चैतन्य लहरी सप्टेंबर-ऑक्टोबर २०१० मराठी का जि र प । Happy Vijay ० a Dasami ८६७ या अंकात श्री गणेश ब्रह्मपुरी पूजा ...... श्री गौरी .१५ श्री शक्ती पूजा १६ IT टीप : मागील अंकात नजरचुकीने ब्रह्मपुरी पूजेऐवजी 'एकादश रुद्र' पूजा पुनर्मुद्रित झाली आहे, या अंकात 'ब्रह्मपुरी पूजा' प्रवचन देत आहोत. तरी याप्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. ১ স স म सपभ ॐ आता है चरण पहा... तुम्हाला पूर्ण विश्व दिसतं का? मला माहीत नाही, मला तिथे दिसतं. 02১৮/6/১b श्री गणेशाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे कारण तेच तुमची प्रगती करतात, तुमची चक्रे शुद्ध करतात, त्यात प्रकाश टाकतात आणि नेहमी प्रकाशाच्या दिशेनेच नेतात. जी सूक्ष्मता तुम्ही सहजयोगात प्राप्त केली आहे, ते गणेशाचेच काम आहे. .ज्याप्रकारे मी गणेशाला बनवले आहे, त्याचप्रकारे तुम्हालाही आत्मसाक्षात्कार देऊन मी बनवले आहे, त्यात काही बदल नाही. एकाच प्रकारे, एकाच तऱहेने बनवले आहे. तुमच्यामध्ये जर भोळेपणा, साधेपणा, सरळपणा आणि विश्वास असेल तर अशा निर्मळ अंत:करणाने श्री गणेशाची जागृती होऊ शकते. जे सहजयोग करतात त्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला निराकारात उतरायचे आहे. साकार स्वरूपात राहून तुम्हाला निराकाराचे पूर्ण माध्यम बनायचे आहे, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्यामधील गणेशाला जागृत करायचे आहे. फक्त पूजा करून नाही, तर त्याला जागृत करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्यामध्ये शुद्धता यायला पाहिजे. .....श्री गणेशाप्रमाणेच मनुष्यालाही आपले चित्त स्वच्छ करायला पाहिजे. चित्त स्वच्छ करण्यासाठी प्रथम हे पाहिले पाहिजे की आपले चित्त कुठे आहे ? जर तुमचे चित्त परमेश्वराकडे असेल तर ते शुद्ध आहे कारण तुमच्यामधे चैतन्य वाहत आहे. ...श्री गणेशाची शक्ती जर आपल्यामध्ये जागृत करायची असेल तर सर्वात आधी हे जाणून घेतले पाहिजे की आपले चित्त निराकाराकडे असले पाहिजे, आपले चित्त चैतन्याकडे असले पाहिजे आणि जे चैतन्य आपल्यामध्ये वाहते आहे त्याकडे बधितले पाहिजे. आपल्यामध्ये गंभीरता, जी श्री गणेशाची शक्ती आहे, ते गांभीर्य आणा......आपण गौरी मातेच्या मदतीने तिच्या शक्तीबरोबर त्या निराकारात उतरा जिथे आपण पूर्ण आनंदात राहू आणि आपल्या नसानसांमधून ती शक्ती अशी वाहील की संपूर्ण जगातील लोकांना कळेल की सहजयोगाने काय चमत्कार केला आहे. प.पू.श्री माताजी, १८-९-८८, मुंबई, चै.ल.खंड ५ अंक ९-१०, १९९३ .सहजयोग्याला पूर्ण तन्हेने, हृदयापासून मानावे लागेल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की श्री गणेशाचे स्थान तर आहे मूलाधार चक्रावर पण जेंव्हा ते तुमच्या हृदयात येतात तेंव्हाच ते आत्मस्वरूप होऊन चैतन्यमय होतात. आत्मा जो आहे तोच श्री गणेश आहे आणि तोच आपल्या हृदयात प्रकाश निर्माण करतो, तर तेच चैतन्य आहे. ज्याने श्री गणेशाला आपल्या हृदयात बसवले आहे तो नेहमी निरानंदात बुडून जातो, त्याला इतर कोणत्याही गोष्टींची पर्वा नसते आणि रिद्धी- सिद्धी सर्व त्याच्या पायापाशी.....श्री गणेश तत्त्व आज्ञा चक्राच्या पातळीवर येऊन सूक्ष्मातिसूक्ष्म होते. आज्ञा चक्रावर हे समजले जाते की आता त्याचे आध्यात्मिक पर्व आहे. प.पू.श्री माताजी, मुंबई, १८-९-१९८८ जसे मी सांगितले की कणाकणात श्री गणेशाचे वास्तव्य आहे, परंतु तुम्हाला ते जागृत करायचे आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास तुम्ही चैतन्यित पाणी पाहिले आहे. चैतन्याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा की पाण्यामध्ये गणेशतत्त्व जागृत केले जात आहे. असे पाणी जेव्हा तुमच्या पोटात जाते, डोळ्यात जाते किंवा तुम्ही इतरत्र कुठे टाकता तेंव्हा ते कार्य करते. ज्या गोष्टीत तुम्ही ते टाकता तिथे गणेशतत्त्व जागृत केले जाते. गणेश तत्त्व जागृत होऊन प्रत्येक गोष्ट समजून घेतो, त्याचे नियोजन करतो, ते क्रियाशील करतो. जेंव्हा तुम्ही बंधन देता तेंव्हा ते चैतन्याला गतीमान करते. पं.पू.श्री माताजी, ८.८.१९८९ ....श्री गणेश आपले सर्वात मोठे सहजयोगी आहेत. त्यांना कधी योग स्वीकारण्याची आवश्यकता पडली नाही. ते नेहमीच योगामध्येच असतात, ते आमचे महान योगी आहेत. त्यांच्यात देवतांचे महान पद प्राप्त करण्याची योग्यता आहे. मी तर म्हणेन, की आमचे महान देव आहेत आणि खरोखरच त्यांची पूजा केली पाहिजे. त्यांच्याद्वारे सर्व देवांची पूजा होते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ लागतात. प.पू.श्री माताजी, २५.९.१९९९ .यासाठी मनुष्याला सर्वात आधी प्रत्येक ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करावी लागते. प.पू.श्री माताजी, बेंगलोर, १३.२.१९९० ...प्रत्येक चतुर्थीला, जी पंधरवड्याच्या चौथ्या दिवशी असते, श्री गणेशाचा जन्मदिवस साजरा केला जातो. कृष्ण पक्षातील चतुर्थी जर मंगळवारी आली तर त्यास अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. या चतुर्थीचे खास महत्त्व असते. अंगारिका काय आहे? श्री गणेश जळणाऱ्या अंगाऱ्यांना थंड करतात. कुंडलिनी पण एक ज्वाळा आहे, त्याचे उत्थान धगधगणार्या ज्वाळेसारखे आहे. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण असते आणि त्यामुळे कोणतीही वरच्या दिशेने जाणारी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते, फक्त अग्नीच गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध दिशेने म्हणजेच वरच्या दिशेने जातो. श्री गणेश दोन प्रकाराने आपल्या आतील अग्नीला शांत करतात, ते कुंडलिनीला शांत करतात, एखाद्या व्यक्तीत असणाऱ्या सर्वप्रकारच्या वाईट गुणांव्यतिरिक्त ते कुंडलिनीकडे त्याच्या आत्मसाक्षात्कारासाठी प्रार्थना करतात. ते कुंडलिनीचे बालक आहेत आणि तुमच्यामध्ये तेच लहान मुलासारखे आहेत. या संबंधामुळे ते कुंडलिनीला समजवू शकतात की तुम्ही माझी आई आहात आणि कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करा. तेव्हा कुंडलिनी शांत राहून विचार करते की, 'माझ्या मुलाच्या इच्छेनुसार मी (कुंडलिनी) वर उठू.' श्री गणेश कुंडलिनीला सांगतात की, 'तुम्ही तुमच्या मुलाला जन्म देत आहात आणि यावेळी तुम्हाला क्रोधित व्हायचे नाही.' असे म्हणून ते कुंडलिनीला शांत करतात. .....कुंडलिनी श्री गणेशाच्या शक्तीद्वाराच उठते. कुंडलिनीमधून जे अंगारे उठतात ते थंड करण्याचे काम ही श्री गणेशच करीत असतात, एकप्रकारे ते आपल्या रागालाही शांत करीत असतात. ६ जेव्हा कोणी राक्षस किंवा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस तुम्हाला त्रास देतो तेंव्हा हे गणांचे स्वामी त्यांचा नाश करतात. तुम्हाला काही सांगावे किंवा करावे लागत नाही. हे गण तुमच्याबरोबर आहेत. प.पू.श्री माताजी, गणपतीपुळे, महाराष्ट्र, २१.११.१९९१ सहजयोग्यांकडे मोठे उत्तरदायित्व आहे की त्यांचे गणेश तत्त्व ठीक असले पाहिजे, याच्याशिवाय पूर्ण सहजयोग डळमळू शकतो. स्त्री किंवा पुरुष, दोघांनीही आपल्या जीवनशैलीत श्री गणेशाला सन्मानपूर्वक स्थान दिले पाहिजे. आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, की श्री गणेशाच्या आशीर्वादानेच आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. प.पू.श्री माताजी, २७.७.१९९३ ....आता तुम्ही विवेकाने कार्य करा कारण आता तुमच्यामध्ये श्री गणेश जागृत झालेले आहेत आणि ते पूर्णपणे विवेकशील आहेत, विवेकाचे दाता आहेत. हेच कारण आहे की ते राक्षसांचा नाश करतात. आपली चेतना विकसित करून तेच आपले सर्व कष्ट दूर करतात. .दिशेचे ज्ञान ही श्री गणेशाची देणगी आहे. श्री गणेश सर्वांच्या आत एका चुंबकाप्रमाणे असतात. आपल्यामधील हा चुंबक कपटी व्यक्तींना आपल्यापासून दूर पळवून निष्कपट आणि अबोध माणसांना आपल्याकडे आकर्षित करतात. निष्कपट बनण्याचा प्रयत्न करा. चतुरता आपल्यासाठी आवश्यक नाही. चातुर्य आपला मानसिक दृष्टिकोन आहे तसेच निष्पापपणा तुमचा अंतर्गत गुण आहे जो सर्वव्यापी शक्तीशी संबंधित आहे. प.पू.श्री माताजी, ऑस्ट्रेलिया, २६.८.१९९० श्री गणेशाची शक्ती आपल्यामध्ये आहे, तुम्हाला तिचा उपयोग करायचा आहे. आपल्या हृदयात श्री गणेशाकडे दया, करुणा तसेच क्षमा याची याचना करत त्यांची पूजा करा. चला, आपण सर्व आपला आधीचा ढोंगीपणा, बंधनं, वाईट विचार तसेच दोषपूर्ण जीवन काढून टाकू तसेच आपल्या निष्पाप वृत्तीला आपल्यामध्ये प्रवाहित होऊ द्या. चला, आपण या गुणाचे उद्घाटन करू या! श्री गणेशाचे अथर्वशीर्ष वाचू या तसेच श्री गणेशाचे ध्यान करू या. तुमच्या सर्व धरणी मातेवर बसून समस्यांचा शेवट होईल. प.पू.श्री माताजी, २६.०८.१९९० ब्रह्मपुरी पूजा १ ब्रह्मपुरी, ३० डिसेंबर १९८९ तुम्हांला एकाहून त्यांच्यापुढे तूम्ही म्हणजे काय, देदीप्यमान होऊ शकतां. एवढे मोठे सुधारक आणि एवढे मोठे महत्त्वाचे लोक तूम्ही होऊ शकतां पण आधी तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा. जट ते दिवे स्वच्छ झाले नाहीत तर तुम्ही जिथल्यातिथे कूजून मरणार आणि सहजयोगाची बदनामी आहे. एक मोठी माणसं करून सोडीन मी. गांधी काय नि टिळक काय, ८ आता आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना असं सांगायचं आहे, की आपल्या देशामध्ये एक तऱहेचा नवीनच भुतांचा प्रकार सुरू झाला आहे आणि या भुतांच्या प्रकारांत राक्षसी प्रवृत्ती, असुरी प्रवृत्ती फार वाढलेली आहे. ते काल आपल्याला दिसलंच आणि ती वाढून त्याचा अतिरेक काल झाला आणि या लोकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल आपण सहजयोगी लोकांना असं सांगायला पाहिजे, की याबाबतीत आम्ही तयारीत असायला पाहिजे, नुसती माझी पूजा करून, आरती करून काम होत नाही. आपल्याला पुष्कळशा गोष्टी करायला पाहिजेत आणि त्यासाठी आपण खांद्याला खांदा देऊन पुढे आलं पाहिजे आणि दंड ठोकून उभे राहिले पाहिजे की आता आम्ही सहजयोगी आहोत. पण अजूनही आपण पुष्कळशा अशा गोष्टी करीत आहोत, की ज्याच्यामुळे आपल्यात कमजोरी आली आहे. मुख्य म्हणजे मी सारखी या जातीयतेबद्दल बोलते आहे, त्याला कारण काय की एकदा तुम्ही जातीयतेमध्ये तुमच्यामध्ये जी एक मूलभूत बांधणी आहे तीच मुळी तुम्हांला रोखते. जातीयतेला धरून बसणं ही फार चुकीची गोष्ट आहे आणि त्याचमुळे जर आपण हे सर्व सोडलं असतं तर अंधश्रद्धा समोर आलीच नसती. गेलात, की कारण आपल्याला माहीत आहे, की अंधश्रद्धा जी आहे ती फक्त आत्मसाक्षात्कारानंतर येते. पण आत्मसाक्षात्कार झाल्यावरसुद्धा आपण त्याच जातीच्या मागे जातो, त्याच जातीत लग्न करतो, त्याच जातीशी संबंध करतो आणि तशाच रीतीने मूर्खासारखे वागत असलो तर मात्र तुमची काहीही वाढ होणार नाही आणि नुसतंच एक राजकारणी त-्हेचं एखादं सोंग होईल. असली सोंग घेऊन आपण सहजयोगी झालो तर आपल्याला काय लाभ होणार आहे? जैसे थे, असेच राहणार आहोत आपण. आपल्याला पुष्कळशा गोष्टी सोडाव्या लागणार आहेत. त्यांत धर्मांधता जी आहे ती सुटली पाहिजे. धर्माधता म्हणजे आधी मी म्हणत होते, की देवळांत जायचं नाही. देवळात जाऊन ब्राह्मणाला पैसे द्यायचे नाहीत. कुंकू लावून घ्यायचं नाही. त्यांच्यात आता थोडीशी सुधारणा झाली आहे. त्याला कारण असं की, लोकांना त्रास होतो. पण घरांत ब्राह्मण आणून लग्न करणं हे ही चुकीचे आहे. ब्राह्मण कोण होतात लग्न करणारे? तुम्ही ब्राह्मण झाले मग ब्राह्मणाला आणून लग्न कशाला करायचं? लग्न हे व्यवस्थित सहजयोग पद्धतीने झालं पाहिजे आणि जोपर्यंत लग्न सहजयोगपद्धतीने होणार नाही, तोपर्यंत मी त्याची हमी देऊ शकत नाही, की ह्या लग्नाचं व्यवस्थित होईल. बरं परत आपल्या महाराष्ट्रांत लग्न म्हणजे अगदी सगळ्यांत मोठं धर्मकार्य आहे. लग्न म्हणजे काय? मग त्याच्यासाठी मुलीसाठी पहाणं, हे करणं, मग बस्त्याला बसणं हे ना ते, घाणेरडे प्रकार चालू असतात. लग्न ही फारच क्षुल्लक गोष्ट आहे. सहजयोगामध्ये त्याचं इतकं माहात्म्य नाही. एका सहजयोग्याचं दुसऱ्या सहजयोगिनीशी लग्न झालं, की त्याचं कारय एवढं माहात्म्य नाही आहे की आयुष्यभर त्याच्याशी लढत बसावं लागतं. जातीजातींत लग्न करून त्याचे जे दुष्परिणाम होतात, ते दिसतात आपल्याला, पण अजूनही आपण त्याच्यातच फसलेलो. तेव्हा सगळ्यांनी आज व्रत घेतलं पाहिजे, की आम्ही कोणत्याही धर्मात , कोणत्याही जातीत, कोणत्याही देशात लग्न करूं. आता तुम्हाला वाळीत टाकण्याचा प्रश्नच नाही कारण तुमचे सोयरे हे आहेत, तुमचे नातलग हे आहेत. जे तुमचे नातलग आहेत, ते कसे वागतात ते तुम्ही पाहिलंच आहे. कालच बघा, गावातल्या लोकांनीच तुम्हाला त्रास दिला ना ? तुमच्या पाहुण्यांना त्यांनीच मारलं ना ? त्यांनी तुमची कोणती मोठी पत ठेवली? आणि आतां या लोकांना काय वाटत असेल तुमच्याबद्दल? मी म्हणते ९ ते नुसतं ऐकून, 'हो, माताजी म्हणतात, पण असं काही विशेष नाही ' असं म्हणायचं नाही. हे फार महत्त्वाचं आहे. जोर्पंत आपल्यातील जातीयता जात नाही, हंडा प्रकार जात नाही, जोपर्यंत आपल्या इथली अंधश्रद्धा जात नाही आणि जोपर्यंत आपण उठून उभे राहत नाही याबाबतीत, सबंध समाजाला एक उदाहरण म्हणून, तोपर्यंत आपण सशक्त नाही. आतां आपण कोणतीही मोठाली माणसं पाहू यां. आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, आपल्या समोर इतर, शिवाजीमहाराज आहेत अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत त्यांनी काय केलं, ते कसे वागले, त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजीमहाराजांनीसुद्धा, त्यांना चारदां लग्न करावं लागलं, राजकारणासाठी त्यांनी ते केलं. राजकारणासाठी मला करायचं आहे, ते मी केलं पण ते नि:संगात होते. त्याच्यावर त्यांचा परिणाम नव्हता काही. करावं लागलं तर केलं. चार लोकांशी आम्हालां दोस्ती करायची आहे. त्यांनी जातपात पाहिली नाही, की शहाण्णवच कुळी असली पाहिजे, की अमकंच असलं पाहिजे. त्यावेळी ज्यावेळी इतक्या वर्षापूर्वी गागाभट्टांना इकडे येऊन त्यांना राज्याभिषेक करावा लागला, तेव्हा या जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवून टाकलं, की तुम्ही कुणबी आहातं , तुम्ही मराठा नाही म्हणून. तेव्हा तुमची कोणतीही जात असेना कां, तुम्ही आज सहजयोगांत आलांत, तुमची जात बदलली, तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म 'विश्व निर्मल धर्म' आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे. त्यामुळे सर्व तुमच्या जातीच्या तुमच्या वाईट सवयी गेल्या, सगळे