चैतन्य लहरी मराठी नोव्हेंबर-डिसेंबर २०१२ १० २हजयोग पहिले तुम्हाला लक्षमीची इलिक ढाखवती आणि नंतर तुम्हाली धन प्रदान करती. तुम्हाली आशीर्वाद ( धन) प्राप्त होतो. है पहिले प्रलोभन आहे ज्यागुळे तुम्ही खाली पडू शकता, तुमचे पतन होऊ शकते. यानंत२ दोन इत२ प्रतीकं आहेत. आपल्या हातांनी ती देते. ज२ तुम्ही एक ढ२वाजी उधडली त२ हवा येणा२ नाही, त्यााठी दुसरा द२वीजी उधडावी लागेल. त्यांनी तर द्यायचेच आहे. पं.पू.श्री मातीजी, २१.१०.१९९० पी या अंकात की सथ अहजयोग्यांनी केलेली उपदेश ...8 १०० कुंडलिनी आणि सत चक्र ...१६ े ः क ॐ* नागपूरमध्ये सहजयोगाचे कार्य उशिरा सुरु झाले. माझ्या लहानपणाच्या वास्तव्याने या भूमौवर आधीच माझ्या चैतन्य लहरी पसरलेल्या होत्या व सूक्ष्मात बरेच कार्य पूर्वीच घटित झाले होते. एके दिवशी है सर्व वृद्धिंगत होणार है मी जाणले होते नागपूर, ५ मार्च १९८९ २हजयोग्यांनी ना केलेला उपदेश आईच्या गावाचं एक विशेष माहात्म्य आहे. येथील जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या रहातात. नागपूर शहरात सहजयोगाचा प्रसार व्हावा असे मला नेहमी वाटे. स्वत:च्याच घरात लोक आईपासून दूर रहातात. आजूबाजूला काय आहे ते पहातच नाहीत. दूरच्या गोष्टीकडे माणसाचे सहज लक्ष जाते. पण ज्या ठिकाणी आपण रहातो, जिथे आपले बराच काळ वास्तव्य झाले असते तेथील लोक इतके जवळ असतात की त्यांना आपल्यातील गहनता लक्षातच येत नाही आणि म्हणूनच नागपूरमध्ये सहजयोगाचे कार्य उशिरा सुरू झाले. माझ्या लहानपणाच्या वास्तव्याने या भूमीवर आधीच माझ्या चैतन्य लहरी पसरलेल्या होत्या व सूक्ष्मात बरेच कार्य पूर्वीच घटित झाले होते. एके दिवशी हे सर्व वृद्धिंगत होणार हे मी जाणले होते. माझे वडील ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्रय लढ्याच्या निमित्ताने जायचे व अनेक लोकांना भेटायचे त्या ठिकाणी मी अनेक लोकांना भेटले. मी त्यावेळी ९ वर्षाची असेन. गांधीजी मला प्रेमाने 'नेपाळी' या नावाने पुकारत. मी ज्या कल्पना व योजना त्यांच्यासमोर ठेवीत असे त्याचा ते आदराने विचार करीत . त्यांच्या आश्रमात, प्रार्थनेत, भजनावली गायली जाई . त्यात एकेका चक्राचे वर्णन कुंडलिनी विषयावर आधारित असे. मूळ आदितत्त्वापासून ख्रिस्तापर्यंत क्रमवार घेण्याविषयी मी त्यांना पूर्ण माहिती दिली. 'अल्ला हो अकबर' इ. यात सर्व काही होते ते नेहमी माझ्याशी विचार विनिमय करीत. जे लोक माझ्याशी लहानपणापासून संबंधित होते त्यांच्या मी अजून लक्षात आहे. कालच्या कार्यक्रमास माझ्या शाळेतील एक शिक्षकही आले होते. कदाचित त्यांच्यातील काही अंतर्ज्ञान व शक्तीने असेल की ज्याच्यामुळे ते माझ्याशी जोडले गेले व त्यामुळेच ते आजही मला ओळखू शकतात. १९४२ च्या 'चले जाव' या स्वातंत्र्य चळवळीत मी भाग घेतला. त्यावेळी मी सायन्स कॉलेजमध्ये शिकत होते. आम्हाला दहशत दाखविण्यासाठी अनेक पोलिस हातात लाठ्या व बंदुक घेऊन आले होते. पण मी न डगमगता गेटवर एकटी थांबले. याचाच निर्देश गेल्या वर्षी पुणे येथील कार्यक्रमात आमचे प्रिन्सिपल साहेब श्री.कृष्णमूर्ती जेव्हा माझ्या दर्शनार्थ आले तेंव्हा केला गेला. 'पहा तुम्ही एक शक्ती आहात हे मी जाणले होते. साक्षात शक्ती असल्याशिवाय एक १७ वर्षांची मुलगी पोलिसांना न भिता सामोरी जाण्याचे धैर्य दाखवू शकणार नाही व आज ती माझ्यासमोर प्रकट झाली आहे' असे त्यांनी गहिवरून सांगितले. निव्याज्य प्रेमाची महती माझ्या लहान वयापासून जे जे माझ्या संपर्कात आले ते मला आजसुद्धा ओळखतात. त्याचे एकच ত कारण होते ते म्हणजे प्रेम. कारण माझे प्रेम निव्व्याज्य व निरपेक्ष आहे. त्यामागे कोणत्याही अपेक्षा नाहीत. या निव्व्याज्य प्रेमामुळेच आजही लोक मला ओळखतात. त्या कठीण काळातही आमची आई म्हणायची की,"आम्हाला स्वत:ला वेगळे असे कोणी ओळखतच नाही. निर्मलाची आई किंवा वडील म्हणूनच आम्हाला ओळखतात. हे केवळ लहान असूनही तू दाखविलेल्या निष्पाप प्रेमामुळेच." दुसरे जे मागतील ते देण्याचा माझा स्वभाव लहानपणापासूनच आहे. मला लोकांबद्दल नेहमी दया व प्रेम वाटत असे. त्यामुळे त्यांच्या अंतर्यामी मला स्थान आहे. त्यावेळी लोकांतील दुर्गुण मला दिसत होते पण मला माहीत होते, की त्यांना आपण जर आज निव््याज्य प्रेम दिले तर ते एक दिवस सहजयोगात उतरतील व परमेश्वराला प्राप्त करतील. म्हणून तुमच्यातही अशा निव्व्याज्य प्रेमाचा उगम व्हावा. त्यामध्ये कोणी कसलीही अपेक्षा ठेवत नाही. तुम्हाला कोणी काही देईल अथवा देणार नाही याची कशाला तमा बाळगायची? कारण ते सर्व विनाशी आहे. माझ्या लहान वयात मी सहजयोगाबद्दल कधीच बोलत नसे. तथापि माझ्या वडिलांना माहीत होते. दुसऱ्या कोणाला नव्हते. माझ्या वडिलांनी नंतर आईला सांगितले कारण तिला माझ्याविषयी एक स्वप्न दिसले होते. माझ्या जन्माच्या आधी तिला वाघ पाहण्याची इच्छा झाली होती व अशी बरीच स्वप्ने तिने पाहिली होती. या निव्व्याज्य प्रेमाची मी एक मुख्य गोष्ट पाहिली. शाळेत, कॉलेजात, शेजारी, प्रत्येकाला माझ्याबद्दल माहिती होती. मला आश्चर्य वाटायचे. ते इतरांना ओळखत नसत. भाऊसुद्धा आश्चर्याने म्हणायचा, "निर्मला दीदीला सगळे लोक कसे ओळखतात?" तुर्क त्याला म्हणायच्या, "तू निर्मलाचा भाऊ आहेस, आम्हाला माहीत आहे ?" तो म्हणायचा, "मला स्वत:चे व्यक्तित्त्व आहे की नाही?" अशा निव्व्याज्य प्रेमातूनच तुम्ही अनेकांशी मैत्री जुळवू शकता. माझ्या मैत्रिणी मला इतक्या पत्र लिहायच्या की कॉलेज, ऑफिसमध्ये लोकांना आश्चर्य वाटायचे की या मुलीला इतकी पत्रे कशी येतात? त्यानंतर माझे लग्न जुन्या विचारसरणीच्या कुटुंबात झाले. सतत डोक्यावर पदर घेऊन चेहरा झाकावा लागे. कोणाशी फारसे बोलायचे नाही. प्रत्येक वयस्कर व्यक्तीच्या पायाला स्पर्श करायचा. त्यावेळी मी काय केलं? प्रत्येकाला निव्व्याज्य प्रेम दिलं. त्यांच्या काही अडचणी असल्या तर सोडवायच्या. त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की मी एक दिवस जरी लखनौला गेले तरी सर्व कुटुंब माझ्याभोवती जमते व मला लोक सोडतच नाहीत. तर अशा तऱ्हेने मी वागले. अशा प्रकारे सर्व काही मधूर आहे. सर्व वातावरण अगदी प्रेममय बनते. लोकांशी बोलताना प्रत्येकाने प्रेमाने व नम्रपणे बोलले पाहिजे. त्यांना कमीपणा वाटेल किंवा अपमान वाटेल असे बोलणे ৩ केव्हाही उचित ठरत नाही. प्रेमाने व नम्रतेने बोला. सर्व काही निव्य्याज्य प्रेमाने करा. याचा भविष्यकाळात किती उपयोग होईल याची तुम्हास कल्पना नाही. माझ्या भावांचे मित्र मला आपल्या बहिणीप्रमाणेच आदराने मानतात. मी त्यांना काही सांगायचा अवकाश इकडचे जग तिकडे करतील. मी काही कल्पनाच करू शकत नाही, की मी त्यांच्यासाठी एवढे काय केले? मी एकच केले 'सगळ्यांवर सदोदित प्रेम केले' प्रेमात एकाने दुसर्यासाठी काही करावे लागते असे नाही. मी जे केले ते माझ्या स्वत:च्या समाधानासाठीच आणि यातून मी जे समाधान मिळविले ते इतके महान आहे, की कितीही खर्च केला तरी ते मिळणार नाही. निव्व्याज्य प्रेम म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले प्रेम. त्याला स्वार्थ शिवू सुद्धा नये. 'मी अमक्याकरीता हे केले' असा विचारही मनाला शिवायला नको. असा स्वभाव असू नये. अर्थातच तो चुकीचा आहे. फोड़ा अहंकाराचा फुगा / 'मी' चे अस्तित्व सहजयोगात काही जुने सहजयोगी आहेत ज्यांच्याबद्दल मला फार विचित्र अनुभव आले आहेत. सुरुवात करणारे तुम्हीच आहात. त्याचा पाया रचणारे पण तुम्हीच. ज्या पायावर (फाऊंडेशन) मुळाशी सहजयोगी आहेत तोच जर अस्थिर झाला तर वरची इमारतच कोलमडून पडेल. तुम्ही लोकांना पार करता याचा अर्थ काय? तुम्ही ते घडवत नाही. तेव्हा प्रत्येकाने असे मानले पाहिजे की, 'मी स्वत: काही करत नाही (मी अकर्मी आहे). ही (कुंडलिनी) जागृती श्री माताजींनी दिली किंवा हा माणूस पार झाला.' 'मी हे केले, ते केले' असल्या भ्रामक कल्पना करून घेऊ नये. 'आम्ही जुने सहजयोगी आहोत. आम्ही सुरुवातीच्या काही थोड्या सहजयोग्यांपैकी एक आहोत' अशात-्हेच्या भ्रामक कल्पना काही सहजयोगी करून घेतात असे मी एक अनुमान काढले. ज्या प्रमाणात हा सहजयोग वाढतो त्या प्रमाणात या भ्रामक कल्पनाही वाढीस लागतात. जसे 'माझ्यामुळे अनेक सहजयोगी या मायेचा सागर पार करून गेले.' या त्यांच्या खोट्या आढ्यतेमुळे अशा प्रकारचे जवळजवळ सर्व सहजयोगी बाहेर फेकले गेले. ज्यांनी हा खोटा गर्व वाढविला ते भूतबाधेने पछाडले जातात असे मी पाहत आले. त्यांचा अहंकाराचा फुगा एवढा फुगतों की त्यांना सहजयोगात अस्वस्थ वाटू लागते. स्वत:ला ते स्वयंघोषित नेता समजू लागतात व इथपर्यंत ते स्वत:ची समजूत करून ठेवतात की, 'हे सर्व आपणच घडवीत आहोत, आपल्यामुळेच सर्व काही व्यवस्थित चालू आहे. हा सर्व डोलारा आम्हीच सांभाळतो. ते सर्व सुरळीत ठेवण्यासाठी त्यामागे आम्हीच आहोत.' या सर्वांचा परिपाक म्हणजे त्यांची नम्रता जाते, फ्रेम संपते आणि ८ ते अधिकाधिक चुका करण्यात गढून जातात. जून्या सहजयोग्यांमध्ये काही कमतरता आहेत असे माझ्या नजरेस आले. नवीन मंत्र, कल्पना व पद्धती पुढे आणून त्या माझ्या नावावर खपवितात. सहजयोग निर्माण करू नका. काही तरी नवे करावे असे विचार पाश्चिमात्यांच्या मनात येतात. सहजयोगाला परंपरा आहे. तुम्हाला त्याची फळे मिळाली आहेत. एकदा फळ हातात आल्यावर पुढे काय करायचे राहते ? कसे करावे? काय करावे हे मी नेमके तुम्हाला सांगत आलेय. सहजयोगात गटबाजी करायची नसते. या सवयी राजकारणामुळे लागतात. 'काही नवे शोध लावू नका अथवा श्री माताजींनी सांगितलेच आहे तर तुम्ही असेच करा' असेही सांगू नका. नवीन काहीतरी निर्माण करून माझ्या नावावर लपविल्याने तुम्ही भ्रमातून निर्माण केलेल्या जाळ्यात अडकता. ह्या गोष्टीचा तुम्ही धिक्कार केला पाहिजे. जे माताजी आम्हाला करावयास सांगतात ते आम्ही करीत राहू. कुठल्याही खोट्या कल्पनांची जाहिरात करणार नाही. समजा तुम्हाला काही विचार किंवा कल्पना ते सुचल्या तर त्याविषयी मला लिहा. त्यावर मी विचार करून जरूर तेथे दुरुस्ती करून हे असे पाहिजे, तसे करा इत्यादी. मी तुम्हाला समजावून सांगेन. जेथे 'मी' चा निर्देश होतो तेथे सहजयोगाचे अस्तित्व संपते. तो मी नाही हे सतत मनावर बिंबले पाहिजे. जेथे 'मी' साकार होतो तेथे सर्व संपते. तुमचा स्वभाव जर रागीट असेल तर राग कमी करण्याचा प्रयत्न करा. जे क्रोधिष्ठ लोक सहजयोगात होते ते सर्व बाहेर फेकले गेले. आपल्यातील ह्या क्रोधाचा उगम कोठून होतो ह्याचा सर्वांनी अभ्यास करावा. जर त्याचा संबंध लिव्हरशी असेल तर लिव्हर ठीक केले पाहिजे. पण तुम्ही शांत व्हायला पाहिजे. पूजेच्या वेळी प्रत्येकजण शांत असतो. आपल्या भोवताली घडणाऱ्या क्षुल्लक घटनेवरूनही रागवण्याची प्रवृत्ती मोडून काढून त्यावर मात केली पाहिजे. त्याशिवाय प्रगती होणार नाही. एवढेच नाही तर त्याचे आपल्यातून पूर्ण उच्चाटन होण्यासाठी झटले पाहिजे. सहजयोगात त्यासाठी मार्ग आहेत. ते कसे घडवावेत याचा प्रत्येकाने अभ्यास करून ते समजून घेणे आवश्यक आहे. विश्व निर्मल धर्म सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने मधोमध राहणे आवश्यक आहे. मी ते माझ्या प्रयत्नाने स्वत: घडवू शकेन असा कोणाचा समज असेल तर तो निरुपयोगी आहे. तुम्ही मधोमध आला नाही तर तुम्ही काही मिळवू शकणार नाही. त्या गहनतेत तुम्ही उतरले पाहिजे. या गहनतेतून मधोमध राहन तुम्ही दुसर्याशी मैत्री केली पाहिजे. ह्या मैत्रीच्या भावनेतूनच 'विश्व निर्मल धर्माच्या' नियमांचे ज्ञान तुम्ही जाणू ९ शकाल व तुमच्यात आत्मसात करून घ्याल. धार्मिक रूढी ज्या आंधळेपणाने वाढल्या जातात, उच्चनीचता किंवा जातपात वरगैरे आम्ही मानत नाही. खरा धर्म आम्ही मानतो. बाह्यातून दिसणारे विधी, कर्मकांड ह्याला आमची मान्यता नाही. वैधव्यास मान्यता नाही. कारण ती चुकीची कल्पना आहे. पुरुषांनी स्त्रियांवर लादलेला हा अन्याय आहे. कोणत्याही पंथातील टिकाकारांना घाबरू नका. आमच्या आईने आम्हाला कपाळावर कुंकू लावण्याची आज्ञा केली आहे असे सांगा. पांढऱ्या कपाळाने फिरण्यास आम्हाला परवानगी नाही. वैधव्य हे फक्त स्त्रियांनाच लागू आहे हा विचारच मुळात चुकीचा आहे. वैधव्य बरोबर आहे असे मानले तर पुरुषांनाही ते लागू झाले पाहिजे. पुरुष जर विधुर होऊ शकत नाही तर स्त्रियांनी वैधव्य का मानावे ? पुरुषांनी