चैतन्य लहरी नोव्हेंबर-डिसेंबर २०१४ मराठी या अंकाल एकात्मिकतेची जाणीव ...४ महालक्ष्मी तत्त्व ...१२ परमेश्वराने कशी सृष्टीची रचना केली आहे, किती सुंदर हे विश्व बनविले आहे, किती साऱ्या गोष्ट्टी आपल्याली दिल्यी आहेत, आती ১ तुम्ही तुमच्या आत्म्याला प्राप्त केले आहे, दुसऱ्यांची आत्मा ओळखू शकती. परमेश्वराची ही किती मोठी कृपा आपल्यावर आहे! बस, हाच विचार करते आपल्यामध्ये फुलून जा. सगळीकडे त्याची आनंद घ्यायली सुरूवात करी. प.पू.श्री माताजी, दिल्ली , ११.३.१९८१ एकात्मिकतेची |C जीणीव दिल्ली, २/ २/१९८३ मागील अंकातील पुढील भाग.... प्रथम तुमच्या हातांचा उपयोग तुमच्या सर्व हेतुपूर्तीसाठी करा. तुमच्यासाठी करा. हेच हात तुम्हाला मदत करू शकतील. आता कुंडलिनी जागृत झालेली आहे. सर्व चक्रांमधून तिचे कमी अधिक प्रमाणात का होईना भ्रमण सुरू आहे. हे सर्व घडते आहे. म्हणून कुंडलिनीचे उत्थापन जास्तीत जास्त करा. तुमच्या हाताने तुम्ही ते करू शकता. ते एक वर्तुळ आहे. ज्यावेळी कुंडलिनी तुमच्या हाताने वरती उचलता, त्यावेळी तुमच्या हातातून अधिकाधिक चैतन्य लहरी प्रवाहित होतात. फक्त तुमचे हातच कुंडलिनी चढवू शकतात. तुम्ही स्वत:ला बंधने घेतांना किंवा कुंडली चढवतांना तुमच्या हातामधून चैतन्य प्रसारित होते. या सर्व क्रिया काळजीपूर्वक शिकून घ्या. तुमचे हात अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमच्या हातामधून चैतन्य लहरी वाहत नसतील तर तुम्हाला त्याची काळजी करावयास हवी. सुरुवातीपासूनच तुमच्या हातामधून चैतन्य लहरींची अनुभूती व्हायला हवी. पूर्वजन्मातील दोषामुळे किंवा हातावरील स्थानामध्ये त्याची जाणीव होईल. त्यानंतर काही वेळाने तुमच्या चक्रांची जाणीव तुम्हाला सहस्रारावर इतर काही गोष्टींमुळे तुम्हाला हातामध्ये काही समस्या सतावत असतील, तर त्या त्या चक्राच्या होईल. काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही काहीसे अस्वस्थ वगैरे होण्याचे काही कारण नाही. सर्व काही ठीक करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मग चक्रांची काळजी करण्याचे काही कारण नाही. काळजीचे काहीच कारण नाही. तुम्ही म्हणाल, 'अरे, हे एवढचं का! छान!' तुम्हाला ती जाणीव होते. ही जाणीवसुद्धा विशुद्धी चक्रातून येते. आपण फक्त अनुभवतो. फक्त अनुभवतो. विशुद्धी चक्राचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हे आहे की ते शुद्ध आणि निर्मळ असले पाहिजे. स्व मंत्र म्हणण्यासाठी विशुद्धी चक्राच्या शुद्धतेचीच मदत होते. जेव्हा एखादा गुरू मंत्र देतो तेव्हा प्रथम त्याच्या डाव्या विशुद्धी चक्रावर काही दोष आहे का, इतर कोणत्या चक्रावर आघात झाला आहे, हे तुम्ही पाहिले पाहिजे, पण प्रथम आहे ती डाव्या विशुद्धी चक्राची बाधा. त्याच्याकरीता आपण मंत्रसिद्धीचा मंत्र म्हणावा. ही मंत्रसिद्धी अशा व्यक्तीस प्राप्त होते ज्याचे डावे विशुद्धी चक्र शुद्ध आहे. अन्यथा त्या व्यक्तीकडून मंत्रसिद्धी होऊ शकत नाही. जे काही मंत्र ते म्हणतील ते फक्त यंत्रवत असतील. मंत्र योग्य पद्धतीने म्हणण्यासाठी आणि परिणामस्वरूप ते सिद्ध मंत्र होण्यासाठी तुमची विशुद्धी चांगली असली पाहिजे. जर तुमचे डावे विशुद्धी चक्र ठीक नसेल, तर 'अल्लाह- हो-अकबर' हा मंत्र म्हणण्याला सुद्धा काही अर्थ नसतो. म्हणून तुम्ही असं पहा, की सहजयोगामध्ये चैतन्याच्या अनुभूतीसाठी डावे आणि उजवे विशुद्धी चक्र किती महत्त्वाचे आहे. म्हणून सहजयोगामध्ये विशुद्धी चक्राचा विशेष महत्वाचा सहभाग आणि भूमिका आहे. कारण या चक्रामुळे आपण विराटाशी, सर्वेसर्वा शक्तीशी जोडले जातो. मग तुम्ही अशा मुद्यावर येता की हे सर्व विशुद्धी चक्रामुळे घडते. 'पूर्ण अकबर' आपणास कळतो. तुम्ही त्याच्याशी जोडले जाता. विशुद्धी चक्रामुळे ही एकरूपता प्रस्थापित होते आणि तुम्हाला त्याची अनुभूती येते. परमेश्वरी चैतन्याची अनुभूती होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या हातांची संवेदनशीलता, मग हे विशुद्ध चक्र शुद्ध कसे ठेवायचे ही समस्या आहे. मला असं सांगण्यात आले आहे की, विशुद्धी चक्रावरील हे भाषण मी संपवावे आणि आता निघावे, पण मला असं वाटतं की, विशुद्धी चक्रावरील हे विवेचन आजच संपवावे. आपले विशुद्धी चक्र संतुलनात ठेवण्यासाठी आपणास काय करावयास पाहिजे? तुम्ही लोणी खायला पाहिजे. कारण त्यात प्रामुख्याने अ व ड जीवनसत्व आहेत. जीवनसत्व ड. क्षमा करा. त्यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियम मिळून त्याची वाढ होते. तुम्ही एक शक्तिशाली माणूस बनता. तुम्ही लोणी न घेता फक्त कॅल्शियम घेतले तर समस्या निर्माण होतात. शरीरिक दृष्ट्या बघता विशुद्धी चक्राच्या तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही लोणी खावे. मी तुम्हाला हे सांगते, गरम पाण्यामध्ये थोडेसे लोणी घ्या. त्या पाण्यामध्ये ते विरघळून घ्या आणि प्या. विशुद्धी चक्र आपल्याला आवश्यक असलेल्या थंड प्रवृत्तीची काळजी घेते. थंड प्रकृती. जेव्हा यकृतामध्ये उष्णता होते, तेव्हा ती सर्व शरीरात पसरते. ही उष्णता थंड करण्याचे एकमेव चक्र म्हणजे विशुद्धी चक्र आणि जर आतमधील इपिथिलाईल सेल्स कोरडे करण्याची, त्याच्या लायनिंगची काही ६ समस्या उद्भवत असल्यास पाण्याबरोबर लोणी खावे किंवा नुसतेच लोणी उन्हाळ्याच्या दिवसात खावे. पण त्यासोबत कर्बोदके घेऊ नका. कर्बोदके नकोत. त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही. हवे तितके लोणी खा. तुमचे वजन वाढणार नाही. तुम्ही कर्बोदके घेणे पूर्णपणे बंद केलेत तर तुमचा आहार हा सात्त्विक आहार होईल. कर्बोदकांना स्पर्शही करू नका आणि मग पहा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्हाला कसा सात्त्विक आहार मिळाला आहे. लोणी व प्रथिने घ्या. सर्व चरबीयुक्त पदार्थ, साय ( क्रीम), प्रत्येक गोष्ट घ्या, तुम्हाला त्याचा काहीही त्रास होणार नाही. प्रथिनांसाठी सर्व सुका मेवा (फळे) घ्या आणि सर्वच वस्तू खा. गोडासाठी मध घ्या, पण कर्बोदके घेऊ नका. आजकाल मध साखरेपासून बनवतात हे तुम्हाला माहीत आहे. जर तुम्ही कर्बोदके टाळलीत आणि ह्या अशा गोष्टी घेतल्या तर तुमची प्रकृती चांगली राहील, पण आपण धीराने घ्यायला पाहिजे. आपल्यामध्ये सर्वप्रकारचे असंतुलन असते. म्हणून मी सांगते, 'तुम्हाला यकृताची समस्या आहे, तर साखर खा. पण जर तुम्ही असेच साखर खाणे बंद केले असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. तुम्हाला प्रथम यकृत ठीक करावे लागेल. त्यानंतर साखर खाणे बंद केले तर चालेल. काही होणार नाही. पण तत्पूर्वी नको. सर्व डॉक्टर्स साधारणपणे सांगतात, की साखर खाऊ नका.चरबी शरीरातून बाहेर पडते, तेव्हा शरीर सुडौल, मुलायम होते. चरबी शरीरात टिकून राहत नाही. कर्बोदकांच्या अभावामुळे शरीरात चरबी टिकून राहणे शक्य नसते. तुम्ही हे घरी करू शकता की थोडे लोणी घ्या, ते दोन्ही हातावर चोळा. ठीक आहे? आता हात धुऊन टाका. लोणी धुतले जाणार नाही. ते हाताला चिकटून राहील. लोणी असे धुतले जाणार नाही. पण जर काही पिष्टमय पदार्थाचा, जसे की पीठ, उपयोग केला तर मग हातावरून लोणी धुतले जाईल. त्यामध्ये विरघळून जाईल. जर कर्बोदकाचा उपयोग केला नाही तर लोणी विरघळले जाणार नाही. पण हे त्या लोकांसाठी आहे, ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असंतुलन नसते. जे पूर्णपणे संतुलनात आहेत, ते लोक हे करू शकतात. मी करू शकते, पण मला कोणी करू देत नाही. सर्वजण उपयोग करतात, जसा काही मी कचऱ्याचा डब्बा आहे. मला फक्त जेवण भरवण्यासाठी माझा करतात. मी खाल्ले नाही तर... अस पहा, आपल्या आईला काही हलकं-फुलकं थोडसं खायला द्या. पण मी असे लोक पाहिले आहेत ते जर मला वाढत असतील, तर ते खूपच वाढतात आणि मी थोडसच खाल्लं तर म्हणतील, 'काय हे, श्रीमाताजी किती थोडं...!' खरं तर मला त्याचीही आवश्यकता नसते. लोकांनी माझा स्वभाव समजून घेतला पाहिजे. जेव्हा मला ते जेवण वाढतात, तेव्हा ते इतकं जास्त वाढतात, की मी ते खाऊच शकत नाही. मी खूप कमी जेवते. मला थोडसंच चालतं. मला कर्बोदके खाण्याची आवश्यकता नाही. खरंच नसते. मला कर्बोदकांची गरज नाही. पण 'माताजी, मी हे बनवले आहे आपल्यासाठी, माताजी, मी हे लाडू बनवले आहेत. आपण ७ खावेत. आई हे मी...' मग मी म्हणते, 'ठीक आहे, आण बाबा. तुमच्या आनंदासाठी मला त्रास झाला तरी चालेल.' प्रियम! इतकी साधी गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे की, तुम्ही मला आग्रह करू नका! आग्रह करण्याची खरच काहीही आवश्यकता नाही. कोणालाही खाण्याचा आग्रह करू नका. मला माहीत असते, की मी ज्यांना आग्रह करते, त्यांना त्याची आवश्यकता असते. 'पण तुम्ही आग्रह करू शकत नाही. कारण तुमच्याकडे तसा दूरदर्शीपणा नाही. जर तुम्हाला माहीत असेल, की कोणाला आग्रह करायचा आणि कोणाला नाही, तर मग ठीक आहे. पण ज्यावेळी आग्रह करता, त्यावेळी ते अन्न चैतन्यित केले आहे का हे पाहिले पाहिजे. जर ते अन्न चैतन्यित नसेल आणि असे अन्न खाण्याचा तुम्ही आग्रह करीत असाल, तर ते खाणार्या माणसाला त्याचा त्रास होईल.. तुम्हा सर्वांना जर विशुद्धी चक्राचे महत्त्व समजून घ्यायचे असेल, तर प्रथमतः तुम्ही जे काही बोलाल ते सहजयोगाविषयीचेच असायला पाहिजे. इतर कशाबद्दल नाही. जर तुम्हाला कोठे लेक्चर द्यायचे असेल मला आधीच माहीत होते, की पुष्कळसे सहजयोगी हे कोणत्या ना कोणत्या संस्थेशी जोडलेले होते या संस्थेचा सदस्य, त्या संस्थेचा सदस्य आणि अशा काही भयंकर संस्थांचे सदस्य की ज्या परमेश्वर विरोधी आहेत. उदाहणार्थ हरे रामा हरे कृष्णा. जे ख्रिस्त विरोधी आहेत. बाह्यत: ते ख्रिस्ताच्या विरोधातले आहेत आणि अंतरंगात ते कृष्ण विरोधी आहेत, पूर्णतः श्रीकृष्णांच्या विरोधात. जो कोणी तिथे जातो आणि परमेश्वराच्या नावाने याचना करतो, त्याचे विशुद्धी चक्र प्रचंड बिघडलेले असते. विशुद्धी चक्र बिघडण्याचे अनेक त्रास त्यांना भोगावे लागतात - जसे की कॅन्सर! असं बरंच काही आणि त्यातच ते मृत्यू पावतात. ज्या व्यक्तीचे विशुद्धी चक्र चांगले आहे. त्यांचा चेहरा टवटवीत, पूर्णपणे उजळलेला असतो, जसा की पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आणि जर तुमचे विशुद्धी चक्र ठीक नसेल, तर तुमचा चेहरा कोमेजलेला असतो. जर विशुद्धी चक्राचे कार्य अत्युत्तम असेल, तर तुमची कांती नितळ असते. चेहरा ताजा आणि चमकदार दिसतो. डोळ्यातसुद्धा चमक असते. कारण विशुद्धी चक्र डोळ्यांचीसुद्धा काळजी घेते. ते मानेची काळजी घेते, ते कानाची काळजी घेते, ते नाकाची काळजी घेते. जर विशुद्धी चक्र खराब झाले असेल, तर तुम्हाला नाक-कान-घसा यांच्या समस्या सतावत असतात. जर एखाद्या व्यक्तीला या समस्या असतील तर आपण म्हणू शकतो, की तो माणूस त्या अमूक एखाद्या संघटनेचा नेता असावा. त्यांना असं वाटतं की ते ' हरे रामा हरे कृष्णा' असं बोलताहेत. पण खरं तर ते पूर्ण विरोधी पूर्णपणे कृष्ण लीलेच्या विरोधी काम करताहेत. अगदी ठामपणे. श्रीकृष्णाचे नांव अशाप्रकारे वेड्यासारखे, सर्व लोकांसमोर उभे राहन अशा भयंकर वेषात ८ धोतर व कुडता की जे त्यांनी अगदी चमत्कारीक असे तयार केले आहेत - त्यांना हे ही माहीत नाही की ते कसे नेसावेत. त्या स्त्रियांनी कशा साड्या नेसल्यात! पुरुषांनी विकत घेतलेले धोतर आपल्या हजामत केलेल्या डोक्यावर बांधले. श्रीकृष्णाने कधी डोक्यावरचे केस काढले होते कां? कधी केस काढले होते कां? श्रीकृष्णाने आपल्याला दिलेली भेट म्हणजेच त्यांचे केस आहेत. खरे तर श्रीकृष्णाच्या केसांचे वर्णन नेहमीच कवितेमध्ये केलेले आहे. एक गोष्ट आहे, एका उर्दू कवीची, जो भारतीय होता. खरं तर हिंदू होता, पण उर्दू कवी आणि काही फाजील लोकांनी त्याला आवाहन केले.... यमकाची एक ओळ सांगितली आणि दुसरी ओळ पूर्ण 'त्याप्रमाणे त्याने ती ओळ अशी पूर्ण केली, करण्याचे आव्हान दिले. तो म्हणाला, कित्येक कवितांमध्ये श्रीकृष्णांच्या केसांचे वर्णन आलेले आहे. येथे ते हजामत करून धोतर आपल्या डोक्यावर बांधून फिरताहेत. श्रीकृष्णाचे आपल्या डोक्यावरचे केस कधी कापले होते का? त्यांनी डोक्याची पूर्ण हजामत केली होती कां? ते योगेश्वर होते. त्यांच्या सोळा हजार पत्नी होत्या. त्यावेळी श्रीकृष्णांच्या बरोबर सर्व गोष्टी कार्यान्वित करण्यासाठी सहजयोगी नव्हते, म्हणून त्या शक्त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले. त्या सर्व त्यांच्यामधीलच योगिनी होत्या. त्यांनी ते सर्व नाटक रचले. त्या शक्त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. कारण एखाद्या पुरुषाने स्त्रला, शिष्या म्हणून स्वीकारले, तर स्वाभाविकपणे सर्वजण त्या पुरुषाला दोष देतात. 