मराठी मे-जून २०११ प क ] ईश्वरी इच्छी सर्व गोष्टींची काळजी घेते. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या अडेचणींचे कारण हे आहे की त्या अडचणी तुम्हाला देवावर सोडायच्या नाहीत. काही लोक म्हणतीत त्यांच्यात ती योग्यतीचे नाही की ते असं करू शकतील. हे फार मूर्खपणाचे विधान आहे. तुम्ही स्वतःचेच निरीक्षण करा. कबेला, इटली, १० मे १९९२ , अनुवादित टी या अक परमेश्वराची इच्छाच हे सर्व कार्य करत असते .... ५. आयेक्षा हेच सर्व दःखाचे कारण आहे १६ सह २ २्वामिनी ...२२ ाप कबेला, इटली, १० मे १९९२, अनुवादित हे सर्व कार्य करत असते जि आपण सहस्रार दिवस साजरा करीत आहोत. तो दिवस कशा प्रकारचा होऊन তगला ते कदाचित तुम्हाला कळलंही नसेल. सहस्र उघडल्याशिवाय देव, धर्म आणि त्याबद्दलचं सारं काही बोलणं ह्या दंतकथा वाटत होत्या. लोकांचा देवावर विश्वास होता पण तो फक्त विश्वासच होता आणि सायन्स-शास्त्र हे सगळ्याच मूल्यमापनाच्या पद्धती व सर्वशक्तिमान परमेश्वराचे अस्तित्व संपवणारच होते. इतिहासामध्ये असं झालं आहे की, जेव्हा जेव्हा शास्त्र प्रस्थापित झाले तेव्हा वेगवेगळ्या धर्मातील कार्ययंत्रणेचे असणाऱ्या लोकांनी प्रमुख शास्त्रातील संशोधनात सापडलेल्या गोष्टींबरोबर राहण्याचा प्रयत्न केला. ऑगस्टीनने हे बायबलमध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आणि सर्व धर्मग्रंथ काल्पनिक आणि दंतकथा आहेत असं दिसूं लागलं. आजच्या शरीरशास्त्राचे वर्णन करणाऱ्या बऱ्याच गोष्टी कुराणामध्ये होत्या. परमेश्वराने एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी मानवाची रचना केली आहे यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांना असं वाटत होतं की, प्राण्यांमध्ये उत्क्रांती होऊन तेच मानव बनले आहेत अशाप्रकारे सतत देवत्त्वाला आव्हान दिलं गेलं. बायबल कुराण, गीता, उपनिषदांमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा कोणताच पुरावा नव्हता कारण अजूनही तो फक्त विश्वासच होता. फार थोड्या लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला होता आणि जेव्हा त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांना वाटलं की ते नुसते स्वत:चे सिद्धांत पुढे करीत आहेत. त्यामुळे ते सारंच एक प्रकारचं निर्जीव शास्त्र बनलं. वाटू लागलं या दहा कमांडमेंटसचा किंवा काटेकोर नियमांचा जीवनात उपयोग करतांना काय फायदा आहे? मनुष्याने पुण्याची प्राप्ती का करायला पाहिजे ? त्यामुळे मानवाच्या लोकांना नितिमूल्यांची मोठीच घसरगुंडी झाली. कोणत्याही प्रकारचा अंकुश नसणारे संस्थापित धर्म देखील सत्ता तसेच पैसा मिळविण्याचे मार्ग स्वीकारू लागले कारण याचप्रकारे आपण लोकांवर ताबा ठेवू शकतो असे त्यांना वाटले. बायबलमध्ये लिहिलेली तत्त्वे लोकांपर्यंत पोहोचवण्याविषयी त्यांना काळजी वाटत नव्हती. खुद्द बायबलमध्येसुद्धा अनधिकृत फेरबदल करण्यात आले होते. पीटर व पॉलने त्यामधील बराच भाग बिघडवण्याचा प्रयत्न केला. कुराणाला याप्रमाणे हाताळण्यात आले नाही, पण त्यामध्ये उजव्या बाजूविषयी जास्त सांगितले होते आणि अजूनही अनेक गोष्टी बुचकळ्यात टाकणाऱ्याच आहेत. एकाच वेळी दोन गोष्टी घडल्या आहेत. पहिली गोष्ट ही की, आता आपल्याकडे मायक्रोबॉयोलॉजीच नवं शास्त्र आहे. ज्यामध्ये प्रत्येक पेशीला 'डी.एन.ए.' ची फित आहे, हे आपण शोधून काढलं आहे. प्रत्येक पेशीमध्ये कॉम्प्युटरप्रमाणे प्रोग्रॅम आहे व त्या कार्यक्रमानुसार विकास घडत जातो. कॉम्प्युटरसारख्या, ज्यामध्ये आधीच प्रोग्रॅम आहे अशा अनेक पेशी आहेत आणि शास्त्रापुढे फार ६ चमत्कारजनक गोष्ट आली आहे. ज्याचं स्पष्टीकरण ते देऊ शकत नाहीत. परमेश्वराची इच्छाच हे सर्व कार्य करत असते, हे सहजयोगाने सिद्ध केलं आहे. हे सर्व चैतन्य आणि आदिशक्ती ही देवाची इच्छा आहे. फार सुसंगतरीत्या परमेश्वराची इच्छा सर्व कार्य करीत आहे. एका शांत आवाजाने पृथ्वीची रचना केली गेली. ती निर्मिती सुसंगत होती. त्या परमेश्वराच्या इच्छेने जे काही घडलं, ते झालं. आता तुमच्या हाताच्या बोटांवर तुम्ही परमेश्वरी इच्छेचा अनुभव घेऊ शकता. आत्मसाक्षात्कारानंतर एकमेव सत्य अशा देवाची जी इच्छा आहे, त्या शास्त्राचा तुम्हाला शोध लागला. सहजयोगामुळे आपण लोकांना रोगमुक्त केलं आहे हे तुम्हाला माहीत आहे. आत्मसाक्षात्कारानंतर अनेक गोष्टी आपोआपच कार्यान्वित होतात, पण लोकांना त्यावर विश्वास ठेवायचा नसतो. सुरुवातीला शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या गोष्टींवरही लोक विश्वास ठेवत नव्हते, पण आता तुम्ही पहात आहात की विज्ञानामध्ये सतत बदल होत आहेत सिद्धांतांना आव्हान दिले जात आहे. विज्ञानाचे जे असे सत्य, ज्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, ते सहजयोगाने उघडकीला आणले आहे. 'परमेश्वर आहे' हे आम्ही सिद्ध करू शकतो. परमेश्वरी इच्छेनेच सर्व सृष्टीची निर्मिती सुसंगतपणे झाली आहे. जर दैवी इच्छेने सरव काही निर्माण झालं आहे, तर मानवप्राण्यांनी दैवरचित गोष्टींचा शोध लावण्याचे श्रेय स्वत: घेता कामा नये. उदा.हा गालिचा कोणीतरी तयार केला असेल आणि तुम्हाला त्याचे रंग सापडले तर त्यांत महान असं काय आहे? कारण ते सारं पहिल्यापासूनच आहे. तुम्ही काही ते निर्माण करीत नाही. दैवी इच्छेने ते निर्माण झाले आहे. जर परमेश्वराची इच्छा इतकी महत्त्वाची आहे तर ती सिद्ध केली पाहिजे. आता सहस्रार उघडल्यावर तुम्हाला ती जाणवते आहे. आपल्याकडे ती इतकी सहजगत्या आली आहे की, आपल्याला ते समजतच नाही. आपण नुसतं बंधन देतो आणि गोष्टी कार्यान्वित होतात ते त्याहनही फार जास्त आहे. आपण या मोठ्या कॉम्प्युटरचा एक भागच झालो आहोत. आपण ईश्वरी इच्छेच्या वाहिन्या झालो आहोत आणि या विश्वाची ज्याने निर्मिती केली त्या शक्तीशी आपण जोडले गेलो आहोत. त्यामुळे आपण सारं काही करू शकतो कारण पूर्ण सत्य असं शास्त्र आपल्याकडे आहे ते सर्व जगाचे कल्याण करेल. आपण शास्त्रज्ञांना सिद्ध करून दाखवू शकतो की या साऱ्या निर्मितीमागे परमेश्वराची शक्ती आहे. उत्क्रांतीची क्रियादेखील ईश्वरी इच्छा आहे. त्याच्या इच्छेशिवाय काहीही घडून आलं नसतं. आता तुम्ही पहात आहात की, परमेश्वराची ही इच्छा आम्ही आपल्या शक्तीच्या रूपात प्राप्त केली आहे. आपण तिला वापरू शकतो. तेव्हा सहजयोग असणं फार महत्त्वाचं आहे. पण, "श्री माताजी, मी आनंदी आहे किंवा मी पवित्र झालो आहे, सर्व काही उत्तम आहे," असे ७ म्हणण्यासाठी सहजयोग नाही. तर तो कशासाठी आहे? हे सर्व आशीर्वाद तुम्हाला का मिळाले? तुम्हाला का स्वच्छ केलं गेलं? जेणेकरून परमेश्वराची इच्छाशक्ती तुमच्यामध्ये दिसून येईल आणि तुमचा एक अविभाज्य भाग बनेल. आपण वर आलं पाहिजे. साधारण तसेच मध्यम श्रेणीच्या लोकांना सहजयोग देणं निरर्थक आहे कारण ते काही कामाचे नसतात. कोणत्याही प्रकारे ते आम्हाला मदत करू शकत नाहीत. आज अशा लोकांची गरज आहे की जे खरोखर ईश्वरी इच्छा प्रकटित करू शकतात, प्रदर्शित करू शकतात. त्यासाठी आम्हाला फार शक्तिशाली लोकांची आवश्यकता आहे. परमेश्वराच्या या इच्छेने पूर्ण विश्व संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वी माता तसेच प्रत्येक गोष्टीची निर्मिती केली. आता आपण नव्या पातळीवर आलो आहोत की परमेश्वरी इच्छेचे आपणच माध्यम आहोत. तर आता आपली कर्तव्ये काय व त्यासाठी आपण काय करायचे आहे? सहस्त्रार उघडल्याने आपली मोहजाले नष्ट झाली आहेत. देवाच्या अस्तित्वाविषयी तुमच्या मनात भ्रामक कल्पना नकोत. शक्तिशाली परमेश्वराचे अस्तित्व, त्याची शक्ती आणि सहजयोगाविषयीचे सत्य याविषयी आपल्याला काही शंका नसायला पाहिजे. ही शक्ती वापरताना तुम्हाला या गोष्टीची जाणीव पाहिजे की, तुम्ही त्या योग्य आहात म्हणून तुम्हाला ही शक्ती दिली गेली आहे. ही सर्वोच्च शक्ती आहे. कोणीही गव्हर्नर किंवा मंत्र्याचे उदाहरण घ्या. त्यांना उद्या वरच्या पदावरून काढून टाकले जाऊ शकते. ते भ्रष्ट असू शकतात, असे ही असू शकते की त्यांच्या स्वत:च्या ताकदीची त्यांना कल्पना नसते. बऱ्याच लोकांना त्यांच्या कार्याविषयी माहिती नसते तरीही ते लोकांकडून निवडून दिले जातात. सहजयोग फक्त लोकांचा धर्म बदलत नाही किंवा फक्त व्यक्तीचा स्वभावच बदलत नाही तर ही एक पुढे जाणाऱ्या नव्या लोकांची अशी नवी रचना आहे, की ज्यांच्यामध्ये परमेश्वराची इच्छा पुढे नेण्याची योग्यता आहे. आत्मसाक्षात्कारामुळे तुमच्या भ्रामक कल्पना पुसल्या गेल्या आहेत. ईश्वर सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे आणि सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे तो सर्व काही बघतो आणि त्याला सर्व काही समजते. त्या शक्तीचा एक भाग तुमच्यामध्येही आहे. सर्वत्र असणारं त्याचं अस्तित्व समजण्यासाठी तुम्ही सहजयोगी आहात हे तुमच्या सतत लक्षात असले पाहिजे. अजूनही मला भारतीय सहजयोगी त्यांची बायका- मुले, घर, कुटुंब, नोकऱ्या इ.विषयी बोलतांना आढळतात. मला प्रश्न पडतो की त्यांची पातळी काय आहे ? ते कुठे आहेत ? त्यांना दिल्या गेलेल्या जबाबदाऱ्या त्या कधी सांभाळणार? सर्वशक्तिमान परमेश्वर जो सर्वत्र आहे, ज्याने सर्व काही घडवले आहे आणि त्याची इच्छा जिने सारे कार्यान्वित केले आहे, त्याला तुमच्याद्वारा कार्य करायचे आहे. म्हणून तुम्हाला खूप शक्तिशाली, बुद्धिमान, अती प्रभावशाली बनलं पाहिजे. तुम्ही जितके जास्त प्रभावशाली व्हाल, तेवढी जास्त शक्ती तुम्हाला मिळेल. मला अजूनही असं वाटतं की सहजयोगी हे जाणण्याची जबाबदारी घेत नाहीत की त्यांना या सर्वज्ञ परमेश्वराचे प्रतिनिधी व्हायचे आहे, जो सर्व काही जाणतो, सर्व काही पहातो, जो शक्तिमान आहे, गुणकारी आहे. ८ तुम्हाला हे समजलं पाहिजे की सहस्रार उघडल्यावर तुमच्यामध्ये ही शक्ती आली आहे, जिच्यामध्ये हे तीनही गुण आहेत. ही महान शक्ती तुम्हाला प्राप्त झाली आहे. त्यासाठी आपल्याला मोठं नाव किंवा पैसेवाल्या, फार यशस्वी लोकांची गरज नाही. आपल्याला सुशील, जाणकार, सुज्ञ असे लोक हवे आहेत जे असे म्हणतील की 'काही झाले तरी मी हे स्वीकारेन, नेहमी याबरोबरच राहीन आणि त्याला सहयोग देईन. मी स्वत:ला बदलेन आणि सुधारेन.' तुम्हा सर्वांचे भ्रम नष्ट झाले आहेत अशी मी आशा करते. स्वत:बद्दलही तुमच्यामध्ये भ्रम नको. तुमच्यामध्ये तुमच्याविषयी काही भ्रामक कल्पना असतील तर तुम्ही सहजयोग सोडा. पण लक्षात ठेवा की ईश्वरी इच्छेने तुम्हाला या कारणासाठी वेचून घेतले आहे म्हणून तुम्ही इथे आहात आणि जर विज्ञान जे पूर्ण सत्य आहे ते जाणण्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. स्वत:साठी व इतरांसाठी ते कार्यान्वित करा. माझे प्रेम तुम्हाला जाणवले आहेच पण तुमचे प्रेम ही जाणवले पाहिजे. कारण प्रेम म्हणजेच ईश्वर आहे. इतरांना कळलं पाहिजे की, तुम्ही दयाळू, प्रेमळ व समंजस आहात. सतत तुमच्यामधून ईश्वराचे प्रेम वहात असते. तुम्हाला ते अशाप्रकारे कार्यान्वित केले पाहिजे की तुम्ही संत आहात हे लोकांना समजेल आणि ही शक्ती तुमच्यामधून वहाते आहे हे ही कळेल. दूसरी गोष्ट झाली आहे ती ही की, जगामध्ये पूर्ण एकसंघता आहे, हे तुम्हाला कळले आहे. मुलांमध्ये नैसर्गिकरीत्या याची जाण असते. सर्वसामान्यपणे चांगल्या मुलाला त्याच्या गोष्टी नेहमीच वाटून घ्यायला, दुसऱ्या मुलांवर प्रेम करायला आवडते तसेच छोट्या मुलांना संरक्षण द्यायला आवडते, हे नैसर्गिक आहे. लहान मुलं ह्याचा विचार करत नाही की समोरच्या मुलाचा रंग किंवा केसाचा रंग काळा आहे की लाल. आपल्या शरीराचे प्रदर्शन करू नये हे लहान मुलांना समजते. इतरांसमोर कपडे काढणे त्यांना आवडत नाही. त्यांच्यामध्ये हे मूळातच असते. मुलांना चोरी करायला आवडत नाही. मी मुलांना सुंदर ठिकाणी तसेच घरांमध्ये जातांना बघितले आहे, ते नेहमीच त्या ठिकाणचे सौंदर्य अबाधित राखण्याचा प्रयत्न करतात. जे देश अविकसित आहेत, त्यांच्यामध्ये असे गुण आहेत. आपल्यामध्ये अबोधितता मूळातूनच आहे. अबोधितता आणि पावित्र्य ईश्वरी इच्छेनेच निर्माण झाले आहे. पहिल्यांदा त्यांनी श्री गणेशाची