च तन्य लहरी मराठी मार्च-एप्रिल २०१ भ १० े राम तुम्हाला इतकेच ांगायचे आहे की हे जीवन तूमचे स्वत:चे आहे आणि तुम्हाला त्याचा पूर्णपणे उपयोग करयला पाहिजे, का२ण है जीवन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजपरयंत परमेश्वराने अनेक लोकांनी जंगात पाठविले आहे, त्याच का्याची ही फलशरुती होत आहे. आज त्याचे कार्याची आशी्वद म्हणून तुम्हा लौकांनी सहजयोग' मिळालेली आहे. प.पू.श्रीभाताजी, मुंबई, २.४.१९८५ या अंकात आपण धर्म औळखला पाहिजे ...४ शिव तत्त्वं बुद्धीच्या पलीकडे अाहे ...१४ ••. 18 अबौधितेचा आनंद उचलला पाहिजे ...१६ होळी तत्त्व ...१८ जात अरथात मनष्याची प्रवृत्ती ...२२ सा परमेश्वर आहे किंवा नाही त्याबद्दल आपण आजपर्यंत जे काही वाचत आलो होतो त्यात काही अर्थ आहे की उगीचच आपल्याला काहौतरी भुलवण्यासाठी लोकांनी हे गरंथ लिहिले आहेत, हे पडताळून पहाण्याची आणि त्याची पूर्णपणे प्रचिती घेण्याची ही वेळ आहे कारण ापण देवाच्या नावावर अनेक उपटसुंभ लोकच बघत असतो. ४ आपण धर्भ औळखला पाहिजे लंडनहन मुंबईला यायचं म्हणजे फार बरं वाटतं कारण लंडन फारच गजबजाटातलं आणखीन अत्यंत यांत्रिक शहर आहे आणि तिथल्या लोकांची एकंदर प्रवृत्तिसुद्धा यांत्रिक त्याहून बरं वाटतं. कारण शहरातून जी स्थिती लोकांच्या मनाची आणि श्रद्धेची होत आहे ती पाहून असं वाटतं की कुठूनतरी दोन-चार मंडळी खऱ्या श्रद्धेची असतील अशा ठिकाणी जावं. झालेली आहे. मग मुंबईहून कळव्याला यायचं की आमचा सहजयोग हा खेड्यापाड्यातून होणारा , शहरातून होणार नाही. हे मागे मी बोलले होते आणि त्याची प्रचिती आम्हाला येते. आता तुम्ही मुंबईच्या जरा जवळ असल्यामुळे थोडंबहुत शहराचं वातावरण आलं आहे तुमच्यात, पण तरीसुद्धा ह्या प्रसन्न, नैसर्गिक वातावरणात रहाणाऱ्या लोकांना परमेश्वराची जाणीव सतत असते. कळवा, मुंबई परमेश्वर आहे किंवा नाही त्याबद्दल आपण आजपर्यंत जे काही वाचत आलो होतो त्यात काही अर्थ आहे की उगीचच आपल्याला काहीतरी भुलवण्यासाठी लोकांनी हे ग्रंथ लिहिले आहेत, हे पडताळून पहाण्याची आणि त्याची पूर्णपणे प्रचिती घेण्याची ही वेळ आहे कारण आपण देवाच्या नावावर अनेक उपटसुंभ लोकच बघत असतो. देवळात गेलं की तुम्हाला पैसे द्यावे लागतात. दोन पैसे द्या तेव्हा तुम्ही जवळ राहणार.. एखादा श्रीमंत मनुष्य जर देवळात आला की लगेच पहिल्यांदा त्याच्या गळ्यात हार, सगळ्यात मोठा हार देवाचा त्याला घातला जातो. जसं काही देवालासुद्धा पैशाचं फार समजतं ! त्यातनं जर तो एखाद्या मोठ्या मोटारीतून आला तर १९.१.१९७९ त्याला आणखीनच फार जवळ समजलं जातं. पण देव हा भावाचा भुकेला आहे. त्याला पैसा, अडका आणि बाहेरची श्रीमंती समजत नाही. त्याला श्रद्धेची श्रीमंती ५ समजते. तो श्रद्धेचा भुकेला आहे आणि श्रद्धाच त्याला ओळखू शकते. आता श्रद्धेचा अर्थ म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. म्हणजे कोणी घरात आला, कोणी बुवा आला अंगाला फासून कुठलीही, कसलीही घाण आणि त्याने येऊन सुरू केलं की, 'मी फार मोठ्ठा गुरू आहे, अमकं आहे, तमकं आहे.' लगेच लोकांची डोकी त्याच्या पायावर अशी फुटतात जसे काही नारळ फुटावेत. आपल्या देशातले लोक फार भाविक आणि भोळे आहेत. पण धर्मभोळे असायला पाहिजे होते, नुसतं भोळं असून चालत नाही. धर्मभोळाचा अर्थ 'आपण धर्म ओळखला पाहिजे.' पहिल्यांदा आपण ओळखलं पाहिजे की कोणत्या माणसासमोर आपण आपली मान वाकवली पाहिजे. कोण खरा गुरू आहे आणि कोण खोटा? प्रत्येक रस्त्यावरचा मनुष्य गुरू असू शकत नाही. कदाचित तो आपल्याहीपेक्षा खालच्या दर्जाचा मनुष्य असेल. जो मनुष्य दूसर्यांच्या पैशावर उपजिविका करतो, तो मनुष्य धर्मगुरू किंवा धर्माशी संबंधित असू शकत नाही. अहो , तुम्हीसुद्धा थोडेसे पैसे जरी कमावले तरीसुद्धा आपल्या स्वत:च्या पायावर उभे आहात. तुम्हालासुद्धा इतकं स्वत:बद्दल वाटतं की, 'आम्ही कुणावरती असं अवलंबून राहणार नाही.' मग ही मंडळी अशाप्रकारे तुमच्या पैशांवर जिवंत राहतात, ती मंडळी तुम्ही जाणलं पाहिजे की कुठलेतरी उपटसुंभ आणि अत्यंत हलक्या दर्जाचे आहेत. ते तुमच्याजवळून पैसे घेतात आणि तुमच्या जीवावरती राहतात. अशा हलक्या लोकांना गुरू मानणं किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं की, 'आम्ही फार मोठे गुरू आहोत. आम्ही हे करतो, ते करतो, मोठ्यामोठ्या गोष्टी केल्या' आणि तुम्हाला जर त्यांनी भुलवलं तर ते आपल्या देशातले लोक फार भाविक आणि भोळे आहेत, लक्षात आलं पाहिजे की हा मनुष्य मुळीच धार्मिक असू शकत नाही. पण दूसरं असं आहे की धार्मिक माणसाबद्दल किंवा अशा संन्यासी लोकांबद्दल असं म्हटलेलं आहे की त्याला गावात मुळीच रहायला द्यायला नाही पाहिजे. जे संसारी लोक आहेत त्यांनीच गावात आलं पाहिजे. सीतेने एक वाल्मिकी रामायणात सांगितले आहे की कोणताही संन्यासी दारात आला तर त्याला दारात ठेवायचं! त्याने गावात राहिलं नाही पाहिजे. गावाच्या वेशीबाहेर त्याने राहिलं पाहिजे आणि ते ही एकच रात्र. गावाशी संबंध जर संन्यासाचा आला तर तो मग सन्यासी कसला! हे तिने, रावणाने तिला जेव्हा लुबाडलं होतं तेव्हा ते लक्षात ठेवून त्याचे वर्णन केलेले आहे की जे लोक असे कपडे घालून तुमच्यासमोर उभे राहतात ते खरोखर म्हणजे तुम्हाला लुबाडण्यासाठी संन्यास घेऊन आलेले आहेत. खरं पाहिलं तर असे कपडे घालायची गरज काय ? जो मनुष्य आतून पूर्णपणे संन्यस्त भावाचा आहे त्याला कशाचीच वाण नाही, जो आपल्यामध्ये मस्त बादशाह आहे, त्याला काय गरज आहे असे कपडे घालून फिरायची आणि तुम्हाला फसवण्याची! पण माणसामध्ये उपजतच ही बुद्धी असते की परमेश्वर म्हणून कोणीतरी आहे. धर्मभोळे असायला पाहिजे होते विशेषत: खेड्यातल्या लोकांना निसर्गाची एवढी सवय झालेली असते, रोज त्यांचा संबंध निसर्गाशी आहे. पाऊस आला तर शेती होणार! जर शेती चांगली नाही झाली, जर ६ जोपर्यंत आपल्याला आत्म्याची शक्ती मिळत नाही, डोळे उघडत नाहीत, तोपर्यंत आपण परमेश्वराला ओळखू शकत नाही. जमीन चांगली नसली तर त्याला ते म्हणतात पृथ्वी आमच्यावर रागावलेली आहे. जर कुठे एकदम आग लागली तर ते म्हणतात की आगीचा आमच्यावरती कोप झालेला आहे, देवीचा आमच्यावर कोप झालेला आहे. घरात जर कोणत्याही रोगाची साथ आली तरी ते म्हणतात की कोणत्या तरी कोपाने हे आम्हाला सगळे भोगावं लागत आहे. अशा परिस्थितीत मनुष्याला निसर्गावरती विश्वास आहे आणि निसर्ग म्हणजे परमेश्वर असं समजून तो परमेश्वराची पूजा करू लागला. परमेश्वराची जाणीव असणं हे अत्यंत मोठं असलं तरीसुद्धा परमेश्वर आपण बनवू शकत नाही. परमेश्वर आहे, तसाच आहे, त्याला आपण म्हणायचं की 'आम्ही परमेश्वराला अस घडवू, तो आहे. फक्त परमेश्वर म्हणजे असा,' तशी गोष्ट नाही. जसा परमेश्वर आहे तसाच आपण काय करू शकतो की परमेश्वराच्या ध्यानात जर बसलं आणि परमेश्वराला जर पाचारण केलं तर तो जसा आपल्या समोर येऊन ठाकेल तसं आपण त्याला ओळखता आलं पाहिजे. ही मात्र सुबुद्धी तुमच्यात यायला पाहिजे आणि ती तुमच्यात जाणीव यायला पाहिजे आणि ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इतकंच आहे, पण ते तुम्हाला जाणवलं पाहिजे. त्यासाठी काय करण्यासारखं आहे ? काय करावं लागेल? आता मला जर तुम्हाला बघायचं असलं तर मला डोळे उघडावे लागतात. ह्या डोळ्यांनी मला बघावं लागतं की तुम्ही कोण? कुठून आलात? तुम्हाला विचारावं लागतं. तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात की तुम्ही कुठे राहता ? तुमचं गाव कोणतं ? मी तुम्हाला ओळखते ह्या डोळ्यांमुळे. जर माझे डोळेच उघडे नसते तर मी तुम्हाला ओळखलं नसतं. परमेश्वराला बघण्यासाठी आपल्यामध्ये दुसरे डोळेदेखील आहेत त्याला 'आत्मा म्हणतात. ह्या आत्म्याचे जोपर्यंत डोळे उघडत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराला बघू शकत नाही, ओळखू शकत नाही. आत्मा जोपर्यंत आपल्यामध्ये जागृत होत नाही, त्याची ज्योत जोपर्यंत आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत आपण जो परमेश्वर मानतो त्याचेच काहीतरी फोटो पहाणार. त्याच्यामध्ये खरेपणा एवढा राहत नाही. किंवा असं म्हणता येईल की परमेश्वराचं पूर्ण ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. थोडसं होतं. जसं जरासा कोणी आंधळा असला की त्याला थोडसं दिसतं तसंच आहे. म्हणून पूर्णपणे जोपर्यंत आपले डोळे उघडत नाहीत, जोपर्यंत आपल्याला आत्म्याची शक्ती मिळत नाही, डोळे उघडत नाहीत, तोपर्यंत परमेश्वराला आपण ओळखू शकत नाही. पण आपल्याला असं वाटतं की आपण देव्हाऱ्यात देव ठेवला, आपला परमेश्वर आहे. ह्याला भजत गेलं की झालं! पण तो आपण तिथे बसवल्यानंतर आपलं हाच ७ वागणं कसं असतं! आपण खून करू किंवा मारामाऱ्या करू किंवा काहीही करू तरी आपल्याला वाटतं की परमेश्वर हा आपलाच आहे. कारण तो आपल्या देव्हाऱ्यात आहे. जाऊन त्याला परत काहीतरी दिलं की झालं! मग कोणाला काही वाटत नाही की 'मी खोटं बोललो, मी चोऱ्या केल्या, मी मारामाऱ्या केल्या, मी दुसऱ्यांचं वाईट केलं आहे.' आणि 'आता काही तरी माझ्या हातून वाईट घडलेले आहे,' असा विचारच मनात येत नाही कारण परमेश्वर हा देव्हाऱ्यात आपण बसवलेला आहे ना ! त्याची आरती केली की झालं. पुढचं काही बघायला नको. तो काही उठून आपल्याला मारत नाही. तेव्हा असा सोयीस्कर परमेश्वर आपल्याला आवडतो. पण त्याने आपली काही सोय होत नाही. आपली स्वत:ची काहीच सोय होत नाही त्याने. आपल्या धर्माची काही सोय होत नाही. फक्त या संसारात रहाण्याची सोय होते कशीबशी. मग नंतर ते ही पुढे येऊन उभं राहतं. तेही संकट आपल्यापुढे येऊन उभं राहतं. आता मनुष्याला, विशेषतः आजार वगैरे आला की परमेश्वर आठवतो. जेव्हा अगदी सुखात असेल तेव्हा एवढा आठवत नाही, पण आजारात असं वाटतं की, 'माझं काही तरी चुकलं असेल बुवा! मला आजार कसा आला? काहीतरी मी कुपथ्य केलं.' मानसिक रोग जडले तेव्हा ही असा विचार येतो, हार्टचा त्रास झालां, की विचार येतो, 'काय झालं माताजी? आमचं काय चुकलं? आम्हाला रोग का आला?' खरोखर म्हणजे इतकी काही जाणूनबुजून चूक केलेली नाही. पण तरीसुद्धा आंधळेपणा हा आहे. कारण जर तुमचा आत्मा उघडलेला नाही तर तुम्ही आंधळेच आहात. परमेश्वराबद्दल, धर्माबद्दल तुम्ही काय जर तुमचा आत्मा उघडलेला नाही जाणता? जे काही जाणता ते सगळे अर्धवटच आहे. म्हणूनच अशी व्यवस्था करायला हवी की ज्याने आपल्याला आपल्या आत्म्याचं दर्शन होतं. तर तुम्ही आंधळेच ही व्यवस्था कोण करणार? आपण करू शकतो का? ह्या डोळ्यांची व्यवस्था आपण केलेली आहे का ? हे डोळे कोणी दिले आपल्याला? परमेश्वराने दिले आहेत का? हे नाक किंवा हे तोंड किंवा हे शरीर हे सगळं काही परमेश्वराने दिले आहे. तुम्ही मिळवलेले आहे का? तुम्ही काय केलं माणूस होण्यासाठी ? जनावरापासून तुम्ही मानव झाले ते कसे झाले? तुम्ही त्यासाठी काय केलं? तेव्हा परमेश्वरासाठी जे आपल्याला डोळे पाहिजेत, जी आपल्याला आत्म्याची ओळख पाहिजे ते सुद्धा परमेश्वरालाच आहात. करायला हवं. आपण त्याबाबतीत काय करणार? सकाळपासून संध्याकाळपर्यंत उड्या मारून किंवा देवाचं नाव घेऊन किंवा देवाच्या आरत्या, पूजा करून हे होणार नाही. आधी परमेश्वराला ओळखून घेतल्यावर त्याच्या आरतीला काही अर्थ आहे, पूजेला काही अर्थ आहे. पण जर दिसतच नाही की परमेश्वर आहे की दगड आहे की धोंडा आहे तर आपल्याला काय करून फायदा होणार आहे? म्हणून आधी आत्मा हा ओळखला पाहिजे. आत्मा ओळखल्याशिवाय काहीही जमत नाही. जोपर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही, जोपर्यंत हा विचार तुमच्या मनात बसणार नाही, तोपर्यंत तुम्हाला माझी गोष्ट आवडणार नाही. आता हा आत्मा कसा उघडायचा? 