मराठी मार्च-एप्रिल २०११ र ्र ৫ ৫ f t t t tf t tf t t f t t t t t t t t t t t { २१ मार्च ....अपमानजनक प्रकार आणि भावनात्मक धर्मक्या तसेचे अशी सर्व व्यवस्था ही या देशाची परंपरा नाही. असे करणाच्या लोकांना बाहेर फेकले जाईल. तुम्ही असे काही करू नये. मी तुम्हाला सांगते की सहजयोगात तुम्ही असे काही करू शकते नाही. जन्मदिवस पूजी, मुंबई, २२.३.२९८४ बमअम्थ ॐ या अंकात... निव््याज्य प्रेम ...४ वि पुनरुत्थान (ईस्टर पूजा) ...१२ परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी द्वारा उपदेश ... २२ क क ी दिल्ली, दि. ३० मार्च १९९०, अनुवादित निल्यांज्य प्रेम पाविन्याचे दुसरे नाव आहे निव्याज्य प्रेम अ जि नवरात्रीची चतुर्थी आहे आणि नवरात्रीमध्ये रात्री पूजा झाली पाहिजे. अंधकार दूर करण्यासाठी रात्रीत प्रकाशाला आणणे अत्यावश्यक आहे. आजच्या दिवसाचा एक आणखी संयोग आहे, की आपण लोक आमचा जन्मदिवस साजरा करीत आहात. आजच्या दिवशी गौरीजींनी आपल्या विवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्र्याचे स्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवली गेली. ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मानव या विश्वात आले ते पावित्र्यामुळे सुरक्षित रहावे आणि अपवित्र गोष्टींपासून दूर रहावे , यासाठी साऱ्या सृष्टीला गौरीजींनी पवित्रतेने न्हाऊन काढले आणि त्यानंतरच साऱ्या सृष्टीची रचना झाली. तर, जीवनामध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण कार्य हे आहे, की आपण आपल्यामधील पावित्र्याला सर्वात उच्च गोष्ट समजणे, पण पवित्र याचा अर्थ असा नव्हे, की आंघोळ करून शूचिर्भूत होऊन, सफाई करून आपल्या शरीराला ठीक करणे, तर आपल्या हृदयाला स्वच्छ केले पाहिजे. हृदयाचा सर्वात मोठा विकार आहे क्रोध आणि मनुष्य जेव्हा क्रोधित होतो तेव्हा जे पवित्र आहे ते नष्ट होऊन जाते कारण पावित्र्याचे दूसरे नाव आहे निव्व्याज्य प्रेम. ते प्रेम जे सतत वाहत असते आणि कशाचीही इच्छा करीत नाही. त्याची तृप्ती यातच आहे, की ते सतत वाहत आहे आणि ज्यावेळी ते वाहत नाही त्यावेळी ते चिंतीत (अस्वस्थ) होते, तर पवित्र याचा अर्थ असा की आपण आपल्या हृदयाला प्रेमाने भरून टाका. क्रोधाने नव्हे. क्रोध आपला शत्रू आहे, पण तो विश्वासाचा शत्रू आहे. जगात जेवढी युद्धे झाली, जेवढी हानी झाली, ती सर्व सामूहिक क्रोधाची कारणे आहेत. क्रोधासाठी कारणे अनेक असतात, 'मी अशासाठी नाराज झालो कारण असे होते.' प्रत्येक क्रोध कोणते तरी कारण शोधू शकतो. युद्धासारख्या भयानक गोष्टीसुद्धा क्रोधापासून उपजतात. त्यांच्या मुळामध्ये हा क्रोधच असतो. जर हृदयामध्ये प्रेम असेल तर क्रोध येऊ शकत नाही आणि क्रोधाचा देखावा असेल, तर तो प्रेमासाठीच. एखाद्या दुष्ट राक्षसाचा जेव्हा संहार केला जातो, तो सुद्धा त्याच्यावर प्रेम केल्यामुळेच होतो कारण तो या योग्यतेचारच असतो, की त्याचा संहार झाला पाहिजे, ज्यायोगे तो आणखी पापकर्म करणार नाही, पण हे कार्य मानवासाठी नाही. हे तर देवीचे कार्य आहे, जे त्यांनी ह्या नवरात्रामध्ये केले. तर, हृदयाला विशाल करून हृदयात असा विचार करा की आम्ही कोणावर असे प्रेम करतो जे निव्याज्य, निर्मम आहे, ज्याबद्दल आमच्यामध्ये असे नाही की हा माझा मुलगा, माझी बहीण आहे, माझे घर, माझी वस्तू. मनुष्याची जी स्थिती आहे त्यापेक्षा आपण खूप उच्च स्थितीला आला आहात कारण आपण सहजयोगी आहात. आपला योग परमेश्वराच्या या प्रेमाच्या सूक्ष्म शक्तीशी झाला आहे. ही शक्ती आपल्या आतमध्ये अविरत वाहत आहे. आपल्याला प्लावित करीत आहे. आपल्याला सांभाळते आहे. आपल्याला तर उठवते आहे. वारंवार आपल्याला प्रेरित करते आहे. आपल्याला आल्हाददायी मधुमय प्रेमाने भरून देत आहे. अशा सुंदर शक्तीशी आपला योग झाला, परंतु आता आमच्या हृदयात त्याच्यासाठी कितीसे स्थान आहे हे पाहिले पाहिजे. आपल्या हृदयात आईसाठी तर प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी आपण लोक आनंदात आहात, पण अजूनही दोन प्रकारचे प्रेम असले पाहिजे, तरच आईचे पूर्णप्रेम असू शकते. खूप एक प्रेम स्वत:विषयी, की आम्ही सहजयोगी आहोत. आम्ही सहजयोगामध्ये शक्ती प्राप्त केली, पण आम्ही याला कशाप्रकारे वाढविले पाहिजे. अनेक लोक सहजयोगाच्या प्रसारासाठी पुष्कळ कार्य करतात. ६ (हॉरीझॉन्टल मूव्हमेंट) समांतर चलन, पृथ्वीप्रमाणे चारही बाजूला पसरणारे. ते लोक स्वत:कडे दृष्टी फिरवत नाहीत, तर जे उध्ध्वगामी चलन आहे, त्याला उत्थानाची गती मिळत नाही. बाह्यामध्ये ते पुष्कळ काही करू शकतात. बाह्यामध्ये ते थांबतील, काम करतील, सर्वांना भेटतील, पण आतल्या शक्तीला वाढवू शकत नाहीत. असेही अनेक लोक आहेत जे आतल्या शक्तीकडे खूप लक्ष देतात आणि बाहेरच्या शक्तीकडे नाही, तर त्यांच्यामध्ये संतुलन येत नाही आणि ज्यावेळी लोक बाह्याच्या अंगामध्ये जास्त वाढू लागतात तेव्हा त्यांच्या आतील शक्ती क्षीण होऊ लागते आणि असे होत होत अशा कडेला पोहोचते की लगेच अहंकारामध्ये बुडू लागतात, की आम्ही सहजयोगाचे एवढे कार्य केले आहे, इतकी मेहनत घेतली आहे, नंतर अशा लोकांचे एक नवीन जीवन सुरू होते, जे सहजयोगासाठी अजिबात उपयुक्त नाही. ते स्वत:बद्दल विचार करतात, की आमचे खूप महत्त्व असले पाहिजे, सेल्फ इंपॉर्टन्स. प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वत:चे महत्त्व दाखवतील. आपले विशेषत्व दाखवतील. स्वत:ला पुढे करतील, पण आतून खिळखिळीतपणा आला आहे, मग त्यांना काही आजार झाला, वेडेपणाची लहर आली , काही मोठे संकट आले, की मग असे म्हणतात की, 'माताजी, आम्ही तर आपल्यावर स्वत:ला पूर्णपणे समर्पित केले होते, मग असे कसे झाले?' याची जबाबदारी आपल्यावरच आहे की आपणच बहकलात. मग असा माणूस एकतर्फी होऊन जातो. तो दुसर्याशी संबंध प्रस्थापित करू शकत नाही. त्याचा संबंध फक्त लोकांवर रूबाब पाडण्यात असतो आणि स्वत:ला उच्च दाखवणे, सर्वात पुढे आले पाहिजे, सगळ्यात त्यांचं महत्त्व असले पाहिजे, तर मग असेही होऊ शकते, की ते विसरून जाऊ शकतात, की श्री माताजींना सुद्धा काही करावयाचे आहे. त्यांना सुद्धा काही दान द्यावयाचे आहे. मी पाहिले की, राहुरी, मुंबईतसुद्धा कशा प्रकारचे असे लोक एकदम उठून वर आले आणि ते स्वत:ला खूप महत्त्वपूर्ण समजू लागले, मग तिथे आरती होत नव्हती, फोटो पुसला जात नव्हता, तरी बरं फोटो नाही लावले. आपलेच घोडे पुढे दामटत. कोणाला काही विचारायचे नाही. आपण करणार. मग भांडणे सुरू झाली. ग्रुप्स तयार झाले कारण ज्या सूत्रामध्ये तुम्ही बांधले गेले आहात ते तुमच्या आईचे सूत्र आहे आणि त्याच सूत्रामध्ये आपण बांधून रहा आणि पूर्ण वेळ हे समजून घ्या की आपण एकाच आईची लेकरे आहोत. आमच्यामध्ये ना कोणी उच्च ना कोणी नीच, ना आपण काही कार्य करत असतो. हे चैतन्यच सर्व कार्य करते. आम्ही काही करतच नाही. ही भावना जेव्हा येते, की 'आम्ही मोठे आहोत, आम्ही हे केले, आम्ही ते करू, हे करू, ' तेव्हा परम चैतन्य म्हणते, 'तुला जे करायचे आहे ते कर, जेथे जावयाचे आहे तिथे जा हवे तर नरकात जा , हवे तर स्वत:ला नष्ट कर, स्वत:चा सर्वनाश कर.' ते आपल्याला थांबवणार नाहीत कारण स्वातंत्र्याला ते मानतात. आपल्याला स्वर्गात जायचे असेल तर त्याचीही व्यवस्था आहे. पण सहजयोगामध्ये आणखी एक मोठा दोष आहे, आपण एक सामूहिक विराट शक्ती आहोत. आपण एकच आहोत. सर्व एकाच शरीराचे अंग -प्रत्यंग आहोत. त्यामध्ये जर कोणी एक असा झाला किंवा दोनचार असे झाले की आपला ग्रुप तयार करतील, तर ज्याप्रमाणे कॅन्सरची मॅलिग्न्सी असते, की एकच पेशी वाढू लागते, वेगळ्या प्रकारे, त्याप्रमाणेच एक व्यक्ती वाढून साऱ्या सहजयोगाला ग्रासू शकते आणि आपली सारी मेहनत व्यर्थ जाते. आपल्याला तर शिकले पाहिजे, जो सर्वात खाली असतो, सर्व नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो आणि स्वत:ला सागरापासून तापवून घेऊन वाफ तयार करून साऱ्या दुनियेवर पावसाचे वरदान पाठवितो. त्याची जी नम्रता आहे तीच त्याच्या गहनतेचे लक्षण आहे. परत तीच वर्षा नद्यांमधून धावत जावून त्याच समुद्राकडे जाते. जेव्हा आपल्यामध्ये नम्रता व प्रेम ७ येईल तेव्हाच आपण या समुद्राप्रमाणे विशाल होऊ, पण आपलेच महत्त्व करायचे, स्वत:लाच विशेष समजायचे, यामुळे सर्वात वाईट गोष्ट ही, की परमचैतन्य आपल्याला सांगून टाकेल की 'जा.' मग आपण एका बाजूला फेकले जाल. ती माझ्यासाठी दुःखकारक गोष्ट असते. असे लोक जे विचार करतात की 'आम्ही हे कार्य केले, ते कार्य केले' त्यांनी पटकन मागे होऊन पाहिले पाहिजे, की आम्ही ध्यान करतो का? आमचे ध्यान लागते का? आम्ही किती गहनतेमध्ये आहोत ? आम्ही कशाकशावर प्रेम करतो, किती जणांवर प्रेम करतो आणि किती जणांशी दुश्मनी करतो. सहजयोगामध्ये काही लोक खूप गहनतेत आहेत. काही अजून किनार्यावरच डोलताहेत. ते कधी फेकले जातील ते सांगू शकत नाही. मी आपल्याला आधीच सांगितले आहे, की १९९० नंतर एक नवीन दालन उघडणार आहे आणि एक नवीन उडी आपल्याला मारायची आहे. ज्याने आपण या नवीन मोहोळात उतरून त्या नव्या गोष्टीला पकडू शकू. सहजयोगाची प्रगती वीस वर्षांची होणार आहे आणि यात टिकून राहण्यासाठी पहिली गोष्ट आपल्यामध्ये पावित्र्य आले पाहिजे. जे नम्रतेने भरले आहे. जर आपण एकदम स्वच्छ आणि पवित्र असाल तर आपल्याला कोणालाही शिवून, कोणाशीही बोलून अपवित्रता येणार नाही कारण आपण प्रत्येक गोष्टीला शुद्ध करतो. आपला स्वभावच शुद्ध करण्याचा आहे. आपण ज्याला भेटाल त्याला शुद्ध करीत जाल. त्यात घाबरण्याची काय गोष्ट आहे? त्यात दुसर्याला धिक्कारण्याची काय गोष्ट आहे? तर