नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ चैतन्य लहरी मराठी 53 अंकात या परमेश्वराचं कार्य ...४ ख्रिसमस पूजा, पुणे, २६ डिसेंबर १९८२ सहजयोग्यांनी अत्यंत प्रेमळ असले पाहिजे ... सेमिनार अँड मिटिंग, ब्रह्मपुरी, २० डिसेंबर १९८८ धर्म आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजेत ..१६ सार्वजनिक कार्यक्रम, औरंगाबाद, १९ डिसेंबर १९८९ सहजयीगामुळे आपल्यामध्ये जी सात सेंटर्स आहेत, परमैश्वराने आपल्यामध्ये जी सुंदर व्यवस्था केलेली आहे, ती कुंडलिनीच्या प्रकाशाने जागृत होते. आणि ह्या देवती जीगृत होऊन त्याचे पूर्ण संतुलन करतीत प. पू.श्रीमातीजी, मुंबई, २६ डिसेंबर १e७५ कृपया लक्ष द्यी : चैतन्य लहरी २०१६ च्या अंकांची नोंदणी सुरू झालेली आहे आणि ती १५ डिसेंबर २०१५ ला समाप्त होईल. ा० ५० परमेश्वराचं कार्य पुणे, २६ डिसेंबर १९८२ ४ आता पुण्याच्या केंद्राला नेहमी मी अत्यंत महत्त्व दिलेले आहे आणि ह्या वेळेला अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे आम्ही पुण्याला आलेलो आहोत. पुण्याला विशेष महत्त्व देण्याचं कारण म्हणजे पुणे ही पुण्यभूमी आहे. आणि एकदा सांगितलं की पुण्यभूमी आहे, तर डोक्यात आलं की त्याला मिळतं असं म्हणू शकत नाही. पण ह्या पुण्यातच कार्य होणार आहे आणि अत्यंत प्रचंड कार्य आहे आणि त्याच प्रचंड कार्याची जेव्हा गती घेतली गेली त्या गतीत सहजयोग टिकणार नाही. तेव्हा आपली गती सहजयोगाला योग्य असली पाहिजे. अर्धवट डोक्याचे जे लोक आहेत त्यांनी आपली गती ठीक करून घ्याव. सहजयोगामध्ये फक्त पुण्य कमवायचं आहे. दुसरं काहीही कमवायचं नाही. तेव्हा हे पुण्य मिळवायचं काम आम्ही कसं करावं? त्यात आम्ही कसं गहन उतरावं ? त्यासाठी काय मेहनत करायला पाहिजे? इकडे लक्ष दिलं पाहिजे. आज एक विशेष दिवस आहे की आज ख्रिस्ताचा जन्म आहे. आणखीन एवढ्या मोठ्या पुण्यात्म्याचा जन्म आज ह्या पुण्यभूमीत झाला. म्हणजे आम्हाला अस वाटतंय, की आज काहीतरी विशेष दिवाळी झालेली आहे आणि ह्या दिवशी हे कार्य ह्या पुण्यभूमीत करावं, म्हणजे काहीतरी विशेष व्यक्ती घडणार आहे आणि परमेश्वराचं कार्य काहीतरी विशेष रूपाने घडणार आहे. तेव्हा हे कार्य फार जोरात फोफावेल. मला दिसतंय ते. फार जोरात फोफावणार आहे. पण तुम्ही कुठे राहन जरासं वाईट वाटेल. तेव्हा ह्या मोठ्या अशा मंथनामध्ये तुम्ही आलेले आहात, ह्या मंथनाला चिकटून गेलात ? मला रहा. स्वत:चे काहीतरी विचार घेऊन किंवा स्वत:च्या बद्दल काहीतरी कल्पना करून तुम्ही सहजयोगात येऊ नका. काही ह्यातलं तुम्हाला मिळवायचं नाहीये. तुम्हाला स्वत:चं मोक्षाचं साधन, परमेश्वरी साधन, असं जे आत्मास्वरूप तुमच्यात आहे तेच मिळवायचं आहे. ह्यातलं काहीही आम्हाला सहजयोगात मिळवायचं नाहीये. ते आई आम्हाला देवो, ह्याच्यापलीकडे आम्हाला काहीही नको. असा आज अगदी पूर्ण निर्धार करून तुम्ही पूजेला बसलं पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही जर आपली एक स्थिती ठेवली तर तुमच्यामध्ये हे उतरणं फार सोपं आहे. कारण जर घागरच भरलेली असली आणि त्याच्यामध्ये घाण असेल तर त्या घाणीचा रंग येऊन तरी काय करणार? तेव्हा आधी हे स्वच्छ करून घेतलं पाहिजे. आम्हाला आणखीन काहीही नको.. सहजयोगाचे जे लाभ आहेत, त्यातला एकच लाभ म्हणजे आत्म्याला मिळवणं. त्यानंतर शारीरिक लाभ होतात, मानसिक लाभ होतात, बौद्धिक लाभ होतात आणि नैतिक लाभ ही होतात. हे इतरांचं लक्षण आहे. आम्हाला फक्त ते परमच पाहिजे, तेच आम्हाला मिळू देत. त्याच्या पलीकडे आम्ही काहीही मागत नाही, असा मनामध्ये निर्धार करून आज आपण सगळ्या पुण्यातल्या लोकांनी बसायला पाहिजे. तुम्ही काहीही केलं तरी मी तुमची आई आहे, मी तुम्हाला क्षमा करेन. पण असे समजू नका, की तुम्ही स्वत:ला क्षमा करू शकता. असा जेव्हा योग येणार आहे आणि त्या दिवसासाठी अती कार्ये केली पाहिजेत. बाह्यात हजारो लोकांना जरी पार केलेले असले तरी आतमध्ये आमच्यात काय फरक झाला, ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला अजून राग येतो १ ५ का? आम्ही कलेक्टिव्हिटीमध्ये बोलतो का? आम्ही उगीचच लोकांशी भांडतो का? आम्ही काहीतरी उगीचच सांगत बसतो का? किंवा आमच्यामध्ये काय काय वाईटपणा आलेला आहे, तिकडे लक्ष असायला पाहिजे. जर तुमच्यामध्ये आतमध्ये फरक नाही झाला, तर तुमच्यामध्ये धार्मिकपणा नाही आला असं होईल. जर तुमच्यामध्ये असं साक्षी स्वरूप आलं तर त्याला काही अर्थ रहाणार नाही. मला हे साक्षी स्वरूप मिळायला पाहिजे. म्हणजे .... बघतांना हे एक नाटक होऊन राहिलं आहे, तुम्ही आम्हाला नाटक दाखवलं आहे. ते आम्ही नाटक बघायचं. अशा रीतीने तुम्ही तिकडे लक्ष दिलं, तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल, की तुमची प्रगती होत आहे आणि जर तुमचं स्वत:कडे लक्ष नसलं तर तुमच्या हातातून जरी हे वारं वाहतं आहे, जसं ह्या मशीनमधून माझा आवाज जातो आहे, तर ह्याच्यावर काही परिणाम होतो आहे का ? मंत्र जरी चालले माझ्या तोंडातून तर ह्याला काही पुरावा होतो का? म्हणजे जसं मेल्यासारखे आहे तसंच आहे ह्याच्यातून मंत्र चालले आहेत ह्याचा काही उपयोग आहे का ? जसं आपण दगडचे दगड राहिलो. आपल्यातले व्हायब्रेशन्स फक्त वाहतात. आम्ही हजारो लोकांना पार केलेले आहे. त्याने काहीही अर्थ निघत नाही. तुम्ही स्वत: ह्याबाबतीमध्ये किती निष्ठेने, किती हृदयाने कार्य करता, इकडे लक्ष ठेवले पाहिजे. ह्याच्यामध्ये तुमचा काहीतरी हेतू आहे का? काहीतरी बाह्यातला हेतू आहे का ? इकडे स्वत:कडे लक्ष ठेवलं पाहिजे. कारण आपण आपल्यालाच सर्व करतो. आपण आपल्यालाच दुखवतो आहोत आणि आपण आपल्यापासून दूर होतो. असं जर केलं तर त्याने काहीही लाभ होणार नाही आणि मला सगळें समजतं. मी जरी वरपांगीपणे तुम्हाला म्हटलं, की या म्हटलं आणि नाही ही म्हटलं तरी दोन्हीही गोष्टींचा अर्थ एकच आहे. म्हणजे काय ? तुम्ही स्वत:कडे लक्ष दिलं पाहिजे, माताजी तुम्हाला काही विशेष सांगणार नाहीत, हे जरूर म्हणते. पण प्रत्येक मनुष्य कसा आहे ? किती पाण्यात आहे ? हे सगळं मला माहिती आहे. तेव्हा आपण माताजींना साक्षी ठेवून आपण कसे आहोत तिकडे लक्ष दिले पाहिजे आणि स्वत:ला ठीक केलं पाहिजे. पुण्याबद्दल ज्या काही तक्रारी मी ऐकल्या त्या म्हणजे आश्चर्याच्याच आहेत. पण तरीसुद्धा असं वाटतं की हळूहळू ह्या ठीक होतील. पहिल्यांदा आपली दृष्टी ठीक करायला पाहिजे. एकदा वर्षातून माताजी इथे येतात. त्यांचा आम्हाला काहीही खर्च नाही. आम्हाला काहीही करावं लागत नाही त्यांच्यासाठी. फक्त आम्ही आमचा खर्च माताजींच्या डोक्यावर नाही घातला पाहिजे. एवढी एक साधी गोष्ट आपल्या लक्षात येऊ नये! म्हणजे हे काही सांगायला पाहिजे का? वेळेला असं मला पुढच्या सांगायला लागलं नाही पाहिजे. तुम्ही स्वत:च विचार केला पाहिजे, की माताजी इथे आल्या आहेत. आम्ही काही माताजींच्यासाठी करायच्या ऐवजी माताजींनीच आमच्यासाठी खर्च करायचा ! तेव्हा स्वत:कडे अत्यंत प्रेमपूर्वक पहायला पाहिजे. आपल्याला चिखलात रहायचे नाही. हजारो लोक चिखलात आहेत. मग सहजयोगाचा फायदा काय? जर ह्या चिखलात रहायचे आहे, मग सहजयोगाला येऊन उपयोग काय? एकदा तुम्ही आपल्या आत्म्याला मिळवलत, तर तुमचे सगळे त्रास दूर होणार, हे तुम्हाला माहिती आहे. ज्यांनी मिळवलं त्यांचे चेहरेच वेगळे दिसतात. ज्यांनी नाही मिळवलं त्यांच्या चेहऱ्यावखूनच दिसतं. म्हणून सगळ्यांना सांगायचं, की आजच्या ह्या महान पर्वाच्या दिवशी जेव्हा ख्रिस्तासारख्या महान माणसाला आपण समर्पण केलं की ज्याने सबंध आयुष्य परमार्थाशिवाय काहीही पाहिलं नाही. त्याचा मान ठेवण्यासाठी त्याचं चारित्र्य आपल्यामध्ये आणायचं. त्याची व्यवस्था आपल्यामध्ये आली पाहिजे. जो आपल्यामध्ये आज महान आहे, असा आपल्याला महाविष्णु अवतार घेऊन आलेला एवढा पुरुष जागृत आहे तर त्याची काहीतरी स्थापना करण्यासाठी त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी, त्याची इज्जत करण्यासाठी त्याला साजेल असं, त्याला शोभेल असं, आपलं वर्तन असायला पाहिजे. आणि ते वर्तन आहे का? स्वत:कडे बघा. त्यात वाईट वाटून घेऊ नका. दुसर्यांना बोलणं फार सोपं आहे. दुसर्यांच्या गोष्टी करणं फार सोपं आहे. इकडून तिकडून भांडाभांडी लावणं फार सोपं आहे. ही सगळी कामे तुम्ही करू शकता. केली आहेत. पुष्कळ जन्म केलीत. ह्या जन्मात करायला पाहिजे असं नाही. आता ह्या जन्मात करायचं आहे ते दुसर्यांसाठी. ते म्हणजे काय तर सूक्ष्मात उतरायचं आहे. तेव्हा बाह्यातलं जे काही आहे ते सोडून टाकलं पाहिजे. आणि सूक्ष्मात उतरण्यासाठी .. (अस्पष्ट) इकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे मात्र समजतं मराठी माणसाला की माताजींच्या पूजेत फार लाभ आहे. पूजेला सगळे येणार. माताजींच्या पूजेला आल्यानंतर आतमध्ये उतरतं. ही गोष्ट खरी आहे. मी मान्य करते. पण ह्याच्यात कार्य माझेच आहे. तुम्ही काय केलं? माझी चक्र चालत नाही, तुमची चक्र चालत नाही, तुम्हाला खाली उतरवते. तुम्ही जर ध्यानधारणा केली नाही, मेहनत केली नाही तर ही जी .....(अस्पष्ट) पूजेचा लाभ होतो आपल्याला. पण तो पूजेचा लाभ आपण टिकवून नाही ठेवला, ते जर आपण धन टिकवून नाही ठेवलं तर त्या धनाचा आपण उपभोग कसा घेणार? आता जे काही पूजेत मिळवणार ते आम्ही जपून ठेवणारच, आणि त्याच्यावरही कळस करू असा निर्धार करून बसायचं. कारण त्याला काही शिक्षण लागत नाही, त्याला काही बुद्धी लागत नाही. त्याला खर्च लागत नाही. पैसे लागत नाही. फक्त काय तर आस्था पाहिजे! स्वत:बद्दल आस्था पाहिजे. माझ्याबद्दल नको. माझ्याबद्दल आहे तुम्हाला मला माहिती आहे. म्हणजे माताजींकडून काय मिळेल ते घ्यावं, पण आमच्याकडून काय आमच्यासाठी मिळेल, स्वत:साठी आम्ही काय करू शकतो ? आम्ही आपला कसा लाभ करू शकतो ? आम्ही आमचा कसा लाभ करू शकतो? इकडे आस्था नाही. स्वत:बद्दल आस्था ठेवायला पाहिजे. मला तुमच्याबद्दल आस्था आहे. थोडी जरी तुमच्याबद्दल तुम्ही आस्था ठेवली, तर स्वत: अत्यंत गांभीर्याने कसं रहायचं, स्वत: च्या इज्जतीने कसं वागायचं? आपण कसं मोठं व्हायचं? हे सगळं समजेल. आणि तुमच्यात जेव्हा हे उतरेल तेव्हा तुमच्या मुलांना ते दिसेल, आणि ते पुढे जातील. तेव्हा आज असा निर्धार करायचा आहे, की आज आपण ख्रिस्ताच्या दरबारात बसलो आहोत, तेव्हा रूढीगत जे आहे ते सोडून द्यायचं. डोक्यात आपल्या जे काही विचार आहेत ते सोडून द्यायचे. जे समोर आहे ते बघू. आपला अहंकार सोडून द्यायचा. ७ क ब्रह्मपुरी, २० डिसेंबर १९८८ सहजयोग्यांनी अत्यंत प्रेमळ असले पाहिजे ८ आता साताऱ्याच्या आणि ब्रह्मपुरीच्या, अंगापूरच्या सर्व सहजयोग्यांना असं सांगायचं आहे, की दोन वेळेला असं झालं की आम्ही अंगापूरच्या प्रोग्रॅमला येऊ शकलो नाही. फार वाईट गोष्ट आहे. मला बरं नाही वाटलं ते. असं कसं झालं एकदम! असं का झालं? असं होत नाही. मागच्या वेळेला बँकेने एवढा त्रास दिला मला. पैसे द्यायला तयार नव्हते. पैशाशिवाय हलायचं कसं! त्यामुळे इकडे येऊ शकले नाही. दुसरं ह्यावेळेला आमच्या ड्रायव्हरमध्येच कोणतंतरी भूत बसलं होतं मला वाटतं. आणि आता परवासुद्धा असाच स्वयंपाकाचा वगैरे विचार होता तो इतक्या सगळ्या उशिराने सामान आलं. म्हणजे कसलीतरी निगेटिव्हिटी कार्य करीत आहे. तेव्हा सहजयोग्यांना एवढेच सांगायचे आहे, की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी नसली पाहिजे. आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग मानला नाही पाहिजे. इतक्या लांब इतक्या आतमध्ये येऊन सहजयोग आपण वाढवतो आहे, तेव्हा आपल्यामध्ये एक तऱ्हेचे समाधान असायला पाहिजे आणि एक तऱ्हेचा आशीर्वाद मानला पाहिजे, की माताजी अंगापूरलाच का येतात! आणखीन पुष्कळ ठिकाणी जाऊ शकतात. नवीन नवीन ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथे जास्त कार्य होऊ शकतं. पण तरीसुद्धा अंगापूरला आणि जसं त्यांनी काल सांगितलं की वारी सुरू झाली, तर हे काही विठ्ठलाचं स्थान नाही, पण तरी येतं , त्याला कारण काय ? पण काहीतरी निगेटिव्हिटी आहे. असं मला वाटतं. आणि ती निगेटिव्हिटी कदाचित अहंकाराची असू शकते. कदाचित अहंकार माणसाला असेल आणि तो इतरांशी बोलतांना किंवा सहजयोगाबद्दल कार्य करतांना ती सहिष्णूता किंवा ते प्रेम किंवा ती माणुसकी दाखवत नसेल, तेव्हा विचार केला पाहिजे. असं का होतय ? दोन वेळा हे झालेले आहे. तेव्हा काहीतरी कारण असायला पाहिजे. तसे आम्ही दोनदा गेलो आहे बाहेर पूर्वीसुद्धा. मग असं काही व्हायला नको होतं. पण अशा पुण्याहून रीतीने येतात, की त्याला काही मार्गच मिळत नाही. त्यातून मार्गच मिळत नाही. मीसुद्धा मग असा विचार करते, की सोडून टाकावं. पण एकदा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, की आमच्यात माणुसकी पूर्णपणे आहे का ? आम्ही सर्व सहजयोग्यांना प्रेमाने वागवतो का? आमचा आम्ही मान ठेवतो का? की आम्ही आपलेच आपल्याबद्दल, आपल्याच फॅमिलीबद्दल, आपल्याच घराबद्दल विचार करत राहतो. असं जर केलं तर तुमचंे तर नुकसान होईलच, पण इतरांचेही फार होईल आणि ती तुमची जबाबदारी आहे. तेव्हा सर्व इथल्या सहजयोग्यांना माझी हात जोडून विनंती आहे, की आपापसामध्ये कोणी उच्च नाही, नीच नाही, सहजयोगामध्ये कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. सगळे