चैतन्य लहरी मार्च-एप्रिल २०१४ मराठी ह ७. ज ५ २ु मनुष्याच्या बुद्धीमध्ये खूप शंका निर्माण होत असतात. पहिली शंका, जी सर्वसामान्य आहे, ती ही की, श्रीमाताजी कोण आहेत ? मी तुम्हाला सांगू इच्छिते की आत्मदृष्टी खोलल्याशिवाय तुम्ही मला समजू शकत नाही. आणि मला समजण्याचा प्रयत्नदेखील तुम्ही करायला नको. प्रथम आपली आत्मदृष्टी उघडा, प.पू.श्रीमाताजी, निर्मल योग १९८३ या अंकाव कुंडलिनी आणि सहजयोग ४ की कुंडलिनी आणि अह्जयोग पुणे, १५.११.१९७३ मनुष्याचं डोकं हे जनावराच्या डोक्याच्या मानाने त्रिकोणाकार आहे. हे सिद्ध आहे, म्हणजे हे सत्य आहे. तेव्हा लोलकासारखे, प्रिझमसारखे हे, या शक्तीमुळे एका वेगळ्या तव्हेनी आलोकित होते. प्राण्यांमध्ये असे होत नाही, एण माणसामध्ये किंवा असे म्हणता येईल की, मानवीय डोक्यामध्ये हर प्रकार घडतो. लोलकीय स्थितीत असल्यामुळे, प्रिझम सारख असल्यामु ळ, म धू न शिखरामधून येणारी जी चैतन्याची किरणं आहेत ती सरळ खाली जातात आणि बाजूला असलेल्या ज्या त्रिकोणाकार लोलकासारख्या दोन रेषा आहेत किंवा लोलकाचा जो आकार आहे, दोन्हीकडून येणाच्या या चैतन्य रेखा, अशा आपापसामध्ये क्रॉस करतात. कुंडलिनी आणि सहजयोग सगळे काही जड शक्तीने केलेले आहे. हे पंखे घेतले आणि मग मेनला लावल्याबरोबर सगळे लावून प्रकाशित झाले. मेनला लावणारी इलेक्ट्रिकची जी शक्ती आहे, तशी समजा चैतन्य शक्ती ही आपल्यामध्ये तीन महिन्याच्या किंवा दोन महिन्याच्या मुलात आईच्या पोटामध्ये प्रवेश करते. यात ते दाखवलेले आहे. या डायग्रॅममध्ये मी ती शक्ती दाखवलेली आहे. मनुष्याचं डोकं हे जनावराच्या डोक्याच्या मानाने त्रिकोणाकार आहे. हे सिद्ध आहे, म्हणजे हे सत्य आहे. तेव्हा लोलकासारखे, प्रिझमसारखे हे, या शक्तीमुळे एका वेगळ्या तऱहेनी आलोकित होते. प्राण्यांमध्ये असे होत नाही, पण माणसामध्ये किंवा असे म्हणता येईल की, मानवीय डोक्यामध्ये हा प्रकार घडतो. लोलकीय स्थितीत असल्यामुळे, प्रिझमसारखं असल्यामुळे, मधून शिखरामधून येणारी जी चैतन्याची किरणं आहेत ती सरळ खाली जातात आणि बाजूला असलेल्या ज्या त्रिकोणाकार लोलकासारख्या दोन रेषा आहेत किंवा लोलकाचा जो आकार आहे, दोन्हीकडून येणार्या या चैतन्य रेखा, अशा आपापसामध्ये क्रॉस करतात. याला इंग्लिशमध्ये रिफ्रॅक्शन म्हणतात आणि मला वाटतं विकेंद्रीकरण म्हणतात मराठीत. सायन्सला मराठीत समजवायचं म्हणजे जरासं जड जातं. तर त्याच्यामुळे असं येऊन, इथे असे क्रॉस करून मग असे खाली येतात आणि वरून म्हणजे ए , बी आणि सी अशा तीन दाखविलेल्या आहेत, पैकी बी मधोमध येते. ए अशी येते खाली आणि सी अशी येते. आता ज्या ठिकाणी क्रॉस करतात त्याला इंग्लिशमध्ये, आपल्या मेंद्मध्ये मधोमध जिथे आपल्या डोळ्याचे तंतू मिळतात, तिथे असाच क्रॉस होतो. बाहेरसुद्धा दिसतं , पण हे जे मी दाखविलेले आहे ते सबंध आपल्या मागचा जो भाग आहे मधला, त्याच्यामध्ये होते. बाहेर होत नाही. तेव्हा ते आपल्याला दिसत नाही, पण सूक्ष्मात असं घडतं. आता याची जी शास्त्रोक्त व्याख्या आहे आणि त्यांनी कशा सिंपथेटिक आणि पॅरासिंपथेटिक संस्था उत्पन्न झालेल्या आहेत त्याबद्दलचा एक लेखसुद्धा आलेला आहे आणि तुम्ही एवढच लक्षात ठेवायचं की मधोमध जी आहे ती पॅरासिंपथेटिकला प्रतिबिंबित करते आणि ज्या दोन बाजूला आहेत त्यापैकी राईट आणि लेफ्ट सिंपथेटिक नव्व्हस सिस्टीम असं शास्त्रोक्त म्हणतात. हे झालं सगळं शास्त्रोक्त! पण खरोखर असं होतं का ? आणि याचं कारण काय? असं करण्याचं कारण काय? माणसामध्ये हे असण्याचं कारण काय? हा प्रश्न समोर येतो. जनावरांचे बरोबर आहे. त्यांच्यामध्ये काही असा प्रश्न नाही. त्यांच्यामध्ये विहिनीकरण होत नाही, विकेंद्रीकरण होत नाही. सगळे बरोबर येतं, माणसामध्ये असं का देवाने केलं? ही विशेष घटना का घडवून आणली? कारण माणसाला परमेश्वराला अहंकार द्यायचा होता. थोडी माया घालायची होती त्यात. थोडेसे इल्युजन बनवायचं होतं . आता एक साधारण उदाहरण घेऊ या. एखादी आई आपल्या मुलाला दुडूदडू धावायला कसं शिकवते. ती कुठे तरी लपते आणि मुलाला म्हणते इकडे ये, इकडे ये. आणि मग तो मुलगा शोधत तिच्यापुढे जाऊ लागतो किंवा चिमणीचं उदाहरण घेतलं तर बरं होईल. चिमणीचं लहानसं पिल्लू असतं त्याला काही उडता येत नाही. चिमणी जाऊन कुठे तरी लपते आणि त्याला हाक मारत असते. ते शोधत शोधत बघत असतं मग शेवटी हिम्मत ६ एक अशी शक्ती माणसामध्ये आहे, की ज्याच्यावर माणसाचा काहीही अधिकार नाही. करून आपले दोन्ही पंख पसरून ते उडायला लागतं. ते पिल्लू जसं शिकतं तसं माणसालासुद्धा हे शिकवलं पाहिजे ती आई कोण आहे? ती शक्ती कोण आहे? ती चेतना कोणाची आहे? कोणच्या चेतनेवर तुम्ही जिवंत आहात ? म्हणून हे सगळे कार्यक्रम, त्या शक्तीने, एक माया म्हणतात त्याला, त्या श्री हरीची माया असं ऐकलं असेल आपण, ती हरीची माया, तिने हे केलेलं सगळं नाटक की तुमच्यावर एक असा पडदा घातलेला आहे, की तुम्हाला असं वाटतं की आपण म्हणजे जे आहोत ते खरेच आहोत. हा सगळा संसार म्हणजे खरा आणि याच्या पलीकडे काही आहे असं वाटत नाही. आतून असं फार तर वाटतं की काही तरी कमी आहे. पूर्ण काही झालं नाही. लोक भाषणं देतात, पुष्कळ लोकांची अशी स्थिती आहे, की पुस्तकं वाचून ते भाषणं देतात आणि काहीही साध्य होत नाही. वेड्यांचा बाजार नुसता तयार करून ठेवला आहे अशा लोकांनी. या पुण्यात, आमच्या मुंबई शहरात कुंडलिनी जागृत करणारे हजारो लोक आहेत. पण ते लोक आमच्याकडे आले, की आम्ही त्यांना नमस्कार करून सांगतो, की तुम्ही तुमच्या गुरुजींच्याकडे जा. आमच्याकडे काही तुमचं ठीक होणार नाही. कारण त्यांच्या सगळ्या चक्रांचा सत्यानाश आणि बिघाड झालेला आहे. त्याला कारण असं, की पुस्तकं वाचून कोणतंही कार्य केलं की ते आर्टिफिशियल आहे. जर एखाद्या मुलाची आई हरवलेली आहे आणि त्याला सांगितलं की हे पुस्तक वाच आईविषयी आणि आई भेटल्यावर तिला जोरात मिठी मार, तर काय स्थिती होईल! नाटकी होईल की नाही! आणि हा नाटकीपणा करत करत आपण कोणत्या स्थितीला जातो ते थोडे मी आज आपल्याला सांगितलं. ए आणि सी या ज्या दोन आपल्यामधल्या शक्त्या आहेत त्याला सिंपथेटिक नव्व्हस सिस्टीम असं म्हटलेलं आहे, त्याला आपल्या योगामध्ये इडा आणि पिंगला अशा दोन नाड्या म्हणतात आणि मधली जी नाडी आहे तिला सुषुम्ना असं म्हणतात. इडा आणि पिंगला, आता जे डॉक्टर्स इथे आहेत ते मला जास्त चांगलं समजू शकतील किंवा सायकॉलॉजिस्टस् आहेत ते चांगलं सांगू शकतील. त्याचा एक फायदा असा आहे, की त्यांनी शोध लावून एवढं तरी शोधून काढलेलं आहे की, एक अशी शक्ती माणसामध्ये आहे, की ज्याच्यावर माणसाचा काहीही अधिकार नाही. तिला ते ऑटोनॉमस नव्व्हस सिस्टीम असं म्हणतात किंवा दुसरं नाव त्याला जे सायकॉलॉजिस्टसनी दिले आहे त्यात युनिव्हर्सल अनकॉन्शस असं नाव दिलेले आहे. ही सगळी नावं आहेत. पण त्याचं असं झालेले आहे, की आपण आपल्या सौंदर्याला, गौरवाला विसरलो. ते फक्त त्या मायेने केलं. तेव्हा ती माया आपल्यावर पडलेली आहे, पण त्या मायेचं जे काही करणं झालं, त्याच्यात कधी कधी लहान लहान मुलं अशी भटकतात, अशी भटकतात, की डोकी फुटून मरतात. परत जन्म होतो, परत शोध चालतो, परत ७ कुंडलिनी आणि सहजयोग शोध चालतो. करत करत शेवटी ती आई मिळाली. कदाचित कलियुगात तो समय, ती विशेष वेळ आलेली आहे. जेव्हा सगळे काही फिरणं, भटकणं त्या मुलाचं संपलेले आहे. कदाचित आजच असाच आपल्यासाठी तो समय, ती विशेष वेळ आलेली आहे. जेव्हा त्या मुलाचं फिरणं, भटकणं संपलेलं आहे आणि कदाचित आजच असाच आपल्यासाठी तो सुमंगल संधीचा काही तरी विशेष म्हटलं पाहिजे, देवाचा आशीर्वाद असेल. आजच पुष्कळ लोकांनासुद्धा हे मिळू शकेल. तेव्हा काही लोक इथे असे विचार करत बसले आहेत की हे कसं शक्य आहे. हे मला माहिती आहे. तेव्हा त्यांनी आता थोडंसं जे काही आपल्या डोक्यात आहे किंवा पुष्कळ वाचलेले आहे, थोडे बाहेर ठेवून आतमध्ये मी जे काही सांगते आहे तिकडे लक्ष द्यावं. पुस्तकं वाचून देखील त्यांना काही विशेष माहिती नाही. याच्याबद्दल ते फारसं काही सांगू शकत नाहीत. पॅरासिंपथेटिक नव्हस सिस्टीम आहे. म्हणजे आपलं हृदय आहे. आपण धावायला लागलो की, हृदय धडा-धडा वाजू शकते. पण आपण म्हटलं की हृदय कमी करून टाकू तर ते कमी करता येणार नाही, वाढवू शकतो, पण कमी करता नाही येणार. अशा पुष्कळशा गोष्टी आपण करतो आहोत - आपल्या पोटामध्ये अन्न पचन होतं - की त्या आपल्या हातच्या नाहीत. त्या आपोआप होत असतात. त्या सगळ्या या पॅरासिंपथेटिक मधल्या. या जे मी दाखविलेल्या आहेत. इथे बी, या दोन्ही शक्त्या म्हणजे लेफ्ट आणि राईट सिंपथेटिक आणि पॅरासिंपथेटिक किंवा इडा, पिंगला आणि सुष्म्ना अशा तिन्ही नाड्या, त्या तिन्हीचा परिणाम त्या मधोमध असलेल्या प्लेक्सेसवर म्हणजे चक्रांवर होतो. हे आहेत, आपल्यामध्ये प्लेक्सेस आहेत ते डॉक्टर मानतील, त्यांचे जे सेंटर्स आहेत त्यांना आम्ही चक्र म्हणतो. मधली जी संस्था आहे ती आपल्या डोक्यामध्ये कोणी पेट्रोल भरावं तशी भरलेली आहे. त्याच्यानंतर मग या दोन्ही संस्था जेव्हा चालू होतात, त्या कशा चालू होतात ते पाहिलं पाहिजे. जेव्हा लहान मूल आईच्या मांडीवर पीत असते त्या वेळी पूर्ण आनंदाने पॅरासिंपथेटिक बनतं. काही करत नाही. व्यवस्थित दुध पितं. इतक्यात दूध आई त्याला इकडून तिकडे हलवते. लगेच हे काय केलं असं वाटतं त्याला. ते पॅरासिंपथेटिकमुळे नव्हे तर सिंपथेटिकमुळे वाटते की, 'असं आईनी मला का केलं.' तो विरोध करतो. तो विरोध आल्यामुळे ईगो म्हणून एक गोष्ट या इथे दाखविली आहे. अहंकार आणि प्रति अहंकार हे दोन्ही अशा रीतीने तयार होतात. पहिल्यांदा अहंकार जेव्हा तो आईला विरोध करतो, 'ही कोण आहे मला त्रास देणारी' असं जेव्हा वाटतं. तेव्हा तो विरोधामध्ये ईगो बनतो आणि त्याच्यानंतर त्याची आई त्याला म्हणते, 'असं करू नकोस, तसं करू नकोस.' त्याचं जे कंडिशनिंग होते त्याच्यामुळे सुपर ईगो तयार होतो म्हणजे प्रति अहंकार बनतो. नावामध्ये येऊ नका. त्याचा जो काही सारा्थ आहे तो घ्यायचा, सारार्थ घ्यायचा. शब्दावरती येऊ नका. आता माणसामध्ये अहंकार आणि प्रति अहंकार हे सारखे वाढत असतात. जेव्हा वाटतं मी कोणी तरी आहे तेव्हा ईगो वाढतो. कोणी सांगितलं असं करायचं नाही, म्हणजे त्याचा सुपर ईगो वाढतो. आणि असं वाढत वाढत दोन्ही खूप वाढायला लागले म्हणजे जाऊन वरती एकमेकांना भिडतात आणि जेव्हा हे दोन्ही एकमेकांना भिडतात ८ अहंकार आणि प्रति अहंकार मुळेच माणसाला मी पणा येतो. तेव्हा आपल्या डोक्याच्या इथे, आपल्याला माहिती आहे, की लहान मुलांची टाळू वाजत असते. ती टाळू भरून आल्याबरोबर मुलाचा अहंकार आणि प्रति अहंकार पूर्णपणे आपलं काम दाखवू लागतो. मधल्या स्थितीमध्ये जेव्हा मुलाची नाळ कापली जाते, तेव्हा तिथे एक मोठी गॅप होऊन जाते. ती बाहेरूनही दिसते. हे डॉक्टर्स ही सांगतील. पॅरासिंपथेटिकमध्ये गॅप आहे. त्याला झेन मध्ये व्हॉईड म्हणतात. मी त्याला भवसागरमध्ये माया म्हणते. ही एक भली मोठी माया आहे. आता आपण आपल्या अहंकार आणि प्रतिअहंकार यामध्ये राहतो आणि अहंकार आणि प्रति अहंकार मुळेच माणसाला मी पणा येतो. मी पणा आला म्हणजे 'मी कोणीतरी आहे, मी वेगळा आहे' अशा रीतीची भावना येते. विषय थोडासा कठीण आहे, म्हणून शांतपणे ऐका हं! 