मराठी जानेवारी-फेब्रुवारी २०११ राढ ७ कह ग्री ु तुम्ही मला कोठेही बघू शकाल. तुम्ही एखाद्या रस्त्याने (गल्लीतून) जीते असाल आणि अचानक तुम्हीली श्रीमातीजी तुमच्या बरीबर येईल. तर हे (सहजयोगाचे) दुसरे युग सुरु असल्याचे आठळून झाले आहे. आणि तुम्ही आश्चर्यचकित होऊ नकी जर मी तुमच्या गादीवर बसून, तुमच्या डीक्यावरून होते फिरवतांना दिसले किंवा मी तुम्हाला येश् ख्रिस्ताच्या रूपात तुमच्या खोलीत चालत येतांना दिसले. तसेच श्री रामाच्या रूपात ही तुम्हीला दिसेन. हे सगळे तर घडणारचे आहे. तर यासाठी तुम्हाला तयार असले पाहिजे. - ५ मे १९८४ SVNNN या अंकात ऐक सूर्य : सहजयोगाची ....४ VANNN परमात्म्याचे कार्य वे दुष्टे शक्ती ...८ NAYN शिव हे आत्म्याचे प्रतीक .... १६ 9& SVAVM ॐँ ु एक स्ं २हजयोगा चा = अ जचा दिवस भारतात आपल्याला साजरा करण्याजोगा आहे कारण सूर्य हा आता मकरवृत्तात आहे आणि मकरवृत्तातून तो कर्कवृत्ताकडे येतो. जेव्हा सूर्य हा पृथ्वीकडे परत येतो तेव्हा ह्या धरणीमातेची संपूर्ण सर्जनशीलता पुन्हा कार्यान्वित होते आणि ती अत्यंत सुंदर अशा फुलांची निर्मिती करते, तसेच सुंदर, पौष्टिक गोष्टींची आणि पूर्तता देणार्या गोष्टींची उदा.फळांची निर्मिती आणि ती आपल्या डोळ्यांना, हिरवळीने थंडावा देते. जे तिच्याकडे आहे. सूर्याच्या केवळ आगमनाने पृथ्वी आपल्याला बहुविध अनेक अशा गोष्टींनी आशीर्वादित करते. असाच एक सूर्य, सहजयोगाचा आता उगवला आहे आणि कळस, अगदी कळसापर्यंत. ह्याचा तुम्हाला प्रत्यय आलाच आहे. अगदी सर्वप्रथम, मुख्य असे तुमचे मूलाधार, त्या मूलाधाराची जी शक्ती, सर्जनशील शक्ती, जी कुंडलिनी उत्थान पावली आहे. जिच्या उत्थानाने तुमच्या अस्तित्वाला एक रूप आले आहे. त्याची प्रचिती तुम्हाला पदोपदी आली आहे . तुमचे जीवनच सुंदर बनले आहे. अगदी आनंदी, आनंदाने ओथंबलेले असे तुमचे जीवन झाले आहे. आता आपण अशा एका उच्च ठिकाणी पोहोचलो आहोत जिथून तुम्हाला उंच भरारी, एक उंच झेप घ्यायची आहे. ही भरारी घेतेवेळी तुम्हाला सारासार विचार, कल्पना आणि आपल्या अटी आपल्या शत्ती ह्या सर्वांकडे आपल्याला लक्ष द्यायला हवे. तुम्ही स्वत:ला ह्या कंडिशनिंगनी घेरलेले असते. सर्व कंडिशनिंगचा आपल्यावर भडिमार झालेला असतो. ४ का ४ कळवा, ११ जानेवारी १९९० मला हे समजत नाही की ज्या गोष्टींची मूलत: काहीच किंमत नाही तरीही त्यांना आपण चिकटतो. ज्या अर्थहीन आहेत आणि ज्या नाहीशा होतात. ह्या उड्डाणात ही उंच उडी घेतेवेळी, ही झेप घेतेवेळी जी तुम्ही घेणार आहात त्यात बरेच जण पाठीमारगे टाकले जाणार आहात. ह्याचा परिणाम म्हणून कदाचित त्यातून कोणी बाहेरही पडू शकणार नाही. तेव्हा ह्या क्षणी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही स्वत:ला ध्यानामध्ये संपूर्ण समर्पित करून घ्या. सामूहिकतेत स्वत:ला झोकून द्या. दररोज तुम्ही स्वत:ला हा प्रश्न केला पाहिजे की मी सहजयोगासाठी काय केले? मी स्वत:साठी काय केले? कृपया तुम्ही स्वत: हे समजून घ्या की तुम्ही ही जी झेप घेतली आहे, जी जबाबदारी स्वीकारली आहे ती संपूर्णपणे अचूकपणे घेतली पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण तयारीत रहा हा सल्ला देते. संपूर्ण तयारीत राहणे म्हणजे ह्या उडीमध्ये, ह्या भरारीमध्ये तुम्ही स्वत:लाच कुठे हरवून बसाल किंवा काही पाठीमागे ही टाकले जाल. कारण तुम्ही स्वत:ला त्या कंडिशनिंगमधून बाहेर काढले नसेल. कंडिशनिंग अनेक प्रकारच्या आहेत. काही अज्ञानातून निर्माण होतात. काही अंधविश्वासातून आणि अशा अनेक गोष्टी ज्यामधून आपल्याला जावे लागलेले असते. कधीकधी आपल्या देशाच्या कंडिशनिंग असतात, कधी आपल्या जातीच्या, काही आपल्याच विशिष्ट शैलीतून निर्माण झालेल्या असतात आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यातून आपण दुसऱ्यांना तोलत-मोलत असतो. परंतु ५ इथे आपण स्वत:लाच तोलायला हवे, स्वत:ला सांगायला हवे की आपण स्वत: सहज संस्कृती अंगीकारली आहे. ही गोष्ट लक्षात नाही ठेवली तर खूप कठीण होऊन बसेल. जी बोट आपल्याला घेऊन जाणार-मी तुम्हाला सावध करू इच्छिते ह्याबाबत, की म्हणाल, 'माताजी, किती तरी लोक पाठीमागे राहिले आहेत.' जर तुमच्या लक्षात आले की काही लोक पाठीमागेच आहेत, त्यांना मदत करा. वस्तुस्थितीची जाणीव द्या. स्पष्ट शब्दात सांगून आणि स्पष्ट सूचना देऊन त्यांना योग्य मार्गावर ठेवा. तुम्हाला जर जाणवले की अमूक एक चुकीच्या मार्गावर आहे तर त्याला योग्य ताकीद द्या. आज ह्या क्षणी ही वेळ अटीतटीची आहे. तेव्हा तुम्ही सव्वांनी सहजयोगाला एकदम गृहीत धरू नका हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. इतर सर्व गोष्टी एखाद्या मृगजळासारख्या आहेत. ज्या तुम्हाला त्या वेळी भौतिकतेतल्या गोष्टीच बरोबर असल्यासारख्या वाटतात आणि ह्या भौतिकतेतल्या गोष्टी तुम्ही थोड्या ताब्यात ठेऊ शकता. इथे परमेश्वर पर्वा करत नाही की कोण श्रीमंत आहे, अत्यंत सुस्थितीत आहे आणि कोण गरीब आहे. तो केवळ हे बघतो की आध्यात्मिक दृष्टीने कोण किती श्रीमंत आहे. परमेश्वर हे ही बघत नाही की तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे? तुमच्याकडे किती पदव्या आहेत किंवा तुमचा दिखाऊपणा किती वगैरे. तो केवळ बघतो हे की तुम्ही किती अबोधित आहात. तुम्ही सहजयोगासाठी किती कार्य केले? तुम्ही परमेश्वरासाठी काय काम केले? तेव्हा तुम्ही तुमच्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे ह्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की सहजयोग तुम्हाला अत्यंत सूक्ष्म नजरेतून पारखत असतो. तेव्हा ह्या अखेरच्या निवाड्यात तुम्ही लोक निर्णायक ठरला आहात. परंतु पुढच्या पायरीसाठी तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक राहायला हवे, ज्यांना वाटते अगदी हृदयातून की मी सहजयोगी आहे पण ते नाही आहेत, ते पाठीमागेच राहतात ह्या शर्यतीत. तेव्हा सूर्य उगवला आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी शिखरापर्यंत पोहोचला आहे आणि ह्या काळात प्रत्येकाने ही काळजी घ्यायला हवी की जो सूर्य आपल्या सभोवताली हिरवळ पसरवितो तोच सूर्य आपल्या प्रखरतेने ओरबाडे मारतो. तेव्हा काळजीपूर्वक राहा. आपल्यामध्ये काय चुकते, आपल्यामध्ये असे जडत्व का येते, आपला मार्ग असा दुर्गम का होतोय? परंतु आतापर्यंत मी अतिशय खुष आहे, अगदी आंनदी आहे जे काही मी तुम्हाला सांगत आले, ज्या ज्या बाबतीत मी तुम्हाला मार्गदर्शन केले ते तुम्ही शांतपणे मान्य केले अगदी रोजच्या जीवनात तुम्ही त्याला ग्रहण केलेत, त्याला अमलात आणले. काही कालांतराने मला नाही वाटत की मला तुम्हाला आणखी काही सांगायची जरूर पडेल. पुढे तुम्हाला तुमच्याच प्रकाशात काय चूक आहे, काय बरोबर हे ६ বिर आपोआपच दिसायला लागेल. परंतु तरीपण मला वाटते पूजेमध्ये, संगीतात तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही तुमचे हृदय उघडे ठेवायला हवे. जर तुम्ही तुमचे हृदय उघडे ठेवले नाही तर कोणतीच गोष्ट कार्यान्वित होणार नाही. कारण ती गोष्ट तेव्हाच कार्यान्वित होते जेव्हा तुमचा आत्मा तुमच्या हृदयात असतो. तुमच्या सर्व कंडिशनिंग्ज तुमचा अहंकार पूर्णपणे गायब होईल जेव्हा तुम्ही तुमचेच ठरवाल की सहजयोगासाठी मी माझे हृदय संपूर्णपणे उघडे ठेवायला हवे. तुम्हाला अनेक आशीर्वाद ! ७ मः ला स्पष्ट कळतंय की, जेव्हा परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जर काही फार मोलाचं असतं तेव्हा दुष्ट शक्ती त्याला विलंब कसा करावा, त्यात अडथळे कसे आणावे, त्याला मार्गावरून दूर कसे करावे, त्याला हरकती कशा आणाव्या याबद्दल त्यांच्या योजना कार्यरत करतात. ते फार आश्चर्यकारक आहे. आज जर तुम्हाला मी परमेश्वरी इच्छेबद्दल काही सांगितलं आणि आपण मानव सतत त्यांच्या विरोधात जाण्याचा कसा प्रयत्न करतो हे सांगितलं तर ते फार चांगलं होईल. परमेश्वराची इच्छा आत्यंतिक साधी आहे. तो परमेश्वरी प्रेम आहे. तो करुणामय आहे. तो दया- क्षमेचा सागर आहे. त्याने हे विश्व निर्माण केले आहे आणि जीवनातील अत्युच्च गोष्ट-आनंद त्यांना देण्यासाठी नंतर त्याने मानव निर्माण केला आहे. आनंद जी फार साधी गोष्ट आहे. जिच्याकडे उसन्या आनंदाप्रमाणे 'द्वैत' नसते. परंतु आपण कसे परमेश्वर विरोधी आहोत, आनंदविरोधी आहोत आणि ते तसे का घडते ? आपली 'जाणीव' तुम्हाला माहीत आहेच, की आपल्या मेंदूमधून खालच्या बाजूकडे वाढत असते आणि जे अधोगतीकडे वाढत असते तेच आपल्याला ईश्वरापासून दूर नेते. अंतिम, आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचा आहे. परंतु प्रथम ईश्वराशी एकरूप आहोत या जाणिवेपासून थोडेसे दूर जातो. ते घेण्यासाठी स्वतंत्रता योग्यरीत्या वापरली गेली पाहिजे. त्या शिक्षणाशिवाय, ते स्वातंत्र्य समजून मानवाला देण्यात उपयोग नाही. तुम्ही स्वतंत्र देश पाहिलेले आहेत. त्यांच्या स्वातंत्र्यातून त्यांनी काय साध्य केले आहे-आपल्याला मारण्यासाठी अणुबॉम्ब! हा मूर्खपणा आहे. हा बेअकलीपणा आहे. हे असंमजस आहे. परंतु ते आम्ही केले आहे. आम्हाला त्याचा गर्व आहे आणि आमच्या नाशासाठी अधिकाधिक वाईट ते कसे बनवले जाईल म्हणून अद्याप त्या कामात गुंग आहेत. ही अशी प्रगती करत आहोत. आपल्या स्वतंत्रतेची परीक्षा घेण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी, जाणीव जी आपलीच होती, ती मानवी जाणीव आपल्याला दिली होती आणि अखेरची म्हणून, अंतिम स्वतंत्रता प्राप्त होण्यासाठी ज्यामुळे तुम्ही 'आत्मा' बनता. तुम्हाला शेवटी 'आत्मा' व्हायचे आहे, परंतु आपण आपल्या तथाकथित जाणिवेत वृद्धिंगत होण्यास सुरुवात करतो, आणि आपला संबंध आत्म्याशी नसतो. मी म्हणेन आपण वृक्षाप्रमाणे इंग्लंड, ३१/५/१९८३ दष्ट शक्ती परमश्वराचे कार्य व आहोत. जे त्याची मुळे पृथ्वीमध्ये खोलवर रुजवतात, ज्यामुळे ते उभे राहते आणि वाढते, त्याचप्रमाणे मुळे आपल्या मेंदमध्ये आहेत आणि नंतर आपण वरवर वाढू लागतो, अगदी पालवी फुटेपर्यंत, फुले उमलण्यापर्यंत आणि फळे निर्माण होईपर्यंत! परंतु उलटपक्षी, फळाच्या स्थितीपर्यंत येईपर्यंत आपलं काय होतं की आपण कृत्रिम पाने निर्माण करायला सुरुवात करतो आणि त्यातून आनंद घेतो. जेव्हा हे तादात्म्य कृत्रिमतेसह सुरु होते तेव्हा आपण सत्याकडून दुष्ट विचारांकडे सरकण्यास सुरुवात होते किंवा अती सकारात्मक विचारांकडे, जे खरोखरचे परमेश्वर विरोधी असतात कारण त्यांची धारणा आहे, की आम्ही अॅटमबाँब बनवतो आणि सर्व तसलं काही.. म्हणजे त्याच्या खरोखरच्या दोन शाखा आहेत. तशा आपल्या दोन शाखा पडतात. काही लोकांना डाव्या बाजूला जायला आवडते किंवा नकारात्मक प्रवृत्तीकडे ते स्वत:चा नाश करतात, स्वत:स त्रास करून घेतात आणि सर्व प्रकारच्या अशा गोष्टी करतात, ज्यामुळे ते मृत्यू पावतात आणि तो पण आत्यंतिक हीनदीन पद्धतीने! ते स्वत:वर सर्व प्रकारचे रोग ओढून घेतात. ते त्यांच्या देहाला यातना देतात. त्यांचेजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीला ते यातना देतात. नंतर दुसरी बाजू आहे. उजव्या हाताकडची बाजू, ज्यामध्ये ते दुसऱ्यांना यातना देण्यासाठी, दुसऱ्यांना नष्ट करण्यासाठी, दुसर्यांवर शक्ती सामर्थ्य गाजवण्यासाठी पुढे येतात. दोन्ही मार्ग परमेश्वरापासून, त्याच्या दया-क्षमेपासून आणि त्याच्या कृपेपासून दूर आहेत. शेवटपर्यंत आत्म्याशीच संबंध असला पाहिजे. तरच फक्त योग्य दिशेने आपली वाटचाल होते. मानवात हा संबंध अगदी सहजपणे तुटतो. कारण त्यांना ते करण्याचे स्वातंत्र्य आहे, आणि अहंकारात ते लोक तो संबंध पुष्कळच तोडत असतात, कारण जेव्हा तुम्ही सुखासीन जीवनाचा कृत्रिम मार्ग विकसित करता तेव्हा, 'त्याचे' अस्तित्व आहे व 'तो' एक असा आहे की जो खेळ चालवत आहे. ही परमेश्वराची चेतना हरवून जाते. आपण आपल्याबद्दल एवढे जागृत बनतो, की आपल्याला वाटते काही चुकीचे नाहीये. आपण हे करतो, आपण ते करतो आणि सर्वप्रकारच्या समस्येमध्ये बुडून जातो. जे आपण करत आहोत, ते खरोखर आपल्या विरोधातले आहे, आणि आपल्या म्हणजे परमेश्वराच्या कारण ईश्वराने आपणाला निर्माण केले आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो. आपण आपल्यावर प्रेम करत नाही. जर आपण आपल्यावर प्रेम केले असते, तर आपण आपल्या शरीराला आणि आपल्या शरीरातील संस्थांना 'चुकलं काय?' 