मग आपली पवित्रता कमी आहे. जर आपली पवित्रता संपूर्ण आहे तर, त्या पवित्रतेमध्येसुद्धा शक्ती व तेज आहे. ती इतकी शक्तिशाली आहे, की कोणत्याही अपवित्रतेला खेचून घेऊ शकता. जशी प्रत्येक प्रकारची गोष्ट समुद्रामध्ये एकाकार होऊन जाते. आता दूसरे लोक आहेत जे फक्त स्वत:च्या प्रगतीचा विचार करतात. ते असा विचार करतात, की 'आम्हाला दुसर्यांशी काय करायचे आहे? आम्ही आमच्या खोलीत बसून श्री माताजींची पूजा करतो आम्ही त्यांना मानतो, आमचा जगाशी काही संबंध नाही' आणि दुसऱ्यापासून वेगळे राहतात. आपण एका शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत. मग आपण म्हणाल, 'माताजी, मी इतकी पूजा करतो, इतके मंत्र म्हणतो, इतके काम करतो मग माझी अशी स्थिती का?' कारण आपण त्या सामूहिक शक्तीपासून दूर गेलात. सहजयोग सामूहिक शक्ती आहे तेव्हा दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे की आपण आपली शक्ती सांभाळणे आणि सामूहिकता घडवत जाणे तरच आपल्यामध्ये पूर्ण संतुलन येईल. मी असे लोक पाहिले आहेत, ज्यांनी सहजयोगासाठी खूप कार्य केले, बरेच चांगले बोलत होते, भाषण देत होते आणि आपल्या भाषणाची टेप तयार केली. मग लोकांना सांगू लागले, आपण माझी टेप ऐका. मग लोक आमची टेप सोडून त्यांची टेप ऐकू लागले. त्यांची अशी स्थिती झाली, की ते आमच्या फोटोला तर नमस्कार करायचे पण आम्हाला नाही कारण त्यांना फोटोची सवय झाली होती. मग त्यांनी स्वत:चे फोटो छापले. ते फोटो सर्वांना दाखवू लागले. अशाप्रकारे आपलेच महत्त्व वाढवू लागले. करता करता अशा खड्ड्यात पडले आणि मग सुटून गेले सहजयोगातून, असे लोक का निघाले ? कारण संतुलन नाही आणि संतुलन नसल्यावर माणूस उजवीकडे किंवा डावीकडे जातो. दोन प्रकारच्या शक्त्या आपल्या आतमध्ये आहेत. ज्यायोगे आपण सहजयोगाकडे खेचलेही जातो आणि दुसरी शक्ती ज्यामुळे आपण बाहेर फेकले जातो. बरं, परत लोक कमी झाले, तर यामध्ये सहजयोगाचे नुकसान ८ र ॐं हि नाम तर झाले नाही. यामध्ये त्यांचेच नुकसान झाले. जर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, तर या गोष्टीला समजून घ्या की सहजयोगाला आपली गरज नाही. आपल्याला सहजयोगाची गरज आहे. 'योग' याचा दुसरा अर्थ होतो युक्ती. एक अर्थ आहे, की संबंध जोडला जाणे, दुसरा आहे की युक्ती. पहिली तर युक्ती ही की आम्हाला याचे ज्ञान झाले पाहिजे. ज्ञानाचा अर्थ बुद्धी नव्हे. युक्ती म्हणजे आमच्या बोटांमध्ये, हातामध्ये, आतमध्ये कुंडलिनीचे पूर्णपणे जागरण होणे हे ज्ञान आहे. मग आणखीसुद्धा ज्ञान होऊ लागते. या ज्ञानामुळे आपण लोकांची कुंडलिनी जागृत करू शकतो. त्यांना समजावू शकतो. त्यांच्याशी पूर्णपणे आपण एकाग्र होऊ शकतो. त्यांच्याशी आपण वार्तालाप करू शकतो. तर आपल्याला यामुळे बौद्धिक ज्ञानसुद्धा येते. आपल्याला सहजयोग ९ अe समजतो. नाही तर आधी कोण समजू शकत होते ? कबीर, नानकजींच्या गोष्टी कोणी आधी समजू शकत होते का? आपले बुद्धिचातुर्य वाढते. अगम्य गोष्ट गम्य होते. का दुसरी युक्ती काय आहे ? ती ही की आपण आमच्यावर भक्ती करतां. ती भक्तीसुद्धा जेव्हां तुम्ही करता तेव्हा अनन्य भक्ती करता. तादात्म्यामध्ये आपण आमच्याशी जोडले जाता. जसे आम्हाला वाटले तसेच आपल्याला लागते. आज उशीर झाला तर वाटू आम्हीसुद्धा असे सांगू शकतो, की आम्ही खूप थकलो. आमच्याने होणार नाही. पण आम्ही असा विचार केला नवरात्री आहे, रात्रीत करावे आणि तोच मुहर्त आम्हाला मिळावयाचा होता. तर आम्हाला करायचेही आहे आणि अत्यंत आनंदात आम्ही करीत आहोत. आम्ही थकलो आहोत, आरामही केला नाही असा विचारही आम्ही करीत नाही आणि आपल्यालासुद्धा असा विचार केला पाहिजे की हीच वेळ श्री माताजींनी ठरविली आहे कारण हीच वेळ आमच्यासाठी उचित आहे, पूजेसाठी. पण अर्धेअधिक लोक उलट्या गोष्टींचा विचार करतील. आम्ही सकाळपासून बसलो आहोत. आम्हाला भूक लागली, मुले झोपली असतील. तर ती अनन्य भक्ती नाही कारण माझा जो विचार आहे, तो आपल्या विचारामध्येच आहे, कोणासाठी मी विचार करते ? जर 'श्री माताजी, हे इतके खराब आहे, असे आहे.' मी म्हणते, 'नाही हो, एकदम चांगले आहे.' मी विचार करते, मी जे बघू शकते ते हे का बघू शकत नाहीत, तर मग अनन्य नाही झाले, अन्य झाले, दसरे झाले. अशात-हेने जसे तुमच्याबद्दल आमचे प्रेम आहे, आपणही सर्वांबद्दल तसेच प्रेम जोपासा. जर ही गोष्ट आपल्यामध्ये नाही तर ते अन्य आहे, अनन्य नाही. जर आमच्याच शरीराचे अंग-प्रत्यंग आहे तर जसे आम्ही आहोत तसेच त्यांना झाले पाहिजे. जसा आम्ही विचार करतो तसाच विचार आपल्याला केला पाहिजे. तर हे वेगळा विचार का करतात ? उलट्या गोष्टीचा विचार का करतात ? जे विहिरीत आहे तेच घड्यामध्ये यायला पाहिजे हेच प्रेमाचे स्रोत आहे. दुसरी गोष्ट कशी येऊ शकेल? आणि जेव्हा दुसरी गोष्ट येते तेव्हा मी विचार करते की त्यांनी आणि कोणत्या दसर्या विहिरीतले पाणी भरले आहे. हा घडा माझा नाही. आता दूसरी गोष्ट म्हणजे 'श्री माताजी आम्ही आपल्याला शरणागत आहोत.' जर तुम्ही शरणागत आहात तर आम्ही तुम्हाला काही सांगितले किंवा कोणतीही गोष्ट समजाविली किंवा आपल्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला, काही ठेवले, तर त्याला नाकारण्याचा प्रश्नच कसा उद्भवेल? पण आपण आणि आम्ही एक १० झालो तर त्यांचा प्रश्नच कसा उद्भवेल? श्री माताजींनी सांगितले ते सांगितले , आम्ही 'श्री माताजी'च झालो तर आम्ही नाही कसे म्हणू शकणार? तर आपल्यामध्ये हे तादात्म्य नाही आले. तर ही दुसरी युक्ती आहे, की 'श्री माताजी, माझ्या हृदयात आपण या. माझ्या बुद्धीमध्ये आपण या. माझ्या विचारांमध्ये आपण या. माझ्या जीवनाच्या प्रत्येक कणामध्ये आपण या. आपण जिथे सांगाल तिथे आम्ही हजर आहोत, हात जोड़ून. ' पण आपल्याला सांगावं तर लागेल ना! आणि पूर्ण हृदयासह, कुठल्या मतलबाने, कारणाने नाही. तिसरी गोष्ट. आम्ही हे काम करतो आहोत. आम्ही सहजयोगाचे हे काम केले. आम्ही ही सजावट केली, ठीक- ठाक केले. मी केलं तर सहजयोगी आले नाहीत. सहजयोगामध्ये आपले सर्व कर्म 'अकर्म' झाले पाहिजे. जेव्हा आपण सूक्ष्मस्तरामध्ये पहाल, तर आपण पहाल की 'काय, मी असा विचार करतो कां की मी केलं.' अशी गोष्ट माझ्या मेंदुत येतेच कशी? याचा अर्थ माझा योग पुरा झाला नाही. जेव्हा योग पूर्ण होतो तेव्हा तुम्ही अकर्मात उतरता. जसे हे घडते आहे, ते घडते आहे, अशा तऱ्हेने आपण बोलू लागता. तेव्हा आपल्याला पूर्णपणे तादात्म्य प्राप्त झाले. तिसरी युक्ती जी शिकली पाहिजे ती अशी की जिथे मी काही करीत आहे, मी काय करीत आहे, जो पर्यंत आपण आपले कार्य शोधित होता तोपर्यंत आपण काही करत होता कारण आपल्यामध्ये अहंभाव होता. जेव्हा आपण सामुदायिकतेमध्ये आलात तेव्हा आपण काही करीत नसता. आपण अंग-प्रत्यंग आहात आणि ते कार्य होत आहे. या युक्त्या मी यासाठी सांगते आहे कारण की झेप घ्यायची आहे. याप्रकारे नेहमी आपण आपले विवेचन करावे आणि स्वत:कडे दृष्टी टाकून पहावी की 'मी काय विचार करतो आहे, मी दुसर्यांसाठी काय विचार करतो आहे. ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांच्याकडून मला शिकले पाहिजे. त्यांचे चांगले गुण दिसतात की फक्त वाईटच गुण दिसतात.' दुसर्यांचे चांगले गुण दिसत असतील आणि स्वत:चे वाईट गुण, तर फार चांगली गोष्ट आहे. ही युक्ती समजून घेतली पाहिजे, की यात जर आम्ही डामडौलात आहोत तर ते स्वत:मुळेच आहोत. सहजयोग तर खूपच महान गोष्ट आहे, पण आमच्यामध्ये जो वाईटपणा येत आहे किंवा याची मजा पूर्णपणे आम्ही लुटू शकत नाही याचे कारण आमच्यामध्ये काही ना काही दोष आहेत. या युक्तीला जर आपण व्यवस्थितपणे केले तर फक्त आनंद मिळेल, निरानंद. आणि काही नाही. आणि मग पाहिजे तरी काय ? आपले रूपच बदलून जाईल. आणि आज या जन्मदिनी मी इच्छा करते की, आपले जन्मदिवससुद्धा साजरे व्हावे. आजपासून आपण या युक्त्या समजून घ्याव्या आणि स्वत:ला अशा पावित्र्याने ओतप्रोत करा जसे काही श्री गणेश. पवित्रतेमुळे माणसामध्ये सुबुद्धी येते कारण पवित्रता प्रेमाचेच नाव आहे. सुबुद्धीचा अर्थ प्रेमच आहे. सर्व गोष्टींचा अर्थ प्रेम आहे आणि जर आपण सुबुद्धी प्राप्त करू शकत नाही आणि प्रेमाला आपलेसे करू शकत नाही तर सहजयोगात येऊन आपला वेळ व्यर्थ घालवणे आहे. या वेळी अशी काही वेळ घटीत होते आहे की सर्वांना यामध्ये सामावले गेले पाहिजे. आणि स्वत:ला परिवर्तनामध्ये घातलेच पाहिजे. परिवर्तित आपल्याला झालेच पाहिजे. वाईट गोष्टी आमच्यामध्ये आहेत. आम्हाला स्वत:ला पूर्णपणे पवित्र करावयाचे आहे. या परिवर्तनाचे फलस्वरूप आशीर्वाद आहे - ते जीवन, ज्याचे वर्णन केले जाणे अशक्य-जे कबीरांनी सांगितले - 'अब मस्त हुए, फिर क्या बोले।' तर आपण त्या आनंदामध्ये या. त्याला प्राप्त करा. त्या आनंदामध्ये आनंदित व्हा. हा माझा आशीर्वाद! ११ पुनरुत्थान दा प ह है ऑस्ट्रेलिया, ३१/३/१९९१, अनुवादित ार करे ० (ईस्ट२ पूजा ) मृतावस्थेतून पुनरुत्थान पावलेल्या ख्रिस्ताची पूजा करण्यासाठी आपण आज इथे आहोत. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत, परंतु त्यांनी स्वत:चं पुनरुत्थान केलं आणि त्यानंतर ते भारतात आले आणि त्यांच्या आईसमवेत तिथे स्थायिक झाले. त्यांच्या पुनरुत्थानानंतर ते कुठे गेले, त्याचे कोणत्याही पुस्तकात वर्णन नाही, पण पुराणांमध्ये शालिवाहनाबद्दल जे वर्णन आहे, जे आमचं घराणं आहे, त्या राजांपैकी एक ख्रिस्तांना काश्मीरमध्ये भेटले आणि त्यांनी त्यांना विचारलं , 'तुझं नांव काय?' आणि त्यांनी म्हटलं, 'माझ नाव येशू.' 