पैतन्य लहरी मराठी जुलै-ऑगस्ट २०१३ पर 2० या अंकाल परमात्मा जो आहे, निराकार आहे, साकार नाही ...४ या प२मात्मा जो आहे, निशकार आहे, सकार नाही. १ धुळे, ९/४/१९७२ GoraDA खरोखर म्हणजे राजकुवर राऊळ सारखी बाई या धुळ्यात आहे हे या धुळ्याचे मोठं भाग्य आहे. तिच्या प्रेमाच्या आकर्षणाने मी इथे आले. मी तिला म्हटले होते एकदा धुळ्यात अवश्य येईन आणि या ठिकाणी किती भक्तिभाव, किती प्रेम आहे! त्याची सुद्धा मला आतून जाणीव होत आहे. धर्माबद्दल आपल्या देशामध्ये आदिकालापासून सगळ्यांनी पुष्कळ लिहून ठेवलेले आहे आणि चर्चा पुष्कळ झाल्या. मंदिरातसुद्धा आता घंटी वरगैरे वाजतात. चर्चमध्ये सुद्धा लोक जातात. मशिदीत जातात. धर्माच्या नावावर आपल्या देशामध्ये पुष्कळ कार्य झालेले आहे. पण जे वास्तविक कार्य आहे ते कुठेही झालेले दिसत नाही. देवळात जातो आपण सगळे काही व्यवस्थित करतो, पूजा- पाठ सगळे व्यवस्थित करतो, घरी येतो, पण तरी सुद्धा असे काही वाटत नाही, की आपण काही मिळविलेले आहे. आतली जी शांतता आहे, आतले जे प्रेम आहे, आतला जो आनंद आहे तो काही मिळत नाही. कितीही केलं तरीसुद्धा असे वाटत नाही, की आपण देवाच्या जवळ गेलो आहोत किंवा आपल्याला ही माऊली मिळाली आहे, की जिच्या मांडीवर डोके ठेवून आपण आरामाने म्हणू शकतो की आम्हाला आता काही करायचे नाही. माझे असे म्हणणे नाही, की देवळात माणसाने जाऊ नये. जावं, अवश्य जावं. जेव्हा मधाची ओळख पटविण्यासाठी पहिल्यांदा फुलाच्या गोष्टी करू तर बरे होईल. म्हणून त्यांनी साकार देव काढले ते सांगण्यासाठीच. म्हणजे फुलांची नावे सांगितली. विष्णू पासून ते शिवापर्यंत तसेच मुसलमानांमध्ये अलीपासून वलीपर्यंत, ख्रिश्चन लोकांमध्ये ख्रिस्तापासून त्याच्या आईपर्यंत सगळ्यांची वंशावळ झाली. नावे सर्व कळली. फुलांची नावे कळूनसुद्धा मधाचा पत्ता लागला नाही. आपण साकार पूजा करतो. वर्णनामध्ये त्यांनी सांगितलेले आहे. आपण विष्णूचा विष्णूंचे नाव घेतो. बघा, त्याच्यासुद्धा श्लोक ऐकला असेल की, 'शांताकारम् भुजगशयनं, पद्मनाभं सुरेशम् । विश्वाधारम् गगन सदृशं, मेघवणं शुभांगं। लक्ष्मीकांतम् कमल नयनं...। आता इथपर्यंत त्यांचे वर्णन झाले. पण त्याची मख्खी कोठे आहे, 'योगिर्भिध्यानगम्यम्।' योगाने ज्याला ध्यानामध्ये जाणलेले आहे, त्याचे हे वर्णन आहे. मी जाणलेले नाही. प्रत्येक देवाबद्दलसुद्धा 'ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो ।' 'ध्यानात जाऊन जो ते बघतो त्या देवाचे मी वर्णन करतो' असा प्रत्येक ठिकाणी आपल्याला इशारा केलेला आहे, पण होते काय; आपण इशाच्यावर थांबतो. आता आपल्याला दुसर्या तऱ्हेचे जे धर्म सुरू झाले, म्हणजे ख्रिश्चन धर्म म्हणा किंवा मुसलमान धर्म म्हणा याच्यात त्यांनी सांगितले, बघा फुलांच्या गोष्टी केल्या म्हणजे मध मिळत नाही. आपण मधाच्या गोष्टी करू. त्यांनी सांगितले, की परमात्मा जो आहे, निराकार आहे, साकार नाही. निराकारात तुम्ही जा, पण कसे जाणार? त्या ही गोष्टीच झाल्या. अहो, मधाच्या गोष्टी करा, नाही तर फुलांच्या गोष्टी करा, गोष्टी म्हणजे गोष्टीच आहेत. गोष्टींनी परमात्म्याला जाणता येत नाही. त्यामुळे झाले काय की गाडीच्या मागे घोडे बांधलेले आहेत आणि गाडी हाकत बसलेलो आहोत आपण! म्हणायचं की, 'गाडी का नाही चालत धर्माची?' धर्म आपल्या आतमध्ये आहे, सगळ्यांनी हे सांगितलेले आहे. आपल्या आतमध्ये परमात्मा आहे हे सुद्धा सगळ्यांनी सांगितलेले आहे. पण होते काय की, कितीही सांगितले तरी ते सांगितलेले असल्यामुळे ते सांगण्यावरच राहून जाते. परवा एका शिखांच्या गुरूद्वारात मी गेले होते. तर तिथे त्यांनी गाणे सुरू केले, 'काहे रे बन खोजन जायी। सदा निवासी सदा आलेपा तोहि संग समायी। पुष्पमध्ये जा बांस बसत है, मुकुरमां हि जब छायी। तैसेहि हरि बसे निरंतर घटहि खोजो भाई ।।' आता गात बसलेत 'घटही खोजो, घटही खोजो।' 'अहो', म्हटले, 'गाता काय? तुम्हाला जर औषध घ्यायचे असले, तुम्हाला वैद्यांनी औषध सांगितले की, तुम्ही मी थोडी सुंठ-साखर घ्या, म्हणजे बरे वाटेल.' घरी येऊन तुम्ही सारखं म्हणाल, 'मी सुंठ- साखर घेतो, ६ सुंठ-साखर घेतो,' याने काय औषध होणार आहे का ? असे आपले चालले आहे, की जे करायचे आहे ते आपण करीत नाही, त्याबद्दल बोलतो. म्हणूनच माझे म्हणणे आहे, की आपल्याला ध्यानात जायला पाहिजे. पण कसे जायचे हे मात्र कोणी सांगत नाही. असे पुष्कळ बोलणारे आपल्याला भेटतील, आपण प्रेम केले पाहिजे. सर्व जगावर प्रेम केले पाहिजे. अहो, प्रेम करायला शिकवता येते का? तुम्ही काय इलेक्ट्रिसिटीचे प्रेम करू शकता का ? प्रेम हे निसर्गतः आतममध्ये आहे आणि ते एकदम आपल्याला असं जाणवतं. आपल्याला आपल्या मुलांबद्दल प्रेम वाटते, आपल्या वडिलांच्याबद्दल वाटते, पत्नीबद्दल वाटते, नवर्याबद्दल वाटतं. हे जे काही प्रेम आहे ते अकस्मात वाटते. शिकवून प्रेम येत नाही. की कुणाला व्हा धर्मसुद्धा शिकवून येत नाही. तो उपजतच आपल्यामध्ये आहे. त्याला जाणावं लागतं. आता कसं जाणायचं? कसं त्या परमात्म्याला जाणून घ्यायचे, हे सांगा, आत्मसाक्षात्कार कसा करून घ्यायचा? पुष्कळसे लोक असे सांगतात,'हो, होऊ शकतं. अस करा, तुम्ही डोक्यावर उभे रहा, पंचवीस मिनिटे उभे देवाचे नाव घ्या.' काही होणार नाही. खोटी गोष्ट आहे. 'तुम्ही भगवी वस्ते घालून नाचा, उड्या मारा. त्याने देव मिळेल.' इतकं सोपं असतं तर काय, दोन रुपयाला साडी रंगवायची आणि नाचत सुटायचं. झालं, देव मिळाला! पण तिसरं कोणी सांगेल, 'तसं होणार नाही. तुम्ही देवळात जा. नाव घेत बसा.' अहो, नावाचं असं आहे, तुलसीदाससारखा मनुष्य, त्याने एवढं मोठं रामायण लिहन ठेवलं, नाव घेत असे. स्वत: रघुवीर त्याच्याकडे तीनदा आले आणि त्याला त्यांनी टिळा लावला, चंदनाचा आणि ओळखलं नाही. तेव रोज राहून आपले 'हरे राम, हरे कृष्ण' वाले मुंबईला माझ्याकडे आले. मला म्हणाले, 'माताजी, तुम्ही नाव घेत नाही देवाचं!' म्हटलं, 'अरे, नाव घेण्यासारखं तुम्हाला तरी कळले आहे का ! कुणाचं नाव घेता? उद्या माझ्या दाराशी येऊन माताजी, माताजी म्हणाल, आणि परवा रस्त्यात भेटलात, तर ओळखाल का मला? तुम्हाला पटणार आहे का माझी ओळख? मी म्हणते आतमध्ये या, आधी त्याला जाणा. एकदासुद्धा नाव घ्यायला कठीण जाणार आहे.' मग म्हणायला लागले. 'आम्ही सगळ्यांनी संन्यास घेतला, एवढा आम्ही त्याग केला आहे, हे करून, ते करून आम्ही जंगलात गेलो, अमुक करतो, तमुक करतो, तुम्हाला आपलं घरात बसून, मुलं-बाळं, नातवंडं आहेत, तुम्ही कसं काय हे करता ? तुम्ही काही सोडले नाही?' मी म्हणाले, 'हे बघा, मी तुम्हाला एवढं सांगते, तुम्हाला चॅलेंज आहे, माझ्या घरातले कोणतेही सामान, कोणतीही वस्तू त्या परमात्म्याच्या पायाच्या धुळी बरोबर काय त्याच्या धुळीच्या कणाबरोबर जरी असली, तरी उचलून न्या तुम्ही. मी तयार आहे.' इकडेतिकडे बघतात. म्हटले, 'काहीही, तुम्हाला जे वाटलं ते उचलून न्या.' म्हणाले, 'त्याच्याबरोबरचे काही नाही.' मी म्हणाले. 'त्याच्या बरोबरचं जर काही नाही तर सोडले काय आणि धरले काय तुम्ही.' 'अहो, आम्ही धरले नाही, तर सोडणार तरी काय?' आता उद्या हा समुद्र समोर आहे. आम्ही जर मनानेच ठरवलं की हा आमच्या नावावर आहे, हा आम्ही धरलाय, म्हणजे हा मूर्खपणा आहे की नाही? आणि मग म्हणायचं आम्ही हा धरलाय आणि आता सोडलाय. आम्ही धरलंच नाही आणि धरते कोण? मेलं म्हणजे किल्ल्यासकट सगळे इथे राहून जाते, हे लक्षात नाही तुमच्या. धरतय कोण आणि सोडतंय कोण? अशा मूर्खपणाने जर देव मिळणार असला, तर देवसुद्धा मूर्खच आहे म्हणायचा! अहो, तो सर्वशक्तिमान, किती शक्ती आहे त्याची! अत्यंत प्रचंड शक्ती असलेला लोहचुंबक जर एखाद्या ठिकाणी असला आणि आपण त्या ठिकाणी जाऊन लहान शक्तीचा लोहचुंबक घेऊन त्याच्यासमोर नाचलो आणि उड्या मारल्या, नाही तर डोक्यावर उभे राहिलो, हे करून जर तो आपल्याकडे येत असला तर तुम्ही करा पण ते शक्य आहे का? ७ फक्त आपल्याकडे जी थोडीशी शक्ती आहे ना, ती नुसती अशी सोडली तर पटकन तो ओढून देतो. बसलाच आहे ओढायला तो तिथे. त्याची एवढी शक्ती एवढ्यासाठीच आहे की आपल्याला आपल्यात ओढून घ्यायचं. पण त्याची अशी इच्छा आहे, की तुमच्या इच्छेमध्ये हे झालं पाहिजे. तुमची इच्छा असायला पाहिजे. जोपर्यंत तुमची इच्छा नाही तोपर्यंत तो तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. म्हणजे माणसाला त्याने त्याच्या गौरवात उभे केले आहे. त्याची सबंध इज्जत आहे. त्याची सर्व स्वतंत्रता आहे. आज काल मुंबईला पुष्कळ हिप्नॉसिस वगैरे लोक करतात म्हणजे ते मोहिनी विद्या करतात. लोकांना वेड्यासारखं त्यांच्यावर मोहिनी मंत्र घालून नाचवणं, कुदणं, काय आणि लोकांना ते आवडतं. लोकांना स्वतंत्रपणा नको, स्वत:चा गौरव नको, स्वत: म्हणजे काय आहात तुम्ही! केवढं मोठं आहे त्याच्यात! आता प्रधान साहेबांनी सांगितलं, एका भिकारणीबद्दल. कधी कधी लोक भिकारी होतात, ते जाणूनबुजून होतात, हे आपल्याला माहिती नाही. समजा एखाद्या जन्मात एखादी मोठी महाराणी असली, पण तिला नवऱ्यापासून म्हणजे त्या राजापासून फार त्रास होत आहे, घरात त्रास, त्या राणीपणाचा बोजा तिला फार झाला असेल तर ती म्हणू शकते की, 'प्रभू, मला पुढील जन्मात एक भिकारीण कर, पण राणी करू नको.' पुढला जन्म तिचा भिकारणीचा होणार, पण आतून ती राणी आहे. तिची तब्येत राणीची रहाणार. तुम्ही पुष्कळसे श्रीमतं लोक पाहिले असतील इतके गरीब असतात, नुसते भिकारी. काही काही गरीब किती श्रीमंत असतात आतून ! ते प्रकार! हजारो रुपये लोक खात बसले आहेत तेव्हा परमात्म्याला जाणण्यासाठी त्याची स्वत:ची धडपड चालली आहे, तो स्वतः तुमच्यासाठी सर्व व्यवस्था करतो. तुम्हाला परत परत जन्माला घालून, तुमच्या आवडीनिवडी कमी करत करत शेवटी तो त्या ठिकाणी आणून पोहोचवतो, तिथे तुम्हाला धर्म दिसून येतो. म्हणजे समजा एखादा मनुष्य अगदी कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे, तो म्हणतोय, 'मी अगदी आणि सगळ्या मुसलमानांबद्दल आणि म्लेंच्छांबद्दल माझ्या मनात द्वेष आहे,' असा विचार करून एक ब्राह्मण आज उभा राहिला, तुम्हाला आश्चर्य वाटेल पुढच्या जन्मी जाऊन तो पक्का मुसलमान झाला पाहिजे. मी सांगते तुम्हाला कर्मनिष्ठपणा करणारे लोक मी इतके पाहिले, मी मधे तेहरानला गेले होते. तेहरानमध्ये ध्यानाला बसवले लोकांना, तिथे घंटा वाजवताहेत आणि आरती उतरवताहेत. इकडे आम्ही मुंबईला आपल्या ब्राह्मणांना बघतो, ते तिकडे नमाज पढतात. काय वेडेपणा! एका अतिशयतेला जातात आणि मग दुसर्या अतिशयतेला जाता. याला शिवायचे नाही, त्याला शिवायचे नाही. पुढच्या जन्मी तुम्ही हरिजनच जन्माला येणार. तुमचा अधिकार आहे का तुमच्या जन्मावर? पण तुम्ही जर कुणाचा द्वेष केला, तर उद्या जग तुमचा द्वेष करेल. जे मी बोलले तेच माझ्याकडे परत येणार आहे. जो मनुष्य या अतिशयतेपासून बाहेर निघालेला आहे त्याच्यासाठी माझा सहजयोग फारच सहज आहे. ते मुसलमान लोक तुम्हाला सांगितले या बीजातून अंकूर काढून दाखवा. कोणी काढून दाखवू शकतं का आपल्याला? एकसुद्धा बीजातून आपण अकूर काढू शकत नाही आणि काय दिमाख आहे माणसाला स्वत:चा! अहो, एक घर बांधले, काय आहे ? मेलेल्या विटा आणि मेलेलं घर! जिवंतपणा आहे का त्याच्यात? एक तरी जिवंत काम आपण करू शकतो का जगामध्ये? काय माणसाचा दिमाख चढलेला आहे स्वत:चा! स्वत:ला काय समजतोय तो! काहीही आपण करत नाही. सांगायचे म्हणजे जे काही आपण करीत आहोत, ते नुसतं आपल्याला वाटतंय की आपण करत आहोत. खरं म्हणजे, आपण काहीही करीत नाही. 'सगळे करतो आहे तो' हे तोपर्यंत आपल्याला जाणवणार नाही, तोपर्यंत हे आपले पक्के होणार नाही, जोपर्यंत त्याला शक्तीचा काही तरी अनुभव मिळत नाही. आंधळ्यासारखा माझ्या गोष्टीवर कृपा करून कोणी ८ विश्वास करू नये. अंधविश्वासाने परमात्मा मिळणे अशक्य आहे. जस समजा, या खोलीमध्ये आपण बाहेरून आलात, अंधार आहे, मी या खोलीची मालकीण आहे, मला या खोलीच्या खिडक्या, दारे सर्व व्यवस्था माहिती आहे. आपण आल्याबरोबर मी म्हणेन, 'बघा, इथे बसा, आपल्यासाठी इथे सतरंजी अंथरली आहे. इकडे दिवा आहे. तिकडे लाईटचे ते बटण आहे.' आपण तो हळूहळू बघाल. आपल्याला समजेल ते. आहे तर विश्वास ठेवायचा, नाही तर मुळीच ठेवायचा नाही. म्हणून कधी कधी आस्तिकापेक्षा तो नास्तिक बरा. म्हणजे आस्तिक वाईट असतात अशातली गोष्ट नाही. माझे म्हणणे असे एखाद्या गोष्टीला चिकटून बसलेला मनुष्य मुश्किलीने त्या समुद्रात उतरू शकतो. जर तुम्हाला समुद्रात उतरायचं आहे तर जे काही स्वत: वर आहे ते सोडायलाच पाहिजे. तुम्हाला या हॉलमध्ये यायला ज्या शिड्या आहेत त्या सर्व सोडाव्याच लागतील. म्हणजे शिड्या वाईट आहेत असा त्याचा अर्थ आहे का? शिड्या सोडल्याशिवाय तुम्ही आतमध्ये कसे येणार? मग दुसरा प्रश्न असा येतो की, 'माताजी, असं कसं शक्य आहे ? पूर्वी एक दोन लोकांना आत्मसाक्षात्कार व्हायचा, आता तुम्ही म्हणता हजारोंना होतो, ते कसे शक्य आहे?' का शक्य नाही? अहो, पूर्वी एखाद्या झाडाला जर एक- दोन फुलं येत होती. आता हजारो फुले येऊन बहरली आहेत, तर हजारो फळे होणार नाहीत का ? असे जीवनात तुम्ही पाहिले नाही का ? काही तरी जीवनामध्ये वाढ झालेली असेल आणि कलियुगातच हे होणार आहे. नाही तर सत्ययुग येणार कसे ? कलियुगाला बदलण्यासाठी सत्ययुगाला आणण्यासाठी असं काही तरी विशेष कार्य झालं पाहिजे. नाही झालं तर सत्ययुग येणे शक्यच नाही. आता अगदी अशा ठिकाणी जाऊन मनुष्य उभा आहे की जिथे एक तर तो चांगल्यात येऊ दे नाही तर वाईटात. जर यावेळी माणसांनी असा निश्चय केला नाही की सत्ययुगच आम्हाला आणायचं आहे, तर संपूर्ण संसाराचा संहार होणार आहे याबद्दल मला शंका नाही. पण आपल्या डोक्यामध्ये जे अजून पूर्वीचे बसले आहे, ते थोडे रिकामे करायला पाहिजे. कारण असं आहे पुष्कळांचे वाचन पुष्कळ झाले आहे. आम्ही पुष्कळ गुरू पाहिले, साधू आले होते, ते अमूक आले होते.' अहो, आले असतील! त्यांनी तुम्हाला काही दिले आहे का? तुम्हाला आनंद दिला आहे का? तुम्हाला शांती दिली आहे का ? तुम्हाला प्रेम काय आहे ते सांगितले आहे का? हातातून वाहिले पाहिजे प्रेम, खट्..खट्...खट्...