चैंतन्य लहरा सप्टेंबर-ऑक्टोबर २०१६ मराठी ाम म ६ 15 या अंकाल स्व म्हणजे तुमचा आरसा ४ ...8 (पूजा, अलिबाग, २१/१२/१९८६) कलेक्टिव्हिटीला यायला पाहिजे ...७ (सार्वजनिक कार्यक्रम, पुणे, १९८०) योग ...१८ ( पूजा, नासिक, १९८५) तीन शक्त्या ..२२ (सेमिनार अँड मिटिंग, दादर, २३ जानेवारी १९७५) देवीच्या सवं अवतारांच्या वेळी ब-्याच असूरी शक्त्या पण पृथ्वी व२ अवतरित झाल्या आणि देवीला युद्ध करून त्यांचा विनाश करावी लागली. हा विनाश फक्त असूरी शक्तींना संपर्वणे यासठीच नव्हता. हा याठी होता, की ह शक्त्या क तसेच संतांनी त्रास देण्याचा, त्यांचे नुकन क२ण्याची प्रयतन करीत असत. पं.पू.श्रीमाताजी, नवरात्री पूजा, २४.१०.१९९३ व म्हणजे तुमचा आरसा अलिबाग २१ डिसेंबर १९८६ हा आरसा बघण्यासाठी, की त्याच्यातलं सौंदर्य काय आहे ते बघण्यासाठी म्हणून हा आरसा तयार केला. सर्व सहजयोगी मंडळींना आमचा प्रणिपात असो ! सुरुवातीला मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, नंतर मराठीत बोलेन. आता ह्यांना मी असं सांगत होते, की पुष्कळ लोक असं विचारतात की देवाने हे जग कशाला निर्माण केलं? या जगाची काय गरज होती ? तर त्याचं कारण असं आहे, की देव हा सौंदर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा स्रोत आहे आणि तो स्वत:ला बघू शकत नाही. त्याला हे कळत नाही, की केवढा मोठा स्रोत तो आहे. तसेच तुम्ही सहजयोगीसुद्धा त्याचा स्रोत आहात. म्हणून देवाने हा सबंध आरसा त्याच्यासाठी तयार केला. हा आरसा बघण्यासाठी, की त्याच्यातलं सौंदर्य काय आहे ते बघण्यासाठी म्हणून हा आरसा तयार केला. आणि ह्या आरशात बघून देव संतुष्ट होतो. पण ह्या आरशात आणखीन एक त्याला बघायचं आहे, ते म्हणजे असं, की मानवामध्ये हा आरसा जागृत झाला की नाही. जो मी मानव तयार केलेला आहे, जो मी मनुष्य तयार केलेला आहे, त्या मनुष्यामध्ये हे सौंदर्य आलं की नाही? त्याला ह्याची जाणीव झाली की नाही, की तो किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये किती गुण आहेत, तो किती महत्त्वाचा आहे, तो किती मोठा आहे. हे सगळे जाणण्याची त्याच्यामध्ये पात्रता आली की नाही? तुकारामांनी म्हटलेले आहे की, 'अणू-रेणूहूनही थोडका, तुका आकाशाएवढा.' मी ह्या अणूरेणूपेक्षा जरी लहान असलो तरी आकाशापेक्षा मोठा आहे. ज्याने हे एकदा बघितलं स्वत:बद्दल, मग तो क्षुल्लक गोष्टींसाठी, भलत्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य घालविणार नाही. व्यर्थ गमवणार नाही. आपलं आयुष्य ह्या क्षुल्लक गोष्टींकरता गमावणं फार मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आता अनेक घाणेरडया गोष्टी आलेल्या आहेत. ते आपल्याला माहिती आहेत. आता दारू पिणे. कोणी म्हटलं, दारू पिऊ नका, तर कोणी ऐकणार नाही. उलट अर्धे लोक तर रागावून निघून ४ ८० जातील. पण जेव्हा तुमचा हा आरसा, म्हणजे तुमचा आत्मा जेव्हा जागृत होतो, तेव्हा त्या आरशात तुम्ही स्वत:ला बघता. 'आणि ही काहीतरी घाणेरडी वस्तू आहे, ह्या घाणेरड्या वस्तूमुळे आम्हाला त्रासच होणार आहे,' हे लक्षात येऊन तुम्ही आपोआप ते टाकून देता. दूसरं आहे, माणसामध्ये अहंकार असतो. त्याचा उद्दामपणा, ज्याने लोकांना आपण दुखावतो, त्रास देतो. ह्या अहंकारालासुद्धा, हा आरसा जागृत झाल्यावर तुम्ही बघू शकता. ते कितीही तुम्ही वाचन केलं, कितीही तुम्ही देवाचं नाव घेतलं, कितीही देवाच्या नावाने धिंगाणा घातला, तरीसुद्धा ते दिसणार नाही. फक्त आत्म्याचा प्रकाश जेव्हा स्पष्टरूपाने तुमच्यामध्ये दिसेल, तेव्हा त्या आत्म्याकडे तुम्ही बघायला लागाल, तर तुमच्या लक्षात येईल, की हे काहीतरी आपल्याला विसंगत आहे. आपण इतके सज्जन आहोत, इतके मोठे आहोत, देवाने आपल्याला किती मोठे बनवलं आहे, आपण काही जनावर नाही आहोत. पशू नाही आहोत. माणसाला आपल्याला सुबुद्धी दिलेली आहे. इतकंच नाही तर आपल्याला स्वतंत्रता दिलेली आहे, की जी परम स्वतंत्रता आहे, ती आपण मिळविली पाहिजे. मग ही फालतूची गुलामी कशाला करायची! असे व्यसनं लावून गुलामी कशाला करायची! आम्ही जर स्वत:च एवढे स्वतंत्र आहोत, आमच्या 'स्व' च्या तंत्रात आम्ही चालतो, तर आम्हाला ही गुलामी काय कामाची? म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं , की स्वधर्म ओळखावा. 'स्व' चा धर्म ओळखला पाहिजे. 'स्व' म्हणजे तुमचा आरसा, जो तुमचा आत्मा आहे, तो तुमचा आरसा आहे. तो मिळविला पाहिजे. आता खेडेगावातून आपल्याकडे अशा पुष्कळ विचित्र कल्पना आहेत देवाबद्दल, की त्याचं मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं. पुष्कळ लोकांना असं वाटतं की देव वगैरे सगळे अंगात येतात, घुमतात. पुष्कळ बायकांना असं वाटतं, की आपल्यामध्ये देवी येतात. आता सांगायचं म्हणजे देवीला झेलणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. देवीची शक्ती असते आणि त्या शक्तीने कुंडलिनी जागृत होते. ज्या बाईच्या अंगात भुतं येतात, तिला तुम्ही जर देवी म्हणाल, तर तुम्ही परमेश्वराच्या विरोधात आहात. ही भूतं आहेत आणि त्या बाईला त्रास होतो. मानसिक त्रास होतो. इतकेच नाही, तर घरच्या सर्व लोकांना दारिद्रय येते. तिच्याकडे जाणाऱ्या लोकांना त्रास होतो. त्यांना दारिद्रय येते. म्हणून अशा गोष्टींकडे आपण भोळेपणाने गेलं नाही पाहिजे. तसंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात पाहिलं तर एक कोणी ना कोणी तरी असा मनुष्य, अशी बाई असते, जे काही तरी अशी कामं करीत असतात. विशेषत: कोकणात जास्त असतं. आता ह्या वर्षी बरं वाटतंय मला इतकं नाहीये. काहीतरी सांगायचं, की अमक्याकडचं भूत आलंय, तमक्याकडचं भूत आलंय. अशा रीतीने गोष्टी करायच्या, की लोकांना नुसतं भारावून टाकायचं. अशा भारावून टाकलेल्या लोकांना मूर्खात काढून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. ही आपल्याकडची एक प्रथा झालेली आहे. नंतर कोणी तरी येऊन बसायचं, भटजी बनायचं आणि म्हणायचं की एवढे पैसे दे. देवाला पैसे वगैरे काही कळत नाही. देवाला पैसे नकोत तुमचे. देवाला फक्त एकच गोष्ट पाहिजे, की तुम्ही स्वत:च्या आत्म्याचा आरसा हाती घ्यावा आणि त्यात आपलं स्वरूप बघावं. पण त्याबद्दल असं सांगितलेलं आहे, की जेव्हा हा हाती आरसा येतो, तर ह्याची जी आपल्याला अस्पष्ट कल्पना येत असते, ती स्पष्ट करण्यासाठी आणि स्थिरावण्यासाठी मनुष्याला ध्यान आणि धारणा केली पाहिजे. ५ म्हणून आधी कुंडलिनीचं जागरण आणि त्या नंतर ध्यान-धारणा करून, पूर्णपणे आपण स्वत:ला जबाबदार समजून, स्वतंत्र समजून आपल्या आसनावर आरुढ़ झालं पाहिजे. आसनावर बसलं पाहिजे. आम्ही काही असे तसे नाही आहोत. आम्ही मानव आहोत. आम्ही काही आमचं आयुष्य असं वाया घालण्यासाठी आणलेलं नाही. आम्ही आमची काही कदर केलेली नाही आजपर्यंत. पण ती आत्म्याची ओळख झाल्याबरोबर लगेच मनुष्य स्वत:ला ओळखू लागतो आणि त्याच्यातले वाईट गुण आहेत ते झडून पडतात. आता आमच्या इंग्लंडला, जेव्हा मी सहजयोग सुरू केला होता, तेव्हा सात असे लोक आले की जे पुष्कळ इकडची-तिकडची व्यसनं घेत असत. आणि एका दिवसात, त्याच दिवशी त्यांची सगळी व्यसनं सुटली. आता व्यसन ही गुलामगिरी आहे. जरी त्याच्यात तुम्हाला आनंद वाटतो, तरी ती एक गुलामगिरी आहे. कोणतीही गुलामगिरी पत्करायची नाही, असं ठरवलं पाहिजे. असं ठरवल्यानंतर हा जो आत्मा आहे, तो स्पष्टरूपाने दृष्टोत्पत्तीस पडतो. त्याचा आपल्याला परिणाम जाणवतो आणि त्या परिणामामुळे जे काही आपल्यामध्ये नको आहे, ते निघून जातं. पण त्याच्याआधी नको तेच आपल्याला आवडतं. जे वाईट तेच आपल्याला आवडतं. जे चुकीचे तेच आपण घेतो. तेव्हा मी एक आईच्या दृष्टीने सांगते, की कोणी वाईट वाटून घेऊ नये. जर व्यसन असलं तर त्याबद्दल घाबरू नये. आत्म्याच्या जागृतीने सगळ्यांची व्यसनं सुटणार. सगळ्यांची गुलामी सुटणार. सगळ्यांची गरिबी सुटणार आणि सर्व तऱ्हेचे जेवढे काही क्लेष आहेत, त्रास आहेत, शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच सांसारिक, सगळेच्या सगळे तुमचे त्रास ह्याच्यातून जाणार आहेत आणि ते झालेच पाहिजेत. तेव्हा ह्या गावाला आम्ही आलो, चाळगावाला, आणखीन ह्या लोकांनीसुद्धा इथे येऊन, इथली पवित्रता पाहिली, तुम्हा लोकांना भेटले. तुमच्याबरोबर नाचले आणि खूप आनंदात होते. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढा सत्कार केला, सगळ्यांना स्वयंपाक करून इतकं सुंदर जेवायला दिलं त्याबद्दल त्यांनी मला सांगितलंय की, 'माताजी, तुम्ही ह्यांना सगळ्यांना कृतार्थ करा.' आता आमची जी पद्धत आहे, की आम्ही ज्या गावाला जातो, तिथली जी मालकीण असते, तिला एक काहीतरी बक्षीस द्यायची पद्धत आहे. त्याप्रमाणे इथे, आपले जे, तुम्हाला माहिती आहे, की हरिश्चंद्र कोळी म्हणून जे आहेत, त्यांनी एवढी मेहनत केली, हे घर स्थापन केलं, सहजयोग इथे स्थापन केला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांची एवढी मदत केली. तेव्हा त्यांना फूल न फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यायचं आहे. बाकि सर्व लोकांनाच काहीतरी द्यायचं आहे. आणि ते काहीतरी द्यायचं म्हणजे ज्याला आपण आशीर्वाद म्हणतो. ह्या आशीर्वादामध्ये तुमच्या कुंडलिनीचं जागरण करून तुम्हाला तुमच्यामध्येच समर्थ करायचं आहे. तुमच्यामध्ये तुम्हाला उभं करायचं आहे. तुमच्या गौरवाची तुम्हाला पूर्णपणे समज येईल तुमच्या मोठेपणाची तुम्हाला समज येईल, त्याची सुज्ञता तुमच्यात येईल, असं काहीतरी करून जायचंय. म्हणजे मग पुढच्या वेळेला आल्यावरती इथे सबंध लोक फार सुंदर दिसतील आणखीन त्यांच्या चेहऱ्यावरती एक तजेला, त्यातून त्यांच्या हृदयामध्ये जशी काही कमळाची फुलं उमलावीत असं सुंदर स्थान परमेश्वरासाठी तयार केलेलं आहे. माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. ६ कलेक्टिव्हिटीला यायला पाहिजे पुणे, १९८० या भारत भूमीच्या योगभूमीत महाराष्ट्र म्हणजे हिरा आहे, याबद्दल काही शंका नाही. लोकांमध्ये भक्तिभाव आहे, समज आहे. त्यातल्या त्यात पुणे हे शहर महाराष्ट्राचं डोकं आहे असं लोक म्हणतात. पण सगळी कामं डोक्याने होत नसतात. त्याला हृदय ही लागतं. हे डोकं जर जास्त चालू लागलं तर हातही बंद पडतात आणि हृदय ही बंद पडतं. या पुण्यामध्ये जेव्हा मी हे कार्य सुरू केलं होतं, तेव्हा फार तर दहा-बारा मंडळी होती आणि हळूहळू हे कार्य वाढू लागलं. त्याला कारण असं आहे की कोणतीही जिवंत गोष्ट करायची म्हणजे त्याला वेळच लागतो. एक जर झाड लावलं तर असं म्हणता येत नाही की पहिल्याच वर्षी अनेक फळं येतील. त्याला वेळ यावी लागते आणि तेव्हाच हे झाड फलद्रूप होतं. त्यातही जे झाड समजा राहुरीला लवकर फलद्रूप होईल, नगरला होईल , ते पुण्याला तितकेच लवकर होईल असं म्हणता येत नाही आणि मुंबईला कधी होईल काही म्हणता येत नाही. त्याला कारण शहरातली मंडळी डोके फार चालवतात. डोके जास्त चालवून परमेश्वर मिळत नाही. कारण परमेश्वराला या लहानशा डोक्याने आपण आत्मसात करू शकत नाही. त्याला मोठं हृदय पाहिजे. मोठ्या हृदयानेच आपण परमेश्वराला आपल्यामध्ये बघू शकतो. आपल्या हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे, असं अनेक साधू-संतांनी सांगितलं आहे. तसंच आपल्यामध्ये कुंडलिनी नावाची शक्ती आहे हे ही सांगितलं आहे. जे आपल्याला हिंदू म्हणवतात आणि हिंदू म्हणून मोठीमोठी संघटना बनवतात, ते मात्र विसरलेत, की या हिंदू धर्माचे प्रणेते आदि शंकराचार्यांनी कुंडलिनीचं वर्णन इथून तिथपर्यंत केलेले आहे. इतकेच नव्हे तर चैतन्य लहरी मिळवणं हेच आपलं परम कर्तव्य आहे आणि ते 'न ७ सर्व जगावर योगेन न सांख्येन' कशाने होत नाही. फक्त आईच्याच कृपेने होतं असं म्हटलं आहे. शेवटी त्यांनी सौंदर्य लहरी' म्हणून एक फार सुंदर, फारच सुंदर पुस्तक लिहिलेले आहे आणि त्यात त्यांनी फक्त आईचेच वर्णन केलेले आहे. देवीचं, शक्तीचं , आईच वर्णन केलेले आहे. प्रत्येक अंग-प्रत्यंगात कोणती कोणती शक्ती आहे आणि त्या कसं कार्य करून घेतात वगैरे फार फक्त परमेश्वराचेच सुंदर..... मलासुद्धा आश्चर्य वाटतं की इतकं ह्यांचं ज्ञान होतं ! म्हणजे मार्कडेयाच्या वर होते साम्राज्य आहे ते. फार सुंदर वर्णन करतात. अशा त्या आदि शंकराचार्यांनासुद्धा आपण विसरून गेलो आणि आपण काहीतरी नवीन तऱ्हेचा हिंदू धर्म काढलेला आहे. आणि तो नवीन धर्म कुठेतरी, काहीतरी अंधश्रद्धा, भलत्या ठिकाणी पैसे ओतणे, तसंच आपल्या बुद्धीने काहीतरी नवीन नवीन विचार काढून, नवीन नवीन तऱ्हेचे धर्म काढणे. त्यात पांगापांग करणे वगैरे वरगैरे अनेक प्रकार हिंदू धम्मातसुद्धा आणि बाकी सगळ्यांचे सामज्य झालेले आहेत. त्याला कारण मुख्य असं, की जर तुम्ही कोणत्याही गोष्टीची अशी व्यवस्था म्हणजे हे एक केली तर त्याच्यासाठी सरकार आहेत, कायदे आहेत. प्रत्येक गोष्टीला कायदा आहे, सरकार आहे. पण धर्माच्या बाबतीत असं नाही. धर्माच्या बाबतीत कोणीही काहीही म्हणावं. म्हणजे कही तरी नेपोलियननेसुद्धा देवावर ताशेरे झाडलेले आहेत. हिटलरनेसुद्धा देवाबद्दल भाषणं दिलेली मिथ्या. आहेत. म्हणजे कोणीही उठालं आणि परमेश्वराबद्दल बोललं तर त्याला कोण धरणार? त्याला कोण पोलीस धरणार? त्याला काही कायदा नाही, कानून नाही, काहीही नाही. त्याचे काही परिणाम नाहीत. तसंच साधु-संतांना देखील छळलं, तर त्याचे काही परिणाम होतात, असं म्हणतात नरकात वरगैरे जातो, ते पाहता येईल. पण सध्या तरी, काही होत नाही असा विचार करून लोक हे विसरतात, की सर्व जगावर फक्त परमेश्वराचेच साम्राज्य आहे आणि बाकी सगळ्यांचे साम्राज्य म्हणजे हे एक काही तरी मिथ्या. एखाद्याने म्हणायचं की आम्ही शिवाजी महाराज आहोत. म्हणून ते काही शिवाजी महाराज होत नाहीत. जे शिवाजी महाराज होते, तेच शिवाजी महाराज होते. पण आपण नाटक करू शकतो आणि थोडा वेळ आपण असा विचार करू शकतो, की आम्ही ह्या जगावरती साम्राज्य करीत आहोत. पण जो ह्या जगावर साम्राज्य करतो तो परमात्मा आहे. त्याचं एक साधं उदाहण मी तुम्हाला सांगते, की जर तुम्हाला एका फुलापासून फळ तयार करता येत नाही, एक ही जर तुम्हाला जिवंत कार्य करता येत नाही, तर तुम्ही करता काय? आपल्या डोक्याला थोडासा तुम्ही हा प्रश्न विचारा. तुम्ही आपल्या डोक्याने आजपर्यंत केलं काय? जे केलं हे दगड-धोंडे! त्याच्या पलीकडे तुम्ही काय केलेले आहे ? त्या डोक्याने तुम्ही मिळवलं काय? तुम्ही चिकित्सा एवढी केली, भांडणं केली. एकमेकांची डोकी फोडण्या पलीकडे तुम्ही केलं काय? फार सायन्स सायन्स करून तरी केलं काय ? अॅटम बॉम्ब बनवून ८ ठेवलेला आहे आणि भुतासारखा तुमच्या डोक्यावर बसलेला आहे. आता तुम्हाला समजत नाही, की हा कधी आपल्या डोक्यावर येईल. त्या क्षणात सबंध विश्व नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. परदेशामध्ये माझे पुष्कळ जाणं-येणं असायचं. आता वास्तव्यच झालं आहे मुळी. तिथल्या लोकांना पाहून तर मला आश्चर्य वाटतं, की हे जे लोक बुद्धीच्या आधारे चालत गेले, ते कुठल्या कुठे जाऊन भरकटलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची अक्कल राहिलेली नाही. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, की आता इथे हे जे गृहस्थ बसलेले आहेत, त्यांनी हजारो अशा, बिचार्या शिकलेल्या पढतमूर्खांना अगदी मूर्खात काढून आणि असे जे कपडे वरगैरे घातलेले आहेत, की ज्या कपङ्यांना घालून त्यांना असं वाटतं की आपण संन्यासी झालो. आपण उच्चपदाला गेलो आणि इतकेच नाही, पण त्यांनी हे ही सांगितलेले आहे, की अधम कार्य करून तुम्ही परमेश्वराला मिळवू शकता आणि ते त्यांनी मानून घेतलं. म्हणजे जे काही आजपर्यंत झालेलं आहे, जेवढं काही शास्त्रशुद्ध आहे ते सगळं चुकीचं आहे. हे सुद्धा बुद्धीने मनुष्य स्वीकारू लागला. तेव्हा ह्या बुद्धीची कमालच म्हटली पाहिजे. जे काही ज्ञानेशांनी सांगितलं किंवा मोठ्या मोठ्या सगळ्या अवतरणांनी सांगितलं गेलं की तुमचा परत जन्म झाला पाहिजे, तुमच्यात परिवर्तन आलं पाहिजे, ते काही खोटं नव्हतं. ती गोष्ट काही खोटी नाहीये आणि तीच गोष्ट आज आम्ही इथे सिद्ध करायला आलेलो आहे . जे त्यांनी भाकीत केलं होतं ते भाकीत आज पूर्ण होणार आहे. त्याची वेळ आली म्हणून आणि ती वेळ पुण्यातही आलेली आहे. सगळ्या विश्वात आलेली आहे आणि त्या वेळेचा पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे, असं एका आईचं तुम्हाला सांगणं आहे. त्याबद्दल तुम्ही जर चिकित्सा करायचं म्हटलं, तर उगीचच वेळ घालवाल आणि जे तुमचं आहे ते मिळविण्याच्या ऐवजी त्याला तुम्ही मुकाल. तेव्हा त्याबद्दल ह्या दृष्टीने विचार केला पाहिजे, की जर कुंडलिनीची जागृती वाचून आणि अभ्यासाने होत असती तर मग पुष्कळशा गरीब लोकांना किंवा अशिक्षित लोकांना कुंडलिनीची जागृतीच होणार नाही. जर कुंडलिनीची जागृती हे एक जिवंत कार्य आहे, तर त्याच्यामध्ये वाचन करून, तुम्ही वाचन करून जर एका 'बी' तून रोप काढून दाखवले, तर जे म्हणाल ते आम्ही हारू शकतो. हे एक जिवंत कार्य आहे आणि त्या कार्यामध्ये उत्क्रांतीत तुम्ही आज अमिबाचे मानव झालेले आहात, त्याच्या पुढची पायरी यायला पाहिजे. ती का यायला पाहिजे ? तुम्हाला अजून तुमचा अर्थच लागलेला नाही. तुम्ही समर्थ आहात. तुम्हाला माहितीच नाही अजून, की तुम्ही जगात आला कशाला आहात ? तुमचा उपयोग काय? दोन-चार पैसे एकत्र करण्यासाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी आपण काही संसारात आलेलो नाही. निदान माणसाने आपली तरी एवढी किंमत करू नये, की आपण दोन-चार पैसे, गाढव मेहनतीसाठी ह्या जगात आलो, गाढवासारखं राबायचं, मुलाबाळांना पोसायचं, म्हातारपणी त्यांचे जोडे खायचे आणि मरायचं. ह्यासाठी काही आम्ही जन्माला आलेलो नाही! परमेश्वराने आपल्याला एवढ्या मेहनतीने मानवस्वरूप दिलेले आहे. ते एवढ्यासाठीच दिलेले आहे! तेव्हा हे कशासाठी दिलेले आहे? जर कोणतीही वस्तू आपण बनवत असलो, तर लोक विचारतील, की ९ काहो, एवढी मेहनत करून तुम्ही का बनवता आहात ? ह्याचा उपयोग काय ? आपण परमेश्वराचं एक साधन आहोत, असं सगळ्या साधु-संतांनी सांगितलं आहे. ते साधन आपण झालं पाहिजे. ते कसं होणार? त्याच्यासाठी लोक धडपडतात, पूजा-पाठ करणे, मंत्र, अमुक-तमुक. गुरू कर, अमक कर, तमकं कर. जगामधल्या गोष्टी करूनसुद्धा, 'आम्ही साधन झालो. आता आम्ही परमेश्वरामध्ये रममाण झालो.' अशा रीतीने काहीतरी एक खोटी, भ्रामक कल्पना डोक्यामध्ये घेऊन बसायचं. ही गोष्ट प्रत्यक्षात घडली पाहिजे. ते तुमच्यात झालं पाहिजे. ते दिसलं पाहिजे. तुम्हाला डोळ्यानेसुद्धा कुंडलिनी दिसू शकते. तिच स्पंदन दिसू शकतं. तिचं वर चढणं दिसू शकतं. ते तुम्ही बघू शकता. ती वर चढल्यावर, ब्रह्मरंध्रात पोहोचल्यावर, तुमच्या टाळूच्या ठिकाणी तिचे स्पंदन तुम्हाला जाणवू शकतं. तुम्ही जाणू शकता. तुम्हाला ते ऐकायला येईल. जसं काही इथे हृदय धडकतं आहे असं हृदयासारखीसुद्धा ती तुम्हाला त्रिकोणाकार अस्थीमध्ये दिसू शकते. हे कुंडलिनीचं जागरणं इथे, पुण्याला हजारो लोकांनी पाहिलेलं आहे. तुमच्यातसुद्धा असे पुष्कळ लोक आहेत ज्यांनी हे पाहिलेले आहे. ते तुम्हाला वाटेल. पण हे का? ही जागृती का होते ? कारण तुम्हाला अर्थ लागला पाहिजे. तुमच्यात परिवर्तन यायला पाहिजे. आज मनुष्य आपण म्हणतो, कितीतरी मी इथे आल्यापासून ऐकते आहे, की आपल्या देशामध्ये हे ठीक नाही, ते ठीक नाही. मनुष्याला लाचलुचपत पाहिजे. त्याला अमकं पाहिजे. त्याला हे झालं पाहिजे. ते झालं पाहिजे. सर्व तऱ्हेचे त्रास डोक्यावर आहेत. का आहेत ते त्रास? परमेश्वराने हे त्रास केलेले नाहीत. हे मानवाने त्रास केलेले आहेत. हा पैसा खातो, त्याने त्याला मारून टाकलं, तिकडे ती दुष्टता चाललेली आहे, तो धर्मांध आहे. अमुक आहे, तमुक आहे. हे सगळं काही परमेश्वराने सांगितलेले नाही. पण हे मानवाने केलेले आहे. कारण काय? कारण त्याला अज्ञान आहे. अंधारात आहे तो. अंधारात तो भांडत असतो. अजून त्याला चाचपडत असतांना जे काही सापडलं तेच माझं आहे, असं समजून सगळे काही दिसलेले नाही. म्हणून तो असं म्हणतो, की हे माझं, हे माझं, हे माझं. जेव्हा प्रकाश येतो, तेव्हा माणसाला समजतं, की हे सगळे काही आहे. उगीचच मी भलतेच घेऊन बसलो आणि त्यासाठी भांडत होतो. त्याच्यासाठी मी केला, त्याचासाठी मी एक संस्था काढली, त्याच्यासाठी मीच खरा ग्रुप असं म्हणत होतो. तेव्हा तो प्रकाश आपल्यामध्ये आला पाहिजे. प्रकाश आल्यानंतर एकदम परिवर्तन होतं. साधी गोष्ट आहे. अंधारात जर एखादा मनुष्य झोपला, तर उठून सकाळी आपलं सगळें काही करतो. त्याला काही लक्षात येत नाही. पण जेव्हा दिवा लावल्याबरोबर, आरशात पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात येतं, 'अरे मी असे कसे कपडे घातले. माझे केस कसे विंचरलेले आहेत. ते नीट झाले पाहिजेत. माझ्या हातात काय आहे ? कपड्यांना कशी घाण लागलेली आहे.' सगळं काही त्याच्या लक्षात येतं. जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत परिवर्तन कसं होणार? मी जर म्हटलं की तुम्ही ही वस्तू करू नका, हे तुमच्यामध्ये चुकलेले आहे. लगेच तुम्हाला राग येणार. आणि बरोबरच आहे. कारण तुम्हाला दिसत नाही ते मला दिसतं. तेव्हा जर प्रकाश तुमच्यात आला, तर प्रकाशात तुम्ही तुमच्याबद्दल बघू शकता. १० ते जान स्वत:बद्दल जाणू शकता. आणि मग तुम्हाला वाटेल, की खरंच आहे. माताजी म्हणतात तसं आहे आमच्यामध्ये! हे तुमच्यामध्ये घडलं पाहिजे आणि हे घडल्यानंतरच परिवर्तन येणार. परिवर्तनाशिवाय काहीही इलाज नाही. तुम्ही काहीही करून बघा. लोकांनी मोठमोठाल्या आल्यावरच मिरवणुका काढल्या, अमुक झालं, तमुक झालं. साखरेच्या किंमती कमी करा, अमुक करा. काय ह्याच्यात ठेवलेले आहे. आकाशाला ...... (अस्पष्ट) बांधणे. हे नसलं तर दूसरं काहीतरी. ते नाही मिळालं तर तिसरं काहीतरी. आपल्याकडे केव्हापासून ही चळवळ मनुष्य आपल्यामध्ये चाललेली आहे. त्या चळवळी काही संपत नाहीत आणि त्याने मिळालं काय लोकांना ? एक परिवर्तन तरी मनुष्य जगात सुखी दिसतो आहे का? एकाला तरी सुख मिळालं आहे का? म्हणजे काय ? म्हणजे काही तरी आपल्यामध्ये असं आहे, जे फारच अति खोल आहे. जे आपल्याला स्वत:च करून मिळालेले नाही. म्हणूनच मनुष्य असा दुःखी आणि चळवळा झालेला आहे. त्याला जर शांत घेतो. कारण करायचं आहे, त्याला जर काही मोक्यावर पोहोचवायचं आहे, तर त्याला मिळालं पाहिजे. जे तो शोधत आहे. ल्याला केवळ आता आपल्या आतूनच आपण ते शोधत आहोत. हा शोध आपल्यामध्ये चालू आहे. जযच येत पुष्कळ लोक मला म्हणतात, 'माताजी, आमचं जर घर बांधून झालं तर आम्ही सुखी होऊ.' नाही, पण परत पुढच्या वर्षी, 'घर झालं बांधून आई, पण आमचा मुलगा हरवला. तो मिळाला तर बरं होईल.' मग तिसरी गोष्ट. तिसर्या वर्षी आले, 'मुलगा आला, पण लग्न झालं तर बरं होईल. ' ल्याला चालूच आहे. त्याला काही अंत नाही. पहेलवान लोकसुद्धा येतील माझ्याकडे आणि सांगतील, 'आई,हे बघा, आम्हाला तुम्ही शांती द्या. ' आता एवढे पहेलवान आहेत, तरी शर्तीसुद्धा रोते. त्यांना काही आजार आहेत. आजारी माणसं म्हणतात, आमचा आजार बरा करा. प्रत्येकात काहीतरी उणीव आहे आणि ती उणीव कशी भरून काढायची? पहिल्यांदा ती उणीव आहे ते आधी समजलं पाहिजे. त्यासाठी प्रकाश हवा. ज्ञान आलं पाहिजे. ज्ञानाशिवाय ते गरम्य होणार नाही. आणि ज्ञान म्हणजे पुस्तकात सापडलेलं ज्ञान. ते तर आधी आहेच. बाहेरच आहे. ते उघड आहे. जे अदृश्य आहे, ते जेव्हा जाणलं जाईल, तेव्हाच त्याला ज्ञान म्हटलं जाईल. असं ज्ञान आपल्यामध्ये आलं पाहिजे. आणि ते ज्ञान आल्यावरच मनुष्य आपल्यामध्ये परिवर्तन स्वत:च करून घेतो. कारण त्याला केवळ ज्ञानच येत नाही, पण त्याला शक्तीसुद्धा येते. आता कुंडलिनीची जागृती जेव्हा होते, तेव्हा माणसामध्ये काय परिवर्तन येतं ते थोडसं मी तुम्हाला सांगते. पैकी भाषणाने ह्या गोष्टी होत नाहीत. मी जर म्हटलं, की अहो पुणेकर, तुम्ही कशाला आपापसात भांडता? शनिवार वाडा आणि बुधवार लागले भांडायला. कशाला भांडता ? तुम्हाला समजणार नाही! मग आता आम्ही ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सगळ्या ह्याला म्हणतो 'आमचे एक विश्व आहे'. तुम्ही मानणार आहात का ? आता साहेब आमचे. त्यांनी ११ योग फक्त सांगितलं की त्यांना शंभर नेशन्सनी निवडून दिलं. पण ते देश किती भांडतात आपापसात ते मला माहिती आहे. तेव्हा ते सर्व एक आहेत असं अजून त्यांना वाटतं. जरी त्यांच्या खूप संस्था एकच आहे. आहेत, अमुक आहे, तमुक आहे, पण ते एक नाहीत. आतून एक नाहीत. आतून तो एकपणा आलेला नाही. ते एकत्रीकरण आलेले नाही. त्याला कारण असं आहे, अजून जे काही सार्वजनिक आहे, जे काही सार्वभौमिक आहे, ते आपल्यामध्ये जागृत झालेलं नाही. अजून सहजयोग ! दुसरा काही योग नाही. आपण आपल्यापुरते आहोत. एखाद्या लहान बेटासारखे आहोत आपण. 'मी, माझं, मला' हे बेट तुटायला पाहिजे. हा बिंदू सिंधूमध्ये मिळाला पाहिजे. हे सगळेच सांगतात, की मिळाला पाहिजे बिंदू सिंधूमध्ये, पण कसा मिळणार? बाकी जे योग त्याला एकच मार्ग आहे. फक्त एकच मार्ग आहे. तो आहे कुंडलिनी जागृतीचा! योग फक्त एकच आहे, सहजयोग ! दुसरा काही योग नाही. बाकी जे योग आहेत ते त्याला सहाय्यक आहेत, उपयोगी आहेत, पण ते योग नाहीत. जसं आम्ही इथे यायला, भेटायला तुम्हाला आहेत ते त्याला अनेक रस्त्याने आलो. म्हणून ते रस्ते खरे नाहीत. इथे आलो, तुम्हाला भेटलो. हा खरा योग. आणि हा सहजयोगाचा मार्ग म्हणजे परमेश्वराने आखलेला आहे. हा तुमच्यामध्ये बनवून सहारयक आहेत, उपयोगी ठेवलेला आहे. तुमच्यामध्ये सगळे काही आहे. आणि त्यानेच ही चक्रे, ही कुंडलिनी वरगैरे सगळे व्यवस्थित ठेवलेले आहे. त्यावर कबीरांनी पुष्कळ लिहिलेले आहे. नानकांनी पुष्कळ आहेत, पण ते लिहिलेले आहे. आणखीन आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेशांनी लिहिलेले आहे. हा सगळा मार्ग आपल्यामध्ये आहे आणि तो मार्ग कोणीही बदलू शकत नाही. तो मार्ग कोणीही करू शकत योग नाहीत. नाही. तो परमेश्वराने आखलेला आहे. आणि हे अंकुर जेव्हा तुमच्यामध्ये जिवंत होतं तेव्हा तुम्हाला आत्मदर्शन होतं, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण ते झाल्याबरोबर काय होतं आपल्यामध्ये. मुख्य म्हणजे पुष्कळ लोकांनी असेही मला सांगितलं की माताजी, एक एक गोष्टीची समाधी लागायला हजारो वर्षे लागतात. आता तुम्ही होता का तेव्हा ऐकायला? तो कोणी पाहिला? बरं कबूल, लागत असतील. अहो, हजार काय चार हजार लागणार. जर डोळ्यावर पडदा घालून समजा आम्हाला तुम्ही सांगितलं, की इथून जाऊन माताजींच्या फोटोला तुम्ही नमस्कार करा. डोळ्यावरती पडदा आहे. कदाचित आम्हाला हजार वर्ष लागतील, तरी आम्ही तिथपर्यंत पोहोचणार नाही. कारण डोळ्यावर पडदा आहे. काही दिसतच नाही. पण जर समजा कोणी आपल्या किमयेने किंवा आपल्या हशारीने किंवा आपल्या जाणकारतेने तो पडदा जर काढला, तर सोपं काम आहे की नाही. तुम्ही सरळ उठाल आणि तिथे जाल की नाही! फक्त तो पडदा काढा आणि ते काढण्याचं काम कुंडलिनी जागृतीने होते. आता लोक हे ही म्हणतील, की कुंडलिनी जागृती हे फार कठीण काम आहे. असेल १२ बुवा! आपल्याला काही कठीण वाटत नाही. ज्यांना असेल त्यांना असेल. आपल्याला ते काही कठीण वाटत नाही. त्याबद्दल ते आमच्या हातून का घडतं ? कसं घडतं? वगैरे, ते तुम्ही पार झाल्यावर जाणाल. काय गोष्ट आहे? असं कसं घडतं ? त्याच्या आधीच उहापोह केला. तर दाराच्या बाहेर आम्ही राहून उपाशी आहोत असं म्हणण्यासारखं आहे. तुम्ही आतमध्ये या, हे घ्या, पार व्हा. आपली चक्र जागृत करून घ्या आणि समजून घ्या, की तुमच्यामध्ये कोणते दोष आहेत आणि ते कसे स्वच्छ करायचे आणि तुमच्यात सार्वभौमिकता पाहिजे. सर्वात प्रथम जेव्हा कुंडलिनी जागृत होते, तेव्हा