चैतन्य लहरा जुलै-ऑगस्ट २०१६ मराठी ु इ क श्ी ग ही चांगली गोष्ट आहे, की ते आपल्या साऱया शस्त्रांबरोबर आपले संरक्षण करण्यासाठी येतात. परंतु त्यांच्याजवळ सुदर्शन चक्र पण आहे. सुदर्शन, सु' अर्थात् शुभ, 'दर्शन अर्थात बघणे. ते आपल्याला शुभ-दर्शन देतात. तुम्ही त्यांच्याबरोबर काही चतुराई केलीत तर ती सगळी आपल्या मानगुटीवर येते आणि तेव्हा तुम्हाला तुमचे शुभ-दर्शन होते की तुम्ही कुठे हवेत लटकत आहात. प.पू.श्रीमाताजी, लंडन, १५.८.१९८२ ् ी ে बंता । েa या अंकाल महाकाली ... (पूजा, लोणावळा, ११/१२/१९८२) परमेश्वराचा गौरव ... ?0 १० (सार्वजनिक कार्यक्रम, सातारा, २६/ १२/१९८५) कलेक्टिव्ह राहिलं पाहिजे ...२० (सेमिनार अँड मिटिंग, राहुरी, ११/१२/१९८८) ० ० आता मराठीत सांगते थोडसं. इंग्लिश भाषेचा असा दोष आहे, की त्यांच्याविरूद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल. पण मराठी भाषेचा हा फायदा आहे, की मराठी भाषेत तुमच्याविरूद्ध काही बोलायचं असेल तर ते त्यांना कळणार नाही. हा तुमचा फायदा र] ি आहे! म्हणजे ते गुप्त राहतं सगळं. तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात. हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे आणि त्यामुळे माताजींनासुद्धा कळत नाही, असं जे लोकांना वाटतं, तर मला मराठी भाषा कळते आणि हिंदीही कळते आणि त्याहून भुतांची भाषा फार चांगली कळते. तेव्हा आज जे महाकालीचं मी सांगितलं , तिकडे लक्ष दिलं पाहिजे, की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे असलं पाहिजे. आता प्रथम आपल्याला जे प्रकार म हाकाला होतात, ते मी आधीच सांगितलंच की, 'माझ्या मुलाला बघा.' 'काय झालं तुमच्या मुलाला? 'काही नाही. फक्त लहानपणापासून बिछान्यातच असतो. हातपाय त्याचे मोडलेले आहेत. डोकं फिरलेलं आहे. काही खात नाही, पित नाही. कंबर त्याची वाकत नाही. फक्त एवढं एकदा माताजी, तुम्ही पाय तिथे लावलेत तर बरं होईल.' फक्त एवढं झालं. आता हे कशामुळे झालेलं आहे. सांगायला नको. ही तुमची पूर्वकर्म बोलताहेत. ती मी कुठवर जिंकणार. किती खाणार आहे ? असा जीव आहे, त्याला वाचवून तरी काय करायचं? त्याला क्षमा करते, की त्याला परत जन्म घेऊ देत. समजलं पाहिजे. त्याच्यावरही कृपा करा, स्वत:वरही करा आणि माझ्यावर विशेषत:. पण तुमचे पाय माताजी घरी लागू द्या. तुम्हाला समजतं ना हे सगळे की माताजी अमुक आहेत. तुम्हाला सांगावं लागत नाही. 'पाच मिनिटं तरी, बरं दोनच मिनिटं. बर एकच मिनिट.' आणि त्या घरात गेलं, म्हणजे सात मजले चढून जावं लागणार. लिफ्टच आऊट आहे. असं का, आता रगडा मला तिथे. मग रगडायचं. आता ते सगळं झालं, आम्ही केलं पुष्कळ. रगडलं आपल्याला तुमच्यासाठी. जे म्हटलं ते केलं. ह्याला बघ रे, त्याला बघ रे, मावशीला बघ रे, अमक्याला बघ रे, सगळ्यांना बघून टाकलं. आता मी कोणाला बघणार नाही. तुमची असेल मावशी तर तुम्ही बघा. माझी ती मावशी नाही. कळलं कां! स्पष्ट मी सांगते. आता मला कोणी सांगायचं नाही, की माझ्या ह्याचं हे बघ, माझ्या त्याचं ते बघ. कृपा करा आता माझ्यावर. फार झाल. दूसरं म्हणजे आपल्या घरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आणू नका माझ्यासमोर. त्याने मला अगदी कंटाळा आला आहे. सहजयोगावरती लक्ष द्यायला पाहिजे. सहजयोग आम्ही कसा वाढवणार? सहजयोगासाठी काय करायला पाहिजे, सेंटर कसं वाढवलं पाहिजे? आमच्यात काय चुकतं ? का लोक आमच्याकडे येत नाही? आमच्यामध्ये ४ कोणती वाईट गोष्ट आहे? हे स्वत: बसून ठरवायचं. बाता मारायच्या नाहीत. बसून विचार करायचा, आमच्यात काय खराबी आहे? आम्ही सहजयोगात काय खराब करतो ? आमच्यात का जमत नाही? पूजेला कमीत कमी पंधरा भुतं तुम्ही जमा नाही केली, तर तुम्ही पट्टीचे मुंबईकर नाही. पण जर पुण्याला गेलं तर कमीत कमी एकवीस तरी असायला पाहिजेत. कारण पुण्याला तर महाभुतं असलीच पाहिजेत. ती आणून पूजेला बसवली नाही आणि माताजींना त्रास दिला नाही तर पुणेकर कसले! पेशवाई न ती, मग माताजींनी सहन केलंच पाहिजे. मग आणून बसवायचे. अहो, पूजेला निदान बघा तरी कोण येतंय, कोण येत नाही ते. वाट्टेल ते आणून पूजेला बसवायचे. हे अगदी विशेष आहे. 'माताजी, पूजेला येऊ का? म्हणजे सगळ्यांना माहिती आहे नां माताजी असं आहे. आम्ही येऊन बसतो नां पूजेला.' पण अधिकार आहे का त्यांना पूजेला बसण्याचा, हे तुम्ही पाहिले पाहिजे. पण इकडे उलट आहे. इकडे मला सांगावं लागतं की, 'मी अमुक आहे. मी आदिशक्ती आहे,' तुम्हाला लोकांना तसं सांगावं लागत नाही. माहिती आहे तुम्हाला. मग, जेवढा फायदा घेता येईल तेवढा घेतला पाहिजे. जितकी भूतं आहेत तितकी आणा. गंगेत सगळी घाण घातली तरी गंगा ती धुवून काढणारच. पण घाण घातलीच पाहिजे का? कधीतरी असा ही विचार करीत जा , की आम्ही माताजींच्या ह्याच्यात नेहमी अशा लोकांना घेऊन जातो. काही शुद्ध लोक भेटले तर बरंय! ह्या भूतांच्या ह्याने काय काम होणार आहे, मला त्रास देण्यापलीकडे. तेव्हा ही भुतं तुम्ही सांभाळून फक्त जे शुद्ध आहेत त्यांना तुम्ही पूजेला आणलं पाहिजे. आतापर्यंत मी सगळं सहन करून घेतलं , पण आता ह्याच्यापुढे करणार नाही. जर तुम्ही भुतं घेऊन आले तर तुमच्या घरी दहा भुतं बसवीन. स्पष्ट सांगते. एक नाही, दहा. मला बसवणं कठीण नाहीये त्यांना आणि तिथे पर्मनंटली बसवून ठेवीन. मी हसून सांगते. पण खरं सांगते मला फार त्रास होतो ह्या गोष्टीचा! हे महाकालीचं स्वरुप जे आहे ते अत्यंत प्रेमळ आहे आणि तुम्हाला रक्षक आहे. इतकेच नाही तर तुमची सगळी काही जी इच्छा आहे ती पूर्ण करायला समर्थ आहे. पण अशा फालतूच्या इच्छा तुम्ही जर घेऊन आलात, किती आम्हाला कर्दन करायचं आहे आणि संहार करायचा आहे. आम्ही काय करायचं? तुम्ही मुलं म्हणून आम्ही किती सहन करायचं? ह्या मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. दूसरं म्हणजे, हे तर झालं भुतांच्या बाबतीत. भयंकर अॅटॅचमेंट. अगदी आमचे प्रधान म्हणतात ना की फॅटर्निटी असते. एकाला भूत असलं की बरोबर तो दुसऱ्या भुताला चिकटतो. अगदी बरोबर, ओळखायचं म्हणजे तरी काय की ह्यांच्यात भुतं आहेत कां? दहा भुतं एकत्र मिळाली की समजायचं की दहाच्या दहा भुतं, एकमेकाला चिकटली. चिकटणारच. कारण भूत भूतालाच चिकटतं. अगदी स्टॅप आहे त्याचा. हे कृपा करून लक्षात ठेवलं पाहिजे. 'सज्जनांची संगती गाठावी.' सज्जनांनी स्वत:ला एकत्र बांधून आणखीन एक ग्रुप करून राहायचं आहे आणि भांडायचं नाही. तो ग्रुप एक करून ठेवला मग हळूहळू करून तो ग्रुप वाढवत गेले पाहिजे. म्हणजे तो न्युक्लिअस बनतो. तो न्युक्लिअस असा वाढवत जायचा मग सज्जनांनी जवळ जवळ येत जायचं. भांडकुदळपणा हे लक्षण भुतांचं आहे. क्रोध आदी ह्या गोष्टी भुतांच्या लक्षणाने आहे. तेव्हा क्रोध येऊ द्यायचा नाही. राग येऊ द्यायचा नाही किंवा घाईघाईने लोक काम करतात, अरे हे कर रे, ते कर रे. असं, तसं. म्हणजे मला कळलं, की हे आलं इकडे. दहा भुतं बसली तर मनुष्य करणार तरी काय ? एक तऱ्हेचा रूबाब पाहिजे माणसात. काय शिवाजी महाराज नां तुम्ही! म्हणजे शिवाजी महाराजांचे नुसते पुतळेच उभे करतात जिथे तिथे. अहो, तुम्ही शिवाजी महाराज! त्यांचा रूबाब काय आणि तुमचा रूबाब काय! ते पहा. कालच पुण्यात मी सांगितलं, की पंक्तीला फुकट करून बसतात सहजयोगी म्हणजे कमालच झाली बुवा! अहो, या ५ महाराष्ट्रात आमच्या मेहतराणीला जरी म्हणत असू, 'ये जेवायला बस.' तर ती तशी बसायची नाही दहादा तिला निमंत्रण दिल्याशिवाय. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. शिवाजी महाराजांच्या गोष्टी सोडा, माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं आहे, की आमच्या घरच्या मेहतराणीला जरी म्हणायचं असलं की, 'बाई तू जेवायला ये.' तर तशी येणार नाही, तिला निमंत्रण गेलं नाही तर. 'मला तुम्ही माताजी, आमंत्रण पत्रिका दिली नाही तर मी कशी येऊ?' ही पद्धत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आणि आता चांगले सहजयोगी, सभ्य लोक फुकटखोरी करून सगळी मुलंबाळं घेऊन जेवायला बसतात, हे ऐकून मला वाटलं आता मी काय बोलायचं! म्हणजे कोणती द्धत ही, कोणती लेव्हल झाली ! खाण्याचा म्हणजे आपल्याला भयंकर त्रास आहे. कुठे जेवायला असलं, भोजन असलं, मग भजन असलं म्हणजे चांगलं. जेवणाशिवाय आपण बोलत नाही. म्हणजे काय ड्रकराची जात आहोत की काय! मला समजत नाही. कसे हे या शिवाजीच्या राज्यात जन्माला आले? हेच मला आधी लक्षात येत नाही. कुठेही खायला मिळालं की धावत जायचं, ही काय पद्धत झाली! फुकटखोरीला काहीतरी मर्यादा पाहिजे आणि ही फुकटखोरी परमेश्वराला दिसते. आपण फुकटखोरी कुठेही करणार नाही. आता एखाद्याची मोटर चालली, बसून घ्या. 'कशाला?' 'अहो, तेवढेच पैसे वाचतील.' आणि ते पैसे जाणार कुठे? ते पैसे वाचवून तुम्ही करणार काय ? स्वत:च्या इज्जतीने माणसाने रहायला शिकलं पाहिजे. ज्याला स्वत:ची इज्जत नाही तो सहजयोगात काय येणार हो! आणि करणार तरी काय ? पहिल्यांदा मनुष्याने इच्छा केली पाहिजे की, 'आमची इज्जत होईल. आम्ही काहीतरी रूबाबदार होऊ. अशी आम्हाला सुबुद्धीच मिळाली पाहिजे.' सहजयोगी म्हणजे काय हे फुकटखोर, हे भांडण करणारे, आपापसात नावं ठेवणारे, म्हणजे माझ्या नावाची बदनामी होऊन जाते. तर आज पहिल्यांदा ही इच्छा करायची, पहिल्यांदा, की फुकटखोरी ही सहजयोग्याला शोभत नाही. तुम्हाला फुकट सहजयोग दिला तर त्याचा अर्थ असा नाही, की तुम्ही फुकटखोरी करीत फिरायचं. अहो, उलट होतंय आजकाल. माझ्याच खिशातून पैसे चाललेत. म्हणजे पैसे द्यायच्या ऐवजी गुरूच पैसे देत आहेत. ही काय तऱ्हा आहे! तुम्हीच विचार करा, असं चालेल का परमेश्वराला ? त्यांना पटेल का? तुम्हाला सगळं माहिती आहे. गुरुला सगळे शास्त्र माहिती आहे चांगलेच. शास्त्र काही सांगायला नको. पण त्यात तुम्ही कुठे फिट होता ते बघा. स्वत: आपली कोणती पोझिशन आपण बनवलेली आहे ते बघा. पैशाचा तर फार मोठा त्रास आहे. कुठेही चार पैसे वाचवता आले तर वाचवावे आणि चार घबाड मिळालं तर काय, वा, बिझनेसच आहे सगळा. माताजी, काही बिझनेस करीत नाही हे माहिती आहे ना तुम्हाला आणि तुम्ही सहजयोगात बिझनेस करू नये. मग पुढे मला सांगू नये. मग तुमचाही बिझनेस होईल. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हजयोगी सत्यवस्तू आहे, खरेपणा आहे. परमेश्वराचे साम्राज्य आहे, तिथे हे चालायचे नाही. ते काही इंडिया गव्हर्नमेंट नाही. परमेश्वराचं साम्राज्य आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. इंडिया गव्हर्नमेंटमध्ये चालतील तुमचे लाचलूचपत आणि सगळे धंदे. परमेश्वराच्या साम्राज्यात हे चालणार नाही. म्हणून मी सांगते बजावून परत. आज इथे सांगते आहे. लक्षात ठेवा. खबरदार कोणीसुद्धा जर एकही पैसा कमवण्याचा किंवा फुकटखोरीचा प्रयत्न केला ह्याच्यापुढे आणि जर काही त्रास झाला तर मी त्याला जबाबदार नाही. इमानदारीत उतरलं पाहिजे. अहो, इमान म्हणजे केवढं होतं पूर्वी. महाराष्ट्रीयनांच इमान म्हणजे कोणी जिंकू शकत नव्हतं. अजूनही सबंध हिन्दुस्थानात गाजलेले आहेत इमानासाठी. फार इमानदार लोक! गरीब लोक बरे तुम्हाला सांगते. इथल्या मोलकरणी, तुम्ही किल्ल्या द्या, काही हात लावणार नाहीत पैशांना! पण हे मध्यम स्थितीतले साहेब लोक. हे दुसर्यांच्या दमावर साहेबी करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत. फार तर दोन कुडते कमी घाला. काही फरक पडणार नाही. रेशमी नसले तर कॉटनचे घाला. आता तुम्हाला 'वसुधैव कुटुम्बकम' करून टाकलं आहे आम्ही. पण उदार चरित नाही. पैशाच्या बाबतीत अगदी कवडीचुंबक. मग पुण्याला तर प्रसिद्धच आहेत म्हणे. आता पुण्यावर फार मोठी जबाबदारी आहे. काल एवढे मोठे, तुमचे सदर्न कमांडचे जनरल साहेब मला म्हणाले, की आम्ही पूण्यभूमीत बसलो आहे. म्हटलं, असं कां? आणि मला म्हणाले, 'माताजी, तुम्ही ह्याला पूर्यभूमी सारखं म्हणता आणि पुण्याला विशेष पुण्य म्हणता, तर इथेच तुम्ही का नाही वास्तव्य करत आणि इथेच तुम्ही राहून आमची का नाही मदत करत ?' एवढी ते पुण्याची महती गात होते. बिचारे आपले शीख आहेत, पंजाबातून आले. 'दुरून डोंगर साजरे', तर आपले पुण्याची महती गात होते. मी आपलं ऐकत होते. भाषणातही महती वगैरे गायली आहे. तेव्हा पुणेवाल्यांवर फारच जबाबदारी आहे. केवढी मी तुमची स्तुती केलेली आहे! मला वाटतं, भरमसाठ स्तुतीमुळेच हे झालेलं आहे बहुदा. बघा एक पत्र लिहिलं होत मी तुम्हाला. ते छापून आलं. त्याचं ट्रान्सलेशन कुलकर्णींना जमेना. मला जमेना, अशी स्तुती मी तुमची केली. तुम्हाला परमेश्वर मानून पूजलं आणि तुम्ही हे काय भिकाऱ्यासारखे उभे आहात. दरिद्री लक्षणं! तेव्हा ह्या स्वरुपातून निघायला पाहिजे. एवढेच एक करा. आपल्या जबाबदारीवर. स्वत: आम्ही इज्जतीची माणसं आहोत. कोण आमच्यावरती खर्च करणार! मग बघा साक्षात् लक्ष्मी तुमचे पाय धुणार. पण म्हणून नाही करायचं. परत तेच. माताजींनी सांगितलं आहे नां, म्हणून आम्ही हे करतोय. लक्ष्मी आमचे पाय नाही धूत. म्हणजे असं पत्र येईल माझ्याजवळ असं दहा पानी. तुम्ही असं म्हणाले, तुम्ही असं म्हणाले, लक्ष्मी आमचे पाय धूत नाही. लक्ष्मीने उलट आम्ही हारलो. आता एकही पैसा नाही. कर्जबाजारी झालो. बायको पळाली, सगळं झालं. अशा भयंकर परिस्थितीत सहजयोग उभा करायचा आहे. झंझावात! त्या झंझावातात सहजयोग्यांच्या रोपाला सांभाळून धरणारे पाहिजेत हो! कुठे गेले ते? सगळे गेले का शिवाजींच्या बरोबर की पेशवाईतच गेले? संपले. ह्या रोपाला सांभाळून धरणारे लोक उभे करा आणि तुम्ही नाही केले तर मी उभे करीन. आणि मग ते तुमचं ठीक करतील. तुमच्यात ते सगळं असतांनासुद्धा तुम्ही जर ते उभं करणार नाही तर कुठून उभं करू. तर पुणेवाल्यांवर फार जबाबदारी आहे. मुंबईकरांना खूप झाडून ठेवलेले आहे आधीच. त्यांना झाडायला नको आता. पण मुंबईकरांनी हलायला पाहिजे. गणपतीसारखे चिकटून मुंबईत राहतात. हलल्याशिवाय मुंबईकरांचा काही फायदा होणार नाही. हललेच पाहिजे. हलतच नाही मुळी! हललेच पाहिजे. प्रत्येकाने ह्यावेळेला ठरवायचं, मी इथून गेल्यावर प्रत्येक मुंबईकराने महाराष्ट्राच्या सर्व सेंटर्सना भेट दिली पाहिजे. प्रत्येकाने. पैसे आहेत. सेंटरवर गेल्यावर ते काही तुम्हाला भुकं मारणार नाहीत. सुट्टी घेऊन, काहीही करून प्रत्येकाने दोन-चार तरी सेंटर्सना भेट दिली पाहिजे. 'बरं, माताजींनी आता दोन-चारच म्हटलं नां! मग दोनच घेऊयात. मग दोन म्हणजे एक असलं तरी झालं. मग कळव्याला गेलं की झालं. कळवा म्हणजे सेंटरच आहे नाही तरी आणि मुंबईच्या बाहेरच आहे नाही का? म्हणजे हद्दीत नाही. मग बघायचे मॅपवर हद्दीत आहे, की बाहेर आहे. बाहेरच आहे मग ७ काय! मग झाल, 'आम्ही कळव्याला जाऊन आलो माताजी.' 'असे का?' मग ठाण्याला जाता का आता? ठाण्याला जा, तिथे बरं राहील तुम्हाला. वटवाघुळे बनून. तिथे पुष्कळ आहेत. ते कसं काय राहील? काय! उत्तम ! ही व्यवस्था नको सहजयोग्यांची. ती माझी मुलं आहेत. काय करताहात स्वत:बरोबर. लक्ष ठेवा स्वत:कडे. तुम्ही माझी मुलं आहात! तेव्हा वटवाघुळाच्या ह्या स्थितीला जायचं नाही. मुळीच जायचं नाही. तेव्हा सांभाळून रहा. हे सांभाळण्याची वेळ आलेली आहे. आता ह्यांच्याहून जास्त लोक येतील. त्यांना लुबाडायचं म्हणजे काय! तुम्ही काय ठगी करता की काय रस्त्यावर, म्हणजे त्यावेळचे ठग आता महाराष्ट्रात जन्माला आले असतील. तर तसं सांगावं. त्यांनी सगळ्यांनी इथेच जन्म घेतलेला आहे आणि हे ठग सगळे आता बसून ठगत आहेत सगळ्यांना. खुल्या दिलाने राहिलं पाहिजे. आता उद्या मंडळी येणार आहेत. सगळ्यांनी काही ना काही तरी त्यांना बक्षीस म्हणून द्यावं. मागच्या वेळेला मीच खर्च करून सगळ्यांना बक्षीस दिलं होतं . पुणेकरांच्या तर्फे त्यांना आत्ता आंबे दिले आणि लोटे आणि पात्र दिलं. कशाला ? पुणेकरांच्या तर्फे! आणि पुणेकरांनी काय केलं! व्वा! आम्ही समागम दिला माताजी, जेवायला बसलो सगळ्यांच्या बरोबर व्यवस्थित. सगळ्यांनी काही ना काही बक्षिसे ह्यांना दिली पाहिजेत. प्रत्येकाने मित्रता जोडली पाहिजे. पण मित्रता म्हणजे अशी नाही, की मला जरा पाचशे रुपये उसने द्या. मी कर्ज घेतलं होतं. माझी आई मेलेली आहे. तिच्या अंगावर कपडा नाही. हे असले प्रकार करण्यापेक्षा त्या लोकांना तुमच्याबद्दल काय कल्पना होणार आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्पष्टपणे मी हे सांगते. आज स्पष्टच बोललेलं बरं. असल्या प्रकारच्या हलकटपणाच्या गोष्टी करायच्या नाहीत. जाऊन दोस्ती करायची. त्यांच्यासमोर आपला मोठेपणा दाखवला पाहिजे. ते तुमच्या दर्शनाला आलेले आहेत. हे चांगले आहे, की परमेश्वराच्या दर्शनाला जा आणि परमेश्वर भीक मागतो आहे ! काय स्थिती आहे हो! ही काय स्थिती आहे. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे. इतका विपर्यास करू नका सहजयोगाचा. तेव्हा कृपा करून ह्यांच्यासाठी काहीतरी करा. ते तुमच्यासाठी किती बक्षिसं घेऊन आले आहेत. एवढा खर्च करून इथे आलेत. आपल्याला पैसे तर समजतात कमीत कमी आणखीन काही समजलं नाही तरी. हे लोक केवढा खर्च करून आलेले आहेत ! त्यांच्यासाठी एखादी वस्तू दिली तर नेहमी लक्षात ठेवतील. प्रेमाने मिठ्या माराव्यात. त्यांना प्रेमाने घरी जेवायला बोलवायचं. दिल्लीकरांच हृदय बघा केवढं मोठं आहे ! 'सात दिवस आम्ही आमच्याकडे ठेवतो माताजी. तुम्ही काही केलं तरी आम्ही ऐकणार नाही. सात दिवस आम्ही आमच्याकडे ठेवू. आम्ही सगळ्यांना वाटून घेऊ. आम्ही एका खोलीत जरी राहतो तर काय झालं. आम्ही वाटून घेऊ. ' हे दिल्लीकर. तसे मुंबईकर दिलदार आहेत. त्याबद्दल शंका नाही. मुंबईकर दिलदार आहेत, पण हलत नाहीत. दिल्लीवाले लोणावळ्याला येतील, पण आज किती सहजयोगी मुंबईहून इथे आले, रविवारला आपण पूजा ठेवली तर. हातावर मोजून घ्या. आज यायला काय झालं होतं पूजेला ! माताजी आज पूजेला बसणार आहेत. हे लोक इतक्या दुरून आले. तुम्ही काही इथपर्यंत येऊ शकत नव्हते ? किती लोक आले आहेत मुंबईचे मला लिस्ट करून द्या. काय झालं होतं यायला त्यांना आज ! सकाळच्या गाडीने यायचं आणि संध्याकाळच्या गाडीने जायला काय झालं होतं ? काय दर आहे लोणावळा? आता काय कळव्याला प्रोग्रॅम केला म्हणजे होईल. तर त्याच्यामध्ये आंतरिकता नाही. ओढ नाहीये. तुमची जर आई उद्या ८ आली असती तर आले असते भेटायला. नक्की. मी तुमची आई नाहीये का? तुमच्या आईची आई आहे मी. माझ्याशिवाय चालणार आहे का तुमचं! आंतरिकता नाहीये. मुंबईच्या लोकांना आतंरिकता असायला पाहिजे. दिल खोल असून फायदा काय? आतंरिकता पाहिजे. पैसे खर्च करून सगळे विकत घेता येत नाही. आतंरिकतेने येतं. आतंरिकता आहे का तुम्हाला? आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, की आम्ही आंतरिक आहोत की नाही. अंत:करणापासून वाटलं पाहिजे. असं नाही म्हणत की सर्वांना नाही वाटत. काही लोकांना मुळीच वाटत नाही. 'माताजी, तुम्ही आल्यामुळे आमचा हा फायदा झाला, तो फायदा झाला. अहो, माझा काय फायदा झाला तो तर बघू द्या मला. आता मुंबईला जर चार माणसं आली तर मला विचार करावा लागतो कोणाच्या घरी ठेवायचं. ज्याच्या घरी ठेवावं तो उचलबांगडीच करत असतो. इथे हेच काम दिसतंय. हे आले ना ह्याला ह्याच्याकडे घाला. त्यांची टोपी ह्याच्यावर काही समजतच नाही हे काय आहे. त्यांना काही तुमचं समजत नाही तर समजवून सांगा. पण आतंरिकता नाहीये. आतंरिकता असायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. पण तेच आम्ही जातो खेडेगावात, म्हणजे बहार आहे. आतंरिकता आहे. सगळं मस्त आहे. काय मजा येते हो! बैलगाडी असो नाही तर काही असो. पायी चालायला लागलं तरी काय झालं. अनवाणी चालायला लागलं तरी काय झालं! अहो, प्रेमाचं एवढं जे धो धो वहात असतं, त्याच्यापुढे काही नको मग. त्याच्या मग काही इच्छा रहात नाही. असं ठेवलं पाहिजे आणि तेच शिकलं पाहिजे त्या लोकांपासून. खुले आहेत. कधीही माझ्याकडून एक कवडीही घेणार नाहीत. मला त्रास देणार नाहीत. सगळी व्यवस्था कशी मस्त ! सकाळी सगळे आंघोळ करून इतके व्यवस्थित उभे ! तेव्हा वाटतं अरे, माझा महाराष्ट्र हा! बस, मुंबई आणि पुणेकरांवर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही सरताज ना इथे बसलेले, तलवारी घेऊन. गंजू देऊ नका. सगळ्यांना सांगणं आहे, थोडे दिवस खेडेगावात जाऊन रहावं आणि थोडं खेडेगावातल्या हातात लोकांकडून शिकावं. जरी काही नसलं घरात तरी अत्यंत प्रेमाने, 'एक कप चहाच घेऊन जा माताजी. काही तरी घ्या. नुसतं पाणी नको.' आणि केवढं प्रेमाने ! हृदय भरून येतं. तसेच पाहिजे. आतंरिकता पाहिजे. ह्या लोकांना पाहिजे. हे आले आहेत, कसे आमच्या जीवाशी हे आलेले आहेत. ह्यांना कुठे ठेऊ आणि कुठे नको! न्हाऊमाखू घालू की भरलं बघून हदय काय करू? कसं करू? असा विचार यायला पाहिजे. ह्यांना जायचंय, आता कधी भेट होणार! हे आमचे जीवाचे निघाले आहेत. तसं नाही. त्याच्याकडून किती काय काढता येईल ते आपण काढलं पाहिजे. आता हे सगळे विसरा. झालं गेलं विसरून जायचं. आता पूढची वाटचाल करायची. त्या वाटचालीमध्ये आपण वर वर उठत जायचं. द्वैतातून अद्वैतात आल्याशिवाय होणार नाही. आणि आपण अजून द्वैतात बसलेलो आहोत आणि त्या द्वैतात थोडेसेच काटे आहेत. ते काढावे लागणार. पैशाचा हा जो आपल्या डोक्यामध्ये बोजा आहे, तो काढून टाका. तुम्हाला लाखोंनी पैसे मिळतील. 'योगक्षेम वहाम्यहम्' म्हटलेले आहे. सोडून बघा. ह्यांना प्रेमाने जवळ करा. चार पैसे खर्च करा. काहीही लागत नाही. तुम्ही कर्जबाजारी होणार नाही. मला काही नको आहे, पण ह्यांच्यासाठी करा. हे बाहेरून आले, त्यांना प्रेमाने जवळ घ्या. लोणावळा, १९ डिसेंबर १९८२ ९ এ परमे१्वराची गौरव सातारा, २६ दिसंबर १९८५ झालं हे वाईट झालं. मला फार वाईट वाटतं. सगळ्यांसाठी एक सभा जाहीर करा आणि त्यात ज्यांनी ज्यांनी हे केलं त्यांनी क्षमा मागितली पाहिजे. अर्थात् ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं काहीतरी वाईटच होणार. मी कितीही प्रयत्न केला, कितीही क्षमा केली तरी हे होणार. पण तरीसुद्धा तुम्हाला सांगायचं, की जे झालं ते विसरून जा. आपल्याला देवधर्माशिवाय चालणार नाही. अशा फालतू लोकांना इथे जमू द्यायचं नाही. इथे ही संस्था येईल आणि नंतर ही संस्था आल्यावरती तुम्ही पोलिसांना कळवा की, 'इथे संस्था आलेली आहे. आमच्या मुलांना बिघडवताहेत आणि त्यांना खूनशी बनवत आहेत. मागच्या वेळेला त्यांनी त्यांना दगड मारायला सांगितलं.' सगळ्यांनी मिळून असं १० सांगायचं. आणि सरपंचसुद्धा सहजयोगी निवडायचे. प्रयत्न करायचे. म्हणून एक फार वाईट मनुष्य आहे. आणि त्याचं सबंध एक माफिया टाइप चालले आहे. तेव्हा त्याच्या पार्टीला व्होट द्यायचं नाही. कोणालाही द्या, पण त्याच्या पार्टीला व्होट दूसरं म्हणजे असं की ह्या देशामध्ये .. द्यायचं नाही आणि सहजयोग्यांनी त्याच्या विरुद्ध काम करायचं. कुठेही असलं तरी त्याच्या विरूद्धच काम करायचं. कुठेही असू देत, की हा मनुष्य किती वाईट आहे. ह्याचा देवावर विश्वास नाही. ह्याने टूम काढलेली आहे रजनीशला भेटून. रजनीश आणि ह्याची मिळून टूरम आहे, की देव नाही असं सिद्ध करायचं! ह्याला देव नको. कारण ह्याच्या आईचा पत्ता नाही. ह्याला देव नको. देव नको म्हणजे तुम्ही दारू प्या आणि वाट्टरेल ते धंदे करा. तर अशा रीतीची पत्रकं काढायची. लोकांना सांगायचं, की असे जे लोक शिकवतात ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्हाला देवाधर्माने रहायचं आहे. आम्हाला दुसरं काही नको. सहजयोगाने कोणी दैववादी बनत नाही. देववादी बनतात आणि सशक्त बनतात. त्याला डॉक्टरांचा पुरावा आहे. हे आम्हाला काय बोलतात ! कोणीही उठावं, काहीही बोलावं. ते मानलं पाहिजे का? डॉक्टरांनीच सिद्ध केलेले आहे, आता आम्ही काय सिद्ध करून दाखवायचं? माझ्यातर्फे मी जितकं होईल तितकं ह्या न्यूजपेपरवाल्यांना सांगितलं. पण असे घाणेरडे न्यूजपेपर्स घ्यायचेच नाही. केसरीवर बहिष्कार टाकायचा, लोकसत्तेवर बहिष्कार टाकायचा. असे जे पेपर आहेत त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. दुसरा पेपर तुम्ही साताऱ्याला सुरू करा. ऐक्य म्हणून जो पेपर आहे त्याच्यावर बहिष्कार टाका. अगदी बेकार आहे तो. पुष्कळ गोष्टींवर बहिष्कार टाकावा लागणार आहे. पूर्वी गांधीजी असतांना सगळ्या बायकांना असं सांगितलं विदेशी कपडे वापरायचे नाही. तर सगळ्या बायकांनी जाळून टाकले. सगळ्या सोन्याच्या बांगड्या देऊन टाकल्या. इतके लोकांनी त्याग केले. अहो, ते नुसतं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी! पण 'स्व'च तंत्र मिळविण्यासाठी आपण एवढीसुद्धा तोशिस आपल्याला लागू देत नाही. सहजयोगात नुसता आशीर्वादच आशीर्वाद आहे, पण त्याच्यासाठी कर्तव्य पण आहे. त्या कर्तव्याला मुकलं नाही पाहिजे. आणि आज सगळ्यांनी आपल्या मनामध्ये पूर्णपणे विचार केला पाहिजे, की माताजींनी ह्या कृष्णेच्या काठी जे आम्हाला समजवून सांगितलेले आहे, आणि त्या भव्यतेला त्या ..(अस्पष्ट) तशी देवा आम्हाला शक्ती दे आणि सुबुद्धी दे की आम्ही त्या भव्यतेला उठू, आणि हा जो आम्ही रडतराऊपणा करतो आहे, तो सगळा बंद झाला पाहिजे. ह्यावर काही उपाय नाही. आपलं आपण ठीक करून घेतलं पाहिजे. स्वत: विचार करून की, 'मी काय करतोय? माताजी म्हणतात की हे फार मोठं होऊ शकतं. मग मी काय करतोय ?' माझ्यात काय दोष आहे ? तुम्ही जर खरच मला आदिशक्ती मानता मग तुम्हाला अजून पाहिजे काय? अहो, आदिशक्ती जी, जिने सर्व सृष्टीची रचना केली. सगळे काही जगामध्ये केलेले आहे. आज जेवढं काही आहे, ते आज जर आम्ही केलेलं आहे तर मग तुम्हाला आणखीन काय पाहिजे. पुष्कळ आदिशक्ती, आदिशक्ती म्हणायचं, ओरडायचं, जयजयकार करायचा, पण त्याचा काही अंदाज आहे का तुम्हाला ? आदिशक्ती म्हणजे काय? केवढी मोठी तिची गोष्ट आहे! आणि तोंडाने आपण म्हणतोय, नुसतच, चर्पटपंजरी आहे ती! स्पष्टपणे समजून घ्यायचं. आदिशक्तीने तुम्हाला निवडलेले आहे त्या कार्यासाठी! हे तुमचं परम भाग्य आहे. अनेक वर्षाचं ११ पुण्य आज कामाला येणार आहे. तेव्हा कृपा करून त्याच्या लायक व्हा. कसलेतरी रडतराऊ बनत, चालणार नाही आणि असे जर असले तर त्याच्यातून तुम्ही निघालेले बरे! आजपासून सगळ्यांनी हा विचार मनात आणायचा. त्या शिवाजीला भवानी आईने तलवार देऊन एवढं प्रभावित केलं! तीच भवानी आई आज तुमच्यासमोर बोलतेय. ती तुम्हाला कुठल्या कुठे पोहचवून देईल, ह्याचा काही अंदाज आहे का तुम्हाला? तर आजच्या ह्या शुभप्रसंगी, नम्रपणे, व्रतनिश्चय, आपण ठरवायचं की 'आम्ही सहजयोगी आहोत आणि मरणापर्यंत आम्ही सहजयोगी राह आणि त्याच्याही नंतर आम्ही सहजयोगी राह. हे अनंतातलं आम्ही मिळवलेलं आहे आणि आम्ही तसे राहू.' अशा वीरश्रीने आणि गौरवाने आयुष्यात राहिलं पाहिजे. हा गौरव असायला पाहिजे. त्यात तुमचं काही चुकलेले नाही. परमेश्वराचं कार्य करणं हे फार मोठं आहे आणि तुम्हाला आम्ही निवडलेले आहे . तुमचा आम्ही गौरव केलेला आहे. आता तुम्ही सुद्धा परमेश्वराचा गौरव वाढवावा, असा माझा तुम्हाला अनंत आशीर्वाद आहे. ह्या शाळेचे आद्यप्रवर्तक जिजाबा मोहिते, यांनी हृदयाला घोटून टाकण्यासारखं भाषण केलं आणि माझीसुद्धा अशी अवस्था आलेली आहे. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतोय. ४२ सालांमध्ये आम्हीसुद्धा लहानपणी स्वातंत्र्ययुद्वात होतो. माझे वडील आणि आई ह्यांनी गांधीजींना सर्वस्व वाहिलं होतं आणि मीसुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणी राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळविण्याची होती. कॉलेजमध्ये असतांना जेव्हा 'भारत छोडो' चा नारा लागला ९ ऑगस्टच्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं मी प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळचे जे कॉलेजचे मुख्य प्रिंसिपल होते, त्यांनी ह्या सहजयोग्यांना सांगितलं की, 'मला तेव्हाच वाटलं, की ही काही तरी मोठी शक्ती असेल, की अठरा वर्षाच्या वयामध्ये त्या बंदका आणि हे राहून ह्याच्यासमोर कशी उभी राहिली.' एकटी मुलगी होते. पण ते कॉलेज आम्ही बंद पाडलं. त्यानंतर ४२ सालात मी अध्यात्माचा विचार केला नाही. फक्त देशाला स्वतंत्रता मिळवून द्यायची. त्यावेळेला आम्हाला ह्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले. बर्फावर घातलं. आई माझी, तिला वाटायचं, ही अठरा वर्षाची मुलगी आहे. तिचे प्राण जाणार आणि जवळजवळ नऊ महिने मला भूमिगत व्हावं लागलं. अशाप्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वहावत गेले आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं होतं, की आपल्या देशातली गरिबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये ते कुठेतरी वाऱ्यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आली मला, की हे कसलं स्वातंत्र्य मिळवलं आहे ? ह्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे आपल्याला? अशा रीतीने हे लोक स्वार्थी आणि स्वत:चे पैसे कमवायचे आणि सर्व देशाला बुडवायचं. स्वच्छता आली पाहिजे. हे जे गांधीजींचं देशाबद्दलचं जे काही प्रेम होतं, ह्या धंद्यात लागलेले. आपल्याकडे देशाविषयी कळकळ असणारे लोक गेले कुठे? कुठेही गेलं की हीच गरिबी बघून माझ्या जीवाला असं होतं की कसं हे ठीक करायचं? कसं वागायचं? तसं पाहिलं तर आपल्या देशात भरभराटच होती. भरभराट होण्याचं कारण असं, की ज्या ज्या देशाला १२ बाहेरून मदत आली आहे, त्यापैकी आपल्या देशाला फारच मदत आली आहे. बाहेरच्या देशातून आपल्या देशाला वर्ल्ड बँकेने पुष्कळ पैसे दिले आहेत. त्याबद्दल शंका नाही आणि ते पैसे आपण न वापरता आपण ते परतु तिकडे स्वित्झर्लंडला पाठवले. इथल्या गरीब लोकांचे पैसे घेऊन आपण स्वित्झर्लंडला ते पैसे पाठवले. त्यानंतर ते स्वित्झर्लंडमधूनच पैसे घेऊन वर्ल्ड बँक आपल्याला पैसे देत असते. म्हणजे एकूण काय की आपण काहीही न होतांना त्याच्यासाठी म्हटलं पाहिजे, की आपण गरीब झालो . इतकेच नाही तर कर्जबाजारी झालो . तर सहजयोग आमचा जो आहे त्याने विश्व निर्मल धर्म म्हणून धर्म स्थापन केला. म्हणजे जगातले सारे धर्म आम्ही मानतो. म्हणजे गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आणि सगळ्या मोठमोठ्या संत-साधुंना आम्ही मानतो. गाडगेमहाराजांना मी भेटलेली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि त्यांनी मला ओळखलं होतं . त्यांनी मला म्हटलं होतं, की असा एक काळ येईल, कारण ते सुद्धा स्वातंत्र्यवीर होते. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज सगळे आमच्या घरी आलेले होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही, त्यावेळेला त्यांनीसुद्धा मला ओळखलं. आणि मला सांगितलं, की एक दिवस असा येईल, की तुम्ही ह्या भारतवर्षाचं कल्याण कराल. संतांच्या मागे आम्ही आहोत. एवढेच नव्हे पण संतांचे कार्य पुढे चालवायचं आहे. संतांनी कधीही माणसाला दैववादी केलेले नाही किंवा कधीही त्यांच्या कर्तृत्वावर घाला घातलेला नाही. आजकाल एकेक उपटसुंभ निघालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही नुसतं विज्ञानाची कास घ्या. आमचं असं म्हणणं आहे, की तुम्ही सत्याची कास घ्या. विज्ञानात आपल्या हिंदुस्थानात कोणी शोध लावले? कोण मोठे वैज्ञानिक इथे बसलेले आहेत ? आपला वारसाच मुळी अध्यात्माचा आहे. त्याला काळं फासून तुम्ही विज्ञान घेऊन बसलात. आता इथे कितीतरी, ३-४ असे लोकं आलेले आहेत, की जे विज्ञानामध्ये फार निष्णात, इथे नसतील अशा त्यांच्याजवळ पदव्या. त्यात ३-४ हिंदुस्थानी लोकसुद्धा आहेत. इथे नाही आलेले. आणि त्यांनी शोध लावले. अनेक शोध लावलेले आहेत आणि त्या शोधातून बरेच काढलेले आहे. त्यात मी त्यांना काही सांगितलेले आहे, हे सुद्धा त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी त्याचा शोध लावला आणि त्यांनी सांगितलं की, 'माताजी, तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे.' त्यापैकी एक गोष्ट मी त्यांना सांगितली, कार्बन अॅटम जो असतो तो आपल्या मूळाधारात असतो. कार्बन अॅटमला चार व्हॅलन्सी असतात. अहो, तुमच्या अंधश्रद्धेच्या माणसाने माझं चार तास डोकं खाल्लं. त्यांना कार्बन म्हणजे काय? त्याची व्हॅलन्सी म्हणजे काय? हे समजवायचं. हे कसलं विज्ञान करणार आहेत ? सांगा तुम्ही, ह्या लोकांना कसलं विज्ञान येतं ? हे लोक म्हणतात आम्ही वैज्ञानिक! एका माणसाला धरून, उभं करून ते काय सगळे लोक होतात? सगळा देश होतो? आपल्या प्रगतीचं त्यांना काही नाही. आपली प्रगती अध्यात्मासाठी, परमेश्वरासाठी आहे. आपली अध्यात्मात एवढ्यासाठी एवढी प्रगती झालेली होती, आहे आणि होणार आहे. त्याला कारण असं आहे, विज्ञान जे झाडासारखं बाहेर वाढलेलं आहे, पण त्याच्या मुळाशी त्याला माहिती नाही. मुळाशिवाय ते झाड कसं राहणार? ते मूळ इथे, आपल्या भारतात, विशेषत: महाराष्ट्रात आहे. विज्ञानाला प्रेम कशाशी खातात ते माहिती आहे का? प्रेमाची व्याख्या करावीच लागेल किंवा कोणतीही जिवंत वस्तु कशी कार्य १३ करते त्याबद्दल ते काही सांगू शकत नाहीत. एका बी ला जर तुम्ही मातीत घातलं, तर ते कसं वर येईल, त्याच्यात कोणती क्रिया होईल, हे सांगू शकत नाही. विज्ञानाला आपली मर्यादा आहे आणि अध्यात्माला मर्यादा नाही. पण त्याला ...... दिलं पाहिजे. त्यात उतरलं पाहिजे आणि वाढ करून घेतली पाहिजे. विज्ञानाबद्दल, अर्थात माझं असं म्हणणं आहे, की मी मागे सांगितलं होतं की तुमच्या इथल्या मुलांना आम्ही विज्ञान वगैरे शिकवू सगळं. सगळं काही शिकवू. पण ते मुख्य नव्हे. विज्ञानाला नेहमी अध्यात्माची जोड पाहिजे. आता आमच्या तीन असे मोठाले लेखक होऊन गेलेले आहेत. आणखीन विज्ञान शास्त्री की ज्यांनी मी सांगितलेल्या गोष्टीवरती रिसर्च केला. ती ही गोष्ट त्यांनी सिद्ध करून दाखवली. पहिली गोष्ट अशी सांगितली मी, की कार्बन अॅटममध्ये, जर तुम्ही त्याचा फोटो घेतला आणि त्याचं जर तुम्ही मॉडेल बनवलं, तर तुम्ही जर एकीकडून दुसरीकडे बघाल, तर त्या अॅटम्सची अशी मांडणी आहे, त्या व्हॅलन्सीजची अशी मांडणी आहे, की जर तुम्ही डावीकडून उरजवीकडे बघितलंत तर तुम्हाला ॐ कार लिहिलेला दिसेल आणि तुम्ही जर उजवीकडून डावीकडे बघितलंत तर तुम्हाला....... दिसेल आणि जर तुम्ही खालून वर बघितलं तर तुम्हाला क्रॉस दिसेल. त्यांनी करून बघितलं आणि सिद्ध केलं की असं झालेलं आहे. एक फार फार मोठे सायंटिस्ट आहेत दोघजण, एक बेल्जियमचे आणि एक अमेरिकेचे. ते दोघेही आता फार मोठ्या पदांवर आहेत. दुसरी गोष्ट मी त्यांना अशी सांगितली , की माणसाच्या, पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा नाहीतर त्यांनी हेच कार्य आपल्याला....., खरं म्हणजे गाडगे महाराज इतके स्वातंत्र्य विचारात फसलेले होते केलं असतं. गांधीजींनीसुद्धा हेच कार्य केलं असतं. पण ती वेळ नव्हती. स्वातंत्र्याची वेळ होती. नाहीतर माझं जे कार्य आहे, ते त्यांच्यापासूनच आलं आहे. त्यांनी हे कार्य पुढे करायचं स्वातंत्र्य मिळाल्यावर, हे ठरवलेलं होतं. पण करणार कसं! स्वातंत्र्य मिळाल्यावर ते किती दिवस राहिले. फारच कमी दिवसात ते सगळेच वैकुंठवासी झाले. बरं, मग दुसरी गोष्ट मी सांगितली, की आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये जीवात्मा आहे आणि तो आपल्या पाठीच्या कण्यावरती सात असे लूप्स करून बसलेला आहे. लूप्स म्हणजे, ज्याला आपण मराठीमध्ये अर्धवर्तुळ म्हणू. अर्धवर्तुळाने, असे सात अर्धवर्तुळ आहेत. ही अर्धवर्तुळ आहेत. पाठीवरती बसलेले आहेत आणि तो ज्याने सगळी चालना होते आणि आत्मा आपल्या हृदयात येतो. तर ते म्हणायला लागले, की आकाशात आम्हाला असं चैतन्य दिसतं. आपल्या हिंदुस्थानात ते फार दिसतं लहान लहान असे पांढरे पांढरे. असे जसे काही अनुस्वारासारखे. अनुस्वारासारखे असे कण दिसतात आकाशात आणि हे आत्मसाक्षात्कारी लोकांना दिसू शकतं. नाहीतर दिसू शकत नाही. तुमची दृष्टी सूक्ष्म व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ते म्हणाले, 'आम्हाला ..... असे दिसतात. ते अर्धवट असे एकात एक घुसलेले ते आहे काय माताजी ?' मी म्हटलं, 'हे मेलेले जीव. ते अजून इथेच रेंगाळत आहेत.' आणखीन हे आपले जे जीवात्मा आहे, त्याचं प्रतिबिंब प्रत्येक आपल्या पेशीवरती, आपल्या सेलवर आहे. तुम्ही पत्ता काढा. एक डॉक्टर मिश्रा म्हणून इथे आलेले आहेत. १४ विज्ञानाला आपली मर्यादा आहे ते फार मोठे सायंटिस्ट आहेत. ओणि अध्यात्माला मर्यादा नाही. त्यांनी सांगितलं की सायन्सने शोधून त्यात उतरलं पाहिजे आणि वाह करून घेतली पाहिजे. काढलं, की प्रत्येक सेलवर असे आहेत. अर्धवर्तुळ असे सात आहेत. ১। म्हणजे आम्ही जे म्हटलेले आहे त्याच्यावर त्यांनी शोध केला. NAP. ০ www तिसरे एक गृहस्थ होते. त्यांनी सांगितलं की शेवटला झिरो पॉइंट LE. ১ तो मायनस ज्याला म्हणतो आपण, २७३ डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणजे तापमानाला. संगळ्यात खालचा. मायनस २७३ डिग्री. तर एकाचा त्याच्यावर विचार चालला होता की मायनस २७३ डिग्रीलाच कसं जायचं? तर मी म्हटलं की ते एकमेव आहे. एकमेव गोष्टीला तुम्ही पोहचू शकत नाही. कारण तुम्ही एकमेव नाही. तेव्हा सायन्सचे सर्व प्रकार त्यांनी करून पाहिले. हिलियमवर म्हटलं होतं तू प्रयोग कर. त्याच्यावर प्रयोग केल्यावरती त्याने पाहिले की जेव्हा हिलियम थंड होत असतो, तर त्याच्यातले अणू-रेणु जे आहेत, ते अगदी व्यवस्थित, सामूहिकतेने वागतात. अगदी सामूहिक वागतात. जसे काही पक्षी एकत्र चालले आहेत, असे वागायला लागतात. ते झालं, पण मी तुम्हाला म्हटलं की एकमेव तुम्हाला त्या परिस्थितीत जायचं आहे, तिथे की टेंपरेचर मायनस २७३ डिग्री जाणार आहे, तर त्या ठिकाणी पोहोचतांना तुम्हाला चैतन्य वापरावं लागतं. आणि शेवटी चैतन्य वापरून त्यांनी ते साधून घेतलं. तसेच तिसऱ्या एका माणसाने दारूचा परिणाम लिव्हरवर का होतो यावर लिहिलं होतं. त्याला मी एक त्याच्यात पॉइंट सांगितला. तो नऊ वर्षापासून तेच लिहित होता. तो पॉइंट सांगितल्याबरोबरच आणि ते सिद्ध झाल्याबरोबर त्याला बी.एसस्सी.ची डिग्री मिळाली. तसेच दिल्लीच्या तीन डॉक्टरांना एम.डी.ची पदवी मिळाली. ती शास्त्रज्ञांनी दिली आहे. ती काही एम.डी. ची पदवी तुम्हाला असा तसा मनुष्य देऊ शकत नाही. शास्त्रज्ञ, शेवटी एम.डी.ची पदवी मिळते. त्यांनी एमबीबीएस केलं होतं. त्यातले एक डॉक्टर इथे आलेले आहेत. ह्याने रोग कसे बरे होतात ह्याचा पडताळा घेतलेला आहे आणि मग लिहिलेले आहे. पण कोणी ह्या महाराष्ट्रात आहे ऐकायला तयार नाही. अहो, ही संतांची भूमी आहे की भुतांची भूमी ते मला समजत नाही. तिथे असे उपटसुंभ निघालेले आहेत. ह्या लोकांना तुम्ही हलवून पाडलत. आपला स्वाध्याय करायचा नाही आणि अध्यात्माला मानायचं नाही. एकतर्फी ह्यांचे जे काही जीवन चाललेले आहे, त्या जीवनामधून आता आपण जे परवा पाहिले नमुने, की खुनशीपणा जो झाला, त्या लोकांना मारलं, बाहेरच्या अठरा लोकांना जखमी केलं. ह्यांनी काय आमचं बिघडवलं होतं ? त्यांना मारायची काय गरज होती ? हा खुनशीपणा हे शिकवत आहेत. हे कसले काय लोकांना चांगले बनवत आहेत! धीट बनवताहेत आणि पुष्कळशी तिथली लहान लहान मूलं घेऊन गेले होते. सोळा वर्षाच्या खालची मुलं. १५ ০ ० त्यांना नेऊन दगड मारायला शिकवलं. तर त्यांचे जे आई-वडील होते ते मला येऊन म्हणायला लागले, 'माताजी, आमच्या मुलांचं आता काय होणार?' त्यांचं तर भूत करून टाकलय. आता सगळ्यांना दगड मारायचं तर मार. ह्या विज्ञानाचा इतका वाईट परिणाम परदेशात झालेला आहे! मी फिरलेली आहे. जे लोक इथे बसून कुपमंडूकासारख्या, पुण्याला बसतात त्यांना रजनीशच फार मोठा मनुष्य वाटतो. म्हणजे काय म्हणावं? त्याला तुम्ही बोलवाल का ह्या शाळेत? खेडेगावात तर मार पडेल त्याला, गेला तर! तर ह्या न्यूजपेपरवाल्यांनासुद्धा तुम्ही पत्र लिहिलं पाहिजे की, 'असल्या घाणेरड्या गोष्टी तुम्ही छापू नका. माताजी हे कार्य करताहेत, ते तुम्हाला काही दिसत नाही. जे चांगलं कार्य करताहेत त्यांच्याबद्दल काही लिहा नां! तुम्ही सगळ्यांनी मिळून अशी चळवळ करायला पाहिजे. ही भूमी संतांची आहे. सगळे फक्त खोटे असं ह्यांचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वरांपासून सगळे संत खोटे आहेत आणि हे मात्र अतिशहाणे निघाले. मी त्यांना असं आवाहन दिलं, की तुम्ही मला आवाहन देण्यापेक्षा मी तुम्हाला आवाहन देते, दोन ओळी तुम्ही संत ज्ञानेश्वरांसारख्या लिहन दाखवा. तर त्यांचं म्हणणं असं, की त्यांनी गीतेवरती टिका लिहिली. कबूल! त्यांचा अमृतानुभव बघा. अहो, रोज मी त्यातल्या चार ओळी वाचते. इतकं आनंददायी आहे ते. इतकं आनंददायी. पण त्याला आत्मसाक्षात्कार पाहिजे नां! सूक्ष्म दृष्टी पाहिजे. ह्या बोथट लोकांना काय समजणार आहे त्याची महती. विज्ञानाने काही कविता होतात का? कोणा वैज्ञानिकाने कविता केलेल्या मी तरी ऐकलेल्या नाही. हे जे आपल्या इथे एवढं मोठं परंपरेने दिलेलं धन आहे, केवढ धन दिलेलं आहे आणि हे संतांचं कार्य आहे. काय काव्य आपल्याकडे केलेले आहे! रोज वाचावं, म्हणावं. आता ही मंडळी तुम्हाला त्या काव्यातलं, एकनाथांचं वगैरे भारूडसुद्धा म्हणून दाखवतील. आणि फक्त संतांनीच ते कार्य केलेले आहे. संतांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर इतकं कार्य केलेले आहे, की तसे कोणीही केलेले नाही. .... काय म्हणतात, 'आम्हासी म्हणती ब्राह्मण, आम्ही जाणिले नाही ब्रह्म, आम्ही कसले ब्राह्मण।' दूसरे एक सरस्वती होते. ते तर एखादा शेंदूर वगैरे फासून बसला तर त्याला तिथे जावून फेकायचे. त्याच्यावर जाऊन घाण करायचे, त्या मूर्तीवर. आता आम्ही सांगितलं देवाच्या कार्याला तुम्ही पैसे देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, की मी कोणाकडूनही एकही पैसा कधी घेतलेला नाही. इथे इतकी मंडळी बसलेली आहेत, त्यांना विचारा आम्ही कोणाकडूनही एकही पैसा घेतलेला नाही. कार्य कसं होतं ! देव कृपेने लक्ष्मीचा हात आहे माझ्या हातात. पैशाची कधीच कमतरता झाली नाही. ह्या शाळेलासुद्धा मी स्वत:चे पैसे दिले. देईन. पण ही मंडळीसुद्धा द्यायला तयार आहेत. पण त्यात एक अडचण आहे की यांना रिझर्व्ह बँकेकडे जावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल. म्हणून मी स्वत:चेच तुम्हाला पैसे दिले. पण तुम्ही जर बरोबर तुमच्या शाळेचा आराखडा करून दिला, तर ह्यांना तुमच्या मुलांबदल भयंकर प्रेम निर्माण होईल. भटक्या जातीची मुलं आहेत. काय हो, माझं हृदय नुसतं पिळवटून निघतं. गरिबी बघून मी खरं सांगते, या भटक्या जातीच्या मुलांसाठी काय करू नि काय नको असं होतं. पण १६ माझे हात असे बांधले गेले आहेत. आता इतके पैसे मी तुम्हाला देऊ शकत नाही. माझी अशी इच्छा आहे, की ह्या लोकांनी तुम्हाला द्यावे. त्यांचीही इच्छा आहे. पण रिझर्व्ह बँकेची परवानगी वरगैरे घेऊन आम्ही व्यवस्थित तुम्हाला देऊ आणि तुम्ही ह्याचा आराखडा काढून द्या. ही शाळाच नाही तर अशा अनेक शाळा आम्ही हाताखाली घेतल्या आहेत. त्यांची लिस्ट बनवलेली आहे. सगळ्यांना आम्ही मदत करणार आहोत. जे लोक एकेकाळी ह्या देशावर राज्य करत होते. त्यांनी आमचा इतका छळ केला. माझी आईसुद्धा पाचवेळा जेलमध्ये गेलेली आहे. तुमच्या फग्ग्युसन कॉलेजची ती ऑनर होती मॅथेमॅटिक्सची रँग्लर परांजपे..... वडील माझे चौदा भाषेत निष्णात होते आणि ते पूर्वीच्या काळच्या सेंट्रल असेंब्लीचे, कॉन्स्टीट्यूट असेंब्लीचे नंतर पार्लमेंटचे मेंबर होते. त्यांनी सगळ काही देशासाठी त्यागलेलं. गाडगे महाराज, ह्यांनीसुद्धा आमच्या वडिलांना सांगितलं आहे. हे संतसुद्धा त्यांना मानत असत. माझे वडीलसुद्धा फार मोठे संत होते आणि त्यांनी सांगितलं की गृहस्थाश्रमात राहूनच त्यांनी संतपणा केला आहे. सगळे काही देशासाठी त्यांनी वाहन टाकलं आणि मुलांना कर्तबगार व्हायला सांगितलं आहे. 'मी तुमच्यासाठी एकही पैसा ठेवणार नाही. तुम्ही कर्तबगार बना.' आणि आमच्या सर्व भावंडांना त्यांनी अत्यंत चांगली शिकवण दिली. त्यात किती जण ह्याच्यात उतरले किंवा नाही, तो दूसरा प्रश्न आहे. पण सगळ्यांना कर्तबगार होण्याबद्दल त्यांनी शिकवलं, आणि सांगितलं की, 'आधी तुम्ही हिंदी आणि मराठी भाषा शिका. इंग्लिश भाषा इतकी सोपी, कोणालाही येईल. पहिल्यांदा आपली मातृभाषा शिकली पाहिजे. आणखीन आपली राष्ट्रभाषा यायला पाहिजे.' इतके तेजस्वी त्यावेळेला लोक होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल. ४२ सालामध्ये माझ्यावरती खूप संकटं आली. पण सांगायचं म्हणजे असं, की तुम्हाला आश्चर्य वाटेल, अठरा वर्षाचं माझं वय होतं . पोलिसांनी मला भयंकर त्रास दिला. तेव्हा आईने एक पत्र माझ्या वडिलांना पाठवलं. त्यावेळेला विनोबाजी आले होते. त्यांना आईची जरा दया आली. तर विनोबाजींनी बोलवून मला सांगितलं की, 'हे बघा , तुम्ही काही करू नका. तुमच्या आईला एवढी काळजी वाटते वरगैरे.' माझे वडील पण तिथे होते. तेव्हा असं झालं होतं की ह्यांना वेल्लूर जेलला नेत होते. साईडिंगला नेऊन उभं केलं होतं. माझ्या वडिलांना मोठा राग आला. म्हणे, 'ह्या म्हाताऱ्याचं काही ऐकू नकोस. तू काय, माझी सर्व मुलं जरी मेली तरी मला चिंता नाही. पण असलं काही करायचं नाही.' स्पष्ट त्यांनी मला सांगितलं. असे तेजस्वी लोक! मला फार गर्व वाटला आणि असच माझ्या मुलांनी व्हावं असं मला वाटतं. ते आता अजून तुम्हाला दिसतंच आहे. मी सामूहिकच आहे. मला एकटीला राहता येत नाही. तुमच्याशिवाय माझं चालणार नाही. मी तुमच्याकडे येते, तुमच्यावर काहीही उपकार नाही. माझ्यावरच उपकार होताहेत. कारण माझा जीव तुमच्यासाठी तुटतोय. आईचे का कधी उपकार होतात? आईचं काहीही म्हटलं तरी, तुझे उपकार म्हटलं काय किंवा काही, तरी हे आईचं प्रेम आहे. त्या प्रेमाला काही पारावार नाही. ते देणारेय. तुम्ही काही केलं तरी देणार. आता त्याही लोकांना मी म्हटलं, त्यांनी एका माणसाला पकडून आणलं. त्याने दगड फेकला. मीही पाहिलं. पण म्हटलं, मारायचं नाही. तुम्ही त्याला मारायचं नाही. कोणीही मारायचं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, किती संत -साधू मंडळी आहेत. इतके मार बसले. कपाळ फोडून टाकलं. हाडं तोडून टाकली. सगळं काही केलं. मी म्हटलं, कोणीही कोणाला मारायचं नाही. आता १७ ही इतकी सुदृढ माणसं आहेत, की ह्या सगळ्यांना ठोकून, पिटून, ह्या सगळ्यांची हाडं मोडून टाकतील. कारण ते प्रकृतीने किती तुमच्यापेक्षा बरे आहेत. खाऊन-पिऊन आहेत. पण मी त्यांना म्हटलं की, कोणीही कोणाला मारायचं नाही. अगदी हात लावायचा नाही. पण इंडियन लोकांनीसुद्धा कोणाला मारायचं नाही. आमचे हिंदुस्थानात जे सहजयोगी आहेत त्यांनी कोणाला मारलं नाही. म्हणजे हे अगदी शांतीचे द्योतक ! खरंच आहे. गांधीजींनी नॉन व्हॉयलन्स शिकवलं. त्यातले हे द्योतक आहेत. एवढं सहन करणं ह्या लोकांना, म्हणजे मला आश्चर्य वाटलं. काल खरोखर मी म्हटलं, हे खरे संत -साधू आले. खरोखर त्यांच्या येण्यानेच तुमच्या देशाचं खरं कल्याण होणार आहे. कारण इतकं सहन केलं काल त्यांनी. अठरा माणसांना इतकं मारलं. कपाळ फोडलं, डोकं फोडलं. एकाला तर पॅरैलिसिस झाला. नंतर तुम्ही म्हणाल, ट्रिटमेंट केली वगैरे. त्यांना बरं वाटलं. हॉस्पिटलला गेले आणि इतके खोटारडे लोक आहेत, की आमची मिरवणूक पुढे गेल्यावर एक गृहस्थ तिथे आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, उलट सांगायला लागले, 'ह्या माताजी, ह्या लोकांना इथे घेऊन आल्या. घाणेरडी संस्कृती इथे घेऊन आल्यात.' अगदी घाणेरडी लोक आहेत. आता सहा वर्षापासून तुम्ही ह्यांना बघता आहात. हे लोक बिडीसुद्धा ओढत नाही. म्हणजे ह्यांच्याजवळ माचीससुद्धा नाही. किती संत-साधू आहेत! तुम्हीच सांगा. कशी मंडळी आहेत ही. त्यांचं वागणं कसं आहे आणि ह्यांच्याविरुद्ध इतकं बोलले. गाववाल्यांना चिथवलं. सरपंच म्हणाले, 'माताजी, खूप झालं!' आणि किती मारलं लोकांना! किती मारलं! हिंदुस्थानी लोकांना तर पुष्कळच मारलेलं आहे. पण पोलिस ठाण्यावरसुद्धा लोक जायला तयार नाहीत. त्या गावातल्या लोकांनी सांगितलं , 'आम्ही जात नाही. आम्हाला परत येऊन मारतील.' म्हणजे हे काय आहे? खुनशीपणा! अंधश्रद्धा निर्मूलन ह्याने होणार आहे का ? अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पहिल्यांदा आत्मसाक्षात्कारी व्हायला पाहिजे. अहो, तुकारामांनी तर शिव्या घातल्या त्यांना. विशेष शिव्या येतात त्यांना. मला तर फारच कमी येतात. त्यांना विशेष येतात. जे दिसेल ते. इतकेच नाही, रामदास स्वामींनी तर इतक्या शिव्या घातल्या ह्या लोकांना, की तुम्ही अशी अंधश्रद्धा करता. धर्माच्या नावाखाली पैसे खाता. धर्माच्या नावाखाली सगळं चालतं. सगळ्यांनी सांगितलं. ह्यांना सांगायला हे कशाला पाहिजेत शहाणे? आणि संतांच्या अंगावरती आले. म्हणजे आपल्या देशाचा सबंध वारसाच बुडवायच्या मागे आहेत. अशा लोकांना मुळीच तुम्ही पुढे येऊ देऊ नका आणि चांगलं पत्र पाठवा, की हे तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करता आहात....., बरं एकंदरीत जे झालं त्याबद्दल सांगायचं असं, की आपण क्षमा केली पाहिजे. क्षमा केल्यावरच त्यांची डोकी ठीक होतील आणि ते सर्व लोक ठीक होतील. पण पोलिसांचं तसं