खट्, हातातून असं जातं. आमचे हे शिष्य आहेत ना इकडे बसलेले. म्हणे, 'मी लोकांना बरे वगैरे करीत नाही कारण वेळ कमी असतो.' माझी इच्छा आहे डॉक्टर्स तयार करायचे. चिकित्सक दृष्टीचा मनुष्य फालतू काही तरी गोष्टींना चिकटून बसला, तर त्याला समुद्रात ढकलायचे तरी कसे ? ज्याला समुद्रात जायचे आहे त्याने तट सोडलाच पाहिजे. आतापर्यंत तटावर भटकलात ही गोष्ट खरी नाही तर कोणाला तरी आनंद दिसला असता. कोणावर तरी ते प्रेम वाहवले असते! कोठे तरी त्या शांतीचा उद्गम झाला असता. पण कोठेही मला दिसला नाही. मी एवढे सगळे साधु संन्यासी पाहिले, एकाही माणसामध्ये ही गोष्ट दिसली नाही जी गोष्ट आमच्या या लोकांमध्ये आहे आणि ती तुमच्यातही येईल. परवा मी वसईला गेले होते. शंभर माणसे पार झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि इतकी आश्चर्यजनक घटना आहे, इतकं अद्भूत आहे ते! लोकांना वाटेल की शक्य नाही ते, पण आहे. सांगायचे म्हणजे लहानपणापासून माझा जन्मच अशा स्थितीत झाला होता, की माझ्याजवळ ही चेतना होती आणि जन्मजन्मांतरी ही चेतना माझ्या जवळ राहिली. पण या जन्मामध्ये विशेष, माझ्या हे लक्षात आले, की या जन्मामध्ये जोपर्यंत मी हे देणार नाही लोकांना, जी कायम माळ्यावर नेहमी जन्माला येते ९ आणि नुसती भाषणे देऊन चालणार नाही. लोकांना नुसते सांगून की, 'तुम्ही प्रेम करा, चांगले लोक बना, याने काही काम बनणार नाही. असे सांगणारे पुष्कळ येऊन गेले. पुस्तकं लिहिणारे पुष्कळ होऊन गेले. पण काय झालं, हे करा, ते करा, ते करा! अशी व्यवस्था झाली पाहिजे की, जिथे ह्यांना, कुठेतरी, कसे तरी पाचव्या माळ्यावर आणून मी जर सोडले, लोकांना वाटेल, की काही तरी आम्हाला श्रीमाताजींनी शिकवलं आहे. आणि जे दिसतं आहे त्याच्या पलीकडेसुद्धा काहीतरी आहे. जेव्हा ते दिसू लागेल, याच्या पलीकडचे दिसू लागेल तेव्हाच त्यांना वाटेल की आहे काही तरी. नाही तर देवाच्या गोष्टी म्हणजे थोतांड आहे. आता आपल्यामध्ये बघा तरुण लोक किती कमी, फार कमी आहेत तरुण. आता तरुणांमध्ये, बडोद्याला मी गेले होते. तिथे युनिव्हर्सिटीत माझे भाषण ठेवले होते. आमच्या सगळ्या लोकांनी सांगितले, 'आम्ही जाऊ देणार नाही, श्रीमाताजी. ' का तर उठल्याबसल्या हेच धंदे, कोणाची प्रेतयात्रा काढ, नाही तर कोणाला मारून काढ! ही आपल्या मुलांची आज स्थिती का? याला कारण आपण. धर्माच्या नावावर एवढे पैसे खर्च केले, एवढी धावपळ केली, त्यांना माहिती आहे की हे महामूर्ख त्यांनी घेऊन ठेवलेत. मग आम्ही तरी कशाला ह्या महामूर्खपणात पडायचे? काही तरी आपण दुसरे कार्य करायचे म्हणून त्यांनी आपले दसरे मारापिटीचे कार्य केले आहे. सुरू अशा रीतीने आपल्या मुलांची ही स्थिती आहे, पण अमेरिकेतल्या तरुण मुलांची ही स्थिती नाही. अमेरिकेतील तरुण मुलांना समजली आहे ही गोष्ट, की त्यांच्याकडे हे आईनस्टाईन वर्गैरे झाले पण त्यांना धर्म मिळालेला नाही. म्हणून ते संतापतात कशाला? त्यांच्यात किती दोष आहेत त्यांना माहिती नाही. आणि धर्म धर्म ही काय चीज आहे, म्हणून त्यांनी सांगितलं, 'हे सगळे सोडा. आम्हाला घर नको, दार नको, आई नको, वडील नको. आम्ही आपले मिळून घोळक्याघोळक्याने राहू आणि हवे तसे जीवन जगू. आम्हाला पैसा नको, काही नको. पैशाने हे सगळे धंदे होतात.' सगळे सोडून निघाले. कोणाचा काय फायदा होणार आहे त्याने? समजा आम्हाला किती वाटले तरी आम्ही हे तरी धरू नाही तर ते तरी धरू, आम्ही जमिनीवर उभे आहोत. त्यावेळी काहीही सोडायचे नाही. कोठेही उभा आहे तरी मनुष्य मजेत उभा असतो. आपल्या आतमध्ये परमात्म्याने याची व्यवस्था एवढी सुंदर करून ठेवली आहे. आपली साक्षात आई आपल्या पोटात आहे. आपल्याला जन्म देण्यासाठीच ती सारखी तिथे बसलेली आहे की तुम्हाला पुनर्जन्म देऊन तुम्हाला त्या राज्यात घालणार आहे की जिथून तुम्ही दुसरे होणार. ती साक्षात तुमच्यात बसलेली आहे. पण लोकांना त्याची कल्पना नाही. आपली दष्टी कोठे आहे? पैसे किती मिळतात आजकाल! नाही तर मग इलेक्शनला उभे राहून पहावे, नाही तर काही तरी सेवा बिवा करावी लोकांची. याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही, पण तसेही जाऊ शकत नाही. प्रयत्न करूनसुद्धा आपण धर्मात उतरू शकत नाही. घोड्यावर बसल्यासारखे हे वाचवायचे, ते वाचवायचे, ही वेळ वाचवायची, ती वेळ वाचवायची. कशासाठी वेळ वाचवायची? अहो, समाधान कोठे आहे ते बघायचे आहे आम्हाला. खरोखर ही वृत्ती देवाने दिलेली आहे. घड्याळसुद्धा देवाने दिलेले आहे. सगळे जे काही बाहेर आहे ते आतमधूनच आलेले आहे. म्हणून घड्याळ एवढ्यासाठीच दिलेले आहे, की तुम्ही वेळ वाचवा. कशासाठी ? आपल्या आतमध्ये जाणा. जरासा वेळ रिकामा मिळाला तर मनुष्य घाबरा होतो. जातो मग सिनेमाला वगैरे कोठे तरी. जरासा वेळ एकटा बसून घालवू शकत नाही. पाच मिनिटे त्याला म्हटले एकटा बस तर स्वत:ला भेटू शकत नाही. पळतो तिथून. कारण आपण स्वत: घाणेरडे आहोत याची त्याला कल्पना आहे. खरे म्हणजे इतके आपण सुंदर आहोत स्वत:. मला जर सांगितले 'तीन महिने तुम्ही इथे खोलीत बसा,' आनंदाने मी बसेन! मला १० कधीही त्याचा त्रास होणार नाही. मी सुंदर आहे म्हणून नाही तर तुम्ही सुंदर आहात ते सुद्धा मी तिथे बसून बघू शकते. किती सौंदर्य आहे त्याची तुम्हाला कल्पनाच नाही. आता आजच्या सहजयोगाला तुम्ही असे समजायचे साध्या भाषेत, की म्हणजे असं आहे कुंडलिनी शास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यापैकी पुष्कळांचे म्हणणे आहे की, कुंडलिनी बिघडते, कुंडलिनी कोणी उठवली तर त्रास होतो, हे होते, ते होते. पुष्कळ तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी लोक सांगतात. खरे म्हणजे काय आहे, की जे लोक कुंडलिनी उठवतात ते त्याला असे समजतात की काही तरी यांत्रिक गोष्ट आहे. मेकॅनिकल गोष्ट आहे. आणि नाही तर त्याच्यावर सेक्ससारखा घाणेरडा आरोप करतात. ही तुमची आई आहे. आई सगळे तुमचे खून माफ करू शकते. तुम्ही तिला मारून टाकले तरी ती ब्र म्हणणार नाही. पण तुम्ही जर तिच्यावर सेक्सचा आरोप केला तर ती चिडणार नाही तुमच्यावर? जे असे बोलतात की कुंडलिनी चिडते, ते सगळे असल्या प्रकारचे आरोप तिच्यावर करतात म्हणून. खरोखर म्हणजे अशी कोणी व्यक्ती जर असली, ज्याच्यामध्ये परमात्म्याचे प्रेम वहात असले, सहजच त्याला असे, जसे आपण पाणी देतो ना झाडाला, जसं पाणी दिल्याबरोबर, एखाद्या फुलाचे कसं सहज फळ होते, तसे तुमचेसुद्धा फळ होऊ शकते. पण पाणी द्यावे लागते, जर तुम्ही त्याच्यावर रॉकेल ओतले तर! पाणी हे जीवन आहे. रॉकेल हे मेलेले आहे. मेलेल्या गोष्टींनी कुंडलिनी जागृत होऊ शकत नाही. कुंडलिनी म्हणजे साध्या शब्दात सांगायचे म्हणजे आता हा माईक आहे नं माझा, ज्याच्यावर मी बोलत आहे, त्याला आधी आम्ही तयार केले आहे व्यवस्थित. देवांनी असेच माणसाला तयार केलेले आहे. प्रत्येकाला, मग तो शिक्षित असो, अशिक्षित असो, हिंदुस्थानचा असो की इंग्लंडचा असो की अमेरिकेचा असो त्याचा काही फरक नाही हे जसे मशीन सुंदर तयार केले आहे तसे परमात्म्याने मनुष्याला तयार करून, त्याच्यामध्ये हे कनेक्शन आहे नां, ते लावून ठेवले आहे. आता हे कनेक्शन परत त्या परमात्म्याला लावायचे, एवढे कार्य म्हणजे सहजयोग. अगदी साधी गोष्ट समजावून सांगायची म्हणजे अशी. त्याचे पुष्कळ शास्त्र आहे, मी पुस्तक पण लिहीते आहे त्याच्यावर. जर कोणाला इच्छा असली तर त्याने ते वाचावे. मी पुस्तक लिहिण्यासाठी आजपर्यंत का...क.. करीत होते कारण की पुस्तक लिहिले की बसले हातात बायबल घेऊन. ह्या याच्यामध्ये हे लिहिलेले आहे, ह्या त्याच्यामध्ये हा मंत्र आहे. मंत्र पाठ करत बसले परत. म्हणून पुस्तक लिहायचीसुद्धा मला थोडीशी चोरी वाटते. भाषणाचेसुद्धा तसेच आहे. भाषणामध्ये सुद्धा असे पुष्कळ लोक असतात, की त्यातलं तेवढं धरून ठेवतात, की ज्याने आपला अटकाव बाहेर राहील. मी म्हणते माझे भाषणसुद्धा विसरा. सगळे काही विसरा . जसे सबंध तुम्ही पायरी चढून आलात, उतरलात आणि आतमध्ये आलात, तसे सगळे विसरायचे. मंत्र म्हणायचा नाही, गुरू म्हणायचा नाही, जप करायचा नाही. सगळे विचार आहेत. दोन विचारांमध्ये लहानशी जागा असते. तिथून मला तुमचं हे जे लक्ष माझ्याकडे आहे ते आतमध्ये घेऊन जायचे आहे. तेव्हा कोणताही विचार, मग तो गुरू असेना का, धर्म असेना का किंवा देवाचे नाव असेना का, तुमच्यासाठी तो विचारच आहे आणि तो एकदा झाल्यावर मग गुरूला अर्थ येतो मग रामाच्या मूर्तीला अर्थ येतो, प्रत्येक गोष्टीला अर्थ येतो. आता मी ज्याच्यावर बसलेली आहे त्या शालीतसुद्धा माझी व्हायब्रेशन्स आहेत. माझ्या पायाचे फोटो नुसते घेऊनसुद्धा या लोकांनी पुष्कळ रोगी बरे केले म्हणजे अर्थ येतो त्यात. पाणी जर माझ्या पायाचे धुऊन नेले, तर त्याने पुष्कळ रोगी बरे झाले आहेत. खरी गोष्ट आहे. मला त्याचे काही आश्चर्य वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल कारण ही परमात्म्याची शक्ती जी आहे त्याने सबंध सृष्टीची रचना केलेली आहे. तर या लहानशा गोष्टी करण्यामध्ये काय विशेष? समूळ रोग जाऊ शकतात, पण ११ पहिल्यांदा आपल्या आतली शक्ती प्रत्येकाने मिळवली पाहिजे आणि संपूर्ण स्वतंत्रतेत मिळाली पाहिजे. गुरू तरी आजकाल पायलीचे पत्नास म्हणतात तसे निघाले आहेत. उठल्यासुठल्या प्रत्येक गावोगावी गुरू निघालेले आहेत. अमेरिकेला याचे पेव फुटलेले आहे. तिथे जाऊन हे काय करतात, तर मोहिनी विद्येने तुमच्यावर अस्त्र घालून, आहे पद्धत, तुमच्या जवळ जेवढे पैसे असतील, जे असेल ते सगळे मागून घ्यायचे व त्याच्यानंतर व्यवस्थित चंगळ करायची. मी असे म्हणते, की देवाच्या ह्या कार्याला पैसा कशाला पाहिजे. एक सरळ गोष्ट आहे. अहो, हे फुकटात झालेच पाहिजे. जे काही महत्त्वपूर्ण आहे ते फुकटच होते. जो काही आपला श्वास चालतो, आपले जे हृदय चालते ते कसे चालते ? डॉक्टरांना विचारा. ते म्हणतील, हे सगळे स्वयंचलित आहे. मग हा 'स्वयं' कोण? तो स्वयं कोण आहे, सांगा जो हे चालवत आहे आणि किती सहज, तसच हे महत्त्वपूर्ण कार्य झालेच पाहिजे. हे जर कठीण असते तर होणारच नाही. आपल्याला इकडून जेवता येतं पण इकडून जाऊन, तिकडून जाऊन हातपाय तोडून तेव्हा आपण जेवलो, नाही तर इतके सहज कसे जेवलो! मी साधे एक आईचे उदाहरण देते. 'मी स्वयंपाक केलाय तुमच्यासाठी. तुम्हाला भूक आहे का? ताट वाढलंय जेवायला. भूक असली तर सरळ बसा, नाही तर म्हणा, 'आई, तू कुठे गेली होतीस ? कोठून आणलेस हे तू ? कसे केलेस हे तू ?" उद्या मी तुम्हाला जर एक रेडिओ बक्षीस दिला, तर तुम्ही काय लगेच उचलून बघाल छानपैकी, 'आईने आम्हाला रेडिओ दिला. ऐकावं त्याचं' का तुम्ही त्याचे सगळे इंजिनियरिंग आधी बघाल ? 'आधी इंजिनियरिंग सांगा नाही तर आम्ही रेडिओ ऐकत नाही.' असे म्हणाल. संसाराच्या गोष्टींबद्दल माणसाला हा उहापोह नाही. समजा, मी उद्या जर म्हटले की, 'इथे हिरा पडलेला आहे.' दिल्लीला जर हे अनाऊन्स झाले तर दिल्लीहन इथे लोक प्लेनने येतील तो बघायला! हिरा असाच तयार आहे. तो घेऊन तर बघा, मग बघुया! धर्माच्या बाबतीत माणूस उलटा चालतो. इतकं तुम्ही पैशाशिवाय कसं देता ? इतके सोपे कसे ? उलटेच आहे. हे आताच सांगितलंय, सगळं जे महत्त्वपूर्ण असते, ते सोपेच असले पाहिजे. पुष्कळांनी मला अमेरिकेत सांगितले , 'श्रीमाताजी, प्रत्येक मनुष्य आमच्याकडून दीडशे ते तीनशे डॉलर्स घेतो आणि तुम्ही इथे एक पैसा घेत नाही हे कसे काय ?' म्हटले, 'हे बघा, तुम्ही सांगा मला त्याची किंमत किती लावायची. मला समजत नाही याची किंमत काय. तुम्ही लावा किंमत.' म्हटले हे सगळे उपटसुंभ लोक आहेत. तुम्हाला मूर्खात काढायला इकडे आले आहेत. तुम्ही मूर्खासारखे त्यांना पैसे देता. तुम्हाला मिळाले काय? व्यवस्थित तुमच्या अंगावर भगवी वस्त्रे घातली, आपल्या माळा घातल्या आणि सगळीकडे आपली जाहिरात करत फिरत आहेत ! आणि आनंद तुम्हाला होतो, की आम्ही देवासाठी केवढे करतो. मग दहा वर्षानी जेव्हा वेडे व्हाल तेव्हा माझ्याकडे पळत याल! सांगायचे म्हणजे सगळे हे प्रकार परलोक विद्येने होतात. जितके बाबाजी लोक आहेत सगळे परलोक विद्या करतात. भुतांचे तुमच्यावर स्थान बनवून त्या भूतांकडून हे सर्व कार्ये करून घेतात. तुमचा पैसा काढून घेतील, तुमच्या मुलाबाळांची नासधूस करून, तुम्हाला रस्त्यावर उभे करायचे आणि यांनी आपले गाठोडे बांधून अमेरिकेला निघायचे! चंबुगबाळे बांधून तिथे बसलेले असे अनेक गुन्हेगार आज तिथे आहेत. यांना धूळ फेकण्याची कला अवगत असल्यामुळे लोकांच्या हे लक्षात येत नाही आणि आपल्याला आश्चर्य वाटेल या कलियुगात पाच राक्षस आणि पाच राक्षसिणी जन्माला आलेल्या आहेत. रावणापासून नरकासुरापासून सगळे जन्माला आलेले आहेत आणि आपले आपले रंग दाखवत आहेत. स्वत:ला रावण म्हणविणार नाहीत. स्वत:ला देव, भगवान असे तसे म्हणवून घेतील! तुम्हाला ओळखायला यायचे नाहीत ते! मायावीपणा आहे त्यांच्यामध्ये! आपण ऐकले असेल की, मायावी राक्षस! ते सगळेच्या सगळे जन्माला आले आहेत आणि आपण मूर्खासारखे 'बाबाजी आ गये, बाबाजी आ गये और हमको दो सौ १२ रुपया निकाल के दे दिया।' अरे दो सौ रुपया तुमको काहे को दिया ? तुम तो करोडपति हो! किसी गरीब को दो नां! सगळ्या श्रीमंतांच्या गळ्यात हिऱ्याच्या माळा दिलेल्या आहेत! त्यांच्याकडे काय हिरे कमी आहेत? द्यायचे तर गरीब लोकांना वाटा! एक आमचे नातलग आले आणि मला म्हणाले, 'बाबाजींनी आम्हाला अंगठी दिली हिर्याची. श्रीमंत आहेत फार.' म्हटले 'तुमच्याकडे किती आहेत?' 'होगी दस- बारा!' म्हटले, 'तो ये और तेरहवी काहे को ले ली ? अगर दस बारह से तुमको आनंद नहीं आया तो ये तेरहवी से आयेगा क्या? इसको काहे को ले ली भाई?' कहे, 'नहीं, वो मेरे भक्ति को देख के दिया।' म्हटले, 'अरे, भक्ति क्या बाज़ार में मिलती है क्या? पागल हो कि रूपये देकर बाज़ार में खरीदो!' म्हणाले, 'ऐसे कोई ज़्यादा रूपये नहीं दिये। मैंने कुछ पाँच-छः हजार रूपये दिये। मन में आया कुछ तो रूपया देना चाहिये, अंगुठी दे दी।' त्या अंगठीत भूत बसविलेले आहे त्यांनी. हे अंगठी फिरवताहेत आणि सगळे सांगते आहे तिकडे! ही परलोक विद्या आहे आणि सगळेच्या सगळे राक्षस कलियुगात ते भूत आलेले आहेत आणि इकडे मी एकटी मात्र प्रेमाच्या गोष्टी सांगत आहे लोकांना ! आणि म्हणते की, सहजयोगात या! आपल्यामध्ये आपला दीप लावा म्हणजे अंधार सगळा जाणार. त्या अंधाराला मारून ओरडून तो नाही जाणार. हा अंधार आपल्या दीपाने जाणार आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये एवढा प्रखर दिवा आहे जो या सगळ्यांना जाळून पोळून संपवून टाकेल आणि तो प्रेमाचा आहे. प्रेमाचे हे वैशिष्ट्य आहे की, समुद्राची जशी ढाल असते ती कितीही समुद्र मोठा आला तरी ती मोठी होत जाते, तसे प्रेम मोठे होते. प्रेमाचा आरसा सर्वत्र अशा बाबतीत वर आहे. त्या आरशात सगळे जग आत आहे आणि तो मंत्र तुमच्यातून वहायला सुरुवात झाली की सगळे पळतात की नाही आपले चंबूगबाळे आवरून. या संसारातूनच गेले पाहिजेत. मी तर इतके म्हणेन की जर श्रीकृष्ण आले तर कंसाला मारणार. तो मेला तरी परत परत जन्म घेणार. राम आला तर रावणाचे फक्त शरीरच मारतो आणि तो परत परत जन्म घेतो. त्या पेक्षा त्याचे परिवर्तन पूढल्या जन्मी तरी साधेल अशी परिस्थिती आलेली आहे. आपल्याला धुळ्याला बघू कसे काय जमते ते! इथली पुण्याई मी बरीच ऐकली आहे. व्यासांचे पण जवळपासच स्थान आहे. इथल्या वातावरणामध्ये असे तरंग आहेत. मला आतून जाणवत आहेत. कार्य होऊ शकते, पण मी एक दोन गोष्टींबद्दल म्हणते की, हट्ट करू नका. मुलगा जर हट्ट करून बसला की आईला फार त्रास होतो. समजावून सांगितले, किती समजावले तरी हट्ट करतात मुले. आता फार झाला हट्ट. आम्ही आलो आहोत तेव्हा घेऊन टाका. दारात गंगा आली तेव्हा घेतले नाही तर मग केव्हा घेणार? पण तुमची घागर भरलेली असेल तर गंगा तरी काय करणार? सूर्य तुमच्या दाराशी जरी आला, आपले दार उघडले नाही तर तो सूर्याचा दोष नाही. तरी तुम्ही परवा एक जण आले, म्हणाले, 'माताजी, बघा, माझी मुलगी इतकी आजारी आहे, तिला बरे केले तर मी तुम्हाला मानेन.' म्हटले, 'मी कोणाला बरे करीत नाही.' मी, तुम्हाला कल्पना नाही, काहीच करीत नाही! मी नुसती मधे उभी आहे. जसा हा माईक मध्ये उभा आहे आणि बोलत आहे. हा पण उद्या म्हणेल, 'मी बोलतोय.' मी काही म्हणत नाही. मी मधे उभी आहे. त्याला बरे करायचे असेल तर तो करेल नाही तर नाही करणार! माझे काही नाही. माझे काही उपकारही नाहीत आणि माझे काही देणे घेणे नाही. मी नुसती मधे उभी आहे. शेवटी एक गोष्ट सांगते मजेदार, राधा आणि कृष्णाची. एकदा राधेने मुरलीची (बासरी) तक्रार केली की, 'तू सारखी कृष्णाच्या तोंडाला का असतेस? तुझ्यात काय विशेष आहे ?' तर मुरली म्हणाली, 'अग १३ 3৯ MAIAMAAAVR वेडे, माझे वैशिष्ट्य एकच आहे की माझे कोणतेच वैशिष्ट्य नाही. मी पोकळ झालेली आहे. माझ्यात काहीही राहिलेले नाही. तो वाजवतो आणि मी नुसती ऐकते आणि बघते. मी तर अशी झालेली आहे. किती पोकळ झालेली आहे. मधे जर मी कुठे उभी राहिले तर त्याचा स्वर बिघडणार नाही. का ? ' तसेच तुम्हाला पोकळ व्हायचे आहे. पोकळ झाल्यावर आपल्याला कळेल की, आपल्यामध्ये किती मोठे सुंदर संगीत आहे आणि फार सौंदर्य असून सुद्धा आनंदमय आहे. सारखे ओझरत पाझरत आपल्याला येत असते. त्या प्रवाहाला नुसते सुरू करून देणे म्हणजे सहजयोग आहे. मला आशा आहे, आपण सगळेजण, विशेषत: मुलांना यात फार लवकर फायदा होतो. मुलांना १४ क० इतक्या लवकर फायदा होतो कारण ते, साधे, भोळे जीव असतात. चटकन