चैतन्य लहवी सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मराठी 38858665600 56000000SSA या अंकाल महालक्ष्मी तत्त्व म्हणजे परमेश्वरामध्ये रममाण होण्याची इच्छा ४ ...8 दिवाळी पूजा, पुणे, १ नोव्हेंबर १९८६ प्रेम हे सहजयोगाचे अन्न आहे ..१२ सेमिनार अँड मिटिंग, सातारा, ६ डिसेंबर १९८४ सहजयोगाद्वारे ताण-तणावाचे नियोजन ...१८ सार्वजनिक कार्यक्रम, मुंबई, ११ मार्च २००० क्षमाशीलता-हे महान शस्त्र आहे ..२२ बुद्ध पूजा (काही भाग) देवीच्या सर्व अवतारांच्या वेळी बऱ्याचे असुरी शक्त्या पण पृथ्वी वर अवतरीत झाल्या आणि दैवीली युद्ध करून त्यांना विनाश करावा लागली. ही विनাश फक्त असुरी शक्त्या समाप्त करण्यासाठी नव्हता. ही विनाश ह्यासाठीसुद्धा होता की ह्या शक्त्या साधक तसेच संतांना त्रास दैत तसेच त्यांना जूकसान पोहोचवण्याची प्रयत्न करीत असत. नवरात्री पूजा, २४.१०.१९९३ प.पू.श्रीमातीजी, मराठीत म्हणतात, 'त्याला पाहिजे जातीचे,' आणि जात कोणती, तर सहजयोगाची. आपली एकच जात आहे. आपली जात एक आहे. असे म्हणतात, 'या देवी सर्वभूतेषु, जातिरूपेण संस्थिता। सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे, की ' जे लोक परमेश्वराला विचारतसुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ देत. दुसरी एक जात आहे, जे नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ देत. तिसरी एक जात आहे, ज्यांना भलते धंदे जास्त आहेत आणि परमेश्वर नको. ते ही आहेत, जाऊ देत . असेही लोक आहेत जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले आहेत. अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहेत. त्यांचं ते ही सुटत नाही. कितीही सांगितलं तरी सुटत नाही. जाऊ देत. ते ही आहेत. त्याहन असे ही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत. त्यांची बुद्धी त्याबाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसतय की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय! हे लोक आपल्या जातीतले आहेत. आपल्या जातीत येऊ शकतात. प्रत्येक माणसाशी सहजयोग वर्णिता येत नाही. सहजयोगाला समजण्यासाठीसुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजेत. सहजयोगी सहजयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भिडतात. काही श्रीमंत माणसं असतात. 'माताजी, ते फार श्रीमंत लोक आहेत. तुम्हाला भेटायची इच्छा आहे.' 'बरं ४ महालक्ष्मी तत्त्व म्हणजे परमेश्वरामध्ये रममाण होण्याची इच्छा पुणे, १ नोव्हेंबर १९८६ मग पुढे काय!' 'ते म्हणतात आम्हाला एकदा माताजींना भेटू द्या. 'मग त्यांना काय पाहिजे?' 'काही नाही, ते भेटायचं म्हणतात.' मी म्हणते, 'अहो, राहू देत, त्यांना अजून थोडसं नाही, असं कसं माताजी म्हणाल्या? एवढे श्रीमंत आहेत. कारण त्या लायकीचे नाहीत ते. पैसे आले म्हणून लायकी येत नाही. दुसरे लोक आले. म्हणे, फार मोठे पॉलिटिशियन आहेत. तुम्ही भेटा. म्हटलं, बघू द्या.' लोकांना समजत दुरून नमस्कार! मला वेळ नाही. एक साधी बाई आली तर माताजी उठून आल्या भेटायला. हे असं कसं? अहो, जे तुम्हाला साधे दिसते, सामान्य दिसते, तेच आम्हाला असामान्य वाटते त्याला आम्ही तरी काय करणार? आमचं जसं डोकं आहे तसेच आम्ही चालणार आहोत की नाही! तसेच सहजोगाचंसुद्धा डोकं असायला पाहिजे. बेकारच्या लोकांकडे आपला वेळ दवडू नये. जी मंडळी परमेश्वराला शोधत आहेत आणि जी परमेश्वराच्या चरणी जायला, लीन व्हायला तत्पर आहेत, अशाच मंडळींकडे जावे. आता हा दीप तुम्ही लावला आणि इतके दिवे लावले, पण समजा एखाद्या दारूङ्या माणसाला दिवा दाखवला किंवा ज्याला भुतं लागली आहेत अशा माणसाला दिवा दाखवला, तर तो तुम्हालाच खायला धावेल. तर त्याला दिवा दाखवण्याची गरज काय ? जगात पुष्कळ लोक आहेत जे खरोखर जाणतात की ते अंध:कारात आहेत आणि त्यांना परमेश्वराला भेटायचे आहे. पण असे ही पुष्कळ लोक ५ आहेत, की देवाला कशासाठी भेटायचं तर आम्हाला काही तरी त्यातून भौतिक लाभ झाला तर बरं होईल. आता सांगायचं म्हणजे असं की भौतिक लाभ होतो, त्याबद्दल शंका नाही. आज इकडे लक्ष्मीपूजन आपण इथे करीत आहोत त्याला हेच कारण आहे, की जी पुण्याची अलक्ष्मी आहे त्याला तोंड दिलं पाहिजे. त्याच्यावर मात केली पाहिजे. त्याच्याशिवाय पुण्यातली, या पुण्यभूमीतील अलक्ष्मी जाणार नाही. त्यातलं मुख्य कारण काय असलं पाहिजे बरं ! अलक्ष्मी असण्याचं मुख्य कारण म्हणजे पुण्याला जितके मारूती आहेत आणि जितके गणपती आहेत, तिथे इतके लोक जाऊन बसलेले आहेत, की ह्या सगळ्यांची आधी उचलबांगडी केली पाहिजे. हे लोक जे मधे देवाच्या नावावर पैसे खातात आणि तुमच्या डोक्याला टिळे लावतात, ते टिळे लावणं बसून बंद केलं पाहिजे. 'मोठं कठीणच काम दिसतं माताजी हे!' आहेच, पण सहजयोगात इलाज आहेत ह्या लोकांचे. अनेक इलाज आहेत. ते इलाज आपण केले पाहिजेत. शिकलं पाहिजे. पण हे लोक इथे बसून जो सगळ्यांची आज्ञा चक्र खराब करतात, त्या आज्ञा चक्रावरून प्रहार करून मनुष्य जागरूक असेल त्यालासुद्धा नष्ट करतात. तेव्हा हे साधे दिसणारे लोक आहेत त्या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या देशांमध्ये हे असले लोक कार्यान्वित असतात, त्या त्या देशामध्ये गरिबी येते. कारण ही सगळी मंडळी प्रेतविद्या आणि स्मशानविद्या ह्याची कार्य करीत असतात. बसतात देवाच्या देवळात. त्यांना देवाची काही भीती नसते. देवाच्या देवळात बसून प्रेतविद्या आणि स्मशानविद्या करतात. कोलकाताला मी गेले. तेव्हा तिथली स्थिती बघून मला वाटलं आता इथे सहजयोग होतो की नाही होत. जो मनुष्य आला त्याला बघते तर काही ना काही तरी बाधा! गरिबी म्हणजे इतकी झालेली आहे कोलकाताला, इतकी गरिबी आहे, की एखादे उजाडलेले मोठे गाव असावे आणि अशी अनेक गावं मिळून एखादा जर प्रांत तयार केला, ती कोलकाताची स्थिती आहे. त्या लोकांना मी विचारलं, 'तुमचं असं कसं ? तुम्ही गेले होते का?' 'हो,' म्हणे, 'आम्ही दीक्षित आहोत.' तिथे दीक्षित नाही म्हणत दीखित म्हणतात. सगळी मंडळी दीखित. इथून तिथपर्यंत सगळे दीखित लोक. म्हणून दीखित बरोबर दुःखी लोक असणारच. पण त्यांना सांगायची सोय नाही, की बाबा रे, तुम्ही हा दीखितपणा करीत आहात हे बरोबर नव्हे. हे लोक सगळे उपटसुंभ आहेत. बरं नुसते पैसे घ्यायचे असते तर हरकत नाही. पण त्याशिवाय जे नाना प्रकार ते करतात, ते म्हणजे अत्यंत जालीम आहेत. प्रत्येक देवस्थानी असा गोंधळ असतो. प्रत्येक देवस्थानी! तुम्ही जेरूसलेमला जा, नाहीतर मक्क्याला जा आणि नाही तर महालक्ष्मीच्या देवळात जा. प्रत्येक ठिकाणी हे प्रकार आपण करतो. त्याने अलक्ष्मी येते. लक्ष्मीचं असं आहे, की इकडून बाधा आली की ती चालली बाहेर. दूसरी गोष्ट व्यसन. व्यसनाच्या अधीन असल्यावरती लक्ष्मी कधीही घरात राहणार नाही. असं म्हणतात की, 'इकडून बाटली आली की तिकडून बाई चालली बाहेर.' नुसतच बाटलीच नाही. अनेकतऱ्हेची आपल्याला व्यसनं आहेत. आता सहजयोगाने सर्व व्यसनं सुटतात. ही गोष्ट खरी आहे. ६ थोडीशी जर अशी मेहनत केली तर सर्व व्यसनं सुटतील. जर व्यसनं असली तर लक्ष्मी तर जाणारच, पण यशसुद्धा आयुष्यात कधी येणार नाही. तुमच जे यश आहे तेसुद्धा संपुष्टात येणार, लक्ष्मी गेल्याबरोबर. राजलक्ष्मी गेली, गृहलक्ष्मी गेली कोणत्याही नादाला जर मनुष्य लागला, कोणत्याही मोहाला जर मनुष्य बळी पडला, तर लक्ष्मी घरातून उठते. ती घरात टिकणार नाही. तुम्ही कितीही दिवे लावा, पण ती काही जर व्यसनं असली तर आत येणार नाही. कारण तुम्हाला दिसत नाही काय आहे ते घरात. तिला लक्ष्मी तर जाणारच, दिसतं, तेव्हा ती बाहेरच्या बाहेरच राहणार. तुम्ही कितीही मेहनत केली, तुम्ही कितीही लक्ष्मीची आरती केली, सुक्त म्हटली, काहीही केलं काही पण यशसुद्धा फायद्याचं नाही उलट सांगणारे जे आहेत त्यांचे खिसे भरत आहात आयुष्यात कधी येणार नाही. तुमच तुम्ही. हे करा, ते करा, त्यातच तुमची सगळी स्थिती होणार. तेव्हा पहिल्यांदा असे काही जे विचार आहेत, ज्याने आपण ह्या अशा यश आहे तेसुद्धा लोकांच्याकडे जातो किंवा वाममार्गाकडे जातो, ते विचार आपण टाकून संपुष्टात येणार, दिले पाहिजे. आता तुम्ही असे म्हणाल, तुकारामांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती. असं कसं. तुकाराम काही श्रीमंत नव्हते. असं तुम्ही म्हणाल. आता वरून बघितलं तर तुकाराम श्रीमंत नव्हते अस दिसेल. सगळ्यांना असं वाटेल, त्यांच्याकडे दागदागिने नव्हते, काही नव्हतं मग लक्ष्मी कशी? लक्ष्मी गेल्याबरोबर. राजलक्ष्मी गेली, गृहलक्ष्मी गेली, कोणत्याही नादाला त्यांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती. पण किती श्रीमंत होते हे बघायचं असलं तर त्यांच्या चरित्राकडे बघा, जेव्हा शिवाजी महाराज सगळे जर मनुष्य लागला, दागदागिने घेऊन त्यांच्या दारावर पोहोचले. तेव्हा त्यांनी शिवरायांना कोणत्याही मोहाला सांगितलं, 'आम्ही शेतकरी. आम्हाला हे करायचय काय ? हे जर मनुष्य बळी तुमच्याजवळ राहू द्या. तुम्ही राजे लोक तुम्ही वापरा हे.' म्हणजे केवढा पडला, तर लक्ष्मी श्रीमंत असला पाहिजे हो तो! आपल्याकडे असा एखादा श्रीमंत बघा, जो घरातून उठते. फार मोठा श्रीमंत असेल, त्याला जर तुम्ही एखादा दागिना द्यायला गेलात तर त्याला मोह होईल की नाही. असा कोणताही श्रीमंत मला दाखवा ज्याला मोह होणार नाही. एक आमचं सोडून द्या. बाकीचे. ज्याला मोह वाटतो, जो अशा गोष्टींकडे लक्ष देतो, आणि हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे. हा मुलखाचा भिकारी झाला आणि श्रीमंत लोक जास्तच असतात भिकारी! एक दोन पैशाची कुठे वस्तू राहिली, तर 'अरे ७ एक दोन पैशाची वस्तू राहिली,' म्हणून धावत येतील परत. म्हणजे श्रीमंत आहेत का भिकारी आहेत हे कोणी ठरवायचं. तेव्हा जे लोक मनाने श्रीमंत आहेत ते खरे श्रीमंत आहेत सहजयोगात. ज्या लोकांच्या घरी जावं, तिथे घरात काही नसलं तरीसुद्धा प्रेमाने, 'माताजी, आमच्याजवळ जे आहे ते एवढेच आहे. आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही. थोडी भाकरी आहे. घेता का ?' केवढ श्रीमंत वाटतं ते! जे घरात होतं नव्हतं ते आणून पुढे ठेवलं. ते प्रेमाने, गोड मानून खायचं. त्यात खरी श्रीमंती त्यांची दिसून येते, की जे आहे घरी ते सगळे पुढे आणून ठेवलं. तेच एखाद्या श्रीमंताच्या घरी जा. अर्ध बंद करून ठेवतील. 'तुम्ही घेता का चहा ?' घेत असलात तर घ्या. नाही तर ठीक आहे. नसेल घेत तर परत. हे कसले श्रीमंत! त्या शबरीने रामाला जी बोरं आणून दिली, रामाला काय खायला नव्हतं की काय? त्या बोराचं त्यांनी एवढं महत्त्व केलं. त्यातच सिद्ध होतं की एवढी श्रीमंत ही शबरी! पाहुणचाराला आले तर त्यांनी तिचा मान ठेवून उष्टी बोरं खाल्ली. ही अशी श्रीमंती जी आली ती खरोखर लक्ष्मीची श्रीमंती आहे. पैसा असो वा नसो मनुष्य श्रीमंत असू शकतो. आपल्या बादशाहीत राहू शकतो. पण चला सहजयोगात ते ही मना आहे. तुम्हाला आम्ही कोणी शबरीच्या स्थितीला नेत नाही. सहजयोगात लक्ष्मी ही मिळणारच. म्हणजे अगदी लक्ष्मीच! ती सगळ्यांना मिळणार त्याबद्दल शंका नाही. त्याला एवढ्यासाठी नाही की तुम्ही भिकारी आहात. पण जगाला दिसलं पाहिजे. जर जगाला असं दिसलं, की तुम्ही सहजयोगात येऊन गरीब झाले तर कोणी सहगयोगात येणार नाही. त्यांना प्रलोभन देण्यासाठी लक्ष्मी तुम्हाला दिलीच पाहिजे. त्याबद्दल शंका नाही. त्याशिवाय त्या आंधळ्यांना दिसायचं नाही. म्हणून लक्ष्मी दिलीच पाहिजे आणि मिळणार. नाभी चक्र उघडल्याबरोबर लक्ष्मी मिळू शकते. पण नाभी चक्रामध्ये लक्ष्मीचं जे स्थान आहे, त्यातलं पहिलं गृहलक्ष्मीचं स्थान आहे. आपण असेही म्हणू की तुकारामाची बायको म्हणजे अगदी जहाल बाई होती. जरा नम्र असती आणि देवाला तिने मानलं असतं तर कदाचित त्यांच्या घरी लक्ष्मी आली असती. तर घरातील गृहलक्ष्मी कशी आहे त्याच्यावरून लक्ष्मी येणार. तिला जर बाधा असती आणि नवरा तिच्या बाधितपणालाच बळी जात असला तर घरात कधीच लक्ष्मी राहणार नाही. पण ती जरी बाधित असली आणि नवऱ्याने सांगितलं , की ही तुझी बाधा गेलीच पाहिजे किंवा नवरा दारू पितो तरी ही बाई आपली पतिव्रता बनून, 'दारू पाहिजे ना तुला माझे दागिने घे तू.' 