'ते का करायचं नाही?' असे अपशब्द बोललो नसतो. तुम्ही तुमच्या या शरीरावर, या तुमच्या मनावर आणि या समाजावर प्रेम केलेच पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम केलेच पाहिजे. कारण परमेश्वराने त्याच्या प्रेमात तुम्हाला निर्माण केले आहे. परंतु 'प्रेम' अगदी विकृत शब्द झाला आहे. आताच्या गोंधळामध्ये काय चुकीचे आहे ? ते प्रेम आहे ? जर मी तुम्हाला सांगितले की ते प्रेम नाहीये, कारण ते निसर्गाच्या विरुद्ध आहे आणि ते तुम्हाला त्रास देते. तुम्ही गोंधळात अडकाल. परंतु लोकांना वाटेल की ही स्त्री पोक्त आहे. ती जुन्या वळणाची आहे आणि व्हिक्टोरिया राणीच्या काळातील आहे. ऐकून घ्या. ही सत्यस्थिती आहे. आपण ज्या नाशवंत गोष्टी आहेत, त्या का करतो ? तुम्ही स्वत: निर्माण करू शकत नाही. तुम्ही तुमच्यासाठी गुलाब देखील तयार करू शकत नाही, तर सर्व शरीर तर सोडून द्या. तर आपल्या विरुद्धच आपण का असावे, आपण समाजविरोधी का असावे, जो समाज आपणच निर्माण केला आहे किंवा संपूर्ण राष्ट्राविरुद्ध किंवा सर्व राष्ट्रांविरुद्ध का असावे, जी आपणच निर्माण केली आहेत. ते सर्व राजकारणी आज काय करत आहेत ? लढाई, कशासाठी ? त्यांचेकडे केवळ पहा. मला समजत नाही ही लढाई कशासाठी ? विध्वंसक शक्ती व फार भयानक गोष्टी निष्पाप मानवजात नष्ट करण्यासाठी निर्माण करणे, जे अगदी निष्पाप आहेत, त्यांना धमकी दिली जाते. त्यांना समजत नाही की त्यांनी उद्या का मरावे कारण काही लोकांची डोकी भ्रमिष्ट झाली आहेत आणि ज्यांची डोकी भ्रमिष्ट झाली आहेत ते आमच्या व्यवस्थेत मार्गदर्शक (सुकाणू म्हणून) आहेत. ती अशी 'नकारात्मकता' आमच्यात वाढत असते. आपण निगेटिव्ह बनतो. दोन्ही निगेटिव्ह वृत्ती आहेत कारण ते परमेश्वराचे अस्तित्व नाकारतात. परमेश्वराचे अस्तित्व नाकारणे हा प्रथम गुन्हा आहे, जो आपण केला आहे. आपण देवालाही भित नाही. परंतु तो करुणामय आहे. तो दयाक्षम आहे. तो सर्व काही आहे. तो त्याच्या दयेतच, हे जग तो नष्ट करणार आहे. तो त्याच्या विरुद्धची पापे करायला यापुढे परवानगी देणार नाही. तरी अन्य तऱ्हेने तो विनाश करतो. कॅन्सर काय आहे ? सर्व प्रकारचे हे रोग, जे आपल्या शरीरात उद्भवतात ते काय आहेत? ते फक्त आपल्या विध्वंसक शक्ती आहेत. ज्या आपण आपल्यातच तयार केल्या आहेत. आपल्या बाहेरच्या कोणत्याही ग्रहाच्या किंवा पृथ्वीबाहेरीलच्या हल्ल्याची भीती नाहीये. नाही, तसलं काहीही नाही. तो आपल्यातच आहे, जो हल्ला तयार होतो. त्याच्याबद्दल जागृत राहिले पाहिजे. स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण आपल्यातच विनाशाचे जंतू एकत्र केले आहेत. ती एवढी अंतर्गत तयार असलेली पद्धती आहे, आपणास जाणीवही नसते की हे हल्ले तिथून येत आहेत आणि ते तेथेच तयार झालेले आहेत. आम्ही आमच्याशीच, आमच्या कृत्रिम जीवनाशी, शिष्टाचाराशी आणि उथळ वागण्याच्या पद्धतीशी पूर्ण समाधानी आहोत. जन्मापासून आपल्यातच 'आत्मा' राहतो, जो तुम्हाला आत्मसाक्षात्कारी करणार आहे. शांती देणार आहे. शाश्वत सुख आणि आपल्या अस्तित्वातील आनंद देणार आहे. हा तुमच्यातील सुंदर दीपक एका हेतूने निर्मिला आहे. तो प्रज्वलित (प्रकाशित) केला पाहिजे. स्वत:स मान द्या. आजकाल 'मान' नावाचा १० शब्दच शब्दकोशात उरला नाही. स्वत:स मान द्या. या दिव्याला आपण मान दिलाच पाहिजे, त्याच्याजवळ आत्म्याचा प्रकाश आहे, आणि तो प्रकाशित केला पाहिजे. तो दिवा म्हणून राहू द्या, त्याला 'प्रभा' आहे. हे एवढे सुंदर विश्व आहे, जे ईश्वराने आमच्यासाठी निर्माण केले आहे. परंतु आम्ही आमच्या अज्ञानात, तथाकथित स्वातंत्र्यात कित्येक गोष्टी नष्ट केल्या आहेत. लोक कोठे जात आहेत-प्रत्यक्ष नरकाकडे हे पाहणे फारच धक्कादायक आहे. आई म्हणून ही गोष्ट फार संबंधित आहे. हे अध:पतन कसे थांबवावे? त्यांना त्याच्याबाहेर कसे काढावे? त्यांना त्यांची किंमत, त्यांचे मूल्य काय आहे ते कसे समजवावे? तुम्ही मानवी जीवन 'गृहीत' समजू नका. ते फार मौल्यवान जीवन आहे जे पुष्कळ पद्धतींतून निर्माण केले गेले आहे. ते मोठ्या अडचणी सोसून तयार केले आहे. विसरू नका की तुम्हाला 'आत्मा' बनायचे आहे, ज्याशिवाय तुमचे जीवन व्यर्थ आहे. नव्हे, संपूर्ण निर्मिती केवळ व्यर्थ आहे. कारण तुम्ही निर्मितीतील उच्च आहात. तुम्ही निर्मितीचे परमसार आहात. आपण कुठपर्यंत आहोत ? आपल्याला अशी अणुशक्ती तयार करायची आहे, जी परमेश्वराबद्दल उघडपणे बोलेल. मी गुंगच झाले की या देशातील लोकांना ईश्वराबद्दल बोलायला आवडत नाही. तुम्ही परमेश्वराबद्दल बोलू शकत नाही? तुम्ही अशा राज्यव्यवस्थेची कल्पना करू शकता का की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या निर्मात्याबद्दल बोलू शकत नाही किंवा समजू शकता, की धर्म म्हणजे काहीही नाही किंवा एक तुम्ही काहीशी अशाप्रकारची गुप्त संघटना तयार करावी ज्यात कुणीही एक प्रवेश करू शकत नाही आणि असं म्हणायचं की आम्ही एक ठराविक पंथाचे आहोत. ईश्वराला पंथ कसा असू शकतो ? जरा विचार करा. वेगवेगळी चर्चेस, मंदिरे आणि वेगवेगळ्या मशिदी त्याच्या कशा काय असू शकतात ? ईश्वराच्या नावांवर आम्ही धर्मवेडे कसे होऊ शकतो? तुम्हाला कल्पना आहे की हेच काय ते सर्व आपण परमेश्वराप्रत केलेले आहे. आम्ही धर्मवेडे बनलो आहोत. असा एक दगड आहे, जो ज्याला स्पर्श करतो, तो त्याचे सोने बनते. परंतु असा एक परीस असलाच पाहिजे. जेव्हा तो मानवजातीला स्पर्श करतो तेव्हा ते कैद्याप्रमाणे बनतात. ते एक कारण आहे, म्हणून इकडे इतका धर्मवेडेपणा आहे. हीच एक समस्या आहे की ही सुवार्ता आणि हा संदेश कसा लोकांपर्यंत द्यावा की तुम्ही आत्मा आहात आणि तुम्हाला आत्माच बनायचे आहे. माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी परमेश्वराची कृतज्ञ आहे -माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. कारण तो संतजनांचा देश आहे. या प्रांतात हजारो संत आहेत. ती परंपरा आहे. तो देश एवढा आध्यात्मिक आहे! अध्यात्म ही या जागेची परंपरा आहे, जेथे मी जन्मले आहे. महा म्हणजे मोठा व राष्ट्र म्हणजे देश. तेथील परंपरा आध्यात्मिकतेची आहे आणि नशाबाजीची नव्हे! तसेच अपायकारक नशिली औषधांची किंवा कोणत्याही इतर गोष्टींची नाही. या देशाची परंपरा आध्यात्मिक आहे. जेथे अगदी साधा कवी, श्री नामदेवांनी जन्म घेतलाय. ते १२ शिंपी होते. अगदी साधासुधा शिंपी! परंतु त्यांनी पुष्कळ मधुर अभंग लिहिले आहेत. मी स्पष्ट करते आहे, की ते काय म्हणतायेत, 'लहानगा मुलगा आकाशात पतंग उडवत आहे. तो आकाशाकडे पाहत आहे. तो मित्रांजवळ बोलत आहे. तो इकडे तिकडे हलतोय आणि इकडच्या तिकडच्या गोष्टींची चर्चा करतोय. परंतु त्याचे चित्त पतंगावर नेहमीच केंद्रित आहे.' नंतर ते म्हणतात, 'एका स्त्रीने तिचा लहानसा मुलगा कडेवर घेतला आहे आणि तिचे घरात सर्व काम ती करत आहे. तिच्या नवऱ्याला ती पाणी देत आहे, लहानग्या बाळाजवळ बसत आहे, जेवण करत आहे, धुणे करण्यासाठी उठत आहे. मूल तिच्या कमरेवर शांत पडून आहे. परंतु सदासर्वदा तिचे चित्त त्या बाळावर असते. एक स्त्री आहे. तिच्या माथ्यावर पाण्याचा घट आहे. ती इतर स्त्रियांबरोबर अगदी नाजूकपणे तोल सांभाळून चालत आहे. जरी त्या एकत्र चालत आहेत, हसत आहेत, स्मित करत आहेत, एकमेकींबरोबर बोलत आहेत, परंतु त्यांचे चित्त नेहमीच पाण्याच्या घटावर आहे. एका अर्थी ते चित्त आत्म्यावर आहे. याचप्रमाणे आपल्याला जीवन व्यतीत करायचे आहे. परंतु हे फार असमंजसपणाचे आहे, की आपले चित्त आपल्या आत्म्यावर असत नाही, जो जीवनातील अंतिम सत्य आहे. परंतु काहीतरी अध्यात्माबद्दल जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता, तेव्हा लोकांना वाटते, की हे पुष्कळच कवडीमोलाचे आहे, ते ऐकू सुद्धा नये. त्यांना ऐहिक गोष्टी परत परत ऐकायला पाहिजे असतात. जर ते आकाशवाणीवर क्षेपित केले, समजा काँझव्ह्हेटिव्ह पार्टी किंवा लेबर पार्टी ते तासन्तास ऐकत राहतील-असली ऐहिक बडबड. प्रत्येक वर्षी ते तुम्ही ऐकता. परंतु जर कुणी म्हणलं की, 'नाही, हे सर्व कृत्रिम आहे.' तुमच्याजवळ आतच अधिक मौल्यवान काहीतरी आहे आणि तेच ऐका. त्यांना वाटते की, या सर्व गोष्टी ऐकण्यासाठी ते आलेले नाहीत. 'ते काय आहे.' तेच जे ही आई आपल्याला सांगत आहे. परंतु आता जागृत व्हा आणि उठा. वेगवेगळ्या पातळीवर आपण समजून घेतले पाहिजे, की या लोकांनी आजपर्यंत काय केले आहे आणि आपण ते स्वीकारले आहे. वर्षानुवर्षे आपण जे गृहीत धरले आहे ते क्षितिजापलीकडील आहे. आपल्या आत एक 'तारका' प्रकाशत आहे आणि तो आपला आत्मा आहे. लोक आत्म्याबद्दल बोलले, ईश्वराबद्दल बोलत राहिले, आणखी एक पंथ बनविला त्यांनी. तो पंथ सांगत राहतो, की ते परमेश्वराचे कार्य करत आहेत या 'परमेश्वरी' कार्यात स्त्रिया त्यांच्या मांड्यांना बांधून ठेवतायेत, आणि त्यांच्या स्वत:च्या शरीराला तकाकी आणताहेत. कल्पना करा. ईश्वराच्या नावावर हा असला भयंकर प्रकार ते करत आहेत. त्याचं स्पष्टीकरण असतं ते म्हणजे, 'तुम्ही इंद्रियदमन अनुभवलेच पाहिजे! "तुम्ही स्वत:च का हे शरीरदमन करायचे?' त्यावर त्यांचे उत्तर असते, 'कारण श्री येशुंनी केलं म्हणून!' तुम्ही श्री येशू आहात का? आणि त्याचा अर्थ असा होतो, की जे जे श्री येशूनी केले ते वाया गेले. म्हणून तुमचे थोडे काही त्यात मिळविण्याची गरज होती! जे काही केले आहेत ते गरजेपेक्षा अधिक आहे कारण श्री येशू हे राजपुत्र होते आणि जर राजपुत्राला शरीरदमन सोसावे लागते, त्याबद्दल इतके मोठे असे १३ वर्षानुवर्षे आपण जे गृहीत धरले आहे ते क्षितिजापलीकडील आहे. आपल्या आति एक तारका प्रकाशत आहे आणि ती आपली आात्मी आहे. काय आहे ? त्यांनी ते पूर्वीच केले आहे. त्यांना आपल्यामध्येच प्रकाशित करायचे आहे आणि याप्रमाणे आपल्याला आपला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. सर्वात सोपी गोष्ट करायची, ती म्हणजे बसायचे व प्रश्न विचारायचे. परंतु हे सर्वोत्तम की, तुमचा आत्मसाक्षात्कार संपादन करावा. आजची तीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थातच या परिस्थितीमध्ये आपण मानव म्हणून ती फार जलदरीत्या कार्यान्वित होणार नाही. मला त्याची फार खात्री आहे. मी फार फार प्रयत्न केला आहे. पर्वताप्रमाणे तुम्हाला कुंडलिनी उठवायची आहे. ते खरोखर पर्वत उचलण्यासारखेच आहे. तुम्हाला इतके दमल्याभागल्यासारखे वाटते. परंतु त्यांना त्याची किंमत करावी असे वाटत नाही. म्हणून निराशाजनक वाटू देऊ नका. त्याबद्दल दुखावले जाऊ देऊ नका. मला खात्री आहे. हळूहळू आणि अविचलपणे तुमच्या स्वत:च्या डोळ्यातच लोक पाहतील की आनंद, शाश्वत सुख आणि ज्ञान याद्वारे तुमच्या जीवनाचे स्वरूप कसे बदलले आहे. ते पाहतील की किती प्रेमळ आणि आनंदी तुम्ही बनलेले आहात आणि नंतर ते विश्वास ठेवतीलच, की तुमचे जीवन अधिक चांगले आहे. काही लोक अशा काही वाईट स्थितीत आहेत, की ते प्रत्येक गोष्टीमध्ये 'काळे चित्र' पाहतात. ते इतके निराश आहेत, की त्यांनी सर्व सोडले आहे. त्यांनी केवळ सोडले आहे. ते आता म्हणताहेत, 'आता आम्ही ते सर्व संपवून बसलो आहोत . आम्ही प्रत्येक गोष्ट केली आहे. आता आम्हाला अधिक काही करायचे नाहीच.' मी फ्रांसमध्ये पाहिले आहे, तेथे ते जगाच्याच अध:पतन आणि जवळ येऊन ठेपलेल्या नाशाबद्दल चर्चा करत आहेत. ते चर्चा करत बसले आहेत, की चला, आता संपून जाऊ या. पुरेसे झाले आहे आपल्याला ते सर्व. आता अंतिम नाश असू द्या, जरी तो अॅटमबाब किंवा इतर अन्य काही असो. ते अगदी निराशाजनक आहेत. जे त्याबद्दल विचार करत आहेत आणि जे त्याबद्दल संबंधित आहेत, त्यांच्या अत्यंत निराशेबद्दल मी समजू शकते. मी त्याबद्दल सचिंत आहे. मी शंकीत नाही, की एखादा कुणी निराशाजनक व्हावा. कधीकधी सहजयोगी फार निराश होतात आणि अत्यंत निराशेने म्हणतात, सोडून द्या हे सर्व. आई आम्ही यामुळे अगदी संपलेलो आहोत आणि आता अधिक काही नाही उरलंय. परंतु मला माहीत नाही, की माझे चित्त आत्म्यापासून कसे दूर करावे. जर तुम्ही प्रयत्न करू ते दूर करण्याचा खूप खूप प्रयत्न करावा. परंतु तुम्ही तसं करू शकत नाही कारण तुम्हीच तेथे शकता, तर आहात. म्हणून ते काहीही असो, जेवढे अधिकाधिक शक्य आहेत, तेवढ्यांना वाचवण्यासाठी तुम्ही लढाल. म्हणून सर्व जे सहजयोगी अधूनमधून वैफल्यग्रस्त होतात. त्याबद्दल मला म्हणायचे आहे, की तुम्ही वैफल्यग्रस्त होता कामा नये. तुम्ही तुमचे धैर्य व समजुतदारपणा सांभाळायचा आहे. १४ ....