'माताजी कसं करायचं?' मी ८ ्य म आधीच सांगितलं आहे की त्याबद्दल तुम्ही काहीही करू शकत नाही. हे परमेश्वराचं करणं आहे, देणं आहे. त्यानेच आम्हाला शरीर दिलं आहे. तोच आम्हाला डोळे देणार. तोच आम्हाला आत्म्याचं दर्शन देणारं. आणि तो देतो. त्याची वेळ यावी लागते. उद्या एखाद्या फुलाला काळजी पडली की माझं फळ होईल की नाही? कसं होणार? काय होणार? त्याने काय फायदा आहे ? जेव्हा त्याचं फळ होणार आहे तेव्हा आपोआपच फळ होईल. तसंच तुम्हाला जेव्हा आत्म्याचं दर्शन व्हायचं असेल तेव्हाच ते व्यवस्थित, वेळेवर होणार आहे आणि होणार. हजारो मंडळी सहजयोगाने पार झालेली आहेत. त्यांच्या आत्म्याचे त्यांना दर्शन झालेले आहे. त्यांच्यातून त्यांचा आत्मा बोलू लागला. पार झाल्याशिवाय किंवा परमेश्वराचे दर्शन, त्याला आपण म्हणतो की आत्म्याचं दर्शन, आत्मसाक्षात्कार, ते झाल्याशिवाय तुम्हाला परमेश्वराशी बोलतासुद्धा येणार नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण रामाचं नाव घेत बसतो, पण राम कुठे आहे ? रामाचं नाव घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे का ? तुम्ही घेऊ शकता का परमेश्वराचे नाव प्रत्येकजण ? आता आम्ही म्हटलं , आम्ही प्राइम मिनिस्टरचं नाव घेतो तर काय उपयोग ? ते काय धावून येणार आहेत! ते काय तुमचे नोकर आहेत ? परमेश्वराचे नाव घ्यायला तो काय आपला नोकर नाहीये ! त्याच्याशी काहीतरी संबंध झाला पाहिजे. पहिल्यांदा विचारणा केली पाहिजे. त्याच्याशी आपला संबंध जोडला पाहिजे. तेव्हा मग जसे आपण प्राइम मिनिस्टरकडे जातांना परवानगी घेऊन जातो, त्याचप्रमाणे तुम्हालाही आधी परवानगी घेतली पाहिजे. परमेश्वराशी जोडले गेले पाहिजे. जर संबंध परमेश्वराशी जोडला गेला नाही आणि त्याची तुम्हाला परवानगी मिळाली नाही, आणि जर तुम्ही तुमचा त्याच्या दाराशी जाऊन त्याचे नाव जोरजोराने घ्यायला सुरुवात केली तर त्याचे पोलीसवाले तुम्हाला धरतील की, 'अहो, कोणत्या हक्काने आलात तुम्ही इथे? कशाला परमेश्वराला त्रास देता?' म्हणून आधी आपल्या आत्म्याचे दर्शन घ्या. आत्म्याला जाणून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या हातातच मुळी परमेश्वराची शक्ती वाह लागेल. मग त्या शक्तीला प्रश्न विचारायचा की, 'परमेश्वर आहे की नाही?' तुम्हाला ९ आश्चर्य वाटेल की जेव्हा ही शक्ती वाह लागते, असा मोठा प्रश्न विचारल्याबरोबर जोरात ही शक्ती सांगते 'हो, आहे.' हातात अशी झणझण झणझण वाहू लागतात. कोणतेही असे प्रश्न विचारले तर ती शक्ती तुम्हाला उत्तर देते. म्हणजेच तुमच्या लक्षात येतं की ही शक्ती जी सगळीकडे, सर्वव्यापी सर्वव्यापी शक्ती म्हणतात, जगामध्ये, असं म्हणतात की परमेश्वराशिवाय पानसुद्धा हलत नाही, ती गोष्ट अगदी खरी आहे. कारण आत्म्याच्या दर्शनानंतरच त्या शक्तीचं दर्शन होतं. आणि तुम्ही ती शक्ती ओळखता आणि तिला पहाता आणि आपल्या हातातून ती वाहू लागते. तिला पूर्णपणे तुम्ही गती देऊ शकता. जेव्हा ही शक्ती तुमच्या हातून वाहू लागते तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची मानसिक स्थिती, तुमची शारीरिक स्थिती एकदम ठीक होऊन जाते. सहजयोगात फारच कमी मंडळी डॉक्टरकडे जातात. सगळ्यांच्या तब्येती अगदी उत्तम होऊन जातात. मानसिक त्रास असतील ते ही ठीक होतात. इतकंच नव्हे तर घराचीसुद्धा परिस्थिती सुधारते. प्रत्येक दृष्टीने परिस्थिती सुधारलीच पाहिजे. तुमच्यात जर परमेश्वराला यायचं झालं आता समजा आम्हाला उद्या इथे यायचे आहे, पाटीलांच्या घरी. तर पाटील आमच्या स्वागतार्थ सगळं स्वच्छ करतील, व्यवस्थित करतील घराला. तसच आहे. तुमच्यात जर परमेश्वराला यायचं झालं तर तुमचं जे शरीर आहे, तुमचं जे मन आहे, तुमची बुद्धी आहे ती सगळी स्वच्छ केली पाहिजे. ती स्वच्छ झाल्यावरच त्याच्यात परमेश्वर येऊ शकतो. आणि ह्याच कारणामुळे पुष्कळ लोकांचे अनेक रोग बरे झाले. पुष्कळ तसले लोक आम्ही बरे केलेले आहेत आणि करतो, पण असे नाही की आम्ही रोगच बरे करतो. जर तुम्हाला परमेश्वराचं दर्शन झालं किंवा तुमच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश पसरला तर आपोआपच जो काही अंधार असेल, मग तो शारीरिक असो, मानसिक असो किंवा धार्मिक असो कोणताही अंध:कार असला तर तो दूर होणारच. तर तुमचं जे शरीर आहे, तुमचं जे मन आहे, आपोआपच दूर होतो. तुम्ही म्हणाल, 'कसा ?' तर आता हा दिवा लावल्याबरोबर तुमची बुद्धी आहे ती इथला अंधार कुठे गेला? तसच तुमच्यातसुद्धा घडतं आणि म्हणून सहजयोगामध्ये माणसाची सर्वत-्हेने उन्नती होते. इतकेच नव्हे तर तो सामूहिक चेतनेला पात्र होतो. हा कठीण शब्द आहे पण अत्यंत सरळ आहे. आपल्या सर्वांच्यामधून एक शक्ती धावत आहे. सगळ्यांच्यामध्ये एक शक्ती आहे. त्या शक्तीला जाणल्याबरोबर तुम्ही सगळे एक असता, हे आतून व्हायला लागतं. म्हणजे हातावर तुम्हाला कळतं की हा मनुष्य कुठे आहे? ह्याला कुठे त्रास आहे? तसच मला कुठे त्रास आहे कारण आत्मदर्शन झाल्यामुळे स्वत:शीच 'स्व-दर्शन' होणार. त्या दोन्हीही गोष्टी घडतात, पण याला काही फार बुद्धी नको. काही पैसा नको. काही डोकं नको इकडे. मनुष्य आहात ना ! जनावर नाही म्हणजे झालं! तुमच्यात जास्ती ज्यांच्याजवळ बुद्धी आहे, ज्यांच्याजवळ अती पैसा आहे त्यांना कधी हे होत नाही. साधारण मध्यम स्थितीतल्या लोकांना होतं. जे मध्यम डोक्याचे आहेत. आता गरीब असले, फारच गरीब असले, अगदी ज्यांना खायला-प्यायलासुद्धा नाही त्यांना व्हायचं नाही कारण त्यांना रात्रं - दिवस चिंता आहे. ह्याची चोरी करतील, सगळी स्वच्छ केली पाहिजे. १० जिथे जिथे सहजयोगाचं सेंटर आहै तिथे तिथे परमेश्वराचा वास आहे. त्याची चोरी करतील, मला आज खायला नाही आत्ता काय ? बरोबरच आहे. त्यांची स्थिती तशीच आहे. पण एकदा असे मध्यम स्थितीतले लोक ह्या ह्याला आल्याबरोबर सबंध समाजच्या समाजच मुळी सुधारतो आणि सगळ्यांना सुबत्ता लाभते. कारण लक्ष्मीचंसुद्धा वरदान ह्याच्यात खूप जोरात आहे. आता सगळ्यांना ही काळजी की, 'माताजी आमचं कसं भलं होईल ? आमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल? किंवा इतर प्रश्न आम्हाला जे आहेत ते कसे सुटतील? त्याचं कसं काय होणार आहे ? आम्ही ह्या सर्व प्रश्नांना कसं उत्तर शोधून काढू?' तर ते सांगायचं म्हणजे असं की इथे , तुमच्या इथे सहजयोगाचं सेंटर आहे. जिथे जिथे सहजयोगाचं सेंटर आहे तिथे तिथे परमेश्वराचा वास आहे. जर तुम्ही ह्या सेंटरला आलात तर ह्या सेंटरमध्येच तुमचे प्रश्न सुटतील. घरी बसून सुटणार नाहीत. पुष्कळसे सहजयोगी असे असतात की, 'आम्ही पार झालो. आता आम्ही घरी बसून आमचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे.' प्रश्न सोडवण्याचा दवाखाना आहे हा! ह्या दवाखान्यात तुम्ही प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला जेव्हाही प्रोग्रॅम असतात तेव्हा तुम्ही आलात आणि हा प्रश्न जर तुम्ही टाकलात तर आत्मदर्शनानंतर सगळे प्रश्न आपोआप सुटतील. त्याचं एक उदाहरण मी सांगते तुम्हाला. किती सोपं उदाहरण आहे! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असं घडतं, अनेकदा. अनेकदा असं झालेलं आहे आणि इतकी अशी उदाहरणं आहेत. अनंत उदाहरणं आहेत की नुसतं अनुसंधानच आहे किंवा अंदाजेच बोलताहेत किंवा कदाचित झालं असेल म्हणून झालं असेल अशा रीतीच्या कल्पनाच करू शकत नाही. आम्ही लंडनला असतांना एक मुलगा, अर्जेरीयाचा मुसलमान होता, तर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, 'सहा महिन्यापासून माताजी मी इथे प्रयत्न करतोय. मला स्कॉलरशिप मिळत नाही. आणि आता अगदी शेवटची वेळ आली आहे. मी आता जातो परत म्हणून.' तो पार झालेला होता. म्हटलं, 'कधी जातो आहेस?' म्हणे, 'मी गुरुवारी जातोय. मी ता गुरुवारी जातो.' तर मी म्हटलं की, 'तू मंगळवारी का नाही जात ? गुरुवारी जातोयस पण आता मंगळवारी जा.' तो म्हणाला, 'बरं, तुम्ही म्हणता तर मंगळवारी जातो.' सोमवारी तो कॉलेजला गेला आणि पाटीवर त्याचं नाव पहिल्यांदा लिहिलेलं होतं की, 'तुला स्कॉलरशिप मिळाली.' हे एक उदाहरणार्थ मी सांगितलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. तुमच्या मुंबईलासुद्धा जेवढी सहजयोगी मंडळी आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं तर प्रत्येकजण एक- एक ग्रंथ सांगेल. एक उदाहरणार्थ मी सांगितलं. असे अनेक प्रश्न आहेत. सहजच सुटतात. ११ अत्यंत सहजच सुटतात. आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला सेंटरवर यायला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे जिथे चार माणसं परमेश्वराची आठवण करतात, तिथेच परमेश्वर असणार. तुम्ही म्हणाल, 'नाही, माताजी तुम्ही माझ्या घरी या. माझ्या घरी जे काही आहे ते...' तुमचं घर कोणतं ? तुम्ही जर आमचं-आमचं करत बसले तर परमेश्वर मुळीच येणार नाही कारण तुम्ही सामूहिक चेतनेत आहात. सर्वजण मिळून इथे परमेश्वराची आठवण करतात. इथेच परमेश्वर आहे. एकटा तुमच्यापुरता परमेश्वर नाही. मला येऊन ऑर्डरसुद्धा देतात, 'माताजी, बघा! मला नोकरी मिळालीच पाहिजे. माझ्या मुलाचं सगळं शिक्षण झालंच पाहिजे.' नंतर 'माझ्या मुलीचं लग्न झालंच पाहिजे.' नंतर 'आमचं घर बांधून निघालंच पाहिजे.' हे झालंच पाहिजे आणि ते झालंच पाहिजे. तर म्हटलं, 'का बुवा?' 'मी मुद्दामून आलो तुमच्याकडे म्हणून.' जसं काही हे दुकान मांडलेलं आहे परमेश्वराचं! तिथे तुम्ही येऊन काही म्हटलं तर हे बघा एवढं एवढं तुम्ही आम्हाला हे द्या. इतक्या पैशाचं हे, इतक्या पैशाचं हे, इतक्या पैशाचं हे.. काही दुकानात जावं तसं आपण हे मागतो. उलट असं म्हणायचं की जे काही आमचं हे आहे, परमेश्वरा , .तूच बघ! फक्त तू आम्हाला हवा. एकदा तू आम्हाला मिळालास की आम्हाला काही नको. असं म्हटल्याबरोबर सगळे प्रश्न सुटतात. आणि ते प्रश्न परमेश्वराला अगदी काहीही मुश्किल नाही. त्यांना काहीही कठीण नाही. परमेश्वर ते कार्य करतो. आतापर्यंत सगळे हे असं म्हणत होते की परमेश्वर कार्य करतो, असं होतं , तसं होतं. पुष्कळ लोकांनी मला सांगितलं, 'आम्ही माताजी, वारकरी बनून आम्ही तिकडे गेलो. विठ्ठलाबरोबर एवढं म्हटलं, हे कर, ते कर. आमचं काही झालं नाही. परमेश्वराने आमचं कार्य केलं नाही.' पण आता तशी वेळ नाही. तुमचे जर आत्मदर्शन झालं नव्हतं, तर तुम्हाला तिथे जाण्याचा परवाना नव्हता. परमेश्वराकडे मागण्याचा परवाना नव्हता. आता आत्मदर्शन झाल्यावर तुम्ही बघा तुम्हाला केवढी शक्ती येते. तुम्ही कोण आहात, ते बघा. त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोणतीही गोष्ट तुम्ही जरी म्हटली तरी ती होणारच. कारण तुमच्यावर देवदूतांचं राज्य आहे. तुमच्यावरती गणेशासारखे आणखीन हनुमानासारखे तसेच भैरवासारखे लोक उभे आहेत. आणि तुमचं कार्य करण्यासाठी पूर्णपणे संपन्न आहेत. पण त्याची आपण प्रचिती मिळाल्याशिवाय , नुसतं एखाद्या बुवाने प्रवचन द्यावं तसा हा प्रकार नव्हे. मी इथे बसून काही तुम्हाला प्रवचन देत नाही. पण जे खरं आहे ते साक्षात करण्यासाठी इथे आलेली आहे. खेडोपाडी लोक सरळ असतात, साधे असतात आणि त्यांच्याजवळ एवढे पैसेही नसतात, म्हणूनच कदाचित त्यांना परमेश्वर जास्त समजतो. ओळखताही येतो. खरा मनुष्य कोण आहे हे एखाद्या खेडेगावातल्या माणसाला चांगलं ओळखता येतं. एवढं शहरातल्या माणसाला ओळखायचे आहे अजून. बहुतेक जेवढे महागुंड , अगदी महाप्रसिद्ध, महाघाणेरडे गुरू लोक आहेत ते सगळे शहरातच आहेत. त्यांना खेड्यापाड्यात येण्याची सोय नाही आणि आवडही नाही. कारण इथे येऊन पैसे कमावता