'बरं, मग.' 'माझ मंगळसूत्र घे. जे पाहिजे ते घे तू. मी पतिव्रता आहे फार मोठी!' अस म्हणून आणखीन त्याला नरकात ढकलत असते. अशांच्या घरी कधीही लक्ष्मी राह शकत नाही. गृहलक्ष्मी म्हणजे एक तेजस्वी स्त्री असायला पाहिजे. तिचं असं आयुष्य असायला पाहिजे, की जिला बघून पुरुषाला ही वाटलं पाहिजे की 'काहीतरी घरात आहे बरं का! काहीतरी असं तसं आम्ही वेडवाकडं केलं तर चालायचं नाही घरात.' पूर्वी पुरुष लोक बायकांना 'मालक' म्हणत असत, 'साहेब' म्हणत असत. एक दरारा असायचा अशा बायकांचा. तो कशामुळे? आरडाओरडा करून नाही झालेला. पण एक त्या बाईच्या तेजस्वितेने असेल. तिची उदात्तता, तिचं गांभीर्य, तिची दानशूरता, तिची निष्ठा, तिची सेवा , तिचं प्रेम ह्या सगळ्या गोष्टींनी त्या ८ बाईला एक प्रकारची तेजस्विता आणि चारित्रय दिलं आहे. ती गोष्ट सुटून आजकाल गृहलक्ष्मी म्हणजे, त्याला नाव म्हणजे, आजकालच्या गृहलक्ष्मींची कशाशी तुलना करायची तेच मला समजत नाही. कारण त्यांच्या डोक्यात काय आहे, तेच कळत नाही मला. नवऱ्याची, किंवा घरातील मुलांची, सासू- सासऱ्यांची, सगळ्यांची सेवा केली पाहिजे. हे कबूल. पण त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या घाणेरड्या गोष्टी, त्यांच्या मूर्खासारख्या गोष्टी त्याला मान्यता द्यायची किंवा त्यांना खुश करण्यासाठी वाट्टेल ते काम करायचं. वाट्टेल त्या मार्गाने जायचं. वाट्रेल तसं वागायंच. 'मग नवरा आहे, माताजी. ' 'मग काय झालं?' 'नवराच आहे.' 'असं का!' नवरा आणि तुम्ही.... सांगत नाही मी, पण समजलं तुम्हाला. ह्या गृहलक्ष्मीची स्थिती एखाद्या कमळासारखी असायला पाहिजे. कमळ हेच गृहलक्ष्मीचं स्थान आहे. नेहमी पाण्यावर, सुगंधित, अत्यंत नाजूक आणि लक्ष्मीला सबंध आधार अशी असणारी. ही कमळासारखी व्यक्ती असायला पाहिजे. ती राजलक्ष्मी असायला पाहिजे. दारोदार भीक मागणे, 'आज द्या हो तुमची साडी नेसायला म्हणजे बरं होईल. ' 'कुठे निघालात तुम्ही?' 'नाही मला दाखवायचं आहे लोकांना असं.' कोणत्याही प्रकारची खोटी घमेंड किंवा कोणत्याही प्रकारचा लपंडाव, त्याची एक आढ्यता, त्याची एक ऐट ही स्त्री मध्ये असली म्हणजे तिच्यात राजलक्ष्मी विराजमान होते, (जणू तिला असं वाटतं). खरोखर लक्ष्मीपूजन म्हणजे स्त्रियांवरच लेक्चर द्यावे लागत आहे, असं तुम्हाला वाटत असेल. पण तशी गोष्ट नाहीये. तिसरी म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे, आपले जे गणपती आहेत, गणपतीचे म्हणजे जे विशेष स्वरूप आहे, म्हणजे तो अत्यंत निष्पाप आहे. तसं निष्पाप असायला पाहिजे. (गणपतीला) अत्यंत तीक्ष्ण बुद्धी असूनसुद्धा. जसं हत्तीला हे समजतं की चांगलं काय आणि वाईट काय! सुबुद्धी म्हणजे अगदी तल्लख आहे त्याची. चालतांनासुद्धा धावतपळत चालणार नाही. पुष्कळशा बायकांना मी बघते त्या बायकांसारख्या चालतच नाही, घोड्यासारख्या चालतात. आणि एवढी धावपळ, हे धर रे, ते धर रे, हे धाव रे, ते धाव रे. मला परवा कोणीतरी प्रश्न विचारला, 'लहान मुलांना ब्लड कॅन्सर कसा होतो? म्हटलं, 'त्यांच्या आईला जाऊन बघा. ती धावपळी असेल.' धावपळ करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांच्याकडे गजलक्ष्मी असू शकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही, की काही करायचंच नाही. जे करायचं ते सुबक आणि सुंदरतेने करायचं. एवढा मोठा हत्ती आहे, त्याला जेव्हा लक्ष्मीला हार घालायचा असतो, सोंडेत व्यवस्थित घेऊन, गळ्यात कसा व्यवस्थित घालतो आणि जरासुद्धा कुठे स्पर्श होऊ देत नाही. ही सुबकता त्याला सुगुण असं गृहिणी म्हणतात, ती यायला पाहिजे. आता हे सगळे जरी झालं तरी जर पुरुषांना बायकांची इज्जत नसली आणि ह्या गोष्टींची इज्जत नसली तर घाणेरड्या बायकांच्या मागे ते धावतात किंवा रस्त्यावरच्या बायकांना महत्त्व देतात किवा एखाद्या जबरदस्त बायकोला ते घाबरतात. तर अशा पुरुषांच्या घरी लक्ष्मी राह शकत नाही. जे आपल्या पत्नीला, जी सुपत्नी आहे, तिला त्रास देतात त्यांच्या घरी लक्ष्मी राह शकत नाही. पुरुषांना असं वाटतं जेवढी काही १ अब्रू वगैरे आहे ती बायकांनाच असते, पुरुषाला काही अब्रू वगैरे नसते. तो कसाही वागला तरी तो धार्मिकच असतो. त्याला असं वाटतच नाही की दुसर्यांकडे वाईट नजरेने पाहणे हे अधार्मिक आहे. असं पुरुषाला वाटतच नाही, म्हणजे 'योगक्षेमं वहाम्यहम्' रियलायझेशनच्या आधी. सहजयोगानंतर तुमचे डोळेच असे फिरतात उलटे. जे श्रीकृष्णाने तुमच्या डोक्यातच हे विचार येत नाहीत. हे मोहाचे विचारच येत नाहीत असेच डोळे फिरतात. म्हणजे ह्या सगळ्या लक्ष्मी तुमच्यामध्ये जागृत झाल्या! कुठेही उभे राहिलात तरी तुमचे चित्त कधीही पडणार नाही. जशी ज्योत नेहमी वर उठते, तसेच तुमचं चित्त नेहमी परमेश्वराकडेच राहणार. अशी स्थिती आली म्हणजे लक्ष्मी म्हटलेले आहे. त्यातला जो क्षेम भाग आहे तो लक्ष्मीच्या तुमच्या घरी येणार. ते अनेक प्रकार आहेत. कृपेने होतो. नरसिंह भगतची हुंडी पटवली ते माहिती असेलच आपल्याला. कृष्णाने सर्वतन्हेचं क्षेम सुदामाची द्वारका बांधली. द्वारिकेतून जाऊन त्याची सोन्याची घरं बांधली. ते माहिती असेल आपल्याला. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असतांना श्रीकृष्णाने तिच्या लज्जेचे रक्षण केले हे ही माहिती असेल आपल्याला. ह्या सर्व चमत्कार गोष्टींनी असतं. नुसतं आर्थिकच नाही. जर आर्थिक असलं, तुम्ही परिपूर्ण रहाल. अत्यंत चमत्कारपूर्ण जीवन असेल. रोज नवीन नवीन चमत्कार, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कशा तऱ्हेने चमत्कार तुमच्यासमोर येतात. समजा, तुमची तब्येत तुम्हाला आशीर्वादित करतात. ही सगळी लक्ष्मीचीच कृपा आहे. हे सगळे आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीची कृपा आहे. अनेक तऱ्हेचे आशीर्वाद असतात. ठीक नसली, तर डॉक्टर तुमचे सगळ परवा मी एक साडी घेतली विकत. तीन हजार रुपयांना मिळाली. ती दुसऱ्या आर्थिक घेऊन माणसाला दाखवली, तर तो म्हणतो, बाजारात ह्याची कमीत कमी किंमत पंधरा जाणार. सर्वत्हेने, १ हजार असायला पाहिजे. म्हटलं, 'नाही, आम्हाला तर ही तीन हजारातच प्रत्येक तन्हेचं क्षेम मिळाली.' ही लक्ष्मीची कृपा म्हटली पाहिजे. दुसरा येऊन सांगतो, 'माताजी, बघा. माझ्याजवळ पैसे नव्हते. मी अस ठरवलं गणपतीपुळ्याला यायचं, तर कसं काय येणार. माझ्याकडे पैसे नव्हते.' तर लगेच टपालाने पत्र आलं की, 'तुझे एवढे पैसे वाचले होते. ते तुला परत पाठविले आहेत. ' हे सगळं एक पैश्याच्या दृष्टीने झालं. घटित होतं आणि त्याची सगळी गोळाबेरीज म्हणजे पण तशा अनेक आहेत. तुमची तब्येत खराब झाली. तुम्ही म्हटलं, 'माताजी, माझी तब्येत खराब झाली.' झालं उद्या ठीक. 'अहो, कसं काय झालं ?' डॉक्टर म्हणतात, तुमच्यामध्ये महालक्ष्मी तत्त्व 'असं कसं शक्य आहे? आम्ही विश्वासच ठेवू शकत नाही. असं कसं झालं.' ही लक्ष्मीची कृपा आहे. 'योगक्षेमं वहाम्यहम्' जे श्रीकृष्णाने म्हटलेले आहे. त्यातला जो क्षेम भाग आहे तो लक्ष्मीच्या कृपेने होतो. सर्व तऱ्हेचं क्षेम असतं. नुसतं जागृत होतं आर्थिकच नाही. जर आर्थिक असलं, समजा, तुमची तब्येत ठीक नसली, तर १० डॉक्टर तुमचं सगळ आर्थिक घेऊन जाणार. सर्वतऱ्हेने, प्रत्येक तऱ्हेचं क्षेम घटित होतं आणि त्याची सगळी गोळाबेरीज म्हणजे तुमच्यामध्ये महालक्ष्मी तत्त्व जागृत होतं आणि महालक्ष्मी तत्त्व म्हणजे परमेश्वरामध्ये रममाण होण्याची इच्छा. माताजी महालक्ष्मी म्हणजे हे सर्व जे काही तुम्हाला मिळालेले आहे, 'हे मिळालय आता, आम्हाला कळलं आहे. परमेश्वराचा आमच्यावर हात आहे. परमेश्वराच्या साम्राज्यात आलो आहोत. पण अजून थोडसं आम्हाला कमी वाटतंय.' 'काय बुवा, काय कमी वाटतंय?' 'अजून आम्ही कोणाला दिलं नाही. वाटून खाल्लं नाही. एकटेच खात बसलो आहोत.' महालक्ष्मी तत्त्व तुमच्यात जागृत होईल आणि हे जागृत झाल्यावर बरोबर तुम्ही संतुलनात, असंतुलनात नाही. संतुलनात हळूहळू आपली दीपशिखा वाढवली तर ती ब्रह्मरंध्रात जाऊन बसेल आणि सबंध तुमचं आयुष्य आलोकित होईल. आजपर्यंत कोणीही जगात झाले नाहीत असे महापुरुष तुमच्यातून निघणार आहेत. आजपर्यंत कोणीही विचारले नाहीत आणि जाणले नाहीत, महाकिमयागार तुमच्यातून निघणार आहेत. पण संतुलन नाही सोडायचं. पण जर तुम्ही संतुलन सोडलं तर हे प्रेम जे आहे, ते इकडे पडेल, नाहीतर तिकडे पडेल. नष्ट होईल. संतुलनात तुमची असे दीपशिखा उघडायची आहे आणि हे झालं पाहिजे, मग ह्या सगळ्याला अर्थ येतो. हे जे आवाज होताहेत आणि हे ध्वनी निघत आहेत (फटाक्यांचे आवाज), ही त्याचीच गर्जना आहे. हे होणार आहे. कडकडणार आहे सबंध जग. दूंदभी वाजणार आहेत आणि सगळ्यांना कळणार आहे की एक नवीन युग तयार होत आहे. त्या माणसात, त्याच्यात, कोणालाही, कोणत्याच प्रकारचा त्रास, त्रागा, संताप राहणार नाही. आणि परमेश्वराच्या साम्राज्यात त्याचे चमत्कार बघावे तितके थोडे आहेत. बघतच रहावं आणि काय बोलणार हे पाहिल्यावर! अशी एक अत्यंत सुंदर मनः स्थिती होते. त्या आनंदाचा उपभोग तुम्ही सर्वांनी सतत मिळवावा. त्या सदिच्छेनेच मी इथे आज या पूजेला तयार झालेली आहे. मला पूर्ण आशा आहे, की आजच्यानंतर सर्व लोक मनोभावे आपल्यातील लक्ष्मी तत्त्व जपून ठेवतील. आणि त्यातून उगवणार्या ह्या नवीन आकांक्षा ह्या महालक्ष्मी तत्त्वाच्या रूपाने बाहेर पडतील. त्या संतुलनात राहून पूर्णपणे समजून घेतील. व्यवहारात आणतील आणि पसरतील. परमेश्वर आपणा सर्वांना ही दिवाळी सुखाची करो! सगळ्यांना माझ्यातर्फे अनंत अनंत आशीर्वाद! ११ प्रेम हे सहजयोगाचं अन्न आहे सातारा, ६ डिसेंबर १९८४ जे होते ते आपण घेतले सातार्याला राजधानी स्थापन केली. त्यांच्यात (शिवाजी महाराज) गुण पाहिजेत. त्यांच्यातला विशेष गुण असा होता की त्यांच्यात कोणतेच दोष नव्हते. जे आपल्या माणसामध्ये दोष असतात. कोणाला कशाची सवय, तर कोणाला कशाची. कोणी काहीतरी वेड्यासारखे एखाद्याच्या मागे लागले तर लागले. ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की ते अंशावतार होते. अंशावतार असल्यामुळे त्यांना कोणतीच वाईट सवय, वाईट खोड, खोटं बोलणं, दारू पिणं वरगैरे म्हणजे असं की त्यांना सांगावं लागत नसे. कारण ते तसे नव्हते. ते अत्यंत स्वभावाने गोड होते. स्वभाव फार गोड होता. अत्यंत गोड स्वभावाचे आणि आईला पूर्णपणे समर्पित. कधीही ते कोणाला वाकडा शब्द बोलले नाहीत किंवा कोणावरही ओरडले नाहीत. कोणावर बिघडले नाहीत. हे दोन गुण फार कठीण असतात. जेव्हा मनुष्याला इतकं आयुष्याचं वरदान असतं आणि इतकंच नव्हे त्या वरदानामध्ये एक महत्त्वही येतं. कारण ते महाराज होते. पण तरीसुद्धा स्वभावामध्ये अत्यंत गोडवा होता आणि स्वत:बद्दल शिष्टपणा नव्हता, की मी राजा आहे आणि हे गोरगरीब आहेत किंवा हे मावळे आहेत. त्यांच्याशी बोलायचं. त्यांच्याबरोबर बसायच, १२ ा भ त त्यांच्याबरोबर भाकरी खायची. कांदा-भाकरी त्यांच्याबरोबर मजेत खात. रात्रंदिवस प्रवास करायचे घोड्यावर. कुठेही रात्रीचं झोपायचं. काहीही करायचं. अशा रीतीने त्यांनी आपलं आयुष्य काढलं. अत्यंत हालअपेष्टा त्यांनी सहन केल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा संभाजी महाराज आणि शाहू महाराजांचे भांडण झाले त्याला कारण एकच होतं भाऊबंदकी. तो आपल्या मराठी लोकांमध्ये स्वभाव आहे. अगदी अंगात वळण आलेले आहे. त्याच्याशिवाय आपल्याला झेपत नाही. ते सहनच करायला आपण तयार होत नाही, की भाऊबंदकी आपल्यात आहे. गोष्ट ऐकायला आपण तयार होत नाही. ही गोष्ट अगदी आपल्यामध्ये मुरलेली आहे. तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे. सहजयोगातही भाऊबंदकी मी बघते सारखी. कुठेही गेलं की भाऊबंदकी आहे. हा महाराष्ट्राचा एक फार मोठा दुर्गुण आहे. या भाऊबंदकीम्ळे आपण एक राज्य गमावलं. आता परमेश्वराचं साम्राज्य गमावू नये. जे लोक परमेश्वराच्या कार्यात आहेत त्यांना सगळ्यांना धरून बसायचं. सोडलं नाही पाहिजे. सोडून बोलायचं नाही. शिवाजी महाराजांची कथा अशी नव्हती. एखाद्याने काही कार्य केलं तर त्याचं १३ केवढं महत्त्व करीत होते. आपल्याला माहिती आहे, की सिंहगड जिंकल्यावर ते म्हणाले, 'गड मिळाला, पण सिंह गेला'. केवढी मोठी गोष्ट आहे. 