चैतन्य लहरी मराठी मे-जून २०१४ है रा] की ० जु मेणबत्तीची ज्योत तुम्हाला सांगू शकते की तुम्ही भूतग्रस्त आहात की नाही. मेणबत्तीला इतके ज्ञान आहे. समजा तुम्हाला हृदय चक्राची समस्या आहे, तुम्हाला हृदय-रोग आहे, तर मेणबत्ती ते सुचित करेल. आणि जर तुम्ही मेणबत्तीच्या प्रकाशाने उपचार कराल तर तुम्ही स्वत:ला रोगमुक्त करू शकाल. ती इतकी संवेदनशील आहे की ती केवळ रोगमुक्तच करत नाही तर ती पूर्ण सक्षम आहे, हेच कारण आहे की भारतात अग्नी पूजा केली जात होती, कदाचित त्यांना हे समजले होते की अग्ीला सर्व काही माहीत आहे. प. पू. श्री माताजी, कबेला, २१.७.२००२ श्ी ्ी 5म या अंकाल श्री सरस्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला सहजयोगाचे ज्ञान मिळते ...४ सत्य परिपूर्ण असते ...२२ श्री स२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाली सहर्जयोगाचे ज्ञान मिळते कॅनडा, ११.८.१९९० श्री सरस्वतीच्या शक्तीने निसर्ग निर्माण होतो श्री स२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला सरस्वती सहर्जयोगाचे ज्ञान मिळते ज्यावेळी त्यांनी मला विचारले की व्हँकोव्हरमध्ये कोणती पूजा करायची? तेव्हा श्री सरस्वतीची पूजा करणे उत्तम असा मी विचार केला. कारण मी ऐकले होते की तो आश्रम फार सुंदर अशा निसर्गरम्य परिसरात आहे आणि सरस्वतीच्या शक्तीने निसर्ग निर्माण होतो. याशिवाय निसर्गात राहणारे लोक अतिशय सृजनशील होतात. त्यांच्या कोमल भावना टिकून राहतात. ते घाई-गडबडीत कधीच नसतात. ज्याला जास्त आधुनिक म्हणता येईल असे ते नसतात. कारण निसर्ग त्यांना शांत करतो. त्यामुळे सरस्वतीची सृजनशीलता त्यांच्यातील कलाकाराला घडविते आणि मला माहीत होते की या देशात फार पूर्वीपासून कलाकार तयार झाले असावेत. कॅनडा हा देश, मला असे जाणवते की विशुद्धीचे हंसा चक्र आहे. श्री महाब्रह्मदेव, ज्यांना श्री हिरण्यगर्भ म्हणतात, जेव्हा श्री सरस्वतीचा आविष्कार करतात, तेव्हा श्री सरस्वती या श्री महासरस्वती होतात. त्यांच्यासाठी त्यांना हंसा चक्रामधून क्रॉस करावे लागते. त्या हंसा चक्रातून क्रॉस करतात आणि श्री विष्णुमाया शक्ती होतात. म्हणजेच त्या श्री विष्णुमाया शक्ती असतात. तेव्हा श्री सरस्वती श्री विष्णुमाया होतात. त्या दोन ठिकाणी क्रॉस करतात, पहिले हंसा चक्रात व दुसरे विशुद्धी, तेव्हा त्या श्रीकृष्णांच्या भगिनी आहेत. श्री सरस्वती यांनी श्रीकृष्णांची बहीण म्हणून जन्म घेतला. ज्यावेळी श्रीकृष्णांचा कंस नावाचा मामा त्यांना ठार मारायला आला त्यावेळी त्या आकाशात गेल्या व वीज बनल्या आणि त्यांनी श्रीकृष्णांच्या येण्याविषयी, म्हणजे त्यांचा जन्म झाला असल्याचे जाहीर केले. त्यामुळे श्रीकृष्ण व विष्णुमाया यांचे बहीण-भावाचे नाते आहे. आश्चर्य म्हणजे परवा आपण रक्षाबंधनाचा समारंभ केला. रक्षाबंधन म्हणजे बहीण- भावाचे नाते. त्यामुळे आज या ठिकाणी आपण वास्तविक श्रीकृष्णांच्या भगिनीची पूजा करणार आहोत. नंतर त्यांनी द्रौपदी म्हणून जन्म घेतला. म्हणून श्रीकृष्ण त्यांचे पावित्र्य वाचविण्यास गेले कारण भावालाच त्याच्या बहिणीचे पावित्र्य आणि नाव याची काळजी असते. ६ निसर्ग म्हणून काल असे झाले, की सरस्वती पूजा होती आणि सोळा वेळा श्री विष्णुमाया कडाडली. काय घडत होते ते मी कोणाला सांगितले नाही, पण मला माहिती होते, की त्या कडाडणार. शिवाय त्यांनी वॉशिंग्टनलाही धमकावले आणि ते चांगले झाले. वॉशिंग्टनला जागे करायला पाहिजे. या सूक्ष्म गोष्टी आहेत आणि ही सूक्ष्म नाती आहेत. मीच फक्त सांगू शकते कारण ही नाती असल्याचे मला माहिती आहे. त्यामुळे त्या व्हँकोव्हरला या भागात आल्या याचे मला मुळीच आश्चर्य वाटले नाही. पण सोळा वेळा या भागावरून हे दर्शविण्यासाठी गेल्या, की सहजयोग किती महत्त्वाचा आहे ते तुम्ही लक्षात घेण्याची वेळ आली आहे आणि जर आपण पूर्णपणे व प्रभावीपणे सहजयोगाचे प्रतिपादन केले नाही तर विष्णुमाया दुसरे रूप धारण करणार आहेत. ज्याच्यामुळे तुमची जंगले, सर्व काही जळणार आहे. हे लक्षात घ्या, की वीजेत सर्व पंचमहाभूते आहेत. त्यात आवाज, प्रकाश, आकाश, आकाशात तिचे कार्य चालते शिवाय तिच्यात पाणी आहे आणि जेव्हा पाणी फ्रिक्शनमधून जाते, जी भूमी माता आहे, म्हणून या सर्व गोष्टी तिच्यामधून कार्यान्वित होतात. म्हणून श्री विष्णुमायेनी काल दाखविले, 'मी इथे आहे, कृपया माझी पूजा करा.' आतापर्यंत आपण सरस्वतीची कधीही पूजा केलेली नाही आणि श्री ब्रह्मदेवांची कोठेही पूजा होत नाही. त्यांनी जगाची निर्मिती केली, ही सर्व जंगले, सर्व समुद्र, सर्व भूमी, सर्व तारे आणि अनेक विश्वे, सर्वांची निर्मिती केली. परंतु आपण या झाडाची, त्या झाडाची पूजा करतो, तशी पूजा करायची नाही. अशा प्रकारच्या कशाचीही पूजा करायची नाही. फक्त भूमी मातेने जे स्वयंभू सारखे निर्माण केले आहे त्यांचीच आपण पूजा करतो. ते सुद्धा अशा पद्धतीने की जी अॅबस्ट्रॅक्ट पद्धत आहे कारण ज्या ज्या ठिकाणी असे स्वयंभू उद्भवले त्या त्या ठिकाणी लोकांनी धर्माचा व्यापार चालविला आहे. म्हणून आपण सहजयोगी असल्याने अशा ठिकाणी जात नाही. तेव्हा तुम्हाला आता हे कळले असेल की मी इथे आल्यानंतर काल अनपेक्षितपणे हे अभूतपूर्व विजेचे आश्चर्यकारक लखलखणे कसे झाले. श्रीकृष्णांची बहीण फारच कार्यप्रवण व कडक व्यक्तिमत्त्व आहे. श्रीकृष्णांचे सत्त्व म्हणजे त्यांचे माधुर्य आणि श्री राधा आल्हाददायिनी शक्ती म्हणजे ज्या तुम्हाला पुलकित करणारा आनंद देतात. श्रीकृष्णांचे सौदर्य म्हणजे त्यांचे माधुर्य, त्यांची लीला, त्याचे संपरर्कातून ७ सहजयोग्यांनी श्री महासरस्वतीची करायची आहे पूजा श्री २२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला महासरस्वती २हर्जयोगाचे ज्ञान मिळते एकात्मतेची भावना निर्माण करणे, हे आहे, पण त्यांची बहीण ईश्वरी संकेत देते आणि अशाप्रकारे ती आली आहे आणि त्यांचे फार कडक व्यक्तिमत्त्व आहे जी प्रत्येकाला काहीतरी संकेत देते. एकप्रकारे माझे आगमन दाखवून दिले आहे, की मी इथे आहे. कदाचित इथल्या आदिवासी लोकांना हे कळले असेल, की भविष्यवाणी प्रत्यक्षात उतरली आहे आणि तुम्ही लोकांनी हे संकेत लक्षात घ्यायला हवेत. सहजयोगाला त्याच्यावर सोडून चालणार नाही, तो त्याच्या मार्गाने कार्यान्वित होईल आणि तुम्ही मात्र सवडीप्रमाणे यावे. तेव्हा श्रीकृष्ण भगिनी विष्णुमाया, याच श्री सरस्वती आहेत आणि त्यांचीच आपण पूजा करणार आहोत. फक्त सहजयोगीच, जे प्रकाशित झालेले आहेत, तेच श्री महासरस्वतीची पूजा करू शकतात. अन्यथा इतर लोक फक्त श्री सरस्वतीची पूजा करू शकतात. कारण श्री सरस्वतीच्या उपासनेने पुस्तके वाचू शकतात. नृत्य, संगीत, लोकांच्या करमणुकीची निर्मिती करू शकतात. वास्तविक श्री सरस्वतीची पूजा सर्वसामान्य जाणिवेच्या लोकांसाठी आहे. पण सहजयोग्यांनी श्री महासरस्वतीची पूजा करायची आहे. मी सांगितल्याप्रमाणे श्री महासरस्वती या श्री विष्णुमाया होतात. त्याच विष्णुमाया आहेत म्हणून तुम्ही अशी व्यक्ती व्हायला पाहिजे, की तुम्ही स्वत:हून श्री विष्णुमाया सांगतात त्याप्रमाणे तुमच्या प्रभावी व कडक भाषणातून सहजयोग काय आहे व तुमचे ध्येय काय आहे, ते लोकांना प्रोत्साहित करणाऱ्या पद्धतीने सांगायला पाहिजे. पण मी पाहिले आहे, की लोक बोलतात तेव्हा ते श्रीकृष्णांप्रमाणे मृद् आणि मधुर होण्याचा प्रयत्न करतात. आम्ही अमेरीकेत त्याचा उपयोग होईल, म्हणून प्रयत्न केला, पण तसे झाले नाही. त्यांना ग्रॅहम किंवा त्याच्यासारखे कडक बोलणारी माणसे आवडतात. कालच्या अनुभवावरून आपण हे शिकायला हवे, असे मला वाटते की प्रभावी भाषण करणाऱ्यांची व प्रभाव पाडू शकणाऱ्यांची तुम्हाला आवश्यकता आहे. कारण लोकांना (अमेरीकन) नॉर्मल संवेदना समजत नाहीत. त्यांच्या संवेदना मेलेल्या असाव्यात. मला वाटते ते बधीर झाले आहेत आणि त्यांना शॉक द्यायला हवा आणि त्यांना शॉक आवडतात. वृत्तपत्रांनी त्यांना शॉक ८ पूजा देण्याची गरज असते. धक्का देणारा कोणताही कार्यक्रम त्यांचे लक्ष वेधून घेतो. संगीतसुद्धा इतके असावे लागते की खडक फुटेल आणि असे असावे लागते की त्यांची डोकी फुटतील. तेव्हा ते खरे खरे खडकासारखे झाले असून तुम्ही लक्षात घ्या की त्यांचा कठीणपणा विष्णुमायेकडून तोडता येईल. म्हणून व्हँकुव्हरमध्ये आज आपण जी विष्णुमायेची पूजा करणार आहोत त्याला कॅनडासाठीच नाही तर अमेरीकेच्या दृष्टीनेसुद्धा फार महत्त्व आहे. अमेरीकन लोकांना, त्यांना झालेल्या आजारांचे, त्यांच्या अंमली पदार्थांच्या व्यसनाचे काही विशेष वाटत नाही. ते स्वत:चा जो सर्वनाश करून घेत आहेत तो त्यांना अजून समजत नाही. ते स्वत:चे काय करून घेत आहेत. स्वत:चा कसा नाश करत आहेत, मौल्यवान मानवी जीवन लहरीपणाने व तथाकथित स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यर्थ घालवीत आहेत, हे त्यांना कळत नाही. म्हणून तुम्ही प्रभावी पद्धतीने सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 'तुम्ही काय करीत आहात ? का स्वत:ची अशी फसवणूक करीत आहात? हे चुकीचे वागणे आहे, हे का तुम्ही समजत नाही ? स्वत:साठी नाही, तर निदान तुमच्या मुला बाळांसाठी? तुम्ही त्यांना सांगा. आम्ही चुकलो , तुम्ही चुकू नका. असे बोलणे आवश्यक आहे आणि लोकांनी (सहजयोग्यांनी) त्याची तयारी करावी. कोणी म्हणेल, की लोकांना हे आवडणार नाही, पण मला याच्या उलट वाटते. भीती दाखवल्याशिवाय ते तुमच्याजवळ येणार नाहीत. म्हणून त्यांना तुम्ही सांगा, सूचना द्या. विष्णुमायेने काल तेच केले आणि तुम्हाला सुचविले, की आता नवीन पद्धत आचरणात आणा आणि जे काही तुम्ही कराल , समजा तुम्ही कोर्स चालवीत असाल, तर त्याच्याशेवटी लोकांना सांगा, 'सहजयोग म्हणजे केवळ कोर्स करणे नाही तर तो तुमच्या सुदृढ प्रकृतीसाठी, तुमच्या कल्याणासाठी आहे. तो अध्यावर सोडून चालणार नाही, तर त्याच्यात प्रगती करायला हवी, मोठे व्हायला हवे, केवळ बीजाचे अंकुरणेच नाही, तर त्याचा वृक्ष व्हायला हवा. अन्यथा त्याचा कोणालाच उपयोग होणार नाही.' म्हणून सहजयोगात प्रगल्भ न होण्याचे धोके त्यांना सांगा. प्रेमाने सांगण्याचा अमेरीकेत उपयोग होत नाही, हे मी पाहिले आहे म्हणून अशा प्रकारे सांगणे आवश्यक आहे. खरोखरची धडाकेबाज माणसे हवीत. अलीकडेच मी बिली ग्राहमचे भाषण ऐकले आणि म्हणाले, 'हा रिकाम्या डोक्याचा माणूस काही तरी बरळतोय!' तरी