चैतन्य लहरी ० जुलै-ऑगस्ट २०१० मराठी ० ७० २ु सए मी एक सर्वसाधारण गृहिणी आहे, जिच्याजवळ हे अनुपम शिल्प आहे. मी तुमची गुरू आहे. मी तुमच्या अचेतनेत प्रवेश करण्यास सक्षम आहे. Seeking & Rationality या अंकात श्री गणेश पूजा ...४ ब्रह्मपुरी पूजा..... ८ Jॐर कतंभरा प्रज्ञा ...१६ श्री बुद्ध पूजा ...७ भौतिक चिकित्सा आणि हृदय रोग ...२१ 64035 (८ 2७ ३ ही ह कि श्री गणेश किम पूजा कळवा, ३१ डिसंबर १९९४ ४ अ जि पूजेमध्ये सगळ्यांनी निश्चय करायचा, की आम्ही आपलं आयुष्य श्री गणेशाच्या चरणी वाहून घेऊ आणि पवित्रता आपल्यामध्ये आणू. त्या पवित्रतेत आम्ही आमच्या मुलांनाही सोडणार नाही. त्यांनाही आम्ही चांगल्या मार्गावर ठेवू. त्यांनाही आम्ही चांगले शिक्षण देऊ आणि वळण लावू. त्यात घाबरू नये. शिस्त ही मुलांना लावलीच डोक्यावर बसतील. म्हणून पाहिजे. जर शिस्त तुम्ही तुमच्या मुलांना लावली नाही तर ती तुमच्या मी निक्षून सांगते जर तुम्हाला गणपतीबद्दल खरच प्रेम असेल तर तुम्ही आपल्या मुलांना सांभाळले पाहिजे. भलतं प्रेम काही कामाचं नाही. त्याने मुलं खराब होतील आणि तुम्हाला फार त्रास होईल. म्हणून या वेळेला त्यांना जी शिस्त पाहिजे ती दिलीच पाहिजे. त्यासाठी थोडसं वाईट वाटतं कधी कधी, की मुलांना आपण बोलतो किंवा मुलांचं असं झालं वगैरे, पण तसं काही वाटून घेतलं नाही पाहिजे. हे कर्तव्य आहे आणि आपलं कर्तव्य हे केलचं पाहिजे असं समजून जर केलं तर ही जी समोर येणारी वाईट पिढी आहे ती आपण टाळू शकतो आणि त्याला आपण मार्गावर आणू शकतो. हा जो समाज बिघडत चालला आहे, त्याला जर ठीक करायचे असेल तर सर्वप्रथम पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. त्यात शिक्षक काही करू शकत नाहीत. पालकांनी लक्ष दिले पाहिजे आणि मुलांना हे समजावून सांगितले पाहिजे की, 'तुम्ही उद्याची पिढी आहात' आणि तुम्हाला या समाजाला सांभाळायचे आहे. त्या घाणेरड्या समाजात जायचे नाही. त्या सिनेमावाल्यांचं सुद्धा दिवाळं वाजवलं पाहिजे म्हणजे ते असले घाणेरडे पिक्चर काढणार नाहीत, घाणेरडं शिकवणार नाहीत आणि घाणेरड्या गोष्टी मुलांमध्ये येणार नाहीत. इतकं होईल की मुलांना हे नकोच असं म्हणतील. आत्ताची मुलं ही फार चांगली मुलं आहेत. जन्मत:च पार झालेली पुष्कळ मुलं आपल्या देशात आहेत. पण त्यांना जर नीट वळण लावलं नाही, त्यांना वाईट काय? चांगल काय? समजलं नाही तर ती मुलं तीच ती वाईट कामं करत राहणार. म्हणून आज श्री गणेशाच्या याच्यात तुम्ही आपल्या मनात ठरवून घ्यायचं की आम्ही माताजींना दाखवून देऊ की आमची मुलं आणि आम्ही, आमचं घरद्वार आणि आमचा समाज हा गणेशाला प्रसन्न करणारा झाला पाहिजे. मला पूर्ण आशा आहे की तुम्ही इकडे लक्ष द्याल. बाहेरून गणेशाची स्तुती करण्यात काही नाही, बाहेरून त्याची प्रार्थना करण्यात किंवा त्याच्या देवळात जाऊन घंटा वाजवण्यात काही अर्थ नाही. आपल्या हृदयात घंटा वाजली पाहिजे. ती जेव्हा वाजेल तेव्हाच हे पावित्र्य पसरेल आणि त्या पावित्र्याने सगळ्यांचे भले होईल आणि उत्तम होईल. सगळ्यांनी सहजयोगात जागृती घेतलेली आहे. तुम्ही जर सगळे सहजयोगी आहात तर तुम्हाला जास्त सांगायला नको. पण बाकीचे जे लोक आहेत, नातलग, तुमची मुलं-बाळं, लेकी सुना सगळ्या, ५ 3अ ७ 'सगळ्यांना सहजयोग हा आला पाहिजे' असा निश्चय करूनच आज जायचंय. आणि तसं घडेल तुमची इच्छा असली तर हळदीकुंकू करून त्यांना बोलवून हे सांगा की सहजयोग घ्या. सहजयोगाशिवाय मार्ग नाही. आणि तुम्हाला पाहून ही ते सहजयोग घेतील अशी व्यवस्था आहे. तेव्हा श्री गणेशाला जे रुचेल, त्याला आवडेल असंच आपण केलं पाहिजे. नुसतं त्याला मोदक देऊन काय फायद्याचं? मोदकामध्ये काय आहे ते पाहिले पाहिजे. मोदकामध्ये जर तुमची सदिच्छा असली, तुमची आपल्या हृदयात घंटा वाजली पाहिजे. जर शुद्ध इच्छा असली तरच त्याला ती पसंत आहे, नाहीतर बाकीचे मोदक तर त्याला काही नको. तेव्हा आता शुद्ध इच्छा ठेवायची आणि शुद्ध इच्छा म्हणजे कुंडलिनी आणि ही शुद्ध इच्छा म्हणजे अशी की आम्हाला सहजयोगात पूर्णपणे उतरू द्या. तसंच आमच्या घराण्यातील सर्व लोकांना सहजयोगाचा लाभ होऊ दे. ती जेव्हा वाजेल तेव्हाच हे पाविव्य पसरेल आणि त्या पाविव्याने सगळ्यांना अनंत आशीर्वाद ! सगळ्यांचे भले होईल आणि उत्तम होईल. ६ श्री बुद्ध पूजा लेनिनग्राड,१४ मे १९९० र शिया मागची आज्ञा आहे. चीनसुद्धा मागची आज्ञा आहे. हे चक्र उघडण्यासाठी श्री बुद्धांची पूजा करण्यात येत आहे. आज्ञा चक्राच्या पातळीवर विचार असतात. तुम्ही सर्व एकाच दैवी शक्तीशी संबंधित असल्यामुळे तिथे मतभेद नाहीत. जर मतभेद असेल तर तुम्ही सहजयोगी नाही. सत्याच्या साम्राज्यात तुमची काळजी घेतली जात आहे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक पायरीवर कोणीतरी आहे जे तुमची काळजी घेत आहे. जेव्हा मी मॉस्को विमानतळावर प्रवेश केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या पर्समध्ये व्हिसा नाही. इमिग्रेशन ऑफिसरने फक्त स्मितहास्य केलं आणि काही प्रश्न न विचारता फक्त मला व्हिसा दिला. सर्व सहजयोगी हा चमत्कार पाहून आश्चर्यचकीत झाले. सूक्ष्मशक्ती प्रत्येक तपशीलाकडे लक्ष देते आणि तिचे अस्तित्व तुम्हाला दाखवून देण्यासाठी चमत्कार करते. सहजयोगामध्ये भीती असता कामा नये. सगळी भीती टाकून द्या. तुम्हाला जर कोणी धाकदपटशा दाखविला तर तो सहजयोगाबाहेर फेकला जाईल. तुम्हाला तुमच्या आत्म्याशिवाय दुसर्या कोणीही तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करता कामा नये. प्रेमशक्तीशिवाय ताकदवान दसरी कोणतीही शक्ती नाही. सहजयोग गंभीर नाही. आनंददायी आहे. ती एक स्थिती आहे. आता 'काळ' तुमचा गुलाम आहे. तुम्ही कालातीत आहात. तुम्हाला कोणी दुखवू शकत नाही. कोणी तुमच्या खोड्या काढण्याचा प्रयत्न करेल , तर तो स्वत:च्याच खोड्यात फसेल. सहजयोगाच्या प्रकाशात तुम्हाला तुमच्या हातात साप दिसतो. त्याला नुसते फेकून द्या. तुम्ही लहान नाही, तुम्ही वयोवृद्ध नाही. तुम्ही फक्त आनंदात आहात. तुमच्याकडे विशाल हृदय नसेल, तर तुमच्याकडे चांगली आज्ञा असू शकत नाही. आज्ञेचा मंत्र आहे 'क्षं- मी क्षमा करतो.' पाठीमागच्या आज्ञेचा मंत्र आहे 'हं-मी आहे.' अशाप्रकारे हं क्षं. ईश्वर तुम्हाला आशीर्वादित करो ! ७ ब्रह्मपुरी पजा जिथे तुम्ही जन्म घेतलात तीच तुमची भूमी आहे आणि तिथे जन्म घेतलेल्या लोकांचाच त्यावर अधिकार आहे. कोमो, इटली, १६/९/१९८४, अनुवाद अ जि आपण विशिष्ट पद्धतीची पूजा, जी एकादश रुद्रांच्या वैभवार्थ करत आहोत. रुद्र ही शिवाची-आत्म्याची संहार शक्ती आहे. आता एक शक्ती, जी त्याचा ( परमेश्वराचा) स्वभाव आहे, ती आहे क्षमाशीलता. तो क्षमा करतो, कारण आपण मानव आहोत. आपण चुका करतो. आपण चुकीच्या गोष्टी करतो, आपण मोहात अडकतो, आपले चित्त भंग पावते म्हणून तो आपल्याला क्षमा करतो. आपण आपले पावित्र्य खराब करतो; आपण अनैतिक गोष्टी करतो, आपण चौर्यकर्म करतो आणि आपण अशा गोष्टी करतो की त्या परमेश्वराच्या विरुद्ध आहेत, त्याच्याविरुद्ध बोलतो. तरीदेखील तो क्षमा करतो. तो आपला वरपांगीपणा, द्विष, आपली वासना, आपला क्रोध (यांना) तो क्षमा करतो. आपली आसक्तीदेखील, क्षुद्र द्वेष, पोकळ गर्व आणि ताबेदारी (मालमत्ता) तो क्षमा करतो, तो आपली अहंकारी वर्तणूक आणि चुकीच्या गोष्टींना अंकित ठेवणे हे देखील क्षमा करतो. प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया आहेच आणि जेव्हा तो (परमेश्वर ) क्षमा करतो, तेव्हा तो विचार करतो, की तुम्हाला एक महान अशी स्वखुशीने गुणवत्ता (कृपा) दिली आहे आणि ज्यांना क्षमा केली गेली आहे आणि तेच मोठ्या चुका करत आहेत. त्यांच्याविरुद्ध संतापाची प्रतिक्रिया त्यांच्यात उभी राहते. विशेषकरून आत्मसाक्षात्कारानंतर.. कारण आत्मसाक्षात्काराचे एवढे महान आशीर्वाद आहेत, तुम्हाला प्रकाश मिळाला आहे आणि प्रकाशात जर तुम्ही समोरच कृतीची वाट पहात चिकटून आहात तर त्याचा संताप वाढतो कारण तो पाहतो, की तुम्ही किती मूर्ख आहात! मी काय म्हणत होते, की आत्मसाक्षात्कारानंतर , विशेष करून तो अधिकाधिक संवेदनशील असतो, की ज्या लोकांना क्षमा केली आहे आणि आत्मसाक्षात्कारासारखी मोठी गोष्ट दिलेली आहे व अद्याप ते अयोग्य गोष्टी करतात तर परमेश्वर अधिक असंतुष्ट होतो म्हणजे तराजूतील क्षमाशीलता कमी होऊ लागते व प्रकोप वाढण्यास सुरुवात होते. पण जेव्हा तो क्षमा करतो, त्या क्षमाशीलतेचा परिणाम म्हणून तुम्हाला कृतज्ञता वाटते आणि मग त्याचे आशी्वाद तुमच्याप्रत वाहण्यास सुरुवात होते. तुम्हाला दुसऱ्यांना क्षमा करण्याची महाप्रचंड क्षमता देतो. तो तुमचा राग शांत करतो. तो तुमची वासना शांत करतो, तुमचा लोभ तो शांत करतो. सुंदरशा दवबिंदुप्रमाणे, तुमच्या जीवनावर आशीर्वाद मिळत असतात. आणि आपण सुंदरशी फुले बनतो आणि त्याच्या आशीर्वादाच्या सूर्यप्रकाशात आम्ही प्रकाशित होऊ लागतो. सर्व जे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते, त्याचा नाश करण्यासाठी तो त्याचा राग किंवा त्याच्या संहार शक्ती वापरतो. प्रत्येक मार्गाने, प्रत्येक क्षणी आत्मसाक्षात्कारी आत्म्याचे तो रक्षण करतो. दुष्ट शक्ती सहजयोग्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या महाप्रचंड संरक्षण शक्तीमुळे ते हल्ले निष्फळ ठरतात. त्याच्या चैतन्य लहरींच्या जाणीवेतून आम्हाला योग्य पथाचे मार्गदर्शन मिळते. त्याचे सुंदरशा आशीर्वादाचे बायबलच्या २३ व्या स्तोत्रात वर्णन केले आहे. 'परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.' तो तुमची मेंढपाळ म्हणून कशी काळजी घेतो ते सर्व वर्णन केले आहे. परंतु तो या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची काळजी घेत नाही. त्यांचा नाश करतो. जे सहजयोगात येतात आणि राक्षसी स्वभाव ते चालूच ठेवतात ते नष्ट होतात. जे सहजयोगात येतात आणि ध्यान करत नाहीत ते ही नष्ट ९ ১ े होतात किंवा ते सहजयोगाच्या बाहेर फेकले जातात. जे ईश्वराच्या विरुद्ध बडबडतात आणि अशा मार्गाने जातात, की जो सहजयोग्याला शोभत नाही, त्यांना तो दूर करतो. म्हणजे एका शक्तीने तो रक्षण करतो आणि दुसर्या शक्तीने तो त्यांना करतो. परंतु त्याची संहार शक्ती (रुद्र), जेव्हा ती जास्त मजबूत होते तेव्हा आपण म्हणतो, 'आता दूर एकादश रुद्र कार्यरत झाले आहेत.' जेव्हा कलकी स्वत: कृतिशील होते तेव्हा हे एकादश रुद्र व्यक्त होतात. म्हणजेच संहार शक्ती, सर्व जे या पृथ्वीवर नकारात्मक आहे ते नष्ट करेल आणि सर्व जे सुष्ट आहे त्याचे रक्षण करेल. म्हणून सहजयोगाने आपली उन्नती झटपट करणे अगदी गरजेचे आहे. सामाजिक जीवनात किंवा वैवाहिक जीवनात किंवा ईश्वराने तुम्हाला जे सर्व काही आशीर्वाद दिले आहेत, त्यावरच समाधानी असता कामा नये. ईश्वराने आपल्यासाठी काय केले आहे, तो आपल्याशी कसा अद्भूत आहे ते आपण नेहमीच पाहतो, परंतु आपण आपल्यासाठी काय केले आहे, आपल्या आत्मउन्नतीसाठी व आपल्या पूर्णत्वासाठी आपण काय करत आहोत ते आपल्याला पहायचे आहे. १० आता अकरापैकी, एकादश म्हणजे अकरा, तुमच्या भवसागराच्या उजव्या बाजूने पाच येतात आणि तुमच्या भवसागराच्या डाव्या बाजूने पाच येतात. जर तुम्ही अगुरुपुढे स्वत: मान तुकवलीत किंवा तुम्ही चुकीची पुस्तके वाचलीत किंवा जर तुम्ही अनैतिक लोकांच्या संगतीत असलात, चुकीच्या मार्गाने जे जात आहेत, त्याचेबद्दल सहानुभूतिपूर्वक राहिलात किंवा तुम्ही स्वत:च या अनैतिक लोकांचे गुरू किंवा एखादे एजंट झालात, तर पहिले पाच, डाव्या हाताच्या बाजूवरील (रुद्र) येतात. आता ह्या पाच समस्या सोडवू शकतो; जर जे जे आपण चुकीचे करत आलो आहोत ते आपण पूर्णपणे सोडले तर! महंमद साहेबांनी असे म्हटले आहे की तुम्हाला सैतानाला ठोकायचे आहे, चपलेने... परंतु ते यांत्रिकपणे करायचे नाही. परंतु हृदयापासून. ज्याप्रमाणे पुष्कळ लोक, जे सहजयोगात येतात आणि मला सांगतात की, 'माझे वडील ह्या गुरूला अनुसरतात.' ते त्या गुरूंना अनुसरतात. ते त्यांच्या वडिलांबरोबर, बहिणींबरोबर, ह्यांच्या आणि त्यांच्याबरोबर गुंतत जातात आणि त्यांना त्या गुरूंपासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि गुंतत जातातदेखील किंवा त्यांच्यापैकी काही इतर शक्तीना शरण जातात. ज्याप्रमाणे मॉरीनचे मला माहीत आहे, जी माझ्याबरोबर होती आणि तिचे आई- वडील व सासू-सासरे म्हणाले की, मुलाला बाप्तीस्मा दिलाच पाहिजे. मी तिला सांगितले, 'तू ह्या मुलाला बाप्तीस्मा देऊ नकोस कारण तो आत्मसाक्षात्कारी आत्मा आहे.' पण ती तशी त्या गोष्टीला न भिता सामोरी जाऊ शकली नाही आणि तिने ते मूल बाप्तीस्मा (नामकरण विधी) साठी नेले आणि ते मूल चमत्कारिक बनले. वेडसर मुलासारखे ते करत होते. म्हणून आता तिने ते सर्व सोडले आणि ती वाचली. परंतु समजा तिला दुसरे मूल असते तर अगदी वाईट झाले असते. आता सहजयोग्यांबाबतची अडचण आहे, की कुणीही सहजयोगाच्या कार्यक्रमाला येतो, त्याला वाटते की तो सहजयोगी आहे, पण ते तसे नाही. एकतर तुमच्याजवळ खूप सामर्थ्याची जाणीव हवी किंवा तुमच्या शारीरातून तो जाणवला पाहिजे. एखादी व्यक्ती अद्याप जी 'बाधित' आहे. ती दुसऱ्या एकाजवळ जो अधिक प्रबळपणे बाधित आहे त्याला आकर्षित होते आणि त्याला समजत नाही की ही दसरी व्यक्ती इतकी प्रबळपणे बाधित आहे, परंतु प्रभावित होते. अशा स्थितीत, अशा व्यक्तीला बाधीत व्यक्तीकडून तडाखा बसतो. शिव रक्षण करू शकत नाहीत. जो बाधीत आहे त्याबद्दल एखाद्यानेही सहानुभूती दाखवू नये. जरी तो वेडा आहे, त्याचे काही बिघडलेले आहे, जरी तो तुमच्या नात्याचा आहे आणि काही असो. कोणत्याही प्रकारची अनुकंपा नको. उलट पक्ष, त्या व्यक्तीबद्दल एक प्रकारचा रागच ११ हा सर्व बाबी हा डाल्या बाजूल्या वाढीकडे जातात किंवा Iपण त्याला म्हणू शकतो की तुमच्या मस्तकावर तुमच्या मेधा च्या उजल्या बाजूला आहे. असावा. एका प्रकारची अनासक्ती आणि ही रागयुक्त अनासक्ती, ही एकच वेळ आहे. जेव्हा तुम्ही रागवलेच पाहिजे. परंतु मी असे लोक पाहिले आहेत, की ज्यांना फार चांगल्या सहजयोगी मंडळींबद्दल राग आहे. परंतु त्यांच्या नवर्यावर किंवा पत्नीवर नाही, जे अत्यंत बाधीत आहेत. म्हणजे जेव्हा एकादश रुद्र उजवीकडे ह्या पाच बाजूवर काम करू लागतात, खरे आपण म्हटले पाहिजे की ते उजव्या बाजूस सरकतात कारण ते डाव्या बाजूकडून येतात आणि उजव्या बाजूस वळतात, नंतर ती व्यक्ती बाधीत होण्यास सुरुवात होते. परंतु त्याच्या अहंकाराने त्याचे कार्य असते. अशी व्यक्ती परिस्थिती आपल्या ताब्यात घेईल. आणि म्हणेल, की 'मी असा नी तसा सहजयोगी आहे. आणि मी म्हणजे असा आहे.....' आपण ह्याप्रमाणे केले पाहिजे आणि ह्याप्रमाणे वागले पाहिजे आणि हुकूमशाहीला सुरुवात करतो. असे लोक काही करू शकतात आणि काही मध्यम प्रतीचे आणि काही अर्ध कच्चे सहजयोगी समजून घेण्याचा प्रयत्न करतील. परंतु पुष्कळसे जाणतील, की ही व्यक्ती 'बाहेर' जात आहे, आता तो त्याच्या 'बाहेर' जाण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे ह्या सर्व बाबी ह्या डाव्या बाजूच्या वाढीकडे जातात किंवा आपण त्याला म्हणू शकतो की तुमच्या मस्तकावर तुमच्या 'मेधा' च्या उजव्या बाजूला आहे. त्या ब्रेन प्लेटला संस्कृतमध्ये 'मेधा' म्हणतात. आता उजव्या बाजूवाला एखादा अशा कल्पनेतून येतो. जी कल्पना ह्या लोकांजवळ असते की 'मी स्वत: फार मोठा गुरू आहे.' ते सहजयोगाबद्दल शिकवायला सुरुवात करतात. जणू काही ते मोठे गुरू बनले आहेत. आम्हाला काही लोक माहीत आहेत की जे कोणत्याही कार्यक्रमात मोठी भाषणे देतात आणि माझ्या भाषणाच्या ध्वनिफिती (टेप्स) वाजवण्याची अनुज्ञा कधीच देत नाहीत किंवा दसरे काही. त्यांना वाटते की ते आता तज्ज्ञ झाले आहेत. नंतर त्यांच्यातील काही म्हणतात, की आता आम्ही एवढे 'महान' झालो आहोत, की मीठ-पाण्यात पाय बुडवण्याची कसलीही गरज नाही किंवा ध्यान करण्याची गरज नाही. अशा प्रकारचे पण काही लोक आहेत. आणि असे काही आहेत जे म्हणतात की, 'पाप आम्हाला कधीच स्पर्श करू शकणार नाही, आता आम्ही सहजयोगी आहोत. आम्ही फार महान उत्क्रांतीत आलो आहोत .' परंतु सर्वांमध्ये वाईट ते आहेत, की जे केवळ माझे नाव घेतात नि म्हणत असतात, 'आईने सांगितले आहे आणि मी तुम्हाला सांगतोय कारण आईने तसे सांगितले आहे.' जेव्हा मी ती बाब कधीच सांगितलेली नसते. ते सर्व असत्य असते. आता काही लोक आहेत की ते सहजयोगाचा पैसा वापरतात आणि सहजयोगाचा अयोग्य फायदा घेतात. कधी कधी सहजयोगी मंडळींचादेखील. आणि असे लोक फार अपवित्र बनतात. कुणी एक जो अशा गोष्टींचा प्रयत्न करतो, तो सहजयोगाबाहेर जाईल. कुणीही अशा व्यक्तीजवळ कधीच जाता कामा नये, अशा व्यक्तीजवळ काहीही संबंध ठेवू नये आणि अनुकंपाही असू नये. कारण ही अपवित्रता कुणालाही कितीही प्रमाणात नुकसान देऊ शकते. अशा १३ निर्विचारीतेच्या जाणिवेत तुम्हाला कुणीही स्पर्श करू शकृणार नाही. ती आहे तुमची तटबंदी असलेली जागा. व्यक्तीपासून दूर रहाणे चांगले. जेव्हा ह्या एकादश रुद्रांची एखाद्या व्यक्तीमध्ये वाढ होते तेव्हा निश्चितच अशा व्यक्तीला कँसरसारखे रोग होतात आणि बरे न होणारे भयानक रोग! खास करून जेव्हा अकरावा रुद्र, जो खरोखर येथे आहे, जे विराटाचे चक्र आहे, जी सामूहिकता आहे, जेव्हा त्यावर परिणाम घडून येतो, तेव्हा अशी व्यक्ती ह्या रोगातून बाहेर पडू शकत नाही. परंतु जर ह्या पैकी पाच मूलाधाराशी किंवा आज्ञेशी एकत्र आले तर त्यांना गंभीर स्वरुपाचा घाणेरडा रोग होतो. म्हणून मी नेहमीच सांगते, की तुमच्या आज्ञा चक्राबद्दल काळजी घ्या. कारण सर्वात वाईट गोष्टींपैकी ती एक आहे, की एकदा ह्या एकादशासह किंवा एकादशाच्या एखाद्या अंशाबरोबर देखील ते चक्र एकत्रित होऊ लागले, तर त्या व्यक्तीला काहीही घडू शकते, तो भयानक अपघातात सापडू शकतो, त्याला कुणाकडून मार पडेल (तडाका हाणला जाईल), कुणाकडूनही खून केला जाईल. ज्याला उजवी आज्ञा आहे आणि उजव्या किंवा डाव्या एकादशांपैकी कोणताही एक रुद्र आहे, अशा व्यक्तीला काहीही होऊ शकेल. त्याचा अर्थ असा की, या पैकी पाच, पाचांपैकी कोणताही एक, जर ते आज्ञा चक्राशी एकत्र आले, तर ईश्वराची संरक्षण शक्ती कमीत कमी असते. म्हणून आज्ञा चक्र स्वच्छ ठेवण्यासाठी हे पहा, आता मी बोलत आहे, तुम्ही मला सातत्याने जागरुकतेने पहावे म्हणजे निर्विचारितेची जाणीव होईल आणि आज्ञा चक्र शांत, थंड होईल. निर्विचारीतेच्या जाणिवेत तुम्हाला कुणीही स्पर्श करू शकणार नाही. ती आहे तुमची तटबंदी असलेली जागा. ध्यानाने तुम्ही निर्विचारीतेची जाणीव प्रस्थापित केली पाहिजे. तुम्ही उच्चपदी उन्नती करत आहात याची ती खूण आहे. खूप लोक ध्यान करीत नाहीत आणि म्हणतात, 'ठीक आहे, आम्ही करत आहोत.' यांत्रिक पद्धतीने ते करतात व म्हणतात 'मी हे केले आणि मी ते केले' परंतु तुम्ही निर्विचारीतेची जाणीव कमीत कमी संपादन केलीत कां? तुमच्या चैतन्य लहरी तुमच्या हातातून येताना तुम्हाला जाणवल्या का? नाहीतर, तुम्ही जर यांत्रिक वृत्तीने काही करत आहात तर ते उपयोगी पडणार नाही. तुम्हालाही किंवा कुणालाही उपयोगी नाही. म्हणून आत्मसाक्षात्कारानंतर, जसे तुम्ही पुष्कळच संरक्षित आहात, तुम्हाला सर्व आशीर्वाद आणि उज्ज्वल भविष्यकाळ आहे, तसेच तुम्हाला पूर्ण नाशाचासुद्धा संभव आहे. मी दोन गोष्टीतले साम्य सांगण्यासाठी सांगते, तुम्ही चढत आहात आणि प्रत्येकजण तुम्हाला चढण्यासाठी आधार देत आहे. तुमचा हात पकडत आहे आणि वर घेण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत, की ज्यांनी तुमचे रक्षण केले जात आहे. चुकीनेदेखील खाली पडण्याची शक्यता नाही. परंतु तुम्ही सत्याची आणि प्रेमाची तुमची बंधने दूर करण्याचा सतत प्रयत्न केलात आणि सातत्याने त्या लोकांना, जे तुम्हाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत-त्यांना हाणण्याचा प्रयत्न केलात तर मोठ्या उंचीवरून खाली पडाल. मला असे सांगायचे आहे, जेवढी उंच उन्नती होते, तेवढे अधिक खाली पडता. फार मोठ्या जोरानेदेखील आणि अधिकाधिक खोल! प्रत्येक प्रयत्न हा परमेश्वरनिर्मित असतो. प्रत्येक आधार तुम्हाला दिला जातो. प्रत्येक काळजी घेतली जाते हे असूनसुद्धा जर तुम्हाला पडायचेच आहे आणि अशा त्या उंचीवरून तर ते फार धोकादायक आहे. १४ ी े ली भाी AT हु आ ार ाी या कुणी एक, सहजयोगात असूनदेखील सहजयोगाच्या उद्दिष्टाला नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळी, अशा विशेषवेळी एकादश रुद्र तुम्हाला अगदी इतका गंभीरपणे फटका देतात, की तो हल्ला फार दूरवर पसरतो. जर त्या कुटुंबातील काही लोक सहजयोगाचे कार्य करत असतील तर सर्व कुटुंबाचे संरक्षण होऊ शकते. परंतु जर कुटुंब सदासर्वकाळ सहजयोग्यांच्या विरुद्ध असेल आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पूर्णपणे विनाश होईल, अगदी वाईट रीतीने. आता हे एकादश रुद्र, मी सांगितल्याप्रमाणे भवसागरातून येतात म्हणजे आम्ही म्हणू शकतो, की त्याचा विध्वंसकतेचा भाग हा मुख्यत: भवसागरातून येतो. परंतु या शक्ती आहेत. सर्व एकाच व्यक्तीत ते म्हणजे महाविष्णुमध्ये दिलेल्या आहेत. तेच श्री भगवान येशू ख्रिस्त आहेत. कारण ते साऱ्या विश्वाचा आधार आहेत. ते ॐकारचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ते मनुष्य स्वरूपातील चैतन्य लहरींचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. म्हणून जेव्हा ते क्रोधी होतात, तेव्हा सारे विश्व भंग पावण्यास सुरुवात होते. आईची शक्ती, जी प्रत्येक अणूत, प्रत्येक रेणूत, प्रत्येक मानवात, प्रत्येक गोष्टीत, जी सजीव व निर्जीव आहे, त्यात प्रवेश करून पसरते. त्या शक्तीचे ते स्वरूप होऊन राहतात. एकदा का ते भंग केले गेले, तर सर्व गोष्टच संकटात लोटली जाते. म्हणून श्री येशूना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे आहे. आता पहा, श्री येशूंना तुम्ही लहान मुलांप्रमाणे असले पाहिजे. तीच आहे निष्पापता, हृदयाची शुद्धता हाच सुंदर मार्ग आहे, की ज्याने तुम्ही त्याला प्रसन्न करू शकता. १५ ० 2० ा लि ऋतंभरा प्रज्ञा लॉजहिज सेमिनार, २३.