येत नाही नां ! त्यांना काही प्रेम नकोय. त्यांना पैसे हवेत. त्यातले आपले एखादे, त्यांच्यातील वाचलेले दोन चार, असे शहरात काही मिळालं नाही मग ते येतात इकडे भटकत. तेव्हा तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत. तुम्हाला देवाने अशा निसर्गरम्य १२ स्थानी आणलेले आहे, त्याला काहीतरी कारणं असली पाहिजेत. त्यातलं मुख्य कारण हे आहे की परमेश्वर हा काय आहे हे तुम्ही जाणलं तर तुम्ही ते उत्तम तऱ्हेने आपल्यामध्ये बिंबवू शकता. तितके एक शहरातला मनुष्य नाही करू शकत. जितकं तुम्हाला हे जमेल तितकं त्यांना हे जमणार नाही. कारण शहरातले जे काही व्यंदफंद आहेत ते तुम्ही शिकलेले नाहीत अजून. तुमच्यामध्ये या घाणेरड्या गोष्टी अजून आलेल्या नाहीत. अत्यंत घाणेरड्या गोष्टी आहेत ज्या शहरामध्ये चालू आहेत आणि ते सर्व लोकांनी शिकून ठेवलेले आहे. त्यांच्या मनाची स्थिती अशी आहे की त्यांच्यामध्ये कोणतंही बी लावायचं म्हणजे फार त्रास होतो. सांगायचं म्हणजे लंडनला मला जर कोणी म्हटलं, तर काम करून मला अगदी कंटाळा येतो. थकवा येऊन जातो. आता दिसायला मोठे छान-छोकी, चांगले कपडे घातलेले, गोरे-गोमटे लोक असतात तिथे, पण आतून इतकी घाण असते त्यांच्यात की मेहनतच करवत नाही. उलट कोणी जर म्हटलं की, 'माताजी, तुम्ही कळव्याला येऊन काम करा.' तर मी अगदी तयार आहे. इथे एक जर तुम्ही झोपडी बांधली तर मी इथे येऊन रहायला तयार आहे. मला मजा वाटेल इथे. पण लंडनला मला जमत नाही. कारण फारच घाणेरडे लोक आहेत, आणि त्यांची स्थिती म्हणजे इतकी घाण आहे की त्या लोकांना दारातसुद्धा उभं करू नये. पण काय करता, 'आलीया भोगासी असावे सादर.' आमच्या साहेबांची नोकरी तिथे झाल्यामुळे आम्हाला तिथे जावं लागलं. आणि तिथल्या लोकांचा उद्धार करण्याची पाळी आल्यावर आम्ही कैक कार्य करत आहोत आणि बरेच इंग्लिश लोक झाले आहेत पार. पण तुमच्या पायाची धूळ त्यांना नाही. एकवेळ श्रद्धा आहे पण तुमचा हा भोळेपणा त्यांच्यात मुळीच नाही. तेव्हा त्यांच्याकडून काहीच शिकण्यासारखं नाहीये. तुम्हाला वाटतं त्यांच्याजवळ दोन-चार कपडे जास्त असले किंवा मोटारी असल्या म्हणजे फार आरामात आहेत; असं मुळीच नाही. अत्यंत दुःखी लोक आहेत आणि सहा माणसात एक मनुष्य तिथे आत्महत्या करतो आणि दहा माणसात सात माणसांची लग्न मोडतात, असे प्रकार आहेत. तेव्हा अशा देशामध्ये काही धर्म असू शकेल असं वाटतच नाही मुळी. त्या देशामध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई-बाप पाडून टाकतात. म्हणजे चांगली मुलं असतात त्यांना मारून टाकतात जीवानिशी. आई स्वत: मारून टाकते गळा घोटून. असं ऐकले आहे का तुम्ही? प्रत्येक आठवड्याला. आपल्याकडे आई म्हणजे मुलावर एवढा जीव टाकेल आणि तिथे हे असे रानटी लोक आहेत. अगदी रानटी. यांत्रिक झालेले आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही भावना नाही. तेव्हा त्यांच्यासारखं होण्याचा काहीच प्रयत्न करू नये. आपल्या देशाची जी अत्यंत जुनी संपदा आहे, ती प्रेमाची जी आहे, ज्याचे आपल्याकडे महत्त्व आहे, ते ठेवले पाहिजे. कारण परमेश्वराची जी शक्ती, ती ही प्रेमशक्ती आहे आणि तो प्रेमाचा भुकेला आहे. राखून म्हणून प्रेमाचंच स्मरण केलं पाहिजे आणि प्रेमात राहिले पाहिजे आणि प्रेमाचीच मजा उचलली पाहिजे. आता मी इथे अनेकदा आलेली आहे, पण ह्यावेळेला मला फारच आनंद झाला. माझा पूर्ण आशीर्वाद ह्या कळव्याला आहे आणि तुम्हा सर्वांना आहे. देव कृपेने एके दिवशी ही जागा फार मोठी होईल आणि तुमच्या मुलाबाळांचं फार भलं होईल, धार्मिकरीत्या. सगळ्यांना आशीर्वाद! १३ र हा न ० शिव तत्त्व बुद्धीच्या पलीकडे आहे १४ मानवाचे अंतिम लक्ष्य हेच असावे की त्याने शिव तत्त्व प्राप्त करावे. शिव तत्त्व बुद्धीच्या पलीकडे आहे. ते फक्त बुद्धीने समजू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला आत्मसाक्षात्कार होत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आत्म्याला ओळखले नाही, स्वत:ला ओळखले नाही, तोपर्यंत तुम्ही शिव तत्त्वाला जाणू शकत नाही. श्री शिवाच्या अवडंबर, आंधळेपणा आणि अंधश्रद्धा पसरली आहे. परंतु जो मनुष्य नावाने खूप आत्मसाक्षात्कारी नाही तो शिवजीला समजूच शकत नाही. कारण त्यांना समजण्यासाठी सर्वप्रथम मनुष्याला अशा स्थितीपर्यंत पोहोचायला पाहिजे जिथे सर्व महान तत्त्व आपणहूनच स्थापित झाले पाहिजे. श्री शिवासाठी असे म्हटले जाते की ते भोळेशंकर आहेत. आजकाल जगात खूप बुद्धिमान लोक निर्माण झाले आहेत आणि ते आपल्या बुद्धीच्या आधारे काहीही उलटसुलट लिहीत असतात आणि नंतर म्हणतात, 'हे शिवजी तर भोळे आहेत.' त्यांचे भोळेपण ही बुद्धिवादी लोकांच्या दृष्टीने एकदम बेकार गोष्ट असेल तितका तो यशस्वी होतो. आहे. आजकाल मनुष्य जितका चलाख आणि चुस्त मग यांचा भोळेपणा कसा समजू शकेल? आजकाल तर लोक असा विचार करतात की जो मनुष्य भोळा असतो तो मूर्ख असतो. परंतु शिवजीचा भोळेपणा असा आहे की तिथे तेच सर्वकाही आहेत. समजा एखादा अतिश्रीमंत मनुष्य आहे आणि अचानक त्याला विरक्ती आली व त्याची सर्व संपत्ती इतर लोक घेऊन गेले आणि ते म्हणाले की, 'काय अजब भोळा मनुष्य आहे, ज्याची सर्व संपत्ती लोक घेऊन चालले आहेत आणि याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही.' परंतु जर तो संसारातूनच विरक्त झाला आहे तर त्याला त्या संपत्तीचे काय महत्त्व वाटणार! तो त्याच्या भोळेपणात बसला आहे आणि त्याची मजा लुटत आहे. जर गोष्टी आपल्या आपणच होत राहतात, सर्व काही ठरवल्यासारखे आहे तर त्यामध्ये श्री शिवाचा काय कार्यभाग असतो? ते भोळेपणात सर्व गोष्टी बघत असतात. ते साक्षी स्वरूप होऊन शक्तीचे कार्य बघत असतात. शक्तीनेच सर्व सृष्टीची रचना केली आहे आणि शक्तीनेच सगळ्या देवी-देवता बनवल्या आहेत आणि त्यांचे कार्य ठरवले आहे. हे सर्व घडलेले आहे आणि आता श्री शिवाचे काय काम आहे ? तर श्री शिवाला ह्याकडे लक्ष ठेवायचे आहे. आणि यामध्येच सर्वकाही येते. त्यांच्या भोळेपणाचा परिणाम असा होतो की त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल तो पार होतो. ज्याच्याकडे त्यांचे चित्त जाईल तो तरून जातो . त्यांना काही करण्याची जरूरीच नाही. हा सर्व खेळ आहे, जसे मुलांचे खेळ असतात. परमेश्वरासाठी हा सगळा एक खेळ आहे. प.पू.श्रीमाताजी, मुंबई, १९.२.१९९३ १५ अबोधितेचा आनन्द उचलला पाहिजे निष्कपटता हा शिवाचा एक गुण आहे. बालकाप्रमाणेच ते अबोध आहेत. साकार अबोधिता आहे. आपल्याला आपल्या चिंता, विचार अबोधितेच्या समुद्रात बुडवून टाकायचे आहेत. अबोधितेला जाणून लक्षात घेऊन आनंद घ्यायला पाहिजे. पशु-पक्षी तसेच मुलं अबोध असतात. या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. रस्त्यावरून जातांना तुम्हाला काय बघितले पाहिजे? तुम्ही तुमची नजर पृथ्वीपासून केवळ तीन फूट उंच ठेवा. या उंचीवर तुम्हाला फूल, हिरवे गवत आणि लहान मुलं दिसतील. तीन फुटापेक्षा जास्त उंच असणाऱ्या लोकांना बघण्याची आवश्यकता नाही. जी व्यक्ती अबोध, निरागस नाही तिच्या फक्त पायापर्यंत तुम्ही बघू शकता, परंतु तिच्या डोळ्याकडे बघू नका. घेऊन, त्याचे महत्त्व मूलाधार अबोध आहे तसेच पवित्र धर्मपरायण आहे. हा श्री गणेशाचा गुण आहे. म्हणूनच या जगात राहतांना जरी तुम्ही लहान मूल नसलात तरी अजूनही त्याच्यासारखे अबोध आहात. प.पू.श्रीमाताजी, इटली, १७.२.१९९१ जसे एकदा श्रीकृष्णाच्या सोळा हजार आणि पाच बायकांना एका सुप्रसिद्ध महात्म्याला भेटायचे होते. परंतु जाण्याच्या रस्त्यावर असणाच्या नदीला पूर आलेला असल्यामुळे त्या ती पार करू शकल्या नाहीत. त्यांनी परत येऊन श्रीकृष्णांना नदी पार करण्याचा विधी विचारला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले की, 'नदीला जाऊन सांगा की जर श्रीकृष्ण योगेश्वर आहेत आणि ब्रह्मचारी ही, तर नदीचे पाणी ओसरू दे.' त्यांनी जाऊन नदीला असे सांगितल्यावर खरोखरच नदीचे पाणी कमी झाले. जरी तुम्ही जगात पती-पत्नी म्हणून राहत असलात तरी तुम्ही अबोध असू शकता. हेच पावित्र्याचे लक्षण आहे. १७ हळ तव TO १६/३/१९९५ आज होळी आहे आणि आजची होळी पहिल्यापेक्षा खूप वेगळी आहे. होळीचे तत्त्व समजून घेतले पाहिजे. होळीच्या दिवशी आपल्या अंतरंगातील दोष व घाण जाळून हृदय स्वच्छ केल्यावर जे प्रेम उफाळून येते, त्याच्या चैतन्याने सगळीकडे चैतन्यमय रंगाची उधळण झाल्याने सर्व लोक मस्त होऊन जातात. यासाठीच होळीच्या दिवशी सर्वप्रथम आपल्यामधील सर्व बाधा जाळून टाकल्या पाहिजेत. सहजयोगात राजकारण नसावे. संपूर्ण समाजातील लोकांवर राजकारणाची जी जबरदस्त पकड आहे त्यामुळे सहजयोगीही त्यामध्ये ओढले जात आहेत. एक व्यक्ती ज्याला सहजयोगाचे पूर्ण ज्ञान नाही, तो आपल्या अशाप्रकारच्या दोषी स्वभावामुळे इतरांना काही-बाही सांगतो, त्यामुळे इतरांवर त्याचा परिणाम होतो व ते ही अशा गोष्टी दुसर्या लोकांपर्यंत पोहोचवतात. जशी काही फ्ल्यू सारखी एखादी हवा पसरत आहे. हा एक आजार आहे. तो पसरतच जातो. पूर्वीच्या काळी स्त्रिया राजकारण करायच्या व पुरुष भांडायचे, परंतु हे आता उलट झाले आहे. कोणतीही व्यक्ती जिला प्रगती करायची आहे, त्याने अशा प्रकारच्या गोष्टीत अडकू नये. ार हा एक प्रकारचा पाशच आहे. मला सर्व दिसत असते. मी काही बोलत नाही, परंतु मला सगळे माहीत आहे. सहजयोग्यांमध्ये आपापसात वैर नसावे. एखाद्या गोष्टीच्या मोहापायी असे होते. सहजयोगी नारद मुनींप्रमाणे एकमेकांना उलट- सुलट गोष्टी सांगून आपसातील वैर वाढवत जातात आपापसातील वैर भावना वाढल्याने प्रेमाचे जाळे तुटून जाते. आपल्याला सहजयोगाविषयी प्रेम असले पाहिजे आणि आईविषयी प्रेम असले पाहिजे. तरी आता पहिल्यापेक्षा ह्या Vह १८ गोष्टींचे प्रमाण कमी झाले आहे. (वैर भावना) परंतु आता लोक दुसर्याच दिशेने चालले आहेत. कोणी म्हणतं की आम्ही दिल्लीचे सहजयोगी, कोणी नोएडाचे, कोणी स्वत:ला अजून कुठलेतरी सहजयोगी म्हणवतो. आपण सर्व एक आहोत. आपल्यामध्ये कोणी दिल्लीचे, मुंबईचे असा फरक नसावा. आपण सर्व एक आहोत आणि आपण सहजयोगी आहोत. समुद्राच्या गोष्टी करा, एका थेंबाच्या नाही. कोणी तुम्हाला काहीतरी बोलून त्रास देत असेल, काही हरकत नाही, त्यांना बोलू देत. ते सर्व हळूहळू समोर येईलच. आमचे लग्न झाले त्यावेळी आमच्या इथे शंभरपेक्षा अधिक लोक होते. आम्ही कधीही कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही. साधु-संतांसारखे सर्वांची सेवा केली. सर्वांना आनंदी ठेवले. आत्तासुद्धा आम्हाला मित्रमंडळी आहेत, परंतु आमच्या पतींना मित्रमंडळी नाहीत. जेव्हा मी लखनौला जाते सर्वजण फक्त आम्हालाच भेटायला येतात. आमच्याकडे त्यांचा खूप ओढा आहे. आमच्या पतींना भेटायला कोणीही येत नाही, सर्वजण आम्हाला भेटायला येतात. असे निव्व्याज्य प्रेम असावे. राहून कोणी काही म्हणो, बडबड करोत आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आपण सहजयोग्यांना पुढचा जन्म तर नाहीये आणि असलाच तर तो एखाद्या संताचा जन्म असेल. या जन्माची वाईट कर्म याच जन्मात धुवा आणि स्वच्छ व्हा. पुढच्या जन्मात त्यासाठी संधी मिळणार नाही. जे काही धुवायचे आहे ते आत्ताच धुवायचे आहे, याच जन्मात, म्हणजे पुढचा जन्म जरी असला तरी तो दोषरहित असेल, संताचा जन्म असेल. आपल्यामध्ये आक्रमकपणा आहे. दुसरे म्हणजे लोकांमध्ये बाधा आहेत. हे दोन्ही आपण काढू शकतो. यासाठी आमच्याजवळ सहजयोगात उपाय ही आहेत. इथे हे सर्व काढून टाकले पाहिजे. तिसरे म्हणजे ढोंगीपणा. स्वत:लाच पुढे-पुढे करून लोकांसमोर येणे. मनामध्ये एक आणि लोकांना वाढवून सांगायचे दूसरेच. यामुळे