चैतन्य लहवी जानेवारी-फेब्रुवारी २०१५ मराठी रा या अंकाव विश्वाचा आत्मा आपल्या हृदयात आहे ... ४ सहजयोग आणि कुंडलिनीची जागृती १४ आपण आपल्या गुरली सागर २०पात मानती. सग२ आपले पिती आहेत. सागर जेव्हा विश्वाद्वारे टाकलेला कच आपल्यामध्ये सामावून घेऊन ढगांच्या २०पात आकाशात जातौ तेव्हा तौ अत्यंतसुंढ२ आणि शुद्ध बनतो. पं.पू.श्री माताजी, देवी पूजा, धर्मशाला, २६ मार्च १९८५ विश्वाची आत्मा आपल्या हृढयात आहे. अ ০ विश्वाचा आत्मा आषल्या हृढयात आहे. त्या आ्म्यात आषण जाणू शकती की है सर्ब विश्व एका परमेश्वराने बनबलेले आहे आणि र. आपल्या सर्वामध्ये त्याच पवैमेश्बराचा अश हा आत्मा 9 र विराजमान आहे. ं पुणे, ०८/०३/१९८६ या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात. पण आपल्या शास्त्रात याला पुण्यपट्टणम असे म्हटलेले आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य या पुणे नगरातून वहात आहे आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे, की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत शिव स्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या मनुष्य बघून, त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठीत असतो. आत्मतत्त्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं सुद्धा, रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्त्व, मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्त्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे, आत्मास्वरूप आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचे प्रतिबिंब जे हृदयात आहे, ते धारणेला जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्रसुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो. एकमेकांना ओळखत नाही, एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते. त्याबद्दल भ्रामकता असते. एकमेव जाणिवेसाठी ज्याला अॅबसल्यूट म्हणतात, तो आत्माच मिळविला पाहिजे. कारण तोच आपल्या सर्व नसानसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विदु म्हटलेले आहे, की विद् झाले पाहिजे. ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसानसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही कितीही म्हटलं की आम्ही जातियता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब-श्रीमंत मिटवून टाकू. म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या, की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत त्यांना बंद करून टाकू किंवा सर्व जगात एकच साम्राज्य आलं पाहिजे अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते बाह्यातून तुम्ही कितीही साध्य केलं तरी ते निष्फळ होऊन जातं. त्याला कारण ज्यांनी हे बनवलं आहे तो मानव, ती मानव जात अजून त्या स्तराला आलेली नाही जिथे ती विश्वात्मकाला जाणेल. विश्वाचा आत्मा आपल्या हृदयात आहे. त्या आत्म्यात आपण जाणू शकतो की हे सर्व विश्व एका परमेश्वराने बनवलेले आहे आणि आपल्या सर्वांमध्ये त्याच परमेश्वराचा अंश हा आत्मा विराजमान आहे. वरपांगीपणाने कितीही आपण म्हटलं, की आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सगळी भावंड आहोत, तरी ती वरवरची भावना राहील. खोल, आतमध्ये, हृदयात तो आत्मा वसलेला आहे. फक्त आपलं चित्त जेव्हा त्याच्या प्रकाशाने आलोकित होते, तेव्हाच मनुष्य समजतो की खरोखरच आपण एकाच शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत. आज आपण विश्व धर्म स्थापन केला तो फक्त अशाच लोकांच्या आधारावर होऊ शकतो, ज्यांच्यामध्ये विश्वात्मकाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. बाह्यातल्या लोकांचा कोणताही तुम्ही असा विश्वाचा कार्यक्रम काढला तर तो फलित होणार नाही कारण त्याच्यात काहीसुद्धा सत्य नाही. तर सर्वप्रथम आत्म्याची आपल्यामध्ये जागृती ही पूर्णपणे झाली पाहिजे. तो जागृत आहे. पण त्याची जी जागृत स्थिती आहे ती चित्तात आली पाहिजे. बाह्यातून प्रयत्न करूनही होऊ शकते, असं लोकांचं म्हणणं आहे, पणा मला असं वाटतं की ती आतूनच होते. आतूनच ती ५ आपल्यामध्ये जागृती येऊ शकते. ती म्हणजे कुंडलिनी जागरणाने. कुंडलिनी ही शक्ती आपल्यामध्ये व्यवस्थित सुप्तावस्थेत असते. आणि ज्यावेळेला तिचं जागरण होतं, तेव्हा ही शक्ती, जसा एखादा दीप आपण पाजळून ठेवावा आणि त्याच्यावरती एखादी शक्ती किंवा समजा गॅसची धार आली तर ती कशी पेटून निघते, तसच आपलं चित्त आहे, ते सबंध आलोकित होऊन जातं. पण तो आलोक जोपर्यंत आपल्या व्यवहारात, आपल्या वागण्यात, आपल्या समाजात, आपल्या देशात आणि या विश्वात पसरणार नाही तोपर्यंत सहजयोगी होऊनसुद्धा काही फायद्याचे नाही. जो आलोक तुमच्यामध्ये आला त्याच्यामुळे तुमच्या प्रकृतीला आराम पडला असेल. कदाचित तुमची मानसिक स्थिती ठीक झाली, शारीरिक स्थिती ठीक झाली, सांसारिक स्थिती ठीक झाली, तरीसुद्धा अजून तुम्हाला शिवशक्ती मिळालेली नाही. शिवाची जी शक्ती आहे ती विश्वाला आपण एक मानलं पाहिजे. एक मानणं हे काही बुद्धीने नाही होत, पण ती जाणीव आतून येते की आम्ही सर्व एक आहोत. हे सर्वप्रथम शिवाचं दर्शन म्हणजे तो विश्वात पसरलेला आहे आणि त्याचं कार्य इतकं तोलून आहे, इतकं समजून आहे की तो प्रत्येकाला ओळखून आहे. आता समजा तुम्ही जर इथे दिवा लावला तर या दिव्याला हे समजणार नाही की कोठपर्यंत प्रकाश पोहोचवायचा किंवा कोणत्या गोष्टीला आलोकित करायचं किंवा कोणती अशी जागा आहे जिथे हा प्रकाश गेला पाहिजे, तो विचार हा दिवा करणार नाही. पण आत्म्याचं तसं नाही, एकदा जर तुम्ही आत्मा तेवला तर तो चैतन्य रूपाने तुमच्या हातातून वाहू लागतो आणि त्याच्यामध्ये ही जी आलोकित झालेली बुद्धी आहे ती त्या चैतन्यातून वाहते. ती तुम्हाला बरोबर सांगते की इथे तुमचं चुकत आहे, इथे तुम्ही ठीक चालले आहात, इथे तुम्ही पुढे चला. म्हणजे साऱ्या परमेश्वराची जी बुद्धी आहे ती या आत्म्यातून वाहते. साऱ्या विश्वातलं जे कार्य आहे, परमेश्वर करतो आहे ते तुमच्या हातूनसुद्धा त्याचप्रमाणे तो करवून घेत आहे. म्हणून सर्वप्रथम आत्म्याला प्राप्त झालं पाहिजे, शिवाला प्राप्त झालं पाहिजे. आता बाह्यातून कसं आपण शिवाकडे जाऊ शकतो, ते पाहिलं पाहिजे. शिवतत्त्वामुळे सत्य जाणलं जातं, कारण मी सांगितलं की विश्वाची सर्व शक्ती जी आहे ती एका शरीरातून वाहिल्यासारखी आहे, त्यामुळे कुठेही काही होत असलं तरी तुम्ही या शक्तीच्याद्वारे सामूहिक चेतनेत सत्य जाणू शकता. सत्य काय किंवा असत्य काय. हे जे केवळ सत्य आहे, जे अॅबसल्यूट आहे, ते तुम्ही आत्म्यामुळे जाणू शकता. आणि या प्रकाशाचा जो विशेष गुण आहे की जेव्हा हा प्रकाश आपल्या हृदयात येतो तेव्हा मनुष्य आनंदात रमण करू लागतो. आनंदाच्या उम्मी त्याच्या अंगात उठू लागतात. त्याच्या बुद्धीत, त्याच्या वागण्यात, सर्व गोष्टींमध्ये एक चमक येते. एक विशेष मोहीत करणारं, उच्च पदाला नेणारं असं एक व्यक्तित्व त्याच्यात जागृत होतं. अशा मानवाजवळ जो मनुष्य येईल त्याचा उद्धार होतो, त्याचं कल्याण होतं . तो सन्मागाला लागतो. उत्तम मार्गाला तो येतो. आपोआपच हे घटित होतं. त्या संगतीतच हे सगळें घडून येतं , पण त्याही पलीकडे असा मनुष्य नेहमी आनंदात मग्न असतो. आनंदाला दोन बाजू नसतात, फक्त केवळ आनंद असतो, त्याला आपण निरानंद म्हणतो. केवळ आनंद म्हणजे त्याच्यामध्ये सुख आणि दु:ख अशा एका नाण्याची दोन बाजू किंवा दोन स्थिती नसतात. मनुष्य एकमेव स्थितीत असतो आणि ती एकमेव स्थिती म्हणजे आनंद स्थिती आहे. यात तो साक्षी स्वरूप होऊन सुख आणि दुःखाच्या लाटांना बघत असतो. जसा काही नावेवर बसला आहे आणि समुद्राच्या ६ कितीही लाटा आल्या तरी त्यांना तो मजेत न्याहाळून राहिला आहे. ती स्थिती, त्या न्याहाळण्याची स्थिती, ती स्थिती तुमच्यात प्राप्त झाली म्हणजे ह्या आनंदाच्या उर्मी, आनंदाचं सौख्य आणि आनंदाचं राज्य काय आहे ते लक्षात येतं. पण ते मिळूनसुद्धा आनंद परिपूर्ण होत नाही. कारण जो या आत्म्याचा स्रोत आहे तो विश्वाचा आत्मा आहे. म्हणून जोपर्यंत हा आनंद विश्वाच्या प्रत्येक सीमेवर नेऊन पोहोचवत नाही, तोपर्यंत आपण आनंदात पूर्णपणे येऊ शकत नाही. म्हणजे एखादं समजा, समुद्रामध्ये फूल पडलं. तर ते वहात वहात या किनार्यावर जाईल, त्या किनाऱ्यावर जाईल, मग त्याची हीच गती होऊन जाते. त्यातच त्याला आनंद वाटतो, तसेच एकदा मनुष्य परमेश्वराच्या साम्राज्यात उतरला की त्याला वाटतं कोणाच्या हृदयाला जाऊन भिडावं, कोणाला जाऊन सांगावं, कोणाला भेटावं, कोणत्या देशात जावं आणि ही सुवार्ता सांगायची की तुम्ही सुद्धा आपल्या आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हा. म्हणून विश्वस्वरूपत्व आल्याशिवाय आम्ही आत्मसाक्षात्कारी झालो, असं म्हणता येत नाही. जे लोक स्वत:ला सहजयोगी म्हणतात ते अजूनसुद्धा जाती-पाती, नसत्या गोष्टींना धरून बसतात. आमच्या जातीतच लग्न झालं पाहिजे. आमची जात, आमचं हे, आमचं ते, या मर्यादेतून निघालं पाहिजे. आमचा देश, आम्ही हिंदुस्थानी, आम्ही इंग्लिश, आम्ही अमेरिकन, आम्ही तुमच्यापेक्षा उच्च, तुम्ही आमच्यापेक्षा नीच, आम्ही उत्तरेत राहणारे, तुम्ही दक्षिणेत राहणारे, पूर्व, पश्चिम या सर्व दिशा मानवाने ठरविल्या आहेत. परमेश्वराने काही बनविल्या नाहीत. त्याने काही या सृष्टीमध्ये वेगळेवेगळे देश वगैरे काही बनविले नाही, पण वैविध्य आणण्यासाठी इतकी सुंदर सृष्टी केली. पण माणसाचं डोकं प्रत्येक ठिकाणी हे शोधत असतं की आता आपण आपल्याला कसं वेगळं करून घ्यायचं, अलगद कसं करून घ्यायचं. तर आता मग पुणेकर झाले, मग मुंबईकर झाले, मग त्यातल्या त्यात पुणेकर म्हणजे सदाशिव पेठवाले झाले. मग त्यातले आणखीनही आतमध्ये गेले तर आणखीन कोणत्या विहिरीत जाऊन बसतील देवाला ठाऊक! पण सहजयोग्यांनी विहिरीत नाही गेलं पाहिजे, सरोवरामध्ये फुलासारखं फुललं पाहिजे. जो सहजयोगी अजूनसुद्धा अशा विहिरीत आहे त्याने लक्षात घेतलं पाहिजे की तो अजूनपर्यंत सहजयोगात पूर्णपणे उतरलेला नाही. तर सर्वप्रथम आपल्यामध्ये विश्वाचं जे स्वरूप आहे ते मान्य केलं पाहिजे. तरच आपण शिवतत्त्वाला उतरलो आहोत . हे कसं आपण बाह्यातून मिळवू शकतो ते आपण ध्यानधारणेत समजावं. जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हां ध्यानाच्या वेळी लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे, दसऱ्यांकडे नाही. स्वत:कडे लक्ष देऊन बघायचं की आता कसले विचार आपल्या डोक्यात येत आहेत. माझ्या डोक्यामध्ये कोणकोणत्या धारणा मी करून ठेवलेल्या आहेत. त्या बघितल्या पाहिजेत. एकतर मी अमका आहे, मी तमका आहे, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी ह्या धर्माचा, त्या कर्माचा, प्रत्येकजण आपल्याला अती शहाणा समजतो. त्यात मी आहे का ? मी त्याच्यामध्ये सामील आहे का? मी कोणत्या तरी एखाद्या ग्रुपचा किंवा एखाद्या देशाचा किंवा एखाद्या लहानशा गल्लीतला एक नागरिक आहे का ? की मी परमेश्वराच्या साम्राज्यातला नागरिक आहे! स्वत:कडे आपण जेव्हा लक्ष देतो ध्यानामध्ये, कारण आपला संबंध आता आत्म्याशी झाला आहे, तसाच हा प्रश्न तुम्ही स्वत:ला टाकाल. लगेच आत्म्याचा झोतच्या झोत तुमच्यासमोर येऊन उभा राहील आणि आश्चर्य वाटेल की नाही बुवा, आपण विश्वातले एक आहोत. एखाद्या लहानशा थेंबाने एका मोठ्या महासागरात मिसळावं आणि आनंदात ७ रमावं असं का वाटू नये त्या थेंबाला. उलट त्या थेंबाचे आणखीन अणू-परमाणू होण्याकडे लक्ष का असावं त्याचं? कारण मानवामध्ये अनेक अशा गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. त्याला आपण अहंकार म्हणतो, प्रती अहंकार म्हणतो, मानसिक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींच्यामुळे त्याची जी बुद्धी आहे किंवा त्याचं जे मन आहे, ते एकाप्रकारे मर्यादित झालेलं आहे आणि त्या मर्यादा तो तोडू शकत नाही. तो समर्थ नसतो. त्याच्यामध्ये शक्ती नसते की या मर्यादा तोडल्या पाहिजेत. माझा समाज काय म्हणेल? माझे बाप काय म्हणतील ? माझी आई काय म्हणेल? म्हणून जे आदि शंकराचार्यांनी सांगितलं की, 'मला आई नाही, बाप नाही, मला कोणी नाही. मी शिवत्त्व आहे.' म्हणजे तिथे शिवतत्त्वामध्ये मला मर्यादा नाही राहिलेल्या. अमर्याद, अनंत असा मी शिव आहे. आणि जो अनंत शिव आहे त्याला या अशा क्षुल्लक आणि मर्यादित करणाऱ्या गोष्टींचा कोणत्याही प्रकारे त्याबद्दल विचारच यायला नको. पण विचार जरी आला तरी त्याबद्दल दिलगिरी वाटायला नको, की मी असं का केलं नाही, मी अशा धर्माचा आहे, मी अमका आहे. जो काही कोतेपणा आपल्यामध्ये आहे, तो सगळा या आपण धारणा केलेल्या गोष्टींमुळे आहे किंवा आपल्यामध्ये ज्या धारणा केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे आहे. लहानपणापासून आता जर आपल्याला शिकवलं की कोणत्या तरी जातीचे लोक फार वाईट असतात! मग आपल्या डोक्यात ते बसलं म्हणजे बसलं. त्याने मर्यादा आल्या म्हणजे कोणी काही सांगितलं तरी सुटत नाही. पण एकदा का तुमच्यात बुवा, विश्वधर्म म्हणजे काय आणि त्याचा प्रकाश किती सुंदर आहे तो पाहिला म्हणजे वाटतं की काय मूर्खासारखं आजपर्यंत मी या अशा मूर्खासारख्या गोष्टींमध्ये कसा रमलो होतो, मी का घोटाळत होतो. ही जेव्हा स्थिती येते तेव्हा म्हटलं पाहिजे की आपली प्रगती उत्थानाकडे झालेली आहे. म्हणून सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आत्म्याची पूर्ण जाणीव व्हायच्या आधी आपल्या बुद्धीमध्ये पूर्णपणे प्रकाश पडला पाहिजे. जे बुद्धीवर पांघरूण पडलेले आहे, जो अंधार आहे, तो अंधार आपल्यामधून गेला पाहिजे आणि त्यासाठी फक्त स्वत:कडे लक्ष नुसतं द्यायचं. आता एखादा मनुष्य अत्यंत क्रोधी आहे समजा. लहानपणापासून त्याला क्रोध येतो कारण वातावरण त्याचं असं होतं. अशा वातावरणात राहिला जिथं त्याला क्रोधी व्हावं लागलं, तुम्ही म्हणाल मनुष्य कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरच बोजा घालतो त्याचा. स्वत:वर घेत नाही. किंवा असं म्हणू की त्याच्या आईने त्रास दिला किंवा वडिलांनी त्रास दिला किंवा काहीतरी झालं म्हणून तो असा झाला समजा. आता त्या क्रोधी माणसाला जर तो क्रोध अजून जाचतो आहे, तर अजून त्याच्या हातात आत्म्याची तलवार आलेली नाही. आणि ही आत्म्याची तलवार ही प्रेमाची आहे आणि फुलांनी गुंफलेली आहे. तर तिसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवण्याची अशी आहे की आत्मा हा प्रेमस्वरूप आहे. निव्वळ प्रेम आहे. पण त्या प्रेमाला समजायला आपल्यालासुद्धा आत्मसाक्षात्कारच पाहिजे. 