पार होतात. आणि पार झाल्यावर उभे राहून मला सांगतात, 'माताजी, इधर से जा रहा है, इधर से नहीं जा रहा है। ती बरोबर सांगतात. चटकन सांगायला सुरुवात करतात. आता मुंबईला दहा वर्षाचा एक मुसलमान मुलगा आहे, शब्बीर. तो पार झाला म्हणजे अगदी मस्त आहे. बरोबर सांगतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की एखाद्याला बाधा असतील तर बरोबर हाताला चटके बसतात आणि जेवढे बाबाजींचे शिष्य लोक आहेत, त्यांच्या हाताला चटके बसतात. पुष्कळांच्या हाताला ब्लिस्टर्स येतात. चांगले फोड, मोठे मोठे फोड येतात. या सर्व शक्त्या आहेत आणि काम करीत आहेत. अजकाल महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. तेव्हा लोकांचं असं अगदी डोक्यात चाललेले आहे की मला माहिती आहे की काही लोकांच्या डोक्यात काय चालले आहे! आता दुष्काळामध्ये, या गरिबी स्थितीमध्ये हे कसं काय पिकणार? एका अर्थाने मी म्हणते दुष्काळ आला थोडं बरं झालं. एकदा अशीच गोष्ट करत असतांना मी महाराष्ट्रातल्या एका फार मोठ्या नेत्यांना म्हटलं होतं कि तुम्ही इथे विहिरी का खणत नाही? विहिरी खणल्या पाहिजेत. पंजाबात किती आहे विहिरी.' तर म्हणाले, 'अहो, त्याला पैसा फार लागेल. असं होईल, तसं होईल. आता बघा. एखादा मनुष्य फार श्रीमंत असतो, तो खरं म्हणजे मनाने जराही श्रीमंत नसतो. मुंबईला माझा जो ड्रायव्हर आहे, मी म्हणते, हा राजा मनुष्य आहे आणि होता तो, पूर्व जन्मी तो राजा होता. त्याने पाहिले की, 'माझ्या रथाचा जो सारथी आहे तो माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे.' त्याने देवाजवळ असे म्हटले की, 'देवा, मला पुढच्या जन्मी सारथी कर. मला कंटाळा आला आहे राजेपणाचा.' तेव्हा तो या जन्मी ड्रायव्हर झाला पण तब्येतीने राजा आहे. तेव्हा श्रीमंती ही काय आहे ! अशा या गरिबीचे नाना प्रकार आहेत. खरोखर एखादा मनुष्य नुसता शांत होऊन जातो. त्याला कशाचीच गरज वाटत नाही. सगळे त्याच्या पायाच्या ठोकरीवर असते. काय चांदी, काय सोने, काय हिरे, सगळे दगड आहेत. अहो, ही काय श्रीमंती आहे का ? श्रीमंती मनाची असते. आता माझेच उदाहरण सांगायचे म्हणजे मला दोन दिवस जेवायला नसले तरी चालते. झोपायला पलंग नसला तरी चालतो व जमिनीवरही झोपते. आम्ही संत आहोत . आम्हाला काय ? अहो, संताला आराम काय ? आराम त्याच्या पायाशी असतो. जो आरामाच्या वर गेला तो खरा संत. तेव्हा गरिबी आणि श्रीमंती आपल्या डोक्याचे विचार आहेत. आपल्या प्रकृतीमध्ये पाहिले पाहिजे. एखादी बाई गरीब असेल, पण तिच्यात केवढी दानत असते! तेव्हा सांगायचे म्हणजे असे, की गरिबी आणि श्रीमंती सोडून त्या परमात्म्याला भेटून घ्या. जो तुम्हाला आतूनच सबंध श्रीमंती देतो. सबंध सृष्टीत जे झालेले आहे, ज्याला आपण पैसा, अडका, वैभव म्हणतो ते त्याच्या पायाच्या बोटाबरोबर किंवा करंगळी बरोबरसुद्धा नाही. सत्ययुग यायला पाहिजे. सत्ययुग आल्याबरोबर काय कमाल होणार आहे! मी त्या युगाची वाट पहात आहे, पण अगोदर ते हिंदुस्थानात येईल, की अमेरिकेत येईल असा मला प्रश्न पडतो. हिंदुस्थानातली माणसे अजून चक्रातून निघायची आहेत. असे मला पुष्कळ वाटते. विशेषत: आमच्या मुंबईची! बघुया! धुळ्याला कसे काय जमते. जमण्यावर आहे. त्याची कृपा आणि त्याचे प्रेम सतत वहात आहे. आम्ही मुंबईला ध्यानाचे प्रयोग करतो. आपली जर इच्छा असली तर ध्यानात जायचे. १५ ध्यानामध्ये फक्त आपल्याला डोळे मिटून बसायचे आहे. काहीही करायचे नाही. करायला निघाले म्हणजे देवापासून आपण दूर जाणार हे समजून घ्यायचं. काहीही करायचं नाही, आरामात बसायचं , जेवायला बसतो तसं. सहज वृत्तीने बसायचे. जी शक्ती माझ्यातून धावते आहे ती तुमच्यातूनही धावत जाईल. तुम्ही आजारी असाल तर बरे व्हाल. जर तुम्हाला काही त्रास असेल तर ती आम्हाला कळवेल आणि जर तुमची सगळी प्रकृती ठीक असली आणि जर तुम्ही कुठल्या गोष्टीला चिकटून बसलेले नसाल तर सहजच तुम्ही निर्विचार व्हाल, विचारांच्या पलीकडे जाल. खरोखर म्हणजे विचारांच्या पलीकडे जाणे अत्यंत कठीण गोष्ट आहे असे लोक म्हणतात. मला तसे वाटत नाही. आता इथून बडोद्याला जाणारा मनुष्य जर अमेरिकेला जाऊन जपानला जाऊन बडोद्याला पोहोचणार असेल तर असेच होणार, पण आम्हाला रस्ता माहीत असल्यामुळे ते अत्यंत सोपे आहे. अगदी सहज मार्गाने सहज होण्यासारखे आहे ते! अत्यंत सहज आहे. अत्यंत सहज भावाने तुम्ही बसा. हळूच तुम्हाला असे वाटेल की आपण निर्विचार झालो. निर्विचार झाल्याबरोबर आपण हात वर करायचा. ही मंडळी जाऊन बघतील की झाले आहेत की नाही. निर्विचार झाला असलात तर आपल्या कानात सांगतील. आज इथे पुष्कळशी मंडळी अशी आली आहेत की ज्यांना रोग आहेत, आजार आहेत. त्यांच्यापैकी जर लहान मुले असतील, फारच लहान मुले असतील तर त्यांना बाहेर घेऊन जा. कारण ती रडतील वगैरे आणि दुसर्यांना त्रास होईल. पंधरा-वीस मिनिटात काय तो निकाल लागेल. तेव्हा काहीही काळजी करण्यासारखे नाही. कोणालाही आजपर्यंत एवढासुद्धा त्रास झाला नाही. तेव्हा तो आपल्यालाही होणार नाही. हजारो माणसांच्या कुंडलिनी जागृत झाल्या आणि तिथेही हजारो माणसे पार झालेली आहेत. त्यांना आत्मदर्शन झालेले आहे. कोणालाही काहीही होणार नाही. पहिली अनुभूती ही की तुम्ही निर्विचार व्हाल. सायन्समध्ये ज्याची नुसती चर्चा केलेली आहे, त्याच्याबद्दल सगळे एकदम तुम्ही जाणू शकता तसे ते अगदी सोपे आहे. परवा मी सांगितले होते की या खोलीमध्ये अंधार असला आणि तुम्ही बाहेरून आलात, एकदम आत आलात आणि तुमचे डोळे बंद असले तर तुम्हाला सुचायचे नाही. हात धरून जर तुम्हाला कोणी सांगितलं की इथे दिवस आहे, बसा वगैरे, तर काही तरी चाचपडत राहिल्यावर नंतर दिसायला लागेल. एकदम सगळी खोली लक्षात येणार नाही. पण समजा एखादा कर्ता असा असला, असला, तर तो जसा खोलीमध्ये लाईट घालू शकतो, आणि सगळेच्या सगळे पाह शकतो. तेव्हा जर एखादा कर्ता असला की, तर तुमचे डोळे खाडकन उघडू शकतो, तुम्हाला सगळेच्या सगळे आतमध्ये दिसू शकतो. अमेरिकेमध्ये लोकांचे डोळे फार उघडले आहेत आपल्या मानाने. कारण त्यांचे सगळे झाले आता, पैसे झाले, घर झाले, द्वार झाले. सब्जेक्ट किती मजेदार आहे बघा, तुमचच वाहन आहे आणि तुमचा गुरूसुद्धा आहे. तुम्ही हे मनसुद्धा म्हणाल, की मला आता एक घड्याळ विकत घ्यायचे आहे, तर वेड्यासारखे धावाल, घेण्यासाठी. घड्याळ घेतल्याबरोबर वाटले काही मजा नाही येत याच्यात. मग पुढे दुसरीकडे धावायचे मग तिसरीकडे. सारखी धावपळ आपली चालली असते. आपले चित्त जिथे जाते तिथे तो (मन) आपल्याबरोबर जातो. पण प्रत्येक वेळेला आनंद त्याला येत नाही. प्रत्येक वेळेला तो सांगतो की मला आनंद आलेला नाही. मला आनंद मिळालेला नाही. मला विराम मिळालेला नाही. तेव्हा काही तरी दूसरे शोधायचे आहे अशी कल्पना तुम्हाला असते. तर हे मन तुम्हाला सारखे इकडून तिकडे पळवत असते. पण त्याला जर तुम्ही दाबून ठेवलेले असले, त्याच्यावर अत्याचार केलेले असले तर हे मन शेवटी मदत करणार नाही. तर या मनाचे तऱ्हेतऱ्हेचे प्रकार आहेत. ध्यानाला सुद्धा जेव्हा तुम्ही बसलेले असता, बघते, हे मन मधेच उभे राहन तुम्हाला काही तरी सांगते. घोडा बघतो की मालक कोठपर्यंत जाऊ शकतात. घड्याळ तेव्हा मी 16 जर मालकाने घोड्याला सांगितलं की, 'हे बघ,' याच्याबरोबर मैत्री करून की, 'हे बघ मला अमक्या ठिकाणी जायचे आहे,' की लगेच ते तयार होते की चला, तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे नेतो. पण घोड्याबरोबर मैत्री केली पाहिजे. हे मनोवैज्ञानिकांचेही म्हणणे आहे की घोड्याबरोबर मैत्री केली पाहिजे, पण कुठे जायचे आहे, कसे जायचे आहे हे कुणालाही माहिती नाही. कोणालाही हे माहिती नाही की तिथे जायचे कसे! ते आपोआप होतं, आपोआपच ते जमतं, हे कोणालाही माहिती नाही. दुसरी सायन्सची बाजू बघायची म्हणजे शरीरदृष्ट्या बघा, सायन्समध्ये डॉक्टर लोक विचारतील की काय असते कुंडलिनी वगैरे? तर जेव्हा मूल आईच्या पोटात दोन महिन्याचे असते तेव्हा ही जीव शक्ती त्या जीवात्म्यामध्ये येते. डोक्याच्या टाळूमधून आत शिरून, मेंदूच्या मधोमधे खाली या पृष्ठवंश रज्जू आहे त्याच्यातून जाऊन, स्पायनल कॉर्ड ज्याला म्हणतात आणि खाली हा त्रिकोणाचा जो हिस्सा आहे, त्याच्यात जाऊन बसते. ही कुंडलिनी शक्ती मधे मधे थांबत जाते. त्याच्यामुळे चक्र बनतात. ही चक्रे आतमध्ये सेंटर्स म्हणविली जातात आणि बाहेर डॉक्टर्स त्यांना प्लेक्सेस म्हणजे पॅरासिंपथेटिक नव्व्हस सिस्टीम म्हणतात. या पॅरासिंपथेटिक नव्व्हस सिस्टीमला हे लोक स्वयंचालित, ऑटोनॉमस नव्व्हस सिस्टीम म्हणतात. त्यांना विचारले की, 'हा स्वयं, ऑटो, कोण? जो हृदयाला चालवतो तो कोण?' तर डॉक्टर त्याचे उत्तर देत नाहीत. अमेरिकेत पुष्कळ न्यूरॉलॉजिस्टना मी भेटले. ते म्हणाले की, कॅन्सरला आम्ही एवढ्यासाठी ठीक करू शकत नाही की या पॅरासिंपथेटिक नव्व्हस सिस्टीमला चालना कशी द्यायची हे आम्हाला कसे जमणार? ते आपोआपच चालू होते. मी जेव्हा त्याला प्रॅक्टिकल करून दाखवले तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटले की तुम्ही पॅरासिंपथॅटिक नव्ह्हस सिस्टीम कशी चालवता ! ते बाहेर दिसून येते एक दोन प्रकारे. त्यापैकी एक म्हणजे डोळे डायलेट होतात, मोठे होतात. तुमचे जे रियलाईज्ड लोक आहेत, त्यांचे डोळे बघा. त्यांची बुबुळे मोठी व काळी झालेली आहेत. विचार हा करा की याच्यापेक्षा मोठा चमत्कार जगात काय असू कतो. हात हलवून दोनशे तीनशे रुपये काढणे हा काही चमत्कार नाही. अंगठ्या वगैरे काढणे हा काही चमत्कार नाही. हे भूत प्रकार आहेत. एकदा खूप मजेदार गोष्ट झाली. ब्राह्मणांकडे एकदा वरात आली. आपल्याला माहिती आहे. यूपीमध्ये केवढे मोठे प्रस्थ असते. आल्याबरोबर, त्यात काही खोडकर होते. त्यांनी हिवाळ्यात सांगितले की, आम्हाला दहीवडेच पाहिजे. आता दहीवडे करणे काही सोपी गोष्ट नाही. तिकडे ब्राह्मण लोकात हिवाळ्यात दहीवडे करीत नाहीत. तर तिथे एक बाबाजी होते. त्यांना निरोप गेला की ते अशा वस्तू आणून देत असत. त्यांना निरोप गेला की तुम्हाला जेवढे रुपये हवे आहेत तेवढे घ्या पण आम्हाला दहीवडे आणून द्या. तर बाबाजी गडबडले. ते म्हणाले की, 'मी दहीवडे आणून देतो पण तिथे थांबणार नाही. पैसे घेऊन निघून जाणार. 'बरं' म्हणाले. 'तुम्ही घ्या आणि चालते व्हा.' त्यांनी त्याला पैसे मोजून दिले आणि बाबाजींनी दहीवडे लावून दिले. खोली बंद केली. आतमध्ये दहीवडे होते. सगळ्यांनी चांगले खाल्ले आणि बाबाजी पसार ! सगळे पैसे घेऊन पसार! दुसऱ्या दिवशी सकाळी मांगवाड्यातले काही मांग आले. आपल्याकडे वाजंत्री वगैरे वाजवतात तसे तिकडेही असतात. आले की मग उष्टे वर्गैरे काढतात. तर ते म्हणाले, 'आमच्या तिथले हे कुल्हड कोण घेऊन आले ? आमच्या तिकडे दहीवडे केले होते. ते कोणी आणून ठेवले इकडे? सगळे ब्राह्मण चिडले. सगळी वरात रुसली. आता जी भूते असतात ती असली कार्ये करतात. ती आपली सूक्ष्मता कुठल्याही जड पदार्थावर घालून त्याला सूक्ष्म करतात. आणि आणून ठेवतात. तुम्हाला ते दिसत नाही. ही भूतविद्या झाली. पण ते काय स्वस्थ बसणार आहेत ? उद्या त्यालाही खातील. अहो, आपणच आहोत. बघा समजा कोणाला दोन पैसे दिले तरी आपण लक्षात ठेवतो, 'बघा! अहो त्या दिवशी मी त्याला दोन पैसे दिले होते आणि त्याला माझा जरासुद्धा उपकार नाही.' तर काय भुते 17 विसरणार आहेत का त्यांचे उपकार. त्यांनी तुमच्यावर जराही उपकार केले असेतील, समजा एखाद्या माणसाला बरे केले. इंग्लंडला असं आहे, एक डॉलेन नावाचा मनुष्य होता, तो मेला आणि त्याचे भूत एका सैनिकावर जाऊन बसले आणि त्याला सांगितले की त्याचा मुलगा अमक्या ठिकाणी राहतो आणि त्याला जाऊन सांग की त्याचा बाप आहे मी. तो माणूस तिथे गेला आणि त्या मुलाला सांगितले तेव्हा त्याला फार मोठे आश्चर्य वाटले. तेव्हा तो म्हणाला, 'बरं, तुम्ही दोन-चार खुणा सांगा.' त्यांनी सांगितले, 'अशा खुणा आहेत, तशा खुणा आहेत वगैरे.' त्या मुलाला ओळख पटली. त्याने विचारले, 'बरं, मग आता काय करायचे.' ते भूत म्हणाले, आता माझे क्लिनिक उघड आणि सगळ्यांना सांग की ज्याचे काही आजार असतील, त्यांनी आम्हाला पत्र जरी लिहिले तरी आम्ही तुम्हाला औषध तयार करून देऊ आणि बरे करू.' आणि सुरू झालं क्लिनिक. त्या डॉक्टरचे पुष्कळ मित्र होते ती ही भुते होती आणि सगळे कार्य करू लागले. 'तू पण काम केल्यावर त्याचा उपकार ते लावणारच. म्हणजे त्यांची आणखी दहा भुते तुमच्या घरात आली. मग तुम्ही माताजींकडे 'माताजी, हा काय त्रास आहे. ' अशी तऱ्हतऱ्हेची भुते आजकाल पसरविणारे मोठे मोठे एजंट्स आलेले आहेत. काही लोक तर नुसत्या भाषणाने तुमच्यावर भूते घालू शकतात. भाषण दिले की लोक घुमायला लागतात, घुमून नाचायला लागतात. त्यांची स्तुती पण गातात. आणि त्यांना असे लोक पाहिजेत पैसे कमवायला, सत्ता कमवायला. तेव्हा शास्त्रीय दृष्ट्यासुद्धा, शारीरिक दृष्ट्यासुद्धा जेवढे आपल्यामध्ये प्लेक्सेस आहेत बरोबर तेवढीच आपल्यामध्ये चक्रे आहेत. ऋषीमुनींनी पुष्कळ वर्षापूर्वी लिहिलेली चक्रे आणि त्याच्यातले बघा अगदी एकसारखे आहे. आता मूलाधार चक्र. मूलाधार चक्राला इंग्लींशमध्ये पेल्व्हिक प्लेक्सस म्हणतात. इथे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांना कळेल मी काय म्हणते आहे ते. पेल्व्हिक प्लेक्ससला चार सबप्लेक्सेस असतात. मूलाधार चक्राला बरोबर चारच, चतुर्दले म्हणतात. म्हणजे त्या कमळाच्या चारच पाकळ्या असतात. पेल्व्हिक प्लेक्सेस म्हणजे मनुष्य जेव्हा मनुष्य साधारण स्थितीमध्ये असतो, तेव्हा त्याच्या नुसत्या धारा दिसतात. जो मनुष्य पूर्णपणे प्रकाशित असतो त्याचे पेल्व्हिक प्लेक्सेस बरोबर अगदी कमळाच्या चार पाकळ्यांसारखे आणि मधोमध असा गोल दिसतो आणि त्या गोलात, तुम्ही बघायला गेलात म्हणजे तुम्हाला दिसणार नाही सध्या, पण एक सांगते आमच्यासारख्यांची गोष्ट-आतमध्ये त्याच्यावर दुष्टी ठेवली. त्या गोलाकारामध्ये एक असा बिंदू फिरतो आणि त्या बिंदमध्ये काय दिसते, श्रीगणेश! तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. श्री गणेश काही आम्ही केलेला देव नाही. आम्ही काहीही केलेले नाही. सगळे आतूनच आलेले आहे. श्री गणेश इथे दिसतात. श्री गणेश दिसायच्या आधी त्याची सोंड दिसते आणि पुष्कळशा द्रष्ट्यांनी त्यालाच कुंडलिनी समजलेले आहे. म्हणजे केवढी मोठी प्लेक्सेसचे एक अंग आहे, तिथे कुंडलिनी बसलेली आहे असा उलटा प्रचार करून, सबंधच घोटाळा करून ठेवलेला आहे आणि तो घोटाळा इतका मोठा झाला आहे, कुंडलिनी जी तुमची आई, जिचा सेक्सचा काही संबंध नाही, तिच्यावर सेक्सचा आरोप केल्यावर ती चिडते आणि ती चिडून तुमच्यावर त्याचे मोठे आगीचा बंब फुटल्यासारखे फोड येतात तेव्हा तुम्ही पुस्तके लिहिता की, कुंडलिनीला हात लावू नका. ती तुमच्यावर चिघळते. चिघळणारच! अरे ती तुमची साक्षात आई आणि तिच्यावर तुम्ही असा घाणेरडा आरोप करता ! चूक झाली ! म्हणून सेक्स जे पेल्व्हिक १८ आता श्रीगणेशाचे किती सुंदर आहे बघा. श्रीगणेश हा चिरबालक आहे. इटर्नल चाईल्ड, चिरबालक आहे. तर आपले अचेतन मन आपल्याला असे सांगते की, प्रभू, जो आपल्या आतमध्ये बसलेला आहे, तो काय सांगतो, की जेव्हा तुम्ही तुमच्या अध्यात्मिकतेमध्ये उतराल, अध्यात्मात, सेक्सच्याबाबतीत तुमची भावना अगदी लहान मुलासारखी हवी. आपल्या आईकडे दृष्टी लहान मुलासारखी असते. जेव्हा तुम्ही लहान मुलासारखे व्हाल, तेव्हा तुमची आई तुम्हाला भेटेल, नाही तर भेटणार नाही. ज्या माणसांना अशी घमेंड असते की, आम्ही म्हणजे काय विद्वान ! आम्ही हे पुस्तक वाचलंय, ते पुस्तक वाचले आहे, कधीही त्यांचे रिअलायझेशन व्हायचे नाही. आईचे असे आहे, रामदास स्वामींनी म्हटले आहे. 