आपल्याला काय फायदा होतो ? आपण स्वत:लाच फसवत असतो. बाहेरून एकच वर्तन असावे. हे दोष होळीच्या दिवशी जाळल्याशिवाय काही फायदा होणार नाही. घेण्याची भावना, दोष, बाधा हे सर्व होळीत जाळून टाका. ग्रुपबाजी, राजकारण हे ही जाळून टाका. एक ग्रुप बनवणे, एकाच जातीच्या लोकांनी आपापले ग्रुप बनवणे हे चांगले नाही. आपण आता सहजयोगी झालो आहोत. आता आपण कोणत्या ग्रुप किंवा जातीचे नाही आहोत. आपल्याच लोकांना महत्त्व देणे ही निरर्थक गोष्ट आहे. आपल्या जातीच्या लोकांना, आपल्या भागातील लोकांना पुढे करणे ठीक नाही. जे प्रमुख आहेत त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या वागणुकीकडे बघून बाकीचे लोक ही असेच वर्तन करतील. ह्या सर्व गोष्टी होळीत जाळून टाका. आतून आणि बदला ह्यासाठी एक मंत्र आहे, खूप मोठा मंत्र, 'सर्वांना क्षमा करा.' याशिवाय प्रगती होणार नाही. आम्हाला आईशी व सहजयोगाशी घेणं-देणं आहे. कोणी काही चुकीचे बोलत असेल तर बुद्धीने त्याचा विचार करा. त्यांना जे पाहिजे ते बडबडू देत. कोणतीही चुकीची गोष्ट ऐकून आपल्यामध्ये काही अयोग्य गोष्टीचा प्रभाव तर पडत नाही ना याकडे तुमचे लक्ष असू द्या. आपण बुद्धांना जाणतो आणि सर्वांना मानतो, बाकी सगळे सोडून द्या. शत्रुत्वामुळे काही फायदा होणार नाही. आपल्यामधील षडरिपू जाळून टाका. आपल्याला वैयक्तिक पातळीवर विकास करायचा आहे. १९ त्यामुळे संपूर्ण जीवनात बदल घडून येईल. एक सफरचंद खराब असेल तर ते पन्नास सफरचंद खराब करते, परंतु सहजयोगात एक व्यक्ती इतरांना चांगले बनवते, पन्नास जणांनाही. वाईट स्वभावाचा परिणाम इतरांवरही होतो. आपल्या परिवारातही आपण या गोष्टी बघत असतो. कुटुंबात एखादी व्यक्ती जरी वाईट स्वभावाची असेल तर त्याचा परिणाम इतरांवर होतो, परंतु सहजयोगात असे नाही. एक जरी चांगला सहजयोगी असेल तर तो इतरांना चांगले करतो. जर कोणी अयोग्य व्यक्ती असेल तर ती आपणहन निघून जाईल. आपल्याला त्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. ती गोष्ट तुम्ही माझ्यावर सोपवा. होळीमध्ये जाळण्यासाठी लोक आपापल्या घरातील लाकूड देतात, जेणेकरून ते लाकूड जळाल्यामुळे त्यांचे घर बाधारहित राहील. सहजयोगात हे लाकूड म्हणजे आपले शरीरच आहे. आपल्या शरीराचे लाकूड जाळून स्वत:ला सोन्यासारखे बनवा. आपल्यातील क्षमाशील शक्ती वाढवा. उजवी बाजू ( आक्रमक स्वभाव) कमी करा. 'हम' आणि 'क्षम' हे आज्ञेचे दोन मंत्र आहेत. जे लोक भूतबाधित आहेत ते बाधा काढण्यासाठी इतरांची मदत घेतात. यामुळे काही फायदा होत नाही. आपणच याला काढले पाहिजे. आपल्याला आत इतरांच्या मदतीची गरज नाही. असे म्हणायला पाहिजे की 'मी सहजयोगी आहे' किंवा 'मी सहजयोगिनी आहे.' बाधा दूर होईल. यामुळे बाधा वाढते. ती शारीरिक असो की मानसिक तिचा एक ग्रुप बनतो. दुसर्यांना शोधत बसू नका. बाधा झालेल्या लोकांना शोधू नका. मी अजून एक गोष्ट बघितली आहे, की लोक माझ्यावर अधिकार गाजवतात. चर्चा, वाद सुरू करतात. अशामुळे लगेचच स्वाधिष्ठान पकडले जाते. वादविवादाचा शेवट दिसतच नाही. तीन-तीन वाजेपर्यंत बसून राहतात. अरे बाबा, आम्ही तुम्हाला समजावले आहे, की तुम्ही बाधाग्रस्त आहात, तुमचे घर स्मशानाजवळ आहे ते सोडा. भाड्याचे घर आहे ते सोडायला काय हरकत आहे? पण नाही. त्यांचे त्याकडे लक्ष नसते आणि अधिकार मात्र गाजवतात. आम्ही पाहिले आहे, की बाधा झालेले सर्वात पुढे असतात. बाधा चिकटते अशाने, काही नियम असायला पाहिजेत. आईवर श्रद्धा असायला हवी. सहजयोगावरही नितांत श्रद्धा ठेवायला पाहिजे. श्रद्धेशिवाय चर्चा केल्यामुळे उजवी विशुद्धी लगेचच पकडली जाते. नियम-आचरण याकडे लक्ष दिले पाहिजे. जेव्हा कधी चुकीची गोष्ट घडत असेल तेव्हा नियमाकडे बघितले पाहिजे. सर्वात जास्त श्रीकृष्णाने राक्षसांना मारले, श्रीरामांनी राक्षसांना मारले, परंतु लोक मला म्हणतात, 'आई (माताजी) सारखा अवतार आजपर्यंत झाला नाही. तुमचे कार्य महान आहे. तुमच्यामध्ये लोकांमधील राक्षसी वृत्तींना नष्ट करण्याची शक्ती आहे.' प्रतीकात्मक होळीचे दहन करा. स्वच्छ व्हा. मुक्ती मिळाल्याच्या आनंदात नाचा, गा आणि सर्वांना आनंदित करा. सहजयोगाची होळी ही श्रीकृष्णाची होळी आहे. आजकाल तर लोक होळीच्या दिवशी भांग पितात. श्रीकृष्ण काय भांग पित होते ? भांग तर फक्त शिवशंकर पीत होते. ज्यांना सहजयोगात रहायचे आहे त्यांना व्यभिचारी वृत्तीचा त्याग करायला पाहिजे. हेच होळीचे महत्त्व आहे. खाण्या-पिण्याला आपण खूप महत्त्व देतो. कोणाला चाट कुठे चांगली मिळते हे माहिती असते, मिठाई इकडे चांगली मिळते, इकडे हे, तिकडे ते अशाप्रकारे संपूर्ण लक्ष या गोष्टींकडेच असते. आस्वाद २० घ्यावा, हे किंवा ते. असे म्हणतात, की श्रीकृष्णाला लाडू जास्त आवडत होते आणि देवीला पुरणपोळी. आता तुम्ही लोकही माझ्यासाठी काही ना काही बनवून आणत असता, परंतु मला या सर्व गोष्टींमध्ये अजिबात रस नाही. आस्वाद घ्यायला पाहिजे. आता तुम्ही सर्वजण इतक्या प्रेमाने पदार्थ बनवून आणता म्हणून मी ते खाते, ही गोष्ट वेगळी. हो, पण आपण बनवून दुसर्यांना खाऊ घाला. जास्त करून उत्तर भारतातील लोकांचे जास्त लक्ष खाण्यामध्येच आहे, नंतर महाराष्ट्रात व दक्षिण भारतातही ही गोष्ट आहे. तसं तर सगळीकडेच हे आहे. आम्हाला लोक विचारतात, 'तुम्हाला काय आवडते ?' आम्हाला तर आठवतही नाही आता, की आम्हाला काय आवडते? येशू ख्रिस्तांनी सांगितले आहे, की 'वाईटपणाची घृणा व वाईट वागणाऱ्यांवर प्रेम करा.' सहजयोग प्रेमानेच वाढेल. तुम्ही तुमच्या प्रेमाची मर्यादा वाढवा. याबाबतीत परदेशी लोक भारतीयांपेक्षा खूप चांगले आहेत. ते आपापसात कधी भांडत नाहीत. त्यांना जे मिळते त्यात ते सुखी असतात. परंतु आपले तसे नाही. इथे चार लोक एक बाथरूम वापरतात, पण गणपतीपुळ्याला गेले, की त्यांना स्वतंत्र, खोलीला जोडून (अॅटॅच्ड) बाथरूम पाहिजे. परदेशी लोकांचे असे नाही. त्यांच्या देशात त्या लोकांकडे स्वत:ची गाडी असते, ते विमानाने प्रवास करतील. त्यांचे जेवण आपल्यासारखे नसते. त्यांच्या खाण्याचे प्रकार वेगळे आहेत, परंतु ते जेव्हा इथे येतात तेव्हा ते आपल्याइथले जेवणही प्रेमाने करतात. इतकेच नाही तर त्याचे कौतुकही करतात. तसे तर ते लोक आम्हाला परमेश्वरच मानतात कारण त्यांना माहिती आहे की शारीरिक आराम हा आराम नसतो, तर लक्ष आत्म्याकडे असले पाहिजे. त्या लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आपल्याला या अपेक्षांकडे लक्ष दिले पाहिजे. अजूनही इतर काही गोष्टी आहेत. जसे कोणतेही काम न विचारता करणे. मला न विचारताच बऱ्याच गोष्टी केल्या जातात. ज्यामुळे शेवटी नुकसानच होते. विचारायला पाहिजे. यातच सर्वांचा फायदा आहे. 'असे का होते ? याकडे लक्ष दिले पाहिजे. खरं तर होळीचे तत्त्व हेच आहे, की स्वत:ला आतून स्वच्छ करणे. येशू ख्रिस्त पूर्वी काश्मिरमध्ये येऊन गेले. त्यावेळी त्यांची भेट आमचे पूर्वज राजा शालिवाहन यांच्याशी झाली होती. तेव्हा येशू ख्रिस्तांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, की 'मला येशू ख्रिस्त म्हणतात आणि ज्या देशातून मी आलो आहे तेथील लोकांना म्लेंच्छ म्हणतात, म्हणून मी तुमच्या देशात आलो आहे.' तेव्हा शालिवाहन राजाने त्यांना सांगितले की, 'तुम्ही तुमच्या देशात परत जाऊन त्या लोकांना 'निर्मलम् तत्त्वम्' स्वीकारायला सांगा.' सहजयोगाचे जे काम आहे ते जर माझ्या एकटीकडून होणारे असते तर मला तुमची आवश्यकता भासली नसती, पण हे कार्य तुमच्या माध्यमातून व्हायचे आहे. तुम्ही सर्व लोक सहजयोगाचे माध्यम आहात. तुम्ही सर्व जितके स्वच्छ रहाल तितके तुम्ही सहजयोगासाठी उपयुक्त असाल. हे तुमच्या गहनतेवर अवलंबून आहे आणि ही गहनता तुमच्यात कशी येणार ? तर गहनता येण्यासाठी श्रद्धा पाहिजे, समर्पणाची भावना पाहिजे. जर आपल्याला मोती पाहिजे असेल तर समुद्रात खोलवर जावे लागते. यासाठी गहनतेत उतरा. आता हेच बघा. जे पाश्च्यात्य लोक इथे येणार होते त्यांना तिकिटासाठी अर्धेच पैसे लागले आणि त्यांनी श्रद्धापूर्वक बँकॉकला जाण्याची इच्छा करताच त्यांना त्याच तिकिटावर बँकॉकला जाण्याची परवानगी मिळाली. गहनतेत उतरल्याने सगळ्या गोष्टी विनासायास प्राप्त होतात. यासाठी गहनतेत उतरा. त्याशिवाय कोणताही फायदा होणार नाही. २१ जात अर्थात मनुष्याची प्रवृत्ती हिंद धर्मात असे मानले जाते की प्रत्येक मनुष्याच्या हृदयात परमेश्वराचे प्रतिबिंब हे आत्म्याच्या रूपात आहे. जर हे असे आहे तर आपण हिंदू समाजाला कशा प्रकारे वेगवेगळ्या जातींमध्ये वाटतो आहोत ? भारतीय संस्कृतीच्या सुरुवातीच्या हजारों वर्षांत मनुष्याच्या स्वभावानुसार त्याची जात ठरवली जायची. 'जात' म्हणजे मनुष्याची प्रवृत्ती. परमेश्वराला प्राप्त करण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे ते लोक 'ब्राह्मण' समजले जात होते. या लोकांना पूर्णपणे पवित्र तसेच संपत्ती व सत्तेपासून दूर रहावे लागायचे. सत्ताधारी लोकांना 'क्षत्रीय' म्हटले जात होते. हे लोक अबोध, धार्मिक तसेच गरीब, दुःखी लोकांच्या सुरक्षेसाठी जिम्मेदार होते. व्यापार तसेच धन कमविणारे लोक 'वैश्य' समजले जात. चौथ्या प्रकारच्या लोकांना 'क्षुद्र' म्हटले जात होते. म्हणजेच खालच्या स्तरातील लोक, जे आपल्या तुच्छ सेवेद्वारे या लोकांची सेवा करून धन मिळवत होते. या जाती जन्मामुळे नसून व्यक्तीच्या प्रवृत्तीनुसार होत असत. प.पू.श्रीमाताजी, २१.३.१९९८ २२ NEW RELEASES ऑडियो-व्हिडियो Title Date Place Lang. Type DVD VCD ACD ACS आपण धर्म ओळखला पाहिजे 19th Jan.1979 600 Kalwa M Sp - th 601* हमारा क्या कार्य है 16" Jan. 1979 Boriwali H/M Sp 21* Mar.1979 जन्मदिवस समारोह - आपके हृदय के अन्दर st Mumbai 265 Sp 265 Н आत्मा का स्थान हो 602 Navaratri Celebration : कुंडलिनी आणि श्री गणेश Dadar 22" Sep.1979 Sp M th 26" Sep.1979 गुरु तत्व और श्रीकृष्ण शक्ति Mumbai Sp 293 293 Н 30th Jan.1980 Seminar For New Sahajyogis : H a 603* Sp Mumbai Н विशेष गोष्टीसाठी ही वेळ आलेली आहे 3dFeb.1982 604* Rahuri Sp सहजयोग आणि कुण्डलिनीची जागृती 8t Mar. 1984 392 Phaltan Pp th * 12"Mar.1989 | सत्य आत्मा के प्रकाश में ही जाना जा सकता है। 393 Noida 408 408 Н Pp परमात्मा को याद करने से ही काम हो जाते हैं 14"Mar.1989 605* 14" Mar.1989 104 Noida Н Pp st 1* Jan.2003 Vaitarna Е/Н/M Gen. Inauguration of Vaitarna Academy 394 प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in की की Happy Rirtliday H.H. Shri Mataji एकच गोष्ट मला आनंद देऊ शकते तुमच्यावर केले तसंच प्रेम तुम्ही दु-्यांवर क. आणि ती म्हणजे जसं फ्रेम मी प.पू.श्रीमाताजी ---------------------- 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-0.txt च तन्य लहरी मराठी मार्च-एप्रिल २०१ भ १० े राम 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-1.txt तुम्हाला इतकेच ांगायचे आहे की हे जीवन तूमचे स्वत:चे आहे आणि तुम्हाला त्याचा पूर्णपणे उपयोग करयला पाहिजे, का२ण है जीवन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजपरयंत परमेश्वराने अनेक लोकांनी जंगात पाठविले आहे, त्याच का्याची ही फलशरुती होत आहे. आज त्याचे कार्याची आशी्वद म्हणून तुम्हा लौकांनी सहजयोग' मिळालेली आहे. प.पू.श्रीभाताजी, मुंबई, २.४.१९८५ या अंकात आपण धर्म औळखला पाहिजे ...४ शिव तत्त्वं बुद्धीच्या पलीकडे अाहे ...१४ ••. 18 अबौधितेचा आनंद उचलला पाहिजे ...१६ होळी तत्त्व ...१८ जात अरथात मनष्याची प्रवृत्ती ...