चैतन्य लहरा मार्च-एप्रिल २०१६ मराठी ाम ु नु इम या अंकाल भाषा व सहजयोग (पूजा, मुंबई, २१/०३/१९८७) जातीयता-भयंकर कोड ... ६ (सार्वजनिक कार्यक्रम, राहुरी, २२/०२/१९८४) निर्विचारिता ..१६ (सेमिनार अँड मिटिंग, मुंबई, ०६/०४/१९७६) तुमचेही वाढढिवस व्हायली पाहिजे. तुम्ही संगळेजण माडा वाढढिवस कारय सज२ करती. कसे हे सहजयोगी आहेत, तुम्ही बंधा की मी अनादि आहे, माझा कार्य वाढदिवस सजर करती? माइी अशी इच्छा आहे, की तुम्हा लोकांचे वाढढिव जरे केले जावेत आणि प्रत्येक वाढदिवशी मुष्य वाढत जातो, कमी त२ होत नाही. पं.पू.श्रीमाताजी, २५ नौव्हेंब२ १९७३ व सहजयोग भाषा 401 ा २ प ८ आणि माझी सर्वांना विनंती आहे, की राष्ट्रभाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये एक समत्व आहे. अर्थात् मराठी भाषेसारखी आध्यात्मिक भाषा आज तरी प्रचलित नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रभाषा ही शिकली पाहिजे. कारण आपले जे इतर बंधू आहेत, जसे तामीळचे लोक आहेत किंवा बांग्लादेश, बांगला भाषा बोलणारे लोक आहेत किंवा इतर देशातले जे लोक आहेत, त्या लोकांचे जे काही विचार आहेत, ते सगळे आधी हिंदी भाषेत देऊयात, इंग्लिश भाषेत जाऊ दे. कारण आपल्या संस्कृतीत आणि इंग्लिश संस्कृतीत फार तफावत आहे. तेव्हा ती आधी हिंदीतच फोफावी लागते. जरी आपली मातृभाषा कोणतीही असली, तरी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे. मग ४ मुंबई, २१/३/१९८७ त्यापासून तुम्ही इतर संस्कृत वरगैरे सगळें शिकू शकता. पण आधी हिंदी भाषा शिकली पाहिजे. सगळे फॉरेनर्स आता हिंदी भाषा शिकत आहेत आणि मला म्हणतात, 'माताजी, ह्या लोकांना तरी हिंदी येतं ! मराठी लोकांना तर हिंदी येतच नाही. मग त्यांच्याशी कसं बोलायचं?' म्हणजे त्यांनी चौदा भाषा शिकायच्या का? आता आपलं विश्वाचं कार्य आहे. आता राष्ट्रभाषेचे तसेच धिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे त्यांनीच काढलेले आहेत. निदान आपण तरी महाराष्ट्रात त्याला नीटपणे सजवलं पाहिजे. मी राष्ट्राभिमान म्हणून म्हणत नाही. पण मला दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही. हिंदी भाषेशिवाय ही संस्कृती आपण जगभर कशी पसरवू शकतो? एक तर सगळ्यांना मराठी भाषा शिका म्हणून म्हणावं लागेल. तसं काही जमायचं नाही. पण आता हिंदी भाषा तरी शिकली पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकांना कठीण नाहीये हिंदी भाषा शिकणं! ती शिकली तर बरं होईल. तसं महाराष्ट्रात फिरत असतांना मी मराठीतच बोलत असते आणि अध्यात्माला फार पोषक आहे, हे सर्व जरी असलं, तरीसुद्धा समयाचाराप्रमाणे ह्या वेळेला जर सगळ्यांना हिंदी भाषा आली तर काम सहज होऊ शकतं. त्यामुळे हिंदी लोकांचं काही माहात्म्य वाढणार नाही. नाही म्हटलं तरीसुद्धा सहजयोग उत्तरेला जायला अजून निदान मला वाटतं ५ वर्षे तरी लागतील. अजून दिल्लीतच.... त्यातून उत्तर हिंदुस्थानात तर त्याहून कठीण काम दिसतंय. बिहारमध्ये तर त्याहन कठीण काम दिसतंय. तेव्हा भाषेचा व सहजयोगाचा काही संबंध नाहीये. तो विचारच सोडला पाहिजे, की आम्ही जर हिंदी भाषेत सगळे केलं तर हिंदी लोकांचं राज्य येईल. सहजयोगात अस राज्य येत नाही. सुरू सहजयोगात प्रेमाचं राज्य येतं. पण आपापसात बोलायला जी भाषा लागते, ती कोणती तरी एक असायला बरी आहे. आता आपल्याकडे इटालियन, अमके-तमके असे चौदा भाषिक लोक आहेत. आता त्यांना मी आपल्या चौदा भाषा शिकवायला सांगून लक्षात कोणती तरी भाषा नको का? आता सगळ्यांना मराठी भाषा फार कठीण वाटते. ही म्हणजे गंगा नाही. गंगेच्या पलीकडची भागीरथी. त्याच्याही पलीकडची अलकनंदा आहे. तिथपर्यंत पोहोचायला कठीण काम आहे. हे सगळे कठीण आहे. आधी गंगेत तर उतरू देत, मग पूढे व्हा अलकनंदेत. अशी ही प्राचीन भाषा आहे. असे हे मराठी, प्रत्येकाला आलेच पाहिजे, पण आम्ही मराठीतूनच बोलणार, करायचे नाहीत. हिंदी भाषा ही शिकली पाहिजे. हिंदी भाषेत.... झाली तर सर्वांना ही समजू शकते. असले हट्ट प्रत्येकाने हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ५ राहुरी, २२ फेब्रुवारी १९८४ राहुरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण इथे जमलेले सर्व राहरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायला मला बरं नाही वाटत. कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळयांना माझा नमस्कार! दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखलं, की ह्या मनुष्याला लोकांबद्दल खरोखर कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही, त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाज कार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं आहे, ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी. पण बहतेक लोक समाजकार्य एवढ्यासाठी करतात की आपण राजकारणात येऊन पैसे कमवू. ते मला सगळं माहिती आहे. मी लहानपणापासून आपल्या देशाची स्थिती पाहिली आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये माझं वय कदाचित जास्त असेल. माझे वडीलसुद्धा फार धर्मनिष्ठ, अत्यंत उच्च प्रतीचे समाजकर्ते, देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉ.आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री, अत्यंत मैत्री! जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं. सगळं काही मी ह्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळच नातं त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. आणि अत्यंत तेजस्वी, उदार असे ते होते. माझे वडील गांधीवादी होते आणि हे थोडेसे गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे. संघर्षाची जरी गोष्ट म्हटली, तरी आपापसात अत्यंत मैत्री होती. फार मैत्री! माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी, विचारायला, कसं काय चाललं आहे? ठीक आहे की नाही ? अशा सर्व मोठ्यामोठ्या लोकांच्या ६ जीत ता भयकर बरोबर माझे लहानपण गेलेले आहे. मी गांधी आश्रमातही वाढले आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काढला. ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे काही समाजकर्ते झाले, आगरकर झाले, टिळक झाले, ह्या सर्वांच्या संघर्षामध्ये जी चीड होती, ती गोष्ट खरी आहे. जातीयता ही आपल्या देशामधील सर्वात भयंकर कीड आहे. म्हणजे कॅन्सरचा रोग आहे तो. आपण म्हणू ह्याला की ह्याच्यापेक्षा कोड आलेलं बरं ! पण ही जातीयतेची कीड आपण काढली पाहिजे आणि ही जातीयता यायलासुद्धा कारण पोटभरू लोकांचं आहे. आता आपण विचार करा, की जातीयता आली की तुम्ही जन्मापासूनच तुम्ही काय महार झाले, की जन्मापासूनच तुम्ही हे झाले. हे कसं शक्य आहे ? जर तुम्ही असा विचार करा, की ज्यांनी गीता लिहिली, कोणी लिहिली? व्यासांनी लिहिली गीता. माझा विचार हा आहे की ज्यांनी जात बनवली त्यांना मी विचारते. व्यास कोण होते ? एका कोळिणीचा पुत्र. ज्याला वडील नाहीत. अनाथ, ते व्यास! त्यांनी गीता लिहिली. ती वाचून तुम्ही जातीयतावाद कसा वाढवता! काय? 'जाती' हा शब्द जो निघाला, हा नंतर लोकांनी स्वतःचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी कधीतरी केला. आपल्या देशामध्ये अशात-्हेची जात नव्हती. कर्मानुसार जात होती. चार जाती मानल्या जात असत. पहिली जात, जो ब्रह्माला शोधतो तो ब्राह्मण. वाल्मिकी कोण होता? परत एक कोळी. आज त्याचं रामायण डोक्यावर घेऊन बसतात आणि जातीयता करता, म्हणजे मला समजत नाही. याचा मेळ कसा बसवायचा ते सांगा तुम्ही? तर हे काहीतरी स्वत:चे वर्चस्व करण्यासाठी. लोकांनी जन्मापासून जात काढली, पण कर्माप्रमाणे जात होती पहिल्यांदा. परमेश्वराने ज्या जाती घातल्या, त्या आतल्या होत्या, बाहेरच्या नाही. आता समजा एक झाडाची जात आहे. आंब्याची जात आहे, त्याला आंबा आला पाहिजे. जो मनुष्य ब्रह्मतत्त्वाला जाणून घेतो, ब्रह्मत्त्वात लीन होतो, तोच ब्राह्मण आहे. असे किती ब्राह्मण असतील, ते माझ्यासमोर या! परवा मी असा प्रश्न केला, येऊन माझ्यासमोर असे असे करायला लागले. म्हटलं, 'हे काय होतं हो तुम्हाला? मोठे ब्राह्मण बनता. हे असं असं कशाला ? तुम्ही ब्रह्माला जाणलंय नां!' 'माताजी, तुम्ही शक्ती, म्हणून आम्ही हालतोय. हे शेजारचे हलतात.' म्हटलं, जाऊन विचारा कोण आहेत ते ? त्यांनी जाऊन विचारपूस केली. कळलं की ते ठाण्याहून, पागलखान्यातून ठीक होऊन आले आहेत. म्हटलं, तुम्ही आणि ते एकच. काय आहे तुमच्यामध्ये जास्त? म्हणून स्वत:ला काहीतरी शिष्ट समजून जर कोणी म्हणेल, की मी ब्रह्मतत्त्वाला प्राप्त झालो आणि मी ब्राह्मण आहे, तर अशा सर्टिफिकेटने, सेल्फ सर्टिफिकेटने काही होणार नाही. असे सर्व धर्मामध्ये झाले आणि होतात. आणि हे आता सांगायचं म्हणजे, की शेड्यूल कास्टमध्ये आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते. ते चांगले जातीचे हे होते, म्हणजे मराठा समजा, राजपूत. पण ते स्वत:ला शेड्यूल कास्ट म्हणून आले. मी म्हटलं, असं कसं, तुम्ही शेड्यूल कास्ट असे कसे झाले ? म्हणे आता आयएएसमध्ये आहे तर शेड्यूल कास्ट ७ सार्वजनिक कार्यक्रम झालो. म्हणजे आता दुसरी जात काढली आणखीन. तर हे असे संघर्ष चालू. ह्या गोष्टी काही ठीक होणार नाही. दुसरी गोष्ट, जात ही काही आपल्या देशात नव्हती. ज्यांनी ब्रह्मकार्य स्वीकारलं ते ब्राह्मण. ज्यांनी युद्धामध्ये परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न केला, ते क्षत्रिय. तर ज्यांनी पैशामध्ये, म्हणजे जे मारवाडी आहेत ते, ते वैश्य. कारण त्यांनी पैशामध्ये परमेश्वर शोधला आणि ज्यांनी असा विचार केला, की काहीही काम पडलं तरी हरकत नाही, पैसे कमवायचे त्यांनासुद्धा ...... आणि अशा लोकांना, उगीचच ज्या लोकांना आपल्याला जबरदस्ती करून काहीतरी वाईटपणाच्या त्यांना .... करून टाकलं, असं करून टाकलं. जे शेती करतात, ते सगळ्यात मोठे कार्य आहे. शेती उत्पादन करणं, शेतीचं कार्य करणं, सर्वात उच्च आहे. पण जो आयएएसचा मनुष्य असला, कलेक्टर, तो उच्च मानला जातो आपल्या देशात. तो तर सरकारी नोकरच. त्याला तरी माहिती आहे का? ती तर नोकराची जात आहे. त्याला आपण कलेक्टर म्हणून नमस्कार करतो. जो शेतीचा मनुष्य जो जमिनीत कष्ट उपसतो, तो खरं तर उच्च कार्याला लागलेला आहे. तेव्हा ही सगळी डोक्याचीच करामत आहे. लोकांच्या डोक्याचीच करामत आहे. काहीतरी डोकं चालवून, कसं लोकांच्या डोक्यामध्ये धोंडा घालायचा, हे आपल्या देशातल्या लोकांना फार चांगलं येतं आणि ते अजून चालूच आहे. कुठेतरी चालूच असणार. आंबेडकरांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. माझे वडीलसुद्धा कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीमध्ये मेंबर होते. त्यांनी कॉन्स्टीट्युशन केलं. आणि वादविवाद व्हायचा. तेव्हा माझे वडील म्हणाले की, 'असं करू या, की जे लोक आपल्याला फार उच्च .ते आमच्या घरी येऊन बसत असत स्थितीचे म्हणतात,' कारण माझे वडील साधे मनुष्य होते, 'त्यांना आपण साधू करू. म्हणजे त्यांच्यातले लक्ष्मी तत्त्व जागृत होऊन ते सर्वांची मदत करतील.' जसं आता सर्जेराव पाटीलांचं झालं. आंबेडकरांचं म्हणणं असं होतं , की ते तुम्ही काही ह्यांच्या गोष्टीत येऊ नका. हे लोक फार दुष्ट आहेत. लबाड आहेत. जे हे मोठेमोठे ब्राह्मण बनतात, काही आपल्याला देणार नाहीत. त्यांचा तर ..... केला पाहिजे. अस त्यांचं म्हणणं होतं. नंतर अल्लाद्दी कृष्णस्वामी अय्यर हे त्याचे चेअरमन होते. आपल्याला माहिती नाही जे कॉन्स्टिटयूशन बनवलं गेलं , त्यात सगळ्यात विद्वान मनुष्य म्हणजे अल्लाद्दी कृष्णस्वामी अय्यर, अगदी पक्का सन्याशी तुम्हाला सांगते. दोन धोतरावर राहणारा मनुष्य. त्याचं मी सगळे पाहिलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. अशी माणसं मी पाहिलेली आहे. तुमचं नशीब नाही चांगलं म्हणून आता हे दुसरेच बघतात. पण आमचं नशीब चांगलं. आम्ही अत्यंत त्यागी माणसं पाहिलेली आहेत त्यावेळी. त्यांचं विशेष सांगितलं तर तुम्हाला वाटेल, माताजी कुठल्या गोष्टी करतात? आणि त्यात हे जे अल्लादी होते, ते तर ब्राह्मणांच्या मागे हात धुऊन लागले होते. स्वतः ब्राह्मण. ह्यांच्या म्हणे सगळ्यांच्या शेंड्या कापू. तेव्हा त्यांच्यामध्ये जी जागृती होती, तेव्हा त्यांना जी वाटायची चीड, म्हणजे चीड सगळ्यांनाच वाटली, आगरकरांना वाटली नाही का, टिळकांना वाटली नाही का, गांधींना वाटली नाही, का, पण प्रत्येकाने आपल्या आपल्या तऱ्हेने गोष्टी मांडल्या. 'माताजी, हे बुद्धांचं आहे.' हे बरोबर आहे. बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं की, 'बुद्धं शरणं गच्छामी!' म्हणजे नुसतच बोलायचं नसत ते. आधी तुम्ही बुद्ध झाले का? बुद्ध म्हणजे काय? पाट्या लावून बुद्ध नाही होत. काय हो, नुसती आम्ही ख्रिश्चन म्हणून पाटी लावली, बुद्ध म्हणून पाटी लावली म्हणून काही आम्ही बुद्ध होत नाही. ८ बुद्ध झालं पाहिजे. हे बुद्ध बसलेत बुद्ध, ज्याला बोध झाला, ज्याला जाणीव तुमच्यासमोर, ज्यांनी ब्रह्माला जाणलं तो झाली तो बुद्ध. ते कार्य आम्ही करतोय नां आता सहजयोगाचं! आधी बुद्ध होऊन घ्या. दूसरं त्यांनी सांगितलं 'धम्मं शरणं गच्छामी'. म्हणजे धर्म जागृत झाला पाहिजे. सांगितलं की दारू पिऊ नका, की हमखास पिणार. ते मी बघतेय. लहानपणीसुद्धा आजीबाई होते मी. तेव्हापासून बघतेय. जे म्हटलं नाही करायचं, तेच करायचं. ही मनुष्याची प्रवृत्ती आहे. बंडखोरी. तेव्हा त्याच्यात जर धर्म जागृत केला, आपोआप सगळ सुटतं. म्हणून धर्म जागृत करायचा. 