चैतन्य लहरी मराठी जुलै-ऑगस्ट २०१४ म स ा ६. को या अंकाल श्री हनुमानासारखे दैवत - चिरंतन बालक ... ४ सहस्राराचा प्रकाश हे ब्रह्मरंध्र आहे ... १७ नम्रता सर्वप्रथम आहे. विनम्र व्हायचे आहे. अल्यंत्र विनम. तुम्हाला प.पू.श्रीमाताजी, इटली, e० जुलै १९९७ े फ्रैंकफर्ट, ३१ /८/ १९९० श्री हनुमानासारखे दैवत - चिरंतन बालक Eा श्री हनुमान हे आपल्या शरीरामधील महान चरित्र आहे. ते स्वाधिष्ठानापासून ते थेट आपल्या मेंदूपर्यंत असतात आणि आपल्या भविष्याच्या नियोजनासाठी लागणारे सर्व जरुरीचे मार्गदर्शन किंवा बौद्धिक क्रियांचा ते पुरवठा करतात. ते आपल्याला मार्गदर्शन देतात आणि रक्षण करतात. जर्मनी ही अशी जागा आहे की जिथे लोक खूप कार्यक्षम असतात, खूप उजव्या बाजूकडे असतात त्यांच्या शरीराचा जास्त वापर करतात आणि यंत्राकडे खूप कल असलेले असतात. ही फार आश्चर्याची गोष्ट आहे, की श्री हनुमानासारखे दैवत जे चिरंतन बालक आहे, माकडासारखं आहे, त्याने मानवाच्या उजव्या बाजूला असावं. त्यांना सांगितले गेले होते, की त्यांनी सूर्याला काबूत ठेवावे. त्याला जास्त शीतल, सौम्य बनवावे. जेव्हा ते जन्मले त्यावेळी त्यांना सांगितले गेले होते, की त्यांनी सूर्याची काळजी घ्यावी. तेव्हा बालक असल्याने त्यांनी विचार केला की त्याला खाऊन का टाकू नये. ते विराटाच्या अंगावर धावत गेले आणि सूर्याला गिळलं. कारण त्यांना वाटलं की त्यांच्या पोटातच असल्यावर सूर्याची नीट काळजी घेता येईल. उजवी बाजू ताब्यात ठेवण्यासाठी केलेली त्यांची ही बालकासारखी वर्तणूक, हे त्यांच्या चरित्रामधलं सौंदर्य आहे. सर्वसाधारणपणे उजवीकडील लोकांना मुले होत नाहीत. ते उजव्या बाजू बाहेर असतात आणि जर त्यांना मुलं झाली तर मुलांना ते आवडत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या मुलांसाठी वेळ नसतो. ते नेहमी खूप कडक शिस्तीचे असतात आणि त्यांच्यावर ओरडतात आणि त्यांना मुलांना कसं हाताळायचं ते कळत नाही किंवा मग ते जास्त लाड करणारे असतात. कारण त्यांना वाटतं, की 'मला हे कधीही मिळालं नाही, तर ते मला माझ्या मुलांना देऊ दे.' तर या अत्यंत उजवीकडे झुकलेल्या लोकांना हनुमान मिळाले आहेत, जे बालक आहेत. ते रामाचे सर्व कार्य करण्यासाठी अती आतूर आहेत. श्री राम हे संतुलनाचे परिपूर्ण असं चरित्र आहे. सॉक्रेटिसने वर्णन केलेला 'हितकारी राजा' ते आहेत. त्यांना सचिव म्हणून त्यांच्या बरोबर कोणीतरी हवं होतं. श्री हनुमान हे ते होत ज्यांची या कामासाठी निर्मिती केली गेली. ते अशा प्रकारचे श्रीरामांचे सेवक आणि सहाय्यक होते. आपल्या मालकाबद्दल सेवकसुद्धा इतके स्वत:ला अर्पण करीत नसतील. श्री हनुमानांना नऊ सिद्धी मिळाल्या होत्या. या सिद्धी अशा होत्या की ते आकाराने मोठे होऊ शकत होते. ते इतके वजनदार होऊ शकत होते, की कोणीही त्यांना उचलू शकत नव्हतं. ते अदृश्य होऊ शकत होते, वगैरे. एखादी व्यक्ती जी खूप उजवीकडे आहे, तिला श्री हनुमान या सिद्धीनी काबूत ठेऊ शकतात. आता एखादा मनुष्य जो त्यांच्या जीवनात फार जोरात पळतो आहे, त्याला तुम्ही कसे ताब्यात घेऊ शकता ? श्री हनुमान त्याला अशाप्रकारे करतात, की ६ त्याला त्याची गती कमी करावी लागते. ते त्याची पावलं खुप जड करतात किंवा त्याचे हात इतके जड करतात, की ती व्यक्ती त्याच्या हाताने जास्त काम करू शकत नाही. फार उजवीकडच्या व्यक्तीला ते विलक्षण आळसावलेले जडत्व देऊ शकतात. दसरी सिद्धी ही की ते त्यांची शेपटी कितीही लांब करू शकतात आणि तिने लोकांना हाताळू शकतात. त्यांच्या शेपटीचा उपयोग ते बसण्यासाठी करतात. त्यांची शेपटी ते एखाद्या डोंगराप्रमाणे त्यावर ते बसतात. त्यांच्याकडे ह्या साऱ्या तुम्ही म्हणता तशा माकडचेष्टा आहेत. नंतर ते गुंडाळून हवेतही उडू शकतात. ते इतके मोठे होऊ शकतात, की त्यांनी बाजूला सारलेल्या हवेला त्यांच्या स्वत:च्या वजनाहून जास्त वजन असतं. ते आर्किमिडीजच्या तत्त्वासारखं आहे. ते इतके मोठे होतात, की त्यांचे शरीर हवेमध्ये होडीसारखं तरंगू शकतं. हवेत उडून ते एकीकडून दुसरीकडे संदेश पाठवू शकतात. आपल्यामध्ये जे आकाशतत्त्वाचं सूक्ष्मतत्त्व असतं ते श्री हुनुमानांच्या अधिपत्याखाली असतं. ते आकाशतत्त्वाच्या सूक्ष्मस्तराचे अधिपती आहेत आणि त्यामधून ते संपर्क साधतात. आपल्यामधे आढळणारी सर्व संपर्काची साधने ज्या वाहिनीविरहीत ग्रंथी आहेत, ज्या पिट्युटरी ग्रंथीद्वारे उपयोगात आणल्या जातात, तेदेखील श्री हनुमानांच्या हालचालींद्वारे होतात, त्याचं कारण ते निराकार स्थितीमध्ये, आकारहीन स्थितीत जाऊ शकतात. तसंच हा माईकचा संपर्कसुद्धा. लाऊडस्पीकर घ्या. आपल्याकडे टी.व्ही. आहेत. रेडिओ आहेत ज्यावर आपण आकाशत्त्वामधलं काहीही पकडतो. ते सर्वकाही श्री हनुमानांचे आशीर्वाद आहेत आणि ते उजव्या बाजूकडील लोकांसाठीच उपलब्ध आहेत.. फक्त उजवीकडील व्यक्ती कॉर्डलेस फोन, तारा, वायरलेस अशा अवकाशातील गोष्टींचा शोध लावू शकतात. कनेक्टर-संपर्क साधण्याच्या साधनाशिवाय ते हे साधू शकतात. तर अशा प्रकारच्या सर्व अवकाशीय जोडणी या महान इंजिनियर श्री हनुमान यांचेकडून केली जाते. ते इतके अचूक आहेत, की तुम्ही त्यांच्यात दोष काढू शकत नाही किंवा आव्हान देऊ शकत नाही. कदाचित तुमचं साधन बरोबर नसेल, पण जर त्यांचे अवकाशाशी संबंधित कार्य पाहिलं तर ते अगदी बरोबर असेल. शास्त्रज्ञ शोध घेतात आणि विचार करतात, की ते नैसर्गिकच आहे. पण ते हे कसं होतं ? याचा विचार करू शकत नाही. आपण असं म्हणू शकतो की इकडे काहीतरी आहे किंवा आपण काहीतरी प्रक्षेपित करतो आणि ज्यामुळे तिकडे टी.व्ही. वर ते दिसतं. पण हे सर्व कार्य श्री हनुमानाद्वारे होतं, ७ ज्यांनी हे सारं सुरेख जाळं तयार केलं आहे आणि या जाळ्यामुळे या सर्व गोष्टी कार्यान्वित होतात. आपल्या अणूंवर मिळणारे व्हायब्रेशन्ससुद्धा ज्याप्रमाणे सल्फरडाय ऑक्साईडमध्ये ऑक्सिजन असतो, जो कंपन पावतो आणि असिमेट्रिक आणि सिमिट्रिक प्रकारची व्हायब्रेशन्स असतात. हे सर्व तुम्हाला माहीत आहे, पण ही व्हायब्रेशन्स कोणामार्फत निर्माण केली जातात ते कोणालाही माहीत नाही. तर ती सारी हनुमानांनी निर्माण केली असतात त्यांच्या सूक्ष्ममार्गाने. त्यांच्याकडे आणखी एक महान सिद्धी आहे, ती म्हणजे अणिमा. त्याचा अर्थ ते अणू- रेणूंमध्ये प्रवेश करू शकतात. बऱ्याच शास्त्रज्ञांना वाटतं, की त्यांनी अणूरेणूचा शोध नव्या युगामध्ये लावला आहे, पण अणूरेणूंचे वर्णन आपल्या जुन्या ग्रंथांमध्येही आढळते. जिथे जिथे तुम्ही विद्युत चुंबकीय प्रवाह कार्य करताना पाहता तो नेहमी हुनामानाच्या आशीर्वादानेच कार्यान्वित होतो. ते विद्युत-चुंबकीय शक्ती निर्माण करतात. श्री गणेशांमध्येही चुंबकीय शक्ती असते. ते लोहचुंबक आहेत. आपण असे म्हणू शकतो की विद्युत-चुंबकीय ही हनुमानाची शक्ती आहे. जड वस्तूंवर ती आहे. पण पदार्थापासून मात्र ती मेंदूपर्यंत जाते. स्वाधिष्ठानपासून ते मेंदूकडे जातात. मेंदूतही ते आपल्या मेंदच्या वेगवेगळ्या भागांचे संधान घडवून आणतात. त्यांनी आपल्याला अशा कितीतरी गोष्टी दिल्या आहेत. जर गणेशांनी आपल्याला सुज्ञता दिली, तर हनुमान आपल्याला विचार करण्याची शक्ती देतात. आपण वाईट गोष्टींचा विचार करू नये यासाठी ते आपले संरक्षण करतात. जर गणेशांनी आपल्याला सुज्ञता दिली तर श्री हनुमान आपल्याला सद्सद्विवेकबुद्धी देतात. सुज्ञता म्हणजे जिथे तुम्हाला सद्सद्विवेकबुद्धीची जास्त जरूर पडत नाही. कारण तुमच्या सुज्ञतेमुळे, हुशारीमुळे काय चांगलं, काय वाईट ते तुम्हाला कळतं. परंतु आपल्या व्यक्तित्वासाठी सद्सद्विवेकबुद्धीची गरज आहे. जिथे त्याला संयमित ठेवायचे असते आणि हे संयमन श्री हनुमानांकडून येते. ते मानवामधील सद्सद्विवेकबुद्धी आहेत. ही सद्सद्विवेकबुद्धी जी हनुमानाच्या सूक्ष्म स्वरुपात आपल्यात असते, ती आपल्याला सत्य आणि असत्य यामधील फरक योग्यप्रकारे जाणणारी बुद्धी देते. सहजयोगाच्या पद्धतीमध्ये आपण श्री गणेशांना अध्यक्ष म्हणतो, जसे विद्यापीठाचे कुलगुरू. ते आपल्याला पदवी बहाल करतात आणि आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत ते समजण्यास मदत करतात. ते आपल्याला निर्विचार समाधी, निर्विकल्प समाधी आणि आनंद देतात. पण मानसिक समज, 'हे चांगलं , हे हितकारक आहे,' आपल्याकडे हे श्री हनुमानांकडून येतं आणि पाश्चात्त्य लोकांसाठी हे फार महत्त्वाचं आहे कारण हे मानसिक आहे, नाहीतर त्यांना ते कळणार ८ नाही. ते जर मानसिक नसेल तर ते निराकारात येऊ शकत नाही. त्यांच्याशिवाय तुम्ही संत झालात, तर ठीक आहे की तुम्ही संतपणाचा आनंद उपभोगाल, पण संतपणा, ठीक आहे तुम्ही हिमालयात रहात असाल, पण तुम्ही लोकांना आत्मसाक्षात्कार देण्यासाठी गेलात तर बरोबर आहे. तेव्हां, हे सगळं म्हणजे विवेकबुद्धी, संरक्षण, मार्गदर्शन श्री हनुमानच आपल्याला देतात. जर्मनी हा असा देश आहे, जो जास्त करून उजव्या बाजूचे मूलतत्त्व आहे, त्यामुळे त्यांची पूजा करून उजव्या बाजूचे संरक्षण मिळणं फार महत्त्वाचं आहे. पण या सर्व विवेकबुद्धीमध्ये त्यांना एक गोष्ट माहीत आहे, की ते श्रीरामांचे पूर्णपणे समाधान करू शकत नाहीत. श्रीराम कोण आहेत ? ते एक हितकारी राजा आहेत. ते हितासाठी कार्य करतात आणि ते औपचारिक राजा आहेत. ते स्वत:ला पुढे करीत नाहीत. ते खूप संतुलित आणि समतोल व्यक्ती आहेत. श्री हनुमान हे श्रीरामांचं काम करण्यासाठी नेहमीच आतुर होते. जेव्हां श्रीरामांनी लक्ष्मणाच्या जीवदानासाठी संजीवनी आणायला सांगितली तेव्हा त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून आणला आणि म्हणाले, 'घ्या.' तर अशा प्रकारची व्यक्ती श्री हनुमान होते. ते एखाद्या लहान बालकाप्रमाणे होते. श्रीराम जे म्हणतील ते ते करत. मी तर म्हणेन एखाद्या गुरू-शिष्याप्रमाणे होते. त्याहूनही जास्त. शिष्य हा दुसऱ्याला पूर्ण समाधान देण्याची उत्कट इच्छा असणारा सेवक आहे. देवाला पूर्णपणे शरणागत असलेला. त्यांची मुख्य गोष्ट आहे शरणागती. उजव्या बाजूकडील लोक सर्वसाधारणपणे परमेश्वराला शरण जातात. तसेच ते त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या कामाला, त्यांच्या पत्नीला शरण जातात, पण ते चुकीच्या लोकांना