पण लोकांवर त्याचा ९ अशा सर्व लोकांना फक्त श्री विष्णुमाया शक्तीच सुधारू शकते श्री स२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला विष्णुमाया सहर्जयोगाचे ज्ञान मिळते केवढा प्रभाव पडतोय! त्याचे शिवाय अजून एक होता, तो मला वाटते सध्या तुरुंगात असावा. नाव माहिती नाही, पण विचित्र माणूस होता. तोसुद्धा, मी पाहिले, रिकाम्या भांड्यासारखी निरर्थक बडबड करीत होता आणि त्याच्यामागे लोक वेड्यासारखे जात होते, हजारोंच्या संख्येने उभे होते, नाचत होते, गात होते वरगैरे. म्हणून या लोकांना धक्का देण्याची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. अजून एक संस्था अशा धक्का देण्याच्या पद्धतीचे अवलंबन करीत होती, ब्रह्मकुमारी. तुम्ही बघा या ब्रह्मकुमारी एखाद्या विजेप्रमाणे होत्या आणि त्या लोकांना सांगायच्या, 'तुमचा नाश झाला आहे. हे जग नष्ट होणार आहे. सर्व काही नष्ट होणार आहे आणि तुमची तयारी नाही, मग 'हे काय होणार?' आता नाही सांगत. जेहोवाह विटनेस पण असेच करतात. ते सांगतात, जग नष्ट होणार आहे, आपण सगळे नष्ट होणार आहोत, म्हणून आपण तयारी करायला हवी आणि ईश्वराकडे लक्ष द्यावे.' हे वास्तव नाही. तरीसुद्धा लोक त्याच्यामागे जातात. तुम्ही त्यांना सत्य सांगा की, 'तुम्ही स्वत:ला नष्ट करीत आहातच, पण तुमचे भविष्यही नष्ट करीत आहात.' अमेरीकेतले बहतेक लोक नष्ट होतील, असे लोक आधीच बोलत आहेत. अनेक कारणांनी हे होते. असे म्हणता येईल की त्यांना परंपरा नाहीत, पण तो मुख्य मुद्दा नाही. मुख्य पॉईंट्स पैकी एक आहे, तो म्हणजे हे लोक येथे येऊन स्थायिक झाले तेव्हा त्यांनी असंख्य लोकांना ठार मारले. आता त्या मारले गेलेल्या लोकांची भुते सगळीकडे तरंगत आहेत आणि जमेल तेवढे अमेरीकन लोकांना नष्ट करण्याची त्यांची इच्छा आहे. जेवढ्या प्रमाणात काळी विद्या, नकारात्मक गोष्टी अमेरीकेत प्रचलित आहेत, तेवढ्या अन्यत्र कोठेच नाहीत. 'गुरू' लोकांना सर्व देशातून बाहेर पडावे लागले. पण ते अमेरीकेत येऊन चांगले स्थायिक झाले आहेत. ही भुते या लोकांना विकृत आयडिया देतात आणि ते स्वत:ला नष्ट करण्याच्या मारगे लागतात. आता भूतिश (विकृत) आयडिया अशा, तर माणूस पबच्या बाहेर येऊन पडलेला दिसतोय आणि भूतिश (विकृत) आयडिया अशी 'काय नुकसान आहे ? तू ट्राय कर, तू १० शक्ती कधीच पडणार नाहीस, आता तुला काहीही होणार नाही. तू एकदम मस्त आहेस.' तेव्हा तुम्ही सांगा, 'हे चुकीचे आहे. असे करू नकोस.' तो म्हणेल, 'वाईट आहोत आम्ही, म्हणून काय झाले ? ' या भूतिश (विकृत) आयडिया आहेत. मानवी आयडिया असे सांगणार नाहीत. तेव्हा अशा सर्व लोकांना फक्त विष्णुमाया शक्तीच सुधारू शकते, दुसरे कोणी नाही. मला आता समजले आहे, की विष्णुमाया शक्तीतूनच लोक सुधारतील, पण कॅथॉलिक आणि ख्रिश्चन यांच्यामुळे विष्णुमाया शक्ती निद्रिस्त आहे. हिंदू धर्मसुद्धा, कारण हिंदू धर्मातसुद्धा पापाची संकल्पना आहे. तुम्ही हे पाप केले आहे, ते केले आहे, एवढे पैसे ब्राह्मणाला द्या म्हणजे तुम्ही वाचाल. म्हणजे प्रत्येक धर्मात हा मूर्खपणा आहे, पण ही विष्णुमाया शक्ती जी सध्या माणसात अत्यंत दबलेली आहे व निद्रिस्त आहे, ती तुम्ही मोठी करा आणि लोकांना झोपेतून जागृत करा. आळस झटकून टाकायला लावून मोठ्या प्रमाणावर त्यांना त्यात सहभागी करा. त्यांना सांगा, की आम्ही विश्वशांती करीत आहोत. आम्हाला मानवाला मुक्त करायचे आहे. तुम्ही मोठ्या मंचावर जाऊन या गोष्टी सांगितल्या तर त्याचा उपयोग होईल. उदा.मी महात्मा गांधींच्या बरोबर होते आणि ते फार चांगले होते. लोकांना महात्मा गांधींबद्दल फार आदर आहे. महात्मा गांधींचे माझ्याबद्दल फार चांगले मत होते. मी लहान होते तरी ते माझा सल्ला घ्यायचे. याचा पुरावा म्हणजे त्यांच्या भजनांचा क्रम वेगळ्या प्रकारचा त्यांनी ठेवला होता. हृदयापासून आरंभ करून आत्म्याविषयी सांगितल्यावर ते मूलाधारापासून वर (वरच्या चक्रातून) जायचे. त्यांनी माझा सल्ला घेतला असल्याचा हा एक पुरावा आहे. ते काही असले तरी त्यांचा उपयोग करता येईल, की महात्मा गांधींनी जे सांगितले होते तेच आता श्रीमाताजी करीत आहेत. त्यांनी सर्वधर्म समभाव म्हणजे सर्व धर्मांना सारख्याच सन्मानाने आणि समजुतीने वागविणे. एकदा तुम्ही असे बोलू लागतात, की लोकांना हे कळेल, की तुमच्यामागे काही तरी उदात्त परंपरा आहे, कारण मी हे कोणत्या पुस्तकातून शिकले हे प्रत्येकाला हवे असते. मी कोणत्याही पुस्तकातून शिकले नाही हे तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही म्हणू शकता की, 'त्या ( श्रीमाताजी) गांधीजींबरोबर होत्या आणि त्यांचे श्रीमाताजींबद्दल फार चांगले मत होते. शांतता, अहिंसा आदी संकल्पना त्यांनीच ११ सांगितल्या होत्या. हीच तंत्रे आणि पद्धती श्रीमाताजींनी उपयोगात आणायची आहेत. आणि श्री २२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला हे नि:संशय खरे आहे. गांधीजी खरोखरच फार कठोर व प्रभावी वक्ते होते. त्यांचे स्व अनुयायीसुद्धा प्रभावी वक्ते होते. ते असे नाही म्हणायचे, 'या. बसा, चहा घ्या. ' आणि २हर्जयोगाचे ज्ञान अशा प्रकारच्या बोलण्याने काही होणार नाही. मिळते अमेरीकन लोकांना आव्हान पाहिजे आणि त्यांना ठिकाणावर आणायला तडाखेबाज माणूस हवा. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने जायला हवे, जसं मधे आम्ही न्युयॉर्कमध्ये कार्यक्रम घेतला होता. त्याला अनेक कृष्णवर्णीय, चिनी आणि भारतीय लोक होते. पण गोरे लोक फारच थोडे होते. गोरे लोक आले आणि म्हणाले, 'तुम्हाला माहिती आहे, मला काहीच झालं नाही.' तेव्हा तुम्ही काय म्हणायचे, 'काहीच झालं नाही? याचा अर्थ तुमच्यात काही तरी गडबड आहे अथवा तुम्ही काही तरी पाप केलं असेल.' मग त्यांना शॉक बसेल. 'आश्चर्य आहे! तुम्हाला काही मिळालं नाही. तुमच्यात काही तरी बिघाड आहे. तुम्हाला मिळायला हवं होतं. मिळवायचा प्रयत्न करा. तुम्हाला माहिती आहे हे फारच चुकीचे आहे.' मग विचारा, 'मला आशा आहे की तुम्हाला कॅन्सर झालेला नाही.' किंवा तुम्ही असं विचारा, 'तुम्हाला एड्स तर झाला नाही?' ते म्हणतील 'नाही, नाही. 'मग तुम्हाला कसला आजार आहे? तुम्हाला कसं नाही मिळालं? बघा, या कृष्णवर्णीयाला मिळालं, चिनी माणसाला मिळालं, तुम्हालाच का नाही मिळालं? तुम्ही गोरे आहात, तर तुम्हाला सर्वात आधी मिळायला हवं. मग कार्य घटित होईल. मी याचा विचार करीत होते, हे अमेरिकन लोक इतके मंद का असतात, कारण एकंदरीतच हे अमेरीकन लोक फारच मंद असतात, अतिशय मंद असतात. हे रॉक म्युझीक, कोणासमोरही लावा, ते पळून जातील, की 'हे काय चाललंय?' पण कालचं रॅप म्युझीक त्यांना इतकं आवडलं होतं आणि ते मला ऐकवत होते. हृदयाचे ठोके उलटे पडायला लागले. मी म्हणाले, 'हे काय होतंय.' सगळंच हादरायला लागले. मी एका बाकावर बसले होते, तो हलायला लागला. माझ्याजवळ कोण होता तो? करणही होता, आम्ही पाहिलं, करण आणि इतर उड्या मारीत होते, भूकंप होत असल्यासारखे वाटत होते. तर ते असं आहे. हे लोक फार फार मंद आहेत, बधिर आहेत. त्यांच्या कथित स्वातंत्र्यामुळे बधिर झाले आहेत, जसं 'आ बैल मुझे मार!' स्वत:ला पण बधिर करून घेण्यासाठी त्यांनी चाकोरी बाहेर जाऊन प्रयत्न केले. दारू असेल, बाई असेल, अनेक लग्ने केली असतील, एक लग्न पुरेसे आहे. पाच पाच लग्ने करून तुम्ही कोणासारखे व्हाल. मला १२ के माहिती नाही, असं काही जनावर आहे का. पण तुम्ही बधिर होता. प्रथम तुम्ही एक पत्नी करता, मग तिच्यावर प्रेम करता, तुम्हाला मुलं होतात, इतकं सगळं तुमच्या पत्नीबरोबर होतं आणि एकदम तुम्ही घटस्फोट घेता आणि तुम्हाला काहीच वाटत नाही! त्यांना तुम्ही सांगा, की हा बधिरपणा आहे, तर ते म्हणतील, 'मला माहिती आहे.' सगळं समजतंय, पण काही वाटत नाही. ते चुकीच वागत आहेत, असं त्यांना वाटत नाही. आपण काही तरी अॅबसर्ड केलं आहे असं त्यांना वाटत नाही आणि त्यांना ्रास होत नाही. दुसरं कोणीही असतं तर त्याला त्रास झाला असता. पत्नीला घटस्फोट दिल्यावर साधारणपणे माणूस सैरभैर व्हायला हवा. पण इथं तुम्हाला दिसतं तो माणूस घमेंडीत सांगत असतो, 'माहिती आहे, मी दोन बायकांना घटस्फोट दिलाय आणि आता तिसरा होणार आहे. तुम्ही तिला भेटू शकता.' त्याची लाज वाटत नाही की काही वाटत नाही. तुम्ही त्या स्त्रीशी लग्न केलंत, तिच्याबरोबर राहिले होता, ती तुमची बायको होती आणि तुम्हाला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. तुमची स्वत:ची मुले आहेत. त्यांच्याबद्दलही काहीच वाटत नाही! अर्थात् हे इंग्लिश लोकांसारखे नाहीत, इंग्लिश लोक मुलांची हत्या करतात, हे त्यांच्या इतके वाईट नाहीत, पण इथे मी ऐकलंय की नवरा बायकांची हत्या करतो, बायको नवऱ्याची वगैरे आणि ते कशाला? प्रेमासाठी! त्यांना एका नवर्याबद्दल प्रेम वाटत नाही, तर दूसर्या नवऱ्याबद्दल कसं वाटणार, मला समजत नाही! प्रेम १३ श्री विष्णुमाया अशाच भावनाहीन लोकांना सांभाळते श्री २२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला विष्णुमाया २हर्जयोगाचे ज्ञान DU मिळते हृदयाचा गुण आहे. तर ते असं आहे. तुम्ही पहाल, तर एकंदरीत सर्व व्यक्तित्व बधिर असल्यासारखं दिसतं. कारण ते माणसासारखे वागत नाहीत, कोणासारखे वागतात ते सांगता येत नाही. कारण त्यांची होऊ शकत नाही. अमेरीकेतच असे लोक आहेत असे नाही. तर सगळीकडे आहेत. पण अमेरीकेत फारच आहे आणि या सर्व गोष्टी अमेरिकेतूनच तुलना उद्भवतात. अशा विचित्र कल्पना अमेरिकेतच उद्भवतात. कारण अमेरीकन लोकांना जाहिरात करणे, प्रसिद्धी देणे चांगले माहिती आहे. एकदा मी जहाजाने चालले होते. पायलट जहाजावर आला. तो माझ्याशी बोलत होता आणि म्हणाला, 'माझा भाऊ फार वाईट राक्षस आहे.' मी म्हणाले, 'काय झाले ?' तेव्हा त्याने सांगितले, की त्याच्या भावाने चार बीटल्स (Beatles) मुलांना पकडले आणि तो त्यांचा मॅनेजर झाला आहे. त्याने या संगीताची सुरुवात केली. मुली जमवल्या. त्यांना दारू प्यायला दिली, ड्रग्ज दिले. मग संगीत सुरू झाल्यावर त्या किंचाळायला, ओरडायला लागल्या, वेडेपणा करू लागल्या. मग ते प्रसिद्ध झाले. याच्यावर साधारणपणे अशी प्रतिक्रिया हवी, 'बापरे! संगीत सुरू झाले, की मुली वेड्या होतात. तेव्हा अशा संगीताच्या कार्यक्रमाला जायला नको.' याच्या उलट अनेक लोक तिकडे जायला लागले. तेव्हा या प्रतिक्रियेचे काय स्पष्टीकरण देणार ? जेवढे जास्त ते ओरडतील, किंचाळतील, त्यात त्यांच्या मते काहीतरी आहे. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी सुप्त आहे, जे त्यांना स्पर्श करून गेले. अन्यथा त्या का किंचाळतील? म्हणजे जे अशा मठू लोकांनाही स्पर्श करते त्याच्यात काहीतरी महान असले पाहिजे. 'म्हणून आपण सगळे जाऊया. आपणही मठ्ठ आहोत, म्हणून आपणही त्या कार्यक्रमाला जाऊयात.' आता तुम्ही मला विचाराल, 'श्रीमाताजी, हा मट्टुपणा या लोकांमध्ये कसा आला ? मी तुम्हाला सांगितलं, तसं साधं आहे. ते असं की त्या लोकांनी स्वातंत्र्याचा इतका जास्त उपभोग घेतला , त्यांचे चित्त व्यर्थ गोष्टींच्या मागे लावलं की ते खरोखर बधिर त्याचं कारण, १४ आव झाले. तुम्ही जिकडे चित्त घालाल तिथून ते रिअॅक्ट होऊन काही तरी होऊन परत येते (तिकडच्या माहितीच्या स्वरूपात ते परत येते). पण तुम्ही सततच बाहेरच चित्ताचा भडिमार करीत राहिलात तर बाहेरूनसुद्धा तोच भडिमार तुमच्यावर होऊन तुमची सेन्सिटिव्हिटी संपवितो. तुम्हाला काहीच कशाचे वाटत नाही, कोणत्याही घटनेचे रेकॉर्डिंग होत नाही म्हणून, त्याच्यासाठी मला वाटते विष्णुमायेची आवश्यकता आहे. यासाठी विष्णुमायेची डाव्या बाजूकडे स्थापना केलेली आहे. श्री विष्णुमाया अशाच भावनाहीन लोकांना सांभाळते. त्यांना भावना देण्यासाठी विष्णुमाया आहे. जेव्हा विष्णुमाया चमकते, त्यावेळी डाव्या बाजूकडे ती तुम्हाला भावना देते आणि लोक समजूतदार होतात. सध्या फक्त त्यांना बैद्धिक स्तरावर कल्पना आहे, की ते अपराधी आहेत. ते केवळ बौद्धिक स्तरावर आहे. बौद्धिक स्तरावर 'मी अपराधी आहे' ही कल्पना असेल तर तुम्हाला काहीच जाणवणार नाही. समजा, तुम्हाला कोणी 'वेडे आहात' असे म्हटले, पण तुम्ही वेडे नसाल तर तुम्हाला कोणी वेडे म्हटल्याचे काही वाटणार नाही. हे तसे आहे. त्यांना अजिबात काही वाटत नाही. कारण त्यांनी बौद्धिक स्तरावर मान्य केल्याने ते बधिर झाले आहेत. आता प्रवृत्ती अशी आहे, तुमचे काही नुकसान नाही तर काय चुकले?' आता मी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कार्यरत व्हायला सांगते. प्रभावी व्हा , काय चालले आहे, वस्तुस्थिती काय आहे, कशी आहे, ते वृत्तपत्रांत लिहा. मी असेच एक पुस्तक आता लिहीत आहे, त्याला 'मेटा मॉडर्निझम (परा आधुनिकता)' म्हणतात. मला जेवढे होता येईल तेवढे प्रभावी होऊन त्यांच्या वागण्यात काय चुकीचे आहे, ते सांगणार आहे, की त्यांच्या लक्षात यावे की हे सगळे चुकीचे आहे, त्याची भलावणी करण्याच्या प्रयत्नाने काही साधणार नाही. आता एड्स आला आहे. मला वाटलं एड्समुळे त्यांचे डोळे उघडतील. पण आता एड्स होणे हौतात्म्य झाले आहे. आता 'युप्पीज' आला आहे. मी म्हणाले, 'युप्पीजना रोग होणार आहे.' आता ते म्हणतात, 'नाही, नाही! युप्पीज होणे फार चांगले आहे. आपल्या युप्पीझमसाठी मेलेले ते हिरो आहेत.' अशाप्रकारे, प्रत्येक वेडेपणाला एक प्रकारच्या महानतेची गोष्ट बनवली जाते आणि लोक त्याला १५ पैसा ही श्री सरस्वतीची वेगळी बाजू आहे श्री २२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला पेसा २हर्जयोगाचे ज्ञान मिळते मान्यता देतात. हे विशेष आहे, की लोक त्याला मान्यता देतात म्हणून तुम्ही आक्रमक होऊन त्याच्या प्रकाशात ते लोक काय आहेत, हे त्यांना दाखवणे महत्त्वाचे आहे. त्यांना दाखवून द्यायलाच पाहिजे. आत्म्याच्या लहान प्रकाशात त्यांना जास्त काही दिसणार नाही. तर खराखुरा, डोळे दिपविणारा विजेचा ज्वलंत प्रकाश पाहिजे. तेव्हा आजची पूजा विशेष करून तुमच्यासाठी आहे, की ज्याच्यामुळे तुमच्यात आक्रमकतेने बोलण्याची व प्रत्येक बाबतीत वागण्याची सृजनशीलता विकसित होईल. केवळ त्याच्यामुळेच ते लोक ठिकाणावर येतील. दुसर्या कशामुळेही नाही. सृजनात्मक कामातसुद्धा जेव्हा आपण काही निर्माण करीत असतो किंवा एखादे गाणे म्हणत असतो, हे गाणे जर भारतीय प्रकारचे असेल, आणि ते मंद (स्लो) तालात असेल तर ते चालणार नाही. त्यांना रविशंकर यांच्यासारखे कोणीतरी भारतीय संगीताच्या दृष्टीने अशास्त्रीय पद्धतीने स्वरांची सरमिसळ करणारा हवा असतो. त्याच्यात रंजकता नसली तरी चालेल. त्याने तुमचे हृदय उघडणे किंवा तसे काही होणार नाही. पण तशा संगीताचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. तेव्हा रॉक अँड रोलमध्ये सतारीचा उपयोग किंवा त्याच्यापेक्षाही वाईट मला अलीकडचे माहिती नाही, संगीत तयार करा. दसरे असे, की ते लोकांना कसा धक्का देण्याचा प्रयत्न करतात ते पहा. धक्का देण्याचा प्रयत्न करण्याचे अजून एक कारण म्हणजे लोक त्यांच्यासारखेच आहेत, हे ते जाणतात. जसे तुम्ही मार्केटमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला दिसते, की कोणी तरी चुकीच्या ठिकाणी फाटलेली पँट, ती सुद्धा अर्धी, घालून आले आहे. ते फक्त धक्का देण्यासाठी! अमेरीकेत डिसेंट दिसणारे कपडे घालण्याची पद्धत आहे. अशी मान्यता आहे, की इनडिसेंट कपडे परिधान करायचे नाहीत, पण असे दिसते, की दुसऱ्यांना धक्का देणारे कपडे घालण्यासाठी संधी मिळाल्यास तसे कपडे घालणे त्यांना आवडते. तसे केसांचा थोडा भाग पांढऱ्या रंगाचा करणे. म्हणजे दुसऱ्यांना धक्का देण्यास, त्यांचे लक्ष वेधून घेण्यास ते काहीही करतील. त्यातून काय मिळते ? काही नाही. दुसर्याचे लक्ष वेधून घेण्यास इतका १६ सरस्वती खर्च करायचा, पण त्याचा फायदा काय? दुसर्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेल्यावरसुद्धा काहीच मिळत नाही, तुम्हाला पैसे मिळत नाही, की तुमच्या खर्चाची भरपाई होत नाही. तेव्हा हे सगळे आनंदहीन प्रयत्न आहेत आणि त्यांच्यामुळे त्या लोकांचे चित्त इतके खराब होते, की ते भावनाहीन होतात. कोणत्याच भावना त्यांना नसतात आणि त्याच्याहून वाईट हे झाले आहे, की ते लोक अत्यंत पैशाच्या मागे धावणारे झाले आहेत. पैसा हा श्री सरस्वतीची वेगळी बाजू आहे. श्री सरस्वती, श्री लक्ष्मी यांचेपासून वेगळ्या असतात. त्या दोघी केव्हाच बरोबर नसतात. या कारणामुळे श्री लक्ष्मीच्यामागे अती धावण्याने त्यांना धक्के मिळतात. कारण एकदम शेअर मार्केट कोसळते, मंदीची लाट येते, व्यवसाय बंद होतात, फार श्रीमंत माणूस गरीब होतो. हे श्री सरस्वतीचे काम असते आणि कोणी जर फारच सरस्वतीच्या मागे असेल, फारच पुस्तके वाचत असेल, महत्त्वाकांक्षी कलाकार, दुसर्या कलाकारांच्या पेक्षा अधिक प्रसिद्धी मिळवायच्या प्रयत्नात असेल, तर श्री लक्ष्मी यांच्याकडून असे फलित मिळते, की त्याच्या कलाकृतींची विक्री होत नाही, पैसे मिळत नाहीत. वगैे. या दोन्ही बाजू हंसा चक्रात संतुलनात येतात किंवा असे म्हणू की तुम्ही सहजयोगी होता तेव्हा त्या संतुलनात येतात. तेव्हा त्या दोन्हींची प्राप्ती करून घेऊन त्यांना संतुलनात ठेवायचे. त्यामुळे तुम्हाला दोघींचेही श्री लक्ष्मी आणि श्री सरस्वतीचे आशीर्वाद मिळतील. पण त्या दोन्ही बाजू, हंसा आणि विशुद्धी या स्थानांत क्रॉस करतात. तेव्हा त्यांना संतुलनात आणावयासाठी काय करायचे तर आपण जे काही मिळवितो, जे काही करतो ते साधारण प्रतीचे असू नये. आपण ते आवेशयुक्त (Fiery) व गतिमान पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा. दोन्ही विशुद्धीमध्ये एकत्र आणायचे. समजा, तुम्ही सहजयोगावर आक्रमकतेने भाषण देणार आहात. तेव्हा तुम्ही हिप्पीसारखे, जेलमधून आल्यासारखे कपडे घालाल, तर तुमचे भाषण कोणीही लक्षपूर्वक ऐकणार नाही. पण तुमचे व्यवस्थित कपडे असतील, तुम्ही आदरणीय वाटाल, चांगले प्रेझेंटेशन असेल आणि तुम्ही आवेशपूर्ण भाषण करीत असाल, तर प्रत्येकजण तुमचे भाषण लक्ष देऊन ऐकेल. तेव्हा हे लक्ष्मी तत्त्वाचे तत्त्व सरस्वती तत्त्वाच्या प्रभावाखाली उपयोगात आणायचे. श्री सरस्वतीच्या आणखी एका आशीर्वादाने तुम्हाला सहजयोगाचे ज्ञान मिळते. मी पाहिले आहे, १७ श्री सरस्वती शिक्षणाची देवता आहे णि श्री ज्ञानाची महरासरस्वती श्री स२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला शिक्षण सहर्जयोगाचे ज्ञान मिळते स्त्रिया, विशेषतः सहजयोगातल्या, सहजयोगिनी आहेत. त्यांना व्हायब्रेशन्स आहेत, पण त्यांना सहजयोग काय आहे, याचे ज्ञान नाही. चक्रे काय आहेत ? व्हायब्रेशन्स कशी बाहेर जातात? ते माहिती नसते. आता आजचे भाषण अगदी अवघड आहे. तुम्ही कागद -पेन्सिल घेऊन चार-पाच वेळा ऐकले म्हणजे ते तुम्हाला समजेल. ते समजणे सोपे नाही. मी सांगते, आता ठीक आहे, रंजक आहे, पण त्या रंजगतेच्या मागे गहन ज्ञान आहे. महिलांना कागद पेन्सिल घेऊन बसलेल्या मी कधी पाहिल्या नाहीत, की श्रीमाताजी काय सांगत आहेत, विविध गोष्टींचे काय ज्ञान देत आहेत, ते आपण शिकावे. त्यांच्यासाठी सहजयोग म्हणजे चांगले असणे, चांगले जेवण बनविणे, सहजयोग्यांना मदत करणे, पूजांना येणे, एवढाच आहे. तेव्हा त्यांनीसुद्धा सहजयोग काय आहे, ते शिकणे महत्त्वाचे आहे. त्यांनी माझी भाषणे ऐकून, त्यांचा अभ्यास करून समजून घ्यायला हवीत. त्याच्या उलट पुरुष आहेत. त्यांच्याकरता बाहेरची कामे करणे, फिरणे, इत्यादी आहे, पण ते नाते-संबंधांकडे, भावनिक बाजूकडे दुर्लक्ष करतात. म्हणून पुरुषांनी सहजयोग करणे आणि महिलांनी करणे याच्यात फरक आहे. फ्रान्समध्ये विशेषत: त्यांच्यात फारच अंतर पडले. स्त्रिया एका बाजूला व पुरुष दुसर्या बाजूला झाले. कल्पना करा, सहजयोगात असला मूर्खपणा असू शकतो! आम्ही हे सर्व करणारी व्यक्ती शोधून काढली व सर्व व्यवस्थित केले. आता पुष्कळ चांगले आहे. पण स्त्रियांना सहजयोगाचे ज्ञान असलेच पाहिजे. पण याचा अर्थ त्यांनी पुरुषांशी भांडणे करावीत, 'त्यांना येते ते आम्हाला ही येते. असा नाही. मी पाहिले आहे. मी असे पाहिले आहे, की सहजयोगाविषयी स्त्रिया आणि पुरुषांच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एक बहिर्मुखी तर दुसरा अंतर्मुखी आहे. पण सहजयोगाच्या संदर्भात स्त्रिया आणि पुरुष यांच्यात काहीही फरक नाही. मी स्वत: स्त्री आहे व मला सहजयोगाचे एवढं ज्ञान आहे, तर मग महिलांना सहजयोगाचे ज्ञान का नसावे ? तेव्हा येथे असलेल्या सर्व स्त्रियांना व सगळीकडच्या स्त्रियांना सहजयोग काय आहे त्याचे ज्ञान हवे. विष्णुमायेला पहा. ती स्त्री आहे, कार्य करू शकते अशी शक्ती आहे. श्री ब्रह्मदेव १८ ज्ञान कार्य करीत नाहीत. त्यांनी हे सगळे निर्माण केले. कारण त्यांना श्री सरस्वतीची शक्ती आहे. अन्यथा ते निर्मिती करू शकले नसते. तेव्हा