'मी' पणा आला म्हणजे जे सारखे अव्याहत डोक्यात वाहत असतं ते बंद होतं आणि तुम्ही काही तरी वेगळे होता. म्हणजे असं समजा हे माझं बोट आहे हे दूसरं बोट आहे. हे वेगळं होऊन म्हणेल, की मी वेगळं बोट आहे. याच्यामध्ये वाहणारं चैतन्य जर कापलं गेलं आणि ह्याला वाटलं मी त्या चैतन्यावर फ्री आहे, तशी स्थिती माणसाची होऊन जाते आणि तो एक मी अमका, मी निर्मला देवी असं स्वत:ला समजू लागतो. आता हे सगळे मी सांगितलं आपल्याला, एवढ्यासाठी झालं की ही एक माया, एक इल्यूजन आहे. माया तुमच्यासमोर आली, की 'मी इल्यूजन आहे, आणि मी सगळं काही आहे, याच्या पलीकडे काही जग नाही' हे दिसायला लागतं. आता जेवढं काही खोटं आहे ते खरं वाटेल, म्हणजे आता जन्मल्याबरोबर तुम्हाला एक नाव दिलं. आता मला जसं नाव दिलं निर्मला. मग ते माझं नाव खरं झालं. आता नावासाठी, जर कोणी मला निर्मला म्हणून शिव्या दिल्या तर लगेच मी त्यांना मारायला उठणार, मग तुम्ही या देशाचे, हिंदुस्थानी हे खोटं आहे. आम्ही कुठलेच नाही. देवाने काय असा हिंदुस्थान, बिंदुस्थान बनवला होता का? त्यांनी काहीसुद्धा मुंबईकर, तुम्ही पुणेकर, मग पुणेकरातही आम्ही अमके आणि तुम्ही तमके करत करत मग आपण असं लहान लहान होत जातो आणि सबंध मिथ्या, जेवढं काही मिथ्या आहे, जेवढं काही खोटं आहे, त्याला आपण एक तुम्ही बनविले नाही. सगळ्या मिथ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपल्या होऊन जातात. मग आम्ही करून घेतो. तर त्याचा इलाज कसा करायचा, हे सहजयोगाने कसं करायचं, हे सगळं नंतर मी कुंडलिनीच्या वर्णनावर आल्यावर आपल्याला सांगणार आहे. आता कुंडलिनीचे वर्णन आतापर्यंत किती तरी योगदर्शन, अमुक, तमुक, ९ कुंडलिनी आणि सहजयोग किती तरी लोकांनी कुंडलिनीवरती, पुष्कळ लोकांनी कुंडलिनी वरती लिहिलेले आहे. पुष्कळसे लोक पुस्तकं वाचून कुंडलिनीचे वर्णन लिहितात, पण कोणी खरोखर कुंडलिनी पाहिली आहे की नाही असं विचारलं तर पुष्कळ म्हणतीलसुद्धा की आम्ही कुंडलिनी पाहिली आहे, पण त्याची प्रचिती पाहिजे. उद्या जर मी म्हटलं की माझ्या हातात खडू आहे. तर त्याची प्रचिती काय तर मला लिहिता आलं पाहिजे. दाखवलं पाहिजे. मी इकडे लिहून जर तुमच्याजवळ कुंडलिनी आहे, तुम्हाला माहिती आहे तर दुसऱ्यामध्ये कुंडलिनीचे काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि जर तुम्हाला कुंडलिनी दिसलेली आहे, एवढं तुम्हाला दर्शन कुंडलिनीचं आहे, तर दुसर्याची कुंडलिनी कुठे आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इतकंच नव्हे तर त्यालासुद्धा तुमच्यासारखं कुंडलिनीचे दर्शन झाले पाहिजे, पण तसं मुळीच होत नाही. कुंडलिनी पाहिलेला मला तरी आतापर्यंत एकही मनुष्य दिसलेला नाही. पुष्कळ गुरू लोक पाहिले आहेत मी. पुष्कळ यच्चयावत हिंदुस्थानात फिरून पुष्कळ लोक पाहिले आहेत मी आणि इतक्या जवळून पाहिले आहेत, की तितक्या जवळ जायला कदाचित तुम्ही धजावणारसुद्धा नाही आणि एकाही माणसाला मी जागृत पाहिलेलं नाही. दोघं- तिघं आहेत, ते मला आतमध्ये माहिती आहेत, की ते आहेत म्हणून. पण ते लोक साधारणपणे संसारात नाहीत. बाहेर बसले आहेत. त्या कुंडलिनीचे दर्शन आपल्याला जेव्हा होतं तेव्हा कुंडलिनी म्हणजे ही पॅरासिंपथेटिक, तिला जेव्हा आपण बघतो, आपल्याला आश्चर्य वाटेल, आता मी हे सायन्सच्या पुढचं बोलतेय, तेव्हा कुंडलिनी ही जशी नं, अशा रंगाची दिसते. इतकंच नव्हे तर तिच्यावर थोडासा पिवळा प्रकाश असतो. थोडासा लालही असतो ट्यूब आहे आणि प्रत्येक चक्रामध्ये एखाद्या कुंडासारखे किंवा एखाद्या तलावासारखं दर्शन होतं. त्याच्यामध्ये प्रतीकरूपाने प्रत्येक चक्रावर तुम्हाला काही तरी दिसतं. सगळ्यात खाली, मूलाधार चक्र आपण ज्याला म्हणतो, त्या मूलाधार चक्रावर आपल्याला श्री गणेशाचं दर्शन होतं. आता पुष्कळांना वाटेल, की माताजी काही तरी सांगतात, पण त्याचा आमच्याजवळ पुरावा आहे. जी मंडळी आता आमच्या इथे पार झालेली आहेत, जर एखाद्याचं मूलाधार चक्रं, याच्यात फार अंतर आहे, मूलाधार चक्रं धरलेले असेल किंवा त्याला त्रास असेल मूलाधार चक्रावर म्हणजे तऱ्हेतऱ्हेचे, जे चार प्लेक्सेस आहेत त्याचे पैकी सेक्स एक आहे, एक तुमचं युरीन, संडास वगैरे असे असले त्यांनी जर गणेशाचं नाव घेतलं, रिअलाईज्ड माणसांनी, तर ते चक्र सुटते. ही त्याची प्रचिती आहे. साक्षात गणेशाचं दर्शन तिथे होतं आणि ते तसच होतं, जसं स्वप्नामध्ये , सबकॉन्शस माईंडमध्ये, झोपेत आपल्याला काही तरी प्रतिकरूपाने दिसतं. हे सायकॉलॉजिस्टनी मानलेले आहे. पण हे दिसायला ते वेगळे डोळे पाहिजेत. ते आल्याशिवाय दिसणार नाही. म्हणून ती गोष्ट नाही अशी गोष्ट नाही. श्री गणेश काही आपल्याला पुस्तकातनं आलेले नाहीत. हे समजून घेण्यासारखं आहे. कोणी त्याच वर्णन केलं म्हणून नाही. ते साक्षात तिथे आहेत आणि त्यांची शक्ती ही गौरी शक्ती आहे, ती चैतन्य शक्ती आहे. तीच या सात चक्रात वेगळ्या वेगळ्या रूपाने आहे. आता मी हिंदू धर्माचा प्रचार करते आहे, असे ही लोक म्हणू शकतील. ते तसे म्हणाले तरी हरकत नाही. कारण खरं काय ते सांगायला पाहिजे. यात हिंदू-मुसलमानांचा काही फरक नाही. असं मी आपल्याला सांगणार १० मुणीपूर चुक्रावर जर तुम्हाला जळत असेल, म्हणजे लक्ष्मीचा त्रास आहे. आहे. पुढे दुसर्या चक्रावर, ज्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात, त्याच्यावर आपल्याला श्री ब्रह्मदेवाचं दर्शन होतं आणि त्यांची जी शक्ती आहे ती आपल्याला माहिती आहे, ती सरस्वती, तिथे सरस्वती देवीचं दर्शन होतं. सरस्वती ही ब्रह्माची शक्ती आहे. तिसऱ्या चक्रावर, ज्याला आपण मणीपूर चक्र म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस म्हणतात, त्याच्यावरती श्री विष्णू, साक्षात श्री विष्णू आणि त्यांची शक्ती लक्ष्मी ती दिसेल याचं उदाहरण म्हणजे अशी जर एखाद्याची नाभी धरली असेल, आमच्या व्हायब्रेशन्समध्ये आम्ही म्हटलं नाभी धरलेली आहे, म्हणजे हे बोट जळतं त्याच्यात. आपल्याला आश्चर्य वाटेल हे बोट बरोबर जळतं. आता इथे निदान पंचवीस-तीस माणसं तरी अशी आहेत, जी पार झालेली आहेत. बरोबर हे बोट धरतील. लहान मूल का असेना. मी जर त्यांना विचारलं की, 'हे काय तुमचं कोणचं बोट धरतंय? तर ते हे दाखवतील. एक-दीड वर्षाची मुलगी आहे. ती बरोबर सांगेल हे बोट धरतंय. हे बोट म्हणजे नाभी चक्र, मणीपूर चक्र. मणीपूर चक्रावर जर तुम्हाला जळत असेल, म्हणजे लक्ष्मीचा त्रास आहे. एक गृहस्थ माझ्याकडे आले. म्हणाले, 'माताजी, माझ्याकडे लक्ष्मीचा त्रास आहे. मी काय करू. पाहिल्यावर लक्षात आलं नाभी चक्र धरलेले आहे. चक्र स्वच्छ झाल्याबरोबर त्यांनी सांगितलं , दुसर्या दिवसापासून माझा लक्ष्मीचा त्रास फारच कमी झाला. ज्यांना नाभी चक्राचा त्रास आहे त्यांना पोटाचे सगळे त्रास असणार. जे सोलर प्लेक्ससमुळे होतात. ते म्हणजे लिव्हरचा त्रास, इंटेस्टाईनचा त्रास, हे शारीरिक झालं . पैशाचा त्रास म्हणजे लक्ष्मीचा त्रास. त्याच्यानंतर वर, ज्याला आपण कार्डियाक प्लेक्सस म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीत ज्याला अनाहत चक्र म्हणतात, त्याठिकाणी श्री शिवाचं स्थान आहे. आत्म्याचं स्थान हे हृदयात आहे. तुम्हाला दिसतं अगदी अंगुष्ठासारखी ज्योत दिसेल. तसं आपल्या गॅसच्या लाईटरमध्ये फ्लेम जळत असते तसं तिथे असतं आणि त्याची जी एनर्जी आहे कुंडलिनी शक्ती ती खालून वर आली की ती पेटते. हृदयामध्ये आपल्या श्री शंकराचे स्थान आहे आणि त्यांची शक्ती पार्वती असते. तिची नऊ रूपं आहेत. नवविधा रूपामध्ये ती असते. शिवाबरोबर असते, तेव्हा शांत, एक स्त्ी स्वरूपात जेव्हा ती एकटी येते तेव्हा ती प्रचंड कार्य करते. जेव्हा ती अन्नपूर्णा असते. त्याच्यापुढे विशुद्धी चक्रावरती श्रीकृष्णाचं स्थान आहे. त्यांची शक्ती श्री राधेची आहे. ही सगळी एकच शक्ती सगळीकडे आहे, पण त्यांचं जे स्थान आहे ते त्यांच्या उत्क्रांतीवर अवलंबून आहे. म्हणजे मानवाची जशी उत्क्रांती होत गेली , संसाराची उत्क्रांती जशी जशी होत गेली , तशी ही स्थाने बनत गेलेली आहेत. तर ते सुद्धा एक हे आहे. सांगायचं म्हणजे त्याच्यावर जर बोलायला बसलं तर एक पूर्ण लेक्चर लागेल, की आपल्यात कशी ११ कुंडलिनी आणि सहजयोग उत्क्रांती झाली, कसे आपण वाढलो वगैरे. नंतर आज्ञा चक्रावर या ठिकाणी श्री महालक्ष्मीचं स्थान आहे. श्री महालक्ष्मीने कुठे अवतार घेतला याचं वर्णन कुठेही आपल्या पुराणात नाही. ते कोणतं आहे, ते जर मी आता आपल्याला सांगितलं तर आपल्याला शॉक बसणार आहे. ते म्हणजे मेरीचं स्थान आहे. जीझसची आई मेरी, महालक्ष्मी होती आणि जीझस हा स्वत: एक प्रणव म्हणून अवतार आहे. आणि नंतर इथे भगवती, साक्षात चैतन्य स्वरूपिणी कुंडलिनी आहे. आता खालून वरपर्यंत येताना जेव्हा एक एक गोष्ट मी त्याच्यात एक-एक युगाची गोष्ट आहे. उत्क्रांतीची वेगळी वेगळी स्वरूपे त्या एकएका अवतारांच्या वेळी झालेली आहेत. त्यातल्या विशेष म्हणजे याठिकाणी जी मी गॅप दाखवलेली आपल्याला सांगते आहे. तेव्हा आहे ज्याला व्हॉईड म्हणतात, त्या ठिकाणी गुरूचे स्थान आहे. गुरूचे स्थान म्हणजे दत्तगुरूंचे स्थान आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल दत्तगुरूंनी कितीतरी वेळा अवतार घेतलेला आहे आणि ज्याचं जरी वर्णन नसलं तरी त्यांची ओळख आहे. हे दत्तगुरूंचे स्थान आहे. इथे त्यांनी अवतार घेतलेला आहे. म्हणता येईल की जनक राजा, जो विदेही जाणला जातो तो, याची मुलगी सीता, तिचं नातं त्यांच्याशी बहिणीचे किंवा मुलीचे असते. सीता ही स्वयं शक्ती स्वरूपा होती. त्याच्यानंतर त्यांचा झोराष्ट्र, जो पारशांचा होता, तो जनकाचाच अवतार होता किंवा दत्तात्रयांचा अवतार होता. याच्यानंतर मच्छिंद्रनाथ यांना म्हणतात. त्यांच्या शिष्यांनी मात्र दुसराच मार्ग आक्रमिला होता. बहुतेक गुरूंची दुर्दशा झाली ती त्यांच्या शिष्यांमुळे. त्याच्यानंतर महंमदसाहेब पैगंबर हे त्यांचेच अवतार. आता कोण मुसलमान नी कोण हिंदू आणि कोणत्या धर्माचा आम्ही प्रचार करतो ते आपल्याला कळेल. नुसतं तिथे पहायला गेले तर सगळे दिसू शकते, पण त्याला ते डोळे असायला पाहिजेत. आधुनिक काळामध्ये आपले शिर्डीचे साईबाबा हे त्यांचे अवतार आणि पैगंबरांची मुलगी जी फातिमा होती ती साक्षात शक्ती आहे आणि तिची जी दोन मुले होती, एक महावीर आणि दुसरे बुद्ध, हसन आणि हुसेन. आता विचारा महावीरांचे भांडण मुसलमानांशी, मुसलमानांचं त्यांच्याशी कशाला? आातमधे आहे आणि जे आहे ते अगदी वेगळे आहे आणि बाहेर जे दिसतं ते अगदीच विचित्र आणि विक्षिप्त आहे. एकाच शक्तीची ही अनेक रुपं, अनेक काळी होऊन मानवाला वर आणण्यासाठी आणि त्याला त्याचंच चैतन्य दर्शन करविण्यासाठी धडपडत राहतात. त्या शक्तीला त्या सबंध रूपाला कुंडलिनी तुम्ही म्हणू शकता, भगवती तुम्ही म्हणू शकता, नांव काहीही दिलं, कोणी तिला ईश्वर म्हणतात, कोणी शिव-शक्ती म्हणतात, काहीही तुम्ही नांव दिलं तरी त्या चैतन्य शक्तीने इतक्या रूपात संसारात अवतार घेतलेला आहे. यालाच इन्कारनेटींग पॉवर ऑफ द डिव्हाईन १२ ु डा उ ा म्हटलं पाहिजे. आता डिव्हाईनच्या तीन पॉवर्स आपल्याला कळल्या. ती जडशक्ती, चैतन्य शक्ती आणि अवतार शक्ती, अशा त्या शक्त्या आहेत आणि त्या अवतार शक्तीमध्ये आपण पाहिलेले आहे, फादर गॉड, मदर गॉड आणि सन गॉड आणि शेवटी हे, त्या शक्तीचे वडील किंवा भाऊ या नात्याने येणारे, म्हणजे दत्तात्रय. हे फार इन्टरेस्टिंग आहे. दत्तात्रेयांचं सगळे फार मजेदार आहे. म्हणजे त्याचं काय आहे की तो मानव झालेला आहे अवतार. मानवाचा तर अवतार झाला म्हणजे काही तरी विशेष रूप आहे. मग मोक्ष पदाला पोहोचलेले चिरंजीव लोक वगैरे, असे सुद्धा पुष्कळ लोक आहेत. ते सुद्धा शरीर घेऊ शकतात. आता या गोष्टी सायन्सच्या पलीकडच्या आहेत. लोक १३ कुंडलिनी आणि सहजयोग म्हणतील ते डोळ्यांनी दिसलं पाहिजे, पण हे डोळे यांनी ते दिसायचं नाही. समजा जर कोणी सांगितलं की एखाद्या पानामध्ये पुष्कळसे सेल्स असतात, तर तुम्ही म्हणाल, की आम्हाला काही दिसत नाही, डोळ्यांना मायक्रोस्कोप लावला तर दिसतं नं! इथे अंतरातला मायक्रोस्कोप लावायला पाहिजे. तो लावल्याशिवाय याची प्रचिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्याबद्दल मला खेद वाटतो, पण करणार काय! पार व्हायला बसा म्हटल्याबरोबर आधी तुम्ही पुस्तकं घेऊन बसता, की माताजी, पुस्तकात लिहिलं आहे ते काय ? आता परवाच एक पुस्तक छापलं गेलं होतं योगावर. योग म्हणजे काय आणि योगामधे काय दिसतं. त्यांना जे दिसतं ते बरोबर आहे आणि आम्हाला जे दिसतं ते ही बरोबर आहे. आता मधली जी शक्ती