समाधानी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तारतम्य नसते. जर तुम्ही श्री हनुमानांची मदत घेतली तर ते तुम्हाला सांगतील, की तुम्हाला सर्व शक्तिमान देवाला शरण गेलं पाहिजे. दुसर्या कोणाला नाही किंवा श्रीरामासारख्या असणाऱ्या तुमच्या गुरूला. मग तुम्ही स्वतंत्र पक्षी आहात आणि सर्व नऊ शक्त्या तुमच्यामध्ये असतात. उतारा करतात. लोकांचा अतिशय विचार करणं आणि तुमचा अहंकार यावर श्री हनुमान अहंकार ते कसा नष्ट करतात हे त्यांनी जेव्हा पूर्ण लंका जाळली आणि रावणाची कशी चेष्टा केली त्यात फार मधुर रीतीने दर्शविले आहे. कारण जो कोणी अहंकारी असेल त्याची चेष्टा केली पाहिजे, मग तो ठीक होतो. जेव्हा रावणाने विचारले, 'तू कोण आहेस? नुसतं माकड!' तेव्हा हनुमानाने त्यांची शेपटी रावणाच्या नाकाकडे नेली आणि गुदगुल्या केल्या. तेव्हा हनुमान ही एक अशी व्यक्ती आहे जी अहंकारी लोकांची चेष्टा करते. ९ हनुमान हे असे आहेत, जेव्हा कोणी अहंकारी तुहाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते त्याची चेष्टा करतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी व्यक्ती उड्या मारेल, जसे हम्प्टी-डम्प्टी खाली कोसळले, त्यांचा मुकुट तुटला. तेव्हा अहंकारी लोकांपासून तुमचे रक्षण करणं हे हनुमानाचे काम आहे आणि अहंकारी लोकांचेही रक्षण ते त्यांचा पाणउतारा करून करतात. जसे सद्दाम हुसेन. सद्दाम हुसेन यांच्या बाबतीत मी हनुमानांना फक्त काम करायला सांगितले , कारण मला माहीत होतं की ते करतील. त्यांनी सद्दामला अशा कठीण परिस्थितीमध्ये टाकलं की त्याला काय करायचं हे कळलं नाही. कारण समजा तो म्हणाला, 'मी लढाई करेन,' तर पूर्ण इराक नष्ट होईल. तो नष्ट होईल. कुवेत नष्ट होईल. सगळं पेट्रोल नष्ट होईल आणि सर्व अडचणीत पडतील. सद्दामचं काय? तो असणार नाही कारण जर अमेरिकन लोकांना लढाई करायची असली तर ते त्याच्या देशांत जाऊन लढतील. ते काही अमेरिकेत लढाई करणार नाहीत. तर आता हनुमान सद्दामच्या मेदूवर काम करीत आहेत आणि त्याला सांगत आहेत की 'आता पहा, तू असं केलंस तर असं होईल.' तो सर्व राजकारणी मुत्सद्यांच्या, अहंकारी लोकांच्या मेंदूवर काम करतो आणि मग कधी कधी ते त्यांची धोरणे बदलतात. ते वळतात आणि तशा प्रकारे ते काम घडतं. श्री हनुमानांचा दुसरा गुण म्हणजे ते लोकांना घडवतात. ते लोकांची भेट घडवून आणतात. ते दोन अहंकारी लोकांचीही भेट घडवून आणतात आणि अशी परिस्थिती निर्माण करतात, की ते दोघे मित्र बनतात, सौम्य होतात. त्यांचे आपल्यामधील पूर्ण व्यक्तित्व आपल्यातील अहंकार ओळखण्याची क्रिया करतात. 'ओहो, हा माझा अहंकार आहे जो काम करतो.' आणि नंतर एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदी, मधुर होतो. ते नेहमी नाचण्याच्या मूडमध्ये असतात. ते नेहमी नाचतच असतात. श्रीरामांसमोर ते नेहमी खाली मान घालून असतात आणि नेहमी श्रीरामांच्या इच्छेप्रमाणे कार्य करतात. म्हणूनच जर श्री गणेश माझ्या मागे उभे असतील तर श्री हनुमान माझ्या पायाशी उभे म्हणजे जसे, मी म्हणेन, जर जर्मनी - जसे फिलीप म्हणाला, की जर्मनी हनुमानासारखी असतात. असली असती तर आपल्याकडे किती प्रभावी शक्ती असती. श्री हनुमानांचा श्री रामाप्रती निष्ठा असणारा स्वभाव आपल्याला दिसतो, तुम्हाला ती गोष्ट माहीत आहे, की जेव्हा सीतेने हनुमानांना एक हार दिला परंतु त्यात श्रीराम नसल्यामुळे त्यांनी तो घातला नाही. सीतेला वाटलं की, ते सारखे अवतीभोवती असतात आणि तिच्या एकांतावर अतिक्रमण होतं. म्हणून तिने हनुमानांना सांगितले की फक्त एका कामासाठीच त्यांनी यावं. प्रत्येक काम १० करण्याची गरज नाही. तिने त्यांना आवडतं काम निवडण्यासाठी सांगितलं. ते म्हणाले की, 'मला फक्त श्रीरामांबरोबरच राहायला आवडेल. त्यांना शिंक आली, त्यांना जांभई आली तर मी असं करेन. (चुटकी वाजवेन)' सीताजींना वाटले की हे तर फार छोटं काम आहे. हे झालं की तो दृष्टीआड होईल. म्हणून त्यांनी अनुमती दिली. हनुमानजी तिथेच उभे राहिले. तेव्हा सीतामाई त्यांना म्हणाल्या, 'आता तू इथे का उभा आहेस?' तेव्हा ते म्हणाले, 'मी त्यासाठीच (कामासाठी) तर उभा आहे. जाणार कसा ? सीताजींनी आधीच त्यांच्या कामासाठी परवानगी दिल्याने त्या आपला शब्द परत मागे घेऊ शकत नव्हत्या. म्हणूनच श्री हनुमान श्रीरामांच्यासमोर नेहमीच त्यांची आज्ञा घेण्यासाठी उभे असलेले दिसतात. सहजयोगामध्ये माझा तुमच्याशी एक गुरू म्हणून, तुमची आई म्हणून संबंध आहे , यापेक्षाही अजून काही अमर्यादित संबंध आहे , पण सध्यातरी आपण फक्त एक गुरू आणि आई या संबंधांचा विचार करू. गुरू म्हणून माझी मुख्य वेदना ही आहे की तुम्ही सहयोगाविषयी सर्व काही शिकून घ्यावे. तुम्ही सहजयोगात निष्णात व्हावे आणि तुम्ही स्वत: गुरू व्हावे. पण यासाठी तुम्हाला पूर्णपणे शरण जावे लागेल. 'इस्लाम' म्हणजे शरणागती. जर तुम्ही शरणागत असाल तरच तुम्हाला कळेल की सहजयोग कसा हाताळायचा. ही शरणागतीसुद्धा श्री हनुमानामुळेच घडवली जाते. तेच आहेत, की जे तुम्हाला शरणागत कसं व्हायचं ते शिकवतात किंवा तुम्हाला शरणागत करतात. कारण अहंकारी लोक शरण जात नाहीत. मग ते काहीतरी अशी अडचण, चमत्कार किंवा चेष्टा करतात की ज्यामुळे शिष्य गुरूला शरण जाईल. त्याची गुरूला शरण जाण्याची शक्तीसुद्धा श्री हनुमानाचीच असते. ते फक्त स्वत: शरणागत नाहीत, तर ते दुसऱ्यांनाही शरण आणतात. कारण अहंकारामुळे तुम्ही शरण येत नाही. म्हणून ते तुमच्या अहंकाराशी लढतात व त्याला खाली पाडतात आणि तुम्हाला शरण आणतात. त्यांच्या स्वत:च्या अभिव्यक्तीत मी म्हणेन, की त्यांनी दाखवून दिले आहे, की उजव्या बाजूला अतिशय सुंदर भाग आहे. जर त्याला पूर्णपणे उपभोगायचे असेल, तर तुमच्या गुरूला तुम्ही पूर्णपणे शरण गेलं पाहिजे, जसे काही तुम्ही त्या गुरूचे सेवक आहात. गुरूंसाठी जे काही करावं लागेल ते न लाजता तुम्ही केलं पाहिजे. अर्थात् गुरूने तुम्हाला कमीत कमी ११ आत्मसाक्षात्कार दिला पाहिजे, नाहीतर तो गुरू नाही. तुम्ही गुरूला कसे खूष करणार आणि त्या गुरूच्या कसे जवळ जाणार... शारीरिक जवळीक म्हणत नाही मी पण, एक प्रकारची एकतानता, एक प्रकारची समज... जे माझ्यापासून खूप दूर असतात त्यांना त्यांच्या हृदयात माझी जाणीव असते. ही शक्ती श्री हनुमानांकडून आपल्याला घेतली पाहिजे. हनुमान हे आहेत जे तुमच्याबरोबरच सर्व देवतांचेही रक्षण करतात. श्री गणेश आणि श्री हनुमान यांच्यात हा फरक आहे की श्री गणेश शक्ती देतात, पण श्री हनुमान रक्षण करतात. जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी होते तेव्हा रथावर श्री हनुमान बसले होते, श्री गणेश नाही. ते रथावर त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी बसले होते. तसेच एक प्रकारे श्रीराम स्वतःच श्री विष्णू होते, तर त्यांच्याकडेही ते लक्ष देत होते. ते देवदूत होते. ख्रिश्चन ग्रंथ बायबलनुसार ते गॅब्रीएल होते. गॅब्रीएल हे एक संदेशवाहक होते आणि ते मारीयासाठी संदेश आणत असत आणि त्यांनी 'इमॅक्युलेट सालवे' हा शब्द वापरला जे माझे नाव आहे. माझे पहिले नाव निर्मला म्हणजे इमॅक्युलेट आणि आडनाव साळवे आहे. मारियाला तिच्या आयुष्यात हनुमानाबरोबर बरेच काही करावे लागले होते. मारिया ही महालक्ष्मी आहे, जी सीता आहे, नंतर राधा. हनुमानाला तिची सेवा करण्यासाठी रहावं लागतं. म्हणून काही वेळा लोक म्हणतात, 'श्री माताजी तुम्हाला कसं कळतं? श्री माताजी तुम्ही निरोप कसा पाठवला? श्री माताजी हे तुम्ही कसं कार्यान्वित केलं?' ही सगळी श्री हनुमानाची डोकेदुखी आहे . माझ्या मनातून काही गेलं की ते ते काढून घेतात आणि ते होतं. कारण सगळी संघटना इतकी व्यवस्थितपणे आखलेली आहे. हे सर्व निरोप. ते कुठून येतात? बरेच लोक सांगतात, 'आई मी फक्त तुमची प्रार्थना केली.' एक गृहस्थ होते. ज्यांची आई कॅन्सरने अतिशय आजारी होती. ते तिला बघायला गेले. काय करायचं हे त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी फक्त प्रार्थना केली, 'श्री माताजी, कृपा करून माझ्या आईला वाचवा.' सहजयोगी म्हणून या व्यक्तीचा प्रामाणिकपणा आणि गहनता हनुमानांना माहीत आहे. या व्यक्तीचं वजन त्यांना माहीत आहे आणि ताबडतोब तीन दिवसांमध्ये ती जगली आणि तिला मुंबईला आणण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सर ठीक झाला आहे. अनेक गोष्टी ज्यांना तुम्ही चमत्कार म्हणता ते श्री हनुमानांनी केलेले असतात. ते आहेत जे हे चमत्कार करतात. ते चमत्कार तुम्हाला दाखवण्यासाठी करतात की तुम्ही किती वेडे आहात, किती मूर्ख आहात. कारण ते उजवीकडे असतात. बघा, ते अहंकाराच्या बाजूने गेले आहेत. १२ अहंकाराने माणूस नेहमी मूर्ख बनतो, मूर्खासारख्या गोष्टी करतो. हे अपरिहार्य आहे. आपल्याला तो असं का करतो ते समजत नाही. मूर्खपणासारखे वागून परत 'काय झालं ?' असे विचारतो जे हनुमानांना आवडत नाही. मग ते परत सगळं गुंडाळतात. नंतर त्यांना कळतं की त्यांनी किती मोठी चूक केली आहे किंवा वेडेपणा केला आहे. पण काही वेळा परत मागे जाणं अतिशय कठीण असतं. जसं यिप्पीज डिसीज मध्ये. कारण या लोकांमधील हनुमानांनी विद्युत चुंबकीय शक्ती मागे घेतलेली असते आणि ती काम करीत नाही. तुमच्या चेतनावस्थेतील मनाशी संबंध राहत नाही. त्यामुळे तुमचे चेतीत मन काम करू शकत नाही. ते फक्त दूर जातं. फक्त जर अशा लोकांनी श्री हनुमानांची भक्तीभावाने पूजा केली तर कदाचित ते वाचू शकतील. पण अशा लोकांना सर्व गोष्टी समजावणे ही सोपी गोष्ट नाही. ते ' आमचा विश्वास नाही' असे म्हणतात. श्री हनुमानांची बरीच अंग आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे. पण एक उदाहरण म्हणजे त्यांचे शरीर, तुम्ही बघाल गेरूने आच्छादलेल्या शिवाप्रमाणे. गेरू हा लाल दगड जो खूप खूप गरम असतो. सर्दीमुळे कधी कधी पुरळ (रॅशेस) येतात, त्यावर जर तुम्ही गेरू लावलात तर ते पुरळ बरे होतात. तसेच बाधेमुळे होणारे त्वचेचे रोग गेरूमुळे बरे होऊ शकतात. या उलट श्री गणेशांचे लाल लेड ऑक्साईडने लेपन केले असते. जे अत्यंत थंड असते. त्यांच्यामधील उष्णतेचं संतुलन करण्यासाठी किंवा उष्णतेचे परिणाम कमी करण्यासाठी ते लावले जाते. संस्कृत तसेच हिंदी