'धम्मं शरणं गच्छामी'. पण सगळ्यात शेवटचं, 'संघं शरणं गच्छामी' जे सांगितलेले आहे बुद्धाचे, ते समजून घेतले पाहिजे. बुद्ध झाल्याशिवाय तुम्ही संघात उतरू शकत नाही. संघ म्हणजे काय ? ज्याला आपण सामूहिक चेतना म्हणतो. ह्या सबंध शरीराच्या अंगप्रत्यंगामध्ये हे बोट किंवा हे बोट वेगळं आहे का? एका संघात बांधलेले आहे. तसेच ह्या विराट पुरुषामध्ये आपण सगळे एक अंगप्रत्यंग आहोत. त्याच्यात फक्त जागृत व्हावं लागतं. जर तुम्ही जागृत झाला तर तुम्ही संघात आले मग काय? मग कोणती जात नी कोणती पात ! तुमच्या हाताला आणि बोटाला काय वेगळी जात आहे? तुमच्या नाकाला वेगळी जात आहे का? जर ह्या बोटाची आम्ही मदत केली तर काय आम्ही कोणाची सेवा केली? तर ते आतून झालं पाहिजे. आपण झाडावरतीच भांडत बसलोय अस मला वाटायचं लहानपणापासून. ही सगळी मंडळी झाडावर बसून आपापसात भांडत आहेत, बोलत आहेत, विचार करत आहेत. आता ह्यांनी म्हटलं की काही विशेष होऊ शकलं नाही. तर त्याला कारण असं की मुळात जा नां! प्रत्येक गोष्टीचं तत्त्व धरलं पाहिजे आणि त्या तत्त्वामध्ये मुख्य तत्त्व हे आहे, की तुमचा आत्मा हा सर्व विश्वात व्यापलेला आहे. ते विश्वव्यापी स्वरूप तुम्ही मिळवून घ्या. हा आमचा सरळ सहजयोग आहे. मग म्हणतील कोण ब्राह्मण आणि कोण क्षुद्र ! सगळे योगीजन झाल्यावरती, परमेश्वराच्या साम्राज्यात उतरल्यावर जातीयता कुठून राहणार? ही सगळी माणसांनी पसरवलेली घाण आहे. अहो, माणूस इथे तर तिथे घाण होणारच. तुम्ही आत्ता जाऊन बघा. एखाद्या जंगलात , एकसुद्धा घाण दिसणार नाही. ते जसं गाव यायला लागलं, बाहेरूनच सुगंध येतो, की माणसं आहेत. जनावरं राहतात, साप रहातात, सर्व तऱ्हेचे राहतात लोक, पण एवढी घाण दिसत नाही. ते गावात आलं की कळतं, की गाव लागलं! ती माणसाला सवय आहे. त्याला डोकं आहे असं जबरदस्त, की कसंतरी, जे काही चांगलं आहे, त्याचं काहीतरी अनिष्ट करून टाकायचं. बुद्धांचं तरी काय भलं केलेले आहे का? मी बघते बुद्धमार्गी लोकांना तर मला आश्चर्य वाटतं की बापरे, बुद्धाला काय करू ? हे जैनांचे महावीर, त्यांचे काय हाल करून ठेवलेत! ते समकालीन एकच गोष्ट करत होते. त्यांचे हाल करून ठेवले. ख्रिस्ताचे हाल करून ठेवले. आपल्या सर्व साधु-संतांनी जे काही शिकवलं, त्यांचे ही हाल करून ठेवले. आता जागृत तुम्हीच व्हा. सगळ्यांना बुद्ध करायचं कार्य मी काढलेले आहे. खरा बुद्ध धर्म हा सहजयोग आहे. कारण ह्याच्यात तुम्ही स्वत: बुद्ध होता. तुम्हाला बोध होतो. तुमच्या बोटांमधून बोध होतो आणि तुम्ही जाणता, तुमचं काय चुकलेले आहे, दुसऱ्यांचे काय चुकलेले आहे, कसं स्वत:ला नीट करून घ्यायचं. आणि एकदा हा जर तुम्ही बुद्ध धर्म घेतला जो आतला, तुमचा सर्वांचा आहे. सगळ्यांना कुंडलिनी आहे. कुंडलिनीला जातपात काही नाही. आहे का? तुमच्या आत्म्याला काही जातपात आहे का? फक्त कुंडलिनी व आत्म्याचा संबंध जोडून देणे. हे ९ सार्वजनिक कार्यक्रम एक कार्य आहे. ते जर झालं की लक्ष्मीचं त्त्वसुद्धा जागृत होतं. आता मी म्हणेन मागासलेल्या लोकांना त्रास काय ? त्यांच्या त्रासाचंसुद्धा एक तत्त्व आहे, ते ही जाणून घ्या. मी सांगते, आई आहे म्हणून. सांगितलेच पाहिजे. म्हणजे भूत आणि हे सगळे, प्रेतविद्या, स्मरशानविद्या, हे धंदे करून आपण आपला सर्वनाश करून घेतलेला आहे, मागासलेल्या जातीने. ते सर्व सोडलं पाहिजे तुम्ही. चेटूक, हे, ते फार करतात. परवा मला एक भेटले होते मागासलेले. त्यांनी मला प्रश्न टाकला, माताजी, मग परमेश्वर सगळीकडे एकसारखा आहे, तर आम्ही अजून एवढे मागासलेले का? अहो, आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जा. तुम्ही तर इंदिराबाईंच्या साम्राज्यात बसलेत. हा प्रश्न त्यांना जाऊन विचारा. पण जर मला विचाराल, तर आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जाऊन मग पहा, कशी दरिद्रता राहते ते. कारण हे एकदा संकट सुटलं, हा चेटुकाचा जो प्रकार चालतो आणि हे जे धंदे चालतात आणि त्यात आणखीन ब्राह्मणांची भर. म्हणजे हे सगळे उपटसुंभ जाऊन तिकडे, 'तुमचं हे आम्ही भलं करतो. चार आंगठ्या आम्हाला द्या. दोन रुपये आम्हाला द्या.' हे असेच तिकडे ते पण आहेत. हे सगळें जर तुम्ही सोडलं, तर गरिबी अशी पळून जाणार! कारण हे जिथे असेल तिकडे लक्ष्मी अशी पळते. बरं परत सांगते पुढची गोष्ट! कारण मी सर्व देशात फिरलेली पण आहे पुष्कळ. जातीयता निघून गेली, तरी समता येणार नाही. हे लक्षात ठेवा. समता शब्द वेगळा आहे. आता काय आहे, की ज्या ठिकाणी जातीयता नाही, परदेशामध्ये, तिथे काय लोक सुखी आहेत ? तिथे काय दुर्दशा आहे ते मला विचारा तुम्ही! इंग्लंडलाच नाही तर त्या नुसत्या लंडन शहरात, प्रत्येक आठवड्यामध्ये दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. आता बोला! जातीयता नाही तिथे. अहो, जेव्हा दुसर्यांना नाही मारू शकत.... बनून तर आता आपल्याच मुलांना मारायला सुरुवात केली. म्हणजे काहीतरी बिघडलेले आहे नां डोके! काहीतरी बिघडलेले आहे. कोणाला विश्वास नाही वाटायचा, पण हे तिथे स्टॅटिस्टिकमध्ये आहे, की त्या लंडन शहरामध्ये दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. मी आपल्या डोळ्याने बघितलं. एवढी एवढी लहान लहान जन्मलेली मुलं, दुसर्या खोलीत झोपवायची. कुत्री-मांजरी आपल्या खोलीत झोपवायची. पाहिलं का तुम्ही कुठे ? ती मुलं तिकडे मरून गेली तरी चालतील. तुमचा विश्वास नाही बसणार, इतके दुष्ट स्वभावाचे लोक आहेत ! उठल्या सुटल्या बंदुकीने गोळ्या झाड. अमेरिकेत हे सारखं चालतं. चोऱ्यामाऱ्या तर इतक्या की तुम्हाला आश्चर्य वाटेल आता आम्ही इथे रात्रीचे फिरतो. कोणी अडवत नाही. काही नाही. तिथे तर अशी रात्रीची फिरण्याची सोयच नाही. कुठेच. दिवसाढवळ्यासुद्धा तुम्ही जर हातामध्ये पर्स घेऊन गेलात, तर ओढून घेणार. लंडनलासुद्धा. अमेरिकेला तर काय विचारायलाच नको. मी गेले तर साहेबांनी सांगितलं की सगळे दागिने काढून या. म्हटलं, 'हे बघा, मला ते जमायचं नाही. कारण हे देवीचं काम आहे आणि हे सगळे दागिने म्हणजे त्या देवीचे आहेत. मला काही काढता येत नाही. चोरी कोण करतं ते मी बघते. पण तुम्ही असं म्हणू नका. मी ते काही काढू शकत नाही. हे देवीचे आहेत. ते अलंकार मला घालावे लागणार. जोपर्यंत ते काम आहे.' तर अशी तिथे स्थिती आहे. तुम्हाला माहिती नाही. तिथे लोकांना १० काय काय त्रास आहेत! रात्रभर झोपू शकत नाही. वेडावलेत . ६५% लोक वेडे आहेत. आता बोला. तिथे काही जातीयता नाही. मग काय? माणसाचा स्वभाव असा आहे, की जर त्याला, एखाद्या ग्रुपला किवा एखाद्या समाजाला दाबायची सोय ठेवली नाही, तर तो घरातच दाबादाबी सुरू करतो. कुठेतरी करणारच. तो स्वभाव आहे. त्याला इलाज काय ? त्याला इलाज असा आहे, की कुंडलिनीचं जागरण केलं तर आज्ञा चक्रावरती तुमचा अहंकारच ओढून घेते कुंडलिनी. सट्ाक, तर हे जे कार्य आहे, ते ह्या वसतीगृहात तुम्ही ह्या मुलांना द्या. ह्या लहान मुलांना पार करा. जसं पाटील साहेबांनी आपल्या शाळेमध्ये मुलांना पार करून घेतलं. तसं तुम्ही पार करून घ्या. हा खरा आशीर्वाद आहे. आता आपण जे म्हटलं, की पैशाचं सोंग घेता येत नाही. कबूल आहे. पण पैशाचं चीज आपण करू शकतो. ते चीज करायला शिका. एक साधारण गोष्ट आपल्याला सांगते, की आमच्या सहजयोगामध्ये एक खेड्यातला मनुष्य, आता त्याला मागासलेला कसं म्हणायचं, माझा मुलगाच आहे तो. तुम्ही म्हणा मागासलेले. त्यांच्या जाती बनलेल्या असतात, त्याला मी काय करू ? अशा जातीचा एक मनुष्य आमच्याकडे येत असे. पाटील आहेत ते. फार सभ्य मनुष्य आणि फार गरीब. बरं, सहजयोगात दानधर्माची प्रथा नाही. आम्ही प्रथा नाही ठेवलेली. पण एका अर्थी दान होतच आहे ते. तर तो आमच्याकडे आला, तर मी म्हटलं, 'काय करता पाटील. रोजचा एक फुलाचा हार घेऊन येता. कसतरी हो.' मी कोणाला तरी म्हटलं, 'कमीत कमी ह्यांचे हाराचे तरी पैसे द्या.' मला जरासे ते कसेसेच वाटले, की आता हाराचं कशाला माझ्यासाठी मनुष्य आणखीन! इथे एवढे हार येतात आणि हे कशाला आपले पैसे घालतात. तर तो म्हणाला, 'माताजी, माझा प्रश्न सुटला. 'कसा?' 'नाही, म्हणजे आता पैशाचा मला काही प्रश्न नाही.' 'असं कां? काय झालं काय ?' 'नाही आमची पडीक जमीन होती नां बाहेर. मी तिथे ध्यान करतो बसून सकाळचं आणि संध्याकाळी थोडीशी शतपावली करतो तिथे.' 'तर काय झालं काय?' 'अहो, त्या जमिनीत काय गुण आला माहीत नाही. एक सिंधी माझ्याकडे आला, असं म्हणाला, जमिनीची थोडीशीही माती घेतली, ' म्हणजे पुण्यवान जमीन झाली नां! तर 'आमच्या विटा दगडासारख्या निघाल्या.' तर त्याने तराजूने तोलून घेतले. हे लक्ष्मी तत्व जागृत झालं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, की त्या माणसाचा मुलगा जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये, म्हणजे जिथे फार श्रीमंतांची, माझी मुलगी तिथेच शिकली, हजारो लोक तिथे उभे राहतात, पण फर्स्ट क्लास फर्स्ट आल्यामुळे स्कॉलरशिप मिळून आता तिथे शिकतो आहे. हे लक्ष्मी तत्त्व आधी जागृत करून घेतलं 'ह्या म्हणून. मला कबूल आहे, तुम्ही शाळेत घाला. शिक्षण द्या, पण त्यांना एक तर पार केलं पाहिजे. बुद्ध केलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या खेडेगावातून टोटके आणि हे करत फिरतात ह्यांना मात्र तुम्ही काढून टाकलं पाहिजे. हे परमेश्वराच्या विरोधात आहेत. पैसे बनवण्यासाठी हे जे लोक कामं करत असतात, प्रेतविद्या, स्मशान विद्या, भानामती वरगैरे, ह्या सगळ्यांचा तुम्ही नायनाट करा म्हणजे लक्ष्मी तत्त्व जागृत होईल. आणि त्याच्यातले काही आपल्या राजकारणी लोकांच्याही डोक्यात घुसलेली आहेत भुतं. हे भुताटलेले लोक आहेत. म्हणून असं होतंय. हे काही नॉर्मल लोक मला वाटतच नाही त्यांच्या बोलण्यावरून. ह्यांना आधी नॉर्मलाइज करायला ह्यांना आधी सहजयोगात आणुयात. सगळेजण योगीजन होऊन घ्या म्हणजे बरं. आता सांगायचं म्हणजे असं आपल्या समाजाचं कल्याण, देशाचं कल्याण, सर्व विश्वाचं ११ सार्वजनिक कार्यक्रम कल्याण करायचं असलं तर आपल्यामध्ये समग्रता यायला पाहिजे. समग्र, म्हणजे सगळ्यांच्या अग्राला एकाच दोरीने बांधून घ्यायचंय. ती दोरी म्हणजे विश्वाची कुंडलिनी आहे. त्या दोरीत एकदा तुम्ही बांधले गेले, म्हणजे कसली जात नि कसली पात. सगळे त्या प्रभू परमेश्वराच्या अंगातले अंगप्रत्यंग झाल्यावर कसली जात नी कसली पात! हे आमचं कार्य आहे. तेव्हा बाहेरच्या झाडावरच्या पानांना जोडण्यात काही अर्थ नाही. मुळात घुसलं पाहिजे. म्हणून सांगायचं म्हणजे असं, की इथे जे आपण वसतीगृह कराल , त्यात कोणी मागासलेला म्हणून म्हणायचं सर्वात मुख्य नाही. कोणी काही म्हणायचं नाही. याला कलंक कसला आला! हे नसते जबरदस्तीचे धंदे आहेत. आपल्या देशात ह्या प्रमाणात आहेत, तिथे दुसऱ्या प्रमाणात आहेत. परत आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे पैसे आले, अॅफ्ल्यूअन्स आलं, म्हणजे आपण फार बरे होऊ. तसं ही नाही आहे हो ! ह्या लोकांच्या जवळ एवढे पैसे आहेत मी परवाच सांगितलं, की स्वित्झर्लंड, नॉर्वे, स्वीडन तीन देशांमध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे आणि तिथे सगळ्यात जास्त लोक आत्महत्या करतात. आता बोला ! त्यांना डोहाळे लागले आत्महत्येचे. काय म्हणावं! तिथले तरुण तरुण मुलं आली, मुली आल्या. त्यांच्या हातामध्ये मला अशी जाणीव झाली, प्रेताची स्थिती आहे. म्हटलं करता काय तरुण लोक ? तोंडं अशी सुकलेली. मेल्यासारखी. म्हटलं, झालं काय तुम्हाला? 'नाही' म्हणे, 'आम्ही बसल्या बसल्या असा विचार करतो, की आत्महत्या कशी करायची?' खायला, प्यायला, द्यायला कशाची ददात नाही. त्याची ददात म्हणजे आत्महत्या करणे. तर म्हटलं झालं काय असं? असं काय करता ? तुम्हाला काही खायला नाही, की प्यायला नाही. तुमच्याकडे काही मोटारी नाही, की गाड्या नाहीत की शिक्षण नाही. सगळं काही आहे. मग, नाही म्हणे आम्हाला आनंद नाही मिळत. कारण आम्हाला आनंद नाही मिळाला कोणत्याच गोष्टीत म्हणून आता आम्ही आनंदाकडे वळतो. बुद्धाचेच उदाहरण आहे नां! सगळें असूनसुद्धा तो कशाला गेला परमेश्वराच्या शोधात . तसे हे परमेश्वराच्या शोधात आत्महत्या करीत आहेत. तेव्हा तुम्ही कशाला तितकं लांब जाऊन, आत्महत्या करून मग परमेश्वर मिळवता? आत्ताच मिळवून घ्या नां! इतका लांबचा रस्ता कशाला ? आधी ते लोक ड्रग्ज घ्यायचे, मग भुतासारखे केस काढून जसे फिरले, आरडाओरडा केला, सगळं केलं त्यांनी. संपलं त्यांचं ते. आता आलेत सहजयोगात आणि मी म्हटलं, की एवढं लांबलचक फिरायची काय गरज आहे ? इथेच हृदयातच बसलेले आहेत. तुमच्या आत्म्याचं स्थान तुमच्या हृदयात आहे. ते आपण घ्यावं आणि त्याच्या शक्तीपुढे बघा! काही दरिद्रता आहे ? काहीच नाही. तशीच नष्ट होऊन जाणार. कृष्णाने सांगितलं आहे नां, योगक्षेम वहाम्यहम् ! म्हटलेले आहे नां, योगक्षेम वहाम्यहम् ! योग झाल्यावर तुमचा क्षेम बघणार, पण आधी योग तर घ्या. तोपर्यंत त्याचं कनेक्शनच लावलेले नाही तर त्याचा उपयोग काय? आधी योग घ्या, असं मी सगळ्यांना सांगते. मग पुढचं बघू. पण योग घेतला, अंकुर फुटला की बसले एकीकडे जाऊन. थोडीशी मेहनत एक महिन्याची आणखीन करा, म्हणजे बघा, तुमचं वसतीगृह बघा. ह्या सबंध राहरीला एक नवीन रूप येणार आहे. आमची हीच मेहनत आहे. आमच्या आई-वडिलांचं स्थान आहे. आणि १२ त्यांना, जरी श्रीमंत होते फार, तरी सगळं काही घरात असूनसुद्धा, सगळा त्याग करूनसुद्धा एक समाधान त्यांना मिळालं नाही, की आमच्या देशाचं काही भलं झालं नाही. एवढी मेहनत केली, जेलमध्ये गेलो. आम्ही आमच्या मुलांचा, सगळ्याचा त्याग केला. सगळे काही केलं पण तरीसुद्धा आमच्या देशाचं काही भलं झालं नाही. पण आमचे वडील जे होते ते फार साधु-संन्याशी होते. त्यांनी मला सांगितलं की, 'बाई, तू ज्या कार्यासाठी आली आहेस, ते कार्य फार मोठंे आहे. हा महायोग आहे. तर तू ते शोधून काढ की सर्व जण सामावतील. कशा रीतीने, योग्य काय ? तू जर ते शोधून काढलंस, तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं. ते तू शोधून काढ.' त्यांच्या वेळेपर्यंत मी करू शकले नव्हते, पण आई जायच्या आधी तिने विचारलं, 'झालं का ते ?' म्हटलं, 'हो. हो झालं. शोधून काढलं.' तिने आनंदाने प्राण सोडले. तेव्हा जे आम्ही मोठे मोठे लोक पूर्वी पाहिले होते, म्हणजे पुष्कळ मोठे लोक झाले. त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे होऊ शकणार. फक्त आपल्या आत्म्याला जागृत करून घ्या. ते अगदी सोप काम आहे. त्याला पैसे लागत नाही. बिल्डिंगा लागत नाही. जिथे असाल तिथे होईल. हे आधी घेऊन घ्या. सरळ आहे नां गोष्ट. हे एकदा मिळवून घ्या, म्हणजे बघा, तुमचं कार्य कसं सुरळीत आणि व्यवस्थित चालतं. हाच एक दोष आपल्यामध्ये आहे, की अजून आपलं परमेश्वराच्या साम्राज्यात पदार्पण झालेलं नाही. त्याचा आशीर्वाद द्यायचा तर कसा द्यायचा. ज्या झाडाला अजून पाणी लागलेलं नाही, ते सुकूनच जाणार. म्हणून कनेक्शन हे करून घेतलं पाहिजे. संबंध हा जोडून घ्यावा. हा आमच्या सहजयोगाचा सरळधोपट मार्ग आहे. बाकी ह्या मुलांनासुद्धा फार उदारता आहे. ह्या बाहेरून आलेल्या लोकांना फार उदारता आहे. आधीच आम्ही (अस्पष्ट) च्या तिथे. तिथे काहीतरी व्यवस्था झाली मुलांची, शाळेची वगैरे. तर मला म्हणतात, माताजी, आम्ही एकेका मुलाला आमचा वारसदार करू. ते करतील म्हणा, पण त्याने काही हे काही मोठं धोरण नाही माझं. होईल . म्हणजे पैसे मिळतील, शिकले, अहो, शिकलेले कितीतरी गाढव मी पाहिलेत. शिकून काही शहाणपण येत आत्ता गेलो होतो नाही माणसाला! अगदी महागाढव होतात. आणि हे राजकारणी काही शिकलेलेल नाहीत नां! त्यांच्यात हृदयच नाहीये. हृदयच नाहीये बघायला, की अहो, हा आपला शेजारचा मनुष्य मरतोय आणि तुम्ही काय गमजा करता आणि पैसे काय खाता! ते हृदय जागृत व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आमचा सहजयोगाचा कार्यक्रम चाललेला आहे. आम्ही जे काही होईल ते सबंध, सगळ्यांच्यासाठी करतोय आणि ते करणार आहोत. जे काही आपल्याला त्रास असतील, फक्त सांगायचा अवकाश. पुष्कळांचे इलाज होतात. नुसतं ऐकूनसुद्धा होऊ शकतं. परमेश्वराच्या साम्राज्यात मात्र आपण या, नाहीतर आमचा हात नाही चालत. आमचा हात परमेश्वराच्या साम्राज्यात आल्यावर चालेल. तो आशीर्वाद तुम्ही घ्या. परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन बसा आसनावर आणि मिळवा स्वत:चं. 