सं चैतन् लहवी मे-जून २०१५ मराठी म ৭ २> कर निर्मल वृक्ष या अंकाल नवीन धर्म म्हणजे विश्व निर्मल धर्म *..४ देवी पूजा, पुणे, १७ डिसेंबर १९८८ ध्यानामध्ये निर्विचारिता ..१० औरंगाबाद, ८ डिसेंबर १९८८ भारतातील भ्रष्टाचार ... १४ सार्वजनिक कार्यक्रम, वाई, १६ डिसेंबर १९९० भ्रम संपले आहेत सर्वशक्तिमान परमात्म्याचे अस्तित्व, त्याची इच्छाशक्ती आणि सहजयीगाचे सत्य . सहस्रार उधडल्याची परिणाम म्हणजे आपले सगळे तुम्हीला कोणतीच शंका नकी. परमेश्वराच्या शक्तीची उपयीग करतीनी तुम्हाला है माहीत असावे की ह्याचे संचालन याविषयी तुमच्यामध्यै कौणताही भ्म नसावा. करण्याच्या तुमच्या योग्यतेमुळैच तुम्हाला ही शक्ती दिली गैलेली आहे. सहस्ीर पूजा, कबैली, इंटेली, १० मे १ee२ नवीन धर्म म्हणजे विश्व निर्मल धर्म पुणे, १७ डिसेंबर १९८८ का २- जर एखाद्या दिव्याला तुम्ही ज्योत दिली तर लगेचच तो प्रकाश देऊ लागती. तसेच तुम्ही प्रकाश देण्यासाठी बनवलेले आहात. आपल्या पुण्यामध्ये या तीस देशातून ही मंडळी आली, इतक्या लांबून आणि आपण पुण्यामध्ये किती लोक आहोत. पुण्यातले किती सहजयोगी आले ? तेव्हा सहजयोग पुण्यामध्ये काही वाढलेला दिसत नाही. त्यात भाऊबंदकीसुद्धा दिसून येते. जो तो माझच खरं असं करतो आहे. म्हणून त्याबद्दल आज दोन शब्द मला सांगावेसे वाटतात. मी असं पाहिलं की एक दुसरे सेंटर काढलेले आहे आणि त्या सेंटरमध्ये असं सांगण्यात येतं की अध्यात्माला पैसे लागत नाही, मग वर्गणी कशाला काढायची? ४ सांगायचं असं, की अध्यात्माला लागत नाही पैसे, पण या तंबूला लागतात. आणखीन पुष्कळ गोष्टींना लागतात. आत्तापर्यंत मीच पदरचे पैसे खर्च करून हिंदुस्थानात येते आणि अजूनही येते. त्याशिवाय सबंध महाराष्ट्रात आमचा दौरा आत्ताच कुठे सुरू झाला जिथे की आपले ट्रस्टचे पैसे चालतात. हे ट्रस्टचे पैसेसुद्धा सगळे एकसार, आपल्याला आश्चर्य वाटेल की बाहेरून आले आहेत कोणीही एकही पैसा नाही दिलेला. फुकटखोरीची इतकी सवय झालेली आहे की जेवायलासुद्धा बसतील तर फुकट बसतील. त्यातल्या त्यात इथले लोक म्हणजे फारच, जास्तच कंजूष दिसतात. म्हणजे पूजेला येतील तर स्व:चा डबा घेऊन यायचा आणि तिथे जेवायचं नाही. तो प्रसाद असतो. तेसुद्धा होत नाही. अशा भिकारी लोकांसाठी सहयजोग नाही. मला श्रीमंतही पचत नाही आणि गरीबही पचत नाही. जे अशा भिकारी वृत्तीचे आहेत त्यांनी सहजयोग सोडावा आणि आमच्यावर कृपा करावी, ही विनंती. म्हणजे दसरे चांगले लोक आतमध्ये येतील. कारण जे लोक इथे येतात त्यांच्याकडूनही भिकारीपणा केला जातो असं मी ऐकलेले आहे. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो, फक्त (अस्पष्ट) लागत नाही, त्यासाठी काही मेहनत करायला लागत नाही. हे कबूल. पण बाकी सगळ्या गोष्टींना पैसा लागतो. ह्या एकंदर भाऊबंदकीला आळा घातलाच पाहिजे. अहो, दिल्लीहूनसुद्धा गणपतीपुळ्याला जास्त लोक येतात. पण ही शरमेची गोष्ट आहे. याकडे लक्ष दिलेच पाहिजे. स्वत:मध्ये ती विशालता आली नाही तर आपण सहजयोगी नाही. सर्वात मुख्य म्हणजे सहजयोगाची जबाबदारी आपली आहे. हा खर्च आपण करायचा आहे. कुठवर करत रहायचं! सर्व ह्याला माताजीच येतात, म्हणजे काय तुम्ही ही फुकटखोरी माताजींच्या माताजींनी दमावर करता ? एकदा बिरबलला अकबरने प्रश्न केला, की जगात अधमात अधम लोक कोण आहेत ? तर त्याने असं उत्तर दिलं की, 'जे लोक देवाच्या दारी जाऊन भीक मागतात, त्यांच्यापेक्षा आणखीन अधमात अधम कोणीच नाही. तेव्हा पुण्यातच हे असं विशेष पाहिलेले आहे मी. आणखीन कुठेच असा त्रास नाही की काहीतरी डोक्याची शक्कल लढवून असे प्रश्न करायचे. तेव्हा जी वर्गणी लागते ती मला माहिती आहे. किती पैसे जमा होतात ते मला माहिती आहे. त्यात सबंध ट्रस्टचे पैसे आम्ही ओतले, ते सगळे ह्या लोकांनी दिलेले पैसे आहेत. ओतून तुमच्यासाठी जागा घेतल्या. आपल्याकडे कोणीही बेईमानी करीत नाही, कोणीही पैसे खात नाही, कोणीही खोटे काम करीत नाही. तेव्हा असं म्हणणं की, 'वर्गणी घेतात,' म्हणजे हे लोक काय पैसे खातात की काय! अशा रीतीने जे लोक कार्य करीत आहेत, त्यांनी आपले सेंटर्स एकदम बंद केले पाहिजेत आणि त्यांना सहजयोगी म्हणता येणार नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही जबाबदार नाही. त्या सेंटरमध्ये जाणाऱ्या लोकांना त्रास झाला तर आम्ही जबाबदार नाही. ही झाली सेंटरची गोष्ट आणि पुण्याची गोष्ट ! आता आपण दोन दिवस पाहिलेच आहे, की किती गर्दी होती सेंटरला, म्हणजे आपल्या प्रोग्रॅमला! इतके लोक आले होते! म्हणजे पुण्याला लोकांना परमेश्वर हा पाहिजे. त्याबद्दल शंका नाही. पण त्यासाठी जरासुद्धा आपल्याला तोशीस लागू द्यायची नाहीये. त्यात परमेश्वर जर येऊन आमच्या पायावर पडला तर त्याहून उत्तम. अशी प्रवृत्ती असल्यामुळे यातली किती मंडळी सहजयोगाला धरतील आणि त्यात वाढतील आणि त्याच्यामध्ये आपली प्रगती करतील हे बघण्यासारखे आहे. त्यात तिसर्या तऱ्हेचे लोक मी पाहिले जे सहजयोगाचा उपयोग आपल्या धंद्यासाठी करतात किंवा काहीतरी पैसे कमवण्यासाठी करतात, हे तर अधमातले, अधमातले अधम झाले आहेत लोक. जे सहजात जमेल ते केले पाहिजे. ही प्रवृत्ती पुण्यामध्ये असावी याचं मला फार आश्चर्य १ वाटतं कारण पुणं हे एक पुण्यपट्टणम आहे. आता काल आणि परवा मी खणखणीत, असं म्हटलं पाहिजे की फार परखडपणे, हसतखेळतच पण सहजयोग सांगितला. त्यावर लोक अगदी, दीड तास मी बोलत होते, पण अगदी नि:स्तब्ध बसले होते आणि त्यांच्यामध्ये निर्विचारीतेची स्थापना झाली आणि ते येतीलही, पण तुम्हाला लोकांना पाहून ते बिचकणार आहेत. कारण तुम्ही तुमच्या लिडर्सचे ऐकत नाही, त्यांचा मान करीत नाही. तुम्ही योगी असल्यासारखे दाखवत नाही. प्रत्येक ठिकाणी पैसे वाचवण्याच्या मागे असता. कसे पैसे बनवायचे? पैसे...पैसे...पैसे! हे भूत सोडलं पाहिजे. तुम्ही दिलदारपणा जर नाही केला तर तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देणार नाही. जर एक दार उघडलं तरच दुसर्या दारातून वारा येतो. पण जर तुम्ही एक दार बंद ठेवलं आणि दुसरं दार उघडलं तर वारा येणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे कंजूष माणसाला सहजयोगामध्ये स्थान नाही. ज्यांना कंजुषी करायची असेल त्यांनी सहजयोगात रहायचे नाही. अशा लोकांना काहीही मिळणार नाही, काही प्रगती होणार नाही. कद्र माणसाची सहजयोगामध्ये काहीसुद्धा लायकी नसते. अशा माणसाने आपला कद्रूपणा करावा आणि घरात बसावं हे बरं! पैशाच्याबाबतीत बोलायचे म्हणजे मला अगदी जीवावर येतं. कारण तुम्हाला माहिती आहे मला काही पैशाची कदर नाहीये. पण हे शिकलं पाहिजे की आपल्यामध्ये लक्ष्मी तत्त्व जर जागृत करायचं असलं तर माणसाने थोडं तरी विशाल हृदयाचे असलं पाहिजे. त्यात भर अशी पडते, की सहजयोग ही आमची जबाबदारी आहे, असं कोणी समजत नाही. ही आपली जबाबदारी आहे. आम्हाला सहजयोग मिळाला. जर एखाद्या दिव्याला तुम्ही ज्योत दिली तर लगेचच तो प्रकाश देऊ लागतो. तसेच तुम्ही प्रकाश देण्यासाठी बनवलेले आहात. नुसते मिरविण्यासाठी नाही किंवा ह्याचा फायदा उचलण्यासाठी नाही किंवा आम्ही सहजयोगी, सहजयोगी म्हणून जगभर फिरण्यासाठी नाही, की ह्यानंतर माताजी आम्हाला देतच असतात. तुम्ही कधी देणार आहात सहजयोगाला! तुमची मेहनत पाहिजे. तन, मन धन म्हणतात, मला नको. मला नको असलं तरी सहजयोगाला त्याची गरज आहे. जबाबदारी म्हणून घेत नाहीत. दोन-चार माणसं मिळून ही कामं करतात. मग त्यांना म्हणायचं की, 'तुम्ही स्वत:ला फार समजतात, तुम्ही फार शिष्ट आहात,' पण तीच दोन-चार माणसं कामाला लागलेली आहेत. असे जे लोक आहेत ते गळून पडणार हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा जर तुम्हाला आपली स्वत:ची प्रगती करून घ्यायची असेल, तर आधी ही आपली फार मोठी जबाबदारी आहे, सहजयोग ही आपली फार मोठी जबाबदारी आहे, हे समजलं पाहिजे आणि त्या जबाबदारीने वागलं पाहिजे. ज्यांना ही जबाबदारी सांभाळता येत नाही आणि ज्यांना असं वाटतं, की आम्ही सहजयोगामध्ये नुसते आनंदाच्या डोही येण्यासाठी आलेलो आहे, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की फार दिवस तुम्ही सहजयोगात टिकू शकणार नाही. ह्याचं चक्र फार जोरात फिरत आहे आणि ह्या चक्राच्या बाहेर माणसं फार लवकर फेकली जातात. मी, मी म्हणणारे असे पुष्कळ फेकले गेलेले आहेत. त्याला मी कारणीभूत नाही. त्याला कारणीभूत तुम्ही आहात. कारण चक्र हे आम्हाला चालवावं लागतं. थोडसं मला भेटायला आले, माताजींना नमस्कार केला किंवा दर्शन घेतलं, झाला सहजयोग. मग तुम्हाला हार्ट अॅटॅक आला, की येऊन म्हणायचं की, 'माताजी मला हार्ट अॅटॅक कसा आला. मी तर तुमचं रोजच माहात्म्य वाचत असतो.' तुम्ही सामूहिकतेत येत नाही. तरी अगदी गावातच सेंटर ठेवलेले आहे. व्यवस्थित रविवारचं सेंटर ठेवलेले आहे. त्यावरही तुम्ही आपली प्रगती करून घेतलेली आहे, तर त्याला तुम्हीच कारणीभूत होणार. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही मंडळी कुठून कुठून तुमच्या ६ सुट्ट्या घेऊन इतक्या मेहनतीने इथे येतात, तुमच्या सबंध ट्रस्टला पैसे देतात, तुमचा सगळा खर्च ह्या लोकांच्यामुळे चालला आहे. जर मी उद्या हे प्रवासाचं बंद केलं आणि मेहनत जर कमी केली तर मला वाटतं आपण सगळेच उघड्यावर पडणार. पैशाची काहीच व्यवस्था होऊ शकत नाही. तेव्हा कृपा करून ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दुसरं म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे, की पुष्कळ पुण्याच्या मुलींची लग्नं बाहेर झालेली आहेत आणि लग्न ठरलेले आहे सगळ्यांचे. आणि मला आशा आहे, की त्या सगळ्या सुखाने आणि आनंदाने राहतील. त्याबद्दल खरोखर आपल्याला एक शुभ वाटलं पाहिजे, ह्या मुलींची लग्न अगदी सहज काही खर्च न करता, इतकी सुंदर लग्न होत आहेत. त्यातल्या त्यात एक गोष्ट आणखीन आहे, की आपल्या मुलींनी बाहेर राहून दाखवलं पाहिजे, की महाराष्ट्रातल्या मुली किती शहाण्या आहेत. तिथे जाऊन शिष्टपणा करायचा! तुमच्यापेक्षा ते जास्त विद्वान आहेत. तुमच्यापेक्षा ते जास्त शिकलेले आहेत. फार हुशार आहेत, पण त्यांचे वैशिष्ट्य असे आहे, की 'विद्या विनयेन शोभते'. ज्या माणसाला विद्या आली आणि त्याला विनय नसला, तो म्हणजे विद्याहीन, मूर्ख, गाढव आहे असं मला वाटतं. 'विद्या विनयेन शोभते' म्हटलेले आहे. तेव्हा तुमच्यामध्ये जर विनय नसला आणि तुम्हाला जर नांदण्याची रीत माहिती नसली, तर तुम्ही लग्न करू नये. आणि केल्यावर, मला फार त्रास होतो. म्हणून ह्या मुलींना माझं सांगणं आहे, की तिथे जाऊन शिष्टपणा दाखवायचा नाही. कितीतरी, असे दोन-चार प्रकार पुण्याला झालेले आहेत, की ज्या मुली म्हणजे काही कामाच्या नाहीत, त्यांची लग्ने करून दिली. तर आमच्याकडे एक अशी म्हण आहे, तामीळ भाषेत, की जे लोक चिखलात राहतात, त्यांना पलंगसुद्धा रूततो. तसाच काहीतरी प्रकार केलेला आहे. आज मुद्दामून तुम्हाला सांगून ठेवते, की जरी मी ह्या सर्व लग्नांना संमती दिलेली आहे, तरीसुद्धा ही तुमची फार मोठी जबाबदारी आहे, की व्यवस्थित वागलं पाहिजे. तुमचं नाव झालं पाहिजे, सहजयोगाचं नाव झालं पाहिजे. ह्या देशाच्या संस्कृतीचं नाव झालं पाहिजे आणि सहजयोगाचं नाव झालं पाहिजे. ही एक फार मोठी संधी आहे. कमीत कमी इतकं तुम्ही करू शकता सहजयोगासाठी. जर त्याची तुम्ही जबाबदारी घेतली तरी. पण नवर्याशी भांडायचं, नवऱ्याकडे सारखं काहीतरी मागत राहायचं, मूर्खपणाने वागायचं, हा प्रकार जर तुम्ही सुरू केला तर त्याने तुम्हालाही काही सौख्य मिळणार नाही, तुमचेही काही हित होणार नाही आणि सहजयोगाचेही होणार नाही. ह्या लोकांपेक्षा तुम्ही गणपती जास्त जाणता. आपला वारसा आहे तो. पुष्कळ तुम्हाला माहिती आहे. बारीक-सारीक सगळं माहिती आहे. नसते कर्मकांडही पुष्कळ माहिती आहेत. पण सहजयोगात जे आवश्यक आहे तेच आपण घ्यायचं. जे अनावश्यक आहे ते सोडून द्यायचं. आणि जे मूर्खपणाचे आहे ते तर एकदमच त्यागलं पाहिजे. तेव्हा आता तुम्ही नवीन धर्मात आला आहात. तुमचा नवीन धर्म म्हणजे विश्व निर्मल धर्म आहे आणि त्या धर्माला धरून जे उचित असेल तेच तुम्ही करायचं. ह्याच्यात जात, पात काही आम्ही मानत नाही हे तुम्हाला माहिती आहे. देश विदेश काही मानत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि जातीची बंधनं देश- विदेशाची बंधनं असली तर तुम्ही सहजयोगी नाही. पुष्कळशा वडिलांना मला सांगायचं आहे, की जर ते खानदानी माणसाशी आपल्या मुलीचं लग्नर करायच्या मागे असले, तर मी त्याच्यात काहीतरी विघ्न आणेन आणि ७ त्रास देईन. मुद्दामून मी तसं करणार. मी ठरवलेलेच आहे. जर तुम्ही 'आमच्याच जातीत लग्न झालं पाहिजे,' असं म्हणाल, झालं तर झालं, सहजच झालं तर काही गोष्ट नाही. पण अशी जर जबरदस्ती मूलीला केली, तिच्या मनाविरूद्ध लग्न करायचं तुम्ही प्रयत्न केलात तर मी जाणूनबुजून त्याच्यात विघ्न आणणार आहे. म्हणजे तुमच्यात अक्कल यायला पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहात. एवढी मोठी आम्ही क्रांती आरंभली आहे आणि एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये तुम्ही आमची एवढीशीसुद्धा मदत करू शकत नाही, तर तुम्ही सहजयोगात येता कशाला? ह्या जाती-पातीने आपल्या देशाला वेड लावलेले आहे आणि किती त्रास दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, जात- पात ह्याला काय अर्थ आहे! उद्या तुमच्या मुलीला जर कोणी सोडलं तर कोण जातवाला तुमचा उभा राहतो. उलट दुसरी मुलगी येऊन उभी राहते. तेव्हा अशा ह्या समाजाला तिलांजली दिली पाहिजे. कारण हा समाज कुठे दिसत नाही. ह्या समाजाने कुठेही मला असं दिसत नाही, की काही धार्मिक कार्य काढलं असेल किंवा सामाजिक कार्य काढलं असेल किंवा ह्याचं अस्तित्व कुठे असेल. कुठेतरी हवेत असतो हा समाज. आणि हवेतला समाज जो आहे, तोच माणसाला खाऊन टाकतो. तर सगळ्यांनी उठायला पाहिजे यासाठी, एकजुटीने. आपण तर इतके लोकं आहोत . पूर्वी तर एकेकट्या माणसाने ही कार्य केलेली आहेत. तेव्हा आपण इतकेजण आहोत. आपल्या सगळ्यांची एकच आता धारणा आहे आणि एकच आपली चेतना आहे. तेव्हा घाबरण्याचे कोणते कारण आहे ! असा विचार केला पाहिजे आणि असा विचार केल्यावर हे लक्षात ठेवलं पाहिजे, की ह्या धर्मयुद्धामध्ये आम्ही सामील आहोत. आमची जबाबदारी आहे आणि युगायुगांमध्ये असं झालेलं नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. ही शेवटची पायरी आपल्याला चढायची आहे. जिथे सगळं स्वच्छ करायचं आहे. जिथं सगळं नीट करायचं आहे. तिथे प्रेमाचं साम्राज्य आणायचं आहे. तिथे सगळी गरिबी आपल्याला हटवायची आहे. केवढी कार्य आहेत ! पण तुमची अजून हीच जळमटं निघत नाही, तर पुढचं कसं काय नीट होणार! तेव्हा जाती-पातीचं वेड सोडलं पाहिजे आणि जातीच्या लोकांना भेटूच नका. ज्ञानेश्वरानी सांगितलं आहे, 'तेची सगेसोयरे होते'. तुमचं नातं सुटलं बाकी लोकांशी. 