हे वैधव्य लादून स्त्रियांच्या यातना मात्र वाढविल्या. ह्यातून वेगळे असे काय मिळणार आहे ? आणखी एका प्रकारामुळे सहजयोग्यांना पकड येते ते म्हणजे ते खोट्या गुरूंच्या नादी लागतात. हे अतिशय धोक्याचे आहे. केव्हाही ते तुमच्या अंतरंगात प्रवेश करतील. अशा लोकांनी आपले अंतरंग पूर्ण स्वच्छ केले पाहिजे. स्वत:ला स्वच्छ केले पाहिजे. ह्यात कोणी हरकत घेऊ नये अथवा ह्याबाबत नाउमेद होऊ नये. असल्या भ्रामक कल्पनांना खतपाणी घालू नये. सुरुवातीला क्षुल्लक म्हणून आपण दुर्लक्ष करतो. परंतु ती गोष्ट हळूहळू वाढत जाते व आपल्या हाताबाहेर जाते. मोठ्या वृक्षाचे रूप धारण करते. त्यातला थोडा अंश जर तुमच्यात राहिला तर तुमच्यातील चैतन्य लहरी नष्ट होतील. जर तुमच्या गुरूतत्त्वावर पकड असेल तर ती जोडपट्टीने दूर करावी. सूक्ष्मातूनही तुमच्या आत्मतत्त्वावर आघात होतात. ह्याबाबत सर्वांनी सतत जागृत राहिले पाहिजे. भारताबाहेरील जे सहजयोगी आहेत त्यांच्यातही अनेक प्रकार पहावयास मिळतात. काही सूक्ष्मतेत उतरतात व गाभ्यापर्यंत पोचतात. काही अर्धवट परिपक्व राहतात तर काही कामातून गेलेले असतात. अशा लोकांशी आपण योग्य रीतीने व नम्रपणाने वागले पाहिजे. यथावकाश तुम्हाला आश्चर्य वाटेल. ज्यांना मूळातूनच (आंतरिक) ओढ नाही ते स्वत:हन बाहेर फेकले जातात. ज्यांना अजून सहजयोग व्यवस्थितपणे समजला नसेल अशांना तुम्ही मदत करत जा. त्यांना तुम्ही संपर्कात ठेवून ठीक करा. ते आल्याबरोबरच त्यांना भूतबाधेने पछाडले आहे असे जाहीर करू नका. महाराष्ट्रात आम्ही जरा कठोरपणे सत्य सांगतो 'अहो, तुम्हाला भूतबाधेने पछाडले' १० 641 कधीकधी तुम्ही दुखावण्याच्या सवयींनी पछाडले जाता. मी जेव्हा एखाद्याला विचारते की तुम्ही सहजयोग का सोडला तर ते मला सांगतात की, 'माताजी, आम्हाला सांगण्यात आले आहे की आमच्या घरातच वाईट शक्तीचे (मृतात्म्याचे) वास्तव्य आहे आणि तुम्ही पण त्या भूताने पछाडलेले आहात.' ह्याबद्दल मी सहजयोग्यांना विचारले तर लगेच उत्तर मिळाले की आम्ही खरे काय ते सांगितले. वस्तुस्थिती सांगतानासुद्धा त्यांना जे उपकारक ठरेल तेवढाच भाग सांगा. तुमच्या सांगण्याने त्यांना काय ११ छु फायदा झाला? उलट सहजयोगात येण्याची त्यांची संधी मात्र गेली. तुम्ही ज्यावेळी खरे सांगता त्यावेळी अगदी गोड शब्दात बोलले पाहिजे असे नाही. पण जे सांगाल ते हितकारक असे सांगा. दुसऱ्यांना पोषक ठरेल अशारीतीने सांगा. त्यांची जी काही अडचण असेल ती समजावून घेऊन आम्ही ती मुळासकट दूर करू असा त्यांना विश्वास द्या. 'तुम्हाला भूतबाधा आहे' असे सांगू नका. तुम्ही जर म्हणाल की तुम्हाला भूतबाधा आहे तर ते लगेच म्हणतील की आम्हाला असे डॉक्टरांनी कधीच सांगितले नाही. तुम्ही असे कसे म्हणता. ह्या गोष्टीबद्दल मी जे सांगितले एकंदरीत ठीकच झाले. आजच्या दिवसापर्यंत नवीन सहजयोग्यांचे काय प्रश्न आहेत त्याबद्दल मी कधीच बोलले नाही. जे लोक नुकतेच सहजयोगात आले त्यांना आपण निव्व्याज्य प्रेमाने वागविले पाहिजे. ह्याबाबत जुन्या सहजयोग्यांनी नीट समजून घेतले पाहिजे. ह्याउलट ते स्वत: पुढे पुढे करीत असतात. अशारीतीने नेहमी पहिल्या रांगेत बसणारे, स्वत:ला जुने समजणारे सहजयोगी, स्वत:ला, 'आम्ही पुढेच बसणार कारण आम्ही खास आहोत. आम्हाला खास पातळी आहे' असे समजतात, असे दाखवितात. असो, माणूस निरूपयोगी आहे. त्यांना एखादे कार्य करण्यास सांगितले तर ते दुसर्यांच्या अंगावर टाकणार 'तुम्ही हे करा, तुम्ही ते करा' असे दुसर्यांना सांगून स्वत: इतस्तत: फिरत राहणार व इतरांना कामात अडकविणार म्हणजेच उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा हा प्रकार. अशी ही परिस्थिती. त्यांना जर मी सहजयोगातून निघून जा म्हणाले तर ते माझ्या पायावर येतात व सांगतात, 'माताजी, आम्ही तर जूने सहजयोगी आहोत.' 'हो का? तुम्ही तर आहातच पण जीर्ण आहात तर आम्हाला सोडणे हेच चांगले.' खरा सहजयोगी सगळ्यांना मी विनंती करते की नम्र होऊन व पूज्य भावनेने शपथ घेतली पाहिजे की 'मी अजून काहीच मिळवले नाही. मला बरीच उन्नती करायची आहे. मी जेव्हा दुसर्यांना प्रकाश देतो तेव्हा हे करताना मीच अधिक प्रकाश १२ कि मिळवतो.' दुसर्यांना तुम्ही प्रकाश दिला पाहिजे. काही जुने सहजयोगी कामातून गेलेत आणि काही नवीन आलेत, ते उन्नत झालेत. अनेक प्रसंगी आलेल्या अनुभवातून व जुन्या सहजयोग्यांच्या वागण्यातून जे दिसले त्यांना सांगण्याचे मी ठरविले, की त्यांना स्वत:च्याच भूतबाधेने पछाडले आहे का? याची त्यांनी तपासणी करावी. ही भूते म्हणजे त्यांचा अहंकारच. या अहंकाराच्या बाधेने आपण ग्रस्त आहोत हे पाहिले पाहिजे. ज्या कारणाने तुमची हानीच होणार. काही वेळा आपण खुष होतो, की आम्हाला सत्ता मिळाली १३ आणि आमचा सर्व लोक आदर करतात. पण सहजयोगात येऊन आपण सत्ता गाजवू असे कोणी समजत असेल, त्यांनी सहजयोग करू नये. आले लक्षात ? पैशाची अफरातफर करण्यास सहजयोगात पूर्ण बंदी आहे. हे धर्माच्या विरूद्ध आहे. पैशाच्या बाबतीत तुम्ही काळजी घ्या. सहजयोगाचा उपयोग अर्थार्जनासाठी करू नका. फायदा मिळवायचा असेल तर तो सहजयोगाच्या बाहेर राहून. मुळातच नेकीने राहणे महत्त्वाचे आहे. नाहीतर याचे वाईट परिणाम होतात. एका गृहस्थाने पैशाचा छोटा घोळ केला तर त्याचा मुलगा गेला. नुकताच एकाला हार्टअॅटॅक आला. त्यानेही असाच पैशाचा घोळ केला. मी काही गोष्टींचा जाब विचारला असता त्यांना राग आला. आठ दिवसांच्या आत त्यांचे निधन झाले. कोणीही मला खोटे सांगू नये. एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि एका मुलीबद्दल मला खोटे सांगू लागले. त्यांना पक्षाघात होऊन त्यांची वाचा गेली. एकमेकांशी खोटे बोलू नये. प्रेम वाढवा. स्पर्धा नको. एकमेकांच्या कागाळ्या करू नका. एकमेकांचे पाय ओढू नका कारण तुम्ही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश केला आहे आणि तेथील कायदे काय आहेत याची जाणीव तुम्ही ठेवा. तेथे तुम्ही खोटे सांगूच शकत नाही. पैशाचे घोळ करू शकत नाही. आपल्या अधिकारात दुसऱ्यावर हुकमत करू शकत नाही. या तीन दुष्ट प्रवृत्ती टाळल्या तर सहजयोगाचे सर्व आशीर्वाद तुम्हास प्राप्त होतील. कुसंस्कृत विचारातून स्त्री- पुरुष संबंधामधे ज्या गैरसमजूती निर्माण होतात, त्या दूर होतात. हे सर्व घटीत होत नसेल तर तो सहजयोगी नाही. वाईट सवयी सहज जातात पण वरील तीन गोष्टींमुळे कमकुवतपणा येतो. सगळ्यात भयंकर म्हणजे सत्तेची अभिलाषा व दुसर्यावर हकमत गाजवण्याची आकांक्षा. असे अधिकाराची हाव असणारे सहजयोगी कोठेही असतील तर निश्चित समजा, की ते बाहेर फेकले जातील. अशा एका घटनेत ते अडकले जातात की स्वत:लाच बाहेर ओढून घेतात. सहजयोगात असे सतत पुढे पुढे करणारे अनेक आहेत. अनावश्यकपणे पुढे पुढे करू नये. मलाच नेहमी श्री माताजींच्या चरणावर जाऊ द्या असा आग्रह धरू नये. जर माझ्या चरणांना तुमच्या हृदयात स्थान आहे तर माझ्या पायावर येऊन काय मोठा लाभ तुम्हास होणार आहे असा विचार सतत बाळगा. अशी सतत पुढे पुढे करणारी व्यक्ती पुढील वर्षात गायब होणार हे निश्चितच. श्री भैरवनाथ त्यांना कायदा शिकवतीलच. सतत पुढे पुढे करणे म्हणजे नुसती डोकेफोडी. त्यांना मी शांत रहा म्हणून सांगितलं तर ते ऐकायला तयार नसतात. असे दिसून येईल की दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात. एक आहे बाहेर टाकणारी १४ (सेंट्रिपेटल) व दुसरी आत ओढणारी (सेंट्रीफ्युगल). एक तुम्हाला मधोमध आणते तर दुसरी केंद्रापासून बाहेर फेकते याचे कारण म्हणजे परमेश्वरी राज्यात सगळ्यांना पुरेल एवढी जागा कोठून असणार ? आता प्रत्येकजण माझ्याशी पत्राने परस्पर संपर्क साधायला बघतात. काही २५ पानांची पत्रे असतात. अशा प्रत्येक पत्राची दखल घेण्यास मला एवढा वेळ आहे का आणि पत्रे वाचली तर त्यात माझी आई अशी आहे किंवा माझ्या आईचा काका, भाऊ इत्यादीविषयी क्षुल्लक गोष्टींनी ते भरलेले असते. मला त्यांच्याशी काय कर्तव्य आहे? सर्व सहजयोगी नात्यात आहेत. तुमच्या इतर नातेवाईकांशी मला काही कर्तव्य नाही. जोपर्यंत तुमचे नातेवाईक सहजयोगात येत नाही त्यांच्याविषयी मला काही करायचे नाही किंवा तुम्हालाही काही करायचे नाही. देवही त्यांच्याविषयी काही करू शकत नाही. अशा लोकांबद्दल मला कधीही सांगू नका. त्यांनी सहजयोगात यावे. तुमच्या परिचयाच्या एखाद्या व्यक्तीबद्दल माझ्याकडे तरफदारी करून माझ्याकडे बिलकूल आणू नका. कारण मला त्याच्याशी काय कर्तव्य ? फार तर त्याला माझा फोटो देऊन त्यावर मेहनत करायला सांगा. बरे एकदम कोणाला करण्याच्या भानगडीत पडू नका. त्याला फोटोपुढे बसवा. डावीकडचा रोग, उजवीकडचा रोग व तिसरा मध्यवर्ती संस्थेवरील अशा तीन प्रकारचे आजार असू शकतात. डावीकडील जे त्रास असतात ते मानसिक प्रकारचे, उजव्या बाजूचे शारीरिक किंवा बौद्धिक व मधल्या संस्थेवरील म्हणजे चुकीच्या गुरूंचे अथवा अनाधिकाराने वापरलेल्या ज्ञानातून निर्माण होतात. या तिन्हीत तुम्ही तरबेज झालात तर फोटोवरूनसुद्धा दुसऱ्याला काय त्रास आहे हे सांगू शकाल. लवकरच या रोगाविषयी आम्ही एक पुस्तक प्रकाशित करणार आहोत. म्हणजे मला श्री माताजींनी असे सांगितले, हे आणि ते असे कोणालाही सांगू नये. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तास न तास ध्यान करण्याची जरुरी नाही. फक्त दहा मिनिटे पुरे. ध्यान लागण्यास एवढा वेळ लागला तर ते मूर्खपणाचे म्हणावे लागेल. असला वेडेपणा टाळा. तुम्हाला एखाद्या स्थळी जायचे आहे व त्याला एखादे फाटक आहे तर त्यातून आत प्रवेश करण्यास किती अवधी लागतो? पण तुम्ही जर निश्चय केला तर निश्चित अधिक वेळ लागेल. डोंगर चढायचाच निश्चय केला तर निश्चित अधिक वेळ लागेल. डोंगर चढायची जरूर आहे का ? साधी गोष्ट बिकट करण्याचा हा प्रकार म्हणजे सहजयोग नव्हे. तर आजचे हे भाषण अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचे भाषांतर करून सर्व केंद्रांना पाठवावे. १५ कुंडलिनी आणि सात मागील अंकातील भागावरून पुढे चालू २३/२/१९७९ हृदय चक्राच्या वर जे चक्र आहे हे विशुद्धवी चक्र. हे फारच महत्त्वपूर्ण आहे. कारण हे चक्र, या चक्रामुळे मनुष्य जनावरापासून मानव झाला आहे. त्याने आपली मान खालून वर उचलली आहे. त्याठिकाणीच तो मानव झालेला आहे. आणि ही जी मान आहे, त्या मानेला कोणाही समोर झुकवायचे नसते. असत्याच्या पुढे तर मुळीच झुकवायचे नसते. पण साक्षात परमेश्वरच असला किंवा साक्षात खरोखर असा मनुष्य असला की जो वंदनीय आहे त्याच्यासमोरच मान झुकवली पाहिजे. आणि त्यामुळे आपण उठल्यासुठल्या ज्याच्या त्याच्या पायावर येतो. मग ते असे ना, ते ढोर असे ना सगळ्यांच्या पायाखाली येतो. आपले हात घालायची काही गरज नाही. आमच्याही भूत पायावर येऊ नये. जोपर्यंत तुम्हाला काही प्रचिती येत नाही तोपर्यंत मुळीच तुम्ही पायावर येऊ नये. आणि याबद्दल मी दोन अनुभव पाहिले. आम्ही लंडनला असतांना लोकांना वाटायचे की माताजींच्या पायावर काय यायचे? काम सगळे आमचे पाय करतात तर करू तरी काय? तर त्यांना हा राग की माताजींच्या पायावर का यायचे आम्ही. म्हणजे पार झाल्यावरसुद्धा. आणखीन इथं मी म्हटलं परवा गावात की आता नको दर्शन फार झालं. तर सगळ्यांना वाईट वाटलं की माताजींनी दर्शन सुद्धा आता आम्हाला दिलेले नाही. म्हणजे अशी दोन टोकं आहेत जगामध्ये. तर सांगायचे असे आहे की सुज्ञपणाने हे समजले पाहिजे की मानव हा अत्यंत उच्च कोटीतला एक विशेष बनवलेला प्राणी आहे आणि त्याने प्रत्येक माणसासमोर आपली मान वाकवायची नाही. तसेच हे विराटाचे स्थान आहे. विराट म्हणजे सबंध जे आहे. असाच परमेश्वर सबंध आहे आपल्यासारखाच. आणि त्याच्यातील आपण एक एक लहान लहान पेशी आहोत. सेल्स आहोत. ह्या ज्या सेल्स आपण आहोत अगदी परमेश्वरासारखेच बनवलेले आहोत. जेव्हा ह्या जागृत होतात तेव्हा त्या विराटाला जाणून घेतात. हे असं विराट स्वरूप हे इथून जाणलं जातं. मग लोक जे तंबाखू खातात, आता नगरला तर मला तंबाखू इतकी पिकते की नाही माहीत नाही. पण प्रत्येकाच्या गळ्यात तंबाखू दिसते मला. तर ही तंबाखू कुठून आली नगर जिल्ह्यात, हे काही मला समजत नाही. पण इतकंच नाही तर बायकासुद्धा ते काहीतरी काळंबिळं लावत असतात. ते काय? तशा तऱ्हेची तंबाखू कुठून आली ते मला ठाऊक नाही. पण त्या तंबाखू मुळे हे चक्र मात्र असं जाम बसलेलं आहे की त्यांच्या मुलांना खोकले, त्यांच्या मुलांच्या मुलांना खोकले आणि त्यांनाही सारखा त्रास, श्वास लागलेला अशी सर्व स्थिती या तंबाखुमुळे होते. पण सांगून कोणी ऐकत नाही. म्हटलं तंबाखू सोडा. सोडवत नाही. फक्त सहजयोगात आल्यावर मात्र या तंबाखूला सोडावं लागतं. आणि ती सुटते कशी वरगैरे असे बरेच मजेदार गृहस्थ ते सहजयोगात आल्यावर फार कार्य करीत असत आणि फार आम्हाला प्रिय होते. सगळं काही असतांना त्यांना तंबाखू पूर्णपणे सोडता येईना. कधीकधी हुक्की यायची त्यांना. शेवटी एकदा मी आले असतांनासुद्धा त्यांनी तंबाखू घेतली होती. माझ्या लक्षात आलं. त्यांना वाटलं की माझ्या काही लक्षात आलं नसेल. त्याच्यानंतर मी उगीचच कानाडोळा केला. म्हटलं बघू या आता कसं काय होतय ते. तर त्याच्यानंतर ते मला सांगायला लागले अनुभव लोकांनी सांगितले. पैकी एक की, 'अहो, माझं तोंड, माताजी, एकदम हनुमानासारखं होतय कधीकधी. असं वाटतं की जसं फुगायला लागलं. हे १६ चंक्र कसं काय? हे सहजयोगाने मी काय हनुमान होतोय की काय मला समजत नाही.' 