'तुज आहे तुजपाशी', ते घ्या. मग कोण रंजले आणि कोण गांजले. अहो, दिवा लावल्यावरती दिवा प्रकाश देतोच स्वत:. दिवा लावण्याचीच वेळ आहे. तोपर्यंत आपण मागतो की तेल घाला ह्याला, दिवा ठीक करा, त्याची वात ठीक करा. आणखीन प्रकाश द्या. आता काही नको करायला. तुमचा दिवा मी ठीक ही करते आणि तो तेवून ही घेते. तो तुम्ही तेवत ठेवायचा, बस्! तुम्हीच देणारे होणार. एवढे मात्र करून घ्या. जे खरं आहे तत्त्व ते एकदा मिळवा. हे फार जरुरी आहे. बाकी सगळे मिळवलेले तुम्ही पाहिले नां! काय त्यांनी दिवे लावले ते ही कळलेले आहे. १३ सार्वजनिक कार्यक्रम तेव्हा तुम्हाला खरोखर जर दिवे लावायचे आहेत, तर जे अस्सल आहे ते मिळवलं पाहिजे. नकलावरती जाऊ नका. अशी एक अत्यंत प्रांजळ विनंती मी तुम्हाला करते! मी आई आहे. जर काही मी तुम्हाला बोलले असेन, आईचं वाईट नाही वाटून घेतलं पाहिजे. ती तुमच्या हितासाठी झटते आहे. तुमच्या हितापलीकडे मला काहीही नको. जे काही आहे माझ्यामध्ये ते सगळेच तुम्हाला द्यायला मी आले आहे. ते घेऊन टाका. म्हणजे मी मोकळी होईन. सर्वांनी मला इथे बोलवलं, भूमीपूजन केलं. आम्हा सर्वांच्यातर्फे, तुम्ही जे मागाल ते आम्ही द्यायला तयार आहोत. मला ते समजत नाही विशेष. तेव्हा ते आपण मला कळवावं. म्हणजे आमचं काय आहे, की जागतिक एक ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्यांच्या काय व्यवस्था आहे वगैरे, त्यांच्याद्वारे सगळं काही होतं. मला पैशाचं एक अक्षर कळत नाही. तेव्हा त्यांचं काय असेल ते तुम्ही लिहून कळवा, काय तुमच्या गरजा असतील ते. मग तिथून काय पाठवायचं, करायचं ते करू. पण त्याचं काही महत्त्व मला नाहीये. मला महत्त्वाचं आहे, की तुमच्यातले किती लोक जागृत होतात नि किती सहजयोगी होतात? तर आता मी आलेली आहे. तर आशीर्वादस्वरूप सर्वांनी असा हात करून बसायचं. आरामात. आणि विचार जरा बंद करा. आता तुम्ही असाल राजकारणी. तुम्ही असाल कुठले काही. पण सध्या तुम्ही आईची मुलं म्हणून बसायचं. आणि हे घेऊन टाका तुमचं तुमच्याजवळ जे आहे. तुमच्या आत्म्याचं तुम्ही घ्या. असे हात करून बसा. त्याला जातपात लागत नाही, काही लागत नाही. तुमच्यामध्येच आत्म्याचं स्थान आहे. ते तुम्ही मिळवून घ्या. काय तराव ! नाव तुमचं सुमंत आहे नां ? सुमंत कोण होते माहिती आहे नां तुम्हाला? माहिती आहे का ? रामाचे सचिव होते. फार मोठं नाव घेतलंय तुम्ही. काय? आईने काहीतरी विचार करूनच नाव ठेवलं असणार. तेव्हा तसं काहीतरी करायला पाहिजे. असे हात करून बसा. अहो, त्या रामाने भिल्लीणीची उष्टी बोरं खाल्ली. मी तर म्हणते, भिल्लीणीची उष्टी बोरं काय पण तिच्या हातचं जेवणही खाणार नाहीत हे गाढव ! आहे नां गोष्ट खरी! मी आहे म्हणून म्हणते ह्यांना ! त्यांनी भिल्लीणीची बोरं खाऊन दाखवली तरी ह्यांच्या डोक्यात प्रकाश नाही पडला, तो कसा प्रकाश पडणार! आत्म्याचा पाहिजे. त्याच्याशिवाय इलाज नाही. काहीही करून दाखवलं हो. विदुराच्या घरी जाऊन कृष्णाने अन्न खाल्लेले आहे. पण तरीसुद्धा लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. एवढा मोठा गीतेचा सबंध ग्रंथसुद्धा त्यांनी कोणाच्या हातून लिहून घेतला? तर त्यांना आणखीन कोणी मिळाले नव्हते. शोधून त्यांनी व्यास काढला. कोळीणीचा. रामायण वाल्मिकीकडून लिहून काढलं परमेश्वराने. परमेश्वराचे चुकलेले नाही. तो वारंवार धडे देतोय तुम्हाला. पण मनुष्याच्या जातीला अक्कल नाही येणार. किती धक्के बसले तरी तसेच. म्हणून आता पार होऊन घ्या. तुम्हीच होऊन घ्या आता बुद्ध, म्हणजे झालं! मग मला काही बोलायला नको. कळलं कां? आता असे हात ठेवा. साधे असे हात करून बसायचं. आता डोक्यावरती बघा तुमच्या गार येतंय का? ह्या हाताने बघा. डोक्यातून गार निघालं पाहिजे. टोप्या काढून बसा. आईकडे कोणी टोप्या घालून बसत नाही. काढा १४ टोप्या. टोप्या कशाला आईसमोर. आईकडे आपण कसे येतो बरं! बघा, वर येतंय का, डोक्यावर गारगार. गार आलं पाहिजे डोक्यातून. ज्या भूमीवर बसला आहात ती भूमी केवढी पुण्यभूमी आहे ते कळेल तुम्हाला! हं येतंय का? काय हो? आता उजवा हात करा. गरमी फार आहे. सगळ्याचीच गरमी चढते. मग आजार होतात. गरमी फार आहे डोक्यात. उजवा हात माझ्याकडे करून सगळ्यांना क्षमा करा आता. आधी सगळ्या राजकारण्यांना क्षमा करा. अज्ञानात करताहेत ते काम. आणि ज्यांनी जातीयता पसरवली त्यांनाही क्षमा करा. मूर्ख आहेत ते. कोणी गाढव आहेत, कोणी मूर्ख आहेत. काय करायचं? सगळ्यांना क्षमा करायची आपण समजूतदारपणे. आता बघा, येतंय का डोक्यावर? काय? बघा गार आलं पाहिजे. क्षमा करा क्षमा. डोळे मिटून क्षमा करायची. क्षमा करता येत नाही लोकांना आणि म्हणतात की, 'माताजी, क्षमा कशी करायची?' पण अहो, तुम्ही क्षमा नाही केली तर स्वत:ला त्रास करून घेता. दूसर्यांना होत नाही. क्षमा करा. 'मी क्षमा केली' म्हणा. मनाने म्हणायचं, पूर्ण मनाने. बघा येतंय का? तुमच्याच डोक्यातून निघालं पाहिजे. बघा जरा बारीक. सूक्ष्म आहे ते. सूक्ष्म आहे. आपण जडात बसलोय. सूक्ष्म आहे. आलं कां? बघा, सूक्ष्म आहे. तुमचं स्वत:चं आहे. हे स्वत:चं आहे बघा. गार येतंय का ? आता चोहीकडेसुद्धा गारवा वाटेल. आता हात असे वर करून बघा. आणि विचारा, ही ब्रह्मशक्ती आहे का ? ही परमेश्वराची शक्ती आहे का आई? असं विचारायचं मला. विचारा, ही परमेश्वरी शक्ती आहे का? मनापासून विचारा. ह्याचं उत्तर मी देते . ही आहे. ही शक्ती आहे बघा. हातात येते आहे तुमच्या. हे चहकडे जे जिवंत कार्य परमेश्वर करतो, ते आपण बघत नाही. लागलं हाताला गार. आता बघा शांत वाटेल. आता ह्याच्यानंतर बघा प्रचिती येईल हळूहळू. काय.. आता 'बुद्धं शरणं गच्छामी' म्हणायचं. नाहीतर मंत्राला काही अर्थ नाही. जागृत नाही. आता जितक्यांची नावं घेतली तितके साक्षात्कारी होते. सगळे साक्षात्कारी. पण त्यावेळेला ही गोष्ट करण्याची सोय नव्हती. येतंय का हातात. गार येतंय. काही आलं! छान वाटतं, शांत! तर आता मी सगळ्यांचा निरोप घेते. परमेश्वरी कृपेने सगळं तुमचं कार्य सुव्यवस्थित होईल. मुलांचे मला पत्ते पाठवा. फोटो पाठवा. ह्या लोकांची इच्छा आहे, की इथल्या मुलांना अँडॉप्ट (दत्तक ) करायचं. त्यांची व्यवस्था करतील. प्रेम देतील त्यांना. अशा रीतीने हे लोक करतील. आपण मुलांचे पत्ते आणि फोटो द्यावेत. त्यांनाही पार करावं. पाठवून त्यांची प्रकृती बरी राहील. त्यांचे सर्व रीतीने ठीक होईल. आपण बोलवलंत त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आणि सर्व सहजयोग्यांच्यातर्फे मी आपले आभार मानते. १५ मुंबई, ६ एप्रिल १९७६ ॐ संरे क. निर्विचारिता हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे ! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल, की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. पण आपल्यामध्ये ती योग्यता नसती, तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे-तिकडे धावत आहेत. वेड लागलं आहे लोकांना. विचार करीत नाही, की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे, अनादी कालापासून, जे मोठ्या-मोठ्या तत्त्ववेत्त्यांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराने, ते त्याचीच एक साक्ष आहे. त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या, त्या सगळ्यांना एकीकडे फेकून ह्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या १६ जाळ्यात फसवलेले आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेले असो, किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो, किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे, की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळी. असत्य असलं की ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतंही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय ? तर नरकाची पायरी. नरक गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चहुकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. संसारात सगळा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत सत्य पुढे केल्याबरोबर लोक असे बिचकतात, जसे अंधारातून कोणाला एकदम सूर्यात आणलं, की त्यांचे डोळे दिपतात आणि नको तो प्रकाश म्हणून मागे सरतात. तेव्हा सहजयोगात पुष्कळ मंडळी एकदम येणार नाहीत. हे लिहून ठेवणे. आली ती घसरणार. कोलमडणार आणि परत त्यांना मी जागेवर बसवणार आणि तरीसुद्धा परत परत धावणार. ही स्थिती राहणारच आहे मुळी, ती काही काळ. पण सहजयोगाला स्थायित्व, जगजाहीर ज्याला म्हणतात तसं करायचं असलं तर त्याचा एकमात्र इलाज आहे, आम्ही काहीही असलो तरी ते आहोतच. आमचं काही वैशिष्ट्य नाहीये ते किंवा आम्ही काही मिळवलेलंही नाही. आम्ही आहोत तसेच आहोत, जन्मजन्मांतरापासून. तेव्हा आमचं त्याच्यात काही देणं नाही न घेणं नाही. तेव्हां आम्ही असलो तर लोक एवढेच म्हणतील की, 'कबूल आहे, माताजी होत्या आदिशक्ती! मग काय! त्या स्वत:च त्या असल्यामुळे त्यांचं काय सांगता तुम्ही!' तर तुमच्याकडे नजर होणार आहे लोकांची, की सहजयोग्यांमध्ये काय परिवर्तन आलं? त्यांच्या धर्माची स्थापना झाली का? कारण धर्मस्थापना होते ना पहिल्यांदा. कलियुगामध्ये धर्मस्थापना माताजींनी केली का? ती कुठे करणार? ती तुमच्या नाभी चक्रात. तुमच्यातून तो धर्म आहे की नाही? तुम्ही धार्मिक आहात की नाही? ही आधी जर सिद्धता झाली, तर चार लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे, की ह्यांच्यामध्ये काय अंतर आलं आहे ! काय मनुष्य झाला आहे! कमालीची ह्याच्यात चमक आलेली आहे! आमचा एक दीप असला तर लोक म्हणतील, की आहे तो पुष्कळ दिवसापासून, आकाशदीप लागलेला आहे. त्याचं काय माहात्म्य! आल्या आणि गेल्या! पण जे दीप आम्ही लावलेले आहेत ते कधी लावले नव्हते. म्हणजे दिवे पाजळले, मराठी भाषेत म्हणायचं म्हणजे. तर तसं झालं नाही पाहिजे. खरोखरच आम्ही दीप लावून दिवाळी सजवली. हे तुमच्या प्रकाशामुळे कळलं पाहिजे लोकांना आणि ह्याच्यापेक्षा मोठी जाहीर बातमी काहीही असू शकत नाही. उद्या आम्ही पेपरमध्ये दिसलो. फोटो आला. 'व्वा! काय माताजींचे दिसतंच आहे मुळी! साक्षात् आहेत मुळी.' 'कबूल, पुढे काय? पण असं आहे, कितीही म्हटलं तरी त्या आदिशक्ती! आमचं काय?' तर मग त्या भामट्याकडे कशाला जाता तुम्ही? तर म्हणे भामट्याकडे एवढ्यासाठी जायचं, की तो नुसती आपली कमाल १७ दाखवत असतो. दोन पैसे दिले की खुश तबियत ! पण माताजी म्हणतात, की तुम्ही दाखवा कमाल! इथेच माताजींच हे चुकतं. त्यांना ज्या काही कमाली करायच्या आहेत त्या कराव्यात त्यांनी! पण आमच्याकडून अपेक्षा करतात, काय माताजींचे! पैसे म्हणतील तर देऊ आम्ही. काबाडकष्ट करा म्हणतील तर करू. पण आमच्याकडे धर्मस्थापना झाली पाहिजे. आमच्यामध्ये प्रेम दिसलं पाहिजे. संसारात लोकांनी म्हटलं पाहिजे, की काय चमकलाय मनुष्य! हे फार कठीण काम आहे बुवा! मग सहजयोग कसा जमणार ? पण आम्हाला जे धंदे करायचे आहेत ते आम्ही करत रा: राहू. मी आता परवाच सांगितलं की मी सिंगापूरला गेले होते. तर तिकडे एक गुरू बाबा, पळ काढत होते. कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं, की तुम्ही स्मगलिंग करा, काहीही करा. वाट्टेल तितक्या बायका ठेवा, पुरुष ठेवा. पण पैसे इकडे द्या मागे. शेवटी त्यांचं सगळ स्मगलिंगचे सामान पकडण्यात आले. तेव्हा ते आले माझ्याकडे. म्हटलं आता तुम्ही जाऊन त्यांना विचारा. तेव्हा ही गोष्ट माणसाला रुचतच नाही मुळी. आता कोणीही घ्या. मी म्हणते की किती तरी रियलाइज्ड साधू मी पाहिलेत. पुष्कळ पाहिले. ते आपले अंबरनाथला होते, महाराज आहेत ते. काही नाही. काही कोणाला करत नाही, काही नाही. मी म्हटलं, 'तुम्ही काही म्हणत का नाही महाराज ?' 'मरू देत.' कारण त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांची पात्रताच नाही मुळी ह्यांना कशाला द्यायचं? माझं तसं म्हणणं नाही. तुमची पात्रता आहे हे आधीच सांगितलं आहे मी. योग्यता आहे हे ही मी सांगितलं आणि हे दिलं आहे, हे ही खरं आहे. त्याबद्दल कोणालाही, तुमच्यातल्या कोणालाही शंका नाहीये. पण ते आतमध्ये भिनलं किती आहे ? त्याचा साक्षात्कार किती झाला आतमध्ये? तिकडे लक्ष असायला पाहिजे. आपल्या ज्या चुका आहेत किंवा जी बाजू लंगडी आहे ती बघितली पाहिजे. एक एक सहजयोगी म्हणजे दीपस्तंभासारखा आहे खरं पाहिलं तर! अहो, इतके गणेश बसवल्यावरती मला कशाला इकडे मरायला पाहिजे. इतकी मेहनत करायला पाहिजे! तुम्हीच सांगा मला! मला तंगड्या तोडायची काय गरज आहे जर तुमच्यासारखे एक एक तुम्ही बसवलेले आहेत. कुंडलिनी तुम्ही उठवू शकता. लोकांना पार करू शकता. एक एक मठ घालून बसलात तर लाखो रुपये तुमच्या पायावरती येणार. मला कशाला एवढी मेहनत करायला पाहिजे. फक्त एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे, अजून तुम्ही समजलेच नाही की तुम्हाला काय मिळालं आहे ते! अहो, ज्यांच्या जागृत्या झाल्या नाहीत त्यांनी सुद्धा आश्रमच्या आश्रम बांधले. 'आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत. घरगुती आहोत. गृहस्थाश्रमी आहोत.' हे बाह्यातलं झालं, पण आतमध्ये काय तुम्ही? जिथे पाय पडेल तिथून बाधा पळणार आहे, मला माहिती आहे. दुधातून पाणी काढून वेगळे करणारी तुमच्यामध्ये शक्ती असतांना, हे सगळं तुम्हाला प्राप्त झाल्यावरसुद्धा तेजस्विता येत नाही तर आता त्याला काय मी कारण सांगू हे मला समजत नाही. चक्र धरतंय म्हणजे काय? एवढी मेहनत करायची तुम्हाला गरजच नाही मुळी! नुसतं निरपेक्षतेत, साक्षी स्वरूपात उभं राहिल्या बरोबर चक्र खाड्कन सुटणार. कारण मिथ्या आहे ते सगळे काही. मिथ्यतेतून फक्त आपण जिथे आहो तिथे उभं राहिल्याबरोबर सगळंच्या सगळं तुटून पडतं की नाही पहा बरं! नुसतं चिकटवा जरा आपल्याला तिकडे. थोडसं चित्त जरा आतमध्ये घ्यायचंय. उभे १८ तिथेच आहेत, कपडेही तेच आहेत. वागणं तेच आहे. नवरा आहे, बायको आहे, मुलं आहे, बाळं आहेत, सगळा संसार आहे. कमाई आहे, पण चित्तात मात्र तुम्ही जर आतमध्ये उभे आहात तर सबंध संसाराची शक्ती तुमच्यामागे उभी आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. ही पृथ्वी माता उभी आहे तुमच्या संरक्षणाला! हे सगळे तारेगण उभे आहेत तुमच्या संरक्षणाला. काय पाहिजे ते! पण सहजयोगावर बोलायचं सुद्धा तरी नव्या नवरी सारखं लाजता. अर्धवट लोकांसाठी सहजयोग नाही हे शंभर वेळा मी सांगितलं आहे. असाल खंबीर आणि वीर तर या. मला दोन असले तरी चालतील. पण ते यायला पाहिजे वीरत्व, घोडा दिला, घोड्यावर बसवलं, घोड्याला कसं चालवायचं शिकवलं, पण तरी रडतराऊ लोकं, म्हणजे करायचं तरी काय हे तुम्ही मला सांगा! आता काय तुम्हाला चिकटवायला पाहिजे का घोड्याला! चक्रं ही धरलीच नाही पाहिजे. खरोखर धरत नाहीत तुमची चक्रं. आता हे बघा. ह्याच्यात माया कशी आहे ती समजून घेतली की तुम्हाला कळेल मी काय म्हणते ते. चक्र धरतच नाही. तुम्ही यंत्र आहात. तुम्ही एक कॉम्प्युटरसारखे यंत्र आहात आणि तुम्हाला जी बातमी मिळते, ती तुम्ही सांगता, इन्फर्मेशन. आता समजा ह्यांचं जर आज्ञा धरलेलं आहे, तर तुमचं आज्ञा धरणार नाही तर तिथे इन्फर्मेशन आली. पण तुमचा तो भाऊ आहे, तर 'माताजी, ह्याचं आज्ञा काढा बरं!' म्हणजे तुम्ही आज्ञाधारी झाला. 'हा माझा भाऊ, हा माझा चुलता, हे माझं अमकं, हे माझं तमकं, हा माझा मुलगा.' म्हणजे धरतं ते ! तुम्ही तुमचे कोण आहात? तुम्ही तुमचे एकाकार तुमच्यामध्ये! तुमच्याच आनंदात, तुमच्याच राज्यात परिवहन करता आणि तिथे जे तुमचे आहेत, ते होते आणि राहणार. तर हे बाह्यातलं जरा सोडायला पाहिजे. म्हणजे चक्रं धरणार नाहीत. ती फक्त इन्फर्मेशन तुम्हाला येते आहे. कोणाला जास्त येणार, कोणाला कमी येणार. त्यामुळे तुमची चक्रं धरत नाहीये. मग त्याच्यावरच लक्ष! 'माताजी, माझं हे धरलं. आता कसं काढू?' आता कसलं तुझं धरलेलं आहे! शेजारच्या माणसाचं धरलंय म्हणून तुझे तसे येत आहे. म्हणजे मिथ्या गोष्टींकडे जी आशंका आहे, ती सोडायला पाहिजे. जे मिथ्या आहे त्याबद्दल काय आशंका ? म्हणजे बागुलबुवा आपण म्हणतो तसं. हा नुसता बागुलबुवा तुम्ही धरत आहात. खरोखर त्याच्यामध्ये काहीही धरणं शक्यच नाही तुम्हाला. आता पुष्कळसे लोक असे म्हणतात, की कोणी होते गुरू. त्यांनी कोणाला अमकं दिलं तर त्यांना तो आजार झाला. तमक्यांनी तमक्याला बरं केलं तर त्यांना तो आजार झाला. तुमच्यातील कितीतरी लोकांनी ह्या लोकांना व्हायब्रेशन्स देऊन ठीक केलेलं आहे! तुम्हाला माहिती आहे. कोणाला आजार झालेला आहे इथे ? साक्षात् गंगा तुमचे पाय धुवत असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुम्ही इथे उभे लोकांनी असं वागायला नको. म्हणजे बाह्यातलं जे वागणं आहे, ते आतला भित्रेपणा, आतला कोतेपणा, त्यामुळे आहे. 'मला धरलं मला धरलं. ' म्हणजे हे आहे. सिंहासनावर बसायच्या राहून, राजासारखं राहिलं पाहिजे. परवा दिल्लीला एक गृहस्थ भेटले. म्हणे, 'मी फार साधा राहतो. शॅबीने राहतो. माताजी, तुम्हाला काही हरकत तर नाही?' म्हटलं, 'तुम्ही राजे आहात. तेव्हा व्यक्तित्व असं पाहिजे, की चार माणसात उभे राहिलं की वाटलं पाहिजे, की उभा आहे कोणीतरी मनुष्य. नाही तर सहजयोगी उभे करायचे म्हणजे लोकांनी म्हणायचं की कुठल्या कैदेतून आलेले हे लोक आहेत ! आपली फक्त स्थिती लक्षात घ्या, की माताजींनी जे दिलेले आहे ते काहीतरी विशेष आहे. अतिविशेष आहे हे मी १९ सांगते आपल्याला. त्याची किमया मी शिकले, तेव्हा जमलंय ते. कारण तुमचे हे गोतावळे सगळे. सुद्धा तुमच्या कुंडलिन्या अशा अटकलेल्या. त्या कशा सोडवायच्या आणि तुम्हाला ह्या मार्गावर कसं आणून सोडायचं, कसं इथे पोहोचवायचं, ही सगळी मेहनत आधी केली आणि तुम्हाला तिकडे सोडवलेले आहे. तुम्हाला पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे. धर्म फार जरुरी आहे. माणसामध्ये आपला धर्म जर हलत असला, तर सहजयोग जमत नाही. फार सोपं काम आहे धर्माचं. 'अति वर्जयेत्' जे काही अती आहे ते सोडायचं. पहिलं म्हणजे, मध्यावर रहायचं आणि अती काही करायचं नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये अतिशयता नसली पाहिजे. हट्ट नसला पाहिजे. वेड्यासारखं एखाद्याच्या मागे लागावं तसं नसलं पाहिजे. हसत खेळत सहज अगदी. अती म्हणजे अती वज्ज्ये. आता धर्मामध्ये काय! एक साधी गोष्ट दारू प्यायची नाही. तंबाखू ओढायची नाही. अशा राक्षसी ह्या वनस्पती आहेत. दारू हे एक त्हेचं राक्षसी मादक पेय आहे. लिक्विड आहे. अशा तऱ्हा आहेत. राक्षसीसुद्धा वस्तू आहेत जगामध्ये. त्या वापरू नका. खाण्याचं सुद्धा अती करू नये. विशेषत: गृहस्थाश्रमी लोकांना हा त्रास आहे, की खायचं असलं की, खाण्याबद्दल जरा जास्तच उत्सुकता असते. 'काय? काय बेत आहे ? काहीतरी चमचमीत करूया!' मग बसल्या बायका पुरुषांच्या डोक्यावर. त्यांची जीभ खराब करून करून. खाण्याचं सुद्धा अती करायचं सारखं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आयांनी मुलांना खराब करायचं. बायकांनी नवऱ्याला खराब करायचं. हे सुद्धा एक वेड आहे नुसतं. आणि मग लिव्हर खराब. अती वर्जयेत् ! नाहीतर उपवासाचा वेडेपणा. खायचेच नाही मुळी. उपवास! हे खायचं नाही, ते खायचं नाही. आठवड्यातून सात दिवस उपवास ! आणि नुसता फलाहार करायचा. खाण्याचं सुद्धा अती करायचं नाही. कपड्यांचं सुद्धा. एक तर नागवे फिरतील, नाही तर कपडे रोज तीन तीन बदलतील. काही मध्ये चालतं की नाही तुमचं! स्वच्छ, व्यवस्थित, उत्तम , साजेल असे कपडे घालायचे अंगावर. त्याच्यातही अती लक्ष नको. गृहस्थाश्रमी लोकांना फार जरुरी आहे. त्यांना एकच फायदा असतो, की मुलंबाळे झाल्यामुळे, काही अती केलं तर मुलं काढतात त्यांची खरडपट्टी. एखादा असा वेडा घरात असला, की लोक हसतात मग त्याला. मुलं हसू लागली की मग त्या वेड्याचा एक तर ....(अस्पष्ट) तरी होतो, आणि नाहीतर सोडून तरी देतो. तेव्हा अती वजर्ण्य करायचे. प्रत्येक बाबतीमध्ये अती वज्ण्य. आणि ज्या गोष्टी सैतानाच्या राज्यातल्या आहेत, तिकडे लक्ष ठेवायचं नाही. आता मनुष्याचा सगळ्यात मोठा धर्म तरी काय ? जर मला कोणी विचारेल की, 'माताजी, मनुष्याचा कोणता सगळ्यात मोठा सद्गुण आहे?' तर आता इतक्या लोकांना पाहिल्यावर एकच मला वाटतं, की फार जरुरी आहे, की हा जो तुमचा माथा आहे ना, हा कोणाही समोर वाकवायचाच नाही मुळी! हा जर माथा तुमचा वाकवला तुम्ही, मग रियलायझेशन फारच कठीण जातं. हे सगळे भामटे आलेले आहेत. त्यांच्यासमोर जाऊन आपलं डोकं टेकायचं! सहजयोग्यांनी तर कोणाही समोर वाकायची गरज नाही. दुसऱ्या सहजयोगी किंवा योगी माणसासमोर डोकं वाकवण्याची गरज नाही. तुम्ही काय कमी आहात! आज्ञा चक्र धरलंच पाहिजे आणि ते असं धरतं की ते सुटता सुटत नाही. कारण तुमच्यावर कोणी नाही, हे सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही गणेशाच्या स्टाइलमध्ये आहात तर ब्रह्मा, २० विष्णू, महेशसुद्धा तुमच्यापुढे जाऊ शकणार नाहीत. ... (अस्पष्ट) या तुम्ही मग बघा. बघा तुम्ही व्हायब्रेशन्स तर बघा! मी बोलते ते खरं आहे की खोटं आहे ! फक्त जसं माझे नाव आहे निर्मल, तसं तुम्ही स्वत:ला निर्मळ ठेवा फक्त. 'फक्त' हा शब्द आहे. ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा तुम्हाला हात लावू शकणार नाहीत. तुम्ही कोणासमोर जाऊन माथा टेकवण्याची काही गरज नाहीये. एवढे सगळे गुरु बाबा लोक आहेत नां, कोणी तेव्हा सहजयोग्यांनी माझ्या डोक्याला हात लावू शकत नाही. गंगासुसद्धा माझ्या डोक्यावर चढ़ू शकत नाही. पण तुम्ही लोक माझ्या डोक्यावर हात ठेवू शकता. आलं का लक्षात? काय करायचं? तेव्हा ही तुमची स्थिती असतांना, एवढ्या मोठ्या पदावर बसले असतांना, पहिल्यांदा आपला स्वत:विषयी बरोबर कल्पना न ठेवणे, हे सहज नाही. म्हणजे आता काही गर्व धर्म कथापन करायला नको. आता कोणी म्हणेल की आदिशक्ती तर असा गर्व का? म्हणजे आम्ही आहोतच. ह्याच्यात गर्व कसा ? म्हणजे आमचं काही वैशिष्ट्य नाही करायला पाहिजे, त्याच्यामध्ये. आम्ही आहोतच. तसेच आहोत. तसेच जर तुम्ही सहजयोगी आहात, नंतर काम. ते तर आहात. त्याच्यात गर्व कसला? पण जे आहात रहा. आता समजा, कोणी जर हिरा असला तर त्याच्यात चमक येणारच. हिऱ्याला काही गर्व चढतो का? याबाबतीत जाणलं त्याच्या उलट पाश्चिमात्य देशात आहे. तिकडे भयंकर अहंकार आहे पाहिजे की पवित्रता लोकांना! ते स्वत:ला लाटसाहेब समजतात. म्हणून इकडून गेलेत त्यांना नागवायला लोक. छाटून एक्सपोर्ट करून. एक्सपोर्ट क्वालिटी. छाटून बदमाश पाठवलेत. त्या अशायला पाहिजे. सगळ्यांचा अहंकार तडाकू तोडलाय की बस! गाढवासारखे आता चिलीम घेऊन आपल्या फिरतात. इतके मूर्ख आहेत. ते इतके महामूर्ख आहेत, की त्यांच्या मूर्खपणाचं मी पत्नीशिवाय वर्णन करू शकत नाही. तुम्हाला सांगेन कधीतरी. आता मुलंबाळ आहेत. सांगण्यासारखं नाही. त्यांनी आपल्या त्या अहंकारामध्ये महामूर्खपणाची पदवी मिळविलेली आहे. म्हणजे त्याला पदवी दानच देता येणार नाही. म्हणजे इतके मूर्ख दुभऱ्या कोणत्याही त्री कडे आई आहेत ते, की वाट्टेल ते करतील, मूर्खपणासाठी. म्हणजे आपल्याकडे वेडेसुद्धा तसं करणार नाहीत. तर ती एक तऱ्हा झाली. तुमची दुसरी तऱ्हा. तुम्ही लोक कितीही स्वरूपातच पाहिलं म्हटलं तरी तसेच राहणार. आणि त्यांना कितीही म्हटलं की अहो , डोकं खाली करा. पाहिजे. तरी ते वरती येणारच. म्हणजे अशा दोन तऱ्हेच्या लोकांवर आम्ही कुठे? थोडी तरी जागा आता सहजयोग्यांच्यामुळे झालेली आहे मधोमध. थोडीशी जागा. ती जरा वाढवायची आहे. मग काम बघा आमचं तुम्ही! तेव्हा सहजयोग्यांनी काय करायचं? पहिल्यांदा आपला धर्म स्थापन करायला २१ पाहिजे, नंतर काम. या बाबतीत जाणलं पाहिजे, की पवित्रता असायला पाहिजे. आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्री कडे आई स्वरूपातच पाहिलं पाहिजे. कठीण नाही. ती एक फारच सोपी गोष्ट आहे, पण आजकालच्या कलियुगात इतकी घाण पसरलेली आहे की नाकातच घुसते, डोळ्यातच घुसते. पूर्वी मला आठवते आमचे आई-वडील सांगायचे की सगळ्यांनी खाली डोळे करून चालायचं. वर डोळे करून कुणी चाललं तर शेजारीपाजारी लगेच आईला जाऊन सांगायचे, 'तुमची मुलगी अशी वर डोळे करून चालली होती.' झालं, मग आमचे अनेक अपराध झाले की त्यावर आईनी ओरडायचं मुलींवर. वडिलांना जर कुणी सांगितलं, 'अहो, तुमचा तो नाना डोळे वर करून चालला होता', मग नानाची कंबख्ती आली. त्याचं खाणं - पिणं बंद. 'तू वर डोळे करून का बघत चालला होता, लक्ष कुठे होतं तुझें?' लक्ष कुठे आहे हा पहिला प्रश्न असायचा. ही मी सांगते ती पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट! पण आता तुम्ही स्वतंत्र झाल्यामुळे बेछूटपणा जो आलेला आहे त्यामुळे जी प्रकरणं आपण केलेली, त्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की डोळे जमिनीवर ठेवायचे. ती तुमची आजी आहे. डोळे नेहमी जमिनीवर ठेवायचे. तिच्या आशीर्वादात राहायचं. स्वत:ला नम्र करून पृथ्वीच्या शरणात राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अर्थ. पैशाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत मनुष्याने कसे वागले पाहिजे ? सारखी पैशाची हाव ठेवून पैसे मिळत नाहीत किंवा दुसऱ्याकडे दोन वस्तू जास्त आहेत म्हणून अधाशासारखे तिकडे बघूनही पैसे मिळत नाहीत आणि त्याच्याजवळ पैसे आहेत म्हणून त्याचा गळा कापूनही पैसे मिळत नाहीत आणि ज्यांना पैसे मिळतात त्यांनासुद्धा सुख आणि आनंद मिळत नाही हे तुम्ही पाहिलेले आहे. आता बुद्धीनेच हा विचार तुम्ही कायम करू शकता की पैशाने सुख मिळत नाही तर मग कशाने मिळतं? पण पैसा एक अंग आहे, मग पैशाचे कोणते अंग आहे. तेव्हा लक्ष्मी नावाचं स्वरूप मी पूर्वी सांगितलं होतं , तसं स्वरूप असायला पाहिजे समाधानी, समाधानी वृत्ती. जे मिळेल ते स्वीकार करण्यामध्ये मनुष्य राजा होऊन जातो. अहो, ज्याला समाधान आहे तोच राजा. जो समाधानी नाही तो भिकारीच आहे. साधा हिशेब असतो. ज्याला समाधान नाही तो कितीही जरी मोठा असला, स्वत:ला मोठे तेव्हा मानत असला तरी तो भिकारी आहे आणि ज्याला समाधान आहे तो दिसायला जरी गरीब दिसला तरी तो राजा. समाधान मानायला पाहिजे आणि ते तुम्हासाठी कठीण नाही. सहजयोगामध्ये ते दिलंय आम्ही तुम्हाला, ते म्हणजे समाधान मानण्याची शक्ती. आता कसं मानून घ्यायचं आणि कसं करायचं ते ही थोडं सांगते मी. कारण हे सगळे प्रश्न माणसाला येतात विचारांच्यामुळे. जर तुमच्यात विचारच आले नाहीत तर प्रश्नही येणार नाहीत. तर कोणत्याही गोष्टीवर विचार जास्त सुरू झाला, अतीवर गेला की विचार उचलायचा आणि फेकायचा माताजींच्या चरणावर. ज्याला आपण अचेतन मन म्हणतो, अनकॉन्शस माईंड, ते तिथे आहे. तो सगळा विचार तिथे फेकायचा. मग आम्ही तो उचलतो. तुम्हाला प्रश्न आहे न उद्याच्या इन्कमटॅक्सचा, मग विचार करू नका. तो आणून आमच्या पायावर फेकायचा. तो जसा तुम्हाला हवा तसा होणार नाही. पण जे तुम्हाला हितकारी आहे ते होईल. हितकारी होईल आणि तेच खरं लाभदायी असते. २२ ১ 2दे] री ॐ ১। क आपल्या अन्तरस्थित या चौदा अवस्थांच्या माध्यमाद्भारेच आपल्या पुनर्जनमाविषयी आम्ही बोलत आहोत. हे स्तर पार केल्यानंतर अचानक आपण एका सुंदर कमळाप्रमाणे उमलतो. ईस्टरच्या दिवशी अंड भेट देणे हे या गोष्टीचे प्रतिक आहे की हे अंड एक सुंदर पक्षी बनू शकते. प.पू.श्री माताजी, इटली, 9९.४.9ee२ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.१०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन : ०२०-६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in आपले आपणच तुम्ही कमळाचे फूल इालेले आहात. कारण तुम्हाला फक्त तुमची सुगंध पस२वणे माहीत आहे. बाकी तुम्हाली काही माहीत नाही. तो देण्यात जी मजी आहे त्याची आनंद उठकणे हा एक अनोखा अनुभव आहे. एका मोठ्या अभिनव प्रकृतीचेच लोक अ२से कर० शकतीत. पं.पू.शरी माताजी, दिल्ली, २१.३.२००० र !० मा ---------------------- 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-0.txt चैतन्य लहरा मार्च-एप्रिल २०१६ मराठी ाम ु नु इम 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-2.txt या अंकाल भाषा व सहजयोग (पूजा, मुंबई, २१/०३/१९८७) जातीयता-भयंकर कोड ... ६ (सार्वजनिक कार्यक्रम, राहुरी, २२/०२/१९८४) निर्विचारिता ..१६ (सेमिनार अँड मिटिंग, मुंबई, ०६/०४/१९७६) तुमचेही वाढढिवस व्हायली पाहिजे. तुम्ही संगळेजण माडा वाढढिवस कारय सज२ करती. कसे हे सहजयोगी आहेत, तुम्ही बंधा की मी अनादि आहे, माझा कार्य वाढदिवस सजर करती? माइी अशी इच्छा आहे, की तुम्हा लोकांचे वाढढिव जरे केले जावेत आणि प्रत्येक वाढदिवशी मुष्य वाढत जातो, कमी त२ होत नाही. पं.पू.