'पुरुषा'ला 'स्त्री' शक्ती म्हणून त्याचेबरोबर हवी असते. स्त्री सदासर्वदा शक्तीच असते. म्हणून त्या श्रीकृष्णांच्या पत्नी बनून आल्या आणि श्रीकृष्ण सोळा हजार शक्त्या आणि पाच राण्यांचे पती बनले. त्या पाच राण्या म्हणजे पंचतत्त्वे. त्यांनी सर्व लीला केल्या. त्यांनी सृजन केले.... तुम्हाला श्रीकृष्णांबद्दल कसे कळणार? त्यांना समजण्यासाठी तुम्ही किती खोलवर जाऊ शकता, म्हणून हे लोक क्षणोक्षणी श्रीकृष्णाचा धावा करतात. प्रत्येक क्षणाला रस्त्यावर उभे राहून त्यांच्या नावाने याचना करतात. प्रत्येक ठिकाणी भिकार्याप्रमाणे भीक मागत फिरतात. श्रीकृष्ण कधीही भीक मागत नव्हते. कधीही नाही. या भिकाऱ्यांची निर्मिती परमेश्वराच्या नावावर होते. मला असं वाटतं की परमेश्वराच्या नावाने भीक मागणे हे प्रचंड पाप आहे. परमेश्वराच्या मंदिरासमोर मी हे सर्व घडतांना पाहिले आहे. माझ्या मनात विचार येत असे की, परमेश्वराच्या मंदिरात, परमेश्वरासमोर उभे ते भीक मागताहेत. फकीर होणे म्हणजेच भीक मागणं! हे सर्व काय आहे? हे लक्षण समृद्धीचे आहे का? श्रीकृष्ण बादशहा राहून होते. योगेश्वर... आणि हे भिकारी, श्रीकृष्णाचे अनुयायी? महाभयंकर. ते किती दयनीय दिसतात. अगदी कोबीसारखे आणि सर्वांचा असा विश्वास आहे की ते सर्व शांत आहेत. स्वाभाविक आहे, जर कोणी स्मशानात रहात असेल, तर तो शांतच असणार, अगदी ९ मृतावस्थेत! आणि आमचा देश जो एक गरीब देश आहे, जो या भिकाऱ्यांना पोसतो आहे. या देशातील श्रीमंत लोकांनी त्यांना पैसा आणि जमीन दिली. हे लामा आणि हे पाश्चिमात्य देशातील भयंकर लोक, जे तिकडून इकडे आले आहेत, त्यांना अशा प्रकारे मदत करण्याचा हा काय उपाय आहे ? हे लोक काही काम करीत नाहीत. खूप छान! इथे येतात, 'हरे रामा हरे कृष्णा' म्हणतात आणि गीता वाचतात. गीतेमधील काही श्लोक पाठ म्हणून दाखवितात आणि पैसे कमवतात. छानपैकी पैसे कमावतात. खेड्यापाड्यात जायचे, एकदोन ठिकाणी थांबायचे आणि भीक मागायची. तुमचा यावर विश्वास बसेल? आणि आमच्या सरकारला त्याची काहीच पर्वा नाही. हे कोण आहेत? ते इकडे का आले आहेत? परमेश्वराच्या नांवावर ते अशाप्रकारे इथे भीक का मागताहेत? जेव्हा की आपल्या देशामध्ये आधीच इतके सर्व भिकारी परमेश्वराच्या नावावरती भीक मागत असताना, मग या असल्या भयंकर लोकांना मदत करण्यापेक्षा का नाही त्यांना एकत्र करीत आणि त्यांना मदत करत? हे लोक परमेश्वर विरोधी आणि श्रीकृष्णांच्या विरोधात कार्य करीत आहेत. ज्यावेळी तुम्ही असे परमेश्वराचे व्यर्थ नाव घेता, तेव्हा तुमच्या विशुद्धीवर बाधा येते. मला असे लोक माहीत आहेत, की बसून वाहे गुरू, वाहे गुरू, वाहे गुरू म्हणत असतात. हे असे आहे कां, नानक साहेब इतके स्वस्त आहेत की त्यांचे नांव असे घेत बसावे, वाहे गुरू, वाहे गुरू, वाहे गुरू! सदासर्वकाळ हातामध्ये जपमाळ घेऊन परमेश्वराचे नाम जपण्याचे, हे सर्व काय चालले आहे? परमेश्वर कोण तो आहे? तो काय तुमच्या खिशात आहे का ? तो असा कवडीमोल आहे का, की तुम्हाला स्वस्तात मिळेल? का, का तुमचे विशुद्धी चक्र असे खराब करीत आहात ? सर्वांना हे समजायला हवं! त्यावेळी तुम्हाला खूप आश्चर्य वाटले! तुम्ही असे विशुद्धी चक्र खराब करून घेता. आत्मसाक्षात्कार प्राप्तीच्या मार्गातील हे महत्त्वाचे चक्र खराब करता. या अथांगाशी जर तुम्हाला एकरूपता साधायची असेल, तर तुमचे चक्र निर्मळ असावयास पाहिजे. या दिवसात सर्दी होते. कारण भारतामध्ये आणि इतरत्रसुद्धा या स्त्रिया आपले शरीर पूर्णपणे झाकत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की आपण फॅशनेबल आहोत हे त्यामुळे इतरांना दिसणार नाही किंवा असंच काही तरी! तसेच अत्यंत अपुरे, तोकडे कपडे वापरण्याची अत्याधुनिक नवीनच एक प्रथा सुरू झाली आहे. दोन्ही बाजूनेही ते परमेश्वर विरोधी आहे. सर्वप्रथम म्हणजे शरीराचे प्रदर्शन हे मूर्खपणाचे लक्षण आहे. म्हणूनच मोहम्मद साहेबांनी विशुद्धी चक्राबाबत खूप सांगितले आहे. जसं की स्त्रियांनी त्यांचे शरीर पूर्णपणे झाकले पाहिजे. मी कधी कधी विचार करते, की ती एक चांगली गोष्ट आहे. फॅशनचा मूर्खपणा आजकाल इतका वाढला आहे, की काही काळानंतर तुम्ही पहाल, हे सर्व फॅशन करणारे मच्छर कपड्याशिवाय अवतीभोवती फिरू लागतील. हा अगदी १० ती कळस असेल. हे अशा व्यक्तीचे लक्षण असते, की ती व्यक्ती 'तो' नसतो किंवा 'ती' नसते. व्यक्ती 'ते' असतात. 'ते' लेक नेहमीच असे वागतात. 'ते' जे कोणी असतात, त्यांची काही लक्षणं असतात. म्हणून रजनीश - जेव्हा लोक त्यांच्याकडे जातात, तेव्हा हे लोक 'ते ' बनतात. कारण त्यांच्यामध्ये अशाप्रकारे आकर्षित करण्याची शक्ती असते. कारण त्यांच्यामध्ये लाज-लज्जा, शरम जरासुद्धा उरलेली नसते. हे सर्व असे आहे. म्हणून आपल्या विशुद्धी चक्राची आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, हे समजून घेतले पाहिजे. फॅशन आणि इतर गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाचे आहे, ते म्हणजे तुमची तब्येत. तुम्ही तुमची विशुद्धी खराब केलीत तर फार चुकीचे होईल. म्हणून प्रत्येकाने आपल्या विशुद्धी चक्राची काळजी नेहमी घेतली पाहिजे. तुम्ही सर्वांनी आपल्या आणि दुसऱ्याच्या विशुद्धी चक्राची काळजी घेण्याचा प्रयत्न नेहमी करावयास पाहिजे. हा मंडप येथे घातलेला मला पसंत नव्हता. मी संयोजकांना तसे सांगितले. तर ते म्हणाले की, 'आपणच म्हणालात की तो बाहेर मोकळ्या जागेवर असावा.' आता मी असं म्हणत नाही की तुम्ही हिमालयावर जा. तुमचा दूरदर्शीपणा तुम्ही वापरायला पाहिजे. ही एक गोष्ट हरवली आहे. तुमच्याकडे तारतम्य हवे. अशा थंडीत लोकांना असं मोकळ्या जागेत बसण्याची व्यवस्था करणं मला माहीत आहे, की तुम्ही चांगले साधक आहात. जे लोक सामूहिकतेसाठी कार्य करतात त्यांना हे कळायला हवे की लोकांच्या घशाचे रक्षण, विशुद्धी चक्राचे रक्षण होईल अशी व्यवस्था करायला पाहिजे. हे फारच महत्त्वाचे आहे. अतिशय महत्त्वाचे! आणि तुम्हाला सर्वांना हे माहीत आहे, की मी तुमच्या विशुद्धी चक्राची किती काळजी घेते. प्रत्येकाच्या विशुद्धी चक्राची. कारण मला हे माहीत आहे की ते किती महत्त्वाचे आहे. कारण अशी काळजी घेतली नाही तर तुम्ही सर्वजण विखुरले जाल आणि कुंडलिनीचे सर्व कार्य वाया जाईल आणि माता कुंडलिनीला त्याचा त्रास होईल. म्हणून सर्वांनी आपले विशुद्धी चक्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. आपण स्वत:ला योग्यप्रकारे स्वच्छ ठेवणे, रोज सकाळी आपला घसा साफ करणे, त्याकरिता खळखळून गुळण्या करणे इत्यादी प्रकारे विशुद्धी चक्राची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला हे ऐहिक सुखाचे वाटेल, पण आईकरिता या ऐहिक सुखाच्या गोष्टीसुद्धा आध्यात्मिक सुखाच्या गोष्टीइतक्याच महत्त्वाच्या असतात. शुद्ध विशुद्धी चक्राशिवाय सहजयोगात येण्याचा काय उपयोग ? म्हणून कृपा करून तुमच्या विशुद्धी चक्राची काळजी घ्या. तिथे योगेश्वराला प्रस्थापित करा. श्रीकृष्णांना तिथे पहा. त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे समजून घ्या, की परमेश्वराने रचलेले नाटक साक्षीभावाने पाहण्यास आलेले आहात आणि श्रीकृष्णांची बासरी, की जिथे मंजूळ स्वर तुमच्या गळ्यातून बाहेर पडताहेत. तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद! ११ महालक्ष्मी ही गुरू तत्त्वावर आधारलेली आहे. पहिल्यांदा गुरू तत्त्व., गुरू तत्त्वाने काय होते? गुरू तत्त्व C. माणसामध्ये येण्याचा अर्थ असा की, मनुष्यामध्ये समतोलपणा येते. प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल असावा लागतो. ह महालक्ष्मी की तत्त्व कोल्हापूर, ४ मार्च १९८४ कोल्हापूरच्या सर्व भाविक आणि श्रद्धावान साधकांना आमचा नमस्कार! कोल्हापूरला आल्याबरोबर तब्येत खराब झाली, एक नाटकच होतं म्हटलं तरी चालेल. कारण आमचे सहजयोगी माताजींच्या शिवाय कुठे जायलाच तयार नाही आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर्वव्यापी शक्ती परमेश्वराची आहे, तुम्ही जाऊन प्रयत्न करा. माझा फोटो घेऊन जा. तुमच्या हातून हजारो लोक पार होतील. पण ते एका ग्रामीण भागात, शहरात नाही, विशेषकरून क्षेत्रस्थळी तर मुळीच होणार नाही. माझे वडील मला सांगत असत की क्षेत्रस्थळी श्रद्धावान फार कमी राहतात. बहतेक क्षेत्रस्थळी लोक पोटभरू, जे देवळावरती पैसे कमवतात किंवा त्यांना बघून बघून परमेश्वरापासून परावृत्त झालेले असेच. त्यांना असं वाटतं की देऊळ इथे असून आम्हाला काय फायदा झाला आणि देवळात सुद्धा हे लोक बसून नुसते आपलं पोटं भरून राहिलेत. यांच्यातही आयुष्यात काही विशेष आहे का? त्यांचंतरी आयुष्य काही उज्ज्वल आहे का? त्यांच्यात काही बघण्यासारखं आहे का ? हे एवढं देवीची पूजा करतात, पाच-पाच त्यांच्या आरत्या करतात, तरी यांच्यामध्ये काही बदल होत नाही, पण असा देव आहे तरी काय? आणि अशी देवी जर महालक्ष्मी आहे तर ह्यांची अशी भिकाऱ्यासारखी स्थिती का ? त्यामुळे कोणताही बुद्धीजीवी वर्ग याला परमेश्वरापासून परावृत्त करतो. त्यांच्या मनात असा विचार येतो की परमेश्वर म्हणून कोणी शक्ती नाही ठीक आहे, एक देऊळ आहे, चला जाऊन येऊ! आपले देवळात गेले, दोन पैसे घातले झालं काम! तेव्हा त्याची ती जी सूक्ष्म स्थिती आहे, त्याच्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे ती कधीही त्यांना मिळत नाही. तसे ते फार भाग्यवान आहेत कारण क्षेत्रस्थळी जन्माला आलेले आहेत हे मोठं भाग्याचं आहे ह्याबद्दल शंकाच नाही. पण क्षेत्रस्थळामध्ये जी इतर गोष्ट व्हायला सुरुवात होते 'अति परिचयात अवज्ञा, संतत गमना तना धरू भवती, प्रयागवासी कुपे स्नानं समाचारं' प्रयागातले लोक आपल्या घरातल्या विहिरीवर नहातात. पण इथून, खेडेगावातून, पायी हजारो पैल चालून लोक गंगेत आंघोळीला जातात. आता गंगा आली तर म्हणे दहा-दहा रुपयांना सगळ्यांना विकली पण तिथे गंगेत राहणारे लोक, त्यांना जर विचारलं तर म्हणे, 'आम्ही तर एक दिवससुद्धा गंगेत जात नाही. घाण आहे सगळी.' तसंच होतं ! अति परिचयात झाल्यामुळे ज्या ज्या क्षेत्रस्थळी गेले तिथे लोकांना एकतर विश्वासच नाही परमेश्वरावर किंवा दुसरा असला तरी तो श्रद्धावान असतो. तेव्हा कोणत्याही क्षेत्रस्थळी सहजयोग जमवणे कठीणच जाणार आहे. हे आमच्या सहजयोग्यांनीही लक्षात ठेवलं पाहिजे. तिथे डबल मेहनत करावी लागते. सर्वप्रथम जे लोक भाविक आहेत, श्रद्धावान आहेत ते खेडेगावातून येतील, इतर जागेतून १४ येतील, देवीच्या देवळात येतील, महालक्ष्मीला जातील. तिचा आशीर्वाद घेतील, कुंकू घेतील, घरी जातील. पण इथले जे स्थायिक लोक आहेत ते डोळ्याखाली रोज बघत असतात की हे देवीचे प्रकरण काय चाललेले आहे, देवळात काय प्रकार चाललेले आहेत आणि जरी आपल्या सांस्कृतिक जबाबदारीमुळे आपल्याला देवीबद्दल अपमान वाटत नसला तरीसुद्धा तिच्याकडे लक्ष असावं तितकं आपलं लक्ष असतं. आता महालक्ष्मी म्हणजे काय आहे ? तिचं इथं .. केवढं महत्त्व आहे, ते थोडसं मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुमच्या लक्षात येईल की तेवढी सूक्ष्मता कोल्हापूरच्या लोकांमध्ये नाही. तेवढे श्रद्धावान ते नाहीत. श्रद्धावान असल्याशिवाय माझी गोष्ट तुम्हाला समजणार नाही आणि कुंडलिनीचे जागरण होणार नाही. तेव्हा श्रद्धेने माझी