शक्तीच्या द्वारेच सर्व कार्य केले जाते आणि शक्ती स्त्र स्वरूपात आहे. पण शक्तीलाच सहजयोग काय आहे याचे ज्ञान नसले तर ती कसे घडवून आणू शकेल? महिलांना मुले आहेत, त्यांना घरातली कामे आहेत, स्वयंपाकघर आहे हे मला माहिती आहे, पण सहजयोगाबद्दल वाचणे, तो समजावून घेणे व ज्ञान मिळविणे किती आनंददायी आहे ! काही जणी वाचतात, त्या वाचत नाहीत असे मला म्हणायचे नाही, पण त्या संख्येने फार थोड्या आहेत आणि त्या फार सुज्ञ आहेत, फारच सुज्ञ आहेत. तेव्हा आजच्या घटनेतून मला समजले आहे, की या निसर्गरम्य परिसरात ब्रह्मदेव - सरस्वती यांच्या कार्याचे आपल्याला आशीर्वाद आहेत, त्यांची क्षमता आपल्याला जाणवते, किती महान निर्मिती ते करू शकतात, निसर्ग परमेश्वराशी एकात्म आहे. आता पहा. मी आल्याबरोबर निसर्गाला ते समजले की मी इथे आहे. त्यांनी स्वत:हनच कार्य करायला आरंभ केला. मला त्यांना भाषण द्यावे लागले नाही, त्यांना पूजा करावी लागली नाही, तसा काही प्रकार नाही. मी काय करीत होते, ते त्यांना समजले. मी लॉस एंजलीसला गेले. तिकडेही असेच. मी कोठेही गेले, तरी काय करायचे हे निसर्गाला समजते. आता माणसांकडून श्रीमाताजी शहरात आहेत. आपल्याला काय करायला हवे? आणि ते करतात. मला सर्व काही उपचार पार पाडून घ्यावे लागतात, ही अडचण आहे, 'हे करा, आता ते करा' वरगैरे. पण मी म्हणेन की सगळे आपोआप व्हायला हवे, कारण आपण एक आहोत. जसा निसर्ग माझ्याशी एक आहे, तसे तुम्ही पण माझ्याशी एक आहात. पण हे घटित होण्याची तेव्हाच सुरुवात होईल, जेव्हा तुम्ही खरोखर पूर्णतया सहजयोगात ओढले जाल आणि सहजयोगाला शरण जाल. ईश्वराचे तुम्हाला आशीर्वाद ! आता श्री सरस्वती शिक्षणाची देवता आहे आणि श्री महासरस्वती ज्ञानाची. जे शुद्ध ज्ञान आहे त्याची देवता आहे. शिक्षणाची देवता श्री सरस्वतीला चार हात आहेत. त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केलेली आहेत. जे पावित्र्याचे व शुद्धतेचे द्योतक आहे. त्या कुमारी आहेत. त्यांच्या हातात वीणा आहे. देवांनी वीणा हे वाद्य सर्वात प्रथम तयार केले, की त्याच्यावर त्यांना शास्त्रीय संगीत वाजवता यावे. अथवा असे संगीत वाजवता यावे ज्याचा देवांना आनंद घेता येईल. दूसर्या हातात जपाची माळ आहे. याचा अर्थ जी १९ व्यक्ती विद्वान आहे ती अतिशय निरासक्त असावी. संत माणसाला फार आसक्ती नसाव्यात. श्री २२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला तो राइट साइडेड नसावा. म्हणजे असे नेहमी होते, की अती शिकलेला विद्वान माणूस कुटुंबाकडे फार लक्ष देत नाही, कलासक्त असतो, शिस्तप्रिय व स्वयं शिस्त असतो, प्रत्येक गोष्ट २हर्जयोगाचे ज्ञान काळजीपूर्वक करतो, कार्यक्षम असतो म्हणजे हे सगळे हातात हात घालनू आपोआप होतेच. मिळते श्री सरस्वतीच्या डाव्या हातात पुस्तक असते. याचा अर्थ श्री सरस्वती, त्यांची शक्ती तुम्हाला पुष्कळ सृजनशीलता देते. ज्याच्यामुळे तुम्ही पुस्तके निर्माण करू शकता (लिहू शकता). याचा अर्थ असा, की तुम्ही जे काही करीत आहात, समजा, तुम्ही सहजयोग करताय आणि सहजयोग ईश्वराशी संबंधित आहे. म्हणून तुम्हाला समजले पाहिजे की पुस्तकामध्ये (स्क्रिप्चर्स) काय आहे. आपल्याला हे समजले पाहिजे की ते ग्रंथाशी कशाप्रकारे जोडले गेले आहे. हे ज्ञान मशरूम ज्ञानाप्रमाणे (एकदम वेगळे ज्ञान) तयार झालेले नसावे, तर ग्रंथांशी संबंधात असावे. याचा अर्थ ते ग्रंथ वाचून त्यातलेच लिहावे असे नाही, तर तुम्हाला काय लाभ झाला, तुम्हाला काय मिळाले, कशाचा शोध लागला, हे ग्रंथांशी (स्क्रिप्चर्स) जुळले पाहिजे. संबंधित हवे. श्री सरस्वती तुम्हाला शक्ती देते जिच्याशी ती संबंधित आहे. उदा. तुम्ही अनेक पुस्तके वाचता त्याच्यातील उद्धरणांचा (कोटेशन्स) उपयोग. मी सुद्धा उद्धरणांचा उपयोग करते. आता जे ज्ञान मी तुम्हाला देत आहे, त्या ग्रंथाचाच भाग आहे. म्हणजे सगळे ज्ञान नाही तर काही भाग, श्रीसरस्वतीबद्दल वगैरे पूर्वीच लिहिलेला आहे. तेव्हा ग्रंथांचा आदर करायला विशेषत: शास्त्रांचा (वेद, उपनिषदे, पुराणे) आदर करायला शिकले पाहिजे. श्री सरस्वती तुम्हाला या ग्रंथाच्या सखोल अभ्याचासी शक्ती देतात. म्हणजे त्यात काय सत्य आहे व काय नाही, त्यात जे लिहिले आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्यात दर्शविलेला सूक्ष्म अर्थ जाणण्याची शक्ती ही श्री सरस्वतीची शक्ती आहे. श्री सरस्वतीची अजून एक शक्ती आहे. ती वाक्शक्ती. या शक्तीमुळे तुम्ही भाषण करता. ती तुम्हाला बोलण्याची शक्ती देते. तुम्ही लिखाणातून, भाषणातून, नाटक, सिनेमा इत्यादींच्या माध्यमातून जे काही प्रसारित करता, ते सर्व श्री सरस्वतीच्या शक्तीतून होते. त्याच्यातील बौद्धिक क्षमता त्या शक्तीकडून मिळते. श्रीकृष्णांनासुद्धा सरस्वतीची शक्ती वापरावी लागते. प्रत्येकाला त्यांचीच शक्ती वापरावी लागते. कारण श्रीकृष्णांची चातुर्य शक्ती सरस्वतीच्या शक्तीमधून येते. तुम्हाला भेटणार्या प्रत्येक ब्रिलियंट व्यक्तीला श्री सरस्वतीची शक्ती मिळाली असते. श्री सरस्वतीची पूजा करणारी व्यक्ती निरासक्त असायला हवी. विविध प्रकारच्या कलाकृती निर्माण २० ए) करणार्या विद्वान कलाकारांना त्यांच्या हयातीत विशेष लाभ मिळत नाही. श्री लक्ष्मीच्या संबंधी अनासक्त असतील, इतर बाबतीत अनासक्त असतील, तर ते आपल्या आनंदासाठी निर्मिती करतात. किसी पैसे मिळतील याची पर्वा करीत नाहीत. तेव्हा सरस्वतीच्या शक्ती तुम्हाला विद्वत्ता व ज्ञान देतात, व मोठे आकलन असणारी बुद्धिमत्ता देतात व असे व्यक्तिमत्त्व देतात, की जे तुमच्या ब्रिलियन्समुळे इतरांपेक्षा अधिक चमकदार (प्रभावी) असते. ती शक्ती तुम्हाला पैसे देणार नाही, धन-दौलत (पझेशन्स) देणार नाही, पण ते पझेशन जे कोणी चोरू शकणार नाही, कोणी हरण करू शकणार नाही. श्री सरस्वतीचे नम्र व्यक्तिमत्त्व आहे, तेव्हा ज्ञानी माणूस नम्र असावा. तो नम्र नसेल तर, सरस्वती तत्त्वाप्रमाणे तो ज्ञानी नाही. अतिशय ज्ञानी माणूस आपल्या विद्वत्तेच्या फलितांनी (त्याला मिळालेला सन्मान) वाकायला हवा (नम्र व्हायला पाहिजे). ज्ञानी व्यक्ती जी स्वत:ला महान समजते, ती अर्धवट ज्ञानी असते, परिपूर्ण ज्ञानी नसते, म्हणून ती अहंकारी असल्याने ज्ञानी असू शकत नाही. खरा ज्ञानी नेहमीच अतिशय नम्र असतो. त्याच्या नम्रतेवरून त्याची विद्वत्ता दिसून येते, कारण सरस्वतीची शक्ती नम्रता देते, व्यावसायिकाची नम्रता नाही, तर खरी नम्रता. अनेक गुण आहेत. मला वाटते एक दिवस त्याच्यावर पुस्तक लिहिता येईल. २१ ( १ २त्य परिपूर्ण असते. सहस्रारे महामाया असे वर्णन केले आहे, तर तुम्ही जर महामाया असलेल्या व्यक्तीला पहाल तर त्यांना तुम्ही पूर्णतया व परिपूर्ण पणे समजू शकणारच नाही. कारण महामाया शक्ती तुमच्या कल्पनेपेक्षाही फार मोठी आहे, म्हणून शरण जाणे आवश्यक आहे. तुमच्या सीमित कल्पनाशक्तीने किंवा बुद्धीने तुम्हाला त्या दैवताला जाणून घेणे शक्य नाही. शिवाय तिला भक्तीगम्या असे ही म्हटले आहे. म्हणजे त्यांना तुम्ही तुमच्या भक्तीमधूनच समजू शकता. तेव्हा भक्ती असणे आवश्यक आहे, भक्ती अत्यंत स्वच्छ असली पाहिजे. म्हणजे हृदयात कोणतीही द्वेष भावना असू नये. परन्तु हृदय स्वच्छ हवे. हृदय स्वच्छ ठेवणे अवघड आहे. मानवाचे सत्याचे ज्ञान नेहमी सापेक्ष असते. परंतु सत्य परिपूर्ण असते. म्हणून सत्याला प्राप्त करून घेण्यासाठी माणसाला त्याचे हृदयात असलेल्या सर्व असत्य गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. म्हणून प्रथम आपले हृदय जरी स्वच्छ नसले तरी साक्षात्कार प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला पुष्कळ आसक्ती असते. बऱ्याच असत्य गोष्टींबद्दल आपल्याला आत्मीयता असते. शिवाय आपली अशी पण समजूत असते, की जागृती किंवा आत्मसाक्षात्कार झाल्यावर आपण फार शक्तिमान होऊ. गोष्टीमध्ये गुंतून पडू लागलो. आपल्या नातेवाईकांना, आयांना- जागृतीनंतरसुद्धा आपण कद्रु बहिणींना कृपा करावी असे म्हणू लागलो. स्त्रियांना त्यांच्या नवऱ्याची, मुलांची, भावाची आठवण झाली, ज्यांच्या ज्यांच्यात म्हणून त्या गुंतून पडल्या होत्या, त्यांच्यासाठी त्या आशीर्वाद मागू लागल्या. मला माहिती आहे, की लवकरच या मायापाशातून तुम्ही स्वत:ची सुटका करून घ्याल. अवताराचे कार्य असे आहे, की त्यांना त्यांच्या शिष्यांची भक्तांची इच्छा पूर्ण करायची असते. पण जेव्हा तुम्ही मला तुमच्या भावाबद्दल, बहिणीबद्दल, आईबद्दल, वडिलांबद्दल सांगता तेव्हा तेसुद्धा मी जितके जमेल तितके पूर्ण करते. शिवाय तुम्ही आश्रय मागता, क्षेमाची इच्छा करता. जे काही तुम्हाला आवश्यक आहे ते मागता व ते पूर्ण केले जाते. तर श्रीकृष्णाचे पातळी वर 'योगक्षेमं वहाम्यहम्' चे वचन होते व म्हणून तुमच्या क्षेमाची काळजी वाहन ते वचन पूर्ण केले गेले. पण आता या नवीन युगात काय घडणार आहे. (५/५/१९८४, फ्रांस) २२ छ हि ्र ा पा. है अरर दना0 र०7 दि ० ल सहस्राराची एक मंत्र आहे, तो आहे 'निर्मला'. ज्याचा अर्थ आहे की प्रत्येकाने स्वच्छ, साफ-सुथरे, पविन्न आणि निव्कलंक रहायला हवे. (निर्मला योग, मे-जून १९८५) प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in * स र ज म २५ ला कोणत्याही रोपट्यावर पाणी पडले तर ते जसे आपले आपण वाढते, त्याचे प्रकारे असे शुद्ध चित्त ज्या मनुव्याचे होते त्याच्या हृदयाची कळी उमलते आणि तो कमळ स्वरूप होऊन त्याची सहसारावर छाप पडते. नंतरत्याची सुगंध चारही दिशेलापसरती. प.पू.श्री माताजी, शिवपूजा, दिल्ली, ९.२.१९९१ ---------------------- 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-0.txt चैतन्य लहरी मराठी मे-जून २०१४ है रा] की ० जु 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-1.txt मेणबत्तीची ज्योत तुम्हाला सांगू शकते की तुम्ही भूतग्रस्त आहात की नाही. मेणबत्तीला इतके ज्ञान आहे. समजा तुम्हाला हृदय चक्राची समस्या आहे, तुम्हाला हृदय-रोग आहे, तर मेणबत्ती ते सुचित करेल. आणि जर तुम्ही मेणबत्तीच्या प्रकाशाने उपचार कराल तर तुम्ही स्वत:ला रोगमुक्त करू शकाल. ती इतकी संवेदनशील आहे की ती केवळ रोगमुक्तच करत नाही तर ती पूर्ण सक्षम आहे, हेच कारण आहे की भारतात अग्नी पूजा केली जात होती, कदाचित त्यांना हे समजले होते की अग्ीला सर्व काही माहीत आहे. प. पू. श्री माताजी, कबेला, २१.७.