'आई स्व... जेव्हा लहान बाळ असते तेव्हा आई कशी त्याला वेळेवर दूध देते आणि त्यांचे संगोपन करते तुम्ही जर लहान बाळासारखे झालात, की जे काही वाचले आहे ते बेकार आहे, जे काही आम्ही जाणलं आहे ते बेकार आहे, आम्ही लहान मुले आहोत, तर आई समजते. खटकन् तुमचे रिअलायझेशन होईल. पुष्कळांचे होत नाही. लोक म्हणतात, 'श्रीमाताजी, असं कसं, तुमची इच्छा झाली म्हणजे व्हायला पाहिजे.' आम्हाला इच्छाच होत नाही कसली. ही आश्चर्याची गोष्ट आहे. आम्हाला तुम्हाला रिअलायज्ड करायची इच्छा नाही, की कसलीच इच्छा आम्हाला नाही. निरिच्छा! पण त्याला करायचे आहे, म्हणून तो येऊन करतोय माझ्यासाठी. दिसायला मी समोर आहे तुमच्या. आतून त्याचे काम चालू आहे. तो म्हणत नाही तुम्हाला. त्याला कारण काय ते मी सांगू शकते. त्याला कारण हे की तुमच्यामध्ये ती बाह्य स्थिती आलेली आहे. स्वतःला काही तरी शिष्ट समजून, मोठे समजून बघा. रिअलायझेशन व्हायचे नाही. तुम्ही असाल मोठे शेठ, तिथे देवाच्या समोर तुम्ही कोण! त्याला भिकारीही चालत नाही आणि शेठ ही चालत नाही. त्याला एक लहान मुलगा, जो भिकारी नाही, चालतो. साध्या लहान मुलाला तुम्ही विचारा बरे, अगदी सरळ गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक मुलगा होता. तो फार लवकर बोलू लागला. तर मुलाला मी विचारले, 'मुला, तुम कौन हो, हिंदुस्तानी हो?' तो म्हणाला, 'नहीं।' 'जपानी हो ?' 'नहीं।' 'मुसलमान हो?' 'नहीं।' 'तो तुम कौन हो?' तो म्हणाला, 'माँ, तुम भूल गयी। मैं तुम्हारा मुन्ना हूँ! यही सत्य है। एकच सत्य आहे, 'मैं तुम्हारा बच्चा हूँ। कितने साल से तुमको खोजते रहे हैं। सगळे खोटे लेबल्स, हिंदुस्थानात जन्मले म्हणून हिंदुस्थानी झाले, पाकिस्तानात जन्मले म्हणून पाकिस्तानी झाले. जेव्हा जन्मता तेव्हा काय तुमच्या डोक्यावर लिहन आलेले आहे ? जरासे मोठे झालात म्हणजे बघू काय करता ते!' हिंदुस्थान तरी कोणी बनवला? माणसांनीच बनवला. त्या देवालासुद्धा आश्चर्य वाटत असेल की, मी हे केव्हाही बनवलेले नाही. अहो, त्याला रंग भरायचे असतील. सर्व सृष्टी त्याने बनवून टाकली तेव्हा आपण एकाला हिंदुस्थान केला, एकाला अमेरिका केला, हे केले, ते केले. त्याच्यावरून वादविवाद, 'आम्ही ब्राह्मण, आम्ही हिंदू, आम्ही मुसलमान, आम्ही अमुक तमुक.' तुम्ही कोण? कोणीही नाही. तुम्ही मुलं आहात. आता आपल्याकडेही बायकांचं असतं की, 'आम्ही बायका. आम्हाला शिवायचे नाही. वगैरे.' हा एक वेडेपणा दुसरा. एकदा मीरा वृंदावनला गेली होती. तिथे तुलसीदासजी मोठे ब्रह्मचारी बनून, ते काही रिअलायज्ड नव्हते, असते तरी म्हणाले नसते, आले आणि त्यांनी मीराबाईला निरोप पाठविला. 'मला तुम्हाला भेटायचे आहे.' त्यांनी सांगितले, 'मी बालब्रह्मचारी आहे. (हे खोटे मी आहे. ते बालब्रह्मचारी नव्हते. त्यांच्या बायकोनी त्यांना काढले म्हणून ब्रह्मचारी झाले.) म्हणून बायकांचे तोंड बघत नाही.' मीराबाईंनी त्यांना उत्तर पाठवले की, 'या वृंदावनात माझ्या कृष्णाशिवाय दुसरा कोणी पुरुष रहात असेल असे मला वाटले नाही. माझी सगळी मुलेच राहतात असे मला वाटते. तेव्हा त्या माणसाला लाज वाटून त्याने सांगितले, 'आई मला क्षमा कर.' हा आपल्या दृष्टीतला फरक १९ आहे. हा सगळा आपल्या दृष्टीतला फरक आहे. ज्या बाईला सर्व संसारच आपला मुलगा आहे, तर हा ही आपला मुलगा. माझी मुले आहेत. त्यातला सर्वात मोठा मुलगा ९२ वर्षाचा होता. होता म्हणजे आत परवाच गेले ते. विसरले नाही. त्याला पुनर्जन्म दिला. तेव्हा आपल्या वृत्तीत जर पाप नसले तर सगळी आपली मुले आहेत. पण स्त्रीला स्त्री असायला पाहिजे, पुरुषाला पुरुष असायला पाहिजे. (असे नाही की स्त्री आणि पुरुष असे कुठे तरी जात आहेत ?) हा असला प्रकार नाही चालणार आमच्या सहजयोगात. असली काही मंडळी असतात की पुरुष बाई आणि बाई पुरुष. असले चालायचे नाही. सहजयोगाला पुरुष, पुरुषच असला पाहिजे, दणकट आणि बाईने सौम्यच असले पाहिजे, बाईसारखे. तेव्हा अमेरिकेत बायका मला म्हणाल्या, 'म्हणजे तुम्ही पुरुषांचेच राज्य आमच्यावर लादता.' मी म्हटले काय राज्य करतील ते! आम्हीच राण्या आहोत खरे म्हणजे ! तसा स्त्री एकटीच घरात सगळ्यांचा बोजा उचलते. आम्ही शांतपणाने उचलतो तो बोजा. शांत असली तरी शक्तीशाली तीच आहे. कुटुंब तीच चालवते. रामाने सीतेला सांगितले 'तू वनात जा.' सीता मॉडर्न असती तर तिने फिर्याद ठोकली असती, 'सगळ्या लोकांच्यासमोर लग्न करून मला घेऊन आलास आणि आता मला वनात जा म्हणतोस, हा अन्याय आहे मला आता मूल होणार आहे म्हणून डबल फिर्याद ठोकली असती आणि दोन मुले झाली असती तर आणखी फिर्याद ठोकली असती. ही मॉडर्न लोकांची कामे. पण सीतेचे कार्य बघा, चुपचाप वनात निघून गेली. सबंध कलंक सोसून राहिली ती. अपमान झाला तरी काही हरकत नाही! मुले झाली त्यांचे संगोपन केले. नवऱ्याचा राग तिने हे मुलांवर काढला नाही. आपल्याकडे बायका नवऱ्याचा राग मुलांवर काढतात. या काय बायका झाल्या, पुरुष. बायका म्हणजे राग गिळून आनंद देणाऱ्या त्या बायका, त्या नारी, त्यांनाच म्हणायचे. 'यत्र नाय्यास्तु पुजयन्ते तत्र रमन्ते देवता:', ज्या आनंदाचा वर्षाव करतात त्या बायका! पुरुषांशी स्पर्धा करायला नको आणि पुरुषांनी त्या धोब्यासारखे वागायला नको, ज्याने सीतेला काढलं. (त्यासाठी कारणीभूत ठरला. ) सीता जशी निघून गेली, वनात राहिली. (जिची सेना जशीच्या तशी ?) तिच्या पावित्र्याला कोण हात लावील? तिला कोण हात लावील? एवढा मोठा रावण धजला नाही तिच्या समोर ! ती एकटी वनात राहिली. इतके दिवस आपल्याला माहिती नसेल, की सीता जेव्हा परत मिळाली तेव्हा रामाने तिला हाक मी मारली, जवळ बोलावले, तेव्हा तिने त्याला सांगितले, 'बघ तुझा त्याग केला मी, माझा त्याग बघ, माझा त्याग केला.' गेली निघून ती, पृथ्वीत सामावली. रामावरही एकसुद्धा कलंक लावला नाही. सामावून गेली ती आपली पृथ्वीमध्ये. रामाने शरयू नदीमध्ये सीता, सीता असे म्हणत आत्महत्या केली असे म्हणतात. ही पुरुषांची रीत झाली. पुरुषांनी पुरुष व्हायलाच पाहिजे. बायकांनी बायका रहायला पाहिजे. त्याच्यात सौंदर्य आहे. बायका जशा आहेत तशाच सुंदर दिसतात. थोडा उशीर होईल त्यांना. लगबग होणार एवढं व्यवस्थित नाही चालायचं!.. आपल्याकडे बायकांची काही काही उदाहरणे आहेत. नूरजहान, काय बाई होती! नूरजहानचे प्रेम बसले होते सलीमवर, त्याच्याशी लग्न करायचे होते. पण अकबराने तिचे लग्न दुसर्या माणसाबरोबर लावून दिले. तर ती निघून गेला. कलकत्याच्या जवळ जाऊन तिथे तो राहिला. मग त्याची सगळी सेवा केली. पुष्कळ वर्ष ती राहिली तिथे. मग सलीम जेव्हा राजा झाला, तेव्हा त्याच्या राज्यकारभारात तिचा नवरा मारला गेला. तिला असं कळलं की त्याने मारले. ते खरे की खोटे देवालाच माहिती. पण हिची वर्तणूक बघा. ती पण मुसलमानच होती ना! बघा तिची वर्तणूक सीतेपेक्षा काही कमी नाही. जेव्हा हा गेला तिच्याकडे, तिच्या पाया पडला, पण ती म्हणाली, 'मी येणार नाही.' तेव्हा तिला अटक करून घेऊन गेला. तेव्हा ती म्हणाली, 'खबरदार माझ्या अंगाला हात लावलास २० तर !' त्याची हिम्मत झाली नाही. तिला अटक करून आणले. तेव्हा ती एका लहान घरात जाऊन रहात असे, मग हा आजारी पडला तिच्या विरहात. तेव्हा त्याच्या आईला त्याची दया आली, मग ती गेली तिच्याकडे. तिला सांगितले, 'बाई मी तुझी सेवा करते.' तिला माहिती नव्हते ही त्याची आई आहे म्हणून. तिने तिची फार सेवा केली. तेव्हा ती म्हणाली, 'तुला काय हवे ते ते माग. माझी तब्येत ठीक आहे. काय मागशील ते देईन. म्हणजे माझ्या हातात असले तर देईन.' ती म्हणाली, 'माझे मागणे एवढेच आहे, की माझ्या मुलाशी तू लग्न कर.' ती म्हणाली, 'हो करते.' एवढा मोठा शहेनशहा, त्याच्याशी लग्न करायला ती तयार नव्हती पण हिच्या मुलाशी लग्न करायला तयार झाली, ह्या गरीब बाईच्या मुलाशी! ही गरीब बाई बनून गेली होती तिथे, नंतर तिला कळले की ज्याच्याशी लग्न व्हायचे तो शहेनशहाच आहे. मग ते लग्न झाले. तर ह्या बायकांचे काय आहे बघा! या देशातल्या एक एक बायकांचे काय आहे बघा! अद्वितीय आहे सगळे बायकांचे! या बायकांच्या दमावर सगळी सृष्टी थांबलेली आहे. पुरुष जुलूम करतात. कितीही करू देत. या बायकांच्या हिमतीपुढे त्यांना काहीही करता येत नाही आणि तरी जी प्रेमाचा वर्षाव करीत राहील तीच खरी बाई. तेव्हा धर्मामध्ये अशी माणसे, जी पूर्णपणे बाईच्या स्वरूपाला बाई आलेली आहे आणि पुरुषाच्या पूर्ण स्वरूपाला जो पुरूष आलेला आहे, असे लोक आमच्या धर्मात येऊ शकतात. जे अर्धवट लोक असतात, त्यांची ओळख असते. लगेच समोर येतात. शास्त्रीय दृष्टीने, मी जे सांगते ते सबंध आपल्या शरीरात आहे. सबंध प्लेक्सेस आपल्या शरीरात आहेत. तेव्हा बुद्धीनेसुद्धा तुम्ही त्याला अगोदर मान्यता दिलेलीच आहे. आता मी तुम्हाला समजविण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला ते मधासारखे आहे. कितीही सांगितले, मधाची अशी चव असते, तो असा असतो, तसा असतो, तरी जोपर्यंत तुम्ही अनुभव घेणार नाही, त्याचा स्वत:वर परिणाम पहाणार नाही, तोपर्यंत माझे भाषण व्यर्थ आहे. पुराव्याला म्हणून मी सांगू शकते की, सायन्समध्ये ज्याला आपण पॅरासिंपथेटिक नव्व्हस सिस्टीम म्हणतो, ती, जिला मी कुंडलिनी म्हणते, जी मी जागृत करते, ती कंट्रोल करते आहे. सबंध कुंडलिनीचे वर्णन, तिचे उठणे, उत्थापन वर्गैरे आणि त्यापासून मिळणारे वेगळे वेगळे आनंद आणि त्यापासून दिसणाऱ्या वेगळ्या वेगळ्या आकृती आणि त्यातून आपल्याला होणारे फायदे, त्यातून आपल्याला काय काय फरक होतो या सगळ्यांचे मी एक विवेचनात्मक पुस्तकच लिहिणार आहे. पण ते एवढे सबंध पुस्तक वाचूनसुद्धा ते मिळाल्याशिवाय नुसते पुस्तक वाचून मजा येणार नाही. म्हणून आधी मिळवून घ्यायचे. ज्यांना ते मिळते आहे त्यांनी ते अधिक मिळवून घ्यायचे. ते वाटल्याशिवाय मिळायचे नाही. पुष्कळशा श्रीमंत लोकांच्या घरात अशी स्थिती असते, की कोणी तरी मेले आहे की काय! इतके श्रीमंत असून घरात पैसा वर्गैरे सगळे असून असे वाटते की आपण स्मशानात आलो आहोत की काय! अरे, तुम्ही प्रेम वाटायला पाहिजे, तुम्ही पैसे काय वाटता! प्रेम वाटा. आपल्याकडे लक्ष्मीचे रूप बघा किती सुंदर आहे! लक्ष्मीला स्त्रीचे रूप दिलेले आहे. म्हणजे काय ती आई स्वरूप असायला पाहिजे. ज्या माणसामध्ये लक्ष्मी आहे त्याला आई स्वरूप असायला पाहिजे. आईने तुमचे किती अपराध पोटात घेतले असतील! लक्ष्मी असलेला मनुष्य आपल्या नोकराला झोडपतो. तो लक्ष्मीपती नाही, पैसेवाला आहे. मग तिच्या हातामध्ये दोन कमळे आहेत. कमळांचा अर्थ काय आहे ? तर कमळासारखी शोभा असायला पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावर, वागण्यावर, बोलण्यावर प्रत्येक गोष्ट शोभनीय असायला पाहिजे. तोंडातून भराभर शिव्या निघत आहेत आणि म्हणे हे लक्ष्मीपती! हे कसले लक्ष्मीपती! लक्ष्मीपतीने कमळासारखे असायला पाहिजे आणि कमळासारखे घर आणि त्याची रहाणी अत्यंत सुंदर आणि २१ त्याच्यामध्ये आरामशीर, एखादा भुंगा कसा कमळामध्ये जाऊन झोपतो तसा, कोणीही गेले तरी त्याला आराम मिळायला पाहिजे. लक्ष्मीपतीची ओळख पुढे आणखी दिलेली आहे की एक हात असा असतो लक्ष्मीचा, या हाताचा अर्थ असा असतो, की तुम्हाला आश्रय आहे. कोणीही गेला तुमच्या आश्रयाला आणि त्याला जर तुम्ही आश्रय देऊ शकत नाही तर तुम्ही कसले लक्ष्मीपती? स्वत:च्या मुला, बाळांना पैसे देऊन गब्बर करणारा कसला लक्ष्मीपती. जनावरात सुद्धा ती स्थिती संपते काही दिवसांनी. पण आपल्या मनुष्यात जनावरांपेक्षा खालची स्थिती आहे. म्हातारे होईपर्यंत कंजूषासारखे मुलासाठी पैसे जोडत बसणारे आणि मुलगा मग मोठा झाला की त्याने म्हाताऱ्याचे पैसे गिळायचे. पण कोणी म्हटले, की एखाद्या गरीबाला पैसे दे, तर 'बापरे! असे मागणारे रोजच येतात!' आपला मूलगा, आपली मुलगी याच्यातच तुम्ही जाणार. आपली मुले पहिल्यांदा पुढे घेतील. 'घ्या, घ्या, अहो सगळी मुलेच आहेत तुमची!' आपला मान झाला पाहिजे, आपल्या मुलीला बरे वाटले पाहिजे, आपण, आपण, आपली, आपली! अहो, शेवटी तीच मुले तुम्हाला त्रास देतात! तेव्हा या प्रेमाला काही अर्थ नाही. स्वार्थी प्रेम म्हणजे प्रेमाचा मृत्यू आहे. एखाद्या झाडामध्ये जाणारी त्याची शक्ती किंवा पाणी एखाद्या फुलामध्येच जाऊन बसले तर सबंध झाड मरून जाईल. अशा प्रेमाचा काय फायदा होणार आहे? अशा लक्ष्मीपतीच्या हातामध्ये लक्ष्मी नाही. लक्ष्मीपतीची बायको बसलेली असते आणि तिच्या शेजारी एक बाई बसते. जिच्या अंगावर चिरगूट कापड ही नसते. तिच्या मनाला खंत वाटणार नाही. दुसर्याचे हालअपेष्टा बघून जे हृदय पाझरणार नाही ते हृदय आहे की दगड आहे! हे सगळे कार्य मी आपल्या हृदयाच्या दमावर करते आहे. आपल्याला माहिती नाही. नुसते हृदयाच्या दमावर करते. हृदय चक्राचा खेळ आहे. तुम्ही पाहिले आहे कशी माझ्या हातावर कुंडलिनी खेळते आहे. सगळी प्रेमाची चक्कर आहे. परमात्म्याने सगळी सृष्टी प्रेमातून केलेली आहे. ज्याला आपण क्रिएटिव्ह काम म्हणतो ती सगळी त्याची प्रेम शक्ती आहे, नुसते प्रेम, प्रेम, प्रेम! ज्या माणसामध्ये प्रेम नाही, जो हृदय उघडून हृदयापाशी कोणाला घेऊ शकत नाही अशा माणसाला देव मिळणार नाही किंवा एखाद्या पंडिताला तुम्ही शंभर रुपये दिले आणि त्याने काही देवाचे केले तरी त्याने तुम्हाला देव मिळणार नाही. देव प्रेमाचा भुकेला आहे. काय त्या देवालासुद्धा प्रेमाची भूक आहे आणि त्या प्रेमाच्या सागरात बुडायला लागलात तर कोण दुसरा? या हाताने या हाताची सेवा करावी आणि म्हणावे , 'अरे, मी तुझी किती सेवा केली?' तसे तुम्ही सगळे माझ्या अंगातच आहात. सगळ्या शरीरात एकच शक्ती वाहते. या बोटाला लागले तर हे बोट चटकन पुढे येते. आता तुम्ही बघताच की जे लोक पार झालेले आहेत ती मंडळी स्वत:चा पैसा खर्च करून तुमच्या धुळ्याला आलेली आहेत. त्यांना तुमच्याकडून पैसे नको, काही नको. आपले पैसे खर्च करून तुमच्याकडे आलेली आहेत. कशाला? तुम्हाला भवसागरातून वाचविण्यासाठी ! कारण आतून प्रेम वाहते आहे. या प्रेमासाठीच मी सुद्धा धावत आले आहे तुमच्याजवळ. जर हे प्रेम माझ्याजवळ नसते तर माझ्याजवळ एवढी संपदा आहे, बाहेरची सोडा, आतली, तर मला काही गरज नाही. पण करुणा! करुणा आतली इतकी जास्त असते, की आतला आनंदसुद्धा बेकार असतो. जन्मजन्मातरीची जमवलेली आहे! या जन्मामध्ये दिल्याशिवाय मार्ग नाही. रात्रंदिवस एक करते आहे तुमच्यासाठी. तुम्ही पण यात थोडी मदत करायची आहे. २२ राम एस ा आवाज मधुर असावी आणि भावा नियंत्रित करायला हवी. जर आपण आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवले तर आपण ८०१% सामूहिकतामिळवू शकती. प. पू. श्रीमाताजी, ०२.०५.१९८५ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा। लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौरसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in अबोधितेद्वारेच तुम्ही आनंद प्रगट करू शकता आणि अबोधिती हाच एक असा मार्ग आहे की ज्यामुळे तुम्ही आनंद अनुभवू शकती. आनंदाविनी या सृष्टीची कल्पनाकरा, कार्य होईल? प. पू.श्रीमाताजी २२.०८.१९८२ ---------------------- 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-0.txt पैतन्य लहरी मराठी जुलै-ऑगस्ट २०१३ पर 2० 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-1.txt या अंकाल परमात्मा जो आहे, निराकार आहे, साकार नाही ...