२२ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-3.txt सा परमेश्वर आहे किंवा नाही त्याबद्दल आपण आजपर्यंत जे काही वाचत आलो होतो त्यात काही अर्थ आहे की उगीचच आपल्याला काहौतरी भुलवण्यासाठी लोकांनी हे गरंथ लिहिले आहेत, हे पडताळून पहाण्याची आणि त्याची पूर्णपणे प्रचिती घेण्याची ही वेळ आहे कारण ापण देवाच्या नावावर अनेक उपटसुंभ लोकच बघत असतो. ४ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-4.txt आपण धर्भ औळखला पाहिजे लंडनहन मुंबईला यायचं म्हणजे फार बरं वाटतं कारण लंडन फारच गजबजाटातलं आणखीन अत्यंत यांत्रिक शहर आहे आणि तिथल्या लोकांची एकंदर प्रवृत्तिसुद्धा यांत्रिक त्याहून बरं वाटतं. कारण शहरातून जी स्थिती लोकांच्या मनाची आणि श्रद्धेची होत आहे ती पाहून असं वाटतं की कुठूनतरी दोन-चार मंडळी खऱ्या श्रद्धेची असतील अशा ठिकाणी जावं. झालेली आहे. मग मुंबईहून कळव्याला यायचं की आमचा सहजयोग हा खेड्यापाड्यातून होणारा , शहरातून होणार नाही. हे मागे मी बोलले होते आणि त्याची प्रचिती आम्हाला येते. आता तुम्ही मुंबईच्या जरा जवळ असल्यामुळे थोडंबहुत शहराचं वातावरण आलं आहे तुमच्यात, पण तरीसुद्धा ह्या प्रसन्न, नैसर्गिक वातावरणात रहाणाऱ्या लोकांना परमेश्वराची जाणीव सतत असते. कळवा, मुंबई परमेश्वर आहे किंवा नाही त्याबद्दल आपण आजपर्यंत जे काही वाचत आलो होतो त्यात काही अर्थ आहे की उगीचच आपल्याला काहीतरी भुलवण्यासाठी लोकांनी हे ग्रंथ लिहिले आहेत, हे पडताळून पहाण्याची आणि त्याची पूर्णपणे प्रचिती घेण्याची ही वेळ आहे कारण आपण देवाच्या नावावर अनेक उपटसुंभ लोकच बघत असतो. देवळात गेलं की तुम्हाला पैसे द्यावे लागतात. दोन पैसे द्या तेव्हा तुम्ही जवळ राहणार.. एखादा श्रीमंत मनुष्य जर देवळात आला की लगेच पहिल्यांदा त्याच्या गळ्यात हार, सगळ्यात मोठा हार देवाचा त्याला घातला जातो. जसं काही देवालासुद्धा पैशाचं फार समजतं ! त्यातनं जर तो एखाद्या मोठ्या मोटारीतून आला तर १९.१.१९७९ त्याला आणखीनच फार जवळ समजलं जातं. पण देव हा भावाचा भुकेला आहे. त्याला पैसा, अडका आणि बाहेरची श्रीमंती समजत नाही. त्याला श्रद्धेची श्रीमंती ५ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-5.txt समजते. तो श्रद्धेचा भुकेला आहे आणि श्रद्धाच त्याला ओळखू शकते. आता श्रद्धेचा अर्थ म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. म्हणजे कोणी घरात आला, कोणी बुवा आला अंगाला फासून कुठलीही, कसलीही घाण आणि त्याने येऊन सुरू केलं की, 'मी फार मोठ्ठा गुरू आहे, अमकं आहे, तमकं आहे.' लगेच लोकांची डोकी त्याच्या पायावर अशी फुटतात जसे काही नारळ फुटावेत. आपल्या देशातले लोक फार भाविक आणि भोळे आहेत. पण धर्मभोळे असायला पाहिजे होते, नुसतं भोळं असून चालत नाही. धर्मभोळाचा अर्थ 'आपण धर्म ओळखला पाहिजे.' पहिल्यांदा आपण ओळखलं पाहिजे की कोणत्या माणसासमोर आपण आपली मान वाकवली पाहिजे. कोण खरा गुरू आहे आणि कोण खोटा? प्रत्येक रस्त्यावरचा मनुष्य गुरू असू शकत नाही. कदाचित तो आपल्याहीपेक्षा खालच्या दर्जाचा मनुष्य असेल. जो मनुष्य दूसर्यांच्या पैशावर उपजिविका करतो, तो मनुष्य धर्मगुरू किंवा धर्माशी संबंधित असू शकत नाही. अहो , तुम्हीसुद्धा थोडेसे पैसे जरी कमावले तरीसुद्धा आपल्या स्वत:च्या पायावर उभे आहात. तुम्हालासुद्धा इतकं स्वत:बद्दल वाटतं की, 'आम्ही कुणावरती असं अवलंबून राहणार नाही.' मग ही मंडळी अशाप्रकारे तुमच्या पैशांवर जिवंत राहतात, ती मंडळी तुम्ही जाणलं पाहिजे की कुठलेतरी उपटसुंभ आणि अत्यंत हलक्या दर्जाचे आहेत. ते तुमच्याजवळून पैसे घेतात आणि तुमच्या जीवावरती राहतात. अशा हलक्या लोकांना गुरू मानणं किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं की, 'आम्ही फार मोठे गुरू आहोत. आम्ही हे करतो, ते करतो, मोठ्यामोठ्या गोष्टी केल्या' आणि तुम्हाला जर त्यांनी भुलवलं तर ते आपल्या देशातले लोक फार भाविक आणि भोळे आहेत, लक्षात आलं पाहिजे की हा मनुष्य मुळीच धार्मिक असू शकत नाही. पण दूसरं असं आहे की धार्मिक माणसाबद्दल किंवा अशा संन्यासी लोकांबद्दल असं म्हटलेलं आहे की त्याला गावात मुळीच रहायला द्यायला नाही पाहिजे. जे संसारी लोक आहेत त्यांनीच गावात आलं पाहिजे. सीतेने एक वाल्मिकी रामायणात सांगितले आहे की कोणताही संन्यासी दारात आला तर त्याला दारात ठेवायचं! त्याने गावात राहिलं नाही पाहिजे. गावाच्या वेशीबाहेर त्याने राहिलं पाहिजे आणि ते ही एकच रात्र. गावाशी संबंध जर संन्यासाचा आला तर तो मग सन्यासी कसला! हे तिने, रावणाने तिला जेव्हा लुबाडलं होतं तेव्हा ते लक्षात ठेवून त्याचे वर्णन केलेले आहे की जे लोक असे कपडे घालून तुमच्यासमोर उभे राहतात ते खरोखर म्हणजे तुम्हाला लुबाडण्यासाठी संन्यास घेऊन आलेले आहेत. खरं पाहिलं तर असे कपडे घालायची गरज काय ? जो मनुष्य आतून पूर्णपणे संन्यस्त भावाचा आहे त्याला कशाचीच वाण नाही, जो आपल्यामध्ये मस्त बादशाह आहे, त्याला काय गरज आहे असे कपडे घालून फिरायची आणि तुम्हाला फसवण्याची! पण माणसामध्ये उपजतच ही बुद्धी असते की परमेश्वर म्हणून कोणीतरी आहे. धर्मभोळे असायला पाहिजे होते विशेषत: खेड्यातल्या लोकांना निसर्गाची एवढी सवय झालेली असते, रोज त्यांचा संबंध निसर्गाशी आहे. पाऊस आला तर शेती होणार! जर शेती चांगली नाही झाली, जर ६ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-6.txt जोपर्यंत आपल्याला आत्म्याची शक्ती मिळत नाही, डोळे उघडत नाहीत, तोपर्यंत आपण परमेश्वराला ओळखू शकत नाही. जमीन चांगली नसली तर त्याला ते म्हणतात पृथ्वी आमच्यावर रागावलेली आहे. जर कुठे एकदम आग लागली तर ते म्हणतात की आगीचा आमच्यावरती कोप झालेला आहे, देवीचा आमच्यावर कोप झालेला आहे. घरात जर कोणत्याही रोगाची साथ आली तरी ते म्हणतात की कोणत्या तरी कोपाने हे आम्हाला सगळे भोगावं लागत आहे. अशा परिस्थितीत मनुष्याला निसर्गावरती विश्वास आहे आणि निसर्ग म्हणजे परमेश्वर असं समजून तो परमेश्वराची पूजा करू लागला. परमेश्वराची जाणीव असणं हे अत्यंत मोठं असलं तरीसुद्धा परमेश्वर आपण बनवू शकत नाही. परमेश्वर आहे, तसाच आहे, त्याला आपण म्हणायचं की 'आम्ही परमेश्वराला अस घडवू, तो आहे. फक्त परमेश्वर म्हणजे असा,' तशी गोष्ट नाही. जसा परमेश्वर आहे तसाच आपण काय करू शकतो की परमेश्वराच्या ध्यानात जर बसलं आणि परमेश्वराला जर पाचारण केलं तर तो जसा आपल्या समोर येऊन ठाकेल तसं आपण त्याला ओळखता आलं पाहिजे. ही मात्र सुबुद्धी तुमच्यात यायला पाहिजे आणि ती तुमच्यात जाणीव यायला पाहिजे आणि ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इतकंच आहे, पण ते तुम्हाला जाणवलं पाहिजे. त्यासाठी काय करण्यासारखं आहे ? काय करावं लागेल? आता मला जर तुम्हाला बघायचं असलं तर मला डोळे उघडावे लागतात. ह्या डोळ्यांनी मला बघावं लागतं की तुम्ही कोण? कुठून आलात? तुम्हाला विचारावं लागतं. तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात की तुम्ही कुठे राहता ? तुमचं गाव कोणतं ? मी तुम्हाला ओळखते ह्या डोळ्यांमुळे. जर माझे डोळेच उघडे नसते तर मी तुम्हाला ओळखलं नसतं. परमेश्वराला बघण्यासाठी आपल्यामध्ये दुसरे डोळेदेखील आहेत त्याला 'आत्मा म्हणतात. ह्या आत्म्याचे जोपर्यंत डोळे उघडत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराला बघू शकत नाही, ओळखू शकत नाही. आत्मा जोपर्यंत आपल्यामध्ये जागृत होत नाही, त्याची ज्योत जोपर्यंत आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत आपण जो परमेश्वर मानतो त्याचेच काहीतरी फोटो पहाणार. त्याच्यामध्ये खरेपणा एवढा राहत नाही. किंवा असं म्हणता येईल की परमेश्वराचं पूर्ण ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. थोडसं होतं. जसं जरासा कोणी आंधळा असला की त्याला थोडसं दिसतं तसंच आहे. म्हणून पूर्णपणे जोपर्यंत आपले डोळे उघडत नाहीत, जोपर्यंत आपल्याला आत्म्याची शक्ती मिळत नाही, डोळे उघडत नाहीत, तोपर्यंत परमेश्वराला आपण ओळखू शकत नाही. पण आपल्याला असं वाटतं की आपण देव्हाऱ्यात देव ठेवला, आपला परमेश्वर आहे. ह्याला भजत गेलं की झालं! पण तो आपण तिथे बसवल्यानंतर आपलं हाच ७ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-7.txt वागणं कसं असतं! आपण खून करू किंवा मारामाऱ्या करू किंवा काहीही करू तरी आपल्याला वाटतं की परमेश्वर हा आपलाच आहे. कारण तो आपल्या देव्हाऱ्यात आहे. जाऊन त्याला परत काहीतरी दिलं की झालं! मग कोणाला काही वाटत नाही की 'मी खोटं बोललो, मी चोऱ्या केल्या, मी मारामाऱ्या केल्या, मी दुसऱ्यांचं वाईट केलं आहे.' आणि 'आता काही तरी माझ्या हातून वाईट घडलेले आहे,' असा विचारच मनात येत नाही कारण परमेश्वर हा देव्हाऱ्यात आपण बसवलेला आहे ना ! त्याची आरती केली की झालं. पुढचं काही बघायला नको. तो काही उठून आपल्याला मारत नाही. तेव्हा असा सोयीस्कर परमेश्वर आपल्याला आवडतो. पण त्याने आपली काही सोय होत नाही. आपली स्वत:ची काहीच सोय होत नाही त्याने. आपल्या धर्माची काही सोय होत नाही. फक्त या संसारात रहाण्याची सोय होते कशीबशी. मग नंतर ते ही पुढे येऊन उभं राहतं. तेही संकट आपल्यापुढे येऊन उभं राहतं. आता मनुष्याला, विशेषतः आजार वगैरे आला की परमेश्वर आठवतो. जेव्हा अगदी सुखात असेल तेव्हा एवढा आठवत नाही, पण आजारात असं वाटतं की, 'माझं काही तरी चुकलं असेल बुवा! मला आजार कसा आला? काहीतरी मी कुपथ्य केलं.' मानसिक रोग जडले तेव्हा ही असा विचार येतो, हार्टचा त्रास झालां, की विचार येतो, 'काय झालं माताजी? आमचं काय चुकलं? आम्हाला रोग का आला?' खरोखर म्हणजे इतकी काही जाणूनबुजून चूक केलेली नाही. पण तरीसुद्धा आंधळेपणा हा आहे. कारण जर तुमचा आत्मा उघडलेला नाही तर तुम्ही आंधळेच आहात. परमेश्वराबद्दल, धर्माबद्दल तुम्ही काय जर तुमचा आत्मा उघडलेला नाही जाणता? जे काही जाणता ते सगळे अर्धवटच आहे. म्हणूनच अशी व्यवस्था करायला हवी की ज्याने आपल्याला आपल्या आत्म्याचं दर्शन होतं. तर तुम्ही आंधळेच ही व्यवस्था कोण करणार? आपण करू शकतो का? ह्या डोळ्यांची व्यवस्था आपण केलेली आहे का ? हे डोळे कोणी दिले आपल्याला? परमेश्वराने दिले आहेत का? हे नाक किंवा हे तोंड किंवा हे शरीर हे सगळं काही परमेश्वराने दिले आहे. तुम्ही मिळवलेले आहे का? तुम्ही काय केलं माणूस होण्यासाठी ? जनावरापासून तुम्ही मानव झाले ते कसे झाले? तुम्ही त्यासाठी काय केलं? तेव्हा परमेश्वरासाठी जे आपल्याला डोळे पाहिजेत, जी आपल्याला आत्म्याची ओळख पाहिजे ते सुद्धा परमेश्वरालाच आहात. करायला हवं. आपण त्याबाबतीत काय करणार? सकाळपासून संध्याकाळपर्यंत उड्या मारून किंवा देवाचं नाव घेऊन किंवा देवाच्या आरत्या, पूजा करून हे होणार नाही. आधी परमेश्वराला ओळखून घेतल्यावर त्याच्या आरतीला काही अर्थ आहे, पूजेला काही अर्थ आहे. पण जर दिसतच नाही की परमेश्वर आहे की दगड आहे की धोंडा आहे तर आपल्याला काय करून फायदा होणार आहे? म्हणून आधी आत्मा हा ओळखला पाहिजे. आत्मा ओळखल्याशिवाय काहीही जमत नाही. जोपर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही, जोपर्यंत हा विचार तुमच्या मनात बसणार नाही, तोपर्यंत तुम्हाला माझी गोष्ट आवडणार नाही. आता हा आत्मा कसा उघडायचा? 