'तुम्ही कोणत्या देशातून आलात?' त्याविषयी विचारलं असता त्यांनी म्हटलं, 'ज्या देशातून मी आलो तो तुम्हाला आणि मला परका आहे आणि आता मी इथे माझ्या स्वत:च्या देशांत आलो आहे,' अशाप्रकारे भारतीय संस्कृतीबाबत त्यांची गुणग्राहकता होती. तिथे ते लोकांना रोगमुक्त करीत होते. त्यांची आणि त्यांच्या आईची कबर तिथे आहे. ज्या लोकांना त्यांच्याविषयी विशेष माहिती नव्हती त्या लोकांनी इतर गोष्टी सांगितल्या आहेत. खिस्त नीतिमत्तेविषयी शिकवण्यासाठी तिथे होते. त्यांच्यासाठी नीतिमत्ता ही आयुष्यातील फार महत्त्वाची गोष्ट होती. ते श्रीगणेशाचे अवतरण होते त्यामुळे त्यांच्यासाठी श्री गणेशतत्त्व अतिशय महत्त्वाचे होते. टेन कमांडमेंटसुमध्ये त्यांनी सांगितले आहे की, 'तुम्ही व्यभिचार करणार नाही, पण खरोखर तुम्हाला असे म्हणतो की, तुम्हाला व्यभिचारी दृष्टी नसेल.' असे म्हणनू त्यांनी ते दर्शविले आहे. त्या सीमेपर्यंत की डोळेसुद्धा व्यभिचाराने खाली फिरत असतात. तसंच एका उपनिषदामध्ये म्हटलं आहे, की स्त्रीकडे पहाणं हा सुद्धा व्यभिचार आहे. स्त्रीचा विचार करणं, स्त्रियांशी जास्त बोलणं हा देखील व्यभिचार आहे. प्रत्येक देशांत मी पाहिलं आहे, की या स्त्रियांना जन संपर्कामध्ये वापरलं जातं म्हणजे त्या जातात आणि उच्चपदावरील लोकांशी अशात-्हेने बोलतात, की त्यांना फाजिल लाड केल्यासारखं वाटतं. अयोग्य मेहेरबान्या मिळविण्याचा एक प्रकार म्हणजे हा 'पी.आर.' चा धंदा. अनेक देशांतील भ्रष्टाचाराची जबाबदारी अंशत: याची आहे. जगात कितीतरी हिंसाचारी व्यक्ती किंवा माफिया, कोणीही वाळीत टाकलेला इतके अत्यंत वाईट प्रकारचे व्यभिचारी लोक असतात. सहजयोगामध्ये नीतिमत्ता हा आपला मूलभूत ठेवा, स्थायीभाव १३ पाहिजे. आपण इतके नशीबवान आहोत, की श्री गणेशांच्या भूमीवर आपण त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत. जो खरं पाहतां - तुम्ही निष्कलंक म्हणू शकता - त्या जीवनामुळे आहे, जे इतकं पवित्र होतं. त्यांचं ते पावित्र्य होतं कारण ते इतर काही नाही फक्त व्हायब्रेशन्स होते, चैतन्य! इतके ते पवित्र होते, की पाण्यावरसुद्धा चालू शकत होते. इतके पवित्र होते, की मृत्युदेखील त्यांना मारू शकला नाही. पावित्र्य हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आपण पुनरुत्थानाविषयी बोलतो. आपला दुसरा जन्म मिळण्याविषयी बोलतो, अंड्याचा पक्षी होतो, त्याला द्विज म्हणतात. दुसऱ्यांदा जन्म झालेला. तशाच प्रकारे आपला अहंकार आणि प्रतिअहंकार यांनी आपण आच्छादिले गेलो आहोत आणि पक्षी होण्यासाठी उघडले जातो आणि अशाप्रकारे आपल्याला जाण आली आहे-या ब्रह्माची, या सर्व विश्वव्यापी शक्तीची! अशाप्रकारे आपण द्विज झालो आहोत, ब्राह्मण. कारण त्याशिवाय कोणत्याही पूजेचा, पठणाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा काय अर्थ आहे ? पण आपल्याला आपल्या पावित्र्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अतिशय खालच्या दर्जाच्या लोकांमुळे अपवित्रता येते, ती ख्रिस्ताने जे म्हटलं आहे, कुजबुज करणारे आत्मे (मर्मरींग सोल्स) त्यांच्यामुळे. हे लोक लोकांच्या पाठी वळल्या की बोलू लागतात आणि या प्रकारच्या बोलण्यात त्यांना खरोखर रंगत येते. ही फार खालच्या पातळीवरची गोष्ट आहे आणि सहजयोगामध्ये ही पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे कारण ती अडचणी निर्माण करते आणि सामूहिकतेवर परिणाम करते. मुख्यत्वेकरून मी स्त्रियांना आणि लिडस्सच्या पत्नींना विनंती करते. त्यांच्यावर महान जबाबदारी आहे, त्यांनी अशा बोलण्यामध्ये रुची दाखविली तर त्या इतरांच्या बरोबरीने खालच्या पातळीला येतात आणि मातृत्वाला आव्हान मिळतं. कोणतीही माता जी मुलांना तशाप्रकारे बोलण्याला परवानगी देते, ती मुलांचं पूर्ण आयुष्य खराब करीत असते. सहजयोगातील लोकांबाबत वाईट बोलणारे कोणीही लोक फार भयानक असतात, तसा विचार करणं प्रत्येकाने सोडून दिलं पाहिजे. आपण कोणाविरुद्ध बोलूं लागलो तर आपल्याला त्या व्यक्तीच्या सर्व वाईट गोष्टी मिळतात. त्याशिवाय आपलं मन खराब होतं. ती स्त्रियांची जबाबदारी आहे कारण हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतं कारण त्यांचं जीवन आणि मित्रमंडळी निवडक (वेचक) असतात. जर पुरुषांना कोणाचा राग आला ते नुसते जातात, भांडतात आणि संपवून येतात, पण स्त्रिया त्यांच्या मनात ठेवतात आणि नंतर काहीतरी म्हणतात. ती इतकी वाईट गोष्ट आहे. एखाद्या वळवळणाऱ्या किड्यासारखी आणि फार संसर्गजन्य कारण नीतिमत्ता ही फक्त लैंगिकता नव्हे. त्याहून जास्त आहे. त्याहून विस्तीर्ण. आपल्यामध्ये पावित्र्य येण्यासाठी, आपल्याला अंतर्मुख झालं पाहिजे. रशियन लोक फार अंतर्मुखी आहेत. ते फार विशेष आहे. एखाद्या रशियन लेखकाचे पुस्तक तुम्ही वाचले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ते सर्व अंतर्मुख असतात. सर्व पात्रे अंतर्मुख असतात. मी असं का केलं, हे त्यांना १४ बघायचं असतं. उदा. एखादी व्यक्ती फार आळशी आहे. सर्व वेळ वाचनात किंवा तसंच काही करण्यात घालविते, पण शारीरिक त्रास घेण्याचा शरीराला वाव देत नाही. तर तो अंतर्मुख होतो. कां? का मी इतका आळशी आहे ? किंवा कोणीतरी नेहमीसारखा चिडलेला असतो, लोकांना तो आवडत नाही. तर इतरांवर रागवण्यापेक्षा त्याला स्वत:ला पहायला पाहिजे. मी इतरांवर का रागवतो? मी इतरांसारखा कां नाही? माझ्यामध्ये काय आहे, जे मला उदास करीत आहे ? मग तुम्हाला कळेल की तुम्ही एकतर रुढींनी लादले गेले आहात किंवा तुम्हाला विचित्र अहंकार आहे, जो तुमच्याकडून चुकीच्या गोष्टी करून घेत आहे. आधुनिक संस्कृती ही जास्त करून मानवाला हितकारक नाही. लोक काय करणार आहेत, ते काय करू शकतात, हे तुम्हाला माहीत नाही. सहजयोगामध्ये तुम्ही दांभिक असू शकत नाही. जर तुम्ही सहजयोगामध्ये पूर्णपणे विश्वास ठेवला नाही, स्वत:ला पवित्र केलं नाही, तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित केलं नाही, स्वत:मध्ये उडी घेतली नाही तर तुम्ही उघडकीस याल आणि सहजयोगापासून दूर फेकले जाल, यात शंका नाही. मी तुम्हाला टाकणार नाही. मी क्षमा करेन. पण ज्याप्रमाणे मी म्हटलं आहे. सहजयोगामध्ये दोन शक्त्या आहेत. केंद्रोपगामी शक्तीने तुम्ही आकर्षित होता, पण केंद्रोपसारी शक्तीने तुम्ही बाहेर टाकले जाता. त्यामुळे आपल्याला फार सावधपणे रहावे लागेल कारण जे काही तुम्हाला मिळालं आहे ते काहीतरी इतकं स्वर्गीय आहे, इतकं सुंदर आहे, की मला स्वत:ला आश्चर्य वाटतं, पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, ब्रह्मचैतन्याने स्वत:च प्रभावी भूमिका घेतली आहे. ते कार्यान्वित झालं आहे, कारण आपण कृतयुगामध्ये आहोत. एका युगामधून दुसऱ्या युगामध्ये जेव्हा अंतर असतं तेव्हा हे कृतयुग येतं. जसं आपल्याकडे कलियुग आहे, यावेळी आपत्ती-उत्क्रांतीची क्रिया होते. आता शेवटची उत्क्रांती चालू झाली आहे. तशाप्रकारे हे सर्व फोटो, हे चमत्कार होतात कारण ब्रह्मचैतन्य हे सर्व चमत्कार घडवून आणतं. या वेळी जर आपण दांभिक होण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वत:लाच दुखापत करीत आहोत. जर आपण स्वत:वर न करता इतरांवर टीका करत असलो तर आपण ही संधी चुकविणार आहोत. वेळेचं महत्त्व तुम्हाला कळलं पाहिजे. सहजयोग फार चांगला आहे आणि हे सगळे भाऊबहीण असण्याचा आनंद तुम्ही उपभोगिता आणि तुमचे चेहरे गुलाबपुष्पांप्रमाणे टवटवीत आहेत, पण अजूनही अशी वेळ येऊ शकते, की तुम्ही मागे पडाल. तेव्हा तुम्ही स्वत:ला शुद्ध करा. स्वत:बद्दल कधीही समाधानी होऊ नका. काही लोकांना कधीच वाटत नाही की मी त्यांच्याबरोबर बोलते. त्यांना नेहमी असच वाटतं की मी इतरांशीच बोलते. आपल्याला आत्मपरीक्षण केले पाहिजे. चिंतन केले पाहिजे आणि जेव्हा आपण आपल्या दोषांकडे पाहू तेव्हा ते गळून पडायला लागतील. तुम्हाला आदर्श बनले पाहिजे म्हणजे लोक तुमच्याकडे पहातील. तुम्ही जर नुसते मिरवणार असाल तर लोक म्हणतील 'या दिखाऊपणाकडे पहा. शो ऑफ कडे १५ पहा.' प्रत्येकजण तुम्ही कसे आहात ते बघूं शकतो, जरी त्यांना ते स्वत:मध्ये दिसले नाही तरी. तेव्हा या सर्व अहंकाराच्या प्रदर्शनासाठी तुम्हाला फार सावधगिरीने राहिले पाहिजे. आता समजा, तुमच्याकडे काही पैसे असले, तुम्ही रुबाब मिरविण्याचा प्रयत्न करता. सरकार दरबारी तुम्हाला काही स्थान असलं तर तुम्ही दिखाऊपणा करता, या सर्व कृत्रिम गोष्टी आहेत. या गोष्टी तुम्हाला समृद्ध करीत नाहीत. कोणत्याही प्रकारे तुम्हाला गरज असलेली शक्ती त्या देत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारे तुम्हाला सुरेख करत नाहीत. या सर्व बाह्यातल्या गोष्टी कोणाकडेही असू शकतात. त्यात काही विशेष नाही, पण अंतर्यामीचं जीवन जे तुमच्याकडे असतं तोच एक तुम्हाला स्वत:ला शुद्ध करण्याचा मार्ग आहे आणि ख्रिस्ताने सांगितलेल्या पद्धतीनेच पुनरुत्थान होऊ शकतं. आता तुम्ही एका कुटुंबाचे घटक आहात. तुमचं वागणं कसे आहे ते पहा. तुमची मुलं कशी आहेत ? सामूहिक आहेत कां? भांडणं करतात कां? ती वाटून घेतात? तुम्ही पहिल्यांदा तशी कृती करा, त्याशिवाय तुमची मुलं करू शकणार नाहीत. ख्रिस्ताकडे पहा, जेमतेम चार वर्षात त्यांचं ध्येय पूर्णत्त्वाला नेणं ते कार्यान्वित करू शकले. बघा, तेवढ्या थोड्या काळात फक्त पुनरुत्थान साध्य करण्यासाठी ते किती ठिकाणी गेले, किती सुरेख उपदेशात्मक कथा त्यांनी सांगितल्या, किती लोकांशी ते बोलले. ते अत्यंत साधेपणाने राहिले. त्यांना असे तंबू वरगैरे नव्हते. डोंगरावर लोकांना गोळा करून त्यांच्याशी ते बोलत होते. पर्वतांवर, प्रवचन दिल्याप्रमाणे. त्यांचं त्यांनी ऐकलं, पण ते जे काय