गोष्टी ऐकायची. म्हणून किती मोठी गोष्ट आहे. त्याचं सर्वप्रथम हे जाणलं पाहिजे की देवीची तीन रूपं आहेत. पहिल्यांदा ती आदिशक्ती म्हणून या संसारात विचरण करते. आदिशक्ती म्हणजे जी सगळ्या शक्त्यांचा समन्वय आहे. तिन्ही शक्त्यांचा समन्वय अशी ती अर्धमात्रा आदिशक्ती आहे आणि तिचं एक रूप म्हणजे महाकालीचं, दूसरं महासरस्वतीचं आणि तिसरं महालक्ष्मीचं. महालक्ष्मी सुषुम्ना मार्गात आपल्यामध्ये प्रगट होते. सुषुम्ना मार्ग आहे तिथं महालक्ष्मीचं स्थान आहे. तेव्हा जी आपल्यामध्ये, शास्त्रीय दृष्ट्या म्हणायचं तर ज्याला आपण पॅरासिम्परथॅटिक नव्व्हस सिस्टीम म्हणतो. तिचा कंट्रोल या शक्तीला असतो. आता जे वैद्यकीय शास्त्रात म्हणजे विज्ञानामध्ये फार हशार झालेले लोकं आहेत, त्यांनी सगळं इंग्रजी शिक्षण घेतलेले आहे, त्यांना जर मी सांगितलं की तुमची पॅरासिम्परथॅटिक नव्व्हस सिस्टीम ही महालक्ष्मी शक्ती कंट्रोल करते. तर मला मारायला धावतील. कारण त्यांच्यामध्ये देवी म्हणून काहीच नाही. जी देवी - देवता आहे ती म्हणजे इंग्लंडची राणी. ती खरी देवी, बाकी काही देवी म्हणून काही वस्तू असेल, घरात महालक्ष्मीचा फोटो असेल, तिला हार घालतील. पण महालक्ष्मीचा संबंध संपूर्ण पॅरासिम्परथॅटिक नव्हस सिस्टीमशी आहे आणि ती सबंध कंट्रोल करते हे मानायला कधीही तयार होणार नाहीत. आणि जरासं आम्ही म्हटलं तर भांडायला उभे राहतील. ही एक प्रथा आहे. दूसरी प्रथा ही की महालक्ष्मी ही गुरू तत्त्वावर आधारलेली आहे. पहिल्यांदा गुरू तत्त्व. गुरू तत्त्वाने काय होते ? गुरू तत्त्व माणसामध्ये येण्याचा अर्थ असा की, मनुष्यामध्ये समतोलपणा येते. प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल असावा लागतो. तुम्ही रस्त्याने म्हणाल की आम्ही एकीकडे तोंड करून चालू तर चालू शकत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल नाही आहे ते. व्यावहारीक नाही. जर तुम्ही म्हणाला १५ की मोटर आम्ही एका चाकावर एका साईडने चालवू तर! जर तुम्हाला एखाद्या सायकलवरही बसायचं असेल तर तुम्हाला त्याचा तोल सांभाळावा लागतो. जर तुम्ही समतोलात आले नाही, मध्यात आले नाही, तर सुषुम्ना मार्गाने तुम्ही जगू शकत नाही. तेव्हा सर्वप्रथम लक्ष्मी तत्त्व आहे. लक्ष्मी तत्त्व हे मधोमध, नाभीवर बसलेले आहे. तुमच्या नाभीमध्ये लक्ष्मी तत्त्व आहे. आता लक्ष्मीचं जे स्वरूप आहे ते आपल्याला माहिती आहे की तिच्या दोन हातांमध्ये कमळं आणि एका हातामध्ये दान आणि दुसर्या हातामध्ये आश्रय अशी तिची एकंदर प्रतिमा पूर्वीच्या ऋषीमुनींनी पहिल्यांदाच काढून ठेवलेली आहे, देवकृपेने. कारण आजकाल जर काढली असती तर काय काढलं असतं लोकांनी मला सांगता येत नाही. याचा अर्थ असा, की जो खरा लक्ष्मी पती आहे, त्याच्या हातातून दान झालं पाहिजे. सारखं दान झालं पाहिजे. काही थांबलं नाही पाहिजे त्याच्या हातातून. सारखं, अव्याहत वाहिलं पाहिजे, तर तो लक्ष्मीपती असतो. त्याच्या आश्रयाला पंधरा-वीस तरी मंडळी असायला पाहिजेत आणि त्यांचा आश्रय सुखदायी असायला पाहिजे, तेव्हा तो लक्ष्मीपती आहे. हातामध्ये दोन कमळं गुलाबी रंगाची, म्हणजे त्याच्या राहणीत, त्याच्या बोलण्यात, त्याच्या एकंदर शरीरात, वैभवात एक तऱ्हेची आक्द्रता असायला पाहिजे. करुणामय असायला पाहिजे. कारण एका कमळामध्ये एक साधारण भुंगा, ज्याच्यामध्ये काटे असतात आणि तो जाऊन झोपतो आणि कमळ त्याला झाकून घेते आणि आरामात त्याला ऊब देते. त्याचे काटे ही बोचत असतील थोडेसे तरी त्याला सांभाळते. असे लक्ष्मीपती असायला पाहिजे. हे लक्ष्मीपतीचंे सांगणं झालं. हे आजकालचे जे लक्ष्मीपती आहेत, त्यांना काय म्हणावं समजत नाही. जर तुम्ही गाढवाला पैसे लावले तर तो काही लक्ष्मीपती होणार नाही. पण ही लक्ष्मी जी आपल्याला मिळाली , आता हे बघा, हे बाहेर देशातून, १४ देशातून इथे लोक आलेले आहेत. त्यांच्याकडे लक्ष्मीचं राज्य आहे एका अर्थाने, एका अर्थाने ह्यांच्याकडे पैसा आहे. पण लक्ष्मीपती नाहीत. पण तरीसुद्धा माहात्म्य स्वत:च्या आत्म्याचं किती आहे! हे बघा, चौदा देशातून इथे तुमच्या कोल्हापूरात आले आहेत, पण कोल्हापूरचे किती लोक इथे आले आहेत माझ्या भाषणाला! किती लोक व्यवस्थित बसले आहेत ? बघ्यासारखे उभे आहेत. श्रद्धा काही दिसते का? मगापासून म्हणतोय 'बसा, बसा, बसायला देखील तयार नाहीत आणि एक तऱ्हेचा हट्टीपणा. या लोकांमध्ये जर त्यांना सांगितलं की हे असं करून तुमचं भलं होईल, तर त्या गोष्टीला अगदी तयार असतात आणि करतात, इतके श्रीमंत आहेत, सायंटिस्ट आहेत, सगळे काही आहे, पण आपल्या लोकांमध्ये ही अक्कल येणं अत्यंत कठीण आहे. त्याला कारण असं झालेलं आहे की आपण म्हणजे अतिशहाणे! आणि आपल्यासमोर मोठमोठाले आदर्श आहेत. सगळ्यांना सगळे पाठ आहे. पुराणे कोणी वाचली १६ नसणार, का कोणी गीता वाचली नाही, कोणी काही केलेले नाही. सगळे अतिशहाणे! कोणी कोणाच भलं केलेलं असो अथवा नसो, पण मुख्य म्हणजे शहाणपण अती आणि त्या अतीशहाणपणामुळे जे आपल्यातलं सत्त्व आहे, जे आपल्यातलं खरं आहे ते आपण गमावणार आहे. 'तुज आहे तुजपाशी' असं सांगितलं आहे. ते तुमच्याचपाशी आहे. या खेडेगावात आहे, पण खेडेगावात पहिल्यांदा रुजणार, क्षेत्रस्थळी सगळ्यात शेवटी। सगळ्यात पहिले खेडेगावात मग मुंबईला सुद्धा रूजेल, पण क्षेत्रस्थळी फार कमी रूजेल असं मला दिसतं. त्याला कारण असं की श्रद्धा जी आहे तिला गहराई आहे. श्रद्धेमध्ये सूक्ष्मता आलेली आहे. श्रद्धा म्हणजे देवीला गेलो, तिला नारळ घातले, हे घेतलं, झालं. नमस्कार, चला आजचं काम देवीचं झालं ! पण देवी म्हणजे काय? महालक्ष्मी तत्त्व म्हणजे काय? इकडे लक्ष नाही. आता जेव्हा लक्ष्मीत मनुष्य उतरला तर या लोकांना लक्ष्मी मिळाली. त्याच्यापुढे आता विवंचना लागली की एवढा मला पैसा मिळाला, सगळं काही मिळालं, सगळं ऐश्वर्य मिळालं तरी आमची मुलं आहेत की जी सुसाईड करताहेत, आत्महत्या करताहेत. म्हणजे पैसा हे काही उत्तर नाही. पैशाने बनवलेली गोष्टी खरी नाही. म्हणजे ह्याच्यापलीकडे काहीतरी असायला पाहिजे. जर पैसा सगळे काही असता, तर ते आम्ही मिळवलेले आहे. मग त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काही दिसत नाही. आम्ही एवढा उपद्व्याप केला, आपली एवढी सुधारणा करून घेतली. आमच्याजवळ एवढा पैसा आला, आम्हाला स्थिर्य नाही, आपापसात मारामाऱ्या. आमच्यात खून पडतात. त्याच्यानंतर काही काही देशांमध्ये तर आई-बहिणींचाच कोणाला पत्ता लागत नाही. इतकं त्यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं आहे आपापसामध्ये की त्यांना आश्चर्य वाटतं की पैशामुळे एवढं वैमनस्य लोकांमध्ये आलं, तेव्हा पैशात काहीतरी खराबी असली पाहिजे ! तर तेव्हा सर्व सोडून आता दुसर्या शोधाला लागले. काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही शोधायला लागले, काही इथून आपले भामटे गुरू गेले आणि त्यांनी त्यांना पकडून घेतलं आणि त्यांना लुटून खाल्लं. तर पण परमेश्वर हा आहे. आणि जे त्याच्या शोधात खरेखुरे फिरतात त्यांना परमेश्वर हा मिळेल. पण जे वरपांगी आहेत त्यांना मिळणार नाही. ह्यांच्यासमोर आपल्यासारखे आदर्श नाहीत. ह्यांनी गुरू गीता ऐकलेली नाही, ह्यांनी गीता ऐकलेली नाही. ह्यांना काही माहीत नाही. आपल्याकडे एक एक मिनिस्टर जर उभा केला तर तो अशी भाषणं देतो की वाटतं, बापरे बाप, साक्षात हा कुठून उतरला आहे ब्रह्मदेव असा बोलतो आहे. पण आज सगळे कोरडे पाषाण. 'लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण'. हे म्हणजे आपल्या इथल्या सर्वच लोकांचे आहे. त्यामुळे होतं काय की वरपांगीपणा येतो. त्यांना आदर्श फार मोठाले, आणि आत काहीच नाही, पोकळ वासा. ह्या पोकळ हि १७ पार े कि वासेला आता ठीक कसं करायचं? त्याच्यात श्रद्धा कशी भरायची? 'श्रद्धा करा' असं होत म्हणून नाही. आणि जोपर्यंत श्रद्धा निर्माण होणार नाही तोपर्यंत या लक्ष्मीतून महालक्ष्मी तत्त्व जागृत होणार नाही. लक्ष्मीतूनच महालक्ष्मी तत्त्व जागृत होईल. पण ती लक्ष्मी जी आपल्याला मिळणार आहे, ती लक्ष्मी ह्या लक्ष्मीसारखी असेल तर! समजा जरी ती महालक्ष्मी आपल्याला मिळाली तर जरुरी नाही की आपल्याजवळ पैसे असायला पाहिजे. जरुरी नाही की तुम्हाला लक्ष्मीचे त्त्व जाणलं पाहिजे. ते जाणल्याशिवायच तुम्ही महालक्ष्मी तत्त्वात उतरू शकता. कारण या अशा विशेष स्थानी आपला जन्म झालेला आहे. हिंदुस्थानात जन्म होणं म्हणजेच लाखो-लाखो योनीतलं पुण्य आहे! मग महाराष्ट्रात होणं तर काय सांगायचं! आणि त्यात क्षेत्रस्थळी जन्मलं म्हणजे केवढं मोठ पुण्यासारखं, जे केवढं संचित! एवढं गाठोड बांधून परत वरपांगीपणा. त्याचा इलाज काय केला पाहिजे ? त्याचा इलाज हा आहे की त्याच्याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे. स्वत:बद्दल विचार करायला पाहिजे. आता मी म्हटलं बसा, तर बसत का नाही? ते लोकही बघताहेत की किती उद्धट लोक आहेत. बसत का नाही तुम्ही लोक? एकंदरीत माणसामध्ये स्वत:बद्दल एक तऱ्हेचे कुतूहल असायला पाहिजे. आणि विचार असायला पाहिजे की मी या जगामध्ये कशाला आलो आहे ? या जगात येऊन मला काय मिळवायचे आहे? मला जे काही मिळवायचे आहे ते मी मिळवले आहे की मला अजून काहीतरी मिळवायचे आहे? मला आनंद मिळाला आहे का? या देशांमध्ये जिथे एवढी प्रगती झालेली आहे त्या देशाच्या लोकांना जाऊन विचारावं की बाबा, तुम्हाला ते मिळालं का ? तुम्ही ज्या सौख्याच्या शोधात होता ते तुम्हाला मिळालय का ? ते सांगतील की आमच्यापेक्षा द:खी कोणी नाही. तुम्ही आमच्यापेक्षा सुखी आहात. तेव्हा कारण हे की या भारतभूमीच्या पुण्याईमुळे तुम्ही बचावले. त्याच्यामुळे तुम्ही बचावले. पण ते पुण्यसुद्धा आता अती शहाणपणामुळे कदाचित अपुरे पडणार. मी आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाला फक्त दोनदा गेले. पण तिथे हजारो सहजयोगी तयार झाले. तुमच्या कोल्हापुरात कितीदा आले मला आठवत नाही, पण पुष्कळदा आलेली आहे आणि तरी इथे किती सहजयोगी आहेत ? मोजून सांगता येतील. म्हणजे लोकांमध्ये श्रद्धा नाही. स्वत:बद्दल श्रद्धा नाही आणि परमेश्वराबद्दलसुद्धा श्रद्धा नाही. जी श्रद्धा आहे ती फार कमी पडते. 'मी परमेश्वराला शोधूनच काढणार.' 'येऱ्यागबाळ्याचे काम नोहे'. 'मी परमेश्वराला सोडणार..' अशी ज्यांनी एकदा आपल्या मनामध्ये धारणा धरली आणि आपल्यामध्ये जागूनच त्याचा हिय्या त्यांनी केला त्याला काहीही नाही. ही वेळ आलेली आहे. आज हजारो लोक हजार ठिकाणी पार होत आहेत आणि क्षेत्रस्थळी राहिलं म्हणून काय झालं! 