'गड मिळाला तर काय झालं, पण सिंह गेला आमचा!' आणि ते सगळे काही त्यांचं जे वागणं होतं त्याच्यामध्ये आपण हे शिकलं पाहिजे की सहजयोगातसुद्धा दुसर्या माणसाचं महत्त्व करणं फार जरुरी आहे. स्वत:चं महत्त्व करत बसायचं नाही. आम्ही विशिष्ट, आम्ही विशेष, आम्ही सर्व काही, असं नाही केलं पाहिजे. खूप लोकांना वाटतं, की आपण शिकलेले आहोत. सहजयोगात काही लोक सुखवस्तू आणि शिकलेले लोक आहेत, तर ते इतर ग्रामीण लोकांशी मिक्सअप होत नाहीत. हे चुकीचे आहे. 'ते लोक वेगळे, आम्ही वेगळे, आम्ही वेगळं रहायचं, त्यांनी वेगळें रहायचं.' अशी जर भावना आली तर मग सहजयोग तुम्हाला मिळाला नाही. योगाला जात नसते, पात नसते, उच्च-नीच काही विचार नसतो. इतकेच नव्हे तर श्रीमंत-गरीब असा विचारसुद्धा योग्यांमध्ये नसला पाहिजे. तरच तुम्ही योगी झाले. तर योग्यांची ओळख ही आहे, की आपण सगळे जे आहोत सरमिसळ एक आहोत. आपण आईची सगळी मुलं-बाळे आहोत. आपल्यामध्ये काहीही फरक नसला पाहिजे. पूर्णपणे संपला पाहिजे. आपल्या देशाला जर बदलायचे आहे, तर जसं आपण शिवाजींचंच आपल्यासमोर एक उदाहरण ठेवलेले आहे आणि बघितलेले आहे, की पहिली गोष्ट म्हणजे स्वत:मध्ये काही दोष नाही. ज्या माणसात स्वत:त दोष आहे तो दुसर्यांना काय सांगू शकतो. दुसरं म्हणजे असं, की जे त्यांचे फॉलोअर्स होते त्यांनासुद्धा त्यांच्याबद्दल नितांत श्रद्धा होती. सारखं तुम्ही जर भांडत बसलात, दोषच काढत बसलात तर तेच होईल. दोन्ही मेळ असायला पाहिजे, तरच भाऊबंदकी होत नाही. हा जर दोन्ही मेळ बसवला नाही, तर मात्र भाऊबंदकी होते. तुटकपणे बोलणं हे फार चुकीचे आहे. तसंच आपल्या लिडरला मान न देणं, त्याचा पाणउतारा करणं, सारखं त्याचं वाईट शोधणं, त्याला शिकवण देणं हे फार चुकीचे आहे. हे त्याच्याहन चुकीचे आहे. तेव्हा ह्या दोन गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपल्या देशातील भाऊबंदकी संपणार. ती नसली पाहिजे. अगदी निघाली कधी निघणार नाही. स्वत: पाहिजे. मुळातून निघाली पाहिजे. आणि ती दुसर्यांचे दोष बघून मधला दोष काढला पाहिजे. मी सातार्यात एवढ्यासाठी होते, की ह्या साताऱ्यातच स्वराज्याची स्थापना झाली आणि ह्या साताऱ्यातच स्वराज्याची बेबंदशाही सुरू झाली, तेव्हा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, की आपल्यामध्ये बेबंदशाही नसली पाहिजे. हे प्रेमाचं कार्य आहे आणि प्रेमालाच जोडत गेलं पाहिजे. बाकी जेवढे काही विचार आणि हे सगळं लोक करतात, काही बुद्धीवादी लोक असतात, ते बुद्धीच्या जोरावर दुसऱ्यापासून दूर होतात. प्रेमाच्या जोरावरच तुम्ही राहिलं पाहिजे. प्रेम हे १४ सहजयोगाचं अन्न आहे. आपण किती दुसर्यांवर प्रेम केलं, दूसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा आपण किती दुसऱ्यांना दिलं, हे पाहिलं पाहिजे ! सातार्याला आता हे कार्य सुरू झालेले आहे. मला फार आनंद झाला. काल मला फार बरं वाटलं. कितीतरी साधक इथे होते. इतके लोक पार झाले! सहजयोगामध्ये फार मोठं कार्य करायचे आहे आणि फार मोठी माणसं होणार आहेत. हेच उद्याचे सगळे पुढारी इथे बसलेले आहेत. ते सगळं बघून मला फार आनंद झाला. पण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपलं पूर्वी जे राजकारणात चुकलं, ते आपलं आता परमेश्वराच्या साम्राज्यात चुकलं नाही पाहिजे. तिथे ते नाही चुकलं पाहिजे. परमेश्वराच्या राज्याचे कायदे फार जबरदस्त आणि फार कडक आहेत. जो मनुष्य त्या कायद्याच्या विरुद्ध पळेल, तो तिथेच हाणला जातो. तेव्हा सांभाळून असा. फार सांभाळून असावं लागतं. त्याचे आशीर्वादही अनंत आहेत. पण एका मुदतीपर्यंत असलं तर. त्याच्यानंतर मात्र हात त्याचा जोरात चालतो. तिथे मग तुमचं काही चालू शकणार नाही. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, की आता आपण परमेश्वराच्या साम्राज्यात येत आहोत. तेव्हा अशी सुबुद्धी झाली पाहिजे, की जिथे कोणत्याही अशात-्हेचं जे गलिच्छ राजकारण आहे ते आणायचं नाही. ह्या गलिच्छ गोष्टी वर आणायच्या नाहीत. आपण प्रेमाच्या साम्राज्यात सर्व एका दुव्याने एकमेकांना बांधलेलो आहोत. एकाच आईची मुलं आहोत. तेव्हा आपापसामध्ये जी सत्ता मिळवायची ती स्वत:वर मिळविली पाहिजे. दूसर्यांवर सत्ता मिळवायची ही जागा नव्हे. ही स्वत:वर सत्ता मिळविण्याची जागा आहे. आणि जर का तुम्ही स्वत:वर सत्ता मिळविली तर पहिली गोष्ट तुमच्या व्हायब्रेशन्समध्ये दिसेल. तुमचे व्हायब्रेशन्स कसे आहेत त्यावरून मला कळतं, तुमच्यात काय चाललेले आहे? कुठे काय चाललं आहे आणि कुठे काय बिघाड होतो? तेव्हा कृपा करून कोणतीही भाऊबंदकी आणि अशात-्हेचे दोष बांधायचे नाहीत आणि बांधले गेले तर तोडत जायचं. माताजींनी सांगितलं आहे, की बांधायचे नाहीत. कोणाच्या विरुद्ध बसून बोलायचं नाही. कोणाला वाईट म्हणायचं नाही. ग्रुप्स बांधायचे नाहीत. सगळे मोडून काढायचे. हा विचार मला साताऱ्याला आल्यावर ग्रुप्स आला. आता इथे लोकांना ह्याची जाणीव दिली पाहिजे. कारण सहजयोग म्हणजे फार ह्याने मिळतो. दुसर्याला दाबू लागतो. किंवा हे लोक जे म्हणतात, की हा मनुष्य कशाला एवढं करतो ? जर मनुष्य दाबू लागला तर त्या लोकांना आणि त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याला जी सत्ता येते त्या सत्तेमध्ये तो असं वाटतं की हा कोण? तर सहजयोगामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, की मातारजींनी एकेका माणसाला प्रत्येक ठिकाणी नियुक्त केलं आहे आणि प्रत्येकाशी त्या संबंध ठेवतात. त्यांचा संबंध त्या एका नियुक्तीमुळे होतो. जसं आपल्या डोक्यातसुद्धा एक ब्रेन आहे. त्या ब्रेनपासून आपण सगळ्यांचा संबंध ठेवला आहे. तसंच सहजयोगात करायला पाहिजे. तेव्हा जर काही त्या माणसात बिघाड झाला तर मला लगेच लक्षात येईल, की मी त्याला ठीक करू शकते. पण तुम्ही त्याचे दोष काढून सगळंच स्पिरीच्युअल करून टाका. आहे की नाही! लक्षात आली का गोष्ट तुम्हाला! १५ जो एक मनुष्य लीडर असेल त्याला तुम्ही मान्य करा आणि मी त्याला बघेन,. त्याने जर चुका केल्या, तर मला सगळे समजतं. प्रत्येकाचं मला समजतं. इतकं मला बारीक माहिती आहे, तुम्हाला माहीत नाही. मी सांगत नाही, म्हणत नाही म्हणजे. ह्याचा अर्थ असा नाही की मला कळत नाही. मला सगळ्यांचं माहिती आहे. तेव्हा ज्या एका माणसाला आपण लीडर केलेले आहे त्या माणसाला मान्य केलं पाहिजे. माताजी इथे आहेत. माताजींवर भरवसा आहे! तुम्ही जास्त शिकलेले असाल किंवा तुमच्याजवळ जास्त पैसे आहेत किंवा काही असेल तरी तसे काही करायचे नाही. एक जो मनुष्य आहे, तो जोपर्यंत मला ठीक वाटतो, तोपर्यंत तुम्ही राहू द्या. पुढे मग त्या माणसाचं काही वाईट असेल, तर मी त्याला काढून टाकेन. मला स्वत:ला ते समजतं एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच सहजयोग वाढणार आहे. कारण जरी सहजयोग आपण म्हणू, की ह्याच्यामध्ये काहीही संस्था नाही. काही तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही. तेव्हा मेंबरशीप नाही. तेव्हा कशाने जोडले जाणार? प्रेमाने... ! प्रेमातच जोडलेले आहे. सगळ्यांनी प्रेमाने जोडून घ्यायचं. आणि दुसरं म्हणजे असं, की प्रेमाची सत्ता जी असते, ती माताजींपासून येते आहे, तेव्हा त्यांनी ज्या माणसाला म्हटलेले आहे, की ह्याला माना, तर त्याला मान द्या. नंतर त्या माणसात वाईट दोष दिसला तर मी त्याला काढून टाकणार. अगदी नक्की काढून टाकणार. माझ्यावर पूर्ण भिस्त ठेवली पाहिजे. आणि आपलं चरित्र जे आहे ते कसं बनवायचं? आपण त्यात कसं वागलं पाहिजे? हे शिकण्यासाठी तुमच्यासमोर मी आहेच. तुम्हाला जर असं वाटत असेल, की आम्ही माताजींसारखे नाही होऊ शकत , तर शिवाजी महाराज आहेत, त्यांना बघा. पुष्कळ लोक आपल्या इथे आहेत. काही कठीण नाही. सहजयोगात पार झालेल्या लोकांना काही कठीण नाही. अगदी आयुष्य एकदम बदलून जातं. ह्या लोकांना बघा किती बदलले! ते जमिनीवर बसू शकत नव्हते पाच मिनीटसुद्धा. मेहनत करून करून जमिनीवर बसायला शिकले. तर ध्यानधारणा वगैरे व्यवस्थित करावी. रोज संध्याकाळी, निदान झोपायच्या आधी एक पंधरा- वीस मिनिटंसुद्धा ध्यानधारणा केली तरी स्थिती बरी होईल आणि सकाळच्या वेळेला, बाहेर जायच्या आधी किंवा सकाळी उठून, आंघोळ करून एक पाच मिनिटं पूजा केली फोटोची की झालं. पण प्रत्येक आठवड्यात सगळ्यांनी भेटलं पाहिजे. जर ते झालं नाही, तर सहजयोग वठत नाही. प्रत्येक आठवड्यात सर्वांनी भेटलं पाहिजे. कारण ही सामूहिक क्रिया आहे. तुम्ही, 'आम्ही माताजी घरी फोटो ठेवला. आम्ही की तुमची पूजा करतो, तरी आम्हाला हा त्रास झाला.' माझं लक्ष नव्हतं. मी आपल्याला कालच सांगितलं, जेव्हा आपण ताक घुसळतो, त्यातून लोणी बाहेर निघतं, तेव्हा जे गोळ्याला चिकटलेले आहे ते आपण काढून घेतो. बाकीचं फेकून टाकतो किंवा गोळ्याला चिकटलेले लोकच आमच्याजवळ येतात. बाकी माझं लक्ष नसतं. तेव्हा त्या ठिकाणी यायला पाहिजे जिथे दहा माणसं भेटतात. बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. पण गटबाजी करायची नाही. बोलणं कमी असावं, ध्यान जास्त असावं म्हणजे बरं होईल. गटबाजी असली म्हणजे, 'मी ठीक करतो, मी तुझे ठीक करतो. मी तुझा ठिकाणा करतो.' असं तुला सुरू १६ झालं म्हणजे गेलं. त्याच्यापेक्षा ध्यानधारणा करायची सगळ्यांनी, भजन म्हणायचं, आरती म्हणायची. काही आपापसातले प्रश्न आहेत ते मिटवायचे. पण इथे बसून काही तरी वादविवाद करणे किंवा हे करणे, ते करणे, बंद आहे. उलट सहजयोगामध्ये जे काही मिळवायचे आहे त्याच्या वाढीला लागा, वाढ कशी झाली, आमची काय वाढ झाली, कुठे आम्ही पोहोचलो आहे ? ते बघावे. हळूहळू मला असं वाटतं, की महाराष्ट्रात सहजयोग जमेल. तुमच्यावर सगळ्या जगाची भिस्त आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व जगाची भिस्त ह्या महाराष्ट्रीयन लोकांवरती आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर तुम्ही का बुडवलं, तर ते ही शक्य आहे तुम्हाला. तेव्हा तसं नाही. आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढून टाकले पाहिजेत. स्वभावामध्ये गोडवा आणला पाहिजे. प्रेमाने बोललं पाहिजे. आणि सगळ्यांशी समतेने वागलं पाहिजे. ते मागण्यात आलं तर आतमध्येसुद्धा (अंतरंगात) येईल. कारण आता तुम्ही आत-बाहेर एकच झाले आहात. जे तुम्ही बाहेर कराल , ते आत येईल. जे तुम्ही आत कराल, ते बाहेर येईल. तेव्हा आत-बाहेर एक झालेलं आहे. असं होत नसतं. आता संबंध झालेला आहे. पुन्हा जर हे बाहेरचं खराब झालं, तरी आवाज येत नाही आणि आतलं खराब झालं तरी आवाज येत नाही. दोन्ही गोष्टी नीट होतात. पुष्कळांचं असं म्हणणं आहे की, 'आम्ही ध्यान करतो माताजी, आम्हाला व्हायब्रेशन्स ठीक आहेत.' पण तरी बाह्यातलं ठीक व्हायला हवं. नाहीतर हळूहळू आतलं जे आहे ते संपून जाणार. म्हणून आत आणि बाहेर दोन्हीही मनुष्यामध्ये एकसारखं असायला पाहिजे आणि दिसायला तेजस्विता असायला पाहिजे. त्या तेजामध्ये कोणत्याही तऱ्हेचा दाह नसला पाहिजे. अत्यंत सौम्य आणि शीतल चंद्रासारखं असलं पाहिजे. पुढच्या वेळेला मी येईन तेव्हा आणखीन मंडळी राहतील, आणि पुष्कळ मंडळींना घेऊन आपण इथे पूजन करूयात. पण ह्यावेळेला मात्र मी येणार नाही. पुढच्या वर्षी येणार आहे. त्यावेळेला कदाचित एक रात्र मी इथे राहणार आहे. तेव्हा बघू काही झालं तर. १७ सहजयोगाद्धारे ताण-तणावाचे नियोजन संबंधच झालेला नाही. संबंध झाला नाही तर बोलता कोणाशी तुम्ही? कोणाचे नाव घेता ? हे माहीत असायला पाहिजे. इतकेच नव्हे तर प्रत्येक चक्रावर वेगळी देवता आहे. तेव्हा नामस्मरण कोणाचं करायचं, जिथे तुमची कुंडलिनी अडकली असेल तिथेच. ते नाहीये. काहीतरी, आता समजा, जर आम्ही इथे आलोच नाही, तर तुम्ही कोणाशी बोलणार? सहजयोगी : ही सेईंग गुरूमंत्राज..... ( तो गुरूमंत्राविषयी विचारतो) काही द्यायचा नाही. मी तरी ठरवलं आहे. गुरूमंत्र वगैरे काहीही देत नाही. कारण काय आहे १८ मुंबई, ११ मार्च २००० की त्याच्यातच मन अडकतं. जर तुमची प्रगती प्रत्येक क्षणी होईल, तर मी कोणता मंत्र देऊ तुम्हाला? काहीही गुरूमंत्र नाही. मला फक्त आई माना म्हणजे मिळवलं. काही नाही. आईस्वरूपात पाहिलं म्हणजे पुष्कळ, लवकर