तुम्हाला ह्या चक्रावरून कुंडलिनी गेली, आज्ञा चक्रावर गेली म्हणजे सहज तुम्हाला ही दशा येते. त्याला आपल्याकडे फार कठीण दशा म्हटलेले आहे. पण आमच्या सहजयोगामध्ये ती अत्यंत साधारण दशा मानलेली आहे. म्हणजे निर्विचारिता स्थापित होते. निर्विचार समाधी. स... मा... धी.... हा शब्दसुद्धा इतका घोटाळ्याचा आहे! लोकांना असं वाटतं, की मेलं म्हणजे समाधी लागते. म्हणजे काय वेडेपणा आहे! सगळेच मरतात. कुत्री, मांजरी सगळेच मरतात. त्यांना काय समाधी लागते का? स... मा... धी... सम शब्दापासून, धी म्हणजे बुद्धी बुद्धी जेव्हा जागृत होते, इनलाइटन्मेंटमध्ये जेव्हा बुद्धी येते, तेव्हाच त्याला समाधी म्हटलं पाहिजे. जेव्हा मनुष्य त्या कुंडलिनी जागृतीला प्राप्त होतो तेव्हा ती कुंडलिनी जेव्हा आज्ञा चक्रावर येते, त्यावेळेला त्याला निर्विचार समाधी येते. म्हणजे त्याची जी बुद्धी आहे, त्याची जी 'धी' आहे, ती जागृत होते आणि जागृत होऊन ती संवेदनशील होते आणि तो निर्विचार होतो. आता संवेदन किती येतं ते बघा. ज्या मनुष्याची कुंडलिनी फक्त आज्ञा चक्राच्या वर आलेली आहे, तो मनुष्य लोकांचे रोग ठीक करू शकतो कारण शारीरिक आहे. आज्ञा चक्राच्या वर आली म्हणजे शरीराच्या वर आली ती. विचारांच्या वर आली. दुसर्यांचे विचार वगैरेसुद्धा वाचू शकेल, पण ते काही महत्त्वाचं नाही. मुख्य म्हणजे रोग ठीक होतात. अशा माणसाच्या हातामध्ये अशी शक्ती येते, की त्याने जर हात लावला तर त्याचे रोग ठीक होतील. जेव्हा कुंडलिनी निघून ब्रह्मरंध्राला छेदते, त्यावेळेला आम्ही पार झालो असे म्हणतो. पण ती सुरुवातच आहे. त्यावेळेला हातातून अशा चैतन्य लहरी हळू हळू वाहू लागतात आणि थंड थंड असे वाऱ्याचे झोत यायला लागतात. हे जेव्हा घडतं त्यानंतर लगेच तुम्ही दुसर्यांना जागृती देऊ शकता. तुम्हाला लगेच कळतं की तुमच्यामध्ये कोणते दोष आहेत. म्हणजे ह्या सर्व चक्रांवर, ह्या बोटांवर चक्रं आहेत. आता समजा जर ह्या माणसाच्या बोटाला जळू लागलं, तर त्याने समजायचं की त्याला त्रास विशुद्धी चक्रावर आहे. आता ह्याचं डीकोडिंग काय आहे? ही बोटं कशाची आहेत ? ह्या बोटांवर कोणती कोणती चक्र आहेत ? हे कोणत्याही शास्त्रात सांगितलेले नाही. पण आमच्या सहजयोगामध्ये विदित आहे. इथे तुम्ही बघू शकता. एखाद्या माणसाला जर हार्ट अॅटॅक आलेला असला, त्याचं हार्ट जर वीक असलं तर त्याचं हे बोट धरणार. जर त्याच्या वडिलांचा मृत्यू अचानक झालेला असला किंवा तो स्वत: वाईट स्थितीत असला किंवा काही तरी हिताचं जे त्व आहे ते खराब झालं, की हे बोट धरणार. त्याप्रमाणे १३ प्रत्येक बोटाला काही तरी अर्थ आहे आणि तो आपण बरोबर पडताळून घेऊ शकतो. आता हे लहान मुलांनासुद्धा जमतं. अगदी लहान मुलं जर पार झाली तर त्यांनासुद्धा कळतं. ते ही सांगतील, माताजी, आमचं हे बोट धरलंय. तुम्ही दहा मुलांचे जरी डोळे मिटून ठेवले तरी सत्य एकच आहे. सगळे एकच बोट वर करणार आणि त्यामुळे हळू हळू आपल्याला समजू लागतं, की हे माझं धरतंय, हे माझं हे, चक्र धरलेलं आहे. आजच एक गृहस्थ माझ्याकडे आले. मला सांगायला लागले की, 'माताजी, माझं आज्ञा धरलंय, ते ठीक करा.' तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज्ञा कशाने धरतं ? अहं भावाने. आजपर्यंत तुम्हाला कोणी भेटला नसेल, ज्याने सांगितलं असेल, की मला अहं भाव झालाय. जरा काढून टाका बरं. पण पार झाल्यानंतर आज्ञा चक्र धरलं की जरा दुखू लागतं तिकडे आणि भारीपणा वाटतो आणि बोटावर समजतं. ह्या बोटावर. आज्ञा चक्र धरलंय. म्हणजे माताजी, माझं तेवढं आज्ञा चक्र काढून टाका. त्रास सुरू झाला. अस म्हणून आज्ञा चक्र काढून टाकतात. त्यांनंतर हळू हळू हे परिवर्तन सुरू होतं आणि त्या परिवर्तनामध्ये मनुष्याची सगळी मूल्य बदलतात. ज्या मूल्यांवर आपण फार महत्त्वाचं समजतो, की हे मूल्य चांगलं आहे, ते मूल्य चांगलं आहे, ह्याच्यासाठी आपण भांडलं पाहिजे, त्याच्यासाठी भांडलं पाहिजे. हे सगळं विसरून जे मूलत: महत्त्वाचं आहे, तिकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्याला समजू लागतं, की कोणतं महत्त्वाचं आहे, कोणतं नाही. खरोखर म्हणजे तेव्हाच योग घडतो. कारण आपल्याला, त्या चैतन्य लहरींना, कोणताही प्रश्न विचारला तर उत्तर मिळू शकतं. समजा आपण विचारलं की, 'परमेश्वर आहे किंवा नाही?' लगेच धड़ू, धड़ हातामध्ये यायला सुरुवात होते. आम्ही खोटे की खरे हे विचारलं तर तेच. हा साधू खरा की खोटा? म्हणजे जरी मेलेले असले, हजारो वर्षापूर्वी झालेले असले, कोणीही असो, तरी हा मनुष्य खरा होता की खोटा होता? हा मनुष्य राक्षस होता की काय? विचारलं , जर तो मनुष्य राक्षस असेल, तर एकदम व्हायब्रेशन्स बंद होऊन जाणार. इतकेच नाही तर हातामध्ये फोडसुद्धा येतात. थोडसं असं बारीक पोळल्यासारखं वाटतं. अशाप्रकारे कोणताही मूलत: जो प्रश्न असेल, त्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळेल. अशाप्रकारे तुम्ही समर्थ होता आणि तुमच्यात सार्वभौमिकता येते. हे झाल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे. हे परिवर्तन माणसामध्ये इतकं सहज घडतं, की शेवटी मनुष्य साक्षी स्वरूप होतो आणि त्याला आश्चर्य वाटतं. हे सगळं नाटक संपल्यासारखं वाटतं. आता काही एवढं महत्त्वाचं वाटत नाही. उगीचच आपण काळजी करत होतो असे वाटते. असं अनेक लोकांचे झालेले आहे. तुम्ही महाराष्ट्राचे आहात, म्हणून तुमचेच होणार, असे नाही. तर हे मुसलमानांचंही झालं आहे, ख्रिश्चन लोकांचंही झालेलं आहे आणि कोणत्याही जातीच्या लोकांचं होतं. आता ह्यातून असा अर्थ काढायचा, की आम्ही मोठे धर्ममात्तंड आहोत! अमके, तमके. असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी काय मिळवलं आहे ? वादाला उभे राहीलं की त्यांना विचारायचं, 'अहो, ह्यांची कुंडलिनी कुठे आहे सांगा बरं?' 'ते आम्हाला कसं माहीत असणार ?' मग बोलू नका. बसा खाली. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे, की तुमची कुंडलिनी कुठे आहे आणि १४ दुसर्यांची कुठे आहे. ह्याचं जर तुम्हाला ज्ञान नसेल, तर सगळं तुमचं बोलणं हे वायफळ आहे. एखाद्या बाईने सूर लावावा, की मी काय भाजी करते, मी काय स्वयंपाक करते, वाह, वाह! हे परिवर्तव आमच्यामध्ये जर स्वयंपाक करायला सांगितला तर त्यांना गॅससुद्धा पेटवता येत नाही. म्हणजे त्याला आपण बकबकच म्हणू. ह्याला अर्थ काय? त्याचा साक्षात् तेव्हाच होतो जेव्हा तुमच्यामध्ये हे ज्ञान, आलं पाहिजे, ही तुमच्या शरीरात बाणलं जातं. आता हे लोक तरी आपली भाषा जाणत नाहीत. दुसऱ्या इच्छा धरा. देशातले लोक आपली भाषा जाणत नाहीत. पण ह्यांची भाषा सगळ्यांची एकच आहे. ह्या भाषेला काही दूसरा पर्यायच नाही. ही प्रेमाची भाषा आहे. त्याच्यासाठी आता आपल्याकडे देवीच्या नावामध्ये, तू मूलाधारात बसलेली आहेस, तू आज्ञा चक्रात आर्जव करावा बसलेली आहेस, तू अमुक आहेस हे सगळं आपण म्हणतो. देवीची सप्तशती काढली की सुरू. अहो, पण ते आहे काय? ते तर समजून घ्या.. कोणीतरी भाडोत्री मनुष्य आणायचा. त्याने लागतो का? काहीतरी वाचायचं, सांगायचं. झालं. आम्ही फार मोठं सत्र केलं, यज्ञ केला. त्याच्यासाठी हे तुम्ही इच्छा केलं, ते केलं, पण काय मिळालं तुम्हाला? सगळे आजारी पडले. हे असं कसं झालं ? अहो, माताजी, असं कसं झालं? मी म्हणे देवाची पूजा करतो. शिवभक्त आहे म्हणे आणि त्रास काय धरा. तर हार्ट अॅटॅक! हे कसं होऊ शकतं ? जर शिव तुमच्या हृदयात आहे तर हार्ट अॅटॅक कसा येणार? जर तुम्ही शिव भक्त आहात तर तुम्हाला हार्ट अॅटॅक का येणार? साधा प्रश्न आहे. आणि तो विचारला पाहिजे. कारण त्याला असं आहे, की तुम्हाला काय अधिकार आहे शिवाची पूजा करण्याचा ? तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आलात का? अहो, तुम्ही इथे बसून इंदिरा गांधीला म्हटलं, 'ए इंदिरा गांधी इकडे ये.' पोलीस तुम्हाला अटक करतील की नाही? तशातलेच हे. अनधिकार चेष्टा तुम्ही करत होता. त्याच्यामुळे हे झालेलं आहे. आता परमेश्वराच्या साम्राज्यात आल्यावर सगळं शिकून घ्या. आपलेच हात नाही तर दुसर्यांचे हात ही तुम्ही वाचू शकाल. इतरांनाही मदत करू शकाल. पण आज ती शेवटची वेळ आलेली आहे. ज्याला आपण लास्ट जजमेंट असं म्हणतो. आता शेवटचा निवाडा, ती वेळ आलेली आहे. सगळ्या पुणेकरांना मी सांगते, तुमचा सगळा शिष्टपणा, चिकित्सकपणा, टवाळखोरपणा वरगैरे अगदी प्रसिद्ध होता, ते आता एका बाजूला मुळा-मुठेच्या संगमात टाकून द्या आणि लक्षात ठेवा, ही शेवटची, निवाड्याची वेळ आलेली आहे आणि तुमचा निर्णय होणार आहे. हा निर्णय फक्त कुंडलिनी जागृतीने होतो, अन्यथा होणार नाही. परमेश्वर तुम्हाला तराजूमध्ये घालून किंवा तुमचे ऑपरेशन वरगैरे काही करून बघणार नाही. तुमची कुंडलिनी जागृत केल्याबरोबर तुम्हाला स्वत:ला कळेल, की आपलं काय, कुठे आहे? ह्या निर्णयामध्ये त्यांनी तुम्हाला वेळ दिलेली आहे. आपल्याला ठीक करून घ्या. ही वेळ आलेली आहे. तेव्हा याकडे दुर्लक्ष करण्यामुळे तुमचेच नुकसान होणार आहे. १५ प्रत्येक वेळेला मी बघते, आमच्या आधीचे जे लोक येतात, बोलतात. त्यांची सगळी भाषा सबंध संघ म्हणजे बिचार्यांची, फारच आपलं जे ....म्हणतात ती आहे. त्यांचं म्हणणं असं की नाही, हे नाही, असं नाही. आधी लाचारी. कारण आपण भिंतीसमोर बोलत असलो, तर काय करणार? जागृत झाला भिंतीशी बोलायचं तरी काय? प्रश्न पडतो. बाई, भिंतीबाई जरा ऐका आता! असं वाटतं कधी पाहिजे. कधी. पण तशी गोष्ट नाही. कलेकिटिव्हिटी हे सगळ्यांनी सांगितलेले खरे आहे. हे आमच्यात झाले पाहिजे. हे परिवर्तन आमच्यामध्ये आलं पाहिजे, ही इच्छा धरा. त्याच्यासाठी आर्जव करावा लागतो का? तुम्ही यायला पाहिजे. इच्छा धरा. तुम्हाला सोनं पाहिजे अशी इच्छा करा. असं काही सांगावं लागतं का माणसाला. सबंध तसेच आमची जागृती व्हावी अशी तुम्ही इच्छा धरा, असं सांगायला कशाला पाहिजे? दुसं काय पाहिजे आपल्याला? जे परमातलं परम आहे, जे सगळ्यात मोठं धन आहे, तेच मिळवलं कलेक्टिव्हिटीमध्ये पाहिजे. हे एक आई म्हणून तुम्हाला, जसं लहान मुलाला समजवावं लागतं नां तस समजवावं लागतं. तेव्हा स्वत:ची तयारी आहे किंवा नाही असे पलायनवादी विचारसुद्धा आणले नाही परमेश्वर पाहिजे. 'माताजी, आमची तयारीच नाही. अजून आमचं इतकं हे करायचंय आणि आम्हाला जागृत झाला पाहिजे . तरच अजून ते करायचंय.' झालं. तुम्ही पूर्वजन्मी हेच केलंय. ह्याही जन्मी हेच करणार, ह्याच्या आदल्या जन्मी तेच केल होतं. आता आम्हाला थोडा हठयोग करू द्या. डोक्यावर अजून आम्ही उभे राहिलो नाही. बाकी सगळी आसनं आली. पण ते एक झालं नाही. ते झाल्यावरती मग येऊ तुमच्याकडे. मग त्याच्यानंतर मात्र आम्ही काही करू शकणार नाही. 'आम्ही इतके लक्ष अजून वाहिलेले नाही, देवाला. बेलपत्र. ते वाहून आम्ही येऊ. ' वाहिले, तुम्ही वाहिले, ह्या जगाचं, ह्या देशाचं, सर्व तुमच्या वडिलांनी वाहिले. हजारो वर्षापासून रूढीगत वहात आले आहेत. काय मिळालं मातवजातीचं त्यात? तुम्हाला काही मिळालं का त्यात ? आता मिळवून घ्या आणि मिळविल्यानंतर हे परिवतर्न स्वत:मध्ये सामावलं पाहिजे. त्याची इज्जत केली पाहिजे. त्यात वाढलं पाहिजे. pल्याण होणार म्हणजे तुमचा वृक्ष होईल. आहे. या पुण्यालाच एका गृहस्थांना आम्ही जागृती दिली. त्यांनी दहा हजार माणसांना नगर जिल्ह्यामध्ये जागृती देऊन पार केलेले आहे. तसेच तुमच्या हातून घडणार आहे आणि तुमच्याकडून महान कार्य होऊ शकतं. आता आपल्यापैकी काही लोकांना प्रश्न असतील तर थोडेबहत विचारा. कारण आमचा इथे पुण्याला खास प्रोग्रॅम, मुद्दाम असा दोनच दिवस आहे. तेव्हा आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा. पण सहजयोगामध्ये नुसतं पार होऊन चालत नाही. पुष्कळशी मंडळी आहेत. आजच एकाने सांगितलं 'आम्ही किराणा दुकानात गेलो, माताजी, तिथे तुमचा फोटो १६ होता. तिकडे त्यांनी दीप वरगैरे लावून ठेवले होते. आम्ही विचारलं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही ७३ साली पार झालो होतो. माताजी इथे आल्या होत्या तेव्हा.' असं कां? मग तेव्हापासून काय केलं तुम्ही? आम्ही म्हणे घरीच पूजा करतो. तसं चालायचं नाही. हे जागतिक कार्य आहे. हे सांघिक कार्य आहे. एकट्याने होणार नाही. सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. व्हायब्रेशन्स त्यांचे गेलेले आहेत आता. व्हायब्रेशन्स येत नाही. काही येत नाही. हे जे व्यक्तिगत आपलं होत पूर्वी, व्यक्तिगत धार्मिक जीवन किंवा व्यक्तिगत परमेश्वराला मिळवणं, त्यानेच नुकसान झालेलं आहे. सगळे लोक विचारतात, ह्या देशात एवढे संत-साधू झाले, एवढे मोठे लोक झाले तरी गरिबी का ? त्याला कारण एकच आहे, की आजपर्यंत जे काही होतं ते व्यक्तिगत होतं. एकएका व्यक्तीने मिळवलं होतं. समाजाने मिळवलेले नव्हते. सगळ्या संघाने मिळविलेले नव्हते. सर्वांनी मिळविलेले नव्हते. बुद्धांनी म्हटलं आहे, 'संघं शरणं गच्छामी.' सबंध संघ जागृत झाला पाहिजे. कलेक्टिव्हिटी यायला पाहिजे. सबंध कलेक्टिव्हिटीमध्ये परमेश्वर जागृत झाला पाहिजे. तरच ह्या जगाचं, ह्या देशाचं सर्व मानवजातीचं कल्याण होणार आहे. जोपर्यंत हे एकाच व्यक्तीपर्यंत असेल, तो आला, त्याला छळा, त्याला मारा आणि तो संपला. आता हे असे नाही. हे जागतिक कार्य आहे. तेव्हा पुष्कळ लोक पार झाल्यानंतरसुद्धा 'माताजी फोटो द्या. आम्ही घरी बसून पूजा करतो. आरती करतो.' तसं चालायचं नाही. त्यानंतर तुम्ही सेंटरवर जायला पाहिजे. स्वत:ची वाढ करून घ्यायला पाहिजे. हा प्रकाश सगळीकडे पसरवला पाहिजे. एवढेच आमचे मागणे आहे. इतका आनंद येतो त्याच्यात. त्याच्यामध्ये किती सार्थक वाटतं! त्या लोकांना विचारा, जे आज इतक्या लांबून तुम्हाला भेटायला आलेले आहेत. आपलं कसं करून घ्यायचं पुढे वगैरे ते सेंटरवर जाऊन तुम्ही बघा. तसंच आमच्याकडे फोटो आहेत आणि पुस्तकं आहेत. पण फोटो, पुस्तकं