७.१९८३ पन जगाच्या निरनिराळ्या भागातून तुम्ही सर्वजण ह्या ठिकाणी आलेले बघून मला अतिशय आनंद होत आहे. तेव्हा प्रेमाने हृदय इतके भरून येते, की शब्द त्याची तीव्रता व्यक्त करण्यास अपुरे पडतात. तुमच्या हृदयात याची तीव्रता समजावयास पाहिजे. ह्या अशा सुंदर नैसर्गिक वातावरणांत आपण एकत्र भेटतो आहोत, यात मला वाटतं अशी परमेश्वराची व्यवस्था आहे, की यावेळी काहीतरी वेगळं मोठे घडावयाचं आहे. ह्यावेळी आपण काही तरी फार मोठ मिळवलं पाहिजे, आता वेळ थोडा आहे. तेव्हा मी तुम्हाला ध्यानाबद्दल काही गोष्टी सांगते व त्यानंतर मला वाटतं आणखी दोन भाषणे होतील. 'मेडिटेशन' हा एक सर्वसाधारण शब्द आहे. ध्यानामध्ये ज्या तीन पायऱ्या आहेत त्या शब्दांतून स्पष्ट होत नाहीत. परंतु संस्कृत भाषेत तुम्ही ध्यानात कसे जायचे ह्या संबंधी स्पष्टपणे सांगितले आहे. प्रथम ध्यान म्हटलं आहे, दुसरी धारणा सांगितली आहे व तिसरी समाधी. सुदैवाने सहजयोग असा आहे, की तुम्हाला या सर्व गोष्टी एकत्र एका बंडल मध्ये मिळतात. तुम्ही बाकी सर्व वगळून समाधीत जाता आणि हेच त्यातील सौंदर्य आहे. प्रथम ध्यान घ्या. प्रथमत: तुम्ही जेव्हा साधक असता तेव्हा तुम्ही पूजा करता त्यावर तुमचे चित्त ठेवता, त्याला ध्यान म्हणतात. आणि धारणा म्हणजे तुम्ही केलेले सतत प्रयत्न. तुमचे चित्त सर्व प्रथम त्यावरच केंद्रित करणे. परंतु जे लोक जागृत नाहीत त्यांच्याकरिता हे केवळ नाटक ठरतं. ते केवळ फक्त अभिनय करत असतात. परंतु जागृत व्यक्तीसाठी ते सत्य आहे. ज्याची तेव्हा प्रथम तुम्हाला ध्यान केलं पाहिजे. कुणी मूर्तीचे ध्यान करतात तर कुणी अमूर्ताचे करतात. परंतु तुम्ही इतके नशीबवान आहांत की अमूर्त सुद्धा तुमच्यासमोर प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात आले आहेत. तुम्ही आता मूर्ताकडून अमूर्ताकडे किंवा अमूर्ताकडून मूर्तता हे सर्वच येथे आहे, एका बंडलमध्ये , तेव्हा तुम्ही काही देवतेवर एकाग्रता करता किंवा त्यासंबंधी विचार करता किंवा काही ठिकाणी निराकार की जो अमूर्त स्वरूपात करतात किंवा सर्वस्वी निराकारावर चित्त एकाग्र करतात. जोपर्यंत तुम्ही जागृत नाहीत तोपर्यंत सर्व बुद्धीचा खेळ आहे. परंतु एकदा का तुम्ही जागृत झालात, की तुम्ही ज्याचे ध्यान करणार आहात त्याचा फक्त विचार करता. पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर ध्यान करता तेव्हा तुमचं चित्त विचलित होत असतं. ते जागृती नंतरही शक्य आहे. ते एका बंडलमध्ये आहे. तरीसुद्धा काही लोक ते काही थोडे थोडे करीत घेतात, तेव्हा जरी तुम्ही ध्यान करता तरी तुमचे चित्त घटकेघटकेला विचलित होत असतं. तेव्हा तुम्ही किती एकाग्रचित्त होऊ शकता त्याच्यावर ते अवलंबून असतं. तेव्हा मी काही असे सहजयोगी पाहिलेत, की काही स्वयंपाक करतात तर काही ध्यान करतात तेव्हा ध्यान करणारा म्हणतो, की काहीतरी जळण्याचा मला वास येतो आहे. तेव्हा अशा ठिकाणी धारणा नसते. धार याचा अर्थ प्रवाह. प्रवाह थांबल्यास त्या ठिकाणी धारणा नाही. ध्यान आहे पण धारणा नाही. ह्यातील दुसरा भाग फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला तुमचं चित्त सतत तुमच्या देवतेवर ठेवावयास पाहिजे. तेव्हा तुम्ही एक स्थिती मिळविता की ज्याला धारणा म्हणतात, की ज्यात तुमचं चित्त त्या देवतेशी एक होतं आणि जेव्हा हे परिपक्व होतं तेव्हा तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त होते. आता ज्या लोकांना असं वाटतं की जागृतीशिवाय ते हे कसं करू शकतात तर ते पूर्णतया चूक परंतु जागृती नंतर जेव्हा तुमची धारणा प्रस्थापित होते तेव्हा तुम्हाला अशा अवस्थेत जावे लागते, की आहे. १७ कु आल ऋतंभरा हे निसर्गाचे नांव आहे आणि एखाद्याला तो निसर्ग प्रकाशित जालेला जाणवतो. ज्यामध्ये तुमची समाधी लागेल. आता ही अवस्था काय आहे ? जेव्हा तुम्ही या अवस्थेत असता तेव्हा तुम्ही जे काही करता, तुम्ही ज्या देवतेला पूजता ते दैवत तुम्ही तुमच्या कामात बघता. तुम्ही असं म्हणू शकता, की जे काही तुम्ही बघता तुम्हाला तुमचे दैवतच ते करत आहे असं दिसतं. तुम्ही जे काही ऐकता, तुम्हाला तुमचे दैवतच सत्य सांगत आहे असं वाटतं. जे काही तुम्ही वाचतां त्यात तुम्हाला दिसेल, की तुमच्या देवतेनेच तुम्हाला सांगितले. तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी, नाकांनी आणि इतर सर्व अवयवांनी जे काही कराल ते सर्व काही तुम्ही ज्या दैवताची पूजा करता त्याच देवतेचं दर्शन तुम्हाला आपोआप घडतं. तुम्हाला आता, मला एकाग्रता करावयाची आहे असा विचार करावयास नको, आता मला हा विचार नको, मला आता हा विचार करायला पाहिजे, हे सर्व काही आपोआप घडते , तुम्ही एखादं पुस्तक वाचाल आणि तुम्हाला त्यात सहजयोगासाठी काय चांगलं ते सापडतं. जर परमेश्वराविरुद्ध लिखाण केलेलं पुस्तक असेल तर ते तुम्ही टाकून द्याल, जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील ते असं समजा, की त्या तुम्हाला काही धडा शिकविण्याकरिता घडलेल्या आहेत, 'मला काही अनुभव शिकविण्याकरिता' हा सर्व त्या दैवताच्या अनुभूतीची प्रचीती आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला गर्भपात होत आहे असे वाटते तेव्हा एक व्यक्ती की जी समाधी अवस्थेला गेली नाही, किंवा सवयीचा गुलाम आहे ती म्हणेल, 'मी माताजीसाठी एवढं केलं, मी इतक्या लांब गेले आणि असं असूनसुद्धा ही अडचण मला आली, पण दुसरा म्हणेल की 'ठीक आहे मला प्रयत्न करून बघू दे, मी जाऊन माताजींच्या फोटोसमोर सांगेन किंवा टेलिफोन करेन' आणि त्याला असे आश्चर्य दिसेल की ते सर्व काही झालेले आहे आणि एकदम योग्य असेच. तुम्ही जर जागृत असलात तरच या गोष्टी शक्य आहेत. अन्यथा नाही. तेव्हा ही जी अवस्था तुमच्यात जागृत झाली आहे ही एक नवीन स्थिती आहे. संस्कृतमध्ये तिला सुंदर नांव आहे फार कठीण नांव आहे 'ऋतंभरा प्रज्ञा' ऋतंभरा हे निसर्गाचे नांव आहे आणि एखाद्याला तो निसर्ग प्रकाशित झालेला जाणवतो. मी तुम्हाला एक उदाहरण देते, ज्यावेळी मूल जन्माला येत असतं, त्यावेळी त्याच्या आईला आपोआप दुध येते. निसर्ग मुलांच्या जन्माकरिता आपोआप कार्यान्वित होत असतो. त्याचप्रमाणे फक्त सहजयोगाच्या ठिकाणी ही ऋतंभरा प्रज्ञा जेव्हा कार्यरत होते तेव्हा काम कसं चटकन घडतं हे बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आता वेळ थोडा आहे. पण मी तुम्हाला एक उदाहरण देते. मी ब्रायटनला आले आणि जॉन्सन म्हणाला, 'माताजी, ब्रायटनमध्ये गुरुपूजा करू या. म्हटलं, 'ठीक आहे, करा. परंतु जागा शोधून काढा.' तेव्हा तो युनिव्हर्सिटीत गेला, म्हणाला, युनिव्हर्सिटीचे लोक मदत करतील परंतु जागा लहान आहे आणि मी म्हणाले, 'परंतु त्यांना विचारून तर बघा.' मग तो म्हणाला, 'नाही ती जागा गुरुपूजेच्या दिवशी रिकामी नाही.' मग मी म्हणाले, 'तुम्ही काय करू शकता ?' तो म्हणाला, 'माताजी, आता काय करायचं?' मी म्हणाले, 'दूसरे कुठेतरी आत्ताच्या आत्ता ' मी की १८ ० -ा ॐी मं आपण आपली उन्नती केली पाहिजे. पातळी उंचावली पाहिजे. रि प्रयत्न करा. फोनवर कुणाला तरी विचारा.' नंतर त्यांनी जाऊन त्यांना फोन केला. आणि त्यांनी सांगितलं, की आमच्याकडे जागा आहे, फारच चांगली जागा आहे आणि तुम्ही ताबडतोब या. जेवायलाच या. लगेच तेथे गेला. त्याने तेथे उत्कृष्ट जेवण केले. ते सर्वजण खूप खुष होते. ते सर्वांनाच जागा देणार होते. ते फारच चांगले लोक होते आणि ह्या सर्व गोष्टी इतक्या चांगल्या रीतीने कशा घडल्या याचे त्याला आश्चर्य वाटले. तो तेव्हा ऋतंभरा प्रज्ञा ही तुमच्या मदतीसाठी कार्यान्वित होत असते. तुम्ही सर्व मला सांगता, की माताजी, हे आश्चर्य घडले ते घडलं आणि आम्हाला समजलं नाही, की ते कसं घडलं. मी एक तुम्हाला उदाहरण देते. काल आम्ही काहीतरी सिमेंटचे काम करीत होतो. तेव्हा इटालियन मुलगा म्हणाला, आपल्याला दोन पिशव्या सिमेंट लागेल. मी म्हणाले, 'तू काम चालू ठेव. ते संपणार नाही.' मी जाण्याच्या अगोदरसुद्धा ते काम चालू होतं आणि सिमेंट संपलं नव्हतं. आता बघा एवढी सिमेंटसारखी गोष्ट. तेव्हा ही एक विशेष गोष्ट आहे, की निसर्ग तुमच्याशी एकरूप झाला व तुम्ही निसर्गाशी एकरूप की झालात तेव्हा या दैवी शक्तीचे प्रेम, संरक्षण आणि तुमच्या प्रती चित्त ह्या काही घटना घडतात ज्यात परिस्थिती निर्माण होते त्यातून प्रदर्शित होतं आणि ह्याला अंत नाही. जे फक्त घडत असतं पण लोकांना ते कसं घडतं हे समजत नाही. पण तीच समाधीची स्थिती आहे. परंतु असे लोक असतील, की मी जर त्यांना विचारलं की तुम्ही हे कराल का? ते म्हणतील 'माताजी, आता दुकानं बंद झाली असतील.' ते काही बरोबर नाही. ते करणार नाही अशा तऱ्हेने ते सांगत राहतील. आणि काही असेही लोक आहेत, की ते म्हणतील 'नाही, मला बघू द्या. जर माताजी म्हणत आहेत तर ते होईलच.' मी आता अगदी साधे उदाहरण देते, फारच बाह्यातले आहे पण ते सत्य आहे. श्री. श्रीवास्तव हे काही विशिष्ट प्रकारचा चहा घेतात. फारच इंग्लिश आणि त्यांना दुसरा चहा आवडत नाही. तेव्हा ते म्हणाले, 'अरे बापरे! आपला चहा संपला. आणि उद्या सकाळी काय करायचे.' तेव्हा मी म्हणाले, 'ठीक आहे. चला आपण चहाच्या दुकानात जाऊ.' तेव्हा ते म्हणाले, 'आता रात्रीचे आठ वाजले आहेत. ते सर्व आपल्याला हसतील व आता रात्री आठ वाजता कुठलेही टी सेंटरचे दुकान उघडे नसेल.' मी म्हणाले, 'बघू तर जाऊन. त्यात अडचण काय आहे. मी म्हणते चला जाऊ या.' परंतु ते म्हणाले, 'काय विचित्र गोष्ट तुम्ही सांगत आहात.' मी म्हणाले, 'ठीक आहे. विचित्र किंवा काहीही असो. चला तर खरं.' परंतु ते ऐकेनात. तेव्हा मी ड्रायव्हरला सांगितले, 'चला, आपण तिकडे गाडीने जाऊया.' आम्ही तेथे गेलो आणि सर्व दिवे लागलेले होते. आम्ही म्हणालो, 'हे सर्व दिवे कसे लागलेले आहेत ?' तेव्हा आम्ही आत गेलो, फारच ओशाळलेले आणि ते सर्वजण उभे होते. 