'तेची सगेसोयरे होते' स्पष्ट सांगितलं आहे, की हेच लोक आहेत, हेच सगेसोयरे आहेत आणि बाकीचे नाहीत आणि सेंटरवर जो जात नाही त्याला सहजयोगी म्हणायचं नाही. सेंटरवर गेलेच पाहिजे. तुम्ही श्रीमंत असाल, ते आपल्या घरी असाल, पण सेंटरवर गेलं पाहिजे. मीसुद्धा तुमच्या बरोबर झोपडीत राहते. वाट्टेल त्या परिस्थितीत राहते. मग सेंटर अगदी फारच सुंदर असलं पाहिजे, त्याच्यामध्ये झगमगाट असला पाहिजे, असा विचार करणे फार चुकीचे आहे. अत्यंत साधारण असं सेंटर असलं पाहिजे, जिथे सर्वसामान्य माणसंसुद्धा येऊ शकतात. आजपर्यंत बरेच दिवस झाले मी आपल्या पुण्यातल्या सहजयोग्यांशी स्पष्टपणे बोलू शकले नाही. आज ह्या रम्य परिसरात मला असं वाटलं, की एकत-्हेची आपल्यातही रम्यता आली पाहिजे आणि ती रम्यता येण्यासाठी आतमध्ये ज्या आपल्या जुनाट पद्धतीच्या, नुसत्या कर्मकांडांच्या आणि धर्माच्या बाबतीत चुकीच्या कल्पना आहेत त्या जाऊन आपण स्वच्छ निर्मळ गंगेत आलं पाहिजे. तेव्हाच हे कार्य होऊ शकतं. त्यात अहंकारसुद्धा आपण जपला पाहिजे. कशाही गोष्टीचा आपल्याला अहंकार असला म्हणजे त्रास होतो. मी म्हणजे कोणीतरी विशेष! कोणा कोणा सहजयोग्यांना वाटतं, की आम्ही पहिल्यांदा सहजयोगात आलो, म्हणजे ८ काहीतरी विशेष! अहो, जे पहिले आहेत तेच जाणार आहेत, असं मला दिसतं आहे. बहुतेक अगदी जे पहिले पहिले होते ते कटतच चालले आहेत. म्हणजे ही कल्पना असते की आम्ही पहिल्यांदा सहजयोगात आलो, हेच पहिल्यांदा तुमच्या विरोधात बसणार. तेव्हा भावना काढून टाकली पाहिजे, की आम्ही फार जुने सहजयोगी आहोत. म्हणजे तुम्ही जुनाट झाले. आता निघून जा. प्रत्येक वेळेला नावीन्य असायला पाहिजे, तरच तो सहजयोगी आहे. आणि ही जिवंत क्रिया आहे. रोज नवीन नवीन आपल्याला येत असतात. प्रत्येक अनुभव वेळेला आनंदी, नावीन्य असायला पाहिजे. आणि 'मी फार जुना, मी फार जुनी,' असा जर तुम्ही मनात विचार ठेवला तर त्याचा जुनाटपणा दिसून येईल. तेव्हा इकडे लक्ष ठेवलं पाहिजे, की आम्ही आपल्याबद्दल काय बोलतो. फक्त सहजयोगाबद्दल आणि माझ्याबद्दल बोललेले बरे आहे. त्यानेच सगळंे काही ठीक होणार आहे. तेव्हा शरणागत होण्याचा अर्थ हाच आहे, की आपल्यामध्ये ज्या या जुन्या गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजेत आणि आपण जो अहंकार गोळा केलेला आहे, तोसुद्धा नष्ट पावला पाहिजे. आता काही फार मोठी पूजा होणार नाहीये. थोडक्यातच पूजा करता येईल. मुहर्त गाठला आम्ही हे नशीब समजायचं. जे होतं ते भल्यासाठी. आपल्या सुमुहर्तावर होतं हे लक्षात घेऊन वागलं पाहिजे. म्हणजे माणसाला कोणताही खेळखंडोबा वाटत नाही. परत दसरं सांगायचं म्हणजे असं, की फाटे नाही फोडायचे. आम्ही जर काही करायचं म्हटलं तर ते ऐकलं पाहिजे. आणि ते पूर्ण मनाने केलं पाहिजे. फाटे फोडले नाही पाहिजे. कोणत्याही गोष्टीला तुम्ही फाटे फोडले तर त्याचा त्रास मला तर होतोच, पण तुम्हालाही होतो. तेव्हा आपलं काहीतरी सांगत बसायचं नाही. मी जे म्हटलं ते, 'बरं मी करतो, बरं मी ऐकतो,' जे असेल ते लगेचच मान्य केलं पाहिजे. नाहीतर भयंकर त्रास होतो. आपल्या सहजयोगालासुद्धा फार याने त्रास होतो, लोक जे फाटे फोडतात, आज जर लोकांनी फाटे फोडले नसते, तर आपल्याजवळ किती तरी सुंदर फ्लॅट असते, मुंबईला आणि इथे सुद्धा पुष्कळ जागा झाल्या असत्या. पण त्यावेळेला ह्या सगळ्यांनी फाटे फोडून फोडून सगळं काही मला इतका त्रास दिला, शेवटी मीच असा विचार केला, की कोणी काही सांगितलं तर त्यांना सांगायचं की फाटे फोड़ू नका आणि मी हे करणार. मी करणार. पूर्वी मी सगळ्यांना विचारून करत असे. पण मी आता बघते की लोकांना सवय झालेली आहे. शिष्टपणा दाखवण्याची. तेंव्हा त्यांना सांगितलंच पाहिजे, की तुम्ही चूप रहा. मी करणार म्हणजे करणारच. मला जे करायचे तेच मी करणार. माझ्यापेक्षा शहाणं तुमच्यात कोणीच नाहीये. तेव्हा उगीचच माझ्यापेक्षा जे कमी शहाणे आहेत त्यांचं मी कशाला ऐकून घ्यायचं! ही नम्रता काही कामाची नाही. असा मोघम विचार करून मी ठरवलेले आहे, जे मला करायचं ते मी करणार . त्याबाबतीत तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल. आज आपण सुरुवातीला एकदा गणेश वंदना म्हणू. त्यावेळेला इथे ज्या काही मुली असतील, पुण्यातल्या, लहान मुली आणि मुलं, त्यांनी येऊन पाणी घालायचं. एकदाच व्हायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं. आणि त्याच्यानंतर मग सात बायकांनी वर यायचं आणि पायाला आलता वगैरे लावायचं काय काम असेल ते आणि पायाची वंदना करायची. तेव्हा आज नुसतं गणेश पूजेवरच आपलं निभेल. पण शेवटी थोडीशी देवीचीसुद्धा आपण पूजा करूया. तेव्हा सुरुवातीला मुलींनी, मुलांनी वर यायचं आणि पायावर पाणी घालायचं फक्त. ९ ध्यानामध्ये निर्विचारिता ७) १प औरंगाबाद, ८ डिसेंबर १९८८ मी मराठवाड्याची महती सांगितली आहे. आजसुद्धा पेपरात आलेले आहे की सुवर्णयुग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे. सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला जे दिसतं आहे ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहजयोग्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोमरोमात पोहोचवण्यासाठी सहजयोग्यांची फार जोरात तयारी पाहिजे. त्यात मुख्य म्हणजे सहजयोग्यांनी ध्यान-धारणा करणे. आपली चक्रे स्वच्छ करणे. खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजे. निदान दोनदा तरी ध्यान केलेच पाहिजे. ध्यानामध्ये निर्विचारिता स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते. आणि हे आत्म्याचं जे फळ मिळालं आहे त्याचं खरं स्वरूप आपल्याला मिळू शकतं. पण जर आपण ध्यान-धारणा केली नाही, तर आपल्याला निर्विचारिता स्थापन करता येणार नाही आणि निर्विचारितेशिवाय आपल्या आतली जी आंतरिक स्थिती आहे ती सुधारणार नाही. त्यासाठी ध्यान-धारणा करायलाच पाहिजे. आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. ते काढण्याचा प्रयत्न करायला नको, फक्त त्यांच्याकडे बघितलं तरी ते निघून जातील. तेव्हा जसं काल भारूडामध्ये सांगितलं की या संसारातून वेगळं निघा आणि मग या संसाराकडे बघितलं. कारण जोपर्यंत तुम्ही या संसाराच्या उलाढालीमध्ये गुरफटलेले असाल तोपर्यंत तुम्हाला याच्यातले प्रश्न सोडवता येणार नाही. तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असले, तर तुम्ही बाहेर कसे येणार ? तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे. जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटांगळ्या जाऊन त्याच्याऐवजी तुम्हाला आनंद लुटता येईल. त्यानंतर तुम्ही इतर लोकांनासुद्धा पोहण्याचं शिकवू शकता. तसंच अध्यात्माचं आहे. आधी तुम्ही स्वत:ची स्थिती दुरुस्त करायची आणि त्यायोगे तुम्ही दुसर्यांचीसुद्धा स्थिती सुधारू शकता. पुष्कळदा मला असंही लोक सांगतात, की सहजयोग्यांमध्ये अजून काही प्रगती झालेली नाहीये. काही प्रगल्भता आलेली नाही आहे. आपापसात अजून वैमनस्य आहे, वगैरे वरगैरे. तेव्हा हा असा १० सहजयोग कसा? सांगायचं म्हणजे असं की आपल्या सहजयोगाचं दार सगळ्यांना उघडे आहे. कोणी कसेही असेनात का, सगळ्यांना तुम्ही सहजयोगाला या अशी मागणी आहे. आमंत्रण आहे. त्यामुळे होतं काय की वाट्टेल त्या तऱ्हेचे, वाट्टेल त्या परिस्थितीतले, वाट्टेल त्या कुरसंस्काराचे लोकसुद्धा ह्याच्यात येतात. त्याबद्दल आपण काही त्यांच्यावरती आधी मज्जाव करीत नाही. पण एकदा का कुंडलिनी जागृत झाली आणि आत्म्याचं दर्शन झालं म्हणजे 'आधी कळस मग पाया' याप्रमाणे आधी तुमच्या आत्म्याची बांधणी होते आणि त्या सुरू बांधणीमुळे तुम्हाला स्वतःच त्या प्रकाशामध्ये दिसतं की आमचं काय चुकलेलं आहे! आम्ही कुठे चुकलो? आणि त्या प्रकाशामध्ये तुम्ही जाणता, की तुम्हाला काय ठीक केलं पाहिजे ? काय तुमचं चुकलेलं असेल ते कसं बरोबर करून घ्यायचं? मी काही तुम्हाला सांगत नाही. तुम्ही स्वतःच बघून ठीक करता. कारण तुम्हाला दिसतं की त्याने आमचं नुकसान होत आहे. त्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे. तेव्हा तुम्हीच त्या गोष्टीला पायबंद घालता. मला त्याबद्दल काहीच बंदोबस्त करावा लागत नाही किंवा सांगावं लागत नाही की तुम्ही हे नीट करून घ्या, ते करून घ्या, पण तुम्हीच तुमचे गुरू होऊन जाता. पण त्यासाठी ध्यान-धारणा ही पाहिजे. जसे लहानशा दिव्याच्या प्रकाशात आपल्याला सगळे काही दिसत नाही, तसेच जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश पूर्णपणे आपल्या चित्तावर पडणार नाही, तोपर्यंत हे चित्त कुठे कुठे धावतंय, त्याला काय काय प्रश्न आहेत ? त्याने काय काय नुकसान करून घेतलं आहे? काहीसुद्धा आपल्याला लक्षात येणार नाही. तेव्हा ध्यान-धारणा ही करायलाच पाहिजे. लोकांचं असं म्हणणं आहे की मला वेळ नाही, मला हे नाही, ते नाही. सगळे बहाणेबाजी. सर्व बेकारची कामं करायला आपल्याला वेळ असतो. दोन मिनिटं परमेश्वराजवळ बसायला वेळ नाही. खरोखर म्हणजे परमेश्वराने हे जेवढं सायन्स, ही जी सगळ्या तऱ्हेची आपली व्यवस्था करून दिलेली आहे ती एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे. आपण हातात घड्याळ बांधतो, ते एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे. आणि वेळ वाचवायचा तो फक्त ध्यानासाठी वाचवायचा. आणि त्यानंतर इतकी शांती, इतका आनंद मनुष्यामध्ये येतो! त्याशिवाय आपली प्रकृती, आपलं मन इतकं शुद्ध होतं , सगळ्या प्रकारचे ताप, दुःख निघून जाऊन मनुष्याची इतकी उत्तरोत्तर प्रगती होत जाते की त्यालाच आश्चर्य वाटतं की कसा मी सहजच या आनंदाच्या सागरात पडलो. तेव्हा प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की हा आमच्यासाठी सहजयोग आहे. माताजींसाठी नाही. मी एवढी दगदग करते. सगळीकडे धावते, सगळ्यांना भेटते, रानोवनी राहते, सगळ्यांची व्यवस्था करते. त्याला कारण मला सहजयोग हवा म्हणून नाही, पण या अंतरात , आतून जी काही मला आपल्याबद्दल कळकळ वाटते त्यासाठी वाटतं, ज्या आनंदासाठी आम्ही आहोत, त्या आनंदात सगळ्या माझ्या मुलांनी यावं. असा विचार ठेवून प्रत्येकाने मेहनत करायला पाहिजे आणि ध्यान-धारणा केली पाहिजे. दुसऱ्यातले वाईट बघू नये. दुसर्यातलं चांगलं बघावं. ते बरं होईल. दुसऱ्यातलं वाईट बघितलं तर त्याने आपला काय फायदा होणार आहे किंवा त्याचा तरी काय फायदा होणार आहे. ज्याने त्याने आपलं वाईट ठीक करावं आणि दूसर्याचं चांगलं बघून त्याचं चांगल्याचं अनुकरण करावं. हे बघितलं पाहिजे. सहजयोगामध्ये पुष्कळशी मंडळी अशी ही आहेत की जी कधी कधी सेंटरला येतील. कधी येणार नाहीत आणि फक्त मी आले की येतात वगैरे. आता त्याबद्दल सांगायचं असं की हे तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असल्यामुळे तुम्ही ११ स्वत:चाच विचार करून केंद्रावर गेलं पाहिजे. ही एक सामूहिक घटना आहे. हे दिवस गेले की एकट्याने घरी बसून पूजापाठ केले किंवा मंत्रोच्चार केले किंवा हे केलं , ते दिवस गेलेले आहेत. आता हे सामूहिकतेत कार्य होणार आहे. सबंध विराटाचे कार्य असल्यामुळे हे एक सामूहिक कार्य आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल, की, 'आम्ही आमच्या घरी बसून माताजी, पूजा करतो, हे करतो,' त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि उद्या येऊन तुम्हीच मला सांगाल की, 'माताजी, आम्ही एवढा सहजयोग केला तरीसुद्धा आम्हाला एवढा त्रास झाला.' सेंटरवर येऊन तुम्ही कोणावर उपकार करीत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला सगळे फुकटच आहे. सेंटरवर येऊन तुम्हाला फक्त स्वत:वरच उपकार केल्यासारखं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर स्वत:वर उपकार करायचे असले तर सेंटरवर यायचे, तिथे भाषणं ऐकायची, त्यानंतर ते जागृतीचं कार्य करायचं आणि तुम्ही संपन्न होऊन घ्यायचं. अध्यात्माचं जे वैभव आहे त्या वैभवाने तुम्ही अनेक लोकांची जागृती करू शकता. अनेक लोकांना पार करू शकता. आमच्याकडे असे लोक आहेत, ज्यांनी एकेका माणसाने दोन-दोन हजार लोकांना पार करून बसवलेले आहे. तेव्हा मराठवाड्यामध्ये फार मोठं जोरात कार्य व्हायला पाहिजे. तर सहजयोग्यांची स्वत:ची शक्ती प्रबळ असली पाहिजे. त्या समर्थतेतच ते अनेक लोकांना पार करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे एका ठिकाणी गणपतीसारखं बसून चालायचं नाही. चार जागी फिरायला पाहिजे. खेडोपाडी, सगळीकडे जोगवे गायले जातात, भारूड गायलं जातं, सगळ्यांना या संतांची माहिती आहे. मोठमोठ्या संतांनी या मराठवाड्यात जन्म घेतला आहे. येथे मोठमोठाली स्वयंभू देवळं आहेत. हे सगळं असूनसुद्धा जर तुम्ही हलला नाहीत तर हे लोक जे धर्मांध आहेत, ज्यांना लोक लुबाडत आहेत, देवाच्या नावाखाली त्यांचा पैसा, आणि त्यांचं सबंध शरीरच वाया जात आहे, त्यांचा बचाव कोण करणार? तेव्हा खेडोपाडी तुम्हीसुद्धा जाऊन असे प्रोग्रॅम घेतले पाहिजेत, त्यांना सहजयोगाबद्दल सांगितलं पाहिजे. त्यांच्याच भाषेत बोललं पाहिजे. फार अशी वाढलेली प्रगल्भ भाषा बोलली तर ते खेडेगावातल्या लोकांना समजत नाही. त्यांच्याच भाषेत त्यांना समजावून सांगायचं की परमेश्वर हा आहे आणि ते मिळविण्याचं साधन अगदी सहज आहे. ते खेडेगावातल्या लोकांना अगदी सहज मिळू शकतं. हा साधेभोळेपणा पुष्कळ धर्ममार्तंडांनी वापरलेला आहे. त्याचा उपयोग करून घेतला आहे. इंग्रज लोक तरी इथे इतके दिवस राज्य का करू शकले? कारण आपण असे साधेभोळे आहोत. एकदा जर आपल्यामध्ये चेतना आली आणि आपण चैतन्य स्वरूप झालो, तर मात्र परमेश्वराचं साम्राज्य या जगात येऊ शकतं. आपणच ते आणू शकतो आणि सगळीकडे गरिबी जाऊन, दारिद्र्य जाऊन, सगळ्या तऱ्हेचे कष्ट, दुःख सगळे नष्ट होऊन लोकांना अगदी अबाधित आनंदाचा उपयोग घेता येतो. तेव्हा सहजयोग्यांनी आपल्याकडे लक्षात घेतलं पाहिजे की स्वत:ची स्वच्छता, स्वत:चा निर्धार करून आपल्या व्यक्तित्वाला बनवलं पाहिजे. स्वत: आनंदात राहतात सहजयोगी पण दुसऱ्यांनाही आनंद दिला पाहिजे, ही सामूहिक कल्पना असली पाहिजे. म्हणजे तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक सहजयोग्याने आपल्यावर जबाबदारी घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने समजलं पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे. जसा हा दिवा आहे, हा आपण पेटवला, तर तो आपली जबाबदारी समजतो की मी, माझ्यापुरता सहजयोग नाही, हे माझ्याजवळ ठेवायचं धन नाही आहे, हे वाटायचं धन आहे, ते दूसऱ्यांना दिलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही घ्याल तर सहजयोगात तुम्ही खरोखर पारंगत व्हाल, प्रत्येकाला एक एक गुरू स्थान आहे आणि ते तुम्ही १२ मिळवू शकता. परमेश्वर नुसता आपल्या साम्राज्यात वाट बघतोय, की कधी माझी मूलं येतील आणि मी त्यांना उत्तमपैकी त्यांच्या स्थानावर बसवीन. तेव्हा असा मोघम विचार करून चालणार नाही, की आम्ही आता सहजयोगात आलो आणि आता आम्हाला जागृती झाली, इतिकर्तव्यता झाली की आता ह्याच्यापुढे काही करायला नको. जर खरोखरच तुम्हाला सहजयोगात उतरायचं आहे, तर तुम्ही सामूहिक कार्य केलेच पाहिजे आणि सामूहिक कार्य केल्यावरच तुम्हाला निर्विकल्प समाधी लाभेल किंवा तुम्हाला कळेल की, तुम्ही काही डॉक्टर नाही, तुम्ही काही शिकलेले नाहीत असे असताना तुमच्या हातून रोग कसे बरे होतात! ह्या सगळ्या किमया कशा होतात! जेव्हा या चमत्काराचे अनुभव तुम्हाला येतील तेव्हाच तुमच्या लक्षात येईल, की आम्ही काहीतरी विशेष झालेलो आहोत, आम्ही योगीजन झालेलो आहे. समजा जर तुम्हाला उद्या आम्ही इंग्रजी पैसे (डॉलर) आणून दिले तर तुम्ही म्हणाल, 'माताजी, हे आम्हाला काय दिलं तुम्ही?' ते वापरले पाहिजेत. ते बाजारात नेऊन वापरल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तसेच , जे तुमच्या हातामध्ये आम्ही तुम्हाला चैतन्य दिलेले आहे, जी तुम्हाला आम्ही शक्ती दिलेली आहे, ती जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कसं कळेल की ही काय वस्तू आहे? त्या दृष्टीने मी म्हणते की सर्व सहजयोग्यांनी मेहनत करावी. आता असं पाहिलं की सहजयोगी इथे फार कमी असले तरीसुद्धा ते भरभक्कम आहेत. ज्याचा पाया भरभक्कम आहे त्याचीच इमारत मोठी होते. उगीचच नसते बाजारबुणगे एकत्र करून तरी काय करायचंय? तेव्हा जेवढे थोडेथोडके लोक आहेत त्यांनी मेहनत करून फार जबरदस्त अशा भरभक्कम पायाची उभारणी केली पाहिजे. त्यावर मग इमारती बांधणं फार सोपं जातं. तेव्हा जेवढे लोक आहेत त्यांनीच मेहनत करून स्वत:ला अगदी व्यवस्थित ध्यान- धारणा वरगैरे करून त्यात आपली वाढ करून एक फार उच्च तऱ्हेच्या सहजयोग्यांचे म्हटलं पाहिजे, टोळकच तयार केलं पाहिजे, की त्यांना पाहिल्या बरोबर लोकांना असं वाटलं पाहिजे की आले कोणीतरी विशेष! अशा लोकांच्या किमया सांगाव्या तेवढ्या कमी आहेत. अशी तीन माणसं जरी झाली तरी गावातली सगळी बाधा पळून जाणार. गावातलं सगळें जेवढं दैन्य आहे ते पळून जाणार. त्यांचा इतका परिणाम होतो. कारण तुम्ही परमेश्वराचे साधन होता आणि त्यांच्यातून परमेश्वर आपलं कार्य करीत असतो. तेव्हा एक जरी मोठा साधु-संत झाला तर त्याचा एवढा परिणाम होतो, तुम्ही तर एवढे मोठे साधु-संत आणि योगी आहात! तेव्हा आणि तुम्हाला काय परमेश्वराने द्यावं आणि काय नाही द्यावं. तुमच्यासाठी काय करावं आणि काय नाही करावं. आणि ही जी आपल्याला फार मोठी संधी मिळालेली आहे, त्यातून आपल्याला काय मिळू शकतं, काय मिळालेलं आहे आणि काय मिळवायचं आहे. त्या विचारानेच मनुष्य आश्चर्यचकित होईल की केवढं मोठं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण किती केलेला आहे. तेव्हा कृपा करून सहजयोग हे एक जीवन लक्ष्यच नव्हे तर जीवन झालं पाहिजे. माणसाच्या जीवनात सहजयोग आला पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्हाला दुसर्या कोणत्याच गोष्टीची आवड वाटणार नाही. कारण खरोखर अमृताचा अनुभव त्याच्यात येतो. १३ भारतातील भ्रष्टाचा२ वाई, १६ डिसेंबर १९९० त्या देशामध्ये किती हिंसाचार वाढलेला आहे, ह्याची अगदी आपल्याला कल्पना नसेल. आता न्युयॉर्कला जायचं असलं तर तुम्ही हातात काही घालून जाऊ शकत नाही, गळ्यात मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही. ते लपवून न्यावं लागतं. आपल्याला त्याची कल्पना नाही. इथे जे हिंदुस्थानी लोक आहेत ते अलिप्तच राहतात, नको रे बाबा! मला काही लोकांनी पत्र पाठवलं की, 'माताजी, तुम्ही हिंदुस्थानात जर चांगली शाळा काढली तर आम्ही आमच्या मुलांना तिथे पाठवू.' काही लोक आपली मुलं इथे घेऊन येतात. कारण ती इतकी उद्धट झाली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इंग्लंडसारख्या शहरामध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये फक्त लंडन या एकाच सिटीमध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. ही दशा तुम्हाला इथे आणायची आहे का ? सर्वांगीण प्रगतीसाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्मात उतरले, तुम्ही जर एखाद्या की दारूड्याला किंवा कोणालाही शंभर रूपये दिले तर तो कुठेतरी वाया घालवणार. पण जर तुम्ही एखाद्या संताला पैसे दिले तर तो सत्कारणीच लागणार. तो सत्कर्मातच जाणार. आता जसे हे लोक आहेत, तर मी पैसे काढले, 'आम्ही एखाद्या शाळेला देणगी देऊ माताजी.' सत्कर्मासाठी. काही वाईट कर्मासाठी नाही. पण आपल्याकडे ते सत्कर्मसुद्धा कठीण झालेले आहे. आम्ही आमचे लंडनला घर विकल्यावर विचार केला की कोणत्यातरी संस्थेला पैसे द्यायचे, तर एक संस्था अशी मिळाली नाही की जिथे खोटेपणा नाही. सर्व संस्थांमध्ये खोटेपणा, म्हणजे करायचे तरी काय ? मग आम्ही शेवटी एक वास्तू बांधली. म्हटलं कमीत कमी एक वास्तू तर बांधू देत. मग पुढचं काय ते बघता येईल. अशा रीतीची ही परिस्थिती आपल्या देशात आलेली आहे आणि हा भ्रष्टाचार आणि आपल्या मुलांचं उद्या काय होणार आहे याचा विचार करा. इतका भ्रष्टाचार कुठेही जगात नाही जितका महाराष्ट्रात आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. हिंदुस्थानातसुद्धा इतका भ्रष्टाचार नाही, इतका या महाराष्ट्रात आहे. मी कारण सबंध हिंदस्थानात फिरलेली आहे. त्याच्याकडे लक्ष नाही आपले आणि अशी ट्रम कुठेही निघालेली नाही, ही निर्मुलनाची. निर्मूलन करण्याची लायकी असायला पाहिजे. आता आमच्याकडे मानव म्हणून एक गृहस्थ आले. ते माझ्याकडे दोन लाख रूपये घेऊन आले. म्हटलं मी चार लाख रूपये देते पण दोन लाख देऊ नका. पण तुम्हाला निर्मूलन करण्याची लायकी नाही. लायकी असायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही संत असायला पाहिजे. निदान तुम्ही संत असायला पाहिजे. आता ही मंडळी जी बाहेरून आली , तुम्हाला काय वाटतं परदेशामध्ये अंधश्रद्धा नाही. भयंकर अंधश्रद्धा आहे. सगळे त्यातून निघून बाहेर पडले आणि आज इथे स्वच्छ होऊन आलेले आहेत. तुम्हाला जर अंधश्रद्धा घालवायची असली, तर धर्म, तुम्हीसुद्धा आत्मसाक्षात्कार घ्या. आत्मसाक्षात्कार घेतल्याशिवाय तुमची अंधश्रद्धा जाणार नाही. जात, पात, अधर्म ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे, असं सर्वांनी सांगितलं आहे. पण एकनाथांना, ते महाराकडे जाऊन जेवले म्हणून लोकांनी त्रास दिला. 