चैतन्य लहरी ा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मराठी ५ु का ू० र] ०] रे ० ा द्ध आपल्याला संपूर्ण विश्वाला विनाशापासून वाचवायचे आहे आणि यासाठी माझी असा विचार आहे, की संपर्ण जनसंख्येच्या कमीत कमी ४०% लोक आत्मसाक्षात्कारी होणे आवश्यक आहे. मग ते कोणत्याही देशाचे असोत, त्यांची शैक्षणिक पातळी कोणतीही असो, सर्वांना आत्मसाक्षात्कर द्यायला पाहिजे. सहसार पूजा, ईंटेली, ६.५.२००१ .. या अकात. may the auspicious उदे ग अंबे उदे ...४ oCcasion of Diwali breeze into your life laughter, love and contentment. 30 खरिसमस पूजा ... २६ दिवासव happy diwali ρυστωαl DEEPOTSAV ा ॐ ए छ ....महालक्ष्मीने आपल्यामध्ये संतुलन स्थापित करून कुंडलिनीच्या उत्थानासाठी योग्य मार्ग करून ठेवला आहे. डावी आणि उजवी बाजू संतुलनात आल्यावर या शक्तीकडूनच मधली नाडी कुंडलिनीवर तन्हेने मोकळी केली जाते. हा प्रेम व करूणेचा मार्ग आहे. येईल अशा ० का े का हि उदै ग अंबे उद्दै पोर्तुगाल, नोव्हेंबर १९९६, अनुवादित या शक्तीचे आणखी एक कार्य म्हणजे ती कुंडलिनीला सर्व चक्रांवर जाण्यास मदत करते आणि सर्व चक्रांची स्थिती सुधारते. या कार्यासाठी कमी जास्त शक्ती वापरून कुंडलिनीला जिथे जरूरी असेल त्या चक्रावर ती पोहचवते कारण कुठल्या चक्राला कुंडलिनीच्या मदतीची जरूर आहे हे ती बरोबर जाणते. आज आपण श्री महालक्ष्मीची पूजा करणार आहोत. या देशामध्ये महालक्ष्मीला भक्तिभावाने मानले जाते. इथे तिला मारिया म्हणून पूजतात, इथे स्वयंभू मारिया पण आहे. यावर माझा आधी विश्वास बसला नव्हता; पण आता इथल्या चैतन्य लहरी पाहिल्यावर मला ती त्या स्वरूपात खरोखर आल्याचे समजले. एका फोटोमध्ये ती माझ्याबरोबर असल्याचेही तुम्हाला माहीत आहे. याच तत्त्वाला अनुसरून तुम्ही आज या स्थितीला आलेले आहात. तुमच्या उत्थानासाठीच असलेला मध्यमार्ग हा कुंडलिनीच्या महालक्ष्मी शक्तीतूनच निर्माण झाला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात 'उदे ग अंबे उदे' हा जोगवा अजूनही म्हणतात. मी त्या लोकांना विचारले की, 'तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात अंबेचे भजन कसं म्हणता ?' तर ते म्हणाले, 'का म्हणतात हे आम्हाला ठाऊक नाही, पण ते चूक आहे कां?' मग मी म्हणाले, 'तुमचं काही चुकले नाही कारण महालक्ष्मीच्या मार्गामधूनच कुंडलिनी वर येत असते आणि कुंडलिनी ही अंबाच आहे.' मग त्यांना हे समजले आणि ते आश्चर्यचकित झाले. अनेक शतकांपासून हे गाणे त्या मंदिरात म्हटले जायचे पण तोपर्यंत तेच गाणे कां म्हणत हे त्यांना कोणी सांगितले नव्हते. आतां ही महालक्ष्मी शक्ती आपल्यासाठी काय करते ते समजून घेऊ या. महालक्ष्मीने आपल्यामध्ये संतुलन स्थापित करून कुंडलिनीच्या उत्थानासाठी योग्य मार्ग करून ठेवला आहे. डावी आणि उजवी बाजू संतुलनात आल्यावर या शक्तीकडूनच मधली नाडी कुंडलिनीवर येईल अशा त्हेने मोकळी केली जाते. हा प्रेम व करुणेचा मार्ग आहे. प्रेम व करुणा या गुणांनी युक्त असल्यामुळे ही शक्ती मधला मार्ग कुंडलिनीवर येऊ शकेल इतका मोठा बनवते. म्हणूनच साधक सत्य शोधायला सुरुवात करतो व ती सुरुवात झाल्यावर महालक्ष्मी तत्त्व जागृत होते. कधी हे त्त्व प्रखरतेने कार्य करायला लागल्यास साधक चुकीच्या व भलत्या मार्गांनी वाटचाल करू लागतो. जे लोक अशा तऱ्हेने साधनेमधेच हरवून बसले त्यांचे मला वाईट वाटते पण योग्य मार्गाला लागून उत्थानाकडे प्रगत झालेले अनेक लोकही आहेत. या शक्तीचे आणखी एक कार्य म्हणजे ती कुंडलिनीला सर्व चक्रांवर जाण्यास मदत करते आणि सर्व चक्रांची स्थिती सुधारते. या कार्यासाठी कमी जास्त शक्ती वापरून कुंडलिनीला जिथे जरूरी असेल त्या चक्रावर ती पोहचवते कारण कुठल्या चक्राला कुंडलिनीच्या मदतीची जरूर आहे हे ती बरोबर जाणते. म्हणून कुंडलिनी जागृत झाल्यावर ती कुठे कुठे चालली आहे. हे तिच्या स्पंदनांवरून तुम्ही ओळखू शकता आणि मग कुठे कार्य करण्याची जरूरी आहे हे तुम्ही समजू शकता. हे सर्व कार्य तुम्हाला अंतिम सत्य सापडावे या प्रेमाच्या व करुणेच्या भावनेतून ती करत असते. आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत, सहजयोगातही उन्नतीच्या मार्गावर चालतानाही काही लोक आपली पूर्वीची गाठोडी जवळ बाळगून राहतात मग ते वर येता येता खाली घसरतात, पुन्हा प्रयत्न करून वर आले तरी पडतात. आज मी तुम्ही लोकांनी कुठली स्थिती मिळवायची आहे हे तुम्हाला समजावून सांगणार आहे. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये दुसर्या अध्यायात 'स्थितप्रज्ञ' असं वर्णन त्याचे केले आहे. ही स्थिती समजायला जरा अवघड आहे. तुमच्या आईइतके ते सरळ दिसत नाही. म्हणून लोकांना ते समजत नाही आणि मग ते ही स्थितप्रज्ञता कशी मिळवायची असे विचारतात. संत ज्ञानेश्वरांनी याच स्थितीला 'सहज-स्थिती' असं नांव दिले आहे. स्थितप्रज्ञ या शब्दाऐवजी सहज स्थिती हा सोपा शब्द त्यांनी वापरला आणि त्याचे सुंदर व सूक्ष्म स्पष्टीकरण त्यांनी दिले. अर्थात ज्ञानेश्वरही फार थोड्या लोकांना समजले. त्या स्थितीला पोहोचलेला मनुष्य आरशासारखा असतो. आरशांत खूप चेहरे प्रतिबिंबित होतात, पुष्कळ वेळा आपण आरशांत पाहतो, त्याच्यासमोर आपण नटतो, पोशाख करतो पण आरसा आहे तसाच राहतो. त्याचप्रमाणे जो स्थितप्रज्ञ असतो, सहजी असतो त्याला आपल्यासमोर कोण आहे, आपल्याकडे कोण बघत आहे याची पर्वा नसते. तो स्वत:मध्ये मग्न असतो. स्वत:शीच समाधानी असतो. सूर्य जसा आपले किरण चहूबाजूंकडे पसरवून सूर्यच राहतो, सगळे किरण त्याच्यामध्येच परततात तसे त्याचे असते. त्याप्रमाणे इंद्रिये जरी त्यांचे काम अखंडपणे करत राहिली तरी सहजस्थिती मिळवलेल्या माणसाला त्याचे काही वाटत नाही कारण तो त्याच्यामध्ये अडकलेला नसतो. इंद्रिये आपले काम करत राहतात पण त्याच्या स्थितीमध्ये त्याचा काही परिणाम होत नाही आणि इंद्रिये काम झाले की शांत होतात. ही स्थिती तुम्हा सर्वांना मिळवायची आहे आणि मगच तुम्ही खऱ्या अर्थाने सहजयोगी होणार आहात. पण सहजयोग्यांमध्ये मी अजून पाहते, की काही जण सहजयोगातून पैसा मिळवण्याच्या मागे लागतात. काही लीडरबद्दल तक्रारी करत राहतात. काही हेवा-मत्सर इ.मध्ये अडकतात. म्हणून मी नेहमी म्हणत असते, की ध्यान करा कारण ध्यानामधूनच तुमच्या प्रगतीच्या आड येणारे हे दोष व सवयी दूर होणार आहेत. तुम्ही ६ 'स्व' ला एकदा ओळखलं की या सर्व गोष्टी संपून जातात आणि तुम्ही स्वत:बरोबरच समाधानी होता. मग तुमच्या तुम्हाला कंटाळा येत नाही. तुम्ही बोअर होत नाही. मला तर बोअर होणे म्हणजे काय हेच समजत नाही; मी कधीच बोअर होत नाही. तुम्ही जर कुठल्याही गोष्टीमध्ये अडकलेले नसाल तर बोअर होण्याचा प्रश्नच कुठे येतो ? दुसरी गोष्ट म्हणजे हाव, लालसा इ. वृत्तीच्या पलीकडे तुम्ही जाता. जे हावरे असतात ते सतत पैसा कशामधून मिळेल याचाच विचार करत राहतात. पैशाचाच लोभ असलेले लोक अजूनही त्याच गोष्टींच्या मागे लागलेले असतात. सतत पैशाचाच विचार. सहजस्थितीमध्ये तुम्ही फक्त बघत राहता. साक्षी बनता. आपल्या उन्नतीच्या आड येणाऱ्या कुठल्याही गोष्टींमध्ये तुमचे मन अडकत नाही. तुम्ही आता मनाच्या पलीकडे गेलेले असल्यामुळे तुम्हाला ही स्थिती मिळवणं अवघड नाही. या सर्व फालतू गोष्टी मनाकडूनच चाललेल्या असतात. मन ही केवळ एक कल्पना आहे असं मी नेहमीच म्हणत असते आणि तुम्ही ते जाणलं पाहिजे. हे काल्पनिक मनच तुमच्या डोक्यात विचार-कल्पना भरवते; म्हणजे पुष्कळजण माझ्याशी बोलताना म्हणतात 'होय माताजी, पण....' आणि हा 'पण' ही तुमच्या मनातलाच! आपला मेंद हे वास्तव आहे पण मन नाही. मन 'पण... पण' म्हणणारे मन बरेच वेळा नैराश्य निर्माण करते. उदास बनवते. आपण फार सज्जन आहोत, फार थोड्याच लोकांनी सहजयोग घेतला अशा विचारांनीही कष्टी होणारे लोक असतात. खरं तर काही हरकत नाही असं समजून नुसते साक्षीपणाने पहात रहा आणि या साक्षी होण्यालाच सहजस्थिती म्हणतात. त्या स्थितीमध्ये तुम्ही सूक्ष्म बनता. आत्मा बनता. अर्थातच या सूक्ष्मावस्थेमध्ये तुम्हाला कशाचा त्रास होत नाही. कशामुळेही तुमची शांतता बिघडत नाही. आता निसर्गाकडे पहा ;B ९२ मूळ धातू आहेत पण त्यातला एकही बदलत नाही. उदा.तुम्ही चांदीला सोने किंवा सोन्याची चांदी बनवू शकत नाही. अणूंनाही स्वत:ची विशिष्ट रचना असते. गुणधर्म असतात. तसेच परमाणूमध्येही त्यांची विशिष्ट रचना असते जी तुम्ही बदलू शकत नाही. तसा बदल करायचा प्रयत्न केलाच तर बाँबगोळे बनणार, प्रलयकारक अणुबाँब. पण मानवाचे तसे नाही, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. परिवर्तन घडू शकते. तुमचंच पहा, तुम्ही आधी मानव होता, पण आता संत झाले आहात. आत्मा झालात. हे फार महान वरदान तुम्हाला मिळालेले आहे, पण तुम्ही अगुरूकडे गेलात आणि तो तुमच्यावर भलते -सलते प्रयोग करू लागला तर तुमचा भडका उडेल. मी असे लोक पाहिले आहेत. त्यांना अजून फीटस् येतात. त्रास होतात. इतर लोकांपेक्षा कितीतरी जास्त त्रास, पण ते सुद्धा आता सुधारले आहेत. म्हणून तुम्ही हे नीट लक्षात घ्या, की एका बाजूने तुम्ही पृथक्करण करून अणू-परमाणूचे विभाजन करू लागता तेव्हा अॅटम बाँब बनून स्फोट होतो, पण दुसऱ्या बाजूने तुम्ही जोडण्याची क्रिया करायला लागता तेव्हा तुम्ही काही निर्मिती करता. वर म्हटले ते ह्या जोडण्याच्या कार्यामधून जमले. प्लास्टिकसुद्धा अशाच जोडण्याच्या क्रियेमधून तयार झाले. जड पदार्थ जोडता येऊन एकत्र आणता येतात. माणसांनासुद्धा असे एकत्र आणून परिवर्तित करायला हवे. त्यांच्या बाबतीत हे जास्त सफल होऊ शकेल कारण मानव बदलू शकतो, त्याच्यामध्ये परिवर्तन घडू शकते. आता सोन्याचं बघा, त्याच्यापासून दागिने किंवा इतर काहीही बनवा, सोने ते सोनेच राहणार. दागिने बनवले म्हणून त्याचे सोनेपण संपले असे होत नाही. पण माणसांचे तसे नाही. एकत्र जोडले गेल्यावर त्यांच्यात पूर्ण परिवर्तन घडून आले. जडद्रव्य, निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये मोठा फरक आहे. निसर्ग व जडद्रव्य हे मानवापेक्षा अत्यंत वेगळ्या, भिन्न धर्माचे आहेत. मानवामध्ये परिवर्तन घडून येणे ही जिवंत क्रिया आहे. ते त्यानंतर सुंदर फुलांसारखे बनतात. पण निसर्गापेक्षा ते वेगळेच असतात. कारण निसर्गाला स्वत:चे मन नसल्यामुळे तो पूर्णपणे परमेश्वराच्या अधीन असतो; त्याची जडण-घडणच तशी आहे. पण इथे तुम्ही तसे नाही कारण तुम्ही स्वत:च्याच नियंत्रणाखाली अजूनही आहांत. तुम्ही स्वत:वर ताबा ठेऊ शकता. तुमच्यामध्ये हे परिवर्तन घडून आले असले तरी तुमचे तुमच्यावर नियंत्रण आहे. हे तुम्ही जाणू शकता, तुमच्यामध्ये काय बदल होत आहे हे तुम्ही अनुभवांतून जाणू शकता. तुम्ही आता स्वत:ला इतर सगळ्या मोहपाशांपासून अलिप्त वेगळे झालेले ओळखू शकता. कोणी माझ्याकडे येऊन म्हणतो, 'माताजी, माझा अहंकार फार वाईट आहे, तो दूर करा.' म्हणजे त्याचा त्रास त्याला समजलेला असतो किंवा दुसरं कोणी म्हणतो, 'माताजी, माझी नाभी अजून ठीक झाली नाही, मी अजून पैशाचीच काळजी करत आहे.' म्हणजे त्याला तो स्वत:चा दोष दिसून येतो. अशा त्हेने स्वत:बद्दलचे ज्ञान होण्यास सुरुवात होते, याला आपण आत्मज्ञान म्हणतो. पण तुम्हाला त्याच्याही पलीकडे जायचे आहे. हे ज्ञान मिळवल्यावर तुम्हाला काय मिळते? आपण ते पाहू या.. हे ज्ञान झाल्यावर आपल्या तरी ७ लक्षात येते, की आजपर्यंत आपण अज्ञानात होतो. अंधारात होतो; आतां प्रकाश आला आहे; आता आपण पाहू शकतो. कुठे काय चुकत आहे ते ओळखू शकतो;B आपल्यामधील सर्व आजपर्यंतच्या समजुती, सवयी इ .सर्व चुकीच्या गोष्टी आहेत हे समजल्यावर आपण त्यांच्यापासून वेगळे, अलिप्त व्हायला लागतो. हेवा, मत्सर, लोभ, हाव अशा कितीतरी वाईट गोष्टी आपल्यामध्ये घर करून राहिल्यासारखे वावरत असतात! खरं तर या दिवाळीच्या दिवशी या वाईट गोष्टीचे नांव घेणेच द्र्दैव म्हणावे लागते. दिवाळी म्हणजे एकामागून एक असे कितीतरी दिवे प्रज्ज्वलित केले जातात आणि त्या प्रकाशात तुम्ही स्वच्छ पाहू शकता. प्रथम स्वत:मधील चुकीच्या गोष्टी तुमच्या नजरेस येतात; नंतर त्या नकोशा वाटू लागल्याने तुम्ही त्या दर करू लागता आणि स्वत:ला स्वच्छ करता. मग हे ज्ञान ही लयाला जाते आणि फक्त तुम्ही उरता. स्वत:च्या चक्रांबद्दलही जाणण्याची जरूरी राहत नाही. फक्त तुम्हीच असता. त्या स्थितीमध्ये कशानेही फरक पडत नाही. तुम्ही दगडासारखे निश्चल बनता पण त्या दगडातही मेंद, हृदय, यकृत सर्व शाबूत राहते. तुम्हाला कशाचाही त्रास होत नाही. कशानेही तुमची शांती बिघडत नाही. उलट प्रेम आणि करुणेच्या सागरांत तुम्ही आनंद उपभोगता, त्यांच्यावर येणार्या लहरी पण हळूहळू थंडावतात आणि शेवटी तुम्ही 'सहज' बनता. पूर्वी लोकांनी ही स्थिती प्राप्त करून घेतली होती, पण वाईट एवढंच झाले, की ते त्या स्थितीमध्ये हरवून गेले, असे सर्व लोक शून्य झाले%; दुसर्यांना ते काही देऊ शकले नाहीत. एका माणसाने ते मिळवले. धन्य झाला आणि मग सर्व खलास किंवा आणखी एका दोघांना, बस, पण आता सहजयोगामध्ये तुम्ही ज्ञानावस्थेत आला आहांत म्हणून प्रथम 'स्व' बद्दलचे पूर्ण ज्ञान मिळवा, अगदी पूर्णज्ञान मिळवा. नंतरच्या स्थितीमध्ये, म्हणजे स्वत:बद्दल पूर्ण ज्ञान झाल्यावर स्वत:मधील सर्व दोष, फालतू कल्पना व आचरण, ज्या गोष्टी तुमच्या उन्नतीच्या आड येत आहेत आणि जे चूक आहे आणि तुम्हाला समजले आहे त्या सर्व गोष्टी टाकून द्या. जसं माझ्या साडीवर काही घाण पडलेली कळली, की मी लगेच ती झटकून टाकते. मग तुम्ही पुढच्या सहज स्थितीला येण्यासाठी सिद्ध होता. सहजयोगामध्ये तुम्ही आणखी एक गोष्ट मिळवता आणि ती म्हणजे सामूहिक चेतना. हाच खरा आधुनिक सहजयोग आहे. पूर्वी लोकांना हे माहीत नव्हते म्हणून ते सर्व जण हरवले गेले. आता तुम्हाला सामूहिक चेतनेची जाणीव झाली आहे आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना जाणू शकता, त्यांच्याबद्दल तुमच्यामध्ये करुणा जागृत होते आणि त्यांच्यासाठी कार्य करू लागता. कधी कधी त्यामध्येही काही लोक मला यातून काय मिळणार, पैसा मिळेल का, लीडर म्हणून मला काही मिळवता येईल का असे विचार करणारे लोक असतील, पण ही सामूहिक चेतना विकसित होत राहते, व्यापक होते आणि मग तुम्ही त्या समुद्रातला एक थेंब म्हणून असता. म्हणजेच समुद्रच बनून जाता. या समुद्रालाही मर्यादा असतातच, पण त्याला त्याची पर्वा नसते. कारण त्या मर्यादांमध्ये राहणे हेच त्याचे जीवन असते: त्या मर्यादा सोडून पलीकडे जायची त्याला इच्छाच नसते. अगदी तसेच तुमचे होते. तुम्ही 'स्व' मध्ये परिपूर्ण होता ; स्वार्थी नसताच पण स्वत:मध्ये समाधानी, स्वावलंबी होता. मला माहीत आहे, की बरेच सहजयोगी, मी म १८ सहजयोगातील त्रासदायक योग्यांनाही काही शिक्षा करत नाही. म्हणून नाराज असतात. पण मला असल्या गोष्टीची काळजी नसते. हे परम चैतन्य, जे सर्व काही कार्यान्वित करत असते. त्याची काळजी घेईल. मी स्वत:कडून कशाला कोणाकडे बघू? सर्व काही घटित होत आहे. तुम्ही ते पाहतच आहात. मग कोणी कशाला त्यामध्ये लुडबूड करायची? सर्व काही बघत राहणे एवढचं माझे काम आहे. तेच पुरेसे आहे. या जन्मामध्ये कोणाला ठार मारायचे किंवा कोणाला नष्ट करायचे हे मला करण्याची जरूरी नाही. ते स्वत:हुनच स्वत:चा नाश करून घेणार आहेत. मी सांगितलेच आहे, की मला लोकांना उघडे पाडायची जरूर नाही, पण मी ज्या ज्या देशांमध्ये जाते तिथे मला दिसते, की लोक उघडे पडत आहेत. आणखी काय चमत्कार होणार आहेत परमेश्वराला माहीत. एखाद्या देशाकडे थोडेसे जरी लक्ष गेले तरी सर्व कार्यान्वित होते; कसे ते मलाच कळत नाही आणि मीच म्हणते 'परमेश्वरा, हे मी कधी केले?' म्हणून आपल्याला परमेश्वरी प्रेमशक्तीचे वाहक बनले पाहिजे. सर्व या परम चैतन्यावर सोपवायचे, जे सर्व कार्य करत असते आणि माझ्यापासून निराळे आहे. मी अगदी एकटी असते. ही शक्तीसुद्धा माझ्यापासून दूर असते, पण तिला मानवांसाठी काय कल्याणप्रद आहे, सहजयोगासाठी काय चांगले आहे हे सर्व समजते आणि त्यानुसार सर्व काही घटित होते. मला त्यांत काही करायची जरूर नाही. तुम्ही कदाचित म्हणाल, 'माताजी, हे तुम्हीच केले आहे.' असू दे. पण खरं तर मी काहीच त्यामध्ये भाग घेत नाही. मला काही सांगायची पण जरूर नाही. ते आपोआप कार्य करायला लागते आणि तेही व्यवस्थित पार पाडते. एक उदाहरण सांगते. इंग्लंडमध्ये खूप वर्षापूर्वी गेले असताना तिथले लोक म्हणाले, 'माताजी, आम्हाला उन्हाळा खुप दिवस चालावा असे वाटते.' असे विचित्र काय मागता असे मी म्हटल्यावर ते पुन्हा पुन्हा म्हणाले, 'असं नाही, पण माताजी, आम्हाला खरंच मोठा उन्हाळ्याचा मोसम हवा आहे.' तीन-चारदा तेच मागणे आणि त्या वर्षी एवढा प्रचंड उन्हाळा झाला, की काही सोय नाही. भारतासारखा नाही, इकडे निदान पंखे तरी असतात; तिकडे तेही नाही. आमच्या घराला लहानशी गॅलरी होती तिथे आम्ही झोपायचे आम्ही दुकानात पंखे विकत घ्यायला गेलो तर ऑर्डर दिल्यानंतर तीन महिन्यांनी मिळतील असे कळले. तीन महिन्यांनी म्हणजे थंडीला सुरुवात होऊन गेलेली असणार. मग 'पंखेच नको' असे आम्ही म्हणालो. माझ्या मुलीने विमानाने दोन पंखे पाठवले म्हणून निभावले. इतका प्रखर उन्हाळा मग काही दिवसांनी झाडांची पाने आधी किरमिजी रंगाची आणि काही दिवसांनी लाल पडू लागली आणि शरद ऋतूला सुरुवात झाली. त्या