वैतन्य लहरी मराठी जानेवारी-फेब्रुवारी २०१३ ४ मुभ या अंकाल १ विशेष गोष्टीसाठी ही वेळ आलेली आहे ... ४ वेदना व यातना ...१२ आज्ञा चक्र सुधारणे ...१४ आजेची समस्या ....१९ ব। ह्ही तेल आलेली आहे मानव स्थितौत आल्यावर आपण परमेश्वराला विसरून जावं है बरोबर नाही. ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं ऐश्वर्य, सुख आणि शांती दिलेली आहे त्या परमेश्वराला लोक फार लवकर विसरतात ४ राहुरी, ३/२/१९८२ परमेश्वराच्या अनेक कृपा आपल्यावर होतात. माणसावरती अनेक त्याच्या कृपा होतात. त्याच्या आशीर्वादाने अनेक उत्तम आणि उत्तम असं जीवन त्याला मिळतं, पण मनुष्य मात्र परमेश्वराला प्रत्येक क्षणी विसरत असतो. परमेश्वराने साक्षात ही सर्व पृथ्वी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे आणि ती पृथ्वी निर्माण करून त्याच्यामध्ये विशेष रूपाने एक स्थान बनवलं आहे, ज्याच्यामुळे ती फार सूर्याच्या जवळ नाही, चंद्रापासून तितकी दूर आहे जितकी दूर तिला रहायला पाहिजे. आणि त्या पृथ्वीमध्ये हे जीवजंतू तयार करून आज ते सुंदर कार्य मनुष्य निर्मितीमध्ये फलद्रूप झालेले आहे, म्हणजे आता तुम्ही मानव झालात. आता मानव स्थितीत आल्यावर आपण परमेश्वराला विसरून जावं हे बरोबर नाही. ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं ऐश्वर्य, सुख आणि शांती दिलेली आहे त्या परमेश्वराला लोक फार लवकर विसरतात, पण ज्या लोकांना परमेश्वराने एवढा आराम दिलेला नाही, जे अजून दारिद्रयात आहेत, दःखात आहेत, आजारी आहेत, त्रासात आहेत ते मात्र परमेश्वराची आठवण करत राहतात. पण ज्या लोकांना परमेश्वराने दिलेले आहे ते मात्र त्याला विसरून जातात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ज्यांना आशीर्वाद दिला ते मात्र परमेश्वराला साफ विसरून जातात आणि ज्यांना दिला नाही ते मात्र त्याची आठवण काढत राहतात. मग त्याची आठवण केल्यावर, त्यांनाही आशीर्वाद मिळाल्यावर ते ही विसरून जातील. मानवाचं असं विचित्र डोकं आहे की त्याला काहीही दिलेलं झेपतच नाही. म्हणून हे आपण समजलं पाहिजे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण बसून मोजत बसलो की परमेश्वराने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला किती त-्हेने आशीर्वादित केलेले आहे तर आपल्याला आश्चर्य वाटेल! आजच माझ्याकडे पुण्यातले पुष्कळ श्रीमंत लोक आले. त्यांच्या घरी किती आजार आहेत, त्या लोकांना किती त्रास आहेत, किती मानसिक त्रास आहेत. कुणाचा मुलगाच दारू पितोय, तर कुणाचा नवराच दारू पितोय, तर कुणाची बायकोच वाया गेलेली आहे अशा रीतीने सर्वांना एवढे प्रश्न आहेत. एखाद्याला आईचच प्रेम मिळालं नाही, तर एखाद्याला बापाचं प्रेम मिळालं नाही, तर एखाद्याला मुलाचं वागणं पसंत नाही. अशात-्हेने अनेक त्यांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपल्याजवळ नाहीत आज , पण ते प्रश्न उद्या तुमच्याजवळ जास्त पैसा आला किंवा जास्त सत्ता आली तर ते तुमच्यासमोर उभे राहतील. जर तुम्ही हे लक्षात घेतलं की हे सर्व परमेश्वराने आपल्याला का दिलय, ही सर्व सुविधा परमेश्वराने आपल्याला का दिली आहे ? तर मात्र तसं होणार नाही. परमेश्वराने आधी तुमची खाण्या-पिण्याची व्यवस्था केलेली आहे. पूर्वी लोकांनी पुष्कळ जर काही खायचं म्हटलं तरी चार जनावरं मारल्याशिवाय ते खाऊ शकत नसत. जंगलामध्ये जावं लागायचं, एकाच ठिकाणी रहावं लागायचं, किती लोकांना तर निवार्यालासुद्धा एक छत नसायचं. मग तिथे साप, विंचू, वाघ अशारीतीची भयंकर जनावरं असायची. त्यांच्यापासून भीती असायची. त्या सर्वांचे निवारण होऊन आज आपण एका सुव्यवस्थित ठिकाणी राहतो आहे. त्याशिवाय ह्या सर्व गोष्टींचे आता परमेश्वराने आपल्याला वरदान दिलेले आहे, टेलिफोन दिलेला आहे, नंतर आपल्याला ऐकायलासुद्धा, पुष्कळांजवळ मी पाहिलेले आहे की तुमच्याजवळ रेडियो वरगैरे आहे. पण हे सगळे जरी मिळालं तरी आपण परमेश्वराला जास्तच विसरत चाललो आहोत. परमेश्वराने आपल्याला का दिलं? ज्या माणसाला पहावं त्याला तो घड्याळ लावून फिरतो ६ आणि म्हणतो की आता वेळ नाहीये, फार उशीर झाला, फार उशीर झाला. प्रत्येकाला वेळ नाहीये. आता मी तिथे ब्राह्मणीला गेले होते, तिथे पुष्कळशा बायका उशिराने आल्या. म्हणाल्या, 'माताजी, आम्ही कामावर गेलो होतो तर आम्हाला वेळ झाला नाही तर, आम्ही येऊ नाही शकलो तर, आत्ताच दर्शन द्या वगैरे वरगैरे.' तर मी म्हटलं की, 'एक दिवस नसत्या गेल्या तर काय झालं. आम्ही लंडनहून आलो एक दिवस तुम्ही जर नसते गेले, तर दोन पैसे तुम्हाला कमी मिळाले असते. काही हरकत नाही. एक दिवस माताजी भेटायला इतक्या लांबून आल्या तर आम्ही त्यांना भेटायला आलो असतो. बरं आम्ही समजा जर निघून गेलो असतो तर तुमची आमची भेटच झाली नसती. पण महत्त्व कशाचं आहे? तर दोन पैसे आपले बुडाले नाही पाहिजे. ते फार महत्त्वाचे आहे. मग उद्या आजारी पडले तर मात्र इथून लंडनपर्यंतचे तिकीट घेऊन तिथे येतील की आमच्या मुलाला ठीक करा. पण आज तुमच्या दारात आम्ही आलेलो आहोत तर तुम्हाला वेळ नाही. तर हे तुम्हाला परमेश्वराने का दिलं? हे घड्याळात सारखं तुमचं बघणं चालतं की आज वेळ नाही, काल वेळ नव्हता, उद्याही वेळ राहणार नाही, मग घड्याळ कशाला बांधता? जर तुमच्या जवळ वेळच रहात नाही तर घड्याळ बांधून तरी उपयोग काय? तर हा जो वेळेसाठी, जो मनुष्याला सारखा त्रास आहे तो एकाच कारणामुळे आहे की त्याला हे माहीत नाही की ही वेळ आपण का शोधत होतो ? कोणची वेळ गाठायची आहे ? कोणत्या वेळेसाठी एवढी आपली धडपड चाललेली आहे? कशासाठी वेळ पाहिजे? इकडून तिकडे वाया दवडण्यासाठी किंवा इकडून दारुच्या गुत्त्यात गेले किंवा घाणेरडी कामं केली, कुणाचे गळे कापले, कुणाचा खून केला अशा घाणेरडया गोष्टी करण्यासाठी वेळ मिळालेला आहे? काहीतरी विशेष गोष्टीसाठी ही वेळ आलेली आहे. आपल्या भारतात काय किंवा बाहेर कधीही लोकांनी घड्याळं लावून वेळ पाहिला नव्हता. आता हे नवीन सूत्र का निघालं आहे ? का? कशाला आपल्याला घड्याळाचं सारखं वाटतं की वेळ गेला बुवा, हा वेळ गेला, तो वेळ गेला असं अशासाठी वाटत आहे ? की आता माणसाला मनन करण्याची वेळ आलेली आहे! स्वत:साठी त्याला वेळ द्यायला पाहिजे. स्वत:बद्दल त्याला समजलं पाहिजे की मी कोण आहे ? मी कशाला ह्या जगात आलो? जर माणसाला वेळ मिळाला तर तो काहीतरी भ्रमिष्टासारखं दुसरेच विचार करत बसतो. पण हा जो वेळ मिळवण्याचा सगळ्यांना एक छंद लागलेला आहे तो एवढ्यासाठीच आहे की त्यांनी हा विचार केला पाहिजे की मला काय करायचे आहे ? मी कशाला ह्या जगात आलो ? परमेश्वराने मला कशाला आणलेले आहे या जगात? मला एवढ्या योनीतून काढून मानव स्थितीत का आणलेले आहे? माझ्या जीवनाला काय अर्थ आहे ? हा असा विचार करण्यासाठी आपली ही धडपड आहे की आपण वेळ वाचवला पाहिजे. पण तसं होत नाही. तसं मुळीच होत नाही. जर तुम्हाला कुणाला म्हटलं, 'मला आजच गेलं पाहिजे मुंबईला, आजच गेलं पाहिजे.' 'कशाला आजच गेलं पाहिजे?' 'नाही, कसही करून तुम्ही तिकीट काढा. मला आजच गेलं पाहिजे.' 'का?' तर 'मला सट्टा खेळायचाय.' जे काही मनुष्य करतो अगदी विपरीत करत असतो. जे त्याला करायचं आहे त्याच्या विपरीत करत असतो. सरळ गोष्टी त्याला समजतच नाही की, बाबारे कशाला एवढा वेळ वाचवतोस? कशासाठी एवढा वेळ वाचवतोय? सगळे आपलं आयुष्य तुझे वायाच गेलेले आहे की रे! तुला हे कळलं का की तू ह्या संसारात कशाला आलास? आता तुम्ही कशाला ह्या संसारात आला ? तर ७ परमेश्वराला जाणण्यासाठी ! परमेश्वराने ही सर्व सृष्टी केली, तुम्हाला सगळं काही दिलं, शेवटी एवढ्यासाठी की तुमच्यामध्ये सुजाणता यावी, तुमच्यामध्ये धर्म यावा आणि नंतर तुम्ही त्या धार्मिक स्थितीमध्ये परमेश्वराशी एकात्म व्हा. केवळ या जीवाचा आणि आत्म्याचा संबंध होतो. तुम्ही त्या परम पित्या परमात्म्याच्या साम्राज्यात प्रवेश करावा म्हणूनच परमेश्वराने ही सगळी रचना केलेली आहे आणि तो आतुरतेने तुमची वाट बघतो आहे की हे कधी माझ्याकडे येणार, पण तुम्ही पैसे मिळाले म्हणून इकडे बहकले, सत्ता मिळाली म्हणून तिकडे बहकले, नाहीतर आपल्या मुला- बाळांमध्ये कुठे ना कुठे तरी असं तुमचं चित्त गेलेले आहे आणि तुमच्याजवळ एवढासुद्धा वेळ नाही की तुम्ही दोन मिनिटं परमेश्वराच्याबद्दल विचार कराल . पाश्चिमात्य देशातील लोकांनी सगळे हेच प्रकार केले. रात्रं-दिवस धडपड करून हे कर रे, ते कर रे , पैसे एकत्र कर रे, काय काय त्यांना जे करायचे ते करून शेवटी काय झालं? त्यांच्या मुलांनी आपल्या आई-वडिलांचं घर सोडलं आणि आम्हाला हे पैसे डोक्यावर घेऊन फिरायचे नाही. तुम्ही सांभाळा ते आणि ते लागले आपल्या मार्गाला आणि ते कुठे जाऊन पोहोचले तर त्यांनी हे सगळे तऱ्हेतऱ्हेचे गांजा-बिंजा घ्यायला सुरुवात केली. आता तुम्हालाही त्या रस्त्याने जायचे असले तर जा. त्याला कोणी काही मना करू शकत नाही कारण तुम्हाला स्वतंत्रता आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला नरकात जायचंय तर जा. सरळ जाऊ शकता. पण जर तुम्ही समजलात की, 'मी कोण आहे? कशासाठी आलो आहे या जगात ? मला काय काय करायचे आहे ? आणि माझी काय स्थिती आहे, वस्तुस्थिती काय आहे?' हे जर तुमच्या लक्षात आलं तर मात्र तुम्ही अधोगतीला न जाता सहजयोगाकडे याल. यालाही एक फाटा आहे, त्या फाट्याने, आपल्या एका लहानशा मार्गानेच तुम्ही आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकता. हे आत्म्याला ठाऊक आहे की तुमचा रस्ता कुठे आहे. तुम्ही कुठे चालला आहात. पण अजून तुमच्या चित्तात तो आत्मा आलेला नाही. तुमच्या चित्तात तो आत्मा आला, चित्तात म्हणजे, आता तुमचं माझ्याकडे चित्त आहे, तुमचं माझ्याकडे लक्ष आहे. तुम्ही बघता मी उभी आहे, माझं बोलणं ऐकता, सगळे काही तुम्हाला माहिती आहे की माताजी ह्या आमच्यासमोर