'काय ढोंगी आहे.' त्याच्यानंतर तुकारामांना छळून छळून मारून टाकलं. आपल्याला सगळे माहितीच आहे, त्या ज्ञानदेवांची, पायात वहाणा नव्हत्या त्यांच्या, पालखीत मिरवणूक काढली. आता आम्ही येतांना रस्त्यात आम्हाला आडवलं. म्हणे, 'माताजी, जेवायला या.' म्हटलं, 'कशाला ?' म्हणे, 'आम्ही पालखी घेऊन आलो.' काय म्हणावं! ज्या माणसाच्या पायात वहाणा नव्हत्या. १४ सगळ्या भावांना घेऊन, बहिणीला घेऊन अशा उन्हातान्हात फिरणारे ते. त्यांच्या आता कुठेतरी पादुका ठेवायच्या. त्यांच्या दमावर जेऊन बसायचे. ह्याला काय म्हणायचे! ते नाही बंद करता येणार तुम्हाला. पण पुष्कळसे असे आहेत ज्यांनी असे प्रकार केले. राहुरीला असे लोक होते जागृतीसाठी, सोडलं त्यांनी की काय मूर्खपणा आहे. असल्या तऱ्हेचे भयंकर प्रकार आपल्या देशात आहेत. ते काढण्यासाठी जागृती शिवाय काहीही मार्ग नाही. आधी जागृती होऊ द्या. माझ्याविरूद्ध लोक कशासाठी उठले आहेत, हेच मला समजत नाही. मी एकही पैसा घेत नाही. देवकृपेने श्रीमंत घराण्यातली मी आहे. इतकंच नव्हे पण श्रीमंत घराण्यात माझं सबंध आयुष्य गेलं आहे. इतकंच नव्हे पण माझे यजमान फार मोठे आहेत. आपल्याला माहीत नाही, की इंग्लंडच्या राणीने त्यांना सर्वोच्च नाइटहड पदवी दिली. सर्वोच्च. अशी हिंदुस्थानात आजपर्यंत कोणाला मिळाली नाही. आणि ३२ देशाने त्यांना सर्वोच्च अशी नाइटहूड, उच्च पदव्या दिलेल्या आहेत. असे माझे यजमान आहेत. मला काय गरज आहे अशा प्रसिद्धीची आणि गावात मिळून भटकत फिरण्याची काय गरज आहे. तुम्ही लक्षात घ्या, की अशा तऱ्हेने कोणालाही बदनाम करणे आणि अशा तऱहेने कोणाचेही कार्य अडवून ठेवणे, जे की समाजकल्याणाचे कार्य आहे. त्यानेच कल्याण होणार आहे. आज हे जे लोक इथे आले आहेत, त्यात मोठमोठाले डॉक्टर्स आहेत. आर्किटेक्ट्रस आहेत. फार मोठाले लोक आहेत. हे काही सर्वसाधारण लोक नाहीत. त्यांच्याशी बोलणार कोण? तर म्हणे एक एमबीबीएस झालेला. पण त्याच्याशी बोलणार तरी काय ? त्याला पॅरासिंपरथॅटिक नव्व्हस सिस्टीमच समजत नाही. त्याच्याशी मी बोलणार तरी काय? आणि म्हणे आमचं आवाहन घ्या. कसलं आवाहन ! त्याला काही अर्थ आहे ? आपली लायकी ओळखायला पाहिजे. विज्ञानावर जर बोलायचं असलं तर एखादा वैज्ञानिक मनुष्य पाहिजे. इथे किती तरी ज्ञानी लोक आले आहेत. तीन लोकांना पीएचडीच्या डिग्या मिळाल्या आहेत, फ्रांसमध्ये, इंग्लंडमध्ये आणि तीन डॉक्टरांना एमडीच्या पदव्या मिळाल्या आहेत, आपल्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या. ज्यांना ज्यांना एमडीच्या पदव्या मिळाल्या ते कुठे पोहोचले असतील, तुम्ही सांगा बरं! त्यावर असं म्हणायचं, की ह्यांनी वैद्यकिय किंवा मेडिकलच्या परिमाणाशिवाय सगळे केलेलं आहे. आता काय म्हणावं! अहो, कोणाला एमडीची पदवी मिळेल का? एवढी तरी अक्कल नाही त्यांना की एमडीची पदवी मिळू शकते का कोणाला, मेडिकलच्या परिमाणाशिवाय? तेव्हा लहान तोंडी मोठा घास घ्यायचा तरी किती? ते तरी समजलं पाहिजे. पण संतांना आम्ही मानतो. कारण त्यांचं चरित्र बघा. त्यांची जी वागणूक आहे, तसे आहेत का कोणी आजकाल? दिसतात का तुम्हाला कुठे? असे संत-साधू दिसतात, जे 'जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती' असे दिसतात का तुम्हाला कुठे? हे सगळे भामटे लोक आहेत आणि हा भामटेपणा करून तुमच्या मुलांची दिशाभूल करतात. तेव्हा कृपा करून मुलांना ह्याच्यात घालू नका. दगड मारायला शिकवतात, आरडा-ओरड करायला. अरे काय तुमच्या मुलांची ही लायकी आहे की नुसतं आरडा-ओरड करत फिरायचं! दिल्लीला अशा पुष्कळशा इन्स्टिट्युट आहेत, पुष्कळ अशा संस्था आहेत, तिथे आरडा-ओरड करण्यासाठी खेडेगावातून लोक आणलेले आहेत. पण त्यांच्यात वेगळ्यावेगळ्या टोप्या, वेगवेगळ्या कार्डबोडवर लिहिलेल्या अशा पुष्कळशा, प्रत्येक पाटीसाठी काय लिहायचे ते त्याच्यात लिहिलेले असते. त्यांच्याजवळ कार्डबोर्डचे मोठमोठाले त्ते आहेत. ते सगळ्यांना दिलेले आहेत. शास्त्रीजींबरोबर माझे यजमान महासचिव होते आणि सचिव होते. आणि शास्त्रीजी मला सांगायला आले, की आजकाल एक नवीन संस्था निघाली आहे. म्हटलं, 'कोणती?' तर मुख्य १५ म्हणे, की नारे लगाने वाली. म्हटलं, 'त्याच्यात काय असतं?' ते नेहमी कोणी आले की जाऊन भेटायचे त्यांना आणि मग हसत यायचे. म्हटलं, झालं कारय? तर म्हणे, 'आज नारे लगानेवाली पार्टी आली आणि त्यांनी हातामध्ये तक्ते धरले आहेत.' आणि त्या तक्त्यांमध्ये काय होतं ? तर म्हणे, की 'दूसऱ्याच पार्टीचं लिहिलेलं. टोप्याही दुसर्याच पार्टीच्या. तर मी त्यांना सांगितलं , की अरे हे तर तुम्ही सकाळी लावून आला होतात, तेच आज संध्याकाळी कशाला घेऊन आलात? तुमची पार्टी तर दूसरी असं तुम्ही म्हणता. म्हणजे त्यांना पैसे देतात. आज ह्या पार्टीचं काम, उद्या त्या पार्टीचं काम, म्हणजे हा त्यांचा बिझनेस झाला आहे. तशी तुमची मुलं आरडाओरडा करण्यासाठी त्यांनी उभी केलेली आहेत. त्या मुलांची लायकी ती नाही. महाराष्ट्राच्या भूमीवर जन्मलेली ही मुलं आहेत. समजून घ्या. आपल्या मुलांची अशी कवडी किंमत करू नका. ह्या मुलांना साक्षात्कार देऊन, ही अभिनव, ही आपल्यामध्ये जी शक्ती आहे ती जागृत करा. ह्मा सर्व शक्त्या आपल्यामध्ये आहेत. जी मुलं वर्गात फार ढ होती. राहरी शाळेमध्ये तुम्ही जाऊन विचारलंत तर सगळी मुलं फस्स्ट क्लासमध्ये आहेत. आणखीन इतकेच नव्हे तर स्कॉलरशीपमध्ये सगळे पटाईत आहेत. कारण इथले प्रिन्सिपलचमुळी रियलायझेशनला आले होते. त्यांनी रियलायझेशन घेतलं होतं आणि सगळ्यांना त्यांनी आत्मसाक्षात्कार दिला. ही इतकी अभिनव एक क्रिया आहे. अर्थात मी असं म्हणेन, की पूर्वी संत-साधू सगळ्यांना देत असत. पण आजच्या ह्या कलीयुगामध्ये एकच गोष्ट आम्ही केली, की जसं ज्ञानेश्वरांनी सामूहिकतेला हे उघडून सांगितलं आहे, तसं सगळ्यांना सामूहिकतेमध्ये जागृती देण्याचं कार्य आम्ही करतो. त्यात वाईट काय करतो आहे ? हे जगाच्या कल्याणासाठी आहे किंवा नाही? किंवा ह्या कार्याने कोणाचे वाईट होणार आहे ? जोपर्यंत तुमच्यामध्ये अध्यात्माचा पाया येणार नाही, तुम्ही कोणतीही भौतिक प्रगती करून बघा, ती नाशवंतच होणार. नाशवंत होणार. कारण त्याला संतुलन राहणार नाही. दारू तरी पितील, आता पितातच आहेत. सगळीकडे लोक दारू प्यायला लागले आहेत. महाराष्ट्रात, मी जन्मात दारू पाहिली नव्हती. मला माहिती नाही दारू काय असते ते. ह्या महाराष्ट्रात जो दिसला तो दारूच पित असतो. नाहीतर आणखीन सगळे धंदे सुरू झाले आहेत. आपल्या वारणा जिल्ह्यात मी गेले होते. तिथले मुख्य ज्यांनी हे सगळें कार्य केलं, ते माझ्या पायावर येऊन रडले. मला म्हणाले, 'माताजी, कशाला मी ही भौतिक प्रगती केली असं झालं मला . मला फार वाईट वाटतं. मी एवढं उगीचच कार्य केलं.' 'अहो,' म्हटलं, 'असं काय करता ?' 'अहो, मी गांधीवादी आणि हे कार्य मूर्ख लोकं मी तयार केले आहेत.' म्हटलं, 'झालंय काय ?' 'अहो दारू काय पितात. बायका ठेवल्या आहेत. मुलांना घरातून काढून टाकलं आहे. सगळा स्वैराचार चालू आहे. आणि मला तर असं झालंय की कधी मी मरतो आणि कधी नाही.' इतके माझ्या पायावर येऊन रडले ते आणि त्यांनी सांगितलं, 'ही भौतिक प्रगती आहे. ' आणि भौतिक प्रगतीपासून जे त्रास आहेत ते सांभाळण्यासाठी आधी अध्यात्माचा पाया ठीक करा. नशीबाने सहजयोग आज उद्भवला आहे. त्याने सगळ्यांची जागृती होऊ शकते. कुंडलिनी जागृती होऊ शकते. आणि तुमच्यामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती समूळ नष्ट होऊ शकते. आम्ही जात -पात मानत नाही. आम्ही विश्वधर्म मानतो. हंडा, हे, ते , असे लग्नातले सगळे घाणेरडे प्रकार. आमच्याकडे ७५ लग्न मागच्यावेळेला झाली, पण एवढेसूद्धा भांडण झालं नाही. परवा एक बाई मला भेटायला आली. त्यांचं डोकं फिरलं होतं. 'अहो , झालं काय ?' 'अहो, एका लग्नाला जाऊन आले.' 'झालं काय?' 'अहो, तिथे रूसवा-रूसवी, फुगवा- फुगवी, हे, ते.' 'अहो,' म्हटलं, 'आमची ७५ लग्न होतात काही भांडण नाही.' इंटरनॅशनल मॅरेजेस होतात. अशा बायका ज्यांना नवऱ्याने टाकलं आहे, १६ ज्यांच्याजवळ पैसा नाही, अशासुद्धा बायकांची लग्न होतात. विधवांचे विवाह होतात. हे समाजकार्य आहे. त्याशिवाय तुमचे जे कृषीविभाग आहेत, त्याच्यासाठीसुद्धा पुष्कळ आम्ही प्रयोग केलेले आहेत. इथे एक फार मोठे डॉक्टर आलेले आहेत. तेसुद्धा बसलेले आहेत. आता अशा लोकांवर तुम्ही दगड फेकता म्हणजे काय म्हणायचं. त्यांनी जाऊन आपल्या देशात काय सांगितलं असेल. सीबीआयसुद्धा तुमच्या या अंधश्रद्धेच्या मागे लागलेले आहे. असं बाहेरच्या लोकांना त्रास देण्याचं काय कारण होतं. अशी कोणती अंधश्रद्धा हे करीत होते. ह्यांचं आयुष्य बदललं म्हणून हे आले सहजयोगामध्ये. ह्यांचं परिवर्तन झालं म्हणून आलेत. अध्यात्माशिवाय जे एकांगी जीवन होतं म्हणून हे सहजयोगात आले. आम्ही काही पैसे घेत नाही किंवा काही करीत नाही. तेव्हा तिथून इथे, महाराष्ट्रात हे का आले ? कारण त्यांचं असं मत आहे, की महाराष्ट्रात इतकं चैतन्य आहे. आहेच. कबूल आहे. कारण संत आहेत इथे. अहो, त्या रामालासुद्धा पायाच्या वहाणा काढून यावे लागले. इतका महाराष्ट्र पवित्र आहे आपला. आणि ह्या महाराष्ट्रात ही घाणेरड्या गोष्टींची अशी टूम काढून, दुसरं म्हणजे भाऊबंदकी ! भयंकर, त्याच्यावरच हे लोक काम करतात. कुठेही सहजयोग झाला की पहिल्यांदा भाऊबंदकी करायची. आपापसात भांडणं लावून द्यायची. हे काय ? हे निर्मूलनाचं कार्य आहे ? तेव्हा ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे. मी म्हणते आहे. बरं! मग, शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही बघितलं पाहिजे, डोळे उघडे ठेवले पाहिजे. डोकं नीट ठेवलं पाहिजे. ही आहे किंवा नाही! ती जागृत होते किंवा नाही! त्याचा आपल्याला लाभ होतो की नाही. ते सोडून उगीचच नाही म्हणून तुम्ही भांडायचं, देव नाही. कशावरून ? कशावरून देव नाही? हे किती अशा्त्रीय आहे. देव नाही असं म्हणतात. जोपर्यंत तुम्ही त्याचा पत्ता नाही लावला तोपर्यंत असं म्हणायचं की आहे किंवा नाही आम्हाला माहीत नाही. ही शास्त्रीय दृष्टी झाली. शास्त्रीय दृष्टी म्हणजे हे नाहीच असं धरून चाललं तर तो मनुष्य अगदी अत्यंत अशास्त्रीय आहे. म्हणूनच परदेशामध्ये कार्य फार होत आहे. आणि कुठेतरी गव्हर्मेंटने आम्हाला पुष्कळ मदत केलेली आहे. कॅनडा गव्हर्नमेंटने फार मदत केलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नमेंटने मदत केलेली आहे. त्याशिवाय अमेरिकेमध्ये विश्व निर्मल धर्म हा रजिस्टर झाला आहे. इथे जातीयता आहे. जातीयतेवर सगळे इलेक्शन होणार तुमचे. काहीतरी आपल्या देशामध्ये कुजलेले आहे. इतकं संतांनी कार्य केलं ते सगळं वाया जाणार आहे. मी सगळीकडे बघते. त्यांच्या लिहिलेल्या गोष्टी. फार आनंद होतो. पण त्या मुलांना वाटत असेल हे काय उगीचच इथे लिहिलंय 'मनुष्य ही कर्तृत्वाची लहान मूर्ती.' हे बनवायला पाहिजे तुम्ही. नुसतं भाषण देऊन नाही चालत. आहे, ही कर्तृत्वाची मूर्ती आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. ते जसं, हे एक आयुध आहे. पण जोपर्यंत ह्या इन्स्ट्रमेंटचं कनेक्शन मेनशी होत नाही, ह्याला काही अर्थ नाही. तसेच आपलासुद्धा त्या परम चैतन्याशी जर संबंध आला नाही, तर आपल्याला काही अर्थ नाही. आपण असेच इकडे तिकडे डुलत राहणार. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा विशेष सहा चक्रांतून निघते. सहा चक्रांतून निघून चहूकडे हे जे चैतन्य पसरलेले आहे, जी चैतन्य सृष्टी आहे, जिने हे सर्व जीवंत कार्य होतं, आपल्या पॅरासिम्पथॅटिक नव्व्हस सिस्टीमला ही शक्ती चालवते, ती आपल्या हाती लागते. म्हणजे आपल्याला थंड थंड असं हातामध्ये वाटू लागतं. त्याच्याबद्दल किती लोकांनी सांगितलं आहे, थंड थंड लहरी येतात. विशेषतः आदी शंकराचार्यांनी एवढं वर्णन केलेले आहे आणि त्यांनी सांगितलं आहे, 'सलिलं, सलिलं' . पण त्यांच्याशीसुद्धा वादाला एक शर्मा म्हणून आला. शेवटी ते कंटाळले. त्यांनी सांगितलं की सगळं हे कार्य आईचं आहे. आईचंच वर्णन त्यांनी सौंदर्य १७ लहरीमध्ये करून टाकलं. म्हणजे तेव्हापासून हा मूर्खपणा चालू आहे. पण आता हा मूर्खपणा थांबवूया. कारण आता या परमेश्वराला सिद्ध करण्याची, तसंच त्या परम चैतन्याला सिद्ध करण्याची शक्ती आलेली आहे या जगात आणि आता कलियुग जाऊन कृतयुग सुरू झालेले आहे. कलियुग संपलं. कृतयुगामध्ये हे ब्रह्मचैतन्यच कार्यान्वित झालं आहे. म्हणून ह्यांचं एवढं कार्य होतं. पण हे लोक रजनीशचे शिष्य. मी गुजरात समाचारमध्ये वाचलं. त्यांनी माझ्याबद्दल असं लिहिलं होतं की, 'आम्ही माताजींना, अंगापूरला त्या निर्मूलन समितीच्या द्वारे एक फटका दिला. आणि आता जर दूसरा फटका आला तर तुम्ही आश्चर्य करू नये.' त्या फटक्याच्या आधीच रजनीशची फटकावली. त्यांच्या आश्रमातून एका माणसाने हे छापले आहे. ह्या लायकीचे आहात का तुम्ही? तो रजनीश किती घाणेरडा मनुष्य होता त्याच्याबद्दल सांगायला नको. सर्व देशातून त्याला हाकलून लावलं. ते आपल्या डोक्यावर येऊन बसलेत आणि ह्यांचे ते गुरू आहेत. ज्या देशामध्ये ह्यांनी घाण केलेली आहे, त्या लोकांना जाऊन विचारा. एक त्यांची फिल्म आहे. ती पाहिलीत तर आठ दिवस तुम्ही जेवणार नाहीत. इतका घाणेरडा नरक उभा केला आहे त्यांनी. पण बुद्धीवादीला ते दिसतच नाही. तो चालाक होता. मी त्याला फार जवळून पाहिलं आहे. आणि मला आश्चर्य वाटलं, तो जेवायचा तरी बकासूरासारखा. एवढं मोठं ताट, त्याच्यामध्ये चोवीस त्याची पक्वान्न आणि बकासूरासारखं सगळे खाऊन टाकायचा. मी तर आश्चर्यचकित झाले की हा मनुष्य आहे की काय! असं सांगतात की आत्मसाक्षात्कारी माणसाचं शरीर हलकं असतं. मलासुद्धा चालतांना वगैरे त्रास होत नाही. वाऱ्यासारखं आहे माझं शरीर, पण तो मनुष्य, कुठे बसायचं म्हटलं तर त्याच्यासाठी एक स्पेशल आसन बनवायला लागायचं. या माणसाला मी फार जवळून पाहिलं आहे. बायकांना नागवं करून आणि वाट्टेल ते ह्याने धंदे केलेले आहेत बायकांच्या वर. असा मनुष्य आता तुमचा गुरू झाल्यावर मात्र ह्या देशाची काय दशा होणार आहे? हे सगळे भामटे आता जर ह्या राजकारणी लोकांचे गुरू झाले, तर तुम्ही लोकांनी उठायला पाहिजे ह्याच्याविरूद्ध, ही गोष्ट खरी आहे. त्यांचं तुम्ही बघाल, जोपर्यंत तुमच्यामध्ये सामाजिकरीत्या कुंडलिनीचे जागरण होत नाही तोपर्यंत त्यांचा तुम्ही नि:पात करू शकत नाही. जिथे तिथे, आता ती गुरूमाई म्हणून बाई आली. तिने लोकांना वेड लावलं. त्यांचे मार खाल्लेले इथे लोक येऊन बसलेले आहेत. तो एक मुक्तानंद. त्याने लाखो रूपये कमवले. करोडो रूपये कमवलेत . सहा करोड रूपयाचे त्याच्याजवळ डायमंड्स आहेत असं मला इन्कमटक्स कमिशनरनं स्वत: सांगितलं. तर जे लोक पैसे घेतात आणि तुम्हाला मूर्खात काढतात, त्यांच्याकडे हजारोंनी लोक जातात. पण जे सत्य सांगतात, सत्याला काही पैसे लागत नाही, तिथे मात्र तुम्ही येऊन विरोध करता. म्हणजे काय अकलेचे दिवे आहेत ते बघा. हे रिकामपणाचे धंदे म्हणावेत की मूर्खपणाचे दिवे म्हणावेत, काय म्हणावं मला सुचेना. हे असं आधीही झालं आहे की संतांच्या मागे हात धुवून लागायचं. पण आता असं करू नये हे बरं , कारण कृतयुग सुरू झालं आहे. तेव्हा त्यात जो त्रास होईल त्याबद्दल मी जबाबदार नाही. ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे, ही तुमची आहे, 'तुज आहे तुजपाशी' जे म्हटलेले आहे, ते सगळं सत्य होणार आहे. जे पसायदान लिहिलं त्यांनी, मागितलं , ते पसायदानच आहे हे. कुंडलिनीचं जागरण आणि त्याने माणसाची इतकी उन्नती होते. सर्व तऱ्हेचे रोग ठीक होतात. कृषीमध्ये, पशुपालनात, प्रत्येक गोष्टीत इतकी समृद्धी येते! इंग्लंडमध्ये पुष्कळ लोक बेकार आहेत. लाखोंनी लोक बेकार आहेत. पण ते सहजयोगात आले की बेकारी गेली. कारण बुद्धी इतकी तल्लख होते. इतकी तल्लख बुद्धी होऊन जाते. आमचे साहेब तर म्हणतात की, 'तुला सगळे देवद्त मिळाले.' ते सगळे देवद्त नव्हते, झाले देवदूत. नव्हते. ते सगळे आता देवदूत झाले. ह्यांचं वागणं १८ बघा, ह्यांचं बोलणं बघा, तोंडावरचं तेज बघा. कोणत्याही भुताच्या मागे लागायचं आणि त्यांना मोठ मानून घ्यायचं. ह्याला काही अर्थ आहे? डोकं लावणं ते आज पूढारी बनतात. आमच्याकडे एक धोबी होता. तो आला माझ्याकडे आणि म्हणाला, 'माताजी, तुम्ही मला मत द्या.' 