चेतच्य लहरो मे मराठी -जून २०१० ७ हृदयात पूजा करणे सर्वोत्तम आहे. माझ्या ज्या चित्राकडे तुम्ही बघत आहात, ते जर तुम्ही हृदयात साठवले किंवा पूजेनंतर त्याची एक झलक तुमच्या हृदयात खोलवर उतरवू शकलात तर तो आनंद, जो तुम्ही त्या वेळी प्राप्त करता, शाश्वत तसेच अनंत बनतो.' या अंकात सहजयोग्यांशी हितगुज.... ४ एकादश रुद्र पूजा...१८ त ३ र ो बग কে सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २६ फेब्रुवारी १९७९ अ ता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की 'सत्यं वदेत, प्रियं वदेत.' यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, की 'सत्यं वदेत, हितं वदेत आणि प्रियं वदेत' म्हणजे जे आत्म्याला हितकारक आहे, हित म्हणजे आत्म्याचा संतोष. ते जरी अप्रिय असले तरी शेवटी ते प्रिय होते आणि ते सत्य असते. समजा, उद्या जर एखादा मनुष्य इथे राजवाड्यांच्याकडे आला आणि येऊन असे विचारले, की अमका मनुष्य इथे लपलेला आहे का? आणि हातात सुरा घेऊन आलेला आहे. तर राजवाङ्यांनी काय सांगावे त्याला. 'तो लपलेला आहे' हे सत्य आहे. ते त्याला सांगायचे का की 'तो इथे लपलेला आहे.' किंवा ते सत्य जर सांगितले तर ते ठीक होईल की ते हितकारक होईल का? असा प्रश्न पुढे उभा राहतो. तेव्हा पहिली गोष्ट त्याला अशी की ही अनाधिकार चेष्टा आहे. त्यांनी जर म्हटले, की 'त्या माणसाचा मला पत्ता सांगा,' तर 'हा कोण विचारणारा ?' ही अनाधिकार चेष्टा आहे. तेव्हा कोणत्याही अनाधिकार चेष्टेला तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे, हे काही हितकारी होणारच नाही. अधिकार असावा लागतो. तसेच सहजयोगात आहे. आम्ही पूर्णपणे आपल्यावर प्रेम करतो आणि ही आमची हार्दिक इच्छा आहे, की सगळ्यांनी सहजयोगामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा आणि परमेश्वराच्या साम्राज्यात यावे. ज्यासाठी मोठे आमंत्रण आपल्याला दिलेले आहे. सगळे अवगत आहे. अत्यंत प्रेमाने बोलावलेले आहे. पण त्यातही अनाधिकार चेष्टा होते. तेव्हा त्या अनाधिकार व्यक्तीला सहजयोग लाभेलच असे सांगता येत नाही. थोडा अधिकार असावा लागतो, आईवरसुद्धा. हे तर आपणच आपले अधिकार स्वतःच जमवून बसलेले आहेत. ते सहज आहे. 'स' म्हणजे बरोबर. 'ज' म्हणजे जन्मलेले. ते आपल्याबरोबर जन्मलेले आहेत. या योगाचे =ा क य= य ॐ शैर अधिकार आपल्या बरोबर जन्मलेले आहेत. पण जशी एखाद्या साम्राज्यात आपले नागरिकाचे अधिकार आपण गमवतो तसेच आपणसुद्धा काही काही अधिकार गमावलेले आहेत. तर ते स्थापित करावे लागतील. ते करायचे काम आमचे आहे. जसे पुण्याला काम आम्ही बघितले, तर गणेश त्त्व मात्र फारच दुःखात आहे. म्हणजे जागृतच होत नाही. आता बघा! पुण्य हे गणेशाचे प्रसाद रूप आहे. म्हणजे आपल्याला गणेशच पुण्य देतो. पुण्य संपदा आपली जी होते ती आपल्या कुंडलिनीमध्ये असते आणि तो संचय संबंध गणेश म्हणजे आपल्यामधले. जे गणेश तत्त्व आहे तो सगळे आकलन करून तिथे, ती संपदा आहे. तेव्हा तुम्ही कितीही पुण्यसंचय केला आणि त्याठिकाणी गणेशच ठीक नसला, आता या जागेतच गणेश खराब करून ठेवला आहे. तुम्हाला माहिती आहे कोणी खराब केला ते. तर इतके वातावरण दुषित झालेले आहे, की तुमची पुण्याईसुद्धा त्या गणेशाला आकलन करता येत नाही. जर घाणीत दूध घातले तर ते हंसालासुद्धा जमायचे नाही, की नीर-क्षीर विवेक कसा करायचा. अशातला हा प्रकार आहे. तेव्हा जे लोक असले वातावरण दृषित करीत आहेत त्यांना तुम्ही पूर्णपणे विरोध करायला पाहिजे. मनातूनच न ॐै विि ा ू से आज्ञा चक्र हे गणेश तत्त्वाचे प्रकटीकरण आहे. नाही तर पूर्णपणे विरोध करायला पाहिजे, की आम्हाला आमचे गणेश तत्त्व खराब करणारा मनुष्य नको. त्याबद्दल जर तुम्ही तटस्थ भावना घेतली तर तोही तुमचा दोष आहे. आता फार मनवून त्या गणेशाला जागृत केले. म्हणजे गणेश तत्त्व हे सगळ्यात शेवटले आहे. फारच सहनशील आहे ते तत्त्व. फार मुश्किलीने नष्ट होते ते आणि ते मुख्य मुळावर बसलेले असते. ते सुद्धा यांनी आत घातलेले आहे आणि तुमच्या डोळ्यादेखत हे सगळे होत आहे. त्याला सत्कार नको, त्याला कोणीही नको. सगळ्या सहजयोग्यांनी जर ठरवले तर त्याला काहीही वेळ लागणार नाही. तेव्हा गणेश तत्व आपल्या इथले, पुण्यातले खराब झालेले आहे. तेव्हा बघा केवढा मोठा घाला आहे. तेव्हा काल गणेशाला मनवून, समजावून जागृत केले आपल्या सगळ्यांमध्ये. ते जागृत झाल्यावर बरेच लोक पार झाले. आता असे पण म्हणाल, की 'आम्ही काही तिकडे गेलो नाही माताजी. आम्हाला त्याच्याबद्दल विरोधच आहे. आम्ही त्याचे तोंडसुद्धा पाहिले नाही, तरी आमच्यातले गणेश तत्त्व का खराब होतंय ?' जे विहिरीत असेल ते येणारच. त्यामुळे इथले जे गणेश तत्त्व खराब झालेले आहे त्याची जबाबदारी सहजयोग्यांवर आहे, पहिली गोष्ट, हे लक्षात ठेवले पाहिजे. ते कसे नीट करायचे? गणेशाची कशी स्थापना करायची? त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला विचारून घ्याव्यात किंवा या लोकांना माहिती आहे, त्या कशा रीतीने स्वच्छ करायच्या. प्रत्येक सहजयोग्यांमध्ये गणेश हा उद्भवला पाहिजे. इतकेच नाही पण जागृत होऊन स्थित झाला पाहिजे. आमच्याकडे काही काही खरेच असे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये गणेश पूर्णपणे जागृत झालेला आहे आणि गणेश तत्त्वांनीच आम्ही कुंडलिनी जागृत करतो. कारण गणेश जोपर्यंत होकार देत नाही तोपर्यंत कुंडलिनी वर येणारच नाही. त्याने हो म्हटल्याशिवाय कुंडलिनी वर येणारच नाही आणि ते तत्त्व जिथे कमी पडेल तिथे कुंडलिनीचे कार्य हळू चालेल. कालसुद्धा जोर कमी होता. तेव्हा गणेश तत्त्वाचा जोर पाहिजे. तेव्हा पुण्याच्या सहजयोग्यांना माझे असे म्हणणे आहे, की गणेश तत्त्वाला आपल्याकडे बळकट केले पाहिजे. तर ते कसे करायचे मी सांगते कारण हितगुज आहे म्हणून. प्रथम गोष्ट म्हणजे अशी, की हे पावित्र्याचे व्रत आहे. तर गणेशाला जे दोष होतात ते पहिले डोळ्यापासून होतात. गणेशाचा अगदी डायरेक्ट संबंध डोळ्यांशी असतो आणि हे गणेश तत्त्व जे आहे तेच पुण्यातून लुप्त झालेले आहे. त्यामुळे त्याच्या मधोमध जिथे ऑप्टिक नव्व्हज् क्रॉस करतात, तिथे आज्ञा चक्राचे स्थान आहे आणि आज्ञा चक्र हे गणेश तत्त्वाचे प्रकटीकरण आहे. तेव्हा गणेश तत्त्व जर खराब झाले असेल तर आपल्या डोळ्यातून काही तरी चूक झाली असली पाहिजे हे लक्षात आणले पाहिजे. म्हणजे प्रथम हे जाणले पाहिजे, की गणेश तत्त्व हे पृथ्वी तत्त्वाचे बनवलेले आहे. आपल्याला माहिती आहे, की अंगावरचा मळ काढून गौरीने गणेशाची स्थापना केली होती. म्हणजे पृथ्वीत्त्व सबंध व्हायब्रेट करून त्याचा गणेश बनविलेला आहे. पृथ्वी तत्त्व हे फार पवित्र आहे आणि त्याची शक्ती शोषून घेण्याची आहे. इतके कोणतेच तत्त्व शोषण्यामध्ये सशक्त नाही. इतके पृथ्वी तत्त्व. पृथ्वी ही आमची आई आहे. त्यामुळे तुमचे आणखी डबलचे नाते आहे त्यांच्याशी. ती तुमची आजी, तुमच्यातले सगळे दोष ओढू शकते आणि तुमच्यामध्ये गणेश तत्त्व घालू शकते. त्यासाठी आधी आपले डोळे ठीक करायला पाहिजेत. नेहमी डोळे (दृष्टी) जमिनीवर ठेवून चालले पाहिजे. हिरवळीवर आपली नजर असायला पाहिजे किंवा चालतानासुद्धा हिरवळीवर चालले पाहिजे. सकाळी उठून जर दव असेल तर त्याच्यावर चालले, तर त्यानेसुद्धा डोळ्यांना शांतता मिळते, पण डोळे नेहमी खाली असले पाहिजेत. परत डोळ्यांची हालचाल फार केली नाही पाहिजे. प्रत्येक वेळी काही झाल्यावर आपले लक्ष असे किंवा असे फिरवायला नाही पाहिजे. तर काय असेल ते विचार करून नंतर डोळे फिरवायचे हळूच. फार ज्या लोकांची डोळ्यांची हालचाल होते त्यांचे गणेश तत्त्व खराब होते. आता आपल्याकडे ज्याला आपण फ्लर्टिंग म्हणतो हा त्यातलाच प्रकार आहे की प्रत्येक बाईकडे बघितलेच पाहिजे! आणि जर नाही बघितले तर माना वळवून मागे बघायचे! अशा काही काही घाणेरड्या पद्धती आज काल निघालेल्या आहेत. ६ वकी आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आमचे भाऊ वगैरे कोणी होते त्यांना ताकीद असायची, की डोळे खाली करून चालायचे. म्हणजे अजूनही त्यावेळची जी मंडळी आहेत त्यांची ही ओळख आहे, की चालतांना ते डोळे असे इकडेतिकडे करून चालत नाहीत. पूर्वी त्याला वेंधळा म्हणत असत. वेंधळ्यासारखे चाललेत इकडेतिकडे बघत. नजर खाली जमिनीवर ठेवून चालले पाहिजे. आपल्याला लक्ष्मणाचे उदाहरण आहे, सीता ही त्याची वहिनी, आता वहिनीबरोबर थट्टा वगैरे पण आपण करतो. तो तिच्याशी बोलतानासुद्धा तिच्या पायाकडेच बघायचा. वर बघायचाच नाही. इतकी त्याच्यामध्ये निष्ठा असली पाहिजे. तर दृष्टी पायाकडे असली पाहिजे. त्याच्यावर बघायचे नाही. जर कोणी विचारले तर मात्र हळूच डोळे वर करून बघायचे, भक्तीने आणि श्रद्धेने. ही डोळ्यांची हालचाल सहजयोगाला फार मदत करते. आमचे लंडनचे लोक-आपल्याला माहिती आहे, त्याबाबतीत काय त्यांची स्थिती झालेली आहे. किती कुचंबणा झालेली आहे. त्यातले थोडेच इथे आल्याबरोबर तुम्हाला एवढा त्रास झाला. तिथे सगळेच तसे आहेत. त्यांना गुरू कशाला लागतात हेच मला समजत नाही. त्या माणसाला शंभरदा शिकवतील असे सगळे घाणेरडे ज्ञान त्यांच्याजवळ आहे. तर त्यांच्याजवळ हे नाही. अगदी त्यांचे गेलेले आहे. तरी सुद्धा पृथ्वी त्त्वावर मेहनत करून त्यांनी आपल्यावर फार कमवून घेतलेले आहे. दुसरे, पृथ्वी त्त्वावर उभे राहून पायावर पाणी घालून घ्यायचे, दोन्ही हात आकाशाकडे असे करायचे किंवा असे करून आमचेही नाव घेतले तरी चालेल. तर ती पृथ्वी सगळे पायातून ओढून घेते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी मोकळे वाटेल. तसेच पृथ्वीवर झोपणे, तिला नमस्कार करणे, तिची क्षमा मागणे, 'तुला आम्ही पायांनी स्पर्श करतो म्हणून क्षमा कर.' पृथ्वी तत्त्वाला जागृत केल्याबरोबर आपल्यातला जो गणेश आहे, ते पृथ्वी तत्त्वाचे इसेन्स आहे. पृथ्वी तत्त्वाचे जे धारणेचे त्व आहे, म्हणजे धारा जेवढी आहे जगात, ती सबंध श्री गणेशामुळे आहे आणि ही धारणा, त्याला आपण ध्यानधारणा म्हणतो, हे सगळे श्री गणेशाचेच प्रकटीकरण आहे. पहिल्यांदा धारणा झाल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा श्रीगणेशाला पूजल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये आठही विनायक इथे आलेले आहेत. हे केवढे मोठे आहे ! पण तिथेसुद्धा घाण! परवा येतांना आम्ही गेलो होतो, रांजणगाव गणपती, व्हायब्रेशन्स त्यांचे अगदी मंद! तरी मागच्या वेळेस जागृत केले. परत गेलो तिथे, सर्वांसाठी क्षमा मागितली. आम्ही भक्तही होतो तुमच्यासाठी, की 'जाऊ दे, त्यांना समजत नाही. तुम्ही फार मोठे आहात. तर यांच्यामध्ये जागृत व्हा. तुमचे काही विचारायला नको. तुम्ही फार शुद्ध तत्त्व आहात, पण या लोकांना काही समजत नाही. अजून अजाण आहेत, तेव्हा यांना क्षमा करा.' आणि तिथे घाणेरडी सिनेमातली गाणी त्यांच्यासमोरच लावलेली. आता काय म्हणावे या प्रकारांना! हे तांत्रिक प्रकार आहेत. देवासमोर घाण करायची. म्हणजे तिथे भुते येतात. त्या भुतांना वापरायचे. नाव घ्यायचे संन्याशाचे की आम्ही संन्यास घेतो आणि घाण करायची. संन्याशाला शोभत नाही तसे वागायचे. म्हणजे इथून जे काही त्यातले तत्त्व असते ते निघून जाते. ते निघून गेल्याबरोबर तिथे भुते येतात. भुतांचे राज्य अशा रीतीने परमेश्वराला काढून तिथे करतात. तेव्हा ते पाहिले पाहिजे, की आमच्या फोटोवरसुद्धा कधी कधी काळी छाया आलेली आम्ही पाहिली आहे. आश्चर्यांची गोष्ट आहे की आमचे चित्त तिथून गेले! नाहीच आम्ही तिथे. फोटो असूनसुद्धा. म्हणजे फोटो इतका साक्षात आहे, पण त्याच्यावरती काळी छाया येते. त्याचे कारण त्या फोटोसमोर काही तरी घाणेरडे प्रकार होतात किंवा कोणी त्याच्यावर काहीतरी आरोपण केलेले आहे किंवा तसे काही. तर आमचे स्वत:चे तसेच आहे. तसे सगळे चांगले आहोत आम्ही. फार छान आहोत, पण पटकन चित्त निघून जाते. तिकडे लक्षच जात नाही आमचे म्हणजे एखाद्या माणसाकडे आम्ही चित्त लावायचा किती ही प्रयत्न केला तरी चित्त लागणार नाही. तिथून निघूनच जाणार. लोक म्हणतात, 'ते एवढे मोठे मंत्री आहेत माताजी, असे काय करता!' 'पण त्यांना आम्ही भेटणारच नाही. कसेही करून जमायचेच नाही.' 'ती एवढी मोठी माणसे आहेत, त्यांना भेटलेच पाहिजे.' 'ते काही जमायचे नाही, रुळायचे नाही. ते काही आम्हाला झेपायचे नाही, असेच काही तरी होणार.' तेव्हा परमेश्वराचे चित्तसुद्धा फार पवित्र आहे. एखाद्या माणसाला फार स्वच्छतेची ७ 4वहा आवड असेल आणि त्याला तुम्ही घाणीत उभे रहा म्हणाल, तर तो राहील का? तो काही घाणीशी झुंझत बसणार नाही. तिथून निघून जाईल. असे ते पवित्र तत्त्व आहे गणेशाचे आणि त्यामुळे ते इतके सहन करणे. तरीसुद्धा त्याचे चित्त हटते. म्हणून इथल्या सहजयोग्यांची ही विशेष जबाबदारी आहे, की त्यांनी गणेशाचे तत्त्व वसवले पाहिजे. याचा अर्थ असा असतो, की लोक गणेशाची मूर्ती विकत घेऊन येतात आणि घरी आणून पूजनाला बसवतात. पण ती आपण विकत आणू शकत नाही कारण ज्या माणसाकडून आपण विकत आणली त्याने कोणत्या मनाने ती मूर्ती बनवली? त्यात व्हायब्रेशन्स होते का? त्याने माती आणली? त्याने पैसे घेतले त्याच परमेश्वराला विकले त्याने. काय हे! अहो, परमेश्वराला विकता येते का? आपण मूर्ती विकत कशी घ्यायची ? तुम्ही आम्हाला विकू इथल्या कुठून सहजयोग्यांची शकता का? 'आम्ही गणपती बसवलाय घरात.' ती मूर्ती बघायला पाहिजे, तिची चक्रे बघायला पाहिजे, तिचे एकंदर सगळे सूत्र बघायला पाहिजे आणि फारच कमी अशा मूत्यो असतात. फारच ही कमी! माझ्याकडे एकच गणपती आहे, फक्त एकच! एकदा आम्ही सांगलीला गेलो होतो. तिथे आमचे फार मोठे शिल्प आहे. त्यांनी स्वतः हाताने बनवून दिलेले आणि तोही लाकडाचा आहे. आणि मी म्हटले तो शेणात बसवावा, गाईचे शेण असते, त्याचा रंग मातीसारखा जसा असतो, अगदी सुंदर गणपती आहे. पण तो एक गणपती मी पाहिला. तो इतका सुज्ञ आहे! इतकी व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये आहेत ! एकदा आमच्याकडे लंडनला एक गृहस्थ मला भेटायला आले आणि त्यांना वाटले आधी सरळ वर जाऊन गणपतीचे दर्शन घ्यावे. आणखी तिथे जाऊन त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. पण काही व्हायब्रेशन्स जाणवले नाहीत त्याला. ते घाबरले. चपापले की 'मला काय झाले? खाली मला चांगले एवढे व्हायब्रेशन्स येत होते. मी वर येऊन या गणपतीचे बघायला लागलो, गणपतीला व्हायब्रेशन्स नाहीत. झाले तरी काय?' शेवटी मग विचार करीत बसले, की काय झाले. तर त्यांना बुद्धीसुद्धा गणपतीने दिली तर अशी सुबुद्धी झाली , की 'आधी मी माताजींना नमस्कार केला नाही, गणपतीला ते पटले नाही. आधी त्यांना नमस्कार करून यावा. कारण गणपतीला आईशिवाय दुसरे काही नको.' खाली धावत आले आणि माझे पाय धरून आपले कान धरले, 'माताजी, तुम्ही आतमध्ये होता. क्षमा करा!' आणि परत वर गेले तर झर झर झर व्हायब्रेशन्स यायला लागले. त्यांनाही क्षमा मागितली. गणपतीला आईशिवाय शिवसुद्धा सुचत नाही. काहीही सुचत नाही. एकच त्त्व माहिती आहे, आई आणि तिची शक्ती. त्यामुळे ते एवढे प्रचंड आहेत आणि त्यांना सगळे देव देवता पूजतात. विशेष जबाबदारी आहे. की तर त्यांनी गणेशाचे तत्व वसवले पाहिजे. शिव शंकर हे की सगळ्यात शेवटी राहतात आणि सदासर्वदा असतात. ते सुद्धा श्रीगणेशाला पूजतात. मग इतर, ब्रह्मदेव, विष्णू यांचे काही म्हणायला नको आणि महाराष्ट्रात याचे फार वरदान आहे आपल्याला. गणपती काय ते आपल्याला समजते आणि नेहमी गणपतीचे वर्णन आपल्याकडे फार आहे आणि गणपतीला आपण फार मानतोही. असा महाराष्ट्र विरळाच ज्याला गणपती माहिती नाही. तेव्हा आधी गणपतीची पूजा झाली पाहिजे व्यवस्थितपणे. काल हाच विचार केला, की पुण्याच्या सहजयोग्यांना काय सांगायचे. विशेष, नवीन तर ते हे की श्री गणेशाला पावन करून घ्या. स्वत:मध्ये बसवून घ्या. गणेशतत्त्व ओळखून घ्या. आता एक गृहस्थ सांगलीहून आले होते, त्यांच्यात गणेश तत्त्व फार चांगले आहे. बाकी लिव्हर जरासे बिघडलेले आहे थोडे, पण गणेश तत्त्व फार जबरदस्त आहे. त्याचा मला फार आनंद झाला. तसेच आमचे धूमाळ साहेब आहेत. हे आता खेडेगावात राहतात. नेहमी जमिनीशी संबंध, तर शेतकरी लोकांचा फार मोठा वारसा आहे, की नेहमी गणपती त्यांच्यावर प्रसन्न असतात. त्यामुळे आम्ही आधी खेडेगावात काम सुरू केलेले आहे. कारण तिथे पहिल्यांदा होणार. जिथे गणपतीचे ८ जक पुजारी असतील तिथे आमचे पहिल्यांदा होणार. म्हणजे ते बसून गणपतीला पूजत नाहीत पण त्यांच्यातला जो गणपती आहे तो जागृत आहे. जितके माणसाला कृत्रिम जीवन मिळत जाते तितके हे कमी होत जाते. तर पहिली गोष्ट आपला गणपती ठीक केला पाहिजे. त्यासाठी काय करावे लागेल पुढे कशी साधना करावी लागेल, तुम्ही आमच्या इतर सहजयोग्यांना, त्यांचा गणपती जागृत झाला. तर तुमचा होणारच. त्याबद्दल काही शंका नाही. आणि त्यानंतर शक्त्या किती वाढतात. ते बघण्यासारखे आहे. तेव्हा अशा गणपतीला नमस्कार करून मी आता पुढचे सांगते, सहजयोगाबद्दल. सहजयोग काय आहे ते आपल्याला माहिती आहे. पुष्कळ माहिती आहे. इथे सगळे सहजयोगी बसलेले आहेत. तेव्हा त्यांना सांगायला नको. आता एक मोठा प्रश्न. प्रश्न काल होता आणि आजही थोडा बहत आहे की असे सहज का घडते ? पण हा इतका विक्षिप्त प्रश्न आहे, की आता आम्ही या माईकमधून बोलतोय. इथे खेडेगावातले कोणी आले असेल आणि त्यांनी माईक पाहिला नसेल तर ते म्हणतील असे कसे शक्य आहे, की तुम्ही तिथे बोलता आणि ते इकडे येते. एखाद्या खेड्यातल्या माणसाने जर कधी लाईट पाहिला नसेल, त्याला जर घरात बोलावले आणि दिवा मालवायला सांगितले तर तो नुसता फुंकत राहणार. 