आहे कुंडलिनी ती मी सांगितली. ती आपल्या आईची कुंडलिनी आहे. मातृहृदयाची कुंडलिनी आहे, प्रेमाची कुंडलिनी आहे. डिव्हाईन लव्ह. बाकी या ज्या दोन ईडा आणि पिंगला आहेत त्याच मुळी माणसाला लाभलेल्या आहेत. त्याच्यातला बदल माणूस जाणू शकतो. बाकी मधला बदल माणूस जाणू शकत नाही. कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी तुम्ही काहीही करू लागलात, केल्याबरोबर, काहीही केल्याबरोबर डॉक्टर लोक दाद देतील, काहीही केल्याबरोबर तुम्ही सिंपथेटिकवर येता. पॅरासिंपथेटिक वर राह शकत नाही. पॅरासिंपथेटिकचा अर्थ आहे जिथे तुम्ही काहीही करत नाही. आपोआप स्पॉन्टॅनियस सहज, जे सहज जन्माला येतं तेच, पॅरासिंपथेटिकवर येते आणि जे तुम्ही धडपडून मिळवता ते तुम्हाला सिंपथेटिक वर नेतं . हेच की आता इडा आणि पिंगला या दोन नाड्यांचे वर्णन केलेलं आहे. डाव्या बाजूला जी संस्था आहे, तिला इडा म्हणतात आणि उजव्या बाजूला जी संस्था आहे तिला पिंगला म्हणतात, पण ती आपल्या डोक्यामध्ये उजवं आणि डावं होतं. खाली आल्यावर ते डावं आणि उजवं असते. तेव्हा तिला आपण ईडा आणि पिंगला असं समजूया. ईडा नाडी ही योगी लोक वापरतात. सहजयोगच, खरा योग आहे. त्यानेच परमात्मा मिळतो. ते लोक काय करतात, ईडा नाडीला वापरण्यामध्ये आपल्या सर्व संस्थांना कंट्रोल करतात. हे करायचं नाही, ते करायचं नाही, इथे जायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, व्रत धरायचं, म्हणजे प्रत्येक धर्मात हे प्रकार आहेत. हे जे लोक करतात ते योगीजन असं आपण म्हणतो. हाडाची काडं करून टाकायची. तप करायचं, जप करायचा, नाव घ्यायचं. सतत काहीतरी क्रिया करायची. धर्माच्या नावावर काहीतरी क्रिया करत बसायचं अशी जो क्रिया करत बसतो, तो ईडा नाडीवर येतो. परवाची गोष्ट मी आपल्याला सांगते. एका गृहस्थाला, ट्युमर झाला होता. मी त्याला पाहिल्याबरोबर विचारलं, 'तुम्ही योग करता का?' तो म्हणाला, 'हो, मी योग सुरू केला आहे. मी शीर्षासन करतो.' शीर्षासनाने कॅन्सर होणार. का, हे इथे दाखवते आपल्याला. आता 'मी हे करणार. मी म्हणजे स्वयंभू, मी अमका, मी तमका' अशी भावना घेऊन तुम्ही योग करता आणि योग करणाऱ्या माणसाला भयंकार अहंकार असतो. आणि त्या अहंकारामुळे, तो छुपा असतो, दिसत नाही. बाहेरून असे वाटेल काय नरम मनुष्य आहे. त्याच्या बोलण्यामध्ये १४ न योगेनं, न सांख्येनं आणि त्याच्या वागण्यामध्ये जरी दिसला नाही तरी डोक्यात तो असतो आणि त्याच्या अहंकारामुळे त्याचा जो ईगो असतो तो इतका बळावतो आणि त्याच्यावर तुम्ही आणखी जर योग वगैरे साधना करून त्याला बळावलं तर काय होईल. त्या ईगोमध्ये भरलेली सिंपथेटिकची ती जी एनर्जी आहे त्याने डोक्यामध्ये कॅन्सरसारखे रोग होतात. तेवढे एकच नाही तर सर्व चक्रांमध्ये काही ना काही त्रास होण्याचा संभव आहे. मी योगाच्या विरोधात नाही हे समजलं पाहिजे. पण आदिशंकराचार्यांनीसुद्धा सांगितले आहे, 'न योगेनं, न सांख्येनं' कोणत्याही गोष्टींनी परमेश्वर दर्शन होत नाही. ते व्हायचं असलं की परमेश्वराची कृपा होऊनच ते सहजच होतं. हे शंकराचार्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे. पण आजकाल वाचतंय कोण शंकराचार्य! आपल्या स्टेटसमध्ये दिसला पाहिजे. स्टेटस पाहिजे. त्याशिवाय धर्म वाटत नाही. कोणी जर स्टेटस् बद्दल बोलत असेल तर भयंकर धार्मिक मनुष्य आहे. ही आपली कल्पना धर्माबद्दलची आहे. तेव्हा शंकराचार्य कोण वाचणार? ते इनसिपिड आहे. त्याला काही चवच नाही, तर योगामुळे परमेश्वर मिळणार नाही आणि योग अतिशय केला तर त्याच्यामुळे नाना प्रकारचे रोग होतील, बरं वाटणार नाही आणि मनुष्य लवकर मरेल कारण योग म्हणजे काय की तो आपल्यातली जी संचित शक्ती आहे तिला ओढून खेचून तिला संपवतो. त्याच्यामधे नवीन शक्ती भरण्याचं कार्य सहजयोगच करतो. म्हणजे सुषुम्नेमधे, सुषुम्ना जर आपण कशी तरी करून उघडली, सगळीकडे पसरलेल्या परमेश्वराच्या प्रेमाशी जर आपण एकाकार झालो, तर ती परत शक्ती सारखी वाहत राहील. म्हणून काहीही न करता मिळवलेले जे आहे, तेच खरोखर परम आहे. दुसऱ्या बाजूला असलेली पिंगला नाडी, त्या पिंगला नाडीमध्येसुद्धा पुष्कळ लोक पडले. म्हणजे आपण आता जप, तप, साधन वगैरे करतो, त्यातले काही प्रकार आणखीन असे आहेत ज्याला आपण प्रेत सिद्धी, स्मशान सिद्धी वगैरे म्हणतो. सगळ्या त्या सिद्धया मिळतात त्या पिंगला नाडीमधे. सगळ्या सिद्धया म्हणजे इथून अंगठी काढून देणं, चार माणसं उभी आहेत त्यांना नागवं करून टाकणं, त्यांना नाचायाला लावणं, त्यांना घुमायला लावणं, त्यांची चित्तवृत्ती बधीर करून टाकणं, त्यांच्याकडून पैसे काढणं, जेवढे काही प्रकार लोक करतात ते पिंगला नाडीच्या शक्तीने करतात. जशी मधल्या शक्तीमधे त्यांना नावं आहेत, तशी त्या इकडच्या, आता जी सांगितली, पिंगला नाडीच्या शक्तीला सुद्धा नावं आहेत. विलासिनी, गायत्री, सावित्री म्हणजे पतिव्रता स्त्रिया आहेत म्हणजे पातिव्रत्य धरून १५ कुंडलिनी आणि सहजयोग बसलेल्या आहेत. हट्टाने. तिला इगोची बाधा होणार, शाप देणार, पण जो मनुष्य पॅरासिंपथेटिकमधे आहे तो शाप देऊच शकणार नाही. कोणाचे काही करेल तर मंगलच करणार. अमंगल करूच शकणार नाही. तसंच इडा नाडीमध्ये असलेल्या लोकांना शंखिणी, डाकिणी अशी नांवे दिलेली आहेत. हस्तिनी वरगैरे वरगैरे त्यांनी नावे आहेत, त्या शक्त्यांची. इडा नाडीवर जे लोक असतात ते लिबिडोवर असतात. लिबिडो म्हणजे आपण ऐकलं असेल, फ्राईडनी त्याचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे, मी जास्त सांगणार नाही. पण ती शक्ती आपल्या सूप्तचेतन, सबकॉन्शस, आपल्यातल्या मेलेल्या विचारांशी, आपल्यातले जे काही मेलेले आहे त्या सगळ्यांशी संबंधित असते. सूप्तचेतन मनाशी तुम्ही आल्याबरोबर तुम्ही ट्रान्समध्ये जाल कारण तुमच्यावरती सूप्त चेतन मन येऊन बसतं. आता ट्रान्सिडेंटल वरगैरे जे काही आहे ते तिथे आहे, नाचणं, घुमणं, ओरडणं वरगैरे म्हणजे काय तुम्ही आपल्या पास्टमध्ये जाणार. कोणी वाघासारखं ओरडतं , कोणी ड्रकरासारखं ओरडतं , म्हणजे तुम्ही आपल्या पास्टमध्ये चालला. प्रेझेंट टेन्समधे राहायचं असेल तर आपल्याला सहजयोगात यायला पाहिजे. या क्षणाला जर जागृत व्हायचं असेल तर सहजयोगाला आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे. आपल्या पास्टमधे जाण्यात काय अर्थ आहे? पुष्कळसे लोक सांगतात की, 'अहो, तुम्ही किनई पूर्व जन्मात माझे पती होता .' असाल ! काहीही असो, जे झालं गेलं ते मेलं. त्याचं आता काय? पण अशा लोकांच्या गोष्टी आपल्याला फार अपिलिंग वाटतात आणि असे लोक आपल्याला फार आवडतात आणि अशा लोकांच्या गोष्टी आपल्याला फार आवडतात आणि अशा लोकांच्या म्हणण्यावरती आपण डोळे मिटून वागतो त्याला कारण असं आहे की तुमची स्वतंत्रताच मुळी हरपून घेतात. तुमची स्वतंत्रताच अशा तऱ्हेने हरपतात की तुमच्या वरती लिबिडोच्या शक्तीनी एखादं भूत बसवतात. अॅक्च्यूअली भूत असतं हं! नाही तर हा विचार करा या लाखो रुपयाच्या प्रॉपर्टीज या साधू लोकांना देण्याची काय गरज आहे! आणि तुमची जोखीम मारली जाते. त्यांच्यामध्ये पावित्र्य आहे की नाही हे सुद्धा कोणी बघत नाही. अहो, साधारण साधुत्व आहे का त्यांच्यामधे हे सुद्धा कोणी बघत नाही. आणि वाटेल तसे पैसे,... अहो , परवाच एक साहेब सांगायला आले होते, चांगले शिकलेले पंडित मनुष्य आहेत. बावीसशे रुपये त्यांनी एका माणसाला दिले म्हणे. मला काय झालं ते माहिती नाही. असे लोक थोडे दिवस तुमच्यावरती छाप घालतात आणि छाप घालून तुमच्याकडून काय काढायचं ते काढतात आणि दोन तीन वर्षानंतर तुम्ही चिडून गेलात तरी काही हरकत नाही. अशा लोकांच्या तऱ्हा-तऱ्हा आहेत. त्याच्यावर सुद्धा मी मागे बोलले होते की काय तऱ्हेने ते पिंगला, ज्याला आपण स्मरशानविद्या, प्रेतविद्या, भूतविद्या असे शब्द, तुम्हाला काही माहीत नाही, म्हणजे असं समजा आता बसल्या बसल्या मी अशी इथून वर आले म्हणजे 'काय माताजींना शक्ती आहे हो ! खाली जे होतं ते वर आलं. पण ती माताजींची शक्ती असू शकेल. पण परमेश्वराची नाही.' परमेश्वराला काही आणखी धंदा नाही का की तिथून उचलून इथे आणायला! आणि इथून तिथे ठेवायला. डोकं काय झालं ? कुठे १६ तुमच्या स्वतंत्रतेवर पहिला त्यांचा हात असतो, तसा विचार केला पाहिजे. होतं डोकं आपलं? कुठे जातं ? बुद्धीला काय बसलेली आहे ? कोणी आपल्या डोक्यावर चक्कर घातलेलं आहे ? काय आहे? आतमध्ये विचारा. बघा हे नाचतात, ओरडतात वेड्यासारखे. हे आहे काय? आपल्या बुद्धीला कोणी हात घातलेला आहे, ते बघितलं पाहिजे. मग ती मंडळी आमच्याकडे आली. त्यांची कुंडलिनी तर सोडाच, त्यांची चक्रं तुटलेली असतात. त्यांचे आज्ञा चक्र आणि नाभी चक्र तुटल्यामुळे काहीही उपयोग होऊ शकत नाही. असे गल्लो गल्ली गुरू निघालेले आहेत, गुरुया निघालेल्या आहेत. त्यांची काही कमी नाही आणि तुमच्या स्वतंत्रतेवर पहिला त्यांचा हात असतो, तसा विचार केला पाहिजे. नाचून परमात्मा मिळू शकतो का? कपडे बदलून परमात्मा मिळू शकतो का? म्हणजे पिंगलेच्या कचाट्यातून तुम्ही पटकन सुटता. पण इंडेचा कचाटा फार जबरदस्त असतो. हजारो माणसं यात बळी पडतात. रावणाला ही सिद्धी होती. ते पूर्वीचे असूर होते. कलीयुगातल्या असुरांचे तुलसीदासांनी वर्णन केलेले आहे. कलीयुगामध्ये सगळे असूर जन्माला आलेत. खरी गोष्ट आहे. दहा तर मलाच माहिती आहेत. पाच बाकीचे जन्माला आले आहेत. त्यांना प्रेम कशाशी खातात माहीत नाही. खवीस असतात खवीस. तुम्ही ओरडता, हे करता, आतून आनंद होतो यांना. 'अहाहा ! काय छळतोय मी मानवाला!' हिटलरला आपण जर खवीस मधला सिक्स्टी पसेंट म्हटलं तर हे हंड्रेड पर्सेंट आहेत. तुम्ही वेड्यासारखे धावत जाता त्यांच्याकडे. कारण ते तुमच्यावर आकर्षण घालतात. तुमच्या या सुपर ईगोमध्ये घालतात ती भुते! आता सायकॉलॉजिस्ट त्याला स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतात. आम्ही त्याला भुतं म्हणतो. एखाद्या वेळी एखादा सज्जन मनुष्य परमेश्वराची पूजा करीत असतो. त्याला सारखं साकडें घालत असतो, तेव्हा सुद्धा एखादा संत त्याच्यात येतो. संत असले तरी ते महंत नाहीत, रिअलाईज्ड नाहीत. पण त्यांना वाटतं याची आपली श्रद्धा रहावी. पण कशाला पाहिजे दुसर्याची मदत? बोलून चालून काय एक हार देवाला घातला. कसला चमत्कार नी कसलं काय! स्वत: तुम्ही काय कमी चमत्कारी आहात! स्वत:च्या शक्तीवर तुम्ही सगळं जाणलेले ते बरं की आपल्या डोक्यात भरून आणि नंतर माताजी, 'आमचं डोकं धरलं , माझ्या मुलाला वेड लागलं, अमुक झालं, तमुक झालं.' म्हणजे माझ्याकडे जेवढे पेशन्टस येतात त्यापैकी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सिक्स्टी पर्सेंट भुतानेच ग्रासलेले असतात. तुम्हाला माहिती नसेल तर विचारा यांना. सबंध सिंपथेटिकचा खेळ असं जरी म्हटलं तरी त्यातला कोणता सिंपथेटिक चालू आहे ते बघितलं पाहिजे. ज्याला अॅबस्टिनन्स म्हणतात. ज्याला आपण म्हणू १७ कुंडलिनी आणि सहजयोग की लोक जास्त तप करा म्हणतात. हे तप ज्याला म्हणतात, ते सुद्धा काही तरी करणं आहे आणि ज्याला इन्डल्जन्स म्हणतात की कोणत्या तरी गोष्टीत अतीरंजन करणं, ते सुद्धा तेच आहे. दोन्ही एकच आहेत. मधोमध परमात्मा आहे. ते सांगणारे पुष्कळ भेटतील, पण करतील हेच. तुम्हाला सांगतील प्रेमाच्या गोष्टी, पण करतील हेच धंदे. कारण त्यांच्यामधे हे नाही. असतं तर चटकन दिसलं असतं तुम्हाला. पार केलेली किती मंडळी आहेत ? पुष्कळ लोकांना मी ब्राह्मणांवरती भाषणं देतांना पाहिलंय की सगळ्यांनी ब्राह्मण झाले पाहिजे. एकाला तरी तुम्ही ब्राह्मण केलंय का? सगळ्यांना ट्रान्समधे घातलेलं आहे. ट्रांसमधले लोक आहेत. आपल्या स्वतंत्रतेत, आपल्या पूर्ण स्वतंत्रतेत उठण्याचा हा मार्ग फक्त परमेश्वराने आखलेला सहजयोग आहे, सह + ज, जो तुमच्याबरोबर जन्मलेला. काही त्याच्यात तुम्हाला करायचं नाही. जसं एक बीज आपोआप अंकुरतं आणि त्याच्यातून आपोआपच झाड बाहेर येऊन त्याला फळं लागतात, तसं