'अरे,' म्हटलं, 'तुला मत द्यायला मी काही वेडी आहे का?' नाही म्हणे, 'मी पुढारी आहे.' 'असं कां!' 'इथले म्हणे धोबी आहेत त्यांचा मी पुढारी.' आणि एवढा मोठा शिकलेला मनुष्य त्याच्या विरूद्ध उभा होता. 'अरे,' म्हटलं, 'मी काय वेडी आहे का तुला मत द्यायला?' 'नाही,' म्हणे, 'मी पुढारी आहे.' आणि तो निवडून आला. म्हणजे, अगदी इतका वाईट मनुष्य होता तो स्वभावाने ! दारूडा. सगळे काही त्याच्यामध्ये होते. पण आमचा धोबी होता, कपडे चोरायचा, हे गुण करायचा. तो निवडून आला. काय हे लोक. जो मनुष्य सज्जन, सुशिक्षित, मला माहीत आहेत ते सुद्धा गृहस्थ. ते नाही निवडून आले, हा आला धोबी. हा काय प्रकार आहे ! आपलं डोकं जागेवर ठेवायला पाहिजे. आज समाजात जेवढ आपण करतो आहे, ते सगळे व्यर्थ जाणार आहे. काहीही राहणार नाही. आता ही शाळा आहे. मला फार बरं वाटलं. शाळा म्हणजे पवित्र स्थान जिथे मुलांना शिक्षण दिलं जातं. आणि जे काही होईल, ते नेहमी आता हे लोक सुद्धा शाळेसाठी, 'माताजी, काहीतरी द्या.' प्रत्येक ठिकाणी आम्ही शाळेसाठी मदत करतो. पण मी काय बघते, त्यांच्यामध्येच भांडण सुरू. आता हे शाळेसाठीच भांडणं सुरू केली अंगापूरला की, 'माताजी पैसे तुम्हालाच देतील, आम्हाला का नाही.' अरे तुम्ही काही कार्य करा तर देऊ.' फार देत नाही. माझ्याजवळ एवढे काही पैसे नाहीत. हे लोकच देतात. मी एकत्र करून दिले आहेत. मी काही दिलेले नाही. आणि त्याच्यावरती हे झालेलं आहे, की इथे येऊन खुसपट काढायचं, काहीतरी भांडण. अहो, आयुष्यभर तुम्ही भांडतच राहणार, तुमची मुलं भांडत राहणार तुम्ही काही प्रगती करणार आहात का ? निदान ह्या लोकांमध्ये भांडखोरपणा तरी नाही. इतके भांडखोर लोक आहेत आणि कुणाची इज्जत नाही. एकदुसऱ्याला खाली ओढायचं हा आपल्या महाराष्ट्राचा गुण आहे. हा फारच वाईट गुण आहे. कुंडलिनी जागरणानंतर हे सगळे संपून जाईल. मनुष्य शांत, समाधानी होईल. एकाचा पाय ओढ, दुसऱ्याचा पाय ओढ. कशी प्रगती होणार त्यांची. कोणाही बद्दल सात्विक श्रद्धा नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लंडनसारख्या शहरामध्ये माझ्या यजमानांनी काम केलं आहे. १३४ देशामधून ते निवडून आले होते आणि लंडनसारख्या देशात जिथे इंग्लिश लोक कोणाला घुसू देत नाही, 'सर्वोच्च' साहेबांना दिलं. ती पदवी आणि कुणाला नाही. ही त्यांची जी ओळख, ज्यांनी काम केलं, ज्यांनी मेहनत केली, जो सच्चा मनुष्य आहे, त्याची ओळख होती. हे आपल्या देशात कधी येणार आहे! परवा मी गेले. मला पोलिसवाल्यांचंसुद्धा इतकं वाईट वाटलं. रस्त्याने जात होते. उभे होते बिचारे. म्हटलं 'आता तुमचं हे कसं काय चाललं.' 'अहो, काही नाही माताजी, उभे आहोत ओळीने.' 'का?' तर म्हणे, 'इथून एक मिनिस्टर जाणार आहे.' 'अरे, जाणार तर त्यांना मारायला कोण येणार आहे? कशाला उभे तुम्ही इथे? चहा प्या. काहीतरी करा. मलाच त्यांची दया वाटली. परत मी आले ८-१० तासाने तरी पोलिस उभेच तिथे. 'अरे,' म्हटलं, 'काही खाल्लं- प्यालं की नाही?' काही नाही. बरं, शेजारपाजाऱ्यांनी तरी त्यांना काही चहापाणी द्यायचं. नाही. पोलिसवाले, म्हणजे गेले. अरे, ते तिथे उन्हातान्हात उभे किती वेळचे. माझाच जीव हळहळला. पण इतक्या लोकांसाठी कशी तिथे व्यवस्था करायची मला काही समजेना. 'अरे,' म्हटलं, 'थोडं जाऊन, आळीपाळीने जाऊन जरा काही खाऊन या नां! असं काय करता इथे. आठ तास कशाला उभे.' 'आम्ही जाऊच शकत नाही, म्हणे. ही आपल्या इथे दर्दशा. म्हणजे जे प्रेमाचंे स्थान, जो प्रेमाचा सागर , असा हा महाराष्ट्र होता. तिथे केवढी घाण आलेली आहे. प्रेम १९ सोडून भाऊबंदकी वर आली आहे . अहो, थोडी होती पूर्वी. आजकाल इतकी भाऊबंदकी झालेली आहे ! कोणाबद्दल काही प्रेम नाही. सहजयोग म्हणजे काय? हे जे प्रेमाचा सागर, क्षमेचा सागर , दयेचा सागर अशी जी परमचैतन्याची शक्ती ती आपल्यात वाहू लागल्याबरोबर मनुष्याला इतकं प्रेम येतं आणि इतका आनंद वाटतो! 'आनंदाच्या डोही' जे वर्णन केलेले आहे ते समोर आहे. तेव्हा ही कुंडलिनी आपली जागृत करून घ्या आणि अशा बेकार लोकांच्या नादी लागू नका. अगदी बेकार लोक आहेत. काही त्यांना अर्थ नाही. जे गृहस्थ आले होते, मानव, त्यांच्यावरून, 'शितावरून भाताची परीक्षा, ' त्याला अध्यात्म माहीत नाही. त्याचा काही व्यासंग नाही. त्याला काही मेडिकल माहीत नाही, की काही माहीत नाही. आता त्याच्याशी बोलायचं तरी काय, कप्पाळ! मग शेवटी मी त्याला एक टेप करून दिली, की बाबा, हे पहा, जरी मी मेडिकल शिकलेले असले, तरी मराठी भाषेचा माझा फार अभ्यास आहे. मी वाचलंय. काय मराठी भाषा आहे! तुम्हाला माहीत नाही, मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि महाराष्ट्रात तर ही विशेष आहे. एक तर देशभक्ती आणि दूसरं देवाकडे लक्ष. हे दोन्ही ठेवलं आहे. जसे शिवाजी महाराज आत्मसाक्षात्कारी होते. त्यांनी हे नाही म्हटलं, की हा धर्म जागवा, 'स्व धर्म जागवावा.' स्व धर्म, 'स्व' म्हणजे आत्म्याचा धर्म, त्यांनी आपली स्वयंचालित संस्था जाणतात, त्याला जागवलं पाहिजे. आणि म्हणून आत्ताच आपण कुंडलिनी जागृतीचे कार्य करतो. याबाबतीत उहापोह करता येत नाही. कारण ज्याला डोळे नाही, त्याला कसं सांगायचं की हा रंग कोणता आहे. आधी डोळे येऊ द्या, मग बघू. नसते वाद - विवाद करून, तीन तास त्या मानवशी बोलून, मी म्हटलं, 'नमस्कार तुमच्या अज्ञानाला! एवढा अज्ञानी मनुष्य मी आजपर्यंत पाहिला नाही. आणि तुम्ही पुढारी कसे झालात.' मग नंतर, कोणी तरी सांगितलं ते वध्ध्याला जेलमध्ये होते आणि म्हणायला लागले की, 'मला इथले जेवण आवडत नाही.' कशा कारणाने गेले माहीत नाही. त्यांनी सांगितलं की, 'इथलं जेवण खावं लागेल.' 'नाही, नाही म्हणे इथलं नको.' मग त्याच्यावरती एक बाई होत्या त्यांनी मला सांगितलं की, 'माताजी, शेवटी ह्याने सांगितलं, मी तुमच्या पाया पडतो, क्षमा मागतो, लिहून देतो, मला घरी जाऊ द्या. मी घरचं जेवण जेवेन.' अशी माणसं तुमचे लीडर. असे विद्वान लोक तुमचे लीडर आहेत. तेव्हा ह्याला त्क करता येत नाही. तर्काच्या पलीकडे आहे. विज्ञानाच्या पलीकडे अध्यात्म आहे. पण हे 'आधी कळस, मग पाया,' आधी अध्यात्म मिळवायचे, मग करा वाट्टेल तेवढी प्रगती. आणि प्रगती होणारच. कारण तुमच्यावर आशीर्वाद आहे, परमेश्वराचा. देशाला परमेश्वराच्या आशीर्वादानेच सगळे कार्य होतं. तेव्हा तो आशीर्वाद आपण घ्यावा आणि ह्या महाराष्ट्र भूषवावं, अशी माझी सर्वांना विनंती आहे. आता आपण आधी जागृतीचा कार्यक्रम करू या. हे लोक सगळे विदेशी आहेत. एखाद्या इंग्लिश माणसाला नुसतं असं सांगायचं असलं, की दरवाजा बंद कर. तर त्याला खोलता येत नसे. त्याला सांगायचं इंग्लिशमध्ये 'देअर वॉज अ बँकर.' मग तो ते म्हणायचा. त्याला एक अक्षर शिकवणं कठीण. आणि पुढे तो मराठीत बोलायला लागला, तर माझ्या आजीबाई म्हणायच्या, की कोणती भाषा बोलतोय हो. अहो, म्हटलं मराठीत बोलतो आहे. 'असं का! मला वाटलं कोणती, इंग्लिश नाही, मराठी नाही, आहे कोणती भाषा.' आता तुम्ही ह्यांचं ऐकून घ्या. पोवाडा गातात सगळे काही. हे कुठून आलं. ते म्हणतात, आपलं संगीत हे ॐ कार स्वरूप आहे. हे सिद्ध होतं. ह्यांना कुठून आलं हे सगळे काही. ताला-सुरात, आपल्याहीपेक्षा छान म्हणतात. तेव्हा ह्यांच्या प्रगतीकडे बघून आपणही आपली प्रगती करून घ्यायची आणि आपल्याकडे लक्ष द्यायचं. आपण काही साधारण लोक नाही. ह्या महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. पण त्याला पाहिजे जातीचे. 'येऱ्यागबाळ्याचे काम नोहे.' तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे, आपला गौरव, आपली शक्ती ही आपल्यात असताना आपण ती का सोडायची ? ती का वापरायची नाही! २० तेव्हा कृपा करून आपलं थोडसं, एक दहा मिनिटाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला जागृती होईल. ज्यांना होईल त्यांना होईल. नाही होणार त्यांना नाही होणार याच्यात जबरदस्ती करता येणार नाही. उद्यापासून तुमची इच्छा असेल तरच, जर तुम्ही त्याच्या विरोधात असलात तर कधीही जागृती होणार नाही. आता हे हिटलर लोक सगळे दगड घेऊन निघालेले आहेत. ते म्हणतात आम्हाला जागृती करा. जन्मात होणार नाही त्यांची जागृती. होणं शक्यच नाही. ज्यांच्या मनामध्ये जरासुद्धा साक्त्विकता नाही, अशा तामसी लोकांची कोण जागृती करणार ? शक्यच नाही. कारण त्यांची लायकी नाही. जागृतीची लायकी तर पाहिजे. दोन लाख मोजा नाहीतर शंभर लाख मोजा. ह्यांची जागृती मला काय, कोणालाच जमणार नाही. ब्रह्मदेवालासुद्धा जमणार नाही. तेव्हा ते शक्य नाही. फक्त ज्या माणसामध्ये असे सात्त्विक विचार असतील, की माझी जागृती झाली पाहिजे. मग तुम्ही काहीही केलं तरी हरकत नाही. या क्षणाला. हे ज्यांच्या मनामध्ये असेल, की माझी जागृती झाली पाहिजे. मला शक्ती मिळाली पाहिजे. त्यांचं आम्ही कार्य करू शकतो आणि ते होऊ शकतं. त्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. दडपशाही करू शकत नाही, काही नाही. तर सगळ्यांनी आता आपली जागृती करून घ्यावी. एका अर्थाने ऊन असलेलं बरं! म्हणजे जे थंड - थंड डोक्यातून येतं किंवा हातातून येतं , ते लगेचच कळतं. ऊन नसलं तर जरा त्रास होतो कधी कधी. एअरकंडिशन असेल तर लोकांना शंका येतात, की हे एअरकंडिशनच चालू आहे. आता आपण जागृतीचं कार्य करू. अहो, तुम्हा लोकांची जागृती पाच मिनिटात होते आणि ह्या लोकांवर माझे मी हात मोडले, वर्षानुवर्ष मेहनत केली तुम्हाल माहीत नाही, पण झाले मात्र हे एकदा. मिळाल्यावर मात्र जमले खूप जोरात. तुम्ही जमत नाही. जसं आपलं स्वातंत्र्य लवकर मिळालं, तर बसले त्याचे धिंडवडे काढत. तसाच प्रकार आहे हा. सहजयोगामध्ये लोक जमत नाही. माझ्या प्रोग्रॅमला येतील. पार होतील. पण सत्कारणी नाही लागत. सत्कारणी लागत नाही. तसं करू नका. कृपा करून आज जागृती घेतल्यानंतर सत्कारणी लावा. फार मोठे कार्य होणार आहे तुमच्या हातून, तुम्ही फार शक्तिशाली आहात. त्या शक्तीला प्राप्त करा. ती शक्ती जर तुम्हाला मिळाली आणि त्यात जर तुम्ही वृक्षासारखे वाढले तर तुम्हीच तुमचे गुरू होता आणि इतकं तुम्ही कार्य करू शकता की त्याला काही अंतर नाही. तेव्हा कृपा करून सहजयोगाला प्राप्त व्हा. सहज, सह म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला. हा योगाचा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो तुम्ही प्राप्त करून घ्यावा. सगळ्यांनी बसून घ्यावं. काल काही लोक बसले नाही, झाले नाही पार. काय होतं माहीत नाही. या पृथ्वीचाच असेल काही तरी अधिकार! बसले नव्हते ते पारच नाही झाले. वर लटकतच रातहिले. असं नाही की जमिनीवरच बसलं पाहिजे. कुठेही बसले असले तरी ठीक आहे. पण जोडे, वहाणा नको. वहाणा काढून टाका. बरं दसरं असं की, मी आई आहे. माझ्यासमोर टोप्या घालायला नको. कारण मी आई आहे आणि आईला काही आपण टोप्या घालून भेटत नाही. तेव्हा मी मिनिस्टर किंवा गुरू नाही. तेव्हा कृपा करून टोप्या उतरवून घ्यायच्या. कारण हे ब्रह्मरंध्र छेदायचे आहे नां! टोपी काढलेली बरी! विल यू प्लीज टेक आऊट यूवर कॅप ? आता फक्त दोन्ही हात माझ्याकडे असे करायचे. नुसते असे. साधे दोन्ही हात असे माझ्याकडे करा. काहीही करायला नको तुम्हा लोकांना. नुसते असे हात करायचे. पाय थोडे वेगळे ठेवा. एकावर एक पाय नको. बसलेल्यांचं नाही म्हणत, पण जे वरती आहेत, असे वर बसलेले, त्यांनी पाय थोडे वेगळे ठेवलेले बरे ! जमिनीवर बसलं म्हणजे झालं. त्यांचं तर कल्याण होणार! बरं, आता नुसते डोळे मिटायचे. नुसते डोळे मिटा. काही करायचं नाही दसरं. डोळे मिटा. आणखीन चष्मा असेल तर तो उतरवून घ्या. चष्मा उतरलेला बरा. डोळ्याची २१ दृष्टी पुष्कळदा बरी होते. फक्त डोळे मिटायचे. आणि मनामध्ये अशी इच्छा धरायची, 'आई, आमची कुंडलिनी जागृत झाली पाहिजे.' ही तुमची आई आहे. कुंडलिनी तुमची आई आहे. प्रत्येकाची वेगळी, वैयक्तिक आई आहे. तुमचं जसं सगळे टेपरेकॉर्डमध्ये असतं तसं तिच्याजवळ सगळं काही आहे. तिला माहिती आहे, की तुम्ही कोण, कसे आहेत. आता डोळे मिटले. डोळे उघडू नका. कृपा करून मी सांगितलं नाही तोपर्यंत डोळे उघडू नका. कारण चित्त आतपर्यंत ओढलं जातं. कुंडलिनी जेव्हा वर येते तेव्हा चित्त आतपर्यंत ओढलं जातं. तेव्हा डोळे बंद ठेवलेले बरे. हे काही मेस्मरिझम नाही. तुमचे डोळे उघडे ठेऊन, लोक डोळ्यात डोळे घालून करतात ते. हे देवाचं कार्य जिवंत कार्य आहे. आता डोळे मिटल्यावर फक्त पाच मिनिटाची गोष्ट आहे अजून. ( माताजींनी माईकमध्ये फुंकर मारली) आता हळूहळू डोळे उघडा. आता डावा हात माझ्याकडे करा. फक्त डावा हात माझ्याकडे ठेवा आणि उजवा हात असा. परत उजवा हात. थोडसं संतुलन द्यावं लागतं आधी. मान वाकवून घ्यायची. आणि डाव्या हाताने, उजवा हात असाच. डाव्या हाताने जी टाळू आहे त्याच्यावर अधांतरी असा डावा हात धरायचा. अधांतरी. हा मराठीतला शब्द 'अधांतरी' कुठे नाही. अरांतरी धरायचे. डोक्यातून गार यायला पाहिजे किंवा गरमही वाटू शकतं. जर तुम्ही क्षमा नसेल केली सगळ्यांना, तर क्षमा केली पाहिजे. सगळ्यांना क्षमा करून टाका. स्वत:लाही क्षमा करा. 'माझं हे चुकलं, माझं ते चुकलं,' काही नाही. तुम्ही मानव आहात. मानवच चुका करतात. परमेश्वर थोडी करतो. तेव्हा 'माझं हे चुकलं, माझं ते चुकलं,' असं काही म्हणायचं नाही. आत्मविश्वास ठेवला पाहिजे. अजून तुम्ही आपल्याला जाणलं नाही. आता डावा हात माझ्याकडे करायचा. जेव्हा तुम्ही स्वत:ला जाणलं नाही, तेव्हा तुम्ही काय स्वत:मध्ये असा वाईट विचार करता. मान खाली घाला. वाकवून घ्यायची खाली. परत उजव्या हाताने करा. असा विचार ठेवायचा नाही, की मी हे पाप केलं, ते पाप केलं, हे चुकलं, ते चुकलं, काही नाही. ह्यावेळेला काही नाही. आणि असे जे लोक तुम्हाला सांगतात नां , ते स्वत: पापी आहेत. सगळ्यांना क्षमा करा एकसाथ. कोणाला क्षमा करायचे ठेवायचे नाही. सगळ्यांना एकसाथ क्षमा करा. आता उजवा हात परत माझ्याकडे. एकसाथ क्षमा करा सगळ्यांना. क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही करता तरी काय? काहीच करत नाही. फक्त आपल्याला त्रास करून घेता. सगळ्यांना एकसाथ क्षमा. आता दोन्ही हात डोक्यावर. असे घेऊन मान मागे घ्यायची आणि एक प्रश्न विचारायचा मनामध्ये तीनदा, 'श्रीमाताजी, परमचैतन्य आहे का?' असा प्रश्न तीनदा विचारायचा. 'माताजी, हे परमचैतन्य आहे का?' किंवा 'श्रीमाताजी, ही परमेश्वरी प्रेमाची शक्ती आहे का?' असा प्रश्न तीनदा, कोणताही विचारा तुम्ही. तीनदा, मान वर करून. काही घाबरायचं वगैरे काही नाही. आता हात खाली करा. दोन्ही हात माझ्याकडे करा आणि माझ्याकडे न विचार करता बघा. न विचार करता. ही निर्विचार समाधी. ही निर्विचार समाधी आहे. आता ज्या लोकांच्या हातामध्ये, बोटांमध्ये किंवा टाळूमध्ये थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील. त्यांनी दोन्ही हात वर करायचे. वर, वरपर्यंत. वा, वा ! ही खरी पायरी आहे. लहानपणी 'पळसाला पाने तीन' शिर्षकाचा एक लेख वाचनात आला. त्यात एक मुलगा वाईवरून पुण्याला निघाला होता. त्याचं वर्णन होतं. मला पुष्कळदा वाटायचं की वाईला यायचं. कारण वाई काहीतरी एक तीर्थस्थान असेल, असं मला नेहमी वाटायचं. आज ते कळलं. आता तुम्ही वाईमध्ये आहात तेव्हा, ह्या स्थानाचं महात्म्य ठेवलं पाहिजे आणि धर्मात उतरलं पाहिजे. आता खरा धर्म तुमच्यात जागृत झाला. तुम्ही कोणत्याही धर्माचे असले, हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन, तरीसुद्धा वाट्टेल ते पाप करू शकता, म्हणजे तो धर्म तुम्हाला रोखत नाही. पण आता तुमचा हाच आत्मधर्म झाल्यामुळे तो तुमचा आत्माच तुम्हाला सांभाळेल. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे ! २२ कुण्डलिनीपण एक ज्वाळी आहे, तिचे उत्थान धगधगणीन्या ज्वाळेसारखे आहे. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे आणि वरच्या बाजूला जाणारी कोणतीही गोष्ट पृथ्वीकडे खेचली जाते. केवळ अग्रीचे गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध, वरील बीजूस जातो. गपतीपुले, महाराष् प.पू.श्री मातीजी, गण ट्र, २१.११.१९९१ प्रकाशक निर्मल ट्रान्सफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१ , ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in आत्म्याची तुलना आपणे सूर्याबरोबर करू शकतो. सूर्य ढगांनी झाकला जाऊ शकतो, सूर्याला ग्रहण लागू शकतं, पण तो आपल्या जागेवर स्थिर असतो. सूर्याला तुम्ही ज्योतिर्मय बनवू शकते नाही, तो तर स्वत:चे प्रकाशमान आहे. ढग जर बाजूला झाले तर त्याच्यावर आलेले आवरण बाजूली होते आणि सूर्य परते एकदा वातीविरणात चमकू लागतो. प.पू.श्रीमाताजी, १८.०६.१९८३ ---------------------- 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-0.txt सं चैतन् लहवी मे-जून २०१५ मराठी म ৭ २> कर 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-1.txt निर्मल वृक्ष 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-2.txt या अंकाल नवीन धर्म म्हणजे विश्व निर्मल धर्म *..४ देवी पूजा, पुणे, १७ डिसेंबर १९८८ ध्यानामध्ये निर्विचारिता ..