आणि मराठीत त्याला सिंदूर म्हणतात. ते नेहमी लाल रंगाचे असते. श्री गणेशांवर याचेच आच्छादन असते. लोक म्हणतात की लेड ऑक्साईडमुळे कॅन्सर होतो, पण ते थंड असते आणि ते तुम्हाला इतकं थंड करू शकतं की तुम्ही डावीकडे जाऊ शकता. कॅन्सर हा सायकोसोमॅटिक रोग आहे आणि म्हणूनच दूरपर्यंत आपण म्हणू शकतो की त्याने कॅन्सर होऊ शकतो कारण तो इतका थंड असतो, की तुम्ही डावीकडे जाता तिथे विषाणू तुम्हाला पकडू शकतात, ज्यांच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. पण तेच ऑक्साईड जे लोक खूप डावीकडे असतात त्यांच्यासाठी बरोबर असतं. ते त्यांच्या आज्ञेवर लावलं की ते थंड होतात. त्यांचा राग कमी होतो. श्री हनुमान हे आपला राग बरा करतात. आपली घाई, आपली गती, आपली आक्रमकता हे ही श्री हनुमानांमुळेच बरे होते. त्यांनी हिटलरबरोबरही खेळ खेळला होता, त्यांची खोडी काढली. हिटलर श्री गणेशाला प्रतीक म्हणून वापरत होते. स्वस्तिक घड्याळाच्या पद्धतीने बनवायला हवं होतं. श्री हनुमानांनी स्वस्तिक बनविण्यासाठी वापरण्याचं टेन्सिल उलट केलं. त्यांनी दसऱया बाजूला श्री गणेशांचा उपयोग केला. श्री हनुमानांना श्री गणेशांविषयी थोडी काळजी होती की ते १३ ऐकतील का? कारण ते ज्येष्ठ आहेत, देवता आहेत, पण हनुमानही देवदूत होते. पण लवकरच तो खेळ खेळला गेला. श्री गणेश आणि श्री हनुमान दोघांनी मिळून हिटलरला जिंकण्यापासून थांबवलं. म्हणून या छोट्या छोट्या खोड्या काढल्या जातात. मला आठवतं, एकदा जर्मनीमध्ये माझी पूजा ठेवली होती. जर्मनी ही जागा अशी आहे, जिथे श्री हनुमानजी अशा खोड्या जास्त करतात. कारण त्यांना त्यांची जास्त गरज आहे. पूजा होती आणि चुकून त्यांनी स्वस्तिक उलट बाजूने काढले. माझे लक्ष गेले नाही. सर्वसाधारणपणे मी नेहमी लक्ष ठेवते, पण त्या दिवशी कसं ते माहीत नाही मी ते पाहिलं नाही. हा सगळा हनुमानांचाच खेळ होता. मी जेव्हा ते पाहिलं तेव्हा म्हंटलं, 'अरे देवा, आता हे कुठे लागणार आहे. आता हे कुठे कार्यान्वित होणार आहे. कोणत्या देशाला आता ते मार देणार ?' पण तेव्हा जर्मनीला फटका बसला नाही, तो मार इंग्लंडला बसला. मी इंग्लंडमध्ये खूप जास्त कष्ट घेतले होते, पण ते सहजयोगाबाबतीत निष्काळजी होते. म्हणून त्यांना मार बसला होता. म्हणून श्री हनुमान जे प्रचंड जलप्रपातासारखे किंवा जोराच्या वादळासारखे जातात आणि गोष्टींचा नाश करतात, ते या सर्व गोष्टी त्यांच्या विद्युत चुंबकीय शक्तीमुळे करतात. सर्व भौतिक वस्तूंवर त्यांचे नियंत्रण आहे. ते तुमच्यासाठी पावसाची निर्मिती करतात. ते सूर्य, वारा यांची निर्मिती करतात. ते या सर्व गोष्टी, समारंभ व्यवस्थित होण्यासाठी, पूजा नीट होण्यासाठी करत असतात. तेच सर्व काही अत्यंत सुरेखपणे करतात, परंतु हे सर्व श्री हनुमान करतात हे कोणालाही समजत नाही. आपण श्री हनुमानांचे सतत आभार मानले पाहिजे. श्री हनुमान हे ऐश्वर्यशाली देवता किंवा देवद्त आहेत आणि याठिकाणी सर्वकाही अत्यंत राजेशाही व सुरेखरीत्या संपन्न झाले आहे आणि त्यांना हे सर्व आवडलेही आहे. ते संन्यासी प्रकारचे व्यक्ती नाहीत किंवा सर्वसंगपरित्यागी पण नाहीत. सर्वसाधारणपणे उजवीकडचे लोक सर्वसंगपरित्याग करणारे असतात. ते उजव्या बाजूचे लोक बनवतात, ते सर्व काही सहज सोपे करतात. तर दुसऱ्या बाजूने श्री हनुमान हे सर्व करीत नाहीत. त्यांना सौंदर्य आवडतं, सुशोभितता आवडते आणि लोकांना ते सर्वसंगपरित्यागाच्या उलट करतात. श्री हनुमान अशाप्रकारच्या गोष्टी देतात. श्री हनुमानांची भक्ती करणारे लोक म्हणतात, की बायकांनी श्री हनुमानांचे दर्शन कधीच घेऊ नये कारण ते ब्रह्मचारी आहेत आणि त्यांना बायकांनी बघू नये असे वाटते. कारण ते कमी खूप कपडे घालतात. पण जर स्त्रियांना वाटलं की ते फक्त एक बालक आहेत, तर ते तेच आहेत. पण लोकांकडे ते एक बालक आहेत अशी कल्पनाच नाही. लहान मुलाला काय - कपडे घातले काय १४ किंवा नाही घातले काय. आणि त्यातूनही ते मर्कटरूपात आहेत. माकडांनी कपडे घालायचे नसतात. त्यांची तुम्ही किती गोड आकृती पाहता, किती अफाट, किती मोठे, मोठी नखं असलेले पण जेव्हा माझ्या पायावरून हळूवार हात फिरवतात तेव्हा त्यांची नखे मागे सारतात. किती हळूवार असतात आणि सगळं काही किती हळूवारपणे सांभाळतात. आता मला असं वाटत आहे की जर्मन लोक सर्व गोष्टी हाताळण्यास, लोकांना हाताळण्यात अतिशय हळूवार, सभ्य झाले आहेत. हे परिवर्तन येत आहे आणि मला वाटतं हा श्री हनुमानांचा आशीर्वाद आहे. ाबड ४ १५ े कर सहसीराचा प्रकाश हे ब्रहमरंध्र आहे ही भौतिकता अतिशय भयंकर आहे. ही अतिशय हास्यास्पद व लाजिरवाणी गोष्ट आहे. ती मानवाला शोभून दिसत नाही. कुत्रा सुद्धा ह्या भौतिकतेचा तिरस्कार करेल . मानव कोणत्या पातळीला येऊन पोहोचला आहे. ही भौतिकता माणसाला अत्यंत निर्लज्ज बनविते. एखाद्या र्त्रीला 'तुमच्याकडे माझा चमचा आहे का?' असे विचारतांना लाजसुद्धा वाटत नाही. भारतात आम्ही लहान असतांना सांगायचे, म्हणजे ही आमची संस्कृती आहे. जर एखाद्याची वस्तू आपल्याकडे असेल, तर आपण ती सांभाळली पाहिजे व परत केली पाहिजे आणि जर आपला हिरा जरी दुूसर्याकडे असेल, तरी तो मागायचा नाही. हा चांगला शिष्टाचार नाही. हिरा हा महत्त्वाचा नसून काय महत्त्वाचे आहे, तर चांगले संबंध, मैत्री व दुसर्यांच्या भावनांची कदर, तुम्ही असं कसं विचारू शकता ? जर त्यांना हिरा सापडला असता तर त्यांनी तो परत केला असतां! त्यांनी जर कांही विचारलेच नाही, याचा अर्थ हिरा नाही आणि १७ तो जरी असता, तरी हिरा म्हणजे काय? तुम्ही घातला काय किंवा त्यांनी घातला काय, काय फरक २हस२ पडणार आहे! है ब्रहम प.पू.श्रीमाताजी, ५ /५/५१९८७ उदा. मी तुम्हाला नाकात तूप सोडायला सांगितले होते. ती अगदी साधी गोष्ट आहे, पण महत्त्वाची आहे. कारण तुमचे हंसाचक्र फारच खराब आहे व एड्सच्या रोगाचे एक लक्षण म्हणजे खराब झालेले हंसा चक्र. तुम्हाला एड्सच्या रोगाचा धोका आहे. पण ही साधी गोष्टसुद्धा पाळली जात नाही. मी काय सांगते, ते ऐकणे तुमचे धार्मिक कर्तव्य आहे. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. माझे हात, माझी बोटं, माझे पाय, माझ्या आज्ञा ऐकतात. मग तुम्हाला मी मोठे योगी बनविले, मान-सन्मान दिला, आदिशक्तीच्या शरीरात धारण केले व माझ्या शरीरात तुम्ही पेशी आहात, तर मग तुम्ही का नाही पाळत. प.पू.श्रीमाताजी, ५/५/१९८७ विशेषत्त्वाची भावना सहजयोग्यांनी सोडून द्यावी. नुसत्या विचारातून नव्हे, मनातून. तुम्ही जरी सारखा मंत्र केला, 'मी विशेष नाही', 'मी कोणी नाही' मग गुंता अधिकच वाढेल, तुम्ही म्हणाल, 'माझ्यासारखा कोणी आहे का ? २३००० वेळा मी मंत्र जपला, 'मी कोणी तरी विशेष आहे, मोठा आहे.' मी या सर्व गटामध्ये कोणीतरी वरचढ आहे. ही कल्पना गळून पडते, जेव्हा समुद्रात पडलेला थेंब सागरात विलीन होतो, तुम्ही सागरच होता. तुमचे व्यक्तित्व संपते. काही परिमाण नाही, की ज्या परिमाणाने हा मोठा, हा लहान असा फरक करता येईल. यातूनच याला जगात समस्या निर्माण होतात. आपल्या भारतातील जातिवाद पहा. पाश्चिमात्य देशातील सामाजिक रचना वर्णभेद हेसुद्धा स्वत:च्या जाणिवेतून निर्माण झालेत. जसे माझाच धर्म श्रेष्ठ, तुमचा खालच्या दर्जाचा. आम्हीच श्रेष्ठ आहोत. यातून सर्व समस्या निर्माण झाल्या. त्याने काहीच साध्य झाले नाही. उलट नुकसानच झाले. केवळ नुकसान. तर सहजयोगात तरी या रोगाची लागण होऊ नये. मी श्रेष्ठ आहे, माझा देश श्रेष्ठ आहे. या भावना तुम्ही घालवा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य दिसू द्या. यासाठी तुम्हाला विशेषत्वाची जरुरी नाही, विशेष शरीराची जरुरी नाही किंवा देखणेपणाची ही नसून सुंदर हृदयाची जरुरी आहे. सुंदर हृदय सर्वांना आकर्षित करते. दुसरे काही नाही. तुमचे हृदय ही असेच हवे. असे लोक मला माहीत आहेत. एका सहजयोग्याने पहिल्या बायकोला घटस्फोट दिला. का? तर ती कुरुप आहे. बेढब आहे. मग त्याने एका सुंदर युवतीबरोबर लग्न केले, त्यानंतर तो घर सोडून पळून गेला. मी विचारले, 'आधीची कुरुप होती म्हणून तिला सोडले आता काय झाले?' तर तो म्हणाला, 'दूसरीला हृदयच नाही' आणि १८ अशाप्रकारे तुमचे हे ईश्वराने दिलेले हृदय अत्यंत उदार धार्मिकतेने भरलेले आहे . या देणगीचा तुम्ही व प्रकाश आदर केला पाहिजे. तुमच्या उदारतेचा जसा आनंद घेता तसा निसर्ग स्वत:च्याच आनंदात असतो. तसा ट्र आहे आनंद लुटा. जास्त चिकित्सा ठेवणे, लोकांच्या चुका काढणे व दुरुस्त करून घेणे म्हणजे एक डोकेद्खीच. उत्तम म्हणजे तुम्ही स्वत:ला ठीक करा. स्वत:लाच हसा, हाच उत्तम मार्ग आहे. प्रत्येकाची काही तरी गमतीची बाब असते. माझ्याही बाबतीत आहे. कबूल करते, प्रयत्न करून ही मी विसरून जाते. उदा. हा चष्मा मी नेहमीच विसरते. अगदी निघायच्या अगोदर घ्यायचा घ्यायचा म्हणून आठवण ठेवून ही ऐनवेळी विसरते. मी गणितात प्रवीण आहे. मी मोजू शकत नाही, चेक कसा भरायचा ते ही मला माहीत नाही, खरे वाटते तुम्हाला? दूसरे मला चेक भरून देतात. अति चिकित्सक लोक नेहमी अयशस्वी ठरतात कारण त्यांचा मेंदूच त्यांच्यावर शक्कल लढवितो. एका गृहस्थाने एकदा सांगितले की तुमच्या मोटारीचा आकार एवढा आहे म्हणून गॅरेजचा आकार ही असा हवा. मी म्हणाले, ठीक आहे. मग जेव्हा गॅरेज बांधले तेव्हा मोटारच आत जाईना, एवढा मोठा चिकित्सक आर्किटेक्ट ज्याला बक्षिसे मिळाली होती. तो अशी चूक सुचविले. मी म्हणाले, आता तरी गॅरेज नीट मोजणी करा. नाहीतर दुसरी गाडी विकत घेऊन तीच तऱ्हा. कशी करू शकतो, हे मला कळेना. त्याने मला दूसरी मोटार घेण्यास प.पू.श्रीमाताजी, ७/५/१९९५, कबेला, इटली पण काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम क्रोध ही एक भयानक प्रवृत्ती माणसामध्ये असते. राग येणे हा उघड उघड मूर्खपणा आहे. कोणावर ही तुम्हाला रागवण्याची जरूरच नाही. रागामुळे तुम्ही स्वत:चेच नुकसान करून घेता. सबंध वातावरण बिघडवता आणि एकमेकांचे नातेसंबंध ही बिघडवता. राग आलाच तर थोडा वेळ शांत बसा व राग का आला? असा स्वत:शीच हे विचार करत रहा. रागातून प्रश्न सुटत नसतात, लक्षात घ्या. प.पू.