तुमच्यात आपोआपच व्हायला परमेश्वराने दिलेले आहे. सहज म्हणजे तुमच्याबरोबर जन्माला आलेलं. तुमच्याच बरोबर जन्मलेले असं आहे. त्याला काम करू द्या. ते नुसतं बघायचं आहे आणि ते इतकं सुंदर होतं. ते कुंडलिनीचं जळणं आणि हे कुंडलिनीचे प्रकार काहीही व्हायला नकोत. उद्या जर एखादं झाड, जर वर येताना जळू लागलं, तर ते झाड आहे का काय आहे! पण जळणार ! त्याच्यात बाधा असली तर जळणार! आम्ही एक्सपरिमेंट करतोय . आता वेगळ्या वेगळ्या झाडांवर, ज्याच्यात बाधा असतील ते जळणार आणि सगळा प्रकार जो काही बिघडलेला आहे तो या मृत लोकातनं आलेल्या भूतांचा आहे. भुतं म्हणजे मेलेला. मरतो म्हणजे काय? आपण सगळे मरतच नाही मुळी. थोडा फार आपल्या शरीराचा भाग बाहेर दिसतोय, पृथ्वी तत्त्वातला निघून जातो. बाकीची चार तत्त्व जशीच्या तशी. ते शरीर आपल्याला दिसतात. त्याचा रंग असा निळसर हलकासा असतो. ते बघितले तर तुम्हाला दिसेलसुद्धा. आणि त्याच्यामधे सूक्ष्मता येते आणि हा वरचा जड भाग पडल्यामुळे त्याच्यात सूक्ष्मता येते आणि ती तुमच्या मनामधे घुसते. एखाद्या मुलाला एकदम भीती वाटते. डॉक्टर्स त्याला काही नावं देतील, त्याला भित्रं म्हणतील, सायकोसोमॅटिक म्हणतील, पण खरोखर होतं काय की या सिंपथेटिकमधे जागा होते. ती तडाडते आणि मग त्याच्यामधे पोकळी होते, व्हॅक्यूम होतो. त्या व्हॅक्यूममध्ये असं एखादं तरी राहतं. या लोकांना सिद्धी असतात. रावणाला सिद्धी होती. मी आपल्याला सांगत होते, तो भाषणामधून नुसत्या भाषणामधून लोकांच्या नाभी वरती भूत घालीत असे. आणि लोक वेड्यासारखे, म्हणजे तो व्यभिचारसुद्धा लोकांकडून करून घेत असे त्या स्थितीमध्ये, ही रावणाची स्थिती! किती तरी त्याचे जन्म झाले. महिषासुरालासुद्धा पुष्कळशा अशा गोष्टी उपलब्ध होत्या आणि हे सगळेच्या सगळे तुमच्यावर उलटले असताना त्यांना गुरू समजून त्यांना पूजलेत म्हणजे आपल्या बुद्धीला अगदी तिलांजली द्यायला नको. बुद्धीच्या पलीकडे जरी परमात्मा असला तरी बुद्धी सोडून नाहीये. ज्यांनी बुद्धीचा त्याग केलेला आहे त्यांना कधीही परमात्मा १८ त्याच्या प्रेम शक्तीने ही रचना केलेली आहे. प्रेम म्हणजे ज्ञान. भेटणार नाही. नाही तर तुम्हाला बुद्धी कशाला दिली त्याने ? बुद्धीने जाणलं पाहिजे की परमात्मा कसा असू शकेल! तो परमात्मा, त्याच्या काय इच्छा आणि कल्पना आणि विचार असू शकतील? तो काही आपल्या माणसासारखा नाही. मी आत्मसाक्षात्कार या बद्दल सांगणार आहे आपल्याला की चैतन्याचं काय स्वरूप आहे आणि चैतन्य काय करते आणि चैतन्याकडे आपलं लक्ष कसं वेधलं जातं. हा मार्ग प्रेमाचा आहे. पुष्कळदा लोक मला असंही विचारतात , की तुम्ही प्रेमाला एवढं का प्राधान्य देता ? कारण प्रेम जर परमात्म्याला झालं नसतं तर त्याने ही सगळी रचना केली कशाला असती? त्याच्या प्रेम शक्तीने ही रचना केलेली आहे. प्रेम म्हणजे ज्ञान. म्हणजे सहजयोगाने असं कळतं की जसे तुम्ही पार होता तसे तुमच्या हातातून व्हायब्रेशन्स वहायला लागतात. सहजयोगाने तुमची कुंडलिनी वर उठून सहस्रार हछेदून त्याच्याशी एकाकार होते तेव्हा तुमच्या हातातून व्हायब्रेशन्स सुरू होतात आणि हे व्हायब्रेशन्स तुम्हाला शिकवतात की कुठं काय आहे? माणसामध्ये कुंडलिनी कुठे आहे ? लहान लहान मुलंसुद्धा तुम्ही असे हात धरले तर सांगतील, 'माताजी पार आहेत बरं का!' एक लहान मुलगा, आठ वर्षाचा मुलगा, तुम्हाला सांगतो की हा मनुष्य पार आहे की नाही. म्हणजे जर तुमच्या हातामध्ये भरपूर व्हायब्रेशन्स येत असतील आणि सहस्रारात थांबलेला असला, तर तो मुलगा पार आहे, पण ते तुम्हाला काही समजायचं नाही मी काय बोलतेय ते! पण एका लहानशा आठ वर्षाच्या पार झालेल्या मुलाला कळतं. तो सांगतो, 'बसलेले आहेत, त्यांना विचारतो हातात तुमच्या व्हायब्रेशन्स येतात का ?' आणि याच व्हायब्रेशन्सने हजारो लोकांना हिंदुस्थानमध्ये, लोकांनी आणि बाहेरसुद्धा पुष्कळांनी ठीक केलेले आहे. म्हणजे मी लिहायला बसले तर ग्रंथच्या ग्रंथ लिहून होतील, पण हे मुख्य कार्य नाही. लोकांना बरं करणं हे मुख्य कार्य आहे. आणि याची प्रचिती घ्यावी. डोकं उघडं करून याची प्रचिती घ्यावी. एवढे सगळे गुरू कार्य करीत आहेत त्यांना जाऊन विचारा, की याचं टेक्निक काय आहे ? तुम्ही काय करता ? ते काहीही सांगू शकणार नाहीत. कारण ते भुतांच्या आहारी स्वत: गेलेले आहेत आणि त्यांचा मृत्यू काळ जवळ आलेला आहे. ही भूतंच त्यांच्या डोक्यावर बसणार आहेत आणि है? त्यांना ठिकाणी लावणार आहे, पण त्याच्या आधी तुम्ही आहारी जाऊ नका. स्वत:च्या स्वतंत्रतेत तुम्ही घ्या सहजयोगाला. मनुष्य स्वत:च्या पूर्ण स्वतंत्रतेत घेतो. तुमच्यावर जबरदस्ती करता येत नाही आणि तुम्ही जरी म्हटलं, 'माताजी, आम्हाला पार करा.' तरी ते होणार नाही. झालं पाहिजे. झालं पाहिजे. जर आम्ही म्हटलं हो , तुम्ही पार झालात तर सगळेच्या सगळे म्हणतील, की तुम्ही पार झालात. सहजयोगाचं हे वैशिष्ट्य आहे, की फळ १९ कुंडलिनी आणि सहजयोग ० ० নে सहजयोगाशिवाय काही मार्ग नाही संसारात. जर हा मार्ग अवलंबन नाही केला तर संसारात सबंध संहार होणार आहे . झालं तर सगळे म्हणतील की फुलाचं फळ झालं. फूल असताना कोणी म्हणणार नाही की हे बघा फळे झाली आहेत. डोळे आहेत नं आम्हाला तसे ते डोळे येतात. ते लहान मूल असो की मोठे असो, सगळे म्हणतील पार म्हणजे पार आणि पार झाल्यावरसुद्धा काय करायचं ते असे की, चैतन्यात उतरण्याची शक्ती जरी आली तरी त्या चैतन्यामध्ये स्थिरता कशी आणायची वरगैरे याचं बरंच काही शिकायचं असतं. ह्युमन क्रायसिसवर मी जेव्हा बोलणार आहे तेव्हा हे सांगणार आहे, की सहजयोगाशिवाय आता काय होणार आहे. सहजयोगाशिवाय काही मार्ग नाही संसारात. जर हा मार्ग अवलंबन नाही केला तर संसारात सबंध संहार होणार आहे. या बद्दल काहीही शंका नाही. विचारी लोकांनी हे जाणून घेतलं तरी पुष्कळ आहे. दहा वर्षानंतर अमेरीकेहन हे कदाचित येईल. तिथल्या डॉक्टरांचे कान उघडे झाले आहेत. कॅन्सर कसे बरे होतात? मी बरे करते असे नाही. ही माझी मुलं आहेत ती बरे करतात. काही तरी कोणी सांगितलं, उडायला सांगितलं तर उडतात, धावायला सांगितलं तर धावतात. पण का? हा विचार आपल्या डोक्यात यायला पाहिजे. आपली स्वतंत्रता बाळगली पाहिजे. ती बाळगली, कोणी गुरू असेल बुवा आपला, तर त्यांनी काय दिलं? मी आई आहे. मी आईच्या नात्याने तुम्हाला सांगते की तुम्ही जागृत रहा. आतमध्ये जागा आणि बघा आपल्यामध्ये काही दिसतय का ? जे काही दिसेल, जे काही मोठं आहे, जे काही गौरवान्वित आहे ते सगळं जाणायला पाहिजे. ते सगळं श्रेय सहजयोगाला आहे. ते तुम्हाला मिळणार आहे. जे मिळण्यासारखं आहे ते का नाही घ्यायचं. कदाचित नाही मिळणार. काही सांगता येत नाही. काही काही आमच्याकडे चार वर्ष येतात त्यांना मिळत नाही. तर काही काही दोन मिनिटात पार होतात. लोक म्हणतात, 'हे काय माताजी, तुम्ही फेवर करताय.' मी फेवर करण्याचा प्रश्नच नाही. मी काहीच करीत नाही. मी फक्त तुमच्या डोक्यावर हात ठेवते. तिथून जे वहातय ते येऊ द्या. ती जी मधे पोकळ गॅप आहे, ती पोकळी आहे, तिला व्हॉईड म्हणतात. त्याच्यात भरते. भरल्याबरोबरच कुंडलिनी वर उठते आणि वर उठल्यावर सहज वर जाऊन सहस्रार छेदून तुम्हाला त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या प्रेम शक्तीशी एकाकार करते. तीच तुमची चेतना, तुमचा अवेअरनेस आहे. त्या शक्तीवर आज प्रत्येकाचं हृदय स्पंदन करीत असतं, ती संपण्याच्या आधी हे पेट्रोल भरून २१ तुto घ्या. हे शरीर जायचेच आहे. पण हा क्षण जो आला आहे तो गाठलाच पाहिजे. पुण्यात गैरसमज झालेत की मी मंदिरात आणि देवळात जाऊ नका असं म्हणते, ते खोटं आहे. मुळीच म्हणत नाही. जे वंदनीय आहेत ते वंदनीय आहेत आणि रहातील. पण तुम्हाला माहिती आहे का की ते कसं वंदनीय आहे. तुम्हाला काय दगड आणि धोंडेच आहेत सगळे ! मी सुद्धा दगड-धोंडाच आहे. तेव्हा ते जाणून घ्या. आधी ते डोळे घ्या. समजा इथे जर पाटी लावून ठेवली, 'इथे माताजींचे भाषण आहे' आणि तुम्ही ती पाटीच वाचत राहिलात, आतमध्ये नाहीच आलात तर मला कसं जाणणार? तेव्हा आतमध्ये येऊन एकदा भेटून तरी घ्या, मग बघा त्या पाटीचा काय अर्थ आहे ते. तुलसीदासाचं उदाहरण आहे. तुलसीदासानी सबंध रामायण लिहिल्यावर श्रीरामांनी त्याना तीनदा दर्शन दिलं आणि त्यांनी त्यांना टिळा लावला. 'तिलक देत रघुवीर' तीनदा आणि तीन वेळा ओळखलं नाही त्यांना. त्यांचं वर्णन रात्रंदिवस करत होता, 'अरे प्रभू, ये.' आता ठाकलाय तरीसुद्धा तुम्हाला आतमधे यायचं नसलं तर तो काय करणार! तेव्हा कोणी काय म्हटलं, कोणी काय सांगितलं, कोणत्या पुस्तकात ते आलं, मी काय सांगते, तुम्हाला काय दिसतंय, तुमचा काय अनुभव आहे, ते मुख्य आहे. सगळ्यांच्या चुका होतात, सगळ्यांच्या चुका झालेल्या आहेत. त्याला कारण शोधा. आमच्या हातून चुका झालेल्या आहेत पूर्व जन्मात आणि या जन्मामध्ये मी जे मिळवलेलं आहे ते घेतलंच पाहिजे. मुलाला कसं शिकवायचं याच्यासाठी कितीही प्रयत्न जरी आईने केले तरी चुकू शकतं तिचं! तिचं चुकलं म्हणजे असं नाही की धर्म चुकले. चुकलेले आहे, पण धर्मामध्ये जी भावना, की मुलाला हे मिळालेच पाहिजे, ते सगळीकडे आहे. ते लिहिलेले आहे, की तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे. ते कोणत्याही धर्मात लिहिलेले आहे. पण ते जमलेले नव्हते. ते जमण्याची संधी जर आलेली आहे, तर ती स्वीकारावी आणि बघावं जमतंय की नाही. जर तुमचं होत नसलं तर होणार नाही. त्याबद्दल मला क्रिटीसाईझ करण्यात काही अर्थ नाही की स्वत:ला खाली पाहण्यात काही अर्थ नाही. उलट परमेश्वराला समर्पित होऊन परत प्रयत्न करा. पण जर तुमच्यात खरंच आर्तता आली, तर कोणत्याही राक्षसांनी कितीही तुमचं बिघडवलेलं असलं तरी तुम्ही ताळ्यावर येणार आणि तुम्ही ठिकाणावर याल याबद्दल मला मुळीच शंका नाही. तेव्हा आपण काहीही करून परमेश्वराला मिळवू शकत नाही हे ब्रीद वाक्य आहे. हा सहजयोग आहे. आपोआप हे घडतं, जसं एक बी आपोआप उगवतं फक्त मी थोडं प्रेमाचं पाणी देते त्याला. माझं काही देणं- घेणं नाही तेव्हा मी गुरुसुद्धा नाहीअसं म्हंटल पाहिजे. पण कधीकधी आई गुरू होते. त्याला काही इलाज नाही तेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावर बसलात, तुम्ही मला त्रास जरी दिलात तरी मान्य आहे, पण त्रास देण्यापेक्षा आई जर काही चांगलं देत असेल तर घ्यावं. ती सुबुद्धी आहे. कुबुद्धी नसते अशातली गोष्ट नाही, कुबुद्धीही आहे. तेव्हा आपण कोणाच्या आहारी जातो ते आपल्याकडे आपण लक्ष ठेवून सहजयोगात यावं. २२ ৯ ा ० तुम्हीली हे जाणून घ्यायचे आहे की सत्य तुमच्या चरणांवर येऊन पडणार नाही. जर तुम्हीली सत्याचवी प्राप्ती करायची असेल तर तुम्हीली सत्याच्यापायावरपडले पाहिजे. (य.पू.श्रीमाताजी, निर्मल योग १९८३) प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in , website : www.nitl.co.in ০০৩ पूजेला येण्यापूर्वी आपल्या चक्रांनी साफ करा तसेच ध्यान करा, पूजेच्या वेळी लोकांनी नाहीतर मला खूप त्रास होतो. घड्याळीकडे बघूनये. प.पू.श्रीमाताजी, ३१.३.१९९५ ---------------------- 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-0.txt चैतन्य लहरी मार्च-एप्रिल २०१४ मराठी ह ७. ज ५ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-1.txt २ु मनुष्याच्या बुद्धीमध्ये खूप शंका निर्माण होत असतात. पहिली शंका, जी सर्वसामान्य आहे, ती ही की, श्रीमाताजी कोण आहेत ? मी तुम्हाला सांगू इच्छिते की आत्मदृष्टी खोलल्याशिवाय तुम्ही मला समजू शकत नाही. आणि मला समजण्याचा प्रयत्नदेखील तुम्ही करायला नको. प्रथम आपली आत्मदृष्टी उघडा, प.पू.श्रीमाताजी, निर्मल योग १९८३ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-2.txt या अंकाव कुंडलिनी आणि सहजयोग ४ की 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-3.txt कुंडलिनी आणि अह्जयोग पुणे, १५.११.