सांगत होते ते सर्वांनी ग्रहण केलं नाही. फार कमी, त्यांचे फक्त बारा शिष्य होते. ज्यांनीसुद्धा त्यांच्या मृत्युनंतर त्यांना जाणलं. त्याआधी ते काय होते हे त्यांना समजलं नाही. जेव्हा त्यांचं पुनरुत्थान झालं, त्यानेसुद्धां त्यांना विचार करायला लावला; ते कोण होते; त्यांनी काय केलं आणि आम्ही कसे काय त्यांचे शिष्य आहोत ! ते साधे होते, पण त्यांची बुद्धी आणि प्रभावीपणा एकाएकी प्रदर्शित झाला. त्यांनी खरोखर दुसरा जन्म मिळवण्याचे इतके चांगले मार्ग दाखविले. खिस्ती धर्म पॉल आणि ऑगस्टीनच्या चुकीच्या पताकेखाली पसरला आणि तशाप्रकारे आपण ख्रिस्त धर्माकडे पहातो; इतकंच नव्हे तर ख्रिस्ताचा ख्रिस्ती धर्म अशाप्रकारे कसा असेल; असं आपल्याला वाटतं. हा ख्रिस्ती धर्म जो आता आला आहे, त्याला ख्रिस्ताशी काही देण घेणं नाही. त्यांनी म्हटलं की ते त्यांच्या कपाळावर चिन्ह धारण करतील आणि मला कळेल ते कोण आहेत ते. जसं आहे त्याप्रमाणे, तुमच्यावर आधीपासून चिन्हं आहे. ख्रिस्ताने त्याच्या शेवटच्या निवाड्यांत तुम्हाला निवडलं आहे आणि तुम्ही तिथे आहांत, पण प्रत्येकाला हे ठाऊक असायला हवं की, असंही होऊ शकतं की, तुम्हीं दांभिक आहांत, तुम्ही शब्दांशी नुसतं खेळता, कदाचित आपल्याला अजून स्वत:ला सिद्ध करायचं असेल. म्हणून फक्त तुमचे मन स्वत:मध्ये घाला आणि स्वत:ला विचारा की, 'मी कुठे चुकलो आहे. १ खिस्ताला जेव्हा क्रॉसवर टांगण्यात आलं, त्यावेळची त्यांची क्षमा करण्याची गुणवत्ता लक्षांत १६ घेतली पाहिजे. 'ते काय करीत आहेत ते त्यांना माहीत नाही', असे म्हणून कशाप्रकारे त्यांनी त्यांना क्षमा केली. हे क्रॉसवर चढणं, जो माणूसच चढवतो आहे, त्या व्यक्तीकरिता ठीक असेल. तुमच्या सर्व क्रुसीफिकेशनमधून निघण्यासाठी तुम्हाला अत्यंत पवित्र, आदर्श आणि सुंदर जीवन असलं पाहिजे. तुमचे गुण, महती, न्यायीपणा याबद्दल तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. नाही तर आधुनिक युगातल्याप्रमाणे, लोक त्यांच्या वेडसर गोष्टींबद्दल फुशारक्या मारतील, पण चांगल्या गोष्टींबद्दल नाही. दोन्ही गोष्टींबद्दल फुशारक्या मारण्याची गरज नाही, पण ज्या गोष्टी इतक्या छान, सुरेख आहेत त्याबद्दल तुम्ही अभिमान बाळगू शकता. खिस्तांनी त्यांच्या वडिलांच्या इच्छेला शरण जाऊन त्यांना विचारलं हा कप त्यांनी काढून घेतल्यास चांगलं होईल, पण जेव्हां वडिलांनी सांगितलं नाही हा कपच तुला प्यायला पाहिजे तेव्हा त्यांनी अनुमती दिली आणि फार धैर्याने सुरेखरीत्या ते त्यामधून गेले. आपण जे काही करू त्यामध्ये आपल्याला तशाप्रकारची शरणागती हवी. त्या शरणागतीने आपण काही केलं पाहिजे. त्यामुळे आपण काही साध्य करतो आहे, रुबाब दाखवतो आहे किंवा काही असा आपण विचार करता कामा नये. आपण शरणागतीमुळे ते कार्यान्वित होत आहे असा विचार केला पाहिजे. आपली शरणागती हे महान आशीर्वाद आहेत असं आपण समजलं पाहिजे. तुमच चित्त जर तुम्ही हृदयावर ठेवलं आणि म्हटलं की 'शरण आहे' तर खूप झालं, पण तुम्ही असं म्हणता कामा नये. 'श्रीमाताजी, मला शरण जायला मदत करा.' या सर्व प्रार्थना काही वेळा वास्तवतेपासून पळून जातात. तुम्ही मला मदत करा वगैरे. शरण जाणं फार सोपं आहे. 'श्रीमाताजी, कृपावंत होऊन माझ्या चित्तामध्ये या.' असं फक्त म्हणायचं आणि तुम्ही जसं म्हणत जाता तशी कुंडलिनी वर चढत जाते आणि ती तुम्हाला स्वच्छ करते, पण अडचण हीच आहे, की तुम्ही तिला नेहमी खराब करता. ख्रिस्त लोकांवर छाप पाडतात, ते त्यांच्या व्यक्तिगत जीवनामुळे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते किती शक्तिमान होते, ते त्यांनी दाखविलं आणि त्यांच्या पुनरुत्थानामध्येसुद्धा. मानवाच्या आकलनशक्तीच्या पलीकडे ते होते, हे त्यांनी दाखविलं. ते म्हणजे पवित्र व्यक्तित्व होतं हे दाखविलं. आपल्याला अशाप्रकारे उठलं पाहिजे, की आपण पवित्रता मागूं आणि आपण स्वत: ती कार्यान्वित करणार आहोत. जे काही झालं आहे ते विसरून जा. त्या गोष्टीबद्दल काळजी करू नका, पण जे काही होणार आहे ते असं आहे. तुम्ही फक्त पावित्र्य मागा आणि सर्व द्वेष, सर्व टीका नाहीशी होईल. ते पावित्र्य तुम्हाला अशी अनुपम स्थिती देईल की लोक नुसतं तुमचं जीवन बघतील आणि बदलतील. १७ ी AA का डिक তল छ ी ४® १९७०० - मी ठरवले होते की त्या रात्री समुद्र किनान्यावरच थांबायचे. मी एकटीच होते आणि खूप छान वाटत होते आणि ध्यान करतांना मला असे वाटले की आता सहसार उघडण्याची वेळ आली आहे. १९८० - मी आज तुम्हाला हे सर्व रसांगते आहे कारण तुमच्यात ती योग्यता आहे. त्यामुळे तुम्हाला हे जाणून घ्यायला पाहिजे की मी तुम्हाला हे सर्व सांगते आहे ही तुमच्यासाठी खरप भारयाची गोष्ट आहे. मी तुम्हाला याची किल्ली देत आहे. १९९० - इतक्या वर्षायासून या दिवसाचीच वाट बघत होते. या वर्षाचा हा एकविसावा सहसार दिवस आहे. या कारणामुळेच हाति एक महत्त्वपूर्ण बदल घडवणारा आहे. तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक एकविसाव्या दिवशी ज्या ठिकाणी जन्मपत्रिकेचा प्रश्न आहे, आम्ही आपले कॅलेंडर बदलले आहे. तर आता एक बदल घडणार आहे आणि तुम्हाला त्याविवयीची पूर्वसूचना मिळू शकेल-एक नवा समजूतदारपणा, एक माहिती नव्या आयामाची. २००० - माझी नजर खूप महान आहे. संपूर्ण जीवनात मला असे वाटते की विश्वभरात याची जागृती व्हावी. संपूर्ण विश्वातील लोकांमध्ये याची जागृती व्हावी. २००८ - माझ्याकडे जे सर्वश्रेष्ठ आहे ते मी तुम्हाला दिले आहे आणि मला असे वाटते की परत दसऱ्यांदा मी हे करू शकणार नाही. हे अशासाठी नाही म्हणत की मी वृद्धावस्थेकडे आहे, तर यासाठी म्हणते की मला तुम्हाला सहजयोग पसरवण्यासाठी पृर्ण स्वात्तंत्र्य द्यायचे आहे. लोकांच्या कल्याणासाठी याचा उपयोग करा. शट ६ं मे ॐ] ॐ] Velaleleladclelelolela परमपूज्य मातीजी श्री निर्मलादेवी द्वारा उपदेश आज सत्ययुगाचा पहिला दिवस आहे. निसर्गच आपल्याला सांगेल की सत्ययुगाची सुरुवात झाली आहे. सहजयोग सत्ययुग घेऊन आला आहे. तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात. तुम्हाला स्वत:वर श्रद्धा तसेच विश्वास असायला हवा. सहजयोगाच्या कार्यपद्धतीवर तुमची श्रद्धा असायला हवी. तुमच्या ज्योतिर्मय श्रद्धेने काय कार्य होते ? पूर्ण विश्वास असावा. माझ्याकडे बघा! मी एकटीने सहजयोगाचा प्रसार केला आहे. बस, परमचैतन्यावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारा. परमेश्वर तर इथे नाही, पण मी तर तुमच्याबरोबर बोलण्यासाठी इथे आहे. तर आता सहजयोग्यांनी शंकामुक्त व्हायला पाहिजे. १. केंद्रप्रमुखांनी अतिशय सावध राहिले पाहिजे. त्यांना कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. ते फक्त निरोप देण्याचे माध्यम आहेत, जसे पत्र पोस्ट करण्यासाठी मला ते एखाद्या पाकिटात टाकावे लागते. स्वामित्वाच्या भावनेमध्ये त्यांनी सावध राहिले पाहिजे. २. कोणत्याही गोष्टीचे नियोजन करतांना नेहमी आपले चित्त महत्त्वपूर्ण गोष्टींवर असावयास हवे. आपल्या प्राथमिक गोष्टींविषयी माहिती स्पष्ट असायला पाहिजे. ३. जर काही नकारात्मकता असेल तर मला सांगा. मी ती ठीक करेन. ४. आयोजक नेहमी पैशाची चिंता करीत असतात. सहजयोगात तुम्हाला नेहमीच धन प्राप्त होत राहील. परंतु जर तुम्ही चिंता करीत असाल तर धन मिळणार नाही. पैसा इतका महत्त्वपूर्ण नाही. ५. आपल्यामध्ये एकमेकांसाठी सद्सद्विवेक असावा. ६. तुम्हाला कोणतीही भीती नसावी. हे तर केवळ एक नाटक आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. जर तुम्ही म्हणाल की तुम्हाला भीती वाटते तर मी काय बोलणार? जर तुमच्याकडून काही चूक झाली तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला सांगू शकते की हे चुकीचे आहे. तुम्ही त्याचे वाईट वाटून घेऊ नका. जर काही सुधारणा करायच्या असतील तर त्या मी करेन. जर तुम्ही घाबरलेले असाल तर तुमचा अहंकार मधे येईल आणि मी तो मोड़ून टाकेन. कमीतकमी तुम्ही तरी मला घाबरू नका. आपल्या चुकांमधूनच आपण शिकत असतो. चुका झाल्यावर घाबरून जाऊ नका. गुढीपाडवा, दिल्ली, २४-०३-९३ २२ सर हे का अ जेव्हा तुम्ही सर्वच गीष्टी आपल्या बुद्धरीच्या सहाय्याने व्यक्त करू शकते नाही, तेव्ही तुम्ही कलेची मदत घेता, स्वेतःली व्यक्त करण्यासाठी तुम्ही काही चिन्हांचाही उपयोग करती, अशी गोष्टी व्यक्त करण्यासाठी ज्या तुम्ही शब्दीत व्यक्त करू शकते नाही. ते हेच आहे जे एक कलाकार करत असती. - दिवाळी १९९३ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा.लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे ४११०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in ै ार ১ तुम्ही अतीउच्चतेपेक्ष ही उच्च आहात. २२.३.१९८४ 2ा ्ी ---------------------- 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-0.txt मराठी मार्च-एप्रिल २०११ र ्र 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-1.txt ৫ ৫ f t t t tf t tf t t f t t t t t t t t t t t { २१ मार्च ....अपमानजनक प्रकार आणि भावनात्मक धर्मक्या तसेचे अशी सर्व व्यवस्था ही या देशाची परंपरा नाही. असे करणाच्या लोकांना बाहेर फेकले जाईल. तुम्ही असे काही करू नये. मी तुम्हाला सांगते की सहजयोगात तुम्ही असे काही करू शकते नाही. जन्मदिवस पूजी, मुंबई, २२.३.२९८४ बमअम्थ ॐ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-2.txt या अंकात... निव््याज्य प्रेम ...४ वि पुनरुत्थान (ईस्टर पूजा) ...