काही गेलं. पण हे भूत अजून गेलेलं नाही. लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहिजे. कारण ही जमात, जी तुमची आहे, ती भुतं आहेत सगळी. दारू पिणं, मारणं, मग ते दारू पिऊन नाही तर काही करां, हंडा घेवो नाहीतर काही करो, पण ते आमच्या जातीतलंच असलं पाहिजे मग तुम्ही सहजयोगी कसे? मग सहजयोग सोडा तुम्ही, काय तुम्ही दोन धर्मात उभे राहू शकतां का? नाही राहू शकत. त्याच्यामुळेच काल यांना मार खावा लागला. हे लोक, ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला आणि 'आम्ही काहीच असं करत नाही' असे करून उभे राहिले. त्यांनी काल मार दिला त्याला कारण थोडेसे तरी मला असं वाटतं की आपल्यामध्ये जी काही थोडीशी कमजोरी आहे ती त्यांनी ओळखली आणि त्यांच्यामध्ये आपण अंधश्रद्धेला पूर्ण झालो. पण जर तुम्ही बोलत सुटलांत की आम्ही सहजयोगी आहोत, आम्हाला कोणतीच अंधश्रद्धा नाही. आम्ही कोणत्याच असल्या गोष्टींना मानत नाही, आम्ही याच्या पलीकडे आहोत, आम्ही सहजयोगी आहोत, आम्ही बोलत नाही, करून दाखवू तुम्हाला. तेव्हा या लोकांच्या लक्षांत येईल की काहीतरी विशेष मंडळी आहेत. आम्ही आमच्या वडिलांना पाहिलं. आमच्या वडिलांना गांधीजींनी सांगितलं की सगळ्या तुमच्या मुलांची लग्नं बाहेर करा. आम्हीसुद्धा शहाण्णवकुळीच आहोत, तेव्हां फार विचार करून लग्न होत असत पूर्वी. वडिलांनी लगेच सांगितलं, 'काही हरकत नाही, कुठेही लग्न करा.' आणि सगळ्यांची अशीच लग्नं लावून दिली आमची. तर काय आमचं वाईट झालं ? त्यांनी सांगितलं मी काँग्रेसचा मनुष्य आहे. मला काय. मला दुसरं काही नाही. मला जात नाही, धर्म नाही. मी गांधीधर्मी आहे. तेव्हा धर्म जर घ्यायचा तर पूर्णपणे घेतला पाहिजे. अर्धवट लोकांसाठी हा धर्म नव्हे, तेव्हांच तुमच्यांत खरी शक्ती येईल. तेव्हांच तुमच्यामध्ये ते पावित्रय १० ে का किम येईल की ज्याने सगळ्यांचं रक्षण होऊ शकतं. पण जर तुम्ही अर्धवट असला तर कोणाचंच रक्षण करू शकत नाही. स्वत:चंही नाही, दुसऱ्याचंही नाही. ते पावित्र्य् आणण्यासाठी एकदम नि:संगांत येऊन उभं राहिलं पाहिजे. जसे आपल्या देशामध्ये मोठेमोठे लोक झाले. टिळकांचं उदाहरण घ्या. त्यांनी एका विधवेशी लग्न केले. गांधींजींच उदाहरण घ्या, ते एका हरिजनाच्या झोपडीत जाऊन जेवत असत. कृष्णाचं उदाहरण घ्या, विदुराकडे जाऊन जेवत असत. रामाचे उदाहरण घ्या, त्याने भिल्लीणीची बोरं खाल्ली. कोणाचेही उदाहरण घेतले तर जी मंडळी अशी मोठी झालेली आहेत त्यांच्यात किती वैशिष्ट्य आहे ते बघा. जर खरोखरच तुम्हाला सहजयोगात यायचं असलं, तर पहिल्यांदा समजलं पाहिजे, की सहजयोगात तुम्ही फार विशाल होता. तुमच्या संकुचित जीवनाच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या बदलून तुम्ही विशाल होता. तुम्ही विश्वात सामावलेले आहात. 'हे विश्वची माझे घर' असे म्हटलेले आहे. पण नुसतं म्हणायचं, तोंडाने म्हणायचं, गाणं म्हणायचं याला काही अर्थ नाही. हे लोक बघा आपली संस्कृती सोडून तुमच्या संस्कृतीत येऊन बसले. कारण हे चांगले आहे म्हणून घेतलं त्यांनी. पण तुम्ही त्यांच्यापासून हे तरी शिका. हे जातपात बघत नाहीत. देश बघत नाहीत. कितीतरी लोकांनी आपल्या हिंदुस्थानी बायकांशी लग्न केले आणि त्यांचं फार भलं केलं. नाहीतर पूर्वी एखाद्या इंग्लिश माणसाला एखादी हिंदुस्थानी बाई दिली तर तिला मारून खायचा तो. म्हणा इथे अजूनही मारून खातातच. इथे बायकांना मारून खाणे हा इथे एकच खाण्याचा धर्म आहे. पण तरीसुद्धा आपण त्या रीतीने वागतो, बायकांची इज्जत करायची नाही. सगळ्यांच्यासमोर भांडायचं, सगळ्यांना बोलायचं ही एक दुसरी पद्धत आहे इथे. बायकांना दाबून ठेवायचं. तेव्हा ही शक्ती जी आहे तुमच्या ११ इथली तिची तुम्ही जोपासना केली पाहिजे. त्यांची वाढ केली पाहिजे. मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना वाढवलं पाहिजे. त्यांच्या आवडीनिवडींप्रमाणे त्यांची लग्न केली पाहिजेत. त्यातल्या त्यात त्यांची सहजयोग्यांशीच लग्न केली पाहिजेत म्हणजे मुलंसुद्धा सहजयोगी होतील, जन्माला जी उद्याची पिढी येणार आहे. तुम्ही किती महत्त्वाच्या पदाला आले आहांत ते तुमच्या लक्षांत येत नाही. तुम्ही ते नाहीत. शिवाजीमहाराजांनी मावळे घेतले त्याच्याही पेक्षा अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीच्या कामावर तुम्ही आलेले आहांत आणि सहजयोगांत आले आहात. जरी माझ्याजवळ दोन सहजयोगी असले तरी चालतील पण त्यांनी पूर्णपणे सहजयोगी असलं पाहिजे नाहीतर सहजयोगात आलं नाही पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे मी जे म्हणते ते मानलं पाहिजे कारण मला सगळं दिसतं आहे. मी सर्वसाक्षी, सर्वदष्ट आहे. मला सगळे समजतं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे 'माताजींनी असं म्हटलं' असं म्हणून काही मला वापरायचं नाही. माताजी असं म्हणणार नाहीत आम्हाला माहीत आहे. एकंदरीत तुमच्यापासून मला इतक्या अपेक्षा का आहेत, त्याला कारण एकच आहे, कारण मी फार शक्तिवान आहे. माझ्यांत फार शक्त्या आहेत. फक्त तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा. म्हणजे प्रकाश द्यायला मी तयार आहे. तुम्हांला एकाहून एक मोठी माणसं करून सोडीन मी. गांधी काय नि टिळक काय, तुम्ही म्हणजे काय, देदीप्यमान होऊ शकतां. एवढे मोठे सुधारक आणि एवढे मोठे महत्त्वाचे लोक तुम्ही होऊ शकतां पण आधी तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा. जर ते दिवे स्वच्छ झाले नाहीत तर तुम्ही जिथल्यातिथे कुजून त्यांच्यापुढे मरणार आणि सहजयोगाची बदनामी आहे. तेव्हा प्रत्येकाने हे लक्षांत घेतले पाहिजे, की माताजींमध्ये अत्यंत शक्त्या आहेत. पण त्या जर वापरायच्या आहेत तर त्याचे जे साधन आम्ही, त्याचे आम्ही प्रकाश आहोत. ते प्रकाश आमच्यातून वाहण्यासाठी म्हणून आमचे दिवे स्वच्छ असले पाहिजेत. त्याची पूर्ण तयारी असली पाहिजे. ध्यानधारणा करायलाच पाहिजे. जे आमच्यामध्ये निषिद्ध आहे ते करायचं नाही. सहजयोगांत पुष्कळशा गोष्टी निषिद्ध आहेत आणि त्या निषिद्ध गोष्टी सोडायच्याच. आतां पुष्कळशा लोकांची व्यसनं सुटून गेलेली आहेत. पुष्कळसे लोक दारूबिरू सोडून व्यवस्थित झाले आहेत. कबूल आहे, पण पैशाच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत अत्यंत चोख असलं पाहिजे. आणि सडेतोड झालं पाहिजे. चार लोकांत गेलं की, सहजयोगाच्या गोष्टी तोंड उघडून बोलायच्या, काय तरी तिथे संभावितपणा आणून, चूपचाप बसून चालत नाही. सहजयोगाच्या बाबतीत, सडेतोडपणाने बोललंच पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे, 'सहजयोग हाच आजच्या युगाचा धर्म आहे. तो जर घेतला नाही तर सर्वांचा सर्वनाश होणार आहे.' सगळ्यांना, ह्यांना, त्यांना, तुमच्या नातलगांना पत्र लिहा. आम्ही सहजयोगांत हे मिळवलं आहे. आतां तुम्ही लोक पत्रिका छापतां त्यांत सुद्धा माझं नांव असायला पाहिजे. आतां मी तुमची कुलदेवता आहे. तुम्ही आमच्या कुळांत आले तर मी तुमची कुलदेवता आहे. बाकी सगळ्या देवतांना काहीही लिहायची गरज नाही. आज मी स्पष्टपणे सांगते, की ज्या लग्नामध्ये माझं नांव नसेल त्या लग्नाला माझा आशीर्वाद नाही. आज मी जिवंत आहे तुमच्यासमोर. हे अवतरण तुमच्यासमोर आलेलं आहे. जे अवतरण समोर आहे त्याला न १२ मानतांना जे आज नाही त्याला मानण्यात काय अर्थ आहे ? मग आमचे मोठे लोक असे म्हणतात आणि लहान लोक असे म्हणतात तर काही नाही. आमचा कुणाशी संबंध नाही. आमचा फक्त माताजींशी संबंध आहे. त्या म्हणतील ते. पण तुम्हीच नातलगांच्या जबड्यांत जाता-मगरीच्या तोंडात पाय ठेवायचा आणि बोटीवर पाय ठेवून तुम्ही बोटीवर येणार नाही. जे नातलग तुमचे सहजयोगी नाहीत त्यांच्याकडे जेवायलासुद्धा जायचं नाही, त्यांचं अन्नसुद्धा घ्यायचं नाही, म्हणजे तुमचे आजार होणार नाहीत. तुम्हाला त्रास होणार नाहीत. तुम्ही या धर्मात पूर्णपणे आलात तर सर्व तऱ्हेने परमेश्वराचा आशीर्वादच आशीर्वाद आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की किती तुमची प्रगती होईल याच्यात. पण जर तुम्ही अर्धवटपणा केलांत तर त्याची फळं तुम्हाला भोगावी लागतील. आणि जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगितलं की मी तुमची आई आहे. मला तुम्हाला खरं ते सांगितलंच पाहिजे. मला कोणाचाही राग नाही किंवा दष्टावा नाही. पण तुमचं भलं व्हावं, हित व्हावं आणि तुम्ही सत्याची कास धरली पाहिजे. सत्याची ज्या माणसाने कास धरली त्या माणसाचे कधीही नुकसान कोणत्याही प्रमाणात होऊ शकत नाही. तेव्हां आजचा हा फार शुभप्रसंगी दिवस आहे. कालचं एव्हढं हे झालं ते सगळं विसरून जा. त्यात काही अर्थ नाही पण त्यांत आपल्यामध्येच अजून सहजयोगाची ती धमक आलेली नाही. नाहीतर एखाद्या गावात जाऊन लोकांनी मारामाच्या करण्याची कोणाची हिंमतच होणार नाही. पण आपल्यातच ती धमक असायला पाहिजे, की नुसतं एका डोळ्याने पाहिलं, की सगळं ठीक होऊन जाईल. तेव्हां सहजयोग्यांनीसुद्धां आतां लक्षांत घेतलं पाहिजे, की प्रत्येक गावात, प्रत्येक खेडेगावात, प्रत्येक शहरात, जिथे राहतो तिथे सहजयोगासाठी आम्ही काय करतोय ? सडेतोड बोललं पाहिजे आणि ब्राह्मणाला बोलवून पूजा करायची, सत्यनारायणाची पूजा करायची हे प्रकार करायचे असले तर तुम्ही सहजयोगांत येऊ नका. सहजयोगांत तुम्ही ब्राह्मण झाले आहांत. सर्व कार्य तुम्ही सहजयोगाच्या दृष्टीने केलं पाहिजे आणि बाकीचं जे काही आहे त्याला तिलांजली दिली पाहिजे. म्हणजे मग हे अंधश्रद्धावाले काही बोलू शकत नाही. कारण आपण अंधश्रद्धेलाच तिलांजली दिली.ज्या काही आपल्या वाईट सवयी होत्या त्या आपण सोडून दिल्या, त्याशिवाय ज्या काही जुन्या कल्पना होत्या त्या सोडून दिल्या. आपण मागासलेले नाही आहोत. सगळ्यांत आपण जे वर्तमानकाळांत अत्यंत उच्चतर लोक जे होतो ते आहांत तुम्ही. उच्चतर, तुमच्याहून उच्च कोणी नाही पण अजूनही तुम्ही त्या नीच लोकांमध्ये राहता मग काय तुम्हालां घाण लागणार नाही? जर हिरा तुम्ही मातीत घातला तर तो हरवायचाच तेव्हां कृपा करून माझ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. वाईट वाटून घ्यायचं नाही. त्याबद्दल माताजी असं बोलल्या असं म्हणायचं नाही. मी जे बोलले ते अगदी हृदयातून बोलले आणि हृदयांतून काढून तुम्हाला सांगतेय. तुमची मुलं आहेत, उद्या पाहायचं कोणाची मुलं वर येतात. पूर्णपणे सहजयोगाला वाहून घेतलेले आहे. तेव्हा आपलं धर्मांतर झालंय असं समजायचं. आतां आपल्याला दुसरा धर्म नाही ही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्यावर तर उपकार होतीलच पण या देशावरही उपकारच होतील आणि सबंध जगावर होतील. कारण तुमच्यात जी एक विशेषता आहे, तुमच्यामध्ये जे विशेष पुण्य आहे, तुम्ही पुष्कळ पुण्य केलंय म्हणून तर या हिंदुस्थानात जन्माला आलांत. या महाराष्ट्रांत जन्माला आला. पण ते सगळं वाया जाणार, मूर्खपणामुळे ते सगळे वाया जाणार. १३ आतापर्यंत कोणते साधूसंत झाले ज्यांनी जातीयतेला मदत केली? अहो, दासगणूंनी सुद्धा म्हटलं आहे : 'आम्हाला म्हणती ब्राह्मण, आम्ही जाणिले नाही ब्रह्म आम्ही कसले ब्राह्मण.' नृसिंहसरस्वतींनी सुद्धा म्हटलं आहे हे सगळे ब्राह्मण होते. त्यांनीसुद्धां म्हटलं आहे मग आपण असं त्याच्या आहारी जायचं आणि तीच तीच कामं करायची. किती चुकीचं आहे! आतां तुम्हाला दर्शन झालंय विशालतेचं. तुम्ही माझे सगळे फोटो बघितलेत. दिव्य आहे सगळं, फार दिव्य आहे. एवढी दिव्यता मिळविण्यासाठी तुम्हालाही दिव्य असायला पाहिजे. आज विशेषकरून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतेय, मी आता विनंती करणार नाही. कारण खूष तुम्ही मला केलं पाहिजे. देवीला प्रसन्न करावं लागतं. मी तुम्हांला प्रसन्न करत बसणार नाही. तुमच्यामध्ये जी शक्ती आहे, तुमच्या आतमध्ये साठवलेली जी संपत्ती आहे, तिचा प्रकाश जगावर पडला पाहिजे आणि तुम्हीच लोक करू शकतां जास्त ह्यांच्यापेक्षा. कारण तुमच्यामध्ये ती संपत्ती आहे. हे लोक संपत्ती नसतांनासुद्धा जास्त त्याचा उपयोग करतात. मग तुमच्याजवळ संपत्ती असतांनासुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करत नाही असे हे दोन प्रकार आहेत. तेव्हा कृपा करून पुढच्या वेळेला मला एकाहून एक सहजयोगी तयार पाहिजेत. इतकेच नव्हे तर प्रत्येकाने जाऊन भाषणे द्यायची. आता अंगापूरच्या लोकांना माझं इतकंच सांगणं आहे, की उद्यां त्यांनी जाऊन संघटना करायची सहजयोगाची. इतकंच नव्हे तर भाषणं द्यायची आणि खुले आम. इथे एक मोठं पटांगण आहे तिथे बसून खुले आम सहजयोगाबद्दल सांगायचं. एका नुसत्या भाषणाने, हे लोक आपल्यावर बिथरले होते आणि आपण कधीच भाषण देत नाही. तिथे त्यांनी एक भाषण दिलं तर तो पोलीसवालासुद्धां बिथरला होता, पण आज त्याच्या लक्षात आलं, तर एवढं वाईट वाटलं. म्हणजे काम करीत नाही त्याबाबतीत, आपण बोलत नाही. आणि सहजयोगाने मित्रता वाढेल. तर आतां जाऊन सगळ्यांना सांगायचं, झालं हे फार वाईट झालं, आम्हांला फार वाईट वाटलं. सगळ्यांनी एक सभा करा. जाहीर सभा. ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी क्षमा मागितली पाहिजे. अर्थात् ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं काहीतरी वाईटच होणार. मी कितीही प्रयत्न केला, किती क्षमा केली, तरी हे गण आहेत आणि हे गण त्यांना ठिकाणावर लावतील. पण तरीसुद्धा तुम्ही सांगायचं, की जे झालं ते विसरून जा. आपल्या देवधर्माशिवाय चालणार नाही. असल्या फालतू लोकांना इथे जमू द्यायचं नाही आणि ही संस्था इथे घ्यायची नाही. आणि नंतर ही संस्था आल्यानंतर तुम्ही पोलिसांना कळवा की इथे संस्था आलेली आहे आमच्या मुलांना बिघडवत आहेत आणि त्यांना खुनशी बनवत आहेत. मागच्या वेळी त्यांनी त्यांना दगड मारायला सांगितले. सगळ्यांनी मिळून असं सांगायचं. आणि सरपंच सुद्धा सहजयोगी निवडायचा. प्रयत्न करायचा. सहजयोगाने कोणी दैववादी बनत नाहीत, देववादी बनतात, सशक्त बनतात. त्याला डॉक्टरांचा पुरावा आहे. हे आम्हाला का बोलतात. कोणीही उठावं, काहीही बोलावं. डॉक्टरांनी सिद्ध केलेले आहे. आता आम्ही काय ते सिद्ध करून दाखवायचे! सहजयोगात नुसता आशीर्वादच आहे पण त्याच्यासाठी कर्तव्य पण आहे, त्या कर्तव्याला मुकलं नाही पाहिजे. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. १४ श्री गौरी गौरी श्री गणेशाची आई आहे आणि आपल्या पावित्र्याच्या रक्षणार्थ त्यांनी श्री गणेशाला जन्म दिला. अशाप्रकारे कुंडलिनी ही गौरी आहे आणि आपल्या मूलाधार चक्रावर श्री गणेश विराजमान आहे. मूलाधार गौरी कुंडलिनीचे निवासस्थान आहे आणि श्रीगणेश कुंडलिनीचे रक्षण करतात. ती आपल्या पावित्र्याची देवता आहे. फक्त श्रीगणेश या अवस्थेमध्ये राहण्यास समर्थ आहेत कारण पेल्विक चक्र मल-मूत्र विसर्जन क्रिया पाहते आणि वातावरणातील दुर्गंधीच्या प्रभावापासून मुक्त, केवळ श्री गणेशच तिथे राहूु शकतात. ते अतिशय शुद्ध तसेच निष्पाप आहेत.......कुंडलिनी श्री गणेशाची कुमारी माता आहे. लोक माता मेरीच्या विरोधात बोलायला लागले आहेत की त्यांना मुलगा कसा झाला. याचे कारण आपले अज्ञान आहे की परमेश्वराच्या साम्राज्यात सर्व काही होऊ शकते. ते या सर्व गोष्टींच्या वरचे आहेत तसेच ते पवित्र आहेत. श्रीगणेश जर अशक्त असतील तर कुंडलिनीला आधार देऊ शकणार नाही. कुंडलिनी जागृतीच्या वेळी श्रीगणेश आपले सर्व कार्य थांबवतात. मी कधीकधी तर नऊ-दहा तास एकाच ठिकाणी बसलेली असते, उठतच नाही. गौरी पूजा, ऑकलंड ८.४.१९९१ .....गौरीच्या शक्तीचा सन्मान झाला पाहिजे कारण ती आपली आई आहे, तिनेच आपल्याला पुनर्जन्म दिला आहे. तिला आपल्याविषयी सर्व काही माहीत आहे. ती अत्यंत सुहृदय तसेच करूण आहे. उत्थान तसेच चक्र भेदण्याचे सारे कष्ट स्वत: झेलत ती आपल्याला पुनर्जन्म देते कारण तिला सर्व माहिती आहे, ती सर्व समजते, ती सर्व व्यवस्था करते आणि आपल्यामध्ये असलेल्या सर्व सौंदर्यपूर्ण गोष्टीला पुढे आणते. साक्षात्कार तसेच ज्ञान प्रदान करण्यासाठी आपल्याला त्यांच्याप्रती (गौरी) कृतज्ञ व्हायचे आहे तसेच हे लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला नेहमीच त्यांना जागृत करायचे आहे, त्यांचा विस्तार करायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे ज्यामुळे आपला साक्षात्कार तसेच उत्थान अक्षय राहील. फक्त उत्थानच संपूर्ण विश्वाला परिवर्तीत करेल म्हणून तुम्ही गौरीला प्रार्थना करा. शुद्ध करणे, तुमचे हृदय तसेच मस्तिष्क शुद्ध करून तुमच्या योगाला अमरता प्रदान करणे हे गौरीचेच कार्य आहे. असे झाल्यानेच आपण परमेश्वराच्या प्रेमाच्या सुंदर शक्तीच्या वाहण्याचा अनुभव तुमच्यामध्ये करू शकता. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कार्य तुम्ही करा, पूर्णपणे समूहात रहा, कोणत्याही गोष्टीचे बलिदान करा आणि सहजयोगाच्या प्रचारासाठी प्रयत्न करत रहा कारण जेव्हा तुम्ही सहजयोगाला एखाद्या वृक्षाप्रमाणे पसरवाल तर त्याची सखोलता ही वाढेल. हे कार्य तितक्याच सुंदरतेने व्हायला पाहिजे जितके कुंडलिनीचे जागरण होते. कुंडलिनीने तुम्हाला कोणताही त्रास दिला नाही, तुमच्यासाठी कोणतेही अडथळे निर्माण केले नाहीत. यापासून आपल्याला काही शिकले पाहिजे. .मी तुम्हा सर्वांना विनंती करते की आपल्या कुंडलिनीवर चित्त ठेवा, ते नेहमी जागृत ठेवा आणि आपल्या चैतन्य लहरींना सांभाळा. फक्त आपल्याच लहरींना ठीक ठेऊ नका तर दुसर्यांविषयी असणार्या आपल्या दृष्टिकोनामध्येही बदल घडवून आणा. त्यांच्यात असणारे दोष बघू नका, त्यांच्यातील चांगले गुण बघा तसेच त्यांच्या चांगले कार्य करण्याच्या सामर्थ्याकडे बघा. कुमारी असूनही गौरी किती विवेकशील आहे, त्याचप्रकारे आपल्यालाही विवेकशील तसेच संवेदनशील बनायचे आहे. १५ न भा ন *१ ी रा सशि कहो अर रा] हो ० ला] -ট----t+-0-2= था १ २३.९.१९९० को Fককরককক श्री शतक्ती पजा कॅलेंडरप्रमाणे यावर्षी नवरात्रीचे दहा दिवस आहेत. नऊ नव्हेत. नऊ दिवस आणि रात्री असे आहेत. जेव्हां देवीला राक्षसांशी लढाई करून मुलांचा नकारात्मक शक्तींपासून बचाव करावा लागला. एका बाजूला ती प्रेमाचा, करुणेचा सागर होती तर दूसर्या बाजूने ती वाघिणीप्रमाणे त्यांचं रक्षण करीत होती. कारण काल असा होता, की कोणीही ध्यानधारणा करू शकत नव्हतं. कोणीही देवाचं नांव घेऊ शकत नव्हतं. आत्मसाक्षात्काराचा तर विचारसुद्धा कोणी करू शकत नव्हतं, पण आज इथे जे बसले आहेत, त्या दिवसांतसुद्धा तुम्ही तिथे होता आणि तुम्हां सर्वांना आजच्यासाठी, या दिवसासाठी वाचविण्यात आलं, ज्यायोगे तुमचा आत्मसाक्षात्कार तुम्हाला मिळाला. त्या काळात देवीचं रूप मायास्वरूपी नव्हतं. ती तिच्या खऱ्या स्वरूपात होती आणि त्यामुळे तिच्या भक्तांमध्येसुद्धा भीतीयुक्त आदर निर्माण झाला होता. त्यामुळे आत्मसाक्षात्कार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. सर्वप्रथम त्याचं रक्षण करायचं होतं. त्यामुळे ज्याप्रमाणे आईला नऊ महिने बाळाला गर्भाशयामध्ये ठेवावं लागतं त्याप्रमाणे, तुम्ही नऊ महिने म्हणूं शकता. नऊ युगे तुम्हा सर्वांचं व्यवस्थित रक्षण केलं गेलं आहे आणि दहाव्या महिन्यात तुम्हाला तुमचा जन्म दिला गेला आहे. शिवाय हा जन्म नेहमीच नऊ महिन्यानंतर सात दिवसांनी होतो. तेव्हां त्याला परिपक्वता येईपर्यंत आपल्याला थोडा वेळ थांबावं लागतं. आता आजची दहावी नवरात्र खरोखर आदिशक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे. एका बाजूला आदिशक्ती ही महाकाली आहे. दुसऱ्या बाजूला ती महासरस्वती आहे. मध्यभागी ती महालक्ष्मी आहे. आणि शिवाय तीच अंबासुद्धा आहे. ती, जी कुण्डलिनी आहे, पण ती त्याच्या पलीकडेसुद्धा आहे. ती पराशक्ती आहे, सर्व शक्त्यांच्या पलीकडे ती आहे कारण शक्ती तीच आहे. शक्तीची ती जननी आहे. आता जेव्हा आपण म्हणतो, की फक्त एकच देव आहे, ठीक आहे, देव एकच आहे, पण या एकाच देवाला डोकं आहे, यकृत आहे, त्याचं पोट आहे, त्याचं नाक आहे, सर्व काही मानवासारखच आहे. कारण ते तसेच म्हणतात. स्वत:च्या प्रतिबिंबाप्रमाणे त्याने मानवाला बनविलं. तर त्याच्या शरीराला वेगवेगळे अवयव आहेत आणि ते वेगवेगळे अवयव त्याला चालू ठेवले पाहिजेत. त्याला वेगवेगळ्या देवता पाहिजेत आणि तुम्ही त्यांना जाणलं पाहिजे. जोपर्यंत या देवतांना तुम्ही जाणत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही स्वत:मध्ये जागृत करू शकत नाही, पण त्या सर्व आदिशक्तीचे अंगप्रत्यंग आहेत. पूर्णपणे त्या आदिशक्तीच्या ताब्यात आहेत. काल तुम्ही आदिशक्तीच्या वेगवेगळ्या शक्त्यांबद्दल घेतं त्याप्रमाणे ऐकलेत. ते कासवासारखं आहे. कासव आपलं सर्व शरीर आपल्या पाठीच्या ढालीमध्ये आक्रसून माझ्या सर्व शक्त्या माझ्यामध्ये मी ओढून घेतल्या आहेत. मी काय म्हणते, तुम्ही त्यांना सहजासहजी शोधू शकत नाही, सहज तुम्हाला त्या सापडू शकणार नाहीत फक्त या आधुनिक कॅमेऱ्याशिवाय. हे आपल्याला फसवू पहात आहेत. तेच माझे प्रकार आणि स्वरूप तुम्हाला दाखवित आहेत कारण या व्हायब्रेशन्समध्ये प्रकाश आहे आणि जेव्हा व्हायब्रेशन्स उत्सर्जित होतात तेव्हां या कॅमेऱ्यांनी ती तुम्हाला दिसू लागतात. ते जरी फार संवेदनाक्षम नसले तरी लोक कसंतरी ती पकडतात. कितीतरी चमत्कार दर्शवणारे फोटो आले आहेत, तुम्हाला माहीतच आहे. एक फोटो तुम्ही पाहिला असेल श्री गणेश स्वत:च माझ्यामागे उभे आहेत. काय चाललं आहे ते तुम्हाला कळत नाही आणि आपल्याला हे समजलं पाहिजे, की देवाच्या जादूच्या नव्या प्रांगणामध्ये आपण प्रवेश केला आहे आणि त्याची जादू अनेक प्रकारे कार्य करते. अर्थात कधीकधी तुम्ही हरवून जाता, तुमच्या पूर्वीच्या अडचणींमुळे. काही वेळा तुम्हाला ओढत नेलं जातं. कधीकधी १७ मोहात पाडलं जातं. कधीकधी निगेटिव्ह फोर्सेस तुमच्यावर दबाव आणतात आणि तुम्ही खाली पडता आणि कोणाही सहजयोग्याच्या बाबतीत असं व्हावं, ही फार दु:खद गोष्ट आहे. या पातळीवर येण्यासाठी तुम्ही किती झगडला आहात, किती परिश्रम केले आहेत ते तुम्हाला माहीत नाही. आणि या पातळीला आल्यानंतर वर जाण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही तर एकतर तुम्ही त्याच जागी चिकटून रहाल किंवा कदाचित खाली फेकले जाल. तुम्ही सहजयोगी आहांत, हे समजलं. तुम्ही नवरा, बायको, आई किंवा वडील नाही. तुम्ही सहजयोगी आहांत. तशी मी आदिशक्ती आहे, तसे तुम्ही सहजयोगी आहात, तर माझं मुख्य कार्य आहे इतरांना आत्मसाक्षात्कार देणं कारण माझे सर्व नातेसंबंध आधीच व्यवस्थित प्रस्थापित झालेले आहेत. कोणत्याही देव - देवतेबद्दल काळजी करण्याचं मला कारण नाही कारण ते सर्व सगळे काही चोखपणे पार पाडतात. आतां, काल तुम्ही जे देवीचं वर्णन वाचलं, त्यात तुम्ही वाचलं, तिचे हात इतक्या वेगाने बाण सोडीत होते, की करते आहे असं वाटत होतं. माझा प्रत्येक केस बाणाप्रमाणे आहे आणि तो इतकं प्रचंड काम करतो पण ती नृत्य वाटतं मी इथे शांतपणे बसले आहे. तुम्ही बसला आहात त्याप्रमाणे, पण तसं नाही. हे त्याहून खूप जास्त तुम्हाला काही आहे. जेव्हां ते सिंह किंवा वाघ माझं 'वाहन' म्हणून दाखवितात, तेव्हा तुम्हाला समजले पाहिजे, की ते खरोखरच तसे आहेत. अशाप्रकारचे वाहन मिळण्यासाठी अमिबापासून या स्थितीपर्यंत त्यांनासुद्धा उत्क्रांतीपासून जावं लागलं. नाहीतर ती वाहने इथे नसती. अशाचप्रकारे तुमचीसुद्धा उत्क्रांती झाली आहे आणि तुमच्यामध्येसुद्धा ही सर्व वाहने आहेत आणि तुम्हाला जे हवं असेल ते ती लगेच कार्यान्वित करतात. तुम्हाला कशाचीही इच्छा झाली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ताबडतोब ते कार्यान्वित होते, पण सहजयोगाला संपूर्ण समर्पण पाहिजे. जेव्हां मी सहजयोग म्हणते तेव्हा तुम्हाला माहीत आहे तुमचं चित्त आणि माझे चरण यांचा तो योग आहे. जर तुम्ही अजून तुमच्या अहंकारामध्येच वावरत असाल, या रेषेवर विचार करीत असाल, की आम्ही काहीतरी आहोत आणि आम्ही आमचा स्वत:चा सहजयोग चालू करू शकतो. आम्ही याप्रकारे कार्य करू, त्याप्रकारे का्य करू, माझी पत्नी अशी आहे, माझं मूल असं आहे, माझा नवरा असा आहे हे प्रश्न तुम्हाला बाजूला सारले पाहिजेत नाहीतर तुम्ही वर चढ़ू शकणार नाही. दिवा तेवत ठेवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घेतले पाहिजेत. आता वाघ हा, स्वत:च्या स्थितीमध्ये राहतो तो स्वत:ची स्थिती बदलत नाही. सर्व देवदेवता त्यांच्या स्वत:च्या गुणवत्तेसकट त्यांच्या स्वत:च्या स्थानावर असतात. त्याचप्रमाणे सहजयोगी म्हणून तुमच्या स्वत:च्या स्थानावर राहिल पाहिजे. आतां पार्चात्य देशांमध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी या फार मूर्खपणाच्या अडचणी आहेत ज्या सहजयोग्यांना साजेशा नाहीत. उदा. जिव्हाळा, अॅटॅचमेंट, पहिल्यांदा त्यांच्या बायका, मूलं यांच्याबद्दल त्यांना जिव्हाळा नसे आणि आता गोंदासारखे ते त्यांना चिकटले आहेत. तुमची मुलं, तुमची पत्नी यांना तुम्ही सोडून द्या असं मी म्हणत नाही. पण तुमचा जिव्हाळा सहजयोगाला हवा. सहजयोगाचे आशीर्वाद तुमच्याकडे आले, की तुमची पत्नी, मुलं या सर्वांकडे ते वाहू लागतील. तुमच्या देशामध्ये सर्वांना आणि सर्व जगामध्येसुद्धा. समजा ही 'अॅटॅचमेंट' ही साधी इलेक्ट्रीकल गोष्ट आहे. जर ही जोडणूक किंवा संधान मुख्य गोष्टीशी नसेल, दुसऱ्या कशाशी असेल तर काय उपयोग आहे ? ती विद्युतशक्ती देऊ शकत नाही. हे तर साधं तर्कशास्त्र आहे की शक्तीच्या उगमस्थानाशी तुमची जोडवणूक पाहिजे तरच शक्ती दुसरीकडे वाहू शकते. जर तुम्ही स्वत:च शक्तीच्या त्या स्रोताशी जोडले गेले नसाल, तर ३ ) । ें शक्ती दुसरीकडे कशी वाहणार? सहजयोगामध्ये ही साधी गोष्ट आपल्याला समजली नाही तर आपल्या या संधानाला गंज चढू लागतो. आणि आपल्याला काय होत आहे हे आपल्याला समजत नाही. मुख्य जे स्रोत त्याच्याशी आपण जोडले गेलो नाही आणि फक्त त्याच संधानाची आपल्याला गरज आहे आणि मग सर्व काही दुसरीकडे वाहू लागेल. आपण आपल्याला आवडणाच्या इतक्या दुःखकारक गोष्टीशी जोडले गेले असतो. ज्या आपल्याला दुःखी करतात. उदा.उद्योजकांच्या मूर्खपणाच्या फॅशन्सविषयी आपल्याला प्रेम असते. या सर्व गोष्टी अॅटॅचमेंट, आनंदाचे स्रोत नाहीत, ज्ञानाचे आरंभस्थान नाहीत किंवा आपल्याला उत्क्रांत करणाऱ्या शक्तीचे उगमस्थान नाही. आणि हेच कारण आहे त्यामुळे सामूहिक उत्क्रांतीची आपली परिस्थिती खराब झाली आहे. आदिशक्तीचं काम हे प्रथम तुम्हाला आत्मसाक्षात्कार देणे हे आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला जीवन देणं, तुमच्या सुखसोयींकडे लक्ष देणं, तुमचं सांत्वन करणं, तुम्हाला शारीरिक प्रश्न असतील तर ती ते सोडवेल. ती क्षेमदात्री आहे, ती तुमचे क्षेम पाहील. त्याचवेळी ती तुमचे रक्षणही करील . मी पाहिलं आहे बरेचसे लोक आतासुद्धा लहानसहान गोष्टींनीसुद्धा घाबरून जातात. आता इथे वाघ उभा आहे तर आपण घाबरायला कशाला पाहिजे? तुमची आई इतकी शक्तिमान आहे, ती किती शक्तिशाली आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आपली आई किती शक्तिशाली आहे, ती आपली आई आहे हे तुम्हाला जर कळलं तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात आणि मग गोष्टी कार्यान्वित होतील. शक्तीला जर वाहू दिलं नाही आणि तुम्ही जर तुमची आई, घर, मुलं 'माझं' याविषयी चिंता करत असाल तर हे 'माझं' जेव्हां गळून पडेल तेव्हा ते कार्यान्वित होईल. हे अशात-्हेने घेता कामा नये, की मी तुम्हाला सर्वसंगपरित्याग करायला सांगते आहे, मुळीच नाही. कोणत्याही संतांनी सर्वसंगपरित्याग केला नाही. त्या सर्वांना बायकामुलं होती. त्यांचं चित्त आदिशक्तीच्या चरणकमलांकडे होतं. जसं गुरू नानकांनी म्हटलं आहे. छोटा मुलगा पतंगाबरोबर खेळत असतो. पतंग सगळीकडे उडत असतो. तो त्याच्या मित्रांबरोबर बोलत असतो, हसत असतो पण चित्त पतंगाकडे असतं. एक स्त्री, घर साफ करत असते, तिच्या कडेवर मूल असतं. ती घर साफ करते, झाडते आहे, सगळं काही करते आहे पण लक्ष मुलांकडे असतं. भारतामध्ये अशा बायका आहेत ज्या पाण्याने भरलेले तीन-चार हंडे डोक्यावर ठेवतात. त्या एकमेकींशी बोलतात, हसतात, मजा करतात पण लक्ष त्या हंड्यांवर असतं. माझं लक्ष नेहमीच तुमच्या कुंडलिनीवर असतं. सहजयोगात तुम्ही खोड्या करू शकत नाही. कोणी खोड्या करण्याचा प्रयत्न करील तर त्याला खूप वाईट शिक्षा मिळेल. तुम्हाला खूप लक्षपूर्वक वागलं पाहिजे. अप्रामाणिकपणा करता कामा नये. मी काही करणार नाही पण इथे या वाहनाचे, वाघाचे दात आहेत. त्यांची ठराविक मूल्यमापने आहेत. त्यांना सर्वांना काय करायचं ते माहीत आहे आणि ते करतील. अशा नकारात्मक गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या तर त्या राक्षसी कल्पना आहेत असं मी म्हणेन कारण त्या तुमचा पूर्णपणे नाश करतील. एका बाजूला सहजयोग म्हणजे उन्नतीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी तुम्हाला दिलेले पूर्ण आशीर्वाद आहेत. तुम्ही एका टोकापर्यंत जाता, पण तुम्ही उंची गाठली आहे हे तुम्हाला समजलंसुद्धा पाहिजे. तिथे तुम्हाला खूप काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. त्या उंचीवरून तुम्ही खाली पडलांत तर तुम्ही खूप खोल खाली पडाल. तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद सौंदर्य, प्रेम, आनंद ज्ञान, मित्र सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. जर तुम्ही खोड्या करणार असाल, तर तिथे राहणं शक्य नाही. तसं तिथे चालत नाही. ताबडतोब तुम्ही बाहेर फेकले जाता. देवता अत्यंत दक्ष आहेत, हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्या तुम्हा सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. कारण त्यांना तुमचं रक्षण करायचं असतं. तुमची काळजी घ्यायची असते. तुम्हाला मदत करावयाची असते. तुमच्यासाठी सारं काही त्यांना कार्यान्वित करावयाचं असतं. त्या तुमच्यासाठी फुलं तयार करतात. त्या तुमच्यासाठी सर्व तऱ्हेच्या चांगल्या गोष्टी करतात. पण त्याचवेळी त्यांचा माझ्याशी संबंध असतो. तुमच्याशी नाही. तुम्ही माझी मुलं आहात म्हणून त्या तुमच्याकडे लक्ष पुरवितात. एकदा का तुम्ही गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केलात की झालं, पण तुमच्या आईची करुणा इतकी महान आहे, की ती नेहमी विसरण्याचा प्रयत्न करते आणि संधी देते आणि अर्थात्, एका टोकापर्यंत त्या देवता मानतात, पण जर तुम्हाला तिरस्करणीय क्रूर आणि पापी व्हायचं असेल आणि तरीही सहजयोगात रहायचं असेल, तर तुम्ही ते करू शकत नाही. इतर धर्माप्रमाणे ते नाही, जिथे तुम्ही र चुका करीत जाता, तुम्हाला हवं तसं करीत जाता, मारून टाकता, फसवाफसवी करता, इथे तुम्हाला शब्दश: सहजयोगी व्हावं लागतं. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. सर्व गोष्टी गृहित धरू नका. 'सहजयोग्यांसाठी आज मी काय केलं' असं मी लिहायला तुम्हाला सांगितलं आहे. आपल्यासाठी आपण सर्व काही करतो. आपलं घर रंगवितो. चांगल्या साड्या घेतो वगैरे वगैरे पण प्रत्येकाने स्वत:ला विचारलं पाहिजे, 'मी सहजयोगासाठी काय केलं? इतरांना मी किती भेटी दिल्या? माझा अनुभव सांगणारी आईविषयी माझ्या हृदयात मला वाटणारं प्रेम प्रदर्शित करणारी किती पत्रं मी इतरांना लिहिली? आज तुम्ही ही आदिशक्तीची पूजा केलीत ही धोकादायक आहे कारण ती आरशाप्रमाणे आहे ज्यामध्ये तुम्हाला स्वत:ला बघावं लागेल, स्वत:ला स्पष्टपणे पहावं लागेल. तुमच्या नवऱ्यावर वर्चस्व गारजविणं ही मूर्खपणाची निरर्थक गोष्ट आहे कारण तुमच्या नवऱ्याला कसं वागवायचं हे तुम्हाला समजत नाही. आपल्याला सुज्ञ स्त्रिया म्हणून प्रगती करायची आहे, स्त्रिया ज्या पृथ्वीमातेसारख्या आहेत. तुम्ही जेव्हा मला विचारता, 'श्री माताजी, तुम्ही इतकं काम करता आणि तरीसुद्धा इतक्या ताज्यातवान्या दिसतां!' त्याचं कारण मी त्याचा आनंद उपभोगते. काम करणं हे मला संगीतासारखं आहे. इतकं थंड करणारं सारं काही मला संगीतच आहे. तुम्हाला संगीताचा कंटाळा येतो कां? त्याउलट तुम्हाला ताजंतवानं वाटतं. जेव्हा मी राक्षसांना मारते तेव्हां तुम्ही पाहिल्याप्रमाणेच, जास्त प्रकाश माझ्याकडे येतो. समजून घ्या, कृपा करून पूर्णपणे आत्मनिरीक्षण करा, आत्म्याचा शोध घ्या, आपल्यामध्ये काय चुकतं आहे ते समजून घ्या. स्वत:च्या अहंकाराचे फाजील लाड करू नका कारण अहंकार तुम्हाला मूर्ख बनवितो. तशाप्रकारचे काही लोक आमच्याकडे सहजयोगामध्ये आहेत. सर्कसमध्ये काही विदूषक असतात तसे आहे ते, पण आपल्याला वाघ आणि सिंहसुद्धा हवेच. लोकांवर छाप पडते ती वाघ आणि सिंहाची, विदूषकांची नव्हे. तुमच्या आईची पूर्ण शक्ती म्हणजे प्रेम आहे. ती जे काही करते ते तिच्या निर्मितीवरील तिच्या प्रेमामुळे आणि मग आत्मनिरीक्षण सुरू होतं. त्याला फार उशीर होता कामा नये. किती वेळापासून मी म्हणते आहे, पृथ्वीमातेला ज्याप्रकारे ते दमवून टाकीत आहेत, आता पर्यावरणाचे प्रश्न आपल्यासमोर राक्षसासारखे उभे आहेत. आता तुम्ही त्याचे काय करणार? तुम्हालाच त्याला तोंड दिले पाहिजे. आता जर तुम्ही त्याला तोंड दिले नाही तर तुम्हाला त्याला अशा वेळी तोंड द्यावे लागेल जेव्हा फार उशीर झालेला असेल. तेव्हा नुसते तुम्ही सहजयोगी आहात म्हणून स्वत:बद्दल समाधानी होऊन राहू नका. तुम्ही अर्थात माझ्या पूजेला आला २० आहात, तुम्ही समुद्रामध्ये पडल्यावर तुम्हाला शोषून घेण्याची त्यामध्ये ताकद असते. तशीच तुम्हाला किनार्यावर परत ढकलण्याची शक्ती असते. दोन्ही बाजूंनी ती कार्य करते . तर 'मी सहजयोगामध्ये गहनतेत का जाऊ शकत नाही?' त्यात अनेक समर्थनं असतात. 'मला वेळ नाही, मी फार कामात आहे, मी ऑफिसमध्ये काम करतो आहे, मी ते करतो आहे.' मग तुम्ही सहजयोगी नाही. तुमचा पूर्ण वेळ सहजयोगासाठी आहे. त्यामुळे सहजयोग तुम्हाला सर्व काही करण्यासाठी भरपूर वेळ देतो. मला काही लोक माहीत आहेत, जगभर असलेल्या सगळ्या पूजांमध्ये ते अचानक सापडतात. मी म्हणते, 'तुम्ही कसे काय इथे ?' ते म्हणतात, 'कामामुळे ते इथे आले.' जर ही शक्ती इतकी महान आहे, तर ती किती महान आहे हे समजण्यासाठी तुम्ही सर्व काही या शक्तीवर सोपवा. सारं काही तुमच्यासाठी ती कार्यान्वित करते . आज आपण शक्तीबद्दल बोलत आहोत, देवीच्या शक्त्या ज्यांचा शोध घेतला पाहिजे, अंमलात आणल्या पाहिजेत, फार चांगल्या तऱहेने संतुलनामध्ये आहेत आणि अत्यंत कार्यक्षम आहेत. या शक्तींनी तुमच्यामध्ये जे काही कार्य केलं आहे, कृपा करून त्यांचा आदर करण्याचा प्रयत्न करा. म्हणू नका की, 'माझं लग्न झालंय, मी गरोदर आहे, मला मुलं आहेत, नोकरी आहे.' ज्यावेळी तुम्ही तुम्हाला परिपूर्ण करतां त्यावेळी सर्व काही परिपूर्ण होतं. सर्व काही तुमच्या परिपूर्णतेशी निगडीत असतं. मग तुम्ही मला प्रश्न विचारीत नाही. 'मी काय काम करायचं आहे ? मला कारय मिळवायचं आहे ?' तुम्हाला तुमचा मार्ग दिसतो आणि सगळं कार्यान्वित होतं. सगळे राक्षस मारले गेले होते. पण ते परत स्वत:च्या जागांवर आले आहेत. सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे साधकांच्या ते डोक्यामध्ये घुसले आहेत कारण आता ते गुरू म्हणून आले आहेत. कॅथलिक चर्च, प्रोटेस्टंट चर्च, सर्वप्रकारची देवळे, मूलगामीपणा इ. ते राक्षसांसारखे दिसतात. जर तुम्ही त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांनी तुमच्यावर प्रभाव पाडला तर ते तुमच्या डोक्यामध्ये जातात. पण तुम्ही सहजयोगामध्ये आल्यानंतर ही डोकीसुद्धा स्वच्छ केली जातात. हे स्वच्छ करणं, हा आनंद तुम्ही इतरांना दिला पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. सर्वप्रथम तुमचं शील, तुमचं वागणं आणि संबंध इतके पवित्र असले पाहिजेत की स्वत:हुन ते प्रकाश उत्सर्जित करतील. जसं, जर तुमच्याकडे फार स्वच्छ कांच असेल तर प्रकाश त्यामधून जाऊ शकतो, पण कुंडलिनी शुद्ध इच्छा असल्यामुळेसुद्धा तुमची खूप तीव्र उचंबळून येणारी, पूर्णपणे बाहेर उतूं जाणारी इच्छा हवी, कधी व्हायब्रेशन्स द्यायचे जे काही तुम्ही करीत आहांत, चित्त तुमच्या संधानावर ठेवा. जर तुम्ही सहजयोग करीत असाल आणि तुमचं संधान सैल असेल तर तुम्ही फक्त अंधार, अज्ञान आणि मूर्खपणा देता. या शक्तिशाली शक्तीशी तुम्ही सदैव संधान ठेवलं पाहिजे आणि प्रोटोकॉलप्रमाणे, वागणुकीच्या नियमांप्रमाणे तिला खूष ठेवलं पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. या सर्व देवता तुम्ही बघता त्यांचे प्रोटोकॉल्स आहेत कारण ते ठरलेले आहेत. तुम्हीसुद्धा तुमचे प्रोटोकॉल व्यवस्थितपणे ठरवले पाहिजेत. जोपर्यंत तुम्हाला काय शक्त्या आहेत ते कळत नाही, त्या तुम्हाला कशा मिळाल्या आणि त्याची आठवण रहात नाही, जोपर्यंत हे सत्य तुमच्या शरीराचा एक भाग होत नाही, तुमची वाढ होणं कठीण आहे. तुम्ही ना धड इथे ना तिथे, लंबकाप्रमाणे उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे जात रहाल. ते उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे फिरत आहेत हे पहायला सहजयोग्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही इतके कमकुवत कसे होऊ शकतां? कारण तुमची वाढ झाली नाही. तुम्हाला 'रॉक ऑफ जिब्राल्टर' २१ सारखं अभेद्य बनलं पाहिजे. तुम्हाला कॅचेस कसे होतील? कोणी अत्यंत निगेटिव्ह आहे असं तुम्हाला वाटलं तर त्या व्यक्तीजवळ जाऊ नका, पण तुम्ही नाजूक बाहुल्या होऊ शकत नाही. माझी मुलं वीर आहेत. तुम्ही माझी मुलं आहांत. आता तुम्ही हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन यापैकी काही नाही. तुम्हाला शूर, न्यायी, चांगले करुणामय, प्रभावी असले पाहिजे. आणि हे थोडक्यात आहे. या पूजेनंतर तुम्ही बसाल, ध्यान कराल आत्मनिरीक्षण कराल आणि मी असं का करतो याचा शोध घ्याल अशी मी आशा करते. काय अडचण आहे ? जर तुम्ही खरोखर या दैवीशक्तीशी जोडले गेले असाल, तर तीन दिवस आणि रात्री तुम्ही जागे राहिलात तरी दमणार नाही. तुमच्या बाबतीत असं झालं आहे कधीकधी पण लक्ष त्या शक्तीवर पाहिजे. चित्त जोडलं गेलेलं असलं तर तुम्हाला ही शक्ती येते, नाहीतर साहजिकच तुम्ही दमून जाता. तुमच्या आईसारखं कोणीतरी आहे जे तुमचं काय चुकतंय हे तुम्हाला सांगू शकतं याबद्दल देवाचे आभार माना. तुमच्या स्वत:च्या आईनेसुद्धां तुम्हाला सांगितले नाही कारण ते तुम्हाला किती घाबरत होते आणि तसं म्हणू नका तुमच्या हृदयाला पकड येते त्यावेळी तुम्ही काय करू शकतां हे प्रेमामुळे, कळकळीमुळे आहे, हे तुम्हाला कळलं तर तुम्ही ते करू शकाल, हे जास्त काही बुद्धीने समजण्याचं नाही, पण आणखी उच्चतर पातळीची जाणीव आहे. जी तुमच्या जाणिवेचाच एक भाग होऊन जाते. ते चुकीचं कसं असू शकेल? ते सर्व चांगलं असलंच पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे, की सर्व सात चक्रे ज्यांवर मी कार्य करते आहे, ती सामूहिकरीत्या मी, विराटाने धरली आहेत. विराटांगनेची गुणवत्ता आहे ती ही, की ही विश्वव्यापी चैतन्याची जाणीव, सामूहिकता आपल्यामध्ये ती निर्माण करते आणि अद्ययावत कालामध्ये आपण सामूहिकतेच्या रस्त्याने आध्यात्मिक मार्गात आहोत. आपण सहस्त्राराच्या स्थितीला पोहोचलो आहोत आणि इथे आपल्याला सामूहिक कार्याचच काम आहे. याचं पूर्णपणे आकलन झालं पाहिजे. कोणीही जो दुर्वर्तनाने किंवा कशाने सामूहिकतेला इजा पोहोचविण्याचा प्रयत्न करील त्याला बाहेर टाकलं जाईल आणि तो चुकीच्या हातात सापडेल सामूहिकता हे आदिशक्तीचं कार्य आहे कारण सहस्रारामध्ये विराटाचे साम्राज्य आहे आणि त्याची शक्ती आहे विराटांगना, जी सामूहिकता आयोजित करते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहीत हवा, की जर कोणत्याही कारणामुळे आपण सामूहिक बनत नसू, काहीही जसे हेवा, भीती किंवा मागून येणारे काही, किड्यासारखे वर येणारे, तर समजून घ्या, की तुमच्यामध्ये काहीतरी चुकीचे आहे. सामूहिकतेमध्ये नाही. सामूहिकतेवर टीका करू नका, जोपर्यंत मी स्वत: त्याचा शोध घेत नाही. सुज्ञतेने सामूहिकतेमध्ये रहा. आस्थेने रहा, लोकांना सामूहिकतेमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करा, एकमेकांबराबर आनंद लुटा, एकमेकांवर टीका करू नका. जर तुम्हाला टीका करण्याची सवय असेल तर स्वत:वर टीका करा. पूर्ण निर्मितीमध्ये आदिशक्तीचं काम महत्त्वाचं आहे. जेव्हा श्री सरस्वतीचं कार्य संपलं तेव्हां राक्षसांना मारण्याचं काम झालं होतं. श्री महालक्ष्मीचं कार्य संपलं होतं जेव्हा तिने हे मानवी पातळीवर आणलं. त्याचा कळस असा आहे, की आता तुम्हाला तुमचा आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. तुम्हाला विशेष गुणवत्ता मिळाली आहे. आता तुम्ही देवाच्या साम्राज्यात प्रवेश केला आहे तर आता तुमची वागणूक नीट ठेवा. ें व्या देवी सर्व भूतय बद्धि ै सं्थिता । ZIT edi चदि रेश संच्धिता NEW RELEASES On the Occasion of Ganesh Puja 2010 ु वदि Speech Title Lang. ACD ACS Date Place VCD DVD सहजयोग्यांशी हितगुज 26th Feb 1979 279 279 Pune M 19th July 1981 | Guru Puja 462 London th 26™ May 1983 463' Shri Buddha Puja Part-I & II Brighton 311 th 464' 17" July 1983 | Puja At Surbiton Ashram 312 Surbiton/UK 24th July1983 465 Guru Puja - Why in England - Brighton Guru Purnima Seminar 14h July 1984 466 Guru Puja Leisin 467 5th July 1985 313 Shri Trigunatmika Puja - Part I & II| Den Haag E 468* 314 Public Program 1986 Delhi Е/Н at Malvankar Hall (Delhi) 26h July 1993 315 Shri Pallas Athena Puja 41* Athens E 41 th 10" Sep 1995 San diego 88 316 Shri Ganesh Puja - Part I & II 88 E Guru Puja 26" July2000 th 210 Cabella 210 E 470' 4th Sept. 2000 | Public Programme Genoa, Italy E अपनी ओर दृष्टि रखें 21 Dec. 1975 261" st Mumbai 261 Н 24th Jul 1979 471* Beej Mantra Bhajans Title ACD Bhajan Details Atmanubhav - Part I Ajit Kadkade 165 Atmanubhav - Part II Ajit Kadkade 166 Shehnai Vadan 167 Pt Jagannath Mishra Nirmal Dhara Nirmal Sangeet Sarita 168 पुणे म्युझिक ग्रुप आईचा सोन्यावाणी रंग 169 FQ Books Price Code Title B 79 Eternally Inspiring Recollections -Volume 7 - Part - I 200/- B 80 Eternally Inspiring Recollections -Volume 7 - Part - II 200/- Sahajyog Parichaya Pustika - Aasami स्वरांजली B 81 2/- B 82 50/- प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी , पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in eaoint मम् म नामा नमः । ॐ काी तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द जागृत असती आणि आतां सिद्ध' मंत्र असतो. ---------------------- 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-0.txt चैतन्य लहरी सप्टेंबर-ऑक्टोबर २०१० मराठी का जि र प । 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-1.txt Happy Vijay 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-2.txt ० a Dasami ८६७ या अंकात श्री गणेश ब्रह्मपुरी पूजा ...... श्री गौरी .१५ श्री शक्ती पूजा १६ IT टीप : मागील अंकात नजरचुकीने ब्रह्मपुरी पूजेऐवजी 'एकादश रुद्र' पूजा पुनर्मुद्रित झाली आहे, या अंकात 'ब्रह्मपुरी पूजा' प्रवचन देत आहोत. तरी याप्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. ১ স স म सपभ ॐ आता है चरण पहा... तुम्हाला पूर्ण विश्व दिसतं का? मला माहीत नाही, मला तिथे दिसतं. 