१० औरंगाबाद, ८ डिसेंबर १९८८ भारतातील भ्रष्टाचार ... १४ सार्वजनिक कार्यक्रम, वाई, १६ डिसेंबर १९९० भ्रम संपले आहेत सर्वशक्तिमान परमात्म्याचे अस्तित्व, त्याची इच्छाशक्ती आणि सहजयीगाचे सत्य . सहस्रार उधडल्याची परिणाम म्हणजे आपले सगळे तुम्हीला कोणतीच शंका नकी. परमेश्वराच्या शक्तीची उपयीग करतीनी तुम्हाला है माहीत असावे की ह्याचे संचालन याविषयी तुमच्यामध्यै कौणताही भ्म नसावा. करण्याच्या तुमच्या योग्यतेमुळैच तुम्हाला ही शक्ती दिली गैलेली आहे. सहस्ीर पूजा, कबैली, इंटेली, १० मे १ee२ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-3.txt नवीन धर्म म्हणजे विश्व निर्मल धर्म पुणे, १७ डिसेंबर १९८८ का २- जर एखाद्या दिव्याला तुम्ही ज्योत दिली तर लगेचच तो प्रकाश देऊ लागती. तसेच तुम्ही प्रकाश देण्यासाठी बनवलेले आहात. आपल्या पुण्यामध्ये या तीस देशातून ही मंडळी आली, इतक्या लांबून आणि आपण पुण्यामध्ये किती लोक आहोत. पुण्यातले किती सहजयोगी आले ? तेव्हा सहजयोग पुण्यामध्ये काही वाढलेला दिसत नाही. त्यात भाऊबंदकीसुद्धा दिसून येते. जो तो माझच खरं असं करतो आहे. म्हणून त्याबद्दल आज दोन शब्द मला सांगावेसे वाटतात. मी असं पाहिलं की एक दुसरे सेंटर काढलेले आहे आणि त्या सेंटरमध्ये असं सांगण्यात येतं की अध्यात्माला पैसे लागत नाही, मग वर्गणी कशाला काढायची? ४ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-4.txt सांगायचं असं, की अध्यात्माला लागत नाही पैसे, पण या तंबूला लागतात. आणखीन पुष्कळ गोष्टींना लागतात. आत्तापर्यंत मीच पदरचे पैसे खर्च करून हिंदुस्थानात येते आणि अजूनही येते. त्याशिवाय सबंध महाराष्ट्रात आमचा दौरा आत्ताच कुठे सुरू झाला जिथे की आपले ट्रस्टचे पैसे चालतात. हे ट्रस्टचे पैसेसुद्धा सगळे एकसार, आपल्याला आश्चर्य वाटेल की बाहेरून आले आहेत कोणीही एकही पैसा नाही दिलेला. फुकटखोरीची इतकी सवय झालेली आहे की जेवायलासुद्धा बसतील तर फुकट बसतील. त्यातल्या त्यात इथले लोक म्हणजे फारच, जास्तच कंजूष दिसतात. म्हणजे पूजेला येतील तर स्व:चा डबा घेऊन यायचा आणि तिथे जेवायचं नाही. तो प्रसाद असतो. तेसुद्धा होत नाही. अशा भिकारी लोकांसाठी सहयजोग नाही. मला श्रीमंतही पचत नाही आणि गरीबही पचत नाही. जे अशा भिकारी वृत्तीचे आहेत त्यांनी सहजयोग सोडावा आणि आमच्यावर कृपा करावी, ही विनंती. म्हणजे दसरे चांगले लोक आतमध्ये येतील. कारण जे लोक इथे येतात त्यांच्याकडूनही भिकारीपणा केला जातो असं मी ऐकलेले आहे. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो, फक्त (अस्पष्ट) लागत नाही, त्यासाठी काही मेहनत करायला लागत नाही. हे कबूल. पण बाकी सगळ्या गोष्टींना पैसा लागतो. ह्या एकंदर भाऊबंदकीला आळा घातलाच पाहिजे. अहो, दिल्लीहूनसुद्धा गणपतीपुळ्याला जास्त लोक येतात. पण ही शरमेची गोष्ट आहे. याकडे लक्ष दिलेच पाहिजे. स्वत:मध्ये ती विशालता आली नाही तर आपण सहजयोगी नाही. सर्वात मुख्य म्हणजे सहजयोगाची जबाबदारी आपली आहे. हा खर्च आपण करायचा आहे. कुठवर करत रहायचं! सर्व ह्याला माताजीच येतात, म्हणजे काय तुम्ही ही फुकटखोरी माताजींच्या माताजींनी दमावर करता ? एकदा बिरबलला अकबरने प्रश्न केला, की जगात अधमात अधम लोक कोण आहेत ? तर त्याने असं उत्तर दिलं की, 'जे लोक देवाच्या दारी जाऊन भीक मागतात, त्यांच्यापेक्षा आणखीन अधमात अधम कोणीच नाही. तेव्हा पुण्यातच हे असं विशेष पाहिलेले आहे मी. आणखीन कुठेच असा त्रास नाही की काहीतरी डोक्याची शक्कल लढवून असे प्रश्न करायचे. तेव्हा जी वर्गणी लागते ती मला माहिती आहे. किती पैसे जमा होतात ते मला माहिती आहे. त्यात सबंध ट्रस्टचे पैसे आम्ही ओतले, ते सगळे ह्या लोकांनी दिलेले पैसे आहेत. ओतून तुमच्यासाठी जागा घेतल्या. आपल्याकडे कोणीही बेईमानी करीत नाही, कोणीही पैसे खात नाही, कोणीही खोटे काम करीत नाही. तेव्हा असं म्हणणं की, 'वर्गणी घेतात,' म्हणजे हे लोक काय पैसे खातात की काय! अशा रीतीने जे लोक कार्य करीत आहेत, त्यांनी आपले सेंटर्स एकदम बंद केले पाहिजेत आणि त्यांना सहजयोगी म्हणता येणार नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही जबाबदार नाही. त्या सेंटरमध्ये जाणाऱ्या लोकांना त्रास झाला तर आम्ही जबाबदार नाही. ही झाली सेंटरची गोष्ट आणि पुण्याची गोष्ट ! आता आपण दोन दिवस पाहिलेच आहे, की किती गर्दी होती सेंटरला, म्हणजे आपल्या प्रोग्रॅमला! इतके लोक आले होते! म्हणजे पुण्याला लोकांना परमेश्वर हा पाहिजे. त्याबद्दल शंका नाही. पण त्यासाठी जरासुद्धा आपल्याला तोशीस लागू द्यायची नाहीये. त्यात परमेश्वर जर येऊन आमच्या पायावर पडला तर त्याहून उत्तम. अशी प्रवृत्ती असल्यामुळे यातली किती मंडळी सहजयोगाला धरतील आणि त्यात वाढतील आणि त्याच्यामध्ये आपली प्रगती करतील हे बघण्यासारखे आहे. त्यात तिसर्या तऱ्हेचे लोक मी पाहिले जे सहजयोगाचा उपयोग आपल्या धंद्यासाठी करतात किंवा काहीतरी पैसे कमवण्यासाठी करतात, हे तर अधमातले, अधमातले अधम झाले आहेत लोक. जे सहजात जमेल ते केले पाहिजे. ही प्रवृत्ती पुण्यामध्ये असावी याचं मला फार आश्चर्य १ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-5.txt वाटतं कारण पुणं हे एक पुण्यपट्टणम आहे. आता काल आणि परवा मी खणखणीत, असं म्हटलं पाहिजे की फार परखडपणे, हसतखेळतच पण सहजयोग सांगितला. त्यावर लोक अगदी, दीड तास मी बोलत होते, पण अगदी नि:स्तब्ध बसले होते आणि त्यांच्यामध्ये निर्विचारीतेची स्थापना झाली आणि ते येतीलही, पण तुम्हाला लोकांना पाहून ते बिचकणार आहेत. कारण तुम्ही तुमच्या लिडर्सचे ऐकत नाही, त्यांचा मान करीत नाही. तुम्ही योगी असल्यासारखे दाखवत नाही. प्रत्येक ठिकाणी पैसे वाचवण्याच्या मागे असता. कसे पैसे बनवायचे? पैसे...पैसे...पैसे! हे भूत सोडलं पाहिजे. तुम्ही दिलदारपणा जर नाही केला तर तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देणार नाही. जर एक दार उघडलं तरच दुसर्या दारातून वारा येतो. पण जर तुम्ही एक दार बंद ठेवलं आणि दुसरं दार उघडलं तर वारा येणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे कंजूष माणसाला सहजयोगामध्ये स्थान नाही. ज्यांना कंजुषी करायची असेल त्यांनी सहजयोगात रहायचे नाही. अशा लोकांना काहीही मिळणार नाही, काही प्रगती होणार नाही. कद्र माणसाची सहजयोगामध्ये काहीसुद्धा लायकी नसते. अशा माणसाने आपला कद्रूपणा करावा आणि घरात बसावं हे बरं! पैशाच्याबाबतीत बोलायचे म्हणजे मला अगदी जीवावर येतं. कारण तुम्हाला माहिती आहे मला काही पैशाची कदर नाहीये. पण हे शिकलं पाहिजे की आपल्यामध्ये लक्ष्मी तत्त्व जर जागृत करायचं असलं तर माणसाने थोडं तरी विशाल हृदयाचे असलं पाहिजे. त्यात भर अशी पडते, की सहजयोग ही आमची जबाबदारी आहे, असं कोणी समजत नाही. ही आपली जबाबदारी आहे. आम्हाला सहजयोग मिळाला. जर एखाद्या दिव्याला तुम्ही ज्योत दिली तर लगेचच तो प्रकाश देऊ लागतो. तसेच तुम्ही प्रकाश देण्यासाठी बनवलेले आहात. नुसते मिरविण्यासाठी नाही किंवा ह्याचा फायदा उचलण्यासाठी नाही किंवा आम्ही सहजयोगी, सहजयोगी म्हणून जगभर फिरण्यासाठी नाही, की ह्यानंतर माताजी आम्हाला देतच असतात. तुम्ही कधी देणार आहात सहजयोगाला! तुमची मेहनत पाहिजे. तन, मन धन म्हणतात, मला नको. मला नको असलं तरी सहजयोगाला त्याची गरज आहे. जबाबदारी म्हणून घेत नाहीत. दोन-चार माणसं मिळून ही कामं करतात. मग त्यांना म्हणायचं की, 'तुम्ही स्वत:ला फार समजतात, तुम्ही फार शिष्ट आहात,' पण तीच दोन-चार माणसं कामाला लागलेली आहेत. असे जे लोक आहेत ते गळून पडणार हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा जर तुम्हाला आपली स्वत:ची प्रगती करून घ्यायची असेल, तर आधी ही आपली फार मोठी जबाबदारी आहे, सहजयोग ही आपली फार मोठी जबाबदारी आहे, हे समजलं पाहिजे आणि त्या जबाबदारीने वागलं पाहिजे. ज्यांना ही जबाबदारी सांभाळता येत नाही आणि ज्यांना असं वाटतं, की आम्ही सहजयोगामध्ये नुसते आनंदाच्या डोही येण्यासाठी आलेलो आहे, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की फार दिवस तुम्ही सहजयोगात टिकू शकणार नाही. ह्याचं चक्र फार जोरात फिरत आहे आणि ह्या चक्राच्या बाहेर माणसं फार लवकर फेकली जातात. मी, मी म्हणणारे असे पुष्कळ फेकले गेलेले आहेत. त्याला मी कारणीभूत नाही. त्याला कारणीभूत तुम्ही आहात. कारण चक्र हे आम्हाला चालवावं लागतं. थोडसं मला भेटायला आले, माताजींना नमस्कार केला किंवा दर्शन घेतलं, झाला सहजयोग. मग तुम्हाला हार्ट अॅटॅक आला, की येऊन म्हणायचं की, 'माताजी मला हार्ट अॅटॅक कसा आला. मी तर तुमचं रोजच माहात्म्य वाचत असतो.' तुम्ही सामूहिकतेत येत नाही. तरी अगदी गावातच सेंटर ठेवलेले आहे. व्यवस्थित रविवारचं सेंटर ठेवलेले आहे. त्यावरही तुम्ही आपली प्रगती करून घेतलेली आहे, तर त्याला तुम्हीच कारणीभूत होणार. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही मंडळी कुठून कुठून तुमच्या ६ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-6.txt सुट्ट्या घेऊन इतक्या मेहनतीने इथे येतात, तुमच्या सबंध ट्रस्टला पैसे देतात, तुमचा सगळा खर्च ह्या लोकांच्यामुळे चालला आहे. जर मी उद्या हे प्रवासाचं बंद केलं आणि मेहनत जर कमी केली तर मला वाटतं आपण सगळेच उघड्यावर पडणार. पैशाची काहीच व्यवस्था होऊ शकत नाही. तेव्हा कृपा करून ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दुसरं म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे, की पुष्कळ पुण्याच्या मुलींची लग्नं बाहेर झालेली आहेत आणि लग्न ठरलेले आहे सगळ्यांचे. आणि मला आशा आहे, की त्या सगळ्या सुखाने आणि आनंदाने राहतील. त्याबद्दल खरोखर आपल्याला एक शुभ वाटलं पाहिजे, ह्या मुलींची लग्न अगदी सहज काही खर्च न करता, इतकी सुंदर लग्न होत आहेत. त्यातल्या त्यात एक गोष्ट आणखीन आहे, की आपल्या मुलींनी बाहेर राहून दाखवलं पाहिजे, की महाराष्ट्रातल्या मुली किती शहाण्या आहेत. तिथे जाऊन शिष्टपणा करायचा! तुमच्यापेक्षा ते जास्त विद्वान आहेत. तुमच्यापेक्षा ते जास्त शिकलेले आहेत. फार हुशार आहेत, पण त्यांचे वैशिष्ट्य असे आहे, की 'विद्या विनयेन शोभते'. ज्या माणसाला विद्या आली आणि त्याला विनय नसला, तो म्हणजे विद्याहीन, मूर्ख, गाढव आहे असं मला वाटतं. 'विद्या विनयेन शोभते' म्हटलेले आहे. तेव्हा तुमच्यामध्ये जर विनय नसला आणि तुम्हाला जर नांदण्याची रीत माहिती नसली, तर तुम्ही लग्न करू नये. आणि केल्यावर, मला फार त्रास होतो. म्हणून ह्या मुलींना माझं सांगणं आहे, की तिथे जाऊन शिष्टपणा दाखवायचा नाही. कितीतरी, असे दोन-चार प्रकार पुण्याला झालेले आहेत, की ज्या मुली म्हणजे काही कामाच्या नाहीत, त्यांची लग्ने करून दिली. तर आमच्याकडे एक अशी म्हण आहे, तामीळ भाषेत, की जे लोक चिखलात राहतात, त्यांना पलंगसुद्धा रूततो. तसाच काहीतरी प्रकार केलेला आहे. आज मुद्दामून तुम्हाला सांगून ठेवते, की जरी मी ह्या सर्व लग्नांना संमती दिलेली आहे, तरीसुद्धा ही तुमची फार मोठी जबाबदारी आहे, की व्यवस्थित वागलं पाहिजे. तुमचं नाव झालं पाहिजे, सहजयोगाचं नाव झालं पाहिजे. ह्या देशाच्या संस्कृतीचं नाव झालं पाहिजे आणि सहजयोगाचं नाव झालं पाहिजे. ही एक फार मोठी संधी आहे. कमीत कमी इतकं तुम्ही करू शकता सहजयोगासाठी. जर त्याची तुम्ही जबाबदारी घेतली तरी. पण नवर्याशी भांडायचं, नवऱ्याकडे सारखं काहीतरी मागत राहायचं, मूर्खपणाने वागायचं, हा प्रकार जर तुम्ही सुरू केला तर त्याने तुम्हालाही काही सौख्य मिळणार नाही, तुमचेही काही हित होणार नाही आणि सहजयोगाचेही होणार नाही. ह्या लोकांपेक्षा तुम्ही गणपती जास्त जाणता. आपला वारसा आहे तो. पुष्कळ तुम्हाला माहिती आहे. बारीक-सारीक सगळं माहिती आहे. नसते कर्मकांडही पुष्कळ माहिती आहेत. पण सहजयोगात जे आवश्यक आहे तेच आपण घ्यायचं. जे अनावश्यक आहे ते सोडून द्यायचं. आणि जे मूर्खपणाचे आहे ते तर एकदमच त्यागलं पाहिजे. तेव्हा आता तुम्ही नवीन धर्मात आला आहात. तुमचा नवीन धर्म म्हणजे विश्व निर्मल धर्म आहे आणि त्या धर्माला धरून जे उचित असेल तेच तुम्ही करायचं. ह्याच्यात जात, पात काही आम्ही मानत नाही हे तुम्हाला माहिती आहे. देश विदेश काही मानत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि जातीची बंधनं देश- विदेशाची बंधनं असली तर तुम्ही सहजयोगी नाही. पुष्कळशा वडिलांना मला सांगायचं आहे, की जर ते खानदानी माणसाशी आपल्या मुलीचं लग्नर करायच्या मागे असले, तर मी त्याच्यात काहीतरी विघ्न आणेन आणि ७ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-7.txt त्रास देईन. मुद्दामून मी तसं करणार. मी ठरवलेलेच आहे. जर तुम्ही 'आमच्याच जातीत लग्न झालं पाहिजे,' असं म्हणाल, झालं तर झालं, सहजच झालं तर काही गोष्ट नाही. पण अशी जर जबरदस्ती मूलीला केली, तिच्या मनाविरूद्ध लग्न करायचं तुम्ही प्रयत्न केलात तर मी जाणूनबुजून त्याच्यात विघ्न आणणार आहे. म्हणजे तुमच्यात अक्कल यायला पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहात. एवढी मोठी आम्ही क्रांती आरंभली आहे आणि एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये तुम्ही आमची एवढीशीसुद्धा मदत करू शकत नाही, तर तुम्ही सहजयोगात येता कशाला? ह्या जाती-पातीने आपल्या देशाला वेड लावलेले आहे आणि किती त्रास दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, जात- पात ह्याला काय अर्थ आहे! उद्या तुमच्या मुलीला जर कोणी सोडलं तर कोण जातवाला तुमचा उभा राहतो. उलट दुसरी मुलगी येऊन उभी राहते. तेव्हा अशा ह्या समाजाला तिलांजली दिली पाहिजे. कारण हा समाज कुठे दिसत नाही. ह्या समाजाने कुठेही मला असं दिसत नाही, की काही धार्मिक कार्य काढलं असेल किंवा सामाजिक कार्य काढलं असेल किंवा ह्याचं अस्तित्व कुठे असेल. कुठेतरी हवेत असतो हा समाज. आणि हवेतला समाज जो आहे, तोच माणसाला खाऊन टाकतो. तर सगळ्यांनी उठायला पाहिजे यासाठी, एकजुटीने. आपण तर इतके लोकं आहोत . पूर्वी तर एकेकट्या माणसाने ही कार्य केलेली आहेत. तेव्हा आपण इतकेजण आहोत. आपल्या सगळ्यांची एकच आता धारणा आहे आणि एकच आपली चेतना आहे. तेव्हा घाबरण्याचे कोणते कारण आहे ! असा विचार केला पाहिजे आणि असा विचार केल्यावर हे लक्षात ठेवलं पाहिजे, की ह्या धर्मयुद्धामध्ये आम्ही सामील आहोत. आमची जबाबदारी आहे आणि युगायुगांमध्ये असं झालेलं नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. ही शेवटची पायरी आपल्याला चढायची आहे. जिथे सगळं स्वच्छ करायचं आहे. जिथं सगळं नीट करायचं आहे. तिथे प्रेमाचं साम्राज्य आणायचं आहे. तिथे सगळी गरिबी आपल्याला हटवायची आहे. केवढी कार्य आहेत ! पण तुमची अजून हीच जळमटं निघत नाही, तर पुढचं कसं काय नीट होणार! तेव्हा जाती-पातीचं वेड सोडलं पाहिजे आणि जातीच्या लोकांना भेटूच नका. ज्ञानेश्वरानी सांगितलं आहे, 'तेची सगेसोयरे होते'. तुमचं नातं सुटलं बाकी लोकांशी. 'तेची सगेसोयरे होते' स्पष्ट सांगितलं आहे, की हेच लोक आहेत, हेच सगेसोयरे आहेत आणि बाकीचे नाहीत आणि सेंटरवर जो जात नाही त्याला सहजयोगी म्हणायचं नाही. सेंटरवर गेलेच पाहिजे. तुम्ही श्रीमंत असाल, ते आपल्या घरी असाल, पण सेंटरवर गेलं पाहिजे. मीसुद्धा तुमच्या बरोबर झोपडीत राहते. वाट्टेल त्या परिस्थितीत राहते. मग सेंटर अगदी फारच सुंदर असलं पाहिजे, त्याच्यामध्ये झगमगाट असला पाहिजे, असा विचार करणे फार चुकीचे आहे. अत्यंत साधारण असं सेंटर असलं पाहिजे, जिथे सर्वसामान्य माणसंसुद्धा येऊ शकतात. आजपर्यंत बरेच दिवस झाले मी आपल्या पुण्यातल्या सहजयोग्यांशी स्पष्टपणे बोलू शकले नाही. आज ह्या रम्य परिसरात मला असं वाटलं, की एकत-्हेची आपल्यातही रम्यता आली पाहिजे आणि ती रम्यता येण्यासाठी आतमध्ये ज्या आपल्या जुनाट पद्धतीच्या, नुसत्या कर्मकांडांच्या आणि धर्माच्या बाबतीत चुकीच्या कल्पना आहेत त्या जाऊन आपण स्वच्छ निर्मळ गंगेत आलं पाहिजे. तेव्हाच हे कार्य होऊ शकतं. त्यात अहंकारसुद्धा आपण जपला पाहिजे. कशाही गोष्टीचा आपल्याला अहंकार असला म्हणजे त्रास होतो. मी म्हणजे कोणीतरी विशेष! कोणा कोणा सहजयोग्यांना वाटतं, की आम्ही पहिल्यांदा सहजयोगात आलो, म्हणजे ८ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-8.txt काहीतरी विशेष! अहो, जे पहिले आहेत तेच जाणार आहेत, असं मला दिसतं आहे. बहुतेक अगदी जे पहिले पहिले होते ते कटतच चालले आहेत. म्हणजे ही कल्पना असते की आम्ही पहिल्यांदा सहजयोगात आलो, हेच पहिल्यांदा तुमच्या विरोधात बसणार. तेव्हा भावना काढून टाकली पाहिजे, की आम्ही फार जुने सहजयोगी आहोत. म्हणजे तुम्ही जुनाट झाले. आता निघून जा. प्रत्येक वेळेला नावीन्य असायला पाहिजे, तरच तो सहजयोगी आहे. आणि ही जिवंत क्रिया आहे. रोज नवीन नवीन आपल्याला येत असतात. प्रत्येक अनुभव वेळेला आनंदी, नावीन्य असायला पाहिजे. आणि 'मी फार जुना, मी फार जुनी,' असा जर तुम्ही मनात विचार ठेवला तर त्याचा जुनाटपणा दिसून येईल. तेव्हा इकडे लक्ष ठेवलं पाहिजे, की आम्ही आपल्याबद्दल काय बोलतो. फक्त सहजयोगाबद्दल आणि माझ्याबद्दल बोललेले बरे आहे. त्यानेच सगळंे काही ठीक होणार आहे. तेव्हा शरणागत होण्याचा अर्थ हाच आहे, की आपल्यामध्ये ज्या या जुन्या गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजेत आणि आपण जो अहंकार गोळा केलेला आहे, तोसुद्धा नष्ट पावला पाहिजे. आता काही फार मोठी पूजा होणार नाहीये. थोडक्यातच पूजा करता येईल. मुहर्त गाठला आम्ही हे नशीब समजायचं. जे होतं ते भल्यासाठी. आपल्या सुमुहर्तावर होतं हे लक्षात घेऊन वागलं पाहिजे. म्हणजे माणसाला कोणताही खेळखंडोबा वाटत नाही. परत दसरं सांगायचं म्हणजे असं, की फाटे नाही फोडायचे. आम्ही जर काही करायचं म्हटलं तर ते ऐकलं पाहिजे. आणि ते