श्रीमाताजी, २५ नौव्हेंब२ १९७३ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-3.txt व सहजयोग भाषा 401 ा २ प ८ आणि माझी सर्वांना विनंती आहे, की राष्ट्रभाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये एक समत्व आहे. अर्थात् मराठी भाषेसारखी आध्यात्मिक भाषा आज तरी प्रचलित नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रभाषा ही शिकली पाहिजे. कारण आपले जे इतर बंधू आहेत, जसे तामीळचे लोक आहेत किंवा बांग्लादेश, बांगला भाषा बोलणारे लोक आहेत किंवा इतर देशातले जे लोक आहेत, त्या लोकांचे जे काही विचार आहेत, ते सगळे आधी हिंदी भाषेत देऊयात, इंग्लिश भाषेत जाऊ दे. कारण आपल्या संस्कृतीत आणि इंग्लिश संस्कृतीत फार तफावत आहे. तेव्हा ती आधी हिंदीतच फोफावी लागते. जरी आपली मातृभाषा कोणतीही असली, तरी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे. मग ४ मुंबई, २१/३/१९८७ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-4.txt त्यापासून तुम्ही इतर संस्कृत वरगैरे सगळें शिकू शकता. पण आधी हिंदी भाषा शिकली पाहिजे. सगळे फॉरेनर्स आता हिंदी भाषा शिकत आहेत आणि मला म्हणतात, 'माताजी, ह्या लोकांना तरी हिंदी येतं ! मराठी लोकांना तर हिंदी येतच नाही. मग त्यांच्याशी कसं बोलायचं?' म्हणजे त्यांनी चौदा भाषा शिकायच्या का? आता आपलं विश्वाचं कार्य आहे. आता राष्ट्रभाषेचे तसेच धिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे त्यांनीच काढलेले आहेत. निदान आपण तरी महाराष्ट्रात त्याला नीटपणे सजवलं पाहिजे. मी राष्ट्राभिमान म्हणून म्हणत नाही. पण मला दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही. हिंदी भाषेशिवाय ही संस्कृती आपण जगभर कशी पसरवू शकतो? एक तर सगळ्यांना मराठी भाषा शिका म्हणून म्हणावं लागेल. तसं काही जमायचं नाही. पण आता हिंदी भाषा तरी शिकली पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकांना कठीण नाहीये हिंदी भाषा शिकणं! ती शिकली तर बरं होईल. तसं महाराष्ट्रात फिरत असतांना मी मराठीतच बोलत असते आणि अध्यात्माला फार पोषक आहे, हे सर्व जरी असलं, तरीसुद्धा समयाचाराप्रमाणे ह्या वेळेला जर सगळ्यांना हिंदी भाषा आली तर काम सहज होऊ शकतं. त्यामुळे हिंदी लोकांचं काही माहात्म्य वाढणार नाही. नाही म्हटलं तरीसुद्धा सहजयोग उत्तरेला जायला अजून निदान मला वाटतं ५ वर्षे तरी लागतील. अजून दिल्लीतच.... त्यातून उत्तर हिंदुस्थानात तर त्याहून कठीण काम दिसतंय. बिहारमध्ये तर त्याहन कठीण काम दिसतंय. तेव्हा भाषेचा व सहजयोगाचा काही संबंध नाहीये. तो विचारच सोडला पाहिजे, की आम्ही जर हिंदी भाषेत सगळे केलं तर हिंदी लोकांचं राज्य येईल. सहजयोगात अस राज्य येत नाही. सुरू सहजयोगात प्रेमाचं राज्य येतं. पण आपापसात बोलायला जी भाषा लागते, ती कोणती तरी एक असायला बरी आहे. आता आपल्याकडे इटालियन, अमके-तमके असे चौदा भाषिक लोक आहेत. आता त्यांना मी आपल्या चौदा भाषा शिकवायला सांगून लक्षात कोणती तरी भाषा नको का? आता सगळ्यांना मराठी भाषा फार कठीण वाटते. ही म्हणजे गंगा नाही. गंगेच्या पलीकडची भागीरथी. त्याच्याही पलीकडची अलकनंदा आहे. तिथपर्यंत पोहोचायला कठीण काम आहे. हे सगळे कठीण आहे. आधी गंगेत तर उतरू देत, मग पूढे व्हा अलकनंदेत. अशी ही प्राचीन भाषा आहे. असे हे मराठी, प्रत्येकाला आलेच पाहिजे, पण आम्ही मराठीतूनच बोलणार, करायचे नाहीत. हिंदी भाषा ही शिकली पाहिजे. हिंदी भाषेत.... झाली तर सर्वांना ही समजू शकते. असले हट्ट प्रत्येकाने हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ५ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-5.txt राहुरी, २२ फेब्रुवारी १९८४ राहुरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण इथे जमलेले सर्व राहरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायला मला बरं नाही वाटत. कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळयांना माझा नमस्कार! दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखलं, की ह्या मनुष्याला लोकांबद्दल खरोखर कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही, त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाज कार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं आहे, ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी. पण बहतेक लोक समाजकार्य एवढ्यासाठी करतात की आपण राजकारणात येऊन पैसे कमवू. ते मला सगळं माहिती आहे. मी लहानपणापासून आपल्या देशाची स्थिती पाहिली आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये माझं वय कदाचित जास्त असेल. माझे वडीलसुद्धा फार धर्मनिष्ठ, अत्यंत उच्च प्रतीचे समाजकर्ते, देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉ.आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री, अत्यंत मैत्री! जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं. सगळं काही मी ह्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळच नातं त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. आणि अत्यंत तेजस्वी, उदार असे ते होते. माझे वडील गांधीवादी होते आणि हे थोडेसे गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे. संघर्षाची जरी गोष्ट म्हटली, तरी आपापसात अत्यंत मैत्री होती. फार मैत्री! माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी, विचारायला, कसं काय चाललं आहे? ठीक आहे की नाही ? अशा सर्व मोठ्यामोठ्या लोकांच्या ६ जीत ता भयकर 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-6.txt बरोबर माझे लहानपण गेलेले आहे. मी गांधी आश्रमातही वाढले आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काढला. ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे काही समाजकर्ते झाले, आगरकर झाले, टिळक झाले, ह्या सर्वांच्या संघर्षामध्ये जी चीड होती, ती गोष्ट खरी आहे. जातीयता ही आपल्या देशामधील सर्वात भयंकर कीड आहे. म्हणजे कॅन्सरचा रोग आहे तो. आपण म्हणू ह्याला की ह्याच्यापेक्षा कोड आलेलं बरं ! पण ही जातीयतेची कीड आपण काढली पाहिजे आणि ही जातीयता यायलासुद्धा कारण पोटभरू लोकांचं आहे. आता आपण विचार करा, की जातीयता आली की तुम्ही जन्मापासूनच तुम्ही काय महार झाले, की जन्मापासूनच तुम्ही हे झाले. हे कसं शक्य आहे ? जर तुम्ही असा विचार करा, की ज्यांनी गीता लिहिली, कोणी लिहिली? व्यासांनी लिहिली गीता. माझा विचार हा आहे की ज्यांनी जात बनवली त्यांना मी विचारते. व्यास कोण होते ? एका कोळिणीचा पुत्र. ज्याला वडील नाहीत. अनाथ, ते व्यास! त्यांनी गीता लिहिली. ती वाचून तुम्ही जातीयतावाद कसा वाढवता! काय? 'जाती' हा शब्द जो निघाला, हा नंतर लोकांनी स्वतःचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी कधीतरी केला. आपल्या देशामध्ये अशात-्हेची जात नव्हती. कर्मानुसार जात होती. चार जाती मानल्या जात असत. पहिली जात, जो ब्रह्माला शोधतो तो ब्राह्मण. वाल्मिकी कोण होता? परत एक कोळी. आज त्याचं रामायण डोक्यावर घेऊन बसतात आणि जातीयता करता, म्हणजे मला समजत नाही. याचा मेळ कसा बसवायचा ते सांगा तुम्ही? तर हे काहीतरी स्वत:चे वर्चस्व करण्यासाठी. लोकांनी जन्मापासून जात काढली, पण कर्माप्रमाणे जात होती पहिल्यांदा. परमेश्वराने ज्या जाती घातल्या, त्या आतल्या होत्या, बाहेरच्या नाही. आता समजा एक झाडाची जात आहे. आंब्याची जात आहे, त्याला आंबा आला पाहिजे. जो मनुष्य ब्रह्मतत्त्वाला जाणून घेतो, ब्रह्मत्त्वात लीन होतो, तोच ब्राह्मण आहे. असे किती ब्राह्मण असतील, ते माझ्यासमोर या! परवा मी असा प्रश्न केला, येऊन माझ्यासमोर असे असे करायला लागले. म्हटलं, 'हे काय होतं हो तुम्हाला? मोठे ब्राह्मण बनता. हे असं असं कशाला ? तुम्ही ब्रह्माला जाणलंय नां!' 'माताजी, तुम्ही शक्ती, म्हणून आम्ही हालतोय. हे शेजारचे हलतात.' म्हटलं, जाऊन विचारा कोण आहेत ते ? त्यांनी जाऊन विचारपूस केली. कळलं की ते ठाण्याहून, पागलखान्यातून ठीक होऊन आले आहेत. म्हटलं, तुम्ही आणि ते एकच. काय आहे तुमच्यामध्ये जास्त? म्हणून स्वत:ला काहीतरी शिष्ट समजून जर कोणी म्हणेल, की मी ब्रह्मतत्त्वाला प्राप्त झालो आणि मी ब्राह्मण आहे, तर अशा सर्टिफिकेटने, सेल्फ सर्टिफिकेटने काही होणार नाही. असे सर्व धर्मामध्ये झाले आणि होतात. आणि हे आता सांगायचं म्हणजे, की शेड्यूल कास्टमध्ये आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते. ते चांगले जातीचे हे होते, म्हणजे मराठा समजा, राजपूत. पण ते स्वत:ला शेड्यूल कास्ट म्हणून आले. मी म्हटलं, असं कसं, तुम्ही शेड्यूल कास्ट असे कसे झाले ? म्हणे आता आयएएसमध्ये आहे तर शेड्यूल कास्ट ७ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-7.txt सार्वजनिक कार्यक्रम झालो. म्हणजे आता दुसरी जात काढली आणखीन. तर हे असे संघर्ष चालू. ह्या गोष्टी काही ठीक होणार नाही. दुसरी गोष्ट, जात ही काही आपल्या देशात नव्हती. ज्यांनी ब्रह्मकार्य स्वीकारलं ते ब्राह्मण. ज्यांनी युद्धामध्ये परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न केला, ते क्षत्रिय. तर ज्यांनी पैशामध्ये, म्हणजे जे मारवाडी आहेत ते, ते वैश्य. कारण त्यांनी पैशामध्ये परमेश्वर शोधला आणि ज्यांनी असा विचार केला, की काहीही काम पडलं तरी हरकत नाही, पैसे कमवायचे त्यांनासुद्धा ...... आणि अशा लोकांना, उगीचच ज्या लोकांना आपल्याला जबरदस्ती करून काहीतरी वाईटपणाच्या त्यांना .... करून टाकलं, असं करून टाकलं. जे शेती करतात, ते सगळ्यात मोठे कार्य आहे. शेती उत्पादन करणं, शेतीचं कार्य करणं, सर्वात उच्च आहे. पण जो आयएएसचा मनुष्य असला, कलेक्टर, तो उच्च मानला जातो आपल्या देशात. तो तर सरकारी नोकरच. त्याला तरी माहिती आहे का? ती तर नोकराची जात आहे. त्याला आपण कलेक्टर म्हणून नमस्कार करतो. जो शेतीचा मनुष्य जो जमिनीत कष्ट उपसतो, तो खरं तर उच्च कार्याला लागलेला आहे. तेव्हा ही सगळी डोक्याचीच करामत आहे. लोकांच्या डोक्याचीच करामत आहे. काहीतरी डोकं चालवून, कसं लोकांच्या डोक्यामध्ये धोंडा घालायचा, हे आपल्या देशातल्या लोकांना फार चांगलं येतं आणि ते अजून चालूच आहे. कुठेतरी चालूच असणार. आंबेडकरांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. माझे वडीलसुद्धा कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीमध्ये मेंबर होते. त्यांनी कॉन्स्टीट्युशन केलं. आणि वादविवाद व्हायचा. तेव्हा माझे वडील म्हणाले की, 'असं करू या, की जे लोक आपल्याला फार उच्च .ते आमच्या घरी येऊन बसत असत स्थितीचे म्हणतात,' कारण माझे वडील साधे मनुष्य होते, 'त्यांना आपण साधू करू. म्हणजे त्यांच्यातले लक्ष्मी तत्त्व जागृत होऊन ते सर्वांची मदत करतील.' जसं आता सर्जेराव पाटीलांचं झालं. आंबेडकरांचं म्हणणं असं होतं , की ते तुम्ही काही ह्यांच्या गोष्टीत येऊ नका. हे लोक फार दुष्ट आहेत. लबाड आहेत. जे हे मोठेमोठे ब्राह्मण बनतात, काही आपल्याला देणार नाहीत. त्यांचा तर ..... केला पाहिजे. अस त्यांचं म्हणणं होतं. नंतर अल्लाद्दी कृष्णस्वामी अय्यर हे त्याचे चेअरमन होते. आपल्याला माहिती नाही जे कॉन्स्टिटयूशन बनवलं गेलं , त्यात सगळ्यात विद्वान मनुष्य म्हणजे अल्लाद्दी कृष्णस्वामी अय्यर, अगदी पक्का सन्याशी तुम्हाला सांगते. दोन धोतरावर राहणारा मनुष्य. त्याचं मी सगळे पाहिलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. अशी माणसं मी पाहिलेली आहे. तुमचं नशीब नाही चांगलं म्हणून आता हे दुसरेच बघतात. पण आमचं नशीब चांगलं. आम्ही अत्यंत त्यागी माणसं पाहिलेली आहेत त्यावेळी. त्यांचं विशेष सांगितलं तर तुम्हाला वाटेल, माताजी कुठल्या गोष्टी करतात? आणि त्यात हे जे अल्लादी होते, ते तर ब्राह्मणांच्या मागे हात धुऊन लागले होते. स्वतः ब्राह्मण. ह्यांच्या म्हणे सगळ्यांच्या शेंड्या कापू. तेव्हा त्यांच्यामध्ये जी जागृती होती, तेव्हा त्यांना जी वाटायची चीड, म्हणजे चीड सगळ्यांनाच वाटली, आगरकरांना वाटली नाही का, टिळकांना वाटली नाही का, गांधींना वाटली नाही, का, पण प्रत्येकाने आपल्या आपल्या तऱ्हेने गोष्टी मांडल्या. 'माताजी, हे बुद्धांचं आहे.' हे बरोबर आहे. बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं की, 'बुद्धं शरणं गच्छामी!' म्हणजे नुसतच बोलायचं नसत ते. आधी तुम्ही बुद्ध झाले का? बुद्ध म्हणजे काय? पाट्या लावून बुद्ध नाही होत. काय हो, नुसती आम्ही ख्रिश्चन म्हणून पाटी लावली, बुद्ध म्हणून पाटी लावली म्हणून काही आम्ही बुद्ध होत नाही. ८ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-8.txt बुद्ध झालं पाहिजे. हे बुद्ध बसलेत बुद्ध, ज्याला बोध झाला, ज्याला जाणीव तुमच्यासमोर, ज्यांनी ब्रह्माला जाणलं तो झाली तो बुद्ध. ते कार्य आम्ही करतोय नां आता सहजयोगाचं! आधी बुद्ध होऊन घ्या. दूसरं त्यांनी सांगितलं 'धम्मं शरणं गच्छामी'. म्हणजे धर्म जागृत झाला पाहिजे. सांगितलं की दारू पिऊ नका, की हमखास पिणार. ते मी बघतेय. लहानपणीसुद्धा आजीबाई होते मी. तेव्हापासून बघतेय. जे म्हटलं नाही करायचं, तेच करायचं. ही मनुष्याची प्रवृत्ती आहे. बंडखोरी. तेव्हा त्याच्यात जर धर्म जागृत केला, आपोआप सगळ सुटतं. म्हणून धर्म जागृत करायचा. 