४ या 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-3.txt प२मात्मा जो आहे, निशकार आहे, सकार नाही. १ धुळे, ९/४/१९७२ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-4.txt GoraDA 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-5.txt खरोखर म्हणजे राजकुवर राऊळ सारखी बाई या धुळ्यात आहे हे या धुळ्याचे मोठं भाग्य आहे. तिच्या प्रेमाच्या आकर्षणाने मी इथे आले. मी तिला म्हटले होते एकदा धुळ्यात अवश्य येईन आणि या ठिकाणी किती भक्तिभाव, किती प्रेम आहे! त्याची सुद्धा मला आतून जाणीव होत आहे. धर्माबद्दल आपल्या देशामध्ये आदिकालापासून सगळ्यांनी पुष्कळ लिहून ठेवलेले आहे आणि चर्चा पुष्कळ झाल्या. मंदिरातसुद्धा आता घंटी वरगैरे वाजतात. चर्चमध्ये सुद्धा लोक जातात. मशिदीत जातात. धर्माच्या नावावर आपल्या देशामध्ये पुष्कळ कार्य झालेले आहे. पण जे वास्तविक कार्य आहे ते कुठेही झालेले दिसत नाही. देवळात जातो आपण सगळे काही व्यवस्थित करतो, पूजा- पाठ सगळे व्यवस्थित करतो, घरी येतो, पण तरी सुद्धा असे काही वाटत नाही, की आपण काही मिळविलेले आहे. आतली जी शांतता आहे, आतले जे प्रेम आहे, आतला जो आनंद आहे तो काही मिळत नाही. कितीही केलं तरीसुद्धा असे वाटत नाही, की आपण देवाच्या जवळ गेलो आहोत किंवा आपल्याला ही माऊली मिळाली आहे, की जिच्या मांडीवर डोके ठेवून आपण आरामाने म्हणू शकतो की आम्हाला आता काही करायचे नाही. माझे असे म्हणणे नाही, की देवळात माणसाने जाऊ नये. जावं, अवश्य जावं. जेव्हा मधाची ओळख पटविण्यासाठी पहिल्यांदा फुलाच्या गोष्टी करू तर बरे होईल. म्हणून त्यांनी साकार देव काढले ते सांगण्यासाठीच. म्हणजे फुलांची नावे सांगितली. विष्णू पासून ते शिवापर्यंत तसेच मुसलमानांमध्ये अलीपासून वलीपर्यंत, ख्रिश्चन लोकांमध्ये ख्रिस्तापासून त्याच्या आईपर्यंत सगळ्यांची वंशावळ झाली. नावे सर्व कळली. फुलांची नावे कळूनसुद्धा मधाचा पत्ता लागला नाही. आपण साकार पूजा करतो. वर्णनामध्ये त्यांनी सांगितलेले आहे. आपण विष्णूचा विष्णूंचे नाव घेतो. बघा, त्याच्यासुद्धा श्लोक ऐकला असेल की, 'शांताकारम् भुजगशयनं, पद्मनाभं सुरेशम् । विश्वाधारम् गगन सदृशं, मेघवणं शुभांगं। लक्ष्मीकांतम् कमल नयनं...। आता इथपर्यंत त्यांचे वर्णन झाले. पण त्याची मख्खी कोठे आहे, 'योगिर्भिध्यानगम्यम्।' योगाने ज्याला ध्यानामध्ये जाणलेले आहे, त्याचे हे वर्णन आहे. मी जाणलेले नाही. प्रत्येक देवाबद्दलसुद्धा 'ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो ।' 'ध्यानात जाऊन जो ते बघतो त्या देवाचे मी वर्णन करतो' असा प्रत्येक ठिकाणी आपल्याला इशारा केलेला आहे, पण होते काय; आपण इशाच्यावर थांबतो. आता आपल्याला दुसर्या तऱ्हेचे जे धर्म सुरू झाले, म्हणजे ख्रिश्चन धर्म म्हणा किंवा मुसलमान धर्म म्हणा याच्यात त्यांनी सांगितले, बघा फुलांच्या गोष्टी केल्या म्हणजे मध मिळत नाही. आपण मधाच्या गोष्टी करू. त्यांनी सांगितले, की परमात्मा जो आहे, निराकार आहे, साकार नाही. निराकारात तुम्ही जा, पण कसे जाणार? त्या ही गोष्टीच झाल्या. अहो, मधाच्या गोष्टी करा, नाही तर फुलांच्या गोष्टी करा, गोष्टी म्हणजे गोष्टीच आहेत. गोष्टींनी परमात्म्याला जाणता येत नाही. त्यामुळे झाले काय की गाडीच्या मागे घोडे बांधलेले आहेत आणि गाडी हाकत बसलेलो आहोत आपण! म्हणायचं की, 'गाडी का नाही चालत धर्माची?' धर्म आपल्या आतमध्ये आहे, सगळ्यांनी हे सांगितलेले आहे. आपल्या आतमध्ये परमात्मा आहे हे सुद्धा सगळ्यांनी सांगितलेले आहे. पण होते काय की, कितीही सांगितले तरी ते सांगितलेले असल्यामुळे ते सांगण्यावरच राहून जाते. परवा एका शिखांच्या गुरूद्वारात मी गेले होते. तर तिथे त्यांनी गाणे सुरू केले, 'काहे रे बन खोजन जायी। सदा निवासी सदा आलेपा तोहि संग समायी। पुष्पमध्ये जा बांस बसत है, मुकुरमां हि जब छायी। तैसेहि हरि बसे निरंतर घटहि खोजो भाई ।।' आता गात बसलेत 'घटही खोजो, घटही खोजो।' 'अहो', म्हटले, 'गाता काय? तुम्हाला जर औषध घ्यायचे असले, तुम्हाला वैद्यांनी औषध सांगितले की, तुम्ही मी थोडी सुंठ-साखर घ्या, म्हणजे बरे वाटेल.' घरी येऊन तुम्ही सारखं म्हणाल, 'मी सुंठ- साखर घेतो, ६ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-6.txt सुंठ-साखर घेतो,' याने काय औषध होणार आहे का ? असे आपले चालले आहे, की जे करायचे आहे ते आपण करीत नाही, त्याबद्दल बोलतो. म्हणूनच माझे म्हणणे आहे, की आपल्याला ध्यानात जायला पाहिजे. पण कसे जायचे हे मात्र कोणी सांगत नाही. असे पुष्कळ बोलणारे आपल्याला भेटतील, आपण प्रेम केले पाहिजे. सर्व जगावर प्रेम केले पाहिजे. अहो, प्रेम करायला शिकवता येते का? तुम्ही काय इलेक्ट्रिसिटीचे प्रेम करू शकता का ? प्रेम हे निसर्गतः आतममध्ये आहे आणि ते एकदम आपल्याला असं जाणवतं. आपल्याला आपल्या मुलांबद्दल प्रेम वाटते, आपल्या वडिलांच्याबद्दल वाटते, पत्नीबद्दल वाटते, नवर्याबद्दल वाटतं. हे जे काही प्रेम आहे ते अकस्मात वाटते. शिकवून प्रेम येत नाही. की कुणाला व्हा धर्मसुद्धा शिकवून येत नाही. तो उपजतच आपल्यामध्ये आहे. त्याला जाणावं लागतं. आता कसं जाणायचं? कसं त्या परमात्म्याला जाणून घ्यायचे, हे सांगा, आत्मसाक्षात्कार कसा करून घ्यायचा? पुष्कळसे लोक असे सांगतात,'हो, होऊ शकतं. अस करा, तुम्ही डोक्यावर उभे रहा, पंचवीस मिनिटे उभे देवाचे नाव घ्या.' काही होणार नाही. खोटी गोष्ट आहे. 'तुम्ही भगवी वस्ते घालून नाचा, उड्या मारा. त्याने देव मिळेल.' इतकं सोपं असतं तर काय, दोन रुपयाला साडी रंगवायची आणि नाचत सुटायचं. झालं, देव मिळाला! पण तिसरं कोणी सांगेल, 'तसं होणार नाही. तुम्ही देवळात जा. नाव घेत बसा.' अहो, नावाचं असं आहे, तुलसीदाससारखा मनुष्य, त्याने एवढं मोठं रामायण लिहन ठेवलं, नाव घेत असे. स्वत: रघुवीर त्याच्याकडे तीनदा आले आणि त्याला त्यांनी टिळा लावला, चंदनाचा आणि ओळखलं नाही. तेव रोज राहून आपले 'हरे राम, हरे कृष्ण' वाले मुंबईला माझ्याकडे आले. मला म्हणाले, 'माताजी, तुम्ही नाव घेत नाही देवाचं!' म्हटलं, 'अरे, नाव घेण्यासारखं तुम्हाला तरी कळले आहे का ! कुणाचं नाव घेता? उद्या माझ्या दाराशी येऊन माताजी, माताजी म्हणाल, आणि परवा रस्त्यात भेटलात, तर ओळखाल का मला? तुम्हाला पटणार आहे का माझी ओळख? मी म्हणते आतमध्ये या, आधी त्याला जाणा. एकदासुद्धा नाव घ्यायला कठीण जाणार आहे.' मग म्हणायला लागले. 'आम्ही सगळ्यांनी संन्यास घेतला, एवढा आम्ही त्याग केला आहे, हे करून, ते करून आम्ही जंगलात गेलो, अमुक करतो, तमुक करतो, तुम्हाला आपलं घरात बसून, मुलं-बाळं, नातवंडं आहेत, तुम्ही कसं काय हे करता ? तुम्ही काही सोडले नाही?' मी म्हणाले, 'हे बघा, मी तुम्हाला एवढं सांगते, तुम्हाला चॅलेंज आहे, माझ्या घरातले कोणतेही सामान, कोणतीही वस्तू त्या परमात्म्याच्या पायाच्या धुळी बरोबर काय त्याच्या धुळीच्या कणाबरोबर जरी असली, तरी उचलून न्या तुम्ही. मी तयार आहे.' इकडेतिकडे बघतात. म्हटले, 'काहीही, तुम्हाला जे वाटलं ते उचलून न्या.' म्हणाले, 'त्याच्याबरोबरचे काही नाही.' मी म्हणाले. 'त्याच्या बरोबरचं जर काही नाही तर सोडले काय आणि धरले काय तुम्ही.' 'अहो, आम्ही धरले नाही, तर सोडणार तरी काय?' आता उद्या हा समुद्र समोर आहे. आम्ही जर मनानेच ठरवलं की हा आमच्या नावावर आहे, हा आम्ही धरलाय, म्हणजे हा मूर्खपणा आहे की नाही? आणि मग म्हणायचं आम्ही हा धरलाय आणि आता सोडलाय. आम्ही धरलंच नाही आणि धरते कोण? मेलं म्हणजे किल्ल्यासकट सगळे इथे राहून जाते, हे लक्षात नाही तुमच्या. धरतय कोण आणि सोडतंय कोण? अशा मूर्खपणाने जर देव मिळणार असला, तर देवसुद्धा मूर्खच आहे म्हणायचा! अहो, तो सर्वशक्तिमान, किती शक्ती आहे त्याची! अत्यंत प्रचंड शक्ती असलेला लोहचुंबक जर एखाद्या ठिकाणी असला आणि आपण त्या ठिकाणी जाऊन लहान शक्तीचा लोहचुंबक घेऊन त्याच्यासमोर नाचलो आणि उड्या मारल्या, नाही तर डोक्यावर उभे राहिलो, हे करून जर तो आपल्याकडे येत असला तर तुम्ही करा पण ते शक्य आहे का? ७ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-7.txt फक्त आपल्याकडे जी थोडीशी शक्ती आहे ना, ती नुसती अशी सोडली तर पटकन तो ओढून देतो. बसलाच आहे ओढायला तो तिथे. त्याची एवढी शक्ती एवढ्यासाठीच आहे की आपल्याला आपल्यात ओढून घ्यायचं. पण त्याची अशी इच्छा आहे, की तुमच्या इच्छेमध्ये हे झालं पाहिजे. तुमची इच्छा असायला पाहिजे. जोपर्यंत तुमची इच्छा नाही तोपर्यंत तो तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. म्हणजे माणसाला त्याने त्याच्या गौरवात उभे केले आहे. त्याची सबंध इज्जत आहे. त्याची सर्व स्वतंत्रता आहे. आज काल मुंबईला पुष्कळ हिप्नॉसिस वगैरे लोक करतात म्हणजे ते मोहिनी विद्या करतात. लोकांना वेड्यासारखं त्यांच्यावर मोहिनी मंत्र घालून नाचवणं, कुदणं, काय आणि लोकांना ते आवडतं. लोकांना स्वतंत्रपणा नको, स्वत:चा गौरव नको, स्वत: म्हणजे काय आहात तुम्ही! केवढं मोठं आहे त्याच्यात! आता प्रधान साहेबांनी सांगितलं, एका भिकारणीबद्दल. कधी कधी लोक भिकारी होतात, ते जाणूनबुजून होतात, हे आपल्याला माहिती नाही. समजा एखाद्या जन्मात एखादी मोठी महाराणी असली, पण तिला नवऱ्यापासून म्हणजे त्या राजापासून फार त्रास होत आहे, घरात त्रास, त्या राणीपणाचा बोजा तिला फार झाला असेल तर ती म्हणू शकते की, 'प्रभू, मला पुढील जन्मात एक भिकारीण कर, पण राणी करू नको.' पुढला जन्म तिचा भिकारणीचा होणार, पण आतून ती राणी आहे. तिची तब्येत राणीची रहाणार. तुम्ही पुष्कळसे श्रीमतं लोक पाहिले असतील इतके गरीब असतात, नुसते भिकारी. काही काही गरीब किती श्रीमंत असतात आतून ! ते प्रकार! हजारो रुपये लोक खात बसले आहेत तेव्हा परमात्म्याला जाणण्यासाठी त्याची स्वत:ची धडपड चालली आहे, तो स्वतः तुमच्यासाठी सर्व व्यवस्था करतो. तुम्हाला परत परत जन्माला घालून, तुमच्या आवडीनिवडी कमी करत करत शेवटी तो त्या ठिकाणी आणून पोहोचवतो, तिथे तुम्हाला धर्म दिसून येतो. म्हणजे समजा एखादा मनुष्य अगदी कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे, तो म्हणतोय, 'मी अगदी आणि सगळ्या मुसलमानांबद्दल आणि म्लेंच्छांबद्दल माझ्या मनात द्वेष आहे,' असा विचार करून एक ब्राह्मण आज उभा राहिला, तुम्हाला आश्चर्य वाटेल पुढच्या जन्मी जाऊन तो पक्का मुसलमान झाला पाहिजे. मी सांगते तुम्हाला कर्मनिष्ठपणा करणारे लोक मी इतके पाहिले, मी मधे तेहरानला गेले होते. तेहरानमध्ये ध्यानाला बसवले लोकांना, तिथे घंटा वाजवताहेत आणि आरती उतरवताहेत. इकडे आम्ही मुंबईला आपल्या ब्राह्मणांना बघतो, ते तिकडे नमाज पढतात. काय वेडेपणा! एका अतिशयतेला जातात आणि मग दुसर्या अतिशयतेला जाता. याला शिवायचे नाही, त्याला शिवायचे नाही. पुढच्या जन्मी तुम्ही हरिजनच जन्माला येणार. तुमचा अधिकार आहे का तुमच्या जन्मावर? पण तुम्ही जर कुणाचा द्वेष केला, तर उद्या जग तुमचा द्वेष करेल. जे मी बोलले तेच माझ्याकडे परत येणार आहे. जो मनुष्य या अतिशयतेपासून बाहेर निघालेला आहे त्याच्यासाठी माझा सहजयोग फारच सहज आहे. ते मुसलमान लोक तुम्हाला सांगितले या बीजातून अंकूर काढून दाखवा. कोणी काढून दाखवू शकतं का आपल्याला? एकसुद्धा बीजातून आपण अकूर काढू शकत नाही आणि काय दिमाख आहे माणसाला स्वत:चा! अहो, एक घर बांधले, काय आहे ? मेलेल्या विटा आणि मेलेलं घर! जिवंतपणा आहे का त्याच्यात? एक तरी जिवंत काम आपण करू शकतो का जगामध्ये? काय माणसाचा दिमाख चढलेला आहे स्वत:चा! स्वत:ला काय समजतोय तो! काहीही आपण करत नाही. सांगायचे म्हणजे जे काही आपण करीत आहोत, ते नुसतं आपल्याला वाटतंय की आपण करत आहोत. खरं म्हणजे, आपण काहीही करीत नाही. 'सगळे करतो आहे तो' हे तोपर्यंत आपल्याला जाणवणार नाही, तोपर्यंत हे आपले पक्के होणार नाही, जोपर्यंत त्याला शक्तीचा काही तरी अनुभव मिळत नाही. आंधळ्यासारखा माझ्या गोष्टीवर कृपा करून कोणी ८ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-8.txt विश्वास करू नये. अंधविश्वासाने परमात्मा मिळणे अशक्य आहे. जस समजा, या खोलीमध्ये आपण बाहेरून आलात, अंधार आहे, मी या खोलीची मालकीण आहे, मला या खोलीच्या खिडक्या, दारे सर्व व्यवस्था माहिती आहे. आपण आल्याबरोबर मी म्हणेन, 'बघा, इथे बसा, आपल्यासाठी इथे सतरंजी अंथरली आहे. इकडे दिवा आहे. तिकडे लाईटचे ते बटण आहे.' आपण तो हळूहळू बघाल. आपल्याला समजेल ते. आहे तर विश्वास ठेवायचा, नाही तर मुळीच ठेवायचा नाही. म्हणून कधी कधी आस्तिकापेक्षा तो नास्तिक बरा. म्हणजे आस्तिक वाईट असतात अशातली गोष्ट नाही. माझे म्हणणे असे एखाद्या गोष्टीला चिकटून बसलेला मनुष्य मुश्किलीने त्या समुद्रात उतरू शकतो. जर तुम्हाला समुद्रात उतरायचं आहे तर जे काही स्वत: वर आहे ते सोडायलाच पाहिजे. तुम्हाला या हॉलमध्ये यायला ज्या शिड्या आहेत त्या सर्व सोडाव्याच लागतील. म्हणजे शिड्या वाईट आहेत असा त्याचा अर्थ आहे का? शिड्या सोडल्याशिवाय तुम्ही आतमध्ये कसे येणार? मग दुसरा प्रश्न असा येतो की, 'माताजी, असं कसं शक्य आहे ? पूर्वी एक दोन लोकांना आत्मसाक्षात्कार व्हायचा, आता तुम्ही म्हणता हजारोंना होतो, ते कसे शक्य आहे?' का शक्य नाही? अहो, पूर्वी एखाद्या झाडाला जर एक- दोन फुलं येत होती. आता हजारो फुले येऊन बहरली आहेत, तर हजारो फळे होणार नाहीत का ? असे जीवनात तुम्ही पाहिले नाही का ? काही तरी जीवनामध्ये वाढ झालेली असेल आणि कलियुगातच हे होणार आहे. नाही तर सत्ययुग येणार कसे ? कलियुगाला बदलण्यासाठी सत्ययुगाला आणण्यासाठी असं काही तरी विशेष कार्य झालं पाहिजे. नाही झालं तर सत्ययुग येणे शक्यच नाही. आता अगदी अशा ठिकाणी जाऊन मनुष्य उभा आहे की जिथे एक तर तो चांगल्यात येऊ दे नाही तर वाईटात. जर यावेळी माणसांनी असा निश्चय केला नाही की सत्ययुगच आम्हाला आणायचं आहे, तर संपूर्ण संसाराचा संहार होणार आहे याबद्दल मला शंका नाही. पण आपल्या डोक्यामध्ये जे अजून पूर्वीचे बसले आहे, ते थोडे रिकामे करायला पाहिजे. कारण असं आहे पुष्कळांचे वाचन पुष्कळ झाले आहे. आम्ही पुष्कळ गुरू पाहिले, साधू आले होते, ते अमूक आले होते.' अहो, आले असतील! त्यांनी तुम्हाला काही दिले आहे का? तुम्हाला आनंद दिला आहे का? तुम्हाला शांती दिली आहे का ? तुम्हाला प्रेम काय आहे ते सांगितले आहे का? हातातून वाहिले पाहिजे प्रेम, खट्..खट्...खट्...