श्रीमाताजी, १०/५/१९९८, कबेला जर तुम्हाला तथाकथित त्रासामधून ही जर आनंद मिळवायचा माहीत असेल, तर तुम्ही योग्य मार्गाने जात असाल व आपोआपच तुम्ही बनू लागता. मग तुम्ही जाणा, की तुमची बरोबर प्रगती होत आहे. जर एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला आणि तुम्ही अतिशय शांत राहिलात किंवा तुमचा राग नाहीसा झाला तर असे समजा, की तुम्ही प्रगती करीत आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर जर घाला पडत असताना तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही चिंतित झाला नाहीत तर समजा की तुमची प्रगती होत आहे. कितीही प्रकारची कृत्रिमता असली, तरी तुमच्या मनावर जर त्याची छाप पडली नाही, तर समजा की तुमची प्रगती होत आहे. दुसर्याची किती ही प्रगती झाली व ती पाहून तुम्हाला काहीही दुःख झाले १९ नाही तर समजा, की तुमची प्रगती होत आहे. २हस२ प.पू.श्रीमाताजी, ५ मे १९८४, फ्रांस है ब्रहा सहस्राराच्या हजार पाकळ्या या तुमच्यामध्ये असलेल्या विराटाच्या शक्त्या आहेत. आपली चुक हीच होते, की सहस्राराचा प्रकाश हे ब्रह्मरंध्र आहे व तिथेच हृदय चक्र आहे, हे तुम्ही लक्षात घेत नाही. चक्र ही बऱ्याच जणांना नीट समजत नाही. हे सर्व महामायेमुळे होते. उदा. प्रत्येकाला वाटते, की आपल्या कुटुंबात सर्वक्षेम असावे आणि इथेच महामाया कार्य करू लागते आणि तुम्ही कुटुंबियांबद्दलच काळजी करू लागता. 'वसुधैव कुटुंबकम्' ही संतांची मनोभूमिका होती, तसे तुमचे झाले पाहिजे. स्वत:च्या कुटुंबाची अशी काळजी घ्या, की सहजयोग्यांचे सामूहिक कुटुंब बळकट होईल. तसे केले नाही तर उलट प्रकार होईल. त्याबाबतीत त्याग हा एक प्रकारचा व्याधिमुक्त होण्याचा उपचार आहे. मग परिस्थिती बदलून प्रेम, करुणा, आपुलकी इ.भावनांना प्राधान्य येते, पण याबाबतीत ही प्रत्येक सहजयोग्यावर प्रेमच केले पाहिजे असा नियम पाळण्याचा आग्रह धरू नये. निगेटिव्ह सहजयोग्याला दूरच ठेवले पाहिजे. कुठल्याही माणसाच्या प्रभावाखाली येणे बरोबर नाही. स्वत:ला अवतारी व्यक्ती समजून सगळ्या पीडितांचा आपणच उद्धार करणारे आहोत अशी कल्पना करू नका. हॉस्पिटलमधला पेशंट इतर पेशंटला औषध देऊ शकत नाही. ते डॉक्टरचे काम आहे. सहजयोगात नवीन आलेल्या लोकांना हे नीट समजत नाही. टोपलीमध्ये ठेवलेल्या सफरचंदामधील चांगली फळे खराब झालेल्या फळांना ठीक करू शकत नाहीत. उलट त्यांच्या संगतीत चांगली फळेच खराब होणार. म्हणून प्रत्येकाला सुधारण्याचे आपले कामच आहे असे समजू नका. तुमचे खरे काम म्हणजे निगेटिव्ह सहजयोग्याला सामूहिकतेतून खडसावले पाहिजे व त्याचे दोष व चुका स्पष्टपणे त्याला दाखविल्या पाहिजेत. जगामध्ये काही माणसे खराब असतातच. शिवाय चैतन्य लहरीमधून चांगले वाईट ओळखणे तुम्हाला सहज शक्य आहे. म्हणून ज्यांना सुधारणे अशक्य आहे अशा लोकांवर तुमची चैतन्य शक्ती वाया घालवू नका. त्यातून तुमचेच नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. सहजयोगात अजून परिपक्व न झालेल्या लोकांनी याबाबतीत जास्त खबरदारी घेतली पाहिजे. ८/५/१९८८, रोम तुमची प्रेमशक्ती तुमचेच नव्हे तर इतरांचे ही संरक्षण करू शकते, आत्म्यावर तुमचे लक्ष सतत जाऊ लागले, तर ते हळूहळू स्थिर होऊ लागते. मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे आवडत नाही, ते आवडते अशासारख्या बाहेर धावणार्या इच्छा सुटून जातात. तसला काही विचारच मनात उमटणार नाही. मी, मला, असे सारखे म्हणत असलेला कोण बरे आहे असे स्वत:लाच विचारत रहा. जर तुम्ही आत्मा आहात, तर तुम्ही प्रेम स्वरुप आहात आणि प्रेमामध्ये तुम्ही सतत दुसर्यांचा, त्यांच्या प्रश्नांचा , त्यांना २० काय आवडेल, कसे बरे वाटेल, असाच विचार करणार, स्वत:चा व स्वत:बद्दलचा विचार मनात व प्रकाश येणारच नाही. तुम्हाला ही स्थिती मिळवायची आहे. तुम्ही एरवी धार्मिक असाल, चांगले सहजयोगी असाल तरीही सहस्राराची ही स्थिती जोपर्यंत तुम्ही मिळवत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला शाब्बास ट्र आहे म्हणणार नाही आणि हे तुमचे तुम्हालाच घडवून आणायचे आहे. त्यासाठी ध्यान फार महत्त्वाचे आहे. प.पू.श्रीमाताजी, ४ मे १९९७, कबेला सहस्रार स्वच्छ ठेवण्यासाठी तुमचे हृदय उघडले पाहिजे. तुमचे हृदयच जर उघडले नाही, तर ते कसे भरणार? तुमचे योगी बंधु-भगिनींसाठी तुम्ही हृदय उघडे केले पाहिजे. मागे माझ्या प्रेमाने मी तुमच्या बाबतीत घडलेल्या घटनेमुळे जर तुम्ही चिंतित असाल तर अशा घटना सहजयोगात घडणार नाहीत. ते अशा तऱ्हेने घडविले आहे. जर एक हात दुखत असेल तर त्याची काळजी घ्यायला दुसरा हात आहे. तुम्ही काही एकटे नाही. तुम्ही सामूहिकतेच्या शरीरात आहात. जर कोणी मूर्ख व बावळट लोक असतील तर अशांसाठी सहजयोग नाही. संस्कृतमध्ये त्यांना 'मूढ' म्हणतात. तसेच जे अतिशहाणे असतील व स्वत:ला फसवायचा प्रयत्न करीत असतील अशांसाठीसुद्धा सहजयोग नाही. मानवी बुद्धीमध्ये कसेही फिरण्याची क्षमता आहे. तसेच जे लोक असहजपणे वागत असतील त्यांच्यासाठी पण सहजयोग नाही. हळूहळू त्यांच्या चैतन्य लहरी जातील. तुम्ही आजारी पडाल. तुमच्या पुढे समस्या येतील व तुम्ही अडचणीत याल. ही तुम्हाला वॉर्निंग नाही, तर विनंती आहे. प.पू.श्रीमाताजी, ५/५/१९८७ सहजयोगामध्ये लोकांनी सामूहिकतेत राहायला शिकले पाहिजे. आपण सामूहिकतेत असणे फार महत्त्वाचे आहे. हे माझंे आहे, हे माझ्या मालकीचं आहे असे आपण कधीच म्हणू नये. अगदी मुलांच्या बाबतीतसुद्धा तुम्ही असे करू नये. हा माझा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, हे 'माझे' निघून गेलं पाहिजे, परंतु हे शक्य नाही. हे विसरणे सोपे नाही. कारण यासाठी आपली डावी व उजवी नाभी व्यवस्थित असणे आवश्यक आहे. यासाठी 'आई हे सर्व काही तुझेच आहे' असे. हा मार्ग आहे. हे असे म्हणण्यात काही धोका नाही कारण जे तुमचे आहे, ते मी कधीच घेणार नाही. प.पू.श्रीमाताजी, ५/५/१९८७ प्रथम आपण जाणीव ( कॉन्सशनेस) समजून घेतली पाहिजे. आपल्या सर्व आवडी-निवडी, विचार, माहिती व ज्ञान साठवणारी जाणीव लीव्हर जवळील पडद्यामध्ये साठवलेली असते. ती उन्नत स्थितीला आल्यावर आपल्याला ज्ञान येते. यावेळी आपण मेंद न वापरता म्हणजे विचार वगैरे न करता कृती करतो. कारण त्यावेळी आपला मेंद अत्यंत संवेदनक्षम झालेला असतो. उदा. अचानक वाटू २१ लागलेली भीती. ही जाणीव अधिक उन्नत झाली, की आपल्यामध्ये आवडी-निवडी निर्माण होतात. इतरांबद्दल आपण द्वेष बाळगतो. आपल्याला त्रास देणार्या व्यक्तीचा कसा समाचार घ्यावा इ.विचार करू लागतो. पण अशी जाणीव अंधारातून प्रेरणा देत राहते. प्रकाश नसल्यावर आपल्याला नीट स्पष्ट दिसत नाही. तसे आपण चुकीच्या गोष्ट्री करीत राहतो. प्रकाश असला, की आपल्याला सर्व काही नीट दिसते. पण अंधारात (अज्ञान) माणूस कसा वागेल याचा भरवसा देता येत नाही. जनावरे अशी नसतात. त्यांना काही भयानक किंवा विचित्र दिसले तर ती हल्ला करतील किंवा पळून जातील. माणसाला अहंकार दिलेला आहे. अहंकारी माणसाला आपण काय करतो व म्हणतो तेच बरोबर आहे, असे वाटते. एखाद्याला ओरडले, मारले तरी त्याला काही चुकले असे वाटत नाही. उलट्या प्रवृत्तीचा माणूस घाबरट असतो व न आवडणाच्या माणसाच्या नजरेस येण्याचे ही टाळतो. अशा तऱ्हेने दूसर्या माणसाबद्दलची प्रतिमा आपण मनात साठवत राहतो. ही जाणीव पुढे सामूहिक स्तरावर ही कार्य करू लागते. आपल्याला एखाद्या जातीचे वा वर्णाचे लोक आवडत नाहीत. हे याचेच उदाहरण म्हणता येईल हे आणखी वाढत गेले, की गोऱ्या लोकांना काळ्या लोकांचा द्वेष असतो. हिटलरसारख्या माणसाला ज्यू लोकांचा संहार करावासा वाटला. असे प्रकार होऊ लागतात. म्हणून प्रत्येक माणसाला सत्य समजणे हे फार महत्त्वाचे आहे. प.पू.श्रीमाताजी, ९/५/१९९९, कबेला चित्त योग्य गोष्टीकडे असले, की तुम्ही आनंद मिळवू शकता. केंटाळा वाटत नाही. त्यामुळे तुमचे चित्त इतर क्षुद्र गोष्टीतून आनंदाकडे राहते. दुसऱ्यालाही तो दिल्यामुळे त्याचाही कंटाळा निघून जातो. मित्र बिघडलेला असेल. त्याचा ही तुम्ही आनंद घेऊ शकता. त्याबद्दल टीका करू नका. मग एखादा तुमचे मन तिरस्कारात न अडकता ते एका माधुर्याकडे वळते. हीच ती तुरिया अवस्था. तुम्ही तुमच्या मजेत राहता. कबीराने म्हटले, 'मस्त हुए तो क्या बोले,' तसा स्वभाव असावा. दुसर्याचा आदर राखा म्हणजे आनंद वाटेल. आम्ही कोणी उच्च आहोत हे दाखवू नका, मग हे आवडते ते आवडत नाही असे वाटत नाही, मी असे लोक पाहिले की, ज्यांना जुजबी ज्ञान असते. पण असा आव आणतात की त्यांना सर्व ज्ञात असते व लगेच कशावर ही शेरेबाजी करतात. टीका करतात. हे अगदी सामान्यपणे दिसून येते. पण तुमच्या शुद्ध ज्ञानामुळे तुम्ही अतिशय नम्र असता तुमचे माधुर्य दिसते, मवाळ व दयाळू असता. एकूण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प.पू.श्रीमाताजी, ७/५/२०००, कबेला २२ मा आपण आपल्या गुरूली सागराच्या रुपात मानतो. सागर आपले पिता आहेत. संपृर्ण विश्वाद्वारे टाकलेली घाण आपल्यामध्ये बुडेवून ढेगांच्या रूपात जेव्ही समूुद्र आकाशीत जाती तेव्हा तो अत्यंत शुद्ध आणि सुंदर बनती. (प.पू.श्रीमाताजी, देवी पूजा, धर्मशाळा, २६.३.१९८५) प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in , website : www.nitl.co.in ४ पृथ्वी तत्त्व अत्यंत पविन्न तत्त्व आहे आणि शोषन घेणे ही त्याची शक्ती आहे. इतर कोणतेही तत्त्व शोबून घेण्यामध्ये इतके सशक्त नाही. पृथ्वी आपली आई आहे. ४ प.पू.श्री माताजी, पुणे, २६.२.१९७९ ा न ०ी १० मुव ---------------------- 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-0.txt चैतन्य लहरी मराठी जुलै-ऑगस्ट २०१४ म स ा ६. को 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-2.txt या अंकाल श्री हनुमानासारखे दैवत - चिरंतन बालक ... ४ सहस्राराचा प्रकाश हे ब्रह्मरंध्र आहे ... १७ नम्रता सर्वप्रथम आहे. विनम्र व्हायचे आहे. अल्यंत्र विनम. तुम्हाला प.पू.