'अहो, विझतच नाही, कसे करायचे.' जसे इकडे बटन दाबल्यावर तिकडे उजेड, तर तो बघतच राहणार, की हे असे कसे होते ? तिकडे बटण दाबले आणि इकडे उजेड! तशातला हा वेडेपणाचा प्रश्न आहे, अगदी फार वेडेपणाचा कारण आपल्याला माहिती आहे, जेव्हा सूर्य आकाशात येतो तेव्हा क्लोरोफिल म्हणून एक पदार्थ वनस्पतीमध्ये तयार होतो. त्यामुळे त्याला हिरवा रंग येतो. सूर्य कुठे आहे हजारो मैल दूर. तो आकाशात आल्याबरोबर ही घटना घडायला सुरुवात होते. जर तुम्हाला सांगितले, की या पानाला हिरवा रंग दे, तर तुम्ही देऊ शकत नाही. म्हणजे वरून ओतू शकता पण आमूलाग्र आतून बाहेरून असा देऊ शकत नाही. पण जेव्हा सृष्टीच्या प्रत्येक पानाला रंगवतो असा सूर्य किती प्रचंड असला पाहिजे. पण आपल्याला त्याचे काहीच आश्चर्य वाटत नाही. ज्याला इंग्लिशमध्ये 'टेकन फॉर ग्रँटेड' म्हणजे तो आला म्हणजे होणारच असे म्हणतात. जगात इतकी फळे कशी लागतात, रात्रीच्या रात्रीत झाडे मोठी होतात. आपण त्यांची वाट बघत नाही. त्याचे काही समजत नाही. त्याचे काही मोजमाप नाही. हे सगळे कसे एकटा सूर्य घडवून आणतो, त्याच्या किरणांमध्ये किती प्रकारच्या शक्त्या आहेत, तेव्हा एकटा सूर्य घडवून आणू शकतो. यावरून आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे जर आमच्याकडून हे घडत असेल तर काही तरी आमच्यातही असले पाहिजे. असा अंदाज लावला पाहिजे. याच्या उलट असं कसं होईल म्हणून बसले, तर मात्र, याला मी माणशी पद्धत म्हणते कारण परमेश्वराची पद्धत वेगळी असते. याला मी माणसी पद्धत म्हणते, म्हणजे उलटीकडून काहीतरी बघायचे आणि म्हणायचे तुम्ही लोंबकाळले कसे ? म्हणजे विनोदी आहे सगळे. तुम्ही सगळीकडे बघा, की असले प्रश्न आपण विचारतो तरी कसे, म्हणजे होताना दिसतंय! आता तुम्हाला कुंडलिनी बघायची असली तर आम्ही दाखवू. त्याचे स्पंदन दाखवू, त्याचे वर उठणे दाखवू, पण लोक तुम्हाला असे प्रश्न विचारतील, तेव्हा मग काय करायचं? त्यांच्याशी कसा वाद घालायचा? हा सहजयोग्यांच्यासमोर प्रश्न असणार. श्री माताजी असा प्रश्न विचारला तर त्याचे काय उत्तर द्यायचे. आता थोडा वेळ असे लक्षात घ्यायचे, की जर थोडे वेडे असले तर त्यांना ठीक करता येते. अगदीच वेडे असले तर त्यांना नमस्कारच केलेला बरा! त्याच्यासाठी डोकेफोड कशाला करायची. काय म्हणजे आपण ही वेडे व्हायचे त्यांच्याबरोबर. सुज्ञपणा असा घ्यायचा की 'ठीक आहे, बघू या. असे म्हणून टाळून द्यायचे पण तसे होत नाही, थोडे असे मनुष्याला वाटते, की आपल्याला मिळाले तर झालेच पाहिजे, कसेही असले तरी केलेच पाहिजे. मग ते झेपत नाही आपल्याला. तेव्हा जी साधी अक्षरे आहेत ती समजून घ्या. आणि सोडवून घ्या. साधी माणसेसुद्धा पुष्कळ आहेत पुण्यात. पुष्कळ आहेत, बहुतेक साधी ९ चित्त, जे बाहेर फिरतंय ते आतमध्ये कसे आणायचे, हे जट तुम्ही शिकलात तर फाए उत्तम सहजयोगी व्हाल. आहेत. कठीण जास्त बोलणार, पुढे पुढे करणार, कठीण जो आहे त्याचे मात्र तो करून घेणार. 'आम्ही मुद्दामून आलो' म्हणे! आता आला कशाला मग म्हणजे हे तरी काय सांगायचे झाले, मुद्दामून आलो! म्हणजे येतात असे इकडे सहज निघाले होते काही तरी करायला, तर इकडे पोहोचले की काय! अहो, मुद्दामूनच येतात. पण त्याचे महत्त्व. तेव्हा, माणसाची बुद्धी इतकी वर वर आहे, त्याला आतमध्ये ओढायला काही तरी मार्ग पाहिजे. आता तुमचे चित्त माझ्याकडे आहे. आता एखादा मनुष्य तुमच्याशी वाद घालतो आहे, काही तरी बोलतोय, तर त्या माणसाला चूप कसे करायचे ? त्याचे चित्त, जे बाहेर फिरतंय ते आतमध्ये कसे आणायचे, हे जर तुम्ही शिकलात तर फार उत्तम सहजयोगी व्हाल. त्यांनी काही तरी बोलायला सुरुवात केली, तर आपण तिकडे लक्ष घालायचे नाही. त्याला हाताने बंधने द्यायची नाही तर चित्ताने देता येतात. आणि लगेच कुंडलिनीवर लक्ष द्यायचे. तो तिकडे बोलतोय आणि आपण कुंडलिनीवर हात करायचा की ती कुंडलिनी लागली चढायला वर. आपल्या नजरेतच आहे कुंडलिनी. आपण आतून चित्त घातले, चित्तारूढ आहात तुम्ही. तो काय बोलतोय तिकडे नाही लक्ष ठेवायचे. ती कुंडलिनी लागली सरकायला की सगळी चक्रे दिसायला लागतात बरोबर. कुठे थांबली, कुठे रुतली, हे प्रॅक्टीस करून दिसायला लागते. थोडेसे प्रॅक्टीस करायचे. प्रत्येकाच्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचे आणि चढवण्याचा प्रयत्न करायचा. बसमध्ये बसले तर, ऑफिसमध्ये बसले तर, कुठेही आधी बघायचे कुंडलिनी कुठे दिसते आहे ती. वर, आता आमच्या लंडनला एक प्रथा आहे. हात 'शेक' करायचा. म्हणजे भयंकर प्रकार असतो. म्हणजे जोपर्यंत तुमचे अर्धा शेर रक्त ओढत नाहीत तोपर्यंत तुमचा हात 'शेक' केला, असे त्यांना वाटतच नाही. असे अगदी लोक 'शेक' करतात. दारू प्यायल्यानंतर 'शेक' , पण दारू पितांना, त्याच्या आधी जातांना लोक शेक करतात. त्यांनी शेकिंग हँड केले की मी त्यांना जागृती देते. हळूहळू आता त्यांचे पिणे कमी होऊ लागले आहे. आणि आमच्या नशिबात हेच आहे, की पाच-पाचशे लोकांशी शेकहँड करायचे. निदान , तिसऱ्या, चौथ्या दिवशी हे प्रसंग घडतात. पाचशे लोक चालले आहेत नं, मग आमचा हात चालला तिकडे. आता ही पद्धत म्हणजे सहजच निघालेली आहे. तिथल्या लोकांना शेकहँड केल्याशिवाय कुंडलिनीला वर घालताच येणार नाही आम्हाला. तर आपण त्यांच्या कुंडलिनीवर लक्ष द्यायचे, कुंडलिनी वर काढायची. लगेच आपल्याला, हळूहळू प्रॅक्टिसने लक्षात येईल, की कुठे कुंडलिनी अडकलेली आहे. लगेच तिथले नाव घ्यायचे. याचेही शास्त्र आहे. ते समजावून घेतले पाहिजे. आमच्या लंडनला या लोकांची व्यवस्था फार चांगली आहे. प्रत्येक चक्रावर काय मंत्र आहे, काय त्यांचे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत, कुठे काय तुटलेले आहे, कुठे काय आहे, ते सगळे काढलेले आहे आणि ते सगळे कागदावर लिहून एक फोल्डर तयार केलेले आहे त्या लोकांनी. एक फोल्डर यांच्याकडे आहे, ते इंग्लीशमध्ये आहे, तुम्ही मराठीत करून घ्यायचे. ते सगळे शिकून लक्षात ठेवायचे. आता जी कामगिरी करायची असते ती अगदी गुप्तरीत्या होते. जर मनुष्य तुम्हाला ठीक वाटला, जर त्याची एक दोन चक्रे असतील तर सुटतील. जागृती मात्र द्यायची त्याला. जागृती दिल्यावर काही विशेष बोलायचे नाही. त्याला स्वत:लाच वाटेल आम्ही भेटायला येऊ. कसे काय, ठीक आहे वगैरे. हळूहळू ते सरकवत जायचे कारण साधारणपणे फार चिकित्सक बुद्धी असते. तुम्ही जर एकदम घाला घातला, की ते चालले. आधी हळूच एखादी वस्तू काढून घ्यायची असली म्हणजे कसे काढतो, तसे काढायला लागते. म्हणजे फार सूक्ष्म आहे ते. लोकांना जर तुम्ही काही विशेष सांगायला गेलात की ते घाबरतात. तेव्हा सहजयोगी मंडळींनी लक्षात ठेवले पाहिजे, की हे फार सूक्ष्म आणि नाजूक काम आहे. माणूस इतका खराब झाला आहे, की त्याच्यावर काही प्रयोग करण्याआधी त्याची संमती घेणेसूद्धा फार कठीण काम झालेले आहे. जागृती त्याला त्याच्या संमतीशिवाय तुम्ही देऊ शकता, पार मात्र करू शकत नाही. पार करायला मात्र त्याची संमती पाहिजे, त्याचा अधिकार आपल्याला घेता येत नाही. जागृतीमुळे त्याची प्रकृती ठीक ११ होईल, त्याला परमेश्वराकडे जावेसे वाटेल, ओळख पटेल पण जागृती आणि पार होणे याच्यात फरक आहे. कुंडलिनी जागृत झाली तरी जोपर्यंत ती पार झाली नाही आणि पूर्णपणे स्थित झाली नाही, तर स्थिरावत नाही, तेव्हा या स्टेजला आणण्यासाठी त्याची संमती पाहिजे, पण तुम्ही त्याला जागृती दिलेली असली तर ती पायरी यायला काही वेळ लागत नाही. आणि ती पायरी आली म्हणजे त्यांना पार करता येते. तरीसुद्धा मुख्य सांगायचे म्हणजे ही फार हळू गतीने चालणारी गोष्ट आहे. तर आधी ज्या लोकांचा विश्वास आहे आणि जे तुम्हाला मानतात, अशा लोकांना हाती घेतलेले बरे. कारण नाही तरी हेच एक द्यायचे असते जगात. दुसरे काही नाही. तुम्ही कुणाला आपल्याकडे जेवायला बोलावले तर काय उपयोग आहे त्याचा ? मी असे लोक पाहिलेले आहेत, त्यांनी जगासाठी इतके काही केले, त्यांना वाटले आम्ही लोककल्याणार्थ हे कार्य केलं , ते कार्य केले, इतके पैसे दिले लोकांना. चांगलं त्याचं भलं केलं, पण काहीही लोकांच्या लक्षात राहत नाही. ते जर परत भणंग भिकारी होऊन आले तर लोक त्यांना आपल्या दारातसुद्धा उभे करत नाहीत. ही लोकांची स्थिती आहे. आपल्याकडे किती लोकांनी देशासाठी त्याग केलेला आहे! लाल बहादूर शास्त्री केवढे मोठे होते तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या नावाचे एक तरी स्मारक तुम्ही कुठे पाहिले आहे का? कुठे तरी तुम्हाला दिसतंय का त्यांच्या नावाचं? आणि हे अगदी निर्विवाद आहे. इतर लोकांबद्दल लोकांनी पुस्तके लिहिली, लोकांनी कळवले, की त्यांचे चरित्र चांगले नाही. पण त्यांच्याबद्दल ( शास्त्रीजींबद्दल) कोणी असे म्हणू शकत नाही. एवढी मोठी कामगिरी त्यांनी थोड्या वेळात केली पण त्यांचे स्मारक उभारलेले तुम्हाला कुठे दिसते आहे का ! परवा त्यांचा फोटो पाहिल्यावर मला आश्चर्य वाटले, की त्यांचा फोटो तिथे घातला तरी कसा ? म्हणजे ते पंतप्रधान तरी होते, की नाही अशी शंका लोकांना वाटायला लागेल. तेव्हा हे असे होते. त्याला कारण काय? कारण त्याला व्हायब्रेशन म्हणजे तुमच्यावर ओंकारच आहे आत्म्याची साथ हवी. जागृती म्हणजे आतून घडलेली घटना असल्यामुळे ते अगदी जीवंतसारखे होऊन जाते आतून आणि त्यामुळे त्याची आठवण राहते. हळूहळू ती आठवण विसरू ही शकते. पण तरीसुद्धा आपण ते जागवतो. आता आपल्याला ज्यांना पार करायचे ते लक्षात घ्यायचे. घरी जाऊन त्यांची नावे लिहन ठेवायची, की ती मंडळी बरी दिसतात. म्हणजे ते धार्मिक असावेत. फार कठीण लोक घेऊ नका. म्हणजे दारूडे; दारुड्यांनाही होते पण आज तशी स्थिती नाही. अशी माणसे जी साधारणपणे धार्मिक आहेत, बॅलन्स्ड आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ज्यांचे परमेश्वराकडे लक्ष आहे आणि जी या मार्गाकडे आहेत, अशी आठ-दहा माणसे आपल्या हातात घ्यायची आणि त्यांच्यावर मेहनत केली पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दहा माणसे जर घेतली तर आठ तरी तुमच्या हाताने पार होणार. प्रत्येकाने दहा जरी पार केले तरी किती पार झाले बघा? मग त्यांच्याकडे लक्ष ठेवले पाहिजे आणि जोपासना केली पाहिजे, की कुठे आहेत? काय आहेत ? कुठे निगेटिव्हिटी पकडतात वगैरे. पार झाल्यावर कळते, की आम्हाला निगेटिव्हिटीने पकडले. त्याच्या आधी वेडा जरी आला तरी कळत नाही, की आम्ही धरले आहोत. वेडा होऊन पागलखान्यात मरूनही गेला तरी कळत नाही. पण सहजयोग्याला लगेच कळते. आज्ञा धरली. आज्ञा धरली म्हणजे काही तरी आम्हाला चिकटले. त्रास होऊ लागतो, मग लगेच लागले हात फिरवायला, आज्ञा काढायला, त्रास होऊ लागतो. त्याला कारण असे की, जेव्हा तुम्ही मानव झालात तेव्हा जनावरात आणि तुमच्यात हा मोठा फरक आहे, की घाणीतून जरी तुम्ही जनावराला काढले तरी त्याला काही वाटणार नाही. वाटेल तिथून जायला तो तयार आहे. पण माणसाला तसे केले, तर त्याला नको. त्याला वहाणा पाहिजेत आणि वहाणा असल्या तरी त्याला घाण येते. घरी जाऊन अंघोळ करणार. त्या स्वच्छतेची कल्पना र १२ माणसाला येते. म्हणून 'जे धरले ते नको रे बाबा! हे असे नको! मला सहजयोगच पाहिजे, हे काढून टाका, ते काढून टाका.' वरगैरे आणि जराशी पकड आली तरी दुखू लागते. आणि मनुष्य ते काढून टाकतो. बरं ते दुखणे काही इतके जाज्वल्य नसते. इंडिकेशन येते. बॅरॉमीटर येते तसे इंडिकेशन येते की या ठिकाणी या माणसाचे हे धरलेले आहे. तुम्ही काढल्यावर त्याचे सुटते आणि तुमचेही सुटते. काय मजेदार आहे बघा. आता काल यांनी बाजारातून कुंकू आणले. ते कपाळावर लावल्यावर भाजू लागले. म्हटले हे कुंकू काढा आधी हे करा. माझ्या लक्षात नाही आले, इतकी गर्दी होती, त्यांनी हात लावायला सांगितल्यावर माझ्या लक्षात नाही आले आधी, परत लक्ष ओढले गेले तिथे. मग ते कुंकू घेतले, व्हायब्रेट केले, मग मी राजवाडे साहेबांना सांगितले, की तुमच्या घरातले कुंकू मागवा, मागच्या वर्षातले, ते चांगले होते. इतके बारीक लक्षात येते. मग सगळे व्हायब्रेट होऊन जाते. व्हायब्रेशन म्हणजे ओंकारच आहे. हा ओंकारच आहे, प्रणव आहे , प्रणव साक्षात, पावित्र्य आहे आणि हे पावित्र्य प्रेम आहे आणि ते सांगत असते, प्रत्येक गोष्टीची जाणीव होते. जसा कॉम्प्युटरशी आपला संबंध जुळतो आणि कॉम्प्युटर आपल्याला सांगतो तसा परमेश्वराने हा जो कॉम्प्युटर बसवलेला आहे तो सगळे बारीक सारीक सांगतो. मग त्याच्यावर ओळखले पाहिजे. तिसर्या स्थितीमध्ये काही लोक अत्यंत धार्मिक असतात. आता कालचे गृहस्थ महादेवाला मानतात आणि त्यांना हार्ट (कॅच) आहे. आता हे कसे शक्य आहे ? अहो, त्यांचे (महादेवाचे) स्थान हृदय आहे आणि त्यांच्यावर महादेवच रागावलेले. हे असे कसे होते ? लोक विचारतात श्रीमाताजी, 'आम्ही एवढी महादेवाची पूजा केलेली, मग आम्हाला हार्ट अॅटॅक कसा आला?' आता हे म्हणतात चुकीचे आहे. चुकीचे नाही, कनेक्शन नव्हते महणून. आता अशा माणसाने, ज्याने महादेवाची पूजा केलेली आहे त्याने असा प्रश्न विचारायचा श्रीमाताजींना, 'श्रीमाताजी, तुम्ही महादेवांची शक्ती आहात का?' तर उत्तराला म्हणून हातावर व्हायब्रेशन्स सुरू होतील. कारण ही गोष्ट खरी आहे. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला तर आम्ही म्हणणारच की, 'हो, आहे सगळे असेच आहे. काय करता आता?' आम्ही आहोत तर आहोत. आता आम्ही आहोत तर कसे सोडायचे ते ? अहो, कोणी काही असला तर त्याला काही त्याचा गर्व असतो का? गर्व त्या माणसाला असतो, ज्याला नसते त्याला! ज्याला असते त्याला कसला गर्व ? आता तुम्हाला बोटे आहेत, नाक आहे, त्याचा गर्व आहे का तुम्हाला? तशातला आमचा प्रकार आहे. म्हणजे आमच्यात जे आहे ते आहे, त्याला आम्ही तरी काय करायचे ? आता आमचे प्रधान इतने जुने ट्रस्टी आहेत, पण त्यांना थोडे चिकटले होते. काल महाशिवरात्रीला उपवास करायचा नसतो, असे मी म्हटले त्यांना, तर त्यांनी मला विचारले आणि उपवास केला. माझ्यासमोर उपवास करायचा नसतो. मला फार दु:ख होते उपवासामुळे. आईला त्रास द्यायचा म्हणजे उपवास करायचा. फक्त नरक चतुर्दशीला आपल्याला उपवास आहे. म्हणजे झोपायचे सकाळी खूप वेळ पर्यंत. अंघोळ वगैरे करायची नाही. त्यादिवशी नरकाचे दार उघडले जाते. सकाळी चार वाजता उठून फराळ केला की भुते घुसतात. अहो, अचूक बसविलेला आहे आराखडा म्हणजे आश्चर्य वाटते. आता, यांचे सांगते गणपतीचे? यांना प्रॉस्टेटचा त्रास होता. आणि हे म्हणजे चतुर्थीला उपवास! चतुर्थीला माझ्याकडे आले आणि यांना प्रोस्टेटचा त्रास! मला समजेना! हा मनुष्य म्हणजे साक्षात गणपती आणि याला प्रोस्टेटचा त्रास? कारण प्रोस्टेटचा कंट्रोल वगैरे गणपती करतात. बघा, म्हणजे सहजयोग कसा आहे. ज्या दिवशी चतुर्थी त्याच दिवशी उपवास केलेला. त्याच दिवशी माझ्याकडे आले हे! सगळे समोरच गणित आलेले. सहजयोगाचे लक्षण आहे. मी काय चणे, माझा प्रसाद चणेच आहे, मी चणेच काढले. म्हटले, घ्या प्रसाद. ते तर काहीच बोलले नाहीत. पण त्यांच्या शेजारी जे उभे होते ते म्हणाले, 'माताजी, आज यांचा उपवास आहे.' मी म्हटले, 'आज कसला उपवास.' त्यावर ते म्हणाले, 'आज चतुर्थी आहे.' म्हटले, 'असं का! तुमच्या घरी जर मुलगा जन्माला आला तर तुम्ही उपवास कराल का त्यादिवशी! कुठले शहाणपण ते! कोणाच्या जन्माच्या दिवशी उपवास करायचा हे सूत्रच मला आजपर्यंत कळले इतका १३ টি उपवास जए सांगितला असेल तर तो एवढ्यासाठीच सांगितला नाही. तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर तुम्ही काय सूतक पाळाल का त्या दिवशी! उपवासाचे म्हणूनच त्यांनी सांगितले, की उपास-तापास करायचे नाहीत. कारण इतकं शास्त्र चुकतं त्या उपासाचं. इतके चुकलेले आहे, की मला आता समजतच नाही की यांना सांगायचे तरी काय! माझे असे म्हणणे नाही की नुसतं खातंच बसायचं. तिकडे फार लक्ष असतं या उपासङ्या लोकांचं. उपासडे नावाचे. पण लक्षं सगळं खाण्याकडे. म्हणजे, 'आज काय बेत आहे ?' सकाळी पहिला प्रश्न, गणपतीला नमस्कार करायच्या आधी, कारण का तर आज उपवास आहे. मग सगळें घर डोक्यावर घेतलं पाहिजे. उपवास आहे म्हणजे काही तरी विशेष पाहिजे, ते आणा, खायलाच पाहिजे. झालंच पाहिजे, ते असं झालंच पाहिजे, खाल्लच पाहिजे, म्हणजे हे काय! उपवास जर सांगितला असेल तर तो एवढ्यासाठीच सांगितला होता, की परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही राहायचे, त्यासाठी जेवणाचा त्रास नको. जेवणाची खरं जर तुम्ही सुरुवात केली, तर 'परमेश्वराच्या सान्निध्यात आता आम्हाला जायचे आहे. जेवायला तिकडे जायचे आहे. ' वगैरे विचार तुमच्या डोक्यात येतील. म्हणून त्या दिवशी उपवास करायचा म्हणजे 'पूर्णपणे परमेश्वराच्या सान्निध्यात रहायचं', असा. पर्यायाने तो उपवास आला. 