एकसारखे आहेत. कुठेही आपलं जंगलात राहतात हे लोक. कुठल्या कुठल्या देशातले काही काही लोक फारच श्रीमंत आहेत. काही इतके श्रीमंत नाहीत. पण सगळे कसे प्रेमाने, आपापसात मिळून मिसळून राहतात. तशी कलेक्टिव्हिटी नसली तर प्रोग्रॅम होत नाही हे मी पाहिलेलं आहे. तेव्हा हे फक्त अंगापूरला किंवा साताऱ्यालाच का होतं ? काल मी त्यांना सांगितलं नाही, पण मला तरी असं वाटतं, की इथले जे सहजयोगी आहेत त्यांनी ध्यान करायला पाहिजे आणि अहंकाराला आतून काढलं पाहिजे. अहंकारामुळे असं होतं. अहंकार जिथे जास्त झाला की हनुमानच हे कार्य करतो. ते होऊच देत नाही. काही ना काही तरी घोटाळे करून ठेवेल आणि मला पुढे येऊच देत नाही. तेव्हा परवाचा आणि कालचा प्रोग्रॅम जो झाला, त्यात मला वाईट वाटत होतं म्हणा. पण मीसुद्धा असमर्थ होते या गोष्टीत. मला समजत नव्हतं, की असं कसं झालं. तेव्हा माझी खरोखर आपल्याला विनंती ९ आहे, की सामूहिकता वाढवली पाहिजे. आपापसातलं प्रेम वाढवलं पाहिजे. सामूहिकता यायला पाहिजे. अधिकतर महाराष्ट्रात लोकांचं आपलं असं आहे, की ह्याचा गळा काप, त्याचा गळा काप. सहजयोगातसुद्धा हे चाललं आहे. हा इकडे तर तो तिकडे, ह्याला येऊ नको देऊ, त्याचा काही ठिकाणा नाही. अशा रीतीने वागून ह्या भाऊबंदकीने सहजयोग कधी वाढणार नाही. तुमच्यावर अनेक आशीर्वाद आहेत परमेश्वराचे आणि अनेक गोष्टी घडल्या आहेत, तेव्हा सारखं परमेश्वराने आम्हाला किती दिलं, किती आम्हाला आनंद दिला, किती आम्हाला सौख्य दिलं, किती आमच्यावरती कृपा केली, ही कृष्णासुद्धा सारखी देवाचेच गुणगान गाते आहे असं मला दिसलं, मग आपण तरी त्याचं किती म्हटलं पाहिजे ! आता इथे तीस देशातले लोक आहेत आणि प्रत्येक देशातल्या लोकांनी आपली गाणी कशी म्हणून घेतली! त्यांच्यासाठी सहजयोग हाच जीवन आहे. तसे आपल्याकडे नाही. एक गाणं कोणी म्हटलं तर दुसरा त्याच्या वरचढ गाणं म्हणेल. पण असं नाही की सगळ्यांनी मिळून ते गाणं आधी शिकावं, मग दुसर गाणं. इतकी कॉम्पिटिशन आपल्यामध्ये चालली आहे, ती गेली पाहिजे. आपण काही आता सर्वसाधारण लोक नाही. आता आपण योगीजन आहोत. योगीजन म्हणजे अगदी कसे नम्र असायला पाहिजे. सहजयोगी अत्यंत प्रेमळ असायला पाहिजे. सगळ्यांना या, बसा! कोणी श्रीमंत असो, कोणी गरीब असो, तरी त्याला म्हणायचं, की तुम्ही येऊन बसा. त्याला व्यवस्थित बघायचं, त्याला प्रेमाने वागवायचं. माझे घर, माझी फॅमिली असे जो जाणार. म्हणून माझी सगळ्यांना अशी विनंती आहे, की असा अप्पलपोटेपणा करायचा नाही किंवा अशा सीमित बघतो तो सहजयोगात राहणार नाही, टिकणार नाही आणि तो निघून मनुष्य ह्याच्यात राहायचे नाही. आपल्याला विशाल व्हायचे आहे. मग आपली नाव दिगंताला पोहोचणार. कोण कोणाला ओळखत होते बघा! राहरीचे आमचे धुमाळ आहेत. त्यांना कोण ओळखत होतं ? कुलकर्णी आहेत पुण्याला त्यांना कोण ओळखत होतं ? मुंबईला मगदूम साहेब आहेत त्यांना कोण ओळखत होतं ? कोणी नाही. पण सगळ्या जगात त्यांची नावं आहेत, त्यांच्या मोठेपणामुळे, त्यांच्या विशालतेमुळे. हे लोक आल्यावर त्यांच्या गळ्याला मिठ्या घालतात. माझ्यावर नाही, की तुम्हीच या, तुम्हीच करा. असं नाही. ह्यांच्याशी ओळख करायची, ह्यांच्याशी बोलायचं. हा कोण? हा कुठून आला आहे ? ह्याचं लग्न कोणाशी आहे ? असं आहे, आहे. स्वत:ला वेगळं, अलिप्त नाही ठेवलं पाहिजे आणि ते जर आलं नां, तर ह्यांच्यामध्ये सरमिसळ होईल, तुमची तसं नावं होणार. सबंध देशादेशातून तुमचे नाव होणार. आता ह्यांना विचारलं की साताऱ्याचे कोण ऑर्गनायझर आहेत? तर कोणाला माहिती नाही. तुम्ही करता त्यांचं ऑर्गनायझेशन? एकाचेही नाव कोणाला माहीत नाही. काय म्हणावं ह्याला. कबूल आहे नां! ही गोष्ट कबूल आहे. तेव्हा सगळ्यांना भेटायचं, बोलायचं, सगळ्यांना नावं सांगायची, ओळखी करून घ्यायच्या! कोणत्या गावचे, कोणत्या देशाचे. लगेच वाईट नाही वाटून घ्यायचं. आई जे म्हणते आहे, ते हितासाठी म्हणते आहे तुमच्या. तेव्हा सगळ्यांना भेटून घ्यायचं, बोलायचं. आता काल जी मंडळी आली होती, जी पार झाली, त्यांची नावं नोंदवली की नाही माहिती नाही. मी सगळं बघत होते, पण काही बोलले नाही. प्रत्येक वेळेला असच होतं, प्रत्येक वेळेला काळजी घ्यावी लागते. हे आपले पाहुणे नाही, हे आपले अंगप्रत्यंग आहेत. आपलं शरीर आहेत. आपल्या शरीरातले भाग आहेत हे समजून घेतलं १० पाहिजे. आता इतक्या विशाल शरीरात तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि त्या शरीराचे आपण अंगप्रत्यंग आहोत. जसं ह्या बोटाला लागलं की ह्या बोटाला कळतं, आणि सगळे शरीर हादरून निघतं. तसेच आपले आहे. तेव्हा ती एकांतातली एकात्मता जोपर्यंत आपल्यामध्ये येणार नाही, त्यांच्या ओळखी पटणार नाही. तोपर्यंत सहजयोगामध्ये अजून आपण उतरलो नाही. आपल्याला सहजयोग समजलेला नाही. ज्यांना सहजयोग समजलेला आहे, ते हे समजतात, की हे युगायुगातलं एक फार मोठं सुवर्ण आहे आणि ते मिळालेलं आहे. लहानसहान गोष्टींमध्येसुद्धा आपण बघतो, की अजून जातीपाती, अमकंतमकं सुटलेलं नाही. हे आपल्याला तोडलेच पाहिजे. ह्या जातीपाती धरून नुसत्या बायकांचाच त्रास आहे. एखादं चांगलं लग्न झालं त्याचा अर्थ असा नाही की सगळी लग्न चांगली होणार आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही की जातीत लग्न करायचेच नाही. पण सहजयोग्याशिवाय करायचं नाही. पण तो जातीतलाच असला पाहिजे असा अट्टाहास करायचा नाही. आपल्याला सर्व विश्वात पसरायचं आहे. ही हिम्मत असायला पाहिजे. जर ही आम्ही समर्थतता तुम्हाला दिली नाही, तर तुम्ही कसले सहजयोगी! जर तुम्ही समर्थ असाल, तरच होऊ शकतं. तर 'येर्यागबाळ्याचे काम नोहे, त्याला पाहिजे जातीचे' असं म्हटलेले आहे. आणि 'मराठा तितुका मेळवावा' असं का म्हटलं? रामदास स्वामी ब्राह्मण असतांना, त्यांना माहिती होतं, की मराठा म्हणजे काहीतरी विशेष, विरश्रीपूर्ण. पण तसं काही दिसत नाही. मराठ्यांचा मला भयंकर अनुभव आलेला आहे. परवा पुण्याला भाषण झालं असतांना सांगितलं होतं, की मी साडीच्या एका दुकानात गेले. आणि प्रत्येक हे मजल्यावरती बघते तर २५-३० माणसं फेटे घालून बसलेली. म्हटलं 'हे करताहेत काय इथे ?' म्हणे, बस्त्याला बसलेत. असे बसत होते का शिवाजी महाराजांच्या वेळेला. वेळ तरी होता का बस्त्याला बसायला? तिथे बसून मुलीच्या साड्या घ्यायच्या, गप्पाष्टकं करायची. किती खालच्या दर्जाचे झाले आहेत हे मराठे, असं मला वाटलं. बसून साड्या निवडायच्या. उद्या बांगड्या भरायला येतील. दूसरं काही मला समजत नाही. पुरुषांनी अशा गोष्टीत ढवळाढवळ करायची आणि अशा गोष्टी बघायच्या म्हणजे अगदी लाजिरवाणी स्थिती आहे. शिवाजी महाराज असते, तर काय म्हणाले असते ह्या सगळ्याला! अहो, हातामध्ये तलवारी घेऊन फिरणारे लोक, बस्त्याला बसून साड्या बघतात, काय म्हणावं ह्या लोकांना! म्हणजे कोणते मराठे सांगितले आहेत ते मला समजत नाही. परत पुष्कळसे लोक शिवाजी महाराजांचे नाव घेऊन धंदे हेच करतात. दारू प्यायची. त्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला इथेच तुमच्या समोरच अटकेत ठेवलं होतं . कारण तो दारू प्यायचा. आहे की नाही गोष्ट खरी. अटकेत ठेवलं होतं की नाही. मग जे लोक दारू पितात ते शिवाजी महाराजांचे नाव कसे घेऊ शकतात ? सरळ गोष्ट आहे. त्यांना अटकेत ठेवायला पाहिजे शिवाजी महाराजांच्या हिशेबाने. कळलं की नाही! जर तुम्ही त्यांना अटकेत ठेऊ शकत नाही, तर निदान त्यांच्याजवळ तरी जाऊ नये. त्यांच्याशी संबंध ठेऊ नये. कारण त्यांचा जो घाणेरडेपणा आहे त्याचा परिणाम तुमच्यावर होतो. अशा समाजाला काय म्हणायच, ह्या मराठा समाजाला! आम्हीसुद्धा त्याच समाजातले आहोत, असं म्हणतात लोक! आणखीन काय ते तुमचे शहाण्णवकुळी वगैरे ते सुद्धा आहे म्हणतात. त्याला काय चाटायचंय, काय त्याच्यात अर्थ आहे! शहाण्णवकुळी ११ म्हणायचं आणि बायकोला मारायचं. अहो, धोबिणीसुद्धा इतक्या मारल्या जात नाही इतक्या मराठ्याच्या बायकांना लोक मारतात, नि त्रास देतात. हे काय मोठे शहाण्णवकूळी झाले ! ह्या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण सहजयोगी आहोत. ही एक क्रांती आहे फार मोठी! जे कोणी क्रांतिकारी असतील त्यांनीच सहजयोगात यावं नाहीतर येऊ नये आणि ही क्रांती फार मोठी आहे. ह्या क्रांतीमध्ये आपण सगळं बदलून टाकणार आहोत हळूहळू. वर्षामध्ये आपण एकत-्हेचं आनंदमय जीवन, आतमध्ये आणि बाहेर, सबंध व्यवस्थित अगदी, असं बसलेलं रामराज्य पाहिजे. त्याची मी कल्पना केलेली आहे. त्या रामराज्याला तुमची तयारी असली तर माझ्याबरोबर उभं रहायचं, नाहीतर उभं रहायचं नाही. उपटसुंभांचं काम नाही सहजयोगामध्ये. काम ज्या लोकांचं आहे जे त्याच्यासाठी समर्पण करतील. मेहनत करतील आणि वेळ घालवतील. पंढरीच्या वाऱ्या करायला लोक तयार आहेत. पंढरीच्या वाऱ्या करायला लोक पोहोचतील, तिथे जाऊन एक एक महिना घालवतील, डोकी फोडून घेतील. पण जे सहज, सरळ आहे, ते मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण किती वेळ घालवला, आपल्या वाडवडिलांनी वेळ घालवला आहे, त्यांच्या वाडवडिलांनी घालवला आहे, आणि आज आपण कुठे आलो आहोत ! पूर्वी होतं बरोबर शिवाजींच्या वेळेला, की मुसलमानांना पळवायचं, पण आता ते सगळं आपल्या आतमध्ये आलेलं आहे. सगळे आपले षडरिपू आपल्या आतमध्ये आलेले आहेत. ते आपण काढून टाकले पाहिजेत. सहजयोगामध्ये बोलायचं एक आणि करायचं दुसरं असं नाही. जसं तुमची आई करीत नाही, तसं तुम्ही करायचं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या असं लक्षात आलं इकडे, मी नागपूरची राहणारी, नागपूरला लोक भयंकर श्रीमंत आहेत. कारण तिथली जमीन चांगली आहे. श्रीमंत लोक आहेत आणि दिलदार लोक आहेत. आणि तुम्ही जर तिकडे, नागपूरकडे संबंध कराल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, सकाळपासून तुमची कशी सेवा करायची, सकाळपासून तुम्हाला काय द्यायचं? तुम्ही अगदी म्हणाल, 'कमाल आहे! अशी सरबराई आम्ही कुठे पाहिली नाही.' त्याला कारण असं, की श्रीमंत लोक आहेत ते. शेतीवाडी चांगली आहे, हवा वगैरे चांगली आहे. सगळं चांगलं आहे. तरीसुद्धा त्यांच्यामध्ये अप्पलपोटेपणा नाही. एकवेळेला स्वत: उपाशी राहतील, पण पाहण्यांचं फार करणार. पण इकडच्या बाजूला मी बघते , की भयंकर लोक कंजूष आहेत. भयंकरच. सहजयोगातसुद्धा पैसे तर देतच नाही काही आता सगळे पैसे बहतेक ह्या लोकांनी दिलेले आहेत. ते तर सोडा. पण आता जर तुम्हाला गणपतीपुळ्याला जायचं असलं, तरी त्यांना असं वाटतं , की माताजींनी आमच्या खाण्या-पिण्याचे, राहण्याचे सगळे पैसे द्यायचे. म्हणजे हा काय भिकारीपणा! तेच आमच्या नागपूरच्या कोणाला जर म्हटलं ना की आम्ही तुमचे खाण्यापिण्याचे पैसे देतो, तर म्हणतील, 'वा, कशाला? आम्ही आमचे देणार. तुम्ही द्यायचे नाहीत.' आमच्याकडून जास्तीचे घ्या म्हणतील. १२ आता हे सगळे गाणे म्हणणारे, गाणं करणारे, ते म्हणे, 'माताजी, बघा, आम्ही फुकटात येणार नाही. इथे येऊन आम्ही पैसे देणार.' विशाल हृदय झालं पाहिजे आणि त्या विशाल हृदयाला आपण घेतलं पाहिजे. आईने सांगितलं त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं. आई आपल्या हितासाठीच सांगते आहे. ती विशालता असायला पाहिजे. तेव्हा सहजयोगाचा कोणी ठेका घेतलेला नाही. सहजयोग कोणा एका माणसाचा नाही. सर्वांचा आहे. सर्वांशी माणुसकीने, प्रेमाने वागायला पाहिजे. सगळे आपले अंगप्रत्यंग आहेत असा विचार केला पाहिजे. आणि तसं प्रेम केलं पाहिजे. ह्या सातारा जिल्ह्याचं फार माहात्म्य आहे. इथे कृष्णाच वहात नाही, पण इथे इतक्या साधुसंतांनी कार्य केलेले आहे, की मला आश्चर्य वाटतं की ह्या सातारा जिल्ह्यात सहजयोग का बसू नये! पण त्याला कारण जे असेल ते शोधून काढलं पाहिजे. त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे आणि ते का होत नाही. तुम्ही हिय्या केला तर का होणार नाही! राजकारणी लोकांनी किती प्रकार करून ठेवलेले आहेत. मग हे अध्यात्म आहे. त्याचा कोणाशी संघर्ष का आहे? त्याचे कोणाशी भांडण का आहे ? आणि लगेचच कोणी सहजयोगात आल्याबरोबरच त्याला फायदा होतो. आता हे .... साहेब बघा. त्यांची काय परिस्थिती होती! आज त्यांची परिस्थिती किती चांगली आहे. कालच एक गृहस्थ भेटले. म्हणाले, 'माताजी, मी आलो इंटरव्ह्यूला. मला मोठी नोकरी मिळाली.' म्हणजे पैशाच्या दृष्टीने म्हणत नाही. पण मनाला स्वास्थ्य. अहंकारादि, राग येणं दूसऱ्यांवरती राग राग दाखवणं हे सगळे सुटतं. मनुष्य शांत चित्त होतो. त्याच्या चेहऱ्यावरच इतकी शांती येते की वाटतच नाही की हा मनुष्य तोच आहे. असं वाटतं की हा कोण देवपुरुष आला! 'अहो, मी तो.' 'असं कां! तुमचे ते चढलेले डोळे वगैरे काही दिसत नाही.' 