श्रीमाताजी, इटली, e० जुलै १९९७ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-4.txt े फ्रैंकफर्ट, ३१ /८/ १९९० श्री हनुमानासारखे दैवत - चिरंतन बालक Eा 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-5.txt श्री हनुमान हे आपल्या शरीरामधील महान चरित्र आहे. ते स्वाधिष्ठानापासून ते थेट आपल्या मेंदूपर्यंत असतात आणि आपल्या भविष्याच्या नियोजनासाठी लागणारे सर्व जरुरीचे मार्गदर्शन किंवा बौद्धिक क्रियांचा ते पुरवठा करतात. ते आपल्याला मार्गदर्शन देतात आणि रक्षण करतात. जर्मनी ही अशी जागा आहे की जिथे लोक खूप कार्यक्षम असतात, खूप उजव्या बाजूकडे असतात त्यांच्या शरीराचा जास्त वापर करतात आणि यंत्राकडे खूप कल असलेले असतात. ही फार आश्चर्याची गोष्ट आहे, की श्री हनुमानासारखे दैवत जे चिरंतन बालक आहे, माकडासारखं आहे, त्याने मानवाच्या उजव्या बाजूला असावं. त्यांना सांगितले गेले होते, की त्यांनी सूर्याला काबूत ठेवावे. त्याला जास्त शीतल, सौम्य बनवावे. जेव्हा ते जन्मले त्यावेळी त्यांना सांगितले गेले होते, की त्यांनी सूर्याची काळजी घ्यावी. तेव्हा बालक असल्याने त्यांनी विचार केला की त्याला खाऊन का टाकू नये. ते विराटाच्या अंगावर धावत गेले आणि सूर्याला गिळलं. कारण त्यांना वाटलं की त्यांच्या पोटातच असल्यावर सूर्याची नीट काळजी घेता येईल. उजवी बाजू ताब्यात ठेवण्यासाठी केलेली त्यांची ही बालकासारखी वर्तणूक, हे त्यांच्या चरित्रामधलं सौंदर्य आहे. सर्वसाधारणपणे उजवीकडील लोकांना मुले होत नाहीत. ते उजव्या बाजू बाहेर असतात आणि जर त्यांना मुलं झाली तर मुलांना ते आवडत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या मुलांसाठी वेळ नसतो. ते नेहमी खूप कडक शिस्तीचे असतात आणि त्यांच्यावर ओरडतात आणि त्यांना मुलांना कसं हाताळायचं ते कळत नाही किंवा मग ते जास्त लाड करणारे असतात. कारण त्यांना वाटतं, की 'मला हे कधीही मिळालं नाही, तर ते मला माझ्या मुलांना देऊ दे.' तर या अत्यंत उजवीकडे झुकलेल्या लोकांना हनुमान मिळाले आहेत, जे बालक आहेत. ते रामाचे सर्व कार्य करण्यासाठी अती आतूर आहेत. श्री राम हे संतुलनाचे परिपूर्ण असं चरित्र आहे. सॉक्रेटिसने वर्णन केलेला 'हितकारी राजा' ते आहेत. त्यांना सचिव म्हणून त्यांच्या बरोबर कोणीतरी हवं होतं. श्री हनुमान हे ते होत ज्यांची या कामासाठी निर्मिती केली गेली. ते अशा प्रकारचे श्रीरामांचे सेवक आणि सहाय्यक होते. आपल्या मालकाबद्दल सेवकसुद्धा इतके स्वत:ला अर्पण करीत नसतील. श्री हनुमानांना नऊ सिद्धी मिळाल्या होत्या. या सिद्धी अशा होत्या की ते आकाराने मोठे होऊ शकत होते. ते इतके वजनदार होऊ शकत होते, की कोणीही त्यांना उचलू शकत नव्हतं. ते अदृश्य होऊ शकत होते, वगैरे. एखादी व्यक्ती जी खूप उजवीकडे आहे, तिला श्री हनुमान या सिद्धीनी काबूत ठेऊ शकतात. आता एखादा मनुष्य जो त्यांच्या जीवनात फार जोरात पळतो आहे, त्याला तुम्ही कसे ताब्यात घेऊ शकता ? श्री हनुमान त्याला अशाप्रकारे करतात, की ६ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-6.txt त्याला त्याची गती कमी करावी लागते. ते त्याची पावलं खुप जड करतात किंवा त्याचे हात इतके जड करतात, की ती व्यक्ती त्याच्या हाताने जास्त काम करू शकत नाही. फार उजवीकडच्या व्यक्तीला ते विलक्षण आळसावलेले जडत्व देऊ शकतात. दसरी सिद्धी ही की ते त्यांची शेपटी कितीही लांब करू शकतात आणि तिने लोकांना हाताळू शकतात. त्यांच्या शेपटीचा उपयोग ते बसण्यासाठी करतात. त्यांची शेपटी ते एखाद्या डोंगराप्रमाणे त्यावर ते बसतात. त्यांच्याकडे ह्या साऱ्या तुम्ही म्हणता तशा माकडचेष्टा आहेत. नंतर ते गुंडाळून हवेतही उडू शकतात. ते इतके मोठे होऊ शकतात, की त्यांनी बाजूला सारलेल्या हवेला त्यांच्या स्वत:च्या वजनाहून जास्त वजन असतं. ते आर्किमिडीजच्या तत्त्वासारखं आहे. ते इतके मोठे होतात, की त्यांचे शरीर हवेमध्ये होडीसारखं तरंगू शकतं. हवेत उडून ते एकीकडून दुसरीकडे संदेश पाठवू शकतात. आपल्यामध्ये जे आकाशतत्त्वाचं सूक्ष्मतत्त्व असतं ते श्री हुनुमानांच्या अधिपत्याखाली असतं. ते आकाशतत्त्वाच्या सूक्ष्मस्तराचे अधिपती आहेत आणि त्यामधून ते संपर्क साधतात. आपल्यामधे आढळणारी सर्व संपर्काची साधने ज्या वाहिनीविरहीत ग्रंथी आहेत, ज्या पिट्युटरी ग्रंथीद्वारे उपयोगात आणल्या जातात, तेदेखील श्री हनुमानांच्या हालचालींद्वारे होतात, त्याचं कारण ते निराकार स्थितीमध्ये, आकारहीन स्थितीत जाऊ शकतात. तसंच हा माईकचा संपर्कसुद्धा. लाऊडस्पीकर घ्या. आपल्याकडे टी.व्ही. आहेत. रेडिओ आहेत ज्यावर आपण आकाशत्त्वामधलं काहीही पकडतो. ते सर्वकाही श्री हनुमानांचे आशीर्वाद आहेत आणि ते उजव्या बाजूकडील लोकांसाठीच उपलब्ध आहेत.. फक्त उजवीकडील व्यक्ती कॉर्डलेस फोन, तारा, वायरलेस अशा अवकाशातील गोष्टींचा शोध लावू शकतात. कनेक्टर-संपर्क साधण्याच्या साधनाशिवाय ते हे साधू शकतात. तर अशा प्रकारच्या सर्व अवकाशीय जोडणी या महान इंजिनियर श्री हनुमान यांचेकडून केली जाते. ते इतके अचूक आहेत, की तुम्ही त्यांच्यात दोष काढू शकत नाही किंवा आव्हान देऊ शकत नाही. कदाचित तुमचं साधन बरोबर नसेल, पण जर त्यांचे अवकाशाशी संबंधित कार्य पाहिलं तर ते अगदी बरोबर असेल. शास्त्रज्ञ शोध घेतात आणि विचार करतात, की ते नैसर्गिकच आहे. पण ते हे कसं होतं ? याचा विचार करू शकत नाही. आपण असं म्हणू शकतो की इकडे काहीतरी आहे किंवा आपण काहीतरी प्रक्षेपित करतो आणि ज्यामुळे तिकडे टी.व्ही. वर ते दिसतं. पण हे सर्व कार्य श्री हनुमानाद्वारे होतं, ७ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-7.txt ज्यांनी हे सारं सुरेख जाळं तयार केलं आहे आणि या जाळ्यामुळे या सर्व गोष्टी कार्यान्वित होतात. आपल्या अणूंवर मिळणारे व्हायब्रेशन्ससुद्धा ज्याप्रमाणे सल्फरडाय ऑक्साईडमध्ये ऑक्सिजन असतो, जो कंपन पावतो आणि असिमेट्रिक आणि सिमिट्रिक प्रकारची व्हायब्रेशन्स असतात. हे सर्व तुम्हाला माहीत आहे, पण ही व्हायब्रेशन्स कोणामार्फत निर्माण केली जातात ते कोणालाही माहीत नाही. तर ती सारी हनुमानांनी निर्माण केली असतात त्यांच्या सूक्ष्ममार्गाने. त्यांच्याकडे आणखी एक महान सिद्धी आहे, ती म्हणजे अणिमा. त्याचा अर्थ ते अणू- रेणूंमध्ये प्रवेश करू शकतात. बऱ्याच शास्त्रज्ञांना वाटतं, की त्यांनी अणूरेणूचा शोध नव्या युगामध्ये लावला आहे, पण अणूरेणूंचे वर्णन आपल्या जुन्या ग्रंथांमध्येही आढळते. जिथे जिथे तुम्ही विद्युत चुंबकीय प्रवाह कार्य करताना पाहता तो नेहमी हुनामानाच्या आशीर्वादानेच कार्यान्वित होतो. ते विद्युत-चुंबकीय शक्ती निर्माण करतात. श्री गणेशांमध्येही चुंबकीय शक्ती असते. ते लोहचुंबक आहेत. आपण असे म्हणू शकतो की विद्युत-चुंबकीय ही हनुमानाची शक्ती आहे. जड वस्तूंवर ती आहे. पण पदार्थापासून मात्र ती मेंदूपर्यंत जाते. स्वाधिष्ठानपासून ते मेंदूकडे जातात. मेंदूतही ते आपल्या मेंदच्या वेगवेगळ्या भागांचे संधान घडवून आणतात. त्यांनी आपल्याला अशा कितीतरी गोष्टी दिल्या आहेत. जर गणेशांनी आपल्याला सुज्ञता दिली, तर हनुमान आपल्याला विचार करण्याची शक्ती देतात. आपण वाईट गोष्टींचा विचार करू नये यासाठी ते आपले संरक्षण करतात. जर गणेशांनी आपल्याला सुज्ञता दिली तर श्री हनुमान आपल्याला सद्सद्विवेकबुद्धी देतात. सुज्ञता म्हणजे जिथे तुम्हाला सद्सद्विवेकबुद्धीची जास्त जरूर पडत नाही. कारण तुमच्या सुज्ञतेमुळे, हुशारीमुळे काय चांगलं, काय वाईट ते तुम्हाला कळतं. परंतु आपल्या व्यक्तित्वासाठी सद्सद्विवेकबुद्धीची गरज आहे. जिथे त्याला संयमित ठेवायचे असते आणि हे संयमन श्री हनुमानांकडून येते. ते मानवामधील सद्सद्विवेकबुद्धी आहेत. ही सद्सद्विवेकबुद्धी जी हनुमानाच्या सूक्ष्म स्वरुपात आपल्यात असते, ती आपल्याला सत्य आणि असत्य यामधील फरक योग्यप्रकारे जाणणारी बुद्धी देते. सहजयोगाच्या पद्धतीमध्ये आपण श्री गणेशांना अध्यक्ष म्हणतो, जसे विद्यापीठाचे कुलगुरू. ते आपल्याला पदवी बहाल करतात आणि आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत ते समजण्यास मदत करतात. ते आपल्याला निर्विचार समाधी, निर्विकल्प समाधी आणि आनंद देतात. पण मानसिक समज, 'हे चांगलं , हे हितकारक आहे,' आपल्याकडे हे श्री हनुमानांकडून येतं आणि पाश्चात्त्य लोकांसाठी हे फार महत्त्वाचं आहे कारण हे मानसिक आहे, नाहीतर त्यांना ते कळणार ८ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-8.txt नाही. ते जर मानसिक नसेल तर ते निराकारात येऊ शकत नाही. त्यांच्याशिवाय तुम्ही संत झालात, तर ठीक आहे की तुम्ही संतपणाचा आनंद उपभोगाल, पण संतपणा, ठीक आहे तुम्ही हिमालयात रहात असाल, पण तुम्ही लोकांना आत्मसाक्षात्कार देण्यासाठी गेलात तर बरोबर आहे. तेव्हां, हे सगळं म्हणजे विवेकबुद्धी, संरक्षण, मार्गदर्शन श्री हनुमानच आपल्याला देतात. जर्मनी हा असा देश आहे, जो जास्त करून उजव्या बाजूचे मूलतत्त्व आहे, त्यामुळे त्यांची पूजा करून उजव्या बाजूचे संरक्षण मिळणं फार महत्त्वाचं आहे. पण या सर्व विवेकबुद्धीमध्ये त्यांना एक गोष्ट माहीत आहे, की ते श्रीरामांचे पूर्णपणे समाधान करू शकत नाहीत. श्रीराम कोण आहेत ? ते एक हितकारी राजा आहेत. ते हितासाठी कार्य करतात आणि ते औपचारिक राजा आहेत. ते स्वत:ला पुढे करीत नाहीत. ते खूप संतुलित आणि समतोल व्यक्ती आहेत. श्री हनुमान हे श्रीरामांचं काम करण्यासाठी नेहमीच आतुर होते. जेव्हां श्रीरामांनी लक्ष्मणाच्या जीवदानासाठी संजीवनी आणायला सांगितली तेव्हा त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून आणला आणि म्हणाले, 'घ्या.' तर अशा प्रकारची व्यक्ती श्री हनुमान होते. ते एखाद्या लहान बालकाप्रमाणे होते. श्रीराम जे म्हणतील ते ते करत. मी तर म्हणेन एखाद्या गुरू-शिष्याप्रमाणे होते. त्याहूनही जास्त. शिष्य हा दुसऱ्याला पूर्ण समाधान देण्याची उत्कट इच्छा असणारा सेवक आहे. देवाला पूर्णपणे शरणागत असलेला. त्यांची मुख्य गोष्ट आहे शरणागती. उजव्या बाजूकडील लोक सर्वसाधारणपणे परमेश्वराला शरण जातात. तसेच ते त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या कामाला, त्यांच्या पत्नीला शरण जातात, पण ते चुकीच्या लोकांना समाधानी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तारतम्य नसते. जर तुम्ही श्री हनुमानांची मदत घेतली तर ते तुम्हाला सांगतील, की तुम्हाला सर्व शक्तिमान देवाला शरण गेलं पाहिजे. दुसर्या कोणाला नाही किंवा