सगळे समजतं. कारण आई एक अशी देवाने आपल्याला दिलेली देणगी आहे, की ज्यामुळे आपल्याला जगातलं सगळें मिळतं. म्हणून मला फक्त आईस्वरूप मानलं की झालं. दुसर त्याच्यापलीकडे काही नाही. नामस्मरण वरगैरे का सांगितलं ? त्याला कारण असं की लोकांचं लक्ष इकडे तिकडे जाऊ नये. या, त्या गोष्टीकडे वेधू नये. म्हणून सांगितलं, तुम्ही नामस्मरण करीत बसा. पण त्याचं इतकं प्रस्थ झालं आहे, इतकं झालं आहे प्रस्थ, की खंडीभर देव उठवले आहेत. त्याच्यातच गुंतले आहेत सकाळपासून. ज्ञानेश्वरांच्या पायात ते नाही झालं, तर त्याच्यापुढे आपल्याकडे आता पालख्या काढतात. बघा, वहाणा नव्हत्या. तुम्ही पालख्या काढून गावोगाव भीक मागत चालले. ह्याला काय अर्थ आहे! अशाने काय होतं, की सर्व काही, अध्यात्माचा एक खेळ होऊन जातो. काहीतरी त्याचं बीभत्स रूप आलेले आहे. तसं काही नाही. अगदी स्वच्छ आहे ते. (सहजयोगी : अष्टांगयोगाची कुंडलिनी उत्थानासाठी मदत होते का ?) नाही. अष्टांगयोगामध्ये अष्टांगामधलं एकच अंग आहे. त्याच्यात शरीराची तुम्ही निगा राखू शकता. त्याच्यापुढे त्यांनी असं सांगितलं आहे, की ह्याने तुम्हाला निर्विचार समाधी लागली पाहिजे आणि निर्विकार समाधी लागली पाहिजे. हे आहे. पण ते कसं काय? ते काही त्यांनी लिहिलेलं नाही. कुंडलिनीचंसुद्धा नाव दिलेले नाही. फक्त आपल्या नाथपंथामध्ये असं होतं , की एका माणसाला द्यायची. लाखात एकाला पार करायचं. अशी एक परंपरा आहे. तेव्हा ज्ञानेश्वरांनी आपल्या भावाला विचारलं, त्यांचे गुरू होते की, 'मला तुम्ही परवानगी द्या, की मी कुंडलिनीबद्दल निदान माझ्या पुस्तकात तरी लिहू ते का?' त्यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्या सहाव्या अध्यायात त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे, की कुंडलिनी नावाची शक्ती आहे. ती अशी आहे. ती उठते. त्याच्यात लोकांनी थोडा विपर्यास केला असेल. पण लिहिलं तर खरी! ही बाराव्या शतकातली गोष्ट आहे. मग सोळाव्या शतकात सगळ्यांनी ह्याच्यावर १९ सांगितलं. रामदास स्वामी, त्यांना विचारलं की, 'कुंडलिनी जागृत किती वेळात होते ?' त्यांनी उत्तर असं दिलं, 'तत्क्षण. जर देणारा असला आणि घेणारा असला.' ही फार मोठी अट आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत फक्त परंपरागत, एक, दोन लोक पार झाले आहेत. आणि अजूनही मी पाहिलेले आहे. जे पोहोचलेले काही गुरू आहेत, ते मला म्हणतात, 'माताजी, तुम्हाला काय झालं आहे. सत्पात्री द्या.' म्हटलं, 'जाऊ देत . नसलं तरी माझी काही हरकत नाही.' कळलं कां! अशा रीतीने या कुंडलिनीबद्दल जो गैरसमज झाला तो असा, की काही काही लोकांनी उपटसुंभपणा केला. 'कुंडलिनी फार वाईट. त्याने तुम्हाला असे दोष येतात. अमुक, तमुक.' खोटं नाटं पुष्कळ लिहिलेले आहे. त्याच्यामुळे लोक घाबरतात. पण तसं काहीही होत नाही. मी तीस वर्षापासून कार्य करते आहे. मी तसे काहीही पाहिलेले नाही. कधीही होत नाही. उलट फायदाच होतो. अनेक रोग ठीक होतात. मानसिक रोग ठीक होतात. आणखीन इतकेच नव्हे, पण धनसंपत्तीसुद्धा होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल! लक्ष्मीची कृपा होते, अलक्ष्मी जाते. हे सगळं होतं. हे आपल्याला करायचे आहे या देशात, विशेषत: महाराष्ट्रात. महाराष्ट्रात फक्त काम कमी आहे आमचं. (सहजयोगी : आपण हे काम खेड्यांमधे का करीत नाही?) मी खेड्यांमधून हे काम केलेले आहे, पण फार वर्षापूर्वी. अहो, त्या खेड्यापाड्यामध्ये इतकं अज्ञान आहे! तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी महाराष्ट्रातल्या लहान लहान खेड्यांमधून गेले. तिथे राहिले, तिथे झोपायचे, इतकी मी मेहनत केलेली आहे. पण त्या खेड्यांमधल्या लोकांचं मला समजत नाही, ते एक रुपया घेऊन येतील. 'अरे, माताजी पैसे नाही घेत.' 'बरं, दहा रुपये घेतील का?' म्हटलं आता ह्यांचं डोकं कुठे गेलं आहे ? खूप काम केलेले आहे आणि अजूनही करायचं आहे. पण बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल, की उत्तर हिंदुस्थानात मी इतकं काम केलेले नाही. पण खेड्यापाड्यात केलं आहे. महाराष्ट्रात एक-दोन दोष आहेत आपल्या. एक तर आपल्याला वाटतं की धर्माच्या बाबतीत आपल्या काही काही अटी असतात. पैसे दिले पाहिजेत, अमुक, तमुक. ती सवय झालेली आहे. आणि दुसरं एक मला वाटतं, थोडी मोठ्या लोकांमध्ये जरा घमेंड आहे. आम्ही काही तरी विशेष आहोत. घमेंड आहे. त्या घमेंडीने पण कमी होतं. असं मला तरी वाटतं. कारण तसं मी पाहिलं आहे, की दुसर्या ठिकाणी इतका सहजयोग का पसरतो, मग इथे का नाही पसरत. ही घरमेंड जायला पाहिजे. कारण घरमेंडीचा फायदा काय आपल्याला? काहीच नाही. सरकारी नोकरांनी तर मुळीच घमेंड केली नाही पाहिजे. कारण कशाची घमेंड हो! मला समजत नाही आणि मला इतकं लक्षात आलं नव्हतं, पण मला भेटायला एक गृहस्थ आले होते. मेजर जनरल आहेत ते. ते फार नम्रपणाने माझ्याशी बोलत होते. आमचा एक शिष्य आहे, तो डॉक्टर आहे. तो कॅनडाला असतो. आशीष म्हणून. तो म्हणतो, 'माताजी, हे काय मेजर २० जनरल आहेत का?' 'हो, आहेत नां! मग काय?' 'मग केवढे नम्र आहेत.' म्हटलं, 'माझ्यासमोर आले तर नम्र होणारच.' 'नाही हो, आपल्या महाराष्ट्रात कोणी जरी कॅप्टन असला ना, की आडवी छाती काढून चालतो, असं (कृती).' आता हे लक्षात घेतलं पाहिजे. घमेंड करून काय फायदा! त्यांचा प्रश्न असा आहे की, 'आयएएस ऑफिसर्सना सहजयोगाची काय गरज आहे ? आता मी आधीच सांगितलं होतं, की काय असतं, हे आयएएसमध्ये गेले म्हणजे इतर लोकांच्यापेक्षा उच्च स्थितीला जातात. म्हणजे अर्थात ते विद्वान आहेत, फार कार्यप्रवण आहेत, म्हणून त्यांना ही स्थिती मिळते. हे कबूल. मग होतं काय की एकांगी जीवन मिळतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ, धावपळ. शनिवार, रविवारसुद्धा धावपळ करीत असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल चाळीस वर्ष आम्ही इथे राहिलो आहोत, साहेबांच्या बरोबर. एक दिवस ह्या गृहस्थाने सुट्टी नाही घेतली. शनिवार, रविवार पण नाही. रोज रात्री यायचं. इतकी कामं करायचे. पण माझी काही हरकत नव्हती. कारण आपल्या राष्ट्रासाठी कार्य करीत होते. त्या माझ्या राष्ट्रीय प्रेमाची मला पूर्णपणे मदत होत होती. पण तसं काही नसतं. तेव्हा थोडसं बॅलन्समध्ये असावं. बर, ते बॅलन्समध्ये आलं, तरीसुद्धा त्यांचं आहेच तसं. आयुष्यच तसं आहे. त्याच्यात सारखं फार काम करावं लागतं आणि त्याने राइट साइड येत जाते. पण त्याला इलाज सहजयोगात आहे. कुंडलिनीच्या जागरणाने त्यांच जे काही असंतुलन आलेलं आहे ते नष्ट होईल. ते पूर्ण नष्ट झाल्याबरोबर मजेत येतील. काही त्यांना वाटणार नाही. म्हणून आयएएस ऑफिसर्सना फार जरुरी आहे. का? कारण आपल्या देशाच्या पाठीचा कणा आहेत ते. त्यांच्याच दमावरती सगळं काही चालू आहे. आपल्याला माहिती असेल, फ्रान्समध्ये इतका बदल होत असतो राजकारणी लोकात. पण तिथले ब्युरोक्रॅटस जे आहेत ते अगदी पक्के आहेत. त्याच्यामुळे तो देश चाललेला आहे. तसं जर आपल्या इथले आयएएस ऑफिसर्स ठीक झाले, अगदी उत्तम झाले, स्वस्थ झाले तर हा देश कोणीच वाकवू शकत नाही. (सहजयोगी : सहजयोगामुळे त्यांच्या मनावरचा ताण कमी होईल का?) अगदी, शंभर नंबरी सांगते तुम्हाला, पूर्णपणे, पूर्णपणे स्ट्रेस कमी होईल! त्याने जे अॅक्सिडेंट होतात ते होणार नाहीत. ते मनमोकळेपणाने सगळ्यांशी बोलतील आणि फारच स्वभाव स्वच्छंद होईल आणि जे शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं नां , 'स्वधर्म ओळखावा,' ते ओळखतील. २१ क्षमाशीलती - हे महान शतर आहे बुद्धाचा संदेश अर्थात अहंकार बाळगू नये असाच आहे. पण ते तुम्ही कसं करता? पण ते तुम्ही कसं काय करणार? तुम्ही काहीही करीत असां तुम्हाला म्हटले पाहिजे 'मी काहीही करीत नाही. श्रीमाताजी...... हे करीत आहेत किंवा परमेश्वर हे करीत आहे. मी काहीही करीत नाही.' पण तुम्ही जर म्हणाल की सहजयोगासाठी तुम्ही काहीतरी करीत आहात तर ते करणं तुम्ही थांबवावे हे बरे! तुम्ही फक्त असं म्हटलं पाहिजे 'नाही, मी काही करीत नव्हतो. मी फक्त तिथे होतो इतकेच' आणि मग तुम्ही फार महान गोष्ट साध्य केलेली आहे, असते. (४/८/१९९१, बेल्जियम) आपलं वडाचं झाड म्हणजे सामूहिकता आहे. सामूहिकतेबरोबर ऐक्य साधण्यासाठी आपल्याला सूक्ष्मतर झालं पाहिजे आणि ते फार आनंददायी आहे. जे तसं करू शकणार नाहीत ते सहजयोगामध्ये प्रगती करू शकणार नाहीत. ते अडचणी निर्माण करतात. ते स्वत: अडचणीत असतात. प्रत्येकाला अडचणीत टाकतील. त्यांचे चित्त विचलीत असतं आणि कोणालाच माहीत नसतं ते कसे काय तिथे आहेत ? तर आज हे समजून घ्यायचं आहे, की आपण सर्वांनी सामूहिक बनलं पाहिजे. कशाच्याही बदल कुरबुर करता कामा नये. अढी बाळगू नये आणि सामूहिकतेचा आनंद उपभोगिला पाहिज. सामूहिकतेची दुसरी बाजू ही, की सामूहिकतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या अस्तित्वामुळे दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये किंवा गैरसोय अथवा अपमानीत वाटता कामा नये. सामूहिकतेमधील तुमचं अस्तित्व असं हवं की तुमच्या सान्निध्याचा आनंद लुटला पाहिजे. आम्ही अमक्यावर रागावलो आहोत, अशा बढाया मारण्यापेक्षा त्या रागाचं क्षमेमध्ये परिवर्तन दुसर्या व्यक्तीने सोडेल क्षमाशीलता करा. रागामुळे तुम्ही खळबळून उठाल. पण क्षमा त्याला खळबळून - हे महान शस्त्र आहे तुमच्याकडचं आणि हे म्हणजे पूर्ण वेळ बुद्धीचं व्यक्तीत्व दाखवणं आहे आणि हे तुम्हाला आत्मसन्मान देईल आणि तुम्ही कशाने ही विचलित होणार नाही. जहाज जलपर्यटनाला योग्य हवे. जर तुम्ही जहाज समुद्रात सोडले आणि जहाज फुटले तर जहाज बनविण्याचा काय उपयोग ? क्षणोक्षणी विचलित होणाऱ्या सहजयोग्याचा काय उपयोग? सहजयोगी नेहमीच विचारात असतात. श्रीमाताजी अहंकार कसा घालवायचा? अहंकाराला सांगायचं तू जा. जेव्हा हा 'मी' पणा जातो तेव्हा आत्म्याचा उदय होतो. दुखवून घेण्यासारखं काय आहे ? ठीक आहे, तुम्हाला फसविलं गेलं! तुम्ही तर कोणाला फसविले नाही ना ? त्याविषयी आनंदी रहा. त्याचाच अर्थ तुम्ही स्वत:ला समर्पित केलं आहे. कोणी ही तुम्हाला फसवू शकत नाही कारण कोणी तरी परम शक्ती आहे, जी तुमची काळजी घेते आहे. (४/८/१९९१, बेल्जियम) २२ श्री गणेशाप्रमाणे मनुष्यालाही आपले चित्त स्वच्छ करायला पाहिजे. चित्त स्वच्छ करण्यासाठी प्रथम हे पाहिले पाहिजे की आपले चित्त कुठे आहे? जर तुमचे चित्त परमेश्वराकडे असेल तर ते शुद्ध आहे कारण तुमच्यामधे चैतन्य वाहत आहे. श्रीमाताजी, १८.९.१९८८ प्रकाशक निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१ , ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in मा पर् প कर wwww. म आपले चित्त या झाडासारखे आहे, जे पृथ्वीशी पूर्णपणे जोडले गेले आहे. तसेच तुम्हालाही तुमच्या आईबरोबर जोडून घ्यायचे आहे आणि झाडाची जी उंची आहे त्याकडे नजर ठेवायची आहे. ही जी काही उंची झाडांनी मिळवलेली आहे ती ह्या वातावरणाशी भांडून, बाहेर येऊन, मस्तक उंच करून केली आहे. जे लोक आपले मस्तक लढून, सांसारिक गोष्टींसाठी, कृत्रिम गोष्टींसांठी, बाह्य गोष्टींसाठी वाकवतात, ते वर कसे उठू Sी न० शकतील ? किंवा जे आपले चित्त या धरती मातेवरून दर करतात, ते तर मरूनच जातील. शा प.प.श्री माताजी, बोर्डी पूजा, १२.२.१९८४ े ---------------------- 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-0.txt चैतन्य लहवी सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मराठी 38858665600 56000000SSA 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-2.txt या अंकाल महालक्ष्मी तत्त्व म्हणजे परमेश्वरामध्ये रममाण होण्याची इच्छा ४ ...8 दिवाळी पूजा, पुणे, १ नोव्हेंबर १९८६ प्रेम हे सहजयोगाचे अन्न आहे ..१२ सेमिनार अँड मिटिंग, सातारा, ६ डिसेंबर १९८४ सहजयोगाद्वारे ताण-तणावाचे नियोजन ...१८ सार्वजनिक कार्यक्रम, मुंबई, ११ मार्च २००० क्षमाशीलता-हे महान शस्त्र आहे ..