वर्षी फार सुंदर ऋतू होता. त्यावेळी एका सहजयोग्याला स्वप्न पडले, की माताजींनी त्याला कारमधून त्यांना फिरायला घेऊन जायला सांगितले. मला अगोदर हे माहीत नव्हते, पण मलाच इच्छा झाली म्हणून मी त्याला फोन करून विचारले, की मला खूप दूरपर्यंत हिंडून सगळीकडचे सौंदर्य बघायचे आहे तर मला हिंडवून आणतोस का? तुम्हाला खरं वाटत नाही नां? म्हणजे काही अप्रिय घडले तरी त्यातूनच काहीतरी चांगले घडून येते असं लक्षात घ्या. त्या वर्षी इंग्लंडमध्ये सगळीकडे शरद ऋत् बहरला होता; सगळे लोक रंगीबेरंगी पाना-फुलांचे ते सौंदर्य टिपायला बाहेर पडले होते. हे दृश्य तसे तिकडे दुर्मीळच असते पण खूप ऊन पडल्यामुळे परमचैतन्याने ते घडवून आणले. परम चैतन्य असे सगळीकडे लक्ष ठेवत असते;B सर्व काही सुव्यवस्थित जमवून आणते. मी काहीच करत नाही; मी तर निष्क्रिय आहे. नूसतं बसून मी सगळं काही बघत असते. मला कसलाच प्रश्न पडत नाही. हळूहळू सावकाशपणे सर्व काही रीतसर घडते. तसं तुम्ही उगीचच मला म्हणता, 'माताजी, आम्ही प्रार्थना केली आणि सर्व काही जमून आले. ' तसं असेलही. या लोकांनी माझ्याबद्दल तसं काही ऐकले असेल, प्रत्यक्ष मी बोलले नसेन, पण त्यांनीच कष्ट घेतले आणि त्यांचे कार्य झाले. मी त्या करतां काहीच जबाबदारी घेत नाही. मी जे काही करते असे तुम्हाला वाटते ते मी करत नसून हे परमचैतन्यच करत असते. कारण मी सुद्धां तुमच्यापासून अगदी पूर्णपणे वेगळी आहे. लोक तुम्हाला म्हणतात, की तुम्ही प्रार्थना करा3 तसं तुम्हाला १ तुम्ही करा वाटले तर, पण खरं म्हणजे या देव -देवतांची, गणांची प्रार्थना करा, माझी नाही कारण मी या सर्व गोष्टींपासून अलिप्त आहे. मला कोणी 'हे कर, ते कर' असे सांगत नाही;B मग मी तरी त्यांना तसं काही करायला कां म्हणून सांगायचे ? ही सहजस्थितीच अशी आहे आणि त्या स्थितीमध्ये तुम्ही उतरलात तर तुम्हाला कसली इच्छा होणार नाही, कशाची जरूर वाटणार नाही. मी किती तरी प्रकारची कामे करते, म्हणजे सूर्य प्रकाश देतो म्हणजे काम करतो असं म्हणाल तर ठीक आहे, तसं मी सगळीकडे लक्ष ठेवते. फुलांकडे बघते, तुमच्याकडून भेटवस्तू स्वीकारते पण तरीही काहीच घेत नाही. माझ्याजवळ काहीच नसते. मला त्याबद्दल आकर्षण नसते. तुम्हाला फुले ठेवायची असतील तर मला चालेल पण फुलं असली किंवा नसली तरी व्यक्तिशः मला काहीच फरक पडत नाही. पण तरीही आई म्हणून तुमच्यावर तुम्हां सर्वांवर माझे प्रेम आहे, पण ते प्रेम व्यक्त करण्यासाठी मी प्रत्यक्ष असं काहीच करत नाही आणि तरीही प्रत्येकजण म्हणतो, 'माताजी, तुम्ही आमच्यावर किती प्रेम करता!' मी कधी प्रेम केले? उलट तुम्हीच म्हणत असता, की मी प्रेम करते. तर जे सर्वकाही घडवीत आहे. ते मी नव्हे तर माझ्यापलीकडचे आहे. या स्थितीमध्ये आपण एकदा पोहोचलो की सहज स्थितीला आलो असे आपण म्हणतो. सहज स्थितीमध्ये तुम्हाला वाटते, की तुम्ही काही करत नाही आणि सर्व काही कार्यान्वित होत आहे, पण आता जर मी तुम्हाला काही सांगितले तर लगेच तुम्ही विचार करणार की आपण काहीच करत नसलो तर सहजयोगाचा प्रसार कशाला करायचा? पण अजून तुम्ही त्या स्थितीला आला नाहीत म्हणून असं होते. म्हणून आधी तुम्ही ती स्थिती मिळवली पाहिजे आणि ती तुम्ही आत्म्याचे ज्ञान मिळवल्यानंतरच मिळणार. म्हणजेच साऱ्या जगाचे ज्ञान. पण तुम्हाला त्याच्याही पुढे जायला पाहिजे. आता पुष्कळ वेळा तुम्ही पाहिले असेल, की मी कधी तरी पटकन काही तरी बोलते आणि तसेच तुम्हाला येते. त्यासाठी मी व्हायब्रेशन्स पाहत नाही, कुंडलिनी किंवा चक्रांकडून काही जाणून घेत घडून नाही; पण एखाद्या कॉम्प्युटरसारखे ते आपोआप होते. आता मी काही कॉम्प्युटर पण नाही, तर ह्या स्थितीचे वर्णन करणं अवघड आहे. कारण ती स्थिती मिळाल्यावरच तुम्हाला ते समजणार आहे. एकदा ती स्थिती मिळवली, की तुम्ही फार सूक्ष्मतेमध्ये उतरता जिथे आनंदाशिवाय काहीच करत नाही, पण हा आनंदही तुम्ही उपभोगू शकत नाही. प्रत्येक वस्तूचा आनंद कसा घ्यायचा मला माहीत नाही. आता तुम्ही 'जय श्रीमाताजी' असं म्हणालात तर तुम्ही मला उद्देशून म्हणत आहात हे पण मी विसरते. मी नुसते 'जय माताजी' एवढेच म्हणते, बस. हे किती सोपे आहे बघा. काही न करताही सर्व कार्यान्वित होत असते. अशा स्थितीला आपण पोहोचले पाहिजे. तशा स्थितीला तुम्ही पोहोचला असाल तर ठीक आहे, पण तसे अजून झालेले नाही. कार्य करूनच तुम्ही हे मिळवणार आहांत. प्रथम तुम्ही ज्ञान मिळवायला हवे, पुढे ज्ञानाची जरूर भासणार नाही, ज्ञान करून घेण्याची गरज उरणार नाही पण प्रथम ही सर्व प्रतिक्रिया कार्यान्वित होऊन परमोच्च अवस्थेपर्यंत रत व्हायला हवी. दिवाळीचा संदेश असा आहे, की आपण जसे सगळीकडे दिवे लावतो तसा सहजयोग सगळीकडे पसरू दे. पण दिव्याला किंवा ज्योतीला त्याची कसली जाणीव असते कां? ते सगळीकडे प्रकाश पसरवतात पण त्यांना स्वत:ला त्याची माहिती नसते. चंद्र चंद्रप्रकाश देतो पण त्याला त्याची जाणीव नसते; त्याचा त्याला आनंद होत नसतो. दिवाळीच्या या प्रसंगी त्याचप्रकारे तुम्हाला सर्वांना प्रकाश द्यायचा आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला कार्य करायचे आहे. हा फार सुंदर विचार आहे. तुम्हाला हे केलंच पाहिजे आणि हे करतानाही लक्षांत ठेवा की तुम्हाला सर्व जगाला, सर्व मानवजातीला प्रकाश द्यायचा आहे. दुसरं म्हणजे तुम्ही प्रकाश देणारा दीपच बनून जायचे आहे. दीप प्रकाश देतो पण आपण दीप आहोत हे त्याला भान नसते. माझे तसंच आहे, मी स्वत:ला ओळखत नाही. ह्याच स्थितीला तुम्हाला यायचे आहे. तुम्ही माझी स्तुती गाता, माझी अनेक नावे घेता, पण तुम्ही माझं नांव घेत आहांत हे माझ्या डोक्यातही येत नाही. आता मी हे सारं सांगत आहे, पण तुम्ही त्यावर काय प्रतिक्रिया १० करणार मला ठाऊक नाही. कदाचित तुमचा अहंकार डोकं वर काढेल आणि तुम्ही म्हणू लागाल की, 'माझे पण अगदी तसेच आहे.' असे पण बरेच जण आहेत ज्यांना वाटते, की ते माताजींपेक्षा मोठे आहेत. आणखी असे बरेच जण आहेत जे स्वत:ला कलकी समजतात. आजकाल अशी एक व्यक्ती आहे, जी आपण कलकी असल्याचं सर्वांना सांगत सुटली आहे. ते असू दे, त्याने काही होणार नाही, त्यांना तसेच राहू दे. त्यांची कल्पना त्यांच्याजवळच राहू दे. पण मी 'मी आदिशक्ती आहे' असे म्हटले तर त्याचा अर्थ होईल की मी कोण आहे हे माझे मलाच ठाऊक नाही; लोक माझ्यामागे लागले की, 'माताजी, मला दिसते, की मी ते जाहीर केल्यानंतर तुमची वाढ चांगली झाली आहे. पण खरं म्हणजे कोणालाच काही जाहीर करण्याची किंवा जाहीरपणे सांगण्याची गरज नसते. ही स्थिती प्रत्येकाने मिळवली पाहिजे, पण त्याच्यासाठी तुम्ही कार्य केले पाहिजे आणि कार्य म्हणजे सहजयोगाचा प्रसार करणे. तुम्हाला खूप दिवे लावायचे आहेत. म्हणजेच तुम्ही एक दीप आहात हे तुम्हाला जाहीरपणे सांगायलाच पाहिजे.' काय जाहीर करायचे? मी जी आहे ती आहे. आता तुम्हाला समजले पाहिजे आणि त्यातून सूक्ष्म झाल्यावर तुमच्या लक्षांत येईल की 'मी एक दीप आहे.' सहजयोगाचा प्रसार करण्यासाठी पुष्कळ सहजयोगी पुष्कळ चांगले कार्य करत आहेत. पुष्कळ देशांमध्ये तो पसरला आहे, पुष्कळ ठिकाणी धर्माबद्दलचे अज्ञान (अंधार) दूर झाले आहे. जात पात, पुष्कळ धर्माचा 'वादी' पणा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे तुमच्यातील दोषही दूर होऊन तुम्ही स्वच्छ पाण्यामध्ये उरतला आहात. एकदा हे करायला लागलात, की हळूहळू तुम्हाला कळेल की सागरच स्वच्छ झाला आहे. आता नुसते पहात राहायचे आणि सारं काही कार्यान्वित होत असल्याचे बघायचे. तुमच्या आयुष्यातच तुम्ही ही स्थिती मिळवाल आणि लोकांना आत्मसाक्षात्कार देण्याचे काम पुरं कराल अशी मला आशा आहे. जे दुसर्यांना जागृती देत नाहीत आणि नुसते पूजेला येतात ते साधारण सहजयोगीच; ते गहनतेत येऊ शकणार नाहीत, पूजेला नुसतं येऊन काय होणार? थोडेसे वर याल पण नंतर परत खाली! पण जे चिकाटीने (पाण्यात येण्याचा) प्रयत्न करतील ते उच्च स्थितीला येतील ही माझी खात्री आहे. माझ्या जीवनकालातच मला अशी काही माणसे पहायची आहेत की ती नुसती उभी असली, की त्यांच्यामधून शांती आणि प्रकाशच बाहेर येईल. ते दीप झाल्यामुळे सतत प्रकाशच देणार. अशा स्थितीला येण्यासाठी धडपड केली तर तुमच्यामध्ये पण ते घडून येईल. अनेक संतांनी हेच सांगितले आहे. पण सर्वसाधारण लोक त्यावेळी त्या स्थितीला आलेले नसल्यामुळे त्यांना ते समजले नाही आणि त्यांनी अशा थोर लोकांना वेडे ठरवले. ख्रिस्तालासुद्धा लोक समजू शकले नाहीत, ओळखू शकले नाहीत म्हणून त्याला सुळावर चढवले, पण तुमचे तसे नाही, तुम्हाला प्रकाश मिळाला आहे. तुम्ही वरच्या स्थितीला येऊ लागला आहात. तुम्ही ख्रिस्तांना आणि सगळ्या संतांना ओळखले आहे आणि या स्थितीमध्येही तुम्हाला कार्य केलेच पाहिजे. सहजयोगाचे कार्य तुम्हाला केलेच पाहिजे; जे हे काम करणार नाहीत त्यांची प्रगती होणार नाही. तुम्हाला सहजयोग अजून खूप वाढवायचा आहे आणि एकमेकांच्या संगतीत राहन बरंच काही कार्यान्वित करायचे आहे आणि जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत मी वर सांगितलेल्या सहजस्थितीला पोहचू शकणार नाही. आजचा दिवस महालक्ष्मीचा आहे. पहिली सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पैशाबद्दलचा वेडेपणा. तुम्ही श्रीमंत माणसाला विचारले तर तो म्हणतो, 'माझ्याजवळ पैसा नाही.' गरीब माणसाजवळ नसतोच पैसा. म्हणजे पैशाबद्दलची ही हाव कधीच पुरी होणारी नसते म्हणून पैशाचा हा लोभ प्रथम गळाला पाहिजे. मग तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्ही स्वच्छ व्हाल. हे कार्य करतानाच तुम्ही स्वच्छ होत आहात की नाही हे तुमचे तुम्हाला कळेल. त्या कार्यामधूनच तुम्ही हे कसं करत आहांत हे तुमचे तुम्हाला समजेल. हे एकदा झाले, की माझ्या हयातीतच तुमच्यापैकी काही जण तरी या स्थितीला आलेले पाहण्याचे भाग्य मला मिळेल. म्हणून या दीपावलीच्या दिवशी मला तुम्हाला हेच सांगायचे आहे, की तुम्ही अधिकाधिक सूक्ष्म ११ सु ६ यची आहे. कार्य कुरूनच आIपल्याला ही प्रगती साध्य कर जे लोक 3से कार्य कत आहेत आणि सहजयोगाचा प्रसार करत आाहेत त्यांना त्याचा फयदा होणारत आहे आणि है परमचैतन्य तर त्यांची सेवा करायला तत्पर आहे. १२ बना. बाह्यातील गोष्टींचा आपल्यावर परिणाम होता कामा नये. उदाहरणार्थ सांगायचे तर एखादी नवी फॅशन दिसली तर लोक त्याच्यामागे धावायला लागतात. हा मूर्खपणा आहे. असे लोक आंधळ्या जनावरांसारखे असतात; कोणीही त्यांना कोठेही वळवावे, आता हे करा, आता ते करा असे सांगत सुटावे. म्हणजे दुसर्या कोणी दिलेला विचार तुमच्या डोक्यात की तुम्ही तुमच्यामधील 'स्व' ला विसरून जाता आणि मग 'मी हिंदू आहे, मी ख्रिश्चन आहे, मी घुसला, मुस्लिम आहे.' हे नसते प्रकार चालू होतात. तुम्ही 'स्व'तंत्र आहात. आत्मा आहात आणि एकदा आत्मा बनलात, की तुमचे तुम्हालाच ते समजू लागते आणि ते समजणे (ज्ञान) हे फार महत्त्वाचे आहे. सामान्य माणूस आणि संत यांच्यामधील अंतर हेच आहे. जे तुम्ही हळूहळू दूर करत आहात. मग इतर माणसांचे प्रश्न तुम्ही समजू लागता आणि माणसांबरोबरच रहात असल्याने त्यांना कशी मदत करायची हे तुम्हाला समजते. सध्याच्या आधुनिक काळात सामूहिक चेतना फक्त सहजयोगामधूनच कार्यान्वित झाली आहे. संतांनासुद्धा ही जाणीव होती पण त्याच्याबद्दल ते काही बोलले नाहीत. एखाद्याची चक्रे खराब असली तरी त्याची त्यांनी पर्वा केली नाही. म्हणजे काळजी वाटली नाही असे नाही तर तिकडे लक्ष दिले नाही. त्यांची अशी स्थिती होती की सर्व काही त्यांना समजत होते एवढच. म्हणजे आरशापुढे एकदा कुरूप माणूस उभा राहिला काय किंवा रूपवान उभा राहिला काय आरशाला काही फरक पडत नाही. तशी त्यांची अवस्था होती. पण आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि कार्य करूनच आपल्याला ही प्रगती साध्य करायची आहे. जे लोक असे कार्य करत आहेत आणि सहजयोगाचा प्रसार करत आहेत त्यांना त्याचा फायदा होणारच आहे आणि हे परमचैतन्य तर त्यांची सेवा करायला तत्पर आहे. मी पाहिले आहे, की काही लोकांनी नुसती इच्छा केली तरी ती पूर्ण केली जाते; त्यांनी काही मागितले तर ते कार्य होणारच. त्याच्यासाठी आपण कसे योग्य बनायचे हा मुख्य मुद्दा आहे. आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर आपण काय करायला हवे असं म्हटले तर ते म्हणजे श्रद्धा. तुम्ही आत्मा आहात, तुम्हाला प्रकाश मिळाला आहे, तुम्ही सर्वांना तो प्रकाश देणार आहात हा आत्मविश्वास तुम्ही ठामपणे बाळगायला हवा. ही श्रद्धा अधिकाधिक खोलवर रूजली, की मग तुम्हीच म्हणाल, 'मी फक्त आत्मा आहे.' आत्मा झाल्यामुळे सर्व निसर्गच तुमच्या पायाशी आहे. मला एक कोळी माहीत आहे, त्याची माझ्यावर प्रचंड श्रद्धा होती; एकदा सहजयोगाच्या कार्यक्रमाला दुसऱ्या खेडेगावात जायचे होते, तो घराबाहेर पडला इतक्यात काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेले. त्याने लगेच आकाशाकडे हात केले आणि म्हणाला, 'हे पहा , मी माताजींच्या कामासाठी निघालो आहे आणि पाऊस पाडण्याचे धाडस तुम्ही करू नका. माझं काम होईस्तोवर तुम्ही तसेच तरंगत रहा.' त्याला बोटीने जायचे होते. बरोबरच्या लोकांना वाटलं 'हा काय बडबडतोय!' सर्वजण बोटीत बसून पलीकडच्या गावात गेले, लोकांना जागृती दिली, सहजयोग समजवून सांगितला आणि परत येऊन घरात शिरला आणि आकाशाकडे पुन्हा पाहून म्हणाला, 'माझं काम झालय आता तुम्ही काय ते करा.' म्हणजे परम चैतन्यावर पूर्ण श्रद्धा अशी, की ते तुमचे काम करण्यासाठी जणू वाटच बघत आहे. तुम्ही म्हणाल ते काम होणार ही श्रद्धा. पण आधी तुम्हाला स्वत:बद्दल, तुम्ही सहजयोगी आहात याबद्दल स्वत:मध्ये पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे. अजूनही मी पाहते, की काही लोकांना लोभ सुटत नाही. म्हणून प्रथम तुमच्यामध्ये धर्म प्रस्थापित झाला पाहिजे. धर्म म्हणजे नीतिमत्ता. तुम्ही नीतीनुसार वागत असाल तर प्रश्न नाही %B मग हे परम चैतन्य तुमचे ऐकणार नाही असे होणारच नाही आणि समजा आज तुम्ही काही इच्छा केली आणि तसं घडून आले नाही तरी तुम्ही निराश होऊ नका ते चांगले नाही. निराश होणे हे प्रगल्भ नसल्याचे लक्षण आहे. त्यात निराश का म्हणून व्हायचे ? कदाचित ते काम न होणेच तुमच्या हिताचे असेल. समजा, मी कुठेतरी जात आहे आणि वाटेत रस्ता चुकला; कुठल्या रस्त्याने जायचे हे कळेनासे झाले तरी म्हणाले, 'ठीक आहे. काही बिघडले नाही. मी आहे तशीच आहे. मी स्वत:लाच कशी हरवेन ?' आणि मग मला दिसून आले, की त्या रस्त्यावर मला एक दुसरा माणूस, ज्याला मी भेटायला उत्सुक होते तो भेटला! खरं वाटत नाही ना! माझ्या बाबतीत असे बरेच वेळा घडते आणि जरी असा कोणी भेटला नाही तरी काय बिघडले? मी त्या बाजूला जावे, थोडी व्हायब्रेशन्स द्यावीत असं होणार असेल. तर हे असे होत असते. जे काही कराल ते आत्मविश्वासाने करीत रहा. श्रद्धेने करा. या श्रद्धेमधूनच तुम्हाला सर्व शक्ती येणार आहे. सत्याला जाणल्यामुळे तुम्ही शक्तिशाली बनता. पूर्ण सत्य जर १३ क गुरूबद्दल तुमच्या मनात श्रद्धा असली, की परम चैतन्य प्रेमळ 11 असते. देह द्ा तुमच्याजवळ आहे तर तुम्हाला सर्व शक्त्या प्राप्त झाल्या आहेत आणि ही शक्ती दुसऱ्या कोणी नव्हे तर तुम्हीच वापरायची आहे आणि शक्तीच सर्व काही कार्यान्वित करत असते. सर्व काही घटित करत असते. म्हणून मला दिसते, की काही अगदी साधेसुधे अडाणी सहजयोगी फार शक्तिशाली असतात कारण हेच की त्यांच्याजवळ अनन्य श्रद्धा असते. संस्कृतमध्ये एक चांगला शब्द आहे. तितिक्षा. म्हणजे सहनशीलता, सबुरी, असा धीर नसला तर जे पाहिजे ते ताबडतोब मिळाले पाहिजे अशी आमची वृत्ती असते. मग पूर्णत्वाने सर्व काही घटित होणार आहे हे तुम्हाला समजत नाही. पुष्कळ लोक असे खूप उतावळे असतात. सारखी धावपळ करत राहतात. नाही तरी जगभर सगळ्या गोष्टींना फार गती प्राप्त झाली आहे आणि तुम्हीच असे आहात, की ही घोडदौड़ शांतपणे पाहू शकता. तुम्ही त्यांच्यामध्ये नसता. म्हणून धीर बाळगायला शिका. यासाठी तुमच्याजवळ पेशन्स हवा आणि स्वत:वर श्रद्धा, आत्मविश्वास हवा म्हणजे हे परमचैतन्य कसं कार्य करते, सहजयोग कसा कार्यान्वित होतो हे तुमच्या लक्षात येईल. त्यामध्ये एखादी गोष्ट घडून आली तर ठीकच कारण त्याचा काही उद्देश असतो. पण एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली तरी हरकत नाही कारण त्यामध्येही काही हेतू असला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा तुमच्या गुरूवरचा विश्वास व श्रद्धा. गुरूबद्दल तुमच्या मनात श्रद्धा असली, की परम चैतन्य प्रेमळ असते. पण जरा तुमचा विश्वास डळमळीत असला तर परम चैतन्याला पण शंका येते; मग मी किंवा दुसरा कोणता गुरू असू दे. कारण ते गुरूमधूनच कार्य करते. माझ्याबाबतीत म्हणायचे झाले तर मी खूप क्षमा करत असते. हे तुम्हाला ठाऊक आहे. पण त्याचाही गैरफायदा घेणारे लोक असतात. दूसरा कोणी गुरू असला तर अशा लोकांना मारेल, कठोर शिक्षा करेल. हाकलूनसुद्धा देईल. अशा गुरूंच्या बऱ्याच कथा मी सांगितल्या आहेत, पण मी नेहमीच क्षमा करते. मला वाटते की अशा लोकांकडे दुर्लक्ष केले तर आज ना उद्या ते सुधारतील आणि वर येतील. पण काही वेळा याचा उलटाच परिणाम होतो, 'माताजी क्षमा करणारच आहेत' असे ते गृहीत धरतात म्हणून तुमची श्रद्धा अशी हवी की जे काही घडत आहे ते शांत चित्ताने पाहत रहा आणि काहीही झाले तरी निराश होऊ नका. आता हेच पहा, की इतक्या लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला आहे, इतके सारे संत झाले आहेत. काल हे फ्रेंच लोक भजने म्हणत होते ते ऐकून मला आश्चर्य वाटले. मध्येमध्ये मीच पेटी घेऊन त्यांना चाल शिकवीत होते. अर्धा तास प्रयत्न केला पण जमले नाही. आता हे फ्रेंच लोक निर्मितीक्षम झाले आहेत. तुमच्यामधील सर्व सुप्त कला जागृत होतील, त्यांचा आविष्कार होईल. फक्त तसे झाले, की त्याचा अहंकार येऊ देऊ नका, एवढी काळजी घ्या. हळूहळू १४ त्यांना बहार येईल आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत तो सुगंध पसरेल आणि सहजयोगात येण्याची त्यांना प्रेरणा होईल. हेच वरदान तुम्हाला मिळणार आहे. त्यावेळी परमात्म्याच्या आशीर्वादाने तुम्ही पूर्णत्वाच्या स्थितीला पोहोचणार आहात. परिपूर्ण मानव बनणार आहात म्हणून तुम्ही स्वत:कडे असे पहा आणि विचारा मी सहजयोगाशी एकरूप झालो आहे कां? सहजयोगाला मी पूर्णपणे वाहून घेतले आहे का? न थांबता पुढे जा ; एक गोष्ट लक्षांत घ्या, की सहजयोगाला शेवट नाही. तो थांबणार नाही. हेवा, मत्सर, कुरबुर यांना तिथे स्थान नाही. तुम्ही सर्वजण संत आहात, तुम्ही अप्रामाणिक नाही, कोणाची फसवणूक करणारे नाहीत. असं काही अजूनही करत असाल तर अजून तुमची प्रगती व्हायला हवी. काही लोकांना वाटते, की सहजयोगामध्ये आपण फार मोठे आहोत, पण तसे काही नसते. असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वाट चुकला आहात. 