'तुम्ही तंबाखू घेता की नाही?' 'हो माताजी, आम्ही घेतो' आणि कानाला हात लावला. तर आता माझ्यासमोर वचन द्या. तुमची सोडवते मी. जरासा प्रयत्न करा. कारण आता पार झाल्यामुळे त्याची विशेष काही गरज वाटत नाही. म्हणे 'आता सुटलंच आहे.' म्हटलं 'जे आता थोडसंच आहे ते ही सोडा म्हणजे हे हनुमानपणा जाईल.' आणि त्याच्यानंतर त्यांनी ती सोडून टाकली. असे सहजयोगाने फार सहज इलाज होतात. आणि अगदी मजेदार इलाज होत असतात आणि सगळ्यांनी ते अगदी मजेने बघावे असे इलाज असतात. त्याच्यानंतर हे जे विशुद्धी चक्र आहे, त्याचे माहात्म्य सांगावे तेवढे कमी. कारण सोळा हजार नाड्या त्या चक्रावर अवलंबून आहेत. तेव्हा तुम्ही हे लक्षात आणलं पाहिजे की तुम्ही सहज जी दोन आण्याची सिगरेट घेऊन पिता ते त्या तुमच्या सोळा हजार नाड्यांना तुम्ही नष्ट करत आहात. आणि त्या किती मुश्किलीने बांधल्या गेल्या आणि त्या कुठून कुठून, कशा सुद्धा माहिती नाही. आता लंडनला इथपर्यंत झालेलं आहे की डॉक्टर सांगतात. इतकंच नाही तर प्रत्येक सिगरेट वर लिहिलेलं असतं की याने तुमचा प्राण जाईल, याने तुम्हाला कॅन्सर होईल तरीसुद्धा लोक घेतात. त्या सिगरेटचा एवढा कॅन्सर झाला तरी लोकांना सुटत नाही. आणि मला हे समजतं कारण सवय अशी गोष्ट आहे की सुटत नाही. फक्त त्याला समजून घेतलं पाहिजे. आणि आपले व्हायब्रेशन्स ठीक केल्यावरती आपोआप कशा धावतात वर्गरे त्याच्याबद्दल तुम्हाला जराशी १७ सुटेल. ती अगदी सहज सुटते आणि या सगळ्या सवयी सुटून मनुष्य अत्यंत अशा वातावरणात येतो की त्याला आपण म्हणू शकू की परमेश्वराच्या साम्राज्यात येतो. त्याच्यावरचे जे स्थान आहे ते आज्ञा चक्राचं. आता मी आपल्याला सांगितलच आहे की सर्व धर्म जे आहे एकाच झाडावरची फुलं आहेत. आणि त्याबद्दल आपण उगीचच वाद घालत बसतो की 'हे माझं फूल आहे, ते तुझं फूल आहे.' एकाच शक्तीवर पोसलेली. अनेक वेळेला वेगवेगळ्या लोकांनी या संसारात येऊन हे कार्य केले आहे. जसं मी आपल्याला सांगितलं आहे की दहा गुरू आले होते. तसंच हे चक्र जे डोक्यावरती आहे, हे जे कुंकू जिथे आम्ही लावतो आहे, ते जे आहे ते आज्ञा चक्र. त्याच्या वरती महाविष्णूचे स्थान आहे. ते आता हा महाविष्णू कोण आहे? ते जर देवीमाहात्म्य आपण कोणी वाचलं असेल तर कळेल. आणि हे म्हणजे ह्याचे जे तत्त्व आहे ते गणेशाचे तत्त्व आहे. म्हणजे जर समजा एखाद्या रुपयाची एक बाजू गणेश असेल तर दुसर्या बाजूला महाविष्णूचं स्थान आहे. आणि त्याला महाविष्णूने अवतरण एकदाच घेतलेले आहे आणि ते ख्रिस्ताचे अवतरण आहे. म्हणजे ख्रिस्त हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला महाविष्णूच आहे. आणि त्याचं जर तुम्ही महाविष्णूचं वाचाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तंतोतंत त्याचं सगळं काही त्या महाविष्णूबरोबर अगदी तसच्या तसं वर्णन केलेलं आहे. आणि खिस्त, ह्याची आई मेरी जी होती, ती स्वयं साक्षात राधाच होती. त्या महाविष्णूच्या वर्णनात आहे की त्या राधेने स्वतःच आपला पुत्र तयार केला होता आणि वडील त्याचे विष्णू होते म्हणून त्याला ख्रिस्त म्हणतात. हे कुणालाही तिथे समजलं नाही की कृष्णाला तिथे ख्रिस्त का म्हणतात? कारण कृषी वरून कृष्ण शब्द झाला. कृष्णाने कृषी केली आणि त्याचं फळ हे ख्रिस्त आहे. आणि त्याच्यात हे वर्णन आहे कृष्णाने आपल्या मुलाला आपला सोळावा अधिकार दिलेला आहे. तसंच तो सर्व जगाचा आधार होईल. लोकांना हे दाखविल जे कृष्णाने सांगितलेलं होतं 'नैनं छिन्दंति शस्त्राणि । नैनं दहती पावक: । ' तर हे दाखवेल की ही जी शक्ती आहे ती कशाही तऱ्हेने नष्ट होऊ शकत नाही. आणि त्याचं उद्धरण होईल. आणि ते आपल्याला त्याच्या पुनरुत्थानात दिसलेलं आहे. तेव्हा ही सगळी मंडळी एकत्र, नात्यात असताना आपण उगीचच मध्ये भांडाभांडी करतो कारण आपल्याला त्यांच नातं जुळलेलं नाही. हे रियलायझेशन नंतर सगळ्यांना कळतं. आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीचा कसा उपयोग करायचा ते समजून घेतो. त्याच्या त्या एकंदर मदतीमुळे आपल्याला सुद्धा ती सर्वव्यापी शक्ती इतकी मदत करते की आपणसुद्धा लहान लहान क्षुद्र जे काही आजपर्यंत शिकलेलो आहोत, ज्या क्षुद्र कल्पना की आम्ही हिंदू, ब्राह्मण, ख्रिश्चन वरगैरे वगैरे, अशा ज्या क्षुद्र भावना आहेत त्या मिटवून आपण जागतिक मानव होऊन जातो. त्याच्यावर जे चक्र आहे, ते सहस्राराचं चक्र आहे. हे चक्र जेव्हा कुंडलिनी छेदते, जेव्हा ब्रह्मरंध्रातून ही कुंडलिनी छेदून जाते तेव्हाच मनुष्य पार झाला असे म्हणतात. त्याला ख्रिस्ताने बाप्तीझम म्हटलेले आहे, महम्मदाने पीर म्हणून म्हटलेले आहे. सगळ्या धर्मांनी सांगितलेले आहे की तुमचा पुनर्जन्म झाला म्हणून. तुमचा द्विज झाला पाहिजे. आता या बाबतीतही फार गोंधळ झाला आहे. द्विज म्हणजे जन्मत नाही. त्याचा पुनर्जन्म होईल तेव्हाच त्याला द्विज म्हटले पाहिजे. आता आपल्याकडे ब्राह्मण म्हटला की कुणी आपण नोकरीवरही ठेवू शकतो. वाट्टेल ते करू शकतो. आता ब्राह्मणत्त्व काय आहे ते मात्र त्यांच्यात नाही. जे जन्मतात ते ब्राह्मण नाही. ज्यांचा पुनर्जन्म होतो तेच खरे ब्राह्मण आहेत. आणि या दृष्टीने पाहिले तर आपण चोखामेळांना पण ब्राह्मण म्हणू शकतो. आणि पुष्कळ ब्राह्मणांना शुद्र म्हणू शकतो. अशी स्थिती आहे. आता परवा आम्ही पुण्याला प्रोग्रामला होतो तर तिथे एका ब्राह्मण सभेमध्ये आमचा प्रोग्राम होता. त्यांना लगेच कळलं की माताजी काही ब्राह्मण नाही. तर त्यांनी सांगितलं की, 'माताजींना आम्ही प्रोग्राम करू देणार १८ नाही.' तर त्यांच ते बघा. 'माताजींच्या ब्दल सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जर असं केलं तर पेपरात येईल की तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणेतर आहात. हा काहीतरी वाद काढला तर तुमचीच बदनामी होईल.' बर तर म्हणे, आता केल्यासरशी होऊ दे. आता काय करता. आता पेपरातच दिल्यामुळे म्हणून. कसंतरी हे त्यांनी मान्य केल्यावर मला काही या लोकांनी सांगितले नाही. म्हणजे आतल्या गोष्टी हे काही सांगत नाही. मी जाऊन उभी राहिले आणि मी आपलं सहज बोलता बोलता म्हटलं की 'अहो, तुमच्यात कोणी ब्राह्मण असले तर माझ्यासमोर या. पट्टीचे असायलाच पाहिजे.' तर तीन-चार येऊन खरेच उभे राहिले. म्हणे 'आम्ही आहोत ब्राह्मण.' म्हटलं 'असं का. मग आता माझ्याकडे असे हात करा.' तर कापायला लागले. म्हटलं 'हे काय होतय तुमचे?' म्हणे 'माताजी, तुम्ही शक्ती आहात म्हणून आम्ही हलतोय.' म्हटलं 'अहो, आम्ही शक्ती आहोत कबूल आहे मला. पण तुम्ही का हलता. बाकी कुणी हलत नाही. पण हे दोघं हलतायेत.' म्हटलं 'विचारा कुठून आले?' ती पागलखान्यातून, ठाण्याहून आणलेली दोन माणसे होती. म्हटलं हे बघा. तेव्हा स्वत: बद्दल नसता अभिमान करून घेणं. आम्ही हे, आम्ही ते असं म्हणून होत नाही. व्हायला पाहिजे. हे घटित झालं पाहिजे. आणि असे खोटे लोक असतात त्यांनी नेहमी संतांना छळून काढले आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्ञानेश्वरांना किती या लोकांनी छळलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे शिड्डीला सुद्धा साईनाथांना या लोकांनी छळलेलं आहे. कुठेही सोडलेलं नाही. इतकेच नाही पण शंकराचार्यांना, आदि शंकराचार्य आपली आई वारली म्हणून घरी गेले आणि त्यांनी सांगितले की तिचा दाहसंस्कार मला करायचा आहे. त्यांनी सांगितले की, करू शकत नाही. तू सन्यासी आहे.' आणि कोणीही त्यांच्या त्या दाहसंस्काराला आले नाही. तेव्हा कालडी गावामध्ये त्यांनी स्वत:चेच झाड वाढवून घेतलं आणि केळाच्या झाडाला आग लावून त्यांनी आपल्या आईचा दाहसंस्कार केला आणि शापित केलं सबंध केरळला, की तुम्ही लोक आपल्या घरासमोर दाहसंस्कार कराल किंवा इथेच आपली प्रेत गाडाल. आजसुद्धा तिथे तसंच होत आहे. 'तू अशा रीतीने त्या सर्व अनाधिकार लोकांनी त्या सर्व संत साधुंचा फार अपमान केला आहे. आपल्याच देशात नाही, प्रत्येक देशात हे झाले आहे. महम्मद साहेबांच्या वेळेला तुम्ही जर पाहिलं तर महम्मद साहेबांना इतका त्रास दिलेला आहे आणि त्यांचा इतका छळ केलेला आहे की त्याचं वर्णन केलं की वाटतं की ज्ञानेश्वरांचा इतका छळ नाही केला जितका त्या महम्मद साहेबांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा झालेला आहे. म्हणजे सगळ्यांना गारद करून टाकलं. हे असं संतांना छळणारे लोक आजसुद्धा सगळे अधिकार पदावर बसून 'आम्ही फार धर्मात्मे, आम्ही फार दंडे सन्यासी, आम्ही फार बंडे सन्यासी आणि आम्ही भोंदू सन्यासी' बनून फिरत आहेत. अशा लोकांना मुळीच भीक घालू नये. आमच्या सहजयोगामध्ये फार मोठी क्रांती घडते आणि ती म्हणजे धर्माचे खरे स्वरूप उभं झाल्यामुळे, धर्म पूर्णपणे स्थापन झाल्यामुळे त्यांच्या लक्षात हे येतंय की हे फालतूचे जे .... असून आपल्याला नुसते लुटत असतात. त्यांना यापुढे आम्ही काहीही भीक घालणार नाही. परंपरा म्हणजे मूर्ख बनण्याची परंपरा, काही कामाची नाही. ज्या परंपरेने मनुष्य सुज्ञ बनत जातो आणि वरच्या पातळीवर येत जातो आणि खरोखरच अध्यात्मामध्ये ज्याला आलोकित होता येतं तीच खरी परंपरा मानली गेली पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजपर्यंत कोणत्याही संताला ह्या लोकांनी जेवू दिले नाही. ख्रिस्ताला सुद्धा त्यांनी क्रुसावर धरलं. सर्वसामान्य माणसांनी जरी त्यांची ओळख करून घेतली तरी अशा लोकांनी त्यांना कधीही मान्य केलं नाही. आमच्यावरही पुष्कळ लोकांचा राग आहे. पण आम्ही जरा दुसर्याच पद्धतीत आहोत. तेव्हा आमच्यावर काही चालणार नाही त्यांचं. परवा असच झालं. एकाच्या प्रोग्रामला एक गृहस्थ एका बाईला घेऊन आले. तिला मिरगीचा रोग येत होता. असे काही रोग असले की मी सांगते की त्यांना जरा मला विचारून आणत जा. माझ्याबरोबर भुताटकी लोक १९ असतात ते हलू लागतात. मिरग्यावाल्यांना असे झटके येतात. मी म्हटलं की मला विचारल्याशिवाय तुम्ही आणत नका जाऊ. तर तिला परत मिरगीचा झटका आला. आल्यावर मी म्हटलं की तुम्ही कशाला घेऊन आला मला न सांगता. मला सांगितलं असतं तर मी लक्ष ठेवलं असतं. आता आला की नाही तिला मिरगीचा झटका! आणि बोलताना व्यत्यय आला. तर उठून आपलं राजकारण सुरू केलं त्यांनी की 'अहो, आम्ही असे ब्राह्मण आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तिथले पुजारी आहोत. तुम्ही संत साधुंनी तर सेवाच केली पाहिजे. आणि काय असंच केलं पाहिजे.' म्हटलं, 'असं का? तुमचे जोडेही खाल्ले पाहिजे. म्हटलं चालते व्हा इथून.' तरीही जायला तयार नव्हते. म्हटलं, 'खबरदार परत तुम्ही इथं आलात तर. प्रत्येक वेळेला संतांवर एवढी जबरदस्ती झाली. आता एकही आम्ही चालू देणार नाही. झालं तेवढं फार झालं.' तेव्हा मग ते उठून निघून गेले. अशा रीतीने म्हणजे या लोकांनी इतकच नाही छळलं तर वरून अरेरावी. संतांना छळलंच पाहिजे. आम्ही दोन थोबाडात दिल्या तर दहा थोबाड्यात त्यांनी खाल्ल्याच पाहिजे. कारण आम्ही फार शहाणे, धर्मात्मा लोकं. अशा रीतीने संतांवर सुद्धा आम्ही इतका अन्याय केला आहे, इतका अन्याय केला पण तरी सर्वसाधारण जनता बघत राहिली. त्यांनी विरोधही केला त्याबद्दल त्यांचा छळही झाला आहे. पण सर्वसामान्य जनतेने मात्र नेहमी संतांना ओळखलंय आणि संतांची