२२ बुद्ध पूजा (काही भाग) देवीच्या सर्व अवतारांच्या वेळी बऱ्याचे असुरी शक्त्या पण पृथ्वी वर अवतरीत झाल्या आणि दैवीली युद्ध करून त्यांना विनाश करावा लागली. ही विनাश फक्त असुरी शक्त्या समाप्त करण्यासाठी नव्हता. ही विनाश ह्यासाठीसुद्धा होता की ह्या शक्त्या साधक तसेच संतांना त्रास दैत तसेच त्यांना जूकसान पोहोचवण्याची प्रयत्न करीत असत. नवरात्री पूजा, २४.१०.१९९३ प.पू.श्रीमातीजी, 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-3.txt मराठीत म्हणतात, 'त्याला पाहिजे जातीचे,' आणि जात कोणती, तर सहजयोगाची. आपली एकच जात आहे. आपली जात एक आहे. असे म्हणतात, 'या देवी सर्वभूतेषु, जातिरूपेण संस्थिता। सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे, की ' जे लोक परमेश्वराला विचारतसुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ देत. दुसरी एक जात आहे, जे नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ देत. तिसरी एक जात आहे, ज्यांना भलते धंदे जास्त आहेत आणि परमेश्वर नको. ते ही आहेत, जाऊ देत . असेही लोक आहेत जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले आहेत. अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहेत. त्यांचं ते ही सुटत नाही. कितीही सांगितलं तरी सुटत नाही. जाऊ देत. ते ही आहेत. त्याहन असे ही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत. त्यांची बुद्धी त्याबाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसतय की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय! हे लोक आपल्या जातीतले आहेत. आपल्या जातीत येऊ शकतात. प्रत्येक माणसाशी सहजयोग वर्णिता येत नाही. सहजयोगाला समजण्यासाठीसुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजेत. सहजयोगी सहजयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भिडतात. काही श्रीमंत माणसं असतात. 'माताजी, ते फार श्रीमंत लोक आहेत. तुम्हाला भेटायची इच्छा आहे.' 'बरं ४ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-4.txt महालक्ष्मी तत्त्व म्हणजे परमेश्वरामध्ये रममाण होण्याची इच्छा पुणे, १ नोव्हेंबर १९८६ मग पुढे काय!' 'ते म्हणतात आम्हाला एकदा माताजींना भेटू द्या. 'मग त्यांना काय पाहिजे?' 'काही नाही, ते भेटायचं म्हणतात.' मी म्हणते, 'अहो, राहू देत, त्यांना अजून थोडसं नाही, असं कसं माताजी म्हणाल्या? एवढे श्रीमंत आहेत. कारण त्या लायकीचे नाहीत ते. पैसे आले म्हणून लायकी येत नाही. दुसरे लोक आले. म्हणे, फार मोठे पॉलिटिशियन आहेत. तुम्ही भेटा. म्हटलं, बघू द्या.' लोकांना समजत दुरून नमस्कार! मला वेळ नाही. एक साधी बाई आली तर माताजी उठून आल्या भेटायला. हे असं कसं? अहो, जे तुम्हाला साधे दिसते, सामान्य दिसते, तेच आम्हाला असामान्य वाटते त्याला आम्ही तरी काय करणार? आमचं जसं डोकं आहे तसेच आम्ही चालणार आहोत की नाही! तसेच सहजोगाचंसुद्धा डोकं असायला पाहिजे. बेकारच्या लोकांकडे आपला वेळ दवडू नये. जी मंडळी परमेश्वराला शोधत आहेत आणि जी परमेश्वराच्या चरणी जायला, लीन व्हायला तत्पर आहेत, अशाच मंडळींकडे जावे. आता हा दीप तुम्ही लावला आणि इतके दिवे लावले, पण समजा एखाद्या दारूङ्या माणसाला दिवा दाखवला किंवा ज्याला भुतं लागली आहेत अशा माणसाला दिवा दाखवला, तर तो तुम्हालाच खायला धावेल. तर त्याला दिवा दाखवण्याची गरज काय ? जगात पुष्कळ लोक आहेत जे खरोखर जाणतात की ते अंध:कारात आहेत आणि त्यांना परमेश्वराला भेटायचे आहे. पण असे ही पुष्कळ लोक ५ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-5.txt आहेत, की देवाला कशासाठी भेटायचं तर आम्हाला काही तरी त्यातून भौतिक लाभ झाला तर बरं होईल. आता सांगायचं म्हणजे असं की भौतिक लाभ होतो, त्याबद्दल शंका नाही. आज इकडे लक्ष्मीपूजन आपण इथे करीत आहोत त्याला हेच कारण आहे, की जी पुण्याची अलक्ष्मी आहे त्याला तोंड दिलं पाहिजे. त्याच्यावर मात केली पाहिजे. त्याच्याशिवाय पुण्यातली, या पुण्यभूमीतील अलक्ष्मी जाणार नाही. त्यातलं मुख्य कारण काय असलं पाहिजे बरं ! अलक्ष्मी असण्याचं मुख्य कारण म्हणजे पुण्याला जितके मारूती आहेत आणि जितके गणपती आहेत, तिथे इतके लोक जाऊन बसलेले आहेत, की ह्या सगळ्यांची आधी उचलबांगडी केली पाहिजे. हे लोक जे मधे देवाच्या नावावर पैसे खातात आणि तुमच्या डोक्याला टिळे लावतात, ते टिळे लावणं बसून बंद केलं पाहिजे. 'मोठं कठीणच काम दिसतं माताजी हे!' आहेच, पण सहजयोगात इलाज आहेत ह्या लोकांचे. अनेक इलाज आहेत. ते इलाज आपण केले पाहिजेत. शिकलं पाहिजे. पण हे लोक इथे बसून जो सगळ्यांची आज्ञा चक्र खराब करतात, त्या आज्ञा चक्रावरून प्रहार करून मनुष्य जागरूक असेल त्यालासुद्धा नष्ट करतात. तेव्हा हे साधे दिसणारे लोक आहेत त्या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या देशांमध्ये हे असले लोक कार्यान्वित असतात, त्या त्या देशामध्ये गरिबी येते. कारण ही सगळी मंडळी प्रेतविद्या आणि स्मशानविद्या ह्याची कार्य करीत असतात. बसतात देवाच्या देवळात. त्यांना देवाची काही भीती नसते. देवाच्या देवळात बसून प्रेतविद्या आणि स्मशानविद्या करतात. कोलकाताला मी गेले. तेव्हा तिथली स्थिती बघून मला वाटलं आता इथे सहजयोग होतो की नाही होत. जो मनुष्य आला त्याला बघते तर काही ना काही तरी बाधा! गरिबी म्हणजे इतकी झालेली आहे कोलकाताला, इतकी गरिबी आहे, की एखादे उजाडलेले मोठे गाव असावे आणि अशी अनेक गावं मिळून एखादा जर प्रांत तयार केला, ती कोलकाताची स्थिती आहे. त्या लोकांना मी विचारलं, 'तुमचं असं कसं ? तुम्ही गेले होते का?' 'हो,' म्हणे, 'आम्ही दीक्षित आहोत.' तिथे दीक्षित नाही म्हणत दीखित म्हणतात. सगळी मंडळी दीखित. इथून तिथपर्यंत सगळे दीखित लोक. म्हणून दीखित बरोबर दुःखी लोक असणारच. पण त्यांना सांगायची सोय नाही, की बाबा रे, तुम्ही हा दीखितपणा करीत आहात हे बरोबर नव्हे. हे लोक सगळे उपटसुंभ आहेत. बरं नुसते पैसे घ्यायचे असते तर हरकत नाही. पण त्याशिवाय जे नाना प्रकार ते करतात, ते म्हणजे अत्यंत जालीम आहेत. प्रत्येक देवस्थानी असा गोंधळ असतो. प्रत्येक देवस्थानी! तुम्ही जेरूसलेमला जा, नाहीतर मक्क्याला जा आणि नाही तर महालक्ष्मीच्या देवळात जा. प्रत्येक ठिकाणी हे प्रकार आपण करतो. त्याने अलक्ष्मी येते. लक्ष्मीचं असं आहे, की इकडून बाधा आली की ती चालली बाहेर. दूसरी गोष्ट व्यसन. व्यसनाच्या अधीन असल्यावरती लक्ष्मी कधीही घरात राहणार नाही. असं म्हणतात की, 'इकडून बाटली आली की तिकडून बाई चालली बाहेर.' नुसतच बाटलीच नाही. अनेकतऱ्हेची आपल्याला व्यसनं आहेत. आता सहजयोगाने सर्व व्यसनं सुटतात. ही गोष्ट खरी आहे. ६ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-6.txt थोडीशी जर अशी मेहनत केली तर सर्व व्यसनं सुटतील. जर व्यसनं असली तर लक्ष्मी तर जाणारच, पण यशसुद्धा आयुष्यात कधी येणार नाही. तुमच जे यश आहे तेसुद्धा संपुष्टात येणार, लक्ष्मी गेल्याबरोबर. राजलक्ष्मी गेली, गृहलक्ष्मी गेली कोणत्याही नादाला जर मनुष्य लागला, कोणत्याही मोहाला जर मनुष्य बळी पडला, तर लक्ष्मी घरातून उठते. ती घरात टिकणार नाही. तुम्ही कितीही दिवे लावा, पण ती काही जर व्यसनं असली तर आत येणार नाही. कारण तुम्हाला दिसत नाही काय आहे ते घरात. तिला लक्ष्मी तर जाणारच, दिसतं, तेव्हा ती बाहेरच्या बाहेरच राहणार. तुम्ही कितीही मेहनत केली, तुम्ही कितीही लक्ष्मीची आरती केली, सुक्त म्हटली, काहीही केलं काही पण यशसुद्धा फायद्याचं नाही उलट सांगणारे जे आहेत त्यांचे खिसे भरत आहात आयुष्यात कधी येणार नाही. तुमच तुम्ही. हे करा, ते करा, त्यातच तुमची सगळी स्थिती होणार. तेव्हा पहिल्यांदा असे काही जे विचार आहेत, ज्याने आपण ह्या अशा यश आहे तेसुद्धा लोकांच्याकडे जातो किंवा वाममार्गाकडे जातो, ते विचार आपण टाकून संपुष्टात येणार, दिले पाहिजे. आता तुम्ही असे म्हणाल, तुकारामांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती. असं कसं. तुकाराम काही श्रीमंत नव्हते. असं तुम्ही म्हणाल. आता वरून बघितलं तर तुकाराम श्रीमंत नव्हते अस दिसेल. सगळ्यांना असं वाटेल, त्यांच्याकडे दागदागिने नव्हते, काही नव्हतं मग लक्ष्मी कशी? लक्ष्मी गेल्याबरोबर. राजलक्ष्मी गेली, गृहलक्ष्मी गेली, कोणत्याही नादाला त्यांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती. पण किती श्रीमंत होते हे बघायचं असलं तर त्यांच्या चरित्राकडे बघा, जेव्हा शिवाजी महाराज सगळे जर मनुष्य लागला, दागदागिने घेऊन त्यांच्या दारावर पोहोचले. तेव्हा त्यांनी शिवरायांना कोणत्याही मोहाला सांगितलं, 'आम्ही शेतकरी. आम्हाला हे करायचय काय ? हे जर मनुष्य बळी तुमच्याजवळ राहू द्या. तुम्ही राजे लोक तुम्ही वापरा हे.' म्हणजे केवढा पडला, तर लक्ष्मी श्रीमंत असला पाहिजे हो तो! आपल्याकडे असा एखादा श्रीमंत बघा, जो घरातून उठते. फार मोठा श्रीमंत असेल, त्याला जर तुम्ही एखादा दागिना द्यायला गेलात तर त्याला मोह होईल की नाही. असा कोणताही श्रीमंत मला दाखवा ज्याला मोह होणार नाही. एक आमचं सोडून द्या. बाकीचे. ज्याला मोह वाटतो, जो अशा गोष्टींकडे लक्ष देतो, आणि हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे. हा मुलखाचा भिकारी झाला आणि श्रीमंत लोक जास्तच असतात भिकारी! एक दोन पैशाची कुठे वस्तू राहिली, तर 'अरे ७ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-7.txt एक दोन पैशाची वस्तू राहिली,' म्हणून धावत येतील परत. म्हणजे श्रीमंत आहेत का भिकारी आहेत हे कोणी ठरवायचं. तेव्हा जे लोक मनाने श्रीमंत आहेत ते खरे श्रीमंत आहेत सहजयोगात. ज्या लोकांच्या घरी जावं, तिथे घरात काही नसलं तरीसुद्धा प्रेमाने, 'माताजी, आमच्याजवळ जे आहे ते एवढेच आहे. आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही. थोडी भाकरी आहे. घेता का ?' केवढ श्रीमंत वाटतं ते! जे घरात होतं नव्हतं ते आणून पुढे ठेवलं. ते प्रेमाने, गोड मानून खायचं. त्यात खरी श्रीमंती त्यांची दिसून येते, की जे आहे घरी ते सगळे पुढे आणून ठेवलं. तेच एखाद्या श्रीमंताच्या घरी जा. अर्ध बंद करून ठेवतील. 'तुम्ही घेता का चहा ?' घेत असलात तर घ्या. नाही तर ठीक आहे. नसेल घेत तर परत. हे कसले श्रीमंत! त्या शबरीने रामाला जी बोरं आणून दिली, रामाला काय खायला नव्हतं की काय? त्या बोराचं त्यांनी एवढं महत्त्व केलं. त्यातच सिद्ध होतं की एवढी श्रीमंत ही शबरी! पाहुणचाराला आले तर त्यांनी तिचा मान ठेवून उष्टी बोरं खाल्ली. ही अशी श्रीमंती जी आली ती खरोखर लक्ष्मीची श्रीमंती आहे. पैसा असो वा नसो मनुष्य श्रीमंत असू शकतो. आपल्या बादशाहीत राहू शकतो. पण चला सहजयोगात ते ही मना आहे. तुम्हाला आम्ही कोणी शबरीच्या स्थितीला नेत नाही. सहजयोगात लक्ष्मी ही मिळणारच. म्हणजे अगदी लक्ष्मीच! ती सगळ्यांना मिळणार त्याबद्दल शंका नाही. त्याला एवढ्यासाठी नाही की तुम्ही भिकारी आहात. पण जगाला दिसलं पाहिजे. जर जगाला असं दिसलं, की तुम्ही सहजयोगात येऊन गरीब झाले तर कोणी सहगयोगात येणार नाही. त्यांना प्रलोभन देण्यासाठी लक्ष्मी तुम्हाला दिलीच पाहिजे. त्याबद्दल शंका नाही. त्याशिवाय त्या आंधळ्यांना दिसायचं नाही. म्हणून लक्ष्मी दिलीच पाहिजे आणि मिळणार. नाभी चक्र उघडल्याबरोबर लक्ष्मी मिळू शकते. पण नाभी चक्रामध्ये लक्ष्मीचं जे स्थान आहे, त्यातलं पहिलं गृहलक्ष्मीचं स्थान आहे. आपण असेही म्हणू की तुकारामाची बायको म्हणजे अगदी जहाल बाई होती. जरा नम्र असती आणि देवाला तिने मानलं असतं तर कदाचित त्यांच्या घरी लक्ष्मी आली असती. तर घरातील गृहलक्ष्मी कशी आहे त्याच्यावरून लक्ष्मी येणार. तिला जर बाधा असती आणि नवरा तिच्या बाधितपणालाच बळी जात असला तर घरात कधीच लक्ष्मी राहणार नाही. पण ती जरी बाधित असली आणि नवऱ्याने सांगितलं , की ही तुझी बाधा गेलीच पाहिजे किंवा नवरा दारू पितो तरी ही बाई आपली पतिव्रता बनून, 'दारू पाहिजे ना तुला माझे दागिने घे तू.' 'बरं, मग.' 