खट्, हातातून असं जातं. आमचे हे शिष्य आहेत ना इकडे बसलेले. म्हणे, 'मी लोकांना बरे वगैरे करीत नाही कारण वेळ कमी असतो.' माझी इच्छा आहे डॉक्टर्स तयार करायचे. चिकित्सक दृष्टीचा मनुष्य फालतू काही तरी गोष्टींना चिकटून बसला, तर त्याला समुद्रात ढकलायचे तरी कसे ? ज्याला समुद्रात जायचे आहे त्याने तट सोडलाच पाहिजे. आतापर्यंत तटावर भटकलात ही गोष्ट खरी नाही तर कोणाला तरी आनंद दिसला असता. कोणावर तरी ते प्रेम वाहवले असते! कोठे तरी त्या शांतीचा उद्गम झाला असता. पण कोठेही मला दिसला नाही. मी एवढे सगळे साधु संन्यासी पाहिले, एकाही माणसामध्ये ही गोष्ट दिसली नाही जी गोष्ट आमच्या या लोकांमध्ये आहे आणि ती तुमच्यातही येईल. परवा मी वसईला गेले होते. शंभर माणसे पार झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि इतकी आश्चर्यजनक घटना आहे, इतकं अद्भूत आहे ते! लोकांना वाटेल की शक्य नाही ते, पण आहे. सांगायचे म्हणजे लहानपणापासून माझा जन्मच अशा स्थितीत झाला होता, की माझ्याजवळ ही चेतना होती आणि जन्मजन्मांतरी ही चेतना माझ्या जवळ राहिली. पण या जन्मामध्ये विशेष, माझ्या हे लक्षात आले, की या जन्मामध्ये जोपर्यंत मी हे देणार नाही लोकांना, जी कायम माळ्यावर नेहमी जन्माला येते ९ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-9.txt आणि नुसती भाषणे देऊन चालणार नाही. लोकांना नुसते सांगून की, 'तुम्ही प्रेम करा, चांगले लोक बना, याने काही काम बनणार नाही. असे सांगणारे पुष्कळ येऊन गेले. पुस्तकं लिहिणारे पुष्कळ होऊन गेले. पण काय झालं, हे करा, ते करा, ते करा! अशी व्यवस्था झाली पाहिजे की, जिथे ह्यांना, कुठेतरी, कसे तरी पाचव्या माळ्यावर आणून मी जर सोडले, लोकांना वाटेल, की काही तरी आम्हाला श्रीमाताजींनी शिकवलं आहे. आणि जे दिसतं आहे त्याच्या पलीकडेसुद्धा काहीतरी आहे. जेव्हा ते दिसू लागेल, याच्या पलीकडचे दिसू लागेल तेव्हाच त्यांना वाटेल की आहे काही तरी. नाही तर देवाच्या गोष्टी म्हणजे थोतांड आहे. आता आपल्यामध्ये बघा तरुण लोक किती कमी, फार कमी आहेत तरुण. आता तरुणांमध्ये, बडोद्याला मी गेले होते. तिथे युनिव्हर्सिटीत माझे भाषण ठेवले होते. आमच्या सगळ्या लोकांनी सांगितले, 'आम्ही जाऊ देणार नाही, श्रीमाताजी. ' का तर उठल्याबसल्या हेच धंदे, कोणाची प्रेतयात्रा काढ, नाही तर कोणाला मारून काढ! ही आपल्या मुलांची आज स्थिती का? याला कारण आपण. धर्माच्या नावावर एवढे पैसे खर्च केले, एवढी धावपळ केली, त्यांना माहिती आहे की हे महामूर्ख त्यांनी घेऊन ठेवलेत. मग आम्ही तरी कशाला ह्या महामूर्खपणात पडायचे? काही तरी आपण दुसरे कार्य करायचे म्हणून त्यांनी आपले दसरे मारापिटीचे कार्य केले आहे. सुरू अशा रीतीने आपल्या मुलांची ही स्थिती आहे, पण अमेरिकेतल्या तरुण मुलांची ही स्थिती नाही. अमेरिकेतील तरुण मुलांना समजली आहे ही गोष्ट, की त्यांच्याकडे हे आईनस्टाईन वर्गैरे झाले पण त्यांना धर्म मिळालेला नाही. म्हणून ते संतापतात कशाला? त्यांच्यात किती दोष आहेत त्यांना माहिती नाही. आणि धर्म धर्म ही काय चीज आहे, म्हणून त्यांनी सांगितलं, 'हे सगळे सोडा. आम्हाला घर नको, दार नको, आई नको, वडील नको. आम्ही आपले मिळून घोळक्याघोळक्याने राहू आणि हवे तसे जीवन जगू. आम्हाला पैसा नको, काही नको. पैशाने हे सगळे धंदे होतात.' सगळे सोडून निघाले. कोणाचा काय फायदा होणार आहे त्याने? समजा आम्हाला किती वाटले तरी आम्ही हे तरी धरू नाही तर ते तरी धरू, आम्ही जमिनीवर उभे आहोत. त्यावेळी काहीही सोडायचे नाही. कोठेही उभा आहे तरी मनुष्य मजेत उभा असतो. आपल्या आतमध्ये परमात्म्याने याची व्यवस्था एवढी सुंदर करून ठेवली आहे. आपली साक्षात आई आपल्या पोटात आहे. आपल्याला जन्म देण्यासाठीच ती सारखी तिथे बसलेली आहे की तुम्हाला पुनर्जन्म देऊन तुम्हाला त्या राज्यात घालणार आहे की जिथून तुम्ही दुसरे होणार. ती साक्षात तुमच्यात बसलेली आहे. पण लोकांना त्याची कल्पना नाही. आपली दष्टी कोठे आहे? पैसे किती मिळतात आजकाल! नाही तर मग इलेक्शनला उभे राहून पहावे, नाही तर काही तरी सेवा बिवा करावी लोकांची. याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही, पण तसेही जाऊ शकत नाही. प्रयत्न करूनसुद्धा आपण धर्मात उतरू शकत नाही. घोड्यावर बसल्यासारखे हे वाचवायचे, ते वाचवायचे, ही वेळ वाचवायची, ती वेळ वाचवायची. कशासाठी वेळ वाचवायची? अहो, समाधान कोठे आहे ते बघायचे आहे आम्हाला. खरोखर ही वृत्ती देवाने दिलेली आहे. घड्याळसुद्धा देवाने दिलेले आहे. सगळे जे काही बाहेर आहे ते आतमधूनच आलेले आहे. म्हणून घड्याळ एवढ्यासाठीच दिलेले आहे, की तुम्ही वेळ वाचवा. कशासाठी ? आपल्या आतमध्ये जाणा. जरासा वेळ रिकामा मिळाला तर मनुष्य घाबरा होतो. जातो मग सिनेमाला वगैरे कोठे तरी. जरासा वेळ एकटा बसून घालवू शकत नाही. पाच मिनिटे त्याला म्हटले एकटा बस तर स्वत:ला भेटू शकत नाही. पळतो तिथून. कारण आपण स्वत: घाणेरडे आहोत याची त्याला कल्पना आहे. खरे म्हणजे इतके आपण सुंदर आहोत स्वत:. मला जर सांगितले 'तीन महिने तुम्ही इथे खोलीत बसा,' आनंदाने मी बसेन! मला १० 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-10.txt कधीही त्याचा त्रास होणार नाही. मी सुंदर आहे म्हणून नाही तर तुम्ही सुंदर आहात ते सुद्धा मी तिथे बसून बघू शकते. किती सौंदर्य आहे त्याची तुम्हाला कल्पनाच नाही. आता आजच्या सहजयोगाला तुम्ही असे समजायचे साध्या भाषेत, की म्हणजे असं आहे कुंडलिनी शास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यापैकी पुष्कळांचे म्हणणे आहे की, कुंडलिनी बिघडते, कुंडलिनी कोणी उठवली तर त्रास होतो, हे होते, ते होते. पुष्कळ तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी लोक सांगतात. खरे म्हणजे काय आहे, की जे लोक कुंडलिनी उठवतात ते त्याला असे समजतात की काही तरी यांत्रिक गोष्ट आहे. मेकॅनिकल गोष्ट आहे. आणि नाही तर त्याच्यावर सेक्ससारखा घाणेरडा आरोप करतात. ही तुमची आई आहे. आई सगळे तुमचे खून माफ करू शकते. तुम्ही तिला मारून टाकले तरी ती ब्र म्हणणार नाही. पण तुम्ही जर तिच्यावर सेक्सचा आरोप केला तर ती चिडणार नाही तुमच्यावर? जे असे बोलतात की कुंडलिनी चिडते, ते सगळे असल्या प्रकारचे आरोप तिच्यावर करतात म्हणून. खरोखर म्हणजे अशी कोणी व्यक्ती जर असली, ज्याच्यामध्ये परमात्म्याचे प्रेम वहात असले, सहजच त्याला असे, जसे आपण पाणी देतो ना झाडाला, जसं पाणी दिल्याबरोबर, एखाद्या फुलाचे कसं सहज फळ होते, तसे तुमचेसुद्धा फळ होऊ शकते. पण पाणी द्यावे लागते, जर तुम्ही त्याच्यावर रॉकेल ओतले तर! पाणी हे जीवन आहे. रॉकेल हे मेलेले आहे. मेलेल्या गोष्टींनी कुंडलिनी जागृत होऊ शकत नाही. कुंडलिनी म्हणजे साध्या शब्दात सांगायचे म्हणजे आता हा माईक आहे नं माझा, ज्याच्यावर मी बोलत आहे, त्याला आधी आम्ही तयार केले आहे व्यवस्थित. देवांनी असेच माणसाला तयार केलेले आहे. प्रत्येकाला, मग तो शिक्षित असो, अशिक्षित असो, हिंदुस्थानचा असो की इंग्लंडचा असो की अमेरिकेचा असो त्याचा काही फरक नाही हे जसे मशीन सुंदर तयार केले आहे तसे परमात्म्याने मनुष्याला तयार करून, त्याच्यामध्ये हे कनेक्शन आहे नां, ते लावून ठेवले आहे. आता हे कनेक्शन परत त्या परमात्म्याला लावायचे, एवढे कार्य म्हणजे सहजयोग. अगदी साधी गोष्ट समजावून सांगायची म्हणजे अशी. त्याचे पुष्कळ शास्त्र आहे, मी पुस्तक पण लिहीते आहे त्याच्यावर. जर कोणाला इच्छा असली तर त्याने ते वाचावे. मी पुस्तक लिहिण्यासाठी आजपर्यंत का...क.. करीत होते कारण की पुस्तक लिहिले की बसले हातात बायबल घेऊन. ह्या याच्यामध्ये हे लिहिलेले आहे, ह्या त्याच्यामध्ये हा मंत्र आहे. मंत्र पाठ करत बसले परत. म्हणून पुस्तक लिहायचीसुद्धा मला थोडीशी चोरी वाटते. भाषणाचेसुद्धा तसेच आहे. भाषणामध्ये सुद्धा असे पुष्कळ लोक असतात, की त्यातलं तेवढं धरून ठेवतात, की ज्याने आपला अटकाव बाहेर राहील. मी म्हणते माझे भाषणसुद्धा विसरा. सगळे काही विसरा . जसे सबंध तुम्ही पायरी चढून आलात, उतरलात आणि आतमध्ये आलात, तसे सगळे विसरायचे. मंत्र म्हणायचा नाही, गुरू म्हणायचा नाही, जप करायचा नाही. सगळे विचार आहेत. दोन विचारांमध्ये लहानशी जागा असते. तिथून मला तुमचं हे जे लक्ष माझ्याकडे आहे ते आतमध्ये घेऊन जायचे आहे. तेव्हा कोणताही विचार, मग तो गुरू असेना का, धर्म असेना का किंवा देवाचे नाव असेना का, तुमच्यासाठी तो विचारच आहे आणि तो एकदा झाल्यावर मग गुरूला अर्थ येतो मग रामाच्या मूर्तीला अर्थ येतो, प्रत्येक गोष्टीला अर्थ येतो. आता मी ज्याच्यावर बसलेली आहे त्या शालीतसुद्धा माझी व्हायब्रेशन्स आहेत. माझ्या पायाचे फोटो नुसते घेऊनसुद्धा या लोकांनी पुष्कळ रोगी बरे केले म्हणजे अर्थ येतो त्यात. पाणी जर माझ्या पायाचे धुऊन नेले, तर त्याने पुष्कळ रोगी बरे झाले आहेत. खरी गोष्ट आहे. मला त्याचे काही आश्चर्य वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल कारण ही परमात्म्याची शक्ती जी आहे त्याने सबंध सृष्टीची रचना केलेली आहे. तर या लहानशा गोष्टी करण्यामध्ये काय विशेष? समूळ रोग जाऊ शकतात, पण ११ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-11.txt पहिल्यांदा आपल्या आतली शक्ती प्रत्येकाने मिळवली पाहिजे आणि संपूर्ण स्वतंत्रतेत मिळाली पाहिजे. गुरू तरी आजकाल पायलीचे पत्नास म्हणतात तसे निघाले आहेत. उठल्यासुठल्या प्रत्येक गावोगावी गुरू निघालेले आहेत. अमेरिकेला याचे पेव फुटलेले आहे. तिथे जाऊन हे काय करतात, तर मोहिनी विद्येने तुमच्यावर अस्त्र घालून, आहे पद्धत, तुमच्या जवळ जेवढे पैसे असतील, जे असेल ते सगळे मागून घ्यायचे व त्याच्यानंतर व्यवस्थित चंगळ करायची. मी असे म्हणते, की देवाच्या ह्या कार्याला पैसा कशाला पाहिजे. एक सरळ गोष्ट आहे. अहो, हे फुकटात झालेच पाहिजे. जे काही महत्त्वपूर्ण आहे ते फुकटच होते. जो काही आपला श्वास चालतो, आपले जे हृदय चालते ते कसे चालते ? डॉक्टरांना विचारा. ते म्हणतील, हे सगळे स्वयंचलित आहे. मग हा 'स्वयं' कोण? तो स्वयं कोण आहे, सांगा जो हे चालवत आहे आणि किती सहज, तसच हे महत्त्वपूर्ण कार्य झालेच पाहिजे. हे जर कठीण असते तर होणारच नाही. आपल्याला इकडून जेवता येतं पण इकडून जाऊन, तिकडून जाऊन हातपाय तोडून तेव्हा आपण जेवलो, नाही तर इतके सहज कसे जेवलो! मी साधे एक आईचे उदाहरण देते. 'मी स्वयंपाक केलाय तुमच्यासाठी. तुम्हाला भूक आहे का? ताट वाढलंय जेवायला. भूक असली तर सरळ बसा, नाही तर म्हणा, 'आई, तू कुठे गेली होतीस ? कोठून आणलेस हे तू ? कसे केलेस हे तू ?" उद्या मी तुम्हाला जर एक रेडिओ बक्षीस दिला, तर तुम्ही काय लगेच उचलून बघाल छानपैकी, 'आईने आम्हाला रेडिओ दिला. ऐकावं त्याचं' का तुम्ही त्याचे सगळे इंजिनियरिंग आधी बघाल ? 'आधी इंजिनियरिंग सांगा नाही तर आम्ही रेडिओ ऐकत नाही.' असे म्हणाल. संसाराच्या गोष्टींबद्दल माणसाला हा उहापोह नाही. समजा, मी उद्या जर म्हटले की, 'इथे हिरा पडलेला आहे.' दिल्लीला जर हे अनाऊन्स झाले तर दिल्लीहन इथे लोक प्लेनने येतील तो बघायला! हिरा असाच तयार आहे. तो घेऊन तर बघा, मग बघुया! धर्माच्या बाबतीत माणूस उलटा चालतो. इतकं तुम्ही पैशाशिवाय कसं देता ? इतके सोपे कसे ? उलटेच आहे. हे आताच सांगितलंय, सगळं जे महत्त्वपूर्ण असते, ते सोपेच असले पाहिजे. पुष्कळांनी मला अमेरिकेत सांगितले , 'श्रीमाताजी, प्रत्येक मनुष्य आमच्याकडून दीडशे ते तीनशे डॉलर्स घेतो आणि तुम्ही इथे एक पैसा घेत नाही हे कसे काय ?' म्हटले, 'हे बघा, तुम्ही सांगा मला त्याची किंमत किती लावायची. मला समजत नाही याची किंमत काय. तुम्ही लावा किंमत.' म्हटले हे सगळे उपटसुंभ लोक आहेत. तुम्हाला मूर्खात काढायला इकडे आले आहेत. तुम्ही मूर्खासारखे त्यांना पैसे देता. तुम्हाला मिळाले काय? व्यवस्थित तुमच्या अंगावर भगवी वस्त्रे घातली, आपल्या माळा घातल्या आणि सगळीकडे आपली जाहिरात करत फिरत आहेत ! आणि आनंद तुम्हाला होतो, की आम्ही देवासाठी केवढे करतो. मग दहा वर्षानी जेव्हा वेडे व्हाल तेव्हा माझ्याकडे पळत याल! सांगायचे म्हणजे सगळे हे प्रकार परलोक विद्येने होतात. जितके बाबाजी लोक आहेत सगळे परलोक विद्या करतात. भुतांचे तुमच्यावर स्थान बनवून त्या भूतांकडून हे सर्व कार्ये करून घेतात. तुमचा पैसा काढून घेतील, तुमच्या मुलाबाळांची नासधूस करून, तुम्हाला रस्त्यावर उभे करायचे आणि यांनी आपले गाठोडे बांधून अमेरिकेला निघायचे! चंबुगबाळे बांधून तिथे बसलेले असे अनेक गुन्हेगार आज तिथे आहेत. यांना धूळ फेकण्याची कला अवगत असल्यामुळे लोकांच्या हे लक्षात येत नाही आणि आपल्याला आश्चर्य वाटेल या कलियुगात पाच राक्षस आणि पाच राक्षसिणी जन्माला आलेल्या आहेत. रावणापासून नरकासुरापासून सगळे जन्माला आलेले आहेत आणि आपले आपले रंग दाखवत आहेत. स्वत:ला रावण म्हणविणार नाहीत. स्वत:ला देव, भगवान असे तसे म्हणवून घेतील! तुम्हाला ओळखायला यायचे नाहीत ते! मायावीपणा आहे त्यांच्यामध्ये! आपण ऐकले असेल की, मायावी राक्षस! ते सगळेच्या सगळे जन्माला आले आहेत आणि आपण मूर्खासारखे 'बाबाजी आ गये, बाबाजी आ गये और हमको दो सौ १२ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-12.txt रुपया निकाल के दे दिया।' अरे दो सौ रुपया तुमको काहे को दिया ? तुम तो करोडपति हो! किसी गरीब को दो नां! सगळ्या श्रीमंतांच्या गळ्यात हिऱ्याच्या माळा दिलेल्या आहेत! त्यांच्याकडे काय हिरे कमी आहेत? द्यायचे तर गरीब लोकांना वाटा! एक आमचे नातलग आले आणि मला म्हणाले, 'बाबाजींनी आम्हाला अंगठी दिली हिर्याची. श्रीमंत आहेत फार.' म्हटले 'तुमच्याकडे किती आहेत?' 'होगी दस- बारा!' म्हटले, 'तो ये और तेरहवी काहे को ले ली ? अगर दस बारह से तुमको आनंद नहीं आया तो ये तेरहवी से आयेगा क्या? इसको काहे को ले ली भाई?' कहे, 'नहीं, वो मेरे भक्ति को देख के दिया।' म्हटले, 'अरे, भक्ति क्या बाज़ार में मिलती है क्या? पागल हो कि रूपये देकर बाज़ार में खरीदो!' म्हणाले, 'ऐसे कोई ज़्यादा रूपये नहीं दिये। मैंने कुछ पाँच-छः हजार रूपये दिये। मन में आया कुछ तो रूपया देना चाहिये, अंगुठी दे दी।' त्या अंगठीत भूत बसविलेले आहे त्यांनी. हे अंगठी फिरवताहेत आणि सगळे सांगते आहे तिकडे! ही परलोक विद्या आहे आणि सगळेच्या सगळे राक्षस कलियुगात ते भूत आलेले आहेत आणि इकडे मी एकटी मात्र प्रेमाच्या गोष्टी सांगत आहे लोकांना ! आणि म्हणते की, सहजयोगात या! आपल्यामध्ये आपला दीप लावा म्हणजे अंधार सगळा जाणार. त्या अंधाराला मारून ओरडून तो नाही जाणार. हा अंधार आपल्या दीपाने जाणार आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये एवढा प्रखर दिवा आहे जो या सगळ्यांना जाळून पोळून संपवून टाकेल आणि तो प्रेमाचा आहे. प्रेमाचे हे वैशिष्ट्य आहे की, समुद्राची जशी ढाल असते ती कितीही समुद्र मोठा आला तरी ती मोठी होत जाते, तसे प्रेम मोठे होते. प्रेमाचा आरसा सर्वत्र अशा बाबतीत वर आहे. त्या आरशात सगळे जग आत आहे आणि तो मंत्र तुमच्यातून वहायला सुरुवात झाली की सगळे पळतात की नाही आपले चंबूगबाळे आवरून. या संसारातूनच गेले पाहिजेत. मी तर इतके म्हणेन की जर श्रीकृष्ण आले तर कंसाला मारणार. तो मेला तरी परत परत जन्म घेणार. राम आला तर रावणाचे फक्त शरीरच मारतो आणि तो परत परत जन्म घेतो. त्या पेक्षा त्याचे परिवर्तन पूढल्या जन्मी तरी साधेल अशी परिस्थिती आलेली आहे. आपल्याला धुळ्याला बघू कसे काय जमते ते! इथली पुण्याई मी बरीच ऐकली आहे. व्यासांचे पण जवळपासच स्थान आहे. इथल्या वातावरणामध्ये असे तरंग आहेत. मला आतून जाणवत आहेत. कार्य होऊ शकते, पण मी एक दोन गोष्टींबद्दल म्हणते की, हट्ट करू नका. मुलगा जर हट्ट करून बसला की आईला फार त्रास होतो. समजावून सांगितले, किती समजावले तरी हट्ट करतात मुले. आता फार झाला हट्ट. आम्ही आलो आहोत तेव्हा घेऊन टाका. दारात गंगा आली तेव्हा घेतले नाही तर मग केव्हा घेणार? पण तुमची घागर भरलेली असेल तर गंगा तरी काय करणार? सूर्य तुमच्या दाराशी जरी आला, आपले दार उघडले नाही तर तो सूर्याचा दोष नाही. तरी तुम्ही परवा एक जण आले, म्हणाले, 'माताजी, बघा, माझी मुलगी इतकी आजारी आहे, तिला बरे केले तर मी तुम्हाला मानेन.' म्हटले, 'मी कोणाला बरे करीत नाही.' मी, तुम्हाला कल्पना नाही, काहीच करीत नाही! मी नुसती मधे उभी आहे. जसा हा माईक मध्ये उभा आहे आणि बोलत आहे. हा पण उद्या म्हणेल, 'मी बोलतोय.' मी काही म्हणत नाही. मी मधे उभी आहे. त्याला बरे करायचे असेल तर तो करेल नाही तर नाही करणार! माझे काही नाही. माझे काही उपकारही नाहीत आणि माझे काही देणे घेणे नाही. मी नुसती मधे उभी आहे. शेवटी एक गोष्ट सांगते मजेदार, राधा आणि कृष्णाची. एकदा राधेने मुरलीची (बासरी) तक्रार केली की, 'तू सारखी कृष्णाच्या तोंडाला का असतेस? तुझ्यात काय विशेष आहे ?' तर मुरली म्हणाली, 'अग १३ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-13.txt 3৯ MAIAMAAAVR वेडे, माझे वैशिष्ट्य एकच आहे की माझे कोणतेच वैशिष्ट्य नाही. मी पोकळ झालेली आहे. माझ्यात काहीही राहिलेले नाही. तो वाजवतो आणि मी नुसती ऐकते आणि बघते. मी तर अशी झालेली आहे. किती पोकळ झालेली आहे. मधे जर मी कुठे उभी राहिले तर त्याचा स्वर बिघडणार नाही. का ? ' तसेच तुम्हाला पोकळ व्हायचे आहे. पोकळ झाल्यावर आपल्याला कळेल की, आपल्यामध्ये किती मोठे सुंदर संगीत आहे आणि फार सौंदर्य असून सुद्धा आनंदमय आहे. सारखे ओझरत पाझरत आपल्याला येत असते. त्या प्रवाहाला नुसते सुरू करून देणे म्हणजे सहजयोग आहे. मला आशा आहे, आपण सगळेजण, विशेषत: मुलांना यात फार