'उपवास म्हणजे परमेश्वराच्या बरोबर सहवास' असा त्याचा खरा अर्थ, म्हणजे संस्कृतातला अर्थ आहे. आणि त्या उपवासाला पर्यायाने अर्थ हा लागला की उपवास करायचा, पण त्याला आणखी एक मजेदार शब्द आहे 'उपासना'. उपासना करायची म्हणजे 'उपास ना'. तर त्या उपासाला थोडी तरी तिलांजली द्यायला पाहिजे. आणि बोलणे एकच, आज एकादशी आहे नं, मग काय आणायचं? मग त्याला ते पाहिजे, बटाट्याचा कीसच पाहिजे, अमकं पाहिजे, मग खिचडी पाहिजे. अहो, माणसाचे तत्त्व किती महत्त्वाचे, किती मोठे, किती महान, किती मुश्किलीने बनवलेलं आणि कुठे ते चाललंय! ते कुठे घालता तुम्ही! परमेश्वराच्या चरणावर घालायचं तत्त्व आहे, ते तुम्ही शेंगदाण्यावर घालता! शेंगदाणे खाऊन का परमेश्वर मिळणार आहे ? अहो, साध्या बुद्धिलासुद्धा कसं पटतं हे मला समजत नाही. या धर्मांधतेचा इतका वाईट परिणाम झालेला आहे की त्याचं दुसरे एक पीक निघालेले आहे. तुमच्या मुलाने तुम्हाला वेड्यात दुसर्या जनरेशनमध्ये तुम्ही बघा, म्हणतील, 'आमचे आई-वडील अगदी वेडे आहेत.' ब्राह्मणांनी त्यांना काढायचं! लुटून खाल्लं, उपासांनी त्यांना मारून टाकले, त्यांनी हे केलं! कोणाचाही विश्वास परमेश्वरावर राहणार नाही. तिकडून सुटले तर अविश्वात पडले. घेतलं परमेश्वर आहे, इतकंच नाही तर सर्व चराचरात कार्य करीत आहे. यात अगदी शंका नाही. पण ते पाहिजे, त्याचा बोध झाला पाहिजे, जसं मी काल सांगितलं होतं, तसं आपण सहजयोगाने यामध्ये मनन शक्ती वाढवली. आता आमच्याकडे अशी पुष्कळ मंडळी आहेत, ज्यांना भाषणसुद्धा देणं कदाचित माहीत नसावं, नुसते भित्रे, बोलायला लागले तर त्यांच्यात साक्षात सरस्वती वाहते. एक आठ वर्षाची मुलगी होती, इतकी सुंदर बोलायला लागली! लंडनला एक आठ-दहा वर्षाचा मुलगा आहे, तो इतकं सुंदर भाषण देतो सहजयोगावर, की लोकांना आश्चर्य वाटते. इतकं कसं येतं ! माझ्या नातीचं मी सांगते, की ती जवळ जवळ त्यावेळी पाच वर्षाची असेल तर ते लडाखला गेले होते. त्यावेळी तिथे एक लामा गृहस्थ बसले होते. ते मोठं आपलं घालूनबिलून आणि हिंदी बोलतायत. तर सगळ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि हिच्या आई-वडिलांनी ठेवल्याबरोबर तिला काही ते पटलं नाही. म्हणजे सहजयोगी ते मोठे! तर ती अगदी उभी राहिली त्यांच्यासमोर जाऊन आणि म्हणाली की, 'ये चोगा पहन के और सर मुंडा के तुम पार नहीं होते. तो काहे को सबसे छुआते हो जब तुम पार नहीं हो!' अगदी स्पष्ट बोलली , अगदी कबीरासारखे ! कबीरांनी या प्रकारांना असले जोडे मारलेत. तुम्ही कबीर वाचा म्हणजे शक्ती येईल तुम्हाला. वाचून काढला पाहिजे. त्यांनी सांगितलं जर डोक्याचे केस काढून मुंडन करून, जर परमेश्वर मिळत असेल, तर या जाणून कबीर १४ होता, की परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही रहायचे, शेळ्या आणि ही मेंढरे यांना तर रोजच भादरलं जातं , ती अगदी परमेश्वराच्या जवळच असतील. अशी प्रत्येकाची त्याने काढलीय. हे अंगावर जे मोठमोठे चोगे घालून फिरतात, स्वत:ला मोठे संन्यासी म्हणवतात. दुसरी माझी एक नात आहे, ती हिच्यापेक्षा थोडी मोठी असेल किंवा हिच्या वयाचीच असेल. तिकडे रमण महर्षींचा प्रोग्रॅम झाला होता, तिथे मला चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं. तिथे असेच मोठमोठाले संन्यासी येऊन बसले होते. असेच एक गृहस्थ शेजारी बसले होते. ते फार मोठे मानले जातात, तर लगेच आमच्या नातीने ते पाहिलं. तिला काही ते सहन झालं नाही. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, 'नानी, तुम्हारे बगल में जो मॅक्सी पहन के बैठे है उनको भगाओ, बहुत गरम आ रहा है मेरे को।' अगदी सरळ उठून सांगितलं तिने. आणि तिथे सगळे सहजयोगी बसले होते. त्यांना हसायला आले कारण त्यांनाही गरम येत होते. हा बघायला लागला की कोण मॅक्सी बसलंय. स्वत:लाच म्हणताहेत हे लक्षातच आलं नाही त्याच्या. तर अशी शक्ती आतून प्रचंड येते, की अगदी खरं बोलायला लागतो. भीती वाटत नाही, सत्यावर उभा आहे. घालून मनुष्य आता ख्रिस्तांचंच आयुष्य बघा, केवढं पवित्र ते! पण एक वेश्या, तिला सगळे दगड मारतायत, त्यांचा वेश्येशी काय संबंध, साक्षात पवित्र तत्त्व होते ते! पण 'ती वाईट आहे, वेश्या आहे' असे समजून जेव्हा तिला लोक दगड मारायला लागले, त्यांनी सांगितले की , 'बघा, तुमच्यापैकी ज्यांनी काही पाप केलं नसेल त्यांनी दगड मारा आणि तो सुद्धा मला मारा.' झालं! सगळ्यांचे हात जिथल्यातिथे थबकले. तुम्ही विचार करा, जर तुम्ही कोणतंही पाप केलं नसेल तर हिला मारा. मग ती त्यांची फार मोठी शिष्या झाली. ती मारी मगदानी म्हणून फार मोठी शिष्या होती. पण आता त्यांचच यांनी घेतलं. आता माणसाचच बघा कसं ते, मला समजत नाही, माणशी डोकं. आमच्या इंग्लिश लोकांचं डोकं आणखीनच वर आहे. मी त्यांना म्हटले, 'हे कशाला असे मूर्खासारखे वागतात लोक!' त्यांनी सांगितले, 'मारी मगदानी वेश्या होती आणि तिचा उद्धार झाला म्हणून आम्ही सगळ्या वेश्या झालो आहोत.' आता काय म्हणावे! अगदी असे सांगतात त्या. 'ती जर वेश्या झाली नसती, तर तिचा उद्धार झाला नसता, म्हणून आम्ही तिकडे चाललो आहोत.' आता याच्यापुढे उत्तर काय? की आपण गाढवाच्या मागे उभे आहोत, हे गाढव आहे हे दिसलं, पण अशा गाढवपणाचे अनेक प्रकार तिथे आहेत. तेव्हा एवढं शिकून आणि आम्ही एवढे अॅडव्हान्स्ड लोक आहोत, हे म्हणून, असे सगळे गाढवच दिसतात मला. आता आपल्याला सांगायला हरकत नाही की ऐंशी वर्षाचे म्हातारे गृहस्थ अठरा वर्षाच्या मुलीला प्रेमपत्र लिहितात. बरं एखादे असे गाढव लिहीत असतील, पण ते वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर येतं. रकानेच्या रकाने रोज! आता आमचे साहेब म्हणायचे ही वाचा, 'गीता' सकाळी उठून. आणि सगळे लोक ते सगळे व्यवस्थित, सिरीयसली वाचतात. म्हणजे सगळेच्या सगळे गाढव असतील, पण ते वाचतात तरी कसे मला समजत नाही. आणि हा सर्रास प्रकार तिथे आहे. ऐंशी वर्षाची म्हातारी अठरा वर्षाच्या मुलाला प्रेमपत्र लिहिते! असं ऐकलंय का तुम्ही कुठे? ऐंशी वर्षाचे म्हातारे, त्यांना काही समज नाही! प्रगल्भता नाही! कसले अॅडव्हान्समेंट! यातले काही प्रश्न मी आपल्याला सांगितले तसं सायन्सचे प्रश्न आहेत कारण आपल्याकडे लोकांना वाटायला लागलं की, 'आम्ही सायंटिफिक झालो' वगैरे. जे लोक फार सायंटिफिक झालेत ते सुद्धा आमच्याबरोबर आलेले आहेत. त्यांच्यापैकी एक दोघांशी आपण हितगुज करावे, त्यांनी बोलावे आपल्याशी अशी माझी इच्छा आहे. आपण त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला म्हणजे आपल्याला कल्पना येईल, की ज्याला आपण सायन्स म्हणतो ते कुठे गेलेले आहे. आता मी आपल्या प्रश्नांची उत्तरे देते. सहजयोगात येणारे अडथळे असे प्रश्न विचारा. सहजयोग्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत म्हणजे मला समजेल, तुम्हाला काय त्रास आहे? काय अडथळे आहेत ? कसं समजावून सांगायचे, असे प्रश्न विचारा. कुंडलिनीबद्दल वगैरे. १५ आता यांनी विचारले 'जालंधर योग वगैरे' ते ऐकून घ्या. आता हा केवढा घोटाळा झालेला आहे, की तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल. जालंधर बंध होतो म्हणजे जालंधर हा जो चक्रातला एक भाग आहे म्हणजे अढी आहे ती. ती अढी अशी पूर्णपणे उघडते आणि ती उघडून घट्ट धरते कुंडलिनीला, असा त्याचा अर्थ आहे. नाभी चक्रावरची गोष्ट आहे ही. कुंडलिनी जेव्हा वर सटकू लागली, समजा, तर कोणतीही गोष्ट वर सरकू लागली म्हणजे कठीण काम आहे नाही का! खाली जाणं सोपं आहे,वर जाणं कठीण आहे. तर वरती नेऊन धडक देणारी चक्रांची जी काही कसक आहे, जी काही गाठ पडते, चक्र स्वत:ला आवळून घेते. म्हणजे वर गेलेली कुंडलिनी खाली घसरू नये याच्यासाठी जालंधर योग वगैरे आहे. खेचरीसुद्धा तोच प्रकार आहे. विशुद्धी चक्रावरती जेव्हा कुंडलिनी येऊन वर सरकते तेव्हा विशुद्धी चक्र स्वत: तिला धरून सस्टेन करत असतं (त्याच स्थितीत ठेवते) की खाली पडू नये म्हणून. ठीक आहे ती क्रिया खरी तेव्हा जिव्हा आतल्या बाजूला ओढली जाणार नक्की. तसंच एकंदर सर्व चित्त आतमध्ये गेल्यामुळे तिथे बंध पडतो. आता हे तुमच्या लक्षात येत नाही. हे तुम्हाला समजत नाही कारण ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे आतमध्ये काय घटना घटित झाल्या ते लक्षात येत नाही. फक्त लक्ष कुंडलिनीकडे धावतं कारण तुमचं लक्षं बाहेरून आतमध्ये ओढलं जातं. ही घटना आतमध्ये सहजयोग हा अत्युत्तम आहे. सर्वात काी वरचा सूक्ष्म होते. लक्ष सुद्धा सूक्ष्मात उतरतं. तर त्यावेळेला हे होत असतं आपल्यामध्ये घडामोडी, आता ही इथून वीज निघाली समजा तर ती आतमध्ये येऊन कशी फिरते आणि इथे येऊन ती कशी लाऊडस्पीकर होऊन जाते, तशातला हा प्रकार आहे. म्हणजे ही सगळी आतमधली सूक्ष्म घटना आहे. ही आपल्या आतमध्ये सगळी घटित होते. हे जे लिहिलेलं आहे त्याला अर्थ आहे. हे श्री ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. पण त्याचा अर्थ जो लावतात म्हणजे आपण असं बसलं म्हणजे जालंधर बंध पडला हे चुकीचं आहे, तुम्ही करू शकत नाही, हे घटित होतं. आता बघा केवढा फरक आहे. ते नॅचरल (स्वाभाविक), आतमध्ये घटित होतं. आता मी असा हात धरला म्हणजे का मायक्रोफोन होणार आहे ? तुम्ही जर म्हणाला, 'आम्ही गव्हर्नर झालो' म्हणजे काय तुम्ही गव्हर्नर होणार आहात? त्याने शक्य झालं का? तुम्हाला कोणी मानेल का? फार तर पागलखान्यात घालतील. एखाद्या माणसाने ओरडावं 'मी गव्हर्नर आहे', वाटेल तर एक मोटार न्यावी तशी ओरडत. लोक म्हणतील 'या सगळ्यांना घाला पागलखान्यात.' जे अधिकार या वस्तुंमध्ये बांधलेले आहेत त्या सूक्ष्म वस्तू आहेत आणि ते अधिकार सूक्ष्म आहेत आणि ते करतात स्वत:. ते तुम्हाला करायला जमत नाही. म्हणून याला सहजयोग म्हणतात. सहजयोग हा अत्युत्तम आहे. सर्वात वरचा आहे म्हणून तो महायोग आहे. सहजयोग म्हणजे सगळे काही. बाकी असहज काहीच होत नाही. तुम्ही काही करता ही कल्पना जर डोक्यातून काढली तर गोष्टींना अर्थ लागतो. फक्त तुम्ही स्विच लावून देता. बाकी सगळं होतं. ते इलेक्ट्रिसिटीमध्येच बांधलेलं आहे की ती अशी वाहिली पाहिजे, तिचं कनेक्शन लागले म्हणजे तिच्यातून लाईट निघालाच पाहिजे, अशा वर्तुळातून गेली म्हणजे तिचा माईक झालाच पाहिजे, तशा वर्तुळातून गेली म्हणजे त्याचा पंखा झालाच पाहिजे. हे इलेक्ट्रिसिटीचंच तत्त्व आहे. तसंच ते कुंडलिनीचे आणि तुमच्यामध्ये बसलेली सुषुम्ना नाडी वरगैरे जे काही यंत्र तुमच्यामध्ये आहे, त्याचं स्वतःचं सगळं बांधलेलं तत्त्व आहे आणि ते तत्त्व असं असं घटित होतं, असं श्री ज्ञानेश्वरांनी सांगितल्यावर 'ते आम्ही करू शकतो. तुम्ही काय सांगितलं.' आम्ही इथे खोटे बोलून दिवा लावतो, तर दिवे लागायचे. आणि ते दिवे लागले म्हणजे कुंडलिनीचा असा त्रास होतो, तसा त्रास होतो असं पुस्तकात लिहून ठेवायचं म्हणजे लोकांना वाटतं वा किती छान आहे ! यांना एवढा त्रास झाला तर आम्हाला किती आहे म्हणून तो महायोग आहे. लावून बघावं १६ झाला पाहिजे. आता एक गृहस्थ त्यांनी लिहिलंय की, 'माझी कुंडलिनी जागृत झाली आहे.' म्हणजे स्वत:चं सेल्फ सर्टिफिकेशन आणि त्याच्यामुळे माझ्या हातावर अगदी विंचू चावल्यासारखं झालं. मी फार तडफडलो. माझ्या अंगावर फोड निघाले. आतून एकदम गरमी झाली, माझं डोकं भणभणायला लागलं, माझी स्थिती खराब झाली, मग मी लोकांना विचारले. त्यांनी सांगितले, 'तुमची कुंडलिनी जागृत झाली. ' एखाद्या गुरूंकडे गेले असतील. तिथे काही तरी प्रकार केले असतील आणि अनाधिकार चेप्टा केल्यामुळे हे श्रीगणेशांचे तडाखे आहेत. ते सिंपथेटिकवर फील झाले. तर लोकांना ते पुस्तक फार आवडते. म्हणजे मनुष्य स्वत:च्या मागेसुद्धा हात धुवून लागलेला आहे. अहो, इतका तुम्हाला जर त्रास झाला आहे, तर त्याला कशाला घालता तुम्ही? काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की कुंडलिनी तुमची आई आहे आणि आई किती प्रेमाने आपल्या पुलांचे संगोपन करते! ती तुम्हाला असा कसा त्रास देईल, असा साधा विचार करा. हे असले लिखाण वाचून आलेला मनुष्य नक्कीच आम्हाला काही जागृती झाली नाही असा विचार करून बसणार. कारण त्याच्यात तो बेडकासारखं उडाला पाहिजे किंवा विंचवाने तरी चावलं पाहिजे, नाही तर त्याला ढेकणासारखा वास आला पाहिजे, काही काही असे प्रकार असतात, पण एक गोष्ट खरी; जेव्हा कुंडलिनी जागृत होते, तेव्हा इतरसुद्धा अनुभव येतात, पण ते अनुभव विशेष मानू नये. कारण उजव्या बाजूला जरा जास्त कुंडलिनी ढकलली गेली तर प्रकाश दिसेल तुम्हाला. त्याचं विशेष मानायचं नाही. तुम्ही बरोबर मधोमध असाल तर काही दिसणार नाही. नंतर सुगंध येतो. कारण पृथ्वी ही आई आहे. तिची तन्मात्रा सुगंध आहे. पृथ्वी ही सुगंधापासून बनविलेली आहे आणि ती आई असल्यामुळे, तुम्हाला कधीही आमची आठवण आली तरी सुगंध येणार. सुगंध हा आमच्या शरीराचा स्वभाव आहे. अनेक तऱ्हेचे सुगंध येत असतात लोकांना. कोणी म्हणतात, 'श्रीमाताजी आम्हाला-आता कालच आम्ही गेलो तर गुग्गुळाचा इतका सुगंध खोलीत पसरला.' खरं ते हे गृहस्थ जे भगवानजी बनून फिरत आहेत, त्यांना कसलाच सुगंध चालत नाही. ईश्वर सुगंध प्रिय आहे. म्हणजे हे कसले भगवानजी आहेत ! हे दर्गंध प्रिय आहेत, घाणप्रिय आहेत ! हे परमेश्वर कसे ? तर सुगंध जर आला माणसाला, तर त्याच्यात हे आहे, की सुगंधाच्या पलीकडे गेलं पाहिजे. त्याने जरासा बहकतो मनुष्य. प्रकाशही दिसेल, सगळे काही आहे. पण याचं पुढे तुम्हाला कळेल, की प्रकाश जेव्हा माणसाला दिसू लागतो ते आज्ञा चक्रही उघडलं गेलंय यात शंका नाही. त्या प्रकाशामध्ये तुम्हाला असे काळे काळे ठिपकेसुद्धा दिसतील. त्या बाधा आहेत. त्या तुमच्यात असतील, दुसर्यात असतील, वातावरणात असतील. त्या कशा काढून टाकायच्या वगैरे वगैरे. प्रकाशाचे जे अवलोकन आहे, ते पूर्णपणे आधी कुंडलिनी स्थिर करून घ्या. माझे काय म्हणणे आहे, आधी दिल्लीला पूर्णपणे पोहोचा, पोहोचल्यावर दिल्ली काय आहे ती जाणली पाहिजे. तेव्हा ते पुढे मग समजतं, हे प्रकाशाचे प्रकार, या ज्योतीने काय होतं, सगळं काही बारीक बारीक, जिथपर्यंत व्हायब्रेशन्स दिसू लागतात. त्याचं वर्तुळ दिसू लागतं. त्याचं फिरणं दिसू लागतं. हे नंतर दिसलं पाहिजे. सुरुवातीलाच असं थोडसं दिसलं, तिकडे मनुष्य रमला, की गेली! म्हणजे घोडा असतो तसं हे मन आहे. त्याच्यावर आरूढ झालं पाहिजे. जर त्या घोड्याला कळलं, की तुम्हाला रस्त्यात गवत खायचंय, तर तुमच्या नाही ताब्यात राहणार. पण त्याला कळलं, की तुम्हाला लक्षावर जायचंय तर तुमच्या अगदी बरोबर कह्यात राहणार. अगदी बरोबर. पण त्याला कळलं पाहिजे की हा मनुष्य घोडेस्वार आहे. त्याला माहिती आहे. पण जर घोड्याला कळलं, की तुम्हाला घोड्यावर बसता येत नाही, तर मग लागतो तो तुम्हाला त्रास द्यायला. त्या घोड्यावर बसता आलंच पाहिजे म्हणजे तो तुमचा मित्र होणार. तुमचा वाहक होणार. तेव्हा या चित्तालासुद्धा एक घोडा समजून सारखं निक्षून सांगायचं, की मला तिथेच पोहोचव तू. दूसरं इकडे तिकडे नेलेलं मला चालायचं नाही. म्हणजे बरोबर राभ तो परम पदाला घेऊन जातो. १७ वकादर रुद्र कोमो, इटली, १६/९/१९८४, अनुवादित आज आपण विशिष्ट पद्धतीची पूजा, जी एकादश रुद्रांच्या वैभवार्थ करत आहोत. रुद्र ही शिवाची- आत्म्याची संहार शक्ती आहे. आता एक शक्ती, जी त्याचा (परमेश्वराचा) स्वभाव आहे, ती आहे क्षमाशीलता. तो क्षमा करतो, कारण आपण मानव आहोत. आपण चुका करतो. आपण चूकीच्या गोष्टी करतो, आपण मोहात अडकतो, आपले चित्त भंग पावते म्हणून तो आपल्याला क्षमा करतो. आपण आपले पावित्र्य खराब करतो; आपण अनैतिक गोष्टी करतो, आपण चौर्यकर्म करतो आणि आपण अशा गोष्टी करतो की त्या परमेश्वराच्या विरुद्ध आहेत, त्याच्याविरुद्ध बोलतो. तरीदेखील तो क्षमा करतो. तो आपली वरपांगीपणा, द्वेष, आपली वासना, आपला क्रोध (यांना) तो क्षमा करतो. आपली आसक्तीदेखील. द्वेष, पोकळ गर्व आणि ताबेदारी (मालमत्ता) तो क्षमा करतो, तो आपली अहंकारी वर्तणूक आणि चुकीच्या गोष्टींना अंकित ठेवणे हे देखील क्षमा करतो. प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया आहेच आणि जेव्हा तो (परमेश्वर) क्षमा करतो, तेव्हा तो विचार करतो, की तुम्हाला एक महान अशी स्वखुशीने गुणवत्ता (कृपा) दिली आहे आणि ज्यांना क्षमा केली गेली आहे आणि तेच मोठ्या चुका करत आहेत. त्यांच्याविरुद्ध संतापाची प्रतिक्रिया त्यांच्यात उभी राहते. विशेषकरून आत्मसाक्षात्कारानंतर कारण आत्मसाक्षात्काराचे एवढे महान आशीर्वाद आहेत, तुम्हाला प्रकाश मिळाला आहे आणि प्रकाशात जर तुम्ही समोरच कृतीची वाट पहात चिकटून आहात तर त्याचा संताप वाढतो कारण तो पाहतो, की तुम्ही किती मूर्ख आहात! मी काय म्हणत होते, की आत्मसाक्षात्कारानंतर, विशेष करून तो अधिकाधिक संवेदनशील असतो, की ज्या लोकांना क्षमा केली आहे आणि आत्मसाक्षात्कारासाठी मोठी गोष्ट दिलेली आहे व अद्याप ते अयोग्य गोष्टी करतात तर परमेश्वर अधिक असंतुष्ट होतो म्हणजे तराजूतील क्षमाशीलता कमी होऊ लागते व प्रकोप वाढण्यास सुरुवात होते. पण जेव्हा तो क्षमा करतो, त्या क्षमाशीलतेचा परिणाम म्हणून तुम्हाला कृतज्ञता वाटते आणि मग त्याचे क्षुदर चा =ा च च= भ चव र आशीर्वाद तुमच्याप्रत वाहण्यास सुरुवात होते. तुम्हाला दुसऱ्यांना क्षमा करण्याची महाप्रचंड क्षमता देतो. तो तुमचा राग शांत करतो. तो तुमची वासना शांत करतो, तुमचा लोभ तो शांत करतो. सुंदरशा दवबिंदप्रमाणे, तुमच्या जीवनावर आशीर्वाद मिळत असतात. आणि आपण सुंदरशी फुले बनतो आणि त्याच्या आशीर्वादाच्या सूर्यप्रकाशात आम्ही प्रकाशित होऊ लागतो. सर्व जे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते, त्याचा नाश करण्यासाठी तो त्याचा राग किंवा त्याच्या संहार शक्ती वापरतो. प्रत्येक मार्गाने, प्रत्येक क्षणी आत्मसाक्षात्कारी आत्म्याचे तो रक्षण करतो. दष्ट शक्ती सहजयोग्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या महाप्रचंड संरक्षण शक्तीमुळे ते हल्ले निष्फळ ठरतात. त्याच्या चैतन्य लहरींच्या जाणिवेतून आम्हाला योग्य पथाचे मार्गदर्शन मिळते. त्याचे सुंदरशा ब = ग ययय्र भ क आशीर्वादाचे बायबलच्या २३ व्या स्तोत्रात वर्णन केले आहे. 'परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.' तो तुमची मेंढपाळ म्हणून कशी काळजी घेतो ते सर्व वर्णन केले आहे. परंतु तो या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची काळजी घेत नाही. त्याचा नाश करतो. जे सहजयोगात येतात आणि राक्षसी स्वभाव ते चालूच ठेवतात ते नष्ट होतात. जे सहजयोगात येतात आणि ध्यान करत नाहीत ते ही नष्ट होतात किंवा ते सहजयोगाच्या बाहेर फेकले जातात. जे ईश्वराच्या विरुद्ध बडबडतात आणि अशा मार्गाने जातात, जो सहजयोग्याला शोभत नाही, त्यांना तो दूर करतो. म्हणजे एका शक्तीने तो रक्षण करतो आणि दुसर्या शक्तीने तो त्यांना दूर करतो. परंतु त्याची संहार शक्ती (रुद्र), जेव्हा ती जास्त मजबूत होते तेव्हा आपण म्हणतो, 'आता एकादश रुद्र कार्यरत झाले आहेत.' जेव्हा कलकी स्वत: कृतीशील होते तेव्हा हे एकादश रुद्र व्यक्त होतात. म्हणजेच संहार शक्ती, सर्व जे या पृथ्वीवर नकारात्मक आहे ते नष्ट करेल आणि सर्व जे सुष्ट आहे त्याचे रक्षण करेल. म्हणून सहजयोग्यांनी आपली उन्नती झटपट करणे अगदी गरजेचे आहे. सामाजिक जीवनाशी किंवा वैवाहिक जीवनाशी किंवा ईश्वराने तुमच्यावर जे सर्व काही आशीर्वाद दिले आहेत, फक्त त्यावरच समाधानी असता कामा नये. ईश्वराने आपल्यासाठी काय केले आहे, तो आपल्याशी कसा अद्भूत आहे ते आपण नेहमीच पाहतो, परंतु आपण आपल्यासाठी काय केले आहे, आपल्या आत्मउन्नतीसाठी व आपल्या पूर्णत्वासाठी आपण काय करत आहोत ते आपल्याला पहायचे आहे. की आता अकरापैकी एकादश म्हणजे अकरा, तुमच्या भवसागराच्या उजव्या बाजूने पाच येतात आणि तुमच्या भवसागराच्या डाव्या बाजूने पाच येतात. जर तुम्ही अगुरुपुढे स्वत: मान तुकवलीत किंवा तुम्ही चुकीची पुस्तके वाचलीत किंवा जर तुम्ही अनैतिक लोकांच्या संगतीत असलात, चुकीच्या मार्गाने जे जात आहेत, त्याचेबद्दल सहानुभूतिपूर्वक राहिलात किंवा तुम्ही स्वत:च या अनैतिक लोकांचे गुरू किंवा एखादे एजंट आलात तर पहिले पाच, डाव्या हाताच्या बाजूवरील (रुद्र) येतात. आता ह्या पाच समस्या सोडवू शकतो; जर जे जे आपण चुकीचे करत आलो आहोत ते आपण पूर्णपणे सोडले तर ! महंमद साहेबांनी असे म्हटले आहे की तुम्हाला सैतानाला ठोकायचे आहे, चपलेने... परंतु ते यांत्रिकपणे करायचे नाही. परंतु हृदयापासून. ज्याप्रमाणे पुष्कळ लोक, जे सहजयोगात येतात आणि मला सांगतात की, 'माझे वडील ह्या गुरूला अनुसरतात.' ते त्या गुरूंना अनुसरतात. ते त्यांच्या वडिलांबरोबर, बहिरणींबरोबर, ह्यांच्या आणि त्यांच्याबरोबर गुंतत जातात आणि त्यांना त्या गुरूंपासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि गुंतत जातातदेखील किंवा त्यांच्यापैकी काही इतर शक्तींना शरण जातात. ज्याप्रमाणे मॉरीनचे मला माहीत आहे, जी माझ्याबरोबर होती आणि तिचे आई-वडील व सासू-सासरे म्हणाले की, मुलाला बाप्तीस्मा दिलाच पाहिजे. मी तिला सांगितले, 'तू ह्या मुलाला बाप्तीस्मा देऊ नकोस कारण तो आत्मसाक्षात्कारी आत्मा आहे.' पण ती तशी त्या गोष्टीला न भिता सामोरी जाऊ शकली नाही आणि तिने ते मूल बाप्तीस्मा (नामकरण विधी) साठी नेले आणि ते मूल चमत्कारीक बनले. वेडसर मुलासारखे ते करत होते. म्हणून आता तिने ते सर्व सोडले आणि ती वाचली. परंतु समजा तिला दुसरे मूल असते तर अगदी वाईट झाले असते. आता सहजयोग्यांबाबतची अडचण आहे, की कुणीही सहजयोगाच्या कार्यक्रमाला येतो, त्याला वाटते की तो सहजयोगी आहे, पण ते तसे नाही. एकतर तुमच्याजवळ खूप सामर्थ्याची जाणीव हवी किंवा तुमच्या शरीरातून तो जाणवला पाहिजे. एखादी व्यक्ती अद्याप जी 'बाधित' आहे, ती दुसऱ्या एकाजवळ, जो अधिक प्रबळपणे बाधित आहे त्याला आकर्षित होते आणि त्याला समजत नाही की ही दसरी व्यक्ती इतकी प्रबळपणे बाधित आहे, परंतु प्रभावित होतो. अशा स्थितीत, अशा व्यक्तीला बाधित व्यक्तीकडून तडाखा बसतो. शिव रक्षण करू शकत नाहीत. २० जे ईश्वटाच्या विरुद्ध बडबडतात आणि अशा मारगाने जातात, की जो सहजयोग्याला शोभत नाहीं, त्यांना तो दूट कटतो. जो बाधीत आहे त्याबद्दल एखाद्यानेही सहानुभूती दाखवू नये. जरी तो वेडा आहे, त्याचे काही बिघडलेले आहे, जरी तो तुमच्या नात्याचा आहे आणि काही असो. कोणत्याही प्रकारची अनुकंपा नको. उलट पक्ष, त्या व्यक्तीबद्दल एक प्रकारचा रागच असावा. एक प्रकारची अनासक्ती आणि ही रागयुक्त अनासक्ती, ही एकच वेळ आहे. जेव्हा तुम्ही रागवलेच पाहिजे. परंतु मी असे लोक पाहिले आहेत, की ज्यांना फार चांगल्या सहजयोगी मंडळींबद्दल राग आहे. परंतु त्यांच्या नवऱ्यावर किंवा पत्नीवर नाही, जे अत्यंत बाधीत आहेत. म्हणजे जेव्हा एकादश रुद्र उजवीकडे ह्या पाच बाजूवर काम करू लागतात, खरे आपण म्हटले पाहिजे की ते उजव्या बाजूस सरकतात कारण ते डाव्या बाजूकडून येतात आणि उजव्या बाजूस वळतात, नंतर ती व्यक्ती बाधीत होण्यास सुरुवात होते. परंतु त्याच्या अहंकाराने त्याचे कार्य असते. अशी व्यक्ती परिस्थिती आपल्या ताब्यात घेईल. आणि म्हणेल, की 'मी असा नी तसा सहजयोगी आहे. आणि मी म्हणजे असा आहे.....' आपण ह्याप्रमाणे केले पाहिजे आणि ह्याप्रमाणे वागले पाहिजे आणि हुकूमशाहीला सुरुवात करतो. लोक काही करू शकतात आणि काही मध्यम प्रतीचे आणि काही अर्धे कच्चे सहजयोगी समजून घेण्याचा प्रयत्न करतील. परंतु पुष्कळसे जाणतील, की ही व्यक्ती 'बाहेर' जात आहे, आता तो त्याच्या 'बाहेर' जाण्याच्या मा्गावर आहे. म्हणजे ह्या सर्व बाबी ह्या डाव्या बाजूच्या वाढीकडे जातात किंवा आपण त्याला म्हणू शकतो की तुमच्या मस्तकावर तुमच्या 'मेधा' च्या उजव्या बाजूला आहे. त्या ब्रेन प्लेटला संस्कृतमध्ये मेधा म्हणतात. आता उजव्या बाजूवाला एखादा अशा कल्पनेतून येतो. जी कल्पना ह्या लोकांजवळ असते की 'मी स्वत: फार मोठा गुरू आहे.' ते सहजयोगाबद्दल शिकवायला सुरुवात करतात. जणू काही ते मोठे गुरू बनले आहेत. आम्हाला काही लोक माहीत आहेत की जे कोणत्याही कार्यक्रमात मोठी भाषणे देतात आणि माझ्या भाषणाच्या ध्वनिफिती (टेप्स) वाजवण्याची अनुज्ञा कधीच देत नाहीत किंवा दुसरे काही. त्यांना वाटते की ते आता तज्ज्ञ झाले आहेत. नंतर त्यांच्यातील काही म्हणतात, की आता आम्ही एवढे 'महान' झालो आहोत की मीठ-पाण्यात पाय बुडवण्याची कसलीही गरज नाही किंवा ध्यान करण्याची गरज नाही. अशा प्रकारचे पण काही लोक आहेत आणि असे काही आहेत जे म्हणतात, की पाप आम्हाला कधीच स्पर्श करू शकणार नाही. आता आम्ही सहजयोगी आहोत. आम्ही फार महान उत्क्रांतीत आलो आहोत. परंतु सर्वांमध्ये वाईट ते आहेत, की जे केवळ माझे नाव घेतात नि म्हणत असतात, 'आईने सांगितले आहे आणि मी तुम्हाला सांगतोय कारण आईने तसे सांगितले आहे.' जेव्हा मी ती बाब कधीच सांगितलेली नसते. ते सर्व असत्य असते. आता काही लोक आहेत की ते सहजयोगाचा पैसा वापरतात आणि सहजयोगाचा अयोग्य फायदा घेतात. कधी कधी सहजयोगी मंडळींचादेखील. आणि असे लोक फार अपवित्र बनतात. कुणी एक जो अशा गोष्टींचा प्रयत्न करतो, तो सहजयोगाबाहेर जाईल. कुणीही अशा व्यक्तीजवळ कधीच जाता कामा नये, अशा व्यक्तीजवळ काहीही संबंध ठेवू नये आणि अनुकंपाही असू नये. कारण ही अपवित्रता कुणालाही कितीही प्रमाणात नुकसान देऊ शकते. अशा व्यक्तीपासून दूर रहाणे चांगले. जेव्हा ह्या एकादश रुद्रांची एखाद्या व्यक्तीमध्ये वाढ होते तेव्हा निश्चितच अशा व्यक्तीला कॅन्सरसारखे रोग होतात आणि बरे न होणारे भयानक रोग! खास करून जेव्हा अकरावा रुद्र, जो खरोखर येथे आहे, जे विराटाचे चक्र आहे, जी सामूहिकता आहे, जेव्हा त्यावर परिणाम घडून येतो, तेव्हा अशी व्यक्ती ह्या रोगातून बाहेर पडू कत नाही. परंतु जर ह्या पैकी पाच मूलाधाराशी किंवा आज्ञेशी एकत्र आले तर त्यांना गंभीर स्वरूपाचा घाणेरडा रोग होतो. म्हणून मी नेहमीच सांगते, की तुमच्या आज्ञा चक्राबद्दल काळजी घ्या. कारण सर्वात वाईट गोष्टींपैकी ती एक आहे, की एकदा ह्या एकादशासह किंवा एकादशाच्या एखाद्या अंशाबरोबर देखील ते चक्र एकत्रित होऊ लागली तर त्या व्यक्तीला काहीही घडू शकते, तो भयानक अपघातात सापडू शकतो, त्याला कुणाकडून मार पडेल (तडाका हाणला जाईल), कुणाकडूनही खून केला जाईल. ज्याला उजवी आज्ञा आहे आणि उजव्या किंवा डाव्या एकादशांपैकी कोणताही एक २१ रुद्र आहे, अशा व्यक्तीला काहीही होऊ शकेल. त्याचा अर्थ असा की, या पैकी पाच, पाचांपैकी कोणताही एक, जर ते आज्ञा चक्राशी एकत्र आले, तर ईश्वराची संरक्षण शक्ती कमीत कमी असते. म्हणून आज्ञा चक्र स्वच्छ ठेवण्यासाठी हे पहा, आता मी बोलत आहे, तुम्ही मला सातत्याने जागरुकतेने पहावे म्हणजे निर्विचारितेची जाणीव होईल आणि आज्ञा चक्र शांत, थंड होईल. निर्विचारीतेच्या जाणिवेत तुम्हाला कुणीही स्पर्श करू शकणार नाही. ती आहे तुमची तटबंदी असलेली जागा. ध्यानाने तुम्ही निर्विचारीतेची जाणीव प्रस्थापित केली पाहिजे. तुम्ही उच्चपदी उन्नती करत आहात याची ती खूण आहे. खूप लोक ध्यान करीत नाहीत आणि म्हणतात, 'ठीक आहे, आम्ही करत आहोत.' यांत्रिक पद्धतीने ते करतात व म्हणतात 'मी हे केले आणि मी ते केले' परंतु तुम्ही निर्विचारीतेची जाणीव कमीत कमी संपादन केलीत कां? तुमच्या चैतन्य लहरी तुमच्या हातातून येताना तुम्हाला जाणवल्या का? नाहीतर, तुम्ही जर यांत्रिक वृत्तीने काही करत आहात तर ते उपयोगी पडणार नाही. तुम्हालाही किंवा कुणालाही उपयोगी नाही. म्हणून आत्मसाक्षात्कारानंतर, जसे तुम्ही पुष्कळच संरक्षित आहात, तुम्हाला सर्व आशीर्वाद आणि उज्ज्वल भविष्यकाळ आहे, तसेच तुम्हाला पूर्ण नाशाचासुद्धा संभव आहे. मी दोन गोष्टीतले साम्य सांगण्यासाठी सांगते, तुम्ही चढत आहात आणि प्रत्येकजण जे तुम्हाला आधाट देण्याचा प्रयत्न कटत आहेत, 7 तुम्हाला चढण्यासाठी आधार देत आहे. तुमचा हात पकडत आहे आणि वर घेण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत, की ज्यांनी तुमचे रक्षण केले जात आहे. चुकीनेदेखील खाली पडण्याची शक्यता नाही. परंतु तुम्ही सत्याची आणि प्रेमाची तुमची बंधने दूर करण्याचा सतत प्रयत्न केलात आणि सातत्याने त्या लोकांना, जे तुम्हाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत-त्यांना हाणण्याचा प्रयत्न केलात तर मोठ्या उंचीवरून खाली पडाल. मला असे सांगायचे आहे, जेवढी उंच उन्नती होते, तेवढे अधिक खाली पडता. फार मोठ्या जोरानेदेखील आणि अधिकाधिक खोल! प्रत्येक प्रयत्न हा परमेश्वरनिर्मित असतो. प्रत्येक आधार तुम्हाला दिला जातो. प्रत्येक काळजी घेतली जाते असूनसुद्धा जर तुम्हाला पडायचेच आहे आणि अशा त्या उंचीवरून तर ते फार धोकादायक आहे. कुणी एक, सहजयोगात असूनदेखील सहजयोगाच्या उद्दिष्टाला नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल. त्यावेळी, अशा विशेषवेळी एकादश रुद्र तुम्हाला अगदी इतका गंभीरपणे फटका देतात, की तो हल्ला फार दूरवर पसरतो. जर त्या कुटुंबातील काही लोक सहजयोगाचे कार्य करत असतील तर सर्व कुटुंबाचे संरक्षण होऊ शकते. परंतु जर कुटुंब सदासर्वकाळ सहजयोग्यांच्या विरुद्ध असेल आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पूर्णपणे विनाश होईल, अगदी वाईट रीतीने. आता हे एकादश रुद्र, मी सांगितल्याप्रमाणे भवसागरातून येतात म्हणजे आम्ही म्हणू शकतो, की त्याचा विध्वंसकतेचा भाग हा मुख्यत: भवसागरातून येतो. परंतु या शक्ती आहेत. सर्व एकाच व्यक्तीत ते म्हणजे महाविष्णुमध्ये दिलेल्या आहेत. तेच श्री भगवान येशू ख्रिस्त आहेत. कारण ते सा्या विश्वाचा आधार आहेत. ते ॐकारचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ते मनुष्य स्वरूपातील चैतन्य लहरींचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. म्हणून जेव्हा ते क्रोधी होतात, तेव्हा सारे विश्व भंग पावण्यास सुरुवात होते. आईची शक्ती, जी प्रत्येक अणूत, प्रत्येक रेणूत, प्रत्येक मानवात, प्रत्येक गोष्टीत, जे सजीव व निर्जिव आहे, त्यात प्रवेश करून पसरते. त्या शक्तीचे ते स्वरूप होऊन राहतात. एकदा का ते भंग केले गेले, तर सर्व गोष्टच संकटात लोटली जाते. म्हणून श्री येशूंना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे आहे. आता पहा, येशूंनी तुम्ही लहान मुलांप्रमाणे असले पाहिजे. तिच आहे निष्पापता, हृदयाची शुद्धता हाच सुंदर मार्ग आहे, की ज्याने तुम्ही त्याला प्रसन्न करू शकता. त्यांना हाणण्याचा प्रयत्न केलात हे त मोठ्या उंचीवरून खाली पडाल. श्री २२ New Releases Title Place Date Type Lang. DVD VCD ACD MP3 ACS 10th Feb 1981 सहजयोग में प्रगति 15* Delhi 15 PP Н 17th Feb 1981 सार्वजनिक प्रवचन:ब्रह्म तत्व का स्वरुप Delhi 16 PP 16* 16th Aug 1982 301* This is the Resurrection time London SP 457 16th Feb 1985 PP भाग १, २ Delhi 14* 14 Н सहस्रार-आत्मा 16th Oct 1988 नवरात्रि पूजा : हमारे जीवन का लक्ष्य गुडिपाडवा पूजा : देवी की शक्ति का प्रादुर्भाव 20 SP 20* Pune Н 5th Apr 2000 Noida Sp/Pu 204 23* 204* H nd Sahasrara Day 2009 - Cabella May 2009 302* Mu Mu Evening Program, Part I & II 21s Mar 1983 Birthday Puja : Overcoming Sydney SP 303* 79* 79 E the six enemies, Part-I & II 29th Feb 1984 Mahashivratri Puja : Detachment & Pandharpur SP 252* 252 304* E & Enlightenment of Brain th Shivratri Puja 6™ Feb 2000 458* E/H/M Pune SP 21st Mar 2001 Birthday Puja सार्वजनिक कार्यक्रम Delhi 218* SP 218 th 24 Mar 2003 Delhi 072* 284* 284 PP Н th 28" Aug 1973 Shri Krishna Puja 303 SP 303* Mumbai E 24h Jul 1979 London 305* 305 SP Seeking : What are we seeking nd 2 May 1985 9th Aug 1987 Nirananda, Part-I & II Vienna SP 321* 321 E Shri Vishnumaya Puja : Vishnumaya 323* New York SP 323 E & Electricity Part-I & II 11h Sep 1994 Shri Ganesh Puja : Religions, 95* SP Moscow 95 Innocence & Love 04th Jul 1993 Cabella 62* Sp 62 Guru Puja : Understand your own value 7h Jan 1983 Ganesh & Devi Puja-Part I & II SP/PU E/M 460* 306* Rahuri th Sahasrara Puja 5" May 2002 307* Cabella SP/Pu 235* 235 Sahasrara Puja सहजयोग से लाभ SP/PU E 7th May 2000 208 Cabella 308* 208* nd 2 Apr 1986 15th Feb 1981 Calcutta 011* 011 PP H तत्त्व की बात, भाग १ Delhi 012* 012 PP 23rd Feb 1986 धर्म की आवश्यकता Delhi 049 PP 049* Н 3rd Dec 1993 सार्वजनिक कार्यक्रम Delhi Н 056* PP 056 Music Title Artist Code No. ACD/ ACS/ Sahasrara Day Evening Program at Cabella, - 2nd May 2009, Part-I & II Bhajan Sopari 157* Musical Evening at Ganapatipule Sahasrara Seminar -1st-5th May 2009 Anand Kakade 158* Haasat Aali Nirmal Aayi Pt.B Subramanian,S.Malini 159* Pt.B Subramanian Niranand 160* Maa Tere Charno Mein Sandeep Dalal 161* Diwali Puja Bhajans, 3rd Nov 1986 Delhi Sahaja Artist 162* Classical Musical Program, Chhindwada, 21ª Mar 2008, Part-I Pt.Arun Apte & Surekha Apte 163* Pt. Arun Apte & Surekha Apte Classical Musical Program, Chhindwada, 21* Mar 2008, Part-II 164* प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in मी जे करुणी आणि प्रेम तुम्हीला दिले आहे ते साठवून दसऱ्यांपर्यत पोहोचवी. नाहीतर तुमचा विनाश होईल. प्रेम आणि करुणा तुमच्यातून वाहिले पाहिजे. २८.७.१९८५ ---------------------- 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-0.txt चेतच्य लहरो मे मराठी -जून २०१० ७ 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-1.txt हृदयात पूजा करणे सर्वोत्तम आहे. माझ्या ज्या चित्राकडे तुम्ही बघत आहात, ते जर तुम्ही हृदयात साठवले किंवा पूजेनंतर त्याची एक झलक तुमच्या हृदयात खोलवर उतरवू शकलात तर तो आनंद, जो तुम्ही त्या वेळी प्राप्त करता, शाश्वत तसेच अनंत बनतो.' 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-2.txt या अंकात सहजयोग्यांशी हितगुज.... ४ एकादश रुद्र पूजा...