'मी काय केले?' याचाच विचार करा; कितीजणांना तुम्ही जागृती दिली ते पहा; कितीजणांना सहजयोग सांगितला ते बघा. बऱ्याच जणांना सहजयोगाबद्दल बोलायला संकोच वाटतो, पार्टीमधे गेले तर दुसर्यांना मी सहजयोगी आहे हे सांगायला धजत नाहीत, मी पीत नाही, ते माझ्या स्वभावातच नाही. जाहीर करणे ही आणखी एक गोष्ट. तुमची श्रद्धा असलीच पाहिजे पण ती तुम्ही जाहीर करायला हवी. सर्व संतांनी तेच केले आणि त्यांना त्रास भोगावा लागला. पण तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. सहजयोग पूर्णपणे समजून घ्या, श्रद्धा बाळगा आणि जाहीर करा. तुमचे ध्येय सर्व जगामध्ये परिवर्तन घडवून आणणे हे आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन झाले, की आपोआप इतरांमध्येही तसे होईल. मग सगळीकडे प्रकाश आणि आनंद पसरेल. तुम्ही आनंदरूपच झाल्यामुळे ते वेगळेपणाने जाणणे पण उरणार नाही. तुम्ही सर्वजण ती स्थिती मिळवाल अशी मला फार आशा आहे. ही दिवाळी पोर्तुगालमध्ये होत आहे ही मला वाटते की एक विशेष गोष्ट आहे. महालक्ष्मी इथे आली होती आणि इथे जे स्वयंभू आहे तो महालक्ष्मीचाच चेहरा आहे. म्हणून मला खात्री आहे, की तुम्हा सर्वांमध्ये हे कार्यान्वित होईल. ही फार सूक्ष्म स्थिती आहे म्हणून तिच्याबद्दल इतके सविस्तर सांगितले. तुम्हाला ही स्थिती सहज मिळवता येईल. मग तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. एखाद्या खेड्यात गेलात तरी सर्व काही जमून येईल. आत्ताचेच पहा, मी कैरोमधे गेले तर सर्वजण मला सलाम करू लागले, मी म्हटले हे काय झाले? हजारोंनी लोक तिथल्या खेड्यातही प्रोग्रामला आले. मी म्हटले, 'तुम्ही इथं प्रोग्रामला कसे आलांत?' तर 'तुमचा चेहरा पाहूनच आलो' असं म्हणाले. वर्तमानपत्रात प्रोग्रामची लहानशी जाहिरात फक्त त्यांनी वाचली. 'तुम्ही अवतारी आहात' असंही म्हणू लागले. मग, असे लोक साधक नसले तरीही जाहीर करा, की सहजयोग हा एकच मार्ग आहे. मला वाटते आतापर्यंत पुष्कळ साधकांना आपण सांगत आलो, साधक लोक उरले नसावेत. म्हणून साधक नसलेल्या सामान्य लोकांना आता सांगायला हवे. परमेश्वराचे तुम्हा सर्वांना आशीर्वाद! १५ खिसमस पूजा टा गणपतीपुळे, ५ डिसेंबर १९९६ येशू ख्रिस्तांचा जन्म ही एक फार मोठी प्रतिकात्मक घटना आहे; अगदी गरीबातल्या गरीब माणसाचाही होणार नाही अशा एका गोठयात त्यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असल्याने त्यांना वाळलेल्या गवतावर झोपावे लागले. पण त्यांचा जन्मच (जीवन) हेच दाखवतो, की अवतारी पुरुष किंवा उन्नतीच्या उच्च स्थितीमधील लोक शारीरिक सुखाबद्दल पूर्णपणे उदासीन असतात. त्यांचा संदेशच इतका महान व गहन होता की त्यांचे शिष्यसुद्धा त्यांच्या शिकवणीप्रमाणे संघर्ष करण्यासाठी तयार झालेले नव्हते. प्रेम व क्षमा हा त्यांचा संदेश सर्व साधु-संत देतात. सर्व अवतारपुरुषांनी व प्रेषितांनी प्रेम व क्षमा हीच शिकवण दिली. ज्यांचा त्याला विरोध होता किंवा ज्याला त्याची उपयुक्तता पटत नव्हती त्यांना त्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले गेले. त्यावेळी लोक साधेसुधे असल्यामुळे त्यांनी त्यांची अनुज्ञा पाळली; त्यातले काही शिष्य फार चांगले होते. काही अर्धवट होते तर काही थोडे साशंक होते. आपले आज्ञा चक्र तयार करण्यासाठी त्यांचे अवतरण झाले आणि त्यांनी अपरंपार कष्ट करूनही आपल्याला असे दिसते की, विशेषत: ख्रिश्चन लोकांचे आज्ञा-चक्र फार खराब असते, ते फार आक्रमक वृत्तीचे, खूप विचार व योजना आखणारे व भविष्याचा जास्त विचार करणारे असतात. उजव्या बाजूचे जे सर्वसाधारण दोष असतात ते ख्रिश्चन म्हणवणाऱ्या देशातील लोकांमध्ये सापडतात. ख्रिस्ती धर्मामध्ये सुरुवातीच्या काळात जे खरोखर ज्ञानी लोक होते त्यांचा ख्रिश्चन धर्माधिकारी म्हणवणाऱ्या लोकांकडून फार छळ झाला आणि त्यांना दाबून ठेवले गेले. ख्रिश्चन पाद्री आणि चर्च-संस्थेतील अशा लोकांनी पण त्यांना खूप त्रास दिला. अजूनही ते चालूच आहे. पार्चात्त्य देशांमध्ये अजूनही आपल्याला हेच दिसून येते, की सर्वसाधारण जनमानसावर या चर्च-संस्थेचा खुप पगडा आहे. एरवी ते लोक फार बुद्धिमान, काटेकोर शास्त्रीय विचारसरणीचे व शूर आहेत, पण मंदिरे, चर्च, धर्म किंवा ख्रिश्चन-धर्म या विषयाबद्दल मात्र मतिगुंग झालेले आहेत. आपल्याकडील लोकांचे काही चुकत असेल हा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. मी इटलीमध्ये गेले होते तेव्हा त्यांच्या कॅथॉलिक चर्चमधले जे आपल्या देशात बघायला मिळणार नाहीत इतके भयंकर अनागोंदी व भ्रष्टाचारी प्रकार पाहन मी थक्कच झाले. पैशाचे अपव्यवहार, विटंबना, अनौरस संतती असले घाणेरडे प्रकार तिथे राजरोस चालतात. ते लोक स्वत:ला फादर-मदर-सिस्टर असं म्हणवतांना ख्रिस्ताच्या नावाखाली असे धंदे कसे करू शकतात ? ख्रिस्तांनी आपल्या शिकवणुकीतून व जीवनकार्यातून आदर्श दाखवायचा प्रयत्न केला.. लंडनमधील एखाद्या भव्य हॉस्पिटलमध्ये आरामात जन्म घेण्याचीच काही जरूर नाही. त्यांच्या स्वत:च्याच अगदी साध्या जन्माची गोष्ट पाहूनच ख्रिश्चन लोक तसेच साधे व्हायला पाहिजे होते पण ते तर उलट सर्व काही पैशामध्ये तोलणारे आज आहेत. पैशासाठी ते दूर दर गेले आणि त्या त्या प्रदेशातील लोकांचा संहार केला. ब्राझील, चिली, अर्जेंटिना या देशात गेलात तर तिथे मूळचा आदिवासी एकही मनुष्य तुम्हाला दिसणार नाही इतके हे लोक त्यांच्याशी विश्वास बसणार नाही इतके क्रूरपणे व आक्रमक पद्धतीने वागले. इंग्लंडमधल्या प्रोटेस्टंट लोकांचीही तीच तऱ्हा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही सारखे थँक यू-थँक यू असे नाही म्हटले तर त्या जातीतून तुम्ही खलास. ख्रिस्तांना कुठली जात होती का ? ते सावळे होते का? नाही तर गोरे होते का? मुळीच नाही. ते भारतीयांसारख्या वर्णाचे होते. पार्चात्त्यांमध्ये ही जातपात कुठून आली ? खऱ्या ख्िश्चन धर्मामध्ये याचा ख़रिस्तांशी काही संबंध नाही. तुम्ही कुठेही जा, साध्या- भोळ्या भाविक लोकांचा हे चर्चमधले लोक वाटेल तसा उपयोग करून घेतात. मतदानासाठी त्यांना वापरतात. पैशासाठी त्यांचा उपयोग करून घेतात. खोटेनाटे पैसे हे चर्चमध्येच बनतात. इतका एकाधिकार, इतकी शिस्त, इतकी हकूमशाही की काय वाट्टेल ते केले तरी पोपसाहेबांचे कधीच काही चुकत नाही. त्यांनी काहीही केले तरी ते योग्य मानायचे. पापाची कसली जाणीव नाही, नरकाची भीती नाही, इतकचं काय ख्रिस्तांचे-(जे साक्षात शुद्ध व अबोधित आहेत) पण स्मरण नाही. एकदा ख्रिस्त मंदिरात बाजार मांडलेल्या लोकांवर स्त्रियांची १६ हंटर उगारून मारू लागले कारण ते म्हणत देवाबरोबर खरेदी-विक्री नाही, तसे ते लोक इतर वस्तूंचाच बाजार भरवत होते पण मंदिराच्या पावित्र्याबद्दल त्यांचा आग्रह होता. ख्रिश्चन लोकांनी आणखी एक प्रकार केला, तो म्हणजे ख्रिस्तांना मारल्याबद्दल त्यांनी ज्यू-लोकांना दोषी ठरवले. ते नेहमीच दोषारोप दसर्यांवर करतात. ख्रिश्चन लोकांमध्ये स्वत: दसऱ्याबरोबर केलेल्या अन्यायाचे खापर दुसर्यावर लादण्याची वृत्ती अजूनही आहे. तसे त्यांनी ज्यू लोकांना दुषण लावले. त्यावेळचे ज्यू लोक नंतर भारतात येऊन भारतीय झाले असावेत. त्यांचा पुनर्जन्मावर कदाचित विश्वास नसेल तर ठीक आहे. दसरी गोष्ट म्हणजे त्यावेळच्या ज्यू लोकांनाच तिथे पुन्हा जन्म मिळाला असं तुम्हाला म्हणायचे आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे त्या एवढ्या गर्दीमध्ये ज्यू लोकांनीच ख्रिस्ताला मारले असं तुम्ही कसं ठरवू शकता ? म्हणून ज्यूं नी ख्रिस्ताला मारलेच नाही. खरं तर त्यावेळच्या न्यायाधीशानेच तो निर्णय घेऊन तशी आज्ञा केली. तो एक रोमन होता. रोमन साम्राज्याला त्याची जबाबदारी नको होती म्हणून ते म्हणाले, की ज्यूंनीच ख़रिस्तांना मारले. म्हणून हिटलरने सुद्धा ज्यू लोकांचाच छळ केला. स्वत:ला कॅथॉलिक म्हणून लहान मुलांनाही गॅस चेंबरमध्ये ठार मारणारा कसा होऊ शकतो हे समजत नाही. पण ज्यांचा असा छळ झाला तेच आता आक्रमक होऊ लागले आहेत व आज ते पॅलेस्टिनियन लोकांच्या विरोधात आहेत; पॅलेस्टिनियन लोकही मुसलमान असून त्या लोकांनीही सगळीकडे थैमान घातले आहे. ख्रिस्तांचे जीवन आणि इतिहास खोलवर जाऊन पाहिला तर हेच दिसून येते, की एक आक्रमण झाले, की त्यातूनच दुसरे आक्रमण सुरू होते. एकाने दुसर्याला थप्पड मारली तर तो मारणाच्याला ठार करण्याचा प्रयत्न करतो. धर्मामुळेच हा मत्सर व दूरावा निर्माण झाला आहे; देवाच्या व धर्माच्या नावाखाली लोक एकमेकांचा खून करत आहेत. सहजयोगातही लोक आता माझंे नाव घेऊन गैरमार्गाला लावणार्याचे ग्रुप बनवत आहेत. तुमच्यावर तसा प्रसंग येणार नाही याची काळजी घ्या. जे प्रत्यक्ष प्रेमशक्तीचे अवतरण होते त्या ख्रिस्ताचे नावाखाली लोक अत्याचार, मत्सर, द्वेष, फसवणूक अशी वाईट कामे करत आहेत. हे लोण एकाकडून दुसऱ्याकडे पसरते आणि सहजयोगातही त्याचा शिरकाव झाला आहे. मी जर एखाद्याला लीडर म्हणून बदलला आणि लीडर नेमला तर लगेच त्याला राग येतो आणि सहजयोगातून आपल्याला किती फायदा मिळाला हे विसरून जातो. साफ विसरतो. नुसते दुसरा लीडर नेमणार आहे असं सांगितले तरी एकदम खलास सहजयोगानेच त्याला सर्व काही दिले, त्याचे सर्व चांगले झाले. सहजयोगाच्या कृपेनेच तो जिवंत आहे हे सारे काही विसरतो. लीडर केल्यावर ती हवाच त्यांच्या डोक्यात शिरते. सहजयोगात लीडर बनवण्यासाठी कधीच आणले नाही. लीडर नेमणे ही फक्त एक सोईसाठी केलेली व्यवस्था आहे आणि एखादा लीडर बिघडत चालला तर त्याला बदलायला हवे इतकाच त्याचा अर्थ. इतके हे सरळ आहे. पण सत्ता मिळवणे ही चुकीची समजूत असल्यामुळे एकदा ती मिळाली की तिचा वाट्टेल तसा वापर केला जातो. हे प्रत्येक देशात चालले आहे आणि अजूनही चालत आहे ही पार खेदाची व क्लेशदायक गोष्ट आहे. माझ्या कार्यात त्यामुळे अडथळे येतील. सर्वांना सामूहिक पूर्णावस्थेला नेण्याचा माझा प्रयत्न आहे. तुमच्यामध्ये भेदभाव मला करायचा नाही. पण जे चुकीचे, अयोग्य व अपवित्र आहे ते तुम्हाला दाखवून द्यायलाच हवे. घरातील स्त्री तांदूळ निवडतांना त्यातले खडे काढून टाकून देते तसं हे आहे. खड्यांसकट आपण भात करत नाही कारण ते खडेच राहणार. संत नामदेव अशा लोकांची माशीबरोबर तुलना करतात. माशी जिवंतपणी अन्नावर येऊन आपल्याला त्रास देतेच. पण चुकून पोटात गेली तर मरूनही वर त्रासच होतो. अशा लोकांना सहजयोग समजणार नाहीच पण ते आपल्याला त्रास देतील. मग जे सहजयोगात प्रगत झाले आहेत त्यांनी काय करायचे ? त्यांनी पण त्यांचे अनुकरण करायचे का? मी कधी कुणाला दोष देत नाही. उलट लोक मला सांगतात, 'माताजी, त्याने सहजयोगाला कधी पैसे दिले नाहीत म्हणून त्याची संपत्ती खलास झाली.' मी कधी कोणाजवळ देणग्या मागत नाही की कधी कशासाठी पैसे मागत नाही. दर वेळेस उलट म्हणते, 'देऊ नका, आपल्याजवळ खूप आहे.' मला जरूर असली तरीसुद्धा मी कुणाकडे एक पैसादेखील मागत नाही. मला तसला प्रश्नच कधी पडत नाही आणि ते मला माहीत आहे दुसरा तुम्हाला ख्रिस्तांच्या जीवनातून आपण हेच समजून घ्यायला हवे की त्यांना कधी कसले प्रश्न नव्हते. ते निर्भय होते. आपण देवपुत्र आहोत हे त्यांना माहीत होते, म्हणूनच सुळावर चढवले गेले त्यालाही त्यांनी तोंड दिले. लोकांना ते आवडले असो वा नसो पण त्यांनी क्रॉस खांद्यावरून वाहिला. क्रॉस हे स्वस्तिकाचेच पण थोड्याफार फरकाचे प्रतीक आहे. ख्रिस्तांना तरीही आपल्या प्राणांची आहती द्यावी लागली. त्यांनी हे प्राणार्पण आपल्या सर्वांसाठी केले ज्यामुळे आपण आज आज्ञा पार करू शकलो. दूसर्यांची निंदा करण्याऐवजी स्वत:ची निंदा केलेली बरी. स्वत:ला सुळावर १८ देण्यासारखे ते आहे असे समजा कारण सहजयोगी म्हणून आपण कुठे आहोत हे तुमचे तुम्हालाच समजेल. मला सांगण्यात आले आहे, की दस-्या लोकांच्या अंकित झालेले ८०-९० सहजयोगी इथे आले आहेत. सहजयोगी व्यक्ती दुसर्याच्या प्रभावाखाली कशी येऊ शकेल? हे शक्य आहे का ? पण कदाचित ते ध्यान करत नसतील3B त्यांना ते कसं जमणार? आता ते क्षमा मागतात. मी क्षमा करेनही पण त्यामुळे ते ठीक होतील असे नाही; त्यांनी हे समजून घ्यायला हवे की आजपर्यंत ते सहजयोगी नव्हते. सहजयोगी जर असा भुलवला जाऊ लागला तर सहजयोगाचा फायदा काय? कुंडलिनी जागरणाचा फायदा काय? ख्रिस्त हे मानवजातीचे तारणकार म्हणून जन्माला आले. आपल्यासाठी या जगात जे शक्य होते ते सारे काही केले. पण आपण त्यांच्यासाठी काय केले? त्याचप्रमाणे बरेच सहजयोगी मागण्या करत असतात की माताजी, आम्ही तुम्हाला भेटू शकत नाही. तुमच्याशी हात मिळवू शकत नाही, तुमच्या पाया पडू शकत नाही, हे नाही, ते नाही इ.इ. मला खरंच आश्चर्य वाटते. मी हे केले पाहिजे, ते केले पाहिजे अशी सारखी माझ्यामागे भुणभुण. तुम्ही फक्त ध्यान करायला पाहिजे. तेवढचं करा आणि हे परमचैतन्य ही माझीच शक्ती आहे आणि माझ्या शक्तीचीच जाणीव तुम्हाला आतमधून होत आहे यावर तुमची श्रद्धा बसेल. तुम्ही जितके माझ्यापासून दूर रहाल तितके तुमच्याच हिताचे आहे. काही सहजयोग्यांची मागण्या करण्याची ही सवय मला अजिबात समजत नाही. त्यांना जागृती मिळाल्याचे ते विसरलेत का? ख्रिस्त हे केवढे महान अवतरण झाले आहे हे आपण समजून घ्यायला हवे त्यांना 'जागृती देता आली नाही ही गोष्ट वेगळी. त्यांना सुळावर चढवणार्या लोकांची तुम्ही कल्पना करा म्हणजे अशा लोकांना 'जागृती' कशी मिळणार हे समजेल. माझ्यासमोर कुणी सुरा होऊन आला तर मी त्याला साक्षात्कार कसा देणार? त्यांचे कोणी ऐकले नाही. त्यांच्या म्हणण्याचा कोणी विचार केला नाही. पण तुम्ही आता साक्षात्कारी झाला आहात; द्विज झाला आहात. तुम्ही महान झाला आहात. तुमच्याजवळ मोठी क्षमता आहे. एवढे सगळे असूनही तुम्ही कसे आहात ? सहजयोगाबद्दल खरी कळकळ व कार्यतत्परता किती जणांजवळ आहे ? विचार करा. सगळ्यांना त्यांचे त्यांचे व्यवसाय आहेत, हे आहे, ते आहे, पण कळकळीने काम करणारे किती आहेत ? ख्रिस्तांजवळ फक्त १२ शिष्य होते आणि एक दोन वगळता सर्व समर्पित होते. साक्षात्कार नसतानांही त्यानी ख्रिस्ती धर्माचे श्रद्धेने कार्य केले आणि तो वृक्ष पसरला. पण त्यांना पूर्ण ज्ञानाची कल्पना नव्हती. त्यांच्याबरोबर ख्रश्चन धर्मांतरामधून आलेले बेकार लोक होते. म्हणून त्यांनी ख्रिस्त जन्माला साजेसे काही केले नाही तरी ते समजण्यासारखे आहे. पण तुम्ही लोक द्विज झाले आहात, आत्मज्ञान तुम्हाला मिळाले आहे, सर्व शक्त्या मिळाल्या आहेत आणि सर्वव्यापी शक्तीबरोबर जोडले गेले आहात तरी तुम्ही असे कसे ? तुम्ही सर्व शक्त्या वापरू शकता, ओळखू शकता, चालू झालेल्या एका इंजिनसारखे तुम्ही झाला आहात. काही चाके चालू झाली आहेत. पण मागे अनेक चाके आहेत आणि म्हणून तुम्हाला खूप करण्यासारखे आहे. मी ख्रिश्चन लोकांना दोष देत नाही. त्यांना कधी आत्मसाक्षात्कार मिळाला नाही; फार फार तर एखादा पाद्री त्यांच्यावर पाणी शिंपडून त्यांना द्यायचा. पण तुमचंे काय? मी तुमच्यासाठी जगत आहे; आईबरोबर राहून तुम्ही प्रगल्भ झाल्याचं मला पाहायचे आहे. पुष्कळ जण तयार झाले असले तरी अजून खूप लोक तयार व्हायचे आहेत. म्हणजे तुम्ही उत्तम भाषण देऊ शकाल किंवा पुस्तके लिहाल हा त्याचा अर्थ नाही. पण आतून तुम्ही प्रगल्भ व्हायला हवे आणि तुमचे व्यक्तिमत्त्व एखाद्या फुलासारखे, ज्यामधून प्रेमाचा ईश्वरी सुगंध दरवळेल, असं बहरले पाहिजे. माझ्यात आणि ख्रिस्तांमध्ये हाच फरक आहे. ते म्हणाले, 'मला आता जास्त काही करायचे नाही;B या मूर्ख लोकांची संगत पुरे झाली.' माझं तसं होणार नाही, जग कसं आहे मला माहीत होते. आज तर जगाची परिस्थिती आणखीनच खराब आहे कारण सर्व नेतेमंडळी आपापसात भांडत आहेत. आजचे राजकारणी भ्रष्ट आहेत, भ्रष्टाचाराची जणू स्पर्धाच चालली आहे, सत्य व प्रामाणिकपणाचा त्यांच्याजवळ लवलेश