२००२ श्ी ्ी 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-2.txt 5म या अंकाल श्री सरस्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला सहजयोगाचे ज्ञान मिळते ...४ सत्य परिपूर्ण असते ...२२ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-4.txt श्री स२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाली सहर्जयोगाचे ज्ञान मिळते कॅनडा, ११.८.१९९० 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-5.txt श्री सरस्वतीच्या शक्तीने निसर्ग निर्माण होतो श्री स२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला सरस्वती सहर्जयोगाचे ज्ञान मिळते ज्यावेळी त्यांनी मला विचारले की व्हँकोव्हरमध्ये कोणती पूजा करायची? तेव्हा श्री सरस्वतीची पूजा करणे उत्तम असा मी विचार केला. कारण मी ऐकले होते की तो आश्रम फार सुंदर अशा निसर्गरम्य परिसरात आहे आणि सरस्वतीच्या शक्तीने निसर्ग निर्माण होतो. याशिवाय निसर्गात राहणारे लोक अतिशय सृजनशील होतात. त्यांच्या कोमल भावना टिकून राहतात. ते घाई-गडबडीत कधीच नसतात. ज्याला जास्त आधुनिक म्हणता येईल असे ते नसतात. कारण निसर्ग त्यांना शांत करतो. त्यामुळे सरस्वतीची सृजनशीलता त्यांच्यातील कलाकाराला घडविते आणि मला माहीत होते की या देशात फार पूर्वीपासून कलाकार तयार झाले असावेत. कॅनडा हा देश, मला असे जाणवते की विशुद्धीचे हंसा चक्र आहे. श्री महाब्रह्मदेव, ज्यांना श्री हिरण्यगर्भ म्हणतात, जेव्हा श्री सरस्वतीचा आविष्कार करतात, तेव्हा श्री सरस्वती या श्री महासरस्वती होतात. त्यांच्यासाठी त्यांना हंसा चक्रामधून क्रॉस करावे लागते. त्या हंसा चक्रातून क्रॉस करतात आणि श्री विष्णुमाया शक्ती होतात. म्हणजेच त्या श्री विष्णुमाया शक्ती असतात. तेव्हा श्री सरस्वती श्री विष्णुमाया होतात. त्या दोन ठिकाणी क्रॉस करतात, पहिले हंसा चक्रात व दुसरे विशुद्धी, तेव्हा त्या श्रीकृष्णांच्या भगिनी आहेत. श्री सरस्वती यांनी श्रीकृष्णांची बहीण म्हणून जन्म घेतला. ज्यावेळी श्रीकृष्णांचा कंस नावाचा मामा त्यांना ठार मारायला आला त्यावेळी त्या आकाशात गेल्या व वीज बनल्या आणि त्यांनी श्रीकृष्णांच्या येण्याविषयी, म्हणजे त्यांचा जन्म झाला असल्याचे जाहीर केले. त्यामुळे श्रीकृष्ण व विष्णुमाया यांचे बहीण-भावाचे नाते आहे. आश्चर्य म्हणजे परवा आपण रक्षाबंधनाचा समारंभ केला. रक्षाबंधन म्हणजे बहीण- भावाचे नाते. त्यामुळे आज या ठिकाणी आपण वास्तविक श्रीकृष्णांच्या भगिनीची पूजा करणार आहोत. नंतर त्यांनी द्रौपदी म्हणून जन्म घेतला. म्हणून श्रीकृष्ण त्यांचे पावित्र्य वाचविण्यास गेले कारण भावालाच त्याच्या बहिणीचे पावित्र्य आणि नाव याची काळजी असते. ६ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-6.txt निसर्ग म्हणून काल असे झाले, की सरस्वती पूजा होती आणि सोळा वेळा श्री विष्णुमाया कडाडली. काय घडत होते ते मी कोणाला सांगितले नाही, पण मला माहिती होते, की त्या कडाडणार. शिवाय त्यांनी वॉशिंग्टनलाही धमकावले आणि ते चांगले झाले. वॉशिंग्टनला जागे करायला पाहिजे. या सूक्ष्म गोष्टी आहेत आणि ही सूक्ष्म नाती आहेत. मीच फक्त सांगू शकते कारण ही नाती असल्याचे मला माहिती आहे. त्यामुळे त्या व्हँकोव्हरला या भागात आल्या याचे मला मुळीच आश्चर्य वाटले नाही. पण सोळा वेळा या भागावरून हे दर्शविण्यासाठी गेल्या, की सहजयोग किती महत्त्वाचा आहे ते तुम्ही लक्षात घेण्याची वेळ आली आहे आणि जर आपण पूर्णपणे व प्रभावीपणे सहजयोगाचे प्रतिपादन केले नाही तर विष्णुमाया दुसरे रूप धारण करणार आहेत. ज्याच्यामुळे तुमची जंगले, सर्व काही जळणार आहे. हे लक्षात घ्या, की वीजेत सर्व पंचमहाभूते आहेत. त्यात आवाज, प्रकाश, आकाश, आकाशात तिचे कार्य चालते शिवाय तिच्यात पाणी आहे आणि जेव्हा पाणी फ्रिक्शनमधून जाते, जी भूमी माता आहे, म्हणून या सर्व गोष्टी तिच्यामधून कार्यान्वित होतात. म्हणून श्री विष्णुमायेनी काल दाखविले, 'मी इथे आहे, कृपया माझी पूजा करा.' आतापर्यंत आपण सरस्वतीची कधीही पूजा केलेली नाही आणि श्री ब्रह्मदेवांची कोठेही पूजा होत नाही. त्यांनी जगाची निर्मिती केली, ही सर्व जंगले, सर्व समुद्र, सर्व भूमी, सर्व तारे आणि अनेक विश्वे, सर्वांची निर्मिती केली. परंतु आपण या झाडाची, त्या झाडाची पूजा करतो, तशी पूजा करायची नाही. अशा प्रकारच्या कशाचीही पूजा करायची नाही. फक्त भूमी मातेने जे स्वयंभू सारखे निर्माण केले आहे त्यांचीच आपण पूजा करतो. ते सुद्धा अशा पद्धतीने की जी अॅबस्ट्रॅक्ट पद्धत आहे कारण ज्या ज्या ठिकाणी असे स्वयंभू उद्भवले त्या त्या ठिकाणी लोकांनी धर्माचा व्यापार चालविला आहे. म्हणून आपण सहजयोगी असल्याने अशा ठिकाणी जात नाही. तेव्हा तुम्हाला आता हे कळले असेल की मी इथे आल्यानंतर काल अनपेक्षितपणे हे अभूतपूर्व विजेचे आश्चर्यकारक लखलखणे कसे झाले. श्रीकृष्णांची बहीण फारच कार्यप्रवण व कडक व्यक्तिमत्त्व आहे. श्रीकृष्णांचे सत्त्व म्हणजे त्यांचे माधुर्य आणि श्री राधा आल्हाददायिनी शक्ती म्हणजे ज्या तुम्हाला पुलकित करणारा आनंद देतात. श्रीकृष्णांचे सौदर्य म्हणजे त्यांचे माधुर्य, त्यांची लीला, त्याचे संपरर्कातून ७ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-7.txt सहजयोग्यांनी श्री महासरस्वतीची करायची आहे पूजा श्री २२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला महासरस्वती २हर्जयोगाचे ज्ञान मिळते एकात्मतेची भावना निर्माण करणे, हे आहे, पण त्यांची बहीण ईश्वरी संकेत देते आणि अशाप्रकारे ती आली आहे आणि त्यांचे फार कडक व्यक्तिमत्त्व आहे जी प्रत्येकाला काहीतरी संकेत देते. एकप्रकारे माझे आगमन दाखवून दिले आहे, की मी इथे आहे. कदाचित इथल्या आदिवासी लोकांना हे कळले असेल, की भविष्यवाणी प्रत्यक्षात उतरली आहे आणि तुम्ही लोकांनी हे संकेत लक्षात घ्यायला हवेत. सहजयोगाला त्याच्यावर सोडून चालणार नाही, तो त्याच्या मार्गाने कार्यान्वित होईल आणि तुम्ही मात्र सवडीप्रमाणे यावे. तेव्हा श्रीकृष्ण भगिनी विष्णुमाया, याच श्री सरस्वती आहेत आणि त्यांचीच आपण पूजा करणार आहोत. फक्त सहजयोगीच, जे प्रकाशित झालेले आहेत, तेच श्री महासरस्वतीची पूजा करू शकतात. अन्यथा इतर लोक फक्त श्री सरस्वतीची पूजा करू शकतात. कारण श्री सरस्वतीच्या उपासनेने पुस्तके वाचू शकतात. नृत्य, संगीत, लोकांच्या करमणुकीची निर्मिती करू शकतात. वास्तविक श्री सरस्वतीची पूजा सर्वसामान्य जाणिवेच्या लोकांसाठी आहे. पण सहजयोग्यांनी श्री महासरस्वतीची पूजा करायची आहे. मी सांगितल्याप्रमाणे श्री महासरस्वती या श्री विष्णुमाया होतात. त्याच विष्णुमाया आहेत म्हणून तुम्ही अशी व्यक्ती व्हायला पाहिजे, की तुम्ही स्वत:हून श्री विष्णुमाया सांगतात त्याप्रमाणे तुमच्या प्रभावी व कडक भाषणातून सहजयोग काय आहे व तुमचे ध्येय काय आहे, ते लोकांना प्रोत्साहित करणाऱ्या पद्धतीने सांगायला पाहिजे. पण मी पाहिले आहे, की लोक बोलतात तेव्हा ते श्रीकृष्णांप्रमाणे मृद् आणि मधुर होण्याचा प्रयत्न करतात. आम्ही अमेरीकेत त्याचा उपयोग होईल, म्हणून प्रयत्न केला, पण तसे झाले नाही. त्यांना ग्रॅहम किंवा त्याच्यासारखे कडक बोलणारी माणसे आवडतात. कालच्या अनुभवावरून आपण हे शिकायला हवे, असे मला वाटते की प्रभावी भाषण करणाऱ्यांची व प्रभाव पाडू शकणाऱ्यांची तुम्हाला आवश्यकता आहे. कारण लोकांना (अमेरीकन) नॉर्मल संवेदना समजत नाहीत. त्यांच्या संवेदना मेलेल्या असाव्यात. मला वाटते ते बधीर झाले आहेत आणि त्यांना शॉक द्यायला हवा आणि त्यांना शॉक आवडतात. वृत्तपत्रांनी त्यांना शॉक ८ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-8.txt पूजा देण्याची गरज असते. धक्का देणारा कोणताही कार्यक्रम त्यांचे लक्ष वेधून घेतो. संगीतसुद्धा इतके असावे लागते की खडक फुटेल आणि असे असावे लागते की त्यांची डोकी फुटतील. तेव्हा ते खरे खरे खडकासारखे झाले असून तुम्ही लक्षात घ्या की त्यांचा कठीणपणा विष्णुमायेकडून तोडता येईल. म्हणून व्हँकुव्हरमध्ये आज आपण जी विष्णुमायेची पूजा करणार आहोत त्याला कॅनडासाठीच नाही तर अमेरीकेच्या दृष्टीनेसुद्धा फार महत्त्व आहे. अमेरीकन लोकांना, त्यांना झालेल्या आजारांचे, त्यांच्या अंमली पदार्थांच्या व्यसनाचे काही विशेष वाटत नाही. ते स्वत:चा जो सर्वनाश करून घेत आहेत तो त्यांना अजून समजत नाही. ते स्वत:चे काय करून घेत आहेत. स्वत:चा कसा नाश करत आहेत, मौल्यवान मानवी जीवन लहरीपणाने व तथाकथित स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यर्थ घालवीत आहेत, हे त्यांना कळत नाही. म्हणून तुम्ही प्रभावी पद्धतीने सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 'तुम्ही काय करीत आहात ? का स्वत:ची अशी फसवणूक करीत आहात? हे चुकीचे वागणे आहे, हे का तुम्ही समजत नाही ? स्वत:साठी नाही, तर निदान तुमच्या मुला बाळांसाठी? तुम्ही त्यांना सांगा. आम्ही चुकलो , तुम्ही चुकू नका. असे बोलणे आवश्यक आहे आणि लोकांनी (सहजयोग्यांनी) त्याची तयारी करावी. कोणी म्हणेल, की लोकांना हे आवडणार नाही, पण मला याच्या उलट वाटते. भीती दाखवल्याशिवाय ते तुमच्याजवळ येणार नाहीत. म्हणून त्यांना तुम्ही सांगा, सूचना द्या. विष्णुमायेने काल तेच केले आणि तुम्हाला सुचविले, की आता नवीन पद्धत आचरणात आणा आणि जे काही तुम्ही कराल , समजा तुम्ही कोर्स चालवीत असाल, तर त्याच्याशेवटी लोकांना सांगा, 'सहजयोग म्हणजे केवळ कोर्स करणे नाही तर तो तुमच्या सुदृढ प्रकृतीसाठी, तुमच्या कल्याणासाठी आहे. तो अध्यावर सोडून चालणार नाही, तर त्याच्यात प्रगती करायला हवी, मोठे व्हायला हवे, केवळ बीजाचे अंकुरणेच नाही, तर त्याचा वृक्ष व्हायला हवा. अन्यथा त्याचा कोणालाच उपयोग होणार नाही.' म्हणून सहजयोगात प्रगल्भ न होण्याचे धोके त्यांना सांगा. प्रेमाने सांगण्याचा अमेरीकेत उपयोग होत नाही, हे मी पाहिले आहे म्हणून अशा प्रकारे सांगणे आवश्यक आहे. खरोखरची धडाकेबाज माणसे हवीत. अलीकडेच मी बिली ग्राहमचे भाषण ऐकले आणि म्हणाले, 'हा रिकाम्या डोक्याचा माणूस काही तरी बरळतोय!' तरी पण लोकांवर त्याचा ९ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-9.txt अशा सर्व लोकांना फक्त श्री विष्णुमाया शक्तीच सुधारू शकते श्री स२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला विष्णुमाया