'नाही. ते उतरलं सगळं.' तसे व्हायला पाहिजे. तसेच बायकांचंसुद्धा आहे. बायकांनीसुद्धा अत्यंत प्रेमाने आईसारखं वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये. आपल्यामध्ये एक गुण फार चांगला आहे, की पावित्र्याची आपल्याला कल्पना आहे. पण इतर गुण फार कमी आहेत. एकतर बोलताना आपण फार उद्धटपणाने बोलतो. मुलांना सुद्धा, 'चल, उठ, नीघ' असं बोलायचं. सरळ म्हणायचं, 'चला, उठा.' आमच्यातिकडे नागपूरला, मुलांना कोणी असं बोलत नाही, 'चल, उठ, नीघ,' असं नाही बोलत . ' चला, उठा, मानाने त्यांना वागवलं, म्हणजे ते सुद्धा तुमचा मान करायला शिकतील. पण पटकन हातातील एखादी वस्तू उचलून घ्यायची. मग त्याला ढकलून टाकायचं. त्याला तिकडे बसवायचं. मुलांचा जर मान नाही केला तर ती मुलं तशीच होणार पुढे जाऊन. तर ही फार मोठी तफावत मी पाहिली. आमच्या तिकडे, खानदेशाला, नागपूरला लोक आहेत, खानदेश म्हणा इतके नाही, पण नागपूरकडची, वऱ्हाडची लोक आहेत, त्यांचं वागणं , त्यांचं बोलणं, मुलांच्या बरोबर एक तऱ्हेची पद्धत आणि शिवाजी महाराज झाले ते इकडे. तिकडे कोणते महाराज आले. ते भोसले झाले होते. बसू. पण तिथे एवढा राजेशाहीपणा कसा आला आणि इथे इतका क्षुद्रपणा कसा? तर मुलांशीसुद्धा इज्जतीने बोललं पाहिजे. आपणसुद्धा सहजयोगी आले तर मानपान केला पाहिजे. आता पुष्कळदा मी आमच्या प्रतिष्ठानमध्येही बघते, की काही भेटायला आले, तर आम्हाला सांगावं लागतं, 'अहो, ह्यांना काही खायला द्या की .' असं नाही, की आल्याबरोबर काहीतरी खायला द्यायचं, त्यांना १३ पाणी द्यायचं, त्यांना बघायचं. तशी इकडे पुण्याला तर मुळीच पद्धत नाही. तिथे तर एक पेरू दहा माणसांना वाटून खातील. अशातले भयंकर कंजुष लोक आहेत पुण्याला. पण सातार्याला तसं नको. तुमच्या इथे शाहू महाराजांसारखे लोक झालेले आहेत. किती तरी गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा एक तऱ्हेचा दातृत्वपणा असला पाहिजे. मोठेपणा असला पाहिजे. लोकांना तोडायचं फार लवकर येतं. आपल्या मराठी भाषेमध्ये इतका गोडवा आहे, इतका चांगुलपणा आहे, पण हे तोडण्याचं जे प्रस्थ आहे, ते कसं वाढलं हे मला समजत नाही. अपमान करायचा लोकांचा. फटकन काहीतरी बोलून टाकायचं. ते तसं सहजयोगात नसलं पाहिजे. कोणी गरीब- श्रीमंत असला तर तो आहे तिथे आहे. परमेश्वराने ते केलेले नाही, समाजाने ते केलेले आहे, म्हणून त्याची काही मान्यता घ्यायची नाही. आणि सरळ मनाने, अत्यंत उदार हृदयाने प्रत्येकाला आपल्या हृदयात बसवले पाहिजे. कारण तुम्ही संत-साधू आहात. तुम्ही सगुणामध्ये आलेले निर्गुण आहात. तेव्हां तुमचं वागणं कसं सुंदर असायला पाहिजे ! त्याच्यामध्ये गर्विष्टपणा नको, जुन्या कल्पना नकोत, काही नको. जर ते झालं नाही तर तुमची सहजयोगाची प्रगती खुंटेल. म्हणून आज मी उघडपणे सांगते आहे, की फार जरुरी आहे, की सहजयोग्यांनी, साताऱ्याच्या विशेष करून, एक फार मोठी प्रगती करायला पाहिजे. आपापसात मैत्री पाहिजे. ग्रुपबाजी नको, गटबाजी नको आणि आपापसात बोलणं नम्रतेचं असलं पाहिजे. फारच नम्रतेचं! प्रत्येकाचा मान केला पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. आणि हा इकडचा, तो तिकडचा असं नाही करायला पाहिजे. सगळे आपल्या हृदयातले आहेत असं समजून वागलं पाहिजे. ह्याबद्दल तुम्ही क्षमा करावी. कारण मला स्वत:लाच समजलं नाही की दोनदा असे प्रोग्रॅम का झाले नाहीत. आणि त्या गोष्टीसाठी मी फार घाबरले होते. दुसरं काही नाही, पण सहजयोगाला सोडून तरी जाणार कुठे? सहजयोगाशिवाय मार्ग काय आहे? आणि त्यानंतर मग किती त्रास होणार? त्याचं किती झेलावं लागणार आहे? म्हणून व्यवस्थित चालावं. नदी तुमच्या घरापर्यंत आलेली आहे. आता गंगेचं जे काही आहे पुण्य ते उचलायचं आहे. आणि त्यासाठी इतका विचार करायचा नाही. फक्त एक समर्पित असून, 'माताजी, तुम्हाला आमचे सगळे जेवढे काही कुसंस्कार आहेत, आणखीन जेवढा काही आमचा अहंकार आहे, तो सगळा आम्ही समर्पण केला. अशी मनामध्ये प्रार्थना करून माणसाने सहजयोगाच्या वाढीला लागलं पाहिजे. त्यात नवरा असं म्हणतो किंवा बायको अशी म्हणते असं म्हणायचं नाही. सहजयोगी प्रत्येक ठिकाणी आपला व्यक्तिगत सहजयोग वाढवू शकतो. इतकेच नव्हे तर हळूहळू सगळ्यांना जिंकूनही घेऊ शकतो. अशा रीतीने एक सशक्त, समर्थ समाज आपल्याला तयार करायचा आहे. तो केल्याशिवाय आपल्या राजकीय ज्या काही व्यवस्था आहे त्या टिकू शकत नाहीत. तर मानवाचेच परिवर्तन पूर्णपणे झालं पाहिजे. सहजयोग म्हणून कोणीतरी मक्तेदारी घ्यायची आणि आम्ही काय ते मोठे सहजयोगी म्हणून मिरवायचं, असा सहजयोग नाही. सहजयोगामध्ये तुमची प्रगती काय झाली? तुम्ही कुठून आलात ? तुम्ही किती लोकांना जागृती दिली? किती लोकांना प्रेम दिलंत ? किती लोकांची दोस्ती झाली ? ते पाहिलं पाहिजे. तेव्हां आता ही मंडळी जाणारच आहेत. आता जाणारच आहेत पुढे तरीसुद्धा त्यांच्यामध्ये बसून तुम्ही कोण? काय? कुठले? त्यांचे पत्ते घेणं, त्यांच्याशी बोलणं, सगळ्यांनी प्रेमाने बोलून घ्यायचं. म्हणजे बरं वाटेल. नाहीतर इथे येतात पाहुण्यासारखे आणि जातात. पाहुण्यांची तरी व्यवस्था झाली पाहिजे. हे पाहुणे कोण आहेत ? त्यांना १४ तुमची ओळखसुद्धा नाही. विचारतात, कोणाकडे जायचं? कोणाला भेटायचं? काय करायचं? कसं करू? इतक्यांदा ते इथे आलेले आहेत तेव्हा तुम्ही सगळ्यांनी दोस्ती करून घ्यायची, त्याच्याबद्दल सांगायचं, की आम्ही सहजयोगी आहोत, असं, तसं, पुष्कळ बोलायला आहे आपापसात तुम्हाला. मजा येते त्याची. एक तऱ्हेचा अलिप्तपणा फार आहे, तो अलिप्तपणा काढून टाकला पाहिजे. तसेच कुठेही गेलं तरी साताऱ्याच्या लोकांनी वेगळं रहायचं, मुंबईच्या लोकांनी वेगळं रहायचं हे चुकीचे आहे. सगळ्यांनी सरमिसळ करून रहायचं. आणि सगळ्यांनी जाणलं पाहिजे. इतकेच नाही तर हिंदुस्थानातसुद्धा लोक साताऱ्याच्या लोकांना ओळखत नाही. मला आश्चर्य वाटलं. आता परवाच कोणी तरी येणार होते, म्हणे 'कोणाकडे यायचं, काय करायचं?' म्हटलं, 'तुम्हाला माहिती नाही साताऱ्याला कोण आहेत ?' ते म्हणाले, 'आम्हाला काही माहिती नाही.' सांगलीचं माहिती आहे. सांगलीला तर सेंटरच नाही, मग साताऱ्याचं का माहिती असू नये? तर सगळीकडे एकत-्हेचं पसरलं पाहिजे आपलं प्रेम, सगळ्यांना आपण जाणलं पाहिजे. सगळ्यांशी दोस्ती केली पाहिजे. सगळ्या विश्वात आपलं नाव झालं पाहिजे. लोकांनी सातारा काय हे ओळखलं पाहिजे. ब्रह्मपुरी माहिती आहे त्यांना आणि ब्रह्मपुरीची नदी माहिती आहे. तिचे कितीतरी फोटो काढले आहेत त्यांनी. पण साताऱ्याचे संचालक कोण आहेत? तिथे कोणते सहजयोगी आहेत? काही त्यांना माहिती नाही. तेव्हा असं अलिप्त रहायचं नाही. 'आम्ही सेवा करतो. कसली सेवा करायची! सेवा काहीच नाही, प्रेम करायचं आहे. प्रेम करतांना त्यांचं नाव, गाव सगळं माहिती पाहिजे. प्रेमाने बघा भारावून गेलं आहे सगळं. आणि असेच माझे हृदय भारावून जाते कधी कधी विचार करून, की आता प्रेम करायला कसं शिकवायचं तुम्हा लोकांना. तेव्हा आता रागावणं, रूसणं, फुगणं, वेगळं होणं, वैगरे गोष्टी सोडून नुसतं प्रेमाच्या सागरात डुंबून जायचं आणि आनंदाने रहायचं. म्हणजे सगळे व्यवस्थित होणार आहे आणि एक दिवस असा येईल की साताऱ्यालाच फार मोठं सेंटर होणार आहे. त्यासाठी आधी तुमचं वागणं असं असायला पाहिजे जसं साधु-संतांचं असतं. नाहीतर पहिल्यावेळेस मी आले होते तर किती लोक आले होते! हजारो लोक आले होते, तुम्हाला आठवत असेल तर. ते सगळे पळूनच गेले. ते टिकतच नाही. तेव्हा तुम्हीसुद्धा थोडी तसदी घेऊन शहरामध्ये एखादी शाळा बघावी. त्या शाळेमध्ये प्रोग्रॅम करावा. मग सगळं कार्य व्यवस्थित चालू होईल. पण तुमचं सेंटरच जर फार दूर असेल तर कसं होणार? तेव्हा सेंटर तिथून काढून शाळेमध्ये सेंटर केलं पाहिजे. लहान लहान ठिकाणी सुद्धा लोक सुरू करतात, मग इथेच सुरू करायला काय झालेलं आहे? सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे. मी जे म्हटलं ते लक्षात घ्यावं, त्याबद्दल मनन करावं आणि 'माताजी, आमच्यामध्ये हे सगळं प्रेम वाह देत. आमच्या हातून हे कार्य होऊ देत, अशीच मागणी करावी. १५ धर्म आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजेत औरंगाबाद १९ डिसेंबर १९८९ आजचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा आहे. औरंगाबादला आलं म्हणजे आपल्या घरी आल्यासारखं वाटतं मला. जवळच इथून पैठण म्हणजे प्रतिष्ठान आहे. तिथे आमचे पूर्वज राहिलेले आहेत, ते आपल्याला माहितीच आहे. सांगायचं म्हणजे असं, की सहजयोगाबद्दल गहन आस्था पाहिजे. आता इथे ३६ देशातले लोक आलेले आहेत. त्यांना गणपती म्हणजे काय ते माहिती नाही. तिथून सुरुवात. ज्यांना गणपतीचा 'ग' माहिती नाही, गणपती काय ते माहिती नाही, त्या लोकांनी इतकी ध्यानधारणा करून इतकं मिळवलं आहे आणि इतके गहन उतरले आहेत, तर आपण किती मिळवायला पाहिजे आणि आपण किती पुढे जायला पाहिजे ! पण तसं आपलं होत नाही. रशियामध्ये जाऊन माझ्या लक्षात आलं की रशियामध्ये हजारो लोक सहजयोगात आले. हजारो लोक आले. दोन हजार बाहेर तर दोन हजार आत, हॉलमध्ये. परत दुसर्या दिवशी सकाळी या म्हटलं तर चारचे चार हजार हजर परत आणि पार केल्यानंतर ते जमतात. सकाळी शिस्तशीर चारला म्हटलं तर चारला आंघोळ करून ध्यानाला बसतात पाचला. पाच ते सहापर्यंत ध्यानाला बसतात सगळे. यच्चयावत. १६ पण आपल्याकडे तसे नाही. आपल्याकडे सगळ्या कर्माला आपल्याला वेळ आहे. बहिणीच्या मुलीच्या अमक्याच्या तमक्याच्या लग्नाला जाऊ आम्ही. अजून आपल्यामध्ये कुर्ंस्कार आहेत हे सगळे. ही माझी बहीण, ती सहजयोगिनी नाही तर आपलं काही नातं नाहीये त्यांच्याशी. 'हेची सोयरे होती' सांगितलेले आहे ज्ञानेश्वरांनी. तुमची सोयरिक ही. ती सोयरिक आता विसरायची. आता तुम्ही सहज धर्मात आलात. आता ती सोयरीक विसरून आता ही तुमची सोयरीक आहे. ह्या मंडळींना बघा. सगळे सोडून तुमच्यासारखे वस्त्र घालून बसलेत इथे . तसेच आपणही आपलं हृदय उघडलं पाहिजे. माझी बहीण अशी. कुठेही गेलं की, माझ्या भावाच्या बायकोच्या आईला अमुक एक रोग आहे म्हणून हजर पहिल्यांदा. सगळा हाच विचार, की माताजींचा कसा उपयोग करून घ्यायचा? अरे, माझा काय फायदा करून घ्यायचा आहे? मला आत्म्याला मिळवायचं आहे. मला आत्म्यामध्ये उतरायचं आहे. माझं स्वत:चं उत्थान मला करून घ्यायचं आहे. ह्याच्यात राहिलं काय? बाकी सगळं तर आहेच. त्याला काही अंत नाही. अमुक झालं, तमुक झालं , नुसते जगाचे प्रश्न माझ्यासमोर ठेवायचे. मग मला असं वाटतं, की हे लोक देवाला शोधताहेत की जगाच्याच काहीतरी गोष्टी शोधत फिरत आहेत सहजयोग वाढायला पाहिजे. जो आपला वारसा आहे. हजारो वर्षे संत-साधूंनी मेहनत केली. ह्या जमिनीत आपलं रक्त ओतलेलं आहे. ह्याठिकाणी तर सहजयोग एकदम वाढायला पाहिजे. येऊ द्या. भामटा येऊ द्या. पैसे घेणारा येऊ द्या. हजारो येऊन उभे राहतील. ते आता एखादा दुष्ट सत्यसाईबाबाचं भूत असलं किंवा कोणाचेही असलं. ते पहिल्यांदा येणार. त्यांच्या पायावर हजारो लोक येणार. पण तो देतो काय ते बघा! म्हणे हिरे देतो. 'अहो, हिरे घ्यायला तुम्ही बाजारात जा!' त्याला देवधर्म कशाला पाहिजे असा. हा काही देवधर्म झाला? आजपर्यंत कोणत्याही संतांनी किंवा कोणत्याही अवतारांनी हिरे वाटले होते का? तो तुम्हाला देणार नाही. श्रीमंत लोकांना वाटतो आणि घेतो त्यांच्याकडून. ह्या अशा गोष्टींमध्ये फसून आपण जे आता वहात चाललो आहे, ते जरासं सुधारायला पाहिजे आणि तेच मला आश्चर्य वाटतं, की हिंदुस्थानामध्ये सहजयोग तेवढा पसरत नाही. एवढा पसरत नाही. आता पुण्याला, मुंबईला, दिल्लीला बरा चाललाय, पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगायला पाहिजे, की तुम्ही आता बसलेत कशासाठी ? आत्मसाक्षात्कार घ्या. ह्याच्यासाठी सर्व धर्म केला. आजपर्यंत एवढी मेहनत केली, आता ह्याच्यापुढे काय करायचं आहे तुम्हाला, काय मिळवायचं आहे, बोलायला पाहिजे. पण आपण आपले लाजतो आणि ते गुरूचे झेंडे लावून फिरतात. सगळे भामटे आहेत इथून तिथून मी सांगते तुम्हाला! सगळे भामटे आहेत. ह्या गुरूंमध्ये मला अस्सल एकही दिसत नाही. असला तर मी स्वत: सांगेन की आहे म्हणून. पण सगळे इथून तिथून भामटे आहेत आणि ते तुम्हाला लुटायला बसलेत. त्यांची तुमच्या प्रॉपर्टीवर, पैशावर, बायकांवर, मुलांवर सगळ्यांवर नजर आहे, पण तुमच्या आत्म्यावर नजर नाही. तेव्हा तुम्हाला स्वत:चं भलं करून घ्यायचं आहे नां! कोणत्या तरी गुरूच्या मारग लागून आपण वाया जाऊ, ही कल्पनाच तुम्हाला येत नाही. बहतेक लोकांना कॅन्सरचा १७ रोग, हा रोग, तो रोग हा ह्या गुरूंच्यामुळे होतो. हे काहीतरी प्रेतविद्या, स्मशानविद्या, भूतविद्या करतात सरळ आणि लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतात. आणि तुमचे पैसे काढत असतात सारखे. तुमच्या जशा या तुम्ही पणत्या लीवल्या गुरूला पेशाची काय गरज असायला पाहिजे ? आज आम्ही श्रीमंत घराण्यातले. साहेबांची मोठी पदवी म्हणून किंवा ह समया आम्ही सगळे घालतो. जर आम्ही गरीबाच्या घरी जन्माला आलो लावलेल्या असतो तर गरिबीत राहिलो असतो. आम्हाला काही त्रास होत नाही कुठेही झोपायला. तुम्ही म्हणाल तर इथे झोपू शकतो. पण ह्यांचं लक्ष आहेत, त्या कुठे? असे अनेक गुरू आहेत, तऱ्हेतऱ्हेचे. त्यांचं एवढं बोकाळलेले २मयांनी दीप आहे. ते गजानन महाराज. केवढा ऋ्रास झाला मला त्या माणसाचा. भयंकर त्रास, काहीही म्हणा. फारच वाईट मनुष्य होता. ज्याने त्याची पोथी वाचली त्याला काही ना काही तरी रोग होणार. तो मनुष्य पन्नास लावली त२ त्यांची प्रकाश वर्षापर्यंत टिकला तर नशीब समजायचं. आता मी स्पष्टच सांगते तुम्हाला. आता त्याच्या पोथ्या वगैरे गोदावरीत नेऊन घाला. ज्यांनी त्याच्या पोथ्या वाचल्या, त्यांचे चेहरेच असे होऊन जातात, येणारच की की विश्वासच बसत नाही. सहजयोगात येऊनसुद्धा चालू असतं त्यांचं! तर जाही! ताच तौ इकडे लक्ष घालायला पाहिजे. प्रकाश धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे आपल्यामध्ये जी धारणा होते, धार आहे, तिचा धर्म आहे हा. जी आपल्यामध्ये धारणा होते तोच धर्म कार्यान्वित होतो. आहे. आणि ती धारणा काय आहे? तर आपल्यामध्ये दहा धर्म आहेत. तौ जुसती प्रकाश ते धर्म आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजेत. ते कुंडलिनीशिवाय होऊ शकत नाहीत. उद्या मी म्हटलं, खोटं बोलू नकोस. तसं जमणार नाही. म्हटलं, चोरी करू नकोस. ते जमणार नाही. उद्या म्हटलं, की कोणाला नाही, त२ त्याचे कार्य धडतं. त्या दुखवू नकोस, तर ते जमणार नाही. पण हे धर्म आपोआप आतमध्ये जागृत झाले तर सांगायची गरज काय? आपोआपच घडतं. सगळं काही आपोआपच सुटतं. काही सांगावं लागत नाही. आपोआपच का्यने मनुष्याला सगळे होतं. कारण तुमच्यात तो धर्म आहे. जशा या तुम्ही पणत्या लावल्या किंवा ह्या समया लावलेल्या आहेत, त्या समयांना दीप २शक्तता येते. लावला तर त्यांचा प्रकाश येणारच की नाही! तसाच तो प्रकाश कार्यान्वित होतो. तो नुसता प्रकाश नाही, तर त्याचं कार्य घडतं. त्या १८ कार्याने मनुष्याला सशक्तता येते. सशक्त झाला, त्याच्यात ती शक्ती आली म्हणजे मग तो कशाला जुमानत नाही. केवढं मोठं हे आपल्याजवळ दान आहे! साधु-संतांचं आहे. शिवाजी महाराजांचं आहे. काय पुरुष होता तो! तो पण एक आत्मसाक्षात्कारी महापुरुष होता. तेव्हा आपलं तसं आयुष्य झालं पाहिजे हे शिकलं पाहिजे. ह्यांच्यापासून शिकण्यासारखं तसं विशेष नाही. मी तुम्हाला सांगते. एकच शिकण्याचं आहे, की ज्यांनी कधी गणपतीला जाणलं नाही, ते तुम्हाला माहिती आहे, ते एवढे गहन कसे उतरले ? तेव्हा ह्यांच्यात काहीतरी गहनता आहे. बाकी जे काही आपण फॉरेनच्या लोकांचं शिकायला म्हणतो, त्यांच्यात काही शिकण्यासारखं नाही. त्यांच्या संस्कृतीत काहीही चांगलं नाही. सगळा सर्वनाश होतो आहे तिकडे. तुम्ही बघाल, तर इंग्लंडसारख्या देशामध्ये दोन मुलांना एका आठवड्यात आई-वडील मारत असतात. आपल्याकडे कोणी मारतं का कोणाला? लहान लहान मुलांना कोंडून मारतात, चिडून, आई-वडील आणि पुष्कळशी मुलं आपल्या आजोबा-आजंना मारून टाकतात. असले भयंकर प्रकार आहेत. रस्त्याने तुम्ही चालले तर तुमची पर्स ओढून घेतील, तुमचं हे ओढून घेतील, मारामाऱ्या चाललेल्या आहेत नुसत्या. अमेरिकेत तर तुम्ही दागिने घालून जाऊच शकत नाही. सगळे ओढून घेतील, लुबाडून घेतील. ड्रग्ज काय आलेले आहेत ! त्यांच्याकडे असले घाणेरडे रोग आलेले आहेत ! सगळा प्रकार इतका भयंकर आहे! त्यासाठी ते इथे आले. शांतीसाठी. तर आपल्याला वरदान आहे बरेच. देवकृपेने आपल्याकडे संस्कृतीमध्ये पुष्कळ वरदान आहे. आपल्या वागण्यात, आपल्या समजण्यात पुष्कळ फरक आहे. पण फक्त धर्माच्याबाबतीत आपण कोते आहोत . धर्म कुठे आहे, आतमध्ये. तो धारण केला गेला पाहिजे. तो झाल्याशिवाय, बाह्यातले धर्म हे माणसाने केलेले धर्म आहेत. अहो, देवळामध्ये सुद्धा काय प्रकार चालले आहेत, तुम्हाला ते सांगायला नको. नुसते पैसे उकळायचे. आमच्याइथे महालक्ष्मीच्या देवळामध्ये, मुंबईला, तर गांजा वगैरे विकतात. अगदी सर्रास, म्हणजे हे काय? देव झोपी गेला आहे, की ह्या लोकांचा राक्षसीपणा एवढा वाढलाय की तिथून उठूनच गेला. असे प्रत्येक देवळामधले प्रकार. खंडोबाच्या देवळाचं म्हणाल तर, विठ्ठलाचं देऊळ आहे, कोल्हापूरला ते काय कमी लोकं आहेत. प्रसिद्ध लोक आहेत. का असं होतंय? लोक म्हणतात, तुम्ही देव देव म्हणता, मग असं कसं होतंय माताजी?' देव हा आहे, पण तुमच्या खिशात नाहीये. तुम्ही जसं म्हणाल तसं देवाला वाकवू शकत नाही. त्याला वाट्टेल तसं करू शकत नाही तुम्ही. देव हा आहे, तो जाणून घेतला पाहिजे कसा आहे ते. तो जाणल्याशिवाय आपण उगीचच प्रत्येक देवळात देव बघतो, तसं नाहीये. आहेत आता, स्वयंभू देवळं आहेत. पण तेही सगळे खराब करून टाकलेत. माणसाला काहीही दिलं तरी तो खराब करून टाकतो. जंगल तसं स्वच्छ असेल, चार माणसं जातील तर खराब होणार. तसेच धर्माचे करून ठेवलेले आहे. त्यामुळे १९ हे आपल्याला अनास्था वाटते की, 'हा धर्म कसा ? मग अशा धर्मात काय करायचं? माताजी, असे लोक आहेत. असे दष्ट आहेत. मग कसं काय करता ? आम्ही एवढं पारायण केलं! आम्हाला सांगितलं आमच्या गुरूंनी पारायण करा. तर आम्ही आजारीच पडलोय. असं कसं झालं?' अहो, तुमचे अजून परमेश्वराशी काहीही लागेबांधे झालेले नाही. काहीही तुमचा अजून संबंध झालेला नाही. जोपर्यंत ह्याचा (स्पिकर) संबंध मेनशी झालेला नाही तर इथे बसून, बडबडून काय होणार आहे माझं? तसेच आहे. जर तुमचा संबंध झाला, संबंधच झालेला आहे म्हणजेच योग. हाच योग प्राप्त झाला पाहिजे आणि तो योग झाला, म्हणजे जे परम चैतन्य आहे ते तुमच्यातून वाह लागते आणि तुम्ही शक्तिशाली होता. पण आधी हे समजलं पाहिजे, की आत्तापर्यंत आम्ही केलेले आहे ते काही शहाणपण नव्हते. टेलिफोनशी संबंधच नाही आणि तुम्ही टेलिफोन केला तर त्याच्यात काय शहाणपणा! तुमचा तसेच आहे. जोपर्यंत कनेक्शन नाही, तोपर्यंत काही नाही. तेव्हा रामाचं नाव घेतलं तर राम रागावणारच. 'तुझा काय संबंध माझ्याशी. तू कोण होतोस ?' कळलं नां! तसा प्रकार आहे. तेव्हा मंत्र वगैरे जे काही म्हणत असाल, ते द्या सोडून आधी तुम्ही सहजयोग धारण करा. मग तुम्हाला कळेल, तुम्हाला कोणता त्रास आहे, तुम्हाला कुठे तकलीफ आहे. काय आहे ते बघू आणि तसं आम्ही तुम्हाला व्यवस्थित मंत्र सांगू, की हा मंत्र तुम्ही म्हणा. त्याचं मोठं ज्ञान आहे. त्याचं मोठं शास्त्र आहे. उठल्यासुटल्या एक मला मंत्र दिला, काय अमका, काय तमका. अरे, काय बघून दिला की असेच देतोय ? त्याला पैसे दिलेय. गाढवही देईल ते. त्याला कशाला गुरू पाहिजे, मंत्र द्यायला. असा सांगोपांग विचार पाहिजे. जर तुमच्यात चाणाक्षपणा नसला तर मूढांसाठी सहजयोग नाहीये. रामदासांनी सांगितलं आहे, मूढांसाठी नाही. रामदासांना विचारलं, 'कुंडलिनी जागृत करायला किती वेळ लागतो.' 'तत्क्षण,' शब्द वापरला आहे, 'तत्क्षण.' त्याक्षणीच कुंडलिनी जागृत होईल, पण अधिकारी पाहिजे. अधिकारी असला तर जागृती होणार. अधिकारी नसला तर कधीच होणार नाही. अधिकारी म्हणजे त्या माणसाचं आयुष्य आहे. तेव्हा पहिली गोष्ट पाहिली पाहिजे, की हा कुंडलिनीचं जागरण करतो की नाही. जर तुमच्याकडून तो पैसे उकळतोय, तर तो काय तुमची जागृती करणार? तो तर तुमचा मिंधा! तुमचा नोकर! तुम्ही रहाल का कोणाच्या दमावर? तुम्हाला जर येऊन म्हटलं की, तुम्ही फुकटखोरी करा. तर तुम्ही कराल का? नाही करणार. तर त्याला तेवढाही मान नाही. फुकटखोरी करून राहतो, खोटे बोलून राहतो. तर सत्यावर उतरायला पाहिजे. जर सत्य धरलंय तर 'जे सत्य धरलंय तेच मिळालं पाहिजे मला,' असा हट्ट धरायचा. तेव्हाच तुम्हाला सत्य मिळेल आणि २० वास्तविकता मिळेल. नाही तर असत्यावर उभे राहिले तर असत्य मिळेल. असत्याने तुम्हाला संतोष मिळणार नाही, समाधान होणार नाही. ज्यासाठी ही सगळी धडपड आहे, ज्यासाठी तुम्ही उपवास करता, ज्यासाठी हे सगळे त्रास उचलले, देवाला टाहो फोडला, ते आपल्या सगळे दारातच आहे. म्हणून आपल्या हृदयातच आधी परमेश्वर ओळखला पाहिजे. आपल्या हृदयात जो परमेश्वर मिळेल त्यानेच हृढयीतच आधी आपण जाणू शकू, त्यानेच आपल्याला सत्य मिळेल, एकमेव सत्य परमे१्व२ कळेल. सत्य काय आणि खोटं काय ? सध्यातरी आपली अशी स्थिती आहे, अधांतरी! सध्या जोपर्यंत आपला परमेश्वराशी संबंध झालेला औळखला नाही, तोपर्यंत परमेश्वराबद्दल काहीही धारणा करून परमेश्वर मिळत पाहिजे. आपल्या नाही. परमेश्वराची तुम्ही धारणा करू शकत नाही. ती आपल्यामध्ये धारणा झाली पाहिजे. परमेश्वर हा असा, परमेश्वर हा तसा, त्याला हृढयात जो शिव्याही द्यायच्या. साकडे घालायचं की, 'तुझं मी एवढं केलं, माझें प२मेशव२ मिळेल का नाही करत.' अरे, पण तुझा संबंधच नाही! परमेश्वराचा काय दोष त्याच्यात! परमेश्वराने तुमचं जर काही केलं नाही, तर त्याचा काय त्यानेच आपण दोष आहे? तुमचा त्याचा संबंध व्हायला नको का? जीणू शकू, तेव्हा सहजयोग आता तुमच्या दारी आलेला आहे. सगळ्यांनी सहजयोग स्वीकारावा आणि त्याचं वर्णन करावं. इतकेच नव्हे, तर तो त्यानेच आपल्या डोक्यावर धरून सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आपल्याली सत्ये पुढच्या वेळेस मला आशा आहे, की तुमच्या औरंगाबादला बरीच मंडळी येतील. आता बाहेरून आले, तर गावातले जास्तच मिळेल, एकमेव पाहिजे ह्यांच्यापेक्षा. तर आज संध्याकाळी बघूयात कसं काय होतं ते ! २त्य कळेल. वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्याला कशाबद्दल विश्वास असला आणि त्याबद्दल कोणी काही म्हटलं, तर फार वाईट वाटतं. समजा सत्य का्य आणि तुमच्या हातात साप आहे. मी म्हटलं, की तुमच्या हातात साप आहे, सोडा. पण अंधार आहे, दिसत नाहीये. तर तुम्ही म्हणाल की, खोटं काय? 'साप नाही दोरीच आहे.' पण जर प्रकाश आला, तर त्या प्रकाशातच कळेल नां, की हा साप आहे म्हणून. तर आधी प्रकाश घेतला पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे, सहजयोग्यांनीसुद्धा, की ज्यांना अजून प्रकाश मिळालेला नाही, त्यांना २१ प्रेमाने समजवून, वळवून घ्यायचं. त्यांना म्हणायचं, 'बघा, आमचं आयुष्य कसं बदलत चाललंय.' तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्या गोष्टी पुढ्यात येतील. आधी ते मागायचं नाही. आधी मागायचं 'प्रकाश दे. आधी आम्हाला परमचैतन्य दे.' आणि त्याच्यानंतर पुढ्यात, जिथे झालं तिथे अगदी समोर, दत्त. काहीही, कोणतेही प्रश्न राहणार नाहीत. सगळं अगदी व्यवस्थित होईल. तेव्हा तुम्ही कृपा करून सहजयोगामध्ये गहनता प्राप्त करा. बाकी सगळं व्यवस्थित होणार आहे. त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. फक्त सहजयोगाकडे लक्ष द्या. आपल्यातला आत्मा जागृत झाला की नाही, ह्याची पूर्णपणे प्रचिती आली आहे की नाही. आपण आता गहनात उतरलो आहोत की नाही. आणखीन निर्विचारितेच्या पलीकडे, निर्विकल्पतेत आपण उतरलो की नाही, इकडे लक्ष दिलं पाहिजे. उगीचच सहजयोग म्हणजे काहीतरी, जसं बाजारात जायचं असा ज्यांनी केला त्यांना सहजयोगाचा कोणताच लाभ होणार नाही. गहनात उतरलं पाहिजे. वेळ दिला पाहिजे. आजकाल वेळ कमी आहे. पण सकाळी दहा मिनिटं, संध्याकाळी दहा मिनिटं, पूर्ण आदराने केलं की झालं, व्यवस्थित होतं. त्याला काही करावं लागत नाही. तर एकंदरीत सगळा, सांगोपांग विचार करायचा. आपल्याला आयुष्यात काय मिळालं आहे, आपण आयुष्यात काय मिळवलं आहे. लोकांशी असं बोलायचं, 'काय हो, काय मिळालं, तुम्ही एवढं जप, तप केलं! हे केलं.' पहिल्यांदा डोळे उघडायचे, प्रकाशात यायचं आणि जे व्यवस्थित ते बघायचं. रूढीगत, फार रूढीगत आहे हे सगळं. त्या रूढींना तोडून टाकलं पाहिजे आणि समजलं पाहिजे, की आपणच त्या मोठ्या मंदिराचे खांब आहोत. आपलाच सगळा आधार होणार आहे. आता तुम्ही सुरुवातीचे सहजयोगी आहात म्हणून फार समजवून सांगितलं, पण तुम्ही काही सगळ्यांना सांगू नका. हळूहळू त्यांची सुटका करा. जाऊन सांगितलं, की 'तुझा हा गुरू आहे, त्याला सोड.' तर तुम्हाला मारायलाच धावतील. व्यवस्थित, आरामात समजवून सांगायचं, 'हे सोडा ह्याने काय मिळालं तुम्हाला? इतके दिवस केलं तर त्याने काय मिळालं? तुमच्या आई-वडिलांना काय मिळालं. हे कशाला करता ?' जे खरं आहे ते मिळवा. तुम्ही स्वत:चे गुरू होऊ शकता मग का नाही करावं. आता आम्ही एवढं कार्य काढलेले आहे. तुम्ही ते करावं आणि स्वीकारावं. २२ ल भः २। क २ ्० साट ८ या ु ुभ मूत्त्यांपेक्षाही तुम्ही एक मोठी मूर्ती आहात. तुम्ही स्वत:च एक मंदिर आहात. ती मूर्ती काही तुमचे व्हायब्रेशन्स थोडीच ओळखू शकते! बस, व्हायब्रेशन्स तर तिच्यामधूनच येत असतात, बस, अजून काय होत असतं! तुम्ही तुमचे हात हलवू शकिती. दुसर्यांनी तुम्ही जागृती देऊ शकता. कोणाची चक्रं खराब असतील तर तुम्ही ती ठीक करू शकता. मूर्ती तर तिथे बसून व्हायब्रेशन्स सोडत असते. प.पू.श्रीमाताजी, मुंबई, ६/४/१९७६ प्रकाशक। निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१ , ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in तुमच्या ज्या वाती आहेत त्या नीट ठेवा. तमचे शरीर नीट ठेवा. जो I, तुमचा दिवा आहे. त्यात असलेली तुमची शक्ती म्हणजेच तेल ते बौल्दिक जमाख्चात खर्च नका. ज्वाळेला सरळ ठेवा. ज्वाळेचा वर्चा भाग न आहे, तो आईला जोडा. तिच्या पायामध्ये बांधा. ज्वाळा सरळ उठेल. निर्विचारितेमध्ये निर्भिडपणे जळत राहील. प.पू. श्रीमाताजी, ६/ ४/१९७६, मुंबई ---------------------- 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-0.txt नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ चैतन्य लहरी मराठी 53 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-2.txt अंकात या परमेश्वराचं कार्य ...४ ख्रिसमस पूजा, पुणे, २६ डिसेंबर १९८२ सहजयोग्यांनी अत्यंत प्रेमळ असले पाहिजे ... सेमिनार अँड मिटिंग, ब्रह्मपुरी, २० डिसेंबर १९८८ धर्म आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजेत ..१६ सार्वजनिक कार्यक्रम, औरंगाबाद, १९ डिसेंबर १९८९ सहजयीगामुळे आपल्यामध्ये जी सात सेंटर्स आहेत, परमैश्वराने आपल्यामध्ये जी सुंदर व्यवस्था केलेली आहे, ती कुंडलिनीच्या प्रकाशाने जागृत होते. आणि ह्या देवती जीगृत होऊन त्याचे पूर्ण संतुलन करतीत प. पू.