पूर्ण मनाने केलं पाहिजे. फाटे फोडले नाही पाहिजे. कोणत्याही गोष्टीला तुम्ही फाटे फोडले तर त्याचा त्रास मला तर होतोच, पण तुम्हालाही होतो. तेव्हा आपलं काहीतरी सांगत बसायचं नाही. मी जे म्हटलं ते, 'बरं मी करतो, बरं मी ऐकतो,' जे असेल ते लगेचच मान्य केलं पाहिजे. नाहीतर भयंकर त्रास होतो. आपल्या सहजयोगालासुद्धा फार याने त्रास होतो, लोक जे फाटे फोडतात, आज जर लोकांनी फाटे फोडले नसते, तर आपल्याजवळ किती तरी सुंदर फ्लॅट असते, मुंबईला आणि इथे सुद्धा पुष्कळ जागा झाल्या असत्या. पण त्यावेळेला ह्या सगळ्यांनी फाटे फोडून फोडून सगळं काही मला इतका त्रास दिला, शेवटी मीच असा विचार केला, की कोणी काही सांगितलं तर त्यांना सांगायचं की फाटे फोड़ू नका आणि मी हे करणार. मी करणार. पूर्वी मी सगळ्यांना विचारून करत असे. पण मी आता बघते की लोकांना सवय झालेली आहे. शिष्टपणा दाखवण्याची. तेंव्हा त्यांना सांगितलंच पाहिजे, की तुम्ही चूप रहा. मी करणार म्हणजे करणारच. मला जे करायचे तेच मी करणार. माझ्यापेक्षा शहाणं तुमच्यात कोणीच नाहीये. तेव्हा उगीचच माझ्यापेक्षा जे कमी शहाणे आहेत त्यांचं मी कशाला ऐकून घ्यायचं! ही नम्रता काही कामाची नाही. असा मोघम विचार करून मी ठरवलेले आहे, जे मला करायचं ते मी करणार . त्याबाबतीत तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल. आज आपण सुरुवातीला एकदा गणेश वंदना म्हणू. त्यावेळेला इथे ज्या काही मुली असतील, पुण्यातल्या, लहान मुली आणि मुलं, त्यांनी येऊन पाणी घालायचं. एकदाच व्हायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं. आणि त्याच्यानंतर मग सात बायकांनी वर यायचं आणि पायाला आलता वगैरे लावायचं काय काम असेल ते आणि पायाची वंदना करायची. तेव्हा आज नुसतं गणेश पूजेवरच आपलं निभेल. पण शेवटी थोडीशी देवीचीसुद्धा आपण पूजा करूया. तेव्हा सुरुवातीला मुलींनी, मुलांनी वर यायचं आणि पायावर पाणी घालायचं फक्त. ९ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-9.txt ध्यानामध्ये निर्विचारिता ७) १प औरंगाबाद, ८ डिसेंबर १९८८ मी मराठवाड्याची महती सांगितली आहे. आजसुद्धा पेपरात आलेले आहे की सुवर्णयुग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे. सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला जे दिसतं आहे ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहजयोग्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोमरोमात पोहोचवण्यासाठी सहजयोग्यांची फार जोरात तयारी पाहिजे. त्यात मुख्य म्हणजे सहजयोग्यांनी ध्यान-धारणा करणे. आपली चक्रे स्वच्छ करणे. खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजे. निदान दोनदा तरी ध्यान केलेच पाहिजे. ध्यानामध्ये निर्विचारिता स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते. आणि हे आत्म्याचं जे फळ मिळालं आहे त्याचं खरं स्वरूप आपल्याला मिळू शकतं. पण जर आपण ध्यान-धारणा केली नाही, तर आपल्याला निर्विचारिता स्थापन करता येणार नाही आणि निर्विचारितेशिवाय आपल्या आतली जी आंतरिक स्थिती आहे ती सुधारणार नाही. त्यासाठी ध्यान-धारणा करायलाच पाहिजे. आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. ते काढण्याचा प्रयत्न करायला नको, फक्त त्यांच्याकडे बघितलं तरी ते निघून जातील. तेव्हा जसं काल भारूडामध्ये सांगितलं की या संसारातून वेगळं निघा आणि मग या संसाराकडे बघितलं. कारण जोपर्यंत तुम्ही या संसाराच्या उलाढालीमध्ये गुरफटलेले असाल तोपर्यंत तुम्हाला याच्यातले प्रश्न सोडवता येणार नाही. तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असले, तर तुम्ही बाहेर कसे येणार ? तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे. जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटांगळ्या जाऊन त्याच्याऐवजी तुम्हाला आनंद लुटता येईल. त्यानंतर तुम्ही इतर लोकांनासुद्धा पोहण्याचं शिकवू शकता. तसंच अध्यात्माचं आहे. आधी तुम्ही स्वत:ची स्थिती दुरुस्त करायची आणि त्यायोगे तुम्ही दुसर्यांचीसुद्धा स्थिती सुधारू शकता. पुष्कळदा मला असंही लोक सांगतात, की सहजयोग्यांमध्ये अजून काही प्रगती झालेली नाहीये. काही प्रगल्भता आलेली नाही आहे. आपापसात अजून वैमनस्य आहे, वगैरे वरगैरे. तेव्हा हा असा १० 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-10.txt सहजयोग कसा? सांगायचं म्हणजे असं की आपल्या सहजयोगाचं दार सगळ्यांना उघडे आहे. कोणी कसेही असेनात का, सगळ्यांना तुम्ही सहजयोगाला या अशी मागणी आहे. आमंत्रण आहे. त्यामुळे होतं काय की वाट्टेल त्या तऱ्हेचे, वाट्टेल त्या परिस्थितीतले, वाट्टेल त्या कुरसंस्काराचे लोकसुद्धा ह्याच्यात येतात. त्याबद्दल आपण काही त्यांच्यावरती आधी मज्जाव करीत नाही. पण एकदा का कुंडलिनी जागृत झाली आणि आत्म्याचं दर्शन झालं म्हणजे 'आधी कळस मग पाया' याप्रमाणे आधी तुमच्या आत्म्याची बांधणी होते आणि त्या सुरू बांधणीमुळे तुम्हाला स्वतःच त्या प्रकाशामध्ये दिसतं की आमचं काय चुकलेलं आहे! आम्ही कुठे चुकलो? आणि त्या प्रकाशामध्ये तुम्ही जाणता, की तुम्हाला काय ठीक केलं पाहिजे ? काय तुमचं चुकलेलं असेल ते कसं बरोबर करून घ्यायचं? मी काही तुम्हाला सांगत नाही. तुम्ही स्वतःच बघून ठीक करता. कारण तुम्हाला दिसतं की त्याने आमचं नुकसान होत आहे. त्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे. तेव्हा तुम्हीच त्या गोष्टीला पायबंद घालता. मला त्याबद्दल काहीच बंदोबस्त करावा लागत नाही किंवा सांगावं लागत नाही की तुम्ही हे नीट करून घ्या, ते करून घ्या, पण तुम्हीच तुमचे गुरू होऊन जाता. पण त्यासाठी ध्यान-धारणा ही पाहिजे. जसे लहानशा दिव्याच्या प्रकाशात आपल्याला सगळे काही दिसत नाही, तसेच जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश पूर्णपणे आपल्या चित्तावर पडणार नाही, तोपर्यंत हे चित्त कुठे कुठे धावतंय, त्याला काय काय प्रश्न आहेत ? त्याने काय काय नुकसान करून घेतलं आहे? काहीसुद्धा आपल्याला लक्षात येणार नाही. तेव्हा ध्यान-धारणा ही करायलाच पाहिजे. लोकांचं असं म्हणणं आहे की मला वेळ नाही, मला हे नाही, ते नाही. सगळे बहाणेबाजी. सर्व बेकारची कामं करायला आपल्याला वेळ असतो. दोन मिनिटं परमेश्वराजवळ बसायला वेळ नाही. खरोखर म्हणजे परमेश्वराने हे जेवढं सायन्स, ही जी सगळ्या तऱ्हेची आपली व्यवस्था करून दिलेली आहे ती एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे. आपण हातात घड्याळ बांधतो, ते एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे. आणि वेळ वाचवायचा तो फक्त ध्यानासाठी वाचवायचा. आणि त्यानंतर इतकी शांती, इतका आनंद मनुष्यामध्ये येतो! त्याशिवाय आपली प्रकृती, आपलं मन इतकं शुद्ध होतं , सगळ्या प्रकारचे ताप, दुःख निघून जाऊन मनुष्याची इतकी उत्तरोत्तर प्रगती होत जाते की त्यालाच आश्चर्य वाटतं की कसा मी सहजच या आनंदाच्या सागरात पडलो. तेव्हा प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की हा आमच्यासाठी सहजयोग आहे. माताजींसाठी नाही. मी एवढी दगदग करते. सगळीकडे धावते, सगळ्यांना भेटते, रानोवनी राहते, सगळ्यांची व्यवस्था करते. त्याला कारण मला सहजयोग हवा म्हणून नाही, पण या अंतरात , आतून जी काही मला आपल्याबद्दल कळकळ वाटते त्यासाठी वाटतं, ज्या आनंदासाठी आम्ही आहोत, त्या आनंदात सगळ्या माझ्या मुलांनी यावं. असा विचार ठेवून प्रत्येकाने मेहनत करायला पाहिजे आणि ध्यान-धारणा केली पाहिजे. दुसऱ्यातले वाईट बघू नये. दुसर्यातलं चांगलं बघावं. ते बरं होईल. दुसऱ्यातलं वाईट बघितलं तर त्याने आपला काय फायदा होणार आहे किंवा त्याचा तरी काय फायदा होणार आहे. ज्याने त्याने आपलं वाईट ठीक करावं आणि दूसर्याचं चांगलं बघून त्याचं चांगल्याचं अनुकरण करावं. हे बघितलं पाहिजे. सहजयोगामध्ये पुष्कळशी मंडळी अशी ही आहेत की जी कधी कधी सेंटरला येतील. कधी येणार नाहीत आणि फक्त मी आले की येतात वगैरे. आता त्याबद्दल सांगायचं असं की हे तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असल्यामुळे तुम्ही ११ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-11.txt स्वत:चाच विचार करून केंद्रावर गेलं पाहिजे. ही एक सामूहिक घटना आहे. हे दिवस गेले की एकट्याने घरी बसून पूजापाठ केले किंवा मंत्रोच्चार केले किंवा हे केलं , ते दिवस गेलेले आहेत. आता हे सामूहिकतेत कार्य होणार आहे. सबंध विराटाचे कार्य असल्यामुळे हे एक सामूहिक कार्य आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल, की, 'आम्ही आमच्या घरी बसून माताजी, पूजा करतो, हे करतो,' त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि उद्या येऊन तुम्हीच मला सांगाल की, 'माताजी, आम्ही एवढा सहजयोग केला तरीसुद्धा आम्हाला एवढा त्रास झाला.' सेंटरवर येऊन तुम्ही कोणावर उपकार करीत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला सगळे फुकटच आहे. सेंटरवर येऊन तुम्हाला फक्त स्वत:वरच उपकार केल्यासारखं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर स्वत:वर उपकार करायचे असले तर सेंटरवर यायचे, तिथे भाषणं ऐकायची, त्यानंतर ते जागृतीचं कार्य करायचं आणि तुम्ही संपन्न होऊन घ्यायचं. अध्यात्माचं जे वैभव आहे त्या वैभवाने तुम्ही अनेक लोकांची जागृती करू शकता. अनेक लोकांना पार करू शकता. आमच्याकडे असे लोक आहेत, ज्यांनी एकेका माणसाने दोन-दोन हजार लोकांना पार करून बसवलेले आहे. तेव्हा मराठवाड्यामध्ये फार मोठं जोरात कार्य व्हायला पाहिजे. तर सहजयोग्यांची स्वत:ची शक्ती प्रबळ असली पाहिजे. त्या समर्थतेतच ते अनेक लोकांना पार करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे एका ठिकाणी गणपतीसारखं बसून चालायचं नाही. चार जागी फिरायला पाहिजे. खेडोपाडी, सगळीकडे जोगवे गायले जातात, भारूड गायलं जातं, सगळ्यांना या संतांची माहिती आहे. मोठमोठ्या संतांनी या मराठवाड्यात जन्म घेतला आहे. येथे मोठमोठाली स्वयंभू देवळं आहेत. हे सगळं असूनसुद्धा जर तुम्ही हलला नाहीत तर हे लोक जे धर्मांध आहेत, ज्यांना लोक लुबाडत आहेत, देवाच्या नावाखाली त्यांचा पैसा, आणि त्यांचं सबंध शरीरच वाया जात आहे, त्यांचा बचाव कोण करणार? तेव्हा खेडोपाडी तुम्हीसुद्धा जाऊन असे प्रोग्रॅम घेतले पाहिजेत, त्यांना सहजयोगाबद्दल सांगितलं पाहिजे. त्यांच्याच भाषेत बोललं पाहिजे. फार अशी वाढलेली प्रगल्भ भाषा बोलली तर ते खेडेगावातल्या लोकांना समजत नाही. त्यांच्याच भाषेत त्यांना समजावून सांगायचं की परमेश्वर हा आहे आणि ते मिळविण्याचं साधन अगदी सहज आहे. ते खेडेगावातल्या लोकांना अगदी सहज मिळू शकतं. हा साधेभोळेपणा पुष्कळ धर्ममार्तंडांनी वापरलेला आहे. त्याचा उपयोग करून घेतला आहे. इंग्रज लोक तरी इथे इतके दिवस राज्य का करू शकले? कारण आपण असे साधेभोळे आहोत. एकदा जर आपल्यामध्ये चेतना आली आणि आपण चैतन्य स्वरूप झालो, तर मात्र परमेश्वराचं साम्राज्य या जगात येऊ शकतं. आपणच ते आणू शकतो आणि सगळीकडे गरिबी जाऊन, दारिद्र्य जाऊन, सगळ्या तऱ्हेचे कष्ट, दुःख सगळे नष्ट होऊन लोकांना अगदी अबाधित आनंदाचा उपयोग घेता येतो. तेव्हा सहजयोग्यांनी आपल्याकडे लक्षात घेतलं पाहिजे की स्वत:ची स्वच्छता, स्वत:चा निर्धार करून आपल्या व्यक्तित्वाला बनवलं पाहिजे. स्वत: आनंदात राहतात सहजयोगी पण दुसऱ्यांनाही आनंद दिला पाहिजे, ही सामूहिक कल्पना असली पाहिजे. म्हणजे तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक सहजयोग्याने आपल्यावर जबाबदारी घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने समजलं पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे. जसा हा दिवा आहे, हा आपण पेटवला, तर तो आपली जबाबदारी समजतो की मी, माझ्यापुरता सहजयोग नाही, हे माझ्याजवळ ठेवायचं धन नाही आहे, हे वाटायचं धन आहे, ते दूसऱ्यांना दिलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही घ्याल तर सहजयोगात तुम्ही खरोखर पारंगत व्हाल, प्रत्येकाला एक एक गुरू स्थान आहे आणि ते तुम्ही १२ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-12.txt मिळवू शकता. परमेश्वर नुसता आपल्या साम्राज्यात वाट बघतोय, की कधी माझी मूलं येतील आणि मी त्यांना उत्तमपैकी त्यांच्या स्थानावर बसवीन. तेव्हा असा मोघम विचार करून चालणार नाही, की आम्ही आता सहजयोगात आलो आणि आता आम्हाला जागृती झाली, इतिकर्तव्यता झाली की आता ह्याच्यापुढे काही करायला नको. जर खरोखरच तुम्हाला सहजयोगात उतरायचं आहे, तर तुम्ही सामूहिक कार्य केलेच पाहिजे आणि सामूहिक कार्य केल्यावरच तुम्हाला निर्विकल्प समाधी लाभेल किंवा तुम्हाला कळेल की, तुम्ही काही डॉक्टर नाही, तुम्ही काही शिकलेले नाहीत असे असताना तुमच्या हातून रोग कसे बरे होतात! ह्या सगळ्या किमया कशा होतात! जेव्हा या चमत्काराचे अनुभव तुम्हाला येतील तेव्हाच तुमच्या लक्षात येईल, की आम्ही काहीतरी विशेष झालेलो आहोत, आम्ही योगीजन झालेलो आहे. समजा जर तुम्हाला उद्या आम्ही इंग्रजी पैसे (डॉलर) आणून दिले तर तुम्ही म्हणाल, 'माताजी, हे आम्हाला काय दिलं तुम्ही?' ते वापरले पाहिजेत. ते बाजारात नेऊन वापरल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तसेच , जे तुमच्या हातामध्ये आम्ही तुम्हाला चैतन्य दिलेले आहे, जी तुम्हाला आम्ही शक्ती दिलेली आहे, ती जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कसं कळेल की ही काय वस्तू आहे? त्या दृष्टीने मी म्हणते की सर्व सहजयोग्यांनी मेहनत करावी. आता असं पाहिलं की सहजयोगी इथे फार कमी असले तरीसुद्धा ते भरभक्कम आहेत. ज्याचा पाया भरभक्कम आहे त्याचीच इमारत मोठी होते. उगीचच नसते बाजारबुणगे एकत्र करून तरी काय करायचंय? तेव्हा जेवढे थोडेथोडके लोक आहेत त्यांनी मेहनत करून फार जबरदस्त अशा भरभक्कम पायाची उभारणी केली पाहिजे. त्यावर मग इमारती बांधणं फार सोपं जातं. तेव्हा जेवढे लोक आहेत त्यांनीच मेहनत करून स्वत:ला अगदी व्यवस्थित ध्यान- धारणा वरगैरे करून त्यात आपली वाढ करून एक फार उच्च तऱ्हेच्या सहजयोग्यांचे म्हटलं पाहिजे, टोळकच तयार केलं पाहिजे, की त्यांना पाहिल्या बरोबर लोकांना असं वाटलं पाहिजे की आले कोणीतरी विशेष! अशा लोकांच्या किमया सांगाव्या तेवढ्या कमी आहेत. अशी तीन माणसं जरी झाली तरी गावातली सगळी बाधा पळून जाणार. गावातलं सगळें जेवढं दैन्य आहे ते पळून जाणार. त्यांचा इतका परिणाम होतो. कारण तुम्ही परमेश्वराचे साधन होता आणि त्यांच्यातून परमेश्वर आपलं कार्य करीत असतो. तेव्हा एक जरी मोठा साधु-संत झाला तर त्याचा एवढा परिणाम होतो, तुम्ही तर एवढे मोठे साधु-संत आणि योगी आहात! तेव्हा आणि तुम्हाला काय परमेश्वराने द्यावं आणि काय नाही द्यावं. तुमच्यासाठी काय करावं आणि काय नाही करावं. आणि ही जी आपल्याला फार मोठी संधी मिळालेली आहे, त्यातून आपल्याला काय मिळू शकतं, काय मिळालेलं आहे आणि काय मिळवायचं आहे. त्या विचारानेच मनुष्य आश्चर्यचकित होईल की केवढं मोठं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण किती केलेला आहे. तेव्हा कृपा करून सहजयोग हे एक जीवन लक्ष्यच नव्हे तर जीवन झालं पाहिजे. माणसाच्या जीवनात सहजयोग आला पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्हाला दुसर्या कोणत्याच गोष्टीची आवड वाटणार नाही. कारण खरोखर अमृताचा अनुभव त्याच्यात येतो. १३ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-13.txt भारतातील भ्रष्टाचा२ वाई, १६ डिसेंबर १९९० त्या देशामध्ये किती हिंसाचार वाढलेला आहे, ह्याची अगदी आपल्याला कल्पना नसेल. आता न्युयॉर्कला जायचं असलं तर तुम्ही हातात काही घालून जाऊ शकत नाही, गळ्यात मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही. ते लपवून न्यावं लागतं. आपल्याला त्याची कल्पना नाही. इथे जे हिंदुस्थानी लोक आहेत ते अलिप्तच राहतात, नको रे बाबा! मला काही लोकांनी पत्र पाठवलं की, 'माताजी, तुम्ही हिंदुस्थानात जर चांगली शाळा काढली तर आम्ही आमच्या मुलांना तिथे पाठवू.' काही लोक आपली मुलं इथे घेऊन येतात. कारण ती इतकी उद्धट झाली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इंग्लंडसारख्या शहरामध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये फक्त लंडन या एकाच सिटीमध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. ही दशा तुम्हाला इथे आणायची आहे का ? सर्वांगीण प्रगतीसाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्मात उतरले, तुम्ही जर एखाद्या की दारूड्याला किंवा कोणालाही शंभर रूपये दिले तर तो कुठेतरी वाया घालवणार. पण जर तुम्ही एखाद्या संताला पैसे दिले तर तो सत्कारणीच लागणार. तो सत्कर्मातच जाणार. आता जसे हे लोक आहेत, तर मी पैसे काढले, 'आम्ही एखाद्या शाळेला देणगी देऊ माताजी.' सत्कर्मासाठी. काही वाईट कर्मासाठी नाही. पण आपल्याकडे ते सत्कर्मसुद्धा कठीण झालेले आहे. आम्ही आमचे लंडनला घर विकल्यावर विचार केला की कोणत्यातरी संस्थेला पैसे द्यायचे, तर एक संस्था अशी मिळाली नाही की जिथे खोटेपणा नाही. सर्व संस्थांमध्ये खोटेपणा, म्हणजे करायचे तरी काय ? मग आम्ही शेवटी एक वास्तू बांधली. म्हटलं कमीत कमी एक वास्तू तर बांधू देत. मग पुढचं काय ते बघता येईल. अशा रीतीची ही परिस्थिती आपल्या देशात आलेली आहे आणि हा भ्रष्टाचार आणि आपल्या मुलांचं उद्या काय होणार आहे याचा विचार करा. इतका भ्रष्टाचार कुठेही जगात नाही जितका महाराष्ट्रात आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. हिंदुस्थानातसुद्धा इतका भ्रष्टाचार नाही, इतका या महाराष्ट्रात आहे. मी कारण सबंध हिंदस्थानात फिरलेली आहे. त्याच्याकडे लक्ष नाही आपले आणि अशी ट्रम कुठेही निघालेली नाही, ही निर्मुलनाची. निर्मूलन करण्याची लायकी असायला पाहिजे. आता आमच्याकडे मानव म्हणून एक गृहस्थ आले. ते माझ्याकडे दोन लाख रूपये घेऊन आले. म्हटलं मी चार लाख रूपये देते पण दोन लाख देऊ नका. पण तुम्हाला निर्मूलन करण्याची लायकी नाही. लायकी असायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही संत असायला पाहिजे. निदान तुम्ही संत असायला पाहिजे. आता ही मंडळी जी बाहेरून आली , तुम्हाला काय वाटतं परदेशामध्ये अंधश्रद्धा नाही. भयंकर अंधश्रद्धा आहे. सगळे त्यातून निघून बाहेर पडले आणि आज इथे स्वच्छ होऊन आलेले आहेत. तुम्हाला जर अंधश्रद्धा घालवायची असली, तर धर्म, तुम्हीसुद्धा आत्मसाक्षात्कार घ्या. आत्मसाक्षात्कार घेतल्याशिवाय तुमची अंधश्रद्धा जाणार नाही. जात, पात, अधर्म ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे, असं सर्वांनी सांगितलं आहे. पण एकनाथांना, ते महाराकडे जाऊन जेवले म्हणून लोकांनी त्रास दिला. 