'मी महालक्ष्मीला प्राप्त करून राहीन,' असे म्हणणारे जर तुमच्यात असले तर आम्ही त्यांच्यासाठी तयार आहोत. महालक्ष्मी तत्तव हे फार मोठे आहे. महालक्ष्मी तत्त्वाशिवाय तुम्ही मानव स्थितीला नसते आला. आज अमिबापासून १८ े तुम्ही जे माणूस झालात ते तुम्ही या महालक्ष्मी तत्त्वामुळे आणि या महालक्ष्मी तत्त्वामध्येच जी आपण 'उदो, उदो अंबे' असं म्हणतो तीच ती कुंडलिनी आहे. त्या कुंडलिनीला 'उठ , ऊठ ' असे आपण म्हणतो या महालक्ष्मी तत्त्वात. इथे जसे गोंधळी गातात, आणखीन ठिकाणी का गातात? म्हणजे सुषुम्ना पथ ज्या पथात आहे. कुंडलिनी उठते ते महालक्ष्मीचं स्थळ तुमच्याकडे असतांना काय तुम्ही तिची सेवा केलेली आहे. ती आतमध्येच जागृत आहे तुमच्यात. तिला जागृत करू दे. पुष्कळ सांगायचंय महालक्ष्मीला , पुष्कळ बोलायचंय. आधी सूक्ष्मात उतरून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या ठिकाणी तुम्ही आलात, काय आहे हे ? हे पृथ्वी तत्त्वातून निघालेले आहे. हे स्थळ पृथ्वी तत्त्वातून निघालेले आहे आणि त्याच्याकडे तुम्ही हात करून बघितलं तरी तुम्हाला काही नाही लागलं. तरी इथं जेवढे सहजयोगी आहेत, फॉरेनर्ससुद्धा जाऊन आले, ते म्हणतात, 'माताजी, केवढं जागृत स्थळं आहे हे!' आता तुम्हाला नाही सांगता यायचं की जागृत आहे की नाही. इथे राहूनही तुम्हाला माहीत नाही की जागृत आहे की ते नाही. मग तुमच्यापुढे मी काय बोलणार! तेव्हाही मोदी बोलत होते तर सगळे लोक उठून उठून जात होते. इतक्या कळवळीने ते बोलत होते, इतक्या मेहनतीने बोलत होते. लोक उठून उठून जात होते. त्यांना त्याची कदर नव्हती की आम्ही या फार मोठ्या स्थळी जन्माला आलो, काहीतरी विशेष पुण्य घेऊन आलो असू. भलं मोठ काहीतरी गाठोडं संपदेचं आहे, ते उघडण्यासाठी माताजी आलेल्या आहेत. ते घेऊन त्यात पुढं गेलं पाहिजे. त्याच्यात मेहनत केली पाहिजे. तिकडे लक्ष घालायला पाहिजे. पण तसं नाही. लक्ष कुठय सध्या आपलं हे पाहिलं पाहिजे. आपलं लक्ष जे आहे ते वरपांगी आहे. त्यात खोल ते लक्ष गेलं पाहिजे आणि ते जाण्यासाठीच ही 'अंबे, उदो, उदो'. अंबेला उठवलं पाहिजे. अंबा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुमची कुंडलिनी आहे. तीच अंबा आहे. ही म्हणजे सबंध सृष्टीला बनवून, इथं थांबलेली आदिशक्ती आहे, ती अंबा आहे, म्हणजे अर्धमात्रा. आपल्याला माहिती आहे की साडेतीन मात्रा या संबंध महाराष्ट्रात आहेत. हे त्रिकोण जे आहे महाराष्ट्राचं, पठार, हे सर्व विश्वाच्या कुंडलिनीचे स्थान आहे. त्यातली महालक्ष्मी इथे आहे. आता इथल्या लोकांची ही स्थिती म्हणजे आम्ही काय बोलायचं पुढे सांगा! ही महालक्ष्मी. आणि महाकाली आपल्याला माहीत आहे कुठे आहे. तुळजापूरला, भवानी आहे, आणखीन माहूरला महासरस्वती आहे, पण अर्धमात्रा मात्र आदिशक्ती, नाशकाजवळ वरणीला आहे. ते सगळं ते बघायला हे लोक जातात. इथे बघायला आले, तुळजापूरला जाऊन आले. पण जाणून की हे काय आहे. सबंध विश्वाची कुंडलिनी, ती त्यातली महालक्ष्मी तुमच्याकडे ज्याच्यातून सर्वांचे उत्थान होणार आहे, ज्याच्यातून कुंडलिनी चढणार आहे. म्हणजे इथल्या लोकांनी काय असायला पाहिजे हे मला तुम्ही सांगा! म्हणजे परमेश्वराची काय इच्छा आहे ? तुम्हाला इथे काय घेऊन पाठवलं १९ असेल परमेश्वराने? हा विचार करून ही जेव्हा वेळ येईल, जेव्हा सर्वांची अशी सामूहिक कुंडलिनी उचलायचा समय येईल त्या वेळेला, विशेष त्या वेळेला कशी मंडळी इथं जन्माला घातली असतील देवाने, काय विचार करून, कोणत्या पट्टीचे लोक इथं घातले असतील? तेच मी शोधतेय. कुठे गेले ते? काहीतरी विशेष मंडळी जन्माला घातली असतीलच, ती अजून हाताला लागली नसतील आम्हाला किंवा असतील ही तुमच्यात काही मंडळी त्याच्यात बसलेली. तर सांगायचंय की जाणून घ्या. तुमच्यातल्या प्रत्येकाला मंडळीला परमेश्वराने काही तरी विशेष देऊन पाठवलेले आहे. तेव्हा ते जे विशेष आहे ते तुम्ही वाढवलं पाहिजे. बाकी बेकार गोष्टीत लक्ष घालून तुमचं जे इथे जन्माचे कारण आहे, जे मूळ कारण इथे जन्म होण्याचं आहे आणि इथे राहण्याचे कारण आहे त्याचे सार्थक करून घ्या. सर्व जगाला तुमच्यापुढे वाकावं लागेल, ज्या दिवशी तुम्ही स्वत:ची संपदा जाणून घ्याल. जसं पसायदान लिहिलेले आहे. आपण ऐकलेच असेल. ह्यातली वाक्य लोकांना समजतात की नाही मला माहीत नाही. त्यांनी वर्णन केलेले आहे की कसे कसे लोक इथे जन्माला येतात. त्या वेळेला काय होईल. ब्रह्मा जर एकत्व झाले ते पसायदान, ते आता, हे पसायदान आहे. हे घ्यायला पाहिजे. आणि ह्या लोकांचे काय? 'चला कल्पतरूचे आरव'. कल्पतरू! तुमचे कल्पतरू बनणार. आता मोदी मला म्हणाले, 'माताजी, कमाल आहे. मी नुसता तुमचा फोटो घेऊन गेलो. तिथे दोन- तीन हजार लोक होते पण तिथे जवळजवळ ८०% लोक पार झाले.' म्हटलं, 'काय कमाल आहे. तुम्ही कल्पतरू झालात. तुम्ही कल्पतरू झालात.' तुम्ही कल्पना करा आणि ते पूर्ण होणार. तुम्ही इच्छा करा आणि ते पूर्ण होणार. असे तुम्ही कल्पतरूंचे आरव तयार करायला पाहिजे. एकट्यादुकटयाने नाही चालायचं. आरव म्हणजे वनच्या वन. 'बोलते पियुषांचे आर्णव.' जे अमृताचे सागर आहेत असे बोल. आता ते बोलत होते कोणाचे लक्षही नव्हते. ते आहे नां, 'वाचली गाथा', तसला प्रकार. तेव्हा स्वत:ची किंमत ओळखा, स्वत:ला समजून घ्या. ह्या अशा क्षेत्रस्थळी, या महत्त्वाच्या, विश्वाच्या महत्त्वाच्या क्षेत्रस्थळी आम्ही जन्माला आलो तर आम्हाला काय कराव लागेल. दंडवत घालायला सांगितलं तर चालले दंडवत घालायला. अहो, पण कुंडलिनीची जागृती करून तुम्ही पार का होत नाही. त्याच्यात ऊहापोह, त्याच्यात भांडणं, त्याच्यात वाद-विवाद. वाद - विवाद करून कधीही कुंडलिनी चढणार नाही. काही सोप्प काम नाही कुंडलिनीचं चढवणं. पाऱ्यासारखी कुंडलिनी असते आणि विशेषकरून क्षेत्रस्थळी. तेव्हा मेहरबानी करून आपल्या संपदेला ओळखून घ्यायचे आहे. स्वत:ला ओळखून घेतले पाहिजे. मग कुंडलिनीचं जागरण फार सोपे काम आहे. फारच सोपे काम आहे. स्वत:ची पहिल्यांदा इज्जत करा, स्वत:चा पहिल्यांदा आदर करा. स्वत:ला २० समजून घ्या की आम्ही का या क्षेत्रस्थळी जन्माला आलो. काहीतरी विशेष असायला पाहिजे. बरीच तरुण मंडळी आलेली आहेत ते पाहन मला आनंद वाटला. कारण तरुण मंडळी फार पटकन पार होतात आणि त्यात लाभतात ही. तसेच पुष्कळ वयस्कर लोकसुद्धा. ज्यांना शहाणपण असेल ते सगळेच याच्यातून पार होतात, पण तरुण मंडळीना पटकन हे लक्षात येतं. पण त्यांनी त्याच्यात थिल्लरपणा केला नाही पाहिजे. तुमचं विशेष आहे की कोणत्याही वयाला सहजयोग लाभ देतो. पण त्यातली मेहनत करण्याची जी शक्ती आहे ती तरुणपणी असते. म्हणून त्या लोकांनी मेहनत करून त्याच्यात रमलं पाहिजे आणि जमलं पाहिजे. जर त्याच्यात जमले नाही, तर तुम्हाला माहितीच आहे की या देशाचाच काय पण सर्व जगाचाच नाश समोर दिसत आहे. त्या नाशाला जर तुम्हाला परतवून पाठवायचं असलं तर स्वत: समर्थ झालं पाहिजे. सम अर्थ झालं पाहिजे आणि सम अर्थ म्हणजे तुम्ही जे आत्मा आहात त्याच आत्म्याला प्राप्त होणे. तुम्ही आत्मा आहात, बाकी सगळं मिथ्या आहे. मन, बुद्धी, अहंकार आदि या उपाधी आहेत, तुम्ही फक्त आत्मा आहे आणि आत्म्याला प्राप्त झाल्याबरोबर तुमच्या हाताला चैतन्य लाभेल. ते चैतन्य म्हणजे तीनही शक्तींचा समन्वय आहे. एक शक्ती नाही. प्राणशक्ती, इच्छाशक्ती आणि धारणा शक्ती म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तीनही शक्त्यांचं समन्वय झालेला आहे अश्या ह्या ज्या चैतन्य लहरी आहेत. त्यामधून तुम्ही सुद्धा दुसर्यांचं भलं करू शकता आणि स्वत:ला एका नवीन वातावरणात, परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करू शकता. हे सर्वांचं व्हावं , सर्वांचं कल्याण व्हावं, म्हणून आमची रात्रंदिवस धडपड चाललेली आहे. त्यात पैसे घेणे वगैरे या गोष्टींचा काही प्रकार नाही. अर्थात पोटभरू लोकांना राग येणारच. मग ते देवाच्या नावाने घेत असतील, कोणाला बरं करण्याच्या नावाने घेत असतील किंवा काहीही असेल, त्या लोकांना हे समजत नाही की माताजी एक पैसा ही न घेता लोकांना बरं कसे करतात ? आम्ही करतो, आमची मर्जी. ज्याला करायचं त्याला करू नाही करायचं त्याला नाही करणार. तुम्ही कोण आम्हाला म्हणणार! का बरं करता ? आणि मला आवाहन दिलं की तुम्हाला आम्ही पैसे देऊ, जर तुम्ही एकाला बरं केलं. आम्ही कशाला आवाहन तुमचं ऐकणार. आमची मर्जी. आम्हाला करायचं असेल तर करू नाहीतर नाही करणार. आम्ही काही तुमच्यासारखे पाट्या लावून कोणाला बरं करीत नाही. आमच्या मर्जीवर जर आलं तर बरं करू लोकांना आणि करतोच. त्यात तुमच्या पोटावरती का पाय यावा? जगामध्ये पुष्कळ आजारी लोक आहेत. आम्ही काही सगळ्यांना बरं करीत नाही. फक्त ज्याच्यात पुण्यसंचय असतो त्यालाच बरं करतो. पाट्या लावून काही आम्ही बरं करणार नाही. त्यांच्यासाठी तुम्ही आपल्या पाट्या लावाव्या. त्याला पाठवू तुमच्या हॉस्पीटलला डॉक्टरांकडे. त्यांच्याकडून पैसे उकळा आणि त्याला बरं करा. फक्त जे साधु-संत आहेत, जे धार्मिक आहेत, मग ते गरीब असोत, कसेही असोत आम्हाला ते प्रिय आहेत, त्यांना आम्ही बरे करणार. तुम्ही त्याची चिंता करू नये. २१ कोणत्याही श्रीमंत माणसाला आम्ही बरं करीत नाही. श्रीमंत लोक म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात जातच नाही. एक-दोघांना बरं केलं तर मला डोकंदखी झाली. एक-दोघांना, ते मला कुठून चिकटले आणि त्यांना बरं केलं तर ते आणखीन दहा श्रीमंत घेऊन आले. म्हटलं, 'बाबा, तुमच्या घरी डॉक्टर आहेत, मला क्षमा करा. मला वेळ नाही.' पळत असते त्यांच्यापासून, पण तरी माझ्या डोक्याला चिकटतात. गरीबांसाठी मला वेळ आहे. एवढंच सांगायचंय की स्वत:, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्याबद्दल उगीच उहापोह करण्यात काही अर्थ नाही. ज्या लोकांना असं वाटतं की सहजयोगामध्ये काहीतरी आम्हाला लाभ होईल त्या लोकांनी सहजयोगात येऊ नये. कोणावर जबरदस्ती नाही. कोणावरही जबरदस्ती नाही. परमेश्वराला मिळवणं ही काही जबरदस्तीची गोष्ट आहे का? तुम्हीच सांगा. ढकलून का तुम्हाला परमेश्वराच्या साम्राज्यात पाठवता येईल? अहो, तिथे सिंहासनावर बसायचंय तुम्हाला? तिथे असे ढकललेले लोक, मेलेले, मुर्दाड लोक तिथे जाऊन बसणार आहेत का ? तुम्हीच सांगा बरं ! तिथे बसणारी मंडळी ही राजेशाही पाहिजेत. तेव्हा असे जे लोक, जे स्वत:ला समजतात की काहीतरी जबरदस्तीने सहजयोग करता येईल किंवा पैसे देऊन सहजयोग करता येईल त्यांनी समजलं पाहिजे की हा सडेतोड योग आहे. जे तुमचं पुण्यसंचित असेल त्याच्यात हजार पटीने जास्त असेल, पण अगदीच पुण्य नसलं समजा, अगदीच महापापी असलात तर काही आम्ही ठेका घेतलाय का तुम्हाला ठीक करण्याचा. तेव्हा लक्षात असायला पाहिजे की परमेश्वरी तत्त्व हे आहे तेच आहे. बाकी काही नाही. बाकी सगळे खोटं आहे. जोपर्यंत तुम्हाला हातालाच लागलेलं नाही, जोपर्यंत ती शक्ती तुमच्या हाताला लागलेली नाही तोपर्यंत तुम्ही असं कसं म्हणता की आहे किंवा नाही. जोपर्यंत इतरांना मिळाला नव्हता, जोपर्यंत रेडिओवरती झाले नव्हते, तोपर्यंत ते म्हणत होते हे नाही आहे. मी जर म्हणते आहे तर बघायला हरकत काय आहे! जर तुम्ही सायंटिफिकली बघता तर सायटिस्ट माणसाचं डोकं उघडं पाहिजे, येउऊन बघायला पाहिजे आहे की नाही आहे. ज्या लोकांना आज लाभ होईल त्यांनी गहनतेत उतरलं पाहिजे. एवढं मात्र आज मला वचन पाहिजे तुम्हा लोकांकडून की 'आज जर आम्हाला माताजी लाभ झाला तर आम्ही गहनतेत उतरू.' वरपांगीपणाने सहजयोग घटित होत नाही. त्याचा काही फायदा होत नाही. एखाद्या बी ला अंकुर ते वाया जात तसे तुम्ही वाया जाणार. तर मला तुम्हाला वाया घालवायचे नाही. तेव्हा कृपा फुटून करून, मनाचा हिय्या करून ध्यानात जायचं आणि परमेश्वरी कृपेने हे घटित होईल अशी मला पूर्ण आशा आहे. २२ ट जर तुम्ही सहजयोगी आहात तर नैसर्गिक वस्तुंचा उपयोग करा.......कृत्रिम गोष्टी वापरू नका कारण वस्तुंची कृत्रिमता आत्म्याचे हनन करते. आत्मा आणि वस्तू यांच्यात संघर्ष सुरू आहे. .....आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करण्यासाठी तुम्ही वस्तुंचा उपयोग करू शकता, इतर कोणत्याही गोष्टींसाठी नाही. (प.पू.श्रीमाताजी, दिल्ली, २१ /०३/१९९५) प्रकाशक निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in , website : www.nitl.co.in जे डोळे अबोध आहेत ते बाहेरून काही घेत नाहीत, ते फक्त देत असतात. पवित्रता कोठेही प्रवेश करू शकते. अत्यंत पवित्र, सुखद आहे आणि अत्यंत सुंदर आहे. आपल्याला सुंदर व्यक्ती बनायचे आहे. प.पू.श्री माताजी, लंडन, १५.८.१९८२ िहार ---------------------- 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-0.txt चैतन्य लहरी नोव्हेंबर-डिसेंबर २०१४ मराठी 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-2.txt या अंकाल एकात्मिकतेची जाणीव ...४ महालक्ष्मी तत्त्व ...१२ परमेश्वराने कशी सृष्टीची रचना केली आहे, किती सुंदर हे विश्व बनविले आहे, किती साऱ्या गोष्ट्टी आपल्याली दिल्यी आहेत, आती ১ तुम्ही तुमच्या आत्म्याला प्राप्त केले आहे, दुसऱ्यांची आत्मा ओळखू शकती. परमेश्वराची ही किती मोठी कृपा आपल्यावर आहे! बस, हाच विचार करते आपल्यामध्ये फुलून जा. सगळीकडे त्याची आनंद घ्यायली सुरूवात करी. प.पू.श्री माताजी, दिल्ली , ११.३.