बोलत आहेत. पण मी म्हटलं की, 'आता तुमचं चित्त तुम्ही आपल्या आत्म्याकडे लावा किंवा परमेश्वराकडे लावा.' तर 'कसं लावायचं माताजी ? मोठं कठीण काम दिसतयं! असं कसं न्यायचं. आतमध्ये चित्त न्यायचं तरी कसं? कारण चित्त तर आमचे बाहेरच पसरलेले आहे. जे जातय बाहेर तेच चित्त आहे. तेव्हा आतमध्ये ते कसं घेऊन जायचं. आमच्या हृदयात जर आत्मा आहे तर आम्ही हदयाकडे कसं चित्त न्यायचं! म्हणूनच परमेश्वराने एक युक्ती योजलेली आहे की तुमच्यामध्येच एक कुंडलिनी नावाची शक्ती, जी तुम्हाला अंकरते, अशी शक्ती त्याने त्रिकोणाकार अस्थीमध्ये ठेवलेली आहे. जेव्हा ही कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये जागृत होते तेव्हा एक घटना घडते. समजा आम्ही इथे उभे आहोत आणि वरून काही पडलं तर सगळ्यांचं लक्ष तिकडे जाईल की नाही! आणि आपलं तर चित्त इतकं चलायमान आहे की एक मनुष्य इकडून तिकडे गेला तरी आपलं लक्ष तिकडे जातं. तेव्हा अशी जेव्हा घटना आतमध्ये होते तर आपलं चित्त आतमध्ये आकर्षिलं जातं आणि हे चलबिचल करणारं मन जे आहे ते आतमध्ये ओढलं जातं. ते जेव्हा आतमध्ये ओढलं जातं तेव्हा आपल्याला काही आतमध्ये चित्त न्यावे लागत नाही. आपल्याला असं वाटतं की आपोआपच काहीतरी झालंय आणि आपलं चित्त आतमध्ये ८ चाललेले आहे. तेव्हा ही कुंडलिनी जागृत होऊन आणि सहा चक्रांतून निघून, ह्या सूक्ष्म चक्रांतून निघून ह्या ब्रह्मरंध्राला भेदते. जेव्हा ती ब्रह्मरंध्राला भेदते इथे त्यावेळेला तुम्ही जसं या मशीनचं कनेक्शन लागलेले आहे 'मेन' शी तसं तुमचंही कनेक्शन परमेश्वराशी होते. म्हणजे समजा हीच कुंडलिनी आहे. ह्या वस्तूला काहीच अर्थ येणार नाही जर ह्याचं कनेक्शन लागलं नाही तर. कोणत्याही मानवालासुद्धा काहीही अर्थ नाही आहे जोपर्यंत त्याचे परमात्म्याशी तादात्म्य झालेले नाही. हे झालंच पाहिजे. घडलेच पाहिजे. जर हे झालं नाही तर ह्या मनुष्याच्या आयुष्याला काहीही अर्थ नाही. तो निरर्थक आहे. तो जन्माला येतो काय आणि मरतो काय, काहीही फरक नाही. जनावरांना तरी आहे अर्थ कारण त्यांना मनुष्य व्हायचे आहे. जनावरं येतात आणि मरतात तर त्यांना काही अर्थ आहे कारण नंतर त्यांना मनुष्य व्हायचे आहे. पण जर मनुष्याला देवपण घ्यायचं नसलं आणि त्याला जर आत्म्याशी संबंध जोडायचा नसला तर तो कामातून गेला. कारण आता पुढे तो काय करणार ? तेव्हा तुम्ही आपल्या आत्म्याला ओळखलं पाहिजे आणि आत्म्यामध्ये लीन झाले पाहिजे. पण ते व्हायचं कसं ? परत 'माताजी कसं होणार? ' मी परत म्हणतेय ही कुंडलिनी शक्ती तुमच्यात जागृत होते. मग ही कशी जागृत होते? जसं एखाद्या बी ला तुम्ही मातेच्या उदरात घातलं म्हणजे ते कसं आपोआप अंकुरतं तसं आपोआप सहजच ही कुंडलिनी तुमच्यामध्ये जागृत होते, पण त्याला जागृत करणारा कुणीतरी अधिकारी पुरुष लागतो. अधिकार परमेश्वरापासून, परमेश्वराच्या प्रेमापासून आलेला पाहिजे. पोटभरू लोकांना हे कार्य जमणार नाही. नुसते वितंडवाद करणाऱ्या लोकांना हे जमणार नाही. ही एक शक्ती आहे, ज्याच्यामध्ये ही शक्ती असते त्या शक्तीमुळेच तुमची कुंडलिनी जागृत होते. म्हणजे जसा एक दिवा पेटलेला असेल तोच दुसरा दिवा पेटवू शकतो. जेव्हा माणसं आपल्याला असं समजतात की आम्ही म्हणजे काहीतरी मोठे आहोत. आम्ही मोठे सायंटिस्ट आहोत किंवा अमुक आहोत, तमुक आहोत तर ते नुसते मानव स्थितीत आहेत फक्त. त्यांचा काहीही उपयोग परमेश्वराला होत नाही. जेव्हा तुमचा संबंध आतम्याशी होतो तेव्हा तुमच्यातून ही ब्रह्मशक्ती वाहून येते. ही ब्रह्मशक्ती चहुकडे पसरलेली आहे. ती सगळीकडे वातावरणात असते, तिच्याचमुळे सर्व फुलांची फळं होतात. त्याच्यामुळेच बी अंकुरते. त्याच्यामुळेच सर्व जिवंत क्रिया होतात. तुमचाही जन्म त्याच्याचमुळे झालेला आहे. त्या शक्तीची तुमच्या हाताला जाणीव होते, परत मी म्हणते त्याची जाणीव होते. जाणीव म्हणजे जशी तुम्हाला गरम आणि थंडची जाणीव होते तशीच तुम्हाला या चैतन्य लहरींची जाणीव होते आणि तुमच्या हातामध्ये अशा थंड थंड लहरी येऊ लागतात. ही ओळख पुष्कळ वर्षापूर्वी मार्कडेय स्वामींनी सांगितली , त्याच्यानंतर आदि शंकराचार्यांी सांगितली, ख्रिस्तांनी सांगितली, मोहम्मद साहेबांनी सांगितली, सगळ्यांनी सांगितलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत माझ्या लेक्चरला काहीच अर्थ नाही. तेव्हा हे घटित झाले पाहिजे, तुमची जागृती झाली पाहिजे. तुम्हाला हे मिळालं पाहिजे. हीच माझी एक परम इच्छा आहे. म्हणूनच मी तुमच्यासाठी इतक्या लांबून इथे आलेली आहे. ते मिळवून घ्या. तुमचं जे आहे ते तुमच्यापाशीच आहे, ते तुमच्याजवळच आहे आणि ते फक्त तुम्हाला द्यायचे आहे, ते तुम्ही सहजच सगळं घेऊन परत त्याची वाढ करून घ्या कारण अंकुरतांना मात्र अंकुर फार सोप्या तऱ्हेने बाहेर पडतं, पण नंतर त्या लहानशा रोपट्याची फार काळजी घ्यावी लागते. म्हणून तुम्हालाही स्वत:ची ९ फार काळजी घ्यावी लागेल. म्हणून पार झाल्यावरसुद्धा जरी बरं वाटलं तरीसुद्धा तुम्ही जाऊन इथल्या सेंटरवर पूर्णपणे ह्याची जी काही माहिती आहे ती घेऊन त्याप्रमाणे वागून आपले वृक्ष वाढवून घ्यावेत. ह्याच्यामुळे मनुष्याची शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्थिती चांगली होते. सगळ्यात मुख्य म्हणजे त्याची धार्मिक प्रवृत्ती बरोबर होते. त्याला हे समजतं की हा खोटा आहे की खरा आहे. हा गुरू वाईट आहे की चांगला आहे. हे त्याला समजतं. आता परवा उसळवाडीला एके ठिकाणी मी गेले होते, तीन-चार वर्षापूर्वी, तर मला तिथे फार बरं वाटलं आणखीन व्हायब्रेशन्स आले म्हणजे थंड लहरी आल्या. तर मी विचारलं की, 'इथे थंड लहरी कशा येतात?' त्यांनी सांगितलं की, 'इथे एक स्थान आहे म्हसोबाचं!' मी जाऊन बघितलं. म्हटलं, 'हे तर अगदी जागृत स्थान आहे इथून केवढ्या अशा थंड-थंड लहरी येतात.' पण जर तुम्ही पार नसले तर तुम्हाला हा दगड काय किंवा तो दगड काय! दगडामध्ये काही फरक कळणार आहे का? तेव्हा ही जाणीव तुमच्यामध्ये झाली पाहिजे. ती जाणीव होताच तुमच्यामध्ये आनंदाचं साम्राज्य येतं आणि तुम्हाला सर्व परमेश्वरी शक्त्या हळूहळू कळू लागतात. तेव्हा आज हा दिवस आलेला आहे की परमेश्वरी शक्ती तुम्हाला मिळाली पाहिजे आणि माझेही राहरीवर विशेष प्रेम आहे, म्हणून मी अनेकदा येते. तर कृपा करून तुम्ही लोक आता आपली कुंडलिनी जागृत करून घ्या आणि त्याच्यानंतर इतरांची पण कुंडलिनी अशीच जागृत करून घ्या. १० रम ११ 5146 वेदना यी टी तं ना े सहजविद्या, ९ एप्रिल २००३ तुम्ही कोणत्या संस्काराचे आहात किंवा नाहीत हे एका सेकंदात ओळखू शकता. जर तुमची डावी बाजू पकडली असेल तर तुम्ही कर्मठ वळणाचे आहात आणि तुम्हाला दुःख, वेदनांचा त्रास होत असतो. जर तुमच्या उजव्या बाजूवर पकड असेल तर तुम्ही अहंकाराच्या नशेत असता आणि तुम्हाला आरोग्याची समस्या असू शकते किंवा तुम्ही चंचल असू शकता. जर तुम्ही अहंकार, प्रति अहंकार ह्यापैकी कोणतीही एक शक्ती मोठ्या प्रमाणात वापरत असाल तर दुसरी बाजू गोठून जाते. आपल्या आत्मोन्नतीसाठी संतुलन आवश्यक आहे. प्रथम डावा हात प.पू.श्रीमाताजीकडे करावा आणि उजवा हात भूमातेवर ठेवावा. नंतर डावा हात वर आकाशाकडे धरावा व उजवा हात प.पू.श्रीमाताजींकडे करावा. जर संतुलनात नसाल तर तुम्हाला फक्त एकाच हातातून चैतन्य लहरी जाणवतील. जर दोन्ही हातामधून सारखे परम चैतन्य जाणवले तर त्याचा अर्थ तुम्ही संतुलनात आहात. जर फरक वाटला तर तुम्ही बंधने देऊन ते संतुलीत करा. आपण आपले आज्ञा चक्र स्थिर करू शकता. त्यासाठी आपण जमिनीकडे पहावे. हिरव्यागार १४ हिरवळीकडे पहावे. नजर शांत करावी. प्रत्येक पुरुषाकडे, स्त्रीकडे पाह नये. त्यामुळे नजर भिरभिरणारी होते. जेंव्हा आपण परमेश्वराची आरती करतो तेंव्हा आपण आपल्या आतील प्रकाशाचे पूजन करतो. आपल्यातील प्रकाशतत्त्व प्रकाशित होते. प्रकाशतत्त्व हे आज्ञा चक्रावर आहे. जेव्हा तुम्ही आरती करता किंवा देवापुढे दिवा ठेवता, प्रकाश दाखविता तेव्हा तुमच्यातील प्रकाशतत्त्व प्रकाशित होते. जर कोणी तुमच्याबद्दल काही बोलत असेल आणि ते सत्य नसेल तर त्याबद्दल वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे ? जर ते खोटे बोलत असतील तर घाबरण्याचे काहीच कारण नाही व जर ते खरे बोलत असतील तर तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत. ती काहीशी वाईट गोष्ट असली तरी ती चांगली गोष्ट आहे. जर ते सत्य आहे, तर ते बोलणे माझ्या अहंकारासाठी योग्य आहे. परंतु ते जर असत्य असेल तर त्याला का महत्त्व द्यावे? त्यासाठी आपण नाराज होता कामा नये. इतर लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा आपण त्रास करून घेऊ नये त्यामुळे इतर लोकांना आपली योग्यता कळेल. जे काही आपल्याला नवीन मिळते त्याचे संगोपन केले पाहिजे. तोच आपला आनंद आहे. ती आहे मानसन्मानाची दिमाखाची आपल्यामधील सुंदरता. श्री येशूजींनी आपल्याला महान शस्त्र दिलेले आहे. ते म्हणजे 'आपण क्षमा केलीच पाहिजे.' ही गोष्ट अत्यंत व्यवहार्य आहे. जेंव्हा आपण फक्त क्षमा करतो तेंव्हा त्या व्यक्तीचे अस्तित्व कोठेही रहात नाही. ती व्यक्ती आपल्याला पुढे कधीही त्रास देत नाही. तसेच ती व्यक्ती आपल्या लक्षातही रहात नाही. फक्त 'क्षमा करणे' अत्यंत सोपी गोष्ट आहे. असे करणे म्हणजे अतिशय आनंदाची भावना आहे. आपल्याला जो भौतिक व मानसिक त्रास होतो त्यापासून सुटका होण्यासाठी प्रत्येकाला क्षमा करा. जरी त्यांनी तुम्हाला इजा केली असली तरीही फक्त तुम्ही त्यांना क्षमा करा कारण परत परत त्याची आठवण केल्याने तुम्ही निष्कारण दुःखी होता. आज्ञा चक्रावर आपण प्रत्येकाला क्षमा करतो व मागील आज्ञा चक्राच्या शुद्धतेसाठी आपल्याला म्हणायचे आहे, 'जर आम्ही काही चूक केली असेल तर हे परमेश्वरा आम्हाला क्षमा करा.' आज्ञा चक्राच्या या दोन बाजू