पूजा केली आहे. आणि म्हणूनच आमचं कार्य सर्व आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठीच आहे. नंतर जे वरचे, जे सहस्राराचे चक्र आहे, त्याच्यामध्ये एक हजार पाकळ्या आहेत. तर डॉक्टर लोकांचे म्हणणे आहे की नाही ९९८ नाड्या आहेत. म्हटलं ९९८ असोत नाहीतर हजार असोत तुमचं काय जातंय हे मला समजत नाही. याच्यावरून वाद घेऊन आम्हाला सहजयोग करायचा नाही. म्हणून निघाले पाठमोरे. अशा पढतमूर्खांना काय म्हणावे! मी स्वत:च यासाठी मेडिसीन केलं म्हटलं या शहाण्यांच्याबरोबर बोलायचे आहे ना ! म्हणून मला सुद्धा शिकलं पाहिजे. आमच्याबरोबर दोन सुज्ञ डॉक्टर आलेले आहेत. एक रशियन आहेत आणि एक आपले पारशी डॉक्टर आहेत. बरेच वर्ष त्यांनी लंडनला राहन प्रॅक्टिस केली आहे. मानसशा्त्रज्ञसुद्धा आहेत. सगळे इथे फार शिकलेले विद्वान लोक आलेले आहेत. आणि यांनी तुमच्यासुद्धा योगशास्त्राचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. इतकचं नव्हे तर प्रत्येक देवता म्हणजे काय ? त्या देवतांचे अर्थ काय ? म्हणजे मी सहजयोग यांना शिकवायला बसवल्याबरोबर यांनी युनिव्हर्सिटीच मांडली मुळी आणि प्रत्येक गोष्टीचं सॉर्टिंग आऊट ज्याला म्हणतात ते करून घेतलेलं आहे. इथे मी आजपर्यंत मोठ मोठ्या टेप्स, लेक्चर्स करून घेतलेले आहेत. त्याचे सगळे वर्गीकरण करणे. ते काय आहे, काय नाही, हे कसं शिकून घेणं ह्या रोगाला काय? ह्या माणसाला हा त्रास आहे. कुंडलिनी कशी उचलायची? त्याचा काय त्रास आहे ? कुठे ती अडकते ? काय झालं? वरगैरे सगळं इत्थंभूत. तुमचे देवता वरगैरे काय करतात ? त्यांच्यापासून तुम्ही शिकणारं. कारण आपण नेहमी इंग्लिश लोकांकडूनच शिकतो. माताजींचे शिकवलेलं एवढं चालत नाही. तेव्हा मी त्यांना बरोबर घेऊन आले आहे. आपल्या संस्कृतीचा एवढा मोठा वारसा आपल्याकडे आहे! एवढं मोठं आपल्याला काही मिळालं आहे त्याची तुम्हाला कल्पनासुद्धा नाही. आणि या अशा कुचकामी शिक्षा पद्धती ज्याला मी म्हणते, ज्याच्यामध्ये काहीही तुम्हाला माहिती होतं नाही की काय खरं आहे. सर्वव्यापी शक्ती काय आहे? त्याच्याबद्दल काहीही त्याच्यामध्ये विचार नाही. विचार विनिमय नाही. अशा या कुचक्या शिक्षा पद्धतीने जर पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागलात तर असेच म्हणता येईल की सगळे सौंदर्य, संपदा, एवढे ऐश्वर्य घरात असताना सुद्धा तुम्हाला भीकेचे डोहाळे लागलेत. आता सहस्रारावर आल्यावर जेव्हा कुंडलिनी छेदन करते तेव्हा तुम्हाला सामूहिक चेतनेचा अनुभव येतो. अनुभव येतो, लेक्चर येत नाही. त्याला actualisation इंग्लिशमध्ये म्हणतात. हा अगदी अनुभव आहे. अनुभव २० म्हणजे तुमच्यामध्ये ही प्रबुद्धता आहे. तुमची जी चेतना आहे ती प्रबुद्ध होते. तुमच्या हातातून हे चैतन्य वाहू लागते. त्यानंतर ह्या बोटामध्ये तुम्हाला बरोबर कळतं की तुमचे कोणते चक्र धरलेले आहे, दुसऱ्यांचे धरलेले आहे कारण तुम्ही आपल्या सुत्रावर आल्यावर सगळ्यांच्या सुत्रावर जाऊ शकता. इथे आम्ही दाखवले आहे प्रत्येक बोटाला की कोणत्या बोटाला कोणते चक्र आहे. डावीकडे व उजवीकडे कोणती चक्र आहेत आणि ती कशी नीट करायची. म्हणजे लहान मूल सुद्धा सांगू शकेल की तुमचं कोणतं चक्र धरलेलं आहे. परवा माझी अडीच वर्षाची नात आहे, ती जन्मलेल्याच, आजकाल पुष्कळ पार लोकं आहेत, त्यातील माझी चारही नातवंड नशिबाने जन्मलेलेच आहेत असे. त्यातील धाकटी जी आहे अडीच वर्षाची, तिच्याकडे याच्यातलीच एक मुलगी गेली होती, पत्रीषा म्हणून. तिने विचारले, 'अनुपमा माझं कोणते धरले आहे ? तिला विशेष इंग्लिश येत नाही तरी तिने सांगितले की लेफ्ट विशुद्धी अँड नाभी. तिला स्पष्ट सांगितलं. एवढीशी अडीच वर्षाची पण तिने सांगितलं. ती म्हणे, 'माताजी, हिला कसं कळलं ? ' म्हटलं असं आहे की हे सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे. हा जो काही बोध आहे तो आतून झालेला आहे. आता जसं आपल्याला कळतं की गरमं आहे, थंड आहे तसंच त्या मुलांना कळतं. फक्त नावं सांगायची गोष्ट. ते सांगतील हे बघा, हे धरतंय आमचं. हे धरतंय. इतकंच नाही तर आम्ही नगरला इथे यायच्या आधी दुसरीकडे गेलो होतो. तर तिथे एक बाई माझ्यासमोर बसल्या होत्या. त्यांचं बोट हलू लागलं. मी त्यांना विचारलं, 'मूलं-बाळे होतांना, बाळंतपणात तुम्हाला फार त्रास झाला?' तर म्हणे, 'फार त्रास झाला. हे झालं, ते झालं आणि ते बोट माझ्यासमोर हालतं होतं. आणि हे चक्र जे आहे त्याने युट्रस कंट्रोल होतं. म्हणजे स्वाधिष्ठान चक्राची राईट साईड जी आहे त्याने युट्रस कंट्रोल होतं. असं आम्ही सांगितल्यावर म्हणे माताजी तुम्हाला कसं कळलं? पण ते समोर सगळं दिसतंय आम्हाला. हे जर आपलं झालं, आपल्या प्रत्येकामध्ये हे घटित होऊ शकते आणि झालं पाहिजे. झाल्याबरोबर ही सामूहिक चेतना तुमच्यामध्ये अवतीर्ण होते. ती काही सांगून होत नाही की आम्ही सगळे भाऊबंद आहोत . असं होत नाही. सगळं जे काही या संसारातलं आहे ते याच शरीरात आहे. जे काही तुम्ही आहात ते आम्हीच आहोत. म्हणजे उपकाराच्यासुद्धा या ज्या भावना मिशनरीपणाच्या आहेत त्यासुद्धा काही कामाच्या नाहीत. अगदी कुचकामाच्या आहेत. कारण जर आमचे एखादे बोट खराब झाले तर आम्ही त्याला असं केलं तरी ते ठीक होऊ शकते. जर तुम्ही आमचंच अंग -प्रत्यंग असलात जर आम्ही तुमचं ठीक केलं तर आम्ही स्वत:ला ठीक करतोय त्यात तुमच्यावर उपकार कसले ? ही अशी स्थिती आतमध्ये अवस्था करते म्हणजे हे काही सांगून होत नाही की हे आमचे बंधू आहेत, असं सांगायला नको. ते जाणवतच मुळी. लगेच इकडे हात असे वळायला लागतात. आता पुष्कळशी मुलं तोंडात बोटं घालतात. याचं निदान मानसशास्त्रज्ञांना लागलं नसलं तरी आम्हाला माहिती आहे. जर ती पार मुलं असली तर अगदी लगेच लक्षात येतं की ती बरोबर तोंडात बोटं घालतायेत, जे तुमचं चक्र बिघडतं. मग बदलतात ती. आता तिथे एक मुलगी अकरा महिन्याची होती. ती बरोबर सांगायला लागली की ह्यांचे हे धरतंय, त्यांचे ते धरतंय. त्यांची बोटच फिरायला लागतात कारण जळल्यासारखं होतं हातामध्ये किंवा काहीतरी ओढल्यासारखं होतं . ते बरोबर आपल्या हाताने असं करू लागतात. आता हे शास्त्र म्हणजे इतकं अभिनव आणि इतकं विशेष आहे! परमेश्वराला जाणण्याचं हे शास्र फार मोठे आहे आणि ही शक्तीसुद्धा आपण जाणली पाहिजे. आपल्यामध्ये ती स्थित आहे फक्त जागृत करून घ्यायची आहे. त्याबद्दल आता लोकांचे पुष्कळ आरोप पण झाले. त्यातलं एक विशेष मी बघते ते म्हणजे की कुंडलिनी जागृत करणे हे फार कठीण कार्य आहे आणि ते करतांना आम्ही बेडकासारखे उडतो वरगैरे वरगैरे असे अनेक लोक मला सांगतात. म्हणजे एक गृहस्थ माझ्यासमोर दोन्ही पाय वर करून बसले होते.. तर लोकांनी सांगितले असे २१ बसायचे नसते माताजींच्याकडे. अहो, म्हणे असच बसू द्या नाहीतर मी बेडकासारखा उडेन. त्यांनी म्हटलं असं का? तर म्हणाले आमचे गुरुजी असं म्हणाले की कुंडलिनी जागृत झाली म्हणजे बेडकासारखे उडतात. म्हटलं असं का? ते उडत होते का? तर म्हणे ते उडायचे. म्हटलं तुम्हाला आता बेडूक करायचे आहे की काय मला. अतिमानव करायच्या ऐवजी कुणाला जर बेडूक करायचे असले, कोणी म्हणे सिंहासारखे ओरडता काय ? आम्ही हजारो लोकांना, हजारो लोकांना अगदी कोलंबिया, चिली अर्जेंटिना, रशिया, चायना सगळ्या देशामध्ये माझं फिरणं झालं आहे. याशिवाय तिकडे इराण आणखीन इटली वगैरे सर्व या ज्याला आपण मेडिटेरियन म्हणतो त्या सर्व जागी माझे फिरणं झालं आहे. आणि अशा अनेक ठिकाणी, अनेक लोकांना जागृत्या दिल्या. पण कुठेही, कोणी बेडकासारखे उडलेले आम्ही पाहिलेले नाही आणि सगळं व्यवस्थित झालं. थोडीबहत गरमी कधी कोणाला वाटली असेल तर असेल पण जास्त त्रास कोणाला झालेला नाही किंवा म्हटलं पाहिजे की बहुतेक शंभरातले ९९ लोक कधीही त्यांना काहीही त्रास झालेला नाही. थोडीशी कधीकधी गरमी हातात येते फक्त. हलकी गरमी हातात येऊ शकते. त्यावर लोकांचे असे म्हणणे की फार कठीण असतं वरगैरे. समजा फार कठीण काम आम्ही सहज करतो तर काहीतरी असलं पाहिजे आमचंसुद्धा. असल्याशिवाय नाही होत. तेव्हा ते कठीण आहे त्याच्यामुळे आम्हालाच सर्टिफिकेट मिळतायत उगीच. तेव्हा असं लक्षात आणलं पाहिजे की काहीतरी कार्य करायचं होतच आणि घडायचं होतं. म्हणून 'माताजींनी हे शोध लावण्यापेक्षा, काहीतरी त्यांना माहिती आहे, ते त्या घेऊन आल्या आमच्यासाठी. त्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण हक्क आहे. म्हणून आम्हाला मिळत आहे आणि आम्हाला ते घेतलेच पाहिजे कारण आमचाही हक्क आहे.' अशा भावनेने जर तुम्ही बसलात तर कोणालाही अहंकार वगैरे जे प्रकार असतात ते येणार आहे कारण लगेच अहंकार डोक्यावर येतो. आपले जे प्रेसिडंट साहेब आहेत त्यांनासुद्धा कॅन्सर झाला होता तेव्हा लंडनला जाऊन त्यांना ठीक केलेले आहे. त्यांना माहिती आहे. आता ते काही मला पेपरात देऊ देणार नाहीत किंवा सांगू देऊ देणार नाहीत. तसं काही सरकारी नसल्यामुळे ते काही करणार नाहीत. असे अनेक प्रश्न मानवाचे असतात. तरी हे आपल्या आईचेच आहे, आपलेच आहे, स्वत:चेच आहे. अगदी त्याच्यात विशेष औपचारिकपणा काही करायचा नाही. अगदी साधंसुधं आहे. तुम्ही जरी आमच्या डोक्यावर येऊन बसले तरी आम्ही आईच आहोत, काही तुमचे गुरू नाही आहोत. पण तरीसुद्धा याला एक मान हा पाहिजेच. आईचा मान केला पाहिजे आणि हे समजले पाहिजे. तो मान जर मनात धरून तुम्ही जर पार झालात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की फार मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात, अनेक आयुष्यातील मिळवलेली ही संपदा तुमची, आज भटकली गेली आहे पण याच्यानंतर मात्र माणसाला थोडसं जमवावं लागतं कारण पाण्यातून जे बुडत होते लोक, त्यांना काढून बोटीवर जरी बसवलं तरी थोडावेळ असं वाटतं की आपण अजून पाण्यातच आहोत आणि काही काही लोक कोलमडतात सुद्धा. म्हणून त्याच्यानंतर थोडी मेहनत करून ते जमवून घ्यावं लागतं. ते कसं करायचं, काय करायचे याच्यासाठी आमचे इथे आम्ही सेंटर उघडलेले आहे. त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही विचारू शकता. याची फारच सोपी पद्धत आहे ज्याने तुमचे अनेक रोग ठीक होऊ शकतात. तेव्हा ते आपले रोग ठीक करून घेऊ शकतात. आमच्या फोटोलाही व्हायब्रेशन्स असल्यामुळे त्याचासुद्धा उपयोग होऊ शकतो. ते लोक फार सुज्ञ आहेत आणि त्यांनी फार मोठे कार्य केले आहे. त्याबद्दल मला मुळीच शंका नाही. एक दिवस या अहमदनगरमध्ये सगळ्यात जास्त सहजयोगी होतील. तरी आपण इथे बोलवलं, माझा मान केला त्याबद्दल मी फार आभारी आहे. २२ ु प१ी भार गुरच्या प्रती व्यक्तीची २मर्पणाची शक्ती ही श्री हनुमानजींची आहे. कोणत्या फ्रकारे तुम्ही गुरला प्रन्न कर शकती आणि त्यांच्या जवळ जाऊ हो शकता? जवळीकता म्हणजे शारीरिक जवळीक नव्हे. याची अर्थ आहे एक _J. क. प्रकारचे ताढात्म्य, एक प्रकारची समज. माइयापासून दू२रहूनही सहजयोगी आपल्या हृढयात माड़ा अनुभव घेऊ शकतात. ही शक्ती आपल्या हनुमानजी पासून प्राप्त कशयची आहे. पं. पू.श्रीमाताजी, जर्मनी, ३१.८.१९९० प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा। लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in आय २हज धमात क्षमा पहिली आवश्यक गोष्ट आहे, तुमच्यामध्ये क्षमा करण्याची शक्ती जेवढी जास्त तेवढे तुम्ही शक्तिशाली व्हाल. सवनी क्षमा कर. ...कलीयुगात क्षमेव्यतिरिक्ति कोणतेही मोठे साधन नाही. प.पू.श्रीमाताजी, २०.११.१९७५ ২ ॐे र० ---------------------- 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-0.txt चैतन्य लहरी मराठी नोव्हेंबर-डिसेंबर २०१२ १० 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-1.txt २हजयोग पहिले तुम्हाला लक्षमीची इलिक ढाखवती आणि नंतर तुम्हाली धन प्रदान करती. तुम्हाली आशीर्वाद ( धन) प्राप्त होतो. है पहिले प्रलोभन आहे ज्यागुळे तुम्ही खाली पडू शकता, तुमचे पतन होऊ शकते. यानंत२ दोन इत२ प्रतीकं आहेत. आपल्या हातांनी ती देते. ज२ तुम्ही एक ढ२वाजी उधडली त२ हवा येणा२ नाही, त्यााठी दुसरा द२वीजी उधडावी लागेल. त्यांनी तर द्यायचेच आहे. पं.पू.श्री मातीजी, २१.१०.१९९० 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-2.txt पी या अंकात की सथ अहजयोग्यांनी केलेली उपदेश ...8 १०० कुंडलिनी आणि सत चक्र ...