'आत्मण्येव आत्मने तुष्टाः' आत्म्यानेच आत्म्याला जाणता येतं असं म्हणतात. म्हणजे असं आहे की जर समजा तुम्हाला डोळे नसले तर तुम्ही स्वत:चे डोळेसुद्धा आरशात बघू शकत नाही. तसच जोपर्यंत तुम्हाला आत्म्याची ओळख झालेली नाही तोपर्यंत तुम्ही या आत्म्याचं स्वरूपसुद्धा जाणू शकत नाही. आणि ह्याचं नुसतं स्वरूप म्हणजे हा नुसता प्रेमाचा पुंज आहे. प्रेम. पण या प्रेमाला आपण जसं जाणतो, तसं प्रेम नव्हे. त्या प्रेमामध्ये लालसा नाही, कोणत्याही तऱ्हेची उद्दामता नाही किंवा त्या प्रेमाला कोणतीही इच्छा राहत नाही. हे प्रेम सतत वाहत राहतं. वाहत राहतं आणि त्यातून जे काही उत्तम आहे, जे हितकारी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये बेनोव्हेलन्स म्हणतात, ते घडून आणत असतं आणि ते घडवतांना कोणत्याही तऱ्हेची दुखापत, इजा ८ किंवा जबरदस्ती तो दुसर्यांवर करीत नाही, ते आपोआपच घडून येतं. आपोआपच घटित होतं. जे आपोआप घटित होतं, जे सहज आहे, ज्याला आपण स्पाँटेनियस इंग्लिशमध्ये म्हणतो, ती सहज स्थिती तुमच्यामध्ये आली आणि आपोआपच त्यात प्रेमाची शक्ती जर वाहत सुटली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की या प्रेमाच्या शक्तीने सर्व कार्य होतं. तुम्ही काहीही करायला नको. पण फक्त त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण ज्याला प्रेम म्हणतो ते कोणत्या प्रकारचं आहे. पहिल्यांदा निरपेक्षिता पाहिजे. आता एक लहानशी गोष्ट. समजा, आम्ही अमेरिकेवरून साड्या घेऊन आलो. कुणाला सांगितलं, की काहो, तुम्ही असं करा, आम्ही इतक्या आणल्या आहेत, अकरा साड्या, आता अकरा लेडिज शोधून काढा. तर एक आपली आई, एक आपली बहीण, एक मुलगी किंवा एक आमची वहिनी असं करून त्यांनी सगळे नातलग आपले जोडून आणून ठेवले माझ्यासमोर स्वत:. म्हटलं, 'अहो, निदान आडनावं तरी वेगळं असलेलं बरं असतं! एकदम, एकजात एकाच आडनावाची अकरा माणसं कशी उभी केली?' 'अहो, पण माताजी, ते असं आहे ना, मी त्यांना ओळखतो. त्यामुळे ते मला माहिती आहेत.' 'असं कां? मग तुम्ही सहजयोगी आहात ना! मग तुम्ही इतरांना ओळखत कसे नाहीत?' मग आता दूसरं कोणाला तरी बोलवा. त्यांनी अशीच चार नांव आणली. म्हणजे मी बुचकळ्यात पडले, की आता करायचं तरी काय करायचं? तेव्हा ज्या प्रेमाला निरपेक्षिता आहे, आता हे निरपेक्ष प्रेम कसं असतं. तिथे माझी भावना तुटते. माझे घर, माझा मुलगा, माझा भाऊ, माझी बायको, ही जिथे भावना राहिली, तिथे निरपेक्षिता नाही. अर्थात् प्रत्येकाशी जसा तुमचा संबंध आहे, तो संबंध आहेच, पण त्याठिकाणी चिकटलं नाही पाहिजे. मी पुष्कळदा उदाहरण देते, की जेव्हा जमिनीतून शक्ती निघते आणि ती एखाद्या झाडात वावरते, त्यावेळेला ते समजा जाऊन ती एखाद्या फुलात अडकली, तर झाड तर मरून जाणारच, पण ते फूलही मरून जाणार. तेव्हा ही निरपेक्षिता ही सगळीकडे वाहते आहे. ज्याला जे पाहिजे ते देत आहे. आता ही बघा, आपल्या इथे बसलात तुम्ही. इथे सगळ्या तऱ्हेची ही वीज शक्ती, इलेक्ट्रिसिटी येत आहे. त्यांनी काही इथे लहान लहान दिवे लावले आहेत, काही मोठे दिवे लावलेत, काही तिकडे फोटोग्राफ चाललेत, इकडे हे मी बोलते आहे हे माझं भाषण ते उचलत आहेत, सगळीकडे पंखे चालले आहेत, बघा. कितरी तरी कामं करताहेत. ज्याला ज्याची गरज आहे ते करताहेत, पण ती कोणाला चिकटून आहे का? ती शक्ती चिकटून नाही, पण जेव्हा जिवंतपणा येतो माणसाला, तेव्हा तो चिकटायला लागतो आणि मनुष्य झाला म्हणजे अती चिकट होतो. फारच चिकटतो. म्हणजे मी कधी कधी म्हणते की माणसाला चिक्कू म्हटलं पाहिजे. कारण चिक्कू शब्द बरोबर शोभतो त्याला. प्रत्येक गोष्टीला चिकटायचं. काही असलं की चिकटायचं आणि हे चिकटणं जे आहे ते शक्तीला ओढून घेतं आणि त्याला विद्रुप करून टाकतं. सुरुवातीला माझा मुलगा, माझा मुलगा, मग शेवटी, 'माताजी, या मुलापासून मला सोडवा. मला फार छळतोय.' म्हणजे त्याचेही इलाज होतच जातात. असं नाही की त्याचे इलाज होत नाहीत. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे, की निरपेक्षिता माणसामध्ये असायला पाहिजे. निरपेक्षितेमध्ये मनुष्याने प्रेम केलं पाहिजे. आपली मुलगी आहे, मुलगा आहे, ठीक आहे. तुमची जबाबदारी आहे. ती पूर्ण करायची, पण त्याच्यात अपेक्षा नको, पहिली गोष्ट आणि दसरं, हे माझं आहे म्हणून करायचं असं नाही. उद्या जर तुमच्या दारी दुसरी एखादी मुलगी ही ९ आली, तर तिच्यावरसुद्धा तितकेच प्रेम करता आलं पाहिजे, तर तुम्ही निरपेक्ष आहात, म्हणजे गुरू आहात. पण जी विश्वावरती प्रेमाची पाखर घालावी लागते, त्याच्यात जो आनंद आहे, तो म्हणजे परमेश्वरालाच विचारला पाहिजे, किती आनंद आहे त्याच्यामध्ये! जर परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलं नसतं तर त्याने सृष्टीच रचली नसती. अहो, डोकेदखी आहे, सृष्टी रचा, मग त्यात माणसं रचा, मग ते तुम्हाला मारायला उठतात, वेड्यासारखे वागतात, परत तुम्ही त्यांना ठीक करा. त्यांना रियलायझेशन द्या, मग त्यांना आत्मसाक्षात्कार द्या आणि तरी ते वेड्यासारखे इकडे तिकडे धावतच असतात. मग कसं तरी त्यांना बोटीत बसवा, जबरदस्तीने बांधून ठेवा. तरीसुद्धा त्यांचं डोकं इकडे तिकडे चाललेले आहे, पण तो निरपेक्ष असल्यामुळे सगळा खेळ आहे. निरपेक्ष आहे. फक्त एकच परमेश्वर हा प्रेमाची भक्ती करीत असतो. प्रेमाच्या आनंदात असतो. मी प्रेम करतो हाच त्याचा आनंद आहे आणि त्या प्रेमातच तो राहतो. त्याला हा विचार येत नाही की याने, दूसर्याने मला मारलं की मला काही म्हटलं, की काही नाही. 'बाबा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू काहीही कर मला. माझं तुझ्यावर प्रेम आहे.' ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे आणि तीच प्रवृत्ती जेव्हा एखाद्या सहजयोग्यात येते तेव्हा मी त्याला निरपेक्षिता म्हणेन. पण तसं दिसत नाही. तसं तुटत नाही. म्हणजे चिकटपणा झाला परत. एखाद्याशी जर तुम्ही चांगले वागत असला, तर त्याच्याशी तुम्ही चांगले वागत रहाल, पण ते दिसत नाही. एखाद्याशी जर तुम्ही तुटकपणाने वागत असले तर तसेच वागत राहणार. दुसर्या माणसाशी तसेच वागत राहणार. समजा जर दोन भावांचं बिनसलं असलं. ते सहजयोगात आहेत, तरी आपापसात बोलताना मात्र एकदसर्यांना तशाच रीतीने बोलतील. जसं एका भावाशी दुसरा भाऊ बोलतो. मग तुम्ही सहजयोगात कशाला आले. आत्म्याला मिळवायला. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे प्रेम करणारा तुमच्यातला स्रोत. मग त्याला स्वीकार्य केलं पाहिजे. त्याच्या आनंदात उतरलं पाहिजे. त्याला आपल्यामध्ये अशा रीतीने घेतलं पाहिजे, की हे माझं सर्वस्व जे आहे, फक्त त्या आत्म्याच्या प्रेमाच्या भक्तीसाठी. त्या आत्म्याला जी भक्ती करायची प्रेमाची ती करू देत. मला काही आहे, माझं शरीर आहे. बुद्धी नाही, काही नाही. फक्त त्या आत्म्याची जी भक्ती आहे ती मला बघू देत. त्याचा मला आनंद उचलू देत. तेव्हां सगळ्यात मुख्य म्हणजे सांगायचं असं, की आपण प्रेमाच्या दरबारात बसलो आहोत. हा प्रेमाचा दरबार आहे. द्वेष, राग, लोभ, मोह हे सगळे एकच प्रकार आहेत. कोणाला कोणी आवडतं म्हणून किंवा कोणाला कोणी आवडत नाही म्हणून. काही त्याच्यामध्ये फरक मला दिसत नाही. दोन्ही एकच गोष्टी आहेत. फक्त एवढेच आहे, की एक दिसायला बरं दिसतं आणि दुसरं दिसायला वाईट दिसतं, पण दोन्ही प्रकार एकच आहेत. प्रेम हे निरपेक्ष असायला पाहिजे. दुसरी गोष्ट की प्रेमामध्ये गोडवा असला पाहिजे. कोणी एक थप्पड थोबाडात द्यायची. थोबाडात देऊन मग म्हणायचं की हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला मारलं. कबूल. म्हणजे लोकांनी म्हणायचं 'असं कसं?' नाही मी प्रेमात मारलं तुला. आणि काही काही पद्धत असते. आता कोणाला जर भेटायला गेले तर जोपर्यंत हातातून अर्धा शेर वजन नाही काढणार तोपर्यंत ते हातच शेक करत राहतील तुमचा. वाटतं ही काय भेटायची पद्धत झाली! आणि हृदयात काहीच नाही. वरपांगीपणा. त्या वरपांगीपणामुळे अगदी हात धरून तुमचे हलवतील. 'वा! वा! काय भेट झाली. अमुक झालं, तमुक झालं.' तुम्हाला वाटेल कधी हात सुटतो, पण हृदयात १० काय? हृदयात प्रेम पाहिजे. हृदयापासून प्रेम पाहिजे. हृदयातून वाहिलं पाहिजे. तसं होत नाही, वरपांगी आणि या वरपांगी प्रेमाने मनुष्याला कधी कधी अशी भूल पडते की, 'मी किती चांगला मनुष्य आहे, मी किती प्रेमळ आहे आणि मी सगळ्यांशी प्रेमळपणाने वागतो.' कारण बिझनेस आहे ना त्याचा, मग, चांगलं वागलंच पाहिजे. पण प्रेमामध्ये मनुष्य अत्यंत गोड असतो. आतून बाहेरून, आतून आणि बाहेरून. कडू नसतो. त्याचा कडूपणासुद्धा गोड लागायला लागतो. असा तो गोड असतो. जोपर्यंत तो गोडवा सहजयोग्यांमध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्हाला मानायला कोण तयार होईल. अहो, असे लेक्चर देणारे, भाषण सांगणारे, बाता सांगणारे पुष्कळ आहेत. आपल्या देशात तर अगदी पेव फुटलं आहे लोकांचं. गर्लोगल्ली बसलेत. तुम्हाला पाहिजे तर पुण्यालासुद्धा मिळतील. पण त्याने काय तृप्ती होते का आपली. सगळं खोटं आहे ते. वरपांगी आहे. तेव्हा हृदयातून प्रेम यायला पाहिजे. आता सगळ्यांचं मला पुष्कळदा असं पत्र येतं की, माताजी, आमच्या हृदयातून प्रेम वाहू द्या. आता मी कसं करू ते! अहो, तुम्ही हृदय उघडा की. आता हृदय कसं उघडायचं एवढं मी सांगते तुम्हाला. हृदय कसं उघडायचं? सर्वप्रथम एका लहानशा गोष्टीवरून सुरू करायचं. आधी लिस्ट करायची की कोणत्या कोणत्या लोकांवर माझे प्रेम आहे आणि कोणत्या कोणत्या लोकंबद्दल मला द्वेष आहे. पहिल्यांदा. मग ज्यांच्यावर मला द्वेष आहे त्यांना प्रेमपत्र लिहायची. फार कठीण काम! फारच कठीण! त्यांना लिहायचं की हे बघा मला तुमची फारच आठवण येते. कारण तुम्ही किती थोर आहात! नसले तरी चालतील पण म्हणायला काय हरकत आहे आणि मला बर वाटेल की तुम्ही या माझ्या पत्राचे उत्तर पाठवाल तर. करून बघा, जमतं का? कारण आत्म्याने तुम्हाला समर्थ केलेले आहे. समर्थ केलंय. पण वरपांगीपणाने नाही. त्याला असं नाही वाटलं पाहिजे की वा! चांगलं पत्र आलं, आता उद्या काहीतरी मागणी येणार. हे पहिलं पत्र म्हणजे इंट्रोडक्शन असणार यांचं. तेव्हा मनापासून, हृदयापासून एक प्रेमपूर्वक पत्र पाठवा. अशा लोकांना ज्यांच्याबद्दल अत्यंत द्वेष वाटतो, वाईट वाटतं, पण सहजयोगी आहेत. पहिल्यांदा सहजयोगात सुरू करायचं. सहजयोगी असले पाहिजेत पहिली गोष्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही जेव्हा पत्र लिहू लागाल, परत तो जो राग आहे तो कुठेतरी येणारच. एखादं त्याच्यामध्ये असं वाक्य येईलच, की ज्याच्यातून तुमचा जो राग आहे तो झळकेल. मग परत दुसरं लिहावं, मग तिसरं लिहावं. करता करता जर शंभर पत्र लिहिली तर एक पत्र अस निघेलच की ज्याच्यामध्ये हा राग निघून गेलेला आहे. ज्या माणसावरती आपला राग आहे तिकडे आपण हृदय उघडून पाहिलं पाहिजे. त्याने जे केलंय ते आपणही करतो, केलंय ना, मग कशाला त्याच्यावर रागवायचं? तो जर अशा रीतीने वागला आहे, तर मी तशा रीतीने वागणार नाही. आणि खरोखर ते प्रेम करून पाहिलं पाहिजे. आता आपल्या देशातले अनेक प्रश्न एवढ्यासाठी आहेत की खरोखर प्रेमाची कल्पना नाही आणि व्याख्या नाही आपल्याजवळ. मुख्य आता बायकांचा जो प्रश्न आहे. नारी लोकांचा म्हणजे दोनच तऱ्हेच्या बायका आपल्या देशामध्ये आहेत, तिसरी तऱ्हा मला दिसत नाही. दिसली तर फार बरं होईल. एक म्हणजे ही की जबरदस्त आणि दुसरी म्हणजे सहन करणारी, मधोमध काही नसतं. एक तर जबरदस्त असली तर ती डोक्यावर बसणार आणि नसली तर पायाखाली तुडवणार. म्हणजे 'जमलं तर सूत नाही तर भूत.' त्यामुळे काय आहे की ११ एकंदर समाज विक्षिप्त झालेला आहे. आणि तो जी बाई सहन करते तिचाच गळा घोटत जाणार आणि जी जबरदस्त असते तिच्या पायाखाली जात राहणार. त्यामुळे तुम्ही नकळत एका, फार मोठ्या पापामध्ये पडत आहात आणि ते पाप म्हणजे असं की एक दूसऱ्या सहनशील बाईला अशा रीतीने त्रास देणं हे परमेश्वराला कधीही मान्य होणार नाही. अनेक असे प्रश्न आहेत. आपल्याकडे आता समजा, जाती-पाती आहेत. त्याच्यामध्ये उच्च-नीच आहे, गरीब- श्रीमंत आहे, हे प्रश्न आहेत. हे प्रश्न मिटविण्यासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये प्रेम किती आहे ते पाहिलं पाहिजे. अहो, या प्रेमाची वाखाणणी अनेक अवतरणांनी केलेली आहे. तर या प्रेमाची जी पाखर आहे ती किती लोकांवर आपण घालू शकतो? किती लोकांसाठी आपल्या हृदयामध्ये कळकळ आहे ? किती लोकांबद्दल आपल्याला खरोखर प्रेम वाटतं ? परवा मी मुंबईला लोकांना प्रश्न विचारला, म्हटलं पुरुषांना फार अगदी असतं की मित्रता आमची फार गहरी असते, बायकांच्या मानाने. तर मी विचारलं की, 'काहो, तुमचे मित्र कोण?' तर ते म्हणाले की, 'हे गृहस्थ आहेत ते माझे मित्र आहेत.' 'अहो, काही नाही म्हटलं, खोटी गोष्ट आहे. आता मोटारीत जातांना तुमच्या विरुद्ध सांगत होते मला. तुमचे कसे मित्र हे?' तर ती मित्रता, आपापसातील जी मित्रता आहे याच्यामध्ये माणसाला खूप एकदुसर्यातलं वैगुण्य दिसत नाही, चांगुलपणा दिसतो. तो वाढत गेला म्हणजे तुमचं हृदय वाढत जातं. दूसरं म्हणजे दानत, ज्याला दानत म्हणतात. दानत म्हणजे देण्याची शक्ती असायला पाहिजे. तुमच्या आईबद्दल तर प्रसिद्धच आहे. तिला भयंकर दानत आहे. पण तुम्ही दानत करून बघा. समजा, तुमच्याजवळ पाच साड्या आहेत आणि एखाद्या बाईजवळ जर कमी असतील, तर एखादी तिला देऊन बघा. तुम्हाला शंभर साड्या नेसण्याचं सौख्य मिळणार आहे. जर तुमचं हृदय उघडं असलं तर. दानत असायला हवी. देण्याची शक्ती असायला पाहिजे. देत सुटायचं. हे घे, तुला हे हवं ना हे घे. तुला ते हवं ना ते घे. दानत असायला पाहिजे. ही दानत सहजयोगात आधी सुरू होते आपल्या पूजनात, मी पाहिलं आहे. लोकांचं हृदय उघडायला लागलं की म्हणजे मग 'माताजी, तुमच्यासाठी मुद्दामून मी खीर करून आणली.' आता मी खावो अथवा न खावो. 