वाढती निराशाजनक स्थिती आहे. या प्रत्यक्ष निराशेतूनच या पृथ्वीतलावर सहजयोगाच्या आगमनाने जन्म घेतला आहे. जर तुम्हाला दुसऱ्यांबद्दल भावना असतील आणि जर तुम्ही त्यांचेबद्दल संबंध दाखवलात तर ते लोक समजून घेतील आणि तुम्ही अधिकाधिक लोक वाचवू शकाल. बंधनमुक्त करू शकाल आणि ते परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकतील. जसे तुम्ही आनंदी आहात, तसे ते देखील आनंदी होतील. वाटेल की फक्त एक अडचण आहे, की तुम्हाला पुष्कळसे अद्याप हरवून बसले आहेत. काही हरकत नाही, तुम्हाला फार परिश्रम करायचे आहेत. तुम्ही समजून घ्यायचे आहे, की काही दुष्ट शक्ती आहेत की त्या त्यांना खाली खेचत आहेत. ते अज्ञानी आहेत आणि त्यांना माहीत नाही, की या ऐहिक संघर्षापलीकडे एक जीवन आहे. सुंदरता आणि वैभव याचे शाश्वत जीवन! परंतु मला खात्री आहे, की हळूहळू ते घटीत होणार आहे. खास करून या सभेमध्येच! त्यांना पुष्कळसे चढउतार आहेत व संपूर्ण गोष्टच नाउमेद होऊन बसली आहे. परंतु एखाद्याने अद्याप समजून घेतले पाहिजे , की परमेश्वराचे कार्य हे परमेश्वराकडून आशीर्वादित होते. तो त्याचे सर्व आशीर्वाद तुम्हाला देईल म्हणजे तुम्ही तुमची इच्छित कर्तव्ये करू शकाल. वेळ पुढे जात आहे आणि आता फार थोडा वेळ उरला आहे. तोही निघून जात आहे. आणि म्हणूनच वाढती निराशाजनक स्थिती आहे. या प्रत्यक्ष निराशेतूनच या पृथ्वीतलावर सहजयोगाच्या आगमनाने जन्म घेतला आहे. जो तुमच्या आजूबाजूला आहे असा जो वाटतोय त्या अडथळ्याबरोबर लढण्यासाठी तुम्हाला अधिक शक्तिमान वाटले पाहिजे आणि या निर्मितीचे अंतिम ध्येय घटीत केले पाहिजे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो ! १५ है पी र रु म लु ै ५ शिव हे आतम्याचे प्रतीक... अ जिकालच्या जगात जे स्थान तीर्थक्षेत्र म्हणून पवित्र मानले जाते तेच अपवित्र होऊन जाते. परिस्थिती इतकी उलटसुलट झालेली आहे, की ज्यावेळी आपण काहीतरी मूलभूत तत्त्व रुजवू इच्छितो तेव्हा ते जणू काही एखाद्या खडकात रोवलेल्या बीजांनी डोकं वर काढण्यासाठी झगडावं तसे होते. तेव्हा आपण आपली बुद्धी शाबूत ठेवून अत्यंत शांत चित्ताने आणि सुज्ञपणे अशा परिस्थितीत काय मिळवू शकतो हे बघितले पाहिजे. ही फार महत्त्वाची बाब आहे. आजचा दिवस माझ्या मते आपणा सर्वांकरिता फार मोठा दिवस आहे कारण पंढरपूर हे ठिकाण विराटच आहे. विठ्ठलाचं आहे. ह्या ठिकाणी आपल्या भक्ताला (पुंडलिकाला) भेटण्यासाठी विठ्ठल अवतीर्ण झाले होते आणि ज्यावेळी पुंडलिकाने त्यांना विटेवर उभे राहण्यास सांगितले होते त्यावेळी ते त्यावर उभे राहिले आणि असे म्हणतात, की अजूनही ते त्यावर उभे राहिले. काही लोक असे म्हणतात, की ज्या मूर्ती आपण बघतो त्या धरणी मातेतून ह्या वाळवंटात वर आलेल्या आहेत. पूंडलिक त्या बरोबर घेऊन आला आणि सांगितले की, 'ह्याच त्या मूर्ती, की ज्या मला व माझ्या मातापित्यांना भेटण्यासाठी आलेल्या होत्या. मी त्यावेळी माझ्या मातापित्यांची सेवा करण्यात गुंतलो असल्यामुळे मी फेकलेल्या विटेवर त्या उभ्या आहेत.' आता ही सर्व गोष्ट अगदी सुज्ञपणे सारासार विचार करून बघावयास पाहिजे, की परमेश्वर हा सर्व तऱ्हेचे चमत्कार करण्यास समर्थ आहे. परमेश्वरानी घडविलेले आपणही, अशा काही गोष्टी करतो की तेही चमत्कार वाटतात. जर आपण १०० वर्षापूर्वीची या जगातील परिस्थिती बघितली तर आज पुष्कळच गोष्टींबद्दल चमत्कार बघत आहोत असे आपण म्हणू शकतो. या दूरच्या स्थळी आजची ही व्यवस्था होऊ शकली म्हणून ईश्वराच्या सर्व चमत्कारांचे ४ विवरण करता येईलच असे नाही व तसे करूही नये. आपल्याला याची १०० वर्षापूर्वी जरासुद्धा कल्पना नव्हती. परंतु हे सर्व चमत्कार, परमेश्वर शक्तीचेच आहेत. याचा अर्थ आपण अत्यंत लहान अगदी अंशात्मक असे चमत्कार करणारे आहोत. मनाच्या पलीकडचे आहोत. परमेश्वर काहीही करू शकतो. तो सर्व तीनही क्षेत्रात तसेच चौथ्याही क्षेत्रात परिभ्रमण करू शकतो व वाटेल ते करू शकतो. तुम्ही रोजच्या व्यवहारातसुद्धा कित्येक चमत्कार घडतात ते पाहिले आहेत. ते कसे घडतात ते तुम्हाला समजू शकत नाही. निर्जीव वस्तूवरही त्याचा प्रभाव पडू शकतो आणि लोकांना त्याचे आश्चर्य वाटते, तेव्हा हे सर्व बघून आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवावाच लागतो, की तो परमेश्वर आहे आणि त्याला जसं वाटेल तसे तो करू शकतो. आपण काहीच नाही. परमेश्वराचे हे पंढरपूर, दि. २९ फेब्रुवारी १९८४, चमत्कार समजण्यासाठी तार्किकता असू नये. हे कसे होऊ शकते, हे कसे असेल याचे तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही मनाच्या त्या अवस्थेत अनुवादित (इंग्लिश) पोहोचाल तेव्हा तुम्ही परमेश्वर हा सर्वशक्तिमान आहे यावर विश्वास ठेवाल. परंतु हे फार कठीण आहे. आपण लोक मर्यादित असल्यामुळे परमेश्वर सर्वशक्तिमान कसा आहे हे आपणास समजू शकत नाही. हा परमेश्वर की आहे ज्यांनी आपल्याला निर्माण केले, जो आपला पालनकर्ता आहे, आपले अस्तित्व रहावे, अशी ज्याची इच्छा आणि जो प्रत्यक्षात आपले अस्तित्वच आहे तो परमेश्वर सर्व शक्तिशाली आहे. त्याला जे करण्याचे असेल ते तुमच्याबाबतीत तो करू शकतो. तो दुसरं विश्व निर्माण करू शकतो. तो ह्या विश्वाचा नाश करू शकतो. हा त्याच्या फक्त इच्छेचा खेळ आहे. शिवपूजेसाठी पंढरपुरात येण्यामागची माझी कल्पना अशी, की शिव हा आत्म्याचा प्रतीक आहे आणि तो आत्मा हा सर्वांच्या ठिकाणी हृदयात असलेला आहे. सदाशिवाचे स्थान हे तुमच्या मस्तकावर आहे. परंतु त्याचे प्रतिबिंब हे तुमच्या हृदयात आहे. तुमचा मेंदू हा विठ्ठल आहे, तेव्हा आत्म्याला तुमच्या मेंदूत आणणं म्हणजे तुमचा मेंदू प्रकाशित करणे. त्याचा अर्थ परमेश्वराला प्राप्त करून घेण्याकरिता तुमचा मर्यादित मेंदू प्रकाशित होऊन तुमच्या मेंदूची कुवत, त्याची शक्ती अमर्याद होणे याचा अर्थ तुमचा मेंदू प्रकाशित करणे असा आहे. परमेश्वराचा साक्षात्कार करून घेणे, ह्याला मी 'समजणे' हा शब्द वापरणार नाही. तो किती शक्तिमान आहे! किती महान आहे! किती अद्भूत आहे! दुसरी गोष्ट अशी की मनुष्याचा मेंदू हा निजीव वस्तूपासून निर्मिती करू शकतो. पण जेव्हा आत्मा मेंदमध्ये शिरतो तेव्हा तो जिवित गोष्टी निर्माण करू शकतो. कुंडलिनीचे जिवित कार्य एवढेच आहे, पण निजीव सजीवाप्रमाणे वागू शकतात कारण तुम्ही निजीवातील आत्म्याला स्पर्श करता. वस्तूसुद्धा ज्याप्रमाणे प्रत्येक अणू शक्तीतील केंद्रबिंदू किंवा कणामध्येसुद्धा त्या अणूचा आत्मा असतो. जेव्हा तुम्ही तुमचा आत्मा बनता तेव्हा तुम्ही निर्जीवातील आत्म्याला स्पर्श करता. तुम्ही असं म्हणा की, अणुशक्तीतील मेंदू म्हणजेच त्याचा केंद्रबिंदू, परंतु अणुशक्तीला ताब्यात ठेवतो तो त्याचा आत्मा जो त्या केंद्रबिंदूत विसावलेला असतो. तर संपूर्ण अणू म्हणजे त्याचे शरीर. हे चित्र झाले. त्याला केंद्रबिंदू आहे. हा केंद्रबिंदू आत्म्याच्या आत आहे. त्याचप्रमाणे आपले शरीर आहे. त्याला चित्त आहे आणि केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू हा मेंदू आहे आणि आत्मा हा हृदयात आहे. तेव्हा मेंद हा आत्म्याकरवी ताब्यात ठेवला जातो. कसं ते पहा, हृदयाच्या भोवती सात वलयं आहेत, ती कितीही वाढू शकतात. सात सात असे सोळा हजार वेळा गुणाकाराइतके वाढू शकतात, की जे या सात चक्रावर दृष्टी ठेवून सोळा हजारापर्यंत शक्ती वाढवू शकतात. आता हा आत्मा या वलयामधून तुमच्या मेंदूचे निरीक्षण करीत आहे, लक्षात ठेवा, निरीक्षण करीत आहे. तो मेंदूतील तुमच्या सात चक्राचे निरीक्षण करीत आहे. तो मेंदूतील सर्व नसांचेही निरीक्षण करीत आहे पण जेव्हा तुम्ही आत्म्यालाच मेंदूत आणता तेव्हा तुम्ही दोन पावलं अधिक पुढे जाता कारण जेव्हा तुमची कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती सदाशिवाला स्पर्श करते व सदाशिव ते आत्म्याला कळवितो म्हणजे आत्मा प्रतिबिंबित होतो. तेव्हा पहिली अवस्था ही, की निरीक्षण करणारी ही सात वलये तुमच्या मेंदूतील चक्राशी संपर्क साधतात आणि ती एकात्म करतात, पण जेव्हा तुम्ही आत्म्याला मेंदूत आणता ही दुसरी अवस्था होते. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी होता कारण तुमचा आत्मा हाच तुमचा मेंदू होतो. ही क्रिया फार डायनॅमिक आहे. ती मानवात पाचवे नक्षत्र (डायमेंशन) उघडते. प्रथमत: तुम्ही जेव्हा जागृत होऊन सामूहिक चेतनेत येता आणि कुंडलिनी चढवू शकता तेव्हा तुम्ही चौथे क्षेत्र ओलांडता. जेव्हा तुमचा आत्मा मेंदूत येतो तेव्हा तुम्ही पाचवे क्षेत्र बनता. म्हणजे तुम्ही कर्ते बनता. उदाहरणार्थ १८ जेव्हा आपला मेंदू हा माईक उचलावयास सांगतो तेव्हा त्याला तुम्ही स्पर्श करता व उचलता. याठिकाणी तुम्ही कर्ता होता पण जेव्हा मेंदुच आत्मा बनतो तेव्हा आत्मा हा कर्ता बनतो आणि जेव्हा आत्मा हा कर्ता होतो तेव्हा त्यात तुम्ही गुंतले जात नाही. तुम्हाला कुठल्याच गोष्टीविषयी आसक्ती रहात नाही. तुमच्याजवळ असणाऱ्या एखाद्या गोष्टीची आसक्ती वाटत नाही आणि वाटू शकतच नाही कारण आत्मा हा पूर्णतया निरासक्त आहे. तुम्हाला कशाचीही तुम्हाला आसक्ती रहात नाही. क्षणभरसुद्धा तुम्ही आसक्त नसता. आता आत्म्याची निरासक्ती समजण्यासाठी आपण आपल्या स्वत:चा अगदी प्रांजळपणाने अभ्यास करावयास हवा, की आपण कसे गुंतलो जातो ? कारण आपण आपल्या मेंदूमुळे आसक्त होतो कारण आपले सर्व संस्कार मेंदूतच साठवले जातात आणि आपला अहंकारही मेंदूतच असतो. तेव्हा सर्व भावनात्मक बंधने ही सर्व मेंदद्वारे निर्माण होतात. तेव्हा असे म्हटले जाते, की जागृतीनंतर निरासक्त राहून शिवतत्त्व अंगीकारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आता तुम्ही ही निरासक्तता कशा बाणवून घ्याल? कारण आपण आपल्या मेंदूद्वारे अर्थात चित्ताद्वारे काही गोष्टींच्या प्रेमात असतो तेव्हा आपण चित्ताला काबूत ठेवायचे म्हणजे, 'चित्तनिरोध' अंगीकारावा. म्हणजे चित्त कोठे जात आहे इकडे लक्ष ठेवावे. सहजयोगात तुम्हाला तुमची प्रगती करावयाची असल्यास तुमची स्वत:ची यंत्रणा सुधारावयास हवी. दुसऱ्याची नाही ही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावयास पाहिजे. आता तुम्ही फक्त तुमच्या चित्तावर लक्ष ठेवा. ते कुठे जात आहे ? स्वत: लक्ष ठेवा. जसं जसं तुम्ही स्वत: आपल्या चित्ताचं निरीक्षण करावयास लागाल तसं तसं तुम्ही आत्म्याशी एकरूप होऊ शकाल कारण जर तुम्हाला चित्ताचं निरीक्षण करावयाचे असेल तर तुम्हाला तुमचा आत्मा व्हावं लागेल. नाहीतर तुम्ही कसे निरीक्षण कराल ? तेव्हा तुम्ही बघा, तुमचं चित्त कुठं जात आहे. सर्वप्रथम तुमची आसक्ती स्थूल गोष्टीवर असते, शारीरिक. शिवाला शरीराची आसक्ती नाही. तो कुठेही झोपणार. तो स्मशानात जाऊन झोपणार कारण तो सर्वांपासून अलिप्त आहे. तो भूतपिशाच्चाने पछाडत नाही किंवा कशानेच नाही. तो अगदीच मुक्त आहे. तुमच्या निरासक्ततेतून तुम्ही तुमच्या आसक्तीचे निरीक्षण करावयास पाहिजे. आता तुमचा आत्मा जरी मेंदूत शिरला नसला , परंतु तुम्ही जागृत आहात तेव्हा काय करायला पाहिजे, की कमीत कमी तुमच्या चित्तावर लक्ष ठेवा, तुमचं चित्त कुठं जात आहे हे अगदी स्पष्टपणे निरखू शकता, चित्ताला आवरणं म्हणजे ह्या गोष्टीतून लक्ष काढून त्या गोष्टीकडे वळवणं तुमच्या आयुष्यातील गोष्टीचे प्राधान्य बदला. हे सर्व तुम्ही जागृत झाल्यानंतर करावयास पाहिजे. अगदी पूर्णपणे सर्व बंधनातून मुक्त व्हावयास पाहिजे. शरीराला आराम पाहिजे तर तो कमी करा. त्यामुळेच तुम्ही लोक हिमालयात जात असत. ह्या पंढरपुरात येण्यासही कितीतरी अडचणी आल्या तेव्हा हिमालयात जाण्याची कल्पना करा. तेव्हा जागृतीनंतर ते त्यांचं हे शरीर हिमालयात नेत असत आणि शरीराला ह्या सगळ्या अडचणीतून नेऊन एक प्रकारची तपश्चर्या करीत असत. त्याचप्रमाणे तुम्ही ही तपश्चर्या केली पाहिजे. शरीराची सुखलोलुपता आता हळूहळू कमी करावयास पाहिजे. शिवाला तो कैलासात असला काय किंवा स्मशानात असला काय किंवा कोठेही असले तर त्यांना सर्व सारखेच. तुमचं चित्तं कुठं आहे? मानवी चित्त हे अगदीच टाकाऊ आहे. फारच गुंतलेले व मूर्खपणाचे आहे. 'हे केलं का ? ' तर ते यासाठी. अशा तऱ्हेचं कारण सर्वांना असते. तेव्हा कुठलेच स्पष्टीकरण देण्याची जरुरी नाही किंवा विचारण्याची जरुरी नाही. स्पष्टीकरणाशिवाय राहणे अत्यंत चांगली गोष्ट आहे. साध्या हिंदीत म्हणायचं झालं तर 'जैसे राखवू तैसेहि राह'. ज्या स्थितीत मला ठेवशील त्या स्थितीत मी आनंदाने राहीन. पुढे याच कवितेत कबीरांनी सांगितले आहे, की तू १९ मला हत्तीवर जावयास लाव, मी जाईन. जर पायाने चालायला लावलं तरी चालेन. 