१२ परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी द्वारा उपदेश ... २२ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-3.txt क क ी दिल्ली, दि. ३० मार्च १९९०, अनुवादित 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-4.txt निल्यांज्य प्रेम पाविन्याचे दुसरे नाव आहे निव्याज्य प्रेम 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-5.txt अ जि नवरात्रीची चतुर्थी आहे आणि नवरात्रीमध्ये रात्री पूजा झाली पाहिजे. अंधकार दूर करण्यासाठी रात्रीत प्रकाशाला आणणे अत्यावश्यक आहे. आजच्या दिवसाचा एक आणखी संयोग आहे, की आपण लोक आमचा जन्मदिवस साजरा करीत आहात. आजच्या दिवशी गौरीजींनी आपल्या विवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्र्याचे स्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवली गेली. ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मानव या विश्वात आले ते पावित्र्यामुळे सुरक्षित रहावे आणि अपवित्र गोष्टींपासून दूर रहावे , यासाठी साऱ्या सृष्टीला गौरीजींनी पवित्रतेने न्हाऊन काढले आणि त्यानंतरच साऱ्या सृष्टीची रचना झाली. तर, जीवनामध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण कार्य हे आहे, की आपण आपल्यामधील पावित्र्याला सर्वात उच्च गोष्ट समजणे, पण पवित्र याचा अर्थ असा नव्हे, की आंघोळ करून शूचिर्भूत होऊन, सफाई करून आपल्या शरीराला ठीक करणे, तर आपल्या हृदयाला स्वच्छ केले पाहिजे. हृदयाचा सर्वात मोठा विकार आहे क्रोध आणि मनुष्य जेव्हा क्रोधित होतो तेव्हा जे पवित्र आहे ते नष्ट होऊन जाते कारण पावित्र्याचे दूसरे नाव आहे निव्व्याज्य प्रेम. ते प्रेम जे सतत वाहत असते आणि कशाचीही इच्छा करीत नाही. त्याची तृप्ती यातच आहे, की ते सतत वाहत आहे आणि ज्यावेळी ते वाहत नाही त्यावेळी ते चिंतीत (अस्वस्थ) होते, तर पवित्र याचा अर्थ असा की आपण आपल्या हृदयाला प्रेमाने भरून टाका. क्रोधाने नव्हे. क्रोध आपला शत्रू आहे, पण तो विश्वासाचा शत्रू आहे. जगात जेवढी युद्धे झाली, जेवढी हानी झाली, ती सर्व सामूहिक क्रोधाची कारणे आहेत. क्रोधासाठी कारणे अनेक असतात, 'मी अशासाठी नाराज झालो कारण असे होते.' प्रत्येक क्रोध कोणते तरी कारण शोधू शकतो. युद्धासारख्या भयानक गोष्टीसुद्धा क्रोधापासून उपजतात. त्यांच्या मुळामध्ये हा क्रोधच असतो. जर हृदयामध्ये प्रेम असेल तर क्रोध येऊ शकत नाही आणि क्रोधाचा देखावा असेल, तर तो प्रेमासाठीच. एखाद्या दुष्ट राक्षसाचा जेव्हा संहार केला जातो, तो सुद्धा त्याच्यावर प्रेम केल्यामुळेच होतो कारण तो या योग्यतेचारच असतो, की त्याचा संहार झाला पाहिजे, ज्यायोगे तो आणखी पापकर्म करणार नाही, पण हे कार्य मानवासाठी नाही. हे तर देवीचे कार्य आहे, जे त्यांनी ह्या नवरात्रामध्ये केले. तर, हृदयाला विशाल करून हृदयात असा विचार करा की आम्ही कोणावर असे प्रेम करतो जे निव्याज्य, निर्मम आहे, ज्याबद्दल आमच्यामध्ये असे नाही की हा माझा मुलगा, माझी बहीण आहे, माझे घर, माझी वस्तू. मनुष्याची जी स्थिती आहे त्यापेक्षा आपण खूप उच्च स्थितीला आला आहात कारण आपण सहजयोगी आहात. आपला योग परमेश्वराच्या या प्रेमाच्या सूक्ष्म शक्तीशी झाला आहे. ही शक्ती आपल्या आतमध्ये अविरत वाहत आहे. आपल्याला प्लावित करीत आहे. आपल्याला सांभाळते आहे. आपल्याला तर उठवते आहे. वारंवार आपल्याला प्रेरित करते आहे. आपल्याला आल्हाददायी मधुमय प्रेमाने भरून देत आहे. अशा सुंदर शक्तीशी आपला योग झाला, परंतु आता आमच्या हृदयात त्याच्यासाठी कितीसे स्थान आहे हे पाहिले पाहिजे. आपल्या हृदयात आईसाठी तर प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी आपण लोक आनंदात आहात, पण अजूनही दोन प्रकारचे प्रेम असले पाहिजे, तरच आईचे पूर्णप्रेम असू शकते. खूप एक प्रेम स्वत:विषयी, की आम्ही सहजयोगी आहोत. आम्ही सहजयोगामध्ये शक्ती प्राप्त केली, पण आम्ही याला कशाप्रकारे वाढविले पाहिजे. अनेक लोक सहजयोगाच्या प्रसारासाठी पुष्कळ कार्य करतात. ६ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-6.txt (हॉरीझॉन्टल मूव्हमेंट) समांतर चलन, पृथ्वीप्रमाणे चारही बाजूला पसरणारे. ते लोक स्वत:कडे दृष्टी फिरवत नाहीत, तर जे उध्ध्वगामी चलन आहे, त्याला उत्थानाची गती मिळत नाही. बाह्यामध्ये ते पुष्कळ काही करू शकतात. बाह्यामध्ये ते थांबतील, काम करतील, सर्वांना भेटतील, पण आतल्या शक्तीला वाढवू शकत नाहीत. असेही अनेक लोक आहेत जे आतल्या शक्तीकडे खूप लक्ष देतात आणि बाहेरच्या शक्तीकडे नाही, तर त्यांच्यामध्ये संतुलन येत नाही आणि ज्यावेळी लोक बाह्याच्या अंगामध्ये जास्त वाढू लागतात तेव्हा त्यांच्या आतील शक्ती क्षीण होऊ लागते आणि असे होत होत अशा कडेला पोहोचते की लगेच अहंकारामध्ये बुडू लागतात, की आम्ही सहजयोगाचे एवढे कार्य केले आहे, इतकी मेहनत घेतली आहे, नंतर अशा लोकांचे एक नवीन जीवन सुरू होते, जे सहजयोगासाठी अजिबात उपयुक्त नाही. ते स्वत:बद्दल विचार करतात, की आमचे खूप महत्त्व असले पाहिजे, सेल्फ इंपॉर्टन्स. प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वत:चे महत्त्व दाखवतील. आपले विशेषत्व दाखवतील. स्वत:ला पुढे करतील, पण आतून खिळखिळीतपणा आला आहे, मग त्यांना काही आजार झाला, वेडेपणाची लहर आली , काही मोठे संकट आले, की मग असे म्हणतात की, 'माताजी, आम्ही तर आपल्यावर स्वत:ला पूर्णपणे समर्पित केले होते, मग असे कसे झाले?' याची जबाबदारी आपल्यावरच आहे की आपणच बहकलात. मग असा माणूस एकतर्फी होऊन जातो. तो दुसर्याशी संबंध प्रस्थापित करू शकत नाही. त्याचा संबंध फक्त लोकांवर रूबाब पाडण्यात असतो आणि स्वत:ला उच्च दाखवणे, सर्वात पुढे आले पाहिजे, सगळ्यात त्यांचं महत्त्व असले पाहिजे, तर मग असेही होऊ शकते, की ते विसरून जाऊ शकतात, की श्री माताजींना सुद्धा काही करावयाचे आहे. त्यांना सुद्धा काही दान द्यावयाचे आहे. मी पाहिले की, राहुरी, मुंबईतसुद्धा कशा प्रकारचे असे लोक एकदम उठून वर आले आणि ते स्वत:ला खूप महत्त्वपूर्ण समजू लागले, मग तिथे आरती होत नव्हती, फोटो पुसला जात नव्हता, तरी बरं फोटो नाही लावले. आपलेच घोडे पुढे दामटत. कोणाला काही विचारायचे नाही. आपण करणार. मग भांडणे सुरू झाली. ग्रुप्स तयार झाले कारण ज्या सूत्रामध्ये तुम्ही बांधले गेले आहात ते तुमच्या आईचे सूत्र आहे आणि त्याच सूत्रामध्ये आपण बांधून रहा आणि पूर्ण वेळ हे समजून घ्या की आपण एकाच आईची लेकरे आहोत. आमच्यामध्ये ना कोणी उच्च ना कोणी नीच, ना आपण काही कार्य करत असतो. हे चैतन्यच सर्व कार्य करते. आम्ही काही करतच नाही. ही भावना जेव्हा येते, की 'आम्ही मोठे आहोत, आम्ही हे केले, आम्ही ते करू, हे करू, ' तेव्हा परम चैतन्य म्हणते, 'तुला जे करायचे आहे ते कर, जेथे जावयाचे आहे तिथे जा हवे तर नरकात जा , हवे तर स्वत:ला नष्ट कर, स्वत:चा सर्वनाश कर.' ते आपल्याला थांबवणार नाहीत कारण स्वातंत्र्याला ते मानतात. आपल्याला स्वर्गात जायचे असेल तर त्याचीही व्यवस्था आहे. पण सहजयोगामध्ये आणखी एक मोठा दोष आहे, आपण एक सामूहिक विराट शक्ती आहोत. आपण एकच आहोत. सर्व एकाच शरीराचे अंग -प्रत्यंग आहोत. त्यामध्ये जर कोणी एक असा झाला किंवा दोनचार असे झाले की आपला ग्रुप तयार करतील, तर ज्याप्रमाणे कॅन्सरची मॅलिग्न्सी असते, की एकच पेशी वाढू लागते, वेगळ्या प्रकारे, त्याप्रमाणेच एक व्यक्ती वाढून साऱ्या सहजयोगाला ग्रासू शकते आणि आपली सारी मेहनत व्यर्थ जाते. आपल्याला तर शिकले पाहिजे, जो सर्वात खाली असतो, सर्व नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो आणि स्वत:ला सागरापासून तापवून घेऊन वाफ तयार करून साऱ्या दुनियेवर पावसाचे वरदान पाठवितो. त्याची जी नम्रता आहे तीच त्याच्या गहनतेचे लक्षण आहे. परत तीच वर्षा नद्यांमधून धावत जावून त्याच समुद्राकडे जाते. जेव्हा आपल्यामध्ये नम्रता व प्रेम ७ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-7.txt येईल तेव्हाच आपण या समुद्राप्रमाणे विशाल होऊ, पण आपलेच महत्त्व करायचे, स्वत:लाच विशेष समजायचे, यामुळे सर्वात वाईट गोष्ट ही, की परमचैतन्य आपल्याला सांगून टाकेल की 'जा.' मग आपण एका बाजूला फेकले जाल. ती माझ्यासाठी दुःखकारक गोष्ट असते. असे लोक जे विचार करतात की 'आम्ही हे कार्य केले, ते कार्य केले' त्यांनी पटकन मागे होऊन पाहिले पाहिजे, की आम्ही ध्यान करतो का? आमचे ध्यान लागते का? आम्ही किती गहनतेमध्ये आहोत ? आम्ही कशाकशावर प्रेम करतो, किती जणांवर प्रेम करतो आणि किती जणांशी दुश्मनी करतो. सहजयोगामध्ये काही लोक खूप गहनतेत आहेत. काही अजून किनार्यावरच डोलताहेत. ते कधी फेकले जातील ते सांगू शकत नाही. मी आपल्याला आधीच सांगितले आहे, की १९९० नंतर एक नवीन दालन उघडणार आहे आणि एक नवीन उडी आपल्याला मारायची आहे. ज्याने आपण या नवीन मोहोळात उतरून त्या नव्या गोष्टीला पकडू शकू. सहजयोगाची प्रगती वीस वर्षांची होणार आहे आणि यात टिकून राहण्यासाठी पहिली गोष्ट आपल्यामध्ये पावित्र्य आले पाहिजे. जे नम्रतेने भरले आहे. जर आपण एकदम स्वच्छ आणि पवित्र असाल तर आपल्याला कोणालाही शिवून, कोणाशीही बोलून अपवित्रता येणार नाही कारण आपण प्रत्येक गोष्टीला शुद्ध करतो. आपला स्वभावच शुद्ध करण्याचा आहे. आपण ज्याला भेटाल त्याला शुद्ध करीत जाल. त्यात घाबरण्याची काय गोष्ट आहे? त्यात दुसर्याला धिक्कारण्याची काय गोष्ट आहे? तर मग आपली पवित्रता कमी आहे. जर आपली पवित्रता संपूर्ण आहे तर, त्या पवित्रतेमध्येसुद्धा शक्ती व तेज आहे. ती इतकी शक्तिशाली आहे, की कोणत्याही अपवित्रतेला खेचून घेऊ शकता. जशी प्रत्येक प्रकारची गोष्ट समुद्रामध्ये एकाकार