निर्मिती केली. ही निर्मिती आदिशक्तीनेच केली कारण तीच परमेश्वरी इच्छा होती. सर्व जग सुरेख करण्यासाठी हे सर्व निर्माण केलं. हे सर्व मूलभूत गुणधर्म, या देवतांची तुमच्यामध्ये प्रतिष्ठापना केली गेली. हे मुद्दाम केले गेले कारण या मानव प्राण्याने संतांसारखे व्हावे आणि संतांसारखे गुणधर्म बाळगावेत. विकसित देशांमध्ये टी. व्ही व इतर गोष्टींनी आपला मेंदू प्रदूषित केला गेला आणि आपल्यामध्ये १० असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आपण इतरांच्या विचारांप्रमाणे वागू लागलो. कोणतीही सशक्त व्यक्ती आपल्यावर वर्चस्व गाजवू शकत होती. फक्त हिटलरनेच नाही तर फॅशन्सनीदेखील आपल्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. फॅशन्समुळे विवेकपूर्ण गोष्टींचा लोक स्वीकार करीत नाहीत. आजकाल लहान स्कर्ट घालायची फॅशन आहे. तुम्हाला लांब स्कर्ट कुठेच मिळणार नाहीत. प्रत्येकाला तसेच घालावे लागते नाहीतर तुम्ही त्या प्रवाहात नाही असे होते. आपल्यावर यांचा सतत मारा होत असल्याने आपण या उद्योजकांचे गुलाम बनतो. मी असे ऐकले आहे की बेल्जियममध्ये कोणतीही गोष्ट ताजी मिळत नाही. तुम्हाला सर्व गोष्ट्ी सुपर मार्केटमधून बंद डब्यातून विकत घ्यावे लागते. हळूहळू आपण पूर्णपणे कृत्रिम बनत चाललो आहोत. अन्न, पोशाख, आपला दृष्टिकोन सारे कृत्रिम होत चालले आहेत. बाहेरचा प्रभाव आणि जाहिरातींचा दबाव यामध्ये आपण हरवून गेलो आहोत. या सर्व आधुनिक गोष्टींच्या प्रभावामुळे आपण आपला अंतर्भूत सद्सद्विवेक हरवून बसलो आहोत. आता सायन्सनंतर महत्त्व आले पैशाचे, आता एकदा हे झाले की सारे उद्योजक महत्त्वाचे ठरतात कारण, पैसे कसे करायचे आणि तुम्हाला सतत कसं फसवत रहायचे ते त्यांना माहीत असते. पण जे लोक आतून दृढ असतात त्यांच्यावर या गोष्टींचा प्रभाव पडत नाही. त्यांच्यावर फॅशन्सचाही परिणाम होत नाही. याउलट पारंपारिकरीत्या त्यांनी जे मिळवलं असतं त्यापासून दूर जाण्याचा त्यांना त्रास होतो. आधुनिक युगात सहजयोगामध्ये अशा प्रकारे उद्योजकांचे गुलाम तयार होत आहेत का हे बघणं महत्त्वाचे आहे. त्याचा विचारांवरही प्रभाव पडतो. फ्रॉईडसारख्या मूर्ख माणसाची बडबड असलेली कितीतरी पुस्तकं आपण वाचतो. फ्रॉईडचा पाश्चिमात्य लोकांवर इतका प्रभाव कसा पडला? कारण तुमची अंतर्यामीची संवेदना तुम्ही हरवली आणि तुम्ही त्याचा स्वीकार केला. अशाप्रकारे फ्रॉईडही लोकांसाठी येशू ख़्रिस्तासारखा बनला. लैंगिक संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण झाले. थोडंस व्यवहारज्ञान असल्यास तुम्हालाही समजू शकतं की, क्षणोक्षणी अशा व्यक्ती ज्यांच्याकडे काही विचार आहेत, कल्पना आहेत ते आपल्याला गुलामीच्या दिशेने ढकलत असतात. त्यांचे विचार महान बनतात. 'त्याने असे म्हटले,' तो कोण आहे? त्याचं आयुष्य काय आहे ? स्वत:हून बघा, तो कशाप्रकारचा माणूस आहे ? परमेश्वराची इच्छा, जिने संपूर्ण विश्वाला तसेच आपल्या प्रत्येक कणाला बनवले आहे, त्याचे तुम्ही प्रतिनिधी असूनही तुम्ही या व्यावसायिकांच्या हातातील खेळणे झालेले आहात. हे उद्योजक अशा दुबळ्या लोकांना मूर्ख बनवून पैसे उकळीत आहेत. एका बाजूला तुमच्याकडे इतक्या महान शक्ती आहेत, इतक्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला निवडलं गेलं आहे आणि दुसर्या ११ बाजूला तुम्ही असे गुलाम आहात. तुमचे अंतर्भूत गुण नष्ट झाले होते. ही सौभाग्याची गोष्ट आहे की कुंडलिनी जागृती व सहस्राराचे भेदन केल्यामुळे तुमच्यामधील हरवलेले गुण जागृत झाले आहेत. तुमची अबोधिता, सृजनशीलता, धर्म, करुणा, मानवतेचे प्रेम, तुमचा न्यायीपणा, सुज्ञता या सर्व गोष्टी, महान गोष्टी सुप्त अवस्थेत होत्या, त्या सर्व जागृत झाल्या. 'तुम्ही ह्या गोष्टी करा किंवा करू नका' असं मला तुम्हाला सांगावे लागत नाही. तुम्हाला स्वत:लाच कळते की हे चूक आहे. तुमच्यासाठी काय चांगले आहे, ते तुम्हालाच कळतं. जर तुम्हाला एखादी अनुचित गोष्ट करायची असेल तर तुम्ही करू शकता, परंतु तुमच्यामधील प्रकाशच तुम्हाला सांगेल की काय चांगले आणि काय वाईट. ज्ञानार्जनासाठी सहस्त्रार उघडल्यामुळेच हे घडू शकते. हे काही नवीन नाही, तुमच्यामध्ये ते आहे. आता हे सर्व अंतर्यामीचे प्रगट होत आहेत आणि तुम्ही त्याचा आनंद लुटता आहात. गुण आता तुम्हाला स्वत:च्या क्षुल्लक कल्पना, वागणं यामधून बाहेर पडले पाहिजे. सहजयोगी सगळीकडे वस्तू पसरवून टाकतात, असं मी ऐकलं आहे. तुम्ही असं कसं वागू शकता ? जीवनाविषयी योग्य ती शिस्त तुमच्यात नसेल तर ईश्वरी इच्छा तुम्ही अंमलात आणू शकणार नाही. तुमच्या स्वातंत्र्याचा मी मान राखते आणि तुमच्या स्वत:च्या कुंडलिनीमुळे ती सुज्ञता, मोठेपणा आणि प्रभाव तुमच्यामध्ये जागृत व्हावा असे मला वाटते. तेव्हा तुम्हाला आपल्या पदाचे मूल्य समजेल. अग्नीमध्ये तापून शुद्ध झालेल्या सोन्याप्रमाणे कुंडलिनीपण तुम्हाला पूर्ण शुद्ध करेल. तुमचं स्वत:चे वैभव, स्वभाव आणि महानता तुम्हाला कळून येईल. त्यामुळे तुमचे सहजपणे एकीकरण होईल. पहिल्यांदा इंग्लंड, स्पेन, इटलीमध्ये सहजयोगी नेहमी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये बसायचे. ते कधीही एकत्र बसत नव्हते. पण आता तसं नाही. मला वाटते आता ते सर्व एकत्र झाले आहेत. माणसांनी संघटित होणं ही सहजयोगासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. ते बुद्धीमुळे होत नाही तर सर्व मानवजात परमेश्वराने निर्माण केली आहे, कशाचाही तिरस्कार करायला नको या जाणिवेतून होत आहे. तुमच्यामध्ये होणारी दुसरी गोष्ट म्हणजे सर्व धर्म अध्यात्माच्या एकाच झाडावर निर्माण झाले आहेत, सर्व धर्माची उपासना केली पाहिजे हे तुम्हाला समजते. सर्व अवतार, संत आणि धर्मग्रंथांची पूजा केली पाहिजे. ज्या धर्मग्रंथांमध्ये काही अडचणी किंवा कमतरता असतील त्या सुधारल्या पाहिजेत. हळूहळू जेव्हा तुम्ही दैवत्त्वाच्या सूक्ष्मतर बाजूकडे जाल तेव्हा कळेल की या सर्व लोकांनी सहजयोगाचे वातावरण निर्माण करायला किती त्रास घेतले आहेत. कोणताही धर्म तूच्छ लेखायला नको किंवा त्यावर हल्ला करायला नको. अशा तऱ्हेने आपण मूलतत्त्ववाद संपवून टाकू, सहजयोगातही लोकांनी मूलगामी होता कामा नये. खूप लक्षपूर्वक रहा. कधी कधी तुम्ही सहजयोगाला मूलगामी करू लागता. 'श्री माताजींनी असं सांगितलं' असं म्हणून तुम्ही दुसर्यांवर प्रभुत्व गाजवायला बघता. मला कुठेही वापरू नका. तुम्ही स्वत: म्हणा कारण, आता तुम्हाला तो हक्क आहे. सहजयोगामध्ये तुमचे असे एक व्यक्तिमत्त्व आहे. मला १२ वाटेल तसे वापरण्याचा कोणाला अधिकार नाही. जे काही तुम्हाला म्हणावयाचे असेल ते तुम्ही स्वत: म्हणा. मी जे काही म्हणते त्याला तुम्ही बांधलेले नाही. तुम्हाला स्वत:ला उभं राहन काय म्हणायचे आहे, ते तुम्ही स्वत: पहायला पाहिजे. आता तुम्हाला तुमची इच्छा वापरली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला स्वत:ला विकसित केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला शुद्ध इच्छा पाहिजे. सर्वशक्तिमान परमेश्वराची शुद्ध इच्छा. एकीकरण फक्त बाह्यात नाही तर आंतरिक ही असावे. याआधी आपण जे काही करत होतो त्यात आपलं मन एक सांगायचे, हृदय दुसरेच काही आणि आपला मेंदू तिसरीच गोष्ट सांगायचा. आता या तिन्ही गोष्टी एक झाल्या आहेत. आता तुमचा मेंदू जे काही म्हणतो, ते करण्याची तुमच्या हृदयाची आणि चित्ताची पूर्णपणे तयारी असते. तुमच्या स्वत:मध्येच अखंडत्व आलं आहे. खूप लोक म्हणतात, 'मला ते करायची इच्छा आहे पण मी ते करू शकत नाही.' आता तसं नाही, कारण तुम्ही पूर्णपणे एकसंध आहात. तुम्ही स्वत:चे निरीक्षण करून बघा की तुमचे एकीकरण झाले आहे की नाही. हे पाहिलं पाहिजे की 'मी जे काही करतो आहे, ते पूर्ण हृदय ओतून, पूर्ण चित्त त्यात घालून करतो आहे का?' मला असे आढळून आले आहे की तुम्ही पूर्ण हृदयातून कार्य करता परंतु तुमचे चित्त पूर्णपणे तिथे नसते. पहिली आलोकित झालेली गोष्ट म्हणजे चित्त, हे पूर्णपणे वापरले जात नाही किंवा एकत्रीकरण अपूर्ण आहे. सर्व चक्रांमध्येही एकसंधपणा येतो. जे काही तुम्ही करता ते पूर्ण चित्ताने आणि मंगल असलं पाहिजे. ते धार्मिक असलं पाहिजे. ही सर्व चक्र म्हणजे एक पूर्ण, एकसंध अशी शक्ती आहे, जी तुम्ही आहात. पूर्ण जीवन एकसंध झाले पाहिजे. जर कोणाची पत्नी वा पती त्या पातळीचे नसतील तर तुम्ही काळजी करता कामा नये. तुम्ही फक्त स्वत:ची काळजी घ्या. इतरांपासून कसलीही अपेक्षा करू नका. तुमचं कर्तव्य हे महत्त्वाचे आहे. तुमचं कर्तव्य पार पाडा. तुम्हाला स्वत:लाच ते कार्यान्वित करावे लागेल. तुम्ही वैयक्तिकरीत्या ते मिळवलं आहे. वैयक्तिकरीत्या ते कार्यान्वित करायचं आहे. इतरांबरोबर एकत्रित व्हायचं आहे. तुम्हाला काय मिळालं आहे ते तुम्ही पाहिलं पाहिजे. 'मला आर्थिक, शारीरिक, मानसिक फायदा झाला. मला प्रसन्नता व आनंद मिळाला आहे.' फक्त इतकेच नाही. हे एकच मोजमाप नसावे. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची जाण असली पाहिजे. अनेक जन्मांनंतर, या जन्मात आत्मसाक्षात्कार मिळवून, परमेश्वरी इच्छेचे पुढचे कार्य करण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्त्व तयार केलं गेलं आहे. प्रत्येक क्षणाला जेव्हा तुम्ही चमत्कार घडताना पहाता तेव्हा हे परमचैतन्याने केलं आहे हे तुम्हाला जाणवतं आहे. परमचैतन्य ही आदिशक्तीची इच्छा आहे व आदिशक्ती ही परमेश्वराची इच्छा आहे. ही व्हायब्रेशन्स ही डी . एन.ए. सारखी आहेत. कशाप्रकारे कार्य करायचे हे ते जाणतात. जसं आज खूपच ऊन पडलेले आहे. सर्व त्रस्त आहेत. पण दोन दिवसांपूर्वी आम्ही हवन केलं आणि खूप ऊन पडले. १३ सर्व आसमंत तुमच्यासाठी कार्य करीत आहे. आता व्यासपीठावर तुम्ही आहात आणि त्याकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. तुमचा स्वत:वर विश्वास नसेल तर तुम्ही कशी मदत करणार? तुम्ही स्वत:ला कशाप्रकारे कार्यान्वित कराल? आणि माणसाने निर्माण केलेले प्रश्न तुम्ही कसे सोडविणार? आपल्यावरची गुलामी आपल्याला फेकून द्यायची आहे. पहिलं म्हणजे सायन्सने आपण सारे काही सिद्ध करू शकतो. 'धर्म' म्हणून म्हणतात हे आपण सिद्ध करून दाखवू शकतो. आपण हिंदू, मुसलमान, कॅथलिक, प्रोटेस्टंट आहोत हे विचार फेकून दिले पाहिजे. आपल्याला नवे व्यक्तिमत्त्व बनले पाहिजे. आत्मसाक्षात्कारानंतर चिखलातून उगवलेल्या कमळासारखे तुम्ही बनता. तुम्ही आता कमळ झालेले आहात. हा चैतन्यहीन चिखल काढून टाकला पाहिजे नाहीतर, त्याचे शिंतोडे राहतील. निरर्थक बंधन तोडा. सर्व रचना इतक्या काळजीपूर्वक, प्रेमाने व नाजूकपणे केली गेली आहे. तेव्हा आपण स्वत:चा आदर राखला पाहिजे. इतरांसाठी आपल्यामध्ये प्रेम, ममता हवी आणि सव्वात जास्त शिस्त हवी. आता माझ्या जीवनाबद्दल तुम्हाला माहीत आहे की, मी खूप प्रवास करते आणि खूप परिश्रम घेते, तुम्हा सर्वांपेक्षा जास्त! त्याचं कारण माझी इच्छा आहे की या जगाला मजेच्या, आनंदाच्या, देवतत्त्वाच्या त्या पातळीवर न्यायचं आहे जिथे मनुष्याला समजेल की त्याचे ध्येय काय आहे आणि त्यांच्या पित्याचं वैभव काय आहे ते . मी कधी असा विचार करीत नाही की मला खूप त्रास होईल किंवा माझे काय होईल. माझ्या कौटुंबिक जीवनाबद्दल मी कधी तुम्हाला त्रास दिला नाही, माझी मुलं किंवा इतर कोणाबाबतही. जे व्यक्तिगत प्रश्न, अडचणी आहेत त्या मी स्वत:च सोडवते. परंतु सहजयोगी मला त्यांच्या कौटुंबिक अडचणींविषयी लांबलचक पत्रं लिहितात. कुटुंबाविषयी गुंतवणूक. तुमच्या डोक्यावर मोठं ओझच आहे. परिवार तुमची जबाबदारी नाही. ती सर्वशक्तिमान परमेश्वराची जबाबदारी आहे. त्याच्यापेक्षा जास्त चांगले तुम्ही करू शकता? जेव्हा तुम्ही काळजी घ्यायला जाता तेव्हा प्रश्न उभे रहातात. आपण अलिप्तता शिकली पाहिजे. तुम्ही तुमच्या गोष्टींना, कुटुंबाला, मुलांना चिटकूनच राहता. मोहमयी लोकांना संत कसे म्हणणार? संत लोक फक्त स्वत:विषयी जबाबदार नसतात, तर ते इतरांबद्दलही असतात. सहजयोगामध्ये येण्याआधी तुम्ही आत्मकेंद्रित होता. कोणाला चिकटलेले नव्हता. आता तुम्ही थोडे विस्तृत झाले आहांत, स्वत:च्या बायकामुलांना चिकटला आहात, असे करणेदेखील स्वार्थ आहे. ती तुमची मुलं नाहीत, तर ती परमेश्वराची आहेत. सहस्त्रार उघडलं, ही फार महत्त्वाची गोष्ट झाली आहे. आता तुम्ही संपूर्ण जगासमोर देवाचं अस्तित्व, त्याची इच्छा सर्व काही सिद्ध करू शकता. सहजयोगाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. जे आव्हान देतात त्यांना समजवता येते. तुम्ही मात्र सहजयोगाकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. तुम्ही लोक १४ ध्यानदेखील करत नाही. ध्यानाशिवाय तुमचा विकास कसा होणार? जोपर्यंत निर्विचारीतेत जात नाही तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकत नाही. कमीतकमी सकाळी आणि संध्याकाळी ध्यान केलं पाहिजे. काही लोक मूळत:च सामूहिक नाही. त्यांना आश्रमाचे जीवन आवडत नाही. अशा लोकांनी सहजयोगाबाहेर गेले पाहिजे. सामूहिकतेशिवाय तुम्ही कसे काय वाढणार? आणि तुमची शक्ती कशी एकत्र करणार? एकत्र राहिलात तर तुम्ही शक्तिमान व्हाल. एक काठी मोडू शकतो, पण काठ्यांची मोळी तोडणं कठीण असतं. हजार निरुपयोगी लोक असण्यापेक्षा दहा चांगल्या गुणवत्तेचे लोक असलेले बरे. आज आपल्याला शपथ घेतली पाहिजे की 'परमेश्वरी इच्छेनुसार माझे आयुष्य मी घडवेन. त्यासाठी मी आत्मसमर्पण करेन. कुटुंब वगैरे इतर काही लक्षात घेणार नाही.' ईश्वरी इच्छा सर्व गोष्टींची काळजी घेते. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या अडचणींचे कारण हे आहे की त्या अडचणी तुम्हाला देवावर सोडायच्या नाहीत. काही लोक म्हणतात त्यांच्यात ती योग्यताच नाही की ते असं करू शकतील. हे फार मूर्खपणाचे विधान आहे. तुम्ही स्वत:चेच निरीक्षण करा. आपण अशी गोष्ट का म्हणतो? कदाचित तुमचं लक्ष पैशाकडे असेल. सहजयोगात काही लोक धंद्याबाबत बोलतात किंवा भौतिक गोष्टींचा मोह असतो. दूसरी गोष्ट म्हणजे ममत्त्व असू शकतं- माझं कुटुंब, मुलं वगैरे. तिसरी गोष्ट तुम्ही अजून तुमच्या जुन्या सवयींना चिकटून असता आणि सद्गुणांशिवाय असलेले तुमचे जीवन तुम्हाला आवडतं. तुमच्यामध्ये सर्व काही करण्याची क्षमता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, ईश्वरी इच्छेचे योग्य करुणामय शक्तिशाली माध्यम तुम्ही बनलं पाहिजे. माझी पूजा तुम्ही व्यवस्थित करता कारण, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो. मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी वर वर वाढलं पाहिजे. वर जाण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा केली पाहिजे. मला खात्री आहे की एके दिवशी हे पूर्णत्वात असलेले विज्ञान इतर विज्ञानाला मागे टाकील, आणि लोकांना ते काय आहे, ते सांगू शकेल. ते तुमच्या हातात आहे. देवाच्या पुराव्याविषयीची नवी पातळी आज आपण पूर्णपणे उघडली आहे. तो दिवस आज आपण साजरा करीत आहोत. त्यांच्याकडे असलेला सर्व भ्रम आपण संपवू शकू हे किती महत्त्वाचं आहे. तुम्हा सर्वांकडे असलेली ती शक्ती आपण वापरू शकू. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. १५ अपेक्षा हेच सर्व दःखाचे कारण आहे शुडी कँप, इंग्लंड, ३१ मे १९९२, अनुवाद (इंग्लिश) स र्व धर्म कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या धर्मांधळेपणात विलीन झाले आहेत कारण कोणालाही आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे सर्वांनी आपापल्या पद्धतीने धर्माची स्थापना केली. ताओ, झेन हे त्याचेच एक भाग आहेत. जीवनापलीकडे काहीतरी प्रत्येकाने शोधलं पाहिजे असं बुद्धांना वाटलं. ते राजपुत्र होते. त्यांना सुरेख पत्नी होती, पुत्र होता. अर्थातच त्या परिस्थितीमध्ये असलेला कोणीही संतुष्ट असतो. एके दिवशी त्यांनी रुग्ण, एक भिकारी व एक मृत व्यक्ती पाहिली. हे दुःख कसं आलं, हे त्यांना कळेना. या दुःखाची गरज काय आहे? त्यामुळे त्यांचे कुटुंब, ऐषआराम यांचा त्याग करून ते सत्याच्या शोधात बाहेर पडले. जसे तुमच्यापैकी काही जण आहेत. सत्य शोधतांना त्यांनी सर्व उपनिषदं, पुस्तकं पालथी घातली, पण त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांनी अन्नत्याग केला. सर्व गोष्टींचा त्याग करून जेंव्हा ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसले होते तेव्हा आदिशक्तीने त्यांना आत्मसाक्षात्कार दिला. याचं कारण, विराटामध्ये विशिष्ट स्थान मिळविण्यासाठी योजून ठेवलेल्यांपैकी हे एक होते. त्यांनी ते साध्य केले. त्यांच्या जीवनामधून आपण पहायचं आहे ते हे की अपेक्षा हेच सर्व दुःखाचे कारण आहे. शुद्ध इच्छा काय, ते त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे, स्वत:च्या कुंडलिनीचे जागरण करून लोकांनी आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे, हे ते त्यांना सांगू शकले नाहीत. त्यांनी संन्यस्त जीवन व्यतीत केल्याने बुद्धांसाठी तो नियमच बनला. अनवाणी चालणारे कमीतकमी हजार लोक त्यांच्याबरोबर असायचे आणि खाण्याची, राहण्याची काहीही व्यवस्था नसे. त्यांना केसांचे वपन करावे लागत असे. थंडी असो वा ऊन फक्त एकच वस्त्र ओढावे लागे. गाणं म्हणणं, नाचणं अथवा कोणत्याही पद्धतीने स्वत:चे मनोरंजन करणे याची त्यांना परवानगी नव्हती. ज्या गावी जात, तिथून जे अन्न गोळा करीत, भिक्षा म्हणून जे मिळेल ते आपल्या गुरूला अर्पण करून, नंतर ते त्याचे भक्षण करीत. तळपत्या उन्हात, पावसांत, चिखलात ते अनवाणी जात. सर्व कौटुंबिक संबंध त्यांनी तोडले होते. जरी पती-पत्नींनी संघात प्रवेश केला, तरी त्यांना पती-पत्नीसारखे वागता येत नसे. सर्व शारीरिक, मानसिक, भावनिक इच्छांचा त्याग करावा लागे. बौद्ध भिक्षूंना पाहिल्यास ते हे सारं करतात. जरी ते राजा असले, तरी देखील. त्यापैकी एक राजा अशोक होता. पूर्णपणे सन्यस्त जीवन व्यतीत करण्याचा त्याने प्रयत्न केला. ते फार कठोर जीवन होतं आणि तसं केल्याने त्यांना स्वत:चा आत्मसाक्षात्कार मिळेल असं त्यांना वाटलं. त्यांच्या दोन शिष्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला, पण पूर्ण आयुष्य शुष्क, कठोर, नीरस होतं, त्यांत काही मौज नव्हती. कौटुंबिक जीवनाची परवानगी नव्हती. तो संघ होता पण जास्त बोलण्याला परवानगी नसल्याने त्या सामूहिकतेमध्ये काही तारतम्य नव्हते. ते फक्त ध्यानधारणा आणि उच्च प्रतीचे जीवन मिळण्याविषयी बोलू शकत होते. ती कल्पना अनेक धर्मात चालू राहिली. त्यानंतर त्यागाच्या नावाखाली गृहस्थाश्रमातील लोकांकडून धन गोळा करण्यास सुरुवात झाली. १७ बुद्धांच्या काळातही साधकांना सर्व गोष्टींचा त्याग करावा लागत होता. परंतु बुद्धांचा हा सर्व प्रयत्न त्यांना मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी होता. तसेच त्यांना पूर्ण सत्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न होता. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे महात्मा बुद्धांचे शिष्य विविध प्रकारचे हास्यास्पद धर्म स्थापन करते झाले. उदा.जपानमध्ये कोणत्याही प्राण्याची हत्या करू देत नव्हते परंतु मांस 15 खाण्यावर बंधन नव्हते. मानवाला ते मारू शकत होते. मनुष्याचा वध करण्यात जपानी निष्णात झाले. लोक विविध प्रकारची कारणेच शोधतात. जेव्हा लाओत्सेने ताओ विषयी उपदेश दिले तेव्हा दुसर्या प्रकारच्या बुद्ध धर्माचा उदय झाला. 'ताओ' ही कुंडलिनी आहे. तो काय म्हणतो हे लोकांना समजलेच नाही. कठोरपणापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. तरीही ते गहनतेत जाऊ शकले नाही. यंगत्से नावाची नदी आहे, तिथे सुंदर पर्वत तसेच झर्यांमुळे प्रत्येक पाच मिनिटाला दृश्य बदलत असते. असे सांगितले गेले आहे की बाह्य सृष्टीतील आकर्षणांकडे तुमच चित्त जाऊ देऊ नये. त्या दृष्याकडे बघून तिथून निघून जायचे. ताओच्या बाबतीतही असेच आहे. ते कलेकडे वळले. मूळात बुद्धांनी कलेचा कधी विचार केला नव्हता. त्यांनी सांगितले की आत्मपरीक्षणाद्वारे आपल्या अंतरंगात गहनतेत जाऊन तुम्हाला पूर्ण सत्य शोधायचे आहे. शेवटी सर्व काही मार्गापासून परावृत्त झाले. जपानमध्ये सुरू झालेली झेन प्रणालीही कुंडलिनीमिश्रित आहे. या प्रणालीमध्ये चक्रांवर तसेच माकडहाडावर मारून कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न केला जात होता. कुंडलिनीचे उत्थान करण्याच्या अत्यंत कडक पद्धती झेन प्रणालीने विकसित केल्या आणि ते इतक्या टोकापर्यंत नेले की, मज्जारज्जू मोडलेले अनेक लोक मला भेटले. मी विदीत्म या झेन प्रणालीच्या प्रमुखाला भेटले. तो खूप आजारी होता व त्याला रोगमुक्त करण्यासाठी मला बोलावले गेले. मला असे आढळले की तो आत्मसाक्षात्कारी नव्हता आणि त्याला कुंडलिनीविषयी काहीही माहीत नव्हते. मी त्याला विचारले, 'झेन म्हणजे काय?' त्याचा अर्थ आहे ध्यान. झेन विषयी त्याचा इतका गोंधळ होता. कित्येक शतकांत त्यांच्याकडे कोणी साक्षात्कारी व्यक्ती झाली नाही. तुम्ही कल्पना करा किती सहजपणे, कोणत्याही बलिदान, तपस्या व त्यागाशिवाय तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे. बुद्ध, येशू ख्रिस्त आणि महावीर आज्ञा चक्रावर विराजमान आहेत. आज्ञा चक्रावर तप आहे. 'तप' चा अर्थ तपस्या. सहजयोगात तपस्येचा अर्थ आहे ध्यानधारणा. ध्यान करण्यासाठी १८ आत्मपीक्षणाद्वारे 8पल्या अतराल गहनतेत जाऊन तुम्हाला पूर्ण सत्य शोधायचे आहे. कधी उठायचे हे तुम्हाला माहिती पाहिजे. सहजयोग्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टी आपोआपच कार्यान्वित होतील. गहनतेत जाण्यासाठी तुम्हाला ध्यान केलं पाहिजे. तुम्हाला वपन करायचे नाही, अनवाणी चालायचे नाही, उपवास करायचे नाही आणि ना ही कौटुंबिक जीवनाचा त्याग करायचा आहे. तुम्ही नाचू, गाऊ आणि मनोरंजन करू शकता. बुद्धचा अर्थ बोध. म्हणजेच आपल्या मध्य नाडी तंत्रावर सत्याविषयी जाणणे. आता तुम्ही सर्वजण कशाचाही त्याग न करता बुद्ध झाले आहांत कारण त्यांनी ज्याचा त्याग केला, ते निरर्थकच होतं. ती एक दंतकथा होती. तुम्ही गाणं ऐकलं, नाच केला, तर काय बिघडलं? काहीच बिघडत नाही. पण या कल्पना या लोकांमध्ये इतक्या रुजून बसल्या आहेत की, त्यांच्याबद्दल तुम्हाला खरोखर दया आणि कळकळ वाटते. ते अन्न खात नाहीत, उपवास करतात. टी. बी.च्या रुग्णांहून खराब दिसतात. याउलट, तुम्ही आपले जीवन सौंदर्यपूर्णरीतीने व्यतीत करीत आहात तसेच तुम्ही गुलाबासारखे दिसता. पण तरीही ते बुद्धांचे तत्त्व आपल्यामध्ये असायला पाहिजे म्हणजेच आपल्याला तप केले पाहिजे. त्याचा अर्थ तुम्ही स्वत:ला उपाशी ठेवा असं नव्हे. पण तुम्हाला भरपूर खाण्याची आवड असेल, तर थोडं कमी खा. मोक्ष, जागृती तसेच उत्थानासाठी बनवलेल्या संगीताचा आनंद घ्या. आपण इतके बंधनात अडकून गेलेलो आहोत की लोकांना आत्मा म्हणजे काय हे ही माहीत नाही. परमेश्वराच्या असीम प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजेच आत्मा आहे. आतासुद्धा आपल्यामध्ये बऱ्याच प्रकारची बंधने कार्य करीत आहेत. आपल्यापैकी काहींना आपल्या राष्ट्रीयतेचा खूप गर्व आहे. आम्ही इतरांबरोबर मिळूनमिसळून राहू शकत नाही. इतरांपेक्षा आपण खूप उच्च प्रतीचे आहोत असा काहींचा समज असतो. तुम्ही आता सर्वव्यापक व्यक्ती आहात. म्हणून तुमच्यामध्ये अशाप्रकारच्या मूर्खतापूर्ण खोट्या सीमारेषा कशा असू शकतात ! तुमच्या आतंच प्रकाश आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हा प्रकाश बाहेर पसरवायचा आहे. जर तुम्ही हा प्रकाश पसरविण्यास असमर्थ असाल तर तुम्हाला अजून शक्ती मिळविण्याची आवश्यकता आहे असे समजा. तुमची कुंडलिनी कशी वर चढवायची आणि दैवी शक्तीशी सतत संबंध कसा साधायचा ते तुम्ही शिकलं पाहिजे. जेणेकरून निर्विचार समाधीत राहून तुम्ही तुमच्यामध्येच गहनतेत वाढा. मला सहजयोग्यांमध्ये 'मी, माझंे' अशाप्रकारची शक्तिशाली बंधनं अजूनही आढळतात. पूर्वी पाश्चात्य लोक त्यांची कुटुंब, बायका- मुलं याविषयी काही काळजी करत नसत. परंतु मला असं वाटतं की ते आता एखाद्या डिंकासारखे त्यांना चिकटून असतात. नवरा, मुलं आणि घर फार महत्त्वाचे होतात. मुलं सामूहिक आहेत. तुम्ही असा विचार