१९७३ मनुष्याचं डोकं हे जनावराच्या डोक्याच्या मानाने त्रिकोणाकार आहे. हे सिद्ध आहे, म्हणजे हे सत्य आहे. तेव्हा लोलकासारखे, प्रिझमसारखे हे, या शक्तीमुळे एका वेगळ्या तव्हेनी आलोकित होते. प्राण्यांमध्ये असे होत नाही, एण माणसामध्ये किंवा असे म्हणता येईल की, मानवीय डोक्यामध्ये हर प्रकार घडतो. लोलकीय स्थितीत असल्यामुळे, प्रिझम सारख असल्यामु ळ, म धू न शिखरामधून येणारी जी चैतन्याची किरणं आहेत ती सरळ खाली जातात आणि बाजूला असलेल्या ज्या त्रिकोणाकार लोलकासारख्या दोन रेषा आहेत किंवा लोलकाचा जो आकार आहे, दोन्हीकडून येणाच्या या चैतन्य रेखा, अशा आपापसामध्ये क्रॉस करतात. 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-5.txt कुंडलिनी आणि सहजयोग सगळे काही जड शक्तीने केलेले आहे. हे पंखे घेतले आणि मग मेनला लावल्याबरोबर सगळे लावून प्रकाशित झाले. मेनला लावणारी इलेक्ट्रिकची जी शक्ती आहे, तशी समजा चैतन्य शक्ती ही आपल्यामध्ये तीन महिन्याच्या किंवा दोन महिन्याच्या मुलात आईच्या पोटामध्ये प्रवेश करते. यात ते दाखवलेले आहे. या डायग्रॅममध्ये मी ती शक्ती दाखवलेली आहे. मनुष्याचं डोकं हे जनावराच्या डोक्याच्या मानाने त्रिकोणाकार आहे. हे सिद्ध आहे, म्हणजे हे सत्य आहे. तेव्हा लोलकासारखे, प्रिझमसारखे हे, या शक्तीमुळे एका वेगळ्या तऱहेनी आलोकित होते. प्राण्यांमध्ये असे होत नाही, पण माणसामध्ये किंवा असे म्हणता येईल की, मानवीय डोक्यामध्ये हा प्रकार घडतो. लोलकीय स्थितीत असल्यामुळे, प्रिझमसारखं असल्यामुळे, मधून शिखरामधून येणारी जी चैतन्याची किरणं आहेत ती सरळ खाली जातात आणि बाजूला असलेल्या ज्या त्रिकोणाकार लोलकासारख्या दोन रेषा आहेत किंवा लोलकाचा जो आकार आहे, दोन्हीकडून येणार्या या चैतन्य रेखा, अशा आपापसामध्ये क्रॉस करतात. याला इंग्लिशमध्ये रिफ्रॅक्शन म्हणतात आणि मला वाटतं विकेंद्रीकरण म्हणतात मराठीत. सायन्सला मराठीत समजवायचं म्हणजे जरासं जड जातं. तर त्याच्यामुळे असं येऊन, इथे असे क्रॉस करून मग असे खाली येतात आणि वरून म्हणजे ए , बी आणि सी अशा तीन दाखविलेल्या आहेत, पैकी बी मधोमध येते. ए अशी येते खाली आणि सी अशी येते. आता ज्या ठिकाणी क्रॉस करतात त्याला इंग्लिशमध्ये, आपल्या मेंद्मध्ये मधोमध जिथे आपल्या डोळ्याचे तंतू मिळतात, तिथे असाच क्रॉस होतो. बाहेरसुद्धा दिसतं , पण हे जे मी दाखविलेले आहे ते सबंध आपल्या मागचा जो भाग आहे मधला, त्याच्यामध्ये होते. बाहेर होत नाही. तेव्हा ते आपल्याला दिसत नाही, पण सूक्ष्मात असं घडतं. आता याची जी शास्त्रोक्त व्याख्या आहे आणि त्यांनी कशा सिंपथेटिक आणि पॅरासिंपथेटिक संस्था उत्पन्न झालेल्या आहेत त्याबद्दलचा एक लेखसुद्धा आलेला आहे आणि तुम्ही एवढच लक्षात ठेवायचं की मधोमध जी आहे ती पॅरासिंपथेटिकला प्रतिबिंबित करते आणि ज्या दोन बाजूला आहेत त्यापैकी राईट आणि लेफ्ट सिंपथेटिक नव्व्हस सिस्टीम असं शास्त्रोक्त म्हणतात. हे झालं सगळं शास्त्रोक्त! पण खरोखर असं होतं का ? आणि याचं कारण काय? असं करण्याचं कारण काय? माणसामध्ये हे असण्याचं कारण काय? हा प्रश्न समोर येतो. जनावरांचे बरोबर आहे. त्यांच्यामध्ये काही असा प्रश्न नाही. त्यांच्यामध्ये विहिनीकरण होत नाही, विकेंद्रीकरण होत नाही. सगळे बरोबर येतं, माणसामध्ये असं का देवाने केलं? ही विशेष घटना का घडवून आणली? कारण माणसाला परमेश्वराला अहंकार द्यायचा होता. थोडी माया घालायची होती त्यात. थोडेसे इल्युजन बनवायचं होतं . आता एक साधारण उदाहरण घेऊ या. एखादी आई आपल्या मुलाला दुडूदडू धावायला कसं शिकवते. ती कुठे तरी लपते आणि मुलाला म्हणते इकडे ये, इकडे ये. आणि मग तो मुलगा शोधत तिच्यापुढे जाऊ लागतो किंवा चिमणीचं उदाहरण घेतलं तर बरं होईल. चिमणीचं लहानसं पिल्लू असतं त्याला काही उडता येत नाही. चिमणी जाऊन कुठे तरी लपते आणि त्याला हाक मारत असते. ते शोधत शोधत बघत असतं मग शेवटी हिम्मत ६ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-6.txt एक अशी शक्ती माणसामध्ये आहे, की ज्याच्यावर माणसाचा काहीही अधिकार नाही. करून आपले दोन्ही पंख पसरून ते उडायला लागतं. ते पिल्लू जसं शिकतं तसं माणसालासुद्धा हे शिकवलं पाहिजे ती आई कोण आहे? ती शक्ती कोण आहे? ती चेतना कोणाची आहे? कोणच्या चेतनेवर तुम्ही जिवंत आहात ? म्हणून हे सगळे कार्यक्रम, त्या शक्तीने, एक माया म्हणतात त्याला, त्या श्री हरीची माया असं ऐकलं असेल आपण, ती हरीची माया, तिने हे केलेलं सगळं नाटक की तुमच्यावर एक असा पडदा घातलेला आहे, की तुम्हाला असं वाटतं की आपण म्हणजे जे आहोत ते खरेच आहोत. हा सगळा संसार म्हणजे खरा आणि याच्या पलीकडे काही आहे असं वाटत नाही. आतून असं फार तर वाटतं की काही तरी कमी आहे. पूर्ण काही झालं नाही. लोक भाषणं देतात, पुष्कळ लोकांची अशी स्थिती आहे, की पुस्तकं वाचून ते भाषणं देतात आणि काहीही साध्य होत नाही. वेड्यांचा बाजार नुसता तयार करून ठेवला आहे अशा लोकांनी. या पुण्यात, आमच्या मुंबई शहरात कुंडलिनी जागृत करणारे हजारो लोक आहेत. पण ते लोक आमच्याकडे आले, की आम्ही त्यांना नमस्कार करून सांगतो, की तुम्ही तुमच्या गुरुजींच्याकडे जा. आमच्याकडे काही तुमचं ठीक होणार नाही. कारण त्यांच्या सगळ्या चक्रांचा सत्यानाश आणि बिघाड झालेला आहे. त्याला कारण असं, की पुस्तकं वाचून कोणतंही कार्य केलं की ते आर्टिफिशियल आहे. जर एखाद्या मुलाची आई हरवलेली आहे आणि त्याला सांगितलं की हे पुस्तक वाच आईविषयी आणि आई भेटल्यावर तिला जोरात मिठी मार, तर काय स्थिती होईल! नाटकी होईल की नाही! आणि हा नाटकीपणा करत करत आपण कोणत्या स्थितीला जातो ते थोडे मी आज आपल्याला सांगितलं. ए आणि सी या ज्या दोन आपल्यामधल्या शक्त्या आहेत त्याला सिंपथेटिक नव्व्हस सिस्टीम असं म्हटलेलं आहे, त्याला आपल्या योगामध्ये इडा आणि पिंगला अशा दोन नाड्या म्हणतात आणि मधली जी नाडी आहे तिला सुषुम्ना असं म्हणतात. इडा आणि पिंगला, आता जे डॉक्टर्स इथे आहेत ते मला जास्त चांगलं समजू शकतील किंवा सायकॉलॉजिस्टस् आहेत ते चांगलं सांगू शकतील. त्याचा एक फायदा असा आहे, की त्यांनी शोध लावून एवढं तरी शोधून काढलेलं आहे की, एक अशी शक्ती माणसामध्ये आहे, की ज्याच्यावर माणसाचा काहीही अधिकार नाही. तिला ते ऑटोनॉमस नव्व्हस सिस्टीम असं म्हणतात किंवा दुसरं नाव त्याला जे सायकॉलॉजिस्टसनी दिले आहे त्यात युनिव्हर्सल अनकॉन्शस असं नाव दिलेले आहे. ही सगळी नावं आहेत. पण त्याचं असं झालेले आहे, की आपण आपल्या सौंदर्याला, गौरवाला विसरलो. ते फक्त त्या मायेने केलं. तेव्हा ती माया आपल्यावर पडलेली आहे, पण त्या मायेचं जे काही करणं झालं, त्याच्यात कधी कधी लहान लहान मुलं अशी भटकतात, अशी भटकतात, की डोकी फुटून मरतात. परत जन्म होतो, परत शोध चालतो, परत ७ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-7.txt कुंडलिनी आणि सहजयोग शोध चालतो. करत करत शेवटी ती आई मिळाली. कदाचित कलियुगात तो समय, ती विशेष वेळ आलेली आहे. जेव्हा सगळे काही फिरणं, भटकणं त्या मुलाचं संपलेले आहे. कदाचित आजच असाच आपल्यासाठी तो समय, ती विशेष वेळ आलेली आहे. जेव्हा त्या मुलाचं फिरणं, भटकणं संपलेलं आहे आणि कदाचित आजच असाच आपल्यासाठी तो सुमंगल संधीचा काही तरी विशेष म्हटलं पाहिजे, देवाचा आशीर्वाद असेल. आजच पुष्कळ लोकांनासुद्धा हे मिळू शकेल. तेव्हा काही लोक इथे असे विचार करत बसले आहेत की हे कसं शक्य आहे. हे मला माहिती आहे. तेव्हा त्यांनी आता थोडंसं जे काही आपल्या डोक्यात आहे किंवा पुष्कळ वाचलेले आहे, थोडे बाहेर ठेवून आतमध्ये मी जे काही सांगते आहे तिकडे लक्ष द्यावं. पुस्तकं वाचून देखील त्यांना काही विशेष माहिती नाही. याच्याबद्दल ते फारसं काही सांगू शकत नाहीत. पॅरासिंपथेटिक नव्हस सिस्टीम आहे. म्हणजे आपलं हृदय आहे. आपण धावायला लागलो की, हृदय धडा-धडा वाजू शकते. पण आपण म्हटलं की हृदय कमी करून टाकू तर ते कमी करता येणार नाही, वाढवू शकतो, पण कमी करता नाही येणार. अशा पुष्कळशा गोष्टी आपण करतो आहोत - आपल्या पोटामध्ये अन्न पचन होतं - की त्या आपल्या हातच्या नाहीत. त्या आपोआप होत असतात. त्या सगळ्या या पॅरासिंपथेटिक मधल्या. या जे मी दाखविलेल्या आहेत. इथे बी, या दोन्ही शक्त्या म्हणजे लेफ्ट आणि राईट सिंपथेटिक आणि पॅरासिंपथेटिक किंवा इडा, पिंगला आणि सुष्म्ना अशा तिन्ही नाड्या, त्या तिन्हीचा परिणाम त्या मधोमध असलेल्या प्लेक्सेसवर म्हणजे चक्रांवर होतो. हे आहेत, आपल्यामध्ये प्लेक्सेस आहेत ते डॉक्टर मानतील, त्यांचे जे सेंटर्स आहेत त्यांना आम्ही चक्र म्हणतो. मधली जी संस्था आहे ती आपल्या डोक्यामध्ये कोणी पेट्रोल भरावं तशी भरलेली आहे. त्याच्यानंतर मग या दोन्ही संस्था जेव्हा चालू होतात, त्या कशा चालू होतात ते पाहिलं पाहिजे. जेव्हा लहान मूल आईच्या मांडीवर पीत असते त्या वेळी पूर्ण आनंदाने पॅरासिंपथेटिक बनतं. काही करत नाही. व्यवस्थित दुध पितं. इतक्यात दूध आई त्याला इकडून तिकडे हलवते. लगेच हे काय केलं असं वाटतं त्याला. ते पॅरासिंपथेटिकमुळे नव्हे तर सिंपथेटिकमुळे वाटते की, 'असं आईनी मला का केलं.' तो विरोध करतो. तो विरोध आल्यामुळे ईगो म्हणून एक गोष्ट या इथे दाखविली आहे. अहंकार आणि प्रति अहंकार हे दोन्ही अशा रीतीने तयार होतात. पहिल्यांदा अहंकार जेव्हा तो आईला विरोध करतो, 'ही कोण आहे मला त्रास देणारी' असं जेव्हा वाटतं. तेव्हा तो विरोधामध्ये ईगो बनतो आणि त्याच्यानंतर त्याची आई त्याला म्हणते, 'असं करू नकोस, तसं करू नकोस.' त्याचं जे कंडिशनिंग होते त्याच्यामुळे सुपर ईगो तयार होतो म्हणजे प्रति अहंकार बनतो. नावामध्ये येऊ नका. त्याचा जो काही सारा्थ आहे तो घ्यायचा, सारार्थ घ्यायचा. शब्दावरती येऊ नका. आता माणसामध्ये अहंकार आणि प्रति अहंकार हे सारखे वाढत असतात. जेव्हा वाटतं मी कोणी तरी आहे तेव्हा ईगो वाढतो. कोणी सांगितलं असं करायचं नाही, म्हणजे त्याचा सुपर ईगो वाढतो. आणि असं वाढत वाढत दोन्ही खूप वाढायला लागले म्हणजे जाऊन वरती एकमेकांना भिडतात आणि जेव्हा हे दोन्ही एकमेकांना भिडतात ८ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-8.txt अहंकार आणि प्रति अहंकार मुळेच माणसाला मी पणा येतो. तेव्हा आपल्या डोक्याच्या इथे, आपल्याला माहिती आहे, की लहान मुलांची टाळू वाजत असते. ती टाळू भरून आल्याबरोबर मुलाचा अहंकार आणि प्रति अहंकार पूर्णपणे आपलं काम दाखवू लागतो. मधल्या स्थितीमध्ये जेव्हा मुलाची नाळ कापली जाते, तेव्हा तिथे एक मोठी गॅप होऊन जाते. ती बाहेरूनही दिसते. हे डॉक्टर्स ही सांगतील. पॅरासिंपथेटिकमध्ये गॅप आहे. त्याला झेन मध्ये व्हॉईड म्हणतात. मी त्याला भवसागरमध्ये माया म्हणते. ही एक भली मोठी माया आहे. आता आपण आपल्या अहंकार आणि प्रतिअहंकार यामध्ये राहतो आणि अहंकार आणि प्रति अहंकार मुळेच माणसाला मी पणा येतो. मी पणा आला म्हणजे 'मी कोणीतरी आहे, मी वेगळा आहे' अशा रीतीची भावना येते. विषय थोडासा कठीण आहे, म्हणून शांतपणे ऐका हं! 