मार्च-एप्रिल २०१५ चैतन्य लहवे रं मराठी भ क ८ क ज ी] ें क ॐ ३ं शि भभ ने प्लैस्टिकपासून तुम्ही हजारो फुलं बनवू शकता, पण खरी फुलं मोठया मुश्किलीने फुलतात. परंतु जेव्हा बहर येतौ तेव्हा हरजारों फुलं फुलू शकतीत. पं.पू.श्री मातीजी, देवी पूजा, मुंबई, २१ मार्च १९७९ या अंकाल प्रेमाचं आणि शांतीचं दान ...४ वाढदिवस पूजा, मुंबई, २२ मार्च १९८४ आत्मा हे अध्यात्माचे डोळे ...१२ सार्वजनिक कार्यक्रम, राहरी, २७ फेब्रुवारी १९७९ नवआगमन अर्चना सहजयोग-संस्थापिका प.पू.माताजी श्री निर्मला देवी The Adorations एक दिव्य अवतरण प.पू.आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवींची १००० नावे प.पू.माताजी श्री निर्मला देवींच्या प्रवचनांचे संकलन सहजयोग पसरल्याशिवाय तुम्ही पसरू शकत अ नाही. सहजयोग पसरला पाहिजे आणि तुम्ही उठलं पाहिजे. ब र सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतिमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम! फार आनंद वाटला मला! सहजयोग्यांना या संसारात राहन सगळे कार्य करायचं असतं. मुलं-बाळं, घर-द्वार, आई -वडील सगळ्यांना सांभाळून सहजयोग करायचा असतो. मी तसंच करते. मी सुद्धा माझ्या घरातल्या सर्व लोकांना सांभाळून, सर्व भाऊ-बहिणींना सांभाळून, सर्व नातलगांना सांभाळून, माझ्या यजमानांना सांभाळून सगळ्यांना सांभाळूनच मी माझा संसार चालवून जगाचा संसार चालवते आहे. कोणालाही सोडायचं नसतं. तेव्हा हे काम कठीण आहे. कारण काही तरी मुलीला झालं, काही मुलाला झालं, कुठे काही बिघडलं, नवरा वाईट असला, काही असलं की बायका घाबरतात. पुरुषांच्या नोकरीत काही खराबी झाली, त्यांच्या पगारात कमी झाली, पैशाचा त्रास झाला, असं झालं, ४ ै । मुंबई, २२ मार्च १९८४ शांतीचं दान प्रेमाचं आणि तसं झालं. त्याने पुरुष घाबरतात. तऱ्हेतऱहेचे असे प्रसंग येतात ज्याने मनावरती दडपण येऊ शकतं. पण अशा परिस्थितीतच सहजयोग बसवला पाहिजे. कारण तुम्ही जर पाण्यापासून दूर असलात आणि तुम्हाला तहान लागलेली असली तर त्याच्यात काही विशेष नाही आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तहान मारतो, त्याला काही विशेष नाही. पण सगळीकडे पाणी असूनसुद्धा तुम्ही त्यातून अलिप्त राहू शकता, तेव्हाच तुम्ही खरे सहजयोगी आहात. तेव्हा पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टी फार लोक मला येऊन सांगत असत. माझ्या आईचं असं आहे, माझ्या वडिलांचं तसं आहे, नवऱ्याचं तसं आहे, अमक्याचं असं आहे. हळूहळू करत करत सगळे सुटत चाललं. सुटता सुटता मनुष्य अशा स्थितीला आला आता सहजयोगात, की त्याला स्वत:चा प्रपंच जो आहे तो एक नाटकासारखा वाटू लागलेला आहे आणि बाकी जगाचा जो प्रपंच आहे तिथे काही तरी करून दाखवलं पाहिजे ही भावना जागृत झालेली आहे. असं मला काल लक्षात आलं आणि मला फार आनंद झाला. विशेष करून ही मुंबानगरी म्हणजे, तिथे म्हणूनच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिघींनी मिळून इथे पृथ्वीतून जन्म घेतला. त्याला कारण हेच आहे, की या मुंबानगरीत जोपर्यंत असा काहीतरी जबरदस्त फोर्स येणार नाही तोपर्यंत सहजयोग इथे बसणार नाही. तेव्हा या मुंबानगरीमध्ये अनेक तऱ्हेचे प्रकार आहेत. ते इतके अनेक आहेत की त्यांचे वर्णन करता येत नाही. भूत प्रकार आहेत, बाधा प्रकार आहेत, पैशाचे प्रकार आहेत, लाचलुचपती आहेत. सर्व तऱ्हेची घाण या मुंबई शहरात! सगळ्या नद्या जशा समुद्रात वाहून जातात तशी सगळी घाण या समुद्रात येऊन बसते. सगळ्या तऱ्हेचे चोर, सगळ्या तऱ्हेचे लंपट लोक, सगळ्या तऱ्हेचे ठगवणारे, सगळे इथे येऊन बसलेले आहेत. तेव्हा या चिखलामध्ये जी कमळं मी काल म्हटली ती, आपल्याला ती फुलवायची आहेत. ती जर आपल्याला फुलवता आली तर सबंध देशामध्ये त्याचा लाभ होणार आहे. दिल्लीमध्ये सुद्धा फार जोरात कार्य सुरू आहे. तसंच या मुंबई शहरातसुद्धा तुम्ही फार मोठं कार्य केलेले आहे आणि ते कार्य म्हणजे या अशा अपुण्य नगरीमध्ये, अशा अधर्मी नगरीमध्ये, अशा सर्व घाणीत तुम्ही स्वत:च्या कमळाला वर उचलून घेता, हे फार मोठं आहे. त्याच्यासाठी मी तुमचं किती अभिनंदन करावं ते मला कळत नाही. गर्वाने मी नुसती झुकून जाते, की केवढं हे मोठं माझ्यासाठी झालेलं आहे. माझ्या मुलांनी किती मोठं कार्य केलं. ह्या समाजात राहून, ह्या समाजाशी निगडीत राहून, त्याच्यात सामावून त्यांनी कसं हे सुंदर कार्य केलं आहे. त्याच्याबद्दल मला फार तुम्हा सगळ्यांचा आदर वाटतो. आता प्रगती हळूहळू नको, तर जोरात प्रगतीला लागलं पाहिजे. सहजयोग पसरल्याशिवाय तुम्ही पसरू शकत नाही. सहजयोग पसरला पाहिजे आणि तुम्ही उठलं पाहिजे. तेव्हाच हे होणार आहे. जोपर्यंत तुम्ही उठणार नाही, तोपर्यंत सहजयोग पसरणार नाही. जसे दिव्याची ज्योत वाढते तसा त्याचा प्रकाश वाढतो, तेव्हा हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. जितकी तुमची ज्योत वाढेल १ तितका त्याचा प्रकाश वाढणार आहे. तऱ्हेतऱ्हेचे लोक आहेत. मला सगळे कबूल आहे. पण त्यातच आपण सहजयोग बसवला ना! त्यातच आपण इतके लोक उभे केले आहेत ना ! आणि आपण सिद्ध करून दिलं ना की परमेश्वर आहे, परमेश्वराची शक्ती आहे आणि त्या शक्तीत आपण कार्य करू शकतो. हे आपण सिद्ध केल्यावर आता त्याबद्दल शंका न ठेवताना अगदी खुल्या दिलाने चढाई केली पाहिजे. खूप जोरात काम सुरू केलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी राहता तिथे शक्य असलं तर एक एक पाटी लावायची बाहेर एक एक केंद्र प्रत्येक घरात सुरू करायचं. करायचं सुरू. काय होत बघू या! अशा रीतीने जिथे जिथे जमेल, जितकं जमेल तितकं केलंच पाहिजे. जमण्यापेक्षाही थोडं जास्त केलं पाहिजे. आणि ती हिम्मत तुम्ही धरावी आणि हे होण्यासारखं आहे. आणि मला आशा आहे की पुढच्या वेळेला मी मुंबईला येईन तेव्हा पुष्कळ सहजयोगी असतील. असे तर पुष्कळ येतातच सहजयोगी. काल किती लोक आले होते तुम्हाला माहिती आहे. हजारो लोक होते. पण त्या हजारो लोकांमध्ये सहजयोगी, पक्के, पोहोचलेले, जाणलेले किती होते! अजूनही सहजयोगी लोक आपल्या घरच्या वातावरणात, आपल्या घरच्या गोष्टींकडे फार लक्ष देतात. मी क्षणात ते प्रश्न सोडवते तुम्हाला माहिती आहे. आणि सहजयोगात ते अगदी क्षणात सोडवले जातात. पण तुम्ही या लहान-लहान गोष्टींसाठी बसून उगीचच डोकंफोड करता आणि स्वत:चा नाश करून घेता. दूसरी गोष्ट आहे, आपापसामध्ये वैमनस्य. जे पूर्वी होतं किंवा पूर्व काळापासून चालत आलेलं आहे ते सोडून आता आपण सगळे सहजयोगी झालोत. आपल्यातले सगळे जे काही आहे, वैमनस्याचे जेवढे काही पॉईंट्स आहेत ते गेले पाहिजे. जेवढं काही आपले चुकलेले आहे ते सगळं काही गेलं पाहिजे. आपल्यामध्ये जे काही, आपापसामध्ये, मनामध्ये वाईट आलेलं आहे ते सगळे गेलं पाहिजे. कारण आता आपण स्वच्छ झालो १ आहोत. आता आपण आरशासारखे झालो आहोत. तेव्हा आपल्यामध्ये काहीही घाण राहू शकत नाही. ह्याच्या एका गोष्टीला असं लक्षात ठेवलं पाहिजे की आपली आई किती क्षमा करते. किती तिला याबाबतीमध्ये सहन करावं लागतं. किती गोष्टी सहन करते, कसं सगळ्यांना सांभाळून घेते, कसं सगळ्यांना सामावून घेते आपल्यासमोर आईचा आदर्श आहे. ती जर एवढं करू शकते, तर आम्ही का करू शकत नाही. आम्ही आपल्यामध्ये का भावना आणू शकत नाही की झालं गेलं विसरून जा. कोणी कसेही असले तरी त्यांना डोक्यावर उचलून घ्यायचं. त्यांना मोठं करायचं, त्यांना बदलून टाकायचं. तुमच्यात ही किमया असल्यावरती मागे काय झालं, कोणी काय केलं हा विचार करू नये. आता पुष्कळ लोकांचं असं असतं की सहजयोगात हे नवीन आलेले. त्यांच्यासमोर तुमचा पहिला आदर्श हा दिसणार आहे की तुम्ही कशा प्रकारे लोकांशी वागता ! आता इथे कदाचित आपली जागा होईल. असं मला वाटतं. आणि नंतर आश्रमही होईल. पण त्या आश्रमात चार माणसं ठेवल्याबरोबर जो येईल त्याला दुल्लती मारायची हे काम सुरू होणार आहे. हे मी पाहिलेले आहे. कुठेही आश्रम केला की चार लोक आले की त्यांना म्हणतात की, 'तुम्ही इथे कशाला आले? तुम्ही कोण? तुम्ही इकडे येऊ नका. तुम्हाला इथे राहायचं नाही. तुमचं हे नाही. तुमचं ते ठीक नाही. ते असं ठीक नाही. ते तसं ठीक नाही,' अशा रीतीने त्यांच्याशी लोक वागायला लागले सहजयोगात. म्हणजे हे शोभतं का आपल्याला! असं जर आपण वागायला लागलो तर आपल्याला शोभतं का? कबूल, काही लोक सहजयोगाला लाभदायक नाहीत. कारण ते लोक सहजयोगाला त्रासदायक आहेत. काही लोकांपासून काहीही होण्यासारखं नाही. कबूल! पण त्या लोकांना सगळ्यांना तुसडवून वागायचं नाही. त्या सगळ्यांना हळूहळू ६ Ηαππψ Βιρτηδαψ आपल्यामध्ये आणायचं. जे त्यांच्यातले वाईट असतील, जे त्यांच्यातले कामातून गेलेले असतील, त्यांचा आम्ही विचार करू आणि काढून टाकू. पण तुम्ही त्याबद्दल मात्र अगदी शांतपणा ठेवायचा. आपल्या जीवनामध्ये पहिले शांतपणा आणला पाहिजे. अत्यंत शांत झालं पाहिजे. मी सारखं सांगत असते, की कबूल तुमच्या जीवनात खूप त्रास आहे, सगळं काही आहे. पण शांतपणा हा जीवनात आणला पाहिजे. हे मला आता तुम्ही या वाढदिवसाला दान दिलं पाहिजे की, 'माताजी आम्ही शांतपणा ठेऊ. ' अत्यंत शांत, बर्फाचा शांतपणा आला पाहिजे. अत्यंत सहन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय काम होणार नाही. आणि ते तुम्ही सहन करूनसुद्धां काहीही तुम्हाला होणार नाही. सगळं सहस्रारातून निघून जाणार आहे. जे काही तुम्ही सहन करता म्हणता ते सगळे निघून जाणार आहे. तेव्हा माणसाने त्याबद्दल जास्त विचार करू नये. मी फार दु:खी, मला हा त्रास वरगैरे. हे कसलं काय आलंय! अहो, तुम्ही संत झाला आहात. आता तुम्हाला दुःख कसलं आलय! संतांजवळ दु:ख राहतात का ? असा विचार ठेवला पाहिजे, आम्ही संत झालोत . आम्ही फार मोठे झालोत. आमच्याजवळ दु:ख, आमच्याजवळ या व्यथा ह्या कशा असणार? आम्ही लोकांच्या व्यथा ठीक करणारे. आम्ही साबणासारखे, सगळ्यांना धूणारे. आमच्यावरती कसा मळ बसणार ! हा एकदा तुम्ही निश्चय कायम केला तर पहिल्यांदा तुम्हाला 'शांती लाभ' होणार आहे. तुमच्यामध्ये पहिल्यांदा शांती लाभणार आहे. आणि तो शांती लाभ झाल्याबरोबरच तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसू लागेल. जोपर्यंत बसणार नाही, तोपर्यंत काहीही व्यवस्थित दिसणार नाही. सगळं उलटं दिसणार आहे. कोणत्याही माणसाबद्दल धारणा, कोणत्याही परिस्थितीबद्दल विचार ह्या सर्व गोष्टी आहेत त्या जर तुम्ही, अशासाठी तुमचे मन जर हालत असले तर कधीही स्पष्टरूपाने दिसणार नाही. म्हणून याला शांतीचा वास करायचा. शांती पाठ करायचा. आईने सांगितलं शांत राहायचं! शांत झाल्यावर तुम्हाला इतकं लक्षात येईल, की सगळे संबंध कसे बनतात ? सगळा आनंद कसा येतो ? मैत्री कशी होते? कामं कशी होतात? तुम्ही अशांत असले तर तुमच्यावरती जे देवदूत आहेत, तुमच्यासाठी जी सगळी आम्ही व्यवस्था केलेली आहे त्या सगळ्या व्यवस्थासुद्धा, मनुष्याच्या मनात शांती त्यांना समजत नाही की आता ह्यांना करायचं काय ? एकदम धावपळ सुरू, घाई सुरू, काही काही लोकांचं म्हणजे राग नाही, पण त्यांना प्रत्येकवेळी इथे ठेऊ का तिथे ठेऊ का? ह्याच्या डोक्यावर ठेऊ का त्याच्या डोक्यावर ठेऊ ? सारखा हात त्यांचा असा असा चाललेला असतो. तेही अशांतपणा आहे. काही लोक रागीट असतात, तोही अशांतपणा आहे. तऱ्हेतऱ्हेचे अशांतपणाचे प्रकार आहेत. काही काही लोक बोलत नाही, राग आतमध्ये घेऊन बसायचं, बोलायचं नाही. एकदम फणकार्याने वागायचं किंवा एखाद्याने अगदी मी फार दु:खी आहे असं तोंड करून बसायचं. हे काही साधु-संतांचं लक्षण आहे? साधु-संत देण्यासाठी येतात जगामध्ये. द्यायचं असतं दुसर्यांना. तेव्हा जे साधु-संत असतात, त्यांच्याकडे कोणी आला तेव्हा त्याला ओलावा मिळाला पाहिजे, प्रेम मिळालं पाहिजे. त्याला समाधान मिळालं पाहिजे, परत त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्याला शांत वाटलं पाहिजे, की या माणसाकडे गेलो बुवा, किती शांत वाटलं! किती शांत मनुष्य! अहो, तुम्ही किती पंडित असलात, तुम्ही ऐकले आहे का कुठे, वेदाचार्य, अमुक-तमुक असले त्यांच्या पायावर कोणी जातं का? एखादा फकिर जरी कुठून आला, रस्त्यावरून एक साधू मनुष्य येऊन उभा राहिला, जो साधू आहे, त्याच्या सगळे पायावर जातात की नाही! तुम्ही कितीही सहजयोगात विद्वान असलात तरी त्या विद्वत्तेचा उपयोग ७ Ηαππψ Βιρτη δαψ काय, तुमच्यात शांतपणा नसला तर! चित्तात ज्याच्या शांतपणा नाही, त्याला कोण साधू म्हणणार? ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पहिली गोष्ट मनुष्याच्या तब्येतीत, वागण्यात भारदस्तपणा, शांतपणा असला पाहिजे. थिल्लरपणा, प्रत्येक वेळेला खिदळत खिदळत हसायचं हे फार कॉमन असतं सहजयोग्यांचं. कारण आतून आनंद होतो. पण खिदळायचं हे बरोबर नाही. भारदस्तपणाने मनुष्याने राहिलं पाहिजे. भारदस्त. राहाणीत, वागण्यात सगळीकडे भारदस्तपणा पाहिजे. आणि दुसरं म्हणजे असं की आपल्यामध्ये जर काही निगेटिव्ह असलं तर त्याचे परिणाम दिसतात वागण्यावर. एखादा मनुष्य जर निगेटिव्ह असला तर त्याच्याकडून सारख्या चुका होतील. ह्याची मिस्टेक, त्याची मिस्टेक, काही ना काही तरी मिस्टेक होत राहणार आहे. मग 'असं कसं झालं माताजी ! माझ्या हातून असं कसं चुकलं?' कसं चुकलं! काही तरी त्याच्यात खोट असल्याशिवाय कसं होणार? मग कोणती खोट आहे ? मग माझ्यात काहीतरी निगेटिव्हिटी आहे. माझ्यात निगेटिव्हिटी आहे नां, मग मी ती काढून टाकणार! पण माताजींना येऊन असं नाही म्हणायचं की, 'माताजी, मी काय करू ? मी सगळं करते तरी होत नाही.' सगळं करते पण मनापासून होत नाही. मनापासून जी गोष्ट होत नाही त्या गोष्टींचा परिणाम तुमच्यापर्यंत येत नाही. पुष्कळ पुरुषांना मी पाहिलं आहे, 'आम्ही एवढी मेहनत करतो माताजी, पण निगेटिव्हिटी काही जात नाही.' अशी कशी जाणार नाही. तुम्ही निगेटिव्हिटी नाहीच आहात, कशी जाणार नाही? सगळं निघून जाऊ शकतं, फक्त प्रयत्न हा केला पाहिजे. अजून सहजयोगामध्ये कच्चे लोक पण पुष्कळ आहेत, हे ही लक्षात घेतलं पाहिजे. सगळे पक्के नाहीत. कच्चे लोक पुष्कळ आहेत. सांभाळून ही राहिलं पाहिजे. त्यातले काही कच्चे लोक असे आहेत, की ते पैशाच्या लोभाने आलेले आहेत सहजयोगात. नुसते पैसे मिळविण्यासाठी. पुष्कळसे लोक असे आलेले आहेत. नुसतं पैसे मिळेल किंवा मोठेपणा मिळेल. स्टेजवर फिरायला मिळेल. काहीतरी शिष्टपणा करायला मिळेल. लीडरशीप मिळेल. असेही पुष्कळ लोक येतात. पण ते ही बदलणार . कारण त्यांच्याही लक्षात येईल की खोटेपणा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात काही अर्थ नाही. लोक हसतात. फार मोठे मोठे असे फिरत असतात. उदाहरणार्थ एक गृहस्थ यायचे होते दिल्लीला प्रोग्रॅमला. ते काय म्हणाले, 'मी काही येऊ शकत नाही. मी फार बिझी आहे. मी अमुक आहे. तमुक आहे. असं झालं, तसं झालं . ' तर एक सहजयोगिनी होती, लहानशीच. शहाणी होती. ती म्हणाली, त्या गृहस्थाला असं सांगा की जसा माताजींनी प्रोग्रॅम केला तसा तुम्ही मावळणकर हॉलमध्ये एक दिवस तरी करून दाखवा. तुमच्या प्रोग्रॅमला चार तरी माणसं येतात का? पैसे देऊन सुद्धा येणार नाहीत. तुम्ही जरी मोठे मिनिस्टर असले, मोठी माणसं असले तरी तुमच्या प्रोग्रॅमला चार माणसंसुद्धा पैसे देऊन येणार नाहीत. तर तुम्ही स्वत:ला काय समजता! तुमचा कोणावर काही अधिकार आहे का? कोणाबद्दल तुम्हाला प्रेम आहे का? कोणी तुम्हाला खरं हृदयापासून मानतं का? कोणी येणार नाही. आज तुम्ही मिनिस्टर म्हणून येतील उगीचच तोंडपूजेला. पण खरोखर पाहिलं तर तुम्ही मावळणकर हॉलमध्ये प्रोग्रॅम करून बघा. या माणसाला चार माणसं सुद्धा भेटायची नाहीत. अॅडव्हर्टाइज करू द्या. लाखो रूपये खर्च करू द्या. चार माणसं जरी प्रोग्रॅमला आली तरी नशीब समजायचं. म्हणजे शेवटी अशी जी माणसं पुढारीपण घेतात, मोठेपण घेतात, स्वत:ला मोठे समजतात, काही तरी असतं स्वत: चं, शिष्टपणा दाखवायचा वगैरे. या लोकांना नंतर पाडावं लागतं. आश्रमातसुद्धा असं होतं नेहमी. आश्रमात एखादा मनुष्य असला तर स्वत:ला शिष्ठ समजतो. मी म्हणजे काहीतरी विशेष. मग तो शिष्ठासारखा वागू लागतो. शिष्ठ मनुष्य जो असतो तो महामूर्ख आहे. ८ सगळे हसतात, हां, चढलं वाटतं हे हरभऱ्याच्या झाडावर! आज जे लोक तुमच्या पुढे पुढे करतात ते ही खोटे आहेत. ते ही पडणार, तुम्हीही पडणार. तेव्हा आपल्यामध्ये ही कुंडलिनी जागृत झाल्यावर, ज्याला आपण म्हणू की चंडी जागृत झाली, या देशात, चंडी जागृत जागृत झाली म्हणजे, आपण सडेतोडपणा ठेवायचा त्याच्यात. सडेतोडपणा. कोणी जर खोटेपणा केला तर तो मनुष्य हमखास पडणार. त्यानंतर आपण काळजी करायला नको. तो सगळ्यांच्या समोर दिसेल, की हे असे खोटे आहेत. त्यांच्यात हे दोष आहेत. ते समोर येऊन उभे राहतील. हा सहजयोगाचा विशेष प्रकाश देण्याचा एक भाग झाला. झाली. म्हणजे काय झालं? कुंडलिनी पैशाला तेव्हा जी