आहेत. तुम्ही सदास्वेदा दुसर्यांना क्षमा करण्याचा प्रयत्न करा. घटित होण्यासाठी हा अत्यंत चांगला मार्ग आहे. नाहीतर आपण नेहमीच आपल्याला क्षमा करण्याचा प्रयत्न करतो आणि दूसऱ्यांना क्षमा करत नाही. प्रत्येक गोष्ट उलट मार्गाने करत असतो. आपण दुसऱ्यांना क्षमा करीत नाही मात्र आपण आपल्यालाच क्षमा करत राहतो, ही अत्यंत वाईट गोष्ट जी आपण करतो. स्वत:ला क्षमा करत बसू नका. दुसऱ्यांना क्षमा करा तर तुम्ही गुरू बनाल. जर एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल, जी तुमच्याबरोबर कठोरपणे वागते किंवा तुमच्याबाबतीत निर्दयी आहे, तेंव्हा ती दिसली की तुम्ही चिडचिडे बनता, त्रासून जाता. अशावेळी फक्त म्हणा, 'मी क्षमा करतो.' जेंव्हा तुम्हाला त्रास असेल तेंव्हा तुम्ही म्हणायचे, 'मी क्षमा करतो.' १५ तुम्ही क्षमा करता त्या क्षणी तुमच्यावरचा ताण दूर होतो आणि कुंडलिनीचे उत्थान होते. जेंव्हा आपण क्षमा करतो, तेंव्हा आपल्याला त्रास होत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे क्षमाशीलता. ही क्षमाशीलता आपल्यामध्ये कशी येते तर भूतकाळ विसरल्यामुळे. जर तुमच्यामध्ये क्षमाशीलता असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की तुम्हाला खूप हलके वाटते आणि तुमचे वैवाहिक जीवनसुद्धा ह्यामुळे अतिशय सुखी होते. तुमचा आत्म्याबरोबर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे क्षमा करणे. कारण तरच तुमचे विचार थांबतील. जितका तुम्ही कमी विचार कराल तेवढे तुम्ही तुमच्या आत्मसाक्षात्काराबरोबर जलद गतीने प्रगती कराल. त्याबाबत वादविवाद करू नका. विचार करू नका. परंतु फक्त घटित होण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फक्त (आत्मस्वरूपात) घटित व्हावयाचे आहे. जर तुम्हाला एखादा विचार तुमच्या मनामध्ये येतो आहे असे वाटले तर फक्त म्हणायचे, 'मी क्षमा करतो'. हा फार महान मंत्र आहे आणि तुमचे विचार थांबतील. सहजयोगी त्याच्या चारित्र्यामुळे, पावित्र्यामुळे, वागणुकीमुळे ओळखला जातो. सहजयोग्याची वर्तणूक अत्यंत शांतीपूर्ण असली पाहिजे. जे सहजयोगी सतत धावपळ करतात आणि नाराज होतात ते सहजयोगी नाहीत. सातत्याने माझ्याकडे, माझ्या फोटोकडे पहात रहा. डोळ्यांची उघडझाप न करता, कसलेही दडपण न ठेवता, चित्त सहस्रारावर ठेऊन, डोळे न मिचकावता. हे तुम्ही करू शकता. ही शारीरिक क्रिया आहे. आपण आपल्या चित्तावर व आज्ञेवर मेहनत घेतलेली आहे. डोळ्यांवर आता जर तुमच्या डाव्या आज्ञेवर अडचण असेल तर याचा अर्थ त्यावर बाधा आहेत. तर त्यासाठी मंत्र कोणता? मागच्या आज्ञेसाठी 'महागणेश , महाहिरण्यगर्भ, महाकालभैरव'. जर तेथे बाधा असेल तर उन्हात बसून सुधारता येईल. मारगील आज्ञेवर सुर्यप्रकाश घ्यावा. भूतांना सूर्यप्रकाश आवडत नाही आणि ती पळून जातात. जर अहंकाराची समस्या असेल तर चंद्रप्रकाशात बसणे अधिक चांगले. पण जर तुम्हाला रडू येत असेल, दुःख होत असेल त्यावेळी सूर्याकडे पाहणे चांगले. जी माणसे बाधीत आहेत ती प.पू.श्रीमाताजींच्या उपस्थितीत उघडकीस येतात. कारण जेथे प्रकाश आहे त्या प्रकाशात बाधा उघडकीस येते. हा फार मोठा धोका आहे की प्रकाशात आल्यावर तुम्ही बाधित आहात हे उघडकीस येते. काही लोक सहजयोगामध्ये सर्वसाधारण दिसतात परंतु एकदा का ते प.पू.श्रीमाताजींच्या समोर येतात तेंव्हा ते तेथेच उभे राहतात व अचानक त्यांच्यामधील बिघाड उघड होतो कारण त्यांच्या आत पुष्कळच बाधा असते. जेंव्हा आज्ञा चक्र जागृत होते, तेंव्हा प्रतिअहंकार आत ओढला जातो व कमी होत जातो. आणि जेव्हा आपण अपराधी वृत्ती न ठेवता क्षमा मागतो व सहजयोगात एखादी जबाबदारी स्वीकारतो तेव्हा १६ त्याचे निरसन होते. जर डाव्या आज्ञा चक्रावर पकड असेल तर तुमचा उजवा हात हृदयावर ठेवा आणि निश्चयपूर्वक म्हणा, 'प.पू.श्रीमाताजी मी आत्मा आहे.' प्रतिअहंकाराचा मंत्र आहे, 'हम्' डाव्या बाजूच्या लोकांना ठीक करतांना प्रकाश ( ज्योत) वापरला जातो. परंतु जे उजव्या बाजूचे आहेत त्यांना प्रकाशतत्त्व फारसे मदत करू शकत नाही. तुम्ही फोटोसमोर प्रकाश ठेवलात, पण जे लोक अहंकारी वृत्तीचे आहेत त्यांच्यासाठी याचा काहीही उपयोग होणार नाही. उजव्या बाजूच्या लोकांनी प्रकाशाचा उपयोग अजिबात करू नये. त्यांनी सूर्यप्रकाशात बसू नये, त्यांनी चंद्रप्रकाशात बसावे. जर आज्ञेची समस्या असेल तर त्यांनी मागच्या बाजूला मेणबत्तीचा उपयोग करावा. जर त्यांची दृष्टी कमकुवत असेल किंवा ते हस्व दृष्टरीचे असतील तर मागच्या बाजूला प्रकाश दिला पाहिजे. त्यांची मागील आज्ञा ठीक नसेल तर त्यांना सांगावे, त्यांनी त्यांच्या मागच्या आज्ञेवर प्रकाशतत्त्व वापरावे. एवढेच नव्हे तर त्यांची कुंडलिनी प्रकाशतत्त्वांनी उठवावी. त्यासाठी प्रकाश (ज्योत) किंवा तूपाचा दिवा वापरावा. जर आपण आपला अहंकार कार्यरत असताना पाहिला तर त्यापासून मुक्तता मिळवू शकतो. अहंकाराशी संघर्ष करू नका, तर त्याचे समर्पण करा. हा एकमेव मार्ग त्याच्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी आहे. तुमच्या अहंकाराला आव्हान देण्यासाठी तुम्ही क्रोधामध्ये अडकू नका. प्रयत्न करा की अहंकार प्रतिक्रिया करत नाही. जर तुम्ही प्रयत्न केलात तर ते तुम्हाला साध्य होईल. तुमचा आरशामध्ये तुम्ही स्वत:ला पहा आणि स्वत:ला हसा व स्वत:ची गंमत करा. जर तुम्हाला उजव्या बाजूच्या समस्या असतील तर तुम्ही म्हणावे, 'मी क्षमा करतो.' त्याचा मंत्र आहे, 'मी सर्वांना क्षमा करतो.' 'मी सर्व करणार आहे' अशी भावना नाकारलीत तरीही समस्या सुटू शकते. स्वत:चे कान पकडून क्षमा मागितली तर अहंकार कमी होण्यास मदत होते. अहंकारासाठी मंत्र आहे 'क्षम' किंवा 'महत्अहंकाराचा' मंत्र. जर तुम्ही म्हणालात, 'मी काहीही करीत नाही परंतु परमेश्वरच सर्व काही करीत आहे' किंवा 'मी काहीही करत नाही.' त्यामुळे अहंकार वाढत नाही आणि आपण विनयशील बनतो. जर आपल्याकडे अहंकार असेल तर आपण डावी बाजू चढवून ती उजव्या बाजूला टाकावी. यासाठी दुसरा मार्ग नाही. तुम्हाला तुमच्या हातानेच ते घटित करावयाचे आहे. परमेश्वराची प्रार्थना (लॉर्डस् प्रेयर) अहंकार कमी करण्याचे काम करते किंवा आपले विचार थांबविते. ती प्रार्थना मंत्र म्हणून म्हणावी. ती प्रार्थना आज्ञा चक्र ( ६ वे चक्र) यासाठी मंत्र स्वरूपच १७ काम ३ि क] www ২G आहे. सहाव्या चक्राचा मंत्र आहे. परमेश्वरी प्रार्थना (लॉर्डस् प्रेयर) परंतु बीज मंत्र आहे 'हम-क्षम' शिवाय 'मी क्षमा करतो याचासुद्धा मंत्राचा आहे. तोच परिणाम आहे, जसा निर्विचारीतेच्या मंत्राचा किंवा महत् अहंकार विचार थांबविण्यासाठी प्रथम गणेश मंत्र म्हणा, नंतर परमेश्वराची प्रार्थना (लॉर्डस् प्रेयर) किंवा 'मी क्षमा करतो' किंवा निर्विचारीतेचा मंत्र ३ वेळा म्हणावा. नंतर सलग महत् अहंकार मंत्र म्हणावा (३ वेळा) आणि डावी बाजू ७ वेळा चढवावी. जेणेकरून संतुलन प्राप्त होईल . निर्विचारीता मिळेपर्यंत प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे. ही उजवी किंवा डाव्या बाजूची क्रिया संपलीच पाहिजे. तुम्ही मधोमध असलेच पाहिजे व मधोमध येण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे ध्यान करणे. रात्रीच्या वेळी सुमारे दहा मिनीटे व सकाळी ५ मिनीटे काही लोक ध्यान करीत नाहीत म्हणून त्यांची स्थिती सुधारत नाही. ज्या मार्गाने तुमची स्थिती तुम्ही वाढवू शकता तो म्हणजे ध्यान व आकलन. १८ याबाबत फक्त दोन समस्या असतात, डावी आज्ञा व उजवी आज्ञा. जर उजव्या बाजूची समस्या असेल तर फक्त जोडेपट्टी करा. जर डाव्या बाजूची समस्या असेल तर बंधने द्यावी किंवा नावाची चिट्ठी जाळावी. परंतु प्रत्यक्षपणे कोणीही साधकाला मदत करण्याचा प्रयत्न करू नका. जर अशी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी आली तर म्हणावे, 'मी तुला मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ' परंतु जर तुम्ही सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न केलात तर संकटात सापडाल कारण तेथे जोडले जाल. तुमचे चित्त क्रियाशील आहे आणि तेथे न गुंतून जाता कार्य करते. त्याला म्हणतात करुणा. त्यासाठी तुम्ही तुमचे चित्त निर्मल केले पाहिजे. ते असे असले पाहिजे कि, जे शांत साक्षीभावाने पाहणारे, पण न गुंतणारे, परंतु ते खंबीर असावे. असेच चित्त काम करते. इतरांबरोबर आपली वागणूक विचित्र हास्यास्पद असते. त्याला अहंकार जबाबदार आहे. ज्या लोकांना अहंकाराची समस्या असते त्यांना जोपर्यंत स्वत:ला त्रास होत नाही तोपर्यंत ते त्याचा शोध घेत नाहीत. अगदी अतिशय त्रास होईपर्यंत. कारण अहंकार वैयक्तिक पातळीवर त्रास देत नाही. मात्र समाजाला अधिक त्रासदायक ठरतो. पुष्कळशा निरर्थक गोष्टींपासून अहंकार घटित होत असतो. या गोष्टी म्हणजे पैसा , बुद्धी इ. यांच्या मूल्यांबाबत चुकीच्या कल्पना असतात. अहंकारी माणसे प्रत्येक गोष्ट बुद्धिच्या पातळीवर करत असतात. त्या गोष्टी त्रासदायक व कंटाळवाण्या असतात. हे सर्व पाश्चिमात्य देशात प्रचलीत आहे. अहंकार तुम्ही कसे सुखी व्हाल हेच पाहतो. जीवनाचे नियोजन काय आहे ते पाहतो. 'आम्ही हे करू शकतो, ते करू शकतो' असा विचार अहंकार करायला लागतो. दूसर्याचा मानसन्मान न ठेवता प्रहार करणाच्या, हानी करणाच्या गोष्टी १९ चौ रमस्या 1घी बोलायला लावतो. अहंकाराचा शेवट मूढता व मूर्खता यामध्ये होतो कारण असे, की आम्हाला परमेश्वराचे विस्मरण होते. तसेच परिपूर्ण विश्वशक्तीशी असलेले आपले नातेसुद्धा विसरले जाते. हे आहे तुमच्याबद्दलचे पूर्ण अज्ञान. ते अज्ञान हा अहंकार देतो. सोप्या शब्दात असे म्हणता येईल, की हा अहंकार दुसरेतिसरे काही नसून फक्त स्वत:बद्दलच्या मूल्याबाबत पूर्णत: चुकीच्या कल्पना. त्यामुळे तुम्हाला वाटते 'मी सर्व काही आहे.' आपण कोण आहोत ? आपण एका बी मध्ये अंकूरदेखील आणू शकत नाही. भारतामध्ये कोणीही 'माझे बरोबर आहे' असा विचार करीत नाही. एकदा का असा विचार करायला सुरुवात केली की, 'मी फक्त बरोबर आहे आणि दुसरी व्यक्ती चुकीची आहे,' 'मी करतो ते योग्य आहे' किंवा 'तो चुकीचा आहे' मानवाबरोबर घडू शकते, ती आहे अहंकार. अत्यंत वाईट अशी भूतबाधा परवडली. कमीत कमी तुम्हाला त्याचे दुःख जाणवते. परंतु अहंकाराचे दु:ख तुम्हाला कधी जाणवत नाही. तुमच्यामध्ये अहंकार आहे असे तुम्हाला वाटत नाही आणि तुम्हाला वाटते की तुम्ही सर्वाधिक योग्य व्यक्ती .