उरला नाही. प्रत्येकजण जाहिरातबाजी, संपर्क- माध्यम, वर्तमानपत्र यात गुंतला आहे आणि ही साधनेच वाईट प्रवृत्तीला बढावा देत आहेत. हे सर्व असूनही मला खात्री होती की सन २००० पर्यंत सहजयोग हा एक अद्वितीय योग ठरणार आहे. तुम्ही मला माझे वाक्य पुरे करू दिले नाहीत, हे जेवढे इथे माझी सेवा करून आहेत तेवढे लोकही खरे सहजयोगी झाले तर! तुमच्या शहरात मी येऊ शकले नाही तरी काही बिघडत नाही, कशानेच काही बिघडत नाही. मुख्य गोष्ट कोणती असेल तर ही, की तुम्हा लोकांना साऱ्या मानवजातीचे उत्थान करायचे आहे. सगळ्यांना एकत्र आणायचे आहे आणि सगळीकडे शांती, आनंद व सुख पसरवायचे आहे. आज मी जेव्हा येत होते तेव्हा लोकांनी शाली पसरल्या. मला आठवण झाली, की ख्रिस्त यायचे तेव्हा लोक पाम वृक्षाची पाने आणत आणि जमिनीवर त्यांच्यासाठी शाली पसरत, पण ते कुटे गेले? ते क्रॉसवर, सुळावर मरणाला १९ सामोरे गेले. तुम्ही माझ्याबद्दल जेव्हा प्रेम दाखवता तेव्हा लक्षात घ्या, की तुम्हाला सहजयोगाच्या कार्याबद्दलही तितकेच प्रेम वाटले पाहिजे. आजकालच्या देशांमध्ये, जिथे ख्रिस्ती धर्माचा प्रभाव आहे, ते सर्वजण अवनतीला चालले आहेत कारण त्यांच्याजवळ नीतीमत्ता नाही. तिथे बेकारी आहे. अनेक समस्या आहेत, त्यांची मुले भरकटलेली आहेत. दारू-धुम्रपानाच्या आहारी जात आहेत, त्यांचा दुष्परिणाम आपल्यावरही होत आहे. हे सर्व ख्रिस्त-विरोधी कार्य आहे. ख्रिस्तांच्या विरोधात कोणी असेल तर तो आपल्यातच आहे कारण त्याला ख्रिस्तांच्या पवित्र व प्रेमाच्या विरोधातल्या या गोष्टी मान्य आहेत. ही मुलगी जी बुडून मेली ती तुमच्या निष्काळजीपणामुळे गेली. तिचे वडील कुठे गेले होते ? लहान मुलाला असे सोडून कसे जाऊ शकतात मला समजत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ख्रिस्तांनी सांगितलेच आहे, की स्वत:वर जसं प्रेम करता तसं मुलांवर, शेजाऱ्यांवर प्रेम करा. पाश्चात्त्य देशांमध्ये तुम्हाला शेजारी मिळाला तर काही धडगत नाही. तो तुम्ही काय करता, कुठे जाता सर्व माहिती मिळवील, दुर्बीणसुद्धा त्यासाठी वापरेल आणि तुम्ही आवाज केलात तर संपलच; साधे गाणे म्हणालात तरी संपलेच . त्या बाबतीत भारतीय लोक चांगले आहेत. आमच्याकडे तसला आवाजाचा प्रश्न नाही. त्यांना तो चालतो. भारतीय लोक आवाजाशी कसे जमवून घेतात मला शोधून काढायचे होते. मला समजले, की पाश्चात्त्य देशातील लोक सदैव ताणतणावाखाली असतात म्हणून त्यांना आवाज सहन होत नाही. पण भारतातील लोकांना टेन्शन म्हणजे काय हे तितकेसे माहीत नाही, मला कळत नाही पण अजून तरी तो प्रकार इकडे फारसा वाढला नाही. पार्चात्यांच्या मानाने कमीच आहे. म्हणून पाश्चात्य लोक आवाजाला इतके घाबरतात. भारतात खेड्यापाङ्यातून राहणारे लोक स्टेशनवरच झोप घेतात, त्यांना काही होत नाही; गाड्या येत-जात असतात पण हे छानपैकी झोप काढतात. पण पाश्चात्त्य देशांची कल्पनाच करा. देवकृपेने इटलीमध्ये आमचा शेजारी जरा दूर होता पण इंग्लंडमध्ये शेजाऱ्यांमुळे आम्हाला बरेच वेळा इकडून दुसरीकडे असा आश्रम बदलावा लागला; त्यातही एक शेजार असा भेटला, की त्याचे नाव मि.पीस होते. कोणी हे नाव त्याला दिले कोण जाणे? जीवनात त्याच्यामध्ये इतका विरोधाभास, इतक्या प्रचंड दोन टोकांच्या वागणुकी की वाटायचे 'शेजाऱ्यावर प्रेम करा' हा उपदेश ते कधी तरी आचरणात आणतील का? भारतीयांमध्ये हा त्रास फारसा नाही. कधी कधी झाला तरी फारसा नाही. शिवाय कुठे संगीताची बैठक असली तर शेजारपाजारचे सगळे येणार आणि शिवाय बरोबर चहा किंवा दसरं काहीतरी आणून संगीताचा आनंद घेणार. पण तिकडे सामूहिकता इतकी कमी आहे, की ते स्वत:ला ख्रिश्चन कसे म्हणतात मला समजत नाही. चर्चमध्ये मात्र अगदी झकासपैकी कपडे करून जाणार. तिथल्या मेयरने सांगितले, की पंधरा मिनिटे बरोबर बसणार. अगदी घड्याळ बघून आणि एका तासानंतर तुरूंगातून सुटल्यासारखे बाहेर पडणार आणि तुमच्या बरोबर तासन्- तास बसलेले हे लोक किती श्रीमंत. मला वाटते, की मीच त्यांच्यावर जादू करत असेन. तिकडे लोक सामूहिकतेत फारसे येत नाहीत. दूसरं म्हणजे दारूची नशा असल्याशिवाय त्यांना एकमेकात संभाषण करणे जमत नाही. सदैव ते थकलेले. चित्रपटगृहात सिनेमा पहायला किंवा असच दुसरीकडे आले, की लगेच बसतील, इतका थकवा, तरुण माणसेसुद्धा. सतत विचार, विचार आणि विचार हे सर्व आज्ञेमुळे, सारखा ख्रिस्त विरोधी विचारांमुळे आणि तसल्याच कामामुळे आता काय करायचं, उद्या काय करायचे हेच विचार. आपण तरीही आशा करू या, की या प्रकारचा धर्म नाहीसा होईल; असले सर्व धर्मच नष्ट होतील. आता फारच झाले आणि हा शेवट व्हायला हवा. त्यांचा काही आधार नाही आणि तुम्ही त्यांना सावरू शकत नाही. त्यांच्यामध्ये अधर्म इतका पसरलेला आहे, की तुम्हाला ते सहन होणार नाही. इस्लाम, हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन इ . सर्व २० पंथांचा शेवट व्हायला हवा. ख्रिस्तांचा कुठला धर्म होता? तुमचा सहजयोग हा एकच धर्म आहे. विश्वाचाही तोच धर्म आहे. तो पवित्र आहे आणि जन्मत:च तो तुमच्यामध्ये आहे. तुम्ही दुसर्या कुठल्या धर्माचे अनुयायी नाही कारण तसा कोणताच दुसरा धर्म नाही. म्हणून मला आशा आहे, की सन २००० पर्यंत पृथ्वीवरचे सर्व धर्म लयास जातील कारण ते सर्वजण काही कारण नसतांना एकमेकांशी भांडत आहेत, एकमेकांना फुकट ठार मारीत आहेत. त्यांना तेच आवडते. कुराणला का दोष द्यायचा, बायबलला का नावे ठेवायची? काळ कठीण आला असं का म्हणायचे? त्यांना आपल्या धर्माचा देशच पाहिजे. स्वत:ची वेगळी जात पाळायची आहे; एकदा तुम्ही विभक्त होण्याची प्रक्रिया केली की तुम्ही ख्रिस्त विरोधी बनता. सहजयोगात तुम्हा सर्वांची एकच ओळख आहे. दुसरी कुठली कल्पनाच माझ्या डोक्यात नव्हती व नाही. आपण सर्वजण एकाच बापाचे पुत्र आहोत. एकाच आईची लेकरे आहोत. वेगवेगळे तट पाडण्याची आपल्याला काय जरूर? पण आतासुद्धा मी पहाते, की निरनिराळे ग्रुप पटकन जमतात. उदा.महाराष्ट्रियन लोक एकत्र बसणार. भारतीयांची ती सवयच आहे, त्यांचा स्वभावच तसा आहे. उत्तर हिंदुस्थान्यांची पण तीच तऱ्हा. तुम्ही इंदोरला आलंच पाहिजे हे का? तो भारताचाच भाग आहे ना ? त्यांना दिल्लीला येणं जमणार नाही;B पण मीच सगळीकडे सगळ्या खेड्यात जायला हवे! असं का? आज तुम्ही दिल्लीत जन्माला आला, उद्या आणखी कुठल्या भयानक गावी जन्माला आलात तर? तसंच या ठिकाणी माझे घर आहे ही अशीच एक डोकंदुखी. तुम्ही माझ्या- माझ्या ठिकाणी यायला पाहिजे. हे एकदा सुरू केलेत, की मग तुमचं संपले. तुम्ही मग ख्रिस्तांचे कोणी लागत नाही. आज तुम्हाला अशी सवय झाली आहे, की तुमच्या आजूबाजूला तुमचेच देशबांधव दिसायला हवे. तुम्ही नुसते शेजारी जे बसले आहेत त्यांच्याकडे पहा ते कोणी परके आहेत का? सहजयोगात 'दसरा' असा कोणी आहे का ? आपण सारे 'एक' आहोत आणि तुम्हाला माझ्याबद्दल व ख्रिस्तांबद्दल प्रेम असेल तर तुम्ही ही एकतेची भावना बाळगलीच पाहिजे. ग्रुप बनवण्याचे सर्व धंदे आता संपले पाहिजेत. सहजयोगामध्ये आपण सर्व एक आहोत. एकच ओळख असणारे, एकच शरीर असलेले , एकाच संस्थेचे; आपण एकमेकांपासून वेगळे आहोत असं म्हणूच शकत नाही. हा हात शरीरापेक्षा वेगळा आहे का? त्याला वेगळे अस्तित्व आहे का ? एकदा का तुम्ही वेगळेपणाची भावना सोडून दिली म्हणजे किती आनंद मिळतो याचे तुम्हालाच आश्चर्य वाटू लागेल. पण जर तुम्ही मी-मी-माझे यातच गुंतून राहिलात तर मग सहजयोगातही आनंद मिळणार नाही; दुसर्याच्या सहवासाचाही तुम्ही आनंद मिळवू शकणार नाही. मी काही फक्त एक देशाची नाही. पुष्कळ मुले व मुली सांगतात, की आम्हाला भारतीयांशीच लग्न करायचे आहे. आता एका ३५ वर्षाच्या भारतीय मुलीला मी भारतीयच नवरा कुठून आणणार? मग विधुरच मिळणार किंवा भारतीय पद्धतीचाच विवाह हवा! काय म्हणणार याला? अशा लोकांचे लग्न जमवणे अशक्य आहे. हं, तुम्हाला थोडी निवड करावीशी वाटेल तर ठीक आहे. तसं करा. पण जोपर्यंत माझा प्रश्न आहे तोपर्यंत मी तुमच्या लग्नाला मान्यता देणार नाही. तुम्हाला मुलींनी भारतीय मुलांशी लग्न केले आहे, पण त्यांना काय त्रास भोगावा लागला मी सांगू शकणार नाही. सहजयोगात यापुढे ते होणार नाही. एका हिंदुस्थानीचे दुसर्या हिंदुस्थानीशी लग्न सहजयोगामध्ये अजून जमलेले नाही. ते शक्य नाही; परमेश्वराची तशी इच्छा नाही, तुम्ही तुमच्या जातीमध्येच असा संबंध का नाही शोधून काढत? भारतामध्ये तर त्याला खूप महत्त्व दिले जाते. माझ्या मुलीचे लग्न जमवताना ते म्हणायचे नको, 'हा श्रीवास्तव नाही' आणि जरी श्रीवास्तव असला तरी म्हणायचे, 'तो तुमच्या सारखा श्रीवास्तव नाही.' मी म्हटले, 'फार झाले. ' आमच्या घरी माझ्याहून वयस्कर असे बरेच नातेवाईक होते. म्हणून मी स्पष्ट सांगितले की, श्रीवास्तव असो वा नसो, मी त्यांचे लग्न जमवणार बास. माझ्या पतीलाही ते पटले. माझ्या नातींच्या वेळीही हीच तऱ्हा. श्रीवास्तव मिळाला तर छानच. नाही मिळाला तर नाही. महाराष्ट्रातही हाच प्रकार; त्यांच्यातले ख्रिश्चन झालेल्यांचीही हीच तऱ्हा. तुमचा विश्वास बसणार नाही. आता तर त्यांच्यातले काही लोक स्वत:ला 'दलित ख्रिश्चन' म्हणवतात. म्हणजे खालच्या जातीतले पण धर्मांतर केलेले म्हणजे ही आणखी एक नवीन जात. एकदा ख्रिश्चन झाल्यावर जात कुठली? सर्वच ख्रिश्चन3B पण नाही, दलित ख्रिश्चन वेगळे, वरच्या वर्गातले खरिश्चन वेगळे%3B त्यांच्यामध्ये एकमेकांत विवाह संबंध चालणार नाही. एरवी सर्व ख्रिश्चन, ख्रिस्तांचे अनुयायी, चांगले कपडे करून नियमित चर्चला जाणारे, स्वत:जवळ नसला तरी इंग्रजांप्रमाणे हवाच म्हणून दुसऱ्याचा सूट उसना आणून चर्चला जायलाच पाहिजे. भारतातील ख्िश्चन लोकांप्रमाणे ख्रिस्तांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तुमचा विश्वास बसत नाही ना ? पण सूट-टाय घातल्याशिवाय तुम्हाला चर्चमध्ये जाता येणार नाही. धोतर नेसून चर्चमध्ये जाणाऱ्या माणसाची तुम्ही कल्पना करू शकता का ? शक्य नाही. मी ख्रिश्चनाबरोबर लग्न केले नाही ही देवाची कृपा. माझ्या बहिणींनाही विवाहाचे वेळी साडीच्याऐवजी झगा घालावा सुरू कुणाला जिथे योग्य जोडीदार मिळेल त्याच्याशीच लग्नर करायची तुमची तयारी पाहिजे. पुष्कळ भारतीय २१ लागला. भारतीय स्त्री साडीशिवाय लग्नासाठी दूसरं काही वापरणे शक्य नाही पण त्यांना जबरदस्तीने फ्रॉक घालावा लागला. पुष्कळांना इंग्लिश पद्धतीनेच लग्न करणे भाग पडले. आता तर, मला आश्चर्य वाटते, की जपानी महिलाही ऑस्ट्रेलियात आल्यावर इंग्लिश वधूसारखा पोशाख करतात कारण ते ख्रिश्चन झालेले असतात. याच्यावरून असे दिसते, की त्यांच्या मताप्रमाणे ख्रिस्त इंग्लंडमध्ये जन्माला आला होता. खरं तर ख्रिश्चन लोकांनी पोशाखाबद्दल इतके काटेकोर असायची जरूर नाही. या सगळ्या मूर्खपणाच्या कल्पना. तुमचा ड्रेस असाच हवा, जेवतांना काटा इकडे, चमचा तिकडे इ.गोष्टी पाश्चात्त्य देशातून आल्या. ख्रिस्त काय काटा-चमचा घेऊन जेवत होते ? त्यांचा जन्मच मुळी गोठ्यात झाला. या लोकांच्या ड्रेस-काटे-चमचे इ. चा बाऊ पाहन हे ख्रिश्चन आहेत का याच्यावर विश्वास ठेवणे जड जाते; वर तुमच्याकडे जेवायला आले तर आधी प्लेट उलटी करून कुठल्या कंपनीची आहे हे पाहतील! त्यालाच महत्त्व. ते स्वत:ला ख्रिश्चन म्हणवतात हाच मुळी मूर्खपणा नव्हे काय? ख्रिस्तांनी तबेल्यात जन्म घेतला आणि या लोकांना या मूर्खपणाच्या गोष्टींबद्दल काटेकोरपणा! ख्रिस्तांच्या जन्मामध्येच काय महानता आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. गाई-वासरे बांधून ठेवली आहेत अशा गोठ्यामध्ये ते जन्मले. तुम्हाला ख्रिश्चन माणूस ओळखायचा असेल तर रविवारच्या सकाळी त्याला पहा. माझ्या वडिलांचा याला फार विरोध होता, ते वापरायचे. ख्रिस्तांनीही कुडताच वापरला, सूट घातला नव्हता. भारतीय लोकांना आचाराची कृत्रिम सभ्यता बाळगण्याची वृत्ती मुळातच असते. त्यांच्याजवळ असती तर मे महिन्याच्या या गरम हवेत त्यांनी सूट का घालावा? आपण सहजयोगी आहोत. सामान्य माणसांसारखे सामान्य कपडे आपण वापरायला हवे. या परम चैतन्याशिवाय कुणावर तुम्हाला छाप पाडायची आहे? ते लोक वरवरचं बघतात. ड्रेससारख्या बाबतीत कमालीची शिस्त, राहण्याच्या सवयींबद्दल पण तेच, फार विचित्र प्रकार सगळा. मी हे सर्व पाहिलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला बजावून ठेवत आहे, ख्रिस्त-विरोधी असलेल्या संस्कृतीपासून दूर रहा. प्रत्येक बाबतीत त्यांनी ख्रिस्तांचा उघड-उघड अपमान केला आहे. तुम्ही सुद्धा आपल्या जीवनशैलीतून ख्रिस्तांचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ख्रिस्तांचा संदेश आहे, की तुम्ही तुमच्यातील दैवी प्रवृत्ती सक्षम बनवा आणि चारित्र्य बलशाली बनवा ज्यायोगे सहजयोग उठून दिसेल ते तुमचे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यांच्या जीवनाचे अनुकरण करा. त्यांना कशाचीही नोकरी, धंदा , घर कसली चिंता वा भीती नव्हती. सगळ्यांमध्ये ते निर्भय होते. त्यांच्या आयुष्यामध्ये त्याची खूप सुंदर उदाहरणे आहेत. पण आपण जेव्हा ख्रिश्चन लोक पाहतो आणि त्यांच्यामध्ये ख्रिस्तांचे कोणते गुण प्रतिबिंबित झाले आहेत हे पहायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला समजते. त्यांनी ख्रिस्तांची कोणतीही अनुज्ञा पाळली नाही; कसलेही केले नाही. आपण सहजयोगी म्हणून आपली वेगळी संस्कृती आहे. आपण नीतीमत्तेचा आदर ठेवतो. आपले व्यक्तिमत्व भारदस्त आहे. आपले एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे. आपण निर्भय आहोत, आपण खोटे बोलत नाही व दुसऱ्यांना लुबाडत नाही आणि आपल्याला कुणी भुरळ पाडू शकत नाही. आपली संस्कृती 'आईची संस्कृती' असायला हवी. त्यामध्ये दिखाऊपणा किंवा कृत्रिमतेचा हव्यास नाही. तुम्ही एकदा ही 'आईची संस्कृती' अंगी बाणवली की सारे जीवनच बदलेल. तुमचे विचार तुमच्या कल्पना बदलतील. मी तुमच्याकडे काही मागत नाही, या भेटवस्तूंचा स्वीकार करण्याची तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करता, तुमच्या समाधानासाठी मी तेही मानते. या ख्रिस्तपूजेच्या दिवशी एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण ख्रिस्तांना काय दिले याचा विचार करा. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपण माताजींना काय दिले याचाही विचार करा. हे फार महत्त्वाचे आहे. मला तुमच्याकडून नको. अजिबात नको. मी स्वत:शी पूर्ण समाधानी आहे. मला एवढंच पाहिजे, की तुम्ही सहजयोगाला, सत्य व प्रेमाला पूर्णपणे वाहून घ्या; ख्रिस्तांनी म्हटल्याप्रमाणे कुजबुजणारे जीव बनू नका; इकडच्या तिकडच्या गप्पा मारलेलं मला आवडत नाही, ते चांगले नाही अणि ते बंद झाले पाहिजे. नाही तर तुम्ही खाली घसराल आणि तेसुद्धा अगदी भयंकर प्रकारे; ही आणीबाणीची वेळ आहे म्हणून तुम्ही स्वर्गाला तरी जाल नाही तर नरकाला. ही प्रक्रिया चालू झालीच आहे. म्हणून तुम्ही कुठे आहात ते पहा. मी तुमची आई म्हणून तुम्हाला सुधारण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगते, की ही आणीबाणी आहे विसरू नका आणि म्हणून ख्रिस्तांच्या विरोधातले कार्य सोडून द्या. आपलं कुठे काय चुकत आहे ते तुम्हीच तुमच्या आतमध्ये शोधून काढा आणि त्याच्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे सहजयोगाला समर्पित व्हा;B त्याच्यातून पैसे मिळवायच्या मागे मात्र लागू नका, तसच सहजयोगामध्ये राजकारण करू नका; सहजयोगाचा महान वृक्ष कसा बनेल ते बघा. तुमच्यामध्ये ती शक्ती आहे म्हणून ते घटित व्हायलाच पाहिजे व होणार आहे. म्हणूनच आज तुम्ही इथे आहात. तुम्हा सर्वांना परमेश्वराचे अनंत आशीर्वाद ! कुंडता अनुकरण काहीही २२ NEW RELEASES Title ACD | ACS Date Place Lang. VCD DVD सार्वजनिक प्रवचन 12" Apr.1995 th 318 Kolkata Н 12-14" Mar.2010 th 319* Shiv Puja - Part I & II Cabella th Virat Viratangana Puja Los Angeles 320 10" Oct.1993 72 E 16 Aspects of Shri Krishna 481 E 3rd Sep.1973 242* आत्मसाक्षात्कार का अर्थ Mumbai 242 Н सार्वजनिक प्रवचन 9th Dec.1973 480° Н 321* st Shri Virat Puja 21* Nov.2010 Noida P ০০০০০০ ८ प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन: ०२० २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in ३ ५ ১৪ ১ ३ ১৭ नववर्ष दिनी आपल्याली शपथ घ्यायची आहे, की आती आपण सहजयोगाली नवीन, विशाल तसेच ১ अधिक वेगवान पद्धतीने प्रारंभ करकू या! नव वर्ष पूजा, केळवे, ३१.१२.२००० का की त। वह सं ं ---------------------- 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-0.txt चैतन्य लहरी ा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मराठी ५ु का ू० र] ०] रे ० 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-1.txt ा द्ध आपल्याला संपूर्ण विश्वाला विनाशापासून वाचवायचे आहे आणि यासाठी माझी असा विचार आहे, की संपर्ण जनसंख्येच्या कमीत कमी ४०% लोक आत्मसाक्षात्कारी होणे आवश्यक आहे. मग ते कोणत्याही देशाचे असोत, त्यांची शैक्षणिक पातळी कोणतीही असो, सर्वांना आत्मसाक्षात्कर द्यायला पाहिजे. सहसार पूजा, ईंटेली, ६.५.२००१ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-2.txt .. या अकात. may the auspicious उदे ग अंबे उदे ...४ oCcasion of Diwali breeze into your life laughter, love and contentment. 