02১৮/6/১b 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-4.txt श्री गणेशाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे कारण तेच तुमची प्रगती करतात, तुमची चक्रे शुद्ध करतात, त्यात प्रकाश टाकतात आणि नेहमी प्रकाशाच्या दिशेनेच नेतात. जी सूक्ष्मता तुम्ही सहजयोगात प्राप्त केली आहे, ते गणेशाचेच काम आहे. .ज्याप्रकारे मी गणेशाला बनवले आहे, त्याचप्रकारे तुम्हालाही आत्मसाक्षात्कार देऊन मी बनवले आहे, त्यात काही बदल नाही. एकाच प्रकारे, एकाच तऱहेने बनवले आहे. तुमच्यामध्ये जर भोळेपणा, साधेपणा, सरळपणा आणि विश्वास असेल तर अशा निर्मळ अंत:करणाने श्री गणेशाची जागृती होऊ शकते. जे सहजयोग करतात त्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला निराकारात उतरायचे आहे. साकार स्वरूपात राहून तुम्हाला निराकाराचे पूर्ण माध्यम बनायचे आहे, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्यामधील गणेशाला जागृत करायचे आहे. फक्त पूजा करून नाही, तर त्याला जागृत करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्यामध्ये शुद्धता यायला पाहिजे. .....श्री गणेशाप्रमाणेच मनुष्यालाही आपले चित्त स्वच्छ करायला पाहिजे. चित्त स्वच्छ करण्यासाठी प्रथम हे पाहिले पाहिजे की आपले चित्त कुठे आहे ? जर तुमचे चित्त परमेश्वराकडे असेल तर ते शुद्ध आहे कारण तुमच्यामधे चैतन्य वाहत आहे. ...श्री गणेशाची शक्ती जर आपल्यामध्ये जागृत करायची असेल तर सर्वात आधी हे जाणून घेतले पाहिजे की आपले चित्त निराकाराकडे असले पाहिजे, आपले चित्त चैतन्याकडे असले पाहिजे आणि जे चैतन्य आपल्यामध्ये वाहते आहे त्याकडे बधितले पाहिजे. आपल्यामध्ये गंभीरता, जी श्री गणेशाची शक्ती आहे, ते गांभीर्य आणा......आपण गौरी मातेच्या मदतीने तिच्या शक्तीबरोबर त्या निराकारात उतरा जिथे आपण पूर्ण आनंदात राहू आणि आपल्या नसानसांमधून ती शक्ती अशी वाहील की संपूर्ण जगातील लोकांना कळेल की सहजयोगाने काय चमत्कार केला आहे. प.पू.श्री माताजी, १८-९-८८, मुंबई, चै.ल.खंड ५ अंक ९-१०, १९९३ .सहजयोग्याला पूर्ण तन्हेने, हृदयापासून मानावे लागेल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की श्री गणेशाचे स्थान तर आहे मूलाधार चक्रावर पण जेंव्हा ते तुमच्या हृदयात येतात तेंव्हाच ते आत्मस्वरूप होऊन चैतन्यमय होतात. आत्मा जो आहे तोच श्री गणेश आहे आणि तोच आपल्या हृदयात प्रकाश निर्माण करतो, तर तेच चैतन्य आहे. ज्याने श्री गणेशाला आपल्या हृदयात बसवले आहे तो नेहमी निरानंदात बुडून जातो, त्याला इतर कोणत्याही गोष्टींची पर्वा नसते आणि रिद्धी- सिद्धी सर्व त्याच्या पायापाशी.....श्री गणेश तत्त्व आज्ञा चक्राच्या पातळीवर येऊन सूक्ष्मातिसूक्ष्म होते. आज्ञा चक्रावर हे समजले जाते की आता त्याचे आध्यात्मिक पर्व आहे. प.पू.श्री माताजी, मुंबई, १८-९-१९८८ जसे मी सांगितले की कणाकणात श्री गणेशाचे वास्तव्य आहे, परंतु तुम्हाला ते जागृत करायचे आहे. 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-5.txt उदाहरण द्यायचे झाल्यास तुम्ही चैतन्यित पाणी पाहिले आहे. चैतन्याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा की पाण्यामध्ये गणेशतत्त्व जागृत केले जात आहे. असे पाणी जेव्हा तुमच्या पोटात जाते, डोळ्यात जाते किंवा तुम्ही इतरत्र कुठे टाकता तेंव्हा ते कार्य करते. ज्या गोष्टीत तुम्ही ते टाकता तिथे गणेशतत्त्व जागृत केले जाते. गणेश तत्त्व जागृत होऊन प्रत्येक गोष्ट समजून घेतो, त्याचे नियोजन करतो, ते क्रियाशील करतो. जेंव्हा तुम्ही बंधन देता तेंव्हा ते चैतन्याला गतीमान करते. पं.पू.श्री माताजी, ८.८.१९८९ ....श्री गणेश आपले सर्वात मोठे सहजयोगी आहेत. त्यांना कधी योग स्वीकारण्याची आवश्यकता पडली नाही. ते नेहमीच योगामध्येच असतात, ते आमचे महान योगी आहेत. त्यांच्यात देवतांचे महान पद प्राप्त करण्याची योग्यता आहे. मी तर म्हणेन, की आमचे महान देव आहेत आणि खरोखरच त्यांची पूजा केली पाहिजे. त्यांच्याद्वारे सर्व देवांची पूजा होते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ लागतात. प.पू.श्री माताजी, २५.९.१९९९ .यासाठी मनुष्याला सर्वात आधी प्रत्येक ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करावी लागते. प.पू.श्री माताजी, बेंगलोर, १३.२.१९९० ...प्रत्येक चतुर्थीला, जी पंधरवड्याच्या चौथ्या दिवशी असते, श्री गणेशाचा जन्मदिवस साजरा केला जातो. कृष्ण पक्षातील चतुर्थी जर मंगळवारी आली तर त्यास अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. या चतुर्थीचे खास महत्त्व असते. अंगारिका काय आहे? श्री गणेश जळणाऱ्या अंगाऱ्यांना थंड करतात. कुंडलिनी पण एक ज्वाळा आहे, त्याचे उत्थान धगधगणार्या ज्वाळेसारखे आहे. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण असते आणि त्यामुळे कोणतीही वरच्या दिशेने जाणारी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते, फक्त अग्नीच गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध दिशेने म्हणजेच वरच्या दिशेने जातो. श्री गणेश दोन प्रकाराने आपल्या आतील अग्नीला शांत करतात, ते कुंडलिनीला शांत करतात, एखाद्या व्यक्तीत असणाऱ्या सर्वप्रकारच्या वाईट गुणांव्यतिरिक्त ते कुंडलिनीकडे त्याच्या आत्मसाक्षात्कारासाठी प्रार्थना करतात. ते कुंडलिनीचे बालक आहेत आणि तुमच्यामध्ये तेच लहान मुलासारखे आहेत. या संबंधामुळे ते कुंडलिनीला समजवू शकतात की तुम्ही माझी आई आहात आणि कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करा. तेव्हा कुंडलिनी शांत राहून विचार करते की, 'माझ्या मुलाच्या इच्छेनुसार मी (कुंडलिनी) वर उठू.' श्री गणेश कुंडलिनीला सांगतात की, 'तुम्ही तुमच्या मुलाला जन्म देत आहात आणि यावेळी तुम्हाला क्रोधित व्हायचे नाही.' असे म्हणून ते कुंडलिनीला शांत करतात. .....कुंडलिनी श्री गणेशाच्या शक्तीद्वाराच उठते. कुंडलिनीमधून जे अंगारे उठतात ते थंड करण्याचे काम ही श्री गणेशच करीत असतात, एकप्रकारे ते आपल्या रागालाही शांत करीत असतात. ६ 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-6.txt जेव्हा कोणी राक्षस किंवा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस तुम्हाला त्रास देतो तेंव्हा हे गणांचे स्वामी त्यांचा नाश करतात. तुम्हाला काही सांगावे किंवा करावे लागत नाही. हे गण तुमच्याबरोबर आहेत. प.पू.श्री माताजी, गणपतीपुळे, महाराष्ट्र, २१.११.१९९१ सहजयोग्यांकडे मोठे उत्तरदायित्व आहे की त्यांचे गणेश तत्त्व ठीक असले पाहिजे, याच्याशिवाय पूर्ण सहजयोग डळमळू शकतो. स्त्री किंवा पुरुष, दोघांनीही आपल्या जीवनशैलीत श्री गणेशाला सन्मानपूर्वक स्थान दिले पाहिजे. आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, की श्री गणेशाच्या आशीर्वादानेच आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. प.पू.श्री माताजी, २७.७.१९९३ ....आता तुम्ही विवेकाने कार्य करा कारण आता तुमच्यामध्ये श्री गणेश जागृत झालेले आहेत आणि ते पूर्णपणे विवेकशील आहेत, विवेकाचे दाता आहेत. हेच कारण आहे की ते राक्षसांचा नाश करतात. आपली चेतना विकसित करून तेच आपले सर्व कष्ट दूर करतात. .दिशेचे ज्ञान ही श्री गणेशाची देणगी आहे. श्री गणेश सर्वांच्या आत एका चुंबकाप्रमाणे असतात. आपल्यामधील हा चुंबक कपटी व्यक्तींना आपल्यापासून दूर पळवून निष्कपट आणि अबोध माणसांना आपल्याकडे आकर्षित करतात. निष्कपट बनण्याचा प्रयत्न करा. चतुरता आपल्यासाठी आवश्यक नाही. चातुर्य आपला मानसिक दृष्टिकोन आहे तसेच निष्पापपणा तुमचा अंतर्गत गुण आहे जो सर्वव्यापी शक्तीशी संबंधित आहे. प.पू.श्री माताजी, ऑस्ट्रेलिया, २६.८.१९९० श्री गणेशाची शक्ती आपल्यामध्ये आहे, तुम्हाला तिचा उपयोग करायचा आहे. आपल्या हृदयात श्री गणेशाकडे दया, करुणा तसेच क्षमा याची याचना करत त्यांची पूजा करा. चला, आपण सर्व आपला आधीचा ढोंगीपणा, बंधनं, वाईट विचार तसेच दोषपूर्ण जीवन काढून टाकू तसेच आपल्या निष्पाप वृत्तीला आपल्यामध्ये प्रवाहित होऊ द्या. चला, आपण या गुणाचे उद्घाटन करू या! श्री गणेशाचे अथर्वशीर्ष वाचू या तसेच श्री गणेशाचे ध्यान करू या. तुमच्या सर्व धरणी मातेवर बसून समस्यांचा शेवट होईल. प.पू.श्री माताजी, २६.०८.१९९० 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-7.txt ब्रह्मपुरी पूजा १ ब्रह्मपुरी, ३० डिसेंबर १९८९ तुम्हांला एकाहून त्यांच्यापुढे तूम्ही म्हणजे काय, देदीप्यमान होऊ शकतां. एवढे मोठे सुधारक आणि एवढे मोठे महत्त्वाचे लोक तूम्ही होऊ शकतां पण आधी तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा. जट ते दिवे स्वच्छ झाले नाहीत तर तुम्ही जिथल्यातिथे कूजून मरणार आणि सहजयोगाची बदनामी आहे. एक मोठी माणसं करून सोडीन मी. गांधी काय नि टिळक काय, ८ 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-8.txt आता आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना असं सांगायचं आहे, की आपल्या देशामध्ये एक तऱहेचा नवीनच भुतांचा प्रकार सुरू झाला आहे आणि या भुतांच्या प्रकारांत राक्षसी प्रवृत्ती, असुरी प्रवृत्ती फार वाढलेली आहे. ते काल आपल्याला दिसलंच आणि ती वाढून त्याचा अतिरेक काल झाला आणि या लोकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल आपण सहजयोगी लोकांना असं सांगायला पाहिजे, की याबाबतीत आम्ही तयारीत असायला पाहिजे, नुसती माझी पूजा करून, आरती करून काम होत नाही. आपल्याला पुष्कळशा गोष्टी करायला पाहिजेत आणि त्यासाठी आपण खांद्याला खांदा देऊन पुढे आलं पाहिजे आणि दंड ठोकून उभे राहिले पाहिजे की आता आम्ही सहजयोगी आहोत. पण अजूनही आपण पुष्कळशा अशा गोष्टी करीत आहोत, की ज्याच्यामुळे आपल्यात कमजोरी आली आहे. मुख्य म्हणजे मी सारखी या जातीयतेबद्दल बोलते आहे, त्याला कारण काय की एकदा तुम्ही जातीयतेमध्ये तुमच्यामध्ये जी एक मूलभूत बांधणी आहे तीच मुळी तुम्हांला रोखते. जातीयतेला धरून बसणं ही फार चुकीची गोष्ट आहे आणि त्याचमुळे जर आपण हे सर्व सोडलं असतं तर अंधश्रद्धा समोर आलीच नसती. गेलात, की कारण आपल्याला माहीत आहे, की अंधश्रद्धा जी आहे ती फक्त आत्मसाक्षात्कारानंतर येते. पण आत्मसाक्षात्कार झाल्यावरसुद्धा आपण त्याच जातीच्या मागे जातो, त्याच जातीत लग्न करतो, त्याच जातीशी संबंध करतो आणि तशाच रीतीने मूर्खासारखे वागत असलो तर मात्र तुमची काहीही वाढ होणार नाही आणि नुसतंच एक राजकारणी त-्हेचं एखादं सोंग होईल. असली सोंग घेऊन आपण सहजयोगी झालो तर आपल्याला काय लाभ होणार आहे? जैसे थे, असेच राहणार आहोत आपण. आपल्याला पुष्कळशा गोष्टी सोडाव्या लागणार आहेत. त्यांत धर्मांधता जी आहे ती सुटली पाहिजे. धर्माधता म्हणजे आधी मी म्हणत होते, की देवळांत जायचं नाही. देवळात जाऊन ब्राह्मणाला पैसे द्यायचे नाहीत. कुंकू लावून घ्यायचं नाही. त्यांच्यात आता थोडीशी सुधारणा झाली आहे. त्याला कारण असं की, लोकांना त्रास होतो. पण घरांत ब्राह्मण आणून लग्न करणं हे ही चुकीचे आहे. ब्राह्मण कोण होतात लग्न करणारे? तुम्ही ब्राह्मण झाले मग ब्राह्मणाला आणून लग्न कशाला करायचं? लग्न हे व्यवस्थित सहजयोग पद्धतीने झालं पाहिजे आणि जोपर्यंत लग्न सहजयोगपद्धतीने होणार नाही, तोपर्यंत मी त्याची हमी देऊ शकत नाही, की ह्या लग्नाचं व्यवस्थित होईल. बरं परत आपल्या महाराष्ट्रांत लग्न म्हणजे अगदी सगळ्यांत मोठं धर्मकार्य आहे. लग्न म्हणजे काय? मग त्याच्यासाठी मुलीसाठी पहाणं, हे करणं, मग बस्त्याला बसणं हे ना ते, घाणेरडे प्रकार चालू असतात. लग्न ही फारच क्षुल्लक गोष्ट आहे. सहजयोगामध्ये त्याचं इतकं माहात्म्य नाही. एका सहजयोग्याचं दुसऱ्या सहजयोगिनीशी लग्न झालं, की त्याचं कारय एवढं माहात्म्य नाही आहे की आयुष्यभर त्याच्याशी लढत बसावं लागतं. जातीजातींत लग्न करून त्याचे जे दुष्परिणाम होतात, ते दिसतात आपल्याला, पण अजूनही आपण त्याच्यातच फसलेलो. तेव्हा सगळ्यांनी आज व्रत घेतलं पाहिजे, की आम्ही कोणत्याही धर्मात , कोणत्याही जातीत, कोणत्याही देशात लग्न करूं. आता तुम्हाला वाळीत टाकण्याचा प्रश्नच नाही कारण तुमचे सोयरे हे आहेत, तुमचे नातलग हे आहेत. जे तुमचे नातलग आहेत, ते कसे वागतात ते तुम्ही पाहिलंच आहे. कालच बघा, गावातल्या लोकांनीच तुम्हाला त्रास दिला ना ? तुमच्या पाहुण्यांना त्यांनीच मारलं ना ? त्यांनी तुमची कोणती मोठी पत ठेवली? आणि आतां या लोकांना काय वाटत असेल तुमच्याबद्दल? मी म्हणते ९ 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-9.txt ते नुसतं ऐकून, 'हो, माताजी म्हणतात, पण असं काही विशेष नाही ' असं म्हणायचं नाही. हे फार महत्त्वाचं आहे. जोर्पंत आपल्यातील जातीयता जात नाही, हंडा प्रकार जात नाही, जोपर्यंत आपल्या इथली अंधश्रद्धा जात नाही आणि जोपर्यंत आपण उठून उभे राहत नाही याबाबतीत, सबंध समाजाला एक उदाहरण म्हणून, तोपर्यंत आपण सशक्त नाही. आतां आपण कोणतीही मोठाली माणसं पाहू यां. आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, आपल्या समोर इतर, शिवाजीमहाराज आहेत अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत त्यांनी काय केलं, ते कसे वागले, त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजीमहाराजांनीसुद्धा, त्यांना चारदां लग्न करावं लागलं, राजकारणासाठी त्यांनी ते केलं. राजकारणासाठी मला करायचं आहे, ते मी केलं पण ते नि:संगात होते. त्याच्यावर त्यांचा परिणाम नव्हता काही. करावं लागलं तर केलं. चार लोकांशी आम्हालां दोस्ती करायची आहे. त्यांनी जातपात पाहिली नाही, की शहाण्णवच कुळी असली पाहिजे, की अमकंच असलं पाहिजे. त्यावेळी ज्यावेळी इतक्या वर्षापूर्वी गागाभट्टांना इकडे येऊन त्यांना राज्याभिषेक करावा लागला, तेव्हा या जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवून टाकलं, की तुम्ही कुणबी आहातं , तुम्ही मराठा नाही म्हणून. तेव्हा तुमची कोणतीही जात असेना कां, तुम्ही आज सहजयोगांत आलांत, तुमची जात बदलली, तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म 'विश्व निर्मल धर्म' आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे. त्यामुळे सर्व तुमच्या जातीच्या तुमच्या वाईट सवयी गेल्या, सगळे काही गेलं. पण हे भूत अजून गेलेलं नाही. लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहिजे. कारण ही जमात, जी तुमची आहे, ती भुतं