१९८१ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-4.txt एकात्मिकतेची |C जीणीव दिल्ली, २/ २/१९८३ मागील अंकातील पुढील भाग.... प्रथम तुमच्या हातांचा उपयोग तुमच्या सर्व हेतुपूर्तीसाठी करा. तुमच्यासाठी करा. हेच हात तुम्हाला मदत करू शकतील. आता कुंडलिनी जागृत झालेली आहे. सर्व चक्रांमधून तिचे कमी अधिक प्रमाणात का होईना भ्रमण सुरू आहे. हे सर्व घडते आहे. म्हणून कुंडलिनीचे उत्थापन जास्तीत जास्त करा. तुमच्या हाताने तुम्ही ते करू शकता. ते एक वर्तुळ आहे. ज्यावेळी कुंडलिनी तुमच्या हाताने वरती उचलता, त्यावेळी तुमच्या हातातून अधिकाधिक चैतन्य लहरी प्रवाहित होतात. फक्त तुमचे हातच कुंडलिनी चढवू शकतात. तुम्ही स्वत:ला बंधने घेतांना किंवा कुंडली चढवतांना तुमच्या हातामधून चैतन्य प्रसारित होते. या सर्व क्रिया काळजीपूर्वक शिकून घ्या. तुमचे हात अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमच्या हातामधून चैतन्य लहरी वाहत नसतील तर तुम्हाला त्याची काळजी करावयास हवी. सुरुवातीपासूनच तुमच्या हातामधून चैतन्य लहरींची अनुभूती व्हायला हवी. पूर्वजन्मातील दोषामुळे किंवा हातावरील स्थानामध्ये त्याची जाणीव होईल. त्यानंतर काही वेळाने तुमच्या चक्रांची जाणीव तुम्हाला सहस्रारावर इतर काही गोष्टींमुळे तुम्हाला हातामध्ये काही समस्या सतावत असतील, तर त्या त्या चक्राच्या होईल. काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही काहीसे अस्वस्थ वगैरे होण्याचे काही कारण नाही. सर्व काही ठीक करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मग चक्रांची काळजी करण्याचे काही कारण नाही. काळजीचे काहीच कारण नाही. तुम्ही म्हणाल, 'अरे, हे एवढचं का! छान!' तुम्हाला ती जाणीव होते. ही जाणीवसुद्धा विशुद्धी चक्रातून 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-5.txt येते. आपण फक्त अनुभवतो. फक्त अनुभवतो. विशुद्धी चक्राचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हे आहे की ते शुद्ध आणि निर्मळ असले पाहिजे. स्व मंत्र म्हणण्यासाठी विशुद्धी चक्राच्या शुद्धतेचीच मदत होते. जेव्हा एखादा गुरू मंत्र देतो तेव्हा प्रथम त्याच्या डाव्या विशुद्धी चक्रावर काही दोष आहे का, इतर कोणत्या चक्रावर आघात झाला आहे, हे तुम्ही पाहिले पाहिजे, पण प्रथम आहे ती डाव्या विशुद्धी चक्राची बाधा. त्याच्याकरीता आपण मंत्रसिद्धीचा मंत्र म्हणावा. ही मंत्रसिद्धी अशा व्यक्तीस प्राप्त होते ज्याचे डावे विशुद्धी चक्र शुद्ध आहे. अन्यथा त्या व्यक्तीकडून मंत्रसिद्धी होऊ शकत नाही. जे काही मंत्र ते म्हणतील ते फक्त यंत्रवत असतील. मंत्र योग्य पद्धतीने म्हणण्यासाठी आणि परिणामस्वरूप ते सिद्ध मंत्र होण्यासाठी तुमची विशुद्धी चांगली असली पाहिजे. जर तुमचे डावे विशुद्धी चक्र ठीक नसेल, तर 'अल्लाह- हो-अकबर' हा मंत्र म्हणण्याला सुद्धा काही अर्थ नसतो. म्हणून तुम्ही असं पहा, की सहजयोगामध्ये चैतन्याच्या अनुभूतीसाठी डावे आणि उजवे विशुद्धी चक्र किती महत्त्वाचे आहे. म्हणून सहजयोगामध्ये विशुद्धी चक्राचा विशेष महत्वाचा सहभाग आणि भूमिका आहे. कारण या चक्रामुळे आपण विराटाशी, सर्वेसर्वा शक्तीशी जोडले जातो. मग तुम्ही अशा मुद्यावर येता की हे सर्व विशुद्धी चक्रामुळे घडते. 'पूर्ण अकबर' आपणास कळतो. तुम्ही त्याच्याशी जोडले जाता. विशुद्धी चक्रामुळे ही एकरूपता प्रस्थापित होते आणि तुम्हाला त्याची अनुभूती येते. परमेश्वरी चैतन्याची अनुभूती होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या हातांची संवेदनशीलता, मग हे विशुद्ध चक्र शुद्ध कसे ठेवायचे ही समस्या आहे. मला असं सांगण्यात आले आहे की, विशुद्धी चक्रावरील हे भाषण मी संपवावे आणि आता निघावे, पण मला असं वाटतं की, विशुद्धी चक्रावरील हे विवेचन आजच संपवावे. आपले विशुद्धी चक्र संतुलनात ठेवण्यासाठी आपणास काय करावयास पाहिजे? तुम्ही लोणी खायला पाहिजे. कारण त्यात प्रामुख्याने अ व ड जीवनसत्व आहेत. जीवनसत्व ड. क्षमा करा. त्यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियम मिळून त्याची वाढ होते. तुम्ही एक शक्तिशाली माणूस बनता. तुम्ही लोणी न घेता फक्त कॅल्शियम घेतले तर समस्या निर्माण होतात. शरीरिक दृष्ट्या बघता विशुद्धी चक्राच्या तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही लोणी खावे. मी तुम्हाला हे सांगते, गरम पाण्यामध्ये थोडेसे लोणी घ्या. त्या पाण्यामध्ये ते विरघळून घ्या आणि प्या. विशुद्धी चक्र आपल्याला आवश्यक असलेल्या थंड प्रवृत्तीची काळजी घेते. थंड प्रकृती. जेव्हा यकृतामध्ये उष्णता होते, तेव्हा ती सर्व शरीरात पसरते. ही उष्णता थंड करण्याचे एकमेव चक्र म्हणजे विशुद्धी चक्र आणि जर आतमधील इपिथिलाईल सेल्स कोरडे करण्याची, त्याच्या लायनिंगची काही ६ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-6.txt समस्या उद्भवत असल्यास पाण्याबरोबर लोणी खावे किंवा नुसतेच लोणी उन्हाळ्याच्या दिवसात खावे. पण त्यासोबत कर्बोदके घेऊ नका. कर्बोदके नकोत. त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही. हवे तितके लोणी खा. तुमचे वजन वाढणार नाही. तुम्ही कर्बोदके घेणे पूर्णपणे बंद केलेत तर तुमचा आहार हा सात्त्विक आहार होईल. कर्बोदकांना स्पर्शही करू नका आणि मग पहा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्हाला कसा सात्त्विक आहार मिळाला आहे. लोणी व प्रथिने घ्या. सर्व चरबीयुक्त पदार्थ, साय ( क्रीम), प्रत्येक गोष्ट घ्या, तुम्हाला त्याचा काहीही त्रास होणार नाही. प्रथिनांसाठी सर्व सुका मेवा (फळे) घ्या आणि सर्वच वस्तू खा. गोडासाठी मध घ्या, पण कर्बोदके घेऊ नका. आजकाल मध साखरेपासून बनवतात हे तुम्हाला माहीत आहे. जर तुम्ही कर्बोदके टाळलीत आणि ह्या अशा गोष्टी घेतल्या तर तुमची प्रकृती चांगली राहील, पण आपण धीराने घ्यायला पाहिजे. आपल्यामध्ये सर्वप्रकारचे असंतुलन असते. म्हणून मी सांगते, 'तुम्हाला यकृताची समस्या आहे, तर साखर खा. पण जर तुम्ही असेच साखर खाणे बंद केले असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. तुम्हाला प्रथम यकृत ठीक करावे लागेल. त्यानंतर साखर खाणे बंद केले तर चालेल. काही होणार नाही. पण तत्पूर्वी नको. सर्व डॉक्टर्स साधारणपणे सांगतात, की साखर खाऊ नका.चरबी शरीरातून बाहेर पडते, तेव्हा शरीर सुडौल, मुलायम होते. चरबी शरीरात टिकून राहत नाही. कर्बोदकांच्या अभावामुळे शरीरात चरबी टिकून राहणे शक्य नसते. तुम्ही हे घरी करू शकता की थोडे लोणी घ्या, ते दोन्ही हातावर चोळा. ठीक आहे? आता हात धुऊन टाका. लोणी धुतले जाणार नाही. ते हाताला चिकटून राहील. लोणी असे धुतले जाणार नाही. पण जर काही पिष्टमय पदार्थाचा, जसे की पीठ, उपयोग केला तर मग हातावरून लोणी धुतले जाईल. त्यामध्ये विरघळून जाईल. जर कर्बोदकाचा उपयोग केला नाही तर लोणी विरघळले जाणार नाही. पण हे त्या लोकांसाठी आहे, ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असंतुलन नसते. जे पूर्णपणे संतुलनात आहेत, ते लोक हे करू शकतात. मी करू शकते, पण मला कोणी करू देत नाही. सर्वजण उपयोग करतात, जसा काही मी कचऱ्याचा डब्बा आहे. मला फक्त जेवण भरवण्यासाठी माझा करतात. मी खाल्ले नाही तर... अस पहा, आपल्या आईला काही हलकं-फुलकं थोडसं खायला द्या. पण मी असे लोक पाहिले आहेत ते जर मला वाढत असतील, तर ते खूपच वाढतात आणि मी थोडसच खाल्लं तर म्हणतील, 'काय हे, श्रीमाताजी किती थोडं...!' खरं तर मला त्याचीही आवश्यकता नसते. लोकांनी माझा स्वभाव समजून घेतला पाहिजे. जेव्हा मला ते जेवण वाढतात, तेव्हा ते इतकं जास्त वाढतात, की मी ते खाऊच शकत नाही. मी खूप कमी जेवते. मला थोडसंच चालतं. मला कर्बोदके खाण्याची आवश्यकता नाही. खरंच नसते. मला कर्बोदकांची गरज नाही. पण 'माताजी, मी हे बनवले आहे आपल्यासाठी, माताजी, मी हे लाडू बनवले आहेत. आपण ७ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-7.txt खावेत. आई हे मी...' मग मी म्हणते, 'ठीक आहे, आण बाबा. तुमच्या आनंदासाठी मला त्रास झाला तरी चालेल.' प्रियम! इतकी साधी गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे की, तुम्ही मला आग्रह करू नका! आग्रह करण्याची खरच काहीही आवश्यकता नाही. कोणालाही खाण्याचा आग्रह करू नका. मला माहीत असते, की मी ज्यांना आग्रह करते, त्यांना त्याची आवश्यकता असते. 'पण तुम्ही आग्रह करू शकत नाही. कारण तुमच्याकडे तसा दूरदर्शीपणा नाही. जर तुम्हाला माहीत असेल, की कोणाला आग्रह करायचा आणि कोणाला नाही, तर मग ठीक आहे. पण ज्यावेळी आग्रह करता, त्यावेळी ते अन्न चैतन्यित केले आहे का हे पाहिले पाहिजे. जर ते अन्न चैतन्यित नसेल आणि असे अन्न खाण्याचा तुम्ही आग्रह करीत असाल, तर ते खाणार्या माणसाला त्याचा त्रास होईल.. तुम्हा सर्वांना जर विशुद्धी चक्राचे महत्त्व समजून घ्यायचे असेल, तर प्रथमतः तुम्ही जे काही बोलाल ते सहजयोगाविषयीचेच असायला पाहिजे. इतर कशाबद्दल नाही. जर तुम्हाला कोठे लेक्चर द्यायचे असेल मला आधीच माहीत होते, की पुष्कळसे सहजयोगी हे कोणत्या ना कोणत्या संस्थेशी जोडलेले होते या संस्थेचा सदस्य, त्या संस्थेचा सदस्य आणि अशा काही भयंकर संस्थांचे सदस्य की ज्या परमेश्वर विरोधी आहेत. उदाहणार्थ हरे रामा हरे कृष्णा. जे ख्रिस्त विरोधी आहेत. बाह्यत: ते ख्रिस्ताच्या विरोधातले आहेत आणि अंतरंगात ते कृष्ण विरोधी आहेत, पूर्णतः श्रीकृष्णांच्या विरोधात. जो कोणी तिथे जातो आणि परमेश्वराच्या नावाने याचना करतो, त्याचे विशुद्धी चक्र प्रचंड बिघडलेले असते. विशुद्धी चक्र बिघडण्याचे अनेक त्रास त्यांना भोगावे लागतात - जसे की कॅन्सर! असं बरंच काही आणि त्यातच ते मृत्यू पावतात. ज्या व्यक्तीचे विशुद्धी चक्र चांगले आहे. त्यांचा चेहरा टवटवीत, पूर्णपणे उजळलेला असतो, जसा की पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आणि जर तुमचे विशुद्धी चक्र ठीक नसेल, तर तुमचा चेहरा कोमेजलेला असतो. जर विशुद्धी चक्राचे कार्य अत्युत्तम असेल, तर तुमची कांती नितळ असते. चेहरा ताजा आणि चमकदार दिसतो. डोळ्यातसुद्धा चमक असते. कारण विशुद्धी चक्र डोळ्यांचीसुद्धा काळजी घेते. ते मानेची काळजी घेते, ते कानाची काळजी घेते, ते नाकाची काळजी घेते. जर विशुद्धी चक्र खराब झाले असेल, तर तुम्हाला नाक-कान-घसा यांच्या समस्या सतावत असतात. जर एखाद्या व्यक्तीला या समस्या असतील तर आपण म्हणू शकतो, की तो माणूस त्या अमूक एखाद्या संघटनेचा नेता असावा. त्यांना असं वाटतं की ते ' हरे रामा हरे कृष्णा' असं बोलताहेत. पण खरं तर ते पूर्ण विरोधी पूर्णपणे कृष्ण लीलेच्या विरोधी काम करताहेत. अगदी ठामपणे. श्रीकृष्णाचे नांव अशाप्रकारे वेड्यासारखे, सर्व लोकांसमोर उभे राहन अशा भयंकर वेषात ८ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-8.txt धोतर व कुडता की जे त्यांनी अगदी चमत्कारीक असे तयार केले आहेत - त्यांना हे ही माहीत नाही की ते कसे नेसावेत. त्या स्त्रियांनी कशा साड्या नेसल्यात! पुरुषांनी विकत घेतलेले धोतर आपल्या हजामत केलेल्या डोक्यावर बांधले. श्रीकृष्णाने कधी डोक्यावरचे केस काढले होते कां? कधी केस काढले होते कां? श्रीकृष्णाने आपल्याला दिलेली भेट म्हणजेच त्यांचे केस आहेत. खरे तर श्रीकृष्णाच्या केसांचे वर्णन नेहमीच कवितेमध्ये केलेले आहे. एक गोष्ट आहे, एका उर्दू कवीची, जो भारतीय होता. खरं तर हिंदू होता, पण उर्दू कवी आणि काही फाजील लोकांनी त्याला आवाहन केले.... यमकाची एक ओळ सांगितली आणि दुसरी ओळ पूर्ण 'त्याप्रमाणे त्याने ती ओळ अशी पूर्ण केली, करण्याचे आव्हान दिले. तो म्हणाला, कित्येक कवितांमध्ये श्रीकृष्णांच्या केसांचे वर्णन आलेले आहे. येथे ते हजामत करून धोतर आपल्या डोक्यावर बांधून फिरताहेत. श्रीकृष्णाचे आपल्या डोक्यावरचे केस कधी कापले होते का? त्यांनी डोक्याची पूर्ण हजामत केली होती कां? ते योगेश्वर होते. त्यांच्या सोळा हजार पत्नी होत्या. त्यावेळी श्रीकृष्णांच्या बरोबर सर्व गोष्टी कार्यान्वित करण्यासाठी सहजयोगी नव्हते, म्हणून त्या शक्त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले. त्या सर्व त्यांच्यामधीलच योगिनी होत्या. त्यांनी ते सर्व नाटक रचले. त्या शक्त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. कारण एखाद्या पुरुषाने स्त्रला, शिष्या म्हणून स्वीकारले, तर स्वाभाविकपणे सर्वजण त्या पुरुषाला दोष देतात. 