30 खरिसमस पूजा ... २६ दिवासव happy diwali ρυστωαl DEEPOTSAV 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-3.txt ा ॐ ए छ ....महालक्ष्मीने आपल्यामध्ये संतुलन स्थापित करून कुंडलिनीच्या उत्थानासाठी योग्य मार्ग करून ठेवला आहे. डावी आणि उजवी बाजू संतुलनात आल्यावर या शक्तीकडूनच मधली नाडी कुंडलिनीवर तन्हेने मोकळी केली जाते. हा प्रेम व करूणेचा मार्ग आहे. येईल अशा ० 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-4.txt का े का हि उदै ग अंबे उद्दै पोर्तुगाल, नोव्हेंबर १९९६, अनुवादित या शक्तीचे आणखी एक कार्य म्हणजे ती कुंडलिनीला सर्व चक्रांवर जाण्यास मदत करते आणि सर्व चक्रांची स्थिती सुधारते. या कार्यासाठी कमी जास्त शक्ती वापरून कुंडलिनीला जिथे जरूरी असेल त्या चक्रावर ती पोहचवते कारण कुठल्या चक्राला कुंडलिनीच्या मदतीची जरूर आहे हे ती बरोबर जाणते. 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-5.txt आज आपण श्री महालक्ष्मीची पूजा करणार आहोत. या देशामध्ये महालक्ष्मीला भक्तिभावाने मानले जाते. इथे तिला मारिया म्हणून पूजतात, इथे स्वयंभू मारिया पण आहे. यावर माझा आधी विश्वास बसला नव्हता; पण आता इथल्या चैतन्य लहरी पाहिल्यावर मला ती त्या स्वरूपात खरोखर आल्याचे समजले. एका फोटोमध्ये ती माझ्याबरोबर असल्याचेही तुम्हाला माहीत आहे. याच तत्त्वाला अनुसरून तुम्ही आज या स्थितीला आलेले आहात. तुमच्या उत्थानासाठीच असलेला मध्यमार्ग हा कुंडलिनीच्या महालक्ष्मी शक्तीतूनच निर्माण झाला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात 'उदे ग अंबे उदे' हा जोगवा अजूनही म्हणतात. मी त्या लोकांना विचारले की, 'तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात अंबेचे भजन कसं म्हणता ?' तर ते म्हणाले, 'का म्हणतात हे आम्हाला ठाऊक नाही, पण ते चूक आहे कां?' मग मी म्हणाले, 'तुमचं काही चुकले नाही कारण महालक्ष्मीच्या मार्गामधूनच कुंडलिनी वर येत असते आणि कुंडलिनी ही अंबाच आहे.' मग त्यांना हे समजले आणि ते आश्चर्यचकित झाले. अनेक शतकांपासून हे गाणे त्या मंदिरात म्हटले जायचे पण तोपर्यंत तेच गाणे कां म्हणत हे त्यांना कोणी सांगितले नव्हते. आतां ही महालक्ष्मी शक्ती आपल्यासाठी काय करते ते समजून घेऊ या. महालक्ष्मीने आपल्यामध्ये संतुलन स्थापित करून कुंडलिनीच्या उत्थानासाठी योग्य मार्ग करून ठेवला आहे. डावी आणि उजवी बाजू संतुलनात आल्यावर या शक्तीकडूनच मधली नाडी कुंडलिनीवर येईल अशा त्हेने मोकळी केली जाते. हा प्रेम व करुणेचा मार्ग आहे. प्रेम व करुणा या गुणांनी युक्त असल्यामुळे ही शक्ती मधला मार्ग कुंडलिनीवर येऊ शकेल इतका मोठा बनवते. म्हणूनच साधक सत्य शोधायला सुरुवात करतो व ती सुरुवात झाल्यावर महालक्ष्मी तत्त्व जागृत होते. कधी हे त्त्व प्रखरतेने कार्य करायला लागल्यास साधक चुकीच्या व भलत्या मार्गांनी वाटचाल करू लागतो. जे लोक अशा तऱ्हेने साधनेमधेच हरवून बसले त्यांचे मला वाईट वाटते पण योग्य मार्गाला लागून उत्थानाकडे प्रगत झालेले अनेक लोकही आहेत. या शक्तीचे आणखी एक कार्य म्हणजे ती कुंडलिनीला सर्व चक्रांवर जाण्यास मदत करते आणि सर्व चक्रांची स्थिती सुधारते. या कार्यासाठी कमी जास्त शक्ती वापरून कुंडलिनीला जिथे जरूरी असेल त्या चक्रावर ती पोहचवते कारण कुठल्या चक्राला कुंडलिनीच्या मदतीची जरूर आहे हे ती बरोबर जाणते. म्हणून कुंडलिनी जागृत झाल्यावर ती कुठे कुठे चालली आहे. हे तिच्या स्पंदनांवरून तुम्ही ओळखू शकता आणि मग कुठे कार्य करण्याची जरूरी आहे हे तुम्ही समजू शकता. हे सर्व कार्य तुम्हाला अंतिम सत्य सापडावे या प्रेमाच्या व करुणेच्या भावनेतून ती करत असते. आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत, सहजयोगातही उन्नतीच्या मार्गावर चालतानाही काही लोक आपली पूर्वीची गाठोडी जवळ बाळगून राहतात मग ते वर येता येता खाली घसरतात, पुन्हा प्रयत्न करून वर आले तरी पडतात. आज मी तुम्ही लोकांनी कुठली स्थिती मिळवायची आहे हे तुम्हाला समजावून सांगणार आहे. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये दुसर्या अध्यायात 'स्थितप्रज्ञ' असं वर्णन त्याचे केले आहे. ही स्थिती समजायला जरा अवघड आहे. तुमच्या आईइतके ते सरळ दिसत नाही. म्हणून लोकांना ते समजत नाही आणि मग ते ही स्थितप्रज्ञता कशी मिळवायची असे विचारतात. संत ज्ञानेश्वरांनी याच स्थितीला 'सहज-स्थिती' असं नांव दिले आहे. स्थितप्रज्ञ या शब्दाऐवजी सहज स्थिती हा सोपा शब्द त्यांनी वापरला आणि त्याचे सुंदर व सूक्ष्म स्पष्टीकरण त्यांनी दिले. अर्थात ज्ञानेश्वरही फार थोड्या लोकांना समजले. त्या स्थितीला पोहोचलेला मनुष्य आरशासारखा असतो. आरशांत खूप चेहरे प्रतिबिंबित होतात, पुष्कळ वेळा आपण आरशांत पाहतो, त्याच्यासमोर आपण नटतो, पोशाख करतो पण आरसा आहे तसाच राहतो. त्याचप्रमाणे जो स्थितप्रज्ञ असतो, सहजी असतो त्याला आपल्यासमोर कोण आहे, आपल्याकडे कोण बघत आहे याची पर्वा नसते. तो स्वत:मध्ये मग्न असतो. स्वत:शीच समाधानी असतो. सूर्य जसा आपले किरण चहूबाजूंकडे पसरवून सूर्यच राहतो, सगळे किरण त्याच्यामध्येच परततात तसे त्याचे असते. त्याप्रमाणे इंद्रिये जरी त्यांचे काम अखंडपणे करत राहिली तरी सहजस्थिती मिळवलेल्या माणसाला त्याचे काही वाटत नाही कारण तो त्याच्यामध्ये अडकलेला नसतो. इंद्रिये आपले काम करत राहतात पण त्याच्या स्थितीमध्ये त्याचा काही परिणाम होत नाही आणि इंद्रिये काम झाले की शांत होतात. ही स्थिती तुम्हा सर्वांना मिळवायची आहे आणि मगच तुम्ही खऱ्या अर्थाने सहजयोगी होणार आहात. पण सहजयोग्यांमध्ये मी अजून पाहते, की काही जण सहजयोगातून पैसा मिळवण्याच्या मागे लागतात. काही लीडरबद्दल तक्रारी करत राहतात. काही हेवा-मत्सर इ.मध्ये अडकतात. म्हणून मी नेहमी म्हणत असते, की ध्यान करा कारण ध्यानामधूनच तुमच्या प्रगतीच्या आड येणारे हे दोष व सवयी दूर होणार आहेत. तुम्ही ६ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-6.txt 'स्व' ला एकदा ओळखलं की या सर्व गोष्टी संपून जातात आणि तुम्ही स्वत:बरोबरच समाधानी होता. मग तुमच्या तुम्हाला कंटाळा येत नाही. तुम्ही बोअर होत नाही. मला तर बोअर होणे म्हणजे काय हेच समजत नाही; मी कधीच बोअर होत नाही. तुम्ही जर कुठल्याही गोष्टीमध्ये अडकलेले नसाल तर बोअर होण्याचा प्रश्नच कुठे येतो ? दुसरी गोष्ट म्हणजे हाव, लालसा इ. वृत्तीच्या पलीकडे तुम्ही जाता. जे हावरे असतात ते सतत पैसा कशामधून मिळेल याचाच विचार करत राहतात. पैशाचाच लोभ असलेले लोक अजूनही त्याच गोष्टींच्या मागे लागलेले असतात. सतत पैशाचाच विचार. सहजस्थितीमध्ये तुम्ही फक्त बघत राहता. साक्षी बनता. आपल्या उन्नतीच्या आड येणाऱ्या कुठल्याही गोष्टींमध्ये तुमचे मन अडकत नाही. तुम्ही आता मनाच्या पलीकडे गेलेले असल्यामुळे तुम्हाला ही स्थिती मिळवणं अवघड नाही. या सर्व फालतू गोष्टी मनाकडूनच चाललेल्या असतात. मन ही केवळ एक कल्पना आहे असं मी नेहमीच म्हणत असते आणि तुम्ही ते जाणलं पाहिजे. हे काल्पनिक मनच तुमच्या डोक्यात विचार-कल्पना भरवते; म्हणजे पुष्कळजण माझ्याशी बोलताना म्हणतात 'होय माताजी, पण....' आणि हा 'पण' ही तुमच्या मनातलाच! आपला मेंद हे वास्तव आहे पण मन नाही. मन 'पण... पण' म्हणणारे मन बरेच वेळा नैराश्य निर्माण करते. उदास बनवते. आपण फार सज्जन आहोत, फार थोड्याच लोकांनी सहजयोग घेतला अशा विचारांनीही कष्टी होणारे लोक असतात. खरं तर काही हरकत नाही असं समजून नुसते साक्षीपणाने पहात रहा आणि या साक्षी होण्यालाच सहजस्थिती म्हणतात. त्या स्थितीमध्ये तुम्ही सूक्ष्म बनता. आत्मा बनता. अर्थातच या सूक्ष्मावस्थेमध्ये तुम्हाला कशाचा त्रास होत नाही. कशामुळेही तुमची शांतता बिघडत नाही. आता निसर्गाकडे पहा ;B ९२ मूळ धातू आहेत पण त्यातला एकही बदलत नाही. उदा.तुम्ही चांदीला सोने किंवा सोन्याची चांदी बनवू शकत नाही. अणूंनाही स्वत:ची विशिष्ट रचना असते. गुणधर्म असतात. तसेच परमाणूमध्येही त्यांची विशिष्ट रचना असते जी तुम्ही बदलू शकत नाही. तसा बदल करायचा प्रयत्न केलाच तर बाँबगोळे बनणार, प्रलयकारक अणुबाँब. पण मानवाचे तसे नाही, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. परिवर्तन घडू शकते. तुमचंच पहा, तुम्ही आधी मानव होता, पण आता संत झाले आहात. आत्मा झालात. हे फार महान वरदान तुम्हाला मिळालेले आहे, पण तुम्ही अगुरूकडे गेलात आणि तो तुमच्यावर भलते -सलते प्रयोग करू लागला तर तुमचा भडका उडेल. मी असे लोक पाहिले आहेत. त्यांना अजून फीटस् येतात. त्रास होतात. इतर लोकांपेक्षा कितीतरी जास्त त्रास, पण ते सुद्धा आता सुधारले आहेत. म्हणून तुम्ही हे नीट लक्षात घ्या, की एका बाजूने तुम्ही पृथक्करण करून अणू-परमाणूचे विभाजन करू लागता तेव्हा अॅटम बाँब बनून स्फोट होतो, पण दुसऱ्या बाजूने तुम्ही जोडण्याची क्रिया करायला लागता तेव्हा तुम्ही काही निर्मिती करता. वर म्हटले ते ह्या जोडण्याच्या कार्यामधून जमले. प्लास्टिकसुद्धा अशाच जोडण्याच्या क्रियेमधून तयार झाले. जड पदार्थ जोडता येऊन एकत्र आणता येतात. माणसांनासुद्धा असे एकत्र आणून परिवर्तित करायला हवे. त्यांच्या बाबतीत हे जास्त सफल होऊ शकेल कारण मानव बदलू शकतो, त्याच्यामध्ये परिवर्तन घडू शकते. आता सोन्याचं बघा, त्याच्यापासून दागिने किंवा इतर काहीही बनवा, सोने ते सोनेच राहणार. दागिने बनवले म्हणून त्याचे सोनेपण संपले असे होत नाही. पण माणसांचे तसे नाही. एकत्र जोडले गेल्यावर त्यांच्यात पूर्ण परिवर्तन घडून आले. जडद्रव्य, निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये मोठा फरक आहे. निसर्ग व जडद्रव्य हे मानवापेक्षा अत्यंत वेगळ्या, भिन्न धर्माचे आहेत. मानवामध्ये परिवर्तन घडून येणे ही जिवंत क्रिया आहे. ते त्यानंतर सुंदर फुलांसारखे बनतात. पण निसर्गापेक्षा ते वेगळेच असतात. कारण निसर्गाला स्वत:चे मन नसल्यामुळे तो पूर्णपणे परमेश्वराच्या अधीन असतो; त्याची जडण-घडणच तशी आहे. पण इथे तुम्ही तसे नाही कारण तुम्ही स्वत:च्याच नियंत्रणाखाली अजूनही आहांत. तुम्ही स्वत:वर ताबा ठेऊ शकता. तुमच्यामध्ये हे परिवर्तन घडून आले असले तरी तुमचे तुमच्यावर नियंत्रण आहे. हे तुम्ही जाणू शकता, तुमच्यामध्ये काय बदल होत आहे हे तुम्ही अनुभवांतून जाणू शकता. तुम्ही आता स्वत:ला इतर सगळ्या मोहपाशांपासून अलिप्त वेगळे झालेले ओळखू शकता. कोणी माझ्याकडे येऊन म्हणतो, 'माताजी, माझा अहंकार फार वाईट आहे, तो दूर करा.' म्हणजे त्याचा त्रास त्याला समजलेला असतो किंवा दुसरं कोणी म्हणतो, 'माताजी, माझी नाभी अजून ठीक झाली नाही, मी अजून पैशाचीच काळजी करत आहे.' म्हणजे त्याला तो स्वत:चा दोष दिसून येतो. अशा त्हेने स्वत:बद्दलचे ज्ञान होण्यास सुरुवात होते, याला आपण आत्मज्ञान म्हणतो. पण तुम्हाला त्याच्याही पलीकडे जायचे आहे. हे ज्ञान मिळवल्यावर तुम्हाला काय मिळते? आपण ते पाहू या.. हे ज्ञान झाल्यावर आपल्या तरी ७ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-7.txt लक्षात येते, की आजपर्यंत आपण अज्ञानात होतो. अंधारात होतो; आतां प्रकाश आला आहे; आता आपण पाहू शकतो. कुठे काय चुकत आहे ते ओळखू शकतो;B आपल्यामधील सर्व आजपर्यंतच्या समजुती, सवयी इ .सर्व चुकीच्या गोष्टी आहेत हे समजल्यावर आपण त्यांच्यापासून वेगळे, अलिप्त व्हायला लागतो. हेवा, मत्सर, लोभ, हाव अशा कितीतरी वाईट गोष्टी आपल्यामध्ये घर करून राहिल्यासारखे वावरत असतात! खरं तर या दिवाळीच्या दिवशी या वाईट गोष्टीचे नांव घेणेच द्र्दैव म्हणावे लागते. दिवाळी म्हणजे एकामागून एक असे कितीतरी दिवे प्रज्ज्वलित केले जातात आणि त्या प्रकाशात तुम्ही स्वच्छ पाहू शकता. प्रथम स्वत:मधील चुकीच्या गोष्टी तुमच्या नजरेस येतात; नंतर त्या नकोशा वाटू लागल्याने तुम्ही त्या दर करू लागता आणि स्वत:ला स्वच्छ करता. मग हे ज्ञान ही लयाला जाते आणि फक्त तुम्ही उरता. स्वत:च्या चक्रांबद्दलही जाणण्याची जरूरी राहत नाही. फक्त तुम्हीच असता. त्या स्थितीमध्ये कशानेही फरक पडत नाही. तुम्ही दगडासारखे निश्चल बनता पण त्या दगडातही मेंद, हृदय, यकृत सर्व शाबूत राहते. तुम्हाला कशाचाही त्रास होत नाही. कशानेही तुमची शांती बिघडत नाही. उलट प्रेम आणि करुणेच्या सागरांत तुम्ही आनंद उपभोगता, त्यांच्यावर येणार्या लहरी पण हळूहळू थंडावतात आणि शेवटी तुम्ही 'सहज' बनता. पूर्वी लोकांनी ही स्थिती प्राप्त करून घेतली होती, पण वाईट एवढंच झाले, की ते त्या स्थितीमध्ये हरवून गेले, असे सर्व लोक शून्य झाले%; दुसर्यांना ते काही देऊ शकले नाहीत. एका माणसाने ते मिळवले. धन्य झाला आणि मग सर्व खलास किंवा आणखी एका दोघांना, बस, पण आता सहजयोगामध्ये तुम्ही ज्ञानावस्थेत आला आहांत म्हणून प्रथम 'स्व' बद्दलचे पूर्ण ज्ञान मिळवा, अगदी पूर्णज्ञान मिळवा. नंतरच्या स्थितीमध्ये, म्हणजे स्वत:बद्दल पूर्ण ज्ञान झाल्यावर स्वत:मधील सर्व दोष, फालतू कल्पना व आचरण, ज्या गोष्टी तुमच्या उन्नतीच्या आड येत आहेत आणि जे चूक आहे आणि तुम्हाला समजले आहे त्या सर्व गोष्टी टाकून द्या. जसं माझ्या साडीवर काही घाण पडलेली कळली, की मी लगेच ती झटकून टाकते. मग तुम्ही पुढच्या सहज स्थितीला येण्यासाठी सिद्ध होता. सहजयोगामध्ये तुम्ही आणखी एक गोष्ट मिळवता आणि ती म्हणजे सामूहिक चेतना. हाच खरा आधुनिक सहजयोग आहे. पूर्वी लोकांना हे माहीत नव्हते म्हणून ते सर्व जण हरवले गेले. आता तुम्हाला सामूहिक चेतनेची जाणीव झाली आहे आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना जाणू शकता, त्यांच्याबद्दल तुमच्यामध्ये करुणा जागृत होते आणि त्यांच्यासाठी कार्य करू लागता. कधी कधी त्यामध्येही काही लोक मला यातून काय मिळणार, पैसा मिळेल का, लीडर म्हणून मला काही मिळवता येईल का असे विचार करणारे लोक असतील, पण ही सामूहिक चेतना विकसित होत राहते, व्यापक होते आणि मग तुम्ही त्या समुद्रातला एक थेंब म्हणून असता. म्हणजेच समुद्रच बनून जाता. या समुद्रालाही मर्यादा असतातच, पण त्याला त्याची पर्वा नसते. कारण त्या मर्यादांमध्ये राहणे हेच त्याचे जीवन असते: त्या मर्यादा सोडून पलीकडे जायची त्याला इच्छाच नसते. अगदी तसेच तुमचे होते. तुम्ही 'स्व' मध्ये परिपूर्ण होता ; स्वार्थी नसताच पण स्वत:मध्ये समाधानी, स्वावलंबी होता. मला माहीत आहे, की बरेच सहजयोगी, मी म १८ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-8.txt सहजयोगातील त्रासदायक योग्यांनाही काही शिक्षा करत नाही. म्हणून नाराज असतात. पण मला असल्या गोष्टीची काळजी नसते. हे परम चैतन्य, जे सर्व काही कार्यान्वित करत असते. त्याची काळजी घेईल. मी स्वत:कडून कशाला कोणाकडे बघू? सर्व काही घटित होत आहे. तुम्ही ते पाहतच आहात. मग कोणी कशाला त्यामध्ये लुडबूड करायची? सर्व काही बघत राहणे एवढचं माझे काम आहे. तेच पुरेसे आहे. या जन्मामध्ये कोणाला ठार मारायचे किंवा कोणाला नष्ट करायचे हे मला करण्याची जरूरी नाही. ते स्वत:हुनच स्वत:चा नाश करून घेणार आहेत. मी सांगितलेच आहे, की मला लोकांना उघडे पाडायची जरूर नाही, पण मी ज्या ज्या देशांमध्ये जाते तिथे मला दिसते, की लोक उघडे पडत आहेत. आणखी काय चमत्कार होणार आहेत परमेश्वराला माहीत. एखाद्या देशाकडे थोडेसे जरी लक्ष गेले तरी सर्व कार्यान्वित होते; कसे ते मलाच कळत नाही आणि मीच म्हणते 'परमेश्वरा, हे मी कधी केले?' म्हणून आपल्याला परमेश्वरी प्रेमशक्तीचे वाहक बनले पाहिजे. सर्व या परम चैतन्यावर सोपवायचे, जे सर्व कार्य करत असते आणि माझ्यापासून निराळे आहे. मी अगदी एकटी असते. ही शक्तीसुद्धा माझ्यापासून दूर असते, पण तिला मानवांसाठी काय कल्याणप्रद आहे, सहजयोगासाठी काय चांगले आहे हे सर्व समजते आणि त्यानुसार सर्व काही घटित होते. मला त्यांत काही करायची जरूर नाही. तुम्ही कदाचित म्हणाल, 'माताजी, हे तुम्हीच केले आहे.' असू दे. पण खरं तर मी काहीच त्यामध्ये भाग घेत नाही. मला काही सांगायची पण जरूर नाही. ते आपोआप कार्य करायला लागते आणि तेही व्यवस्थित पार पाडते. एक उदाहरण सांगते. इंग्लंडमध्ये खूप वर्षापूर्वी गेले असताना तिथले लोक म्हणाले, 'माताजी, आम्हाला उन्हाळा खुप दिवस चालावा असे वाटते.' असे विचित्र काय मागता असे मी म्हटल्यावर ते पुन्हा पुन्हा म्हणाले, 'असं नाही, पण माताजी, आम्हाला खरंच मोठा उन्हाळ्याचा मोसम हवा आहे.' तीन-चारदा तेच मागणे आणि त्या वर्षी एवढा प्रचंड उन्हाळा झाला, की काही सोय नाही. भारतासारखा नाही, इकडे निदान पंखे तरी असतात; तिकडे तेही नाही. आमच्या घराला लहानशी गॅलरी होती तिथे आम्ही झोपायचे आम्ही दुकानात पंखे विकत घ्यायला गेलो तर ऑर्डर दिल्यानंतर तीन महिन्यांनी मिळतील असे कळले. तीन महिन्यांनी म्हणजे थंडीला सुरुवात होऊन गेलेली असणार. मग 'पंखेच नको' असे आम्ही म्हणालो. माझ्या मुलीने विमानाने दोन पंखे पाठवले म्हणून निभावले. इतका प्रखर उन्हाळा मग काही दिवसांनी झाडांची पाने आधी किरमिजी रंगाची आणि काही दिवसांनी लाल पडू लागली आणि शरद ऋतूला सुरुवात झाली. त्या वर्षी फार सुंदर ऋतू होता. त्यावेळी एका सहजयोग्याला स्वप्न पडले, की माताजींनी त्याला कारमधून त्यांना फिरायला घेऊन जायला सांगितले. मला अगोदर हे माहीत