१६ े ः क ॐ* 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-4.txt नागपूरमध्ये सहजयोगाचे कार्य उशिरा सुरु झाले. माझ्या लहानपणाच्या वास्तव्याने या भूमौवर आधीच माझ्या चैतन्य लहरी पसरलेल्या होत्या व सूक्ष्मात बरेच कार्य पूर्वीच घटित झाले होते. एके दिवशी है सर्व वृद्धिंगत होणार है मी जाणले होते नागपूर, ५ मार्च १९८९ २हजयोग्यांनी ना केलेला उपदेश 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-5.txt आईच्या गावाचं एक विशेष माहात्म्य आहे. येथील जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या रहातात. नागपूर शहरात सहजयोगाचा प्रसार व्हावा असे मला नेहमी वाटे. स्वत:च्याच घरात लोक आईपासून दूर रहातात. आजूबाजूला काय आहे ते पहातच नाहीत. दूरच्या गोष्टीकडे माणसाचे सहज लक्ष जाते. पण ज्या ठिकाणी आपण रहातो, जिथे आपले बराच काळ वास्तव्य झाले असते तेथील लोक इतके जवळ असतात की त्यांना आपल्यातील गहनता लक्षातच येत नाही आणि म्हणूनच नागपूरमध्ये सहजयोगाचे कार्य उशिरा सुरू झाले. माझ्या लहानपणाच्या वास्तव्याने या भूमीवर आधीच माझ्या चैतन्य लहरी पसरलेल्या होत्या व सूक्ष्मात बरेच कार्य पूर्वीच घटित झाले होते. एके दिवशी हे सर्व वृद्धिंगत होणार हे मी जाणले होते. माझे वडील ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्रय लढ्याच्या निमित्ताने जायचे व अनेक लोकांना भेटायचे त्या ठिकाणी मी अनेक लोकांना भेटले. मी त्यावेळी ९ वर्षाची असेन. गांधीजी मला प्रेमाने 'नेपाळी' या नावाने पुकारत. मी ज्या कल्पना व योजना त्यांच्यासमोर ठेवीत असे त्याचा ते आदराने विचार करीत . त्यांच्या आश्रमात, प्रार्थनेत, भजनावली गायली जाई . त्यात एकेका चक्राचे वर्णन कुंडलिनी विषयावर आधारित असे. मूळ आदितत्त्वापासून ख्रिस्तापर्यंत क्रमवार घेण्याविषयी मी त्यांना पूर्ण माहिती दिली. 'अल्ला हो अकबर' इ. यात सर्व काही होते ते नेहमी माझ्याशी विचार विनिमय करीत. जे लोक माझ्याशी लहानपणापासून संबंधित होते त्यांच्या मी अजून लक्षात आहे. कालच्या कार्यक्रमास माझ्या शाळेतील एक शिक्षकही आले होते. कदाचित त्यांच्यातील काही अंतर्ज्ञान व शक्तीने असेल की ज्याच्यामुळे ते माझ्याशी जोडले गेले व त्यामुळेच ते आजही मला ओळखू शकतात. १९४२ च्या 'चले जाव' या स्वातंत्र्य चळवळीत मी भाग घेतला. त्यावेळी मी सायन्स कॉलेजमध्ये शिकत होते. आम्हाला दहशत दाखविण्यासाठी अनेक पोलिस हातात लाठ्या व बंदुक घेऊन आले होते. पण मी न डगमगता गेटवर एकटी थांबले. याचाच निर्देश गेल्या वर्षी पुणे येथील कार्यक्रमात आमचे प्रिन्सिपल साहेब श्री.कृष्णमूर्ती जेव्हा माझ्या दर्शनार्थ आले तेंव्हा केला गेला. 'पहा तुम्ही एक शक्ती आहात हे मी जाणले होते. साक्षात शक्ती असल्याशिवाय एक १७ वर्षांची मुलगी पोलिसांना न भिता सामोरी जाण्याचे धैर्य दाखवू शकणार नाही व आज ती माझ्यासमोर प्रकट झाली आहे' असे त्यांनी गहिवरून सांगितले. निव्याज्य प्रेमाची महती माझ्या लहान वयापासून जे जे माझ्या संपर्कात आले ते मला आजसुद्धा ओळखतात. त्याचे एकच ত 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-6.txt कारण होते ते म्हणजे प्रेम. कारण माझे प्रेम निव्व्याज्य व निरपेक्ष आहे. त्यामागे कोणत्याही अपेक्षा नाहीत. या निव्व्याज्य प्रेमामुळेच आजही लोक मला ओळखतात. त्या कठीण काळातही आमची आई म्हणायची की,"आम्हाला स्वत:ला वेगळे असे कोणी ओळखतच नाही. निर्मलाची आई किंवा वडील म्हणूनच आम्हाला ओळखतात. हे केवळ लहान असूनही तू दाखविलेल्या निष्पाप प्रेमामुळेच." दुसरे जे मागतील ते देण्याचा माझा स्वभाव लहानपणापासूनच आहे. मला लोकांबद्दल नेहमी दया व प्रेम वाटत असे. त्यामुळे त्यांच्या अंतर्यामी मला स्थान आहे. त्यावेळी लोकांतील दुर्गुण मला दिसत होते पण मला माहीत होते, की त्यांना आपण जर आज निव््याज्य प्रेम दिले तर ते एक दिवस सहजयोगात उतरतील व परमेश्वराला प्राप्त करतील. म्हणून तुमच्यातही अशा निव्व्याज्य प्रेमाचा उगम व्हावा. त्यामध्ये कोणी कसलीही अपेक्षा ठेवत नाही. तुम्हाला कोणी काही देईल अथवा देणार नाही याची कशाला तमा बाळगायची? कारण ते सर्व विनाशी आहे. माझ्या लहान वयात मी सहजयोगाबद्दल कधीच बोलत नसे. तथापि माझ्या वडिलांना माहीत होते. दुसऱ्या कोणाला नव्हते. माझ्या वडिलांनी नंतर आईला सांगितले कारण तिला माझ्याविषयी एक स्वप्न दिसले होते. माझ्या जन्माच्या आधी तिला वाघ पाहण्याची इच्छा झाली होती व अशी बरीच स्वप्ने तिने पाहिली होती. या निव्व्याज्य प्रेमाची मी एक मुख्य गोष्ट पाहिली. शाळेत, कॉलेजात, शेजारी, प्रत्येकाला माझ्याबद्दल माहिती होती. मला आश्चर्य वाटायचे. ते इतरांना ओळखत नसत. भाऊसुद्धा आश्चर्याने म्हणायचा, "निर्मला दीदीला सगळे लोक कसे ओळखतात?" तुर्क त्याला म्हणायच्या, "तू निर्मलाचा भाऊ आहेस, आम्हाला माहीत आहे ?" तो म्हणायचा, "मला स्वत:चे व्यक्तित्त्व आहे की नाही?" अशा निव्व्याज्य प्रेमातूनच तुम्ही अनेकांशी मैत्री जुळवू शकता. माझ्या मैत्रिणी मला इतक्या पत्र लिहायच्या की कॉलेज, ऑफिसमध्ये लोकांना आश्चर्य वाटायचे की या मुलीला इतकी पत्रे कशी येतात? त्यानंतर माझे लग्न जुन्या विचारसरणीच्या कुटुंबात झाले. सतत डोक्यावर पदर घेऊन चेहरा झाकावा लागे. कोणाशी फारसे बोलायचे नाही. प्रत्येक वयस्कर व्यक्तीच्या पायाला स्पर्श करायचा. त्यावेळी मी काय केलं? प्रत्येकाला निव्व्याज्य प्रेम दिलं. त्यांच्या काही अडचणी असल्या तर सोडवायच्या. त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की मी एक दिवस जरी लखनौला गेले तरी सर्व कुटुंब माझ्याभोवती जमते व मला लोक सोडतच नाहीत. तर अशा तऱ्हेने मी वागले. अशा प्रकारे सर्व काही मधूर आहे. सर्व वातावरण अगदी प्रेममय बनते. लोकांशी बोलताना प्रत्येकाने प्रेमाने व नम्रपणे बोलले पाहिजे. त्यांना कमीपणा वाटेल किंवा अपमान वाटेल असे बोलणे ৩ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-7.txt केव्हाही उचित ठरत नाही. प्रेमाने व नम्रतेने बोला. सर्व काही निव्य्याज्य प्रेमाने करा. याचा भविष्यकाळात किती उपयोग होईल याची तुम्हास कल्पना नाही. माझ्या भावांचे मित्र मला आपल्या बहिणीप्रमाणेच आदराने मानतात. मी त्यांना काही सांगायचा अवकाश इकडचे जग तिकडे करतील. मी काही कल्पनाच करू शकत नाही, की मी त्यांच्यासाठी एवढे काय केले? मी एकच केले 'सगळ्यांवर सदोदित प्रेम केले' प्रेमात एकाने दुसर्यासाठी काही करावे लागते असे नाही. मी जे केले ते माझ्या स्वत:च्या समाधानासाठीच आणि यातून मी जे समाधान मिळविले ते इतके महान आहे, की कितीही खर्च केला तरी ते मिळणार नाही. निव्व्याज्य प्रेम म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले प्रेम. त्याला स्वार्थ शिवू सुद्धा नये. 'मी अमक्याकरीता हे केले' असा विचारही मनाला शिवायला नको. असा स्वभाव असू नये. अर्थातच तो चुकीचा आहे. फोड़ा अहंकाराचा फुगा / 'मी' चे अस्तित्व सहजयोगात काही जुने सहजयोगी आहेत ज्यांच्याबद्दल मला फार विचित्र अनुभव आले आहेत. सुरुवात करणारे तुम्हीच आहात. त्याचा पाया रचणारे पण तुम्हीच. ज्या पायावर (फाऊंडेशन) मुळाशी सहजयोगी आहेत तोच जर अस्थिर झाला तर वरची इमारतच कोलमडून पडेल. तुम्ही लोकांना पार करता याचा अर्थ काय? तुम्ही ते घडवत नाही. तेव्हा प्रत्येकाने असे मानले पाहिजे की, 'मी स्वत: काही करत नाही (मी अकर्मी आहे). ही (कुंडलिनी) जागृती श्री माताजींनी दिली किंवा हा माणूस पार झाला.' 'मी हे केले, ते केले' असल्या भ्रामक कल्पना करून घेऊ नये. 'आम्ही जुने सहजयोगी आहोत. आम्ही सुरुवातीच्या काही थोड्या सहजयोग्यांपैकी एक आहोत' अशात-्हेच्या भ्रामक कल्पना काही सहजयोगी करून घेतात असे मी एक अनुमान काढले. ज्या प्रमाणात हा सहजयोग वाढतो त्या प्रमाणात या भ्रामक कल्पनाही वाढीस लागतात. जसे 'माझ्यामुळे अनेक सहजयोगी या मायेचा सागर पार करून गेले.' या त्यांच्या खोट्या आढ्यतेमुळे अशा प्रकारचे जवळजवळ सर्व सहजयोगी बाहेर फेकले गेले. ज्यांनी हा खोटा गर्व वाढविला ते भूतबाधेने पछाडले जातात असे मी पाहत आले. त्यांचा अहंकाराचा फुगा एवढा फुगतों की त्यांना सहजयोगात अस्वस्थ वाटू लागते. स्वत:ला ते स्वयंघोषित नेता समजू लागतात व इथपर्यंत ते स्वत:ची समजूत करून ठेवतात की, 'हे सर्व आपणच घडवीत आहोत, आपल्यामुळेच सर्व काही व्यवस्थित चालू आहे. हा सर्व डोलारा आम्हीच सांभाळतो. ते सर्व सुरळीत ठेवण्यासाठी त्यामागे आम्हीच आहोत.' या सर्वांचा परिपाक म्हणजे त्यांची नम्रता जाते, फ्रेम संपते आणि ८ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-8.txt ते अधिकाधिक चुका करण्यात गढून जातात. जून्या सहजयोग्यांमध्ये काही कमतरता आहेत असे माझ्या नजरेस आले. नवीन मंत्र, कल्पना व पद्धती पुढे आणून त्या माझ्या नावावर खपवितात. सहजयोग निर्माण करू नका. काही तरी नवे करावे असे विचार पाश्चिमात्यांच्या मनात येतात. सहजयोगाला परंपरा आहे. तुम्हाला त्याची फळे मिळाली आहेत. एकदा फळ हातात आल्यावर पुढे काय करायचे राहते ? कसे करावे? काय करावे हे मी नेमके तुम्हाला सांगत आलेय. सहजयोगात गटबाजी करायची नसते. या सवयी राजकारणामुळे लागतात. 'काही नवे शोध लावू नका अथवा श्री माताजींनी सांगितलेच आहे तर तुम्ही असेच करा' असेही सांगू नका. नवीन काहीतरी निर्माण करून माझ्या नावावर लपविल्याने तुम्ही भ्रमातून निर्माण केलेल्या जाळ्यात अडकता. ह्या गोष्टीचा तुम्ही धिक्कार केला पाहिजे. जे माताजी आम्हाला करावयास सांगतात ते आम्ही करीत राहू. कुठल्याही खोट्या कल्पनांची जाहिरात करणार नाही. समजा तुम्हाला काही विचार किंवा कल्पना ते सुचल्या तर त्याविषयी मला लिहा. त्यावर मी विचार करून जरूर तेथे दुरुस्ती करून हे असे पाहिजे, तसे करा इत्यादी. मी तुम्हाला समजावून सांगेन. जेथे 'मी' चा निर्देश होतो तेथे सहजयोगाचे अस्तित्व संपते. तो मी नाही हे सतत मनावर बिंबले पाहिजे. जेथे 'मी' साकार होतो तेथे सर्व संपते. तुमचा स्वभाव जर रागीट असेल तर राग कमी करण्याचा प्रयत्न करा. जे क्रोधिष्ठ लोक सहजयोगात होते ते सर्व बाहेर फेकले गेले. आपल्यातील ह्या क्रोधाचा उगम कोठून होतो ह्याचा सर्वांनी अभ्यास करावा. जर त्याचा संबंध लिव्हरशी असेल तर लिव्हर ठीक केले पाहिजे. पण तुम्ही शांत व्हायला पाहिजे. पूजेच्या वेळी प्रत्येकजण शांत असतो. आपल्या भोवताली घडणाऱ्या क्षुल्लक घटनेवरूनही रागवण्याची प्रवृत्ती मोडून काढून त्यावर मात केली पाहिजे. त्याशिवाय प्रगती होणार नाही. एवढेच नाही तर त्याचे आपल्यातून पूर्ण उच्चाटन होण्यासाठी झटले पाहिजे. सहजयोगात त्यासाठी मार्ग आहेत. ते कसे घडवावेत याचा प्रत्येकाने अभ्यास करून ते समजून घेणे आवश्यक आहे. विश्व निर्मल धर्म सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने मधोमध राहणे आवश्यक आहे. मी ते माझ्या प्रयत्नाने स्वत: घडवू शकेन असा कोणाचा समज असेल तर तो निरुपयोगी आहे. तुम्ही मधोमध आला नाही तर तुम्ही काही मिळवू शकणार नाही. त्या गहनतेत तुम्ही उतरले पाहिजे. या गहनतेतून मधोमध राहन तुम्ही दुसर्याशी मैत्री केली पाहिजे. ह्या मैत्रीच्या भावनेतूनच 'विश्व निर्मल धर्माच्या' नियमांचे ज्ञान तुम्ही जाणू ९ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-9.txt शकाल व तुमच्यात आत्मसात करून घ्याल. धार्मिक रूढी ज्या आंधळेपणाने वाढल्या जातात, उच्चनीचता किंवा जातपात वरगैरे आम्ही मानत नाही. खरा धर्म आम्ही मानतो. बाह्यातून दिसणारे विधी, कर्मकांड ह्याला आमची मान्यता नाही. वैधव्यास मान्यता नाही. कारण ती चुकीची कल्पना आहे. पुरुषांनी स्त्रियांवर लादलेला हा अन्याय आहे. कोणत्याही पंथातील टिकाकारांना घाबरू नका. आमच्या आईने आम्हाला कपाळावर कुंकू लावण्याची आज्ञा केली आहे असे सांगा. पांढऱ्या कपाळाने फिरण्यास आम्हाला परवानगी नाही. वैधव्य हे फक्त स्त्रियांनाच लागू आहे हा विचारच मुळात चुकीचा आहे. वैधव्य बरोबर आहे असे मानले तर पुरुषांनाही ते लागू झाले पाहिजे. पुरुष जर विधुर होऊ शकत नाही तर स्त्रियांनी वैधव्य का मानावे ? पुरुषांनी हे वैधव्य लादून स्त्रियांच्या यातना मात्र वाढविल्या. ह्यातून वेगळे असे काय मिळणार आहे ? आणखी एका प्रकारामुळे सहजयोग्यांना पकड येते ते म्हणजे