'आम्ही सर्वजण आपल्यासाठी केव्हाची वाट पाहत आहोत आणि तुम्ही सर्वात शेवटी आलात.' पहा कल्पना करा. तेव्हा मी माझ्या पतीना विचारले, ते १९ ७ आते वाo म्हणाले, 'मी विसरलो आपल्याला आज येथे स्वागत समारंभ होता.' आणि ते म्हणाले, 'तुम्ही सर्वात शेवटी आलात.' आणि म्हणाले, 'काही हरकत नाही. तुम्ही तुमचे प्रेझेन्ट्स घ्या.' तेव्हा त्यांनी प्रत्येकी दोन चहाचे डबे प्रेझेंट दिले. माझा म्हणण्याचा अर्थ असा, की अशी हजारो उदाहरणे देता येतील. आजच कुणीतरी पलंग सरकविण्याचा प्रयत्न करीत होते. तिघेजण प्रयत्न करीत होते. मी म्हणाले, 'ठीक आहे, मी सरकवते.' 'मी फक्त माझी नाभी तेथे लावली, मी काही ढकलले नाही. ते असंच पुढे सरकलं ते केवळ ऋतंभरा प्रज्ञेमुळे. परंतु हा काही चमत्कार नाही. हे ईश्वराचे तुमच्यावरील प्रेम प्रदर्शित करणे, तुम्हाला, तुम्ही कोणी खास निवडलेले आहात, हे दाखविण्यासाठी आहे. परंतु ही परिस्थिती तुम्ही मान्य केली पाहिजे. पण तुम्ही जर सर्वसाधारण लोकांसारखे वागलात, की 'अरे देवा, दकाने बंद असतील. तो माणूस किती विचित्र आहे. मला वाटत नाही की ते काम होईल.' तेव्हा ते कधीच होणार नाही. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे, की निराकार व साकार मी अशा तुम्हाला जन्म दिलेला आहे. तुम्ही निवडलेले साधुसंत आहांत तेव्हा ही प्रज्ञा प्रदर्शित होत असते. प्रत्येक क्षणाला प्रदर्शित होत असते. तुम्ही तयारीत रहा, आनंदी रहा आणि तिचं स्वागत करा आणि विश्वास ठेवा, की तुम्ही जिथं आहात त्याची पातळी वेगळी आहे. आता वेळ झालेली आहे, की सहजयोग्याने आपली पातळी बदलली पाहिजे. आपण बदललं पाहिजे. आपण आपली उन्नती केली पाहिजे. पातळी उंचावली पाहिजे. परंतु सहजयोग असं काही मिश्रीत आहे, की एकाच प्लेटवर आपल्याकडे अत्यंत खराब अशा भूतापासून अगदी वरच्या दर्जाचे लोक आहेत. आता काही जण गेले आहेत. फार अहंकारी आहेत. ते सारखे गडगडत असतात. आपल्याला समजत नाही, की ही प्लेट उंचावयाची कशी? जर तुम्ही ती प्लेट उंचावली तर ते गडगडत खाली येतील. तेव्हा तुम्ही घाबरलेले आहात. तुम्हाला त्यांना धरून ठेवलं पाहिजे आणि काही असे आहेत, की ते चौरस आहेत व दुसर्याच्या समस्या भुताप्रमाणे आपल्या डोक्यावर घेतात. जर तुम्ही त्यांची उन्नती करण्याचा प्रयत्न कराल तर ते खाली घसरत येतील किंवा सर्व भूते पडतील. तुम्ही ज्या उंचीवर त्यांना न्याल तेथेच ते टिकून राहतील. तेव्हा जे लोक अजून काठावर आहेत ते मला नक्कीच त्रासदायक आहेत. कारण माझ्या प्रेमामुळे मी त्यांना बाहेर फेकू शकत नाही आणि आपल्याला त्यांना मदत करावयास पाहिजे. त्यांची उन्नती करावयास पाहिजे. खरे पाहतां त्यांना त्यातून बाहेर यावयास पाहिजे. आपण त्यांच्यासाठी किती वाट पहायची. प्रत्येकानी बघितलं पाहिजे, की जे काठावर आहेत त्यांना नीटपणे आत आणलं पाहिजे. म्हणजे ते सहजयोगातून बाहेर जाणार नाहीत. जिव्हाळा ठीक आहे. पण आपली सहजयोगाची पातळी खाली करून चालणार नाही. कधीच नाही. जे लोक सहजयोगात चांगले प्रस्थापित झाले आहेत त्यांची पातळी उंचावयास पाहिजे. तेव्हा प्रत्येकाने किमान पातळीपर्यंत येण्याचे व स्थिर करण्याचे प्रयत्न करावे. नाहीतर मला सांगण्यास खेद वाटतो, की ते चाळणीतून गळले जातील. धन्यवाद! २० वु भौतिक चिकित्सा आणि हृदय रोग जेव्हा चैतन्य लहरी वाहतात तेव्हा शरीरातील पेशींना त्या आराम देतात. ताण-तणावांमुळे पेशी आखडतात. उदा.डावी विशुद्धी किंवा इतर कोणत्याही चक्रांमधील ताणामुळे पाठीच्या कण्यातील हाडांचे आखडणे सुरू होते. जेव्हा तुम्ही तुमची चक्रं मला समर्पित करता तेव्हा ती सुखद अवस्थेमध्ये येतात आणि त्यावेळेस चैतन्य लहरी देऊन तुम्ही ती ठीक करू शकता. या चैतन्य लहरी तुम्ही दुसर्यांनाही देऊ शकता. त्यासाठी दुसर्या व्यक्तीला स्पर्श करायची आवश्यकता नाही. मंत्राचा उपयोग करून दरूनच हाताने दूसर्या व्यक्तीला चैतन्य लहरी द्या. डाव्या बाजूच्या आजारात (मानसिक) तुम्ही सामूहिक अवचेतनेत जाता, जिथे 'प्रोटीन ५२' विषाणू एकत्रित केले जातात. यामुळे बऱ्याचदा अशी स्थिती निर्माण होते, की व्यक्तीचा नाइलाज होतो. ज्या लोकांचे यकृत खराब आहे किंवा ज्यांनी यकृताचा दुरुपयोग केला आहे त्यांना ताप येऊ शकतो. गरम यकृताला बर्फ लावून ठीक करता येते. मलेरिया हा देखील उजव्या बाजूचा आजार आहे. बॅक्टेरियाद्वारे झालेले आजार डाव्या बाजूचे रोग आहेत. हे विशेषकरून मशरूम्स, जुने पनीर अशाप्रकारचे पदार्थ खाल्ल्यामुळे होतात. मधुमेह डाव्या बाजूच्या बाधेने प्रभावित उजव्या बाजूच्या प्रतिक्रियेमुळे होतो. शरीराची उजवी बाजू संवेदनशील असते. जेंव्हा तुम्ही अती विचार करता, आपल्या या सवयीमध्ये अडकता तेंव्हा तुमच्या आत भीती उत्पन्न होते, जी तुम्हाला जास्त दुर्बल बनवते. परिश्रम करणारी व्यक्ती जेंव्हा खूप विचार करते तेंव्हा त्याच्यातील चरबीच्या कणांचा उपयोग मेंदूला व्यस्त राहण्याने डावी बाजू उपेक्षित राहते. त्याची शक्ती कमी कमी होत गेल्याने ते मानसिक रोगाचे कारण बनते. अशा परिस्थितीत जर तुमच्यामध्ये भीती उत्पन्न झाली किंवा कोणतीही दोषाची भावना निर्माण झाली तर मधुमेह होऊ शकतो. याला ठीक करण्यासाठी 'अली ' चा मंत्र लाभकारी आहे. स्वाधिष्ठान व डावे नाभी चक्र याचे स्रोत आहेत. पत्नीच्या काळजीमुळे किंवा तिच्यासाठी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची चिंता करण्यामुळे डाव्या नाभीवर परिणाम होतो, अशा परिस्थितीत मधुमेह होऊ शकतो. आपल्या आज्ञा चक्राला साफ करून हे ठीक करा. जास्त विचार करू नका. निर्विचार चेतनेत रहा. डावी बाजू उचलून उजवीकडे टाका. जास्त साखर बाहेर टाकण्याच्या क्रियेला संतुलित करण्यासाठी मिठाचा उपयोग वाढवा कारण मिठात स्वच्छताकारक पाणी असते. उजवी नाभी आणि स्वाधिष्ठानवर शक्ती पोहोचवण्यासाठी होतो. या कार्यासाठी स्वाधिष्ठान कार्यरत असते आणि त्याच्या या बाजूला बर्फ ठेवा आणि उपयुक्त परीक्षणानंतर साखरेचा उपयोग बंद करा. हृदय रोग सर्वात जास्त कार्यरत आणि शिथिल हृदय आक्रमक लोकांमध्ये हृदय जास्त कार्यरत असते. अशा परिस्थितीत हार्ट अॅटॅक येऊ शकतो. हा अॅटॅक लहान वयातही येऊ शकतो. चित्त जास्त बाहेर असणे हे एक त्याचे कारण आहे. जास्त भौतिक दृष्टिकोन ठेवल्यास (हैC. २१ (2हलट बu400 परी आत्म्याकडे त्यांचे लक्ष नसते आणि शेवटी आत्मा त्यांचा त्याग करतो. भविष्यविषयक आणि परिवाराची जास्त चिंता, काळजी करण्यानेही व्यक्ती जास्त क्रियाशील होते, ज्यामुळे हृदयाला रक्ताभिसरणासाठी जास्त श्रम करावे लागतात. त्यामुळे ते थकते. अधिक प्रमाणात मंत्र इ. चा जप करणारे, तंबाखू, सिगरेट पिणारे लोक पहिले आपली डावी विशुद्धी खराब करतात. जेणेकरून हृदयाला रक्ताभिसरण करण्यात अडचण निर्माण होते आणि हृदय थकते. डाव्या विशुद्धीमुळे शिथिल हृदय 'अंजायना' चे कारण होऊ शकते. हार्ट अॅटॅक दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारच्या समस्येत पोट आणि हृदयाच्या उजव्या बाजूला बर्फ ठेऊन ठीक करता येते. यासाठी डाव्याला उचलून उजव्यावर ही टाकता येते. 'पाणी-पाद' क्रिया ही लाभकारी आहे. उजव्या बाजूच्या समस्येसाठी 'मेणबत्ती (कँडल) उपचार' (अग्नितत्त्व) करू नये. दिवे घालवून झोपावे आणि जास्तीत जास्त घरातच राहून पूर्ण आराम करावा. उजवा हात डाव्या हृदयावर ठेऊन म्हणावे, 'श्रीमाताजी, मी आत्मा आहे, कृपा करून मला क्षमा करा.' शिथिल हृदयाच्या समस्येत रोगी म्हणू शकतो की, 'श्रीमाताजी, तुम्हीच माझे बीज मंत्र आहात, तुम्हीच मंत्रिका आहात. तसेच 'मी निर्दोष आहे.' आणि 'श्रीमाताजी मी सर्वांना क्षमा करतो.' डावी बाजू शुद्ध करण्यासाठी अग्नितत्वाचा उपयोग (): करा. प.पू.श्रीमाताजी आणि डॉ.तलवार यांच्यात झालेला वार्तालाप ह) २२ स्वः चा अर्थ आहे आत्मा आणि आत्म्याचे राज्य येणे म्हणजेच स्वराज्य आहे. स्वातंत्र्याचा अर्थ आहे परत तेच आत्म्याचे तंत्र म्हणजे आत्म्याची एक पद्धत. प.पू.श्री माताजी निर्मलादेवी, ५.१२.९९ प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा.लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in रन ा। काभ का ा ार जर आपणे फुलीली विचाटले की त्याला काय पाहिजे? तर ते की, मला कोणतेही ो, शुज्य न महणेल मला दसरे काही नको. ज्या मार्गावरुन आदिशक्ती जाणए त्यी में मली टीकी. प.पू. श्री माताजी निर्मला देी के ---------------------- 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-0.txt चैतन्य लहरी ० जुलै-ऑगस्ट २०१० मराठी ० ७० २ु 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-1.txt सए मी एक सर्वसाधारण गृहिणी आहे, जिच्याजवळ हे अनुपम शिल्प आहे. मी तुमची गुरू आहे. मी तुमच्या अचेतनेत प्रवेश करण्यास सक्षम आहे. Seeking & Rationality 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-2.txt या अंकात श्री गणेश पूजा ...४ ब्रह्मपुरी पूजा..... ८ Jॐर कतंभरा प्रज्ञा ...१६ श्री बुद्ध पूजा ...७ भौतिक चिकित्सा आणि हृदय रोग ...