करू नका की हा तुमचा मुलगा आहे. असा विचार करून तुम्ही स्वत:ला मर्यादित करीत आहात आणि अडचणीत पडता. प्रत्येक देशाच्या अडचणी कमी होत आहेत. आम्हाला जातीयता आवडत नाही. भारतीय सहजयोग्यांना जाती-पाती नष्ट व्हाव्या असच वाटतं. कारण ह्या प्रथा स्वत:चा विनाश करणाऱ्या आहेत. म्हणूनच आपण बघू लागतो की माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, देशासाठी तसेच संपूर्ण विश्वासाठी विनाशक काय आहे. तुमच्या सुरचित जीवनाच्या एकदम विरुद्ध अशा प्रकारची वाईट कृत्ये तुम्हाला समजतात १९ आणि तुम्ही ती थांबवू शकता. हे फक्त तेव्हाच शक्य आहे, जेव्हां तुम्ही आत्मपरीक्षण करता. तसेच पूर्णपणे समर्पित करण्याचा प्रयत्न करून पाहिले 16 पाहिजे की तुमच्यामध्ये ते गुण आहेत का? आता कुंडलिनीने तुमच्यामधील सर्व चांगल्या गुणांना जागृत केले आहे. या सर्व गुणवत्ता तुमच्यामध्ये जशाच्या तशा होत्या. जेव्हा कुंडलिनी वर उठू लागली त्यावेळी या सर्व सुरेख गुणवत्ता तिने जागृत केल्या. सहजयोग इतकी मौल्यवान गोष्ट आहे की मनुष्याला फार पूर्वीच याची माहिती व्हायला पाहिजे होती. हे फक्त परमेश्वराविषयी बोलणं किंवा तुमच्या आत देवत्व आहे असं म्हणणं नव्हे. हा तर त्याचा प्रभावीपणा आहे. तुम्हाला कोणत्याही विज्ञानाची आवश्यकता नाही. काही अडचण असली तर बंधनं द्या इतकं ते सोपं आहे. विज्ञानाने तुम्ही जे काही करता, ते सारं तुम्ही सहजयोगाने करू টি 16. शकता. आपण कॉम्प्युटरसुद्धा आहोत. फक्त आपल्याला आपली गहनता विकसित केली पाहिजे. आता तुम्ही योग्य रेषेवर आहांत. हे आधुनिक विज्ञान, जे आपला विनाश करू शकतं, त्याची आपल्याला गरज नाही. स्वाभिमान तुम्हाला पाहिजे आणि तुम्ही सहजयोगी आहांत हे जाणून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला ती स्थिती प्राप्त करून घेतली पाहिजे. विज्ञान जे काही करू शकते ते तुम्ही पूर्णपणे करू शकाल. सर्व शक्त्यांचे तुम्ही मूर्त स्वरूप बनता. काही लोक येऊन मला सांगतात, 'माताजी, आम्ही आमचं हृदय उघड़ू शकत नाही.' तुम्हाला करुणा येत नाही कां? कुत्र्यामांजरासाठी लोकांची हृदयं उघडलेली मी पाहिली आहेत पण मुलांसाठी नाही. हेच ते स्थान आहे जिथे आत्म्याचं अस्तित्व आहे आणि जिथून ती आपला प्रकाश पसरवते. हे तेच पहिले स्थळ आहे जिथे प्रेमाने परिपूर्ण व्यक्तीचा प्रकाश तुम्ही बघू शकता. असेही असू शकते की तुमच्यामध्ये फक्त अहंकार आहे पण आत्मसन्मान नाही आणि त्यामुळेच तुम्ही तुमचे हृदय उघडू চি 16 शकत नाही. श्री अहंकाराचा नाश करणारे आहेत. आपल्या अहंकारावर त्यांचे नियंत्रण असते आणि आपल्या उजव्या बाजूची पूर्तता ते करतात. उजव्या बुद्ध তি बाजूकडे झुकलेली व्यक्ती कधीही हसत नाही किंवा स्मितहास्य ही करीत नाही. परंतु बुद्धाला जाड आणि हसणारा दाखवला आहे. केवळ हसण्यामुळेच ते उजवी बाजू सांभाळून घेतात. ते आपली थट्टा करून सर्व नाटक बघतात. तुमच्या प्रकाशित चेतनेने सगळा मूर्खपणा बघा तसेच त्याचा आनंद घ्या. उदा.एलिझाबेथ टेलरला लग्न करून मधुचंद्रासाठी जातांना बघून अशा व्यक्तींवर मोहीत होण्यापेक्षा त्यांची मूर्खता बघा. वस्तूंविषयी तुमची प्रतिक्रिया तुमच्या चित्ताच्या अवस्थेवर २० तुम्ही सहजयोी आहात हे जाणून घेतते पाहिजे आणि लुम्हाला ती स्थिती प्राप्त करून घेतली पाहिजे. विज्ञान जे काी कू शकले ते तुम्ही पूर्णपणे करू आका. अवलंबून असते. जर ही काही दैवी वस्तू असेल तर तुमचे चित्त भावविभोर व्हायला पाहिजे. परंतु जर काही मूर्खपणा किंवा हास्यास्पद गोष्टी असतील तर तुम्ही त्याचे तत्त्व बघू शकता. तुमच्या चित्ताद्वारे सत्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे तत्त्व बघू शकता. सत्याची तुलना करतांना हे मूर्खासारखे, खोटे किंवा भोंदुगिरी असू शकते. परंतु जर तुम्ही सहजयोगी आहात तर तुम्हाला या गोष्टी बघून त्याचा आनंद घेण्याची योग्यता असली पाहिजे. विशिष्ट वयापर्यंत मुलं असे करतात. तुमची प्रतिक्रिया तुमच्या प्रकाशित चित्तावर अवलंबून असते. प्रकाशित चित्त कोणत्याही मूर्ख, भ्रामक तसेच नकारात्मक चित्तापेक्षा वेगळी प्रतिक्रिया देते. आपण जे आहोत त्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि आपण आत्मा आहोत. श्री बुद्धांनी सांगितलेल्या तीन गोष्टी तुम्ही सर्वांनी रोज सकाळी म्हणायला पाहिजेत. पहिली म्हणजे, 'बुद्धं शरणं गच्छामि' म्हणजे प्रकाशित चित्ताला मी शरण जातो. नंतर त्यांनी सांगितले, 'धम्मं शरणं गच्छामि' म्हणजेच मी माझ्या धर्माला शरण जातो. हा काही विकृत झालेला खोटा धर्म नव्हे. याचा अर्थ असा आहे की मी स्वत:ला माझ्यामधे असणाऱ्या धर्मपरायणतेप्रती समर्पित करतो. त्यांनी सांगितलेली तिसरी गोष्ट म्हणजे, 'संघं शरणं गच्छामि' मी स्वत:ला सामूहिकतेप्रती समर्पित करतो. सहली वरगैरेच्या कारणांमुळे महिन्यांतून कमीत कमी एकदा तरी तुम्ही भेटायला पाहिजे. तुम्ही अखंडत्वाचे एक अविभाज्य भाग आहांत. लहान ब्रह्मांड हे विशाल झाले आहे. तुम्ही विराटाचे जाणीव असली पाहिजे. अशाप्रकारे गोष्टी फार लवकर अंग-प्रत्यंग आहात आणि त्याची तुम्हाला कार्यान्वित होतात तसेच आपण नकारात्मक, सकारात्मक अहंकारी तसेच नम्र व्यक्तींना ओळखू शकतो. आपण सहजयोग्यांना तसेच सहजयोगी म्हणवणाऱ्यांना ओळखू शकतो. दांभिक लोकांचा आपण त्याग करतो. सामूहिक झाल्याशिवाय तुम्हाला त्याचे महत्त्व कधीही कळणार नाही. समूहामुळे तुम्हाला इतकी शक्ती, समाधान आणि आनंद प्राप्त होतो की प्रत्येक सहजयोग्याला सामूहिकतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. कोणत्याही गोष्टींची कमतरता असली तरीही तुम्ही सामूहिक व्हा. समूहामध्ये तुम्ही कोणाच्याही चुका काढू नका, शिव्या देऊ नका आणि इतरांचे दोष बघू नका. आत्मपरीक्षण करा की जर सर्व लोक आनंद घेतात तर मीच असे बसून दुसऱ्यांचे दोष का शोधू. तुम्ही इतरांचे दोष बघत बसण्यापेक्षा जर आपलेच दोष शोधण्याकडे लक्ष द्याल तर मला विश्वास आहे की तुम्ही जास्त सामूहिक व्हाल. सहजयोग हा पूर्ण सत्य असल्यामुळे जास्त व्यवहारी आहे. त्यामुळे या सर्व शक्त्या, जाण आणि करुणामय प्रेम यामुळे तुम्हाला स्वत:बद्दल खात्री असली पाहिजे आणि तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे की नेहमीच परमेश्वराची सर्वव्यापक शक्ती तुमची प्रगती होण्यामध्ये तुम्हाला मदत, रक्षण, मार्गदर्शन, पोषण तसेच काळजी घेत असते. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. २१ मिनी सहर्सीर स्वीा सहस्रार हे सर्वशक्तिशाली चक्र आहे कारण हे फक्त सात चक्रांचेच नाही तर इतरही परंतु सर्वसाधारणपणे महामायेच्या माध्यमातूनच सर्व गोष्टी कार्यान्वित होत असतात आणि असेच व्हायला पाहिजे. बऱ्याच चक्रांचे पीठ आहे. सहस्रारावर तुम्ही काहीही करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता की, 'श्रीमाताजी, हे वातावरण पर्यावरणाच्या समस्यांनी भरलेले आहे, तुम्ही ते शुद्ध का नाही करत ?' जरी वातावरण शुद्ध झाले तरी लोक समस्या निर्माणच करत राहतील. ही मानव निर्मित समस्या आहे आणि जर मी ती ठीक केली तर ते त्यांचा अधिकारच आहे असे समजतील. त्यांना ह्या समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि आपल्या सवयी बदलाव्या लागतील. त्यांना समजले पाहिजे की ते स्वत:च स्वत:चा विनाश करीत आहेत, जर दूसरी कोणी व्यक्ती शुद्धीकरणासाठी असेल तर ते कधीच परिवर्तित होणार नाहीत. सोडवल्यावरही माझे कार्य संपत नाही आणि माझे फक्त हेच एक लक्ष्य नाही. माझे ध्येय तर त्यांना सक्षम बनवण्याचे आहे, जेणेकरून ते स्वत:च त्यांच्या समस्या सोडवू शकतील. तुम्हाला तुमचे त्यांच्या समस्या डॉक्टर अथवा आपले गुरू बनायचे आहे परंतु महामायेशिवाय तुम्ही असे करू शकत नाही कारण तिलाच माहिती आहे की स्वतंत्र मानवाच्या शुद्धीकरण आणि नियंत्रणात कुठपर्यंत जायचे आहे. अशा प्रकारचे मूर्खतापूर्ण स्वातंत्र्य सहजयोग्यांचे नसते. त्यांना तर आत्म्याचे स्वातंत्रय प्राप्त झाले आहे, म्हणूनच त्यांचे प्रश्न सोडवणे बिलकुल उचित आहे की जेणेकरून ते पुर्ण स्वतंत्र होतील. जे लोक काहीही विचार न करता संपूर्ण विश्वाला नुकसान पोहोचवत आहेत त्यांना स्वतंत्र करण्यात काय फायदा? त्यांच्यासाठी आवश्यक आहे की त्यांनी सहजयोगात यावे, यासाठीच हा महामायेचा अवतार आहे. जर मी माता मेरी, राधा किंवा अशाच इतर रूपात आले असते तर कदाचित सगळे लोक इथे असले असते आणि सुंदर भजन गात बसले असते, परंतु असे नाहीये. प.पू.श्री माताजी, ८.५.१९९४ २२ NEW RELEASES Lang, Type | D Title Date Place VCD DVD ACD 489* 23rd Dec.1981 Christmas Puja 199 London Sp/Pu th 4" Jul.1982 Guru Puja : A mother for Guru 490 Sp/Pu 200 London 2nd Feb.1983 Delhi 267 Talk about Vishudhi 491 PP सार्वजनिक प्रवचन 26th Feb.1983 492 Nasik M PP 100 th 079* 4" Aug.1985 Shri Ganesh Puja:Your Power is Chastity Brighton 493* Sp/Pu -th Mahalakshmi Puja 205° M/E | Sp/Pu 6™ Jan.1986 494 Sangli th 495* 20"Jan.1986 064 Mumbai 1st Public Program : Attention should be on God PP 19th Feb.1986 साधक वही होता है जो साध लेता हैं। 496 Jaipur Н PP 009 संक्रान्ति पूजा / Sankranti Puja M/E | Sp/Pu 14th Jan.1987 497 089 Rahuri 8th Mar.1989 सार्वजनिक प्रवचन : इंसान का परिवर्तन 498* Delhi PP 130 Н इडा पिंगला सुषुम्ना, भाग-१, २ th- 15"Mar. 1989 499* 109 Delhi Н PP 23th Sep.1990 Navaratri Puja : Deities are watching you, Geneva Part I & II 500 068 E Sp/Pu द्वितीय सार्वजनिक प्रवचन - न्यू इंग्लिश स्कूल 6"Dec.1990 th- 501" 213 Pune PP पूजा:सहजयोगी को कार्यशील होना चाहिए Kolkata सरस्वती 3"Feb.1992 rd 502 049 Sp/Pu H सार्वजनिक प्रवचन 23"Mar.1992 503* Delhi 134 H PP सार्वजनिक प्रवचन 22nºMar.1993 504 Delhi PP 275 Н आनन्द की प्राप्ति बिना अंहकार से मिलती है 2n Dec.1993 Noida 050 505 Н PP सार्वजनिक प्रवचन th 20Jan.1994 506 Hyderabad H 057 PP आप इस मनुष्य धारणा में सत्य को जान नहीं सकते सार्वजनिक प्रवचन |Pune 27" Jan.1994 th 507* 077 PP H th 12"Apr.1995 508 Kolkata Н 318 PP th 509* 21 Mar.1995 Birthday Puja : Love & Be Loved Delhi Sp/Pu 015 th 14 Dec.1995 510 सत्य की पहचान चैतन्य से है Lucknow PP 052 Н 26 Mar.2001 th कलयुग में सहजयोग का महत्व Delhi 062 PP 511 th 22™ Aug.2002 You are the spirit 512 055 New York PP 513 PP Unknown Establish your Self Realization Unknown 095 E 6"Feb.2001 Italy Experiment with “Vega Machine" E Doc 086* Sahasrara Day Puja The Start of a new Era : Part I & II 5th May.1984 335 Sp/Pu 289 France 18 Sep.1982 th It is eternal life 336° 514* UK Sp Bhajan Title Artist Song List ACD ACS JAI NIRMAL |Ajit Singh 172 MAIYYA प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in करं समुद्राकडून शिका की जो सर्वात खाली राहनही सर्व गोष्टी, सर्व दं नद्याना अपल्यामध्ये सामावून घेतो. समुद्राशिवाय ही सृष्टी चाल गो शकणार नाही. जन्मदिन पूजा, दिल्ली, ३० मार्च १९९० न रन रवन ० ---------------------- 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-0.txt मराठी मे-जून २०११ प 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-1.txt क ] ईश्वरी इच्छी सर्व गोष्टींची काळजी घेते. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या अडेचणींचे कारण हे आहे की त्या अडचणी तुम्हाला देवावर सोडायच्या नाहीत. काही लोक म्हणतीत त्यांच्यात ती योग्यतीचे नाही की ते असं करू शकतील. हे फार मूर्खपणाचे विधान आहे. तुम्ही स्वतःचेच निरीक्षण करा. कबेला, इटली, १० मे १९९२ , अनुवादित 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-2.txt टी या अक परमेश्वराची इच्छाच हे सर्व कार्य करत असते .... ५. आयेक्षा हेच सर्व दःखाचे कारण आहे १६ सह २ २्वामिनी ...