ते खोट्या गुरूंच्या नादी लागतात. हे अतिशय धोक्याचे आहे. केव्हाही ते तुमच्या अंतरंगात प्रवेश करतील. अशा लोकांनी आपले अंतरंग पूर्ण स्वच्छ केले पाहिजे. स्वत:ला स्वच्छ केले पाहिजे. ह्यात कोणी हरकत घेऊ नये अथवा ह्याबाबत नाउमेद होऊ नये. असल्या भ्रामक कल्पनांना खतपाणी घालू नये. सुरुवातीला क्षुल्लक म्हणून आपण दुर्लक्ष करतो. परंतु ती गोष्ट हळूहळू वाढत जाते व आपल्या हाताबाहेर जाते. मोठ्या वृक्षाचे रूप धारण करते. त्यातला थोडा अंश जर तुमच्यात राहिला तर तुमच्यातील चैतन्य लहरी नष्ट होतील. जर तुमच्या गुरूतत्त्वावर पकड असेल तर ती जोडपट्टीने दूर करावी. सूक्ष्मातूनही तुमच्या आत्मतत्त्वावर आघात होतात. ह्याबाबत सर्वांनी सतत जागृत राहिले पाहिजे. भारताबाहेरील जे सहजयोगी आहेत त्यांच्यातही अनेक प्रकार पहावयास मिळतात. काही सूक्ष्मतेत उतरतात व गाभ्यापर्यंत पोचतात. काही अर्धवट परिपक्व राहतात तर काही कामातून गेलेले असतात. अशा लोकांशी आपण योग्य रीतीने व नम्रपणाने वागले पाहिजे. यथावकाश तुम्हाला आश्चर्य वाटेल. ज्यांना मूळातूनच (आंतरिक) ओढ नाही ते स्वत:हन बाहेर फेकले जातात. ज्यांना अजून सहजयोग व्यवस्थितपणे समजला नसेल अशांना तुम्ही मदत करत जा. त्यांना तुम्ही संपर्कात ठेवून ठीक करा. ते आल्याबरोबरच त्यांना भूतबाधेने पछाडले आहे असे जाहीर करू नका. महाराष्ट्रात आम्ही जरा कठोरपणे सत्य सांगतो 'अहो, तुम्हाला भूतबाधेने पछाडले' १० 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-10.txt 641 कधीकधी तुम्ही दुखावण्याच्या सवयींनी पछाडले जाता. मी जेव्हा एखाद्याला विचारते की तुम्ही सहजयोग का सोडला तर ते मला सांगतात की, 'माताजी, आम्हाला सांगण्यात आले आहे की आमच्या घरातच वाईट शक्तीचे (मृतात्म्याचे) वास्तव्य आहे आणि तुम्ही पण त्या भूताने पछाडलेले आहात.' ह्याबद्दल मी सहजयोग्यांना विचारले तर लगेच उत्तर मिळाले की आम्ही खरे काय ते सांगितले. वस्तुस्थिती सांगतानासुद्धा त्यांना जे उपकारक ठरेल तेवढाच भाग सांगा. तुमच्या सांगण्याने त्यांना काय ११ छु 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-11.txt फायदा झाला? उलट सहजयोगात येण्याची त्यांची संधी मात्र गेली. तुम्ही ज्यावेळी खरे सांगता त्यावेळी अगदी गोड शब्दात बोलले पाहिजे असे नाही. पण जे सांगाल ते हितकारक असे सांगा. दुसऱ्यांना पोषक ठरेल अशारीतीने सांगा. त्यांची जी काही अडचण असेल ती समजावून घेऊन आम्ही ती मुळासकट दूर करू असा त्यांना विश्वास द्या. 'तुम्हाला भूतबाधा आहे' असे सांगू नका. तुम्ही जर म्हणाल की तुम्हाला भूतबाधा आहे तर ते लगेच म्हणतील की आम्हाला असे डॉक्टरांनी कधीच सांगितले नाही. तुम्ही असे कसे म्हणता. ह्या गोष्टीबद्दल मी जे सांगितले एकंदरीत ठीकच झाले. आजच्या दिवसापर्यंत नवीन सहजयोग्यांचे काय प्रश्न आहेत त्याबद्दल मी कधीच बोलले नाही. जे लोक नुकतेच सहजयोगात आले त्यांना आपण निव्व्याज्य प्रेमाने वागविले पाहिजे. ह्याबाबत जुन्या सहजयोग्यांनी नीट समजून घेतले पाहिजे. ह्याउलट ते स्वत: पुढे पुढे करीत असतात. अशारीतीने नेहमी पहिल्या रांगेत बसणारे, स्वत:ला जुने समजणारे सहजयोगी, स्वत:ला, 'आम्ही पुढेच बसणार कारण आम्ही खास आहोत. आम्हाला खास पातळी आहे' असे समजतात, असे दाखवितात. असो, माणूस निरूपयोगी आहे. त्यांना एखादे कार्य करण्यास सांगितले तर ते दुसर्यांच्या अंगावर टाकणार 'तुम्ही हे करा, तुम्ही ते करा' असे दुसर्यांना सांगून स्वत: इतस्तत: फिरत राहणार व इतरांना कामात अडकविणार म्हणजेच उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा हा प्रकार. अशी ही परिस्थिती. त्यांना जर मी सहजयोगातून निघून जा म्हणाले तर ते माझ्या पायावर येतात व सांगतात, 'माताजी, आम्ही तर जूने सहजयोगी आहोत.' 'हो का? तुम्ही तर आहातच पण जीर्ण आहात तर आम्हाला सोडणे हेच चांगले.' खरा सहजयोगी सगळ्यांना मी विनंती करते की नम्र होऊन व पूज्य भावनेने शपथ घेतली पाहिजे की 'मी अजून काहीच मिळवले नाही. मला बरीच उन्नती करायची आहे. मी जेव्हा दुसर्यांना प्रकाश देतो तेव्हा हे करताना मीच अधिक प्रकाश १२ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-12.txt कि मिळवतो.' दुसर्यांना तुम्ही प्रकाश दिला पाहिजे. काही जुने सहजयोगी कामातून गेलेत आणि काही नवीन आलेत, ते उन्नत झालेत. अनेक प्रसंगी आलेल्या अनुभवातून व जुन्या सहजयोग्यांच्या वागण्यातून जे दिसले त्यांना सांगण्याचे मी ठरविले, की त्यांना स्वत:च्याच भूतबाधेने पछाडले आहे का? याची त्यांनी तपासणी करावी. ही भूते म्हणजे त्यांचा अहंकारच. या अहंकाराच्या बाधेने आपण ग्रस्त आहोत हे पाहिले पाहिजे. ज्या कारणाने तुमची हानीच होणार. काही वेळा आपण खुष होतो, की आम्हाला सत्ता मिळाली १३ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-13.txt आणि आमचा सर्व लोक आदर करतात. पण सहजयोगात येऊन आपण सत्ता गाजवू असे कोणी समजत असेल, त्यांनी सहजयोग करू नये. आले लक्षात ? पैशाची अफरातफर करण्यास सहजयोगात पूर्ण बंदी आहे. हे धर्माच्या विरूद्ध आहे. पैशाच्या बाबतीत तुम्ही काळजी घ्या. सहजयोगाचा उपयोग अर्थार्जनासाठी करू नका. फायदा मिळवायचा असेल तर तो सहजयोगाच्या बाहेर राहून. मुळातच नेकीने राहणे महत्त्वाचे आहे. नाहीतर याचे वाईट परिणाम होतात. एका गृहस्थाने पैशाचा छोटा घोळ केला तर त्याचा मुलगा गेला. नुकताच एकाला हार्टअॅटॅक आला. त्यानेही असाच पैशाचा घोळ केला. मी काही गोष्टींचा जाब विचारला असता त्यांना राग आला. आठ दिवसांच्या आत त्यांचे निधन झाले. कोणीही मला खोटे सांगू नये. एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि एका मुलीबद्दल मला खोटे सांगू लागले. त्यांना पक्षाघात होऊन त्यांची वाचा गेली. एकमेकांशी खोटे बोलू नये. प्रेम वाढवा. स्पर्धा नको. एकमेकांच्या कागाळ्या करू नका. एकमेकांचे पाय ओढू नका कारण तुम्ही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश केला आहे आणि तेथील कायदे काय आहेत याची जाणीव तुम्ही ठेवा. तेथे तुम्ही खोटे सांगूच शकत नाही. पैशाचे घोळ करू शकत नाही. आपल्या अधिकारात दुसऱ्यावर हुकमत करू शकत नाही. या तीन दुष्ट प्रवृत्ती टाळल्या तर सहजयोगाचे सर्व आशीर्वाद तुम्हास प्राप्त होतील. कुसंस्कृत विचारातून स्त्री- पुरुष संबंधामधे ज्या गैरसमजूती निर्माण होतात, त्या दूर होतात. हे सर्व घटीत होत नसेल तर तो सहजयोगी नाही. वाईट सवयी सहज जातात पण वरील तीन गोष्टींमुळे कमकुवतपणा येतो. सगळ्यात भयंकर म्हणजे सत्तेची अभिलाषा व दुसर्यावर हकमत गाजवण्याची आकांक्षा. असे अधिकाराची हाव असणारे सहजयोगी कोठेही असतील तर निश्चित समजा, की ते बाहेर फेकले जातील. अशा एका घटनेत ते अडकले जातात की स्वत:लाच बाहेर ओढून घेतात. सहजयोगात असे सतत पुढे पुढे करणारे अनेक आहेत. अनावश्यकपणे पुढे पुढे करू नये. मलाच नेहमी श्री माताजींच्या चरणावर जाऊ द्या असा आग्रह धरू नये. जर माझ्या चरणांना तुमच्या हृदयात स्थान आहे तर माझ्या पायावर येऊन काय मोठा लाभ तुम्हास होणार आहे असा विचार सतत बाळगा. अशी सतत पुढे पुढे करणारी व्यक्ती पुढील वर्षात गायब होणार हे निश्चितच. श्री भैरवनाथ त्यांना कायदा शिकवतीलच. सतत पुढे पुढे करणे म्हणजे नुसती डोकेफोडी. त्यांना मी शांत रहा म्हणून सांगितलं तर ते ऐकायला तयार नसतात. असे दिसून येईल की दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात. एक आहे बाहेर टाकणारी १४ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-14.txt (सेंट्रिपेटल) व दुसरी आत ओढणारी (सेंट्रीफ्युगल). एक तुम्हाला मधोमध आणते तर दुसरी केंद्रापासून बाहेर फेकते याचे कारण म्हणजे परमेश्वरी राज्यात सगळ्यांना पुरेल एवढी जागा कोठून असणार ? आता प्रत्येकजण माझ्याशी पत्राने परस्पर संपर्क साधायला बघतात. काही २५ पानांची पत्रे असतात. अशा प्रत्येक पत्राची दखल घेण्यास मला एवढा वेळ आहे का आणि पत्रे वाचली तर त्यात माझी आई अशी आहे किंवा माझ्या आईचा काका, भाऊ इत्यादीविषयी क्षुल्लक गोष्टींनी ते भरलेले असते. मला त्यांच्याशी काय कर्तव्य आहे? सर्व सहजयोगी नात्यात आहेत. तुमच्या इतर नातेवाईकांशी मला काही कर्तव्य नाही. जोपर्यंत तुमचे नातेवाईक सहजयोगात येत नाही त्यांच्याविषयी मला काही करायचे नाही किंवा तुम्हालाही काही करायचे नाही. देवही त्यांच्याविषयी काही करू शकत नाही. अशा लोकांबद्दल मला कधीही सांगू नका. त्यांनी सहजयोगात यावे. तुमच्या परिचयाच्या एखाद्या व्यक्तीबद्दल माझ्याकडे तरफदारी करून माझ्याकडे बिलकूल आणू नका. कारण मला त्याच्याशी काय कर्तव्य ? फार तर त्याला माझा फोटो देऊन त्यावर मेहनत करायला सांगा. बरे एकदम कोणाला करण्याच्या भानगडीत पडू नका. त्याला फोटोपुढे बसवा. डावीकडचा रोग, उजवीकडचा रोग व तिसरा मध्यवर्ती संस्थेवरील अशा तीन प्रकारचे आजार असू शकतात. डावीकडील जे त्रास असतात ते मानसिक प्रकारचे, उजव्या बाजूचे शारीरिक किंवा बौद्धिक व मधल्या संस्थेवरील म्हणजे चुकीच्या गुरूंचे अथवा अनाधिकाराने वापरलेल्या ज्ञानातून निर्माण होतात. या तिन्हीत तुम्ही तरबेज झालात तर फोटोवरूनसुद्धा दुसऱ्याला काय त्रास आहे हे सांगू शकाल. लवकरच या रोगाविषयी आम्ही एक पुस्तक प्रकाशित करणार आहोत. म्हणजे मला श्री माताजींनी असे सांगितले, हे आणि ते असे कोणालाही सांगू नये. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तास न तास ध्यान करण्याची जरुरी नाही. फक्त दहा मिनिटे पुरे. ध्यान लागण्यास एवढा वेळ लागला तर ते मूर्खपणाचे म्हणावे लागेल. असला वेडेपणा टाळा. तुम्हाला एखाद्या स्थळी जायचे आहे व त्याला एखादे फाटक आहे तर त्यातून आत प्रवेश करण्यास किती अवधी लागतो? पण तुम्ही जर निश्चय केला तर निश्चित अधिक वेळ लागेल. डोंगर चढायचाच निश्चय केला तर निश्चित अधिक वेळ लागेल. डोंगर चढायची जरूर आहे का ? साधी गोष्ट बिकट करण्याचा हा प्रकार म्हणजे सहजयोग नव्हे. तर आजचे हे भाषण अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचे भाषांतर करून सर्व केंद्रांना पाठवावे. १५ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-15.txt कुंडलिनी आणि सात मागील अंकातील भागावरून पुढे चालू २३/२/१९७९ हृदय चक्राच्या वर जे चक्र आहे हे विशुद्धवी चक्र. हे फारच महत्त्वपूर्ण आहे. कारण हे चक्र, या चक्रामुळे मनुष्य जनावरापासून मानव झाला आहे. त्याने आपली मान खालून वर उचलली आहे. त्याठिकाणीच तो मानव झालेला आहे. आणि ही जी मान आहे, त्या मानेला कोणाही समोर झुकवायचे नसते. असत्याच्या पुढे तर मुळीच झुकवायचे नसते. पण साक्षात परमेश्वरच असला किंवा साक्षात खरोखर असा मनुष्य असला की जो वंदनीय आहे त्याच्यासमोरच मान झुकवली पाहिजे. आणि त्यामुळे आपण उठल्यासुठल्या ज्याच्या त्याच्या पायावर येतो. मग ते असे ना, ते ढोर असे ना सगळ्यांच्या पायाखाली येतो. आपले हात घालायची काही गरज नाही. आमच्याही भूत पायावर येऊ नये. जोपर्यंत तुम्हाला काही प्रचिती येत नाही तोपर्यंत मुळीच तुम्ही पायावर येऊ नये. आणि याबद्दल मी दोन अनुभव पाहिले. आम्ही लंडनला असतांना लोकांना वाटायचे की माताजींच्या पायावर काय यायचे? काम सगळे आमचे पाय करतात तर करू तरी काय? तर त्यांना हा राग की माताजींच्या पायावर का यायचे आम्ही. म्हणजे पार झाल्यावरसुद्धा. आणखीन इथं मी म्हटलं परवा गावात की आता नको दर्शन फार झालं. तर सगळ्यांना वाईट वाटलं की माताजींनी दर्शन सुद्धा आता आम्हाला दिलेले नाही. म्हणजे अशी दोन टोकं आहेत जगामध्ये. तर सांगायचे असे आहे की सुज्ञपणाने हे समजले पाहिजे की मानव हा अत्यंत उच्च कोटीतला एक विशेष बनवलेला प्राणी आहे आणि त्याने प्रत्येक माणसासमोर आपली मान वाकवायची नाही. तसेच हे विराटाचे स्थान आहे. विराट म्हणजे सबंध जे आहे. असाच परमेश्वर सबंध आहे आपल्यासारखाच. आणि त्याच्यातील आपण एक एक लहान लहान पेशी आहोत. सेल्स आहोत. ह्या ज्या सेल्स आपण आहोत अगदी परमेश्वरासारखेच बनवलेले आहोत. जेव्हा ह्या जागृत होतात तेव्हा त्या विराटाला जाणून घेतात. हे असं विराट स्वरूप हे इथून जाणलं जातं. मग लोक जे तंबाखू खातात, आता नगरला तर मला तंबाखू इतकी पिकते की नाही माहीत नाही. पण प्रत्येकाच्या गळ्यात तंबाखू दिसते मला. तर ही तंबाखू कुठून आली नगर जिल्ह्यात, हे काही मला समजत नाही. पण इतकंच नाही तर बायकासुद्धा ते काहीतरी काळंबिळं लावत असतात. ते काय? तशा तऱ्हेची तंबाखू कुठून आली ते मला ठाऊक नाही. पण त्या तंबाखू मुळे हे चक्र मात्र असं जाम बसलेलं आहे की त्यांच्या मुलांना खोकले, त्यांच्या मुलांच्या मुलांना खोकले आणि त्यांनाही सारखा त्रास, श्वास लागलेला अशी सर्व स्थिती या तंबाखुमुळे होते. पण सांगून कोणी ऐकत नाही. म्हटलं तंबाखू सोडा. सोडवत नाही. फक्त सहजयोगात आल्यावर मात्र या तंबाखूला सोडावं लागतं. आणि ती सुटते कशी वरगैरे असे बरेच मजेदार गृहस्थ ते सहजयोगात आल्यावर फार कार्य करीत असत आणि फार आम्हाला प्रिय होते. सगळं काही असतांना त्यांना तंबाखू पूर्णपणे सोडता येईना. कधीकधी हुक्की यायची त्यांना. शेवटी एकदा मी आले असतांनासुद्धा त्यांनी तंबाखू घेतली होती. माझ्या लक्षात आलं. त्यांना वाटलं की माझ्या काही लक्षात आलं नसेल. त्याच्यानंतर मी उगीचच कानाडोळा केला. म्हटलं बघू या आता कसं काय होतय ते. तर त्याच्यानंतर ते मला सांगायला लागले अनुभव लोकांनी सांगितले. पैकी एक की, 'अहो, माझं तोंड, माताजी, एकदम हनुमानासारखं होतय कधीकधी. असं वाटतं की जसं फुगायला लागलं. हे १६ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-16.txt चंक्र कसं काय? हे सहजयोगाने मी काय हनुमान होतोय की काय मला समजत नाही.' 