'जैसे राखहू तैसे ही रहूं.' तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया नाही. प्रथम स्पष्टीकरण नाही आणि आता प्रतिक्रिया नाही. दुसरे खाण्याबाबतचे. खाण्यात अजिबात चित्त असता कामा नये. जनावराप्रमाणेच मानवाचेसुद्धा प्रथम लक्ष खाण्यात. तसं पाहता सकाळी काय खाल्लं हे ही लक्षात असू नये. परंतु आपण उद्या काय खाणार याचा विचार करतो. आपण अन्न हे शरीर चालविण्यासाठी खात नसून जिभेच्या स्वादासाठी खातो. एकदा का तुम्हाला कळलं की भोगविलास हा अत्यंत स्थूल, अगदी स्थूल स्वरूपाचे चित्त आहे, की कळेल की कोणत्याही प्रकारचा भोगविलास हा अगदी हीन प्रकारचे फक्त इंद्रियांना होणारे सुख आहे. इंद्रियलोलूप आहे. अतिशय वरवरचे आहे, परंतु जेव्हा मी म्हणते, की सुख नको, याचा अर्थ तुम्ही गंभीर होऊन जणू काही सूतकात आहात असे होता कामा नये. परंतु तुम्ही शिवासारखे झाले पाहिजे. तितके निरासक्त! शिवजी अत्यंत जोरात धावत असलेल्या नंदीवर बसून त्यांच्या लग्नाला आले. नंदीवर ते दोन्ही पाय एका बाजूस सोडून बसले होते व नंदी अत्यंत जोरात धावत होता. त्यांनी त्याला धरून ठेवले होते. त्यांचेबरोबर कोणाला नाक नाही तर कोणाला डोळा नाही अशा तऱ्हेचे अत्यंत विचित्र लोक होते. त्यांची पत्नी पार्वती मात्र अत्यंत ओशाळली कारण सर्व लोक शिवाच्या विचित्रपणाच्या वागण्याबद्दल बोलत होते. परंतु शिव मात्र नि:शंक होते. त्यांच्या प्रतिष्ठेबद्दल त्यांना जराही तमा नव्हती परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही हिप्पी व्हावं. हाच मोठा प्रश्न आहे. एकदा का तुम्ही त्या विचारात गेलात की तुम्ही हिप्पी होता. बऱ्याच लोकांत असा विश्वास आहे, की शिवासारखे वागले, की तुम्ही शिव होता. बरेच लोक असे समजतात, की तुम्ही गांजा घेतलात, की तुम्ही शिव होता. शिव गांजा घेत होते कारण त्यांना जगातून तशा प्रकारच्या सर्व गोष्टी नष्ट करायच्या होत्या. गांजा असो, की काहीही असो, त्याचा प्रश्न कोठे येतो ? काहीही दिले तरी त्यांना नशा येत नसे, प्रश्नच उरत नाही. शिव कोणत्याही गोष्टीला बांधील नव्हते. त्यांना असे वाटते, शिवासारखे राहिले, की शिवासारखे होता येते. ते प्रत्येक बाबतीत निरासक्त होते. स्वत:चे दिसण्याबद्दल त्यांना अजिबात पर्वा नव्हती. ते जसे दिसत होते तसेच सुंदर होते. शिवाला काही करण्याची आवश्यकता नव्हती. तेव्हा कोणत्याही गोष्टीला चिकटून राहणे हे कुरूपतेचे लक्षण आहे. मूर्खपणा आहे. तुम्ही पाहिजे तसा पेहेराव करू शकता आणि जरी तुम्ही अत्यंत साध्या पेहेरावात असलात तरीसुद्धा तुमची भव्यता दिसू शकते, परंतु जर तुम्ही असे समजलात की ठीक आहे मग अशा परिस्थितीत एकच चादर गुडाळून वावरू या, तर ते तसे नाही. तुमच्या आत्म्यातून तुमच्यात निर्माण होणारे सौंदर्य तुम्हाला जी शक्ती देते, की त्यामुळे जो काय पेहेराव कराल त्यांनी तुमच्या सौंदर्यात काहीच फरक पडणार नाही व ते सौंदर्य कायम राहील. परंतु तुम्ही ती स्थिती गाठली आहे का? ज्यावेळी तुमचा आत्मा तुमच्या मेंदूत शिरतो तेव्हाच ती स्थिती तुम्ही मिळवू शकता. अहंकारी लोकांच्या बाबतीत ते फार कठीण आहे आणि म्हणूनच ते कशाचाही आनंद उपभोगू शकत नाहीत आणि एवढ्या तेवढ्या कारणांनी ते कोलमडून पडतात आणि आनंदाचा उगम जो आत्मा, जो प्रगट होत नाही, येत नाही. आनंद हेच सौंदर्य आहे, परंतु ती अवस्था मिळवावी लागते. आसक्ती ही अनेक मार्गांनी येते. आसक्ती थोडीशी जरी ठेवली तरी लगेच येते. तुमच्या कुटुंबाचे प्रेम, माझ्या मुलांचे काय होईल, माझ्या नवर्याचे काय होईल, माझ्या आईचे काय होईल, माझ्या बायकोचे काय होईल ? हे आणि ते अगदी मूर्खपणा आहे. तुमचे वडील कोण आणि आई कोण? तुमचा नवरा कोण व तुमची बायको कोण? शिवाना या गोष्टीच माहीत नाहीत. ते आणि त्यांची शक्ती अविभक्त आहे. तेव्हा शिव हे एकच व्यक्तित्व आहे. तेथे द्वैत नाही, जेव्हा द्वैत असतं तेव्हा तुम्ही 'माझी बायको' असं म्हणणार, माझं नाक, माझा कान, माझं माझं याचा अर्थ काय? जोपर्यंत माझं माझं २० कराल, द्वैत खोलवर जाईल, पण जेव्हा मी म्हणते की, 'मीच नाक आहे' तेव्हा द्वैत नाही. शिव हीच शक्ती आहे आणि शक्ती म्हणजे शिव, तिथे द्वैत नाही. परंतु आपण नेहमीच द्वैतात राहिल्यामुळे सतत आसक्ती येते. जर द्वैत नसले तर आसक्ती कुठं आहे ? जर तुम्हीच उजेड व तुम्हीच दिवा असाल तर द्वैत कुठे आहे ? जर तुम्हीच चंद्र व तुम्हीच प्रकाश असाल तर द्वैत कुठे आहे? तुम्हीच सूर्य व तुम्हीच प्रकाश, तुम्हीच शब्द आणि तुम्हीच अर्थ, तर द्वैत कुठे आहे ? पण जेव्हा या दोन्ही गोष्टी निराळ्या होतात तेव्हां तिथे द्वैत आलं आणि निराळेपणाने आसक्ती येते, पण तुम्हीच ते झालात तर तुम्ही त्याला बांधील कसं असणार? तेव्हा तुम्हाला हे कळतं का ? तुम्ही व तुमचे यांत वेगळेपण व अंतर असल्यामुळे तुम्ही त्याच्या बंधनात अडकता. तो मीच आहे, मग दुसरा कोण? सर्व विश्व मीच आहे, तर मग वेगळे कोण? परंतु ही नुसती बुद्धीची फेक नाही किंवा अहंकारातून निघालेली बुद्धीची झेप नाही. तेव्हां दुसरा कोणीच नाही. जेव्हा तुमचा आत्मा तुमच्या मेंदूत येईल तेव्हाच हे शक्य आहे. मग तुम्ही त्या विराटाचेच एक अंग बनता. मी जसं सांगितलं की विराट म्हणजेच मेंद. तेव्हा तुम्ही जे कराल, तुम्ही राग दाखवा, करुणा दाखवा, काहीही दाखवा तो आत्माच सर्व काही व्यक्त करीत असतो कारण मेंदूचे वेगळे अस्तित्व राहत नाही. मर्यादित असलेली बुद्धी आता अमर्याद आत्मा झालेली आहे. त्या गोष्टीला उदाहरण कसे द्यावयाचे हे मला समजत नाही. परंतु ह्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर समुद्रात रंग टाकला तर समुद्र काही रंगीत होत नाही. नीट समजण्याचा प्रयत्न करा. परंतु अत्यंत थोडा रंग समुद्रात टाकला तर रंगाचे अस्तित्व पूर्णपणे नाहीसे होते. आता दुसर्या बाजूने विचार करा, पण जर समुद्रच रंगीत असला तर तो वातावरणात फेकला काय किंवा कोणत्याही लहान भागावर किंवा अणूरेणूत टाकला काय, तर ते सर्व काही रंगीत होऊन जाईल. तेव्हा आत्मा हा प्रकाश असलेल्या समुद्रासारखा आहे. जेव्हा हा समुद्र तुमच्या मेंदूच्या लहानशा कपात ओतला जातो तेव्हा त्या कपाचे अस्तित्व राहत नाही आणि सर्व काही आत्माच बनते. तुम्ही अगदी प्रत्येक गोष्ट आत्मामय बनवू शकता. ज्याला तुम्ही स्पर्श कराल ते होईल. वाळू आत्मामय होईल, ग्रह-तारे प्रत्येक गोष्ट आत्मामय होईल. तेव्हा आत्मा हा सागर आहे आणि तुमचा मेंदू हा मर्यादित आहे. तेव्हा तुमच्या या मर्यादित मेंदूतील आसक्ती नष्ट केली पाहिजे. तेव्हा तुमच्या मेंदूच्या मर्यादा तोडल्या पाहिजेत म्हणजे जेव्हा हा सागर तुमच्या मेंदूत भरतो, तेव्हा तो लहानसा कप फुटेल आणि त्याचा प्रत्येक कण नी कण रंगीत होऊन जाईल, मग सर्व वातावरण काय तुम्ही बघाल ते सर्व काही, सर्व वातावरण रंगीबेरंगी बनेल. आत्म्याचा प्रकाशच आत्म्याचा रंग आहे आणि आत्म्याचा प्रकाशच काम करतो, घडवितो, विचार करतो, सर्व काही करतो. मी आज शिवततत्व तुमच्या मेंदूत आणण्याचं ठरविलं. सर्वात प्रथम म्हणजे तुमचा मेंदू शिवतत्त्वाकडे घेऊन जाण्यासाठी तुमच्या मेंदूलाच विचारा की, 'तू कुठे जात आहेस?' चित्त ह्यात घ्याल, त्यात घ्याल आणि निष्कारण त्यात गुंतून राहता, तेव्हा सर्वांतून मुक्त व्हा. ह्या उपाधी सोडा. आपलं चित्त सर्वांतून काढा आणि फक्त मेंदू बना. पूर्णपणे निरासक्त बना. हा मुक्त झालेला मेंदू आत्म्याच्या रंगांनी पूर्णपणे भरून टाका. ते आपोआप घडेल. जोपर्यंत तुमच्या चित्तावर मर्यादा आहेत तोपर्यंत ते घडणार नाही. तेव्हा प्रत्येकाने स्वतंत्रपणे अगदी निष्ठेने ही तपस्या करावयास पाहिजे. अगदी प्रत्येकाने. मी तुमच्याबरोबर आहेच. तेव्हा असे पहाता पूजेचीही आवश्यकता नाही. परंतु ती स्थिती मिळवायला पाहिजे आणि म्हणून ती स्थिती येण्यासाठी पूजेची आवश्यकता आहे. मला आशा आहे की, तुमच्यातील बरेच जण ह्यातील शिवतत्त्व व्हाल, परंतु मी तुम्हाला हालअपेष्टात रहावयास सांगत नाही. अशा तऱ्हेच्या प्रगतीमध्ये कष्ट नाहीत. जेव्हा तुम्ही समजाल, की ही संपूर्ण आनंदाची स्थिती आहे, तेव्हाच तुम्ही 'निरानंद' व्हाल, त्या आनंदाला सहस्रारात हे नाव आहे आणि तुम्हाला माहीत आहे, की तुमच्या आईचं नांव 'निरा' आहे, तुम्ही निरानंद होता. २१ आजच्या या शिवपूजेला वेगळाच अर्थ आहे. मला वाटतं की जे आपण बाह्यातून करतो, वरच्या थरांतून करतो ते सूक्ष्मातही घडेल. मी तुमचा आत्मा तुमच्या मेंदूत सारण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु तुमचं चित्तच अजून गुंतलेले असल्यामुळे मला ते थोडं थोडं कठीण दिसते. तुमचा राग, लोभ, वासना , होण्याचा हावरेपणा सार्यापासून मुक्त प्रयत्न करा. सर्व काही कमी करा. आज मी वॉरेन यांना सांगितले, की त्या लोकांना कमी खाण्यास सांगा. आधाशासारखं खाऊ नका. एखादेवेळी मेजवानीत तुम्ही जास्त खाल. परंतु, प्रत्येकवेळी काही तुम्ही तसं खाऊ नका. हे सहजयोग्याचं लक्षण नाही. स्वत:वर ताबा ठेवा. मला माहीत आहे, तुमच्यापैकी काही लोक विशेष करू शकणार नाहीत ते ठीक आहे. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगेन आणि मदतही करीन. परंतु तुमच्यातील बरेचजण करू शकतील आणि तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हा आजपासून हा सहजयोग खोलात सूक्ष्मात आपण सुरू करू. तुमच्यातील काही तितके खोल काही जाणार नाहीत, परंतु पुष्कळांनी जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जवळजवळ प्रत्येकानेच. तुम्ही त्याकरिता जास्त शिक्षित किंवा अत्यंत सुखवस्तू असावयास पाहिजे असं अजिबात नाही. परंतु जे लोक समर्पित होऊन श्रद्धेने ध्यान धारणा करतात ते सूक्ष्मात जातात कारण ते इतर सहजयोगाकरता जणू काही अत्यंत खोलवर जाणारी पहिली मुळेच आहेत, की जेणेकरून इतर सहजयोगी त्यांचे पाठोपाठ जाऊ शकतील. आजच्या पूजेकरता श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणूया. यावेळी पाय वगैरे धुण्याची आवश्यकता नाही. फक्त गणेश अथर्वशीर्ष म्हणा. शिव कायमच स्वच्छ, शुद्ध व निर्मळ आहेत, जे निर्मळ आहे त्याला काय स्वच्छ करणार? कोणी म्हणेल, की माताजी आम्ही जेव्हा आपले चरण धुतो तेव्हा आम्हाला पाण्यात आपल्या चैतन्य लहरी मिळतात. परंतु यावेळी सर्व काही इतके निरासक्त आहे, की या अवस्थेत हे सर्व धुऊन टाकलेले आहे, स्वच्छ केलेले आहे, की तेव्हा धुण्याची आवश्यकता नाही. नंतर आपण देवी पूजन करू कारण गौरी जी कुमारिका आहे तिची पूजा करू. आपण तिची १०१ नावे म्हणू आणि नंतर शिवाची पूजा करू. मी एका भाषणात याबद्दल सर्व काही सांगू शकत नाही. परंतु निरासक्तीही तुमच्या जागृतीमध्येच तुमच्यात यावयास हवी. शरणागती म्हणजे काय? काहीच नाही कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आसक्तीतून मुक्त होता तेव्हा आपोआपच तुम्ही शरण जाता. जेव्हा तुम्ही कशाला चिकटून बसता तेव्हा तुम्ही शरण आलेले नसता. मला शरण जाऊन तुम्ही काय देणार? मी अगदी निरिच्छ आहे. मला हे काहीही समजत नाही. मला तुमच्यापासून काय मिळवायचं आहे ? काहीही नाही. मी अतिशय निरिच्छ आहे. तेव्हां आज आपण अशी प्रार्थना करू की, 'हे परमेश्वरा , आम्हाला शक्ती दे आणि जे सर्वात जास्त आकर्षक किंवा सर्व आकर्षणाचा उगम आहे ते दे की ज्याच्यामुळे इतर सर्व सुखे ऐषाराम वाढविणारा आनंद, वगैरेंची आकर्षणे सोडून देऊन आम्ही पूर्णपणे शुद्ध आनंद हेच ज्याचे रूप आहे अशा शिवतत्त्वात जाऊ.' मला वाटतं , की मी इथे का आले आहे व आजचा दिवस का मोठा आहे हे स्पष्ट केलं पाहिजे. आज जे तुम्ही इथे आहात ते विशेषकरून नशीबवान लोक आहात की आजच हे भाषण ऐकण्यासाठी व इथे उपस्थित राहण्यासाठी परमेश्वराने दयाळू होऊन तुमची निवड मुद्दाम केली आहे आणि एकदा का तुम्ही निरासक्त व निरोगी झालात, की तुम्हांस एक जबाबदार व अभियुक्त झाल्याचं जाणवावयास लागेल. जबाबदारी ही अहंकार निर्माण करणारी नाही तर ती स्वत:च सिद्ध होणारी, व्यक्त होणारी, प्रगट होणारी अशी असेल. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद ! २२ NEW RELEASES Title Date Place Lang. Type ACD DVD 11th Feb.1983 486 Mahashivratri Puja (Part 1 & 2) 330* Delhi Sp/Pu E 331* 18th Jan.1983 M/E Puja in Nasik (Part 1 & 2) Nasik Sp/Pu श्री भूमीदेवी पूजा 4th Feb.1985 Sp/Pu| 327 M Pune श्री महाशिवरात्री पूजा ( भाग १ व २) 488* 8th Mar.1986 332 Sp/Pu Pune 17th Dec.1989 484° Alibag 323 Alibag Puja : Advice to Sahajayogis Sp E 29th Dec.1991 324' 485* Shri Mahalakshmi Puja Alibag M/E Sp/Pu st 322 21* Mar.2010 Puja Birthday Puja (Part 1 & 2) Cabella Music| 328 20/21-3-2010 Cabella Birthday Puja Evening Pro.(Part 1-2) 5th Nov.2010 Abhay Sapori-Santoor Vadan & Diwali Pujan 334 Noida Music 1st Dec.2010 Music| 325* Bhavarpan Noida 26, 30h Nov. & Jaipur & Noida Visit 2010 (Part 1 & 2) | Jaipur & 326 Pu/Mu 4th Dec.2010 Noida Bhajan Title Artist Song List ACD ACS Bhavarpan 171* Abhijit Ghoshal प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in २३ आमचे मुख्य कार्य संपूर्ण विश्वातील लोकांचे सहस्रार उघडणे हे आहे. है कार्य अत्यंत सरळ, साधे आहे. आणि हे म्ही करू शकता तसेच जर तुम्ही है कार्य तु हं० हि सामूहिक स्वरूपात केले तर ते जास्त प्रभावी होईल. चांगल्या प्रकारे जर तुम्ही सामूहिक असाल तर याला खूप कार्यान्वित करू शकता. ० पु. कवी ---------------------- 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-0.txt मराठी जानेवारी-फेब्रुवारी २०११ राढ ७ कह 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-1.txt ग्री ु तुम्ही मला कोठेही बघू शकाल. तुम्ही एखाद्या रस्त्याने (गल्लीतून) जीते असाल आणि अचानक तुम्हीली श्रीमातीजी तुमच्या बरीबर येईल. तर हे (सहजयोगाचे) दुसरे युग सुरु असल्याचे आठळून झाले आहे. आणि तुम्ही आश्चर्यचकित होऊ नकी जर मी तुमच्या गादीवर बसून, तुमच्या डीक्यावरून होते फिरवतांना दिसले किंवा मी तुम्हाला येश् ख्रिस्ताच्या रूपात तुमच्या खोलीत चालत येतांना दिसले. तसेच श्री रामाच्या रूपात ही तुम्हीला दिसेन. हे सगळे तर घडणारचे आहे. तर यासाठी तुम्हाला तयार असले पाहिजे. - ५ मे १९८४ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-2.txt SVNNN या अंकात ऐक सूर्य : सहजयोगाची ....