नाहीये. पोलिसांनी त्यांना धरलेले आहे. तेव्हा मी काही त्याबाबतीत बोलू शकत नाही. (अस्पष्ट) मी त्यांना धरून चांगलंच ठीक करणार आहे. त्यांचा बंदोबस्त करणार आहे. तेव्हा पोलिसांच्या बाबतीत आम्ही काही बोलू शकत नाही. पण तरीसुद्धा माझी अशी प्रार्थना आहे, की तुम्ही अशी प्रार्थना करावी की, 'प्रभू, तू ह्यांना सुमती दे. ते कोणत्या ह्याच्यात नाही.' हे असं म्हटल्यावरती तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही क्षमा करून टाका. पण सगळ्यांना फार राग आलेला आहे. मला माहिती आहे, गावातले लोक, बाहेरचे, इकडचे, तिकडचे, हे सगळे फार चिडले आहेत. इतकेच नव्हे, पण महाराष्ट्रात आमचं फार १८ कार्य झालेलं आहे. मला माहिती आहे. मी खेडोपाडी जाते. कोण जातं हो खेडोपाडी? कोण बघतं कोणाला आजकाल ? त्यामुळे सगळ्यांना इतका राग आलेला आहे, की मला ही भीती वाटते की आता विस्फोट नाही झाला पाहिजे. तुम्ही माझं नाव कायम ठेवलं पाहिजे. शांतीपूर्वक सगळं काही झालं पाहिजे. झालेलं आहे, ह्यांचं चुकलं. ह्यांचा मूर्खपणा आहे. जाईल तो सुद्धा. इंग्रजसुद्धा निघून गेले. त्यांनी आपल्याला एवढं छळलं. आज इथे किती तरी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्याच्यातले कमीत कमी ६० मंडळी तरी इंग्लिश आहेत. ते माझ्या चरणावर आहेत. आश्चर्य वाटेल आणि तुमच्या गळ्यात गळे घालून भेटतात. तुमच्याशी बोलतात. खेडेगावात जाऊन हे कसे शिकलेले आहे ? ते मी आता आपल्याला दाखवणार आहे. ह्यांचा प्रोग्रॅम होऊ द्या थोडासा. ह्याच्यानंतर तुम्ही चहापाणी म्हणाल तर ते. ह्यांनी एकनाथांची गाणी, तुकारामांची गाणी कशी म्हटलेली आहेत आणि ते कसं आपल्या सहजयोगाला वळवून घेतलेलं आहे, ते बघा. आणि संस्कृतमधील सबंध आदि शंकराचार्यांचं, सौंदर्य लहरीमधलं सबंध ह्यांना पाठ आहे. जे आपल्यालासुद्धा नाही. एकदा तुम्ही ऐका! तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हे संत कसे आहेत ? आणि तुम्ही म्हणता ते कदाचित माझ्या सहवासातच म्हणा, पण इतकं हे बहरेल, हे मला माहिती नव्हतं. अगदी बहरून गेलं आहे. आणि ह्याच्यात ३६ देशातले आम्ही निवडक लोक आणलेत. ३६ देशातले लोक आहेत. परवा रशियाला गेलो होतो, तर रशियाला एकेका ह्याला चार चार हजार माणसं यायची आणि नुसतं मी बसले होते त्या जागेलाच शिवण्यासाठी त्यांची धडपड होती. तिथल्या गव्व्हन्मेंटने आम्हाला मान्यता दिली आहे. अमेरिकेतल्या गव्व्हन्मेंटने आमचा 'विश्व निर्मल धर्म' स्वीकारलेला आहे. तो स्थापन झालेला, त्याला मान्यता दिलेली आहे. इटलीमध्ये तिथल्या गव्हन्मेंटने मान्यताच दिलेली नाही, तर माझ्याबद्दल एक पुस्तक छापलेलं आहे. ह्यावर्षी जे सगळ्यात मोठे पुरुष झाले किंवा मोठे लोक झाले आहेत आणि ज्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे त्यात मी आहे. म्हणून माझ्यावर एक पुस्तक लिहिलेले आहे. त्याशिवाय टकी हा मुसलमानांचा देश आहे. तिथेसुद्धा आमच्यासाठी त्यांनी सरकारी मान्यता देऊन कधीही या, कधीही जा अशी व्यवस्था केलेली आहे. इंग्लंडमध्येसुद्धा माझ्यासाठी, तुम्ही कधीही आलात, कधीही गेलात, अशी व्यवस्था केलेली आहे. माझी तुलना ह्या रजनीशबरोबर करतात. त्याला सर्व देशातून हकालपट्टी करून इथे घातलेले आहे. सगळे नुसतं असं त्याच्याच तोंडातून बोलत असतात. जसा काही तो 'संजय उवाच' आहे. आता ह्या मुलांच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं, की माझी फार इच्छा आहे, की ह्यांनी पुढेही प्रगती करावी. तेव्हा ह्यांचं तपशीलवार तुम्ही द्या. ही मुलं कोण आहेत ? काय आहेत ? त्यांच्यावरती लक्ष ठेवावं. इथून शिक्षण झाल्यावर आम्ही त्यांची व्यवस्था पुढेही करू शकतो. त्यांना नोकऱ्या देणं वरगैरे. म्हणजे आम्ही अशी जबाबदारी घेतली आहे. ती तुम्हाला सांगते. १९ कलेक्टिव्ह राहिलं पाहिजे CE राहुरी, ११ डिसेंबर १९८८ आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळीपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. ते जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे. आपली मुलंबाळं सांभाळली पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदार चरितानां वसुधैव कुटुम्बकम्, म्हटलेले आहे. ते उदार चरित्र कुठे आहे? आता सगळ्यांचं इथे असं म्हणणं आहे, की माताजी, आश्रमाला तुम्ही इथे जागा द्या. आश्रम घ्या. अहो, पण त्याच्यात राहणार कोण? ते आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा देते. तर म्हणे माताजी, तुम्ही रहाल. म्हणजे मी तिर्थ आश्रमात राहणार आहे? मला आश्रमात घालता का तुम्ही? माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे ? मला काय गरज आहे सहजयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे? मला तर सगळे मिळालेच आहे. मी आहेच ती. तेव्हा म्हणे तुमच्या राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करतोय . म्हटलं मुळीच करू नका. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देईन. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला. त्यासाठी पैसे दिले, सगळं काही झालं. तिथे रहायलाच कोणी तयार नाही. पैसे देऊन कोणी रहायला तयार नाही. हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण, की आपल्याला काही सवयी झालेल्या आहेत. त्यातली एक सवय अशी आहे, की आपलं एक घर असलं पाहिजे. मग त्यात पुष्कळ फायदे असतात. बायकोवर ओरडता येतं. जेवणाचं असं पाहिजे. मला हीच भाजी पाहिजे. मला ते नाही पसंत. मग नवर्याची पसंत बायको बघत बसते. आता आश्रमात काय ? सगळ्यांच्यासाठी स्वयंपाक केला तो खायला लागतो. सगळं काही असलं, तरी प्रत्येकाला वेगवेगळं काही मिळत नाही. तिथे नवऱ्याची मिजास कशी चालणार? बरं बायकोचंसुद्धा, मला ही खोली आवडते. मला हेच आवडतं. माझच घर असलेलं बरं. माझी मुलं आली म्हणजे त्यांना मी लाडू देणार. दुसरी मुलं आली तर त्यांना मी बोरं देणार. हे कसं चालणार! त्यामुळे होतं काय की आपल्यामध्ये अजून एकत्र कुटुंब पद्धती जी आपली विश्वाची आहे, त्याची अजून कल्पना आलेली नाही आणि ह्या लोकांचं बरं झालेलं आहे एका अर्थाने की ह्यांचे आई-वडीलच सुटले नशीबाने. त्यामुळे आता जो नवीनच आपण संसार थाटलेला आहे, हेच आपलं घर, हीच आपली आई, हेच आपले वडील, असं समजून हे सगळे मिळून मिसळून राहतात. इतक्या देशातले लोक आहेत ते मिळून मिसळून राहतात. त्यामुळे बघा किती कमाल आहे! कलेक्टिव्हची किती कमाल आहे. एक गाणं आता इथं गुरूजींनी म्हटलं, की ते तुम्ही एका वर्षानंतर ऐकून घ्या ह्यांचं. सगळ्या गावातून, सगळ्या देशातून, सगळ्यांच्या तोंडून ते गाणं येईल. पण तसं आपल्याकडे होत नाही. एकही गाणं. आरतीचं पुस्तक घेऊन लोक आरती म्हणतात म्हणजे काय म्हणावं महाराष्ट्राला, एकसुद्धा गाण सगळ्यांना बरोबर म्हणता येत नाही. परत सगळ्यांनी एकत्र रहाणं म्हणजे अशक्य गोष्ट २० आहे. सगळ्यांनी एकत्र रहायचं म्हणजे अगदी अशक्य गोष्ट आहे. कारण प्रत्येकाला आपलं घर पाहिजे, आपली बायको पाहिजे, मुलं पाहिजे आणि त्यांचं सगळं आपापसात ठीक आहे. त्यात आता फक्त असं झालं पाहिजे, की मुलांनीच पळून निघायचं घरातून. म्हणजे मग ठीक होईल. त्याशिवाय काही मला मार्ग दिसत नाही आणि म्हणून आपली जी मुलं बाहेर लग्न करून पाठवलेली आहेत, त्यांच्याबद्दलही तक्रार आहे, की ह्यांना काही घरातलं काम येत नाही. हे राहूच शकत नाही. आश्रमात पळून जातात. आता इतक्या दिवसापासून घरात रहायची सवय झाल्यामुळे आश्रमाच्या त्या अफाट ह्याच्यात रहाणं त्यांना कठीण जातं. त्या सीमित गोष्टींनी रहाणाऱ्यांना ते कठीण जातं. पण आपल्याला जर सहजयोग करायचा आहे, तर आपल्याला आश्रमातच रहावं लागेल. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर मी आता त्यातून मध्यमार्ग काढला आहे शोधून. ते म्हणजे असं, इंडियन लोकांसाठी, तसं तर ते काही राहूच शकत नाही. म्हणून जिथे आश्रम असेल तिथे शनिवार, रविवार जाऊन रहायचं. फक्त. त्यात म्हणे, ते महाभारत सकाळी लागतं. मग आमचं कसं होणार माताजी? म्हटलं, अहो, एक टेलिव्हिजनही ठेवा आणि महाभारतही बघा. मग आणखीन काय करणार? अशा रीतीने एवढं मोठं का कार्य होणार आहे ? अशा 'येऱ्यागबाळ्यांचे काम नोहे, त्याला पाहिजेत जातीचे,' म्हणतात. अहो, आम्ही आमच्या वडिलांना, आईला पाहिलं. वर्षानुवर्षे जेलमध्ये खितपत पडले. आम्ही अकरा त्यांची मुलं आहोत. त्या गांधीजींमध्ये अशी कोणती करामत होती, की त्यांनी असं लोकांना देशोधडीला लावून एवढं कार्य करून घेतलं आणि आमच्यामध्ये असं काय कमी आहे, की तुम्ही लोक आमचं काही करत नाही. अशी कोणती गोष्ट आहे? एकच चुकलंय, गांधीजींनी सुरुवातीपासूनच त्यांना क्लेष उचलायला सांगितला. स्वच्छ करायचा. नोकर ठेवायचा नाही. मग ते अंगवळणी पडलं त्यांच्या आणि जर तुम्हाला राष्ट्रकार्याला यायचंच असलं, तर त्याच्यामध्ये सगळा त्याग केला पाहिजे. त्यागमूर्ती असले पाहिजे. त्यामुळे काय झालं की प्रत्येकाची त्याच्यात चढाओढ. सहजयोगात उलटं आहे, सहजयोगात सगळा आशीर्वाद आहे. आता माताजी, सगळं ठीक आहे, पण आमच्याकडे कोंबडी नाही. ती कशी मेली? ती नाही मेली पाहिजे. तेही माताजींनी बघितलं पाहिजे. असं कसं झालं? ..... पाणी उचलायचं. संडास आम्ही सहजयोग करतो, आमच्याकडे कोंबडी कशी नाही? आणि त्याचा माझ्यावर आरोप. तेव्हा सांगायचं असं आहे, की सहजयोगात सगळे आशीर्वाद असल्यामुळे जरासुद्धा कुठे खोच लागूच दिली नाही पाहिजे. खोच तर फार मोठी झाली. जराशी इजा नाही होऊ दिली पाहिजे. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, माताजी. मग हे असं झालं पाहिजे. हे मूल झालं पाहिजे. मुलगीच झाली, मुलगा झाला पाहिजे. म्हणजे मला इतकं काही धरलंय त्यांनी वेठीवर, म्हणजे तुम्ही सहजयोग करता नां, मग द्या. देता की नाही. तशीच मराठी भाषा आपली आहेच परखड! परखडपणे मलाच म्हणायचं, की तुम्ही आमचं हे भलं नाही केलं, तुम्ही आमचं ते भलं नाही केलं. ते भलं करा, हे भलं करा. अहो, पण कशाला? मला सहजयोग पाहिजे का तुम्हाला पाहिजे? पूर्वीच्या काळी लोक जात असत हिमालयात त्या थंडीत आणि तिथे कुडकुडत आणि त्यांचे गुरूजी लोक त्यांचे कपडे उतरवून टाकायचे आणि तसे बसा तिथे बर्फावर. एक लंगोट घालून बसायचे. बसा. त्यात त्यांची परीक्षा घ्यायचे. त्यात नाही काही जमलं तर द्यायचे दणादणु. तसला काही प्रकार आपण केलेला नाही. सगळ्यांना आसनावर बसवलं. हे दिलं , ते दिलं. झालं. पण आम्ही काही दिलं की नाही सहजयोगाला? विचार करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण अजून एकही पैसा सहजयोगाला दिलेला नाही. फक्त जेवणाचेसुद्धा पैसे द्यायचे लोकांच्या जीवावर येतं. आता पुण्याला मी म्हटलं, की बरं मी हिशेब बघते. कसं काय ते? का मिळत नाही पैसे? मागच्या २१ वेळेला ७५ माणसं फुकट जेवली. फु.कट..! सात दिवस. तर ह्यावेळेला मी असा नियम काढला, की मी सगळे पैसे इथे बँकेत जमा करते. बघते. तर '७५० रुपयाने ठरवलंय माताजी, मागच्या वेळेला खूप तोटा आला. तुम्हाला पैसे द्यावे लागले.' म्हटलं, 'बरं, ठीक आहे.' तुमचेच पैसे कमी होतात. म्हटलं, 'सगळ्यांच्या ह्याच्यातले शंभर मी देते बाकीचे तर घ्या.' तरी वाट बघत बसले, अणखीन ५० रू. कमी झाले तर बरं! इतक्या स्वस्तात स्वस्त करतोय आम्ही तरीसुद्धा 'त्यात पैसे थोडेसे वाचवता आले तर बरच होईल.' त्यातून एक पैसासुद्धा आपण कुठेही, कशालाही खर्च करत नाही. थोडी फार तुम्ही वर्गणी देत असाल ती, मला त्याचं काही माहिती नाही. पण सांगायचं म्हणजे असं, की आपल्याला एवढं मिळालेलं आहे. आपण काय सहजयोगाला देणार? काय मेहनत केली सहजयोगासाठी ? आपण परमेश्वरासाठी काय केलंय? मला काही नको. मला उगीचच तुम्ही साड्या वगैरे देता. काही त्याची गरज नाही. माझ्याकडे पुष्कळ आहे. कितीही डोकं फोडून सांगितलं तरी ऐकतच नाही कोणी. मला काहीही नको तुमच्याकडून. अगदी साडी देतात ती ही नको आणि जे काही तुम्ही पूजेचे पैसे देता त्याचीसुद्धा चांदीची भांडी घेऊन देते तुम्हाला. मला काहीही नको. पण सहजयोगासाठी तुम्ही मेहनत करा. स्वत: ची मेहनत करा. चार ठिकाणी भेटत जा आपापसात. बायकांना सांगितलं, दुसर्या बायकांना हळदी-कुंकवाला बोलवा. त्यांना सहजयोगाच्या गोष्टी सांगा. अहो, जर कोणाचा एखादा गुरू असला नां , तर तो भरमसाठ सांगत बसतो. मी एरोप्लेनने आले. एका गृहस्थाचा कोणी गुरू होता. तो आपला झेंडा घेऊन तिथे उभा. त्याने लेक्चरच द्यायला सुरू केलं, फर्स्ट क्लासमध्ये. 'माझे गुरू असे नी माझे गुरू तसे.' रस्त्यावर उभं रहायचं आणि गुरूचं व्याख्यान सांगत बसायचं. म्हणून सहजयोग पसरत नाही. त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. आशीर्वाद आहेत! पण जबाबदारी घेता का तुम्ही काही सहजयोगाची! का माझ्यावरच सारी जबाबदारी आहे ? आज इथे बसलेत ध्यानाला तर माताजी, आम्हाला शक्ती द्या, की आम्ही जबाबदारी घेणार. असं सगळ्या भारतीय सहजयोग्यांनी आपल्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे. निर्धार केला पाहिजे. अहो, ते शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला निघाले होते मराठे आता करताहेत काय म्हटलं? तर बस्त्याला जाऊन बसलेत म्हणे. गेले कुठे ते? का सगळे बाजारबुणगेच आहेत आपल्याकडे? तर तेवढा सैनिकपणा पण नाहीये. काही तुम्हाला सिंहगड चढायला म्हणत नाही. फक्त थोडसं लक्षात घेतलं पाहिजे, की आमची जबाबदारी आहे, वाढवण्याची. जसं एक दारूडा असं म्हणतो की, मी दारू पितो, तर इतरांनाही वाटलीच पाहिजे. तर तसेच आता तुम्ही आनंदाचा एवढा उपभोग घेता तो दुसर्यांना दिला पाहिजे, एवढी जबाबदारी तुम्हाला वाटली पाहिजे. सहजयोग तसेच बायकांनाही सांगायचं आहे, बायकांना बोलवा. त्यांचं अस म्हणणं आहे, की इकडे सगळे बुद्धिजीवी आहेत. बायका तर बुद्धिजीवी नाहीत. बायकांच्या थ्रू काम करा. ते बरं काम होतं . हळदी - कुंकवाला बोलवायचं. हळदी-कुंकू द्यायचं. त्या बायकांना सांगायचं आहे, हे असे असे आहे. आम्हाला हा फायदा झाला. हा चमत्कार झाला. चमत्काराचे फोटो दाखवा, की त्या बायका आपल्या पुरुषांना ठीक करणार. बायकांच्या थ्रू गांधीजींनीही कामे करवली. गांधीजींनी सांगितलं, की मला हरिजन उद्धार करायचा आहे, तुमच्या बांगड्या उतरवून द्या. सगळ्यांनी आपल्या बांगड्या सरळ सरळ त्यांना दिल्या. मी तसं काही म्हणत नाही हं ! तसं काही नाही. पण हळदी- कुंकवाला बायकांना बोलवायचं, सगळ्यांनी मिळून. हळदी-कुंकवाला या आणि तिथे हे करा. २२ EGO १ भी तरी ठरवलं आहे. गुरमंत्र वगैरे काहीही देत नाही. कारण कारय आहे की त्याच्यातच मन अंडकतं. ज२ तुमची प्रगती प्रत्येक क्षणी होईल, त२ भी कोणती मंत्र देऊ तुम्हाला? काहीही गुरूमंत्र नाही. मला फक्त आई मानी म्हणजे मिळवलं. ढदू२ काही नाही. आईस्वरूपात पाहिलं म्हणजे पुष्कळ, लवकरसगळं समजतं. पं.पू.श्रीमाताजी, मुंबई, ११/३/२००० प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in म हिं सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की झमानुभव प्राप्त करने स्थितप्रज्ञ बना. सर्व प्रलोभनं, अहंकार, सर्व बंधनांपासून मुक्त होऊन स्थितप्रज्ञ बना. स्थितप्रज्ञ सि्थितीत मनुष्य साधारण मनुष्याप्रमाणे विचार करत नाही आणि ना ही सामान्य व्यक্ধीप्रमाणे औौतिक वस्तूकडे आकर्बित होतो. अशी व्यक्ती पूर्णवणे निर्लिघ्त होते. त्याची कोणतीही तक্रार नसते आणि ना ही त्याला ईव्य्या असते. हे सगळ श्री कृष्णांनी सांगितलं आहे. ए.पू.श्रीमाताजी, ५/९/१९९९, कबेला, इटली ---------------------- 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-0.txt चैतन्य लहरा जुलै-ऑगस्ट २०१६ मराठी ु इ क श्ी ग 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-1.txt ही चांगली गोष्ट आहे, की ते आपल्या साऱया शस्त्रांबरोबर आपले संरक्षण करण्यासाठी येतात. परंतु त्यांच्याजवळ सुदर्शन चक्र पण आहे. सुदर्शन, सु' अर्थात् शुभ, 'दर्शन अर्थात बघणे. ते आपल्याला शुभ-दर्शन देतात. तुम्ही त्यांच्याबरोबर काही चतुराई केलीत तर ती सगळी आपल्या मानगुटीवर येते आणि तेव्हा तुम्हाला तुमचे शुभ-दर्शन होते की तुम्ही कुठे हवेत लटकत आहात. प.पू.श्रीमाताजी, लंडन, १५.८.१९८२ ् ी ে बंता । েa 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-2.txt या अंकाल महाकाली ... (पूजा, लोणावळा, ११/१२/१९८२) परमेश्वराचा गौरव ... ?0 १० (सार्वजनिक कार्यक्रम, सातारा, २६/ १२/१९८५) कलेक्टिव्ह राहिलं पाहिजे ...