'मी मुद्दामून तुमच्यासाठी पुरणपोळी करून आणली.' आता ती सुरुवात झाली. पण ती पुरणपोळी तुम्ही एखाद्या सहजयोग्यासाठी केलीत तर मला जास्त आनंद होईल. आपापसात तुम्ही जर ते प्रेम वाटून घेतलं तर मला जास्त आनंद होईल. फार आनंद होईल. जर तुम्ही एखाद्या सहजयोग्याविषयी चांगलं येऊन सांगितलं तर मला फार आनंद होईल. आणि जर तुम्ही वाखाणणी केली की हा मनुष्य काय बहारीचा मनुष्य आहे! त्याने मला फारच आनंद होतो. हां, जर तुमचं चुकलं असेल तर मी सांगीन की तुम्ही सांभाळून रहा. पण बहुतेक असं मी पाहिलंय की, जेव्हा लोक एकदुसऱ्यांची मित्रता आणि एकदुसर्यांचं चांगलं सांगतात, जेव्हां रममाण होतात, त्यांचा आनंद उचलतात तेव्हा वाटतं की आता सुरू झालं प्रेमाचं रामराज्य ! आणि हे प्रेमाचं असे अद्भूत क्षण फार कमी येतात. एकदुसऱ्यांमध्ये आपण अजून वापरलेलं नाही आहे. हे साम्राज्य आपण अजून जाणून घेतलेले नाही आहे. याची शक्ती आपण अजून मानलेली नाही आहे. तिची किती प्रचंड क्रियाशीलता आहे, तिकडे आपलं लक्ष नाही. इतका त्याच्यामध्ये जोर आहे, की सगळी तुमची जेवढी काही मोठमोठाली आज साम्राज्य दिसतात, मोठमोठाले तुम्ही अॅटमबाँब वगैरे करून ठेवलेले आहेत, जे काही तुम्ही द्वेषावर उभारले आहे ते एकदम हाणून पडणार. एकदम जमीनदोस्त होऊन जातील ते. पण ती वापरता आली पाहिजे. तिची जाणीव झाली पाहिजे की मी प्रेमाचा पुजारी आहे. मी प्रेमात आहे. मला राग, द्वेष, लोभ वगैरे काही माहीत नाही, मी फक्त प्रेमाचा पुजारी आहे, मला भक्ती फक्त प्रेमाची करायची १२ आहे. असं आमच्या आईने सांगितलं. तिने त्या भक्तीत स्वत:शी जोडून घेतलंय आणि आम्ही तीच भक्ती दुसर्यांची करणार. मग कोणत्या जातीपाती, कोण कुठलं आणि कोण काय? द्वेषामध्ये मनुष्य एखादं वैगुण्य बघेल. त्याच्यावरच डोकं धरून बसेल. पण प्रेमामध्ये एखादा गुण, एखादा विशेष आनंददायी क्षण आठवावा. 'कसं चांगलं बोलले होते बरं त्यादिवशी ते!' मग त्याच्यावर बांधावी आपली इमारत. हृदयाची इमारत बांधायची, कसं बरं प्रेमाने बोलले हे! किती बरं वाटलं नाही का? की कसं अलगद येऊन त्यांनी असं म्हटलं. पण कधी जर तुम्ही कोणाला टोचून बोलाल तर ते कधीच तुमच्यासाठी चांगला विचार ठेऊ शकत नाही. आपल्या लक्षात कसं येत नाही. आम्ही जर दुसरऱ्यांशी वाईट बोललो तर तो आमच्याबद्दल वाईट बोलणारच. तो कशाला चांगले बोलणार? तो काय म्हणेल का, 'वा, वा! काय चांगले आहेत. यांनी मला चार शिव्या घातल्या.' असं होऊ शकेल का? साध्या, सहज शहाणपणातसुद्धा मनुष्याने समजलं पाहिजे की आपण दुसऱ्याच्या विरुद्ध जर इतकं भाडभाड बोललो, तर तो मनुष्य काय तुमच्या गळ्यात येऊन हार घालणार आहे! तेव्हा हृदय उघडतांना एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की या माणसाला आपण आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेले आहे. आता या हृदयामध्ये प्रेमाची शक्ती आहे. ती शुद्धीकरण करते. ती पवित्र करते. ती ह्या माणसाला पवित्र करेल. त्याच्यावर सोडून द्यायचं. आता तो कदाचित तुम्हाला त्रासही देईल थोडासा. प्रयत्न करावा. प्रयत्न करायला काही कठीण काम नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण सर्व विश्वाएवढे झालो की काय? लहानपणी नेहमी मला वाटायचं की विश्वाचं कार्य करायचे आहे. कसं काय होणार? माझी भेट लोकांशी कशी होईल? तर एकदम असं वाटायचं की माझं हृदय खुप मोठं होत चालले आहे आणि त्यात सगळे सामावत चालले आहे. इतका आनंद वाटायचा त्या गोष्टींनी त्यावेळेला नुसतं चित्र बघत असे. आज ते साक्षात दिसतंय समोर. जागोजागी हजारो सहजयोगी बसलेले आहेत. त्या प्रेमाच्या ह्याच्यात स्नात होते. तसंच प्रेम तुम्ही सर्वांना द्यावं आणि आजचा जो विशेष कार्यक्रम आहे, शिवपूजेचा, त्यात हृदयामध्ये एक विचार ठेवावा की आजपासून मी प्रेमाची भक्ती करणार आहे. आईने सांगितलं आहे. प्रेमाची मी भक्ती करणार आहे. प्रेमच करणार आणि ते करून जरी थोडासा त्रास झाला तरी ती तपस्विता आहे. ती सहन करीन. पण मी प्रेम करीन, साऱ्या जगावर प्रेम करीन आणि निरपेक्षपणे प्रेम करणार आहे. लहानशा कुपमंडूकासारखं आपलं, माझी, माझं करणार नाही. पण सगळ्यांच्यासाठी जे होईल ते प्रेमाने करेन. मग लोक लाथाडतील. कदाचित काही बोलतीलसुद्धा. माझं तसं केलं पुष्कळ. पण प्रेमाची शक्ती फार जबरदस्त असते. हे जाणून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन त्या भक्तीने ते केलं पाहिजे. असो, आता पूजेची वेळ झालेली आहे. आता मी पुण्यालाच वास्तव्य करायचे ठरवलेले आहे, शिवपूजा इथे करून. सर्व विश्वात भारत ही योगभूमी आहे आणि महाराष्ट्र ही पवित्र भूमी आहे. कुंडलिनी आहे ही साऱया जगाची. महाराष्ट्र म्हणजे केवढा मोठा देश आहे! त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे आणि त्यात आज महाराष्ट्रात पुणं हे त्याचं हृदय आहे. आणि या ठिकाणी आज शिवाची स्थापना करायची आहे. आणि माझं इथे वास्तव्य झाल्यावर कैलासच इथे उतरला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी त्यात मदत केली पाहिजे. आणि कैलासवासी जसे लोक असतात, कैलासावरती राहुन अगदी थंड मनाने, थंड प्रकृतीचे! तसे आपण इथे सगळ्या सहजयोग्यांनी झालं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की पुण्यामध्ये खरोखर साम्राज्य कैलासासारखं, श्री सदाशिवाचं आहे. अशीच सगळ्यांच्याकडून अपेक्षा करून मी इथे वास्तव्य करायचं ठरवलं आहे आणि सगळ्यांनी कृपा करून माझी मदत करावी. १३ सहजयोग आणि कुंडलिनीची जञागृती फलटण, ०८ मार्च १९८४ फलटणच्या सर्व सात्विक भाविक साधकांना आमचा नमस्कार! आज हृदयापासून तुमची क्षमा मागते, पण माझा काही दोष नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याही पेक्षा जास्त उत्कंठतेने तुम्हाला भेटण्यासाठी धावत येत होते, पण रस्ते महाराष्ट्रातले कसे आहेत त्याचा अनुभव येतो. त्यात रस्त्यात इतके अपघात झालेले की जीव नुसता अगदी घाबरून जातो. मग कुठे जर गाडी तुमची फेल झाली तर रस्त्यात एक दुकान नाही की एक जागा नाही की कोणी मनुष्य नाही की ज्याला म्हणता येईल की 'बाबा, आमच्या गाडीला एक वस्तू पाहिजे ती दे.' ही आपल्या देशाची खरोखरच हलाखीची स्थिती आहे. आणि त्यामुळे कुठे टेलिफोन नाही की तुम्हाला कळवायला की कसं पोहोचायचं? कसं झालंय. म्हणजे फार परिस्थिती अजून सुद्धा अशी आपली झालेली नाही की जिथे आपण कधी म्हणू की आम्ही यावेळेला पोहोचू, त्यावेळेला पोहोचू, पाहोचले तर नशीब! आदळत, आपटत . एका शरीरात जर पोहोचले ( काहीही इजा न होता) तर स्वत:ला मानायचं की बाबा पोहोचलो! पण अशा परिस्थितीत सुद्धा भारतीय जीवन पुष्कळ सुखी आहे. आणि लोकांमध्ये एकत-्हेचे समाधान, शहाणपण आहे. कारण अजून आपण आपल्या धर्माला जागून आहोत. जर अशी स्थिती परदेशात कुठेही असती, तर लोकांनी सगळ्यांना उडवून दिलं असतं. एकही रस्ता असा असता तर सगळ्यांनी उडवून दिलं असतं. पण आपल्या देशात लोक समाधानी आहेत आणि जसं असू दे बाबा, परमेश्वराचं नाव घेत असतात. आज इतके एकानंतर एक प्रश्न आले की त्या प्रश्नांना ठीक करता करता शेवटी मी फलटणला जाते १४ की नाही अशी सुद्धा मला शंका आली होती. आजचा विषय 'सहजयोग आणि कुंडलिनीची जागृती' असा आहे. तुम्ही कुंडलिनी हा शब्द ऐकलेला आहे. जे लोक सुशिक्षित आहेत, ज्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे, ज्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे. संत-साधूंना जाणलं आहे, अशा लोकांना कुंडलिनी काय आहे हे माहिती आहे. पण जे अगदीच आजकालच शाळेत गेलेले, कॉलेजला गेलेले नवयुवक आहेत, कदाचित त्यांना कुंडलिनी काय आहे ते माहिती नसणार. पण कुंडलिनी म्हणून एक शक्ती आहे असं हजारो वर्षापूर्वी लोकांनी सांगितलं आहे. हजारो वर्षापूर्वी! म्हणजे चौदा हजार वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये भृगू संहिता म्हणून फार मोठं ज्योतिषावर लिखाण केलं गेलं होतं. त्याच्याही आधी नाडी ग्रंथ म्हणून आपल्या देशामध्ये एक ग्रंथ लिहिला होता. आता आपण इतके साहेब झालो आहेत की आपण आपल्यातलं काही वाचत नाही किंवा आपल्यामध्ये काही आहे विशेष तिकडे दष्टी करीत नाही. पण हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात नाडी ग्रंथ हा विषय जो आहे तो एक स्वामी भगंदर म्हणून एक गृहस्थ होते त्यांनी बाराव्या शतकात परत उजळणी करून आजच्या वेळेला सोडला आणि असं भाकित केलं होतं की १९७० साली सहजयोग सुरू होणार आहे आणि सहजयोग सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये सुप्त असलेली ही कुंडलिनी शक्ती आपोआप जागृत होऊन लोकांना आत्मसाक्षात्कार घडेल. आणि त्यात हे ही सांगितलं आहे की इस्पितळ नावाची संस्था वरगैरे जी आहे संपुष्टात येईल. अर्थात ते डॉक्टरांनी वाचू नये. नाही तर माझ्यावरती धावत येतील मारायला. आणून ते जे पण एक असा सारासार विचार केला पाहिजे की आपण काही बाहेरचे आहे इतक्या लवकर घेतो आणि आपल्या देशातलं इतकं मोठं आहे, तिकडे आपली नजर का जात नाही? जी गोष्ट ज्ञानाची आहे तशीच आपली इतर बाबतीतही आहे. आपलं लक्ष बाहेर लवकर जातं. पण जर म्हटलं की तुमचं लक्ष आतमध्ये घेऊन जा, तर तुम्ही म्हणाल, 'माताजी, हे कसं करायचं?' हे लक्ष आतमध्ये कसं करायचं? हे लक्ष आतमध्ये नेण्याचं कार्य तुम्ही करू शकत नाही ही गोष्ट खरी आहे. तर ती घडविण्याची किमया कोण करणार? त्यासाठी आपल्यामध्ये ही कुंडलिनी नावाची शक्ती आहे. आता जर एखाद्या विदेशी माणसाने येऊन सांगितलं की अशी वीज म्हणून वस्तू आहे, तर लगेच आपण तिकडे धावतो किंवा ती वीज काय वस्तू आहे ती शोधून काढली पाहिजे? ती वीज आपल्या शहरात आली पाहिजे. तिने हे फायदे होतात. असे चालू होईल. पण जर कोणी येऊन सांगितलं की आतमध्ये अशी शक्ती तुमच्या आहे तर तिकडे आपली दृष्टी सहसा जात नाही. तिकडे आपण बघत नाही की हे काय आहे. आणि बघितलं पाहिजे. जर मी तुम्हाला समजा काही गुप्त गोष्टी सांगत असले तर तिकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे की यात काहीतरी आहे. हे जे काही माताजी सांगत आहेत यात खरं किती आहे? तर त्याची उदाहरणे अनेक आहेत. म्हणजे संत-साधू लोक हे साक्षात्कारी होते हे आपल्याला माहिती आहे. त्यांना ते करू धर्म होता, त्यांना सांगावं लागायचं नाही, तुम्ही असं करू नका, तसं करू नका. हे करू नका. १५ ठोक्हा शुद्छ बेजञাनिक तुम्ही व्हाल, नेव्हा नका. हे कसं झालं? त्यांच्यात आपल्यात एवढा फरक का होता? हे एक उदाहरण घेतलं आपण. काहीतरी त्यांच्यात विशेष होतं आणि काहीतरी आपल्यात कमी आहे. त्यांच्याजवळ पैसे कमी असतील. असेल. त्यांच्याजवळ दोन कपडे कमी असतील. पण तुमच्याही दृष्टीला हे येईल, की त्यांच्यामध्ये जे गुण होते ते आपल्यामध्ये नाही आहेत. ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. जे हा विज्ञानाने संतांमध्ये होतं ते आपल्यामध्ये नाही आहे. म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यात काहीतरी तफावत होती आणि ती तफावत का होती हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ती एवढ्यासाठी की त्यांचा आम्हा काय आत्मसाक्षात्कार झालेला होता. संतांनी त्यावेळेला जशी सोय होती त्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही देवाला विसरू नका. आज विज्ञानाच्या नावाखाली देवाचे धिंडवडे काढले आहेत. तसे देवाच्या नावाखाली ही काढलेले आहेत. भोंद लोक ही जगात पुष्कळ आहेत, जे पैसे बनवतात, लोकांना फसवितात. पण विज्ञानाच्या नावावर सुद्धा त्यांनी सांगितलं की देव म्हणून काही वस्तूच नाही. त्याला बंद करून ठेवायचे. म्हणजे माझ्या मते दोन्ही एकच झाले. जे तुम्ही बघितलं नाही, जे तुम्ही पाहिलं नाही, तुम्ही जाणलं नाही, ते नाही असं म्हणणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टी नाही झाली. जर शुद्ध वैज्ञानिक दृष्टी असली तर मनुष्य सरळ म्हणेल की, 'मी नाही पाहिलेलं पण मी बघतो.' पण हे लोक शुद्ध वैज्ञानिक आहेत, जे कारण ह्यांचं जे विज्ञान आहे ते पराकोटीला पोहोचले आहे. आपलं अजून अर्धवट, लोंबकळत आहे त्याच्यामुळे इथले वैज्ञानिक तेवढे पोहोचलेले नाहीत. तर जेव्हा शुद्ध वैज्ञानिक तुम्ही व्हाल तेव्हा तुमच्याही दृष्टीला हे येईल, की ह्या विज्ञानाने आम्ही काय मिळवलं? ते इथे आपल्याला असं वाटतं की चला, किती त्रास होतो प्रवासाचा, लोक मिळत नाही, हे नाही, नाही. पण तसं पाहिलं तर त्या देशात असं मला वाटतं की मी नरकात राहते की काय. अगदी नरक वाटतो. म्हणजे सगळे असतं, रस्ते ठीक आहेत, लखलखाट आहे, सगळं काही आहे, पण नरक वाटतो तिथे. माणूसकी नाही तिथे. उदंडपणा, उद्धटपणा, रागीटपणा हिंसा, इतकी जास्त हिंसा आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या इंग्लंड शहरामध्ये, ज्या इंग्लिंश लोकांनी आपल्यावर राज्य केलं त्याठिकाणी दोन मुलांना प्रत्येक आठवड्यात आई-वडील मारून टाकतात. जर आपली मुलं त्यांच्या रस्त्यावर गेली तर हे ही तसंच करतील. दारू पितील त्यांच्यासारखे, उदंड होतील, उनाड होतील, तसेच वागू लागतील. आता ते रस्त्यावर असे आले आहेत, की इतकं लांब चालून जेव्हा ते पोहोचले ( इतक्या काळानंतर), तेव्हा खड्डा दिसला आणि आता या खड्ड्यातच पडायचंय आपल्याला कळलं तेव्हा मग मागे वळून आले. पण आपण का नाही आधीच या गोष्टी समजून घ्याव्या की आपल्या देशात या केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. या केवढ्या व्यवस्था आपल्या देशात संत-साधूंनी केलेल्या आहेत. त्याचा फायदा का करून घेतला नाही आणि का करून घेत नाही? कारण कोणाचेच लक्ष परमेश्वराकडे नाही. फक्त जे भोंद लोक आहेत, पोटभरू लोक आहेत किंवा असे लोक आहेत ते तुम्हाला येऊन देवाबद्दल काहीतरी सांगतात किंवा जे थोडे फार संत-साधू असतात, त्यांचे तुम्ही हात-पाय मोडून ठेवले आहेत. दोन्ही पैकी एक. ही अशी स्थिती आहे. १६ पि आता परमेश्वराने जे आपल्याला मनुष्य केलं ते कशासाठी केले आहे. या स्थितीला आणले ते एवढ्यासाठी नाही की आपण मनुष्य व्हावं, आपल्याजवळ पैसे हवे. थोडीशी रक्कम शिल्लक झाली की आपण गुत्त्यात मरावं. त्याच्यासाठी केले आहे का परमेश्वराने आपल्याला? कोणतीही वस्तू आपण बनवतो. आता हे यंत्र जर आपण बनवलेले आहे तर हे कोणत्या तरी कारणामुळेच बनवलेले आहे की नाही. एवढी मेहनत करून आज तुम्हाला मनुष्य बनवलं, तर परमेश्वराने काहीतरी तुमची इज्जत केलेली आहे. इतक्या मेहनतीने, प्रेमाने का तुम्हाला बनवलं? आपण असा विचार केला पाहिजे की परमेश्वराने आम्हाला का बनवलं? त्याला कारण आपण तसा विचारच करीत नाही. जे आपल्याला मिळालं ते मिळालेले आहे. नाक, डोळे, तोंड सगळं काही मिळालेले आहे. आता ह्याच्यापुढचा कशाला आपण विचार करायचा ? पण परमेश्वराने मनुष्य आपल्याला एवढ्यासाठी बनवलेले आहे की आता मनुष्य झाल्यावरच मनुष्याला त्याचा आत्मा मिळू शकतो आणि आत्मा मिळाल्यावर त्याचा संबंध परमात्म्याशी होऊ शकतो. मग सरळ प्रश्न असा होतो की परमात्म्याशी संबंध कशाला करायचा? आता प्रश्न असाच आहे की या वस्तूचा संबंध, कनेक्शन मेनशी कशाला लावायचं? ही वस्तू जी बनविलेली आहे ती अर्धवट आहे. जोपर्यंत तिचा संबंध आम्ही मेनशी लावत नाही, हिचा काही उपयोग नाही आणि ही भ्रांत आहे. ह्याच्यावर आम्ही कितीही ओरडलो तरी हिचा काही उपयोग होणार नाही. म्हणून जोपर्यंत संबंध परमेश्वराशी लागणार नाही तोपर्यंत तुम्हालाही काही अर्थ लागणार नाही. म्हणूनच आज तुमचा लोक असे सभ्रांत फिरत