सहर्जयोगाचे ज्ञान मिळते केवढा प्रभाव पडतोय! त्याचे शिवाय अजून एक होता, तो मला वाटते सध्या तुरुंगात असावा. नाव माहिती नाही, पण विचित्र माणूस होता. तोसुद्धा, मी पाहिले, रिकाम्या भांड्यासारखी निरर्थक बडबड करीत होता आणि त्याच्यामागे लोक वेड्यासारखे जात होते, हजारोंच्या संख्येने उभे होते, नाचत होते, गात होते वरगैरे. म्हणून या लोकांना धक्का देण्याची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. अजून एक संस्था अशा धक्का देण्याच्या पद्धतीचे अवलंबन करीत होती, ब्रह्मकुमारी. तुम्ही बघा या ब्रह्मकुमारी एखाद्या विजेप्रमाणे होत्या आणि त्या लोकांना सांगायच्या, 'तुमचा नाश झाला आहे. हे जग नष्ट होणार आहे. सर्व काही नष्ट होणार आहे आणि तुमची तयारी नाही, मग 'हे काय होणार?' आता नाही सांगत. जेहोवाह विटनेस पण असेच करतात. ते सांगतात, जग नष्ट होणार आहे, आपण सगळे नष्ट होणार आहोत, म्हणून आपण तयारी करायला हवी आणि ईश्वराकडे लक्ष द्यावे.' हे वास्तव नाही. तरीसुद्धा लोक त्याच्यामागे जातात. तुम्ही त्यांना सत्य सांगा की, 'तुम्ही स्वत:ला नष्ट करीत आहातच, पण तुमचे भविष्यही नष्ट करीत आहात.' अमेरीकेतले बहतेक लोक नष्ट होतील, असे लोक आधीच बोलत आहेत. अनेक कारणांनी हे होते. असे म्हणता येईल की त्यांना परंपरा नाहीत, पण तो मुख्य मुद्दा नाही. मुख्य पॉईंट्स पैकी एक आहे, तो म्हणजे हे लोक येथे येऊन स्थायिक झाले तेव्हा त्यांनी असंख्य लोकांना ठार मारले. आता त्या मारले गेलेल्या लोकांची भुते सगळीकडे तरंगत आहेत आणि जमेल तेवढे अमेरीकन लोकांना नष्ट करण्याची त्यांची इच्छा आहे. जेवढ्या प्रमाणात काळी विद्या, नकारात्मक गोष्टी अमेरीकेत प्रचलित आहेत, तेवढ्या अन्यत्र कोठेच नाहीत. 'गुरू' लोकांना सर्व देशातून बाहेर पडावे लागले. पण ते अमेरीकेत येऊन चांगले स्थायिक झाले आहेत. ही भुते या लोकांना विकृत आयडिया देतात आणि ते स्वत:ला नष्ट करण्याच्या मारगे लागतात. आता भूतिश (विकृत) आयडिया अशा, तर माणूस पबच्या बाहेर येऊन पडलेला दिसतोय आणि भूतिश (विकृत) आयडिया अशी 'काय नुकसान आहे ? तू ट्राय कर, तू १० 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-10.txt शक्ती कधीच पडणार नाहीस, आता तुला काहीही होणार नाही. तू एकदम मस्त आहेस.' तेव्हा तुम्ही सांगा, 'हे चुकीचे आहे. असे करू नकोस.' तो म्हणेल, 'वाईट आहोत आम्ही, म्हणून काय झाले ? ' या भूतिश (विकृत) आयडिया आहेत. मानवी आयडिया असे सांगणार नाहीत. तेव्हा अशा सर्व लोकांना फक्त विष्णुमाया शक्तीच सुधारू शकते, दुसरे कोणी नाही. मला आता समजले आहे, की विष्णुमाया शक्तीतूनच लोक सुधारतील, पण कॅथॉलिक आणि ख्रिश्चन यांच्यामुळे विष्णुमाया शक्ती निद्रिस्त आहे. हिंदू धर्मसुद्धा, कारण हिंदू धर्मातसुद्धा पापाची संकल्पना आहे. तुम्ही हे पाप केले आहे, ते केले आहे, एवढे पैसे ब्राह्मणाला द्या म्हणजे तुम्ही वाचाल. म्हणजे प्रत्येक धर्मात हा मूर्खपणा आहे, पण ही विष्णुमाया शक्ती जी सध्या माणसात अत्यंत दबलेली आहे व निद्रिस्त आहे, ती तुम्ही मोठी करा आणि लोकांना झोपेतून जागृत करा. आळस झटकून टाकायला लावून मोठ्या प्रमाणावर त्यांना त्यात सहभागी करा. त्यांना सांगा, की आम्ही विश्वशांती करीत आहोत. आम्हाला मानवाला मुक्त करायचे आहे. तुम्ही मोठ्या मंचावर जाऊन या गोष्टी सांगितल्या तर त्याचा उपयोग होईल. उदा.मी महात्मा गांधींच्या बरोबर होते आणि ते फार चांगले होते. लोकांना महात्मा गांधींबद्दल फार आदर आहे. महात्मा गांधींचे माझ्याबद्दल फार चांगले मत होते. मी लहान होते तरी ते माझा सल्ला घ्यायचे. याचा पुरावा म्हणजे त्यांच्या भजनांचा क्रम वेगळ्या प्रकारचा त्यांनी ठेवला होता. हृदयापासून आरंभ करून आत्म्याविषयी सांगितल्यावर ते मूलाधारापासून वर (वरच्या चक्रातून) जायचे. त्यांनी माझा सल्ला घेतला असल्याचा हा एक पुरावा आहे. ते काही असले तरी त्यांचा उपयोग करता येईल, की महात्मा गांधींनी जे सांगितले होते तेच आता श्रीमाताजी करीत आहेत. त्यांनी सर्वधर्म समभाव म्हणजे सर्व धर्मांना सारख्याच सन्मानाने आणि समजुतीने वागविणे. एकदा तुम्ही असे बोलू लागतात, की लोकांना हे कळेल, की तुमच्यामागे काही तरी उदात्त परंपरा आहे, कारण मी हे कोणत्या पुस्तकातून शिकले हे प्रत्येकाला हवे असते. मी कोणत्याही पुस्तकातून शिकले नाही हे तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही म्हणू शकता की, 'त्या ( श्रीमाताजी) गांधीजींबरोबर होत्या आणि त्यांचे श्रीमाताजींबद्दल फार चांगले मत होते. शांतता, अहिंसा आदी संकल्पना त्यांनीच ११ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-11.txt सांगितल्या होत्या. हीच तंत्रे आणि पद्धती श्रीमाताजींनी उपयोगात आणायची आहेत. आणि श्री २२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला हे नि:संशय खरे आहे. गांधीजी खरोखरच फार कठोर व प्रभावी वक्ते होते. त्यांचे स्व अनुयायीसुद्धा प्रभावी वक्ते होते. ते असे नाही म्हणायचे, 'या. बसा, चहा घ्या. ' आणि २हर्जयोगाचे ज्ञान अशा प्रकारच्या बोलण्याने काही होणार नाही. मिळते अमेरीकन लोकांना आव्हान पाहिजे आणि त्यांना ठिकाणावर आणायला तडाखेबाज माणूस हवा. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने जायला हवे, जसं मधे आम्ही न्युयॉर्कमध्ये कार्यक्रम घेतला होता. त्याला अनेक कृष्णवर्णीय, चिनी आणि भारतीय लोक होते. पण गोरे लोक फारच थोडे होते. गोरे लोक आले आणि म्हणाले, 'तुम्हाला माहिती आहे, मला काहीच झालं नाही.' तेव्हा तुम्ही काय म्हणायचे, 'काहीच झालं नाही? याचा अर्थ तुमच्यात काही तरी गडबड आहे अथवा तुम्ही काही तरी पाप केलं असेल.' मग त्यांना शॉक बसेल. 'आश्चर्य आहे! तुम्हाला काही मिळालं नाही. तुमच्यात काही तरी बिघाड आहे. तुम्हाला मिळायला हवं होतं. मिळवायचा प्रयत्न करा. तुम्हाला माहिती आहे हे फारच चुकीचे आहे.' मग विचारा, 'मला आशा आहे की तुम्हाला कॅन्सर झालेला नाही.' किंवा तुम्ही असं विचारा, 'तुम्हाला एड्स तर झाला नाही?' ते म्हणतील 'नाही, नाही. 'मग तुम्हाला कसला आजार आहे? तुम्हाला कसं नाही मिळालं? बघा, या कृष्णवर्णीयाला मिळालं, चिनी माणसाला मिळालं, तुम्हालाच का नाही मिळालं? तुम्ही गोरे आहात, तर तुम्हाला सर्वात आधी मिळायला हवं. मग कार्य घटित होईल. मी याचा विचार करीत होते, हे अमेरिकन लोक इतके मंद का असतात, कारण एकंदरीतच हे अमेरीकन लोक फारच मंद असतात, अतिशय मंद असतात. हे रॉक म्युझीक, कोणासमोरही लावा, ते पळून जातील, की 'हे काय चाललंय?' पण कालचं रॅप म्युझीक त्यांना इतकं आवडलं होतं आणि ते मला ऐकवत होते. हृदयाचे ठोके उलटे पडायला लागले. मी म्हणाले, 'हे काय होतंय.' सगळंच हादरायला लागले. मी एका बाकावर बसले होते, तो हलायला लागला. माझ्याजवळ कोण होता तो? करणही होता, आम्ही पाहिलं, करण आणि इतर उड्या मारीत होते, भूकंप होत असल्यासारखे वाटत होते. तर ते असं आहे. हे लोक फार फार मंद आहेत, बधिर आहेत. त्यांच्या कथित स्वातंत्र्यामुळे बधिर झाले आहेत, जसं 'आ बैल मुझे मार!' स्वत:ला पण बधिर करून घेण्यासाठी त्यांनी चाकोरी बाहेर जाऊन प्रयत्न केले. दारू असेल, बाई असेल, अनेक लग्ने केली असतील, एक लग्न पुरेसे आहे. पाच पाच लग्ने करून तुम्ही कोणासारखे व्हाल. मला १२ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-12.txt के माहिती नाही, असं काही जनावर आहे का. पण तुम्ही बधिर होता. प्रथम तुम्ही एक पत्नी करता, मग तिच्यावर प्रेम करता, तुम्हाला मुलं होतात, इतकं सगळं तुमच्या पत्नीबरोबर होतं आणि एकदम तुम्ही घटस्फोट घेता आणि तुम्हाला काहीच वाटत नाही! त्यांना तुम्ही सांगा, की हा बधिरपणा आहे, तर ते म्हणतील, 'मला माहिती आहे.' सगळं समजतंय, पण काही वाटत नाही. ते चुकीच वागत आहेत, असं त्यांना वाटत नाही. आपण काही तरी अॅबसर्ड केलं आहे असं त्यांना वाटत नाही आणि त्यांना ्रास होत नाही. दुसरं कोणीही असतं तर त्याला त्रास झाला असता. पत्नीला घटस्फोट दिल्यावर साधारणपणे माणूस सैरभैर व्हायला हवा. पण इथं तुम्हाला दिसतं तो माणूस घमेंडीत सांगत असतो, 'माहिती आहे, मी दोन बायकांना घटस्फोट दिलाय आणि आता तिसरा होणार आहे. तुम्ही तिला भेटू शकता.' त्याची लाज वाटत नाही की काही वाटत नाही. तुम्ही त्या स्त्रीशी लग्न केलंत, तिच्याबरोबर राहिले होता, ती तुमची बायको होती आणि तुम्हाला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. तुमची स्वत:ची मुले आहेत. त्यांच्याबद्दलही काहीच वाटत नाही! अर्थात् हे इंग्लिश लोकांसारखे नाहीत, इंग्लिश लोक मुलांची हत्या करतात, हे त्यांच्या इतके वाईट नाहीत, पण इथे मी ऐकलंय की नवरा बायकांची हत्या करतो, बायको नवऱ्याची वगैरे आणि ते कशाला? प्रेमासाठी! त्यांना एका नवर्याबद्दल प्रेम वाटत नाही, तर दूसर्या नवऱ्याबद्दल कसं वाटणार, मला समजत नाही! प्रेम १३ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-13.txt श्री विष्णुमाया अशाच भावनाहीन लोकांना सांभाळते श्री २२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला विष्णुमाया २हर्जयोगाचे ज्ञान DU मिळते हृदयाचा गुण आहे. तर ते असं आहे. तुम्ही पहाल, तर एकंदरीत सर्व व्यक्तित्व बधिर असल्यासारखं दिसतं. कारण ते माणसासारखे वागत नाहीत, कोणासारखे वागतात ते सांगता येत नाही. कारण त्यांची होऊ शकत नाही. अमेरीकेतच असे लोक आहेत असे नाही. तर सगळीकडे आहेत. पण अमेरीकेत फारच आहे आणि या सर्व गोष्टी अमेरिकेतूनच तुलना उद्भवतात. अशा विचित्र कल्पना अमेरिकेतच उद्भवतात. कारण अमेरीकन लोकांना जाहिरात करणे, प्रसिद्धी देणे चांगले माहिती आहे. एकदा मी जहाजाने चालले होते. पायलट जहाजावर आला. तो माझ्याशी बोलत होता आणि म्हणाला, 'माझा भाऊ फार वाईट राक्षस आहे.' मी म्हणाले, 'काय झाले ?' तेव्हा त्याने सांगितले, की त्याच्या भावाने चार बीटल्स (Beatles) मुलांना पकडले आणि तो त्यांचा मॅनेजर झाला आहे. त्याने या संगीताची सुरुवात केली. मुली जमवल्या. त्यांना दारू प्यायला दिली, ड्रग्ज दिले. मग संगीत सुरू झाल्यावर त्या किंचाळायला, ओरडायला लागल्या, वेडेपणा करू लागल्या. मग ते प्रसिद्ध झाले. याच्यावर साधारणपणे अशी प्रतिक्रिया हवी, 'बापरे! संगीत सुरू झाले, की मुली वेड्या होतात. तेव्हा अशा संगीताच्या कार्यक्रमाला जायला नको.' याच्या उलट अनेक लोक तिकडे जायला लागले. तेव्हा या प्रतिक्रियेचे काय स्पष्टीकरण देणार ? जेवढे जास्त ते ओरडतील, किंचाळतील, त्यात त्यांच्या मते काहीतरी आहे. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी सुप्त आहे, जे त्यांना स्पर्श करून गेले. अन्यथा त्या का किंचाळतील? म्हणजे जे अशा मठू लोकांनाही स्पर्श करते त्याच्यात काहीतरी महान असले पाहिजे. 'म्हणून आपण सगळे जाऊया. आपणही मठ्ठ आहोत, म्हणून आपणही त्या कार्यक्रमाला जाऊयात.' आता तुम्ही मला विचाराल, 'श्रीमाताजी, हा मट्टुपणा या लोकांमध्ये कसा आला ? मी तुम्हाला सांगितलं, तसं साधं आहे. ते असं की त्या लोकांनी स्वातंत्र्याचा इतका जास्त उपभोग घेतला , त्यांचे चित्त व्यर्थ गोष्टींच्या मागे लावलं की ते खरोखर बधिर त्याचं कारण, १४ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-14.txt आव झाले. तुम्ही जिकडे चित्त घालाल तिथून ते रिअॅक्ट होऊन काही तरी होऊन परत येते (तिकडच्या माहितीच्या स्वरूपात ते परत येते). पण तुम्ही सततच बाहेरच चित्ताचा भडिमार करीत राहिलात तर बाहेरूनसुद्धा तोच भडिमार तुमच्यावर होऊन तुमची सेन्सिटिव्हिटी संपवितो. तुम्हाला काहीच कशाचे वाटत नाही, कोणत्याही घटनेचे रेकॉर्डिंग होत नाही म्हणून, त्याच्यासाठी मला वाटते विष्णुमायेची आवश्यकता आहे. यासाठी विष्णुमायेची डाव्या बाजूकडे स्थापना केलेली आहे. श्री विष्णुमाया अशाच भावनाहीन लोकांना सांभाळते. त्यांना भावना देण्यासाठी विष्णुमाया आहे. जेव्हा विष्णुमाया चमकते, त्यावेळी डाव्या बाजूकडे ती तुम्हाला भावना देते आणि लोक समजूतदार होतात. सध्या फक्त त्यांना बैद्धिक स्तरावर कल्पना आहे, की ते अपराधी आहेत. ते केवळ बौद्धिक स्तरावर आहे. बौद्धिक स्तरावर 'मी अपराधी आहे' ही कल्पना असेल तर तुम्हाला काहीच जाणवणार नाही. समजा, तुम्हाला कोणी 'वेडे आहात' असे म्हटले, पण तुम्ही वेडे नसाल तर तुम्हाला कोणी वेडे म्हटल्याचे काही वाटणार नाही. हे तसे आहे. त्यांना अजिबात काही वाटत नाही. कारण त्यांनी बौद्धिक स्तरावर मान्य केल्याने ते बधिर झाले आहेत. आता प्रवृत्ती अशी आहे, तुमचे काही नुकसान नाही तर काय चुकले?' आता मी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कार्यरत व्हायला सांगते. प्रभावी व्हा , काय चालले आहे, वस्तुस्थिती काय आहे, कशी आहे, ते वृत्तपत्रांत लिहा. मी असेच एक पुस्तक आता लिहीत आहे, त्याला 'मेटा मॉडर्निझम (परा आधुनिकता)' म्हणतात. मला जेवढे होता येईल तेवढे प्रभावी होऊन त्यांच्या वागण्यात काय चुकीचे आहे, ते सांगणार आहे, की त्यांच्या लक्षात यावे की हे सगळे चुकीचे आहे, त्याची भलावणी करण्याच्या प्रयत्नाने काही साधणार नाही. आता एड्स आला आहे. मला वाटलं एड्समुळे त्यांचे डोळे उघडतील. पण आता एड्स होणे हौतात्म्य झाले आहे. आता 'युप्पीज' आला आहे. मी म्हणाले, 'युप्पीजना रोग होणार आहे.' आता ते म्हणतात, 'नाही, नाही! युप्पीज होणे फार चांगले आहे. आपल्या युप्पीझमसाठी मेलेले ते हिरो आहेत.' अशाप्रकारे, प्रत्येक वेडेपणाला एक प्रकारच्या महानतेची गोष्ट बनवली जाते आणि लोक त्याला १५ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-15.txt पैसा ही श्री सरस्वतीची वेगळी बाजू आहे श्री २२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला पेसा २हर्जयोगाचे ज्ञान मिळते मान्यता देतात. हे विशेष आहे, की लोक त्याला मान्यता देतात म्हणून तुम्ही आक्रमक होऊन त्याच्या प्रकाशात ते लोक काय आहेत, हे त्यांना दाखवणे महत्त्वाचे आहे. त्यांना दाखवून द्यायलाच पाहिजे. आत्म्याच्या लहान प्रकाशात त्यांना जास्त काही दिसणार नाही. तर खराखुरा, डोळे दिपविणारा विजेचा ज्वलंत प्रकाश पाहिजे. तेव्हा आजची पूजा विशेष करून तुमच्यासाठी आहे, की ज्याच्यामुळे तुमच्यात आक्रमकतेने बोलण्याची व प्रत्येक बाबतीत वागण्याची सृजनशीलता विकसित होईल. केवळ त्याच्यामुळेच ते लोक ठिकाणावर येतील. दुसर्या कशामुळेही नाही. सृजनात्मक कामातसुद्धा जेव्हा आपण काही निर्माण करीत असतो किंवा एखादे गाणे म्हणत असतो, हे गाणे जर भारतीय प्रकारचे असेल, आणि ते मंद (स्लो) तालात असेल तर ते चालणार नाही. त्यांना रविशंकर यांच्यासारखे कोणीतरी भारतीय संगीताच्या दृष्टीने अशास्त्रीय पद्धतीने स्वरांची सरमिसळ करणारा हवा असतो. त्याच्यात रंजकता नसली तरी चालेल. त्याने तुमचे हृदय उघडणे किंवा तसे काही होणार नाही. पण तशा संगीताचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. तेव्हा रॉक अँड रोलमध्ये सतारीचा उपयोग किंवा त्याच्यापेक्षाही वाईट मला अलीकडचे माहिती नाही, संगीत तयार करा. दसरे असे, की ते लोकांना कसा धक्का देण्याचा प्रयत्न करतात ते पहा. धक्का देण्याचा प्रयत्न करण्याचे अजून एक कारण म्हणजे लोक त्यांच्यासारखेच आहेत, हे ते जाणतात. जसे तुम्ही मार्केटमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला दिसते, की कोणी तरी चुकीच्या ठिकाणी फाटलेली पँट, ती सुद्धा अर्धी, घालून आले आहे. ते फक्त धक्का देण्यासाठी! अमेरीकेत डिसेंट दिसणारे कपडे घालण्याची पद्धत आहे. अशी मान्यता आहे, की इनडिसेंट कपडे परिधान करायचे नाहीत, पण असे दिसते, की दुसऱ्यांना धक्का देणारे कपडे घालण्यासाठी संधी मिळाल्यास तसे कपडे घालणे त्यांना आवडते. तसे केसांचा थोडा भाग पांढऱ्या रंगाचा करणे. म्हणजे दुसऱ्यांना धक्का देण्यास, त्यांचे लक्ष वेधून घेण्यास ते काहीही करतील. त्यातून काय मिळते ? काही नाही. दुसर्याचे लक्ष वेधून घेण्यास इतका १६ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-16.txt सरस्वती खर्च करायचा, पण त्याचा फायदा काय? दुसर्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेल्यावरसुद्धा काहीच मिळत नाही, तुम्हाला पैसे मिळत नाही, की तुमच्या खर्चाची भरपाई होत नाही. तेव्हा हे सगळे आनंदहीन प्रयत्न आहेत आणि त्यांच्यामुळे त्या लोकांचे चित्त इतके खराब होते, की ते भावनाहीन होतात. कोणत्याच भावना त्यांना नसतात आणि त्याच्याहून वाईट हे झाले आहे, की ते लोक अत्यंत पैशाच्या मागे धावणारे झाले आहेत. पैसा हा श्री सरस्वतीची वेगळी बाजू आहे. श्री सरस्वती, श्री लक्ष्मी यांचेपासून वेगळ्या असतात. त्या दोघी केव्हाच बरोबर नसतात. या कारणामुळे श्री लक्ष्मीच्यामागे अती धावण्याने त्यांना धक्के मिळतात. कारण एकदम शेअर मार्केट कोसळते, मंदीची लाट येते, व्यवसाय बंद होतात, फार श्रीमंत माणूस गरीब होतो. हे श्री सरस्वतीचे काम असते आणि कोणी जर फारच सरस्वतीच्या मागे असेल, फारच पुस्तके वाचत असेल, महत्त्वाकांक्षी कलाकार, दुसर्या कलाकारांच्या पेक्षा अधिक प्रसिद्धी मिळवायच्या प्रयत्नात असेल, तर श्री लक्ष्मी यांच्याकडून असे फलित मिळते, की त्याच्या कलाकृतींची विक्री होत नाही, पैसे मिळत नाहीत. वगैे. या दोन्ही बाजू हंसा चक्रात संतुलनात येतात किंवा असे म्हणू की तुम्ही सहजयोगी होता तेव्हा त्या संतुलनात येतात. तेव्हा त्या दोन्हींची प्राप्ती करून घेऊन त्यांना संतुलनात ठेवायचे. त्यामुळे तुम्हाला दोघींचेही श्री लक्ष्मी आणि श्री सरस्वतीचे आशीर्वाद मिळतील. पण त्या दोन्ही बाजू, हंसा आणि विशुद्धी या स्थानांत क्रॉस करतात. तेव्हा त्यांना संतुलनात आणावयासाठी काय करायचे तर आपण जे काही मिळवितो, जे काही करतो ते साधारण प्रतीचे असू नये. आपण ते आवेशयुक्त (Fiery) व गतिमान पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा. दोन्ही विशुद्धीमध्ये एकत्र आणायचे. समजा, तुम्ही सहजयोगावर आक्रमकतेने भाषण देणार आहात. तेव्हा तुम्ही हिप्पीसारखे, जेलमधून आल्यासारखे कपडे घालाल, तर तुमचे भाषण कोणीही लक्षपूर्वक ऐकणार नाही. पण तुमचे व्यवस्थित कपडे असतील, तुम्ही आदरणीय वाटाल, चांगले प्रेझेंटेशन असेल आणि तुम्ही आवेशपूर्ण भाषण करीत असाल, तर प्रत्येकजण तुमचे भाषण लक्ष देऊन ऐकेल. तेव्हा हे लक्ष्मी तत्त्वाचे तत्त्व सरस्वती तत्त्वाच्या प्रभावाखाली उपयोगात आणायचे. श्री सरस्वतीच्या आणखी एका आशीर्वादाने तुम्हाला सहजयोगाचे ज्ञान मिळते. मी पाहिले आहे, १७ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-17.txt श्री सरस्वती शिक्षणाची देवता आहे णि श्री ज्ञानाची महरासरस्वती श्री स२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला शिक्षण सहर्जयोगाचे ज्ञान मिळते स्त्रिया, विशेषतः सहजयोगातल्या, सहजयोगिनी आहेत. त्यांना व्हायब्रेशन्स आहेत, पण त्यांना सहजयोग काय आहे, याचे ज्ञान नाही. चक्रे काय आहेत ? व्हायब्रेशन्स कशी बाहेर जातात? ते माहिती नसते. आता आजचे भाषण अगदी अवघड आहे. तुम्ही कागद -पेन्सिल घेऊन चार-पाच वेळा ऐकले म्हणजे ते तुम्हाला समजेल. ते समजणे सोपे नाही. मी सांगते, आता ठीक आहे, रंजक आहे, पण त्या रंजगतेच्या मागे गहन ज्ञान आहे. महिलांना कागद पेन्सिल घेऊन बसलेल्या मी कधी पाहिल्या नाहीत, की श्रीमाताजी काय सांगत आहेत, विविध गोष्टींचे काय ज्ञान देत आहेत, ते आपण शिकावे. त्यांच्यासाठी सहजयोग म्हणजे चांगले असणे, चांगले जेवण बनविणे, सहजयोग्यांना मदत करणे, पूजांना येणे, एवढाच आहे. तेव्हा त्यांनीसुद्धा सहजयोग काय आहे, ते शिकणे महत्त्वाचे आहे. त्यांनी माझी भाषणे ऐकून, त्यांचा अभ्यास करून समजून घ्यायला हवीत. त्याच्या उलट पुरुष आहेत. त्यांच्याकरता बाहेरची कामे करणे, फिरणे, इत्यादी आहे, पण ते नाते-संबंधांकडे, भावनिक बाजूकडे दुर्लक्ष करतात. म्हणून पुरुषांनी सहजयोग करणे आणि महिलांनी करणे याच्यात फरक आहे. फ्रान्समध्ये विशेषत: त्यांच्यात फारच अंतर पडले. स्त्रिया एका बाजूला व पुरुष दुसर्या बाजूला झाले. कल्पना करा, सहजयोगात असला मूर्खपणा असू शकतो! आम्ही हे सर्व करणारी व्यक्ती शोधून काढली व सर्व व्यवस्थित केले. आता पुष्कळ चांगले आहे. पण स्त्रियांना सहजयोगाचे ज्ञान असलेच पाहिजे. पण याचा अर्थ त्यांनी पुरुषांशी भांडणे करावीत, 'त्यांना येते ते आम्हाला ही येते. असा नाही. मी पाहिले आहे. मी असे पाहिले आहे, की सहजयोगाविषयी स्त्रिया आणि पुरुषांच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एक बहिर्मुखी तर दुसरा अंतर्मुखी आहे. पण सहजयोगाच्या संदर्भात स्त्रिया आणि पुरुष यांच्यात काहीही फरक नाही. मी स्वत: स्त्री आहे व मला सहजयोगाचे एवढं ज्ञान आहे, तर मग महिलांना सहजयोगाचे