२१ 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-3.txt 64035 (८ 2७ ३ ही ह कि श्री गणेश किम पूजा कळवा, ३१ डिसंबर १९९४ ४ 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-4.txt अ जि पूजेमध्ये सगळ्यांनी निश्चय करायचा, की आम्ही आपलं आयुष्य श्री गणेशाच्या चरणी वाहून घेऊ आणि पवित्रता आपल्यामध्ये आणू. त्या पवित्रतेत आम्ही आमच्या मुलांनाही सोडणार नाही. त्यांनाही आम्ही चांगल्या मार्गावर ठेवू. त्यांनाही आम्ही चांगले शिक्षण देऊ आणि वळण लावू. त्यात घाबरू नये. शिस्त ही मुलांना लावलीच डोक्यावर बसतील. म्हणून पाहिजे. जर शिस्त तुम्ही तुमच्या मुलांना लावली नाही तर ती तुमच्या मी निक्षून सांगते जर तुम्हाला गणपतीबद्दल खरच प्रेम असेल तर तुम्ही आपल्या मुलांना सांभाळले पाहिजे. भलतं प्रेम काही कामाचं नाही. त्याने मुलं खराब होतील आणि तुम्हाला फार त्रास होईल. म्हणून या वेळेला त्यांना जी शिस्त पाहिजे ती दिलीच पाहिजे. त्यासाठी थोडसं वाईट वाटतं कधी कधी, की मुलांना आपण बोलतो किंवा मुलांचं असं झालं वगैरे, पण तसं काही वाटून घेतलं नाही पाहिजे. हे कर्तव्य आहे आणि आपलं कर्तव्य हे केलचं पाहिजे असं समजून जर केलं तर ही जी समोर येणारी वाईट पिढी आहे ती आपण टाळू शकतो आणि त्याला आपण मार्गावर आणू शकतो. हा जो समाज बिघडत चालला आहे, त्याला जर ठीक करायचे असेल तर सर्वप्रथम पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. त्यात शिक्षक काही करू शकत नाहीत. पालकांनी लक्ष दिले पाहिजे आणि मुलांना हे समजावून सांगितले पाहिजे की, 'तुम्ही उद्याची पिढी आहात' आणि तुम्हाला या समाजाला सांभाळायचे आहे. त्या घाणेरड्या समाजात जायचे नाही. त्या सिनेमावाल्यांचं सुद्धा दिवाळं वाजवलं पाहिजे म्हणजे ते असले घाणेरडे पिक्चर काढणार नाहीत, घाणेरडं शिकवणार नाहीत आणि घाणेरड्या गोष्टी मुलांमध्ये येणार नाहीत. इतकं होईल की मुलांना हे नकोच असं म्हणतील. आत्ताची मुलं ही फार चांगली मुलं आहेत. जन्मत:च पार झालेली पुष्कळ मुलं आपल्या देशात आहेत. पण त्यांना जर नीट वळण लावलं नाही, त्यांना वाईट काय? चांगल काय? समजलं नाही तर ती मुलं तीच ती वाईट कामं करत राहणार. म्हणून आज श्री गणेशाच्या याच्यात तुम्ही आपल्या मनात ठरवून घ्यायचं की आम्ही माताजींना दाखवून देऊ की आमची मुलं आणि आम्ही, आमचं घरद्वार आणि आमचा समाज हा गणेशाला प्रसन्न करणारा झाला पाहिजे. मला पूर्ण आशा आहे की तुम्ही इकडे लक्ष द्याल. बाहेरून गणेशाची स्तुती करण्यात काही नाही, बाहेरून त्याची प्रार्थना करण्यात किंवा त्याच्या देवळात जाऊन घंटा वाजवण्यात काही अर्थ नाही. आपल्या हृदयात घंटा वाजली पाहिजे. ती जेव्हा वाजेल तेव्हाच हे पावित्र्य पसरेल आणि त्या पावित्र्याने सगळ्यांचे भले होईल आणि उत्तम होईल. सगळ्यांनी सहजयोगात जागृती घेतलेली आहे. तुम्ही जर सगळे सहजयोगी आहात तर तुम्हाला जास्त सांगायला नको. पण बाकीचे जे लोक आहेत, नातलग, तुमची मुलं-बाळं, लेकी सुना सगळ्या, ५ 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-5.txt 3अ ७ 'सगळ्यांना सहजयोग हा आला पाहिजे' असा निश्चय करूनच आज जायचंय. आणि तसं घडेल तुमची इच्छा असली तर हळदीकुंकू करून त्यांना बोलवून हे सांगा की सहजयोग घ्या. सहजयोगाशिवाय मार्ग नाही. आणि तुम्हाला पाहून ही ते सहजयोग घेतील अशी व्यवस्था आहे. तेव्हा श्री गणेशाला जे रुचेल, त्याला आवडेल असंच आपण केलं पाहिजे. नुसतं त्याला मोदक देऊन काय फायद्याचं? मोदकामध्ये काय आहे ते पाहिले पाहिजे. मोदकामध्ये जर तुमची सदिच्छा असली, तुमची आपल्या हृदयात घंटा वाजली पाहिजे. जर शुद्ध इच्छा असली तरच त्याला ती पसंत आहे, नाहीतर बाकीचे मोदक तर त्याला काही नको. तेव्हा आता शुद्ध इच्छा ठेवायची आणि शुद्ध इच्छा म्हणजे कुंडलिनी आणि ही शुद्ध इच्छा म्हणजे अशी की आम्हाला सहजयोगात पूर्णपणे उतरू द्या. तसंच आमच्या घराण्यातील सर्व लोकांना सहजयोगाचा लाभ होऊ दे. ती जेव्हा वाजेल तेव्हाच हे पाविव्य पसरेल आणि त्या पाविव्याने सगळ्यांना अनंत आशीर्वाद ! सगळ्यांचे भले होईल आणि उत्तम होईल. ६ 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-6.txt श्री बुद्ध पूजा लेनिनग्राड,१४ मे १९९० र शिया मागची आज्ञा आहे. चीनसुद्धा मागची आज्ञा आहे. हे चक्र उघडण्यासाठी श्री बुद्धांची पूजा करण्यात येत आहे. आज्ञा चक्राच्या पातळीवर विचार असतात. तुम्ही सर्व एकाच दैवी शक्तीशी संबंधित असल्यामुळे तिथे मतभेद नाहीत. जर मतभेद असेल तर तुम्ही सहजयोगी नाही. सत्याच्या साम्राज्यात तुमची काळजी घेतली जात आहे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक पायरीवर कोणीतरी आहे जे तुमची काळजी घेत आहे. जेव्हा मी मॉस्को विमानतळावर प्रवेश केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या पर्समध्ये व्हिसा नाही. इमिग्रेशन ऑफिसरने फक्त स्मितहास्य केलं आणि काही प्रश्न न विचारता फक्त मला व्हिसा दिला. सर्व सहजयोगी हा चमत्कार पाहून आश्चर्यचकीत झाले. सूक्ष्मशक्ती प्रत्येक तपशीलाकडे लक्ष देते आणि तिचे अस्तित्व तुम्हाला दाखवून देण्यासाठी चमत्कार करते. सहजयोगामध्ये भीती असता कामा नये. सगळी भीती टाकून द्या. तुम्हाला जर कोणी धाकदपटशा दाखविला तर तो सहजयोगाबाहेर फेकला जाईल. तुम्हाला तुमच्या आत्म्याशिवाय दुसर्या कोणीही तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करता कामा नये. प्रेमशक्तीशिवाय ताकदवान दसरी कोणतीही शक्ती नाही. सहजयोग गंभीर नाही. आनंददायी आहे. ती एक स्थिती आहे. आता 'काळ' तुमचा गुलाम आहे. तुम्ही कालातीत आहात. तुम्हाला कोणी दुखवू शकत नाही. कोणी तुमच्या खोड्या काढण्याचा प्रयत्न करेल , तर तो स्वत:च्याच खोड्यात फसेल. सहजयोगाच्या प्रकाशात तुम्हाला तुमच्या हातात साप दिसतो. त्याला नुसते फेकून द्या. तुम्ही लहान नाही, तुम्ही वयोवृद्ध नाही. तुम्ही फक्त आनंदात आहात. तुमच्याकडे विशाल हृदय नसेल, तर तुमच्याकडे चांगली आज्ञा असू शकत नाही. आज्ञेचा मंत्र आहे 'क्षं- मी क्षमा करतो.' पाठीमागच्या आज्ञेचा मंत्र आहे 'हं-मी आहे.' अशाप्रकारे हं क्षं. ईश्वर तुम्हाला आशीर्वादित करो ! ७ 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-7.txt ब्रह्मपुरी पजा जिथे तुम्ही जन्म घेतलात तीच तुमची भूमी आहे आणि तिथे जन्म घेतलेल्या लोकांचाच त्यावर अधिकार आहे. कोमो, इटली, १६/९/१९८४, अनुवाद 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-8.txt अ जि आपण विशिष्ट पद्धतीची पूजा, जी एकादश रुद्रांच्या वैभवार्थ करत आहोत. रुद्र ही शिवाची-आत्म्याची संहार शक्ती आहे. आता एक शक्ती, जी त्याचा ( परमेश्वराचा) स्वभाव आहे, ती आहे क्षमाशीलता. तो क्षमा करतो, कारण आपण मानव आहोत. आपण चुका करतो. आपण चुकीच्या गोष्टी करतो, आपण मोहात अडकतो, आपले चित्त भंग पावते म्हणून तो आपल्याला क्षमा करतो. आपण आपले पावित्र्य खराब करतो; आपण अनैतिक गोष्टी करतो, आपण चौर्यकर्म करतो आणि आपण अशा गोष्टी करतो की त्या परमेश्वराच्या विरुद्ध आहेत, त्याच्याविरुद्ध बोलतो. तरीदेखील तो क्षमा करतो. तो आपला वरपांगीपणा, द्विष, आपली वासना, आपला क्रोध (यांना) तो क्षमा करतो. आपली आसक्तीदेखील, क्षुद्र द्वेष, पोकळ गर्व आणि ताबेदारी (मालमत्ता) तो क्षमा करतो, तो आपली अहंकारी वर्तणूक आणि चुकीच्या गोष्टींना अंकित ठेवणे हे देखील क्षमा करतो. प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया आहेच आणि जेव्हा तो (परमेश्वर ) क्षमा करतो, तेव्हा तो विचार करतो, की तुम्हाला एक महान अशी स्वखुशीने गुणवत्ता (कृपा) दिली आहे आणि ज्यांना क्षमा केली गेली आहे आणि तेच मोठ्या चुका करत आहेत. त्यांच्याविरुद्ध संतापाची प्रतिक्रिया त्यांच्यात उभी राहते. विशेषकरून आत्मसाक्षात्कारानंतर.. कारण आत्मसाक्षात्काराचे एवढे महान आशीर्वाद आहेत, तुम्हाला प्रकाश मिळाला आहे आणि प्रकाशात जर तुम्ही समोरच कृतीची वाट पहात चिकटून आहात तर त्याचा संताप वाढतो कारण तो पाहतो, की तुम्ही किती मूर्ख आहात! मी काय म्हणत होते, की आत्मसाक्षात्कारानंतर , विशेष करून तो अधिकाधिक संवेदनशील असतो, की ज्या लोकांना क्षमा केली आहे आणि आत्मसाक्षात्कारासारखी मोठी गोष्ट दिलेली आहे व अद्याप ते अयोग्य गोष्टी करतात तर परमेश्वर अधिक असंतुष्ट होतो म्हणजे तराजूतील क्षमाशीलता कमी होऊ लागते व प्रकोप वाढण्यास सुरुवात होते. पण जेव्हा तो क्षमा करतो, त्या क्षमाशीलतेचा परिणाम म्हणून तुम्हाला कृतज्ञता वाटते आणि मग त्याचे आशी्वाद तुमच्याप्रत वाहण्यास सुरुवात होते. तुम्हाला दुसऱ्यांना क्षमा करण्याची महाप्रचंड क्षमता देतो. तो तुमचा राग शांत करतो. तो तुमची वासना शांत करतो, तुमचा लोभ तो शांत करतो. सुंदरशा दवबिंदुप्रमाणे, तुमच्या जीवनावर आशीर्वाद मिळत असतात. आणि आपण सुंदरशी फुले बनतो आणि त्याच्या आशीर्वादाच्या सूर्यप्रकाशात आम्ही प्रकाशित होऊ लागतो. सर्व जे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते, त्याचा नाश करण्यासाठी तो त्याचा राग किंवा त्याच्या संहार शक्ती वापरतो. प्रत्येक मार्गाने, प्रत्येक क्षणी आत्मसाक्षात्कारी आत्म्याचे तो रक्षण करतो. दुष्ट शक्ती सहजयोग्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या महाप्रचंड संरक्षण शक्तीमुळे ते हल्ले निष्फळ ठरतात. त्याच्या चैतन्य लहरींच्या जाणीवेतून आम्हाला योग्य पथाचे मार्गदर्शन मिळते. त्याचे सुंदरशा आशीर्वादाचे बायबलच्या २३ व्या स्तोत्रात वर्णन केले आहे. 'परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.' तो तुमची मेंढपाळ म्हणून कशी काळजी घेतो ते सर्व वर्णन केले आहे. परंतु तो या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची काळजी घेत नाही. त्यांचा नाश करतो. जे सहजयोगात येतात आणि राक्षसी स्वभाव ते चालूच ठेवतात ते नष्ट होतात. जे सहजयोगात येतात आणि ध्यान करत नाहीत ते ही नष्ट ९ 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-9.txt ১ े होतात किंवा ते सहजयोगाच्या बाहेर फेकले जातात. जे ईश्वराच्या विरुद्ध बडबडतात आणि अशा मार्गाने जातात, की जो सहजयोग्याला शोभत नाही, त्यांना तो दूर करतो. म्हणजे एका शक्तीने तो रक्षण करतो आणि दुसर्या शक्तीने तो त्यांना करतो. परंतु त्याची संहार शक्ती (रुद्र), जेव्हा ती जास्त मजबूत होते तेव्हा आपण म्हणतो, 'आता दूर एकादश रुद्र कार्यरत झाले आहेत.' जेव्हा कलकी स्वत: कृतिशील होते तेव्हा हे एकादश रुद्र व्यक्त होतात. म्हणजेच संहार शक्ती, सर्व जे या पृथ्वीवर नकारात्मक आहे ते नष्ट करेल आणि सर्व जे सुष्ट आहे त्याचे रक्षण करेल. म्हणून सहजयोगाने आपली उन्नती झटपट करणे अगदी गरजेचे आहे. सामाजिक जीवनात किंवा वैवाहिक जीवनात किंवा ईश्वराने तुम्हाला जे सर्व काही आशीर्वाद दिले आहेत, त्यावरच समाधानी असता कामा नये. ईश्वराने आपल्यासाठी काय केले आहे, तो आपल्याशी कसा अद्भूत आहे ते आपण नेहमीच पाहतो, परंतु आपण आपल्यासाठी काय केले आहे, आपल्या आत्मउन्नतीसाठी व आपल्या पूर्णत्वासाठी आपण काय करत आहोत ते आपल्याला पहायचे आहे. १० 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-10.txt आता अकरापैकी, एकादश म्हणजे अकरा, तुमच्या भवसागराच्या उजव्या बाजूने पाच येतात आणि तुमच्या भवसागराच्या डाव्या बाजूने पाच येतात. जर तुम्ही अगुरुपुढे स्वत: मान तुकवलीत किंवा तुम्ही चुकीची पुस्तके वाचलीत किंवा जर तुम्ही अनैतिक लोकांच्या संगतीत असलात, चुकीच्या मार्गाने जे जात आहेत, त्याचेबद्दल सहानुभूतिपूर्वक राहिलात किंवा तुम्ही स्वत:च या अनैतिक लोकांचे गुरू किंवा एखादे एजंट झालात, तर पहिले पाच, डाव्या हाताच्या बाजूवरील (रुद्र) येतात. आता ह्या पाच समस्या सोडवू शकतो; जर जे जे आपण चुकीचे करत आलो आहोत ते आपण पूर्णपणे सोडले तर! महंमद साहेबांनी असे म्हटले आहे की तुम्हाला सैतानाला ठोकायचे आहे, चपलेने... परंतु ते यांत्रिकपणे करायचे नाही. परंतु हृदयापासून. ज्याप्रमाणे पुष्कळ लोक, जे सहजयोगात येतात आणि मला सांगतात की, 'माझे वडील ह्या गुरूला अनुसरतात.' ते त्या गुरूंना अनुसरतात. ते त्यांच्या वडिलांबरोबर, बहिणींबरोबर, ह्यांच्या आणि त्यांच्याबरोबर गुंतत जातात आणि त्यांना त्या गुरूंपासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि गुंतत जातातदेखील किंवा त्यांच्यापैकी काही इतर शक्तीना शरण जातात. ज्याप्रमाणे मॉरीनचे मला माहीत आहे, जी माझ्याबरोबर होती आणि तिचे आई- वडील व सासू-सासरे म्हणाले की, मुलाला बाप्तीस्मा दिलाच पाहिजे. मी तिला सांगितले, 'तू ह्या मुलाला बाप्तीस्मा देऊ नकोस कारण तो आत्मसाक्षात्कारी आत्मा आहे.' पण ती तशी त्या गोष्टीला न भिता सामोरी जाऊ शकली नाही आणि तिने ते मूल बाप्तीस्मा (नामकरण विधी) साठी नेले आणि ते मूल चमत्कारिक बनले. वेडसर मुलासारखे ते करत होते. म्हणून आता तिने ते सर्व सोडले आणि ती वाचली. परंतु समजा तिला दुसरे मूल असते तर अगदी वाईट झाले असते. आता सहजयोग्यांबाबतची अडचण आहे, की कुणीही सहजयोगाच्या कार्यक्रमाला येतो, त्याला वाटते की तो सहजयोगी आहे, पण ते तसे नाही. एकतर तुमच्याजवळ खूप सामर्थ्याची जाणीव हवी किंवा तुमच्या शारीरातून तो जाणवला पाहिजे. एखादी व्यक्ती अद्याप जी 'बाधित' आहे. ती दुसऱ्या एकाजवळ जो अधिक प्रबळपणे बाधित आहे त्याला आकर्षित होते आणि त्याला समजत नाही की ही दसरी व्यक्ती इतकी प्रबळपणे बाधित आहे, परंतु प्रभावित होते. अशा स्थितीत, अशा व्यक्तीला बाधीत व्यक्तीकडून तडाखा बसतो. शिव रक्षण करू शकत नाहीत. जो बाधीत आहे त्याबद्दल एखाद्यानेही सहानुभूती दाखवू नये. जरी तो वेडा आहे, त्याचे काही बिघडलेले आहे, जरी तो तुमच्या नात्याचा आहे आणि काही असो. कोणत्याही प्रकारची अनुकंपा नको. उलट पक्ष, त्या व्यक्तीबद्दल एक प्रकारचा रागच ११ 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-12.txt हा सर्व बाबी हा डाल्या बाजूल्या वाढीकडे जातात किंवा Iपण त्याला म्हणू शकतो की तुमच्या मस्तकावर तुमच्या मेधा च्या उजल्या बाजूला आहे. असावा. एका प्रकारची अनासक्ती आणि ही रागयुक्त अनासक्ती, ही एकच वेळ आहे. जेव्हा तुम्ही रागवलेच पाहिजे. परंतु मी असे लोक पाहिले आहेत, की ज्यांना फार चांगल्या सहजयोगी मंडळींबद्दल राग आहे. परंतु त्यांच्या नवर्यावर किंवा पत्नीवर नाही, जे अत्यंत बाधीत आहेत. म्हणजे जेव्हा एकादश रुद्र उजवीकडे ह्या पाच बाजूवर काम करू लागतात, खरे आपण म्हटले पाहिजे की ते उजव्या बाजूस सरकतात कारण ते डाव्या बाजूकडून येतात आणि उजव्या बाजूस वळतात, नंतर ती व्यक्ती बाधीत होण्यास सुरुवात होते. परंतु त्याच्या अहंकाराने त्याचे कार्य असते. अशी व्यक्ती परिस्थिती आपल्या ताब्यात घेईल. आणि म्हणेल, की 'मी असा नी तसा सहजयोगी आहे. आणि मी म्हणजे असा आहे.....' आपण ह्याप्रमाणे केले पाहिजे आणि ह्याप्रमाणे वागले पाहिजे आणि हुकूमशाहीला सुरुवात करतो. असे लोक काही करू शकतात आणि काही मध्यम प्रतीचे आणि काही अर्ध कच्चे सहजयोगी समजून घेण्याचा प्रयत्न करतील. परंतु पुष्कळसे जाणतील, की ही व्यक्ती 'बाहेर' जात आहे, आता तो त्याच्या 'बाहेर' जाण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे ह्या सर्व बाबी ह्या डाव्या बाजूच्या वाढीकडे जातात किंवा आपण त्याला म्हणू शकतो की तुमच्या मस्तकावर तुमच्या 'मेधा' च्या उजव्या बाजूला आहे. त्या ब्रेन प्लेटला संस्कृतमध्ये 'मेधा' म्हणतात. आता उजव्या बाजूवाला एखादा अशा कल्पनेतून येतो. जी कल्पना ह्या लोकांजवळ असते की 'मी स्वत: फार मोठा गुरू आहे.' ते सहजयोगाबद्दल शिकवायला सुरुवात करतात. जणू काही ते मोठे गुरू बनले आहेत. आम्हाला काही लोक माहीत आहेत की जे कोणत्याही कार्यक्रमात मोठी भाषणे देतात आणि माझ्या भाषणाच्या ध्वनिफिती (टेप्स) वाजवण्याची अनुज्ञा कधीच देत नाहीत किंवा दसरे काही. त्यांना वाटते की ते आता तज्ज्ञ झाले आहेत. नंतर त्यांच्यातील काही म्हणतात, की आता आम्ही एवढे 'महान' झालो आहोत, की मीठ-पाण्यात पाय बुडवण्याची कसलीही गरज नाही किंवा ध्यान करण्याची गरज नाही. अशा प्रकारचे पण काही लोक आहेत. आणि असे काही आहेत जे म्हणतात की, 'पाप आम्हाला कधीच स्पर्श करू शकणार नाही, आता आम्ही सहजयोगी आहोत. आम्ही फार महान उत्क्रांतीत आलो आहोत .' परंतु सर्वांमध्ये वाईट ते आहेत, की जे केवळ माझे नाव घेतात नि म्हणत असतात, 'आईने सांगितले आहे आणि मी तुम्हाला सांगतोय कारण आईने तसे सांगितले आहे.' जेव्हा मी ती बाब कधीच सांगितलेली नसते. ते सर्व असत्य असते. आता काही लोक आहेत की ते सहजयोगाचा पैसा वापरतात आणि सहजयोगाचा अयोग्य फायदा घेतात. कधी कधी सहजयोगी मंडळींचादेखील. आणि असे लोक फार अपवित्र बनतात. कुणी एक जो अशा गोष्टींचा प्रयत्न करतो, तो सहजयोगाबाहेर जाईल. कुणीही अशा व्यक्तीजवळ कधीच जाता कामा नये, अशा व्यक्तीजवळ काहीही संबंध ठेवू नये आणि अनुकंपाही असू नये. कारण ही अपवित्रता कुणालाही कितीही प्रमाणात नुकसान देऊ शकते. अशा १३ 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-13.txt निर्विचारीतेच्या जाणिवेत तुम्हाला कुणीही स्पर्श करू शकृणार नाही. ती आहे तुमची तटबंदी असलेली जागा. व्यक्तीपासून दूर रहाणे चांगले. जेव्हा ह्या एकादश रुद्रांची एखाद्या व्यक्तीमध्ये वाढ होते तेव्हा निश्चितच अशा व्यक्तीला कँसरसारखे रोग होतात आणि बरे न होणारे भयानक रोग! खास करून जेव्हा अकरावा रुद्र, जो खरोखर येथे आहे, जे विराटाचे चक्र आहे, जी सामूहिकता आहे, जेव्हा त्यावर परिणाम घडून येतो, तेव्हा अशी व्यक्ती ह्या रोगातून बाहेर पडू शकत नाही. परंतु जर ह्या पैकी पाच मूलाधाराशी किंवा आज्ञेशी एकत्र आले तर त्यांना गंभीर स्वरुपाचा घाणेरडा रोग होतो. म्हणून मी नेहमीच सांगते, की तुमच्या आज्ञा चक्राबद्दल काळजी घ्या. कारण सर्वात वाईट गोष्टींपैकी ती एक आहे, की एकदा ह्या एकादशासह किंवा एकादशाच्या एखाद्या अंशाबरोबर देखील ते चक्र एकत्रित होऊ लागले, तर त्या व्यक्तीला काहीही घडू शकते, तो भयानक अपघातात सापडू शकतो, त्याला कुणाकडून मार पडेल (तडाका हाणला जाईल), कुणाकडूनही खून केला जाईल. ज्याला उजवी आज्ञा आहे आणि उजव्या किंवा डाव्या एकादशांपैकी कोणताही एक रुद्र आहे, अशा व्यक्तीला काहीही होऊ शकेल. त्याचा अर्थ असा की, या पैकी पाच, पाचांपैकी कोणताही एक, जर ते आज्ञा चक्राशी एकत्र आले, तर ईश्वराची संरक्षण शक्ती कमीत कमी असते. म्हणून आज्ञा चक्र स्वच्छ ठेवण्यासाठी हे पहा, आता मी बोलत आहे, तुम्ही मला सातत्याने जागरुकतेने पहावे म्हणजे निर्विचारितेची जाणीव होईल आणि आज्ञा चक्र शांत, थंड होईल. निर्विचारीतेच्या जाणिवेत तुम्हाला कुणीही स्पर्श करू शकणार नाही. ती आहे तुमची तटबंदी असलेली जागा. ध्यानाने तुम्ही निर्विचारीतेची जाणीव प्रस्थापित केली पाहिजे. तुम्ही उच्चपदी उन्नती करत आहात याची ती खूण आहे. खूप लोक ध्यान करीत नाहीत आणि म्हणतात, 'ठीक आहे, आम्ही करत आहोत.' यांत्रिक पद्धतीने ते करतात व म्हणतात 'मी हे केले आणि मी ते केले' परंतु तुम्ही निर्विचारीतेची जाणीव कमीत कमी संपादन केलीत कां? तुमच्या चैतन्य लहरी तुमच्या हातातून येताना तुम्हाला जाणवल्या का? नाहीतर, तुम्ही जर यांत्रिक वृत्तीने काही करत आहात तर ते उपयोगी पडणार नाही. तुम्हालाही किंवा कुणालाही उपयोगी नाही. म्हणून आत्मसाक्षात्कारानंतर, जसे तुम्ही पुष्कळच संरक्षित आहात, तुम्हाला सर्व आशीर्वाद आणि उज्ज्वल भविष्यकाळ आहे, तसेच तुम्हाला पूर्ण नाशाचासुद्धा संभव आहे. मी दोन गोष्टीतले साम्य सांगण्यासाठी सांगते, तुम्ही चढत आहात आणि प्रत्येकजण तुम्हाला चढण्यासाठी आधार देत आहे. तुमचा हात पकडत आहे आणि वर घेण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत, की ज्यांनी तुमचे रक्षण केले जात आहे. चुकीनेदेखील खाली पडण्याची शक्यता नाही. परंतु तुम्ही सत्याची आणि प्रेमाची तुमची बंधने दूर करण्याचा सतत प्रयत्न केलात आणि सातत्याने त्या लोकांना, जे तुम्हाला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत-त्यांना हाणण्याचा प्रयत्न केलात तर मोठ्या उंचीवरून खाली पडाल. मला असे सांगायचे आहे, जेवढी उंच उन्नती होते, तेवढे अधिक खाली पडता. फार मोठ्या जोरानेदेखील आणि अधिकाधिक खोल! प्रत्येक प्रयत्न हा परमेश्वरनिर्मित असतो. प्रत्येक आधार तुम्हाला दिला जातो. प्रत्येक काळजी घेतली जाते हे असूनसुद्धा जर तुम्हाला पडायचेच आहे आणि अशा त्या उंचीवरून तर ते फार धोकादायक आहे. १४ 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-14.txt ी े ली भाी AT हु आ ार ाी या कुणी एक, सहजयोगात असूनदेखील सहजयोगाच्या उद्दिष्टाला नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळी, अशा