४ VANNN परमात्म्याचे कार्य वे दुष्टे शक्ती ...८ NAYN शिव हे आत्म्याचे प्रतीक .... १६ 9& SVAVM 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-3.txt ॐँ ु एक स्ं २हजयोगा चा = अ जचा दिवस भारतात आपल्याला साजरा करण्याजोगा आहे कारण सूर्य हा आता मकरवृत्तात आहे आणि मकरवृत्तातून तो कर्कवृत्ताकडे येतो. जेव्हा सूर्य हा पृथ्वीकडे परत येतो तेव्हा ह्या धरणीमातेची संपूर्ण सर्जनशीलता पुन्हा कार्यान्वित होते आणि ती अत्यंत सुंदर अशा फुलांची निर्मिती करते, तसेच सुंदर, पौष्टिक गोष्टींची आणि पूर्तता देणार्या गोष्टींची उदा.फळांची निर्मिती आणि ती आपल्या डोळ्यांना, हिरवळीने थंडावा देते. जे तिच्याकडे आहे. सूर्याच्या केवळ आगमनाने पृथ्वी आपल्याला बहुविध अनेक अशा गोष्टींनी आशीर्वादित करते. असाच एक सूर्य, सहजयोगाचा आता उगवला आहे आणि कळस, अगदी कळसापर्यंत. ह्याचा तुम्हाला प्रत्यय आलाच आहे. अगदी सर्वप्रथम, मुख्य असे तुमचे मूलाधार, त्या मूलाधाराची जी शक्ती, सर्जनशील शक्ती, जी कुंडलिनी उत्थान पावली आहे. जिच्या उत्थानाने तुमच्या अस्तित्वाला एक रूप आले आहे. त्याची प्रचिती तुम्हाला पदोपदी आली आहे . तुमचे जीवनच सुंदर बनले आहे. अगदी आनंदी, आनंदाने ओथंबलेले असे तुमचे जीवन झाले आहे. आता आपण अशा एका उच्च ठिकाणी पोहोचलो आहोत जिथून तुम्हाला उंच भरारी, एक उंच झेप घ्यायची आहे. ही भरारी घेतेवेळी तुम्हाला सारासार विचार, कल्पना आणि आपल्या अटी आपल्या शत्ती ह्या सर्वांकडे आपल्याला लक्ष द्यायला हवे. तुम्ही स्वत:ला ह्या कंडिशनिंगनी घेरलेले असते. सर्व कंडिशनिंगचा आपल्यावर भडिमार झालेला असतो. ४ का 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-4.txt ४ कळवा, ११ जानेवारी १९९० मला हे समजत नाही की ज्या गोष्टींची मूलत: काहीच किंमत नाही तरीही त्यांना आपण चिकटतो. ज्या अर्थहीन आहेत आणि ज्या नाहीशा होतात. ह्या उड्डाणात ही उंच उडी घेतेवेळी, ही झेप घेतेवेळी जी तुम्ही घेणार आहात त्यात बरेच जण पाठीमारगे टाकले जाणार आहात. ह्याचा परिणाम म्हणून कदाचित त्यातून कोणी बाहेरही पडू शकणार नाही. तेव्हा ह्या क्षणी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही स्वत:ला ध्यानामध्ये संपूर्ण समर्पित करून घ्या. सामूहिकतेत स्वत:ला झोकून द्या. दररोज तुम्ही स्वत:ला हा प्रश्न केला पाहिजे की मी सहजयोगासाठी काय केले? मी स्वत:साठी काय केले? कृपया तुम्ही स्वत: हे समजून घ्या की तुम्ही ही जी झेप घेतली आहे, जी जबाबदारी स्वीकारली आहे ती संपूर्णपणे अचूकपणे घेतली पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण तयारीत रहा हा सल्ला देते. संपूर्ण तयारीत राहणे म्हणजे ह्या उडीमध्ये, ह्या भरारीमध्ये तुम्ही स्वत:लाच कुठे हरवून बसाल किंवा काही पाठीमागे ही टाकले जाल. कारण तुम्ही स्वत:ला त्या कंडिशनिंगमधून बाहेर काढले नसेल. कंडिशनिंग अनेक प्रकारच्या आहेत. काही अज्ञानातून निर्माण होतात. काही अंधविश्वासातून आणि अशा अनेक गोष्टी ज्यामधून आपल्याला जावे लागलेले असते. कधीकधी आपल्या देशाच्या कंडिशनिंग असतात, कधी आपल्या जातीच्या, काही आपल्याच विशिष्ट शैलीतून निर्माण झालेल्या असतात आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यातून आपण दुसऱ्यांना तोलत-मोलत असतो. परंतु ५ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-5.txt इथे आपण स्वत:लाच तोलायला हवे, स्वत:ला सांगायला हवे की आपण स्वत: सहज संस्कृती अंगीकारली आहे. ही गोष्ट लक्षात नाही ठेवली तर खूप कठीण होऊन बसेल. जी बोट आपल्याला घेऊन जाणार-मी तुम्हाला सावध करू इच्छिते ह्याबाबत, की म्हणाल, 'माताजी, किती तरी लोक पाठीमागे राहिले आहेत.' जर तुमच्या लक्षात आले की काही लोक पाठीमागेच आहेत, त्यांना मदत करा. वस्तुस्थितीची जाणीव द्या. स्पष्ट शब्दात सांगून आणि स्पष्ट सूचना देऊन त्यांना योग्य मार्गावर ठेवा. तुम्हाला जर जाणवले की अमूक एक चुकीच्या मार्गावर आहे तर त्याला योग्य ताकीद द्या. आज ह्या क्षणी ही वेळ अटीतटीची आहे. तेव्हा तुम्ही सव्वांनी सहजयोगाला एकदम गृहीत धरू नका हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. इतर सर्व गोष्टी एखाद्या मृगजळासारख्या आहेत. ज्या तुम्हाला त्या वेळी भौतिकतेतल्या गोष्टीच बरोबर असल्यासारख्या वाटतात आणि ह्या भौतिकतेतल्या गोष्टी तुम्ही थोड्या ताब्यात ठेऊ शकता. इथे परमेश्वर पर्वा करत नाही की कोण श्रीमंत आहे, अत्यंत सुस्थितीत आहे आणि कोण गरीब आहे. तो केवळ हे बघतो की आध्यात्मिक दृष्टीने कोण किती श्रीमंत आहे. परमेश्वर हे ही बघत नाही की तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे? तुमच्याकडे किती पदव्या आहेत किंवा तुमचा दिखाऊपणा किती वगैरे. तो केवळ बघतो हे की तुम्ही किती अबोधित आहात. तुम्ही सहजयोगासाठी किती कार्य केले? तुम्ही परमेश्वरासाठी काय काम केले? तेव्हा तुम्ही तुमच्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे ह्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की सहजयोग तुम्हाला अत्यंत सूक्ष्म नजरेतून पारखत असतो. तेव्हा ह्या अखेरच्या निवाड्यात तुम्ही लोक निर्णायक ठरला आहात. परंतु पुढच्या पायरीसाठी तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक राहायला हवे, ज्यांना वाटते अगदी हृदयातून की मी सहजयोगी आहे पण ते नाही आहेत, ते पाठीमागेच राहतात ह्या शर्यतीत. तेव्हा सूर्य उगवला आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी शिखरापर्यंत पोहोचला आहे आणि ह्या काळात प्रत्येकाने ही काळजी घ्यायला हवी की जो सूर्य आपल्या सभोवताली हिरवळ पसरवितो तोच सूर्य आपल्या प्रखरतेने ओरबाडे मारतो. तेव्हा काळजीपूर्वक राहा. आपल्यामध्ये काय चुकते, आपल्यामध्ये असे जडत्व का येते, आपला मार्ग असा दुर्गम का होतोय? परंतु आतापर्यंत मी अतिशय खुष आहे, अगदी आंनदी आहे जे काही मी तुम्हाला सांगत आले, ज्या ज्या बाबतीत मी तुम्हाला मार्गदर्शन केले ते तुम्ही शांतपणे मान्य केले अगदी रोजच्या जीवनात तुम्ही त्याला ग्रहण केलेत, त्याला अमलात आणले. काही कालांतराने मला नाही वाटत की मला तुम्हाला आणखी काही सांगायची जरूर पडेल. पुढे तुम्हाला तुमच्याच प्रकाशात काय चूक आहे, काय बरोबर हे ६ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-6.txt বिर आपोआपच दिसायला लागेल. परंतु तरीपण मला वाटते पूजेमध्ये, संगीतात तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही तुमचे हृदय उघडे ठेवायला हवे. जर तुम्ही तुमचे हृदय उघडे ठेवले नाही तर कोणतीच गोष्ट कार्यान्वित होणार नाही. कारण ती गोष्ट तेव्हाच कार्यान्वित होते जेव्हा तुमचा आत्मा तुमच्या हृदयात असतो. तुमच्या सर्व कंडिशनिंग्ज तुमचा अहंकार पूर्णपणे गायब होईल जेव्हा तुम्ही तुमचेच ठरवाल की सहजयोगासाठी मी माझे हृदय संपूर्णपणे उघडे ठेवायला हवे. तुम्हाला अनेक आशीर्वाद ! ७ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-7.txt मः ला स्पष्ट कळतंय की, जेव्हा परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जर काही फार मोलाचं असतं तेव्हा दुष्ट शक्ती त्याला विलंब कसा करावा, त्यात अडथळे कसे आणावे, त्याला मार्गावरून दूर कसे करावे, त्याला हरकती कशा आणाव्या याबद्दल त्यांच्या योजना कार्यरत करतात. ते फार आश्चर्यकारक आहे. आज जर तुम्हाला मी परमेश्वरी इच्छेबद्दल काही सांगितलं आणि आपण मानव सतत त्यांच्या विरोधात जाण्याचा कसा प्रयत्न करतो हे सांगितलं तर ते फार चांगलं होईल. परमेश्वराची इच्छा आत्यंतिक साधी आहे. तो परमेश्वरी प्रेम आहे. तो करुणामय आहे. तो दया- क्षमेचा सागर आहे. त्याने हे विश्व निर्माण केले आहे आणि जीवनातील अत्युच्च गोष्ट-आनंद त्यांना देण्यासाठी नंतर त्याने मानव निर्माण केला आहे. आनंद जी फार साधी गोष्ट आहे. जिच्याकडे उसन्या आनंदाप्रमाणे 'द्वैत' नसते. परंतु आपण कसे परमेश्वर विरोधी आहोत, आनंदविरोधी आहोत आणि ते तसे का घडते ? आपली 'जाणीव' तुम्हाला माहीत आहेच, की आपल्या मेंदूमधून खालच्या बाजूकडे वाढत असते आणि जे अधोगतीकडे वाढत असते तेच आपल्याला ईश्वरापासून दूर नेते. अंतिम, आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचा आहे. परंतु प्रथम ईश्वराशी एकरूप आहोत या जाणिवेपासून थोडेसे दूर जातो. ते घेण्यासाठी स्वतंत्रता योग्यरीत्या वापरली गेली पाहिजे. त्या शिक्षणाशिवाय, ते स्वातंत्र्य समजून मानवाला देण्यात उपयोग नाही. तुम्ही स्वतंत्र देश पाहिलेले आहेत. त्यांच्या स्वातंत्र्यातून त्यांनी काय साध्य केले आहे-आपल्याला मारण्यासाठी अणुबॉम्ब! हा मूर्खपणा आहे. हा बेअकलीपणा आहे. हे असंमजस आहे. परंतु ते आम्ही केले आहे. आम्हाला त्याचा गर्व आहे आणि आमच्या नाशासाठी अधिकाधिक वाईट ते कसे बनवले जाईल म्हणून अद्याप त्या कामात गुंग आहेत. ही अशी प्रगती करत आहोत. आपल्या स्वतंत्रतेची परीक्षा घेण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी, जाणीव जी आपलीच होती, ती मानवी जाणीव आपल्याला दिली होती आणि अखेरची म्हणून, अंतिम स्वतंत्रता प्राप्त होण्यासाठी ज्यामुळे तुम्ही 'आत्मा' बनता. तुम्हाला शेवटी 'आत्मा' व्हायचे आहे, परंतु आपण आपल्या तथाकथित जाणिवेत वृद्धिंगत होण्यास सुरुवात करतो, आणि आपला संबंध आत्म्याशी नसतो. मी म्हणेन आपण वृक्षाप्रमाणे इंग्लंड, ३१/५/१९८३ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-8.txt दष्ट शक्ती परमश्वराचे कार्य व आहोत. जे त्याची मुळे पृथ्वीमध्ये खोलवर रुजवतात, ज्यामुळे ते उभे राहते आणि वाढते, त्याचप्रमाणे मुळे आपल्या मेंदमध्ये आहेत आणि नंतर आपण वरवर वाढू लागतो, अगदी पालवी फुटेपर्यंत, फुले उमलण्यापर्यंत आणि फळे निर्माण होईपर्यंत! परंतु उलटपक्षी, फळाच्या स्थितीपर्यंत येईपर्यंत आपलं काय होतं की आपण कृत्रिम पाने निर्माण करायला सुरुवात करतो आणि त्यातून आनंद घेतो. जेव्हा हे तादात्म्य कृत्रिमतेसह सुरु होते तेव्हा आपण सत्याकडून दुष्ट विचारांकडे सरकण्यास सुरुवात होते किंवा अती सकारात्मक विचारांकडे, जे खरोखरचे परमेश्वर विरोधी असतात कारण त्यांची धारणा आहे, की आम्ही अॅटमबाँब बनवतो आणि सर्व तसलं काही.. म्हणजे त्याच्या खरोखरच्या दोन शाखा आहेत. तशा आपल्या दोन शाखा पडतात. काही लोकांना डाव्या बाजूला जायला आवडते किंवा नकारात्मक प्रवृत्तीकडे ते स्वत:चा नाश करतात, स्वत:स त्रास करून घेतात आणि सर्व प्रकारच्या अशा गोष्टी करतात, ज्यामुळे ते मृत्यू पावतात आणि तो पण आत्यंतिक हीनदीन पद्धतीने! ते स्वत:वर सर्व प्रकारचे रोग ओढून घेतात. ते त्यांच्या देहाला यातना देतात. त्यांचेजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीला ते यातना देतात. नंतर दुसरी बाजू आहे. उजव्या हाताकडची बाजू, ज्यामध्ये ते दुसऱ्यांना यातना देण्यासाठी, दुसऱ्यांना नष्ट करण्यासाठी, दुसर्यांवर शक्ती सामर्थ्य गाजवण्यासाठी पुढे येतात. दोन्ही मार्ग परमेश्वरापासून, त्याच्या दया-क्षमेपासून आणि त्याच्या कृपेपासून दूर आहेत. शेवटपर्यंत आत्म्याशीच संबंध असला पाहिजे. तरच फक्त योग्य दिशेने आपली वाटचाल होते. मानवात हा संबंध अगदी सहजपणे तुटतो. कारण त्यांना ते करण्याचे स्वातंत्र्य आहे, आणि अहंकारात ते लोक तो संबंध पुष्कळच तोडत असतात, कारण जेव्हा तुम्ही सुखासीन जीवनाचा कृत्रिम मार्ग विकसित करता तेव्हा, 'त्याचे' अस्तित्व आहे व 'तो' एक असा आहे की जो खेळ चालवत आहे. ही परमेश्वराची चेतना हरवून जाते. आपण आपल्याबद्दल एवढे जागृत बनतो, की आपल्याला वाटते काही चुकीचे नाहीये. आपण हे करतो, आपण ते करतो आणि सर्वप्रकारच्या समस्येमध्ये बुडून जातो. जे आपण करत आहोत, ते खरोखर आपल्या विरोधातले आहे, आणि आपल्या म्हणजे परमेश्वराच्या कारण ईश्वराने आपणाला निर्माण केले आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो. आपण आपल्यावर प्रेम करत नाही. जर आपण आपल्यावर प्रेम केले असते, तर आपण आपल्या शरीराला आणि आपल्या शरीरातील संस्थांना 'चुकलं काय?' 