आहेत सगळी. दारू पिणं, मारणं, मग ते दारू पिऊन नाही तर काही करां, हंडा घेवो नाहीतर काही करो, पण ते आमच्या जातीतलंच असलं पाहिजे मग तुम्ही सहजयोगी कसे? मग सहजयोग सोडा तुम्ही, काय तुम्ही दोन धर्मात उभे राहू शकतां का? नाही राहू शकत. त्याच्यामुळेच काल यांना मार खावा लागला. हे लोक, ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला आणि 'आम्ही काहीच असं करत नाही' असे करून उभे राहिले. त्यांनी काल मार दिला त्याला कारण थोडेसे तरी मला असं वाटतं की आपल्यामध्ये जी काही थोडीशी कमजोरी आहे ती त्यांनी ओळखली आणि त्यांच्यामध्ये आपण अंधश्रद्धेला पूर्ण झालो. पण जर तुम्ही बोलत सुटलांत की आम्ही सहजयोगी आहोत, आम्हाला कोणतीच अंधश्रद्धा नाही. आम्ही कोणत्याच असल्या गोष्टींना मानत नाही, आम्ही याच्या पलीकडे आहोत, आम्ही सहजयोगी आहोत, आम्ही बोलत नाही, करून दाखवू तुम्हाला. तेव्हा या लोकांच्या लक्षांत येईल की काहीतरी विशेष मंडळी आहेत. आम्ही आमच्या वडिलांना पाहिलं. आमच्या वडिलांना गांधीजींनी सांगितलं की सगळ्या तुमच्या मुलांची लग्नं बाहेर करा. आम्हीसुद्धा शहाण्णवकुळीच आहोत, तेव्हां फार विचार करून लग्न होत असत पूर्वी. वडिलांनी लगेच सांगितलं, 'काही हरकत नाही, कुठेही लग्न करा.' आणि सगळ्यांची अशीच लग्नं लावून दिली आमची. तर काय आमचं वाईट झालं ? त्यांनी सांगितलं मी काँग्रेसचा मनुष्य आहे. मला काय. मला दुसरं काही नाही. मला जात नाही, धर्म नाही. मी गांधीधर्मी आहे. तेव्हा धर्म जर घ्यायचा तर पूर्णपणे घेतला पाहिजे. अर्धवट लोकांसाठी हा धर्म नव्हे, तेव्हांच तुमच्यांत खरी शक्ती येईल. तेव्हांच तुमच्यामध्ये ते पावित्रय १० 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-10.txt ে का किम येईल की ज्याने सगळ्यांचं रक्षण होऊ शकतं. पण जर तुम्ही अर्धवट असला तर कोणाचंच रक्षण करू शकत नाही. स्वत:चंही नाही, दुसऱ्याचंही नाही. ते पावित्र्य् आणण्यासाठी एकदम नि:संगांत येऊन उभं राहिलं पाहिजे. जसे आपल्या देशामध्ये मोठेमोठे लोक झाले. टिळकांचं उदाहरण घ्या. त्यांनी एका विधवेशी लग्न केले. गांधींजींच उदाहरण घ्या, ते एका हरिजनाच्या झोपडीत जाऊन जेवत असत. कृष्णाचं उदाहरण घ्या, विदुराकडे जाऊन जेवत असत. रामाचे उदाहरण घ्या, त्याने भिल्लीणीची बोरं खाल्ली. कोणाचेही उदाहरण घेतले तर जी मंडळी अशी मोठी झालेली आहेत त्यांच्यात किती वैशिष्ट्य आहे ते बघा. जर खरोखरच तुम्हाला सहजयोगात यायचं असलं, तर पहिल्यांदा समजलं पाहिजे, की सहजयोगात तुम्ही फार विशाल होता. तुमच्या संकुचित जीवनाच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या बदलून तुम्ही विशाल होता. तुम्ही विश्वात सामावलेले आहात. 'हे विश्वची माझे घर' असे म्हटलेले आहे. पण नुसतं म्हणायचं, तोंडाने म्हणायचं, गाणं म्हणायचं याला काही अर्थ नाही. हे लोक बघा आपली संस्कृती सोडून तुमच्या संस्कृतीत येऊन बसले. कारण हे चांगले आहे म्हणून घेतलं त्यांनी. पण तुम्ही त्यांच्यापासून हे तरी शिका. हे जातपात बघत नाहीत. देश बघत नाहीत. कितीतरी लोकांनी आपल्या हिंदुस्थानी बायकांशी लग्न केले आणि त्यांचं फार भलं केलं. नाहीतर पूर्वी एखाद्या इंग्लिश माणसाला एखादी हिंदुस्थानी बाई दिली तर तिला मारून खायचा तो. म्हणा इथे अजूनही मारून खातातच. इथे बायकांना मारून खाणे हा इथे एकच खाण्याचा धर्म आहे. पण तरीसुद्धा आपण त्या रीतीने वागतो, बायकांची इज्जत करायची नाही. सगळ्यांच्यासमोर भांडायचं, सगळ्यांना बोलायचं ही एक दुसरी पद्धत आहे इथे. बायकांना दाबून ठेवायचं. तेव्हा ही शक्ती जी आहे तुमच्या ११ 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-11.txt इथली तिची तुम्ही जोपासना केली पाहिजे. त्यांची वाढ केली पाहिजे. मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना वाढवलं पाहिजे. त्यांच्या आवडीनिवडींप्रमाणे त्यांची लग्न केली पाहिजेत. त्यातल्या त्यात त्यांची सहजयोग्यांशीच लग्न केली पाहिजेत म्हणजे मुलंसुद्धा सहजयोगी होतील, जन्माला जी उद्याची पिढी येणार आहे. तुम्ही किती महत्त्वाच्या पदाला आले आहांत ते तुमच्या लक्षांत येत नाही. तुम्ही ते नाहीत. शिवाजीमहाराजांनी मावळे घेतले त्याच्याही पेक्षा अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीच्या कामावर तुम्ही आलेले आहांत आणि सहजयोगांत आले आहात. जरी माझ्याजवळ दोन सहजयोगी असले तरी चालतील पण त्यांनी पूर्णपणे सहजयोगी असलं पाहिजे नाहीतर सहजयोगात आलं नाही पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे मी जे म्हणते ते मानलं पाहिजे कारण मला सगळं दिसतं आहे. मी सर्वसाक्षी, सर्वदष्ट आहे. मला सगळे समजतं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे 'माताजींनी असं म्हटलं' असं म्हणून काही मला वापरायचं नाही. माताजी असं म्हणणार नाहीत आम्हाला माहीत आहे. एकंदरीत तुमच्यापासून मला इतक्या अपेक्षा का आहेत, त्याला कारण एकच आहे, कारण मी फार शक्तिवान आहे. माझ्यांत फार शक्त्या आहेत. फक्त तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा. म्हणजे प्रकाश द्यायला मी तयार आहे. तुम्हांला एकाहून एक मोठी माणसं करून सोडीन मी. गांधी काय नि टिळक काय, तुम्ही म्हणजे काय, देदीप्यमान होऊ शकतां. एवढे मोठे सुधारक आणि एवढे मोठे महत्त्वाचे लोक तुम्ही होऊ शकतां पण आधी तुमचे दिवे तुम्ही स्वच्छ करा. जर ते दिवे स्वच्छ झाले नाहीत तर तुम्ही जिथल्यातिथे कुजून त्यांच्यापुढे मरणार आणि सहजयोगाची बदनामी आहे. तेव्हा प्रत्येकाने हे लक्षांत घेतले पाहिजे, की माताजींमध्ये अत्यंत शक्त्या आहेत. पण त्या जर वापरायच्या आहेत तर त्याचे जे साधन आम्ही, त्याचे आम्ही प्रकाश आहोत. ते प्रकाश आमच्यातून वाहण्यासाठी म्हणून आमचे दिवे स्वच्छ असले पाहिजेत. त्याची पूर्ण तयारी असली पाहिजे. ध्यानधारणा करायलाच पाहिजे. जे आमच्यामध्ये निषिद्ध आहे ते करायचं नाही. सहजयोगांत पुष्कळशा गोष्टी निषिद्ध आहेत आणि त्या निषिद्ध गोष्टी सोडायच्याच. आतां पुष्कळशा लोकांची व्यसनं सुटून गेलेली आहेत. पुष्कळसे लोक दारूबिरू सोडून व्यवस्थित झाले आहेत. कबूल आहे, पण पैशाच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत अत्यंत चोख असलं पाहिजे. आणि सडेतोड झालं पाहिजे. चार लोकांत गेलं की, सहजयोगाच्या गोष्टी तोंड उघडून बोलायच्या, काय तरी तिथे संभावितपणा आणून, चूपचाप बसून चालत नाही. सहजयोगाच्या बाबतीत, सडेतोडपणाने बोललंच पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे, 'सहजयोग हाच आजच्या युगाचा धर्म आहे. तो जर घेतला नाही तर सर्वांचा सर्वनाश होणार आहे.' सगळ्यांना, ह्यांना, त्यांना, तुमच्या नातलगांना पत्र लिहा. आम्ही सहजयोगांत हे मिळवलं आहे. आतां तुम्ही लोक पत्रिका छापतां त्यांत सुद्धा माझं नांव असायला पाहिजे. आतां मी तुमची कुलदेवता आहे. तुम्ही आमच्या कुळांत आले तर मी तुमची कुलदेवता आहे. बाकी सगळ्या देवतांना काहीही लिहायची गरज नाही. आज मी स्पष्टपणे सांगते, की ज्या लग्नामध्ये माझं नांव नसेल त्या लग्नाला माझा आशीर्वाद नाही. आज मी जिवंत आहे तुमच्यासमोर. हे अवतरण तुमच्यासमोर आलेलं आहे. जे अवतरण समोर आहे त्याला न १२ 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-12.txt मानतांना जे आज नाही त्याला मानण्यात काय अर्थ आहे ? मग आमचे मोठे लोक असे म्हणतात आणि लहान लोक असे म्हणतात तर काही नाही. आमचा कुणाशी संबंध नाही. आमचा फक्त माताजींशी संबंध आहे. त्या म्हणतील ते. पण तुम्हीच नातलगांच्या जबड्यांत जाता-मगरीच्या तोंडात पाय ठेवायचा आणि बोटीवर पाय ठेवून तुम्ही बोटीवर येणार नाही. जे नातलग तुमचे सहजयोगी नाहीत त्यांच्याकडे जेवायलासुद्धा जायचं नाही, त्यांचं अन्नसुद्धा घ्यायचं नाही, म्हणजे तुमचे आजार होणार नाहीत. तुम्हाला त्रास होणार नाहीत. तुम्ही या धर्मात पूर्णपणे आलात तर सर्व तऱ्हेने परमेश्वराचा आशीर्वादच आशीर्वाद आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की किती तुमची प्रगती होईल याच्यात. पण जर तुम्ही अर्धवटपणा केलांत तर त्याची फळं तुम्हाला भोगावी लागतील. आणि जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगितलं की मी तुमची आई आहे. मला तुम्हाला खरं ते सांगितलंच पाहिजे. मला कोणाचाही राग नाही किंवा दष्टावा नाही. पण तुमचं भलं व्हावं, हित व्हावं आणि तुम्ही सत्याची कास धरली पाहिजे. सत्याची ज्या माणसाने कास धरली त्या माणसाचे कधीही नुकसान कोणत्याही प्रमाणात होऊ शकत नाही. तेव्हां आजचा हा फार शुभप्रसंगी दिवस आहे. कालचं एव्हढं हे झालं ते सगळं विसरून जा. त्यात काही अर्थ नाही पण त्यांत आपल्यामध्येच अजून सहजयोगाची ती धमक आलेली नाही. नाहीतर एखाद्या गावात जाऊन लोकांनी मारामाच्या करण्याची कोणाची हिंमतच होणार नाही. पण आपल्यातच ती धमक असायला पाहिजे, की नुसतं एका डोळ्याने पाहिलं, की सगळं ठीक होऊन जाईल. तेव्हां सहजयोग्यांनीसुद्धां आतां लक्षांत घेतलं पाहिजे, की प्रत्येक गावात, प्रत्येक खेडेगावात, प्रत्येक शहरात, जिथे राहतो तिथे सहजयोगासाठी आम्ही काय करतोय ? सडेतोड बोललं पाहिजे आणि ब्राह्मणाला बोलवून पूजा करायची, सत्यनारायणाची पूजा करायची हे प्रकार करायचे असले तर तुम्ही सहजयोगांत येऊ नका. सहजयोगांत तुम्ही ब्राह्मण झाले आहांत. सर्व कार्य तुम्ही सहजयोगाच्या दृष्टीने केलं पाहिजे आणि बाकीचं जे काही आहे त्याला तिलांजली दिली पाहिजे. म्हणजे मग हे अंधश्रद्धावाले काही बोलू शकत नाही. कारण आपण अंधश्रद्धेलाच तिलांजली दिली.ज्या काही आपल्या वाईट सवयी होत्या त्या आपण सोडून दिल्या, त्याशिवाय ज्या काही जुन्या कल्पना होत्या त्या सोडून दिल्या. आपण मागासलेले नाही आहोत. सगळ्यांत आपण जे वर्तमानकाळांत अत्यंत उच्चतर लोक जे होतो ते आहांत तुम्ही. उच्चतर, तुमच्याहून उच्च कोणी नाही पण अजूनही तुम्ही त्या नीच लोकांमध्ये राहता मग काय तुम्हालां घाण लागणार नाही? जर हिरा तुम्ही मातीत घातला तर तो हरवायचाच तेव्हां कृपा करून माझ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. वाईट वाटून घ्यायचं नाही. त्याबद्दल माताजी असं बोलल्या असं म्हणायचं नाही. मी जे बोलले ते अगदी हृदयातून बोलले आणि हृदयांतून काढून तुम्हाला सांगतेय. तुमची मुलं आहेत, उद्या पाहायचं कोणाची मुलं वर येतात. पूर्णपणे सहजयोगाला वाहून घेतलेले आहे. तेव्हा आपलं धर्मांतर झालंय असं समजायचं. आतां आपल्याला दुसरा धर्म नाही ही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्यावर तर उपकार होतीलच पण या देशावरही उपकारच होतील आणि सबंध जगावर होतील. कारण तुमच्यात जी एक विशेषता आहे, तुमच्यामध्ये जे विशेष पुण्य आहे, तुम्ही पुष्कळ पुण्य केलंय म्हणून तर या हिंदुस्थानात जन्माला आलांत. या महाराष्ट्रांत जन्माला आला. पण ते सगळं वाया जाणार, मूर्खपणामुळे ते सगळे वाया जाणार. १३ 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-13.txt आतापर्यंत कोणते साधूसंत झाले ज्यांनी जातीयतेला मदत केली? अहो, दासगणूंनी सुद्धा म्हटलं आहे : 'आम्हाला म्हणती ब्राह्मण, आम्ही जाणिले नाही ब्रह्म आम्ही कसले ब्राह्मण.' नृसिंहसरस्वतींनी सुद्धा म्हटलं आहे हे सगळे ब्राह्मण होते. त्यांनीसुद्धां म्हटलं आहे मग आपण असं त्याच्या आहारी जायचं आणि तीच तीच कामं करायची. किती चुकीचं आहे! आतां तुम्हाला दर्शन झालंय विशालतेचं. तुम्ही माझे सगळे फोटो बघितलेत. दिव्य आहे सगळं, फार दिव्य आहे. एवढी दिव्यता मिळविण्यासाठी तुम्हालाही दिव्य असायला पाहिजे. आज विशेषकरून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतेय, मी आता विनंती करणार नाही. कारण खूष तुम्ही मला केलं पाहिजे. देवीला प्रसन्न करावं लागतं. मी तुम्हांला प्रसन्न करत बसणार नाही. तुमच्यामध्ये जी शक्ती आहे, तुमच्या आतमध्ये साठवलेली जी संपत्ती आहे, तिचा प्रकाश जगावर पडला पाहिजे आणि तुम्हीच लोक करू शकतां जास्त ह्यांच्यापेक्षा. कारण तुमच्यामध्ये ती संपत्ती आहे. हे लोक संपत्ती नसतांनासुद्धा जास्त त्याचा उपयोग करतात. मग तुमच्याजवळ संपत्ती असतांनासुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करत नाही असे हे दोन प्रकार आहेत. तेव्हा कृपा करून पुढच्या वेळेला मला एकाहून एक सहजयोगी तयार पाहिजेत. इतकेच नव्हे तर प्रत्येकाने जाऊन भाषणे द्यायची. आता अंगापूरच्या लोकांना माझं इतकंच सांगणं आहे, की उद्यां त्यांनी जाऊन संघटना करायची सहजयोगाची. इतकंच नव्हे तर भाषणं द्यायची आणि खुले आम. इथे एक मोठं पटांगण आहे तिथे बसून खुले आम सहजयोगाबद्दल सांगायचं. एका नुसत्या भाषणाने, हे लोक आपल्यावर बिथरले होते आणि आपण कधीच भाषण देत नाही. तिथे त्यांनी एक भाषण दिलं तर तो पोलीसवालासुद्धां बिथरला होता, पण आज त्याच्या लक्षात आलं, तर एवढं वाईट वाटलं. म्हणजे काम करीत नाही त्याबाबतीत, आपण बोलत नाही. आणि सहजयोगाने मित्रता वाढेल. तर आतां जाऊन सगळ्यांना सांगायचं, झालं हे फार वाईट झालं, आम्हांला फार वाईट वाटलं. सगळ्यांनी एक सभा करा. जाहीर सभा. ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी क्षमा मागितली पाहिजे. अर्थात् ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं काहीतरी वाईटच होणार. मी कितीही प्रयत्न केला, किती क्षमा केली, तरी हे गण आहेत आणि हे गण त्यांना ठिकाणावर लावतील. पण तरीसुद्धा तुम्ही सांगायचं, की जे झालं ते विसरून जा. आपल्या देवधर्माशिवाय चालणार नाही. असल्या फालतू लोकांना इथे जमू द्यायचं नाही आणि ही संस्था इथे घ्यायची नाही. आणि नंतर ही संस्था आल्यानंतर तुम्ही पोलिसांना कळवा की इथे संस्था आलेली आहे आमच्या मुलांना बिघडवत आहेत आणि त्यांना खुनशी बनवत आहेत. मागच्या वेळी त्यांनी त्यांना दगड मारायला सांगितले. सगळ्यांनी मिळून असं सांगायचं. आणि सरपंच सुद्धा सहजयोगी निवडायचा. प्रयत्न करायचा. सहजयोगाने कोणी दैववादी बनत नाहीत, देववादी बनतात, सशक्त बनतात. त्याला डॉक्टरांचा पुरावा आहे. हे आम्हाला का बोलतात. कोणीही उठावं, काहीही बोलावं. डॉक्टरांनी सिद्ध केलेले आहे. आता आम्ही काय ते सिद्ध करून दाखवायचे! सहजयोगात नुसता आशीर्वादच आहे पण त्याच्यासाठी कर्तव्य पण आहे, त्या कर्तव्याला मुकलं नाही पाहिजे. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. १४ 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-14.txt श्री गौरी गौरी श्री गणेशाची आई आहे आणि आपल्या पावित्र्याच्या रक्षणार्थ त्यांनी श्री गणेशाला जन्म दिला. अशाप्रकारे कुंडलिनी ही गौरी आहे आणि आपल्या मूलाधार चक्रावर श्री गणेश विराजमान आहे. मूलाधार गौरी कुंडलिनीचे निवासस्थान आहे आणि श्रीगणेश कुंडलिनीचे रक्षण करतात. ती आपल्या पावित्र्याची देवता आहे. फक्त श्रीगणेश या अवस्थेमध्ये राहण्यास समर्थ आहेत कारण पेल्विक चक्र मल-मूत्र विसर्जन क्रिया पाहते आणि वातावरणातील दुर्गंधीच्या प्रभावापासून मुक्त, केवळ श्री गणेशच तिथे राहूु शकतात. ते अतिशय शुद्ध तसेच निष्पाप आहेत.......कुंडलिनी श्री गणेशाची कुमारी माता आहे. लोक माता मेरीच्या विरोधात बोलायला लागले आहेत की त्यांना मुलगा कसा झाला. याचे कारण आपले अज्ञान आहे की परमेश्वराच्या साम्राज्यात सर्व काही होऊ शकते. ते या सर्व गोष्टींच्या वरचे आहेत तसेच ते पवित्र आहेत. श्रीगणेश जर अशक्त असतील तर कुंडलिनीला आधार देऊ शकणार नाही. कुंडलिनी जागृतीच्या वेळी श्रीगणेश आपले सर्व कार्य थांबवतात. मी कधीकधी तर नऊ-दहा तास एकाच ठिकाणी बसलेली असते, उठतच नाही. गौरी पूजा, ऑकलंड ८.४.१९९१ .....गौरीच्या शक्तीचा सन्मान झाला पाहिजे कारण ती आपली आई आहे, तिनेच आपल्याला पुनर्जन्म दिला आहे. तिला आपल्याविषयी सर्व काही माहीत आहे. ती अत्यंत सुहृदय तसेच करूण आहे. उत्थान तसेच चक्र भेदण्याचे सारे कष्ट स्वत: झेलत ती आपल्याला पुनर्जन्म देते कारण तिला सर्व माहिती आहे, ती सर्व समजते, ती सर्व व्यवस्था करते आणि आपल्यामध्ये असलेल्या सर्व सौंदर्यपूर्ण गोष्टीला पुढे आणते. साक्षात्कार तसेच ज्ञान प्रदान करण्यासाठी आपल्याला त्यांच्याप्रती (गौरी) कृतज्ञ व्हायचे आहे तसेच हे लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला नेहमीच त्यांना जागृत करायचे आहे, त्यांचा विस्तार करायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे ज्यामुळे आपला साक्षात्कार तसेच उत्थान अक्षय राहील. फक्त उत्थानच संपूर्ण विश्वाला परिवर्तीत करेल म्हणून तुम्ही गौरीला प्रार्थना करा. शुद्ध करणे, तुमचे हृदय तसेच मस्तिष्क शुद्ध करून तुमच्या योगाला अमरता प्रदान करणे हे गौरीचेच कार्य आहे. असे झाल्यानेच आपण परमेश्वराच्या प्रेमाच्या सुंदर शक्तीच्या वाहण्याचा अनुभव तुमच्यामध्ये करू शकता. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कार्य तुम्ही करा, पूर्णपणे समूहात रहा, कोणत्याही गोष्टीचे बलिदान करा आणि सहजयोगाच्या प्रचारासाठी प्रयत्न करत रहा कारण जेव्हा तुम्ही सहजयोगाला एखाद्या वृक्षाप्रमाणे पसरवाल तर त्याची सखोलता ही वाढेल. हे कार्य तितक्याच सुंदरतेने व्हायला पाहिजे जितके कुंडलिनीचे जागरण होते. कुंडलिनीने तुम्हाला कोणताही त्रास दिला नाही, तुमच्यासाठी कोणतेही अडथळे निर्माण केले नाहीत. यापासून आपल्याला काही शिकले पाहिजे. .मी तुम्हा सर्वांना विनंती करते की आपल्या कुंडलिनीवर चित्त ठेवा, ते नेहमी जागृत ठेवा आणि आपल्या चैतन्य लहरींना सांभाळा. फक्त आपल्याच लहरींना ठीक ठेऊ नका तर दुसर्यांविषयी असणार्या आपल्या दृष्टिकोनामध्येही बदल घडवून आणा. त्यांच्यात असणारे दोष बघू नका, त्यांच्यातील चांगले गुण बघा तसेच त्यांच्या चांगले कार्य करण्याच्या सामर्थ्याकडे बघा. कुमारी असूनही गौरी किती विवेकशील आहे, त्याचप्रकारे आपल्यालाही विवेकशील तसेच संवेदनशील बनायचे आहे. १५ 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-15.txt न भा ন *१ ी रा सशि कहो अर रा] हो ० ला] -ট----t+-0-2= था १ २३.९.१९९० को Fককরককক श्री शतक्ती पजा 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-16.txt कॅलेंडरप्रमाणे यावर्षी नवरात्रीचे दहा दिवस आहेत. नऊ नव्हेत. नऊ दिवस आणि रात्री असे आहेत. जेव्हां देवीला राक्षसांशी लढाई करून मुलांचा नकारात्मक शक्तींपासून बचाव करावा लागला. एका बाजूला ती प्रेमाचा, करुणेचा सागर होती तर दूसर्या बाजूने ती वाघिणीप्रमाणे त्यांचं रक्षण करीत होती. कारण काल असा होता, की कोणीही ध्यानधारणा करू शकत नव्हतं. कोणीही देवाचं नांव घेऊ शकत नव्हतं. आत्मसाक्षात्काराचा तर विचारसुद्धा कोणी करू शकत नव्हतं, पण आज इथे जे बसले आहेत, त्या दिवसांतसुद्धा तुम्ही तिथे होता आणि तुम्हां सर्वांना आजच्यासाठी, या दिवसासाठी वाचविण्यात आलं, ज्यायोगे तुमचा आत्मसाक्षात्कार तुम्हाला मिळाला. त्या काळात देवीचं रूप मायास्वरूपी नव्हतं. ती तिच्या खऱ्या स्वरूपात होती आणि त्यामुळे तिच्या भक्तांमध्येसुद्धा भीतीयुक्त आदर निर्माण झाला होता. त्यामुळे आत्मसाक्षात्कार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. सर्वप्रथम त्याचं रक्षण करायचं होतं. त्यामुळे ज्याप्रमाणे आईला नऊ महिने बाळाला गर्भाशयामध्ये ठेवावं लागतं त्याप्रमाणे, तुम्ही नऊ महिने म्हणूं शकता. नऊ युगे तुम्हा सर्वांचं व्यवस्थित रक्षण केलं गेलं आहे आणि दहाव्या महिन्यात तुम्हाला तुमचा जन्म दिला गेला आहे. शिवाय हा जन्म नेहमीच नऊ महिन्यानंतर सात दिवसांनी होतो. तेव्हां त्याला परिपक्वता येईपर्यंत आपल्याला थोडा वेळ थांबावं लागतं. आता आजची दहावी नवरात्र खरोखर आदिशक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे. एका बाजूला आदिशक्ती ही महाकाली आहे. दुसऱ्या बाजूला ती महासरस्वती आहे. मध्यभागी ती महालक्ष्मी आहे. आणि शिवाय तीच अंबासुद्धा आहे. ती, जी कुण्डलिनी आहे, पण ती त्याच्या पलीकडेसुद्धा आहे. ती पराशक्ती आहे, सर्व शक्त्यांच्या पलीकडे ती आहे कारण शक्ती तीच आहे. शक्तीची ती जननी आहे. आता जेव्हा आपण म्हणतो, की फक्त एकच देव आहे, ठीक आहे, देव एकच आहे, पण या एकाच देवाला डोकं आहे, यकृत आहे, त्याचं पोट आहे, त्याचं नाक आहे, सर्व काही मानवासारखच आहे. कारण ते तसेच म्हणतात. स्वत:च्या प्रतिबिंबाप्रमाणे त्याने मानवाला बनविलं. तर त्याच्या शरीराला वेगवेगळे अवयव आहेत आणि ते वेगवेगळे अवयव त्याला चालू ठेवले पाहिजेत. त्याला वेगवेगळ्या देवता पाहिजेत आणि तुम्ही त्यांना जाणलं पाहिजे. जोपर्यंत या देवतांना तुम्ही जाणत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही स्वत:मध्ये जागृत करू शकत नाही, पण त्या सर्व आदिशक्तीचे अंगप्रत्यंग आहेत. पूर्णपणे त्या आदिशक्तीच्या ताब्यात आहेत. काल तुम्ही आदिशक्तीच्या वेगवेगळ्या शक्त्यांबद्दल घेतं त्याप्रमाणे ऐकलेत. ते कासवासारखं आहे. कासव आपलं सर्व शरीर आपल्या पाठीच्या ढालीमध्ये आक्रसून माझ्या सर्व शक्त्या माझ्यामध्ये मी ओढून घेतल्या आहेत. मी काय म्हणते, तुम्ही त्यांना सहजासहजी शोधू शकत नाही, सहज तुम्हाला त्या सापडू शकणार नाहीत फक्त या आधुनिक कॅमेऱ्याशिवाय. हे आपल्याला फसवू पहात आहेत. तेच माझे प्रकार आणि स्वरूप तुम्हाला दाखवित आहेत कारण या व्हायब्रेशन्समध्ये प्रकाश आहे आणि जेव्हा व्हायब्रेशन्स उत्सर्जित होतात तेव्हां या कॅमेऱ्यांनी ती तुम्हाला दिसू लागतात. ते जरी फार संवेदनाक्षम नसले तरी लोक कसंतरी ती पकडतात. कितीतरी चमत्कार दर्शवणारे फोटो आले आहेत, तुम्हाला माहीतच आहे. एक फोटो तुम्ही पाहिला असेल श्री गणेश स्वत:च माझ्यामागे उभे आहेत. काय चाललं आहे ते तुम्हाला कळत नाही आणि आपल्याला हे समजलं पाहिजे, की देवाच्या जादूच्या नव्या प्रांगणामध्ये आपण प्रवेश केला आहे आणि त्याची जादू अनेक प्रकारे कार्य करते. अर्थात कधीकधी तुम्ही हरवून जाता, तुमच्या पूर्वीच्या अडचणींमुळे. काही वेळा तुम्हाला ओढत नेलं जातं. कधीकधी १७ 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-17.txt मोहात पाडलं जातं. कधीकधी निगेटिव्ह फोर्सेस तुमच्यावर दबाव आणतात आणि तुम्ही खाली पडता आणि कोणाही सहजयोग्याच्या बाबतीत असं व्हावं, ही फार दु:खद गोष्ट आहे. या पातळीवर येण्यासाठी तुम्ही किती झगडला आहात, किती परिश्रम केले आहेत ते तुम्हाला माहीत नाही. आणि या पातळीला आल्यानंतर वर जाण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही तर एकतर तुम्ही त्याच जागी चिकटून रहाल किंवा कदाचित खाली फेकले जाल. तुम्ही सहजयोगी आहांत, हे समजलं. तुम्ही नवरा, बायको, आई किंवा वडील नाही. तुम्ही सहजयोगी आहांत. तशी मी आदिशक्ती आहे, तसे तुम्ही सहजयोगी आहात, तर माझं मुख्य कार्य आहे इतरांना आत्मसाक्षात्कार देणं कारण माझे सर्व नातेसंबंध आधीच व्यवस्थित प्रस्थापित झालेले आहेत. कोणत्याही देव - देवतेबद्दल काळजी करण्याचं मला कारण नाही कारण ते सर्व सगळे काही चोखपणे पार पाडतात. आतां, काल तुम्ही जे देवीचं वर्णन वाचलं, त्यात तुम्ही वाचलं, तिचे हात इतक्या वेगाने बाण सोडीत होते, की करते आहे असं वाटत होतं. माझा प्रत्येक केस बाणाप्रमाणे आहे आणि तो इतकं प्रचंड काम करतो पण ती नृत्य वाटतं मी इथे शांतपणे बसले आहे. तुम्ही बसला आहात त्याप्रमाणे, पण तसं नाही. हे त्याहून खूप जास्त तुम्हाला काही आहे. जेव्हां ते सिंह किंवा वाघ माझं 'वाहन' म्हणून दाखवितात, तेव्हा तुम्हाला समजले पाहिजे, की ते खरोखरच तसे आहेत. अशाप्रकारचे वाहन मिळण्यासाठी अमिबापासून या स्थितीपर्यंत त्यांनासुद्धा उत्क्रांतीपासून जावं लागलं. नाहीतर ती वाहने इथे नसती. अशाचप्रकारे तुमचीसुद्धा उत्क्रांती झाली आहे आणि तुमच्यामध्येसुद्धा ही सर्व वाहने आहेत आणि तुम्हाला जे हवं असेल ते ती लगेच कार्यान्वित करतात. तुम्हाला कशाचीही इच्छा झाली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ताबडतोब ते कार्यान्वित होते, पण सहजयोगाला संपूर्ण समर्पण पाहिजे. जेव्हां मी सहजयोग म्हणते तेव्हा तुम्हाला माहीत आहे तुमचं चित्त आणि माझे चरण यांचा तो योग आहे. जर तुम्ही अजून तुमच्या अहंकारामध्येच वावरत असाल, या रेषेवर विचार करीत असाल, की आम्ही काहीतरी आहोत आणि आम्ही आमचा स्वत:चा सहजयोग चालू करू शकतो. आम्ही याप्रकारे कार्य करू, त्याप्रकारे का्य करू, माझी पत्नी अशी आहे, माझं मूल असं आहे, माझा नवरा असा आहे हे प्रश्न तुम्हाला बाजूला सारले पाहिजेत नाहीतर तुम्ही वर चढ़ू शकणार नाही. दिवा तेवत ठेवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घेतले पाहिजेत. आता वाघ हा, स्वत:च्या स्थितीमध्ये राहतो तो स्वत:ची स्थिती बदलत नाही. सर्व देवदेवता त्यांच्या स्वत:च्या गुणवत्तेसकट त्यांच्या स्वत:च्या स्थानावर असतात. त्याचप्रमाणे सहजयोगी म्हणून तुमच्या स्वत:च्या स्थानावर राहिल पाहिजे. आतां पार्चात्य देशांमध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी या फार मूर्खपणाच्या अडचणी आहेत ज्या सहजयोग्यांना साजेशा नाहीत. उदा. जिव्हाळा, अॅटॅचमेंट, पहिल्यांदा त्यांच्या बायका, मूलं यांच्याबद्दल त्यांना जिव्हाळा नसे आणि आता गोंदासारखे ते त्यांना चिकटले आहेत. तुमची मुलं, तुमची पत्नी यांना तुम्ही सोडून द्या असं मी म्हणत नाही. पण तुमचा जिव्हाळा सहजयोगाला हवा. सहजयोगाचे आशीर्वाद तुमच्याकडे आले, की तुमची पत्नी, मुलं या सर्वांकडे ते वाहू लागतील. तुमच्या देशामध्ये सर्वांना आणि सर्व जगामध्येसुद्धा. समजा ही 'अॅटॅचमेंट' ही साधी इलेक्ट्रीकल गोष्ट आहे. जर ही जोडणूक किंवा संधान मुख्य गोष्टीशी नसेल, दुसऱ्या कशाशी असेल तर काय उपयोग आहे ? ती विद्युतशक्ती देऊ शकत नाही. हे तर साधं तर्कशास्त्र आहे की शक्तीच्या उगमस्थानाशी तुमची जोडवणूक पाहिजे तरच शक्ती दुसरीकडे वाहू शकते. जर तुम्ही स्वत:च शक्तीच्या त्या स्रोताशी जोडले गेले नसाल, तर 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-18.txt ३ ) । ें शक्ती दुसरीकडे कशी वाहणार? सहजयोगामध्ये ही साधी गोष्ट आपल्याला समजली नाही तर आपल्या या संधानाला गंज चढू लागतो. आणि आपल्याला काय होत आहे हे आपल्याला समजत नाही. मुख्य जे स्रोत त्याच्याशी आपण जोडले गेलो नाही आणि फक्त त्याच संधानाची आपल्याला गरज आहे आणि मग सर्व काही दुसरीकडे वाहू लागेल. आपण आपल्याला आवडणाच्या इतक्या दुःखकारक गोष्टीशी जोडले गेले असतो. ज्या आपल्याला दुःखी करतात. उदा.उद्योजकांच्या मूर्खपणाच्या फॅशन्सविषयी आपल्याला प्रेम असते. या सर्व गोष्टी अॅटॅचमेंट, आनंदाचे स्रोत नाहीत, ज्ञानाचे आरंभस्थान नाहीत किंवा आपल्याला उत्क्रांत करणाऱ्या शक्तीचे उगमस्थान नाही. आणि हेच कारण आहे त्यामुळे सामूहिक उत्क्रांतीची आपली परिस्थिती खराब झाली आहे. आदिशक्तीचं काम हे प्रथम तुम्हाला आत्मसाक्षात्कार देणे हे आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला जीवन देणं, तुमच्या सुखसोयींकडे लक्ष देणं, तुमचं सांत्वन करणं, तुम्हाला शारीरिक प्रश्न असतील तर ती ते सोडवेल. ती क्षेमदात्री आहे, ती तुमचे क्षेम पाहील. त्याचवेळी ती तुमचे रक्षणही करील . मी पाहिलं आहे बरेचसे लोक आतासुद्धा लहानसहान गोष्टींनीसुद्धा घाबरून जातात. आता इथे वाघ उभा आहे तर आपण घाबरायला कशाला पाहिजे? तुमची आई इतकी शक्तिमान आहे, ती किती शक्तिशाली आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आपली आई किती शक्तिशाली आहे, ती आपली आई आहे हे तुम्हाला जर कळलं तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात आणि मग गोष्टी कार्यान्वित होतील. शक्तीला जर वाहू दिलं नाही आणि तुम्ही जर तुमची आई, घर, मुलं 'माझं' याविषयी चिंता करत असाल तर हे 'माझं' जेव्हां गळून पडेल तेव्हा ते कार्यान्वित होईल. हे अशात-्हेने घेता कामा नये, की मी तुम्हाला सर्वसंगपरित्याग करायला सांगते आहे, मुळीच नाही. कोणत्याही संतांनी सर्वसंगपरित्याग केला नाही. त्या सर्वांना बायकामुलं होती. त्यांचं चित्त आदिशक्तीच्या चरणकमलांकडे होतं. जसं गुरू नानकांनी म्हटलं आहे. छोटा मुलगा पतंगाबरोबर खेळत असतो. पतंग सगळीकडे उडत असतो. तो त्याच्या मित्रांबरोबर बोलत असतो, हसत असतो पण चित्त पतंगाकडे असतं. एक स्त्री, घर साफ करत असते, तिच्या कडेवर मूल असतं. ती घर साफ करते, झाडते आहे, सगळं काही करते आहे पण लक्ष मुलांकडे असतं. भारतामध्ये अशा बायका आहेत ज्या पाण्याने भरलेले तीन-चार हंडे डोक्यावर ठेवतात. त्या एकमेकींशी बोलतात, हसतात, मजा करतात पण लक्ष त्या हंड्यांवर असतं. माझं लक्ष नेहमीच तुमच्या कुंडलिनीवर असतं. सहजयोगात तुम्ही खोड्या करू शकत नाही. कोणी खोड्या करण्याचा प्रयत्न करील तर त्याला खूप वाईट शिक्षा मिळेल. तुम्हाला खूप लक्षपूर्वक वागलं पाहिजे. अप्रामाणिकपणा करता कामा नये. मी काही करणार नाही पण इथे या वाहनाचे, वाघाचे दात आहेत. त्यांची ठराविक मूल्यमापने आहेत. त्यांना