'माताजी कसं करायचं?' मी ८ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-8.txt ्य म आधीच सांगितलं आहे की त्याबद्दल तुम्ही काहीही करू शकत नाही. हे परमेश्वराचं करणं आहे, देणं आहे. त्यानेच आम्हाला शरीर दिलं आहे. तोच आम्हाला डोळे देणार. तोच आम्हाला आत्म्याचं दर्शन देणारं. आणि तो देतो. त्याची वेळ यावी लागते. उद्या एखाद्या फुलाला काळजी पडली की माझं फळ होईल की नाही? कसं होणार? काय होणार? त्याने काय फायदा आहे ? जेव्हा त्याचं फळ होणार आहे तेव्हा आपोआपच फळ होईल. तसंच तुम्हाला जेव्हा आत्म्याचं दर्शन व्हायचं असेल तेव्हाच ते व्यवस्थित, वेळेवर होणार आहे आणि होणार. हजारो मंडळी सहजयोगाने पार झालेली आहेत. त्यांच्या आत्म्याचे त्यांना दर्शन झालेले आहे. त्यांच्यातून त्यांचा आत्मा बोलू लागला. पार झाल्याशिवाय किंवा परमेश्वराचे दर्शन, त्याला आपण म्हणतो की आत्म्याचं दर्शन, आत्मसाक्षात्कार, ते झाल्याशिवाय तुम्हाला परमेश्वराशी बोलतासुद्धा येणार नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण रामाचं नाव घेत बसतो, पण राम कुठे आहे ? रामाचं नाव घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे का ? तुम्ही घेऊ शकता का परमेश्वराचे नाव प्रत्येकजण ? आता आम्ही म्हटलं , आम्ही प्राइम मिनिस्टरचं नाव घेतो तर काय उपयोग ? ते काय धावून येणार आहेत! ते काय तुमचे नोकर आहेत ? परमेश्वराचे नाव घ्यायला तो काय आपला नोकर नाहीये ! त्याच्याशी काहीतरी संबंध झाला पाहिजे. पहिल्यांदा विचारणा केली पाहिजे. त्याच्याशी आपला संबंध जोडला पाहिजे. तेव्हा मग जसे आपण प्राइम मिनिस्टरकडे जातांना परवानगी घेऊन जातो, त्याचप्रमाणे तुम्हालाही आधी परवानगी घेतली पाहिजे. परमेश्वराशी जोडले गेले पाहिजे. जर संबंध परमेश्वराशी जोडला गेला नाही आणि त्याची तुम्हाला परवानगी मिळाली नाही, आणि जर तुम्ही तुमचा त्याच्या दाराशी जाऊन त्याचे नाव जोरजोराने घ्यायला सुरुवात केली तर त्याचे पोलीसवाले तुम्हाला धरतील की, 'अहो, कोणत्या हक्काने आलात तुम्ही इथे? कशाला परमेश्वराला त्रास देता?' म्हणून आधी आपल्या आत्म्याचे दर्शन घ्या. आत्म्याला जाणून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या हातातच मुळी परमेश्वराची शक्ती वाह लागेल. मग त्या शक्तीला प्रश्न विचारायचा की, 'परमेश्वर आहे की नाही?' तुम्हाला ९ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-9.txt आश्चर्य वाटेल की जेव्हा ही शक्ती वाह लागते, असा मोठा प्रश्न विचारल्याबरोबर जोरात ही शक्ती सांगते 'हो, आहे.' हातात अशी झणझण झणझण वाहू लागतात. कोणतेही असे प्रश्न विचारले तर ती शक्ती तुम्हाला उत्तर देते. म्हणजेच तुमच्या लक्षात येतं की ही शक्ती जी सगळीकडे, सर्वव्यापी सर्वव्यापी शक्ती म्हणतात, जगामध्ये, असं म्हणतात की परमेश्वराशिवाय पानसुद्धा हलत नाही, ती गोष्ट अगदी खरी आहे. कारण आत्म्याच्या दर्शनानंतरच त्या शक्तीचं दर्शन होतं. आणि तुम्ही ती शक्ती ओळखता आणि तिला पहाता आणि आपल्या हातातून ती वाहू लागते. तिला पूर्णपणे तुम्ही गती देऊ शकता. जेव्हा ही शक्ती तुमच्या हातून वाहू लागते तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची मानसिक स्थिती, तुमची शारीरिक स्थिती एकदम ठीक होऊन जाते. सहजयोगात फारच कमी मंडळी डॉक्टरकडे जातात. सगळ्यांच्या तब्येती अगदी उत्तम होऊन जातात. मानसिक त्रास असतील ते ही ठीक होतात. इतकंच नव्हे तर घराचीसुद्धा परिस्थिती सुधारते. प्रत्येक दृष्टीने परिस्थिती सुधारलीच पाहिजे. तुमच्यात जर परमेश्वराला यायचं झालं आता समजा आम्हाला उद्या इथे यायचे आहे, पाटीलांच्या घरी. तर पाटील आमच्या स्वागतार्थ सगळं स्वच्छ करतील, व्यवस्थित करतील घराला. तसच आहे. तुमच्यात जर परमेश्वराला यायचं झालं तर तुमचं जे शरीर आहे, तुमचं जे मन आहे, तुमची बुद्धी आहे ती सगळी स्वच्छ केली पाहिजे. ती स्वच्छ झाल्यावरच त्याच्यात परमेश्वर येऊ शकतो. आणि ह्याच कारणामुळे पुष्कळ लोकांचे अनेक रोग बरे झाले. पुष्कळ तसले लोक आम्ही बरे केलेले आहेत आणि करतो, पण असे नाही की आम्ही रोगच बरे करतो. जर तुम्हाला परमेश्वराचं दर्शन झालं किंवा तुमच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश पसरला तर आपोआपच जो काही अंधार असेल, मग तो शारीरिक असो, मानसिक असो किंवा धार्मिक असो कोणताही अंध:कार असला तर तो दूर होणारच. तर तुमचं जे शरीर आहे, तुमचं जे मन आहे, आपोआपच दूर होतो. तुम्ही म्हणाल, 'कसा ?' तर आता हा दिवा लावल्याबरोबर तुमची बुद्धी आहे ती इथला अंधार कुठे गेला? तसच तुमच्यातसुद्धा घडतं आणि म्हणून सहजयोगामध्ये माणसाची सर्वत-्हेने उन्नती होते. इतकेच नव्हे तर तो सामूहिक चेतनेला पात्र होतो. हा कठीण शब्द आहे पण अत्यंत सरळ आहे. आपल्या सर्वांच्यामधून एक शक्ती धावत आहे. सगळ्यांच्यामध्ये एक शक्ती आहे. त्या शक्तीला जाणल्याबरोबर तुम्ही सगळे एक असता, हे आतून व्हायला लागतं. म्हणजे हातावर तुम्हाला कळतं की हा मनुष्य कुठे आहे? ह्याला कुठे त्रास आहे? तसच मला कुठे त्रास आहे कारण आत्मदर्शन झाल्यामुळे स्वत:शीच 'स्व-दर्शन' होणार. त्या दोन्हीही गोष्टी घडतात, पण याला काही फार बुद्धी नको. काही पैसा नको. काही डोकं नको इकडे. मनुष्य आहात ना ! जनावर नाही म्हणजे झालं! तुमच्यात जास्ती ज्यांच्याजवळ बुद्धी आहे, ज्यांच्याजवळ अती पैसा आहे त्यांना कधी हे होत नाही. साधारण मध्यम स्थितीतल्या लोकांना होतं. जे मध्यम डोक्याचे आहेत. आता गरीब असले, फारच गरीब असले, अगदी ज्यांना खायला-प्यायलासुद्धा नाही त्यांना व्हायचं नाही कारण त्यांना रात्रं - दिवस चिंता आहे. ह्याची चोरी करतील, सगळी स्वच्छ केली पाहिजे. १० 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-10.txt जिथे जिथे सहजयोगाचं सेंटर आहै तिथे तिथे परमेश्वराचा वास आहे. त्याची चोरी करतील, मला आज खायला नाही आत्ता काय ? बरोबरच आहे. त्यांची स्थिती तशीच आहे. पण एकदा असे मध्यम स्थितीतले लोक ह्या ह्याला आल्याबरोबर सबंध समाजच्या समाजच मुळी सुधारतो आणि सगळ्यांना सुबत्ता लाभते. कारण लक्ष्मीचंसुद्धा वरदान ह्याच्यात खूप जोरात आहे. आता सगळ्यांना ही काळजी की, 'माताजी आमचं कसं भलं होईल ? आमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल? किंवा इतर प्रश्न आम्हाला जे आहेत ते कसे सुटतील? त्याचं कसं काय होणार आहे ? आम्ही ह्या सर्व प्रश्नांना कसं उत्तर शोधून काढू?' तर ते सांगायचं म्हणजे असं की इथे , तुमच्या इथे सहजयोगाचं सेंटर आहे. जिथे जिथे सहजयोगाचं सेंटर आहे तिथे तिथे परमेश्वराचा वास आहे. जर तुम्ही ह्या सेंटरला आलात तर ह्या सेंटरमध्येच तुमचे प्रश्न सुटतील. घरी बसून सुटणार नाहीत. पुष्कळसे सहजयोगी असे असतात की, 'आम्ही पार झालो. आता आम्ही घरी बसून आमचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे.' प्रश्न सोडवण्याचा दवाखाना आहे हा! ह्या दवाखान्यात तुम्ही प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला जेव्हाही प्रोग्रॅम असतात तेव्हा तुम्ही आलात आणि हा प्रश्न जर तुम्ही टाकलात तर आत्मदर्शनानंतर सगळे प्रश्न आपोआप सुटतील. त्याचं एक उदाहरण मी सांगते तुम्हाला. किती सोपं उदाहरण आहे! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असं घडतं, अनेकदा. अनेकदा असं झालेलं आहे आणि इतकी अशी उदाहरणं आहेत. अनंत उदाहरणं आहेत की नुसतं अनुसंधानच आहे किंवा अंदाजेच बोलताहेत किंवा कदाचित झालं असेल म्हणून झालं असेल अशा रीतीच्या कल्पनाच करू शकत नाही. आम्ही लंडनला असतांना एक मुलगा, अर्जेरीयाचा मुसलमान होता, तर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, 'सहा महिन्यापासून माताजी मी इथे प्रयत्न करतोय. मला स्कॉलरशिप मिळत नाही. आणि आता अगदी शेवटची वेळ आली आहे. मी आता जातो परत म्हणून.' तो पार झालेला होता. म्हटलं, 'कधी जातो आहेस?' म्हणे, 'मी गुरुवारी जातोय. मी ता गुरुवारी जातो.' तर मी म्हटलं की, 'तू मंगळवारी का नाही जात ? गुरुवारी जातोयस पण आता मंगळवारी जा.' तो म्हणाला, 'बरं, तुम्ही म्हणता तर मंगळवारी जातो.' सोमवारी तो कॉलेजला गेला आणि पाटीवर त्याचं नाव पहिल्यांदा लिहिलेलं होतं की, 'तुला स्कॉलरशिप मिळाली.' हे एक उदाहरणार्थ मी सांगितलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. तुमच्या मुंबईलासुद्धा जेवढी सहजयोगी मंडळी आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं तर प्रत्येकजण एक- एक ग्रंथ सांगेल. एक उदाहरणार्थ मी सांगितलं. असे अनेक प्रश्न आहेत. सहजच सुटतात. ११ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-11.txt अत्यंत सहजच सुटतात. आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला सेंटरवर यायला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे जिथे चार माणसं परमेश्वराची आठवण करतात, तिथेच परमेश्वर असणार. तुम्ही म्हणाल, 'नाही, माताजी तुम्ही माझ्या घरी या. माझ्या घरी जे काही आहे ते...' तुमचं घर कोणतं ? तुम्ही जर आमचं-आमचं करत बसले तर परमेश्वर मुळीच येणार नाही कारण तुम्ही सामूहिक चेतनेत आहात. सर्वजण मिळून इथे परमेश्वराची आठवण करतात. इथेच परमेश्वर आहे. एकटा तुमच्यापुरता परमेश्वर नाही. मला येऊन ऑर्डरसुद्धा देतात, 'माताजी, बघा! मला नोकरी मिळालीच पाहिजे. माझ्या मुलाचं सगळं शिक्षण झालंच पाहिजे.' नंतर 'माझ्या मुलीचं लग्न झालंच पाहिजे.' नंतर 'आमचं घर बांधून निघालंच पाहिजे.' हे झालंच पाहिजे आणि ते झालंच पाहिजे. तर म्हटलं, 'का बुवा?' 'मी मुद्दामून आलो तुमच्याकडे म्हणून.' जसं काही हे दुकान मांडलेलं आहे परमेश्वराचं! तिथे तुम्ही येऊन काही म्हटलं तर हे बघा एवढं एवढं तुम्ही आम्हाला हे द्या. इतक्या पैशाचं हे, इतक्या पैशाचं हे, इतक्या पैशाचं हे.. काही दुकानात जावं तसं आपण हे मागतो. उलट असं म्हणायचं की जे काही आमचं हे आहे, परमेश्वरा , .तूच बघ! फक्त तू आम्हाला हवा. एकदा तू आम्हाला मिळालास की आम्हाला काही नको. असं म्हटल्याबरोबर सगळे प्रश्न सुटतात. आणि ते प्रश्न परमेश्वराला अगदी काहीही मुश्किल नाही. त्यांना काहीही कठीण नाही. परमेश्वर ते कार्य करतो. आतापर्यंत सगळे हे असं म्हणत होते की परमेश्वर कार्य करतो, असं होतं , तसं होतं. पुष्कळ लोकांनी मला सांगितलं, 'आम्ही माताजी, वारकरी बनून आम्ही तिकडे गेलो. विठ्ठलाबरोबर एवढं म्हटलं, हे कर, ते कर. आमचं काही झालं नाही. परमेश्वराने आमचं कार्य केलं नाही.' पण आता तशी वेळ नाही. तुमचे जर आत्मदर्शन झालं नव्हतं, तर तुम्हाला तिथे जाण्याचा परवाना नव्हता. परमेश्वराकडे मागण्याचा परवाना नव्हता. आता आत्मदर्शन झाल्यावर तुम्ही बघा तुम्हाला केवढी शक्ती येते. तुम्ही कोण आहात, ते बघा. त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोणतीही गोष्ट तुम्ही जरी म्हटली तरी ती होणारच. कारण तुमच्यावर देवदूतांचं राज्य आहे. तुमच्यावरती गणेशासारखे आणखीन हनुमानासारखे तसेच भैरवासारखे लोक उभे आहेत. आणि तुमचं कार्य करण्यासाठी पूर्णपणे संपन्न आहेत. पण त्याची आपण प्रचिती मिळाल्याशिवाय , नुसतं एखाद्या बुवाने प्रवचन द्यावं तसा हा प्रकार नव्हे. मी इथे बसून काही तुम्हाला प्रवचन देत नाही. पण जे खरं आहे ते साक्षात करण्यासाठी इथे आलेली आहे. खेडोपाडी लोक सरळ असतात, साधे असतात आणि त्यांच्याजवळ एवढे पैसेही नसतात, म्हणूनच कदाचित त्यांना परमेश्वर जास्त समजतो. ओळखताही येतो. खरा मनुष्य कोण आहे हे एखाद्या खेडेगावातल्या माणसाला चांगलं ओळखता येतं. एवढं शहरातल्या माणसाला ओळखायचे आहे अजून. बहुतेक जेवढे महागुंड , अगदी महाप्रसिद्ध, महाघाणेरडे गुरू लोक आहेत ते सगळे शहरातच आहेत. त्यांना खेड्यापाड्यात येण्याची सोय नाही आणि आवडही नाही. कारण इथे येऊन पैसे कमावता येत नाही नां ! त्यांना काही प्रेम नकोय. त्यांना