२० (सेमिनार अँड मिटिंग, राहुरी, ११/१२/१९८८) ० ० 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-3.txt आता मराठीत सांगते थोडसं. इंग्लिश भाषेचा असा दोष आहे, की त्यांच्याविरूद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल. पण मराठी भाषेचा हा फायदा आहे, की मराठी भाषेत तुमच्याविरूद्ध काही बोलायचं असेल तर ते त्यांना कळणार नाही. हा तुमचा फायदा र] ি आहे! म्हणजे ते गुप्त राहतं सगळं. तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात. हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे आणि त्यामुळे माताजींनासुद्धा कळत नाही, असं जे लोकांना वाटतं, तर मला मराठी भाषा कळते आणि हिंदीही कळते आणि त्याहून भुतांची भाषा फार चांगली कळते. तेव्हा आज जे महाकालीचं मी सांगितलं , तिकडे लक्ष दिलं पाहिजे, की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे असलं पाहिजे. आता प्रथम आपल्याला जे प्रकार म हाकाला होतात, ते मी आधीच सांगितलंच की, 'माझ्या मुलाला बघा.' 'काय झालं तुमच्या मुलाला? 'काही नाही. फक्त लहानपणापासून बिछान्यातच असतो. हातपाय त्याचे मोडलेले आहेत. डोकं फिरलेलं आहे. काही खात नाही, पित नाही. कंबर त्याची वाकत नाही. फक्त एवढं एकदा माताजी, तुम्ही पाय तिथे लावलेत तर बरं होईल.' फक्त एवढं झालं. आता हे कशामुळे झालेलं आहे. सांगायला नको. ही तुमची पूर्वकर्म बोलताहेत. ती मी कुठवर जिंकणार. किती खाणार आहे ? असा जीव आहे, त्याला वाचवून तरी काय करायचं? त्याला क्षमा करते, की त्याला परत जन्म घेऊ देत. समजलं पाहिजे. त्याच्यावरही कृपा करा, स्वत:वरही करा आणि माझ्यावर विशेषत:. पण तुमचे पाय माताजी घरी लागू द्या. तुम्हाला समजतं ना हे सगळे की माताजी अमुक आहेत. तुम्हाला सांगावं लागत नाही. 'पाच मिनिटं तरी, बरं दोनच मिनिटं. बर एकच मिनिट.' आणि त्या घरात गेलं, म्हणजे सात मजले चढून जावं लागणार. लिफ्टच आऊट आहे. असं का, आता रगडा मला तिथे. मग रगडायचं. आता ते सगळं झालं, आम्ही केलं पुष्कळ. रगडलं आपल्याला तुमच्यासाठी. जे म्हटलं ते केलं. ह्याला बघ रे, त्याला बघ रे, मावशीला बघ रे, अमक्याला बघ रे, सगळ्यांना बघून टाकलं. आता मी कोणाला बघणार नाही. तुमची असेल मावशी तर तुम्ही बघा. माझी ती मावशी नाही. कळलं कां! स्पष्ट मी सांगते. आता मला कोणी सांगायचं नाही, की माझ्या ह्याचं हे बघ, माझ्या त्याचं ते बघ. कृपा करा आता माझ्यावर. फार झाल. दूसरं म्हणजे आपल्या घरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आणू नका माझ्यासमोर. त्याने मला अगदी कंटाळा आला आहे. सहजयोगावरती लक्ष द्यायला पाहिजे. सहजयोग आम्ही कसा वाढवणार? सहजयोगासाठी काय करायला पाहिजे, सेंटर कसं वाढवलं पाहिजे? आमच्यात काय चुकतं ? का लोक आमच्याकडे येत नाही? आमच्यामध्ये ४ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-4.txt कोणती वाईट गोष्ट आहे? हे स्वत: बसून ठरवायचं. बाता मारायच्या नाहीत. बसून विचार करायचा, आमच्यात काय खराबी आहे? आम्ही सहजयोगात काय खराब करतो ? आमच्यात का जमत नाही? पूजेला कमीत कमी पंधरा भुतं तुम्ही जमा नाही केली, तर तुम्ही पट्टीचे मुंबईकर नाही. पण जर पुण्याला गेलं तर कमीत कमी एकवीस तरी असायला पाहिजेत. कारण पुण्याला तर महाभुतं असलीच पाहिजेत. ती आणून पूजेला बसवली नाही आणि माताजींना त्रास दिला नाही तर पुणेकर कसले! पेशवाई न ती, मग माताजींनी सहन केलंच पाहिजे. मग आणून बसवायचे. अहो, पूजेला निदान बघा तरी कोण येतंय, कोण येत नाही ते. वाट्टेल ते आणून पूजेला बसवायचे. हे अगदी विशेष आहे. 'माताजी, पूजेला येऊ का? म्हणजे सगळ्यांना माहिती आहे नां माताजी असं आहे. आम्ही येऊन बसतो नां पूजेला.' पण अधिकार आहे का त्यांना पूजेला बसण्याचा, हे तुम्ही पाहिले पाहिजे. पण इकडे उलट आहे. इकडे मला सांगावं लागतं की, 'मी अमुक आहे. मी आदिशक्ती आहे,' तुम्हाला लोकांना तसं सांगावं लागत नाही. माहिती आहे तुम्हाला. मग, जेवढा फायदा घेता येईल तेवढा घेतला पाहिजे. जितकी भूतं आहेत तितकी आणा. गंगेत सगळी घाण घातली तरी गंगा ती धुवून काढणारच. पण घाण घातलीच पाहिजे का? कधीतरी असा ही विचार करीत जा , की आम्ही माताजींच्या ह्याच्यात नेहमी अशा लोकांना घेऊन जातो. काही शुद्ध लोक भेटले तर बरंय! ह्या भूतांच्या ह्याने काय काम होणार आहे, मला त्रास देण्यापलीकडे. तेव्हा ही भुतं तुम्ही सांभाळून फक्त जे शुद्ध आहेत त्यांना तुम्ही पूजेला आणलं पाहिजे. आतापर्यंत मी सगळं सहन करून घेतलं , पण आता ह्याच्यापुढे करणार नाही. जर तुम्ही भुतं घेऊन आले तर तुमच्या घरी दहा भुतं बसवीन. स्पष्ट सांगते. एक नाही, दहा. मला बसवणं कठीण नाहीये त्यांना आणि तिथे पर्मनंटली बसवून ठेवीन. मी हसून सांगते. पण खरं सांगते मला फार त्रास होतो ह्या गोष्टीचा! हे महाकालीचं स्वरुप जे आहे ते अत्यंत प्रेमळ आहे आणि तुम्हाला रक्षक आहे. इतकेच नाही तर तुमची सगळी काही जी इच्छा आहे ती पूर्ण करायला समर्थ आहे. पण अशा फालतूच्या इच्छा तुम्ही जर घेऊन आलात, किती आम्हाला कर्दन करायचं आहे आणि संहार करायचा आहे. आम्ही काय करायचं? तुम्ही मुलं म्हणून आम्ही किती सहन करायचं? ह्या मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. दूसरं म्हणजे, हे तर झालं भुतांच्या बाबतीत. भयंकर अॅटॅचमेंट. अगदी आमचे प्रधान म्हणतात ना की फॅटर्निटी असते. एकाला भूत असलं की बरोबर तो दुसऱ्या भुताला चिकटतो. अगदी बरोबर, ओळखायचं म्हणजे तरी काय की ह्यांच्यात भुतं आहेत कां? दहा भुतं एकत्र मिळाली की समजायचं की दहाच्या दहा भुतं, एकमेकाला चिकटली. चिकटणारच. कारण भूत भूतालाच चिकटतं. अगदी स्टॅप आहे त्याचा. हे कृपा करून लक्षात ठेवलं पाहिजे. 'सज्जनांची संगती गाठावी.' सज्जनांनी स्वत:ला एकत्र बांधून आणखीन एक ग्रुप करून राहायचं आहे आणि भांडायचं नाही. तो ग्रुप एक करून ठेवला मग हळूहळू करून तो ग्रुप वाढवत गेले पाहिजे. म्हणजे तो न्युक्लिअस बनतो. तो न्युक्लिअस असा वाढवत जायचा मग सज्जनांनी जवळ जवळ येत जायचं. भांडकुदळपणा हे लक्षण भुतांचं आहे. क्रोध आदी ह्या गोष्टी भुतांच्या लक्षणाने आहे. तेव्हा क्रोध येऊ द्यायचा नाही. राग येऊ द्यायचा नाही किंवा घाईघाईने लोक काम करतात, अरे हे कर रे, ते कर रे. असं, तसं. म्हणजे मला कळलं, की हे आलं इकडे. दहा भुतं बसली तर मनुष्य करणार तरी काय ? एक तऱ्हेचा रूबाब पाहिजे माणसात. काय शिवाजी महाराज नां तुम्ही! म्हणजे शिवाजी महाराजांचे नुसते पुतळेच उभे करतात जिथे तिथे. अहो, तुम्ही शिवाजी महाराज! त्यांचा रूबाब काय आणि तुमचा रूबाब काय! ते पहा. कालच पुण्यात मी सांगितलं, की पंक्तीला फुकट करून बसतात सहजयोगी म्हणजे कमालच झाली बुवा! अहो, या ५ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-5.txt महाराष्ट्रात आमच्या मेहतराणीला जरी म्हणत असू, 'ये जेवायला बस.' तर ती तशी बसायची नाही दहादा तिला निमंत्रण दिल्याशिवाय. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. शिवाजी महाराजांच्या गोष्टी सोडा, माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं आहे, की आमच्या घरच्या मेहतराणीला जरी म्हणायचं असलं की, 'बाई तू जेवायला ये.' तर तशी येणार नाही, तिला निमंत्रण गेलं नाही तर. 'मला तुम्ही माताजी, आमंत्रण पत्रिका दिली नाही तर मी कशी येऊ?' ही पद्धत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आणि आता चांगले सहजयोगी, सभ्य लोक फुकटखोरी करून सगळी मुलंबाळं घेऊन जेवायला बसतात, हे ऐकून मला वाटलं आता मी काय बोलायचं! म्हणजे कोणती द्धत ही, कोणती लेव्हल झाली ! खाण्याचा म्हणजे आपल्याला भयंकर त्रास आहे. कुठे जेवायला असलं, भोजन असलं, मग भजन असलं म्हणजे चांगलं. जेवणाशिवाय आपण बोलत नाही. म्हणजे काय ड्रकराची जात आहोत की काय! मला समजत नाही. कसे हे या शिवाजीच्या राज्यात जन्माला आले? हेच मला आधी लक्षात येत नाही. कुठेही खायला मिळालं की धावत जायचं, ही काय पद्धत झाली! फुकटखोरीला काहीतरी मर्यादा पाहिजे आणि ही फुकटखोरी परमेश्वराला दिसते. आपण फुकटखोरी कुठेही करणार नाही. आता एखाद्याची मोटर चालली, बसून घ्या. 'कशाला?' 'अहो, तेवढेच पैसे वाचतील.' आणि ते पैसे जाणार कुठे? ते पैसे वाचवून तुम्ही करणार काय ? स्वत:च्या इज्जतीने माणसाने रहायला शिकलं पाहिजे. ज्याला स्वत:ची इज्जत नाही तो सहजयोगात काय येणार हो! आणि करणार तरी काय ? पहिल्यांदा मनुष्याने इच्छा केली पाहिजे की, 'आमची इज्जत होईल. आम्ही काहीतरी रूबाबदार होऊ. अशी आम्हाला सुबुद्धीच मिळाली पाहिजे.' सहजयोगी म्हणजे काय हे फुकटखोर, हे भांडण करणारे, आपापसात नावं ठेवणारे, म्हणजे माझ्या नावाची बदनामी होऊन जाते. तर आज पहिल्यांदा ही इच्छा करायची, पहिल्यांदा, की फुकटखोरी ही सहजयोग्याला शोभत नाही. तुम्हाला फुकट सहजयोग दिला तर त्याचा अर्थ असा नाही, की तुम्ही फुकटखोरी करीत फिरायचं. अहो, उलट होतंय आजकाल. माझ्याच खिशातून पैसे चाललेत. म्हणजे पैसे द्यायच्या ऐवजी गुरूच पैसे देत आहेत. ही काय तऱ्हा आहे! तुम्हीच विचार करा, असं चालेल का परमेश्वराला ? त्यांना पटेल का? तुम्हाला सगळं माहिती आहे. गुरुला सगळे शास्त्र माहिती आहे चांगलेच. शास्त्र काही सांगायला नको. पण त्यात तुम्ही कुठे फिट होता ते बघा. स्वत: आपली कोणती पोझिशन आपण बनवलेली आहे ते बघा. पैशाचा तर फार मोठा त्रास आहे. कुठेही चार पैसे वाचवता आले तर वाचवावे आणि चार घबाड मिळालं तर काय, वा, बिझनेसच आहे सगळा. माताजी, काही बिझनेस करीत नाही हे माहिती आहे ना तुम्हाला आणि तुम्ही सहजयोगात बिझनेस करू नये. मग पुढे मला सांगू नये. मग तुमचाही बिझनेस होईल. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हजयोगी सत्यवस्तू आहे, खरेपणा आहे. परमेश्वराचे साम्राज्य आहे, तिथे हे चालायचे नाही. ते काही इंडिया गव्हर्नमेंट नाही. परमेश्वराचं साम्राज्य आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. इंडिया गव्हर्नमेंटमध्ये चालतील तुमचे लाचलूचपत आणि सगळे धंदे. परमेश्वराच्या साम्राज्यात हे चालणार नाही. म्हणून मी सांगते बजावून परत. आज इथे सांगते आहे. लक्षात ठेवा. खबरदार कोणीसुद्धा जर एकही पैसा कमवण्याचा किंवा फुकटखोरीचा प्रयत्न केला ह्याच्यापुढे आणि जर काही त्रास झाला तर मी त्याला जबाबदार नाही. इमानदारीत उतरलं पाहिजे. अहो, इमान 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-6.txt म्हणजे केवढं होतं पूर्वी. महाराष्ट्रीयनांच इमान म्हणजे कोणी जिंकू शकत नव्हतं. अजूनही सबंध हिन्दुस्थानात गाजलेले आहेत इमानासाठी. फार इमानदार लोक! गरीब लोक बरे तुम्हाला सांगते. इथल्या मोलकरणी, तुम्ही किल्ल्या द्या, काही हात लावणार नाहीत पैशांना! पण हे मध्यम स्थितीतले साहेब लोक. हे दुसर्यांच्या दमावर साहेबी करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत. फार तर दोन कुडते कमी घाला. काही फरक पडणार नाही. रेशमी नसले तर कॉटनचे घाला. आता तुम्हाला 'वसुधैव कुटुम्बकम' करून टाकलं आहे आम्ही. पण उदार चरित नाही. पैशाच्या बाबतीत अगदी कवडीचुंबक. मग पुण्याला तर प्रसिद्धच आहेत म्हणे. आता पुण्यावर फार मोठी जबाबदारी आहे. काल एवढे मोठे, तुमचे सदर्न कमांडचे जनरल साहेब मला म्हणाले, की आम्ही पूण्यभूमीत बसलो आहे. म्हटलं, असं कां? आणि मला म्हणाले, 'माताजी, तुम्ही ह्याला पूर्यभूमी सारखं म्हणता आणि पुण्याला विशेष पुण्य म्हणता, तर इथेच तुम्ही का नाही वास्तव्य करत आणि इथेच तुम्ही राहून आमची का नाही मदत करत ?' एवढी ते पुण्याची महती गात होते. बिचारे आपले शीख आहेत, पंजाबातून आले. 'दुरून डोंगर साजरे', तर आपले पुण्याची महती गात होते. मी आपलं ऐकत होते. भाषणातही महती वगैरे गायली आहे. तेव्हा पुणेवाल्यांवर फारच जबाबदारी आहे. केवढी मी तुमची स्तुती केलेली आहे! मला वाटतं, भरमसाठ स्तुतीमुळेच हे झालेलं आहे बहुदा. बघा एक पत्र लिहिलं होत मी तुम्हाला. ते छापून आलं. त्याचं ट्रान्सलेशन कुलकर्णींना जमेना. मला जमेना, अशी स्तुती मी तुमची केली. तुम्हाला परमेश्वर मानून पूजलं आणि तुम्ही हे काय भिकाऱ्यासारखे उभे आहात. दरिद्री लक्षणं! तेव्हा ह्या स्वरुपातून निघायला पाहिजे. एवढेच एक करा. आपल्या जबाबदारीवर. स्वत: आम्ही इज्जतीची माणसं आहोत. कोण आमच्यावरती खर्च करणार! मग बघा साक्षात् लक्ष्मी तुमचे पाय धुणार. पण म्हणून नाही करायचं. परत तेच. माताजींनी सांगितलं आहे नां, म्हणून आम्ही हे करतोय. लक्ष्मी आमचे पाय नाही धूत. म्हणजे असं पत्र येईल माझ्याजवळ असं दहा पानी. तुम्ही असं म्हणाले, तुम्ही असं म्हणाले, लक्ष्मी आमचे पाय धूत नाही. लक्ष्मीने उलट आम्ही हारलो. आता एकही पैसा नाही. कर्जबाजारी झालो. बायको पळाली, सगळं झालं. अशा भयंकर परिस्थितीत सहजयोग उभा करायचा आहे. झंझावात! त्या झंझावातात सहजयोग्यांच्या रोपाला सांभाळून धरणारे पाहिजेत हो! कुठे गेले ते? सगळे गेले का शिवाजींच्या बरोबर की पेशवाईतच गेले? संपले. ह्या रोपाला सांभाळून धरणारे लोक उभे करा आणि तुम्ही नाही केले तर मी उभे करीन. आणि मग ते तुमचं ठीक करतील. तुमच्यात ते सगळं असतांनासुद्धा तुम्ही जर ते उभं करणार नाही तर कुठून उभं करू. तर पुणेवाल्यांवर फार जबाबदारी आहे. मुंबईकरांना खूप झाडून ठेवलेले आहे आधीच. त्यांना झाडायला नको आता. पण मुंबईकरांनी हलायला पाहिजे. गणपतीसारखे चिकटून मुंबईत राहतात. हलल्याशिवाय मुंबईकरांचा काही फायदा होणार नाही. हललेच पाहिजे. हलतच नाही मुळी! हललेच पाहिजे. प्रत्येकाने ह्यावेळेला ठरवायचं, मी इथून गेल्यावर प्रत्येक मुंबईकराने महाराष्ट्राच्या सर्व सेंटर्सना भेट दिली पाहिजे. प्रत्येकाने. पैसे आहेत. सेंटरवर गेल्यावर ते काही तुम्हाला भुकं मारणार नाहीत. सुट्टी घेऊन, काहीही करून प्रत्येकाने दोन-चार तरी सेंटर्सना भेट दिली पाहिजे. 'बरं, माताजींनी आता दोन-चारच म्हटलं नां! मग दोनच घेऊयात. मग दोन म्हणजे एक असलं तरी झालं. मग कळव्याला गेलं की झालं. कळवा म्हणजे सेंटरच आहे नाही तरी आणि मुंबईच्या बाहेरच आहे नाही का? म्हणजे हद्दीत नाही. मग बघायचे मॅपवर हद्दीत आहे, की बाहेर आहे. बाहेरच आहे मग ७ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-7.txt काय! मग झाल, 'आम्ही कळव्याला जाऊन आलो माताजी.' 'असे का?' मग ठाण्याला जाता का आता? ठाण्याला जा, तिथे बरं राहील तुम्हाला. वटवाघुळे बनून. तिथे पुष्कळ आहेत. ते कसं काय राहील? काय! उत्तम ! ही व्यवस्था नको सहजयोग्यांची. ती माझी मुलं आहेत. काय करताहात स्वत:बरोबर. लक्ष ठेवा स्वत:कडे. तुम्ही माझी मुलं आहात! तेव्हा वटवाघुळाच्या ह्या स्थितीला जायचं नाही. मुळीच जायचं नाही. तेव्हा सांभाळून रहा. हे सांभाळण्याची वेळ आलेली आहे. आता ह्यांच्याहून जास्त लोक येतील. त्यांना लुबाडायचं म्हणजे काय! तुम्ही काय ठगी करता की काय रस्त्यावर, म्हणजे त्यावेळचे ठग आता महाराष्ट्रात जन्माला आले असतील. तर तसं सांगावं. त्यांनी सगळ्यांनी इथेच जन्म घेतलेला आहे आणि हे ठग सगळे आता बसून ठगत आहेत सगळ्यांना. खुल्या दिलाने राहिलं पाहिजे. आता उद्या मंडळी येणार आहेत. सगळ्यांनी काही ना काही तरी त्यांना बक्षीस म्हणून द्यावं. मागच्या वेळेला मीच खर्च करून सगळ्यांना बक्षीस दिलं होतं . पुणेकरांच्या तर्फे त्यांना आत्ता आंबे दिले आणि लोटे आणि पात्र दिलं. कशाला ? पुणेकरांच्या तर्फे! आणि पुणेकरांनी काय केलं! व्वा! आम्ही समागम दिला माताजी, जेवायला बसलो सगळ्यांच्या बरोबर व्यवस्थित. सगळ्यांनी काही ना काही बक्षिसे ह्यांना दिली पाहिजेत. प्रत्येकाने मित्रता जोडली पाहिजे. पण मित्रता म्हणजे अशी नाही, की मला जरा पाचशे रुपये उसने द्या. मी कर्ज घेतलं होतं. माझी आई मेलेली आहे. तिच्या अंगावर कपडा नाही. हे असले प्रकार करण्यापेक्षा त्या लोकांना तुमच्याबद्दल काय कल्पना होणार आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्पष्टपणे मी हे सांगते. आज स्पष्टच बोललेलं बरं. असल्या प्रकारच्या हलकटपणाच्या गोष्टी करायच्या नाहीत. जाऊन दोस्ती करायची. त्यांच्यासमोर आपला मोठेपणा दाखवला पाहिजे. ते तुमच्या दर्शनाला आलेले आहेत. हे चांगले आहे, की परमेश्वराच्या दर्शनाला जा आणि परमेश्वर भीक मागतो आहे ! काय स्थिती आहे हो! ही काय स्थिती आहे. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे. इतका विपर्यास करू नका सहजयोगाचा. तेव्हा कृपा करून ह्यांच्यासाठी काहीतरी करा. ते तुमच्यासाठी किती बक्षिसं घेऊन आले आहेत. एवढा खर्च करून इथे आलेत. आपल्याला पैसे तर समजतात कमीत कमी आणखीन काही समजलं नाही तरी. हे लोक केवढा खर्च करून आलेले आहेत ! त्यांच्यासाठी एखादी वस्तू दिली तर नेहमी लक्षात ठेवतील. प्रेमाने मिठ्या माराव्यात. त्यांना प्रेमाने घरी जेवायला बोलवायचं. दिल्लीकरांच हृदय बघा केवढं मोठं आहे ! 'सात दिवस आम्ही आमच्याकडे ठेवतो माताजी. तुम्ही काही केलं तरी आम्ही ऐकणार नाही. सात दिवस आम्ही आमच्याकडे ठेवू. आम्ही सगळ्यांना वाटून घेऊ. आम्ही एका खोलीत जरी राहतो तर काय झालं. आम्ही वाटून घेऊ. ' हे दिल्लीकर. तसे मुंबईकर दिलदार आहेत. त्याबद्दल शंका नाही. मुंबईकर दिलदार आहेत, पण हलत नाहीत. दिल्लीवाले लोणावळ्याला येतील, पण आज किती सहजयोगी मुंबईहून इथे आले, रविवारला आपण पूजा ठेवली तर. हातावर मोजून घ्या. आज यायला काय झालं होतं पूजेला ! माताजी आज पूजेला बसणार आहेत. हे लोक इतक्या दुरून आले. तुम्ही काही इथपर्यंत येऊ शकत नव्हते ? किती लोक आले आहेत मुंबईचे मला लिस्ट करून द्या. काय झालं होतं यायला त्यांना आज ! सकाळच्या गाडीने यायचं आणि संध्याकाळच्या गाडीने जायला काय झालं होतं ? काय दर आहे लोणावळा? आता काय कळव्याला प्रोग्रॅम केला म्हणजे होईल. तर त्याच्यामध्ये आंतरिकता नाही. ओढ नाहीये. तुमची जर आई उद्या ८ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-8.txt आली असती तर आले असते भेटायला. नक्की. मी तुमची आई नाहीये का? तुमच्या आईची आई आहे मी. माझ्याशिवाय चालणार आहे का तुमचं! आंतरिकता नाहीये. मुंबईच्या लोकांना आतंरिकता असायला पाहिजे. दिल खोल असून फायदा काय? आतंरिकता पाहिजे. पैसे खर्च करून सगळे विकत घेता येत नाही. आतंरिकतेने येतं. आतंरिकता आहे का तुम्हाला? आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, की आम्ही आंतरिक आहोत की नाही. अंत:करणापासून वाटलं पाहिजे. असं नाही म्हणत की सर्वांना नाही वाटत. काही लोकांना मुळीच वाटत नाही. 'माताजी, तुम्ही आल्यामुळे आमचा हा फायदा झाला, तो फायदा झाला. अहो, माझा काय फायदा झाला तो तर बघू द्या मला. आता मुंबईला जर चार माणसं आली तर मला विचार करावा लागतो कोणाच्या घरी ठेवायचं. ज्याच्या घरी ठेवावं तो उचलबांगडीच करत असतो. इथे हेच काम दिसतंय. हे आले ना ह्याला ह्याच्याकडे घाला. त्यांची टोपी ह्याच्यावर काही समजतच नाही हे काय आहे. त्यांना काही तुमचं समजत नाही तर समजवून सांगा. पण आतंरिकता नाहीये. आतंरिकता असायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. पण तेच आम्ही जातो खेडेगावात, म्हणजे बहार आहे. आतंरिकता आहे. सगळं मस्त आहे. काय मजा येते हो! बैलगाडी असो नाही तर काही असो. पायी चालायला लागलं तरी काय झालं. अनवाणी चालायला लागलं तरी काय झालं! अहो, प्रेमाचं एवढं जे धो धो वहात असतं, त्याच्यापुढे काही नको मग. त्याच्या मग काही इच्छा रहात नाही. असं ठेवलं पाहिजे आणि तेच शिकलं पाहिजे त्या लोकांपासून. खुले आहेत. कधीही माझ्याकडून एक कवडीही घेणार नाहीत. मला त्रास देणार नाहीत. सगळी व्यवस्था कशी मस्त ! सकाळी सगळे आंघोळ करून इतके व्यवस्थित उभे ! तेव्हा वाटतं अरे, माझा महाराष्ट्र हा! बस, मुंबई आणि पुणेकरांवर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही सरताज ना इथे बसलेले, तलवारी घेऊन. गंजू देऊ नका. सगळ्यांना सांगणं आहे, थोडे दिवस खेडेगावात जाऊन रहावं आणि थोडं खेडेगावातल्या हातात लोकांकडून शिकावं. जरी काही नसलं घरात तरी अत्यंत प्रेमाने, 'एक कप चहाच घेऊन जा माताजी. काही तरी घ्या. नुसतं पाणी नको.' आणि केवढं प्रेमाने ! हृदय भरून येतं. तसेच पाहिजे. आतंरिकता पाहिजे. ह्या लोकांना पाहिजे. हे आले आहेत, कसे आमच्या जीवाशी हे आलेले आहेत. ह्यांना कुठे ठेऊ आणि कुठे नको! न्हाऊमाखू घालू की भरलं बघून हदय काय करू? कसं करू? असा विचार यायला पाहिजे. ह्यांना जायचंय, आता कधी भेट होणार! हे आमचे जीवाचे निघाले आहेत. तसं नाही. त्याच्याकडून किती काय काढता येईल ते आपण काढलं पाहिजे. आता हे सगळे विसरा. झालं गेलं विसरून जायचं. आता पूढची वाटचाल करायची. त्या वाटचालीमध्ये आपण वर वर उठत जायचं. द्वैतातून अद्वैतात आल्याशिवाय होणार नाही. आणि आपण अजून द्वैतात बसलेलो आहोत आणि त्या द्वैतात थोडेसेच काटे आहेत. ते काढावे लागणार. पैशाचा हा जो आपल्या डोक्यामध्ये बोजा आहे, तो काढून टाका. तुम्हाला लाखोंनी पैसे मिळतील. 'योगक्षेम वहाम्यहम्' म्हटलेले आहे. सोडून बघा. ह्यांना प्रेमाने जवळ करा. चार पैसे खर्च करा. काहीही लागत नाही. तुम्ही कर्जबाजारी होणार नाही. मला काही नको आहे, पण ह्यांच्यासाठी करा. हे बाहेरून आले, त्यांना प्रेमाने जवळ घ्या. लोणावळा, १९ डिसेंबर १९८२ ९ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-9.txt এ परमे१्वराची गौरव सातारा, २६ दिसंबर १९८५ झालं हे वाईट झालं. मला फार वाईट वाटतं. सगळ्यांसाठी एक सभा जाहीर करा आणि त्यात ज्यांनी ज्यांनी हे केलं त्यांनी क्षमा मागितली पाहिजे. अर्थात् ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं काहीतरी वाईटच होणार. मी कितीही प्रयत्न केला, कितीही क्षमा केली तरी हे होणार. पण तरीसुद्धा तुम्हाला सांगायचं, की जे झालं ते विसरून जा. आपल्याला देवधर्माशिवाय चालणार नाही. अशा फालतू लोकांना इथे जमू द्यायचं नाही. इथे ही संस्था येईल आणि नंतर ही संस्था आल्यावरती तुम्ही पोलिसांना कळवा की, 'इथे संस्था आलेली आहे. आमच्या मुलांना बिघडवताहेत आणि त्यांना खूनशी बनवत आहेत. मागच्या वेळेला त्यांनी त्यांना दगड मारायला सांगितलं.' सगळ्यांनी मिळून असं १० 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-10.txt सांगायचं. आणि सरपंचसुद्धा सहजयोगी निवडायचे. प्रयत्न करायचे. म्हणून एक फार वाईट मनुष्य आहे. आणि त्याचं सबंध एक माफिया टाइप चालले आहे. तेव्हा त्याच्या पार्टीला व्होट द्यायचं नाही. कोणालाही द्या, पण त्याच्या पार्टीला व्होट दूसरं म्हणजे असं की ह्या देशामध्ये .. द्यायचं नाही आणि सहजयोग्यांनी त्याच्या विरुद्ध काम करायचं. कुठेही असलं तरी त्याच्या विरूद्धच काम करायचं. कुठेही असू देत, की हा मनुष्य किती वाईट आहे. ह्याचा देवावर विश्वास नाही. ह्याने टूम काढलेली आहे रजनीशला भेटून. रजनीश आणि ह्याची मिळून टूरम आहे, की देव नाही असं सिद्ध करायचं! ह्याला देव नको. कारण ह्याच्या आईचा पत्ता नाही. ह्याला देव नको. देव नको म्हणजे तुम्ही दारू प्या आणि वाट्टरेल ते धंदे करा. तर अशा रीतीची पत्रकं काढायची. लोकांना सांगायचं, की असे जे लोक शिकवतात ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्हाला देवाधर्माने रहायचं आहे. आम्हाला दुसरं काही नको. सहजयोगाने कोणी दैववादी बनत नाही. देववादी बनतात आणि सशक्त बनतात. त्याला डॉक्टरांचा पुरावा आहे. हे आम्हाला काय बोलतात ! कोणीही उठावं, काहीही बोलावं. ते मानलं पाहिजे का? डॉक्टरांनीच सिद्ध केलेले आहे, आता आम्ही काय सिद्ध करून दाखवायचं? माझ्यातर्फे मी जितकं होईल तितकं ह्या न्यूजपेपरवाल्यांना सांगितलं. पण असे घाणेरडे न्यूजपेपर्स घ्यायचेच नाही. केसरीवर बहिष्कार टाकायचा, लोकसत्तेवर बहिष्कार टाकायचा. असे जे पेपर आहेत त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. दुसरा पेपर तुम्ही साताऱ्याला सुरू करा. ऐक्य म्हणून जो पेपर आहे त्याच्यावर बहिष्कार टाका. अगदी बेकार आहे तो. पुष्कळ गोष्टींवर बहिष्कार टाकावा लागणार आहे. पूर्वी गांधीजी असतांना सगळ्या बायकांना असं सांगितलं विदेशी कपडे वापरायचे नाही. तर सगळ्या बायकांनी जाळून टाकले. सगळ्या सोन्याच्या बांगड्या देऊन टाकल्या. इतके लोकांनी त्याग केले. अहो, ते नुसतं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी! पण 'स्व'च तंत्र मिळविण्यासाठी आपण एवढीसुद्धा तोशिस आपल्याला लागू देत नाही. सहजयोगात नुसता आशीर्वादच आशीर्वाद आहे, पण त्याच्यासाठी कर्तव्य पण आहे. त्या कर्तव्याला मुकलं नाही पाहिजे. आणि आज सगळ्यांनी आपल्या मनामध्ये पूर्णपणे विचार केला पाहिजे, की माताजींनी ह्या कृष्णेच्या काठी जे आम्हाला समजवून सांगितलेले आहे, आणि त्या भव्यतेला त्या ..(अस्पष्ट) तशी देवा आम्हाला शक्ती दे आणि सुबुद्धी दे की आम्ही त्या भव्यतेला उठू, आणि हा जो आम्ही रडतराऊपणा करतो आहे, तो सगळा बंद झाला पाहिजे. ह्यावर काही उपाय नाही. आपलं आपण ठीक करून घेतलं पाहिजे. स्वत: विचार करून की, 'मी काय करतोय? माताजी म्हणतात की हे फार मोठं होऊ शकतं. मग मी काय करतोय ?' माझ्यात काय दोष आहे ? तुम्ही जर खरच मला आदिशक्ती मानता मग तुम्हाला अजून पाहिजे काय? अहो, आदिशक्ती जी, जिने सर्व सृष्टीची रचना केली. सगळे काही जगामध्ये केलेले आहे. आज जेवढं काही आहे, ते आज जर आम्ही केलेलं आहे तर मग तुम्हाला आणखीन काय पाहिजे. पुष्कळ आदिशक्ती, आदिशक्ती म्हणायचं, ओरडायचं, जयजयकार करायचा, पण त्याचा काही अंदाज आहे का तुम्हाला ? आदिशक्ती म्हणजे काय? केवढी मोठी तिची गोष्ट आहे! आणि तोंडाने आपण म्हणतोय, नुसतच, चर्पटपंजरी आहे ती! स्पष्टपणे समजून घ्यायचं. आदिशक्तीने तुम्हाला निवडलेले आहे त्या कार्यासाठी! हे तुमचं परम भाग्य आहे. अनेक वर्षाचं ११ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-11.txt पुण्य आज कामाला येणार आहे. तेव्हा कृपा करून त्याच्या लायक व्हा. कसलेतरी रडतराऊ बनत, चालणार नाही आणि असे जर असले तर त्याच्यातून तुम्ही निघालेले बरे! आजपासून सगळ्यांनी हा विचार मनात आणायचा. त्या शिवाजीला भवानी आईने तलवार देऊन एवढं प्रभावित केलं! तीच भवानी आई आज तुमच्यासमोर बोलतेय. ती तुम्हाला कुठल्या कुठे पोहचवून देईल, ह्याचा काही अंदाज आहे का तुम्हाला? तर आजच्या ह्या शुभप्रसंगी, नम्रपणे, व्रतनिश्चय, आपण ठरवायचं की 'आम्ही सहजयोगी आहोत आणि मरणापर्यंत आम्ही सहजयोगी राह आणि त्याच्याही नंतर आम्ही सहजयोगी राह. हे अनंतातलं आम्ही मिळवलेलं आहे आणि आम्ही तसे राहू.' अशा वीरश्रीने आणि गौरवाने आयुष्यात राहिलं पाहिजे. हा गौरव असायला पाहिजे. त्यात तुमचं काही चुकलेले नाही. परमेश्वराचं कार्य करणं हे फार मोठं आहे आणि तुम्हाला आम्ही निवडलेले आहे . तुमचा आम्ही गौरव केलेला आहे. आता तुम्ही सुद्धा परमेश्वराचा गौरव वाढवावा, असा माझा तुम्हाला अनंत आशीर्वाद आहे. ह्या शाळेचे आद्यप्रवर्तक जिजाबा मोहिते, यांनी हृदयाला घोटून टाकण्यासारखं भाषण केलं आणि माझीसुद्धा अशी अवस्था आलेली आहे. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतोय. ४२ सालांमध्ये आम्हीसुद्धा लहानपणी स्वातंत्र्ययुद्वात होतो. माझे वडील आणि आई ह्यांनी गांधीजींना सर्वस्व वाहिलं होतं आणि मीसुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणी राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळविण्याची होती. कॉलेजमध्ये असतांना जेव्हा 'भारत छोडो' चा नारा लागला ९ ऑगस्टच्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं मी प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळचे जे कॉलेजचे मुख्य प्रिंसिपल होते, त्यांनी ह्या सहजयोग्यांना सांगितलं की, 'मला तेव्हाच वाटलं, की ही काही तरी मोठी शक्ती असेल, की अठरा वर्षाच्या वयामध्ये त्या बंदका आणि हे राहून ह्याच्यासमोर कशी उभी राहिली.' एकटी मुलगी होते. पण ते कॉलेज आम्ही बंद पाडलं. त्यानंतर ४२ सालात मी अध्यात्माचा विचार केला नाही. फक्त देशाला स्वतंत्रता मिळवून द्यायची. त्यावेळेला आम्हाला ह्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले. बर्फावर घातलं. आई माझी, तिला वाटायचं, ही अठरा वर्षाची मुलगी आहे. तिचे प्राण जाणार आणि जवळजवळ नऊ महिने मला भूमिगत व्हावं लागलं. अशाप्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वहावत गेले आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं होतं, की आपल्या देशातली गरिबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये ते कुठेतरी वाऱ्यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आली मला, की हे कसलं स्वातंत्र्य मिळवलं आहे ? ह्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे आपल्याला? अशा रीतीने हे लोक स्वार्थी आणि स्वत:चे पैसे कमवायचे आणि सर्व देशाला बुडवायचं. स्वच्छता आली पाहिजे. हे जे गांधीजींचं देशाबद्दलचं जे काही प्रेम होतं, ह्या धंद्यात लागलेले. आपल्याकडे देशाविषयी कळकळ असणारे लोक गेले कुठे? कुठेही गेलं की हीच गरिबी बघून माझ्या जीवाला असं होतं की कसं हे ठीक करायचं? कसं वागायचं? तसं पाहिलं तर आपल्या देशात भरभराटच होती. भरभराट होण्याचं कारण असं, की ज्या ज्या देशाला १२ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-12.txt बाहेरून मदत आली आहे, त्यापैकी आपल्या देशाला फारच मदत आली आहे. बाहेरच्या देशातून आपल्या देशाला वर्ल्ड बँकेने पुष्कळ पैसे दिले आहेत. त्याबद्दल शंका नाही आणि ते पैसे आपण न वापरता आपण ते परतु तिकडे स्वित्झर्लंडला पाठवले. इथल्या गरीब लोकांचे पैसे घेऊन आपण स्वित्झर्लंडला ते पैसे पाठवले. त्यानंतर ते स्वित्झर्लंडमधूनच पैसे घेऊन वर्ल्ड बँक आपल्याला पैसे देत असते. म्हणजे एकूण काय की आपण काहीही न होतांना त्याच्यासाठी म्हटलं पाहिजे, की आपण गरीब झालो . इतकेच नाही तर कर्जबाजारी झालो . तर सहजयोग आमचा जो आहे त्याने विश्व निर्मल धर्म म्हणून धर्म स्थापन केला. म्हणजे जगातले सारे धर्म आम्ही मानतो. म्हणजे गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आणि सगळ्या मोठमोठ्या संत-साधुंना आम्ही मानतो. गाडगेमहाराजांना मी भेटलेली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि त्यांनी मला ओळखलं होतं . त्यांनी मला म्हटलं होतं, की असा एक काळ येईल, कारण ते सुद्धा स्वातंत्र्यवीर होते. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज सगळे आमच्या घरी आलेले होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही, त्यावेळेला त्यांनीसुद्धा मला ओळखलं. आणि मला सांगितलं, की एक दिवस असा येईल, की तुम्ही ह्या भारतवर्षाचं कल्याण कराल. संतांच्या मागे आम्ही आहोत. एवढेच नव्हे पण संतांचे कार्य पुढे चालवायचं आहे. संतांनी कधीही माणसाला दैववादी केलेले नाही किंवा कधीही त्यांच्या कर्तृत्वावर घाला घातलेला नाही. आजकाल एकेक उपटसुंभ निघालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही नुसतं विज्ञानाची कास घ्या. आमचं असं म्हणणं आहे, की तुम्ही सत्याची कास घ्या. विज्ञानात आपल्या हिंदुस्थानात कोणी शोध लावले? कोण मोठे वैज्ञानिक इथे बसलेले आहेत ? आपला वारसाच मुळी अध्यात्माचा आहे. त्याला काळं फासून तुम्ही विज्ञान घेऊन बसलात. आता इथे कितीतरी, ३-४ असे लोकं आलेले आहेत, की जे विज्ञानामध्ये फार निष्णात, इथे नसतील अशा त्यांच्याजवळ पदव्या. त्यात ३-४ हिंदुस्थानी लोकसुद्धा आहेत. इथे नाही आलेले. आणि त्यांनी शोध लावले. अनेक शोध लावलेले आहेत आणि त्या शोधातून बरेच काढलेले आहे. त्यात मी त्यांना काही सांगितलेले आहे, हे सुद्धा त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी त्याचा शोध लावला आणि त्यांनी सांगितलं की, 'माताजी, तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे.' त्यापैकी एक गोष्ट मी त्यांना सांगितली, कार्बन अॅटम जो असतो तो आपल्या मूळाधारात असतो. कार्बन अॅटमला चार व्हॅलन्सी असतात. अहो, तुमच्या अंधश्रद्धेच्या माणसाने माझं चार तास डोकं खाल्लं. त्यांना कार्बन म्हणजे काय? त्याची व्हॅलन्सी म्हणजे काय? हे समजवायचं. हे कसलं विज्ञान करणार आहेत ? सांगा तुम्ही, ह्या लोकांना कसलं विज्ञान येतं ? हे लोक म्हणतात आम्ही वैज्ञानिक! एका माणसाला धरून, उभं करून ते काय सगळे लोक होतात? सगळा देश होतो? आपल्या प्रगतीचं त्यांना काही नाही. आपली प्रगती अध्यात्मासाठी, परमेश्वरासाठी आहे. आपली अध्यात्मात एवढ्यासाठी एवढी प्रगती झालेली होती, आहे आणि होणार आहे. त्याला कारण असं आहे, विज्ञान जे झाडासारखं बाहेर वाढलेलं आहे, पण त्याच्या मुळाशी त्याला माहिती नाही. मुळाशिवाय ते झाड कसं राहणार? ते मूळ इथे, आपल्या भारतात, विशेषत: महाराष्ट्रात आहे. विज्ञानाला प्रेम कशाशी खातात ते माहिती आहे का? प्रेमाची व्याख्या करावीच लागेल किंवा कोणतीही जिवंत वस्तु कशी कार्य १३ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-13.txt करते त्याबद्दल ते काही सांगू शकत नाहीत. एका बी ला जर तुम्ही मातीत घातलं, तर ते कसं वर येईल, त्याच्यात कोणती क्रिया होईल, हे सांगू शकत नाही. विज्ञानाला आपली मर्यादा आहे आणि अध्यात्माला मर्यादा नाही. पण त्याला ...... दिलं पाहिजे. त्यात उतरलं पाहिजे आणि वाढ करून घेतली पाहिजे. विज्ञानाबद्दल, अर्थात माझं असं म्हणणं आहे, की मी मागे सांगितलं होतं की तुमच्या इथल्या मुलांना आम्ही विज्ञान वगैरे शिकवू सगळं. सगळं काही शिकवू. पण ते मुख्य नव्हे. विज्ञानाला नेहमी अध्यात्माची जोड पाहिजे. आता आमच्या तीन असे मोठाले लेखक होऊन गेलेले आहेत. आणखीन विज्ञान शास्त्री की ज्यांनी मी सांगितलेल्या गोष्टीवरती रिसर्च केला. ती ही गोष्ट त्यांनी सिद्ध करून दाखवली. पहिली गोष्ट अशी सांगितली मी, की कार्बन अॅटममध्ये, जर तुम्ही त्याचा फोटो घेतला आणि त्याचं जर तुम्ही मॉडेल बनवलं, तर तुम्ही जर एकीकडून दुसरीकडे बघाल, तर त्या अॅटम्सची अशी मांडणी आहे, त्या व्हॅलन्सीजची अशी मांडणी आहे, की जर तुम्ही डावीकडून उरजवीकडे बघितलंत तर तुम्हाला ॐ कार लिहिलेला दिसेल आणि तुम्ही जर उजवीकडून डावीकडे बघितलंत तर तुम्हाला....... दिसेल आणि जर तुम्ही खालून वर बघितलं तर तुम्हाला क्रॉस दिसेल. त्यांनी करून बघितलं आणि सिद्ध केलं की असं झालेलं आहे. एक फार फार मोठे सायंटिस्ट आहेत दोघजण, एक बेल्जियमचे आणि एक अमेरिकेचे. ते दोघेही आता फार मोठ्या पदांवर आहेत. दुसरी गोष्ट मी त्यांना अशी सांगितली , की माणसाच्या, पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा नाहीतर त्यांनी हेच कार्य आपल्याला....., खरं म्हणजे गाडगे महाराज इतके स्वातंत्र्य विचारात फसलेले होते केलं असतं. गांधीजींनीसुद्धा हेच कार्य केलं असतं. पण ती वेळ नव्हती. स्वातंत्र्याची वेळ होती. नाहीतर माझं जे कार्य आहे, ते त्यांच्यापासूनच आलं आहे. त्यांनी हे कार्य पुढे करायचं स्वातंत्र्य मिळाल्यावर, हे ठरवलेलं होतं. पण करणार कसं! स्वातंत्र्य मिळाल्यावर ते किती दिवस राहिले. फारच कमी दिवसात ते सगळेच वैकुंठवासी झाले. बरं, मग दुसरी गोष्ट मी सांगितली, की आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये जीवात्मा आहे आणि तो आपल्या पाठीच्या कण्यावरती सात असे लूप्स करून बसलेला आहे. लूप्स म्हणजे, ज्याला आपण मराठीमध्ये अर्धवर्तुळ म्हणू. अर्धवर्तुळाने, असे सात अर्धवर्तुळ आहेत. ही अर्धवर्तुळ आहेत. पाठीवरती बसलेले आहेत आणि तो ज्याने सगळी चालना होते आणि आत्मा आपल्या हृदयात येतो. तर ते म्हणायला लागले, की आकाशात आम्हाला असं चैतन्य दिसतं. आपल्या हिंदुस्थानात ते फार दिसतं लहान लहान असे पांढरे पांढरे. असे जसे काही अनुस्वारासारखे. अनुस्वारासारखे असे कण दिसतात आकाशात आणि हे आत्मसाक्षात्कारी लोकांना दिसू शकतं. नाहीतर दिसू शकत नाही. तुमची दृष्टी सूक्ष्म व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ते म्हणाले, 'आम्हाला ..... असे दिसतात. ते अर्धवट असे एकात एक घुसलेले ते आहे काय माताजी ?' मी म्हटलं, 'हे मेलेले जीव. ते अजून इथेच रेंगाळत आहेत.' आणखीन हे आपले जे जीवात्मा आहे, त्याचं प्रतिबिंब प्रत्येक आपल्या पेशीवरती, आपल्या सेलवर आहे. तुम्ही पत्ता काढा. एक डॉक्टर मिश्रा म्हणून इथे आलेले आहेत. १४ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-14.txt विज्ञानाला आपली मर्यादा आहे ते फार मोठे सायंटिस्ट आहेत. ओणि अध्यात्माला मर्यादा नाही. त्यांनी सांगितलं की सायन्सने शोधून त्यात उतरलं पाहिजे आणि वाह करून घेतली पाहिजे. काढलं, की प्रत्येक सेलवर असे आहेत. अर्धवर्तुळ असे सात आहेत. ১। म्हणजे आम्ही जे म्हटलेले आहे त्याच्यावर त्यांनी शोध केला. NAP. ০ www तिसरे एक गृहस्थ होते. त्यांनी सांगितलं की शेवटला झिरो पॉइंट LE. ১ तो मायनस ज्याला म्हणतो आपण, २७३ डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणजे तापमानाला. संगळ्यात खालचा. मायनस २७३ डिग्री. तर एकाचा त्याच्यावर विचार चालला होता की मायनस २७३ डिग्रीलाच कसं जायचं? तर मी म्हटलं की ते एकमेव आहे. एकमेव गोष्टीला तुम्ही पोहचू शकत नाही. कारण तुम्ही एकमेव नाही. तेव्हा सायन्सचे सर्व प्रकार त्यांनी करून पाहिले. हिलियमवर म्हटलं होतं तू प्रयोग कर. त्याच्यावर प्रयोग केल्यावरती त्याने पाहिले की जेव्हा हिलियम थंड होत असतो, तर त्याच्यातले अणू-रेणु जे आहेत, ते अगदी व्यवस्थित, सामूहिकतेने वागतात. अगदी सामूहिक वागतात. जसे काही पक्षी एकत्र चालले आहेत, असे वागायला लागतात. ते झालं, पण मी तुम्हाला म्हटलं की एकमेव तुम्हाला त्या परिस्थितीत जायचं आहे, तिथे की टेंपरेचर मायनस २७३ डिग्री जाणार आहे, तर त्या ठिकाणी पोहोचतांना तुम्हाला चैतन्य वापरावं लागतं. आणि शेवटी चैतन्य वापरून त्यांनी ते साधून घेतलं. तसेच तिसऱ्या एका माणसाने दारूचा परिणाम लिव्हरवर का होतो यावर लिहिलं होतं. त्याला मी एक त्याच्यात पॉइंट सांगितला. तो नऊ वर्षापासून तेच लिहित होता. तो पॉइंट सांगितल्याबरोबरच आणि ते सिद्ध झाल्याबरोबर त्याला बी.एसस्सी.ची डिग्री मिळाली. तसेच दिल्लीच्या तीन डॉक्टरांना एम.डी.ची पदवी मिळाली. ती शास्त्रज्ञांनी दिली आहे. ती काही एम.डी. ची पदवी तुम्हाला असा तसा मनुष्य देऊ शकत नाही. शास्त्रज्ञ, शेवटी एम.डी.ची पदवी मिळते. त्यांनी एमबीबीएस केलं होतं. त्यातले एक डॉक्टर इथे आलेले आहेत. ह्याने रोग कसे बरे होतात ह्याचा पडताळा घेतलेला आहे आणि मग लिहिलेले आहे. पण कोणी ह्या महाराष्ट्रात आहे ऐकायला तयार नाही. अहो, ही संतांची भूमी आहे की भुतांची भूमी ते मला समजत नाही. तिथे असे उपटसुंभ निघालेले आहेत. ह्या लोकांना तुम्ही हलवून पाडलत. आपला स्वाध्याय करायचा नाही आणि अध्यात्माला मानायचं नाही. एकतर्फी ह्यांचे जे काही जीवन चाललेले आहे, त्या जीवनामधून आता आपण जे परवा पाहिले नमुने, की खुनशीपणा जो झाला, त्या लोकांना मारलं, बाहेरच्या अठरा लोकांना जखमी केलं. ह्यांनी काय आमचं बिघडवलं होतं ? त्यांना मारायची काय गरज होती ? हा खुनशीपणा हे शिकवत आहेत. हे कसले काय लोकांना चांगले बनवत आहेत! धीट बनवताहेत आणि पुष्कळशी तिथली लहान लहान मूलं घेऊन गेले होते. सोळा वर्षाच्या खालची मुलं. १५ ০ ० 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-15.txt त्यांना नेऊन दगड मारायला शिकवलं. तर त्यांचे जे आई-वडील होते ते मला येऊन म्हणायला लागले, 'माताजी, आमच्या मुलांचं आता काय होणार?' त्यांचं तर भूत करून टाकलय. आता सगळ्यांना दगड मारायचं तर मार. ह्या विज्ञानाचा इतका वाईट परिणाम परदेशात झालेला आहे! मी फिरलेली आहे. जे लोक इथे बसून कुपमंडूकासारख्या, पुण्याला बसतात त्यांना रजनीशच फार मोठा मनुष्य वाटतो. म्हणजे काय म्हणावं? त्याला तुम्ही बोलवाल का ह्या शाळेत? खेडेगावात तर मार पडेल त्याला, गेला तर! तर ह्या न्यूजपेपरवाल्यांनासुद्धा तुम्ही पत्र लिहिलं पाहिजे की, 'असल्या घाणेरड्या गोष्टी तुम्ही छापू नका. माताजी हे कार्य करताहेत, ते तुम्हाला काही दिसत नाही. जे चांगलं कार्य करताहेत त्यांच्याबद्दल काही लिहा नां! तुम्ही सगळ्यांनी मिळून अशी चळवळ करायला पाहिजे. ही भूमी संतांची आहे. सगळे फक्त खोटे असं ह्यांचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वरांपासून सगळे संत खोटे आहेत आणि हे मात्र अतिशहाणे निघाले. मी त्यांना असं आवाहन दिलं, की तुम्ही मला आवाहन देण्यापेक्षा मी तुम्हाला आवाहन देते, दोन ओळी तुम्ही संत ज्ञानेश्वरांसारख्या लिहन दाखवा. तर त्यांचं म्हणणं असं, की त्यांनी गीतेवरती टिका लिहिली. कबूल! त्यांचा अमृतानुभव बघा. अहो, रोज मी त्यातल्या चार ओळी वाचते. इतकं आनंददायी आहे ते. इतकं आनंददायी. पण त्याला आत्मसाक्षात्कार पाहिजे नां! सूक्ष्म दृष्टी पाहिजे. ह्या बोथट लोकांना काय समजणार आहे त्याची महती. विज्ञानाने काही कविता होतात का? कोणा वैज्ञानिकाने कविता केलेल्या मी तरी ऐकलेल्या नाही. हे जे आपल्या इथे एवढं मोठं परंपरेने दिलेलं धन आहे, केवढ धन दिलेलं आहे आणि हे संतांचं कार्य आहे. काय काव्य आपल्याकडे केलेले आहे! रोज वाचावं, म्हणावं. आता ही मंडळी तुम्हाला त्या काव्यातलं, एकनाथांचं वगैरे भारूडसुद्धा म्हणून दाखवतील. आणि फक्त संतांनीच ते कार्य केलेले आहे. संतांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर इतकं कार्य केलेले आहे, की तसे कोणीही केलेले नाही. .... काय म्हणतात, 'आम्हासी म्हणती ब्राह्मण, आम्ही जाणिले नाही ब्रह्म, आम्ही कसले ब्राह्मण।' दूसरे एक सरस्वती होते. ते तर एखादा शेंदूर वगैरे फासून बसला तर त्याला तिथे जावून फेकायचे. त्याच्यावर जाऊन घाण करायचे, त्या मूर्तीवर. आता आम्ही सांगितलं देवाच्या कार्याला तुम्ही पैसे देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, की मी कोणाकडूनही एकही पैसा कधी घेतलेला नाही. इथे इतकी मंडळी बसलेली आहेत, त्यांना विचारा आम्ही कोणाकडूनही एकही पैसा घेतलेला नाही. कार्य कसं होतं ! देव कृपेने लक्ष्मीचा हात आहे माझ्या हातात. पैशाची कधीच कमतरता झाली नाही. ह्या शाळेलासुद्धा मी स्वत:चे पैसे दिले. देईन. पण ही मंडळीसुद्धा द्यायला तयार आहेत. पण त्यात एक अडचण आहे की यांना रिझर्व्ह बँकेकडे जावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल. म्हणून मी स्वत:चेच तुम्हाला पैसे दिले. पण तुम्ही जर बरोबर तुमच्या शाळेचा आराखडा करून दिला, तर ह्यांना तुमच्या मुलांबदल भयंकर प्रेम निर्माण होईल. भटक्या जातीची मुलं आहेत. काय हो, माझं हृदय नुसतं पिळवटून निघतं. गरिबी बघून मी खरं सांगते, या भटक्या जातीच्या मुलांसाठी काय करू नि काय नको असं होतं. पण १६ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-16.txt माझे हात असे बांधले गेले आहेत. आता इतके पैसे मी तुम्हाला देऊ शकत नाही. माझी अशी इच्छा आहे, की ह्या लोकांनी तुम्हाला द्यावे. त्यांचीही इच्छा आहे. पण रिझर्व्ह बँकेची परवानगी वरगैरे घेऊन आम्ही व्यवस्थित तुम्हाला देऊ आणि तुम्ही ह्याचा आराखडा काढून द्या. ही शाळाच नाही तर अशा अनेक शाळा आम्ही हाताखाली घेतल्या आहेत. त्यांची लिस्ट बनवलेली आहे. सगळ्यांना आम्ही मदत करणार आहोत. जे लोक एकेकाळी ह्या देशावर राज्य करत होते. त्यांनी आमचा इतका छळ केला. माझी आईसुद्धा पाचवेळा जेलमध्ये गेलेली आहे. तुमच्या फग्ग्युसन कॉलेजची ती ऑनर होती मॅथेमॅटिक्सची रँग्लर परांजपे..... वडील माझे चौदा भाषेत निष्णात होते आणि ते पूर्वीच्या काळच्या सेंट्रल असेंब्लीचे, कॉन्स्टीट्यूट असेंब्लीचे नंतर पार्लमेंटचे मेंबर होते. त्यांनी सगळ काही देशासाठी त्यागलेलं. गाडगे महाराज, ह्यांनीसुद्धा आमच्या वडिलांना सांगितलं आहे. हे संतसुद्धा त्यांना मानत असत. माझे वडीलसुद्धा फार मोठे संत होते आणि त्यांनी सांगितलं की गृहस्थाश्रमात राहूनच त्यांनी संतपणा केला आहे. सगळे काही देशासाठी त्यांनी वाहन टाकलं आणि मुलांना कर्तबगार व्हायला सांगितलं आहे. 'मी तुमच्यासाठी एकही पैसा ठेवणार नाही. तुम्ही कर्तबगार बना.' आणि आमच्या सर्व भावंडांना त्यांनी अत्यंत चांगली शिकवण दिली. त्यात किती जण ह्याच्यात उतरले किंवा नाही, तो दूसरा प्रश्न आहे. पण सगळ्यांना कर्तबगार होण्याबद्दल त्यांनी शिकवलं, आणि सांगितलं की, 'आधी तुम्ही हिंदी आणि मराठी भाषा शिका. इंग्लिश भाषा इतकी सोपी, कोणालाही येईल. पहिल्यांदा आपली मातृभाषा शिकली पाहिजे. आणखीन आपली राष्ट्रभाषा यायला पाहिजे.' इतके तेजस्वी त्यावेळेला लोक होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल. ४२ सालामध्ये माझ्यावरती खूप संकटं आली. पण सांगायचं म्हणजे असं, की तुम्हाला आश्चर्य वाटेल, अठरा वर्षाचं माझं वय होतं . पोलिसांनी मला भयंकर त्रास दिला. तेव्हा आईने एक पत्र माझ्या वडिलांना पाठवलं. त्यावेळेला विनोबाजी आले होते. त्यांना आईची जरा दया आली. तर विनोबाजींनी बोलवून मला सांगितलं की, 'हे बघा , तुम्ही काही करू नका. तुमच्या आईला एवढी काळजी वाटते वरगैरे.' माझे वडील पण तिथे होते. तेव्हा असं झालं होतं की ह्यांना वेल्लूर जेलला नेत होते. साईडिंगला नेऊन उभं केलं होतं. माझ्या वडिलांना मोठा राग आला. म्हणे, 'ह्या म्हाताऱ्याचं काही ऐकू नकोस. तू काय, माझी सर्व मुलं जरी मेली तरी मला चिंता नाही. पण असलं काही करायचं नाही.' स्पष्ट त्यांनी मला सांगितलं. असे तेजस्वी लोक! मला फार गर्व वाटला आणि असच माझ्या मुलांनी व्हावं असं मला वाटतं. ते आता अजून तुम्हाला दिसतंच आहे. मी सामूहिकच आहे. मला एकटीला राहता येत नाही. तुमच्याशिवाय माझं चालणार नाही. मी तुमच्याकडे येते, तुमच्यावर काहीही उपकार नाही. माझ्यावरच उपकार होताहेत. कारण माझा जीव तुमच्यासाठी तुटतोय. आईचे का कधी उपकार होतात? आईचं काहीही म्हटलं तरी, तुझे उपकार म्हटलं काय किंवा काही, तरी हे आईचं प्रेम आहे. त्या प्रेमाला काही पारावार नाही. ते देणारेय. तुम्ही काही केलं तरी देणार. आता त्याही लोकांना मी म्हटलं, त्यांनी एका माणसाला पकडून आणलं. त्याने दगड फेकला. मीही पाहिलं. पण म्हटलं, मारायचं नाही. तुम्ही त्याला मारायचं नाही. कोणीही मारायचं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, किती संत -साधू मंडळी आहेत. इतके मार बसले. कपाळ फोडून टाकलं. हाडं तोडून टाकली. सगळं काही केलं. मी म्हटलं, कोणीही कोणाला मारायचं नाही. आता १७ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-17.txt ही इतकी सुदृढ माणसं आहेत, की ह्या सगळ्यांना ठोकून, पिटून, ह्या सगळ्यांची हाडं मोडून टाकतील. कारण ते प्रकृतीने किती तुमच्यापेक्षा बरे आहेत. खाऊन-पिऊन आहेत. पण मी त्यांना म्हटलं की, कोणीही कोणाला मारायचं नाही. अगदी हात लावायचा नाही. पण इंडियन लोकांनीसुद्धा कोणाला मारायचं नाही. आमचे हिंदुस्थानात जे सहजयोगी आहेत त्यांनी कोणाला मारलं नाही. म्हणजे हे अगदी शांतीचे द्योतक ! खरंच आहे. गांधीजींनी नॉन व्हॉयलन्स शिकवलं. त्यातले हे द्योतक आहेत. एवढं सहन करणं ह्या लोकांना, म्हणजे मला आश्चर्य वाटलं. काल खरोखर मी म्हटलं, हे खरे संत -साधू आले. खरोखर त्यांच्या येण्यानेच तुमच्या देशाचं खरं कल्याण होणार आहे. कारण इतकं सहन केलं काल त्यांनी. अठरा माणसांना इतकं मारलं. कपाळ फोडलं, डोकं फोडलं. एकाला तर पॅरैलिसिस झाला. नंतर तुम्ही म्हणाल, ट्रिटमेंट केली वगैरे. त्यांना बरं वाटलं. हॉस्पिटलला गेले आणि इतके खोटारडे लोक आहेत, की आमची मिरवणूक पुढे गेल्यावर एक गृहस्थ तिथे आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, उलट सांगायला लागले, 'ह्या माताजी, ह्या लोकांना इथे घेऊन आल्या. घाणेरडी संस्कृती इथे घेऊन आल्यात.' अगदी घाणेरडी लोक आहेत. आता सहा वर्षापासून तुम्ही ह्यांना बघता आहात. हे लोक बिडीसुद्धा ओढत नाही. म्हणजे ह्यांच्याजवळ माचीससुद्धा नाही. किती संत-साधू आहेत! तुम्हीच सांगा. कशी मंडळी आहेत ही. त्यांचं वागणं कसं आहे आणि ह्यांच्याविरुद्ध इतकं बोलले. गाववाल्यांना चिथवलं. सरपंच म्हणाले, 'माताजी, खूप झालं!' आणि किती मारलं लोकांना! किती मारलं! हिंदुस्थानी लोकांना तर पुष्कळच मारलेलं आहे. पण पोलिस ठाण्यावरसुद्धा लोक जायला तयार नाहीत. त्या गावातल्या लोकांनी सांगितलं , 'आम्ही जात नाही. आम्हाला परत येऊन मारतील.' म्हणजे हे काय आहे? खुनशीपणा! अंधश्रद्धा निर्मूलन ह्याने होणार आहे का ? अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पहिल्यांदा आत्मसाक्षात्कारी व्हायला पाहिजे. अहो, तुकारामांनी तर शिव्या घातल्या त्यांना. विशेष शिव्या येतात त्यांना. मला तर फारच कमी येतात. त्यांना विशेष येतात. जे दिसेल ते. इतकेच नाही, रामदास स्वामींनी तर इतक्या शिव्या घातल्या ह्या लोकांना, की तुम्ही अशी अंधश्रद्धा करता. धर्माच्या नावाखाली पैसे खाता. धर्माच्या नावाखाली सगळं चालतं. सगळ्यांनी सांगितलं. ह्यांना सांगायला हे कशाला पाहिजेत शहाणे? आणि