लवकर फायदा होतो. मुलांना १४ क० 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-14.txt इतक्या लवकर फायदा होतो कारण ते, साधे, भोळे जीव असतात. चटकन पार होतात. आणि पार झाल्यावर उभे राहून मला सांगतात, 'माताजी, इधर से जा रहा है, इधर से नहीं जा रहा है। ती बरोबर सांगतात. चटकन सांगायला सुरुवात करतात. आता मुंबईला दहा वर्षाचा एक मुसलमान मुलगा आहे, शब्बीर. तो पार झाला म्हणजे अगदी मस्त आहे. बरोबर सांगतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की एखाद्याला बाधा असतील तर बरोबर हाताला चटके बसतात आणि जेवढे बाबाजींचे शिष्य लोक आहेत, त्यांच्या हाताला चटके बसतात. पुष्कळांच्या हाताला ब्लिस्टर्स येतात. चांगले फोड, मोठे मोठे फोड येतात. या सर्व शक्त्या आहेत आणि काम करीत आहेत. अजकाल महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. तेव्हा लोकांचं असं अगदी डोक्यात चाललेले आहे की मला माहिती आहे की काही लोकांच्या डोक्यात काय चालले आहे! आता दुष्काळामध्ये, या गरिबी स्थितीमध्ये हे कसं काय पिकणार? एका अर्थाने मी म्हणते दुष्काळ आला थोडं बरं झालं. एकदा अशीच गोष्ट करत असतांना मी महाराष्ट्रातल्या एका फार मोठ्या नेत्यांना म्हटलं होतं कि तुम्ही इथे विहिरी का खणत नाही? विहिरी खणल्या पाहिजेत. पंजाबात किती आहे विहिरी.' तर म्हणाले, 'अहो, त्याला पैसा फार लागेल. असं होईल, तसं होईल. आता बघा. एखादा मनुष्य फार श्रीमंत असतो, तो खरं म्हणजे मनाने जराही श्रीमंत नसतो. मुंबईला माझा जो ड्रायव्हर आहे, मी म्हणते, हा राजा मनुष्य आहे आणि होता तो, पूर्व जन्मी तो राजा होता. त्याने पाहिले की, 'माझ्या रथाचा जो सारथी आहे तो माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे.' त्याने देवाजवळ असे म्हटले की, 'देवा, मला पुढच्या जन्मी सारथी कर. मला कंटाळा आला आहे राजेपणाचा.' तेव्हा तो या जन्मी ड्रायव्हर झाला पण तब्येतीने राजा आहे. तेव्हा श्रीमंती ही काय आहे ! अशा या गरिबीचे नाना प्रकार आहेत. खरोखर एखादा मनुष्य नुसता शांत होऊन जातो. त्याला कशाचीच गरज वाटत नाही. सगळे त्याच्या पायाच्या ठोकरीवर असते. काय चांदी, काय सोने, काय हिरे, सगळे दगड आहेत. अहो, ही काय श्रीमंती आहे का ? श्रीमंती मनाची असते. आता माझेच उदाहरण सांगायचे म्हणजे मला दोन दिवस जेवायला नसले तरी चालते. झोपायला पलंग नसला तरी चालतो व जमिनीवरही झोपते. आम्ही संत आहोत . आम्हाला काय ? अहो, संताला आराम काय ? आराम त्याच्या पायाशी असतो. जो आरामाच्या वर गेला तो खरा संत. तेव्हा गरिबी आणि श्रीमंती आपल्या डोक्याचे विचार आहेत. आपल्या प्रकृतीमध्ये पाहिले पाहिजे. एखादी बाई गरीब असेल, पण तिच्यात केवढी दानत असते! तेव्हा सांगायचे म्हणजे असे, की गरिबी आणि श्रीमंती सोडून त्या परमात्म्याला भेटून घ्या. जो तुम्हाला आतूनच सबंध श्रीमंती देतो. सबंध सृष्टीत जे झालेले आहे, ज्याला आपण पैसा, अडका, वैभव म्हणतो ते त्याच्या पायाच्या बोटाबरोबर किंवा करंगळी बरोबरसुद्धा नाही. सत्ययुग यायला पाहिजे. सत्ययुग आल्याबरोबर काय कमाल होणार आहे! मी त्या युगाची वाट पहात आहे, पण अगोदर ते हिंदुस्थानात येईल, की अमेरिकेत येईल असा मला प्रश्न पडतो. हिंदुस्थानातली माणसे अजून चक्रातून निघायची आहेत. असे मला पुष्कळ वाटते. विशेषत: आमच्या मुंबईची! बघुया! धुळ्याला कसे काय जमते. जमण्यावर आहे. त्याची कृपा आणि त्याचे प्रेम सतत वहात आहे. आम्ही मुंबईला ध्यानाचे प्रयोग करतो. आपली जर इच्छा असली तर ध्यानात जायचे. १५ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-15.txt ध्यानामध्ये फक्त आपल्याला डोळे मिटून बसायचे आहे. काहीही करायचे नाही. करायला निघाले म्हणजे देवापासून आपण दूर जाणार हे समजून घ्यायचं. काहीही करायचं नाही, आरामात बसायचं , जेवायला बसतो तसं. सहज वृत्तीने बसायचे. जी शक्ती माझ्यातून धावते आहे ती तुमच्यातूनही धावत जाईल. तुम्ही आजारी असाल तर बरे व्हाल. जर तुम्हाला काही त्रास असेल तर ती आम्हाला कळवेल आणि जर तुमची सगळी प्रकृती ठीक असली आणि जर तुम्ही कुठल्या गोष्टीला चिकटून बसलेले नसाल तर सहजच तुम्ही निर्विचार व्हाल, विचारांच्या पलीकडे जाल. खरोखर म्हणजे विचारांच्या पलीकडे जाणे अत्यंत कठीण गोष्ट आहे असे लोक म्हणतात. मला तसे वाटत नाही. आता इथून बडोद्याला जाणारा मनुष्य जर अमेरिकेला जाऊन जपानला जाऊन बडोद्याला पोहोचणार असेल तर असेच होणार, पण आम्हाला रस्ता माहीत असल्यामुळे ते अत्यंत सोपे आहे. अगदी सहज मार्गाने सहज होण्यासारखे आहे ते! अत्यंत सहज आहे. अत्यंत सहज भावाने तुम्ही बसा. हळूच तुम्हाला असे वाटेल की आपण निर्विचार झालो. निर्विचार झाल्याबरोबर आपण हात वर करायचा. ही मंडळी जाऊन बघतील की झाले आहेत की नाही. निर्विचार झाला असलात तर आपल्या कानात सांगतील. आज इथे पुष्कळशी मंडळी अशी आली आहेत की ज्यांना रोग आहेत, आजार आहेत. त्यांच्यापैकी जर लहान मुले असतील, फारच लहान मुले असतील तर त्यांना बाहेर घेऊन जा. कारण ती रडतील वगैरे आणि दुसर्यांना त्रास होईल. पंधरा-वीस मिनिटात काय तो निकाल लागेल. तेव्हा काहीही काळजी करण्यासारखे नाही. कोणालाही आजपर्यंत एवढासुद्धा त्रास झाला नाही. तेव्हा तो आपल्यालाही होणार नाही. हजारो माणसांच्या कुंडलिनी जागृत झाल्या आणि तिथेही हजारो माणसे पार झालेली आहेत. त्यांना आत्मदर्शन झालेले आहे. कोणालाही काहीही होणार नाही. पहिली अनुभूती ही की तुम्ही निर्विचार व्हाल. सायन्समध्ये ज्याची नुसती चर्चा केलेली आहे, त्याच्याबद्दल सगळे एकदम तुम्ही जाणू शकता तसे ते अगदी सोपे आहे. परवा मी सांगितले होते की या खोलीमध्ये अंधार असला आणि तुम्ही बाहेरून आलात, एकदम आत आलात आणि तुमचे डोळे बंद असले तर तुम्हाला सुचायचे नाही. हात धरून जर तुम्हाला कोणी सांगितलं की इथे दिवस आहे, बसा वगैरे, तर काही तरी चाचपडत राहिल्यावर नंतर दिसायला लागेल. एकदम सगळी खोली लक्षात येणार नाही. पण समजा एखादा कर्ता असा असला, असला, तर तो जसा खोलीमध्ये लाईट घालू शकतो, आणि सगळेच्या सगळे पाह शकतो. तेव्हा जर एखादा कर्ता असला की, तर तुमचे डोळे खाडकन उघडू शकतो, तुम्हाला सगळेच्या सगळे आतमध्ये दिसू शकतो. अमेरिकेमध्ये लोकांचे डोळे फार उघडले आहेत आपल्या मानाने. कारण त्यांचे सगळे झाले आता, पैसे झाले, घर झाले, द्वार झाले. सब्जेक्ट किती मजेदार आहे बघा, तुमचच वाहन आहे आणि तुमचा गुरूसुद्धा आहे. तुम्ही हे मनसुद्धा म्हणाल, की मला आता एक घड्याळ विकत घ्यायचे आहे, तर वेड्यासारखे धावाल, घेण्यासाठी. घड्याळ घेतल्याबरोबर वाटले काही मजा नाही येत याच्यात. मग पुढे दुसरीकडे धावायचे मग तिसरीकडे. सारखी धावपळ आपली चालली असते. आपले चित्त जिथे जाते तिथे तो (मन) आपल्याबरोबर जातो. पण प्रत्येक वेळेला आनंद त्याला येत नाही. प्रत्येक वेळेला तो सांगतो की मला आनंद आलेला नाही. मला आनंद मिळालेला नाही. मला विराम मिळालेला नाही. तेव्हा काही तरी दूसरे शोधायचे आहे अशी कल्पना तुम्हाला असते. तर हे मन तुम्हाला सारखे इकडून तिकडे पळवत असते. पण त्याला जर तुम्ही दाबून ठेवलेले असले, त्याच्यावर अत्याचार केलेले असले तर हे मन शेवटी मदत करणार नाही. तर या मनाचे तऱ्हेतऱ्हेचे प्रकार आहेत. ध्यानाला सुद्धा जेव्हा तुम्ही बसलेले असता, बघते, हे मन मधेच उभे राहन तुम्हाला काही तरी सांगते. घोडा बघतो की मालक कोठपर्यंत जाऊ शकतात. घड्याळ तेव्हा मी 16 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-16.txt जर मालकाने घोड्याला सांगितलं की, 'हे बघ,' याच्याबरोबर मैत्री करून की, 'हे बघ मला अमक्या ठिकाणी जायचे आहे,' की लगेच ते तयार होते की चला, तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे नेतो. पण घोड्याबरोबर मैत्री केली पाहिजे. हे मनोवैज्ञानिकांचेही म्हणणे आहे की घोड्याबरोबर मैत्री केली पाहिजे, पण कुठे जायचे आहे, कसे जायचे आहे हे कुणालाही माहिती नाही. कोणालाही हे माहिती नाही की तिथे जायचे कसे! ते आपोआप होतं, आपोआपच ते जमतं, हे कोणालाही माहिती नाही. दुसरी सायन्सची बाजू बघायची म्हणजे शरीरदृष्ट्या बघा, सायन्समध्ये डॉक्टर लोक विचारतील की काय असते कुंडलिनी वगैरे? तर जेव्हा मूल आईच्या पोटात दोन महिन्याचे असते तेव्हा ही जीव शक्ती त्या जीवात्म्यामध्ये येते. डोक्याच्या टाळूमधून आत शिरून, मेंदूच्या मधोमधे खाली या पृष्ठवंश रज्जू आहे त्याच्यातून जाऊन, स्पायनल कॉर्ड ज्याला म्हणतात आणि खाली हा त्रिकोणाचा जो हिस्सा आहे, त्याच्यात जाऊन बसते. ही कुंडलिनी शक्ती मधे मधे थांबत जाते. त्याच्यामुळे चक्र बनतात. ही चक्रे आतमध्ये सेंटर्स म्हणविली जातात आणि बाहेर डॉक्टर्स त्यांना प्लेक्सेस म्हणजे पॅरासिंपथेटिक नव्व्हस सिस्टीम म्हणतात. या पॅरासिंपथेटिक नव्व्हस सिस्टीमला हे लोक स्वयंचालित, ऑटोनॉमस नव्व्हस सिस्टीम म्हणतात. त्यांना विचारले की, 'हा स्वयं, ऑटो, कोण? जो हृदयाला चालवतो तो कोण?' तर डॉक्टर त्याचे उत्तर देत नाहीत. अमेरिकेत पुष्कळ न्यूरॉलॉजिस्टना मी भेटले. ते म्हणाले की, कॅन्सरला आम्ही एवढ्यासाठी ठीक करू शकत नाही की या पॅरासिंपथेटिक नव्व्हस सिस्टीमला चालना कशी द्यायची हे आम्हाला कसे जमणार? ते आपोआपच चालू होते. मी जेव्हा त्याला प्रॅक्टिकल करून दाखवले तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटले की तुम्ही पॅरासिंपथॅटिक नव्ह्हस सिस्टीम कशी चालवता ! ते बाहेर दिसून येते एक दोन प्रकारे. त्यापैकी एक म्हणजे डोळे डायलेट होतात, मोठे होतात. तुमचे जे रियलाईज्ड लोक आहेत, त्यांचे डोळे बघा. त्यांची बुबुळे मोठी व काळी झालेली आहेत. विचार हा करा की याच्यापेक्षा मोठा चमत्कार जगात काय असू कतो. हात हलवून दोनशे तीनशे रुपये काढणे हा काही चमत्कार नाही. अंगठ्या वगैरे काढणे हा काही चमत्कार नाही. हे भूत प्रकार आहेत. एकदा खूप मजेदार गोष्ट झाली. ब्राह्मणांकडे एकदा वरात आली. आपल्याला माहिती आहे. यूपीमध्ये केवढे मोठे प्रस्थ असते. आल्याबरोबर, त्यात काही खोडकर होते. त्यांनी हिवाळ्यात सांगितले की, आम्हाला दहीवडेच पाहिजे. आता दहीवडे करणे काही सोपी गोष्ट नाही. तिकडे ब्राह्मण लोकात हिवाळ्यात दहीवडे करीत नाहीत. तर तिथे एक बाबाजी होते. त्यांना निरोप गेला की ते अशा वस्तू आणून देत असत. त्यांना निरोप गेला की तुम्हाला जेवढे रुपये हवे आहेत तेवढे घ्या पण आम्हाला दहीवडे आणून द्या. तर बाबाजी गडबडले. ते म्हणाले की, 'मी दहीवडे आणून देतो पण तिथे थांबणार नाही. पैसे घेऊन निघून जाणार. 'बरं' म्हणाले. 'तुम्ही घ्या आणि चालते व्हा.' त्यांनी त्याला पैसे मोजून दिले आणि बाबाजींनी दहीवडे लावून दिले. खोली बंद केली. आतमध्ये दहीवडे होते. सगळ्यांनी चांगले खाल्ले आणि बाबाजी पसार ! सगळे पैसे घेऊन पसार! दुसऱ्या दिवशी सकाळी मांगवाड्यातले काही मांग आले. आपल्याकडे वाजंत्री वगैरे वाजवतात तसे तिकडेही असतात. आले की मग उष्टे वर्गैरे काढतात. तर ते म्हणाले, 'आमच्या तिथले हे कुल्हड कोण घेऊन आले ? आमच्या तिकडे दहीवडे केले होते. ते कोणी आणून ठेवले इकडे? सगळे ब्राह्मण चिडले. सगळी वरात रुसली. आता जी भूते असतात ती असली कार्ये करतात. ती आपली सूक्ष्मता कुठल्याही जड पदार्थावर घालून त्याला सूक्ष्म करतात. आणि आणून ठेवतात. तुम्हाला ते दिसत नाही. ही भूतविद्या झाली. पण ते काय स्वस्थ बसणार आहेत ? उद्या त्यालाही खातील. अहो, आपणच आहोत. बघा समजा कोणाला दोन पैसे दिले तरी आपण लक्षात ठेवतो, 'बघा! अहो त्या दिवशी मी त्याला दोन पैसे दिले होते आणि त्याला माझा जरासुद्धा उपकार नाही.' तर काय भुते 17 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-17.txt विसरणार आहेत का त्यांचे उपकार. त्यांनी तुमच्यावर जराही उपकार केले असेतील, समजा एखाद्या माणसाला बरे केले. इंग्लंडला असं आहे, एक डॉलेन नावाचा मनुष्य होता, तो मेला आणि त्याचे भूत एका सैनिकावर जाऊन बसले आणि त्याला सांगितले की त्याचा मुलगा अमक्या ठिकाणी राहतो आणि त्याला जाऊन सांग की त्याचा बाप आहे मी. तो माणूस तिथे गेला आणि त्या मुलाला सांगितले तेव्हा त्याला फार मोठे आश्चर्य वाटले. तेव्हा तो म्हणाला, 'बरं, तुम्ही दोन-चार खुणा सांगा.' त्यांनी सांगितले, 'अशा खुणा आहेत, तशा खुणा आहेत वगैरे.' त्या मुलाला ओळख पटली. त्याने विचारले, 'बरं, मग आता काय करायचे.' ते भूत म्हणाले, आता माझे क्लिनिक उघड आणि सगळ्यांना सांग की ज्याचे काही आजार असतील, त्यांनी आम्हाला पत्र जरी लिहिले तरी आम्ही तुम्हाला औषध तयार करून देऊ आणि बरे करू.' आणि सुरू झालं क्लिनिक. त्या डॉक्टरचे पुष्कळ मित्र होते ती ही भुते होती आणि सगळे कार्य करू लागले. 'तू पण काम केल्यावर त्याचा उपकार ते लावणारच. म्हणजे त्यांची आणखी दहा भुते तुमच्या घरात आली. मग तुम्ही माताजींकडे 'माताजी, हा काय त्रास आहे. ' अशी तऱ्हतऱ्हेची भुते आजकाल पसरविणारे मोठे मोठे एजंट्स आलेले आहेत. काही लोक तर नुसत्या भाषणाने तुमच्यावर भूते घालू शकतात. भाषण दिले की लोक घुमायला लागतात, घुमून नाचायला लागतात. त्यांची स्तुती पण गातात. आणि त्यांना असे लोक पाहिजेत पैसे कमवायला, सत्ता कमवायला. तेव्हा शास्त्रीय दृष्ट्यासुद्धा, शारीरिक दृष्ट्यासुद्धा जेवढे आपल्यामध्ये प्लेक्सेस आहेत बरोबर तेवढीच आपल्यामध्ये चक्रे आहेत. ऋषीमुनींनी पुष्कळ वर्षापूर्वी लिहिलेली चक्रे आणि त्याच्यातले बघा अगदी एकसारखे आहे. आता मूलाधार चक्र. मूलाधार चक्राला इंग्लींशमध्ये पेल्व्हिक प्लेक्सस म्हणतात. इथे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांना कळेल मी काय म्हणते आहे ते. पेल्व्हिक प्लेक्ससला चार सबप्लेक्सेस असतात. मूलाधार चक्राला बरोबर चारच, चतुर्दले म्हणतात. म्हणजे त्या कमळाच्या चारच पाकळ्या असतात. पेल्व्हिक प्लेक्सेस म्हणजे मनुष्य जेव्हा मनुष्य साधारण स्थितीमध्ये असतो, तेव्हा त्याच्या नुसत्या धारा दिसतात. जो मनुष्य पूर्णपणे प्रकाशित असतो त्याचे पेल्व्हिक प्लेक्सेस बरोबर अगदी कमळाच्या चार पाकळ्यांसारखे आणि मधोमध असा गोल दिसतो आणि त्या गोलात, तुम्ही बघायला गेलात म्हणजे तुम्हाला दिसणार नाही सध्या, पण एक सांगते आमच्यासारख्यांची गोष्ट-आतमध्ये त्याच्यावर दुष्टी ठेवली. त्या गोलाकारामध्ये एक असा बिंदू फिरतो आणि त्या बिंदमध्ये काय दिसते, श्रीगणेश! तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. श्री गणेश काही आम्ही केलेला देव नाही. आम्ही काहीही केलेले नाही. सगळे आतूनच आलेले आहे. श्री गणेश इथे दिसतात. श्री गणेश दिसायच्या आधी त्याची सोंड दिसते आणि पुष्कळशा द्रष्ट्यांनी त्यालाच कुंडलिनी समजलेले आहे. म्हणजे केवढी मोठी प्लेक्सेसचे एक अंग आहे, तिथे कुंडलिनी बसलेली आहे असा उलटा प्रचार करून, सबंधच घोटाळा करून ठेवलेला आहे आणि तो घोटाळा इतका मोठा झाला आहे, कुंडलिनी जी तुमची आई, जिचा सेक्सचा काही संबंध नाही, तिच्यावर सेक्सचा आरोप केल्यावर ती चिडते आणि ती चिडून तुमच्यावर त्याचे मोठे आगीचा बंब फुटल्यासारखे फोड येतात तेव्हा तुम्ही पुस्तके लिहिता की, कुंडलिनीला हात लावू नका. ती तुमच्यावर चिघळते. चिघळणारच! अरे ती तुमची साक्षात आई आणि तिच्यावर तुम्ही असा घाणेरडा आरोप करता ! चूक झाली ! म्हणून सेक्स जे पेल्व्हिक १८ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-18.txt आता श्रीगणेशाचे किती सुंदर आहे बघा. श्रीगणेश हा चिरबालक आहे. इटर्नल चाईल्ड, चिरबालक आहे. तर आपले अचेतन मन आपल्याला असे सांगते की, प्रभू, जो आपल्या आतमध्ये बसलेला आहे, तो काय सांगतो, की जेव्हा तुम्ही तुमच्या अध्यात्मिकतेमध्ये उतराल, अध्यात्मात, सेक्सच्याबाबतीत तुमची भावना अगदी लहान मुलासारखी हवी. आपल्या आईकडे दृष्टी लहान मुलासारखी असते. जेव्हा तुम्ही लहान मुलासारखे व्हाल, तेव्हा तुमची आई तुम्हाला भेटेल, नाही तर भेटणार नाही. ज्या माणसांना अशी घमेंड असते की, आम्ही म्हणजे काय विद्वान ! आम्ही हे पुस्तक वाचलंय, ते पुस्तक वाचले आहे, कधीही त्यांचे रिअलायझेशन व्हायचे नाही. आईचे असे आहे, रामदास स्वामींनी म्हटले आहे. 