२२ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-4.txt ाप कबेला, इटली, १० मे १९९२, अनुवादित हे सर्व कार्य करत असते 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-5.txt जि आपण सहस्रार दिवस साजरा करीत आहोत. तो दिवस कशा प्रकारचा होऊन তगला ते कदाचित तुम्हाला कळलंही नसेल. सहस्र उघडल्याशिवाय देव, धर्म आणि त्याबद्दलचं सारं काही बोलणं ह्या दंतकथा वाटत होत्या. लोकांचा देवावर विश्वास होता पण तो फक्त विश्वासच होता आणि सायन्स-शास्त्र हे सगळ्याच मूल्यमापनाच्या पद्धती व सर्वशक्तिमान परमेश्वराचे अस्तित्व संपवणारच होते. इतिहासामध्ये असं झालं आहे की, जेव्हा जेव्हा शास्त्र प्रस्थापित झाले तेव्हा वेगवेगळ्या धर्मातील कार्ययंत्रणेचे असणाऱ्या लोकांनी प्रमुख शास्त्रातील संशोधनात सापडलेल्या गोष्टींबरोबर राहण्याचा प्रयत्न केला. ऑगस्टीनने हे बायबलमध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आणि सर्व धर्मग्रंथ काल्पनिक आणि दंतकथा आहेत असं दिसूं लागलं. आजच्या शरीरशास्त्राचे वर्णन करणाऱ्या बऱ्याच गोष्टी कुराणामध्ये होत्या. परमेश्वराने एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी मानवाची रचना केली आहे यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांना असं वाटत होतं की, प्राण्यांमध्ये उत्क्रांती होऊन तेच मानव बनले आहेत अशाप्रकारे सतत देवत्त्वाला आव्हान दिलं गेलं. बायबल कुराण, गीता, उपनिषदांमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा कोणताच पुरावा नव्हता कारण अजूनही तो फक्त विश्वासच होता. फार थोड्या लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला होता आणि जेव्हा त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांना वाटलं की ते नुसते स्वत:चे सिद्धांत पुढे करीत आहेत. त्यामुळे ते सारंच एक प्रकारचं निर्जीव शास्त्र बनलं. वाटू लागलं या दहा कमांडमेंटसचा किंवा काटेकोर नियमांचा जीवनात उपयोग करतांना काय फायदा आहे? मनुष्याने पुण्याची प्राप्ती का करायला पाहिजे ? त्यामुळे मानवाच्या लोकांना नितिमूल्यांची मोठीच घसरगुंडी झाली. कोणत्याही प्रकारचा अंकुश नसणारे संस्थापित धर्म देखील सत्ता तसेच पैसा मिळविण्याचे मार्ग स्वीकारू लागले कारण याचप्रकारे आपण लोकांवर ताबा ठेवू शकतो असे त्यांना वाटले. बायबलमध्ये लिहिलेली तत्त्वे लोकांपर्यंत पोहोचवण्याविषयी त्यांना काळजी वाटत नव्हती. खुद्द बायबलमध्येसुद्धा अनधिकृत फेरबदल करण्यात आले होते. पीटर व पॉलने त्यामधील बराच भाग बिघडवण्याचा प्रयत्न केला. कुराणाला याप्रमाणे हाताळण्यात आले नाही, पण त्यामध्ये उजव्या बाजूविषयी जास्त सांगितले होते आणि अजूनही अनेक गोष्टी बुचकळ्यात टाकणाऱ्याच आहेत. एकाच वेळी दोन गोष्टी घडल्या आहेत. पहिली गोष्ट ही की, आता आपल्याकडे मायक्रोबॉयोलॉजीच नवं शास्त्र आहे. ज्यामध्ये प्रत्येक पेशीला 'डी.एन.ए.' ची फित आहे, हे आपण शोधून काढलं आहे. प्रत्येक पेशीमध्ये कॉम्प्युटरप्रमाणे प्रोग्रॅम आहे व त्या कार्यक्रमानुसार विकास घडत जातो. कॉम्प्युटरसारख्या, ज्यामध्ये आधीच प्रोग्रॅम आहे अशा अनेक पेशी आहेत आणि शास्त्रापुढे फार ६ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-6.txt चमत्कारजनक गोष्ट आली आहे. ज्याचं स्पष्टीकरण ते देऊ शकत नाहीत. परमेश्वराची इच्छाच हे सर्व कार्य करत असते, हे सहजयोगाने सिद्ध केलं आहे. हे सर्व चैतन्य आणि आदिशक्ती ही देवाची इच्छा आहे. फार सुसंगतरीत्या परमेश्वराची इच्छा सर्व कार्य करीत आहे. एका शांत आवाजाने पृथ्वीची रचना केली गेली. ती निर्मिती सुसंगत होती. त्या परमेश्वराच्या इच्छेने जे काही घडलं, ते झालं. आता तुमच्या हाताच्या बोटांवर तुम्ही परमेश्वरी इच्छेचा अनुभव घेऊ शकता. आत्मसाक्षात्कारानंतर एकमेव सत्य अशा देवाची जी इच्छा आहे, त्या शास्त्राचा तुम्हाला शोध लागला. सहजयोगामुळे आपण लोकांना रोगमुक्त केलं आहे हे तुम्हाला माहीत आहे. आत्मसाक्षात्कारानंतर अनेक गोष्टी आपोआपच कार्यान्वित होतात, पण लोकांना त्यावर विश्वास ठेवायचा नसतो. सुरुवातीला शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या गोष्टींवरही लोक विश्वास ठेवत नव्हते, पण आता तुम्ही पहात आहात की विज्ञानामध्ये सतत बदल होत आहेत सिद्धांतांना आव्हान दिले जात आहे. विज्ञानाचे जे असे सत्य, ज्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, ते सहजयोगाने उघडकीला आणले आहे. 'परमेश्वर आहे' हे आम्ही सिद्ध करू शकतो. परमेश्वरी इच्छेनेच सर्व सृष्टीची निर्मिती सुसंगतपणे झाली आहे. जर दैवी इच्छेने सरव काही निर्माण झालं आहे, तर मानवप्राण्यांनी दैवरचित गोष्टींचा शोध लावण्याचे श्रेय स्वत: घेता कामा नये. उदा.हा गालिचा कोणीतरी तयार केला असेल आणि तुम्हाला त्याचे रंग सापडले तर त्यांत महान असं काय आहे? कारण ते सारं पहिल्यापासूनच आहे. तुम्ही काही ते निर्माण करीत नाही. दैवी इच्छेने ते निर्माण झाले आहे. जर परमेश्वराची इच्छा इतकी महत्त्वाची आहे तर ती सिद्ध केली पाहिजे. आता सहस्रार उघडल्यावर तुम्हाला ती जाणवते आहे. आपल्याकडे ती इतकी सहजगत्या आली आहे की, आपल्याला ते समजतच नाही. आपण नुसतं बंधन देतो आणि गोष्टी कार्यान्वित होतात ते त्याहनही फार जास्त आहे. आपण या मोठ्या कॉम्प्युटरचा एक भागच झालो आहोत. आपण ईश्वरी इच्छेच्या वाहिन्या झालो आहोत आणि या विश्वाची ज्याने निर्मिती केली त्या शक्तीशी आपण जोडले गेलो आहोत. त्यामुळे आपण सारं काही करू शकतो कारण पूर्ण सत्य असं शास्त्र आपल्याकडे आहे ते सर्व जगाचे कल्याण करेल. आपण शास्त्रज्ञांना सिद्ध करून दाखवू शकतो की या साऱ्या निर्मितीमागे परमेश्वराची शक्ती आहे. उत्क्रांतीची क्रियादेखील ईश्वरी इच्छा आहे. त्याच्या इच्छेशिवाय काहीही घडून आलं नसतं. आता तुम्ही पहात आहात की, परमेश्वराची ही इच्छा आम्ही आपल्या शक्तीच्या रूपात प्राप्त केली आहे. आपण तिला वापरू शकतो. तेव्हा सहजयोग असणं फार महत्त्वाचं आहे. पण, "श्री माताजी, मी आनंदी आहे किंवा मी पवित्र झालो आहे, सर्व काही उत्तम आहे," असे ७ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-7.txt म्हणण्यासाठी सहजयोग नाही. तर तो कशासाठी आहे? हे सर्व आशीर्वाद तुम्हाला का मिळाले? तुम्हाला का स्वच्छ केलं गेलं? जेणेकरून परमेश्वराची इच्छाशक्ती तुमच्यामध्ये दिसून येईल आणि तुमचा एक अविभाज्य भाग बनेल. आपण वर आलं पाहिजे. साधारण तसेच मध्यम श्रेणीच्या लोकांना सहजयोग देणं निरर्थक आहे कारण ते काही कामाचे नसतात. कोणत्याही प्रकारे ते आम्हाला मदत करू शकत नाहीत. आज अशा लोकांची गरज आहे की जे खरोखर ईश्वरी इच्छा प्रकटित करू शकतात, प्रदर्शित करू शकतात. त्यासाठी आम्हाला फार शक्तिशाली लोकांची आवश्यकता आहे. परमेश्वराच्या या इच्छेने पूर्ण विश्व संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वी माता तसेच प्रत्येक गोष्टीची निर्मिती केली. आता आपण नव्या पातळीवर आलो आहोत की परमेश्वरी इच्छेचे आपणच माध्यम आहोत. तर आता आपली कर्तव्ये काय व त्यासाठी आपण काय करायचे आहे? सहस्त्रार उघडल्याने आपली मोहजाले नष्ट झाली आहेत. देवाच्या अस्तित्वाविषयी तुमच्या मनात भ्रामक कल्पना नकोत. शक्तिशाली परमेश्वराचे अस्तित्व, त्याची शक्ती आणि सहजयोगाविषयीचे सत्य याविषयी आपल्याला काही शंका नसायला पाहिजे. ही शक्ती वापरताना तुम्हाला या गोष्टीची जाणीव पाहिजे की, तुम्ही त्या योग्य आहात म्हणून तुम्हाला ही शक्ती दिली गेली आहे. ही सर्वोच्च शक्ती आहे. कोणीही गव्हर्नर किंवा मंत्र्याचे उदाहरण घ्या. त्यांना उद्या वरच्या पदावरून काढून टाकले जाऊ शकते. ते भ्रष्ट असू शकतात, असे ही असू शकते की त्यांच्या स्वत:च्या ताकदीची त्यांना कल्पना नसते. बऱ्याच लोकांना त्यांच्या कार्याविषयी माहिती नसते तरीही ते लोकांकडून निवडून दिले जातात. सहजयोग फक्त लोकांचा धर्म बदलत नाही किंवा फक्त व्यक्तीचा स्वभावच बदलत नाही तर ही एक पुढे जाणाऱ्या नव्या लोकांची अशी नवी रचना आहे, की ज्यांच्यामध्ये परमेश्वराची इच्छा पुढे नेण्याची योग्यता आहे. आत्मसाक्षात्कारामुळे तुमच्या भ्रामक कल्पना पुसल्या गेल्या आहेत. ईश्वर सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे आणि सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे तो सर्व काही बघतो आणि त्याला सर्व काही समजते. त्या शक्तीचा एक भाग तुमच्यामध्येही आहे. सर्वत्र असणारं त्याचं अस्तित्व समजण्यासाठी तुम्ही सहजयोगी आहात हे तुमच्या सतत लक्षात असले पाहिजे. अजूनही मला भारतीय सहजयोगी त्यांची बायका- मुले, घर, कुटुंब, नोकऱ्या इ.विषयी बोलतांना आढळतात. मला प्रश्न पडतो की त्यांची पातळी काय आहे ? ते कुठे आहेत ? त्यांना दिल्या गेलेल्या जबाबदाऱ्या त्या कधी सांभाळणार? सर्वशक्तिमान परमेश्वर जो सर्वत्र आहे, ज्याने सर्व काही घडवले आहे आणि त्याची इच्छा जिने सारे कार्यान्वित केले आहे, त्याला तुमच्याद्वारा कार्य करायचे आहे. म्हणून तुम्हाला खूप शक्तिशाली, बुद्धिमान, अती प्रभावशाली बनलं पाहिजे. तुम्ही जितके जास्त प्रभावशाली व्हाल, तेवढी जास्त शक्ती तुम्हाला मिळेल. मला अजूनही असं वाटतं की सहजयोगी हे जाणण्याची जबाबदारी घेत नाहीत की त्यांना या सर्वज्ञ परमेश्वराचे प्रतिनिधी व्हायचे आहे, जो सर्व काही जाणतो, सर्व काही पहातो, जो शक्तिमान आहे, गुणकारी आहे. ८ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-9.txt तुम्हाला हे समजलं पाहिजे की सहस्रार उघडल्यावर तुमच्यामध्ये ही शक्ती आली आहे, जिच्यामध्ये हे तीनही गुण आहेत. ही महान शक्ती तुम्हाला प्राप्त झाली आहे. त्यासाठी आपल्याला मोठं नाव किंवा पैसेवाल्या, फार यशस्वी लोकांची गरज नाही. आपल्याला सुशील, जाणकार, सुज्ञ असे लोक हवे आहेत जे असे म्हणतील की 'काही झाले तरी मी हे स्वीकारेन, नेहमी याबरोबरच राहीन आणि त्याला सहयोग देईन. मी स्वत:ला बदलेन आणि सुधारेन.' तुम्हा सर्वांचे भ्रम नष्ट झाले आहेत अशी मी आशा करते. स्वत:बद्दलही तुमच्यामध्ये भ्रम नको. तुमच्यामध्ये तुमच्याविषयी काही भ्रामक कल्पना असतील तर तुम्ही सहजयोग सोडा. पण लक्षात ठेवा की ईश्वरी इच्छेने तुम्हाला या कारणासाठी वेचून घेतले आहे म्हणून तुम्ही इथे आहात आणि जर विज्ञान जे पूर्ण सत्य आहे ते जाणण्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. स्वत:साठी व इतरांसाठी ते कार्यान्वित करा. माझे प्रेम तुम्हाला जाणवले आहेच पण तुमचे प्रेम ही जाणवले पाहिजे. कारण प्रेम म्हणजेच ईश्वर आहे. इतरांना कळलं पाहिजे की, तुम्ही दयाळू, प्रेमळ व समंजस आहात. सतत तुमच्यामधून ईश्वराचे प्रेम वहात असते. तुम्हाला ते अशाप्रकारे कार्यान्वित केले पाहिजे की तुम्ही संत आहात हे लोकांना समजेल आणि ही शक्ती तुमच्यामधून वहाते आहे हे ही कळेल. दूसरी गोष्ट झाली आहे ती ही की, जगामध्ये पूर्ण एकसंघता आहे, हे तुम्हाला कळले आहे. मुलांमध्ये नैसर्गिकरीत्या याची जाण असते. सर्वसामान्यपणे चांगल्या मुलाला त्याच्या गोष्टी नेहमीच वाटून घ्यायला, दुसऱ्या मुलांवर प्रेम करायला आवडते तसेच छोट्या मुलांना संरक्षण द्यायला आवडते, हे नैसर्गिक आहे. लहान मुलं ह्याचा विचार करत नाही की समोरच्या मुलाचा रंग किंवा केसाचा रंग काळा आहे की लाल. आपल्या शरीराचे प्रदर्शन करू नये हे लहान मुलांना समजते. इतरांसमोर कपडे काढणे त्यांना आवडत नाही. त्यांच्यामध्ये हे मूळातच असते. मुलांना चोरी करायला आवडत नाही. मी मुलांना सुंदर ठिकाणी तसेच घरांमध्ये जातांना बघितले आहे, ते नेहमीच त्या ठिकाणचे सौंदर्य अबाधित राखण्याचा प्रयत्न करतात. जे देश अविकसित आहेत, त्यांच्यामध्ये असे गुण आहेत. आपल्यामध्ये अबोधितता मूळातूनच आहे. अबोधितता आणि पावित्र्य ईश्वरी इच्छेनेच निर्माण झाले आहे. पहिल्यांदा त्यांनी श्री गणेशाची निर्मिती केली. ही निर्मिती आदिशक्तीनेच केली कारण तीच परमेश्वरी इच्छा होती. सर्व जग सुरेख करण्यासाठी हे सर्व निर्माण केलं. हे सर्व मूलभूत गुणधर्म, या देवतांची तुमच्यामध्ये प्रतिष्ठापना केली गेली. हे मुद्दाम केले