमचा आवाज येतो. सात तऱ्हेचे ैकै १३ य] 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-16.txt आवाज येतात. ते म्हणजे बरोबर नाही. आला नाही पाहिजे आवाज. याच्यातून पुष्कळसे आवाज येतात. हे आवाज येत असताना हे मशीन बिघडलेलं आहे. म्हणजे बिघडलेलं नाही पण या मशीनमधून येणारी जी शक्ती आहे ती बरोबर अॅडजस्टेड नाही तसंच आहे. ओम जो आवाज येतो, तो आम्ही मोठे दुर्ग मिळविले म्हणून जे लोक म्हणतात, त्यांना जरा अर्धवट नॉलेज आहे. त्याच्यामुळे त्यांना समजत नाही की ते चुकलेलं आहे. आवाज बिवाज काही यायला नको खरं म्हणजे आवाज सुरुवातीला यायला हरकत नाही. म्हणजे काय, तुम्ही ऐकता आवाज. पण काही हरकत नाही. कारण आता एनर्जी येऊ लागली आहे. अॅडजस्ट करून घ्यायचं. काय गोष्ट आहे. असा आवाज का आला आपण अॅडजस्ट करून घ्यायचं. अॅडजस्ट करून घेतल्यावर समजलं पाहिजे की हं आता बरोबर आलं आहे. आता ही एनर्जी वापरली पाहिजे, घेण्यासाठी किंवा देण्यासाठी. दोन्ही गोष्टींसाठी. आता हा आहे माईक. जर याच्यामध्ये आवाज येत असला तर माझा आवाज यातून कसा येईल? तेव्हा जर काहीही जरासं अॅडजेस्टमेंटला फरक असला तर परमेश्वराचा आवाज आपल्यातून कसा जाईल, त्याची शक्ती आपल्यातून कशी जाईल, तेव्हा या मशिनला पूर्णपणे मौन झालं पाहिजे. तसंच तुमच्या या शक्तीला सुद्धा आतून मौन झालं पाहिजे. मौन होणं म्हणजे बेस्ट अचीव्ह केलं. अॅक्टिव्हिटीचं जे तंतोतंत डेलिकेट जी ोॅडजस्टमेंट आहे ते जेव्हा मौन झालं म्हणजे बेस्ट झालं. म्हणजे मग ते वरून येणारे आहे ते मुखीर होत नाही. म्हणून ते ही आता एक सांगते मी. कारण परवा ते वाचत होते पुस्तक, हठयोगावरती म्हटलं बघावं. हे एवढं तर पुस्तक लिहून ठेवलंय म्हणा. त्याच्यात त्यांनी सांगितलंय आवाज येतात. म्हणजे काय ? म्हणजे मशीन बिघडलेले आहे. मशीन आम्ही बनवलेले आहे नं म्हणून आम्हाला माहिती. मशीन खराब आहे तर ते ऐकत बसू नका. ते काही चांगलं नाही. आवाज येतो म्हणजे ते मशीन खराब आहे म्हणजे अॅडजस्टेड नाही म्हणून आवाज येतो. आता हा तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला आजार होऊ दे, तुम्हाला काही त्रास असला म्हणजे आवाज येणार डोक्यात. डोकं भणभण करणार, काहीतरी असा त्रास असला म्हणजेच आवाज येणार, तुम्ही जर पूर्णपणे अगदी स्वस्थ असाल नं तर मौन आहे. मौन शांत, शांती आणि मौन, या दोन गोष्टी स्थापित झाल्या. आता सांगायचे म्हणजे आज वेळ कमी आहे, पायावर येणं सुरू झालं म्हणजे धडाधड, माझे पाय, परवा तुम्ही सगळ्यांनी मिळून मोडून टाकले. तेव्हा हे पाय जरा थोडे दिवस आणखी चालू द्यावे ही विनंती आहे. कारण मी काही इन्शुअर केले नाहीत माझे पाय तर तुम्ही जर माझे पाय मोडले तर माझं काही ठीक होणार नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे की माझे पाय एवढ्या जोरात धरून वरगैरे ओढू नका. आणखीन जरी पायातून पुष्कळ शक्ती वाहते पण तरी जरा नाजूकच आहेत ते. तेव्हा हळूच हात-पाय खाली ठेवून डोकं जर ठेवलं तर बरं. पण