श्रीरामासारख्या असणाऱ्या तुमच्या गुरूला. मग तुम्ही स्वतंत्र पक्षी आहात आणि सर्व नऊ शक्त्या तुमच्यामध्ये असतात. उतारा करतात. लोकांचा अतिशय विचार करणं आणि तुमचा अहंकार यावर श्री हनुमान अहंकार ते कसा नष्ट करतात हे त्यांनी जेव्हा पूर्ण लंका जाळली आणि रावणाची कशी चेष्टा केली त्यात फार मधुर रीतीने दर्शविले आहे. कारण जो कोणी अहंकारी असेल त्याची चेष्टा केली पाहिजे, मग तो ठीक होतो. जेव्हा रावणाने विचारले, 'तू कोण आहेस? नुसतं माकड!' तेव्हा हनुमानाने त्यांची शेपटी रावणाच्या नाकाकडे नेली आणि गुदगुल्या केल्या. तेव्हा हनुमान ही एक अशी व्यक्ती आहे जी अहंकारी लोकांची चेष्टा करते. ९ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-9.txt हनुमान हे असे आहेत, जेव्हा कोणी अहंकारी तुहाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते त्याची चेष्टा करतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी व्यक्ती उड्या मारेल, जसे हम्प्टी-डम्प्टी खाली कोसळले, त्यांचा मुकुट तुटला. तेव्हा अहंकारी लोकांपासून तुमचे रक्षण करणं हे हनुमानाचे काम आहे आणि अहंकारी लोकांचेही रक्षण ते त्यांचा पाणउतारा करून करतात. जसे सद्दाम हुसेन. सद्दाम हुसेन यांच्या बाबतीत मी हनुमानांना फक्त काम करायला सांगितले , कारण मला माहीत होतं की ते करतील. त्यांनी सद्दामला अशा कठीण परिस्थितीमध्ये टाकलं की त्याला काय करायचं हे कळलं नाही. कारण समजा तो म्हणाला, 'मी लढाई करेन,' तर पूर्ण इराक नष्ट होईल. तो नष्ट होईल. कुवेत नष्ट होईल. सगळं पेट्रोल नष्ट होईल आणि सर्व अडचणीत पडतील. सद्दामचं काय? तो असणार नाही कारण जर अमेरिकन लोकांना लढाई करायची असली तर ते त्याच्या देशांत जाऊन लढतील. ते काही अमेरिकेत लढाई करणार नाहीत. तर आता हनुमान सद्दामच्या मेदूवर काम करीत आहेत आणि त्याला सांगत आहेत की 'आता पहा, तू असं केलंस तर असं होईल.' तो सर्व राजकारणी मुत्सद्यांच्या, अहंकारी लोकांच्या मेंदूवर काम करतो आणि मग कधी कधी ते त्यांची धोरणे बदलतात. ते वळतात आणि तशा प्रकारे ते काम घडतं. श्री हनुमानांचा दुसरा गुण म्हणजे ते लोकांना घडवतात. ते लोकांची भेट घडवून आणतात. ते दोन अहंकारी लोकांचीही भेट घडवून आणतात आणि अशी परिस्थिती निर्माण करतात, की ते दोघे मित्र बनतात, सौम्य होतात. त्यांचे आपल्यामधील पूर्ण व्यक्तित्व आपल्यातील अहंकार ओळखण्याची क्रिया करतात. 'ओहो, हा माझा अहंकार आहे जो काम करतो.' आणि नंतर एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदी, मधुर होतो. ते नेहमी नाचण्याच्या मूडमध्ये असतात. ते नेहमी नाचतच असतात. श्रीरामांसमोर ते नेहमी खाली मान घालून असतात आणि नेहमी श्रीरामांच्या इच्छेप्रमाणे कार्य करतात. म्हणूनच जर श्री गणेश माझ्या मागे उभे असतील तर श्री हनुमान माझ्या पायाशी उभे म्हणजे जसे, मी म्हणेन, जर जर्मनी - जसे फिलीप म्हणाला, की जर्मनी हनुमानासारखी असतात. असली असती तर आपल्याकडे किती प्रभावी शक्ती असती. श्री हनुमानांचा श्री रामाप्रती निष्ठा असणारा स्वभाव आपल्याला दिसतो, तुम्हाला ती गोष्ट माहीत आहे, की जेव्हा सीतेने हनुमानांना एक हार दिला परंतु त्यात श्रीराम नसल्यामुळे त्यांनी तो घातला नाही. सीतेला वाटलं की, ते सारखे अवतीभोवती असतात आणि तिच्या एकांतावर अतिक्रमण होतं. म्हणून तिने हनुमानांना सांगितले की फक्त एका कामासाठीच त्यांनी यावं. प्रत्येक काम १० 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-10.txt करण्याची गरज नाही. तिने त्यांना आवडतं काम निवडण्यासाठी सांगितलं. ते म्हणाले की, 'मला फक्त श्रीरामांबरोबरच राहायला आवडेल. त्यांना शिंक आली, त्यांना जांभई आली तर मी असं करेन. (चुटकी वाजवेन)' सीताजींना वाटले की हे तर फार छोटं काम आहे. हे झालं की तो दृष्टीआड होईल. म्हणून त्यांनी अनुमती दिली. हनुमानजी तिथेच उभे राहिले. तेव्हा सीतामाई त्यांना म्हणाल्या, 'आता तू इथे का उभा आहेस?' तेव्हा ते म्हणाले, 'मी त्यासाठीच (कामासाठी) तर उभा आहे. जाणार कसा ? सीताजींनी आधीच त्यांच्या कामासाठी परवानगी दिल्याने त्या आपला शब्द परत मागे घेऊ शकत नव्हत्या. म्हणूनच श्री हनुमान श्रीरामांच्यासमोर नेहमीच त्यांची आज्ञा घेण्यासाठी उभे असलेले दिसतात. सहजयोगामध्ये माझा तुमच्याशी एक गुरू म्हणून, तुमची आई म्हणून संबंध आहे , यापेक्षाही अजून काही अमर्यादित संबंध आहे , पण सध्यातरी आपण फक्त एक गुरू आणि आई या संबंधांचा विचार करू. गुरू म्हणून माझी मुख्य वेदना ही आहे की तुम्ही सहयोगाविषयी सर्व काही शिकून घ्यावे. तुम्ही सहजयोगात निष्णात व्हावे आणि तुम्ही स्वत: गुरू व्हावे. पण यासाठी तुम्हाला पूर्णपणे शरण जावे लागेल. 'इस्लाम' म्हणजे शरणागती. जर तुम्ही शरणागत असाल तरच तुम्हाला कळेल की सहजयोग कसा हाताळायचा. ही शरणागतीसुद्धा श्री हनुमानामुळेच घडवली जाते. तेच आहेत, की जे तुम्हाला शरणागत कसं व्हायचं ते शिकवतात किंवा तुम्हाला शरणागत करतात. कारण अहंकारी लोक शरण जात नाहीत. मग ते काहीतरी अशी अडचण, चमत्कार किंवा चेष्टा करतात की ज्यामुळे शिष्य गुरूला शरण जाईल. त्याची गुरूला शरण जाण्याची शक्तीसुद्धा श्री हनुमानाचीच असते. ते फक्त स्वत: शरणागत नाहीत, तर ते दुसऱ्यांनाही शरण आणतात. कारण अहंकारामुळे तुम्ही शरण येत नाही. म्हणून ते तुमच्या अहंकाराशी लढतात व त्याला खाली पाडतात आणि तुम्हाला शरण आणतात. त्यांच्या स्वत:च्या अभिव्यक्तीत मी म्हणेन, की त्यांनी दाखवून दिले आहे, की उजव्या बाजूला अतिशय सुंदर भाग आहे. जर त्याला पूर्णपणे उपभोगायचे असेल, तर तुमच्या गुरूला तुम्ही पूर्णपणे शरण गेलं पाहिजे, जसे काही तुम्ही त्या गुरूचे सेवक आहात. गुरूंसाठी जे काही करावं लागेल ते न लाजता तुम्ही केलं पाहिजे. अर्थात् गुरूने तुम्हाला कमीत कमी ११ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-11.txt आत्मसाक्षात्कार दिला पाहिजे, नाहीतर तो गुरू नाही. तुम्ही गुरूला कसे खूष करणार आणि त्या गुरूच्या कसे जवळ जाणार... शारीरिक जवळीक म्हणत नाही मी पण, एक प्रकारची एकतानता, एक प्रकारची समज... जे माझ्यापासून खूप दूर असतात त्यांना त्यांच्या हृदयात माझी जाणीव असते. ही शक्ती श्री हनुमानांकडून आपल्याला घेतली पाहिजे. हनुमान हे आहेत जे तुमच्याबरोबरच सर्व देवतांचेही रक्षण करतात. श्री गणेश आणि श्री हनुमान यांच्यात हा फरक आहे की श्री गणेश शक्ती देतात, पण श्री हनुमान रक्षण करतात. जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी होते तेव्हा रथावर श्री हनुमान बसले होते, श्री गणेश नाही. ते रथावर त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी बसले होते. तसेच एक प्रकारे श्रीराम स्वतःच श्री विष्णू होते, तर त्यांच्याकडेही ते लक्ष देत होते. ते देवदूत होते. ख्रिश्चन ग्रंथ बायबलनुसार ते गॅब्रीएल होते. गॅब्रीएल हे एक संदेशवाहक होते आणि ते मारीयासाठी संदेश आणत असत आणि त्यांनी 'इमॅक्युलेट सालवे' हा शब्द वापरला जे माझे नाव आहे. माझे पहिले नाव निर्मला म्हणजे इमॅक्युलेट आणि आडनाव साळवे आहे. मारियाला तिच्या आयुष्यात हनुमानाबरोबर बरेच काही करावे लागले होते. मारिया ही महालक्ष्मी आहे, जी सीता आहे, नंतर राधा. हनुमानाला तिची सेवा करण्यासाठी रहावं लागतं. म्हणून काही वेळा लोक म्हणतात, 'श्री माताजी तुम्हाला कसं कळतं? श्री माताजी तुम्ही निरोप कसा पाठवला? श्री माताजी हे तुम्ही कसं कार्यान्वित केलं?' ही सगळी श्री हनुमानाची डोकेदुखी आहे . माझ्या मनातून काही गेलं की ते ते काढून घेतात आणि ते होतं. कारण सगळी संघटना इतकी व्यवस्थितपणे आखलेली आहे. हे सर्व निरोप. ते कुठून येतात? बरेच लोक सांगतात, 'आई मी फक्त तुमची प्रार्थना केली.' एक गृहस्थ होते. ज्यांची आई कॅन्सरने अतिशय आजारी होती. ते तिला बघायला गेले. काय करायचं हे त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी फक्त प्रार्थना केली, 'श्री माताजी, कृपा करून माझ्या आईला वाचवा.' सहजयोगी म्हणून या व्यक्तीचा प्रामाणिकपणा आणि गहनता हनुमानांना माहीत आहे. या व्यक्तीचं वजन त्यांना माहीत आहे आणि ताबडतोब तीन दिवसांमध्ये ती जगली आणि तिला मुंबईला आणण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सर ठीक झाला आहे. अनेक गोष्टी ज्यांना तुम्ही चमत्कार म्हणता ते श्री हनुमानांनी केलेले असतात. ते आहेत जे हे चमत्कार करतात. ते चमत्कार तुम्हाला दाखवण्यासाठी करतात की तुम्ही किती वेडे आहात, किती मूर्ख आहात. कारण ते उजवीकडे असतात. बघा, ते अहंकाराच्या बाजूने गेले आहेत. १२ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-12.txt अहंकाराने माणूस नेहमी मूर्ख बनतो, मूर्खासारख्या गोष्टी करतो. हे अपरिहार्य आहे. आपल्याला तो असं का करतो ते समजत नाही. मूर्खपणासारखे वागून परत 'काय झालं ?' असे विचारतो जे हनुमानांना आवडत नाही. मग ते परत सगळं गुंडाळतात. नंतर त्यांना कळतं की त्यांनी किती मोठी चूक केली आहे किंवा वेडेपणा केला आहे. पण काही वेळा परत मागे जाणं अतिशय कठीण असतं. जसं यिप्पीज डिसीज मध्ये. कारण या लोकांमधील हनुमानांनी विद्युत चुंबकीय शक्ती मागे घेतलेली असते आणि ती काम करीत नाही. तुमच्या चेतनावस्थेतील मनाशी संबंध राहत नाही. त्यामुळे तुमचे चेतीत मन काम करू शकत नाही. ते फक्त दूर जातं. फक्त जर अशा लोकांनी श्री हनुमानांची भक्तीभावाने पूजा केली तर कदाचित ते वाचू शकतील. पण अशा लोकांना सर्व गोष्टी समजावणे ही सोपी गोष्ट नाही. ते ' आमचा विश्वास नाही' असे म्हणतात. श्री हनुमानांची बरीच अंग आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे. पण एक उदाहरण म्हणजे त्यांचे शरीर, तुम्ही बघाल गेरूने आच्छादलेल्या शिवाप्रमाणे. गेरू हा लाल दगड जो खूप खूप गरम असतो. सर्दीमुळे कधी कधी पुरळ (रॅशेस) येतात, त्यावर जर तुम्ही गेरू लावलात तर ते पुरळ बरे होतात. तसेच बाधेमुळे होणारे त्वचेचे रोग गेरूमुळे बरे होऊ शकतात. या उलट श्री गणेशांचे लाल लेड ऑक्साईडने लेपन केले असते. जे अत्यंत थंड असते. त्यांच्यामधील उष्णतेचं संतुलन करण्यासाठी किंवा उष्णतेचे परिणाम कमी करण्यासाठी