दिली की घरी बसले. असं करून चालायचं नाही. स्वत:ची पूर्णपणे वाढ करून घ्या. आणि ही वाढ करून घेणं हे तुमचं परम कर्तव्य आहे. त्याशिवाय काहीही होणार नाही. हे समजण्याची गोष्ट आहे, जे आपण एकट्याने मिळवलेले होते, ती वेळ आज नाही. आज सगळ्यांनी मिळून खाण्याची वेळ आहे. आणि म्हणून सगळ्यांनी हे मिळवलं पाहिजे. जितक्या लोकांना मिळेल तितकं उत्तम आहे. बाकी राहतील ते राहतील. त्यानंतरचे मी सांगू शकत नाही. त्यानंतरचा काळ भयंकर आहे. तेव्हा काही असे हॉल भरणार नाहीत. मेडिटेशन होणार नाही. कोणी येऊन तुम्हाला समजवणार नाही. पण फक्त घोड्यावरून नुसत्या चकमकी होतील. ज्यांना जायचं ते जातील, ज्यांना रहायचं ते राहतील. याप्रमाणे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की वेळ थोडा आहे. ह्या वेळेमध्ये आपण वृद्धिंगत झालं पाहिजे. मिळवून घेतलं पाहिजे. १७ यो ा भ ४ ं गे २ नासिक, १७ डिसेंबर १९८५ १८ *३ ३० आता मी इंग्लिशमध्ये जरी बोलले असले तरी आपल्याला सगळे कळलं असेल. पण तरी सांगायचं म्हणजे असं की आपला सहजयोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की, 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.' तर सहज हा जो योग घडतो, तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमच सहस्रार भेदन, इथपर्यंत आमचं तुमचं देणं - घेणं आहे. आता पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये तुम्ही जर एखादं बी घातलंत, तर तिचं देणं - घेणं एवढेच आहे की, 'बाबा, तुझ्यामध्ये मी अंकुर फोडते.' पण त्यानंतर बघायला नको. तेव्हा जरी हे अगदी सहज असलं, तरी आता आम्ही संत झालो, हे समजणं फार कठीण आहे. आता आम्ही बी घडलो. हे समजणं फारच कठीण गोष्ट आहे. अजून आम्ही तेच आहोत, असं सारखं आपल्याला वाटत असतं किंवा तसं नाही वाटलं, तरी आपली वागणूक तशीच असते. तर ती बदलायला पाहिजे आणि समजलं पाहिजे, की आता आम्ही संत झालोत. संतांची किती लक्षणं सांगितलेली आहेत रामदास स्वामींनी! प्रत्येकाने सांगितलेली आहेत. त्या संतांमधली आपल्यामध्ये कोणती लक्षणं आहेत ती पाहिली पाहिजेत. तिकडे लक्ष दिलं पाहिजे. ती लक्षणं आपल्यामध्ये दृष्टीगोचर का होत नाही? लोक आपल्यामध्ये ते शोधत का नाहीत? ते आपल्यात त्यांना दिसत का नाही? त्याला कारण काय हे पाहिलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण असा विचार केला पाहिजे, की परमेश्वराने आपल्याला अंकुरलं आहे. बरं, झालं. आता पुढे काय? आम्ही काय केलं त्या परमेश्वरासाठी ? आम्हाला सहजयोगामध्ये हे माहिती आहे, की प्रत्येकाला आशीर्वादित करतो परमेश्वर. 'योगक्षेमं वहाम्यहम्' योग मिळाला तुम्हाला, क्षेम घ्याच. ते त्याच्याच बरोबर येतं समजा. बिल्ट इन. त्याला काही करायला नको. क्षेम घ्या. पण क्षेमाबरोबर एक आणखीन यायला पाहिजे, कृतज्ञता. ती येत नाही. कृतज्ञता आली, तर लगेच हा विचार येईल की, 'मला एवढं फुकटात मिळालं, आम्ही काय केलं होतं ? कशाला असं मिळालं? कसं मिळालं? आता मी काय देऊ? जीव का प्राण !' असा विचार यायला पाहिजे. पण ये रे माझ्या मागल्या! 'माताजी, असं झालं. नोकरी तर लागली. पैसे मिळू लागले. पण अजून माझ्या मुलीचं लग्न झालेलं नाही.' बरं , ते झालं . मग 'अमकं राहिलं.' म्हणजे तेच चालू आहे तुमचं. जे मागचं होतं तेच पुढे सुरू आहे. त्याला काही अर्थ आहे का ? आता सहजात तुम्ही आले, ह्याचा अर्थ असा आहे, की तुम्ही पहिल्यांदा संत झाले. आता दुसरा जो शब्द योग आहे, त्याच्याकडे लक्ष जर दिलं योगाला अर्थ दोन आहेत. योग म्हणजे परमेश्वराशी आपला संबंध होणे किंवा जीवा-शिवाचा संबंध होणे . त्यांची सांगड बसणे. ते झालं. पण सांगड नाही बसलेली. नुसते तुमचे संबंध झालेले आहेत. फक्त असं समजायचं आपल्याला. पण योगाचा दुसरा अर्थ असा आहे, की युक्ती, कौशल्य. कुशलता पाहिजे. १९ सहजयोगाची तुम्ही युक्ती शिकलेत का ? त्याची कुशलता शिकले का? नाही. मग त्याला काय अर्थ आहे ? अर्धवटच झालं ते. म्हणजे आपली समजा बाहेर आम्ही पाटी लावली एक, की इथे सांगवी राहतात. तुम्ही पाटी वाचून गेलात, तर भेटले का सांगव्यांना? तसलाच हा प्रकार आहे. एखाद्या युनिव्हर्सिटीत तुम्ही गेले की, 'आम्ही गेलो होतो. युनिव्हर्सिटी पाहून आलो. प्रोफेसरांना भेटलो.' बरं, मग. पुढे काय? 'मग आम्ही झालो की, ग्रॅज्युएट आहोत.' कसं? 'नाही, म्हणजे आम्ही जाऊन आलो होतो म्हणून.' आपल्याकडे इंग्लंडला जाऊन यायचे. काही केलं नाही तिकडे. तसेच आलात परत. आपण म्हणतो नां , 'झक मारून.' तरीसुद्धा त्याला इंग्लंड रिटर्न आपण आम्ही म्हणत असू. तसलाच प्रकार आहे. सहजयोगी आम्ही, सहजयोगी, सहजयोगी, सहजयोगी. बरं कां? मग ह्या बोटाला काय अर्थ आहे? इकडे जळलं म्हणजे काय होतं ? ते माहीत नाही बुवा. आम्ही सहजयोगी आहोत. बिल्ले लावून आम्ही सहजयोगी झालोत. तसं सहजयोगात होत नाही. काहीतरी व्हावं लागतं आणि त्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि त्या करण्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यातला एक त्याग आपण नेहमीच करतो तो म्हणजे बुद्धीचा त्याग. तर तो नको. ते सोडून पुढचं बोलायचं. बुद्धीचा त्याग करून मोकळं व्हायचं आणि नंतर म्हणायचं सहजयोगाने आमची वाट लावली. तर ते एक सोडून बाकी जर त्यागाकडे दृष्टी असली, आम्ही काय सोडलं? जे बेकार होतं ते सोडलं. ज्याला काही अर्थ नव्हता ते सोडलं. असा विचार धरायचा. जसे ते हरे रामाचे लोक आले आणि मला म्हणायला लागले की, 'तुम्ही एवढे श्रीमंतीत असलेले.' ते आता माझ्या नवर्याचं आहे सगळं. मी तरी काय करू? 'तुम्ही एवढे श्रीमंतीत बसलेले. तुम्ही काय एवढा त्याग केलेला आणि तुम्ही कशा झालात देवी?' अहो, म्हटलं, देवी त्याग नसते करत. तीच एक त्याग करत नाही. बाकी सगळ्यांना करावा लागतो. तीच भोगते आहे. 'बरं, कबूल,' म्हटलं, 'तुम्ही काय त्याग केले ते सांगा.' म्हणे, 'आम्ही हे सोडलं, ते सोडलं, हे सोडलं.' म्हटलं, 'असं का! बरं असं करा तुम्ही, माझ्या घरात किंवा माझ्या अंगावर तुम्हाला कोणतेही जर त्या श्रीकृष्णाच्या पायाच्या धुळीबरोबर किंवा त्याच्या कणाबरोबर एखादं काही मिळालं तर घेऊन जा तुम्ही. ते सांगा, पण त्याच्या पायाच्या धुळीच्या कणाबरोबर असायला पाहिजे.' दगड बनले गृहस्थ. तसेच त्यांच्या तोंडावर इतक्या सुरकुत्या होत्या, की मोजून घ्याव्यात. आणि म्हणे आम्ही मोठे कृष्ण भक्त. म्हणजे काय कृष्णाला शोभेल का? कृष्ण भक्त म्हणजे कसे अगदी टवटवीत असायला पाहिजे. हे बसलेत ना सगळे. तर मी म्हटलं , 'अहो , तुम्ही कृष्णभक्त. तुम्ही सांगत का नाही?' दगड बनले. काही दिसेच नां! म्हटलं काय, तुम्ही दगडधोंड्यांचा त्याग केला काय? हे दगडधोंडेच नां! नाहीतर काय ती राख. तिचा त्याग केला? त्याग कशाचा करायचा? जर काही धरलेच नाही, तर त्याग कशाचा करायचा? म्हणजे करायचं काय माणसाने, की काही धरायचं नाही. त्याग करायचा म्हणजे काय ? धरायचं नाही. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, ही माझी नोकरी, हे माझं घर, हे माझं ते , ते माझं हे. हे माझं आणि मी पण सुटलं पाहिजे आणि हे जोपर्यंत सुटणार नाही सहजयोग जमणार नाही. ते सोडता आलं पाहिजे. ते सोडणं आपल्या महाराष्ट्रात जरा कठीण जातं. मुलगा-मुलगी म्हणजे जीव का प्राण! एक डोळा हा, दूसरा डोळा तो. त्यांनी म्हातारपणी लाथा मारल्या की लक्षात कारण २० येतं, की अरे बाबा, हे काय केलं आपण? सगळे जग तुमचं कुटुंब व्हायला पाहिजे. हे संतांचं लक्षण आहे. 'माझं' पण गेलं पाहिजे. 'मी'पण गेलं पाहिजे. आणि ते जाण्यासाठी आयुष्य आम्ही सहजयोगाला वाहन दिलंय. आता परमेश्वराशिवाय आम्हाला काय करायचंय ? आम्ही परमेश्वराच्या कार्यात रत आहोत. आम्हाला वेळ नाही आता दुसऱ्या गोष्टींसाठी. आमचं हृदय आम्ही परमेश्वराला वाहिलं आहे. आम्हाला कोणत्याही दष्ट भावनांना हृदय नाही राहिलेलं. आमच्या बुद्धीत दूसरं काही सूचत नाही. फक्त सहजयोग आणि त्या परमेश्वराच्या कार्यासाठी कारय करायचंय तेच आमच्या डोक्यात विचार चाललेले आहेत. आमच्या जठराग्नीलासुद्धा दुसरं काही पचत नाही. तुम्ही काही बोलू नका दुसरं, बुवा. आम्हाला चालायचेच नाही. परमेश्वराच्या साम्राज्यात बसल्यावर आम्ही दुसरं काही बोलायला तयार नाही. आमच्याजवळ वेळ नाही त्या गोष्टीला. असे जेव्हा होईल तेव्हाच ते सुटणार आहे. इतर गोष्टी सुटल्याशिवाय सहजयोग जमू शकत नाही. त्याबाबतीत जरा कच्चे आहोत आपण. त्यामुळे सहजयोगी तयार म्हणायला फार कमी आहेत. त्याच्यामुळे एका माणसावर सगळे पडतं आणि बाकीची मंडळी नुसती ढम्म् बसून राहतात. नसली तरी थोडंबहुत.... हळूहळू हळूहळू ते वाढत जातं. पण त्याला काय आहे, की वाढीला इतकी इंचाइंचाने प्रगती होत आहे. की त्याने सहजयोग कसा फोफावेल? हे समजत नाही. कारण इथे काही तरी व्हावं लागतं. काही प्लॅस्टिकचं बनवता येत नाही. की चला, एका मशिनमध्ये घातलंय माताजींनी सगळ्यांना. आता तयार करून ठेवलेत इकडे पुतळे. ते मेलेलं काम आहे. जिवंत कार्य करायचं म्हणजे त्याला वेळ लागतो. हे मलाही माहिती आहे. पण जरा जास्तच वेळ लागला असं व्हायला नको. वाटतं की आता काय करावं ? कसं करावं? नाशिकमध्ये जरा जास्तच वेळ लागतो आहे आणि इथे भागीरथी धावते आहे. रामाने आणि सीतेने इकडे अनवाणी चालून पवित्र केलेले आहे. ही तपोभूमी आहे. सगळं ह्यांना मी सांगते वर्णन करून. त्यात आदिशक्ती गडावरती बसलेल्या आहेत. सगळं असून, इथं सगळ्यात गाडं जे आहे, हळू चालते आहे . म्हणजे ज्या रथाला शंभर घोडे लावले, त्याच्यापेक्षा ते दोन घोडे लावलेलं खर्चर चांगलं चालतंय हे बघून आश्चर्य वाटतं नाही कां? की ते जे गाडं आहे, ते बरं चाललेलं आहे दोन घोड्यांचं आणि शंभर घोड्यांचं काय झालं, काहीच समजत नाही. आणि केवढी मेहनत घातली तुमच्या पूर्वजांनी इथे - संतांनी किती साधु- येऊन इथे मेहनत केलेली आहे. ह्या तपोभूमीमध्ये. त्याचा विचार करा! आणि तुम्ही इथे जन्म कशाला घेतला मग? असाही विचार करावा की आमचा ह्या नाशिकला जन्म झाला, एवढ्या पवित्र भूमीत, तर आम्ही काय करायचं? नसत्या गोष्टींकडे लक्ष नसलं पाहिजे. नको ते पाहिजे, ह्या प्रवृत्त्या सोडून जे हवं तिकडे लक्ष दिलं, समाधानात राहून, आम्ही आता परमेश्वराच्या कार्याला लागलो आहे. हे आयुष्य आमचं परमेश्वरासाठी आहे. हा जो काही आमच्या प्राणाचा दिवा लावलेला आहे, तो परमेश्वराच्याच प्रकाशाला पसरवेल. अशा उमेदीने तुम्ही जर आलात, तर आनंदाच्या सागरात पोहाल. सगळं काही तुमचं बघण्यात येईल. परमेश्वर सबंध क्षेम देईल. त्याच्यावर अत्यंत समाधानात आणि पूर्ण काही झालं, संपूर्ण आपण आटपून घेतलं, आता पूर्ण झालात, असं तुम्हाला वाटेल. परमेश्वर तुम्हा सर्वांना सुबुद्धी देवो ! २१ तीन शक्त्या दादर, २३ जानेवारी १९७५ ते ही अत्यंत दुःखी लोक आहेत. रडत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अन्न पचत नाही त्यांना. काय फायदा! जिथे खायला नाही ते रडतात, ज्यांना खायला आहे ते ही रडतात. आत्महत्या करतात. जे आजारी आहे ते रडतात, जे आजारी नाही ते ही रडतात. काय सुरू आहे? सगळा वेडेपणा आहे. मागायचं तर ते मागा जे अस्सल आहे. आम्ही अस्सल द्यायला आलो आहोत. तुम्ही काय नकली गोष्टी मागता आमच्याकडे! तब्येत बरी करून द्या. अमकं ठीक करून द्या. तमकं करून द्या. अरे, होईल ते. त्याचं काय! अस्सल माल घ्या आधी. त्याचे मूल्य नाही. अरे संसारात सगळ्यात महत्त्वपूर्ण तेच आहे. ते मिळाल्याशिवाय आनंदच मिळणार नाही. काहीही बाकी सगळे व्यर्थच ठरतं. आता परिसासारखे जे आहे ते मागा. असे मागणारे असले, तर देणारे आम्ही आहोत इकडे बसलेले, पण आहेत कुठे मागणारे? आईला मागितलं तर विशेषच मागायला पाहिजे. असलं कसलं काय मागायचं! भाडोत्री! सगळी कमाई देऊन टाकू तुम्हाला. मागा तर खरी. सगळी पुण्याई तुमच्यासाठी लावून टाकू पणाला. उभे तर रहा! तुमच्या चरणावर येऊन पडलो तरी तुमच्या लक्षात येणार नाही. ही केवढी तळमळ आतून आहे ! समजलं पाहिजे. कळेल का ? ध्यानात जायचे आहे प्रेमाने. सगळे प्रेमाचे खेळ आहेत. अगदी शांतपणे डोळे मिटायचे. काही करायचं नाही. स्वत:चं, जे तुमच्यातलं आहे, ते अगदी वर आहे. २२ भ ८ िम आधी कळस मग पाया या्रमाणे आधी तुमच्या आत्म्याची बांधणी सुर० होते आणि त्या बांधणीमुळे तुम्हाला स्वत:लाच त्या प्रकाशामध्ये दिशतं की आमचं काय चुकलेलं आहे! आम्ही कुठे चुकली? आणि त्या प्रकाशामध्ये तुम्ही जाणती, की तुम्हाली काय ठीक केलं पाहिजे? काय तुमचं चुकलेलं असेल ते कसं बरोबर करन ध्यायचं ? मी काही तुम्हाला संगत नाही. प.पू.श्रीमातीजी, औरंगाबाढ, ८/१२/१९८८ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in ा ध२ हे मंदिर२२े आहे. जिथे तुम्हाली सगळया पवित्र गोष्टी, जसे पावित्रय, निरागसती मुलांना द्यीयच्या आहेत, ज्याची उपयोग त्यांनी पूढील आयुष्यासाठीही होईल. प.पू.श्रीमाताजी, लंडन, ११.६.१९७९ 3. क क ---------------------- 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-0.txt चैंतन्य लहरा सप्टेंबर-ऑक्टोबर २०१६ मराठी ाम म ६ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-1.txt 15 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-2.txt या अंकाल स्व म्हणजे तुमचा आरसा ४ ...8 (पूजा, अलिबाग, २१/१२/१९८६) कलेक्टिव्हिटीला यायला पाहिजे ...७ (सार्वजनिक कार्यक्रम, पुणे, १९८०) योग ...१८ ( पूजा, नासिक, १९८५) तीन शक्त्या ..२२ (सेमिनार अँड मिटिंग, दादर, २३ जानेवारी १९७५) देवीच्या सवं अवतारांच्या वेळी ब-्याच असूरी शक्त्या पण पृथ्वी व२ अवतरित झाल्या आणि देवीला युद्ध करून त्यांचा विनाश करावी लागली. हा विनाश फक्त असूरी शक्तींना संपर्वणे यासठीच नव्हता. हा याठी होता, की ह शक्त्या क तसेच संतांनी त्रास देण्याचा, त्यांचे नुकन क२ण्याची प्रयतन करीत असत. पं.पू.श्रीमाताजी, नवरात्री पूजा, २४.१०.