नव्हते, पण मलाच इच्छा झाली म्हणून मी त्याला फोन करून विचारले, की मला खूप दूरपर्यंत हिंडून सगळीकडचे सौंदर्य बघायचे आहे तर मला हिंडवून आणतोस का? तुम्हाला खरं वाटत नाही नां? म्हणजे काही अप्रिय घडले तरी त्यातूनच काहीतरी चांगले घडून येते असं लक्षात घ्या. त्या वर्षी इंग्लंडमध्ये सगळीकडे शरद ऋत् बहरला होता; सगळे लोक रंगीबेरंगी पाना-फुलांचे ते सौंदर्य टिपायला बाहेर पडले होते. हे दृश्य तसे तिकडे दुर्मीळच असते पण खूप ऊन पडल्यामुळे परमचैतन्याने ते घडवून आणले. परम चैतन्य असे सगळीकडे लक्ष ठेवत असते;B सर्व काही सुव्यवस्थित जमवून आणते. मी काहीच करत नाही; मी तर निष्क्रिय आहे. नूसतं बसून मी सगळं काही बघत असते. मला कसलाच प्रश्न पडत नाही. हळूहळू सावकाशपणे सर्व काही रीतसर घडते. तसं तुम्ही उगीचच मला म्हणता, 'माताजी, आम्ही प्रार्थना केली आणि सर्व काही जमून आले. ' तसं असेलही. या लोकांनी माझ्याबद्दल तसं काही ऐकले असेल, प्रत्यक्ष मी बोलले नसेन, पण त्यांनीच कष्ट घेतले आणि त्यांचे कार्य झाले. मी त्या करतां काहीच जबाबदारी घेत नाही. मी जे काही करते असे तुम्हाला वाटते ते मी करत नसून हे परमचैतन्यच करत असते. कारण मी सुद्धां तुमच्यापासून अगदी पूर्णपणे वेगळी आहे. लोक तुम्हाला म्हणतात, की तुम्ही प्रार्थना करा3 तसं तुम्हाला १ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-9.txt तुम्ही करा वाटले तर, पण खरं म्हणजे या देव -देवतांची, गणांची प्रार्थना करा, माझी नाही कारण मी या सर्व गोष्टींपासून अलिप्त आहे. मला कोणी 'हे कर, ते कर' असे सांगत नाही;B मग मी तरी त्यांना तसं काही करायला कां म्हणून सांगायचे ? ही सहजस्थितीच अशी आहे आणि त्या स्थितीमध्ये तुम्ही उतरलात तर तुम्हाला कसली इच्छा होणार नाही, कशाची जरूर वाटणार नाही. मी किती तरी प्रकारची कामे करते, म्हणजे सूर्य प्रकाश देतो म्हणजे काम करतो असं म्हणाल तर ठीक आहे, तसं मी सगळीकडे लक्ष ठेवते. फुलांकडे बघते, तुमच्याकडून भेटवस्तू स्वीकारते पण तरीही काहीच घेत नाही. माझ्याजवळ काहीच नसते. मला त्याबद्दल आकर्षण नसते. तुम्हाला फुले ठेवायची असतील तर मला चालेल पण फुलं असली किंवा नसली तरी व्यक्तिशः मला काहीच फरक पडत नाही. पण तरीही आई म्हणून तुमच्यावर तुम्हां सर्वांवर माझे प्रेम आहे, पण ते प्रेम व्यक्त करण्यासाठी मी प्रत्यक्ष असं काहीच करत नाही आणि तरीही प्रत्येकजण म्हणतो, 'माताजी, तुम्ही आमच्यावर किती प्रेम करता!' मी कधी प्रेम केले? उलट तुम्हीच म्हणत असता, की मी प्रेम करते. तर जे सर्वकाही घडवीत आहे. ते मी नव्हे तर माझ्यापलीकडचे आहे. या स्थितीमध्ये आपण एकदा पोहोचलो की सहज स्थितीला आलो असे आपण म्हणतो. सहज स्थितीमध्ये तुम्हाला वाटते, की तुम्ही काही करत नाही आणि सर्व काही कार्यान्वित होत आहे, पण आता जर मी तुम्हाला काही सांगितले तर लगेच तुम्ही विचार करणार की आपण काहीच करत नसलो तर सहजयोगाचा प्रसार कशाला करायचा? पण अजून तुम्ही त्या स्थितीला आला नाहीत म्हणून असं होते. म्हणून आधी तुम्ही ती स्थिती मिळवली पाहिजे आणि ती तुम्ही आत्म्याचे ज्ञान मिळवल्यानंतरच मिळणार. म्हणजेच साऱ्या जगाचे ज्ञान. पण तुम्हाला त्याच्याही पुढे जायला पाहिजे. आता पुष्कळ वेळा तुम्ही पाहिले असेल, की मी कधी तरी पटकन काही तरी बोलते आणि तसेच तुम्हाला येते. त्यासाठी मी व्हायब्रेशन्स पाहत नाही, कुंडलिनी किंवा चक्रांकडून काही जाणून घेत घडून नाही; पण एखाद्या कॉम्प्युटरसारखे ते आपोआप होते. आता मी काही कॉम्प्युटर पण नाही, तर ह्या स्थितीचे वर्णन करणं अवघड आहे. कारण ती स्थिती मिळाल्यावरच तुम्हाला ते समजणार आहे. एकदा ती स्थिती मिळवली, की तुम्ही फार सूक्ष्मतेमध्ये उतरता जिथे आनंदाशिवाय काहीच करत नाही, पण हा आनंदही तुम्ही उपभोगू शकत नाही. प्रत्येक वस्तूचा आनंद कसा घ्यायचा मला माहीत नाही. आता तुम्ही 'जय श्रीमाताजी' असं म्हणालात तर तुम्ही मला उद्देशून म्हणत आहात हे पण मी विसरते. मी नुसते 'जय माताजी' एवढेच म्हणते, बस. हे किती सोपे आहे बघा. काही न करताही सर्व कार्यान्वित होत असते. अशा स्थितीला आपण पोहोचले पाहिजे. तशा स्थितीला तुम्ही पोहोचला असाल तर ठीक आहे, पण तसे अजून झालेले नाही. कार्य करूनच तुम्ही हे मिळवणार आहांत. प्रथम तुम्ही ज्ञान मिळवायला हवे, पुढे ज्ञानाची जरूर भासणार नाही, ज्ञान करून घेण्याची गरज उरणार नाही पण प्रथम ही सर्व प्रतिक्रिया कार्यान्वित होऊन परमोच्च अवस्थेपर्यंत रत व्हायला हवी. दिवाळीचा संदेश असा आहे, की आपण जसे सगळीकडे दिवे लावतो तसा सहजयोग सगळीकडे पसरू दे. पण दिव्याला किंवा ज्योतीला त्याची कसली जाणीव असते कां? ते सगळीकडे प्रकाश पसरवतात पण त्यांना स्वत:ला त्याची माहिती नसते. चंद्र चंद्रप्रकाश देतो पण त्याला त्याची जाणीव नसते; त्याचा त्याला आनंद होत नसतो. दिवाळीच्या या प्रसंगी त्याचप्रकारे तुम्हाला सर्वांना प्रकाश द्यायचा आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला कार्य करायचे आहे. हा फार सुंदर विचार आहे. तुम्हाला हे केलंच पाहिजे आणि हे करतानाही लक्षांत ठेवा की तुम्हाला सर्व जगाला, सर्व मानवजातीला प्रकाश द्यायचा आहे. दुसरं म्हणजे तुम्ही प्रकाश देणारा दीपच बनून जायचे आहे. दीप प्रकाश देतो पण आपण दीप आहोत हे त्याला भान नसते. माझे तसंच आहे, मी स्वत:ला ओळखत नाही. ह्याच स्थितीला तुम्हाला यायचे आहे. तुम्ही माझी स्तुती गाता, माझी अनेक नावे घेता, पण तुम्ही माझं नांव घेत आहांत हे माझ्या डोक्यातही येत नाही. आता मी हे सारं सांगत आहे, पण तुम्ही त्यावर काय प्रतिक्रिया १० 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-10.txt करणार मला ठाऊक नाही. कदाचित तुमचा अहंकार डोकं वर काढेल आणि तुम्ही म्हणू लागाल की, 'माझे पण अगदी तसेच आहे.' असे पण बरेच जण आहेत ज्यांना वाटते, की ते माताजींपेक्षा मोठे आहेत. आणखी असे बरेच जण आहेत जे स्वत:ला कलकी समजतात. आजकाल अशी एक व्यक्ती आहे, जी आपण कलकी असल्याचं सर्वांना सांगत सुटली आहे. ते असू दे, त्याने काही होणार नाही, त्यांना तसेच राहू दे. त्यांची कल्पना त्यांच्याजवळच राहू दे. पण मी 'मी आदिशक्ती आहे' असे म्हटले तर त्याचा अर्थ होईल की मी कोण आहे हे माझे मलाच ठाऊक नाही; लोक माझ्यामागे लागले की, 'माताजी, मला दिसते, की मी ते जाहीर केल्यानंतर तुमची वाढ चांगली झाली आहे. पण खरं म्हणजे कोणालाच काही जाहीर करण्याची किंवा जाहीरपणे सांगण्याची गरज नसते. ही स्थिती प्रत्येकाने मिळवली पाहिजे, पण त्याच्यासाठी तुम्ही कार्य केले पाहिजे आणि कार्य म्हणजे सहजयोगाचा प्रसार करणे. तुम्हाला खूप दिवे लावायचे आहेत. म्हणजेच तुम्ही एक दीप आहात हे तुम्हाला जाहीरपणे सांगायलाच पाहिजे.' काय जाहीर करायचे? मी जी आहे ती आहे. आता तुम्हाला समजले पाहिजे आणि त्यातून सूक्ष्म झाल्यावर तुमच्या लक्षांत येईल की 'मी एक दीप आहे.' सहजयोगाचा प्रसार करण्यासाठी पुष्कळ सहजयोगी पुष्कळ चांगले कार्य करत आहेत. पुष्कळ देशांमध्ये तो पसरला आहे, पुष्कळ ठिकाणी धर्माबद्दलचे अज्ञान (अंधार) दूर झाले आहे. जात पात, पुष्कळ धर्माचा 'वादी' पणा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे तुमच्यातील दोषही दूर होऊन तुम्ही स्वच्छ पाण्यामध्ये उरतला आहात. एकदा हे करायला लागलात, की हळूहळू तुम्हाला कळेल की सागरच स्वच्छ झाला आहे. आता नुसते पहात राहायचे आणि सारं काही कार्यान्वित होत असल्याचे बघायचे. तुमच्या आयुष्यातच तुम्ही ही स्थिती मिळवाल आणि लोकांना आत्मसाक्षात्कार देण्याचे काम पुरं कराल अशी मला आशा आहे. जे दुसर्यांना जागृती देत नाहीत आणि नुसते पूजेला येतात ते साधारण सहजयोगीच; ते गहनतेत येऊ शकणार नाहीत, पूजेला नुसतं येऊन काय होणार? थोडेसे वर याल पण नंतर परत खाली! पण जे चिकाटीने (पाण्यात येण्याचा) प्रयत्न करतील ते उच्च स्थितीला येतील ही माझी खात्री आहे. माझ्या जीवनकालातच मला अशी काही माणसे पहायची आहेत की ती नुसती उभी असली, की त्यांच्यामधून शांती आणि प्रकाशच बाहेर येईल. ते दीप झाल्यामुळे सतत प्रकाशच देणार. अशा स्थितीला येण्यासाठी धडपड केली तर तुमच्यामध्ये पण ते घडून येईल. अनेक संतांनी हेच सांगितले आहे. पण सर्वसाधारण लोक त्यावेळी त्या स्थितीला आलेले नसल्यामुळे त्यांना ते समजले नाही आणि त्यांनी अशा थोर लोकांना वेडे ठरवले. ख्रिस्तालासुद्धा लोक समजू शकले नाहीत, ओळखू शकले नाहीत म्हणून त्याला सुळावर चढवले, पण तुमचे तसे नाही, तुम्हाला प्रकाश मिळाला आहे. तुम्ही वरच्या स्थितीला येऊ लागला आहात. तुम्ही ख्रिस्तांना आणि सगळ्या संतांना ओळखले आहे आणि या स्थितीमध्येही तुम्हाला कार्य केलेच पाहिजे. सहजयोगाचे कार्य तुम्हाला केलेच पाहिजे; जे हे काम करणार नाहीत त्यांची प्रगती होणार नाही. तुम्हाला सहजयोग अजून खूप वाढवायचा आहे आणि एकमेकांच्या संगतीत राहन बरंच काही कार्यान्वित करायचे आहे आणि जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत मी वर सांगितलेल्या सहजस्थितीला पोहचू शकणार नाही. आजचा दिवस महालक्ष्मीचा आहे. पहिली सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पैशाबद्दलचा वेडेपणा. तुम्ही श्रीमंत माणसाला विचारले तर तो म्हणतो, 'माझ्याजवळ पैसा नाही.' गरीब माणसाजवळ नसतोच पैसा. म्हणजे पैशाबद्दलची ही हाव कधीच पुरी होणारी नसते म्हणून पैशाचा हा लोभ प्रथम गळाला पाहिजे. मग तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्ही स्वच्छ व्हाल. हे कार्य करतानाच तुम्ही स्वच्छ होत आहात की नाही हे तुमचे तुम्हाला कळेल. त्या कार्यामधूनच तुम्ही हे कसं करत आहांत हे तुमचे तुम्हाला समजेल. हे एकदा झाले, की माझ्या हयातीतच तुमच्यापैकी काही जण तरी या स्थितीला आलेले पाहण्याचे भाग्य मला मिळेल. म्हणून या दीपावलीच्या दिवशी मला तुम्हाला हेच सांगायचे आहे, की तुम्ही अधिकाधिक सूक्ष्म ११ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-11.txt सु ६ यची आहे. कार्य कुरूनच आIपल्याला ही प्रगती साध्य कर जे लोक 3से कार्य कत आहेत आणि सहजयोगाचा प्रसार करत आाहेत त्यांना त्याचा फयदा होणारत आहे आणि है परमचैतन्य तर त्यांची सेवा करायला तत्पर आहे. १२ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-12.txt बना. बाह्यातील गोष्टींचा आपल्यावर परिणाम होता कामा नये. उदाहरणार्थ सांगायचे तर एखादी नवी फॅशन दिसली तर लोक त्याच्यामागे धावायला लागतात. हा मूर्खपणा आहे. असे लोक आंधळ्या जनावरांसारखे असतात; कोणीही त्यांना कोठेही वळवावे, आता हे करा, आता ते करा असे सांगत सुटावे. म्हणजे दुसर्या कोणी दिलेला विचार तुमच्या डोक्यात की तुम्ही तुमच्यामधील 'स्व' ला विसरून जाता आणि मग 'मी हिंदू आहे, मी ख्रिश्चन आहे, मी घुसला, मुस्लिम आहे.' हे नसते प्रकार चालू होतात. तुम्ही 'स्व'तंत्र आहात. आत्मा आहात आणि एकदा आत्मा बनलात, की तुमचे तुम्हालाच ते समजू लागते आणि ते समजणे (ज्ञान) हे फार महत्त्वाचे आहे. सामान्य माणूस आणि संत यांच्यामधील अंतर हेच आहे. जे तुम्ही हळूहळू दूर करत आहात. मग इतर माणसांचे प्रश्न तुम्ही समजू लागता आणि माणसांबरोबरच रहात असल्याने त्यांना कशी मदत करायची हे तुम्हाला समजते. सध्याच्या आधुनिक काळात सामूहिक चेतना फक्त सहजयोगामधूनच कार्यान्वित झाली आहे. संतांनासुद्धा ही जाणीव होती पण त्याच्याबद्दल ते काही बोलले नाहीत. एखाद्याची चक्रे खराब असली तरी त्याची त्यांनी पर्वा केली नाही. म्हणजे काळजी वाटली नाही असे नाही तर तिकडे लक्ष दिले नाही. त्यांची अशी स्थिती होती की सर्व काही त्यांना समजत होते एवढच. म्हणजे आरशापुढे एकदा कुरूप माणूस उभा राहिला काय किंवा रूपवान उभा राहिला काय आरशाला काही फरक पडत नाही. तशी त्यांची अवस्था होती. पण आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि कार्य करूनच आपल्याला ही प्रगती साध्य करायची आहे. जे लोक असे कार्य करत आहेत आणि सहजयोगाचा प्रसार करत आहेत त्यांना त्याचा फायदा होणारच आहे आणि हे परमचैतन्य तर त्यांची सेवा करायला तत्पर आहे. मी पाहिले आहे, की काही लोकांनी नुसती इच्छा केली तरी ती पूर्ण केली जाते; त्यांनी काही मागितले तर ते कार्य होणारच. त्याच्यासाठी आपण कसे योग्य बनायचे हा मुख्य मुद्दा आहे. आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर आपण काय करायला हवे असं म्हटले तर ते म्हणजे श्रद्धा. तुम्ही आत्मा आहात, तुम्हाला प्रकाश मिळाला आहे, तुम्ही सर्वांना तो प्रकाश देणार आहात हा आत्मविश्वास तुम्ही ठामपणे बाळगायला हवा. ही श्रद्धा अधिकाधिक खोलवर रूजली, की मग तुम्हीच म्हणाल, 'मी फक्त आत्मा आहे.' आत्मा झाल्यामुळे सर्व निसर्गच तुमच्या पायाशी आहे. मला एक कोळी माहीत आहे, त्याची माझ्यावर प्रचंड श्रद्धा होती; एकदा सहजयोगाच्या कार्यक्रमाला दुसऱ्या खेडेगावात जायचे होते, तो घराबाहेर पडला इतक्यात काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेले. त्याने लगेच आकाशाकडे हात केले आणि म्हणाला, 'हे पहा , मी माताजींच्या कामासाठी निघालो आहे आणि पाऊस पाडण्याचे धाडस तुम्ही करू नका. माझं काम होईस्तोवर तुम्ही तसेच तरंगत रहा.' त्याला बोटीने जायचे होते. बरोबरच्या लोकांना वाटलं 'हा काय बडबडतोय!' सर्वजण बोटीत बसून पलीकडच्या गावात गेले, लोकांना जागृती दिली, सहजयोग समजवून सांगितला आणि परत येऊन घरात शिरला आणि आकाशाकडे पुन्हा पाहून म्हणाला, 'माझं काम झालय आता तुम्ही काय ते करा.' म्हणजे परम चैतन्यावर पूर्ण श्रद्धा अशी, की ते तुमचे काम करण्यासाठी जणू वाटच बघत आहे. तुम्ही म्हणाल ते काम होणार ही श्रद्धा. पण आधी तुम्हाला स्वत:बद्दल, तुम्ही सहजयोगी आहात याबद्दल स्वत:मध्ये पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे. अजूनही मी पाहते, की काही लोकांना लोभ सुटत नाही. म्हणून प्रथम तुमच्यामध्ये धर्म प्रस्थापित झाला पाहिजे. धर्म म्हणजे नीतिमत्ता. तुम्ही नीतीनुसार वागत असाल तर प्रश्न नाही %B मग हे परम चैतन्य तुमचे ऐकणार नाही असे होणारच नाही आणि समजा आज तुम्ही काही इच्छा केली आणि तसं घडून आले नाही तरी तुम्ही निराश होऊ नका ते चांगले नाही. निराश होणे हे प्रगल्भ नसल्याचे लक्षण आहे. त्यात निराश का म्हणून व्हायचे ? कदाचित ते काम न होणेच तुमच्या हिताचे असेल. समजा, मी कुठेतरी जात आहे आणि वाटेत रस्ता चुकला; कुठल्या रस्त्याने जायचे हे कळेनासे झाले तरी म्हणाले, 'ठीक आहे. काही बिघडले नाही. मी आहे तशीच आहे. मी स्वत:लाच कशी हरवेन ?' आणि मग मला दिसून आले, की त्या रस्त्यावर मला एक दुसरा माणूस, ज्याला मी भेटायला उत्सुक होते तो भेटला! खरं वाटत नाही ना! माझ्या बाबतीत असे बरेच वेळा घडते आणि जरी असा कोणी भेटला नाही तरी काय बिघडले? मी त्या बाजूला जावे, थोडी व्हायब्रेशन्स द्यावीत असं होणार असेल. तर हे असे होत असते. जे काही कराल ते आत्मविश्वासाने करीत रहा. श्रद्धेने करा. या श्रद्धेमधूनच तुम्हाला सर्व शक्ती येणार आहे. सत्याला जाणल्यामुळे तुम्ही शक्तिशाली बनता. पूर्ण सत्य जर १३ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-13.txt क गुरूबद्दल तुमच्या मनात श्रद्धा असली, की परम चैतन्य प्रेमळ 11 असते. देह द्ा तुमच्याजवळ आहे तर तुम्हाला सर्व शक्त्या प्राप्त झाल्या आहेत आणि ही शक्ती दुसऱ्या कोणी नव्हे तर तुम्हीच वापरायची आहे आणि शक्तीच सर्व काही कार्यान्वित करत असते. सर्व काही घटित करत असते. म्हणून मला दिसते, की काही अगदी साधेसुधे अडाणी सहजयोगी फार शक्तिशाली असतात कारण हेच की त्यांच्याजवळ अनन्य श्रद्धा असते. संस्कृतमध्ये एक चांगला शब्द आहे. तितिक्षा. म्हणजे सहनशीलता, सबुरी, असा धीर नसला तर जे पाहिजे ते ताबडतोब मिळाले पाहिजे अशी आमची वृत्ती असते. मग पूर्णत्वाने सर्व काही घटित होणार आहे हे तुम्हाला समजत नाही. पुष्कळ लोक असे खूप उतावळे असतात. सारखी धावपळ करत राहतात. नाही तरी जगभर सगळ्या गोष्टींना फार गती प्राप्त झाली आहे आणि तुम्हीच असे आहात, की ही घोडदौड़ शांतपणे पाहू शकता. तुम्ही त्यांच्यामध्ये नसता. म्हणून धीर बाळगायला शिका. यासाठी तुमच्याजवळ पेशन्स हवा आणि स्वत:वर श्रद्धा, आत्मविश्वास हवा म्हणजे हे परमचैतन्य कसं कार्य करते, सहजयोग कसा कार्यान्वित होतो हे तुमच्या लक्षात येईल. त्यामध्ये एखादी गोष्ट घडून आली तर ठीकच कारण त्याचा काही उद्देश असतो. पण एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली तरी हरकत नाही कारण त्यामध्येही काही हेतू असला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा तुमच्या गुरूवरचा विश्वास व श्रद्धा. गुरूबद्दल तुमच्या मनात श्रद्धा असली, की परम चैतन्य प्रेमळ असते. पण जरा तुमचा विश्वास डळमळीत असला तर परम चैतन्याला पण शंका येते; मग मी किंवा दुसरा कोणता गुरू असू दे. कारण ते गुरूमधूनच कार्य करते. माझ्याबाबतीत म्हणायचे झाले तर मी खूप क्षमा करत असते. हे तुम्हाला ठाऊक आहे. पण त्याचाही गैरफायदा घेणारे लोक असतात. दूसरा कोणी गुरू असला तर अशा लोकांना मारेल, कठोर शिक्षा करेल. हाकलूनसुद्धा देईल. अशा गुरूंच्या बऱ्याच कथा मी सांगितल्या आहेत, पण मी नेहमीच क्षमा करते. मला वाटते की अशा लोकांकडे दुर्लक्ष केले तर आज ना उद्या ते सुधारतील आणि वर येतील. पण काही वेळा याचा उलटाच परिणाम होतो, 'माताजी क्षमा करणारच आहेत' असे ते गृहीत धरतात म्हणून तुमची श्रद्धा अशी हवी की जे काही घडत आहे ते शांत चित्ताने पाहत रहा आणि काहीही झाले तरी निराश होऊ नका. आता हेच पहा, की इतक्या लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला आहे, इतके सारे संत झाले आहेत. काल हे फ्रेंच लोक भजने म्हणत होते ते ऐकून मला आश्चर्य वाटले. मध्येमध्ये मीच पेटी घेऊन त्यांना चाल शिकवीत होते. अर्धा तास प्रयत्न केला पण जमले नाही. आता हे फ्रेंच लोक निर्मितीक्षम झाले आहेत. तुमच्यामधील सर्व सुप्त कला जागृत होतील, त्यांचा आविष्कार होईल. फक्त तसे झाले, की त्याचा अहंकार येऊ देऊ नका, एवढी काळजी घ्या. हळूहळू १४ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-14.txt त्यांना बहार येईल आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत तो सुगंध पसरेल आणि सहजयोगात येण्याची त्यांना प्रेरणा होईल. हेच वरदान तुम्हाला मिळणार आहे. त्यावेळी परमात्म्याच्या आशीर्वादाने तुम्ही पूर्णत्वाच्या स्थितीला पोहोचणार आहात. परिपूर्ण मानव बनणार आहात म्हणून तुम्ही स्वत:कडे असे पहा आणि विचारा मी सहजयोगाशी एकरूप झालो आहे कां? सहजयोगाला मी पूर्णपणे वाहून घेतले आहे का? न थांबता पुढे जा ; एक गोष्ट लक्षांत घ्या, की सहजयोगाला शेवट नाही. तो थांबणार नाही. हेवा, मत्सर, कुरबुर यांना तिथे स्थान नाही. तुम्ही सर्वजण संत आहात, तुम्ही अप्रामाणिक नाही, कोणाची फसवणूक करणारे नाहीत. असं काही अजूनही करत असाल तर अजून तुमची प्रगती व्हायला हवी. काही लोकांना वाटते, की सहजयोगामध्ये आपण फार मोठे आहोत, पण तसे काही नसते. असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वाट चुकला आहात. 