आहेत. त्यांना समजत नाही, चांगलं काय, वाईट काय? कशाला म्हणायचं परमेश्वर, कशाला म्हणायचं दुष्टपणा, कशाला म्हणायचं चांगुलपणा ? पुष्कळांना असं वाटतं की परदेशातले लोक फार सुखी आहेत, ही अगदी चुकीची कल्पना आहे. अत्यंत चुकीची कल्पना आहे. कारण तिथे आजकाल, तुम्ही जर तरुण लोकांना जाऊन विचारलं, फार जे श्रीमंत देश आहेत, तर ते सांगतील की 'आम्ही तर फक्त आत्महत्येच्याच विवंचनेत बसलेलो आहोत. आम्ही असा विचार करतो आहोत की आत्महत्या कशी करायची?' अशा परिस्थितीत त्या लोकांनी जे मिळविलेले आहे त्यापेक्षा अधिक आपण मिळवू शकतो. जर आपण दुसरा मार्ग अवलंबिला. जर तुम्हाला एखादं झाड दिसलं, जे खूप मोठंे झालेलं आहे, तर लक्षात घेतलं पाहिजे की त्या झाडाला मूळे असली पाहिजे. जर त्याला, मुळाला पाणी नसलं तर ते झाड सुकून जाणार. तेच आज विश्वाचं झालेलं आहे, की पाश्चिमात्य देशांनी आपली भरमसाठ, अगदी खूप प्रगती करून घेतलेली आहे आणि ते कोलमडायला बसले आहेत. कारण त्यांनी आपली मूळे शोधून नाही काढली. कारण त्यांची मूळे या देशात आहेत आणि ह्या देशातले लोक त्यांच्यामागे धावत आहेत सैरावैरा. तेव्हा ज्यांचं जे काम आहे ते सोडून ते त्यांच्यामागे लागले तर झाड आधीच लवकरच कोलमडणार. तेव्हा इथल्या देशातल्या लोकांनी आपली पाळेमुळे काय आहेत ते शोधून काढले पाहिजे आणि ती पाळेमुळे आपल्यामध्ये आपल्या संतांनी सांगितलेली आहेत की 'तुज आहे तुजपाशी' म्हणजे काही खोटं १७ बोलले नाहीत ते. जर असं म्हटलं की तुज आहे तुजपाशी आणि ते तू शोधून काढलं पाहिजेस, तर त्यात मनुष्याने फारसा विचार करू नये. दुसरं असं की कुंडलिनी ही जी शक्ती आहे ही शुद्ध इच्छा आहे. मनुष्याच्या बाकीच्या सर्व इच्छा अशुद्ध आहेत. कारण कोणतीही इच्छा तुम्ही केलीत आणि ती पूर्ण झाली तरी दुसरी इच्छा होतेच. आज वाटलं आम्हाला की एक कपडा विकत घ्यावा, बरं मग त्याच्या नंतर वाटतं की एक घर बनवावं, मग वाटतं मोटर असावी. म्हणजे इच्छेवर इच्छा होत जातात पण मन काही तृप्त होत नाही. प्रत्येक ऋतुमध्ये, वेगळ्यावेगळ्या ऋतुमध्ये अनेक तऱ्हेची फळें आणि फुलं येतात, याला योगशास्त्रामध्ये ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. ती शक्ती, जी परमेश्वराची जिवंत ब्रह्मशक्ती, ती अजून आपल्या हाताला लागलेली नाही. ती कार्य करते. शक्ती आहे, करते, दिसतं आपल्याला. फुलं आली, ही आली कुठून? ही जिवंत शक्तीने आली. पण ही जी कार्य करणारी शक्ती आहे, ही शक्ती आम्हाला, अजून आमच्या हाताला लागलेली नाही. तिच्यावर आमचं काही प्रभुत्व आलेलं नाही किंवा आम्ही तिला जाणलंसुद्धा नाही. पण मनुष्याचं तिकडे लक्ष नाही. कारण मनुष्यामध्ये उथळपणा आहे. गहनता नाही, उथळपणा आहे. म्हणजे एक की असलं, चला काही हरकत नाही. एवढं कोण बघायला जातं. असेल, आपल्याला काय, माळ्याने फुलं दिलं की झालं! आता त्याच्यापुढे कोण बघायला जातं की ही फुलं कोणी बनविली. पण जर गहन विचार केला तर हे झालेलं आहे. तेव्हा ही सर्वव्यापी ब्रह्मशक्ती आपल्या हाताला लागावी अशी जर तुम्ही इच्छा केली तर त्यात काही वैगुण्य नाही. पण ती लागायची कशी? कसं होणार? त्याला काय करायला पाहिजे? आपल्याला जर एखाद्या बी ला अंकुर फोडायचं असलं तर आपण काही त्याच्यासमोर विज्ञान लावत नाही, वाद करीत नाही, विवाद करीत नाही, भजन म्हणत नाही, गाणं म्हणत नाही. काय करतो ? त्या बी ला या आईच्या पोटात देतो आणि त्याच्यात अंकुर फुटतात. ते अंकुर आपोआप, सहज फुटतात. त्याला काही करावं लागतं का? काही करावं लागत नाही. तसंच आहे की तुम्हाला सुद्धा जे अती व्हायचं आहे, याच्यापुढचं व्हायचं आहे, त्यालासुद्धा काही करावं लागणार नाही आणि आता तरी तुम्ही मनुष्य झालात, तुम्ही काय केलं? तुम्ही काही केलेलं आहे का? आपोआपच झाल. तेव्हा ह्याच्यापुढचं जे व्हायचंय तेसुद्धा आपोआपच होणार आहे, त्यासाठी तुम्हाला डोक्यावर उभं राहायला नको. हे सर्व असतांना, हे असं आधी का नाही झालं? असाही लोक प्रश्न करतील. कारण आजकाल सगळ्यांना प्रश्न करण्याची सवय झालेली आहे. सगळीकडे राजकारणी मतं मागत फिरतात, तर लोक प्रश्नही करत फिरतात. मी काही राजकारणी नाही आहे. पण असा विचार केला पाहिजे की आत्तापर्यंत झालं नाही हे आपण अशा विचाराने म्हणतो, की आपल्याला जिवंत वस्तू कधीही एकदम होत नाही, एकानंतर एक. आधी बी रूजतं, त्याला मुळे येतात, मग त्याचा बुंधा येतो, मग त्याच्या फांद्या येतात, मग फांद्यांना फुलं येतात, मग त्यांना फळं येतात. असं होत नाही की बी घातलं की त्याच्यात फळं निघतं. म्हणजे उत्तरोत्तर गोष्ट होत जाते.. ह्याला उत्क्रांती असं म्हणतात आणि आज ही वेळ आलेली आहे म्हणून अनेक लोकांची कुंडलिनी जागृत होऊ १८ तुम्हाला भुछ्दा जे अवी ब्हायच आहे, याच्यापुढच शकते. आता कुंडलिनी कशी जागृत होते? काय होतं ? वरगैरे त्याच्याबद्दल आमच्याकडे बरीच पुस्तकं आहेत. ती तुम्ही वाचावी, गहनपणाने , शहाणपणाने. हा नवीन विषय आहे. ते तुम्ही जाणलेलं नाही. हे ज्ञान मुळातलं आहे . आणि हे जाणण्यासाठी सूक्ष्म व्हावं लागतं. म्हणून गहनतेने तो विषय घेतला पाहिजे. जर तुम्हाला ते शिकायचं असलं तर फार सोपं काम आहे, कुंडलिनीच जागरण करणं कठीण नाही. तेव्हा ती तुम्ही जागृत करून हायचं आहे, व्यालामुदहा काही कराव লागणाव जाही. घ्यावी आणि त्याच्यानंतर तिचा पुढे वापर कसा करायचा, तिचा साभाळ कसा करायचा, नंतर दुसर्यांना ह्याचा फायदा कसा करून द्यायचा हे सुद्धा शिकलं पाहिजे. याचे अनेक फायदे होतात. पण ते फायदे झाल्यावरच तुम्ही बघा. नाहीतर तुम्ही म्हणाल, की आत्ता सिद्ध करून दाखवा. काल असंच झालं. ५-६ दारूडे आले. म्हणे, 'माताजी, आता आमचे चाळीस जण आहेत त्यांना तुम्ही ठीक करा.' म्हटलं, 'असं कसं. आता मला प्रोग्रॅमला जायचंय.' नाही म्हणे 'आत्ताच करा.' आता ते दारू प्यायले होते. त्यांना कोण काय म्हणणार! ते पोलिस वरगैरे आले, त्या दारू प्यायलेल्या अवस्थेत काय म्हणतात, त्यांना काही समजतं का ? म्हटलं, 'तुम्ही दारू पिऊन आलात, तुम्हाला काही म्हणू नाही शकत.' पोलिस आले. मग काय काय झालं, त्यांची प्रकरणं झाली, भानगडी. पण हे असं असतं, की ज्या ठिकाणी, तुम्ही कधी कॉलेजमध्ये दारू पिऊन गेलात तर तुम्हाला काही समजेल का? म्हणजे कॉलेजचंसुद्धा नाही समजायचं. शाळेत दारू पिऊन गेलात तर तुम्हाला काही समजेल का? डोकंच ठिकाणावर नसतं माणसाचं. मग कुंडलिनीसारखी गोष्ट तुम्हाला दारू पिऊन कशी समजणार ? पण ते भांडायला लागले, ओरडायला लागले. म्हटलं हा आहे तरी काय प्रकार! आम्ही तुम्हाला तुमचं द्यायला आलोय. एवढ्यात भांडायला काय झालंय तुम्हाला? तर असा विक्षिप्तपणा, चमत्कारिकपणा येण्याची फार संभावना आहे. कारण आपल्याकडे जे एकदम, मी म्हटलं ना की झाड उलथून पडण्याची वेळ आलेली आहे. ती गोष्ट आपल्याकडेही होऊ घातली आहे. तेव्हा थोडसं काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. जे तिथे झालं, ते इथे नाही झालं पाहिजे. त्यांची पुनरावृत्ती इथे झाली नाही पाहिजे. आपण धोपटमार्गाने, सरळ मार्गाने परमेश्वराच्या साम्राज्यात गेलं पाहिजे. हीच एक मला विवंचना आहे. कुठे असं नाही झालं पाहिजे, त्यांचे तर अर्धे देश बुडालेलेच आहेत. ६५% लोक अमेरिकेत वेडे आहेत. ६५% तरुण लोक वेडे आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकाल यांच्या प्रगतीला काय म्हणावं. स्वित्झर्लंडची जवळ जवळ ८०% तरुण मुलं आत्महत्या कशी करावी याची खलबतं करतात. म्हणजे 'अती शहाणे त्याचे बैल रिकामे' असं मराठीत म्हणतात ते तिथे दिसतं. आणि एवढं सगळं करून काय मिळवलं हेच मला समजत नाही. इतके दु:खी जीव आहेत. कोणी आई-वडिलांजवळ रहात नाही, बापाला विचारत नाही, बाप मेला तर एक-एक महिना त्याचं शव सोडून १९ गेलं तरी कोणी बघायला येत नाही. म्हणजे माणुसकीतून उठलेले आहेत. असं आपल्या देशात होऊ नये. आधीच तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन त्याच्या प्रेमाचा आस्वाद घ्यावा. अशी माझी सदिच्छा आहे. आणि या भारताचे एवढे पुण्य आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्र भूमीचं एवढं पुण्य आहे की महाराष्ट्रातला मनुष्य म्हणजे एक विशेष आहे. त्याला धर्माची चाड आहे, देवाची चाड आहे. मोठ्यांचा मान आहे. फसतोही कधी कधी, कबूल. फसत नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये धर्मभावना, चांगुलपणाने वागण्याची एक इच्छा नेहमी असते. जरी तो वाईट मार्गाने वागला तरी हे माझं चुकलं असं सांगतो. नाशिकला मी गेले होते. एक गृहस्थ आले आणि माझ्याजवळ येऊन म्हणाले, 'माताजी, मी तुम्हाला कबूल करतो, मी दारू पिऊन आलो. मी चोवीस तास दारू पिऊन आलो. तुम्ही माझी आई आहात. मी तुम्हाला कबूल करतो. तुम्ही माझी दारू सोडवून द्या. हे वाईट आहे मला माहिती आहे पण मला सुटत नाही.' आता सुटली त्यांची दारू. पण ही गोष्ट वाईट आहे हे त्याला माहिती आहे. कारण तो भारतातला, या महाराष्ट्रातला मनुष्य आहे, पण या लोकांना हे ही माहीत नाही हे वाईट आहे. आता यांना काय म्हणावं! इतकी बेछूट स्थिती तिथे झालेली आहे. ती तुमच्या मुला-बाळांची होऊ नये. तुम्ही ज्यासाठी या देशामध्ये एवढा जन्म घेतला, ज्या पूर्वपुण्याईने जे मिळविलेले आहे, ते तुम्हाला मिळावं. या सदिच्छेनेच मी आज फलटणला आलेली आहे. तेव्हा तुम्ही ते घ्यावं. उशीर फार झालेला आहे म्हणून मी काही जास्त लेक्चर देणार नाही. आता आपण कुंडलिनी जागृतीचाच कार्यक्रम घेऊयात. आता सगळ्यांनी, ज्याला सहजासन असं म्हणतात, असं पाय मोकळे करून बसा. पाय मोकळे करून. फार जास्त एकावर एक चढवायचे नाहीत. आणि दोन्ही हात असे आरामात आपल्या मांडीवर ठेवायचे. काहीही विशेष करायचे नाही. दोन्हीही हात असे मांडीवर ठेवायचे. फक्त श्रद्धेने बसलं पाहिजे. दुसरं म्हणजे असं, की हे ब्रह्मरंध्र आहे, इथे , ते छेदावं लागतं. आणि आईसमोर आपल्याला काही टोपी घालायला नको. आई म्हणजे आपली आई आहे. काही अंमलदार नाहीये, गुरू नाही आहे. तेव्हा टोपी काढलेली बरी. कारण हे ब्रह्मरंध्र छेदावं लागतं. बायकांनी पदर राहू देत कारण तो पातळ असतो. पण टोपी जरा काढलेली बरी. थोडसं आवळतं कधी-कधी. चष्माही काढला तरी हरकत नाही. कारण डोळे तुम्हाला मिटूनच ठेवावे लागणार आहेत, आणि त्याने डोळे ठीक होतात. म्हणून चष्मा काढलेला बरा . पायात चपला नसतीलच, मला माहीत आहे. आता असे हात करून बसायचे आहे. जास्त मानेला ताण द्यायचा नाही किंवा वाकायचं नाही. सरळ आपण जसे बसतो, तसं बसायचं. आता सर्वप्रथम डोळे मिटून या आपल्या मायभूमीला नमस्कार करूयात. तीनदा. कारण तिने आपल्याला जन्म दिला आणि ती पूर्यभूमी आहे. तिला खरोखर मनापासून तुम्ही नमस्कार करा. तुम्हाला माहीत नाही की ती किती मोठी आई आहे तुमची! नमस्कार करावा, तीनदा. आता मी शेवटलं २१ सांगते ते लक्षपूर्वक ऐका. फार सोपं काम आहे. म्हणजे तुम्ही स्वत:ला कसं कवच घालायचं. जे आईचं कवच असतं ना, आईचा पदर कसा घालायचा म्हटलं तरी चालेल. आपल्याला सात चक्रं आहेत. तेव्हा आपलं संरक्षण झालं पाहिजे, वाईट प्रवृत्तीपासून. म्हणजे आपल्याला जे मिळालंय ते हरवलं नाही पाहिजे. त्यासाठी रोज सकाळ - संध्याकाळ, एकदा उठल्यावर किंवा बाहेर जातांना आणि एकदा झोपतांना दोनदा हे बंधन घालायचं असतं. अगदी सोपं आहे. हे फोटो देतील तुम्हाला आणि तुम्ही फोटोचे पैसे नाही घ्यायचे. सगळ्यांनी आदराने फोटो घ्यायचा. जो हात आहे, हा इथून उचलून असा वर आणि असा नेला म्हणजे एक कवच तयार होत आता हा आणि असाच परत आणायचा. एक असा उचलून, एक म्हणजे पहिलंच चक्र मूलाधार, त्याला झालं. नंतर दुसरं चक्र स्वाधिष्ठान. त्याला तुम्ही दिलं, तिसरं चक्र नाभी , त्याला तुम्ही बंधनात घातलं. चौथं चक्र हृदय त्याला तुम्ही बंधनात घातलं. पाचवं चक्र विशुद्धी म्हणजे कंठाचं. त्याला तुम्ही बंधनात घातलं. सहावं चक्र आज्ञेचं, ते तुमच्या मेंदूत असतं. आणि हे सातवं चक्र ब्रहम्मरंध्र म्हणजे ज्याला सहस्रार असं म्हणतात. अशा रीतीने तुमची जी सात चक्र आहेत, त्यांना बंधन घातलंत. आता स्वत:ची कुंडलिनी कशी उचलायची ते बघा. थोडं शांतपणाने घ्या. आता हा हात असा ठेवायचा. थोडा गंभीर आहे हा विषय . हा हात असा, डावा, समोर ठेवायचा. म्हणजे आनंद आतून, इतक्या उकळ्या फुटून वाहणार आहे. की तुम्ही हसतच रहाल जगाकडे बघून. पण आता थोडावेळ थांबून घ्यायचं. हा डावा हात असा पुढे ठेवायचा, कुंडलिनी वर, मी बसले आहे. तुम्ही बसला आहात. आता ह्याच्यावरती फिरवायचा हा उजवा हात. हा असा उभा घ्यायचा आणि हा असा. ही इच्छा शक्ती आहे आणि ही क्रियाशक्ती आहे. हा हात वर, समोर, खाली, मागे असा फिरवायचा. वर, समोर, खाली, मागे असा तीनदा वर न्यायचा. आता चला. आता खांदे मोकळे सोडून, डोकं वर करून ह्याला असे वेटोळे घालून आणि एक गाठ मारायची जोरात स्वत:ला. आता एकदा कुंडलिनी चढवली. आता ही तीन, त्रिगुणात्मिका आहे. म्हणून तीनदा चढवायला लागते. आता परत चढवायची. आता परत खांदे मोकळे सोडून, डोकं वर करून विचार नाही करायचा. परत एक वेटोळे घाला अशी दूसरी गाठ मारायची, तिसऱ्यांदा तीन गाठी बांधायच्या. म्हणजे नीर गाठ होते. पार झाले तुम्ही. सर्व संत-साधूंना आमचा नमस्कार! २२ स२ व पा ा उ क ४ ु (२G -25 92 उ्हर ও) ট দেনন ততত্ তইতাহর आपल्याली हे समजून घ्यायली पाहिजे की आपण एका मोठ्या सूक्ष्म आणि मजबूत धाग्याने बांधले गेलो आहोत आणि एकमेकांमधील प्रेम यापेक्षा जास्त आनंदाची दूसरी कोणतीच गोष्ट नाही. (प.पू.श्रीमाताजी, कलकत्ता, ०९/०४/१९९০) प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in भारतीतच संपूर्ण विश्वाची कुंडलिनी बसलेली आहे आणि जर आपला भारत देश ठीक झाला तर पूर्ण जगच ठीक होईल. आणि त्याचे सहस्रार ही इथेच बसलेले आहे आणि म्हणूनच मला हजारो हिंदुस्थानी असे पाहिजे की जे आत्मसाक्षात्कार देऊ शकतील. प.पू.श्रीमाताजी, २५/११/१९७३ ा मा भ० म ु हं छा न ---------------------- 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-0.txt चैतन्य लहवी जानेवारी-फेब्रुवारी २०१५ मराठी रा 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-1.txt या अंकाव विश्वाचा आत्मा आपल्या हृदयात आहे ... ४ सहजयोग आणि कुंडलिनीची जागृती १४ आपण आपल्या गुरली सागर २०पात मानती. सग२ आपले पिती आहेत. सागर जेव्हा विश्वाद्वारे टाकलेला कच आपल्यामध्ये सामावून घेऊन ढगांच्या २०पात आकाशात जातौ तेव्हा तौ अत्यंतसुंढ२ आणि शुद्ध बनतो. पं.पू.