पैसे हवेत. त्यातले आपले एखादे, त्यांच्यातील वाचलेले दोन चार, असे शहरात काही मिळालं नाही मग ते येतात इकडे भटकत. तेव्हा तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत. तुम्हाला देवाने अशा निसर्गरम्य १२ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-12.txt स्थानी आणलेले आहे, त्याला काहीतरी कारणं असली पाहिजेत. त्यातलं मुख्य कारण हे आहे की परमेश्वर हा काय आहे हे तुम्ही जाणलं तर तुम्ही ते उत्तम तऱ्हेने आपल्यामध्ये बिंबवू शकता. तितके एक शहरातला मनुष्य नाही करू शकत. जितकं तुम्हाला हे जमेल तितकं त्यांना हे जमणार नाही. कारण शहरातले जे काही व्यंदफंद आहेत ते तुम्ही शिकलेले नाहीत अजून. तुमच्यामध्ये या घाणेरड्या गोष्टी अजून आलेल्या नाहीत. अत्यंत घाणेरड्या गोष्टी आहेत ज्या शहरामध्ये चालू आहेत आणि ते सर्व लोकांनी शिकून ठेवलेले आहे. त्यांच्या मनाची स्थिती अशी आहे की त्यांच्यामध्ये कोणतंही बी लावायचं म्हणजे फार त्रास होतो. सांगायचं म्हणजे लंडनला मला जर कोणी म्हटलं, तर काम करून मला अगदी कंटाळा येतो. थकवा येऊन जातो. आता दिसायला मोठे छान-छोकी, चांगले कपडे घातलेले, गोरे-गोमटे लोक असतात तिथे, पण आतून इतकी घाण असते त्यांच्यात की मेहनतच करवत नाही. उलट कोणी जर म्हटलं की, 'माताजी, तुम्ही कळव्याला येऊन काम करा.' तर मी अगदी तयार आहे. इथे एक जर तुम्ही झोपडी बांधली तर मी इथे येऊन रहायला तयार आहे. मला मजा वाटेल इथे. पण लंडनला मला जमत नाही. कारण फारच घाणेरडे लोक आहेत, आणि त्यांची स्थिती म्हणजे इतकी घाण आहे की त्या लोकांना दारातसुद्धा उभं करू नये. पण काय करता, 'आलीया भोगासी असावे सादर.' आमच्या साहेबांची नोकरी तिथे झाल्यामुळे आम्हाला तिथे जावं लागलं. आणि तिथल्या लोकांचा उद्धार करण्याची पाळी आल्यावर आम्ही कैक कार्य करत आहोत आणि बरेच इंग्लिश लोक झाले आहेत पार. पण तुमच्या पायाची धूळ त्यांना नाही. एकवेळ श्रद्धा आहे पण तुमचा हा भोळेपणा त्यांच्यात मुळीच नाही. तेव्हा त्यांच्याकडून काहीच शिकण्यासारखं नाहीये. तुम्हाला वाटतं त्यांच्याजवळ दोन-चार कपडे जास्त असले किंवा मोटारी असल्या म्हणजे फार आरामात आहेत; असं मुळीच नाही. अत्यंत दुःखी लोक आहेत आणि सहा माणसात एक मनुष्य तिथे आत्महत्या करतो आणि दहा माणसात सात माणसांची लग्न मोडतात, असे प्रकार आहेत. तेव्हा अशा देशामध्ये काही धर्म असू शकेल असं वाटतच नाही मुळी. त्या देशामध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई-बाप पाडून टाकतात. म्हणजे चांगली मुलं असतात त्यांना मारून टाकतात जीवानिशी. आई स्वत: मारून टाकते गळा घोटून. असं ऐकले आहे का तुम्ही? प्रत्येक आठवड्याला. आपल्याकडे आई म्हणजे मुलावर एवढा जीव टाकेल आणि तिथे हे असे रानटी लोक आहेत. अगदी रानटी. यांत्रिक झालेले आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही भावना नाही. तेव्हा त्यांच्यासारखं होण्याचा काहीच प्रयत्न करू नये. आपल्या देशाची जी अत्यंत जुनी संपदा आहे, ती प्रेमाची जी आहे, ज्याचे आपल्याकडे महत्त्व आहे, ते ठेवले पाहिजे. कारण परमेश्वराची जी शक्ती, ती ही प्रेमशक्ती आहे आणि तो प्रेमाचा भुकेला आहे. राखून म्हणून प्रेमाचंच स्मरण केलं पाहिजे आणि प्रेमात राहिले पाहिजे आणि प्रेमाचीच मजा उचलली पाहिजे. आता मी इथे अनेकदा आलेली आहे, पण ह्यावेळेला मला फारच आनंद झाला. माझा पूर्ण आशीर्वाद ह्या कळव्याला आहे आणि तुम्हा सर्वांना आहे. देव कृपेने एके दिवशी ही जागा फार मोठी होईल आणि तुमच्या मुलाबाळांचं फार भलं होईल, धार्मिकरीत्या. सगळ्यांना आशीर्वाद! १३ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-13.txt र हा न ० शिव तत्त्व बुद्धीच्या पलीकडे आहे १४ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-14.txt मानवाचे अंतिम लक्ष्य हेच असावे की त्याने शिव तत्त्व प्राप्त करावे. शिव तत्त्व बुद्धीच्या पलीकडे आहे. ते फक्त बुद्धीने समजू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला आत्मसाक्षात्कार होत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आत्म्याला ओळखले नाही, स्वत:ला ओळखले नाही, तोपर्यंत तुम्ही शिव तत्त्वाला जाणू शकत नाही. श्री शिवाच्या अवडंबर, आंधळेपणा आणि अंधश्रद्धा पसरली आहे. परंतु जो मनुष्य नावाने खूप आत्मसाक्षात्कारी नाही तो शिवजीला समजूच शकत नाही. कारण त्यांना समजण्यासाठी सर्वप्रथम मनुष्याला अशा स्थितीपर्यंत पोहोचायला पाहिजे जिथे सर्व महान तत्त्व आपणहूनच स्थापित झाले पाहिजे. श्री शिवासाठी असे म्हटले जाते की ते भोळेशंकर आहेत. आजकाल जगात खूप बुद्धिमान लोक निर्माण झाले आहेत आणि ते आपल्या बुद्धीच्या आधारे काहीही उलटसुलट लिहीत असतात आणि नंतर म्हणतात, 'हे शिवजी तर भोळे आहेत.' त्यांचे भोळेपण ही बुद्धिवादी लोकांच्या दृष्टीने एकदम बेकार गोष्ट असेल तितका तो यशस्वी होतो. आहे. आजकाल मनुष्य जितका चलाख आणि चुस्त मग यांचा भोळेपणा कसा समजू शकेल? आजकाल तर लोक असा विचार करतात की जो मनुष्य भोळा असतो तो मूर्ख असतो. परंतु शिवजीचा भोळेपणा असा आहे की तिथे तेच सर्वकाही आहेत. समजा एखादा अतिश्रीमंत मनुष्य आहे आणि अचानक त्याला विरक्ती आली व त्याची सर्व संपत्ती इतर लोक घेऊन गेले आणि ते म्हणाले की, 'काय अजब भोळा मनुष्य आहे, ज्याची सर्व संपत्ती लोक घेऊन चालले आहेत आणि याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही.' परंतु जर तो संसारातूनच विरक्त झाला आहे तर त्याला त्या संपत्तीचे काय महत्त्व वाटणार! तो त्याच्या भोळेपणात बसला आहे आणि त्याची मजा लुटत आहे. जर गोष्टी आपल्या आपणच होत राहतात, सर्व काही ठरवल्यासारखे आहे तर त्यामध्ये श्री शिवाचा काय कार्यभाग असतो? ते भोळेपणात सर्व गोष्टी बघत असतात. ते साक्षी स्वरूप होऊन शक्तीचे कार्य बघत असतात. शक्तीनेच सर्व सृष्टीची रचना केली आहे आणि शक्तीनेच सगळ्या देवी-देवता बनवल्या आहेत आणि त्यांचे कार्य ठरवले आहे. हे सर्व घडलेले आहे आणि आता श्री शिवाचे काय काम आहे ? तर श्री शिवाला ह्याकडे लक्ष ठेवायचे आहे. आणि यामध्येच सर्वकाही येते. त्यांच्या भोळेपणाचा परिणाम असा होतो की त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल तो पार होतो. ज्याच्याकडे त्यांचे चित्त जाईल तो तरून जातो . त्यांना काही करण्याची जरूरीच नाही. हा सर्व खेळ आहे, जसे मुलांचे खेळ असतात. परमेश्वरासाठी हा सगळा एक खेळ आहे. प.पू.श्रीमाताजी, मुंबई, १९.२.१९९३ १५ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-15.txt अबोधितेचा 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-16.txt आनन्द उचलला पाहिजे निष्कपटता हा शिवाचा एक गुण आहे. बालकाप्रमाणेच ते अबोध आहेत. साकार अबोधिता आहे. आपल्याला आपल्या चिंता, विचार अबोधितेच्या समुद्रात बुडवून टाकायचे आहेत. अबोधितेला जाणून लक्षात घेऊन आनंद घ्यायला पाहिजे. पशु-पक्षी तसेच मुलं अबोध असतात. या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. रस्त्यावरून जातांना तुम्हाला काय बघितले पाहिजे? तुम्ही तुमची नजर पृथ्वीपासून केवळ तीन फूट उंच ठेवा. या उंचीवर तुम्हाला फूल, हिरवे गवत आणि लहान मुलं दिसतील. तीन फुटापेक्षा जास्त उंच असणाऱ्या लोकांना बघण्याची आवश्यकता नाही. जी व्यक्ती अबोध, निरागस नाही तिच्या फक्त पायापर्यंत तुम्ही बघू शकता, परंतु तिच्या डोळ्याकडे बघू नका. घेऊन, त्याचे महत्त्व मूलाधार अबोध आहे तसेच पवित्र धर्मपरायण आहे. हा श्री गणेशाचा गुण आहे. म्हणूनच या जगात राहतांना जरी तुम्ही लहान मूल नसलात तरी अजूनही त्याच्यासारखे अबोध आहात. प.पू.श्रीमाताजी, इटली, १७.२.१९९१ जसे एकदा श्रीकृष्णाच्या सोळा हजार आणि पाच बायकांना एका सुप्रसिद्ध महात्म्याला भेटायचे होते. परंतु जाण्याच्या रस्त्यावर असणाच्या नदीला पूर आलेला असल्यामुळे त्या ती पार करू शकल्या नाहीत. त्यांनी परत येऊन श्रीकृष्णांना नदी पार करण्याचा विधी विचारला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले की, 'नदीला जाऊन सांगा की जर श्रीकृष्ण योगेश्वर आहेत आणि ब्रह्मचारी ही, तर नदीचे पाणी ओसरू दे.' त्यांनी जाऊन नदीला असे सांगितल्यावर खरोखरच नदीचे पाणी कमी झाले. जरी तुम्ही जगात पती-पत्नी म्हणून राहत असलात तरी तुम्ही अबोध असू शकता. हेच पावित्र्याचे लक्षण आहे. १७ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-17.txt हळ तव TO १६/३/१९९५ आज होळी आहे आणि आजची होळी पहिल्यापेक्षा खूप वेगळी आहे. होळीचे तत्त्व समजून घेतले पाहिजे. होळीच्या दिवशी आपल्या अंतरंगातील दोष व घाण जाळून हृदय स्वच्छ केल्यावर जे प्रेम उफाळून येते, त्याच्या चैतन्याने सगळीकडे चैतन्यमय रंगाची उधळण झाल्याने सर्व लोक मस्त होऊन जातात. यासाठीच होळीच्या दिवशी सर्वप्रथम आपल्यामधील सर्व बाधा जाळून टाकल्या पाहिजेत. सहजयोगात राजकारण नसावे. संपूर्ण समाजातील लोकांवर राजकारणाची जी जबरदस्त पकड आहे त्यामुळे सहजयोगीही त्यामध्ये ओढले जात आहेत. एक व्यक्ती ज्याला सहजयोगाचे पूर्ण ज्ञान नाही, तो आपल्या अशाप्रकारच्या दोषी स्वभावामुळे इतरांना काही-बाही सांगतो, त्यामुळे इतरांवर त्याचा परिणाम होतो व ते ही अशा गोष्टी दुसर्या लोकांपर्यंत पोहोचवतात. जशी काही फ्ल्यू सारखी एखादी हवा पसरत आहे. हा एक आजार आहे. तो पसरतच जातो. पूर्वीच्या काळी स्त्रिया राजकारण करायच्या व पुरुष भांडायचे, परंतु हे आता उलट झाले आहे. कोणतीही व्यक्ती जिला प्रगती करायची आहे, त्याने अशा प्रकारच्या गोष्टीत अडकू नये. ार हा एक प्रकारचा पाशच आहे. मला सर्व दिसत असते. मी काही बोलत नाही, परंतु मला सगळे माहीत आहे. सहजयोग्यांमध्ये आपापसात वैर नसावे. एखाद्या गोष्टीच्या मोहापायी असे होते. सहजयोगी नारद मुनींप्रमाणे एकमेकांना उलट- सुलट गोष्टी सांगून आपसातील वैर वाढवत जातात आपापसातील वैर भावना वाढल्याने प्रेमाचे जाळे तुटून जाते. आपल्याला सहजयोगाविषयी प्रेम असले पाहिजे आणि आईविषयी प्रेम असले पाहिजे. तरी आता पहिल्यापेक्षा ह्या Vह १८ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-18.txt गोष्टींचे प्रमाण कमी झाले आहे. (वैर भावना) परंतु आता लोक दुसर्याच दिशेने चालले आहेत. कोणी म्हणतं की आम्ही दिल्लीचे सहजयोगी, कोणी नोएडाचे, कोणी स्वत:ला अजून कुठलेतरी सहजयोगी म्हणवतो. आपण सर्व एक आहोत. आपल्यामध्ये कोणी दिल्लीचे, मुंबईचे असा फरक नसावा. आपण सर्व एक आहोत आणि आपण सहजयोगी आहोत. समुद्राच्या गोष्टी करा, एका थेंबाच्या नाही. कोणी तुम्हाला काहीतरी बोलून त्रास देत असेल, काही हरकत नाही, त्यांना बोलू देत. ते सर्व हळूहळू समोर येईलच. आमचे लग्न झाले त्यावेळी आमच्या इथे शंभरपेक्षा अधिक लोक होते. आम्ही कधीही कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही. साधु-संतांसारखे सर्वांची सेवा केली. सर्वांना आनंदी ठेवले. आत्तासुद्धा आम्हाला मित्रमंडळी आहेत, परंतु आमच्या पतींना मित्रमंडळी नाहीत. जेव्हा मी लखनौला जाते सर्वजण फक्त आम्हालाच भेटायला येतात. आमच्याकडे त्यांचा खूप ओढा आहे. आमच्या पतींना भेटायला कोणीही येत नाही, सर्वजण आम्हाला भेटायला येतात. असे निव्व्याज्य प्रेम असावे. राहून कोणी काही म्हणो, बडबड करोत आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आपण सहजयोग्यांना पुढचा जन्म तर नाहीये आणि असलाच तर तो एखाद्या संताचा जन्म असेल. या जन्माची वाईट कर्म याच जन्मात धुवा आणि स्वच्छ व्हा. पुढच्या जन्मात त्यासाठी संधी मिळणार नाही. जे काही धुवायचे आहे