होऊन जाते. आता दूसरे लोक आहेत जे फक्त स्वत:च्या प्रगतीचा विचार करतात. ते असा विचार करतात, की 'आम्हाला दुसर्यांशी काय करायचे आहे? आम्ही आमच्या खोलीत बसून श्री माताजींची पूजा करतो आम्ही त्यांना मानतो, आमचा जगाशी काही संबंध नाही' आणि दुसऱ्यापासून वेगळे राहतात. आपण एका शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत. मग आपण म्हणाल, 'माताजी, मी इतकी पूजा करतो, इतके मंत्र म्हणतो, इतके काम करतो मग माझी अशी स्थिती का?' कारण आपण त्या सामूहिक शक्तीपासून दूर गेलात. सहजयोग सामूहिक शक्ती आहे तेव्हा दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे की आपण आपली शक्ती सांभाळणे आणि सामूहिकता घडवत जाणे तरच आपल्यामध्ये पूर्ण संतुलन येईल. मी असे लोक पाहिले आहेत, ज्यांनी सहजयोगासाठी खूप कार्य केले, बरेच चांगले बोलत होते, भाषण देत होते आणि आपल्या भाषणाची टेप तयार केली. मग लोकांना सांगू लागले, आपण माझी टेप ऐका. मग लोक आमची टेप सोडून त्यांची टेप ऐकू लागले. त्यांची अशी स्थिती झाली, की ते आमच्या फोटोला तर नमस्कार करायचे पण आम्हाला नाही कारण त्यांना फोटोची सवय झाली होती. मग त्यांनी स्वत:चे फोटो छापले. ते फोटो सर्वांना दाखवू लागले. अशाप्रकारे आपलेच महत्त्व वाढवू लागले. करता करता अशा खड्ड्यात पडले आणि मग सुटून गेले सहजयोगातून, असे लोक का निघाले ? कारण संतुलन नाही आणि संतुलन नसल्यावर माणूस उजवीकडे किंवा डावीकडे जातो. दोन प्रकारच्या शक्त्या आपल्या आतमध्ये आहेत. ज्यायोगे आपण सहजयोगाकडे खेचलेही जातो आणि दुसरी शक्ती ज्यामुळे आपण बाहेर फेकले जातो. बरं, परत लोक कमी झाले, तर यामध्ये सहजयोगाचे नुकसान ८ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-8.txt र ॐं हि नाम तर झाले नाही. यामध्ये त्यांचेच नुकसान झाले. जर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, तर या गोष्टीला समजून घ्या की सहजयोगाला आपली गरज नाही. आपल्याला सहजयोगाची गरज आहे. 'योग' याचा दुसरा अर्थ होतो युक्ती. एक अर्थ आहे, की संबंध जोडला जाणे, दुसरा आहे की युक्ती. पहिली तर युक्ती ही की आम्हाला याचे ज्ञान झाले पाहिजे. ज्ञानाचा अर्थ बुद्धी नव्हे. युक्ती म्हणजे आमच्या बोटांमध्ये, हातामध्ये, आतमध्ये कुंडलिनीचे पूर्णपणे जागरण होणे हे ज्ञान आहे. मग आणखीसुद्धा ज्ञान होऊ लागते. या ज्ञानामुळे आपण लोकांची कुंडलिनी जागृत करू शकतो. त्यांना समजावू शकतो. त्यांच्याशी पूर्णपणे आपण एकाग्र होऊ शकतो. त्यांच्याशी आपण वार्तालाप करू शकतो. तर आपल्याला यामुळे बौद्धिक ज्ञानसुद्धा येते. आपल्याला सहजयोग ९ अe 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-9.txt समजतो. नाही तर आधी कोण समजू शकत होते ? कबीर, नानकजींच्या गोष्टी कोणी आधी समजू शकत होते का? आपले बुद्धिचातुर्य वाढते. अगम्य गोष्ट गम्य होते. का दुसरी युक्ती काय आहे ? ती ही की आपण आमच्यावर भक्ती करतां. ती भक्तीसुद्धा जेव्हां तुम्ही करता तेव्हा अनन्य भक्ती करता. तादात्म्यामध्ये आपण आमच्याशी जोडले जाता. जसे आम्हाला वाटले तसेच आपल्याला लागते. आज उशीर झाला तर वाटू आम्हीसुद्धा असे सांगू शकतो, की आम्ही खूप थकलो. आमच्याने होणार नाही. पण आम्ही असा विचार केला नवरात्री आहे, रात्रीत करावे आणि तोच मुहर्त आम्हाला मिळावयाचा होता. तर आम्हाला करायचेही आहे आणि अत्यंत आनंदात आम्ही करीत आहोत. आम्ही थकलो आहोत, आरामही केला नाही असा विचारही आम्ही करीत नाही आणि आपल्यालासुद्धा असा विचार केला पाहिजे की हीच वेळ श्री माताजींनी ठरविली आहे कारण हीच वेळ आमच्यासाठी उचित आहे, पूजेसाठी. पण अर्धेअधिक लोक उलट्या गोष्टींचा विचार करतील. आम्ही सकाळपासून बसलो आहोत. आम्हाला भूक लागली, मुले झोपली असतील. तर ती अनन्य भक्ती नाही कारण माझा जो विचार आहे, तो आपल्या विचारामध्येच आहे, कोणासाठी मी विचार करते ? जर 'श्री माताजी, हे इतके खराब आहे, असे आहे.' मी म्हणते, 'नाही हो, एकदम चांगले आहे.' मी विचार करते, मी जे बघू शकते ते हे का बघू शकत नाहीत, तर मग अनन्य नाही झाले, अन्य झाले, दसरे झाले. अशात-हेने जसे तुमच्याबद्दल आमचे प्रेम आहे, आपणही सर्वांबद्दल तसेच प्रेम जोपासा. जर ही गोष्ट आपल्यामध्ये नाही तर ते अन्य आहे, अनन्य नाही. जर आमच्याच शरीराचे अंग-प्रत्यंग आहे तर जसे आम्ही आहोत तसेच त्यांना झाले पाहिजे. जसा आम्ही विचार करतो तसाच विचार आपल्याला केला पाहिजे. तर हे वेगळा विचार का करतात ? उलट्या गोष्टीचा विचार का करतात ? जे विहिरीत आहे तेच घड्यामध्ये यायला पाहिजे हेच प्रेमाचे स्रोत आहे. दुसरी गोष्ट कशी येऊ शकेल? आणि जेव्हा दुसरी गोष्ट येते तेव्हा मी विचार करते की त्यांनी आणि कोणत्या दसर्या विहिरीतले पाणी भरले आहे. हा घडा माझा नाही. आता दूसरी गोष्ट म्हणजे 'श्री माताजी आम्ही आपल्याला शरणागत आहोत.' जर तुम्ही शरणागत आहात तर आम्ही तुम्हाला काही सांगितले किंवा कोणतीही गोष्ट समजाविली किंवा आपल्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला, काही ठेवले, तर त्याला नाकारण्याचा प्रश्नच कसा उद्भवेल? पण आपण आणि आम्ही एक १० 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-10.txt झालो तर त्यांचा प्रश्नच कसा उद्भवेल? श्री माताजींनी सांगितले ते सांगितले , आम्ही 'श्री माताजी'च झालो तर आम्ही नाही कसे म्हणू शकणार? तर आपल्यामध्ये हे तादात्म्य नाही आले. तर ही दुसरी युक्ती आहे, की 'श्री माताजी, माझ्या हृदयात आपण या. माझ्या बुद्धीमध्ये आपण या. माझ्या विचारांमध्ये आपण या. माझ्या जीवनाच्या प्रत्येक कणामध्ये आपण या. आपण जिथे सांगाल तिथे आम्ही हजर आहोत, हात जोड़ून. ' पण आपल्याला सांगावं तर लागेल ना! आणि पूर्ण हृदयासह, कुठल्या मतलबाने, कारणाने नाही. तिसरी गोष्ट. आम्ही हे काम करतो आहोत. आम्ही सहजयोगाचे हे काम केले. आम्ही ही सजावट केली, ठीक- ठाक केले. मी केलं तर सहजयोगी आले नाहीत. सहजयोगामध्ये आपले सर्व कर्म 'अकर्म' झाले पाहिजे. जेव्हा आपण सूक्ष्मस्तरामध्ये पहाल, तर आपण पहाल की 'काय, मी असा विचार करतो कां की मी केलं.' अशी गोष्ट माझ्या मेंदुत येतेच कशी? याचा अर्थ माझा योग पुरा झाला नाही. जेव्हा योग पूर्ण होतो तेव्हा तुम्ही अकर्मात उतरता. जसे हे घडते आहे, ते घडते आहे, अशा तऱ्हेने आपण बोलू लागता. तेव्हा आपल्याला पूर्णपणे तादात्म्य प्राप्त झाले. तिसरी युक्ती जी शिकली पाहिजे ती अशी की जिथे मी काही करीत आहे, मी काय करीत आहे, जो पर्यंत आपण आपले कार्य शोधित होता तोपर्यंत आपण काही करत होता कारण आपल्यामध्ये अहंभाव होता. जेव्हा आपण सामुदायिकतेमध्ये आलात तेव्हा आपण काही करीत नसता. आपण अंग-प्रत्यंग आहात आणि ते कार्य होत आहे. या युक्त्या मी यासाठी सांगते आहे कारण की झेप घ्यायची आहे. याप्रकारे नेहमी आपण आपले विवेचन करावे आणि स्वत:कडे दृष्टी टाकून पहावी की 'मी काय विचार करतो आहे, मी दुसर्यांसाठी काय विचार करतो आहे. ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यांच्याकडून मला शिकले पाहिजे. त्यांचे चांगले गुण दिसतात की फक्त वाईटच गुण दिसतात.' दुसर्यांचे चांगले गुण दिसत असतील आणि स्वत:चे वाईट गुण, तर फार चांगली गोष्ट आहे. ही युक्ती समजून घेतली पाहिजे, की यात जर आम्ही डामडौलात आहोत तर ते स्वत:मुळेच आहोत. सहजयोग तर खूपच महान गोष्ट आहे, पण आमच्यामध्ये जो वाईटपणा येत आहे किंवा याची मजा पूर्णपणे आम्ही लुटू शकत नाही याचे कारण आमच्यामध्ये काही ना काही दोष आहेत. या युक्तीला जर आपण व्यवस्थितपणे केले तर फक्त आनंद मिळेल, निरानंद. आणि काही नाही. आणि मग पाहिजे तरी काय ? आपले रूपच बदलून जाईल. आणि आज या जन्मदिनी मी इच्छा करते की, आपले जन्मदिवससुद्धा साजरे व्हावे. आजपासून आपण या युक्त्या समजून घ्याव्या आणि स्वत:ला अशा पावित्र्याने ओतप्रोत करा जसे काही श्री गणेश. पवित्रतेमुळे माणसामध्ये सुबुद्धी येते कारण पवित्रता प्रेमाचेच नाव आहे. सुबुद्धीचा अर्थ प्रेमच आहे. सर्व गोष्टींचा अर्थ प्रेम आहे आणि जर आपण सुबुद्धी प्राप्त करू शकत नाही आणि प्रेमाला आपलेसे करू शकत नाही तर सहजयोगात येऊन आपला वेळ व्यर्थ घालवणे आहे. या वेळी अशी काही वेळ घटीत होते आहे की सर्वांना यामध्ये सामावले गेले पाहिजे. आणि स्वत:ला परिवर्तनामध्ये घातलेच पाहिजे. परिवर्तित आपल्याला झालेच पाहिजे. वाईट गोष्टी आमच्यामध्ये आहेत. आम्हाला स्वत:ला पूर्णपणे पवित्र करावयाचे आहे. या परिवर्तनाचे फलस्वरूप आशीर्वाद आहे - ते जीवन, ज्याचे वर्णन केले जाणे अशक्य-जे कबीरांनी सांगितले - 'अब मस्त हुए, फिर क्या बोले।' तर आपण त्या आनंदामध्ये या. त्याला प्राप्त करा. त्या आनंदामध्ये आनंदित व्हा. हा माझा आशीर्वाद! ११ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-11.txt पुनरुत्थान दा प ह है ऑस्ट्रेलिया, ३१/३/१९९१, अनुवादित ार करे ० 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-12.txt (ईस्ट२ पूजा ) मृतावस्थेतून पुनरुत्थान पावलेल्या ख्रिस्ताची पूजा करण्यासाठी आपण आज इथे आहोत. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत, परंतु त्यांनी स्वत:चं पुनरुत्थान केलं आणि त्यानंतर ते भारतात आले आणि त्यांच्या आईसमवेत तिथे स्थायिक झाले. त्यांच्या पुनरुत्थानानंतर ते कुठे गेले, त्याचे कोणत्याही पुस्तकात वर्णन नाही, पण पुराणांमध्ये शालिवाहनाबद्दल जे वर्णन आहे, जे आमचं घराणं आहे, त्या राजांपैकी एक ख्रिस्तांना काश्मीरमध्ये भेटले आणि त्यांनी त्यांना विचारलं , 'तुझं नांव काय?' आणि त्यांनी म्हटलं, 'माझ नाव येशू.' 