श्रीमातीजी, मुंबई, २६ डिसेंबर १e७५ कृपया लक्ष द्यी : चैतन्य लहरी २०१६ च्या अंकांची नोंदणी सुरू झालेली आहे आणि ती १५ डिसेंबर २०१५ ला समाप्त होईल. 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-3.txt ा० ५० परमेश्वराचं कार्य पुणे, २६ डिसेंबर १९८२ ४ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-4.txt आता पुण्याच्या केंद्राला नेहमी मी अत्यंत महत्त्व दिलेले आहे आणि ह्या वेळेला अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे आम्ही पुण्याला आलेलो आहोत. पुण्याला विशेष महत्त्व देण्याचं कारण म्हणजे पुणे ही पुण्यभूमी आहे. आणि एकदा सांगितलं की पुण्यभूमी आहे, तर डोक्यात आलं की त्याला मिळतं असं म्हणू शकत नाही. पण ह्या पुण्यातच कार्य होणार आहे आणि अत्यंत प्रचंड कार्य आहे आणि त्याच प्रचंड कार्याची जेव्हा गती घेतली गेली त्या गतीत सहजयोग टिकणार नाही. तेव्हा आपली गती सहजयोगाला योग्य असली पाहिजे. अर्धवट डोक्याचे जे लोक आहेत त्यांनी आपली गती ठीक करून घ्याव. सहजयोगामध्ये फक्त पुण्य कमवायचं आहे. दुसरं काहीही कमवायचं नाही. तेव्हा हे पुण्य मिळवायचं काम आम्ही कसं करावं? त्यात आम्ही कसं गहन उतरावं ? त्यासाठी काय मेहनत करायला पाहिजे? इकडे लक्ष दिलं पाहिजे. आज एक विशेष दिवस आहे की आज ख्रिस्ताचा जन्म आहे. आणखीन एवढ्या मोठ्या पुण्यात्म्याचा जन्म आज ह्या पुण्यभूमीत झाला. म्हणजे आम्हाला अस वाटतंय, की आज काहीतरी विशेष दिवाळी झालेली आहे आणि ह्या दिवशी हे कार्य ह्या पुण्यभूमीत करावं, म्हणजे काहीतरी विशेष व्यक्ती घडणार आहे आणि परमेश्वराचं कार्य काहीतरी विशेष रूपाने घडणार आहे. तेव्हा हे कार्य फार जोरात फोफावेल. मला दिसतंय ते. फार जोरात फोफावणार आहे. पण तुम्ही कुठे राहन जरासं वाईट वाटेल. तेव्हा ह्या मोठ्या अशा मंथनामध्ये तुम्ही आलेले आहात, ह्या मंथनाला चिकटून गेलात ? मला रहा. स्वत:चे काहीतरी विचार घेऊन किंवा स्वत:च्या बद्दल काहीतरी कल्पना करून तुम्ही सहजयोगात येऊ नका. काही ह्यातलं तुम्हाला मिळवायचं नाहीये. तुम्हाला स्वत:चं मोक्षाचं साधन, परमेश्वरी साधन, असं जे आत्मास्वरूप तुमच्यात आहे तेच मिळवायचं आहे. ह्यातलं काहीही आम्हाला सहजयोगात मिळवायचं नाहीये. ते आई आम्हाला देवो, ह्याच्यापलीकडे आम्हाला काहीही नको. असा आज अगदी पूर्ण निर्धार करून तुम्ही पूजेला बसलं पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही जर आपली एक स्थिती ठेवली तर तुमच्यामध्ये हे उतरणं फार सोपं आहे. कारण जर घागरच भरलेली असली आणि त्याच्यामध्ये घाण असेल तर त्या घाणीचा रंग येऊन तरी काय करणार? तेव्हा आधी हे स्वच्छ करून घेतलं पाहिजे. आम्हाला आणखीन काहीही नको.. सहजयोगाचे जे लाभ आहेत, त्यातला एकच लाभ म्हणजे आत्म्याला मिळवणं. त्यानंतर शारीरिक लाभ होतात, मानसिक लाभ होतात, बौद्धिक लाभ होतात आणि नैतिक लाभ ही होतात. हे इतरांचं लक्षण आहे. आम्हाला फक्त ते परमच पाहिजे, तेच आम्हाला मिळू देत. त्याच्या पलीकडे आम्ही काहीही मागत नाही, असा मनामध्ये निर्धार करून आज आपण सगळ्या पुण्यातल्या लोकांनी बसायला पाहिजे. तुम्ही काहीही केलं तरी मी तुमची आई आहे, मी तुम्हाला क्षमा करेन. पण असे समजू नका, की तुम्ही स्वत:ला क्षमा करू शकता. असा जेव्हा योग येणार आहे आणि त्या दिवसासाठी अती कार्ये केली पाहिजेत. बाह्यात हजारो लोकांना जरी पार केलेले असले तरी आतमध्ये आमच्यात काय फरक झाला, ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला अजून राग येतो १ ५ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-5.txt का? आम्ही कलेक्टिव्हिटीमध्ये बोलतो का? आम्ही उगीचच लोकांशी भांडतो का? आम्ही काहीतरी उगीचच सांगत बसतो का? किंवा आमच्यामध्ये काय काय वाईटपणा आलेला आहे, तिकडे लक्ष असायला पाहिजे. जर तुमच्यामध्ये आतमध्ये फरक नाही झाला, तर तुमच्यामध्ये धार्मिकपणा नाही आला असं होईल. जर तुमच्यामध्ये असं साक्षी स्वरूप आलं तर त्याला काही अर्थ रहाणार नाही. मला हे साक्षी स्वरूप मिळायला पाहिजे. म्हणजे .... बघतांना हे एक नाटक होऊन राहिलं आहे, तुम्ही आम्हाला नाटक दाखवलं आहे. ते आम्ही नाटक बघायचं. अशा रीतीने तुम्ही तिकडे लक्ष दिलं, तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल, की तुमची प्रगती होत आहे आणि जर तुमचं स्वत:कडे लक्ष नसलं तर तुमच्या हातातून जरी हे वारं वाहतं आहे, जसं ह्या मशीनमधून माझा आवाज जातो आहे, तर ह्याच्यावर काही परिणाम होतो आहे का ? मंत्र जरी चालले माझ्या तोंडातून तर ह्याला काही पुरावा होतो का? म्हणजे जसं मेल्यासारखे आहे तसंच आहे ह्याच्यातून मंत्र चालले आहेत ह्याचा काही उपयोग आहे का ? जसं आपण दगडचे दगड राहिलो. आपल्यातले व्हायब्रेशन्स फक्त वाहतात. आम्ही हजारो लोकांना पार केलेले आहे. त्याने काहीही अर्थ निघत नाही. तुम्ही स्वत: ह्याबाबतीमध्ये किती निष्ठेने, किती हृदयाने कार्य करता, इकडे लक्ष ठेवले पाहिजे. ह्याच्यामध्ये तुमचा काहीतरी हेतू आहे का? काहीतरी बाह्यातला हेतू आहे का ? इकडे स्वत:कडे लक्ष ठेवलं पाहिजे. कारण आपण आपल्यालाच सर्व करतो. आपण आपल्यालाच दुखवतो आहोत आणि आपण आपल्यापासून दूर होतो. असं जर केलं तर त्याने काहीही लाभ होणार नाही आणि मला सगळें समजतं. मी जरी वरपांगीपणे तुम्हाला म्हटलं, की या म्हटलं आणि नाही ही म्हटलं तरी दोन्हीही गोष्टींचा अर्थ एकच आहे. म्हणजे काय ? तुम्ही स्वत:कडे लक्ष दिलं पाहिजे, माताजी तुम्हाला काही विशेष सांगणार नाहीत, हे जरूर म्हणते. पण प्रत्येक मनुष्य कसा आहे ? किती पाण्यात आहे ? हे सगळं मला माहिती आहे. तेव्हा आपण माताजींना साक्षी ठेवून आपण कसे आहोत तिकडे लक्ष दिले पाहिजे आणि स्वत:ला ठीक केलं पाहिजे. पुण्याबद्दल ज्या काही तक्रारी मी ऐकल्या त्या म्हणजे आश्चर्याच्याच आहेत. पण तरीसुद्धा असं वाटतं की हळूहळू ह्या ठीक होतील. पहिल्यांदा आपली दृष्टी ठीक करायला पाहिजे. एकदा वर्षातून माताजी इथे येतात. त्यांचा आम्हाला काहीही खर्च नाही. आम्हाला काहीही करावं लागत नाही त्यांच्यासाठी. फक्त आम्ही आमचा खर्च माताजींच्या डोक्यावर नाही घातला पाहिजे. एवढी एक साधी गोष्ट आपल्या लक्षात येऊ नये! म्हणजे हे काही सांगायला पाहिजे का? वेळेला असं मला पुढच्या सांगायला लागलं नाही पाहिजे. तुम्ही स्वत:च विचार केला पाहिजे, की माताजी इथे आल्या आहेत. आम्ही काही माताजींच्यासाठी करायच्या ऐवजी माताजींनीच आमच्यासाठी खर्च करायचा ! तेव्हा स्वत:कडे अत्यंत प्रेमपूर्वक पहायला पाहिजे. आपल्याला चिखलात रहायचे नाही. हजारो लोक चिखलात आहेत. मग सहजयोगाचा फायदा काय? जर ह्या चिखलात रहायचे आहे, मग सहजयोगाला येऊन उपयोग काय? एकदा तुम्ही आपल्या आत्म्याला मिळवलत, तर तुमचे सगळे त्रास दूर होणार, हे तुम्हाला माहिती आहे. ज्यांनी मिळवलं त्यांचे चेहरेच वेगळे दिसतात. ज्यांनी नाही मिळवलं त्यांच्या चेहऱ्यावखूनच दिसतं. 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-6.txt म्हणून सगळ्यांना सांगायचं, की आजच्या ह्या महान पर्वाच्या दिवशी जेव्हा ख्रिस्तासारख्या महान माणसाला आपण समर्पण केलं की ज्याने सबंध आयुष्य परमार्थाशिवाय काहीही पाहिलं नाही. त्याचा मान ठेवण्यासाठी त्याचं चारित्र्य आपल्यामध्ये आणायचं. त्याची व्यवस्था आपल्यामध्ये आली पाहिजे. जो आपल्यामध्ये आज महान आहे, असा आपल्याला महाविष्णु अवतार घेऊन आलेला एवढा पुरुष जागृत आहे तर त्याची काहीतरी स्थापना करण्यासाठी त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी, त्याची इज्जत करण्यासाठी त्याला साजेल असं, त्याला शोभेल असं, आपलं वर्तन असायला पाहिजे. आणि ते वर्तन आहे का? स्वत:कडे बघा. त्यात वाईट वाटून घेऊ नका. दुसर्यांना बोलणं फार सोपं आहे. दुसर्यांच्या गोष्टी करणं फार सोपं आहे. इकडून तिकडून भांडाभांडी लावणं फार सोपं आहे. ही सगळी कामे तुम्ही करू शकता. केली आहेत. पुष्कळ जन्म केलीत. ह्या जन्मात करायला पाहिजे असं नाही. आता ह्या जन्मात करायचं आहे ते दुसर्यांसाठी. ते म्हणजे काय तर सूक्ष्मात उतरायचं आहे. तेव्हा बाह्यातलं जे काही आहे ते सोडून टाकलं पाहिजे. आणि सूक्ष्मात उतरण्यासाठी .. (अस्पष्ट) इकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे मात्र समजतं मराठी माणसाला की माताजींच्या पूजेत फार लाभ आहे. पूजेला सगळे येणार. माताजींच्या पूजेला आल्यानंतर आतमध्ये उतरतं. ही गोष्ट खरी आहे. मी मान्य करते. पण ह्याच्यात कार्य माझेच आहे. तुम्ही काय केलं? माझी चक्र चालत नाही, तुमची चक्र चालत नाही, तुम्हाला खाली उतरवते. तुम्ही जर ध्यानधारणा केली नाही, मेहनत केली नाही तर ही जी .....(अस्पष्ट) पूजेचा लाभ होतो आपल्याला. पण तो पूजेचा लाभ आपण टिकवून नाही ठेवला, ते जर आपण धन टिकवून नाही ठेवलं तर त्या धनाचा आपण उपभोग कसा घेणार? आता जे काही पूजेत मिळवणार ते आम्ही जपून ठेवणारच, आणि त्याच्यावरही कळस करू असा निर्धार करून बसायचं. कारण त्याला काही शिक्षण लागत नाही, त्याला काही बुद्धी लागत नाही. त्याला खर्च लागत नाही. पैसे लागत नाही. फक्त काय तर आस्था पाहिजे! स्वत:बद्दल आस्था पाहिजे. माझ्याबद्दल नको. माझ्याबद्दल आहे तुम्हाला मला माहिती आहे. म्हणजे माताजींकडून काय मिळेल ते घ्यावं, पण आमच्याकडून काय आमच्यासाठी मिळेल, स्वत:साठी आम्ही काय करू शकतो ? आम्ही आपला कसा लाभ करू शकतो ? आम्ही आमचा कसा लाभ करू शकतो? इकडे आस्था नाही. स्वत:बद्दल आस्था ठेवायला पाहिजे. मला तुमच्याबद्दल आस्था आहे. थोडी जरी तुमच्याबद्दल तुम्ही आस्था ठेवली, तर स्वत: अत्यंत गांभीर्याने कसं रहायचं, स्वत: च्या इज्जतीने कसं वागायचं? आपण कसं मोठं व्हायचं? हे सगळं समजेल. आणि तुमच्यात जेव्हा हे उतरेल तेव्हा तुमच्या मुलांना ते दिसेल, आणि ते पुढे जातील. तेव्हा आज असा निर्धार करायचा आहे, की आज आपण ख्रिस्ताच्या दरबारात बसलो आहोत, तेव्हा रूढीगत जे आहे ते सोडून द्यायचं. डोक्यात आपल्या जे काही विचार आहेत ते सोडून द्यायचे. जे समोर आहे ते बघू. आपला अहंकार सोडून द्यायचा. ७ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-7.txt क ब्रह्मपुरी, २० डिसेंबर १९८८ सहजयोग्यांनी अत्यंत प्रेमळ असले पाहिजे ८ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-8.txt आता साताऱ्याच्या आणि ब्रह्मपुरीच्या, अंगापूरच्या सर्व सहजयोग्यांना असं सांगायचं आहे, की दोन वेळेला असं झालं की आम्ही अंगापूरच्या प्रोग्रॅमला येऊ शकलो नाही. फार वाईट गोष्ट आहे. मला बरं नाही वाटलं ते. असं कसं झालं एकदम! असं का झालं? असं होत नाही. मागच्या वेळेला बँकेने एवढा त्रास दिला मला. पैसे द्यायला तयार नव्हते. पैशाशिवाय हलायचं कसं! त्यामुळे इकडे येऊ शकले नाही. दुसरं ह्यावेळेला आमच्या ड्रायव्हरमध्येच कोणतंतरी भूत बसलं होतं मला वाटतं. आणि आता परवासुद्धा असाच स्वयंपाकाचा वगैरे विचार होता तो इतक्या सगळ्या उशिराने सामान आलं. म्हणजे कसलीतरी निगेटिव्हिटी कार्य करीत आहे. तेव्हा सहजयोग्यांना एवढेच सांगायचे आहे, की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी नसली पाहिजे. आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग मानला नाही पाहिजे. इतक्या लांब इतक्या आतमध्ये येऊन सहजयोग आपण वाढवतो आहे, तेव्हा आपल्यामध्ये एक तऱ्हेचे समाधान असायला पाहिजे आणि एक तऱ्हेचा आशीर्वाद मानला पाहिजे, की माताजी अंगापूरलाच का येतात! आणखीन पुष्कळ ठिकाणी जाऊ शकतात. नवीन नवीन ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथे जास्त कार्य होऊ शकतं. पण तरीसुद्धा अंगापूरला आणि जसं त्यांनी काल सांगितलं की वारी सुरू झाली, तर हे काही विठ्ठलाचं स्थान नाही, पण तरी येतं , त्याला कारण काय ? पण काहीतरी निगेटिव्हिटी आहे. असं मला वाटतं. आणि ती निगेटिव्हिटी कदाचित अहंकाराची असू शकते. कदाचित अहंकार माणसाला असेल आणि तो इतरांशी बोलतांना किंवा सहजयोगाबद्दल कार्य करतांना ती सहिष्णूता किंवा ते प्रेम किंवा ती माणुसकी दाखवत नसेल, तेव्हा विचार केला पाहिजे. असं का होतय ? दोन वेळा हे झालेले आहे. तेव्हा काहीतरी कारण असायला पाहिजे. तसे आम्ही दोनदा गेलो आहे बाहेर पूर्वीसुद्धा. मग असं काही व्हायला नको होतं. पण अशा पुण्याहून रीतीने येतात, की त्याला काही मार्गच मिळत नाही. त्यातून मार्गच मिळत नाही. मीसुद्धा मग असा विचार करते, की सोडून टाकावं. पण एकदा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, की आमच्यात माणुसकी पूर्णपणे आहे का ? आम्ही सर्व सहजयोग्यांना प्रेमाने वागवतो का? आमचा आम्ही मान ठेवतो का? की आम्ही आपलेच आपल्याबद्दल, आपल्याच फॅमिलीबद्दल, आपल्याच घराबद्दल विचार करत राहतो. असं जर केलं तर तुमचंे तर नुकसान होईलच, पण इतरांचेही फार होईल आणि ती तुमची जबाबदारी आहे. तेव्हा सर्व इथल्या सहजयोग्यांना माझी हात जोडून विनंती आहे, की आपापसामध्ये कोणी उच्च नाही, नीच नाही, सहजयोगामध्ये कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. सगळे एकसारखे आहेत. कुठेही आपलं जंगलात राहतात हे लोक. कुठल्या कुठल्या देशातले काही काही लोक फारच श्रीमंत आहेत. काही इतके श्रीमंत नाहीत. पण सगळे कसे प्रेमाने, आपापसात मिळून मिसळून राहतात. तशी