'मी काय केले?' याचाच विचार करा; कितीजणांना तुम्ही जागृती दिली ते पहा; कितीजणांना सहजयोग सांगितला ते बघा. बऱ्याच जणांना सहजयोगाबद्दल बोलायला संकोच वाटतो, पार्टीमधे गेले तर दुसर्यांना मी सहजयोगी आहे हे सांगायला धजत नाहीत, मी पीत नाही, ते माझ्या स्वभावातच नाही. जाहीर करणे ही आणखी एक गोष्ट. तुमची श्रद्धा असलीच पाहिजे पण ती तुम्ही जाहीर करायला हवी. सर्व संतांनी तेच केले आणि त्यांना त्रास भोगावा लागला. पण तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. सहजयोग पूर्णपणे समजून घ्या, श्रद्धा बाळगा आणि जाहीर करा. तुमचे ध्येय सर्व जगामध्ये परिवर्तन घडवून आणणे हे आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन झाले, की आपोआप इतरांमध्येही तसे होईल. मग सगळीकडे प्रकाश आणि आनंद पसरेल. तुम्ही आनंदरूपच झाल्यामुळे ते वेगळेपणाने जाणणे पण उरणार नाही. तुम्ही सर्वजण ती स्थिती मिळवाल अशी मला फार आशा आहे. ही दिवाळी पोर्तुगालमध्ये होत आहे ही मला वाटते की एक विशेष गोष्ट आहे. महालक्ष्मी इथे आली होती आणि इथे जे स्वयंभू आहे तो महालक्ष्मीचाच चेहरा आहे. म्हणून मला खात्री आहे, की तुम्हा सर्वांमध्ये हे कार्यान्वित होईल. ही फार सूक्ष्म स्थिती आहे म्हणून तिच्याबद्दल इतके सविस्तर सांगितले. तुम्हाला ही स्थिती सहज मिळवता येईल. मग तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. एखाद्या खेड्यात गेलात तरी सर्व काही जमून येईल. आत्ताचेच पहा, मी कैरोमधे गेले तर सर्वजण मला सलाम करू लागले, मी म्हटले हे काय झाले? हजारोंनी लोक तिथल्या खेड्यातही प्रोग्रामला आले. मी म्हटले, 'तुम्ही इथं प्रोग्रामला कसे आलांत?' तर 'तुमचा चेहरा पाहूनच आलो' असं म्हणाले. वर्तमानपत्रात प्रोग्रामची लहानशी जाहिरात फक्त त्यांनी वाचली. 'तुम्ही अवतारी आहात' असंही म्हणू लागले. मग, असे लोक साधक नसले तरीही जाहीर करा, की सहजयोग हा एकच मार्ग आहे. मला वाटते आतापर्यंत पुष्कळ साधकांना आपण सांगत आलो, साधक लोक उरले नसावेत. म्हणून साधक नसलेल्या सामान्य लोकांना आता सांगायला हवे. परमेश्वराचे तुम्हा सर्वांना आशीर्वाद! १५ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-15.txt खिसमस पूजा टा गणपतीपुळे, ५ डिसेंबर १९९६ येशू ख्रिस्तांचा जन्म ही एक फार मोठी प्रतिकात्मक घटना आहे; अगदी गरीबातल्या गरीब माणसाचाही होणार नाही अशा एका गोठयात त्यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असल्याने त्यांना वाळलेल्या गवतावर झोपावे लागले. पण त्यांचा जन्मच (जीवन) हेच दाखवतो, की अवतारी पुरुष किंवा उन्नतीच्या उच्च स्थितीमधील लोक शारीरिक सुखाबद्दल पूर्णपणे उदासीन असतात. त्यांचा संदेशच इतका महान व गहन होता की त्यांचे शिष्यसुद्धा त्यांच्या शिकवणीप्रमाणे संघर्ष करण्यासाठी तयार झालेले नव्हते. प्रेम व क्षमा हा त्यांचा संदेश सर्व साधु-संत देतात. सर्व अवतारपुरुषांनी व प्रेषितांनी प्रेम व क्षमा हीच शिकवण दिली. ज्यांचा त्याला विरोध होता किंवा ज्याला त्याची उपयुक्तता पटत नव्हती त्यांना त्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले गेले. त्यावेळी लोक साधेसुधे असल्यामुळे त्यांनी त्यांची अनुज्ञा पाळली; त्यातले काही शिष्य फार चांगले होते. काही अर्धवट होते तर काही थोडे साशंक होते. आपले आज्ञा चक्र तयार करण्यासाठी त्यांचे अवतरण झाले आणि त्यांनी अपरंपार कष्ट करूनही आपल्याला असे दिसते की, विशेषत: ख्रिश्चन लोकांचे आज्ञा-चक्र फार खराब असते, ते फार आक्रमक वृत्तीचे, खूप विचार व योजना आखणारे व भविष्याचा जास्त विचार करणारे असतात. उजव्या बाजूचे जे सर्वसाधारण दोष असतात ते ख्रिश्चन म्हणवणाऱ्या देशातील लोकांमध्ये सापडतात. ख्रिस्ती धर्मामध्ये सुरुवातीच्या काळात जे खरोखर ज्ञानी लोक होते त्यांचा ख्रिश्चन धर्माधिकारी म्हणवणाऱ्या लोकांकडून फार छळ झाला आणि त्यांना दाबून ठेवले गेले. ख्रिश्चन पाद्री आणि चर्च-संस्थेतील अशा लोकांनी पण त्यांना खूप त्रास दिला. अजूनही ते चालूच आहे. पार्चात्त्य देशांमध्ये अजूनही आपल्याला हेच दिसून येते, की सर्वसाधारण जनमानसावर या चर्च-संस्थेचा खुप पगडा आहे. एरवी ते लोक फार बुद्धिमान, काटेकोर शास्त्रीय विचारसरणीचे व शूर आहेत, पण मंदिरे, चर्च, धर्म किंवा ख्रिश्चन-धर्म या विषयाबद्दल मात्र मतिगुंग झालेले आहेत. आपल्याकडील लोकांचे काही चुकत असेल हा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. मी इटलीमध्ये गेले होते तेव्हा त्यांच्या कॅथॉलिक चर्चमधले जे आपल्या देशात बघायला मिळणार नाहीत इतके भयंकर अनागोंदी व भ्रष्टाचारी प्रकार पाहन मी थक्कच झाले. पैशाचे अपव्यवहार, विटंबना, अनौरस संतती असले घाणेरडे प्रकार तिथे राजरोस चालतात. ते लोक स्वत:ला फादर-मदर-सिस्टर असं म्हणवतांना ख्रिस्ताच्या नावाखाली असे धंदे कसे करू शकतात ? ख्रिस्तांनी आपल्या शिकवणुकीतून व जीवनकार्यातून आदर्श दाखवायचा प्रयत्न केला.. लंडनमधील एखाद्या भव्य हॉस्पिटलमध्ये आरामात जन्म घेण्याचीच काही जरूर नाही. त्यांच्या स्वत:च्याच अगदी साध्या जन्माची गोष्ट पाहूनच ख्रिश्चन लोक तसेच साधे व्हायला पाहिजे होते पण ते तर उलट सर्व काही पैशामध्ये तोलणारे आज आहेत. पैशासाठी ते दूर दर गेले आणि त्या त्या प्रदेशातील लोकांचा संहार केला. ब्राझील, चिली, अर्जेंटिना या देशात गेलात तर तिथे मूळचा आदिवासी एकही मनुष्य तुम्हाला दिसणार नाही इतके हे लोक त्यांच्याशी विश्वास बसणार नाही इतके क्रूरपणे व आक्रमक पद्धतीने वागले. इंग्लंडमधल्या प्रोटेस्टंट लोकांचीही तीच तऱ्हा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही सारखे थँक यू-थँक यू असे नाही म्हटले तर त्या जातीतून तुम्ही खलास. ख्रिस्तांना कुठली जात होती का ? ते सावळे होते का? नाही तर गोरे होते का? मुळीच नाही. ते भारतीयांसारख्या वर्णाचे होते. पार्चात्त्यांमध्ये ही जातपात कुठून आली ? खऱ्या ख्िश्चन धर्मामध्ये याचा ख़रिस्तांशी काही संबंध नाही. तुम्ही कुठेही जा, साध्या- भोळ्या भाविक लोकांचा हे चर्चमधले लोक वाटेल तसा उपयोग करून घेतात. मतदानासाठी त्यांना वापरतात. पैशासाठी त्यांचा उपयोग करून घेतात. खोटेनाटे पैसे हे चर्चमध्येच बनतात. इतका एकाधिकार, इतकी शिस्त, इतकी हकूमशाही की काय वाट्टेल ते केले तरी पोपसाहेबांचे कधीच काही चुकत नाही. त्यांनी काहीही केले तरी ते योग्य मानायचे. पापाची कसली जाणीव नाही, नरकाची भीती नाही, इतकचं काय ख्रिस्तांचे-(जे साक्षात शुद्ध व अबोधित आहेत) पण स्मरण नाही. एकदा ख्रिस्त मंदिरात बाजार मांडलेल्या लोकांवर स्त्रियांची १६ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-17.txt हंटर उगारून मारू लागले कारण ते म्हणत देवाबरोबर खरेदी-विक्री नाही, तसे ते लोक इतर वस्तूंचाच बाजार भरवत होते पण मंदिराच्या पावित्र्याबद्दल त्यांचा आग्रह होता. ख्रिश्चन लोकांनी आणखी एक प्रकार केला, तो म्हणजे ख्रिस्तांना मारल्याबद्दल त्यांनी ज्यू-लोकांना दोषी ठरवले. ते नेहमीच दोषारोप दसर्यांवर करतात. ख्रिश्चन लोकांमध्ये स्वत: दसऱ्याबरोबर केलेल्या अन्यायाचे खापर दुसर्यावर लादण्याची वृत्ती अजूनही आहे. तसे त्यांनी ज्यू लोकांना दुषण लावले. त्यावेळचे ज्यू लोक नंतर भारतात येऊन भारतीय झाले असावेत. त्यांचा पुनर्जन्मावर कदाचित विश्वास नसेल तर ठीक आहे. दसरी गोष्ट म्हणजे त्यावेळच्या ज्यू लोकांनाच तिथे पुन्हा जन्म मिळाला असं तुम्हाला म्हणायचे आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे त्या एवढ्या गर्दीमध्ये ज्यू लोकांनीच ख्रिस्ताला मारले असं तुम्ही कसं ठरवू शकता ? म्हणून ज्यूं नी ख्रिस्ताला मारलेच नाही. खरं तर त्यावेळच्या न्यायाधीशानेच तो निर्णय घेऊन तशी आज्ञा केली. तो एक रोमन होता. रोमन साम्राज्याला त्याची जबाबदारी नको होती म्हणून ते म्हणाले, की ज्यूंनीच ख़रिस्तांना मारले. म्हणून हिटलरने सुद्धा ज्यू लोकांचाच छळ केला. स्वत:ला कॅथॉलिक म्हणून लहान मुलांनाही गॅस चेंबरमध्ये ठार मारणारा कसा होऊ शकतो हे समजत नाही. पण ज्यांचा असा छळ झाला तेच आता आक्रमक होऊ लागले आहेत व आज ते पॅलेस्टिनियन लोकांच्या विरोधात आहेत; पॅलेस्टिनियन लोकही मुसलमान असून त्या लोकांनीही सगळीकडे थैमान घातले आहे. ख्रिस्तांचे जीवन आणि इतिहास खोलवर जाऊन पाहिला तर हेच दिसून येते, की एक आक्रमण झाले, की त्यातूनच दुसरे आक्रमण सुरू होते. एकाने दुसर्याला थप्पड मारली तर तो मारणाच्याला ठार करण्याचा प्रयत्न करतो. धर्मामुळेच हा मत्सर व दूरावा निर्माण झाला आहे; देवाच्या व धर्माच्या नावाखाली लोक एकमेकांचा खून करत आहेत. सहजयोगातही लोक आता माझंे नाव घेऊन गैरमार्गाला लावणार्याचे ग्रुप बनवत आहेत. तुमच्यावर तसा प्रसंग येणार नाही याची काळजी घ्या. जे प्रत्यक्ष प्रेमशक्तीचे अवतरण होते त्या ख्रिस्ताचे नावाखाली लोक अत्याचार, मत्सर, द्वेष, फसवणूक अशी वाईट कामे करत आहेत. हे लोण एकाकडून दुसऱ्याकडे पसरते आणि सहजयोगातही त्याचा शिरकाव झाला आहे. मी जर एखाद्याला लीडर म्हणून बदलला आणि लीडर नेमला तर लगेच त्याला राग येतो आणि सहजयोगातून आपल्याला किती फायदा मिळाला हे विसरून जातो. साफ विसरतो. नुसते दुसरा लीडर नेमणार आहे असं सांगितले तरी एकदम खलास सहजयोगानेच त्याला सर्व काही दिले, त्याचे सर्व चांगले झाले. सहजयोगाच्या कृपेनेच तो जिवंत आहे हे सारे काही विसरतो. लीडर केल्यावर ती हवाच त्यांच्या डोक्यात शिरते. सहजयोगात लीडर बनवण्यासाठी कधीच आणले नाही. लीडर नेमणे ही फक्त एक सोईसाठी केलेली व्यवस्था आहे आणि एखादा लीडर बिघडत चालला तर त्याला बदलायला हवे इतकाच त्याचा अर्थ. इतके हे सरळ आहे. पण सत्ता मिळवणे ही चुकीची समजूत असल्यामुळे एकदा ती मिळाली की तिचा वाट्टेल तसा वापर केला जातो. हे प्रत्येक देशात चालले आहे आणि अजूनही चालत आहे ही पार खेदाची व क्लेशदायक गोष्ट आहे. माझ्या कार्यात त्यामुळे अडथळे येतील. सर्वांना सामूहिक पूर्णावस्थेला नेण्याचा माझा प्रयत्न आहे. तुमच्यामध्ये भेदभाव मला करायचा नाही. पण जे चुकीचे, अयोग्य व अपवित्र आहे ते तुम्हाला दाखवून द्यायलाच हवे. घरातील स्त्री तांदूळ निवडतांना त्यातले खडे काढून टाकून देते तसं हे आहे. खड्यांसकट आपण भात करत नाही कारण ते खडेच राहणार. संत नामदेव अशा लोकांची माशीबरोबर तुलना करतात. माशी जिवंतपणी अन्नावर येऊन आपल्याला त्रास देतेच. पण चुकून पोटात गेली तर मरूनही वर त्रासच होतो. अशा लोकांना सहजयोग समजणार नाहीच पण ते आपल्याला त्रास देतील. मग जे सहजयोगात प्रगत झाले आहेत त्यांनी काय करायचे ? त्यांनी पण त्यांचे अनुकरण करायचे का? मी कधी कुणाला दोष देत नाही. उलट लोक मला सांगतात, 'माताजी, त्याने सहजयोगाला कधी पैसे दिले नाहीत म्हणून त्याची संपत्ती खलास झाली.' मी कधी कोणाजवळ देणग्या मागत नाही की कधी कशासाठी पैसे मागत नाही. दर वेळेस उलट म्हणते, 'देऊ नका, आपल्याजवळ खूप आहे.' मला जरूर असली तरीसुद्धा मी कुणाकडे एक पैसादेखील मागत नाही. मला तसला प्रश्नच कधी पडत नाही आणि ते मला माहीत आहे दुसरा तुम्हाला ख्रिस्तांच्या जीवनातून आपण हेच समजून घ्यायला हवे की त्यांना कधी कसले प्रश्न नव्हते. ते निर्भय होते. आपण देवपुत्र आहोत हे त्यांना माहीत होते, म्हणूनच सुळावर चढवले गेले त्यालाही त्यांनी तोंड दिले. लोकांना ते आवडले असो वा नसो पण त्यांनी क्रॉस खांद्यावरून वाहिला. क्रॉस हे स्वस्तिकाचेच पण थोड्याफार फरकाचे प्रतीक आहे. ख्रिस्तांना तरीही आपल्या प्राणांची आहती द्यावी लागली. त्यांनी हे प्राणार्पण आपल्या सर्वांसाठी केले ज्यामुळे आपण आज आज्ञा पार करू शकलो. दूसर्यांची निंदा करण्याऐवजी स्वत:ची निंदा केलेली बरी. स्वत:ला सुळावर १८ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-18.txt देण्यासारखे ते आहे असे समजा कारण सहजयोगी म्हणून आपण कुठे आहोत हे तुमचे तुम्हालाच समजेल. मला सांगण्यात आले आहे, की दस-्या लोकांच्या अंकित झालेले ८०-९० सहजयोगी इथे आले आहेत. सहजयोगी व्यक्ती दुसर्याच्या प्रभावाखाली कशी येऊ शकेल? हे शक्य आहे का ? पण कदाचित ते ध्यान करत नसतील3B त्यांना ते कसं जमणार? आता ते क्षमा मागतात. मी क्षमा करेनही पण त्यामुळे ते ठीक होतील असे नाही; त्यांनी हे समजून घ्यायला हवे की आजपर्यंत ते सहजयोगी नव्हते. सहजयोगी जर असा भुलवला जाऊ लागला तर सहजयोगाचा फायदा काय? कुंडलिनी जागरणाचा फायदा काय? ख्रिस्त हे मानवजातीचे तारणकार म्हणून जन्माला आले. आपल्यासाठी या जगात जे शक्य होते ते सारे काही केले. पण आपण त्यांच्यासाठी काय केले? त्याचप्रमाणे बरेच सहजयोगी मागण्या करत असतात की माताजी, आम्ही तुम्हाला भेटू शकत नाही. तुमच्याशी हात मिळवू शकत नाही, तुमच्या पाया पडू शकत नाही, हे नाही, ते नाही इ.इ. मला खरंच आश्चर्य वाटते. मी हे केले पाहिजे, ते केले पाहिजे अशी सारखी माझ्यामागे भुणभुण. तुम्ही फक्त ध्यान करायला पाहिजे. तेवढचं करा आणि हे परमचैतन्य ही माझीच शक्ती आहे आणि माझ्या शक्तीचीच जाणीव तुम्हाला आतमधून होत आहे यावर तुमची श्रद्धा बसेल. तुम्ही जितके माझ्यापासून दूर रहाल तितके तुमच्याच हिताचे आहे. काही सहजयोग्यांची मागण्या करण्याची ही सवय मला अजिबात समजत नाही. त्यांना जागृती मिळाल्याचे ते विसरलेत का? ख्रिस्त हे केवढे महान अवतरण झाले आहे हे आपण समजून घ्यायला हवे त्यांना 'जागृती देता आली नाही ही गोष्ट वेगळी. त्यांना सुळावर चढवणार्या लोकांची तुम्ही कल्पना करा म्हणजे अशा लोकांना 'जागृती' कशी मिळणार हे समजेल. माझ्यासमोर कुणी सुरा होऊन आला तर मी त्याला साक्षात्कार कसा देणार? त्यांचे कोणी ऐकले नाही. त्यांच्या म्हणण्याचा कोणी विचार केला नाही. पण तुम्ही आता साक्षात्कारी झाला आहात; द्विज झाला आहात. तुम्ही महान झाला आहात. तुमच्याजवळ मोठी क्षमता आहे. एवढे सगळे असूनही तुम्ही कसे आहात ? सहजयोगाबद्दल खरी कळकळ व कार्यतत्परता किती जणांजवळ आहे ? विचार करा. सगळ्यांना त्यांचे त्यांचे व्यवसाय आहेत, हे आहे, ते आहे, पण कळकळीने काम करणारे किती आहेत ? ख्रिस्तांजवळ फक्त १२ शिष्य होते आणि एक दोन वगळता सर्व समर्पित होते. साक्षात्कार नसतानांही त्यानी ख्रिस्ती धर्माचे श्रद्धेने कार्य केले आणि तो वृक्ष पसरला. पण त्यांना पूर्ण ज्ञानाची कल्पना नव्हती. त्यांच्याबरोबर ख्रश्चन धर्मांतरामधून आलेले बेकार लोक होते. म्हणून त्यांनी ख्रिस्त जन्माला साजेसे काही केले नाही तरी ते समजण्यासारखे आहे. पण तुम्ही लोक द्विज झाले आहात, आत्मज्ञान तुम्हाला मिळाले आहे, सर्व शक्त्या मिळाल्या आहेत आणि सर्वव्यापी शक्तीबरोबर जोडले गेले आहात तरी तुम्ही असे कसे ? तुम्ही सर्व शक्त्या वापरू शकता, ओळखू शकता, चालू झालेल्या एका इंजिनसारखे तुम्ही झाला आहात. काही चाके चालू झाली आहेत. पण मागे अनेक चाके आहेत आणि म्हणून तुम्हाला खूप करण्यासारखे आहे. मी ख्रिश्चन लोकांना दोष देत नाही. त्यांना कधी आत्मसाक्षात्कार मिळाला नाही; फार फार तर एखादा पाद्री त्यांच्यावर पाणी शिंपडून त्यांना द्यायचा. पण तुमचंे काय? मी तुमच्यासाठी जगत आहे; आईबरोबर राहून तुम्ही प्रगल्भ झाल्याचं मला पाहायचे आहे. पुष्कळ जण तयार झाले असले तरी अजून खूप लोक तयार व्हायचे आहेत. म्हणजे तुम्ही उत्तम भाषण देऊ शकाल किंवा पुस्तके लिहाल हा त्याचा अर्थ नाही. पण आतून तुम्ही प्रगल्भ व्हायला हवे आणि तुमचे व्यक्तिमत्त्व एखाद्या फुलासारखे, ज्यामधून