'मी' पणा आला म्हणजे जे सारखे अव्याहत डोक्यात वाहत असतं ते बंद होतं आणि तुम्ही काही तरी वेगळे होता. म्हणजे असं समजा हे माझं बोट आहे हे दूसरं बोट आहे. हे वेगळं होऊन म्हणेल, की मी वेगळं बोट आहे. याच्यामध्ये वाहणारं चैतन्य जर कापलं गेलं आणि ह्याला वाटलं मी त्या चैतन्यावर फ्री आहे, तशी स्थिती माणसाची होऊन जाते आणि तो एक मी अमका, मी निर्मला देवी असं स्वत:ला समजू लागतो. आता हे सगळे मी सांगितलं आपल्याला, एवढ्यासाठी झालं की ही एक माया, एक इल्यूजन आहे. माया तुमच्यासमोर आली, की 'मी इल्यूजन आहे, आणि मी सगळं काही आहे, याच्या पलीकडे काही जग नाही' हे दिसायला लागतं. आता जेवढं काही खोटं आहे ते खरं वाटेल, म्हणजे आता जन्मल्याबरोबर तुम्हाला एक नाव दिलं. आता मला जसं नाव दिलं निर्मला. मग ते माझं नाव खरं झालं. आता नावासाठी, जर कोणी मला निर्मला म्हणून शिव्या दिल्या तर लगेच मी त्यांना मारायला उठणार, मग तुम्ही या देशाचे, हिंदुस्थानी हे खोटं आहे. आम्ही कुठलेच नाही. देवाने काय असा हिंदुस्थान, बिंदुस्थान बनवला होता का? त्यांनी काहीसुद्धा मुंबईकर, तुम्ही पुणेकर, मग पुणेकरातही आम्ही अमके आणि तुम्ही तमके करत करत मग आपण असं लहान लहान होत जातो आणि सबंध मिथ्या, जेवढं काही मिथ्या आहे, जेवढं काही खोटं आहे, त्याला आपण एक तुम्ही बनविले नाही. सगळ्या मिथ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपल्या होऊन जातात. मग आम्ही करून घेतो. तर त्याचा इलाज कसा करायचा, हे सहजयोगाने कसं करायचं, हे सगळं नंतर मी कुंडलिनीच्या वर्णनावर आल्यावर आपल्याला सांगणार आहे. आता कुंडलिनीचे वर्णन आतापर्यंत किती तरी योगदर्शन, अमुक, तमुक, ९ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-9.txt कुंडलिनी आणि सहजयोग किती तरी लोकांनी कुंडलिनीवरती, पुष्कळ लोकांनी कुंडलिनी वरती लिहिलेले आहे. पुष्कळसे लोक पुस्तकं वाचून कुंडलिनीचे वर्णन लिहितात, पण कोणी खरोखर कुंडलिनी पाहिली आहे की नाही असं विचारलं तर पुष्कळ म्हणतीलसुद्धा की आम्ही कुंडलिनी पाहिली आहे, पण त्याची प्रचिती पाहिजे. उद्या जर मी म्हटलं की माझ्या हातात खडू आहे. तर त्याची प्रचिती काय तर मला लिहिता आलं पाहिजे. दाखवलं पाहिजे. मी इकडे लिहून जर तुमच्याजवळ कुंडलिनी आहे, तुम्हाला माहिती आहे तर दुसऱ्यामध्ये कुंडलिनीचे काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि जर तुम्हाला कुंडलिनी दिसलेली आहे, एवढं तुम्हाला दर्शन कुंडलिनीचं आहे, तर दुसर्याची कुंडलिनी कुठे आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इतकंच नव्हे तर त्यालासुद्धा तुमच्यासारखं कुंडलिनीचे दर्शन झाले पाहिजे, पण तसं मुळीच होत नाही. कुंडलिनी पाहिलेला मला तरी आतापर्यंत एकही मनुष्य दिसलेला नाही. पुष्कळ गुरू लोक पाहिले आहेत मी. पुष्कळ यच्चयावत हिंदुस्थानात फिरून पुष्कळ लोक पाहिले आहेत मी आणि इतक्या जवळून पाहिले आहेत, की तितक्या जवळ जायला कदाचित तुम्ही धजावणारसुद्धा नाही आणि एकाही माणसाला मी जागृत पाहिलेलं नाही. दोघं- तिघं आहेत, ते मला आतमध्ये माहिती आहेत, की ते आहेत म्हणून. पण ते लोक साधारणपणे संसारात नाहीत. बाहेर बसले आहेत. त्या कुंडलिनीचे दर्शन आपल्याला जेव्हा होतं तेव्हा कुंडलिनी म्हणजे ही पॅरासिंपथेटिक, तिला जेव्हा आपण बघतो, आपल्याला आश्चर्य वाटेल, आता मी हे सायन्सच्या पुढचं बोलतेय, तेव्हा कुंडलिनी ही जशी नं, अशा रंगाची दिसते. इतकंच नव्हे तर तिच्यावर थोडासा पिवळा प्रकाश असतो. थोडासा लालही असतो ट्यूब आहे आणि प्रत्येक चक्रामध्ये एखाद्या कुंडासारखे किंवा एखाद्या तलावासारखं दर्शन होतं. त्याच्यामध्ये प्रतीकरूपाने प्रत्येक चक्रावर तुम्हाला काही तरी दिसतं. सगळ्यात खाली, मूलाधार चक्र आपण ज्याला म्हणतो, त्या मूलाधार चक्रावर आपल्याला श्री गणेशाचं दर्शन होतं. आता पुष्कळांना वाटेल, की माताजी काही तरी सांगतात, पण त्याचा आमच्याजवळ पुरावा आहे. जी मंडळी आता आमच्या इथे पार झालेली आहेत, जर एखाद्याचं मूलाधार चक्रं, याच्यात फार अंतर आहे, मूलाधार चक्रं धरलेले असेल किंवा त्याला त्रास असेल मूलाधार चक्रावर म्हणजे तऱ्हेतऱ्हेचे, जे चार प्लेक्सेस आहेत त्याचे पैकी सेक्स एक आहे, एक तुमचं युरीन, संडास वगैरे असे असले त्यांनी जर गणेशाचं नाव घेतलं, रिअलाईज्ड माणसांनी, तर ते चक्र सुटते. ही त्याची प्रचिती आहे. साक्षात गणेशाचं दर्शन तिथे होतं आणि ते तसच होतं, जसं स्वप्नामध्ये , सबकॉन्शस माईंडमध्ये, झोपेत आपल्याला काही तरी प्रतिकरूपाने दिसतं. हे सायकॉलॉजिस्टनी मानलेले आहे. पण हे दिसायला ते वेगळे डोळे पाहिजेत. ते आल्याशिवाय दिसणार नाही. म्हणून ती गोष्ट नाही अशी गोष्ट नाही. श्री गणेश काही आपल्याला पुस्तकातनं आलेले नाहीत. हे समजून घेण्यासारखं आहे. कोणी त्याच वर्णन केलं म्हणून नाही. ते साक्षात तिथे आहेत आणि त्यांची शक्ती ही गौरी शक्ती आहे, ती चैतन्य शक्ती आहे. तीच या सात चक्रात वेगळ्या वेगळ्या रूपाने आहे. आता मी हिंदू धर्माचा प्रचार करते आहे, असे ही लोक म्हणू शकतील. ते तसे म्हणाले तरी हरकत नाही. कारण खरं काय ते सांगायला पाहिजे. यात हिंदू-मुसलमानांचा काही फरक नाही. असं मी आपल्याला सांगणार १० 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-10.txt मुणीपूर चुक्रावर जर तुम्हाला जळत असेल, म्हणजे लक्ष्मीचा त्रास आहे. आहे. पुढे दुसर्या चक्रावर, ज्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात, त्याच्यावर आपल्याला श्री ब्रह्मदेवाचं दर्शन होतं आणि त्यांची जी शक्ती आहे ती आपल्याला माहिती आहे, ती सरस्वती, तिथे सरस्वती देवीचं दर्शन होतं. सरस्वती ही ब्रह्माची शक्ती आहे. तिसऱ्या चक्रावर, ज्याला आपण मणीपूर चक्र म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस म्हणतात, त्याच्यावरती श्री विष्णू, साक्षात श्री विष्णू आणि त्यांची शक्ती लक्ष्मी ती दिसेल याचं उदाहरण म्हणजे अशी जर एखाद्याची नाभी धरली असेल, आमच्या व्हायब्रेशन्समध्ये आम्ही म्हटलं नाभी धरलेली आहे, म्हणजे हे बोट जळतं त्याच्यात. आपल्याला आश्चर्य वाटेल हे बोट बरोबर जळतं. आता इथे निदान पंचवीस-तीस माणसं तरी अशी आहेत, जी पार झालेली आहेत. बरोबर हे बोट धरतील. लहान मूल का असेना. मी जर त्यांना विचारलं की, 'हे काय तुमचं कोणचं बोट धरतंय? तर ते हे दाखवतील. एक-दीड वर्षाची मुलगी आहे. ती बरोबर सांगेल हे बोट धरतंय. हे बोट म्हणजे नाभी चक्र, मणीपूर चक्र. मणीपूर चक्रावर जर तुम्हाला जळत असेल, म्हणजे लक्ष्मीचा त्रास आहे. एक गृहस्थ माझ्याकडे आले. म्हणाले, 'माताजी, माझ्याकडे लक्ष्मीचा त्रास आहे. मी काय करू. पाहिल्यावर लक्षात आलं नाभी चक्र धरलेले आहे. चक्र स्वच्छ झाल्याबरोबर त्यांनी सांगितलं , दुसर्या दिवसापासून माझा लक्ष्मीचा त्रास फारच कमी झाला. ज्यांना नाभी चक्राचा त्रास आहे त्यांना पोटाचे सगळे त्रास असणार. जे सोलर प्लेक्ससमुळे होतात. ते म्हणजे लिव्हरचा त्रास, इंटेस्टाईनचा त्रास, हे शारीरिक झालं . पैशाचा त्रास म्हणजे लक्ष्मीचा त्रास. त्याच्यानंतर वर, ज्याला आपण कार्डियाक प्लेक्सस म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीत ज्याला अनाहत चक्र म्हणतात, त्याठिकाणी श्री शिवाचं स्थान आहे. आत्म्याचं स्थान हे हृदयात आहे. तुम्हाला दिसतं अगदी अंगुष्ठासारखी ज्योत दिसेल. तसं आपल्या गॅसच्या लाईटरमध्ये फ्लेम जळत असते तसं तिथे असतं आणि त्याची जी एनर्जी आहे कुंडलिनी शक्ती ती खालून वर आली की ती पेटते. हृदयामध्ये आपल्या श्री शंकराचे स्थान आहे आणि त्यांची शक्ती पार्वती असते. तिची नऊ रूपं आहेत. नवविधा रूपामध्ये ती असते. शिवाबरोबर असते, तेव्हा शांत, एक स्त्ी स्वरूपात जेव्हा ती एकटी येते तेव्हा ती प्रचंड कार्य करते. जेव्हा ती अन्नपूर्णा असते. त्याच्यापुढे विशुद्धी चक्रावरती श्रीकृष्णाचं स्थान आहे. त्यांची शक्ती श्री राधेची आहे. ही सगळी एकच शक्ती सगळीकडे आहे, पण त्यांचं जे स्थान आहे ते त्यांच्या उत्क्रांतीवर अवलंबून आहे. म्हणजे मानवाची जशी उत्क्रांती होत गेली , संसाराची उत्क्रांती जशी जशी होत गेली , तशी ही स्थाने बनत गेलेली आहेत. तर ते सुद्धा एक हे आहे. सांगायचं म्हणजे त्याच्यावर जर बोलायला बसलं तर एक पूर्ण लेक्चर लागेल, की आपल्यात कशी ११ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-11.txt कुंडलिनी आणि सहजयोग उत्क्रांती झाली, कसे आपण वाढलो वगैरे. नंतर आज्ञा चक्रावर या ठिकाणी श्री महालक्ष्मीचं स्थान आहे. श्री महालक्ष्मीने कुठे अवतार घेतला याचं वर्णन कुठेही आपल्या पुराणात नाही. ते कोणतं आहे, ते जर मी आता आपल्याला सांगितलं तर आपल्याला शॉक बसणार आहे. ते म्हणजे मेरीचं स्थान आहे. जीझसची आई मेरी, महालक्ष्मी होती आणि जीझस हा स्वत: एक प्रणव म्हणून अवतार आहे. आणि नंतर इथे भगवती, साक्षात चैतन्य स्वरूपिणी कुंडलिनी आहे. आता खालून वरपर्यंत येताना जेव्हा एक एक गोष्ट मी त्याच्यात एक-एक युगाची गोष्ट आहे. उत्क्रांतीची वेगळी वेगळी स्वरूपे त्या एकएका अवतारांच्या वेळी झालेली आहेत. त्यातल्या विशेष म्हणजे याठिकाणी जी मी गॅप दाखवलेली आपल्याला सांगते आहे. तेव्हा आहे ज्याला व्हॉईड म्हणतात, त्या ठिकाणी गुरूचे स्थान आहे. गुरूचे स्थान म्हणजे दत्तगुरूंचे स्थान आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल दत्तगुरूंनी कितीतरी वेळा अवतार घेतलेला आहे आणि ज्याचं जरी वर्णन नसलं तरी त्यांची ओळख आहे. हे दत्तगुरूंचे स्थान आहे. इथे त्यांनी अवतार घेतलेला आहे. म्हणता येईल की जनक राजा, जो विदेही जाणला जातो तो, याची मुलगी सीता, तिचं नातं त्यांच्याशी बहिणीचे किंवा मुलीचे असते. सीता ही स्वयं शक्ती स्वरूपा होती. त्याच्यानंतर त्यांचा झोराष्ट्र, जो पारशांचा होता, तो जनकाचाच अवतार होता किंवा दत्तात्रयांचा अवतार होता. याच्यानंतर मच्छिंद्रनाथ यांना म्हणतात. त्यांच्या शिष्यांनी मात्र दुसराच मार्ग आक्रमिला होता. बहुतेक गुरूंची दुर्दशा झाली ती त्यांच्या शिष्यांमुळे. त्याच्यानंतर महंमदसाहेब पैगंबर हे त्यांचेच अवतार. आता कोण मुसलमान नी कोण हिंदू आणि कोणत्या धर्माचा आम्ही प्रचार करतो ते आपल्याला कळेल. नुसतं तिथे पहायला गेले तर सगळे दिसू शकते, पण त्याला ते डोळे असायला पाहिजेत. आधुनिक काळामध्ये आपले शिर्डीचे साईबाबा हे त्यांचे अवतार आणि पैगंबरांची मुलगी जी फातिमा होती ती साक्षात शक्ती आहे आणि तिची जी दोन मुले होती, एक महावीर आणि दुसरे बुद्ध, हसन आणि हुसेन. आता विचारा महावीरांचे भांडण मुसलमानांशी, मुसलमानांचं त्यांच्याशी कशाला? आातमधे आहे आणि जे आहे ते अगदी वेगळे आहे आणि बाहेर जे दिसतं ते अगदीच विचित्र आणि विक्षिप्त आहे. एकाच शक्तीची ही अनेक रुपं, अनेक काळी होऊन मानवाला वर आणण्यासाठी आणि त्याला त्याचंच चैतन्य दर्शन करविण्यासाठी धडपडत राहतात. त्या शक्तीला त्या सबंध रूपाला कुंडलिनी तुम्ही म्हणू शकता, भगवती तुम्ही म्हणू शकता, नांव काहीही दिलं, कोणी तिला ईश्वर म्हणतात, कोणी शिव-शक्ती म्हणतात, काहीही तुम्ही नांव दिलं तरी त्या चैतन्य शक्तीने इतक्या रूपात संसारात अवतार घेतलेला आहे. यालाच इन्कारनेटींग पॉवर ऑफ द डिव्हाईन १२ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-12.txt ु डा उ ा म्हटलं पाहिजे. आता डिव्हाईनच्या तीन पॉवर्स आपल्याला कळल्या. ती जडशक्ती, चैतन्य शक्ती आणि अवतार शक्ती, अशा त्या शक्त्या आहेत आणि त्या अवतार शक्तीमध्ये आपण पाहिलेले आहे, फादर गॉड, मदर गॉड आणि सन गॉड आणि शेवटी हे, त्या शक्तीचे वडील किंवा भाऊ या नात्याने येणारे, म्हणजे दत्तात्रय. हे फार इन्टरेस्टिंग आहे. दत्तात्रेयांचं सगळे फार मजेदार आहे. म्हणजे त्याचं काय आहे की तो मानव झालेला आहे अवतार. मानवाचा तर अवतार झाला म्हणजे काही तरी विशेष रूप आहे. मग मोक्ष पदाला पोहोचलेले चिरंजीव लोक वगैरे, असे सुद्धा पुष्कळ लोक आहेत. ते सुद्धा शरीर घेऊ शकतात. आता या गोष्टी सायन्सच्या पलीकडच्या आहेत. लोक १३ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-13.txt कुंडलिनी आणि सहजयोग म्हणतील ते डोळ्यांनी दिसलं पाहिजे, पण हे डोळे यांनी ते दिसायचं नाही. समजा जर कोणी सांगितलं की एखाद्या पानामध्ये पुष्कळसे सेल्स असतात, तर तुम्ही म्हणाल, की आम्हाला काही दिसत नाही, डोळ्यांना मायक्रोस्कोप लावला तर दिसतं नं! इथे अंतरातला मायक्रोस्कोप लावायला पाहिजे. तो लावल्याशिवाय याची प्रचिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्याबद्दल मला खेद वाटतो, पण करणार काय! पार व्हायला बसा म्हटल्याबरोबर आधी तुम्ही पुस्तकं घेऊन बसता, की माताजी, पुस्तकात लिहिलं आहे ते काय ? आता परवाच एक पुस्तक छापलं गेलं होतं योगावर. योग म्हणजे काय आणि योगामधे काय