विशेषवेळी एकादश रुद्र तुम्हाला अगदी इतका गंभीरपणे फटका देतात, की तो हल्ला फार दूरवर पसरतो. जर त्या कुटुंबातील काही लोक सहजयोगाचे कार्य करत असतील तर सर्व कुटुंबाचे संरक्षण होऊ शकते. परंतु जर कुटुंब सदासर्वकाळ सहजयोग्यांच्या विरुद्ध असेल आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पूर्णपणे विनाश होईल, अगदी वाईट रीतीने. आता हे एकादश रुद्र, मी सांगितल्याप्रमाणे भवसागरातून येतात म्हणजे आम्ही म्हणू शकतो, की त्याचा विध्वंसकतेचा भाग हा मुख्यत: भवसागरातून येतो. परंतु या शक्ती आहेत. सर्व एकाच व्यक्तीत ते म्हणजे महाविष्णुमध्ये दिलेल्या आहेत. तेच श्री भगवान येशू ख्रिस्त आहेत. कारण ते साऱ्या विश्वाचा आधार आहेत. ते ॐकारचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ते मनुष्य स्वरूपातील चैतन्य लहरींचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. म्हणून जेव्हा ते क्रोधी होतात, तेव्हा सारे विश्व भंग पावण्यास सुरुवात होते. आईची शक्ती, जी प्रत्येक अणूत, प्रत्येक रेणूत, प्रत्येक मानवात, प्रत्येक गोष्टीत, जी सजीव व निर्जीव आहे, त्यात प्रवेश करून पसरते. त्या शक्तीचे ते स्वरूप होऊन राहतात. एकदा का ते भंग केले गेले, तर सर्व गोष्टच संकटात लोटली जाते. म्हणून श्री येशूना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे आहे. आता पहा, श्री येशूंना तुम्ही लहान मुलांप्रमाणे असले पाहिजे. तीच आहे निष्पापता, हृदयाची शुद्धता हाच सुंदर मार्ग आहे, की ज्याने तुम्ही त्याला प्रसन्न करू शकता. १५ ० 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-15.txt 2० ा लि ऋतंभरा प्रज्ञा लॉजहिज सेमिनार, २३.७.१९८३ पन 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-16.txt जगाच्या निरनिराळ्या भागातून तुम्ही सर्वजण ह्या ठिकाणी आलेले बघून मला अतिशय आनंद होत आहे. तेव्हा प्रेमाने हृदय इतके भरून येते, की शब्द त्याची तीव्रता व्यक्त करण्यास अपुरे पडतात. तुमच्या हृदयात याची तीव्रता समजावयास पाहिजे. ह्या अशा सुंदर नैसर्गिक वातावरणांत आपण एकत्र भेटतो आहोत, यात मला वाटतं अशी परमेश्वराची व्यवस्था आहे, की यावेळी काहीतरी वेगळं मोठे घडावयाचं आहे. ह्यावेळी आपण काही तरी फार मोठ मिळवलं पाहिजे, आता वेळ थोडा आहे. तेव्हा मी तुम्हाला ध्यानाबद्दल काही गोष्टी सांगते व त्यानंतर मला वाटतं आणखी दोन भाषणे होतील. 'मेडिटेशन' हा एक सर्वसाधारण शब्द आहे. ध्यानामध्ये ज्या तीन पायऱ्या आहेत त्या शब्दांतून स्पष्ट होत नाहीत. परंतु संस्कृत भाषेत तुम्ही ध्यानात कसे जायचे ह्या संबंधी स्पष्टपणे सांगितले आहे. प्रथम ध्यान म्हटलं आहे, दुसरी धारणा सांगितली आहे व तिसरी समाधी. सुदैवाने सहजयोग असा आहे, की तुम्हाला या सर्व गोष्टी एकत्र एका बंडल मध्ये मिळतात. तुम्ही बाकी सर्व वगळून समाधीत जाता आणि हेच त्यातील सौंदर्य आहे. प्रथम ध्यान घ्या. प्रथमत: तुम्ही जेव्हा साधक असता तेव्हा तुम्ही पूजा करता त्यावर तुमचे चित्त ठेवता, त्याला ध्यान म्हणतात. आणि धारणा म्हणजे तुम्ही केलेले सतत प्रयत्न. तुमचे चित्त सर्व प्रथम त्यावरच केंद्रित करणे. परंतु जे लोक जागृत नाहीत त्यांच्याकरिता हे केवळ नाटक ठरतं. ते केवळ फक्त अभिनय करत असतात. परंतु जागृत व्यक्तीसाठी ते सत्य आहे. ज्याची तेव्हा प्रथम तुम्हाला ध्यान केलं पाहिजे. कुणी मूर्तीचे ध्यान करतात तर कुणी अमूर्ताचे करतात. परंतु तुम्ही इतके नशीबवान आहांत की अमूर्त सुद्धा तुमच्यासमोर प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात आले आहेत. तुम्ही आता मूर्ताकडून अमूर्ताकडे किंवा अमूर्ताकडून मूर्तता हे सर्वच येथे आहे, एका बंडलमध्ये , तेव्हा तुम्ही काही देवतेवर एकाग्रता करता किंवा त्यासंबंधी विचार करता किंवा काही ठिकाणी निराकार की जो अमूर्त स्वरूपात करतात किंवा सर्वस्वी निराकारावर चित्त एकाग्र करतात. जोपर्यंत तुम्ही जागृत नाहीत तोपर्यंत सर्व बुद्धीचा खेळ आहे. परंतु एकदा का तुम्ही जागृत झालात, की तुम्ही ज्याचे ध्यान करणार आहात त्याचा फक्त विचार करता. पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर ध्यान करता तेव्हा तुमचं चित्त विचलित होत असतं. ते जागृती नंतरही शक्य आहे. ते एका बंडलमध्ये आहे. तरीसुद्धा काही लोक ते काही थोडे थोडे करीत घेतात, तेव्हा जरी तुम्ही ध्यान करता तरी तुमचे चित्त घटकेघटकेला विचलित होत असतं. तेव्हा तुम्ही किती एकाग्रचित्त होऊ शकता त्याच्यावर ते अवलंबून असतं. तेव्हा मी काही असे सहजयोगी पाहिलेत, की काही स्वयंपाक करतात तर काही ध्यान करतात तेव्हा ध्यान करणारा म्हणतो, की काहीतरी जळण्याचा मला वास येतो आहे. तेव्हा अशा ठिकाणी धारणा नसते. धार याचा अर्थ प्रवाह. प्रवाह थांबल्यास त्या ठिकाणी धारणा नाही. ध्यान आहे पण धारणा नाही. ह्यातील दुसरा भाग फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला तुमचं चित्त सतत तुमच्या देवतेवर ठेवावयास पाहिजे. तेव्हा तुम्ही एक स्थिती मिळविता की ज्याला धारणा म्हणतात, की ज्यात तुमचं चित्त त्या देवतेशी एक होतं आणि जेव्हा हे परिपक्व होतं तेव्हा तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त होते. आता ज्या लोकांना असं वाटतं की जागृतीशिवाय ते हे कसं करू शकतात तर ते पूर्णतया चूक परंतु जागृती नंतर जेव्हा तुमची धारणा प्रस्थापित होते तेव्हा तुम्हाला अशा अवस्थेत जावे लागते, की आहे. १७ कु आल 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-17.txt ऋतंभरा हे निसर्गाचे नांव आहे आणि एखाद्याला तो निसर्ग प्रकाशित जालेला जाणवतो. ज्यामध्ये तुमची समाधी लागेल. आता ही अवस्था काय आहे ? जेव्हा तुम्ही या अवस्थेत असता तेव्हा तुम्ही जे काही करता, तुम्ही ज्या देवतेला पूजता ते दैवत तुम्ही तुमच्या कामात बघता. तुम्ही असं म्हणू शकता, की जे काही तुम्ही बघता तुम्हाला तुमचे दैवतच ते करत आहे असं दिसतं. तुम्ही जे काही ऐकता, तुम्हाला तुमचे दैवतच सत्य सांगत आहे असं वाटतं. जे काही तुम्ही वाचतां त्यात तुम्हाला दिसेल, की तुमच्या देवतेनेच तुम्हाला सांगितले. तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी, नाकांनी आणि इतर सर्व अवयवांनी जे काही कराल ते सर्व काही तुम्ही ज्या दैवताची पूजा करता त्याच देवतेचं दर्शन तुम्हाला आपोआप घडतं. तुम्हाला आता, मला एकाग्रता करावयाची आहे असा विचार करावयास नको, आता मला हा विचार नको, मला आता हा विचार करायला पाहिजे, हे सर्व काही आपोआप घडते , तुम्ही एखादं पुस्तक वाचाल आणि तुम्हाला त्यात सहजयोगासाठी काय चांगलं ते सापडतं. जर परमेश्वराविरुद्ध लिखाण केलेलं पुस्तक असेल तर ते तुम्ही टाकून द्याल, जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील ते असं समजा, की त्या तुम्हाला काही धडा शिकविण्याकरिता घडलेल्या आहेत, 'मला काही अनुभव शिकविण्याकरिता' हा सर्व त्या दैवताच्या अनुभूतीची प्रचीती आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला गर्भपात होत आहे असे वाटते तेव्हा एक व्यक्ती की जी समाधी अवस्थेला गेली नाही, किंवा सवयीचा गुलाम आहे ती म्हणेल, 'मी माताजीसाठी एवढं केलं, मी इतक्या लांब गेले आणि असं असूनसुद्धा ही अडचण मला आली, पण दुसरा म्हणेल की 'ठीक आहे मला प्रयत्न करून बघू दे, मी जाऊन माताजींच्या फोटोसमोर सांगेन किंवा टेलिफोन करेन' आणि त्याला असे आश्चर्य दिसेल की ते सर्व काही झालेले आहे आणि एकदम योग्य असेच. तुम्ही जर जागृत असलात तरच या गोष्टी शक्य आहेत. अन्यथा नाही. तेव्हा ही जी अवस्था तुमच्यात जागृत झाली आहे ही एक नवीन स्थिती आहे. संस्कृतमध्ये तिला सुंदर नांव आहे फार कठीण नांव आहे 'ऋतंभरा प्रज्ञा' ऋतंभरा हे निसर्गाचे नांव आहे आणि एखाद्याला तो निसर्ग प्रकाशित झालेला जाणवतो. मी तुम्हाला एक उदाहरण देते, ज्यावेळी मूल जन्माला येत असतं, त्यावेळी त्याच्या आईला आपोआप दुध येते. निसर्ग मुलांच्या जन्माकरिता आपोआप कार्यान्वित होत असतो. त्याचप्रमाणे फक्त सहजयोगाच्या ठिकाणी ही ऋतंभरा प्रज्ञा जेव्हा कार्यरत होते तेव्हा काम कसं चटकन घडतं हे बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आता वेळ थोडा आहे. पण मी तुम्हाला एक उदाहरण देते. मी ब्रायटनला आले आणि जॉन्सन म्हणाला, 'माताजी, ब्रायटनमध्ये गुरुपूजा करू या. म्हटलं, 'ठीक आहे, करा. परंतु जागा शोधून काढा.' तेव्हा तो युनिव्हर्सिटीत गेला, म्हणाला, युनिव्हर्सिटीचे लोक मदत करतील परंतु जागा लहान आहे आणि मी म्हणाले, 'परंतु त्यांना विचारून तर बघा.' मग तो म्हणाला, 'नाही ती जागा गुरुपूजेच्या दिवशी रिकामी नाही.' मग मी म्हणाले, 'तुम्ही काय करू शकता ?' तो म्हणाला, 'माताजी, आता काय करायचं?' मी म्हणाले, 'दूसरे कुठेतरी आत्ताच्या आत्ता ' मी की १८ ० -ा ॐी मं 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-18.txt आपण आपली उन्नती केली पाहिजे. पातळी उंचावली पाहिजे. रि प्रयत्न करा. फोनवर कुणाला तरी विचारा.' नंतर त्यांनी जाऊन त्यांना फोन केला. आणि त्यांनी सांगितलं, की आमच्याकडे जागा आहे, फारच चांगली जागा आहे आणि तुम्ही ताबडतोब या. जेवायलाच या. लगेच तेथे गेला. त्याने तेथे उत्कृष्ट जेवण केले. ते सर्वजण खूप खुष होते. ते सर्वांनाच जागा देणार होते. ते फारच चांगले लोक होते आणि ह्या सर्व गोष्टी इतक्या चांगल्या रीतीने कशा घडल्या याचे त्याला आश्चर्य वाटले. तो तेव्हा ऋतंभरा प्रज्ञा ही तुमच्या मदतीसाठी कार्यान्वित होत असते. तुम्ही सर्व मला सांगता, की माताजी, हे आश्चर्य घडले ते घडलं आणि आम्हाला समजलं नाही, की ते कसं घडलं. मी एक तुम्हाला उदाहरण देते. काल आम्ही काहीतरी सिमेंटचे काम करीत होतो. तेव्हा इटालियन मुलगा म्हणाला, आपल्याला दोन पिशव्या सिमेंट लागेल. मी म्हणाले, 'तू काम चालू ठेव. ते संपणार नाही.' मी जाण्याच्या अगोदरसुद्धा ते काम चालू होतं आणि सिमेंट संपलं नव्हतं. आता बघा एवढी सिमेंटसारखी गोष्ट. तेव्हा ही एक विशेष गोष्ट आहे, की निसर्ग तुमच्याशी एकरूप झाला व तुम्ही निसर्गाशी एकरूप की झालात तेव्हा या दैवी शक्तीचे प्रेम, संरक्षण आणि तुमच्या प्रती चित्त ह्या काही घटना घडतात ज्यात परिस्थिती निर्माण होते त्यातून प्रदर्शित होतं आणि ह्याला अंत नाही. जे फक्त घडत असतं पण लोकांना ते कसं घडतं हे समजत नाही. पण तीच समाधीची स्थिती आहे. परंतु असे लोक असतील, की मी जर त्यांना विचारलं की तुम्ही हे कराल का? ते म्हणतील 'माताजी, आता दुकानं बंद झाली असतील.' ते काही बरोबर नाही. ते करणार नाही अशा तऱ्हेने ते सांगत राहतील. आणि काही असेही लोक आहेत, की ते म्हणतील 'नाही, मला बघू द्या. जर माताजी म्हणत आहेत तर ते होईलच.' मी आता अगदी साधे उदाहरण देते, फारच बाह्यातले आहे पण ते सत्य आहे. श्री. श्रीवास्तव हे काही विशिष्ट प्रकारचा चहा घेतात. फारच इंग्लिश आणि त्यांना दुसरा चहा आवडत नाही. तेव्हा ते म्हणाले, 'अरे बापरे! आपला चहा संपला. आणि उद्या सकाळी काय करायचे.' तेव्हा मी म्हणाले, 'ठीक आहे. चला आपण चहाच्या दुकानात जाऊ.' तेव्हा ते म्हणाले, 'आता रात्रीचे आठ वाजले आहेत. ते सर्व आपल्याला हसतील व आता रात्री आठ वाजता कुठलेही टी सेंटरचे दुकान उघडे नसेल.' मी म्हणाले, 'बघू तर जाऊन. त्यात अडचण काय आहे. मी म्हणते चला जाऊ या.' परंतु ते म्हणाले, 'काय विचित्र गोष्ट तुम्ही सांगत आहात.' मी म्हणाले, 'ठीक आहे. विचित्र किंवा काहीही असो. चला तर खरं.' परंतु ते ऐकेनात. तेव्हा मी ड्रायव्हरला सांगितले, 'चला, आपण तिकडे गाडीने जाऊया.' आम्ही तेथे गेलो आणि सर्व दिवे लागलेले होते. आम्ही म्हणालो, 'हे सर्व दिवे कसे लागलेले आहेत ?' तेव्हा आम्ही आत गेलो, फारच ओशाळलेले आणि ते सर्वजण उभे होते. 