श्री माताजी, देवी पूजा, धर्मशाला, २६ मार्च १९८५ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-3.txt विश्वाची आत्मा आपल्या हृढयात आहे. अ ০ विश्वाचा आत्मा आषल्या हृढयात आहे. त्या आ्म्यात आषण जाणू शकती की है सर्ब विश्व एका परमेश्वराने बनबलेले आहे आणि र. आपल्या सर्वामध्ये त्याच पवैमेश्बराचा अश हा आत्मा 9 र विराजमान आहे. ं 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-4.txt पुणे, ०८/०३/१९८६ या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात. पण आपल्या शास्त्रात याला पुण्यपट्टणम असे म्हटलेले आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य या पुणे नगरातून वहात आहे आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे, की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत शिव स्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या मनुष्य बघून, त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठीत असतो. आत्मतत्त्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं सुद्धा, रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्त्व, मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्त्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे, आत्मास्वरूप आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचे प्रतिबिंब जे हृदयात आहे, ते धारणेला जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्रसुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो. एकमेकांना ओळखत नाही, एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते. त्याबद्दल भ्रामकता असते. एकमेव जाणिवेसाठी ज्याला अॅबसल्यूट म्हणतात, तो आत्माच मिळविला पाहिजे. कारण तोच आपल्या सर्व नसानसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विदु म्हटलेले आहे, की विद् झाले पाहिजे. ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसानसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही कितीही म्हटलं की आम्ही जातियता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब-श्रीमंत मिटवून टाकू. म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या, की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत त्यांना बंद करून टाकू किंवा सर्व जगात एकच साम्राज्य आलं पाहिजे अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते बाह्यातून तुम्ही कितीही साध्य केलं तरी ते निष्फळ होऊन जातं. त्याला कारण ज्यांनी हे बनवलं आहे तो मानव, ती मानव जात अजून त्या स्तराला आलेली नाही जिथे ती विश्वात्मकाला जाणेल. विश्वाचा आत्मा आपल्या हृदयात आहे. त्या आत्म्यात आपण जाणू शकतो की हे सर्व विश्व एका परमेश्वराने बनवलेले आहे आणि आपल्या सर्वांमध्ये त्याच परमेश्वराचा अंश हा आत्मा विराजमान आहे. वरपांगीपणाने कितीही आपण म्हटलं, की आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सगळी भावंड आहोत, तरी ती वरवरची भावना राहील. खोल, आतमध्ये, हृदयात तो आत्मा वसलेला आहे. फक्त आपलं चित्त जेव्हा त्याच्या प्रकाशाने आलोकित होते, तेव्हाच मनुष्य समजतो की खरोखरच आपण एकाच शरीराचे अंग-प्रत्यंग आहोत. आज आपण विश्व धर्म स्थापन केला तो फक्त अशाच लोकांच्या आधारावर होऊ शकतो, ज्यांच्यामध्ये विश्वात्मकाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. बाह्यातल्या लोकांचा कोणताही तुम्ही असा विश्वाचा कार्यक्रम काढला तर तो फलित होणार नाही कारण त्याच्यात काहीसुद्धा सत्य नाही. तर सर्वप्रथम आत्म्याची आपल्यामध्ये जागृती ही पूर्णपणे झाली पाहिजे. तो जागृत आहे. पण त्याची जी जागृत स्थिती आहे ती चित्तात आली पाहिजे. बाह्यातून प्रयत्न करूनही होऊ शकते, असं लोकांचं म्हणणं आहे, पणा मला असं वाटतं की ती आतूनच होते. आतूनच ती ५ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-5.txt आपल्यामध्ये जागृती येऊ शकते. ती म्हणजे कुंडलिनी जागरणाने. कुंडलिनी ही शक्ती आपल्यामध्ये व्यवस्थित सुप्तावस्थेत असते. आणि ज्यावेळेला तिचं जागरण होतं, तेव्हा ही शक्ती, जसा एखादा दीप आपण पाजळून ठेवावा आणि त्याच्यावरती एखादी शक्ती किंवा समजा गॅसची धार आली तर ती कशी पेटून निघते, तसच आपलं चित्त आहे, ते सबंध आलोकित होऊन जातं. पण तो आलोक जोपर्यंत आपल्या व्यवहारात, आपल्या वागण्यात, आपल्या समाजात, आपल्या देशात आणि या विश्वात पसरणार नाही तोपर्यंत सहजयोगी होऊनसुद्धा काही फायद्याचे नाही. जो आलोक तुमच्यामध्ये आला त्याच्यामुळे तुमच्या प्रकृतीला आराम पडला असेल. कदाचित तुमची मानसिक स्थिती ठीक झाली, शारीरिक स्थिती ठीक झाली, सांसारिक स्थिती ठीक झाली, तरीसुद्धा अजून तुम्हाला शिवशक्ती मिळालेली नाही. शिवाची जी शक्ती आहे ती विश्वाला आपण एक मानलं पाहिजे. एक मानणं हे काही बुद्धीने नाही होत, पण ती जाणीव आतून येते की आम्ही सर्व एक आहोत. हे सर्वप्रथम शिवाचं दर्शन म्हणजे तो विश्वात पसरलेला आहे आणि त्याचं कार्य इतकं तोलून आहे, इतकं समजून आहे की तो प्रत्येकाला ओळखून आहे. आता समजा तुम्ही जर इथे दिवा लावला तर या दिव्याला हे समजणार नाही की कोठपर्यंत प्रकाश पोहोचवायचा किंवा कोणत्या गोष्टीला आलोकित करायचं किंवा कोणती अशी जागा आहे जिथे हा प्रकाश गेला पाहिजे, तो विचार हा दिवा करणार नाही. पण आत्म्याचं तसं नाही, एकदा जर तुम्ही आत्मा तेवला तर तो चैतन्य रूपाने तुमच्या हातातून वाहू लागतो आणि त्याच्यामध्ये ही जी आलोकित झालेली बुद्धी आहे ती त्या चैतन्यातून वाहते. ती तुम्हाला बरोबर सांगते की इथे तुमचं चुकत आहे, इथे तुम्ही ठीक चालले आहात, इथे तुम्ही पुढे चला. म्हणजे साऱ्या परमेश्वराची जी बुद्धी आहे ती या आत्म्यातून वाहते. साऱ्या विश्वातलं जे कार्य आहे, परमेश्वर करतो आहे ते तुमच्या हातूनसुद्धा त्याचप्रमाणे तो करवून घेत आहे. म्हणून सर्वप्रथम आत्म्याला प्राप्त झालं पाहिजे, शिवाला प्राप्त झालं पाहिजे. आता बाह्यातून कसं आपण शिवाकडे जाऊ शकतो, ते पाहिलं पाहिजे. शिवतत्त्वामुळे सत्य जाणलं जातं, कारण मी सांगितलं की विश्वाची सर्व शक्ती जी आहे ती एका शरीरातून वाहिल्यासारखी आहे, त्यामुळे कुठेही काही होत असलं तरी तुम्ही या शक्तीच्याद्वारे सामूहिक चेतनेत सत्य जाणू शकता. सत्य काय किंवा असत्य काय. हे जे केवळ सत्य आहे, जे अॅबसल्यूट आहे, ते तुम्ही आत्म्यामुळे जाणू शकता. आणि या प्रकाशाचा जो विशेष गुण आहे की जेव्हा हा प्रकाश आपल्या हृदयात येतो तेव्हा मनुष्य आनंदात रमण करू लागतो. आनंदाच्या उम्मी त्याच्या अंगात उठू लागतात. त्याच्या बुद्धीत, त्याच्या वागण्यात, सर्व गोष्टींमध्ये एक चमक येते. एक विशेष मोहीत करणारं, उच्च पदाला नेणारं असं एक व्यक्तित्व त्याच्यात जागृत होतं. अशा मानवाजवळ जो मनुष्य येईल त्याचा उद्धार होतो, त्याचं कल्याण होतं . तो सन्मागाला लागतो. उत्तम मार्गाला तो येतो. आपोआपच हे घटित होतं. त्या संगतीतच हे सगळें घडून येतं , पण त्याही पलीकडे असा मनुष्य नेहमी आनंदात मग्न असतो. आनंदाला दोन बाजू नसतात, फक्त केवळ आनंद असतो, त्याला आपण निरानंद म्हणतो. केवळ आनंद म्हणजे त्याच्यामध्ये सुख आणि दु:ख अशा एका नाण्याची दोन बाजू किंवा दोन स्थिती नसतात. मनुष्य एकमेव स्थितीत असतो आणि ती एकमेव स्थिती म्हणजे आनंद स्थिती आहे. यात तो साक्षी स्वरूप होऊन सुख आणि दुःखाच्या लाटांना बघत असतो. जसा काही नावेवर बसला आहे आणि समुद्राच्या ६ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-6.txt कितीही लाटा आल्या तरी त्यांना तो मजेत न्याहाळून राहिला आहे. ती स्थिती, त्या न्याहाळण्याची स्थिती, ती स्थिती तुमच्यात प्राप्त झाली म्हणजे ह्या आनंदाच्या उर्मी, आनंदाचं सौख्य आणि आनंदाचं राज्य काय आहे ते लक्षात येतं. पण ते मिळूनसुद्धा आनंद परिपूर्ण होत नाही. कारण जो या आत्म्याचा स्रोत आहे तो विश्वाचा आत्मा आहे. म्हणून जोपर्यंत हा आनंद विश्वाच्या प्रत्येक सीमेवर नेऊन पोहोचवत नाही, तोपर्यंत आपण आनंदात पूर्णपणे येऊ शकत नाही. म्हणजे एखादं समजा, समुद्रामध्ये फूल पडलं. तर ते वहात वहात या किनार्यावर जाईल, त्या किनाऱ्यावर जाईल, मग त्याची हीच गती होऊन जाते. त्यातच त्याला आनंद वाटतो, तसेच एकदा मनुष्य परमेश्वराच्या साम्राज्यात उतरला की त्याला वाटतं कोणाच्या हृदयाला जाऊन भिडावं, कोणाला जाऊन सांगावं, कोणाला भेटावं, कोणत्या देशात जावं आणि ही सुवार्ता सांगायची की तुम्ही सुद्धा आपल्या आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हा. म्हणून विश्वस्वरूपत्व आल्याशिवाय आम्ही आत्मसाक्षात्कारी झालो, असं म्हणता येत नाही. जे लोक स्वत:ला सहजयोगी म्हणतात ते अजूनसुद्धा जाती-पाती, नसत्या गोष्टींना धरून बसतात. आमच्या जातीतच लग्न झालं पाहिजे. आमची जात, आमचं हे, आमचं ते, या मर्यादेतून निघालं पाहिजे. आमचा देश, आम्ही हिंदुस्थानी, आम्ही इंग्लिश, आम्ही अमेरिकन, आम्ही तुमच्यापेक्षा उच्च, तुम्ही आमच्यापेक्षा नीच, आम्ही उत्तरेत राहणारे, तुम्ही दक्षिणेत राहणारे, पूर्व, पश्चिम या सर्व दिशा मानवाने ठरविल्या आहेत. परमेश्वराने काही बनविल्या नाहीत. त्याने काही या सृष्टीमध्ये वेगळेवेगळे देश वगैरे काही बनविले नाही, पण वैविध्य आणण्यासाठी इतकी सुंदर सृष्टी केली. पण माणसाचं डोकं प्रत्येक ठिकाणी हे शोधत असतं की आता आपण आपल्याला कसं वेगळं करून घ्यायचं, अलगद कसं करून घ्यायचं. तर आता मग पुणेकर झाले, मग मुंबईकर झाले, मग त्यातल्या त्यात पुणेकर म्हणजे सदाशिव पेठवाले झाले. मग त्यातले आणखीनही आतमध्ये गेले तर आणखीन कोणत्या विहिरीत जाऊन बसतील देवाला ठाऊक! पण सहजयोग्यांनी विहिरीत नाही गेलं पाहिजे, सरोवरामध्ये फुलासारखं फुललं पाहिजे. जो सहजयोगी अजूनसुद्धा अशा विहिरीत आहे त्याने लक्षात घेतलं पाहिजे की तो अजूनपर्यंत सहजयोगात पूर्णपणे उतरलेला नाही. तर सर्वप्रथम आपल्यामध्ये विश्वाचं जे स्वरूप आहे ते मान्य केलं पाहिजे. तरच आपण शिवतत्त्वाला उतरलो आहोत . हे कसं आपण बाह्यातून मिळवू शकतो ते आपण ध्यानधारणेत समजावं. जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हां ध्यानाच्या वेळी लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे, दसऱ्यांकडे नाही. स्वत:कडे लक्ष देऊन बघायचं की आता कसले विचार आपल्या डोक्यात येत आहेत. माझ्या डोक्यामध्ये कोणकोणत्या धारणा मी करून ठेवलेल्या आहेत. त्या बघितल्या पाहिजेत. एकतर मी अमका आहे, मी तमका आहे, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी ह्या धर्माचा, त्या कर्माचा, प्रत्येकजण आपल्याला अती शहाणा समजतो. त्यात मी आहे का ? मी त्याच्यामध्ये सामील आहे का? मी कोणत्या तरी एखाद्या ग्रुपचा किंवा एखाद्या देशाचा किंवा एखाद्या लहानशा गल्लीतला एक नागरिक आहे का ? की मी परमेश्वराच्या साम्राज्यातला नागरिक आहे! स्वत:कडे आपण जेव्हा लक्ष देतो ध्यानामध्ये, कारण आपला संबंध आता आत्म्याशी झाला आहे, तसाच हा प्रश्न तुम्ही स्वत:ला टाकाल. लगेच आत्म्याचा झोतच्या झोत तुमच्यासमोर येऊन उभा राहील आणि आश्चर्य वाटेल की नाही बुवा, आपण विश्वातले एक आहोत. एखाद्या लहानशा थेंबाने एका मोठ्या महासागरात मिसळावं आणि आनंदात ७ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-7.txt रमावं असं का वाटू नये त्या थेंबाला. उलट त्या थेंबाचे आणखीन अणू-परमाणू होण्याकडे लक्ष का असावं त्याचं? कारण मानवामध्ये अनेक अशा गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. त्याला आपण अहंकार म्हणतो, प्रती अहंकार म्हणतो, मानसिक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींच्यामुळे त्याची जी बुद्धी आहे किंवा त्याचं जे मन आहे, ते एकाप्रकारे मर्यादित झालेलं आहे आणि त्या मर्यादा तो तोडू शकत नाही. तो समर्थ नसतो. त्याच्यामध्ये शक्ती नसते की या मर्यादा तोडल्या पाहिजेत. माझा समाज काय म्हणेल? माझे बाप काय म्हणतील ? माझी आई काय म्हणेल? म्हणून जे आदि शंकराचार्यांनी सांगितलं की, 'मला आई नाही, बाप नाही, मला कोणी नाही. मी शिवत्त्व आहे.' म्हणजे तिथे शिवतत्त्वामध्ये मला मर्यादा नाही राहिलेल्या. अमर्याद, अनंत असा मी शिव आहे. आणि जो अनंत शिव आहे त्याला या अशा क्षुल्लक आणि मर्यादित करणाऱ्या गोष्टींचा कोणत्याही प्रकारे त्याबद्दल विचारच यायला नको. पण विचार जरी आला तरी त्याबद्दल दिलगिरी वाटायला नको, की मी असं का केलं नाही, मी अशा धर्माचा आहे, मी अमका आहे. जो काही कोतेपणा आपल्यामध्ये आहे, तो सगळा या आपण धारणा केलेल्या गोष्टींमुळे आहे किंवा आपल्यामध्ये ज्या धारणा केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे आहे. लहानपणापासून आता जर आपल्याला शिकवलं की कोणत्या तरी जातीचे लोक फार वाईट असतात! मग आपल्या डोक्यात ते बसलं म्हणजे बसलं. त्याने मर्यादा आल्या म्हणजे कोणी काही सांगितलं तरी सुटत नाही. पण एकदा का तुमच्यात बुवा, विश्वधर्म म्हणजे काय आणि त्याचा प्रकाश किती सुंदर आहे तो पाहिला म्हणजे वाटतं की काय मूर्खासारखं आजपर्यंत मी या अशा मूर्खासारख्या गोष्टींमध्ये कसा रमलो होतो, मी का घोटाळत होतो. ही जेव्हा स्थिती येते तेव्हा म्हटलं पाहिजे की आपली प्रगती उत्थानाकडे झालेली आहे. म्हणून सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आत्म्याची पूर्ण जाणीव व्हायच्या आधी आपल्या बुद्धीमध्ये पूर्णपणे प्रकाश पडला पाहिजे. जे बुद्धीवर पांघरूण पडलेले आहे, जो अंधार आहे, तो अंधार आपल्यामधून गेला पाहिजे आणि त्यासाठी फक्त स्वत:कडे लक्ष नुसतं द्यायचं. आता एखादा मनुष्य अत्यंत क्रोधी आहे समजा. लहानपणापासून त्याला क्रोध येतो कारण वातावरण त्याचं असं होतं. अशा वातावरणात राहिला जिथं त्याला क्रोधी व्हावं लागलं, तुम्ही म्हणाल मनुष्य कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरच बोजा घालतो त्याचा. स्वत:वर घेत नाही. किंवा असं म्हणू की त्याच्या आईने त्रास दिला किंवा वडिलांनी त्रास दिला किंवा काहीतरी झालं म्हणून तो असा झाला समजा. आता त्या क्रोधी माणसाला जर तो क्रोध अजून जाचतो आहे, तर अजून त्याच्या हातात आत्म्याची तलवार आलेली नाही. आणि ही आत्म्याची तलवार ही प्रेमाची आहे आणि फुलांनी गुंफलेली आहे. तर तिसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवण्याची अशी आहे की आत्मा हा प्रेमस्वरूप आहे. निव्वळ प्रेम आहे. पण त्या प्रेमाला समजायला आपल्यालासुद्धा आत्मसाक्षात्कारच पाहिजे. 