नवीन मंडळी आलीत, तुम्हाला जर वाटतील की हे खोटे आहेत, हे लपवाछपवी करतात, आले, अमुक झालं, तमुक झालं. काहीही असलं, तुम्ही त्यांची काळजी करायची नाही. त्यांचे विचार आम्ही करणार, त्याची व्यवस्था आम्ही करणार. तुम्ही स्वत:ची व्यवस्था मात्र भारदस्त राजासारखी ठेवायची. कोणी कसाही असला, कसाही वागला तरी तसंच रहायचं. असं जर तुमचं वागणं असलं तर कोणीही तुम्हाला हात लावू शकत नाही. पण लहानसहान गोष्टींमध्ये लोक भांडणं करतात. लहान लहान गोष्टींमध्ये. आता मराठीत बोलल्या, मग हिंदीत कशाला बोलल्या माताजी. मराठीतून बोलायला पाहिजे. अरे पण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, पण यांना बघा. ह्या लोकांनी, हे फॉरेनर्स आलेत, ह्यांनी तर कधी मराठी भाषा कशाशी खातात, त्यांना मराठी नावाची भाषा पण जगात आहे हे ही माहिती नसेल. पण ते चूपचाप ऐकत बसतात. त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. कारण ते तुमच्यापेक्षा पुष्कळ हरभ-्याच्या झाडावर चढलेले आहेत. चांगले आपटले आहेत चढून चढ़ून. त्यांना माहिती आहे, ते हरभऱ्याच्या झाडावरून आपटलेले. आपटून आपटून आता टाकीचे घाव सोसून त्यांच्यात देवपण आलेले आहे. अजून आपल्याला आपटायचं आहे. त्या आपटण्यासाठी आता आपण कशाला चढायचं वरती. जाऊ द्या काही घोड्यावर बसायला नको. कागदी घोड्यावर बसून जी स्थिती होते, ती स्थिती स्वत:ची कशाला करून घ्यायची आणि सगळ्यांसमोर फटफजिती करून घ्यायची. सगळ्यांची फटफजिती होते. तेव्हा एक शहाणपणा धरून , कोणताही खोटेपणाचा, मोठेपणाचा आव आणायचा नाही. सहजयोगात तुम्ही पैसेवाले असाल तर असाल आपल्या घरात. माताजी नाही खरेदी करू शकत. तुम्ही श्रीमंत असाल तर तिथेच रहा. तुम्ही मोठे मिनिस्टर असाल तर घरात बसा. तुम्ही कोणीही असलात तरी तुमचं महत्त्व इथे नाही. इथे मग फक्त हे आहे की तुमची कुंडलिनी कुठे आहे? तुम्ही सहजयोगात कुठे आहे? तुम्ही कोणते कोणते सिद्ध केलेत आपले चक्र? आहे. तो मनुष्य मोठा, बाकी मनुष्य मोठा नाही. हे साधु-संतांचं राज्य आहे. साधु-संतांच्या राज्यात या ते मुख्य सगळ्या बाह्यातल्या गोष्टी बाहेरच वाहण्यासारख्या आहेत. त्या तुम्ही कोणत्या गाडीतून आलात? तुम्ही किती पैसे घातले? तुम्ही काय केलं? ह्याचे काही महत्त्व इथे नाही. कोणावर इंप्रेशन पडणार नाही. तेव्हा ज्या गोष्टीचं खरं जगामध्ये नेहमी इंप्रेशन पडलं ते म्हणजे तुम्ही संत -साधू कोणत्या लेव्हलचे आहे ते पाहिलं पाहिजे. ते संत- साधू तुम्ही झालं पाहिजे. एवढा मोठा राजवाडा आहे. फोर्ट आहे, आग्ग्राला. मी गेले होते तिथे. तर रात्र झाली, संध्याकाळ झाली, तर असं वाटायला लागलं की भूतखाना आहे इथे, काही आहेच नाही. जे मोठमोठे राजे झाले, राण्या झाल्या काय काय त्यांनी दागिने घातले असतील. पुरुषांनी काय काय नखरे केले असतील. काय झालं असेल ते झालं असेल. सगळे संपलं. बाहेर आले तर तिथे एक मदार आहे. तिथे एक दीप जळत होता. त्या लाईटमुळे आम्ही खाली येऊ शकलो. कारण लाइटच नाही तिथे. विचारलं की, ही कोणाची? तर म्हणे, हे फकीर ९ होते. आणि हे अकबर बादशहांचे गुरू होते. पण ते कधीही आतमध्ये, राजवाड्यामध्ये गेले नाहीत. म्हणून अकबर बादशहाने त्यांची कबर इथे बांधली. केवढी मोठी गोष्ट आहे. केवढी मोठी गोष्ट आहे की आज त्या माणसाच्या तिथे अजून दिवा लावला जातो आणि त्या एवढ्या मोठ्या महालामध्ये एक दिवा नाही. अंधार गुडूप. कोणाला माहीत नाही, कोण राजे झाले ? कोण राण्या झाल्या? कोणाच्या कबरी तिथे असतील! कारय असेल ते असेल. तेव्हा मनुष्याचं जे राहतं, पर्मनन्टली जे राहतं ते काय आहे? ते त्याच्यातलं ऐश्वर्य आहे आणि ते ऐश्वर्य त्याच्या आत्म्यातलं आहे. ते आम्ही सहजयोगाने मिळवायचं. आम्हाला दसर्या लोकांसारखं ऐश्वर्य मिळवायचं नाही. जे टिकाऊ नाही. जे निरंतर राहणारं आहे ते मिळवायचं आहे. आणि ते मिळविल्यानंतर वाटलं पाहिजे, दिलं पाहिजे, लोकांना बरं केलं पाहिजे. त्यांना फायदे झाले पाहिजेत. त्यांच्याकडे करुणेच्या भावनेने पाहिलं पाहिजे. सगळ्यांना प्रेमाने वागवलं पाहिजे. हे एकदा जर वाढत चाललं तर मला वाटतं की या देशाचीच काय तर हजारो देशांची स्थिती आपण ठीक करू. पण पहिल्यांदा तुम्ही तयार व्हायला पाहिजे. माझ्या एकटीच्याने होणार नाही. जसं हे आहे (माईक). ह्याच्यातून मी बोलते आहे. पण याला काढायला किंवा याच्या आवाजाला न्यायलासुद्धा काहीतरी पाहिजे नां! तसंच तुमचं आहे. जर तुम्ही अगदी पूर्णपणे पोकळ असलात तर त्याच्यातून ही शक्ती अशी सुंदर वाहेल की जसं मी काल म्हटलं होतं की ते व्हायचे दिवस आलेत. विश्वाचं कमळ उघडायचं आहे. विश्वाचं सहस्रारदल उघडायचं आहे. सहस्त्रदलाचं कमळ उघडायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही एकेक दल आहात. ते काही जास्त कठीण काम नाही. सगळ्यांनी जरा मेहनत केली, स्वत:ची ध्यान-धारणा, स्वच्छता ठेवायची. मेहनत करायची. घरातच आपल्या म्हणायचं आमचा हा आश्रम आहे. आम्ही आश्रमवासी आहे. सकाळी उठून ध्यान- धारणा, पूजा वरगैरे सर्व व्यवस्थित करून जे काही कार्य करायचे आहे ते, परत संध्याकाळी ध्यान- धारणा. परत जिथे प्रोग्रॅम असेल त्या प्रोग्रॅमला जायचं. कुठेही प्रोग्रॅम असला तरी तो गाठायचा. आपल्या तिथे जवळपास करू शकतो का एखादं केंद्र, तिथे सुरू करायचं, चार माणसं जोडायची. त्यांना सहजयोगाला बोलवायचं. हळदीकुंकवाला बायकांना बोलवायचं, सहजयोग सांगायचा. असं असं माताजींनी आम्हाला दिलेले आहे. हे मिळालेले आहे. हे सगळीकडे सांगत सुटायचं. सुसमाचार सगळ्यांना द्यायचा. अशा रीतीने सहजयोग वाढवायचा. आणि जी मंडळी अजून अर्धवट आहेत, त्या लोकांना जरासं प्रेमाने घ्यायचं. बसवायचं. 'हे करा म्हणजे बरं होइल.' हिडीसफिडीस करून होणार नाही. त्याला फार प्रेमाने वागायला पाहिजे. ही गोष्ट पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. अत्यंत प्रेमाने सगळ्यांना जोडून घ्यायचं. त्यांच्यावरती सगळ्यात जास्त प्रेमाचं इंप्रेशन पडतं की तुम्ही कसे आहात. एका बाईला मी दिल्लीला पाठवलं , की तुम्ही जाऊन आशीर्वाद घ्या. तर तिने मला सांगितलं , 'वहाँ तो बंदरों का राज चलता है।' म्हटलं, 'बंदरों का राज चल रहा है?' 'और कहाँ माताजी, उन बंदरों के बीच मुझे नहीं जाने का। कहाँ आप और कहाँ आप के बंदर!' मला काही समजेच ना बंदर कैसे रह रहें हैं वहाँ? तर म्हणे 'एक से एक तुफान आदमी रहता है?' ज्याच्याशी बोला तोच म्हणे हरभ-्याच्या झाडावर. बरं म्हटलं, 'कोई हर्ज नहीं। हम उनसे बात करेंगे। ठीक है। पण इतकं वाईट नसणार. मी तुम्हाला सांगते इतकं वाईट नसणार. पण इंप्रेशन असं पडतं माणसाचं. जरा ही तुम्ही शिष्टपणा केला की इंप्रेशन वाईट होणार. अत्यंत नम्रपणाने रहायचं. दसरं सांगायचं म्हणजे आपल्या भारतीय परंपरेला उतरणारे आपण असायला पाहिजे. आता समजा. एखादा आश्रम आपला झाला आणि तिथे जीन्स घालून, केस कापून एखादी बाई उभी असली आणि तिने 'हाय' सुरू केलं, १० Ηαππψ Βιρτηδαψ ते म्हणतील, आं, हा कसला काय आश्रम! आपला काही मॉडर्न आश्रम नाही. अनादी आश्रम आहे. ते काही असं नाही, की आपण तिथे मॉडर्न वस्तू आणल्या आणि मॉडर्न पद्धती जाणतो. मॉडर्न बोलतो, तसं काही करायचं नाही. ट्रॅडिशनल होणं वेगळं आहे आणि ग्लॅमरस होणं वेगळं आहे. ग्लॅमर सहजयोगाला मान्य नाही. मान्यच नाही. पण ट्रॅडिशनल राहायचं. म्हणजे असं नाही की विवाहित स्त्रीने अगदी भूतासारखं रहायचं. आपल्याकडे तर विधवांनीसुद्धा व्यवस्थित ट्रॅडिशननुसार कपडे घालायचे असं ठरवलेले आहे. तेव्हा ट्रॅडिशनली राहायचं. पुरूषांनीसुद्धा ट्रॅडिशनली राहायचं आहे. जास्त साहेबीपणा करायचा नाही. नाही तर, मी परवाच सांगितलं की साहेबीपणाचं लक्षण असं असतं की जेव्हा काही तरी साहेबीपणा दाखवायचा तर बो वगैरे लावून लोक येतात तेव्हा लोकांना असं वाटतं की हा बेअररच आहे की काय. कुणाला हे वाटत नाही की हा कोणी साहेब आला. मोठे पैसे खर्च करून बो घेतलेला आहे. कशाला पाहिजे? आपल्या देशातले कपडे फार लावून सुंदर आहेत. ते पारंपारिक ह्या देशात आले आहेत. त्याने आपल्यासाठी थंड रहातं , बरं रहातं , व्यवस्थित रहातं , दिसायला सुंदर दिसतं. तेव्हा दुसर्यांचं फालतू अनुकरण करायला नको. शक्यतो माणसाने पारंपारिक स्थितीमध्ये रहायला पाहिजे, विशेषतः आश्रमामध्ये परंपरेने रहायला पाहिजे. आपल्याकडे परंपरागत जी आवभगत आहे, जी बोलण्याची पद्धत आहे, गेटआऊट वरगैरे आपल्याकडे शब्द नाही. असे आपण बोलत नाही कधी गेट आऊट. उठल्यासुठल्या 'व्हॉटसु रॉँग' असे आपण शब्द बोलत नाही. किंवा 'आय हेट यू' असं आम्ही म्हटलं असतं लहानपणी तर वडिलांनी ठोकून काढलं असतं आम्हाला. 'आय हेट यू' असं फार म्हणतात इंग्लिश भाषेत. 'आय हेट यू'. म्हणजे तुम्ही आहात कोण? हेट यू म्हणजे काय? पण यांच्याकडे असं आपण म्हणू का की 'मला तुझी घृणा वाटते.' म्हणतील, तुला घृणा वाटते का? तर तुझं नाक ठीक करू आपण. तिकडे ही अशी पद्धत आहे बोलायची. ती आपण शिकायची नाही. इंग्लिश पद्धत शिकायची नाही, हे वेस्टर्न शिकायचं नाही. हे चांगलं नाही. 'आय हेट यू' म्हणजे काय? आमच्याकडे अशी पद्धतच नाही बोलायची. कोणी आलं तर, 'भाग्य, परम भाग्य आहे. या, बसा, तुम्हाला काय पाहिजे?' अहो, तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे हरिश्चंद्राने सगळे राज्य देऊन टाकलं. लहान मुलाला मारून टाकलं, कोणी काय केलं. ज्याने जे मागितलं ते आपण आपल्या पाहुण्यांना देत असू. पण आता ही इंग्लिश लोकांची पाहूण्यांची जी पद्धत आहे, म्हणजे वेस्टर्न लोकांची ती आपल्याला नको आणि हे असे भयंकर शब्द तोंडात, घाणेरडे शब्द, शिव्यागाळीचे मुळीच आणायचे नाहीत. अगदी सोज्वळ शब्दाने, आपण जसं एखाद्या बाळबोध घराण्यातील लोक जसे वागतात तसं आपण वागलं पाहिजे. तुमची आई अत्यंत बाळबोध आहे आणि तसेच तुम्ही वागले पाहिजे. आणि वाईट तऱ्हेचं बोलणं मी अगदी ऐकलं की मला फार आश्चर्य वाटतं. आता तुमच्या आया बदलल्या मी तुमची आई आहे. तेव्हा तुमची आई जर तशी बोलत असली तर ते विसरा. आणि माझ्यासारखं वागायला सुरुवात करा. आणि कोणतीही अशी गोष्ट बोलायची नाही. मुख्य सांगायचं म्हणजे प्रेम आणि शांती या दोन गोष्टींचा तुमच्यातून पूर्णपणे प्रकाश मिळाला पाहिजे. लोकांनी सांगितलं पाहिजे की तो मनुष्य प्रेमाचा आणि शांतीचा अवतार आहे. असं मला ऐकायला मिळाले की मला फार आनंद होईल. एवढं मला प्रेमाचं आणि शांतीचं दान आज द्यावं. हे माझं मागणं आहे. ११ आत्मा हे अध्यात्माचे डोळे राहुरी, २७ फेब्रुवारी १९७९ ही पुण्यभूमी आहे. राऊळबाई सारख्या योगिनी जिथे वास करतात ती भूमी आम्हाला फार पूजनीय आहे. तसेच राहरीचे धुमाळ साहेब जे आज आपल्यासमोर भाषण देत होते यांनीसुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे खेड्यापाड्यातून. त्यांच्याबरोबर राहरीहन अनेक सहजयोगी आलेले आहेत आणि एक एक हिऱ्यासारखे तासलेले सुंदर सहजयोगी आहेत. हे किती विद्वान आहेत आणि परमेश्वराबद्दल जाणतात हे जर बघायचं असलं तर त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करून बघितली पाहिजे. सहजयोग म्हणजे सहज, 'सह' म्हणजे आपल्याबरोबर, 'ज' आहे. हा आपल्याबरोबर जन्मलेला आहे. संस्था आहे असं अनादिकालापासून म्हणजे जन्मलेला. सहजयोग हा एक महायोग आता आपल्यामध्ये कुंडलिनी ही लोकांनी सांगून ठेवलं आहे. मार्कडेस्वामींनी याच्यावर विशेषकरून आदि शंकराचार्यांनी, विस्तारपूर्वक लिहिलेले आहे. त्यानंतर कबीर, नानक त्यांनीस्द्धा याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेले आणि आई हे फार पवित्र आहे की ही तुमची आई आहे स्थान आहे. आता फ्रॉइड माणसाने आपल्या आईशी सारख्या घाणे रड्या घाणेरडा संबंध ठेऊन आणि फारच घाणेरडी आणि त्यामुळे आज स्थिती काढलेली आहे पाश्चिमात्य देशामध्ये त्यांची जितकी हानी झालेली आहे ती जाऊन बघावी आणि मग आश्चर्य प्रय तर नुसता लोकांचा शिरच्छेद कुंडलिनीच थिजवून टाकलेली आणि ती पवित्र आई आहे. जे लोक आईचं पवित्रपण जाणत नाही त्यांना वाटतं की या राक्षसाने, हिटलरने केला, पण याने सगळ्यांची आहे. कारण कुंडलिनी ही आई आहे आईचं पवित्रपण भारतीय माणसाला सांगायला नको. सहजयोग लाभू शकत नाही. ते शक्यही नाही. कारण असेही लोक आम्ही पाहिलेत, भारतीय असूनसुद्धा की ते पवित्रपणाला विसरलेले आहेत. पवित्रपणाचं महत्त्व ते विसरलेले आहेत. आणि स्वत:ला त्यांनी अशा रस्त्यावर घालून घेतलेले आहे, जो सरळ डिस्ट्क्शनवर जातो, नाशाला जातो. ही शक्ती आपल्यामध्ये स्थित आहे, ती आहे आणि ती असते असं अनेक लोकांनी आपल्याला सांगितलेले आहे. आजकाल जे पुष्कळसे गुरू वगैरे निघालेले १२ आहेत त्यांना काही इतिहास राहिलेला नाही. ते जे काही बोलतात ते सगळे अधांतरी आहे. स्वत:चीच काहीतरी ट्रम काढलेली आहे, पैसे कमवण्यासाठी. त्याला काहीतरी इतिहास असायला पाहिजे. प्रत्येक घटना ही ऐतिहासिक असते. जशी उत्क्रांती आपण बघितली, तर अमिबापासून मनुष्य होईपर्यंत त्याला हळूहळू एक एका टप्प्याने वर यावे लागले आहे. तसा सबंध जो इतिहास आध्यात्मिक जीवनाचा झालेला आहे ती सुद्धा एक घटना एका मार्गाला नेऊन पोहोचवते . जर ही जिवंत प्रक्रिया आहे, तर ज्याप्रमाणे एक बी, त्यातून मुळे निघतात, बुंधा निघतो, पाने निघतात, फुले होतात आणि मग त्याला फळे लागतात. असं क्रमाने ते एक एक घडत जातं. त्याचप्रमाणे आज जे काही अध्यात्मामध्ये आपण वाचलेले आहे, तुकारामबुवा काय किंवा ज्ञानेश्वर किंवा त्याच्याही आधीचे जे लोक मोठमोठे साधु-संत आपल्या देशामध्ये झालेले आहेत, या साधु- संतांना एकप्रकारे पुष्कळशा गुरू लोकांनी तिलांजली देऊन आम्हीच काहीतरी शिष्ट आहे, म्हणून नवीन नवीन टूम काढून आणि स्वत:चा नुसता पैसे बनविण्याचा मार्ग आखलेला आहे. त्यात त्यांनी काहीही पापकर्म केली, तरी ती पापकर्म सुसंगतच त्यांना वाटतात आणि तसं ते आपल्या बुद्धीने असा चमत्कार घडवून आणतात, की हिप्नॉटिझमच्यामुळे त्या गोष्टी लोकांच्या डोक्यात बसतात आणि लोक ते मानू लागतात. या लोकांची स्थिती पुढे जाऊन कालांतराने वेड्यासारखी, पिसाटल्यासारखी होते आणि होणारच. कारण जे सत्य आहे, जे खरं आहे, जे विद्यमान आहे, ते मिळण्याचं साधन असायलाच पाहिजे. परमेश्वराने अमिबापासून आज आपल्याला मानव का केलं? कसं केलं? त्यांनी कोणती रचना आपल्यामध्ये केली? हे जे आपले आज व्यवहार चालले आहेत , हे कोणत्या सूक्ष्म शक्तीमुळे ह्याबद्दल आपल्या शास्त्रांमध्ये, इतकेच नव्हे पण इतर शास्त्रांमध्येसुद्धा पुष्कळ मर्जन झालेलं आहे. बायबलमध्येसुद्धा ह्याचा उल्लेख आहे. कुराणातसुद्धा याचा उल्लेख आहे. तसंच आपल्या सर्व शास्त्रांमध्ये याचा फारच विस्तारपूर्वक उल्लेख आहे. आणि प्रत्येक धर्मात एक गोष्ट लिहिलेली आहे, की तुम्ही आत्म्याशी ओळख करून घ्यायला पाहिजे. तुमचा परत जन्म झाला पाहिजे. तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे. जोपर्यंत तुमचा पुनर्जन्म होत नाही तोपर्यंत बाकीच्या सर्व गोष्टींना काहीही अर्थ लागत नाही. जेंट म्हणून एक फार मोठा शास्त्रज्ञ झाला आहे. त्याने असं सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला आत्मा आणि त्याचं द्वार मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतंही धर्मकार्य केलं तर त्यात एखाद्या राक्षसालाच तुम्ही पूजित असाल तरी तुमच्या लक्षात येणार नाही. कारण आत्म्यामुळेच संपूर्णत्वाला मनुष्य येतो आणि त्याचे डोळे उघडतात. म्हणजे असं की जर आता इथे वीज नव्हती तर तुम्ही जे काही पाहत होता ते अंधारात आणि अंधारात तुम्हाला काहीही दिसत नव्हतं. तेव्हा जे काही मिळेल ते सत्य असं तुम्ही धरून चालत होता. आत्मा हे अध्यात्माचे डोळे आहेत. ते उघडल्याशिवाय आपण आत्म्याबद्दल किंवा परमात्म्याबद्दल काहीही जाणू शकत नाही. आता हे करतांना आम्हाला काय केलं पाहिजे? त्याबद्दल आम्ही काय उपाययोजना केली पाहिजे ? असं लोकांचं म्हणणं आहे. एक सरळ माझा प्रश्न आहे, की तुम्ही अमिबाचे मानव झालात, तुम्ही काय केलंत? किंवा एखाद्या फळाला विचारावं, की तू एखाद्या बी पासून फळ झालास तू काय केलंस? कोणतीही जिवंत क्रिया ही आपोआप घडते. मानव कधीही कोणतेही जिवंत कार्य करू शकत नाही जोपर्यंत तो आत्म्याशी संबंधित होत नाही. हे सगळे मेलेलं कार्य आहे. जर विटा आहेत तर त्या मेलेल्या आहेत, त्यांचं जर घर बांधलं किंवा एखादं झाड जर पडलं त्याचा जर तुम्ही बसायला एखादा बाक वरगैरे केला, तर सगळं हे मेलेलं कार्य आहे. हे जिवंत १३ कार्य नाही. जिवंत कार्य मनुष्य तेव्हाच करू शकतो, जेव्हा त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश प्रगट होतो. मी आता आपल्याला कुंडलिनीविषयी सांगणार आहे. तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी कुंडलिनीचं स्पंदन बघू शकता. ती आमची ओळख आहे, मार्कंडेयांनी याची ओळख दिलेली आहे आमची, की