'काय ढोंगी आहे.' त्याच्यानंतर तुकारामांना छळून छळून मारून टाकलं. आपल्याला सगळे माहितीच आहे, त्या ज्ञानदेवांची, पायात वहाणा नव्हत्या त्यांच्या, पालखीत मिरवणूक काढली. आता आम्ही येतांना रस्त्यात आम्हाला आडवलं. म्हणे, 'माताजी, जेवायला या.' म्हटलं, 'कशाला ?' म्हणे, 'आम्ही पालखी घेऊन आलो.' काय म्हणावं! ज्या माणसाच्या पायात वहाणा नव्हत्या. १४ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-14.txt सगळ्या भावांना घेऊन, बहिणीला घेऊन अशा उन्हातान्हात फिरणारे ते. त्यांच्या आता कुठेतरी पादुका ठेवायच्या. त्यांच्या दमावर जेऊन बसायचे. ह्याला काय म्हणायचे! ते नाही बंद करता येणार तुम्हाला. पण पुष्कळसे असे आहेत ज्यांनी असे प्रकार केले. राहुरीला असे लोक होते जागृतीसाठी, सोडलं त्यांनी की काय मूर्खपणा आहे. असल्या तऱ्हेचे भयंकर प्रकार आपल्या देशात आहेत. ते काढण्यासाठी जागृती शिवाय काहीही मार्ग नाही. आधी जागृती होऊ द्या. माझ्याविरूद्ध लोक कशासाठी उठले आहेत, हेच मला समजत नाही. मी एकही पैसा घेत नाही. देवकृपेने श्रीमंत घराण्यातली मी आहे. इतकंच नव्हे पण श्रीमंत घराण्यात माझं सबंध आयुष्य गेलं आहे. इतकंच नव्हे पण माझे यजमान फार मोठे आहेत. आपल्याला माहीत नाही, की इंग्लंडच्या राणीने त्यांना सर्वोच्च नाइटहड पदवी दिली. सर्वोच्च. अशी हिंदुस्थानात आजपर्यंत कोणाला मिळाली नाही. आणि ३२ देशाने त्यांना सर्वोच्च अशी नाइटहूड, उच्च पदव्या दिलेल्या आहेत. असे माझे यजमान आहेत. मला काय गरज आहे अशा प्रसिद्धीची आणि गावात मिळून भटकत फिरण्याची काय गरज आहे. तुम्ही लक्षात घ्या, की अशा तऱ्हेने कोणालाही बदनाम करणे आणि अशा तऱहेने कोणाचेही कार्य अडवून ठेवणे, जे की समाजकल्याणाचे कार्य आहे. त्यानेच कल्याण होणार आहे. आज हे जे लोक इथे आले आहेत, त्यात मोठमोठाले डॉक्टर्स आहेत. आर्किटेक्ट्रस आहेत. फार मोठाले लोक आहेत. हे काही सर्वसाधारण लोक नाहीत. त्यांच्याशी बोलणार कोण? तर म्हणे एक एमबीबीएस झालेला. पण त्याच्याशी बोलणार तरी काय ? त्याला पॅरासिंपरथॅटिक नव्व्हस सिस्टीमच समजत नाही. त्याच्याशी मी बोलणार तरी काय? आणि म्हणे आमचं आवाहन घ्या. कसलं आवाहन ! त्याला काही अर्थ आहे ? आपली लायकी ओळखायला पाहिजे. विज्ञानावर जर बोलायचं असलं तर एखादा वैज्ञानिक मनुष्य पाहिजे. इथे किती तरी ज्ञानी लोक आले आहेत. तीन लोकांना पीएचडीच्या डिग्या मिळाल्या आहेत, फ्रांसमध्ये, इंग्लंडमध्ये आणि तीन डॉक्टरांना एमडीच्या पदव्या मिळाल्या आहेत, आपल्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या. ज्यांना ज्यांना एमडीच्या पदव्या मिळाल्या ते कुठे पोहोचले असतील, तुम्ही सांगा बरं! त्यावर असं म्हणायचं, की ह्यांनी वैद्यकिय किंवा मेडिकलच्या परिमाणाशिवाय सगळे केलेलं आहे. आता काय म्हणावं! अहो, कोणाला एमडीची पदवी मिळेल का? एवढी तरी अक्कल नाही त्यांना की एमडीची पदवी मिळू शकते का कोणाला, मेडिकलच्या परिमाणाशिवाय? तेव्हा लहान तोंडी मोठा घास घ्यायचा तरी किती? ते तरी समजलं पाहिजे. पण संतांना आम्ही मानतो. कारण त्यांचं चरित्र बघा. त्यांची जी वागणूक आहे, तसे आहेत का कोणी आजकाल? दिसतात का तुम्हाला कुठे? असे संत-साधू दिसतात, जे 'जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती' असे दिसतात का तुम्हाला कुठे? हे सगळे भामटे लोक आहेत आणि हा भामटेपणा करून तुमच्या मुलांची दिशाभूल करतात. तेव्हा कृपा करून मुलांना ह्याच्यात घालू नका. दगड मारायला शिकवतात, आरडा-ओरड करायला. अरे काय तुमच्या मुलांची ही लायकी आहे की नुसतं आरडा-ओरड करत फिरायचं! दिल्लीला अशा पुष्कळशा इन्स्टिट्युट आहेत, पुष्कळ अशा संस्था आहेत, तिथे आरडा-ओरड करण्यासाठी खेडेगावातून लोक आणलेले आहेत. पण त्यांच्यात वेगळ्यावेगळ्या टोप्या, वेगवेगळ्या कार्डबोडवर लिहिलेल्या अशा पुष्कळशा, प्रत्येक पाटीसाठी काय लिहायचे ते त्याच्यात लिहिलेले असते. त्यांच्याजवळ कार्डबोर्डचे मोठमोठाले त्ते आहेत. ते सगळ्यांना दिलेले आहेत. शास्त्रीजींबरोबर माझे यजमान महासचिव होते आणि सचिव होते. आणि शास्त्रीजी मला सांगायला आले, की आजकाल एक नवीन संस्था निघाली आहे. म्हटलं, 'कोणती?' तर मुख्य १५ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-15.txt म्हणे, की नारे लगाने वाली. म्हटलं, 'त्याच्यात काय असतं?' ते नेहमी कोणी आले की जाऊन भेटायचे त्यांना आणि मग हसत यायचे. म्हटलं, झालं कारय? तर म्हणे, 'आज नारे लगानेवाली पार्टी आली आणि त्यांनी हातामध्ये तक्ते धरले आहेत.' आणि त्या तक्त्यांमध्ये काय होतं ? तर म्हणे, की 'दूसऱ्याच पार्टीचं लिहिलेलं. टोप्याही दुसर्याच पार्टीच्या. तर मी त्यांना सांगितलं , की अरे हे तर तुम्ही सकाळी लावून आला होतात, तेच आज संध्याकाळी कशाला घेऊन आलात? तुमची पार्टी तर दूसरी असं तुम्ही म्हणता. म्हणजे त्यांना पैसे देतात. आज ह्या पार्टीचं काम, उद्या त्या पार्टीचं काम, म्हणजे हा त्यांचा बिझनेस झाला आहे. तशी तुमची मुलं आरडाओरडा करण्यासाठी त्यांनी उभी केलेली आहेत. त्या मुलांची लायकी ती नाही. महाराष्ट्राच्या भूमीवर जन्मलेली ही मुलं आहेत. समजून घ्या. आपल्या मुलांची अशी कवडी किंमत करू नका. ह्या मुलांना साक्षात्कार देऊन, ही अभिनव, ही आपल्यामध्ये जी शक्ती आहे ती जागृत करा. ह्मा सर्व शक्त्या आपल्यामध्ये आहेत. जी मुलं वर्गात फार ढ होती. राहरी शाळेमध्ये तुम्ही जाऊन विचारलंत तर सगळी मुलं फस्स्ट क्लासमध्ये आहेत. आणखीन इतकेच नव्हे तर स्कॉलरशीपमध्ये सगळे पटाईत आहेत. कारण इथले प्रिन्सिपलचमुळी रियलायझेशनला आले होते. त्यांनी रियलायझेशन घेतलं होतं आणि सगळ्यांना त्यांनी आत्मसाक्षात्कार दिला. ही इतकी अभिनव एक क्रिया आहे. अर्थात मी असं म्हणेन, की पूर्वी संत-साधू सगळ्यांना देत असत. पण आजच्या ह्या कलीयुगामध्ये एकच गोष्ट आम्ही केली, की जसं ज्ञानेश्वरांनी सामूहिकतेला हे उघडून सांगितलं आहे, तसं सगळ्यांना सामूहिकतेमध्ये जागृती देण्याचं कार्य आम्ही करतो. त्यात वाईट काय करतो आहे ? हे जगाच्या कल्याणासाठी आहे किंवा नाही? किंवा ह्या कार्याने कोणाचे वाईट होणार आहे ? जोपर्यंत तुमच्यामध्ये अध्यात्माचा पाया येणार नाही, तुम्ही कोणतीही भौतिक प्रगती करून बघा, ती नाशवंतच होणार. नाशवंत होणार. कारण त्याला संतुलन राहणार नाही. दारू तरी पितील, आता पितातच आहेत. सगळीकडे लोक दारू प्यायला लागले आहेत. महाराष्ट्रात, मी जन्मात दारू पाहिली नव्हती. मला माहिती नाही दारू काय असते ते. ह्या महाराष्ट्रात जो दिसला तो दारूच पित असतो. नाहीतर आणखीन सगळे धंदे सुरू झाले आहेत. आपल्या वारणा जिल्ह्यात मी गेले होते. तिथले मुख्य ज्यांनी हे सगळें कार्य केलं, ते माझ्या पायावर येऊन रडले. मला म्हणाले, 'माताजी, कशाला मी ही भौतिक प्रगती केली असं झालं मला . मला फार वाईट वाटतं. मी एवढं उगीचच कार्य केलं.' 'अहो,' म्हटलं, 'असं काय करता ?' 'अहो, मी गांधीवादी आणि हे कार्य मूर्ख लोकं मी तयार केले आहेत.' म्हटलं, 'झालंय काय ?' 'अहो दारू काय पितात. बायका ठेवल्या आहेत. मुलांना घरातून काढून टाकलं आहे. सगळा स्वैराचार चालू आहे. आणि मला तर असं झालंय की कधी मी मरतो आणि कधी नाही.' इतके माझ्या पायावर येऊन रडले ते आणि त्यांनी सांगितलं, 'ही भौतिक प्रगती आहे. ' आणि भौतिक प्रगतीपासून जे त्रास आहेत ते सांभाळण्यासाठी आधी अध्यात्माचा पाया ठीक करा. नशीबाने सहजयोग आज उद्भवला आहे. त्याने सगळ्यांची जागृती होऊ शकते. कुंडलिनी जागृती होऊ शकते. आणि तुमच्यामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती समूळ नष्ट होऊ शकते. आम्ही जात -पात मानत नाही. आम्ही विश्वधर्म मानतो. हंडा, हे, ते , असे लग्नातले सगळे घाणेरडे प्रकार. आमच्याकडे ७५ लग्न मागच्यावेळेला झाली, पण एवढेसूद्धा भांडण झालं नाही. परवा एक बाई मला भेटायला आली. त्यांचं डोकं फिरलं होतं. 'अहो , झालं काय ?' 'अहो, एका लग्नाला जाऊन आले.' 'झालं काय?' 'अहो, तिथे रूसवा-रूसवी, फुगवा- फुगवी, हे, ते.' 'अहो,' म्हटलं, 'आमची ७५ लग्न होतात काही भांडण नाही.' इंटरनॅशनल मॅरेजेस होतात. अशा बायका ज्यांना नवऱ्याने टाकलं आहे, १६ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-16.txt ज्यांच्याजवळ पैसा नाही, अशासुद्धा बायकांची लग्न होतात. विधवांचे विवाह होतात. हे समाजकार्य आहे. त्याशिवाय तुमचे जे कृषीविभाग आहेत, त्याच्यासाठीसुद्धा पुष्कळ आम्ही प्रयोग केलेले आहेत. इथे एक फार मोठे डॉक्टर आलेले आहेत. तेसुद्धा बसलेले आहेत. आता अशा लोकांवर तुम्ही दगड फेकता म्हणजे काय म्हणायचं. त्यांनी जाऊन आपल्या देशात काय सांगितलं असेल. सीबीआयसुद्धा तुमच्या या अंधश्रद्धेच्या मागे लागलेले आहे. असं बाहेरच्या लोकांना त्रास देण्याचं काय कारण होतं. अशी कोणती अंधश्रद्धा हे करीत होते. ह्यांचं आयुष्य बदललं म्हणून हे आले सहजयोगामध्ये. ह्यांचं परिवर्तन झालं म्हणून आलेत. अध्यात्माशिवाय जे एकांगी जीवन होतं म्हणून हे सहजयोगात आले. आम्ही काही पैसे घेत नाही किंवा काही करीत नाही. तेव्हा तिथून इथे, महाराष्ट्रात हे का आले ? कारण त्यांचं असं मत आहे, की महाराष्ट्रात इतकं चैतन्य आहे. आहेच. कबूल आहे. कारण संत आहेत इथे. अहो, त्या रामालासुद्धा पायाच्या वहाणा काढून यावे लागले. इतका महाराष्ट्र पवित्र आहे आपला. आणि ह्या महाराष्ट्रात ही घाणेरड्या गोष्टींची अशी टूम काढून, दुसरं म्हणजे भाऊबंदकी ! भयंकर, त्याच्यावरच हे लोक काम करतात. कुठेही सहजयोग झाला की पहिल्यांदा भाऊबंदकी करायची. आपापसात भांडणं लावून द्यायची. हे काय ? हे निर्मूलनाचं कार्य आहे ? तेव्हा ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे. मी म्हणते आहे. बरं! मग, शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही बघितलं पाहिजे, डोळे उघडे ठेवले पाहिजे. डोकं नीट ठेवलं पाहिजे. ही आहे किंवा नाही! ती जागृत होते किंवा नाही! त्याचा आपल्याला लाभ होतो की नाही. ते सोडून उगीचच नाही म्हणून तुम्ही भांडायचं, देव नाही. कशावरून ? कशावरून देव नाही? हे किती अशा्त्रीय आहे. देव नाही असं म्हणतात. जोपर्यंत तुम्ही त्याचा पत्ता नाही लावला तोपर्यंत असं म्हणायचं की आहे किंवा नाही आम्हाला माहीत नाही. ही शास्त्रीय दृष्टी झाली. शास्त्रीय दृष्टी म्हणजे हे नाहीच असं धरून चाललं तर तो मनुष्य अगदी अत्यंत अशास्त्रीय आहे. म्हणूनच परदेशामध्ये कार्य फार होत आहे. आणि कुठेतरी गव्हर्मेंटने आम्हाला पुष्कळ मदत केलेली आहे. कॅनडा गव्हर्नमेंटने फार मदत केलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नमेंटने मदत केलेली आहे. त्याशिवाय अमेरिकेमध्ये विश्व निर्मल धर्म हा रजिस्टर झाला आहे. इथे जातीयता आहे. जातीयतेवर सगळे इलेक्शन होणार तुमचे. काहीतरी आपल्या देशामध्ये कुजलेले आहे. इतकं संतांनी कार्य केलं ते सगळं वाया जाणार आहे. मी सगळीकडे बघते. त्यांच्या लिहिलेल्या गोष्टी. फार आनंद होतो. पण त्या मुलांना वाटत असेल हे काय उगीचच इथे लिहिलंय 'मनुष्य ही कर्तृत्वाची लहान मूर्ती.' हे बनवायला पाहिजे तुम्ही. नुसतं भाषण देऊन नाही चालत. आहे, ही कर्तृत्वाची मूर्ती आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. ते जसं, हे एक आयुध आहे. पण जोपर्यंत ह्या इन्स्ट्रमेंटचं कनेक्शन मेनशी होत नाही, ह्याला काही अर्थ नाही. तसेच आपलासुद्धा त्या परम चैतन्याशी जर संबंध आला नाही, तर आपल्याला काही अर्थ नाही. आपण असेच इकडे तिकडे डुलत राहणार. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा विशेष सहा चक्रांतून निघते. सहा चक्रांतून निघून चहूकडे हे जे चैतन्य पसरलेले आहे, जी चैतन्य सृष्टी आहे, जिने हे सर्व जीवंत कार्य होतं, आपल्या पॅरासिम्पथॅटिक नव्व्हस सिस्टीमला ही शक्ती चालवते, ती आपल्या हाती लागते. म्हणजे आपल्याला थंड थंड असं हातामध्ये वाटू लागतं. त्याच्याबद्दल किती लोकांनी सांगितलं आहे, थंड थंड लहरी येतात. विशेषतः आदी शंकराचार्यांनी एवढं वर्णन केलेले आहे आणि त्यांनी सांगितलं आहे, 'सलिलं, सलिलं' . पण त्यांच्याशीसुद्धा वादाला एक शर्मा म्हणून आला. शेवटी ते कंटाळले. त्यांनी सांगितलं की सगळं हे कार्य आईचं आहे. आईचंच वर्णन त्यांनी सौंदर्य १७ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-17.txt लहरीमध्ये करून टाकलं. म्हणजे तेव्हापासून हा मूर्खपणा चालू आहे. पण आता हा मूर्खपणा थांबवूया. कारण आता या परमेश्वराला सिद्ध करण्याची, तसंच त्या परम चैतन्याला सिद्ध करण्याची शक्ती आलेली आहे या जगात आणि आता कलियुग जाऊन कृतयुग सुरू झालेले आहे. कलियुग संपलं. कृतयुगामध्ये हे ब्रह्मचैतन्यच कार्यान्वित झालं आहे. म्हणून ह्यांचं एवढं कार्य होतं. पण हे लोक रजनीशचे शिष्य. मी गुजरात समाचारमध्ये वाचलं. त्यांनी माझ्याबद्दल असं लिहिलं होतं की, 'आम्ही माताजींना, अंगापूरला त्या निर्मूलन समितीच्या द्वारे एक फटका दिला. आणि आता जर दूसरा फटका आला तर तुम्ही आश्चर्य करू नये.' त्या फटक्याच्या आधीच रजनीशची फटकावली. त्यांच्या आश्रमातून एका माणसाने हे छापले आहे. ह्या लायकीचे आहात का तुम्ही? तो रजनीश किती घाणेरडा मनुष्य होता त्याच्याबद्दल सांगायला नको. सर्व देशातून त्याला हाकलून लावलं. ते आपल्या डोक्यावर येऊन बसलेत आणि ह्यांचे ते गुरू आहेत. ज्या देशामध्ये ह्यांनी घाण केलेली आहे, त्या लोकांना जाऊन विचारा. एक त्यांची फिल्म आहे. ती पाहिलीत तर आठ दिवस तुम्ही जेवणार नाहीत. इतका घाणेरडा नरक उभा केला आहे त्यांनी. पण बुद्धीवादीला ते दिसतच नाही. तो चालाक होता. मी त्याला फार जवळून पाहिलं आहे. आणि मला आश्चर्य वाटलं, तो जेवायचा तरी बकासूरासारखा. एवढं मोठं ताट, त्याच्यामध्ये चोवीस त्याची पक्वान्न आणि बकासूरासारखं सगळे खाऊन टाकायचा. मी तर आश्चर्यचकित झाले की हा मनुष्य आहे की काय! असं सांगतात की आत्मसाक्षात्कारी माणसाचं शरीर हलकं असतं. मलासुद्धा चालतांना वगैरे त्रास होत नाही. वाऱ्यासारखं आहे माझं शरीर, पण तो मनुष्य, कुठे बसायचं म्हटलं तर त्याच्यासाठी एक स्पेशल आसन बनवायला लागायचं. या माणसाला मी फार जवळून पाहिलं आहे. बायकांना नागवं करून आणि वाट्टेल ते ह्याने धंदे केलेले आहेत बायकांच्या वर. असा मनुष्य आता तुमचा गुरू झाल्यावर मात्र ह्या देशाची काय दशा होणार आहे? हे सगळे भामटे आता जर ह्या राजकारणी लोकांचे गुरू झाले, तर तुम्ही लोकांनी उठायला पाहिजे ह्याच्याविरूद्ध, ही गोष्ट खरी आहे. त्यांचं तुम्ही बघाल, जोपर्यंत तुमच्यामध्ये सामाजिकरीत्या कुंडलिनीचे जागरण होत नाही तोपर्यंत त्यांचा तुम्ही नि:पात करू शकत नाही. जिथे तिथे, आता ती गुरूमाई म्हणून बाई आली. तिने लोकांना वेड लावलं. त्यांचे मार खाल्लेले इथे लोक येऊन बसलेले आहेत. तो एक मुक्तानंद. त्याने लाखो रूपये कमवले. करोडो रूपये कमवलेत . सहा करोड रूपयाचे त्याच्याजवळ डायमंड्स आहेत असं मला इन्कमटक्स कमिशनरनं स्वत: सांगितलं. तर जे लोक पैसे घेतात आणि तुम्हाला मूर्खात काढतात, त्यांच्याकडे हजारोंनी लोक जातात. पण जे सत्य सांगतात, सत्याला काही पैसे लागत नाही, तिथे मात्र तुम्ही येऊन विरोध करता. म्हणजे काय अकलेचे दिवे आहेत ते बघा. हे रिकामपणाचे धंदे म्हणावेत की मूर्खपणाचे दिवे म्हणावेत, काय म्हणावं मला सुचेना. हे असं आधीही झालं आहे की संतांच्या मागे हात धुवून लागायचं. पण आता असं करू नये हे बरं , कारण कृतयुग सुरू झालं आहे. तेव्हा त्यात जो त्रास होईल त्याबद्दल मी जबाबदार नाही. ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे, ही तुमची आहे, 'तुज आहे तुजपाशी' जे म्हटलेले आहे, ते सगळं सत्य होणार आहे. जे पसायदान लिहिलं त्यांनी, मागितलं , ते पसायदानच आहे हे. कुंडलिनीचं जागरण आणि त्याने माणसाची इतकी उन्नती होते. सर्व तऱ्हेचे रोग ठीक होतात. कृषीमध्ये, पशुपालनात, प्रत्येक गोष्टीत इतकी समृद्धी येते! इंग्लंडमध्ये पुष्कळ लोक बेकार आहेत. लाखोंनी लोक बेकार आहेत. पण ते सहजयोगात आले की बेकारी गेली. कारण बुद्धी इतकी तल्लख होते. इतकी तल्लख बुद्धी होऊन जाते. आमचे साहेब तर म्हणतात की, 'तुला सगळे देवद्त मिळाले.' ते सगळे देवद्त नव्हते, झाले देवदूत. नव्हते. ते सगळे आता देवदूत झाले. ह्यांचं वागणं १८ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-18.txt बघा, ह्यांचं बोलणं बघा, तोंडावरचं तेज बघा. कोणत्याही भुताच्या मागे लागायचं आणि त्यांना मोठ मानून घ्यायचं. ह्याला काही अर्थ आहे? डोकं लावणं ते आज पूढारी बनतात. आमच्याकडे एक धोबी होता. तो आला माझ्याकडे आणि म्हणाला, 'माताजी, तुम्ही मला मत द्या.' 