गेले कारण या मानव प्राण्याने संतांसारखे व्हावे आणि संतांसारखे गुणधर्म बाळगावेत. विकसित देशांमध्ये टी. व्ही व इतर गोष्टींनी आपला मेंदू प्रदूषित केला गेला आणि आपल्यामध्ये १० 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-10.txt असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आपण इतरांच्या विचारांप्रमाणे वागू लागलो. कोणतीही सशक्त व्यक्ती आपल्यावर वर्चस्व गाजवू शकत होती. फक्त हिटलरनेच नाही तर फॅशन्सनीदेखील आपल्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. फॅशन्समुळे विवेकपूर्ण गोष्टींचा लोक स्वीकार करीत नाहीत. आजकाल लहान स्कर्ट घालायची फॅशन आहे. तुम्हाला लांब स्कर्ट कुठेच मिळणार नाहीत. प्रत्येकाला तसेच घालावे लागते नाहीतर तुम्ही त्या प्रवाहात नाही असे होते. आपल्यावर यांचा सतत मारा होत असल्याने आपण या उद्योजकांचे गुलाम बनतो. मी असे ऐकले आहे की बेल्जियममध्ये कोणतीही गोष्ट ताजी मिळत नाही. तुम्हाला सर्व गोष्ट्ी सुपर मार्केटमधून बंद डब्यातून विकत घ्यावे लागते. हळूहळू आपण पूर्णपणे कृत्रिम बनत चाललो आहोत. अन्न, पोशाख, आपला दृष्टिकोन सारे कृत्रिम होत चालले आहेत. बाहेरचा प्रभाव आणि जाहिरातींचा दबाव यामध्ये आपण हरवून गेलो आहोत. या सर्व आधुनिक गोष्टींच्या प्रभावामुळे आपण आपला अंतर्भूत सद्सद्विवेक हरवून बसलो आहोत. आता सायन्सनंतर महत्त्व आले पैशाचे, आता एकदा हे झाले की सारे उद्योजक महत्त्वाचे ठरतात कारण, पैसे कसे करायचे आणि तुम्हाला सतत कसं फसवत रहायचे ते त्यांना माहीत असते. पण जे लोक आतून दृढ असतात त्यांच्यावर या गोष्टींचा प्रभाव पडत नाही. त्यांच्यावर फॅशन्सचाही परिणाम होत नाही. याउलट पारंपारिकरीत्या त्यांनी जे मिळवलं असतं त्यापासून दूर जाण्याचा त्यांना त्रास होतो. आधुनिक युगात सहजयोगामध्ये अशा प्रकारे उद्योजकांचे गुलाम तयार होत आहेत का हे बघणं महत्त्वाचे आहे. त्याचा विचारांवरही प्रभाव पडतो. फ्रॉईडसारख्या मूर्ख माणसाची बडबड असलेली कितीतरी पुस्तकं आपण वाचतो. फ्रॉईडचा पाश्चिमात्य लोकांवर इतका प्रभाव कसा पडला? कारण तुमची अंतर्यामीची संवेदना तुम्ही हरवली आणि तुम्ही त्याचा स्वीकार केला. अशाप्रकारे फ्रॉईडही लोकांसाठी येशू ख़्रिस्तासारखा बनला. लैंगिक संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण झाले. थोडंस व्यवहारज्ञान असल्यास तुम्हालाही समजू शकतं की, क्षणोक्षणी अशा व्यक्ती ज्यांच्याकडे काही विचार आहेत, कल्पना आहेत ते आपल्याला गुलामीच्या दिशेने ढकलत असतात. त्यांचे विचार महान बनतात. 'त्याने असे म्हटले,' तो कोण आहे? त्याचं आयुष्य काय आहे ? स्वत:हून बघा, तो कशाप्रकारचा माणूस आहे ? परमेश्वराची इच्छा, जिने संपूर्ण विश्वाला तसेच आपल्या प्रत्येक कणाला बनवले आहे, त्याचे तुम्ही प्रतिनिधी असूनही तुम्ही या व्यावसायिकांच्या हातातील खेळणे झालेले आहात. हे उद्योजक अशा दुबळ्या लोकांना मूर्ख बनवून पैसे उकळीत आहेत. एका बाजूला तुमच्याकडे इतक्या महान शक्ती आहेत, इतक्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला निवडलं गेलं आहे आणि दुसर्या ११ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-11.txt बाजूला तुम्ही असे गुलाम आहात. तुमचे अंतर्भूत गुण नष्ट झाले होते. ही सौभाग्याची गोष्ट आहे की कुंडलिनी जागृती व सहस्राराचे भेदन केल्यामुळे तुमच्यामधील हरवलेले गुण जागृत झाले आहेत. तुमची अबोधिता, सृजनशीलता, धर्म, करुणा, मानवतेचे प्रेम, तुमचा न्यायीपणा, सुज्ञता या सर्व गोष्टी, महान गोष्टी सुप्त अवस्थेत होत्या, त्या सर्व जागृत झाल्या. 'तुम्ही ह्या गोष्टी करा किंवा करू नका' असं मला तुम्हाला सांगावे लागत नाही. तुम्हाला स्वत:लाच कळते की हे चूक आहे. तुमच्यासाठी काय चांगले आहे, ते तुम्हालाच कळतं. जर तुम्हाला एखादी अनुचित गोष्ट करायची असेल तर तुम्ही करू शकता, परंतु तुमच्यामधील प्रकाशच तुम्हाला सांगेल की काय चांगले आणि काय वाईट. ज्ञानार्जनासाठी सहस्त्रार उघडल्यामुळेच हे घडू शकते. हे काही नवीन नाही, तुमच्यामध्ये ते आहे. आता हे सर्व अंतर्यामीचे प्रगट होत आहेत आणि तुम्ही त्याचा आनंद लुटता आहात. गुण आता तुम्हाला स्वत:च्या क्षुल्लक कल्पना, वागणं यामधून बाहेर पडले पाहिजे. सहजयोगी सगळीकडे वस्तू पसरवून टाकतात, असं मी ऐकलं आहे. तुम्ही असं कसं वागू शकता ? जीवनाविषयी योग्य ती शिस्त तुमच्यात नसेल तर ईश्वरी इच्छा तुम्ही अंमलात आणू शकणार नाही. तुमच्या स्वातंत्र्याचा मी मान राखते आणि तुमच्या स्वत:च्या कुंडलिनीमुळे ती सुज्ञता, मोठेपणा आणि प्रभाव तुमच्यामध्ये जागृत व्हावा असे मला वाटते. तेव्हा तुम्हाला आपल्या पदाचे मूल्य समजेल. अग्नीमध्ये तापून शुद्ध झालेल्या सोन्याप्रमाणे कुंडलिनीपण तुम्हाला पूर्ण शुद्ध करेल. तुमचं स्वत:चे वैभव, स्वभाव आणि महानता तुम्हाला कळून येईल. त्यामुळे तुमचे सहजपणे एकीकरण होईल. पहिल्यांदा इंग्लंड, स्पेन, इटलीमध्ये सहजयोगी नेहमी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये बसायचे. ते कधीही एकत्र बसत नव्हते. पण आता तसं नाही. मला वाटते आता ते सर्व एकत्र झाले आहेत. माणसांनी संघटित होणं ही सहजयोगासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. ते बुद्धीमुळे होत नाही तर सर्व मानवजात परमेश्वराने निर्माण केली आहे, कशाचाही तिरस्कार करायला नको या जाणिवेतून होत आहे. तुमच्यामध्ये होणारी दुसरी गोष्ट म्हणजे सर्व धर्म अध्यात्माच्या एकाच झाडावर निर्माण झाले आहेत, सर्व धर्माची उपासना केली पाहिजे हे तुम्हाला समजते. सर्व अवतार, संत आणि धर्मग्रंथांची पूजा केली पाहिजे. ज्या धर्मग्रंथांमध्ये काही अडचणी किंवा कमतरता असतील त्या सुधारल्या पाहिजेत. हळूहळू जेव्हा तुम्ही दैवत्त्वाच्या सूक्ष्मतर बाजूकडे जाल तेव्हा कळेल की या सर्व लोकांनी सहजयोगाचे वातावरण निर्माण करायला किती त्रास घेतले आहेत. कोणताही धर्म तूच्छ लेखायला नको किंवा त्यावर हल्ला करायला नको. अशा तऱ्हेने आपण मूलतत्त्ववाद संपवून टाकू, सहजयोगातही लोकांनी मूलगामी होता कामा नये. खूप लक्षपूर्वक रहा. कधी कधी तुम्ही सहजयोगाला मूलगामी करू लागता. 'श्री माताजींनी असं सांगितलं' असं म्हणून तुम्ही दुसर्यांवर प्रभुत्व गाजवायला बघता. मला कुठेही वापरू नका. तुम्ही स्वत: म्हणा कारण, आता तुम्हाला तो हक्क आहे. सहजयोगामध्ये तुमचे असे एक व्यक्तिमत्त्व आहे. मला १२ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-12.txt वाटेल तसे वापरण्याचा कोणाला अधिकार नाही. जे काही तुम्हाला म्हणावयाचे असेल ते तुम्ही स्वत: म्हणा. मी जे काही म्हणते त्याला तुम्ही बांधलेले नाही. तुम्हाला स्वत:ला उभं राहन काय म्हणायचे आहे, ते तुम्ही स्वत: पहायला पाहिजे. आता तुम्हाला तुमची इच्छा वापरली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला स्वत:ला विकसित केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला शुद्ध इच्छा पाहिजे. सर्वशक्तिमान परमेश्वराची शुद्ध इच्छा. एकीकरण फक्त बाह्यात नाही तर आंतरिक ही असावे. याआधी आपण जे काही करत होतो त्यात आपलं मन एक सांगायचे, हृदय दुसरेच काही आणि आपला मेंदू तिसरीच गोष्ट सांगायचा. आता या तिन्ही गोष्टी एक झाल्या आहेत. आता तुमचा मेंदू जे काही म्हणतो, ते करण्याची तुमच्या हृदयाची आणि चित्ताची पूर्णपणे तयारी असते. तुमच्या स्वत:मध्येच अखंडत्व आलं आहे. खूप लोक म्हणतात, 'मला ते करायची इच्छा आहे पण मी ते करू शकत नाही.' आता तसं नाही, कारण तुम्ही पूर्णपणे एकसंध आहात. तुम्ही स्वत:चे निरीक्षण करून बघा की तुमचे एकीकरण झाले आहे की नाही. हे पाहिलं पाहिजे की 'मी जे काही करतो आहे, ते पूर्ण हृदय ओतून, पूर्ण चित्त त्यात घालून करतो आहे का?' मला असे आढळून आले आहे की तुम्ही पूर्ण हृदयातून कार्य करता परंतु तुमचे चित्त पूर्णपणे तिथे नसते. पहिली आलोकित झालेली गोष्ट म्हणजे चित्त, हे पूर्णपणे वापरले जात नाही किंवा एकत्रीकरण अपूर्ण आहे. सर्व चक्रांमध्येही एकसंधपणा येतो. जे काही तुम्ही करता ते पूर्ण चित्ताने आणि मंगल असलं पाहिजे. ते धार्मिक असलं पाहिजे. ही सर्व चक्र म्हणजे एक पूर्ण, एकसंध अशी शक्ती आहे, जी तुम्ही आहात. पूर्ण जीवन एकसंध झाले पाहिजे. जर कोणाची पत्नी वा पती त्या पातळीचे नसतील तर तुम्ही काळजी करता कामा नये. तुम्ही फक्त स्वत:ची काळजी घ्या. इतरांपासून कसलीही अपेक्षा करू नका. तुमचं कर्तव्य हे महत्त्वाचे आहे. तुमचं कर्तव्य पार पाडा. तुम्हाला स्वत:लाच ते कार्यान्वित करावे लागेल. तुम्ही वैयक्तिकरीत्या ते मिळवलं आहे. वैयक्तिकरीत्या ते कार्यान्वित करायचं आहे. इतरांबरोबर एकत्रित व्हायचं आहे. तुम्हाला काय मिळालं आहे ते तुम्ही पाहिलं पाहिजे. 'मला आर्थिक, शारीरिक, मानसिक फायदा झाला. मला प्रसन्नता व आनंद मिळाला आहे.' फक्त इतकेच नाही. हे एकच मोजमाप नसावे. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची जाण असली पाहिजे. अनेक जन्मांनंतर, या जन्मात आत्मसाक्षात्कार मिळवून, परमेश्वरी इच्छेचे पुढचे कार्य करण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्त्व तयार केलं गेलं आहे. प्रत्येक क्षणाला जेव्हा तुम्ही चमत्कार घडताना पहाता तेव्हा हे परमचैतन्याने केलं आहे हे तुम्हाला जाणवतं आहे. परमचैतन्य ही आदिशक्तीची इच्छा आहे व आदिशक्ती ही परमेश्वराची इच्छा आहे. ही व्हायब्रेशन्स ही डी . एन.ए. सारखी आहेत. कशाप्रकारे कार्य करायचे हे ते जाणतात. जसं आज खूपच ऊन पडलेले आहे. सर्व त्रस्त आहेत. पण दोन दिवसांपूर्वी आम्ही हवन केलं आणि खूप ऊन पडले. १३ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-13.txt सर्व आसमंत तुमच्यासाठी कार्य करीत आहे. आता व्यासपीठावर तुम्ही आहात आणि त्याकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. तुमचा स्वत:वर विश्वास नसेल तर तुम्ही कशी मदत करणार? तुम्ही स्वत:ला कशाप्रकारे कार्यान्वित कराल? आणि माणसाने निर्माण केलेले प्रश्न तुम्ही कसे सोडविणार? आपल्यावरची गुलामी आपल्याला फेकून द्यायची आहे. पहिलं म्हणजे सायन्सने आपण सारे काही सिद्ध करू शकतो. 'धर्म' म्हणून म्हणतात हे आपण सिद्ध करून दाखवू शकतो. आपण हिंदू, मुसलमान, कॅथलिक, प्रोटेस्टंट आहोत हे विचार फेकून दिले पाहिजे. आपल्याला नवे व्यक्तिमत्त्व बनले पाहिजे. आत्मसाक्षात्कारानंतर चिखलातून उगवलेल्या कमळासारखे तुम्ही बनता. तुम्ही आता कमळ झालेले आहात. हा चैतन्यहीन चिखल काढून टाकला पाहिजे नाहीतर, त्याचे शिंतोडे राहतील. निरर्थक बंधन तोडा. सर्व रचना इतक्या काळजीपूर्वक, प्रेमाने व नाजूकपणे केली गेली आहे. तेव्हा आपण स्वत:चा आदर राखला पाहिजे. इतरांसाठी आपल्यामध्ये प्रेम, ममता हवी आणि सव्वात जास्त शिस्त हवी. आता माझ्या जीवनाबद्दल तुम्हाला माहीत आहे की, मी खूप प्रवास करते आणि खूप परिश्रम घेते, तुम्हा सर्वांपेक्षा जास्त! त्याचं कारण माझी इच्छा आहे की या जगाला मजेच्या, आनंदाच्या, देवतत्त्वाच्या त्या पातळीवर न्यायचं आहे जिथे मनुष्याला समजेल की त्याचे ध्येय काय आहे आणि त्यांच्या पित्याचं वैभव काय आहे ते . मी कधी असा विचार करीत नाही की मला खूप त्रास होईल किंवा माझे काय होईल. माझ्या कौटुंबिक जीवनाबद्दल मी कधी तुम्हाला त्रास दिला नाही, माझी मुलं किंवा इतर कोणाबाबतही. जे व्यक्तिगत प्रश्न, अडचणी आहेत त्या मी स्वत:च सोडवते. परंतु सहजयोगी मला त्यांच्या कौटुंबिक अडचणींविषयी लांबलचक पत्रं लिहितात. कुटुंबाविषयी गुंतवणूक. तुमच्या डोक्यावर मोठं ओझच आहे. परिवार तुमची जबाबदारी नाही. ती सर्वशक्तिमान परमेश्वराची जबाबदारी आहे. त्याच्यापेक्षा जास्त चांगले तुम्ही करू शकता? जेव्हा तुम्ही काळजी घ्यायला जाता तेव्हा प्रश्न उभे रहातात. आपण अलिप्तता शिकली पाहिजे. तुम्ही तुमच्या गोष्टींना, कुटुंबाला, मुलांना चिटकूनच राहता. मोहमयी लोकांना संत कसे म्हणणार? संत लोक फक्त स्वत:विषयी जबाबदार नसतात, तर ते इतरांबद्दलही असतात. सहजयोगामध्ये येण्याआधी तुम्ही आत्मकेंद्रित होता. कोणाला चिकटलेले नव्हता. आता तुम्ही थोडे विस्तृत झाले आहांत, स्वत:च्या बायकामुलांना चिकटला आहात, असे करणेदेखील स्वार्थ आहे. ती तुमची मुलं नाहीत, तर ती परमेश्वराची आहेत. सहस्त्रार उघडलं, ही फार महत्त्वाची गोष्ट झाली आहे. आता तुम्ही संपूर्ण जगासमोर देवाचं अस्तित्व, त्याची इच्छा सर्व काही सिद्ध करू शकता. सहजयोगाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. जे आव्हान देतात त्यांना समजवता येते. तुम्ही मात्र सहजयोगाकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. तुम्ही लोक १४ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-14.txt ध्यानदेखील करत नाही. ध्यानाशिवाय तुमचा विकास कसा होणार? जोपर्यंत निर्विचारीतेत जात नाही तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकत नाही. कमीतकमी सकाळी आणि संध्याकाळी ध्यान केलं पाहिजे. काही लोक मूळत:च सामूहिक नाही. त्यांना आश्रमाचे जीवन आवडत नाही. अशा लोकांनी सहजयोगाबाहेर गेले पाहिजे. सामूहिकतेशिवाय तुम्ही कसे काय वाढणार? आणि तुमची शक्ती कशी एकत्र करणार? एकत्र राहिलात तर तुम्ही शक्तिमान व्हाल. एक काठी मोडू शकतो, पण काठ्यांची मोळी तोडणं कठीण असतं. हजार निरुपयोगी लोक असण्यापेक्षा दहा चांगल्या गुणवत्तेचे लोक असलेले बरे. आज आपल्याला शपथ घेतली पाहिजे की 'परमेश्वरी इच्छेनुसार माझे आयुष्य मी घडवेन. त्यासाठी मी आत्मसमर्पण करेन. कुटुंब वगैरे इतर काही लक्षात घेणार नाही.' ईश्वरी इच्छा सर्व गोष्टींची काळजी घेते. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या अडचणींचे कारण हे आहे की त्या अडचणी तुम्हाला देवावर सोडायच्या नाहीत. काही लोक म्हणतात त्यांच्यात ती योग्यताच नाही की ते असं करू शकतील. हे फार मूर्खपणाचे विधान आहे. तुम्ही स्वत:चेच निरीक्षण करा. आपण अशी गोष्ट का म्हणतो? कदाचित तुमचं लक्ष पैशाकडे असेल. सहजयोगात काही लोक धंद्याबाबत बोलतात किंवा भौतिक गोष्टींचा मोह असतो. दूसरी गोष्ट म्हणजे ममत्त्व असू शकतं- माझं कुटुंब, मुलं वगैरे. तिसरी गोष्ट तुम्ही अजून तुमच्या जुन्या सवयींना चिकटून असता आणि सद्गुणांशिवाय असलेले तुमचे जीवन तुम्हाला आवडतं. तुमच्यामध्ये सर्व काही करण्याची क्षमता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, ईश्वरी इच्छेचे योग्य करुणामय शक्तिशाली माध्यम तुम्ही बनलं पाहिजे. माझी पूजा तुम्ही व्यवस्थित करता कारण, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो. मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी वर वर वाढलं पाहिजे. वर जाण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा केली पाहिजे. मला खात्री आहे की एके दिवशी हे पूर्णत्वात असलेले विज्ञान इतर विज्ञानाला मागे टाकील, आणि लोकांना ते काय आहे, ते सांगू शकेल. ते तुमच्या हातात आहे. देवाच्या पुराव्याविषयीची नवी पातळी आज आपण पूर्णपणे उघडली आहे. तो दिवस आज आपण साजरा करीत आहोत. त्यांच्याकडे असलेला सर्व भ्रम आपण संपवू शकू हे किती महत्त्वाचं आहे. तुम्हा सर्वांकडे असलेली ती शक्ती आपण वापरू शकू. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. १५ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-15.txt अपेक्षा हेच सर्व दःखाचे कारण आहे 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-16.txt शुडी कँप, इंग्लंड, ३१ मे १९९२, अनुवाद (इंग्लिश) स र्व धर्म कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या धर्मांधळेपणात विलीन झाले आहेत कारण कोणालाही आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे सर्वांनी आपापल्या पद्धतीने धर्माची स्थापना केली. ताओ, झेन हे त्याचेच एक भाग आहेत. जीवनापलीकडे काहीतरी प्रत्येकाने शोधलं पाहिजे असं बुद्धांना वाटलं. ते राजपुत्र होते. त्यांना सुरेख पत्नी होती, पुत्र होता. अर्थातच त्या परिस्थितीमध्ये असलेला कोणीही संतुष्ट असतो. एके दिवशी त्यांनी रुग्ण, एक भिकारी व एक मृत व्यक्ती पाहिली. हे दुःख कसं आलं, हे त्यांना कळेना. या दुःखाची गरज काय आहे? त्यामुळे त्यांचे कुटुंब, ऐषआराम यांचा त्याग करून ते सत्याच्या शोधात बाहेर पडले. जसे तुमच्यापैकी काही जण आहेत. सत्य शोधतांना त्यांनी सर्व उपनिषदं, पुस्तकं पालथी घातली, पण त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांनी अन्नत्याग केला. सर्व गोष्टींचा त्याग करून जेंव्हा ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसले होते तेव्हा आदिशक्तीने त्यांना आत्मसाक्षात्कार दिला. याचं कारण, विराटामध्ये विशिष्ट स्थान मिळविण्यासाठी योजून ठेवलेल्यांपैकी हे एक होते. त्यांनी ते साध्य केले. त्यांच्या जीवनामधून आपण पहायचं आहे ते हे की अपेक्षा हेच सर्व दुःखाचे कारण आहे. शुद्ध इच्छा काय, ते त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे, स्वत:च्या कुंडलिनीचे जागरण करून लोकांनी आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे, हे ते त्यांना सांगू शकले नाहीत. त्यांनी संन्यस्त जीवन व्यतीत केल्याने बुद्धांसाठी तो नियमच बनला. अनवाणी चालणारे कमीतकमी हजार लोक त्यांच्याबरोबर असायचे आणि खाण्याची, राहण्याची काहीही व्यवस्था नसे. त्यांना केसांचे वपन करावे लागत असे. थंडी असो वा ऊन फक्त एकच वस्त्र ओढावे लागे. गाणं म्हणणं, नाचणं अथवा कोणत्याही पद्धतीने स्वत:चे मनोरंजन करणे याची त्यांना परवानगी नव्हती. ज्या गावी जात, तिथून जे अन्न गोळा करीत, भिक्षा म्हणून जे मिळेल ते आपल्या गुरूला अर्पण करून, नंतर ते त्याचे भक्षण करीत. तळपत्या उन्हात, पावसांत, चिखलात ते अनवाणी जात. सर्व कौटुंबिक संबंध त्यांनी तोडले होते. जरी पती-पत्नींनी संघात प्रवेश केला, तरी त्यांना पती-पत्नीसारखे वागता येत नसे. सर्व शारीरिक, मानसिक, भावनिक इच्छांचा त्याग करावा लागे. बौद्ध भिक्षूंना पाहिल्यास ते हे सारं करतात. जरी ते राजा असले, तरी देखील. त्यापैकी एक राजा अशोक होता. पूर्णपणे सन्यस्त जीवन व्यतीत करण्याचा त्याने प्रयत्न केला. ते फार कठोर जीवन होतं आणि तसं केल्याने त्यांना स्वत:चा आत्मसाक्षात्कार मिळेल असं त्यांना वाटलं. त्यांच्या दोन शिष्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला, पण पूर्ण आयुष्य शुष्क, कठोर, नीरस होतं, त्यांत काही मौज नव्हती. कौटुंबिक जीवनाची परवानगी नव्हती. तो संघ होता पण जास्त बोलण्याला परवानगी नसल्याने त्या सामूहिकतेमध्ये काही तारतम्य नव्हते. ते फक्त ध्यानधारणा आणि उच्च प्रतीचे जीवन मिळण्याविषयी बोलू शकत होते. ती कल्पना अनेक धर्मात चालू राहिली. त्यानंतर त्यागाच्या नावाखाली गृहस्थाश्रमातील लोकांकडून धन गोळा करण्यास सुरुवात झाली. १७ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-17.txt बुद्धांच्या काळातही साधकांना सर्व गोष्टींचा त्याग करावा लागत होता. परंतु बुद्धांचा हा सर्व प्रयत्न त्यांना मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी होता. तसेच त्यांना पूर्ण सत्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न होता. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे महात्मा बुद्धांचे शिष्य विविध प्रकारचे हास्यास्पद धर्म स्थापन करते झाले. उदा.जपानमध्ये कोणत्याही प्राण्याची हत्या करू देत नव्हते परंतु मांस 15 खाण्यावर बंधन नव्हते. मानवाला ते मारू शकत होते. मनुष्याचा वध करण्यात जपानी निष्णात झाले. लोक विविध प्रकारची कारणेच शोधतात. जेव्हा लाओत्सेने ताओ विषयी उपदेश दिले तेव्हा दुसर्या प्रकारच्या बुद्ध धर्माचा उदय झाला. 'ताओ' ही कुंडलिनी आहे. तो काय म्हणतो हे लोकांना समजलेच नाही. कठोरपणापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. तरीही ते गहनतेत जाऊ शकले नाही. यंगत्से नावाची नदी आहे, तिथे सुंदर पर्वत तसेच झर्यांमुळे प्रत्येक पाच मिनिटाला दृश्य बदलत असते. असे सांगितले गेले आहे की बाह्य सृष्टीतील आकर्षणांकडे तुमच चित्त जाऊ देऊ नये. त्या दृष्याकडे बघून तिथून निघून जायचे. ताओच्या बाबतीतही असेच आहे. ते कलेकडे वळले. मूळात बुद्धांनी कलेचा कधी विचार केला नव्हता. त्यांनी सांगितले की आत्मपरीक्षणाद्वारे आपल्या अंतरंगात गहनतेत जाऊन तुम्हाला पूर्ण सत्य शोधायचे आहे. शेवटी सर्व काही मार्गापासून परावृत्त झाले. जपानमध्ये सुरू झालेली झेन प्रणालीही कुंडलिनीमिश्रित आहे. या प्रणालीमध्ये चक्रांवर तसेच माकडहाडावर मारून कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न केला जात होता. कुंडलिनीचे उत्थान करण्याच्या अत्यंत कडक पद्धती झेन प्रणालीने विकसित केल्या आणि ते इतक्या टोकापर्यंत नेले की, मज्जारज्जू मोडलेले अनेक लोक मला भेटले. मी विदीत्म या झेन प्रणालीच्या प्रमुखाला भेटले. तो खूप आजारी होता व त्याला रोगमुक्त करण्यासाठी मला बोलावले गेले. मला असे आढळले की तो आत्मसाक्षात्कारी नव्हता आणि त्याला कुंडलिनीविषयी काहीही माहीत नव्हते. मी त्याला विचारले, 'झेन म्हणजे काय?' त्याचा अर्थ आहे ध्यान. झेन विषयी त्याचा इतका गोंधळ होता. कित्येक शतकांत त्यांच्याकडे कोणी साक्षात्कारी व्यक्ती झाली नाही. तुम्ही कल्पना करा किती सहजपणे, कोणत्याही बलिदान, तपस्या व त्यागाशिवाय तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे. बुद्ध, येशू ख्रिस्त आणि महावीर आज्ञा चक्रावर विराजमान आहेत. आज्ञा चक्रावर तप आहे. 'तप' चा अर्थ तपस्या. सहजयोगात तपस्येचा अर्थ आहे ध्यानधारणा. ध्यान करण्यासाठी १८ आत्मपीक्षणाद्वारे 8पल्या अतराल गहनतेत जाऊन तुम्हाला पूर्ण सत्य शोधायचे आहे. 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-18.txt कधी उठायचे हे तुम्हाला माहिती पाहिजे. सहजयोग्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टी आपोआपच कार्यान्वित होतील. गहनतेत जाण्यासाठी तुम्हाला ध्यान केलं पाहिजे. तुम्हाला वपन करायचे नाही, अनवाणी चालायचे नाही, उपवास करायचे नाही आणि ना ही कौटुंबिक जीवनाचा त्याग करायचा आहे. तुम्ही नाचू, गाऊ आणि मनोरंजन करू शकता. बुद्धचा अर्थ बोध. म्हणजेच आपल्या मध्य नाडी तंत्रावर सत्याविषयी जाणणे. आता तुम्ही सर्वजण कशाचाही त्याग न करता बुद्ध झाले आहांत कारण त्यांनी ज्याचा त्याग केला, ते निरर्थकच होतं. ती एक दंतकथा होती. तुम्ही गाणं ऐकलं, नाच केला, तर काय बिघडलं? काहीच बिघडत नाही. पण या कल्पना या लोकांमध्ये इतक्या रुजून बसल्या आहेत की, त्यांच्याबद्दल तुम्हाला खरोखर दया आणि कळकळ वाटते. ते अन्न खात नाहीत, उपवास करतात. टी. बी.