त्यांच्या पायावर कुंडलिनीचं स्पंदन होईल. इथे असे पुष्कळसे लोक आहेत ज्यांनी असं कुंडलिनीचं स्पंदन पाहिलेले आहे. हजारो लोकांचं असं स्पंदन पाहिलेले आहे. ती त्रिकोणाकार अस्थीमध्ये स्पंदते. आम्ही त्याच्या फिल्म्ससुद्धा घेतलेल्या आहेत आणि लंडनला पुष्कळ लोकांच्यामध्ये हे कार्य होतं आहे. हे स्पंदन तुम्ही वर चढतांनासुद्धा बघू शकता. पण ज्या माणसांमध्ये काहीच रूकावट नसते आणि जे लोक पवित्र, साधे, सरळ असे लोक असतात, अशा लोकांना कुंडलिनी कधी चढते ते ही कळत नाही. एकदम निर्विचारिता येऊन त्यानंतर ते, हातातून चैतन्य वाहू लागतं. म्हणून माझं कार्य मी बहतेक खेडेगावात करते. शहरात मी कार्य करत नाही. कारण शहरात भामटे पुष्कळ आलेले आहेत. शहरातले लोक भामट्यांना भाळतात. त्यांना भामटे पाहिजे. काहीतरी सर्कस पाहिजे. त्यांना सत्य नको आहे. त्यांना कोणत्या तरी सर्कशीत आपणही उभं राहिलं पाहिजे असं वाटतं. खेडेगावातला मनुष्य सरळ, साधा आणि परमेश्वराला जाणणारा, ज्याला आपण स्पिरीच्युअल सेन्सिटिव्हिटी म्हणतो किंवा आध्यात्मिक संवेदनशीलता म्हणतो ती त्याला असते. रामाच्या वेळेला जेव्हा ते वनवासात गेले होते, तेव्हा सर्व गरिबांना, सर्व रस्त्यावरच्या लोकांना आणि जंगलातून फिरतानासुद्धा त्यांना माहीत होतं की हे श्रीराम आहेत. आता आपण म्हणतो की आपल्या इथे अष्टविनायक आहेत. अष्टविनायकांची ही भूमी का आहे? हे अष्टविनायक म्हणजे कोण? अष्टविनायक म्हणजे पृथ्वीतून निघालेली चैतन्य तत्त्व आहेत. विनायक हे त्याचं एक प्रतिक आहे. हे सगळ्यात मोठ प्रतिक आहे. ते ओळखलं पाहिजे. ते पावित्र्याचे प्रतिक आहे. परमेश्वराने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा श्रीगणेशाला निर्माण केलं. पहिल्यांदा पवित्रता निर्माण केली. पण गुरूंचा उलटा प्रकार असतो नेहमी. ते बरोबर पवित्रतेला नष्ट करून तिथे स्वैराचार करतात आणि तिथे भूतं आणतात. म्हणजे समजा एखादा देवीचा फोटो असला. तर त्या देवीसमोर काहीतरी स्वैराचार करायचा. हा तांत्रिकपणा आहे. त्यामुळे देवीचे चित्त तिथून हटतं. कारण घाणीकडे देवीचं चित्त रहात नाही. तिला घाण पसंत होत नाही. तिला सुगंध पाहिजे. तिला फुलं पाहिजे. जगातलं जेवढं सौंदर्य आहे ते देवीला पाहिजे. तिला घाण पसंतच होत नाही. व्यभिचार वगैरे असले घाणेरडे प्रकार तिला बघवत नाही. तिचं चित्त त्या जागेतून हटल्याबरोबर तिथं ते सैतानाचं राज्य आणून ठेवतात. आणि मग ते सैतानाचं राज्य तिथे आल्यावरती लोकांना भुरळ घालणं, त्यांना हिप्नटॉइज करणं त्यांच्याकडून पैसे काढणं, त्यांच्या पैशावर गमजा करणं, म्हणजे इतकी गलिच्छ दशा, इतकी ग्लानीची दशा आहे ती. अशा रीतीने हे गुरू लोक सुद्धा ठगवतात. पण त्याचा अर्थ असा नव्हे की खरे गुरू जगात नाही. जगात खरे गुरू आजही आहेत. पण बहुतेक जंगलात दडून बसलेत. मलासुद्धा भेटायला येतात आणि सांगतात, 'आई, तुम्ही १० -१२ वर्ष मेहनत करा, मग आम्ही येतो.' आजकाल जग भामट्यांचे आहे. राक्षसांचं आहे. हे राक्षस आजकाल आलेले आहेत. आणि राक्षसांवरच लोक भाळलेले आहेत. त्यांना सत्य नको. स्वत:चाच विनाश करण्याच्या मागे लागलेले आहेत. त्यांना स्वत:चा विनाश दिसत नाही. अशा जगात आम्हाला यायचं नाही आणि आम्हाला हे लोक क्रूसावर टांगतील किंवा आमच्यावरही हे लोक विषप्रयोग १४ करतील म्हणून आम्हाला यायचं नाही. तेव्हा आज ही स्थिती सहजयोगाची जरी असली तरी मला फार आनंद वाटतो की ह्यावेळच्या आमच्या महाराष्ट्राच्या दौर्यात अनेक लोक पार झालेत. एका क्षणात. एका क्षणात कुंडलिनी सटकन उठून ब्रह्मरंध्राला छेदून गेली. आता हे आपल्यामध्ये आहे किंवा नाही. आता आमच्या इथे दोन डॉक्टर्स आहेत आणि असे अनेक डॉक्टर्स, आमचे शिष्य लंडनला आहेत. आणि आमचं फार सॉलिड काम झालेलं आहे तिथं. परवा सुद्धा मेडिकल सायंसेसमध्ये माझे लेक्चर आहे. मी स्वत: मेडिसीन केलेले आहे, डॉक्टरांशी बोलायचं म्हणून. आणि लंडनलासुद्धा एका आम्ही डॉक्टरच्या बायकोचा कॅन्सर ठीक केल्यामुळे त्या डॉक्टरांनी स्वत:, ते फार मोठे डॉक्टर आहेत तिथले, डॉक्टरांच्यामध्ये एक कॉन्फरन्स ठेवलेली आहे. तिथे ही सर्व गोष्ट पुढे येणार आहे. तर आपल्यामध्ये ज्या शक्त्या आहेत, त्याचा संबंध परमेश्वराशी कसा लागतो हे मी आपल्याला सांगणार आहे. पहिला तर ऐतिहासिक संबंध आपल्याला सांगितला, की आजपर्यंत जे काही एक एक अनेक अवतार होत गेले त्या अवतारांचं आज फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. आजकाल एक ट्रम निघालेली आहे, की प्रत्येक अवताराला काहीतरी शिष्टपणा करून, आपल्या डोक्याच्या किल्ल्या फिरवून, लोकांना मूर्खात काढून आणि सगळ्यांचा अपमान करायचा आणि त्याला आम्हीसुद्धा अगदी शिष्ठासारखे संमत होतो. हे फार मोठं पाप आहे. अवतारांची थट्टा करणे. त्यांना समजून न घेतांना त्यांना कुत्सित लेखणे हे फार मोठं, भयानक काम, ते करू नये. पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, की तुम्ही कुठे आहात ? तुमची काय पात्रता आहे ? तुम्ही काय मिळविलेले आहे? आणि हा जो मनुष्य गुरू किंवा अशा गोष्टी बोलत असेल तर त्या माणसाने तरी काय मिळविलेले आहे ? त्याची काय स्थिती आहे? तो स्वत:च सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिंकत असतो, आजारी असतो. एकाही आजाराला त्याने बरं केलेले माहिती नाही. अशा माणसाच्या मागेसुद्धा आपले आजकालचे तरुण लागलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे की आपल्या देशात ही गोष्ट घडत आहे. परदेशात सोडून द्या. परदेशात तर इतके घाणेरडे लोक आहेत की त्यांना शिकवायला, तेच त्यांचे गुरू होतील असे आहेत. त्यांना सगळं माहिती आहे. पण ज्या कचऱ्यात ते जाऊन पडले, तिथून ते उठण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या लक्षात आलेले आहे. तिथल्या विचारक लोकांच्या लक्षात आलेले आहे, की आम्हाला आणून खड्ड्यात घातलेले आहे. आमची सगळी व्यवस्था चुकली. आमची मुलं वाया गेली, आम्ही वाया गेलो. त्या माणसांनी आमचे सर्व तऱ्हेचे जेवढे काही मंगल होते ते संपवून टाकलेले आहे. हे फ्रॉइडबद्दल सगळे लोक तिथे जाणत असूनसुद्धा आज तो फ्रॉइड आमच्या डोक्यावर येऊन बसलेला आहे. इतकी जुनी आपली परंपरा आहे, त्या परंपरेचा तरी आपण अभ्यास केला पाहिजे. त्याला जाणलं पाहिजे. आपल्याकडे एकाहून एक अत्युत्तम लेखक आहेत आणि त्यांनी फार सत्यावर लिहिलेले आहे. त्याची माहिती घेतली पाहिजे आणि त्यानंतर त्या भामट्यांच्याजवळ जाऊन काही शिकलं पाहिजे. कळकळून हे जाणलं पाहिजे, की तुम्ही कोणत्याही परमेश्वराच्या कार्यासाठी, लेक्चरसाठी, परमेश्वराच्या स्मरणासाठी किंवा कुंडलिनी जागृतीसाठी पैसा देऊ शकत नाही. हे हलकटपणाचं लक्षण आहे. कुंडलिनी जागृती ही आपोआप घडते. पैसे देऊन तुम्ही एका बी मधून अंकूर काढू शकता का? जे लोक दुसर्यांच्या पैशावर जिवंत राहतात, ते अत्यंत दरिद्री लोक आहेत. त्यांनी पैसे जमवले आहेत भामटेपणाने, १५ त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. आपल्या शहरांमधून ही फार प्रथा वाढलेली आहे, धुळ्याच्या लोकांनासुद्धा सांगू इच्छिते, की जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे विकले नाही गेलात तोपर्यंत अक्कल आपली शाबूत ठेवा आणि जाणून घ्या की परमेश्वरी तत्त्व हे सगळ्यात महत्त्वाचं असल्यामुळे ते मिळालेच पाहिजे, मिळणार. आपोआप घटित होऊन मिळणार आहे. आणि त्यासाठी जर कोणी मनुष्य पैसे देत असेल तर त्याला स्पष्ट मी आज म्हणून सांगावं की परमेश्वराला तुम्ही विकत घेऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही पैसाही देऊ शकत नाही. परमेश्वराच्या नावावर काहीही विकतात याचं मला आश्चर्य वाटतं. म्हणजे ज्याला विकताच येत नाही त्याच्या नावावर सगळे विकतं. ही फार आश्चर्याची गोष्ट आहे आणि हे समजून असलं पाहिजे. कारण आम्ही एका शहरात आलेलो आहोत. म्हणून आम्ही शहरवासियांना सांगतो, की तुमच्याजवळ पैसे आहेत. तुमच्या खिशात पैसे आहेत, 'जिथे गुळ तिथे माशी'. तुमच्याजवळ पैसे आहेत हे या लोकांना माहिती आहे. सगळ्या पैसेवाल्यांच्या शरीराला लागलेली ही भुतं आहेत. त्यांचा एकूण एक पैसा काढून घेतल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही. म्हणून सांभाळून असलं पाहिजे, की परमेश्वरी तत्त्वासाठी तुम्ही पैसे देत असला, तर अहंकारपोषक विचार तुम्हाला तुम्हाला विकून काढतील. नंतर लुटल्यावर 'माताजी, आम्हाला लुटून घेतलं, प्रगट झालं पाहिजे. आता तुम्ही अवेअरनेस म्हणतात ही या थराला देऊन, तुमच्या अहंकाराला बळावून आणि ते मात्र तुम्ही ओरडत माझ्याकडे याल. जर एखादा लहानसा थेब म्हणून. जे सत्य आहे ते आपोआप समुद्रापासून अलग झाला, मानव झालात, ही चेतना, ज्याला तर तो काही समुद्रापर्यंत मिळालेले आहे. त्याच्यासाठी आली. हे तुम्हाला कस सहजच येऊ शकत नाही. तुम्ही काही उड्या मारल्या नाहीत काहीही केलेले नाही. म्हणून हे किंवा धरपकड केलेली नाही किंवा तर समुद्राला त्या थैंबापर्यंत यावं लागतं. आपोआपच घटित झालं पाहिजे. ही परमेश्वराची कृपा आहे. जर एखादा लहानसा थेंब समुद्रापासून अलग शकत नाही. तर समुद्राला त्या थेंबापर्यंत झाला, तर तो काही समुद्रापर्यंत येऊ यावं लागतं. परमेश्वरालासुद्धा हा प्रश्न आहे. कारण त्याने सर्व सृष्टी निर्माण केली आणि सर्व सृष्टीचं त्याने इतकं सुंदर आजपर्यंत जे काही आहे ते घडवलं. त्यानंतर त्या सृष्टीला काही तरी अर्थ यायला पाहिजे. ज्या मानवाला त्याने इतक्या मेहनतीने घडविलेले आहे. त्याच्यात हजारो नाड्या आणि हजारो इंद्रिय स्थितीमध्ये त्याशिवाय रोजच्या वागण्यातसुद्धा, व्यवहारातसुद्धा इतके सतर्क असतात. अशा या परमेश्वराला त्या असून, मानवाला अर्थ दिलाच पाहिजे. म्हणजे समजा आम्ही हे मशिन घडविलेले आहे आणि ह्याला जर मेनला लावलं नाही तर ह्याला काही अर्थ नाही. तसेच जोपर्यंत तुम्ही मेनला लागत नाही, तोपर्यंत तुम्हालाही अर्थ नाही. पण ते ह्यांना ही जमत नाही. तसेच तुम्हालाही जमणार नाही. याचा अर्थ असा नव्हे, की आम्हीच काहीतरी करतो आहे किंवा आम्ही केलेले आहे त्याच्यात. हे समजण्यासारखं आणि सोप तत्त्व आहे. एखादा दीप जर पेटलेला नसला पण तयार असला तर एक पेटलेला दीप येऊन त्याला प्रज्वलित करू शकतो. अगदी सोपे तत्त्व आहे ते. परमेश्वराने तुमचा दीप ठीक केलेला आहे. अशा त्हेने दीप तुमच्यामध्ये आहे. हे बघण्यासारखं आहे आणि हे समजून घ्यावं. ह्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये ही कुंडलिनी, तुमची आई, प्रत्येकाची आई ती परमेश्वराने तिथे बसवलेली १६ आहे. ही समजा तुमची टेप आहे जन्मजन्मांतरातली, इथे बसवलेली आहे, त्रिकोणाकार अस्थिमध्ये साडेतीन वेटोळे घालून. आता हे सगळे म्हणतील, लोकांना सांगायला कुंडलिनी वाले लेक्चर देतात, त्यांना काही माहीत नसतांनासुद्धा लेक्चर देतात आणि बोलतात त्याच्यावर. ही तुमची आई आहे, प्रत्येकाची आई आहे. आणि त्याच्याखाली जे चक्र आपल्याला दिसते आहे, ज्याला मूलाधार चक्र म्हणतात, त्याच्यामध्ये श्रीगणेश बसविलेला आहे. तो कशाला ? तो एवढ्यासाठीच, की कुंडलिनीचं रक्षण झालं पाहिजे. कुंडलिनीच्या लज्जेचं रक्षण झालं पाहिजे, जी गौरी आहे. तिने गणेश बसवलेला बाहेर. गौरी तुमची आई आहे. ती वाट बघते आहे त्या दिवसाची जेव्हा असा कोणीतरी अधिकारी तिच्यासमोर येईल, ज्यावेळी ती तुम्हाला पुनर्जन्म देऊ शकते. ती अनेक जन्मातून तुमच्याबरोबर आलेली आहे. ती तिथेच स्थित आहे आणि खाली नुसता गणेश बसविलेला आहे. आता गणेश तत्त्वाबद्दल जितकं सांगावं तितकं थोडं आहे. पण हे बाळाचं तत्त्व आहे. लहान बालक जसा अबोध असतो, इनोसंट असतो तसं हे तत्त्व परमेश्वराने आपल्यात बसवलेले आहे. आता मुख्य म्हणजे या लोकांचं कार्य असतं की जो इनोसन्स आहे तोच तोडून टाकायचा म्हणून. तुमच्यातला गणेशच संपवून तुमचा टाकायचा. म्हणजे तुमची कुंडलिनी काही वाचू शकत नाही. ते बालक आहे. त्याला काही समजत नाही. अबोध आहे. म्हणून त्याला तिथे बसविलेले आहे. सहजयोगाच्या वेळेला तुम्हालाही त्या बालकासारखे अबोध असायला पाहिजे. नाहीतर तुमची कुंडलिनी वर येणार नाही. आणि होते ते इथे. ज्यावेळी कुंडलिनी चढते त्यावेळेला गणेश सांगतो, की आता हातामध्ये चैतन्य येत आहे. तर कुंडलिनीला आदेश येतो, की ठीक आहे आता तुम्ही उठावं आणि ही घटना घटित होते. आपण गणेशाला पूजतो, पण गणेश म्हणजे काय ते आपल्याला माहीत नाही. आता त्याबद्दल सगळे सांगायचं म्हणजे कठीण आहे. पण तरीसुद्धा गणेशाचा आणि कार्बनचा अगदी जवळचा संबंध आहे. हे तत्त्व प्रत्येक मानवात आहे. त्याचा नाश सर्रास चाललेला आहे. पण त्याचाच नाश झाल्यावर तुमचा होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा त्याचाच नाश करण्याच्या मागे लोक आहेत. म्हणजे तुमचेच पावित्र्य नष्ट केल्यावर मग ते तुमचाही नाश करू शकतील. ही त्यांची प्रथा आहे. हा गणेश खाली बसलेला, ज्यावेळी त्याच्यात व्हायब्रेशन्स येतात तेव्हा जागृत होतो आणि जागृत झाल्यानंतर कुंडलिनीला इशारा करतो, की आता तुम्हाला वर चढायला हरकत नाही. आता लक्षात घेतलं पाहिजे, की हे जे सातवं चक्र आहे, ह्या चक्राला कुंडलिनी भेदत नाही. कुंडलिनी वरच्या सहा चक्रांना भेदते. खालचं चक्र जसंच्या तसं असतं. तेव्हा हे असे घाणेरडे प्रकार करून कुंडलिनी जागृत करणारे महामूर्ख फक्त तुमचं पावित्र्य नष्ट करून, तुमची सगळी पर्सनॅलिटी संपवून टाकण्याच्या मागे आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते ही तुमच्याकडून पैसे घेऊन. स्वत:ला अशा महामूर्खात पाडू नका. आणि विचार करा. तुम्हाला काय मिळालं आहे? परमेश्वराने हे तत्त्व किती मुश्किलीने इथे बसविलेले आहे! ते तिथे जागृत करून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र हा म्हणूनच महा राष्ट्र आहे, मोठा देश आहे आणि त्यातली माणसं तुटू शकणार नाहीत. कारण इथे अष्टविनायकांचं जे साम्राज्य चाललेले आहे, त्यांच्यातून जे व्हायब्रेशन्स येतात, त्यांच्यामुळे सगळं वातावरणच मुळी भारीत आहे. पुष्कळांचं असं म्हणणं आहे, की ही मूर्तीपूजा आहे. हे त्यांना कसं सांगायचं, की हे पृथ्वीतून निघालेले चैतन्य तत्त्व आहे. कारण त्यांच्या हातातून चैतन्यच वहात नाही मुळी. ज्यांच्या हातातून १७ चैतन्य वहात नाही त्यांच्याशी काही बोलण्यात अर्थ नाही. म्हणून मी म्हणते, की जोपर्यंत आत्म्याची परीक्षा होत नाही, तोपर्यंत धर्माच्या बाबतीत तुम्ही काहीही केलं तरी त्याला काहीही अर्थ लागत नाही. जसं टेलिफोनचं कनेक्शन लागल्याशिवाय तुम्ही टेलिफोन चालवला तर त्याला काहीच अर्थ नाही, तसंच आहे ते. कुंडलिनी ही जागृत होऊन तुम्ही पार झालंच पाहिजे, ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर हातातून हळूहळू व्हायब्रेशन्स वहायला लागतात. आता याची व्यवस्था आपल्यामध्ये कशी केलेली आहे, ते मी आपल्याला सांगते. ह्याच्यामध्ये आम्ही आपल्याला फक्त तीन नाड्या दाखविलेल्या आहेत. एक उजवीकडे, एक डावीकडे, एक मधोमध. ह्या तीन नाड्या, ऑटोनॉमस नव्व्हस् सिस्टीम ज्याला म्हणतात, स्वयंचालित, त्यांना पोषण करतात. ह्या सूक्ष्म नाड्या आपल्या मणक्याच्या हाडांमध्ये असतात. ह्या तीन नाड्या म्हणजे परमेश्वराच्या तीन शक्त्या आहेत. त्या आपल्यामध्ये कार्यान्वित करतात. पैकी डावीकडची जी नाडी आहे, जिला इडा नाडी असं म्हणतात, त्यामुळे आपलं अस्तित्व असतं. हे शिवतत्त्व आहे. ह्यामुळे आपल्यामध्ये अस्तित्व असतं. जर ही नाडी नसती, तर आपल्यामध्ये अस्तित्व आलं नसतं. आपल्या इच्छा, भावनासुद्धा ह्याच नाडीमुळे जागृत होतात आणि कार्यान्वित असतात. तिला इडा नाडी आणि चंद्र नाडी असेही म्हणतात. आपण ऐकलेले आहे, हठयोगामध्ये 'फा' जे आहे ते ह्या नाडीचं नाव आहे. ही नाडी परमेश्वराची ती शक्ती, जिला आम्ही महाकाली म्हणतो. त्या शक्तीमुळेच स्थित असते. आता संस्कृतमध्ये त्याला नाव आहे महाकाली, इंग्लिशमध्ये नाही, त्याला आम्ही काय करणार! इंग्लिश लोकांचे ज्ञान इथे आणून सांगण्यासारखं इथे काहीही नाही. त्यांचं राजकारण वरगैरे काहीही असेल, पण धर्माच्या बाबतीत त्यांनी काही मिळविलेले नाही. आपली इतकी जास्त परसत्ता डोक्यावर नाचलेली आहे, की जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले असले तरी स्वत:चं अस्तित्व अजून आपण जाणलेले नाही. म्हणून आपल्या हिंदुस्थानात ज्या ज्या लोकांनी फार मोठ्याल्या गोष्टी शोधून ठेवलेल्या होत्या, त्याला आपण तिलांजली दिलेली आहे. इतकच नाही पण आज गांधीजींनाही आपण विचारत नाही. पण ही मात्र आपण घोडचूक करीत आहोत. कारण सगळ्या सायन्सनी जेव्हा सर्व गोष्टींचा शोध लावला त्यानंतर ते त्याच स्थितीत जाऊन पोहोचले आहेत की ते असं म्हणतात की कुंडलिनी जागृती ही घटना घटित झाली पाहिजे. आणि त्यातले पुष्कळ लोक ह्या स्थितीला पोहोचलेले आहेत की ही घटना काहीतरी