'धम्मं शरणं गच्छामी'. पण सगळ्यात शेवटचं, 'संघं शरणं गच्छामी' जे सांगितलेले आहे बुद्धाचे, ते समजून घेतले पाहिजे. बुद्ध झाल्याशिवाय तुम्ही संघात उतरू शकत नाही. संघ म्हणजे काय ? ज्याला आपण सामूहिक चेतना म्हणतो. ह्या सबंध शरीराच्या अंगप्रत्यंगामध्ये हे बोट किंवा हे बोट वेगळं आहे का? एका संघात बांधलेले आहे. तसेच ह्या विराट पुरुषामध्ये आपण सगळे एक अंगप्रत्यंग आहोत. त्याच्यात फक्त जागृत व्हावं लागतं. जर तुम्ही जागृत झाला तर तुम्ही संघात आले मग काय? मग कोणती जात नी कोणती पात ! तुमच्या हाताला आणि बोटाला काय वेगळी जात आहे? तुमच्या नाकाला वेगळी जात आहे का? जर ह्या बोटाची आम्ही मदत केली तर काय आम्ही कोणाची सेवा केली? तर ते आतून झालं पाहिजे. आपण झाडावरतीच भांडत बसलोय अस मला वाटायचं लहानपणापासून. ही सगळी मंडळी झाडावर बसून आपापसात भांडत आहेत, बोलत आहेत, विचार करत आहेत. आता ह्यांनी म्हटलं की काही विशेष होऊ शकलं नाही. तर त्याला कारण असं की मुळात जा नां! प्रत्येक गोष्टीचं तत्त्व धरलं पाहिजे आणि त्या तत्त्वामध्ये मुख्य तत्त्व हे आहे, की तुमचा आत्मा हा सर्व विश्वात व्यापलेला आहे. ते विश्वव्यापी स्वरूप तुम्ही मिळवून घ्या. हा आमचा सरळ सहजयोग आहे. मग म्हणतील कोण ब्राह्मण आणि कोण क्षुद्र ! सगळे योगीजन झाल्यावरती, परमेश्वराच्या साम्राज्यात उतरल्यावर जातीयता कुठून राहणार? ही सगळी माणसांनी पसरवलेली घाण आहे. अहो, माणूस इथे तर तिथे घाण होणारच. तुम्ही आत्ता जाऊन बघा. एखाद्या जंगलात , एकसुद्धा घाण दिसणार नाही. ते जसं गाव यायला लागलं, बाहेरूनच सुगंध येतो, की माणसं आहेत. जनावरं राहतात, साप रहातात, सर्व तऱ्हेचे राहतात लोक, पण एवढी घाण दिसत नाही. ते गावात आलं की कळतं, की गाव लागलं! ती माणसाला सवय आहे. त्याला डोकं आहे असं जबरदस्त, की कसंतरी, जे काही चांगलं आहे, त्याचं काहीतरी अनिष्ट करून टाकायचं. बुद्धांचं तरी काय भलं केलेले आहे का? मी बघते बुद्धमार्गी लोकांना तर मला आश्चर्य वाटतं की बापरे, बुद्धाला काय करू ? हे जैनांचे महावीर, त्यांचे काय हाल करून ठेवलेत! ते समकालीन एकच गोष्ट करत होते. त्यांचे हाल करून ठेवले. ख्रिस्ताचे हाल करून ठेवले. आपल्या सर्व साधु-संतांनी जे काही शिकवलं, त्यांचे ही हाल करून ठेवले. आता जागृत तुम्हीच व्हा. सगळ्यांना बुद्ध करायचं कार्य मी काढलेले आहे. खरा बुद्ध धर्म हा सहजयोग आहे. कारण ह्याच्यात तुम्ही स्वत: बुद्ध होता. तुम्हाला बोध होतो. तुमच्या बोटांमधून बोध होतो आणि तुम्ही जाणता, तुमचं काय चुकलेले आहे, दुसऱ्यांचे काय चुकलेले आहे, कसं स्वत:ला नीट करून घ्यायचं. आणि एकदा हा जर तुम्ही बुद्ध धर्म घेतला जो आतला, तुमचा सर्वांचा आहे. सगळ्यांना कुंडलिनी आहे. कुंडलिनीला जातपात काही नाही. आहे का? तुमच्या आत्म्याला काही जातपात आहे का? फक्त कुंडलिनी व आत्म्याचा संबंध जोडून देणे. हे ९ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-9.txt सार्वजनिक कार्यक्रम एक कार्य आहे. ते जर झालं की लक्ष्मीचं त्त्वसुद्धा जागृत होतं. आता मी म्हणेन मागासलेल्या लोकांना त्रास काय ? त्यांच्या त्रासाचंसुद्धा एक तत्त्व आहे, ते ही जाणून घ्या. मी सांगते, आई आहे म्हणून. सांगितलेच पाहिजे. म्हणजे भूत आणि हे सगळे, प्रेतविद्या, स्मरशानविद्या, हे धंदे करून आपण आपला सर्वनाश करून घेतलेला आहे, मागासलेल्या जातीने. ते सर्व सोडलं पाहिजे तुम्ही. चेटूक, हे, ते फार करतात. परवा मला एक भेटले होते मागासलेले. त्यांनी मला प्रश्न टाकला, माताजी, मग परमेश्वर सगळीकडे एकसारखा आहे, तर आम्ही अजून एवढे मागासलेले का? अहो, आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जा. तुम्ही तर इंदिराबाईंच्या साम्राज्यात बसलेत. हा प्रश्न त्यांना जाऊन विचारा. पण जर मला विचाराल, तर आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जाऊन मग पहा, कशी दरिद्रता राहते ते. कारण हे एकदा संकट सुटलं, हा चेटुकाचा जो प्रकार चालतो आणि हे जे धंदे चालतात आणि त्यात आणखीन ब्राह्मणांची भर. म्हणजे हे सगळे उपटसुंभ जाऊन तिकडे, 'तुमचं हे आम्ही भलं करतो. चार आंगठ्या आम्हाला द्या. दोन रुपये आम्हाला द्या.' हे असेच तिकडे ते पण आहेत. हे सगळें जर तुम्ही सोडलं, तर गरिबी अशी पळून जाणार! कारण हे जिथे असेल तिकडे लक्ष्मी अशी पळते. बरं परत सांगते पुढची गोष्ट! कारण मी सर्व देशात फिरलेली पण आहे पुष्कळ. जातीयता निघून गेली, तरी समता येणार नाही. हे लक्षात ठेवा. समता शब्द वेगळा आहे. आता काय आहे, की ज्या ठिकाणी जातीयता नाही, परदेशामध्ये, तिथे काय लोक सुखी आहेत ? तिथे काय दुर्दशा आहे ते मला विचारा तुम्ही! इंग्लंडलाच नाही तर त्या नुसत्या लंडन शहरात, प्रत्येक आठवड्यामध्ये दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. आता बोला! जातीयता नाही तिथे. अहो, जेव्हा दुसर्यांना नाही मारू शकत.... बनून तर आता आपल्याच मुलांना मारायला सुरुवात केली. म्हणजे काहीतरी बिघडलेले आहे नां डोके! काहीतरी बिघडलेले आहे. कोणाला विश्वास नाही वाटायचा, पण हे तिथे स्टॅटिस्टिकमध्ये आहे, की त्या लंडन शहरामध्ये दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. मी आपल्या डोळ्याने बघितलं. एवढी एवढी लहान लहान जन्मलेली मुलं, दुसर्या खोलीत झोपवायची. कुत्री-मांजरी आपल्या खोलीत झोपवायची. पाहिलं का तुम्ही कुठे ? ती मुलं तिकडे मरून गेली तरी चालतील. तुमचा विश्वास नाही बसणार, इतके दुष्ट स्वभावाचे लोक आहेत ! उठल्या सुटल्या बंदुकीने गोळ्या झाड. अमेरिकेत हे सारखं चालतं. चोऱ्यामाऱ्या तर इतक्या की तुम्हाला आश्चर्य वाटेल आता आम्ही इथे रात्रीचे फिरतो. कोणी अडवत नाही. काही नाही. तिथे तर अशी रात्रीची फिरण्याची सोयच नाही. कुठेच. दिवसाढवळ्यासुद्धा तुम्ही जर हातामध्ये पर्स घेऊन गेलात, तर ओढून घेणार. लंडनलासुद्धा. अमेरिकेला तर काय विचारायलाच नको. मी गेले तर साहेबांनी सांगितलं की सगळे दागिने काढून या. म्हटलं, 'हे बघा, मला ते जमायचं नाही. कारण हे देवीचं काम आहे आणि हे सगळे दागिने म्हणजे त्या देवीचे आहेत. मला काही काढता येत नाही. चोरी कोण करतं ते मी बघते. पण तुम्ही असं म्हणू नका. मी ते काही काढू शकत नाही. हे देवीचे आहेत. ते अलंकार मला घालावे लागणार. जोपर्यंत ते काम आहे.' तर अशी तिथे स्थिती आहे. तुम्हाला माहिती नाही. तिथे लोकांना १० 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-10.txt काय काय त्रास आहेत! रात्रभर झोपू शकत नाही. वेडावलेत . ६५% लोक वेडे आहेत. आता बोला. तिथे काही जातीयता नाही. मग काय? माणसाचा स्वभाव असा आहे, की जर त्याला, एखाद्या ग्रुपला किवा एखाद्या समाजाला दाबायची सोय ठेवली नाही, तर तो घरातच दाबादाबी सुरू करतो. कुठेतरी करणारच. तो स्वभाव आहे. त्याला इलाज काय ? त्याला इलाज असा आहे, की कुंडलिनीचं जागरण केलं तर आज्ञा चक्रावरती तुमचा अहंकारच ओढून घेते कुंडलिनी. सट्ाक, तर हे जे कार्य आहे, ते ह्या वसतीगृहात तुम्ही ह्या मुलांना द्या. ह्या लहान मुलांना पार करा. जसं पाटील साहेबांनी आपल्या शाळेमध्ये मुलांना पार करून घेतलं. तसं तुम्ही पार करून घ्या. हा खरा आशीर्वाद आहे. आता आपण जे म्हटलं, की पैशाचं सोंग घेता येत नाही. कबूल आहे. पण पैशाचं चीज आपण करू शकतो. ते चीज करायला शिका. एक साधारण गोष्ट आपल्याला सांगते, की आमच्या सहजयोगामध्ये एक खेड्यातला मनुष्य, आता त्याला मागासलेला कसं म्हणायचं, माझा मुलगाच आहे तो. तुम्ही म्हणा मागासलेले. त्यांच्या जाती बनलेल्या असतात, त्याला मी काय करू ? अशा जातीचा एक मनुष्य आमच्याकडे येत असे. पाटील आहेत ते. फार सभ्य मनुष्य आणि फार गरीब. बरं, सहजयोगात दानधर्माची प्रथा नाही. आम्ही प्रथा नाही ठेवलेली. पण एका अर्थी दान होतच आहे ते. तर तो आमच्याकडे आला, तर मी म्हटलं, 'काय करता पाटील. रोजचा एक फुलाचा हार घेऊन येता. कसतरी हो.' मी कोणाला तरी म्हटलं, 'कमीत कमी ह्यांचे हाराचे तरी पैसे द्या.' मला जरासे ते कसेसेच वाटले, की आता हाराचं कशाला माझ्यासाठी मनुष्य आणखीन! इथे एवढे हार येतात आणि हे कशाला आपले पैसे घालतात. तर तो म्हणाला, 'माताजी, माझा प्रश्न सुटला. 'कसा?' 'नाही, म्हणजे आता पैशाचा मला काही प्रश्न नाही.' 'असं कां? काय झालं काय ?' 'नाही आमची पडीक जमीन होती नां बाहेर. मी तिथे ध्यान करतो बसून सकाळचं आणि संध्याकाळी थोडीशी शतपावली करतो तिथे.' 'तर काय झालं काय?' 'अहो, त्या जमिनीत काय गुण आला माहीत नाही. एक सिंधी माझ्याकडे आला, असं म्हणाला, जमिनीची थोडीशीही माती घेतली, ' म्हणजे पुण्यवान जमीन झाली नां! तर 'आमच्या विटा दगडासारख्या निघाल्या.' तर त्याने तराजूने तोलून घेतले. हे लक्ष्मी तत्व जागृत झालं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, की त्या माणसाचा मुलगा जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये, म्हणजे जिथे फार श्रीमंतांची, माझी मुलगी तिथेच शिकली, हजारो लोक तिथे उभे राहतात, पण फर्स्ट क्लास फर्स्ट आल्यामुळे स्कॉलरशिप मिळून आता तिथे शिकतो आहे. हे लक्ष्मी तत्त्व आधी जागृत करून घेतलं 'ह्या म्हणून. मला कबूल आहे, तुम्ही शाळेत घाला. शिक्षण द्या, पण त्यांना एक तर पार केलं पाहिजे. बुद्ध केलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या खेडेगावातून टोटके आणि हे करत फिरतात ह्यांना मात्र तुम्ही काढून टाकलं पाहिजे. हे परमेश्वराच्या विरोधात आहेत. पैसे बनवण्यासाठी हे जे लोक कामं करत असतात, प्रेतविद्या, स्मशान विद्या, भानामती वरगैरे, ह्या सगळ्यांचा तुम्ही नायनाट करा म्हणजे लक्ष्मी तत्त्व जागृत होईल. आणि त्याच्यातले काही आपल्या राजकारणी लोकांच्याही डोक्यात घुसलेली आहेत भुतं. हे भुताटलेले लोक आहेत. म्हणून असं होतंय. हे काही नॉर्मल लोक मला वाटतच नाही त्यांच्या बोलण्यावरून. ह्यांना आधी नॉर्मलाइज करायला ह्यांना आधी सहजयोगात आणुयात. सगळेजण योगीजन होऊन घ्या म्हणजे बरं. आता सांगायचं म्हणजे असं आपल्या समाजाचं कल्याण, देशाचं कल्याण, सर्व विश्वाचं ११ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-11.txt सार्वजनिक कार्यक्रम कल्याण करायचं असलं तर आपल्यामध्ये समग्रता यायला पाहिजे. समग्र, म्हणजे सगळ्यांच्या अग्राला एकाच दोरीने बांधून घ्यायचंय. ती दोरी म्हणजे विश्वाची कुंडलिनी आहे. त्या दोरीत एकदा तुम्ही बांधले गेले, म्हणजे कसली जात नि कसली पात. सगळे त्या प्रभू परमेश्वराच्या अंगातले अंगप्रत्यंग झाल्यावर कसली जात नी कसली पात! हे आमचं कार्य आहे. तेव्हा बाहेरच्या झाडावरच्या पानांना जोडण्यात काही अर्थ नाही. मुळात घुसलं पाहिजे. म्हणून सांगायचं म्हणजे असं, की इथे जे आपण वसतीगृह कराल , त्यात कोणी मागासलेला म्हणून म्हणायचं सर्वात मुख्य नाही. कोणी काही म्हणायचं नाही. याला कलंक कसला आला! हे नसते जबरदस्तीचे धंदे आहेत. आपल्या देशात ह्या प्रमाणात आहेत, तिथे दुसऱ्या प्रमाणात आहेत. परत आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे पैसे आले, अॅफ्ल्यूअन्स आलं, म्हणजे आपण फार बरे होऊ. तसं ही नाही आहे हो ! ह्या लोकांच्या जवळ एवढे पैसे आहेत मी परवाच सांगितलं, की स्वित्झर्लंड, नॉर्वे, स्वीडन तीन देशांमध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे आणि तिथे सगळ्यात जास्त लोक आत्महत्या करतात. आता बोला ! त्यांना डोहाळे लागले आत्महत्येचे. काय म्हणावं! तिथले तरुण तरुण मुलं आली, मुली आल्या. त्यांच्या हातामध्ये मला अशी जाणीव झाली, प्रेताची स्थिती आहे. म्हटलं करता काय तरुण लोक ? तोंडं अशी सुकलेली. मेल्यासारखी. म्हटलं, झालं काय तुम्हाला? 'नाही' म्हणे, 'आम्ही बसल्या बसल्या असा विचार करतो, की आत्महत्या कशी करायची?' खायला, प्यायला, द्यायला कशाची ददात नाही. त्याची ददात म्हणजे आत्महत्या करणे. तर म्हटलं झालं काय असं? असं काय करता ? तुम्हाला काही खायला नाही, की प्यायला नाही. तुमच्याकडे काही मोटारी नाही, की गाड्या नाहीत की शिक्षण नाही. सगळं काही आहे. मग, नाही म्हणे आम्हाला आनंद नाही मिळत. कारण आम्हाला आनंद नाही मिळाला कोणत्याच गोष्टीत म्हणून आता आम्ही आनंदाकडे वळतो. बुद्धाचेच उदाहरण आहे नां! सगळें असूनसुद्धा तो कशाला गेला परमेश्वराच्या शोधात . तसे हे परमेश्वराच्या शोधात आत्महत्या करीत आहेत. तेव्हा तुम्ही कशाला तितकं लांब जाऊन, आत्महत्या करून मग परमेश्वर मिळवता? आत्ताच मिळवून घ्या नां! इतका लांबचा रस्ता कशाला ? आधी ते लोक ड्रग्ज घ्यायचे, मग भुतासारखे केस काढून जसे फिरले, आरडाओरडा केला, सगळं केलं त्यांनी. संपलं त्यांचं ते. आता आलेत सहजयोगात आणि मी म्हटलं, की एवढं लांबलचक फिरायची काय गरज आहे ? इथेच हृदयातच बसलेले आहेत. तुमच्या आत्म्याचं स्थान तुमच्या हृदयात आहे. ते आपण घ्यावं आणि त्याच्या शक्तीपुढे बघा! काही दरिद्रता आहे ? काहीच नाही. तशीच नष्ट होऊन जाणार. कृष्णाने सांगितलं आहे नां, योगक्षेम वहाम्यहम् ! म्हटलेले आहे नां, योगक्षेम वहाम्यहम् ! योग झाल्यावर तुमचा क्षेम बघणार, पण आधी योग तर घ्या. तोपर्यंत त्याचं कनेक्शनच लावलेले नाही तर त्याचा उपयोग काय? आधी योग घ्या, असं मी सगळ्यांना सांगते. मग पुढचं बघू. पण योग घेतला, अंकुर फुटला की बसले एकीकडे जाऊन. थोडीशी मेहनत एक महिन्याची आणखीन करा, म्हणजे बघा, तुमचं वसतीगृह बघा. ह्या सबंध राहरीला एक नवीन रूप येणार आहे. आमची हीच मेहनत आहे. आमच्या आई-वडिलांचं स्थान आहे. आणि १२ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-12.txt त्यांना, जरी श्रीमंत होते फार, तरी सगळं काही घरात असूनसुद्धा, सगळा त्याग करूनसुद्धा एक समाधान त्यांना मिळालं नाही, की आमच्या देशाचं काही भलं झालं नाही. एवढी मेहनत केली, जेलमध्ये गेलो. आम्ही आमच्या मुलांचा, सगळ्याचा त्याग केला. सगळे काही केलं पण तरीसुद्धा आमच्या देशाचं काही भलं झालं नाही. पण आमचे वडील जे होते ते फार साधु-संन्याशी होते. त्यांनी मला सांगितलं की, 'बाई, तू ज्या कार्यासाठी आली आहेस, ते कार्य फार मोठंे आहे. हा महायोग आहे. तर तू ते शोधून काढ की सर्व जण सामावतील. कशा रीतीने, योग्य काय ? तू जर ते शोधून काढलंस, तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं. ते तू शोधून काढ.' त्यांच्या वेळेपर्यंत मी करू शकले नव्हते, पण आई जायच्या आधी तिने विचारलं, 'झालं का ते ?' म्हटलं, 'हो. हो झालं. शोधून काढलं.' तिने आनंदाने प्राण सोडले. तेव्हा जे आम्ही मोठे मोठे लोक पूर्वी पाहिले होते, म्हणजे पुष्कळ मोठे लोक झाले. त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे होऊ शकणार. फक्त आपल्या आत्म्याला जागृत करून घ्या. ते अगदी सोप काम आहे. त्याला पैसे लागत नाही. बिल्डिंगा लागत नाही. जिथे असाल तिथे होईल. हे आधी घेऊन घ्या. सरळ आहे नां गोष्ट. हे एकदा मिळवून घ्या, म्हणजे बघा, तुमचं कार्य कसं सुरळीत आणि व्यवस्थित चालतं. हाच एक दोष आपल्यामध्ये आहे, की अजून आपलं परमेश्वराच्या साम्राज्यात पदार्पण झालेलं नाही. त्याचा आशीर्वाद द्यायचा तर कसा द्यायचा. ज्या झाडाला अजून पाणी लागलेलं नाही, ते सुकूनच जाणार. म्हणून कनेक्शन हे करून घेतलं पाहिजे. संबंध हा जोडून घ्यावा. हा आमच्या सहजयोगाचा सरळधोपट मार्ग आहे. बाकी ह्या मुलांनासुद्धा फार उदारता आहे. ह्या बाहेरून आलेल्या लोकांना फार उदारता आहे. आधीच आम्ही (अस्पष्ट) च्या तिथे. तिथे काहीतरी व्यवस्था झाली मुलांची, शाळेची वगैरे. तर मला म्हणतात, माताजी, आम्ही एकेका मुलाला आमचा वारसदार करू. ते करतील म्हणा, पण त्याने काही हे काही मोठं धोरण नाही माझं. होईल . म्हणजे पैसे मिळतील, शिकले, अहो, शिकलेले कितीतरी गाढव मी पाहिलेत. शिकून काही शहाणपण येत आत्ता गेलो होतो नाही माणसाला! अगदी महागाढव होतात. आणि हे राजकारणी काही शिकलेलेल नाहीत नां! त्यांच्यात हृदयच नाहीये. हृदयच नाहीये बघायला, की अहो, हा आपला शेजारचा मनुष्य मरतोय आणि तुम्ही काय गमजा करता आणि पैसे काय खाता! ते हृदय जागृत व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आमचा सहजयोगाचा कार्यक्रम चाललेला आहे. आम्ही जे काही होईल ते सबंध, सगळ्यांच्यासाठी करतोय आणि ते करणार आहोत. जे काही आपल्याला त्रास असतील, फक्त सांगायचा अवकाश. पुष्कळांचे इलाज होतात. नुसतं ऐकूनसुद्धा होऊ शकतं. परमेश्वराच्या साम्राज्यात मात्र आपण या, नाहीतर आमचा हात नाही चालत. आमचा हात परमेश्वराच्या साम्राज्यात आल्यावर चालेल. तो आशीर्वाद तुम्ही घ्या. परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन बसा आसनावर आणि मिळवा स्वत:चं. 