'ते का करायचं नाही?' असे अपशब्द बोललो नसतो. तुम्ही तुमच्या या 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-9.txt शरीरावर, या तुमच्या मनावर आणि या समाजावर प्रेम केलेच पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम केलेच पाहिजे. कारण परमेश्वराने त्याच्या प्रेमात तुम्हाला निर्माण केले आहे. परंतु 'प्रेम' अगदी विकृत शब्द झाला आहे. आताच्या गोंधळामध्ये काय चुकीचे आहे ? ते प्रेम आहे ? जर मी तुम्हाला सांगितले की ते प्रेम नाहीये, कारण ते निसर्गाच्या विरुद्ध आहे आणि ते तुम्हाला त्रास देते. तुम्ही गोंधळात अडकाल. परंतु लोकांना वाटेल की ही स्त्री पोक्त आहे. ती जुन्या वळणाची आहे आणि व्हिक्टोरिया राणीच्या काळातील आहे. ऐकून घ्या. ही सत्यस्थिती आहे. आपण ज्या नाशवंत गोष्टी आहेत, त्या का करतो ? तुम्ही स्वत: निर्माण करू शकत नाही. तुम्ही तुमच्यासाठी गुलाब देखील तयार करू शकत नाही, तर सर्व शरीर तर सोडून द्या. तर आपल्या विरुद्धच आपण का असावे, आपण समाजविरोधी का असावे, जो समाज आपणच निर्माण केला आहे किंवा संपूर्ण राष्ट्राविरुद्ध किंवा सर्व राष्ट्रांविरुद्ध का असावे, जी आपणच निर्माण केली आहेत. ते सर्व राजकारणी आज काय करत आहेत ? लढाई, कशासाठी ? त्यांचेकडे केवळ पहा. मला समजत नाही ही लढाई कशासाठी ? विध्वंसक शक्ती व फार भयानक गोष्टी निष्पाप मानवजात नष्ट करण्यासाठी निर्माण करणे, जे अगदी निष्पाप आहेत, त्यांना धमकी दिली जाते. त्यांना समजत नाही की त्यांनी उद्या का मरावे कारण काही लोकांची डोकी भ्रमिष्ट झाली आहेत आणि ज्यांची डोकी भ्रमिष्ट झाली आहेत ते आमच्या व्यवस्थेत मार्गदर्शक (सुकाणू म्हणून) आहेत. ती अशी 'नकारात्मकता' आमच्यात वाढत असते. आपण निगेटिव्ह बनतो. दोन्ही निगेटिव्ह वृत्ती आहेत कारण ते परमेश्वराचे अस्तित्व नाकारतात. परमेश्वराचे अस्तित्व नाकारणे हा प्रथम गुन्हा आहे, जो आपण केला आहे. आपण देवालाही भित नाही. परंतु तो करुणामय आहे. तो दयाक्षम आहे. तो सर्व काही आहे. तो त्याच्या दयेतच, हे जग तो नष्ट करणार आहे. तो त्याच्या विरुद्धची पापे करायला यापुढे परवानगी देणार नाही. तरी अन्य तऱ्हेने तो विनाश करतो. कॅन्सर काय आहे ? सर्व प्रकारचे हे रोग, जे आपल्या शरीरात उद्भवतात ते काय आहेत? ते फक्त आपल्या विध्वंसक शक्ती आहेत. ज्या आपण आपल्यातच तयार केल्या आहेत. आपल्या बाहेरच्या कोणत्याही ग्रहाच्या किंवा पृथ्वीबाहेरीलच्या हल्ल्याची भीती नाहीये. नाही, तसलं काहीही नाही. तो आपल्यातच आहे, जो हल्ला तयार होतो. त्याच्याबद्दल जागृत राहिले पाहिजे. स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण आपल्यातच विनाशाचे जंतू एकत्र केले आहेत. ती एवढी अंतर्गत तयार असलेली पद्धती आहे, आपणास जाणीवही नसते की हे हल्ले तिथून येत आहेत आणि ते तेथेच तयार झालेले आहेत. आम्ही आमच्याशीच, आमच्या कृत्रिम जीवनाशी, शिष्टाचाराशी आणि उथळ वागण्याच्या पद्धतीशी पूर्ण समाधानी आहोत. जन्मापासून आपल्यातच 'आत्मा' राहतो, जो तुम्हाला आत्मसाक्षात्कारी करणार आहे. शांती देणार आहे. शाश्वत सुख आणि आपल्या अस्तित्वातील आनंद देणार आहे. हा तुमच्यातील सुंदर दीपक एका हेतूने निर्मिला आहे. तो प्रज्वलित (प्रकाशित) केला पाहिजे. स्वत:स मान द्या. आजकाल 'मान' नावाचा १० 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-11.txt शब्दच शब्दकोशात उरला नाही. स्वत:स मान द्या. या दिव्याला आपण मान दिलाच पाहिजे, त्याच्याजवळ आत्म्याचा प्रकाश आहे, आणि तो प्रकाशित केला पाहिजे. तो दिवा म्हणून राहू द्या, त्याला 'प्रभा' आहे. हे एवढे सुंदर विश्व आहे, जे ईश्वराने आमच्यासाठी निर्माण केले आहे. परंतु आम्ही आमच्या अज्ञानात, तथाकथित स्वातंत्र्यात कित्येक गोष्टी नष्ट केल्या आहेत. लोक कोठे जात आहेत-प्रत्यक्ष नरकाकडे हे पाहणे फारच धक्कादायक आहे. आई म्हणून ही गोष्ट फार संबंधित आहे. हे अध:पतन कसे थांबवावे? त्यांना त्याच्याबाहेर कसे काढावे? त्यांना त्यांची किंमत, त्यांचे मूल्य काय आहे ते कसे समजवावे? तुम्ही मानवी जीवन 'गृहीत' समजू नका. ते फार मौल्यवान जीवन आहे जे पुष्कळ पद्धतींतून निर्माण केले गेले आहे. ते मोठ्या अडचणी सोसून तयार केले आहे. विसरू नका की तुम्हाला 'आत्मा' बनायचे आहे, ज्याशिवाय तुमचे जीवन व्यर्थ आहे. नव्हे, संपूर्ण निर्मिती केवळ व्यर्थ आहे. कारण तुम्ही निर्मितीतील उच्च आहात. तुम्ही निर्मितीचे परमसार आहात. आपण कुठपर्यंत आहोत ? आपल्याला अशी अणुशक्ती तयार करायची आहे, जी परमेश्वराबद्दल उघडपणे बोलेल. मी गुंगच झाले की या देशातील लोकांना ईश्वराबद्दल बोलायला आवडत नाही. तुम्ही परमेश्वराबद्दल बोलू शकत नाही? तुम्ही अशा राज्यव्यवस्थेची कल्पना करू शकता का की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या निर्मात्याबद्दल बोलू शकत नाही किंवा समजू शकता, की धर्म म्हणजे काहीही नाही किंवा एक तुम्ही काहीशी अशाप्रकारची गुप्त संघटना तयार करावी ज्यात कुणीही एक प्रवेश करू शकत नाही आणि असं म्हणायचं की आम्ही एक ठराविक पंथाचे आहोत. ईश्वराला पंथ कसा असू शकतो ? जरा विचार करा. वेगवेगळी चर्चेस, मंदिरे आणि वेगवेगळ्या मशिदी त्याच्या कशा काय असू शकतात ? ईश्वराच्या नावांवर आम्ही धर्मवेडे कसे होऊ शकतो? तुम्हाला कल्पना आहे की हेच काय ते सर्व आपण परमेश्वराप्रत केलेले आहे. आम्ही धर्मवेडे बनलो आहोत. असा एक दगड आहे, जो ज्याला स्पर्श करतो, तो त्याचे सोने बनते. परंतु असा एक परीस असलाच पाहिजे. जेव्हा तो मानवजातीला स्पर्श करतो तेव्हा ते कैद्याप्रमाणे बनतात. ते एक कारण आहे, म्हणून इकडे इतका धर्मवेडेपणा आहे. हीच एक समस्या आहे की ही सुवार्ता आणि हा संदेश कसा लोकांपर्यंत द्यावा की तुम्ही आत्मा आहात आणि तुम्हाला आत्माच बनायचे आहे. माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी परमेश्वराची कृतज्ञ आहे -माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. कारण तो संतजनांचा देश आहे. या प्रांतात हजारो संत आहेत. ती परंपरा आहे. तो देश एवढा आध्यात्मिक आहे! अध्यात्म ही या जागेची परंपरा आहे, जेथे मी जन्मले आहे. महा म्हणजे मोठा व राष्ट्र म्हणजे देश. तेथील परंपरा आध्यात्मिकतेची आहे आणि नशाबाजीची नव्हे! तसेच अपायकारक नशिली औषधांची किंवा कोणत्याही इतर गोष्टींची नाही. या देशाची परंपरा आध्यात्मिक आहे. जेथे अगदी साधा कवी, श्री नामदेवांनी जन्म घेतलाय. ते १२ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-12.txt शिंपी होते. अगदी साधासुधा शिंपी! परंतु त्यांनी पुष्कळ मधुर अभंग लिहिले आहेत. मी स्पष्ट करते आहे, की ते काय म्हणतायेत, 'लहानगा मुलगा आकाशात पतंग उडवत आहे. तो आकाशाकडे पाहत आहे. तो मित्रांजवळ बोलत आहे. तो इकडे तिकडे हलतोय आणि इकडच्या तिकडच्या गोष्टींची चर्चा करतोय. परंतु त्याचे चित्त पतंगावर नेहमीच केंद्रित आहे.' नंतर ते म्हणतात, 'एका स्त्रीने तिचा लहानसा मुलगा कडेवर घेतला आहे आणि तिचे घरात सर्व काम ती करत आहे. तिच्या नवऱ्याला ती पाणी देत आहे, लहानग्या बाळाजवळ बसत आहे, जेवण करत आहे, धुणे करण्यासाठी उठत आहे. मूल तिच्या कमरेवर शांत पडून आहे. परंतु सदासर्वदा तिचे चित्त त्या बाळावर असते. एक स्त्री आहे. तिच्या माथ्यावर पाण्याचा घट आहे. ती इतर स्त्रियांबरोबर अगदी नाजूकपणे तोल सांभाळून चालत आहे. जरी त्या एकत्र चालत आहेत, हसत आहेत, स्मित करत आहेत, एकमेकींबरोबर बोलत आहेत, परंतु त्यांचे चित्त नेहमीच पाण्याच्या घटावर आहे. एका अर्थी ते चित्त आत्म्यावर आहे. याचप्रमाणे आपल्याला जीवन व्यतीत करायचे आहे. परंतु हे फार असमंजसपणाचे आहे, की आपले चित्त आपल्या आत्म्यावर असत नाही, जो जीवनातील अंतिम सत्य आहे. परंतु काहीतरी अध्यात्माबद्दल जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता, तेव्हा लोकांना वाटते, की हे पुष्कळच कवडीमोलाचे आहे, ते ऐकू सुद्धा नये. त्यांना ऐहिक गोष्टी परत परत ऐकायला पाहिजे असतात. जर ते आकाशवाणीवर क्षेपित केले, समजा काँझव्ह्हेटिव्ह पार्टी किंवा लेबर पार्टी ते तासन्तास ऐकत राहतील-असली ऐहिक बडबड. प्रत्येक वर्षी ते तुम्ही ऐकता. परंतु जर कुणी म्हणलं की, 'नाही, हे सर्व कृत्रिम आहे.' तुमच्याजवळ आतच अधिक मौल्यवान काहीतरी आहे आणि तेच ऐका. त्यांना वाटते की, या सर्व गोष्टी ऐकण्यासाठी ते आलेले नाहीत. 'ते काय आहे.' तेच जे ही आई आपल्याला सांगत आहे. परंतु आता जागृत व्हा आणि उठा. वेगवेगळ्या पातळीवर आपण समजून घेतले पाहिजे, की या लोकांनी आजपर्यंत काय केले आहे आणि आपण ते स्वीकारले आहे. वर्षानुवर्षे आपण जे गृहीत धरले आहे ते क्षितिजापलीकडील आहे. आपल्या आत एक 'तारका' प्रकाशत आहे आणि तो आपला आत्मा आहे. लोक आत्म्याबद्दल बोलले, ईश्वराबद्दल बोलत राहिले, आणखी एक पंथ बनविला त्यांनी. तो पंथ सांगत राहतो, की ते परमेश्वराचे कार्य करत आहेत या 'परमेश्वरी' कार्यात स्त्रिया त्यांच्या मांड्यांना बांधून ठेवतायेत, आणि त्यांच्या स्वत:च्या शरीराला तकाकी आणताहेत. कल्पना करा. ईश्वराच्या नावावर हा असला भयंकर प्रकार ते करत आहेत. त्याचं स्पष्टीकरण असतं ते म्हणजे, 'तुम्ही इंद्रियदमन अनुभवलेच पाहिजे! "तुम्ही स्वत:च का हे शरीरदमन करायचे?' त्यावर त्यांचे उत्तर असते, 'कारण श्री येशुंनी केलं म्हणून!' तुम्ही श्री येशू आहात का? आणि त्याचा अर्थ असा होतो, की जे जे श्री येशूनी केले ते वाया गेले. म्हणून तुमचे थोडे काही त्यात मिळविण्याची गरज होती! जे काही केले आहेत ते गरजेपेक्षा अधिक आहे कारण श्री येशू हे राजपुत्र होते आणि जर राजपुत्राला शरीरदमन सोसावे लागते, त्याबद्दल इतके मोठे असे १३ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-13.txt वर्षानुवर्षे आपण जे गृहीत धरले आहे ते क्षितिजापलीकडील आहे. आपल्या आति एक तारका प्रकाशत आहे आणि ती आपली आात्मी आहे. काय आहे ? त्यांनी ते पूर्वीच केले आहे. त्यांना आपल्यामध्येच प्रकाशित करायचे आहे आणि याप्रमाणे आपल्याला आपला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. सर्वात सोपी गोष्ट करायची, ती म्हणजे बसायचे व प्रश्न विचारायचे. परंतु हे सर्वोत्तम की, तुमचा आत्मसाक्षात्कार संपादन करावा. आजची तीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थातच या परिस्थितीमध्ये आपण मानव म्हणून ती फार जलदरीत्या कार्यान्वित होणार नाही. मला त्याची फार खात्री आहे. मी फार फार प्रयत्न केला आहे. पर्वताप्रमाणे तुम्हाला कुंडलिनी उठवायची आहे. ते खरोखर पर्वत उचलण्यासारखेच आहे. तुम्हाला इतके दमल्याभागल्यासारखे वाटते. परंतु त्यांना त्याची किंमत करावी असे वाटत नाही. म्हणून निराशाजनक वाटू देऊ नका. त्याबद्दल दुखावले जाऊ देऊ नका. मला खात्री आहे. हळूहळू आणि अविचलपणे तुमच्या स्वत:च्या डोळ्यातच लोक पाहतील की आनंद, शाश्वत सुख आणि ज्ञान याद्वारे तुमच्या जीवनाचे स्वरूप कसे बदलले आहे. ते पाहतील की किती प्रेमळ आणि आनंदी तुम्ही बनलेले आहात आणि नंतर ते विश्वास ठेवतीलच, की तुमचे जीवन अधिक चांगले आहे. काही लोक अशा काही वाईट स्थितीत आहेत, की ते प्रत्येक गोष्टीमध्ये 'काळे चित्र' पाहतात. ते इतके निराश आहेत, की त्यांनी सर्व सोडले आहे. त्यांनी केवळ सोडले आहे. ते आता म्हणताहेत, 'आता आम्ही ते सर्व संपवून बसलो आहोत . आम्ही प्रत्येक गोष्ट केली आहे. आता आम्हाला अधिक काही करायचे नाहीच.' मी फ्रांसमध्ये पाहिले आहे, तेथे ते जगाच्याच अध:पतन आणि जवळ येऊन ठेपलेल्या नाशाबद्दल चर्चा करत आहेत. ते चर्चा करत बसले आहेत, की चला, आता संपून जाऊ या. पुरेसे झाले आहे आपल्याला ते सर्व. आता अंतिम नाश असू द्या, जरी तो अॅटमबाब किंवा इतर अन्य काही असो. ते अगदी निराशाजनक आहेत. जे त्याबद्दल विचार करत आहेत आणि जे त्याबद्दल संबंधित आहेत, त्यांच्या अत्यंत निराशेबद्दल मी समजू शकते. मी त्याबद्दल सचिंत आहे. मी शंकीत नाही, की एखादा कुणी निराशाजनक व्हावा. कधीकधी सहजयोगी फार निराश होतात आणि अत्यंत निराशेने म्हणतात, सोडून द्या हे सर्व. आई आम्ही यामुळे अगदी संपलेलो आहोत आणि आता अधिक काही नाही उरलंय. परंतु मला माहीत नाही, की माझे चित्त आत्म्यापासून कसे दूर करावे. जर तुम्ही प्रयत्न करू ते दूर करण्याचा खूप खूप प्रयत्न करावा. परंतु तुम्ही तसं करू शकत नाही कारण तुम्हीच तेथे शकता, तर आहात. म्हणून ते काहीही असो, जेवढे अधिकाधिक शक्य आहेत, तेवढ्यांना वाचवण्यासाठी तुम्ही लढाल. म्हणून सर्व जे सहजयोगी अधूनमधून वैफल्यग्रस्त होतात. त्याबद्दल मला म्हणायचे आहे, की तुम्ही वैफल्यग्रस्त होता कामा नये. तुम्ही तुमचे धैर्य व समजुतदारपणा सांभाळायचा आहे. १४ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-14.txt ....