ज्ञान का नसावे ? तेव्हा येथे असलेल्या सर्व स्त्रियांना व सगळीकडच्या स्त्रियांना सहजयोग काय आहे त्याचे ज्ञान हवे. विष्णुमायेला पहा. ती स्त्री आहे, कार्य करू शकते अशी शक्ती आहे. श्री ब्रह्मदेव १८ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-18.txt ज्ञान कार्य करीत नाहीत. त्यांनी हे सगळे निर्माण केले. कारण त्यांना श्री सरस्वतीची शक्ती आहे. अन्यथा ते निर्मिती करू शकले नसते. तेव्हा शक्तीच्या द्वारेच सर्व कार्य केले जाते आणि शक्ती स्त्र स्वरूपात आहे. पण शक्तीलाच सहजयोग काय आहे याचे ज्ञान नसले तर ती कसे घडवून आणू शकेल? महिलांना मुले आहेत, त्यांना घरातली कामे आहेत, स्वयंपाकघर आहे हे मला माहिती आहे, पण सहजयोगाबद्दल वाचणे, तो समजावून घेणे व ज्ञान मिळविणे किती आनंददायी आहे ! काही जणी वाचतात, त्या वाचत नाहीत असे मला म्हणायचे नाही, पण त्या संख्येने फार थोड्या आहेत आणि त्या फार सुज्ञ आहेत, फारच सुज्ञ आहेत. तेव्हा आजच्या घटनेतून मला समजले आहे, की या निसर्गरम्य परिसरात ब्रह्मदेव - सरस्वती यांच्या कार्याचे आपल्याला आशीर्वाद आहेत, त्यांची क्षमता आपल्याला जाणवते, किती महान निर्मिती ते करू शकतात, निसर्ग परमेश्वराशी एकात्म आहे. आता पहा. मी आल्याबरोबर निसर्गाला ते समजले की मी इथे आहे. त्यांनी स्वत:हनच कार्य करायला आरंभ केला. मला त्यांना भाषण द्यावे लागले नाही, त्यांना पूजा करावी लागली नाही, तसा काही प्रकार नाही. मी काय करीत होते, ते त्यांना समजले. मी लॉस एंजलीसला गेले. तिकडेही असेच. मी कोठेही गेले, तरी काय करायचे हे निसर्गाला समजते. आता माणसांकडून श्रीमाताजी शहरात आहेत. आपल्याला काय करायला हवे? आणि ते करतात. मला सर्व काही उपचार पार पाडून घ्यावे लागतात, ही अडचण आहे, 'हे करा, आता ते करा' वरगैरे. पण मी म्हणेन की सगळे आपोआप व्हायला हवे, कारण आपण एक आहोत. जसा निसर्ग माझ्याशी एक आहे, तसे तुम्ही पण माझ्याशी एक आहात. पण हे घटित होण्याची तेव्हाच सुरुवात होईल, जेव्हा तुम्ही खरोखर पूर्णतया सहजयोगात ओढले जाल आणि सहजयोगाला शरण जाल. ईश्वराचे तुम्हाला आशीर्वाद ! आता श्री सरस्वती शिक्षणाची देवता आहे आणि श्री महासरस्वती ज्ञानाची. जे शुद्ध ज्ञान आहे त्याची देवता आहे. शिक्षणाची देवता श्री सरस्वतीला चार हात आहेत. त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केलेली आहेत. जे पावित्र्याचे व शुद्धतेचे द्योतक आहे. त्या कुमारी आहेत. त्यांच्या हातात वीणा आहे. देवांनी वीणा हे वाद्य सर्वात प्रथम तयार केले, की त्याच्यावर त्यांना शास्त्रीय संगीत वाजवता यावे. अथवा असे संगीत वाजवता यावे ज्याचा देवांना आनंद घेता येईल. दूसर्या हातात जपाची माळ आहे. याचा अर्थ जी १९ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-19.txt व्यक्ती विद्वान आहे ती अतिशय निरासक्त असावी. संत माणसाला फार आसक्ती नसाव्यात. श्री २२स्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला तो राइट साइडेड नसावा. म्हणजे असे नेहमी होते, की अती शिकलेला विद्वान माणूस कुटुंबाकडे फार लक्ष देत नाही, कलासक्त असतो, शिस्तप्रिय व स्वयं शिस्त असतो, प्रत्येक गोष्ट २हर्जयोगाचे ज्ञान काळजीपूर्वक करतो, कार्यक्षम असतो म्हणजे हे सगळे हातात हात घालनू आपोआप होतेच. मिळते श्री सरस्वतीच्या डाव्या हातात पुस्तक असते. याचा अर्थ श्री सरस्वती, त्यांची शक्ती तुम्हाला पुष्कळ सृजनशीलता देते. ज्याच्यामुळे तुम्ही पुस्तके निर्माण करू शकता (लिहू शकता). याचा अर्थ असा, की तुम्ही जे काही करीत आहात, समजा, तुम्ही सहजयोग करताय आणि सहजयोग ईश्वराशी संबंधित आहे. म्हणून तुम्हाला समजले पाहिजे की पुस्तकामध्ये (स्क्रिप्चर्स) काय आहे. आपल्याला हे समजले पाहिजे की ते ग्रंथाशी कशाप्रकारे जोडले गेले आहे. हे ज्ञान मशरूम ज्ञानाप्रमाणे (एकदम वेगळे ज्ञान) तयार झालेले नसावे, तर ग्रंथांशी संबंधात असावे. याचा अर्थ ते ग्रंथ वाचून त्यातलेच लिहावे असे नाही, तर तुम्हाला काय लाभ झाला, तुम्हाला काय मिळाले, कशाचा शोध लागला, हे ग्रंथांशी (स्क्रिप्चर्स) जुळले पाहिजे. संबंधित हवे. श्री सरस्वती तुम्हाला शक्ती देते जिच्याशी ती संबंधित आहे. उदा. तुम्ही अनेक पुस्तके वाचता त्याच्यातील उद्धरणांचा (कोटेशन्स) उपयोग. मी सुद्धा उद्धरणांचा उपयोग करते. आता जे ज्ञान मी तुम्हाला देत आहे, त्या ग्रंथाचाच भाग आहे. म्हणजे सगळे ज्ञान नाही तर काही भाग, श्रीसरस्वतीबद्दल वगैरे पूर्वीच लिहिलेला आहे. तेव्हा ग्रंथांचा आदर करायला विशेषत: शास्त्रांचा (वेद, उपनिषदे, पुराणे) आदर करायला शिकले पाहिजे. श्री सरस्वती तुम्हाला या ग्रंथाच्या सखोल अभ्याचासी शक्ती देतात. म्हणजे त्यात काय सत्य आहे व काय नाही, त्यात जे लिहिले आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्यात दर्शविलेला सूक्ष्म अर्थ जाणण्याची शक्ती ही श्री सरस्वतीची शक्ती आहे. श्री सरस्वतीची अजून एक शक्ती आहे. ती वाक्शक्ती. या शक्तीमुळे तुम्ही भाषण करता. ती तुम्हाला बोलण्याची शक्ती देते. तुम्ही लिखाणातून, भाषणातून, नाटक, सिनेमा इत्यादींच्या माध्यमातून जे काही प्रसारित करता, ते सर्व श्री सरस्वतीच्या शक्तीतून होते. त्याच्यातील बौद्धिक क्षमता त्या शक्तीकडून मिळते. श्रीकृष्णांनासुद्धा सरस्वतीची शक्ती वापरावी लागते. प्रत्येकाला त्यांचीच शक्ती वापरावी लागते. कारण श्रीकृष्णांची चातुर्य शक्ती सरस्वतीच्या शक्तीमधून येते. तुम्हाला भेटणार्या प्रत्येक ब्रिलियंट व्यक्तीला श्री सरस्वतीची शक्ती मिळाली असते. श्री सरस्वतीची पूजा करणारी व्यक्ती निरासक्त असायला हवी. विविध प्रकारच्या कलाकृती निर्माण २० 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-20.txt ए) करणार्या विद्वान कलाकारांना त्यांच्या हयातीत विशेष लाभ मिळत नाही. श्री लक्ष्मीच्या संबंधी अनासक्त असतील, इतर बाबतीत अनासक्त असतील, तर ते आपल्या आनंदासाठी निर्मिती करतात. किसी पैसे मिळतील याची पर्वा करीत नाहीत. तेव्हा सरस्वतीच्या शक्ती तुम्हाला विद्वत्ता व ज्ञान देतात, व मोठे आकलन असणारी बुद्धिमत्ता देतात व असे व्यक्तिमत्त्व देतात, की जे तुमच्या ब्रिलियन्समुळे इतरांपेक्षा अधिक चमकदार (प्रभावी) असते. ती शक्ती तुम्हाला पैसे देणार नाही, धन-दौलत (पझेशन्स) देणार नाही, पण ते पझेशन जे कोणी चोरू शकणार नाही, कोणी हरण करू शकणार नाही. श्री सरस्वतीचे नम्र व्यक्तिमत्त्व आहे, तेव्हा ज्ञानी माणूस नम्र असावा. तो नम्र नसेल तर, सरस्वती तत्त्वाप्रमाणे तो ज्ञानी नाही. अतिशय ज्ञानी माणूस आपल्या विद्वत्तेच्या फलितांनी (त्याला मिळालेला सन्मान) वाकायला हवा (नम्र व्हायला पाहिजे). ज्ञानी व्यक्ती जी स्वत:ला महान समजते, ती अर्धवट ज्ञानी असते, परिपूर्ण ज्ञानी नसते, म्हणून ती अहंकारी असल्याने ज्ञानी असू शकत नाही. खरा ज्ञानी नेहमीच अतिशय नम्र असतो. त्याच्या नम्रतेवरून त्याची विद्वत्ता दिसून येते, कारण सरस्वतीची शक्ती नम्रता देते, व्यावसायिकाची नम्रता नाही, तर खरी नम्रता. अनेक गुण आहेत. मला वाटते एक दिवस त्याच्यावर पुस्तक लिहिता येईल. २१ ( १ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-21.txt २त्य परिपूर्ण असते. सहस्रारे महामाया असे वर्णन केले आहे, तर तुम्ही जर महामाया असलेल्या व्यक्तीला पहाल तर त्यांना तुम्ही पूर्णतया व परिपूर्ण पणे समजू शकणारच नाही. कारण महामाया शक्ती तुमच्या कल्पनेपेक्षाही फार मोठी आहे, म्हणून शरण जाणे आवश्यक आहे. तुमच्या सीमित कल्पनाशक्तीने किंवा बुद्धीने तुम्हाला त्या दैवताला जाणून घेणे शक्य नाही. शिवाय तिला भक्तीगम्या असे ही म्हटले आहे. म्हणजे त्यांना तुम्ही तुमच्या भक्तीमधूनच समजू शकता. तेव्हा भक्ती असणे आवश्यक आहे, भक्ती अत्यंत स्वच्छ असली पाहिजे. म्हणजे हृदयात कोणतीही द्वेष भावना असू नये. परन्तु हृदय स्वच्छ हवे. हृदय स्वच्छ ठेवणे अवघड आहे. मानवाचे सत्याचे ज्ञान नेहमी सापेक्ष असते. परंतु सत्य परिपूर्ण असते. म्हणून सत्याला प्राप्त करून घेण्यासाठी माणसाला त्याचे हृदयात असलेल्या सर्व असत्य गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. म्हणून प्रथम आपले हृदय जरी स्वच्छ नसले तरी साक्षात्कार प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला पुष्कळ आसक्ती असते. बऱ्याच असत्य गोष्टींबद्दल आपल्याला आत्मीयता असते. शिवाय आपली अशी पण समजूत असते, की जागृती किंवा आत्मसाक्षात्कार झाल्यावर आपण फार शक्तिमान होऊ. गोष्टीमध्ये गुंतून पडू लागलो. आपल्या नातेवाईकांना, आयांना- जागृतीनंतरसुद्धा आपण कद्रु बहिणींना कृपा करावी असे म्हणू लागलो. स्त्रियांना त्यांच्या नवऱ्याची, मुलांची, भावाची आठवण झाली, ज्यांच्या ज्यांच्यात म्हणून त्या गुंतून पडल्या होत्या, त्यांच्यासाठी त्या आशीर्वाद मागू लागल्या. मला माहिती आहे, की लवकरच या मायापाशातून तुम्ही स्वत:ची सुटका करून घ्याल. अवताराचे कार्य असे आहे, की त्यांना त्यांच्या शिष्यांची भक्तांची इच्छा पूर्ण करायची असते. पण जेव्हा तुम्ही मला तुमच्या भावाबद्दल, बहिणीबद्दल, आईबद्दल, वडिलांबद्दल सांगता तेव्हा तेसुद्धा मी जितके जमेल तितके पूर्ण करते. शिवाय तुम्ही आश्रय मागता, क्षेमाची इच्छा करता. जे काही तुम्हाला आवश्यक आहे ते मागता व ते पूर्ण केले जाते. तर श्रीकृष्णाचे पातळी वर 'योगक्षेमं वहाम्यहम्' चे वचन होते व म्हणून तुमच्या क्षेमाची काळजी वाहन ते वचन पूर्ण केले गेले. पण आता या नवीन युगात काय घडणार आहे. (५/५/१९८४, फ्रांस) २२ 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-22.txt छ हि ्र ा पा. है अरर दना0 र०7 दि ० ल सहस्राराची एक मंत्र आहे, तो आहे 'निर्मला'. ज्याचा अर्थ आहे की प्रत्येकाने स्वच्छ, साफ-सुथरे, पविन्न आणि निव्कलंक रहायला हवे. (निर्मला योग, मे-जून १९८५) प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in * स र 2014_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-23.txt ज म २५ ला कोणत्याही रोपट्यावर पाणी पडले तर ते जसे आपले आपण वाढते, त्याचे प्रकारे असे शुद्ध चित्त ज्या मनुव्याचे होते त्याच्या हृदयाची कळी उमलते आणि तो कमळ स्वरूप होऊन त्याची सहसारावर छाप पडते. नंतरत्याची सुगंध चारही दिशेलापसरती. प.पू.श्री माताजी, शिवपूजा, दिल्ली, ९.२.१९९१