'तुज आहे तुजपाशी', ते घ्या. मग कोण रंजले आणि कोण गांजले. अहो, दिवा लावल्यावरती दिवा प्रकाश देतोच स्वत:. दिवा लावण्याचीच वेळ आहे. तोपर्यंत आपण मागतो की तेल घाला ह्याला, दिवा ठीक करा, त्याची वात ठीक करा. आणखीन प्रकाश द्या. आता काही नको करायला. तुमचा दिवा मी ठीक ही करते आणि तो तेवून ही घेते. तो तुम्ही तेवत ठेवायचा, बस्! तुम्हीच देणारे होणार. एवढे मात्र करून घ्या. जे खरं आहे तत्त्व ते एकदा मिळवा. हे फार जरुरी आहे. बाकी सगळे मिळवलेले तुम्ही पाहिले नां! काय त्यांनी दिवे लावले ते ही कळलेले आहे. १३ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-13.txt सार्वजनिक कार्यक्रम तेव्हा तुम्हाला खरोखर जर दिवे लावायचे आहेत, तर जे अस्सल आहे ते मिळवलं पाहिजे. नकलावरती जाऊ नका. अशी एक अत्यंत प्रांजळ विनंती मी तुम्हाला करते! मी आई आहे. जर काही मी तुम्हाला बोलले असेन, आईचं वाईट नाही वाटून घेतलं पाहिजे. ती तुमच्या हितासाठी झटते आहे. तुमच्या हितापलीकडे मला काहीही नको. जे काही आहे माझ्यामध्ये ते सगळेच तुम्हाला द्यायला मी आले आहे. ते घेऊन टाका. म्हणजे मी मोकळी होईन. सर्वांनी मला इथे बोलवलं, भूमीपूजन केलं. आम्हा सर्वांच्यातर्फे, तुम्ही जे मागाल ते आम्ही द्यायला तयार आहोत. मला ते समजत नाही विशेष. तेव्हा ते आपण मला कळवावं. म्हणजे आमचं काय आहे, की जागतिक एक ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्यांच्या काय व्यवस्था आहे वगैरे, त्यांच्याद्वारे सगळं काही होतं. मला पैशाचं एक अक्षर कळत नाही. तेव्हा त्यांचं काय असेल ते तुम्ही लिहून कळवा, काय तुमच्या गरजा असतील ते. मग तिथून काय पाठवायचं, करायचं ते करू. पण त्याचं काही महत्त्व मला नाहीये. मला महत्त्वाचं आहे, की तुमच्यातले किती लोक जागृत होतात नि किती सहजयोगी होतात? तर आता मी आलेली आहे. तर आशीर्वादस्वरूप सर्वांनी असा हात करून बसायचं. आरामात. आणि विचार जरा बंद करा. आता तुम्ही असाल राजकारणी. तुम्ही असाल कुठले काही. पण सध्या तुम्ही आईची मुलं म्हणून बसायचं. आणि हे घेऊन टाका तुमचं तुमच्याजवळ जे आहे. तुमच्या आत्म्याचं तुम्ही घ्या. असे हात करून बसा. त्याला जातपात लागत नाही, काही लागत नाही. तुमच्यामध्येच आत्म्याचं स्थान आहे. ते तुम्ही मिळवून घ्या. काय तराव ! नाव तुमचं सुमंत आहे नां ? सुमंत कोण होते माहिती आहे नां तुम्हाला? माहिती आहे का ? रामाचे सचिव होते. फार मोठं नाव घेतलंय तुम्ही. काय? आईने काहीतरी विचार करूनच नाव ठेवलं असणार. तेव्हा तसं काहीतरी करायला पाहिजे. असे हात करून बसा. अहो, त्या रामाने भिल्लीणीची उष्टी बोरं खाल्ली. मी तर म्हणते, भिल्लीणीची उष्टी बोरं काय पण तिच्या हातचं जेवणही खाणार नाहीत हे गाढव ! आहे नां गोष्ट खरी! मी आहे म्हणून म्हणते ह्यांना ! त्यांनी भिल्लीणीची बोरं खाऊन दाखवली तरी ह्यांच्या डोक्यात प्रकाश नाही पडला, तो कसा प्रकाश पडणार! आत्म्याचा पाहिजे. त्याच्याशिवाय इलाज नाही. काहीही करून दाखवलं हो. विदुराच्या घरी जाऊन कृष्णाने अन्न खाल्लेले आहे. पण तरीसुद्धा लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. एवढा मोठा गीतेचा सबंध ग्रंथसुद्धा त्यांनी कोणाच्या हातून लिहून घेतला? तर त्यांना आणखीन कोणी मिळाले नव्हते. शोधून त्यांनी व्यास काढला. कोळीणीचा. रामायण वाल्मिकीकडून लिहून काढलं परमेश्वराने. परमेश्वराचे चुकलेले नाही. तो वारंवार धडे देतोय तुम्हाला. पण मनुष्याच्या जातीला अक्कल नाही येणार. किती धक्के बसले तरी तसेच. म्हणून आता पार होऊन घ्या. तुम्हीच होऊन घ्या आता बुद्ध, म्हणजे झालं! मग मला काही बोलायला नको. कळलं कां? आता असे हात ठेवा. साधे असे हात करून बसायचं. आता डोक्यावरती बघा तुमच्या गार येतंय का? ह्या हाताने बघा. डोक्यातून गार निघालं पाहिजे. टोप्या काढून बसा. आईकडे कोणी टोप्या घालून बसत नाही. काढा १४ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-14.txt टोप्या. टोप्या कशाला आईसमोर. आईकडे आपण कसे येतो बरं! बघा, वर येतंय का, डोक्यावर गारगार. गार आलं पाहिजे डोक्यातून. ज्या भूमीवर बसला आहात ती भूमी केवढी पुण्यभूमी आहे ते कळेल तुम्हाला! हं येतंय का? काय हो? आता उजवा हात करा. गरमी फार आहे. सगळ्याचीच गरमी चढते. मग आजार होतात. गरमी फार आहे डोक्यात. उजवा हात माझ्याकडे करून सगळ्यांना क्षमा करा आता. आधी सगळ्या राजकारण्यांना क्षमा करा. अज्ञानात करताहेत ते काम. आणि ज्यांनी जातीयता पसरवली त्यांनाही क्षमा करा. मूर्ख आहेत ते. कोणी गाढव आहेत, कोणी मूर्ख आहेत. काय करायचं? सगळ्यांना क्षमा करायची आपण समजूतदारपणे. आता बघा, येतंय का डोक्यावर? काय? बघा गार आलं पाहिजे. क्षमा करा क्षमा. डोळे मिटून क्षमा करायची. क्षमा करता येत नाही लोकांना आणि म्हणतात की, 'माताजी, क्षमा कशी करायची?' पण अहो, तुम्ही क्षमा नाही केली तर स्वत:ला त्रास करून घेता. दूसर्यांना होत नाही. क्षमा करा. 'मी क्षमा केली' म्हणा. मनाने म्हणायचं, पूर्ण मनाने. बघा येतंय का? तुमच्याच डोक्यातून निघालं पाहिजे. बघा जरा बारीक. सूक्ष्म आहे ते. सूक्ष्म आहे. आपण जडात बसलोय. सूक्ष्म आहे. आलं कां? बघा, सूक्ष्म आहे. तुमचं स्वत:चं आहे. हे स्वत:चं आहे बघा. गार येतंय का ? आता चोहीकडेसुद्धा गारवा वाटेल. आता हात असे वर करून बघा. आणि विचारा, ही ब्रह्मशक्ती आहे का ? ही परमेश्वराची शक्ती आहे का आई? असं विचारायचं मला. विचारा, ही परमेश्वरी शक्ती आहे का? मनापासून विचारा. ह्याचं उत्तर मी देते . ही आहे. ही शक्ती आहे बघा. हातात येते आहे तुमच्या. हे चहकडे जे जिवंत कार्य परमेश्वर करतो, ते आपण बघत नाही. लागलं हाताला गार. आता बघा शांत वाटेल. आता ह्याच्यानंतर बघा प्रचिती येईल हळूहळू. काय.. आता 'बुद्धं शरणं गच्छामी' म्हणायचं. नाहीतर मंत्राला काही अर्थ नाही. जागृत नाही. आता जितक्यांची नावं घेतली तितके साक्षात्कारी होते. सगळे साक्षात्कारी. पण त्यावेळेला ही गोष्ट करण्याची सोय नव्हती. येतंय का हातात. गार येतंय. काही आलं! छान वाटतं, शांत! तर आता मी सगळ्यांचा निरोप घेते. परमेश्वरी कृपेने सगळं तुमचं कार्य सुव्यवस्थित होईल. मुलांचे मला पत्ते पाठवा. फोटो पाठवा. ह्या लोकांची इच्छा आहे, की इथल्या मुलांना अँडॉप्ट (दत्तक ) करायचं. त्यांची व्यवस्था करतील. प्रेम देतील त्यांना. अशा रीतीने हे लोक करतील. आपण मुलांचे पत्ते आणि फोटो द्यावेत. त्यांनाही पार करावं. पाठवून त्यांची प्रकृती बरी राहील. त्यांचे सर्व रीतीने ठीक होईल. आपण बोलवलंत त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आणि सर्व सहजयोग्यांच्यातर्फे मी आपले आभार मानते. १५ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-15.txt मुंबई, ६ एप्रिल १९७६ ॐ संरे क. निर्विचारिता हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे ! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल, की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. पण आपल्यामध्ये ती योग्यता नसती, तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे-तिकडे धावत आहेत. वेड लागलं आहे लोकांना. विचार करीत नाही, की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे, अनादी कालापासून, जे मोठ्या-मोठ्या तत्त्ववेत्त्यांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराने, ते त्याचीच एक साक्ष आहे. त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या, त्या सगळ्यांना एकीकडे फेकून ह्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या १६ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-16.txt जाळ्यात फसवलेले आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेले असो, किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो, किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे, की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळी. असत्य असलं की ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतंही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय ? तर नरकाची पायरी. नरक गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चहुकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. संसारात सगळा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत सत्य पुढे केल्याबरोबर लोक असे बिचकतात, जसे अंधारातून कोणाला एकदम सूर्यात आणलं, की त्यांचे डोळे दिपतात आणि नको तो प्रकाश म्हणून मागे सरतात. तेव्हा सहजयोगात पुष्कळ मंडळी एकदम येणार नाहीत. हे लिहून ठेवणे. आली ती घसरणार. कोलमडणार आणि परत त्यांना मी जागेवर बसवणार आणि तरीसुद्धा परत परत धावणार. ही स्थिती राहणारच आहे मुळी, ती काही काळ. पण सहजयोगाला स्थायित्व, जगजाहीर ज्याला म्हणतात तसं करायचं असलं तर त्याचा एकमात्र इलाज आहे, आम्ही काहीही असलो तरी ते आहोतच. आमचं काही वैशिष्ट्य नाहीये ते किंवा आम्ही काही मिळवलेलंही नाही. आम्ही आहोत तसेच आहोत, जन्मजन्मांतरापासून. तेव्हा आमचं त्याच्यात काही देणं नाही न घेणं नाही. तेव्हां आम्ही असलो तर लोक एवढेच म्हणतील की, 'कबूल आहे, माताजी होत्या आदिशक्ती! मग काय! त्या स्वत:च त्या असल्यामुळे त्यांचं काय सांगता तुम्ही!' तर तुमच्याकडे नजर होणार आहे लोकांची, की सहजयोग्यांमध्ये काय परिवर्तन आलं? त्यांच्या धर्माची स्थापना झाली का? कारण धर्मस्थापना होते ना पहिल्यांदा. कलियुगामध्ये धर्मस्थापना माताजींनी केली का? ती कुठे करणार? ती तुमच्या नाभी चक्रात. तुमच्यातून तो धर्म आहे की नाही? तुम्ही धार्मिक आहात की नाही? ही आधी जर सिद्धता झाली, तर चार लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे, की ह्यांच्यामध्ये काय अंतर आलं आहे ! काय मनुष्य झाला आहे! कमालीची ह्याच्यात चमक आलेली आहे! आमचा एक दीप असला तर लोक म्हणतील, की आहे तो पुष्कळ दिवसापासून, आकाशदीप लागलेला आहे. त्याचं काय माहात्म्य! आल्या आणि गेल्या! पण जे दीप आम्ही लावलेले आहेत ते कधी लावले नव्हते. म्हणजे दिवे पाजळले, मराठी भाषेत म्हणायचं म्हणजे. तर तसं झालं नाही पाहिजे. खरोखरच आम्ही दीप लावून दिवाळी सजवली. हे तुमच्या प्रकाशामुळे कळलं पाहिजे लोकांना आणि ह्याच्यापेक्षा मोठी जाहीर बातमी काहीही असू शकत नाही. उद्या आम्ही पेपरमध्ये दिसलो. फोटो आला. 'व्वा! काय माताजींचे दिसतंच आहे मुळी! साक्षात् आहेत मुळी.' 'कबूल, पुढे काय? पण असं आहे, कितीही म्हटलं तरी त्या आदिशक्ती! आमचं काय?' तर मग त्या भामट्याकडे कशाला जाता तुम्ही? तर म्हणे भामट्याकडे एवढ्यासाठी जायचं, की तो नुसती आपली कमाल १७ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-17.txt दाखवत असतो. दोन पैसे दिले की खुश तबियत ! पण माताजी म्हणतात, की तुम्ही दाखवा कमाल! इथेच माताजींच हे चुकतं. त्यांना ज्या काही कमाली करायच्या आहेत त्या कराव्यात त्यांनी! पण आमच्याकडून अपेक्षा करतात, काय माताजींचे! पैसे म्हणतील तर देऊ आम्ही. काबाडकष्ट करा म्हणतील तर करू. पण आमच्याकडे धर्मस्थापना झाली पाहिजे. आमच्यामध्ये प्रेम दिसलं पाहिजे. संसारात लोकांनी म्हटलं पाहिजे, की काय चमकलाय मनुष्य! हे फार कठीण काम आहे बुवा! मग सहजयोग कसा जमणार ? पण आम्हाला जे धंदे करायचे आहेत ते आम्ही करत रा: राहू. मी आता परवाच सांगितलं की मी सिंगापूरला गेले होते. तर तिकडे एक गुरू बाबा, पळ काढत होते. कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं, की तुम्ही स्मगलिंग करा, काहीही करा. वाट्टेल तितक्या बायका ठेवा, पुरुष ठेवा. पण पैसे इकडे द्या मागे. शेवटी त्यांचं सगळ स्मगलिंगचे सामान पकडण्यात आले. तेव्हा ते आले माझ्याकडे. म्हटलं आता तुम्ही जाऊन त्यांना विचारा. तेव्हा ही गोष्ट माणसाला रुचतच नाही मुळी. आता कोणीही घ्या. मी म्हणते की किती तरी रियलाइज्ड साधू मी पाहिलेत. पुष्कळ पाहिले. ते आपले अंबरनाथला होते, महाराज आहेत ते. काही नाही. काही कोणाला करत नाही, काही नाही. मी म्हटलं, 'तुम्ही काही म्हणत का नाही महाराज ?' 'मरू देत.' कारण त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांची पात्रताच नाही मुळी ह्यांना कशाला द्यायचं? माझं तसं म्हणणं नाही. तुमची पात्रता आहे हे आधीच सांगितलं आहे मी. योग्यता आहे हे ही मी सांगितलं आणि हे दिलं आहे, हे ही खरं आहे. त्याबद्दल कोणालाही, तुमच्यातल्या कोणालाही शंका नाहीये. पण ते आतमध्ये भिनलं किती आहे ? त्याचा साक्षात्कार किती झाला आतमध्ये? तिकडे लक्ष असायला पाहिजे. आपल्या ज्या चुका आहेत किंवा जी बाजू लंगडी आहे ती बघितली पाहिजे. एक एक सहजयोगी म्हणजे दीपस्तंभासारखा आहे खरं पाहिलं तर! अहो, इतके गणेश बसवल्यावरती मला कशाला इकडे मरायला पाहिजे. इतकी मेहनत करायला पाहिजे! तुम्हीच सांगा मला! मला तंगड्या तोडायची काय गरज आहे जर तुमच्यासारखे एक एक तुम्ही बसवलेले आहेत. कुंडलिनी तुम्ही उठवू शकता. लोकांना पार करू शकता. एक एक मठ घालून बसलात तर लाखो रुपये तुमच्या पायावरती येणार. मला कशाला एवढी मेहनत करायला पाहिजे. फक्त एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे, अजून तुम्ही समजलेच नाही की तुम्हाला काय मिळालं आहे ते! अहो, ज्यांच्या जागृत्या झाल्या नाहीत त्यांनी सुद्धा आश्रमच्या आश्रम बांधले. 'आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत. घरगुती आहोत. गृहस्थाश्रमी आहोत.' हे बाह्यातलं झालं, पण आतमध्ये काय तुम्ही? जिथे पाय पडेल तिथून बाधा पळणार आहे, मला माहिती आहे. दुधातून पाणी काढून वेगळे करणारी तुमच्यामध्ये शक्ती असतांना, हे सगळं तुम्हाला प्राप्त झाल्यावरसुद्धा तेजस्विता येत नाही तर आता त्याला काय मी कारण सांगू हे मला समजत नाही. चक्र धरतंय म्हणजे काय? एवढी मेहनत करायची तुम्हाला गरजच नाही मुळी! नुसतं निरपेक्षतेत, साक्षी स्वरूपात उभं राहिल्या बरोबर चक्र खाड्कन सुटणार. कारण मिथ्या आहे ते सगळे काही. मिथ्यतेतून फक्त आपण जिथे आहो तिथे उभं राहिल्याबरोबर सगळंच्या सगळं तुटून पडतं की नाही पहा बरं! नुसतं चिकटवा जरा आपल्याला तिकडे. थोडसं चित्त जरा आतमध्ये घ्यायचंय. उभे १८ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-18.txt तिथेच आहेत, कपडेही तेच आहेत. वागणं तेच आहे. नवरा आहे, बायको आहे, मुलं आहे, बाळं आहेत, सगळा संसार आहे. कमाई आहे, पण चित्तात मात्र तुम्ही जर आतमध्ये उभे आहात तर सबंध संसाराची शक्ती तुमच्यामागे उभी आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. ही पृथ्वी माता उभी आहे तुमच्या संरक्षणाला! हे सगळे तारेगण उभे आहेत तुमच्या संरक्षणाला. काय पाहिजे ते! पण सहजयोगावर बोलायचं सुद्धा तरी नव्या नवरी सारखं लाजता. अर्धवट लोकांसाठी सहजयोग नाही हे शंभर वेळा मी सांगितलं आहे. असाल खंबीर आणि वीर तर या. मला दोन असले तरी चालतील. पण ते यायला पाहिजे वीरत्व, घोडा दिला, घोड्यावर बसवलं, घोड्याला कसं चालवायचं शिकवलं, पण तरी रडतराऊ लोकं, म्हणजे करायचं तरी काय हे तुम्ही मला सांगा! आता काय तुम्हाला चिकटवायला पाहिजे का घोड्याला! चक्रं ही धरलीच नाही पाहिजे. खरोखर धरत नाहीत तुमची चक्रं. आता हे बघा. ह्याच्यात माया कशी आहे ती समजून घेतली की तुम्हाला कळेल मी काय म्हणते ते. चक्र धरतच नाही. तुम्ही यंत्र आहात. तुम्ही एक कॉम्प्युटरसारखे यंत्र आहात आणि तुम्हाला जी बातमी मिळते, ती तुम्ही सांगता, इन्फर्मेशन. आता समजा ह्यांचं जर आज्ञा धरलेलं आहे, तर तुमचं आज्ञा धरणार नाही तर तिथे इन्फर्मेशन आली. पण तुमचा तो भाऊ आहे, तर 'माताजी, ह्याचं आज्ञा काढा बरं!' म्हणजे तुम्ही आज्ञाधारी झाला. 'हा माझा भाऊ, हा माझा चुलता, हे माझं अमकं, हे माझं तमकं, हा माझा मुलगा.' म्हणजे धरतं ते ! तुम्ही तुमचे कोण आहात? तुम्ही तुमचे एकाकार तुमच्यामध्ये! तुमच्याच आनंदात, तुमच्याच राज्यात परिवहन करता आणि तिथे जे तुमचे आहेत, ते होते आणि राहणार. तर हे बाह्यातलं जरा सोडायला पाहिजे. म्हणजे चक्रं धरणार नाहीत. ती फक्त इन्फर्मेशन तुम्हाला येते आहे. कोणाला जास्त येणार, कोणाला कमी येणार. त्यामुळे तुमची चक्रं धरत नाहीये. मग त्याच्यावरच लक्ष! 'माताजी, माझं हे धरलं. आता कसं काढू?' आता कसलं तुझं धरलेलं आहे! शेजारच्या माणसाचं धरलंय म्हणून तुझे तसे येत आहे. म्हणजे मिथ्या गोष्टींकडे जी आशंका आहे, ती सोडायला पाहिजे. जे मिथ्या आहे त्याबद्दल काय आशंका ? म्हणजे बागुलबुवा आपण म्हणतो तसं. हा नुसता बागुलबुवा तुम्ही धरत आहात. खरोखर त्याच्यामध्ये काहीही धरणं शक्यच नाही तुम्हाला. आता पुष्कळसे लोक असे म्हणतात, की कोणी होते गुरू. त्यांनी कोणाला अमकं दिलं तर त्यांना तो आजार झाला. तमक्यांनी तमक्याला बरं केलं तर त्यांना तो आजार झाला. तुमच्यातील कितीतरी लोकांनी ह्या लोकांना व्हायब्रेशन्स देऊन ठीक केलेलं आहे! तुम्हाला माहिती आहे. कोणाला आजार झालेला आहे इथे ? साक्षात् गंगा तुमचे पाय धुवत असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुम्ही इथे उभे लोकांनी असं वागायला नको. म्हणजे बाह्यातलं जे वागणं आहे, ते आतला भित्रेपणा, आतला कोतेपणा, त्यामुळे आहे. 'मला धरलं मला धरलं. ' म्हणजे हे आहे. सिंहासनावर बसायच्या राहून, राजासारखं राहिलं पाहिजे. परवा दिल्लीला एक गृहस्थ भेटले. म्हणे, 'मी फार साधा राहतो. शॅबीने राहतो. माताजी, तुम्हाला काही हरकत तर नाही?' म्हटलं, 'तुम्ही राजे आहात. तेव्हा व्यक्तित्व असं पाहिजे, की चार माणसात उभे राहिलं की वाटलं पाहिजे, की उभा आहे कोणीतरी मनुष्य. नाही तर सहजयोगी उभे करायचे म्हणजे लोकांनी म्हणायचं की कुठल्या कैदेतून आलेले हे लोक आहेत ! आपली फक्त स्थिती लक्षात घ्या, की माताजींनी जे दिलेले आहे ते काहीतरी विशेष आहे. अतिविशेष आहे हे मी १९ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-19.txt सांगते आपल्याला. त्याची किमया मी शिकले, तेव्हा जमलंय ते. कारण तुमचे हे गोतावळे सगळे. सुद्धा तुमच्या कुंडलिन्या अशा अटकलेल्या. त्या कशा सोडवायच्या आणि तुम्हाला ह्या मार्गावर कसं आणून सोडायचं, कसं इथे पोहोचवायचं, ही सगळी मेहनत आधी केली आणि तुम्हाला तिकडे सोडवलेले आहे. तुम्हाला पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे. धर्म फार जरुरी आहे. माणसामध्ये आपला धर्म जर हलत असला, तर सहजयोग जमत नाही. फार सोपं काम आहे धर्माचं. 'अति वर्जयेत्' जे काही अती आहे ते सोडायचं. पहिलं म्हणजे, मध्यावर रहायचं आणि अती काही करायचं नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये अतिशयता नसली पाहिजे. हट्ट नसला पाहिजे. वेड्यासारखं एखाद्याच्या मागे लागावं तसं नसलं पाहिजे. हसत खेळत सहज अगदी. अती म्हणजे अती वज्ज्ये. आता धर्मामध्ये काय! एक साधी गोष्ट दारू प्यायची नाही. तंबाखू ओढायची नाही. अशा राक्षसी ह्या वनस्पती आहेत. दारू हे एक त्हेचं राक्षसी मादक पेय आहे. लिक्विड आहे. अशा तऱ्हा आहेत. राक्षसीसुद्धा वस्तू आहेत जगामध्ये. त्या वापरू नका. खाण्याचं सुद्धा अती करू नये. विशेषत: गृहस्थाश्रमी लोकांना हा त्रास आहे, की खायचं असलं की, खाण्याबद्दल जरा जास्तच उत्सुकता असते. 'काय? काय बेत आहे ? काहीतरी चमचमीत करूया!' मग बसल्या बायका पुरुषांच्या डोक्यावर. त्यांची जीभ खराब करून करून. खाण्याचं सुद्धा अती करायचं सारखं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आयांनी मुलांना खराब करायचं. बायकांनी नवऱ्याला खराब करायचं. हे सुद्धा एक वेड आहे नुसतं. आणि मग लिव्हर खराब. अती वर्जयेत् ! नाहीतर उपवासाचा वेडेपणा. खायचेच नाही मुळी. उपवास! हे खायचं नाही, ते खायचं नाही. आठवड्यातून सात दिवस उपवास ! आणि नुसता फलाहार करायचा. खाण्याचं सुद्धा अती करायचं नाही. कपड्यांचं सुद्धा. एक तर नागवे फिरतील, नाही तर कपडे रोज तीन तीन बदलतील. काही मध्ये चालतं की नाही तुमचं! स्वच्छ, व्यवस्थित, उत्तम , साजेल असे कपडे घालायचे अंगावर. त्याच्यातही अती लक्ष नको. गृहस्थाश्रमी लोकांना फार जरुरी आहे. त्यांना एकच फायदा असतो, की मुलंबाळे झाल्यामुळे, काही अती केलं तर मुलं काढतात त्यांची खरडपट्टी. एखादा असा वेडा घरात असला, की लोक हसतात मग त्याला. मुलं हसू लागली की मग त्या वेड्याचा एक तर ....(अस्पष्ट) तरी होतो, आणि नाहीतर सोडून तरी देतो. तेव्हा अती वजर्ण्य करायचे. प्रत्येक बाबतीमध्ये अती वज्ण्य. आणि ज्या गोष्टी सैतानाच्या राज्यातल्या आहेत, तिकडे लक्ष ठेवायचं नाही. आता मनुष्याचा सगळ्यात मोठा धर्म तरी काय ? जर मला कोणी विचारेल की, 'माताजी, मनुष्याचा कोणता सगळ्यात मोठा सद्गुण आहे?' तर आता इतक्या लोकांना पाहिल्यावर एकच मला वाटतं, की फार जरुरी आहे, की हा जो तुमचा माथा आहे ना, हा कोणाही समोर वाकवायचाच नाही मुळी! हा जर माथा तुमचा वाकवला तुम्ही, मग रियलायझेशन फारच कठीण जातं. हे सगळे भामटे आलेले आहेत. त्यांच्यासमोर जाऊन आपलं डोकं टेकायचं! सहजयोग्यांनी तर कोणाही समोर वाकायची गरज नाही. दुसऱ्या सहजयोगी किंवा योगी माणसासमोर डोकं वाकवण्याची गरज नाही. तुम्ही काय कमी आहात! आज्ञा चक्र धरलंच पाहिजे आणि ते असं धरतं की ते सुटता सुटत नाही. कारण तुमच्यावर कोणी नाही, हे सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही गणेशाच्या स्टाइलमध्ये आहात तर ब्रह्मा, २० 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-20.txt विष्णू, महेशसुद्धा तुमच्यापुढे जाऊ शकणार नाहीत. ... (अस्पष्ट) या तुम्ही मग बघा. बघा तुम्ही व्हायब्रेशन्स तर बघा! मी बोलते ते खरं आहे की खोटं आहे ! फक्त जसं माझे नाव आहे निर्मल, तसं तुम्ही स्वत:ला निर्मळ ठेवा फक्त. 'फक्त' हा शब्द आहे. ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा तुम्हाला हात लावू शकणार नाहीत. तुम्ही कोणासमोर जाऊन माथा टेकवण्याची काही गरज नाहीये. एवढे सगळे गुरु बाबा लोक आहेत नां, कोणी तेव्हा सहजयोग्यांनी माझ्या डोक्याला हात लावू शकत नाही. गंगासुसद्धा माझ्या डोक्यावर चढ़ू शकत नाही. पण तुम्ही लोक माझ्या डोक्यावर हात ठेवू शकता. आलं का लक्षात? काय करायचं? तेव्हा ही तुमची स्थिती असतांना, एवढ्या मोठ्या पदावर बसले असतांना, पहिल्यांदा आपला स्वत:विषयी बरोबर कल्पना न ठेवणे, हे सहज नाही. म्हणजे आता काही गर्व धर्म कथापन करायला नको. आता कोणी म्हणेल की आदिशक्ती तर असा गर्व का? म्हणजे आम्ही आहोतच. ह्याच्यात गर्व कसा ? म्हणजे आमचं काही वैशिष्ट्य नाही करायला पाहिजे, त्याच्यामध्ये. आम्ही आहोतच. तसेच आहोत. तसेच जर तुम्ही सहजयोगी आहात, नंतर काम. ते तर आहात. त्याच्यात गर्व कसला? पण जे आहात रहा. आता समजा, कोणी जर हिरा असला तर त्याच्यात चमक येणारच. हिऱ्याला काही गर्व चढतो का? याबाबतीत जाणलं त्याच्या उलट पाश्चिमात्य देशात आहे. तिकडे भयंकर अहंकार आहे पाहिजे की पवित्रता लोकांना! ते स्वत:ला लाटसाहेब समजतात. म्हणून इकडून गेलेत त्यांना नागवायला लोक. छाटून एक्सपोर्ट करून. एक्सपोर्ट क्वालिटी. छाटून बदमाश पाठवलेत. त्या अशायला पाहिजे. सगळ्यांचा अहंकार तडाकू तोडलाय की बस! गाढवासारखे आता चिलीम घेऊन आपल्या फिरतात. इतके मूर्ख आहेत. ते इतके महामूर्ख आहेत, की त्यांच्या मूर्खपणाचं मी पत्नीशिवाय वर्णन करू शकत नाही. तुम्हाला सांगेन कधीतरी. आता मुलंबाळ आहेत. सांगण्यासारखं नाही. त्यांनी आपल्या त्या अहंकारामध्ये महामूर्खपणाची पदवी मिळविलेली आहे. म्हणजे त्याला पदवी दानच देता येणार नाही. म्हणजे इतके मूर्ख दुभऱ्या कोणत्याही त्री कडे आई आहेत ते, की वाट्टेल ते करतील, मूर्खपणासाठी. म्हणजे आपल्याकडे वेडेसुद्धा तसं करणार नाहीत. तर ती एक तऱ्हा झाली. तुमची दुसरी तऱ्हा. तुम्ही लोक कितीही स्वरूपातच पाहिलं म्हटलं तरी तसेच राहणार. आणि त्यांना कितीही म्हटलं की अहो , डोकं खाली करा. पाहिजे. तरी ते वरती येणारच. म्हणजे अशा दोन तऱ्हेच्या लोकांवर आम्ही कुठे? थोडी तरी जागा आता सहजयोग्यांच्यामुळे झालेली आहे मधोमध. थोडीशी जागा. ती जरा वाढवायची आहे. मग काम बघा आमचं तुम्ही! तेव्हा सहजयोग्यांनी काय करायचं? पहिल्यांदा आपला धर्म स्थापन करायला २१ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-21.txt पाहिजे, नंतर काम. या बाबतीत जाणलं पाहिजे, की पवित्रता असायला पाहिजे. आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्री कडे आई स्वरूपातच पाहिलं पाहिजे. कठीण नाही. ती एक फारच सोपी गोष्ट आहे, पण आजकालच्या कलियुगात इतकी घाण पसरलेली आहे की नाकातच घुसते, डोळ्यातच घुसते. पूर्वी मला आठवते आमचे आई-वडील सांगायचे की सगळ्यांनी खाली डोळे करून चालायचं. वर डोळे करून कुणी चाललं तर शेजारीपाजारी लगेच आईला जाऊन सांगायचे, 'तुमची मुलगी अशी वर डोळे करून चालली होती.' झालं, मग आमचे अनेक अपराध झाले की त्यावर आईनी ओरडायचं मुलींवर. वडिलांना जर कुणी सांगितलं, 'अहो, तुमचा तो नाना डोळे वर करून चालला होता', मग नानाची कंबख्ती आली. त्याचं खाणं - पिणं बंद. 'तू वर डोळे करून का बघत चालला होता, लक्ष कुठे होतं तुझें?' लक्ष कुठे आहे हा पहिला प्रश्न असायचा. ही मी सांगते ती पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट! पण आता तुम्ही स्वतंत्र झाल्यामुळे बेछूटपणा जो आलेला आहे त्यामुळे जी प्रकरणं आपण केलेली, त्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की डोळे जमिनीवर ठेवायचे. ती तुमची आजी आहे. डोळे नेहमी जमिनीवर ठेवायचे. तिच्या आशीर्वादात राहायचं. स्वत:ला नम्र करून पृथ्वीच्या शरणात राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अर्थ. पैशाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत मनुष्याने कसे वागले पाहिजे ? सारखी पैशाची हाव ठेवून पैसे मिळत नाहीत किंवा दुसऱ्याकडे दोन वस्तू जास्त आहेत म्हणून अधाशासारखे तिकडे बघूनही पैसे मिळत नाहीत आणि त्याच्याजवळ पैसे आहेत म्हणून त्याचा गळा कापूनही पैसे मिळत नाहीत आणि ज्यांना पैसे मिळतात त्यांनासुद्धा सुख आणि आनंद मिळत नाही हे तुम्ही पाहिलेले आहे. आता बुद्धीनेच हा विचार तुम्ही कायम करू शकता की पैशाने सुख मिळत नाही तर मग कशाने मिळतं? पण पैसा एक अंग आहे, मग पैशाचे कोणते अंग आहे. तेव्हा लक्ष्मी नावाचं स्वरूप मी पूर्वी सांगितलं होतं , तसं स्वरूप असायला पाहिजे समाधानी, समाधानी वृत्ती. जे मिळेल ते स्वीकार करण्यामध्ये मनुष्य राजा होऊन जातो. अहो, ज्याला समाधान आहे तोच राजा. जो समाधानी नाही तो भिकारीच आहे. साधा हिशेब असतो. ज्याला समाधान नाही तो कितीही जरी मोठा असला, स्वत:ला मोठे तेव्हा मानत असला तरी तो भिकारी आहे आणि ज्याला समाधान आहे तो दिसायला जरी गरीब दिसला तरी तो राजा. समाधान मानायला पाहिजे आणि ते तुम्हासाठी कठीण नाही. सहजयोगामध्ये ते दिलंय आम्ही तुम्हाला, ते म्हणजे समाधान मानण्याची शक्ती. आता कसं मानून घ्यायचं आणि कसं करायचं ते ही थोडं सांगते मी. कारण हे सगळे प्रश्न माणसाला येतात विचारांच्यामुळे. जर तुमच्यात विचारच आले नाहीत तर प्रश्नही येणार नाहीत. तर कोणत्याही गोष्टीवर विचार जास्त सुरू झाला, अतीवर गेला की विचार उचलायचा आणि फेकायचा माताजींच्या चरणावर. ज्याला आपण अचेतन मन म्हणतो, अनकॉन्शस माईंड, ते तिथे आहे. तो सगळा विचार तिथे फेकायचा. मग आम्ही तो उचलतो. तुम्हाला प्रश्न आहे न उद्याच्या इन्कमटॅक्सचा, मग विचार करू नका. तो आणून आमच्या पायावर फेकायचा. तो जसा तुम्हाला हवा तसा होणार नाही. पण जे तुम्हाला हितकारी आहे ते होईल. हितकारी होईल आणि तेच खरं लाभदायी असते. २२ 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-22.txt ১ 2दे] री ॐ ১। क आपल्या अन्तरस्थित या चौदा अवस्थांच्या माध्यमाद्भारेच आपल्या पुनर्जनमाविषयी आम्ही बोलत आहोत. हे स्तर पार केल्यानंतर अचानक आपण एका सुंदर कमळाप्रमाणे उमलतो. ईस्टरच्या दिवशी अंड भेट देणे हे या गोष्टीचे प्रतिक आहे की हे अंड एक सुंदर पक्षी बनू शकते. प.पू.श्री माताजी, इटली, 9९.४.9ee२ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं.१०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८. फोन : ०२०-६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in 2016_Chaitanya_Lehari_M_II.pdf-page-23.txt आपले आपणच तुम्ही कमळाचे फूल इालेले आहात. कारण तुम्हाला फक्त तुमची सुगंध पस२वणे माहीत आहे. बाकी तुम्हाली काही माहीत नाही. तो देण्यात जी मजी आहे त्याची आनंद उठकणे हा एक अनोखा अनुभव आहे. एका मोठ्या अभिनव प्रकृतीचेच लोक अ२से कर० शकतीत. पं.पू.शरी माताजी, दिल्ली, २१.३.२००० र !० मा