'तुम्ही कोणत्या देशातून आलात?' त्याविषयी विचारलं असता त्यांनी म्हटलं, 'ज्या देशातून मी आलो तो तुम्हाला आणि मला परका आहे आणि आता मी इथे माझ्या स्वत:च्या देशांत आलो आहे,' अशाप्रकारे भारतीय संस्कृतीबाबत त्यांची गुणग्राहकता होती. तिथे ते लोकांना रोगमुक्त करीत होते. त्यांची आणि त्यांच्या आईची कबर तिथे आहे. ज्या लोकांना त्यांच्याविषयी विशेष माहिती नव्हती त्या लोकांनी इतर गोष्टी सांगितल्या आहेत. खिस्त नीतिमत्तेविषयी शिकवण्यासाठी तिथे होते. त्यांच्यासाठी नीतिमत्ता ही आयुष्यातील फार महत्त्वाची गोष्ट होती. ते श्रीगणेशाचे अवतरण होते त्यामुळे त्यांच्यासाठी श्री गणेशतत्त्व अतिशय महत्त्वाचे होते. टेन कमांडमेंटसुमध्ये त्यांनी सांगितले आहे की, 'तुम्ही व्यभिचार करणार नाही, पण खरोखर तुम्हाला असे म्हणतो की, तुम्हाला व्यभिचारी दृष्टी नसेल.' असे म्हणनू त्यांनी ते दर्शविले आहे. त्या सीमेपर्यंत की डोळेसुद्धा व्यभिचाराने खाली फिरत असतात. तसंच एका उपनिषदामध्ये म्हटलं आहे, की स्त्रीकडे पहाणं हा सुद्धा व्यभिचार आहे. स्त्रीचा विचार करणं, स्त्रियांशी जास्त बोलणं हा देखील व्यभिचार आहे. प्रत्येक देशांत मी पाहिलं आहे, की या स्त्रियांना जन संपर्कामध्ये वापरलं जातं म्हणजे त्या जातात आणि उच्चपदावरील लोकांशी अशात-्हेने बोलतात, की त्यांना फाजिल लाड केल्यासारखं वाटतं. अयोग्य मेहेरबान्या मिळविण्याचा एक प्रकार म्हणजे हा 'पी.आर.' चा धंदा. अनेक देशांतील भ्रष्टाचाराची जबाबदारी अंशत: याची आहे. जगात कितीतरी हिंसाचारी व्यक्ती किंवा माफिया, कोणीही वाळीत टाकलेला इतके अत्यंत वाईट प्रकारचे व्यभिचारी लोक असतात. सहजयोगामध्ये नीतिमत्ता हा आपला मूलभूत ठेवा, स्थायीभाव १३ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-13.txt पाहिजे. आपण इतके नशीबवान आहोत, की श्री गणेशांच्या भूमीवर आपण त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत. जो खरं पाहतां - तुम्ही निष्कलंक म्हणू शकता - त्या जीवनामुळे आहे, जे इतकं पवित्र होतं. त्यांचं ते पावित्र्य होतं कारण ते इतर काही नाही फक्त व्हायब्रेशन्स होते, चैतन्य! इतके ते पवित्र होते, की पाण्यावरसुद्धा चालू शकत होते. इतके पवित्र होते, की मृत्युदेखील त्यांना मारू शकला नाही. पावित्र्य हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आपण पुनरुत्थानाविषयी बोलतो. आपला दुसरा जन्म मिळण्याविषयी बोलतो, अंड्याचा पक्षी होतो, त्याला द्विज म्हणतात. दुसऱ्यांदा जन्म झालेला. तशाच प्रकारे आपला अहंकार आणि प्रतिअहंकार यांनी आपण आच्छादिले गेलो आहोत आणि पक्षी होण्यासाठी उघडले जातो आणि अशाप्रकारे आपल्याला जाण आली आहे-या ब्रह्माची, या सर्व विश्वव्यापी शक्तीची! अशाप्रकारे आपण द्विज झालो आहोत, ब्राह्मण. कारण त्याशिवाय कोणत्याही पूजेचा, पठणाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा काय अर्थ आहे ? पण आपल्याला आपल्या पावित्र्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अतिशय खालच्या दर्जाच्या लोकांमुळे अपवित्रता येते, ती ख्रिस्ताने जे म्हटलं आहे, कुजबुज करणारे आत्मे (मर्मरींग सोल्स) त्यांच्यामुळे. हे लोक लोकांच्या पाठी वळल्या की बोलू लागतात आणि या प्रकारच्या बोलण्यात त्यांना खरोखर रंगत येते. ही फार खालच्या पातळीवरची गोष्ट आहे आणि सहजयोगामध्ये ही पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे कारण ती अडचणी निर्माण करते आणि सामूहिकतेवर परिणाम करते. मुख्यत्वेकरून मी स्त्रियांना आणि लिडस्सच्या पत्नींना विनंती करते. त्यांच्यावर महान जबाबदारी आहे, त्यांनी अशा बोलण्यामध्ये रुची दाखविली तर त्या इतरांच्या बरोबरीने खालच्या पातळीला येतात आणि मातृत्वाला आव्हान मिळतं. कोणतीही माता जी मुलांना तशाप्रकारे बोलण्याला परवानगी देते, ती मुलांचं पूर्ण आयुष्य खराब करीत असते. सहजयोगातील लोकांबाबत वाईट बोलणारे कोणीही लोक फार भयानक असतात, तसा विचार करणं प्रत्येकाने सोडून दिलं पाहिजे. आपण कोणाविरुद्ध बोलूं लागलो तर आपल्याला त्या व्यक्तीच्या सर्व वाईट गोष्टी मिळतात. त्याशिवाय आपलं मन खराब होतं. ती स्त्रियांची जबाबदारी आहे कारण हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतं कारण त्यांचं जीवन आणि मित्रमंडळी निवडक (वेचक) असतात. जर पुरुषांना कोणाचा राग आला ते नुसते जातात, भांडतात आणि संपवून येतात, पण स्त्रिया त्यांच्या मनात ठेवतात आणि नंतर काहीतरी म्हणतात. ती इतकी वाईट गोष्ट आहे. एखाद्या वळवळणाऱ्या किड्यासारखी आणि फार संसर्गजन्य कारण नीतिमत्ता ही फक्त लैंगिकता नव्हे. त्याहून जास्त आहे. त्याहून विस्तीर्ण. आपल्यामध्ये पावित्र्य येण्यासाठी, आपल्याला अंतर्मुख झालं पाहिजे. रशियन लोक फार अंतर्मुखी आहेत. ते फार विशेष आहे. एखाद्या रशियन लेखकाचे पुस्तक तुम्ही वाचले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ते सर्व अंतर्मुख असतात. सर्व पात्रे अंतर्मुख असतात. मी असं का केलं, हे त्यांना १४ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-14.txt बघायचं असतं. उदा. एखादी व्यक्ती फार आळशी आहे. सर्व वेळ वाचनात किंवा तसंच काही करण्यात घालविते, पण शारीरिक त्रास घेण्याचा शरीराला वाव देत नाही. तर तो अंतर्मुख होतो. कां? का मी इतका आळशी आहे ? किंवा कोणीतरी नेहमीसारखा चिडलेला असतो, लोकांना तो आवडत नाही. तर इतरांवर रागवण्यापेक्षा त्याला स्वत:ला पहायला पाहिजे. मी इतरांवर का रागवतो? मी इतरांसारखा कां नाही? माझ्यामध्ये काय आहे, जे मला उदास करीत आहे ? मग तुम्हाला कळेल की तुम्ही एकतर रुढींनी लादले गेले आहात किंवा तुम्हाला विचित्र अहंकार आहे, जो तुमच्याकडून चुकीच्या गोष्टी करून घेत आहे. आधुनिक संस्कृती ही जास्त करून मानवाला हितकारक नाही. लोक काय करणार आहेत, ते काय करू शकतात, हे तुम्हाला माहीत नाही. सहजयोगामध्ये तुम्ही दांभिक असू शकत नाही. जर तुम्ही सहजयोगामध्ये पूर्णपणे विश्वास ठेवला नाही, स्वत:ला पवित्र केलं नाही, तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित केलं नाही, स्वत:मध्ये उडी घेतली नाही तर तुम्ही उघडकीस याल आणि सहजयोगापासून दूर फेकले जाल, यात शंका नाही. मी तुम्हाला टाकणार नाही. मी क्षमा करेन. पण ज्याप्रमाणे मी म्हटलं आहे. सहजयोगामध्ये दोन शक्त्या आहेत. केंद्रोपगामी शक्तीने तुम्ही आकर्षित होता, पण केंद्रोपसारी शक्तीने तुम्ही बाहेर टाकले जाता. त्यामुळे आपल्याला फार सावधपणे रहावे लागेल कारण जे काही तुम्हाला मिळालं आहे ते काहीतरी इतकं स्वर्गीय आहे, इतकं सुंदर आहे, की मला स्वत:ला आश्चर्य वाटतं, पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, ब्रह्मचैतन्याने स्वत:च प्रभावी भूमिका घेतली आहे. ते कार्यान्वित झालं आहे, कारण आपण कृतयुगामध्ये आहोत. एका युगामधून दुसऱ्या युगामध्ये जेव्हा अंतर असतं तेव्हा हे कृतयुग येतं. जसं आपल्याकडे कलियुग आहे, यावेळी आपत्ती-उत्क्रांतीची क्रिया होते. आता शेवटची उत्क्रांती चालू झाली आहे. तशाप्रकारे हे सर्व फोटो, हे चमत्कार होतात कारण ब्रह्मचैतन्य हे सर्व चमत्कार घडवून आणतं. या वेळी जर आपण दांभिक होण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वत:लाच दुखापत करीत आहोत. जर आपण स्वत:वर न करता इतरांवर टीका करत असलो तर आपण ही संधी चुकविणार आहोत. वेळेचं महत्त्व तुम्हाला कळलं पाहिजे. सहजयोग फार चांगला आहे आणि हे सगळे भाऊबहीण असण्याचा आनंद तुम्ही उपभोगिता आणि तुमचे चेहरे गुलाबपुष्पांप्रमाणे टवटवीत आहेत, पण अजूनही अशी वेळ येऊ शकते, की तुम्ही मागे पडाल. तेव्हा तुम्ही स्वत:ला शुद्ध करा. स्वत:बद्दल कधीही समाधानी होऊ नका. काही लोकांना कधीच वाटत नाही की मी त्यांच्याबरोबर बोलते. त्यांना नेहमी असच वाटतं की मी इतरांशीच बोलते. आपल्याला आत्मपरीक्षण केले पाहिजे. चिंतन केले पाहिजे आणि जेव्हा आपण आपल्या दोषांकडे पाहू तेव्हा ते गळून पडायला लागतील. तुम्हाला आदर्श बनले पाहिजे म्हणजे लोक तुमच्याकडे पहातील. तुम्ही जर नुसते मिरवणार असाल तर लोक म्हणतील 'या दिखाऊपणाकडे पहा. शो ऑफ कडे १५ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-15.txt पहा.' प्रत्येकजण तुम्ही कसे आहात ते बघूं शकतो, जरी त्यांना ते स्वत:मध्ये दिसले नाही तरी. तेव्हा या सर्व अहंकाराच्या प्रदर्शनासाठी तुम्हाला फार सावधगिरीने राहिले पाहिजे. आता समजा, तुमच्याकडे काही पैसे असले, तुम्ही रुबाब मिरविण्याचा प्रयत्न करता. सरकार दरबारी तुम्हाला काही स्थान असलं तर तुम्ही दिखाऊपणा करता, या सर्व कृत्रिम गोष्टी आहेत. या गोष्टी तुम्हाला समृद्ध करीत नाहीत. कोणत्याही प्रकारे तुम्हाला गरज असलेली शक्ती त्या देत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारे तुम्हाला सुरेख करत नाहीत. या सर्व बाह्यातल्या गोष्टी कोणाकडेही असू शकतात. त्यात काही विशेष नाही, पण अंतर्यामीचं जीवन जे तुमच्याकडे असतं तोच एक तुम्हाला स्वत:ला शुद्ध करण्याचा मार्ग आहे आणि ख्रिस्ताने सांगितलेल्या पद्धतीनेच पुनरुत्थान होऊ शकतं. आता तुम्ही एका कुटुंबाचे घटक आहात. तुमचं वागणं कसे आहे ते पहा. तुमची मुलं कशी आहेत ? सामूहिक आहेत कां? भांडणं करतात कां? ती वाटून घेतात? तुम्ही पहिल्यांदा तशी कृती करा, त्याशिवाय तुमची मुलं करू शकणार नाहीत. ख्रिस्ताकडे पहा, जेमतेम चार वर्षात त्यांचं ध्येय पूर्णत्त्वाला नेणं ते कार्यान्वित करू शकले. बघा, तेवढ्या थोड्या काळात फक्त पुनरुत्थान साध्य करण्यासाठी ते