'आम्ही सर्वजण आपल्यासाठी केव्हाची वाट पाहत आहोत आणि तुम्ही सर्वात शेवटी आलात.' पहा कल्पना करा. तेव्हा मी माझ्या पतीना विचारले, ते १९ ७ आते 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-19.txt वाo म्हणाले, 'मी विसरलो आपल्याला आज येथे स्वागत समारंभ होता.' आणि ते म्हणाले, 'तुम्ही सर्वात शेवटी आलात.' आणि म्हणाले, 'काही हरकत नाही. तुम्ही तुमचे प्रेझेन्ट्स घ्या.' तेव्हा त्यांनी प्रत्येकी दोन चहाचे डबे प्रेझेंट दिले. माझा म्हणण्याचा अर्थ असा, की अशी हजारो उदाहरणे देता येतील. आजच कुणीतरी पलंग सरकविण्याचा प्रयत्न करीत होते. तिघेजण प्रयत्न करीत होते. मी म्हणाले, 'ठीक आहे, मी सरकवते.' 'मी फक्त माझी नाभी तेथे लावली, मी काही ढकलले नाही. ते असंच पुढे सरकलं ते केवळ ऋतंभरा प्रज्ञेमुळे. परंतु हा काही चमत्कार नाही. हे ईश्वराचे तुमच्यावरील प्रेम प्रदर्शित करणे, तुम्हाला, तुम्ही कोणी खास निवडलेले आहात, हे दाखविण्यासाठी आहे. परंतु ही परिस्थिती तुम्ही मान्य केली पाहिजे. पण तुम्ही जर सर्वसाधारण लोकांसारखे वागलात, की 'अरे देवा, दकाने बंद असतील. तो माणूस किती विचित्र आहे. मला वाटत नाही की ते काम होईल.' तेव्हा ते कधीच होणार नाही. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे, की निराकार व साकार मी अशा तुम्हाला जन्म दिलेला आहे. तुम्ही निवडलेले साधुसंत आहांत तेव्हा ही प्रज्ञा प्रदर्शित होत असते. प्रत्येक क्षणाला प्रदर्शित होत असते. तुम्ही तयारीत रहा, आनंदी रहा आणि तिचं स्वागत करा आणि विश्वास ठेवा, की तुम्ही जिथं आहात त्याची पातळी वेगळी आहे. आता वेळ झालेली आहे, की सहजयोग्याने आपली पातळी बदलली पाहिजे. आपण बदललं पाहिजे. आपण आपली उन्नती केली पाहिजे. पातळी उंचावली पाहिजे. परंतु सहजयोग असं काही मिश्रीत आहे, की एकाच प्लेटवर आपल्याकडे अत्यंत खराब अशा भूतापासून अगदी वरच्या दर्जाचे लोक आहेत. आता काही जण गेले आहेत. फार अहंकारी आहेत. ते सारखे गडगडत असतात. आपल्याला समजत नाही, की ही प्लेट उंचावयाची कशी? जर तुम्ही ती प्लेट उंचावली तर ते गडगडत खाली येतील. तेव्हा तुम्ही घाबरलेले आहात. तुम्हाला त्यांना धरून ठेवलं पाहिजे आणि काही असे आहेत, की ते चौरस आहेत व दुसर्याच्या समस्या भुताप्रमाणे आपल्या डोक्यावर घेतात. जर तुम्ही त्यांची उन्नती करण्याचा प्रयत्न कराल तर ते खाली घसरत येतील किंवा सर्व भूते पडतील. तुम्ही ज्या उंचीवर त्यांना न्याल तेथेच ते टिकून राहतील. तेव्हा जे लोक अजून काठावर आहेत ते मला नक्कीच त्रासदायक आहेत. कारण माझ्या प्रेमामुळे मी त्यांना बाहेर फेकू शकत नाही आणि आपल्याला त्यांना मदत करावयास पाहिजे. त्यांची उन्नती करावयास पाहिजे. खरे पाहतां त्यांना त्यातून बाहेर यावयास पाहिजे. आपण त्यांच्यासाठी किती वाट पहायची. प्रत्येकानी बघितलं पाहिजे, की जे काठावर आहेत त्यांना नीटपणे आत आणलं पाहिजे. म्हणजे ते सहजयोगातून बाहेर जाणार नाहीत. जिव्हाळा ठीक आहे. पण आपली सहजयोगाची पातळी खाली करून चालणार नाही. कधीच नाही. जे लोक सहजयोगात चांगले प्रस्थापित झाले आहेत त्यांची पातळी उंचावयास पाहिजे. तेव्हा प्रत्येकाने किमान पातळीपर्यंत येण्याचे व स्थिर करण्याचे प्रयत्न करावे. नाहीतर मला सांगण्यास खेद वाटतो, की ते चाळणीतून गळले जातील. धन्यवाद! २० वु 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-20.txt भौतिक चिकित्सा आणि हृदय रोग जेव्हा चैतन्य लहरी वाहतात तेव्हा शरीरातील पेशींना त्या आराम देतात. ताण-तणावांमुळे पेशी आखडतात. उदा.डावी विशुद्धी किंवा इतर कोणत्याही चक्रांमधील ताणामुळे पाठीच्या कण्यातील हाडांचे आखडणे सुरू होते. जेव्हा तुम्ही तुमची चक्रं मला समर्पित करता तेव्हा ती सुखद अवस्थेमध्ये येतात आणि त्यावेळेस चैतन्य लहरी देऊन तुम्ही ती ठीक करू शकता. या चैतन्य लहरी तुम्ही दुसर्यांनाही देऊ शकता. त्यासाठी दुसर्या व्यक्तीला स्पर्श करायची आवश्यकता नाही. मंत्राचा उपयोग करून दरूनच हाताने दूसर्या व्यक्तीला चैतन्य लहरी द्या. डाव्या बाजूच्या आजारात (मानसिक) तुम्ही सामूहिक अवचेतनेत जाता, जिथे 'प्रोटीन ५२' विषाणू एकत्रित केले जातात. यामुळे बऱ्याचदा अशी स्थिती निर्माण होते, की व्यक्तीचा नाइलाज होतो. ज्या लोकांचे यकृत खराब आहे किंवा ज्यांनी यकृताचा दुरुपयोग केला आहे त्यांना ताप येऊ शकतो. गरम यकृताला बर्फ लावून ठीक करता येते. मलेरिया हा देखील उजव्या बाजूचा आजार आहे. बॅक्टेरियाद्वारे झालेले आजार डाव्या बाजूचे रोग आहेत. हे विशेषकरून मशरूम्स, जुने पनीर अशाप्रकारचे पदार्थ खाल्ल्यामुळे होतात. मधुमेह डाव्या बाजूच्या बाधेने प्रभावित उजव्या बाजूच्या प्रतिक्रियेमुळे होतो. शरीराची उजवी बाजू संवेदनशील असते. जेंव्हा तुम्ही अती विचार करता, आपल्या या सवयीमध्ये अडकता तेंव्हा तुमच्या आत भीती उत्पन्न होते, जी तुम्हाला जास्त दुर्बल बनवते. परिश्रम करणारी व्यक्ती जेंव्हा खूप विचार करते तेंव्हा त्याच्यातील चरबीच्या कणांचा उपयोग मेंदूला व्यस्त राहण्याने डावी बाजू उपेक्षित राहते. त्याची शक्ती कमी कमी होत गेल्याने ते मानसिक रोगाचे कारण बनते. अशा परिस्थितीत जर तुमच्यामध्ये भीती उत्पन्न झाली किंवा कोणतीही दोषाची भावना निर्माण झाली तर मधुमेह होऊ शकतो. याला ठीक करण्यासाठी 'अली ' चा मंत्र लाभकारी आहे. स्वाधिष्ठान व डावे नाभी चक्र याचे स्रोत आहेत. पत्नीच्या काळजीमुळे किंवा तिच्यासाठी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची चिंता करण्यामुळे डाव्या नाभीवर परिणाम होतो, अशा परिस्थितीत मधुमेह होऊ शकतो. आपल्या आज्ञा चक्राला साफ करून हे ठीक करा. जास्त विचार करू नका. निर्विचार चेतनेत रहा. डावी बाजू उचलून उजवीकडे टाका. जास्त साखर बाहेर टाकण्याच्या क्रियेला संतुलित करण्यासाठी मिठाचा उपयोग वाढवा कारण मिठात स्वच्छताकारक पाणी असते. उजवी नाभी आणि स्वाधिष्ठानवर शक्ती पोहोचवण्यासाठी होतो. या कार्यासाठी स्वाधिष्ठान कार्यरत असते आणि त्याच्या या बाजूला बर्फ ठेवा आणि उपयुक्त परीक्षणानंतर साखरेचा उपयोग बंद करा. हृदय रोग सर्वात जास्त कार्यरत आणि शिथिल हृदय आक्रमक लोकांमध्ये हृदय जास्त कार्यरत असते. अशा परिस्थितीत हार्ट अॅटॅक येऊ शकतो. हा अॅटॅक लहान वयातही येऊ शकतो. चित्त जास्त बाहेर असणे हे एक त्याचे कारण आहे. जास्त भौतिक दृष्टिकोन ठेवल्यास (हैC. २१ (2हलट 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-21.txt बu400 परी आत्म्याकडे त्यांचे लक्ष नसते आणि शेवटी आत्मा त्यांचा त्याग करतो. भविष्यविषयक आणि परिवाराची जास्त चिंता, काळजी करण्यानेही व्यक्ती जास्त क्रियाशील होते, ज्यामुळे हृदयाला रक्ताभिसरणासाठी जास्त श्रम करावे लागतात. त्यामुळे ते थकते. अधिक प्रमाणात मंत्र इ. चा जप करणारे, तंबाखू, सिगरेट पिणारे लोक पहिले आपली डावी विशुद्धी खराब करतात. जेणेकरून हृदयाला रक्ताभिसरण करण्यात अडचण निर्माण होते आणि हृदय थकते. डाव्या विशुद्धीमुळे शिथिल हृदय 'अंजायना' चे कारण होऊ शकते. हार्ट अॅटॅक दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारच्या समस्येत पोट आणि हृदयाच्या उजव्या बाजूला बर्फ ठेऊन ठीक करता येते. यासाठी डाव्याला उचलून उजव्यावर ही टाकता येते. 'पाणी-पाद' क्रिया ही लाभकारी आहे. उजव्या बाजूच्या समस्येसाठी 'मेणबत्ती (कँडल) उपचार' (अग्नितत्त्व) करू नये. दिवे घालवून झोपावे आणि जास्तीत जास्त घरातच राहून पूर्ण आराम करावा. उजवा हात डाव्या हृदयावर ठेऊन म्हणावे, 'श्रीमाताजी, मी आत्मा आहे, कृपा करून मला क्षमा करा.' शिथिल हृदयाच्या समस्येत रोगी म्हणू शकतो की, 'श्रीमाताजी, तुम्हीच माझे बीज मंत्र आहात, तुम्हीच मंत्रिका आहात. तसेच 'मी निर्दोष आहे.' आणि 'श्रीमाताजी मी सर्वांना क्षमा करतो.' डावी बाजू शुद्ध करण्यासाठी अग्नितत्वाचा उपयोग (): करा. प.पू.श्रीमाताजी आणि डॉ.तलवार यांच्यात झालेला वार्तालाप ह) २२ 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-22.txt स्वः चा अर्थ आहे आत्मा आणि आत्म्याचे राज्य येणे म्हणजेच स्वराज्य आहे. स्वातंत्र्याचा अर्थ आहे परत तेच आत्म्याचे तंत्र म्हणजे आत्म्याची एक पद्धत. प.पू.श्री माताजी निर्मलादेवी, ५.१२.९९ प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा.लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in रन 2010_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-23.txt ा। काभ का ा ार जर आपणे फुलीली विचाटले की त्याला काय पाहिजे? तर ते की, मला कोणतेही ो, शुज्य न महणेल मला दसरे काही नको. ज्या मार्गावरुन आदिशक्ती जाणए त्यी में मली टीकी. प.पू. श्री माताजी निर्मला देी के