च्या रुग्णांहून खराब दिसतात. याउलट, तुम्ही आपले जीवन सौंदर्यपूर्णरीतीने व्यतीत करीत आहात तसेच तुम्ही गुलाबासारखे दिसता. पण तरीही ते बुद्धांचे तत्त्व आपल्यामध्ये असायला पाहिजे म्हणजेच आपल्याला तप केले पाहिजे. त्याचा अर्थ तुम्ही स्वत:ला उपाशी ठेवा असं नव्हे. पण तुम्हाला भरपूर खाण्याची आवड असेल, तर थोडं कमी खा. मोक्ष, जागृती तसेच उत्थानासाठी बनवलेल्या संगीताचा आनंद घ्या. आपण इतके बंधनात अडकून गेलेलो आहोत की लोकांना आत्मा म्हणजे काय हे ही माहीत नाही. परमेश्वराच्या असीम प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजेच आत्मा आहे. आतासुद्धा आपल्यामध्ये बऱ्याच प्रकारची बंधने कार्य करीत आहेत. आपल्यापैकी काहींना आपल्या राष्ट्रीयतेचा खूप गर्व आहे. आम्ही इतरांबरोबर मिळूनमिसळून राहू शकत नाही. इतरांपेक्षा आपण खूप उच्च प्रतीचे आहोत असा काहींचा समज असतो. तुम्ही आता सर्वव्यापक व्यक्ती आहात. म्हणून तुमच्यामध्ये अशाप्रकारच्या मूर्खतापूर्ण खोट्या सीमारेषा कशा असू शकतात ! तुमच्या आतंच प्रकाश आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हा प्रकाश बाहेर पसरवायचा आहे. जर तुम्ही हा प्रकाश पसरविण्यास असमर्थ असाल तर तुम्हाला अजून शक्ती मिळविण्याची आवश्यकता आहे असे समजा. तुमची कुंडलिनी कशी वर चढवायची आणि दैवी शक्तीशी सतत संबंध कसा साधायचा ते तुम्ही शिकलं पाहिजे. जेणेकरून निर्विचार समाधीत राहून तुम्ही तुमच्यामध्येच गहनतेत वाढा. मला सहजयोग्यांमध्ये 'मी, माझंे' अशाप्रकारची शक्तिशाली बंधनं अजूनही आढळतात. पूर्वी पाश्चात्य लोक त्यांची कुटुंब, बायका- मुलं याविषयी काही काळजी करत नसत. परंतु मला असं वाटतं की ते आता एखाद्या डिंकासारखे त्यांना चिकटून असतात. नवरा, मुलं आणि घर फार महत्त्वाचे होतात. मुलं सामूहिक आहेत. तुम्ही असा विचार करू नका की हा तुमचा मुलगा आहे. असा विचार करून तुम्ही स्वत:ला मर्यादित करीत आहात आणि अडचणीत पडता. प्रत्येक देशाच्या अडचणी कमी होत आहेत. आम्हाला जातीयता आवडत नाही. भारतीय सहजयोग्यांना जाती-पाती नष्ट व्हाव्या असच वाटतं. कारण ह्या प्रथा स्वत:चा विनाश करणाऱ्या आहेत. म्हणूनच आपण बघू लागतो की माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, देशासाठी तसेच संपूर्ण विश्वासाठी विनाशक काय आहे. तुमच्या सुरचित जीवनाच्या एकदम विरुद्ध अशा प्रकारची वाईट कृत्ये तुम्हाला समजतात १९ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-19.txt आणि तुम्ही ती थांबवू शकता. हे फक्त तेव्हाच शक्य आहे, जेव्हां तुम्ही आत्मपरीक्षण करता. तसेच पूर्णपणे समर्पित करण्याचा प्रयत्न करून पाहिले 16 पाहिजे की तुमच्यामध्ये ते गुण आहेत का? आता कुंडलिनीने तुमच्यामधील सर्व चांगल्या गुणांना जागृत केले आहे. या सर्व गुणवत्ता तुमच्यामध्ये जशाच्या तशा होत्या. जेव्हा कुंडलिनी वर उठू लागली त्यावेळी या सर्व सुरेख गुणवत्ता तिने जागृत केल्या. सहजयोग इतकी मौल्यवान गोष्ट आहे की मनुष्याला फार पूर्वीच याची माहिती व्हायला पाहिजे होती. हे फक्त परमेश्वराविषयी बोलणं किंवा तुमच्या आत देवत्व आहे असं म्हणणं नव्हे. हा तर त्याचा प्रभावीपणा आहे. तुम्हाला कोणत्याही विज्ञानाची आवश्यकता नाही. काही अडचण असली तर बंधनं द्या इतकं ते सोपं आहे. विज्ञानाने तुम्ही जे काही करता, ते सारं तुम्ही सहजयोगाने करू টি 16. शकता. आपण कॉम्प्युटरसुद्धा आहोत. फक्त आपल्याला आपली गहनता विकसित केली पाहिजे. आता तुम्ही योग्य रेषेवर आहांत. हे आधुनिक विज्ञान, जे आपला विनाश करू शकतं, त्याची आपल्याला गरज नाही. स्वाभिमान तुम्हाला पाहिजे आणि तुम्ही सहजयोगी आहांत हे जाणून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला ती स्थिती प्राप्त करून घेतली पाहिजे. विज्ञान जे काही करू शकते ते तुम्ही पूर्णपणे करू शकाल. सर्व शक्त्यांचे तुम्ही मूर्त स्वरूप बनता. काही लोक येऊन मला सांगतात, 'माताजी, आम्ही आमचं हृदय उघड़ू शकत नाही.' तुम्हाला करुणा येत नाही कां? कुत्र्यामांजरासाठी लोकांची हृदयं उघडलेली मी पाहिली आहेत पण मुलांसाठी नाही. हेच ते स्थान आहे जिथे आत्म्याचं अस्तित्व आहे आणि जिथून ती आपला प्रकाश पसरवते. हे तेच पहिले स्थळ आहे जिथे प्रेमाने परिपूर्ण व्यक्तीचा प्रकाश तुम्ही बघू शकता. असेही असू शकते की तुमच्यामध्ये फक्त अहंकार आहे पण आत्मसन्मान नाही आणि त्यामुळेच तुम्ही तुमचे हृदय उघडू চি 16 शकत नाही. श्री अहंकाराचा नाश करणारे आहेत. आपल्या अहंकारावर त्यांचे नियंत्रण असते आणि आपल्या उजव्या बाजूची पूर्तता ते करतात. उजव्या बुद्ध তি बाजूकडे झुकलेली व्यक्ती कधीही हसत नाही किंवा स्मितहास्य ही करीत नाही. परंतु बुद्धाला जाड आणि हसणारा दाखवला आहे. केवळ हसण्यामुळेच ते उजवी बाजू सांभाळून घेतात. ते आपली थट्टा करून सर्व नाटक बघतात. तुमच्या प्रकाशित चेतनेने सगळा मूर्खपणा बघा तसेच त्याचा आनंद घ्या. उदा.एलिझाबेथ टेलरला लग्न करून मधुचंद्रासाठी जातांना बघून अशा व्यक्तींवर मोहीत होण्यापेक्षा त्यांची मूर्खता बघा. वस्तूंविषयी तुमची प्रतिक्रिया तुमच्या चित्ताच्या अवस्थेवर २० तुम्ही सहजयोी आहात हे जाणून घेतते पाहिजे आणि लुम्हाला ती स्थिती प्राप्त करून घेतली पाहिजे. विज्ञान जे काी कू शकले ते तुम्ही पूर्णपणे करू आका. 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-20.txt अवलंबून असते. जर ही काही दैवी वस्तू असेल तर तुमचे चित्त भावविभोर व्हायला पाहिजे. परंतु जर काही मूर्खपणा किंवा हास्यास्पद गोष्टी असतील तर तुम्ही त्याचे तत्त्व बघू शकता. तुमच्या चित्ताद्वारे सत्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे तत्त्व बघू शकता. सत्याची तुलना करतांना हे मूर्खासारखे, खोटे किंवा भोंदुगिरी असू शकते. परंतु जर तुम्ही सहजयोगी आहात तर तुम्हाला या गोष्टी बघून त्याचा आनंद घेण्याची योग्यता असली पाहिजे. विशिष्ट वयापर्यंत मुलं असे करतात. तुमची प्रतिक्रिया तुमच्या प्रकाशित चित्तावर अवलंबून असते. प्रकाशित चित्त कोणत्याही मूर्ख, भ्रामक तसेच नकारात्मक चित्तापेक्षा वेगळी प्रतिक्रिया देते. आपण जे आहोत त्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि आपण आत्मा आहोत. श्री बुद्धांनी सांगितलेल्या तीन गोष्टी तुम्ही सर्वांनी रोज सकाळी म्हणायला पाहिजेत. पहिली म्हणजे, 'बुद्धं शरणं गच्छामि' म्हणजे प्रकाशित चित्ताला मी शरण जातो. नंतर त्यांनी सांगितले, 'धम्मं शरणं गच्छामि' म्हणजेच मी माझ्या धर्माला शरण जातो. हा काही विकृत झालेला खोटा धर्म नव्हे. याचा अर्थ असा आहे की मी स्वत:ला माझ्यामधे असणाऱ्या धर्मपरायणतेप्रती समर्पित करतो. त्यांनी सांगितलेली तिसरी गोष्ट म्हणजे, 'संघं शरणं गच्छामि' मी स्वत:ला सामूहिकतेप्रती समर्पित करतो. सहली वरगैरेच्या कारणांमुळे महिन्यांतून कमीत कमी एकदा तरी तुम्ही भेटायला पाहिजे. तुम्ही अखंडत्वाचे एक अविभाज्य भाग आहांत. लहान ब्रह्मांड हे विशाल झाले आहे. तुम्ही विराटाचे जाणीव असली पाहिजे. अशाप्रकारे गोष्टी फार लवकर अंग-प्रत्यंग आहात आणि त्याची तुम्हाला कार्यान्वित होतात तसेच आपण नकारात्मक, सकारात्मक अहंकारी तसेच नम्र व्यक्तींना ओळखू शकतो. आपण सहजयोग्यांना तसेच सहजयोगी म्हणवणाऱ्यांना ओळखू शकतो. दांभिक लोकांचा आपण त्याग करतो. सामूहिक झाल्याशिवाय तुम्हाला त्याचे महत्त्व कधीही कळणार नाही. समूहामुळे तुम्हाला इतकी शक्ती, समाधान आणि आनंद प्राप्त होतो की प्रत्येक सहजयोग्याला सामूहिकतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. कोणत्याही गोष्टींची कमतरता असली तरीही तुम्ही सामूहिक व्हा. समूहामध्ये तुम्ही कोणाच्याही चुका काढू नका, शिव्या देऊ नका आणि इतरांचे दोष बघू नका. आत्मपरीक्षण करा की जर सर्व लोक आनंद घेतात तर मीच असे बसून दुसऱ्यांचे दोष का शोधू. तुम्ही इतरांचे दोष बघत बसण्यापेक्षा जर आपलेच दोष शोधण्याकडे लक्ष द्याल तर मला विश्वास आहे की तुम्ही जास्त सामूहिक व्हाल. सहजयोग हा पूर्ण सत्य असल्यामुळे जास्त व्यवहारी आहे. त्यामुळे या सर्व शक्त्या, जाण आणि करुणामय प्रेम यामुळे तुम्हाला स्वत:बद्दल खात्री असली पाहिजे आणि तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे की नेहमीच परमेश्वराची सर्वव्यापक शक्ती तुमची प्रगती होण्यामध्ये तुम्हाला मदत, रक्षण, मार्गदर्शन, पोषण तसेच काळजी घेत असते. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. २१ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-21.txt मिनी सहर्सीर स्वीा सहस्रार हे सर्वशक्तिशाली चक्र आहे कारण हे फक्त सात चक्रांचेच नाही तर इतरही परंतु सर्वसाधारणपणे महामायेच्या माध्यमातूनच सर्व गोष्टी कार्यान्वित होत असतात आणि असेच व्हायला पाहिजे. बऱ्याच चक्रांचे पीठ आहे. सहस्रारावर तुम्ही काहीही करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता की, 'श्रीमाताजी, हे वातावरण पर्यावरणाच्या समस्यांनी भरलेले आहे, तुम्ही ते शुद्ध का नाही करत ?' जरी वातावरण शुद्ध झाले तरी लोक समस्या निर्माणच करत राहतील. ही मानव निर्मित समस्या आहे आणि जर मी ती ठीक केली तर ते त्यांचा अधिकारच आहे असे समजतील. त्यांना ह्या समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि आपल्या सवयी बदलाव्या लागतील. त्यांना समजले पाहिजे की ते स्वत:च स्वत:चा विनाश करीत आहेत, जर दूसरी कोणी व्यक्ती शुद्धीकरणासाठी असेल तर ते कधीच परिवर्तित होणार नाहीत. सोडवल्यावरही माझे कार्य संपत नाही आणि माझे फक्त हेच एक लक्ष्य नाही. माझे ध्येय तर त्यांना सक्षम बनवण्याचे आहे, जेणेकरून ते स्वत:च त्यांच्या समस्या सोडवू शकतील. तुम्हाला तुमचे त्यांच्या समस्या डॉक्टर अथवा आपले गुरू बनायचे आहे परंतु महामायेशिवाय तुम्ही असे करू शकत नाही कारण तिलाच माहिती आहे की स्वतंत्र मानवाच्या शुद्धीकरण आणि नियंत्रणात कुठपर्यंत जायचे आहे. अशा प्रकारचे मूर्खतापूर्ण स्वातंत्र्य सहजयोग्यांचे नसते. त्यांना तर आत्म्याचे स्वातंत्रय प्राप्त झाले आहे, म्हणूनच त्यांचे प्रश्न सोडवणे बिलकुल उचित आहे की जेणेकरून ते पुर्ण स्वतंत्र होतील. जे लोक काहीही विचार न करता संपूर्ण विश्वाला नुकसान पोहोचवत आहेत त्यांना स्वतंत्र करण्यात काय फायदा? त्यांच्यासाठी आवश्यक आहे की त्यांनी सहजयोगात यावे, यासाठीच हा महामायेचा अवतार आहे. जर मी माता मेरी, राधा किंवा अशाच इतर रूपात आले असते तर कदाचित सगळे लोक इथे असले असते आणि सुंदर भजन गात बसले असते, परंतु असे नाहीये. प.पू.श्री माताजी, ८.५.१९९४ २२ 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-22.txt NEW RELEASES Lang, Type | D Title Date Place VCD DVD ACD 489* 23rd Dec.1981 Christmas Puja 199 London Sp/Pu th 4" Jul.1982 Guru Puja : A mother for Guru 490 Sp/Pu 200 London 2nd Feb.1983 Delhi 267 Talk about Vishudhi 491 PP सार्वजनिक प्रवचन 26th Feb.1983 492 Nasik M PP 100 th 079* 4" Aug.1985 Shri Ganesh Puja:Your Power is Chastity Brighton 493* Sp/Pu -th Mahalakshmi Puja 205° M/E | Sp/Pu 6™ Jan.1986 494 Sangli th 495* 20"Jan.1986 064 Mumbai 1st Public Program : Attention should be on God PP 19th Feb.1986 साधक वही होता है जो साध लेता हैं। 496 Jaipur Н PP 009 संक्रान्ति पूजा / Sankranti Puja M/E | Sp/Pu 14th Jan.1987 497 089 Rahuri 8th Mar.1989 सार्वजनिक प्रवचन : इंसान का परिवर्तन 498* Delhi PP 130 Н इडा पिंगला सुषुम्ना, भाग-१, २ th- 15"Mar. 1989 499* 109 Delhi Н PP 23th Sep.1990 Navaratri Puja : Deities are watching you, Geneva Part I & II 500 068 E Sp/Pu द्वितीय सार्वजनिक प्रवचन - न्यू इंग्लिश स्कूल 6"Dec.1990 th- 501" 213 Pune PP पूजा:सहजयोगी को कार्यशील होना चाहिए Kolkata सरस्वती 3"Feb.1992 rd 502 049 Sp/Pu H सार्वजनिक प्रवचन 23"Mar.1992 503* Delhi 134 H PP सार्वजनिक प्रवचन 22nºMar.1993 504 Delhi PP 275 Н आनन्द की प्राप्ति बिना अंहकार से मिलती है 2n Dec.1993 Noida 050 505 Н PP सार्वजनिक प्रवचन th 20Jan.1994 506 Hyderabad H 057 PP आप इस मनुष्य धारणा में सत्य को जान नहीं सकते सार्वजनिक प्रवचन |Pune 27" Jan.1994 th 507* 077 PP H th 12"Apr.1995 508 Kolkata Н 318 PP th 509* 21 Mar.1995 Birthday Puja : Love & Be Loved Delhi Sp/Pu 015 th 14 Dec.1995 510 सत्य की पहचान चैतन्य से है Lucknow PP 052 Н 26 Mar.2001 th कलयुग में सहजयोग का महत्व Delhi 062 PP 511 th 22™ Aug.2002 You are the spirit 512 055 New York PP 513 PP Unknown Establish your Self Realization Unknown 095 E 6"Feb.2001 Italy Experiment with “Vega Machine" E Doc 086* Sahasrara Day Puja The Start of a new Era : Part I & II 5th May.1984 335 Sp/Pu 289 France 18 Sep.1982 th It is eternal life 336° 514* UK Sp Bhajan Title Artist Song List ACD ACS JAI NIRMAL |Ajit Singh 172 MAIYYA प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन ०२०- २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in 2011_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-23.txt करं समुद्राकडून शिका की जो सर्वात खाली राहनही सर्व गोष्टी, सर्व दं नद्याना अपल्यामध्ये सामावून घेतो. समुद्राशिवाय ही सृष्टी चाल गो शकणार नाही. जन्मदिन पूजा, दिल्ली, ३० मार्च १९९० न रन रवन ०