किती ठिकाणी गेले, किती सुरेख उपदेशात्मक कथा त्यांनी सांगितल्या, किती लोकांशी ते बोलले. ते अत्यंत साधेपणाने राहिले. त्यांना असे तंबू वरगैरे नव्हते. डोंगरावर लोकांना गोळा करून त्यांच्याशी ते बोलत होते. पर्वतांवर, प्रवचन दिल्याप्रमाणे. त्यांचं त्यांनी ऐकलं, पण ते जे काय सांगत होते ते सर्वांनी ग्रहण केलं नाही. फार कमी, त्यांचे फक्त बारा शिष्य होते. ज्यांनीसुद्धा त्यांच्या मृत्युनंतर त्यांना जाणलं. त्याआधी ते काय होते हे त्यांना समजलं नाही. जेव्हा त्यांचं पुनरुत्थान झालं, त्यानेसुद्धां त्यांना विचार करायला लावला; ते कोण होते; त्यांनी काय केलं आणि आम्ही कसे काय त्यांचे शिष्य आहोत ! ते साधे होते, पण त्यांची बुद्धी आणि प्रभावीपणा एकाएकी प्रदर्शित झाला. त्यांनी खरोखर दुसरा जन्म मिळवण्याचे इतके चांगले मार्ग दाखविले. खिस्ती धर्म पॉल आणि ऑगस्टीनच्या चुकीच्या पताकेखाली पसरला आणि तशाप्रकारे आपण ख्रिस्त धर्माकडे पहातो; इतकंच नव्हे तर ख्रिस्ताचा ख्रिस्ती धर्म अशाप्रकारे कसा असेल; असं आपल्याला वाटतं. हा ख्रिस्ती धर्म जो आता आला आहे, त्याला ख्रिस्ताशी काही देण घेणं नाही. त्यांनी म्हटलं की ते त्यांच्या कपाळावर चिन्ह धारण करतील आणि मला कळेल ते कोण आहेत ते. जसं आहे त्याप्रमाणे, तुमच्यावर आधीपासून चिन्हं आहे. ख्रिस्ताने त्याच्या शेवटच्या निवाड्यांत तुम्हाला निवडलं आहे आणि तुम्ही तिथे आहांत, पण प्रत्येकाला हे ठाऊक असायला हवं की, असंही होऊ शकतं की, तुम्हीं दांभिक आहांत, तुम्ही शब्दांशी नुसतं खेळता, कदाचित आपल्याला अजून स्वत:ला सिद्ध करायचं असेल. म्हणून फक्त तुमचे मन स्वत:मध्ये घाला आणि स्वत:ला विचारा की, 'मी कुठे चुकलो आहे. १ खिस्ताला जेव्हा क्रॉसवर टांगण्यात आलं, त्यावेळची त्यांची क्षमा करण्याची गुणवत्ता लक्षांत १६ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-16.txt घेतली पाहिजे. 'ते काय करीत आहेत ते त्यांना माहीत नाही', असे म्हणून कशाप्रकारे त्यांनी त्यांना क्षमा केली. हे क्रॉसवर चढणं, जो माणूसच चढवतो आहे, त्या व्यक्तीकरिता ठीक असेल. तुमच्या सर्व क्रुसीफिकेशनमधून निघण्यासाठी तुम्हाला अत्यंत पवित्र, आदर्श आणि सुंदर जीवन असलं पाहिजे. तुमचे गुण, महती, न्यायीपणा याबद्दल तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. नाही तर आधुनिक युगातल्याप्रमाणे, लोक त्यांच्या वेडसर गोष्टींबद्दल फुशारक्या मारतील, पण चांगल्या गोष्टींबद्दल नाही. दोन्ही गोष्टींबद्दल फुशारक्या मारण्याची गरज नाही, पण ज्या गोष्टी इतक्या छान, सुरेख आहेत त्याबद्दल तुम्ही अभिमान बाळगू शकता. खिस्तांनी त्यांच्या वडिलांच्या इच्छेला शरण जाऊन त्यांना विचारलं हा कप त्यांनी काढून घेतल्यास चांगलं होईल, पण जेव्हां वडिलांनी सांगितलं नाही हा कपच तुला प्यायला पाहिजे तेव्हा त्यांनी अनुमती दिली आणि फार धैर्याने सुरेखरीत्या ते त्यामधून गेले. आपण जे काही करू त्यामध्ये आपल्याला तशाप्रकारची शरणागती हवी. त्या शरणागतीने आपण काही केलं पाहिजे. त्यामुळे आपण काही साध्य करतो आहे, रुबाब दाखवतो आहे किंवा काही असा आपण विचार करता कामा नये. आपण शरणागतीमुळे ते कार्यान्वित होत आहे असा विचार केला पाहिजे. आपली शरणागती हे महान आशीर्वाद आहेत असं आपण समजलं पाहिजे. तुमच चित्त जर तुम्ही हृदयावर ठेवलं आणि म्हटलं की 'शरण आहे' तर खूप झालं, पण तुम्ही असं म्हणता कामा नये. 'श्रीमाताजी, मला शरण जायला मदत करा.' या सर्व प्रार्थना काही वेळा वास्तवतेपासून पळून जातात. तुम्ही मला मदत करा वगैरे. शरण जाणं फार सोपं आहे. 'श्रीमाताजी, कृपावंत होऊन माझ्या चित्तामध्ये या.' असं फक्त म्हणायचं आणि तुम्ही जसं म्हणत जाता तशी कुंडलिनी वर चढत जाते आणि ती तुम्हाला स्वच्छ करते, पण अडचण हीच आहे, की तुम्ही तिला नेहमी खराब करता. ख्रिस्त लोकांवर छाप पाडतात, ते त्यांच्या व्यक्तिगत जीवनामुळे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते किती शक्तिमान होते, ते त्यांनी दाखविलं आणि त्यांच्या पुनरुत्थानामध्येसुद्धा. मानवाच्या आकलनशक्तीच्या पलीकडे ते होते, हे त्यांनी दाखविलं. ते म्हणजे पवित्र व्यक्तित्व होतं हे दाखविलं. आपल्याला अशाप्रकारे उठलं पाहिजे, की आपण पवित्रता मागूं आणि आपण स्वत: ती कार्यान्वित करणार आहोत. जे काही झालं आहे ते विसरून जा. त्या गोष्टीबद्दल काळजी करू नका, पण जे काही होणार आहे ते असं आहे. तुम्ही फक्त पावित्र्य मागा आणि सर्व द्वेष, सर्व टीका नाहीशी होईल. ते पावित्र्य तुम्हाला अशी अनुपम स्थिती देईल की लोक नुसतं तुमचं जीवन बघतील आणि बदलतील. १७ 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-17.txt ी 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-18.txt AA 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-20.txt का डिक তল छ ी ४® १९७०० - मी ठरवले होते की त्या रात्री समुद्र किनान्यावरच थांबायचे. मी एकटीच होते आणि खूप छान वाटत होते आणि ध्यान करतांना मला असे वाटले की आता सहसार उघडण्याची वेळ आली आहे. १९८० - मी आज तुम्हाला हे सर्व रसांगते आहे कारण तुमच्यात ती योग्यता आहे. त्यामुळे तुम्हाला हे जाणून घ्यायला पाहिजे की मी तुम्हाला हे सर्व सांगते आहे ही तुमच्यासाठी खरप भारयाची गोष्ट आहे. मी तुम्हाला याची किल्ली देत आहे. १९९० - इतक्या वर्षायासून या दिवसाचीच वाट बघत होते. या वर्षाचा हा एकविसावा सहसार दिवस आहे. या कारणामुळेच हाति एक महत्त्वपूर्ण बदल घडवणारा आहे. तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक एकविसाव्या दिवशी ज्या ठिकाणी जन्मपत्रिकेचा प्रश्न आहे, आम्ही आपले कॅलेंडर बदलले आहे. तर आता एक बदल घडणार आहे आणि तुम्हाला त्याविवयीची पूर्वसूचना मिळू शकेल-एक नवा समजूतदारपणा, एक माहिती नव्या आयामाची. २००० - माझी नजर खूप महान आहे. संपूर्ण जीवनात मला असे वाटते की विश्वभरात याची जागृती व्हावी. संपूर्ण विश्वातील लोकांमध्ये याची जागृती व्हावी. २००८ - माझ्याकडे जे सर्वश्रेष्ठ आहे ते मी तुम्हाला दिले आहे आणि मला असे वाटते की परत दसऱ्यांदा मी हे करू शकणार नाही. हे अशासाठी नाही म्हणत की मी वृद्धावस्थेकडे आहे, तर यासाठी म्हणते की मला तुम्हाला सहजयोग पसरवण्यासाठी पृर्ण स्वात्तंत्र्य द्यायचे आहे. लोकांच्या कल्याणासाठी याचा उपयोग करा. शट 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-21.txt ६ं मे ॐ] ॐ] Velaleleladclelelolela परमपूज्य मातीजी श्री निर्मलादेवी द्वारा उपदेश आज सत्ययुगाचा पहिला दिवस आहे. निसर्गच आपल्याला सांगेल की सत्ययुगाची सुरुवात झाली आहे. सहजयोग सत्ययुग घेऊन आला आहे. तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात. तुम्हाला स्वत:वर श्रद्धा तसेच विश्वास असायला हवा. सहजयोगाच्या कार्यपद्धतीवर तुमची श्रद्धा असायला हवी. तुमच्या ज्योतिर्मय श्रद्धेने काय कार्य होते ? पूर्ण विश्वास असावा. माझ्याकडे बघा! मी एकटीने सहजयोगाचा प्रसार केला आहे. बस, परमचैतन्यावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारा. परमेश्वर तर इथे नाही, पण मी तर तुमच्याबरोबर बोलण्यासाठी इथे आहे. तर आता सहजयोग्यांनी शंकामुक्त व्हायला पाहिजे. १. केंद्रप्रमुखांनी अतिशय सावध राहिले पाहिजे. त्यांना कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. ते फक्त निरोप देण्याचे माध्यम आहेत, जसे पत्र पोस्ट करण्यासाठी मला ते एखाद्या पाकिटात टाकावे लागते. स्वामित्वाच्या भावनेमध्ये त्यांनी सावध राहिले पाहिजे. २. कोणत्याही गोष्टीचे नियोजन करतांना नेहमी आपले चित्त महत्त्वपूर्ण गोष्टींवर असावयास हवे. आपल्या प्राथमिक गोष्टींविषयी माहिती स्पष्ट असायला पाहिजे. ३. जर काही नकारात्मकता असेल तर मला सांगा. मी ती ठीक करेन. ४. आयोजक नेहमी पैशाची चिंता करीत असतात. सहजयोगात तुम्हाला नेहमीच धन प्राप्त होत राहील. परंतु जर तुम्ही चिंता करीत असाल तर धन मिळणार नाही. पैसा इतका महत्त्वपूर्ण नाही. ५. आपल्यामध्ये एकमेकांसाठी सद्सद्विवेक असावा. ६. तुम्हाला कोणतीही भीती नसावी. हे तर केवळ एक नाटक आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. जर तुम्ही म्हणाल की तुम्हाला भीती वाटते तर मी काय बोलणार? जर तुमच्याकडून काही चूक झाली तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला सांगू शकते की हे चुकीचे आहे. तुम्ही त्याचे वाईट वाटून घेऊ नका. जर काही सुधारणा करायच्या असतील तर त्या मी करेन. जर तुम्ही घाबरलेले असाल तर तुमचा अहंकार मधे येईल आणि मी तो मोड़ून टाकेन. कमीतकमी तुम्ही तरी मला घाबरू नका. आपल्या चुकांमधूनच आपण शिकत असतो. चुका झाल्यावर घाबरून जाऊ नका. गुढीपाडवा, दिल्ली, २४-०३-९३ २२ सर 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-22.txt हे का अ जेव्हा तुम्ही सर्वच गीष्टी आपल्या बुद्धरीच्या सहाय्याने व्यक्त करू शकते नाही, तेव्ही तुम्ही कलेची मदत घेता, स्वेतःली व्यक्त करण्यासाठी तुम्ही काही चिन्हांचाही उपयोग करती, अशी गोष्टी व्यक्त करण्यासाठी ज्या तुम्ही शब्दीत व्यक्त करू शकते नाही. ते हेच आहे जे एक कलाकार करत असती. - दिवाळी १९९३ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा.लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे ४११०३८. फोन : ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in 2011_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-23.txt ै ार ১ तुम्ही अतीउच्चतेपेक्ष ही उच्च आहात. २२.३.१९८४ 2ा ्ी