'आई स्व... जेव्हा लहान बाळ असते तेव्हा आई कशी त्याला वेळेवर दूध देते आणि त्यांचे संगोपन करते तुम्ही जर लहान बाळासारखे झालात, की जे काही वाचले आहे ते बेकार आहे, जे काही आम्ही जाणलं आहे ते बेकार आहे, आम्ही लहान मुले आहोत, तर आई समजते. खटकन् तुमचे रिअलायझेशन होईल. पुष्कळांचे होत नाही. लोक म्हणतात, 'श्रीमाताजी, असं कसं, तुमची इच्छा झाली म्हणजे व्हायला पाहिजे.' आम्हाला इच्छाच होत नाही कसली. ही आश्चर्याची गोष्ट आहे. आम्हाला तुम्हाला रिअलायज्ड करायची इच्छा नाही, की कसलीच इच्छा आम्हाला नाही. निरिच्छा! पण त्याला करायचे आहे, म्हणून तो येऊन करतोय माझ्यासाठी. दिसायला मी समोर आहे तुमच्या. आतून त्याचे काम चालू आहे. तो म्हणत नाही तुम्हाला. त्याला कारण काय ते मी सांगू शकते. त्याला कारण हे की तुमच्यामध्ये ती बाह्य स्थिती आलेली आहे. स्वतःला काही तरी शिष्ट समजून, मोठे समजून बघा. रिअलायझेशन व्हायचे नाही. तुम्ही असाल मोठे शेठ, तिथे देवाच्या समोर तुम्ही कोण! त्याला भिकारीही चालत नाही आणि शेठ ही चालत नाही. त्याला एक लहान मुलगा, जो भिकारी नाही, चालतो. साध्या लहान मुलाला तुम्ही विचारा बरे, अगदी सरळ गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक मुलगा होता. तो फार लवकर बोलू लागला. तर मुलाला मी विचारले, 'मुला, तुम कौन हो, हिंदुस्तानी हो?' तो म्हणाला, 'नहीं।' 'जपानी हो ?' 'नहीं।' 'मुसलमान हो?' 'नहीं।' 'तो तुम कौन हो?' तो म्हणाला, 'माँ, तुम भूल गयी। मैं तुम्हारा मुन्ना हूँ! यही सत्य है। एकच सत्य आहे, 'मैं तुम्हारा बच्चा हूँ। कितने साल से तुमको खोजते रहे हैं। सगळे खोटे लेबल्स, हिंदुस्थानात जन्मले म्हणून हिंदुस्थानी झाले, पाकिस्तानात जन्मले म्हणून पाकिस्तानी झाले. जेव्हा जन्मता तेव्हा काय तुमच्या डोक्यावर लिहन आलेले आहे ? जरासे मोठे झालात म्हणजे बघू काय करता ते!' हिंदुस्थान तरी कोणी बनवला? माणसांनीच बनवला. त्या देवालासुद्धा आश्चर्य वाटत असेल की, मी हे केव्हाही बनवलेले नाही. अहो, त्याला रंग भरायचे असतील. सर्व सृष्टी त्याने बनवून टाकली तेव्हा आपण एकाला हिंदुस्थान केला, एकाला अमेरिका केला, हे केले, ते केले. त्याच्यावरून वादविवाद, 'आम्ही ब्राह्मण, आम्ही हिंदू, आम्ही मुसलमान, आम्ही अमुक तमुक.' तुम्ही कोण? कोणीही नाही. तुम्ही मुलं आहात. आता आपल्याकडेही बायकांचं असतं की, 'आम्ही बायका. आम्हाला शिवायचे नाही. वगैरे.' हा एक वेडेपणा दुसरा. एकदा मीरा वृंदावनला गेली होती. तिथे तुलसीदासजी मोठे ब्रह्मचारी बनून, ते काही रिअलायज्ड नव्हते, असते तरी म्हणाले नसते, आले आणि त्यांनी मीराबाईला निरोप पाठविला. 'मला तुम्हाला भेटायचे आहे.' त्यांनी सांगितले, 'मी बालब्रह्मचारी आहे. (हे खोटे मी आहे. ते बालब्रह्मचारी नव्हते. त्यांच्या बायकोनी त्यांना काढले म्हणून ब्रह्मचारी झाले.) म्हणून बायकांचे तोंड बघत नाही.' मीराबाईंनी त्यांना उत्तर पाठवले की, 'या वृंदावनात माझ्या कृष्णाशिवाय दुसरा कोणी पुरुष रहात असेल असे मला वाटले नाही. माझी सगळी मुलेच राहतात असे मला वाटते. तेव्हा त्या माणसाला लाज वाटून त्याने सांगितले, 'आई मला क्षमा कर.' हा आपल्या दृष्टीतला फरक १९ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-19.txt आहे. हा सगळा आपल्या दृष्टीतला फरक आहे. ज्या बाईला सर्व संसारच आपला मुलगा आहे, तर हा ही आपला मुलगा. माझी मुले आहेत. त्यातला सर्वात मोठा मुलगा ९२ वर्षाचा होता. होता म्हणजे आत परवाच गेले ते. विसरले नाही. त्याला पुनर्जन्म दिला. तेव्हा आपल्या वृत्तीत जर पाप नसले तर सगळी आपली मुले आहेत. पण स्त्रीला स्त्री असायला पाहिजे, पुरुषाला पुरुष असायला पाहिजे. (असे नाही की स्त्री आणि पुरुष असे कुठे तरी जात आहेत ?) हा असला प्रकार नाही चालणार आमच्या सहजयोगात. असली काही मंडळी असतात की पुरुष बाई आणि बाई पुरुष. असले चालायचे नाही. सहजयोगाला पुरुष, पुरुषच असला पाहिजे, दणकट आणि बाईने सौम्यच असले पाहिजे, बाईसारखे. तेव्हा अमेरिकेत बायका मला म्हणाल्या, 'म्हणजे तुम्ही पुरुषांचेच राज्य आमच्यावर लादता.' मी म्हटले काय राज्य करतील ते! आम्हीच राण्या आहोत खरे म्हणजे ! तसा स्त्री एकटीच घरात सगळ्यांचा बोजा उचलते. आम्ही शांतपणाने उचलतो तो बोजा. शांत असली तरी शक्तीशाली तीच आहे. कुटुंब तीच चालवते. रामाने सीतेला सांगितले 'तू वनात जा.' सीता मॉडर्न असती तर तिने फिर्याद ठोकली असती, 'सगळ्या लोकांच्यासमोर लग्न करून मला घेऊन आलास आणि आता मला वनात जा म्हणतोस, हा अन्याय आहे मला आता मूल होणार आहे म्हणून डबल फिर्याद ठोकली असती आणि दोन मुले झाली असती तर आणखी फिर्याद ठोकली असती. ही मॉडर्न लोकांची कामे. पण सीतेचे कार्य बघा, चुपचाप वनात निघून गेली. सबंध कलंक सोसून राहिली ती. अपमान झाला तरी काही हरकत नाही! मुले झाली त्यांचे संगोपन केले. नवऱ्याचा राग तिने हे मुलांवर काढला नाही. आपल्याकडे बायका नवऱ्याचा राग मुलांवर काढतात. या काय बायका झाल्या, पुरुष. बायका म्हणजे राग गिळून आनंद देणाऱ्या त्या बायका, त्या नारी, त्यांनाच म्हणायचे. 'यत्र नाय्यास्तु पुजयन्ते तत्र रमन्ते देवता:', ज्या आनंदाचा वर्षाव करतात त्या बायका! पुरुषांशी स्पर्धा करायला नको आणि पुरुषांनी त्या धोब्यासारखे वागायला नको, ज्याने सीतेला काढलं. (त्यासाठी कारणीभूत ठरला. ) सीता जशी निघून गेली, वनात राहिली. (जिची सेना जशीच्या तशी ?) तिच्या पावित्र्याला कोण हात लावील? तिला कोण हात लावील? एवढा मोठा रावण धजला नाही तिच्या समोर ! ती एकटी वनात राहिली. इतके दिवस आपल्याला माहिती नसेल, की सीता जेव्हा परत मिळाली तेव्हा रामाने तिला हाक मी मारली, जवळ बोलावले, तेव्हा तिने त्याला सांगितले, 'बघ तुझा त्याग केला मी, माझा त्याग बघ, माझा त्याग केला.' गेली निघून ती, पृथ्वीत सामावली. रामावरही एकसुद्धा कलंक लावला नाही. सामावून गेली ती आपली पृथ्वीमध्ये. रामाने शरयू नदीमध्ये सीता, सीता असे म्हणत आत्महत्या केली असे म्हणतात. ही पुरुषांची रीत झाली. पुरुषांनी पुरुष व्हायलाच पाहिजे. बायकांनी बायका रहायला पाहिजे. त्याच्यात सौंदर्य आहे. बायका जशा आहेत तशाच सुंदर दिसतात. थोडा उशीर होईल त्यांना. लगबग होणार एवढं व्यवस्थित नाही चालायचं!.. आपल्याकडे बायकांची काही काही उदाहरणे आहेत. नूरजहान, काय बाई होती! नूरजहानचे प्रेम बसले होते सलीमवर, त्याच्याशी लग्न करायचे होते. पण अकबराने तिचे लग्न दुसर्या माणसाबरोबर लावून दिले. तर ती निघून गेला. कलकत्याच्या जवळ जाऊन तिथे तो राहिला. मग त्याची सगळी सेवा केली. पुष्कळ वर्ष ती राहिली तिथे. मग सलीम जेव्हा राजा झाला, तेव्हा त्याच्या राज्यकारभारात तिचा नवरा मारला गेला. तिला असं कळलं की त्याने मारले. ते खरे की खोटे देवालाच माहिती. पण हिची वर्तणूक बघा. ती पण मुसलमानच होती ना! बघा तिची वर्तणूक सीतेपेक्षा काही कमी नाही. जेव्हा हा गेला तिच्याकडे, तिच्या पाया पडला, पण ती म्हणाली, 'मी येणार नाही.' तेव्हा तिला अटक करून घेऊन गेला. तेव्हा ती म्हणाली, 'खबरदार माझ्या अंगाला हात लावलास २० 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-20.txt तर !' त्याची हिम्मत झाली नाही. तिला अटक करून आणले. तेव्हा ती एका लहान घरात जाऊन रहात असे, मग हा आजारी पडला तिच्या विरहात. तेव्हा त्याच्या आईला त्याची दया आली, मग ती गेली तिच्याकडे. तिला सांगितले, 'बाई मी तुझी सेवा करते.' तिला माहिती नव्हते ही त्याची आई आहे म्हणून. तिने तिची फार सेवा केली. तेव्हा ती म्हणाली, 'तुला काय हवे ते ते माग. माझी तब्येत ठीक आहे. काय मागशील ते देईन. म्हणजे माझ्या हातात असले तर देईन.' ती म्हणाली, 'माझे मागणे एवढेच आहे, की माझ्या मुलाशी तू लग्न कर.' ती म्हणाली, 'हो करते.' एवढा मोठा शहेनशहा, त्याच्याशी लग्न करायला ती तयार नव्हती पण हिच्या मुलाशी लग्न करायला तयार झाली, ह्या गरीब बाईच्या मुलाशी! ही गरीब बाई बनून गेली होती तिथे, नंतर तिला कळले की ज्याच्याशी लग्न व्हायचे तो शहेनशहाच आहे. मग ते लग्न झाले. तर ह्या बायकांचे काय आहे बघा! या देशातल्या एक एक बायकांचे काय आहे बघा! अद्वितीय आहे सगळे बायकांचे! या बायकांच्या दमावर सगळी सृष्टी थांबलेली आहे. पुरुष जुलूम करतात. कितीही करू देत. या बायकांच्या हिमतीपुढे त्यांना काहीही करता येत नाही आणि तरी जी प्रेमाचा वर्षाव करीत राहील तीच खरी बाई. तेव्हा धर्मामध्ये अशी माणसे, जी पूर्णपणे बाईच्या स्वरूपाला बाई आलेली आहे आणि पुरुषाच्या पूर्ण स्वरूपाला जो पुरूष आलेला आहे, असे लोक आमच्या धर्मात येऊ शकतात. जे अर्धवट लोक असतात, त्यांची ओळख असते. लगेच समोर येतात. शास्त्रीय दृष्टीने, मी जे सांगते ते सबंध आपल्या शरीरात आहे. सबंध प्लेक्सेस आपल्या शरीरात आहेत. तेव्हा बुद्धीनेसुद्धा तुम्ही त्याला अगोदर मान्यता दिलेलीच आहे. आता मी तुम्हाला समजविण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला ते मधासारखे आहे. कितीही सांगितले, मधाची अशी चव असते, तो असा असतो, तसा असतो, तरी जोपर्यंत तुम्ही अनुभव घेणार नाही, त्याचा स्वत:वर परिणाम पहाणार नाही, तोपर्यंत माझे भाषण व्यर्थ आहे. पुराव्याला म्हणून मी सांगू शकते की, सायन्समध्ये ज्याला आपण पॅरासिंपथेटिक नव्व्हस सिस्टीम म्हणतो, ती, जिला मी कुंडलिनी म्हणते, जी मी जागृत करते, ती कंट्रोल करते आहे. सबंध कुंडलिनीचे वर्णन, तिचे उठणे, उत्थापन वर्गैरे आणि त्यापासून मिळणारे वेगळे वेगळे आनंद आणि त्यापासून दिसणाऱ्या वेगळ्या वेगळ्या आकृती आणि त्यातून आपल्याला होणारे फायदे, त्यातून आपल्याला काय काय फरक होतो या सगळ्यांचे मी एक विवेचनात्मक पुस्तकच लिहिणार आहे. पण ते एवढे सबंध पुस्तक वाचूनसुद्धा ते मिळाल्याशिवाय नुसते पुस्तक वाचून मजा येणार नाही. म्हणून आधी मिळवून घ्यायचे. ज्यांना ते मिळते आहे त्यांनी ते अधिक मिळवून घ्यायचे. ते वाटल्याशिवाय मिळायचे नाही. पुष्कळशा श्रीमंत लोकांच्या घरात अशी स्थिती असते, की कोणी तरी मेले आहे की काय! इतके श्रीमंत असून घरात पैसा वर्गैरे सगळे असून असे वाटते की आपण स्मशानात आलो आहोत की काय! अरे, तुम्ही प्रेम वाटायला पाहिजे, तुम्ही पैसे काय वाटता! प्रेम वाटा. आपल्याकडे लक्ष्मीचे रूप बघा किती सुंदर आहे! लक्ष्मीला स्त्रीचे रूप दिलेले आहे. म्हणजे काय ती आई स्वरूप असायला पाहिजे. ज्या माणसामध्ये लक्ष्मी आहे त्याला आई स्वरूप असायला पाहिजे. आईने तुमचे किती अपराध पोटात घेतले असतील! लक्ष्मी असलेला मनुष्य आपल्या नोकराला झोडपतो. तो लक्ष्मीपती नाही, पैसेवाला आहे. मग तिच्या हातामध्ये दोन कमळे आहेत. कमळांचा अर्थ काय आहे ? तर कमळासारखी शोभा असायला पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावर, वागण्यावर, बोलण्यावर प्रत्येक गोष्ट शोभनीय असायला पाहिजे. तोंडातून भराभर शिव्या निघत आहेत आणि म्हणे हे लक्ष्मीपती! हे कसले लक्ष्मीपती! लक्ष्मीपतीने कमळासारखे असायला पाहिजे आणि कमळासारखे घर आणि त्याची रहाणी अत्यंत सुंदर आणि २१ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-21.txt त्याच्यामध्ये आरामशीर, एखादा भुंगा कसा कमळामध्ये जाऊन झोपतो तसा, कोणीही गेले तरी त्याला आराम मिळायला पाहिजे. लक्ष्मीपतीची ओळख पुढे आणखी दिलेली आहे की एक हात असा असतो लक्ष्मीचा, या हाताचा अर्थ असा असतो, की तुम्हाला आश्रय आहे. कोणीही गेला तुमच्या आश्रयाला आणि त्याला जर तुम्ही आश्रय देऊ शकत नाही तर तुम्ही कसले लक्ष्मीपती? स्वत:च्या मुला, बाळांना पैसे देऊन गब्बर करणारा कसला लक्ष्मीपती. जनावरात सुद्धा ती स्थिती संपते काही दिवसांनी. पण आपल्या मनुष्यात जनावरांपेक्षा खालची स्थिती आहे. म्हातारे होईपर्यंत कंजूषासारखे मुलासाठी पैसे जोडत बसणारे आणि मुलगा मग मोठा झाला की त्याने म्हाताऱ्याचे पैसे गिळायचे. पण कोणी म्हटले, की एखाद्या गरीबाला पैसे दे, तर 'बापरे! असे मागणारे रोजच येतात!' आपला मूलगा, आपली मुलगी याच्यातच तुम्ही जाणार. आपली मुले पहिल्यांदा पुढे घेतील. 'घ्या, घ्या, अहो सगळी मुलेच आहेत तुमची!' आपला मान झाला पाहिजे, आपल्या मुलीला बरे वाटले पाहिजे, आपण, आपण, आपली, आपली! अहो, शेवटी तीच मुले तुम्हाला त्रास देतात! तेव्हा या प्रेमाला काही अर्थ नाही. स्वार्थी प्रेम म्हणजे प्रेमाचा मृत्यू आहे. एखाद्या झाडामध्ये जाणारी त्याची शक्ती किंवा पाणी एखाद्या फुलामध्येच जाऊन बसले तर सबंध झाड मरून जाईल. अशा प्रेमाचा काय फायदा होणार आहे? अशा लक्ष्मीपतीच्या हातामध्ये लक्ष्मी नाही. लक्ष्मीपतीची बायको बसलेली असते आणि तिच्या शेजारी एक बाई बसते. जिच्या अंगावर चिरगूट कापड ही नसते. तिच्या मनाला खंत वाटणार नाही. दुसर्याचे हालअपेष्टा बघून जे हृदय पाझरणार नाही ते हृदय आहे की दगड आहे! हे सगळे कार्य मी आपल्या हृदयाच्या दमावर करते आहे. आपल्याला माहिती नाही. नुसते हृदयाच्या दमावर करते. हृदय चक्राचा खेळ आहे. तुम्ही पाहिले आहे कशी माझ्या हातावर कुंडलिनी खेळते आहे. सगळी प्रेमाची चक्कर आहे. परमात्म्याने सगळी सृष्टी प्रेमातून केलेली आहे. ज्याला आपण क्रिएटिव्ह काम म्हणतो ती सगळी त्याची प्रेम शक्ती आहे, नुसते प्रेम, प्रेम, प्रेम! ज्या माणसामध्ये प्रेम नाही, जो हृदय उघडून हृदयापाशी कोणाला घेऊ शकत नाही अशा माणसाला देव मिळणार नाही किंवा एखाद्या पंडिताला तुम्ही शंभर रुपये दिले आणि त्याने काही देवाचे केले तरी त्याने तुम्हाला देव मिळणार नाही. देव प्रेमाचा भुकेला आहे. काय त्या देवालासुद्धा प्रेमाची भूक आहे आणि त्या प्रेमाच्या सागरात बुडायला लागलात तर कोण दुसरा? या हाताने या हाताची सेवा करावी आणि म्हणावे , 'अरे, मी तुझी किती सेवा केली?' तसे तुम्ही सगळे माझ्या अंगातच आहात. सगळ्या शरीरात एकच शक्ती वाहते. या बोटाला लागले तर हे बोट चटकन पुढे येते. आता तुम्ही बघताच की जे लोक पार झालेले आहेत ती मंडळी स्वत:चा पैसा खर्च करून तुमच्या धुळ्याला आलेली आहेत. त्यांना तुमच्याकडून पैसे नको, काही नको. आपले पैसे खर्च करून तुमच्याकडे आलेली आहेत. कशाला? तुम्हाला भवसागरातून वाचविण्यासाठी ! कारण आतून प्रेम वाहते आहे. या प्रेमासाठीच मी सुद्धा धावत आले आहे तुमच्याजवळ. जर हे प्रेम माझ्याजवळ नसते तर माझ्याजवळ एवढी संपदा आहे, बाहेरची सोडा, आतली, तर मला काही गरज नाही. पण करुणा! करुणा आतली इतकी जास्त असते, की आतला आनंदसुद्धा बेकार असतो. जन्मजन्मातरीची जमवलेली आहे! या जन्मामध्ये दिल्याशिवाय मार्ग नाही. रात्रंदिवस एक करते आहे तुमच्यासाठी. तुम्ही पण यात थोडी मदत करायची आहे. २२ 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-22.txt राम एस ा आवाज मधुर असावी आणि भावा नियंत्रित करायला हवी. जर आपण आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवले तर आपण ८०१% सामूहिकतामिळवू शकती. प. पू. श्रीमाताजी, ०२.०५.१९८५ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा। लि. प्लॉट नं.८, चंद्रगुप्त हौरसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन ०२० - २५२८६५३७, २५२८६७२०, e-mail : sale@nitl.co.in 2013_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-23.txt अबोधितेद्वारेच तुम्ही आनंद प्रगट करू शकता आणि अबोधिती हाच एक असा मार्ग आहे की ज्यामुळे तुम्ही आनंद अनुभवू शकती. आनंदाविनी या सृष्टीची कल्पनाकरा, कार्य होईल? प. पू.श्रीमाताजी २२.०८.१९८२