ते आत्ताच धुवायचे आहे, याच जन्मात, म्हणजे पुढचा जन्म जरी असला तरी तो दोषरहित असेल, संताचा जन्म असेल. आपल्यामध्ये आक्रमकपणा आहे. दुसरे म्हणजे लोकांमध्ये बाधा आहेत. हे दोन्ही आपण काढू शकतो. यासाठी आमच्याजवळ सहजयोगात उपाय ही आहेत. इथे हे सर्व काढून टाकले पाहिजे. तिसरे म्हणजे ढोंगीपणा. स्वत:लाच पुढे-पुढे करून लोकांसमोर येणे. मनामध्ये एक आणि लोकांना वाढवून सांगायचे दूसरेच. यामुळे आपल्याला काय फायदा होतो ? आपण स्वत:लाच फसवत असतो. बाहेरून एकच वर्तन असावे. हे दोष होळीच्या दिवशी जाळल्याशिवाय काही फायदा होणार नाही. घेण्याची भावना, दोष, बाधा हे सर्व होळीत जाळून टाका. ग्रुपबाजी, राजकारण हे ही जाळून टाका. एक ग्रुप बनवणे, एकाच जातीच्या लोकांनी आपापले ग्रुप बनवणे हे चांगले नाही. आपण आता सहजयोगी झालो आहोत. आता आपण कोणत्या ग्रुप किंवा जातीचे नाही आहोत. आपल्याच लोकांना महत्त्व देणे ही निरर्थक गोष्ट आहे. आपल्या जातीच्या लोकांना, आपल्या भागातील लोकांना पुढे करणे ठीक नाही. जे प्रमुख आहेत त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या वागणुकीकडे बघून बाकीचे लोक ही असेच वर्तन करतील. ह्या सर्व गोष्टी होळीत जाळून टाका. आतून आणि बदला ह्यासाठी एक मंत्र आहे, खूप मोठा मंत्र, 'सर्वांना क्षमा करा.' याशिवाय प्रगती होणार नाही. आम्हाला आईशी व सहजयोगाशी घेणं-देणं आहे. कोणी काही चुकीचे बोलत असेल तर बुद्धीने त्याचा विचार करा. त्यांना जे पाहिजे ते बडबडू देत. कोणतीही चुकीची गोष्ट ऐकून आपल्यामध्ये काही अयोग्य गोष्टीचा प्रभाव तर पडत नाही ना याकडे तुमचे लक्ष असू द्या. आपण बुद्धांना जाणतो आणि सर्वांना मानतो, बाकी सगळे सोडून द्या. शत्रुत्वामुळे काही फायदा होणार नाही. आपल्यामधील षडरिपू जाळून टाका. आपल्याला वैयक्तिक पातळीवर विकास करायचा आहे. १९ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-19.txt त्यामुळे संपूर्ण जीवनात बदल घडून येईल. एक सफरचंद खराब असेल तर ते पन्नास सफरचंद खराब करते, परंतु सहजयोगात एक व्यक्ती इतरांना चांगले बनवते, पन्नास जणांनाही. वाईट स्वभावाचा परिणाम इतरांवरही होतो. आपल्या परिवारातही आपण या गोष्टी बघत असतो. कुटुंबात एखादी व्यक्ती जरी वाईट स्वभावाची असेल तर त्याचा परिणाम इतरांवर होतो, परंतु सहजयोगात असे नाही. एक जरी चांगला सहजयोगी असेल तर तो इतरांना चांगले करतो. जर कोणी अयोग्य व्यक्ती असेल तर ती आपणहन निघून जाईल. आपल्याला त्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. ती गोष्ट तुम्ही माझ्यावर सोपवा. होळीमध्ये जाळण्यासाठी लोक आपापल्या घरातील लाकूड देतात, जेणेकरून ते लाकूड जळाल्यामुळे त्यांचे घर बाधारहित राहील. सहजयोगात हे लाकूड म्हणजे आपले शरीरच आहे. आपल्या शरीराचे लाकूड जाळून स्वत:ला सोन्यासारखे बनवा. आपल्यातील क्षमाशील शक्ती वाढवा. उजवी बाजू ( आक्रमक स्वभाव) कमी करा. 'हम' आणि 'क्षम' हे आज्ञेचे दोन मंत्र आहेत. जे लोक भूतबाधित आहेत ते बाधा काढण्यासाठी इतरांची मदत घेतात. यामुळे काही फायदा होत नाही. आपणच याला काढले पाहिजे. आपल्याला आत इतरांच्या मदतीची गरज नाही. असे म्हणायला पाहिजे की 'मी सहजयोगी आहे' किंवा 'मी सहजयोगिनी आहे.' बाधा दूर होईल. यामुळे बाधा वाढते. ती शारीरिक असो की मानसिक तिचा एक ग्रुप बनतो. दुसर्यांना शोधत बसू नका. बाधा झालेल्या लोकांना शोधू नका. मी अजून एक गोष्ट बघितली आहे, की लोक माझ्यावर अधिकार गाजवतात. चर्चा, वाद सुरू करतात. अशामुळे लगेचच स्वाधिष्ठान पकडले जाते. वादविवादाचा शेवट दिसतच नाही. तीन-तीन वाजेपर्यंत बसून राहतात. अरे बाबा, आम्ही तुम्हाला समजावले आहे, की तुम्ही बाधाग्रस्त आहात, तुमचे घर स्मशानाजवळ आहे ते सोडा. भाड्याचे घर आहे ते सोडायला काय हरकत आहे? पण नाही. त्यांचे त्याकडे लक्ष नसते आणि अधिकार मात्र गाजवतात. आम्ही पाहिले आहे, की बाधा झालेले सर्वात पुढे असतात. बाधा चिकटते अशाने, काही नियम असायला पाहिजेत. आईवर श्रद्धा असायला हवी. सहजयोगावरही नितांत श्रद्धा ठेवायला पाहिजे. श्रद्धेशिवाय चर्चा केल्यामुळे उजवी विशुद्धी लगेचच पकडली जाते. नियम-आचरण याकडे लक्ष दिले पाहिजे. जेव्हा कधी चुकीची गोष्ट घडत असेल तेव्हा नियमाकडे बघितले पाहिजे. सर्वात जास्त श्रीकृष्णाने राक्षसांना मारले, श्रीरामांनी राक्षसांना मारले, परंतु लोक मला म्हणतात, 'आई (माताजी) सारखा अवतार आजपर्यंत झाला नाही. तुमचे कार्य महान आहे. तुमच्यामध्ये लोकांमधील राक्षसी वृत्तींना नष्ट करण्याची शक्ती आहे.' प्रतीकात्मक होळीचे दहन करा. स्वच्छ व्हा. मुक्ती मिळाल्याच्या आनंदात नाचा, गा आणि सर्वांना आनंदित करा. सहजयोगाची होळी ही श्रीकृष्णाची होळी आहे. आजकाल तर लोक होळीच्या दिवशी भांग पितात. श्रीकृष्ण काय भांग पित होते ? भांग तर फक्त शिवशंकर पीत होते. ज्यांना सहजयोगात रहायचे आहे त्यांना व्यभिचारी वृत्तीचा त्याग करायला पाहिजे. हेच होळीचे महत्त्व आहे. खाण्या-पिण्याला आपण खूप महत्त्व देतो. कोणाला चाट कुठे चांगली मिळते हे माहिती असते, मिठाई इकडे चांगली मिळते, इकडे हे, तिकडे ते अशाप्रकारे संपूर्ण लक्ष या गोष्टींकडेच असते. आस्वाद २० 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-20.txt घ्यावा, हे किंवा ते. असे म्हणतात, की श्रीकृष्णाला लाडू जास्त आवडत होते आणि देवीला पुरणपोळी. आता तुम्ही लोकही माझ्यासाठी काही ना काही बनवून आणत असता, परंतु मला या सर्व गोष्टींमध्ये अजिबात रस नाही. आस्वाद घ्यायला पाहिजे. आता तुम्ही सर्वजण इतक्या प्रेमाने पदार्थ बनवून आणता म्हणून मी ते खाते, ही गोष्ट वेगळी. हो, पण आपण बनवून दुसर्यांना खाऊ घाला. जास्त करून उत्तर भारतातील लोकांचे जास्त लक्ष खाण्यामध्येच आहे, नंतर महाराष्ट्रात व दक्षिण भारतातही ही गोष्ट आहे. तसं तर सगळीकडेच हे आहे. आम्हाला लोक विचारतात, 'तुम्हाला काय आवडते ?' आम्हाला तर आठवतही नाही आता, की आम्हाला काय आवडते? येशू ख्रिस्तांनी सांगितले आहे, की 'वाईटपणाची घृणा व वाईट वागणाऱ्यांवर प्रेम करा.' सहजयोग प्रेमानेच वाढेल. तुम्ही तुमच्या प्रेमाची मर्यादा वाढवा. याबाबतीत परदेशी लोक भारतीयांपेक्षा खूप चांगले आहेत. ते आपापसात कधी भांडत नाहीत. त्यांना जे मिळते त्यात ते सुखी असतात. परंतु आपले तसे नाही. इथे चार लोक एक बाथरूम वापरतात, पण गणपतीपुळ्याला गेले, की त्यांना स्वतंत्र, खोलीला जोडून (अॅटॅच्ड) बाथरूम पाहिजे. परदेशी लोकांचे असे नाही. त्यांच्या देशात त्या लोकांकडे स्वत:ची गाडी असते, ते विमानाने प्रवास करतील. त्यांचे जेवण आपल्यासारखे नसते. त्यांच्या खाण्याचे प्रकार वेगळे आहेत, परंतु ते जेव्हा इथे येतात तेव्हा ते आपल्याइथले जेवणही प्रेमाने करतात. इतकेच नाही तर त्याचे कौतुकही करतात. तसे तर ते लोक आम्हाला परमेश्वरच मानतात कारण त्यांना माहिती आहे की शारीरिक आराम हा आराम नसतो, तर लक्ष आत्म्याकडे असले पाहिजे. त्या लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आपल्याला या अपेक्षांकडे लक्ष दिले पाहिजे. अजूनही इतर काही गोष्टी आहेत. जसे कोणतेही काम न विचारता करणे. मला न विचारताच बऱ्याच गोष्टी केल्या जातात. ज्यामुळे शेवटी नुकसानच होते. विचारायला पाहिजे. यातच सर्वांचा फायदा आहे. 'असे का होते ? याकडे लक्ष दिले पाहिजे. खरं तर होळीचे तत्त्व हेच आहे, की स्वत:ला आतून स्वच्छ करणे. येशू ख्रिस्त पूर्वी काश्मिरमध्ये येऊन गेले. त्यावेळी त्यांची भेट आमचे पूर्वज राजा शालिवाहन यांच्याशी झाली होती. तेव्हा येशू ख्रिस्तांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, की 'मला येशू ख्रिस्त म्हणतात आणि ज्या देशातून मी आलो आहे तेथील लोकांना म्लेंच्छ म्हणतात, म्हणून मी तुमच्या देशात आलो आहे.' तेव्हा शालिवाहन राजाने त्यांना सांगितले की, 'तुम्ही तुमच्या देशात परत जाऊन त्या लोकांना 'निर्मलम् तत्त्वम्' स्वीकारायला सांगा.' सहजयोगाचे जे काम आहे ते जर माझ्या एकटीकडून होणारे असते तर मला तुमची आवश्यकता भासली नसती, पण हे कार्य तुमच्या माध्यमातून व्हायचे आहे. तुम्ही सर्व लोक सहजयोगाचे माध्यम आहात. तुम्ही सर्व जितके स्वच्छ रहाल तितके तुम्ही सहजयोगासाठी उपयुक्त असाल. हे तुमच्या गहनतेवर अवलंबून आहे आणि ही गहनता तुमच्यात कशी येणार ? तर गहनता येण्यासाठी श्रद्धा पाहिजे, समर्पणाची भावना पाहिजे. जर आपल्याला मोती पाहिजे असेल तर समुद्रात खोलवर जावे लागते. यासाठी गहनतेत उतरा. आता हेच बघा. जे पाश्च्यात्य लोक इथे येणार होते त्यांना तिकिटासाठी अर्धेच पैसे लागले आणि त्यांनी श्रद्धापूर्वक बँकॉकला जाण्याची इच्छा करताच त्यांना त्याच तिकिटावर बँकॉकला जाण्याची परवानगी मिळाली. गहनतेत उतरल्याने सगळ्या गोष्टी विनासायास प्राप्त होतात. यासाठी गहनतेत उतरा. त्याशिवाय कोणताही फायदा होणार नाही. २१ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-21.txt जात अर्थात मनुष्याची प्रवृत्ती हिंद धर्मात असे मानले जाते की प्रत्येक मनुष्याच्या हृदयात परमेश्वराचे प्रतिबिंब हे आत्म्याच्या रूपात आहे. जर हे असे आहे तर आपण हिंदू समाजाला कशा प्रकारे वेगवेगळ्या जातींमध्ये वाटतो आहोत ? भारतीय संस्कृतीच्या सुरुवातीच्या हजारों वर्षांत मनुष्याच्या स्वभावानुसार त्याची जात ठरवली जायची. 'जात' म्हणजे मनुष्याची प्रवृत्ती. परमेश्वराला प्राप्त करण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे ते लोक 'ब्राह्मण' समजले जात होते. या लोकांना पूर्णपणे पवित्र तसेच संपत्ती व सत्तेपासून दूर रहावे लागायचे. सत्ताधारी लोकांना 'क्षत्रीय' म्हटले जात होते. हे लोक अबोध, धार्मिक तसेच गरीब, दुःखी लोकांच्या सुरक्षेसाठी जिम्मेदार होते. व्यापार तसेच धन कमविणारे लोक 'वैश्य' समजले जात. चौथ्या प्रकारच्या लोकांना 'क्षुद्र' म्हटले जात होते. म्हणजेच खालच्या स्तरातील लोक, जे आपल्या तुच्छ सेवेद्वारे या लोकांची सेवा करून धन मिळवत होते. या जाती जन्मामुळे नसून व्यक्तीच्या प्रवृत्तीनुसार होत असत. प.पू.श्रीमाताजी, २१.३.१९९८ २२ 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-22.txt NEW RELEASES ऑडियो-व्हिडियो Title Date Place Lang. Type DVD VCD ACD ACS आपण धर्म ओळखला पाहिजे 19th Jan.1979 600 Kalwa M Sp - th 601* हमारा क्या कार्य है 16" Jan. 1979 Boriwali H/M Sp 21* Mar.1979 जन्मदिवस समारोह - आपके हृदय के अन्दर st Mumbai 265 Sp 265 Н आत्मा का स्थान हो 602 Navaratri Celebration : कुंडलिनी आणि श्री गणेश Dadar 22" Sep.1979 Sp M th 26" Sep.1979 गुरु तत्व और श्रीकृष्ण शक्ति Mumbai Sp 293 293 Н 30th Jan.1980 Seminar For New Sahajyogis : H a 603* Sp Mumbai Н विशेष गोष्टीसाठी ही वेळ आलेली आहे 3dFeb.1982 604* Rahuri Sp सहजयोग आणि कुण्डलिनीची जागृती 8t Mar. 1984 392 Phaltan Pp th * 12"Mar.1989 | सत्य आत्मा के प्रकाश में ही जाना जा सकता है। 393 Noida 408 408 Н Pp परमात्मा को याद करने से ही काम हो जाते हैं 14"Mar.1989 605* 14" Mar.1989 104 Noida Н Pp st 1* Jan.2003 Vaitarna Е/Н/M Gen. Inauguration of Vaitarna Academy 394 प्रकाशक + निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६०३२, e-mail : sale@nitl.co.in की की 2012_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-23.txt Happy Rirtliday H.H. Shri Mataji एकच गोष्ट मला आनंद देऊ शकते तुमच्यावर केले तसंच प्रेम तुम्ही दु-्यांवर क. आणि ती म्हणजे जसं फ्रेम मी प.पू.श्रीमाताजी