संपलेच म्हणून समजा. सर्वात निकृष्ट गोष्ट, जी आहात. एखाद्या गोष्टीवर जर तुम्ही प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केलात, त्याबाबत अतिक्रियाशील राहिलात, प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे , अतिकार्यक्षमपणे करीत राहिलात, तर तुमचा अहंकार वाढीस लागतो. जेंव्हा तुमचा अहंकार वाढतो तेंव्हा तुम्ही हिंसाचार करता. जेव्हा तुम्ही अधिक उत्पादन निर्मिती करता तेव्हा त्यासाठी तुम्हाला अधिक आक्रमक व्हावे लागते. त्याची विक्री कशी करावी ते तुम्ही जाणत नाही, मग तुम्ही आक्रमक उद्योजक किंवा आक्रमक देश अशाप्रकारे काहीतरी बनता मग तो देश दुसऱ्या देशावर सामुग्रीसह साम्राज्य करतो. तुम्ही भौतिकवादी बनता आणि अशा लोकांना नसते. ते अगदी शुष्क, कोरडे असतात. फक्त एकच गोष्ट ते जाणतात ती म्हणजे पैसा.....पैसा......पैसा. हदय उजवी बाजू (पिंगला) ही सामूहिक अतिंद्रीय चेतनेची असते म्हणजे भविष्यकाळाची असते. त्यामुळे येथे आपण भविष्याबाबत विचारात गुरफटलेलो असतो. अत्यंत नियोजन करतो. त्याबाबत आपण आक्रमक झालेलो असतो. सर्व महत्त्वाकांक्षी लोक भविष्यात जगणारे असतात. हिटलरने त्याच्या सर्व शक्त्या लोकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी वापरल्या. त्यांनी जे लोक उजव्या बाजूवर (महत्त्वाकांक्षी बनून) मृत्यू पावले त्यांचा वापर केला. म्हणजेच जे लोक, अतिंद्रीय चेतनेचे लोक इतरांवर बसले ते सुद्धा महत्त्वाकांक्षी झाले. पूर्णत: हृदय शून्य लोक. ते इतके हृदयशून्य होते की तुम्ही कल्पना करू शकत नाही. तुम्ही अशा काही २० लोकांची जीवनकथा वाचून पहा. ते सुरुवातीस इतके हृदयशून्य नव्हते. वास्तविक नव्हतेच. ते चांगले मुक्त व कनवाळू होते. तर मग एकाएकी ते सैतानी विध्वंसक कसे बनले? आता गोष्ट अशी आहे ते जर आता जिवंत नाहीत तरी त्यांचे काहीसे कार्य चालूच आहे. असे लोक काही काळ गतिशील बनतात. ते कदाचित गतिशील दिसतात. परंतु नंतर त्यांना पुष्कळसा भार वाहून न्यावा लागतो आणि ते कोबीच्या गड्ड्यासारखे म्हणजे दुसऱ्या बाजूच्या (ईडा) वरील लोकांसारखे बनतात. जेंव्हा अतिद्रीय प्रवृत्तीची भूते आत येतात तेंव्हा तुम्ही अतिमहत्त्वाकांक्षी बनता. तुम्हाला कल्पना सुचायला सुरुवात होते... संघटीत कसे करावे?.....हे कसे करावे?.....जे काही वैज्ञानिक मरण पावले आणि त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल ते कधीच समाधानी नव्हे..... म्हणून (पृथ्वीवर) येतात आणि तुम्हाला नवीन नवीन कल्पना देतात....... हेच सर्व आहे, अतिंद्रीय शक्तीचा परिणाम. आता प्रबळ आसक्ती जी अगदी सूक्ष्म स्वरुपात असते, ती आहे अहंकार. अशा काही आवडीच्या गोष्टी असतात की सहजयोगावर पुस्तक लिहावे किंवा सहजयोगासाठी काही चित्रे रंगवावीत किंवा मी सहजयोगासाठी काही कमवावे. सहजयोगासाठी हे करावे आणि ते करावे हा सुद्धा अहंकारच आहे. सहजयोगाचा मी नेता व्हावे असे वाटले की मग मत्सर सुरू होतो. जर आईने सांगितले 'हे चांगले केले नाही' तर तुम्ही दुखावले जाता. जर आईने सांगितले 'े चांगले केले आहे' तर तुम्हाला आनंद वाटतो. त्याचा अर्थ तुम्ही अद्याप सूक्ष्म अहंकाराच्या पातळीवर आहात. कधी तुम्हाला वाटते जे काही तुम्ही बोलता त्यास मी मान्यता द्यावी. हे अगदी सूक्ष्म आहे. त्याला माताजी मान्यता देत नाहीत. ते सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला समजत नाही. यामागे परमेश्वरी मूळ कारण असलेच पाहिजे. नाहीतर मी का मान्यता देत नाही? आपण समजून घेतलेच पाहिजे. हे सर्व परमेश्वराचे कार्य आहे आणि आपण परमेश्वराच्या हातातील केवळ साधन आहोत. आता प्रतिअहंकार जो आपली कर्मठ बंधने, आपले भय, भीती, संकटे, चिंता साठवून ठेवतो. जे काही आपण वाचतो किंवा अनुभव घेतो त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे आपण पळून जातो. आपण काम करणे टाळतो किंवा घाबरलेलो असतो. ज्या गोष्टी आपण त्याच्याविषयीचे सत्य शोधलेले नसते, जाणलेले नसते त्यामुळे हे घडते. चुकीच्या कर्मठ बंधनातून, बालपणातून आणि धर्मातून सत्य न शोधल्यामुळे असे घडते. प्रतिअहंकार आपण पाहिलात, आपल्यावर जास्त काय परिणाम होतो ते पाहिलेत आणि तुम्हाला दुःखी कोण बनवितो ते पाहिले गुरुपासून, २१ पाहिजे. आता समजा तुम्ही पुष्कळ प्रयत्न करीत आहात... 'हे ईश्वरा मला मदत कर. हे माझ्यासाठी कर.' तेंव्हा तुम्ही बाधित होता कारण अद्याप तुम्ही परमेश्वराशी जोडलेले नसता आणि एकदा का तुम्ही बाधित झालात त्याचा अर्थ इतर भुते तुमच्यामध्ये शिरतात. जेंव्हा अशी भुते तुमच्यामध्ये येतात तेंव्हा तुम्ही खरोखरचे पागल बनता. अशाप्रकारची गोष्ट जे लोक डाव्या बाजूला जातात त्यांना होते. जेव्हां तुम्ही सामूहिक अंतर जाणिवेत प्रवेश करता ( भूतकाळात) तेंव्हा यापैकी कोणते तरी एक भूत तुमचा ताबा घेते आणि एकदा का त्याने तुमचा ताबा घेतला की तुम्ही या रोगाचे बळी पडता. विशेषतः मी पाहिले आहे की अशा बाधित व्यक्ती अर्थातच वेड्या बनतात. त्यांना फेफरे हा रोग होतो. या सर्व बाधित व्यक्ती, तसेच फेफरे हा रोग इ.बरे होऊ शकतात. सर्व मानसिक समस्या, उदासिनता बरी होऊ शकते. हे अजिबात कठीण नाही परंतु प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. जर तुम्ही बाधित आहात तर तुम्ही ते काढण्यासाठी खरोखर मेहनत घेतली पाहिजे. तसे पाहिले तर ते तुमच्यापासून दूर होऊ शकते आणि तुम्ही तुमचा आत्मा बनू शकता. डाव्या बाजूच्या लोकांना काही प्रकारची बाधा असू शकते. याचा अर्थ ते कोणाकडून तरी बाधित आहेत. काही लोक उजव्या बाजूकडून बाधित होतात. फक्त डाव्या बाजूकडूनच बाधित होतात असे नव्हे. डाव्या बाजूकडील बाधा विशेष पद्धतीच्या असतात कारण त्या शरीरात वेदना देतात. उजव्या बाजूच्या लोकांना स्वत:ला वेदना होत नाहीत. अशी व्यक्ती दुसऱ्यांना वेदना देते. अशी बाधा जी अगुरूना अनुसरल्यामुळे होते. जसे एखाद्या व्यक्तीमध्ये मृतात्मे अस्तित्वात असतात. ज्याप्रमाणे एखाद्या मुलीमध्ये मृत पुरुषाचा आत्मा असल्यास त्या मुलीला सतत पुरुषाप्रमाणे पेहराव करावासा वाटतो किंवा एखादा दारूबाज मृतात्मा एखाद्या तरुण व्यक्तीमध्ये शिरला तर त्याला सदासर्वकाळ व्हिस्की पिण्याची इच्छा होते. असे सर्व प्रकार अर्धजागृत जाणिवेपासून होतात. नंतर अर्धजागृत जाणिवेच्या क्षेत्रातून हिटलर पद्धतीचे लोक, हकूमशहा जन्माला येतात. जेंब्हा मी काही लोकांना सांगते तेंव्हा ते म्हणतात, 'श्रीमाताजी, मला माहीत आहे, मी ते करतोय ते मला माहीत आहे.' तर असे तुम्ही का करता ? याचा अर्थ तुम्ही बाधित आहात. तुम्ही बाधित व्यक्ती आहात. जे तुम्ही जाणता हे चुकीचे आहे. तरी तुम्ही ते करता. म्हणजे तुम्ही बाधित व्यक्ती आहात. जर तुम्ही स्वत:ला जोडेपट्टी केलीत तर बरे होईल ! मल्टीपल सिरॉसिस..... डाव्या बाजूचा रोग ..... आतापर्यंत इंग्लंडमध्ये मी तीन रोगी पाहिले आहेत. ते सहजयोगामुळे बरे झाले आहेत. त्या सर्वांपैकी त्यांची पत्नी किंवा पती बाधित होते. जेंव्हा डावी नाभी जर डाव्या आज्ञेला किंवा डाव्या स्वाधिष्ठान चक्राशी एकत्रित आली तर तुम्हाला ब्लड कॅन्सर (रक्ताचा कर्करोग ) होऊ शकतो. प्रोटीन ५८ व ५२ ही शरीराच्या अज्ञात भागाकडून आपल्याकडे येतात.... सामूहिक सुप्त मन आपल्यामध्ये प्रवेश करते आणि कॅन्सरला (कर्करोगाला) सुरुवात होते. आता जे काही मृत आहे ते डाव्या बाजूवर आहे. त्याबद्दल वास्तविक आपण बोलत आहोत, हीच बाधा आहे. जी अशी गोष्ट आहे की आपल्यामध्ये प्रवेश करते आणि कर्करोगाला सुरुवात होते. 22 २० म] .तुम्ही सर्वजण माझ़ी मुलं आहात, माझ़ी मुले-मुली आहात. हे सर्व श्री गणेशासा२२खे आहे. आपण सगळे पैगंबरांसा२२खे आहोत. ৫आपल्यामध्ये पैगंबरांची शक्ती आहे का?" " श्री माताजी, काय आम्ही खरेच साक्षात्कारी लोक आहोत?' ८काय आम्ही मानवीय सभ्यतेचे सा२तत्त्व आहोत?" 66 काय आपण लोक परमेश्वराच्या कृपेचा निष्कर्ष आहोत?'" 66 हे प्रश्नं विचार आणि हया शक्त्या आपल्यामध्ये विकसित करा. प.पू.श्री माताजी, १४.१.१९८३ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा। लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in विशेषकरून आमची आशीद २प्मी आणि नवमी या दोन दिवशी असतो. सप्तमी आणि नवमी या दिवशी क अशा प्रकारचे आयोजन ज२रू२ करा ज्यात तुम्ही पूर्णपणे तुमच्याकडे लंक्षी द्यील. मूहिक ध्यान अशाच ठिकाणी कशा जिथे माझे पाय पडले आहेतं, जी गोष्टशुद्ध झालेली आहे. पं.पू.श्रीमातीजी, २७.५.१९७६ े पा. सा ा के ० र ० र ---------------------- 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-0.txt वैतन्य लहरी मराठी जानेवारी-फेब्रुवारी २०१३ ४ मुभ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-2.txt या अंकाल १ विशेष गोष्टीसाठी ही वेळ आलेली आहे ... ४ वेदना व यातना ...१२ आज्ञा चक्र सुधारणे ...१४ आजेची समस्या ....१९ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-4.txt ব। ह्ही तेल आलेली आहे मानव स्थितौत आल्यावर आपण परमेश्वराला विसरून जावं है बरोबर नाही. ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं ऐश्वर्य, सुख आणि शांती दिलेली आहे त्या परमेश्वराला लोक फार लवकर विसरतात ४ राहुरी, ३/२/१९८२ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-5.txt परमेश्वराच्या अनेक कृपा आपल्यावर होतात. माणसावरती अनेक त्याच्या कृपा होतात. त्याच्या आशीर्वादाने अनेक उत्तम आणि उत्तम असं जीवन त्याला मिळतं, पण मनुष्य मात्र परमेश्वराला प्रत्येक क्षणी विसरत असतो. परमेश्वराने साक्षात ही सर्व पृथ्वी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे आणि ती पृथ्वी निर्माण करून त्याच्यामध्ये विशेष रूपाने एक स्थान बनवलं आहे, ज्याच्यामुळे ती फार सूर्याच्या जवळ नाही, चंद्रापासून तितकी दूर आहे जितकी दूर तिला रहायला पाहिजे. आणि त्या पृथ्वीमध्ये हे जीवजंतू तयार करून आज ते सुंदर कार्य मनुष्य निर्मितीमध्ये फलद्रूप झालेले आहे, म्हणजे आता तुम्ही मानव झालात. आता मानव स्थितीत आल्यावर आपण परमेश्वराला विसरून जावं हे बरोबर नाही. ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं ऐश्वर्य, सुख आणि शांती दिलेली आहे त्या परमेश्वराला लोक फार लवकर विसरतात, पण ज्या लोकांना परमेश्वराने एवढा आराम दिलेला नाही, जे अजून दारिद्रयात आहेत, दःखात आहेत, आजारी आहेत, त्रासात आहेत ते मात्र परमेश्वराची आठवण करत राहतात. पण ज्या लोकांना परमेश्वराने दिलेले आहे ते मात्र त्याला विसरून जातात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ज्यांना आशीर्वाद दिला ते मात्र परमेश्वराला साफ विसरून जातात आणि ज्यांना दिला नाही ते मात्र त्याची आठवण काढत राहतात. मग त्याची आठवण केल्यावर, त्यांनाही आशीर्वाद मिळाल्यावर ते ही विसरून जातील. मानवाचं असं विचित्र डोकं आहे की त्याला काहीही दिलेलं झेपतच नाही. म्हणून हे आपण समजलं पाहिजे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण बसून मोजत बसलो की परमेश्वराने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला किती त-्हेने आशीर्वादित केलेले आहे तर आपल्याला आश्चर्य वाटेल! आजच माझ्याकडे पुण्यातले पुष्कळ श्रीमंत लोक आले. त्यांच्या घरी किती आजार आहेत, त्या लोकांना किती त्रास आहेत, किती मानसिक त्रास आहेत. कुणाचा मुलगाच दारू पितोय, तर कुणाचा नवराच दारू पितोय, तर कुणाची बायकोच वाया गेलेली आहे अशा रीतीने सर्वांना एवढे प्रश्न आहेत. एखाद्याला आईचच प्रेम मिळालं नाही, तर एखाद्याला बापाचं प्रेम मिळालं नाही, तर एखाद्याला मुलाचं वागणं पसंत नाही. अशात-्हेने अनेक त्यांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपल्याजवळ नाहीत आज , पण ते प्रश्न उद्या तुमच्याजवळ जास्त पैसा आला किंवा जास्त सत्ता आली तर ते तुमच्यासमोर उभे राहतील. जर तुम्ही हे लक्षात घेतलं की हे सर्व परमेश्वराने आपल्याला का दिलय, ही सर्व सुविधा परमेश्वराने आपल्याला का दिली आहे ? तर मात्र तसं होणार नाही. परमेश्वराने आधी तुमची खाण्या-पिण्याची व्यवस्था केलेली आहे. पूर्वी लोकांनी पुष्कळ जर काही खायचं म्हटलं तरी चार जनावरं मारल्याशिवाय ते खाऊ शकत नसत. जंगलामध्ये जावं लागायचं, एकाच ठिकाणी रहावं लागायचं, किती लोकांना तर निवार्यालासुद्धा एक छत नसायचं. मग तिथे साप, विंचू, वाघ अशारीतीची भयंकर जनावरं असायची. त्यांच्यापासून भीती असायची. त्या सर्वांचे निवारण होऊन आज आपण एका सुव्यवस्थित ठिकाणी राहतो आहे. त्याशिवाय ह्या सर्व गोष्टींचे आता परमेश्वराने आपल्याला वरदान दिलेले आहे, टेलिफोन दिलेला आहे, नंतर आपल्याला ऐकायलासुद्धा, पुष्कळांजवळ मी पाहिलेले आहे की तुमच्याजवळ रेडियो वरगैरे आहे. पण हे सगळे जरी मिळालं तरी आपण परमेश्वराला जास्तच विसरत चाललो आहोत. परमेश्वराने आपल्याला का दिलं? ज्या माणसाला पहावं त्याला तो घड्याळ लावून फिरतो ६ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-6.txt आणि म्हणतो की आता वेळ नाहीये, फार उशीर झाला, फार उशीर झाला. प्रत्येकाला वेळ नाहीये. आता मी तिथे ब्राह्मणीला गेले होते, तिथे पुष्कळशा बायका उशिराने आल्या. म्हणाल्या, 'माताजी, आम्ही कामावर गेलो होतो तर आम्हाला वेळ झाला नाही तर, आम्ही येऊ नाही शकलो तर, आत्ताच दर्शन द्या वगैरे वरगैरे.' तर मी म्हटलं की, 'एक दिवस नसत्या गेल्या तर काय झालं. आम्ही लंडनहून आलो एक दिवस तुम्ही जर नसते गेले, तर दोन पैसे तुम्हाला कमी मिळाले असते. काही हरकत नाही. एक दिवस माताजी भेटायला इतक्या लांबून आल्या तर आम्ही त्यांना भेटायला आलो असतो. बरं आम्ही समजा जर निघून गेलो असतो तर तुमची आमची भेटच झाली नसती. पण महत्त्व कशाचं आहे? तर दोन पैसे आपले बुडाले नाही पाहिजे. ते फार महत्त्वाचे आहे. मग उद्या आजारी पडले तर मात्र इथून लंडनपर्यंतचे तिकीट घेऊन तिथे येतील की आमच्या मुलाला ठीक करा. पण आज तुमच्या दारात आम्ही आलेलो आहोत तर तुम्हाला वेळ नाही. तर हे तुम्हाला परमेश्वराने का दिलं? हे घड्याळात सारखं तुमचं बघणं चालतं की आज वेळ नाही, काल वेळ नव्हता, उद्याही वेळ राहणार नाही, मग घड्याळ कशाला बांधता? जर तुमच्या जवळ वेळच रहात नाही तर घड्याळ बांधून तरी उपयोग काय? तर हा जो वेळेसाठी, जो मनुष्याला सारखा त्रास आहे तो एकाच कारणामुळे आहे की त्याला हे माहीत नाही की ही वेळ आपण का शोधत होतो ? कोणची वेळ गाठायची आहे ? कोणत्या वेळेसाठी एवढी आपली धडपड चाललेली आहे? कशासाठी वेळ पाहिजे? इकडून तिकडे वाया दवडण्यासाठी किंवा इकडून दारुच्या गुत्त्यात गेले किंवा घाणेरडी कामं केली, कुणाचे गळे कापले, कुणाचा खून केला अशा घाणेरडया गोष्टी करण्यासाठी वेळ मिळालेला आहे? काहीतरी विशेष गोष्टीसाठी ही वेळ आलेली आहे. आपल्या भारतात काय किंवा बाहेर कधीही लोकांनी घड्याळं लावून वेळ पाहिला नव्हता. आता हे नवीन सूत्र का निघालं आहे ? का? कशाला आपल्याला घड्याळाचं सारखं वाटतं की वेळ गेला बुवा, हा वेळ गेला, तो वेळ गेला असं अशासाठी वाटत आहे ? की आता माणसाला मनन करण्याची वेळ आलेली आहे! स्वत:साठी त्याला वेळ द्यायला पाहिजे. स्वत:बद्दल त्याला समजलं पाहिजे की मी कोण आहे ? मी कशाला ह्या जगात आलो? जर माणसाला वेळ मिळाला तर तो काहीतरी भ्रमिष्टासारखं दुसरेच विचार करत बसतो. पण हा जो वेळ मिळवण्याचा सगळ्यांना एक छंद लागलेला आहे तो एवढ्यासाठीच आहे की त्यांनी हा विचार केला पाहिजे की मला काय करायचे आहे ? मी कशाला ह्या जगात आलो ? परमेश्वराने मला कशाला आणलेले आहे या जगात? मला एवढ्या योनीतून काढून मानव स्थितीत का आणलेले आहे? माझ्या जीवनाला काय अर्थ आहे ? हा असा विचार करण्यासाठी आपली ही धडपड आहे की आपण वेळ वाचवला पाहिजे. पण तसं होत नाही. तसं मुळीच होत नाही. जर तुम्हाला कुणाला म्हटलं, 'मला आजच गेलं पाहिजे मुंबईला, आजच गेलं पाहिजे.' 'कशाला आजच गेलं पाहिजे?' 'नाही, कसही करून तुम्ही तिकीट काढा. मला आजच गेलं पाहिजे.' 'का?' तर 'मला सट्टा खेळायचाय.' जे काही मनुष्य करतो अगदी विपरीत करत असतो. जे त्याला करायचं आहे त्याच्या विपरीत करत असतो. सरळ गोष्टी त्याला समजतच नाही की, बाबारे कशाला एवढा वेळ वाचवतोस? कशासाठी एवढा वेळ वाचवतोय? सगळे आपलं आयुष्य तुझे वायाच गेलेले आहे की रे! तुला हे कळलं का की तू ह्या संसारात कशाला आलास? आता तुम्ही कशाला ह्या संसारात आला ? तर ७ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-7.txt परमेश्वराला जाणण्यासाठी ! परमेश्वराने ही सर्व सृष्टी केली, तुम्हाला सगळं काही दिलं, शेवटी एवढ्यासाठी की तुमच्यामध्ये सुजाणता यावी, तुमच्यामध्ये धर्म यावा आणि नंतर तुम्ही त्या धार्मिक स्थितीमध्ये परमेश्वराशी एकात्म व्हा. केवळ या जीवाचा आणि आत्म्याचा संबंध होतो. तुम्ही त्या परम पित्या परमात्म्याच्या साम्राज्यात प्रवेश करावा म्हणूनच परमेश्वराने ही सगळी रचना केलेली आहे आणि तो आतुरतेने तुमची वाट बघतो आहे की हे कधी माझ्याकडे येणार, पण तुम्ही पैसे मिळाले म्हणून इकडे बहकले, सत्ता मिळाली म्हणून तिकडे बहकले, नाहीतर आपल्या मुला- बाळांमध्ये कुठे ना कुठे तरी असं तुमचं चित्त गेलेले आहे आणि तुमच्याजवळ एवढासुद्धा वेळ नाही की तुम्ही दोन मिनिटं परमेश्वराच्याबद्दल विचार कराल . पाश्चिमात्य देशातील लोकांनी सगळे हेच प्रकार केले. रात्रं-दिवस धडपड करून हे कर रे, ते कर रे , पैसे एकत्र कर रे, काय काय त्यांना जे करायचे ते करून शेवटी काय झालं? त्यांच्या मुलांनी आपल्या आई-वडिलांचं घर सोडलं आणि आम्हाला हे पैसे डोक्यावर घेऊन फिरायचे नाही. तुम्ही सांभाळा ते आणि ते लागले आपल्या मार्गाला आणि ते कुठे जाऊन पोहोचले तर त्यांनी हे सगळे तऱ्हेतऱ्हेचे गांजा-बिंजा घ्यायला सुरुवात केली. आता तुम्हालाही त्या रस्त्याने जायचे असले तर जा. त्याला कोणी काही मना करू शकत नाही कारण तुम्हाला स्वतंत्रता आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला नरकात जायचंय तर जा. सरळ जाऊ शकता. पण जर तुम्ही समजलात की, 'मी कोण आहे? कशासाठी आलो आहे या जगात ? मला काय काय करायचे आहे ? आणि माझी काय स्थिती आहे, वस्तुस्थिती काय आहे?' हे जर तुमच्या लक्षात आलं तर मात्र तुम्ही अधोगतीला न जाता सहजयोगाकडे याल. यालाही एक फाटा आहे, त्या फाट्याने, आपल्या एका लहानशा मार्गानेच तुम्ही आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकता. हे आत्म्याला ठाऊक आहे की तुमचा रस्ता कुठे आहे. तुम्ही कुठे चालला आहात. पण अजून तुमच्या चित्तात तो आत्मा आलेला नाही. तुमच्या चित्तात तो आत्मा आला, चित्तात म्हणजे, आता तुमचं माझ्याकडे चित्त आहे, तुमचं माझ्याकडे लक्ष आहे. तुम्ही बघता मी उभी आहे, माझं बोलणं ऐकता, सगळे काही तुम्हाला माहिती आहे की माताजी ह्या आमच्यासमोर बोलत आहेत. पण मी म्हटलं की, 'आता तुमचं चित्त तुम्ही आपल्या आत्म्याकडे लावा किंवा परमेश्वराकडे लावा.' तर 'कसं लावायचं माताजी ? मोठं कठीण काम दिसतयं! असं कसं न्यायचं. आतमध्ये चित्त न्यायचं तरी कसं? कारण चित्त तर आमचे बाहेरच पसरलेले आहे. जे जातय बाहेर तेच चित्त