१९९३ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-3.txt व म्हणजे तुमचा आरसा अलिबाग २१ डिसेंबर १९८६ हा आरसा बघण्यासाठी, की त्याच्यातलं सौंदर्य काय आहे ते बघण्यासाठी म्हणून हा आरसा तयार केला. सर्व सहजयोगी मंडळींना आमचा प्रणिपात असो ! सुरुवातीला मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, नंतर मराठीत बोलेन. आता ह्यांना मी असं सांगत होते, की पुष्कळ लोक असं विचारतात की देवाने हे जग कशाला निर्माण केलं? या जगाची काय गरज होती ? तर त्याचं कारण असं आहे, की देव हा सौंदर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा स्रोत आहे आणि तो स्वत:ला बघू शकत नाही. त्याला हे कळत नाही, की केवढा मोठा स्रोत तो आहे. तसेच तुम्ही सहजयोगीसुद्धा त्याचा स्रोत आहात. म्हणून देवाने हा सबंध आरसा त्याच्यासाठी तयार केला. हा आरसा बघण्यासाठी, की त्याच्यातलं सौंदर्य काय आहे ते बघण्यासाठी म्हणून हा आरसा तयार केला. आणि ह्या आरशात बघून देव संतुष्ट होतो. पण ह्या आरशात आणखीन एक त्याला बघायचं आहे, ते म्हणजे असं, की मानवामध्ये हा आरसा जागृत झाला की नाही. जो मी मानव तयार केलेला आहे, जो मी मनुष्य तयार केलेला आहे, त्या मनुष्यामध्ये हे सौंदर्य आलं की नाही? त्याला ह्याची जाणीव झाली की नाही, की तो किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये किती गुण आहेत, तो किती महत्त्वाचा आहे, तो किती मोठा आहे. हे सगळे जाणण्याची त्याच्यामध्ये पात्रता आली की नाही? तुकारामांनी म्हटलेले आहे की, 'अणू-रेणूहूनही थोडका, तुका आकाशाएवढा.' मी ह्या अणूरेणूपेक्षा जरी लहान असलो तरी आकाशापेक्षा मोठा आहे. ज्याने हे एकदा बघितलं स्वत:बद्दल, मग तो क्षुल्लक गोष्टींसाठी, भलत्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य घालविणार नाही. व्यर्थ गमवणार नाही. आपलं आयुष्य ह्या क्षुल्लक गोष्टींकरता गमावणं फार मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आता अनेक घाणेरडया गोष्टी आलेल्या आहेत. ते आपल्याला माहिती आहेत. आता दारू पिणे. कोणी म्हटलं, दारू पिऊ नका, तर कोणी ऐकणार नाही. उलट अर्धे लोक तर रागावून निघून ४ ८० 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-4.txt जातील. पण जेव्हा तुमचा हा आरसा, म्हणजे तुमचा आत्मा जेव्हा जागृत होतो, तेव्हा त्या आरशात तुम्ही स्वत:ला बघता. 'आणि ही काहीतरी घाणेरडी वस्तू आहे, ह्या घाणेरड्या वस्तूमुळे आम्हाला त्रासच होणार आहे,' हे लक्षात येऊन तुम्ही आपोआप ते टाकून देता. दूसरं आहे, माणसामध्ये अहंकार असतो. त्याचा उद्दामपणा, ज्याने लोकांना आपण दुखावतो, त्रास देतो. ह्या अहंकारालासुद्धा, हा आरसा जागृत झाल्यावर तुम्ही बघू शकता. ते कितीही तुम्ही वाचन केलं, कितीही तुम्ही देवाचं नाव घेतलं, कितीही देवाच्या नावाने धिंगाणा घातला, तरीसुद्धा ते दिसणार नाही. फक्त आत्म्याचा प्रकाश जेव्हा स्पष्टरूपाने तुमच्यामध्ये दिसेल, तेव्हा त्या आत्म्याकडे तुम्ही बघायला लागाल, तर तुमच्या लक्षात येईल, की हे काहीतरी आपल्याला विसंगत आहे. आपण इतके सज्जन आहोत, इतके मोठे आहोत, देवाने आपल्याला किती मोठे बनवलं आहे, आपण काही जनावर नाही आहोत. पशू नाही आहोत. माणसाला आपल्याला सुबुद्धी दिलेली आहे. इतकंच नाही तर आपल्याला स्वतंत्रता दिलेली आहे, की जी परम स्वतंत्रता आहे, ती आपण मिळविली पाहिजे. मग ही फालतूची गुलामी कशाला करायची! असे व्यसनं लावून गुलामी कशाला करायची! आम्ही जर स्वत:च एवढे स्वतंत्र आहोत, आमच्या 'स्व' च्या तंत्रात आम्ही चालतो, तर आम्हाला ही गुलामी काय कामाची? म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं , की स्वधर्म ओळखावा. 'स्व' चा धर्म ओळखला पाहिजे. 'स्व' म्हणजे तुमचा आरसा, जो तुमचा आत्मा आहे, तो तुमचा आरसा आहे. तो मिळविला पाहिजे. आता खेडेगावातून आपल्याकडे अशा पुष्कळ विचित्र कल्पना आहेत देवाबद्दल, की त्याचं मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं. पुष्कळ लोकांना असं वाटतं की देव वगैरे सगळे अंगात येतात, घुमतात. पुष्कळ बायकांना असं वाटतं, की आपल्यामध्ये देवी येतात. आता सांगायचं म्हणजे देवीला झेलणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. देवीची शक्ती असते आणि त्या शक्तीने कुंडलिनी जागृत होते. ज्या बाईच्या अंगात भुतं येतात, तिला तुम्ही जर देवी म्हणाल, तर तुम्ही परमेश्वराच्या विरोधात आहात. ही भूतं आहेत आणि त्या बाईला त्रास होतो. मानसिक त्रास होतो. इतकेच नाही, तर घरच्या सर्व लोकांना दारिद्रय येते. तिच्याकडे जाणाऱ्या लोकांना त्रास होतो. त्यांना दारिद्रय येते. म्हणून अशा गोष्टींकडे आपण भोळेपणाने गेलं नाही पाहिजे. तसंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात पाहिलं तर एक कोणी ना कोणी तरी असा मनुष्य, अशी बाई असते, जे काही तरी अशी कामं करीत असतात. विशेषत: कोकणात जास्त असतं. आता ह्या वर्षी बरं वाटतंय मला इतकं नाहीये. काहीतरी सांगायचं, की अमक्याकडचं भूत आलंय, तमक्याकडचं भूत आलंय. अशा रीतीने गोष्टी करायच्या, की लोकांना नुसतं भारावून टाकायचं. अशा भारावून टाकलेल्या लोकांना मूर्खात काढून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. ही आपल्याकडची एक प्रथा झालेली आहे. नंतर कोणी तरी येऊन बसायचं, भटजी बनायचं आणि म्हणायचं की एवढे पैसे दे. देवाला पैसे वगैरे काही कळत नाही. देवाला पैसे नकोत तुमचे. देवाला फक्त एकच गोष्ट पाहिजे, की तुम्ही स्वत:च्या आत्म्याचा आरसा हाती घ्यावा आणि त्यात आपलं स्वरूप बघावं. पण त्याबद्दल असं सांगितलेलं आहे, की जेव्हा हा हाती आरसा येतो, तर ह्याची जी आपल्याला अस्पष्ट कल्पना येत असते, ती स्पष्ट करण्यासाठी आणि स्थिरावण्यासाठी मनुष्याला ध्यान आणि धारणा केली पाहिजे. ५ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-5.txt म्हणून आधी कुंडलिनीचं जागरण आणि त्या नंतर ध्यान-धारणा करून, पूर्णपणे आपण स्वत:ला जबाबदार समजून, स्वतंत्र समजून आपल्या आसनावर आरुढ़ झालं पाहिजे. आसनावर बसलं पाहिजे. आम्ही काही असे तसे नाही आहोत. आम्ही मानव आहोत. आम्ही काही आमचं आयुष्य असं वाया घालण्यासाठी आणलेलं नाही. आम्ही आमची काही कदर केलेली नाही आजपर्यंत. पण ती आत्म्याची ओळख झाल्याबरोबर लगेच मनुष्य स्वत:ला ओळखू लागतो आणि त्याच्यातले वाईट गुण आहेत ते झडून पडतात. आता आमच्या इंग्लंडला, जेव्हा मी सहजयोग सुरू केला होता, तेव्हा सात असे लोक आले की जे पुष्कळ इकडची-तिकडची व्यसनं घेत असत. आणि एका दिवसात, त्याच दिवशी त्यांची सगळी व्यसनं सुटली. आता व्यसन ही गुलामगिरी आहे. जरी त्याच्यात तुम्हाला आनंद वाटतो, तरी ती एक गुलामगिरी आहे. कोणतीही गुलामगिरी पत्करायची नाही, असं ठरवलं पाहिजे. असं ठरवल्यानंतर हा जो आत्मा आहे, तो स्पष्टरूपाने दृष्टोत्पत्तीस पडतो. त्याचा आपल्याला परिणाम जाणवतो आणि त्या परिणामामुळे जे काही आपल्यामध्ये नको आहे, ते निघून जातं. पण त्याच्याआधी नको तेच आपल्याला आवडतं. जे वाईट तेच आपल्याला आवडतं. जे चुकीचे तेच आपण घेतो. तेव्हा मी एक आईच्या दृष्टीने सांगते, की कोणी वाईट वाटून घेऊ नये. जर व्यसन असलं तर त्याबद्दल घाबरू नये. आत्म्याच्या जागृतीने सगळ्यांची व्यसनं सुटणार. सगळ्यांची गुलामी सुटणार. सगळ्यांची गरिबी सुटणार आणि सर्व तऱ्हेचे जेवढे काही क्लेष आहेत, त्रास आहेत, शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच सांसारिक, सगळेच्या सगळे तुमचे त्रास ह्याच्यातून जाणार आहेत आणि ते झालेच पाहिजेत. तेव्हा ह्या गावाला आम्ही आलो, चाळगावाला, आणखीन ह्या लोकांनीसुद्धा इथे येऊन, इथली पवित्रता पाहिली, तुम्हा लोकांना भेटले. तुमच्याबरोबर नाचले आणि खूप आनंदात होते. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढा सत्कार केला, सगळ्यांना स्वयंपाक करून इतकं सुंदर जेवायला दिलं त्याबद्दल त्यांनी मला सांगितलंय की, 'माताजी, तुम्ही ह्यांना सगळ्यांना कृतार्थ करा.' आता आमची जी पद्धत आहे, की आम्ही ज्या गावाला जातो, तिथली जी मालकीण असते, तिला एक काहीतरी बक्षीस द्यायची पद्धत आहे. त्याप्रमाणे इथे, आपले जे, तुम्हाला माहिती आहे, की हरिश्चंद्र कोळी म्हणून जे आहेत, त्यांनी एवढी मेहनत केली, हे घर स्थापन केलं, सहजयोग इथे स्थापन केला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांची एवढी मदत केली. तेव्हा त्यांना फूल न फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यायचं आहे. बाकि सर्व लोकांनाच काहीतरी द्यायचं आहे. आणि ते काहीतरी द्यायचं म्हणजे ज्याला आपण आशीर्वाद म्हणतो. ह्या आशीर्वादामध्ये तुमच्या कुंडलिनीचं जागरण करून तुम्हाला तुमच्यामध्येच समर्थ करायचं आहे. तुमच्यामध्ये तुम्हाला उभं करायचं आहे. तुमच्या गौरवाची तुम्हाला पूर्णपणे समज येईल तुमच्या मोठेपणाची तुम्हाला समज येईल, त्याची सुज्ञता तुमच्यात येईल, असं काहीतरी करून जायचंय. म्हणजे मग पुढच्या वेळेला आल्यावरती इथे सबंध लोक फार सुंदर दिसतील आणखीन त्यांच्या चेहऱ्यावरती एक तजेला, त्यातून त्यांच्या हृदयामध्ये जशी काही कमळाची फुलं उमलावीत असं सुंदर स्थान परमेश्वरासाठी तयार केलेलं आहे. माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. ६ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-6.txt कलेक्टिव्हिटीला यायला पाहिजे पुणे, १९८० या भारत भूमीच्या योगभूमीत महाराष्ट्र म्हणजे हिरा आहे, याबद्दल काही शंका नाही. लोकांमध्ये भक्तिभाव आहे, समज आहे. त्यातल्या त्यात पुणे हे शहर महाराष्ट्राचं डोकं आहे असं लोक म्हणतात. पण सगळी कामं डोक्याने होत नसतात. त्याला हृदय ही लागतं. हे डोकं जर जास्त चालू लागलं तर हातही बंद पडतात आणि हृदय ही बंद पडतं. या पुण्यामध्ये जेव्हा मी हे कार्य सुरू केलं होतं, तेव्हा फार तर दहा-बारा मंडळी होती आणि हळूहळू हे कार्य वाढू लागलं. त्याला कारण असं आहे की कोणतीही जिवंत गोष्ट करायची म्हणजे त्याला वेळच लागतो. एक जर झाड लावलं तर असं म्हणता येत नाही की पहिल्याच वर्षी अनेक फळं येतील. त्याला वेळ यावी लागते आणि तेव्हाच हे झाड फलद्रूप होतं. त्यातही जे झाड समजा राहुरीला लवकर फलद्रूप होईल, नगरला होईल , ते पुण्याला तितकेच लवकर होईल असं म्हणता येत नाही आणि मुंबईला कधी होईल काही म्हणता येत नाही. त्याला कारण शहरातली मंडळी डोके फार चालवतात. डोके जास्त चालवून परमेश्वर मिळत नाही. कारण परमेश्वराला या लहानशा डोक्याने आपण आत्मसात करू शकत नाही. त्याला मोठं हृदय पाहिजे. मोठ्या हृदयानेच आपण परमेश्वराला आपल्यामध्ये बघू शकतो. आपल्या हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे, असं अनेक साधू-संतांनी सांगितलं आहे. तसंच आपल्यामध्ये कुंडलिनी नावाची शक्ती आहे हे ही सांगितलं आहे. जे आपल्याला हिंदू म्हणवतात आणि हिंदू म्हणून मोठीमोठी संघटना बनवतात, ते मात्र विसरलेत, की या हिंदू धर्माचे प्रणेते आदि शंकराचार्यांनी कुंडलिनीचं वर्णन इथून तिथपर्यंत केलेले आहे. इतकेच नव्हे तर चैतन्य लहरी मिळवणं हेच आपलं परम कर्तव्य आहे आणि ते 'न ७ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-7.txt सर्व जगावर योगेन न सांख्येन' कशाने होत नाही. फक्त आईच्याच कृपेने होतं असं म्हटलं आहे. शेवटी त्यांनी सौंदर्य लहरी' म्हणून एक फार सुंदर, फारच सुंदर पुस्तक लिहिलेले आहे आणि त्यात त्यांनी फक्त आईचेच वर्णन केलेले आहे. देवीचं, शक्तीचं , आईच वर्णन केलेले आहे. प्रत्येक अंग-प्रत्यंगात कोणती कोणती शक्ती आहे आणि त्या कसं कार्य करून घेतात वगैरे फार फक्त परमेश्वराचेच सुंदर..... मलासुद्धा आश्चर्य वाटतं की इतकं ह्यांचं ज्ञान होतं ! म्हणजे मार्कडेयाच्या वर होते साम्राज्य आहे ते. फार सुंदर वर्णन करतात. अशा त्या आदि शंकराचार्यांनासुद्धा आपण विसरून गेलो आणि आपण काहीतरी नवीन तऱ्हेचा हिंदू धर्म काढलेला आहे. आणि तो नवीन धर्म कुठेतरी, काहीतरी अंधश्रद्धा, भलत्या ठिकाणी पैसे ओतणे, तसंच आपल्या बुद्धीने काहीतरी नवीन नवीन विचार काढून, नवीन नवीन तऱ्हेचे धर्म काढणे. त्यात पांगापांग करणे वगैरे वरगैरे अनेक प्रकार हिंदू धम्मातसुद्धा आणि बाकी सगळ्यांचे सामज्य झालेले आहेत. त्याला कारण मुख्य असं, की जर तुम्ही कोणत्याही गोष्टीची अशी व्यवस्था म्हणजे हे एक केली तर त्याच्यासाठी सरकार आहेत, कायदे आहेत. प्रत्येक गोष्टीला कायदा आहे, सरकार आहे. पण धर्माच्या बाबतीत असं नाही. धर्माच्या बाबतीत कोणीही काहीही म्हणावं. म्हणजे कही तरी नेपोलियननेसुद्धा देवावर ताशेरे झाडलेले आहेत. हिटलरनेसुद्धा देवाबद्दल भाषणं दिलेली मिथ्या. आहेत. म्हणजे कोणीही उठालं आणि परमेश्वराबद्दल बोललं तर त्याला कोण धरणार? त्याला कोण पोलीस धरणार? त्याला काही कायदा नाही, कानून नाही, काहीही नाही. त्याचे काही परिणाम नाहीत. तसंच साधु-संतांना देखील छळलं, तर त्याचे काही परिणाम होतात, असं म्हणतात नरकात वरगैरे जातो, ते पाहता येईल. पण सध्या तरी, काही होत नाही असा विचार करून लोक हे विसरतात, की सर्व जगावर फक्त परमेश्वराचेच साम्राज्य आहे आणि बाकी सगळ्यांचे साम्राज्य म्हणजे हे एक काही तरी मिथ्या. एखाद्याने म्हणायचं की आम्ही शिवाजी महाराज आहोत. म्हणून ते काही शिवाजी महाराज होत नाहीत. जे शिवाजी महाराज होते, तेच शिवाजी महाराज होते. पण आपण नाटक करू शकतो आणि थोडा वेळ आपण असा विचार करू शकतो, की आम्ही ह्या जगावरती साम्राज्य करीत आहोत. पण जो ह्या जगावर साम्राज्य करतो तो परमात्मा आहे. त्याचं एक साधं उदाहण मी तुम्हाला सांगते, की जर तुम्हाला एका फुलापासून फळ तयार करता येत नाही, एक ही जर तुम्हाला जिवंत कार्य करता येत नाही, तर तुम्ही करता काय? आपल्या डोक्याला थोडासा तुम्ही हा प्रश्न विचारा. तुम्ही आपल्या डोक्याने आजपर्यंत केलं काय? जे केलं हे दगड-धोंडे! त्याच्या पलीकडे तुम्ही काय केलेले आहे ? त्या डोक्याने तुम्ही मिळवलं काय? तुम्ही चिकित्सा एवढी केली, भांडणं केली. एकमेकांची डोकी फोडण्या पलीकडे तुम्ही केलं काय? फार सायन्स सायन्स करून तरी केलं काय ? अॅटम बॉम्ब बनवून ८ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-8.txt ठेवलेला आहे आणि भुतासारखा तुमच्या डोक्यावर बसलेला आहे. आता तुम्हाला समजत नाही, की हा कधी आपल्या डोक्यावर येईल. त्या क्षणात सबंध विश्व नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. परदेशामध्ये माझे पुष्कळ जाणं-येणं असायचं. आता वास्तव्यच झालं आहे मुळी. तिथल्या लोकांना पाहून तर मला आश्चर्य वाटतं, की हे जे लोक बुद्धीच्या आधारे चालत गेले, ते कुठल्या कुठे जाऊन भरकटलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची अक्कल राहिलेली नाही. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, की आता इथे हे जे गृहस्थ बसलेले आहेत, त्यांनी हजारो अशा, बिचार्या शिकलेल्या पढतमूर्खांना अगदी मूर्खात काढून आणि असे जे कपडे वरगैरे घातलेले आहेत, की ज्या कपङ्यांना घालून त्यांना असं वाटतं की आपण संन्यासी झालो. आपण उच्चपदाला गेलो आणि इतकेच नाही, पण त्यांनी हे ही सांगितलेले आहे, की अधम कार्य करून तुम्ही परमेश्वराला मिळवू शकता आणि ते त्यांनी मानून घेतलं. म्हणजे जे काही आजपर्यंत झालेलं आहे, जेवढं काही शास्त्रशुद्ध आहे ते सगळं चुकीचं आहे. हे सुद्धा बुद्धीने मनुष्य स्वीकारू लागला. तेव्हा ह्या बुद्धीची कमालच म्हटली पाहिजे. जे काही ज्ञानेशांनी सांगितलं किंवा मोठ्या मोठ्या सगळ्या अवतरणांनी सांगितलं गेलं की तुमचा परत जन्म झाला पाहिजे, तुमच्यात परिवर्तन आलं पाहिजे, ते काही खोटं नव्हतं. ती गोष्ट काही खोटी नाहीये आणि तीच गोष्ट आज आम्ही इथे सिद्ध करायला आलेलो आहे . जे त्यांनी भाकीत केलं होतं ते भाकीत आज पूर्ण होणार आहे. त्याची वेळ आली म्हणून आणि ती वेळ पुण्यातही आलेली आहे. सगळ्या विश्वात आलेली आहे आणि त्या वेळेचा पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे, असं एका आईचं तुम्हाला सांगणं आहे. त्याबद्दल तुम्ही जर चिकित्सा करायचं म्हटलं, तर उगीचच वेळ घालवाल आणि जे तुमचं आहे ते मिळविण्याच्या ऐवजी त्याला तुम्ही मुकाल. तेव्हा त्याबद्दल ह्या दृष्टीने विचार केला पाहिजे, की जर कुंडलिनीची जागृती वाचून आणि अभ्यासाने होत असती तर मग पुष्कळशा गरीब लोकांना किंवा अशिक्षित लोकांना कुंडलिनीची जागृतीच होणार नाही. जर कुंडलिनीची जागृती हे एक जिवंत कार्य आहे, तर त्याच्यामध्ये वाचन करून, तुम्ही वाचन करून जर एका 'बी' तून रोप काढून दाखवले, तर जे म्हणाल ते आम्ही हारू शकतो. हे एक जिवंत कार्य आहे आणि त्या कार्यामध्ये उत्क्रांतीत तुम्ही आज अमिबाचे मानव झालेले आहात, त्याच्या पुढची पायरी यायला पाहिजे. ती का यायला पाहिजे ? तुम्हाला अजून तुमचा अर्थच लागलेला नाही. तुम्ही समर्थ आहात. तुम्हाला माहितीच नाही अजून, की तुम्ही जगात आला कशाला आहात ? तुमचा उपयोग काय? दोन-चार पैसे एकत्र करण्यासाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी आपण काही संसारात आलेलो नाही. निदान माणसाने आपली तरी एवढी किंमत करू नये, की आपण दोन-चार पैसे, गाढव मेहनतीसाठी ह्या जगात आलो, गाढवासारखं राबायचं, मुलाबाळांना पोसायचं, म्हातारपणी त्यांचे जोडे खायचे आणि मरायचं. ह्यासाठी काही आम्ही जन्माला आलेलो नाही! परमेश्वराने आपल्याला एवढ्या मेहनतीने मानवस्वरूप दिलेले आहे. ते एवढ्यासाठीच दिलेले आहे! तेव्हा हे कशासाठी दिलेले आहे? जर कोणतीही वस्तू आपण बनवत असलो, तर लोक विचारतील, की ९ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-9.txt काहो, एवढी मेहनत करून तुम्ही का बनवता आहात ? ह्याचा उपयोग काय ? आपण परमेश्वराचं एक साधन आहोत, असं सगळ्या साधु-संतांनी सांगितलं आहे. ते साधन आपण झालं पाहिजे. ते कसं होणार? त्याच्यासाठी लोक धडपडतात, पूजा-पाठ करणे, मंत्र, अमुक-तमुक. गुरू कर, अमक कर, तमकं कर. जगामधल्या गोष्टी करूनसुद्धा, 'आम्ही साधन झालो. आता आम्ही परमेश्वरामध्ये रममाण झालो.' अशा रीतीने काहीतरी एक खोटी, भ्रामक कल्पना डोक्यामध्ये घेऊन बसायचं. ही गोष्ट प्रत्यक्षात घडली पाहिजे. ते तुमच्यात झालं पाहिजे. ते दिसलं पाहिजे. तुम्हाला डोळ्यानेसुद्धा कुंडलिनी दिसू शकते. तिच स्पंदन दिसू शकतं. तिचं वर चढणं दिसू शकतं. ते तुम्ही बघू शकता. ती वर चढल्यावर, ब्रह्मरंध्रात पोहोचल्यावर, तुमच्या टाळूच्या ठिकाणी तिचे स्पंदन तुम्हाला जाणवू शकतं. तुम्ही जाणू शकता. तुम्हाला ते ऐकायला येईल. जसं काही इथे हृदय धडकतं आहे असं हृदयासारखीसुद्धा ती तुम्हाला त्रिकोणाकार अस्थीमध्ये दिसू शकते. हे कुंडलिनीचं जागरणं इथे, पुण्याला हजारो लोकांनी पाहिलेलं आहे. तुमच्यातसुद्धा असे पुष्कळ लोक आहेत ज्यांनी हे पाहिलेले आहे. ते तुम्हाला वाटेल. पण हे का? ही जागृती का होते ? कारण तुम्हाला अर्थ लागला पाहिजे. तुमच्यात परिवर्तन यायला पाहिजे. आज मनुष्य आपण म्हणतो, कितीतरी मी इथे आल्यापासून ऐकते आहे, की आपल्या देशामध्ये हे ठीक नाही, ते ठीक नाही. मनुष्याला लाचलुचपत पाहिजे. त्याला अमकं पाहिजे. त्याला हे झालं पाहिजे. ते झालं पाहिजे. सर्व तऱ्हेचे त्रास डोक्यावर आहेत. का आहेत ते त्रास? परमेश्वराने हे त्रास केलेले नाहीत. हे मानवाने त्रास केलेले आहेत. हा पैसा खातो, त्याने त्याला मारून टाकलं, तिकडे ती दुष्टता चाललेली आहे, तो धर्मांध आहे. अमुक आहे, तमुक आहे. हे सगळं काही परमेश्वराने सांगितलेले नाही. पण हे मानवाने केलेले आहे. कारण काय? कारण त्याला अज्ञान आहे. अंधारात आहे तो. अंधारात तो भांडत असतो. अजून त्याला चाचपडत असतांना जे काही सापडलं तेच माझं आहे, असं समजून सगळे काही दिसलेले नाही. म्हणून तो असं म्हणतो, की हे माझं, हे माझं, हे माझं. जेव्हा प्रकाश येतो, तेव्हा माणसाला समजतं, की हे सगळे काही आहे. उगीचच मी भलतेच घेऊन बसलो आणि त्यासाठी भांडत होतो. त्याच्यासाठी मी केला, त्याचासाठी मी एक संस्था काढली, त्याच्यासाठी मीच खरा ग्रुप असं म्हणत होतो. तेव्हा तो प्रकाश आपल्यामध्ये आला पाहिजे. प्रकाश आल्यानंतर एकदम परिवर्तन होतं. साधी गोष्ट आहे. अंधारात जर एखादा मनुष्य झोपला, तर उठून सकाळी आपलं सगळें काही करतो. त्याला काही लक्षात येत नाही. पण जेव्हा दिवा लावल्याबरोबर, आरशात पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात येतं, 'अरे मी असे कसे कपडे घातले. माझे केस कसे विंचरलेले आहेत. ते नीट झाले पाहिजेत. माझ्या हातात काय आहे ? कपड्यांना कशी घाण लागलेली आहे.' सगळं काही त्याच्या लक्षात येतं. जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत परिवर्तन कसं होणार? मी जर म्हटलं की तुम्ही ही वस्तू करू नका, हे तुमच्यामध्ये चुकलेले आहे. लगेच तुम्हाला राग येणार. आणि बरोबरच आहे. कारण तुम्हाला दिसत नाही ते मला दिसतं. तेव्हा जर प्रकाश तुमच्यात आला, तर प्रकाशात तुम्ही तुमच्याबद्दल बघू शकता. १० 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-10.txt ते जान स्वत:बद्दल जाणू शकता. आणि मग तुम्हाला वाटेल, की खरंच आहे. माताजी म्हणतात तसं आहे आमच्यामध्ये! हे तुमच्यामध्ये घडलं पाहिजे आणि हे घडल्यानंतरच परिवर्तन येणार. परिवर्तनाशिवाय काहीही इलाज नाही. तुम्ही काहीही करून बघा. लोकांनी मोठमोठाल्या आल्यावरच मिरवणुका काढल्या, अमुक झालं, तमुक झालं. साखरेच्या किंमती कमी करा, अमुक करा. काय ह्याच्यात ठेवलेले आहे. आकाशाला ...... (अस्पष्ट) बांधणे. हे नसलं तर दूसरं काहीतरी. ते नाही मिळालं तर तिसरं काहीतरी. आपल्याकडे केव्हापासून ही चळवळ मनुष्य आपल्यामध्ये चाललेली आहे. त्या चळवळी काही संपत नाहीत आणि त्याने मिळालं काय लोकांना ? एक परिवर्तन तरी मनुष्य जगात सुखी दिसतो आहे का? एकाला तरी सुख मिळालं आहे का? म्हणजे काय ? म्हणजे काही तरी आपल्यामध्ये असं आहे, जे फारच अति खोल आहे. जे आपल्याला स्वत:च करून मिळालेले नाही. म्हणूनच मनुष्य असा दुःखी आणि चळवळा झालेला आहे. त्याला जर शांत घेतो. कारण करायचं आहे, त्याला जर काही मोक्यावर पोहोचवायचं आहे, तर त्याला मिळालं पाहिजे. जे तो शोधत आहे. ल्याला केवळ आता आपल्या आतूनच आपण ते शोधत आहोत. हा शोध आपल्यामध्ये चालू आहे. जযच येत पुष्कळ लोक मला म्हणतात, 'माताजी, आमचं जर घर बांधून झालं तर आम्ही सुखी होऊ.' नाही, पण परत पुढच्या वर्षी, 'घर झालं बांधून आई, पण आमचा मुलगा हरवला. तो मिळाला तर बरं होईल.' मग तिसरी गोष्ट. तिसर्या वर्षी आले, 'मुलगा आला, पण लग्न झालं तर बरं होईल. ' ल्याला चालूच आहे. त्याला काही अंत नाही. पहेलवान लोकसुद्धा येतील माझ्याकडे आणि सांगतील, 'आई,हे बघा, आम्हाला तुम्ही शांती द्या. ' आता एवढे पहेलवान आहेत, तरी शर्तीसुद्धा रोते. त्यांना काही आजार आहेत. आजारी माणसं म्हणतात, आमचा आजार बरा करा. प्रत्येकात काहीतरी उणीव आहे आणि ती उणीव कशी भरून काढायची? पहिल्यांदा ती उणीव आहे ते आधी समजलं पाहिजे. त्यासाठी प्रकाश हवा. ज्ञान आलं पाहिजे. ज्ञानाशिवाय ते गरम्य होणार नाही. आणि ज्ञान म्हणजे पुस्तकात सापडलेलं ज्ञान. ते तर आधी आहेच. बाहेरच आहे. ते उघड आहे. जे अदृश्य आहे, ते जेव्हा जाणलं जाईल, तेव्हाच त्याला ज्ञान म्हटलं जाईल. असं ज्ञान आपल्यामध्ये आलं पाहिजे. आणि ते ज्ञान आल्यावरच मनुष्य आपल्यामध्ये परिवर्तन स्वत:च करून घेतो. कारण त्याला केवळ ज्ञानच येत नाही, पण त्याला शक्तीसुद्धा येते. आता कुंडलिनीची जागृती जेव्हा होते, तेव्हा माणसामध्ये काय परिवर्तन येतं ते थोडसं मी तुम्हाला सांगते. पैकी भाषणाने ह्या गोष्टी होत नाहीत. मी जर म्हटलं, की अहो पुणेकर, तुम्ही कशाला आपापसात भांडता? शनिवार वाडा आणि बुधवार लागले भांडायला. कशाला भांडता ? तुम्हाला समजणार नाही! मग आता आम्ही ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सगळ्या ह्याला म्हणतो 'आमचे एक विश्व आहे'. तुम्ही मानणार आहात का ? आता साहेब आमचे. त्यांनी ११ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-11.txt योग फक्त सांगितलं की त्यांना शंभर नेशन्सनी निवडून दिलं. पण ते देश किती भांडतात आपापसात ते मला माहिती आहे. तेव्हा ते सर्व एक आहेत असं अजून त्यांना वाटतं. जरी त्यांच्या खूप संस्था एकच आहे. आहेत, अमुक आहे, तमुक आहे, पण ते एक नाहीत. आतून एक नाहीत. आतून तो एकपणा आलेला नाही. ते एकत्रीकरण आलेले नाही. त्याला कारण असं आहे, अजून जे काही सार्वजनिक आहे, जे काही सार्वभौमिक आहे, ते आपल्यामध्ये जागृत झालेलं नाही. अजून सहजयोग ! दुसरा काही योग नाही. आपण आपल्यापुरते आहोत. एखाद्या लहान बेटासारखे आहोत आपण. 'मी, माझं, मला' हे बेट तुटायला पाहिजे. हा बिंदू सिंधूमध्ये मिळाला पाहिजे. हे सगळेच सांगतात, की मिळाला पाहिजे बिंदू सिंधूमध्ये, पण कसा मिळणार? बाकी जे योग त्याला एकच मार्ग आहे. फक्त एकच मार्ग आहे. तो आहे कुंडलिनी जागृतीचा! योग फक्त एकच आहे, सहजयोग ! दुसरा काही योग नाही. बाकी जे योग आहेत ते त्याला सहाय्यक आहेत, उपयोगी आहेत, पण ते योग नाहीत. जसं आम्ही इथे यायला, भेटायला तुम्हाला आहेत ते त्याला अनेक रस्त्याने आलो. म्हणून ते रस्ते खरे नाहीत. इथे आलो, तुम्हाला भेटलो. हा खरा योग. आणि हा सहजयोगाचा मार्ग म्हणजे परमेश्वराने आखलेला आहे. हा तुमच्यामध्ये बनवून सहारयक आहेत, उपयोगी ठेवलेला आहे. तुमच्यामध्ये सगळे काही आहे. आणि त्यानेच ही चक्रे, ही कुंडलिनी वरगैरे सगळे व्यवस्थित ठेवलेले आहे. त्यावर कबीरांनी पुष्कळ लिहिलेले आहे. नानकांनी पुष्कळ आहेत, पण ते लिहिलेले आहे. आणखीन आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेशांनी लिहिलेले आहे. हा सगळा मार्ग आपल्यामध्ये आहे आणि तो मार्ग कोणीही बदलू शकत नाही. तो मार्ग कोणीही करू शकत योग नाहीत. नाही. तो परमेश्वराने आखलेला आहे. आणि हे अंकुर जेव्हा तुमच्यामध्ये जिवंत होतं तेव्हा तुम्हाला आत्मदर्शन होतं, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण ते झाल्याबरोबर काय होतं आपल्यामध्ये. मुख्य म्हणजे पुष्कळ लोकांनी असेही मला सांगितलं की माताजी, एक एक गोष्टीची समाधी लागायला हजारो वर्षे लागतात. आता तुम्ही होता का तेव्हा ऐकायला? तो कोणी पाहिला? बरं कबूल, लागत असतील. अहो, हजार काय चार हजार लागणार. जर डोळ्यावर पडदा घालून समजा आम्हाला तुम्ही सांगितलं, की इथून जाऊन माताजींच्या फोटोला तुम्ही नमस्कार करा. डोळ्यावरती पडदा आहे. कदाचित आम्हाला हजार वर्ष लागतील, तरी आम्ही तिथपर्यंत पोहोचणार नाही. कारण डोळ्यावर पडदा आहे. काही दिसतच नाही. पण जर समजा कोणी आपल्या किमयेने किंवा आपल्या हशारीने किंवा आपल्या जाणकारतेने तो पडदा जर काढला, तर सोपं काम आहे की नाही. तुम्ही सरळ उठाल आणि तिथे जाल की नाही! फक्त तो पडदा काढा आणि ते काढण्याचं काम कुंडलिनी जागृतीने होते. आता लोक हे ही म्हणतील, की कुंडलिनी जागृती हे फार कठीण काम आहे. असेल १२ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-12.txt बुवा! आपल्याला काही कठीण वाटत नाही. ज्यांना असेल त्यांना असेल. आपल्याला ते काही कठीण वाटत नाही. त्याबद्दल ते आमच्या हातून का घडतं ? कसं घडतं? वगैरे, ते तुम्ही पार झाल्यावर जाणाल. काय गोष्ट आहे? असं कसं घडतं ? त्याच्या आधीच उहापोह केला. तर दाराच्या बाहेर आम्ही राहून उपाशी आहोत असं म्हणण्यासारखं आहे. तुम्ही आतमध्ये या, हे घ्या, पार व्हा. आपली चक्र जागृत करून घ्या आणि समजून घ्या, की तुमच्यामध्ये कोणते दोष आहेत आणि ते कसे स्वच्छ करायचे आणि तुमच्यात सार्वभौमिकता पाहिजे. सर्वात प्रथम जेव्हा कुंडलिनी जागृत होते, तेव्हा तुम्हाला