इतक्या जोरामध्ये पाय दाबून असं धरायचं नाही. कृपा करून विशेषत: आपली मराठेशाही माझ्यावर गाजवू नका. गरीब माणूस आहे. परवा कारण तुम्ही लोकांनी माझे पाय एवढे ओढले की माझी मुलगी म्हणाली पायावर कोणी मारलं की चाबकाचे फटके असे वाटतंय पायावर वळ आल्यासारखे अर्थात त्याला काही हरकत नाही म्हणा. तुम्ही तुझ्या प्रेमाने करता पण प्रेमात अगदी लचकाच घेतला पाहिजे असं काही जरुरी नाही. जोपर्यंत अर्धाशेर मांस नाही काढलं तोपर्यंत आपण प्रेम प्रदर्शन केलं नाही असं नसतं. उलट नाजूकपणाने व्यवस्थितपणे, श्रद्धेनी कोणतेही कार्य केले म्हणजे सुबक दिसतं आणि बरे असते. तेव्हा थोडीशी माझी काळजी घ्यावी त्याबाबतीत अशी माझी विनंती आहे. कितीही असलं तरी आई म्हणजे आईच असते नां! तिला मुलं जायला लागली म्हणजे देवी असो की कुणी असे ना, तिला वाटते की मी मुलांना सोडून आता कुठे निघाले असं वाटणारंच. आता जी मंडळी पार नाही झालेली त्यांनी हात असा करा आणि जी मंडळी ध्यानात बसलेली आहेत त्यांनी जरा असे बघायचे. बघुया. येतंय थंड? .....तुम्हाला? हातामध्ये थंड वाहतंय...उत्तम....! का १४ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-17.txt रि मै डायरी १७/५/१९८० १५ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-18.txt मी आपल्याला सांगत आले आहे की सर्व सहजयोग्यांनी डायरी लिहायला सुरू केले पाहिजे. प्रत्येक दिवशी घडणाऱ्या घटनांचा उल्लेख तुम्हाला डायरी लिहितांना करायचा आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जागरूक रहाल आणि दुसरे म्हणजे भूतकाळ किंवा भविष्यकाळाविषयी तुम्हाला जर काही खास गोष्टी आठवल्या, काही खास योजनांचा विचार केला असेल तर त्याची नोंद डायरीमध्ये करू शकता. अशाप्रकारे तुम्हाला दोन डायऱ्या बनवायला पाहिजेत. तुमचे चित्त एकाग्र होण्यासाठी ते आपल्या खास तथ्यांवर ठेवले पाहिजे. पहिले म्हणजे जसे मी तुम्हाला सांगितले, की जर तुम्ही डायरी बनवू लागाल तर तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत हे लक्षात ठेवावे लागेल. यामुळे तुमचे चित्त जागरूक राहील आणि तुम्ही अशा गोष्टींकडे लक्ष द्याल की काय झाले आणि कुठे झाले? तुम्हाला आश्चर्य वाटेल, की जेव्हा तुमचे चित्त जागरूक असेल तेव्हा तुम्हाला समजेल की कोणत्या नवीन गोष्टी तुमच्याजवळ आल्या आहेत. जसे खूप उत्तम योजना, जीवनात घडणारे चमत्कार, परमेश्वराच्या सौंदर्याचे चमत्कार आणि त्याचे मांगल्य, परमेश्वराचा मोठेपणा, त्याची उदारता, त्यांचे आशीर्वाद- कशाप्रकारे कार्य करतात. जेव्हा तुम्ही डायरी लिहिणे सुरू करता तेव्हा त्याच्याविषयी (परमेश्वर) दोन ओळी का होईना लिहा. यामुळे तुमचे मन त्याच्याबरोबर जोडलेले राहील. तुम्ही डायरीमध्ये हे पण लिहू शकता की काय, काय घडले आहे. तुम्ही ध्यान केले आहे का किवा करू शकलात का? तुम्हाला ध्यान करण्यासाठी वेळ मिळाला की नाही. स्वत:ला थोडे फार असे तयार करा म की जणू काही तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करीत आहात. त्याचप्रकारे तुम्ही टीप ही बनवा. मी सकाळी उठलो का? उठलात का? तुम्हाला तुमच्या मार्गाकडेही लक्ष ठेवले पाहिजे की तुम्ही मध्यमार्गात आहात की डाव्या किवा उजव्या बाजूकडे आहात. डायरी तयार करणे ही एक खूप चांगली सवय आहे. त्याबरोबरच तुम्हाला हे पण दिसेल की कशाप्रकारे हळूहळू आपल्या योजनांमध्ये बदल येऊ लागतो, कशाप्रकारे नव्या प्राथमिक गरजा निर्माण होऊ लागतात. कशाप्रकारे तुम्ही वास्तवातील गोष्टींना अधिक महत्त्व देऊ लागता आणि अनावश्यक गोष्टींना कमी महत्त्व देऊ लागता. मला वाटते डायरी बाळगणे ही मानवासाठी एक खूप उपयुक्त गोष्ट आहे. काही काळानंतर काही डायऱ्या प्रदर्शनीय वस्तू बनतील आणि लोकांना वाटेल तुम्ही काय लिहिले हे बघावे. यात नसावी किंवा यात काही लपवू नये. अगदी खरे आणि समजेल असे असावे.... भोंदूगिरी १६ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-19.txt माताजींचा "आई- भा ज जे काही सांगितले आहे, की आपण आपल्या मुलांवर जी जबरदस्ती, जुलूम करतो ते आपल्याला जुलूम वाटत नाहीत. परंतु ही मुले म्हणजे साधु-संतच तुमच्या घरी आलेले आहेत. तुम्हाला त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांना सांभाळले पाहिजे. त्यांना प्रेम द्यायला पाहिजे, ज्यामुळे ती फुलतील, वाढतील. त्यांना स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. ती कधी चुकीची कामे करू शकत नाहीत कारण ती संत -साधू आहेत. परंतु तुमच्या बघण्यात फरक आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमचा जोर लावता, हिटलरशाही, मनगटशाही गाजवता. अशा विचारांबाबत मला वाटते माझ्या वरचढ कोणी नसेल. मुलांना काहीही बोलणे, रागावणे मला बिलकूल आवडत नाही. जर एखादी चुकीची गोष्ट त्यांनी केली तर त्यांना समजवा, पण या मुलांना वाढायला पाहिजे. हीच मुलं आपल्या देशाचे उद्याचे नागरिक आहेत आणि हीच मुलं तुम्हाला करामत करून दाखवतील. या लोकांना, मुलांना अशाप्रकारे स्वातंत्र्य दिल्याने ते किती चांगले झाले आहेत हे मी बघते आहे. बरेच जण बिघडले ही आहेत. आता तुमच्याजवळ तुमची संस्कृती आहे. त्या आधारावरच तुम्ही मुलांचा सांभाळ करा. त्यांना समजवून सांगा, की आपली संस्कृती काय आहे , ज्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सहज, सरळ होतील. आपल्या देशाविषयी, इथे होऊन गेलेल्या महान लोकांविषयी कोणाला काही माहीतच नाही. कोणालाच काही माहिती नाही की किती कष्टाने, त्याग करून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. हे या मुलांना सांगितले पाहिजे. जे मोठ-मोठे नेते होऊन गेले त्यांचे फोटो घरात लावले पाहिजेत. कशा, कशा लढाया झाल्या हे त्यांना समजावले पाहिजे. शाळेत हे समजावून सांगितले पाहिजे, अशाप्रकारचे तिथे वातावरण असावे. आम्ही बघतो की मुलांना सिनेमातील हिरो-हिरोईन माहिती आहेत. परंतु ज्या लोकांनी इतका त्याग केला, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्याविषयी