संतांच्या अंगावरती आले. म्हणजे आपल्या देशाचा सबंध वारसाच बुडवायच्या मागे आहेत. अशा लोकांना मुळीच तुम्ही पुढे येऊ देऊ नका आणि चांगलं पत्र पाठवा, की हे तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करता आहात....., बरं एकंदरीत जे झालं त्याबद्दल सांगायचं असं, की आपण क्षमा केली पाहिजे. क्षमा केल्यावरच त्यांची डोकी ठीक होतील आणि ते सर्व लोक ठीक होतील. पण पोलिसांचं तसं नाहीये. पोलिसांनी त्यांना धरलेले आहे. तेव्हा मी काही त्याबाबतीत बोलू शकत नाही. (अस्पष्ट) मी त्यांना धरून चांगलंच ठीक करणार आहे. त्यांचा बंदोबस्त करणार आहे. तेव्हा पोलिसांच्या बाबतीत आम्ही काही बोलू शकत नाही. पण तरीसुद्धा माझी अशी प्रार्थना आहे, की तुम्ही अशी प्रार्थना करावी की, 'प्रभू, तू ह्यांना सुमती दे. ते कोणत्या ह्याच्यात नाही.' हे असं म्हटल्यावरती तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही क्षमा करून टाका. पण सगळ्यांना फार राग आलेला आहे. मला माहिती आहे, गावातले लोक, बाहेरचे, इकडचे, तिकडचे, हे सगळे फार चिडले आहेत. इतकेच नव्हे, पण महाराष्ट्रात आमचं फार १८ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-18.txt कार्य झालेलं आहे. मला माहिती आहे. मी खेडोपाडी जाते. कोण जातं हो खेडोपाडी? कोण बघतं कोणाला आजकाल ? त्यामुळे सगळ्यांना इतका राग आलेला आहे, की मला ही भीती वाटते की आता विस्फोट नाही झाला पाहिजे. तुम्ही माझं नाव कायम ठेवलं पाहिजे. शांतीपूर्वक सगळं काही झालं पाहिजे. झालेलं आहे, ह्यांचं चुकलं. ह्यांचा मूर्खपणा आहे. जाईल तो सुद्धा. इंग्रजसुद्धा निघून गेले. त्यांनी आपल्याला एवढं छळलं. आज इथे किती तरी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्याच्यातले कमीत कमी ६० मंडळी तरी इंग्लिश आहेत. ते माझ्या चरणावर आहेत. आश्चर्य वाटेल आणि तुमच्या गळ्यात गळे घालून भेटतात. तुमच्याशी बोलतात. खेडेगावात जाऊन हे कसे शिकलेले आहे ? ते मी आता आपल्याला दाखवणार आहे. ह्यांचा प्रोग्रॅम होऊ द्या थोडासा. ह्याच्यानंतर तुम्ही चहापाणी म्हणाल तर ते. ह्यांनी एकनाथांची गाणी, तुकारामांची गाणी कशी म्हटलेली आहेत आणि ते कसं आपल्या सहजयोगाला वळवून घेतलेलं आहे, ते बघा. आणि संस्कृतमधील सबंध आदि शंकराचार्यांचं, सौंदर्य लहरीमधलं सबंध ह्यांना पाठ आहे. जे आपल्यालासुद्धा नाही. एकदा तुम्ही ऐका! तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हे संत कसे आहेत ? आणि तुम्ही म्हणता ते कदाचित माझ्या सहवासातच म्हणा, पण इतकं हे बहरेल, हे मला माहिती नव्हतं. अगदी बहरून गेलं आहे. आणि ह्याच्यात ३६ देशातले आम्ही निवडक लोक आणलेत. ३६ देशातले लोक आहेत. परवा रशियाला गेलो होतो, तर रशियाला एकेका ह्याला चार चार हजार माणसं यायची आणि नुसतं मी बसले होते त्या जागेलाच शिवण्यासाठी त्यांची धडपड होती. तिथल्या गव्व्हन्मेंटने आम्हाला मान्यता दिली आहे. अमेरिकेतल्या गव्व्हन्मेंटने आमचा 'विश्व निर्मल धर्म' स्वीकारलेला आहे. तो स्थापन झालेला, त्याला मान्यता दिलेली आहे. इटलीमध्ये तिथल्या गव्हन्मेंटने मान्यताच दिलेली नाही, तर माझ्याबद्दल एक पुस्तक छापलेलं आहे. ह्यावर्षी जे सगळ्यात मोठे पुरुष झाले किंवा मोठे लोक झाले आहेत आणि ज्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे त्यात मी आहे. म्हणून माझ्यावर एक पुस्तक लिहिलेले आहे. त्याशिवाय टकी हा मुसलमानांचा देश आहे. तिथेसुद्धा आमच्यासाठी त्यांनी सरकारी मान्यता देऊन कधीही या, कधीही जा अशी व्यवस्था केलेली आहे. इंग्लंडमध्येसुद्धा माझ्यासाठी, तुम्ही कधीही आलात, कधीही गेलात, अशी व्यवस्था केलेली आहे. माझी तुलना ह्या रजनीशबरोबर करतात. त्याला सर्व देशातून हकालपट्टी करून इथे घातलेले आहे. सगळे नुसतं असं त्याच्याच तोंडातून बोलत असतात. जसा काही तो 'संजय उवाच' आहे. आता ह्या मुलांच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं, की माझी फार इच्छा आहे, की ह्यांनी पुढेही प्रगती करावी. तेव्हा ह्यांचं तपशीलवार तुम्ही द्या. ही मुलं कोण आहेत ? काय आहेत ? त्यांच्यावरती लक्ष ठेवावं. इथून शिक्षण झाल्यावर आम्ही त्यांची व्यवस्था पुढेही करू शकतो. त्यांना नोकऱ्या देणं वरगैरे. म्हणजे आम्ही अशी जबाबदारी घेतली आहे. ती तुम्हाला सांगते. १९ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-19.txt कलेक्टिव्ह राहिलं पाहिजे CE राहुरी, ११ डिसेंबर १९८८ आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळीपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. ते जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे. आपली मुलंबाळं सांभाळली पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदार चरितानां वसुधैव कुटुम्बकम्, म्हटलेले आहे. ते उदार चरित्र कुठे आहे? आता सगळ्यांचं इथे असं म्हणणं आहे, की माताजी, आश्रमाला तुम्ही इथे जागा द्या. आश्रम घ्या. अहो, पण त्याच्यात राहणार कोण? ते आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा देते. तर म्हणे माताजी, तुम्ही रहाल. म्हणजे मी तिर्थ आश्रमात राहणार आहे? मला आश्रमात घालता का तुम्ही? माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे ? मला काय गरज आहे सहजयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे? मला तर सगळे मिळालेच आहे. मी आहेच ती. तेव्हा म्हणे तुमच्या राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करतोय . म्हटलं मुळीच करू नका. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देईन. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला. त्यासाठी पैसे दिले, सगळं काही झालं. तिथे रहायलाच कोणी तयार नाही. पैसे देऊन कोणी रहायला तयार नाही. हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण, की आपल्याला काही सवयी झालेल्या आहेत. त्यातली एक सवय अशी आहे, की आपलं एक घर असलं पाहिजे. मग त्यात पुष्कळ फायदे असतात. बायकोवर ओरडता येतं. जेवणाचं असं पाहिजे. मला हीच भाजी पाहिजे. मला ते नाही पसंत. मग नवर्याची पसंत बायको बघत बसते. आता आश्रमात काय ? सगळ्यांच्यासाठी स्वयंपाक केला तो खायला लागतो. सगळं काही असलं, तरी प्रत्येकाला वेगवेगळं काही मिळत नाही. तिथे नवऱ्याची मिजास कशी चालणार? बरं बायकोचंसुद्धा, मला ही खोली आवडते. मला हेच आवडतं. माझच घर असलेलं बरं. माझी मुलं आली म्हणजे त्यांना मी लाडू देणार. दुसरी मुलं आली तर त्यांना मी बोरं देणार. हे कसं चालणार! त्यामुळे होतं काय की आपल्यामध्ये अजून एकत्र कुटुंब पद्धती जी आपली विश्वाची आहे, त्याची अजून कल्पना आलेली नाही आणि ह्या लोकांचं बरं झालेलं आहे एका अर्थाने की ह्यांचे आई-वडीलच सुटले नशीबाने. त्यामुळे आता जो नवीनच आपण संसार थाटलेला आहे, हेच आपलं घर, हीच आपली आई, हेच आपले वडील, असं समजून हे सगळे मिळून मिसळून राहतात. इतक्या देशातले लोक आहेत ते मिळून मिसळून राहतात. त्यामुळे बघा किती कमाल आहे! कलेक्टिव्हची किती कमाल आहे. एक गाणं आता इथं गुरूजींनी म्हटलं, की ते तुम्ही एका वर्षानंतर ऐकून घ्या ह्यांचं. सगळ्या गावातून, सगळ्या देशातून, सगळ्यांच्या तोंडून ते गाणं येईल. पण तसं आपल्याकडे होत नाही. एकही गाणं. आरतीचं पुस्तक घेऊन लोक आरती म्हणतात म्हणजे काय म्हणावं महाराष्ट्राला, एकसुद्धा गाण सगळ्यांना बरोबर म्हणता येत नाही. परत सगळ्यांनी एकत्र रहाणं म्हणजे अशक्य गोष्ट २० 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-20.txt आहे. सगळ्यांनी एकत्र रहायचं म्हणजे अगदी अशक्य गोष्ट आहे. कारण प्रत्येकाला आपलं घर पाहिजे, आपली बायको पाहिजे, मुलं पाहिजे आणि त्यांचं सगळं आपापसात ठीक आहे. त्यात आता फक्त असं झालं पाहिजे, की मुलांनीच पळून निघायचं घरातून. म्हणजे मग ठीक होईल. त्याशिवाय काही मला मार्ग दिसत नाही आणि म्हणून आपली जी मुलं बाहेर लग्न करून पाठवलेली आहेत, त्यांच्याबद्दलही तक्रार आहे, की ह्यांना काही घरातलं काम येत नाही. हे राहूच शकत नाही. आश्रमात पळून जातात. आता इतक्या दिवसापासून घरात रहायची सवय झाल्यामुळे आश्रमाच्या त्या अफाट ह्याच्यात रहाणं त्यांना कठीण जातं. त्या सीमित गोष्टींनी रहाणाऱ्यांना ते कठीण जातं. पण आपल्याला जर सहजयोग करायचा आहे, तर आपल्याला आश्रमातच रहावं लागेल. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर मी आता त्यातून मध्यमार्ग काढला आहे शोधून. ते म्हणजे असं, इंडियन लोकांसाठी, तसं तर ते काही राहूच शकत नाही. म्हणून जिथे आश्रम असेल तिथे शनिवार, रविवार जाऊन रहायचं. फक्त. त्यात म्हणे, ते महाभारत सकाळी लागतं. मग आमचं कसं होणार माताजी? म्हटलं, अहो, एक टेलिव्हिजनही ठेवा आणि महाभारतही बघा. मग आणखीन काय करणार? अशा रीतीने एवढं मोठं का कार्य होणार आहे ? अशा 'येऱ्यागबाळ्यांचे काम नोहे, त्याला पाहिजेत जातीचे,' म्हणतात. अहो, आम्ही आमच्या वडिलांना, आईला पाहिलं. वर्षानुवर्षे जेलमध्ये खितपत पडले. आम्ही अकरा त्यांची मुलं आहोत. त्या गांधीजींमध्ये अशी कोणती करामत होती, की त्यांनी असं लोकांना देशोधडीला लावून एवढं कार्य करून घेतलं आणि आमच्यामध्ये असं काय कमी आहे, की तुम्ही लोक आमचं काही करत नाही. अशी कोणती गोष्ट आहे? एकच चुकलंय, गांधीजींनी सुरुवातीपासूनच त्यांना क्लेष उचलायला सांगितला. स्वच्छ करायचा. नोकर ठेवायचा नाही. मग ते अंगवळणी पडलं त्यांच्या आणि जर तुम्हाला राष्ट्रकार्याला यायचंच असलं, तर त्याच्यामध्ये सगळा त्याग केला पाहिजे. त्यागमूर्ती असले पाहिजे. त्यामुळे काय झालं की प्रत्येकाची त्याच्यात चढाओढ. सहजयोगात उलटं आहे, सहजयोगात सगळा आशीर्वाद आहे. आता माताजी, सगळं ठीक आहे, पण आमच्याकडे कोंबडी नाही. ती कशी मेली? ती नाही मेली पाहिजे. तेही माताजींनी बघितलं पाहिजे. असं कसं झालं? ..... पाणी उचलायचं. संडास आम्ही सहजयोग करतो, आमच्याकडे कोंबडी कशी नाही? आणि त्याचा माझ्यावर आरोप. तेव्हा सांगायचं असं आहे, की सहजयोगात सगळे आशीर्वाद असल्यामुळे जरासुद्धा कुठे खोच लागूच दिली नाही पाहिजे. खोच तर फार मोठी झाली. जराशी इजा नाही होऊ दिली पाहिजे. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, माताजी. मग हे असं झालं पाहिजे. हे मूल झालं पाहिजे. मुलगीच झाली, मुलगा झाला पाहिजे. म्हणजे मला इतकं काही धरलंय त्यांनी वेठीवर, म्हणजे तुम्ही सहजयोग करता नां, मग द्या. देता की नाही. तशीच मराठी भाषा आपली आहेच परखड! परखडपणे मलाच म्हणायचं, की तुम्ही आमचं हे भलं नाही केलं, तुम्ही आमचं ते भलं नाही केलं. ते भलं करा, हे भलं करा. अहो, पण कशाला? मला सहजयोग पाहिजे का तुम्हाला पाहिजे? पूर्वीच्या काळी लोक जात असत हिमालयात त्या थंडीत आणि तिथे कुडकुडत आणि त्यांचे गुरूजी लोक त्यांचे कपडे उतरवून टाकायचे आणि तसे बसा तिथे बर्फावर. एक लंगोट घालून बसायचे. बसा. त्यात त्यांची परीक्षा घ्यायचे. त्यात नाही काही जमलं तर द्यायचे दणादणु. तसला काही प्रकार आपण केलेला नाही. सगळ्यांना आसनावर बसवलं. हे दिलं , ते दिलं. झालं. पण आम्ही काही दिलं की नाही सहजयोगाला? विचार करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण अजून एकही पैसा सहजयोगाला दिलेला नाही. फक्त जेवणाचेसुद्धा पैसे द्यायचे लोकांच्या जीवावर येतं. आता पुण्याला मी म्हटलं, की बरं मी हिशेब बघते. कसं काय ते? का मिळत नाही पैसे? मागच्या २१ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-21.txt वेळेला ७५ माणसं फुकट जेवली. फु.कट..! सात दिवस. तर ह्यावेळेला मी असा नियम काढला, की मी सगळे पैसे इथे बँकेत जमा करते. बघते. तर '७५० रुपयाने ठरवलंय माताजी, मागच्या वेळेला खूप तोटा आला. तुम्हाला पैसे द्यावे लागले.' म्हटलं, 'बरं, ठीक आहे.' तुमचेच पैसे कमी होतात. म्हटलं, 'सगळ्यांच्या ह्याच्यातले शंभर मी देते बाकीचे तर घ्या.' तरी वाट बघत बसले, अणखीन ५० रू. कमी झाले तर बरं! इतक्या स्वस्तात स्वस्त करतोय आम्ही तरीसुद्धा 'त्यात पैसे थोडेसे वाचवता आले तर बरच होईल.' त्यातून एक पैसासुद्धा आपण कुठेही, कशालाही खर्च करत नाही. थोडी फार तुम्ही वर्गणी देत असाल ती, मला त्याचं काही माहिती नाही. पण सांगायचं म्हणजे असं, की आपल्याला एवढं मिळालेलं आहे. आपण काय सहजयोगाला देणार? काय मेहनत केली सहजयोगासाठी ? आपण परमेश्वरासाठी काय केलंय? मला काही नको. मला उगीचच तुम्ही साड्या वगैरे देता. काही त्याची गरज नाही. माझ्याकडे पुष्कळ आहे. कितीही डोकं फोडून सांगितलं तरी ऐकतच नाही कोणी. मला काहीही नको तुमच्याकडून. अगदी साडी देतात ती ही नको आणि जे काही तुम्ही पूजेचे पैसे देता त्याचीसुद्धा चांदीची भांडी घेऊन देते तुम्हाला. मला काहीही नको. पण सहजयोगासाठी तुम्ही मेहनत करा. स्वत: ची मेहनत करा. चार ठिकाणी भेटत जा आपापसात. बायकांना सांगितलं, दुसर्या बायकांना हळदी-कुंकवाला बोलवा. त्यांना सहजयोगाच्या गोष्टी सांगा. अहो, जर कोणाचा एखादा गुरू असला नां , तर तो भरमसाठ सांगत बसतो. मी एरोप्लेनने आले. एका गृहस्थाचा कोणी गुरू होता. तो आपला झेंडा घेऊन तिथे उभा. त्याने लेक्चरच द्यायला सुरू केलं, फर्स्ट क्लासमध्ये. 'माझे गुरू असे नी माझे गुरू तसे.' रस्त्यावर उभं रहायचं आणि गुरूचं व्याख्यान सांगत बसायचं. म्हणून सहजयोग पसरत नाही. त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. आशीर्वाद आहेत! पण जबाबदारी घेता का तुम्ही काही सहजयोगाची! का माझ्यावरच सारी जबाबदारी आहे ? आज इथे बसलेत ध्यानाला तर माताजी, आम्हाला शक्ती द्या, की आम्ही जबाबदारी घेणार. असं सगळ्या भारतीय सहजयोग्यांनी आपल्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे. निर्धार केला पाहिजे. अहो, ते शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला निघाले होते मराठे आता करताहेत काय म्हटलं? तर बस्त्याला जाऊन बसलेत म्हणे. गेले कुठे ते? का सगळे बाजारबुणगेच आहेत आपल्याकडे? तर तेवढा सैनिकपणा पण नाहीये. काही तुम्हाला सिंहगड चढायला म्हणत नाही. फक्त थोडसं लक्षात घेतलं पाहिजे, की आमची जबाबदारी आहे, वाढवण्याची. जसं एक दारूडा असं म्हणतो की, मी दारू पितो, तर इतरांनाही वाटलीच पाहिजे. तर तसेच आता तुम्ही आनंदाचा एवढा उपभोग घेता तो दुसर्यांना दिला पाहिजे, एवढी जबाबदारी तुम्हाला वाटली पाहिजे. सहजयोग तसेच बायकांनाही सांगायचं आहे, बायकांना बोलवा. त्यांचं अस म्हणणं आहे, की इकडे सगळे बुद्धिजीवी आहेत. बायका तर बुद्धिजीवी नाहीत. बायकांच्या थ्रू काम करा. ते बरं काम होतं . हळदी - कुंकवाला बोलवायचं. हळदी-कुंकू द्यायचं. त्या बायकांना सांगायचं आहे, हे असे असे आहे. आम्हाला हा फायदा झाला. हा चमत्कार झाला. चमत्काराचे फोटो दाखवा, की त्या बायका आपल्या पुरुषांना ठीक करणार. बायकांच्या थ्रू गांधीजींनीही कामे करवली. गांधीजींनी सांगितलं, की मला हरिजन उद्धार करायचा आहे, तुमच्या बांगड्या उतरवून द्या. सगळ्यांनी आपल्या बांगड्या सरळ सरळ त्यांना दिल्या. मी तसं काही म्हणत नाही हं ! तसं काही नाही. पण हळदी- कुंकवाला बायकांना बोलवायचं, सगळ्यांनी मिळून. हळदी-कुंकवाला या आणि तिथे हे करा. २२ 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-22.txt EGO १ भी तरी ठरवलं आहे. गुरमंत्र वगैरे काहीही देत नाही. कारण कारय आहे की त्याच्यातच मन अंडकतं. ज२ तुमची प्रगती प्रत्येक क्षणी होईल, त२ भी कोणती मंत्र देऊ तुम्हाला? काहीही गुरूमंत्र नाही. मला फक्त आई मानी म्हणजे मिळवलं. ढदू२ काही नाही. आईस्वरूपात पाहिलं म्हणजे पुष्कळ, लवकरसगळं समजतं. पं.पू.श्रीमाताजी, मुंबई, ११/३/२००० प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in म 2016_Chaitanya_Lehari_M_IV.pdf-page-23.txt हिं सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की झमानुभव प्राप्त करने स्थितप्रज्ञ बना. सर्व प्रलोभनं, अहंकार, सर्व बंधनांपासून मुक्त होऊन स्थितप्रज्ञ बना. स्थितप्रज्ञ सि्थितीत मनुष्य साधारण मनुष्याप्रमाणे विचार करत नाही आणि ना ही सामान्य व्यक্ধीप्रमाणे औौतिक वस्तूकडे आकर्बित होतो. अशी व्यक्ती पूर्णवणे निर्लिघ्त होते. त्याची कोणतीही तक্रार नसते आणि ना ही त्याला ईव्य्या असते. हे सगळ श्री कृष्णांनी सांगितलं आहे. ए.पू.श्रीमाताजी, ५/९/१९९९, कबेला, इटली