'माझ मंगळसूत्र घे. जे पाहिजे ते घे तू. मी पतिव्रता आहे फार मोठी!' अस म्हणून आणखीन त्याला नरकात ढकलत असते. अशांच्या घरी कधीही लक्ष्मी राह शकत नाही. गृहलक्ष्मी म्हणजे एक तेजस्वी स्त्री असायला पाहिजे. तिचं असं आयुष्य असायला पाहिजे, की जिला बघून पुरुषाला ही वाटलं पाहिजे की 'काहीतरी घरात आहे बरं का! काहीतरी असं तसं आम्ही वेडवाकडं केलं तर चालायचं नाही घरात.' पूर्वी पुरुष लोक बायकांना 'मालक' म्हणत असत, 'साहेब' म्हणत असत. एक दरारा असायचा अशा बायकांचा. तो कशामुळे? आरडाओरडा करून नाही झालेला. पण एक त्या बाईच्या तेजस्वितेने असेल. तिची उदात्तता, तिचं गांभीर्य, तिची दानशूरता, तिची निष्ठा, तिची सेवा , तिचं प्रेम ह्या सगळ्या गोष्टींनी त्या ८ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-8.txt बाईला एक प्रकारची तेजस्विता आणि चारित्रय दिलं आहे. ती गोष्ट सुटून आजकाल गृहलक्ष्मी म्हणजे, त्याला नाव म्हणजे, आजकालच्या गृहलक्ष्मींची कशाशी तुलना करायची तेच मला समजत नाही. कारण त्यांच्या डोक्यात काय आहे, तेच कळत नाही मला. नवऱ्याची, किंवा घरातील मुलांची, सासू- सासऱ्यांची, सगळ्यांची सेवा केली पाहिजे. हे कबूल. पण त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या घाणेरड्या गोष्टी, त्यांच्या मूर्खासारख्या गोष्टी त्याला मान्यता द्यायची किंवा त्यांना खुश करण्यासाठी वाट्टेल ते काम करायचं. वाट्टेल त्या मार्गाने जायचं. वाट्रेल तसं वागायंच. 'मग नवरा आहे, माताजी. ' 'मग काय झालं?' 'नवराच आहे.' 'असं का!' नवरा आणि तुम्ही.... सांगत नाही मी, पण समजलं तुम्हाला. ह्या गृहलक्ष्मीची स्थिती एखाद्या कमळासारखी असायला पाहिजे. कमळ हेच गृहलक्ष्मीचं स्थान आहे. नेहमी पाण्यावर, सुगंधित, अत्यंत नाजूक आणि लक्ष्मीला सबंध आधार अशी असणारी. ही कमळासारखी व्यक्ती असायला पाहिजे. ती राजलक्ष्मी असायला पाहिजे. दारोदार भीक मागणे, 'आज द्या हो तुमची साडी नेसायला म्हणजे बरं होईल. ' 'कुठे निघालात तुम्ही?' 'नाही मला दाखवायचं आहे लोकांना असं.' कोणत्याही प्रकारची खोटी घमेंड किंवा कोणत्याही प्रकारचा लपंडाव, त्याची एक आढ्यता, त्याची एक ऐट ही स्त्री मध्ये असली म्हणजे तिच्यात राजलक्ष्मी विराजमान होते, (जणू तिला असं वाटतं). खरोखर लक्ष्मीपूजन म्हणजे स्त्रियांवरच लेक्चर द्यावे लागत आहे, असं तुम्हाला वाटत असेल. पण तशी गोष्ट नाहीये. तिसरी म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे, आपले जे गणपती आहेत, गणपतीचे म्हणजे जे विशेष स्वरूप आहे, म्हणजे तो अत्यंत निष्पाप आहे. तसं निष्पाप असायला पाहिजे. (गणपतीला) अत्यंत तीक्ष्ण बुद्धी असूनसुद्धा. जसं हत्तीला हे समजतं की चांगलं काय आणि वाईट काय! सुबुद्धी म्हणजे अगदी तल्लख आहे त्याची. चालतांनासुद्धा धावतपळत चालणार नाही. पुष्कळशा बायकांना मी बघते त्या बायकांसारख्या चालतच नाही, घोड्यासारख्या चालतात. आणि एवढी धावपळ, हे धर रे, ते धर रे, हे धाव रे, ते धाव रे. मला परवा कोणीतरी प्रश्न विचारला, 'लहान मुलांना ब्लड कॅन्सर कसा होतो? म्हटलं, 'त्यांच्या आईला जाऊन बघा. ती धावपळी असेल.' धावपळ करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांच्याकडे गजलक्ष्मी असू शकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही, की काही करायचंच नाही. जे करायचं ते सुबक आणि सुंदरतेने करायचं. एवढा मोठा हत्ती आहे, त्याला जेव्हा लक्ष्मीला हार घालायचा असतो, सोंडेत व्यवस्थित घेऊन, गळ्यात कसा व्यवस्थित घालतो आणि जरासुद्धा कुठे स्पर्श होऊ देत नाही. ही सुबकता त्याला सुगुण असं गृहिणी म्हणतात, ती यायला पाहिजे. आता हे सगळे जरी झालं तरी जर पुरुषांना बायकांची इज्जत नसली आणि ह्या गोष्टींची इज्जत नसली तर घाणेरड्या बायकांच्या मागे ते धावतात किंवा रस्त्यावरच्या बायकांना महत्त्व देतात किवा एखाद्या जबरदस्त बायकोला ते घाबरतात. तर अशा पुरुषांच्या घरी लक्ष्मी राह शकत नाही. जे आपल्या पत्नीला, जी सुपत्नी आहे, तिला त्रास देतात त्यांच्या घरी लक्ष्मी राह शकत नाही. पुरुषांना असं वाटतं जेवढी काही १ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-9.txt अब्रू वगैरे आहे ती बायकांनाच असते, पुरुषाला काही अब्रू वगैरे नसते. तो कसाही वागला तरी तो धार्मिकच असतो. त्याला असं वाटतच नाही की दुसर्यांकडे वाईट नजरेने पाहणे हे अधार्मिक आहे. असं पुरुषाला वाटतच नाही, म्हणजे 'योगक्षेमं वहाम्यहम्' रियलायझेशनच्या आधी. सहजयोगानंतर तुमचे डोळेच असे फिरतात उलटे. जे श्रीकृष्णाने तुमच्या डोक्यातच हे विचार येत नाहीत. हे मोहाचे विचारच येत नाहीत असेच डोळे फिरतात. म्हणजे ह्या सगळ्या लक्ष्मी तुमच्यामध्ये जागृत झाल्या! कुठेही उभे राहिलात तरी तुमचे चित्त कधीही पडणार नाही. जशी ज्योत नेहमी वर उठते, तसेच तुमचं चित्त नेहमी परमेश्वराकडेच राहणार. अशी स्थिती आली म्हणजे लक्ष्मी म्हटलेले आहे. त्यातला जो क्षेम भाग आहे तो लक्ष्मीच्या तुमच्या घरी येणार. ते अनेक प्रकार आहेत. कृपेने होतो. नरसिंह भगतची हुंडी पटवली ते माहिती असेलच आपल्याला. कृष्णाने सर्वतन्हेचं क्षेम सुदामाची द्वारका बांधली. द्वारिकेतून जाऊन त्याची सोन्याची घरं बांधली. ते माहिती असेल आपल्याला. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असतांना श्रीकृष्णाने तिच्या लज्जेचे रक्षण केले हे ही माहिती असेल आपल्याला. ह्या सर्व चमत्कार गोष्टींनी असतं. नुसतं आर्थिकच नाही. जर आर्थिक असलं, तुम्ही परिपूर्ण रहाल. अत्यंत चमत्कारपूर्ण जीवन असेल. रोज नवीन नवीन चमत्कार, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कशा तऱ्हेने चमत्कार तुमच्यासमोर येतात. समजा, तुमची तब्येत तुम्हाला आशीर्वादित करतात. ही सगळी लक्ष्मीचीच कृपा आहे. हे सगळे आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीची कृपा आहे. अनेक तऱ्हेचे आशीर्वाद असतात. ठीक नसली, तर डॉक्टर तुमचे सगळ परवा मी एक साडी घेतली विकत. तीन हजार रुपयांना मिळाली. ती दुसऱ्या आर्थिक घेऊन माणसाला दाखवली, तर तो म्हणतो, बाजारात ह्याची कमीत कमी किंमत पंधरा जाणार. सर्वत्हेने, १ हजार असायला पाहिजे. म्हटलं, 'नाही, आम्हाला तर ही तीन हजारातच प्रत्येक तन्हेचं क्षेम मिळाली.' ही लक्ष्मीची कृपा म्हटली पाहिजे. दुसरा येऊन सांगतो, 'माताजी, बघा. माझ्याजवळ पैसे नव्हते. मी अस ठरवलं गणपतीपुळ्याला यायचं, तर कसं काय येणार. माझ्याकडे पैसे नव्हते.' तर लगेच टपालाने पत्र आलं की, 'तुझे एवढे पैसे वाचले होते. ते तुला परत पाठविले आहेत. ' हे सगळं एक पैश्याच्या दृष्टीने झालं. घटित होतं आणि त्याची सगळी गोळाबेरीज म्हणजे पण तशा अनेक आहेत. तुमची तब्येत खराब झाली. तुम्ही म्हटलं, 'माताजी, माझी तब्येत खराब झाली.' झालं उद्या ठीक. 'अहो, कसं काय झालं ?' डॉक्टर म्हणतात, तुमच्यामध्ये महालक्ष्मी तत्त्व 'असं कसं शक्य आहे? आम्ही विश्वासच ठेवू शकत नाही. असं कसं झालं.' ही लक्ष्मीची कृपा आहे. 'योगक्षेमं वहाम्यहम्' जे श्रीकृष्णाने म्हटलेले आहे. त्यातला जो क्षेम भाग आहे तो लक्ष्मीच्या कृपेने होतो. सर्व तऱ्हेचं क्षेम असतं. नुसतं जागृत होतं आर्थिकच नाही. जर आर्थिक असलं, समजा, तुमची तब्येत ठीक नसली, तर १० 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-10.txt डॉक्टर तुमचं सगळ आर्थिक घेऊन जाणार. सर्वतऱ्हेने, प्रत्येक तऱ्हेचं क्षेम घटित होतं आणि त्याची सगळी गोळाबेरीज म्हणजे तुमच्यामध्ये महालक्ष्मी तत्त्व जागृत होतं आणि महालक्ष्मी तत्त्व म्हणजे परमेश्वरामध्ये रममाण होण्याची इच्छा. माताजी महालक्ष्मी म्हणजे हे सर्व जे काही तुम्हाला मिळालेले आहे, 'हे मिळालय आता, आम्हाला कळलं आहे. परमेश्वराचा आमच्यावर हात आहे. परमेश्वराच्या साम्राज्यात आलो आहोत. पण अजून थोडसं आम्हाला कमी वाटतंय.' 'काय बुवा, काय कमी वाटतंय?' 'अजून आम्ही कोणाला दिलं नाही. वाटून खाल्लं नाही. एकटेच खात बसलो आहोत.' महालक्ष्मी तत्त्व तुमच्यात जागृत होईल आणि हे जागृत झाल्यावर बरोबर तुम्ही संतुलनात, असंतुलनात नाही. संतुलनात हळूहळू आपली दीपशिखा वाढवली तर ती ब्रह्मरंध्रात जाऊन बसेल आणि सबंध तुमचं आयुष्य आलोकित होईल. आजपर्यंत कोणीही जगात झाले नाहीत असे महापुरुष तुमच्यातून निघणार आहेत. आजपर्यंत कोणीही विचारले नाहीत आणि जाणले नाहीत, महाकिमयागार तुमच्यातून निघणार आहेत. पण संतुलन नाही सोडायचं. पण जर तुम्ही संतुलन सोडलं तर हे प्रेम जे आहे, ते इकडे पडेल, नाहीतर तिकडे पडेल. नष्ट होईल. संतुलनात तुमची असे दीपशिखा उघडायची आहे आणि हे झालं पाहिजे, मग ह्या सगळ्याला अर्थ येतो. हे जे आवाज होताहेत आणि हे ध्वनी निघत आहेत (फटाक्यांचे आवाज), ही त्याचीच गर्जना आहे. हे होणार आहे. कडकडणार आहे सबंध जग. दूंदभी वाजणार आहेत आणि सगळ्यांना कळणार आहे की एक नवीन युग तयार होत आहे. त्या माणसात, त्याच्यात, कोणालाही, कोणत्याच प्रकारचा त्रास, त्रागा, संताप राहणार नाही. आणि परमेश्वराच्या साम्राज्यात त्याचे चमत्कार बघावे तितके थोडे आहेत. बघतच रहावं आणि काय बोलणार हे पाहिल्यावर! अशी एक अत्यंत सुंदर मनः स्थिती होते. त्या आनंदाचा उपभोग तुम्ही सर्वांनी सतत मिळवावा. त्या सदिच्छेनेच मी इथे आज या पूजेला तयार झालेली आहे. मला पूर्ण आशा आहे, की आजच्यानंतर सर्व लोक मनोभावे आपल्यातील लक्ष्मी तत्त्व जपून ठेवतील. आणि त्यातून उगवणार्या ह्या नवीन आकांक्षा ह्या महालक्ष्मी तत्त्वाच्या रूपाने बाहेर पडतील. त्या संतुलनात राहून पूर्णपणे समजून घेतील. व्यवहारात आणतील आणि पसरतील. परमेश्वर आपणा सर्वांना ही दिवाळी सुखाची करो! सगळ्यांना माझ्यातर्फे अनंत अनंत आशीर्वाद! ११ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-11.txt प्रेम हे सहजयोगाचं अन्न आहे सातारा, ६ डिसेंबर १९८४ जे होते ते आपण घेतले सातार्याला राजधानी स्थापन केली. त्यांच्यात (शिवाजी महाराज) गुण पाहिजेत. त्यांच्यातला विशेष गुण असा होता की त्यांच्यात कोणतेच दोष नव्हते. जे आपल्या माणसामध्ये दोष असतात. कोणाला कशाची सवय, तर कोणाला कशाची. कोणी काहीतरी वेड्यासारखे एखाद्याच्या मागे लागले तर लागले. ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की ते अंशावतार होते. अंशावतार असल्यामुळे त्यांना कोणतीच वाईट सवय, वाईट खोड, खोटं बोलणं, दारू पिणं वरगैरे म्हणजे असं की त्यांना सांगावं लागत नसे. कारण ते तसे नव्हते. ते अत्यंत स्वभावाने गोड होते. स्वभाव फार गोड होता. अत्यंत गोड स्वभावाचे आणि आईला पूर्णपणे समर्पित. कधीही ते कोणाला वाकडा शब्द बोलले नाहीत किंवा कोणावरही ओरडले नाहीत. कोणावर बिघडले नाहीत. हे दोन गुण फार कठीण असतात. जेव्हा मनुष्याला इतकं आयुष्याचं वरदान असतं आणि इतकंच नव्हे त्या वरदानामध्ये एक महत्त्वही येतं. कारण ते महाराज होते. पण तरीसुद्धा स्वभावामध्ये अत्यंत गोडवा होता आणि स्वत:बद्दल शिष्टपणा नव्हता, की मी राजा आहे आणि हे गोरगरीब आहेत किंवा हे मावळे आहेत. त्यांच्याशी बोलायचं. त्यांच्याबरोबर बसायच, १२ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-12.txt ा भ त त्यांच्याबरोबर भाकरी खायची. कांदा-भाकरी त्यांच्याबरोबर मजेत खात. रात्रंदिवस प्रवास करायचे घोड्यावर. कुठेही रात्रीचं झोपायचं. काहीही करायचं. अशा रीतीने त्यांनी आपलं आयुष्य काढलं. अत्यंत हालअपेष्टा त्यांनी सहन केल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा संभाजी महाराज आणि शाहू महाराजांचे भांडण झाले त्याला कारण एकच होतं भाऊबंदकी. तो आपल्या मराठी लोकांमध्ये स्वभाव आहे. अगदी अंगात वळण आलेले आहे. त्याच्याशिवाय आपल्याला झेपत नाही. ते सहनच करायला आपण तयार होत नाही, की भाऊबंदकी आपल्यात आहे. गोष्ट ऐकायला आपण तयार होत नाही. ही गोष्ट अगदी आपल्यामध्ये मुरलेली आहे. तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे. सहजयोगातही भाऊबंदकी मी बघते सारखी. कुठेही गेलं की भाऊबंदकी आहे. हा महाराष्ट्राचा एक फार मोठा दुर्गुण आहे. या भाऊबंदकीम्ळे आपण एक राज्य गमावलं. आता परमेश्वराचं साम्राज्य गमावू नये. जे लोक परमेश्वराच्या कार्यात आहेत त्यांना सगळ्यांना धरून बसायचं. सोडलं नाही पाहिजे. सोडून बोलायचं नाही. शिवाजी महाराजांची कथा अशी नव्हती. एखाद्याने काही कार्य केलं तर त्याचं १३ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-13.txt केवढं महत्त्व करीत होते. आपल्याला माहिती आहे, की सिंहगड जिंकल्यावर ते म्हणाले, 'गड मिळाला, पण सिंह गेला'. केवढी मोठी गोष्ट आहे. 