ट्रिगरिंगमुळे होते. ती बुद्धीमुळे होऊ शकत नाही, कोणत्या कार्यामुळे होऊ शकत नाही. पण काहीतरी ट्रिगरिंगमुळे होते. आदि शंकराचार्यांनी सांगितले आहे, 'न योगे न सांख्येन', कशाने होणार? वाद-विवाद करून होणार नाही. नाचून होणार नाही. कशाने होईल ? आईच्या कृपेने होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. विवेक चुडामणीसारखा मोठा ग्रंथ शंकराचार्यांनी लिहिल्यावर दुसरा ग्रंथ त्यांनी सौंदर्य लहरींवर लिहिला. त्याच्यामध्ये सगळे त्यांनी आपल्या आईचे वर्णन आणि या लहरींचं वर्णन केले आहे. ज्याला आपण चैतन्य लहरी म्हणतो. लोकांनी विचारलं, तुम्ही हे काय सुरू केलं? म्हणे, ही सगळी विद्या आहे, बाकी सगळी अविद्या आहे. ही गोष्ट खरी आहे. कारण हे सर्वव्यापी आहे. हे तत्त्व, हे परमेश्वरी तत्त्व कार्यान्वित असतं आणि जगाचं एक पानसुद्धा परमेश्वराच्या इच्छेशिवाय हालत नाही. हे ते जाणल्याशिवाय, हे तत्त्व ओळखल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आपली स्थिती अशीच आहे, जसे काही खेड्यातले लोक एरोप्लेनवर बसले आणि त्यांनी असं म्हटलं, की १८ या एरोप्लेनला फार बोजा नको म्हणून कमी सामान घेऊन जा. त्यांनी आपल्या डोक्यावरच सामान ठेवलय अशी आपली स्थिती आहे. जोपर्यंत ही घटना तुमच्यात घटित होत नाही. ती होईलच असं आम्ही हमखास सांगत नाही किंवा आम्ही त्याचा ठेकाही घेतलेला नाही. झाली तर ही तुमची स्वत:ची संपदा, तुमची पुण्याई, परमेश्वराने तुम्हाला दिलेला हा विशेष आशीर्वाद असणार आहे, तो घ्यावा. आम्ही मध्ये बसलेलो आहोत आणि नाही झाली तर त्यात आमचं चुकलेले नाहीये. त्यात तुमचेच कुठेतरी चुकलेलं असेल किंवा तुम्हाला काहीतरी मानसिक त्रास असेल किंवा तुम्हाला काही तरी शारीरिक त्रास असेल किंवा तुम्हाला बौद्धिक असेल किंवा तुमचे धार्मिकसुद्धा काहीतरी चुकलेले असेल. त्यामुळे सुद्धा ती कुंडलिनी उठत नाही. पण ह्या कुंडलिनीचं हे वैशिष्ट्य आहे की जेव्हा ही कुंडलिनी वर उठते तेव्हा ती या सर्व चक्रातून आतमध्ये जातांना ही जी डावीकडची ओळ आहे, जिला आपण इडा नाडी असं म्हटलेले आहे, तशीच जी उजव्या हाताची नाडी आहे जिला आपण पिंगला नाडी असे म्हणतो या दोन्ही नाड्यांना जागृत करत जाते. म्हणजे जसं उजवी आणि डावीकडची नाडी मिळून मधोमध ब्रह्मचक्र तयार होतं. जेव्हा ही कुंडलिनी ह्या मधल्या चक्रातून छेदन करते त्यावेळेला दोन्ही बाजूला त्यांच्यापासून लाभ होतो. आता तिकडची जी नाडी आहे त्याने आपण शारीरिक व बौद्धिक क्रिया करीत असतो. जेवढं आपलं प्लॅनिंग आहे, फ्युचरचे जेवढे विचार आहेत तो सगळा आपण ह्याने करतो. ह्या दोन नाड्या आपल्यामध्ये सूक्ष्मामध्ये इडा आणि पिंगला आणि बाहेर जड तत्त्वात त्यांना लेफ्ट अँड राइट सिंपथेटिक नव्हस सिस्टीम असं म्हणतात. नंतर ही जी सहा चक्रं वर आहेत, १, २, ३, ४, ५ आणि ६ ही चक्रसुद्धा अनुक्रमाने असं म्हटलं आहे मी आपल्याला, की तुम्हाला एक इतिहास आहे. आपल्या अनेक उत्क्रांतीच्या काळात ही आपल्यामध्ये बांधली गेलेली आहेत त्याला माइल स्टोन म्हणतात आणि त्या प्रत्येक चक्रावर एक-एक दैवत आहे. ते ओळखलं पाहिजे. जाणलं पाहिजे आणि त्यांना जागृत कसं करायचं हे जर तुम्हाला समजलं तर सगळी तुम्हाला परमेश्वर तत्त्वाची विद्या आहे. जर ते तुम्ही जाणलं नाही तर बाकी सगळी अविद्या आहे. आता आम्ही कॅन्सरचे रोग बरे करतो. यात काही शंकाच नाही. आम्ही अगदी केलेले आहे. लंडनलासुद्धा केलंय. पण आमचा हा धंदा नाही रोग बरा करण्याचा. आजच आम्हाला जयसिंगराव म्हणत होते, की माताजी, आम्ही पाच वर्षापासून पार झालो आहोत. आमच्या फॅमिलीमध्ये. वडील ह्यांचे बिछान्यावर नेहमी असायचे आणि सगळ्यांना आजार जेव्हा पासून आम्ही पार झालोय, तेव्हापासून आमच्याकडे एक डॉक्टर म्हणून आला नाही. नाहीतर प्रत्येक आठवड्याला त्याची फी असायचीच आमच्याकडे. कारण जेव्हा ही कुंडलिनी वर चढते तेव्हा ती उजव्या बाजूची जी नाडी आहे तिला ती पोषण करते. त्यामुळे आपल्याला शारीरिक लाभ होतो. त्याचप्रमाणे डावीकडची जी आपली कंडिशनिंग आहे ती सुद्धा संपून जाते. आता फ्रॉइड वर्गैरेंनी जे सांगितलं आहे, तुमच्यामध्ये जे कंडिशनिंग आहे, ते काढले पाहिजे. म्हणजे परत एकात एक कार्य, जर माणसातले कंडिशनिंग पूर्णपणे काढले, तर त्याच्यात अहंकार येतो. म्हणजे इथे आपण बघतांना दोन नाड्या आहेत. त्यापैकी डावीकडची जी आहे, ती इडा नाडी आहे. हिला फ्रॉइडने फक्त ओळखले ही जी नाडी, इडा नाडी आहे, या इडा आहे. त्याला सगळे काही माहिती नाही. थोडं बहुत माहिती आहे . तर १९ नाडीमुळे फक्त आपल्याला मानसिक जे काही कंडिशनिंग होतं म्हणजे आपलं पास्ट त्याने बनते. आपलं गतं आहे ते बनतं. म्हणजे मी आता आपल्याशी बोलते ना ते सगळे त्याच्यात जातं. त्या प्रदेशात, त्या एरियामध्ये जातं. पण आपल्याला फ्युचरपण आहे. आपल्याला भविष्यपण आहे आणि आपल्याला वर्तमान, प्रेझेंटपण आहे. याची व्यवस्था मात्र काही फ्रॉइडला आली नाही. कारण आंधळे असल्यामुळे अर्धवट बघितलं आणि स्वत: अत्यंत घाणेरडा मनुष्य असल्यामुळे घाणेरड्याच्या डोळ्यातून सगळं घाणेरडं दिसतं. म्हणून त्याने अशी विचित्र, काहीतरी एक नवीन टूम काढली. फारच एकांगी आहे तो आणि त्या एकांगीपणामुळे नुसतं तुमच्याकडे जे कंडिशनिंग आहे ते काढलं पाहिजे असा त्याने एक नियम काढला. पण जर मनुष्याला काही सुसंस्कार नसले तर तो किती अहंकारी होतो, त्याला किती इगो येतो, हे इथे बघता येईल आपल्याला. कारण डावीकडची ही जी बाजू वर जाते त्याने सुपर इगो म्हणून एक संस्था तयार होते आणि उजवीकडून जे आपण कार्य करतो त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून, इगो म्हणून ही संस्था तयार होते. आता इथे हे सगळे सायकॉलॉजीच आहे. म्हणजे फ्रॉइड नंतरचं हे आलं. पण फ्रॉइड नंतर कोणी कोणाला मानीत नाही. त्यालाच मानत होते. त्याच्यानंतर ह्यूंग आले. त्यांनी एवढं कार्य केलं. कोणी जाणत घाणेरडेपणा पाहिजे. तेव्हा हे जे सुपर इगो म्हणून नाही त्यांना. कारण लोक घाणेरडे आहेत. त्यांना येतो, की समजा एक लहान मूल आहे. आहे पूर्णपणे. त्यावेळेला त्या मुलाला आपल्यामध्ये येतं, प्रति अहंकार तो असा आईजवळ दूध पीत आहे. ते आनंदात एकीकडून दुसरीकडे आईने केलं, इगो जागृत होतो. असं का केलं? हे कंडिशनिंग झालं. त्याने सुपर जरी आपल्याला तर राग येतो. त्या वेळेला त्याचा स्वातंत्र्य मिळालेले तेव्हा आई त्याला म्हणते चूप रहा. असले तरी स्वत:चं इगो जागृत होतो. हे दोन्हीही माणसामध्ये. म्हणजे मधोमध जागा अस्तित्व अजून आपण समतोल असायला पाहिजे जाणलेले नाही. होऊन कुंडलिनी जेव्हा वर जाते आणि कुंडलिनी वर ब्रह्मरंध्र छेदून जाते. तेव्हा ते दोन्हीकडून खाली होतात. तुम्ही अगदी बघू शकता छेदतांना. जाते. आणि ही जी सहा चक्रं आहेत त्यांची तुम्हाला दिसेल इथे टाळू अशी आतमध्ये वेगवेगळी नावे आहेत. आता इतका वेळ नाही, सगळं सांगायला. पण तरीसुद्धा सांगायचे हे, की जेव्हा कुंडलिनी आपल्या ब्रह्मरंध्राला छेदते, तेव्हा सामूहिक चेतना आपल्यामध्ये होते म्हणजे अॅक्च्युअलायझेशन ज्याला आपण म्हणतो. घटना होते. सांगावं लागत नाही. म्हणजे आपली कुंडलिनी कुठे आहे हे लोक सांगू शकतात. झालेले आहेत. आपली जी बोटं आहेत त्या बोटांमध्ये सबंध सिम्पर्थॅटिकची चक्र आहेत. उजव्या आणि ते पार डावीकडचं कोणतं चक्र धरलेले आहे ते या बोटांवरून कळू लागते. त्याच्या आधी कळत नाही. म्हणजे आत्मज्ञान झाल्यावरच आपल्याला हे कळतं, की आपल्यात काय चुकलेले आहे आणि सामूहिक चेतना जागृत झाल्यामुळे ही जागृती होते. हे काही लेक्चर होत नाही की भाषण होत नाही, की काही पुस्तक होत नाही. पण ही घटना तुमच्यात घटित होते. तुम्ही ते होता. एक अतिमानव होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही सामूहिक चेतना समजते आणि लहान मुलंसुद्धा सांगू शकतात की तुमचं कोणतं चक्र धरलंय. आता, माझी नात फक्त अडीच वर्षाची आहे. आमची एक इंग्लंडची मुलगी आली होती, आता गेली ती परत. ती घरी गेली आणि तिने तिला विचारलं की, 'माझं कोणतं चक्र २० धरलंय?' तिने सांगितलं, 'लेफ्ट नाभी आणि लेफ्ट विशुद्धी.' आणि तिचं धरलेले होते. कारण बोटच मुळी जळतात. हे सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे. तुम्ही सब्जेक्ट होतात, तुम्ही कर्ता होता. आता उदाहरणार्थ एक माणूस घाणीतून गेला तर त्याला घाण वाटेल आणि एक जर जनावर घाणीतून गेले तर त्याला घाणीचा काही त्रास होत नाही. माणसाला होतो. आजकाल तर असे लोक मी पाहिलेत, की त्यांना सुगंधाचा त्रास होतो. म्हणजे किती घाणेरडे असले पाहिजे. तर ज्यांना घाणीचा त्रास होतो, ते मानव आहेत. पुढे गेल्यावर जेव्हा ही जागृती होते तेव्हा त्यांना नैतिक घाणेरडेपणाचा त्रास व्हायला लागतो. म्हणूनच म्हटलं की सगळ्यांची व्यसनं सुटली आपोआप. ती काय आम्ही दारूबंदी वरगैरे काढली नाही. कारण आत्म्याचा आनंद आत पाझरू लागला, म्हणजे आपोआप हे सगळं सुटतं. आपण बोअर होतो म्हणून या वस्तू घेतो. पण मनुष्य इतक्या आनंदात रममाण होतो, त्या आत्म्याच्या आंदोलनात, इतका तो समाधानी बनतो, संतोषी बनतो, तसंच सबंध त्याचं व्यक्तित्व इतकं सुंदर होऊन जातं, इतकं आकर्षक होऊन जातं आणि त्याला म्हणतात डायनॅमिक होऊन जातं. त्यांनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. जी मुलं शिकत नव्हती, ती क्लासमध्ये फर्स्ट क्लास येऊ लागली. ही गोष्ट अगदी खरी आहे. हे घटित होते. जेव्हा अशी घटना माणसामध्ये होते, तेव्हा तो कोणत्याही व्यसनाकडे जात नाही. कारण त्याचं तिकडे चित्तच जात नाही. त्याचं चित्त इतकं जास्त आलोकित असते, की तो अशा घाणेरड्या वस्तूंकडे जातच नाही आणि आपोआप ती गोष्ट सुटते. अगदी आतून तुम्हाला कळतं, की हे चक्र धरलेले आहे, इथून कुंडलिनी चाललेली आहे, वर कुठे पोहोचलेली आहे. जरी ती तुम्हाला दिसली नाही तरी आतून तुम्हाला कळेल की ह्या माणसाची कुंडलिनी कुठे चाललेली आहे आणि वर कुठे उडालेली आहे. हे संबंधच्या संबंध शास्त्र पूर्वीपासून केलेले आहे. आज केलेले नाही. कबीरानेसुद्धा सहजयोग सांगितला. पण कबीराचेही खोबरं केलंय काही काही लोकांनी. मला तर ही कमाल वाटते लोकांच्या डोक्याची, की सगळ्याचं खोबरं हे कसे करू शकतात आणि तुम्ही ते मानून तरी कसे घेता? कबीरनेसुद्धा याच्यावर लिहिलेले आहे, नानकांनी लिहिले आहे, तुकारामबुवांनी लिहिलेले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तर फारच स्पष्टपणाने लिहिलेले आहे. तर सर्वप्रथम गोष्ट आपल्या देशाची ही आहे, की आपल्याला मर्यादा आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. आपला देश फार मोठा आहे. त्या लोकांजवळ पैसे असतील, पण लक्ष्मीत्त्व नाही त्यांच्याकडे. अगदी घाणेरडे लोक आहेत. तुम्ही जर त्यांच्याबद्दल जाणत असाल, तर त्या देशात जाऊन बघा. ही आमची मंडळी इथे आल्यावर त्यांना इतकं आश्चर्य वाटतं, की इथल्या लोकांना किती प्रेम आहे ! तिथे जर कोणाच्या घरी तुम्ही गेलात तर एक कप कोणी चहा देणार नाही. श्रीमंत, लॉर्ड असला तरीसुद्धा! एक एक कवडी सांभाळून ठेवेल तो. आपल्याकडे इकडे-तिकडचे लोक आले तर जोडे, वहाणा विकत नेतील फार तर. तिथे जर एखादा पाहुणा घरात आणला तर बायका, मुली सगळे घेऊन पळून जायचा. इतकी तिथे घाण साचलेली आहे त्या देशांमध्ये. आपल्याला असं वाटतं, की ते लोक फार सुखी आहेत. स्वीडनमध्ये, जेथे सगळ्यात जास्त सुबत्ता आहे, फार पैसा आहे. त्याठिकाणी सगळ्यात जास्त २१ आत्महत्या होत आहेत. सगळ्यात जास्त! म्हणजे दहापैकी नऊ लोक आत्महत्येचाच विचार करीत असतात. म्हणजे अशा सुख आणि सुबत्तेला काय करायचं! लंडनमध्ये, जे स्टॅटिस्टिक निघालं आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे, की इंग्लंडमध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मूलं मारून टाकतात आई-वडील आणि तीन फॅमिलीमधून एक फॅमिलीच्या आई-वडिलांनासुद्धा लोक मारायच्या मागे असतात. स्टॅटिस्टिक घेतल्यावर. आणि बेशरमपणे सांगतात. काही त्यांना शरम नाही. बेशरमपणा हे त्यांचं मुख्य तत्त्व आहे. त्यांना शरम कशाशी खातात हे माहिती नाही. अगदी बेशरमसारखं रहायचं. तिथेसुद्धा आम्ही सहजयोग उभा केला. आज असे आमचे तीनशे हिरे आहेत तिथे आणि इतके विद्वान आहेत. सगळे तुम्हाला समजवून सांगतील. मी इतके आजपर्यंत पाहिले आहेत. आमचे शिष्य पुष्कळ आहेत तिथे. त्यांनी एवढं कार्य केलेले आहे. इतक्या लोकांनीसुद्धा आणि इतके खोल उतरले आहेत सहजयोगामध्ये. आणि इतकी त्यांना माहिती आहे. पण असे फारेनर्स पाहिले नाहीत की ज्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे. आणि प्रत्येक वाचून, त्यातली सगळी माहिती काढून, त्याच्याबरोबर पत्ता लावून, हे कसं आहे, काय आहे. त्याचा सबंध अभ्यास करून सहजयोगाला त्यांनी जीवन घेतलेले आहे. आणि हे कार्य करीत आहेत. मूर्खासारखे ओरडत बसत नाही. कोणी आपली चक्री फिरवावी आणि त्याच्यामागे धावत सुटत नाही. एक एक अक्षर ते समजून घेतात, की हे कुंडलिनी कशी चढते ? ती वर कशी न्यायची? त्याच लोकांनी हजारो लोकांना बरं केलेले आहे. आजकाल मी कोणाला बरं करीत नाही. ही शक्ती आपल्या आतून वहात असते. वाहून चक्र कोणत आहे, ते चक्र कोणतं आहे? आणि ह्या चक्रावर अहो, अगदी साधारण, खेड्यात राहणाऱ्या लोकांनी इतका चमत्कार करून दाखविला आहे. पण आम्ही इतकी पब्लिसिटी करीत नाही ह्या गोष्टीची. होते आपोआपच. कुंडलिनीच्या नावावरसुद्धा अनेक गोष्टी लोक विकतात. कुंडलिनीमध्ये सामूहिक चेतना झाली पाहिजे, पहिली गोष्ट. मनुष्य सामूहिक चेतनेत उतरला पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की दुसर्याची कुंडलिनी कुठे आहे? माझ्याकडे पुष्कळ लोक येतात की, 'माताजी, आमची कुंडलिनी उठलेली आहे.' 'बरं, बसा म्हटलं.' लागले उडायला घोड्यासारखे. नाहीतर बेडकासारखे उडतात. 'अहो,' म्हटलं, 'हे काय ?' 'आमची जागृत झाली म्हणून आम्ही उडतोय.' आता म्हटलं, 'तुम्हाला अतीमानव व्हायचंय की घोडा व्हायचंय? नाहीतर काय बेडून व्हायचंय? नाहीतर उद्या पिसवा व्हाल .' गुरासारखे ओरडता, हे काय मानवाचं लक्षण आहे. आणि मी अतीमानव, परमेश्वराच्या गोष्टी करते आणि हे काय मांडलय तुम्ही माझ्यापुढे. 'ते आमच्या गुरूंनी सांगितलं.' 'असं, का!' 'आम्हाला त्यांनी नाव दिलेले आहे.' झालं. 'माळ दिलेली आहे.' झालं. कुंडलिनी कुठे आहे ? ती चढली की नाही वर? मी म्हटलं, 'तुमची कुंडलिनी चढली आहे वर तर यांची सांगा कुठे आहे?' 'ते कसं सांगायचं. ?' म्हटलं, 'कशी चढली आहे त्यांची कुंडलिनी?' 'ह्यांना कोणता रोग झालेला आहे ते सांगा?' ते सांगता येत नाही. 'तुम्हाला काय त्रास आहे ते सांगा, चक्रांवर.' 'माताजी, ते काही आम्हाला माहिती नाही. चक्रं वगैरे असतात असं आमच्या गुरूंनी फक्त सांगितलेले आहे.' बरं. आणि हे तुम्हाला दिले आहे. शेवटी मग पागलखान्यात सगळ्यांनी जायचं. व्यवस्थित. किती पापकर्म होऊन रातहिले आहे जगामध्ये. पैसे मिळविण्यासाठी यांनी स्मगल करावं, काय करायचं असेल ते करावं. वाट्टेल ते धंदे करावेत. २२ ३ आपल्यामध्ये स्थित या चौदा अवस्थांच्या माध्यमाद्वारे आपल्या पुनर्जन्माविषयी आम्ही बोलत आहोत. हे स्तर पार केल्यानंतर आपण एका सुंदर कमळासारखे फुलतो. ईस्टरला अंडे भेट देणे या गोष्टीचे प्रतीक आहे की हे अंडे सुंदर पक्षी बनू शकते. प.पू.श्री माताजी, इटली, १९.४.१९९२ प्रकाशक निर्मल ट्रान्सफोर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१ , ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in या होळीच्या दिवशी आपल्याला अशा गोष्टी जाळल्या पाहिजेत ज्याने आपले चित्त खराब होते. ज्यामुळे आपली आज्ञा खराब होते. म्हणजे दोन्ही गोष्टी होतील, चित्त पण साफ होईल आणि आनंद व पावित्र्यात होळी खेळाल. ज्यादिवशी याचे पूर्ण काँबीनेशन होईल, त्यादिवशी दोन्ही चक्रांवर एकरूपता येईल, सहस्राचा काही प्रश्न रहाणार नाही. २८/२/१९९१, होळी पूजा, नवी दिल्ली मरी ४ ा ा २० की ---------------------- 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-0.txt मार्च-एप्रिल २०१५ चैतन्य लहवे रं मराठी भ क ८ क ज ी] ें क ॐ ३ं शि भभ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-1.txt ने प्लैस्टिकपासून तुम्ही हजारो फुलं बनवू शकता, पण खरी फुलं मोठया मुश्किलीने फुलतात. परंतु जेव्हा बहर येतौ तेव्हा हरजारों फुलं फुलू शकतीत. पं.पू.श्री मातीजी, देवी पूजा, मुंबई, २१ मार्च १९७९ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-2.txt या अंकाल प्रेमाचं आणि शांतीचं दान ...४ वाढदिवस पूजा, मुंबई, २२ मार्च १९८४ आत्मा हे अध्यात्माचे डोळे ...१२ सार्वजनिक कार्यक्रम, राहरी, २७ फेब्रुवारी १९७९ नवआगमन अर्चना सहजयोग-संस्थापिका प.पू.माताजी श्री निर्मला देवी The Adorations एक दिव्य अवतरण प.पू.आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवींची १००० नावे प.पू.माताजी श्री निर्मला देवींच्या प्रवचनांचे संकलन 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-3.txt सहजयोग पसरल्याशिवाय तुम्ही पसरू शकत अ नाही. सहजयोग पसरला पाहिजे आणि तुम्ही उठलं पाहिजे. ब र सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतिमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम! फार आनंद वाटला मला! सहजयोग्यांना या संसारात राहन सगळे कार्य करायचं असतं. मुलं-बाळं, घर-द्वार, आई -वडील सगळ्यांना सांभाळून सहजयोग करायचा असतो. मी तसंच करते. मी सुद्धा माझ्या घरातल्या सर्व लोकांना सांभाळून, सर्व भाऊ-बहिणींना सांभाळून, सर्व नातलगांना सांभाळून, माझ्या यजमानांना सांभाळून सगळ्यांना सांभाळूनच मी माझा संसार चालवून जगाचा संसार चालवते आहे. कोणालाही सोडायचं नसतं. तेव्हा हे काम कठीण आहे. कारण काही तरी मुलीला झालं, काही मुलाला झालं, कुठे काही बिघडलं, नवरा वाईट असला, काही असलं की बायका घाबरतात. पुरुषांच्या नोकरीत काही खराबी झाली, त्यांच्या पगारात कमी झाली, पैशाचा त्रास झाला, असं झालं, ४ ै । 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-4.txt मुंबई, २२ मार्च १९८४ शांतीचं दान प्रेमाचं आणि तसं झालं. त्याने पुरुष घाबरतात. तऱ्हेतऱहेचे असे प्रसंग येतात ज्याने मनावरती दडपण येऊ शकतं. पण अशा परिस्थितीतच सहजयोग बसवला पाहिजे. कारण तुम्ही जर पाण्यापासून दूर असलात आणि तुम्हाला तहान लागलेली असली तर त्याच्यात काही विशेष नाही आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तहान मारतो, त्याला काही विशेष नाही. पण सगळीकडे पाणी असूनसुद्धा तुम्ही त्यातून अलिप्त राहू शकता, तेव्हाच तुम्ही खरे सहजयोगी आहात. तेव्हा पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टी फार लोक मला येऊन सांगत असत. माझ्या आईचं असं आहे, माझ्या वडिलांचं तसं आहे, नवऱ्याचं तसं आहे, अमक्याचं असं आहे. हळूहळू करत करत सगळे सुटत चाललं. सुटता सुटता मनुष्य अशा स्थितीला आला आता सहजयोगात, की त्याला स्वत:चा प्रपंच जो आहे तो एक नाटकासारखा वाटू लागलेला आहे आणि बाकी जगाचा जो प्रपंच आहे तिथे काही तरी करून दाखवलं पाहिजे ही भावना जागृत झालेली आहे. असं मला काल लक्षात आलं आणि मला फार आनंद झाला. विशेष करून ही मुंबानगरी म्हणजे, तिथे म्हणूनच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिघींनी मिळून इथे पृथ्वीतून जन्म घेतला. त्याला कारण हेच आहे, की या मुंबानगरीत जोपर्यंत असा काहीतरी जबरदस्त फोर्स येणार नाही तोपर्यंत सहजयोग इथे बसणार नाही. तेव्हा या मुंबानगरीमध्ये अनेक तऱ्हेचे प्रकार आहेत. ते इतके अनेक आहेत की त्यांचे वर्णन करता येत नाही. भूत प्रकार आहेत, बाधा प्रकार आहेत, पैशाचे प्रकार आहेत, लाचलुचपती आहेत. सर्व तऱ्हेची घाण या मुंबई शहरात! सगळ्या नद्या जशा समुद्रात वाहून जातात तशी सगळी घाण या समुद्रात येऊन बसते. सगळ्या तऱ्हेचे चोर, सगळ्या तऱ्हेचे लंपट लोक, सगळ्या तऱ्हेचे ठगवणारे, सगळे इथे येऊन बसलेले आहेत. तेव्हा या चिखलामध्ये जी कमळं मी काल म्हटली ती, आपल्याला ती फुलवायची आहेत. ती जर आपल्याला फुलवता आली तर सबंध देशामध्ये त्याचा लाभ होणार आहे. दिल्लीमध्ये सुद्धा फार जोरात कार्य सुरू आहे. तसंच या मुंबई शहरातसुद्धा तुम्ही फार मोठं कार्य केलेले आहे आणि ते कार्य म्हणजे या अशा अपुण्य नगरीमध्ये, अशा अधर्मी नगरीमध्ये, अशा सर्व घाणीत तुम्ही स्वत:च्या कमळाला वर उचलून घेता, हे फार मोठं आहे. त्याच्यासाठी मी तुमचं किती अभिनंदन करावं ते मला कळत नाही. गर्वाने मी नुसती झुकून जाते, की केवढं हे मोठं माझ्यासाठी झालेलं आहे. माझ्या मुलांनी किती मोठं कार्य केलं. ह्या समाजात राहून, ह्या समाजाशी निगडीत राहून, त्याच्यात सामावून त्यांनी कसं हे सुंदर कार्य केलं आहे. त्याच्याबद्दल मला फार तुम्हा सगळ्यांचा आदर वाटतो. आता प्रगती हळूहळू नको, तर जोरात प्रगतीला लागलं पाहिजे. सहजयोग पसरल्याशिवाय तुम्ही पसरू शकत नाही. सहजयोग पसरला पाहिजे आणि तुम्ही उठलं पाहिजे. तेव्हाच हे होणार आहे. जोपर्यंत तुम्ही उठणार नाही, तोपर्यंत सहजयोग पसरणार नाही. जसे दिव्याची ज्योत वाढते तसा त्याचा प्रकाश वाढतो, तेव्हा हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. जितकी तुमची ज्योत वाढेल १ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-5.txt तितका त्याचा प्रकाश वाढणार आहे. तऱ्हेतऱ्हेचे लोक आहेत. मला सगळे कबूल आहे. पण त्यातच आपण सहजयोग बसवला ना! त्यातच आपण इतके लोक उभे केले आहेत ना ! आणि आपण सिद्ध करून दिलं ना की परमेश्वर आहे, परमेश्वराची शक्ती आहे आणि त्या शक्तीत आपण कार्य करू शकतो. हे आपण सिद्ध केल्यावर आता त्याबद्दल शंका न ठेवताना अगदी खुल्या दिलाने चढाई केली पाहिजे. खूप जोरात काम सुरू केलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी राहता तिथे शक्य असलं तर एक एक पाटी लावायची बाहेर एक एक केंद्र प्रत्येक घरात सुरू करायचं. करायचं सुरू. काय होत बघू या! अशा रीतीने जिथे जिथे जमेल, जितकं जमेल तितकं केलंच पाहिजे. जमण्यापेक्षाही थोडं जास्त केलं पाहिजे. आणि ती हिम्मत तुम्ही धरावी आणि हे होण्यासारखं आहे. आणि मला आशा आहे की पुढच्या वेळेला मी मुंबईला येईन तेव्हा पुष्कळ सहजयोगी असतील. असे तर पुष्कळ येतातच सहजयोगी. काल किती लोक आले होते तुम्हाला माहिती आहे. हजारो लोक होते. पण त्या हजारो लोकांमध्ये सहजयोगी, पक्के, पोहोचलेले, जाणलेले किती होते! अजूनही सहजयोगी लोक आपल्या घरच्या वातावरणात, आपल्या घरच्या गोष्टींकडे फार लक्ष देतात. मी क्षणात ते प्रश्न सोडवते तुम्हाला माहिती आहे. आणि सहजयोगात ते अगदी क्षणात सोडवले जातात. पण तुम्ही या लहान-लहान गोष्टींसाठी बसून उगीचच डोकंफोड करता आणि स्वत:चा नाश करून घेता. दूसरी गोष्ट आहे, आपापसामध्ये वैमनस्य. जे पूर्वी होतं किंवा पूर्व काळापासून चालत आलेलं आहे ते सोडून आता आपण सगळे सहजयोगी झालोत. आपल्यातले सगळे जे काही आहे, वैमनस्याचे जेवढे काही पॉईंट्स आहेत ते गेले पाहिजे. जेवढं काही आपले चुकलेले आहे ते सगळं काही गेलं पाहिजे. आपल्यामध्ये जे काही, आपापसामध्ये, मनामध्ये वाईट आलेलं आहे ते सगळे गेलं पाहिजे. कारण आता आपण स्वच्छ झालो १ आहोत. आता आपण आरशासारखे झालो आहोत. तेव्हा आपल्यामध्ये काहीही घाण राहू शकत नाही. ह्याच्या एका गोष्टीला असं लक्षात ठेवलं पाहिजे की आपली आई किती क्षमा करते. किती तिला याबाबतीमध्ये सहन करावं लागतं. किती गोष्टी सहन करते, कसं सगळ्यांना सांभाळून घेते, कसं सगळ्यांना सामावून घेते आपल्यासमोर आईचा आदर्श आहे. ती जर एवढं करू शकते, तर आम्ही का करू शकत नाही. आम्ही आपल्यामध्ये का भावना आणू शकत नाही की झालं गेलं विसरून जा. कोणी कसेही असले तरी त्यांना डोक्यावर उचलून घ्यायचं. त्यांना मोठं करायचं, त्यांना बदलून टाकायचं. तुमच्यात ही किमया असल्यावरती मागे काय झालं, कोणी काय केलं हा विचार करू नये. आता पुष्कळ लोकांचं असं असतं की सहजयोगात हे नवीन आलेले. त्यांच्यासमोर तुमचा पहिला आदर्श हा दिसणार आहे की तुम्ही कशा प्रकारे लोकांशी वागता ! आता इथे कदाचित आपली जागा होईल. असं मला वाटतं. आणि नंतर आश्रमही होईल. पण त्या आश्रमात चार माणसं ठेवल्याबरोबर जो येईल त्याला दुल्लती मारायची हे काम सुरू होणार आहे. हे मी पाहिलेले आहे. कुठेही आश्रम केला की चार लोक आले की त्यांना म्हणतात की, 'तुम्ही इथे कशाला आले? तुम्ही कोण? तुम्ही इकडे येऊ नका. तुम्हाला इथे राहायचं नाही. तुमचं हे नाही. तुमचं ते ठीक नाही. ते असं ठीक नाही. ते तसं ठीक नाही,' अशा रीतीने त्यांच्याशी लोक वागायला लागले सहजयोगात. म्हणजे हे शोभतं का आपल्याला! असं जर आपण वागायला लागलो तर आपल्याला शोभतं का? कबूल, काही लोक सहजयोगाला लाभदायक नाहीत. कारण ते लोक सहजयोगाला त्रासदायक आहेत. काही लोकांपासून काहीही होण्यासारखं नाही. कबूल! पण त्या लोकांना सगळ्यांना तुसडवून वागायचं नाही. त्या सगळ्यांना हळूहळू ६ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-6.txt Ηαππψ Βιρτηδαψ आपल्यामध्ये आणायचं. जे त्यांच्यातले वाईट असतील, जे त्यांच्यातले कामातून गेलेले असतील, त्यांचा आम्ही विचार करू आणि काढून टाकू. पण तुम्ही त्याबद्दल मात्र अगदी शांतपणा ठेवायचा. आपल्या जीवनामध्ये पहिले शांतपणा आणला पाहिजे. अत्यंत शांत झालं पाहिजे. मी सारखं सांगत असते, की कबूल तुमच्या जीवनात खूप त्रास आहे, सगळं काही आहे. पण शांतपणा हा जीवनात आणला पाहिजे. हे मला आता तुम्ही या वाढदिवसाला दान दिलं पाहिजे की, 'माताजी आम्ही शांतपणा ठेऊ. ' अत्यंत शांत, बर्फाचा शांतपणा आला पाहिजे. अत्यंत सहन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय काम होणार नाही. आणि ते तुम्ही सहन करूनसुद्धां काहीही तुम्हाला होणार नाही. सगळं सहस्रारातून निघून जाणार आहे. जे काही तुम्ही सहन करता म्हणता ते सगळे निघून जाणार आहे. तेव्हा माणसाने त्याबद्दल जास्त विचार करू नये. मी फार दु:खी, मला हा त्रास वरगैरे. हे कसलं काय आलंय! अहो, तुम्ही संत झाला आहात. आता तुम्हाला दुःख कसलं आलय! संतांजवळ दु:ख राहतात का ? असा विचार ठेवला पाहिजे, आम्ही संत झालोत . आम्ही फार मोठे झालोत. आमच्याजवळ दु:ख, आमच्याजवळ या व्यथा ह्या कशा असणार? आम्ही लोकांच्या व्यथा ठीक करणारे. आम्ही साबणासारखे, सगळ्यांना धूणारे. आमच्यावरती कसा मळ बसणार ! हा एकदा तुम्ही निश्चय कायम केला तर पहिल्यांदा तुम्हाला 'शांती लाभ' होणार आहे. तुमच्यामध्ये पहिल्यांदा शांती लाभणार आहे. आणि तो शांती लाभ झाल्याबरोबरच तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसू लागेल. जोपर्यंत बसणार नाही, तोपर्यंत काहीही व्यवस्थित दिसणार नाही. सगळं उलटं दिसणार आहे. कोणत्याही माणसाबद्दल धारणा, कोणत्याही परिस्थितीबद्दल विचार ह्या सर्व गोष्टी आहेत त्या जर तुम्ही, अशासाठी तुमचे मन जर हालत असले तर कधीही स्पष्टरूपाने दिसणार नाही. म्हणून याला शांतीचा वास करायचा. शांती पाठ करायचा. आईने सांगितलं शांत राहायचं! शांत झाल्यावर तुम्हाला इतकं लक्षात येईल, की सगळे संबंध कसे बनतात ? सगळा आनंद कसा येतो ? मैत्री कशी होते? कामं कशी होतात? तुम्ही अशांत असले तर तुमच्यावरती जे देवदूत आहेत, तुमच्यासाठी जी सगळी आम्ही व्यवस्था केलेली आहे त्या सगळ्या व्यवस्थासुद्धा, मनुष्याच्या मनात शांती त्यांना समजत नाही की आता ह्यांना करायचं काय ? एकदम धावपळ सुरू, घाई सुरू, काही काही लोकांचं म्हणजे राग नाही, पण त्यांना प्रत्येकवेळी इथे ठेऊ का तिथे ठेऊ का? ह्याच्या डोक्यावर ठेऊ का त्याच्या डोक्यावर ठेऊ ? सारखा हात त्यांचा असा असा चाललेला असतो. तेही अशांतपणा आहे. काही लोक रागीट असतात, तोही अशांतपणा आहे. तऱ्हेतऱ्हेचे अशांतपणाचे प्रकार आहेत. काही काही लोक बोलत नाही, राग आतमध्ये घेऊन बसायचं, बोलायचं नाही. एकदम फणकार्याने वागायचं किंवा एखाद्याने अगदी मी फार दु:खी आहे असं तोंड करून बसायचं. हे काही साधु-संतांचं लक्षण आहे? साधु-संत देण्यासाठी येतात जगामध्ये. द्यायचं असतं दुसर्यांना. तेव्हा जे साधु-संत असतात, त्यांच्याकडे कोणी आला तेव्हा त्याला ओलावा मिळाला पाहिजे, प्रेम मिळालं पाहिजे. त्याला समाधान मिळालं पाहिजे, परत त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्याला शांत वाटलं पाहिजे, की या माणसाकडे गेलो बुवा, किती शांत वाटलं! किती शांत मनुष्य! अहो, तुम्ही किती पंडित असलात, तुम्ही ऐकले आहे का कुठे, वेदाचार्य, अमुक-तमुक असले त्यांच्या पायावर कोणी जातं का? एखादा फकिर जरी कुठून आला, रस्त्यावरून एक साधू मनुष्य येऊन उभा राहिला, जो साधू आहे, त्याच्या सगळे पायावर जातात की नाही! तुम्ही कितीही सहजयोगात विद्वान असलात तरी त्या विद्वत्तेचा उपयोग ७ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-7.txt Ηαππψ Βιρτη δαψ काय, तुमच्यात शांतपणा नसला तर! चित्तात ज्याच्या शांतपणा नाही, त्याला कोण साधू म्हणणार? ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पहिली गोष्ट मनुष्याच्या तब्येतीत, वागण्यात भारदस्तपणा, शांतपणा असला पाहिजे. थिल्लरपणा, प्रत्येक वेळेला खिदळत खिदळत हसायचं हे फार कॉमन असतं सहजयोग्यांचं. कारण आतून आनंद होतो. पण खिदळायचं हे बरोबर नाही. भारदस्तपणाने मनुष्याने राहिलं पाहिजे. भारदस्त. राहाणीत, वागण्यात सगळीकडे भारदस्तपणा पाहिजे. आणि दुसरं म्हणजे असं की आपल्यामध्ये जर काही निगेटिव्ह असलं तर त्याचे परिणाम दिसतात वागण्यावर. एखादा मनुष्य जर निगेटिव्ह असला तर त्याच्याकडून सारख्या चुका होतील. ह्याची मिस्टेक, त्याची मिस्टेक, काही ना काही तरी मिस्टेक होत राहणार आहे. मग 'असं कसं झालं माताजी ! माझ्या हातून असं कसं चुकलं?' कसं चुकलं! काही तरी त्याच्यात खोट असल्याशिवाय कसं होणार? मग कोणती खोट आहे ? मग माझ्यात काहीतरी निगेटिव्हिटी आहे. माझ्यात निगेटिव्हिटी आहे नां, मग मी ती काढून टाकणार! पण माताजींना येऊन असं नाही म्हणायचं की, 'माताजी, मी काय करू ? मी सगळं करते तरी होत नाही.' सगळं करते पण मनापासून होत नाही. मनापासून जी गोष्ट होत नाही त्या गोष्टींचा परिणाम तुमच्यापर्यंत येत नाही. पुष्कळ पुरुषांना मी पाहिलं आहे, 'आम्ही एवढी मेहनत करतो माताजी, पण निगेटिव्हिटी काही जात नाही.' अशी कशी जाणार नाही. तुम्ही निगेटिव्हिटी नाहीच आहात, कशी जाणार नाही? सगळं निघून जाऊ शकतं, फक्त प्रयत्न हा केला पाहिजे. अजून सहजयोगामध्ये कच्चे लोक पण पुष्कळ आहेत, हे ही लक्षात घेतलं पाहिजे. सगळे पक्के नाहीत. कच्चे लोक पुष्कळ आहेत. सांभाळून ही राहिलं पाहिजे. त्यातले काही कच्चे लोक असे आहेत, की ते पैशाच्या लोभाने आलेले आहेत सहजयोगात. नुसते पैसे मिळविण्यासाठी. पुष्कळसे लोक असे आलेले आहेत. नुसतं पैसे मिळेल किंवा मोठेपणा मिळेल. स्टेजवर फिरायला मिळेल. काहीतरी शिष्टपणा करायला मिळेल. लीडरशीप मिळेल. असेही पुष्कळ लोक येतात. पण ते ही बदलणार . कारण त्यांच्याही लक्षात येईल की खोटेपणा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात काही अर्थ नाही. लोक हसतात. फार मोठे मोठे असे फिरत असतात. उदाहरणार्थ एक गृहस्थ यायचे होते दिल्लीला प्रोग्रॅमला. ते काय म्हणाले, 'मी काही येऊ शकत नाही. मी फार बिझी आहे. मी अमुक आहे. तमुक आहे. असं झालं, तसं झालं . ' तर एक सहजयोगिनी होती, लहानशीच. शहाणी होती. ती म्हणाली, त्या गृहस्थाला असं सांगा की जसा माताजींनी प्रोग्रॅम केला तसा तुम्ही मावळणकर हॉलमध्ये एक दिवस तरी करून दाखवा. तुमच्या प्रोग्रॅमला चार तरी माणसं येतात का? पैसे देऊन सुद्धा येणार नाहीत. तुम्ही जरी मोठे मिनिस्टर असले, मोठी माणसं असले तरी तुमच्या प्रोग्रॅमला चार माणसंसुद्धा पैसे देऊन येणार नाहीत. तर तुम्ही स्वत:ला काय समजता! तुमचा कोणावर काही अधिकार आहे का? कोणाबद्दल तुम्हाला प्रेम आहे का? कोणी तुम्हाला खरं हृदयापासून मानतं का? कोणी येणार नाही. आज तुम्ही मिनिस्टर म्हणून येतील उगीचच तोंडपूजेला. पण खरोखर पाहिलं तर तुम्ही मावळणकर हॉलमध्ये प्रोग्रॅम करून बघा. या माणसाला चार माणसं सुद्धा भेटायची नाहीत. अॅडव्हर्टाइज करू द्या. लाखो रूपये खर्च करू द्या. चार माणसं जरी प्रोग्रॅमला आली तरी नशीब समजायचं. म्हणजे शेवटी अशी जी माणसं पुढारीपण घेतात, मोठेपण घेतात, स्वत:ला मोठे समजतात, काही तरी असतं स्वत: चं, शिष्टपणा दाखवायचा वगैरे. या लोकांना नंतर पाडावं लागतं. आश्रमातसुद्धा असं होतं नेहमी. आश्रमात एखादा मनुष्य असला तर स्वत:ला शिष्ठ समजतो. मी म्हणजे काहीतरी विशेष. मग तो शिष्ठासारखा वागू लागतो. शिष्ठ मनुष्य जो असतो तो महामूर्ख आहे. ८ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-8.txt सगळे हसतात, हां, चढलं वाटतं हे हरभऱ्याच्या झाडावर! आज जे लोक तुमच्या पुढे पुढे करतात ते ही खोटे आहेत. ते ही पडणार, तुम्हीही पडणार. तेव्हा आपल्यामध्ये ही कुंडलिनी जागृत झाल्यावर, ज्याला आपण म्हणू की चंडी जागृत झाली, या देशात, चंडी जागृत जागृत झाली म्हणजे, आपण सडेतोडपणा ठेवायचा त्याच्यात. सडेतोडपणा. कोणी जर खोटेपणा केला तर तो मनुष्य हमखास पडणार. त्यानंतर आपण काळजी करायला नको. तो सगळ्यांच्या समोर दिसेल, की हे असे खोटे आहेत. त्यांच्यात हे दोष आहेत. ते समोर येऊन उभे राहतील. हा सहजयोगाचा विशेष प्रकाश देण्याचा एक भाग झाला. झाली. म्हणजे काय झालं? कुंडलिनी पैशाला तेव्हा जी नवीन मंडळी आलीत, तुम्हाला जर वाटतील की हे खोटे आहेत, हे लपवाछपवी करतात, आले, अमुक झालं, तमुक झालं. काहीही असलं, तुम्ही त्यांची काळजी करायची नाही. त्यांचे विचार आम्ही करणार, त्याची