१८ त ३ र ो बग কে 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-3.txt सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २६ फेब्रुवारी १९७९ अ ता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की 'सत्यं वदेत, प्रियं वदेत.' यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, की 'सत्यं वदेत, हितं वदेत आणि प्रियं वदेत' म्हणजे जे आत्म्याला हितकारक आहे, हित म्हणजे आत्म्याचा संतोष. ते जरी अप्रिय असले तरी शेवटी ते प्रिय होते आणि ते सत्य असते. समजा, उद्या जर एखादा मनुष्य इथे राजवाड्यांच्याकडे आला आणि येऊन असे विचारले, की अमका मनुष्य इथे लपलेला आहे का? आणि हातात सुरा घेऊन आलेला आहे. तर राजवाङ्यांनी काय सांगावे त्याला. 'तो लपलेला आहे' हे सत्य आहे. ते त्याला सांगायचे का की 'तो इथे लपलेला आहे.' किंवा ते सत्य जर सांगितले तर ते ठीक होईल की ते हितकारक होईल का? असा प्रश्न पुढे उभा राहतो. तेव्हा पहिली गोष्ट त्याला अशी की ही अनाधिकार चेष्टा आहे. त्यांनी जर म्हटले, की 'त्या माणसाचा मला पत्ता सांगा,' तर 'हा कोण विचारणारा ?' ही अनाधिकार चेष्टा आहे. तेव्हा कोणत्याही अनाधिकार चेष्टेला तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे, हे काही हितकारी होणारच नाही. अधिकार असावा लागतो. तसेच सहजयोगात आहे. आम्ही पूर्णपणे आपल्यावर प्रेम करतो आणि ही आमची हार्दिक इच्छा आहे, की सगळ्यांनी सहजयोगामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा आणि परमेश्वराच्या साम्राज्यात यावे. ज्यासाठी मोठे आमंत्रण आपल्याला दिलेले आहे. सगळे अवगत आहे. अत्यंत प्रेमाने बोलावलेले आहे. पण त्यातही अनाधिकार चेष्टा होते. तेव्हा त्या अनाधिकार व्यक्तीला सहजयोग लाभेलच असे सांगता येत नाही. थोडा अधिकार असावा लागतो, आईवरसुद्धा. हे तर आपणच आपले अधिकार स्वतःच जमवून बसलेले आहेत. ते सहज आहे. 'स' म्हणजे बरोबर. 'ज' म्हणजे जन्मलेले. ते आपल्याबरोबर जन्मलेले आहेत. या योगाचे =ा क 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-4.txt य= य ॐ शैर अधिकार आपल्या बरोबर जन्मलेले आहेत. पण जशी एखाद्या साम्राज्यात आपले नागरिकाचे अधिकार आपण गमवतो तसेच आपणसुद्धा काही काही अधिकार गमावलेले आहेत. तर ते स्थापित करावे लागतील. ते करायचे काम आमचे आहे. जसे पुण्याला काम आम्ही बघितले, तर गणेश त्त्व मात्र फारच दुःखात आहे. म्हणजे जागृतच होत नाही. आता बघा! पुण्य हे गणेशाचे प्रसाद रूप आहे. म्हणजे आपल्याला गणेशच पुण्य देतो. पुण्य संपदा आपली जी होते ती आपल्या कुंडलिनीमध्ये असते आणि तो संचय संबंध गणेश म्हणजे आपल्यामधले. जे गणेश तत्त्व आहे तो सगळे आकलन करून तिथे, ती संपदा आहे. तेव्हा तुम्ही कितीही पुण्यसंचय केला आणि त्याठिकाणी गणेशच ठीक नसला, आता या जागेतच गणेश खराब करून ठेवला आहे. तुम्हाला माहिती आहे कोणी खराब केला ते. तर इतके वातावरण दुषित झालेले आहे, की तुमची पुण्याईसुद्धा त्या गणेशाला आकलन करता येत नाही. जर घाणीत दूध घातले तर ते हंसालासुद्धा जमायचे नाही, की नीर-क्षीर विवेक कसा करायचा. अशातला हा प्रकार आहे. तेव्हा जे लोक असले वातावरण दृषित करीत आहेत त्यांना तुम्ही पूर्णपणे विरोध करायला पाहिजे. मनातूनच न ॐै विि ा ू 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-5.txt से आज्ञा चक्र हे गणेश तत्त्वाचे प्रकटीकरण आहे. नाही तर पूर्णपणे विरोध करायला पाहिजे, की आम्हाला आमचे गणेश तत्त्व खराब करणारा मनुष्य नको. त्याबद्दल जर तुम्ही तटस्थ भावना घेतली तर तोही तुमचा दोष आहे. आता फार मनवून त्या गणेशाला जागृत केले. म्हणजे गणेश तत्त्व हे सगळ्यात शेवटले आहे. फारच सहनशील आहे ते तत्त्व. फार मुश्किलीने नष्ट होते ते आणि ते मुख्य मुळावर बसलेले असते. ते सुद्धा यांनी आत घातलेले आहे आणि तुमच्या डोळ्यादेखत हे सगळे होत आहे. त्याला सत्कार नको, त्याला कोणीही नको. सगळ्या सहजयोग्यांनी जर ठरवले तर त्याला काहीही वेळ लागणार नाही. तेव्हा गणेश तत्व आपल्या इथले, पुण्यातले खराब झालेले आहे. तेव्हा बघा केवढा मोठा घाला आहे. तेव्हा काल गणेशाला मनवून, समजावून जागृत केले आपल्या सगळ्यांमध्ये. ते जागृत झाल्यावर बरेच लोक पार झाले. आता असे पण म्हणाल, की 'आम्ही काही तिकडे गेलो नाही माताजी. आम्हाला त्याच्याबद्दल विरोधच आहे. आम्ही त्याचे तोंडसुद्धा पाहिले नाही, तरी आमच्यातले गणेश तत्त्व का खराब होतंय ?' जे विहिरीत असेल ते येणारच. त्यामुळे इथले जे गणेश तत्त्व खराब झालेले आहे त्याची जबाबदारी सहजयोग्यांवर आहे, पहिली गोष्ट, हे लक्षात ठेवले पाहिजे. ते कसे नीट करायचे? गणेशाची कशी स्थापना करायची? त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला विचारून घ्याव्यात किंवा या लोकांना माहिती आहे, त्या कशा रीतीने स्वच्छ करायच्या. प्रत्येक सहजयोग्यांमध्ये गणेश हा उद्भवला पाहिजे. इतकेच नाही पण जागृत होऊन स्थित झाला पाहिजे. आमच्याकडे काही काही खरेच असे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये गणेश पूर्णपणे जागृत झालेला आहे आणि गणेश तत्त्वांनीच आम्ही कुंडलिनी जागृत करतो. कारण गणेश जोपर्यंत होकार देत नाही तोपर्यंत कुंडलिनी वर येणारच नाही. त्याने हो म्हटल्याशिवाय कुंडलिनी वर येणारच नाही आणि ते तत्त्व जिथे कमी पडेल तिथे कुंडलिनीचे कार्य हळू चालेल. कालसुद्धा जोर कमी होता. तेव्हा गणेश तत्त्वाचा जोर पाहिजे. तेव्हा पुण्याच्या सहजयोग्यांना माझे असे म्हणणे आहे, की गणेश तत्त्वाला आपल्याकडे बळकट केले पाहिजे. तर ते कसे करायचे मी सांगते कारण हितगुज आहे म्हणून. प्रथम गोष्ट म्हणजे अशी, की हे पावित्र्याचे व्रत आहे. तर गणेशाला जे दोष होतात ते पहिले डोळ्यापासून होतात. गणेशाचा अगदी डायरेक्ट संबंध डोळ्यांशी असतो आणि हे गणेश तत्त्व जे आहे तेच पुण्यातून लुप्त झालेले आहे. त्यामुळे त्याच्या मधोमध जिथे ऑप्टिक नव्व्हज् क्रॉस करतात, तिथे आज्ञा चक्राचे स्थान आहे आणि आज्ञा चक्र हे गणेश तत्त्वाचे प्रकटीकरण आहे. तेव्हा गणेश तत्त्व जर खराब झाले असेल तर आपल्या डोळ्यातून काही तरी चूक झाली असली पाहिजे हे लक्षात आणले पाहिजे. म्हणजे प्रथम हे जाणले पाहिजे, की गणेश तत्त्व हे पृथ्वी तत्त्वाचे बनवलेले आहे. आपल्याला माहिती आहे, की अंगावरचा मळ काढून गौरीने गणेशाची स्थापना केली होती. म्हणजे पृथ्वीत्त्व सबंध व्हायब्रेट करून त्याचा गणेश बनविलेला आहे. पृथ्वी तत्त्व हे फार पवित्र आहे आणि त्याची शक्ती शोषून घेण्याची आहे. इतके कोणतेच तत्त्व शोषण्यामध्ये सशक्त नाही. इतके पृथ्वी तत्त्व. पृथ्वी ही आमची आई आहे. त्यामुळे तुमचे आणखी डबलचे नाते आहे त्यांच्याशी. ती तुमची आजी, तुमच्यातले सगळे दोष ओढू शकते आणि तुमच्यामध्ये गणेश तत्त्व घालू शकते. त्यासाठी आधी आपले डोळे ठीक करायला पाहिजेत. नेहमी डोळे (दृष्टी) जमिनीवर ठेवून चालले पाहिजे. हिरवळीवर आपली नजर असायला पाहिजे किंवा चालतानासुद्धा हिरवळीवर चालले पाहिजे. सकाळी उठून जर दव असेल तर त्याच्यावर चालले, तर त्यानेसुद्धा डोळ्यांना शांतता मिळते, पण डोळे नेहमी खाली असले पाहिजेत. परत डोळ्यांची हालचाल फार केली नाही पाहिजे. प्रत्येक वेळी काही झाल्यावर आपले लक्ष असे किंवा असे फिरवायला नाही पाहिजे. तर काय असेल ते विचार करून नंतर डोळे फिरवायचे हळूच. फार ज्या लोकांची डोळ्यांची हालचाल होते त्यांचे गणेश तत्त्व खराब होते. आता आपल्याकडे ज्याला आपण फ्लर्टिंग म्हणतो हा त्यातलाच प्रकार आहे की प्रत्येक बाईकडे बघितलेच पाहिजे! आणि जर नाही बघितले तर माना वळवून मागे बघायचे! अशा काही काही घाणेरड्या पद्धती आज काल निघालेल्या आहेत. ६ वकी 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-6.txt आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आमचे भाऊ वगैरे कोणी होते त्यांना ताकीद असायची, की डोळे खाली करून चालायचे. म्हणजे अजूनही त्यावेळची जी मंडळी आहेत त्यांची ही ओळख आहे, की चालतांना ते डोळे असे इकडेतिकडे करून चालत नाहीत. पूर्वी त्याला वेंधळा म्हणत असत. वेंधळ्यासारखे चाललेत इकडेतिकडे बघत. नजर खाली जमिनीवर ठेवून चालले पाहिजे. आपल्याला लक्ष्मणाचे उदाहरण आहे, सीता ही त्याची वहिनी, आता वहिनीबरोबर थट्टा वगैरे पण आपण करतो. तो तिच्याशी बोलतानासुद्धा तिच्या पायाकडेच बघायचा. वर बघायचाच नाही. इतकी त्याच्यामध्ये निष्ठा असली पाहिजे. तर दृष्टी पायाकडे असली पाहिजे. त्याच्यावर बघायचे नाही. जर कोणी विचारले तर मात्र हळूच डोळे वर करून बघायचे, भक्तीने आणि श्रद्धेने. ही डोळ्यांची हालचाल सहजयोगाला फार मदत करते. आमचे लंडनचे लोक-आपल्याला माहिती आहे, त्याबाबतीत काय त्यांची स्थिती झालेली आहे. किती कुचंबणा झालेली आहे. त्यातले थोडेच इथे आल्याबरोबर तुम्हाला एवढा त्रास झाला. तिथे सगळेच तसे आहेत. त्यांना गुरू कशाला लागतात हेच मला समजत नाही. त्या माणसाला शंभरदा शिकवतील असे सगळे घाणेरडे ज्ञान त्यांच्याजवळ आहे. तर त्यांच्याजवळ हे नाही. अगदी त्यांचे गेलेले आहे. तरी सुद्धा पृथ्वी त्त्वावर मेहनत करून त्यांनी आपल्यावर फार कमवून घेतलेले आहे. दुसरे, पृथ्वी त्त्वावर उभे राहून पायावर पाणी घालून घ्यायचे, दोन्ही हात आकाशाकडे असे करायचे किंवा असे करून आमचेही नाव घेतले तरी चालेल. तर ती पृथ्वी सगळे पायातून ओढून घेते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी मोकळे वाटेल. तसेच पृथ्वीवर झोपणे, तिला नमस्कार करणे, तिची क्षमा मागणे, 'तुला आम्ही पायांनी स्पर्श करतो म्हणून क्षमा कर.' पृथ्वी तत्त्वाला जागृत केल्याबरोबर आपल्यातला जो गणेश आहे, ते पृथ्वी तत्त्वाचे इसेन्स आहे. पृथ्वी तत्त्वाचे जे धारणेचे त्व आहे, म्हणजे धारा जेवढी आहे जगात, ती सबंध श्री गणेशामुळे आहे आणि ही धारणा, त्याला आपण ध्यानधारणा म्हणतो, हे सगळे श्री गणेशाचेच प्रकटीकरण आहे. पहिल्यांदा धारणा झाल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा श्रीगणेशाला पूजल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये आठही विनायक इथे आलेले आहेत. हे केवढे मोठे आहे ! पण तिथेसुद्धा घाण! परवा येतांना आम्ही गेलो होतो, रांजणगाव गणपती, व्हायब्रेशन्स त्यांचे अगदी मंद! तरी मागच्या वेळेस जागृत केले. परत गेलो तिथे, सर्वांसाठी क्षमा मागितली. आम्ही भक्तही होतो तुमच्यासाठी, की 'जाऊ दे, त्यांना समजत नाही. तुम्ही फार मोठे आहात. तर यांच्यामध्ये जागृत व्हा. तुमचे काही विचारायला नको. तुम्ही फार शुद्ध तत्त्व आहात, पण या लोकांना काही समजत नाही. अजून अजाण आहेत, तेव्हा यांना क्षमा करा.' आणि तिथे घाणेरडी सिनेमातली गाणी त्यांच्यासमोरच लावलेली. आता काय म्हणावे या प्रकारांना! हे तांत्रिक प्रकार आहेत. देवासमोर घाण करायची. म्हणजे तिथे भुते येतात. त्या भुतांना वापरायचे. नाव घ्यायचे संन्याशाचे की आम्ही संन्यास घेतो आणि घाण करायची. संन्याशाला शोभत नाही तसे वागायचे. म्हणजे इथून जे काही त्यातले तत्त्व असते ते निघून जाते. ते निघून गेल्याबरोबर तिथे भुते येतात. भुतांचे राज्य अशा रीतीने परमेश्वराला काढून तिथे करतात. तेव्हा ते पाहिले पाहिजे, की आमच्या फोटोवरसुद्धा कधी कधी काळी छाया आलेली आम्ही पाहिली आहे. आश्चर्यांची गोष्ट आहे की आमचे चित्त तिथून गेले! नाहीच आम्ही तिथे. फोटो असूनसुद्धा. म्हणजे फोटो इतका साक्षात आहे, पण त्याच्यावरती काळी छाया येते. त्याचे कारण त्या फोटोसमोर काही तरी घाणेरडे प्रकार होतात किंवा कोणी त्याच्यावर काहीतरी आरोपण केलेले आहे किंवा तसे काही. तर आमचे स्वत:चे तसेच आहे. तसे सगळे चांगले आहोत आम्ही. फार छान आहोत, पण पटकन चित्त निघून जाते. तिकडे लक्षच जात नाही आमचे म्हणजे एखाद्या माणसाकडे आम्ही चित्त लावायचा किती ही प्रयत्न केला तरी चित्त लागणार नाही. तिथून निघूनच जाणार. लोक म्हणतात, 'ते एवढे मोठे मंत्री आहेत माताजी, असे काय करता!' 'पण त्यांना आम्ही भेटणारच नाही. कसेही करून जमायचेच नाही.' 'ती एवढी मोठी माणसे आहेत, त्यांना भेटलेच पाहिजे.' 'ते काही जमायचे नाही, रुळायचे नाही. ते काही आम्हाला झेपायचे नाही, असेच काही तरी होणार.' तेव्हा परमेश्वराचे चित्तसुद्धा फार पवित्र आहे. एखाद्या माणसाला फार स्वच्छतेची ७ 4वहा 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-7.txt आवड असेल आणि त्याला तुम्ही घाणीत उभे रहा म्हणाल, तर तो राहील का? तो काही घाणीशी झुंझत बसणार नाही. तिथून निघून जाईल. असे ते पवित्र तत्त्व आहे गणेशाचे आणि त्यामुळे ते इतके सहन करणे. तरीसुद्धा त्याचे चित्त हटते. म्हणून इथल्या सहजयोग्यांची ही विशेष जबाबदारी आहे, की त्यांनी गणेशाचे तत्त्व वसवले पाहिजे. याचा अर्थ असा असतो, की लोक गणेशाची मूर्ती विकत घेऊन येतात आणि घरी आणून पूजनाला बसवतात. पण ती आपण विकत आणू शकत नाही कारण ज्या माणसाकडून आपण विकत आणली त्याने कोणत्या मनाने ती मूर्ती बनवली? त्यात व्हायब्रेशन्स होते का? त्याने माती आणली? त्याने पैसे घेतले त्याच परमेश्वराला विकले त्याने. काय हे! अहो, परमेश्वराला विकता येते का? आपण मूर्ती विकत कशी घ्यायची ? तुम्ही आम्हाला विकू इथल्या कुठून सहजयोग्यांची शकता का? 'आम्ही गणपती बसवलाय घरात.' ती मूर्ती बघायला पाहिजे, तिची चक्रे बघायला पाहिजे, तिचे एकंदर सगळे सूत्र बघायला पाहिजे आणि फारच कमी अशा मूत्यो असतात. फारच ही कमी! माझ्याकडे एकच गणपती आहे, फक्त एकच! एकदा आम्ही सांगलीला गेलो होतो. तिथे आमचे फार मोठे शिल्प आहे. त्यांनी स्वतः हाताने बनवून दिलेले आणि तोही लाकडाचा आहे. आणि मी म्हटले तो शेणात बसवावा, गाईचे शेण असते, त्याचा रंग मातीसारखा जसा असतो, अगदी सुंदर गणपती आहे. पण तो एक गणपती मी पाहिला. तो इतका सुज्ञ आहे! इतकी व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये आहेत ! एकदा आमच्याकडे लंडनला एक गृहस्थ मला भेटायला आले आणि त्यांना वाटले आधी सरळ वर जाऊन गणपतीचे दर्शन घ्यावे. आणखी तिथे जाऊन त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. पण काही व्हायब्रेशन्स जाणवले नाहीत त्याला. ते घाबरले. चपापले की 'मला काय झाले? खाली मला चांगले एवढे व्हायब्रेशन्स येत होते. मी वर येऊन या गणपतीचे बघायला लागलो, गणपतीला व्हायब्रेशन्स नाहीत. झाले तरी काय?' शेवटी मग विचार करीत बसले, की काय झाले. तर त्यांना बुद्धीसुद्धा गणपतीने दिली तर अशी सुबुद्धी झाली , की 'आधी मी माताजींना नमस्कार केला नाही, गणपतीला ते पटले नाही. आधी त्यांना नमस्कार करून यावा. कारण गणपतीला आईशिवाय दुसरे काही नको.' खाली धावत आले आणि माझे पाय धरून आपले कान धरले, 'माताजी, तुम्ही आतमध्ये होता. क्षमा करा!' आणि परत वर गेले तर झर झर झर व्हायब्रेशन्स यायला लागले. त्यांनाही क्षमा मागितली. गणपतीला आईशिवाय शिवसुद्धा सुचत नाही. काहीही सुचत नाही. एकच त्त्व माहिती आहे, आई आणि तिची शक्ती. त्यामुळे ते एवढे प्रचंड आहेत आणि त्यांना सगळे देव देवता पूजतात. विशेष जबाबदारी आहे. की तर त्यांनी गणेशाचे तत्व वसवले पाहिजे. शिव शंकर हे की सगळ्यात शेवटी राहतात आणि सदासर्वदा असतात. ते सुद्धा श्रीगणेशाला पूजतात. मग इतर, ब्रह्मदेव, विष्णू यांचे काही म्हणायला नको आणि महाराष्ट्रात याचे फार वरदान आहे आपल्याला. गणपती काय ते आपल्याला समजते आणि नेहमी गणपतीचे वर्णन आपल्याकडे फार आहे आणि गणपतीला आपण फार मानतोही. असा महाराष्ट्र विरळाच ज्याला गणपती माहिती नाही. तेव्हा आधी गणपतीची पूजा झाली पाहिजे व्यवस्थितपणे. काल हाच विचार केला, की पुण्याच्या सहजयोग्यांना काय सांगायचे. विशेष, नवीन तर ते हे की श्री गणेशाला पावन करून घ्या. स्वत:मध्ये बसवून घ्या. गणेशतत्त्व ओळखून घ्या. आता एक गृहस्थ सांगलीहून आले होते, त्यांच्यात गणेश तत्त्व फार चांगले आहे. बाकी लिव्हर जरासे बिघडलेले आहे थोडे, पण गणेश तत्त्व फार जबरदस्त आहे. त्याचा मला फार आनंद झाला. तसेच आमचे धूमाळ साहेब आहेत. हे आता खेडेगावात राहतात. नेहमी जमिनीशी संबंध, तर शेतकरी लोकांचा फार मोठा वारसा आहे, की नेहमी गणपती त्यांच्यावर प्रसन्न असतात. त्यामुळे आम्ही आधी खेडेगावात काम सुरू केलेले आहे. कारण तिथे पहिल्यांदा होणार. जिथे गणपतीचे ८ जक 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-8.txt पुजारी असतील तिथे आमचे पहिल्यांदा होणार. म्हणजे ते बसून गणपतीला पूजत नाहीत पण त्यांच्यातला जो गणपती आहे तो जागृत आहे. जितके माणसाला कृत्रिम जीवन मिळत जाते तितके हे कमी होत जाते. तर पहिली गोष्ट आपला गणपती ठीक केला पाहिजे. त्यासाठी काय करावे लागेल पुढे कशी साधना करावी लागेल, तुम्ही आमच्या इतर सहजयोग्यांना, त्यांचा गणपती जागृत झाला. तर तुमचा होणारच. त्याबद्दल काही शंका नाही. आणि त्यानंतर शक्त्या किती वाढतात. ते बघण्यासारखे आहे. तेव्हा अशा गणपतीला नमस्कार करून मी आता पुढचे सांगते, सहजयोगाबद्दल. सहजयोग काय आहे ते आपल्याला माहिती आहे. पुष्कळ माहिती आहे. इथे सगळे सहजयोगी बसलेले आहेत. तेव्हा त्यांना सांगायला नको. आता एक मोठा प्रश्न. प्रश्न काल होता आणि आजही थोडा बहत आहे की असे सहज का घडते ? पण हा इतका विक्षिप्त प्रश्न आहे, की आता आम्ही या माईकमधून बोलतोय. इथे खेडेगावातले कोणी आले असेल आणि त्यांनी माईक पाहिला नसेल तर ते म्हणतील असे कसे शक्य आहे, की तुम्ही तिथे बोलता आणि ते इकडे येते. एखाद्या खेड्यातल्या माणसाने जर कधी लाईट पाहिला नसेल, त्याला जर घरात बोलावले आणि दिवा मालवायला सांगितले तर तो नुसता फुंकत राहणार. 