'आत्मण्येव आत्मने तुष्टाः' आत्म्यानेच आत्म्याला जाणता येतं असं म्हणतात. म्हणजे असं आहे की जर समजा तुम्हाला डोळे नसले तर तुम्ही स्वत:चे डोळेसुद्धा आरशात बघू शकत नाही. तसच जोपर्यंत तुम्हाला आत्म्याची ओळख झालेली नाही तोपर्यंत तुम्ही या आत्म्याचं स्वरूपसुद्धा जाणू शकत नाही. आणि ह्याचं नुसतं स्वरूप म्हणजे हा नुसता प्रेमाचा पुंज आहे. प्रेम. पण या प्रेमाला आपण जसं जाणतो, तसं प्रेम नव्हे. त्या प्रेमामध्ये लालसा नाही, कोणत्याही तऱ्हेची उद्दामता नाही किंवा त्या प्रेमाला कोणतीही इच्छा राहत नाही. हे प्रेम सतत वाहत राहतं. वाहत राहतं आणि त्यातून जे काही उत्तम आहे, जे हितकारी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये बेनोव्हेलन्स म्हणतात, ते घडून आणत असतं आणि ते घडवतांना कोणत्याही तऱ्हेची दुखापत, इजा ८ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-8.txt किंवा जबरदस्ती तो दुसर्यांवर करीत नाही, ते आपोआपच घडून येतं. आपोआपच घटित होतं. जे आपोआप घटित होतं, जे सहज आहे, ज्याला आपण स्पाँटेनियस इंग्लिशमध्ये म्हणतो, ती सहज स्थिती तुमच्यामध्ये आली आणि आपोआपच त्यात प्रेमाची शक्ती जर वाहत सुटली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की या प्रेमाच्या शक्तीने सर्व कार्य होतं. तुम्ही काहीही करायला नको. पण फक्त त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण ज्याला प्रेम म्हणतो ते कोणत्या प्रकारचं आहे. पहिल्यांदा निरपेक्षिता पाहिजे. आता एक लहानशी गोष्ट. समजा, आम्ही अमेरिकेवरून साड्या घेऊन आलो. कुणाला सांगितलं, की काहो, तुम्ही असं करा, आम्ही इतक्या आणल्या आहेत, अकरा साड्या, आता अकरा लेडिज शोधून काढा. तर एक आपली आई, एक आपली बहीण, एक मुलगी किंवा एक आमची वहिनी असं करून त्यांनी सगळे नातलग आपले जोडून आणून ठेवले माझ्यासमोर स्वत:. म्हटलं, 'अहो, निदान आडनावं तरी वेगळं असलेलं बरं असतं! एकदम, एकजात एकाच आडनावाची अकरा माणसं कशी उभी केली?' 'अहो, पण माताजी, ते असं आहे ना, मी त्यांना ओळखतो. त्यामुळे ते मला माहिती आहेत.' 'असं कां? मग तुम्ही सहजयोगी आहात ना! मग तुम्ही इतरांना ओळखत कसे नाहीत?' मग आता दूसरं कोणाला तरी बोलवा. त्यांनी अशीच चार नांव आणली. म्हणजे मी बुचकळ्यात पडले, की आता करायचं तरी काय करायचं? तेव्हा ज्या प्रेमाला निरपेक्षिता आहे, आता हे निरपेक्ष प्रेम कसं असतं. तिथे माझी भावना तुटते. माझे घर, माझा मुलगा, माझा भाऊ, माझी बायको, ही जिथे भावना राहिली, तिथे निरपेक्षिता नाही. अर्थात् प्रत्येकाशी जसा तुमचा संबंध आहे, तो संबंध आहेच, पण त्याठिकाणी चिकटलं नाही पाहिजे. मी पुष्कळदा उदाहरण देते, की जेव्हा जमिनीतून शक्ती निघते आणि ती एखाद्या झाडात वावरते, त्यावेळेला ते समजा जाऊन ती एखाद्या फुलात अडकली, तर झाड तर मरून जाणारच, पण ते फूलही मरून जाणार. तेव्हा ही निरपेक्षिता ही सगळीकडे वाहते आहे. ज्याला जे पाहिजे ते देत आहे. आता ही बघा, आपल्या इथे बसलात तुम्ही. इथे सगळ्या तऱ्हेची ही वीज शक्ती, इलेक्ट्रिसिटी येत आहे. त्यांनी काही इथे लहान लहान दिवे लावले आहेत, काही मोठे दिवे लावलेत, काही तिकडे फोटोग्राफ चाललेत, इकडे हे मी बोलते आहे हे माझं भाषण ते उचलत आहेत, सगळीकडे पंखे चालले आहेत, बघा. कितरी तरी कामं करताहेत. ज्याला ज्याची गरज आहे ते करताहेत, पण ती कोणाला चिकटून आहे का? ती शक्ती चिकटून नाही, पण जेव्हा जिवंतपणा येतो माणसाला, तेव्हा तो चिकटायला लागतो आणि मनुष्य झाला म्हणजे अती चिकट होतो. फारच चिकटतो. म्हणजे मी कधी कधी म्हणते की माणसाला चिक्कू म्हटलं पाहिजे. कारण चिक्कू शब्द बरोबर शोभतो त्याला. प्रत्येक गोष्टीला चिकटायचं. काही असलं की चिकटायचं आणि हे चिकटणं जे आहे ते शक्तीला ओढून घेतं आणि त्याला विद्रुप करून टाकतं. सुरुवातीला माझा मुलगा, माझा मुलगा, मग शेवटी, 'माताजी, या मुलापासून मला सोडवा. मला फार छळतोय.' म्हणजे त्याचेही इलाज होतच जातात. असं नाही की त्याचे इलाज होत नाहीत. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे, की निरपेक्षिता माणसामध्ये असायला पाहिजे. निरपेक्षितेमध्ये मनुष्याने प्रेम केलं पाहिजे. आपली मुलगी आहे, मुलगा आहे, ठीक आहे. तुमची जबाबदारी आहे. ती पूर्ण करायची, पण त्याच्यात अपेक्षा नको, पहिली गोष्ट आणि दसरं, हे माझं आहे म्हणून करायचं असं नाही. उद्या जर तुमच्या दारी दुसरी एखादी मुलगी ही ९ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-9.txt आली, तर तिच्यावरसुद्धा तितकेच प्रेम करता आलं पाहिजे, तर तुम्ही निरपेक्ष आहात, म्हणजे गुरू आहात. पण जी विश्वावरती प्रेमाची पाखर घालावी लागते, त्याच्यात जो आनंद आहे, तो म्हणजे परमेश्वरालाच विचारला पाहिजे, किती आनंद आहे त्याच्यामध्ये! जर परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलं नसतं तर त्याने सृष्टीच रचली नसती. अहो, डोकेदखी आहे, सृष्टी रचा, मग त्यात माणसं रचा, मग ते तुम्हाला मारायला उठतात, वेड्यासारखे वागतात, परत तुम्ही त्यांना ठीक करा. त्यांना रियलायझेशन द्या, मग त्यांना आत्मसाक्षात्कार द्या आणि तरी ते वेड्यासारखे इकडे तिकडे धावतच असतात. मग कसं तरी त्यांना बोटीत बसवा, जबरदस्तीने बांधून ठेवा. तरीसुद्धा त्यांचं डोकं इकडे तिकडे चाललेले आहे, पण तो निरपेक्ष असल्यामुळे सगळा खेळ आहे. निरपेक्ष आहे. फक्त एकच परमेश्वर हा प्रेमाची भक्ती करीत असतो. प्रेमाच्या आनंदात असतो. मी प्रेम करतो हाच त्याचा आनंद आहे आणि त्या प्रेमातच तो राहतो. त्याला हा विचार येत नाही की याने, दूसर्याने मला मारलं की मला काही म्हटलं, की काही नाही. 'बाबा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू काहीही कर मला. माझं तुझ्यावर प्रेम आहे.' ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे आणि तीच प्रवृत्ती जेव्हा एखाद्या सहजयोग्यात येते तेव्हा मी त्याला निरपेक्षिता म्हणेन. पण तसं दिसत नाही. तसं तुटत नाही. म्हणजे चिकटपणा झाला परत. एखाद्याशी जर तुम्ही चांगले वागत असला, तर त्याच्याशी तुम्ही चांगले वागत रहाल, पण ते दिसत नाही. एखाद्याशी जर तुम्ही तुटकपणाने वागत असले तर तसेच वागत राहणार. दुसर्या माणसाशी तसेच वागत राहणार. समजा जर दोन भावांचं बिनसलं असलं. ते सहजयोगात आहेत, तरी आपापसात बोलताना मात्र एकदसर्यांना तशाच रीतीने बोलतील. जसं एका भावाशी दुसरा भाऊ बोलतो. मग तुम्ही सहजयोगात कशाला आले. आत्म्याला मिळवायला. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे प्रेम करणारा तुमच्यातला स्रोत. मग त्याला स्वीकार्य केलं पाहिजे. त्याच्या आनंदात उतरलं पाहिजे. त्याला आपल्यामध्ये अशा रीतीने घेतलं पाहिजे, की हे माझं सर्वस्व जे आहे, फक्त त्या आत्म्याच्या प्रेमाच्या भक्तीसाठी. त्या आत्म्याला जी भक्ती करायची प्रेमाची ती करू देत. मला काही आहे, माझं शरीर आहे. बुद्धी नाही, काही नाही. फक्त त्या आत्म्याची जी भक्ती आहे ती मला बघू देत. त्याचा मला आनंद उचलू देत. तेव्हां सगळ्यात मुख्य म्हणजे सांगायचं असं, की आपण प्रेमाच्या दरबारात बसलो आहोत. हा प्रेमाचा दरबार आहे. द्वेष, राग, लोभ, मोह हे सगळे एकच प्रकार आहेत. कोणाला कोणी आवडतं म्हणून किंवा कोणाला कोणी आवडत नाही म्हणून. काही त्याच्यामध्ये फरक मला दिसत नाही. दोन्ही एकच गोष्टी आहेत. फक्त एवढेच आहे, की एक दिसायला बरं दिसतं आणि दुसरं दिसायला वाईट दिसतं, पण दोन्ही प्रकार एकच आहेत. प्रेम हे निरपेक्ष असायला पाहिजे. दुसरी गोष्ट की प्रेमामध्ये गोडवा असला पाहिजे. कोणी एक थप्पड थोबाडात द्यायची. थोबाडात देऊन मग म्हणायचं की हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला मारलं. कबूल. म्हणजे लोकांनी म्हणायचं 'असं कसं?' नाही मी प्रेमात मारलं तुला. आणि काही काही पद्धत असते. आता कोणाला जर भेटायला गेले तर जोपर्यंत हातातून अर्धा शेर वजन नाही काढणार तोपर्यंत ते हातच शेक करत राहतील तुमचा. वाटतं ही काय भेटायची पद्धत झाली! आणि हृदयात काहीच नाही. वरपांगीपणा. त्या वरपांगीपणामुळे अगदी हात धरून तुमचे हलवतील. 'वा! वा! काय भेट झाली. अमुक झालं, तमुक झालं.' तुम्हाला वाटेल कधी हात सुटतो, पण हृदयात १० 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-10.txt काय? हृदयात प्रेम पाहिजे. हृदयापासून प्रेम पाहिजे. हृदयातून वाहिलं पाहिजे. तसं होत नाही, वरपांगी आणि या वरपांगी प्रेमाने मनुष्याला कधी कधी अशी भूल पडते की, 'मी किती चांगला मनुष्य आहे, मी किती प्रेमळ आहे आणि मी सगळ्यांशी प्रेमळपणाने वागतो.' कारण बिझनेस आहे ना त्याचा, मग, चांगलं वागलंच पाहिजे. पण प्रेमामध्ये मनुष्य अत्यंत गोड असतो. आतून बाहेरून, आतून आणि बाहेरून. कडू नसतो. त्याचा कडूपणासुद्धा गोड लागायला लागतो. असा तो गोड असतो. जोपर्यंत तो गोडवा सहजयोग्यांमध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्हाला मानायला कोण तयार होईल. अहो, असे लेक्चर देणारे, भाषण सांगणारे, बाता सांगणारे पुष्कळ आहेत. आपल्या देशात तर अगदी पेव फुटलं आहे लोकांचं. गर्लोगल्ली बसलेत. तुम्हाला पाहिजे तर पुण्यालासुद्धा मिळतील. पण त्याने काय तृप्ती होते का आपली. सगळं खोटं आहे ते. वरपांगी आहे. तेव्हा हृदयातून प्रेम यायला पाहिजे. आता सगळ्यांचं मला पुष्कळदा असं पत्र येतं की, माताजी, आमच्या हृदयातून प्रेम वाहू द्या. आता मी कसं करू ते! अहो, तुम्ही हृदय उघडा की. आता हृदय कसं उघडायचं एवढं मी सांगते तुम्हाला. हृदय कसं उघडायचं? सर्वप्रथम एका लहानशा गोष्टीवरून सुरू करायचं. आधी लिस्ट करायची की कोणत्या कोणत्या लोकांवर माझे प्रेम आहे आणि कोणत्या कोणत्या लोकंबद्दल मला द्वेष आहे. पहिल्यांदा. मग ज्यांच्यावर मला द्वेष आहे त्यांना प्रेमपत्र लिहायची. फार कठीण काम! फारच कठीण! त्यांना लिहायचं की हे बघा मला तुमची फारच आठवण येते. कारण तुम्ही किती थोर आहात! नसले तरी चालतील पण म्हणायला काय हरकत आहे आणि मला बर वाटेल की तुम्ही या माझ्या पत्राचे उत्तर पाठवाल तर. करून बघा, जमतं का? कारण आत्म्याने तुम्हाला समर्थ केलेले आहे. समर्थ केलंय. पण वरपांगीपणाने नाही. त्याला असं नाही वाटलं पाहिजे की वा! चांगलं पत्र आलं, आता उद्या काहीतरी मागणी येणार. हे पहिलं पत्र म्हणजे इंट्रोडक्शन असणार यांचं. तेव्हा मनापासून, हृदयापासून एक प्रेमपूर्वक पत्र पाठवा. अशा लोकांना ज्यांच्याबद्दल अत्यंत द्वेष वाटतो, वाईट वाटतं, पण सहजयोगी आहेत. पहिल्यांदा सहजयोगात सुरू करायचं. सहजयोगी असले पाहिजेत पहिली गोष्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही जेव्हा पत्र लिहू लागाल, परत तो जो राग आहे तो कुठेतरी येणारच. एखादं त्याच्यामध्ये असं वाक्य येईलच, की ज्याच्यातून तुमचा जो राग आहे तो झळकेल. मग परत दुसरं लिहावं, मग तिसरं लिहावं. करता करता जर शंभर पत्र लिहिली तर एक पत्र अस निघेलच की ज्याच्यामध्ये हा राग निघून गेलेला आहे. ज्या माणसावरती आपला राग आहे तिकडे आपण हृदय उघडून पाहिलं पाहिजे. त्याने जे केलंय ते आपणही करतो, केलंय ना, मग कशाला त्याच्यावर रागवायचं? तो जर अशा रीतीने वागला आहे, तर मी तशा रीतीने वागणार नाही. आणि खरोखर ते प्रेम करून पाहिलं पाहिजे. आता आपल्या देशातले अनेक प्रश्न एवढ्यासाठी आहेत की खरोखर प्रेमाची कल्पना नाही आणि व्याख्या नाही आपल्याजवळ. मुख्य आता बायकांचा जो प्रश्न आहे. नारी लोकांचा म्हणजे दोनच तऱ्हेच्या बायका आपल्या देशामध्ये आहेत, तिसरी तऱ्हा मला दिसत नाही. दिसली तर फार बरं होईल. एक म्हणजे ही की जबरदस्त आणि दुसरी म्हणजे सहन करणारी, मधोमध काही नसतं. एक तर जबरदस्त असली तर ती डोक्यावर बसणार आणि नसली तर पायाखाली तुडवणार. म्हणजे 'जमलं तर सूत नाही तर भूत.' त्यामुळे काय आहे की ११ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-11.txt एकंदर समाज विक्षिप्त झालेला आहे. आणि तो जी बाई सहन करते तिचाच गळा घोटत जाणार आणि जी जबरदस्त असते तिच्या पायाखाली जात राहणार. त्यामुळे तुम्ही नकळत एका, फार मोठ्या पापामध्ये पडत आहात आणि ते पाप म्हणजे असं की एक दूसऱ्या सहनशील बाईला अशा रीतीने त्रास देणं हे परमेश्वराला कधीही मान्य होणार नाही. अनेक असे प्रश्न आहेत. आपल्याकडे आता समजा, जाती-पाती आहेत. त्याच्यामध्ये उच्च-नीच आहे, गरीब- श्रीमंत आहे, हे प्रश्न आहेत. हे प्रश्न मिटविण्यासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये प्रेम किती आहे ते पाहिलं पाहिजे. अहो, या प्रेमाची वाखाणणी अनेक अवतरणांनी केलेली आहे. तर या प्रेमाची जी पाखर आहे ती किती लोकांवर आपण घालू शकतो? किती लोकांसाठी आपल्या हृदयामध्ये कळकळ आहे ? किती लोकांबद्दल आपल्याला खरोखर प्रेम वाटतं ? परवा मी मुंबईला लोकांना प्रश्न विचारला, म्हटलं पुरुषांना फार अगदी असतं की मित्रता आमची फार गहरी असते, बायकांच्या मानाने. तर मी विचारलं की, 'काहो, तुमचे मित्र कोण?' तर ते म्हणाले की, 'हे गृहस्थ आहेत ते माझे मित्र आहेत.' 'अहो, काही नाही म्हटलं, खोटी गोष्ट आहे. आता मोटारीत जातांना तुमच्या विरुद्ध सांगत होते मला. तुमचे कसे मित्र हे?' तर ती मित्रता, आपापसातील जी मित्रता आहे याच्यामध्ये माणसाला खूप एकदुसर्यातलं वैगुण्य दिसत नाही, चांगुलपणा दिसतो. तो वाढत गेला म्हणजे तुमचं हृदय वाढत जातं. दूसरं म्हणजे दानत, ज्याला दानत म्हणतात. दानत म्हणजे देण्याची शक्ती असायला पाहिजे. तुमच्या आईबद्दल तर प्रसिद्धच आहे. तिला भयंकर दानत आहे. पण तुम्ही दानत करून बघा. समजा, तुमच्याजवळ पाच साड्या आहेत आणि एखाद्या बाईजवळ जर कमी असतील, तर एखादी तिला देऊन बघा. तुम्हाला शंभर साड्या नेसण्याचं सौख्य मिळणार आहे. जर तुमचं हृदय उघडं असलं तर. दानत असायला हवी. देण्याची शक्ती असायला पाहिजे. देत सुटायचं. हे घे, तुला हे हवं ना हे घे. तुला ते हवं ना ते घे. दानत असायला पाहिजे. ही दानत सहजयोगात आधी सुरू होते आपल्या पूजनात, मी पाहिलं आहे. लोकांचं हृदय उघडायला लागलं की म्हणजे मग 'माताजी, तुमच्यासाठी मुद्दामून मी खीर करून आणली.' आता मी खावो अथवा न खावो. 