व्यवस्था आम्ही करणार. तुम्ही स्वत:ची व्यवस्था मात्र भारदस्त राजासारखी ठेवायची. कोणी कसाही असला, कसाही वागला तरी तसंच रहायचं. असं जर तुमचं वागणं असलं तर कोणीही तुम्हाला हात लावू शकत नाही. पण लहानसहान गोष्टींमध्ये लोक भांडणं करतात. लहान लहान गोष्टींमध्ये. आता मराठीत बोलल्या, मग हिंदीत कशाला बोलल्या माताजी. मराठीतून बोलायला पाहिजे. अरे पण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, पण यांना बघा. ह्या लोकांनी, हे फॉरेनर्स आलेत, ह्यांनी तर कधी मराठी भाषा कशाशी खातात, त्यांना मराठी नावाची भाषा पण जगात आहे हे ही माहिती नसेल. पण ते चूपचाप ऐकत बसतात. त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. कारण ते तुमच्यापेक्षा पुष्कळ हरभ-्याच्या झाडावर चढलेले आहेत. चांगले आपटले आहेत चढून चढ़ून. त्यांना माहिती आहे, ते हरभऱ्याच्या झाडावरून आपटलेले. आपटून आपटून आता टाकीचे घाव सोसून त्यांच्यात देवपण आलेले आहे. अजून आपल्याला आपटायचं आहे. त्या आपटण्यासाठी आता आपण कशाला चढायचं वरती. जाऊ द्या काही घोड्यावर बसायला नको. कागदी घोड्यावर बसून जी स्थिती होते, ती स्थिती स्वत:ची कशाला करून घ्यायची आणि सगळ्यांसमोर फटफजिती करून घ्यायची. सगळ्यांची फटफजिती होते. तेव्हा एक शहाणपणा धरून , कोणताही खोटेपणाचा, मोठेपणाचा आव आणायचा नाही. सहजयोगात तुम्ही पैसेवाले असाल तर असाल आपल्या घरात. माताजी नाही खरेदी करू शकत. तुम्ही श्रीमंत असाल तर तिथेच रहा. तुम्ही मोठे मिनिस्टर असाल तर घरात बसा. तुम्ही कोणीही असलात तरी तुमचं महत्त्व इथे नाही. इथे मग फक्त हे आहे की तुमची कुंडलिनी कुठे आहे? तुम्ही सहजयोगात कुठे आहे? तुम्ही कोणते कोणते सिद्ध केलेत आपले चक्र? आहे. तो मनुष्य मोठा, बाकी मनुष्य मोठा नाही. हे साधु-संतांचं राज्य आहे. साधु-संतांच्या राज्यात या ते मुख्य सगळ्या बाह्यातल्या गोष्टी बाहेरच वाहण्यासारख्या आहेत. त्या तुम्ही कोणत्या गाडीतून आलात? तुम्ही किती पैसे घातले? तुम्ही काय केलं? ह्याचे काही महत्त्व इथे नाही. कोणावर इंप्रेशन पडणार नाही. तेव्हा ज्या गोष्टीचं खरं जगामध्ये नेहमी इंप्रेशन पडलं ते म्हणजे तुम्ही संत -साधू कोणत्या लेव्हलचे आहे ते पाहिलं पाहिजे. ते संत- साधू तुम्ही झालं पाहिजे. एवढा मोठा राजवाडा आहे. फोर्ट आहे, आग्ग्राला. मी गेले होते तिथे. तर रात्र झाली, संध्याकाळ झाली, तर असं वाटायला लागलं की भूतखाना आहे इथे, काही आहेच नाही. जे मोठमोठे राजे झाले, राण्या झाल्या काय काय त्यांनी दागिने घातले असतील. पुरुषांनी काय काय नखरे केले असतील. काय झालं असेल ते झालं असेल. सगळे संपलं. बाहेर आले तर तिथे एक मदार आहे. तिथे एक दीप जळत होता. त्या लाईटमुळे आम्ही खाली येऊ शकलो. कारण लाइटच नाही तिथे. विचारलं की, ही कोणाची? तर म्हणे, हे फकीर ९ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-9.txt होते. आणि हे अकबर बादशहांचे गुरू होते. पण ते कधीही आतमध्ये, राजवाड्यामध्ये गेले नाहीत. म्हणून अकबर बादशहाने त्यांची कबर इथे बांधली. केवढी मोठी गोष्ट आहे. केवढी मोठी गोष्ट आहे की आज त्या माणसाच्या तिथे अजून दिवा लावला जातो आणि त्या एवढ्या मोठ्या महालामध्ये एक दिवा नाही. अंधार गुडूप. कोणाला माहीत नाही, कोण राजे झाले ? कोण राण्या झाल्या? कोणाच्या कबरी तिथे असतील! कारय असेल ते असेल. तेव्हा मनुष्याचं जे राहतं, पर्मनन्टली जे राहतं ते काय आहे? ते त्याच्यातलं ऐश्वर्य आहे आणि ते ऐश्वर्य त्याच्या आत्म्यातलं आहे. ते आम्ही सहजयोगाने मिळवायचं. आम्हाला दसर्या लोकांसारखं ऐश्वर्य मिळवायचं नाही. जे टिकाऊ नाही. जे निरंतर राहणारं आहे ते मिळवायचं आहे. आणि ते मिळविल्यानंतर वाटलं पाहिजे, दिलं पाहिजे, लोकांना बरं केलं पाहिजे. त्यांना फायदे झाले पाहिजेत. त्यांच्याकडे करुणेच्या भावनेने पाहिलं पाहिजे. सगळ्यांना प्रेमाने वागवलं पाहिजे. हे एकदा जर वाढत चाललं तर मला वाटतं की या देशाचीच काय तर हजारो देशांची स्थिती आपण ठीक करू. पण पहिल्यांदा तुम्ही तयार व्हायला पाहिजे. माझ्या एकटीच्याने होणार नाही. जसं हे आहे (माईक). ह्याच्यातून मी बोलते आहे. पण याला काढायला किंवा याच्या आवाजाला न्यायलासुद्धा काहीतरी पाहिजे नां! तसंच तुमचं आहे. जर तुम्ही अगदी पूर्णपणे पोकळ असलात तर त्याच्यातून ही शक्ती अशी सुंदर वाहेल की जसं मी काल म्हटलं होतं की ते व्हायचे दिवस आलेत. विश्वाचं कमळ उघडायचं आहे. विश्वाचं सहस्रारदल उघडायचं आहे. सहस्त्रदलाचं कमळ उघडायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही एकेक दल आहात. ते काही जास्त कठीण काम नाही. सगळ्यांनी जरा मेहनत केली, स्वत:ची ध्यान-धारणा, स्वच्छता ठेवायची. मेहनत करायची. घरातच आपल्या म्हणायचं आमचा हा आश्रम आहे. आम्ही आश्रमवासी आहे. सकाळी उठून ध्यान- धारणा, पूजा वरगैरे सर्व व्यवस्थित करून जे काही कार्य करायचे आहे ते, परत संध्याकाळी ध्यान- धारणा. परत जिथे प्रोग्रॅम असेल त्या प्रोग्रॅमला जायचं. कुठेही प्रोग्रॅम असला तरी तो गाठायचा. आपल्या तिथे जवळपास करू शकतो का एखादं केंद्र, तिथे सुरू करायचं, चार माणसं जोडायची. त्यांना सहजयोगाला बोलवायचं. हळदीकुंकवाला बायकांना बोलवायचं, सहजयोग सांगायचा. असं असं माताजींनी आम्हाला दिलेले आहे. हे मिळालेले आहे. हे सगळीकडे सांगत सुटायचं. सुसमाचार सगळ्यांना द्यायचा. अशा रीतीने सहजयोग वाढवायचा. आणि जी मंडळी अजून अर्धवट आहेत, त्या लोकांना जरासं प्रेमाने घ्यायचं. बसवायचं. 'हे करा म्हणजे बरं होइल.' हिडीसफिडीस करून होणार नाही. त्याला फार प्रेमाने वागायला पाहिजे. ही गोष्ट पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. अत्यंत प्रेमाने सगळ्यांना जोडून घ्यायचं. त्यांच्यावरती सगळ्यात जास्त प्रेमाचं इंप्रेशन पडतं की तुम्ही कसे आहात. एका बाईला मी दिल्लीला पाठवलं , की तुम्ही जाऊन आशीर्वाद घ्या. तर तिने मला सांगितलं , 'वहाँ तो बंदरों का राज चलता है।' म्हटलं, 'बंदरों का राज चल रहा है?' 'और कहाँ माताजी, उन बंदरों के बीच मुझे नहीं जाने का। कहाँ आप और कहाँ आप के बंदर!' मला काही समजेच ना बंदर कैसे रह रहें हैं वहाँ? तर म्हणे 'एक से एक तुफान आदमी रहता है?' ज्याच्याशी बोला तोच म्हणे हरभ-्याच्या झाडावर. बरं म्हटलं, 'कोई हर्ज नहीं। हम उनसे बात करेंगे। ठीक है। पण इतकं वाईट नसणार. मी तुम्हाला सांगते इतकं वाईट नसणार. पण इंप्रेशन असं पडतं माणसाचं. जरा ही तुम्ही शिष्टपणा केला की इंप्रेशन वाईट होणार. अत्यंत नम्रपणाने रहायचं. दसरं सांगायचं म्हणजे आपल्या भारतीय परंपरेला उतरणारे आपण असायला पाहिजे. आता समजा. एखादा आश्रम आपला झाला आणि तिथे जीन्स घालून, केस कापून एखादी बाई उभी असली आणि तिने 'हाय' सुरू केलं, १० 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-10.txt Ηαππψ Βιρτηδαψ ते म्हणतील, आं, हा कसला काय आश्रम! आपला काही मॉडर्न आश्रम नाही. अनादी आश्रम आहे. ते काही असं नाही, की आपण तिथे मॉडर्न वस्तू आणल्या आणि मॉडर्न पद्धती जाणतो. मॉडर्न बोलतो, तसं काही करायचं नाही. ट्रॅडिशनल होणं वेगळं आहे आणि ग्लॅमरस होणं वेगळं आहे. ग्लॅमर सहजयोगाला मान्य नाही. मान्यच नाही. पण ट्रॅडिशनल राहायचं. म्हणजे असं नाही की विवाहित स्त्रीने अगदी भूतासारखं रहायचं. आपल्याकडे तर विधवांनीसुद्धा व्यवस्थित ट्रॅडिशननुसार कपडे घालायचे असं ठरवलेले आहे. तेव्हा ट्रॅडिशनली राहायचं. पुरूषांनीसुद्धा ट्रॅडिशनली राहायचं आहे. जास्त साहेबीपणा करायचा नाही. नाही तर, मी परवाच सांगितलं की साहेबीपणाचं लक्षण असं असतं की जेव्हा काही तरी साहेबीपणा दाखवायचा तर बो वगैरे लावून लोक येतात तेव्हा लोकांना असं वाटतं की हा बेअररच आहे की काय. कुणाला हे वाटत नाही की हा कोणी साहेब आला. मोठे पैसे खर्च करून बो घेतलेला आहे. कशाला पाहिजे? आपल्या देशातले कपडे फार लावून सुंदर आहेत. ते पारंपारिक ह्या देशात आले आहेत. त्याने आपल्यासाठी थंड रहातं , बरं रहातं , व्यवस्थित रहातं , दिसायला सुंदर दिसतं. तेव्हा दुसर्यांचं फालतू अनुकरण करायला नको. शक्यतो माणसाने पारंपारिक स्थितीमध्ये रहायला पाहिजे, विशेषतः आश्रमामध्ये परंपरेने रहायला पाहिजे. आपल्याकडे परंपरागत जी आवभगत आहे, जी बोलण्याची पद्धत आहे, गेटआऊट वरगैरे आपल्याकडे शब्द नाही. असे आपण बोलत नाही कधी गेट आऊट. उठल्यासुठल्या 'व्हॉटसु रॉँग' असे आपण शब्द बोलत नाही. किंवा 'आय हेट यू' असं आम्ही म्हटलं असतं लहानपणी तर वडिलांनी ठोकून काढलं असतं आम्हाला. 'आय हेट यू' असं फार म्हणतात इंग्लिश भाषेत. 'आय हेट यू'. म्हणजे तुम्ही आहात कोण? हेट यू म्हणजे काय? पण यांच्याकडे असं आपण म्हणू का की 'मला तुझी घृणा वाटते.' म्हणतील, तुला घृणा वाटते का? तर तुझं नाक ठीक करू आपण. तिकडे ही अशी पद्धत आहे बोलायची. ती आपण शिकायची नाही. इंग्लिश पद्धत शिकायची नाही, हे वेस्टर्न शिकायचं नाही. हे चांगलं नाही. 'आय हेट यू' म्हणजे काय? आमच्याकडे अशी पद्धतच नाही बोलायची. कोणी आलं तर, 'भाग्य, परम भाग्य आहे. या, बसा, तुम्हाला काय पाहिजे?' अहो, तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे हरिश्चंद्राने सगळे राज्य देऊन टाकलं. लहान मुलाला मारून टाकलं, कोणी काय केलं. ज्याने जे मागितलं ते आपण आपल्या पाहुण्यांना देत असू. पण आता ही इंग्लिश लोकांची पाहूण्यांची जी पद्धत आहे, म्हणजे वेस्टर्न लोकांची ती आपल्याला नको आणि हे असे भयंकर शब्द तोंडात, घाणेरडे शब्द, शिव्यागाळीचे मुळीच आणायचे नाहीत. अगदी सोज्वळ शब्दाने, आपण जसं एखाद्या बाळबोध घराण्यातील लोक जसे वागतात तसं आपण वागलं पाहिजे. तुमची आई अत्यंत बाळबोध आहे आणि तसेच तुम्ही वागले पाहिजे. आणि वाईट तऱ्हेचं बोलणं मी अगदी ऐकलं की मला फार आश्चर्य वाटतं. आता तुमच्या आया बदलल्या मी तुमची आई आहे. तेव्हा तुमची आई जर तशी बोलत असली तर ते विसरा. आणि माझ्यासारखं वागायला सुरुवात करा. आणि कोणतीही अशी गोष्ट बोलायची नाही. मुख्य सांगायचं म्हणजे प्रेम आणि शांती या दोन गोष्टींचा तुमच्यातून पूर्णपणे प्रकाश मिळाला पाहिजे. लोकांनी सांगितलं पाहिजे की तो मनुष्य प्रेमाचा आणि शांतीचा अवतार आहे. असं मला ऐकायला मिळाले की मला फार आनंद होईल. एवढं मला प्रेमाचं आणि शांतीचं दान आज द्यावं. हे माझं मागणं आहे. ११ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-11.txt आत्मा हे अध्यात्माचे डोळे राहुरी, २७ फेब्रुवारी १९७९ ही पुण्यभूमी आहे. राऊळबाई सारख्या योगिनी जिथे वास करतात ती भूमी आम्हाला फार पूजनीय आहे. तसेच राहरीचे धुमाळ साहेब जे आज आपल्यासमोर भाषण देत होते यांनीसुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे खेड्यापाड्यातून. त्यांच्याबरोबर राहरीहन अनेक सहजयोगी आलेले आहेत आणि एक एक हिऱ्यासारखे तासलेले सुंदर सहजयोगी आहेत. हे किती विद्वान आहेत आणि परमेश्वराबद्दल जाणतात हे जर बघायचं असलं तर त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करून बघितली पाहिजे. सहजयोग म्हणजे सहज, 'सह' म्हणजे आपल्याबरोबर, 'ज' आहे. हा आपल्याबरोबर जन्मलेला आहे. संस्था आहे असं अनादिकालापासून म्हणजे जन्मलेला. सहजयोग हा एक महायोग आता आपल्यामध्ये कुंडलिनी ही लोकांनी सांगून ठेवलं आहे. मार्कडेस्वामींनी याच्यावर विशेषकरून आदि शंकराचार्यांनी, विस्तारपूर्वक लिहिलेले आहे. त्यानंतर कबीर, नानक त्यांनीस्द्धा याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेले आणि आई हे फार पवित्र आहे की ही तुमची आई आहे स्थान आहे. आता फ्रॉइड माणसाने आपल्या आईशी सारख्या घाणे रड्या घाणेरडा संबंध ठेऊन आणि फारच घाणेरडी आणि त्यामुळे आज स्थिती काढलेली आहे पाश्चिमात्य देशामध्ये त्यांची जितकी हानी झालेली आहे ती जाऊन बघावी आणि मग आश्चर्य प्रय तर नुसता लोकांचा शिरच्छेद कुंडलिनीच थिजवून टाकलेली आणि ती पवित्र आई आहे. जे लोक आईचं पवित्रपण जाणत नाही त्यांना वाटतं की या राक्षसाने, हिटलरने केला, पण याने सगळ्यांची आहे. कारण कुंडलिनी ही आई आहे आईचं पवित्रपण भारतीय माणसाला सांगायला नको. सहजयोग लाभू शकत नाही. ते शक्यही नाही. कारण असेही लोक आम्ही पाहिलेत, भारतीय असूनसुद्धा की ते पवित्रपणाला विसरलेले आहेत. पवित्रपणाचं महत्त्व ते विसरलेले आहेत. आणि स्वत:ला त्यांनी अशा रस्त्यावर घालून घेतलेले आहे, जो सरळ डिस्ट्क्शनवर जातो, नाशाला जातो. ही शक्ती आपल्यामध्ये स्थित आहे, ती आहे आणि ती असते असं अनेक लोकांनी आपल्याला सांगितलेले आहे. आजकाल जे पुष्कळसे गुरू वगैरे निघालेले १२ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-12.txt आहेत त्यांना काही इतिहास राहिलेला नाही. ते जे काही बोलतात ते सगळे अधांतरी आहे. स्वत:चीच काहीतरी ट्रम काढलेली आहे, पैसे कमवण्यासाठी. त्याला काहीतरी इतिहास असायला पाहिजे. प्रत्येक घटना ही ऐतिहासिक असते. जशी उत्क्रांती आपण बघितली, तर अमिबापासून मनुष्य होईपर्यंत त्याला हळूहळू एक एका टप्प्याने वर यावे लागले आहे. तसा सबंध जो इतिहास आध्यात्मिक जीवनाचा झालेला आहे ती सुद्धा एक घटना एका मार्गाला नेऊन पोहोचवते . जर ही जिवंत प्रक्रिया आहे, तर ज्याप्रमाणे एक बी, त्यातून मुळे निघतात, बुंधा निघतो, पाने निघतात, फुले होतात आणि मग त्याला फळे लागतात. असं क्रमाने ते एक एक घडत जातं. त्याचप्रमाणे आज जे काही अध्यात्मामध्ये आपण वाचलेले आहे, तुकारामबुवा काय किंवा ज्ञानेश्वर किंवा त्याच्याही आधीचे जे लोक मोठमोठे साधु-संत आपल्या देशामध्ये झालेले आहेत, या साधु- संतांना एकप्रकारे पुष्कळशा गुरू लोकांनी तिलांजली देऊन आम्हीच काहीतरी शिष्ट आहे, म्हणून नवीन नवीन टूम काढून आणि स्वत:चा नुसता पैसे बनविण्याचा मार्ग आखलेला आहे. त्यात त्यांनी काहीही पापकर्म केली, तरी ती पापकर्म सुसंगतच त्यांना वाटतात आणि तसं ते आपल्या बुद्धीने असा चमत्कार घडवून आणतात, की हिप्नॉटिझमच्यामुळे त्या गोष्टी लोकांच्या डोक्यात बसतात आणि लोक ते मानू लागतात. या लोकांची स्थिती पुढे जाऊन कालांतराने वेड्यासारखी, पिसाटल्यासारखी होते आणि होणारच. कारण जे सत्य आहे, जे खरं आहे, जे विद्यमान आहे, ते मिळण्याचं साधन असायलाच पाहिजे. परमेश्वराने अमिबापासून आज आपल्याला मानव का केलं? कसं केलं? त्यांनी कोणती रचना आपल्यामध्ये केली? हे जे आपले आज व्यवहार चालले आहेत , हे कोणत्या सूक्ष्म शक्तीमुळे ह्याबद्दल आपल्या शास्त्रांमध्ये, इतकेच नव्हे पण इतर शास्त्रांमध्येसुद्धा पुष्कळ मर्जन झालेलं आहे. बायबलमध्येसुद्धा ह्याचा उल्लेख आहे. कुराणातसुद्धा याचा उल्लेख आहे. तसंच आपल्या सर्व शास्त्रांमध्ये याचा फारच विस्तारपूर्वक उल्लेख आहे. आणि प्रत्येक धर्मात एक गोष्ट लिहिलेली आहे, की तुम्ही आत्म्याशी ओळख करून घ्यायला पाहिजे. तुमचा परत जन्म झाला पाहिजे. तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे. जोपर्यंत तुमचा पुनर्जन्म होत नाही तोपर्यंत बाकीच्या सर्व गोष्टींना काहीही अर्थ लागत नाही. जेंट म्हणून एक फार मोठा शास्त्रज्ञ झाला आहे. त्याने असं सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला आत्मा आणि त्याचं द्वार मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतंही धर्मकार्य केलं तर त्यात एखाद्या राक्षसालाच तुम्ही पूजित असाल तरी तुमच्या लक्षात येणार नाही. कारण आत्म्यामुळेच संपूर्णत्वाला मनुष्य येतो आणि त्याचे डोळे उघडतात. म्हणजे असं की जर आता इथे वीज नव्हती तर तुम्ही जे काही पाहत होता ते अंधारात आणि अंधारात तुम्हाला काहीही दिसत नव्हतं. तेव्हा जे काही मिळेल ते सत्य असं तुम्ही धरून चालत होता. आत्मा हे अध्यात्माचे डोळे आहेत. ते उघडल्याशिवाय आपण आत्म्याबद्दल किंवा परमात्म्याबद्दल काहीही जाणू शकत नाही. आता हे करतांना आम्हाला काय केलं पाहिजे? त्याबद्दल आम्ही काय उपाययोजना केली पाहिजे ? असं लोकांचं म्हणणं आहे. एक सरळ माझा प्रश्न आहे, की तुम्ही अमिबाचे मानव झालात, तुम्ही काय केलंत? किंवा एखाद्या फळाला विचारावं, की तू एखाद्या बी पासून फळ झालास तू काय केलंस? कोणतीही जिवंत क्रिया ही आपोआप घडते. मानव कधीही कोणतेही जिवंत कार्य करू शकत नाही जोपर्यंत तो आत्म्याशी संबंधित होत नाही. हे सगळे मेलेलं कार्य आहे. जर विटा आहेत तर त्या मेलेल्या आहेत, त्यांचं जर घर बांधलं किंवा एखादं झाड जर पडलं त्याचा जर तुम्ही बसायला एखादा बाक वरगैरे केला, तर सगळं हे मेलेलं कार्य आहे. हे जिवंत १३ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-13.txt कार्य नाही. जिवंत कार्य मनुष्य तेव्हाच करू शकतो, जेव्हा त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश प्रगट होतो. मी आता आपल्याला कुंडलिनीविषयी सांगणार