'पुरुषा'ला 'स्त्री' शक्ती म्हणून त्याचेबरोबर हवी असते. स्त्री सदासर्वदा शक्तीच असते. म्हणून त्या श्रीकृष्णांच्या पत्नी बनून आल्या आणि श्रीकृष्ण सोळा हजार शक्त्या आणि पाच राण्यांचे पती बनले. त्या पाच राण्या म्हणजे पंचतत्त्वे. त्यांनी सर्व लीला केल्या. त्यांनी सृजन केले.... तुम्हाला श्रीकृष्णांबद्दल कसे कळणार? त्यांना समजण्यासाठी तुम्ही किती खोलवर जाऊ शकता, म्हणून हे लोक क्षणोक्षणी श्रीकृष्णाचा धावा करतात. प्रत्येक क्षणाला रस्त्यावर उभे राहून त्यांच्या नावाने याचना करतात. प्रत्येक ठिकाणी भिकार्याप्रमाणे भीक मागत फिरतात. श्रीकृष्ण कधीही भीक मागत नव्हते. कधीही नाही. या भिकाऱ्यांची निर्मिती परमेश्वराच्या नावावर होते. मला असं वाटतं की परमेश्वराच्या नावाने भीक मागणे हे प्रचंड पाप आहे. परमेश्वराच्या मंदिरासमोर मी हे सर्व घडतांना पाहिले आहे. माझ्या मनात विचार येत असे की, परमेश्वराच्या मंदिरात, परमेश्वरासमोर उभे ते भीक मागताहेत. फकीर होणे म्हणजेच भीक मागणं! हे सर्व काय आहे? हे लक्षण समृद्धीचे आहे का? श्रीकृष्ण बादशहा राहून होते. योगेश्वर... आणि हे भिकारी, श्रीकृष्णाचे अनुयायी? महाभयंकर. ते किती दयनीय दिसतात. अगदी कोबीसारखे आणि सर्वांचा असा विश्वास आहे की ते सर्व शांत आहेत. स्वाभाविक आहे, जर कोणी स्मशानात रहात असेल, तर तो शांतच असणार, अगदी ९ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-9.txt मृतावस्थेत! आणि आमचा देश जो एक गरीब देश आहे, जो या भिकाऱ्यांना पोसतो आहे. या देशातील श्रीमंत लोकांनी त्यांना पैसा आणि जमीन दिली. हे लामा आणि हे पाश्चिमात्य देशातील भयंकर लोक, जे तिकडून इकडे आले आहेत, त्यांना अशा प्रकारे मदत करण्याचा हा काय उपाय आहे ? हे लोक काही काम करीत नाहीत. खूप छान! इथे येतात, 'हरे रामा हरे कृष्णा' म्हणतात आणि गीता वाचतात. गीतेमधील काही श्लोक पाठ म्हणून दाखवितात आणि पैसे कमवतात. छानपैकी पैसे कमावतात. खेड्यापाड्यात जायचे, एकदोन ठिकाणी थांबायचे आणि भीक मागायची. तुमचा यावर विश्वास बसेल? आणि आमच्या सरकारला त्याची काहीच पर्वा नाही. हे कोण आहेत? ते इकडे का आले आहेत? परमेश्वराच्या नांवावर ते अशाप्रकारे इथे भीक का मागताहेत? जेव्हा की आपल्या देशामध्ये आधीच इतके सर्व भिकारी परमेश्वराच्या नावावरती भीक मागत असताना, मग या असल्या भयंकर लोकांना मदत करण्यापेक्षा का नाही त्यांना एकत्र करीत आणि त्यांना मदत करत? हे लोक परमेश्वर विरोधी आणि श्रीकृष्णांच्या विरोधात कार्य करीत आहेत. ज्यावेळी तुम्ही असे परमेश्वराचे व्यर्थ नाव घेता, तेव्हा तुमच्या विशुद्धीवर बाधा येते. मला असे लोक माहीत आहेत, की बसून वाहे गुरू, वाहे गुरू, वाहे गुरू म्हणत असतात. हे असे आहे कां, नानक साहेब इतके स्वस्त आहेत की त्यांचे नांव असे घेत बसावे, वाहे गुरू, वाहे गुरू, वाहे गुरू! सदासर्वकाळ हातामध्ये जपमाळ घेऊन परमेश्वराचे नाम जपण्याचे, हे सर्व काय चालले आहे? परमेश्वर कोण तो आहे? तो काय तुमच्या खिशात आहे का ? तो असा कवडीमोल आहे का, की तुम्हाला स्वस्तात मिळेल? का, का तुमचे विशुद्धी चक्र असे खराब करीत आहात ? सर्वांना हे समजायला हवं! त्यावेळी तुम्हाला खूप आश्चर्य वाटले! तुम्ही असे विशुद्धी चक्र खराब करून घेता. आत्मसाक्षात्कार प्राप्तीच्या मार्गातील हे महत्त्वाचे चक्र खराब करता. या अथांगाशी जर तुम्हाला एकरूपता साधायची असेल, तर तुमचे चक्र निर्मळ असावयास पाहिजे. या दिवसात सर्दी होते. कारण भारतामध्ये आणि इतरत्रसुद्धा या स्त्रिया आपले शरीर पूर्णपणे झाकत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की आपण फॅशनेबल आहोत हे त्यामुळे इतरांना दिसणार नाही किंवा असंच काही तरी! तसेच अत्यंत अपुरे, तोकडे कपडे वापरण्याची अत्याधुनिक नवीनच एक प्रथा सुरू झाली आहे. दोन्ही बाजूनेही ते परमेश्वर विरोधी आहे. सर्वप्रथम म्हणजे शरीराचे प्रदर्शन हे मूर्खपणाचे लक्षण आहे. म्हणूनच मोहम्मद साहेबांनी विशुद्धी चक्राबाबत खूप सांगितले आहे. जसं की स्त्रियांनी त्यांचे शरीर पूर्णपणे झाकले पाहिजे. मी कधी कधी विचार करते, की ती एक चांगली गोष्ट आहे. फॅशनचा मूर्खपणा आजकाल इतका वाढला आहे, की काही काळानंतर तुम्ही पहाल, हे सर्व फॅशन करणारे मच्छर कपड्याशिवाय अवतीभोवती फिरू लागतील. हा अगदी १० 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-10.txt ती कळस असेल. हे अशा व्यक्तीचे लक्षण असते, की ती व्यक्ती 'तो' नसतो किंवा 'ती' नसते. व्यक्ती 'ते' असतात. 'ते' लेक नेहमीच असे वागतात. 'ते' जे कोणी असतात, त्यांची काही लक्षणं असतात. म्हणून रजनीश - जेव्हा लोक त्यांच्याकडे जातात, तेव्हा हे लोक 'ते ' बनतात. कारण त्यांच्यामध्ये अशाप्रकारे आकर्षित करण्याची शक्ती असते. कारण त्यांच्यामध्ये लाज-लज्जा, शरम जरासुद्धा उरलेली नसते. हे सर्व असे आहे. म्हणून आपल्या विशुद्धी चक्राची आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, हे समजून घेतले पाहिजे. फॅशन आणि इतर गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाचे आहे, ते म्हणजे तुमची तब्येत. तुम्ही तुमची विशुद्धी खराब केलीत तर फार चुकीचे होईल. म्हणून प्रत्येकाने आपल्या विशुद्धी चक्राची काळजी नेहमी घेतली पाहिजे. तुम्ही सर्वांनी आपल्या आणि दुसऱ्याच्या विशुद्धी चक्राची काळजी घेण्याचा प्रयत्न नेहमी करावयास पाहिजे. हा मंडप येथे घातलेला मला पसंत नव्हता. मी संयोजकांना तसे सांगितले. तर ते म्हणाले की, 'आपणच म्हणालात की तो बाहेर मोकळ्या जागेवर असावा.' आता मी असं म्हणत नाही की तुम्ही हिमालयावर जा. तुमचा दूरदर्शीपणा तुम्ही वापरायला पाहिजे. ही एक गोष्ट हरवली आहे. तुमच्याकडे तारतम्य हवे. अशा थंडीत लोकांना असं मोकळ्या जागेत बसण्याची व्यवस्था करणं मला माहीत आहे, की तुम्ही चांगले साधक आहात. जे लोक सामूहिकतेसाठी कार्य करतात त्यांना हे कळायला हवे की लोकांच्या घशाचे रक्षण, विशुद्धी चक्राचे रक्षण होईल अशी व्यवस्था करायला पाहिजे. हे फारच महत्त्वाचे आहे. अतिशय महत्त्वाचे! आणि तुम्हाला सर्वांना हे माहीत आहे, की मी तुमच्या विशुद्धी चक्राची किती काळजी घेते. प्रत्येकाच्या विशुद्धी चक्राची. कारण मला हे माहीत आहे की ते किती महत्त्वाचे आहे. कारण अशी काळजी घेतली नाही तर तुम्ही सर्वजण विखुरले जाल आणि कुंडलिनीचे सर्व कार्य वाया जाईल आणि माता कुंडलिनीला त्याचा त्रास होईल. म्हणून सर्वांनी आपले विशुद्धी चक्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. आपण स्वत:ला योग्यप्रकारे स्वच्छ ठेवणे, रोज सकाळी आपला घसा साफ करणे, त्याकरिता खळखळून गुळण्या करणे इत्यादी प्रकारे विशुद्धी चक्राची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला हे ऐहिक सुखाचे वाटेल, पण आईकरिता या ऐहिक सुखाच्या गोष्टीसुद्धा आध्यात्मिक सुखाच्या गोष्टीइतक्याच महत्त्वाच्या असतात. शुद्ध विशुद्धी चक्राशिवाय सहजयोगात येण्याचा काय उपयोग ? म्हणून कृपा करून तुमच्या विशुद्धी चक्राची काळजी घ्या. तिथे योगेश्वराला प्रस्थापित करा. श्रीकृष्णांना तिथे पहा. त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे समजून घ्या, की परमेश्वराने रचलेले नाटक साक्षीभावाने पाहण्यास आलेले आहात आणि श्रीकृष्णांची बासरी, की जिथे मंजूळ स्वर तुमच्या गळ्यातून बाहेर पडताहेत. तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद! ११ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-11.txt महालक्ष्मी ही गुरू तत्त्वावर आधारलेली आहे. पहिल्यांदा गुरू तत्त्व., गुरू तत्त्वाने काय होते? गुरू तत्त्व C. माणसामध्ये येण्याचा अर्थ असा की, मनुष्यामध्ये समतोलपणा येते. प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल असावा लागतो. 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-12.txt ह महालक्ष्मी की तत्त्व कोल्हापूर, ४ मार्च १९८४ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-13.txt कोल्हापूरच्या सर्व भाविक आणि श्रद्धावान साधकांना आमचा नमस्कार! कोल्हापूरला आल्याबरोबर तब्येत खराब झाली, एक नाटकच होतं म्हटलं तरी चालेल. कारण आमचे सहजयोगी माताजींच्या शिवाय कुठे जायलाच तयार नाही आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर्वव्यापी शक्ती परमेश्वराची आहे, तुम्ही जाऊन प्रयत्न करा. माझा फोटो घेऊन जा. तुमच्या हातून हजारो लोक पार होतील. पण ते एका ग्रामीण भागात, शहरात नाही, विशेषकरून क्षेत्रस्थळी तर मुळीच होणार नाही. माझे वडील मला सांगत असत की क्षेत्रस्थळी श्रद्धावान फार कमी राहतात. बहतेक क्षेत्रस्थळी लोक पोटभरू, जे देवळावरती पैसे कमवतात किंवा त्यांना बघून बघून परमेश्वरापासून परावृत्त झालेले असेच. त्यांना असं वाटतं की देऊळ इथे असून आम्हाला काय फायदा झाला आणि देवळात सुद्धा हे लोक बसून नुसते आपलं पोटं भरून राहिलेत. यांच्यातही आयुष्यात काही विशेष आहे का? त्यांचंतरी आयुष्य काही उज्ज्वल आहे का? त्यांच्यात काही बघण्यासारखं आहे का ? हे एवढं देवीची पूजा करतात, पाच-पाच त्यांच्या आरत्या करतात, तरी यांच्यामध्ये काही बदल होत नाही, पण असा देव आहे तरी काय? आणि अशी देवी जर महालक्ष्मी आहे तर ह्यांची अशी भिकाऱ्यासारखी स्थिती का ? त्यामुळे कोणताही बुद्धीजीवी वर्ग याला परमेश्वरापासून परावृत्त करतो. त्यांच्या मनात असा विचार येतो की परमेश्वर म्हणून कोणी शक्ती नाही ठीक आहे, एक देऊळ आहे, चला जाऊन येऊ! आपले देवळात गेले, दोन पैसे घातले झालं काम! तेव्हा त्याची ती जी सूक्ष्म स्थिती आहे, त्याच्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे ती कधीही त्यांना मिळत नाही. तसे ते फार भाग्यवान आहेत कारण क्षेत्रस्थळी जन्माला आलेले आहेत हे मोठं भाग्याचं आहे ह्याबद्दल शंकाच नाही. पण क्षेत्रस्थळामध्ये जी इतर गोष्ट व्हायला सुरुवात होते 'अति परिचयात अवज्ञा, संतत गमना तना धरू भवती, प्रयागवासी कुपे स्नानं समाचारं' प्रयागातले लोक आपल्या घरातल्या विहिरीवर नहातात. पण इथून, खेडेगावातून, पायी हजारो पैल चालून लोक गंगेत आंघोळीला जातात. आता गंगा आली तर म्हणे दहा-दहा रुपयांना सगळ्यांना विकली पण तिथे गंगेत राहणारे लोक, त्यांना जर विचारलं तर म्हणे, 'आम्ही तर एक दिवससुद्धा गंगेत जात नाही. घाण आहे सगळी.' तसंच होतं ! अति परिचयात झाल्यामुळे ज्या ज्या क्षेत्रस्थळी गेले तिथे लोकांना एकतर विश्वासच नाही परमेश्वरावर किंवा दुसरा असला तरी तो श्रद्धावान असतो. तेव्हा कोणत्याही क्षेत्रस्थळी सहजयोग जमवणे कठीणच जाणार आहे. हे आमच्या सहजयोग्यांनीही लक्षात ठेवलं पाहिजे. तिथे डबल मेहनत करावी लागते. सर्वप्रथम जे लोक भाविक आहेत, श्रद्धावान आहेत ते खेडेगावातून येतील, इतर जागेतून १४ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-14.txt येतील, देवीच्या देवळात येतील, महालक्ष्मीला जातील. तिचा आशीर्वाद घेतील, कुंकू घेतील, घरी जातील. पण इथले जे स्थायिक लोक आहेत ते डोळ्याखाली रोज बघत असतात की हे देवीचे प्रकरण काय चाललेले आहे, देवळात काय प्रकार चाललेले आहेत आणि जरी आपल्या सांस्कृतिक जबाबदारीमुळे आपल्याला देवीबद्दल अपमान वाटत नसला तरीसुद्धा तिच्याकडे लक्ष असावं तितकं आपलं लक्ष असतं. आता महालक्ष्मी म्हणजे काय आहे ? तिचं इथं .. केवढं महत्त्व आहे, ते थोडसं मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुमच्या लक्षात येईल की तेवढी सूक्ष्मता कोल्हापूरच्या लोकांमध्ये नाही. तेवढे श्रद्धावान