'मी मुद्दामून तुमच्यासाठी पुरणपोळी करून आणली.' आता ती सुरुवात झाली. पण ती पुरणपोळी तुम्ही एखाद्या सहजयोग्यासाठी केलीत तर मला जास्त आनंद होईल. आपापसात तुम्ही जर ते प्रेम वाटून घेतलं तर मला जास्त आनंद होईल. फार आनंद होईल. जर तुम्ही एखाद्या सहजयोग्याविषयी चांगलं येऊन सांगितलं तर मला फार आनंद होईल. आणि जर तुम्ही वाखाणणी केली की हा मनुष्य काय बहारीचा मनुष्य आहे! त्याने मला फारच आनंद होतो. हां, जर तुमचं चुकलं असेल तर मी सांगीन की तुम्ही सांभाळून रहा. पण बहुतेक असं मी पाहिलंय की, जेव्हा लोक एकदुसऱ्यांची मित्रता आणि एकदुसर्यांचं चांगलं सांगतात, जेव्हां रममाण होतात, त्यांचा आनंद उचलतात तेव्हा वाटतं की आता सुरू झालं प्रेमाचं रामराज्य ! आणि हे प्रेमाचं असे अद्भूत क्षण फार कमी येतात. एकदुसऱ्यांमध्ये आपण अजून वापरलेलं नाही आहे. हे साम्राज्य आपण अजून जाणून घेतलेले नाही आहे. याची शक्ती आपण अजून मानलेली नाही आहे. तिची किती प्रचंड क्रियाशीलता आहे, तिकडे आपलं लक्ष नाही. इतका त्याच्यामध्ये जोर आहे, की सगळी तुमची जेवढी काही मोठमोठाली आज साम्राज्य दिसतात, मोठमोठाले तुम्ही अॅटमबाँब वगैरे करून ठेवलेले आहेत, जे काही तुम्ही द्वेषावर उभारले आहे ते एकदम हाणून पडणार. एकदम जमीनदोस्त होऊन जातील ते. पण ती वापरता आली पाहिजे. तिची जाणीव झाली पाहिजे की मी प्रेमाचा पुजारी आहे. मी प्रेमात आहे. मला राग, द्वेष, लोभ वगैरे काही माहीत नाही, मी फक्त प्रेमाचा पुजारी आहे, मला भक्ती फक्त प्रेमाची करायची १२ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-12.txt आहे. असं आमच्या आईने सांगितलं. तिने त्या भक्तीत स्वत:शी जोडून घेतलंय आणि आम्ही तीच भक्ती दुसर्यांची करणार. मग कोणत्या जातीपाती, कोण कुठलं आणि कोण काय? द्वेषामध्ये मनुष्य एखादं वैगुण्य बघेल. त्याच्यावरच डोकं धरून बसेल. पण प्रेमामध्ये एखादा गुण, एखादा विशेष आनंददायी क्षण आठवावा. 'कसं चांगलं बोलले होते बरं त्यादिवशी ते!' मग त्याच्यावर बांधावी आपली इमारत. हृदयाची इमारत बांधायची, कसं बरं प्रेमाने बोलले हे! किती बरं वाटलं नाही का? की कसं अलगद येऊन त्यांनी असं म्हटलं. पण कधी जर तुम्ही कोणाला टोचून बोलाल तर ते कधीच तुमच्यासाठी चांगला विचार ठेऊ शकत नाही. आपल्या लक्षात कसं येत नाही. आम्ही जर दुसरऱ्यांशी वाईट बोललो तर तो आमच्याबद्दल वाईट बोलणारच. तो कशाला चांगले बोलणार? तो काय म्हणेल का, 'वा, वा! काय चांगले आहेत. यांनी मला चार शिव्या घातल्या.' असं होऊ शकेल का? साध्या, सहज शहाणपणातसुद्धा मनुष्याने समजलं पाहिजे की आपण दुसऱ्याच्या विरुद्ध जर इतकं भाडभाड बोललो, तर तो मनुष्य काय तुमच्या गळ्यात येऊन हार घालणार आहे! तेव्हा हृदय उघडतांना एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की या माणसाला आपण आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेले आहे. आता या हृदयामध्ये प्रेमाची शक्ती आहे. ती शुद्धीकरण करते. ती पवित्र करते. ती ह्या माणसाला पवित्र करेल. त्याच्यावर सोडून द्यायचं. आता तो कदाचित तुम्हाला त्रासही देईल थोडासा. प्रयत्न करावा. प्रयत्न करायला काही कठीण काम नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण सर्व विश्वाएवढे झालो की काय? लहानपणी नेहमी मला वाटायचं की विश्वाचं कार्य करायचे आहे. कसं काय होणार? माझी भेट लोकांशी कशी होईल? तर एकदम असं वाटायचं की माझं हृदय खुप मोठं होत चालले आहे आणि त्यात सगळे सामावत चालले आहे. इतका आनंद वाटायचा त्या गोष्टींनी त्यावेळेला नुसतं चित्र बघत असे. आज ते साक्षात दिसतंय समोर. जागोजागी हजारो सहजयोगी बसलेले आहेत. त्या प्रेमाच्या ह्याच्यात स्नात होते. तसंच प्रेम तुम्ही सर्वांना द्यावं आणि आजचा जो विशेष कार्यक्रम आहे, शिवपूजेचा, त्यात हृदयामध्ये एक विचार ठेवावा की आजपासून मी प्रेमाची भक्ती करणार आहे. आईने सांगितलं आहे. प्रेमाची मी भक्ती करणार आहे. प्रेमच करणार आणि ते करून जरी थोडासा त्रास झाला तरी ती तपस्विता आहे. ती सहन करीन. पण मी प्रेम करीन, साऱ्या जगावर प्रेम करीन आणि निरपेक्षपणे प्रेम करणार आहे. लहानशा कुपमंडूकासारखं आपलं, माझी, माझं करणार नाही. पण सगळ्यांच्यासाठी जे होईल ते प्रेमाने करेन. मग लोक लाथाडतील. कदाचित काही बोलतीलसुद्धा. माझं तसं केलं पुष्कळ. पण प्रेमाची शक्ती फार जबरदस्त असते. हे जाणून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन त्या भक्तीने ते केलं पाहिजे. असो, आता पूजेची वेळ झालेली आहे. आता मी पुण्यालाच वास्तव्य करायचे ठरवलेले आहे, शिवपूजा इथे करून. सर्व विश्वात भारत ही योगभूमी आहे आणि महाराष्ट्र ही पवित्र भूमी आहे. कुंडलिनी आहे ही साऱया जगाची. महाराष्ट्र म्हणजे केवढा मोठा देश आहे! त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे आणि त्यात आज महाराष्ट्रात पुणं हे त्याचं हृदय आहे. आणि या ठिकाणी आज शिवाची स्थापना करायची आहे. आणि माझं इथे वास्तव्य झाल्यावर कैलासच इथे उतरला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी त्यात मदत केली पाहिजे. आणि कैलासवासी जसे लोक असतात, कैलासावरती राहुन अगदी थंड मनाने, थंड प्रकृतीचे! तसे आपण इथे सगळ्या सहजयोग्यांनी झालं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की पुण्यामध्ये खरोखर साम्राज्य कैलासासारखं, श्री सदाशिवाचं आहे. अशीच सगळ्यांच्याकडून अपेक्षा करून मी इथे वास्तव्य करायचं ठरवलं आहे आणि सगळ्यांनी कृपा करून माझी मदत करावी. १३ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-13.txt सहजयोग आणि कुंडलिनीची जञागृती फलटण, ०८ मार्च १९८४ फलटणच्या सर्व सात्विक भाविक साधकांना आमचा नमस्कार! आज हृदयापासून तुमची क्षमा मागते, पण माझा काही दोष नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याही पेक्षा जास्त उत्कंठतेने तुम्हाला भेटण्यासाठी धावत येत होते, पण रस्ते महाराष्ट्रातले कसे आहेत त्याचा अनुभव येतो. त्यात रस्त्यात इतके अपघात झालेले की जीव नुसता अगदी घाबरून जातो. मग कुठे जर गाडी तुमची फेल झाली तर रस्त्यात एक दुकान नाही की एक जागा नाही की कोणी मनुष्य नाही की ज्याला म्हणता येईल की 'बाबा, आमच्या गाडीला एक वस्तू पाहिजे ती दे.' ही आपल्या देशाची खरोखरच हलाखीची स्थिती आहे. आणि त्यामुळे कुठे टेलिफोन नाही की तुम्हाला कळवायला की कसं पोहोचायचं? कसं झालंय. म्हणजे फार परिस्थिती अजून सुद्धा अशी आपली झालेली नाही की जिथे आपण कधी म्हणू की आम्ही यावेळेला पोहोचू, त्यावेळेला पोहोचू, पाहोचले तर नशीब! आदळत, आपटत . एका शरीरात जर पोहोचले ( काहीही इजा न होता) तर स्वत:ला मानायचं की बाबा पोहोचलो! पण अशा परिस्थितीत सुद्धा भारतीय जीवन पुष्कळ सुखी आहे. आणि लोकांमध्ये एकत-्हेचे समाधान, शहाणपण आहे. कारण अजून आपण आपल्या धर्माला जागून आहोत. जर अशी स्थिती परदेशात कुठेही असती, तर लोकांनी सगळ्यांना उडवून दिलं असतं. एकही रस्ता असा असता तर सगळ्यांनी उडवून दिलं असतं. पण आपल्या देशात लोक समाधानी आहेत आणि जसं असू दे बाबा, परमेश्वराचं नाव घेत असतात. आज इतके एकानंतर एक प्रश्न आले की त्या प्रश्नांना ठीक करता करता शेवटी मी फलटणला जाते १४ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-14.txt की नाही अशी सुद्धा मला शंका आली होती. आजचा विषय 'सहजयोग आणि कुंडलिनीची जागृती' असा आहे. तुम्ही कुंडलिनी हा शब्द ऐकलेला आहे. जे लोक सुशिक्षित आहेत, ज्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे, ज्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे. संत-साधूंना जाणलं आहे, अशा लोकांना कुंडलिनी काय आहे हे माहिती आहे. पण जे अगदीच आजकालच शाळेत गेलेले, कॉलेजला गेलेले नवयुवक आहेत, कदाचित त्यांना कुंडलिनी काय आहे ते माहिती नसणार. पण कुंडलिनी म्हणून एक शक्ती आहे असं हजारो वर्षापूर्वी लोकांनी सांगितलं आहे. हजारो वर्षापूर्वी! म्हणजे चौदा हजार वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये भृगू संहिता म्हणून फार मोठं ज्योतिषावर लिखाण केलं गेलं होतं. त्याच्याही आधी नाडी ग्रंथ म्हणून आपल्या देशामध्ये एक ग्रंथ लिहिला होता. आता आपण इतके साहेब झालो आहेत की आपण आपल्यातलं काही वाचत नाही किंवा आपल्यामध्ये काही आहे विशेष तिकडे दष्टी करीत नाही. पण हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात नाडी ग्रंथ हा विषय जो आहे तो एक स्वामी भगंदर म्हणून एक गृहस्थ होते त्यांनी बाराव्या शतकात परत उजळणी करून आजच्या वेळेला सोडला आणि असं भाकित केलं होतं की १९७० साली सहजयोग सुरू होणार आहे आणि सहजयोग सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये सुप्त असलेली ही कुंडलिनी शक्ती आपोआप जागृत होऊन लोकांना आत्मसाक्षात्कार घडेल. आणि त्यात हे ही सांगितलं आहे की इस्पितळ नावाची संस्था वरगैरे जी आहे संपुष्टात येईल. अर्थात ते डॉक्टरांनी वाचू नये. नाही तर माझ्यावरती धावत येतील मारायला. आणून ते जे पण एक असा सारासार विचार केला पाहिजे की आपण काही बाहेरचे आहे इतक्या लवकर घेतो आणि आपल्या देशातलं इतकं मोठं आहे, तिकडे आपली नजर का जात नाही? जी गोष्ट ज्ञानाची आहे तशीच आपली इतर बाबतीतही आहे. आपलं लक्ष बाहेर लवकर जातं. पण जर म्हटलं की तुमचं लक्ष आतमध्ये घेऊन जा, तर तुम्ही म्हणाल, 'माताजी, हे कसं करायचं?' हे लक्ष आतमध्ये कसं करायचं? हे लक्ष आतमध्ये नेण्याचं कार्य तुम्ही करू शकत नाही ही गोष्ट खरी आहे. तर ती घडविण्याची किमया कोण करणार? त्यासाठी आपल्यामध्ये ही कुंडलिनी नावाची शक्ती आहे. आता जर एखाद्या विदेशी माणसाने येऊन सांगितलं की अशी वीज म्हणून वस्तू आहे, तर लगेच आपण तिकडे धावतो किंवा ती वीज काय वस्तू आहे ती शोधून काढली पाहिजे? ती वीज आपल्या शहरात आली पाहिजे. तिने हे फायदे होतात. असे चालू होईल. पण जर कोणी येऊन सांगितलं की आतमध्ये अशी शक्ती तुमच्या आहे तर तिकडे आपली दृष्टी सहसा जात नाही. तिकडे आपण बघत नाही की हे काय आहे. आणि बघितलं पाहिजे. जर मी तुम्हाला समजा काही गुप्त गोष्टी सांगत असले तर तिकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे की यात काहीतरी आहे. हे जे काही माताजी सांगत आहेत यात खरं किती आहे? तर त्याची उदाहरणे अनेक आहेत. म्हणजे संत-साधू लोक हे साक्षात्कारी होते हे आपल्याला माहिती आहे. त्यांना ते करू धर्म होता, त्यांना सांगावं लागायचं नाही, तुम्ही असं करू नका, तसं करू नका. हे करू नका. १५ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-15.txt ठोक्हा शुद्छ बेजञাनिक तुम्ही व्हाल, नेव्हा नका. हे कसं झालं? त्यांच्यात आपल्यात एवढा फरक का होता? हे एक उदाहरण घेतलं आपण. काहीतरी त्यांच्यात विशेष होतं आणि काहीतरी आपल्यात कमी आहे. त्यांच्याजवळ पैसे कमी असतील. असेल. त्यांच्याजवळ दोन कपडे कमी असतील. पण तुमच्याही दृष्टीला हे येईल, की त्यांच्यामध्ये जे गुण होते ते आपल्यामध्ये नाही आहेत. ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. जे हा विज्ञानाने संतांमध्ये होतं ते आपल्यामध्ये नाही आहे. म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यात काहीतरी तफावत होती आणि ती तफावत का होती हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ती एवढ्यासाठी की त्यांचा आम्हा काय आत्मसाक्षात्कार झालेला होता. संतांनी त्यावेळेला जशी सोय होती त्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही देवाला विसरू नका. आज विज्ञानाच्या नावाखाली देवाचे धिंडवडे काढले आहेत. तसे देवाच्या नावाखाली ही काढलेले आहेत. भोंद लोक ही जगात पुष्कळ आहेत, जे पैसे बनवतात, लोकांना फसवितात. पण विज्ञानाच्या नावावर सुद्धा त्यांनी सांगितलं की देव म्हणून काही वस्तूच नाही. त्याला बंद करून ठेवायचे. म्हणजे माझ्या मते दोन्ही एकच झाले. जे तुम्ही बघितलं नाही, जे तुम्ही पाहिलं नाही, तुम्ही जाणलं नाही, ते नाही असं म्हणणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टी नाही झाली. जर शुद्ध वैज्ञानिक दृष्टी असली तर मनुष्य सरळ म्हणेल की, 'मी नाही पाहिलेलं पण मी बघतो.' पण हे लोक शुद्ध वैज्ञानिक आहेत, जे कारण ह्यांचं जे विज्ञान आहे ते पराकोटीला पोहोचले आहे. आपलं अजून अर्धवट, लोंबकळत आहे त्याच्यामुळे इथले वैज्ञानिक तेवढे पोहोचलेले नाहीत. तर जेव्हा शुद्ध वैज्ञानिक तुम्ही व्हाल तेव्हा तुमच्याही दृष्टीला हे येईल, की ह्या विज्ञानाने आम्ही काय मिळवलं? ते इथे आपल्याला असं वाटतं की चला, किती त्रास होतो प्रवासाचा, लोक मिळत नाही, हे नाही, नाही. पण तसं पाहिलं तर त्या देशात असं मला वाटतं की मी नरकात राहते की काय. अगदी नरक वाटतो. म्हणजे सगळे असतं, रस्ते ठीक आहेत, लखलखाट आहे, सगळं काही आहे, पण नरक वाटतो तिथे. माणूसकी नाही तिथे. उदंडपणा, उद्धटपणा, रागीटपणा हिंसा, इतकी जास्त हिंसा आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या इंग्लंड शहरामध्ये, ज्या इंग्लिंश लोकांनी आपल्यावर राज्य केलं त्याठिकाणी दोन मुलांना प्रत्येक आठवड्यात आई-वडील मारून टाकतात. जर आपली मुलं त्यांच्या रस्त्यावर गेली तर हे ही तसंच करतील. दारू पितील त्यांच्यासारखे, उदंड होतील, उनाड होतील, तसेच वागू लागतील. आता ते रस्त्यावर असे आले आहेत, की इतकं लांब चालून जेव्हा ते पोहोचले ( इतक्या काळानंतर), तेव्हा खड्डा दिसला आणि आता या खड्ड्यातच पडायचंय आपल्याला कळलं तेव्हा मग मागे वळून आले. पण आपण का नाही आधीच या गोष्टी समजून घ्याव्या की आपल्या देशात या केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. या केवढ्या व्यवस्था आपल्या देशात संत-साधूंनी केलेल्या आहेत. त्याचा फायदा का करून घेतला नाही आणि का करून घेत नाही? कारण कोणाचेच लक्ष परमेश्वराकडे नाही. फक्त जे भोंद लोक आहेत, पोटभरू लोक आहेत किंवा असे लोक आहेत ते तुम्हाला येऊन देवाबद्दल काहीतरी सांगतात किंवा जे थोडे फार संत-साधू असतात, त्यांचे तुम्ही हात-पाय मोडून ठेवले आहेत. दोन्ही पैकी एक. ही अशी स्थिती आहे. १६ पि 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-16.txt आता परमेश्वराने जे आपल्याला मनुष्य केलं ते कशासाठी केले आहे. या स्थितीला आणले ते एवढ्यासाठी नाही की आपण मनुष्य व्हावं, आपल्याजवळ पैसे हवे. थोडीशी रक्कम शिल्लक झाली की आपण गुत्त्यात मरावं. त्याच्यासाठी केले आहे का परमेश्वराने आपल्याला? कोणतीही वस्तू आपण बनवतो. आता हे यंत्र जर आपण बनवलेले आहे तर हे कोणत्या तरी कारणामुळेच बनवलेले आहे की नाही. एवढी मेहनत करून आज तुम्हाला मनुष्य बनवलं, तर परमेश्वराने काहीतरी तुमची इज्जत केलेली आहे. इतक्या मेहनतीने, प्रेमाने का तुम्हाला बनवलं? आपण असा विचार केला पाहिजे की परमेश्वराने आम्हाला का बनवलं? त्याला कारण आपण तसा विचारच करीत नाही. जे आपल्याला मिळालं ते मिळालेले आहे. नाक, डोळे, तोंड सगळं काही मिळालेले आहे. आता ह्याच्यापुढचा कशाला आपण विचार करायचा ? पण परमेश्वराने मनुष्य आपल्याला एवढ्यासाठी बनवलेले आहे की आता मनुष्य झाल्यावरच मनुष्याला त्याचा आत्मा मिळू शकतो आणि आत्मा मिळाल्यावर त्याचा संबंध परमात्म्याशी होऊ शकतो. मग सरळ प्रश्न असा होतो की परमात्म्याशी संबंध कशाला करायचा? आता प्रश्न असाच आहे की या वस्तूचा संबंध, कनेक्शन मेनशी कशाला लावायचं? ही वस्तू जी