'अहो, विझतच नाही, कसे करायचे.' जसे इकडे बटन दाबल्यावर तिकडे उजेड, तर तो बघतच राहणार, की हे असे कसे होते ? तिकडे बटण दाबले आणि इकडे उजेड! तशातला हा वेडेपणाचा प्रश्न आहे, अगदी फार वेडेपणाचा कारण आपल्याला माहिती आहे, जेव्हा सूर्य आकाशात येतो तेव्हा क्लोरोफिल म्हणून एक पदार्थ वनस्पतीमध्ये तयार होतो. त्यामुळे त्याला हिरवा रंग येतो. सूर्य कुठे आहे हजारो मैल दूर. तो आकाशात आल्याबरोबर ही घटना घडायला सुरुवात होते. जर तुम्हाला सांगितले, की या पानाला हिरवा रंग दे, तर तुम्ही देऊ शकत नाही. म्हणजे वरून ओतू शकता पण आमूलाग्र आतून बाहेरून असा देऊ शकत नाही. पण जेव्हा सृष्टीच्या प्रत्येक पानाला रंगवतो असा सूर्य किती प्रचंड असला पाहिजे. पण आपल्याला त्याचे काहीच आश्चर्य वाटत नाही. ज्याला इंग्लिशमध्ये 'टेकन फॉर ग्रँटेड' म्हणजे तो आला म्हणजे होणारच असे म्हणतात. जगात इतकी फळे कशी लागतात, रात्रीच्या रात्रीत झाडे मोठी होतात. आपण त्यांची वाट बघत नाही. त्याचे काही समजत नाही. त्याचे काही मोजमाप नाही. हे सगळे कसे एकटा सूर्य घडवून आणतो, त्याच्या किरणांमध्ये किती प्रकारच्या शक्त्या आहेत, तेव्हा एकटा सूर्य घडवून आणू शकतो. यावरून आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे जर आमच्याकडून हे घडत असेल तर काही तरी आमच्यातही असले पाहिजे. असा अंदाज लावला पाहिजे. याच्या उलट असं कसं होईल म्हणून बसले, तर मात्र, याला मी माणशी पद्धत म्हणते कारण परमेश्वराची पद्धत वेगळी असते. याला मी माणसी पद्धत म्हणते, म्हणजे उलटीकडून काहीतरी बघायचे आणि म्हणायचे तुम्ही लोंबकाळले कसे ? म्हणजे विनोदी आहे सगळे. तुम्ही सगळीकडे बघा, की असले प्रश्न आपण विचारतो तरी कसे, म्हणजे होताना दिसतंय! आता तुम्हाला कुंडलिनी बघायची असली तर आम्ही दाखवू. त्याचे स्पंदन दाखवू, त्याचे वर उठणे दाखवू, पण लोक तुम्हाला असे प्रश्न विचारतील, तेव्हा मग काय करायचं? त्यांच्याशी कसा वाद घालायचा? हा सहजयोग्यांच्यासमोर प्रश्न असणार. श्री माताजी असा प्रश्न विचारला तर त्याचे काय उत्तर द्यायचे. आता थोडा वेळ असे लक्षात घ्यायचे, की जर थोडे वेडे असले तर त्यांना ठीक करता येते. अगदीच वेडे असले तर त्यांना नमस्कारच केलेला बरा! त्याच्यासाठी डोकेफोड कशाला करायची. काय म्हणजे आपण ही वेडे व्हायचे त्यांच्याबरोबर. सुज्ञपणा असा घ्यायचा की 'ठीक आहे, बघू या. असे म्हणून टाळून द्यायचे पण तसे होत नाही, थोडे असे मनुष्याला वाटते, की आपल्याला मिळाले तर झालेच पाहिजे, कसेही असले तरी केलेच पाहिजे. मग ते झेपत नाही आपल्याला. तेव्हा जी साधी अक्षरे आहेत ती समजून घ्या. आणि सोडवून घ्या. साधी माणसेसुद्धा पुष्कळ आहेत पुण्यात. पुष्कळ आहेत, बहुतेक साधी ९ 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-10.txt चित्त, जे बाहेर फिरतंय ते आतमध्ये कसे आणायचे, हे जट तुम्ही शिकलात तर फाए उत्तम सहजयोगी व्हाल. आहेत. कठीण जास्त बोलणार, पुढे पुढे करणार, कठीण जो आहे त्याचे मात्र तो करून घेणार. 'आम्ही मुद्दामून आलो' म्हणे! आता आला कशाला मग म्हणजे हे तरी काय सांगायचे झाले, मुद्दामून आलो! म्हणजे येतात असे इकडे सहज निघाले होते काही तरी करायला, तर इकडे पोहोचले की काय! अहो, मुद्दामूनच येतात. पण त्याचे महत्त्व. तेव्हा, माणसाची बुद्धी इतकी वर वर आहे, त्याला आतमध्ये ओढायला काही तरी मार्ग पाहिजे. आता तुमचे चित्त माझ्याकडे आहे. आता एखादा मनुष्य तुमच्याशी वाद घालतो आहे, काही तरी बोलतोय, तर त्या माणसाला चूप कसे करायचे ? त्याचे चित्त, जे बाहेर फिरतंय ते आतमध्ये कसे आणायचे, हे जर तुम्ही शिकलात तर फार उत्तम सहजयोगी व्हाल. त्यांनी काही तरी बोलायला सुरुवात केली, तर आपण तिकडे लक्ष घालायचे नाही. त्याला हाताने बंधने द्यायची नाही तर चित्ताने देता येतात. आणि लगेच कुंडलिनीवर लक्ष द्यायचे. तो तिकडे बोलतोय आणि आपण कुंडलिनीवर हात करायचा की ती कुंडलिनी लागली चढायला वर. आपल्या नजरेतच आहे कुंडलिनी. आपण आतून चित्त घातले, चित्तारूढ आहात तुम्ही. तो काय बोलतोय तिकडे नाही लक्ष ठेवायचे. ती कुंडलिनी लागली सरकायला की सगळी चक्रे दिसायला लागतात बरोबर. कुठे थांबली, कुठे रुतली, हे प्रॅक्टीस करून दिसायला लागते. थोडेसे प्रॅक्टीस करायचे. प्रत्येकाच्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचे आणि चढवण्याचा प्रयत्न करायचा. बसमध्ये बसले तर, ऑफिसमध्ये बसले तर, कुठेही आधी बघायचे कुंडलिनी कुठे दिसते आहे ती. वर, आता आमच्या लंडनला एक प्रथा आहे. हात 'शेक' करायचा. म्हणजे भयंकर प्रकार असतो. म्हणजे जोपर्यंत तुमचे अर्धा शेर रक्त ओढत नाहीत तोपर्यंत तुमचा हात 'शेक' केला, असे त्यांना वाटतच नाही. असे अगदी लोक 'शेक' करतात. दारू प्यायल्यानंतर 'शेक' , पण दारू पितांना, त्याच्या आधी जातांना लोक शेक करतात. त्यांनी शेकिंग हँड केले की मी त्यांना जागृती देते. हळूहळू आता त्यांचे पिणे कमी होऊ लागले आहे. आणि आमच्या नशिबात हेच आहे, की पाच-पाचशे लोकांशी शेकहँड करायचे. निदान , तिसऱ्या, चौथ्या दिवशी हे प्रसंग घडतात. पाचशे लोक चालले आहेत नं, मग आमचा हात चालला तिकडे. आता ही पद्धत म्हणजे सहजच निघालेली आहे. तिथल्या लोकांना शेकहँड केल्याशिवाय कुंडलिनीला वर घालताच येणार नाही आम्हाला. तर आपण त्यांच्या कुंडलिनीवर लक्ष द्यायचे, कुंडलिनी वर काढायची. लगेच आपल्याला, हळूहळू प्रॅक्टिसने लक्षात येईल, की कुठे कुंडलिनी अडकलेली आहे. लगेच तिथले नाव घ्यायचे. याचेही शास्त्र आहे. ते समजावून घेतले पाहिजे. आमच्या लंडनला या लोकांची व्यवस्था फार चांगली आहे. प्रत्येक चक्रावर काय मंत्र आहे, काय त्यांचे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत, कुठे काय तुटलेले आहे, कुठे काय आहे, ते सगळे काढलेले आहे आणि ते सगळे कागदावर लिहून एक फोल्डर तयार केलेले आहे त्या लोकांनी. एक फोल्डर यांच्याकडे आहे, ते इंग्लीशमध्ये आहे, तुम्ही मराठीत करून घ्यायचे. ते सगळे शिकून लक्षात ठेवायचे. आता जी कामगिरी करायची असते ती अगदी गुप्तरीत्या होते. जर मनुष्य तुम्हाला ठीक वाटला, जर त्याची एक दोन चक्रे असतील तर सुटतील. जागृती मात्र द्यायची त्याला. जागृती दिल्यावर काही विशेष बोलायचे नाही. त्याला स्वत:लाच वाटेल आम्ही भेटायला येऊ. कसे काय, ठीक आहे वगैरे. हळूहळू ते सरकवत जायचे कारण साधारणपणे फार चिकित्सक बुद्धी असते. तुम्ही जर एकदम घाला घातला, की ते चालले. आधी हळूच एखादी वस्तू काढून घ्यायची असली म्हणजे कसे काढतो, तसे काढायला लागते. म्हणजे फार सूक्ष्म आहे ते. लोकांना जर तुम्ही काही विशेष सांगायला गेलात की ते घाबरतात. तेव्हा सहजयोगी मंडळींनी लक्षात ठेवले पाहिजे, की हे फार सूक्ष्म आणि नाजूक काम आहे. माणूस इतका खराब झाला आहे, की त्याच्यावर काही प्रयोग करण्याआधी त्याची संमती घेणेसूद्धा फार कठीण काम झालेले आहे. जागृती त्याला त्याच्या संमतीशिवाय तुम्ही देऊ शकता, पार मात्र करू शकत नाही. पार करायला मात्र त्याची संमती पाहिजे, त्याचा अधिकार आपल्याला घेता येत नाही. जागृतीमुळे त्याची प्रकृती ठीक ११ 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-11.txt होईल, त्याला परमेश्वराकडे जावेसे वाटेल, ओळख पटेल पण जागृती आणि पार होणे याच्यात फरक आहे. कुंडलिनी जागृत झाली तरी जोपर्यंत ती पार झाली नाही आणि पूर्णपणे स्थित झाली नाही, तर स्थिरावत नाही, तेव्हा या स्टेजला आणण्यासाठी त्याची संमती पाहिजे, पण तुम्ही त्याला जागृती दिलेली असली तर ती पायरी यायला काही वेळ लागत नाही. आणि ती पायरी आली म्हणजे त्यांना पार करता येते. तरीसुद्धा मुख्य सांगायचे म्हणजे ही फार हळू गतीने चालणारी गोष्ट आहे. तर आधी ज्या लोकांचा विश्वास आहे आणि जे तुम्हाला मानतात, अशा लोकांना हाती घेतलेले बरे. कारण नाही तरी हेच एक द्यायचे असते जगात. दुसरे काही नाही. तुम्ही कुणाला आपल्याकडे जेवायला बोलावले तर काय उपयोग आहे त्याचा ? मी असे लोक पाहिलेले आहेत, त्यांनी जगासाठी इतके काही केले, त्यांना वाटले आम्ही लोककल्याणार्थ हे कार्य केलं , ते कार्य केले, इतके पैसे दिले लोकांना. चांगलं त्याचं भलं केलं, पण काहीही लोकांच्या लक्षात राहत नाही. ते जर परत भणंग भिकारी होऊन आले तर लोक त्यांना आपल्या दारातसुद्धा उभे करत नाहीत. ही लोकांची स्थिती आहे. आपल्याकडे किती लोकांनी देशासाठी त्याग केलेला आहे! लाल बहादूर शास्त्री केवढे मोठे होते तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या नावाचे एक तरी स्मारक तुम्ही कुठे पाहिले आहे का? कुठे तरी तुम्हाला दिसतंय का त्यांच्या नावाचं? आणि हे अगदी निर्विवाद आहे. इतर लोकांबद्दल लोकांनी पुस्तके लिहिली, लोकांनी कळवले, की त्यांचे चरित्र चांगले नाही. पण त्यांच्याबद्दल ( शास्त्रीजींबद्दल) कोणी असे म्हणू शकत नाही. एवढी मोठी कामगिरी त्यांनी थोड्या वेळात केली पण त्यांचे स्मारक उभारलेले तुम्हाला कुठे दिसते आहे का ! परवा त्यांचा फोटो पाहिल्यावर मला आश्चर्य वाटले, की त्यांचा फोटो तिथे घातला तरी कसा ? म्हणजे ते पंतप्रधान तरी होते, की नाही अशी शंका लोकांना वाटायला लागेल. तेव्हा हे असे होते. त्याला कारण काय? कारण त्याला व्हायब्रेशन म्हणजे तुमच्यावर ओंकारच आहे आत्म्याची साथ हवी. जागृती म्हणजे आतून घडलेली घटना असल्यामुळे ते अगदी जीवंतसारखे होऊन जाते आतून आणि त्यामुळे त्याची आठवण राहते. हळूहळू ती आठवण विसरू ही शकते. पण तरीसुद्धा आपण ते जागवतो. आता आपल्याला ज्यांना पार करायचे ते लक्षात घ्यायचे. घरी जाऊन त्यांची नावे लिहन ठेवायची, की ती मंडळी बरी दिसतात. म्हणजे ते धार्मिक असावेत. फार कठीण लोक घेऊ नका. म्हणजे दारूडे; दारुड्यांनाही होते पण आज तशी स्थिती नाही. अशी माणसे जी साधारणपणे धार्मिक आहेत, बॅलन्स्ड आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ज्यांचे परमेश्वराकडे लक्ष आहे आणि जी या मार्गाकडे आहेत, अशी आठ-दहा माणसे आपल्या हातात घ्यायची आणि त्यांच्यावर मेहनत केली पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दहा माणसे जर घेतली तर आठ तरी तुमच्या हाताने पार होणार. प्रत्येकाने दहा जरी पार केले तरी किती पार झाले बघा? मग त्यांच्याकडे लक्ष ठेवले पाहिजे आणि जोपासना केली पाहिजे, की कुठे आहेत? काय आहेत ? कुठे निगेटिव्हिटी पकडतात वगैरे. पार झाल्यावर कळते, की आम्हाला निगेटिव्हिटीने पकडले. त्याच्या आधी वेडा जरी आला तरी कळत नाही, की आम्ही धरले आहोत. वेडा होऊन पागलखान्यात मरूनही गेला तरी कळत नाही. पण सहजयोग्याला लगेच कळते. आज्ञा धरली. आज्ञा धरली म्हणजे काही तरी आम्हाला चिकटले. त्रास होऊ लागतो, मग लगेच लागले हात फिरवायला, आज्ञा काढायला, त्रास होऊ लागतो. त्याला कारण असे की, जेव्हा तुम्ही मानव झालात तेव्हा जनावरात आणि तुमच्यात हा मोठा फरक आहे, की घाणीतून जरी तुम्ही जनावराला काढले तरी त्याला काही वाटणार नाही. वाटेल तिथून जायला तो तयार आहे. पण माणसाला तसे केले, तर त्याला नको. त्याला वहाणा पाहिजेत आणि वहाणा असल्या तरी त्याला घाण येते. घरी जाऊन अंघोळ करणार. त्या स्वच्छतेची कल्पना र १२ 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-12.txt माणसाला येते. म्हणून 'जे धरले ते नको रे बाबा! हे असे नको! मला सहजयोगच पाहिजे, हे काढून टाका, ते काढून टाका.' वरगैरे आणि जराशी पकड आली तरी दुखू लागते. आणि मनुष्य ते काढून टाकतो. बरं ते दुखणे काही इतके जाज्वल्य नसते. इंडिकेशन येते. बॅरॉमीटर येते तसे इंडिकेशन येते की या ठिकाणी या माणसाचे हे धरलेले आहे. तुम्ही काढल्यावर त्याचे सुटते आणि तुमचेही सुटते. काय मजेदार आहे बघा. आता काल यांनी बाजारातून कुंकू आणले. ते कपाळावर लावल्यावर भाजू लागले. म्हटले हे कुंकू काढा आधी हे करा. माझ्या लक्षात नाही आले, इतकी गर्दी होती, त्यांनी हात लावायला सांगितल्यावर माझ्या लक्षात नाही आले आधी, परत लक्ष ओढले गेले तिथे. मग ते कुंकू घेतले, व्हायब्रेट केले, मग मी राजवाडे साहेबांना सांगितले, की तुमच्या घरातले कुंकू मागवा, मागच्या वर्षातले, ते चांगले होते. इतके बारीक लक्षात येते. मग सगळे व्हायब्रेट होऊन जाते. व्हायब्रेशन म्हणजे ओंकारच आहे. हा ओंकारच आहे, प्रणव आहे , प्रणव साक्षात, पावित्र्य आहे आणि हे पावित्र्य प्रेम आहे आणि ते सांगत असते, प्रत्येक गोष्टीची जाणीव होते. जसा कॉम्प्युटरशी आपला संबंध जुळतो आणि कॉम्प्युटर आपल्याला सांगतो तसा परमेश्वराने हा जो कॉम्प्युटर बसवलेला आहे तो सगळे बारीक सारीक सांगतो. मग त्याच्यावर ओळखले पाहिजे. तिसर्या स्थितीमध्ये काही लोक अत्यंत धार्मिक असतात. आता कालचे गृहस्थ महादेवाला मानतात आणि त्यांना हार्ट (कॅच) आहे. आता हे कसे शक्य आहे ? अहो, त्यांचे (महादेवाचे) स्थान हृदय आहे आणि त्यांच्यावर महादेवच रागावलेले. हे असे कसे होते ? लोक विचारतात श्रीमाताजी, 'आम्ही एवढी महादेवाची पूजा केलेली, मग आम्हाला हार्ट अॅटॅक कसा आला?' आता हे म्हणतात चुकीचे आहे. चुकीचे नाही, कनेक्शन नव्हते महणून. आता अशा माणसाने, ज्याने महादेवाची पूजा केलेली आहे त्याने असा प्रश्न विचारायचा श्रीमाताजींना, 'श्रीमाताजी, तुम्ही महादेवांची शक्ती आहात का?' तर उत्तराला म्हणून हातावर व्हायब्रेशन्स सुरू होतील. कारण ही गोष्ट खरी आहे. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला तर आम्ही म्हणणारच की, 'हो, आहे सगळे असेच आहे. काय करता आता?' आम्ही आहोत तर आहोत. आता आम्ही आहोत तर कसे सोडायचे ते ? अहो, कोणी काही असला तर त्याला काही त्याचा गर्व असतो का? गर्व त्या माणसाला असतो, ज्याला नसते त्याला! ज्याला असते त्याला कसला गर्व ? आता तुम्हाला बोटे आहेत, नाक आहे, त्याचा गर्व आहे का तुम्हाला? तशातला आमचा प्रकार आहे. म्हणजे आमच्यात जे आहे ते आहे, त्याला आम्ही तरी काय करायचे ? आता आमचे प्रधान इतने जुने ट्रस्टी आहेत, पण त्यांना थोडे चिकटले होते. काल महाशिवरात्रीला उपवास करायचा नसतो, असे मी म्हटले त्यांना, तर त्यांनी मला विचारले आणि उपवास केला. माझ्यासमोर उपवास करायचा नसतो. मला फार दु:ख होते उपवासामुळे. आईला त्रास द्यायचा म्हणजे उपवास करायचा. फक्त नरक चतुर्दशीला आपल्याला उपवास आहे. म्हणजे झोपायचे सकाळी खूप वेळ पर्यंत. अंघोळ वगैरे करायची नाही. त्यादिवशी नरकाचे दार उघडले जाते. सकाळी चार वाजता उठून फराळ केला की भुते घुसतात. अहो, अचूक बसविलेला आहे आराखडा म्हणजे आश्चर्य वाटते. आता, यांचे सांगते गणपतीचे? यांना प्रॉस्टेटचा त्रास होता. आणि हे म्हणजे चतुर्थीला उपवास! चतुर्थीला माझ्याकडे आले आणि यांना प्रोस्टेटचा त्रास! मला समजेना! हा मनुष्य म्हणजे साक्षात गणपती आणि याला प्रोस्टेटचा त्रास? कारण प्रोस्टेटचा कंट्रोल वगैरे गणपती करतात. बघा, म्हणजे सहजयोग कसा आहे. ज्या दिवशी चतुर्थी त्याच दिवशी उपवास केलेला. त्याच दिवशी माझ्याकडे आले हे! सगळे समोरच गणित आलेले. सहजयोगाचे लक्षण आहे. मी काय चणे, माझा प्रसाद चणेच आहे, मी चणेच काढले. म्हटले, घ्या प्रसाद. ते तर काहीच बोलले नाहीत. पण त्यांच्या शेजारी जे उभे होते ते म्हणाले, 'माताजी, आज यांचा उपवास आहे.' मी म्हटले, 'आज कसला उपवास.' त्यावर ते म्हणाले, 'आज चतुर्थी आहे.' म्हटले, 'असं का! तुमच्या घरी जर मुलगा जन्माला आला तर तुम्ही उपवास कराल का त्यादिवशी! कुठले शहाणपण ते! कोणाच्या जन्माच्या दिवशी उपवास करायचा हे सूत्रच मला आजपर्यंत कळले इतका १३ টি 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-13.txt उपवास जए सांगितला असेल तर तो एवढ्यासाठीच सांगितला नाही. तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर तुम्ही काय सूतक पाळाल का त्या दिवशी! उपवासाचे म्हणूनच त्यांनी सांगितले, की उपास-तापास करायचे नाहीत. कारण इतकं शास्त्र चुकतं त्या उपासाचं. इतके चुकलेले आहे, की मला आता समजतच नाही की यांना सांगायचे तरी काय! माझे असे म्हणणे नाही की नुसतं खातंच बसायचं. तिकडे फार लक्ष असतं या उपासङ्या लोकांचं. उपासडे नावाचे. पण लक्षं सगळं खाण्याकडे. म्हणजे, 'आज काय बेत आहे ?' सकाळी पहिला प्रश्न, गणपतीला नमस्कार करायच्या आधी, कारण का तर आज उपवास आहे. मग सगळें घर डोक्यावर घेतलं पाहिजे. उपवास आहे म्हणजे काही तरी विशेष पाहिजे, ते आणा, खायलाच पाहिजे. झालंच पाहिजे, ते असं झालंच पाहिजे, खाल्लच पाहिजे, म्हणजे हे काय! उपवास जर सांगितला असेल तर तो एवढ्यासाठीच सांगितला होता, की परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही राहायचे, त्यासाठी जेवणाचा त्रास नको. जेवणाची खरं जर तुम्ही सुरुवात केली, तर 'परमेश्वराच्या सान्निध्यात आता आम्हाला जायचे आहे. जेवायला तिकडे जायचे आहे. ' वगैरे विचार तुमच्या डोक्यात येतील. म्हणून त्या दिवशी उपवास करायचा म्हणजे 'पूर्णपणे परमेश्वराच्या सान्निध्यात रहायचं', असा. पर्यायाने तो उपवास आला. 