कलेक्टिव्हिटी नसली तर प्रोग्रॅम होत नाही हे मी पाहिलेलं आहे. तेव्हा हे फक्त अंगापूरला किंवा साताऱ्यालाच का होतं ? काल मी त्यांना सांगितलं नाही, पण मला तरी असं वाटतं, की इथले जे सहजयोगी आहेत त्यांनी ध्यान करायला पाहिजे आणि अहंकाराला आतून काढलं पाहिजे. अहंकारामुळे असं होतं. अहंकार जिथे जास्त झाला की हनुमानच हे कार्य करतो. ते होऊच देत नाही. काही ना काही तरी घोटाळे करून ठेवेल आणि मला पुढे येऊच देत नाही. तेव्हा परवाचा आणि कालचा प्रोग्रॅम जो झाला, त्यात मला वाईट वाटत होतं म्हणा. पण मीसुद्धा असमर्थ होते या गोष्टीत. मला समजत नव्हतं, की असं कसं झालं. तेव्हा माझी खरोखर आपल्याला विनंती ९ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-9.txt आहे, की सामूहिकता वाढवली पाहिजे. आपापसातलं प्रेम वाढवलं पाहिजे. सामूहिकता यायला पाहिजे. अधिकतर महाराष्ट्रात लोकांचं आपलं असं आहे, की ह्याचा गळा काप, त्याचा गळा काप. सहजयोगातसुद्धा हे चाललं आहे. हा इकडे तर तो तिकडे, ह्याला येऊ नको देऊ, त्याचा काही ठिकाणा नाही. अशा रीतीने वागून ह्या भाऊबंदकीने सहजयोग कधी वाढणार नाही. तुमच्यावर अनेक आशीर्वाद आहेत परमेश्वराचे आणि अनेक गोष्टी घडल्या आहेत, तेव्हा सारखं परमेश्वराने आम्हाला किती दिलं, किती आम्हाला आनंद दिला, किती आम्हाला सौख्य दिलं, किती आमच्यावरती कृपा केली, ही कृष्णासुद्धा सारखी देवाचेच गुणगान गाते आहे असं मला दिसलं, मग आपण तरी त्याचं किती म्हटलं पाहिजे ! आता इथे तीस देशातले लोक आहेत आणि प्रत्येक देशातल्या लोकांनी आपली गाणी कशी म्हणून घेतली! त्यांच्यासाठी सहजयोग हाच जीवन आहे. तसे आपल्याकडे नाही. एक गाणं कोणी म्हटलं तर दुसरा त्याच्या वरचढ गाणं म्हणेल. पण असं नाही की सगळ्यांनी मिळून ते गाणं आधी शिकावं, मग दुसर गाणं. इतकी कॉम्पिटिशन आपल्यामध्ये चालली आहे, ती गेली पाहिजे. आपण काही आता सर्वसाधारण लोक नाही. आता आपण योगीजन आहोत. योगीजन म्हणजे अगदी कसे नम्र असायला पाहिजे. सहजयोगी अत्यंत प्रेमळ असायला पाहिजे. सगळ्यांना या, बसा! कोणी श्रीमंत असो, कोणी गरीब असो, तरी त्याला म्हणायचं, की तुम्ही येऊन बसा. त्याला व्यवस्थित बघायचं, त्याला प्रेमाने वागवायचं. माझे घर, माझी फॅमिली असे जो जाणार. म्हणून माझी सगळ्यांना अशी विनंती आहे, की असा अप्पलपोटेपणा करायचा नाही किंवा अशा सीमित बघतो तो सहजयोगात राहणार नाही, टिकणार नाही आणि तो निघून मनुष्य ह्याच्यात राहायचे नाही. आपल्याला विशाल व्हायचे आहे. मग आपली नाव दिगंताला पोहोचणार. कोण कोणाला ओळखत होते बघा! राहरीचे आमचे धुमाळ आहेत. त्यांना कोण ओळखत होतं ? कुलकर्णी आहेत पुण्याला त्यांना कोण ओळखत होतं ? मुंबईला मगदूम साहेब आहेत त्यांना कोण ओळखत होतं ? कोणी नाही. पण सगळ्या जगात त्यांची नावं आहेत, त्यांच्या मोठेपणामुळे, त्यांच्या विशालतेमुळे. हे लोक आल्यावर त्यांच्या गळ्याला मिठ्या घालतात. माझ्यावर नाही, की तुम्हीच या, तुम्हीच करा. असं नाही. ह्यांच्याशी ओळख करायची, ह्यांच्याशी बोलायचं. हा कोण? हा कुठून आला आहे ? ह्याचं लग्न कोणाशी आहे ? असं आहे, आहे. स्वत:ला वेगळं, अलिप्त नाही ठेवलं पाहिजे आणि ते जर आलं नां, तर ह्यांच्यामध्ये सरमिसळ होईल, तुमची तसं नावं होणार. सबंध देशादेशातून तुमचे नाव होणार. आता ह्यांना विचारलं की साताऱ्याचे कोण ऑर्गनायझर आहेत? तर कोणाला माहिती नाही. तुम्ही करता त्यांचं ऑर्गनायझेशन? एकाचेही नाव कोणाला माहीत नाही. काय म्हणावं ह्याला. कबूल आहे नां! ही गोष्ट कबूल आहे. तेव्हा सगळ्यांना भेटायचं, बोलायचं, सगळ्यांना नावं सांगायची, ओळखी करून घ्यायच्या! कोणत्या गावचे, कोणत्या देशाचे. लगेच वाईट नाही वाटून घ्यायचं. आई जे म्हणते आहे, ते हितासाठी म्हणते आहे तुमच्या. तेव्हा सगळ्यांना भेटून घ्यायचं, बोलायचं. आता काल जी मंडळी आली होती, जी पार झाली, त्यांची नावं नोंदवली की नाही माहिती नाही. मी सगळं बघत होते, पण काही बोलले नाही. प्रत्येक वेळेला असच होतं, प्रत्येक वेळेला काळजी घ्यावी लागते. हे आपले पाहुणे नाही, हे आपले अंगप्रत्यंग आहेत. आपलं शरीर आहेत. आपल्या शरीरातले भाग आहेत हे समजून घेतलं १० 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-10.txt पाहिजे. आता इतक्या विशाल शरीरात तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि त्या शरीराचे आपण अंगप्रत्यंग आहोत. जसं ह्या बोटाला लागलं की ह्या बोटाला कळतं, आणि सगळे शरीर हादरून निघतं. तसेच आपले आहे. तेव्हा ती एकांतातली एकात्मता जोपर्यंत आपल्यामध्ये येणार नाही, त्यांच्या ओळखी पटणार नाही. तोपर्यंत सहजयोगामध्ये अजून आपण उतरलो नाही. आपल्याला सहजयोग समजलेला नाही. ज्यांना सहजयोग समजलेला आहे, ते हे समजतात, की हे युगायुगातलं एक फार मोठं सुवर्ण आहे आणि ते मिळालेलं आहे. लहानसहान गोष्टींमध्येसुद्धा आपण बघतो, की अजून जातीपाती, अमकंतमकं सुटलेलं नाही. हे आपल्याला तोडलेच पाहिजे. ह्या जातीपाती धरून नुसत्या बायकांचाच त्रास आहे. एखादं चांगलं लग्न झालं त्याचा अर्थ असा नाही की सगळी लग्न चांगली होणार आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही की जातीत लग्न करायचेच नाही. पण सहजयोग्याशिवाय करायचं नाही. पण तो जातीतलाच असला पाहिजे असा अट्टाहास करायचा नाही. आपल्याला सर्व विश्वात पसरायचं आहे. ही हिम्मत असायला पाहिजे. जर ही आम्ही समर्थतता तुम्हाला दिली नाही, तर तुम्ही कसले सहजयोगी! जर तुम्ही समर्थ असाल, तरच होऊ शकतं. तर 'येर्यागबाळ्याचे काम नोहे, त्याला पाहिजे जातीचे' असं म्हटलेले आहे. आणि 'मराठा तितुका मेळवावा' असं का म्हटलं? रामदास स्वामी ब्राह्मण असतांना, त्यांना माहिती होतं, की मराठा म्हणजे काहीतरी विशेष, विरश्रीपूर्ण. पण तसं काही दिसत नाही. मराठ्यांचा मला भयंकर अनुभव आलेला आहे. परवा पुण्याला भाषण झालं असतांना सांगितलं होतं, की मी साडीच्या एका दुकानात गेले. आणि प्रत्येक हे मजल्यावरती बघते तर २५-३० माणसं फेटे घालून बसलेली. म्हटलं 'हे करताहेत काय इथे ?' म्हणे, बस्त्याला बसलेत. असे बसत होते का शिवाजी महाराजांच्या वेळेला. वेळ तरी होता का बस्त्याला बसायला? तिथे बसून मुलीच्या साड्या घ्यायच्या, गप्पाष्टकं करायची. किती खालच्या दर्जाचे झाले आहेत हे मराठे, असं मला वाटलं. बसून साड्या निवडायच्या. उद्या बांगड्या भरायला येतील. दूसरं काही मला समजत नाही. पुरुषांनी अशा गोष्टीत ढवळाढवळ करायची आणि अशा गोष्टी बघायच्या म्हणजे अगदी लाजिरवाणी स्थिती आहे. शिवाजी महाराज असते, तर काय म्हणाले असते ह्या सगळ्याला! अहो, हातामध्ये तलवारी घेऊन फिरणारे लोक, बस्त्याला बसून साड्या बघतात, काय म्हणावं ह्या लोकांना! म्हणजे कोणते मराठे सांगितले आहेत ते मला समजत नाही. परत पुष्कळसे लोक शिवाजी महाराजांचे नाव घेऊन धंदे हेच करतात. दारू प्यायची. त्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला इथेच तुमच्या समोरच अटकेत ठेवलं होतं . कारण तो दारू प्यायचा. आहे की नाही गोष्ट खरी. अटकेत ठेवलं होतं की नाही. मग जे लोक दारू पितात ते शिवाजी महाराजांचे नाव कसे घेऊ शकतात ? सरळ गोष्ट आहे. त्यांना अटकेत ठेवायला पाहिजे शिवाजी महाराजांच्या हिशेबाने. कळलं की नाही! जर तुम्ही त्यांना अटकेत ठेऊ शकत नाही, तर निदान त्यांच्याजवळ तरी जाऊ नये. त्यांच्याशी संबंध ठेऊ नये. कारण त्यांचा जो घाणेरडेपणा आहे त्याचा परिणाम तुमच्यावर होतो. अशा समाजाला काय म्हणायच, ह्या मराठा समाजाला! आम्हीसुद्धा त्याच समाजातले आहोत, असं म्हणतात लोक! आणखीन काय ते तुमचे शहाण्णवकुळी वगैरे ते सुद्धा आहे म्हणतात. त्याला काय चाटायचंय, काय त्याच्यात अर्थ आहे! शहाण्णवकुळी ११ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-11.txt म्हणायचं आणि बायकोला मारायचं. अहो, धोबिणीसुद्धा इतक्या मारल्या जात नाही इतक्या मराठ्याच्या बायकांना लोक मारतात, नि त्रास देतात. हे काय मोठे शहाण्णवकूळी झाले ! ह्या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण सहजयोगी आहोत. ही एक क्रांती आहे फार मोठी! जे कोणी क्रांतिकारी असतील त्यांनीच सहजयोगात यावं नाहीतर येऊ नये आणि ही क्रांती फार मोठी आहे. ह्या क्रांतीमध्ये आपण सगळं बदलून टाकणार आहोत हळूहळू. वर्षामध्ये आपण एकत-्हेचं आनंदमय जीवन, आतमध्ये आणि बाहेर, सबंध व्यवस्थित अगदी, असं बसलेलं रामराज्य पाहिजे. त्याची मी कल्पना केलेली आहे. त्या रामराज्याला तुमची तयारी असली तर माझ्याबरोबर उभं रहायचं, नाहीतर उभं रहायचं नाही. उपटसुंभांचं काम नाही सहजयोगामध्ये. काम ज्या लोकांचं आहे जे त्याच्यासाठी समर्पण करतील. मेहनत करतील आणि वेळ घालवतील. पंढरीच्या वाऱ्या करायला लोक तयार आहेत. पंढरीच्या वाऱ्या करायला लोक पोहोचतील, तिथे जाऊन एक एक महिना घालवतील, डोकी फोडून घेतील. पण जे सहज, सरळ आहे, ते मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण किती वेळ घालवला, आपल्या वाडवडिलांनी वेळ घालवला आहे, त्यांच्या वाडवडिलांनी घालवला आहे, आणि आज आपण कुठे आलो आहोत ! पूर्वी होतं बरोबर शिवाजींच्या वेळेला, की मुसलमानांना पळवायचं, पण आता ते सगळं आपल्या आतमध्ये आलेलं आहे. सगळे आपले षडरिपू आपल्या आतमध्ये आलेले आहेत. ते आपण काढून टाकले पाहिजेत. सहजयोगामध्ये बोलायचं एक आणि करायचं दुसरं असं नाही. जसं तुमची आई करीत नाही, तसं तुम्ही करायचं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या असं लक्षात आलं इकडे, मी नागपूरची राहणारी, नागपूरला लोक भयंकर श्रीमंत आहेत. कारण तिथली जमीन चांगली आहे. श्रीमंत लोक आहेत आणि दिलदार लोक आहेत. आणि तुम्ही जर तिकडे, नागपूरकडे संबंध कराल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, सकाळपासून तुमची कशी सेवा करायची, सकाळपासून तुम्हाला काय द्यायचं? तुम्ही अगदी म्हणाल, 'कमाल आहे! अशी सरबराई आम्ही कुठे पाहिली नाही.' त्याला कारण असं, की श्रीमंत लोक आहेत ते. शेतीवाडी चांगली आहे, हवा वगैरे चांगली आहे. सगळं चांगलं आहे. तरीसुद्धा त्यांच्यामध्ये अप्पलपोटेपणा नाही. एकवेळेला स्वत: उपाशी राहतील, पण पाहण्यांचं फार करणार. पण इकडच्या बाजूला मी बघते , की भयंकर लोक कंजूष आहेत. भयंकरच. सहजयोगातसुद्धा पैसे तर देतच नाही काही आता सगळे पैसे बहतेक ह्या लोकांनी दिलेले आहेत. ते तर सोडा. पण आता जर तुम्हाला गणपतीपुळ्याला जायचं असलं, तरी त्यांना असं वाटतं , की माताजींनी आमच्या खाण्या-पिण्याचे, राहण्याचे सगळे पैसे द्यायचे. म्हणजे हा काय भिकारीपणा! तेच आमच्या नागपूरच्या कोणाला जर म्हटलं ना की आम्ही तुमचे खाण्यापिण्याचे पैसे देतो, तर म्हणतील, 'वा, कशाला? आम्ही आमचे देणार. तुम्ही द्यायचे नाहीत.' आमच्याकडून जास्तीचे घ्या म्हणतील. १२ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-12.txt आता हे सगळे गाणे म्हणणारे, गाणं करणारे, ते म्हणे, 'माताजी, बघा, आम्ही फुकटात येणार नाही. इथे येऊन आम्ही पैसे देणार.' विशाल हृदय झालं पाहिजे आणि त्या विशाल हृदयाला आपण घेतलं पाहिजे. आईने सांगितलं त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं. आई आपल्या हितासाठीच सांगते आहे. ती विशालता असायला पाहिजे. तेव्हा सहजयोगाचा कोणी ठेका घेतलेला नाही. सहजयोग कोणा एका माणसाचा नाही. सर्वांचा आहे. सर्वांशी माणुसकीने, प्रेमाने वागायला पाहिजे. सगळे आपले अंगप्रत्यंग आहेत असा विचार केला पाहिजे. आणि तसं प्रेम केलं पाहिजे. ह्या सातारा जिल्ह्याचं फार माहात्म्य आहे. इथे कृष्णाच वहात नाही, पण इथे इतक्या साधुसंतांनी कार्य केलेले आहे, की मला आश्चर्य वाटतं की ह्या सातारा जिल्ह्यात सहजयोग का बसू नये! पण त्याला कारण जे असेल ते शोधून काढलं पाहिजे. त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे आणि ते का होत नाही. तुम्ही हिय्या केला तर का होणार नाही! राजकारणी लोकांनी किती प्रकार करून ठेवलेले आहेत. मग हे अध्यात्म आहे. त्याचा कोणाशी संघर्ष का आहे? त्याचे कोणाशी भांडण का आहे ? आणि लगेचच कोणी सहजयोगात आल्याबरोबरच त्याला फायदा होतो. आता हे .... साहेब बघा. त्यांची काय परिस्थिती होती! आज त्यांची परिस्थिती किती चांगली आहे. कालच एक गृहस्थ भेटले. म्हणाले, 'माताजी, मी आलो इंटरव्ह्यूला. मला मोठी नोकरी मिळाली.' म्हणजे पैशाच्या दृष्टीने म्हणत नाही. पण मनाला स्वास्थ्य. अहंकारादि, राग येणं दूसऱ्यांवरती राग राग दाखवणं हे सगळे सुटतं. मनुष्य शांत चित्त होतो. त्याच्या चेहऱ्यावरच इतकी शांती येते की वाटतच नाही की हा मनुष्य तोच आहे. असं वाटतं की हा कोण देवपुरुष आला! 'अहो, मी तो.' 'असं कां! तुमचे ते चढलेले डोळे वगैरे काही दिसत नाही.' 