आहे. तेव्हा आतमध्ये ते कसं घेऊन जायचं. आमच्या हृदयात जर आत्मा आहे तर आम्ही हदयाकडे कसं चित्त न्यायचं! म्हणूनच परमेश्वराने एक युक्ती योजलेली आहे की तुमच्यामध्येच एक कुंडलिनी नावाची शक्ती, जी तुम्हाला अंकरते, अशी शक्ती त्याने त्रिकोणाकार अस्थीमध्ये ठेवलेली आहे. जेव्हा ही कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये जागृत होते तेव्हा एक घटना घडते. समजा आम्ही इथे उभे आहोत आणि वरून काही पडलं तर सगळ्यांचं लक्ष तिकडे जाईल की नाही! आणि आपलं तर चित्त इतकं चलायमान आहे की एक मनुष्य इकडून तिकडे गेला तरी आपलं लक्ष तिकडे जातं. तेव्हा अशी जेव्हा घटना आतमध्ये होते तर आपलं चित्त आतमध्ये आकर्षिलं जातं आणि हे चलबिचल करणारं मन जे आहे ते आतमध्ये ओढलं जातं. ते जेव्हा आतमध्ये ओढलं जातं तेव्हा आपल्याला काही आतमध्ये चित्त न्यावे लागत नाही. आपल्याला असं वाटतं की आपोआपच काहीतरी झालंय आणि आपलं चित्त आतमध्ये ८ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-8.txt चाललेले आहे. तेव्हा ही कुंडलिनी जागृत होऊन आणि सहा चक्रांतून निघून, ह्या सूक्ष्म चक्रांतून निघून ह्या ब्रह्मरंध्राला भेदते. जेव्हा ती ब्रह्मरंध्राला भेदते इथे त्यावेळेला तुम्ही जसं या मशीनचं कनेक्शन लागलेले आहे 'मेन' शी तसं तुमचंही कनेक्शन परमेश्वराशी होते. म्हणजे समजा हीच कुंडलिनी आहे. ह्या वस्तूला काहीच अर्थ येणार नाही जर ह्याचं कनेक्शन लागलं नाही तर. कोणत्याही मानवालासुद्धा काहीही अर्थ नाही आहे जोपर्यंत त्याचे परमात्म्याशी तादात्म्य झालेले नाही. हे झालंच पाहिजे. घडलेच पाहिजे. जर हे झालं नाही तर ह्या मनुष्याच्या आयुष्याला काहीही अर्थ नाही. तो निरर्थक आहे. तो जन्माला येतो काय आणि मरतो काय, काहीही फरक नाही. जनावरांना तरी आहे अर्थ कारण त्यांना मनुष्य व्हायचे आहे. जनावरं येतात आणि मरतात तर त्यांना काही अर्थ आहे कारण नंतर त्यांना मनुष्य व्हायचे आहे. पण जर मनुष्याला देवपण घ्यायचं नसलं आणि त्याला जर आत्म्याशी संबंध जोडायचा नसला तर तो कामातून गेला. कारण आता पुढे तो काय करणार ? तेव्हा तुम्ही आपल्या आत्म्याला ओळखलं पाहिजे आणि आत्म्यामध्ये लीन झाले पाहिजे. पण ते व्हायचं कसं ? परत 'माताजी कसं होणार? ' मी परत म्हणतेय ही कुंडलिनी शक्ती तुमच्यात जागृत होते. मग ही कशी जागृत होते? जसं एखाद्या बी ला तुम्ही मातेच्या उदरात घातलं म्हणजे ते कसं आपोआप अंकुरतं तसं आपोआप सहजच ही कुंडलिनी तुमच्यामध्ये जागृत होते, पण त्याला जागृत करणारा कुणीतरी अधिकारी पुरुष लागतो. अधिकार परमेश्वरापासून, परमेश्वराच्या प्रेमापासून आलेला पाहिजे. पोटभरू लोकांना हे कार्य जमणार नाही. नुसते वितंडवाद करणाऱ्या लोकांना हे जमणार नाही. ही एक शक्ती आहे, ज्याच्यामध्ये ही शक्ती असते त्या शक्तीमुळेच तुमची कुंडलिनी जागृत होते. म्हणजे जसा एक दिवा पेटलेला असेल तोच दुसरा दिवा पेटवू शकतो. जेव्हा माणसं आपल्याला असं समजतात की आम्ही म्हणजे काहीतरी मोठे आहोत. आम्ही मोठे सायंटिस्ट आहोत किंवा अमुक आहोत, तमुक आहोत तर ते नुसते मानव स्थितीत आहेत फक्त. त्यांचा काहीही उपयोग परमेश्वराला होत नाही. जेव्हा तुमचा संबंध आतम्याशी होतो तेव्हा तुमच्यातून ही ब्रह्मशक्ती वाहून येते. ही ब्रह्मशक्ती चहुकडे पसरलेली आहे. ती सगळीकडे वातावरणात असते, तिच्याचमुळे सर्व फुलांची फळं होतात. त्याच्यामुळेच बी अंकुरते. त्याच्यामुळेच सर्व जिवंत क्रिया होतात. तुमचाही जन्म त्याच्याचमुळे झालेला आहे. त्या शक्तीची तुमच्या हाताला जाणीव होते, परत मी म्हणते त्याची जाणीव होते. जाणीव म्हणजे जशी तुम्हाला गरम आणि थंडची जाणीव होते तशीच तुम्हाला या चैतन्य लहरींची जाणीव होते आणि तुमच्या हातामध्ये अशा थंड थंड लहरी येऊ लागतात. ही ओळख पुष्कळ वर्षापूर्वी मार्कडेय स्वामींनी सांगितली , त्याच्यानंतर आदि शंकराचार्यांी सांगितली, ख्रिस्तांनी सांगितली, मोहम्मद साहेबांनी सांगितली, सगळ्यांनी सांगितलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत माझ्या लेक्चरला काहीच अर्थ नाही. तेव्हा हे घटित झाले पाहिजे, तुमची जागृती झाली पाहिजे. तुम्हाला हे मिळालं पाहिजे. हीच माझी एक परम इच्छा आहे. म्हणूनच मी तुमच्यासाठी इतक्या लांबून इथे आलेली आहे. ते मिळवून घ्या. तुमचं जे आहे ते तुमच्यापाशीच आहे, ते तुमच्याजवळच आहे आणि ते फक्त तुम्हाला द्यायचे आहे, ते तुम्ही सहजच सगळं घेऊन परत त्याची वाढ करून घ्या कारण अंकुरतांना मात्र अंकुर फार सोप्या तऱ्हेने बाहेर पडतं, पण नंतर त्या लहानशा रोपट्याची फार काळजी घ्यावी लागते. म्हणून तुम्हालाही स्वत:ची ९ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-9.txt फार काळजी घ्यावी लागेल. म्हणून पार झाल्यावरसुद्धा जरी बरं वाटलं तरीसुद्धा तुम्ही जाऊन इथल्या सेंटरवर पूर्णपणे ह्याची जी काही माहिती आहे ती घेऊन त्याप्रमाणे वागून आपले वृक्ष वाढवून घ्यावेत. ह्याच्यामुळे मनुष्याची शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्थिती चांगली होते. सगळ्यात मुख्य म्हणजे त्याची धार्मिक प्रवृत्ती बरोबर होते. त्याला हे समजतं की हा खोटा आहे की खरा आहे. हा गुरू वाईट आहे की चांगला आहे. हे त्याला समजतं. आता परवा उसळवाडीला एके ठिकाणी मी गेले होते, तीन-चार वर्षापूर्वी, तर मला तिथे फार बरं वाटलं आणखीन व्हायब्रेशन्स आले म्हणजे थंड लहरी आल्या. तर मी विचारलं की, 'इथे थंड लहरी कशा येतात?' त्यांनी सांगितलं की, 'इथे एक स्थान आहे म्हसोबाचं!' मी जाऊन बघितलं. म्हटलं, 'हे तर अगदी जागृत स्थान आहे इथून केवढ्या अशा थंड-थंड लहरी येतात.' पण जर तुम्ही पार नसले तर तुम्हाला हा दगड काय किंवा तो दगड काय! दगडामध्ये काही फरक कळणार आहे का? तेव्हा ही जाणीव तुमच्यामध्ये झाली पाहिजे. ती जाणीव होताच तुमच्यामध्ये आनंदाचं साम्राज्य येतं आणि तुम्हाला सर्व परमेश्वरी शक्त्या हळूहळू कळू लागतात. तेव्हा आज हा दिवस आलेला आहे की परमेश्वरी शक्ती तुम्हाला मिळाली पाहिजे आणि माझेही राहरीवर विशेष प्रेम आहे, म्हणून मी अनेकदा येते. तर कृपा करून तुम्ही लोक आता आपली कुंडलिनी जागृत करून घ्या आणि त्याच्यानंतर इतरांची पण कुंडलिनी अशीच जागृत करून घ्या. १० 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-10.txt रम ११ 5146 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-12.txt वेदना यी टी तं ना े 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-13.txt सहजविद्या, ९ एप्रिल २००३ तुम्ही कोणत्या संस्काराचे आहात किंवा नाहीत हे एका सेकंदात ओळखू शकता. जर तुमची डावी बाजू पकडली असेल तर तुम्ही कर्मठ वळणाचे आहात आणि तुम्हाला दुःख, वेदनांचा त्रास होत असतो. जर तुमच्या उजव्या बाजूवर पकड असेल तर तुम्ही अहंकाराच्या नशेत असता आणि तुम्हाला आरोग्याची समस्या असू शकते किंवा तुम्ही चंचल असू शकता. जर तुम्ही अहंकार, प्रति अहंकार ह्यापैकी कोणतीही एक शक्ती मोठ्या प्रमाणात वापरत असाल तर दुसरी बाजू गोठून जाते. आपल्या आत्मोन्नतीसाठी संतुलन आवश्यक आहे. प्रथम डावा हात प.पू.श्रीमाताजीकडे करावा आणि उजवा हात भूमातेवर ठेवावा. नंतर डावा हात वर आकाशाकडे धरावा व उजवा हात प.पू.श्रीमाताजींकडे करावा. जर संतुलनात नसाल तर तुम्हाला फक्त एकाच हातातून चैतन्य लहरी जाणवतील. जर दोन्ही हातामधून सारखे परम चैतन्य जाणवले तर त्याचा अर्थ तुम्ही संतुलनात आहात. जर फरक वाटला तर तुम्ही बंधने देऊन ते संतुलीत करा. आपण आपले आज्ञा चक्र स्थिर करू शकता. त्यासाठी आपण जमिनीकडे पहावे. हिरव्यागार १४ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-14.txt हिरवळीकडे पहावे. नजर शांत करावी. प्रत्येक पुरुषाकडे, स्त्रीकडे पाह नये. त्यामुळे नजर भिरभिरणारी होते. जेंव्हा आपण परमेश्वराची आरती करतो तेंव्हा आपण आपल्या आतील प्रकाशाचे पूजन करतो. आपल्यातील प्रकाशतत्त्व प्रकाशित होते. प्रकाशतत्त्व हे आज्ञा चक्रावर आहे. जेव्हा तुम्ही आरती करता किंवा देवापुढे दिवा ठेवता, प्रकाश दाखविता तेव्हा तुमच्यातील प्रकाशतत्त्व प्रकाशित होते. जर कोणी तुमच्याबद्दल काही बोलत असेल आणि ते सत्य नसेल तर त्याबद्दल वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे ? जर ते खोटे बोलत असतील तर घाबरण्याचे काहीच कारण नाही व जर ते खरे बोलत असतील तर तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत. ती काहीशी वाईट गोष्ट असली तरी ती चांगली गोष्ट आहे. जर ते सत्य आहे, तर ते बोलणे माझ्या अहंकारासाठी योग्य आहे. परंतु ते जर असत्य असेल तर त्याला का महत्त्व द्यावे? त्यासाठी आपण नाराज होता कामा नये. इतर लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा आपण त्रास करून घेऊ नये त्यामुळे इतर लोकांना आपली योग्यता कळेल. जे काही आपल्याला नवीन मिळते त्याचे संगोपन केले पाहिजे. तोच आपला आनंद आहे. ती आहे मानसन्मानाची दिमाखाची आपल्यामधील सुंदरता. श्री येशूजींनी आपल्याला महान शस्त्र दिलेले आहे. ते म्हणजे 'आपण क्षमा केलीच पाहिजे.' ही गोष्ट अत्यंत व्यवहार्य आहे. जेंव्हा आपण फक्त क्षमा करतो तेंव्हा त्या व्यक्तीचे अस्तित्व कोठेही रहात नाही. ती व्यक्ती आपल्याला पुढे कधीही त्रास देत नाही. तसेच ती व्यक्ती आपल्या लक्षातही रहात नाही. फक्त 'क्षमा करणे' अत्यंत सोपी गोष्ट आहे. असे करणे म्हणजे अतिशय आनंदाची भावना आहे. आपल्याला जो भौतिक व मानसिक त्रास होतो त्यापासून सुटका होण्यासाठी प्रत्येकाला क्षमा करा. जरी त्यांनी तुम्हाला इजा केली असली तरीही फक्त तुम्ही त्यांना क्षमा करा कारण परत परत त्याची आठवण केल्याने तुम्ही निष्कारण दुःखी होता. आज्ञा चक्रावर आपण प्रत्येकाला क्षमा करतो व मागील आज्ञा चक्राच्या शुद्धतेसाठी आपल्याला म्हणायचे आहे, 