प्रेमाचा ईश्वरी सुगंध दरवळेल, असं बहरले पाहिजे. माझ्यात आणि ख्रिस्तांमध्ये हाच फरक आहे. ते म्हणाले, 'मला आता जास्त काही करायचे नाही;B या मूर्ख लोकांची संगत पुरे झाली.' माझं तसं होणार नाही, जग कसं आहे मला माहीत होते. आज तर जगाची परिस्थिती आणखीनच खराब आहे कारण सर्व नेतेमंडळी आपापसात भांडत आहेत. आजचे राजकारणी भ्रष्ट आहेत, भ्रष्टाचाराची जणू स्पर्धाच चालली आहे, सत्य व प्रामाणिकपणाचा त्यांच्याजवळ लवलेश उरला नाही. प्रत्येकजण जाहिरातबाजी, संपर्क- माध्यम, वर्तमानपत्र यात गुंतला आहे आणि ही साधनेच वाईट प्रवृत्तीला बढावा देत आहेत. हे सर्व असूनही मला खात्री होती की सन २००० पर्यंत सहजयोग हा एक अद्वितीय योग ठरणार आहे. तुम्ही मला माझे वाक्य पुरे करू दिले नाहीत, हे जेवढे इथे माझी सेवा करून आहेत तेवढे लोकही खरे सहजयोगी झाले तर! तुमच्या शहरात मी येऊ शकले नाही तरी काही बिघडत नाही, कशानेच काही बिघडत नाही. मुख्य गोष्ट कोणती असेल तर ही, की तुम्हा लोकांना साऱ्या मानवजातीचे उत्थान करायचे आहे. सगळ्यांना एकत्र आणायचे आहे आणि सगळीकडे शांती, आनंद व सुख पसरवायचे आहे. आज मी जेव्हा येत होते तेव्हा लोकांनी शाली पसरल्या. मला आठवण झाली, की ख्रिस्त यायचे तेव्हा लोक पाम वृक्षाची पाने आणत आणि जमिनीवर त्यांच्यासाठी शाली पसरत, पण ते कुटे गेले? ते क्रॉसवर, सुळावर मरणाला १९ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-19.txt सामोरे गेले. तुम्ही माझ्याबद्दल जेव्हा प्रेम दाखवता तेव्हा लक्षात घ्या, की तुम्हाला सहजयोगाच्या कार्याबद्दलही तितकेच प्रेम वाटले पाहिजे. आजकालच्या देशांमध्ये, जिथे ख्रिस्ती धर्माचा प्रभाव आहे, ते सर्वजण अवनतीला चालले आहेत कारण त्यांच्याजवळ नीतीमत्ता नाही. तिथे बेकारी आहे. अनेक समस्या आहेत, त्यांची मुले भरकटलेली आहेत. दारू-धुम्रपानाच्या आहारी जात आहेत, त्यांचा दुष्परिणाम आपल्यावरही होत आहे. हे सर्व ख्रिस्त-विरोधी कार्य आहे. ख्रिस्तांच्या विरोधात कोणी असेल तर तो आपल्यातच आहे कारण त्याला ख्रिस्तांच्या पवित्र व प्रेमाच्या विरोधातल्या या गोष्टी मान्य आहेत. ही मुलगी जी बुडून मेली ती तुमच्या निष्काळजीपणामुळे गेली. तिचे वडील कुठे गेले होते ? लहान मुलाला असे सोडून कसे जाऊ शकतात मला समजत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ख्रिस्तांनी सांगितलेच आहे, की स्वत:वर जसं प्रेम करता तसं मुलांवर, शेजाऱ्यांवर प्रेम करा. पाश्चात्त्य देशांमध्ये तुम्हाला शेजारी मिळाला तर काही धडगत नाही. तो तुम्ही काय करता, कुठे जाता सर्व माहिती मिळवील, दुर्बीणसुद्धा त्यासाठी वापरेल आणि तुम्ही आवाज केलात तर संपलच; साधे गाणे म्हणालात तरी संपलेच . त्या बाबतीत भारतीय लोक चांगले आहेत. आमच्याकडे तसला आवाजाचा प्रश्न नाही. त्यांना तो चालतो. भारतीय लोक आवाजाशी कसे जमवून घेतात मला शोधून काढायचे होते. मला समजले, की पाश्चात्त्य देशातील लोक सदैव ताणतणावाखाली असतात म्हणून त्यांना आवाज सहन होत नाही. पण भारतातील लोकांना टेन्शन म्हणजे काय हे तितकेसे माहीत नाही, मला कळत नाही पण अजून तरी तो प्रकार इकडे फारसा वाढला नाही. पार्चात्यांच्या मानाने कमीच आहे. म्हणून पाश्चात्य लोक आवाजाला इतके घाबरतात. भारतात खेड्यापाङ्यातून राहणारे लोक स्टेशनवरच झोप घेतात, त्यांना काही होत नाही; गाड्या येत-जात असतात पण हे छानपैकी झोप काढतात. पण पाश्चात्त्य देशांची कल्पनाच करा. देवकृपेने इटलीमध्ये आमचा शेजारी जरा दूर होता पण इंग्लंडमध्ये शेजाऱ्यांमुळे आम्हाला बरेच वेळा इकडून दुसरीकडे असा आश्रम बदलावा लागला; त्यातही एक शेजार असा भेटला, की त्याचे नाव मि.पीस होते. कोणी हे नाव त्याला दिले कोण जाणे? जीवनात त्याच्यामध्ये इतका विरोधाभास, इतक्या प्रचंड दोन टोकांच्या वागणुकी की वाटायचे 'शेजाऱ्यावर प्रेम करा' हा उपदेश ते कधी तरी आचरणात आणतील का? भारतीयांमध्ये हा त्रास फारसा नाही. कधी कधी झाला तरी फारसा नाही. शिवाय कुठे संगीताची बैठक असली तर शेजारपाजारचे सगळे येणार आणि शिवाय बरोबर चहा किंवा दसरं काहीतरी आणून संगीताचा आनंद घेणार. पण तिकडे सामूहिकता इतकी कमी आहे, की ते स्वत:ला ख्रिश्चन कसे म्हणतात मला समजत नाही. चर्चमध्ये मात्र अगदी झकासपैकी कपडे करून जाणार. तिथल्या मेयरने सांगितले, की पंधरा मिनिटे बरोबर बसणार. अगदी घड्याळ बघून आणि एका तासानंतर तुरूंगातून सुटल्यासारखे बाहेर पडणार आणि तुमच्या बरोबर तासन्- तास बसलेले हे लोक किती श्रीमंत. मला वाटते, की मीच त्यांच्यावर जादू करत असेन. तिकडे लोक सामूहिकतेत फारसे येत नाहीत. दूसरं म्हणजे दारूची नशा असल्याशिवाय त्यांना एकमेकात संभाषण करणे जमत नाही. सदैव ते थकलेले. चित्रपटगृहात सिनेमा पहायला किंवा असच दुसरीकडे आले, की लगेच बसतील, इतका थकवा, तरुण माणसेसुद्धा. सतत विचार, विचार आणि विचार हे सर्व आज्ञेमुळे, सारखा ख्रिस्त विरोधी विचारांमुळे आणि तसल्याच कामामुळे आता काय करायचं, उद्या काय करायचे हेच विचार. आपण तरीही आशा करू या, की या प्रकारचा धर्म नाहीसा होईल; असले सर्व धर्मच नष्ट होतील. आता फारच झाले आणि हा शेवट व्हायला हवा. त्यांचा काही आधार नाही आणि तुम्ही त्यांना सावरू शकत नाही. त्यांच्यामध्ये अधर्म इतका पसरलेला आहे, की तुम्हाला ते सहन होणार नाही. इस्लाम, हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन इ . सर्व २० 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-20.txt पंथांचा शेवट व्हायला हवा. ख्रिस्तांचा कुठला धर्म होता? तुमचा सहजयोग हा एकच धर्म आहे. विश्वाचाही तोच धर्म आहे. तो पवित्र आहे आणि जन्मत:च तो तुमच्यामध्ये आहे. तुम्ही दुसर्या कुठल्या धर्माचे अनुयायी नाही कारण तसा कोणताच दुसरा धर्म नाही. म्हणून मला आशा आहे, की सन २००० पर्यंत पृथ्वीवरचे सर्व धर्म लयास जातील कारण ते सर्वजण काही कारण नसतांना एकमेकांशी भांडत आहेत, एकमेकांना फुकट ठार मारीत आहेत. त्यांना तेच आवडते. कुराणला का दोष द्यायचा, बायबलला का नावे ठेवायची? काळ कठीण आला असं का म्हणायचे? त्यांना आपल्या धर्माचा देशच पाहिजे. स्वत:ची वेगळी जात पाळायची आहे; एकदा तुम्ही विभक्त होण्याची प्रक्रिया केली की तुम्ही ख्रिस्त विरोधी बनता. सहजयोगात तुम्हा सर्वांची एकच ओळख आहे. दुसरी कुठली कल्पनाच माझ्या डोक्यात नव्हती व नाही. आपण सर्वजण एकाच बापाचे पुत्र आहोत. एकाच आईची लेकरे आहोत. वेगवेगळे तट पाडण्याची आपल्याला काय जरूर? पण आतासुद्धा मी पहाते, की निरनिराळे ग्रुप पटकन जमतात. उदा.महाराष्ट्रियन लोक एकत्र बसणार. भारतीयांची ती सवयच आहे, त्यांचा स्वभावच तसा आहे. उत्तर हिंदुस्थान्यांची पण तीच तऱ्हा. तुम्ही इंदोरला आलंच पाहिजे हे का? तो भारताचाच भाग आहे ना ? त्यांना दिल्लीला येणं जमणार नाही;B पण मीच सगळीकडे सगळ्या खेड्यात जायला हवे! असं का? आज तुम्ही दिल्लीत जन्माला आला, उद्या आणखी कुठल्या भयानक गावी जन्माला आलात तर? तसंच या ठिकाणी माझे घर आहे ही अशीच एक डोकंदुखी. तुम्ही माझ्या- माझ्या ठिकाणी यायला पाहिजे. हे एकदा सुरू केलेत, की मग तुमचं संपले. तुम्ही मग ख्रिस्तांचे कोणी लागत नाही. आज तुम्हाला अशी सवय झाली आहे, की तुमच्या आजूबाजूला तुमचेच देशबांधव दिसायला हवे. तुम्ही नुसते शेजारी जे बसले आहेत त्यांच्याकडे पहा ते कोणी परके आहेत का? सहजयोगात 'दसरा' असा कोणी आहे का ? आपण सारे 'एक' आहोत आणि तुम्हाला माझ्याबद्दल व ख्रिस्तांबद्दल प्रेम असेल तर तुम्ही ही एकतेची भावना बाळगलीच पाहिजे. ग्रुप बनवण्याचे सर्व धंदे आता संपले पाहिजेत. सहजयोगामध्ये आपण सर्व एक आहोत. एकच ओळख असणारे, एकच शरीर असलेले , एकाच संस्थेचे; आपण एकमेकांपासून वेगळे आहोत असं म्हणूच शकत नाही. हा हात शरीरापेक्षा वेगळा आहे का? त्याला वेगळे अस्तित्व आहे का ? एकदा का तुम्ही वेगळेपणाची भावना सोडून दिली म्हणजे किती आनंद मिळतो याचे तुम्हालाच आश्चर्य वाटू लागेल. पण जर तुम्ही मी-मी-माझे यातच गुंतून राहिलात तर मग सहजयोगातही आनंद मिळणार नाही; दुसर्याच्या सहवासाचाही तुम्ही आनंद मिळवू शकणार नाही. मी काही फक्त एक देशाची नाही. पुष्कळ मुले व मुली सांगतात, की आम्हाला भारतीयांशीच लग्न करायचे आहे. आता एका ३५ वर्षाच्या भारतीय मुलीला मी भारतीयच नवरा कुठून आणणार? मग विधुरच मिळणार किंवा भारतीय पद्धतीचाच विवाह हवा! काय म्हणणार याला? अशा लोकांचे लग्न जमवणे अशक्य आहे. हं, तुम्हाला थोडी निवड करावीशी वाटेल तर ठीक आहे. तसं करा. पण जोपर्यंत माझा प्रश्न आहे तोपर्यंत मी तुमच्या लग्नाला मान्यता देणार नाही. तुम्हाला मुलींनी भारतीय मुलांशी लग्न केले आहे, पण त्यांना काय त्रास भोगावा लागला मी सांगू शकणार नाही. सहजयोगात यापुढे ते होणार नाही. एका हिंदुस्थानीचे दुसर्या हिंदुस्थानीशी लग्न सहजयोगामध्ये अजून जमलेले नाही. ते शक्य नाही; परमेश्वराची तशी इच्छा नाही, तुम्ही तुमच्या जातीमध्येच असा संबंध का नाही शोधून काढत? भारतामध्ये तर त्याला खूप महत्त्व दिले जाते. माझ्या मुलीचे लग्न जमवताना ते म्हणायचे नको, 'हा श्रीवास्तव नाही' आणि जरी श्रीवास्तव असला तरी म्हणायचे, 'तो तुमच्या सारखा श्रीवास्तव नाही.' मी म्हटले, 'फार झाले. ' आमच्या घरी माझ्याहून वयस्कर असे बरेच नातेवाईक होते. म्हणून मी स्पष्ट सांगितले की, श्रीवास्तव असो वा नसो, मी त्यांचे लग्न जमवणार बास. माझ्या पतीलाही ते पटले. माझ्या नातींच्या वेळीही हीच तऱ्हा. श्रीवास्तव मिळाला तर छानच. नाही मिळाला तर नाही. महाराष्ट्रातही हाच प्रकार; त्यांच्यातले ख्रिश्चन झालेल्यांचीही हीच तऱ्हा. तुमचा विश्वास बसणार नाही. आता तर त्यांच्यातले काही लोक स्वत:ला 'दलित ख्रिश्चन' म्हणवतात. म्हणजे खालच्या जातीतले पण धर्मांतर केलेले म्हणजे ही आणखी एक नवीन जात. एकदा ख्रिश्चन झाल्यावर जात कुठली? सर्वच ख्रिश्चन3B पण नाही, दलित ख्रिश्चन वेगळे, वरच्या वर्गातले खरिश्चन वेगळे%3B त्यांच्यामध्ये एकमेकांत विवाह संबंध चालणार नाही. एरवी सर्व ख्रिश्चन, ख्रिस्तांचे अनुयायी, चांगले कपडे करून नियमित चर्चला जाणारे, स्वत:जवळ नसला तरी इंग्रजांप्रमाणे हवाच म्हणून दुसऱ्याचा सूट उसना आणून चर्चला जायलाच पाहिजे. भारतातील ख्िश्चन लोकांप्रमाणे ख्रिस्तांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तुमचा विश्वास बसत नाही ना ? पण सूट-टाय घातल्याशिवाय तुम्हाला चर्चमध्ये जाता येणार नाही. धोतर नेसून चर्चमध्ये जाणाऱ्या माणसाची तुम्ही कल्पना करू शकता का ? शक्य नाही. मी ख्रिश्चनाबरोबर लग्न केले नाही ही देवाची कृपा. माझ्या बहिणींनाही विवाहाचे वेळी साडीच्याऐवजी झगा घालावा सुरू कुणाला जिथे योग्य जोडीदार मिळेल त्याच्याशीच लग्नर करायची तुमची तयारी पाहिजे. पुष्कळ भारतीय २१ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-21.txt लागला. भारतीय स्त्री साडीशिवाय लग्नासाठी दूसरं काही वापरणे शक्य नाही पण त्यांना जबरदस्तीने फ्रॉक घालावा लागला. पुष्कळांना इंग्लिश पद्धतीनेच लग्न करणे भाग पडले. आता तर, मला आश्चर्य वाटते, की जपानी महिलाही ऑस्ट्रेलियात आल्यावर इंग्लिश वधूसारखा पोशाख करतात कारण ते ख्रिश्चन झालेले असतात. याच्यावरून असे दिसते, की त्यांच्या मताप्रमाणे ख्रिस्त इंग्लंडमध्ये जन्माला आला होता. खरं तर ख्रिश्चन लोकांनी पोशाखाबद्दल इतके काटेकोर असायची जरूर नाही. या सगळ्या मूर्खपणाच्या कल्पना. तुमचा ड्रेस असाच हवा, जेवतांना काटा इकडे, चमचा तिकडे इ.गोष्टी पाश्चात्त्य देशातून आल्या. ख्रिस्त काय काटा-चमचा घेऊन जेवत होते ? त्यांचा जन्मच मुळी गोठ्यात झाला. या लोकांच्या ड्रेस-काटे-चमचे इ. चा बाऊ पाहन हे ख्रिश्चन आहेत का याच्यावर विश्वास ठेवणे जड जाते; वर तुमच्याकडे जेवायला आले तर आधी प्लेट उलटी करून कुठल्या कंपनीची आहे हे पाहतील! त्यालाच महत्त्व. ते स्वत:ला ख्रिश्चन म्हणवतात हाच मुळी मूर्खपणा नव्हे काय? ख्रिस्तांनी तबेल्यात जन्म घेतला आणि या लोकांना या मूर्खपणाच्या गोष्टींबद्दल काटेकोरपणा! ख्रिस्तांच्या जन्मामध्येच काय महानता आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. गाई-वासरे बांधून ठेवली आहेत अशा गोठ्यामध्ये ते जन्मले. तुम्हाला ख्रिश्चन माणूस ओळखायचा असेल तर रविवारच्या सकाळी त्याला पहा. माझ्या वडिलांचा याला फार विरोध होता, ते वापरायचे. ख्रिस्तांनीही कुडताच वापरला, सूट घातला नव्हता. भारतीय लोकांना आचाराची कृत्रिम सभ्यता बाळगण्याची वृत्ती मुळातच असते. त्यांच्याजवळ असती तर मे महिन्याच्या या गरम हवेत त्यांनी सूट का घालावा? आपण सहजयोगी आहोत. सामान्य माणसांसारखे सामान्य कपडे आपण वापरायला हवे. या परम चैतन्याशिवाय कुणावर तुम्हाला छाप पाडायची आहे? ते लोक वरवरचं बघतात. ड्रेससारख्या बाबतीत कमालीची शिस्त, राहण्याच्या सवयींबद्दल पण तेच, फार विचित्र प्रकार सगळा. मी हे सर्व पाहिलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला बजावून ठेवत आहे, ख्रिस्त-विरोधी असलेल्या संस्कृतीपासून दूर रहा. प्रत्येक बाबतीत त्यांनी ख्रिस्तांचा उघड-उघड अपमान केला आहे. तुम्ही सुद्धा आपल्या जीवनशैलीतून ख्रिस्तांचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ख्रिस्तांचा संदेश आहे, की तुम्ही तुमच्यातील दैवी प्रवृत्ती सक्षम बनवा आणि चारित्र्य बलशाली बनवा ज्यायोगे सहजयोग उठून दिसेल ते तुमचे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यांच्या जीवनाचे अनुकरण करा. त्यांना कशाचीही नोकरी, धंदा , घर कसली चिंता वा भीती नव्हती. सगळ्यांमध्ये ते निर्भय होते. त्यांच्या आयुष्यामध्ये त्याची खूप सुंदर उदाहरणे आहेत. पण आपण जेव्हा ख्रिश्चन लोक पाहतो आणि त्यांच्यामध्ये ख्रिस्तांचे कोणते गुण प्रतिबिंबित झाले आहेत हे पहायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला समजते. त्यांनी ख्रिस्तांची कोणतीही अनुज्ञा पाळली नाही; कसलेही केले नाही. आपण सहजयोगी म्हणून आपली वेगळी संस्कृती आहे. आपण नीतीमत्तेचा आदर ठेवतो. आपले व्यक्तिमत्व भारदस्त आहे. आपले एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे. आपण निर्भय आहोत, आपण खोटे बोलत नाही व दुसऱ्यांना लुबाडत नाही आणि आपल्याला कुणी भुरळ पाडू शकत नाही. आपली संस्कृती 'आईची संस्कृती' असायला हवी. त्यामध्ये दिखाऊपणा किंवा कृत्रिमतेचा हव्यास नाही. तुम्ही एकदा ही 'आईची संस्कृती' अंगी बाणवली की सारे जीवनच बदलेल. तुमचे विचार तुमच्या कल्पना बदलतील. मी तुमच्याकडे काही मागत नाही, या भेटवस्तूंचा स्वीकार करण्याची तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करता, तुमच्या समाधानासाठी मी तेही मानते. या ख्रिस्तपूजेच्या दिवशी एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण ख्रिस्तांना काय दिले याचा विचार करा. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपण माताजींना काय दिले याचाही विचार करा. हे फार महत्त्वाचे आहे. मला तुमच्याकडून नको. अजिबात नको. मी स्वत:शी पूर्ण समाधानी आहे. मला एवढंच पाहिजे, की तुम्ही सहजयोगाला, सत्य व प्रेमाला पूर्णपणे वाहून घ्या; ख्रिस्तांनी म्हटल्याप्रमाणे कुजबुजणारे जीव बनू नका; इकडच्या तिकडच्या गप्पा मारलेलं मला आवडत नाही, ते चांगले नाही अणि ते बंद झाले पाहिजे. नाही तर तुम्ही खाली घसराल आणि तेसुद्धा अगदी भयंकर प्रकारे; ही आणीबाणीची वेळ आहे म्हणून तुम्ही स्वर्गाला तरी जाल नाही तर नरकाला. ही प्रक्रिया चालू झालीच आहे. म्हणून तुम्ही कुठे आहात ते पहा. मी तुमची आई म्हणून तुम्हाला सुधारण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगते, की ही आणीबाणी आहे विसरू नका आणि म्हणून ख्रिस्तांच्या विरोधातले कार्य सोडून द्या. आपलं कुठे काय चुकत आहे ते तुम्हीच तुमच्या आतमध्ये शोधून काढा आणि त्याच्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे सहजयोगाला समर्पित व्हा;B त्याच्यातून पैसे मिळवायच्या मागे मात्र लागू नका, तसच सहजयोगामध्ये राजकारण करू नका; सहजयोगाचा महान वृक्ष कसा बनेल ते बघा. तुमच्यामध्ये ती शक्ती आहे म्हणून ते घटित व्हायलाच पाहिजे व होणार आहे. म्हणूनच आज तुम्ही इथे आहात. तुम्हा सर्वांना परमेश्वराचे अनंत आशीर्वाद ! कुंडता अनुकरण काहीही २२ 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-22.txt NEW RELEASES Title ACD | ACS Date Place Lang. VCD DVD सार्वजनिक प्रवचन 12" Apr.1995 th 318 Kolkata Н 12-14" Mar.2010 th 319* Shiv Puja - Part I & II Cabella th Virat Viratangana Puja Los Angeles 320 10" Oct.1993 72 E 16 Aspects of Shri Krishna 481 E 3rd Sep.1973 242* आत्मसाक्षात्कार का अर्थ Mumbai 242 Н सार्वजनिक प्रवचन 9th Dec.1973 480° Н 321* st Shri Virat Puja 21* Nov.2010 Noida P ০০০০০০ ८ प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन: ०२० २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in 2010_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-23.txt ३ ५ ১৪ ১ ३ ১৭ नववर्ष दिनी आपल्याली शपथ घ्यायची आहे, की आती आपण सहजयोगाली नवीन, विशाल तसेच ১ अधिक वेगवान पद्धतीने प्रारंभ करकू या! नव वर्ष पूजा, केळवे, ३१.१२.२००० का की त। वह सं ं