'नाही. ते उतरलं सगळं.' तसे व्हायला पाहिजे. तसेच बायकांचंसुद्धा आहे. बायकांनीसुद्धा अत्यंत प्रेमाने आईसारखं वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये. आपल्यामध्ये एक गुण फार चांगला आहे, की पावित्र्याची आपल्याला कल्पना आहे. पण इतर गुण फार कमी आहेत. एकतर बोलताना आपण फार उद्धटपणाने बोलतो. मुलांना सुद्धा, 'चल, उठ, नीघ' असं बोलायचं. सरळ म्हणायचं, 'चला, उठा.' आमच्यातिकडे नागपूरला, मुलांना कोणी असं बोलत नाही, 'चल, उठ, नीघ,' असं नाही बोलत . ' चला, उठा, मानाने त्यांना वागवलं, म्हणजे ते सुद्धा तुमचा मान करायला शिकतील. पण पटकन हातातील एखादी वस्तू उचलून घ्यायची. मग त्याला ढकलून टाकायचं. त्याला तिकडे बसवायचं. मुलांचा जर मान नाही केला तर ती मुलं तशीच होणार पुढे जाऊन. तर ही फार मोठी तफावत मी पाहिली. आमच्या तिकडे, खानदेशाला, नागपूरला लोक आहेत, खानदेश म्हणा इतके नाही, पण नागपूरकडची, वऱ्हाडची लोक आहेत, त्यांचं वागणं , त्यांचं बोलणं, मुलांच्या बरोबर एक तऱ्हेची पद्धत आणि शिवाजी महाराज झाले ते इकडे. तिकडे कोणते महाराज आले. ते भोसले झाले होते. बसू. पण तिथे एवढा राजेशाहीपणा कसा आला आणि इथे इतका क्षुद्रपणा कसा? तर मुलांशीसुद्धा इज्जतीने बोललं पाहिजे. आपणसुद्धा सहजयोगी आले तर मानपान केला पाहिजे. आता पुष्कळदा मी आमच्या प्रतिष्ठानमध्येही बघते, की काही भेटायला आले, तर आम्हाला सांगावं लागतं, 'अहो, ह्यांना काही खायला द्या की .' असं नाही, की आल्याबरोबर काहीतरी खायला द्यायचं, त्यांना १३ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-13.txt पाणी द्यायचं, त्यांना बघायचं. तशी इकडे पुण्याला तर मुळीच पद्धत नाही. तिथे तर एक पेरू दहा माणसांना वाटून खातील. अशातले भयंकर कंजुष लोक आहेत पुण्याला. पण सातार्याला तसं नको. तुमच्या इथे शाहू महाराजांसारखे लोक झालेले आहेत. किती तरी गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा एक तऱ्हेचा दातृत्वपणा असला पाहिजे. मोठेपणा असला पाहिजे. लोकांना तोडायचं फार लवकर येतं. आपल्या मराठी भाषेमध्ये इतका गोडवा आहे, इतका चांगुलपणा आहे, पण हे तोडण्याचं जे प्रस्थ आहे, ते कसं वाढलं हे मला समजत नाही. अपमान करायचा लोकांचा. फटकन काहीतरी बोलून टाकायचं. ते तसं सहजयोगात नसलं पाहिजे. कोणी गरीब- श्रीमंत असला तर तो आहे तिथे आहे. परमेश्वराने ते केलेले नाही, समाजाने ते केलेले आहे, म्हणून त्याची काही मान्यता घ्यायची नाही. आणि सरळ मनाने, अत्यंत उदार हृदयाने प्रत्येकाला आपल्या हृदयात बसवले पाहिजे. कारण तुम्ही संत-साधू आहात. तुम्ही सगुणामध्ये आलेले निर्गुण आहात. तेव्हां तुमचं वागणं कसं सुंदर असायला पाहिजे ! त्याच्यामध्ये गर्विष्टपणा नको, जुन्या कल्पना नकोत, काही नको. जर ते झालं नाही तर तुमची सहजयोगाची प्रगती खुंटेल. म्हणून आज मी उघडपणे सांगते आहे, की फार जरुरी आहे, की सहजयोग्यांनी, साताऱ्याच्या विशेष करून, एक फार मोठी प्रगती करायला पाहिजे. आपापसात मैत्री पाहिजे. ग्रुपबाजी नको, गटबाजी नको आणि आपापसात बोलणं नम्रतेचं असलं पाहिजे. फारच नम्रतेचं! प्रत्येकाचा मान केला पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. आणि हा इकडचा, तो तिकडचा असं नाही करायला पाहिजे. सगळे आपल्या हृदयातले आहेत असं समजून वागलं पाहिजे. ह्याबद्दल तुम्ही क्षमा करावी. कारण मला स्वत:लाच समजलं नाही की दोनदा असे प्रोग्रॅम का झाले नाहीत. आणि त्या गोष्टीसाठी मी फार घाबरले होते. दुसरं काही नाही, पण सहजयोगाला सोडून तरी जाणार कुठे? सहजयोगाशिवाय मार्ग काय आहे? आणि त्यानंतर मग किती त्रास होणार? त्याचं किती झेलावं लागणार आहे? म्हणून व्यवस्थित चालावं. नदी तुमच्या घरापर्यंत आलेली आहे. आता गंगेचं जे काही आहे पुण्य ते उचलायचं आहे. आणि त्यासाठी इतका विचार करायचा नाही. फक्त एक समर्पित असून, 'माताजी, तुम्हाला आमचे सगळे जेवढे काही कुसंस्कार आहेत, आणखीन जेवढा काही आमचा अहंकार आहे, तो सगळा आम्ही समर्पण केला. अशी मनामध्ये प्रार्थना करून माणसाने सहजयोगाच्या वाढीला लागलं पाहिजे. त्यात नवरा असं म्हणतो किंवा बायको अशी म्हणते असं म्हणायचं नाही. सहजयोगी प्रत्येक ठिकाणी आपला व्यक्तिगत सहजयोग वाढवू शकतो. इतकेच नव्हे तर हळूहळू सगळ्यांना जिंकूनही घेऊ शकतो. अशा रीतीने एक सशक्त, समर्थ समाज आपल्याला तयार करायचा आहे. तो केल्याशिवाय आपल्या राजकीय ज्या काही व्यवस्था आहे त्या टिकू शकत नाहीत. तर मानवाचेच परिवर्तन पूर्णपणे झालं पाहिजे. सहजयोग म्हणून कोणीतरी मक्तेदारी घ्यायची आणि आम्ही काय ते मोठे सहजयोगी म्हणून मिरवायचं, असा सहजयोग नाही. सहजयोगामध्ये तुमची प्रगती काय झाली? तुम्ही कुठून आलात ? तुम्ही किती लोकांना जागृती दिली? किती लोकांना प्रेम दिलंत ? किती लोकांची दोस्ती झाली ? ते पाहिलं पाहिजे. तेव्हां आता ही मंडळी जाणारच आहेत. आता जाणारच आहेत पुढे तरीसुद्धा त्यांच्यामध्ये बसून तुम्ही कोण? काय? कुठले? त्यांचे पत्ते घेणं, त्यांच्याशी बोलणं, सगळ्यांनी प्रेमाने बोलून घ्यायचं. म्हणजे बरं वाटेल. नाहीतर इथे येतात पाहुण्यासारखे आणि जातात. पाहुण्यांची तरी व्यवस्था झाली पाहिजे. हे पाहुणे कोण आहेत ? त्यांना १४ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-14.txt तुमची ओळखसुद्धा नाही. विचारतात, कोणाकडे जायचं? कोणाला भेटायचं? काय करायचं? कसं करू? इतक्यांदा ते इथे आलेले आहेत तेव्हा तुम्ही सगळ्यांनी दोस्ती करून घ्यायची, त्याच्याबद्दल सांगायचं, की आम्ही सहजयोगी आहोत, असं, तसं, पुष्कळ बोलायला आहे आपापसात तुम्हाला. मजा येते त्याची. एक तऱ्हेचा अलिप्तपणा फार आहे, तो अलिप्तपणा काढून टाकला पाहिजे. तसेच कुठेही गेलं तरी साताऱ्याच्या लोकांनी वेगळं रहायचं, मुंबईच्या लोकांनी वेगळं रहायचं हे चुकीचे आहे. सगळ्यांनी सरमिसळ करून रहायचं. आणि सगळ्यांनी जाणलं पाहिजे. इतकेच नाही तर हिंदुस्थानातसुद्धा लोक साताऱ्याच्या लोकांना ओळखत नाही. मला आश्चर्य वाटलं. आता परवाच कोणी तरी येणार होते, म्हणे 'कोणाकडे यायचं, काय करायचं?' म्हटलं, 'तुम्हाला माहिती नाही साताऱ्याला कोण आहेत ?' ते म्हणाले, 'आम्हाला काही माहिती नाही.' सांगलीचं माहिती आहे. सांगलीला तर सेंटरच नाही, मग साताऱ्याचं का माहिती असू नये? तर सगळीकडे एकत-्हेचं पसरलं पाहिजे आपलं प्रेम, सगळ्यांना आपण जाणलं पाहिजे. सगळ्यांशी दोस्ती केली पाहिजे. सगळ्या विश्वात आपलं नाव झालं पाहिजे. लोकांनी सातारा काय हे ओळखलं पाहिजे. ब्रह्मपुरी माहिती आहे त्यांना आणि ब्रह्मपुरीची नदी माहिती आहे. तिचे कितीतरी फोटो काढले आहेत त्यांनी. पण साताऱ्याचे संचालक कोण आहेत? तिथे कोणते सहजयोगी आहेत? काही त्यांना माहिती नाही. तेव्हा असं अलिप्त रहायचं नाही. 'आम्ही सेवा करतो. कसली सेवा करायची! सेवा काहीच नाही, प्रेम करायचं आहे. प्रेम करतांना त्यांचं नाव, गाव सगळं माहिती पाहिजे. प्रेमाने बघा भारावून गेलं आहे सगळं. आणि असेच माझे हृदय भारावून जाते कधी कधी विचार करून, की आता प्रेम करायला कसं शिकवायचं तुम्हा लोकांना. तेव्हा आता रागावणं, रूसणं, फुगणं, वेगळं होणं, वैगरे गोष्टी सोडून नुसतं प्रेमाच्या सागरात डुंबून जायचं आणि आनंदाने रहायचं. म्हणजे सगळे व्यवस्थित होणार आहे आणि एक दिवस असा येईल की साताऱ्यालाच फार मोठं सेंटर होणार आहे. त्यासाठी आधी तुमचं वागणं असं असायला पाहिजे जसं साधु-संतांचं असतं. नाहीतर पहिल्यावेळेस मी आले होते तर किती लोक आले होते! हजारो लोक आले होते, तुम्हाला आठवत असेल तर. ते सगळे पळूनच गेले. ते टिकतच नाही. तेव्हा तुम्हीसुद्धा थोडी तसदी घेऊन शहरामध्ये एखादी शाळा बघावी. त्या शाळेमध्ये प्रोग्रॅम करावा. मग सगळं कार्य व्यवस्थित चालू होईल. पण तुमचं सेंटरच जर फार दूर असेल तर कसं होणार? तेव्हा सेंटर तिथून काढून शाळेमध्ये सेंटर केलं पाहिजे. लहान लहान ठिकाणी सुद्धा लोक सुरू करतात, मग इथेच सुरू करायला काय झालेलं आहे? सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे. मी जे म्हटलं ते लक्षात घ्यावं, त्याबद्दल मनन करावं आणि 'माताजी, आमच्यामध्ये हे सगळं प्रेम वाह देत. आमच्या हातून हे कार्य होऊ देत, अशीच मागणी करावी. १५ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-15.txt धर्म आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजेत औरंगाबाद १९ डिसेंबर १९८९ आजचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा आहे. औरंगाबादला आलं म्हणजे आपल्या घरी आल्यासारखं वाटतं मला. जवळच इथून पैठण म्हणजे प्रतिष्ठान आहे. तिथे आमचे पूर्वज राहिलेले आहेत, ते आपल्याला माहितीच आहे. सांगायचं म्हणजे असं, की सहजयोगाबद्दल गहन आस्था पाहिजे. आता इथे ३६ देशातले लोक आलेले आहेत. त्यांना गणपती म्हणजे काय ते माहिती नाही. तिथून सुरुवात. ज्यांना गणपतीचा 'ग' माहिती नाही, गणपती काय ते माहिती नाही, त्या लोकांनी इतकी ध्यानधारणा करून इतकं मिळवलं आहे आणि इतके गहन उतरले आहेत, तर आपण किती मिळवायला पाहिजे आणि आपण किती पुढे जायला पाहिजे ! पण तसं आपलं होत नाही. रशियामध्ये जाऊन माझ्या लक्षात आलं की रशियामध्ये हजारो लोक सहजयोगात आले. हजारो लोक आले. दोन हजार बाहेर तर दोन हजार आत, हॉलमध्ये. परत दुसर्या दिवशी सकाळी या म्हटलं तर चारचे चार हजार हजर परत आणि पार केल्यानंतर ते जमतात. सकाळी शिस्तशीर चारला म्हटलं तर चारला आंघोळ करून ध्यानाला बसतात पाचला. पाच ते सहापर्यंत ध्यानाला बसतात सगळे. यच्चयावत. १६ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-16.txt पण आपल्याकडे तसे नाही. आपल्याकडे सगळ्या कर्माला आपल्याला वेळ आहे. बहिणीच्या मुलीच्या अमक्याच्या तमक्याच्या लग्नाला जाऊ आम्ही. अजून आपल्यामध्ये कुर्ंस्कार आहेत हे सगळे. ही माझी बहीण, ती सहजयोगिनी नाही तर आपलं काही नातं नाहीये त्यांच्याशी. 'हेची सोयरे होती' सांगितलेले आहे ज्ञानेश्वरांनी. तुमची सोयरिक ही. ती सोयरिक आता विसरायची. आता तुम्ही सहज धर्मात आलात. आता ती सोयरीक विसरून आता ही तुमची सोयरीक आहे. ह्या मंडळींना बघा. सगळे सोडून तुमच्यासारखे वस्त्र घालून बसलेत इथे . तसेच आपणही आपलं हृदय उघडलं पाहिजे. माझी बहीण अशी. कुठेही गेलं की, माझ्या भावाच्या बायकोच्या आईला अमुक एक रोग आहे म्हणून हजर पहिल्यांदा. सगळा हाच विचार, की माताजींचा कसा उपयोग करून घ्यायचा? अरे, माझा काय फायदा करून घ्यायचा आहे? मला आत्म्याला मिळवायचं आहे. मला आत्म्यामध्ये उतरायचं आहे. माझं स्वत:चं उत्थान मला करून घ्यायचं आहे. ह्याच्यात राहिलं काय? बाकी सगळं तर आहेच. त्याला काही अंत नाही. अमुक झालं, तमुक झालं , नुसते जगाचे प्रश्न माझ्यासमोर ठेवायचे. मग मला असं वाटतं, की हे लोक देवाला शोधताहेत की जगाच्याच काहीतरी गोष्टी शोधत फिरत आहेत सहजयोग वाढायला पाहिजे. जो आपला वारसा आहे. हजारो वर्षे संत-साधूंनी मेहनत केली. ह्या जमिनीत आपलं रक्त ओतलेलं आहे. ह्याठिकाणी तर सहजयोग एकदम वाढायला पाहिजे. येऊ द्या. भामटा येऊ द्या. पैसे घेणारा येऊ द्या. हजारो येऊन उभे राहतील. ते आता एखादा दुष्ट सत्यसाईबाबाचं भूत असलं किंवा कोणाचेही असलं. ते पहिल्यांदा येणार. त्यांच्या पायावर हजारो लोक येणार. पण तो देतो काय ते बघा! म्हणे हिरे देतो. 'अहो, हिरे घ्यायला तुम्ही बाजारात जा!' त्याला देवधर्म कशाला पाहिजे असा. हा काही देवधर्म झाला? आजपर्यंत कोणत्याही संतांनी किंवा कोणत्याही अवतारांनी हिरे वाटले होते का? तो तुम्हाला देणार नाही. श्रीमंत लोकांना वाटतो आणि घेतो त्यांच्याकडून. ह्या अशा गोष्टींमध्ये फसून आपण जे आता वहात चाललो आहे, ते जरासं सुधारायला पाहिजे आणि तेच मला आश्चर्य वाटतं, की हिंदुस्थानामध्ये सहजयोग तेवढा पसरत नाही. एवढा पसरत नाही. आता पुण्याला, मुंबईला, दिल्लीला बरा चाललाय, पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगायला पाहिजे, की तुम्ही आता बसलेत कशासाठी ? आत्मसाक्षात्कार घ्या. ह्याच्यासाठी सर्व धर्म केला. आजपर्यंत एवढी मेहनत केली, आता ह्याच्यापुढे काय करायचं आहे तुम्हाला, काय मिळवायचं आहे, बोलायला पाहिजे. पण आपण आपले लाजतो आणि ते गुरूचे झेंडे लावून फिरतात. सगळे भामटे आहेत इथून तिथून मी सांगते तुम्हाला! सगळे भामटे आहेत. ह्या गुरूंमध्ये मला अस्सल एकही दिसत नाही. असला तर मी स्वत: सांगेन की आहे म्हणून. पण सगळे इथून तिथून भामटे आहेत आणि ते तुम्हाला लुटायला बसलेत. त्यांची तुमच्या प्रॉपर्टीवर, पैशावर, बायकांवर, मुलांवर सगळ्यांवर नजर आहे, पण तुमच्या आत्म्यावर नजर नाही. तेव्हा तुम्हाला स्वत:चं भलं करून घ्यायचं आहे नां! कोणत्या तरी गुरूच्या मारग लागून आपण वाया जाऊ, ही कल्पनाच तुम्हाला येत नाही. बहतेक लोकांना कॅन्सरचा १७ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-17.txt रोग, हा रोग, तो रोग हा ह्या गुरूंच्यामुळे होतो. हे काहीतरी प्रेतविद्या, स्मशानविद्या, भूतविद्या करतात सरळ आणि लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतात. आणि तुमचे पैसे काढत असतात सारखे. तुमच्या जशा या तुम्ही पणत्या लीवल्या गुरूला पेशाची काय गरज असायला पाहिजे ? आज आम्ही श्रीमंत घराण्यातले. साहेबांची मोठी पदवी म्हणून किंवा ह समया आम्ही सगळे घालतो. जर आम्ही गरीबाच्या घरी जन्माला आलो लावलेल्या असतो तर गरिबीत राहिलो असतो. आम्हाला काही त्रास होत नाही कुठेही झोपायला. तुम्ही म्हणाल तर इथे झोपू शकतो. पण ह्यांचं लक्ष आहेत, त्या कुठे? असे अनेक गुरू आहेत, तऱ्हेतऱ्हेचे. त्यांचं एवढं बोकाळलेले २मयांनी दीप आहे. ते गजानन महाराज. केवढा ऋ्रास झाला मला त्या माणसाचा. भयंकर त्रास, काहीही म्हणा. फारच वाईट मनुष्य होता. ज्याने त्याची पोथी वाचली त्याला काही ना काही तरी रोग होणार. तो मनुष्य