'जर आम्ही काही चूक केली असेल तर हे परमेश्वरा आम्हाला क्षमा करा.' आज्ञा चक्राच्या या दोन बाजू आहेत. तुम्ही सदास्वेदा दुसर्यांना क्षमा करण्याचा प्रयत्न करा. घटित होण्यासाठी हा अत्यंत चांगला मार्ग आहे. नाहीतर आपण नेहमीच आपल्याला क्षमा करण्याचा प्रयत्न करतो आणि दूसऱ्यांना क्षमा करत नाही. प्रत्येक गोष्ट उलट मार्गाने करत असतो. आपण दुसऱ्यांना क्षमा करीत नाही मात्र आपण आपल्यालाच क्षमा करत राहतो, ही अत्यंत वाईट गोष्ट जी आपण करतो. स्वत:ला क्षमा करत बसू नका. दुसऱ्यांना क्षमा करा तर तुम्ही गुरू बनाल. जर एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल, जी तुमच्याबरोबर कठोरपणे वागते किंवा तुमच्याबाबतीत निर्दयी आहे, तेंव्हा ती दिसली की तुम्ही चिडचिडे बनता, त्रासून जाता. अशावेळी फक्त म्हणा, 'मी क्षमा करतो.' जेंव्हा तुम्हाला त्रास असेल तेंव्हा तुम्ही म्हणायचे, 'मी क्षमा करतो.' १५ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-15.txt तुम्ही क्षमा करता त्या क्षणी तुमच्यावरचा ताण दूर होतो आणि कुंडलिनीचे उत्थान होते. जेंव्हा आपण क्षमा करतो, तेंव्हा आपल्याला त्रास होत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे क्षमाशीलता. ही क्षमाशीलता आपल्यामध्ये कशी येते तर भूतकाळ विसरल्यामुळे. जर तुमच्यामध्ये क्षमाशीलता असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की तुम्हाला खूप हलके वाटते आणि तुमचे वैवाहिक जीवनसुद्धा ह्यामुळे अतिशय सुखी होते. तुमचा आत्म्याबरोबर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे क्षमा करणे. कारण तरच तुमचे विचार थांबतील. जितका तुम्ही कमी विचार कराल तेवढे तुम्ही तुमच्या आत्मसाक्षात्काराबरोबर जलद गतीने प्रगती कराल. त्याबाबत वादविवाद करू नका. विचार करू नका. परंतु फक्त घटित होण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फक्त (आत्मस्वरूपात) घटित व्हावयाचे आहे. जर तुम्हाला एखादा विचार तुमच्या मनामध्ये येतो आहे असे वाटले तर फक्त म्हणायचे, 'मी क्षमा करतो'. हा फार महान मंत्र आहे आणि तुमचे विचार थांबतील. सहजयोगी त्याच्या चारित्र्यामुळे, पावित्र्यामुळे, वागणुकीमुळे ओळखला जातो. सहजयोग्याची वर्तणूक अत्यंत शांतीपूर्ण असली पाहिजे. जे सहजयोगी सतत धावपळ करतात आणि नाराज होतात ते सहजयोगी नाहीत. सातत्याने माझ्याकडे, माझ्या फोटोकडे पहात रहा. डोळ्यांची उघडझाप न करता, कसलेही दडपण न ठेवता, चित्त सहस्रारावर ठेऊन, डोळे न मिचकावता. हे तुम्ही करू शकता. ही शारीरिक क्रिया आहे. आपण आपल्या चित्तावर व आज्ञेवर मेहनत घेतलेली आहे. डोळ्यांवर आता जर तुमच्या डाव्या आज्ञेवर अडचण असेल तर याचा अर्थ त्यावर बाधा आहेत. तर त्यासाठी मंत्र कोणता? मागच्या आज्ञेसाठी 'महागणेश , महाहिरण्यगर्भ, महाकालभैरव'. जर तेथे बाधा असेल तर उन्हात बसून सुधारता येईल. मारगील आज्ञेवर सुर्यप्रकाश घ्यावा. भूतांना सूर्यप्रकाश आवडत नाही आणि ती पळून जातात. जर अहंकाराची समस्या असेल तर चंद्रप्रकाशात बसणे अधिक चांगले. पण जर तुम्हाला रडू येत असेल, दुःख होत असेल त्यावेळी सूर्याकडे पाहणे चांगले. जी माणसे बाधीत आहेत ती प.पू.श्रीमाताजींच्या उपस्थितीत उघडकीस येतात. कारण जेथे प्रकाश आहे त्या प्रकाशात बाधा उघडकीस येते. हा फार मोठा धोका आहे की प्रकाशात आल्यावर तुम्ही बाधित आहात हे उघडकीस येते. काही लोक सहजयोगामध्ये सर्वसाधारण दिसतात परंतु एकदा का ते प.पू.श्रीमाताजींच्या समोर येतात तेंव्हा ते तेथेच उभे राहतात व अचानक त्यांच्यामधील बिघाड उघड होतो कारण त्यांच्या आत पुष्कळच बाधा असते. जेंव्हा आज्ञा चक्र जागृत होते, तेंव्हा प्रतिअहंकार आत ओढला जातो व कमी होत जातो. आणि जेव्हा आपण अपराधी वृत्ती न ठेवता क्षमा मागतो व सहजयोगात एखादी जबाबदारी स्वीकारतो तेव्हा १६ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-16.txt त्याचे निरसन होते. जर डाव्या आज्ञा चक्रावर पकड असेल तर तुमचा उजवा हात हृदयावर ठेवा आणि निश्चयपूर्वक म्हणा, 'प.पू.श्रीमाताजी मी आत्मा आहे.' प्रतिअहंकाराचा मंत्र आहे, 'हम्' डाव्या बाजूच्या लोकांना ठीक करतांना प्रकाश ( ज्योत) वापरला जातो. परंतु जे उजव्या बाजूचे आहेत त्यांना प्रकाशतत्त्व फारसे मदत करू शकत नाही. तुम्ही फोटोसमोर प्रकाश ठेवलात, पण जे लोक अहंकारी वृत्तीचे आहेत त्यांच्यासाठी याचा काहीही उपयोग होणार नाही. उजव्या बाजूच्या लोकांनी प्रकाशाचा उपयोग अजिबात करू नये. त्यांनी सूर्यप्रकाशात बसू नये, त्यांनी चंद्रप्रकाशात बसावे. जर आज्ञेची समस्या असेल तर त्यांनी मागच्या बाजूला मेणबत्तीचा उपयोग करावा. जर त्यांची दृष्टी कमकुवत असेल किंवा ते हस्व दृष्टरीचे असतील तर मागच्या बाजूला प्रकाश दिला पाहिजे. त्यांची मागील आज्ञा ठीक नसेल तर त्यांना सांगावे, त्यांनी त्यांच्या मागच्या आज्ञेवर प्रकाशतत्त्व वापरावे. एवढेच नव्हे तर त्यांची कुंडलिनी प्रकाशतत्त्वांनी उठवावी. त्यासाठी प्रकाश (ज्योत) किंवा तूपाचा दिवा वापरावा. जर आपण आपला अहंकार कार्यरत असताना पाहिला तर त्यापासून मुक्तता मिळवू शकतो. अहंकाराशी संघर्ष करू नका, तर त्याचे समर्पण करा. हा एकमेव मार्ग त्याच्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी आहे. तुमच्या अहंकाराला आव्हान देण्यासाठी तुम्ही क्रोधामध्ये अडकू नका. प्रयत्न करा की अहंकार प्रतिक्रिया करत नाही. जर तुम्ही प्रयत्न केलात तर ते तुम्हाला साध्य होईल. तुमचा आरशामध्ये तुम्ही स्वत:ला पहा आणि स्वत:ला हसा व स्वत:ची गंमत करा. जर तुम्हाला उजव्या बाजूच्या समस्या असतील तर तुम्ही म्हणावे, 'मी क्षमा करतो.' त्याचा मंत्र आहे, 'मी सर्वांना क्षमा करतो.' 'मी सर्व करणार आहे' अशी भावना नाकारलीत तरीही समस्या सुटू शकते. स्वत:चे कान पकडून क्षमा मागितली तर अहंकार कमी होण्यास मदत होते. अहंकारासाठी मंत्र आहे 'क्षम' किंवा 'महत्अहंकाराचा' मंत्र. जर तुम्ही म्हणालात, 'मी काहीही करीत नाही परंतु परमेश्वरच सर्व काही करीत आहे' किंवा 'मी काहीही करत नाही.' त्यामुळे अहंकार वाढत नाही आणि आपण विनयशील बनतो. जर आपल्याकडे अहंकार असेल तर आपण डावी बाजू चढवून ती उजव्या बाजूला टाकावी. यासाठी दुसरा मार्ग नाही. तुम्हाला तुमच्या हातानेच ते घटित करावयाचे आहे. परमेश्वराची प्रार्थना (लॉर्डस् प्रेयर) अहंकार कमी करण्याचे काम करते किंवा आपले विचार थांबविते. ती प्रार्थना मंत्र म्हणून म्हणावी. ती प्रार्थना आज्ञा चक्र ( ६ वे चक्र) यासाठी मंत्र स्वरूपच १७ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-17.txt काम ३ि क] www ২G आहे. सहाव्या चक्राचा मंत्र आहे. परमेश्वरी प्रार्थना (लॉर्डस् प्रेयर) परंतु बीज मंत्र आहे 'हम-क्षम' शिवाय 'मी क्षमा करतो याचासुद्धा मंत्राचा आहे. तोच परिणाम आहे, जसा निर्विचारीतेच्या मंत्राचा किंवा महत् अहंकार विचार थांबविण्यासाठी प्रथम गणेश मंत्र म्हणा, नंतर परमेश्वराची प्रार्थना (लॉर्डस् प्रेयर) किंवा 'मी क्षमा करतो' किंवा निर्विचारीतेचा मंत्र ३ वेळा म्हणावा. नंतर सलग महत् अहंकार मंत्र म्हणावा (३ वेळा) आणि डावी बाजू ७ वेळा चढवावी. जेणेकरून संतुलन प्राप्त होईल . निर्विचारीता मिळेपर्यंत प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे. ही उजवी किंवा डाव्या बाजूची क्रिया संपलीच पाहिजे. तुम्ही मधोमध असलेच पाहिजे व मधोमध येण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे ध्यान करणे. रात्रीच्या वेळी सुमारे दहा मिनीटे व सकाळी ५ मिनीटे काही लोक ध्यान करीत नाहीत म्हणून त्यांची स्थिती सुधारत नाही. ज्या मार्गाने तुमची स्थिती तुम्ही वाढवू शकता तो म्हणजे ध्यान व आकलन. १८ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-18.txt याबाबत फक्त दोन समस्या असतात, डावी आज्ञा व उजवी आज्ञा. जर उजव्या बाजूची समस्या असेल तर फक्त जोडेपट्टी करा. जर डाव्या बाजूची समस्या असेल तर बंधने द्यावी किंवा नावाची चिट्ठी जाळावी. परंतु प्रत्यक्षपणे कोणीही साधकाला मदत करण्याचा प्रयत्न करू नका. जर अशी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी आली तर म्हणावे, 'मी तुला मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ' परंतु जर तुम्ही सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न केलात तर संकटात सापडाल कारण तेथे जोडले जाल. तुमचे चित्त क्रियाशील आहे आणि तेथे न गुंतून जाता कार्य करते. त्याला म्हणतात करुणा. त्यासाठी तुम्ही तुमचे चित्त निर्मल केले पाहिजे. ते असे असले पाहिजे कि, जे शांत साक्षीभावाने पाहणारे, पण न गुंतणारे, परंतु ते खंबीर असावे. असेच चित्त काम करते. इतरांबरोबर आपली वागणूक विचित्र हास्यास्पद असते. त्याला अहंकार जबाबदार आहे. ज्या लोकांना अहंकाराची समस्या असते त्यांना जोपर्यंत स्वत:ला त्रास होत नाही तोपर्यंत ते त्याचा शोध घेत नाहीत. अगदी अतिशय त्रास होईपर्यंत. कारण अहंकार वैयक्तिक पातळीवर त्रास देत नाही. मात्र समाजाला अधिक त्रासदायक ठरतो. पुष्कळशा निरर्थक गोष्टींपासून अहंकार घटित होत असतो. या गोष्टी म्हणजे पैसा , बुद्धी इ. यांच्या मूल्यांबाबत चुकीच्या कल्पना असतात. अहंकारी माणसे प्रत्येक गोष्ट बुद्धिच्या पातळीवर करत असतात. त्या गोष्टी त्रासदायक व कंटाळवाण्या असतात. हे सर्व पाश्चिमात्य देशात प्रचलीत आहे. अहंकार तुम्ही कसे सुखी व्हाल हेच पाहतो. जीवनाचे नियोजन काय आहे ते पाहतो. 