आहे. तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी कुंडलिनीचं स्पंदन बघू शकता. ती आमची ओळख आहे, मार्कंडेयांनी याची ओळख दिलेली आहे आमची, की त्यांच्या पायावर कुंडलिनीचं स्पंदन होईल. इथे असे पुष्कळसे लोक आहेत ज्यांनी असं कुंडलिनीचं स्पंदन पाहिलेले आहे. हजारो लोकांचं असं स्पंदन पाहिलेले आहे. ती त्रिकोणाकार अस्थीमध्ये स्पंदते. आम्ही त्याच्या फिल्म्ससुद्धा घेतलेल्या आहेत आणि लंडनला पुष्कळ लोकांच्यामध्ये हे कार्य होतं आहे. हे स्पंदन तुम्ही वर चढतांनासुद्धा बघू शकता. पण ज्या माणसांमध्ये काहीच रूकावट नसते आणि जे लोक पवित्र, साधे, सरळ असे लोक असतात, अशा लोकांना कुंडलिनी कधी चढते ते ही कळत नाही. एकदम निर्विचारिता येऊन त्यानंतर ते, हातातून चैतन्य वाहू लागतं. म्हणून माझं कार्य मी बहतेक खेडेगावात करते. शहरात मी कार्य करत नाही. कारण शहरात भामटे पुष्कळ आलेले आहेत. शहरातले लोक भामट्यांना भाळतात. त्यांना भामटे पाहिजे. काहीतरी सर्कस पाहिजे. त्यांना सत्य नको आहे. त्यांना कोणत्या तरी सर्कशीत आपणही उभं राहिलं पाहिजे असं वाटतं. खेडेगावातला मनुष्य सरळ, साधा आणि परमेश्वराला जाणणारा, ज्याला आपण स्पिरीच्युअल सेन्सिटिव्हिटी म्हणतो किंवा आध्यात्मिक संवेदनशीलता म्हणतो ती त्याला असते. रामाच्या वेळेला जेव्हा ते वनवासात गेले होते, तेव्हा सर्व गरिबांना, सर्व रस्त्यावरच्या लोकांना आणि जंगलातून फिरतानासुद्धा त्यांना माहीत होतं की हे श्रीराम आहेत. आता आपण म्हणतो की आपल्या इथे अष्टविनायक आहेत. अष्टविनायकांची ही भूमी का आहे? हे अष्टविनायक म्हणजे कोण? अष्टविनायक म्हणजे पृथ्वीतून निघालेली चैतन्य तत्त्व आहेत. विनायक हे त्याचं एक प्रतिक आहे. हे सगळ्यात मोठ प्रतिक आहे. ते ओळखलं पाहिजे. ते पावित्र्याचे प्रतिक आहे. परमेश्वराने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा श्रीगणेशाला निर्माण केलं. पहिल्यांदा पवित्रता निर्माण केली. पण गुरूंचा उलटा प्रकार असतो नेहमी. ते बरोबर पवित्रतेला नष्ट करून तिथे स्वैराचार करतात आणि तिथे भूतं आणतात. म्हणजे समजा एखादा देवीचा फोटो असला. तर त्या देवीसमोर काहीतरी स्वैराचार करायचा. हा तांत्रिकपणा आहे. त्यामुळे देवीचे चित्त तिथून हटतं. कारण घाणीकडे देवीचं चित्त रहात नाही. तिला घाण पसंत होत नाही. तिला सुगंध पाहिजे. तिला फुलं पाहिजे. जगातलं जेवढं सौंदर्य आहे ते देवीला पाहिजे. तिला घाण पसंतच होत नाही. व्यभिचार वगैरे असले घाणेरडे प्रकार तिला बघवत नाही. तिचं चित्त त्या जागेतून हटल्याबरोबर तिथं ते सैतानाचं राज्य आणून ठेवतात. आणि मग ते सैतानाचं राज्य तिथे आल्यावरती लोकांना भुरळ घालणं, त्यांना हिप्नटॉइज करणं त्यांच्याकडून पैसे काढणं, त्यांच्या पैशावर गमजा करणं, म्हणजे इतकी गलिच्छ दशा, इतकी ग्लानीची दशा आहे ती. अशा रीतीने हे गुरू लोक सुद्धा ठगवतात. पण त्याचा अर्थ असा नव्हे की खरे गुरू जगात नाही. जगात खरे गुरू आजही आहेत. पण बहुतेक जंगलात दडून बसलेत. मलासुद्धा भेटायला येतात आणि सांगतात, 'आई, तुम्ही १० -१२ वर्ष मेहनत करा, मग आम्ही येतो.' आजकाल जग भामट्यांचे आहे. राक्षसांचं आहे. हे राक्षस आजकाल आलेले आहेत. आणि राक्षसांवरच लोक भाळलेले आहेत. त्यांना सत्य नको. स्वत:चाच विनाश करण्याच्या मागे लागलेले आहेत. त्यांना स्वत:चा विनाश दिसत नाही. अशा जगात आम्हाला यायचं नाही आणि आम्हाला हे लोक क्रूसावर टांगतील किंवा आमच्यावरही हे लोक विषप्रयोग १४ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-14.txt करतील म्हणून आम्हाला यायचं नाही. तेव्हा आज ही स्थिती सहजयोगाची जरी असली तरी मला फार आनंद वाटतो की ह्यावेळच्या आमच्या महाराष्ट्राच्या दौर्यात अनेक लोक पार झालेत. एका क्षणात. एका क्षणात कुंडलिनी सटकन उठून ब्रह्मरंध्राला छेदून गेली. आता हे आपल्यामध्ये आहे किंवा नाही. आता आमच्या इथे दोन डॉक्टर्स आहेत आणि असे अनेक डॉक्टर्स, आमचे शिष्य लंडनला आहेत. आणि आमचं फार सॉलिड काम झालेलं आहे तिथं. परवा सुद्धा मेडिकल सायंसेसमध्ये माझे लेक्चर आहे. मी स्वत: मेडिसीन केलेले आहे, डॉक्टरांशी बोलायचं म्हणून. आणि लंडनलासुद्धा एका आम्ही डॉक्टरच्या बायकोचा कॅन्सर ठीक केल्यामुळे त्या डॉक्टरांनी स्वत:, ते फार मोठे डॉक्टर आहेत तिथले, डॉक्टरांच्यामध्ये एक कॉन्फरन्स ठेवलेली आहे. तिथे ही सर्व गोष्ट पुढे येणार आहे. तर आपल्यामध्ये ज्या शक्त्या आहेत, त्याचा संबंध परमेश्वराशी कसा लागतो हे मी आपल्याला सांगणार आहे. पहिला तर ऐतिहासिक संबंध आपल्याला सांगितला, की आजपर्यंत जे काही एक एक अनेक अवतार होत गेले त्या अवतारांचं आज फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. आजकाल एक ट्रम निघालेली आहे, की प्रत्येक अवताराला काहीतरी शिष्टपणा करून, आपल्या डोक्याच्या किल्ल्या फिरवून, लोकांना मूर्खात काढून आणि सगळ्यांचा अपमान करायचा आणि त्याला आम्हीसुद्धा अगदी शिष्ठासारखे संमत होतो. हे फार मोठं पाप आहे. अवतारांची थट्टा करणे. त्यांना समजून न घेतांना त्यांना कुत्सित लेखणे हे फार मोठं, भयानक काम, ते करू नये. पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, की तुम्ही कुठे आहात ? तुमची काय पात्रता आहे ? तुम्ही काय मिळविलेले आहे? आणि हा जो मनुष्य गुरू किंवा अशा गोष्टी बोलत असेल तर त्या माणसाने तरी काय मिळविलेले आहे ? त्याची काय स्थिती आहे? तो स्वत:च सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिंकत असतो, आजारी असतो. एकाही आजाराला त्याने बरं केलेले माहिती नाही. अशा माणसाच्या मागेसुद्धा आपले आजकालचे तरुण लागलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे की आपल्या देशात ही गोष्ट घडत आहे. परदेशात सोडून द्या. परदेशात तर इतके घाणेरडे लोक आहेत की त्यांना शिकवायला, तेच त्यांचे गुरू होतील असे आहेत. त्यांना सगळं माहिती आहे. पण ज्या कचऱ्यात ते जाऊन पडले, तिथून ते उठण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या लक्षात आलेले आहे. तिथल्या विचारक लोकांच्या लक्षात आलेले आहे, की आम्हाला आणून खड्ड्यात घातलेले आहे. आमची सगळी व्यवस्था चुकली. आमची मुलं वाया गेली, आम्ही वाया गेलो. त्या माणसांनी आमचे सर्व तऱ्हेचे जेवढे काही मंगल होते ते संपवून टाकलेले आहे. हे फ्रॉइडबद्दल सगळे लोक तिथे जाणत असूनसुद्धा आज तो फ्रॉइड आमच्या डोक्यावर येऊन बसलेला आहे. इतकी जुनी आपली परंपरा आहे, त्या परंपरेचा तरी आपण अभ्यास केला पाहिजे. त्याला जाणलं पाहिजे. आपल्याकडे एकाहून एक अत्युत्तम लेखक आहेत आणि त्यांनी फार सत्यावर लिहिलेले आहे. त्याची माहिती घेतली पाहिजे आणि त्यानंतर त्या भामट्यांच्याजवळ जाऊन काही शिकलं पाहिजे. कळकळून हे जाणलं पाहिजे, की तुम्ही कोणत्याही परमेश्वराच्या कार्यासाठी, लेक्चरसाठी, परमेश्वराच्या स्मरणासाठी किंवा कुंडलिनी जागृतीसाठी पैसा देऊ शकत नाही. हे हलकटपणाचं लक्षण आहे. कुंडलिनी जागृती ही आपोआप घडते. पैसे देऊन तुम्ही एका बी मधून अंकूर काढू शकता का? जे लोक दुसर्यांच्या पैशावर जिवंत राहतात, ते अत्यंत दरिद्री लोक आहेत. त्यांनी पैसे जमवले आहेत भामटेपणाने, १५ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-15.txt त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. आपल्या शहरांमधून ही फार प्रथा वाढलेली आहे, धुळ्याच्या लोकांनासुद्धा सांगू इच्छिते, की जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे विकले नाही गेलात तोपर्यंत अक्कल आपली शाबूत ठेवा आणि जाणून घ्या की परमेश्वरी तत्त्व हे सगळ्यात महत्त्वाचं असल्यामुळे ते मिळालेच पाहिजे, मिळणार. आपोआप घटित होऊन मिळणार आहे. आणि त्यासाठी जर कोणी मनुष्य पैसे देत असेल तर त्याला स्पष्ट मी आज म्हणून सांगावं की परमेश्वराला तुम्ही विकत घेऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही पैसाही देऊ शकत नाही. परमेश्वराच्या नावावर काहीही विकतात याचं मला आश्चर्य वाटतं. म्हणजे ज्याला विकताच येत नाही त्याच्या नावावर सगळे विकतं. ही फार आश्चर्याची गोष्ट आहे आणि हे समजून असलं पाहिजे. कारण आम्ही एका शहरात आलेलो आहोत. म्हणून आम्ही शहरवासियांना सांगतो, की तुमच्याजवळ पैसे आहेत. तुमच्या खिशात पैसे आहेत, 'जिथे गुळ तिथे माशी'. तुमच्याजवळ पैसे आहेत हे या लोकांना माहिती आहे. सगळ्या पैसेवाल्यांच्या शरीराला लागलेली ही भुतं आहेत. त्यांचा एकूण एक पैसा काढून घेतल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही. म्हणून सांभाळून असलं पाहिजे, की परमेश्वरी तत्त्वासाठी तुम्ही पैसे देत असला, तर अहंकारपोषक विचार तुम्हाला तुम्हाला विकून काढतील. नंतर लुटल्यावर 'माताजी, आम्हाला लुटून घेतलं, प्रगट झालं पाहिजे. आता तुम्ही अवेअरनेस म्हणतात ही या थराला देऊन, तुमच्या अहंकाराला बळावून आणि ते मात्र तुम्ही ओरडत माझ्याकडे याल. जर एखादा लहानसा थेब म्हणून. जे सत्य आहे ते आपोआप समुद्रापासून अलग झाला, मानव झालात, ही चेतना, ज्याला तर तो काही समुद्रापर्यंत मिळालेले आहे. त्याच्यासाठी आली. हे तुम्हाला कस सहजच येऊ शकत नाही. तुम्ही काही उड्या मारल्या नाहीत काहीही केलेले नाही. म्हणून हे किंवा धरपकड केलेली नाही किंवा तर समुद्राला त्या थैंबापर्यंत यावं लागतं. आपोआपच घटित झालं पाहिजे. ही परमेश्वराची कृपा आहे. जर एखादा लहानसा थेंब समुद्रापासून अलग शकत नाही. तर समुद्राला त्या थेंबापर्यंत झाला, तर तो काही समुद्रापर्यंत येऊ यावं लागतं. परमेश्वरालासुद्धा हा प्रश्न आहे. कारण त्याने सर्व सृष्टी निर्माण केली आणि सर्व सृष्टीचं त्याने इतकं सुंदर आजपर्यंत जे काही आहे ते घडवलं. त्यानंतर त्या सृष्टीला काही तरी अर्थ यायला पाहिजे. ज्या मानवाला त्याने इतक्या मेहनतीने घडविलेले आहे. त्याच्यात हजारो नाड्या आणि हजारो इंद्रिय स्थितीमध्ये त्याशिवाय रोजच्या वागण्यातसुद्धा, व्यवहारातसुद्धा इतके सतर्क असतात. अशा या परमेश्वराला त्या असून, मानवाला अर्थ दिलाच पाहिजे. म्हणजे समजा आम्ही हे मशिन घडविलेले आहे आणि ह्याला जर मेनला लावलं नाही तर ह्याला काही अर्थ नाही. तसेच जोपर्यंत तुम्ही मेनला लागत नाही, तोपर्यंत तुम्हालाही अर्थ नाही. पण ते ह्यांना ही जमत नाही. तसेच तुम्हालाही जमणार नाही. याचा अर्थ असा नव्हे, की आम्हीच काहीतरी करतो आहे किंवा आम्ही केलेले आहे त्याच्यात. हे समजण्यासारखं आणि सोप तत्त्व आहे. एखादा दीप जर पेटलेला नसला पण तयार असला तर एक पेटलेला दीप येऊन त्याला प्रज्वलित करू शकतो. अगदी सोपे तत्त्व आहे ते. परमेश्वराने तुमचा दीप ठीक केलेला आहे. अशा त्हेने दीप तुमच्यामध्ये आहे. हे बघण्यासारखं आहे आणि हे समजून घ्यावं. ह्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये ही कुंडलिनी, तुमची आई, प्रत्येकाची आई ती परमेश्वराने तिथे बसवलेली १६ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-16.txt आहे. ही समजा तुमची टेप आहे जन्मजन्मांतरातली, इथे बसवलेली आहे, त्रिकोणाकार अस्थिमध्ये साडेतीन वेटोळे घालून. आता हे सगळे म्हणतील, लोकांना सांगायला कुंडलिनी वाले लेक्चर देतात, त्यांना काही माहीत नसतांनासुद्धा लेक्चर देतात आणि बोलतात त्याच्यावर. ही तुमची आई आहे, प्रत्येकाची आई आहे. आणि त्याच्याखाली जे चक्र आपल्याला दिसते आहे, ज्याला मूलाधार चक्र म्हणतात, त्याच्यामध्ये श्रीगणेश बसविलेला आहे. तो कशाला ? तो एवढ्यासाठीच, की कुंडलिनीचं रक्षण झालं पाहिजे. कुंडलिनीच्या लज्जेचं रक्षण झालं पाहिजे, जी गौरी आहे. तिने गणेश बसवलेला बाहेर. गौरी तुमची आई आहे. ती वाट बघते आहे त्या दिवसाची जेव्हा असा कोणीतरी अधिकारी तिच्यासमोर येईल, ज्यावेळी ती तुम्हाला पुनर्जन्म देऊ शकते. ती अनेक जन्मातून तुमच्याबरोबर आलेली आहे. ती तिथेच स्थित आहे आणि खाली नुसता गणेश बसविलेला आहे. आता गणेश तत्त्वाबद्दल जितकं सांगावं तितकं थोडं आहे. पण हे बाळाचं तत्त्व आहे. लहान बालक जसा अबोध असतो, इनोसंट असतो तसं हे तत्त्व परमेश्वराने आपल्यात बसवलेले आहे. आता मुख्य म्हणजे या लोकांचं कार्य असतं की जो इनोसन्स आहे तोच तोडून टाकायचा म्हणून. तुमच्यातला गणेशच संपवून तुमचा टाकायचा. म्हणजे तुमची कुंडलिनी काही वाचू शकत नाही. ते बालक आहे. त्याला काही समजत नाही. अबोध आहे. म्हणून त्याला तिथे बसविलेले आहे. सहजयोगाच्या वेळेला तुम्हालाही त्या बालकासारखे अबोध असायला पाहिजे. नाहीतर तुमची कुंडलिनी वर येणार नाही. आणि होते ते इथे. ज्यावेळी कुंडलिनी चढते त्यावेळेला गणेश सांगतो, की आता हातामध्ये चैतन्य येत आहे. तर कुंडलिनीला आदेश येतो, की ठीक आहे आता तुम्ही उठावं आणि ही घटना घटित होते. आपण गणेशाला पूजतो, पण गणेश म्हणजे काय ते आपल्याला माहीत नाही. आता त्याबद्दल सगळे सांगायचं म्हणजे कठीण आहे. पण तरीसुद्धा गणेशाचा आणि कार्बनचा अगदी जवळचा संबंध आहे. हे तत्त्व प्रत्येक मानवात आहे. त्याचा नाश सर्रास चाललेला आहे. पण त्याचाच नाश झाल्यावर तुमचा होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा त्याचाच नाश करण्याच्या मागे लोक आहेत. म्हणजे तुमचेच पावित्र्य नष्ट केल्यावर मग ते तुमचाही नाश करू शकतील. ही त्यांची प्रथा आहे. हा गणेश खाली बसलेला, ज्यावेळी त्याच्यात व्हायब्रेशन्स येतात तेव्हा जागृत होतो आणि जागृत झाल्यानंतर कुंडलिनीला इशारा करतो, की आता तुम्हाला वर चढायला हरकत नाही. आता लक्षात घेतलं पाहिजे, की हे जे सातवं चक्र आहे, ह्या चक्राला कुंडलिनी भेदत नाही. कुंडलिनी वरच्या सहा चक्रांना भेदते. खालचं चक्र जसंच्या तसं असतं. तेव्हा हे असे घाणेरडे प्रकार करून कुंडलिनी जागृत करणारे महामूर्ख फक्त तुमचं पावित्र्य नष्ट करून, तुमची सगळी पर्सनॅलिटी संपवून टाकण्याच्या मागे आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते ही तुमच्याकडून पैसे घेऊन. स्वत:ला अशा महामूर्खात पाडू नका. आणि विचार करा. तुम्हाला काय मिळालं आहे? परमेश्वराने हे तत्त्व किती मुश्किलीने इथे बसविलेले आहे! ते तिथे जागृत करून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र हा म्हणूनच महा राष्ट्र आहे, मोठा देश आहे आणि त्यातली माणसं तुटू शकणार नाहीत. कारण इथे अष्टविनायकांचं जे साम्राज्य चाललेले आहे, त्यांच्यातून जे व्हायब्रेशन्स येतात, त्यांच्यामुळे सगळं वातावरणच मुळी भारीत आहे. पुष्कळांचं असं म्हणणं आहे, की ही मूर्तीपूजा आहे. हे त्यांना कसं सांगायचं, की हे पृथ्वीतून निघालेले चैतन्य तत्त्व आहे. कारण त्यांच्या हातातून चैतन्यच वहात नाही मुळी. ज्यांच्या हातातून १७ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-17.txt चैतन्य वहात नाही त्यांच्याशी काही बोलण्यात अर्थ नाही. म्हणून मी म्हणते, की जोपर्यंत आत्म्याची परीक्षा होत नाही, तोपर्यंत धर्माच्या बाबतीत तुम्ही काहीही केलं तरी त्याला काहीही अर्थ लागत नाही. जसं टेलिफोनचं कनेक्शन लागल्याशिवाय तुम्ही टेलिफोन चालवला तर त्याला काहीच अर्थ नाही, तसंच आहे ते. कुंडलिनी ही जागृत होऊन तुम्ही पार झालंच पाहिजे, ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर हातातून हळूहळू व्हायब्रेशन्स वहायला लागतात. आता याची व्यवस्था आपल्यामध्ये कशी केलेली आहे, ते मी आपल्याला सांगते. ह्याच्यामध्ये आम्ही आपल्याला फक्त तीन नाड्या दाखविलेल्या आहेत. एक उजवीकडे, एक डावीकडे, एक मधोमध. ह्या तीन नाड्या, ऑटोनॉमस नव्व्हस् सिस्टीम ज्याला म्हणतात, स्वयंचालित, त्यांना पोषण करतात. ह्या सूक्ष्म नाड्या आपल्या मणक्याच्या हाडांमध्ये असतात. ह्या तीन नाड्या म्हणजे परमेश्वराच्या तीन शक्त्या आहेत. त्या आपल्यामध्ये कार्यान्वित करतात. पैकी डावीकडची जी नाडी आहे, जिला इडा नाडी असं म्हणतात, त्यामुळे आपलं अस्तित्व असतं. हे शिवतत्त्व आहे. ह्यामुळे आपल्यामध्ये अस्तित्व असतं. जर ही नाडी नसती, तर आपल्यामध्ये अस्तित्व आलं नसतं. आपल्या इच्छा, भावनासुद्धा ह्याच नाडीमुळे जागृत होतात आणि कार्यान्वित असतात. तिला इडा नाडी आणि चंद्र नाडी असेही म्हणतात. आपण ऐकलेले आहे, हठयोगामध्ये 'फा' जे आहे ते ह्या नाडीचं नाव आहे. ही नाडी परमेश्वराची ती शक्ती, जिला आम्ही महाकाली म्हणतो. त्या शक्तीमुळेच स्थित असते. आता संस्कृतमध्ये त्याला नाव आहे महाकाली, इंग्लिशमध्ये नाही, त्याला आम्ही काय करणार! इंग्लिश लोकांचे ज्ञान इथे आणून सांगण्यासारखं इथे काहीही नाही. त्यांचं राजकारण वरगैरे काहीही असेल, पण धर्माच्या बाबतीत त्यांनी काही मिळविलेले नाही. आपली इतकी जास्त परसत्ता डोक्यावर नाचलेली आहे, की जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले असले तरी स्वत:चं अस्तित्व अजून आपण जाणलेले नाही. म्हणून आपल्या हिंदुस्थानात ज्या ज्या लोकांनी फार मोठ्याल्या गोष्टी शोधून