ते लावले जाते. संस्कृत तसेच हिंदी आणि मराठीत त्याला सिंदूर म्हणतात. ते नेहमी लाल रंगाचे असते. श्री गणेशांवर याचेच आच्छादन असते. लोक म्हणतात की लेड ऑक्साईडमुळे कॅन्सर होतो, पण ते थंड असते आणि ते तुम्हाला इतकं थंड करू शकतं की तुम्ही डावीकडे जाऊ शकता. कॅन्सर हा सायकोसोमॅटिक रोग आहे आणि म्हणूनच दूरपर्यंत आपण म्हणू शकतो की त्याने कॅन्सर होऊ शकतो कारण तो इतका थंड असतो, की तुम्ही डावीकडे जाता तिथे विषाणू तुम्हाला पकडू शकतात, ज्यांच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. पण तेच ऑक्साईड जे लोक खूप डावीकडे असतात त्यांच्यासाठी बरोबर असतं. ते त्यांच्या आज्ञेवर लावलं की ते थंड होतात. त्यांचा राग कमी होतो. श्री हनुमान हे आपला राग बरा करतात. आपली घाई, आपली गती, आपली आक्रमकता हे ही श्री हनुमानांमुळेच बरे होते. त्यांनी हिटलरबरोबरही खेळ खेळला होता, त्यांची खोडी काढली. हिटलर श्री गणेशाला प्रतीक म्हणून वापरत होते. स्वस्तिक घड्याळाच्या पद्धतीने बनवायला हवं होतं. श्री हनुमानांनी स्वस्तिक बनविण्यासाठी वापरण्याचं टेन्सिल उलट केलं. त्यांनी दसऱया बाजूला श्री गणेशांचा उपयोग केला. श्री हनुमानांना श्री गणेशांविषयी थोडी काळजी होती की ते १३ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-13.txt ऐकतील का? कारण ते ज्येष्ठ आहेत, देवता आहेत, पण हनुमानही देवदूत होते. पण लवकरच तो खेळ खेळला गेला. श्री गणेश आणि श्री हनुमान दोघांनी मिळून हिटलरला जिंकण्यापासून थांबवलं. म्हणून या छोट्या छोट्या खोड्या काढल्या जातात. मला आठवतं, एकदा जर्मनीमध्ये माझी पूजा ठेवली होती. जर्मनी ही जागा अशी आहे, जिथे श्री हनुमानजी अशा खोड्या जास्त करतात. कारण त्यांना त्यांची जास्त गरज आहे. पूजा होती आणि चुकून त्यांनी स्वस्तिक उलट बाजूने काढले. माझे लक्ष गेले नाही. सर्वसाधारणपणे मी नेहमी लक्ष ठेवते, पण त्या दिवशी कसं ते माहीत नाही मी ते पाहिलं नाही. हा सगळा हनुमानांचाच खेळ होता. मी जेव्हा ते पाहिलं तेव्हा म्हंटलं, 'अरे देवा, आता हे कुठे लागणार आहे. आता हे कुठे कार्यान्वित होणार आहे. कोणत्या देशाला आता ते मार देणार ?' पण तेव्हा जर्मनीला फटका बसला नाही, तो मार इंग्लंडला बसला. मी इंग्लंडमध्ये खूप जास्त कष्ट घेतले होते, पण ते सहजयोगाबाबतीत निष्काळजी होते. म्हणून त्यांना मार बसला होता. म्हणून श्री हनुमान जे प्रचंड जलप्रपातासारखे किंवा जोराच्या वादळासारखे जातात आणि गोष्टींचा नाश करतात, ते या सर्व गोष्टी त्यांच्या विद्युत चुंबकीय शक्तीमुळे करतात. सर्व भौतिक वस्तूंवर त्यांचे नियंत्रण आहे. ते तुमच्यासाठी पावसाची निर्मिती करतात. ते सूर्य, वारा यांची निर्मिती करतात. ते या सर्व गोष्टी, समारंभ व्यवस्थित होण्यासाठी, पूजा नीट होण्यासाठी करत असतात. तेच सर्व काही अत्यंत सुरेखपणे करतात, परंतु हे सर्व श्री हनुमान करतात हे कोणालाही समजत नाही. आपण श्री हनुमानांचे सतत आभार मानले पाहिजे. श्री हनुमान हे ऐश्वर्यशाली देवता किंवा देवद्त आहेत आणि याठिकाणी सर्वकाही अत्यंत राजेशाही व सुरेखरीत्या संपन्न झाले आहे आणि त्यांना हे सर्व आवडलेही आहे. ते संन्यासी प्रकारचे व्यक्ती नाहीत किंवा सर्वसंगपरित्यागी पण नाहीत. सर्वसाधारणपणे उजवीकडचे लोक सर्वसंगपरित्याग करणारे असतात. ते उजव्या बाजूचे लोक बनवतात, ते सर्व काही सहज सोपे करतात. तर दुसऱ्या बाजूने श्री हनुमान हे सर्व करीत नाहीत. त्यांना सौंदर्य आवडतं, सुशोभितता आवडते आणि लोकांना ते सर्वसंगपरित्यागाच्या उलट करतात. श्री हनुमान अशाप्रकारच्या गोष्टी देतात. श्री हनुमानांची भक्ती करणारे लोक म्हणतात, की बायकांनी श्री हनुमानांचे दर्शन कधीच घेऊ नये कारण ते ब्रह्मचारी आहेत आणि त्यांना बायकांनी बघू नये असे वाटते. कारण ते कमी खूप कपडे घालतात. पण जर स्त्रियांना वाटलं की ते फक्त एक बालक आहेत, तर ते तेच आहेत. पण लोकांकडे ते एक बालक आहेत अशी कल्पनाच नाही. लहान मुलाला काय - कपडे घातले काय १४ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-14.txt किंवा नाही घातले काय. आणि त्यातूनही ते मर्कटरूपात आहेत. माकडांनी कपडे घालायचे नसतात. त्यांची तुम्ही किती गोड आकृती पाहता, किती अफाट, किती मोठे, मोठी नखं असलेले पण जेव्हा माझ्या पायावरून हळूवार हात फिरवतात तेव्हा त्यांची नखे मागे सारतात. किती हळूवार असतात आणि सगळं काही किती हळूवारपणे सांभाळतात. आता मला असं वाटत आहे की जर्मन लोक सर्व गोष्टी हाताळण्यास, लोकांना हाताळण्यात अतिशय हळूवार, सभ्य झाले आहेत. हे परिवर्तन येत आहे आणि मला वाटतं हा श्री हनुमानांचा आशीर्वाद आहे. ाबड ४ १५ े कर 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-16.txt सहसीराचा प्रकाश हे ब्रहमरंध्र आहे ही भौतिकता अतिशय भयंकर आहे. ही अतिशय हास्यास्पद व लाजिरवाणी गोष्ट आहे. ती मानवाला शोभून दिसत नाही. कुत्रा सुद्धा ह्या भौतिकतेचा तिरस्कार करेल . मानव कोणत्या पातळीला येऊन पोहोचला आहे. ही भौतिकता माणसाला अत्यंत निर्लज्ज बनविते. एखाद्या र्त्रीला 'तुमच्याकडे माझा चमचा आहे का?' असे विचारतांना लाजसुद्धा वाटत नाही. भारतात आम्ही लहान असतांना सांगायचे, म्हणजे ही आमची संस्कृती आहे. जर एखाद्याची वस्तू आपल्याकडे असेल, तर आपण ती सांभाळली पाहिजे व परत केली पाहिजे आणि जर आपला हिरा जरी दुूसर्याकडे असेल, तरी तो मागायचा नाही. हा चांगला शिष्टाचार नाही. हिरा हा महत्त्वाचा नसून काय महत्त्वाचे आहे, तर चांगले संबंध, मैत्री व दुसर्यांच्या भावनांची कदर, तुम्ही असं कसं विचारू शकता ? जर त्यांना हिरा सापडला असता तर त्यांनी तो परत केला असतां! त्यांनी जर कांही विचारलेच नाही, याचा अर्थ हिरा नाही आणि १७ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-17.txt तो जरी असता, तरी हिरा म्हणजे काय? तुम्ही घातला काय किंवा त्यांनी घातला काय, काय फरक २हस२ पडणार आहे! है ब्रहम प.पू.श्रीमाताजी, ५ /५/५१९८७ उदा. मी तुम्हाला नाकात तूप सोडायला सांगितले होते. ती अगदी साधी गोष्ट आहे, पण महत्त्वाची आहे. कारण तुमचे हंसाचक्र फारच खराब आहे व एड्सच्या रोगाचे एक लक्षण म्हणजे खराब झालेले हंसा चक्र. तुम्हाला एड्सच्या रोगाचा धोका आहे. पण ही साधी गोष्टसुद्धा पाळली जात नाही. मी काय सांगते, ते ऐकणे तुमचे धार्मिक कर्तव्य आहे. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. माझे हात, माझी बोटं, माझे पाय, माझ्या आज्ञा ऐकतात. मग तुम्हाला मी मोठे योगी बनविले, मान-सन्मान दिला, आदिशक्तीच्या शरीरात धारण केले व माझ्या शरीरात तुम्ही पेशी आहात, तर मग तुम्ही का नाही पाळत. प.पू.श्रीमाताजी, ५/५/१९८७ विशेषत्त्वाची भावना सहजयोग्यांनी सोडून द्यावी. नुसत्या विचारातून नव्हे, मनातून. तुम्ही जरी सारखा मंत्र केला, 'मी विशेष नाही', 'मी कोणी नाही' मग गुंता अधिकच वाढेल, तुम्ही म्हणाल, 'माझ्यासारखा कोणी आहे का ? २३००० वेळा मी मंत्र जपला, 'मी कोणी तरी विशेष आहे, मोठा आहे.' मी या सर्व गटामध्ये कोणीतरी वरचढ आहे. ही कल्पना गळून पडते, जेव्हा समुद्रात पडलेला थेंब सागरात विलीन होतो, तुम्ही सागरच होता. तुमचे व्यक्तित्व संपते. काही परिमाण नाही, की ज्या परिमाणाने हा मोठा, हा लहान असा फरक करता येईल. यातूनच याला जगात समस्या निर्माण होतात. आपल्या भारतातील जातिवाद पहा. पाश्चिमात्य देशातील सामाजिक रचना वर्णभेद हेसुद्धा स्वत:च्या जाणिवेतून निर्माण झालेत. जसे माझाच धर्म श्रेष्ठ, तुमचा खालच्या दर्जाचा. आम्हीच श्रेष्ठ आहोत. यातून सर्व समस्या निर्माण झाल्या. त्याने काहीच साध्य झाले नाही. उलट नुकसानच झाले. केवळ नुकसान. तर सहजयोगात तरी या रोगाची लागण होऊ नये. मी श्रेष्ठ आहे, माझा देश श्रेष्ठ आहे. या भावना तुम्ही घालवा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य दिसू द्या. यासाठी तुम्हाला विशेषत्वाची जरुरी नाही, विशेष शरीराची जरुरी नाही किंवा देखणेपणाची ही नसून सुंदर हृदयाची जरुरी आहे. सुंदर हृदय सर्वांना आकर्षित करते. दुसरे काही नाही. तुमचे हृदय ही असेच हवे. असे लोक मला माहीत आहेत. एका सहजयोग्याने पहिल्या बायकोला घटस्फोट दिला. का? तर ती कुरुप आहे. बेढब आहे. मग त्याने एका सुंदर युवतीबरोबर लग्न केले, त्यानंतर तो घर सोडून पळून गेला. मी विचारले, 'आधीची कुरुप होती म्हणून तिला सोडले आता काय झाले?' तर तो म्हणाला, 'दूसरीला हृदयच नाही' आणि १८ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-18.txt अशाप्रकारे तुमचे हे ईश्वराने दिलेले हृदय अत्यंत उदार धार्मिकतेने भरलेले आहे . या देणगीचा तुम्ही व प्रकाश आदर केला पाहिजे. तुमच्या उदारतेचा जसा आनंद घेता तसा निसर्ग स्वत:च्याच आनंदात असतो. तसा ट्र आहे आनंद लुटा. जास्त चिकित्सा ठेवणे, लोकांच्या चुका काढणे व दुरुस्त करून घेणे म्हणजे एक डोकेद्खीच. उत्तम म्हणजे तुम्ही स्वत:ला ठीक करा. स्वत:लाच हसा, हाच उत्तम मार्ग आहे. प्रत्येकाची काही तरी गमतीची बाब असते. माझ्याही बाबतीत आहे. कबूल करते, प्रयत्न करून ही मी विसरून जाते. उदा. हा चष्मा मी नेहमीच विसरते. अगदी निघायच्या अगोदर घ्यायचा घ्यायचा म्हणून आठवण ठेवून ही ऐनवेळी विसरते. मी गणितात प्रवीण आहे. मी मोजू शकत नाही, चेक कसा भरायचा ते ही मला माहीत नाही, खरे वाटते तुम्हाला? दूसरे मला चेक भरून देतात. अति चिकित्सक लोक नेहमी अयशस्वी ठरतात कारण त्यांचा मेंदूच त्यांच्यावर शक्कल लढवितो. एका गृहस्थाने एकदा सांगितले की तुमच्या मोटारीचा आकार एवढा आहे म्हणून गॅरेजचा आकार ही असा हवा. मी म्हणाले, ठीक आहे. मग जेव्हा गॅरेज बांधले तेव्हा मोटारच आत जाईना, एवढा मोठा चिकित्सक आर्किटेक्ट ज्याला बक्षिसे मिळाली होती. तो अशी चूक सुचविले. मी म्हणाले, आता तरी गॅरेज नीट मोजणी करा. नाहीतर दुसरी गाडी विकत घेऊन तीच तऱ्हा. कशी करू शकतो, हे मला कळेना. त्याने मला दूसरी मोटार घेण्यास प.पू.