'आम्ही हे करू शकतो, ते करू शकतो' असा विचार अहंकार करायला लागतो. दूसर्याचा मानसन्मान न ठेवता प्रहार करणाच्या, हानी करणाच्या गोष्टी १९ चौ रमस्या 1घी 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-19.txt बोलायला लावतो. अहंकाराचा शेवट मूढता व मूर्खता यामध्ये होतो कारण असे, की आम्हाला परमेश्वराचे विस्मरण होते. तसेच परिपूर्ण विश्वशक्तीशी असलेले आपले नातेसुद्धा विसरले जाते. हे आहे तुमच्याबद्दलचे पूर्ण अज्ञान. ते अज्ञान हा अहंकार देतो. सोप्या शब्दात असे म्हणता येईल, की हा अहंकार दुसरेतिसरे काही नसून फक्त स्वत:बद्दलच्या मूल्याबाबत पूर्णत: चुकीच्या कल्पना. त्यामुळे तुम्हाला वाटते 'मी सर्व काही आहे.' आपण कोण आहोत ? आपण एका बी मध्ये अंकूरदेखील आणू शकत नाही. भारतामध्ये कोणीही 'माझे बरोबर आहे' असा विचार करीत नाही. एकदा का असा विचार करायला सुरुवात केली की, 'मी फक्त बरोबर आहे आणि दुसरी व्यक्ती चुकीची आहे,' 'मी करतो ते योग्य आहे' किंवा 'तो चुकीचा आहे' मानवाबरोबर घडू शकते, ती आहे अहंकार. अत्यंत वाईट अशी भूतबाधा परवडली. कमीत कमी तुम्हाला त्याचे दुःख जाणवते. परंतु अहंकाराचे दु:ख तुम्हाला कधी जाणवत नाही. तुमच्यामध्ये अहंकार आहे असे तुम्हाला वाटत नाही आणि तुम्हाला वाटते की तुम्ही सर्वाधिक योग्य व्यक्ती .संपलेच म्हणून समजा. सर्वात निकृष्ट गोष्ट, जी आहात. एखाद्या गोष्टीवर जर तुम्ही प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केलात, त्याबाबत अतिक्रियाशील राहिलात, प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे , अतिकार्यक्षमपणे करीत राहिलात, तर तुमचा अहंकार वाढीस लागतो. जेंव्हा तुमचा अहंकार वाढतो तेंव्हा तुम्ही हिंसाचार करता. जेव्हा तुम्ही अधिक उत्पादन निर्मिती करता तेव्हा त्यासाठी तुम्हाला अधिक आक्रमक व्हावे लागते. त्याची विक्री कशी करावी ते तुम्ही जाणत नाही, मग तुम्ही आक्रमक उद्योजक किंवा आक्रमक देश अशाप्रकारे काहीतरी बनता मग तो देश दुसऱ्या देशावर सामुग्रीसह साम्राज्य करतो. तुम्ही भौतिकवादी बनता आणि अशा लोकांना नसते. ते अगदी शुष्क, कोरडे असतात. फक्त एकच गोष्ट ते जाणतात ती म्हणजे पैसा.....पैसा......पैसा. हदय उजवी बाजू (पिंगला) ही सामूहिक अतिंद्रीय चेतनेची असते म्हणजे भविष्यकाळाची असते. त्यामुळे येथे आपण भविष्याबाबत विचारात गुरफटलेलो असतो. अत्यंत नियोजन करतो. त्याबाबत आपण आक्रमक झालेलो असतो. सर्व महत्त्वाकांक्षी लोक भविष्यात जगणारे असतात. हिटलरने त्याच्या सर्व शक्त्या लोकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी वापरल्या. त्यांनी जे लोक उजव्या बाजूवर (महत्त्वाकांक्षी बनून) मृत्यू पावले त्यांचा वापर केला. म्हणजेच जे लोक, अतिंद्रीय चेतनेचे लोक इतरांवर बसले ते सुद्धा महत्त्वाकांक्षी झाले. पूर्णत: हृदय शून्य लोक. ते इतके हृदयशून्य होते की तुम्ही कल्पना करू शकत नाही. तुम्ही अशा काही २० 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-20.txt लोकांची जीवनकथा वाचून पहा. ते सुरुवातीस इतके हृदयशून्य नव्हते. वास्तविक नव्हतेच. ते चांगले मुक्त व कनवाळू होते. तर मग एकाएकी ते सैतानी विध्वंसक कसे बनले? आता गोष्ट अशी आहे ते जर आता जिवंत नाहीत तरी त्यांचे काहीसे कार्य चालूच आहे. असे लोक काही काळ गतिशील बनतात. ते कदाचित गतिशील दिसतात. परंतु नंतर त्यांना पुष्कळसा भार वाहून न्यावा लागतो आणि ते कोबीच्या गड्ड्यासारखे म्हणजे दुसऱ्या बाजूच्या (ईडा) वरील लोकांसारखे बनतात. जेंव्हा अतिद्रीय प्रवृत्तीची भूते आत येतात तेंव्हा तुम्ही अतिमहत्त्वाकांक्षी बनता. तुम्हाला कल्पना सुचायला सुरुवात होते... संघटीत कसे करावे?.....हे कसे करावे?.....जे काही वैज्ञानिक मरण पावले आणि त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल ते कधीच समाधानी नव्हे..... म्हणून (पृथ्वीवर) येतात आणि तुम्हाला नवीन नवीन कल्पना देतात....... हेच सर्व आहे, अतिंद्रीय शक्तीचा परिणाम. आता प्रबळ आसक्ती जी अगदी सूक्ष्म स्वरुपात असते, ती आहे अहंकार. अशा काही आवडीच्या गोष्टी असतात की सहजयोगावर पुस्तक लिहावे किंवा सहजयोगासाठी काही चित्रे रंगवावीत किंवा मी सहजयोगासाठी काही कमवावे. सहजयोगासाठी हे करावे आणि ते करावे हा सुद्धा अहंकारच आहे. सहजयोगाचा मी नेता व्हावे असे वाटले की मग मत्सर सुरू होतो. जर आईने सांगितले 'हे चांगले केले नाही' तर तुम्ही दुखावले जाता. जर आईने सांगितले 'े चांगले केले आहे' तर तुम्हाला आनंद वाटतो. त्याचा अर्थ तुम्ही अद्याप सूक्ष्म अहंकाराच्या पातळीवर आहात. कधी तुम्हाला वाटते जे काही तुम्ही बोलता त्यास मी मान्यता द्यावी. हे अगदी सूक्ष्म आहे. त्याला माताजी मान्यता देत नाहीत. ते सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला समजत नाही. यामागे परमेश्वरी मूळ कारण असलेच पाहिजे. नाहीतर मी का मान्यता देत नाही? आपण समजून घेतलेच पाहिजे. हे सर्व परमेश्वराचे कार्य आहे आणि आपण परमेश्वराच्या हातातील केवळ साधन आहोत. आता प्रतिअहंकार जो आपली कर्मठ बंधने, आपले भय, भीती, संकटे, चिंता साठवून ठेवतो. जे काही आपण वाचतो किंवा अनुभव घेतो त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे आपण पळून जातो. आपण काम करणे टाळतो किंवा घाबरलेलो असतो. ज्या गोष्टी आपण त्याच्याविषयीचे सत्य शोधलेले नसते, जाणलेले नसते त्यामुळे हे घडते. चुकीच्या कर्मठ बंधनातून, बालपणातून आणि धर्मातून सत्य न शोधल्यामुळे असे घडते. प्रतिअहंकार आपण पाहिलात, आपल्यावर जास्त काय परिणाम होतो ते पाहिलेत आणि तुम्हाला दुःखी कोण बनवितो ते पाहिले गुरुपासून, २१ 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-21.txt पाहिजे. आता समजा तुम्ही पुष्कळ प्रयत्न करीत आहात... 'हे ईश्वरा मला मदत कर. हे माझ्यासाठी कर.' तेंव्हा तुम्ही बाधित होता कारण अद्याप तुम्ही परमेश्वराशी जोडलेले नसता आणि एकदा का तुम्ही बाधित झालात त्याचा अर्थ इतर भुते तुमच्यामध्ये शिरतात. जेंव्हा अशी भुते तुमच्यामध्ये येतात तेंव्हा तुम्ही खरोखरचे पागल बनता. अशाप्रकारची गोष्ट जे लोक डाव्या बाजूला जातात त्यांना होते. जेव्हां तुम्ही सामूहिक अंतर जाणिवेत प्रवेश करता ( भूतकाळात) तेंव्हा यापैकी कोणते तरी एक भूत तुमचा ताबा घेते आणि एकदा का त्याने तुमचा ताबा घेतला की तुम्ही या रोगाचे बळी पडता. विशेषतः मी पाहिले आहे की अशा बाधित व्यक्ती अर्थातच वेड्या बनतात. त्यांना फेफरे हा रोग होतो. या सर्व बाधित व्यक्ती, तसेच फेफरे हा रोग इ.बरे होऊ शकतात. सर्व मानसिक समस्या, उदासिनता बरी होऊ शकते. हे अजिबात कठीण नाही परंतु प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. जर तुम्ही बाधित आहात तर तुम्ही ते काढण्यासाठी खरोखर मेहनत घेतली पाहिजे. तसे पाहिले तर ते तुमच्यापासून दूर होऊ शकते आणि तुम्ही तुमचा आत्मा बनू शकता. डाव्या बाजूच्या लोकांना काही प्रकारची बाधा असू शकते. याचा अर्थ ते कोणाकडून तरी बाधित आहेत. काही लोक उजव्या बाजूकडून बाधित होतात. फक्त डाव्या बाजूकडूनच बाधित होतात असे नव्हे. डाव्या बाजूकडील बाधा विशेष पद्धतीच्या असतात कारण त्या शरीरात वेदना देतात. उजव्या बाजूच्या लोकांना स्वत:ला वेदना होत नाहीत. अशी व्यक्ती दुसऱ्यांना वेदना देते. अशी बाधा जी अगुरूना अनुसरल्यामुळे होते. जसे एखाद्या व्यक्तीमध्ये मृतात्मे अस्तित्वात असतात. ज्याप्रमाणे एखाद्या मुलीमध्ये मृत पुरुषाचा आत्मा असल्यास त्या मुलीला सतत पुरुषाप्रमाणे पेहराव करावासा वाटतो किंवा एखादा दारूबाज मृतात्मा एखाद्या तरुण व्यक्तीमध्ये शिरला तर त्याला सदासर्वकाळ व्हिस्की पिण्याची इच्छा होते. असे सर्व प्रकार अर्धजागृत जाणिवेपासून होतात. नंतर अर्धजागृत जाणिवेच्या क्षेत्रातून हिटलर पद्धतीचे लोक, हकूमशहा जन्माला येतात. जेंब्हा मी काही लोकांना सांगते तेंव्हा ते म्हणतात, 'श्रीमाताजी, मला माहीत आहे, मी ते करतोय ते मला माहीत आहे.' तर असे तुम्ही का करता ? याचा अर्थ तुम्ही बाधित आहात. तुम्ही बाधित व्यक्ती आहात. जे तुम्ही जाणता हे चुकीचे आहे. तरी तुम्ही ते करता. म्हणजे तुम्ही बाधित व्यक्ती आहात. जर तुम्ही स्वत:ला जोडेपट्टी केलीत तर बरे होईल ! मल्टीपल सिरॉसिस..... डाव्या बाजूचा रोग ..... आतापर्यंत इंग्लंडमध्ये मी तीन रोगी पाहिले आहेत. ते सहजयोगामुळे बरे झाले आहेत. त्या सर्वांपैकी त्यांची पत्नी किंवा पती बाधित होते. जेंव्हा डावी नाभी जर डाव्या आज्ञेला किंवा डाव्या स्वाधिष्ठान चक्राशी एकत्रित आली तर तुम्हाला ब्लड कॅन्सर (रक्ताचा कर्करोग ) होऊ शकतो. प्रोटीन ५८ व ५२ ही शरीराच्या अज्ञात भागाकडून आपल्याकडे येतात.... सामूहिक सुप्त मन आपल्यामध्ये प्रवेश करते आणि कॅन्सरला (कर्करोगाला) सुरुवात होते. आता जे काही मृत आहे ते डाव्या बाजूवर आहे. त्याबद्दल वास्तविक आपण बोलत आहोत, हीच बाधा आहे. जी अशी गोष्ट आहे की आपल्यामध्ये प्रवेश करते आणि कर्करोगाला सुरुवात होते. 22 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-22.txt २० म] .तुम्ही सर्वजण माझ़ी मुलं आहात, माझ़ी मुले-मुली आहात. हे सर्व श्री गणेशासा२२खे आहे. आपण सगळे पैगंबरांसा२२खे आहोत. ৫आपल्यामध्ये पैगंबरांची शक्ती आहे का?" " श्री माताजी, काय आम्ही खरेच साक्षात्कारी लोक आहोत?' ८काय आम्ही मानवीय सभ्यतेचे सा२तत्त्व आहोत?" 66 काय आपण लोक परमेश्वराच्या कृपेचा निष्कर्ष आहोत?'" 66 हे प्रश्नं विचार आणि हया शक्त्या आपल्यामध्ये विकसित करा. प.पू.श्री माताजी, १४.१.१९८३ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा। लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in 2013_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-23.txt विशेषकरून आमची आशीद २प्मी आणि नवमी या दोन दिवशी असतो. सप्तमी आणि नवमी या दिवशी क अशा प्रकारचे आयोजन ज२रू२ करा ज्यात तुम्ही पूर्णपणे तुमच्याकडे लंक्षी द्यील. मूहिक ध्यान अशाच ठिकाणी कशा जिथे माझे पाय पडले आहेतं, जी गोष्टशुद्ध झालेली आहे. पं.पू.श्रीमातीजी, २७.५.१९७६ े पा. सा ा के ० र ० र