ह्या चक्रावरून कुंडलिनी गेली, आज्ञा चक्रावर गेली म्हणजे सहज तुम्हाला ही दशा येते. त्याला आपल्याकडे फार कठीण दशा म्हटलेले आहे. पण आमच्या सहजयोगामध्ये ती अत्यंत साधारण दशा मानलेली आहे. म्हणजे निर्विचारिता स्थापित होते. निर्विचार समाधी. स... मा... धी.... हा शब्दसुद्धा इतका घोटाळ्याचा आहे! लोकांना असं वाटतं, की मेलं म्हणजे समाधी लागते. म्हणजे काय वेडेपणा आहे! सगळेच मरतात. कुत्री, मांजरी सगळेच मरतात. त्यांना काय समाधी लागते का? स... मा... धी... सम शब्दापासून, धी म्हणजे बुद्धी बुद्धी जेव्हा जागृत होते, इनलाइटन्मेंटमध्ये जेव्हा बुद्धी येते, तेव्हाच त्याला समाधी म्हटलं पाहिजे. जेव्हा मनुष्य त्या कुंडलिनी जागृतीला प्राप्त होतो तेव्हा ती कुंडलिनी जेव्हा आज्ञा चक्रावर येते, त्यावेळेला त्याला निर्विचार समाधी येते. म्हणजे त्याची जी बुद्धी आहे, त्याची जी 'धी' आहे, ती जागृत होते आणि जागृत होऊन ती संवेदनशील होते आणि तो निर्विचार होतो. आता संवेदन किती येतं ते बघा. ज्या मनुष्याची कुंडलिनी फक्त आज्ञा चक्राच्या वर आलेली आहे, तो मनुष्य लोकांचे रोग ठीक करू शकतो कारण शारीरिक आहे. आज्ञा चक्राच्या वर आली म्हणजे शरीराच्या वर आली ती. विचारांच्या वर आली. दुसर्यांचे विचार वगैरेसुद्धा वाचू शकेल, पण ते काही महत्त्वाचं नाही. मुख्य म्हणजे रोग ठीक होतात. अशा माणसाच्या हातामध्ये अशी शक्ती येते, की त्याने जर हात लावला तर त्याचे रोग ठीक होतील. जेव्हा कुंडलिनी निघून ब्रह्मरंध्राला छेदते, त्यावेळेला आम्ही पार झालो असे म्हणतो. पण ती सुरुवातच आहे. त्यावेळेला हातातून अशा चैतन्य लहरी हळू हळू वाहू लागतात आणि थंड थंड असे वाऱ्याचे झोत यायला लागतात. हे जेव्हा घडतं त्यानंतर लगेच तुम्ही दुसर्यांना जागृती देऊ शकता. तुम्हाला लगेच कळतं की तुमच्यामध्ये कोणते दोष आहेत. म्हणजे ह्या सर्व चक्रांवर, ह्या बोटांवर चक्रं आहेत. आता समजा जर ह्या माणसाच्या बोटाला जळू लागलं, तर त्याने समजायचं की त्याला त्रास विशुद्धी चक्रावर आहे. आता ह्याचं डीकोडिंग काय आहे? ही बोटं कशाची आहेत ? ह्या बोटांवर कोणती कोणती चक्र आहेत ? हे कोणत्याही शास्त्रात सांगितलेले नाही. पण आमच्या सहजयोगामध्ये विदित आहे. इथे तुम्ही बघू शकता. एखाद्या माणसाला जर हार्ट अॅटॅक आलेला असला, त्याचं हार्ट जर वीक असलं तर त्याचं हे बोट धरणार. जर त्याच्या वडिलांचा मृत्यू अचानक झालेला असला किंवा तो स्वत: वाईट स्थितीत असला किंवा काही तरी हिताचं जे त्व आहे ते खराब झालं, की हे बोट धरणार. त्याप्रमाणे १३ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-13.txt प्रत्येक बोटाला काही तरी अर्थ आहे आणि तो आपण बरोबर पडताळून घेऊ शकतो. आता हे लहान मुलांनासुद्धा जमतं. अगदी लहान मुलं जर पार झाली तर त्यांनासुद्धा कळतं. ते ही सांगतील, माताजी, आमचं हे बोट धरलंय. तुम्ही दहा मुलांचे जरी डोळे मिटून ठेवले तरी सत्य एकच आहे. सगळे एकच बोट वर करणार आणि त्यामुळे हळू हळू आपल्याला समजू लागतं, की हे माझं धरतंय, हे माझं हे, चक्र धरलेलं आहे. आजच एक गृहस्थ माझ्याकडे आले. मला सांगायला लागले की, 'माताजी, माझं आज्ञा धरलंय, ते ठीक करा.' तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज्ञा कशाने धरतं ? अहं भावाने. आजपर्यंत तुम्हाला कोणी भेटला नसेल, ज्याने सांगितलं असेल, की मला अहं भाव झालाय. जरा काढून टाका बरं. पण पार झाल्यानंतर आज्ञा चक्र धरलं की जरा दुखू लागतं तिकडे आणि भारीपणा वाटतो आणि बोटावर समजतं. ह्या बोटावर. आज्ञा चक्र धरलंय. म्हणजे माताजी, माझं तेवढं आज्ञा चक्र काढून टाका. त्रास सुरू झाला. अस म्हणून आज्ञा चक्र काढून टाकतात. त्यांनंतर हळू हळू हे परिवर्तन सुरू होतं आणि त्या परिवर्तनामध्ये मनुष्याची सगळी मूल्य बदलतात. ज्या मूल्यांवर आपण फार महत्त्वाचं समजतो, की हे मूल्य चांगलं आहे, ते मूल्य चांगलं आहे, ह्याच्यासाठी आपण भांडलं पाहिजे, त्याच्यासाठी भांडलं पाहिजे. हे सगळं विसरून जे मूलत: महत्त्वाचं आहे, तिकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्याला समजू लागतं, की कोणतं महत्त्वाचं आहे, कोणतं नाही. खरोखर म्हणजे तेव्हाच योग घडतो. कारण आपल्याला, त्या चैतन्य लहरींना, कोणताही प्रश्न विचारला तर उत्तर मिळू शकतं. समजा आपण विचारलं की, 'परमेश्वर आहे किंवा नाही?' लगेच धड़ू, धड़ हातामध्ये यायला सुरुवात होते. आम्ही खोटे की खरे हे विचारलं तर तेच. हा साधू खरा की खोटा? म्हणजे जरी मेलेले असले, हजारो वर्षापूर्वी झालेले असले, कोणीही असो, तरी हा मनुष्य खरा होता की खोटा होता? हा मनुष्य राक्षस होता की काय? विचारलं , जर तो मनुष्य राक्षस असेल, तर एकदम व्हायब्रेशन्स बंद होऊन जाणार. इतकेच नाही तर हातामध्ये फोडसुद्धा येतात. थोडसं असं बारीक पोळल्यासारखं वाटतं. अशाप्रकारे कोणताही मूलत: जो प्रश्न असेल, त्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळेल. अशाप्रकारे तुम्ही समर्थ होता आणि तुमच्यात सार्वभौमिकता येते. हे झाल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे. हे परिवर्तन माणसामध्ये इतकं सहज घडतं, की शेवटी मनुष्य साक्षी स्वरूप होतो आणि त्याला आश्चर्य वाटतं. हे सगळं नाटक संपल्यासारखं वाटतं. आता काही एवढं महत्त्वाचं वाटत नाही. उगीचच आपण काळजी करत होतो असे वाटते. असं अनेक लोकांचे झालेले आहे. तुम्ही महाराष्ट्राचे आहात, म्हणून तुमचेच होणार, असे नाही. तर हे मुसलमानांचंही झालं आहे, ख्रिश्चन लोकांचंही झालेलं आहे आणि कोणत्याही जातीच्या लोकांचं होतं. आता ह्यातून असा अर्थ काढायचा, की आम्ही मोठे धर्ममात्तंड आहोत! अमके, तमके. असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी काय मिळवलं आहे ? वादाला उभे राहीलं की त्यांना विचारायचं, 'अहो, ह्यांची कुंडलिनी कुठे आहे सांगा बरं?' 'ते आम्हाला कसं माहीत असणार ?' मग बोलू नका. बसा खाली. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे, की तुमची कुंडलिनी कुठे आहे आणि १४ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-14.txt दुसर्यांची कुठे आहे. ह्याचं जर तुम्हाला ज्ञान नसेल, तर सगळं तुमचं बोलणं हे वायफळ आहे. एखाद्या बाईने सूर लावावा, की मी काय भाजी करते, मी काय स्वयंपाक करते, वाह, वाह! हे परिवर्तव आमच्यामध्ये जर स्वयंपाक करायला सांगितला तर त्यांना गॅससुद्धा पेटवता येत नाही. म्हणजे त्याला आपण बकबकच म्हणू. ह्याला अर्थ काय? त्याचा साक्षात् तेव्हाच होतो जेव्हा तुमच्यामध्ये हे ज्ञान, आलं पाहिजे, ही तुमच्या शरीरात बाणलं जातं. आता हे लोक तरी आपली भाषा जाणत नाहीत. दुसऱ्या इच्छा धरा. देशातले लोक आपली भाषा जाणत नाहीत. पण ह्यांची भाषा सगळ्यांची एकच आहे. ह्या भाषेला काही दूसरा पर्यायच नाही. ही प्रेमाची भाषा आहे. त्याच्यासाठी आता आपल्याकडे देवीच्या नावामध्ये, तू मूलाधारात बसलेली आहेस, तू आज्ञा चक्रात आर्जव करावा बसलेली आहेस, तू अमुक आहेस हे सगळं आपण म्हणतो. देवीची सप्तशती काढली की सुरू. अहो, पण ते आहे काय? ते तर समजून घ्या.. कोणीतरी भाडोत्री मनुष्य आणायचा. त्याने लागतो का? काहीतरी वाचायचं, सांगायचं. झालं. आम्ही फार मोठं सत्र केलं, यज्ञ केला. त्याच्यासाठी हे तुम्ही इच्छा केलं, ते केलं, पण काय मिळालं तुम्हाला? सगळे आजारी पडले. हे असं कसं झालं ? अहो, माताजी, असं कसं झालं? मी म्हणे देवाची पूजा करतो. शिवभक्त आहे म्हणे आणि त्रास काय धरा. तर हार्ट अॅटॅक! हे कसं होऊ शकतं ? जर शिव तुमच्या हृदयात आहे तर हार्ट अॅटॅक कसा येणार? जर तुम्ही शिव भक्त आहात तर तुम्हाला हार्ट अॅटॅक का येणार? साधा प्रश्न आहे. आणि तो विचारला पाहिजे. कारण त्याला असं आहे, की तुम्हाला काय अधिकार आहे शिवाची पूजा करण्याचा ? तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आलात का? अहो, तुम्ही इथे बसून इंदिरा गांधीला म्हटलं, 'ए इंदिरा गांधी इकडे ये.' पोलीस तुम्हाला अटक करतील की नाही? तशातलेच हे. अनधिकार चेष्टा तुम्ही करत होता. त्याच्यामुळे हे झालेलं आहे. आता परमेश्वराच्या साम्राज्यात आल्यावर सगळं शिकून घ्या. आपलेच हात नाही तर दुसर्यांचे हात ही तुम्ही वाचू शकाल. इतरांनाही मदत करू शकाल. पण आज ती शेवटची वेळ आलेली आहे. ज्याला आपण लास्ट जजमेंट असं म्हणतो. आता शेवटचा निवाडा, ती वेळ आलेली आहे. सगळ्या पुणेकरांना मी सांगते, तुमचा सगळा शिष्टपणा, चिकित्सकपणा, टवाळखोरपणा वरगैरे अगदी प्रसिद्ध होता, ते आता एका बाजूला मुळा-मुठेच्या संगमात टाकून द्या आणि लक्षात ठेवा, ही शेवटची, निवाड्याची वेळ आलेली आहे आणि तुमचा निर्णय होणार आहे. हा निर्णय फक्त कुंडलिनी जागृतीने होतो, अन्यथा होणार नाही. परमेश्वर तुम्हाला तराजूमध्ये घालून किंवा तुमचे ऑपरेशन वरगैरे काही करून बघणार नाही. तुमची कुंडलिनी जागृत केल्याबरोबर तुम्हाला स्वत:ला कळेल, की आपलं काय, कुठे आहे? ह्या निर्णयामध्ये त्यांनी तुम्हाला वेळ दिलेली आहे. आपल्याला ठीक करून घ्या. ही वेळ आलेली आहे. तेव्हा याकडे दुर्लक्ष करण्यामुळे तुमचेच नुकसान होणार आहे. १५ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-15.txt प्रत्येक वेळेला मी बघते, आमच्या आधीचे जे लोक येतात, बोलतात. त्यांची सगळी भाषा सबंध संघ म्हणजे बिचार्यांची, फारच आपलं जे ....म्हणतात ती आहे. त्यांचं म्हणणं असं की नाही, हे नाही, असं नाही. आधी लाचारी. कारण आपण भिंतीसमोर बोलत असलो, तर काय करणार? जागृत झाला भिंतीशी बोलायचं तरी काय? प्रश्न पडतो. बाई, भिंतीबाई जरा ऐका आता! असं वाटतं कधी पाहिजे. कधी. पण तशी गोष्ट नाही. कलेकिटिव्हिटी हे सगळ्यांनी सांगितलेले खरे आहे. हे आमच्यात झाले पाहिजे. हे परिवर्तन आमच्यामध्ये आलं पाहिजे, ही इच्छा धरा. त्याच्यासाठी आर्जव करावा लागतो का? तुम्ही यायला पाहिजे. इच्छा धरा. तुम्हाला सोनं पाहिजे अशी इच्छा करा. असं काही सांगावं लागतं का माणसाला. सबंध तसेच आमची जागृती व्हावी अशी तुम्ही इच्छा धरा, असं सांगायला कशाला पाहिजे? दुसं काय पाहिजे आपल्याला? जे परमातलं परम आहे, जे सगळ्यात मोठं धन आहे, तेच मिळवलं कलेक्टिव्हिटीमध्ये पाहिजे. हे एक आई म्हणून तुम्हाला, जसं लहान मुलाला समजवावं लागतं नां तस समजवावं लागतं. तेव्हा स्वत:ची तयारी आहे किंवा नाही असे पलायनवादी विचारसुद्धा आणले नाही परमेश्वर पाहिजे. 'माताजी, आमची तयारीच नाही. अजून आमचं इतकं हे करायचंय आणि आम्हाला जागृत झाला पाहिजे . तरच अजून ते करायचंय.' झालं. तुम्ही पूर्वजन्मी हेच केलंय. ह्याही जन्मी हेच करणार, ह्याच्या आदल्या जन्मी तेच केल होतं. आता आम्हाला थोडा हठयोग करू द्या. डोक्यावर अजून आम्ही उभे राहिलो नाही. बाकी सगळी आसनं आली. पण ते एक झालं नाही. ते झाल्यावरती मग येऊ तुमच्याकडे. मग त्याच्यानंतर मात्र आम्ही काही करू शकणार नाही. 'आम्ही इतके लक्ष अजून वाहिलेले नाही, देवाला. बेलपत्र. ते वाहून आम्ही येऊ. ' वाहिले, तुम्ही वाहिले, ह्या जगाचं, ह्या देशाचं, सर्व तुमच्या वडिलांनी वाहिले. हजारो वर्षापासून रूढीगत वहात आले आहेत. काय मिळालं मातवजातीचं त्यात? तुम्हाला काही मिळालं का त्यात ? आता मिळवून घ्या आणि मिळविल्यानंतर हे परिवतर्न स्वत:मध्ये सामावलं पाहिजे. त्याची इज्जत केली पाहिजे. त्यात वाढलं पाहिजे. pल्याण होणार म्हणजे तुमचा वृक्ष होईल. आहे. या पुण्यालाच एका गृहस्थांना आम्ही जागृती दिली. त्यांनी दहा हजार माणसांना नगर जिल्ह्यामध्ये जागृती देऊन पार केलेले आहे. तसेच तुमच्या हातून घडणार आहे आणि तुमच्याकडून महान कार्य होऊ शकतं. आता आपल्यापैकी काही लोकांना प्रश्न असतील तर थोडेबहत विचारा. कारण आमचा इथे पुण्याला खास प्रोग्रॅम, मुद्दाम असा दोनच दिवस आहे. तेव्हा आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा. पण सहजयोगामध्ये नुसतं पार होऊन चालत नाही. पुष्कळशी मंडळी आहेत. आजच एकाने सांगितलं 'आम्ही किराणा दुकानात गेलो, माताजी, तिथे तुमचा फोटो १६ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-16.txt होता. तिकडे त्यांनी दीप वरगैरे लावून ठेवले होते. आम्ही विचारलं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही ७३ साली पार झालो होतो. माताजी इथे आल्या होत्या तेव्हा.' असं कां? मग तेव्हापासून काय केलं तुम्ही? आम्ही म्हणे घरीच पूजा करतो. तसं चालायचं नाही. हे जागतिक कार्य आहे. हे सांघिक कार्य आहे. एकट्याने होणार नाही. सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. व्हायब्रेशन्स त्यांचे गेलेले आहेत आता. व्हायब्रेशन्स येत नाही. काही येत नाही. हे जे व्यक्तिगत आपलं होत पूर्वी, व्यक्तिगत धार्मिक जीवन किंवा व्यक्तिगत परमेश्वराला मिळवणं, त्यानेच नुकसान झालेलं आहे. सगळे लोक विचारतात, ह्या देशात एवढे संत-साधू झाले, एवढे मोठे लोक झाले तरी गरिबी का ? त्याला कारण एकच आहे, की आजपर्यंत जे काही होतं ते व्यक्तिगत होतं. एकएका व्यक्तीने मिळवलं होतं. समाजाने मिळवलेले नव्हते. सगळ्या संघाने मिळविलेले नव्हते. सर्वांनी मिळविलेले नव्हते. बुद्धांनी म्हटलं आहे, 'संघं शरणं गच्छामी.' सबंध संघ जागृत झाला पाहिजे. कलेक्टिव्हिटी यायला पाहिजे. सबंध कलेक्टिव्हिटीमध्ये परमेश्वर जागृत झाला पाहिजे. तरच ह्या जगाचं, ह्या देशाचं सर्व मानवजातीचं कल्याण होणार आहे. जोपर्यंत हे एकाच व्यक्तीपर्यंत असेल, तो आला, त्याला छळा, त्याला मारा आणि तो संपला. आता हे असे नाही. हे जागतिक कार्य आहे. तेव्हा पुष्कळ लोक पार झाल्यानंतरसुद्धा 'माताजी फोटो द्या. आम्ही घरी बसून पूजा करतो. आरती करतो.' तसं चालायचं नाही. त्यानंतर तुम्ही सेंटरवर जायला पाहिजे. स्वत:ची वाढ करून घ्यायला पाहिजे. हा प्रकाश सगळीकडे पसरवला पाहिजे. एवढेच आमचे मागणे आहे. इतका आनंद येतो