तर त्यांना काहीच माहिती नाही. हा खूप मोठा विरोधाभास आपल्या इथे आहे. मुलांना निरर्थक गोष्टी सांगण्यापेक्षा त्यांना सांगा की तुम्ही ज्या देशात जन्मले आहात त्या देशाची तुम्ही संपत्ती आहात. तुमच्यासाठी काय, काय केले गेले आहे, किती त्याग केला आहे. हा त्याग कशाप्रकारे केला आहे हे त्यांना सांगा. तेव्हाच त्यांच्यामध्ये देशभक्ती जागृत होईल आणि उद्याचे हे नागरिक चांगले देशभक्त होतील. ते सहजयोगी ही आहेत. त्यांच्यासाठी देशभक्ती करणे खूप सोपे आहे. तुम्हा सर्वांना माझे अनंत आशीर्वाद! १७ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-20.txt चुडिलांसाली संदेश ३१ डिसेंबर १९९८ ु र० २० ्थ र ४७ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-21.txt केक पाऊंड ० दिवाल र एए५ हां सहस साहित्य :- सर्व साहित्य साधारण तापमानावर २५० ग्रॅम मैदा, १/४ छोटा चमचा बेकिंग पावडर २५० ग्रॅम बिन मीठाचे लोणी, २५० ग्रॅम साखर, २५० ग्रॅम अंडी, १/४ छोटा चमचा व्हॅनीला इसेन्स, साधारण १२५मि.ली.दूध कृती १) केकपात्राला थोडे तूप लावून मैदा भुरभुरा. (२२ सें.मी.केकपात्र). ओव्हन १८० डिग्री सें. (३५० डिग्री फॅ. ) वर 'प्री-हीट' करा. २) मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. ३) एका भांड्यात लोणी क्रीमसारखे फेट्ून घ्या. साखर टाकून विरघळेपर्यंत फेटा. ४) एक, एक अंडे फोडून टाकत फेटत रहा. जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळणार नाही तोपर्यंत फेटत रहा. मिश्रण चांगले फुलून यायला हवे. ५) व्हॅनीला इसेन्स टाका. मैदा व बेकिंग पावडर घाला. आता दूध टाकून हळूहळू मिश्रण एकत्र करा. (दूध मैद्यानुसार कमी-जास्त करता येते) ६) हे मिश्रण केकपात्रात टाकून ४० मिनीट बेक करा. ७) एखादी पातळ काडी मधोमध टाकून केक शिजल्याची खात्री करून घ्या. जर काडीला केक चिकटला नाही तर त्याचा अर्थ आहे केक तयार झाला आहे. केक थंड होऊ द्या. एका जाळीवर केकपात्र उलट करून केक काढून घ्या जेणेकरून पूर्ण थंड होईल, नंतर वाढा. :- सूचना : तुम्हाला पाहिजे असल्यास ५० ग्रॅम किसमिस, बारीक केलेले खजूर, कुटलेला सुकामेवा, रवाळ फळ टाकू शकता. हे सर्व साहित्य एक मोठा चमचा मैद्याबरोबर प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकून चांगले हलवा आणि केकच्या मिश्रणात टाका. १९ सो 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-22.txt FOR में मे। ठ * प्रकशक जिमल ड्रासोर्मेशन प्रा० लि. प्लाढ न.८, चंद्रगुप्त होसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरूड, पुणे - ४११०३८. फौन 8 ०२०० २५२८६५३७, २५२८६०३२ B-mail : sale@nitl.eo.in ৪ 2009_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-23.txt ॐ० क २ क २ ५ रा] तूम्ही कथी कमळ उपलतांना पाहिते हे! ते हजूहन् उमलते. बंतर त्यातून सुगंध पसस्तो, सपच वेगळ्याप्रकार . अरो है पुष्प आदिशरी्या चरण कमलांवर चढवले जाऊ शक्ते. २३/९/१९८४