सर्वांना काय करायचं ते माहीत आहे आणि ते करतील. अशा नकारात्मक गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या तर त्या राक्षसी कल्पना आहेत असं मी म्हणेन कारण त्या तुमचा पूर्णपणे नाश करतील. एका बाजूला सहजयोग म्हणजे उन्नतीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी तुम्हाला दिलेले पूर्ण आशीर्वाद आहेत. तुम्ही एका टोकापर्यंत जाता, पण तुम्ही उंची गाठली आहे हे तुम्हाला समजलंसुद्धा पाहिजे. तिथे तुम्हाला खूप काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. त्या उंचीवरून तुम्ही खाली पडलांत तर तुम्ही खूप खोल खाली पडाल. तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद सौंदर्य, प्रेम, आनंद ज्ञान, मित्र सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. जर तुम्ही खोड्या करणार असाल, तर तिथे राहणं शक्य नाही. तसं तिथे चालत नाही. ताबडतोब तुम्ही बाहेर फेकले जाता. देवता अत्यंत दक्ष 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-19.txt आहेत, हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्या तुम्हा सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. कारण त्यांना तुमचं रक्षण करायचं असतं. तुमची काळजी घ्यायची असते. तुम्हाला मदत करावयाची असते. तुमच्यासाठी सारं काही त्यांना कार्यान्वित करावयाचं असतं. त्या तुमच्यासाठी फुलं तयार करतात. त्या तुमच्यासाठी सर्व तऱ्हेच्या चांगल्या गोष्टी करतात. पण त्याचवेळी त्यांचा माझ्याशी संबंध असतो. तुमच्याशी नाही. तुम्ही माझी मुलं आहात म्हणून त्या तुमच्याकडे लक्ष पुरवितात. एकदा का तुम्ही गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केलात की झालं, पण तुमच्या आईची करुणा इतकी महान आहे, की ती नेहमी विसरण्याचा प्रयत्न करते आणि संधी देते आणि अर्थात्, एका टोकापर्यंत त्या देवता मानतात, पण जर तुम्हाला तिरस्करणीय क्रूर आणि पापी व्हायचं असेल आणि तरीही सहजयोगात रहायचं असेल, तर तुम्ही ते करू शकत नाही. इतर धर्माप्रमाणे ते नाही, जिथे तुम्ही र चुका करीत जाता, तुम्हाला हवं तसं करीत जाता, मारून टाकता, फसवाफसवी करता, इथे तुम्हाला शब्दश: सहजयोगी व्हावं लागतं. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. सर्व गोष्टी गृहित धरू नका. 'सहजयोग्यांसाठी आज मी काय केलं' असं मी लिहायला तुम्हाला सांगितलं आहे. आपल्यासाठी आपण सर्व काही करतो. आपलं घर रंगवितो. चांगल्या साड्या घेतो वगैरे वगैरे पण प्रत्येकाने स्वत:ला विचारलं पाहिजे, 'मी सहजयोगासाठी काय केलं? इतरांना मी किती भेटी दिल्या? माझा अनुभव सांगणारी आईविषयी माझ्या हृदयात मला वाटणारं प्रेम प्रदर्शित करणारी किती पत्रं मी इतरांना लिहिली? आज तुम्ही ही आदिशक्तीची पूजा केलीत ही धोकादायक आहे कारण ती आरशाप्रमाणे आहे ज्यामध्ये तुम्हाला स्वत:ला बघावं लागेल, स्वत:ला स्पष्टपणे पहावं लागेल. तुमच्या नवऱ्यावर वर्चस्व गारजविणं ही मूर्खपणाची निरर्थक गोष्ट आहे कारण तुमच्या नवऱ्याला कसं वागवायचं हे तुम्हाला समजत नाही. आपल्याला सुज्ञ स्त्रिया म्हणून प्रगती करायची आहे, स्त्रिया ज्या पृथ्वीमातेसारख्या आहेत. तुम्ही जेव्हा मला विचारता, 'श्री माताजी, तुम्ही इतकं काम करता आणि तरीसुद्धा इतक्या ताज्यातवान्या दिसतां!' त्याचं कारण मी त्याचा आनंद उपभोगते. काम करणं हे मला संगीतासारखं आहे. इतकं थंड करणारं सारं काही मला संगीतच आहे. तुम्हाला संगीताचा कंटाळा येतो कां? त्याउलट तुम्हाला ताजंतवानं वाटतं. जेव्हा मी राक्षसांना मारते तेव्हां तुम्ही पाहिल्याप्रमाणेच, जास्त प्रकाश माझ्याकडे येतो. समजून घ्या, कृपा करून पूर्णपणे आत्मनिरीक्षण करा, आत्म्याचा शोध घ्या, आपल्यामध्ये काय चुकतं आहे ते समजून घ्या. स्वत:च्या अहंकाराचे फाजील लाड करू नका कारण अहंकार तुम्हाला मूर्ख बनवितो. तशाप्रकारचे काही लोक आमच्याकडे सहजयोगामध्ये आहेत. सर्कसमध्ये काही विदूषक असतात तसे आहे ते, पण आपल्याला वाघ आणि सिंहसुद्धा हवेच. लोकांवर छाप पडते ती वाघ आणि सिंहाची, विदूषकांची नव्हे. तुमच्या आईची पूर्ण शक्ती म्हणजे प्रेम आहे. ती जे काही करते ते तिच्या निर्मितीवरील तिच्या प्रेमामुळे आणि मग आत्मनिरीक्षण सुरू होतं. त्याला फार उशीर होता कामा नये. किती वेळापासून मी म्हणते आहे, पृथ्वीमातेला ज्याप्रकारे ते दमवून टाकीत आहेत, आता पर्यावरणाचे प्रश्न आपल्यासमोर राक्षसासारखे उभे आहेत. आता तुम्ही त्याचे काय करणार? तुम्हालाच त्याला तोंड दिले पाहिजे. आता जर तुम्ही त्याला तोंड दिले नाही तर तुम्हाला त्याला अशा वेळी तोंड द्यावे लागेल जेव्हा फार उशीर झालेला असेल. तेव्हा नुसते तुम्ही सहजयोगी आहात म्हणून स्वत:बद्दल समाधानी होऊन राहू नका. तुम्ही अर्थात माझ्या पूजेला आला २० 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-20.txt आहात, तुम्ही समुद्रामध्ये पडल्यावर तुम्हाला शोषून घेण्याची त्यामध्ये ताकद असते. तशीच तुम्हाला किनार्यावर परत ढकलण्याची शक्ती असते. दोन्ही बाजूंनी ती कार्य करते . तर 'मी सहजयोगामध्ये गहनतेत का जाऊ शकत नाही?' त्यात अनेक समर्थनं असतात. 'मला वेळ नाही, मी फार कामात आहे, मी ऑफिसमध्ये काम करतो आहे, मी ते करतो आहे.' मग तुम्ही सहजयोगी नाही. तुमचा पूर्ण वेळ सहजयोगासाठी आहे. त्यामुळे सहजयोग तुम्हाला सर्व काही करण्यासाठी भरपूर वेळ देतो. मला काही लोक माहीत आहेत, जगभर असलेल्या सगळ्या पूजांमध्ये ते अचानक सापडतात. मी म्हणते, 'तुम्ही कसे काय इथे ?' ते म्हणतात, 'कामामुळे ते इथे आले.' जर ही शक्ती इतकी महान आहे, तर ती किती महान आहे हे समजण्यासाठी तुम्ही सर्व काही या शक्तीवर सोपवा. सारं काही तुमच्यासाठी ती कार्यान्वित करते . आज आपण शक्तीबद्दल बोलत आहोत, देवीच्या शक्त्या ज्यांचा शोध घेतला पाहिजे, अंमलात आणल्या पाहिजेत, फार चांगल्या तऱहेने संतुलनामध्ये आहेत आणि अत्यंत कार्यक्षम आहेत. या शक्तींनी तुमच्यामध्ये जे काही कार्य केलं आहे, कृपा करून त्यांचा आदर करण्याचा प्रयत्न करा. म्हणू नका की, 'माझं लग्न झालंय, मी गरोदर आहे, मला मुलं आहेत, नोकरी आहे.' ज्यावेळी तुम्ही तुम्हाला परिपूर्ण करतां त्यावेळी सर्व काही परिपूर्ण होतं. सर्व काही तुमच्या परिपूर्णतेशी निगडीत असतं. मग तुम्ही मला प्रश्न विचारीत नाही. 'मी काय काम करायचं आहे ? मला कारय मिळवायचं आहे ?' तुम्हाला तुमचा मार्ग दिसतो आणि सगळं कार्यान्वित होतं. सगळे राक्षस मारले गेले होते. पण ते परत स्वत:च्या जागांवर आले आहेत. सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे साधकांच्या ते डोक्यामध्ये घुसले आहेत कारण आता ते गुरू म्हणून आले आहेत. कॅथलिक चर्च, प्रोटेस्टंट चर्च, सर्वप्रकारची देवळे, मूलगामीपणा इ. ते राक्षसांसारखे दिसतात. जर तुम्ही त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांनी तुमच्यावर प्रभाव पाडला तर ते तुमच्या डोक्यामध्ये जातात. पण तुम्ही सहजयोगामध्ये आल्यानंतर ही डोकीसुद्धा स्वच्छ केली जातात. हे स्वच्छ करणं, हा आनंद तुम्ही इतरांना दिला पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. सर्वप्रथम तुमचं शील, तुमचं वागणं आणि संबंध इतके पवित्र असले पाहिजेत की स्वत:हुन ते प्रकाश उत्सर्जित करतील. जसं, जर तुमच्याकडे फार स्वच्छ कांच असेल तर प्रकाश त्यामधून जाऊ शकतो, पण कुंडलिनी शुद्ध इच्छा असल्यामुळेसुद्धा तुमची खूप तीव्र उचंबळून येणारी, पूर्णपणे बाहेर उतूं जाणारी इच्छा हवी, कधी व्हायब्रेशन्स द्यायचे जे काही तुम्ही करीत आहांत, चित्त तुमच्या संधानावर ठेवा. जर तुम्ही सहजयोग करीत असाल आणि तुमचं संधान सैल असेल तर तुम्ही फक्त अंधार, अज्ञान आणि मूर्खपणा देता. या शक्तिशाली शक्तीशी तुम्ही सदैव संधान ठेवलं पाहिजे आणि प्रोटोकॉलप्रमाणे, वागणुकीच्या नियमांप्रमाणे तिला खूष ठेवलं पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. या सर्व देवता तुम्ही बघता त्यांचे प्रोटोकॉल्स आहेत कारण ते ठरलेले आहेत. तुम्हीसुद्धा तुमचे प्रोटोकॉल व्यवस्थितपणे ठरवले पाहिजेत. जोपर्यंत तुम्हाला काय शक्त्या आहेत ते कळत नाही, त्या तुम्हाला कशा मिळाल्या आणि त्याची आठवण रहात नाही, जोपर्यंत हे सत्य तुमच्या शरीराचा एक भाग होत नाही, तुमची वाढ होणं कठीण आहे. तुम्ही ना धड इथे ना तिथे, लंबकाप्रमाणे उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे जात रहाल. ते उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे फिरत आहेत हे पहायला सहजयोग्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही इतके कमकुवत कसे होऊ शकतां? कारण तुमची वाढ झाली नाही. तुम्हाला 'रॉक ऑफ जिब्राल्टर' २१ 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-21.txt सारखं अभेद्य बनलं पाहिजे. तुम्हाला कॅचेस कसे होतील? कोणी अत्यंत निगेटिव्ह आहे असं तुम्हाला वाटलं तर त्या व्यक्तीजवळ जाऊ नका, पण तुम्ही नाजूक बाहुल्या होऊ शकत नाही. माझी मुलं वीर आहेत. तुम्ही माझी मुलं आहांत. आता तुम्ही हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन यापैकी काही नाही. तुम्हाला शूर, न्यायी, चांगले करुणामय, प्रभावी असले पाहिजे. आणि हे थोडक्यात आहे. या पूजेनंतर तुम्ही बसाल, ध्यान कराल आत्मनिरीक्षण कराल आणि मी असं का करतो याचा शोध घ्याल अशी मी आशा करते. काय अडचण आहे ? जर तुम्ही खरोखर या दैवीशक्तीशी जोडले गेले असाल, तर तीन दिवस आणि रात्री तुम्ही जागे राहिलात तरी दमणार नाही. तुमच्या बाबतीत असं झालं आहे कधीकधी पण लक्ष त्या शक्तीवर पाहिजे. चित्त जोडलं गेलेलं असलं तर तुम्हाला ही शक्ती येते, नाहीतर साहजिकच तुम्ही दमून जाता. तुमच्या आईसारखं कोणीतरी आहे जे तुमचं काय चुकतंय हे तुम्हाला सांगू शकतं याबद्दल देवाचे आभार माना. तुमच्या स्वत:च्या आईनेसुद्धां तुम्हाला सांगितले नाही कारण ते तुम्हाला किती घाबरत होते आणि तसं म्हणू नका तुमच्या हृदयाला पकड येते त्यावेळी तुम्ही काय करू शकतां हे प्रेमामुळे, कळकळीमुळे आहे, हे तुम्हाला कळलं तर तुम्ही ते करू शकाल, हे जास्त काही बुद्धीने समजण्याचं नाही, पण आणखी उच्चतर पातळीची जाणीव आहे. जी तुमच्या जाणिवेचाच एक भाग होऊन जाते. ते चुकीचं कसं असू शकेल? ते सर्व चांगलं असलंच पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे, की सर्व सात चक्रे ज्यांवर मी कार्य करते आहे, ती सामूहिकरीत्या मी, विराटाने धरली आहेत. विराटांगनेची गुणवत्ता आहे ती ही, की ही विश्वव्यापी चैतन्याची जाणीव, सामूहिकता आपल्यामध्ये ती निर्माण करते आणि अद्ययावत कालामध्ये आपण सामूहिकतेच्या रस्त्याने आध्यात्मिक मार्गात आहोत. आपण सहस्त्राराच्या स्थितीला पोहोचलो आहोत आणि इथे आपल्याला सामूहिक कार्याचच काम आहे. याचं पूर्णपणे आकलन झालं पाहिजे. कोणीही जो दुर्वर्तनाने किंवा कशाने सामूहिकतेला इजा पोहोचविण्याचा प्रयत्न करील त्याला बाहेर टाकलं जाईल आणि तो चुकीच्या हातात सापडेल सामूहिकता हे आदिशक्तीचं कार्य आहे कारण सहस्रारामध्ये विराटाचे साम्राज्य आहे आणि त्याची शक्ती आहे विराटांगना, जी सामूहिकता आयोजित करते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहीत हवा, की जर कोणत्याही कारणामुळे आपण सामूहिक बनत नसू, काहीही जसे हेवा, भीती किंवा मागून येणारे काही, किड्यासारखे वर येणारे, तर समजून घ्या, की तुमच्यामध्ये काहीतरी चुकीचे आहे. सामूहिकतेमध्ये नाही. सामूहिकतेवर टीका करू नका, जोपर्यंत मी स्वत: त्याचा शोध घेत नाही. सुज्ञतेने सामूहिकतेमध्ये रहा. आस्थेने रहा, लोकांना सामूहिकतेमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करा, एकमेकांबराबर आनंद लुटा, एकमेकांवर टीका करू नका. जर तुम्हाला टीका करण्याची सवय असेल तर स्वत:वर टीका करा. पूर्ण निर्मितीमध्ये आदिशक्तीचं काम महत्त्वाचं आहे. जेव्हा श्री सरस्वतीचं कार्य संपलं तेव्हां राक्षसांना मारण्याचं काम झालं होतं. श्री महालक्ष्मीचं कार्य संपलं होतं जेव्हा तिने हे मानवी पातळीवर आणलं. त्याचा कळस असा आहे, की आता तुम्हाला तुमचा आत्मसाक्षात्कार मिळाला आहे. तुम्हाला विशेष गुणवत्ता मिळाली आहे. आता तुम्ही देवाच्या साम्राज्यात प्रवेश केला आहे तर आता तुमची वागणूक नीट ठेवा. ें 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-22.txt व्या देवी सर्व भूतय बद्धि ै सं्थिता । ZIT edi चदि रेश संच्धिता NEW RELEASES On the Occasion of Ganesh Puja 2010 ु वदि Speech Title Lang. ACD ACS Date Place VCD DVD सहजयोग्यांशी हितगुज 26th Feb 1979 279 279 Pune M 19th July 1981 | Guru Puja 462 London th 26™ May 1983 463' Shri Buddha Puja Part-I & II Brighton 311 th 464' 17" July 1983 | Puja At Surbiton Ashram 312 Surbiton/UK 24th July1983 465 Guru Puja - Why in England - Brighton Guru Purnima Seminar 14h July 1984 466 Guru Puja Leisin 467 5th July 1985 313 Shri Trigunatmika Puja - Part I & II| Den Haag E 468* 314 Public Program 1986 Delhi Е/Н at Malvankar Hall (Delhi) 26h July 1993 315 Shri Pallas Athena Puja 41* Athens E 41 th 10" Sep 1995 San diego 88 316 Shri Ganesh Puja - Part I & II 88 E Guru Puja 26" July2000 th 210 Cabella 210 E 470' 4th Sept. 2000 | Public Programme Genoa, Italy E अपनी ओर दृष्टि रखें 21 Dec. 1975 261" st Mumbai 261 Н 24th Jul 1979 471* Beej Mantra Bhajans Title ACD Bhajan Details Atmanubhav - Part I Ajit Kadkade 165 Atmanubhav - Part II Ajit Kadkade 166 Shehnai Vadan 167 Pt Jagannath Mishra Nirmal Dhara Nirmal Sangeet Sarita 168 पुणे म्युझिक ग्रुप आईचा सोन्यावाणी रंग 169 FQ Books Price Code Title B 79 Eternally Inspiring Recollections -Volume 7 - Part - I 200/- B 80 Eternally Inspiring Recollections -Volume 7 - Part - II 200/- Sahajyog Parichaya Pustika - Aasami स्वरांजली B 81 2/- B 82 50/- प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी , पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in eaoint मम् म नामा नमः । 2010_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-23.txt ॐ काी तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द जागृत असती आणि आतां सिद्ध' मंत्र असतो.