दिसतं. त्यांना जे दिसतं ते बरोबर आहे आणि आम्हाला जे दिसतं ते ही बरोबर आहे. आता मधली जी शक्ती आहे कुंडलिनी ती मी सांगितली. ती आपल्या आईची कुंडलिनी आहे. मातृहृदयाची कुंडलिनी आहे, प्रेमाची कुंडलिनी आहे. डिव्हाईन लव्ह. बाकी या ज्या दोन ईडा आणि पिंगला आहेत त्याच मुळी माणसाला लाभलेल्या आहेत. त्याच्यातला बदल माणूस जाणू शकतो. बाकी मधला बदल माणूस जाणू शकत नाही. कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी तुम्ही काहीही करू लागलात, केल्याबरोबर, काहीही केल्याबरोबर डॉक्टर लोक दाद देतील, काहीही केल्याबरोबर तुम्ही सिंपथेटिकवर येता. पॅरासिंपथेटिक वर राह शकत नाही. पॅरासिंपथेटिकचा अर्थ आहे जिथे तुम्ही काहीही करत नाही. आपोआप स्पॉन्टॅनियस सहज, जे सहज जन्माला येतं तेच, पॅरासिंपथेटिकवर येते आणि जे तुम्ही धडपडून मिळवता ते तुम्हाला सिंपथेटिक वर नेतं . हेच की आता इडा आणि पिंगला या दोन नाड्यांचे वर्णन केलेलं आहे. डाव्या बाजूला जी संस्था आहे, तिला इडा म्हणतात आणि उजव्या बाजूला जी संस्था आहे तिला पिंगला म्हणतात, पण ती आपल्या डोक्यामध्ये उजवं आणि डावं होतं. खाली आल्यावर ते डावं आणि उजवं असते. तेव्हा तिला आपण ईडा आणि पिंगला असं समजूया. ईडा नाडी ही योगी लोक वापरतात. सहजयोगच, खरा योग आहे. त्यानेच परमात्मा मिळतो. ते लोक काय करतात, ईडा नाडीला वापरण्यामध्ये आपल्या सर्व संस्थांना कंट्रोल करतात. हे करायचं नाही, ते करायचं नाही, इथे जायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, व्रत धरायचं, म्हणजे प्रत्येक धर्मात हे प्रकार आहेत. हे जे लोक करतात ते योगीजन असं आपण म्हणतो. हाडाची काडं करून टाकायची. तप करायचं, जप करायचा, नाव घ्यायचं. सतत काहीतरी क्रिया करायची. धर्माच्या नावावर काहीतरी क्रिया करत बसायचं अशी जो क्रिया करत बसतो, तो ईडा नाडीवर येतो. परवाची गोष्ट मी आपल्याला सांगते. एका गृहस्थाला, ट्युमर झाला होता. मी त्याला पाहिल्याबरोबर विचारलं, 'तुम्ही योग करता का?' तो म्हणाला, 'हो, मी योग सुरू केला आहे. मी शीर्षासन करतो.' शीर्षासनाने कॅन्सर होणार. का, हे इथे दाखवते आपल्याला. आता 'मी हे करणार. मी म्हणजे स्वयंभू, मी अमका, मी तमका' अशी भावना घेऊन तुम्ही योग करता आणि योग करणाऱ्या माणसाला भयंकार अहंकार असतो. आणि त्या अहंकारामुळे, तो छुपा असतो, दिसत नाही. बाहेरून असे वाटेल काय नरम मनुष्य आहे. त्याच्या बोलण्यामध्ये १४ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-14.txt न योगेनं, न सांख्येनं आणि त्याच्या वागण्यामध्ये जरी दिसला नाही तरी डोक्यात तो असतो आणि त्याच्या अहंकारामुळे त्याचा जो ईगो असतो तो इतका बळावतो आणि त्याच्यावर तुम्ही आणखी जर योग वगैरे साधना करून त्याला बळावलं तर काय होईल. त्या ईगोमध्ये भरलेली सिंपथेटिकची ती जी एनर्जी आहे त्याने डोक्यामध्ये कॅन्सरसारखे रोग होतात. तेवढे एकच नाही तर सर्व चक्रांमध्ये काही ना काही त्रास होण्याचा संभव आहे. मी योगाच्या विरोधात नाही हे समजलं पाहिजे. पण आदिशंकराचार्यांनीसुद्धा सांगितले आहे, 'न योगेनं, न सांख्येनं' कोणत्याही गोष्टींनी परमेश्वर दर्शन होत नाही. ते व्हायचं असलं की परमेश्वराची कृपा होऊनच ते सहजच होतं. हे शंकराचार्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे. पण आजकाल वाचतंय कोण शंकराचार्य! आपल्या स्टेटसमध्ये दिसला पाहिजे. स्टेटस पाहिजे. त्याशिवाय धर्म वाटत नाही. कोणी जर स्टेटस् बद्दल बोलत असेल तर भयंकर धार्मिक मनुष्य आहे. ही आपली कल्पना धर्माबद्दलची आहे. तेव्हा शंकराचार्य कोण वाचणार? ते इनसिपिड आहे. त्याला काही चवच नाही, तर योगामुळे परमेश्वर मिळणार नाही आणि योग अतिशय केला तर त्याच्यामुळे नाना प्रकारचे रोग होतील, बरं वाटणार नाही आणि मनुष्य लवकर मरेल कारण योग म्हणजे काय की तो आपल्यातली जी संचित शक्ती आहे तिला ओढून खेचून तिला संपवतो. त्याच्यामधे नवीन शक्ती भरण्याचं कार्य सहजयोगच करतो. म्हणजे सुषुम्नेमधे, सुषुम्ना जर आपण कशी तरी करून उघडली, सगळीकडे पसरलेल्या परमेश्वराच्या प्रेमाशी जर आपण एकाकार झालो, तर ती परत शक्ती सारखी वाहत राहील. म्हणून काहीही न करता मिळवलेले जे आहे, तेच खरोखर परम आहे. दुसऱ्या बाजूला असलेली पिंगला नाडी, त्या पिंगला नाडीमध्येसुद्धा पुष्कळ लोक पडले. म्हणजे आपण आता जप, तप, साधन वगैरे करतो, त्यातले काही प्रकार आणखीन असे आहेत ज्याला आपण प्रेत सिद्धी, स्मशान सिद्धी वगैरे म्हणतो. सगळ्या त्या सिद्धया मिळतात त्या पिंगला नाडीमधे. सगळ्या सिद्धया म्हणजे इथून अंगठी काढून देणं, चार माणसं उभी आहेत त्यांना नागवं करून टाकणं, त्यांना नाचायाला लावणं, त्यांना घुमायला लावणं, त्यांची चित्तवृत्ती बधीर करून टाकणं, त्यांच्याकडून पैसे काढणं, जेवढे काही प्रकार लोक करतात ते पिंगला नाडीच्या शक्तीने करतात. जशी मधल्या शक्तीमधे त्यांना नावं आहेत, तशी त्या इकडच्या, आता जी सांगितली, पिंगला नाडीच्या शक्तीला सुद्धा नावं आहेत. विलासिनी, गायत्री, सावित्री म्हणजे पतिव्रता स्त्रिया आहेत म्हणजे पातिव्रत्य धरून १५ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-15.txt कुंडलिनी आणि सहजयोग बसलेल्या आहेत. हट्टाने. तिला इगोची बाधा होणार, शाप देणार, पण जो मनुष्य पॅरासिंपथेटिकमधे आहे तो शाप देऊच शकणार नाही. कोणाचे काही करेल तर मंगलच करणार. अमंगल करूच शकणार नाही. तसंच इडा नाडीमध्ये असलेल्या लोकांना शंखिणी, डाकिणी अशी नांवे दिलेली आहेत. हस्तिनी वरगैरे वरगैरे त्यांनी नावे आहेत, त्या शक्त्यांची. इडा नाडीवर जे लोक असतात ते लिबिडोवर असतात. लिबिडो म्हणजे आपण ऐकलं असेल, फ्राईडनी त्याचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे, मी जास्त सांगणार नाही. पण ती शक्ती आपल्या सूप्तचेतन, सबकॉन्शस, आपल्यातल्या मेलेल्या विचारांशी, आपल्यातले जे काही मेलेले आहे त्या सगळ्यांशी संबंधित असते. सूप्तचेतन मनाशी तुम्ही आल्याबरोबर तुम्ही ट्रान्समध्ये जाल कारण तुमच्यावरती सूप्त चेतन मन येऊन बसतं. आता ट्रान्सिडेंटल वरगैरे जे काही आहे ते तिथे आहे, नाचणं, घुमणं, ओरडणं वरगैरे म्हणजे काय तुम्ही आपल्या पास्टमध्ये जाणार. कोणी वाघासारखं ओरडतं , कोणी ड्रकरासारखं ओरडतं , म्हणजे तुम्ही आपल्या पास्टमध्ये चालला. प्रेझेंट टेन्समधे राहायचं असेल तर आपल्याला सहजयोगात यायला पाहिजे. या क्षणाला जर जागृत व्हायचं असेल तर सहजयोगाला आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे. आपल्या पास्टमधे जाण्यात काय अर्थ आहे? पुष्कळसे लोक सांगतात की, 'अहो, तुम्ही किनई पूर्व जन्मात माझे पती होता .' असाल ! काहीही असो, जे झालं गेलं ते मेलं. त्याचं आता काय? पण अशा लोकांच्या गोष्टी आपल्याला फार अपिलिंग वाटतात आणि असे लोक आपल्याला फार आवडतात आणि अशा लोकांच्या गोष्टी आपल्याला फार आवडतात आणि अशा लोकांच्या म्हणण्यावरती आपण डोळे मिटून वागतो त्याला कारण असं आहे की तुमची स्वतंत्रताच मुळी हरपून घेतात. तुमची स्वतंत्रताच अशा तऱ्हेने हरपतात की तुमच्या वरती लिबिडोच्या शक्तीनी एखादं भूत बसवतात. अॅक्च्यूअली भूत असतं हं! नाही तर हा विचार करा या लाखो रुपयाच्या प्रॉपर्टीज या साधू लोकांना देण्याची काय गरज आहे! आणि तुमची जोखीम मारली जाते. त्यांच्यामध्ये पावित्र्य आहे की नाही हे सुद्धा कोणी बघत नाही. अहो, साधारण साधुत्व आहे का त्यांच्यामधे हे सुद्धा कोणी बघत नाही. आणि वाटेल तसे पैसे,... अहो , परवाच एक साहेब सांगायला आले होते, चांगले शिकलेले पंडित मनुष्य आहेत. बावीसशे रुपये त्यांनी एका माणसाला दिले म्हणे. मला काय झालं ते माहिती नाही. असे लोक थोडे दिवस तुमच्यावरती छाप घालतात आणि छाप घालून तुमच्याकडून काय काढायचं ते काढतात आणि दोन तीन वर्षानंतर तुम्ही चिडून गेलात तरी काही हरकत नाही. अशा लोकांच्या तऱ्हा-तऱ्हा आहेत. त्याच्यावर सुद्धा मी मागे बोलले होते की काय तऱ्हेने ते पिंगला, ज्याला आपण स्मरशानविद्या, प्रेतविद्या, भूतविद्या असे शब्द, तुम्हाला काही माहीत नाही, म्हणजे असं समजा आता बसल्या बसल्या मी अशी इथून वर आले म्हणजे 'काय माताजींना शक्ती आहे हो ! खाली जे होतं ते वर आलं. पण ती माताजींची शक्ती असू शकेल. पण परमेश्वराची नाही.' परमेश्वराला काही आणखी धंदा नाही का की तिथून उचलून इथे आणायला! आणि इथून तिथे ठेवायला. डोकं काय झालं ? कुठे १६ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-16.txt तुमच्या स्वतंत्रतेवर पहिला त्यांचा हात असतो, तसा विचार केला पाहिजे. होतं डोकं आपलं? कुठे जातं ? बुद्धीला काय बसलेली आहे ? कोणी आपल्या डोक्यावर चक्कर घातलेलं आहे ? काय आहे? आतमध्ये विचारा. बघा हे नाचतात, ओरडतात वेड्यासारखे. हे आहे काय? आपल्या बुद्धीला कोणी हात घातलेला आहे, ते बघितलं पाहिजे. मग ती मंडळी आमच्याकडे आली. त्यांची कुंडलिनी तर सोडाच, त्यांची चक्रं तुटलेली असतात. त्यांचे आज्ञा चक्र आणि नाभी चक्र तुटल्यामुळे काहीही उपयोग होऊ शकत नाही. असे गल्लो गल्ली गुरू निघालेले आहेत, गुरुया निघालेल्या आहेत. त्यांची काही कमी नाही आणि तुमच्या स्वतंत्रतेवर पहिला त्यांचा हात असतो, तसा विचार केला पाहिजे. नाचून परमात्मा मिळू शकतो का? कपडे बदलून परमात्मा मिळू शकतो का? म्हणजे पिंगलेच्या कचाट्यातून तुम्ही पटकन सुटता. पण इंडेचा कचाटा फार जबरदस्त असतो. हजारो माणसं यात बळी पडतात. रावणाला ही सिद्धी होती. ते पूर्वीचे असूर होते. कलीयुगातल्या असुरांचे तुलसीदासांनी वर्णन केलेले आहे. कलीयुगामध्ये सगळे असूर जन्माला आलेत. खरी गोष्ट आहे. दहा तर मलाच माहिती आहेत. पाच बाकीचे जन्माला आले आहेत. त्यांना प्रेम कशाशी खातात माहीत नाही. खवीस असतात खवीस. तुम्ही ओरडता, हे करता, आतून आनंद होतो यांना. 'अहाहा ! काय छळतोय मी मानवाला!' हिटलरला आपण जर खवीस मधला सिक्स्टी पसेंट म्हटलं तर हे हंड्रेड पर्सेंट आहेत. तुम्ही वेड्यासारखे धावत जाता त्यांच्याकडे. कारण ते तुमच्यावर आकर्षण घालतात. तुमच्या या सुपर ईगोमध्ये घालतात ती भुते! आता सायकॉलॉजिस्ट त्याला स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतात. आम्ही त्याला भुतं म्हणतो. एखाद्या वेळी एखादा सज्जन मनुष्य परमेश्वराची पूजा करीत असतो. त्याला सारखं साकडें घालत असतो, तेव्हा सुद्धा एखादा संत त्याच्यात येतो. संत असले तरी ते महंत नाहीत, रिअलाईज्ड नाहीत. पण त्यांना वाटतं याची आपली श्रद्धा रहावी. पण कशाला पाहिजे दुसर्याची मदत? बोलून चालून काय एक हार देवाला घातला. कसला चमत्कार नी कसलं काय! स्वत: तुम्ही काय कमी चमत्कारी आहात! स्वत:च्या शक्तीवर तुम्ही सगळं जाणलेले ते बरं की आपल्या डोक्यात भरून आणि नंतर माताजी, 'आमचं डोकं धरलं , माझ्या मुलाला वेड लागलं, अमुक झालं, तमुक झालं.' म्हणजे माझ्याकडे जेवढे पेशन्टस येतात त्यापैकी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सिक्स्टी पर्सेंट भुतानेच ग्रासलेले असतात. तुम्हाला माहिती नसेल तर विचारा यांना. सबंध सिंपथेटिकचा खेळ असं जरी म्हटलं तरी त्यातला कोणता सिंपथेटिक चालू आहे ते बघितलं पाहिजे. ज्याला अॅबस्टिनन्स म्हणतात. ज्याला आपण म्हणू १७ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-17.txt कुंडलिनी आणि सहजयोग की लोक जास्त तप करा म्हणतात. हे तप ज्याला म्हणतात, ते सुद्धा काही तरी करणं आहे आणि ज्याला इन्डल्जन्स म्हणतात की कोणत्या तरी गोष्टीत अतीरंजन करणं, ते सुद्धा तेच आहे. दोन्ही एकच आहेत. मधोमध परमात्मा आहे. ते सांगणारे पुष्कळ भेटतील, पण करतील हेच. तुम्हाला सांगतील प्रेमाच्या गोष्टी, पण करतील हेच धंदे. कारण त्यांच्यामधे हे नाही. असतं तर चटकन दिसलं असतं तुम्हाला. पार केलेली किती मंडळी आहेत ? पुष्कळ लोकांना मी ब्राह्मणांवरती भाषणं देतांना पाहिलंय की सगळ्यांनी ब्राह्मण झाले पाहिजे. एकाला तरी