पन्नास लावली त२ त्यांची प्रकाश वर्षापर्यंत टिकला तर नशीब समजायचं. आता मी स्पष्टच सांगते तुम्हाला. आता त्याच्या पोथ्या वगैरे गोदावरीत नेऊन घाला. ज्यांनी त्याच्या पोथ्या वाचल्या, त्यांचे चेहरेच असे होऊन जातात, येणारच की की विश्वासच बसत नाही. सहजयोगात येऊनसुद्धा चालू असतं त्यांचं! तर जाही! ताच तौ इकडे लक्ष घालायला पाहिजे. प्रकाश धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे आपल्यामध्ये जी धारणा होते, धार आहे, तिचा धर्म आहे हा. जी आपल्यामध्ये धारणा होते तोच धर्म कार्यान्वित होतो. आहे. आणि ती धारणा काय आहे? तर आपल्यामध्ये दहा धर्म आहेत. तौ जुसती प्रकाश ते धर्म आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजेत. ते कुंडलिनीशिवाय होऊ शकत नाहीत. उद्या मी म्हटलं, खोटं बोलू नकोस. तसं जमणार नाही. म्हटलं, चोरी करू नकोस. ते जमणार नाही. उद्या म्हटलं, की कोणाला नाही, त२ त्याचे कार्य धडतं. त्या दुखवू नकोस, तर ते जमणार नाही. पण हे धर्म आपोआप आतमध्ये जागृत झाले तर सांगायची गरज काय? आपोआपच घडतं. सगळं काही आपोआपच सुटतं. काही सांगावं लागत नाही. आपोआपच का्यने मनुष्याला सगळे होतं. कारण तुमच्यात तो धर्म आहे. जशा या तुम्ही पणत्या लावल्या किंवा ह्या समया लावलेल्या आहेत, त्या समयांना दीप २शक्तता येते. लावला तर त्यांचा प्रकाश येणारच की नाही! तसाच तो प्रकाश कार्यान्वित होतो. तो नुसता प्रकाश नाही, तर त्याचं कार्य घडतं. त्या १८ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-18.txt कार्याने मनुष्याला सशक्तता येते. सशक्त झाला, त्याच्यात ती शक्ती आली म्हणजे मग तो कशाला जुमानत नाही. केवढं मोठं हे आपल्याजवळ दान आहे! साधु-संतांचं आहे. शिवाजी महाराजांचं आहे. काय पुरुष होता तो! तो पण एक आत्मसाक्षात्कारी महापुरुष होता. तेव्हा आपलं तसं आयुष्य झालं पाहिजे हे शिकलं पाहिजे. ह्यांच्यापासून शिकण्यासारखं तसं विशेष नाही. मी तुम्हाला सांगते. एकच शिकण्याचं आहे, की ज्यांनी कधी गणपतीला जाणलं नाही, ते तुम्हाला माहिती आहे, ते एवढे गहन कसे उतरले ? तेव्हा ह्यांच्यात काहीतरी गहनता आहे. बाकी जे काही आपण फॉरेनच्या लोकांचं शिकायला म्हणतो, त्यांच्यात काही शिकण्यासारखं नाही. त्यांच्या संस्कृतीत काहीही चांगलं नाही. सगळा सर्वनाश होतो आहे तिकडे. तुम्ही बघाल, तर इंग्लंडसारख्या देशामध्ये दोन मुलांना एका आठवड्यात आई-वडील मारत असतात. आपल्याकडे कोणी मारतं का कोणाला? लहान लहान मुलांना कोंडून मारतात, चिडून, आई-वडील आणि पुष्कळशी मुलं आपल्या आजोबा-आजंना मारून टाकतात. असले भयंकर प्रकार आहेत. रस्त्याने तुम्ही चालले तर तुमची पर्स ओढून घेतील, तुमचं हे ओढून घेतील, मारामाऱ्या चाललेल्या आहेत नुसत्या. अमेरिकेत तर तुम्ही दागिने घालून जाऊच शकत नाही. सगळे ओढून घेतील, लुबाडून घेतील. ड्रग्ज काय आलेले आहेत ! त्यांच्याकडे असले घाणेरडे रोग आलेले आहेत ! सगळा प्रकार इतका भयंकर आहे! त्यासाठी ते इथे आले. शांतीसाठी. तर आपल्याला वरदान आहे बरेच. देवकृपेने आपल्याकडे संस्कृतीमध्ये पुष्कळ वरदान आहे. आपल्या वागण्यात, आपल्या समजण्यात पुष्कळ फरक आहे. पण फक्त धर्माच्याबाबतीत आपण कोते आहोत . धर्म कुठे आहे, आतमध्ये. तो धारण केला गेला पाहिजे. तो झाल्याशिवाय, बाह्यातले धर्म हे माणसाने केलेले धर्म आहेत. अहो, देवळामध्ये सुद्धा काय प्रकार चालले आहेत, तुम्हाला ते सांगायला नको. नुसते पैसे उकळायचे. आमच्याइथे महालक्ष्मीच्या देवळामध्ये, मुंबईला, तर गांजा वगैरे विकतात. अगदी सर्रास, म्हणजे हे काय? देव झोपी गेला आहे, की ह्या लोकांचा राक्षसीपणा एवढा वाढलाय की तिथून उठूनच गेला. असे प्रत्येक देवळामधले प्रकार. खंडोबाच्या देवळाचं म्हणाल तर, विठ्ठलाचं देऊळ आहे, कोल्हापूरला ते काय कमी लोकं आहेत. प्रसिद्ध लोक आहेत. का असं होतंय? लोक म्हणतात, तुम्ही देव देव म्हणता, मग असं कसं होतंय माताजी?' देव हा आहे, पण तुमच्या खिशात नाहीये. तुम्ही जसं म्हणाल तसं देवाला वाकवू शकत नाही. त्याला वाट्टेल तसं करू शकत नाही तुम्ही. देव हा आहे, तो जाणून घेतला पाहिजे कसा आहे ते. तो जाणल्याशिवाय आपण उगीचच प्रत्येक देवळात देव बघतो, तसं नाहीये. आहेत आता, स्वयंभू देवळं आहेत. पण तेही सगळे खराब करून टाकलेत. माणसाला काहीही दिलं तरी तो खराब करून टाकतो. जंगल तसं स्वच्छ असेल, चार माणसं जातील तर खराब होणार. तसेच धर्माचे करून ठेवलेले आहे. त्यामुळे १९ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-19.txt हे आपल्याला अनास्था वाटते की, 'हा धर्म कसा ? मग अशा धर्मात काय करायचं? माताजी, असे लोक आहेत. असे दष्ट आहेत. मग कसं काय करता ? आम्ही एवढं पारायण केलं! आम्हाला सांगितलं आमच्या गुरूंनी पारायण करा. तर आम्ही आजारीच पडलोय. असं कसं झालं?' अहो, तुमचे अजून परमेश्वराशी काहीही लागेबांधे झालेले नाही. काहीही तुमचा अजून संबंध झालेला नाही. जोपर्यंत ह्याचा (स्पिकर) संबंध मेनशी झालेला नाही तर इथे बसून, बडबडून काय होणार आहे माझं? तसेच आहे. जर तुमचा संबंध झाला, संबंधच झालेला आहे म्हणजेच योग. हाच योग प्राप्त झाला पाहिजे आणि तो योग झाला, म्हणजे जे परम चैतन्य आहे ते तुमच्यातून वाह लागते आणि तुम्ही शक्तिशाली होता. पण आधी हे समजलं पाहिजे, की आत्तापर्यंत आम्ही केलेले आहे ते काही शहाणपण नव्हते. टेलिफोनशी संबंधच नाही आणि तुम्ही टेलिफोन केला तर त्याच्यात काय शहाणपणा! तुमचा तसेच आहे. जोपर्यंत कनेक्शन नाही, तोपर्यंत काही नाही. तेव्हा रामाचं नाव घेतलं तर राम रागावणारच. 'तुझा काय संबंध माझ्याशी. तू कोण होतोस ?' कळलं नां! तसा प्रकार आहे. तेव्हा मंत्र वगैरे जे काही म्हणत असाल, ते द्या सोडून आधी तुम्ही सहजयोग धारण करा. मग तुम्हाला कळेल, तुम्हाला कोणता त्रास आहे, तुम्हाला कुठे तकलीफ आहे. काय आहे ते बघू आणि तसं आम्ही तुम्हाला व्यवस्थित मंत्र सांगू, की हा मंत्र तुम्ही म्हणा. त्याचं मोठं ज्ञान आहे. त्याचं मोठं शास्त्र आहे. उठल्यासुटल्या एक मला मंत्र दिला, काय अमका, काय तमका. अरे, काय बघून दिला की असेच देतोय ? त्याला पैसे दिलेय. गाढवही देईल ते. त्याला कशाला गुरू पाहिजे, मंत्र द्यायला. असा सांगोपांग विचार पाहिजे. जर तुमच्यात चाणाक्षपणा नसला तर मूढांसाठी सहजयोग नाहीये. रामदासांनी सांगितलं आहे, मूढांसाठी नाही. रामदासांना विचारलं, 'कुंडलिनी जागृत करायला किती वेळ लागतो.' 'तत्क्षण,' शब्द वापरला आहे, 'तत्क्षण.' त्याक्षणीच कुंडलिनी जागृत होईल, पण अधिकारी पाहिजे. अधिकारी असला तर जागृती होणार. अधिकारी नसला तर कधीच होणार नाही. अधिकारी म्हणजे त्या माणसाचं आयुष्य आहे. तेव्हा पहिली गोष्ट पाहिली पाहिजे, की हा कुंडलिनीचं जागरण करतो की नाही. जर तुमच्याकडून तो पैसे उकळतोय, तर तो काय तुमची जागृती करणार? तो तर तुमचा मिंधा! तुमचा नोकर! तुम्ही रहाल का कोणाच्या दमावर? तुम्हाला जर येऊन म्हटलं की, तुम्ही फुकटखोरी करा. तर तुम्ही कराल का? नाही करणार. तर त्याला तेवढाही मान नाही. फुकटखोरी करून राहतो, खोटे बोलून राहतो. तर सत्यावर उतरायला पाहिजे. जर सत्य धरलंय तर 'जे सत्य धरलंय तेच मिळालं पाहिजे मला,' असा हट्ट धरायचा. तेव्हाच तुम्हाला सत्य मिळेल आणि २० 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-20.txt वास्तविकता मिळेल. नाही तर असत्यावर उभे राहिले तर असत्य मिळेल. असत्याने तुम्हाला संतोष मिळणार नाही, समाधान होणार नाही. ज्यासाठी ही सगळी धडपड आहे, ज्यासाठी तुम्ही उपवास करता, ज्यासाठी हे सगळे त्रास उचलले, देवाला टाहो फोडला, ते आपल्या सगळे दारातच आहे. म्हणून आपल्या हृदयातच आधी परमेश्वर ओळखला पाहिजे. आपल्या हृदयात जो परमेश्वर मिळेल त्यानेच हृढयीतच आधी आपण जाणू शकू, त्यानेच आपल्याला सत्य मिळेल, एकमेव सत्य परमे१्व२ कळेल. सत्य काय आणि खोटं काय ? सध्यातरी आपली अशी स्थिती आहे, अधांतरी! सध्या जोपर्यंत आपला परमेश्वराशी संबंध झालेला औळखला नाही, तोपर्यंत परमेश्वराबद्दल काहीही धारणा करून परमेश्वर मिळत पाहिजे. आपल्या नाही. परमेश्वराची तुम्ही धारणा करू शकत नाही. ती आपल्यामध्ये धारणा झाली पाहिजे. परमेश्वर हा असा, परमेश्वर हा तसा, त्याला हृढयात जो शिव्याही द्यायच्या. साकडे घालायचं की, 'तुझं मी एवढं केलं, माझें प२मेशव२ मिळेल का नाही करत.' अरे, पण तुझा संबंधच नाही! परमेश्वराचा काय दोष त्याच्यात! परमेश्वराने तुमचं जर काही केलं नाही, तर त्याचा काय त्यानेच आपण दोष आहे? तुमचा त्याचा संबंध व्हायला नको का? जीणू शकू, तेव्हा सहजयोग आता तुमच्या दारी आलेला आहे. सगळ्यांनी सहजयोग स्वीकारावा आणि त्याचं वर्णन करावं. इतकेच नव्हे, तर तो त्यानेच आपल्या डोक्यावर धरून सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आपल्याली सत्ये पुढच्या वेळेस मला आशा आहे, की तुमच्या औरंगाबादला बरीच मंडळी येतील. आता बाहेरून आले, तर गावातले जास्तच मिळेल, एकमेव पाहिजे ह्यांच्यापेक्षा. तर आज संध्याकाळी बघूयात कसं काय होतं ते ! २त्य कळेल. वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्याला कशाबद्दल विश्वास असला आणि त्याबद्दल कोणी काही म्हटलं, तर फार वाईट वाटतं. समजा सत्य का्य आणि तुमच्या हातात साप आहे. मी म्हटलं, की तुमच्या हातात साप आहे, सोडा. पण अंधार आहे, दिसत नाहीये. तर तुम्ही म्हणाल की, खोटं काय? 'साप नाही दोरीच आहे.' पण जर प्रकाश आला, तर त्या प्रकाशातच कळेल नां, की हा साप आहे म्हणून. तर आधी प्रकाश घेतला पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे, सहजयोग्यांनीसुद्धा, की ज्यांना अजून प्रकाश मिळालेला नाही, त्यांना २१ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-21.txt प्रेमाने समजवून, वळवून घ्यायचं. त्यांना म्हणायचं, 'बघा, आमचं आयुष्य कसं बदलत चाललंय.' तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्या गोष्टी पुढ्यात येतील. आधी ते मागायचं नाही. आधी मागायचं 'प्रकाश दे. आधी आम्हाला परमचैतन्य दे.' आणि त्याच्यानंतर पुढ्यात, जिथे झालं तिथे अगदी समोर, दत्त. काहीही, कोणतेही प्रश्न राहणार नाहीत. सगळं अगदी व्यवस्थित होईल. तेव्हा तुम्ही कृपा करून सहजयोगामध्ये गहनता प्राप्त करा. बाकी सगळं व्यवस्थित होणार आहे. त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. फक्त सहजयोगाकडे लक्ष द्या. आपल्यातला आत्मा जागृत झाला की नाही, ह्याची पूर्णपणे प्रचिती आली आहे की नाही. आपण आता गहनात उतरलो आहोत की नाही. आणखीन निर्विचारितेच्या पलीकडे, निर्विकल्पतेत आपण उतरलो की नाही, इकडे लक्ष दिलं पाहिजे. उगीचच सहजयोग म्हणजे काहीतरी, जसं बाजारात जायचं असा ज्यांनी केला त्यांना सहजयोगाचा कोणताच लाभ होणार नाही. गहनात उतरलं पाहिजे. वेळ दिला पाहिजे. आजकाल वेळ कमी आहे. पण सकाळी दहा मिनिटं, संध्याकाळी दहा मिनिटं, पूर्ण आदराने केलं की झालं, व्यवस्थित होतं. त्याला काही करावं लागत नाही. तर एकंदरीत सगळा, सांगोपांग विचार करायचा. आपल्याला आयुष्यात काय मिळालं आहे, आपण आयुष्यात काय मिळवलं आहे. लोकांशी असं बोलायचं, 'काय हो, काय मिळालं, तुम्ही एवढं जप, तप केलं! हे केलं.' पहिल्यांदा डोळे उघडायचे, प्रकाशात यायचं आणि जे व्यवस्थित ते बघायचं. रूढीगत, फार रूढीगत आहे हे सगळं. त्या रूढींना तोडून टाकलं पाहिजे आणि समजलं पाहिजे, की आपणच त्या मोठ्या मंदिराचे खांब आहोत. आपलाच सगळा आधार होणार आहे. आता तुम्ही सुरुवातीचे सहजयोगी आहात म्हणून फार समजवून सांगितलं, पण तुम्ही काही सगळ्यांना सांगू नका. हळूहळू त्यांची सुटका करा. जाऊन सांगितलं, की 'तुझा हा गुरू आहे, त्याला सोड.' तर तुम्हाला मारायलाच धावतील. व्यवस्थित, आरामात समजवून सांगायचं, 'हे सोडा ह्याने काय मिळालं तुम्हाला? इतके दिवस केलं तर त्याने काय मिळालं? तुमच्या आई-वडिलांना काय मिळालं. हे कशाला करता ?' जे खरं आहे ते मिळवा. तुम्ही स्वत:चे गुरू होऊ शकता मग का नाही करावं. आता आम्ही एवढं कार्य काढलेले आहे. तुम्ही ते करावं आणि स्वीकारावं. २२ 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-22.txt ल भः २। क २ ्० साट ८ या ु ुभ मूत्त्यांपेक्षाही तुम्ही एक मोठी मूर्ती आहात. तुम्ही स्वत:च एक मंदिर आहात. ती मूर्ती काही तुमचे व्हायब्रेशन्स थोडीच ओळखू शकते! बस, व्हायब्रेशन्स तर तिच्यामधूनच येत असतात, बस, अजून काय होत असतं! तुम्ही तुमचे हात हलवू शकिती. दुसर्यांनी तुम्ही जागृती देऊ शकता. कोणाची चक्रं खराब असतील तर तुम्ही ती ठीक करू शकता. मूर्ती तर तिथे बसून व्हायब्रेशन्स सोडत असते. प.पू.श्रीमाताजी, मुंबई, ६/४/१९७६ प्रकाशक। निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-२५२८६५३७, ६५२२६०३१ , ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in 2015_Chaitanya_Lehari_M_VI.pdf-page-23.txt तुमच्या ज्या वाती आहेत त्या नीट ठेवा. तमचे शरीर नीट ठेवा. जो I, तुमचा दिवा आहे. त्यात असलेली तुमची शक्ती म्हणजेच तेल ते बौल्दिक जमाख्चात खर्च नका. ज्वाळेला सरळ ठेवा. ज्वाळेचा वर्चा भाग न आहे, तो आईला जोडा. तिच्या पायामध्ये बांधा. ज्वाळा सरळ उठेल. निर्विचारितेमध्ये निर्भिडपणे जळत राहील. प.पू. श्रीमाताजी, ६/ ४/१९७६, मुंबई