ठेवलेल्या होत्या, त्याला आपण तिलांजली दिलेली आहे. इतकच नाही पण आज गांधीजींनाही आपण विचारत नाही. पण ही मात्र आपण घोडचूक करीत आहोत. कारण सगळ्या सायन्सनी जेव्हा सर्व गोष्टींचा शोध लावला त्यानंतर ते त्याच स्थितीत जाऊन पोहोचले आहेत की ते असं म्हणतात की कुंडलिनी जागृती ही घटना घटित झाली पाहिजे. आणि त्यातले पुष्कळ लोक ह्या स्थितीला पोहोचलेले आहेत की ही घटना काहीतरी ट्रिगरिंगमुळे होते. ती बुद्धीमुळे होऊ शकत नाही, कोणत्या कार्यामुळे होऊ शकत नाही. पण काहीतरी ट्रिगरिंगमुळे होते. आदि शंकराचार्यांनी सांगितले आहे, 'न योगे न सांख्येन', कशाने होणार? वाद-विवाद करून होणार नाही. नाचून होणार नाही. कशाने होईल ? आईच्या कृपेने होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. विवेक चुडामणीसारखा मोठा ग्रंथ शंकराचार्यांनी लिहिल्यावर दुसरा ग्रंथ त्यांनी सौंदर्य लहरींवर लिहिला. त्याच्यामध्ये सगळे त्यांनी आपल्या आईचे वर्णन आणि या लहरींचं वर्णन केले आहे. ज्याला आपण चैतन्य लहरी म्हणतो. लोकांनी विचारलं, तुम्ही हे काय सुरू केलं? म्हणे, ही सगळी विद्या आहे, बाकी सगळी अविद्या आहे. ही गोष्ट खरी आहे. कारण हे सर्वव्यापी आहे. हे तत्त्व, हे परमेश्वरी तत्त्व कार्यान्वित असतं आणि जगाचं एक पानसुद्धा परमेश्वराच्या इच्छेशिवाय हालत नाही. हे ते जाणल्याशिवाय, हे तत्त्व ओळखल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आपली स्थिती अशीच आहे, जसे काही खेड्यातले लोक एरोप्लेनवर बसले आणि त्यांनी असं म्हटलं, की १८ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-18.txt या एरोप्लेनला फार बोजा नको म्हणून कमी सामान घेऊन जा. त्यांनी आपल्या डोक्यावरच सामान ठेवलय अशी आपली स्थिती आहे. जोपर्यंत ही घटना तुमच्यात घटित होत नाही. ती होईलच असं आम्ही हमखास सांगत नाही किंवा आम्ही त्याचा ठेकाही घेतलेला नाही. झाली तर ही तुमची स्वत:ची संपदा, तुमची पुण्याई, परमेश्वराने तुम्हाला दिलेला हा विशेष आशीर्वाद असणार आहे, तो घ्यावा. आम्ही मध्ये बसलेलो आहोत आणि नाही झाली तर त्यात आमचं चुकलेले नाहीये. त्यात तुमचेच कुठेतरी चुकलेलं असेल किंवा तुम्हाला काहीतरी मानसिक त्रास असेल किंवा तुम्हाला काही तरी शारीरिक त्रास असेल किंवा तुम्हाला बौद्धिक असेल किंवा तुमचे धार्मिकसुद्धा काहीतरी चुकलेले असेल. त्यामुळे सुद्धा ती कुंडलिनी उठत नाही. पण ह्या कुंडलिनीचं हे वैशिष्ट्य आहे की जेव्हा ही कुंडलिनी वर उठते तेव्हा ती या सर्व चक्रातून आतमध्ये जातांना ही जी डावीकडची ओळ आहे, जिला आपण इडा नाडी असं म्हटलेले आहे, तशीच जी उजव्या हाताची नाडी आहे जिला आपण पिंगला नाडी असे म्हणतो या दोन्ही नाड्यांना जागृत करत जाते. म्हणजे जसं उजवी आणि डावीकडची नाडी मिळून मधोमध ब्रह्मचक्र तयार होतं. जेव्हा ही कुंडलिनी ह्या मधल्या चक्रातून छेदन करते त्यावेळेला दोन्ही बाजूला त्यांच्यापासून लाभ होतो. आता तिकडची जी नाडी आहे त्याने आपण शारीरिक व बौद्धिक क्रिया करीत असतो. जेवढं आपलं प्लॅनिंग आहे, फ्युचरचे जेवढे विचार आहेत तो सगळा आपण ह्याने करतो. ह्या दोन नाड्या आपल्यामध्ये सूक्ष्मामध्ये इडा आणि पिंगला आणि बाहेर जड तत्त्वात त्यांना लेफ्ट अँड राइट सिंपथेटिक नव्हस सिस्टीम असं म्हणतात. नंतर ही जी सहा चक्रं वर आहेत, १, २, ३, ४, ५ आणि ६ ही चक्रसुद्धा अनुक्रमाने असं म्हटलं आहे मी आपल्याला, की तुम्हाला एक इतिहास आहे. आपल्या अनेक उत्क्रांतीच्या काळात ही आपल्यामध्ये बांधली गेलेली आहेत त्याला माइल स्टोन म्हणतात आणि त्या प्रत्येक चक्रावर एक-एक दैवत आहे. ते ओळखलं पाहिजे. जाणलं पाहिजे आणि त्यांना जागृत कसं करायचं हे जर तुम्हाला समजलं तर सगळी तुम्हाला परमेश्वर तत्त्वाची विद्या आहे. जर ते तुम्ही जाणलं नाही तर बाकी सगळी अविद्या आहे. आता आम्ही कॅन्सरचे रोग बरे करतो. यात काही शंकाच नाही. आम्ही अगदी केलेले आहे. लंडनलासुद्धा केलंय. पण आमचा हा धंदा नाही रोग बरा करण्याचा. आजच आम्हाला जयसिंगराव म्हणत होते, की माताजी, आम्ही पाच वर्षापासून पार झालो आहोत. आमच्या फॅमिलीमध्ये. वडील ह्यांचे बिछान्यावर नेहमी असायचे आणि सगळ्यांना आजार जेव्हा पासून आम्ही पार झालोय, तेव्हापासून आमच्याकडे एक डॉक्टर म्हणून आला नाही. नाहीतर प्रत्येक आठवड्याला त्याची फी असायचीच आमच्याकडे. कारण जेव्हा ही कुंडलिनी वर चढते तेव्हा ती उजव्या बाजूची जी नाडी आहे तिला ती पोषण करते. त्यामुळे आपल्याला शारीरिक लाभ होतो. त्याचप्रमाणे डावीकडची जी आपली कंडिशनिंग आहे ती सुद्धा संपून जाते. आता फ्रॉइड वर्गैरेंनी जे सांगितलं आहे, तुमच्यामध्ये जे कंडिशनिंग आहे, ते काढले पाहिजे. म्हणजे परत एकात एक कार्य, जर माणसातले कंडिशनिंग पूर्णपणे काढले, तर त्याच्यात अहंकार येतो. म्हणजे इथे आपण बघतांना दोन नाड्या आहेत. त्यापैकी डावीकडची जी आहे, ती इडा नाडी आहे. हिला फ्रॉइडने फक्त ओळखले ही जी नाडी, इडा नाडी आहे, या इडा आहे. त्याला सगळे काही माहिती नाही. थोडं बहुत माहिती आहे . तर १९ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-19.txt नाडीमुळे फक्त आपल्याला मानसिक जे काही कंडिशनिंग होतं म्हणजे आपलं पास्ट त्याने बनते. आपलं गतं आहे ते बनतं. म्हणजे मी आता आपल्याशी बोलते ना ते सगळे त्याच्यात जातं. त्या प्रदेशात, त्या एरियामध्ये जातं. पण आपल्याला फ्युचरपण आहे. आपल्याला भविष्यपण आहे आणि आपल्याला वर्तमान, प्रेझेंटपण आहे. याची व्यवस्था मात्र काही फ्रॉइडला आली नाही. कारण आंधळे असल्यामुळे अर्धवट बघितलं आणि स्वत: अत्यंत घाणेरडा मनुष्य असल्यामुळे घाणेरड्याच्या डोळ्यातून सगळं घाणेरडं दिसतं. म्हणून त्याने अशी विचित्र, काहीतरी एक नवीन टूम काढली. फारच एकांगी आहे तो आणि त्या एकांगीपणामुळे नुसतं तुमच्याकडे जे कंडिशनिंग आहे ते काढलं पाहिजे असा त्याने एक नियम काढला. पण जर मनुष्याला काही सुसंस्कार नसले तर तो किती अहंकारी होतो, त्याला किती इगो येतो, हे इथे बघता येईल आपल्याला. कारण डावीकडची ही जी बाजू वर जाते त्याने सुपर इगो म्हणून एक संस्था तयार होते आणि उजवीकडून जे आपण कार्य करतो त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून, इगो म्हणून ही संस्था तयार होते. आता इथे हे सगळे सायकॉलॉजीच आहे. म्हणजे फ्रॉइड नंतरचं हे आलं. पण फ्रॉइड नंतर कोणी कोणाला मानीत नाही. त्यालाच मानत होते. त्याच्यानंतर ह्यूंग आले. त्यांनी एवढं कार्य केलं. कोणी जाणत घाणेरडेपणा पाहिजे. तेव्हा हे जे सुपर इगो म्हणून नाही त्यांना. कारण लोक घाणेरडे आहेत. त्यांना येतो, की समजा एक लहान मूल आहे. आहे पूर्णपणे. त्यावेळेला त्या मुलाला आपल्यामध्ये येतं, प्रति अहंकार तो असा आईजवळ दूध पीत आहे. ते आनंदात एकीकडून दुसरीकडे आईने केलं, इगो जागृत होतो. असं का केलं? हे कंडिशनिंग झालं. त्याने सुपर जरी आपल्याला तर राग येतो. त्या वेळेला त्याचा स्वातंत्र्य मिळालेले तेव्हा आई त्याला म्हणते चूप रहा. असले तरी स्वत:चं इगो जागृत होतो. हे दोन्हीही माणसामध्ये. म्हणजे मधोमध जागा अस्तित्व अजून आपण समतोल असायला पाहिजे जाणलेले नाही. होऊन कुंडलिनी जेव्हा वर जाते आणि कुंडलिनी वर ब्रह्मरंध्र छेदून जाते. तेव्हा ते दोन्हीकडून खाली होतात. तुम्ही अगदी बघू शकता छेदतांना. जाते. आणि ही जी सहा चक्रं आहेत त्यांची तुम्हाला दिसेल इथे टाळू अशी आतमध्ये वेगवेगळी नावे आहेत. आता इतका वेळ नाही, सगळं सांगायला. पण तरीसुद्धा सांगायचे हे, की जेव्हा कुंडलिनी आपल्या ब्रह्मरंध्राला छेदते, तेव्हा सामूहिक चेतना आपल्यामध्ये होते म्हणजे अॅक्च्युअलायझेशन ज्याला आपण म्हणतो. घटना होते. सांगावं लागत नाही. म्हणजे आपली कुंडलिनी कुठे आहे हे लोक सांगू शकतात. झालेले आहेत. आपली जी बोटं आहेत त्या बोटांमध्ये सबंध सिम्पर्थॅटिकची चक्र आहेत. उजव्या आणि ते पार डावीकडचं कोणतं चक्र धरलेले आहे ते या बोटांवरून कळू लागते. त्याच्या आधी कळत नाही. म्हणजे आत्मज्ञान झाल्यावरच आपल्याला हे कळतं, की आपल्यात काय चुकलेले आहे आणि सामूहिक चेतना जागृत झाल्यामुळे ही जागृती होते. हे काही लेक्चर होत नाही की भाषण होत नाही, की काही पुस्तक होत नाही. पण ही घटना तुमच्यात घटित होते. तुम्ही ते होता. एक अतिमानव होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही सामूहिक चेतना समजते आणि लहान मुलंसुद्धा सांगू शकतात की तुमचं कोणतं चक्र धरलंय. आता, माझी नात फक्त अडीच वर्षाची आहे. आमची एक इंग्लंडची मुलगी आली होती, आता गेली ती परत. ती घरी गेली आणि तिने तिला विचारलं की, 'माझं कोणतं चक्र २० 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-20.txt धरलंय?' तिने सांगितलं, 'लेफ्ट नाभी आणि लेफ्ट विशुद्धी.' आणि तिचं धरलेले होते. कारण बोटच मुळी जळतात. हे सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे. तुम्ही सब्जेक्ट होतात, तुम्ही कर्ता होता. आता उदाहरणार्थ एक माणूस घाणीतून गेला तर त्याला घाण वाटेल आणि एक जर जनावर घाणीतून गेले तर त्याला घाणीचा काही त्रास होत नाही. माणसाला होतो. आजकाल तर असे लोक मी पाहिलेत, की त्यांना सुगंधाचा त्रास होतो. म्हणजे किती घाणेरडे असले पाहिजे. तर ज्यांना घाणीचा त्रास होतो, ते मानव आहेत. पुढे गेल्यावर जेव्हा ही जागृती होते तेव्हा त्यांना नैतिक घाणेरडेपणाचा त्रास व्हायला लागतो. म्हणूनच म्हटलं की सगळ्यांची व्यसनं सुटली आपोआप. ती काय आम्ही दारूबंदी वरगैरे काढली नाही. कारण आत्म्याचा आनंद आत पाझरू लागला, म्हणजे आपोआप हे सगळं सुटतं. आपण बोअर होतो म्हणून या वस्तू घेतो. पण मनुष्य इतक्या आनंदात रममाण होतो, त्या आत्म्याच्या आंदोलनात, इतका तो समाधानी बनतो, संतोषी बनतो, तसंच सबंध त्याचं व्यक्तित्व इतकं सुंदर होऊन जातं, इतकं आकर्षक होऊन जातं आणि त्याला म्हणतात डायनॅमिक होऊन जातं. त्यांनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. जी मुलं शिकत नव्हती, ती क्लासमध्ये फर्स्ट क्लास येऊ लागली. ही गोष्ट अगदी खरी आहे. हे घटित होते. जेव्हा अशी घटना माणसामध्ये होते, तेव्हा तो कोणत्याही व्यसनाकडे जात नाही. कारण त्याचं तिकडे चित्तच जात नाही. त्याचं चित्त इतकं जास्त आलोकित असते, की तो अशा घाणेरड्या वस्तूंकडे जातच नाही आणि आपोआप ती गोष्ट सुटते. अगदी आतून तुम्हाला कळतं, की हे चक्र धरलेले आहे, इथून कुंडलिनी चाललेली आहे, वर कुठे पोहोचलेली आहे. जरी ती तुम्हाला दिसली नाही तरी आतून तुम्हाला कळेल की ह्या माणसाची कुंडलिनी कुठे चाललेली आहे आणि वर कुठे उडालेली आहे. हे संबंधच्या संबंध शास्त्र पूर्वीपासून केलेले आहे. आज केलेले नाही. कबीरानेसुद्धा सहजयोग सांगितला. पण कबीराचेही खोबरं केलंय काही काही लोकांनी. मला तर ही कमाल वाटते लोकांच्या डोक्याची, की सगळ्याचं खोबरं हे कसे करू शकतात आणि तुम्ही ते मानून तरी कसे घेता? कबीरनेसुद्धा याच्यावर लिहिलेले आहे, नानकांनी लिहिले आहे, तुकारामबुवांनी लिहिलेले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तर फारच स्पष्टपणाने लिहिलेले आहे. तर सर्वप्रथम गोष्ट आपल्या देशाची ही आहे, की आपल्याला मर्यादा आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. आपला देश फार मोठा आहे. त्या लोकांजवळ पैसे असतील, पण लक्ष्मीत्त्व नाही त्यांच्याकडे. अगदी घाणेरडे लोक आहेत. तुम्ही जर त्यांच्याबद्दल जाणत असाल, तर त्या देशात जाऊन बघा. ही आमची मंडळी इथे आल्यावर त्यांना इतकं आश्चर्य वाटतं, की इथल्या लोकांना किती प्रेम आहे ! तिथे जर कोणाच्या घरी तुम्ही गेलात तर एक कप कोणी चहा देणार नाही. श्रीमंत, लॉर्ड असला तरीसुद्धा! एक एक कवडी सांभाळून ठेवेल तो. आपल्याकडे इकडे-तिकडचे लोक आले तर जोडे, वहाणा विकत नेतील फार तर. तिथे जर एखादा पाहुणा घरात आणला तर बायका, मुली सगळे घेऊन पळून जायचा. इतकी तिथे घाण साचलेली आहे त्या देशांमध्ये. आपल्याला असं वाटतं, की ते लोक फार सुखी आहेत. स्वीडनमध्ये, जेथे सगळ्यात जास्त सुबत्ता आहे, फार पैसा आहे. त्याठिकाणी सगळ्यात जास्त २१ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-21.txt आत्महत्या होत आहेत. सगळ्यात जास्त! म्हणजे दहापैकी नऊ लोक आत्महत्येचाच विचार करीत असतात. म्हणजे अशा सुख आणि सुबत्तेला काय करायचं! लंडनमध्ये, जे स्टॅटिस्टिक निघालं आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे, की इंग्लंडमध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मूलं मारून टाकतात आई-वडील आणि तीन फॅमिलीमधून एक फॅमिलीच्या आई-वडिलांनासुद्धा लोक मारायच्या मागे असतात. स्टॅटिस्टिक घेतल्यावर. आणि बेशरमपणे सांगतात. काही त्यांना शरम नाही. बेशरमपणा हे त्यांचं मुख्य तत्त्व आहे. त्यांना शरम कशाशी खातात हे माहिती नाही. अगदी बेशरमसारखं रहायचं. तिथेसुद्धा आम्ही सहजयोग उभा केला. आज असे आमचे तीनशे हिरे आहेत तिथे आणि इतके विद्वान आहेत. सगळे तुम्हाला समजवून सांगतील. मी इतके आजपर्यंत पाहिले आहेत. आमचे शिष्य पुष्कळ आहेत तिथे. त्यांनी एवढं कार्य केलेले आहे. इतक्या लोकांनीसुद्धा आणि इतके खोल उतरले आहेत सहजयोगामध्ये. आणि इतकी त्यांना माहिती आहे. पण असे फारेनर्स पाहिले नाहीत की ज्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे. आणि प्रत्येक वाचून, त्यातली सगळी माहिती काढून, त्याच्याबरोबर पत्ता लावून, हे कसं आहे, काय आहे. त्याचा सबंध अभ्यास करून सहजयोगाला त्यांनी जीवन घेतलेले आहे. आणि हे कार्य करीत आहेत. मूर्खासारखे ओरडत बसत नाही. कोणी आपली चक्री फिरवावी आणि त्याच्यामागे धावत सुटत नाही. एक एक अक्षर ते समजून घेतात, की हे कुंडलिनी कशी चढते ? ती वर कशी न्यायची? त्याच लोकांनी हजारो लोकांना बरं केलेले आहे. आजकाल मी कोणाला बरं करीत नाही. ही शक्ती आपल्या आतून वहात असते. वाहून चक्र कोणत आहे, ते चक्र कोणतं आहे? आणि ह्या चक्रावर अहो, अगदी साधारण, खेड्यात राहणाऱ्या लोकांनी इतका चमत्कार करून दाखविला आहे. पण आम्ही इतकी पब्लिसिटी करीत नाही ह्या गोष्टीची. होते आपोआपच. कुंडलिनीच्या नावावरसुद्धा अनेक गोष्टी लोक विकतात. कुंडलिनीमध्ये सामूहिक चेतना झाली पाहिजे, पहिली गोष्ट. मनुष्य सामूहिक चेतनेत उतरला पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की दुसर्याची कुंडलिनी कुठे आहे? माझ्याकडे पुष्कळ लोक येतात की, 'माताजी, आमची कुंडलिनी उठलेली आहे.' 'बरं, बसा म्हटलं.' लागले उडायला घोड्यासारखे. नाहीतर बेडकासारखे उडतात. 'अहो,' म्हटलं, 'हे काय ?' 'आमची जागृत झाली म्हणून आम्ही उडतोय.' आता म्हटलं, 'तुम्हाला अतीमानव व्हायचंय की घोडा व्हायचंय? नाहीतर काय बेडून व्हायचंय? नाहीतर उद्या पिसवा व्हाल .' गुरासारखे ओरडता, हे काय मानवाचं लक्षण आहे. आणि मी अतीमानव, परमेश्वराच्या गोष्टी करते आणि हे काय मांडलय तुम्ही माझ्यापुढे. 'ते आमच्या गुरूंनी सांगितलं.' 'असं, का!' 'आम्हाला त्यांनी नाव दिलेले आहे.' झालं. 'माळ दिलेली आहे.' झालं. कुंडलिनी कुठे आहे ? ती चढली की नाही वर? मी म्हटलं, 'तुमची कुंडलिनी चढली आहे वर तर यांची सांगा कुठे आहे?' 'ते कसं सांगायचं. ?' म्हटलं, 'कशी चढली आहे त्यांची कुंडलिनी?' 'ह्यांना कोणता रोग झालेला आहे ते सांगा?' ते सांगता येत नाही. 'तुम्हाला काय त्रास आहे ते सांगा, चक्रांवर.' 'माताजी, ते काही आम्हाला माहिती नाही. चक्रं वगैरे असतात असं आमच्या गुरूंनी फक्त सांगितलेले आहे.' बरं. आणि हे तुम्हाला दिले आहे. शेवटी मग पागलखान्यात सगळ्यांनी जायचं. व्यवस्थित. किती पापकर्म होऊन रातहिले आहे जगामध्ये. पैसे मिळविण्यासाठी यांनी स्मगल करावं, काय करायचं असेल ते करावं. वाट्टेल ते धंदे करावेत. २२ 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-22.txt ३ आपल्यामध्ये स्थित या चौदा अवस्थांच्या माध्यमाद्वारे आपल्या पुनर्जन्माविषयी आम्ही बोलत आहोत. हे स्तर पार केल्यानंतर आपण एका सुंदर कमळासारखे फुलतो. ईस्टरला अंडे भेट देणे या गोष्टीचे प्रतीक आहे की हे अंडे सुंदर पक्षी बनू शकते. प.पू.श्री माताजी, इटली, १९.४.१९९२ प्रकाशक निर्मल ट्रान्सफोर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१ , ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in 2015_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-23.txt या होळीच्या दिवशी आपल्याला अशा गोष्टी जाळल्या पाहिजेत ज्याने आपले चित्त खराब होते. ज्यामुळे आपली आज्ञा खराब होते. म्हणजे दोन्ही गोष्टी होतील, चित्त पण साफ होईल आणि आनंद व पावित्र्यात होळी खेळाल. ज्यादिवशी याचे पूर्ण काँबीनेशन होईल, त्यादिवशी दोन्ही चक्रांवर एकरूपता येईल, सहस्राचा काही प्रश्न रहाणार नाही. २८/२/१९९१, होळी पूजा, नवी दिल्ली मरी ४ ा ा २० की