'अरे,' म्हटलं, 'तुला मत द्यायला मी काही वेडी आहे का?' नाही म्हणे, 'मी पुढारी आहे.' 'असं कां!' 'इथले म्हणे धोबी आहेत त्यांचा मी पुढारी.' आणि एवढा मोठा शिकलेला मनुष्य त्याच्या विरूद्ध उभा होता. 'अरे,' म्हटलं, 'मी काय वेडी आहे का तुला मत द्यायला?' 'नाही,' म्हणे, 'मी पुढारी आहे.' आणि तो निवडून आला. म्हणजे, अगदी इतका वाईट मनुष्य होता तो स्वभावाने ! दारूडा. सगळे काही त्याच्यामध्ये होते. पण आमचा धोबी होता, कपडे चोरायचा, हे गुण करायचा. तो निवडून आला. काय हे लोक. जो मनुष्य सज्जन, सुशिक्षित, मला माहीत आहेत ते सुद्धा गृहस्थ. ते नाही निवडून आले, हा आला धोबी. हा काय प्रकार आहे ! आपलं डोकं जागेवर ठेवायला पाहिजे. आज समाजात जेवढ आपण करतो आहे, ते सगळे व्यर्थ जाणार आहे. काहीही राहणार नाही. आता ही शाळा आहे. मला फार बरं वाटलं. शाळा म्हणजे पवित्र स्थान जिथे मुलांना शिक्षण दिलं जातं. आणि जे काही होईल, ते नेहमी आता हे लोक सुद्धा शाळेसाठी, 'माताजी, काहीतरी द्या.' प्रत्येक ठिकाणी आम्ही शाळेसाठी मदत करतो. पण मी काय बघते, त्यांच्यामध्येच भांडण सुरू. आता हे शाळेसाठीच भांडणं सुरू केली अंगापूरला की, 'माताजी पैसे तुम्हालाच देतील, आम्हाला का नाही.' अरे तुम्ही काही कार्य करा तर देऊ.' फार देत नाही. माझ्याजवळ एवढे काही पैसे नाहीत. हे लोकच देतात. मी एकत्र करून दिले आहेत. मी काही दिलेले नाही. आणि त्याच्यावरती हे झालेलं आहे, की इथे येऊन खुसपट काढायचं, काहीतरी भांडण. अहो, आयुष्यभर तुम्ही भांडतच राहणार, तुमची मुलं भांडत राहणार तुम्ही काही प्रगती करणार आहात का ? निदान ह्या लोकांमध्ये भांडखोरपणा तरी नाही. इतके भांडखोर लोक आहेत आणि कुणाची इज्जत नाही. एकदुसऱ्याला खाली ओढायचं हा आपल्या महाराष्ट्राचा गुण आहे. हा फारच वाईट गुण आहे. कुंडलिनी जागरणानंतर हे सगळे संपून जाईल. मनुष्य शांत, समाधानी होईल. एकाचा पाय ओढ, दुसऱ्याचा पाय ओढ. कशी प्रगती होणार त्यांची. कोणाही बद्दल सात्विक श्रद्धा नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लंडनसारख्या शहरामध्ये माझ्या यजमानांनी काम केलं आहे. १३४ देशामधून ते निवडून आले होते आणि लंडनसारख्या देशात जिथे इंग्लिश लोक कोणाला घुसू देत नाही, 'सर्वोच्च' साहेबांना दिलं. ती पदवी आणि कुणाला नाही. ही त्यांची जी ओळख, ज्यांनी काम केलं, ज्यांनी मेहनत केली, जो सच्चा मनुष्य आहे, त्याची ओळख होती. हे आपल्या देशात कधी येणार आहे! परवा मी गेले. मला पोलिसवाल्यांचंसुद्धा इतकं वाईट वाटलं. रस्त्याने जात होते. उभे होते बिचारे. म्हटलं 'आता तुमचं हे कसं काय चाललं.' 'अहो, काही नाही माताजी, उभे आहोत ओळीने.' 'का?' तर म्हणे, 'इथून एक मिनिस्टर जाणार आहे.' 'अरे, जाणार तर त्यांना मारायला कोण येणार आहे? कशाला उभे तुम्ही इथे? चहा प्या. काहीतरी करा. मलाच त्यांची दया वाटली. परत मी आले ८-१० तासाने तरी पोलिस उभेच तिथे. 'अरे,' म्हटलं, 'काही खाल्लं- प्यालं की नाही?' काही नाही. बरं, शेजारपाजाऱ्यांनी तरी त्यांना काही चहापाणी द्यायचं. नाही. पोलिसवाले, म्हणजे गेले. अरे, ते तिथे उन्हातान्हात उभे किती वेळचे. माझाच जीव हळहळला. पण इतक्या लोकांसाठी कशी तिथे व्यवस्था करायची मला काही समजेना. 'अरे,' म्हटलं, 'थोडं जाऊन, आळीपाळीने जाऊन जरा काही खाऊन या नां! असं काय करता इथे. आठ तास कशाला उभे.' 'आम्ही जाऊच शकत नाही, म्हणे. ही आपल्या इथे दर्दशा. म्हणजे जे प्रेमाचंे स्थान, जो प्रेमाचा सागर , असा हा महाराष्ट्र होता. तिथे केवढी घाण आलेली आहे. प्रेम १९ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-19.txt सोडून भाऊबंदकी वर आली आहे . अहो, थोडी होती पूर्वी. आजकाल इतकी भाऊबंदकी झालेली आहे ! कोणाबद्दल काही प्रेम नाही. सहजयोग म्हणजे काय? हे जे प्रेमाचा सागर, क्षमेचा सागर , दयेचा सागर अशी जी परमचैतन्याची शक्ती ती आपल्यात वाहू लागल्याबरोबर मनुष्याला इतकं प्रेम येतं आणि इतका आनंद वाटतो! 'आनंदाच्या डोही' जे वर्णन केलेले आहे ते समोर आहे. तेव्हा ही कुंडलिनी आपली जागृत करून घ्या आणि अशा बेकार लोकांच्या नादी लागू नका. अगदी बेकार लोक आहेत. काही त्यांना अर्थ नाही. जे गृहस्थ आले होते, मानव, त्यांच्यावरून, 'शितावरून भाताची परीक्षा, ' त्याला अध्यात्म माहीत नाही. त्याचा काही व्यासंग नाही. त्याला काही मेडिकल माहीत नाही, की काही माहीत नाही. आता त्याच्याशी बोलायचं तरी काय, कप्पाळ! मग शेवटी मी त्याला एक टेप करून दिली, की बाबा, हे पहा, जरी मी मेडिकल शिकलेले असले, तरी मराठी भाषेचा माझा फार अभ्यास आहे. मी वाचलंय. काय मराठी भाषा आहे! तुम्हाला माहीत नाही, मराठी भाषेसारखी भाषा नाही. आणि महाराष्ट्रात तर ही विशेष आहे. एक तर देशभक्ती आणि दूसरं देवाकडे लक्ष. हे दोन्ही ठेवलं आहे. जसे शिवाजी महाराज आत्मसाक्षात्कारी होते. त्यांनी हे नाही म्हटलं, की हा धर्म जागवा, 'स्व धर्म जागवावा.' स्व धर्म, 'स्व' म्हणजे आत्म्याचा धर्म, त्यांनी आपली स्वयंचालित संस्था जाणतात, त्याला जागवलं पाहिजे. आणि म्हणून आत्ताच आपण कुंडलिनी जागृतीचे कार्य करतो. याबाबतीत उहापोह करता येत नाही. कारण ज्याला डोळे नाही, त्याला कसं सांगायचं की हा रंग कोणता आहे. आधी डोळे येऊ द्या, मग बघू. नसते वाद - विवाद करून, तीन तास त्या मानवशी बोलून, मी म्हटलं, 'नमस्कार तुमच्या अज्ञानाला! एवढा अज्ञानी मनुष्य मी आजपर्यंत पाहिला नाही. आणि तुम्ही पुढारी कसे झालात.' मग नंतर, कोणी तरी सांगितलं ते वध्ध्याला जेलमध्ये होते आणि म्हणायला लागले की, 'मला इथले जेवण आवडत नाही.' कशा कारणाने गेले माहीत नाही. त्यांनी सांगितलं की, 'इथलं जेवण खावं लागेल.' 'नाही, नाही म्हणे इथलं नको.' मग त्याच्यावरती एक बाई होत्या त्यांनी मला सांगितलं की, 'माताजी, शेवटी ह्याने सांगितलं, मी तुमच्या पाया पडतो, क्षमा मागतो, लिहून देतो, मला घरी जाऊ द्या. मी घरचं जेवण जेवेन.' अशी माणसं तुमचे लीडर. असे विद्वान लोक तुमचे लीडर आहेत. तेव्हा ह्याला त्क करता येत नाही. तर्काच्या पलीकडे आहे. विज्ञानाच्या पलीकडे अध्यात्म आहे. पण हे 'आधी कळस, मग पाया,' आधी अध्यात्म मिळवायचे, मग करा वाट्टेल तेवढी प्रगती. आणि प्रगती होणारच. कारण तुमच्यावर आशीर्वाद आहे, परमेश्वराचा. देशाला परमेश्वराच्या आशीर्वादानेच सगळे कार्य होतं. तेव्हा तो आशीर्वाद आपण घ्यावा आणि ह्या महाराष्ट्र भूषवावं, अशी माझी सर्वांना विनंती आहे. आता आपण आधी जागृतीचा कार्यक्रम करू या. हे लोक सगळे विदेशी आहेत. एखाद्या इंग्लिश माणसाला नुसतं असं सांगायचं असलं, की दरवाजा बंद कर. तर त्याला खोलता येत नसे. त्याला सांगायचं इंग्लिशमध्ये 'देअर वॉज अ बँकर.' मग तो ते म्हणायचा. त्याला एक अक्षर शिकवणं कठीण. आणि पुढे तो मराठीत बोलायला लागला, तर माझ्या आजीबाई म्हणायच्या, की कोणती भाषा बोलतोय हो. अहो, म्हटलं मराठीत बोलतो आहे. 'असं का! मला वाटलं कोणती, इंग्लिश नाही, मराठी नाही, आहे कोणती भाषा.' आता तुम्ही ह्यांचं ऐकून घ्या. पोवाडा गातात सगळे काही. हे कुठून आलं. ते म्हणतात, आपलं संगीत हे ॐ कार स्वरूप आहे. हे सिद्ध होतं. ह्यांना कुठून आलं हे सगळे काही. ताला-सुरात, आपल्याहीपेक्षा छान म्हणतात. तेव्हा ह्यांच्या प्रगतीकडे बघून आपणही आपली प्रगती करून घ्यायची आणि आपल्याकडे लक्ष द्यायचं. आपण काही साधारण लोक नाही. ह्या महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. पण त्याला पाहिजे जातीचे. 'येऱ्यागबाळ्याचे काम नोहे.' तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे, आपला गौरव, आपली शक्ती ही आपल्यात असताना आपण ती का सोडायची ? ती का वापरायची नाही! २० 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-20.txt तेव्हा कृपा करून आपलं थोडसं, एक दहा मिनिटाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला जागृती होईल. ज्यांना होईल त्यांना होईल. नाही होणार त्यांना नाही होणार याच्यात जबरदस्ती करता येणार नाही. उद्यापासून तुमची इच्छा असेल तरच, जर तुम्ही त्याच्या विरोधात असलात तर कधीही जागृती होणार नाही. आता हे हिटलर लोक सगळे दगड घेऊन निघालेले आहेत. ते म्हणतात आम्हाला जागृती करा. जन्मात होणार नाही त्यांची जागृती. होणं शक्यच नाही. ज्यांच्या मनामध्ये जरासुद्धा साक्त्विकता नाही, अशा तामसी लोकांची कोण जागृती करणार ? शक्यच नाही. कारण त्यांची लायकी नाही. जागृतीची लायकी तर पाहिजे. दोन लाख मोजा नाहीतर शंभर लाख मोजा. ह्यांची जागृती मला काय, कोणालाच जमणार नाही. ब्रह्मदेवालासुद्धा जमणार नाही. तेव्हा ते शक्य नाही. फक्त ज्या माणसामध्ये असे सात्त्विक विचार असतील, की माझी जागृती झाली पाहिजे. मग तुम्ही काहीही केलं तरी हरकत नाही. या क्षणाला. हे ज्यांच्या मनामध्ये असेल, की माझी जागृती झाली पाहिजे. मला शक्ती मिळाली पाहिजे. त्यांचं आम्ही कार्य करू शकतो आणि ते होऊ शकतं. त्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. दडपशाही करू शकत नाही, काही नाही. तर सगळ्यांनी आता आपली जागृती करून घ्यावी. एका अर्थाने ऊन असलेलं बरं! म्हणजे जे थंड - थंड डोक्यातून येतं किंवा हातातून येतं , ते लगेचच कळतं. ऊन नसलं तर जरा त्रास होतो कधी कधी. एअरकंडिशन असेल तर लोकांना शंका येतात, की हे एअरकंडिशनच चालू आहे. आता आपण जागृतीचं कार्य करू. अहो, तुम्हा लोकांची जागृती पाच मिनिटात होते आणि ह्या लोकांवर माझे मी हात मोडले, वर्षानुवर्ष मेहनत केली तुम्हाल माहीत नाही, पण झाले मात्र हे एकदा. मिळाल्यावर मात्र जमले खूप जोरात. तुम्ही जमत नाही. जसं आपलं स्वातंत्र्य लवकर मिळालं, तर बसले त्याचे धिंडवडे काढत. तसाच प्रकार आहे हा. सहजयोगामध्ये लोक जमत नाही. माझ्या प्रोग्रॅमला येतील. पार होतील. पण सत्कारणी नाही लागत. सत्कारणी लागत नाही. तसं करू नका. कृपा करून आज जागृती घेतल्यानंतर सत्कारणी लावा. फार मोठे कार्य होणार आहे तुमच्या हातून, तुम्ही फार शक्तिशाली आहात. त्या शक्तीला प्राप्त करा. ती शक्ती जर तुम्हाला मिळाली आणि त्यात जर तुम्ही वृक्षासारखे वाढले तर तुम्हीच तुमचे गुरू होता आणि इतकं तुम्ही कार्य करू शकता की त्याला काही अंतर नाही. तेव्हा कृपा करून सहजयोगाला प्राप्त व्हा. सहज, सह म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला. हा योगाचा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो तुम्ही प्राप्त करून घ्यावा. सगळ्यांनी बसून घ्यावं. काल काही लोक बसले नाही, झाले नाही पार. काय होतं माहीत नाही. या पृथ्वीचाच असेल काही तरी अधिकार! बसले नव्हते ते पारच नाही झाले. वर लटकतच रातहिले. असं नाही की जमिनीवरच बसलं पाहिजे. कुठेही बसले असले तरी ठीक आहे. पण जोडे, वहाणा नको. वहाणा काढून टाका. बरं दसरं असं की, मी आई आहे. माझ्यासमोर टोप्या घालायला नको. कारण मी आई आहे आणि आईला काही आपण टोप्या घालून भेटत नाही. तेव्हा मी मिनिस्टर किंवा गुरू नाही. तेव्हा कृपा करून टोप्या उतरवून घ्यायच्या. कारण हे ब्रह्मरंध्र छेदायचे आहे नां! टोपी काढलेली बरी! विल यू प्लीज टेक आऊट यूवर कॅप ? आता फक्त दोन्ही हात माझ्याकडे असे करायचे. नुसते असे. साधे दोन्ही हात असे माझ्याकडे करा. काहीही करायला नको तुम्हा लोकांना. नुसते असे हात करायचे. पाय थोडे वेगळे ठेवा. एकावर एक पाय नको. बसलेल्यांचं नाही म्हणत, पण जे वरती आहेत, असे वर बसलेले, त्यांनी पाय थोडे वेगळे ठेवलेले बरे ! जमिनीवर बसलं म्हणजे झालं. त्यांचं तर कल्याण होणार! बरं, आता नुसते डोळे मिटायचे. नुसते डोळे मिटा. काही करायचं नाही दसरं. डोळे मिटा. आणखीन चष्मा असेल तर तो उतरवून घ्या. चष्मा उतरलेला बरा. डोळ्याची २१ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-21.txt दृष्टी पुष्कळदा बरी होते. फक्त डोळे मिटायचे. आणि मनामध्ये अशी इच्छा धरायची, 'आई, आमची कुंडलिनी जागृत झाली पाहिजे.' ही तुमची आई आहे. कुंडलिनी तुमची आई आहे. प्रत्येकाची वेगळी, वैयक्तिक आई आहे. तुमचं जसं सगळे टेपरेकॉर्डमध्ये असतं तसं तिच्याजवळ सगळं काही आहे. तिला माहिती आहे, की तुम्ही कोण, कसे आहेत. आता डोळे मिटले. डोळे उघडू नका. कृपा करून मी सांगितलं नाही तोपर्यंत डोळे उघडू नका. कारण चित्त आतपर्यंत ओढलं जातं. कुंडलिनी जेव्हा वर येते तेव्हा चित्त आतपर्यंत ओढलं जातं. तेव्हा डोळे बंद ठेवलेले बरे. हे काही मेस्मरिझम नाही. तुमचे डोळे उघडे ठेऊन, लोक डोळ्यात डोळे घालून करतात ते. हे देवाचं कार्य जिवंत कार्य आहे. आता डोळे मिटल्यावर फक्त पाच मिनिटाची गोष्ट आहे अजून. ( माताजींनी माईकमध्ये फुंकर मारली) आता हळूहळू डोळे उघडा. आता डावा हात माझ्याकडे करा. फक्त डावा हात माझ्याकडे ठेवा आणि उजवा हात असा. परत उजवा हात. थोडसं संतुलन द्यावं लागतं आधी. मान वाकवून घ्यायची. आणि डाव्या हाताने, उजवा हात असाच. डाव्या हाताने जी टाळू आहे त्याच्यावर अधांतरी असा डावा हात धरायचा. अधांतरी. हा मराठीतला शब्द 'अधांतरी' कुठे नाही. अरांतरी धरायचे. डोक्यातून गार यायला पाहिजे किंवा गरमही वाटू शकतं. जर तुम्ही क्षमा नसेल केली सगळ्यांना, तर क्षमा केली पाहिजे. सगळ्यांना क्षमा करून टाका. स्वत:लाही क्षमा करा. 'माझं हे चुकलं, माझं ते चुकलं,' काही नाही. तुम्ही मानव आहात. मानवच चुका करतात. परमेश्वर थोडी करतो. तेव्हा 'माझं हे चुकलं, माझं ते चुकलं,' असं काही म्हणायचं नाही. आत्मविश्वास ठेवला पाहिजे. अजून तुम्ही आपल्याला जाणलं नाही. आता डावा हात माझ्याकडे करायचा. जेव्हा तुम्ही स्वत:ला जाणलं नाही, तेव्हा तुम्ही काय स्वत:मध्ये असा वाईट विचार करता. मान खाली घाला. वाकवून घ्यायची खाली. परत उजव्या हाताने करा. असा विचार ठेवायचा नाही, की मी हे पाप केलं, ते पाप केलं, हे चुकलं, ते चुकलं, काही नाही. ह्यावेळेला काही नाही. आणि असे जे लोक तुम्हाला सांगतात नां , ते स्वत: पापी आहेत. सगळ्यांना क्षमा करा एकसाथ. कोणाला क्षमा करायचे ठेवायचे नाही. सगळ्यांना एकसाथ क्षमा करा. आता उजवा हात परत माझ्याकडे. एकसाथ क्षमा करा सगळ्यांना. क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही करता तरी काय? काहीच करत नाही. फक्त आपल्याला त्रास करून घेता. सगळ्यांना एकसाथ क्षमा. आता दोन्ही हात डोक्यावर. असे घेऊन मान मागे घ्यायची आणि एक प्रश्न विचारायचा मनामध्ये तीनदा, 'श्रीमाताजी, परमचैतन्य आहे का?' असा प्रश्न तीनदा विचारायचा. 'माताजी, हे परमचैतन्य आहे का?' किंवा 'श्रीमाताजी, ही परमेश्वरी प्रेमाची शक्ती आहे का?' असा प्रश्न तीनदा, कोणताही विचारा तुम्ही. तीनदा, मान वर करून. काही घाबरायचं वगैरे काही नाही. आता हात खाली करा. दोन्ही हात माझ्याकडे करा आणि माझ्याकडे न विचार करता बघा. न विचार करता. ही निर्विचार समाधी. ही निर्विचार समाधी आहे. आता ज्या लोकांच्या हातामध्ये, बोटांमध्ये किंवा टाळूमध्ये थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील. त्यांनी दोन्ही हात वर करायचे. वर, वरपर्यंत. वा, वा ! ही खरी पायरी आहे. लहानपणी 'पळसाला पाने तीन' शिर्षकाचा एक लेख वाचनात आला. त्यात एक मुलगा वाईवरून पुण्याला निघाला होता. त्याचं वर्णन होतं. मला पुष्कळदा वाटायचं की वाईला यायचं. कारण वाई काहीतरी एक तीर्थस्थान असेल, असं मला नेहमी वाटायचं. आज ते कळलं. आता तुम्ही वाईमध्ये आहात तेव्हा, ह्या स्थानाचं महात्म्य ठेवलं पाहिजे आणि धर्मात उतरलं पाहिजे. आता खरा धर्म तुमच्यात जागृत झाला. तुम्ही कोणत्याही धर्माचे असले, हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन, तरीसुद्धा वाट्टेल ते पाप करू शकता, म्हणजे तो धर्म तुम्हाला रोखत नाही. पण आता तुमचा हाच आत्मधर्म झाल्यामुळे तो तुमचा आत्माच तुम्हाला सांभाळेल. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे ! २२ 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-22.txt कुण्डलिनीपण एक ज्वाळी आहे, तिचे उत्थान धगधगणीन्या ज्वाळेसारखे आहे. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे आणि वरच्या बाजूला जाणारी कोणतीही गोष्ट पृथ्वीकडे खेचली जाते. केवळ अग्रीचे गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध, वरील बीजूस जातो. गपतीपुले, महाराष् प.पू.श्री मातीजी, गण ट्र, २१.११.१९९१ प्रकाशक निर्मल ट्रान्सफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१ , ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in 2015_Chaitanya_Lehari_M_III.pdf-page-23.txt आत्म्याची तुलना आपणे सूर्याबरोबर करू शकतो. सूर्य ढगांनी झाकला जाऊ शकतो, सूर्याला ग्रहण लागू शकतं, पण तो आपल्या जागेवर स्थिर असतो. सूर्याला तुम्ही ज्योतिर्मय बनवू शकते नाही, तो तर स्वत:चे प्रकाशमान आहे. ढग जर बाजूला झाले तर त्याच्यावर आलेले आवरण बाजूली होते आणि सूर्य परते एकदा वातीविरणात चमकू लागतो. प.पू.श्रीमाताजी, १८.०६.१९८३