बनविलेली आहे ती अर्धवट आहे. जोपर्यंत तिचा संबंध आम्ही मेनशी लावत नाही, हिचा काही उपयोग नाही आणि ही भ्रांत आहे. ह्याच्यावर आम्ही कितीही ओरडलो तरी हिचा काही उपयोग होणार नाही. म्हणून जोपर्यंत संबंध परमेश्वराशी लागणार नाही तोपर्यंत तुम्हालाही काही अर्थ लागणार नाही. म्हणूनच आज तुमचा लोक असे सभ्रांत फिरत आहेत. त्यांना समजत नाही, चांगलं काय, वाईट काय? कशाला म्हणायचं परमेश्वर, कशाला म्हणायचं दुष्टपणा, कशाला म्हणायचं चांगुलपणा ? पुष्कळांना असं वाटतं की परदेशातले लोक फार सुखी आहेत, ही अगदी चुकीची कल्पना आहे. अत्यंत चुकीची कल्पना आहे. कारण तिथे आजकाल, तुम्ही जर तरुण लोकांना जाऊन विचारलं, फार जे श्रीमंत देश आहेत, तर ते सांगतील की 'आम्ही तर फक्त आत्महत्येच्याच विवंचनेत बसलेलो आहोत. आम्ही असा विचार करतो आहोत की आत्महत्या कशी करायची?' अशा परिस्थितीत त्या लोकांनी जे मिळविलेले आहे त्यापेक्षा अधिक आपण मिळवू शकतो. जर आपण दुसरा मार्ग अवलंबिला. जर तुम्हाला एखादं झाड दिसलं, जे खूप मोठंे झालेलं आहे, तर लक्षात घेतलं पाहिजे की त्या झाडाला मूळे असली पाहिजे. जर त्याला, मुळाला पाणी नसलं तर ते झाड सुकून जाणार. तेच आज विश्वाचं झालेलं आहे, की पाश्चिमात्य देशांनी आपली भरमसाठ, अगदी खूप प्रगती करून घेतलेली आहे आणि ते कोलमडायला बसले आहेत. कारण त्यांनी आपली मूळे शोधून नाही काढली. कारण त्यांची मूळे या देशात आहेत आणि ह्या देशातले लोक त्यांच्यामागे धावत आहेत सैरावैरा. तेव्हा ज्यांचं जे काम आहे ते सोडून ते त्यांच्यामागे लागले तर झाड आधीच लवकरच कोलमडणार. तेव्हा इथल्या देशातल्या लोकांनी आपली पाळेमुळे काय आहेत ते शोधून काढले पाहिजे आणि ती पाळेमुळे आपल्यामध्ये आपल्या संतांनी सांगितलेली आहेत की 'तुज आहे तुजपाशी' म्हणजे काही खोटं १७ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-17.txt बोलले नाहीत ते. जर असं म्हटलं की तुज आहे तुजपाशी आणि ते तू शोधून काढलं पाहिजेस, तर त्यात मनुष्याने फारसा विचार करू नये. दुसरं असं की कुंडलिनी ही जी शक्ती आहे ही शुद्ध इच्छा आहे. मनुष्याच्या बाकीच्या सर्व इच्छा अशुद्ध आहेत. कारण कोणतीही इच्छा तुम्ही केलीत आणि ती पूर्ण झाली तरी दुसरी इच्छा होतेच. आज वाटलं आम्हाला की एक कपडा विकत घ्यावा, बरं मग त्याच्या नंतर वाटतं की एक घर बनवावं, मग वाटतं मोटर असावी. म्हणजे इच्छेवर इच्छा होत जातात पण मन काही तृप्त होत नाही. प्रत्येक ऋतुमध्ये, वेगळ्यावेगळ्या ऋतुमध्ये अनेक तऱ्हेची फळें आणि फुलं येतात, याला योगशास्त्रामध्ये ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. ती शक्ती, जी परमेश्वराची जिवंत ब्रह्मशक्ती, ती अजून आपल्या हाताला लागलेली नाही. ती कार्य करते. शक्ती आहे, करते, दिसतं आपल्याला. फुलं आली, ही आली कुठून? ही जिवंत शक्तीने आली. पण ही जी कार्य करणारी शक्ती आहे, ही शक्ती आम्हाला, अजून आमच्या हाताला लागलेली नाही. तिच्यावर आमचं काही प्रभुत्व आलेलं नाही किंवा आम्ही तिला जाणलंसुद्धा नाही. पण मनुष्याचं तिकडे लक्ष नाही. कारण मनुष्यामध्ये उथळपणा आहे. गहनता नाही, उथळपणा आहे. म्हणजे एक की असलं, चला काही हरकत नाही. एवढं कोण बघायला जातं. असेल, आपल्याला काय, माळ्याने फुलं दिलं की झालं! आता त्याच्यापुढे कोण बघायला जातं की ही फुलं कोणी बनविली. पण जर गहन विचार केला तर हे झालेलं आहे. तेव्हा ही सर्वव्यापी ब्रह्मशक्ती आपल्या हाताला लागावी अशी जर तुम्ही इच्छा केली तर त्यात काही वैगुण्य नाही. पण ती लागायची कशी? कसं होणार? त्याला काय करायला पाहिजे? आपल्याला जर एखाद्या बी ला अंकुर फोडायचं असलं तर आपण काही त्याच्यासमोर विज्ञान लावत नाही, वाद करीत नाही, विवाद करीत नाही, भजन म्हणत नाही, गाणं म्हणत नाही. काय करतो ? त्या बी ला या आईच्या पोटात देतो आणि त्याच्यात अंकुर फुटतात. ते अंकुर आपोआप, सहज फुटतात. त्याला काही करावं लागतं का? काही करावं लागत नाही. तसंच आहे की तुम्हाला सुद्धा जे अती व्हायचं आहे, याच्यापुढचं व्हायचं आहे, त्यालासुद्धा काही करावं लागणार नाही आणि आता तरी तुम्ही मनुष्य झालात, तुम्ही काय केलं? तुम्ही काही केलेलं आहे का? आपोआपच झाल. तेव्हा ह्याच्यापुढचं जे व्हायचंय तेसुद्धा आपोआपच होणार आहे, त्यासाठी तुम्हाला डोक्यावर उभं राहायला नको. हे सर्व असतांना, हे असं आधी का नाही झालं? असाही लोक प्रश्न करतील. कारण आजकाल सगळ्यांना प्रश्न करण्याची सवय झालेली आहे. सगळीकडे राजकारणी मतं मागत फिरतात, तर लोक प्रश्नही करत फिरतात. मी काही राजकारणी नाही आहे. पण असा विचार केला पाहिजे की आत्तापर्यंत झालं नाही हे आपण अशा विचाराने म्हणतो, की आपल्याला जिवंत वस्तू कधीही एकदम होत नाही, एकानंतर एक. आधी बी रूजतं, त्याला मुळे येतात, मग त्याचा बुंधा येतो, मग त्याच्या फांद्या येतात, मग फांद्यांना फुलं येतात, मग त्यांना फळं येतात. असं होत नाही की बी घातलं की त्याच्यात फळं निघतं. म्हणजे उत्तरोत्तर गोष्ट होत जाते.. ह्याला उत्क्रांती असं म्हणतात आणि आज ही वेळ आलेली आहे म्हणून अनेक लोकांची कुंडलिनी जागृत होऊ १८ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-18.txt तुम्हाला भुछ्दा जे अवी ब्हायच आहे, याच्यापुढच शकते. आता कुंडलिनी कशी जागृत होते? काय होतं ? वरगैरे त्याच्याबद्दल आमच्याकडे बरीच पुस्तकं आहेत. ती तुम्ही वाचावी, गहनपणाने , शहाणपणाने. हा नवीन विषय आहे. ते तुम्ही जाणलेलं नाही. हे ज्ञान मुळातलं आहे . आणि हे जाणण्यासाठी सूक्ष्म व्हावं लागतं. म्हणून गहनतेने तो विषय घेतला पाहिजे. जर तुम्हाला ते शिकायचं असलं तर फार सोपं काम आहे, कुंडलिनीच जागरण करणं कठीण नाही. तेव्हा ती तुम्ही जागृत करून हायचं आहे, व्यालामुदहा काही कराव লागणाव जाही. घ्यावी आणि त्याच्यानंतर तिचा पुढे वापर कसा करायचा, तिचा साभाळ कसा करायचा, नंतर दुसर्यांना ह्याचा फायदा कसा करून द्यायचा हे सुद्धा शिकलं पाहिजे. याचे अनेक फायदे होतात. पण ते फायदे झाल्यावरच तुम्ही बघा. नाहीतर तुम्ही म्हणाल, की आत्ता सिद्ध करून दाखवा. काल असंच झालं. ५-६ दारूडे आले. म्हणे, 'माताजी, आता आमचे चाळीस जण आहेत त्यांना तुम्ही ठीक करा.' म्हटलं, 'असं कसं. आता मला प्रोग्रॅमला जायचंय.' नाही म्हणे 'आत्ताच करा.' आता ते दारू प्यायले होते. त्यांना कोण काय म्हणणार! ते पोलिस वरगैरे आले, त्या दारू प्यायलेल्या अवस्थेत काय म्हणतात, त्यांना काही समजतं का ? म्हटलं, 'तुम्ही दारू पिऊन आलात, तुम्हाला काही म्हणू नाही शकत.' पोलिस आले. मग काय काय झालं, त्यांची प्रकरणं झाली, भानगडी. पण हे असं असतं, की ज्या ठिकाणी, तुम्ही कधी कॉलेजमध्ये दारू पिऊन गेलात तर तुम्हाला काही समजेल का? म्हणजे कॉलेजचंसुद्धा नाही समजायचं. शाळेत दारू पिऊन गेलात तर तुम्हाला काही समजेल का? डोकंच ठिकाणावर नसतं माणसाचं. मग कुंडलिनीसारखी गोष्ट तुम्हाला दारू पिऊन कशी समजणार ? पण ते भांडायला लागले, ओरडायला लागले. म्हटलं हा आहे तरी काय प्रकार! आम्ही तुम्हाला तुमचं द्यायला आलोय. एवढ्यात भांडायला काय झालंय तुम्हाला? तर असा विक्षिप्तपणा, चमत्कारिकपणा येण्याची फार संभावना आहे. कारण आपल्याकडे जे एकदम, मी म्हटलं ना की झाड उलथून पडण्याची वेळ आलेली आहे. ती गोष्ट आपल्याकडेही होऊ घातली आहे. तेव्हा थोडसं काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. जे तिथे झालं, ते इथे नाही झालं पाहिजे. त्यांची पुनरावृत्ती इथे झाली नाही पाहिजे. आपण धोपटमार्गाने, सरळ मार्गाने परमेश्वराच्या साम्राज्यात गेलं पाहिजे. हीच एक मला विवंचना आहे. कुठे असं नाही झालं पाहिजे, त्यांचे तर अर्धे देश बुडालेलेच आहेत. ६५% लोक अमेरिकेत वेडे आहेत. ६५% तरुण लोक वेडे आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकाल यांच्या प्रगतीला काय म्हणावं. स्वित्झर्लंडची जवळ जवळ ८०% तरुण मुलं आत्महत्या कशी करावी याची खलबतं करतात. म्हणजे 'अती शहाणे त्याचे बैल रिकामे' असं मराठीत म्हणतात ते तिथे दिसतं. आणि एवढं सगळं करून काय मिळवलं हेच मला समजत नाही. इतके दु:खी जीव आहेत. कोणी आई-वडिलांजवळ रहात नाही, बापाला विचारत नाही, बाप मेला तर एक-एक महिना त्याचं शव सोडून १९ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-20.txt गेलं तरी कोणी बघायला येत नाही. म्हणजे माणुसकीतून उठलेले आहेत. असं आपल्या देशात होऊ नये. आधीच तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन त्याच्या प्रेमाचा आस्वाद घ्यावा. अशी माझी सदिच्छा आहे. आणि या भारताचे एवढे पुण्य आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्र भूमीचं एवढं पुण्य आहे की महाराष्ट्रातला मनुष्य म्हणजे एक विशेष आहे. त्याला धर्माची चाड आहे, देवाची चाड आहे. मोठ्यांचा मान आहे. फसतोही कधी कधी, कबूल. फसत नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये धर्मभावना, चांगुलपणाने वागण्याची एक इच्छा नेहमी असते. जरी तो वाईट मार्गाने वागला तरी हे माझं चुकलं असं सांगतो. नाशिकला मी गेले होते. एक गृहस्थ आले आणि माझ्याजवळ येऊन म्हणाले, 'माताजी, मी तुम्हाला कबूल करतो, मी दारू पिऊन आलो. मी चोवीस तास दारू पिऊन आलो. तुम्ही माझी आई आहात. मी तुम्हाला कबूल करतो. तुम्ही माझी दारू सोडवून द्या. हे वाईट आहे मला माहिती आहे पण मला सुटत नाही.' आता सुटली त्यांची दारू. पण ही गोष्ट वाईट आहे हे त्याला माहिती आहे. कारण तो भारतातला, या महाराष्ट्रातला मनुष्य आहे, पण या लोकांना हे ही माहीत नाही हे वाईट आहे. आता यांना काय म्हणावं! इतकी बेछूट स्थिती तिथे झालेली आहे. ती तुमच्या मुला-बाळांची होऊ नये. तुम्ही ज्यासाठी या देशामध्ये एवढा जन्म घेतला, ज्या पूर्वपुण्याईने जे मिळविलेले आहे, ते तुम्हाला मिळावं. या सदिच्छेनेच मी आज फलटणला आलेली आहे. तेव्हा तुम्ही ते घ्यावं. उशीर फार झालेला आहे म्हणून मी काही जास्त लेक्चर देणार नाही. आता आपण कुंडलिनी जागृतीचाच कार्यक्रम घेऊयात. आता सगळ्यांनी, ज्याला सहजासन असं म्हणतात, असं पाय मोकळे करून बसा. पाय मोकळे करून. फार जास्त एकावर एक चढवायचे नाहीत. आणि दोन्ही हात असे आरामात आपल्या मांडीवर ठेवायचे. काहीही विशेष करायचे नाही. दोन्हीही हात असे मांडीवर ठेवायचे. फक्त श्रद्धेने बसलं पाहिजे. दुसरं म्हणजे असं, की हे ब्रह्मरंध्र आहे, इथे , ते छेदावं लागतं. आणि आईसमोर आपल्याला काही टोपी घालायला नको. आई म्हणजे आपली आई आहे. काही अंमलदार नाहीये, गुरू नाही आहे. तेव्हा टोपी काढलेली बरी. कारण हे ब्रह्मरंध्र छेदावं लागतं. बायकांनी पदर राहू देत कारण तो पातळ असतो. पण टोपी जरा काढलेली बरी. थोडसं आवळतं कधी-कधी. चष्माही काढला तरी हरकत नाही. कारण डोळे तुम्हाला मिटूनच ठेवावे लागणार आहेत, आणि त्याने डोळे ठीक होतात. म्हणून चष्मा काढलेला बरा . पायात चपला नसतीलच, मला माहीत आहे. आता असे हात करून बसायचे आहे. जास्त मानेला ताण द्यायचा नाही किंवा वाकायचं नाही. सरळ आपण जसे बसतो, तसं बसायचं. आता सर्वप्रथम डोळे मिटून या आपल्या मायभूमीला नमस्कार करूयात. तीनदा. कारण तिने आपल्याला जन्म दिला आणि ती पूर्यभूमी आहे. तिला खरोखर मनापासून तुम्ही नमस्कार करा. तुम्हाला माहीत नाही की ती किती मोठी आई आहे तुमची! नमस्कार करावा, तीनदा. आता मी शेवटलं २१ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-21.txt सांगते ते लक्षपूर्वक ऐका. फार सोपं काम आहे. म्हणजे तुम्ही स्वत:ला कसं कवच घालायचं. जे आईचं कवच असतं ना, आईचा पदर कसा घालायचा म्हटलं तरी चालेल. आपल्याला सात चक्रं आहेत. तेव्हा आपलं संरक्षण झालं पाहिजे, वाईट प्रवृत्तीपासून. म्हणजे आपल्याला जे मिळालंय ते हरवलं नाही पाहिजे. त्यासाठी रोज सकाळ - संध्याकाळ, एकदा उठल्यावर किंवा बाहेर जातांना आणि एकदा झोपतांना दोनदा हे बंधन घालायचं असतं. अगदी सोपं आहे. हे फोटो देतील तुम्हाला आणि तुम्ही फोटोचे पैसे नाही घ्यायचे. सगळ्यांनी आदराने फोटो घ्यायचा. जो हात आहे, हा इथून उचलून असा वर आणि असा नेला म्हणजे एक कवच तयार होत आता हा आणि असाच परत आणायचा. एक असा उचलून, एक म्हणजे पहिलंच चक्र मूलाधार, त्याला झालं. नंतर दुसरं चक्र स्वाधिष्ठान. त्याला तुम्ही दिलं, तिसरं चक्र नाभी , त्याला तुम्ही बंधनात घातलं. चौथं चक्र हृदय त्याला तुम्ही बंधनात घातलं. पाचवं चक्र विशुद्धी म्हणजे कंठाचं. त्याला तुम्ही बंधनात घातलं. सहावं चक्र आज्ञेचं, ते तुमच्या मेंदूत असतं. आणि हे सातवं चक्र ब्रहम्मरंध्र म्हणजे ज्याला सहस्रार असं म्हणतात. अशा रीतीने तुमची जी सात चक्र आहेत, त्यांना बंधन घातलंत. आता स्वत:ची कुंडलिनी कशी उचलायची ते बघा. थोडं शांतपणाने घ्या. आता हा हात असा ठेवायचा. थोडा गंभीर आहे हा विषय . हा हात असा, डावा, समोर ठेवायचा. म्हणजे आनंद आतून, इतक्या उकळ्या फुटून वाहणार आहे. की तुम्ही हसतच रहाल जगाकडे बघून. पण आता थोडावेळ थांबून घ्यायचं. हा डावा हात असा पुढे ठेवायचा, कुंडलिनी वर, मी बसले आहे. तुम्ही बसला आहात. आता ह्याच्यावरती फिरवायचा हा उजवा हात. हा असा उभा घ्यायचा आणि हा असा. ही इच्छा शक्ती आहे आणि ही क्रियाशक्ती आहे. हा हात वर, समोर, खाली, मागे असा फिरवायचा. वर, समोर, खाली, मागे असा तीनदा वर न्यायचा. आता चला. आता खांदे मोकळे सोडून, डोकं वर करून ह्याला असे वेटोळे घालून आणि एक गाठ मारायची जोरात स्वत:ला. आता एकदा कुंडलिनी चढवली. आता ही तीन, त्रिगुणात्मिका आहे. म्हणून तीनदा चढवायला लागते. आता परत चढवायची. आता परत खांदे मोकळे सोडून, डोकं वर करून विचार नाही करायचा. परत एक वेटोळे घाला अशी दूसरी गाठ मारायची, तिसऱ्यांदा तीन गाठी बांधायच्या. म्हणजे नीर गाठ होते. पार झाले तुम्ही. सर्व संत-साधूंना आमचा नमस्कार! २२ 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-22.txt स२ व पा ा उ क ४ ु (२G -25 92 उ्हर ও) ট দেনন ততত্ তইতাহর आपल्याली हे समजून घ्यायली पाहिजे की आपण एका मोठ्या सूक्ष्म आणि मजबूत धाग्याने बांधले गेलो आहोत आणि एकमेकांमधील प्रेम यापेक्षा जास्त आनंदाची दूसरी कोणतीच गोष्ट नाही. (प.पू.श्रीमाताजी, कलकत्ता, ०९/०४/१९९০) प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in 2015_Chaitanya_Lehari_M_I.pdf-page-23.txt भारतीतच संपूर्ण विश्वाची कुंडलिनी बसलेली आहे आणि जर आपला भारत देश ठीक झाला तर पूर्ण जगच ठीक होईल. आणि त्याचे सहस्रार ही इथेच बसलेले आहे आणि म्हणूनच मला हजारो हिंदुस्थानी असे पाहिजे की जे आत्मसाक्षात्कार देऊ शकतील. प.पू.श्रीमाताजी, २५/११/१९७३ ा मा भ० म ु हं छा न