'गड मिळाला तर काय झालं, पण सिंह गेला आमचा!' आणि ते सगळे काही त्यांचं जे वागणं होतं त्याच्यामध्ये आपण हे शिकलं पाहिजे की सहजयोगातसुद्धा दुसर्या माणसाचं महत्त्व करणं फार जरुरी आहे. स्वत:चं महत्त्व करत बसायचं नाही. आम्ही विशिष्ट, आम्ही विशेष, आम्ही सर्व काही, असं नाही केलं पाहिजे. खूप लोकांना वाटतं, की आपण शिकलेले आहोत. सहजयोगात काही लोक सुखवस्तू आणि शिकलेले लोक आहेत, तर ते इतर ग्रामीण लोकांशी मिक्सअप होत नाहीत. हे चुकीचे आहे. 'ते लोक वेगळे, आम्ही वेगळे, आम्ही वेगळं रहायचं, त्यांनी वेगळें रहायचं.' अशी जर भावना आली तर मग सहजयोग तुम्हाला मिळाला नाही. योगाला जात नसते, पात नसते, उच्च-नीच काही विचार नसतो. इतकेच नव्हे तर श्रीमंत-गरीब असा विचारसुद्धा योग्यांमध्ये नसला पाहिजे. तरच तुम्ही योगी झाले. तर योग्यांची ओळख ही आहे, की आपण सगळे जे आहोत सरमिसळ एक आहोत. आपण आईची सगळी मुलं-बाळे आहोत. आपल्यामध्ये काहीही फरक नसला पाहिजे. पूर्णपणे संपला पाहिजे. आपल्या देशाला जर बदलायचे आहे, तर जसं आपण शिवाजींचंच आपल्यासमोर एक उदाहरण ठेवलेले आहे आणि बघितलेले आहे, की पहिली गोष्ट म्हणजे स्वत:मध्ये काही दोष नाही. ज्या माणसात स्वत:त दोष आहे तो दुसर्यांना काय सांगू शकतो. दुसरं म्हणजे असं, की जे त्यांचे फॉलोअर्स होते त्यांनासुद्धा त्यांच्याबद्दल नितांत श्रद्धा होती. सारखं तुम्ही जर भांडत बसलात, दोषच काढत बसलात तर तेच होईल. दोन्ही मेळ असायला पाहिजे, तरच भाऊबंदकी होत नाही. हा जर दोन्ही मेळ बसवला नाही, तर मात्र भाऊबंदकी होते. तुटकपणे बोलणं हे फार चुकीचे आहे. तसंच आपल्या लिडरला मान न देणं, त्याचा पाणउतारा करणं, सारखं त्याचं वाईट शोधणं, त्याला शिकवण देणं हे फार चुकीचे आहे. हे त्याच्याहन चुकीचे आहे. तेव्हा ह्या दोन गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपल्या देशातील भाऊबंदकी संपणार. ती नसली पाहिजे. अगदी निघाली कधी निघणार नाही. स्वत: पाहिजे. मुळातून निघाली पाहिजे. आणि ती दुसर्यांचे दोष बघून मधला दोष काढला पाहिजे. मी सातार्यात एवढ्यासाठी होते, की ह्या साताऱ्यातच स्वराज्याची स्थापना झाली आणि ह्या साताऱ्यातच स्वराज्याची बेबंदशाही सुरू झाली, तेव्हा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, की आपल्यामध्ये बेबंदशाही नसली पाहिजे. हे प्रेमाचं कार्य आहे आणि प्रेमालाच जोडत गेलं पाहिजे. बाकी जेवढे काही विचार आणि हे सगळं लोक करतात, काही बुद्धीवादी लोक असतात, ते बुद्धीच्या जोरावर दुसऱ्यापासून दूर होतात. प्रेमाच्या जोरावरच तुम्ही राहिलं पाहिजे. प्रेम हे १४ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-14.txt सहजयोगाचं अन्न आहे. आपण किती दुसर्यांवर प्रेम केलं, दूसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा आपण किती दुसऱ्यांना दिलं, हे पाहिलं पाहिजे ! सातार्याला आता हे कार्य सुरू झालेले आहे. मला फार आनंद झाला. काल मला फार बरं वाटलं. कितीतरी साधक इथे होते. इतके लोक पार झाले! सहजयोगामध्ये फार मोठं कार्य करायचे आहे आणि फार मोठी माणसं होणार आहेत. हेच उद्याचे सगळे पुढारी इथे बसलेले आहेत. ते सगळं बघून मला फार आनंद झाला. पण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपलं पूर्वी जे राजकारणात चुकलं, ते आपलं आता परमेश्वराच्या साम्राज्यात चुकलं नाही पाहिजे. तिथे ते नाही चुकलं पाहिजे. परमेश्वराच्या राज्याचे कायदे फार जबरदस्त आणि फार कडक आहेत. जो मनुष्य त्या कायद्याच्या विरुद्ध पळेल, तो तिथेच हाणला जातो. तेव्हा सांभाळून असा. फार सांभाळून असावं लागतं. त्याचे आशीर्वादही अनंत आहेत. पण एका मुदतीपर्यंत असलं तर. त्याच्यानंतर मात्र हात त्याचा जोरात चालतो. तिथे मग तुमचं काही चालू शकणार नाही. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, की आता आपण परमेश्वराच्या साम्राज्यात येत आहोत. तेव्हा अशी सुबुद्धी झाली पाहिजे, की जिथे कोणत्याही अशात-्हेचं जे गलिच्छ राजकारण आहे ते आणायचं नाही. ह्या गलिच्छ गोष्टी वर आणायच्या नाहीत. आपण प्रेमाच्या साम्राज्यात सर्व एका दुव्याने एकमेकांना बांधलेलो आहोत. एकाच आईची मुलं आहोत. तेव्हा आपापसामध्ये जी सत्ता मिळवायची ती स्वत:वर मिळविली पाहिजे. दूसर्यांवर सत्ता मिळवायची ही जागा नव्हे. ही स्वत:वर सत्ता मिळविण्याची जागा आहे. आणि जर का तुम्ही स्वत:वर सत्ता मिळविली तर पहिली गोष्ट तुमच्या व्हायब्रेशन्समध्ये दिसेल. तुमचे व्हायब्रेशन्स कसे आहेत त्यावरून मला कळतं, तुमच्यात काय चाललेले आहे? कुठे काय चाललं आहे आणि कुठे काय बिघाड होतो? तेव्हा कृपा करून कोणतीही भाऊबंदकी आणि अशात-्हेचे दोष बांधायचे नाहीत आणि बांधले गेले तर तोडत जायचं. माताजींनी सांगितलं आहे, की बांधायचे नाहीत. कोणाच्या विरुद्ध बसून बोलायचं नाही. कोणाला वाईट म्हणायचं नाही. ग्रुप्स बांधायचे नाहीत. सगळे मोडून काढायचे. हा विचार मला साताऱ्याला आल्यावर ग्रुप्स आला. आता इथे लोकांना ह्याची जाणीव दिली पाहिजे. कारण सहजयोग म्हणजे फार ह्याने मिळतो. दुसर्याला दाबू लागतो. किंवा हे लोक जे म्हणतात, की हा मनुष्य कशाला एवढं करतो ? जर मनुष्य दाबू लागला तर त्या लोकांना आणि त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याला जी सत्ता येते त्या सत्तेमध्ये तो असं वाटतं की हा कोण? तर सहजयोगामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, की मातारजींनी एकेका माणसाला प्रत्येक ठिकाणी नियुक्त केलं आहे आणि प्रत्येकाशी त्या संबंध ठेवतात. त्यांचा संबंध त्या एका नियुक्तीमुळे होतो. जसं आपल्या डोक्यातसुद्धा एक ब्रेन आहे. त्या ब्रेनपासून आपण सगळ्यांचा संबंध ठेवला आहे. तसंच सहजयोगात करायला पाहिजे. तेव्हा जर काही त्या माणसात बिघाड झाला तर मला लगेच लक्षात येईल, की मी त्याला ठीक करू शकते. पण तुम्ही त्याचे दोष काढून सगळंच स्पिरीच्युअल करून टाका. आहे की नाही! लक्षात आली का गोष्ट तुम्हाला! १५ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-15.txt जो एक मनुष्य लीडर असेल त्याला तुम्ही मान्य करा आणि मी त्याला बघेन,. त्याने जर चुका केल्या, तर मला सगळे समजतं. प्रत्येकाचं मला समजतं. इतकं मला बारीक माहिती आहे, तुम्हाला माहीत नाही. मी सांगत नाही, म्हणत नाही म्हणजे. ह्याचा अर्थ असा नाही की मला कळत नाही. मला सगळ्यांचं माहिती आहे. तेव्हा ज्या एका माणसाला आपण लीडर केलेले आहे त्या माणसाला मान्य केलं पाहिजे. माताजी इथे आहेत. माताजींवर भरवसा आहे! तुम्ही जास्त शिकलेले असाल किंवा तुमच्याजवळ जास्त पैसे आहेत किंवा काही असेल तरी तसे काही करायचे नाही. एक जो मनुष्य आहे, तो जोपर्यंत मला ठीक वाटतो, तोपर्यंत तुम्ही राहू द्या. पुढे मग त्या माणसाचं काही वाईट असेल, तर मी त्याला काढून टाकेन. मला स्वत:ला ते समजतं एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच सहजयोग वाढणार आहे. कारण जरी सहजयोग आपण म्हणू, की ह्याच्यामध्ये काहीही संस्था नाही. काही तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही. तेव्हा मेंबरशीप नाही. तेव्हा कशाने जोडले जाणार? प्रेमाने... ! प्रेमातच जोडलेले आहे. सगळ्यांनी प्रेमाने जोडून घ्यायचं. आणि दुसरं म्हणजे असं, की प्रेमाची सत्ता जी असते, ती माताजींपासून येते आहे, तेव्हा त्यांनी ज्या माणसाला म्हटलेले आहे, की ह्याला माना, तर त्याला मान द्या. नंतर त्या माणसात वाईट दोष दिसला तर मी त्याला काढून टाकणार. अगदी नक्की काढून टाकणार. माझ्यावर पूर्ण भिस्त ठेवली पाहिजे. आणि आपलं चरित्र जे आहे ते कसं बनवायचं? आपण त्यात कसं वागलं पाहिजे? हे शिकण्यासाठी तुमच्यासमोर मी आहेच. तुम्हाला जर असं वाटत असेल, की आम्ही माताजींसारखे नाही होऊ शकत , तर शिवाजी महाराज आहेत, त्यांना बघा. पुष्कळ लोक आपल्या इथे आहेत. काही कठीण नाही. सहजयोगात पार झालेल्या लोकांना काही कठीण नाही. अगदी आयुष्य एकदम बदलून जातं. ह्या लोकांना बघा किती बदलले! ते जमिनीवर बसू शकत नव्हते पाच मिनीटसुद्धा. मेहनत करून करून जमिनीवर बसायला शिकले. तर ध्यानधारणा वगैरे व्यवस्थित करावी. रोज संध्याकाळी, निदान झोपायच्या आधी एक पंधरा- वीस मिनिटंसुद्धा ध्यानधारणा केली तरी स्थिती बरी होईल आणि सकाळच्या वेळेला, बाहेर जायच्या आधी किंवा सकाळी उठून, आंघोळ करून एक पाच मिनिटं पूजा केली फोटोची की झालं. पण प्रत्येक आठवड्यात सगळ्यांनी भेटलं पाहिजे. जर ते झालं नाही, तर सहजयोग वठत नाही. प्रत्येक आठवड्यात सर्वांनी भेटलं पाहिजे. कारण ही सामूहिक क्रिया आहे. तुम्ही, 'आम्ही माताजी घरी फोटो ठेवला. आम्ही की तुमची पूजा करतो, तरी आम्हाला हा त्रास झाला.' माझं लक्ष नव्हतं. मी आपल्याला कालच सांगितलं, जेव्हा आपण ताक घुसळतो, त्यातून लोणी बाहेर निघतं, तेव्हा जे गोळ्याला चिकटलेले आहे ते आपण काढून घेतो. बाकीचं फेकून टाकतो किंवा गोळ्याला चिकटलेले लोकच आमच्याजवळ येतात. बाकी माझं लक्ष नसतं. तेव्हा त्या ठिकाणी यायला पाहिजे जिथे दहा माणसं भेटतात. बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. पण गटबाजी करायची नाही. बोलणं कमी असावं, ध्यान जास्त असावं म्हणजे बरं होईल. गटबाजी असली म्हणजे, 'मी ठीक करतो, मी तुझे ठीक करतो. मी तुझा ठिकाणा करतो.' असं तुला सुरू १६ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-16.txt झालं म्हणजे गेलं. त्याच्यापेक्षा ध्यानधारणा करायची सगळ्यांनी, भजन म्हणायचं, आरती म्हणायची. काही आपापसातले प्रश्न आहेत ते मिटवायचे. पण इथे बसून काही तरी वादविवाद करणे किंवा हे करणे, ते करणे, बंद आहे. उलट सहजयोगामध्ये जे काही मिळवायचे आहे त्याच्या वाढीला लागा, वाढ कशी झाली, आमची काय वाढ झाली, कुठे आम्ही पोहोचलो आहे ? ते बघावे. हळूहळू मला असं वाटतं, की महाराष्ट्रात सहजयोग जमेल. तुमच्यावर सगळ्या जगाची भिस्त आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व जगाची भिस्त ह्या महाराष्ट्रीयन लोकांवरती आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर तुम्ही का बुडवलं, तर ते ही शक्य आहे तुम्हाला. तेव्हा तसं नाही. आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढून टाकले पाहिजेत. स्वभावामध्ये गोडवा आणला पाहिजे. प्रेमाने बोललं पाहिजे. आणि सगळ्यांशी समतेने वागलं पाहिजे. ते मागण्यात आलं तर आतमध्येसुद्धा (अंतरंगात) येईल. कारण आता तुम्ही आत-बाहेर एकच झाले आहात. जे तुम्ही बाहेर कराल , ते आत येईल. जे तुम्ही आत कराल, ते बाहेर येईल. तेव्हा आत-बाहेर एक झालेलं आहे. असं होत नसतं. आता संबंध झालेला आहे. पुन्हा जर हे बाहेरचं खराब झालं, तरी आवाज येत नाही आणि आतलं खराब झालं तरी आवाज येत नाही. दोन्ही गोष्टी नीट होतात. पुष्कळांचं असं म्हणणं आहे की, 'आम्ही ध्यान करतो माताजी, आम्हाला व्हायब्रेशन्स ठीक आहेत.' पण तरी बाह्यातलं ठीक व्हायला हवं. नाहीतर हळूहळू आतलं जे आहे ते संपून जाणार. म्हणून आत आणि बाहेर दोन्हीही मनुष्यामध्ये एकसारखं असायला पाहिजे आणि दिसायला तेजस्विता असायला पाहिजे. त्या तेजामध्ये कोणत्याही तऱ्हेचा दाह नसला पाहिजे. अत्यंत सौम्य आणि शीतल चंद्रासारखं असलं पाहिजे. पुढच्या वेळेला मी येईन तेव्हा आणखीन मंडळी राहतील, आणि पुष्कळ मंडळींना घेऊन आपण इथे पूजन करूयात. पण ह्यावेळेला मात्र मी येणार नाही. पुढच्या वर्षी येणार आहे. त्यावेळेला कदाचित एक रात्र मी इथे राहणार आहे. तेव्हा बघू काही झालं तर. १७ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-17.txt सहजयोगाद्धारे ताण-तणावाचे नियोजन संबंधच झालेला नाही. संबंध झाला नाही तर बोलता कोणाशी तुम्ही? कोणाचे नाव घेता ? हे माहीत असायला पाहिजे. इतकेच नव्हे तर प्रत्येक चक्रावर वेगळी देवता आहे. तेव्हा नामस्मरण कोणाचं करायचं, जिथे तुमची कुंडलिनी अडकली असेल तिथेच. ते नाहीये. काहीतरी, आता समजा, जर आम्ही इथे आलोच नाही, तर तुम्ही कोणाशी बोलणार? सहजयोगी : ही सेईंग गुरूमंत्राज..... ( तो