तुम्ही ब्राह्मण केलंय का? सगळ्यांना ट्रान्समधे घातलेलं आहे. ट्रांसमधले लोक आहेत. आपल्या स्वतंत्रतेत, आपल्या पूर्ण स्वतंत्रतेत उठण्याचा हा मार्ग फक्त परमेश्वराने आखलेला सहजयोग आहे, सह + ज, जो तुमच्याबरोबर जन्मलेला. काही त्याच्यात तुम्हाला करायचं नाही. जसं एक बीज आपोआप अंकुरतं आणि त्याच्यातून आपोआपच झाड बाहेर येऊन त्याला फळं लागतात, तसं तुमच्यात आपोआपच व्हायला परमेश्वराने दिलेले आहे. सहज म्हणजे तुमच्याबरोबर जन्माला आलेलं. तुमच्याच बरोबर जन्मलेले असं आहे. त्याला काम करू द्या. ते नुसतं बघायचं आहे आणि ते इतकं सुंदर होतं. ते कुंडलिनीचं जळणं आणि हे कुंडलिनीचे प्रकार काहीही व्हायला नकोत. उद्या जर एखादं झाड, जर वर येताना जळू लागलं, तर ते झाड आहे का काय आहे! पण जळणार ! त्याच्यात बाधा असली तर जळणार! आम्ही एक्सपरिमेंट करतोय . आता वेगळ्या वेगळ्या झाडांवर, ज्याच्यात बाधा असतील ते जळणार आणि सगळा प्रकार जो काही बिघडलेला आहे तो या मृत लोकातनं आलेल्या भूतांचा आहे. भुतं म्हणजे मेलेला. मरतो म्हणजे काय? आपण सगळे मरतच नाही मुळी. थोडा फार आपल्या शरीराचा भाग बाहेर दिसतोय, पृथ्वी तत्त्वातला निघून जातो. बाकीची चार तत्त्व जशीच्या तशी. ते शरीर आपल्याला दिसतात. त्याचा रंग असा निळसर हलकासा असतो. ते बघितले तर तुम्हाला दिसेलसुद्धा. आणि त्याच्यामधे सूक्ष्मता येते आणि हा वरचा जड भाग पडल्यामुळे त्याच्यात सूक्ष्मता येते आणि ती तुमच्या मनामधे घुसते. एखाद्या मुलाला एकदम भीती वाटते. डॉक्टर्स त्याला काही नावं देतील, त्याला भित्रं म्हणतील, सायकोसोमॅटिक म्हणतील, पण खरोखर होतं काय की या सिंपथेटिकमधे जागा होते. ती तडाडते आणि मग त्याच्यामधे पोकळी होते, व्हॅक्यूम होतो. त्या व्हॅक्यूममध्ये असं एखादं तरी राहतं. या लोकांना सिद्धी असतात. रावणाला सिद्धी होती. मी आपल्याला सांगत होते, तो भाषणामधून नुसत्या भाषणामधून लोकांच्या नाभी वरती भूत घालीत असे. आणि लोक वेड्यासारखे, म्हणजे तो व्यभिचारसुद्धा लोकांकडून करून घेत असे त्या स्थितीमध्ये, ही रावणाची स्थिती! किती तरी त्याचे जन्म झाले. महिषासुरालासुद्धा पुष्कळशा अशा गोष्टी उपलब्ध होत्या आणि हे सगळेच्या सगळे तुमच्यावर उलटले असताना त्यांना गुरू समजून त्यांना पूजलेत म्हणजे आपल्या बुद्धीला अगदी तिलांजली द्यायला नको. बुद्धीच्या पलीकडे जरी परमात्मा असला तरी बुद्धी सोडून नाहीये. ज्यांनी बुद्धीचा त्याग केलेला आहे त्यांना कधीही परमात्मा १८ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-18.txt त्याच्या प्रेम शक्तीने ही रचना केलेली आहे. प्रेम म्हणजे ज्ञान. भेटणार नाही. नाही तर तुम्हाला बुद्धी कशाला दिली त्याने ? बुद्धीने जाणलं पाहिजे की परमात्मा कसा असू शकेल! तो परमात्मा, त्याच्या काय इच्छा आणि कल्पना आणि विचार असू शकतील? तो काही आपल्या माणसासारखा नाही. मी आत्मसाक्षात्कार या बद्दल सांगणार आहे आपल्याला की चैतन्याचं काय स्वरूप आहे आणि चैतन्य काय करते आणि चैतन्याकडे आपलं लक्ष कसं वेधलं जातं. हा मार्ग प्रेमाचा आहे. पुष्कळदा लोक मला असंही विचारतात , की तुम्ही प्रेमाला एवढं का प्राधान्य देता ? कारण प्रेम जर परमात्म्याला झालं नसतं तर त्याने ही सगळी रचना केली कशाला असती? त्याच्या प्रेम शक्तीने ही रचना केलेली आहे. प्रेम म्हणजे ज्ञान. म्हणजे सहजयोगाने असं कळतं की जसे तुम्ही पार होता तसे तुमच्या हातातून व्हायब्रेशन्स वहायला लागतात. सहजयोगाने तुमची कुंडलिनी वर उठून सहस्रार हछेदून त्याच्याशी एकाकार होते तेव्हा तुमच्या हातातून व्हायब्रेशन्स सुरू होतात आणि हे व्हायब्रेशन्स तुम्हाला शिकवतात की कुठं काय आहे? माणसामध्ये कुंडलिनी कुठे आहे ? लहान लहान मुलंसुद्धा तुम्ही असे हात धरले तर सांगतील, 'माताजी पार आहेत बरं का!' एक लहान मुलगा, आठ वर्षाचा मुलगा, तुम्हाला सांगतो की हा मनुष्य पार आहे की नाही. म्हणजे जर तुमच्या हातामध्ये भरपूर व्हायब्रेशन्स येत असतील आणि सहस्रारात थांबलेला असला, तर तो मुलगा पार आहे, पण ते तुम्हाला काही समजायचं नाही मी काय बोलतेय ते! पण एका लहानशा आठ वर्षाच्या पार झालेल्या मुलाला कळतं. तो सांगतो, 'बसलेले आहेत, त्यांना विचारतो हातात तुमच्या व्हायब्रेशन्स येतात का ?' आणि याच व्हायब्रेशन्सने हजारो लोकांना हिंदुस्थानमध्ये, लोकांनी आणि बाहेरसुद्धा पुष्कळांनी ठीक केलेले आहे. म्हणजे मी लिहायला बसले तर ग्रंथच्या ग्रंथ लिहून होतील, पण हे मुख्य कार्य नाही. लोकांना बरं करणं हे मुख्य कार्य आहे. आणि याची प्रचिती घ्यावी. डोकं उघडं करून याची प्रचिती घ्यावी. एवढे सगळे गुरू कार्य करीत आहेत त्यांना जाऊन विचारा, की याचं टेक्निक काय आहे ? तुम्ही काय करता ? ते काहीही सांगू शकणार नाहीत. कारण ते भुतांच्या आहारी स्वत: गेलेले आहेत आणि त्यांचा मृत्यू काळ जवळ आलेला आहे. ही भूतंच त्यांच्या डोक्यावर बसणार आहेत आणि है? त्यांना ठिकाणी लावणार आहे, पण त्याच्या आधी तुम्ही आहारी जाऊ नका. स्वत:च्या स्वतंत्रतेत तुम्ही घ्या सहजयोगाला. मनुष्य स्वत:च्या पूर्ण स्वतंत्रतेत घेतो. तुमच्यावर जबरदस्ती करता येत नाही आणि तुम्ही जरी म्हटलं, 'माताजी, आम्हाला पार करा.' तरी ते होणार नाही. झालं पाहिजे. झालं पाहिजे. जर आम्ही म्हटलं हो , तुम्ही पार झालात तर सगळेच्या सगळे म्हणतील, की तुम्ही पार झालात. सहजयोगाचं हे वैशिष्ट्य आहे, की फळ १९ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-19.txt कुंडलिनी आणि सहजयोग ० ० নে 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-20.txt सहजयोगाशिवाय काही मार्ग नाही संसारात. जर हा मार्ग अवलंबन नाही केला तर संसारात सबंध संहार होणार आहे . झालं तर सगळे म्हणतील की फुलाचं फळ झालं. फूल असताना कोणी म्हणणार नाही की हे बघा फळे झाली आहेत. डोळे आहेत नं आम्हाला तसे ते डोळे येतात. ते लहान मूल असो की मोठे असो, सगळे म्हणतील पार म्हणजे पार आणि पार झाल्यावरसुद्धा काय करायचं ते असे की, चैतन्यात उतरण्याची शक्ती जरी आली तरी त्या चैतन्यामध्ये स्थिरता कशी आणायची वरगैरे याचं बरंच काही शिकायचं असतं. ह्युमन क्रायसिसवर मी जेव्हा बोलणार आहे तेव्हा हे सांगणार आहे, की सहजयोगाशिवाय आता काय होणार आहे. सहजयोगाशिवाय काही मार्ग नाही संसारात. जर हा मार्ग अवलंबन नाही केला तर संसारात सबंध संहार होणार आहे. या बद्दल काहीही शंका नाही. विचारी लोकांनी हे जाणून घेतलं तरी पुष्कळ आहे. दहा वर्षानंतर अमेरीकेहन हे कदाचित येईल. तिथल्या डॉक्टरांचे कान उघडे झाले आहेत. कॅन्सर कसे बरे होतात? मी बरे करते असे नाही. ही माझी मुलं आहेत ती बरे करतात. काही तरी कोणी सांगितलं, उडायला सांगितलं तर उडतात, धावायला सांगितलं तर धावतात. पण का? हा विचार आपल्या डोक्यात यायला पाहिजे. आपली स्वतंत्रता बाळगली पाहिजे. ती बाळगली, कोणी गुरू असेल बुवा आपला, तर त्यांनी काय दिलं? मी आई आहे. मी आईच्या नात्याने तुम्हाला सांगते की तुम्ही जागृत रहा. आतमध्ये जागा आणि बघा आपल्यामध्ये काही दिसतय का ? जे काही दिसेल, जे काही मोठं आहे, जे काही गौरवान्वित आहे ते सगळं जाणायला पाहिजे. ते सगळं श्रेय सहजयोगाला आहे. ते तुम्हाला मिळणार आहे. जे मिळण्यासारखं आहे ते का नाही घ्यायचं. कदाचित नाही मिळणार. काही सांगता येत नाही. काही काही आमच्याकडे चार वर्ष येतात त्यांना मिळत नाही. तर काही काही दोन मिनिटात पार होतात. लोक म्हणतात, 'हे काय माताजी, तुम्ही फेवर करताय.' मी फेवर करण्याचा प्रश्नच नाही. मी काहीच करीत नाही. मी फक्त तुमच्या डोक्यावर हात ठेवते. तिथून जे वहातय ते येऊ द्या. ती जी मधे पोकळ गॅप आहे, ती पोकळी आहे, तिला व्हॉईड म्हणतात. त्याच्यात भरते. भरल्याबरोबरच कुंडलिनी वर उठते आणि वर उठल्यावर सहज वर जाऊन सहस्रार छेदून तुम्हाला त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या प्रेम शक्तीशी एकाकार करते. तीच तुमची चेतना, तुमचा अवेअरनेस आहे. त्या शक्तीवर आज प्रत्येकाचं हृदय स्पंदन करीत असतं, ती संपण्याच्या आधी हे पेट्रोल भरून २१ तुto 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-21.txt घ्या. हे शरीर जायचेच आहे. पण हा क्षण जो आला आहे तो गाठलाच पाहिजे. पुण्यात गैरसमज झालेत की मी मंदिरात आणि देवळात जाऊ नका असं म्हणते, ते खोटं आहे. मुळीच म्हणत नाही. जे वंदनीय आहेत ते वंदनीय आहेत आणि रहातील. पण तुम्हाला माहिती आहे का की ते कसं वंदनीय आहे. तुम्हाला काय दगड आणि धोंडेच आहेत सगळे ! मी सुद्धा दगड-धोंडाच आहे. तेव्हा ते जाणून घ्या. आधी ते डोळे घ्या. समजा इथे जर पाटी लावून ठेवली, 'इथे माताजींचे भाषण आहे' आणि तुम्ही ती पाटीच वाचत राहिलात, आतमध्ये नाहीच आलात तर मला कसं जाणणार? तेव्हा आतमध्ये येऊन एकदा भेटून तरी घ्या, मग बघा त्या पाटीचा काय अर्थ आहे ते. तुलसीदासाचं उदाहरण आहे. तुलसीदासानी सबंध रामायण लिहिल्यावर श्रीरामांनी त्याना तीनदा दर्शन दिलं आणि त्यांनी त्यांना टिळा लावला. 'तिलक देत रघुवीर' तीनदा आणि तीन वेळा ओळखलं नाही त्यांना. त्यांचं वर्णन रात्रंदिवस करत होता, 'अरे प्रभू, ये.' आता ठाकलाय तरीसुद्धा तुम्हाला आतमधे यायचं नसलं तर तो काय करणार! तेव्हा कोणी काय म्हटलं, कोणी काय सांगितलं, कोणत्या पुस्तकात ते आलं, मी काय सांगते, तुम्हाला काय दिसतंय, तुमचा काय अनुभव आहे, ते मुख्य आहे. सगळ्यांच्या चुका होतात, सगळ्यांच्या चुका झालेल्या आहेत. त्याला कारण शोधा. आमच्या हातून चुका झालेल्या आहेत पूर्व जन्मात आणि या जन्मामध्ये मी जे मिळवलेलं आहे ते घेतलंच पाहिजे. मुलाला कसं शिकवायचं याच्यासाठी कितीही प्रयत्न जरी आईने केले तरी चुकू शकतं तिचं! तिचं चुकलं म्हणजे असं नाही की धर्म चुकले. चुकलेले आहे, पण धर्मामध्ये जी भावना, की मुलाला हे मिळालेच पाहिजे, ते सगळीकडे आहे. ते लिहिलेले आहे, की तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे. ते कोणत्याही धर्मात लिहिलेले आहे. पण ते जमलेले नव्हते. ते जमण्याची संधी जर आलेली आहे, तर ती स्वीकारावी आणि बघावं जमतंय की नाही. जर तुमचं होत नसलं तर होणार नाही. त्याबद्दल मला क्रिटीसाईझ करण्यात काही अर्थ नाही की स्वत:ला खाली पाहण्यात काही अर्थ नाही. उलट परमेश्वराला समर्पित होऊन परत प्रयत्न करा. पण जर तुमच्यात खरंच आर्तता आली, तर कोणत्याही राक्षसांनी कितीही तुमचं बिघडवलेलं असलं तरी तुम्ही ताळ्यावर येणार आणि तुम्ही ठिकाणावर याल याबद्दल मला मुळीच शंका नाही. तेव्हा आपण काहीही करून परमेश्वराला मिळवू शकत नाही हे ब्रीद वाक्य आहे. हा सहजयोग आहे. आपोआप हे घडतं, जसं एक बी आपोआप उगवतं फक्त मी थोडं प्रेमाचं पाणी देते त्याला. माझं काही देणं- घेणं नाही तेव्हा मी गुरुसुद्धा नाहीअसं म्हंटल पाहिजे. पण कधीकधी आई गुरू होते. त्याला काही इलाज नाही तेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावर बसलात, तुम्ही मला त्रास जरी दिलात तरी मान्य आहे, पण त्रास देण्यापेक्षा आई जर काही चांगलं देत असेल तर घ्यावं. ती सुबुद्धी आहे. कुबुद्धी नसते अशातली गोष्ट नाही, कुबुद्धीही आहे. तेव्हा आपण कोणाच्या आहारी जातो ते आपल्याकडे आपण लक्ष ठेवून सहजयोगात यावं. २२ 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-22.txt ৯ ा ० तुम्हीली हे जाणून घ्यायचे आहे की सत्य तुमच्या चरणांवर येऊन पडणार नाही. जर तुम्हीली सत्याचवी प्राप्ती करायची असेल तर तुम्हीली सत्याच्यापायावरपडले पाहिजे. (य.पू.श्रीमाताजी, निर्मल योग १९८३) प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in , website : www.nitl.co.in 2014_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-23.txt ০০৩ पूजेला येण्यापूर्वी आपल्या चक्रांनी साफ करा तसेच ध्यान करा, पूजेच्या वेळी लोकांनी नाहीतर मला खूप त्रास होतो. घड्याळीकडे बघूनये. प.पू.श्रीमाताजी, ३१.३.१९९५