'तुम्ही तंबाखू घेता की नाही?' 'हो माताजी, आम्ही घेतो' आणि कानाला हात लावला. तर आता माझ्यासमोर वचन द्या. तुमची सोडवते मी. जरासा प्रयत्न करा. कारण आता पार झाल्यामुळे त्याची विशेष काही गरज वाटत नाही. म्हणे 'आता सुटलंच आहे.' म्हटलं 'जे आता थोडसंच आहे ते ही सोडा म्हणजे हे हनुमानपणा जाईल.' आणि त्याच्यानंतर त्यांनी ती सोडून टाकली. असे सहजयोगाने फार सहज इलाज होतात. आणि अगदी मजेदार इलाज होत असतात आणि सगळ्यांनी ते अगदी मजेने बघावे असे इलाज असतात. त्याच्यानंतर हे जे विशुद्धी चक्र आहे, त्याचे माहात्म्य सांगावे तेवढे कमी. कारण सोळा हजार नाड्या त्या चक्रावर अवलंबून आहेत. तेव्हा तुम्ही हे लक्षात आणलं पाहिजे की तुम्ही सहज जी दोन आण्याची सिगरेट घेऊन पिता ते त्या तुमच्या सोळा हजार नाड्यांना तुम्ही नष्ट करत आहात. आणि त्या किती मुश्किलीने बांधल्या गेल्या आणि त्या कुठून कुठून, कशा सुद्धा माहिती नाही. आता लंडनला इथपर्यंत झालेलं आहे की डॉक्टर सांगतात. इतकंच नाही तर प्रत्येक सिगरेट वर लिहिलेलं असतं की याने तुमचा प्राण जाईल, याने तुम्हाला कॅन्सर होईल तरीसुद्धा लोक घेतात. त्या सिगरेटचा एवढा कॅन्सर झाला तरी लोकांना सुटत नाही. आणि मला हे समजतं कारण सवय अशी गोष्ट आहे की सुटत नाही. फक्त त्याला समजून घेतलं पाहिजे. आणि आपले व्हायब्रेशन्स ठीक केल्यावरती आपोआप कशा धावतात वर्गरे त्याच्याबद्दल तुम्हाला जराशी १७ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-17.txt सुटेल. ती अगदी सहज सुटते आणि या सगळ्या सवयी सुटून मनुष्य अत्यंत अशा वातावरणात येतो की त्याला आपण म्हणू शकू की परमेश्वराच्या साम्राज्यात येतो. त्याच्यावरचे जे स्थान आहे ते आज्ञा चक्राचं. आता मी आपल्याला सांगितलच आहे की सर्व धर्म जे आहे एकाच झाडावरची फुलं आहेत. आणि त्याबद्दल आपण उगीचच वाद घालत बसतो की 'हे माझं फूल आहे, ते तुझं फूल आहे.' एकाच शक्तीवर पोसलेली. अनेक वेळेला वेगवेगळ्या लोकांनी या संसारात येऊन हे कार्य केले आहे. जसं मी आपल्याला सांगितलं आहे की दहा गुरू आले होते. तसंच हे चक्र जे डोक्यावरती आहे, हे जे कुंकू जिथे आम्ही लावतो आहे, ते जे आहे ते आज्ञा चक्र. त्याच्या वरती महाविष्णूचे स्थान आहे. ते आता हा महाविष्णू कोण आहे? ते जर देवीमाहात्म्य आपण कोणी वाचलं असेल तर कळेल. आणि हे म्हणजे ह्याचे जे तत्त्व आहे ते गणेशाचे तत्त्व आहे. म्हणजे जर समजा एखाद्या रुपयाची एक बाजू गणेश असेल तर दुसर्या बाजूला महाविष्णूचं स्थान आहे. आणि त्याला महाविष्णूने अवतरण एकदाच घेतलेले आहे आणि ते ख्रिस्ताचे अवतरण आहे. म्हणजे ख्रिस्त हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला महाविष्णूच आहे. आणि त्याचं जर तुम्ही महाविष्णूचं वाचाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तंतोतंत त्याचं सगळं काही त्या महाविष्णूबरोबर अगदी तसच्या तसं वर्णन केलेलं आहे. आणि खिस्त, ह्याची आई मेरी जी होती, ती स्वयं साक्षात राधाच होती. त्या महाविष्णूच्या वर्णनात आहे की त्या राधेने स्वतःच आपला पुत्र तयार केला होता आणि वडील त्याचे विष्णू होते म्हणून त्याला ख्रिस्त म्हणतात. हे कुणालाही तिथे समजलं नाही की कृष्णाला तिथे ख्रिस्त का म्हणतात? कारण कृषी वरून कृष्ण शब्द झाला. कृष्णाने कृषी केली आणि त्याचं फळ हे ख्रिस्त आहे. आणि त्याच्यात हे वर्णन आहे कृष्णाने आपल्या मुलाला आपला सोळावा अधिकार दिलेला आहे. तसंच तो सर्व जगाचा आधार होईल. लोकांना हे दाखविल जे कृष्णाने सांगितलेलं होतं 'नैनं छिन्दंति शस्त्राणि । नैनं दहती पावक: । ' तर हे दाखवेल की ही जी शक्ती आहे ती कशाही तऱ्हेने नष्ट होऊ शकत नाही. आणि त्याचं उद्धरण होईल. आणि ते आपल्याला त्याच्या पुनरुत्थानात दिसलेलं आहे. तेव्हा ही सगळी मंडळी एकत्र, नात्यात असताना आपण उगीचच मध्ये भांडाभांडी करतो कारण आपल्याला त्यांच नातं जुळलेलं नाही. हे रियलायझेशन नंतर सगळ्यांना कळतं. आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीचा कसा उपयोग करायचा ते समजून घेतो. त्याच्या त्या एकंदर मदतीमुळे आपल्याला सुद्धा ती सर्वव्यापी शक्ती इतकी मदत करते की आपणसुद्धा लहान लहान क्षुद्र जे काही आजपर्यंत शिकलेलो आहोत, ज्या क्षुद्र कल्पना की आम्ही हिंदू, ब्राह्मण, ख्रिश्चन वरगैरे वगैरे, अशा ज्या क्षुद्र भावना आहेत त्या मिटवून आपण जागतिक मानव होऊन जातो. त्याच्यावर जे चक्र आहे, ते सहस्राराचं चक्र आहे. हे चक्र जेव्हा कुंडलिनी छेदते, जेव्हा ब्रह्मरंध्रातून ही कुंडलिनी छेदून जाते तेव्हाच मनुष्य पार झाला असे म्हणतात. त्याला ख्रिस्ताने बाप्तीझम म्हटलेले आहे, महम्मदाने पीर म्हणून म्हटलेले आहे. सगळ्या धर्मांनी सांगितलेले आहे की तुमचा पुनर्जन्म झाला म्हणून. तुमचा द्विज झाला पाहिजे. आता या बाबतीतही फार गोंधळ झाला आहे. द्विज म्हणजे जन्मत नाही. त्याचा पुनर्जन्म होईल तेव्हाच त्याला द्विज म्हटले पाहिजे. आता आपल्याकडे ब्राह्मण म्हटला की कुणी आपण नोकरीवरही ठेवू शकतो. वाट्टेल ते करू शकतो. आता ब्राह्मणत्त्व काय आहे ते मात्र त्यांच्यात नाही. जे जन्मतात ते ब्राह्मण नाही. ज्यांचा पुनर्जन्म होतो तेच खरे ब्राह्मण आहेत. आणि या दृष्टीने पाहिले तर आपण चोखामेळांना पण ब्राह्मण म्हणू शकतो. आणि पुष्कळ ब्राह्मणांना शुद्र म्हणू शकतो. अशी स्थिती आहे. आता परवा आम्ही पुण्याला प्रोग्रामला होतो तर तिथे एका ब्राह्मण सभेमध्ये आमचा प्रोग्राम होता. त्यांना लगेच कळलं की माताजी काही ब्राह्मण नाही. तर त्यांनी सांगितलं की, 'माताजींना आम्ही प्रोग्राम करू देणार १८ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-18.txt नाही.' तर त्यांच ते बघा. 'माताजींच्या ब्दल सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जर असं केलं तर पेपरात येईल की तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणेतर आहात. हा काहीतरी वाद काढला तर तुमचीच बदनामी होईल.' बर तर म्हणे, आता केल्यासरशी होऊ दे. आता काय करता. आता पेपरातच दिल्यामुळे म्हणून. कसंतरी हे त्यांनी मान्य केल्यावर मला काही या लोकांनी सांगितले नाही. म्हणजे आतल्या गोष्टी हे काही सांगत नाही. मी जाऊन उभी राहिले आणि मी आपलं सहज बोलता बोलता म्हटलं की 'अहो, तुमच्यात कोणी ब्राह्मण असले तर माझ्यासमोर या. पट्टीचे असायलाच पाहिजे.' तर तीन-चार येऊन खरेच उभे राहिले. म्हणे 'आम्ही आहोत ब्राह्मण.' म्हटलं 'असं का. मग आता माझ्याकडे असे हात करा.' तर कापायला लागले. म्हटलं 'हे काय होतय तुमचे?' म्हणे 'माताजी, तुम्ही शक्ती आहात म्हणून आम्ही हलतोय.' म्हटलं 'अहो, आम्ही शक्ती आहोत कबूल आहे मला. पण तुम्ही का हलता. बाकी कुणी हलत नाही. पण हे दोघं हलतायेत.' म्हटलं 'विचारा कुठून आले?' ती पागलखान्यातून, ठाण्याहून आणलेली दोन माणसे होती. म्हटलं हे बघा. तेव्हा स्वत: बद्दल नसता अभिमान करून घेणं. आम्ही हे, आम्ही ते असं म्हणून होत नाही. व्हायला पाहिजे. हे घटित झालं पाहिजे. आणि असे खोटे लोक असतात त्यांनी नेहमी संतांना छळून काढले आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्ञानेश्वरांना किती या लोकांनी छळलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे शिड्डीला सुद्धा साईनाथांना या लोकांनी छळलेलं आहे. कुठेही सोडलेलं नाही. इतकेच नाही पण शंकराचार्यांना, आदि शंकराचार्य आपली आई वारली म्हणून घरी गेले आणि त्यांनी सांगितले की तिचा दाहसंस्कार मला करायचा आहे. त्यांनी सांगितले की, करू शकत नाही. तू सन्यासी आहे.' आणि कोणीही त्यांच्या त्या दाहसंस्काराला आले नाही. तेव्हा कालडी गावामध्ये त्यांनी स्वत:चेच झाड वाढवून घेतलं आणि केळाच्या झाडाला आग लावून त्यांनी आपल्या आईचा दाहसंस्कार केला आणि शापित केलं सबंध केरळला, की तुम्ही लोक आपल्या घरासमोर दाहसंस्कार कराल किंवा इथेच आपली प्रेत गाडाल. आजसुद्धा तिथे तसंच होत आहे. 'तू अशा रीतीने त्या सर्व अनाधिकार लोकांनी त्या सर्व संत साधुंचा फार अपमान केला आहे. आपल्याच देशात नाही, प्रत्येक देशात हे झाले आहे. महम्मद साहेबांच्या वेळेला तुम्ही जर पाहिलं तर महम्मद साहेबांना इतका त्रास दिलेला आहे आणि त्यांचा इतका छळ केलेला आहे की त्याचं वर्णन केलं की वाटतं की ज्ञानेश्वरांचा इतका छळ नाही केला जितका त्या महम्मद साहेबांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा झालेला आहे. म्हणजे सगळ्यांना गारद करून टाकलं. हे असं संतांना छळणारे लोक आजसुद्धा सगळे अधिकार पदावर बसून 'आम्ही फार धर्मात्मे, आम्ही फार दंडे सन्यासी, आम्ही फार बंडे सन्यासी आणि आम्ही भोंदू सन्यासी' बनून फिरत आहेत. अशा लोकांना मुळीच भीक घालू नये. आमच्या सहजयोगामध्ये फार मोठी क्रांती घडते आणि ती म्हणजे धर्माचे खरे स्वरूप उभं झाल्यामुळे, धर्म पूर्णपणे स्थापन झाल्यामुळे त्यांच्या लक्षात हे येतंय की हे फालतूचे जे .... असून आपल्याला नुसते लुटत असतात. त्यांना यापुढे आम्ही काहीही भीक घालणार नाही. परंपरा म्हणजे मूर्ख बनण्याची परंपरा, काही कामाची नाही. ज्या परंपरेने मनुष्य सुज्ञ बनत जातो आणि वरच्या पातळीवर येत जातो आणि खरोखरच अध्यात्मामध्ये ज्याला आलोकित होता येतं तीच खरी परंपरा मानली गेली पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजपर्यंत कोणत्याही संताला ह्या लोकांनी जेवू दिले नाही. ख्रिस्ताला सुद्धा त्यांनी क्रुसावर धरलं. सर्वसामान्य माणसांनी जरी त्यांची ओळख करून घेतली तरी अशा लोकांनी त्यांना कधीही मान्य केलं नाही. आमच्यावरही पुष्कळ लोकांचा राग आहे. पण आम्ही जरा दुसर्याच पद्धतीत आहोत. तेव्हा आमच्यावर काही चालणार नाही त्यांचं. परवा असच झालं. एकाच्या प्रोग्रामला एक गृहस्थ एका बाईला घेऊन आले. तिला मिरगीचा रोग येत होता. असे काही रोग असले की मी सांगते की त्यांना जरा मला विचारून आणत जा. माझ्याबरोबर भुताटकी लोक १९ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-19.txt असतात ते हलू लागतात. मिरग्यावाल्यांना असे झटके येतात. मी म्हटलं की मला विचारल्याशिवाय तुम्ही आणत नका जाऊ. तर तिला परत मिरगीचा झटका आला. आल्यावर मी म्हटलं की तुम्ही कशाला घेऊन आला मला न सांगता. मला सांगितलं असतं तर मी लक्ष ठेवलं असतं. आता आला की नाही तिला मिरगीचा झटका! आणि बोलताना व्यत्यय आला. तर उठून आपलं राजकारण सुरू केलं त्यांनी की 'अहो, आम्ही असे ब्राह्मण आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तिथले पुजारी आहोत. तुम्ही संत साधुंनी तर सेवाच केली पाहिजे. आणि काय असंच केलं पाहिजे.' म्हटलं, 'असं का? तुमचे जोडेही खाल्ले पाहिजे. म्हटलं चालते व्हा इथून.' तरीही जायला तयार नव्हते. म्हटलं, 'खबरदार परत तुम्ही इथं आलात तर. प्रत्येक वेळेला संतांवर एवढी जबरदस्ती झाली. आता एकही आम्ही चालू देणार नाही. झालं