ते नाहीत. श्रद्धावान असल्याशिवाय माझी गोष्ट तुम्हाला समजणार नाही आणि कुंडलिनीचे जागरण होणार नाही. तेव्हा श्रद्धेने माझी गोष्टी ऐकायची. म्हणून किती मोठी गोष्ट आहे. त्याचं सर्वप्रथम हे जाणलं पाहिजे की देवीची तीन रूपं आहेत. पहिल्यांदा ती आदिशक्ती म्हणून या संसारात विचरण करते. आदिशक्ती म्हणजे जी सगळ्या शक्त्यांचा समन्वय आहे. तिन्ही शक्त्यांचा समन्वय अशी ती अर्धमात्रा आदिशक्ती आहे आणि तिचं एक रूप म्हणजे महाकालीचं, दूसरं महासरस्वतीचं आणि तिसरं महालक्ष्मीचं. महालक्ष्मी सुषुम्ना मार्गात आपल्यामध्ये प्रगट होते. सुषुम्ना मार्ग आहे तिथं महालक्ष्मीचं स्थान आहे. तेव्हा जी आपल्यामध्ये, शास्त्रीय दृष्ट्या म्हणायचं तर ज्याला आपण पॅरासिम्परथॅटिक नव्व्हस सिस्टीम म्हणतो. तिचा कंट्रोल या शक्तीला असतो. आता जे वैद्यकीय शास्त्रात म्हणजे विज्ञानामध्ये फार हशार झालेले लोकं आहेत, त्यांनी सगळं इंग्रजी शिक्षण घेतलेले आहे, त्यांना जर मी सांगितलं की तुमची पॅरासिम्परथॅटिक नव्व्हस सिस्टीम ही महालक्ष्मी शक्ती कंट्रोल करते. तर मला मारायला धावतील. कारण त्यांच्यामध्ये देवी म्हणून काहीच नाही. जी देवी - देवता आहे ती म्हणजे इंग्लंडची राणी. ती खरी देवी, बाकी काही देवी म्हणून काही वस्तू असेल, घरात महालक्ष्मीचा फोटो असेल, तिला हार घालतील. पण महालक्ष्मीचा संबंध संपूर्ण पॅरासिम्परथॅटिक नव्हस सिस्टीमशी आहे आणि ती सबंध कंट्रोल करते हे मानायला कधीही तयार होणार नाहीत. आणि जरासं आम्ही म्हटलं तर भांडायला उभे राहतील. ही एक प्रथा आहे. दूसरी प्रथा ही की महालक्ष्मी ही गुरू तत्त्वावर आधारलेली आहे. पहिल्यांदा गुरू तत्त्व. गुरू तत्त्वाने काय होते ? गुरू तत्त्व माणसामध्ये येण्याचा अर्थ असा की, मनुष्यामध्ये समतोलपणा येते. प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल असावा लागतो. तुम्ही रस्त्याने म्हणाल की आम्ही एकीकडे तोंड करून चालू तर चालू शकत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल नाही आहे ते. व्यावहारीक नाही. जर तुम्ही म्हणाला १५ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-15.txt की मोटर आम्ही एका चाकावर एका साईडने चालवू तर! जर तुम्हाला एखाद्या सायकलवरही बसायचं असेल तर तुम्हाला त्याचा तोल सांभाळावा लागतो. जर तुम्ही समतोलात आले नाही, मध्यात आले नाही, तर सुषुम्ना मार्गाने तुम्ही जगू शकत नाही. तेव्हा सर्वप्रथम लक्ष्मी तत्त्व आहे. लक्ष्मी तत्त्व हे मधोमध, नाभीवर बसलेले आहे. तुमच्या नाभीमध्ये लक्ष्मी तत्त्व आहे. आता लक्ष्मीचं जे स्वरूप आहे ते आपल्याला माहिती आहे की तिच्या दोन हातांमध्ये कमळं आणि एका हातामध्ये दान आणि दुसर्या हातामध्ये आश्रय अशी तिची एकंदर प्रतिमा पूर्वीच्या ऋषीमुनींनी पहिल्यांदाच काढून ठेवलेली आहे, देवकृपेने. कारण आजकाल जर काढली असती तर काय काढलं असतं लोकांनी मला सांगता येत नाही. याचा अर्थ असा, की जो खरा लक्ष्मी पती आहे, त्याच्या हातातून दान झालं पाहिजे. सारखं दान झालं पाहिजे. काही थांबलं नाही पाहिजे त्याच्या हातातून. सारखं, अव्याहत वाहिलं पाहिजे, तर तो लक्ष्मीपती असतो. त्याच्या आश्रयाला पंधरा-वीस तरी मंडळी असायला पाहिजेत आणि त्यांचा आश्रय सुखदायी असायला पाहिजे, तेव्हा तो लक्ष्मीपती आहे. हातामध्ये दोन कमळं गुलाबी रंगाची, म्हणजे त्याच्या राहणीत, त्याच्या बोलण्यात, त्याच्या एकंदर शरीरात, वैभवात एक तऱ्हेची आक्द्रता असायला पाहिजे. करुणामय असायला पाहिजे. कारण एका कमळामध्ये एक साधारण भुंगा, ज्याच्यामध्ये काटे असतात आणि तो जाऊन झोपतो आणि कमळ त्याला झाकून घेते आणि आरामात त्याला ऊब देते. त्याचे काटे ही बोचत असतील थोडेसे तरी त्याला सांभाळते. असे लक्ष्मीपती असायला पाहिजे. हे लक्ष्मीपतीचंे सांगणं झालं. हे आजकालचे जे लक्ष्मीपती आहेत, त्यांना काय म्हणावं समजत नाही. जर तुम्ही गाढवाला पैसे लावले तर तो काही लक्ष्मीपती होणार नाही. पण ही लक्ष्मी जी आपल्याला मिळाली , आता हे बघा, हे बाहेर देशातून, १४ देशातून इथे लोक आलेले आहेत. त्यांच्याकडे लक्ष्मीचं राज्य आहे एका अर्थाने, एका अर्थाने ह्यांच्याकडे पैसा आहे. पण लक्ष्मीपती नाहीत. पण तरीसुद्धा माहात्म्य स्वत:च्या आत्म्याचं किती आहे! हे बघा, चौदा देशातून इथे तुमच्या कोल्हापूरात आले आहेत, पण कोल्हापूरचे किती लोक इथे आले आहेत माझ्या भाषणाला! किती लोक व्यवस्थित बसले आहेत ? बघ्यासारखे उभे आहेत. श्रद्धा काही दिसते का? मगापासून म्हणतोय 'बसा, बसा, बसायला देखील तयार नाहीत आणि एक तऱ्हेचा हट्टीपणा. या लोकांमध्ये जर त्यांना सांगितलं की हे असं करून तुमचं भलं होईल, तर त्या गोष्टीला अगदी तयार असतात आणि करतात, इतके श्रीमंत आहेत, सायंटिस्ट आहेत, सगळे काही आहे, पण आपल्या लोकांमध्ये ही अक्कल येणं अत्यंत कठीण आहे. त्याला कारण असं झालेलं आहे की आपण म्हणजे अतिशहाणे! आणि आपल्यासमोर मोठमोठाले आदर्श आहेत. सगळ्यांना सगळे पाठ आहे. पुराणे कोणी वाचली १६ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-16.txt नसणार, का कोणी गीता वाचली नाही, कोणी काही केलेले नाही. सगळे अतिशहाणे! कोणी कोणाच भलं केलेलं असो अथवा नसो, पण मुख्य म्हणजे शहाणपण अती आणि त्या अतीशहाणपणामुळे जे आपल्यातलं सत्त्व आहे, जे आपल्यातलं खरं आहे ते आपण गमावणार आहे. 'तुज आहे तुजपाशी' असं सांगितलं आहे. ते तुमच्याचपाशी आहे. या खेडेगावात आहे, पण खेडेगावात पहिल्यांदा रुजणार, क्षेत्रस्थळी सगळ्यात शेवटी। सगळ्यात पहिले खेडेगावात मग मुंबईला सुद्धा रूजेल, पण क्षेत्रस्थळी फार कमी रूजेल असं मला दिसतं. त्याला कारण असं की श्रद्धा जी आहे तिला गहराई आहे. श्रद्धेमध्ये सूक्ष्मता आलेली आहे. श्रद्धा म्हणजे देवीला गेलो, तिला नारळ घातले, हे घेतलं, झालं. नमस्कार, चला आजचं काम देवीचं झालं ! पण देवी म्हणजे काय? महालक्ष्मी तत्त्व म्हणजे काय? इकडे लक्ष नाही. आता जेव्हा लक्ष्मीत मनुष्य उतरला तर या लोकांना लक्ष्मी मिळाली. त्याच्यापुढे आता विवंचना लागली की एवढा मला पैसा मिळाला, सगळं काही मिळालं, सगळं ऐश्वर्य मिळालं तरी आमची मुलं आहेत की जी सुसाईड करताहेत, आत्महत्या करताहेत. म्हणजे पैसा हे काही उत्तर नाही. पैशाने बनवलेली गोष्टी खरी नाही. म्हणजे ह्याच्यापलीकडे काहीतरी असायला पाहिजे. जर पैसा सगळे काही असता, तर ते आम्ही मिळवलेले आहे. मग त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काही दिसत नाही. आम्ही एवढा उपद्व्याप केला, आपली एवढी सुधारणा करून घेतली. आमच्याजवळ एवढा पैसा आला, आम्हाला स्थिर्य नाही, आपापसात मारामाऱ्या. आमच्यात खून पडतात. त्याच्यानंतर काही काही देशांमध्ये तर आई-बहिणींचाच कोणाला पत्ता लागत नाही. इतकं त्यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं आहे आपापसामध्ये की त्यांना आश्चर्य वाटतं की पैशामुळे एवढं वैमनस्य लोकांमध्ये आलं, तेव्हा पैशात काहीतरी खराबी असली पाहिजे ! तर तेव्हा सर्व सोडून आता दुसर्या शोधाला लागले. काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही शोधायला लागले, काही इथून आपले भामटे गुरू गेले आणि त्यांनी त्यांना पकडून घेतलं आणि त्यांना लुटून खाल्लं. तर पण परमेश्वर हा आहे. आणि जे त्याच्या शोधात खरेखुरे फिरतात त्यांना परमेश्वर हा मिळेल. पण जे वरपांगी आहेत त्यांना मिळणार नाही. ह्यांच्यासमोर आपल्यासारखे आदर्श नाहीत. ह्यांनी गुरू गीता ऐकलेली नाही, ह्यांनी गीता ऐकलेली नाही. ह्यांना काही माहीत नाही. आपल्याकडे एक एक मिनिस्टर जर उभा केला तर तो अशी भाषणं देतो की वाटतं, बापरे बाप, साक्षात हा कुठून उतरला आहे ब्रह्मदेव असा बोलतो आहे. पण आज सगळे कोरडे पाषाण. 'लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण'. हे म्हणजे आपल्या इथल्या सर्वच लोकांचे आहे. त्यामुळे होतं काय की वरपांगीपणा येतो. त्यांना आदर्श फार मोठाले, आणि आत काहीच नाही, पोकळ वासा. ह्या पोकळ हि १७ पार े कि 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-17.txt वासेला आता ठीक कसं करायचं? त्याच्यात श्रद्धा कशी भरायची? 'श्रद्धा करा' असं होत म्हणून नाही. आणि जोपर्यंत श्रद्धा निर्माण होणार नाही तोपर्यंत या लक्ष्मीतून महालक्ष्मी तत्त्व जागृत होणार नाही. लक्ष्मीतूनच महालक्ष्मी तत्त्व जागृत होईल. पण ती लक्ष्मी जी आपल्याला मिळणार आहे, ती लक्ष्मी ह्या लक्ष्मीसारखी असेल तर! समजा जरी ती महालक्ष्मी आपल्याला मिळाली तर जरुरी नाही की आपल्याजवळ पैसे असायला पाहिजे. जरुरी नाही की तुम्हाला लक्ष्मीचे त्त्व जाणलं पाहिजे. ते जाणल्याशिवायच तुम्ही महालक्ष्मी तत्त्वात उतरू शकता. कारण या अशा विशेष स्थानी आपला जन्म झालेला आहे. हिंदुस्थानात जन्म होणं म्हणजेच लाखो-लाखो योनीतलं पुण्य आहे! मग महाराष्ट्रात होणं तर काय सांगायचं! आणि त्यात क्षेत्रस्थळी जन्मलं म्हणजे केवढं मोठ पुण्यासारखं, जे केवढं संचित! एवढं गाठोड बांधून परत वरपांगीपणा. त्याचा इलाज काय केला पाहिजे ? त्याचा इलाज हा आहे की त्याच्याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे. स्वत:बद्दल विचार करायला पाहिजे. आता मी म्हटलं बसा, तर बसत का नाही? ते लोकही बघताहेत की किती उद्धट लोक आहेत. बसत का नाही तुम्ही लोक? एकंदरीत माणसामध्ये स्वत:बद्दल एक तऱ्हेचे कुतूहल असायला पाहिजे. आणि विचार असायला पाहिजे की मी या जगामध्ये कशाला आलो आहे ? या जगात येऊन मला काय मिळवायचे आहे? मला जे काही मिळवायचे आहे ते मी मिळवले आहे की मला अजून काहीतरी मिळवायचे आहे? मला आनंद मिळाला आहे का? या देशांमध्ये जिथे एवढी प्रगती झालेली आहे त्या देशाच्या लोकांना जाऊन विचारावं की बाबा, तुम्हाला ते मिळालं का ? तुम्ही ज्या सौख्याच्या शोधात होता ते तुम्हाला मिळालय का ? ते सांगतील की आमच्यापेक्षा द:खी कोणी नाही. तुम्ही आमच्यापेक्षा सुखी आहात. तेव्हा कारण हे की या भारतभूमीच्या पुण्याईमुळे तुम्ही बचावले. त्याच्यामुळे तुम्ही बचावले. पण ते पुण्यसुद्धा आता अती शहाणपणामुळे कदाचित अपुरे पडणार. मी आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाला फक्त दोनदा गेले. पण तिथे हजारो सहजयोगी तयार झाले. तुमच्या कोल्हापुरात कितीदा आले मला आठवत नाही, पण पुष्कळदा आलेली आहे आणि तरी इथे किती सहजयोगी आहेत ? मोजून सांगता येतील. म्हणजे लोकांमध्ये श्रद्धा नाही. स्वत:बद्दल श्रद्धा नाही आणि परमेश्वराबद्दलसुद्धा श्रद्धा नाही. जी श्रद्धा आहे ती फार कमी पडते. 'मी परमेश्वराला शोधूनच काढणार.' 'येऱ्यागबाळ्याचे काम नोहे'. 'मी परमेश्वराला सोडणार..' अशी ज्यांनी एकदा आपल्या मनामध्ये धारणा धरली आणि आपल्यामध्ये जागूनच त्याचा हिय्या त्यांनी केला त्याला काहीही नाही. ही वेळ आलेली आहे. आज हजारो लोक हजार ठिकाणी पार होत आहेत आणि क्षेत्रस्थळी राहिलं म्हणून काय झालं! 