वाढती निराशाजनक स्थिती आहे. या प्रत्यक्ष निराशेतूनच या पृथ्वीतलावर सहजयोगाच्या आगमनाने जन्म घेतला आहे. जर तुम्हाला दुसऱ्यांबद्दल भावना असतील आणि जर तुम्ही त्यांचेबद्दल संबंध दाखवलात तर ते लोक समजून घेतील आणि तुम्ही अधिकाधिक लोक वाचवू शकाल. बंधनमुक्त करू शकाल आणि ते परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकतील. जसे तुम्ही आनंदी आहात, तसे ते देखील आनंदी होतील. वाटेल की फक्त एक अडचण आहे, की तुम्हाला पुष्कळसे अद्याप हरवून बसले आहेत. काही हरकत नाही, तुम्हाला फार परिश्रम करायचे आहेत. तुम्ही समजून घ्यायचे आहे, की काही दुष्ट शक्ती आहेत की त्या त्यांना खाली खेचत आहेत. ते अज्ञानी आहेत आणि त्यांना माहीत नाही, की या ऐहिक संघर्षापलीकडे एक जीवन आहे. सुंदरता आणि वैभव याचे शाश्वत जीवन! परंतु मला खात्री आहे, की हळूहळू ते घटीत होणार आहे. खास करून या सभेमध्येच! त्यांना पुष्कळसे चढउतार आहेत व संपूर्ण गोष्टच नाउमेद होऊन बसली आहे. परंतु एखाद्याने अद्याप समजून घेतले पाहिजे , की परमेश्वराचे कार्य हे परमेश्वराकडून आशीर्वादित होते. तो त्याचे सर्व आशीर्वाद तुम्हाला देईल म्हणजे तुम्ही तुमची इच्छित कर्तव्ये करू शकाल. वेळ पुढे जात आहे आणि आता फार थोडा वेळ उरला आहे. तोही निघून जात आहे. आणि म्हणूनच वाढती निराशाजनक स्थिती आहे. या प्रत्यक्ष निराशेतूनच या पृथ्वीतलावर सहजयोगाच्या आगमनाने जन्म घेतला आहे. जो तुमच्या आजूबाजूला आहे असा जो वाटतोय त्या अडथळ्याबरोबर लढण्यासाठी तुम्हाला अधिक शक्तिमान वाटले पाहिजे आणि या निर्मितीचे अंतिम ध्येय घटीत केले पाहिजे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो ! १५ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-15.txt है पी र रु म लु ै ५ शिव हे आतम्याचे प्रतीक... 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-16.txt अ जिकालच्या जगात जे स्थान तीर्थक्षेत्र म्हणून पवित्र मानले जाते तेच अपवित्र होऊन जाते. परिस्थिती इतकी उलटसुलट झालेली आहे, की ज्यावेळी आपण काहीतरी मूलभूत तत्त्व रुजवू इच्छितो तेव्हा ते जणू काही एखाद्या खडकात रोवलेल्या बीजांनी डोकं वर काढण्यासाठी झगडावं तसे होते. तेव्हा आपण आपली बुद्धी शाबूत ठेवून अत्यंत शांत चित्ताने आणि सुज्ञपणे अशा परिस्थितीत काय मिळवू शकतो हे बघितले पाहिजे. ही फार महत्त्वाची बाब आहे. आजचा दिवस माझ्या मते आपणा सर्वांकरिता फार मोठा दिवस आहे कारण पंढरपूर हे ठिकाण विराटच आहे. विठ्ठलाचं आहे. ह्या ठिकाणी आपल्या भक्ताला (पुंडलिकाला) भेटण्यासाठी विठ्ठल अवतीर्ण झाले होते आणि ज्यावेळी पुंडलिकाने त्यांना विटेवर उभे राहण्यास सांगितले होते त्यावेळी ते त्यावर उभे राहिले आणि असे म्हणतात, की अजूनही ते त्यावर उभे राहिले. काही लोक असे म्हणतात, की ज्या मूर्ती आपण बघतो त्या धरणी मातेतून ह्या वाळवंटात वर आलेल्या आहेत. पूंडलिक त्या बरोबर घेऊन आला आणि सांगितले की, 'ह्याच त्या मूर्ती, की ज्या मला व माझ्या मातापित्यांना भेटण्यासाठी आलेल्या होत्या. मी त्यावेळी माझ्या मातापित्यांची सेवा करण्यात गुंतलो असल्यामुळे मी फेकलेल्या विटेवर त्या उभ्या आहेत.' आता ही सर्व गोष्ट अगदी सुज्ञपणे सारासार विचार करून बघावयास पाहिजे, की परमेश्वर हा सर्व तऱ्हेचे चमत्कार करण्यास समर्थ आहे. परमेश्वरानी घडविलेले आपणही, अशा काही गोष्टी करतो की तेही चमत्कार वाटतात. जर आपण १०० वर्षापूर्वीची या जगातील परिस्थिती बघितली तर आज पुष्कळच गोष्टींबद्दल चमत्कार बघत आहोत असे आपण म्हणू शकतो. या दूरच्या स्थळी आजची ही व्यवस्था होऊ शकली म्हणून ईश्वराच्या सर्व चमत्कारांचे ४ विवरण करता येईलच असे नाही व तसे करूही नये. आपल्याला याची १०० वर्षापूर्वी जरासुद्धा कल्पना नव्हती. परंतु हे सर्व चमत्कार, परमेश्वर शक्तीचेच आहेत. याचा अर्थ आपण अत्यंत लहान अगदी अंशात्मक असे चमत्कार करणारे आहोत. मनाच्या पलीकडचे आहोत. परमेश्वर काहीही करू शकतो. तो सर्व तीनही क्षेत्रात तसेच चौथ्याही क्षेत्रात परिभ्रमण करू शकतो व वाटेल ते करू शकतो. तुम्ही रोजच्या व्यवहारातसुद्धा कित्येक चमत्कार घडतात ते पाहिले आहेत. ते कसे घडतात ते तुम्हाला समजू शकत नाही. निर्जीव वस्तूवरही त्याचा प्रभाव पडू शकतो आणि लोकांना त्याचे आश्चर्य वाटते, तेव्हा हे सर्व बघून आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवावाच लागतो, की तो परमेश्वर आहे आणि त्याला जसं वाटेल तसे तो करू शकतो. आपण काहीच नाही. परमेश्वराचे हे पंढरपूर, दि. २९ फेब्रुवारी १९८४, चमत्कार समजण्यासाठी तार्किकता असू नये. हे कसे होऊ शकते, हे कसे असेल याचे तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही मनाच्या त्या अवस्थेत अनुवादित (इंग्लिश) 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-17.txt पोहोचाल तेव्हा तुम्ही परमेश्वर हा सर्वशक्तिमान आहे यावर विश्वास ठेवाल. परंतु हे फार कठीण आहे. आपण लोक मर्यादित असल्यामुळे परमेश्वर सर्वशक्तिमान कसा आहे हे आपणास समजू शकत नाही. हा परमेश्वर की आहे ज्यांनी आपल्याला निर्माण केले, जो आपला पालनकर्ता आहे, आपले अस्तित्व रहावे, अशी ज्याची इच्छा आणि जो प्रत्यक्षात आपले अस्तित्वच आहे तो परमेश्वर सर्व शक्तिशाली आहे. त्याला जे करण्याचे असेल ते तुमच्याबाबतीत तो करू शकतो. तो दुसरं विश्व निर्माण करू शकतो. तो ह्या विश्वाचा नाश करू शकतो. हा त्याच्या फक्त इच्छेचा खेळ आहे. शिवपूजेसाठी पंढरपुरात येण्यामागची माझी कल्पना अशी, की शिव हा आत्म्याचा प्रतीक आहे आणि तो आत्मा हा सर्वांच्या ठिकाणी हृदयात असलेला आहे. सदाशिवाचे स्थान हे तुमच्या मस्तकावर आहे. परंतु त्याचे प्रतिबिंब हे तुमच्या हृदयात आहे. तुमचा मेंदू हा विठ्ठल आहे, तेव्हा आत्म्याला तुमच्या मेंदूत आणणं म्हणजे तुमचा मेंदू प्रकाशित करणे. त्याचा अर्थ परमेश्वराला प्राप्त करून घेण्याकरिता तुमचा मर्यादित मेंदू प्रकाशित होऊन तुमच्या मेंदूची कुवत, त्याची शक्ती अमर्याद होणे याचा अर्थ तुमचा मेंदू प्रकाशित करणे असा आहे. परमेश्वराचा साक्षात्कार करून घेणे, ह्याला मी 'समजणे' हा शब्द वापरणार नाही. तो किती शक्तिमान आहे! किती महान आहे! किती अद्भूत आहे! दुसरी गोष्ट अशी की मनुष्याचा मेंदू हा निजीव वस्तूपासून निर्मिती करू शकतो. पण जेव्हा आत्मा मेंदमध्ये शिरतो तेव्हा तो जिवित गोष्टी निर्माण करू शकतो. कुंडलिनीचे जिवित कार्य एवढेच आहे, पण निजीव सजीवाप्रमाणे वागू शकतात कारण तुम्ही निजीवातील आत्म्याला स्पर्श करता. वस्तूसुद्धा ज्याप्रमाणे प्रत्येक अणू शक्तीतील केंद्रबिंदू किंवा कणामध्येसुद्धा त्या अणूचा आत्मा असतो. जेव्हा तुम्ही तुमचा आत्मा बनता तेव्हा तुम्ही निर्जीवातील आत्म्याला स्पर्श करता. तुम्ही असं म्हणा की, अणुशक्तीतील मेंदू म्हणजेच त्याचा केंद्रबिंदू, परंतु अणुशक्तीला ताब्यात ठेवतो तो त्याचा आत्मा जो त्या केंद्रबिंदूत विसावलेला असतो. तर संपूर्ण अणू म्हणजे त्याचे शरीर. हे चित्र झाले. त्याला केंद्रबिंदू आहे. हा केंद्रबिंदू आत्म्याच्या आत आहे. त्याचप्रमाणे आपले शरीर आहे. त्याला चित्त आहे आणि केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू हा मेंदू आहे आणि आत्मा हा हृदयात आहे. तेव्हा मेंद हा आत्म्याकरवी ताब्यात ठेवला जातो. कसं ते पहा, हृदयाच्या भोवती सात वलयं आहेत, ती कितीही वाढू शकतात. सात सात असे सोळा हजार वेळा गुणाकाराइतके वाढू शकतात, की जे या सात चक्रावर दृष्टी ठेवून सोळा हजारापर्यंत शक्ती वाढवू शकतात. आता हा आत्मा या वलयामधून तुमच्या मेंदूचे निरीक्षण करीत आहे, लक्षात ठेवा, निरीक्षण करीत आहे. तो मेंदूतील तुमच्या सात चक्राचे निरीक्षण करीत आहे. तो मेंदूतील सर्व नसांचेही निरीक्षण करीत आहे पण जेव्हा तुम्ही आत्म्यालाच मेंदूत आणता तेव्हा तुम्ही दोन पावलं अधिक पुढे जाता कारण जेव्हा तुमची कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती सदाशिवाला स्पर्श करते व सदाशिव ते आत्म्याला कळवितो म्हणजे आत्मा प्रतिबिंबित होतो. तेव्हा पहिली अवस्था ही, की निरीक्षण करणारी ही सात वलये तुमच्या मेंदूतील चक्राशी संपर्क साधतात आणि ती एकात्म करतात, पण जेव्हा तुम्ही आत्म्याला मेंदूत आणता ही दुसरी अवस्था होते. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी होता कारण तुमचा आत्मा हाच तुमचा मेंदू होतो. ही क्रिया फार डायनॅमिक आहे. ती मानवात पाचवे नक्षत्र (डायमेंशन) उघडते. प्रथमत: तुम्ही जेव्हा जागृत होऊन सामूहिक चेतनेत येता आणि कुंडलिनी चढवू शकता तेव्हा तुम्ही चौथे क्षेत्र ओलांडता. जेव्हा तुमचा आत्मा मेंदूत येतो तेव्हा तुम्ही पाचवे क्षेत्र बनता. म्हणजे तुम्ही कर्ते बनता. उदाहरणार्थ १८ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-18.txt जेव्हा आपला मेंदू हा माईक उचलावयास सांगतो तेव्हा त्याला तुम्ही स्पर्श करता व उचलता. याठिकाणी तुम्ही कर्ता होता पण जेव्हा मेंदुच आत्मा बनतो तेव्हा आत्मा हा कर्ता बनतो आणि जेव्हा आत्मा हा कर्ता होतो तेव्हा त्यात तुम्ही गुंतले जात नाही. तुम्हाला कुठल्याच गोष्टीविषयी आसक्ती रहात नाही. तुमच्याजवळ असणाऱ्या एखाद्या गोष्टीची आसक्ती वाटत नाही आणि वाटू शकतच नाही कारण आत्मा हा पूर्णतया निरासक्त आहे. तुम्हाला कशाचीही तुम्हाला आसक्ती रहात नाही. क्षणभरसुद्धा तुम्ही आसक्त नसता. आता आत्म्याची निरासक्ती समजण्यासाठी आपण आपल्या स्वत:चा अगदी प्रांजळपणाने अभ्यास करावयास हवा, की आपण कसे गुंतलो जातो ? कारण आपण आपल्या मेंदूमुळे आसक्त होतो कारण आपले सर्व संस्कार मेंदूतच साठवले जातात आणि आपला अहंकारही मेंदूतच असतो. तेव्हा सर्व भावनात्मक बंधने ही सर्व मेंदद्वारे निर्माण होतात. तेव्हा असे म्हटले जाते, की जागृतीनंतर निरासक्त राहून शिवतत्त्व अंगीकारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आता तुम्ही ही निरासक्तता कशा बाणवून घ्याल? कारण आपण आपल्या मेंदूद्वारे अर्थात चित्ताद्वारे काही गोष्टींच्या प्रेमात असतो तेव्हा आपण चित्ताला काबूत ठेवायचे म्हणजे, 'चित्तनिरोध' अंगीकारावा. म्हणजे चित्त कोठे जात आहे इकडे लक्ष ठेवावे. सहजयोगात तुम्हाला तुमची प्रगती करावयाची असल्यास तुमची स्वत:ची यंत्रणा सुधारावयास हवी. दुसऱ्याची नाही ही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावयास पाहिजे. आता तुम्ही फक्त तुमच्या चित्तावर लक्ष ठेवा. ते कुठे जात आहे ? स्वत: लक्ष ठेवा. जसं जसं तुम्ही स्वत: आपल्या चित्ताचं निरीक्षण करावयास लागाल तसं तसं तुम्ही आत्म्याशी एकरूप होऊ शकाल कारण जर तुम्हाला चित्ताचं निरीक्षण करावयाचे असेल तर तुम्हाला तुमचा आत्मा व्हावं लागेल. नाहीतर तुम्ही कसे निरीक्षण कराल ? तेव्हा तुम्ही बघा, तुमचं चित्त कुठं जात आहे. सर्वप्रथम तुमची आसक्ती स्थूल गोष्टीवर असते, शारीरिक. शिवाला शरीराची आसक्ती नाही. तो कुठेही झोपणार. तो स्मशानात जाऊन झोपणार कारण तो सर्वांपासून अलिप्त आहे. तो भूतपिशाच्चाने पछाडत नाही किंवा कशानेच नाही. तो अगदीच मुक्त आहे. तुमच्या निरासक्ततेतून तुम्ही तुमच्या आसक्तीचे निरीक्षण करावयास पाहिजे. आता तुमचा आत्मा जरी मेंदूत शिरला नसला , परंतु तुम्ही जागृत आहात तेव्हा काय करायला पाहिजे, की कमीत कमी तुमच्या चित्तावर लक्ष ठेवा, तुमचं चित्त कुठं जात आहे हे अगदी स्पष्टपणे निरखू शकता, चित्ताला आवरणं म्हणजे ह्या गोष्टीतून लक्ष काढून त्या गोष्टीकडे वळवणं तुमच्या आयुष्यातील गोष्टीचे प्राधान्य बदला. हे सर्व तुम्ही जागृत झाल्यानंतर करावयास पाहिजे. अगदी पूर्णपणे सर्व बंधनातून मुक्त व्हावयास पाहिजे. शरीराला आराम पाहिजे तर तो कमी करा. त्यामुळेच तुम्ही लोक हिमालयात जात असत. ह्या पंढरपुरात येण्यासही कितीतरी अडचणी आल्या तेव्हा हिमालयात जाण्याची कल्पना करा. तेव्हा जागृतीनंतर ते त्यांचं हे शरीर हिमालयात नेत असत आणि शरीराला ह्या सगळ्या अडचणीतून नेऊन एक प्रकारची तपश्चर्या करीत असत. त्याचप्रमाणे तुम्ही ही तपश्चर्या केली पाहिजे. शरीराची सुखलोलुपता आता हळूहळू कमी करावयास पाहिजे. शिवाला तो कैलासात असला काय किंवा स्मशानात असला काय किंवा कोठेही असले तर त्यांना सर्व सारखेच. तुमचं चित्तं कुठं आहे? मानवी चित्त हे अगदीच टाकाऊ आहे. फारच गुंतलेले व मूर्खपणाचे आहे. 'हे केलं का ? ' तर ते यासाठी. अशा तऱ्हेचं कारण सर्वांना असते. तेव्हा कुठलेच स्पष्टीकरण देण्याची जरुरी नाही किंवा विचारण्याची जरुरी नाही. स्पष्टीकरणाशिवाय राहणे अत्यंत चांगली गोष्ट आहे. साध्या हिंदीत म्हणायचं झालं तर 'जैसे राखवू तैसेहि राह'. ज्या स्थितीत मला ठेवशील त्या स्थितीत मी आनंदाने राहीन. पुढे याच कवितेत कबीरांनी सांगितले आहे, की तू १९ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-19.txt मला हत्तीवर जावयास लाव, मी जाईन. जर पायाने चालायला लावलं तरी चालेन. 