श्रीमाताजी, ७/५/१९९५, कबेला, इटली पण काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम क्रोध ही एक भयानक प्रवृत्ती माणसामध्ये असते. राग येणे हा उघड उघड मूर्खपणा आहे. कोणावर ही तुम्हाला रागवण्याची जरूरच नाही. रागामुळे तुम्ही स्वत:चेच नुकसान करून घेता. सबंध वातावरण बिघडवता आणि एकमेकांचे नातेसंबंध ही बिघडवता. राग आलाच तर थोडा वेळ शांत बसा व राग का आला? असा स्वत:शीच हे विचार करत रहा. रागातून प्रश्न सुटत नसतात, लक्षात घ्या. प.पू.श्रीमाताजी, १०/५/१९९८, कबेला जर तुम्हाला तथाकथित त्रासामधून ही जर आनंद मिळवायचा माहीत असेल, तर तुम्ही योग्य मार्गाने जात असाल व आपोआपच तुम्ही बनू लागता. मग तुम्ही जाणा, की तुमची बरोबर प्रगती होत आहे. जर एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला आणि तुम्ही अतिशय शांत राहिलात किंवा तुमचा राग नाहीसा झाला तर असे समजा, की तुम्ही प्रगती करीत आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर जर घाला पडत असताना तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही चिंतित झाला नाहीत तर समजा की तुमची प्रगती होत आहे. कितीही प्रकारची कृत्रिमता असली, तरी तुमच्या मनावर जर त्याची छाप पडली नाही, तर समजा की तुमची प्रगती होत आहे. दुसर्याची किती ही प्रगती झाली व ती पाहून तुम्हाला काहीही दुःख झाले १९ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-19.txt नाही तर समजा, की तुमची प्रगती होत आहे. २हस२ प.पू.श्रीमाताजी, ५ मे १९८४, फ्रांस है ब्रहा सहस्राराच्या हजार पाकळ्या या तुमच्यामध्ये असलेल्या विराटाच्या शक्त्या आहेत. आपली चुक हीच होते, की सहस्राराचा प्रकाश हे ब्रह्मरंध्र आहे व तिथेच हृदय चक्र आहे, हे तुम्ही लक्षात घेत नाही. चक्र ही बऱ्याच जणांना नीट समजत नाही. हे सर्व महामायेमुळे होते. उदा. प्रत्येकाला वाटते, की आपल्या कुटुंबात सर्वक्षेम असावे आणि इथेच महामाया कार्य करू लागते आणि तुम्ही कुटुंबियांबद्दलच काळजी करू लागता. 'वसुधैव कुटुंबकम्' ही संतांची मनोभूमिका होती, तसे तुमचे झाले पाहिजे. स्वत:च्या कुटुंबाची अशी काळजी घ्या, की सहजयोग्यांचे सामूहिक कुटुंब बळकट होईल. तसे केले नाही तर उलट प्रकार होईल. त्याबाबतीत त्याग हा एक प्रकारचा व्याधिमुक्त होण्याचा उपचार आहे. मग परिस्थिती बदलून प्रेम, करुणा, आपुलकी इ.भावनांना प्राधान्य येते, पण याबाबतीत ही प्रत्येक सहजयोग्यावर प्रेमच केले पाहिजे असा नियम पाळण्याचा आग्रह धरू नये. निगेटिव्ह सहजयोग्याला दूरच ठेवले पाहिजे. कुठल्याही माणसाच्या प्रभावाखाली येणे बरोबर नाही. स्वत:ला अवतारी व्यक्ती समजून सगळ्या पीडितांचा आपणच उद्धार करणारे आहोत अशी कल्पना करू नका. हॉस्पिटलमधला पेशंट इतर पेशंटला औषध देऊ शकत नाही. ते डॉक्टरचे काम आहे. सहजयोगात नवीन आलेल्या लोकांना हे नीट समजत नाही. टोपलीमध्ये ठेवलेल्या सफरचंदामधील चांगली फळे खराब झालेल्या फळांना ठीक करू शकत नाहीत. उलट त्यांच्या संगतीत चांगली फळेच खराब होणार. म्हणून प्रत्येकाला सुधारण्याचे आपले कामच आहे असे समजू नका. तुमचे खरे काम म्हणजे निगेटिव्ह सहजयोग्याला सामूहिकतेतून खडसावले पाहिजे व त्याचे दोष व चुका स्पष्टपणे त्याला दाखविल्या पाहिजेत. जगामध्ये काही माणसे खराब असतातच. शिवाय चैतन्य लहरीमधून चांगले वाईट ओळखणे तुम्हाला सहज शक्य आहे. म्हणून ज्यांना सुधारणे अशक्य आहे अशा लोकांवर तुमची चैतन्य शक्ती वाया घालवू नका. त्यातून तुमचेच नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. सहजयोगात अजून परिपक्व न झालेल्या लोकांनी याबाबतीत जास्त खबरदारी घेतली पाहिजे. ८/५/१९८८, रोम तुमची प्रेमशक्ती तुमचेच नव्हे तर इतरांचे ही संरक्षण करू शकते, आत्म्यावर तुमचे लक्ष सतत जाऊ लागले, तर ते हळूहळू स्थिर होऊ लागते. मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे आवडत नाही, ते आवडते अशासारख्या बाहेर धावणार्या इच्छा सुटून जातात. तसला काही विचारच मनात उमटणार नाही. मी, मला, असे सारखे म्हणत असलेला कोण बरे आहे असे स्वत:लाच विचारत रहा. जर तुम्ही आत्मा आहात, तर तुम्ही प्रेम स्वरुप आहात आणि प्रेमामध्ये तुम्ही सतत दुसर्यांचा, त्यांच्या प्रश्नांचा , त्यांना २० 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-20.txt काय आवडेल, कसे बरे वाटेल, असाच विचार करणार, स्वत:चा व स्वत:बद्दलचा विचार मनात व प्रकाश येणारच नाही. तुम्हाला ही स्थिती मिळवायची आहे. तुम्ही एरवी धार्मिक असाल, चांगले सहजयोगी असाल तरीही सहस्राराची ही स्थिती जोपर्यंत तुम्ही मिळवत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला शाब्बास ट्र आहे म्हणणार नाही आणि हे तुमचे तुम्हालाच घडवून आणायचे आहे. त्यासाठी ध्यान फार महत्त्वाचे आहे. प.पू.श्रीमाताजी, ४ मे १९९७, कबेला सहस्रार स्वच्छ ठेवण्यासाठी तुमचे हृदय उघडले पाहिजे. तुमचे हृदयच जर उघडले नाही, तर ते कसे भरणार? तुमचे योगी बंधु-भगिनींसाठी तुम्ही हृदय उघडे केले पाहिजे. मागे माझ्या प्रेमाने मी तुमच्या बाबतीत घडलेल्या घटनेमुळे जर तुम्ही चिंतित असाल तर अशा घटना सहजयोगात घडणार नाहीत. ते अशा तऱ्हेने घडविले आहे. जर एक हात दुखत असेल तर त्याची काळजी घ्यायला दुसरा हात आहे. तुम्ही काही एकटे नाही. तुम्ही सामूहिकतेच्या शरीरात आहात. जर कोणी मूर्ख व बावळट लोक असतील तर अशांसाठी सहजयोग नाही. संस्कृतमध्ये त्यांना 'मूढ' म्हणतात. तसेच जे अतिशहाणे असतील व स्वत:ला फसवायचा प्रयत्न करीत असतील अशांसाठीसुद्धा सहजयोग नाही. मानवी बुद्धीमध्ये कसेही फिरण्याची क्षमता आहे. तसेच जे लोक असहजपणे वागत असतील त्यांच्यासाठी पण सहजयोग नाही. हळूहळू त्यांच्या चैतन्य लहरी जातील. तुम्ही आजारी पडाल. तुमच्या पुढे समस्या येतील व तुम्ही अडचणीत याल. ही तुम्हाला वॉर्निंग नाही, तर विनंती आहे. प.पू.श्रीमाताजी, ५/५/१९८७ सहजयोगामध्ये लोकांनी सामूहिकतेत राहायला शिकले पाहिजे. आपण सामूहिकतेत असणे फार महत्त्वाचे आहे. हे माझंे आहे, हे माझ्या मालकीचं आहे असे आपण कधीच म्हणू नये. अगदी मुलांच्या बाबतीतसुद्धा तुम्ही असे करू नये. हा माझा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, हे 'माझे' निघून गेलं पाहिजे, परंतु हे शक्य नाही. हे विसरणे सोपे नाही. कारण यासाठी आपली डावी व उजवी नाभी व्यवस्थित असणे आवश्यक आहे. यासाठी 'आई हे सर्व काही तुझेच आहे' असे. हा मार्ग आहे. हे असे म्हणण्यात काही धोका नाही कारण जे तुमचे आहे, ते मी कधीच घेणार नाही. प.पू.श्रीमाताजी, ५/५/१९८७ प्रथम आपण जाणीव ( कॉन्सशनेस) समजून घेतली पाहिजे. आपल्या सर्व आवडी-निवडी, विचार, माहिती व ज्ञान साठवणारी जाणीव लीव्हर जवळील पडद्यामध्ये साठवलेली असते. ती उन्नत स्थितीला आल्यावर आपल्याला ज्ञान येते. यावेळी आपण मेंद न वापरता म्हणजे विचार वगैरे न करता कृती करतो. कारण त्यावेळी आपला मेंद अत्यंत संवेदनक्षम झालेला असतो. उदा. अचानक वाटू २१ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-21.txt लागलेली भीती. ही जाणीव अधिक उन्नत झाली, की आपल्यामध्ये आवडी-निवडी निर्माण होतात. इतरांबद्दल आपण द्वेष बाळगतो. आपल्याला त्रास देणार्या व्यक्तीचा कसा समाचार घ्यावा इ.विचार करू लागतो. पण अशी जाणीव अंधारातून प्रेरणा देत राहते. प्रकाश नसल्यावर आपल्याला नीट स्पष्ट दिसत नाही. तसे आपण चुकीच्या गोष्ट्री करीत राहतो. प्रकाश असला, की आपल्याला सर्व काही नीट दिसते. पण अंधारात (अज्ञान) माणूस कसा वागेल याचा भरवसा देता येत नाही. जनावरे अशी नसतात. त्यांना काही भयानक किंवा विचित्र दिसले तर ती हल्ला करतील किंवा पळून जातील. माणसाला अहंकार दिलेला आहे. अहंकारी माणसाला आपण काय करतो व म्हणतो तेच बरोबर आहे, असे वाटते. एखाद्याला ओरडले, मारले तरी त्याला काही चुकले असे वाटत नाही. उलट्या प्रवृत्तीचा माणूस घाबरट असतो व न आवडणाच्या माणसाच्या नजरेस येण्याचे ही टाळतो. अशा तऱ्हेने दूसर्या माणसाबद्दलची प्रतिमा आपण मनात साठवत राहतो. ही जाणीव पुढे सामूहिक स्तरावर ही कार्य करू लागते. आपल्याला एखाद्या जातीचे वा वर्णाचे लोक आवडत नाहीत. हे याचेच उदाहरण म्हणता येईल हे आणखी वाढत गेले, की गोऱ्या लोकांना काळ्या लोकांचा द्वेष असतो. हिटलरसारख्या माणसाला ज्यू लोकांचा संहार करावासा वाटला. असे प्रकार होऊ लागतात. म्हणून प्रत्येक माणसाला सत्य समजणे हे फार महत्त्वाचे आहे. प.पू.श्रीमाताजी, ९/५/१९९९, कबेला चित्त योग्य गोष्टीकडे असले, की तुम्ही आनंद मिळवू शकता. केंटाळा वाटत नाही. त्यामुळे तुमचे चित्त इतर क्षुद्र गोष्टीतून आनंदाकडे राहते. दुसऱ्यालाही तो दिल्यामुळे त्याचाही कंटाळा निघून जातो. मित्र बिघडलेला असेल. त्याचा ही तुम्ही आनंद घेऊ शकता. त्याबद्दल टीका करू नका. मग एखादा तुमचे मन तिरस्कारात न अडकता ते एका माधुर्याकडे वळते. हीच ती तुरिया अवस्था. तुम्ही तुमच्या मजेत राहता. कबीराने म्हटले, 'मस्त हुए तो क्या बोले,' तसा स्वभाव असावा. दुसर्याचा आदर राखा म्हणजे आनंद वाटेल. आम्ही कोणी उच्च आहोत हे दाखवू नका, मग हे आवडते ते आवडत नाही असे वाटत नाही, मी असे लोक पाहिले की, ज्यांना जुजबी ज्ञान असते. पण असा आव आणतात की त्यांना सर्व ज्ञात असते व लगेच कशावर ही शेरेबाजी करतात. टीका करतात. हे अगदी सामान्यपणे दिसून येते. पण तुमच्या शुद्ध ज्ञानामुळे तुम्ही अतिशय नम्र असता तुमचे माधुर्य दिसते, मवाळ व दयाळू असता. एकूण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प.पू.श्रीमाताजी, ७/५/२०००, कबेला २२ 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-22.txt मा आपण आपल्या गुरूली सागराच्या रुपात मानतो. सागर आपले पिता आहेत. संपृर्ण विश्वाद्वारे टाकलेली घाण आपल्यामध्ये बुडेवून ढेगांच्या रूपात जेव्ही समूुद्र आकाशीत जाती तेव्हा तो अत्यंत शुद्ध आणि सुंदर बनती. (प.पू.श्रीमाताजी, देवी पूजा, धर्मशाळा, २६.३.१९८५) प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in , website : www.nitl.co.in 2014_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-23.txt ४ पृथ्वी तत्त्व अत्यंत पविन्न तत्त्व आहे आणि शोषन घेणे ही त्याची शक्ती आहे. इतर कोणतेही तत्त्व शोबून घेण्यामध्ये इतके सशक्त नाही. पृथ्वी आपली आई आहे. ४ प.पू.श्री माताजी, पुणे, २६.२.१९७९ ा न ०ी १० मुव