तेवढं फार झालं.' तेव्हा मग ते उठून निघून गेले. अशा रीतीने म्हणजे या लोकांनी इतकच नाही छळलं तर वरून अरेरावी. संतांना छळलंच पाहिजे. आम्ही दोन थोबाडात दिल्या तर दहा थोबाड्यात त्यांनी खाल्ल्याच पाहिजे. कारण आम्ही फार शहाणे, धर्मात्मा लोकं. अशा रीतीने संतांवर सुद्धा आम्ही इतका अन्याय केला आहे, इतका अन्याय केला पण तरी सर्वसाधारण जनता बघत राहिली. त्यांनी विरोधही केला त्याबद्दल त्यांचा छळही झाला आहे. पण सर्वसामान्य जनतेने मात्र नेहमी संतांना ओळखलंय आणि संतांची पूजा केली आहे. आणि म्हणूनच आमचं कार्य सर्व आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठीच आहे. नंतर जे वरचे, जे सहस्राराचे चक्र आहे, त्याच्यामध्ये एक हजार पाकळ्या आहेत. तर डॉक्टर लोकांचे म्हणणे आहे की नाही ९९८ नाड्या आहेत. म्हटलं ९९८ असोत नाहीतर हजार असोत तुमचं काय जातंय हे मला समजत नाही. याच्यावरून वाद घेऊन आम्हाला सहजयोग करायचा नाही. म्हणून निघाले पाठमोरे. अशा पढतमूर्खांना काय म्हणावे! मी स्वत:च यासाठी मेडिसीन केलं म्हटलं या शहाण्यांच्याबरोबर बोलायचे आहे ना ! म्हणून मला सुद्धा शिकलं पाहिजे. आमच्याबरोबर दोन सुज्ञ डॉक्टर आलेले आहेत. एक रशियन आहेत आणि एक आपले पारशी डॉक्टर आहेत. बरेच वर्ष त्यांनी लंडनला राहन प्रॅक्टिस केली आहे. मानसशा्त्रज्ञसुद्धा आहेत. सगळे इथे फार शिकलेले विद्वान लोक आलेले आहेत. आणि यांनी तुमच्यासुद्धा योगशास्त्राचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. इतकचं नव्हे तर प्रत्येक देवता म्हणजे काय ? त्या देवतांचे अर्थ काय ? म्हणजे मी सहजयोग यांना शिकवायला बसवल्याबरोबर यांनी युनिव्हर्सिटीच मांडली मुळी आणि प्रत्येक गोष्टीचं सॉर्टिंग आऊट ज्याला म्हणतात ते करून घेतलेलं आहे. इथे मी आजपर्यंत मोठ मोठ्या टेप्स, लेक्चर्स करून घेतलेले आहेत. त्याचे सगळे वर्गीकरण करणे. ते काय आहे, काय नाही, हे कसं शिकून घेणं ह्या रोगाला काय? ह्या माणसाला हा त्रास आहे. कुंडलिनी कशी उचलायची? त्याचा काय त्रास आहे ? कुठे ती अडकते ? काय झालं? वरगैरे सगळं इत्थंभूत. तुमचे देवता वरगैरे काय करतात ? त्यांच्यापासून तुम्ही शिकणारं. कारण आपण नेहमी इंग्लिश लोकांकडूनच शिकतो. माताजींचे शिकवलेलं एवढं चालत नाही. तेव्हा मी त्यांना बरोबर घेऊन आले आहे. आपल्या संस्कृतीचा एवढा मोठा वारसा आपल्याकडे आहे! एवढं मोठं आपल्याला काही मिळालं आहे त्याची तुम्हाला कल्पनासुद्धा नाही. आणि या अशा कुचकामी शिक्षा पद्धती ज्याला मी म्हणते, ज्याच्यामध्ये काहीही तुम्हाला माहिती होतं नाही की काय खरं आहे. सर्वव्यापी शक्ती काय आहे? त्याच्याबद्दल काहीही त्याच्यामध्ये विचार नाही. विचार विनिमय नाही. अशा या कुचक्या शिक्षा पद्धतीने जर पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागलात तर असेच म्हणता येईल की सगळे सौंदर्य, संपदा, एवढे ऐश्वर्य घरात असताना सुद्धा तुम्हाला भीकेचे डोहाळे लागलेत. आता सहस्रारावर आल्यावर जेव्हा कुंडलिनी छेदन करते तेव्हा तुम्हाला सामूहिक चेतनेचा अनुभव येतो. अनुभव येतो, लेक्चर येत नाही. त्याला actualisation इंग्लिशमध्ये म्हणतात. हा अगदी अनुभव आहे. अनुभव २० 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-20.txt म्हणजे तुमच्यामध्ये ही प्रबुद्धता आहे. तुमची जी चेतना आहे ती प्रबुद्ध होते. तुमच्या हातातून हे चैतन्य वाहू लागते. त्यानंतर ह्या बोटामध्ये तुम्हाला बरोबर कळतं की तुमचे कोणते चक्र धरलेले आहे, दुसऱ्यांचे धरलेले आहे कारण तुम्ही आपल्या सुत्रावर आल्यावर सगळ्यांच्या सुत्रावर जाऊ शकता. इथे आम्ही दाखवले आहे प्रत्येक बोटाला की कोणत्या बोटाला कोणते चक्र आहे. डावीकडे व उजवीकडे कोणती चक्र आहेत आणि ती कशी नीट करायची. म्हणजे लहान मूल सुद्धा सांगू शकेल की तुमचं कोणतं चक्र धरलेलं आहे. परवा माझी अडीच वर्षाची नात आहे, ती जन्मलेल्याच, आजकाल पुष्कळ पार लोकं आहेत, त्यातील माझी चारही नातवंड नशिबाने जन्मलेलेच आहेत असे. त्यातील धाकटी जी आहे अडीच वर्षाची, तिच्याकडे याच्यातलीच एक मुलगी गेली होती, पत्रीषा म्हणून. तिने विचारले, 'अनुपमा माझं कोणते धरले आहे ? तिला विशेष इंग्लिश येत नाही तरी तिने सांगितले की लेफ्ट विशुद्धी अँड नाभी. तिला स्पष्ट सांगितलं. एवढीशी अडीच वर्षाची पण तिने सांगितलं. ती म्हणे, 'माताजी, हिला कसं कळलं ? ' म्हटलं असं आहे की हे सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे. हा जो काही बोध आहे तो आतून झालेला आहे. आता जसं आपल्याला कळतं की गरमं आहे, थंड आहे तसंच त्या मुलांना कळतं. फक्त नावं सांगायची गोष्ट. ते सांगतील हे बघा, हे धरतंय आमचं. हे धरतंय. इतकंच नाही तर आम्ही नगरला इथे यायच्या आधी दुसरीकडे गेलो होतो. तर तिथे एक बाई माझ्यासमोर बसल्या होत्या. त्यांचं बोट हलू लागलं. मी त्यांना विचारलं, 'मूलं-बाळे होतांना, बाळंतपणात तुम्हाला फार त्रास झाला?' तर म्हणे, 'फार त्रास झाला. हे झालं, ते झालं आणि ते बोट माझ्यासमोर हालतं होतं. आणि हे चक्र जे आहे त्याने युट्रस कंट्रोल होतं. म्हणजे स्वाधिष्ठान चक्राची राईट साईड जी आहे त्याने युट्रस कंट्रोल होतं. असं आम्ही सांगितल्यावर म्हणे माताजी तुम्हाला कसं कळलं? पण ते समोर सगळं दिसतंय आम्हाला. हे जर आपलं झालं, आपल्या प्रत्येकामध्ये हे घटित होऊ शकते आणि झालं पाहिजे. झाल्याबरोबर ही सामूहिक चेतना तुमच्यामध्ये अवतीर्ण होते. ती काही सांगून होत नाही की आम्ही सगळे भाऊबंद आहोत . असं होत नाही. सगळं जे काही या संसारातलं आहे ते याच शरीरात आहे. जे काही तुम्ही आहात ते आम्हीच आहोत. म्हणजे उपकाराच्यासुद्धा या ज्या भावना मिशनरीपणाच्या आहेत त्यासुद्धा काही कामाच्या नाहीत. अगदी कुचकामाच्या आहेत. कारण जर आमचे एखादे बोट खराब झाले तर आम्ही त्याला असं केलं तरी ते ठीक होऊ शकते. जर तुम्ही आमचंच अंग -प्रत्यंग असलात जर आम्ही तुमचं ठीक केलं तर आम्ही स्वत:ला ठीक करतोय त्यात तुमच्यावर उपकार कसले ? ही अशी स्थिती आतमध्ये अवस्था करते म्हणजे हे काही सांगून होत नाही की हे आमचे बंधू आहेत, असं सांगायला नको. ते जाणवतच मुळी. लगेच इकडे हात असे वळायला लागतात. आता पुष्कळशी मुलं तोंडात बोटं घालतात. याचं निदान मानसशास्त्रज्ञांना लागलं नसलं तरी आम्हाला माहिती आहे. जर ती पार मुलं असली तर अगदी लगेच लक्षात येतं की ती बरोबर तोंडात बोटं घालतायेत, जे तुमचं चक्र बिघडतं. मग बदलतात ती. आता तिथे एक मुलगी अकरा महिन्याची होती. ती बरोबर सांगायला लागली की ह्यांचे हे धरतंय, त्यांचे ते धरतंय. त्यांची बोटच फिरायला लागतात कारण जळल्यासारखं होतं हातामध्ये किंवा काहीतरी ओढल्यासारखं होतं . ते बरोबर आपल्या हाताने असं करू लागतात. आता हे शास्त्र म्हणजे इतकं अभिनव आणि इतकं विशेष आहे! परमेश्वराला जाणण्याचं हे शास्र फार मोठे आहे आणि ही शक्तीसुद्धा आपण जाणली पाहिजे. आपल्यामध्ये ती स्थित आहे फक्त जागृत करून घ्यायची आहे. त्याबद्दल आता लोकांचे पुष्कळ आरोप पण झाले. त्यातलं एक विशेष मी बघते ते म्हणजे की कुंडलिनी जागृत करणे हे फार कठीण कार्य आहे आणि ते करतांना आम्ही बेडकासारखे उडतो वरगैरे वरगैरे असे अनेक लोक मला सांगतात. म्हणजे एक गृहस्थ माझ्यासमोर दोन्ही पाय वर करून बसले होते.. तर लोकांनी सांगितले असे २१ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-21.txt बसायचे नसते माताजींच्याकडे. अहो, म्हणे असच बसू द्या नाहीतर मी बेडकासारखा उडेन. त्यांनी म्हटलं असं का? तर म्हणाले आमचे गुरुजी असं म्हणाले की कुंडलिनी जागृत झाली म्हणजे बेडकासारखे उडतात. म्हटलं असं का? ते उडत होते का? तर म्हणे ते उडायचे. म्हटलं तुम्हाला आता बेडूक करायचे आहे की काय मला. अतिमानव करायच्या ऐवजी कुणाला जर बेडूक करायचे असले, कोणी म्हणे सिंहासारखे ओरडता काय ? आम्ही हजारो लोकांना, हजारो लोकांना अगदी कोलंबिया, चिली अर्जेंटिना, रशिया, चायना सगळ्या देशामध्ये माझं फिरणं झालं आहे. याशिवाय तिकडे इराण आणखीन इटली वगैरे सर्व या ज्याला आपण मेडिटेरियन म्हणतो त्या सर्व जागी माझे फिरणं झालं आहे. आणि अशा अनेक ठिकाणी, अनेक लोकांना जागृत्या दिल्या. पण कुठेही, कोणी बेडकासारखे उडलेले आम्ही पाहिलेले नाही आणि सगळं व्यवस्थित झालं. थोडीबहत गरमी कधी कोणाला वाटली असेल तर असेल पण जास्त त्रास कोणाला झालेला नाही किंवा म्हटलं पाहिजे की बहुतेक शंभरातले ९९ लोक कधीही त्यांना काहीही त्रास झालेला नाही. थोडीशी कधीकधी गरमी हातात येते फक्त. हलकी गरमी हातात येऊ शकते. त्यावर लोकांचे असे म्हणणे की फार कठीण असतं वरगैरे. समजा फार कठीण काम आम्ही सहज करतो तर काहीतरी असलं पाहिजे आमचंसुद्धा. असल्याशिवाय नाही होत. तेव्हा ते कठीण आहे त्याच्यामुळे आम्हालाच सर्टिफिकेट मिळतायत उगीच. तेव्हा असं लक्षात आणलं पाहिजे की काहीतरी कार्य करायचं होतच आणि घडायचं होतं. म्हणून 'माताजींनी हे शोध लावण्यापेक्षा, काहीतरी त्यांना माहिती आहे, ते त्या घेऊन आल्या आमच्यासाठी. त्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण हक्क आहे. म्हणून आम्हाला मिळत आहे आणि आम्हाला ते घेतलेच पाहिजे कारण आमचाही हक्क आहे.' अशा भावनेने जर तुम्ही बसलात तर कोणालाही अहंकार वगैरे जे प्रकार असतात ते येणार आहे कारण लगेच अहंकार डोक्यावर येतो. आपले जे प्रेसिडंट साहेब आहेत त्यांनासुद्धा कॅन्सर झाला होता तेव्हा लंडनला जाऊन त्यांना ठीक केलेले आहे. त्यांना माहिती आहे. आता ते काही मला पेपरात देऊ देणार नाहीत किंवा सांगू देऊ देणार नाहीत. तसं काही सरकारी नसल्यामुळे ते काही करणार नाहीत. असे अनेक प्रश्न मानवाचे असतात. तरी हे आपल्या आईचेच आहे, आपलेच आहे, स्वत:चेच आहे. अगदी त्याच्यात विशेष औपचारिकपणा काही करायचा नाही. अगदी साधंसुधं आहे. तुम्ही जरी आमच्या डोक्यावर येऊन बसले तरी आम्ही आईच आहोत, काही तुमचे गुरू नाही आहोत. पण तरीसुद्धा याला एक मान हा पाहिजेच. आईचा मान केला पाहिजे आणि हे समजले पाहिजे. तो मान जर मनात धरून तुम्ही जर पार झालात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की फार मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात, अनेक आयुष्यातील मिळवलेली ही संपदा तुमची, आज भटकली गेली आहे पण याच्यानंतर मात्र माणसाला थोडसं जमवावं लागतं कारण पाण्यातून जे बुडत होते लोक, त्यांना काढून बोटीवर जरी बसवलं तरी थोडावेळ असं वाटतं की आपण अजून पाण्यातच आहोत आणि काही काही लोक कोलमडतात सुद्धा. म्हणून त्याच्यानंतर थोडी मेहनत करून ते जमवून घ्यावं लागतं. ते कसं करायचं, काय करायचे याच्यासाठी आमचे इथे आम्ही सेंटर उघडलेले आहे. त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही विचारू शकता. याची फारच सोपी पद्धत आहे ज्याने तुमचे अनेक रोग ठीक होऊ शकतात. तेव्हा ते आपले रोग ठीक करून घेऊ शकतात. आमच्या फोटोलाही व्हायब्रेशन्स असल्यामुळे त्याचासुद्धा उपयोग होऊ शकतो. ते लोक फार सुज्ञ आहेत आणि त्यांनी फार मोठे कार्य केले आहे. त्याबद्दल मला मुळीच शंका नाही. एक दिवस या अहमदनगरमध्ये सगळ्यात जास्त सहजयोगी होतील. तरी आपण इथे बोलवलं, माझा मान केला त्याबद्दल मी फार आभारी आहे. २२ 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-22.txt ु प१ी भार गुरच्या प्रती व्यक्तीची २मर्पणाची शक्ती ही श्री हनुमानजींची आहे. कोणत्या फ्रकारे तुम्ही गुरला प्रन्न कर शकती आणि त्यांच्या जवळ जाऊ हो शकता? जवळीकता म्हणजे शारीरिक जवळीक नव्हे. याची अर्थ आहे एक _J. क. प्रकारचे ताढात्म्य, एक प्रकारची समज. माइयापासून दू२रहूनही सहजयोगी आपल्या हृढयात माड़ा अनुभव घेऊ शकतात. ही शक्ती आपल्या हनुमानजी पासून प्राप्त कशयची आहे. पं. पू.श्रीमाताजी, जर्मनी, ३१.८.१९९० प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा। लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in आय 2012_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-23.txt २हज धमात क्षमा पहिली आवश्यक गोष्ट आहे, तुमच्यामध्ये क्षमा करण्याची शक्ती जेवढी जास्त तेवढे तुम्ही शक्तिशाली व्हाल. सवनी क्षमा कर. ...कलीयुगात क्षमेव्यतिरिक्ति कोणतेही मोठे साधन नाही. प.पू.श्रीमाताजी, २०.११.१९७५ ২ ॐे र०