गुरूमंत्राविषयी विचारतो) काही द्यायचा नाही. मी तरी ठरवलं आहे. गुरूमंत्र वगैरे काहीही देत नाही. कारण काय आहे १८ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-18.txt मुंबई, ११ मार्च २००० की त्याच्यातच मन अडकतं. जर तुमची प्रगती प्रत्येक क्षणी होईल, तर मी कोणता मंत्र देऊ तुम्हाला? काहीही गुरूमंत्र नाही. मला फक्त आई माना म्हणजे मिळवलं. काही नाही. आईस्वरूपात पाहिलं म्हणजे पुष्कळ, लवकर सगळे समजतं. कारण आई एक अशी देवाने आपल्याला दिलेली देणगी आहे, की ज्यामुळे आपल्याला जगातलं सगळें मिळतं. म्हणून मला फक्त आईस्वरूप मानलं की झालं. दुसर त्याच्यापलीकडे काही नाही. नामस्मरण वरगैरे का सांगितलं ? त्याला कारण असं की लोकांचं लक्ष इकडे तिकडे जाऊ नये. या, त्या गोष्टीकडे वेधू नये. म्हणून सांगितलं, तुम्ही नामस्मरण करीत बसा. पण त्याचं इतकं प्रस्थ झालं आहे, इतकं झालं आहे प्रस्थ, की खंडीभर देव उठवले आहेत. त्याच्यातच गुंतले आहेत सकाळपासून. ज्ञानेश्वरांच्या पायात ते नाही झालं, तर त्याच्यापुढे आपल्याकडे आता पालख्या काढतात. बघा, वहाणा नव्हत्या. तुम्ही पालख्या काढून गावोगाव भीक मागत चालले. ह्याला काय अर्थ आहे! अशाने काय होतं, की सर्व काही, अध्यात्माचा एक खेळ होऊन जातो. काहीतरी त्याचं बीभत्स रूप आलेले आहे. तसं काही नाही. अगदी स्वच्छ आहे ते. (सहजयोगी : अष्टांगयोगाची कुंडलिनी उत्थानासाठी मदत होते का ?) नाही. अष्टांगयोगामध्ये अष्टांगामधलं एकच अंग आहे. त्याच्यात शरीराची तुम्ही निगा राखू शकता. त्याच्यापुढे त्यांनी असं सांगितलं आहे, की ह्याने तुम्हाला निर्विचार समाधी लागली पाहिजे आणि निर्विकार समाधी लागली पाहिजे. हे आहे. पण ते कसं काय? ते काही त्यांनी लिहिलेलं नाही. कुंडलिनीचंसुद्धा नाव दिलेले नाही. फक्त आपल्या नाथपंथामध्ये असं होतं , की एका माणसाला द्यायची. लाखात एकाला पार करायचं. अशी एक परंपरा आहे. तेव्हा ज्ञानेश्वरांनी आपल्या भावाला विचारलं, त्यांचे गुरू होते की, 'मला तुम्ही परवानगी द्या, की मी कुंडलिनीबद्दल निदान माझ्या पुस्तकात तरी लिहू ते का?' त्यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्या सहाव्या अध्यायात त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे, की कुंडलिनी नावाची शक्ती आहे. ती अशी आहे. ती उठते. त्याच्यात लोकांनी थोडा विपर्यास केला असेल. पण लिहिलं तर खरी! ही बाराव्या शतकातली गोष्ट आहे. मग सोळाव्या शतकात सगळ्यांनी ह्याच्यावर १९ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-19.txt सांगितलं. रामदास स्वामी, त्यांना विचारलं की, 'कुंडलिनी जागृत किती वेळात होते ?' त्यांनी उत्तर असं दिलं, 'तत्क्षण. जर देणारा असला आणि घेणारा असला.' ही फार मोठी अट आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत फक्त परंपरागत, एक, दोन लोक पार झाले आहेत. आणि अजूनही मी पाहिलेले आहे. जे पोहोचलेले काही गुरू आहेत, ते मला म्हणतात, 'माताजी, तुम्हाला काय झालं आहे. सत्पात्री द्या.' म्हटलं, 'जाऊ देत . नसलं तरी माझी काही हरकत नाही.' कळलं कां! अशा रीतीने या कुंडलिनीबद्दल जो गैरसमज झाला तो असा, की काही काही लोकांनी उपटसुंभपणा केला. 'कुंडलिनी फार वाईट. त्याने तुम्हाला असे दोष येतात. अमुक, तमुक.' खोटं नाटं पुष्कळ लिहिलेले आहे. त्याच्यामुळे लोक घाबरतात. पण तसं काहीही होत नाही. मी तीस वर्षापासून कार्य करते आहे. मी तसे काहीही पाहिलेले नाही. कधीही होत नाही. उलट फायदाच होतो. अनेक रोग ठीक होतात. मानसिक रोग ठीक होतात. आणखीन इतकेच नव्हे, पण धनसंपत्तीसुद्धा होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल! लक्ष्मीची कृपा होते, अलक्ष्मी जाते. हे सगळं होतं. हे आपल्याला करायचे आहे या देशात, विशेषत: महाराष्ट्रात. महाराष्ट्रात फक्त काम कमी आहे आमचं. (सहजयोगी : आपण हे काम खेड्यांमधे का करीत नाही?) मी खेड्यांमधून हे काम केलेले आहे, पण फार वर्षापूर्वी. अहो, त्या खेड्यापाड्यामध्ये इतकं अज्ञान आहे! तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी महाराष्ट्रातल्या लहान लहान खेड्यांमधून गेले. तिथे राहिले, तिथे झोपायचे, इतकी मी मेहनत केलेली आहे. पण त्या खेड्यांमधल्या लोकांचं मला समजत नाही, ते एक रुपया घेऊन येतील. 'अरे, माताजी पैसे नाही घेत.' 'बरं, दहा रुपये घेतील का?' म्हटलं आता ह्यांचं डोकं कुठे गेलं आहे ? खूप काम केलेले आहे आणि अजूनही करायचं आहे. पण बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल, की उत्तर हिंदुस्थानात मी इतकं काम केलेले नाही. पण खेड्यापाड्यात केलं आहे. महाराष्ट्रात एक-दोन दोष आहेत आपल्या. एक तर आपल्याला वाटतं की धर्माच्या बाबतीत आपल्या काही काही अटी असतात. पैसे दिले पाहिजेत, अमुक, तमुक. ती सवय झालेली आहे. आणि दुसरं एक मला वाटतं, थोडी मोठ्या लोकांमध्ये जरा घमेंड आहे. आम्ही काही तरी विशेष आहोत. घमेंड आहे. त्या घमेंडीने पण कमी होतं. असं मला तरी वाटतं. कारण तसं मी पाहिलं आहे, की दुसर्या ठिकाणी इतका सहजयोग का पसरतो, मग इथे का नाही पसरत. ही घरमेंड जायला पाहिजे. कारण घरमेंडीचा फायदा काय आपल्याला? काहीच नाही. सरकारी नोकरांनी तर मुळीच घमेंड केली नाही पाहिजे. कारण कशाची घमेंड हो! मला समजत नाही आणि मला इतकं लक्षात आलं नव्हतं, पण मला भेटायला एक गृहस्थ आले होते. मेजर जनरल आहेत ते. ते फार नम्रपणाने माझ्याशी बोलत होते. आमचा एक शिष्य आहे, तो डॉक्टर आहे. तो कॅनडाला असतो. आशीष म्हणून. तो म्हणतो, 'माताजी, हे काय मेजर २० 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-20.txt जनरल आहेत का?' 'हो, आहेत नां! मग काय?' 'मग केवढे नम्र आहेत.' म्हटलं, 'माझ्यासमोर आले तर नम्र होणारच.' 'नाही हो, आपल्या महाराष्ट्रात कोणी जरी कॅप्टन असला ना, की आडवी छाती काढून चालतो, असं (कृती).' आता हे लक्षात घेतलं पाहिजे. घमेंड करून काय फायदा! त्यांचा प्रश्न असा आहे की, 'आयएएस ऑफिसर्सना सहजयोगाची काय गरज आहे ? आता मी आधीच सांगितलं होतं, की काय असतं, हे आयएएसमध्ये गेले म्हणजे इतर लोकांच्यापेक्षा उच्च स्थितीला जातात. म्हणजे अर्थात ते विद्वान आहेत, फार कार्यप्रवण आहेत, म्हणून त्यांना ही स्थिती मिळते. हे कबूल. मग होतं काय की एकांगी जीवन मिळतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ, धावपळ. शनिवार, रविवारसुद्धा धावपळ करीत असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल चाळीस वर्ष आम्ही इथे राहिलो आहोत, साहेबांच्या बरोबर. एक दिवस ह्या गृहस्थाने सुट्टी नाही घेतली. शनिवार, रविवार पण नाही. रोज रात्री यायचं. इतकी कामं करायचे. पण माझी काही हरकत नव्हती. कारण आपल्या राष्ट्रासाठी कार्य करीत होते. त्या माझ्या राष्ट्रीय प्रेमाची मला पूर्णपणे मदत होत होती. पण तसं काही नसतं. तेव्हा थोडसं बॅलन्समध्ये असावं. बर, ते बॅलन्समध्ये आलं, तरीसुद्धा त्यांचं आहेच तसं. आयुष्यच तसं आहे. त्याच्यात सारखं फार काम करावं लागतं आणि त्याने राइट साइड येत जाते. पण त्याला इलाज सहजयोगात आहे. कुंडलिनीच्या जागरणाने त्यांच जे काही असंतुलन आलेलं आहे ते नष्ट होईल. ते पूर्ण नष्ट झाल्याबरोबर मजेत येतील. काही त्यांना वाटणार नाही. म्हणून आयएएस ऑफिसर्सना फार जरुरी आहे. का? कारण आपल्या देशाच्या पाठीचा कणा आहेत ते. त्यांच्याच दमावरती सगळं काही चालू आहे. आपल्याला माहिती असेल, फ्रान्समध्ये इतका बदल होत असतो राजकारणी लोकात. पण तिथले ब्युरोक्रॅटस जे आहेत ते अगदी पक्के आहेत. त्याच्यामुळे तो देश चाललेला आहे. तसं जर आपल्या इथले आयएएस ऑफिसर्स ठीक झाले, अगदी उत्तम झाले, स्वस्थ झाले तर हा देश कोणीच वाकवू शकत नाही. (सहजयोगी : सहजयोगामुळे त्यांच्या मनावरचा ताण कमी होईल का?) अगदी, शंभर नंबरी सांगते तुम्हाला, पूर्णपणे, पूर्णपणे स्ट्रेस कमी होईल! त्याने जे अॅक्सिडेंट होतात ते होणार नाहीत. ते मनमोकळेपणाने सगळ्यांशी बोलतील आणि फारच स्वभाव स्वच्छंद होईल आणि जे शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं नां , 'स्वधर्म ओळखावा,' ते ओळखतील. २१ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-21.txt क्षमाशीलती - हे महान शतर आहे बुद्धाचा संदेश अर्थात अहंकार बाळगू नये असाच आहे. पण ते तुम्ही कसं करता? पण ते तुम्ही कसं काय करणार? तुम्ही काहीही करीत असां तुम्हाला म्हटले पाहिजे 'मी काहीही करीत नाही. श्रीमाताजी...... हे करीत आहेत किंवा परमेश्वर हे करीत आहे. मी काहीही करीत नाही.' पण तुम्ही जर म्हणाल की सहजयोगासाठी तुम्ही काहीतरी करीत आहात तर ते करणं तुम्ही थांबवावे हे बरे! तुम्ही फक्त असं म्हटलं पाहिजे 'नाही, मी काही करीत नव्हतो. मी फक्त तिथे होतो इतकेच' आणि मग तुम्ही फार महान गोष्ट साध्य केलेली आहे, असते. (४/८/१९९१, बेल्जियम) आपलं वडाचं झाड म्हणजे सामूहिकता आहे. सामूहिकतेबरोबर ऐक्य साधण्यासाठी आपल्याला सूक्ष्मतर झालं पाहिजे आणि ते फार आनंददायी आहे. जे तसं करू शकणार नाहीत ते सहजयोगामध्ये प्रगती करू शकणार नाहीत. ते अडचणी निर्माण करतात. ते स्वत: अडचणीत असतात. प्रत्येकाला अडचणीत टाकतील. त्यांचे चित्त विचलीत असतं आणि कोणालाच माहीत नसतं ते कसे काय तिथे आहेत ? तर आज हे समजून घ्यायचं आहे, की आपण सर्वांनी सामूहिक बनलं पाहिजे. कशाच्याही बदल कुरबुर करता कामा नये. अढी बाळगू नये आणि सामूहिकतेचा आनंद उपभोगिला पाहिज. सामूहिकतेची दुसरी बाजू ही, की सामूहिकतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या अस्तित्वामुळे दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये किंवा गैरसोय अथवा अपमानीत वाटता कामा नये. सामूहिकतेमधील तुमचं अस्तित्व असं हवं की तुमच्या सान्निध्याचा आनंद लुटला पाहिजे. आम्ही अमक्यावर रागावलो आहोत, अशा बढाया मारण्यापेक्षा त्या रागाचं क्षमेमध्ये परिवर्तन दुसर्या व्यक्तीने सोडेल क्षमाशीलता करा. रागामुळे तुम्ही खळबळून उठाल. पण क्षमा त्याला खळबळून - हे महान शस्त्र आहे तुमच्याकडचं आणि हे म्हणजे पूर्ण वेळ बुद्धीचं व्यक्तीत्व दाखवणं आहे आणि हे तुम्हाला आत्मसन्मान देईल आणि तुम्ही कशाने ही विचलित होणार नाही. जहाज जलपर्यटनाला योग्य हवे. जर तुम्ही जहाज समुद्रात सोडले आणि जहाज फुटले तर जहाज बनविण्याचा काय उपयोग ? क्षणोक्षणी विचलित होणाऱ्या सहजयोग्याचा काय उपयोग? सहजयोगी नेहमीच विचारात असतात. श्रीमाताजी अहंकार कसा घालवायचा? अहंकाराला सांगायचं तू जा. जेव्हा हा 'मी' पणा जातो तेव्हा आत्म्याचा उदय होतो. दुखवून घेण्यासारखं काय आहे ? ठीक आहे, तुम्हाला फसविलं गेलं! तुम्ही तर कोणाला फसविले नाही ना ? त्याविषयी आनंदी रहा. त्याचाच अर्थ तुम्ही स्वत:ला समर्पित केलं आहे. कोणी ही तुम्हाला फसवू शकत नाही कारण कोणी तरी परम शक्ती आहे, जी तुमची काळजी घेते आहे. (४/८/१९९१, बेल्जियम) २२ 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-22.txt श्री गणेशाप्रमाणे मनुष्यालाही आपले चित्त स्वच्छ करायला पाहिजे. चित्त स्वच्छ करण्यासाठी प्रथम हे पाहिले पाहिजे की आपले चित्त कुठे आहे? जर तुमचे चित्त परमेश्वराकडे असेल तर ते शुद्ध आहे कारण तुमच्यामधे चैतन्य वाहत आहे. श्रीमाताजी, १८.९.१९८८ प्रकाशक निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१ , ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in मा पर् 2015_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-23.txt প कर wwww. म आपले चित्त या झाडासारखे आहे, जे पृथ्वीशी पूर्णपणे जोडले गेले आहे. तसेच तुम्हालाही तुमच्या आईबरोबर जोडून घ्यायचे आहे आणि झाडाची जी उंची आहे त्याकडे नजर ठेवायची आहे. ही जी काही उंची झाडांनी मिळवलेली आहे ती ह्या वातावरणाशी भांडून, बाहेर येऊन, मस्तक उंच करून केली आहे. जे लोक आपले मस्तक लढून, सांसारिक गोष्टींसाठी, कृत्रिम गोष्टींसांठी, बाह्य गोष्टींसाठी वाकवतात, ते वर कसे उठू Sी न० शकतील ? किंवा जे आपले चित्त या धरती मातेवरून दर करतात, ते तर मरूनच जातील. शा प.प.श्री माताजी, बोर्डी पूजा, १२.२.१९८४ े