'मी महालक्ष्मीला प्राप्त करून राहीन,' असे म्हणणारे जर तुमच्यात असले तर आम्ही त्यांच्यासाठी तयार आहोत. महालक्ष्मी तत्तव हे फार मोठे आहे. महालक्ष्मी तत्त्वाशिवाय तुम्ही मानव स्थितीला नसते आला. आज अमिबापासून १८ े 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-18.txt तुम्ही जे माणूस झालात ते तुम्ही या महालक्ष्मी तत्त्वामुळे आणि या महालक्ष्मी तत्त्वामध्येच जी आपण 'उदो, उदो अंबे' असं म्हणतो तीच ती कुंडलिनी आहे. त्या कुंडलिनीला 'उठ , ऊठ ' असे आपण म्हणतो या महालक्ष्मी तत्त्वात. इथे जसे गोंधळी गातात, आणखीन ठिकाणी का गातात? म्हणजे सुषुम्ना पथ ज्या पथात आहे. कुंडलिनी उठते ते महालक्ष्मीचं स्थळ तुमच्याकडे असतांना काय तुम्ही तिची सेवा केलेली आहे. ती आतमध्येच जागृत आहे तुमच्यात. तिला जागृत करू दे. पुष्कळ सांगायचंय महालक्ष्मीला , पुष्कळ बोलायचंय. आधी सूक्ष्मात उतरून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या ठिकाणी तुम्ही आलात, काय आहे हे ? हे पृथ्वी तत्त्वातून निघालेले आहे. हे स्थळ पृथ्वी तत्त्वातून निघालेले आहे आणि त्याच्याकडे तुम्ही हात करून बघितलं तरी तुम्हाला काही नाही लागलं. तरी इथं जेवढे सहजयोगी आहेत, फॉरेनर्ससुद्धा जाऊन आले, ते म्हणतात, 'माताजी, केवढं जागृत स्थळं आहे हे!' आता तुम्हाला नाही सांगता यायचं की जागृत आहे की नाही. इथे राहूनही तुम्हाला माहीत नाही की जागृत आहे की ते नाही. मग तुमच्यापुढे मी काय बोलणार! तेव्हाही मोदी बोलत होते तर सगळे लोक उठून उठून जात होते. इतक्या कळवळीने ते बोलत होते, इतक्या मेहनतीने बोलत होते. लोक उठून उठून जात होते. त्यांना त्याची कदर नव्हती की आम्ही या फार मोठ्या स्थळी जन्माला आलो, काहीतरी विशेष पुण्य घेऊन आलो असू. भलं मोठ काहीतरी गाठोडं संपदेचं आहे, ते उघडण्यासाठी माताजी आलेल्या आहेत. ते घेऊन त्यात पुढं गेलं पाहिजे. त्याच्यात मेहनत केली पाहिजे. तिकडे लक्ष घालायला पाहिजे. पण तसं नाही. लक्ष कुठय सध्या आपलं हे पाहिलं पाहिजे. आपलं लक्ष जे आहे ते वरपांगी आहे. त्यात खोल ते लक्ष गेलं पाहिजे आणि ते जाण्यासाठीच ही 'अंबे, उदो, उदो'. अंबेला उठवलं पाहिजे. अंबा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुमची कुंडलिनी आहे. तीच अंबा आहे. ही म्हणजे सबंध सृष्टीला बनवून, इथं थांबलेली आदिशक्ती आहे, ती अंबा आहे, म्हणजे अर्धमात्रा. आपल्याला माहिती आहे की साडेतीन मात्रा या संबंध महाराष्ट्रात आहेत. हे त्रिकोण जे आहे महाराष्ट्राचं, पठार, हे सर्व विश्वाच्या कुंडलिनीचे स्थान आहे. त्यातली महालक्ष्मी इथे आहे. आता इथल्या लोकांची ही स्थिती म्हणजे आम्ही काय बोलायचं पुढे सांगा! ही महालक्ष्मी. आणि महाकाली आपल्याला माहीत आहे कुठे आहे. तुळजापूरला, भवानी आहे, आणखीन माहूरला महासरस्वती आहे, पण अर्धमात्रा मात्र आदिशक्ती, नाशकाजवळ वरणीला आहे. ते सगळं ते बघायला हे लोक जातात. इथे बघायला आले, तुळजापूरला जाऊन आले. पण जाणून की हे काय आहे. सबंध विश्वाची कुंडलिनी, ती त्यातली महालक्ष्मी तुमच्याकडे ज्याच्यातून सर्वांचे उत्थान होणार आहे, ज्याच्यातून कुंडलिनी चढणार आहे. म्हणजे इथल्या लोकांनी काय असायला पाहिजे हे मला तुम्ही सांगा! म्हणजे परमेश्वराची काय इच्छा आहे ? तुम्हाला इथे काय घेऊन पाठवलं १९ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-19.txt असेल परमेश्वराने? हा विचार करून ही जेव्हा वेळ येईल, जेव्हा सर्वांची अशी सामूहिक कुंडलिनी उचलायचा समय येईल त्या वेळेला, विशेष त्या वेळेला कशी मंडळी इथं जन्माला घातली असतील देवाने, काय विचार करून, कोणत्या पट्टीचे लोक इथं घातले असतील? तेच मी शोधतेय. कुठे गेले ते? काहीतरी विशेष मंडळी जन्माला घातली असतीलच, ती अजून हाताला लागली नसतील आम्हाला किंवा असतील ही तुमच्यात काही मंडळी त्याच्यात बसलेली. तर सांगायचंय की जाणून घ्या. तुमच्यातल्या प्रत्येकाला मंडळीला परमेश्वराने काही तरी विशेष देऊन पाठवलेले आहे. तेव्हा ते जे विशेष आहे ते तुम्ही वाढवलं पाहिजे. बाकी बेकार गोष्टीत लक्ष घालून तुमचं जे इथे जन्माचे कारण आहे, जे मूळ कारण इथे जन्म होण्याचं आहे आणि इथे राहण्याचे कारण आहे त्याचे सार्थक करून घ्या. सर्व जगाला तुमच्यापुढे वाकावं लागेल, ज्या दिवशी तुम्ही स्वत:ची संपदा जाणून घ्याल. जसं पसायदान लिहिलेले आहे. आपण ऐकलेच असेल. ह्यातली वाक्य लोकांना समजतात की नाही मला माहीत नाही. त्यांनी वर्णन केलेले आहे की कसे कसे लोक इथे जन्माला येतात. त्या वेळेला काय होईल. ब्रह्मा जर एकत्व झाले ते पसायदान, ते आता, हे पसायदान आहे. हे घ्यायला पाहिजे. आणि ह्या लोकांचे काय? 'चला कल्पतरूचे आरव'. कल्पतरू! तुमचे कल्पतरू बनणार. आता मोदी मला म्हणाले, 'माताजी, कमाल आहे. मी नुसता तुमचा फोटो घेऊन गेलो. तिथे दोन- तीन हजार लोक होते पण तिथे जवळजवळ ८०% लोक पार झाले.' म्हटलं, 'काय कमाल आहे. तुम्ही कल्पतरू झालात. तुम्ही कल्पतरू झालात.' तुम्ही कल्पना करा आणि ते पूर्ण होणार. तुम्ही इच्छा करा आणि ते पूर्ण होणार. असे तुम्ही कल्पतरूंचे आरव तयार करायला पाहिजे. एकट्यादुकटयाने नाही चालायचं. आरव म्हणजे वनच्या वन. 'बोलते पियुषांचे आर्णव.' जे अमृताचे सागर आहेत असे बोल. आता ते बोलत होते कोणाचे लक्षही नव्हते. ते आहे नां, 'वाचली गाथा', तसला प्रकार. तेव्हा स्वत:ची किंमत ओळखा, स्वत:ला समजून घ्या. ह्या अशा क्षेत्रस्थळी, या महत्त्वाच्या, विश्वाच्या महत्त्वाच्या क्षेत्रस्थळी आम्ही जन्माला आलो तर आम्हाला काय कराव लागेल. दंडवत घालायला सांगितलं तर चालले दंडवत घालायला. अहो, पण कुंडलिनीची जागृती करून तुम्ही पार का होत नाही. त्याच्यात ऊहापोह, त्याच्यात भांडणं, त्याच्यात वाद-विवाद. वाद - विवाद करून कधीही कुंडलिनी चढणार नाही. काही सोप्प काम नाही कुंडलिनीचं चढवणं. पाऱ्यासारखी कुंडलिनी असते आणि विशेषकरून क्षेत्रस्थळी. तेव्हा मेहरबानी करून आपल्या संपदेला ओळखून घ्यायचे आहे. स्वत:ला ओळखून घेतले पाहिजे. मग कुंडलिनीचं जागरण फार सोपे काम आहे. फारच सोपे काम आहे. स्वत:ची पहिल्यांदा इज्जत करा, स्वत:चा पहिल्यांदा आदर करा. स्वत:ला २० 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-20.txt समजून घ्या की आम्ही का या क्षेत्रस्थळी जन्माला आलो. काहीतरी विशेष असायला पाहिजे. बरीच तरुण मंडळी आलेली आहेत ते पाहन मला आनंद वाटला. कारण तरुण मंडळी फार पटकन पार होतात आणि त्यात लाभतात ही. तसेच पुष्कळ वयस्कर लोकसुद्धा. ज्यांना शहाणपण असेल ते सगळेच याच्यातून पार होतात, पण तरुण मंडळीना पटकन हे लक्षात येतं. पण त्यांनी त्याच्यात थिल्लरपणा केला नाही पाहिजे. तुमचं विशेष आहे की कोणत्याही वयाला सहजयोग लाभ देतो. पण त्यातली मेहनत करण्याची जी शक्ती आहे ती तरुणपणी असते. म्हणून त्या लोकांनी मेहनत करून त्याच्यात रमलं पाहिजे आणि जमलं पाहिजे. जर त्याच्यात जमले नाही, तर तुम्हाला माहितीच आहे की या देशाचाच काय पण सर्व जगाचाच नाश समोर दिसत आहे. त्या नाशाला जर तुम्हाला परतवून पाठवायचं असलं तर स्वत: समर्थ झालं पाहिजे. सम अर्थ झालं पाहिजे आणि सम अर्थ म्हणजे तुम्ही जे आत्मा आहात त्याच आत्म्याला प्राप्त होणे. तुम्ही आत्मा आहात, बाकी सगळं मिथ्या आहे. मन, बुद्धी, अहंकार आदि या उपाधी आहेत, तुम्ही फक्त आत्मा आहे आणि आत्म्याला प्राप्त झाल्याबरोबर तुमच्या हाताला चैतन्य लाभेल. ते चैतन्य म्हणजे तीनही शक्तींचा समन्वय आहे. एक शक्ती नाही. प्राणशक्ती, इच्छाशक्ती आणि धारणा शक्ती म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तीनही शक्त्यांचं समन्वय झालेला आहे अश्या ह्या ज्या चैतन्य लहरी आहेत. त्यामधून तुम्ही सुद्धा दुसर्यांचं भलं करू शकता आणि स्वत:ला एका नवीन वातावरणात, परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करू शकता. हे सर्वांचं व्हावं , सर्वांचं कल्याण व्हावं, म्हणून आमची रात्रंदिवस धडपड चाललेली आहे. त्यात पैसे घेणे वगैरे या गोष्टींचा काही प्रकार नाही. अर्थात पोटभरू लोकांना राग येणारच. मग ते देवाच्या नावाने घेत असतील, कोणाला बरं करण्याच्या नावाने घेत असतील किंवा काहीही असेल, त्या लोकांना हे समजत नाही की माताजी एक पैसा ही न घेता लोकांना बरं कसे करतात ? आम्ही करतो, आमची मर्जी. ज्याला करायचं त्याला करू नाही करायचं त्याला नाही करणार. तुम्ही कोण आम्हाला म्हणणार! का बरं करता ? आणि मला आवाहन दिलं की तुम्हाला आम्ही पैसे देऊ, जर तुम्ही एकाला बरं केलं. आम्ही कशाला आवाहन तुमचं ऐकणार. आमची मर्जी. आम्हाला करायचं असेल तर करू नाहीतर नाही करणार. आम्ही काही तुमच्यासारखे पाट्या लावून कोणाला बरं करीत नाही. आमच्या मर्जीवर जर आलं तर बरं करू लोकांना आणि करतोच. त्यात तुमच्या पोटावरती का पाय यावा? जगामध्ये पुष्कळ आजारी लोक आहेत. आम्ही काही सगळ्यांना बरं करीत नाही. फक्त ज्याच्यात पुण्यसंचय असतो त्यालाच बरं करतो. पाट्या लावून काही आम्ही बरं करणार नाही. त्यांच्यासाठी तुम्ही आपल्या पाट्या लावाव्या. त्याला पाठवू तुमच्या हॉस्पीटलला डॉक्टरांकडे. त्यांच्याकडून पैसे उकळा आणि त्याला बरं करा. फक्त जे साधु-संत आहेत, जे धार्मिक आहेत, मग ते गरीब असोत, कसेही असोत आम्हाला ते प्रिय आहेत, त्यांना आम्ही बरे करणार. तुम्ही त्याची चिंता करू नये. २१ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-21.txt कोणत्याही श्रीमंत माणसाला आम्ही बरं करीत नाही. श्रीमंत लोक म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात जातच नाही. एक-दोघांना बरं केलं तर मला डोकंदखी झाली. एक-दोघांना, ते मला कुठून चिकटले आणि त्यांना बरं केलं तर ते आणखीन दहा श्रीमंत घेऊन आले. म्हटलं, 'बाबा, तुमच्या घरी डॉक्टर आहेत, मला क्षमा करा. मला वेळ नाही.' पळत असते त्यांच्यापासून, पण तरी माझ्या डोक्याला चिकटतात. गरीबांसाठी मला वेळ आहे. एवढंच सांगायचंय की स्वत:, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्याबद्दल उगीच उहापोह करण्यात काही अर्थ नाही. ज्या लोकांना असं वाटतं की सहजयोगामध्ये काहीतरी आम्हाला लाभ होईल त्या लोकांनी सहजयोगात येऊ नये. कोणावर जबरदस्ती नाही. कोणावरही जबरदस्ती नाही. परमेश्वराला मिळवणं ही काही जबरदस्तीची गोष्ट आहे का? तुम्हीच सांगा. ढकलून का तुम्हाला परमेश्वराच्या साम्राज्यात पाठवता येईल? अहो, तिथे सिंहासनावर बसायचंय तुम्हाला? तिथे असे ढकललेले लोक, मेलेले, मुर्दाड लोक तिथे जाऊन बसणार आहेत का ? तुम्हीच सांगा बरं ! तिथे बसणारी मंडळी ही राजेशाही पाहिजेत. तेव्हा असे जे लोक, जे स्वत:ला समजतात की काहीतरी जबरदस्तीने सहजयोग करता येईल किंवा पैसे देऊन सहजयोग करता येईल त्यांनी समजलं पाहिजे की हा सडेतोड योग आहे. जे तुमचं पुण्यसंचित असेल त्याच्यात हजार पटीने जास्त असेल, पण अगदीच पुण्य नसलं समजा, अगदीच महापापी असलात तर काही आम्ही ठेका घेतलाय का तुम्हाला ठीक करण्याचा. तेव्हा लक्षात असायला पाहिजे की परमेश्वरी तत्त्व हे आहे तेच आहे. बाकी काही नाही. बाकी सगळे खोटं आहे. जोपर्यंत तुम्हाला हातालाच लागलेलं नाही, जोपर्यंत ती शक्ती तुमच्या हाताला लागलेली नाही तोपर्यंत तुम्ही असं कसं म्हणता की आहे किंवा नाही. जोपर्यंत इतरांना मिळाला नव्हता, जोपर्यंत रेडिओवरती झाले नव्हते, तोपर्यंत ते म्हणत होते हे नाही आहे. मी जर म्हणते आहे तर बघायला हरकत काय आहे! जर तुम्ही सायंटिफिकली बघता तर सायटिस्ट माणसाचं डोकं उघडं पाहिजे, येउऊन बघायला पाहिजे आहे की नाही आहे. ज्या लोकांना आज लाभ होईल त्यांनी गहनतेत उतरलं पाहिजे. एवढं मात्र आज मला वचन पाहिजे तुम्हा लोकांकडून की 'आज जर आम्हाला माताजी लाभ झाला तर आम्ही गहनतेत उतरू.' वरपांगीपणाने सहजयोग घटित होत नाही. त्याचा काही फायदा होत नाही. एखाद्या बी ला अंकुर ते वाया जात तसे तुम्ही वाया जाणार. तर मला तुम्हाला वाया घालवायचे नाही. तेव्हा कृपा फुटून करून, मनाचा हिय्या करून ध्यानात जायचं आणि परमेश्वरी कृपेने हे घटित होईल अशी मला पूर्ण आशा आहे. २२ 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-22.txt ट जर तुम्ही सहजयोगी आहात तर नैसर्गिक वस्तुंचा उपयोग करा.......कृत्रिम गोष्टी वापरू नका कारण वस्तुंची कृत्रिमता आत्म्याचे हनन करते. आत्मा आणि वस्तू यांच्यात संघर्ष सुरू आहे. .....आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करण्यासाठी तुम्ही वस्तुंचा उपयोग करू शकता, इतर कोणत्याही गोष्टींसाठी नाही. (प.पू.श्रीमाताजी, दिल्ली, २१ /०३/१९९५) प्रकाशक निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in , website : www.nitl.co.in 2014_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-23.txt जे डोळे अबोध आहेत ते बाहेरून काही घेत नाहीत, ते फक्त देत असतात. पवित्रता कोठेही प्रवेश करू शकते. अत्यंत पवित्र, सुखद आहे आणि अत्यंत सुंदर आहे. आपल्याला सुंदर व्यक्ती बनायचे आहे. प.पू.श्री माताजी, लंडन, १५.८.१९८२ िहार