'जैसे राखहू तैसे ही रहूं.' तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया नाही. प्रथम स्पष्टीकरण नाही आणि आता प्रतिक्रिया नाही. दुसरे खाण्याबाबतचे. खाण्यात अजिबात चित्त असता कामा नये. जनावराप्रमाणेच मानवाचेसुद्धा प्रथम लक्ष खाण्यात. तसं पाहता सकाळी काय खाल्लं हे ही लक्षात असू नये. परंतु आपण उद्या काय खाणार याचा विचार करतो. आपण अन्न हे शरीर चालविण्यासाठी खात नसून जिभेच्या स्वादासाठी खातो. एकदा का तुम्हाला कळलं की भोगविलास हा अत्यंत स्थूल, अगदी स्थूल स्वरूपाचे चित्त आहे, की कळेल की कोणत्याही प्रकारचा भोगविलास हा अगदी हीन प्रकारचे फक्त इंद्रियांना होणारे सुख आहे. इंद्रियलोलूप आहे. अतिशय वरवरचे आहे, परंतु जेव्हा मी म्हणते, की सुख नको, याचा अर्थ तुम्ही गंभीर होऊन जणू काही सूतकात आहात असे होता कामा नये. परंतु तुम्ही शिवासारखे झाले पाहिजे. तितके निरासक्त! शिवजी अत्यंत जोरात धावत असलेल्या नंदीवर बसून त्यांच्या लग्नाला आले. नंदीवर ते दोन्ही पाय एका बाजूस सोडून बसले होते व नंदी अत्यंत जोरात धावत होता. त्यांनी त्याला धरून ठेवले होते. त्यांचेबरोबर कोणाला नाक नाही तर कोणाला डोळा नाही अशा तऱ्हेचे अत्यंत विचित्र लोक होते. त्यांची पत्नी पार्वती मात्र अत्यंत ओशाळली कारण सर्व लोक शिवाच्या विचित्रपणाच्या वागण्याबद्दल बोलत होते. परंतु शिव मात्र नि:शंक होते. त्यांच्या प्रतिष्ठेबद्दल त्यांना जराही तमा नव्हती परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही हिप्पी व्हावं. हाच मोठा प्रश्न आहे. एकदा का तुम्ही त्या विचारात गेलात की तुम्ही हिप्पी होता. बऱ्याच लोकांत असा विश्वास आहे, की शिवासारखे वागले, की तुम्ही शिव होता. बरेच लोक असे समजतात, की तुम्ही गांजा घेतलात, की तुम्ही शिव होता. शिव गांजा घेत होते कारण त्यांना जगातून तशा प्रकारच्या सर्व गोष्टी नष्ट करायच्या होत्या. गांजा असो, की काहीही असो, त्याचा प्रश्न कोठे येतो ? काहीही दिले तरी त्यांना नशा येत नसे, प्रश्नच उरत नाही. शिव कोणत्याही गोष्टीला बांधील नव्हते. त्यांना असे वाटते, शिवासारखे राहिले, की शिवासारखे होता येते. ते प्रत्येक बाबतीत निरासक्त होते. स्वत:चे दिसण्याबद्दल त्यांना अजिबात पर्वा नव्हती. ते जसे दिसत होते तसेच सुंदर होते. शिवाला काही करण्याची आवश्यकता नव्हती. तेव्हा कोणत्याही गोष्टीला चिकटून राहणे हे कुरूपतेचे लक्षण आहे. मूर्खपणा आहे. तुम्ही पाहिजे तसा पेहेराव करू शकता आणि जरी तुम्ही अत्यंत साध्या पेहेरावात असलात तरीसुद्धा तुमची भव्यता दिसू शकते, परंतु जर तुम्ही असे समजलात की ठीक आहे मग अशा परिस्थितीत एकच चादर गुडाळून वावरू या, तर ते तसे नाही. तुमच्या आत्म्यातून तुमच्यात निर्माण होणारे सौंदर्य तुम्हाला जी शक्ती देते, की त्यामुळे जो काय पेहेराव कराल त्यांनी तुमच्या सौंदर्यात काहीच फरक पडणार नाही व ते सौंदर्य कायम राहील. परंतु तुम्ही ती स्थिती गाठली आहे का? ज्यावेळी तुमचा आत्मा तुमच्या मेंदूत शिरतो तेव्हाच ती स्थिती तुम्ही मिळवू शकता. अहंकारी लोकांच्या बाबतीत ते फार कठीण आहे आणि म्हणूनच ते कशाचाही आनंद उपभोगू शकत नाहीत आणि एवढ्या तेवढ्या कारणांनी ते कोलमडून पडतात आणि आनंदाचा उगम जो आत्मा, जो प्रगट होत नाही, येत नाही. आनंद हेच सौंदर्य आहे, परंतु ती अवस्था मिळवावी लागते. आसक्ती ही अनेक मार्गांनी येते. आसक्ती थोडीशी जरी ठेवली तरी लगेच येते. तुमच्या कुटुंबाचे प्रेम, माझ्या मुलांचे काय होईल, माझ्या नवर्याचे काय होईल, माझ्या आईचे काय होईल, माझ्या बायकोचे काय होईल ? हे आणि ते अगदी मूर्खपणा आहे. तुमचे वडील कोण आणि आई कोण? तुमचा नवरा कोण व तुमची बायको कोण? शिवाना या गोष्टीच माहीत नाहीत. ते आणि त्यांची शक्ती अविभक्त आहे. तेव्हा शिव हे एकच व्यक्तित्व आहे. तेथे द्वैत नाही, जेव्हा द्वैत असतं तेव्हा तुम्ही 'माझी बायको' असं म्हणणार, माझं नाक, माझा कान, माझं माझं याचा अर्थ काय? जोपर्यंत माझं माझं २० 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-20.txt कराल, द्वैत खोलवर जाईल, पण जेव्हा मी म्हणते की, 'मीच नाक आहे' तेव्हा द्वैत नाही. शिव हीच शक्ती आहे आणि शक्ती म्हणजे शिव, तिथे द्वैत नाही. परंतु आपण नेहमीच द्वैतात राहिल्यामुळे सतत आसक्ती येते. जर द्वैत नसले तर आसक्ती कुठं आहे ? जर तुम्हीच उजेड व तुम्हीच दिवा असाल तर द्वैत कुठे आहे ? जर तुम्हीच चंद्र व तुम्हीच प्रकाश असाल तर द्वैत कुठे आहे? तुम्हीच सूर्य व तुम्हीच प्रकाश, तुम्हीच शब्द आणि तुम्हीच अर्थ, तर द्वैत कुठे आहे ? पण जेव्हा या दोन्ही गोष्टी निराळ्या होतात तेव्हां तिथे द्वैत आलं आणि निराळेपणाने आसक्ती येते, पण तुम्हीच ते झालात तर तुम्ही त्याला बांधील कसं असणार? तेव्हा तुम्हाला हे कळतं का ? तुम्ही व तुमचे यांत वेगळेपण व अंतर असल्यामुळे तुम्ही त्याच्या बंधनात अडकता. तो मीच आहे, मग दुसरा कोण? सर्व विश्व मीच आहे, तर मग वेगळे कोण? परंतु ही नुसती बुद्धीची फेक नाही किंवा अहंकारातून निघालेली बुद्धीची झेप नाही. तेव्हां दुसरा कोणीच नाही. जेव्हा तुमचा आत्मा तुमच्या मेंदूत येईल तेव्हाच हे शक्य आहे. मग तुम्ही त्या विराटाचेच एक अंग बनता. मी जसं सांगितलं की विराट म्हणजेच मेंद. तेव्हा तुम्ही जे कराल, तुम्ही राग दाखवा, करुणा दाखवा, काहीही दाखवा तो आत्माच सर्व काही व्यक्त करीत असतो कारण मेंदूचे वेगळे अस्तित्व राहत नाही. मर्यादित असलेली बुद्धी आता अमर्याद आत्मा झालेली आहे. त्या गोष्टीला उदाहरण कसे द्यावयाचे हे मला समजत नाही. परंतु ह्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर समुद्रात रंग टाकला तर समुद्र काही रंगीत होत नाही. नीट समजण्याचा प्रयत्न करा. परंतु अत्यंत थोडा रंग समुद्रात टाकला तर रंगाचे अस्तित्व पूर्णपणे नाहीसे होते. आता दुसर्या बाजूने विचार करा, पण जर समुद्रच रंगीत असला तर तो वातावरणात फेकला काय किंवा कोणत्याही लहान भागावर किंवा अणूरेणूत टाकला काय, तर ते सर्व काही रंगीत होऊन जाईल. तेव्हा आत्मा हा प्रकाश असलेल्या समुद्रासारखा आहे. जेव्हा हा समुद्र तुमच्या मेंदूच्या लहानशा कपात ओतला जातो तेव्हा त्या कपाचे अस्तित्व राहत नाही आणि सर्व काही आत्माच बनते. तुम्ही अगदी प्रत्येक गोष्ट आत्मामय बनवू शकता. ज्याला तुम्ही स्पर्श कराल ते होईल. वाळू आत्मामय होईल, ग्रह-तारे प्रत्येक गोष्ट आत्मामय होईल. तेव्हा आत्मा हा सागर आहे आणि तुमचा मेंदू हा मर्यादित आहे. तेव्हा तुमच्या या मर्यादित मेंदूतील आसक्ती नष्ट केली पाहिजे. तेव्हा तुमच्या मेंदूच्या मर्यादा तोडल्या पाहिजेत म्हणजे जेव्हा हा सागर तुमच्या मेंदूत भरतो, तेव्हा तो लहानसा कप फुटेल आणि त्याचा प्रत्येक कण नी कण रंगीत होऊन जाईल, मग सर्व वातावरण काय तुम्ही बघाल ते सर्व काही, सर्व वातावरण रंगीबेरंगी बनेल. आत्म्याचा प्रकाशच आत्म्याचा रंग आहे आणि आत्म्याचा प्रकाशच काम करतो, घडवितो, विचार करतो, सर्व काही करतो. मी आज शिवततत्व तुमच्या मेंदूत आणण्याचं ठरविलं. सर्वात प्रथम म्हणजे तुमचा मेंदू शिवतत्त्वाकडे घेऊन जाण्यासाठी तुमच्या मेंदूलाच विचारा की, 'तू कुठे जात आहेस?' चित्त ह्यात घ्याल, त्यात घ्याल आणि निष्कारण त्यात गुंतून राहता, तेव्हा सर्वांतून मुक्त व्हा. ह्या उपाधी सोडा. आपलं चित्त सर्वांतून काढा आणि फक्त मेंदू बना. पूर्णपणे निरासक्त बना. हा मुक्त झालेला मेंदू आत्म्याच्या रंगांनी पूर्णपणे भरून टाका. ते आपोआप घडेल. जोपर्यंत तुमच्या चित्तावर मर्यादा आहेत तोपर्यंत ते घडणार नाही. तेव्हा प्रत्येकाने स्वतंत्रपणे अगदी निष्ठेने ही तपस्या करावयास पाहिजे. अगदी प्रत्येकाने. मी तुमच्याबरोबर आहेच. तेव्हा असे पहाता पूजेचीही आवश्यकता नाही. परंतु ती स्थिती मिळवायला पाहिजे आणि म्हणून ती स्थिती येण्यासाठी पूजेची आवश्यकता आहे. मला आशा आहे की, तुमच्यातील बरेच जण ह्यातील शिवतत्त्व व्हाल, परंतु मी तुम्हाला हालअपेष्टात रहावयास सांगत नाही. अशा तऱ्हेच्या प्रगतीमध्ये कष्ट नाहीत. जेव्हा तुम्ही समजाल, की ही संपूर्ण आनंदाची स्थिती आहे, तेव्हाच तुम्ही 'निरानंद' व्हाल, त्या आनंदाला सहस्रारात हे नाव आहे आणि तुम्हाला माहीत आहे, की तुमच्या आईचं नांव 'निरा' आहे, तुम्ही निरानंद होता. २१ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-21.txt आजच्या या शिवपूजेला वेगळाच अर्थ आहे. मला वाटतं की जे आपण बाह्यातून करतो, वरच्या थरांतून करतो ते सूक्ष्मातही घडेल. मी तुमचा आत्मा तुमच्या मेंदूत सारण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु तुमचं चित्तच अजून गुंतलेले असल्यामुळे मला ते थोडं थोडं कठीण दिसते. तुमचा राग, लोभ, वासना , होण्याचा हावरेपणा सार्यापासून मुक्त प्रयत्न करा. सर्व काही कमी करा. आज मी वॉरेन यांना सांगितले, की त्या लोकांना कमी खाण्यास सांगा. आधाशासारखं खाऊ नका. एखादेवेळी मेजवानीत तुम्ही जास्त खाल. परंतु, प्रत्येकवेळी काही तुम्ही तसं खाऊ नका. हे सहजयोग्याचं लक्षण नाही. स्वत:वर ताबा ठेवा. मला माहीत आहे, तुमच्यापैकी काही लोक विशेष करू शकणार नाहीत ते ठीक आहे. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगेन आणि मदतही करीन. परंतु तुमच्यातील बरेचजण करू शकतील आणि तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हा आजपासून हा सहजयोग खोलात सूक्ष्मात आपण सुरू करू. तुमच्यातील काही तितके खोल काही जाणार नाहीत, परंतु पुष्कळांनी जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जवळजवळ प्रत्येकानेच. तुम्ही त्याकरिता जास्त शिक्षित किंवा अत्यंत सुखवस्तू असावयास पाहिजे असं अजिबात नाही. परंतु जे लोक समर्पित होऊन श्रद्धेने ध्यान धारणा करतात ते सूक्ष्मात जातात कारण ते इतर सहजयोगाकरता जणू काही अत्यंत खोलवर जाणारी पहिली मुळेच आहेत, की जेणेकरून इतर सहजयोगी त्यांचे पाठोपाठ जाऊ शकतील. आजच्या पूजेकरता श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणूया. यावेळी पाय वगैरे धुण्याची आवश्यकता नाही. फक्त गणेश अथर्वशीर्ष म्हणा. शिव कायमच स्वच्छ, शुद्ध व निर्मळ आहेत, जे निर्मळ आहे त्याला काय स्वच्छ करणार? कोणी म्हणेल, की माताजी आम्ही जेव्हा आपले चरण धुतो तेव्हा आम्हाला पाण्यात आपल्या चैतन्य लहरी मिळतात. परंतु यावेळी सर्व काही इतके निरासक्त आहे, की या अवस्थेत हे सर्व धुऊन टाकलेले आहे, स्वच्छ केलेले आहे, की तेव्हा धुण्याची आवश्यकता नाही. नंतर आपण देवी पूजन करू कारण गौरी जी कुमारिका आहे तिची पूजा करू. आपण तिची १०१ नावे म्हणू आणि नंतर शिवाची पूजा करू. मी एका भाषणात याबद्दल सर्व काही सांगू शकत नाही. परंतु निरासक्तीही तुमच्या जागृतीमध्येच तुमच्यात यावयास हवी. शरणागती म्हणजे काय? काहीच नाही कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आसक्तीतून मुक्त होता तेव्हा आपोआपच तुम्ही शरण जाता. जेव्हा तुम्ही कशाला चिकटून बसता तेव्हा तुम्ही शरण आलेले नसता. मला शरण जाऊन तुम्ही काय देणार? मी अगदी निरिच्छ आहे. मला हे काहीही समजत नाही. मला तुमच्यापासून काय मिळवायचं आहे ? काहीही नाही. मी अतिशय निरिच्छ आहे. तेव्हां आज आपण अशी प्रार्थना करू की, 'हे परमेश्वरा , आम्हाला शक्ती दे आणि जे सर्वात जास्त आकर्षक किंवा सर्व आकर्षणाचा उगम आहे ते दे की ज्याच्यामुळे इतर सर्व सुखे ऐषाराम वाढविणारा आनंद, वगैरेंची आकर्षणे सोडून देऊन आम्ही पूर्णपणे शुद्ध आनंद हेच ज्याचे रूप आहे अशा शिवतत्त्वात जाऊ.' मला वाटतं , की मी इथे का आले आहे व आजचा दिवस का मोठा आहे हे स्पष्ट केलं पाहिजे. आज जे तुम्ही इथे आहात ते विशेषकरून नशीबवान लोक आहात की आजच हे भाषण ऐकण्यासाठी व इथे उपस्थित राहण्यासाठी परमेश्वराने दयाळू होऊन तुमची निवड मुद्दाम केली आहे आणि एकदा का तुम्ही निरासक्त व निरोगी झालात, की तुम्हांस एक जबाबदार व अभियुक्त झाल्याचं जाणवावयास लागेल. जबाबदारी ही अहंकार निर्माण करणारी नाही तर ती स्वत:च सिद्ध होणारी, व्यक्त होणारी, प्रगट होणारी अशी असेल. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद ! २२ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-22.txt NEW RELEASES Title Date Place Lang. Type ACD DVD 11th Feb.1983 486 Mahashivratri Puja (Part 1 & 2) 330* Delhi Sp/Pu E 331* 18th Jan.1983 M/E Puja in Nasik (Part 1 & 2) Nasik Sp/Pu श्री भूमीदेवी पूजा 4th Feb.1985 Sp/Pu| 327 M Pune श्री महाशिवरात्री पूजा ( भाग १ व २) 488* 8th Mar.1986 332 Sp/Pu Pune 17th Dec.1989 484° Alibag 323 Alibag Puja : Advice to Sahajayogis Sp E 29th Dec.1991 324' 485* Shri Mahalakshmi Puja Alibag M/E Sp/Pu st 322 21* Mar.2010 Puja Birthday Puja (Part 1 & 2) Cabella Music| 328 20/21-3-2010 Cabella Birthday Puja Evening Pro.(Part 1-2) 5th Nov.2010 Abhay Sapori-Santoor Vadan & Diwali Pujan 334 Noida Music 1st Dec.2010 Music| 325* Bhavarpan Noida 26, 30h Nov. & Jaipur & Noida Visit 2010 (Part 1 & 2) | Jaipur & 326 Pu/Mu 4th Dec.2010 Noida Bhajan Title Artist Song List ACD ACS Bhavarpan 171* Abhijit Ghoshal प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in २३ 2011_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-23.txt आमचे मुख्य कार्य संपूर्ण विश्वातील लोकांचे सहस्रार उघडणे हे आहे. है कार्य अत्यंत सरळ, साधे आहे. आणि हे म्ही करू शकता तसेच जर तुम्ही है कार्य तु हं० हि सामूहिक स्वरूपात केले तर ते जास्त प्रभावी होईल. चांगल्या प्रकारे जर तुम्ही सामूहिक असाल तर याला खूप कार्यान्वित करू शकता. ० पु. कवी