त्याच्यात. त्याच्यामध्ये किती सार्थक वाटतं! त्या लोकांना विचारा, जे आज इतक्या लांबून तुम्हाला भेटायला आलेले आहेत. आपलं कसं करून घ्यायचं पुढे वगैरे ते सेंटरवर जाऊन तुम्ही बघा. तसंच आमच्याकडे फोटो आहेत आणि पुस्तकं आहेत. पण फोटो, पुस्तकं दिली की घरी बसले. असं करून चालायचं नाही. स्वत:ची पूर्णपणे वाढ करून घ्या. आणि ही वाढ करून घेणं हे तुमचं परम कर्तव्य आहे. त्याशिवाय काहीही होणार नाही. हे समजण्याची गोष्ट आहे, जे आपण एकट्याने मिळवलेले होते, ती वेळ आज नाही. आज सगळ्यांनी मिळून खाण्याची वेळ आहे. आणि म्हणून सगळ्यांनी हे मिळवलं पाहिजे. जितक्या लोकांना मिळेल तितकं उत्तम आहे. बाकी राहतील ते राहतील. त्यानंतरचे मी सांगू शकत नाही. त्यानंतरचा काळ भयंकर आहे. तेव्हा काही असे हॉल भरणार नाहीत. मेडिटेशन होणार नाही. कोणी येऊन तुम्हाला समजवणार नाही. पण फक्त घोड्यावरून नुसत्या चकमकी होतील. ज्यांना जायचं ते जातील, ज्यांना रहायचं ते राहतील. याप्रमाणे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की वेळ थोडा आहे. ह्या वेळेमध्ये आपण वृद्धिंगत झालं पाहिजे. मिळवून घेतलं पाहिजे. १७ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-17.txt यो ा भ ४ ं गे २ नासिक, १७ डिसेंबर १९८५ १८ *३ ३० 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-18.txt आता मी इंग्लिशमध्ये जरी बोलले असले तरी आपल्याला सगळे कळलं असेल. पण तरी सांगायचं म्हणजे असं की आपला सहजयोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की, 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.' तर सहज हा जो योग घडतो, तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमच सहस्रार भेदन, इथपर्यंत आमचं तुमचं देणं - घेणं आहे. आता पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये तुम्ही जर एखादं बी घातलंत, तर तिचं देणं - घेणं एवढेच आहे की, 'बाबा, तुझ्यामध्ये मी अंकुर फोडते.' पण त्यानंतर बघायला नको. तेव्हा जरी हे अगदी सहज असलं, तरी आता आम्ही संत झालो, हे समजणं फार कठीण आहे. आता आम्ही बी घडलो. हे समजणं फारच कठीण गोष्ट आहे. अजून आम्ही तेच आहोत, असं सारखं आपल्याला वाटत असतं किंवा तसं नाही वाटलं, तरी आपली वागणूक तशीच असते. तर ती बदलायला पाहिजे आणि समजलं पाहिजे, की आता आम्ही संत झालोत. संतांची किती लक्षणं सांगितलेली आहेत रामदास स्वामींनी! प्रत्येकाने सांगितलेली आहेत. त्या संतांमधली आपल्यामध्ये कोणती लक्षणं आहेत ती पाहिली पाहिजेत. तिकडे लक्ष दिलं पाहिजे. ती लक्षणं आपल्यामध्ये दृष्टीगोचर का होत नाही? लोक आपल्यामध्ये ते शोधत का नाहीत? ते आपल्यात त्यांना दिसत का नाही? त्याला कारण काय हे पाहिलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण असा विचार केला पाहिजे, की परमेश्वराने आपल्याला अंकुरलं आहे. बरं, झालं. आता पुढे काय? आम्ही काय केलं त्या परमेश्वरासाठी ? आम्हाला सहजयोगामध्ये हे माहिती आहे, की प्रत्येकाला आशीर्वादित करतो परमेश्वर. 'योगक्षेमं वहाम्यहम्' योग मिळाला तुम्हाला, क्षेम घ्याच. ते त्याच्याच बरोबर येतं समजा. बिल्ट इन. त्याला काही करायला नको. क्षेम घ्या. पण क्षेमाबरोबर एक आणखीन यायला पाहिजे, कृतज्ञता. ती येत नाही. कृतज्ञता आली, तर लगेच हा विचार येईल की, 'मला एवढं फुकटात मिळालं, आम्ही काय केलं होतं ? कशाला असं मिळालं? कसं मिळालं? आता मी काय देऊ? जीव का प्राण !' असा विचार यायला पाहिजे. पण ये रे माझ्या मागल्या! 'माताजी, असं झालं. नोकरी तर लागली. पैसे मिळू लागले. पण अजून माझ्या मुलीचं लग्न झालेलं नाही.' बरं , ते झालं . मग 'अमकं राहिलं.' म्हणजे तेच चालू आहे तुमचं. जे मागचं होतं तेच पुढे सुरू आहे. त्याला काही अर्थ आहे का ? आता सहजात तुम्ही आले, ह्याचा अर्थ असा आहे, की तुम्ही पहिल्यांदा संत झाले. आता दुसरा जो शब्द योग आहे, त्याच्याकडे लक्ष जर दिलं योगाला अर्थ दोन आहेत. योग म्हणजे परमेश्वराशी आपला संबंध होणे किंवा जीवा-शिवाचा संबंध होणे . त्यांची सांगड बसणे. ते झालं. पण सांगड नाही बसलेली. नुसते तुमचे संबंध झालेले आहेत. फक्त असं समजायचं आपल्याला. पण योगाचा दुसरा अर्थ असा आहे, की युक्ती, कौशल्य. कुशलता पाहिजे. १९ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-19.txt सहजयोगाची तुम्ही युक्ती शिकलेत का ? त्याची कुशलता शिकले का? नाही. मग त्याला काय अर्थ आहे ? अर्धवटच झालं ते. म्हणजे आपली समजा बाहेर आम्ही पाटी लावली एक, की इथे सांगवी राहतात. तुम्ही पाटी वाचून गेलात, तर भेटले का सांगव्यांना? तसलाच हा प्रकार आहे. एखाद्या युनिव्हर्सिटीत तुम्ही गेले की, 'आम्ही गेलो होतो. युनिव्हर्सिटी पाहून आलो. प्रोफेसरांना भेटलो.' बरं, मग. पुढे काय? 'मग आम्ही झालो की, ग्रॅज्युएट आहोत.' कसं? 'नाही, म्हणजे आम्ही जाऊन आलो होतो म्हणून.' आपल्याकडे इंग्लंडला जाऊन यायचे. काही केलं नाही तिकडे. तसेच आलात परत. आपण म्हणतो नां , 'झक मारून.' तरीसुद्धा त्याला इंग्लंड रिटर्न आपण आम्ही म्हणत असू. तसलाच प्रकार आहे. सहजयोगी आम्ही, सहजयोगी, सहजयोगी, सहजयोगी. बरं कां? मग ह्या बोटाला काय अर्थ आहे? इकडे जळलं म्हणजे काय होतं ? ते माहीत नाही बुवा. आम्ही सहजयोगी आहोत. बिल्ले लावून आम्ही सहजयोगी झालोत. तसं सहजयोगात होत नाही. काहीतरी व्हावं लागतं आणि त्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि त्या करण्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यातला एक त्याग आपण नेहमीच करतो तो म्हणजे बुद्धीचा त्याग. तर तो नको. ते सोडून पुढचं बोलायचं. बुद्धीचा त्याग करून मोकळं व्हायचं आणि नंतर म्हणायचं सहजयोगाने आमची वाट लावली. तर ते एक सोडून बाकी जर त्यागाकडे दृष्टी असली, आम्ही काय सोडलं? जे बेकार होतं ते सोडलं. ज्याला काही अर्थ नव्हता ते सोडलं. असा विचार धरायचा. जसे ते हरे रामाचे लोक आले आणि मला म्हणायला लागले की, 'तुम्ही एवढे श्रीमंतीत असलेले.' ते आता माझ्या नवर्याचं आहे सगळं. मी तरी काय करू? 'तुम्ही एवढे श्रीमंतीत बसलेले. तुम्ही काय एवढा त्याग केलेला आणि तुम्ही कशा झालात देवी?' अहो, म्हटलं, देवी त्याग नसते करत. तीच एक त्याग करत नाही. बाकी सगळ्यांना करावा लागतो. तीच भोगते आहे. 'बरं, कबूल,' म्हटलं, 'तुम्ही काय त्याग केले ते सांगा.' म्हणे, 'आम्ही हे सोडलं, ते सोडलं, हे सोडलं.' म्हटलं, 'असं का! बरं असं करा तुम्ही, माझ्या घरात किंवा माझ्या अंगावर तुम्हाला कोणतेही जर त्या श्रीकृष्णाच्या पायाच्या धुळीबरोबर किंवा त्याच्या कणाबरोबर एखादं काही मिळालं तर घेऊन जा तुम्ही. ते सांगा, पण त्याच्या पायाच्या धुळीच्या कणाबरोबर असायला पाहिजे.' दगड बनले गृहस्थ. तसेच त्यांच्या तोंडावर इतक्या सुरकुत्या होत्या, की मोजून घ्याव्यात. आणि म्हणे आम्ही मोठे कृष्ण भक्त. म्हणजे काय कृष्णाला शोभेल का? कृष्ण भक्त म्हणजे कसे अगदी टवटवीत असायला पाहिजे. हे बसलेत ना सगळे. तर मी म्हटलं , 'अहो , तुम्ही कृष्णभक्त. तुम्ही सांगत का नाही?' दगड बनले. काही दिसेच नां! म्हटलं काय, तुम्ही दगडधोंड्यांचा त्याग केला काय? हे दगडधोंडेच नां! नाहीतर काय ती राख. तिचा त्याग केला? त्याग कशाचा करायचा? जर काही धरलेच नाही, तर त्याग कशाचा करायचा? म्हणजे करायचं काय माणसाने, की काही धरायचं नाही. त्याग करायचा म्हणजे काय ? धरायचं नाही. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, ही माझी नोकरी, हे माझं घर, हे माझं ते , ते माझं हे. हे माझं आणि मी पण सुटलं पाहिजे आणि हे जोपर्यंत सुटणार नाही सहजयोग जमणार नाही. ते सोडता आलं पाहिजे. ते सोडणं आपल्या महाराष्ट्रात जरा कठीण जातं. मुलगा-मुलगी म्हणजे जीव का प्राण! एक डोळा हा, दूसरा डोळा तो. त्यांनी म्हातारपणी लाथा मारल्या की लक्षात कारण २० 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-20.txt येतं, की अरे बाबा, हे काय केलं आपण? सगळे जग तुमचं कुटुंब व्हायला पाहिजे. हे संतांचं लक्षण आहे. 'माझं' पण गेलं पाहिजे. 'मी'पण गेलं पाहिजे. आणि ते जाण्यासाठी आयुष्य आम्ही सहजयोगाला वाहन दिलंय. आता परमेश्वराशिवाय आम्हाला काय करायचंय ? आम्ही परमेश्वराच्या कार्यात रत आहोत. आम्हाला वेळ नाही आता दुसऱ्या गोष्टींसाठी. आमचं हृदय आम्ही परमेश्वराला वाहिलं आहे. आम्हाला कोणत्याही दष्ट भावनांना हृदय नाही राहिलेलं. आमच्या बुद्धीत दूसरं काही सूचत नाही. फक्त सहजयोग आणि त्या परमेश्वराच्या कार्यासाठी कारय करायचंय तेच आमच्या डोक्यात विचार चाललेले आहेत. आमच्या जठराग्नीलासुद्धा दुसरं काही पचत नाही. तुम्ही काही बोलू नका दुसरं, बुवा. आम्हाला चालायचेच नाही. परमेश्वराच्या साम्राज्यात बसल्यावर आम्ही दुसरं काही बोलायला तयार नाही. आमच्याजवळ वेळ नाही त्या गोष्टीला. असे जेव्हा होईल तेव्हाच ते सुटणार आहे. इतर गोष्टी सुटल्याशिवाय सहजयोग जमू शकत नाही. त्याबाबतीत जरा कच्चे आहोत आपण. त्यामुळे सहजयोगी तयार म्हणायला फार कमी आहेत. त्याच्यामुळे एका माणसावर सगळे पडतं आणि बाकीची मंडळी नुसती ढम्म् बसून राहतात. नसली तरी थोडंबहुत.... हळूहळू हळूहळू ते वाढत जातं. पण त्याला काय आहे, की वाढीला इतकी इंचाइंचाने प्रगती होत आहे. की त्याने सहजयोग कसा फोफावेल? हे समजत नाही. कारण इथे काही तरी व्हावं लागतं. काही प्लॅस्टिकचं बनवता येत नाही. की चला, एका मशिनमध्ये घातलंय माताजींनी सगळ्यांना. आता तयार करून ठेवलेत इकडे पुतळे. ते मेलेलं काम आहे. जिवंत कार्य करायचं म्हणजे त्याला वेळ लागतो. हे मलाही माहिती आहे. पण जरा जास्तच वेळ लागला असं व्हायला नको. वाटतं की आता काय करावं ? कसं करावं? नाशिकमध्ये जरा जास्तच वेळ लागतो आहे आणि इथे भागीरथी धावते आहे. रामाने आणि सीतेने इकडे अनवाणी चालून पवित्र केलेले आहे. ही तपोभूमी आहे. सगळं ह्यांना मी सांगते वर्णन करून. त्यात आदिशक्ती गडावरती बसलेल्या आहेत. सगळं असून, इथं सगळ्यात गाडं जे आहे, हळू चालते आहे . म्हणजे ज्या रथाला शंभर घोडे लावले, त्याच्यापेक्षा ते दोन घोडे लावलेलं खर्चर चांगलं चालतंय हे बघून आश्चर्य वाटतं नाही कां? की ते जे गाडं आहे, ते बरं चाललेलं आहे दोन घोड्यांचं आणि शंभर घोड्यांचं काय झालं, काहीच समजत नाही. आणि केवढी मेहनत घातली तुमच्या पूर्वजांनी इथे - संतांनी किती साधु- येऊन इथे मेहनत केलेली आहे. ह्या तपोभूमीमध्ये. त्याचा विचार करा! आणि तुम्ही इथे जन्म कशाला घेतला मग? असाही विचार करावा की आमचा ह्या नाशिकला जन्म झाला, एवढ्या पवित्र भूमीत, तर आम्ही काय करायचं? नसत्या गोष्टींकडे लक्ष नसलं पाहिजे. नको ते पाहिजे, ह्या प्रवृत्त्या सोडून जे हवं तिकडे लक्ष दिलं, समाधानात राहून, आम्ही आता परमेश्वराच्या कार्याला लागलो आहे. हे आयुष्य आमचं परमेश्वरासाठी आहे. हा जो काही आमच्या प्राणाचा दिवा लावलेला आहे, तो परमेश्वराच्याच प्रकाशाला पसरवेल. अशा उमेदीने तुम्ही जर आलात, तर आनंदाच्या सागरात पोहाल. सगळं काही तुमचं बघण्यात येईल. परमेश्वर सबंध क्षेम देईल. त्याच्यावर अत्यंत समाधानात आणि पूर्ण काही झालं, संपूर्ण आपण आटपून घेतलं, आता पूर्ण झालात, असं तुम्हाला वाटेल. परमेश्वर तुम्हा सर्वांना सुबुद्धी देवो ! २१ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-21.txt तीन शक्त्या दादर, २३ जानेवारी १९७५ ते ही अत्यंत दुःखी लोक आहेत. रडत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अन्न पचत नाही त्यांना. काय फायदा! जिथे खायला नाही ते रडतात, ज्यांना खायला आहे ते ही रडतात. आत्महत्या करतात. जे आजारी आहे ते रडतात, जे आजारी नाही ते ही रडतात. काय सुरू आहे? सगळा वेडेपणा आहे. मागायचं तर ते मागा जे अस्सल आहे. आम्ही अस्सल द्यायला आलो आहोत. तुम्ही काय नकली गोष्टी मागता आमच्याकडे! तब्येत बरी करून द्या. अमकं ठीक करून द्या. तमकं करून द्या. अरे, होईल ते. त्याचं काय! अस्सल माल घ्या आधी. त्याचे मूल्य नाही. अरे संसारात सगळ्यात महत्त्वपूर्ण तेच आहे. ते मिळाल्याशिवाय आनंदच मिळणार नाही. काहीही बाकी सगळे व्यर्थच ठरतं. आता परिसासारखे जे आहे ते मागा. असे मागणारे असले, तर देणारे आम्ही आहोत इकडे बसलेले, पण आहेत कुठे मागणारे? आईला मागितलं तर विशेषच मागायला पाहिजे. असलं कसलं काय मागायचं! भाडोत्री! सगळी कमाई देऊन टाकू तुम्हाला. मागा तर खरी. सगळी पुण्याई तुमच्यासाठी लावून टाकू पणाला. उभे तर रहा! तुमच्या चरणावर येऊन पडलो तरी तुमच्या लक्षात येणार नाही. ही केवढी तळमळ आतून आहे ! समजलं पाहिजे. कळेल का ? ध्यानात जायचे आहे प्रेमाने. सगळे प्रेमाचे खेळ आहेत. अगदी शांतपणे डोळे मिटायचे. काही करायचं नाही. स्वत:चं, जे तुमच्यातलं आहे, ते अगदी वर आहे. २२ 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-22.txt भ ८ िम आधी कळस मग पाया या्रमाणे आधी तुमच्या आत्म्याची बांधणी सुर० होते आणि त्या बांधणीमुळे तुम्हाला स्वत:लाच त्या प्रकाशामध्ये दिशतं की आमचं काय चुकलेलं आहे! आम्ही कुठे चुकली? आणि त्या प्रकाशामध्ये तुम्ही जाणती, की तुम्हाली काय ठीक केलं पाहिजे? काय तुमचं चुकलेलं असेल ते कसं बरोबर करन ध्यायचं ? मी काही तुम्हाला संगत नाही. प.पू.श्रीमातीजी, औरंगाबाढ, ८/१२/१९८८ प्रकाशक । निर्मल ट्रांसफॉर्मेशन प्रा. लि. प्लॉट नं. १०, भाग्यचिंतामणी हौसिंग सोसायटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११ ०३८. फोन : ०२०-६५२२६०३१, ६५२२६०३२, e-mail : sale@nitl.co.in, website : www.nitl.co.in 2016_Chaitanya_Lehari_M_V.pdf-page-23.txt ा ध२ हे मंदिर२२े आहे. जिथे तुम्हाली सगळया पवित्र गोष्टी, जसे पावित्रय, निरागसती मुलांना द्यीयच्या आहेत, ज्याची उपयोग त्यांनी पूढील आयुष्यासाठीही होईल. प.पू.श्रीमाताजी, लंडन, ११.६.१९७९ 3. क क