'उपवास म्हणजे परमेश्वराच्या बरोबर सहवास' असा त्याचा खरा अर्थ, म्हणजे संस्कृतातला अर्थ आहे. आणि त्या उपवासाला पर्यायाने अर्थ हा लागला की उपवास करायचा, पण त्याला आणखी एक मजेदार शब्द आहे 'उपासना'. उपासना करायची म्हणजे 'उपास ना'. तर त्या उपासाला थोडी तरी तिलांजली द्यायला पाहिजे. आणि बोलणे एकच, आज एकादशी आहे नं, मग काय आणायचं? मग त्याला ते पाहिजे, बटाट्याचा कीसच पाहिजे, अमकं पाहिजे, मग खिचडी पाहिजे. अहो, माणसाचे तत्त्व किती महत्त्वाचे, किती मोठे, किती महान, किती मुश्किलीने बनवलेलं आणि कुठे ते चाललंय! ते कुठे घालता तुम्ही! परमेश्वराच्या चरणावर घालायचं तत्त्व आहे, ते तुम्ही शेंगदाण्यावर घालता! शेंगदाणे खाऊन का परमेश्वर मिळणार आहे ? अहो, साध्या बुद्धिलासुद्धा कसं पटतं हे मला समजत नाही. या धर्मांधतेचा इतका वाईट परिणाम झालेला आहे की त्याचं दुसरे एक पीक निघालेले आहे. तुमच्या मुलाने तुम्हाला वेड्यात दुसर्या जनरेशनमध्ये तुम्ही बघा, म्हणतील, 'आमचे आई-वडील अगदी वेडे आहेत.' ब्राह्मणांनी त्यांना काढायचं! लुटून खाल्लं, उपासांनी त्यांना मारून टाकले, त्यांनी हे केलं! कोणाचाही विश्वास परमेश्वरावर राहणार नाही. तिकडून सुटले तर अविश्वात पडले. घेतलं परमेश्वर आहे, इतकंच नाही तर सर्व चराचरात कार्य करीत आहे. यात अगदी शंका नाही. पण ते पाहिजे, त्याचा बोध झाला पाहिजे, जसं मी काल सांगितलं होतं, तसं आपण सहजयोगाने यामध्ये मनन शक्ती वाढवली. आता आमच्याकडे अशी पुष्कळ मंडळी आहेत, ज्यांना भाषणसुद्धा देणं कदाचित माहीत नसावं, नुसते भित्रे, बोलायला लागले तर त्यांच्यात साक्षात सरस्वती वाहते. एक आठ वर्षाची मुलगी होती, इतकी सुंदर बोलायला लागली! लंडनला एक आठ-दहा वर्षाचा मुलगा आहे, तो इतकं सुंदर भाषण देतो सहजयोगावर, की लोकांना आश्चर्य वाटते. इतकं कसं येतं ! माझ्या नातीचं मी सांगते, की ती जवळ जवळ त्यावेळी पाच वर्षाची असेल तर ते लडाखला गेले होते. त्यावेळी तिथे एक लामा गृहस्थ बसले होते. ते मोठं आपलं घालूनबिलून आणि हिंदी बोलतायत. तर सगळ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि हिच्या आई-वडिलांनी ठेवल्याबरोबर तिला काही ते पटलं नाही. म्हणजे सहजयोगी ते मोठे! तर ती अगदी उभी राहिली त्यांच्यासमोर जाऊन आणि म्हणाली की, 'ये चोगा पहन के और सर मुंडा के तुम पार नहीं होते. तो काहे को सबसे छुआते हो जब तुम पार नहीं हो!' अगदी स्पष्ट बोलली , अगदी कबीरासारखे ! कबीरांनी या प्रकारांना असले जोडे मारलेत. तुम्ही कबीर वाचा म्हणजे शक्ती येईल तुम्हाला. वाचून काढला पाहिजे. त्यांनी सांगितलं जर डोक्याचे केस काढून मुंडन करून, जर परमेश्वर मिळत असेल, तर या जाणून कबीर १४ 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-14.txt होता, की परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही रहायचे, शेळ्या आणि ही मेंढरे यांना तर रोजच भादरलं जातं , ती अगदी परमेश्वराच्या जवळच असतील. अशी प्रत्येकाची त्याने काढलीय. हे अंगावर जे मोठमोठे चोगे घालून फिरतात, स्वत:ला मोठे संन्यासी म्हणवतात. दुसरी माझी एक नात आहे, ती हिच्यापेक्षा थोडी मोठी असेल किंवा हिच्या वयाचीच असेल. तिकडे रमण महर्षींचा प्रोग्रॅम झाला होता, तिथे मला चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं. तिथे असेच मोठमोठाले संन्यासी येऊन बसले होते. असेच एक गृहस्थ शेजारी बसले होते. ते फार मोठे मानले जातात, तर लगेच आमच्या नातीने ते पाहिलं. तिला काही ते सहन झालं नाही. ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, 'नानी, तुम्हारे बगल में जो मॅक्सी पहन के बैठे है उनको भगाओ, बहुत गरम आ रहा है मेरे को।' अगदी सरळ उठून सांगितलं तिने. आणि तिथे सगळे सहजयोगी बसले होते. त्यांना हसायला आले कारण त्यांनाही गरम येत होते. हा बघायला लागला की कोण मॅक्सी बसलंय. स्वत:लाच म्हणताहेत हे लक्षातच आलं नाही त्याच्या. तर अशी शक्ती आतून प्रचंड येते, की अगदी खरं बोलायला लागतो. भीती वाटत नाही, सत्यावर उभा आहे. घालून मनुष्य आता ख्रिस्तांचंच आयुष्य बघा, केवढं पवित्र ते! पण एक वेश्या, तिला सगळे दगड मारतायत, त्यांचा वेश्येशी काय संबंध, साक्षात पवित्र तत्त्व होते ते! पण 'ती वाईट आहे, वेश्या आहे' असे समजून जेव्हा तिला लोक दगड मारायला लागले, त्यांनी सांगितले की , 'बघा, तुमच्यापैकी ज्यांनी काही पाप केलं नसेल त्यांनी दगड मारा आणि तो सुद्धा मला मारा.' झालं! सगळ्यांचे हात जिथल्यातिथे थबकले. तुम्ही विचार करा, जर तुम्ही कोणतंही पाप केलं नसेल तर हिला मारा. मग ती त्यांची फार मोठी शिष्या झाली. ती मारी मगदानी म्हणून फार मोठी शिष्या होती. पण आता त्यांचच यांनी घेतलं. आता माणसाचच बघा कसं ते, मला समजत नाही, माणशी डोकं. आमच्या इंग्लिश लोकांचं डोकं आणखीनच वर आहे. मी त्यांना म्हटले, 'हे कशाला असे मूर्खासारखे वागतात लोक!' त्यांनी सांगितले, 'मारी मगदानी वेश्या होती आणि तिचा उद्धार झाला म्हणून आम्ही सगळ्या वेश्या झालो आहोत.' आता काय म्हणावे! अगदी असे सांगतात त्या. 'ती जर वेश्या झाली नसती, तर तिचा उद्धार झाला नसता, म्हणून आम्ही तिकडे चाललो आहोत.' आता याच्यापुढे उत्तर काय? की आपण गाढवाच्या मागे उभे आहोत, हे गाढव आहे हे दिसलं, पण अशा गाढवपणाचे अनेक प्रकार तिथे आहेत. तेव्हा एवढं शिकून आणि आम्ही एवढे अॅडव्हान्स्ड लोक आहोत, हे म्हणून, असे सगळे गाढवच दिसतात मला. आता आपल्याला सांगायला हरकत नाही की ऐंशी वर्षाचे म्हातारे गृहस्थ अठरा वर्षाच्या मुलीला प्रेमपत्र लिहितात. बरं एखादे असे गाढव लिहीत असतील, पण ते वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर येतं. रकानेच्या रकाने रोज! आता आमचे साहेब म्हणायचे ही वाचा, 'गीता' सकाळी उठून. आणि सगळे लोक ते सगळे व्यवस्थित, सिरीयसली वाचतात. म्हणजे सगळेच्या सगळे गाढव असतील, पण ते वाचतात तरी कसे मला समजत नाही. आणि हा सर्रास प्रकार तिथे आहे. ऐंशी वर्षाची म्हातारी अठरा वर्षाच्या मुलाला प्रेमपत्र लिहिते! असं ऐकलंय का तुम्ही कुठे? ऐंशी वर्षाचे म्हातारे, त्यांना काही समज नाही! प्रगल्भता नाही! कसले अॅडव्हान्समेंट! यातले काही प्रश्न मी आपल्याला सांगितले तसं सायन्सचे प्रश्न आहेत कारण आपल्याकडे लोकांना वाटायला लागलं की, 'आम्ही सायंटिफिक झालो' वगैरे. जे लोक फार सायंटिफिक झालेत ते सुद्धा आमच्याबरोबर आलेले आहेत. त्यांच्यापैकी एक दोघांशी आपण हितगुज करावे, त्यांनी बोलावे आपल्याशी अशी माझी इच्छा आहे. आपण त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला म्हणजे आपल्याला कल्पना येईल, की ज्याला आपण सायन्स म्हणतो ते कुठे गेलेले आहे. आता मी आपल्या प्रश्नांची उत्तरे देते. सहजयोगात येणारे अडथळे असे प्रश्न विचारा. सहजयोग्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत म्हणजे मला समजेल, तुम्हाला काय त्रास आहे? काय अडथळे आहेत ? कसं समजावून सांगायचे, असे प्रश्न विचारा. कुंडलिनीबद्दल वगैरे. १५ 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-15.txt आता यांनी विचारले 'जालंधर योग वगैरे' ते ऐकून घ्या. आता हा केवढा घोटाळा झालेला आहे, की तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल. जालंधर बंध होतो म्हणजे जालंधर हा जो चक्रातला एक भाग आहे म्हणजे अढी आहे ती. ती अढी अशी पूर्णपणे उघडते आणि ती उघडून घट्ट धरते कुंडलिनीला, असा त्याचा अर्थ आहे. नाभी चक्रावरची गोष्ट आहे ही. कुंडलिनी जेव्हा वर सटकू लागली, समजा, तर कोणतीही गोष्ट वर सरकू लागली म्हणजे कठीण काम आहे नाही का! खाली जाणं सोपं आहे,वर जाणं कठीण आहे. तर वरती नेऊन धडक देणारी चक्रांची जी काही कसक आहे, जी काही गाठ पडते, चक्र स्वत:ला आवळून घेते. म्हणजे वर गेलेली कुंडलिनी खाली घसरू नये याच्यासाठी जालंधर योग वगैरे आहे. खेचरीसुद्धा तोच प्रकार आहे. विशुद्धी चक्रावरती जेव्हा कुंडलिनी येऊन वर सरकते तेव्हा विशुद्धी चक्र स्वत: तिला धरून सस्टेन करत असतं (त्याच स्थितीत ठेवते) की खाली पडू नये म्हणून. ठीक आहे ती क्रिया खरी तेव्हा जिव्हा आतल्या बाजूला ओढली जाणार नक्की. तसंच एकंदर सर्व चित्त आतमध्ये गेल्यामुळे तिथे बंध पडतो. आता हे तुमच्या लक्षात येत नाही. हे तुम्हाला समजत नाही कारण ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे आतमध्ये काय घटना घटित झाल्या ते लक्षात येत नाही. फक्त लक्ष कुंडलिनीकडे धावतं कारण तुमचं लक्षं बाहेरून आतमध्ये ओढलं जातं. ही घटना आतमध्ये सहजयोग हा अत्युत्तम आहे. सर्वात काी वरचा सूक्ष्म होते. लक्ष सुद्धा सूक्ष्मात उतरतं. तर त्यावेळेला हे होत असतं आपल्यामध्ये घडामोडी, आता ही इथून वीज निघाली समजा तर ती आतमध्ये येऊन कशी फिरते आणि इथे येऊन ती कशी लाऊडस्पीकर होऊन जाते, तशातला हा प्रकार आहे. म्हणजे ही सगळी आतमधली सूक्ष्म घटना आहे. ही आपल्या आतमध्ये सगळी घटित होते. हे जे लिहिलेलं आहे त्याला अर्थ आहे. हे श्री ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. पण त्याचा अर्थ जो लावतात म्हणजे आपण असं बसलं म्हणजे जालंधर बंध पडला हे चुकीचं आहे, तुम्ही करू शकत नाही, हे घटित होतं. आता बघा केवढा फरक आहे. ते नॅचरल (स्वाभाविक), आतमध्ये घटित होतं. आता मी असा हात धरला म्हणजे का मायक्रोफोन होणार आहे ? तुम्ही जर म्हणाला, 'आम्ही गव्हर्नर झालो' म्हणजे काय तुम्ही गव्हर्नर होणार आहात? त्याने शक्य झालं का? तुम्हाला कोणी मानेल का? फार तर पागलखान्यात घालतील. एखाद्या माणसाने ओरडावं 'मी गव्हर्नर आहे', वाटेल तर एक मोटार न्यावी तशी ओरडत. लोक म्हणतील 'या सगळ्यांना घाला पागलखान्यात.' जे अधिकार या वस्तुंमध्ये बांधलेले आहेत त्या सूक्ष्म वस्तू आहेत आणि ते अधिकार सूक्ष्म आहेत आणि ते करतात स्वत:. ते तुम्हाला करायला जमत नाही. म्हणून याला सहजयोग म्हणतात. सहजयोग हा अत्युत्तम आहे. सर्वात वरचा आहे म्हणून तो महायोग आहे. सहजयोग म्हणजे सगळे काही. बाकी असहज काहीच होत नाही. तुम्ही काही करता ही कल्पना जर डोक्यातून काढली तर गोष्टींना अर्थ लागतो. फक्त तुम्ही स्विच लावून देता. बाकी सगळं होतं. ते इलेक्ट्रिसिटीमध्येच बांधलेलं आहे की ती अशी वाहिली पाहिजे, तिचं कनेक्शन लागले म्हणजे तिच्यातून लाईट निघालाच पाहिजे, अशा वर्तुळातून गेली म्हणजे तिचा माईक झालाच पाहिजे, तशा वर्तुळातून गेली म्हणजे त्याचा पंखा झालाच पाहिजे. हे इलेक्ट्रिसिटीचंच तत्त्व आहे. तसंच ते कुंडलिनीचे आणि तुमच्यामध्ये बसलेली सुषुम्ना नाडी वरगैरे जे काही यंत्र तुमच्यामध्ये आहे, त्याचं स्वतःचं सगळं बांधलेलं तत्त्व आहे आणि ते तत्त्व असं असं घटित होतं, असं श्री ज्ञानेश्वरांनी सांगितल्यावर 'ते आम्ही करू शकतो. तुम्ही काय सांगितलं.' आम्ही इथे खोटे बोलून दिवा लावतो, तर दिवे लागायचे. आणि ते दिवे लागले म्हणजे कुंडलिनीचा असा त्रास होतो, तसा त्रास होतो असं पुस्तकात लिहून ठेवायचं म्हणजे लोकांना वाटतं वा किती छान आहे ! यांना एवढा त्रास झाला तर आम्हाला किती आहे म्हणून तो महायोग आहे. लावून बघावं १६ 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-16.txt झाला पाहिजे. आता एक गृहस्थ त्यांनी लिहिलंय की, 'माझी कुंडलिनी जागृत झाली आहे.' म्हणजे स्वत:चं सेल्फ सर्टिफिकेशन आणि त्याच्यामुळे माझ्या हातावर अगदी विंचू चावल्यासारखं झालं. मी फार तडफडलो. माझ्या अंगावर फोड निघाले. आतून एकदम गरमी झाली, माझं डोकं भणभणायला लागलं, माझी स्थिती खराब झाली, मग मी लोकांना विचारले. त्यांनी सांगितले, 'तुमची कुंडलिनी जागृत झाली. ' एखाद्या गुरूंकडे गेले असतील. तिथे काही तरी प्रकार केले असतील आणि अनाधिकार चेप्टा केल्यामुळे हे श्रीगणेशांचे तडाखे आहेत. ते सिंपथेटिकवर फील झाले. तर लोकांना ते पुस्तक फार आवडते. म्हणजे मनुष्य स्वत:च्या मागेसुद्धा हात धुवून लागलेला आहे. अहो, इतका तुम्हाला जर त्रास झाला आहे, तर त्याला कशाला घालता तुम्ही? काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की कुंडलिनी तुमची आई आहे आणि आई किती प्रेमाने आपल्या पुलांचे संगोपन करते! ती तुम्हाला असा कसा त्रास देईल, असा साधा विचार करा. हे असले लिखाण वाचून आलेला मनुष्य नक्कीच आम्हाला काही जागृती झाली नाही असा विचार करून बसणार. कारण त्याच्यात तो बेडकासारखं उडाला पाहिजे किंवा विंचवाने तरी चावलं पाहिजे, नाही तर त्याला ढेकणासारखा वास आला पाहिजे, काही काही असे प्रकार असतात, पण एक गोष्ट खरी; जेव्हा कुंडलिनी जागृत होते, तेव्हा इतरसुद्धा अनुभव येतात, पण ते अनुभव विशेष मानू नये. कारण उजव्या बाजूला जरा जास्त कुंडलिनी ढकलली गेली तर प्रकाश दिसेल तुम्हाला. त्याचं विशेष मानायचं नाही. तुम्ही बरोबर मधोमध असाल तर काही दिसणार नाही. नंतर सुगंध येतो. कारण पृथ्वी ही आई आहे. तिची तन्मात्रा सुगंध आहे. पृथ्वी ही सुगंधापासून बनविलेली आहे आणि ती आई असल्यामुळे, तुम्हाला कधीही आमची आठवण आली तरी सुगंध येणार. सुगंध हा आमच्या शरीराचा स्वभाव आहे. अनेक तऱ्हेचे सुगंध येत असतात लोकांना. कोणी म्हणतात, 'श्रीमाताजी आम्हाला-आता कालच आम्ही गेलो तर गुग्गुळाचा इतका सुगंध खोलीत पसरला.' खरं ते हे गृहस्थ जे भगवानजी बनून फिरत आहेत, त्यांना कसलाच सुगंध चालत नाही. ईश्वर सुगंध प्रिय आहे. म्हणजे हे कसले भगवानजी आहेत ! हे दर्गंध प्रिय आहेत, घाणप्रिय आहेत ! हे परमेश्वर कसे ? तर सुगंध जर आला माणसाला, तर त्याच्यात हे आहे, की सुगंधाच्या पलीकडे गेलं पाहिजे. त्याने जरासा बहकतो मनुष्य. प्रकाशही दिसेल, सगळे काही आहे. पण याचं पुढे तुम्हाला कळेल, की प्रकाश जेव्हा माणसाला दिसू लागतो ते आज्ञा चक्रही उघडलं गेलंय यात शंका नाही. त्या प्रकाशामध्ये तुम्हाला असे काळे काळे ठिपकेसुद्धा दिसतील. त्या बाधा आहेत. त्या तुमच्यात असतील, दुसर्यात असतील, वातावरणात असतील. त्या कशा काढून टाकायच्या वगैरे वगैरे. प्रकाशाचे जे अवलोकन आहे, ते पूर्णपणे आधी कुंडलिनी स्थिर करून घ्या. माझे काय म्हणणे आहे, आधी दिल्लीला पूर्णपणे पोहोचा, पोहोचल्यावर दिल्ली काय आहे ती जाणली पाहिजे. तेव्हा ते पुढे मग समजतं, हे प्रकाशाचे प्रकार, या ज्योतीने काय होतं, सगळं काही बारीक बारीक, जिथपर्यंत व्हायब्रेशन्स दिसू लागतात. त्याचं वर्तुळ दिसू लागतं. त्याचं फिरणं दिसू लागतं. हे नंतर दिसलं पाहिजे. सुरुवातीलाच असं थोडसं दिसलं, तिकडे मनुष्य रमला, की गेली! म्हणजे घोडा असतो तसं हे मन आहे. त्याच्यावर आरूढ झालं पाहिजे. जर त्या घोड्याला कळलं, की तुम्हाला रस्त्यात गवत खायचंय, तर तुमच्या नाही ताब्यात राहणार. पण त्याला कळलं, की तुम्हाला लक्षावर जायचंय तर तुमच्या अगदी बरोबर कह्यात राहणार. अगदी बरोबर. पण त्याला कळलं पाहिजे की हा मनुष्य घोडेस्वार आहे. त्याला माहिती आहे. पण जर घोड्याला कळलं, की तुम्हाला घोड्यावर बसता येत नाही, तर मग लागतो तो तुम्हाला त्रास द्यायला. त्या घोड्यावर बसता आलंच पाहिजे म्हणजे तो तुमचा मित्र होणार. तुमचा वाहक होणार. तेव्हा या चित्तालासुद्धा एक घोडा समजून सारखं निक्षून सांगायचं, की मला तिथेच पोहोचव तू. दूसरं इकडे तिकडे नेलेलं मला चालायचं नाही. म्हणजे बरोबर राभ तो परम पदाला घेऊन जातो. १७ 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-17.txt वकादर रुद्र कोमो, इटली, १६/९/१९८४, अनुवादित आज आपण विशिष्ट पद्धतीची पूजा, जी एकादश रुद्रांच्या वैभवार्थ करत आहोत. रुद्र ही शिवाची- आत्म्याची संहार शक्ती आहे. आता एक शक्ती, जी त्याचा (परमेश्वराचा) स्वभाव आहे, ती आहे क्षमाशीलता. तो क्षमा करतो, कारण आपण मानव आहोत. आपण चुका करतो. आपण चूकीच्या गोष्टी करतो, आपण मोहात अडकतो, आपले चित्त भंग पावते म्हणून तो आपल्याला क्षमा करतो. आपण आपले पावित्र्य खराब करतो; आपण अनैतिक गोष्टी करतो, आपण चौर्यकर्म करतो आणि आपण अशा गोष्टी करतो की त्या परमेश्वराच्या विरुद्ध आहेत, त्याच्याविरुद्ध बोलतो. तरीदेखील तो क्षमा करतो. तो आपली वरपांगीपणा, द्वेष, आपली वासना, आपला क्रोध (यांना) तो क्षमा करतो. आपली आसक्तीदेखील. द्वेष, पोकळ गर्व आणि ताबेदारी (मालमत्ता) तो क्षमा करतो, तो आपली अहंकारी वर्तणूक आणि चुकीच्या गोष्टींना अंकित ठेवणे हे देखील क्षमा करतो. प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया आहेच आणि जेव्हा तो (परमेश्वर) क्षमा करतो, तेव्हा तो विचार करतो, की तुम्हाला एक महान अशी स्वखुशीने गुणवत्ता (कृपा) दिली आहे आणि ज्यांना क्षमा केली गेली आहे आणि तेच मोठ्या चुका करत आहेत. त्यांच्याविरुद्ध संतापाची प्रतिक्रिया त्यांच्यात उभी राहते. विशेषकरून आत्मसाक्षात्कारानंतर कारण आत्मसाक्षात्काराचे एवढे महान आशीर्वाद आहेत, तुम्हाला प्रकाश मिळाला आहे आणि प्रकाशात जर तुम्ही समोरच कृतीची वाट पहात चिकटून आहात तर त्याचा संताप वाढतो कारण तो पाहतो, की तुम्ही किती मूर्ख आहात! मी काय म्हणत होते, की आत्मसाक्षात्कारानंतर, विशेष करून तो अधिकाधिक संवेदनशील असतो, की ज्या लोकांना क्षमा केली आहे आणि आत्मसाक्षात्कारासाठी मोठी गोष्ट दिलेली आहे व अद्याप ते अयोग्य गोष्टी करतात तर परमेश्वर अधिक असंतुष्ट होतो म्हणजे तराजूतील क्षमाशीलता कमी होऊ लागते व प्रकोप वाढण्यास सुरुवात होते. पण जेव्हा तो क्षमा करतो, त्या क्षमाशीलतेचा परिणाम म्हणून तुम्हाला कृतज्ञता वाटते आणि मग त्याचे क्षुदर 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-18.txt चा =ा च च= भ चव र आशीर्वाद तुमच्याप्रत वाहण्यास सुरुवात होते. तुम्हाला दुसऱ्यांना क्षमा करण्याची महाप्रचंड क्षमता देतो. तो तुमचा राग शांत करतो. तो तुमची वासना शांत करतो, तुमचा लोभ तो शांत करतो. सुंदरशा दवबिंदप्रमाणे, तुमच्या जीवनावर आशीर्वाद मिळत असतात. आणि आपण सुंदरशी फुले बनतो आणि त्याच्या आशीर्वादाच्या सूर्यप्रकाशात आम्ही प्रकाशित होऊ लागतो. सर्व जे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते, त्याचा नाश करण्यासाठी तो त्याचा राग किंवा त्याच्या संहार शक्ती वापरतो. प्रत्येक मार्गाने, प्रत्येक क्षणी आत्मसाक्षात्कारी आत्म्याचे तो रक्षण करतो. दष्ट शक्ती सहजयोग्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या महाप्रचंड संरक्षण शक्तीमुळे ते हल्ले निष्फळ ठरतात. त्याच्या चैतन्य लहरींच्या जाणिवेतून आम्हाला योग्य पथाचे मार्गदर्शन मिळते. त्याचे सुंदरशा ब = ग ययय्र 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-19.txt भ क आशीर्वादाचे बायबलच्या २३ व्या स्तोत्रात वर्णन केले आहे. 'परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.' तो तुमची मेंढपाळ म्हणून कशी काळजी घेतो ते सर्व वर्णन केले आहे. परंतु तो या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची काळजी घेत नाही. त्याचा नाश करतो. जे सहजयोगात येतात आणि राक्षसी स्वभाव ते चालूच ठेवतात ते नष्ट होतात. जे सहजयोगात येतात आणि ध्यान करत नाहीत ते ही नष्ट होतात किंवा ते सहजयोगाच्या बाहेर फेकले जातात. जे ईश्वराच्या विरुद्ध बडबडतात आणि अशा मार्गाने जातात, जो सहजयोग्याला शोभत नाही, त्यांना तो दूर करतो. म्हणजे एका शक्तीने तो रक्षण करतो आणि दुसर्या शक्तीने तो त्यांना दूर करतो. परंतु त्याची संहार शक्ती (रुद्र), जेव्हा ती जास्त मजबूत होते तेव्हा आपण म्हणतो, 'आता एकादश रुद्र कार्यरत झाले आहेत.' जेव्हा कलकी स्वत: कृतीशील होते तेव्हा हे एकादश रुद्र व्यक्त होतात. म्हणजेच संहार शक्ती, सर्व जे या पृथ्वीवर नकारात्मक आहे ते नष्ट करेल आणि सर्व जे सुष्ट आहे त्याचे रक्षण करेल. म्हणून सहजयोग्यांनी आपली उन्नती झटपट करणे अगदी गरजेचे आहे. सामाजिक जीवनाशी किंवा वैवाहिक जीवनाशी किंवा ईश्वराने तुमच्यावर जे सर्व काही आशीर्वाद दिले आहेत, फक्त त्यावरच समाधानी असता कामा नये. ईश्वराने आपल्यासाठी काय केले आहे, तो आपल्याशी कसा अद्भूत आहे ते आपण नेहमीच पाहतो, परंतु आपण आपल्यासाठी काय केले आहे, आपल्या आत्मउन्नतीसाठी व आपल्या पूर्णत्वासाठी आपण काय करत आहोत ते आपल्याला पहायचे आहे. की आता अकरापैकी एकादश म्हणजे अकरा, तुमच्या भवसागराच्या उजव्या बाजूने पाच येतात आणि तुमच्या भवसागराच्या डाव्या बाजूने पाच येतात. जर तुम्ही अगुरुपुढे स्वत: मान तुकवलीत किंवा तुम्ही चुकीची पुस्तके वाचलीत किंवा जर तुम्ही अनैतिक लोकांच्या संगतीत असलात, चुकीच्या मार्गाने जे जात आहेत, त्याचेबद्दल सहानुभूतिपूर्वक राहिलात किंवा तुम्ही स्वत:च या अनैतिक लोकांचे गुरू किंवा एखादे एजंट आलात तर पहिले पाच, डाव्या हाताच्या बाजूवरील (रुद्र) येतात. आता ह्या पाच समस्या सोडवू शकतो; जर जे जे आपण चुकीचे करत आलो आहोत ते आपण पूर्णपणे सोडले तर ! महंमद साहेबांनी असे म्हटले आहे की तुम्हाला सैतानाला ठोकायचे आहे, चपलेने... परंतु ते यांत्रिकपणे करायचे नाही. परंतु हृदयापासून. ज्याप्रमाणे पुष्कळ लोक, जे सहजयोगात येतात आणि मला सांगतात की, 'माझे वडील ह्या गुरूला अनुसरतात.' ते त्या गुरूंना अनुसरतात. ते त्यांच्या वडिलांबरोबर, बहिरणींबरोबर, ह्यांच्या आणि त्यांच्याबरोबर गुंतत जातात आणि त्यांना त्या गुरूंपासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि गुंतत जातातदेखील किंवा त्यांच्यापैकी काही इतर शक्तींना शरण जातात. ज्याप्रमाणे मॉरीनचे मला माहीत आहे, जी माझ्याबरोबर होती आणि तिचे आई-वडील व सासू-सासरे म्हणाले की, मुलाला बाप्तीस्मा दिलाच पाहिजे. मी तिला सांगितले, 'तू ह्या मुलाला बाप्तीस्मा देऊ नकोस कारण तो आत्मसाक्षात्कारी आत्मा आहे.' पण ती तशी त्या गोष्टीला न भिता सामोरी जाऊ शकली नाही आणि तिने ते मूल बाप्तीस्मा (नामकरण विधी) साठी नेले आणि ते मूल चमत्कारीक बनले. वेडसर मुलासारखे ते करत होते. म्हणून आता तिने ते सर्व सोडले आणि ती वाचली. परंतु समजा तिला दुसरे मूल असते तर अगदी वाईट झाले असते. आता सहजयोग्यांबाबतची अडचण आहे, की कुणीही सहजयोगाच्या कार्यक्रमाला येतो, त्याला वाटते की तो सहजयोगी आहे, पण ते तसे नाही. एकतर तुमच्याजवळ खूप सामर्थ्याची जाणीव हवी किंवा तुमच्या शरीरातून तो जाणवला पाहिजे. एखादी व्यक्ती अद्याप जी 'बाधित' आहे, ती दुसऱ्या एकाजवळ, जो अधिक प्रबळपणे बाधित आहे त्याला आकर्षित होते आणि त्याला समजत नाही की ही दसरी व्यक्ती इतकी प्रबळपणे बाधित आहे, परंतु प्रभावित होतो. अशा स्थितीत, अशा व्यक्तीला बाधित व्यक्तीकडून तडाखा बसतो. शिव रक्षण करू शकत नाहीत. २० 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-20.txt जे ईश्वटाच्या विरुद्ध बडबडतात आणि अशा मारगाने जातात, की जो सहजयोग्याला शोभत नाहीं, त्यांना तो दूट कटतो. जो बाधीत आहे त्याबद्दल एखाद्यानेही सहानुभूती दाखवू नये. जरी तो वेडा आहे, त्याचे काही बिघडलेले आहे, जरी तो तुमच्या नात्याचा आहे आणि काही असो. कोणत्याही प्रकारची अनुकंपा नको. उलट पक्ष, त्या व्यक्तीबद्दल एक प्रकारचा रागच असावा. एक प्रकारची अनासक्ती आणि ही रागयुक्त अनासक्ती, ही एकच वेळ आहे. जेव्हा तुम्ही रागवलेच पाहिजे. परंतु मी असे लोक पाहिले आहेत, की ज्यांना फार चांगल्या सहजयोगी मंडळींबद्दल राग आहे. परंतु त्यांच्या नवऱ्यावर किंवा पत्नीवर नाही, जे अत्यंत बाधीत आहेत. म्हणजे जेव्हा एकादश रुद्र उजवीकडे ह्या पाच बाजूवर काम करू लागतात, खरे आपण म्हटले पाहिजे की ते उजव्या बाजूस सरकतात कारण ते डाव्या बाजूकडून येतात आणि उजव्या बाजूस वळतात, नंतर ती व्यक्ती बाधीत होण्यास सुरुवात होते. परंतु त्याच्या अहंकाराने त्याचे कार्य असते. अशी व्यक्ती परिस्थिती आपल्या ताब्यात घेईल. आणि म्हणेल, की 'मी असा नी तसा सहजयोगी आहे. आणि मी म्हणजे असा आहे.....' आपण ह्याप्रमाणे केले पाहिजे आणि ह्याप्रमाणे वागले पाहिजे आणि हुकूमशाहीला सुरुवात करतो. लोक काही करू शकतात आणि काही मध्यम प्रतीचे आणि काही अर्धे कच्चे सहजयोगी समजून घेण्याचा प्रयत्न करतील. परंतु पुष्कळसे जाणतील, की ही व्यक्ती 'बाहेर' जात आहे, आता तो त्याच्या 'बाहेर' जाण्याच्या मा्गावर आहे. म्हणजे ह्या सर्व बाबी ह्या डाव्या बाजूच्या वाढीकडे जातात किंवा आपण त्याला म्हणू शकतो की तुमच्या मस्तकावर तुमच्या 'मेधा' च्या उजव्या बाजूला आहे. त्या ब्रेन प्लेटला संस्कृतमध्ये मेधा म्हणतात. आता उजव्या बाजूवाला एखादा अशा कल्पनेतून येतो. जी कल्पना ह्या लोकांजवळ असते की 'मी स्वत: फार मोठा गुरू आहे.' ते सहजयोगाबद्दल शिकवायला सुरुवात करतात. जणू काही ते मोठे गुरू बनले आहेत. आम्हाला काही लोक माहीत आहेत की जे कोणत्याही कार्यक्रमात मोठी भाषणे देतात आणि माझ्या भाषणाच्या ध्वनिफिती (टेप्स) वाजवण्याची अनुज्ञा कधीच देत नाहीत किंवा दुसरे काही. त्यांना वाटते की ते आता तज्ज्ञ झाले आहेत. नंतर त्यांच्यातील काही म्हणतात, की आता आम्ही एवढे 'महान' झालो आहोत की मीठ-पाण्यात पाय बुडवण्याची कसलीही गरज नाही किंवा ध्यान करण्याची गरज नाही. अशा प्रकारचे पण काही लोक आहेत आणि असे काही आहेत जे म्हणतात, की पाप आम्हाला कधीच स्पर्श करू शकणार नाही. आता आम्ही सहजयोगी आहोत. आम्ही फार महान उत्क्रांतीत आलो आहोत. परंतु सर्वांमध्ये वाईट ते आहेत, की जे केवळ माझे नाव घेतात नि म्हणत असतात, 'आईने सांगितले आहे आणि मी तुम्हाला सांगतोय कारण आईने तसे सांगितले आहे.' जेव्हा मी ती बाब कधीच सांगितलेली नसते. ते सर्व असत्य असते. आता काही लोक आहेत की ते सहजयोगाचा पैसा वापरतात आणि सहजयोगाचा अयोग्य फायदा घेतात. कधी कधी सहजयोगी मंडळींचादेखील. आणि असे लोक फार अपवित्र बनतात. कुणी एक जो अशा गोष्टींचा प्रयत्न करतो, तो सहजयोगाबाहेर जाईल. कुणीही अशा व्यक्तीजवळ कधीच जाता कामा नये, अशा व्यक्तीजवळ काहीही संबंध ठेवू नये आणि अनुकंपाही असू नये. कारण ही अपवित्रता कुणालाही कितीही प्रमाणात नुकसान देऊ शकते. अशा व्यक्तीपासून दूर रहाणे चांगले. जेव्हा ह्या एकादश रुद्रांची एखाद्या व्यक्तीमध्ये वाढ होते तेव्हा निश्चितच अशा व्यक्तीला कॅन्सरसारखे रोग होतात आणि बरे न होणारे भयानक रोग! खास करून जेव्हा अकरावा रुद्र, जो खरोखर येथे आहे, जे विराटाचे चक्र आहे, जी सामूहिकता आहे, जेव्हा त्यावर परिणाम घडून येतो, तेव्हा अशी व्यक्ती ह्या रोगातून बाहेर पडू कत नाही. परंतु जर ह्या पैकी पाच मूलाधाराशी किंवा आज्ञेशी एकत्र आले तर त्यांना गंभीर स्वरूपाचा घाणेरडा रोग होतो. म्हणून मी नेहमीच सांगते, की तुमच्या आज्ञा चक्राबद्दल काळजी घ्या. कारण सर्वात वाईट गोष्टींपैकी ती एक आहे, की एकदा ह्या एकादशासह किंवा एकादशाच्या एखाद्या अंशाबरोबर देखील ते चक्र एकत्रित होऊ लागली तर त्या व्यक्तीला काहीही घडू शकते, तो भयानक अपघातात सापडू शकतो, त्याला कुणाकडून मार पडेल (तडाका हाणला जाईल), कुणाकडूनही खून केला जाईल. ज्याला उजवी आज्ञा आहे आणि उजव्या किंवा डाव्या एकादशांपैकी कोणताही एक २१ 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-21.txt रुद्र आहे, अशा व्यक्तीला काहीही होऊ शकेल. त्याचा अर्थ असा की, या पैकी पाच, पाचांपैकी कोणताही एक, जर ते आज्ञा चक्राशी एकत्र आले, तर ईश्वराची संरक्षण शक्ती कमीत कमी असते. म्हणून आज्ञा चक्र स्वच्छ ठेवण्यासाठी हे पहा, आता मी बोलत आहे, तुम्ही मला सातत्याने जागरुकतेने पहावे म्हणजे निर्विचारितेची जाणीव होईल आणि आज्ञा चक्र शांत, थंड होईल. निर्विचारीतेच्या जाणिवेत तुम्हाला कुणीही स्पर्श करू शकणार नाही. ती आहे तुमची तटबंदी असलेली जागा. ध्यानाने तुम्ही निर्विचारीतेची जाणीव प्रस्थापित केली पाहिजे. तुम्ही उच्चपदी उन्नती करत आहात याची ती खूण आहे. खूप लोक ध्यान करीत नाहीत आणि म्हणतात, 'ठीक आहे, आम्ही करत आहोत.' यांत्रिक पद्धतीने ते करतात व म्हणतात 'मी हे केले आणि मी ते केले' परंतु तुम्ही निर्विचारीतेची जाणीव कमीत कमी संपादन केलीत कां? तुमच्या चैतन्य लहरी तुमच्या हातातून येताना तुम्हाला जाणवल्या का? नाहीतर, तुम्ही जर यांत्रिक वृत्तीने काही करत आहात तर ते उपयोगी पडणार नाही. तुम्हालाही किंवा कुणालाही उपयोगी नाही. म्हणून आत्मसाक्षात्कारानंतर, जसे तुम्ही पुष्कळच संरक्षित आहात, तुम्हाला सर्व आशीर्वाद आणि उज्ज्वल भविष्यकाळ आहे, तसेच तुम्हाला पूर्ण नाशाचासुद्धा संभव आहे. मी दोन गोष्टीतले साम्य सांगण्यासाठी सांगते, तुम्ही चढत आहात आणि प्रत्येकजण जे तुम्हाला आधाट देण्याचा प्रयत्न कटत आहेत, 7 तुम्हाला चढण्यासाठी आधार देत आहे. तुमचा हात पकडत आहे आणि वर घेण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत, की ज्यांनी तुमचे रक्षण केले जात आहे. चुकीनेदेखील खाली पडण्याची शक्यता नाही. परंतु तुम्ही सत्याची आणि प्रेमाची तुमची बंधने दूर करण्याचा सतत प्रयत्न केलात आणि सातत्याने त्या लोकांना, जे तुम्हाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत-त्यांना हाणण्याचा प्रयत्न केलात तर मोठ्या उंचीवरून खाली पडाल. मला असे सांगायचे आहे, जेवढी उंच उन्नती होते, तेवढे अधिक खाली पडता. फार मोठ्या जोरानेदेखील आणि अधिकाधिक खोल! प्रत्येक प्रयत्न हा परमेश्वरनिर्मित असतो. प्रत्येक आधार तुम्हाला दिला जातो. प्रत्येक काळजी घेतली जाते असूनसुद्धा जर तुम्हाला पडायचेच आहे आणि अशा त्या उंचीवरून तर ते फार धोकादायक आहे. कुणी एक, सहजयोगात असूनदेखील सहजयोगाच्या उद्दिष्टाला नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल. त्यावेळी, अशा विशेषवेळी एकादश रुद्र तुम्हाला अगदी इतका गंभीरपणे फटका देतात, की तो हल्ला फार दूरवर पसरतो. जर त्या कुटुंबातील काही लोक सहजयोगाचे कार्य करत असतील तर सर्व कुटुंबाचे संरक्षण होऊ शकते. परंतु जर कुटुंब सदासर्वकाळ सहजयोग्यांच्या विरुद्ध असेल आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पूर्णपणे विनाश होईल, अगदी वाईट रीतीने. आता हे एकादश रुद्र, मी सांगितल्याप्रमाणे भवसागरातून येतात म्हणजे आम्ही म्हणू शकतो, की त्याचा विध्वंसकतेचा भाग हा मुख्यत: भवसागरातून येतो. परंतु या शक्ती आहेत. सर्व एकाच व्यक्तीत ते म्हणजे महाविष्णुमध्ये दिलेल्या आहेत. तेच श्री भगवान येशू ख्रिस्त आहेत. कारण ते सा्या विश्वाचा आधार आहेत. ते ॐकारचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ते मनुष्य स्वरूपातील चैतन्य लहरींचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. म्हणून जेव्हा ते क्रोधी होतात, तेव्हा सारे विश्व भंग पावण्यास सुरुवात होते. आईची शक्ती, जी प्रत्येक अणूत, प्रत्येक रेणूत, प्रत्येक मानवात, प्रत्येक गोष्टीत, जे सजीव व निर्जिव आहे, त्यात प्रवेश करून पसरते. त्या शक्तीचे ते स्वरूप होऊन राहतात. एकदा का ते भंग केले गेले, तर सर्व गोष्टच संकटात लोटली जाते. म्हणून श्री येशूंना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे आहे. आता पहा, येशूंनी तुम्ही लहान मुलांप्रमाणे असले पाहिजे. तिच आहे निष्पापता, हृदयाची शुद्धता हाच सुंदर मार्ग आहे, की ज्याने तुम्ही त्याला प्रसन्न करू शकता. त्यांना हाणण्याचा प्रयत्न केलात हे त मोठ्या उंचीवरून खाली पडाल. श्री २२ 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-22.txt New Releases Title Place Date Type Lang. DVD VCD ACD MP3 ACS 10th Feb 1981 सहजयोग में प्रगति 15* Delhi 15 PP Н 17th Feb 1981 सार्वजनिक प्रवचन:ब्रह्म तत्व का स्वरुप Delhi 16 PP 16* 16th Aug 1982 301* This is the Resurrection time London SP 457 16th Feb 1985 PP भाग १, २ Delhi 14* 14 Н सहस्रार-आत्मा 16th Oct 1988 नवरात्रि पूजा : हमारे जीवन का लक्ष्य गुडिपाडवा पूजा : देवी की शक्ति का प्रादुर्भाव 20 SP 20* Pune Н 5th Apr 2000 Noida Sp/Pu 204 23* 204* H nd Sahasrara Day 2009 - Cabella May 2009 302* Mu Mu Evening Program, Part I & II 21s Mar 1983 Birthday Puja : Overcoming Sydney SP 303* 79* 79 E the six enemies, Part-I & II 29th Feb 1984 Mahashivratri Puja : Detachment & Pandharpur SP 252* 252 304* E & Enlightenment of Brain th Shivratri Puja 6™ Feb 2000 458* E/H/M Pune SP 21st Mar 2001 Birthday Puja सार्वजनिक कार्यक्रम Delhi 218* SP 218 th 24 Mar 2003 Delhi 072* 284* 284 PP Н th 28" Aug 1973 Shri Krishna Puja 303 SP 303* Mumbai E 24h Jul 1979 London 305* 305 SP Seeking : What are we seeking nd 2 May 1985 9th Aug 1987 Nirananda, Part-I & II Vienna SP 321* 321 E Shri Vishnumaya Puja : Vishnumaya 323* New York SP 323 E & Electricity Part-I & II 11h Sep 1994 Shri Ganesh Puja : Religions, 95* SP Moscow 95 Innocence & Love 04th Jul 1993 Cabella 62* Sp 62 Guru Puja : Understand your own value 7h Jan 1983 Ganesh & Devi Puja-Part I & II SP/PU E/M 460* 306* Rahuri th Sahasrara Puja 5" May 2002 307* Cabella SP/Pu 235* 235 Sahasrara Puja सहजयोग से लाभ SP/PU E 7th May 2000 208 Cabella 308* 208* nd 2 Apr 1986 15th Feb 1981 Calcutta 011* 011 PP H तत्त्व की बात, भाग १ Delhi 012* 012 PP 23rd Feb 1986 धर्म की आवश्यकता Delhi 049 PP 049* Н 3rd Dec 1993 सार्वजनिक कार्यक्रम Delhi Н 056* PP 056 Music Title Artist Code No. ACD/ ACS/ Sahasrara Day Evening Program at Cabella, - 2nd May 2009, Part-I & II Bhajan Sopari 157* Musical Evening at Ganapatipule Sahasrara Seminar -1st-5th May 2009 Anand Kakade 158* Haasat Aali Nirmal Aayi Pt.B Subramanian,S.Malini 159* Pt.B Subramanian Niranand 160* Maa Tere Charno Mein Sandeep Dalal 161* Diwali Puja Bhajans, 3rd Nov 1986 Delhi Sahaja Artist 162* Classical Musical Program, Chhindwada, 21ª Mar 2008, Part-I Pt.Arun Apte & Surekha Apte 163* Pt. Arun Apte & Surekha Apte Classical Musical Program, Chhindwada, 21* Mar 2008, Part-II 164* प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in 2010_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-23.txt मी जे करुणी आणि प्रेम तुम्हीला दिले आहे ते साठवून दसऱ्यांपर्यत पोहोचवी. नाहीतर तुमचा विनाश होईल. प्रेम आणि करुणा तुमच्यातून वाहिले पाहिजे. २८.७.१९८५